मराठी बृहद्कोश

सात मराठी शब्दकोशांतील २,८४,८८८ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

मनस्वी

वि. १ मन स्वाधीन असलेला; मन जिंकणारा; संयमी. 'मृत्यु न म्हणे हा मनस्वी ।' -दा ३.९.२६. २ बेसनद- शीर; स्वैर वर्तनाचा; अमर्याद. ३ स्वच्छंदी; लहरी; छांदिष्ट (काम, वागणूक, स्वभाव, मनुष्य). ४ बेदरकार; निधड्या छातीचा. 'स्वातंत्र्यासारख्या गोष्टी ज्यांना मिळवावयाच्या आहेत अशा जिगीषूंनीं मनस्वी म्हणजे लोकमान्य टिळकांप्रमाणें निधड्या छातीचें झालें पाहिजे.' -धर्मशास्त्रविचार (काणेकृत). ५ पुष्कळ; अतोनात; विपुल; अतिशय. उदा॰ मनस्वी-पाऊस-ऊन-थंडी; मनस्वी-उंच-खोल-लहान इ॰ क्रियाविषेषणाप्रमाणेंहि योजतात. जसें-मनस्वी लिहीतो-वाचतो. मनस्वार-वि. (क्व.) मनस्वी अर्थ ५ पहा.

दाते शब्दकोश

मनस्वी manasvī a (S Properly. Of subdued mind and affections; of restrained and well-governed soul or self.) Popularly. Lax, licentious, lawless, devious from all law and rule: also capricious, fanciful, freakful--proceedings, deportment; and attrib. the person. 2 sometimes मनस्वार In lax phraseology. Abundant, copious, profusely plentiful. Applied with all latitude. Ex. म0 पाऊस- ऊन-थंड; म0 महाग-सवंग; म0 उंच-खोल-लांब-रुंद- लाहन-मोठा; म0 श्रम-सुख-दुःख. Used also as ad Ex. हा म0 लिहितो-बोलतो-वाचतो-मारतो-खातो- देतो-घेतो.

मोल्सवर्थ शब्दकोश

मनस्वी a Abundant, capricious.

वझे शब्दकोश

(सं) वि० मानी, स्वाभिमानी. २ पुष्कल, विपुळ, फार, अतिशय.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

मनो मनस्वी

वि. इच्छेस येईल तसें वागणारा.

दाते शब्दकोश

संबंधित शब्द

अजागळी

स्त्री. मनस्वी खोडया; दांडगाई; धिंगाणा; अर- वाळी. [सं. अजागल? प्रा. अजुअ = अयुत + आगळी?]

दाते शब्दकोश

अजागळी      

स्त्री.       मनस्वी खोड्या; दांडगाई; धिंगाणा; अरवाळी.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अलांडाबलांडा      

पु.       अडथळा; विघ्न : ‘नसता अलांडा बलांडा व जेवे वेठबिगारी मनस्वी घालून तगादा करिताति.’ – मसाप २·२९६.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अलांडाबलांडा

पु. अडथळा; विघ्न. 'नसता अ॰ व जेवे वेठबिगारी मनस्वी घालून तगादा करिताति.' -मसाप २.३९६.

दाते शब्दकोश

अनर्गल, अनर्गळ      

वि.       आडकाठी नसलेला; उच्छृंखल; स्वच्छंदी; मनस्वी; स्वेच्छाचारी : ‘तू ठायींचा गोवळ । अविचारी अनर्गळ I’– तुगा १८५.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अनर्गल-ळ

वि. अडकाठी नसलेला; बेकैद; उच्छृंखल; स्वच्छंदी; मनस्वी; स्वेच्छाचारी. 'तूं ठायींचा गोवळ । अविचारी अनर्गळ ।' -तुगा १८५. -क्रिवि. मनसोक्त; स्वेच्छाचारानें; स्वैर; अप्रतिबद्ध. 'शिष्या मुक्तपणें अनर्गळ । करिसी इंद्रियें बाष्कळ ।' -दा ५.६.६०. [सं. अ + अर्गला]. ॰ता-स्वच्छंदपणा; स्वेच्छा- चार; स्वैर वर्तन. 'अनर्गळता करूं नये ।' -दा १४.१.२५.

दाते शब्दकोश

आपच्छंदी      

वि.       स्वैर; स्वच्छंदी; नादिष्ट; मनाला येईल तसे वागणारा; मनस्वी.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आपगंड

वि. (राजा.) हट्टी; स्वच्छंदी; मनस्वी; स्वेच्छा- चारी. [आप + का. गंड = मोठा]

दाते शब्दकोश

आपगंड      

वि.       हट्टी; स्वच्छंदी; मनस्वी; स्वेच्छाचारी. (राजा.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अत्यंत

क्रिवि. वि. अतिशय; फाजील; फार; मनस्वी; बेसुमार; अमर्यादपणें; बहुत; बेहद्द. [सं.] ॰स्वजन पु. निक- टचा, अगदीं जवळचा नातलग; अति प्रीतीचा माणूस. 'दारा पुत्र धन यौवन । बंधु सेवक अत्यंतस्वजन ।'

दाते शब्दकोश

(सं) क्रि० फारच, अतिशय, अति, मनस्वी, बहुत.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

अत्यंत      

वि. क्रिवि.       अतिशय; फाजील; फार; मनस्वी; बेसुमार; अमर्यादपणे; बहुत; बेहद्द. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आवेगशील      

वि.       (एकदम उत्पन्न झालेल्या) प्रेरणेप्रमाणे वागणारा; मनस्वी; मनसोक्त वागणारा. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

बाबतीवाला

वि. वतनदार; हक्कदार. 'त्यांच्या कमकुवतपणामुळें यांचा वगैरे मनस्वी उपसर्ग गांवास लागला.'

दाते शब्दकोश

बाधावाई

वि. अफवाई वार्‍यावर आलेली उडतउडत (बातमी). 'परभारे इकडे मनस्वी बाधावाई खबर्‍या आल्या कीं, सिंदे, होळकर याणी श्रीमंताचें लक्ष्य सोडून तिकडे मिळाले.' -रा १९.१२५. बाधअवई पहा.

दाते शब्दकोश

बे-बुदी; बे-बूद

(स्त्री.) नाश; खराबी. “मनस्वी उपसर्ग गांवास लागोन गांवची बेबुदी जाहली” (खरे ९६६).

फारसी-मराठी शब्दकोश

भयग्रस्त

जागच्या जागीं खिळला, पोटांत धस्स झाले, बोबडी वळायची पाळी आली, अंगावर झररदिशी कांटा उभा राही, पाहून छातींत धडकी भरे, डोळ्यांपुढे काजवे चमकले, दरदरून घाम सुटला, दांतखिळी बसली, छाती दडपून गेली, घणाच्या घावासारखे छातीचे ठोके पडूं लागले. सर्दच झाला, थरकांप उडे, गर्भगळित झाली, घाबरगुंडी उडाली, भयशंकेनें गांगरला, मनस्वी भेदरला.

शब्दकौमुदी

चबढबी-ब्या, चबडबी-ब्या

वि. १ मनस्वी खेंकटे- खोर व साहसी; उपद्व्यापी; पैशासाठीं नाना तर्‍हेच्या हिक- मती आणि युक्त्या करणारा; घालमेल्या; चळवळ्या. २ (ना) हरहुन्नरी; अष्टपैलू. चबढब पहा.

दाते शब्दकोश

चर्पट

चरपट पहा. ॰पंजरी-स्त्री. १ एका स्तोत्राचें नांव. चरपटपंजरी पहा. २ (ल.) मनस्वी लांबचलांब गोष्ट, भाषण, बडबड, चर्‍हाट. 'भास्करभाऊची ती स्थिती पाहून सीतारामाल वाईट वाटलें, पण पंड्याजीची चर्पटपंजरी चाललीच होती.' -जग हें असें आहे.

दाते शब्दकोश

चुरचुराट

पु. १ अतिशय चुरचुर; चुणचुण; सणसणाट; फुणफुण. २ (ल.) अतिशय खेद होणें; मनस्वी वाईट वाटणें; फार हुरहुर, खंत चुटपुट. [चुरचुर]

दाते शब्दकोश

गाडग्यालवंड पाऊस      

घरातील गाडगीमडकी वाहून जातील असा मुसळधार पाऊस : ‘ते दिवशीं पाऊस मनस्वी लागला. कोण्हाचे मडकें मडक्यांत राहूं पावलें नाहीं, गाडग्यालवंड पाऊस.’ –पेद. गाडण      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गरद(ध)ट

वि. मनस्वी; अविचारी. बेपर्वा; गळदट पहा.

दाते शब्दकोश

गरदट, गरधट      

वि.       मनस्वी; अविचारी; बेपर्वा. पहा : गळदट

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

हाटी

स्त्री. हट्टी पहा. भिल्ल रामोशी वगैरेची गांवा- बाहेर असलेली वस्ती, झोंपडया, घरें वगैरे. ' गुजरदरी व कालदरी येथे दाहाबारा हाट्या भिलाच्या नेहेमी राहून सरकारी महालाचे गावास व मोगलाईंतील गावास मनस्वी उपद्रव करून गुराच्या वोळत्या केल्या. ' -पेद ४२.४४. [हट्टी]

दाते शब्दकोश

कडाकूट      

पु. स्त्री.       १. एखादी गोष्ट सिद्ध करण्याविषयी करायचा जोराचा प्रयत्न, मेहनत, दगदग. २. बारीक शोध; काथ्याकूट. ३. अतिशयपणा; रेलचेल; चंगळ; लयलूट; समृद्धी; कडेलोट. ४. मनस्वी आवेश; जोर.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कडाकूट

पुस्त्री. १ एखादी गोष्ट सिद्ध करण्याविषयीं करावयाचा जोराचा प्रयत्न, मेहनत, दगदग. २ बारीक शोध; काथ्याकुट. ३ अतिशयपणा; लयलूट; समृद्धि; कडेलोट. 'काय हो, आज आंब्याची-गुळाची-तुपाची-लाडवांची-पिकाची- धान्यची कडाकुट ।' 'पावसानें-वार्‍यानें-थंडीनें कडाकूट केली ।' ४ मनस्वी आवेश; जोर. (कडाकोट शब्दाहून हा शब्द भिन्न आहें). [सं. कड्ड = कठिण, कडक असणें; कड + कूट = रास; गु. कडाकुट = त्रास; खडा + कुटणें] -क्रिवि. १ अतिशय; फार; गडद; धो धो; जोरानें; तडाख्यानें (पडणारा पाऊस, जमणारे ढग, वाहणारा वारा, वादळ, अंधार इ॰). २ झाडून सर्व जोर, पुर्णत्व इ॰ दाखविण्याकरितां हा शब्द योजतात. 'आज कडाकूट पंडित मिळाले होतें.'

दाते शब्दकोश

कळी      

स्त्री.       १. भांडण; तंटा; कज्जा; कलागत : ‘विकत कळी जयानें घेतली आजि मोलें ।’ – सारुह ३·७८. २. कलियुग; चालूयुग : ‘ऐसें युगीं परी कळीं । आणि महाराष्ट्र मंडळी ।’ – ज्ञा १८·•१८०३. ३. युद्ध : ‘ऐसें गोत्रचि दोहीं दळीं । उदित जालें असे कळी ।’ – ज्ञा १. १८४. [सं. कलि] (वा.) कळीला येणे – भांडायला लागणे : ‘पण तो कळीला आला.’ – ययाती २९८. कळीवाचून काटा निघणे – भांडणतंटा किंवा त्रासावाचून अनिष्ट गोष्ट नाहीशी होणे : ‘कॉलेजात विद्यार्थ्यांची मनस्वी गर्दी होत असते व ती कमी व्हावी यासाठी कॉलेजची फी १५ रूपये करावी म्हणजे आपोआपच कळीवांचून काटा निघेल अशी कल्पना आहे.’ – मनोरंजन पु. ७. भाग ८.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कळी

स्त्री. १ भांडण; तंटा; कज्जा; कलागत. 'विकत कळी जयानें घेतली आजि मोलें ।' -सारुह ३.७८. 'कळी करि सुनिर्मळीं परम उग्र दावा नळीं ।' -केका २१. 'येगे कळी बैस माझे नळीं.' २ कलियुग; चालू युग. 'ऐसें युगीं परी कळीं । आणि महाराष्ट्र मंडळी. ।' -ज्ञा १८.१८०२. ३ युद्ध. 'ऐसें गोत्रचि दोहीं दळीं । उदित जालें असे कळी ।' -ज्ञा १.१८४. कळीचा नारद-पु. कळलाव्या; भांडण लावून देणारा; काज्जेदलाल; आगलाव्या; चुगल्या; लावालावी करून तंटे उपस्थित करणारा (पुराणांत नारद हा नेहमीं तिन्ही लोकांत भांडणें उपस्थित करतो अशा कथा आढळ- तात यावरून). [कळ + नारद] कळीवांचून कांटा निघणें- भांडणतंटा किंवा त्रासावांचून अनिष्ट गोष्ट नाहींशी होणें. 'कालेजांत विद्यार्थ्यांची मनस्वी गर्दी होत असते ती कमी व्हावी यासाठीं कॉलेजची फी वाढवून १५ रुपये करावी म्हणजे आपोआपच कळीवांचून कांटा निघेल अशी कल्पना निघाली आहे.' -मनोरंजन पु. ७. भाग ८.

दाते शब्दकोश

खातर      

स्त्री.       १. गुमान; पर्वा; विचार; चिंता (सामान्यतः निषेधार्थी.) २. खात्री; विश्वास; भरवसा. ३. पसंती; मर्जी; मन. ४. (ल.) मनस्वी त्रास; खोडमोड (ना.) [फा. खातिर] (वा.) खातर करणे - खात्री करणे; पटविणे; आश्वासन देणे. खातर पटणे, खातरेस येणे - आवडणे, पसंत पडणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खातर

स्त्री. १ गुमान, पर्वा; विचार; चिंता (सामान्यतः निषेधार्थी). 'पैका गेल्याची त्यास खातर नाहीं.' २ खात्री; विश्वास; भरंवसा; निशा. 'हा मनुष्य विश्वासु असी आमची खातर आहे.' ३ पसंती; मर्जी; मन. 'आमचे खातरेस वाटेल तें करूं.' ४ विचार. 'स्वामीची खातर जरूर जाणून...' -रा १.१३२. ५ आस्था. 'त्यांतही श्रीमंताचे सरकारांत या संस्थानची यास खातर अधिक.' -रा ७.३७. ६ सत्कार; मान ७ आश्वासन. ८ (ल.) (ना.) मनस्वी त्रास; खोडमोड. 'सायकलीवरून हिंडलों पण माझी चांगलीच खातर झाली.' -शअ. करितां; साठीं. माझ्याखातर' 'त्या खातरहि तें मला कर्तव्यच आहे.' -तोबं २२. [अर. खातिर्] (वाप्र.) ॰करणें-खात्री करणें; पटविणें; आश्वासन देणें. ॰पटणें-आवडणें, पसंत पडणें. खातरेस येणें-पसंत पडणें. सामाशब्द- ॰खा, खातीरखा-वि. १ स्नेहाचा, चांगलें इच्छिणारा; हितेच्छु (केवळ पत्रव्यवहारांत). २ यशस्वी. 'कित्येक उम्द उम्दे मनसुबे खातीरख्वाह् होतील.' -रा १.५३. ३ समा- धान. 'बहुत खातरखा केली.' -रा १०.२६५. -क्रिवि. १ इच्छेप्रमाणें. 'इंग्रेज पल्टणें पुण्यासमीप आली त्यांचें पारिपत्य खातरखा न जालें' -दिमरा १.४०. २ यथास्थित. 'बंदोबस्त ही खातरखा आमचे स्वामी करितील.' -रा १.१३२. ॰जमा-स्त्री. १ खात्री; विश्वास; निशा; संशय, आशंका, संदेहनिवृत्ति. (क्रि॰ करणें). 'एवंच दादासाहेब खातरजमेशीं जात नाहींत.' -भाब ८४.२ हिंमत. ' एक वेळ लढाई खातरजमेची द्यावी.' ख ११. ६०८४.३ गुमान; हिशेब; पर्वा.-वि. स्वस्थ. 'तुम्ही खातर- जमा असणें.' -रा १५.२१ [फा. खातिरजम्अ]॰जामीन- दार-पु. खातरीदार पहा. ॰तसल्ली स्त्री. समाधान. 'सर्वांची खातरतसल्ली होऊन जमाव जालाच असेल.' -दिमरा १.३१. [अर. तसल्ली = समाधान] ॰दारी स्त्री. १ खात्री; हमी (माणूस, चिन्ह यांची).२ विश्वास, निशा. [फा. खातिरदारी] ॰दास्त- स्त्री. खातरजमा, इच्छा. 'त्याची खातरदास्त पुरेल तेथें जावें.' -खा ९.४९६५. ॰नशीन -वि. श्रुत. -खरे ७.३५६६. [फा. खातिर्नशीन] ॰निशा -स्त्री. मनाचें समाधान; संदेहनिवृत्ति. 'अशी माझी खातर निशा झाली.' -बाळ २.१६. [फा. खाति- र्निशान]

दाते शब्दकोश

खवारी      

स्त्री.       १. अप्रतिष्ठा; बेअब्रू. २. अवकृपा; अवज्ञा : ‘मनस्वी लोकांच्या बुद्धी ऐकोन त्याचें निदर्शन जें खवारी जाली.’ - मइसा ८·१२८. ३. स्वारी. [फा. ख्वारी]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खवारी

स्त्री. अप्रतिष्ठा; अवकृपा; अवज्ञा. ‘मनस्वी लोकांच्या बुद्धी ऐकोन त्याचें निदर्शन जें खवारी जाली.’ –रा ८.१२८. [फा. ख्वारी = नीचपणा; दुःख]

दाते शब्दकोश

खवारी; ख्वारी

(स्त्री.) [फा. ख्वारी] अप्रतिष्ठा; अवकृपा, “मनस्वी लोकांच्या बुद्धी ऐकोन त्याचें निदर्शन जें, खधारी ज़ाली; दुराचरणाचें निदर्शन तुम्हांस आलें” (राजवाडे ८।१२८).

फारसी-मराठी शब्दकोश

निकर्श-र्ष

पु. १ अतिरेक; पराकाष्ठा; अतिशयपणा (कार्य, विचार इ॰संबंधीं). २ हट्ट; मनस्वी हट्ट; निकर पहा. ३ कहर; अनर्थ; त्रास; जुलुम. 'संस्थान उच्छेद करावा हे वासना धरून निकर्श मांडिला आहे.' -वाडशाछ ९८. ४ र्‍हास; उतरती कळा. याच्या उलट उत्कर्ष. [नि + सं. कृष्-कर्ष] ॰काल-पु. उंतरती कळा; र्‍हासाचा, अपकर्षाचा काळ, वेळ.

दाते शब्दकोश

ओके      

वि.       सुने; रिकामे : ‘त्या ओक्या घरात तिचं मनस्वी कौतुक झालं.’ − रथ ११४.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

पोर

पु. लहान मुलगा; पोरगा. १ -स्त्री. लहान मुलगी; पोरगी. लहान मूल; बच्चा. २ जनावराचें लहान पिल्लूं; पाडस; बछडें. -वि. (गो.) पोरका; अनाथ. [सं. पुत्रक; का. पोर] म्ह॰ पोरा आणि बुद्धि तेरा. ॰कट-वि. पोरासारखें; पोराला शोभणारें. पोरका-वि. १ लहान मुलाचें; मुलाला, शोभणारें; भव्य, गंभीर, प्रौढ इ॰ नव्हें तें (भाषण, वस्त्र इ॰). २ (कों.) आईबापांवांचून असलेला; अनाथ. उदा॰ 'बापपोरका, आई- पोरका.' ॰किडा-पु. धान्य खाणारा एक लहान किडा; टोका; क्षुद्र कीटक. ॰खाद्या-वि. जिचीं मुलें लवकर मरतात अशी (स्त्री). ॰खेळ-पु. १ मुलांचा इटीदांडू इ॰ खेळ. २ पोरासारखें हसणें, उड्या मारणें इ॰ ३ घेणें देणें इ॰ व्यवहारांचें मर्यादा सोडून मनस्वी वर्तन. ४ (ल.) सहज करतां येणारी गोष्ट पोरगा-पु. १ मुलगा; पोर. २ खिजमतगार पोर; पोर्‍या; लहान वयाचा नोकर. ३ स्त्रीवेष घेतलेला नाचणारा पोर. ४ लेकवळा; गुलाम [पुत्रक] पोरगी- स्त्री. मुलगी. पोरगें-न. लहान मूल. ॰गळ-वि. पोरकट पहा. ॰चेष्टा-स्त्री. पोरखेळ अर्थ २ व ३ पहा. मुलाचें नाचणें, बागडणें. ॰जिन्नस-पुस्त्री. (निंदार्थी) लहान मुलगा; पोरसौदा; पोर. पोरटा-टी-टें-पुस्त्रीन. (निंदार्थी किंवा रागानें) पोरगा-गी-गें; कारटा. ॰पिसा-वि. १ पोरांचा अतिशय शोकी; मुलांची फार आवड असणारा. २ अपत्यप्राप्तिसाठीं अतिशय उत्कंठित झालेला. ॰पिसें-न. १ पोरांचा बेसुमार शोक. २ अपत्यप्राप्तिसाठीं बे- सुमार उत्कंठा. ॰बुद्धि-स्त्री. अपक्व बुद्धि. -वि. अपक्वबुद्धीचा. ॰वट-वि. पोरांचा आचारविचारासारखा; पोरकट पहा. [पोर + वत्] ॰वडा-वाडा-वंडा-पु. पोरांचा समुदाय; सुळसुळाट; मुलांचा पुष्कळ भरणा असलेलें कुटुंब; घर, गांव, राज्य इ॰ च्या कारभारामध्यें प्रौढ, अनुभवी मनुष्य नसल्यामुळें होणारी अव्य- वस्था, किंवा अननुभवी लोकांचें प्राधान्य. 'नुस्ता पोरवडा घरीं न कवडा चित्तीं बरा नीवडा ।' -असु ५. [पोर + वाडा = घर] ॰वय-न. लहानपण; लहान वय. 'संसार सुखास अहल्या आंचवली पोरवयांत ।' -विक १६ ॰वाला-वि. १ मुलेंबाळें असलेला (कुटुंबी पुरुष-स्त्री). २ (ल.) लेंकुरवाळें; फांटे फूट- लेलें (हळकुंड). ॰समजूत-स्त्री. लहान मुलाची बुद्धि; अल्प समजूत. ॰सौदा-पु. लहान मुलगा; पोरजिन्नस. 'हा पोरसौदा असून बरा शहाणा आहे.' -वि पोरवय; मुलासारखा. [पोर + फा; सौदा = माल] पोरांडी-डें-स्त्रीन. (उपहासानें) पोर वडा पहा. [पोर + रांड] -वि. पोरें व बायका मात्र आहेत असें. [सं. पुत्ररंड] पोरापोरका-वि. आईबाप आणि मित्र नस- लेला; अनाथ (मुलगा). [पोरका + पोर] पोरापोरीं, पोरा- सोरीं-क्रिवि. १ पोरांमध्यें; पोरांकडून; पोरांनीं. २ एका मुलापासून दुसर्‍या मुलाला अशा रीतीनें वंशपरंपरेनें (वतन, वारसा इ॰ जाणे). पोरीटोरी-स्त्रीअव. (निंदार्थीं) मुली. 'पोरीटोरी गोरी काळी सार्‍या पाहुनि कविराय बाला ।' -राला ५४. पोरेंबाळें-लेकरें- सोरें-नअव. मुलें लेकरें; (व्यापक) मुलेंबाळें. [सं. पुत्रक + सोद- रक] पोरी-वि. (कु.) पोरका; आईबाप नसलेला. पोरोडा- पोरवडा पहा. पोर्या, पोर्‍या-पु. १ पोरगा अर्थ १ ते ३ पहा. २ (कों.) पोरकिडा. ३ (प्र.) पोहरा पहा. ४ बताणा, बच्चा पहा.

दाते शब्दकोश

प्रखर

वि. १ अतिशय उष्ण; तीक्ष्ण; तीव्र; कडक (औषध, तपकीर इ॰). २ भयंकर; तीव्र ;अनावर; मनस्वी; उतावीळ पणाची. -क्रिवि. चलाखपणें; चुणचुणीतपणें; रोखठोकपणें; स्पष्ट पणें (उत्तर देणें). [सं.]

दाते शब्दकोश

रया; रयात; रयायत

(स्त्री.) [अ. रिआयत्] कींव; कृपा; क्षमा; सूट; अदब; भीड. “परन्तु तुम्ही आतां शास्त्रांची आज्ञा उलट करून आपले मग्रूरीनें रया सोडून देऊन त्या सतीस मारितां” (ऐटि २|३४). “बे कैदी जाली आहे...मनस्वी भाषणें आहेत, सर्वांनी रया सोडली" (खरे ६।२९६२). “त्यांचीं घोडीं अवघीं तबेल्यास लावणें, ये विषयीं रयात् न करणें” (सभासद ४८). “या कालीं आम्हांवर रयात केली तर आम्हीही बहुत कामास येऊं” (खरे ५९६). “रयात जालिया रयत तज़ावज़ा होणार नाहीं, पुढें उमेदीनें लावणी करार-वाके करितील” (चन्द्रचूडदप्तर १|५१). “साल मज्कुरीं खण्डणीची रयात करावी” (खरे ४|८१७). “महिपतरावांनीं क्रूरपणा धरून जेथें सांपडेल तेथें पैका घेतला; कोणाची रू-रयात अगर वळख धरिली नाही” (खरे ९६३). “कोण्ही कांहीं रयायत करील ऐसें नाहीं; काम होय तोंवर कोरडी मिनत करितात; मन्सब द्यावयासी तयार; जागीर कपर्दिकेची न देत” (राजवाडे ६|३३१). “राजश्रीस जागीर सरन्ज़ामी आलियावर तुम्हांस रयायत पांच हज़ाराची पर्गणाचे पैकीं करार होईल” (राजवाडे १५।१००).

फारसी-मराठी शब्दकोश

सच्चा

खरा, खराखुरा, प्रामाणिक, वचनाला जागणारा, दुसरा हरिश्चंद्र किवा धर्मराजा, खोटें करणार नाहीं, एकवचनी, शब्दाला जागणारा, बनावट नाहीं, खरें नाणें, बनावटपणाचा अंश नाहीं, सत्याचा वाली, सत्यप्रिय, सत्यवादी, सत्यब्रुव, सत्य ब्रीदवाक्य असणारा, वचनाचा धड, आंत-बाहेर नाहीं, सार्वजनिक बाबतींत परीटघडीसारखे, शंभर नंबरी सोनें चौदा कॅरट नव्हे, ते विक्षिप्त असतील पण अप्रामाणिक खासच नव्हते, दांभिकपणाची मनस्वी चीड.

शब्दकौमुदी

स्वैर

स्वच्छंदी, स्वैरवादी, सैराट, निरर्गल, उच्छृंखल, बेछूट, बेफाट, अनियंत्रित, कोणाचा दाब नाहीं, मनचाहे वर्तन, या होडीला सुकाणूं नाहीं, हा बाजीरावी घोडा ज्या दिशेला निघेल तिकडे त्याची दौड, कोणाचें ऐकणार नाहीं, मनस्वी, याच्या जीवनाला वेळापत्रक नाहीं.

शब्दकौमुदी

टीका

स्त्री. १ (कठीण ग्रंथांवरील) व्याख्या; स्पष्टीकरण; विवरण; भाष्य; भाषांतरानें किंवा व्याख्येनें केलेलें अर्थविवरण; भाषांतर; टिप्पण अर्थ २ पहा. २ (ल.) पाल्हाळ; विस्तार; अति- शयोक्ति. ३ (ल.) गुणदोषविवेचन; दोषदर्शन; (पाठीमागें केलेलीं) निंदा; कुतर्कानें केलेलें मनस्वी शब्दपांडित्य. [सं.] ॰कार-पु. विवरण करणारा; टिका (टीपा) देणारा, करणारा.

दाते शब्दकोश

टीका      

स्त्री.       १. (सास.) एखाद्या कृतीचे गुणदोष विवेचन; आलोचना. २. (कठीण ग्रंथावरील) व्याख्या; स्पष्टीकरण; विवरण; भाष्य; भाषांतराचे किंवा व्याख्येचे केलेले अर्थविवरण; समीक्षा; भाषांतर; निरूपण. पहा : टिप्पण २. ३. (ल.) पाल्हाळ; विस्तार; अतिशयोक्ती. ४. (ल.) गुणदोषविवेचन; दोषदर्शन; पाठीमागे केलेली निंदा; कुतर्काने केलेले मनस्वी शब्दपांडित्य. [सं.टीक्, टीका]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तर्‍हा

स्त्री. १ प्रकार; भेद; जात. 'लढाई खूब तर्‍हेनें जाली.' -रा १०.१९२. २ रीत; पद्धति; मार्ग. '''आमची पल्ल्याची तर्‍हे आपण कहाडतील, ती कांहीं दिसोन आली नाहीं.' -रा १२.११५. ३ (ल.) परिणाम; शेवट. 'पण त्या दोघांच्या दोन तर्‍हा झाल्या.' -इंप ५८. [अर. तर्ह्] (वाप्र.) तरतर्‍हा-तर्‍हातर्‍हा करणें-१ मनस्वी चेष्टा, चाळे, ढंग करणें. २ (कर्माची पष्टी) (एखाद्यास) अनेक प्रकारांनीं छळणें, त्रास देणें; (एखाद्याची) कुचेष्टा करणें. तर्‍हेस-तर्‍हीं भरणें, तर्‍हेस पेटणें-भलत्याच गोष्टीच्या नादीं लागणें; हट्टास पेटणें; हट्टाची लहर येणें. 'तर्‍हे भरोंच नये । सुचावे नाना उपाये ।' -दा ११.५. ११. 'हें पोर एकदां तर्‍हीं भरलें म्हणजे कोण्हाचें ऐकत नाहीं.' तर्‍हेस जाणें- विक्षिप्त, चमत्कारिक बनणें; स्वैरपणानें, विलक्षण रीतीनें, स्वतःच्या लहरीनें वागणें. -तर्‍हेस-तर्‍हेदेणें-(एखाद्यास) बेफामपणानें, उच्छृंखलपणानें, स्वैरपणानें, चमत्कारिक रीतीनें वागण्यास प्रवृत्त करणें. सामाशब्द- ॰तर्‍ही-वि. नाना तर्‍हेचा; विविध; निरनि- राळ्या प्रकारांचा. 'वीस पंचवीस तोफानी तर्‍हातर्‍ही येणेंप्रमाणें नबाबानें पाठवावें.' -ख ८७५. [तर्‍हा द्वि.] तर्‍हेचा, तरतर्‍हेचा, तर्‍हेदार-वि. १ अपूर्व; विलक्षण; नव्या, विशेष प्रकारचा; नव- लाईचा. 'हातांत जर्मनसिल्व्हरच्या झांकणाची तर्‍हेदार दौत घेत- लेली आहे.' -सुदे ३०. २ सुंदर; सुरेख; दिखाऊ; देखणा. 'पान्दान चांगलें तर्‍हेदार आहे.' -रा ३.४८७. तर्‍हेबाज, तर्‍हेखोर- वि. १ तर्‍हेवाईक; चमत्कारिक स्वभावाचा (मनुष्य). २ लहरी; स्वच्छंदी; छांदिष्ट. 'तर्‍हेबाज ती अधींच खिलाडू नवर्‍याच्या गोष्टी एकून ।' -पला ७८. [तर्‍हा + फा. बाज प्रत्यय] तर्‍हे- वाईक, तर्‍हेवार-वि. १ विशिष्ट तर्‍हेचा. २ चमत्कारिक; विलक्षण; विचित्र; विक्षिप्त (व्यक्ति, वस्तु). ३ अपूर्व; अप्रतिम; नवीन तर्‍हेचा. ४ (ल.) सुंदर; दिखाऊ. 'तर्‍हेवार कापड. [फा.]

दाते शब्दकोश

उधळ

स्त्री. अवास्तव खर्च; बेसुमार खर्च; उधळपट्टी. [सं. उद् + धूल] ॰खोर-पट्ट्या-पांड्या-माणक्या-माधळ्या- वाढ्या-वि. अति खर्च करणारा; उधळ्या; बेसुमार, बेदाद, शक्ती- बाहेर, निष्कारण खर्च करणारा. ॰ठक-पु. (चुकीनें) उजळठक पहा. ॰पट्टी-स्त्री. १ मनस्वी खर्च; फाजील, निष्कारण व्यय. २ (चुकीनें) खरडपट्टी पहा. (क्रि॰ काढणें). ॰भवानी-मावशी-स्त्री. खर्चिक स्त्री; उधळी. ॰माणकी-माधळ-स्त्री. उधळ; उधळपट्टी. म्ह॰ उधळमाधळ घाल गोंधळ.

दाते शब्दकोश

उधळपट्टी      

स्त्री. १. मनस्वी, फाजील, प्रमाणाबाहेर खर्च; निष्कारण व्यय.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

राक्षस

पु. १ मानुष किंवा अमानुषरूप देवांचा शत्रु; कुबेराचा सेवक व त्याच्या निधींचा रक्षक; स्मशानांत जाण्या- येण्याची रहाळ असणारा; मृत शरीरांना सजीव करणारा उग्र पिशाच म्हणून निरनिराळया रीतींनीं वर्णिलेला देव किंवा पिशाच; असुर; दानव; दैत्य. २ क्रूर, भयंकर, अकराळ विकराळ, अधाशी, झोपाळू मनुष्य. ३ साठ संवत्सरांतील एकुणपन्नासावा संवत्सर. [सं.] सामाशब्द-॰गण-पु. जन्मकाळच्या नक्षत्रावरून केलेल्या देवगण, मनुष्यगण, व राक्षसगण ह्या तीन वर्गांतील शेवटला वर्ग. [सं.] ॰गणी-वि. राक्षसगण असलेला. ॰मुखी-मोहरा-मोरा- मोहरी-विक्रिवि. दक्षिणाभिमुख; दक्षिणेकडे. गंगमोहरा पहा. [सं.] ॰विधि-विवाह-पु. विवाहाच्या आठ प्रकारांपैकीं एक प्रकार. बलात्कारानें केलेला विवाह; पालकांच्या व कन्येच्या इच्छेविरुद्ध तिचें हरण करणें. अष्टौ विवाह पहा. 'परंणू पाहे राक्षस विधि ।' -एरुस्व १२.६६. [सं.] ॰वेळ-वेळा-स्त्री. सूर्या- स्ताच्या व रात्रीच्या मधील काळ; तीनीसांजा. [सं. राक्षस + वेळ] राक्षसान्न-न. तामस अन्न (बाजरी, उडीद, मसृर, राळा, मिरची इ॰). [सं.] राक्षशी(सी)ण-स्त्री. १ राक्षसाची स्त्री. २ दुष्ट स्त्री. [सं. राक्षसी] म्ह॰ राक्षसणी पीठ कांडितात घरा- मध्यें-रानामध्यें-तेथें = पराकाष्ठेचा ओसाडपणा दाखविण्याकरितां योजतात. राक्षसी-शी-स्त्री. राक्षसाची बायको; राक्षसस्त्री. -वि. १ राक्षसांच्या संबंधी; राक्षसास योग्य. २ प्रचंड; भीम; साहसी; मनस्वी (कृत्यें). ३ आसुरी; तामस; अघोरी (उपाय). ४ कुत्सित; अयोग्य; जबर (अन्न, खाणें) (समासांत) राक्षसी- कृत्य-करणी-खाणें-भाषण-घोडा-बाग-घोडा-बाग-मजल-जोर इ॰ [सं. राक्षस] सामाशब्द- ॰अवतार-पु. अतिशय क्रूर आणि रानटी मनुष्य. ॰उपाय-उपचार-पु. असुरी, अधोरी उपाय, उप- चार. ॰झोंप-स्त्री. अतिशय गाढ व दीर्घ काल झोंप. ॰दौलत- स्त्री. सात्त्विकपणा, टिकाऊपणा नसलेली भरभराट, संपत्ति. ॰धान्य- न. बाजरी (कारण हें धान्य हेमाडपंतानें लंकेहून आणलें अशी सम- जूत आहे). ॰पीक-न. अतिशय विपुल पीक. ॰भाषा-स्त्री. संकृताच्या अपभ्रंशानें बनलेली व नाटकांत राक्षसांच्या, पिशा- चांच्या तोडीं घाचलेली, हेंगाडी भाषा. ॰माया-माव-स्त्री. राक्षसाची माया, कपट. ॰मुलूक-ख-पु. नर्मदेच्या दक्षिणे- कडील प्रदेश. ह्याच्या उलट देवमुलूक (नर्मदेच्या उत्तरेकडील प्रदेश). ॰विद्या-स्त्री. राक्षस आणि पिशाच यांस काढून लाव- ण्याची, त्यांस ताब्यांत ठेवण्याची विद्या. ॰वेळ-वेळा-स्त्री. राक्षस वेळ पहा. ॰संपत्ति-स्त्री. राक्षसी दौलत पहा. ॰हाड- न. टणक व बळकट मनुष्य. राक्षेस-पु. राक्षस. 'किती येक राक्षेस ते हाकलीती ।' -राक १.४.

दाते शब्दकोश

लहर

स्त्री. १ तरंग; लाट (पाण्याची). 'प्रकटति बहुतर लहरी, करि करिवरसा ऱ्हदासि बहु तरल हरी ।' -मोकृष्ण १६. १०. २ शरीरांत उठणारा वेग, पेटका, झटका (मादक, विषारी पदार्थ, विषारी दंश, क्रोध, काम इ॰ कांपासून किंवा मरणकाळीं येणारा).'सोसिल शोकविषाच्या कृष्णा मत्काय हा किती लहरी ।' -मोस्त्री ४.९. ३ शौचाच्या वेळीं होणारी पोटांतील खळबळ; ओसर; शौचाचा आवेग. ४ झगडा, वेदना इ॰ च्या वेळीं होणारी क्रिया; धडपड. ५ वाऱ्याची झुळूक; मंद वायु. ६ हुक्की; एकदम होणारी इच्छा; प्रवृत्ति; कल (मनाचा). 'वामनाची तेव्हां लहर लागली नाहीं.' ७ विशिष्ट जातीच्या सापाच्या गळ्याखालच्या रेषा (ह्या जितक्या असतात तितक्या तो साप चावलेल्या मनुष्यास विषाच्या लहरी येतात अशी लोकांत प्रसिद्धि आहे). ८ नागमोडी सारखी रेषा (कापड, वस्त्र इ॰ वरील विणकामांतील किंवा रंगानें उठवि- लेली). ९ कापड, पोषाख याची नागमोडी घडी. १० आकस्मिक झडप; ग्रासण (झोपेनें). 'झोपेची लहर' ११ छाया; झांक. [सं. लहरी] सामाशब्द- ॰दार-वि. १ छांदिष्ट; लहरी; तबीयती इ॰ २ नामी; सुंदर; लहर दाखविणारा (पोषाख, गाणें, वाजविणें भाषण, कविता इ॰). [लहर] ॰बहर-स्त्री. १ जोम; ज्वानी; भर; अत्युकर्ष. 'नवतीची लहरबहर थोडी.' 'आंब्याची लहरबहर उन्हाळ्यांत असती' २ हुक्की. [लहर + बहर] लहरा- पु. १ (संगीत) छाया; थाट; सूर (विशेषतः तंतुवाद्यावरील) 'कोणत्या रागाचा लहरा आणूं बरें?' २ तान; लेकर. (वाप्र.) ॰मोरणें-छांदिष्टपणानें क्रिडा करण; मौज मारणें. लहरी-स्त्री. १ लाट. २ (काव्य) शरीरांत उठणारा वेग, पेटका. 'काम-क्रोध लहरी' 'लागला म्हणोनि लहरी । भांजेची ना ।' -ज्ञा २. ७१. -तुगा १४०. ३ (व.) चुनडीप्रमाणें नागमोडी रेघा असलेलें स्त्रियांचें नेसण्याच एक वस्त्र. लहर पहा. -वि. छांदिष्ट; चंचल; मनस्वी. [लहर] ॰दार-वि. १ लहरी, नागमोडी (कांठ, वस्त्र इ॰); लाटांसारख्या रेघांचा. 'किनखापे लाल लहरीदार.' -समारो २. ७३. २ छांदिष्ट; लहरी; तऱ्हेबाज; विलक्षण. ३ पाण्याच्या लाटेप्रमाणें वरखालीं होणारें. [लहर + दार] ॰बहरी-वि. छांदिष्ट; लहरी, लहरबहर पहा. [लहरी द्वि.] लहऱ्या पिटणें-(व.) कमालीची उत्सुकता लागणें, दाखविणें. 'जाण्यासाठीं लहऱ्या पिटतो जसा.'

दाते शब्दकोश