मराठी बृहद्कोश

सात मराठी शब्दकोशांतील २,८४,८८८ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

संबंधित शब्द

भाकर-री

स्त्री. १ जोंधळा, बाजरी इ॰ च्या पिठाचा चपटा आणि वाटोळा (जाड-पोळीसारखा) भाजून केलेला खाद्य पदार्थ. 'वीरांची उत्पत्ति, वीरांचें संगोपन व वीरांचें तेजोवर्धन स्वकष्टाच्या भाकरी करीत असतात.' -सत्वपरीक्षा ७७. देशावर भाकर (अनेक वचन भाकरी) व कोंकणांत भाकरी (अनेक वचन भाकर्‍या) अशीं रूपें रूढ आहेत. भाकर शब्द थोडा अशिष्ट मानतात. २ पाण्या- वर उडविण्याचा चपटा दगड आणि हा खेळ. [सं. भक्ष्याहार] म्ह॰ भाकरीस तोंड नाहीं भांडणास मूळ नाहीं. ॰पायानें खाणें-मोडणें-मूर्ख, वेडगळ असणें. भाकरीला भूक लागली-जेवण वाट पाहात आहे. सामाशब्द- ॰काला-पु. भाकरी व इतर खाद्य पदार्थ यांचा कुसकरा; दूधभाकरी. 'मुख- प्रक्षालन करी । अंगिकारी भाकरकाला ।' -घन श्यामाची भूपाळी. ॰खाऊ-वि. (निंदार्थी) भाकरी हें ज्याचें खाणें आहे असा (शेतकरी, कुणबी इ॰). याच्या उलट भात खाऊ म्हणजे पांढर- पेशा. [भाकर + खाणें] ॰तुकडा-पु. (क्षुद्रतादर्शक संज्ञा) १ भाकरी. २ अन्न; जेवण. ॰बडव्या-वि. (तिरस्कारार्थीं) दुसर्‍याच्या घरीं आचारीपणा करून उपजीविका करणारा; स्वयंपाकी. [भाकर + बड- विणें] ॰मोड्या-वि. १ भाकरखाऊ पहा. २ तुकडमोड्या. भाक- रीचा खेळ-पु. पाण्याच्या पृष्ठभागाला तीन चार वेळां स्पर्श करून पुढें जाईल अशाप्रकारें खापर्‍या किंवा चपटे दगड पाण्यावर फेकण्याचा मुलांचा खेळ. भाकरीचा पिंड-पु. मुख्यत्वें भाकरी- वर पोसला गेलेला, भाकरी मानवणारा मनुष्य; भाकरखाऊ. भाकरीची चाकरी-स्त्री. पोट भरण्याकरितां करावी लागणारी नोकरी. 'कल्पनांचा सुखसंचार संपला आणि एकलकोंडा भविष्य- काळ व भाकरीची चाकरी डोळे फाडून दटावूं लागली.' -तीन- आणेमाला १०. भाकरीचें झाड-न. एक प्रकारचेंझाड. हें दक्षिण पॅसिफिक महासागराच्या बेटांतून होतें; यापासून भाकरी करतात. भाकर्‍या-वि. दुसर्‍याच्या घरीं तुकडे मोडणारा; उपट- सुंभ. भाकर्‍या भाजणें-मुलींचा खेळ. -मखेपु ३४६. लष्क- रच्या भाकर्‍या भाजणें-नसत्या उठाठेवी करणें. (पूर्वी ज्या ठिकाणीं लष्करी तळ पडे त्या ठिकाणच्या लोकांना भाकर्‍या भाज- ण्यास लावीत). भाकर्‍या निवडुंग-पुन. फड्यानिवडुंग पहा.

दाते शब्दकोश

अर्धार्धें

क्रिवि. १ अर्धा (वांटणीचा भाग दर्शवितांना एकंदर संख्येपैकीं प्रत्येकाविषयीं बोलावयाचें झाल्यास). 'सर्वांस अर्धाल्या भाकर्‍या दे.' 'अर्धाला खांब पूर.' [आकारांत विशेषणांना 'ला' हा विभागणीवाचक प्रत्यय लागतो. उ॰ मोठाला, इवलाला इतकाला, इ॰ अर्धा + ला]

दाते शब्दकोश

भाकर

भाकर bhākara f Bread, or a cake of bread, sometimes of wheaten meal or flour, but commonly of meal of bádzriacute;, जोंधळा &c. Pr. भाकरीस तोंड नाहीं भांड- णास मूळ नाहीं. The law of the use of this word is thus:--भाकर pl भाकरी is the form in the Desh, but, especially, amongst the vulgar. भाकरी is the classic form, signifying Bread, a cake of bread, cakes of bread, the particular sense and the number being determined by the number, singular or plural, of the adjective or verb in construction. भाकरी is the form in the Konkan̤--always singular, becoming in the plural भाकऱ्या. For a plain cake of wheaten meal or flour (a bannock or sconce) the term is पोळी. भाकरीला भूक लागली Dinner is waiting Sir. भाकरी पायानें खाणें or मोडणें To be idiotic or crazy.

मोल्सवर्थ शब्दकोश

चपाट

न. राखरांगोळी, निःशेषता; सत्यनाश; उध्वस्त जमीनदोस्त केलेली किंवा खाऊन फडशा पाडलेली स्थिति. 'चावोनी चपाट केले भक्त भोळे । अव्यक्त ठेविलें निजप्रेम ।' -ब ७०५. 'त्यानें शंभर लाडवांचें एका क्षणांत खाऊन चपाट केलें. -वि. १ उध्वस्त केलेला; जमीनदोस्त केलेला; सपाट करून टाकलेला; लुटलेला. 'पेंढार्‍यांनीं गांवचे गांव चपाट करून टाकले.' २ खाल्लेला; फन्ना उडविलेला; साफ; चाटूनपुसून स्वच्छ, गुळगुळीत केलेला. 'त्यानें दहा भाकर्‍या खाऊन चपाट केल्या.' [चपटा, चापट, चापणें]

दाते शब्दकोश

हटकोरी

हटकोरी haṭakōrī m (In poetry, ballads &c. for हटकरी) A bazar-man or a market-man. Ex. राम्या राम्या लांब दोरी हटकोऱ्याच्या भाकऱ्या चोरी.

मोल्सवर्थ शब्दकोश

हट-ट्ट

पु. बाजार; मंडई; विशषतः फिरता बाजार, जत्रा. [सं. हट्ट] म्ह॰ १ हटीं जेवण मठीं निद्रा. (स्वैराचार दाखविण्या- साठीं योजतात). २ हट गोड आहे परंतु हात गोड नाहीं. (बाजारी माल चांगला आहे पण तयार करणारा चांगला नाहीं). हटास ओघळ जाणें-रेलचेल, समृद्धि असणें. ॰करीकरीण-पु. स्त्री. १ बाजारकरी; बाजारकरीण. २ बाजारांत विक्री करणारा माणूस, स्त्री; दुकानदार. ॰कोरी-पु. हटकरी पहा. 'राम्याराम्या लांब दोरी, हटकोर्‍याच्या भाकर्‍या चोरी.' ॰बाजार-पु. बाजारहाट. 'कुटुंबवत्सळ खर्च पदरीं । म्हणवूनि धावे हटबाजारीं ।' ॰वट- स्त्री. फळें; भाजीपाला विकण्याची जागा; भाजीबाजार. ॰विला- सिनी-स्त्री. वेश्या; बाजारबसवी. [सं.] हटाऊ-वि. १ बाजारासंबंधीं; बाजारी. २ हलका; क्षुद्र; नीच. म्ह॰ हटाऊ गुरु आणि शिटाऊ-पटाऊ-भेटाऊ चेला.

दाते शब्दकोश

लशकर or लषकर

लशकर or लषकर laśakara or laṣakara n ( P) An army. Note. This word formerly had, and still sometimes has, especial reference to Sindiá's army. 2 m A lascar. लशकरच्या भाकऱ्या कोण भाजील Who will devote himself to serve the stranger-world--i.e. who will toil or work but for his own? Also--who can decide or judge satisfactorily to a thousand litigants?

मोल्सवर्थ शब्दकोश