आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह!
शब्दार्थ
मंडूर
मंडूर m Rust of iron, or a medicinal preparation of it.
मंडूर maṇḍūra m S Rust of iron, or a medicinal preparation of it.
(सं) पु० रसायनविशेष.
संबंधित शब्द
तक्र
न. ताक. [सं.] सामाशब्द-॰कौंडिण्य न्याय-पु. एका पदार्थाला दोन सजातीय विधी असतां त्यांपैकीं सामा- न्याला विशेषाचा जो बाध येतो तो. उदा॰ सर्वांस तक्र वाढा आणि कौंडिण्यास दहीं वाढा, या वाक्यांत दह्याच्या विधानानें तक्राच्याला बाध आला. ॰मंडूर-पु. ताकाच्या अनुपानाशीं घ्यावयाचा मंडूर (लोहकीटापासून केलेलें औषध.) [सं. तक्र + मंडूर] ॰योग-पु. मीठ, हळद व मोहर्या हीं औषधें प्रत्येकीं २० तोळे घेऊन ४०० तोळे ताकांत टाकावीं आणि तें भांडें तोंड बांधून तीन दिवस तसेंच ठेवावें. नंतर त्यांतील २० तोळे ताक दररोज प्यावें याप्रमाणें २१ दिवस केलें असतां पानथरीचा नाश होतो. -थोर २.१९८. [सं. तक्र + योग]
धगड
पु. १ जार; भडवा; यार; उपपति. 'जड प्रपंच धगडालागीं ।' -दावि ७५. 'म्हणे प्रदोष करत्ये न माती करत्ये. त्या मेल्या धगडाला मात्र घेऊन बसत्ये.' -सागोप्र २.३. २ (अशिष्ट, निंदार्थी) नवरा, पति. 'पोरी, आज मुके देतांना तोंड असें वांकडें करतेस पण उद्यां नवरा (आजोबा इथें थोड्याशा ग्राम्य भाषेंत धगड असें बोलत) मुके घेऊं लागला म्हणजे कसें करशील.' -बहकलेली तरुणी ६. ३ (एखाद्याचें) निर्दालन, परा- भव करणारा; उरावर बसणारा; पुरें पडणारा; डोक्यावरचा मनुष्य इ॰ 'हा पंडितांचा धगड आसे.' 'मंडूर हा पंडु रोगाचा धगड आहे.' [सं. धव; हिं. धगडा] म्ह॰ जेथें दगड तेथें धगड. धगडी-स्त्री. रखेल; रांड; जारिणी; नाटकशाळा. हा शब्द धगडीचा = रांडलेक, रांडेचा या ग्राम्य शिवीच्या रूपानेंच विशेष रूढ आहे.' फुगडी फू, उघडी हो । न होसी उघडी तरी मग धगडी तूं ।' -ब ५९०. 'धगडीचा बटकीचा लवंडीचा ।' -दा १७.६.२०. [धगड; तुल॰ गुज.]
लोहभस्म
लोहभस्म lōhabhasma n (S) लोहमंडूर m (Properly मंडूर) Rust of iron or a medicinal preparation from it.
लोह-हो
न. १ लोखंड. २ लोखंडाचे केलेलें शस्त्र, तर- वार इ॰. 'लोहांचें काळवखें पडिलें । फररां आकाशु गवसिलें ।' -शिशु ५८५. ३ लोहभस्म; लोखंडाच्या गंजापासून अगर किटा- पासून केलेलें औषध. ४ रक्त. 'राया राणिएंचा जाला । जरि घे लोहाचा कांटाळा ।' -शिशु ४७१. ५ सोनें; सुवर्णरूप धन, -वि. १ तांबडा. २ लोखंडी. [सं.] ॰कांत-नपु. १ लोखंड आकर्षून घेणारा पादार्थविशेष; लोहचुंबक. २ लोखंडाची एक जात. ३ ह्या जातीच्या लोखंडाचें औषधार्थ केलेलें भस्म; तिख्याचें भस्म. ॰कार-पु. लोहार; लोखंडाचे पदार्थ बनविणारा. [सं.] ॰किट्ट-न. १ लोखंडाचा गंज; जळलेलें लोखंड. २ मंडूर नांवाचे औषधी द्रव्य. [सं.] ॰घंगाळ-न. मोठें लोखंडी घंगाळ; काहील. 'सूर्यनारायण जेवावयास आले, साती दरवाजे उघडले, लोह घंगाळे पाणी तापविलें ।' -आदित्यराणूबाईची कहाणी- कहाण्या भाग १. पृ. ९. ॰चुंबक-पु. लोखंडाच्या वस्तूला आकर्षण करणारा दगड; लोहकांत. -वि. (ल.) हट्ट घेऊन बसणारा; अनेक युक्त्या करणारा किंवा धरणें धरून बसणारा; झटून, चिकटून दुसऱ्यापासून द्रव्य घेतल्याशिवाय न सोडणारा माणूस. [सं.] ॰चुंबकाकर्षण-न. एका लोहचुंबकाचें दक्षिण टोंक दुसऱ्या लोहचुंबकाच्या उत्तर टोंकाजवळ आणिलें असतां त्यां मधील दिसून येणारें परस्पर आकर्षण. ॰चुंबकप्रतिसारण- न. दोन लोहचुंबकांच्या उत्तर किंवा दक्षिण टोंकामधील परस्परांस दूर लोटणें. ॰चूर्ण-न. लोखंडाचा कीस. ॰तुला-ळा--स्त्री. १ लोखंडाची तागडी; लोखंडी तराजू. २ लोखंडी गज, दांडा ॰दंड-पु. १ लोखंडी गदा; पातकी लोकांना मारण्याची यमाची गदा-हत्यार. २ यम, शनि यांच्या शांतीसाठीं ब्राह्मणाला दान द्यावयाचा लोखंडी सोटा; गज; लोखंडी काठी. [सं.] ॰दंडक्षेत्र- न. विना. पंढरपूर. 'शोधीत शोधीत हृषीकेशी । आला लोहदंड क्षेत्रासी । दिडीरवन म्हणती त्यासी । तेथें द्वारकावासी प्रवे- शला ।' -ह ३६. १८०. ॰धुरोळा-पु. लोखंडाचा-लोखंडा- सारखा धुराळा-धूळ; तांबडी धूळ. 'रणीं उटीला लोहधुरोळा । तेथें चालों न शके वारा ।' -एरुस्व ९.३७. [सं. लोह + धूलि] ॰परिघ-पु. लोखंडी गदा-सोटा; लेखंडी पहार. 'जे वनिता असे जारीण । तीस यमदूत नेती घरून । लोहपरिघ तप्त करून । कामागारीं दाटिती ।' ॰पेटि-का-स्त्री. लोखंडाची पेटी; तिजोरी; (इं.) सेफ. 'सरकारी ब्यांकेसारखी सुरक्षित लोह- पेटिकाच नाहीं.' -आगर ३.६६. ॰बंद-पु. लोखंडाची सांखळी. 'दोहीं बाहीं कुंजरथाट । मद गाळिता गजघंट । दातीं लोहबंद तिखट । वीर सुभट वळंघले ।' -एरुस्व ८.१६. ॰बंद-ध-वि. सोनेरी. -शर ॰भस्म-मंडूर-नपु. लोखंडाच्या गंजापासून केलेलें एक रसायन; लोखंडाचें प्राणिद. ॰मय-वि. १ लोखंडाचा बनविलेला; लोखंडी; लोखंड असलेला; लोहनिर्मित. २ (ल.) भयंकर; क्रूर; निर्घृण. [सं.] ॰मार्ग-पु. लोखंडी रस्ता; रेलवे; आगगाडीचा रुळांचा मार्ग. 'सरकारनें लोहमार्ग हिदुस्थानांत केले ते आपल्या सोयीसाठीं आहेत.' -टि १.३३. ॰लंगर- पु. लोखंडी बेड्या; साखळदंड. 'लोहोलंगर पायांत खिळविले ।' -ऐपो २०९. ॰शलाका-स्त्री. लोखंडाची सळई. लोहं(हां)गी, लव्हांगी, लोहंगी काठी-स्त्री. लोखंडाचे खिळे आणि कडचा जागोजाग बसवून मारामारीसाठीं केलेला सोटा; पहार. [लोह + अंग] लोहिवी-स्त्री. तांबूसपणा. 'पुढां उपरति रागें लोहिवी । धर्ममोक्षाची शाखा पालवी । लाहलाहात नित्य नवी । वाढतीची असे ।' -ज्ञा १५.१९४. लोहार-पु. लोखंडाचा खिळें, कोयते इ॰ अनेक पदार्थ करणारा कारागीर. [सं. लोहकार] लोहार- काम-न. लोखंडाच्या अनेक वस्तू करण्याचें काम; लोहाराचें योग्य कर्म. लोहारकी-स्त्री. लोहाराचा धंदा. लोहारडा-पु. (निंदेनें किंवा कुत्सितपणें) लोहार. लोहारसाळ-स्त्री. १ लोखंडी कामाचा कारखाना; लोहाराची काम करण्याची जागा. 'लोहारसाळेंतून खुरप्याला पाणी पाजून आण.' २ लोहाराची भट्टी. [सं. लोहकार + शाला] लोह-स्त्री. पेटी; तिजोरी. 'जैसी लोभियाचे हातीं । सांपडे अवचितीं धनलोहें ।' -एभा ७.५७०. ॰लोहो आर्गळा-स्त्री. लोखंडाचा अडसर. 'कपाटें लोहो आर्गळा पंथ मोठें ।' -राक १.२. [सं. लोह + अर्गळा] लोहोदक-न. ज्यांत लोखंडाचा अंश आहे असें पाणी. [लोह + उदक] लोहो- लोखंड-न. लोखंडाची भांडी, हत्यारें इ॰ वस्तू. [लोह + लोखंड]
मंडल
मंडल maṇḍala n (S) A circle; a ring; an orbit; the sensible horizon; a circumference in general: also the area included. 2 The disk of the sun or moon. 3 A province, a region, a circle, a district exceeding twenty, or, according to some, forty Yojanas every way. 4 The country over which the twelve princes termed Chakrawartí are supposed to have reigned; whence the term Mandel to signify a province; as in Coromandel (कुरुमंडल). 5 A company, an assembly, a band or an association. 6 Leprosy with circular spots. 7 A sort of mystical diagram inscribed in summoning a divinity upon occasions. 8 A kind of harmless snake. 9 A figure (circular, square, triangular &c.) described upon the ground underneath the leaf off which one eats his meal. 10 A form of military array,--the circle. 11 The wheel-rut of a limemill. 12 In comp. A region of the body. Ex. मस्तकमंडल, कुचमंडल, कर्णमंडल. 13 A period of forty-two days. Used with reference to taking medicine or observing regimen. Ex. एक मंडलपर्यंत तुह्मी मंडूर घेत जा ह्मणजे बरे व्हाल. मंडलावर धरणें To ring (a horse &c.), to lounge.