मराठी बृहद्कोश

आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

भग

भग bhaga n Vulgar for भक्ष or भक Food &c.

मोल्सवर्थ शब्दकोश

भग bhaga m (S) An ulcer or a sore; yet esp. applied to a venereal ulcer. 2 Pudendum muliebre.

मोल्सवर्थ शब्दकोश

भग m An ulcer.

वझे शब्दकोश

न पु. १ क्षत; व्रण (मुख्यत्वें उपदंशापासून झालेला). २ योनि; स्त्रियांचें उपस्थ. 'भगद्वारा चालवीं संसारू ।' -एभा ८.२५८. [सं.] ॰दड-दाड-दळ-न. मोठें भोंक; खिंड; जमिनींत पडलेला खड्डा. २ जखम; व्रण. ॰देव-वि. (ल.) बाहेर- ख्यालीं (माणूस). ॰पाळ-वि. विषयासक्त. 'चेल्यांचा सुकाळ । पिंडदंड भगपाळ ।' -तुगा २८२९. ॰भाग्य-न. स्त्रियेनें आपल्या स्वतःच्या आणि पुरुषानें आपल्या बायकोच्या, मुलीच्या इ॰ देहविक्रयानें मिळविलेली संपत्ति, श्रेष्ठता. [सं.] ॰भोग-पु. योनिसुख. ॰वृत्ति-स्त्री. वेश्यावृत्ति; भगजीविका. [सं.] ॰भगल- पु. (ना.) गोट्या खेळण्यासाठीं जमीनींत केलेला खळगा. ॰ले पण-न. रतिविलास; इष्क. भगळ-ळी-स्त्री. चीर;भेग; भगदळ (विशेषतः जमीनींतील, इमारतींतील). ॰भगळ-भगाड-स- स्त्रीन. १ मोठें, ओबडधोबड भोंक; खिंडार (भिंत, ताल, बंधारा यांतील). २ रुंद तोंडाची जखम, क्षत.

दाते शब्दकोश

पु. न. (अशिष्ट) भक; भक्ष. [सं. भक्ष]

दाते शब्दकोश

न. ऐश्वर्य; नशीब [सं.]

दाते शब्दकोश

(सं) न० भेग, चीर. २ स्त्रियांचें उपस्थ, ३ ऐश्वर्य.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

भग(ग्ग)ल

स्त्री. (राजा. कु.) उपहास; थट्टा; फजिती. (क्रि॰ करणें; मांडणें; उडवणें). 'विठू परशरामाचे छंद असेग बेबहारी । भगलीच्या उडाल्या भगल भणभण सारी ।' -पला ८०. [हिं. भागना = भागील = पाळलेला] ॰उडणें-अक्रि. (व.) फजीती उडणें. ॰उडविणें-सक्रि. (ना.) थट्टा करणें; फजीती करणें; रेवडी उडविणें. भगली-वि. (गो.) थट्टेखोर. भगेल-स्त्री. उपहास; विटंबना इ॰.

दाते शब्दकोश

संबंधित शब्द

भगवान्

पु. १ षड्गुणैश्वर्य संपन्न परमेश्वर; देव. 'अभा ग्याचा साथी भगवान.' २ षड्गुणैश्वर्यसंपन्न. या शब्दाच्या दोन व्याख्या आहेत त्या येणें प्रमाणें:- १ 'उत्पत्तिं प्रलयं चैव भूताना मागतिं गतिम् । वेत्ति विद्यामविद्यांच स वाच्यो भगवानिति ।' २ 'ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशसः श्रियः । ज्ञानवैराग्ययोश्चैव षण्णां भग इतीरितः । सकल ऐश्वर्य, धर्म अथवा वीर्य, कीर्ति, द्रव्य, ज्ञान, वैराग्य हीं सहा भगें (ऐश्वर्यें) ज्यास आहेत तो भगवान् होय. [सं. भग + वत्]

दाते शब्दकोश

भगवत्

वि. १ संस्कृत भगवान् याचे नपुंसकलिंगी रूप. २ भगवान् (ईश्वर) या शब्दाचें समासांत होणारें रूप. उदा॰ भगव- त्कृपा = ईश्वरी कृपा, भगवदिच्छा; भागवत्-सेवा; भगवद्रूप; भग- वन्माया, भगवद्भक्ति, भगवद्भजन, भगवत्प्राप्ति इ॰ [सं. भग = ऐश्वर्य + मत्(वत्)] भगवंत-पु. १ परमेश्वर; देव; षड्गुणैश्वर्य- संपन्न ईश्वर. 'यश श्री वैराग्य ज्ञान । ऐश्वर्य औदार्य हे षड् गुण । नित्य वसती परिपूर्ण । तो मी नारायण भगवंत ।' -एभा १५.९७. २ (काव्य) अलौकिक सामर्थ्यवान् ऋषि, साधु इ॰ भगवंतपण- न. ईश्वरत्व (पालन करण्याचा स्वभाव). 'अंगींचें भगवंतपण । आठवीं बापा ।' -ज्ञा ११.४४३. भगवती-स्त्री. १ पार्वती; देवी. २ (ल.) भगवती आई (तांबड्या मिरच्यांची पूड). ३ मृदुंगावर वाजविण्याचा एक ठेका. याचे बोल:-त्ता धिगधी, त्ता धिग धिंत्ता. [सं.]

दाते शब्दकोश

भगवत् bhagavat This is, in Sanskrit, the neuter termination of the adjective भगवान्, or the form in composition of भगवान् (the common name of God); as भगवत्कृपा Divine favor, भगवत्सत्ता Divine power, भगवदिच्छा The divine will, भगवत्सेवा, भगवद्रूप, भग- वन्माया, भगवद्भक्ति or भगवद्भजन, भगवत्प्राप्ति, भगवद्दास.

मोल्सवर्थ शब्दकोश

आदित्य      

पु.       १. सूर्य; रवि : ‘वीरांच्या अभिमाना झाला अस्त । माध्यान्हीं आला आदित्य ।’ − एरुस्व ७·६४. २. बारा आदित्य (देवता). धातू, मित्र, अर्यमन्, रुद्र, वरुण, सूर्य, भग, विवस्वत, पवन, सवित्, त्वष्ट्‌ट व विष्णू ही बारा महिन्यांतील सूर्याची बारा रूपे आहेत. ३. अदिति पुत्र; (सामान्यतः देवता किंवा देव.) ४. सूर्यफूल : ‘आदित्याचीं झाडें । सदा सन्मुख सूर्याकडे ।’ − ज्ञा १८·८६५. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आदित्य

पु. १ सूर्य; रवि. 'वीरांच्या अभिमाना झाला अस्त । माध्यान्हीं आला आदित्य ।' -एरुस्व ८.६४. २ बारा आदित्य (देवता)-धातु, मित्र, अर्यमन्, रुद्र, वरुण, सूर्य, भग, विवस्वत्, पूषन्, सवितु/?/, त्वष्टु/?/, व विष्णु हीं बारा महिन्यांतील सूर्याचीं बारा रूपें आहेत. ३ अदितिपुत्र; (सामा.) देवता किंवा देव. ४ सूर्यकमळ. 'आदित्याचीं झाडें । सदा सन्मुख सूर्याकडे ।' -ज्ञा १८.८६५. [सं.] ॰वार-पु. रविवार. -त्याची छत्री-स्त्री. अळंबें; एक वनस्पति. -त्याची तुळस-स्त्री. एक तुळशीसारखी वनस्पति.

दाते शब्दकोश

अविस्वासणें

अक्रि. अविश्वास ठेवणें; विश्वास नसणें. 'भग- वद्वचनीं अविस्वासे । ऐसा कोण पतित असे ।' -दा १.१.२१. [सं. अ + विश्वस्]

दाते शब्दकोश

भाग

भाग bhāga m (S) A share, portion, part. 2 In arithmetic. Quotient. 3 Division, dividing, parting. v दे. 4 Tenor, purport, sum, substance, gist (i.e. quotient) of a speech or a mind. 5 A fraction. भाग होणें or भागास येणें or पडणें To become the parl or duty of. Ex. त्यानें शिवी दिल्ही तेव्हां त्याचे तोंडांत मारणें हें भागास आलें; सांगतां तेंच ऐकते म्हणून गोष्ट येती ह्याचे भागां.

मोल्सवर्थ शब्दकोश

भेगेंद्र

पु. इंद्र. [सं. भग + इंद्र]

दाते शब्दकोश

भगास

न. भगदळ; खिंडार, मोठा व्रण. -वि. ओसाड; निर्जन; वसति नसलेलें. [भग]

दाते शब्दकोश

भगदड, भगदाड, भगदळ

भगदड, भगदाड, भगदळ bhagadaḍa, bhagadāḍa, bhagadaḷa n (Intens. of भग) A large uneven hole or opening; as a breach in a wall, dam &c., a gap in a fence, a sunken place on the ground, a wound, an ulcer-eaten spot &c.

मोल्सवर्थ शब्दकोश

भगळ

भगळ bhagaḷa f भगाड n भगास n (Intens. of भग) A large, unshapely, or uneven hole or opening; as a breach in a wall, mound, mole &c., a gap in a fence, a hollow or chasm in the ground, a widegaping wound or sore.

मोल्सवर्थ शब्दकोश

भकाट

न. उपासामुळें खोल गेलेला शरीराचा, पोटाचा भाग; (पोटाची) खळगी. (क्रि॰ बसणें; पडणें; पाडणें). 'गाईला कोण्ही वैरण घातली नाहीं म्हणून तिची भकाटें बसलीं.' [सं. भग = भोंक] भकाटें भरणें-क्रि. पोट भरणें. भकाटी, भका- (क)ळी-स्त्री. १ (फार दिवसांच्या उपवासानें) पोट आंत, खालीं जाण्याची अवस्था. 'पोट भकाटीस, भकाळीस गेलें.' 'पोटाला भकाळी पडली किंवा पोटाची भकाळी झाली.' २ बाखल किंवा बाजू खोल गेल्यानें झालेला खळगा, उपासानें पडलेली पोटाची खळगी (क्रि॰ बसणें; पडणें; पाडणें). ३ कुशी. 'मेहनतीनें भकाट्या जशा उडतात तशा ह्या उडत नाहींत.' -अश्वप १.२२३. (पोट)भकाटीस जाणें-क्रि. पोटांत अन्न नसल्यामुळें त्यास खळी पडणें; पोट खोल जाणें.

दाते शब्दकोश

भकाट bhakāṭa n (भग Hole.) The hollow of a side of the body, esp. as formed by the sinking in of the parts from fasting. v बस, पड, पाड. Ex. गाईला कोण्ही वैरण घातली नाहीं म्हणून तिचीं भकाटें बसलीं. भकाटें भरणें To fill out the belly or flanks.

मोल्सवर्थ शब्दकोश

भंगसाळ

स्त्री. १ मोठा पण भयाण वाडा. २ (कों.) देव- ळाचा गाभारा व सभामंडप यांमधील प्रदेश. ३ भगदाड; भग- दळ; रुंद भेग. ४ कुडाळदेशकर ब्राह्मण राजवटींत बांधलेला कुडाळच्या नदीवरील संध्येचा घांट. ५ (गो.) शिल्पकामाच्या उपयोगी, लांकडाचा कारखाना.

दाते शब्दकोश

चेला

पु. शिष्य; छात्र. 'चेल्यांचा सुकाळ । पिंडदंड भग- पाळ ।' -तुगा २८१९. 'मी विधात्याचा चेला बनणार.' -नाकु ३.२७. [सं. चेट; हिं. चेला = शिष्य, शागीर्द]

दाते शब्दकोश

चूत

(सं) स्त्री० पुच्ची, भग, स्त्रीचें जननेंद्रिय, योनि.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

दादरा

पु. १ भांड्यांतील पदार्थ झांकलेला रहावा म्हणून भांड्याच्या तोंडास पान, वस्त्र इ॰ कांचें बांधतात तें आच्छादन. २ धूर बाहेर जावा, किंवा घरांत उजेड यावा म्हणून घराच्या छपरास ठेवावयाचें छिद्र, गवाक्ष; धाब्यांतील झरोका. ३ (राजा). (ल.) अतिशय थंडीमुळें कानांस बसणारा दडा; कान बंद होणें; कानठळी. (क्रि॰ बसणें). ४ जिना बंद करण्यासाठीं जिन्यावर आडवें पाडावयाचें दार, झडप; दादर. ५ खिडकी; भोंक; भग- दाड ६ (व.) जिना; दादर पहा. [दादर]

दाते शब्दकोश

दरा

पुस्त्री. १ खोरें; दरी; टेकड्यांमधील सखल भाग; कुहर; घोल. २ (ल.) पोट. [सं] म्ह॰ ज्या गांवीं भरे दरा तोच गांव बरा. ॰खोरा-पु. दरेंखोरें; खांचर; खळगा; ओघळ; भग- दाड. [दरा + खोरा] दरींखोरीं, दर्‍याखोर्‍यांत पडणें-उत- रणें-जाणें-घालणें-पाडणें-(ल.) दरिद्री होणें; नुकसानींत येणें; अब्रू जाणें; दारिद्रांत टाकणें; गुरफटणें.

दाते शब्दकोश

गुह्य

न. १ जननेंद्रिय; उपस्थ; शिश्न; योनी; भग. २ गुप्त गोष्ट, वर्तमान. -वि. १ खाजगी; एकांताची; आडवळणाची (जागा). २ गुप्त; गूढ; प्रच्छन्न (कृत्य, कारभार, गोष्ट). [सं. गुह् = लपविणें]

दाते शब्दकोश

गुह्य      

न.       १. गुप्त गोष्ट, वर्तमान; गूढ तत्त्व. २. जननेंद्रिय; उपस्थ; योनी; शिश्न; भग.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कुस

(स्त्री.) हिंदी अर्थ : भग, योनी. मराठी अर्थ : कूस.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

प्रत्यक्

वि. १ पुढचा; पुढला; नंतरचा; पश्चात्कालीन. २ पश्चिमदिशेकडील. ३ (स्थल, काल, जीव, पदार्थ, भाग इ॰ त) सर्वत्र व्यापून राहणारा; सर्वव्यापी (आत्मा, शिव, जीव यांस जोडून). ४ साक्षात्; प्रत्यक्ष. 'नामया शरण भगवंतासी । भग- वंत तरी प्रत्यक् त्यासी ।' एकनाथ आनंदलहरी ११९. [सं.] ॰ज्योति-स्त्री. आत्मप्रकाश. 'प्रत्यक्ज्योतीची वोवाळणी । करिसी मनपवनाचीं खेळणीं ।' -ज्ञा १२.६. ॰दर्शन-दृष्टी-नस्त्री. मागें पहाणें; पुढें पाहणें; पश्चिमेकडे पाहणें. ॰प्रतीति-स्त्री. आत्म- ज्ञान. ॰बुद्धि-स्त्री. अंतर्मुख झालेली बुद्धि; मी अंतर्यामीं (आत्मा) आहें अशी बुद्धि. 'मग देहाहंतेचें दळें । सांडूनि एकेचि वेळे । प्रत्यक्बुद्धि करतळे । हातवसावे ।' -ज्ञा १५.२५८. ॰बोध-पु. आत्मज्ञान; प्रत्यगात्मा व ब्रह्म एकच आहेत असें ज्ञान. 'जे प्रत्य- ग्बोधाचया माथया । सोहंतेचां मध्यान्हीं आलयां ।' -माज्ञा १६. १०. ॰मुखपण-न. अंतर्मुखवृत्ति. 'येथ प्रवृत्ति वोहटे जिणें । अप्रवृत्तिसी वाधावणें । आतां प्रत्यङ्मुखपणें । प्रचारु दिसे ।' -अमृ ९.२८ प्रत्यगात्मा-पु. १ देहांत व्यापून राहिलेलें ब्रह्म. २ त्वंपदाचें लक्ष्य. ३ कूटस्थ. [प्रत्यकं/?/ + आत्मा] प्रत्यगावृत्ति प्रत्यक्वृत्ति-स्त्री. आत्माकारवृत्ति; अंतर्वृत्ति; अंतर्मुखता; सोहं अशी स्वस्वरूपाकार वृत्ति. 'मग प्रत्यगावृत्तीचीं चोखटें । लाविलीं गंगेचेनि तटें ।' -ज्ञा १८.१०१७. [प्रत्यक् + आवृत्ति, वृत्ति]

दाते शब्दकोश

सुभग

वि. १ दैववान; नशीबवान. २ सुंदर. [सं. सु + भग = दैव] सुभगा-स्त्री. भाग्यशाली स्त्री.

दाते शब्दकोश

उच्छिष्ट

वि. १ अवशेष राहिलेले; उरलेले (पदार्थ); उष्टें. 'पडिलिये ठायीं उच्छिष्ट सेवावें.' -तुगा ६३२. २ (ल.) उप- भुक्त; वापरलेलें (वस्त्र,पुष्प,स्त्री,इ॰). ३ उष्टें; शिळें; नवीन नस- णारें; उसनें घेतलेलें. -न. उष्टीं पात्रें; उष्टे; उच्छिष्टान्न. 'उच्छिष्टें काढी धर्माघरीं । ब्राह्मणाची भीड थोरी ।' -एरुस्व २. २६. [सं. उत् + शिष्ट] ॰कल्पना-स्त्री. दुसर्‍यानें अगोदर व्यक्त केलेली कल्पना; शिळा, नावीन्य नसलेला विचार. ॰चांडाळी-स्त्री. एक क्षुद्र देवता. हिला प्रसन्न करण्याकरितां दोन जेवणांच्या मधील कालांत भाकरीचा तुकडा दाढेंत ठेवण्याचा एक विधि. 'कर्णपिशाच भग- लिनी । उच्छिष्टचांडाळी रानसटवी जखणी । वेताळ मुंज्या काळर- जनी । भजिजें जनीं अतिप्रीती ।' -ह १३.६८. ॰भाषण- श्लोक-वाक्य-न. पु. पूर्वीं दुसर्‍यानें म्हटलेलें कवन अगर भाषण; वाङ्मयचौर्य.

दाते शब्दकोश

उळंबणें

उक्रि. अवलंबणे; आश्रय करणें; प्राप्त होणें. 'भग- वंताचिये भक्ति । स्वर्गसुखातें उळंबिति ।।' -रास १.६३२. [सं. अवलंब्]

दाते शब्दकोश

आत्म

वि. १ आत्म्यासंबंधींचें. २ स्वतःचें; आपलें. [सं.] ॰कार्य-न. आपलें काम; स्वतःचें काम. -क्रिवि. खासगी कामा- करितां; आपल्या कामासाठीं (व्यापारी लोकांच्या पत्रव्यवहारांत हा शब्द येतो). हें अप. रूप आहे. ॰ख्याति-ख्याति पहा. ॰गत-वि. स्वगत; आपल्याशीं (नाटकांत खाद्या पात्रानें केलेलें भाषण). ॰गति-स्त्री. १ आत्म्याची अखेरची अवस्था. २ आपली अखेर. 'प्रिये आत्मगति यांची दिसताहे ।' -सप्र १३.१४. ॰ग्रह-पु. १ आत्मज्ञान. २ स्वीकार करणें; स्वतःचें मानणें; आपला म्हणणें; कैवार घेणें. ॰घात-पु. १ आत्महत्त्या; स्वतःचा घात, नुकसान (धर्मशास्त्रविहित प्राणत्यागास हा शब्द लावीत नाहींत). 'तंव तो विशिष्ट गुरूनाथ । म्हणे सहसा न करावा आत्मघात ।' ॰घातक-की, घाती-वि. १ स्वतःचा घात करणारा. २ (ल.) स्वतःचें नुकसान करणारा; स्वतःच्या पायांवर धोंडा पाडून घेणारा. ॰घ्न-वि. १ आत्महत्त्या करणारा. २ आत्मघातकी. ॰चर्चा-वि. आत्म्यासंबंधीं वादविवाद; ब्रह्मविचार; आत्मानात्म- विचार. [सं.] ॰च्छाया-स्त्री. स्वतःची सावली. 'कां कवळि- लिया न धरे । आत्मच्छाया ।।' -ज्ञा १८.५३०. [सं.] ॰ज-पु. स्वतःपासून जन्मलेला; पुत्र; मुलगा. 'पैल इतरु हा आत्मजु । हें उरेल के ।' -ज्ञा ५.९३. ॰जा-स्त्री. स्वतःची मुलगी. 'अगा आत्मजेच्या विषी ।' -ज्ञा १२.१३२. ॰जिज्ञासु-वि. आत्मज्ञानाची इच्छा करणारा. 'ऐसे आत्मजिज्ञासु जे होते ।' -ज्ञा १६.५२. ॰तत्त्व- न. ब्रह्मज्ञान; आत्मज्ञान. 'येर आत्मतत्त्व उदासीन' -ज्ञा १८.३०६. ॰तोख, तोष-पु. आत्मानंद; स्वसंतोष. ॰त्याग-पु. स्वार्थ- त्याग. 'हा आत्मत्याग व लोकाश्रय सरकारचे गुप्त हेतु पर्यायानें सिद्धीस नेण्यास जर उपयोगी पडला...' -टि ३.१८२. ॰त्व-न. आत्मस्वरूप. 'न लगती तपें व्रतें अनुष्ठान । आत्मत्वाची खूण वेगळीच' -ब. १७९. ॰धन-न. १ स्वतःची संपत्ति. २ स्वतःचा आत्मा; स्वतः ३ (ल.) स्वतःचा पुत्र. ॰निंदा-स्त्री. स्वतःची निंदा; स्वतःस दोष देणें; स्वतःवर दोषारोप करणें (पश्चात्तापाच्या वेळीं). ॰निवेदन-न. आत्मसमर्पण; परमेश्वराच्या ठिकाणीं स्वतःस वाहून घेणें; नवविधाभक्तींतील शेवटचा-नवव्या भक्तीचा प्रकार, म्हणजे जीवशिवैक्य. 'आत्मनिवेदनाचें लक्षण । आधीं पाहावें मी कोण । मग परमात्मा निर्गुण । तो वोळखावा ।' -दा ८.८.१३. २ स्वतःची कथा, खुलासा; आत्मचरित्र. ॰निश्वास-पु. वेद (यस्य निःश्वसितं वेदाः = वेद ज्याचे (परमेश्वराचे) निःश्वास आहेत या वाक्यावरून). ॰निष्ठ-वि. १ आत्मस्वरूपीं तल्लीन असलेला; आत्मानंदीं, ब्रह्मानंदीं निमग्न असलेला. २ मनोभवाचा; कळकळीचा; उत्सुक. ॰निष्ठा-स्त्री. १ आत्म्याच्या ठिकाणीं निष्ठा. २ स्वतःवर विश्वास; आत्मविश्वास. ॰परिचय-पु. आत्म्याविषयींचें किंवा स्वतःविषयींचें ज्ञान-ओळख. ॰पोटी-वि. अप्पलपोट्या; स्वार्थी. 'तव भीम म्हणे श्रीकृष्णासी । तूं बरवा आत्मपोटी कळलासी । मी अतिथी उभा असता द्वारासी । भोजन सावकाश करिसी तूं ।' -जै १०.२. ॰प्रची(ती)ति-स्त्री. १ आत्मज्ञान; स्वप्रतीति, गुरुप्रतीति, आत्मप्रतीति या तीन प्रतीतींपैकीं एक. २ स्वतःच्या अनुभवावरून मिळविलेलें ज्ञान-बोध; आत्मानुभव. 'नाना ग्रंथांच्या समती । उपनिषदें वेदांत श्रुती । आणि मुख्य आत्मप्रचीती । शास्त्रेंसहित ।' -दा १.१.१५. ॰प्रशंसा-स्त्री. स्वतःची स्तुति; आत्मस्तुति-श्लाघा. ॰प्राप्ति-लाभ-स्त्रीपु. आत्म- ज्ञान; ब्रह्मज्ञान. 'महामंत्र आत्मप्राप्तीची खाणी ।' ॰बंधु-पु. स्वतःचा नातेवाईक; चुलत-मावस-आते-मामे भाऊ. ॰बिंब-न. १ प्रतिबिंब. 'का आत्मबिंबा घेतलें । बाळकें जळीं ।' -ज्ञा १८.१३०६. २ जीवात्मा (परमात्म्याचें प्रतिबिंब). ॰बोध-पु. आत्मज्ञान. 'मग सत्वें चोखाळें । उघडती आत्मबोधाचे डोळे ।' -ज्ञा १८.२१०. -आत्मंभरी-वि. अप्पलपोट्या. ॰यज्ञ-पु. स्वार्थत्याग; जीवि- ताचें बलिदान; स्वतः मरणाला तयार होणें. ॰राज-पु. आत्मा; स्वतः 'तेथ न सुवावा अभंगीं । आत्मराजु ।' -ज्ञा १८.२८०. ॰रूप-न. स्वस्वरूप. 'जयजय स्वसंवेद्या आत्मरूपा ।' -ज्ञा १.१. ॰लिंग-न. १ आत्मस्वरूप. 'पैं तुझी आण वाहणें । हें आत्मलिंगतें शिवणें ।' -ज्ञा १८.१३६९. २ शिवाचें मुख्य लिंग (प्रतीक). शंकरानें आपल्या भक्तासाठीं आत्मस्वरूपाचा तत्त्वांश मूर्त करून ठेवला आहे. ३ अत्यंत जिवलग मनुष्य; प्रेमाचें माणूस. 'एके दिवशीं बाजीरावसाहेब हे नानासाहेबास भोजनाचे वेळीं बोलेले कीं, रघुनाथराव यांचें पूर्वज विठ्ठल शिवदेव हे आमचे दादासाहेबांचे आत्मलिंग होते.' -तीर्थयात्राप्रबंध ८२. ॰वत्-वि. आपल्या प्रमाणें; स्वतःसारखें; भेदभाव, आपपरभाव न ठेवतां. 'आत्मवत् सर्व भूतानि ।' या वचनावरून. 'आत्मवत् देखावे अवघे जन । नसो देहभान किंचित ।' ॰वश-मनोनिग्रह; आत्म निग्रह-आत्मसंयमन. ॰विचार-पु. आत्म्यासंबंधीं चर्चा; ब्रम्ह- विचार. 'संतसंगे आत्मविचार.' ॰विद्या-स्त्री. १ ब्रह्मविद्या; अध्या- त्मविद्या; वेदांत. २ आत्मज्ञान; स्वतःसंबंधीं जाणीव. ॰विधि-पु. आत्म्याचें कर्तव्य, गुणधर्म. 'ऐका चित्त देऊन आत्मविधि ।' ॰वेत्ता-पु. ज्याला स्वस्वरूपाची पूर्ण ओळख झाली, स्वहृदयांत वास करणारा ब्रम्हांडव्यापी परमात्मा आपण आहों असा ज्याच्या बुद्धीचा निर्धार झाला तो; मी ब्रह्म आहे असें मानणारा. ॰शास्त्र-न. अध्या- त्मविद्या-शास्त्र. ॰शुद्धि-स्त्री. चित्तशुद्धि; स्वतःचे आचारविचार, वर्तन शुद्ध ठेवणें. म्ह॰ आधीं आत्मशुद्धि. मग देवशुद्धि ॰संतो- षानें क्रिवि. राजाखुशीनें; कोणाची भीड न धरतां; आपखुषीनें. 'हें खत मी आत्मसंतोषानें लिहून दिलें असें.' ॰संतोषी-वि. १ आत्मा- नंदांत सुख मानणारा. २ (ल.) आपमतलबी. ॰सत्ता-स्त्री. ब्रह्म- ज्ञान; आत्मस्वरूप. तैसें होईजे जाईजे देहें । तें आत्मसत्ते अवि- क्रिये ।' -ज्ञा १५. ३८०. ॰संयम-आत्मवश पहा. ॰साधन-न. १ आपल्या जीवाचें किंवा जन्माचें सार्थक करणें. जैसि संताचि कास मुमुक्षु नर । धरिति आत्मसाधना ।' २ स्वतःच्या उपजी- विकेची व्यवस्था-तरतूद. ३ (ल.) स्वतःचा मतलब. 'त्याचें कांहीं- तरी आत्मसाधन असेल तरच तो इतकी खटपट करितो.' ॰साक्षा- त्कार-पु. निर्गुण साक्षात्कार (सगुण साक्षात्काराच्या उलट); अंत- र्यामीं परमेश्वर- ब्रह्म याचें दर्शन होणें. ॰सुख-न.स्वतःचें (शारी- रिक किंवा मानसिक) सुख; आपल्या ठिकाणींच सुख; ब्रह्मज्ञाना- पासून होणारें सुख. ॰स्तुति स्त्री. स्वतःची प्रशंसा; आत्मप्रशंसा. 'आत्मस्तुति मनांतून । स्वप्नीं जयासि नावडे ।' ॰स्थिति-स्त्री. ब्रह्म- स्वरूपाची स्थिति; आत्म्याची स्वतंत्र अवस्था; शरीर किंवा इतर वस्तू यांहून भिन्न अशी अलिप्त स्थिति. कांहीं वाक्प्रचार-आत्मस्थिती ओळ- खावी-जाणावी-संपादावी-जोडावी-धरावी = सोडूं नये; आत्म- स्थितीवर असणें. ॰हत्त्या-स्त्री. १ (कायदा) शास्त्रविधिविरहित स्वतःस मरण येईल असें कृत्य स्वतः करून मरणास कारण होणें; हेतुपुरस्सर स्वतःचा जीव स्वतः घेणें; आत्मनाश; आत्मघात. २ आत्महत्येचें पाप, गुन्हा. ॰हत्त्यारा-वि. आत्मघात करणारा. 'जो आपला आपण घातकी । तो आत्महत्यारा पातकी ।' -दा १७.७.१०. ॰हित-न. १(ईश्वरप्राप्तीनें होणारें) जीवाचें कल्याण; देहाचें सार्थक; भग- वत्प्राप्ति. 'आहा नरदेह उत्तम पूर्ण । केवळ भगवत्प्राप्तीचें स्थान । म्यां आत्महित न करून । बुडालों किं अंधतमीं ।' २ स्वतःचा फायदा. ॰ज्ञान-न. १ ब्रह्मज्ञान; स्वस्वरूपाचें ज्ञान; अध्यात्मज्ञान. 'ज्ञान म्हणिजे आत्मज्ञान । पाहावें आपणासि आपण ।' -दा ५.६.१. २ स्वतःच्या वर्तनाची जाणीव. म्ह॰ आधीं आत्मज्ञान, मग ब्रह्मज्ञान.

दाते शब्दकोश

दुर्

अ. दुष्टपणा; वाईटपणा, कठिणपणा, दुःख इ॰कांच्या वाचक शब्दापूर्वीं योजावयाचा उपसर्ग. जसें:-दुराचार = वाईट वर्त- णूक; दुर्लभ = मिळण्यास कठिण; दुस्सह = सहन करण्यास कठिण इ॰. याचीं संधिनियमानुरूप दुर्, दुस्, दुष्, दुश् इ॰ रूपें होतात. जसें:- दुर्लभ दुष्कर, दुश्चल, दुस्सह, दुस्साध्य, दुराचार, दुरंत इ. हा उपसर्ग जोडून अनेक सामासिक शब्द बनतात. त्यांपैकीं कांहीं येथें दिले आहेत. दुरंत-वि. १ अपार; अनंत; अमर्याद; अंत लागण्यास कठिण असा (मोह, माया इ॰). २ अतिशय कठिण; तीव्र (दुःख इ॰). [दुर् + अंत = शेवट] दुरतिक्रम-वि. ओलांडून जाण्यास कठिण; दुस्तर; दुर्लंघ्य. २ असाध्य. [दुर् + अतिक्रम = ओलांडणें] दुरत्यय-यी-वि. १ नाश करून टाकण्यास कठिण. २ प्रतिबंध करण्यास, टाळण्यास कठिण; अपरिहार्य. ३ असाध्य (दुःख, आजार, रोग इ॰). अप्रतीकार्य (अडचण, संकट). ४ मन वळ- विण्यास कठिण असा (मनुष्य); दुराराध्य. [दुर् + अत्यय = पार पडणें, जाणें इ॰] दुरदृष्ट-न. दुर्दैव; वाईट अदृष्ट. 'कीं आड आलें दुरदृष्ट माझें ।' -सारुह १.१०. [दुर् + अदृष्ट] दुरधिगम्य- वि. १ समजण्यास कठिण; दुर्बोध; दुर्ज्ञेय. २ दुष्प्राप्य; मिळण्यास कठिण; दुर्गम. [दुर् + सं. अधि + गम् = मिळविणें] दुरभिमान-पु. पोकळ, वृथा, अवास्तव अभिमान; फाजील गर्व. [दुर् + अभिमान] दुरवबोध-वि. दुर्बोध; गूढ. [दुर् + सं. अव + बुध् = जाणणें] दुरा- कांक्षा-स्त्री. दुष्प्राप्य वस्तूचा अभिलाष. [दुर् + आकांक्षा = इच्छा, अभिलाष] दुराग्रह-पु. हट्ट, लोकविरोध, शास्त्रविरोध, संकटें इ॰ कांना न जुमानतां एखाद्या गोष्टीचा पिच्छा पुरविण्याचा हट्ट; अनिष्ट आग्रह. 'न सुखद दुराग्रह सखा हा सर्वाऽनर्थ गेह ठक राया ।' -मोकर्ण ४६.५०. [दुर् = वाईट + आग्रह = हट्ट] दुराग्रही-वि. दुरा- ग्रह धरण्याचा ज्याचा स्वभाव आहे असा; हेकेखोर; हटवादी; हट्टी. [दुराग्रह] दुराचरण, दुराचार-नपु. निंद्य, वाईट, वागणूक; दुर्वर्तन; दुष्ट आचरण. [दुर् = दुष्ट + सं. आचरण = वर्तन] दुराचरणी, दुराचारी-वि. निंद्य, वाईट, दुष्ट वर्तनाचा; बदफैली. [दुराचार] दुरात्मत्व-न. १ दुष्ट अंतःकरण; मनाचा दुष्टपणा. २ दुष्ट कृत्य. 'किमपि दुरात्मत्व घडलें ।' [दुर् = दुष्ट + आत्मा = मन] दुरात्मा- वि. दुष्ट मनाचा (मनुष्य); खट; शठ. [दुर् + आत्मा] दुरा- धर्ष-वि. जिंकण्यास, वर्चस्वाखालीं आणण्यास कठिण. [दुर् + सं. आ + धृष् = जिंकणें] दुराप-वि. मिळविण्यास कठिण; दुर्लभ; अप्राप्य. 'राया, भीष्माला जें सुख, इतरां तें दुराप, गा, स्वापें ।' -मोभीष्म ६.२९. दुराप(पा)स्त-वि. घडून येण्यास कठिण; दुर्घट; असंभाव्य. 'वाळूचें तेल काढणें ही गोष्ट दुरापस्त आहे.' [दुर् + सं. अप + अस् = ] दुराराध्य-वि. संतुष्ट, प्रसन्न करण्यास कठिण, अशक्य; मन वळविण्यास कठिण. 'मोक्षु दुराराध्यु कीर होय । परि तोही आराधी तुझे पाय ।' -ज्ञा ११.९९. [दुर् + सं. आराध्य] दुराशा-स्त्री. निरर्थक, फोल, अवास्तव आशा, दुष्प्राप्य गोष्टीची आशा दुष्ट वासना. 'आम्हास अन्न खावयास मिळेना आणि पालखींत बसण्याची दुराशा धरावी हें चांगलें नव्हे.' 'दुराशागुणें जो नव्हे दैन्यवाणी ।' -राम १६८. [दर् + आशा] दुरासद-वि. कष्टानें प्राप्त होणारें; जिंकण्यास, मिळण्यास कठिण. [दुर् + सं. आ + सद = मिळ विणें] दुरित-न. पाप; पातक; संचितकर्म. 'पुन्हां न मन हे मळो दुरित आत्मबोधें जळो ।' -केका ११९. [दुर् + सं. इ = जाणें] दुरुक्त-न. वाईट, दुष्टपणाचें, अश्लील भाषण; शिवी; अपशब्द; दुर्भाषण; अश्लील बोलणें. [दुर् + उक्ति = बोलणें] दुरुत्तर-न. अप मानकारक, उर्मटपणाचें उत्तर; दुरुक्ति. [दर् + उत्तर] दुरुद्धर-वि. खंडण करण्यास, खोडून काढण्यास कठिण असा (पूर्वपक्ष, आक्षेप, आरोप). 'या सिद्धांतावर दोष दिला हा सर्वांस दुरुद्धर आहे.' [दुर् + सं. उद् + धृ = काढून टाकणें; वर, बाहेर काढणें] दुरूह-वि. दुर्बोध; गूढ; अतर्क्य. 'ईश्वरानें सृष्टि कशी उत्पन्न केली हें सर्वांस दुरूह आहे.' [दुर् + सं. ऊह् = अनुमानणें] दुर्गत-वि. गरीब; दिन; दरिद्री; लाचार. 'झांकी शरपटलानीं आढ्य जसा दुर्गतांसि वस्त्रांनीं ।' -मोभीष्म ९.६५. [दुर् + सं. गत = गेलेला] दुर्गति-स्त्री. १ दुर्दशा; वाईट स्थिति; संकटाची, लाजिरवाणी स्थिति; अडचण; लचांड. २ नरक; नरकांत पडणें. [दुर् + गति = स्थिति] दुर्गंध- गंधी-पुस्त्री. घाण; वाईट वास. -वि. घाण वास येणारें [दुर् = वाईट + सं. गंध = वास] ॰नाशक-वि. (रसा.) दुर्गंधाचा नाश करणारें; (इं.) डिओडरंट्. [दुर्गध + सं. नाशक = नाश करणारा] दुर्गंधिल-वि. (रासा.) आर्सेनिक व मेथिल यांच्या संयोगापासून बनलेला विषारी, दुर्गंधी (पदार्थ) (इं.) कॅको- डिल्. दुर्गम-वि. जाण्यास कठिण (स्थळ, प्रदेश इ॰). [दुर् + सं + गम् = जाणें] दुर्गुण-पु. वाईट गुण; दोष; अवगुण; दुर्मार्गाकडील कल. (क्रि॰ आचरणें). [दुर् + गुण] दुर्गुणी-वि. वाईट गुणांचा; अवगुणी; दुराचरी; दुर्वर्तनी. [दुर्गुण] दुर्घट-वि. धड- वून आणण्यास, घडून येण्यास, सिद्धीस नेण्यास कठिण. [दुर् + सं. घट् = घडणें, घडवून आणणें] दुर्घटना-स्त्री. अशुभ, अनिष्ट गोष्ट घडणें; आकस्मिक आलेलें संकट, वाईट परिस्थिति. [दुर् + सं. घटना = स्थिति] दुर्घाण-स्त्री. दुस्सह घाण; ओरढाण; उग्रष्टाण. [दुर् + घाण] दुर्जन-पु. वाईट, दुष्ट मनुष्य. [दुर् + जन = मनुष्य, लोक] दुर्जय-वि. १ जिंकण्यास कठिण. २ दुस्साध्य; दुस्तर. [दुर + सं. जि = जिंकणें] दुर्जर-वि. पचविण्यास, विरघळ- ण्यास कठिण. [दुर् + सं. जृ = जिरणें] दुर्दम-वि. दमन करण्यास, वर्चस्वाखालीं आणण्यास कठिण. 'तिला इंग्लंडांतील प्रबल व दुर्दम प्रजाजनांच्या अडथळ्याशिवाय दुसरें कोणतेंच नियमन नसे.' -पार्ल ६. [दुर् + दम्] दुर्दर्श-वि. दिसण्यास, पाहण्यास कठिण; अतिशय अस्पष्ट. [दुर् + सं. दृश् = पाहणें] दुर्दशा-स्त्री. अवनतीची, अडचणीची, संकटाची, वाईट, दुःखद स्थिति; दुर्गति; दुःस्थिति. 'भिजल्यामुळें शालजोडीची दुर्दशा जाली.' [दुर् + दशा = स्थिति दुर्दिन-न. १ वाईट दिवस. २ अकालीं अभ्रें आलेला दिवस. ३ वृष्टि. -शर. [दुर् + सं. दिन = दिवस] दुर्दैव-न. कमनशीब; दुर्भाग्य. 'कीं माझें दुर्दैव प्रभुच्या मार्गांत आडवें पडलें ।' -मोसंशयरत्नमाला (नवनीत पृ. ३४९). -वि. कम- नशिबी; अभागी. [दुर् + दैव = नशीब] दुर्दैवी-वि. अभागी; कम- नशिबी. [दुर्दैव] दुर्धर-पु. एक नरकविशेष. [सं.] दुर्धर- वि. १ धारण, ग्रहण करण्यास कठिण. २ दुस्साध्य; दुष्प्राप्य. ३ (काव्य) (व्यापक) बिकट; खडतर; असह्य; उग्र; कठिण. 'तप करीत दुर्धर । अंगीं चालला घर्मपूर ।' ४ भयंकर; घोर; भयानक. 'महादुर्धर कानन ।' [दुर् + सं. धृ = धरणें, धारण करणें] दुर्धर्ष- वि. दुराधर्ष; दमन करण्यास, वर्चस्वाखालीं आणण्यास कठिण; दुर्दम्य; अनिवार्य. [दुर् + धृष् = जिंकणें, वठणीवर आणणें] दुर्नाम- न. अपकीर्ति; दुष्कीर्ति; बदनामी. [दुर् + सं. नामन् = नांव] दुर्नि- मित्त-न. अन्याय्य, निराधार कारण, सबब, निमित्त. [दुर् + निमित्त = कारण] दुर्निर्वह-वि. १ दुःसह; असह्य; सहन करण्यास कठिण; निभावून जाण्यास, पार पडण्यास कठिण (अडचण, संकट). २ दुस्साध्य; दुष्कर; [दुर् + सं. निर् + वह्] दुर्निवार, दुर्निवा- रण-वि. १ निवारण, प्रतिबंध करण्यास कठिण; अपरिहार्य; अनि- वार्य. २ कबजांत आणण्यास कठिण; दुर्दम्य. [दुर् + नि + वृ] दुर्बल-ळ-वि. १ दुबला; अशक्त; असमर्थ. २ गरीब; दीन; दरिद्री. 'ऐसें असतां एके दिवशीं । दुर्बळ द्विज आला परियेसीं ।' -गुच ३८.७. [दुर् + बल = शक्ति] दुर्बळी-वि. (काव्य.) दुर्बळ पहा. दुर्बुद्ध-वि. १ दुष्ट बुद्धीचा; खुनशी वृत्तीचा. २ मूर्ख; मूढ; मंदमति; ठोंब्या. [दुर् + बुद्धि] दुर्बुद्धि-स्त्री. १ दुष्ट मनोवृत्ति; खुनशी स्वभाव; मनाचा दुष्टपणा. 'दुर्बुद्धि ते मना । कदा नुपजो नारायणा ।' -तुगा ७९८. २ मूर्खपणा; अनिष्ट परिणामकारक बुद्धि. -वि. दुष्ट मनाचा; दुर्बुद्ध पहा. [दुर् + बुद्धि] दुर्बोध-वि. समजण्यास कठिण (ग्रंथ, भाषण इ॰) [दुर् + बोध् = समजणें, ज्ञान] दुर्भग-वि. कमनशिबी; दुर्दैवी; भाग्यहीन. [दुर् + सं. भग = भाग्य] दुर्भर-वि. भरून पूर्ण करण्यास कठिण; तृप्त करण्यास कठिण (पोट, इच्छा, आकांक्षा). 'इंद्रियें वज्रघातें तपे उष्ण वरी ज्वाळ । सोसिलें काय करूं दुर्भर हे चांडाळ ।' -तुगा ३५४. -न. (ल.) पोट. 'तरा दुस्तरा त्या परासागरातें । सरा वीसरा त्या भरा दुर्भरातें ।' -राम ८०. [दुर् + सं. भृ = भरणें] दुर्भ्यक्ष्य-वि. खाण्यास कठिण, अयोग्य; अभ्यक्ष्य. [दुर् + सं. भक्ष्य = खाद्य] दुभोग्य-न. कमनशीब; दुर्दैव. -वि. दुर्दैवी; अभागी. [दुर् + सं. भाग्य = दैव] दुर्भावपु. १ दुष्ट भावना; कुभाव; द्वेषबुद्धि. २ (एखाद्याविषयींचा) संशय; वाईट ग्रह; (विरू.) दुष्टभाव. [दुर् + भाव = भावना, इच्छा] दुर्भाषण-न. वाईट, अपशब्दयुक्त, शिवीगाळीचें बोलणें; दुर्वचन पहा. [दुर् + भाषण = बोलणें] दुर्भिक्ष-न. १ दुष्काळ; महागाई. २ (दुष्काळ इ॰ कांत होणारी अन्नसामुग्री इ॰ कांची) टंचाई; कमीपणा; उणीव. [सं.] ॰रक्षित-वि. दासांतील एक प्रकार; आपलें दास्य करावें एतदर्थ दुष्काळांतून वांचविलेला (दास, गुलाम इ॰). -मिताक्षरा-व्यवहारमयूख दाय २८९. [दुर्भिक्ष + सं. रक्षित = रक्षण केलेला] दुर्भेद-वि. बुद्धीचा प्रवेश होण्यास कठिण; दुर्बोध. 'तैसें दुर्भेद जे अभिप्राय । कां गुरुगम्य हन ठाय ।' -ज्ञा ६.४५९. [दुर् + सं. भिद् = तोडणें] दुर्भेद्य-वि. फोडण्यास, तुकडे करण्यास कठिण (हिरा; तट). [दुर् + सं. भेद्य = फोडण्यासारखा] दुर्मति-स्त्री. १ दुर्बुद्धि; खाष्टपणा; कुटिलपणा. २ मूर्खपणा; खूळ; वेडेपणा. -पु. एका संवत्सराचें नांव. -वि. १ दुष्ट बुद्धीचा; खाष्ट स्वभावाचा. २ मूर्ख; खुळा; वेडा. [दुर् + मति = बुद्धि, मन] दुर्मद-पु. दुराग्रहीपणा; हेकेखोरी; गर्विष्ठपणाचा हटवादीपणा. 'किती सेवाल धन दुर्मदा' -अमृतपदें ५८. -वि. मदांध; मदोन्मत्त; गर्विष्ठ. 'सावियाचि उतत होते दायाद । आणि बळिये जगीं दुर्मद ।' -ज्ञा ११.४८०. [दुर् + मद = गर्व] दुर्मनस्क, दुर्मना-वि. खिन्न; उदास मनाचा; विमनस्क; दुःखित. [दुर् + सं. मनस् = मन] दुर्मरण-न (वाघानें खाऊन, पाण्यांत बुडून, सर्प डसून इ॰ प्रकारांनीं आलेला) अपमृत्यु; अपघातानें आलेलें मरण; अमोक्षदायक मरण. [दुर् + मरण] दुर्मि(र्मी)ल-ळ- वि. मिळण्यास कठिण; दुर्लभ. [दुर् + सं. मिल् = मिळणें] दुर्मुख- पु. एका संवत्सराचें नांव. -वि. १ घुम्या; कुरठा; तुसडा; आंबट तोंडाचा. २ तोंडाळ; शिवराळ जिभेचा. 'दुर्मुखी स्त्रीचा त्याग करून । संन्यास ग्रहण करावा ।' [दुर् + मुख] दुर्मुखणें- अक्रि. तोंड आंबट होणें; फुरंगुटणें; गाल फुगविणें; (एखाद्या कार्याविषयीं) उत्साहशून्यतेची चर्या धारण करणें. 'खायास म्हटलें म्हणजे हांसत येतात आणि उद्योगाचें नांव घेतलें म्हणजें लागलेच दुर्मुखतात.' [दुर्मुख] दुर्मुखला-वि. आंबट चेहर्‍याचा; घुम्या; कुरठा; तुसडा. [दुर्मुख] दुर्मेधा-वि. १ मंदबुद्धीचा. २ दुष्ट स्वभावाचा; दुर्मति. [दुर् + सं. मेधा = बुद्धि] दुर्योग-पु. सत्ता- वीस योगांतील अशुभ, अनिष्ट योगांपैकीं प्रत्येक. [दुर् + योग] दुर्लंघ्य-वि. १ ओलांडता येण्यास कठिण; दुस्तर (नदी इ॰). २ मोडता न येण्यासारखी, अनुल्लंघनीय (आज्ञा, हुकूम, शपथ इ॰) ३ निभावून जाण्यास कठिण (संकट, अडचण इ॰). ४ घालविण्यास, दवडण्यास, क्रमण्यास, नेण्यास कठिण (काळ, वेळ इ॰). [दुर् + सं. लंघ्य = ओलांडावयाजोगें] दुर्लभ-वि. मिळण्यास कठिण; अलभ्य; दुर्मिळ; दुष्यप्राप्य; विरळा. 'अलीकडे आपलें दर्शन दुर्लभ जालें. दुर्ललित-न. चेष्टा; खोडी. 'आमच्या विविध दुर्ललिताबद्दल गुरुजींनीं कसें शासन केलें...' -आश्रमहारिणी ७. [दुर् + सं. ललित = वर्तन, चेष्टा] दुर्लक्ष-न. लक्ष नसणें; हयगय; निष्काळजी- पणा; गफलत; अनवधान. -वि. १ लक्ष न देणारा; अनवधानी; गाफील; बेसावध, 'तुम्ही गोष्ट सांगीतली पण मीं दुर्लक्ष होतों म्हणून ऐकिली नाहीं.' २ दिसण्यास, समजण्यास कठिण; 'ईश्वराचें निर्गुण स्वरूप दुर्लक्ष आहे.' [दुर् + सं. लक्ष्य] दुर्लक्षण- न. १ (मनुष्य, जनावर इ॰ कांचें) अशुभसूचक लक्षण, चिन्ह; दुश्चिन्ह; दोष; वाईट संवय; खोड; दुर्गुण. 'हा घोडा लात मारतो एवढें यामध्यें दुर्लक्षण आहे.' [दुर् + लक्षण = चिन्ह] दुर्लक्षण-णी- वि. १ दुर्लक्षणानें, वैगुण्यानें युक्त (मनुष्य, घोडा इ॰). (विरू.) दुर्लक्षणी. २ दुर्गुणी; दुराचारी; दुर्वर्तनी. दुर्लक्ष्य-वि. १ बुद्धीनें, दृष्टीनें अज्ञेय; अगम्य. २ दुर्लक्ष इतर अर्थीं पहा. [दुर् + सं. लक्ष्य] दुर्लौकिक-पु. अपकीर्ती; दुष्कीर्ति; बेअब्रू; बदनामी; कुप्रसिद्धि. [दुर् + लौकिक = कीर्ति] दुर्वच, दुर्वचन, दुर्वाक्यन. १ वाईट बोलणें; दुर्भाषण; अशिष्टपणाचें, अश्लील, शिवीगाळीचें भाषण. २ अशुभ, अनिष्टसूचक भाषण. [सं. दुर् + वचस्, वचन, वाक्य = बोलणें] दुर्वह-वि. १ वाहण्यास, नेण्यास कठिण. २ सोसण्यास, सहन करण्यास कठिण. [दुर् + सं. वह् = वाहणें, नेणें] दुर्वाड- वि. अतिशय मोठें; कठिण. -शर. प्रतिकूल. [दुर् + वह्] दुर्वात- उलट दिशेचा वारा. 'तुज महामृत्युचिया सागरीं । आतां हे त्रैलोक्यजीविताची तरी । शोकदुर्वातलहरी । आंदोळत असे ।' -ज्ञा ११.३४८. [दुर् + सं. वात = वारा] दुर्वाद-पु. वाईट शब्द; दुर्वच; वाईट बोलणें; भाषण. 'हां गा राजसूययागाचिया सभासदीं । देखतां त्रिभुवनाची मांदी । कैसा शतधा दुर्वादी । निस्तेजिलासी ।' -ज्ञा ११.१०१. [दुर् + वाद = बोलणें] दुर्वारवि. दुर्निवार; अनिवार्य; टाळण्यास, प्रतिकार करण्यास कठिण; अपरिहार्य. २ आवरतां येण्यास कठिण; अनिवार; अनावर. [दुर् + वारणें] दुर्वास-पु. १ (व.) सासुरवास; कष्ट; त्रास; जाच. [दुर् + वास = राहणें] दुर्वासना-स्त्री. वाईट इच्छा; कुवासना; दुष्प्रवृत्ति. [दुर् + वासना] दुर्विदग्ध-वि. विद्येंत न मुरलेला तथापि विद्येचा गर्व वाहणारा; अर्ध्या हळकुंडानें; पिवळा झालेला. [दुर् + सं. विदग्ध = विद्वान्] दुर्विपाक-पु. वाईट परिणाम. [दुर् + सं. विपाक = परिणाम] दुर्विभावनीय-वि. समजण्यास, कल्पना करण्यास कठिण. [दुर् + सं. विभावनीय = कल्पना करतां येण्यासारखें] दुर्वृत्ति-स्त्री. दुराचारी; दुर्व्यसनी; दुर्वर्तनी. [दुर् + सं. वृत्त = वागणूक] दुर्वत्ति-स्त्री. दुराचरण; भ्रष्टाचार; बदफैली. [दुर् + सं. वृत्ति = वर्तन] दुर्व्यसन-न. दुराचरणाची संवय; द्यूत, मद्यपान, वेश्यागमन इ॰कांसारखें वाईट व्यसन. 'दुर्व्यसन दुस्तरचि बहु सूज्ञासहि फार कंप देतें हो' -वत्सलाहरण. [दुर् + व्यसन] दुर्व्यसन-नी-वि. वाईट व्यसन, संवय लागलेला; दुराचारी; बदफैली. (प्र.) दुर्व्यसनी. दुर्व्रात्य-वि. अतिशय दुष्ट; व्रात्य; खोडकर; खट्याळ; (मुलगा अथवा त्यांचें आचरण). [दुर् + व्रात्य = खोडकर, द्वाड] दुर्हृद, दुर्हृदय-वि. वाईट, दुष्ट मनाचा. [दुर् + सं. हृदु, हृदय = मन] दुर्ज्ञेय-वि. समजण्यास कठिण; गूढ; गहन. 'ही पद्धत कशी सुरू झाली असावी हें समजणें दुर्ज्ञेय आहे.' -इंमू ७६. [दुर् + सं. ज्ञेय = समजण्याजोगें] दुःशक- वि. करण्यास कठिण; अशक्यप्राय. [दुस् + सं. शक् = शकणें] दुःशकुन-पु. अपशकुन; अनिष्टसूचक चिन्ह. [दुस् + शकुन] दुश्शील, दुःशील-वि. वाईट शीलाचा; दुराचरणी. [दुस् + शील] दुश्चरित्र-न. पापाचरण; दुष्कृत्य. [दुस् + चरित्र] दुश्चल-वि. (अक्षरशः व ल.) पुढें जाण्यास, सरसावण्यास, चालण्यास कठिण. [दुस् + सं. चल् = चालणें] दुश्चि(श्ची)त-वि. १ (काव्य) अयोग्य, चुकीचा, अपराधी (माणूस, कृत्य). 'अंगुष्ठ धरुनि मस्तकपर्यंत । अखंड दुश्चित आचरलों ।' २ खिन्न; उदास; दुःखी. 'राजा प्रजा पिडी । क्षेत्री दुश्चितासी तोडी ।' -तुगा २९८४. [सं. दुश्चित अप.] दुश्चित्त-वि. १ खिन्न; दुर्मनस्क; दुःखित; उदास; उद्विग्न. 'अबदुल्याची खबर ऐकतां मनांत झाले दुश्चित ।' -ऐपो १३२. २ क्षुब्ध. 'परी कुंडलिनी नावेक दुश्चित्त होती । ते तयातें म्हणे परौती ।' -ज्ञा ६.२३८ [दुस् + चित्त = मन] दुश्चिंत- वि. (काव्य) खिन्न; दुःखी; उदास; दुश्चित्त अर्थ २ पहा. 'डोळे लावुनियां न होतों दुश्चिंत । तुझी परचीत भाव होती ।' [दुश्चित अप.] दुश्चिन्ह-न. अशुभ, वाईट लक्षण; अपशकुन. 'दुश्चिन्हें उद्भवलीं क्षितीं । दिवसा दिवाभीतें बोभाति ।' [दुस् + चिन्ह] दुश्शाप-पु. वाईट, उग्र, खडतर शाप. [दुस् + शाप] दुश्शासन-पुविना. दुर्योधनाचा भाऊ. -वि. व्यवस्था राख- ण्यास, अधिकार चालविण्यास कठिण. [दुस् + शासन = अधिकार चालविणें] दुष्कर-वि. १ करण्यास कठिण; बिकट; अवघड. 'म्हणोनि अभ्यासासि कांहीं । सर्वथा दुष्कर नाहीं ।' -ज्ञा १२.११३. २ दुष्परिणामकारक. -मोल. [दुस् + सं. कृ = करणें] दुष्कर्म-न. वाईट, पापी, दुष्टपणाचें कृत्य; कर्म. [दुस् + कर्म] दुष्कर्मा, दुष्कर्मी-पु. दुष्ट कृत्य करणारा; पापी; दुरात्मा. [दुस् + कर्मन्] दुष्काल-ळ-पु. अतिवृष्टि किंवा अनावृष्टि होऊन पिकें बुडून अन्नाची वाण पडते तो काळ; दुकाळ; महागाई. 'जैसा रोगिया ज्वराहूनि उठिला । कां भणगा दुष्काळु पाहला ।' -ज्ञा ११.४२८. [दुस् + काल] म्ह॰ दुष्काळांत तेरावा महिना = दुष्का- ळांत वर्षाचे बारा महिने काढतां काढतांच मुष्कील पडते. अशा वेळीं अधिक मास (तेरावा महिना) आला म्हणजे संकटातं भर पडते असा अर्थ. दुष्कीर्ति-स्त्री. अपकीर्ती; बदनामी; बेअब्रू. [दुस् = कीर्ति] दुष्कृत-ति-नस्त्री. १ पापकर्म; वाईट कृत्य. 'आणि आचरण पाहातां सुभटा । तो दुष्कृताचा कीर सेल वांटा ।' -ज्ञा ९.४१६. २ कृतींतील. वागणुकींतील दुष्टपणा. [दुस् + कृत- ति] दुष्प्रतिग्रह-पु. जो प्रतिग्रह (दानाचा स्वीकार) केला असतां, स्वीकारणारा अधोगतीस जातो तो; निंद्य प्रतिग्रह; अशुभप्रसंगीं केलेलें दान स्वीकारणें; वाईट कृत्याबाबत स्वीकारलेलें दान इ॰. उदा॰ वैतरणी, शय्या, लोखंड, तेल, म्हैस हे दुष्प्रतिग्रह होत. [दुस् + सं. प्रतिग्रह = दान स्वीकारणें] दुष्प्राप-प्य-वि. दुर्लभ; मिळण्यास कठिण; विरळा; दुर्मिळ. [दुस् + सं. प्र + आप् = मिळ- विणें] दुस्तर-वि. तरून जाण्यास, पार पडण्यास कठिण. 'समुद्रापेक्षां हा संसार मला दुस्तर वाटतो.' -न. (ल.) संकट. 'थोर वोढवलें दुस्तर । तुटलें सासुरें माहेर ।' -एरुस्व ८.५५. [दुस + सं तृ = तरणें] दुस्पर्श-वि. स्पर्श करण्यास कठिण, अयोग्य. [दुस् + सं. स्पृश् = स्पर्श करणें] दुस्संग-पु. दुष्टांची संगत; कुसंगति. [दुस् + संग] दुस्सह-वि. सहन करण्यास कठिण; असह्य. [दुस् + सं. सह् = सहन करणें] दुस्सही-वि. (प्र.) दुस्सह स्सह अप.] दुस्साध्य-वि. १ सिद्धीस नेण्यास, साधावयास कठिण. 'थोर वय झाल्यावर विद्या दुःसाध्य होते.' २ बरा करण्यास कठिण (रोग, रोगी). आटोक्यांत आणण्यास कठिण (शत्रु, अनिष्ट गोष्ट, संकट इ॰). [दुस् + सं. साध्य = साधण्यास सोपें] दुस्स्वप्न-न. १ अशुभसूचक स्वप्न. २ (मनांतील) कुतर्क, आशंका, विकल्प. [दुस् + स्वप्न] दुस्स्वभाव-पु. वाईट, दुष्ट स्वभाव. -वि. वाईट, दुष्ट स्वभावाचा. [दुस् + स्वभाव]

दाते शब्दकोश

महत्

वि. १ मोठा; बडा; विस्तृत. २ (ल.) थोर; वरच्या दर्जाचा; उत्कृष्ट; कोणत्याहि गुणांत श्रेष्ठ. जसें-महाबुद्धिमान्, महालबाड; महासोदा. महत् हा शब्द कर्मधारय आणि बहुव्रीहि समासांत महा असा होतो आणि तत्पुरुष समासांत तसाच राहतो. जसें-महादेव, महाबाहु व महत्पूजा; महत्सेवा. ३ अतिशय; फार; अत्यंत. जसें-महाप्रचंड; महातीक्ष्ण इ॰ [सं.] महतामहत्-वि. (व.) मोठ्यांतला मोठा; सर्वांत मोठा. महत्तत्व-न. सत्व, रज, तम या तीन गुणांची साम्यावस्था; मूळमाया; गुणसाम्य. 'सत्त्वगुणापासून महत्तत्व उत्पन्न झालें.' -टिले ४.३६१. महत्तमसाधारण भाजकपु. दिलेल्या सर्व संख्यांना पूर्ण भाग जाईल अशी सर्वांत मोठी संख्या. महदंतर-न. फार मोठें अंतर, तफावत; वेगळेपणा. महदहंबुद्धि-स्त्री. महत्तत्त्व; अहंकार- बुद्धि. 'एवं महदहंबुद्धि । मनें महाभूत समृद्धि ।' -माज्ञा १५.१०५. महदादिदेहांत-क्रिवि. महत्तत्त्वापासून स्थूलदेहापर्यंत. 'महदादि देहांतें । इयें आशेषेंही भूतें ।' -ज्ञा ९.६७. महद्ब्रह्म-न. मूळ ब्रह्म. 'तया महद्ब्रह्मातें व्याली । दैविकी इच्छा ।' -ज्ञा ११.५११. महद्भूत-वि. विलक्षण; असामान्य; चमत्कारिक. महद्वर्त्त-न. गोलाचें वर्तुळ; खगोलीय वृत्त. महती-स्त्री. मोठेपणा; महत्त्व. 'त्याचेनि माझी त्रैलोकीं ख्याती । मज महती त्याचेनी ।' -एभा १४.२६९. महतीवीणा-स्त्री. नारदाच्या वीणेचें नांव. महत्त्व-न. मोठेपणा; योग्यता; लौकिक; प्रतिष्ठा; किंमत. महती पहा. 'रायाजी पाटिल महत्त्व रक्षी ।' ऐपो ३२. उतरणें- योग्यता; प्रतिष्ठा; कमी होणें. ॰वाढविणेंफुशारकी, बढाई मारणें. ॰दर्शक-वि. पदार्थाचें माप, लांबी, रुंदी इ॰ दाखवि- णारें (परिमाण). ॰मापन-न. गणितशास्त्राचा एक विभाग; आकारमान मोजण्याची विद्या; मापनशास्त्र. महत्त्वकांक्षा- -स्त्री. मोठेपणाची इच्छा, हांव; जिगीषा. 'कर्तबगार लोकांच्या वेडाला महत्त्वाकांक्षा म्हणतात.' -विधिलिखित २१. महा-वि. १ महत् पहा. २ थोर; बडा. 'हे एक महा आहेत.' 'तो काय एक महा आहे.' ॰अर्बुद-न. एक हजार दशकोटि ही संख्या. ॰ऊर-पु. (अप.) महापूर; अतिशय मोठा पूर. ॰एकादशी- स्त्री. आषाढशुद्ध व कार्तिक शुद्ध एकादशी. ॰कंद-पु. १ मोठ्या जातीचा कंद. २ लसूण. ॰कल्प-पु. ब्रह्मदेवाच्या शंभर वर्षांचा काल; ब्रह्मदेवाचें आयुष्य; महाप्रलय; कल्प पहा. ॰काल-ळ- पु. १ प्रलय काळचा शंकराचा अवतार. 'महाकाळ उभा चिरीन बाणीं ।' २ बारा ज्योतिर्लिंगांपैकीं एक (उज्जनी येथील). ॰काली-स्त्री. १ पार्वती. २ प्रचंड तोफ; महाकाळी. -शर. ॰काव्य-न. वीररसप्रधान, मोठें, अभिजात, रामायण-महा- भारताप्रमाणें काव्य; (इं.) एपिक. 'आर्ष महाकाव्यांत कोण- कोणते गुण असावे याबद्दल पुढें विवेचन येईलच.' ॰काश-न. अवकाश; अफाट पोकळी. याच्या उलट घटाकाश, मठाकाश. [महा + आकाश] ॰कुल-कुलीन-वि. थोर, उच्च कुलांतील; कुलीन. ॰खळें-न. मोठें अंगण. ॰गाणी-नी-वि. गानकुशल. 'उत्तर देशींच्या महागणी । गुर्जरिणी अतिगौरा ।' -मुरुंशु १२२. ॰गिरी-पु. मोठा पर्वत; हिमालय. 'किं मक्षिकाचेनि थडकें । महागिरी पडों शकें ।' -एकनाथ-आनंदलहरी ४२. -स्त्री. १ तीनशें खंडीपर्यंत वजन नेणारें जहाज, गलबत; मालाचें तारूं; 'सबब त्यांजकडे दोन महागिऱ्या भरून गवत व एक महागिरी- भर लांकडे देविलीं असें,' -समारो ३.१६. २ मोठें तारूं; शिबाड; बतेला. ॰ग्रह-ग्राह-पु. मोठी सुसर; मोठा मगर. 'गज करवडी महाग्राह ।' -एरुस्व १०.८० -एभा २०.३५०. ॰जन- पु. १ काही गुण, विद्या इ॰ मुळें थोर, श्रेष्ठ माणूस. 'परंतु हृदयीं महाजन भयास मी मानितों ।' -भक्तमयूरकेका ७५. ३ व्यापारी; उदमी; सावकार. ३ गाव, कसबा इ॰ तील व्यापाराला नियम, शिस्त घालून देणारा, त्यावर देखरेख करणारा व कर वसूल करणारा सरकारी अधिकारी. ह्या अर्थीं महाजनी असाहि शब्द आहे. ४ पंच ॰जनकी-स्त्री. महाजनांचे काम, अधिकार. ॰डोळा-पु. एक मासा. -प्रणिमो ८१. ॰तल-न. सप्तपातालांपैकीं एक; नाग व असुर यांचें स्थान. ॰ताप-पु. (तंजा.) शोभेच्या दारूचा एक प्रकार; चंद्रज्योति. महताब पहा. ॰तेज-न. १ ब्रह्म २ सूर्य. 'हें अपार कैसेनि कवळावें । महातेज कवणें धवळावें.' -ज्ञा १.७४ महात्मा-पु. १ महानुभव पंथांतील व्यक्ति. ३ मोटा धैर्यवान, पराक्रमी मनुष्य. 'तैसें महात्मा वृक्षमुळीं । असावें खांड देउळीं ।' -भाए ४९३. गौतमबुद्ध, गांधी यांस संबोधितात. -वि. १ थोर मनाचा; उदार; महानुभाव. 'परते धर्म महात्मा, स्तविला बहु नारदादि साधूंनीं ।' -मोभीष्म १.९९. [महा + आत्मा] ॰दंदी- वि. महामत्सरी; कट्टर द्वेष्टा. 'छंदी फंदि महादंदि । रावण पडिला तुझ्या बंदि ।' -ज्ञानप्रदीप २६६. [सं. महाद्वंद्वी] ॰दशा-स्त्री. (ज्योतिष) कुंडलीतींल मुख्य ग्रहाची बाधा अंतर्दशा पहा. ॰दान- न. (मोठें दान) हत्ती इ॰ षोडशदानांपैकीं एक; षोडशमहादानें पहा. ॰देव-पु. १ शंकर; शिव. 'महादेव म्हणावया कारण । ब्रह्मयासि. जाण या हेतू ।' -एभा १३.२७९. २ (विणकाम) हातमागाच्या फणीचा मरचा अवयव, दांडा फळी. हा आणि तळाचा दांडा किंवा पार्वती मिळून फणीची चौकट होते या फणीच्या चौकटीस महादेवपार्वती किंवा हात्यादांडी असेंहि म्हणतात. ॰देवाचें देणें- न. कंटाळवाणें व दीर्घकाल टिकणारें काम. ॰देवापुढचा-वि. (शब्दशः) नंदी; (ल.) मूर्ख; निर्बुद्ध. ॰देवी-स्त्री. १ पार्वती; दुर्गा. २ एक प्रकारची वनस्पति. हिचें बीं महादेवाच्या पिंडीच्या आकाराप्रमाणें असतें. ॰देवी सहादेवी-स्त्री. (माण.) चैत्री पौर्णिमेस तिन्हीसांजचे वेळीं एखाद्या भिंतीवर जीं महादेवी सहादेवी म्हणून दोन गंधाचीं बाहुलीं काढून त्यांची पूजा कर- तात तीं. -मसाप ४.४.२५९. ॰दैव-(माण.) सर्व जातींचे लोक. ॰द्वार-न. (मंदिराचा किंवा राजवाड्याचा) बाहेरचा किंवा मुख्य दरवाजा. 'भक्त गर्जती महाद्वारीं । त्यांसी द्यावे दर्शन ।' -भूपाळी विठ्ठलाची पृ २२. ॰द्वीप-न. (मोठें बेट) खंड. 'तयाफळाचे हें महाद्वीप । पातली प्रभु ।' -ज्ञा १६.३२. ॰नदी-स्त्री. मोठी नदी; उगमापासून शंभर योजनांवर वाहात जाणारी नदी. ॰न मी-स्त्री. १ आश्विन शुद्ध नवमी; नवरात्राचा शेवटचा दिवस. २ रामनवमी. -शास्त्रीको ॰नवरात्र-न. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून विजयादशमीपर्यंतचा काल. ॰नस- पु. स्वयंपाकघर. ॰नक्षत्र-न. सूर्यनक्षत्र ॰नाड-पु. महाजना- सारखा एक वतनदार. 'महाजन व महानाड पेठ मजकूर याचें नांवें सनद कीं,' -थोमारो १.५४. [महा + नाड-डु] ॰निंब-पु. एक प्रकारचें झाड. ॰निद्रा-स्त्री. मरण; मृत्यु. 'तिसरें प्रमाण महा- निद्रा म्हणजे मृत्यु हें होय?' -टि ४.४८१. महानुभाव-पु. श्रीचक्रधरानें स्थापिलेला एक द्वैतवादी पंथ. या पंथात श्रीकृष्ण- भक्ति प्रमुख आहे. [महा + अनुभाव] -वि. १ ज्यानें कामक्रोधादि विकार जिंकले आहेत असा; महात्मा. २ उदार, थोर पुरुष. एवं पिंडारकीं ऋषि सर्व । शापानुग्रही महानुभाव ।' -एभा १.३३६. ३ प्रशस्त अनुभवाचा; ब्रह्मानुभवी. 'ऐसे जे महानुभाव । जे दैविये प्रकृतीचें दैव ।' -ज्ञा ९ १९४. ४ विद्या, बुद्धि, पराक्रम इ॰ गुणांनीं श्रेष्ठ मनुष्य; महाप्रतापी. ॰नेटका-वि. परिपूर्ण; पूर्णपणे; व्यवस्थित. 'यज्ञ मुनिचा राखे महानेटका ।' -मोरामायणें त्रिःसप्तमंत्रमय रामा- यण ३. ॰नैवेद्य-पुन. पंचपक्वान्नमय अन्नाचें ताट वाढून देवाला दाखवितात तो नैवेद्य (साखर, दूध इ॰चा छोटा नैवेद्य होतो). ॰न्यास-पु. पूजा करतांना शरीराच्या विवक्षित भागांना स्पर्श करून करावयास न्यास. याचाच दुसरा प्रकार लघुन्यास. ॰पड-पु. (महानु.) महापट; ध्वज. 'आहो जी देवा । पैलु देखिला महा- पडांचा मेळावा ।' -शिशु १०३३. [महापट] ॰प(पं)थ-पु. १ मृत्यु; मरण; मृत्यूची वाट. 'न देशील सत्यवंत । तरी करीन हाचि महापंथ ।' -वसा ६.८. २ निर्याणाचा मार्ग. 'लागले महापंथी तत्काळाची ।' -एभा ३१.२९८. ॰पद-न. ब्रह्मपद. 'कीं श्रुति हे महापदीं । पैठी जाहली ।' -ज्ञा १३.३७१. ॰पद्म-पु. १ एकं, दहं, शतं ह्या श्रेणींतील तेराव्या स्थानची संख्या (एकावर बारा शून्यें इतका आकडा) २ कुबेराच्या नवनिधींपैकीं एक निधि. नवविधी पहा. ॰पातक-न. ब्रह्महत्या, दारू पिणें, सुवर्णाची चोरी, गुरूच्या पत्नीबरोबर किंवा स्वतःच्या मातेबरोबर संभोग आणि यापैकीं एखादें पातक करणाराशीं मैत्री, अशा पांच मोठ्या पातकांपैकीं प्रत्येक. ॰पातकी-वि. १ ज्याच्या हातून महापातक घडलें आहे असा. २ अत्यंत पापी; दुराचारी. म्ह॰ अवसानघातकी महापातकी. ॰पाप-पी-महापातक-की पहा. ॰पीठ-न. विष्णूच्या चक्रानें झालेले शक्ती-पार्वतीच्या शरीराचे तुकडे ज्या ठिकाणीं पडले असें मानतात त्या अत्यंत पवित्र स्थानापैकीं प्रत्येक. अशीं स्थानें साडेतीन आहेत. तुळजापूर, मातापूर आणि कोल्हापूर, हीं तीन व अर्धे सप्तशृंग. औट पीठ पहा. ॰पुरुष-पु. १ ईश्वर. २ साधु- पुरुष; सत्पुरुष; ब्रह्मनिष्ठ मनुष्य. 'महापुरुषाचें चित्त । जालिया वस्तुगत ।' -ज्ञा १३. ७८९. ३ मेलेल्या ब्राह्मणाचें पिशाच्च. ॰पू(पु)जा-स्त्री. व्रतसमाप्ति इत्यादि विवक्षित प्रसंगास अनुसरून करतात ती मोठी पूजा. ॰पूर-पु. नदीस येणारा मोठा पूर, लोंढा. 'महापूरें झाडें जाती । तेथे लव्हाळे राहती ।' -तुगा १०४३. ॰प्रयास-पु. मोठे परिश्रम, कष्ट, प्रयत्न, खटाटोप. ॰प्रलयपु. १ प्रत्येक ४३२००००००० वर्षांनीं होणारा सर्व जगाचा नाश. २ ब्रह्मदेवाच्या शंभर वर्षांनीं होणारा सर्व (देव, ब्राह्मण, साधू, ब्रह्मा यासह) विश्वाचा नाश. 'जो ब्रह्याच्या स्थूळ देहाचें मरण । तो महाप्रलय जाण ।' महाकल्प पहा. ॰प्रयासपुअव. फार मोठे कष्ट, श्रम, प्रयत्न. ॰प्रसादपु. १ धार्मिक किंवा देवाच्या उत्सवा- नंतर वाटतात तो फुलें, मिठाई, जेवण इ॰ रूप प्रसाद. २ देव, गुरु इ॰पासून मिळालेली प्रसादाची वस्तु (कृपा, अनुग्रह म्हणून). ३ (शब्दशः व ल.) मोठी कृपा, अनुग्रह 'महाप्रसादाचेनि हरिखें । सप्रेम सुखें डुल्लती ।' ॰प्रस्थानन. (मोठा प्रवास) १ यथार्थ ब्रह्मज्ञानानंतर येणारा मृत्यु. २ (ल) मरण; मृत्यु ॰प्राणपु. १ मोठ्या जोरानें व प्रयासानें केलेला उच्चार: हकारयुक्त उच्चार २ जोरानें आणि प्रयासानें उच्चारण्याचा वर्ण. जसें-ख, घ, छ, झ, ठ, ढ, थ, ध, फ, भ, आणि ह अल्पप्राण आणि बाह्य प्रयत्न पहा. ॰फणी-पु. मोठा साप. ॰फल-ळ-न. मोठे, उत्कृष्ट फळ; नारळ. फणस इ॰ ॰बलि-ळी-पु. पिशाच्चादिकांस संतुष्ट कर- ण्यासाठीं मांस, अन्न इ॰ चा बलि, अर्पण करावयाचा पदार्थ ॰बळी-वि. अत्यंत प्रबळ, सामर्थ्यवान्. 'महाबळी प्राणदाता सकळां उठवी बळें ।' -मारुतिस्तोत्र. ॰बळी बुटी-स्त्री. रुंदट पानाचें आलें. ॰भाग-वि. १ अतिशय भाग्यवान् 'नित्य निष्काम अतिप्रीतीं । मज भजती महाभाग ।' -एभा २४ ३३५. २ सद्गुणी; सद्वर्तनी. ॰भारत-न. व्यासप्रणीत कौरव-पांडवाच्या युद्धाचें भारतीयांचे पवित्र असें एक महाकाव्य; महापुराण ॰भूत-न. पृथ्वी, आप तेज, वायु आणि आकाश ह्या पंचमहाभूतांपैकीं प्रत्येक. 'तरी होसी गा तूं परब्रह्म । जें या महाभूता विसंवतें धाम ।' -ज्ञा १०. १४९. ॰भेड-वि. अत्यंत भितराः भेकड. 'मग विरा- टाचेनि महाभडें उत्तरें ।' -ज्ञा ११ ४६९. ॰मणि-पु. मौल्यवान् रत्न; हिरा, माणिक इ॰ 'कांचोटी आणि महामणी । मेरू मषक सम नव्हे ।' -ह १ ८४. ॰मति-मना-वि. थोर अंतःकरणाचा; उदार मनाचा; महात्मा. ॰मंत्र-पु. निरनिराळ्या देवतांचा मुख्य मंत्र. जसें-गायत्री हा ब्राह्मणाचा महामंत्र. 'महामंत्र आत्मप्रा- प्तीची खाणी ।' ॰मंत्री-पु. मुख्यप्रधान; मुख्य मंत्री सल्लागार. ॰महोपाध्याय-पु. मोठ्या शास्त्राला देतात ती एक सन्मानाची सरकारी पदवी. ॰म/?/त्र-पु. हत्ती हांकणारा; महात. 'मुरडावया मत्त हस्ती । महामात्र दोन्हीं हस्तीं । अंकुश हाणी तैसा श्रीपती । मर्मोद्धाटनें करितसे ।' -यथादी २.१६. ॰माया-स्त्री. १ पार्वती; दुर्गा. २ जगदुत्पादक शक्ति; सर्व संसाराला, प्रपंचाला कारणीभूत अशी देवता; आदिमाया; मूलप्रकृति ३ जहांबाज कजाग बायको. ॰मार-पु. मोठा मार, फटका. 'शुक्रबाणाचा महामारु ।' -मुवन ३.३८. ॰मारी-स्त्री. १ महामृत्यु. 'तेथ अचेतना झुंजारीं । न मरत्या महामारीं ।' -एभा २८.२५०. २ (ल.) प्राणसंकट. 'तिचेनि योगें महामारी पातली हे जाणिजे ।' -मुवन ७.१८७. ३ पटकी या सांथीचा रोग. ४ या रोगाची अधिष्ठात्री, दुर्गादेवी. ५ जिवापाड श्रम; शिकस्तीचा प्रयत्न. ६ हाणाहाणी; मारामारी; मोठें युद्ध. 'दोघे झुंजतां महा- मारी' -मुवन ३.३६. 'तैसी मांडिली महामारी ।' -कथा २.२.६०. ॰मृत्यू-पु. मरण; मृत्यू (अपमृत्युविषयीं बोलतांना उपयोग) जसें- 'अपमृत्यूचा महामृत्यु झाला.' ॰मृत्युंजय- (वैद्यक) एक औषध. ॰यंत्र-न. तोफ. ॰यज्ञ-याग-पु. मोठा यज्ञ; पंच महायज्ञांपैकीं प्रत्येक; पंचमहायज्ञ पहा. 'तरी महायाग- प्रमुखें । कर्मे निफज नाही अचुकें ।' -ज्ञा १८. १६६. ॰यात्रा- स्त्री. १ काशीयात्रा. २ (ल.) मरण; मृत्यु. 'आधीं पेशवाई सकट सगळ्यांना महायात्रेला धाडीन.' -अस्तंभा १६२. महा- प्रस्थान पहा. ॰रथ-रथी-पु. १ शस्त्रास्त्रांत प्रवीण असून दहा हजार धनुर्धारी योद्ध्यांबरोबर एकटाच लढणारा योद्धा. 'महारथी श्रेष्ठ । द्रुपद वीरु ।' -ज्ञा १.९८. २ (ल.) अत्यंत शूर, कर्तब- गार पुरुष किंवा मोठा वक्ता. ॰रस-न. १ ब्रह्म. २ पक्वान. -मनको. ॰राज-पु. १ सार्वभौम राजा; सम्राट. २ (आदरार्थी) श्रेष्ठ माणूस. ३ जैन, गुजराथी वैष्णव लोकांचा गुरु. ॰रात्रि- स्त्री. महाशिवरात्र माघ वद्य चतुर्दशी. ॰राष्ट्र-नपु. मराठे लोकाचा देश; उत्तरेस नर्मदानदी, दक्षिणेस कर्नाटक, पूर्वेस तैलंगण आणि पश्चिमेस समुद्र यांनीं मर्यादित असलेला प्रदेश; मुंबई इलाख्यां- तील एक विभीग. ॰राष्ट्र-राष्ट्रीय-वि. महाराष्ट्रदेशासंबंधाचे (लोक, भाषा, रिवाज इ॰). ॰राष्ट्र-भाषा-स्त्री. मराठी भाषा; संस्कृत-प्राकृत भाषेपासून झालेली एक देशी भाषा. ॰राष्ट्री- एक जुनी प्राकृत भाषा. ॰रुख-पु. एक प्रकारचे झाड; महावृक्ष. 'कर्वत लागला महारुखा । म्हणे पुढती न दिसे निका ।' -मुआदि ३३.२९. ॰रुद्र-पु. १ रुद्राभिषेकाचा एक प्रकार; अकरा लघुरुद्र; लघुरुद्राच्या उलट शब्द महारुद्र. २ मारुती. 'महारुद्र आज्ञेप्रमाणें निघाला ।' -राक १.१. ॰रुद्रो-पु. (गु.) बाजरीची मोठी जात हिचें काड फार उंच होतें -कृषि २७७. ॰रोग-पु. १ अत्यंत दुःखदायक असा रोग. याचे आठ प्रकार आहेत-वात- व्याधि, अश्मरी, कृछ्र, मेह, उदर, भगंदर. अर्श आणि संग्रहणी. कांहींच्या मतें हे नऊ आहेत; त्यांत राजयक्ष्मा हा एक जास्त असून कृछ्राऐवजीं कुष्ठ व संग्रहणीच्या ऐवजीं ग्रहणी अशीं नांवें आहेत. २ रक्तपिती; गलित कुष्ठ. महार्घ-वि. १ महाग; दुष्प्राप्य. 'महार्घ येथें परमार्थ जाला ।' -सारुह १.२१. २ मौल्यवान् [सं. महा + अर्घ] महार्णव-पु. मोठा समुद्र; महासागर. 'वनीं रणीं शत्रु-जलाग्निसंकटी । महार्णवीं पर्वत-वास दुर्घटीं ।' -वामन स्फुट श्लोक ३५. (नवनीत पृ. १३७.) -न. १ (ल.) मोंठें, दीर्घकाल चाललेलें भांडण; युद्ध; लढाई. 'दोघां मांडलें महार्णव । दाविती बळ प्रौढीगौरव ।' -निगा २४. २ प्रसिद्धि; डांगोरा; जघन्यत्व. ३ लहान काम, प्रकरण, गोष्ट इ॰ ला मोठें रूप देऊन सांगणें; राईचा पर्वत करणें. 'एवढ्याशा गोष्टीचें त्वां लागलेंच महार्णव केलेंस.' [सं. महा + अर्णव] ॰लय-पु. १ आश्रयस्थान; आश्रम; धर्मशाळा. २ देऊळ. ३ परमात्मा. ४ भाद्रपद वद्यपक्षां- तील पितरांप्रीत्यर्थ केलेलें श्राद्ध; पक्ष; मृतपितृकानें भाद्रपद शुद्ध पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत दररोज करावयाचें श्राद्ध. हें रोज करणें अशक्य असल्यास १५ दिवसांतून एका उक्त दिवशीं करावें. [महा + आलय] ॰लक्ष्मी-स्त्री. १ विष्णुपत्नी २ अश्विन शुद्ध अष्टमीस पूजावयाची एक देवता, त्या देवतेचे व्रत. ३ भग- वती; कोल्हापूरची देवी. ४ (ना.) ज्येष्ठागौरी; भाद्रपद शुद्ध नव- मीस पूजा करावयाच्या देवता. ॰लिंग-न. बारा ज्योतिर्लिंगांपैकीं प्रत्येक. ॰वटी, माहावटी-स्त्री. राजमार्ग. 'हे कपटाची कस(व)टी । अनृत्याची माहावटी ।' -भाए ७५५. ॰वस्त्र-न. उंची, सुंदर वस्त्र; प्रतिष्ठित वस्त्र; शालजोडी इ॰ ॰वाक्य-न. वेदांतील जीवब्रह्माचें ऐक्य दाखविणारें तत्त्वमसि आदि वाक्य हीं चार वेदांची चार आहेत. 'तो महावाक्याचेनि नांवें । गुरुकृपे- चेनि थांवें ।' -ज्ञा १८.४०४. २ गायत्री मंत्र. ॰वात-पु. (तासीं ८० मैल वेगाचा) सोसाट्याचा वारा; झंझावत; तुफान. 'महावात सूटला म्हणुनि का कंप येत भूघरा ।' -सौभद्र. ॰विषुव-न. मेष संपात; हरिपद. ॰वृत्त-न. ज्या वृत्ताची पातळी गोलाच्या मध्य बिंदूतून जाते तें वृत्त; मोठें वर्तुळ. ॰वोजा-वि. मोठ्या थाटांची; तेजस्वी. 'संतोषोनी महाराजा । सभा रचित महवोजा ।' -गुच ३४. ९७. [महा + ओजस्] ॰व्याधि-पु. महारोग; रक्तपिती. ॰शब्द- पु. बोंब; शंखध्वनि. ॰शय-पु. १ थोर पुरुष; महात्मा, २ मोठ्या माणसांस महाराज रावसाहेब याप्रमाणे संबोधावयाचा शब्द. [सं. महा + आशय; बं. मॉशे; फ्रें मुस्ये (माँसिय)] ॰शिवरात्र-त्रि-स्त्री. माघ वद्य चतुर्दशी. ॰शून्य-न. जें कांहींच नाहीं असें जें शून्यास अधिष्ठानरूप ब्रह्म तें; परब्रह्म. 'आतां महा- शून्याचिया डोहीं । जेथ गगनासीचि ठावो नाहीं ।' -ज्ञा ६. ३१५. ॰महाष्टमी-स्त्री. अश्विन शुद्ध अष्टमी. ॰सरणी-स्त्री. स्वर्गमार्ग. ' होउनि सुयोधनाचा शोकार्त वरो पिता महास- रणी ।' -मोभीष्म ११.१५. ॰सागर-पु. पृथीवरील पाण्याचा सागराहून मोठा सांठा; मोठासमुद्र. उदा॰ हिंदी महासागर. ॰सिद्धांत-पु. एकमेवाद्वितीयं ब्रह्म हा मुख्य सिद्धांत. 'आणि महासिद्धांतापासीं । श्रुति हारपती शब्देंसीं ।' -ज्ञा १५.४३४. ॰सिद्धि-स्त्री. अष्टमहासिद्धी पहा. 'जेथ महासिद्धींचीं भांडारें । अमृताचीं कोठारें ।' -ज्ञा ६.३२१. ॰सुख-न. ब्रह्मसुख; ब्रह्म साक्षात्कार. 'जेथ परमानंदु केवळु । महासुखाचा ।' -ज्ञा १.१४. ॰स्म(श्म)शान-न. काशीक्षेत्र. 'सदाशिव बैसता निजासनीं । महाश्मशानीं निजवस्ती ।' -एभा २.३१. ॰क्षेत्र-न. काशी- क्षेत्र. -रा ३.४७६. ॰महेंद्र-पु. १ हिंदुस्थानांतील पर्वताच्या सात रांगांपैकीं एक. २ इंद्राचें नांव. 'हें महेंद्रपदही पाविजेल । परि मोह हा न फिटेल ।' -ज्ञा २.६५. [महा + इंद्र] महेश, महेश्वर-पु. शिव; शंकर. [महा + ईश्वर] महेश्वरी पातळ-न. महेश्वर नांवाच्या गांवी (इंदूर संस्थान) तयार झालेलें वस्त्र, पातळ. 'आधींच कंबर बारिक त्यावर महेश्वरी पातळ कसलें ।' -होला ८९. महोत्सव, महोत्साह-पु. मोठा उत्सव; आनंद- दायक प्रसंग. [महा + उत्सव] महोदधि-पु. १ महासागर; मोठा समुद्र. ' महोदधीं कां भिनले । स्त्रोत जैसे ।' -ज्ञा १५.३१७. २ हिंदीमहासागर [महा + उदधि] महोदय-पु. माघ किंवा पौष महिन्यांत सोमवारी सूर्योदयीं अमावस्यारंभ श्रवण नक्ष- त्राचा मध्य आणि व्यतिपाताचा शेवट यांचा योग; एक मोठें पर्व. [महा + उदय] महौजा-वि. तेजस्वी; ज्याचें तेज मोठें आहे असा; सामर्थ्यवान् 'पुरुष श्याम महौजा ओढित होता बळेंचि मजला जो ।' -मोवन १३.८८. [महा + ओज] महान्-वि. १ मोठा; विस्तृत; थोर. २ उशीरा पिकणारें (धान्य, पीक); गरवें ३ दोन किंवा अनेक वर्षें टिकणारें (झाड, मिरची, कापूस, पांढरी तूर इ॰).

दाते शब्दकोश