मराठी बृहद्कोश

नऊ मराठी शब्दकोशांमधील २,६२,७३६ शब्दांचा एकत्रित संग्रह

शब्दार्थ

भीक

स्त्री. १ भिक्षा; दानधर्म. २ अभाव; कमताई; उणीव; वैगुण्य. 'सर्व गोष्टीची भीक आहे.' [सं. भिक्षा; प्रा. भिक्खा] म्ह॰ १ भिकेची हंडी शिंक्यास चढत नाहीं. २ भीक नको पण कुत्रा आवर. (वाप्र.) भीक असून द(दा)रिद्र(द्र्य)कां- भिक्षेकर्‍याचा धंदा पतकरल्यावर मग अडचण कां सोसावी? ॰काढणें-क्रि. अडचण सोसणें; दारिद्र्य अनुभविणें. ॰घालणें- क्रि. १ (ल.) वचकून असणें. 'तो माझ्यावर आपला अंमल चालवूं पाहतो, पण मी कोठें त्याला भीक घालायाला बसलों आहें !' ३ मोजणें; मानणें; जुमानणें. 'बायकांच्या धमका- वणीला कां तुम्ही भीक घालणार?' २ मागितलेली वस्तु देणें; एखाद्याची विनंती मान्य करणें (हा प्रयोग नेहमीं नकारार्थीं असतो). 'मीं त्याला परोपरीनें विनविलें, पण त्यानें माझ्या शब्दाला भीक घातली नाहीं.' ॰न घालणेंक्रि. अतिशय तुच्छ लेखणें. ॰लागणें-क्रि. १ फार मागणी असणें; अतिशय चणचणीचा असणें. २ भिकेस मिळणें; कमताई असणें. भिकेचा डोहळा- पु. दारिद्र्य आणणारी हलकट, नीच, भिकार खोड, कृत्य, इच्छा. (क्रि॰ लागणें, आठवणें, होणें) भिकेचे डोहाळे होणें-क्रि. दारिद्र्यादि दुर्दशा येण्यापूर्वीं तदनुरूप पूर्वींच्या संपन्न स्थितीत विरुद्ध अशा वासना होणें (ज्या प्रकारची संतति व्हावयाची असते त्या प्रकारचे डोहाळे-वासना गर्भारपणीं बायकांना होतात यावरून). भिकेवर लक्ष्य ठेवेणें-भीक मागण्याचा प्रसंग येईल अशा रीतीनें वर्तन करणें. आळशी, उधळा इ॰ बनणें. भिकेवर श्राद्धन. १ भिक्षेवर केलेलें श्राद्ध; भिकार, चुटपुटीत श्राद्ध. २ (ल) दिलेल्या, उसन्या घेतलेल्या, तुटपुंज्या सामग्रीवर भिकार- पणानें चालविलेला धंदा, काम. (क्रि॰ करणें, होणें). सामाशब्द- ॰दुःख-न. भीक मागण्याची दुःखकारक स्थिति. ॰पायली- स्त्री. गांवकर्‍यांकडून महारास दिलें जाणारें धान्य. ॰बरी-स्त्री. भिक्षा; धर्म. (क्रि॰ मागणें). [भीक द्वि.] भी(भि)क बाळी- स्त्री. पुरुषांचा उजव्या कानांत घालावयाचा मोत्याचा दागिना. पुर्वी ही भिक्षा मागून मिळविलेल्या सोन्याची अथवा त्या पैशांचें सोनें घेऊन त्याची करीत. ॰मागता-माग्या-वि. भिक्षा मागणारा; भिकारी. म्ह॰ भीक मागत्या दहा घरें. भिकणें-न. १ भिक्षा मागून मिळालेली एखादी वस्तु; भिक्षा. (क्रि॰ मागणें). २ जोशी, भक्त, उपाध्याय इ॰ कांस दिलेलें बक्षीस, इनाम. ३ धर्मादाय. ४ धर्मादाय म्हणून सरकाराकडून घेण्यांत येणारा कर. ५ बलुतेंअलुतें; बलुतेदार इ॰ स धान्य देणें. ६ जकातीच्या उत्पन्नांतील पतकीस दिलेला हक्क. ७ भिकारीपणा; दारिद्र्य. (क्रि॰ लागणें).

दाते शब्दकोश

भीक bhīka f (भिक्षा S) Alms. Pr. भिकेची हंडी शिक्यास चढत नाहीं. Pr. भीक नको पण कुत्रा आवर. 2 Want or lack. Ex. सर्व गोष्टीची भीक आहे. भीक काढणें To suffer want; to know poverty. भीक न घालणें (To refuse even charity unto.) To despise exceedingly. भीक लागणें g. of s. To be in great demand; to be very scarce. भीक लागणें with acc. of o. To be reduced to beggary. भिकेचा डोहळा. m A mean, low, beggarly (trick, act, desire) considered as a prognostic of approaching poverty. v लाग, अठव, हो. भीक असून दरिद्र कां Since you beg (i. e. consent to the place and work of a beggar) why yet are you poor (i. e. why beg at one door or at ten doors, when you might beg at a hundred)? भिकेवर लक्ष्य ठेवणें To have an eye to beggary, i. e. to be indolent, unthrifty &c. भिकेवर श्राद्ध with करणें or होणें Shráddh made upon alms, i. e. poor or scanty shráddh. Hence fig. Any business conducted or work performed upon given or borrowed materials and in a poor way. Hence भिकेवर श्राद्ध कोठें होतें? An exclamation in expression of one's conviction of any utter inadequacy or insufficiency.

मोल्सवर्थ शब्दकोश

भीक f Alms. Want or lack. भाक न घालणें Despise exceedingly. भीक लागणें. Be in great demand, भिकेचा डोहळा m A mean, low (trick, act, desire) considered as a prognostic of approaching poverty. भिकेर श्राद्ध करणें Any business conducted or work performed upon given or borrowed materials and in a poor way.

वझे शब्दकोश

(सं) स्त्री० भिक्षा, मधुकरी.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

भिक(कु)टणें

सक्रि. झाडाच्या डहाळ्या, पानें ओरबडणें.

दाते शब्दकोश

संबंधित शब्द

याचक

पु. १ भिकारी; भीक मागणारा; २ मागण्यास आलेला मनुष्य. [सं. याच्-मागणें] ॰वृत्ति-स्त्री. भिक्षुकी; भिक्षा मागण्याचा धंदा; भिक्षा मागून पोट भरणें. [सं. वृत् = राहणें] याचकी, याचकाई-स्त्री. भिक्षुकी; भिकारीपणा. याचणें-सक्रि. १ मागणें; विनंति करणें; प्रार्थना करणें. २ भिक्षा मागणें; एखाद्यापाशीं भीक मागणें; एखादी वस्तु मागणें. [सं. याच् = भीक मागणें] याचन-ना-नस्त्री. भिक्षा; भीक; विनंति; अर्ज; प्रार्थनापूर्वक मागणें. याचनीय-वि. भीक मागण्यासारखी; भिक्षा मागण्यास किंवा घालण्यास योग्य, लायक. [सं.] यांचा, याञ्चा-स्त्री. याचना. [सं. याञ्चा] याचित- वि. मागितलेलें; ज्याच्या जवळ याचना केली तो (मनुष्य). [सं.] याचिता-वि. भिक्षा मागणारा; भिकारी; याचक. याची-पु. याचक. 'असें असतां द्विज पांचसात याची । ' -र ३.

दाते शब्दकोश

लोलो

पु. शब्दांच्या उच्चाराचा शुद्धपणा, योग्य ठिकाणीं शब्दावर आघात देणें, विराम इ॰ कडे लक्ष न देतां केलेलें घोकणें, भाषण, वाचन, वेदपटन इ॰; सरासरी ग्रंथ घोकीत किंवा पढत असणें. -उद्गा. गुरांना पाणी पाजतांना गुराखी उच्चारतात तो शब्द. [ध्व.] ॰करणें-(क.) भांडणें. ॰घालणें-१ कसेंतरी वाचणें; सरासरी ग्रंथ पठन करणें, घोकणें इ॰. २ भिकाऱ्यानें तगादा करून किंवा लोचटपणानें भीक मागणें; (शिमग्यांत होळकर भीक मागतात तशी) उद्धटपणानें किंवा जोराने भीक मागणें.

दाते शब्दकोश

अवंतण-णें-न., अवता

पु. १ आमंत्रण; बोलावणें. (क्रि० देणें, सांगणें, करणें). 'जन्ममरणासी अवतणें । दीधलें तेणें सर्वथा ।' -एरुस्व १२.३८. २ अक्षता टाकून आव्हान करणें; विधिपूर्वक बोलावणें, अभिमंत्रण करणें. आवंतण पहा. म्ह० अवतण टाकून भीक मागणें = दिलेल्या आमंत्रणाला झिडकारून भीक मागत हिंडणें म्हणजे (ल.) मूर्खपणानें वागणें. [सं. आमंत्रण; प्रा. आमंतण- अपभ्रष्ट आवंतण; द्रा. अउतण]

दाते शब्दकोश

भिका

भीक पहा. -वि. हलका; हिणकस. [भीक] भिका- वरख-पु. भिकार वरख; वाईट कागदाचा अर्धा, सगळा बंद. भिकाबंद पहा. भिकें, भिकेबंद-नपु. भिकाबंद पहा. भिके- सवता-पु. भिकारी. 'जगाचा जो नित्य दाता । तो आशेनें केला भिकेसवता ।' -एभा ८.३१२. भिका(खा)ळ-स्त्री. (प्र.) भिक्षाळ; भिक्षावळ. 'मुंजीची भिकाळ.'

दाते शब्दकोश

भीकदुःख

भीकदुःख bhīkaduḥkha n (भीक & दुःख added to throw an air of pitiableness over the hard resource of asking charity.) भीकबरी f (भीक by redup.) Alms or charity indefinitely. v माग.

मोल्सवर्थ शब्दकोश

झक

(स्त्री.) [फा. दक् झइन्] भीक. झक मारणें= भीक मागणें, अनाठायीं काम करणें; बोम्बलणें. “मागें (= मेल्यावर) दौलत...किल्ले स्वामींचे स्वामी घेतील. कर्ज़दार झक मारीत राहतील!” (खरे १|१७७).

फारसी-मराठी शब्दकोश

झोळी

स्त्री. १ झोळणा पहा. २ चौपदरी; दोन दोन कोंपर्‍यास गांठ दिलेलें फडकें (भाजीचें, भिक्षेचें). ३ वस्त्राचा पाळणा; दोर्‍यांचा विणलेला पाळणा. ४ (सामा.) पिशवी. [सं. झौलिक = लहान पिशवी; प्रा. झोलिआ; का. जोळिगि; हि. झोली] ॰बंद-वि. भिकारी; भीक मागण्याचा धंदा करणारा. 'तो दाली- बंद मी झोळीबंद.' झोळी घेणें-सांवरणें = भीक मागणें. झोलीकोपरगांवाचा सुभा-पु. भिकेचा धंदा. (क्रि॰ घेणें).

दाते शब्दकोश

भिक्षा

स्त्री. १ भीक; धर्म; भिकार्‍यांस दिलेला पैसा, अन्न इ॰. (क्रि॰ घालणें, देणें). २ धर्मार्थ संन्यासी, योगी इ॰ कांस दिलेलें भोजन. ३ (ल.) करुणापूर्ण शब्दांनीं केलेली मागणी, मागित- लेली वस्तू. 'तूं कोण्हावर रागें भरूं नको एवढी मला भिक्षा दे.' [सं. भिक्ष्] म्ह॰ भिक्षापती कीं लक्षापती. भिक्षणें-सक्रि. (काव्य) भिक्षा मागणें; याचना करणें. भिक्षागृह-न. अनाथगृह; कंगालखाना. 'या कोटीवरून आम्हांस भिक्षागृहाची आठवण होते.' -नि ५१०. [सं.] भिक्षाटन-ण-न. भिक्षा मागत फिरणें; भैक्ष्य, भैक्ष्यचर्या. [सं. भिक्षा + अटन] ॰भाग्य-न. (राजा.) भिक्षेचें भाग्य; भिक्षा मागण्यानें पैसा मिळावा असलें नशीब. [सं.] भिक्षार्थी-वि. भिक्षेची याचना करणारा; भिकारी. [सं.] ॰हारी-वि. भिक्षेवर निर्वाह करणारा. [सं. भिक्षा + आहार] भिक्षाळ, भिक्षावळ-स्त्री. १ मुंजींत बटूनें आईजवळ भिक्षा मागणें आणि तिनें व इतर सुवासिनींनीं त्यास भिक्षा (लाडू, फळें, द्रव्य इ॰) घालणें. २ अशा रीतीनें मागितलेली भिक्षा. ३ ही भिक्षा घालण्याचा समारंभ. भिक्षित-वि. भिक्षा मागून आण- लेला; याचित. भिक्षेकरी-पु. भिकारी. भिक्षेश्वरी-स्त्री. भीक. म्ह॰ भिक्षेश्वरी किंवा लक्षेश्वरी. [सं.] भिक्षोपजीवी-वि. भिक्षेवर उपजीविका करणारा. [सं. भिक्षा + उपजीविन्]

दाते शब्दकोश

(सं) स्त्री० भीक, दान.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

मांग

पु. एक हिंदु जात व तींतील व्यक्ति. फाशी देण्याचें काम यांचेकडे असे; यांच्यांतील कांहीं सांकेतिक शब्द- हिडका = मारामारी. कुडतुल = पेटी. धादल, खडल = फोडणें. कुडपळ = गाडी. गांगल = चांभार. पेडणें = पळून जाणें. खुमर = दार. तवला = खुनासहित, दरोडा. शेग = मालाचा वाटा. पेडम, भुरा = युरोपियन. हलक, हलवा = सोनें किंवा चोरीचा माल. दुबक, फुकणी = बंदूक. कूड, कुडच = घर. नादी, खवडी = घरफोडी. बे, बोय = दिवा. चिलड = कुलूप. खारपे, दमुल = पैसा. ऊन = चांदणें. झुकीर, मुलसी = पोलीस. ताड = दोरी. हुरकत, पेडा, हुराकडा = पळ. तोलकला = निजला. निल- गंटी = काठी. कडूल, कटनूल = तलवार; हत्यार. मूच, नली = चोरी. इ॰ -गुजा. [सं. मातंग] (अंगांत) मांग शिरणें-येणें-रागावणें; त्वेष चडणें. ॰गारु(रो)डी-पु. मांगांतील एक पोटजात. हे म्हशी विकतात व भादरतात. यांच्या टोळ्या गांवाबाहेर पालांत उतरतात; ढोल बाजवून नजरबंदीचा खेळ करतात. धान्य, मेंड्या इ॰ चोर- तात. ॰गारूड-न. १ मांगगारुड्याची जादुगारी; मूठ फेकणें. मांगटा-डा-पु. १ (निंदार्थी) मांग. २ मांगाचा भाट व उपाध्याय. अस्पृ ४७. मांगणी-स्त्री. मांग जातीची स्त्री. मांगणीचा पत्री- स्त्री. अमावस्या, संक्रांत किंवा महापर्व आलें असतां भीक मागत फिरणाऱ्या मांगणीच्या टोपलींत (दुःखें व ग्रहबाधा नाहींशी करण्यांत हिचा उपयोग होतो म्हणून) टाकलेलीं द्रव्यें (धान्य, तेल, मीठ इ॰). मांगणीचें पत्तर-न. वरील भीक मागणाऱ्या मांग- णीचें तरसाळे, पोखरलेला भोपळा. मांग हृदय-यी-वि. निष्ठुर अंतःकरणाचा; निर्दय; पाषाणहृदय. [मांग + हृदय] मांग(गो) ळी-स्त्री. १ थोरल्या दिवाळीच्या दिवशीं मांग लोक मोळाचा ओढण्याकरितां दोर करून चावडीवर ठेवितात तो. २ मुंजींत मुंज्याच्या कमरेस बांधावयाची मोळाची दोरी. 'आणि स्वध- र्माची मांगळी । बांधे वाचेच्या पिंपळी । ' -ज्ञा १३.६५८. [मांग + वळी] मांगिणी-स्त्री. एक क्षुद्र देवता. 'पूजा जोगिणी मांगिणी ।' -दावि ६३. मांगेला-पु. गुजराथेंत मांगास म्हणतात.

दाते शब्दकोश

देश

पु. १ प्रांत; प्रदेश; भाषाभेदानें भिन्न झालेला प्रांत. 'देशा- सारखा वेष.' २ जागा; स्थान. 'वृक्षाचे मूळदेशीं सेचन केलें म्हणजे अग्रदेशींहि टवटवी येते.' ३ योग्य स्थान; सभोवतीची परिस्थिति, भूमि. 'देश काल पाहून काम करावें.' ४ सह्याद्री, बालाघाट, कर्नाटक व गोदावरी नदी यांमधील देश. ५ (ज्योतिष) औरस चौरस १०० योजनें यांनीं व्याप्त असा भूभाग. ६ परिसीमायुक्त भूमिभाग. जसें:- देश (महाराष्ट्र, कर्नाटक देश इ॰); प्रांत (पुणें, वाई प्रांत इ॰). या- खेरीज सुभा, परगणा, तालुका, जिल्हा, महाल, कसबा, पेटा, पुठा, मौजा, संमत, तरफ, टप्पा, मजरा, मुजरी इ॰ आणखीहि भूमिभाग आहेत. यांची माहिती त्या त्या शब्दाखालीं पाहणें. [सं. दिश् = दाखविणें. तुल॰ झें. दिश्; ग्री. देइक्नुमि; लॅ. दिकेरे; गॉं. तैहन; प्रा. ज. झीग्ऑन; लिथु. झेन्क्लास = खूण; आर्मे. लेशी; लेशवाव (गांव)] (वाप्र.) ॰घेणें, आपला देश घेणें-आपल्या स्वतःच्या कामांत लक्ष घालणें. देशाचा पाटा वरवंटा होणें- बेचिराख, ओसाड करणें. देशीं जाणें-स्वदेशास जाणें. (सामा- शब्द) ॰कार-पु. एक राग. या रागांत षड्ज, तीव्र ऋषभ, तीव्र गांधार, पंचम, तीव्र धैवत हे स्वर लागतात. जाति औडुव-औडुव. वादी धैवत. संवादी गांधार. गानसमय दिवसाचा पहिला प्रहर. -वि. (गो.) देशावरचा. ॰कारण-न. देशभक्ति; राजकारण. ॰कालवस्तुपरिच्छेदरहित-वि. काळ, स्थळ इ॰ वस्तूनें अनिश्चयात्मक अथवा अनिर्ववनीय म्हणजे सर्वव्यापी, शाश्वत, अशरीर असें ब्रह्म, आत्मा, ईश्वर इ॰ ॰कुळकरण-न. देशकुळ- कर्ण्याचें काम. ॰कुळकरणी-पु. देशपांड्या; महालांतील प्रत्येक गांवच्या कुळकर्ण्यावरील मुख्य वतनदार कुलकर्णी. याचें काम कुळ- कर्ण्याचा व खोतांचा हिशेब तपासण्याचें असतें. ॰चौगुला-पु. देशमुखाच्या हाताखालील अधिकारी. ॰ठक-वि. अट्टल सोदा; महाठक. ॰त्याग-पु. १ देशांतर. २ हद्दपारी. ॰द्रोह-पु. स्वदेशाचा विश्वासघात. ॰द्रोही-वि. देशद्रोह करणारा. ॰धडी-धडीस- क्रिवि. देशोदेशीं भीक मागत फिरण्याची स्थिति. 'नाना हव्या- सांची जोडी । तृष्णा करी देशधडी ।' -तुगा ३५५. ॰धर्म-पु. १ देशाचा धर्म. २ स्थानिक आचारविचार, चालरीत. ॰पांड्या- डे-पु. देशकुळकर्णी पहा. ॰परिच्छेद रहित-वि. (ब्रह्माचें विशेषण) देश, काळ इ॰ मर्यादेच्या बाहेरचा. ॰भक्त-वि. देशाची सेवा करणारा. ॰भाषा-स्त्री. देशाची भाषा. बोलण्याची, लोकभाषा. ॰भाषाज्ञान-न. अनेक भाषांचें ज्ञान. ॰भ्रमण- न. निरनिराळ्या देशांत फिरणें; मुशाफरी; पर्यटण; प्रवास. ॰मर्यादा-स्त्री. १ देशांतील आचारविचार; संप्रदाय; नियम; पद्धति. २ देशाची सीमा. ॰मूख-पु. १ परगण्याचा वतनदार अधिकारी. हा परगण्यांतील सर्व पाटलांवरील मुख्य असतो. २ (विनोदानें) सोनाराचें कांकता नामक हत्यार. ३ (ल.) हुलगा. (कारण यास देशांत फार चाहतात). ४ वतल (ओतल) मधून पाणी काढण्याचें मडकें. ५ (विनोदानें) पिकदाणीसारखा उपयोग करण्याचें मडकें. ६ (व.) लग्नांत आणलेलें मडकें. ॰मुखी-स्त्री. १ देशमुखाचें काम किंवा अधिकार. २ महालांतील नक्त जमा- बंदीवर शेंकडा सात आणि धान्यावर शेंकडा तीन असा कर. ॰मुखीण-स्त्री. १ देशमुखाची बायको. २ (व.) वाकळ; गोधडी. ॰लेखक-पु. देशकुळकरणी पहा. ॰वटा-पु. हद्दपारी; देशत्याग. 'मोक्ष तो पाहातसे वास । रिद्धिसिद्धि देशवटा त्रास ।' -तुगा ७२७. ॰वर-वर(ऊर)करी-देशावर-वरकरी पहा. ॰वही-स्त्री. लोकांच्या नांवांची यादी, चोपडी. 'काळाची देश- वही । वाचितां माझे नांव नाहीं.' -भाए १५१. ॰वळू-वि. देशी; खेडवळ. ॰व्यवहार-पु. देशधर्म पहा. ॰साया, शाया-वि. माळवी; सोरठी. 'आणिके देशशाया सांगडी । कोसी कनकवर्णी ।' -दाव २८१. ॰सेविका-वि. १ देशाची सेवा करणारी (स्त्री.). २ स्वयंसेविका. ॰स्थ-वि. १ ब्राह्मणांतील एक पोटजात. २ देशांत राहणारा. ॰स्थी-वि. देशस्थासंबंधीं (व्यवहार इ॰). देशाउर- देशावर पहा. 'तो देशाउरें निघाला ।' -पंच १.३९. देशाचार-पु. देशधर्म पहा; शास्त्रप्रमाण नसतांहि एखादे देशामध्यें शिष्टपरंपरेने चालत असलेला आचार. देशाटन-न. देशभ्रमण पहा. 'केल्यानें देशाटन पंडितमैत्री सभेंत संचार' देशांतर-न. १ परदेश; दुसरा देश; (धर्मसंबंधीं बाबींत) साठ योजनें दूर असणारा अथवा नदी-पर्वतानें तुटक झालेला असा देश. हा परका समजला जातो. २ याम्योत्तरवृत्तापासून पूर्वेकडील अथवा पश्चिमेकडील अंतर. देशांतरीं जाणें, देशांतर करणें-प्रवास करणें देशाधडी- धडीस-देशधडी पहा. देशाभिमान-पु. देशाचा अभिमान; स्वराष्ट्राविषयीं तळमळ, प्रेम, जिव्हाळा. 'खरा देशाभिमान म्हणजे आपल्या देशांतील लोकांचीं निकृष्टावस्थेचीं कारणें शोधून तन्निवार- णार्थ उद्योग करणें. -टिसू १०७. देशावर-पु. १ देशोदेशीं भीक मागत फिरणें.' २ -न. अशा रीतीनें मिळविलेली भिक्षा. ३ पर- देश; परदेशी व्यापाराचा, पेठेचा गांव. ४ परदेशी, आयात माल. ५ परदेशाच्या व्यापारी, किंमतीसंबंधीं बातम्या. देशावरास-देशा- वरीं जाणें-१ देशपर्यटन करणें. २ देशोदेशीं भिक्षा मागत फिरणें. देशावरकरी-कर-पु. देशोदेशीं भिक्षाटण करणारा माणूस. देशाळू-वि. (व.) देशावरचा; मोठया शहरांतील. देशिक-पु. १ प्रवासी; मुशाफर; परदेशांत फिरणारा. २ आत्मज्ञानोपदेशक सद्गुरु. ३ समूह; थवा. 'ऐसां कव्हणी नाहीं अभिचरिकू । जो होमीं कोंकिळांचां देशिकू ।' -शिशु ८४३. देशी-वि. १ घाटावरील देशासंबंधीं. २ (समासांत) त्या त्या देशासंबंधीं. जसें:- पुणेदेशी; एतद्देशी इ॰ २ मराठी भाषा; देशांतील भाषा. 'देशियेचेनि नागर पणें ।' -ज्ञा १०.४२. ११.३ देशीकार-वि. मराठी भाषेच्या आकाराचें; मराठी भाषेमध्यें रचलेलें बनविलेलें. 'केलें ज्ञानदेवें गीते । देशीकार लेणें । -ज्ञा १०.१८०५. [देशी + आकार] देशी- ताल-ताल पहा. देशीय-वि. देशी अर्थ १२ पहा. देशी- संगीत-न. निरनिराळ्या देशांतील लोकांच्या अभिरुचीप्रमाणें प्रचलित असलेलें संगीत. गान पहा. देशोधडी-धडीस-देस- धडी, धडीस-क्रिवि. देशधडी पहा.

दाते शब्दकोश

आई

स्त्री. १ जननी; माता. 'आई वदे बा न मानीं संकट' -दावि १६०. २ जगदंभा; देवी; देवींच्या नावापुढें लावावयाचें उपपद; जसें-तुकाई, मरीआई, काळकाई. ३ (संकेतिक) वारकरी पंथांतील लोक ज्ञानेश्वरीस म्हणतात. ४ (सामा.) देवी 'आईच नवसु नाहीं पुरविला' -दावि ३४७. ५ देवी (रोग); फोड्या. ६ लहान मुलाला लडिवाळपणें संबोधितात. [सं. आर्ये, किंवा अयि ? सं. आदि ? प्रा. आइ? ] शिवाय अइ पहा. म्ह॰ १ आईचें दूध कीं गायीचें दूध = दोन समान गोष्टींपैकीं सरसनिरस ठरवितां येत नाहीं अशा वेळीं योजतात. यासारखीच दुसरी म्हण- आई गोड कीं उदार = दुसर्‍याच्या मालमत्तेवर उदारपणा दाखविणें; आयती चैन करणें. ३ आई जेवूं घालीना, बाप भीक मांगू देईना = दोन संकटें आलीं असतां किंवा दोन परस्परविरुद्ध मतांच्या अधिकार्‍यांची मर्जी संभाळावयाची असतां योजतात (इकडे आड तिकडे विहीर याप्रमाणें). ४ एका आईचीं लेंकरें = बंधुभाव दाखविण्या- करितां योजतात. ५ लहानपणीं आई आई, थोरपणीं बाय- लबाई = लहानपणीं आईची आठवण वारंवार होते पण प्रौढपणीं स्त्रीमुळें विसर पडतो. ६ आई मेल्यावर बाप मावसा (निष्काळजी) होतो. ॰आंग- न. आईपणा-मायपणा ज्या अंगापासून येतो तें अंग; स्त्रीचें किंवा प्राण्यांतील मादीचें जननेंद्रिय, व आंतील गर्भा- शयाचा भाग; गुह्यांग. 'बाळंत होतांना तिला त्रास झाला, आईअंग बाहेर आलें' [आई + अंग] ॰काळी- स्त्री. शेतजमीन. ही आई- सारखी पोषक असते म्हणून आदरार्थीं. -गांवगाडा. [आई + काळी = शेतजमीन] ॰पांढर- स्त्री. गांवठाण; गांव ज्या जमिनींत वसतो ती जमीन; ही शेताच्या निरुपयोग म्हणजे साधारण पांढर्‍या रंगाची असते. [आई + पांढरी] ॰पोरका- वि. आईवांचून उघडा पड- लेला; ज्याची आई मेली आहे असें (मूल) ॰बाई स्त्री. १ आई सारखी वयानें श्रेष्ठ, सुस्वभावी अशी बाई; आईप्रमाणें स्त्री. म्ह॰ देई घेई ती आई बाई, न देई ती मसणांत जाई. २ शेजारची बाई; शेजारपाजारची स्त्री; शेजारीण. ३ कोणी तरी बाई. (अनेकवचनी उपयोग). म्ह॰ परीट नागविला तर आयाबाया नागविल्या = पर टाच्या येथें चोरी झाली तर त्यांचे कांहीं जात नाहीं, उलट इतर लोक उघडे पडतात. ॰करणें खुशामत करणें; गोंजारणें. ॰बाप- पु. आई व बाप; वडील व मातोश्री; मातापिता. (अव.) आई व बाप. 'माझीं आईबापें आणि माझे शिक्षक जें मला सांगतात तें कां केलें पाहिजें ?' -मराठी ३ रें पुस्तक (१८७३) पृ. ४१. आई- बापावरून पावणें, आईबाप उद्धरणें- आईबापावरून शिव्या देणें; वेड्यावांकड्या, वाईट शिव्या देणें. ॰माई- स्त्री. व्यापक अर्थानें बाई; एखादी आईसारखी मानलेली स्त्री, माउली; आई- बाई. ॰माई उद्धरणें- आईवरून शिव्या देणें. ॰माई करणें- खुषमस्करी करणें; मनधरणी करणें.

दाते शब्दकोश

आई f A mother. आईजीच्या दोंदावर बाईजी उदार. Used where one person is generous upon the property of another. आई जेंवू घालीना, बाप भीक मागू देईना A fix, a dilemma; betwixt two difficulties.

वझे शब्दकोश

आई āī f (अंबा S) A mother. 2 A term of fondness for an infant. आईचें दूध कीं गायीचें दूध Used where two courses of action are presented, so similar as to preclude preference or rejection. आईजीच्या दोंदावर बाईजी उदार Used where one person is generous upon the property of another. आ0 जेवूं घालीना बाप भीक मागूं देईना Expresses a dilemma or strait; pressure betwixt two difficulties or two authorities. आई ती गुरवीण होईन नैवेद्य खाईन Used of an idle female of a household forward enough to devour the prepared meal; a female drone. एका आईचीं लेंकरें (Children of one mother.) A term expressing Fraternity or Brotherhood.

मोल्सवर्थ शब्दकोश

अमीर

पु. १ थोर किंवा बडा इसम; सरदार; उमराव; उच्च घराण्यांतील मनुष्य. 'धीर वीर किति अमीर होउनि फकीर भिक मागती ।' -ऐपो ३६७. २ आज्ञा करणारा अधिकारी [अर. अमीर = सरदार; श्रेष्ठमनुष्य. आमिर = आज्ञा करणारा; शास्ता. अम्र = आज्ञा; हुकूम सं. मित्र (सूर्य) किंवा अमर = देव, श्रेष्ठ. फा. मिहिर.?]. ॰उमराव-पु. बडे लोक; सरदारमंडळी. [अमीरउम्रा अमीरचें अव.]. ॰उल्-उमरा(व)-अमीरांतील श्रेष्ठ; सरदा- रांचा नायक. (मालोजी घोरपडे यास ही पदवी होती.) ॰उल्- ममालिक-राज्यांतील श्रेष्ठ अधिकारी. ॰राव-एक पदवी. -मदरु १.१२.

दाते शब्दकोश

अमीर      

पु.       १. थोर किंवा बडा इसम; सरदार; उमराव; उच्च घराण्यातील मनुष्य : ‘थोर वीर किती अमीर होऊनि फकीर भिक मागती ।’ – ऐपो ३६७. २. आज्ञा करणारा अधिकारी. [फा.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अमका

वि. १ कोणी एक इसम; फलाणा; कोणी विवक्षित मनुष्य; कोणी एक. 'लोक म्हणतील अमक्याचा अमुक । घरोघरीं मागतो भीक ।' -नव १८.५१. २ (नामाबरोबर उपयोग) कोणी; विशिष्ट; विवक्षित (इसम, पदार्थ). [सं. अमुक.] ॰तमका-ढमका- धमका- कोणी तरी; कांहींएक (इसम, वस्तु) [अमका द्विरु.]

दाते शब्दकोश

अमका      

वि.       १. कोणी एक इसम; फलाणा; कोणी विवक्षित मनुष्य; कोणी एक : ‘लोक म्हणतील अमक्याचा अमुक । घरोघरी मागतो भीक ।’ – नव १८·५१. २. (नामाबरोबर उपयोग) कोण; विशिष्ट; विवक्षित (माणूस, पदार्थ). [सं. अमुक]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अंबारी      

स्त्री.       हत्तीवरील बसावयाची मेघडंबरी, आसन, बैठक. जेव्हा वर छताची योजना नसेल तेव्हा या बैठकीला हौदा म्हणतात : ‘अवर्ण अंबाऱ्या शोभल्या वरी ।’ − नव १३·७५. [अर. अमारी] (वा.) उलटी अंबारी हातात येणे, उलट्या अंबारीत बसणे, उलट्या अंबारीने राज्य करणे– भिक्षांदेही करणे; भीक मागणे (गाठ मारलेल्या भिक्षेच्या झोळीचा आकार उलट्या अंबारीसारखा असतो यावरून) : ‘माझी कातड्याची पेटी व फराळाचे आणि चार धोतरें एवढे मात्र…. बचावलें. नाहींतर आजच उलट्या अंबारीच्या राज्याचा उपभोग घ्याला लागला असता.’ − रंगराव. अंबारीत बसणे − श्रेष्ठपणास चढणे; वैभव, अधिकार प्राप्त होणे. अंबारीसकट हत्ती गिळणे − सर्वस्व स्वाहा करणे; सगळेच हडप करणे : ‘येथील मंडळी अंबारीसकट हत्ती गिळणार हे स्पष्ट आपणास विदित आहे.’ − पुणे अखबार १·७७.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अंबारी

स्त्री. हत्तीवरील बसावयाची मेघडंबरी, आसन, बैठक; जेव्हा वर छताची योजना नसेल तेव्हां या बैठकिला हौदा म्हणतात. क्वचित उंटावरील बैठकीलाहि अंबारी म्हणतात. 'अवर्ण अंबार्‍या शोभल्या वरी ।' -नव १३.७५. [अर. अमारी] अंबारीत बसणें-श्रेष्ठपणास चढणें. उलट्या अंबारीत बसणें, उलट्या अंबारीनें राज्य करणें-उलटी अंबारी हातांत येणें-भिक्षांदेही करणें; भीक मागणें (गांठ मारलेल्या भिक्षेच्या झोळीचा आकार उलट्या अंबारीसारखा असतो यावरून). 'माझी कातड्याची पेटी व फराळाचें आणि चार धोतरें एवढें मात्र ...... बचावलें. नाही तर आजच उलट्या अंबारीच्या राज्याचा उपयोग घ्यावा लागला असता.' -रंग- राव.

दाते शब्दकोश

अंबोली      

स्त्री.       पत्नी : ‘अंबोल्या सांडोनि कोण मागे भीक ‘− जना ३३.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अतिराग

पु. अत्यंत राग-क्रोध. -वि. अतिशत रागीट; क्रोधी 'अतिरागा भीक मागा । त्याहून रागा देशा त्यागा.' [सं.]

दाते शब्दकोश

अतिरागा

अतिरागा a Extremely passionate. अतिरागा भीक मागा Passion leads to beggary.

वझे शब्दकोश

अवतण or णें

अवतण or णें avataṇa or ṇēṃ n अवता m (Vulgar. From आमं- त्रण S through अंवतणें) An invitation. v दे, सांग. अ0 टाकून भीक मांगणें To reject an invitation and yet go about begging (i. e. to act very foolishly).

मोल्सवर्थ शब्दकोश

बोंबलभिक्या

बोंबलभिक्या bōmbalabhikyā a (बोंबलणें & भीक) A term for an unlucky wight.

मोल्सवर्थ शब्दकोश

भैर्‍या

पु. बहिरोबाचा कुणबी जातीचा भक्त. हे जोति- बाच्या नांवानें भीक मागतात. [भैरव]

दाते शब्दकोश

भातुकें, भातु(तू)क

न. १ (काव्य) भोजनाव्यतिरिक्त लहान मुलांस देतात तें खाद्य; खाऊ; भातकूल. 'जे लोक- त्रयाचें भातुकें । खेळतांचि खाय कवतिकें ।' -ज्ञा ३.२४८. २ अल्प उपाहार; फराळ; खाद्य (पीठ, पोहे, लाडू. इ॰). 'मज भीक कांहीं देवा । प्रेम भातुकें पाटवा ।' -तुगा ११८२. ३ चागलें, चवदार हलकें खाद्य. 'देईं आवडीचें भातुकें ।' -मुआदि १३.६. ४ भक्ष्य. 'देहा केंवि रिझे । हें काळाचें भातुकें ।' -तुगा. ५ अन्न; आहार. 'कृष्ण दर्शनाचेनि भातुकें ।... माझें शरीर अजेय ।' -जै ५.५. ६ विवाहात वधूकडून वराकडे नेतात ते फराळाचे पदार्थ. -शास्त्रीको [भात]

दाते शब्दकोश

भिकार

भिकार bhikāra a (भीक) Poor, wretched, beggarly, devoid of the common comforts of life--a country, town, village: also poor or beggarly in various applications; as भि0 राज्य-जमीन-बाग-दौलत-पीक-हंगाम &c. See the compounds following.

मोल्सवर्थ शब्दकोश

भिकार bhikāra n (भीक) A crowd or multitude of beggars: also beggars considered collectively.

मोल्सवर्थ शब्दकोश

न. भिकार्‍यांचा थवा, समुदाय; समुच्चयानें भिकारी लोक. -वि. दरिद्री; भिकारी; कंगाल; जीवनाच्या सामान्य सुखाविरहित (देश, गांव, खेडें); भिकारी; दरिद्री. जसें- भिकारी-राज्य-जमीन-बाग-दौलत-पीक-हंगाम इ॰ [सं. भिक्ष् = मागणें] ॰काम-न. दरिद्री, भिकारी काम. ॰खाना-पु. १ भिकार्‍यांची वस्तीची जागा. २ भिकारी घर, वसतिस्थान. ३ (निंदेनें) भिकारी, दरिद्री मानलेलें घर. ॰खोड-चट-चाळा- स्त्रीपु. अशिष्ट, बिनसंभावित, भिकार्‍यासारखी खोड, चाळा, चाल, रीत, ढंग, संबंध. ॰गंड-न. भिकारी लोक. ॰चेष्टा-स्त्री. हलकट, क्षुद्र, घाणेरडे, गदळ, अयोग्य काम, कृत्य; निवळ रिकामा कार- भार; बेफायदेशीर कृत्य. ॰चोंट-वि. १ (निंदार्थीं) भिकारी; कृपण. २ दरिद्री; तुच्छ; पसंत नसलेला; (किंमत, बळकटी, पृष्ठता, इ॰- कांत) कमी दर्जाचा; अपुरता (पदार्थ). ॰छंद-पु. वाईट नाद, संवय, खोड. ॰टोकार-न. (व्यापक, सामा.) भिकारी लोक; भिकार्‍यांचा व टोळभैरवांचा समुदाय. [भिकारी द्वि.] ॰डा-पु. (तिरस्कारदर्शक) भिकारी. ॰णें-अक्रि. भिकारी, दरिद्री होणें. ॰दासावर हुंडी-स्त्री. अत्यंत गरीब माणसाकडे केलेली पैशाची मागणी, विनंति. ॰पेठ-स्त्री. मालाचा पुरवठा पूर्ण नसलेलें शहर. (समासांत) भिकार-नगरी-पुरी-वस्ती इ॰ ॰बुद्धि-स्त्री. भिकारी- बुद्धि; हलकी कल्पना, युक्ति, तोड, सल्ला, विचार. ॰भास- स्त्री. (गो.) भिकार चेष्टा. ॰भोपळा- वि. दुर्दैवी; कपाळकरंटा. ॰लक्षण-न. हलकट व भिकारी लक्षण, चिन्ह; भिकार चाळा. ॰लाड-पु. (भिकारी करण्यासारखे लाड) अतिशय कौतुक. आणि लालन (प्रायः मुलाचें); मुलास बिघडविण्यासारखे लाड. ॰वाडा-पु. १ भिकार्‍यांची राहण्याची जागा. २ भिकार्‍यांचा समुदाय ३ भिकार दिसणारें घर, इमारत. ॰विकरी-स्त्री. १ भिकार वस्तूंची विकरी. २ थोडकी विकरी; अतिशय लहान प्रमाणांतील किरकोळ विकरी. ॰सौदा-पु. भिकार माल, वस्तु; कोणताहि बेफायदेशीर व्यापार, करार; भिकार खटलें, काम. ॰हट- पु. नीच, हलकट, अयोग्य खवखव, हांव, आग्रह. -री-हाड- न. १ (ल.) भिकारी किंवा गरीब कुळी २ अत्यंत हीन असें जीवित हाडाचें दारिद्र्य हाडींमाशीं खिळलेली दारिद्रता. भिकारी- पु. १ भीक मागणारा मनुष्य. २ दरिद्री, कंगाल मनुष्य. ३ -वि. (निंदार्थी) कवडीमोल; तुच्छ; भिकारी (मनुष्य, स्थळ, वस्तु). ४ हिताची गोष्ट न ऐकणारा; लाभाविषयीं पराङ्मुख; तोटा, नाश करणार्‍या कामाविषयीं तत्पर असा (मनुष्य इ॰). म्ह॰ (व.) भिकार्‍याला ओकार्‍या = भिकार्‍याला आढ्यता फार.

दाते शब्दकोश

भिकारी

भिकारी bhikārī m (भीक) A beggar. Pr. भिकाऱ्यांला ओ- कारी Beggars are dainty. 2 A poor or indigent person. 3 Applied freely to persons, places, and things, to stigmatize them as mean, vile, low, worthless, beggarly.

मोल्सवर्थ शब्दकोश

पु० भीक मागणारा, कंगाल, गरीब.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

भिकणें

भिकणें bhikaṇēṃ n (भीक) Anything got by begging, alms. v माग. 2 A present or gratuity given to an astrologer, devotee, domestic priest &c. 3 The grant or allowance (of corn) to the बलुतेदार &c. 4 The fee, out of the proceeds of Zakát or duties, to the पतकी. 5 Beggary or poverty. v लाग.

मोल्सवर्थ शब्दकोश

भोंपळा

पु. १ एक प्रकारचें भाजीचें फळ. ह्याचे काळा, पांढरा व तांबडा असे प्रकार आहेत. उंदराच्या विषयावर काळ्या भोप- ळ्याचा देठ उगाळून लावतात. कडू भोपळा म्हणून एक भोपळ्याची जात आहे. वीणा, सतार यांच्या डेर्‍यास याचा उपयोग करतात. २ वीणा इ॰चा डेरा. ३ (व.) नाट व खांबाच्या वरचें टोंक यामधील ठोकळा. ४ (ल.) कमंडलु; तुंबा. (वाप्र.) (भ्रमाचा) भोपळा फुटणें-एखाद्या गोष्टींत कांहीं अर्थ असेल अशी जी समजूत ती कांहीं करणानें त्या गोष्टीचें खरें स्वरूप उघडकीस येऊन दूर होणें. (हातीं) भोंपळा येणें-दरिद्री होणें; भीक मागूं लागणें. भोपळ्या एवढें शून्य-अत्यंत अभाव. भोपळ देवता-स्त्री. लहान मुलाप्रमाणें खोड्या करणारी, भटक्या मारणारी वयस्क स्त्री. [भोंपळा + देवता] भोंपळसुती-वि. १ जें चालविण्यांत बंदोबस्त, व्यवस्थितपणा, बारकाई, कुशलता इ॰ नाहीं असें (राज्य, कारभार, सावकारी, व्यवहार इ॰). २ अव्यवस्थित; अजागळ; निष्कळजीपणानें केलेला (पोषाख, कामकाज). ३ जाडेभरडें; राकट; ओबडधोबड (सामान- सुमान, कामकाज). [भोंपळा + सूत] भोंपळी-स्त्री. भोंपळ्याचा वेल. भोंपळी खरबूज-न. एक प्रकारचें खरबूज. भोंपळी मिरची-स्त्री. एक प्रकारची जाड मिरची ही कमी तिखट असते. हिची भाजी करतात. भोंपळ्या रोग-अंगांत मेदोवृद्धि करणारा एक रोग; फोपसेपणा.

दाते शब्दकोश

चौपालवी

स्त्री. चौपदरी; भिक्षेची झोळी. 'चौपालवी बांधोनि करीं । भीक मागावी दारोदारीं ।' -एभा ३.४९४. [चौ + सं. पल्लव-पालव = पदर]

दाते शब्दकोश

चौपालवी      

स्त्री.       चौपदरी; भिक्षेची झोळी : ‘चौपालवी बांधोनि करीं । भीक मागावी दारोदारीं ।’ − एभा ३·४९४.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चौपदरी

स्त्री. चौकोनी फडक्याचीं चार टोकें एकत्र धरून भिक्षेसाठीं बनविलेली झोळी; मधुकरीचें फडकें; भिकार्‍याची झोळी. 'अन्नसत्रवाल्यास जसा चौपदरीचा योग यावा त्याप्र- माणें या भरतभूमिवासी जडभरताची आजला हालहवाल होऊन गेली आहे.' -केसरी -वि. १ चार पदरांचा, पेडांचा (दोर इ॰). २ चौघडी; चार पदर होतील अशा रीतीनें घडी घातलेलें (लुगडें, धोतर इ॰). [चा = चार + पदर = कोपरा, टोंक] (वाप्र.) ॰गळा काढणें-मोठयानें रडणें, ओरडणें. ॰(हातीं) घेणें-येणें-भिक्षा मागण्याचा धंदा आरंभिणें; भीक मागणें. 'अलिकडे तूं मुळींच अभ्यास करीत नाहींस, पुढें चौपदरी हातीं घेणार आहेस कीं काय ?' ॰चा जहागिरदार-पु. (उप.) भिकारी. 'चौपदरीचा जहागिरदार, नी मिजास बादशहाची.

दाते शब्दकोश

चंदुलाल

पु.विना. १ हा जातीचा खत्री असून निजामाचा मुख्य दिवाण होता. याचा दानधर्माबद्दल लौकिक असे. २ (ल.) फाजील दानशूर, उधळ्या, चैनी माणूस. म्ह॰ (व.) चंदुलाल मरगये चंदुलालके नोकर घरघर लगगये = खुशालचंद्र माणसाबरो- बर खूप चैनी केल्या परंतु तो मरतांच भीक मागण्याची ज्यास पाळी आली त्यास म्हणतात.

दाते शब्दकोश

दैन्य      

न.       १. गरिबीमुळे आलेला दीनपणा; प्रतिकूल परिस्थिती; गरिबी. २. हीनपणा; हलकेपणा; उणेपणा. [सं.] (वा.) दैन्य करणे – भीक मागणे : ‘मग निदैव निघे किरीटी । दैन्यचि करूं ।’ – ज्ञा ९·३११.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

डाकु(को)ता, डाकोचा, डाकुलता

पु. शूद्रांची एक जात व तींतील व्यक्ति; हे लोक हस्तसामुद्रिक, भविष्य, पंचांग सांगून डमरू कुडबुडें वाजवून भीक मागतात. ब्राह्मण पिता व गवळी जातीची माता यांपासून झालेली ही संतति आहे असें म्हणतात. 'डाकुलता होरा बतलावे ।' [हिं. डकौत-तिया, डाक = वाद्य]

दाते शब्दकोश

दौलत; दव्लत

(स्त्री.) [अ. दौलत्] सम्पत्ती; जहागीर; राज्य; सैन्य; सल्तनत. “शहाजी राजे यांसी दौलतेमध्यें पुणें पर्गणा होता” (सभासद ५). “हे दौलत कर्जरोगानें निरन्तर ग्रस्त” (सानेपयाव ३४३). “झाडून बुणगेसुद्धां दौलत गर्द जाली” (खरे ११|६०८६). “आपल्या आपल्यांत भाण्डून दौलत बुडविली हा लौकिक कशाला पाहिजे” (राजवाडे १३|६९). “निदान जें मागतील तें इङ्ग्रजांस देऊं. राहील तीच दौलत करूं; परन्तु नबाबसुद्धां फितुरियांचें पारपत्य घडे तेच गोष्ट करावी यांत श्रीमन्तही कबूल आहेत” (राजवाडे १२|७९). “व्यर्थ आपण इङ्ग्रज़ न आणितां आणल्याचें श्रेय येतें! श्रीमन्तांचें राज्यांत भीक बरी; परन्तु दुसरेयाचें दौलतींत सुख ही समान होणार नाहीं.” (खरे १२। ६८३०). दौलत करणें=जहागीर चालविणें (सभासद ३).

फारसी-मराठी शब्दकोश

देशावर      

पु.       देशोदेशी भीक मागत फिरणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

दिशा      

स्त्री. १. दिग्विभाग; पूर्व, पश्चिम इ. आठ दिशा; आकाशाची पृथ्वीकडची बाजू. २. प्रांत; प्रदेश. ३. रीत; प्रकार; मार्ग (कामाचा इ.). [सं.] (वा.) दिशा कोंडणे –अवष्टंभ, अवरोध होणे : ‘मुरडा हागवण उन्हाळे । दिशा कोंडतां आंदोळे ।’ – दास ३·६·३०. दिशा फाकणे, दिशा फुटणे, दिशा पालटणे, दिशा उघडणे – उषःकाल होणे; उजाडणे. दिशा भारणे, दिशा बांधणे – मंत्रसामर्थ्याने चोहीकडचा प्रदेश, लोक यांची नजरबंदी करणे; कोणालाही आपले कृत्य कळणार नाही असे करणे. दिशेस जाणे – (प्र.) बहिर्दिशेला, शौचाला जाणे. चारही दिशा मोकळ्या होणे – (कोठेही भटकणे, भीक मागणे इ. साठी) थोडीही आडकाठी नसणे; अंकुश नाहीसा होणे. दशदिशा पळणे –पांगापांग होणे; त्रेधा उडणे. दिशाचक्र      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

दिशा

स्त्री. १ दिग्विभाग; पूर्व, पश्चिम इ॰ आठ दिशा. आका- शाची पृथ्वीची बाजू. २ प्रांत; प्रदेश. ३ रीत; प्रकार; मार्ग (कामाचा इ॰). 'या लिहिण्याची एक वार दिशा दाखवून द्या म्हणजे हिशेब आकारून देईन. [सं.] (वाप्र.) ॰कोंडणें- १ अवष्टंभ होणें. 'मुरडा हागवण उन्हाळे । दिशा कोंडतां आंदोळे ।' दा ३.६.३०. ॰दाखवणें-संकेत, मार्ग दाखविणें; सूचना देणें; थोडें समजावून देणें. ॰फाकणें-फुलणें-पालटणें-(आकाश) प्रकाशानें प्रफुल्लित होणें; उषःकाल होणें; उजाडणें. ॰भारणें- बांधणें-मंत्रसामर्थ्यानें चोहोंकडचा प्रदेश, लोक यांची नजरबंदी करणें; कोणास आपलें कृत्य कळणार नाहीं असें करणें. दिशेस जाणें-(प्र.) बहिर्दिशेस जाणें; शौचास जाणें. 'आज दोन वेळ दिशेस जावें लागल्यामुळें दोन स्नानें घडलीं.' चारहि दिशा मोकळ्या होणें-सर्व जग मोकळें असणें (कोठेंहि भटकणें; भीक मागणें इ॰ करितां) किंचितहि आडकाठी नसणें. दश- दिशा पळणें-कोणीकडेहि पळणें; पांगापांग होणें; त्रेधा उडणें सामाशब्द- ॰चक्र-न. क्षितिज. 'अथवा दशदिशा समाकुळ । दिशाचक्र ।' -ज्ञा ११.३१५. ॰बंधन-दिशा भांरणें पहा. ॰भूल-भुलीस्त्री. १ दिशा, वाट चुकणें. २ (ल) गोंधळ उडणें; होणें; भुरळ पडणें. ॰भूली-वि. दिशा चुकलेला; भ्रांतचित्त.

दाते शब्दकोश

डोह(हा)ळा

पु. १ गर्भवती स्त्रीची वासना; इच्छा. 'वसिष्ठ म्हणे रायासी । धर्ममर्यादा आहे ऐसी । डोहळे पुसावे स्त्रियांसी । मागतो त्यांसी तें द्यावें ।' -भारा-बाल ४.३४. २ अयोग्य इच्छा; भलत्या गोष्टीवर वासना जाणें; छंद; हौस; शोक. (क्रि॰ पुरणें; पुरविणें). 'कैसे प्राप्तीचिये वेळे । निदैवा अंधळे- पणाचे डोहळे ।' ज्ञा ६.७३. [सं. दोहद; प्रा. डोहला] भिकेचा डोहळा आठविणें-ज्यामुळें भीक मागावी लागेल असे ढंग करणें; व्यसनापायीं उधळेपणा करणें. म्ह॰ पोराचें चिन्ह डोहाळ्या- वरून ओळखावें. डोहळे(हाळ)जेवण-न. डोहाळतुलीला मेज- बानी. पहिल्या गरोदरावस्थेंत स्त्रीला डोहाळे लागूं लागले म्हणजे (हल्लीं सातव्या महिन्यांत) सुवासनींना बोलवून भोजनसमारंभ करतात तें.

दाते शब्दकोश

डोहळा, डोहाळा, डोहला, डोहोला, डौला      

पु.       १. गर्भवती स्त्रीला एखादा पदार्थ खावासा वाटणे; तिला होणारी विशिष्ट इच्छा, मनोरथ, लालसा, लक्षणे. २. अयोग्य इच्छा; भलत्या गोष्टीवर वासना जाणे; छंद; हौस; शौक (क्रि. पुरणे, पुरविणे): ‘कैसे प्राप्तीचिये वेळे । निदैवा अंधळेपणाचे डोहळे ।’ –ज्ञा ६·७३. [सं. दोहद] (वा.) (भिकेचा) डोहळा आठविणे –ज्यामुळे दारिद्र्य येईल, भीक मागावी लागेल असे ढंग करणे; व्यसनात पैसा उधळणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

दोमदोम      

उद्गा.       दावलमलपीराचे भक्त अथवा मुसलमान फकीर यांचा भिक्षा मागण्याच्या वेळचा शब्द. दमदम, दमसाहेब असेही म्हणतात. [ध्व.] (वा.) दोमदोम करीत फिरणे, दोमदोम करीत जाणे – दारोदार, देशोदेशी भिक्षा मागत फिरणे; भीक मागणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

दोमदोम

उद्गा. दावलमल पीराचे भक्त अथवा मुसलमान फकीर यांचा भिक्षा मागण्याच्यावेळचा सवालाचा शब्द. दम- दम, दमसाहेब, असेंहि म्हणतात. [ध्व.] ॰करीत फिरणें- जाणें-दारोदार, देशोदेशीं भिक्षा मागत फिरणें; भीक मागणें.

दाते शब्दकोश

दत्त

दत्त p Given, presented, made over. r Fate, fortune, lot, allotment. Ex. ज्या दत्ताला भ्यावें तें दत्त पुढेंच आहें. Appointed business, occupation or sphere; as भीक मागणें हें ब्राह्मणाचें दत्तच आहें.

वझे शब्दकोश

दत्त datta p (S) Given, presented, made over. v कर, हो. 2 (Given to be) received in adoption--a son. 3 Used as s n (For ईश्वरदत्त or देवदत्त in the sense of God-given, God-assigned, God-appointed.) Fortune, fate, luck, lot, allotment. Ex. ज्या दत्ताला भ्यावें तें दत्त पुढेंच आहे; मी आपल्या दत्ताला भीत असतां मजवर अवकृपा झाली. Also appointed business, occupation, or sphere; as भीक मागणें हें ब्राह्मणाचें दत्तच आहे.

मोल्सवर्थ शब्दकोश

दुरग मरगी      

एक रानटी जमात. हे कडकलक्ष्मी–नाडलक्ष्मीचे सोंग काढून भीक मागतात. दुरगव्वा मरगव्वा      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

दुरग मरगी

स्त्री. एक रानटी जात. हे कडक लक्ष्मी- नाडलक्ष्मीचें सोंग काढून भीक मागतात.

दाते शब्दकोश

दया

स्त्री. १ करुणा; अनुकंपा; कळवळा. २ कृपा; मेहेर- बानी. ३ विशेषतः देवानें केलेली कृपा, अनुकंपा (समासांत) दया-कर-निधान-निधि-समुद्र-सागर-इ॰ = दयाळू (माणूस). [सं.] म्ह॰ दया उधार खता रोकडी. ॰दया, दयांदयां, भयाभया, दयामया-क्रिवि. दया ! दया ! असें ओरडत दारो- दार भीक मागत फिरून. (क्रि॰ करणें; करीत फिरणें, जाणें). दयांदयां-स्त्री. केविलवाणी स्थिति. दयांदयां होणें-अतिशय करुणास्पद स्थितीस येणें. ॰धर्म-पु. नैतिक व धार्मिक कृत्यें; आचारविचार. (क्रि॰ करणें; होणें). ॰भूत-रूप-वि. दयाशील; दयेची मूर्ति; मूर्तिमान् दयाच असा (मनुष्य इ॰). ॰मय- वि. दयेनें पूर्ण; दयाशील; कृपाळू. ॰माया-स्त्री. सामन्यातः दया; कृपा; माया; ममता. (क्रि॰ येणें; असणें; करणें; ठेवणें; राखणें). ॰राम मुकुंददासाचे नातू-पुअव. (ल.) एखादा अतिशय श्रीमंत मनुष्य (व्यंगोक्तीनें) अतिशय दरिद्री मनुष्य. ॰लु-ळू- वि. कृपाळू. ॰वान्-वंत, दयाळ-वि. कृपाळू; मायाळु. ॰शील- वि. दयाळू स्वभावाचा; दुसर्‍यावर नेहमीं दया करणार ॰हीन- वि. निर्दय; निष्ठुर.

दाते शब्दकोश

दयादया, दभदया, दयादभ, दयाभया      

क्रिवि.       दया! दया! असे ओरडत दारोदार भीक मागत फिरून. (क्रि. करणे, करत फिरणे, जाणे.).

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गदा      

पु.       १. भिकारी. २. भीक; मधुकरी : ‘तुका म्हणे वृत्ती सांडुनि । गदा मागत जाती ॥’ - तुगा ४१२. [फा.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गदा

पु. १ भिकारी. २ भीक; मधुकरी. 'तुका म्हणे वृत्ति सांडुनि । गदा मागत जाती ।। -तुगा ४१२. [फा. गदा]

दाते शब्दकोश

गुन्हेगार

नदीपार केलेले, चोर, दरवडेखोर, डाकू, चांचे, ठग, लुच्चे, फसवे, लफंगे, खुनी, मवाली, गुंड, अपराधी, कायदेभंगी, सुरेमार, सराईत गुन्हेगार, अट्टल भामटे, कायद्याला भीक न घालणारे, अवैध वर्तनाचे, कानू तुडविणारे, न्यायकोर्टाना हवे असणारे, तुरुंगपीठाचे होऊ घातलेले पदवीधर ! बंदीशाळेचे स्नातक, खिसेकापू.

शब्दकौमुदी

घंटी अप्पा      

पु.       दोन्ही हातांनी घंटा वाजवीत भीक मागत फिरणारा मनुष्य.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

इवला, इवलासा, इवलिसा

वि. थोडा; एवढासा; एवढा; उलिसा; किंचित्; अल्प; मुठभर. चिमटीभर; नखभर. 'समयीं आलिया याचक । इवली भीक न घालिती ।' -एभा ७.२८५. [सं. अल्प-अल्पीयस्]

दाते शब्दकोश

इवला, इवलासा, इवलिसा      

वि.       थोडा; एवढासा; एवढा; उलिसा; किंचित; मूठभर; चिमटीभर; नखभर : ‘समयीं आलिया याचक । इवली भीक न घालिती ।’− एभा ७·२८५. [सं. अल्प −अल्पीयस्]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

जोगवा, जोगेश्वरी

पु. देवीच्या नांवानें पांच घरें मागितलेली भीक; देवीचे उपासक, पीडितजन 'जोगवा' म्हणून अशी भिक्षा मागतात. म्ह॰ देगेबाई जोगवा म्हटल्यानें कोणीहि देत नाहीं. (क्रि॰ मागणें). जोगवेकर-करी-करीण-पुस्त्री. जोगवा मागणारा-री.

दाते शब्दकोश

जोकमार

पु. एक क्षुद्र देवता; कामण्णा; कर्नाटक प्रांतांत भाद्रपद शु।। ८ पासून एक पुरुषाकृति मातीचें चित्र बृहत्शिस्न असलेलें व तरवार धारण केलेलें तयार करून टोप- लींत ठेवून गांवांत घरोघर फिरवितात व ज्वारी कपडे वगैरे भीक मागतात. याचा जन्म तराळाचे घरीं व मृत्यु परटाच्या धुण्याच्या दगडावर होतो व परीट सुतक धरतो. या दिवसांत म्हणजे शु।। ८ पासून १५ पर्यंत लहान मुलींचे कडेदोरे तोडून टाकतात व नंतर बळकव्वा देवीपुढें मुलांस नेऊन तिची ओटी भरून मग कडदोरा बांधतात.

दाते शब्दकोश

झक, झक्क      

स्त्री.       १. मासा. २. (ल.) वाईट गोष्ट; निंद्य कर्म. [सं.झष् = मासा] (वा.) झक मारणे - (अशिष्ट) १. ढोबळ चूक करणे; मूर्खाप्रमाणे वागणे. २. निंद्य कर्म, व्यभिचार इ. करणे; लोकसंप्रदायाविरुद्ध वागणे. ३. करू नये ती गोष्ट केली असे कबूल करणे किंवा कबूल करून तिच्याबद्दलचा दोष आपल्या पदरात घेणे. झक मारीत पडणे - निरुपयोगी, निष्फळ होऊन पडणे. (एखादी गोष्ट) झक मारीत करणे, झक मारीत जाणे, झक मारीत देणे, झक मारीत येणे, झकत करणे, झक्कत करणे, झकत जाणे, झकत देणे, झकत येणे; झक्कत जाणे, झक्कत देणे, झक्कत येणे - इच्छा नसताही नाइलाज म्हणून करणे - जाणे इ.; आपसुख करणे इ.: ‘या भरवसेनें दवडिलें लुब्धा । येईल झकमारू म्हणोनि ।’ - दावि ४४०. पहा : झकत, झक मारीत राहणे - भीक मागणे; नाइलाज म्हणून हात चोळीत बसणे; बोंबलत राहणे : ‘मागें दौलत किल्ले स्वामींचे स्वामी घेतील. कर्जदार झक मारीत राहतील.’ - ऐलेसं १·१७७. झक मारून झुणका खाणे - झक मारणे; मूर्खपणा करणे. (कर.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

झोळी      

स्त्री.       १. पहा : झोळणी. २. चौपदरी; दोन दोन कोपऱ्यास गाठ दिलेले फडके (भाजीचे, भिक्षेचे). ३. वस्त्राचा पाळणा; दोऱ्यांचा विणलेला पाळणा. ४. (सामा.) पिशवी. ५. लढाईत जखमी झालेल्या माणसास उचलून आणण्यासाठी दोन भाल्यांवर पासोडी गुंडाळून त्याची स्ट्रेचर बनवून त्यास काढून आणीत, त्याला झोळी म्हणत. [क.जोळिगे; सं. झौलिक]. (वा.) झोळी घेणे, झोळी सावरणे – भिक मागणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

झोळीबंद      

वि.       भिकारी; भीक मागण्याचा धंदा करणारा.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

काशीकापडी      

पु.       काशीफळाचे म्हणजे भोपळ्याचे भिक्षापात्र घेऊन फिरणारा भिकारी. हे भिकारी सतत तीर्थोतीर्थी यात्रा करीत, भीक मागत फिरतात : ‘वडील स्त्रीस बहुत दिवस संतान नव्हतें तिने मल्हारी या नावाचे काशीकापड्याची सेवा त्याचे आजारीपणात केली.’ - केळकर संग्रह चास जो दप्तर.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कळाकळा करण

क्रि. (ध्वनि) त्रास आणण्यासारख्या व डोकें उठविण्यासारख्या हेकेखोरपणानें भाषण करणें; भीक मागणें; कंटाळा येईल अशा रीतीनें पुनःपुनः सांगणें.

दाते शब्दकोश

कळाकळा करणे      

सक्रि.       त्रासदायक व डोके उठविणाऱ्या हेकेखोरपणाने भाषण करणे; भीक मागणे; कंटाळा येईल अशा रीतीने पुनःपुन्हा सांगणे. [ध्व.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कल्पवृक्ष

कल्पतरु पहा. मंदार, पारिजातक, संतान, कल्पवृक्ष, हरिचंदन या पांच देवतरूंपैकीं एक. 'फळे कल्पवृक्षु जैसा ।' -ज्ञा ४.२१६. 'कीं कल्पवृक्ष शोधित आला घर ।' -रावि १.४८. 'कल्पवृक्षाखालीं बसून झोळीला गांठी कां द्याव्या ?' 'कल्पवृक्ष अंगणीं देख । तो कासया मागेल भीक ।' [सं.]

दाते शब्दकोश

कल्पवृक्ष kalpavṛkṣa m (S) The wishing-tree of Indra's heaven. See कल्पतरु. This term is applied severally to five trees, पारिभद्र or लिंब, मंदार, पारिजातक, संतान, हरीचंदन. Another enumeration excludes पारिभद्र, and makes कल्पवृक्ष itself one of the five. कल्पवृक्षा- खालीं बसून झोळीला गांठी कां द्याव्या? Why, when sitting under the Wishing-tree, should we close and tie up our bag? Also क0 आंगणी देख ॥ तो का- साया मागेल भीक?

मोल्सवर्थ शब्दकोश

कणी

स्त्री. १ फुटका अंश, भाग (धान्य वगैरेचा); कण पहा. २ भात शिजल्यावर त्यांत राहिलेला कच्चा तांदुळाचा अंश; शिजलेल्या अन्नांतील हिरवा अंश. ३ (राजा.) पातळ भाजी इ॰ स लावतात तें पीठ. ४ (अनेकवचनी प्रयोग) तूप मध, साखर इ॰ कांचा सूक्ष्म अंश. ५ (अव.) शिजलेल्या धान्याचा अंश. ६ (गु.) रत्नाचा बारीक तुकडा, अंश. [कण]. कण्या कण्या करणें-१ हीनपणा स्वीकारून भीक मागणें. 'कण्या कण्या केलं तरी कुणीहि दाद घेत नाहींत असा कटु काल आला.' २ लाचार- पणें क्षमेची याचना करणें. दाताच्या कण्या करणें-ऐकत नसतां एखाद्यास अनेक वेळां उपदेश करणें, सांगणें; पढविणें. कण्या खाऊन मिशांस तूप लावणें-पोटास खावयास मिळालें नाहीं तरी बाह्यतः डौल मिरविणें; नसता दिमाख दाखविणें. कण्या टाकून कोंबडीं कलागत उत्पन्न करून देऊन त्यांच्या भांड- णाची मजा पाहणें.

दाते शब्दकोश

कणी      

स्त्री.       १. फुटका अंश; भाग (धान्य वगैरेचा). पहा : कण. २. भात शिजल्यावर त्यात राहिलेला कच्चा तांदळाचा अंश; शिजलेल्या अन्नातील कच्चा अंश. ३. पातळ भाजी इत्यादीला लावतात ते पीठ. (राजा.) ४. (अनेकवचनी प्रयोग) तूप, मध, साखर इत्यादिकांचा सूक्ष्म अंश. ५. (अव.) शिजलेल्या धान्याचा अंश. ६. रत्नाचा बारीक तुकडा, अंश, कण. [सं. कणिका, गु.] (वा.) कण्या कण्या करणे − १. हीनपणा स्वीकारून भीक मागणे. २. लाचारपणे क्षमेची याचना करणे. कण्या खाऊन मिशीला तूप लावणे − पोटाला खायला मिळाले नाही तरी बाह्यतः डौल मिरविणे; नसता दिमाख दाखविणे. कण्या टाकून कोंबडी झुंजविणे − आपला पैसा वगैरे खर्च करून दुसऱ्या दोघांत कलागत उत्पन्न करून देऊन त्यांच्या भांडणाची मजा पाहणे. दातांच्या कण्या करणे − ऐकत नसता एखाद्याला अनेक वेळा उपदेश करणे, सांगणे, पढविणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कफणी, कफनी      

स्त्री.       १. कोपरापासून पुढील हात व डोके या शिवाय सर्व शरीर झाकेल असा अंगरखा; पायघोळ सदरा; बिनबाह्यांचा अंगरखा. हा फकीर, साधू वगैरे वापरतात. २. जाकीट. (व.) [फा. कफनी] (वा.) गळ्यात कफनी घालणे - १. संसारपाश तोडून विरक्त होणे; संसारत्याग करणे. २. भिक्षापात्र हाती घेणे, भीक मागणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कफणी-नी

स्त्री. १ कोपरापासून पुढील हात व डोकें यांशिवाय सर्व शरीर झांकेल असा अंगरखा, हा फकीर, साधू वगैरे लोक वापरतात; बिन बाह्यांचा अंगरखा; पायघोळ सद्रा. २ (व.) जाकीट. [अर. फा. कफनी] गळ्यांत कफनी घालणें- (ल.) १ संसारपाश तोडून विरक्त होणें, संसारत्याग करणें. २ भिक्षापात्र हातीं घेणें. भीक मागणें.

दाते शब्दकोश

करोटी

स्त्री. करवंटी; नरोटी. करोटी हातांत घेणें— भीक मागणें; विपन्नावस्थेस पोंचणें. [सं. करोटी]

दाते शब्दकोश

करोटी, करोटा      

स्त्री. पु.       करवंटी; नरोटी. (वा.) करोटी हातात घेणे − भीक मागणे; विपन्नावस्थेला पोचणे. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कुडबुडा, कुडबुड्या, कुडमुडा, कुडमुड्या जोशी      

हातात कुडबुडे घेऊन भविष्य सांगून भीक मागणाऱ्या गोसावींची (अब्राह्मण) एक जात व त्या जातीतील व्यक्ती : ‘कुडबुडे जाशी हे अशा प्रकारच्या लोकज्योतिषांपैकीच होत.’ - लोक्षि २९७.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कुडबुडा-मुडा-मुड्या जोशी

पु. हातात कुडबुडें घेऊन भविष्य सांगून भीक मागणार्‍या जोशांची (अब्राह्मण) एक जात व त्यांतील व्यक्ति.

दाते शब्दकोश

खंडण, खंडन, खंडणा, खंडना      

न. स्त्री.       १. मोडणे; तोडणे. २. निरुत्तर करणे; खोडून काढणे. ३. शेवट; भंग : ‘या पोटाकारणें गा झालों पांगिला जना । न सरेची मायबाप भीक नाहीं खंडणा ।’ - तुगा २४९. ४. खंड पडणे; थांबणे : ‘मही लोटला आरक्ताचा पाट । खंडणा नोहे परम अचाट ।’ - नव ९·१५६. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खंडण-न-णा-ना

नस्त्री. १ मोडणें; तोडणें. २ निरुत्तर करणें; खोडून काढणें. ३ शेवट; भंग. 'या पोटाकारणें गा झालों पांगिला जना । न सरेची मायबाप भीक नाहीं खंडणा ।' -तुगा ३४९. ४ खंड पडणें; थांबणें. 'मही लोटला आरक्ताचा पाट । खंडणा नोहे परम अचाट ।' -नव ९.१५६. [सं. खंडन; (खण्ड् = तुकडा पडणें)]

दाते शब्दकोश

लांबोरा

वि. लोचट; कंटाळा येईपर्यंत पाठीमागें लागणारा (भीक मागणयाठीं, द्रव्य गोळा करणें इ॰ साठीं).

दाते शब्दकोश

लें(ले)क

पु. १ मुलगा; पुत्र. २ पादपूरणार्थक बुवा इ॰ अर्थी उपयोग. 'आतां तिकडे जाणार तरी कोण लेक.' -मृ ४४. ३ हीनतादर्शक, तुच्छता, तिरस्कार अगर निंदाव्यंजक शब्द. म्हणती अहारे नपुंसका । ऐसें राज्य सोडुनी लेका । भीक मागणें वरियेलें ।' -नव १८.२५. -स्त्री. मुलगी; कन्या. 'म्हणे तुझी होइन मीच लेंकी ।' -सारुह २.२५. म्ह॰ लेकी बोले सुने लागे. ॰(पु)पूत-बाळ-पु. न. मुलगा; मूल; मुलगा किंवा मुलगी. (सामा.) मूलबील; मूलबाळ. ॰वळा-पु. राखेचा मुलगा; रांडेचा मुलगा; स्वस्त्री वांचून इतर स्त्रीचे ठिकाणीं झालेली संतति: दासीपुत्र. ॰विता-पु. बाप; पिता लेकाचा-लेको-पु. निंदा किंवा तिरस्कारदर्शक शब्द. 'कसा लेकाचा कार्याला जुंपला आहें.' -नाकु ३.५५.

दाते शब्दकोश

मागणी

स्त्री. १ लग्नासाठीं वधूपक्षाजवळ वरपक्षानें केलेलें मागणें; वाडःनिश्चय. २ याचना; मागणें. [सं. मार्ग् = शोधणें; म. मागणें] ॰करणें-घालणें-आमच्या येथें आपली मुलगी द्या असें वरपक्षानें वधूपक्षास म्हणणें. मागणें-न. १ कांही एक पदार्थ स्वतःस देण्याविषयीं विनंति करणें. २ मागावयास आलेला किंवा गेलेला मनुष्य. ॰मागणें-सक्रि. द्या म्हणणें; याचना करणें; विचारणें. [सं. मार्ग् = शोधणें; फ्रे जि. मंगार; पोर्तु. जि. मागिणार] आज्ञा मागणें-परवानगी घेणें. मागणें, मागणेंकरी, मागता, मागतेकरी-पु. भिक्षेकरी; मागणारा; याचक. 'तें केवीं दैन्य फेडीती । मागतेयांची । ' -शिशु १५०. 'धिक्कारिति अज्ञ जसे मागतया भीक सर्वदा भणगा ।' -मोआदि २२.३४. मागरा- माग्या-वि. पाहिली ती वस्तु मागणारा; मागण्याची, याचना करण्याची संवय असलेला. मागीव-वि. मागून आणलेला; उसनवार. [मागणें]

दाते शब्दकोश

मदत (निंदा)

आइजीच्या जिवावर बाइजी उदार, न देवाय न धर्माय, उष्टें खावें तर ते तुपासाठीं, गंगेचें पाणी घेऊन गंगेलाच अर्ध्य प्रदान करण्याचा प्रकार, भीक नको पण कुत्रा आवर, पैसा दक्षिणा अन् लक्ष प्रदक्षिणा ! वाळूंत कशाला ओतायचे पाणी ? घर भरलें, मागल्या दारानें दिलें, अनाठायीं दान, चुकलेल्या शेळ्या खंडोबाला वाहिल्या.

शब्दकौमुदी

मीठ

न. १ लवण; क्षार. मीठ ही पांढऱ्या रंगाची खारट वस्तु असून मनुष्यमात्रास अत्यंत आवश्यक अशी आहे. बरेंचसें मीठ समुद्राच्या पाण्यापासून करतात. मिठाच्या काहीं खाणीहि आहेत. २ (कर. आट्यापाट्या) लोण. (क्रि॰ आणणें). [सं. मिष्ट = रुचकर] (वाप्र.) ॰घालणें-१ पिठांत मीठ घालणें; चव आणणें; गोडी आणणें; पुष्कळदा मोठ्या साठ्यांत थोडीशी भर घालणें; पुष्कळ असून आणखी थोडीशी अपेक्षा असेल अशा ठिकाणी जरूर ती भर घालणें. २ महत्व देणें; पर्वा करणें, ठेवणें; भीक घालणें. 'ते दुबळ्या भटभिक्षुकांना मीठ घालतील कीं काय !' -नि. १०६८. ॰मोठें खारट असणें-कडक किंवा करडा धनी असणें; मालक मोठा कटोर असणें. ॰तोडणें- मीठ कमी करणें; खावयास कमी घालणें. 'मुलास मुलगी मोठी झाली तर तिचें मीठ तोडणें.' ॰देणें-चामडें कठीण करण्या- करितां त्यास मीठ लावणें. (अंगास)मीठ मोहऱ्या लागणें- रागावणें; क्रुद्ध होणें; संतप्त होणें. सामाशब्द- ॰कणी-स्त्री. लांबून घरी आल्यानंतर दृष्ट काढण्याचे मीठ; मिठानें काढलेली दृष्ट. ॰बंदर-न. मीठ उतरण्याचे बंदर. ॰भाकर-भात-स्त्रीपु. गरीबीचें जेवण (विशेषतः यजमान आपण दिलेल्या जेवणासंबंधी विनयानें असें म्हणतो). ॰मसाला-पु. मीठ व मसाल्याचे सर्व जिन्नस; पदार्थास चव आणणारे पदार्थ. ॰मोहऱ्या-स्त्रीअव. दृष्ट काढण्याचें साहित्य. ॰मोहऱ्या ओवाळणें-दृष्ट काढणें. ॰लोणारी-पु. मीठ बनविण्याचा धंदा करणारी एक जात व त्या जातीचा मनुष्य. ॰मीठारंग-पु. मोत्याचा पिवळट गुलाबी रंग.

दाते शब्दकोश

नानक

पु. शीखधर्माचा संस्थापक; शीखांचा आद्यगुरु. ॰पंथी-शाही, नानसाई-पु. नानक याचे अनुयायी; शीख भिक्षेकरी वर्ग. यांच्यांतील भिक्षेकरी टिपरीवर टिपरी मारून भीक (पैसे) मागतात; हे फार लोचट भिक्षेकरी आहेत. -गांगा १३३.

दाते शब्दकोश

नरोटी, नरोटे, नरेटी      

स्त्री. न.       १. पहा : नरटी. २. (ल.) अतिशय थोडे दूध देणारी गाय, म्हैस. (वा.) नरोटी लागणे, नरोटे लागणे, नरेटी लागणे– (विहीर इ.तील) पाणी नरटीने काढण्याइतके कमी होणे. नरोटी हातात घेणे, नरोटे हातात घेणे, नरेटी हातात घेणे–भीक मागायला लागणे. नरोटी हातात येणे, नरोटे हातात येणे, नरेटी हातात येणे–एखाद्याला मिळकतीपैकी काहीही न मिळणे, न उरणे; भीक मागण्याची वेळ येणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

नरोटी-टें, नरेटी

स्त्रीन. १ माणसाची अस्थिमय कवटी; करोटी. २ नारळाची कवटी. 'अहा सांडून रत्नवाटी । हातीं घेतली कैसी नरोटी ।' -नव १८.३२. ३ (ल.) अतिशय थोडें दूध देणारी गाय, म्हैस. [नर + वाटी ?] ॰लागणें-(विहीर, नदी इ॰ कांतील) पाणी नरोटीनें कांढांवें लागण्या इतकें कमी होणें. नरटवणी पहा. 'विहीरीला, नदीला, उन्हाळ्यांत नरोटी लागतें.' ॰हातांत घेणें-भीक मागावयांस लागणें; दारोदार होणें. ॰हातांत येणें- (एखाद्याच्या जवळ) मिळकतींपैकीं त्यास कांहींहि न मिळणें, उरणें; भीक मागण्याचा प्रसंग येणें. 'स्नेही-शेजार्‍यांत जर इस्टे- टीची वाटणी होऊं लागली तर मालकच्या हातीं नरोटीच यायची !' -सत्तेचे गुलाम ३.

दाते शब्दकोश

ओम् भवति पक्ष      

पु.       १. भिक्षावृत्ती; भीक मागण्याचा पेशा : ‘ब्राम्हणाची मुख्य दीक्षा । मागितली पाहिजे भिक्षा । ओं(वो) भवति या पक्षा । रक्षिलें पाहिजे ॥’- दास १४·२·१. २. (ल. उप.) अर्ज विनंत्या करून (स्वराज्य) मागणाऱ्याचा एक पक्ष; मवाळ पक्ष.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

पेंचप्रसंग

शृंगापत्ति त्रांगडे, पेंच, बांका प्रसंग, अवघड वेळ, बिनतोड परिस्थिती, आणीबाणीची वेळ अडचणीची स्थिती, पेंचदार समस्या, अक्रोड सिच्युएशन, प्राणसंकट, बिनतोड डाव, इकडे आड तिकडे विहीर, इकडे साप तिकडे दरड, धरलें तर चावतें सोडलें तर पळतें, इकडे आग तिकडे फुफाटा, खाल्ले तर बाधतें टाकलें तर श्रापते, वाघ म्हटलें तरी खातो वाघोबा म्हटलें तरी खातो, अडचणीचें दुखणें नि जांवई वैद्य ! समोर बैल मागे नाग, किल्ली आंत टाकून बाहेर खोलीला कुलूप घातलें, आईं खाटीक बाप कसाई, आई खाऊं घालीना बाप भीक मागूं देईना, असंगाशी संग नी प्राणांशीं गांठ, बोचकें कीं डोचकें गमवावें असा पेंचप्रसंग ! दगडाखालीं हात सांपडला, गळा गुंतला, प्रसंग पडे बांका तो गधेको कहना पडता है काका, तोंड बांधून बुक्क्यांचा मार, तेरी चूप मेरीबी चूप अशी स्थिती, चोरीचा मामला हळूहळू बोंबला ! आपलेच दांत आपलेच ओठ, न बोलावें तर साहत नाहीं बोलावें तर अब्रू जाते, यांत कुठूनही सुटका नाहीं, गाडा चिखलांत रुतला, कमळाच्या जाळ्यांत अडकल्यागत, नेहमीचा खोड्यात अडकला जाण्याची भीति, धडपड करावी तर अधिकच खोलांत, चिमट्यांत धरल्यागत स्थिति.
मृदंगाला दोन्हींकडून थाप, प्रवाहाच्या ऐन मध्यावर नावाडी सोडून गेले, जणूं नकळत मधमाश्यांचे पोळें जागें केलें, ही डोक्यावर टांगती तलवार ठरली, गुपचूप राहतां ।शिंक येऊं लागली तसें, सभेंत बोलतांना कासोटा निसटला ! कोणी ओळखलेंच तर आली का पंचाईत ! प्रकरण अंगाशीं येतें कीं काय असें वाटलें, काय करूं कसें करूं झालें, ही निरगांठ सुटावी कशी ? दोन पात्यांची ही कात्री आणि मध्यें माझे तुकडे !

शब्दकौमुदी

पिरंगणें

अक्रि. (राजा.) १ पिरपिर करणें; किरकिरणें; रड लावणें. २ गयांवयां करून भीक मागणें. [ध्व.] पिरंगणी- स्त्री. (गो. राजा.) पिरपिर; कुरकुर; किरकिर.

दाते शब्दकोश

पोतराज

पु. शेंदूर फासून लहंगा नेसून मरीआईच्या नांवानें भीक मागणारा महार, मांग; कडकलक्ष्मी [पोत = मशाल + राज]

दाते शब्दकोश

पुळपुळ

स्त्री. १ एकसारखें शौचास होणें. २ एकसारखा पाऊस पडत राहणें. ३ एकसारखें बोलणें; पुटपुटणें; कुरकुरणें; भीक मागणें किंवा कोणतीहि त्रासदायक किंवा कंटाळवाणी क्रिया करणें. [ध्व.]

दाते शब्दकोश

फकिरी

स्त्री. १ फकीराची वृत्ति, व्यवसाय. २ मोहरम- मध्यें फकीरांना द्यावयाची भिक्षा. 'गारपीरचे लष्करांतील शिपाई व गंगाधरशास्त्री यांजकडील माणसें मोहरमची फकिरी मागावयास आले; सबब मशार्निल्हेनीं लष्करवाले यांस रुपये दहा व शास्त्री यांजकडील माणसास पांच एकून पंधरा रुपये दिल्हे. -पया १२६. ३ मोहरममध्यें फकिराची दीक्षा घेतात ती; -गळ्यांत नाडा बांधणें इ॰ ४ दारिद्र्य; भिक्षावृत्ति; भीक. -वि. फकीरासंबंधीं; फकीरविषयक. [अर. फकीर्] ॰दौलत-संपत्ति-स्त्री. (भिक्षे- कर्‍याची संपत्ति); चंचल, अस्थिर संपत्ति; एके जागीं फार वेळ न राहणारी लक्ष्मी. ॰बाणा-पु. भिक्षेकर्‍याचा धंदा, वृत्ति, भिक्षा देही; दारिद्र्य. (क्रि॰ धरणें; घेणें; बाळगणें).

दाते शब्दकोश

फकिरी

(स्त्री.) [फा. फकीरी] दारिद्र्य; भिक्षावृत्ती; भीक; फकिरासम्बन्धी. “गारपीरचे लष्करांतील शिपाई व गङ्गाधर शास्त्री याजकडील माणसें मोहरमची फकिरी मागावयास आले; सबब मशार्निल्हेनीं लष्करवाले यांस रुपये दहा व शास्त्री यांजकडील माणसास पांच एकूण पन्धरा रुपये दिल्हे” (साने-पयाव १२६).

फारसी-मराठी शब्दकोश

राग (निंदा )

अति रागा भीक मागा त्याहून रागा देश त्यागा, रागें रागे खाई कुत्र्याचीं हाडेंं, शेषं कोपेन पूरयेत, व्याप तितका संताप, तापतें लवकर तें निवर्तेहि लवकर, आपला कमीपणा रागाने भरून काढतो.

शब्दकौमुदी

राउ(ऊ)ळ

पु. १ (महानु.) राजा. 'राउळें नेली सर्व संपत्ती '। -भाए ७२६. २ (महानु.) श्रीकृष्ण परमात्मा; देव. 'भवमोचकें चिरित्र । राउळाचीं ।' -ज्ञाप्र ९५२. ३ (महानु.) गोसावी; देव; चक्तधर. 'ऐसीं परीकरें पवित्रें। राउळांचीं लिळाचरित्रें ।' -ऋ २५. ४ छोटे रजपूत जातीचे जहागीरदार. ५ श्रीगुरुमहा- राज; श्रेष्ठ पुरुष. 'तरी याचिलागीं तुमतें । म्यां राउळासि विनविलें होतें ।' -ज्ञा ५.५. ६ एक जात किंवा तिच्यापैकीं एक व्यक्ति. हे भैरवाचे भक्त असून कोष्टी कामाकरितां लागणारे कुंचले, फण्या इ॰ तयार करितात. (नाशिक) वई तयार करणारी जात. -ज्ञान- प्रकाश ९.१.३१. ७ बदरीनारायणाचा नंबुद्री ब्राह्मण जातीचा पूजारी. 'बदरीनारायणाची पूजा अद्याप आचार्यांचें लंबेरी म्हणून ब्राह्मण आहेत त्यांजकडेस आहे. त्यांस...राऊळ म्हणतात. -तीप्र ५३. ८ पहाटेस हातांत मोठा त्रिशूळ घेऊन दोहरा म्हणत भीक मागणारा भिकारी. -न. १ घर; राजवाड़ा. 'आला वसुदेवाचिया राउळा ।' -एभा २.३९. २ देऊळ; मंदिर. 'काकडआरतीस ते वेळीं । पुजारी आले राउळांत ।' -भवि २.२९. [सं. राजकुल] सामाशब्द- ॰गण-न. (महानु.) राजमंदिर. 'कांइवो बोलणें रांउळगणांत ।' -धवळे पू. ७.२. राउळार-न. राऊळ; राजवाडा.

दाते शब्दकोश

रडणें

रडणें raḍaṇēṃ v i (रुदन S) To cry, to utter lamentations or to shed tears. 2 To bewail, bemoan, lament, deplore, regret. Pr. सदा मरे त्याला कोण रडे? 3 fig. To undergo destruction, blasting, marring; to be smashed, squashed, dished. Used freely. Ex. चार दिवस मामलत होती तीही रडली आतां लागले भीक मागायाला; माझें काय तेथें रडतें; तुझें काय त्यावांचून रडतें. 4 This verb is used with the uttermost license in reviling the mode of doing, proceeding, or being of a matter. Ex. आजपर्यंत मामलत रडत होती तेव्हां काय आह्माला दिल्हें तें आ- तां देणार; हा तीन वर्षें शेत रडला पण कांहीं झालें नाहीं, मी सावकारी करीन म्हटलें ती रडली आतां दुसरें कांहीं रडावें. Further exemplification may be obtained hourly in the streets. रडत्याचें अंसू पुसणें To wipe away the tears of the afflicted. 2 fig. To beguile a mourner or a petitioner with solitary words of consolation or with empty promises.

मोल्सवर्थ शब्दकोश

सबील

स्त्री. रस्ता; मार्ग; पद्धति. [अर. सबील] सबील करणें-कसेंहि करून, भीक मागून अगर उसने घेऊन पैसा उभा करणें; द्रव्य गोळा करणें. 'खर्च तोडून अदवानीवर सबील करावी.' -रा ५.१८७.

दाते शब्दकोश

सदा

सदा sadā ad (S) pop सदां ad Always. Ex. सदा चालिजे धर्मपंथ ॥ सर्व कुमति टाकोनि ॥. Ex. of comp. सदाकष्टी, सदादुःखी, सदाभोगी, सदारड्या, सदारोगी, सदानंद or दी, सदाशुचि, सदासुखी. Sometimes to intensity or enhance the sense त्रिकाळ is added, as सदात्रिकाळ Perpetually, unfailingly through the three times, morning, noon, and evening; as गायी दुहति सदात्रिकाळ ॥ क्षीर तुंबळ वर्षिति ॥. सदा पीक सदा भीक A phrase descriptive of the perpetual poverty and wretchedness of the Kun̤bí whatever luxuriant crops may crown his fields.

मोल्सवर्थ शब्दकोश

सदा-दां

क्रिवि. नेहमीं; सदोदित; निरंतर; सतत. 'हा सदां पाणिबुडा । युधिष्ठिरूं साबडा ।' -शिशु ८९४. 'सदा सर्वदा योग तूझा घडावा ।' -राम. सदाकष्टी, सदादुःखी, सदाभोगी, सदारड्या, सदारोगी, सदानंदी, सदाशुचि, सदासुखी असे याचे समासहि होतात. म्ह॰ १ सदा पीक सदा भीक = कुणब्याचें कितीहि पीक आलें तरी दारिद्र्य जात नाहीं. २ सदा मरे त्याला कोण रडे = दुःखाची कांहीं काळानें संवय होते या अर्थीं. सदा त्रिकाळ-नेहमीं; सतत; निरंतर; तिन्ही त्रिकाळ; सकाळ, दुपार, संध्याकाळ (विशेष जोर दाखविण्याकरितां योजतात). सदाकदा, सदानकदा, सदाकाळ-क्रिवि. नेहमीं; निरंतर; सतत; सदोदित. सदावक्र-वि. नेहमीं वांकडा, दुर्मुखलेला, रुसलेला, हट्टी; कष्टी; उदास. सदा खाटलेकरी-वि. बिछा- न्यास खिळलेला. सदागति-वि. नेहमीं भ्रमण करणारा; सारखा गतिमान असणारा (हवा, वार). सदातन-वि. चिरं- तन; शाश्वत; निरंतरचा; कायमचा. सदाफळ-वि. नेहमीं फळें देणारें. 'जोडती दाटें झाडें । सदाफळ तीं ।' -ज्ञा ६.१७३. सदासर्वदा-क्रिवि. नेहमीं; सतत. सदासिद्ध-वि. शाश्वत; चिरंतन (परमेश्वर).

दाते शब्दकोश

शोभणें

शोभणें śōbhaṇēṃ v i (शोभा) To have a handsome or beautiful appearance; to display lustre, radiance, beauty, grace. 2 To become; to be suitable to; to be graceful, ornamental, fitting unto. Ex. भीक मागणें हें अंधळ्या पांगळ्यास शोभतें धट्ट्या कट्ठ्यास शोभत नाहीं. Pr. शोभेल तें करावें पचेल तें खावें.

मोल्सवर्थ शब्दकोश

स्वगुण

समुद्र हा पिता चंद्रमा बंधु रमा भगिनी मेहुणा द्वारकेचा हरि असा शंख दारोदारीं भीक मागे.

शब्दकौमुदी

टिमटिम

टिमटिम ṭimaṭima f (Imit.) The sound of the टिमकी. 2 fig. The riot and rattle of high life. Ex. हा दोन दिवस टि0 करितो पुढें भीक मागेल.

मोल्सवर्थ शब्दकोश

स्त्री. १ टिमकीचा आवाज २ (ल.) चैन; मजा. 'हा दोन दिवस टिमटिम करतो, पुढें भीक मागेल.' [ध्व.]

दाते शब्दकोश

उकळा      

पु.       १. लोकांकडून हक्कदाराने किंवा कुळांकडून सावकाराने गोळा केलेली बाकी, वसुली; उगरण. २. भीक मागून जमा केलेला संग्रह. ३. दुसऱ्याकडून उपटलेला जिन्नस; वस्तू.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उकळा

पु. १ लोकांकडून हक्क्दारानें किंवा कुळांकडून साव- कारानें गोळा केलेली बाकी, वसुली; उगरण. २ भीक मागून जमा केलेला संग्रह. ३ दुसर्‍याकडून उपटलेला जिन्नस, वस्तु. [उकळणें]

दाते शब्दकोश

उकळीत      

स्त्री.       १. येणे असलेल्या पैशांची वसुली; उकळणी. २. भीक मागून मिळवलेला जिन्नस. ३. विकण्याकरिता आणलेल्या बागाईत किंवा किराणा मालावर ऐनमालाच्या रूपाने वसूल केलेली (शेखदाराने) रक्कम; करवसुली. ४. पाटलाने रयतेकडून वसूल केलेला सरकारी सारा. ५. प्रत्येक हप्त्याची जी येणे रक्कम असेल त्या बाबतीत धारेकऱ्यांना पाठवलेला फिरता हुकूम, याद, हिशेबाचा कागद अगर स्मरणपत्र. [सं. उत्कल्.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उकळीत

स्त्री. न. १ येणें असलेल्या पैशांची उगवणी; वसूल केलेली रक्कम. २ भीक मागून मिळविलेला जिन्नस. ३ विका- वयाकरितां आणलेल्या बागाईत किंवा किराणा मालावर ऐनमालाच्या रूपानें वसूल केलेली (शेखदारानें) रक्कम; करवसुली. ४ पाटलानें रयतेकडून वसूल केलेला सरकारी सारा. ५ धरेकर्‍यांना प्रत्येक हप्त्याची जी येणें रक्कम असेल त्या बाबतींत पाठविलेला फिरता हुकूम, याद, हिशेबाचा कागद अगर स्मरण. [सं.उत्कल्]

दाते शब्दकोश

उपाय (अयोग्य)

अघोरी उपाय, सुतासाठी मणी फोडण्याप्रमाणे, बहाल तासून खुंटी काढणे, अव्यापारेषु व्यापार, नसता फंदा, जुजबी उपाय, वरातीमागून घोडे, दाट झाले पाणी घाल पातळ झाले पीठ घाल, गवताने अग्नि झाकण्याप्रमाणे, गळा कापला खोकला मिटला, भीक नको पण कुत्रा आवर, नुसत्या मलमपट्ट्या.

शब्दकौमुदी

विद्यार्थी (वाह्यात)

मास्तरांना किंवा प्राध्यापकांना भीक घालीत नाहींत, नतद्रष्ट मुलें, छडी लागे छम् छम् विद्या येई घम् घम् हाच नियम यांना लागू, नाठाळपणाने शिक्षेची धार बोथट बनवून टाकली, वाह्यात कार्टीं, टारगट पोरें, यापेक्षां ढोरें बरीं.

शब्दकौमुदी

वीख

न. विष; विख पहा. [विष] म्ह॰ वीख घेववतें पण भीक घेववत नाहीं (भिक्षा मागण्यापेक्षां मरण सोपें वाटतें). विखार-री-विषार-री पहा.

दाते शब्दकोश

वीख vīkha n (Vulgar corr. of विष) Poison. Pr. वीख घेव- तें पण भीक घेवत नाहीं It is easier to die than to beg.

मोल्सवर्थ शब्दकोश

याचना

(सं) स्त्री० भिक्षा, भीक.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

पांढरा

वि. १ सफेत; शूभ्र; श्वेतवर्ण. २ (ल.) (महानु.) लुच्चा; सोदा; कपटी; अमंगळ. 'हा पांढरा संन्यासी । तूं कांहीं जाणैसी ना ।' -शिशु २२०. [सं. पाण्डुर] (वाप्र.) पांढऱ्याचा काळा-पांढऱ्यावर काळें करणें-१ (एखादी गोष्ट करार इ॰ पांढऱ्या कागदावर काळ्या शाईनें) लिहून नमूद करणें; लेखबद्ध करणें. (सामा.) लिहिणें. 'ज्यास पांढऱ्यावर काळें करतां येत नव्हतें ते हल्लीं मानसशास्त्राच्या गोष्टी सांगू लागले आहेत.' -ओक. पांढऱ्या कपाळाची-वि. विधवा; (कपाळा- वरील) कुंकुमतिलकहीन; गतभर्तृका. पांढऱ्या पायाचा-वि. (ल.) जेथें जाईल तेथें वाटोळें करील असा; अपशकुनी; वाईट पायगुणाचा (मनुष्य). उखळ पांढरें होणें-दारिद्र्य जाऊन श्रीमंती येणें. सामाशब्द- ॰अभ्रक-पु. अभ्रकाची पांढरी जात. ॰ऊंस-पु. पिवळसर पांढऱ्या उंसाची एक जात (वेडा किंवा विलायती ऊंस याहून निराळा). ॰कांदा-बटाटा-पु. (उप.) (कु.) कोंबडीचें अंडें. ॰कावळा-पु. निसर्गांत अविद्यामान, अप्राप्य वस्तु. जसें-शशशृंग, खपुष्प, वंध्यापुत्र इ॰ कावळा हा काळ्या रंगाचा असतो त्यावरून हा अर्थ. पांढऱ्या कावळ्या- कडे जाणें-देशांतर करून भीक मागणें. 'आम्हांस पांढऱ्या कावळ्याकडे जावें लागेल.' -हरिवंशबखर ५४. जिकडे पांढरे कावळे असतील तिकडे जा-'येथून काळें कर' या अर्थीं लोचट मनुष्य इ॰कांस उद्देशून योजावयाचा वाक्प्रचार. ॰गहूं-पु. गव्हाची एक जात. ॰चित्रक-पु. चित्रकाची पांढरी जात. ॰तित्तिर-पु. कपिंजल. -योर १.५९. ॰धोतरा-पु. पांढरीं फुलें येणरी धोत्र्याची एक जात. ॰परीस-पु. (उप.) १ दगड; पांढऱ्या पायाचा मनुष्य; कपाळकरंटा. 'आईबापांच्या पोटीं असला पांढरा परीस जन्माला आला.' -नामना ९९. २ अट्टल सोदा; लुच्चा. [पांढरा + परीस] म्ह॰ (व.) पांढरा परीस नर्मद्या गणेश = आंत निराळें व बाहेर निराळें असें ज्याचें वर्तन असतें त्यास उद्देशून म्हणतात. ॰पाल-वि. आजार इ॰कांमुळें शरीर रक्तहीन झाल्यामुळें पांढऱ्या पालीसारखा दिसूं लागलेला. ॰फटफटीत-सफेत-शुभ्र-फेक-वि. अतिशय पांढरा; केवळ पांढरा; पांढरा स्वच्छ. ॰फटफटीत-फिटूक-वि. अतिशय फिक्का; निस्तेज. 'त्याचा चेहराहि पांढराफिटुक दिसायला लागला आहे.' -कमला नाटक अक १. प्र. २. ॰भोपळा-पु. दुध्या भोंपळा. ॰राळा-पु. राळ्याची पांडरी जात. कांहीं लोक खसखस व हें धान्य यांचा अंतर्भाव अठरा उपधान्यांत करून एकूण उपधान्यांची संख्या वीस मानतात. ॰वडस-पु. डोळ्याच्या बुबुळ्यावर पांढऱ्या रंगाचा होणारा रोग. सं. शुक्लार्म. -योर २.५३३. ॰सफेत-द-वि. पांढरा स्वच्छ; अतिशय पांढरा (वस्त्र, कागद इ॰ पदार्थ). [पांढरा + फा. सफेद् = पांढरा] ॰हत्ती-पु. (ल.) मोठ्या खर्चानें पाळतां, पोषितां येण्यासारखें, पोसण्यास जड असें जनावर, मनुष्य इ॰ (इं.) व्हाइट् एलेफंट् यास प्रतिशब्द. ॰हत्या-वि. तांदुळाचा एक भेद. पांढरपायी-वि. मागचा एक पायपांढरा असलेला (घोडा). हा अयब मानतात. अशुभ चिन्हें पहा. [पांढरा + पाय] -र पाल-स्त्री. (ल.) अति- शय रोड, निस्तेज मनुष्य. -र पोटा-वि. १ गव्हाची एक हलकी जात. ह्या जातीच गहूं एका बाजूस तांबडा व दुसऱ्या बाजूस पांढरा असतो. २ अव्यवस्थितपणें भाजलेली व मध्यभागीं पांढरी राहिलेली (भाकरी). [पांढरें + पोट] -फळी-स्त्री. एक तृणधान्य व त्याचें तृण. पांढरफळीचीं काडें लहान असून हात-दीड हात उंच असतात. या झाडांचा रंग पांढरा असतो. यास मोहरीहून जरासें मोठें असें पांढरें बीं येतें. हें बीं गुरें खातात. दुष्काळांत माणसेंहि या बियांच्या भाकरी करून खातात. -वगु ४.६२. [पांढरें + फळ,] -रमाती-स्त्री. १ पांढऱ्या रंगाची माती. २ पांढरी जमीन. -रवट-वि. किंचित् पांढरा; पांढुरका. [पांढरा + वत्] -रवणी-नी-न. पांढरा प्रदर. 'पांढरवनी पडे तें राहे.' -वैद्यक ८५.८६. [पांढरें + पाणी] पांढरे केश-स-पुअव. १ पिकलेले पांढरे झालेले केस. २ (ल.) म्हातारपण; उतारवय. -रे गोलक-पुअव. रक्तांतील पांढऱ्या पेशी. -रे तारे-पु. (शोभेचें दारूकाम) दारू कामाचा एक प्रकार. 'बाण, नळे वगैरे सामानांत पांढरे तारे तयार होतात.' -अग्निक्रिडा ११. -रे तीळ-पु. तिळाची पांढरी जात. -रे पिशी-विअव. गव्हाची एक जात. या जातीच्या गव्हाचा दाणा गिड्डा असून भरींव व चमकदार असतो. -मुंव्या ४२. पांढरी-स्त्री. १ (गांवठाणावरील) लोकवस्ती. 'ययापरी उद्वस समस्त । पांढरी पडली ।' -गीता २.२२७१. २ गांवची सीमा; शिवारांतील (गाळाची मळी साचून तयार झालेली) जमीन; गांवठाण. 'गांवची पांढरी सोडून लोकांनीं वस्ती लांब नेली' -खेया २५. ३ पांढर (-स्त्री.) इतर सर्व अर्थी पहा. [सं. पाण्डुर] पांढरी घेटूळ-घेटोळी-स्त्री. घेटोळीची, पुनर्नव्याची पांढरी जात. -री जमीन-स्त्री. पांढरसर जमीन. ही आवळ व निबर असून पाणी ढाळते. -गांगा १. -री झीक- स्त्री. (भरतकाम) रुपेरी जरतार असलेली मखमल. -री तुळस- स्त्री. रामतुळस; हिच्या उलट कृष्णतुळस. ही काळसर रंगाची असते. -री पोळी-स्त्री. गव्हाची साधी पोळी. पुरणपोळी, गुळाची पोळी इ॰कांच्या उलट. -री माठ-स्त्री. माठ या पाले- भाजीची पांढरी जात. तांबडी व काटे माठ असे हिचे दुसरे प्रकार आहेत. -री माती-स्त्री. चिकणमातीचा एक प्रकार; चिनी माती. पांढर माती पहा. -पदाव ३५. -री रुई-स्त्री. फिकट पांढऱ्या रंगाची रुईची जात. -री साल-स्त्री. तांदुळाची एक जात. याच्या उलट काळी साल. -री सुरळी-स्त्री. (विणकाम) १ फणींतील एका घरांत काळें व एका घरांत पांढरें उभार सूत असून आडवण सर्व काळें व कोणतीहि किनार असलेलें लुगडें. २ फणींतील एका घरांत तांबडें व एकांत पांढरें असें उभार आणि आडवण सर्व तांबडें असून कोणत्याहि किनारीनें युक्त असा लुगड्याचा प्रकार. पांढरें अळूं-न. अळवाची पांढरी जात. हें अग्निदीपक व सारक असून मूळव्याध, कृमि, पित्त यांचें नाशक आहे. -योर १.४७. -रें निशाण-न. (ल.) मुसलमानांचे, मोंगलांचें निशाण. 'नऊशें पठाण कापिला । पांढरें निशाण उपटलें ।' -ऐपो ६१. -रें पाणी- न. अगदीं पातळ, पाणचट ताक; ताकवणी. -रें पातळ-न. (विणकाम) सर्व पो पांढरें व कोणतीहि किनार असें विणलेलें पातळ. -रें फेक-वि पांढरें शुभ्र. -रें बुबुळ-न. डोळ्यांतील पांढरा भाग; याच्या उलट काळें बुबुळ. -रें मीठ-न. समुद्राच्या पाण्यापासून बनविलेलें मीठ; याच्या उलट मातीमीठ, खाणींतील मीठ; काळें मीठ -रें वांगें-न. (सांकेतिक) (क.) कोंबडीचें अंडें.

दाते शब्दकोश

बोंब

स्त्री. १ तोंडावर हात मारीत मारीत काढलेला मोठा आवाज; शंखध्वनि (अति दुःख, महत्संकट, तक्रार किंवा शिमगा यावेळीं केलेला). (क्रि॰ मारणें; ठोकणें). २ हाकाटी; दुर्मिक्ष. 'यंदा पाण्याची फार बोंब उडाली.' ३ पुकार; गलबला; ओरडा. [देप्रा. बुंबा ध्व. बं] म्ह॰ (राजा) मृगाआधीं पेरावें व बोंबे- आधीं पळावें. ॰उठणें- १ बोंब लागणें पहा. २ भुमका उठणें; जाहीर होणें. ॰पडणें वाजणें-होणें- १ ओरडा होणें; हाकाटी होणें; न मिळाल्यामुळें बोभाटा होणें. २ अत्यंत प्रयासानें मिळणें; दुर्मिक्ष होणें. (कोणेकाच्या नांवाची) ॰पडणें- एखादें दुष्कर्म अमक्यानें केलें असा बोभाटा होणें. ॰पाडणें- (ना.) (उपरोधिक) शतकृत्य करणें; दिग्विजय करणें; दिवे लावणें. ॰लागणें-कळ उठणें; वेदना होणें; बोंब उठणें; वेदनांनीं ओरडण्याइंतके दुःख होणें. (एखाद्याच्या नांवानें )बोंब मारणें- एखादी वाईट गोष्ट अमक्यानें केली असें सांगत सुटणें. काय बोंब मारली-(व.) कोणती कर्तबगारी केली? बोंबलणें- अक्रि. १ बोंब मारणें; बोंब ठोकणें. २ (एखादें कार्य किंवा मस- लत) फसणें; शेवटास किंवा पूर्णत्वास न जातां मध्येंच निःशेष होणें; कांहीं एक निष्पन्न न होणें. ३ (व.) टेंभलणें; मोठ्यानें रडणें. बोंबलता-वि. बोंबलणारा; बोंब मारणारा. म्ह॰ रडत्याची शेती बोंबलत्याचें दुभतें. बोंबलपट्टी-स्त्री. १ मोठा आरडा- ओरडा; हाकाटी; गलबला. २ स्वतःची फुशारकी; आत्मस्तुति; आत्मश्लाघा. बोंबल बाराखडी-स्त्री. अंगीं मुळींच विद्वत्ता नसून पांडित्याची ऐट दाखविणें. बोंबलभिक्या-वि. कपाळ- करंटा; कमनशिबी; दुर्दैवी. [बोंबलणें + भीक] बोंबल्या-वि. १ नेहमीं वोंबलण्याची किंवा आरडाओरड करण्याची संवय असलेला; बोंबलणारा. २ नेहमीं फुरफुरणारा (घोडा). म्ह॰ (व.) येरे माझ्या मागल्या पाप न जाई बोंबल्या. बोंबल्या गणेश-हणमंत- पु. १ वाचाळ, वटवट्या, तोंडाळ इसम. २ गुप्त गोष्ट मनांत न ठेवणारा मनुष्य. ३ नेहमीं अमंगळ बोलणारा, अभद्रभाषी, रड्या माणूस. [बोंबलणें + गणेश-हणमंत] बोंबळी-स्त्री. बोंब. -शर. बोंबाबोंब-स्त्री. भयंकर हाकाटी; आरडाओरडा (अनर्था मुळें झालेली). 'कां मग बोंबाबोंब ।' -टिळक. [बोंब द्वि.] बोंबाळ-पु. गोंधळ; धांदल; दंगलधुमाकूळ; गडबड; धामधूम (मेजवानी इ॰मध्यें). म्ह॰ गावांत लगीन कुत्र्याला बोंबाळ. बोंबाळणें-उक्रि. १ गोंधळांत सांपडणें; त्रासांत अडकणें; गोंधळून जाणें; गडबडून जाणें. २ गोंधळ करणें; गडबड उडवून देणें; गोंध- ळांत पाडणें; त्रास देणें. बोंबो-वि. (गो.) वेडाः मूर्ख. बोंब्या- पु. १ गयेमधील एक पंड्या; हा यात्रेकरू आले म्हणजे त्यांच्या पुढें बोंब मारीत जातो. २ हाकारा करणारा नोकर. 'त्यांत बोंब्या निघून गेला ।' -ऐपो ५२. ३ (थोड्याशा दुखापतीमुळें किंवा भीतीमुळें) मोठी ओरड करणारा; बोंबलणारा. ४ काम फत्ते करून न येणारा (एक शिवी)

दाते शब्दकोश

नाक      

न.       १. श्वास व वास घेण्याचे इंद्रिय; श्वासनलिकेची सुरुवात; घ्राणेंद्रिय; नासिका. २. (ल.) धान्य, बटाटे इ.ला ज्या ठिकाणी मोड येतो ती जागा; डोळा. ३. सुई, दाभण इ.चे भोक; नेडे. ४. (कुटुंब, सभा इ.तील) मुख्य उत्कृष्ट मनुष्य; देशातील मुख्य शहर किंवा किल्ला. ५. नथीकरता नाकाला पाडलेले भोक, छिद्र. ६. धीटपणा; दम; खात्री. ७. निलाजरेपणा. ८. अब्रू; चांगली कीर्ती, नाव; उजळ माथा. [सं. नासिका] (वा.) नाक ओरबाडणे–नाकातील अलंकार हिसकून घेणे. नाक कापणे–खोडकी, गर्व जिरविणे; पराभव करणे. (आपले) नाक कापून दुसऱ्याला अपशकुन, अवलक्षण करणे–दुसऱ्याचे नुकसान व्हावे म्हणून आपला स्वतःचा नाश करून घेणे. नाक कापून पाटावाने पुसणे–एखाद्याची मोठी अप्रतिष्ठा करून नंतर थोडा सन्मान करणे. नाक खाजवणे–चिडवणे; वेडावणे; खिजवणे. नाक खाली पडणे, नाक पाडणे, नाक होणे–गर्व नाहीसा होणे, करणे; मानहानी होणे. नाक गुंडाळणे–आपला कमीपणा, पराभव कबूल करणे; शरण जाणे; क्षमा मागणे. नाक गेले तरी भोके राहिली आहेत असे म्हणणे–मागील गुन्ह्याची लाज सोडून पुन्हा निर्लज्जपणे बोलणे, वागणे. नाक घासणे–१. आर्जव, खुशामत करणे; हांजी हांजी करणे. २. क्षमा मागणे; चूक कबूल करणे. नाक चढवून बोलणे–उद्धटपणाने बोलणे. नाक ठेचणे –फजिती करणे; नक्षा उतरणे; खोड मोडणे. नाक जळणे,नाकातले केस जळणे–फार दुर्गंधी येणे. नाक झाडणे–१. तिरस्कार दाखवणे; ताठा, गर्व उतरविणे. २. नाक शिंकरणे. ३. घोडा इ. जनावराने जोराने नाकातून वारा काढणे. नाक तोडून कडोस्त्रीला खोवणे–१. भीक मागण्यासाठी लाजलज्जा सोडणे; अगदी लोचट बनणे. २. नापसंती दाखवणे; नावे ठेवणे. नाक धरणे–वाट पाहायला लावणे; खोळंबा करणे. नाक धरल्यास, नाक दाबल्यास तोंड उघडणे–एखाद्याला पेचात धरल्याशिवाय तो आपल्या म्हणण्याला कबूल होत नाही म्हणून त्याला पेचात धरणे. नाक धरून बसणे–१. (प्राणायामावरून) धार्मिक कृत्यांत गुंतलेला असणे. २. कर्तव्य न करता वेळ दवडणे. नाक मुठीत धरून जाणे–निरुपायाने, नाइलाजाने शरण जाणे; अभिमान सोडून जाणे.नाक मुरडणे, नाक मोडणे–नाक वाकडे करून नापसंती दर्शविणे; फजिती उडवणे; गर्व उतरवणे. नाक लावून (करणे)–धिटाईने; निलाजरेपणाने (करणे). नाक वर करणे, नाक वर करून चालणे, नाक वर असणे–१. दिमाख, ताठा, गर्व, निर्लज्जपणा दाखवणे; वरचढ असणे. २. स्वतः दोषी असतानाही दिमाख दाखवणे; शरम न वाटणे. नाक वाहणे–पडसे येणे. नाक सावरणे– (बायकी) मूल जन्मल्याबरोबर त्याला न्हाऊ घालताना त्याच्या नाकात तेलाचे एकदोन थेंब सोडून त्याच तेलाच्या हाताने नाकाच्या वरच्या भागापासून शेवटपर्यंत हलके चोळणे. नाकधुऱ्याकाढणे, नाकदुऱ्या काढणे–१. अतिनम्रपणाने विनवणे; शरण जाणे; क्षमा मागणे. २. केलेल्या अपराधाबद्दल प्रायश्चित्त भोगणे. नाकपुड्या पिंजारणे, नाकपुड्या फुलविणे, नाकपुड्या फुगविणे, नागपुड्या फुरफुरविणे, नाकपुड्या फेंदरणे–रागाने खेकसणे; अंगावर जाणे; नाक फुगवून राग दाखविणे. नाकमुष्ट्या हाणणे–हिणवणे; नाराजी दाखवणे. नाकाचा कानवला करणे–नाक मुरडणे. नाकाची घाण मरणे, जाणे –१. सवयीमुळे, पडशामुळे वास न येणे; सवय होणे. २. (ल.) सवयीमुळे वाईटाचा तिरस्कार न वाटणे. नाकात काड्या घालणे–चिडवणे; टोमणे मारणे; कुरापत काढणे; चीड येईल असे वागणे. नाकात दम येणे–निरुपाय होणे; अत्यंत थकणे. नाकात बोलणे– नाकातून, गेंगाण्या स्वरात बोलणे; (कोकणी लोकांप्रमाणे) अनुस्वारयुक्त बोलणे. नाकातोंडाची गुंजडी करणे– (नाक, तोंड आवळून, चंबूसारखे करून) राग, नापसंती दाखवणे. नाकाने कांदे, वांगी सोलणे–१. नसता, खोटा शुचिर्भूतपणा दाखवणे; उगीच पावित्र्याच्या गोष्टी सांगणे. २. एखादे वेळी फार चोखंदळपणा करणे पण एरवी वाटेल तसे वागणे. नाकापेक्षा मोती जड होणे–गौण वस्तूला अधिक महत्त्व प्राप्त होणे; कनिष्ठ दर्जाचा मनुष्य वरिष्ठाहून वरचढ होणे. नाकाला चुना लावणे, नाकाला चुना लागणे– १. बदनाम करणे, होणे : ‘सोसे कुलजा मृत्यु, न अयशाचा सोसवे चुना नाकीं ।’ – मोद्रोण २१·५८. २. डिवचणे. नाकाला जीभ लावणे, झिमोटा घालणे – तिरस्कार दाखवणे; गर्व, ताठा, दिमाख दाखवणे; नाक मुरडणे. नाकाला पदर लावणे– १. लज्जेने, अपर्कीतीमुळे तोंड झाकणे. २. घाणीचा तिरस्कार करणे. नाकाला मिरच्या झोंबणे–एखादी गोष्ट मनाला, वर्मी लागणे. नाकावर असणे–अगदी तयार असणे. नाकावरची माशी तरवारीने हाणणे–लवकर राग येणे. (व.) नाकावर जीव येणे–कमालीचे कष्ट पडणे. नाकावर टिचणे–१. एखाद्याचे पैसे ताबडतोब देणे. २. काकूं न करता, अडथळ्याला न जुमानता एकदम देणे, करून टाकणे. नाकावर निंबू घासणे,नाकावर निंबूपिळणे– प्रतिपक्षाला न जुमानता आपले काम साधणे; प्रतिपक्षाला चीत करणे. नाकावर पदर येणे–१. वैधव्य येणे. २. लाजेने लपून एकांतवासात बसणे. नाकावर पाय देणे–विरोधाची पर्वा न करणे; प्रतिपक्षावर मात करणे. नाकावर बोट ठेवणे–१. गुप्त ठेवायला, गप्प बसायला सांगणे. २. (रागाने किंवा अन्य कारणाने एखाद्याला) दबकावणे. नाकावर माशी बसू न देणे–अतिशय चिडखोर असणे; अपमान किंवा तिरस्कार अगदी सहन न होणे; थोडेदेखील उणे बोलणे सहन न होणे. नाकावर वाट करणे –विरोधाला न जुमानता काम सिद्धीला नेणे. नाकाशी सूत धरणे–अगदी मरणोन्मुख होणे. (मरताना श्वास आहे की नाही ते पाहण्यासाठी नाकाशी सूत धरतात). नाकासमोर जाणे, चालणे–अगदी सरळ मार्गाने जाणे. नाकाहोटांवर जेवणे–चाखतमाखत, चोखंदळपणाने जेवणे. नाकीचा बाल, नाकाचा बाल–१. अत्यंत आवडता, जिवलग माणूस; गळ्यातला ताईत. २. मोठ्यांच्या परमप्रीतीतला दुर्जन. नाकी नऊ, नळ, नव येणे–१. अतिशय दमणे, कंटाळणे, भागणे (श्रमाने). २. (नऊ इंद्रियांची शक्ती नाकात येणे) मरणाच्या दारीअसणे. नाकी वेसण घालणे–एखाद्याला कह्यात, कबजात ठेवणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

मिळण

न. आमटी, भाजी इत्यादि मिळून येण्याकरितां त्यांस लावावयाचें पीठ. [सं. मेलन] मिळण-णी-नस्त्री. १ एकत्र होणें; मिलाफ; संबंध; मिश्रण; एकी. २ संगम. 'सागर- सरिता जीवन एक । परि मिळणीं भजन दिसे अधिक ।' -एभा १.९५. ३ संसर्ग; भेट; स्पर्श; संयोग; संबंध; मेळ. 'सत्संगसूर्याचे मिळणीं निर्विकल्पमळणी । विकासे ।' -एभा २६.४३८. ३ एकरूपता. 'कृष्णमिळणीं मिळल्या । त्याही न फिरती ।' -तुगा १२८. ४ मीलन; एकत्र जुळणें, जमणें. 'तेही तेही ठाई मिळणी । समयो सांजवेळु कां रजनी ।' -ज्ञा १७.२९५. मिळणीं मिळणें- भेटणें; एकत्र येणें; संयोग-संगम होणें. मिळणीं मिळणींत- मिळणीस असणें-चालणें-मिळणें-एखाद्याच्या तंत्रानें चालणें, मिळून जाणें; कह्यांत, ताबेदारींत असणें. मिळणीस मिळणें-संगम होणें; एखाद्याशीं मिळून जाणें. मिळणी होणें- भेटणें. मिळणें-अक्रि. १ (द्रव्य, लाभ, नोकरी, पदवी इ॰) प्राप्त होणें; हस्तगत होणें. २ एकत्रित होणें; मिसळणें. ३ एक- रूप होणें; एकत्रित, एकजीव होणें; एकमत होणें. ४ जुळणें; अनुरूप किंवा अनुकूल होणें; बरोबरीचे होणें; एखाद्याप्रमाणें-सारखें असणें. ५ एखाद्याच्या बाजूचा होणें; एखाद्या विशिष्ट पक्षाचा, मताचा, धोरणाचा होणें. 'पार्थासी नमुनियां अजा मिळ रे ।' -मोभीष्म १२.५२.६ भेटणें; भिडणें; टेकणें; गांठ पडणें; संयुक्त होणें; समोरासमोर येणें. ७ सांपडणें; आढळणें; दृष्टोत्पत्तीस येणें; दिसणें; पहिलें जाणें. ८ पकडीत येणें; धरूं येणें; हातांत येणें. 'हा खिळा अवघड ठिकाणीं बसला, ह्यास धरायला मिळत नाहीं.' ९ शक्य होणें; शक्य असणें. 'हे कुलूप भलत्याला उघडायला मिळ- णार नाही.' १० (गो.) रतिभावानेनें अंगीकार करणें. ११ गुर- फटला जाणें; अडकणें. 'मिळेना कदा कल्पनेचेन मेळीं ।' -राम ५४. १२ नफा; फायदा होणें; उत्पन्न होणें. [सं. मिल् = भेटणें] म्ह॰ मिळत नाही भीक तर वैद्यकी शीक. मिळून मिसळून वागणें-मित्रत्वाच्या, घरोब्याच्या, समतेच्या नात्यानें वागणें. मिळता-वि. जुळता; मिळणारा. मिळता काळ-पु. भर- भराटी काळ; प्राप्तीची वेळ; मिळण्याचा काल. मिळताऊ- वि. १ बरोबरीच्या लोकाशीं लवकर मिसळून जाणार; दुस- ऱ्याशीं आपलें पटवून घेणारा. २ जिंकणारा, मिळविणारा. मिळ- ताव-पु. १ प्राप्ती; मिळकत; फायदा. २ सामील होणें. मिळती वस्त-स्त्री. मिळवितां येण्यासारखी वस्तु; ज्याची नुकसानभर- पाई करतां येईल असा माल. 'पोर मिळवतीवस्त आहे. परंतु आईबाप मिळवतीवस्त नाहींत.' [मिळणें + वस्तु]

दाते शब्दकोश

ओम्, ॐ

अ. अ = विष्णु, उ = शिव, म = ब्रह्मा. ह्याप्रमाणें तिन्ही देवांचें वास्तव्य या शब्दांत आहे. १ वेद, पुराण, पोथी, स्तोत्र इ॰ म्हणण्यापूर्वीं व संपविल्यानंतर जो पवित्र शब्द उच्चार- तात तो; प्रार्थनेच्या वेळीं प्रारंभीं उच्चारावयाचा शब्द. 'ओम् नमोजी गणनायका ।'; 'ओम् श्रीरामरक्षास्तोत्रमंत्रस्य ।' २ आरंभ; उपक्रम. ३ प्रणवब्रह्म; शब्दब्रह्म; एकाक्षर ब्रह्म. 'ॐ नमोजी आद्या ।।' -ज्ञा १.१.३ वैदिक काळीं (मांडूक्य उपनिषदांत), अ = वैश्वानर, उ = तैजस, म = प्राज्ञ, ओम् = अतर्क्य, अवाच्य व ज्यामध्यें सर्व जगाचा समावेश होतो असें ब्रह्म, असा अर्थ होता. ओम् हें अक्षर प्रथम उपनिषदांत आढळतें. ॰कार-ओम् पहा. ॰तत्सत्- ॐ ( = ब्रह्म), तत् ( = तें), सत् ( = खरें,) फक्त ब्रह्म हें खरें किंवा शाश्वत आहे. 'ओम्, ॐ तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु ।' मंत्र किंवा एखादें कर्म संपविल्यानंतर हें वाक्य म्हणण्याचा परिपाठ आहे. लक्षणेनें याचा अर्थ संपविणें, पाणी सोडणें असा आहे. 'ॐ तत्सत् ब्रह्मार्पणं सेवट ।' -दावि २६. ॰पुण्या-पुण्याहम्- १ मी प्रणवरूप, पुण्यस्वरूप आहें अशा अर्थाचा मंत्र. एखाद्या मंगल संस्कारापूर्वीं स्वस्तिवाचन नांवाचें कर्म केलें जातें त्यामध्यें संस्कारकर्त्या यजमानास ब्राह्मण 'ओं पुण्याहं' असा आशीर्वाद देत असतात. 'चिद्ब्रह्मेंसि लग्न लाविशी । ओं पुण्येसी तत्त्वता ।' -एभा ८.१. २ लग्न मंत्राचा आरंभ, पुण्याहवाचनाचे वेळीं म्हणण्यांत येणारे मंत्र. 'ॐ पुण्याह म्हणोनियां जाण । लाविलें उभयतांचें लग्न ।।' -जै ५६.२०. ॰फस, ॰फस होणें- १ निष्फळ होणें; फसणें. 'परीक्षा नापास झाल्यामुळें त्याचे सारे बेत ओंफस झाले व पुन्हां तो कॉलेजची वारी करूं लागला.' २ लयास जाणें, नायनाट होणें. [ओम् + फस् = फुगा फुटल्याचा आवाज] ॰भवति १ (भिक्षां देहि). बाई भिक्षा वाढा, असा भिक्षा- मागतांना म्हणावयाचा मंत्र. २ (ल.) भिक्षा (मागणें); भिक्षाटन. 'नीट वागला नाहींस तर ओंभवती करीत फिरशील बरें !' ॰भवति पक्ष-१ भिक्षावृत्ति; भीक मागण्याचा पेषा. 'ब्राह्मणाची मुख्य दीक्षा । मागितली पाहिजे भिक्षा । ओं(वों)भवति या पक्षा ! रक्षिलें पाहिजे ।।' -दा १४.२.१. २ (ल. उप.) अर्ज विनंत्या करून (स्वराज्य) मागणार्‍यांचा एक पक्ष; मवाळ पक्ष.

दाते शब्दकोश

तोंड

न. १ ज्यानें खातां वं बोलतां येतें तो शरीराचा अव- यव; मुख; वदन; तुंड. २ चेहरा; हनुवटीपासून डोक्यापर्यंत मस्तकाचा दर्शनी भाग. ३ (सामा.) (एखाद्या वस्तूचा) दर्शनी भाग; पुढचा-अग्रभाग; समोरील अंग. 'या ओझ्याच्या तोंडीं मात्र चांगल्या चांगल्या पेंढ्या घातल्या आहेत.' ४ (फोड, गळूं इ॰ कांचा) छिद्र पडावयाजोगा, छिद्रासारखा भाग; व्रणाचें मुख. यांतूनच पुढें पू, लस इ॰ वाहतात. ५ (कुपी, तपेली, लोटी इ॰ कांचें) पदार्थ आंत घालावयाचें भोंक; द्वार; मार्ग; मुख. ६ (एखाद्या विषयांत, शास्त्रांत, गांवांत, देशांत, घरांत) शिरकाव होण्याचा मार्ग; प्रवेशद्वार. 'ह्या घराचें तोंड उत्तरेस आहे.' ७ (ल.) गुरुकिल्ली. उदा॰ 'एखाद्या प्रांताचें, देशाचें किल्ला हें तोंड होय.' 'व्याकरण भाषेचें तोंड होय.' ८ (वारा इ॰कांची) दिशा; बाजू. ९ धैर्य; दम; उमेद; एखादें कार्य करण्याविषयींची न्यायतः योग्यता. १० एखाद्या पदार्थाचें ग्रहण किंवा त्या पदार्थाचा एखाद्या कर्याकडे विनियोग इ॰ कांचा आरंभ त्या पदार्थाच्या ज्या भागाकडून करि- तात तो भाग. 'भाकरीस जिकडून म्हटलें तिकडून तोंड आहे.' ११ (युद्ध, वादविवाद इ॰कांसारख्या गोष्टींची) प्रारंभदशा. 'वादास आतां कुठें तोंड लागलें.' १२ (सोनारी धंदा) हातोड्याच्या सगळ्यांत खालच्या बाजूस अडिश्रीच्या बुडासारखा जो भाग असतो तो. यानें ठोकलेला जिन्नस सारखा करून घेतात. १३ (सोनारी धंदा) कांबीस गोल आकार देतांनां तिचीं टोंकें जेथें जुळतात तो भाग. १४ (बुद्धिबळें) डाव सुरू करण्याचा प्रकार; मोहरा. 'वजीराच्या प्याद्याचें तोंड.' [सं. तुंड; प्रा. तोंड] (वाप्र.) ॰आटोपणें, सांभाळणें, आवरणें-जपून बोलणें; बोलण्याला आळा घालणें; अमर्याद भाषण, अभक्ष्यभक्षण यांपासून निवृत्त होणें. ॰आणणें- (आट्यापाट्यांचा खेळ) शेवटची पाटी खेळून जाऊन पुन्हां एक एक खेळत येणें; पाणी आणणें; लोण आणणें. ॰आंबट करणें- (एखाद्यानें) असंतुष्ट, निराशायुक्त मुद्रा धारण करणें. तोंड आहे कीं तोबरा-खादाड किंवा बडबड्या माणसास उद्देशून वापरावयाचा, 'किती खातोस' 'किती बोलतोस' या अर्थाचा वाक्प्रचार. ॰उतरणें-(निराशा, आजार इ॰ कांनीं) चेहरा म्लान होणें, सुकणें, फिका पडणें, निस्तेज होणें. ॰उष्टें करणें-(अन्नाचा) एखादा-दुसरा घांस, एक दोन घांस खाणें; जेवणाचें नुसतें नांव करणें. ॰करणें-बडबड, वटवट, बकबक करणें; उद्धटपणानें, निर्लज्ज- पणानें बोलणें. ॰करून बोलणें-निर्लज्जपणें, आपला (लहान) दर्जा सोडून बोलणें. ॰काळें करणें-(उप.) एखादा ठपका, तोहमत अंगावर आल्यामुळें निघून, पळून, निसटून जाणें; हातावर तुरी देणें; दृष्टीस न पडणें (केव्हां केव्हां तोंड हा शब्द वगळला तरी चालतो. जसें:-त्यांनीं काळें केलें). ॰गोड करणें-१ (एखाद्याला) लांच देणें; खूष करणें. २ मेजवानी देणें; गोड खावयास घालणें. ॰गोरेंमोरें करणें-(कोणी रागें भरल्यामुळें, मनास वाईट वाटल्यामुळें) निराशेची, लाजलेपणाची मुद्रा धारण करणें. ॰घालणें-(दोघे बोलत असतां तिसर्‍यानें) संबंध नसतां मध्येंच बोलणें. ॰घेऊन येणें-एखाद्यानें एखाद्यावर सोंपविलेलें काम न करतां त्यानें तसेंच परत येणें. 'असें सर्वांनीं न करावें. जो मामलेदार असें करून तोंड घेऊन येईल त्याचें मुखावलोकन न करितां फिरोन सेवा न सांगतां त्यास घरींच बसवावें.' -मराआ २९. ॰घेणें-१ बोंबलत सुटणें; ताशेरा झाडणें; बोंबलपट्टी करणें. २ तोंडांतून लाल गळावी म्हणून पारा इ॰ तोंड आणणारीं औषधें घेणें. तोंड देणें पहा. 'मी वैद्याकडून तोंड घेतलें आहें.' तोंडचा-वि. १ विरुद्ध, उलट दिशेचा; समोरून येणारा (वारा, ऊन, भरती इ॰). २ ज्याची कर्तबगारी केवळ तोंडांतच, बोल- ण्यांतच आहे, क्रियेंत दिसून येत नाहीं असा. 'तोंडचा शिपाई- कारकून-सुग्रण-खबरदार.' ३ तोंडानें सांगितलेला, निवेदन केलेला; तोंडीं केलेला (व्यवहार, हिशेब, पुरावा इ॰). याच्या उलट लेखी. तोंडचा, तोंडींचा घास काढणें-हिरून घेणें-१ (एखा- द्याची) अगदीं आटोक्यांत आलेली वस्तु, पदरीं पडावयास आलेला लाभ हिसकावून घेणें. २ (एखाद्याच्या) अन्नावर पाणी पाडणें; अन्नांत माती कालविणें; पोटावर पाय देणें. तोंडचा-तोंडींचा घांस देणें-(ल.) (एखाद्यास) अतिशय प्रेमानें, ममतेनें वाग- विणें; प्रसंगविशेषीं आपण उपाशी राहून दुसर्‍यास खावयास देणें. तोंडचा गोड आणि हातचा जड-बोलण्यांत गोड व अघळ- पघळ, पण प्रत्यक्ष पैशाची मदत करण्यांत पूज्य. तोंडचा चतुर- वि. बोलण्यांत पटाईत; वाक्पटु. तोंडचा जार-पु. नुकत्याच जन्मलेल्या मुलाच्या तोंडांतील फेंस; चिकटा; ओंठावरचा जार; जन्मप्रसंगींचा तोंडावरचा पातळ पापुद्रा (विशेषतः तुझ्या, त्याच्या तोंडाचा जार वाळला नाहीं. = तूं, तो अजून केवळ बालक आहेस.' अशा वाक्यांत उपयोग). तोंडचा नीट-वि. १ बोलून भला, चांगला; बोलकाचालका; सौजन्ययुक्त. २ युक्तायुक्त विचार करून बोलणारा. ३ हजरजबाबी; अस्खलित बोलणारा. तोंडचा फटकळ-वि. शिवराळ; उघडतोंड्या; अश्लील, शिवराळ भाषण करणारा. तोंडचा रागीट-वि. जहाल; तिखट; कडक भाषण करणारा. तोंडचा शिनळ-वि. १ इष्कबाज, फंदी म्हणून नांव मिळविण्याची इच्छा करणारा; स्त्रियांची खोटी खुषमस्करी करणारा; स्त्रियांच्या कृपेची खोटीच फुशारकी मारणारा. २ निरर्गल व अश्लील भाषण करणारा; शिवराळ. तोंड(डा)ची गोष्ट-स्त्री. सहजसाध्य, अतिशय सोपी गोष्ट, काम. 'वाघ मारणें तोंडची गोष्ट नव्हे.' तोंड चुकविणें-हातून एखादा अपराध घडला असतां कोणी रागें भरेल या भीतीनें, काम वगैरे टाळण्यासाठीं चुकारतट्टू- पणानें एखाद्यापासून आपलें तोंड लपविणें; दृष्टीस न पडणें; छपून असणें. ॰चे तोंडीं-क्रिवि. प्रत्यक्षाप्रत्यक्ष; तोंडानें; बोला- चालीनें. ॰चे तोंडीं व्यवहार-केवळ तोंडानें बोलून, बोलाचा- लीनें झालेला, होणारा व्यवहार, धंदा. याच्या उलट लेखी व्यव- हार. ॰चें पायचें-न. (कों.) गुरांच्या तोंडास व पायांस होणारा रोग. ॰चे हिशेब-पुअव. कागदांवर आंकडेमोड न करितांमनां- तल्यामनांत कांहीं आडाख्यांच्या; मदतीनें करावयाचे हिशेब. तोंडचें तोंडावरचें पाणी पळणें; उडणें, तोंड कोरडें पडणें-१ (भीतीमुळें) चेहरा फिका पडणें; बावरून,घाबरून जाणें. २ (भीति इ॰ कांमुळें) तोंडांतील ओलावा नाहींसा होणें. तोंड टाकणें-टाकून बोलणें-१ (क्रोधावेशानें) अप शब्दांचा वर्षाव करणें; निर्भर्त्सना करून बोलणें; खरडपट्टी काढणें; अद्वातद्वा बोलणें. 'तूं नोकर-माणसांवर उगीच तोंड टाकलेंस.' २ (घोडा इ॰ जनावरानें) चावण्यासाठीं तोंड पुढें करणें. 'ह्या घोड्याला तोंड टाकण्याची भारी खोड आहे, ती घालविली पाहिजे.' ॰ठेचणारा-फाडणारा-वि. (एखाद्या) उद्धट, बडबड्या माण- सास गप्प बसविण्याची हातोटी ज्यास साधली आहे असा; उद्दामपणानें, गर्वानें बोलणार्‍या व्यक्तीस रोखठोक उत्तर देऊन चूप बसविणारा. [तोंड + ठेचणें] ॰तोडणें-(ना.) एखादी वस्तु मिळ- विण्याकरितां एखाद्याच्या पाठीस लागणें; त्याच्यापुढें तोंड वेंगा- डणें. ॰दाबणें-लांचलुचपत देऊन (एखाद्याचें) तोंड बंद करणें; (एखाद्यास) वश करणें; गप्प करणें. ॰दाबणारा-वि. लांच देऊन (एखाद्या) प्रतिकूल व्यक्तीस वळविणारा; गप्प बसविणारा. [तोंड + दाबणें = बंद करणें] ॰दाबी-स्त्री. (एखाद्यानें) गुप्त बातमी फोडूं नये म्हणून, प्रतिकूल बोलूं नये म्हणून (त्यास) लांच देऊन त्याचें तोंड दाबण्याची, वश करण्याची क्रिया. 'तो गांवकाम- गारांची तोंडदाबी करतो.' -गुजा २१. [तोंड + दाबणें = बंद करणें] ॰दिसणें-एखाद्याची केलेली निर्त्भर्त्सना दुसरी बाजू न कळतां लोकांच्या नजरेस येणें व आपणच वाईट ठरणें (पण ज्याची निर्भर्त्सना केली असेल त्याचें वर्तन सुधारण्याची आशा नसणें ). 'मी तुला रागें भरलों म्हणजे माझें तोंड मात्र दिसेल, पण तूं आपला आहे तसाच राहणार.' ॰देणें- १ पारा वगैरे देऊन तोंडाच्या आंतील त्वचा सुजविण; तोंड आणविणें. 'वैद्य- बोवा म्हणाले कीं त्याला तोंड दिलें आहे.' २ सैन्याच्या अग्रभागीं राहून शत्रूवर हल्ला करणें. ३ (एखाद्याचा) प्रतिपक्षी होऊन राहणें; लढावयाला सिद्ध होणें. ४ (आट्यापाट्यांचा खेळ शेवटची पाटी खेळून परत येणार्‍या गड्याकडे पाटी धरणारानें तोंड फिरविणें. ५ एखाद्या गोष्टीला न भितां तींतून धैर्यानें पार पडण्याची तयारी ठेवणें. ॰धरणें-१ अन्नसेवन करण्याची तोंडाची शक्ति आजार वगैरे कारणांमुळें नाहींशी होणें. 'त्याचें तोंड धरलें आहे, त्याला चमच्याचमच्यानें दुध पाजावें लागतें.' २ (एखा- द्याची) बोलण्याची शक्ति नाहींशी करणें. ३ (एखाद्याला आपल्या) तावडींत, कबजांत आणणें. 'मी त्याचें तोंड धरलें आहे, तो आतां काय करणार !' ॰धुवून येणें-(उप.) एखाद्याची विनंति कधींहि मान्य होणार नाहीं असें म्हणून फेटाळून लावतांना योजण्याचा तिरस्कारदर्शक वाक्प्रचार. ॰निपटणें-(आजार, उपवास इ॰ कारणांमुळें एखाद्याचे) गाल खोल जाणें, चेहरा सुकणें. 'महिनाभर हें मूल तापानें आजारी होतें, त्याचें तोंड पहा कसें निपटलें आहे तें.' ॰पडणें-१ सुरवात होणें. 'लढाईस तोंड पडलें.' २ (गळूं इ॰ कांस) छिद्र पडणें; फुटणें; वाहूं लागणें. ॰पसरणें-वेंगाडणें-१ खिन्नपणाची, केविलवाणी मुद्रा धारण करणें. २ हिनदीनपणानें याचना करणें. ॰पाघळणें-१ न बोला- वयाची गोष्ट कोणाएकापाशीं बोलून टाकणें; बडबडणें. २ (ल.) गुप्त गोष्ट बाहेर फोडणें, फुटूं देणें. ॰पाडणें-एखादें कोडें सोड- विण्यास, वेढा फोडण्यास प्रारंभ करणें; भांडणास सुरवात करणें. ॰पाहणें-१ (एखाद्याच्या) आश्रयाची, मदतीची अपेक्षा करून असणें. 'आम्ही पडलों गरीब, म्हणून आम्हांला सावकाराचीं तोंडें पाहण्याची पाळी वारंवार येते.' २ (एखाद्यानें) स्वतःच्या शक्तीचा, कर्तुत्वाचा अजमास करणें. 'तूं असें करीन म्हणतोस, पण आधीं आपलें तोंड पहा !' ३ बोलणाराचें भाषण नुसतें ऐकणें, पण त्यानें सांगितलेलें करावयास किंवा केलेला बोध अनु- सरावयास प्रवृत्त न होतां स्वस्थ बसून राहणें. 'म्हणती हाणा, मारा, पाडा, घ्या, काय पाहतां तोंडा ।' -मोद्रोण ३.१२५. ॰पाहात-बसणें-काय करावें, कसें करावें या विवंचनेंत असणें. ॰पिटणें-बडबड करणें. 'पश्चिमद्वारींचें कवाड । सदा वार्‍यानें करी खडखड । तैशी न करी बडबड । वृथा तोंड पिटीना ।' -एभा १०.२३१. ॰फिरणें-१ आजारानें, पदार्थाच्या अधिक सेवनानें तोंडाची रुची नाहींशी होणें; तोंड वाईट होणें. २ तोंडांतून शिव्यांचा वर्षाव होऊं लागणें. 'तो रागावला म्हणजे कोणावर त्याचें तोंड फिरेल ह्याचा नेम नाहीं.' ॰फिरविणें-१ तोंडाची चव नाहींशी करणें. २ शिव्यांचा वर्षाव करीत सुटणें. 'तो रागावला म्हणजे तुमच्यावर देखील तोंड फिरवावयाला कचर- णार नाहीं.' ३ वितळत असलेला किंवा तापविला जात अस- लेला धातु इ॰ कानें) रंगामध्यें फरक दाखविणें, रंग पाल- टणें. 'ह्या तांब्यानें अद्याप तोंड फिरविलें नाहीं, आणखी पुष्कळ आंच दिली पाहिजे.' ४ दुसर्‍याकडे पाहणें; विशिष्ट गोष्टी- कडे लक्ष्य न देतां इतर गोष्टींकडे प्रवृत्ति दाखविणें. ५ गतीची दिशा बदलणें; दुसर्‍या दिशेला, माघारें वळणें. ॰फुटणें-१ थंडीमुळें तोंडाची बाह्य त्वचा खरखरीत होणें, भेगलणें. २ (एखाद्याची) फजिती उडणें; पत नाहींशी होणें; नाचक्की होणें; अभिमान गलित होण्याजोगा अपमान, शिक्षा इत्यादि होणें. ॰बंद करणें-१ जीभ आवरणें; जपून बोलणें. २ (एखाद्याला) लांच देऊन गप्प बसविणें, वश करून घेणें. ॰बंदावर राखणें- खाण्याला किंवा बोलण्याला आळा घालणें. 'तूं आपलें तोंड बंदावर राखिलें नाहींस तर अजीर्णानें आजारी पडशील.' ॰बांधणें-लांच देऊन (एखाद्याचे) तोंड बंद करणें; (एखाद्यानें) गुप्त गोष्ट फोडूं नये म्हणून पैसे देऊन त्यास गप्प बसविणें. ॰बाहेर काढणें-१ तोंड दाखविणें; राजरोसपणें समाजांत हिंडणें (बहुधां निषेधार्थी प्रयोग). 'तुरुंगांतून सुटून आल्यावर त्यानें आज दोन वर्षांत एकदांहि तोंड बाहेर काढलें नाहीं.' २ फिरण्यासाठीं, कामकाजासाठीं घराबाहेर पडणें. ॰बिघडणें-तोंड बेचव होणें; तोंडास अरुचि उत्पन्न होणें. विटणें. -॰भर-भरून बोलणें- भीड, संकोच, भीति न धरतां मनमोकळेपणानें भरपूर, अघळपघळ बोलणें; दुसर्‍याचें आणि आपलें समाधान व्हावयाजोगें अघळपघळ बोलणें. ॰भरून साखर घालणें-(एखाद्याचें) तोंड साखरेनें भरणें; (एखाद्याच्या) कामगिरीबद्दल, विजयाबद्दल संतोषादाखल त्याचें तोंड साखरेनें भरणें; (एखाद्याच्या) कामगिरीबद्दल गोड, भरपूर मोबदला देणें. ॰मागणें-(आट्यापाट्यांचा खेळ) लोण घेऊन परत जातांना पाटीवरील गड्यास आपणाकडे तोंड फिर- विण्यास सांगणें. तोंड मागितल्यावर पाटीवरील गडी आपलें तोंड फिरवितो त्यास 'तोंड देणें' म्हणतात. ॰माजणें-१ मिष्टान्न खावयाची चटक लागल्यानें साध्या पदार्थाबद्दल अरुचि उत्पन्न होणें. २ शिव्या देण्याची, फटकळपणानें बोलण्याची खोड लागणें. ॰मातीसारखें-शेणासारखें होणें-(आजारानें) तोंडाची चव नाहींशी होणें; तोंड विटणें, फिरणें; अन्नद्वेष होणें. ॰मिचकणें- दांत, ओंठ खाणें. ॰येणें-१ तोंडाच्या आंतल्या बाजूच्या त्वचेस फोड येऊन ती हुळहुळी होणें व लाळ गळूं लागणें. २ (कर.) लहान मूल बोलूं लागणें. 'आमच्या मुलाला तोंड आलें आहे.' = तो बोलावयास लागला आहे. ॰रंगविणें-१ विडा खाऊन ओंठ तांबडे लाल करून घेणें. २ (ल.) (एखाद्याचें थोबाड) थोबाडींत मारून लाल- भडक करून सोडणें. ॰लागणें-(लढाई, वादविवाद, अंगीकृत कार्य इ॰ कांस) सुरवात होणें. 'तेव्हां युद्धास तोंड लागलें.' -इमं २९०. ॰लावणें-१ (वादविवाद इ॰ कांस) सुरवात करणें. २ प्यावया- साठीं एखादें पेय ओंठाशीं नेणें. ३ ॰वाईट करणें-निराशेची मुद्रा धारण करणें. ॰वाईट होणें-१ तोंडावर निराशेची मुद्रा येणें. २ (ताप इ॰ कांमुळें) तोंडास अरुचि येणें. ॰वांकडें करणें-१ वेडावून दाखविणें. २ नापसंती दर्शविणें. ॰वाजविणें-एकसारखें बोलत सुटणें; निरर्थक बडबड करणें; बकबकणें; वटवट करणें; भांडण करणें. ॰वासणें-१ निराशेनें, दुःखानें तोंड उघडणें व तें बराच वेळ तसेंच ठेवणें. २ याचना करण्यासाठीं तोंड उघडणें, वेंगाडणें. ॰वासून पडणें-शक्तीच्या क्षीणतेमुळें, उत्साह, तेज, वगैरे नष्ट झाल्यामुळें, गतप्राण झाल्यामुळें आ पसरून पडणें. 'तो पडला सिंहनिहमत्तद्विपसाचि तोंड वासून ।' -मोगदा ५.२५. ॰वासून बोलणें-अविचारानें बोलणें. 'ऐसें स्वसख्यांपासीं कां गे वदलीस तोंड वासून ।' -मोउद्योग १३.२०५. ॰विचकणें-दीन मुद्रेनें आणि केविलवाण्या स्वरानें याचना करणें. ॰वेटा(डा)विणें- (काव्य) (एखाद्यास) वेडावून दाखविण्यासाठीं त्याच्यापुढें तोंड वेडेंवाकडें करणें. ॰शेणासारखें पडणें-(लाजिरवाणें कृत्य केल्यानें) तोंड उतरणें; निस्तेज होणें; काळवंडणें. ॰संभाळणें- जपून बोलणें; जीभ आवरणें; भलते सलते शब्द तोंडांतून बाहेर पडूं न देणें; अमर्याद बोलण्यास आळा घालणें. ॰सुटणें- चरांचरां, फडाफडां, अद्वातद्वा बोलूं लागणें. ॰सुरू होणें-बड- बडीला, शिव्यांना सुरवात होणें. ॰सोडणें-१ फडांफडां, अद्वातद्वा बोलूं लागणें; अमर्याद बोलणें. २ आधाशासारखें खात सुटणें; तोंड मोकळें सोडणें. ॰हातीं-हातावर धरणें-तोंडे सोडणें (दोन्ही अर्थीं) पहा. तोंडाचा खट्याळ-फटकळ-फटकाळ-फटकूळ-वाईट-शिनळ-वि. शिवराळ; तोंडाळ; अश्लील बोलणारा. तोंडाचा खबरदार-बहादर-बळकट-वि. बोलण्यांत चतुर, हुषार; बोलण्याची हातोटी ज्याला साधली आहे असा. -तोंडाचा गयाळ, तोंडगयाळ-वि. जिभेचा हलका; चुर- चोंबडा; लुतरा; बडबड्या; ज्याच्या तोंडीं तीळ भिजत नाहीं असा. तोंडाचा गोड-वि. गोड बोलणारा; गोडबोल्या. म्ह॰ तोंडचा गोड हाताचा जड = गोड व अघळपघळ भाषण करणारा पण प्रत्यक्ष कांहींहि मदत, पैसा न देणारा. तोंडाचा जड-वि. रेंगत बोलणारा; फार थोडें बोलणारा; अस्पष्ट भाषण करणारा; तोंडाचा तिखट-वि. खरमरीत, स्पष्ट, झोंबणारें, कठोर भाषण करणारा. तोंडाचा तोफखाना सुटणें-(एखाद्याची) अद्वातद्वा बोल- ण्याची क्रिया सुरू होणें; शिव्यांचा वर्षाव होऊं लागणें. तोंडाचा पट्टा सुटणें-चालणें-अद्वातद्वा बोलणें; शिव्यांचा भडिमार सुरू होणें; तोंडाचा पट्टा सोडणें-(एखाद्यानें) शिव्यांचा भडिमार सुरू करणें; जीभ मोकळी सोडणें; (एखाद्याची) खरडपट्टी आरंभिणें. तोंडाचा पालट-पु. रुचिपालट; तोंडास रुचि येईल असा अन्नांत केलेला फेरबदल; अन्नांतील, खाण्यांतील फरक, बदल. तोंडाचा बोबडा-वि. बोबडें बोलणारा; तोतरा. तोंडाचा मिठा-वि. गोडबोल्या; तोंडाचा गोड पहा. तोंडाचा हलका- वि. चुरचोंबडा; भडभड्या; विचार न करितां बोलणारा; फटकळ. तोंडाचा हुक्का होणें-(व.) तोंड सुकून जाणें. तोंडाची चुंबळ-स्त्री. दुसर्‍यास वेडावून दाखविण्याकरितां चुंबळीसारखी केलेली ओठांची रचना; वांकडें तोंड. तोंडाची वाफ दघडणें- १ मूर्खास उपदेश करतांना, निरर्थक, निरुपयोगी, निष्फळ भाषण करणें. २ ज्यावर विश्वास बसणार नाहीं असें भाषण करणें; मूर्खपणानें बोलणें; वल्गना करणें; बाता मारणें. (या वाक्प्रचारांत दवडणें बद्दल खरचणें गमविणें, फुकट जाणें, घालविणें, काढणें इ॰ क्रियापदेंहि योजतात). तोंडाचें बोळकें होणें-(म्हातारपणामुळें) तोंडां- तील सर्व दांत पडणें. तोंडाचें सुख-न. तोंडसुख पहा. (वरील सर्व वाक्प्रचारांत तोंडाचा या शब्दाऐवजीं तोंडचा हा शब्दहि वापरतात). तोंडांत खाणें, मारून घेणें-१ गालांत चपराक खाणें; मार मिळणें. २ पराभूत होणें; हार जाणें. ३ फजिती झाल्या- नंतर शहाणपणा शिकणें; नुकसान सोसून धडा शिकणें; बोध मिळविणें. तोंडांत जडणें-थोबाडींत, गालांत बसणें (चपराक, थप्पड इ॰). तोंडांत तीळभर न राहणें-अगदीं क्षुद्र अशी गुप्त गोष्टहि पोटांत न ठरणें; कोणतीहि लहानसहान गोष्ट गुप्त ठेवूं न शकणें. तोंडांत तोंड घालणें-१ (ल.) प्रेम, मैत्री इ॰कांच्या भावानें वागणें; मोठ्या प्रेमाचा, मित्रपणाचा आविर्भाव आणून वागणें. २ एकमेकांचें चुंबन घेणें. तोंडांत देणें-(एखाद्याच्या) थोबाडींत मारणें; गालांत चपराक मारणें; तोंडांत बोट घालणें-(ल.) आश्चर्यचकित, थक्क होणें; विस्मय पावणें. तोंडांत भडकावणें-तोंडांत देणें पहा. तोंडांत माती घालणें-खाण्यास अन्न नसणें; अतिशय हाल, कष्ट सोसावे लागणें. तोंडांत माती पडणें-१ (एखाद्याची) उपा समार होणें. २ मरणें. तोंडात शेण घालणें-(एखाद्याची) फजिती करणें; (एखाद्यास) नांवें ठेवणें; खरडपट्टी काढणें. तोंडांत साखर असणें-(गो.) (एखाद्याचें) तोंड, वाणी गोड असणें; गोड बोलत असणें. तोंडांत साखर घालणें-१ तोंड भरून साखर घालणें पहा. २ (उप.) तोंडांत शेण घालणें. 'सावित्री- बाईच्या तोंडांत लोक जेव्हां फारच साखर घालीत, तेव्हां तिनें दोन तीन जुनेरीं एकत्र शिवून जानकीबाईला द्यावी.' -रंगराव. तोंडांत साखर पडणें-(एखाद्याला) आनंदाचा प्रसंग, दिवस येणें. तोंडांतून ब्र काढणें-(तोंडांतून) अधिक-उणें अक्षर काढणें, उच्चारणें. 'आंतल्याआंत चूर होऊन मेलें पाहिजे, तोंडां- तून ब्र काढण्याची सोय नाहीं.' -विकारविलसित. तोंडानें पाप भरणें, तोंडें पाप घेणें-लोकांचीं पातकें उच्चारणें; लोकांचे दोष बोलून दाखविणें; वाईट बोलण्याची हौस यथेच्छ पुरवून घेणें; लोकांचीं पापें उच्चारून जिव्हा विटाळणें. 'कैसीं वो मानुसें । सपाइनि परंवंसें । तोंडे पाप घेती कांइसें । वायां वीण ।' -शिशु २१६. तोंडापुढें-क्रिवि. अगदीं जिव्हाग्रीं; मुखोद्गत. तोंडा- पुरता, तोंडावर गोड-वि. मधुर पण खोटें बोलणारा; दुतोंड्या; वरवर गोड बोलणारा व आंतून कपटी असलेला; उघडपणें प्रिय भाषण करणारा व मनांत निराळेच असणारा. ताडापुरता मांडा-पु. १ भूक भागेल एवढीच पोळी. २ (ल.) जेमतेम गरज भागेल एवढाच जरूर त्या वस्तूचा पुरवठा. तोंडार मारप- (गो.) (एखाद्याच्या) पदरांत चूक बांधणें; वरमण्यासारखें उत्तर देणें. तोंडार ल्हायो उडप-(गो.) फार जलद, अस्ख- लित बोलणें; लाह्या फुटणें. तोंडाला काळोखी आणणें- लावणें-बेअब्रू, नापत करणें. तोंडाला टांकी दिलेली असणें-देवीच्या खोल वणांनीं तोंड भरलेलें असणें; तोंडावर देवीचे वण फार असणें. तोंडाला पाणी सुटणें-(एखादी वस्तु पाहून तिच्यासंबंधीं) मोह उत्पन्न होणें; हांव सुटणें. तोंडाला पानें पुसणें-फसविणें; चकविणें; छकविणें; भोळसाविणें; भोंदणें; तोंडा- वरून हात फिरविणें. 'त्याच्यावर देखरेख करावयाला चार माणसें होतीं, पण त्यानें सर्वांच्या तोंडाला पानें पुसून आपला डाव साधला.' तोंडाला फांटा फुटणें-मूळ मुद्दा सोडून भलतेंच बोलत सुटणें; हवें तसें अमर्याद भाषण करूं लागणें. तोंडावर-क्रिवि. १ समक्ष; डोळ्यांदेखत. २ (ल.) निर्भयपणें; भीड न धरतां. 'मी त्याच्या तोंडावर त्याला लुच्चा म्हणण्यास भिणार नाहीं.' तोंडावर तुकडा टाकणें-(एखाद्यानें) गप्प बसावें, प्रतिकूल बोलूं नये म्हणून त्याला थोडेसें कांहीं देणें. तोंडावर-ला-तोंड देणें-१ (एखाद्यास) विरोध करणें; विरुद्ध बोलणें. २ (एखाद्यास) उद्धटपणानें, अविनयानें, दांडगेपणानें उत्तर देणें; उत्तरास प्रत्युत्तर देणें. तोंडा- वर तोंड पडणें-दोघांची गांठ पडून संभाषण, बोलाचाल होणें. तोंडावर थुंकणें-(एखाद्याची) निर्भर्त्सना, छीःथू करणें; धिक्कार करणें. तोंडावर देणें-तोंडांत देणें पहा. 'काय भीड याची द्या कीं तोंडावरी ।' -दावि ३०२. तोंडावर नक्षत्र पडणें-(एखाद्यानें) तोंडाळपणा करणें; शिवराळ असणें; नेहमीं अपशब्दांनीं तोंड भर- लेलें असणें. 'ह्याजकरिकां तोंडावर नक्षंत्र पडलेल्या पोरास म्या बोलविलें म्हणून हे मला शब्द लावीत नाहींत.' -बाळ २.१४२. तोंडावर पडप-(गो.) थोबाडींत (चपराक) बसणें, पडणें. तोंडावर पदर येणें-१ वैधव्य प्राप्त होणें. 'तिच्या तोंडावर पदर आला म्हणून ती बाहेर पडत नाहीं.' २ लज्जेनें तोंड लपविण्या- जोगी स्थिति होणें. तोंडावर मारणें-(एखाद्याला) पराभूत करणें. तोंडावर सांगणें-बोलणें-(एखाद्याच्या) समक्ष, निर्भीडपणें, बेडरपणें सांगणें, बोलणें. तोंडावरून-तोंडावर हात फिर- विणें-(एखाद्यास) गोड बोलून, फूसलावून, भुलथाप देऊन फस- विणें; भोंदणें; छकविणें. तोंडाशीं तोंड देणें-(हलक्या दर्जाच्या व्यक्तीनें वरिष्ठाशीं) आपला दर्जा विसरून, बरोबरीच्या नात्यानें, अविनयानें बोलणें, व्यवहार करणें. तोंडास काळोखी-स्त्री. मुखसंकोच; ओशाळगत; गोंधळून गेल्याची स्थिति; बेअब्रू; कलंक. तोंडास काळोखी, काजळी लागणें-(एखाद्याची) बेअब्रू, नाचक्की होणें; दुष्कीर्ति होणें; नांवाला कलंक लागणें. तोंडास काळोखी-काजळी लावणें-(एखाद्याचें) नांव कलंकित करणें; बेअब्रू करणें. 'सुनेनें माझ्या तोंडाला काळोखी लावली.' तोंडास कुत्रें बांधलेलें असणें-ताळतंत्र सोडून, अद्वातद्वा, अपशब्द बोलणें; शिव्या देणें. 'त्यानें तर जसें तोंडाला कुत्रेंच बांधलें आहे.' तोंडास खीळ घालणें-निग्रहपूर्वक, हट्टानें मौन धारण करणें. तोंडास तोंड-न. वादविवाद; वाग्युद्ध; हमरी- तुमरी; धसाफसी. -क्रिवि. समक्षासमक्ष; समोरासमोर; प्रत्यक्ष. तोंडास तोंड देणें-१ तोंडाशीं तोंड देणें पहा. २ मार्मिकपणें, खरमरीतपणें उत्तर देणें. तोंडास पाणी सुटणें-(एखाद्या- वस्तूबद्दल, गोष्टीबद्दल) लोभ, मोह उत्पन्न होणें; तोंडाला पाणी सुटणें पहा. 'पोर्तुगीज लोकांची बढती पाहून तिकडच्या दुसर्‍या साहसी लोकांच्या तोंडास पाणी सुटलें.' -बाजी. तोंडास तोंड न दिसणें-(पहांटेस) तोंड न ओळखतां येण्याइतका अंधेर असणें (झुंजमुंजु पहाटेविषयीं वर्णन करितांना हा वाक्प्रचार योजतात). 'अद्याप चांगलें उजाडलें नाहीं, तोंडास तोंड दिसत नाहीं.' तोंडास-तोंडीं बसणें-(श्लोक, शब्द इ॰) स्पष्ट, बिन- चूक, भरभर म्हणण्याइतका पाठ होणें. 'तो श्लोक दहा वेळां पुस्तकांत पाहून म्हण, म्हणजे तो तुझ्या तोंडीं बसेल.' तोंडास येईल तें बोलणें-विचार न करितां, भरमसाटपणानें वाटेल तें बोलणें; अद्वातद्वा, अपशब्द बोलणें. तोंडास-तोंडीं लागणें- १ (एखाद्याच्या) तोंडास तोंड देणें; उलट उत्तरें देणें. २ हुज्जत घालणें; वादविवाद करण्यास तयार होणें. (एखाद्याच्या) तोंडा- समोर-क्रिवि. १ (एखाद्याच्या) समक्ष; समोर; डोळ्यांदेखत. २ अगदीं मुखोद्गत; जिव्हाग्रीं. तोंडापुढें पहा. 'हा श्लोक माझ्या अगदीं तोंडासमोर आहे.' तोंडास हळद लागणें-(एखाद्यास) दोष देणें, नापसंती दर्शविणें अशा अर्थीं हा वाक्प्रचार योजितात. तोंडासारखा-वि. (एखाद्याची) खुशामत, स्तुति इ॰ होईल अशा प्रकारचा; एखाद्याच्या खुशामतीकरितां त्याच्या मतास जुळता. तोंडासारखें बोलणें-(एखाद्याची) स्तुति, खुशामत करण्या- करितां त्याच्याच मताची, म्हणण्याची री ओढणें; त्याचें मन न दुखवेल असें बोलणें. तोंडीं आणणें-देणें-(रोग्यास) लाळ गळण्याचें, तोंड येण्याचें औषध देऊन तोंड आणणें. तोंडीं- काढणें-१ ओकारी देणें; वांती होणें. २ (एखाद्यास त्यानें) केलेले उपकार बोलून दाखवून टोमणा मारणें. तोंडीं खीळ पडणें- तोंड बंद होणें; गप्प बसणें भाग पडणें. 'अवघ्या कोल्यांचें मर्म अंडीं । धरितां तोंडीं खीळ पडे ।' तोंडीं घास येणें-(एखा- द्यास) घांसभर अन्न मिळणें; चरितार्थाचें साधन मिळणें; पोटा पाण्याची व्यवस्था होणें. तोंडीं तीळ न भिजणें-१ (तापानें, संतापून ओरडण्यानें, रडण्यानें) तोंड शुष्क होणें, कोरडें पडणें. २ एखादी गुप्त गोष्ट मनांत न राहणें, बोलून टाकणें; तोंडीं तृण धरणें-(एखाद्यानें) शरण आलों. असें कबूल करणें; शरणागत होणें; हार जाणें (दांतीं तृण धरणें असाहि प्रयोग रूढ आहे). तोंडीं देणें-(एखाद्यास एहाद्या माणसाच्या, कठिण कार्याच्या) सपाट्यांत, तडाख्यांत, जबड्यांत, तावडींत लोटणें, देणें; हाल, दुःख सोसण्यास (एखाद्यास) पुढें करणें. तोंडीं-तोंडास पान- पानें पुसणें-(एखाद्यास) छकविणें; लुबाडणें; भोंदणें; अपेक्षित लाभ होऊं न देणें; स्वतःच्या पोळीवर तूप ओढून घेऊन दुसर्‍यास तोंड पहावयास लावणें. 'त्यानें आपल्या नळीचें वर्‍हाड केलें आणि सर्वांच्या तोंडीं पान पुसलें.' तोंडीं माती घालणें- (एखाद्यानें) अतिशय दुःखाकुल, शोकाकुल होणें. 'ऊर, माथा बडवून, तोंडीं माती घालूं लागली' -भाव ७५. तोंडीं येऊन बुडणें-नासणें-(एखादी वस्तु, पीक इ॰) अगदीं परिपक्वदशेस, परिणतावस्थेस येऊन, ऐन भरांत येऊन, नाहींशीं होणें, वाईट होणें. तोंडीं येणें-१ (पारा इ॰ औषधानें) तोंड येणें. २ ऐन भरांत, परिपक्व दशेस, पूर्णावस्थेस येणें. तोंडीं-रक्त, रगत लागणें-१ वाघ इ॰ हिंस्त्र पशूला माणसाच्या रक्ताची चटक लागून तो माणसावर टपून बसणें. २ (ल.) लांच-लुचपत खाण्याची चटक लागणें. तोंडीं लागणें-(एखाद्यास एखाद्या वस्तूची, खाद्याची चव प्रथमच कळून त्या वस्तूची त्यास) चटक लागणें; आवड उत्पन्न होणें. 'ह्याच्या तोंडीं भात लागला म्हणून यास भाकर आवडत नाहीं.' तोंडीं लागणें-१ (एखाद्याच्या) तोंडास तोंड देणें; उद्धटपणानें, आपला दर्जा विसरून उलट जबाब देणें. २ हुज्जत घालणें; वादविवादास प्रवृत्त होणें; तोंडास लागणें पहा. 'सुज्ञ आहेत ते दूषकांच्या तोंडीं लागत नसतात.' -नि. ३ (युद्ध, भांडण, इ॰कांच्या) आणीबाणीच्या ठिकाणीं, आघाडीस, अग्रभागीं असणें. तोंडीं लावणें-न. जेवतांना तोंडास रुचि आणणारा भाजी, चटणी इ॰ सारखा मधून मधून खावयाचा चमचमीत पदार्थ. तोंडीं लावणें-१ जेवतांना भाजी, चटणी इ॰ चम- चमीत पदार्थानें रुचिपालट करणें. 'आज तोंडीं लावावयाला भाजीबिजी कांहीं केली नाहीं काय ?' २ विसारादाखल पैसे देणें. तोंडें मागितलेली किंमत-स्त्री. (एखाद्या वस्तूची) दुकान- दारानें सांगितलेली व झिगझिग वगैरे न करितां गिर्‍हाइकानें दिलेली किंमत. तोंडें मानलेला-मानला-वि. (तोंडच्या) शब्दानें, वचनानें मानलेला (बाप, भाऊ, मुलगा इ॰); धर्माचा, पुण्याचा पहा. तोंडें वांकडीं करणें-वेडावून दाखविणें; वेडावणें. लहान तोंडीं मोठा घांस घेणें-१ (एखाद्यानें) आपल्या आवांक्या- बाहेरचें काम हातीं घेणें. २ (वडील, वरिष्ठ माणसांसमोर) न शोभेल असें, मर्यादा सोडून, बेअदबीनें बोलणें; वडील माणसांस शहाणपण शिकविणें. जळो तुझें तोंड-(बायकी भाषेंत) एक शिवी. स्त्रिया रागानें ही शिवी उपयोगांत आणतात. म्ह॰ १ तोंड बांधून (दाबून) बुक्कयांचा मार = एखाद्याचा विनाकारण छळ होऊन त्यास त्याविरुद्ध तक्रार करतां न येणें; एखाद्यास अन्यायानें वाग- वून त्याविरुद्ध त्यानें कागाळी केल्यास त्यास बेगुमानपणें शिक्षा करणें. 'बायकांचा जन्म म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार, म्हण- तात तें अक्षरशः खरें आहे.' -पकोघे २ (गो.) तोंडाच्या बाता घरा बाईल भीक मागता = बाहेर मोठमोठया गप्पा मारतो पण घरीं बायको भीक मागते. सामाशब्द- तोंड उष्ट-न. एखादा-दुसरा घांस खाणें; केवळ अन्न तोंडास लावणें; तोंड खरकटें करणें. [तोंड + उष्टें] ॰ओळख-स्त्री. परस्परांचा विशेष परिचय नसतां, चेहरा पाहू- नच हा अमुक आहे असें समजण्याजोगी ओळख; (एखाद्याची) चेहरेपट्टी लक्षांत राहून तीवरूनच त्याला ओळखतां येणें; नांव वगैरे कांहीं माहीत नसून (एखाद्याचा) केवळ तोंडावळाच ओळ- खीचा असणें. 'एखाद्याला वाटेल कीं बाळासाहेबांशीं त्याची तोंड- ओळखच आहे.' -इंप ३७. ॰कडी-स्त्री. १ आंतील तुळयांचीं तोंडें बाहेर भिंतींतील ज्या तुळईवर ठेवतात, ती सलग तुळई. २ कौलारू छपराचे वासे ज्या सलग तुळईवर टेकतात ती छपराच्या शेवटीं, टोंकास असलेली तुळई. ३ गुरांचें दावें जिला बांधतात ती कडी. ४ (सोनारी धंदा) दागिन्याची शेवटची कडी, नाकें; ज्यांत फांसा इ॰ अडकवितात ती (सरी इ॰ सारख्या दागिन्याची) टोंकाची, तोंडाची कडी; (जव्याच्या) मण्याच्या वगैरे तोंडाशीं ठेवलेली कडी. ५ (जमाखर्चाच्या वहींतील जमा आणि खर्च या दोहोंबाजूंचा मेळ. हा मेळ = = = अशा दुलांगीनें, (दुहेरी रेषेनें) दाखविण्याचा प्रघात आहे. 'वहीची खात्याची-तारखेची-तोंडकडी' असा शब्दप्रयोग करितात. (क्रि॰ मिळणें; जुळणें; येणें; उतरणें; चुकणें; बंद होणें). [तोंड + कडी] ॰कळा-स्त्री. चेहर्‍यावरील तजेला; कांति; तेज; टवटवी. (प्र.) मुखकळा. [तोंड + कळा = तेज] ॰काढप-(गो.) उपदंश झालेल्या रोग्यास एक प्रकारचें औषध देऊन त्याच्या तोंडांतून लाळ वाहवितात तो प्रकार. ह्या औषधानें तोंड बरेंच सुजतें. [तोंड + गो. काढप = काढणें] ॰खुरी- स्त्री. (ना.) गुरांचा एक रोग. ॰खोडी-वि. तोंडाळ; टाकून बोलणारा; तोंड टाकणारा; अशी संवय असलेला. 'परम अधम रुक्मी हा महा तोंडखोडी ।' -सारुह ३.७८. [तोंड + खोड = वाईट संवय] ॰घडण-स्त्री तोंडाची ठेवण; चेहरेपट्टी; तोंडवळां. 'या मुलाची बापासारखी तोंडघडण आहे.' [तोंड + घडण = रचना] ॰घशीं- सीं-क्रिवि. १ जमीनीवर पडून तोंड घासलें जाईल, फुटेल अशा रीतीनें. (क्रि॰ पडणें; पाडणें; देणें). 'तो तोंडघसींच पडे करतां दंतप्रहार बहु रागें ।' -मो. २. (आश्रय तुटल्यानें) गोत्यांत; पेचांत; अडचणींत; फजिती होईल अशा तर्‍हेनें; फशीं (पडणें). [तोंड + घासणें] ॰घशी देणें-दुसरा तोंडघशीं पडे असें करणें. ॰चाट्या-वि. खुशामत करणारा; थुंकी झेलणारा; तोंडासारखें बोलणारा. ॰चाळा-पु. १ तोंड वेडेंवाकडें करून वेडावण्याची क्रिया. २ वात इ॰कांच्या लहरीनें होणारी तोंडाची हालचाल, चाळा. ॰चुकाऊ-वू-व्या, तोंडचुकारू-चुकव्या-वि. (काम इ॰ कांच्या भीतीनें) दृष्टि चुकविणारा; तोंड लपविणारा; नजरेस न पडे असा. [तोंड + चुकविणें] ॰चुकावणी-स्त्री. (एखाद्यापासून) तोंड लपविण्याची, स्वतःस छपविण्याची क्रिया. ॰जबानी-स्त्री. तोंडानें सांगितलेली हकीगत, दिलेली साक्ष, पुरावा. -क्रिवि तोंडी, तोंडानें. [तोंड + फा. झबान्] ॰जाब-पु. तोंडी जबाब. ॰झाडणी-स्त्री. तिरस्कारपूर्ण उद्गारांनीं झिडकारणें; खडका- वणें; खरडपट्टी काढणें. ॰देखणा-ला-वि. आपल्या अंतःकरणांत तसा भाव नसून दुसर्‍याचें मन राखण्याकरितां त्याला रुचेल असा केलेला (व्यवहार, भाषण, गो इ॰); खुशामतीचा; तोंडासारखा; तोंडपुजपणाचा. 'प्राणनाथ, मला हीं तोंडदेखणीं बोलणीं आव- डत नाहींत.' -पारिभौ ३५. [तोंड + देखणें = पाहणें] ॰देखली गोष्ट-स्त्री.दुसर्‍याची मर्जी राखण्याकरितां केलेलें, खुशामतीचें भाषण. ॰निरोप-पु. तोंडी सांगितलेला निरोप. 'कृष्णास ते हळुच तोंडनिरोप सांगे ।' -सारुह ४.९. ॰पट्टा-पु. (बायकी). तोंडाचा तोफखाना; अपशब्दांचा भडिमार; संतापानें, जोराजोरानें बेबंदपणें बोलणें. [तोंड + पट्टा = तलवार] ॰पट्टी-स्त्री. (शिवणकाम) तोंडाला शिवलेला पट्टी. 'योग्य तेवढी तोंडपट्टी कातरावी.' -काप्र. १४. ॰पाटिलकी-स्त्री. १ आपण कांहीं न करतां बसल्या जागे- वरून लुडबुडेपणानें दुसर्‍यांना हुकुमवजा गोष्टी, कामें सांगणें (पाटलाला बसल्या जागेवरून अनेक कामें हुकुम सोडून करून घ्यावीं लागतात त्यावरून). २ (उप.) लुडबुडेपणाची वटवट, बडबड; तोंडाळपणा. 'दुसरें कांहीं न झालें तरी नुसती तोंडपाटिलकी करण्यास कांहीं हरकत नाहीं.' -आगर ३.६१. [तोंड + पाटिलकी = पाटलाचें काम] ॰पाठ-वि. पुस्तकाच्या सहाय्यावांचून केवळ तोंडांनें म्हणतां येण्यासारखा; मुखोद्गत [तोंड + पाट = पठण केलेलें] ॰पालटपुस्त्री. १ (अरुचि घालविण्याकरितां केलेला) अन्नांतील फेरबदल. २ अन्नांत फेरबदल करून अरुचि घालविण्याची क्रिया. [तोंड + पालट = बदल] ॰पिटी-स्त्री. १ (वडील, गुरु इ॰ कांची) आज्ञा न मानतां तिचें औचित्य इ॰ कासंबंधीं केलेली वाटाघाट; (वडिलांशीं, गुरूंशीं) उद्धटपणानें वाद घालणें; उलट उत्तर देणें; प्रश्न इ॰ विचारून अडवणूक करणें. 'गुरूंसी करिती तोंडपिटी ।' -विपू १.५७. २ (दगडोबास शिकविण्याकरितां, विसराळू माणसास पुन्हां पुन्हां बजाविण्याकरितां, थिल्लर जनावरास हांकलण्याकरितां करावी लागणारी) व्यर्थ बडबड, कटकट, वटवट. [तोंड + पिटणें] ॰प्रचिती-प्रचीति-स्त्री. खुशामत करण्याकरितां (एखाद्याच्या) व्यक्तिमाहात्म्यास, भाषणास, अस्तित्वास मान देणें; आदर दाख- विणें. [तोंड + प्रचीति] ॰प्रचीतक्रिवि. १ तोंडासारखें; खुशामतीचें; तोंडापुरतें (भाषण, वर्तन इ॰ करणें) २ माणूस ओळखून, पाहून; माणसामाणसांत तारतम्य ठेवून (बोलणें, चालणें, वागणें). ॰प्रचीत बोलणारा-चालणारा-वागणारा-वि. माणसामाणसांत तारतम्य ठेवून चालणारा, बोलणारा, वागणारा. ॰फटालकी -फटालीस्त्री. तोंडाची निरर्थक बडबड, वटवट, टकळी. [तोंड + ध्व. फटां ! द्वि.] ॰फटाला-ल्या-वि. मूर्खपणानें कांहीं तरी बड बडणारा; बकणारा; वटवट करणारा. [तोंड + ध्व. फटां !] ॰फट्याळ-वि. तोंडाचा फटकळ; शिवराळ; तोंडाळ; बातेफरास; अंगीं कर्तृत्व नसून लंब्या लंब्या बाता झोंकणारा. ॰फट्याळी- स्त्री. शिवराळपणा; तोंडाळपणा; वावदूकता. [तोंडफट्याळ] ॰बडबड्या-बडव्या-वि. निरर्थक वटवट, बडबड करणारा: बकबकणांरा टकळी चालविणारा. ॰बंद -बांधणी-पुस्त्री. गाडीच्या चाकाच्या तुंब्यावरील बाहेरील बाजूचें लोखंडी कडें, पट्टी. आंतील बाजूच्या कड्यास कटबंद असें म्हणतात. [तोंड + बंद = बांधणी] ॰बळ-न. वक्तृत्वशक्ति; वाक्पटुता; वाक्चातुर्य. 'आंगबळ न चांगबळ देरे देवा तोंडबळ.' ॰बळाचा-वि. ज्याला बोलण्याची हातोटी, वक्तृत्कला साधली आहें असा; तोंडबळ अस- लेला; भाषणपटु जबेफरास. ॰बाग-स्त्री. (राजा.) चेहरेपट्टी; चेहर्‍याची ठेवण, घडण; मुखवटा. ॰बांधणी-स्त्री. १ तोंडबंद पहा. २ (ढोरांचा धंदा) कातड्याच्या मोटेच्या सोंडेच्या टोंकाकरितां बाजूला शिवलेला गोट. ॰भडभड्या-वि. तोंडास येईल तें बड- बडत, बकत सुटणारा; बोलण्याची, बडबडण्याची हुक्की, इसळी ज्यास येते असा; भडभडून बोलणारा. ॰भर-वि. तोंडास येईल तेवढा; भरपूर. 'हॅमिल्टन यांनीं खर्चवाढीबद्दल तोंडभर मगणी केली होती.' -केले १.१९८. ॰मार-स्त्री. १ रोग्यावर लाद- लेला खाद्यपेयांचा निर्बंध, पथ्य. २ एखाद्यास बोलण्याकरितां तोंड उघडूं न देणें; भाषणबंदी. ३ (ल.) (एखाद्याच्या) आशा, आकांक्षा फोल ठरविणें; (एखाद्याचा केलेला) आशाभंग; मनोभंग; निराशा. (क्रि॰ करणें). ॰मारा-पु. १ शेतीच्या कामाच्या वेळीं पिकांत वगैरें काम करतांना गुरांच्या तोंडाला जाळी, मुंगसें, मुसकें बांधणें. २ (एखाद्यास केलेली) भाषणबंदी; खाद्यपेयांचा निर्बंध. ३ (प्र.) तोंडमार. तोंडमार अर्थ ३ पहा. ॰मिळवणी- स्त्री, १ जमा आणि खर्च यांचा मेळ; तोंडें मिळविण्यासाठीं मांडलेला जमाखर्च. २ ऋणको व धनको यांच्यांतील हिशेबाची बेबाकी, पूज्य. ३ मेळ. -शर. ॰मिळवणी खातें- (जमाखर्च) कच्चें खातें (याचें देणें येणें सालअखेर पुरें करून खुद्द खात्यांत जिरवितात). ॰लपव्या-वि. तोंड लपविणारा; छपून राहणारा; दडी मारून बसणारा. ॰लाग-पु. शिंगें असलेल्या जनावरांच्या तोंडास होणारा रोग; यांत लाळ गळत असते. ॰वळख-स्त्री (प्र.) तोंडओळख पहा. ॰वळण-वळा-नपु. चेहरा; चर्या; मुद्रा; चेहर्‍याची घडण, ठेवण; रूपरेखा; चेहरामोहरा; चेहरेपट्टी; मुखाकृति; मुखवटा. [तोंड + वळ = रचना] ॰वीख-न. (ल.) तोंडानें ओकलेलें, तोंडां- तून निघालेलें, विषारी, वाईट भाषण, बोलणें. [तोंड + विष] ॰शिनळ, शिंदळ-वि. अचकटविचटक, बीभत्स बोलणारा; केवळ तोंडानें शिनळकी करणारा. ॰शेवळें-न. मुंडावळ. -बदलापूर २७७. [तोंड + शेवळें = शेवाळें] ॰सर-क्रिवि. तुडुंब; तोंडापर्यंत; भरपूर. ॰सरता-वि. अस्खलित, तोंडपाठ न म्हणतां येण्या- सारखा; अडखळत अडखळत म्हणतां येण्यासारखा (श्लोक, ग्रंथ इ॰). -क्रिवि. घसरत घसरत; अडखळत; चुका करीत; कसेंबसें; आठवून आठवून. [तोंड + सरणें] ॰सुख-न. १ एखा- द्यानें केलेल्या अपकाराचें शरीरानें प्रतिकार करण्याचें सामर्थ्य नसल्यामुळें केवळ तोंडानें यथेच्छ शिव्यांचा, अपशब्दांचा भडि- मार करून त्यांत सुख मानणें. २ जिव्हा मोकाट सोडून वाटेल तसें बोलण्यांत मानलेलें सुख; यथेच्छ व अद्वातद्वा केलेलें भाषण; (एखाद्याची काढलेली) खरडपट्टी; बोडंती. (क्रि॰ घेणें). ॰सुख घेणें-(एखाद्याची) खरडपट्टी काढणें, हजेरी घेणें; (एखा- द्यावर) शिव्यांचा, अपशब्दांचा भडिमार करणें. ॰सुटका-स्त्री. १ जिभेचा (बोलण्यांतील) स्वैरपणा; सुळसुळीतपणा; वाक्चा- पल्य; जबेफराशी; (भाषण इ॰ कांतील) जनलज्जेपासूनची मोक- ळीक. २ भाषणस्वातंत्र्य; बोलण्याची मोकळीक. ३ तोंडाळपणा; शिवराळपणा. ४ (पथ्य, अरुची, तोंड येणें इ॰ कांपासून झालेली) तोंडाची सुटका, मोकळीक; तोंड बरें होणें; खाण्यापिण्याला स्वातंत्र्य. [तोंड + सुटणें] ॰हिशेबी-वि. अनेक रकमांचा मनांतल्या- मनांत चटकन्‌ हिशेब करून सांगणारा बुद्धिमान (मनुष्य); शीघ्रगणक. ॰तोंडागळा-वि. (तोंडानें) बोलण्यांत, वक्तृत्वशक्तींत अधिक. 'कीं शेषाहूनि तोंडागळें । बोलकें आथी ।' -ज्ञा ९. ३७०. [तोंड + आगळा = अधिक] ॰तोंडातोंडी-क्रिवि. १ समोरासमोर; २ बोलण्यांत; बोलाचालींत. [तोंड द्वि.] ॰तोंडाळ-वि. १ दुसर्‍या- वर तोंड टाकणारा; शिवराळ; भांडखोर. 'लटिकें आणि तोंडाळ । अतिशयेंसीं ।' -दा २.३.१०. २ बडबड्या; वाचाळ. [तोंड] म्ह॰ हाताळ पुरवतो पण तोंडाळ पुरवत नाहीं = शिवराळ माणसा- पेक्षां चोर पुरवतो. ॰तोंडाळणें-उक्रि. बकबक करून गुप्त गोष्ट फोडणें; जीभ पघळणें. [तोंडाळ] ॰तोंडोंतोंड-क्रिवि. तोंडापर्यंत; कंठोकांठ; तुडुंब; तोंडसर.॰तोंडोंळा-पु. तोंडवळा; चेहरेपट्टी. [तोंड + ओळा, वळा प्रत्यय]

दाते शब्दकोश