आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह!
शब्दार्थ
भंडारी
पु. १ शूद्रांतील एक वर्ग व त्यांतील व्यक्ति. हे ताड- माडापासून दारू काढतात. २ (नाविक.) जहाजावरील जेवण तयार करणारा इसम; खलाशी. भंडारडा-ड्या-पु. (तुच्छतेनें) भंडारी. भंडारथल, भंडारव(वा)डा-नपु. भंडारी लोकांची राहण्याची जागा, मोहल्ला. 'माड व भडारथल देखील.' -वाड- बाबा १.३. भंडारमाड-पु. फळें येऊं न दारू, माडी काढण्यासाठीं राखून ठेविलेला माड. याच्या उलट नारळमाड (फळासाठीं ठेव- लेलें नारळाचें झाड). [भंडारी + माड]
भंडारी bhaṇḍārī m The keeper of a भंडार, a treasurer.
भंडारी m A treasurer. A class of Shudras. A bag (as used by the devotees of खंडोबा) for turmeric powder.
भंडारी bhaṇḍārī f A recess in a wall (generally provided with shutters and boards) for a cupboard; an inner blind window. 2 A bag (as used by the devotees of खंडोबा) for turmeric-powder.
भंडारी bhaṇḍārī m A class of Shúdras or an individual of it. They extract spirituous liquors from the Cocoanut-tree &c.
पु० जातिविशेष, पिण्याची दारू करणारा.
पु. एक महाराष्ट्रांतील दर्यावर्दी लोकांची जात. हे आपणांस क्षत्रिय मानतान. [भांडें = गलबत]
संबंधित शब्द
मिराशी
वि. १ मिरासदार; वतनदार. २ भंडारी. 'मिराशी म्हणजे भंडारी म्हणून त्यास भंडारवाडा असें म्हणतात' -गोराघ ११३.
बाया
स्त्री. (कों.) बाई; बहीण. बहिणीस बाया, बायो म्हणून हांक मारतात. बायक्या; असाहि शब्द आहे. श्रीमती आनंदीबाई कर्वे यांस बाया असें नांव रूढ आहे. 'बाया लेंक मागें आली । तिला साकशी रहाहो ।' -भंडारी लग्नांतील गाणें. -मसाप ५.१५९.
भंडारडा or ड्या
भंडारडा or ड्या bhaṇḍāraḍā or ḍyā m A contemptuous form of the word भंडारी.
भंडारमाड
भंडारमाड bhaṇḍāramāḍa m (भंडारी & माड) A Cocoanut-tree which is reserved to yield spirit, and is not suffered to bear fruit: as disting. from नारळमाड A Cocoanut-tree kept for fruit.
भंडारवडा
भंडारवडा bhaṇḍāravaḍā or -वाडा m (भंडारी & वाडा) The ward inhabited by the Bhanḍárí caste.
भोंडगा
भोंडगा bhōṇḍagā m C भोंड्या m C Contemptuous forms of the word भंडारी.
भोंडगा, भोंड्या
पु. (कों.) (तिरस्कारार्थीं) भंडारी.
दालदी
पु. (कों.) कोळी, दर्यावर्दी, नावाडी अशी जात. हे बहुधा मुसलमान असतात. 'देवगड येथील दालदी व गाबीत कसबी भंडारी आहेत.' -समारो २.१९६. -वि. दालदासंबंधीं; मासे धरण्याच्या उपयोगाची (होडी, मचवा इ॰). [दालद] म्ह॰ भट्टास तारवें दालद्यास गोरवें = भलत्याच माणसानें भलताच धंदा करणें मूर्खपणा होय.
दुदगें
न. (गो.) भंडारी लोक मदवरून सुर (ताडी) काढण्यासाठीं वापरतात तें पांढर्या भोंपळ्याचें केलेलें भांडें. [सं. दुग्ध; गो. दुद.]
घडी
स्त्री. १. लहान घागर; लोटी. २. भंडारी लोक दारू काढण्यासाठी माडावर जे मडके लावतात ते. पहा : घडा
घडी
स्त्री. १ लहान घागर. -शर. २ भंडारी लोक दारू काढण्यासाठीं माडावर जें मडकें लावतात तें. घडा पहा.
काती
काती f The cleaver or bill of a भंडारी.
काती kātī f The cleaver or bill of a भंडारी
कुबेर
पु.१ देवांचा भंडारी; यावरून. २ (ल.) श्रीमंत माणूस. 'कुबेराचें धन मार्कंडेयाचें आयुष्य (असावें) = सुखस्वास्थ्य असणें. [सं.]
खूद
खूद khūda m The narrow-necked earthen vessel in which the भंडारी people keep their ताडी.
म्हाळका
पु. मागणी घालणारा. 'सीतेचे म्हाळके बसूं घाला डाळीचे । पुसती कुळीये जनकाची.' -भंडारी गाणीं. -मसाप ५.१५४.
पोय
स्त्री. १ पोफळीच्या पानाच्या देंठाजवळचा पसरट भाग (याचा द्रोण करतात). विरी; पवली; पोगी. नारळाचा कोंब; माडाचें बोंड; नारळीच्या फुलावरचें आच्छादन. २ (कु) नारळीच्या पेंडीचा जाड पापुद्रा. 'पोयींतून माडी काडतात.' ॰कर-वि. (कों.) प्रथमतः ज्यास पोय आली असा (माड). ॰कापो-पू. (कों.) माडी काढणारा भंडारी. [पोय + कापणें]
रेंद
न. (राजा. कु.) १ ताडीमाडीचा मक्ता. २ दारूचा गुत्ता. ३ दारू गाळण्याची भट्टी; रेंदसरा. रेंदकरी-पु. मक्तेदार; दारू, ताडी विकणारे लोक. रेंद(दे)सरा-पु. दारू गाळ- ण्याची भट्टी. रेंदा-पु १ दारू गाळण्यासाठीं आंबविलेला, कुजत घातलेला पदार्थ. २ पितळ करण्याकरतां मिसळण्याचा पदार्थ. ३ सोन्यांत घालावयाचें हीण. रेंदे-न. अबकारीकर; दारू गाळणी वरील सरकारी कर. 'रेदे व गादीयादेखील' -वाडबाबा ३.४. रेंदेकरी-पु. दारू मक्तेदार. रेंदेर-पु. (गो.) भंडारी; माडी, ताडी, इ॰ काढणारी जात.
ठोकणी
स्त्री. १ आघात; ठोका; टोला. २ गिलावा ठोकण्याची गवंड्याची तीन धारांची लाकडी खुंटी व तिनें ठोकण्याचा व्यापार; चोपणी. (बे.) कोडता. [ठोकणें] ३ (कों.) भंडारी जातीमध्यें लग्नांत करवलीशिवाय तिच्या दुसर्या मैत्रीणी असतात त्यांचे पाय धुण्याची क्रिया. -मसाप ४.४.२५५.
ठोकणी
स्त्री. भंडारी जातीतील लग्नात करवलीशिवाय नवरीच्या इतर मैत्रिणींचे पाय धुण्याचा विधी. (को.)