नऊ मराठी शब्दकोशांमधील २,६२,७३६ शब्दांचा एकत्रित संग्रह
संबंधित शब्द
मर्म
न. १ गूढ शक्ति; सुप्त गुणधर्म; कार्यसाधक गुण (यांचे अनुमान कार्यावरून होतें). 'सर्व पदार्थांमध्यें जीं ईश्वरानें मर्में ठेविलीं आहेत तीं कोणास समजतात.' २ (शरीरादिकाचा) नाजूक भाग, अवयव; जिव्हाळी; वर्म. ३ छिद्र; उणेपणा; व्यंग. 'मर्म उघडितां, मानी पुरुष बुडाले त्रपेंत, जड तरले ।' -मोआदि २४.४७. ४ रहस्य; गूडार्थ; खरा आंतला हेतु (भाषण, लेख इ॰चा,); तात्पर्य. ५ मेख; मुद्दा; खोंच; रोंख. ६ कला; खुबी; गूढविद्या; युक्ति; गुरुकिल्ली (एखादें कोडें, रचना, क्रिया, धंदा इ॰ ची). 'अद्यपि श्लोक लावण्याचें मर्म तुला समजलें नाहीं.' 'घड्याळांतलें मर्म कळत नाहीं.' ७ शत्रु; अरि; नाशक; भंजक; उलट आणि प्रतिक्रिया करणाऱ्या गुणांची वस्तु. 'केळ्याचें मर्म तूप, गव्हाचें मर्म कांकडी.' [सं.] ॰भेद-पु. १ नाजुक भागावर केलेला आघात; जिव्हाळीं झालेली जखम. २ (ल.) जिव्हाळीं लागणें, झोंबणें; मर्मस्पर्श. ३ कट, युक्ति, बेत शोधून काढणें; खुबी, रहस्य हुडकणें; बिंग बाहेर काढणें; गूढपरिज्ञान. ४ एखा- द्याचा उणेपणा. व्यंग, दोष इ॰ चा स्फोट करणें; एखाद्याच्या मनाला झोंबेल अशा गोष्टी उघड करणें. ॰भेदक-भेदी, वेधक वेधी-वि. जिव्हाळीं स्पर्श करणारा; नाजूक भागाला जखम करणारा; बिंगें उघडकीस आणणारा (अक्षरशः व ल). ॰वेत्ता-वि. मर्म जाणणारा; मर्मज्ञ. ॰स्थल-स्थान-न. १ नाजूक भाग; जिव्हाळीं. २ (ल.) दोष. उणीव असलेलें स्थान; व्यंग. ॰स्पृक्- वि. नाजूक भागावर स्पर्श करणारा, जखम करणारा; चावा घेणारा (अक्षरशः व ल.); मर्मभेदी. ॰ज्ञ-वि. १ मर्म, गूढ, खुबी जाणणारा. २ अत्यंत कुशल; निपुण; पंडित. मर्मण-वि. मर्मज्ञ (अप.) 'मानवा सुजाणा मर्मणा सुजाणा ।' -देप ११३. मर्मान्वेषण-न. एखाद्याचें मर्म, उणेपणा शोधून काढणें; छिद्रा- न्वेषण. (अक्षरशः व ल.) मर्मान्वेषी-वि. मर्म, दोष, उणें शोधणारा; छिद्रान्वेषी. मर्मी-वि. १ गुप्त, गूढ, गोष्ट जाणणारा. २ एखाद्या गोष्टींत अत्यंत निपुण; कुशल; मर्मज्ञ. ३ मर्मभेदी; भेदक; झोंबणारें; टीकात्मक (भाषण). मर्मीक-वि. (प्र.) मार्मिक पहा. मर्मोद्घाटक-वि. एखाद्याचें मर्म, दोषस्थल, कमीपणा उघडकीस आणणारा; मर्मभेदी. मर्मोद्घाटन-न. एखाद्याचें व्यंग, उणें, दोष उघडकीस आणणें; मर्मभेद.
अणखर
वि. १. बळकट; मजबूत; टिकाऊ; भक्कम (लुगडे, सणंग). भरीव, शुद्ध धातूचे (दागिने). २. कठीण; कठोर; तडकाफडकी; रोख-ठोक; निर्भीड (भाषण वर्तन). ३. दुःखप्रद, मर्मभेदी, खोचदार (भाषण). ४. विलक्षण; चमत्कारिक; कधी न घडणारी; अलौकिक.
चटका
पु. १. दाह; भाजणारी उष्णता; तलखी; प्रखरता (सूर्य, अग्नी किंवा तापलेला पदार्थ यांपासून उत्पन्न होणारी); ताप. २. ऊन किंवा तिखट पदार्थ खाल्ल्याने घशाशी होणारी आग; अशी आग होण्याचा गुणधर्म. (क्रि. लागणे.) ३. पोळल्यामुळे किंवा तिखट पदार्थ खाल्ल्यामुळे होणाऱ्या तात्कालिक वेदना, दुःखावेग. (क्रि. बसणे.) ४. पोळल्यामुळे पडलेला डाग, जखम; भाजल्याची खूण. ५. अंतःकरणाला होणाऱ्या वेदना; मनस्ताप; चरका; संताप; मानसिक यातना; चुटपुट; रुखरुख; एखादी वस्तू परत मिळण्याविषयी लागलेली उत्कंठा (क्रि. बसणे, लागणे.) : ‘मी सोडुनि आलों तटका । तो जिवा लागला चटका ।’ - मध्वक २२०. ६. व्यंगोक्ती; औपराधिक मर्मभेदी भाषण; प्रतिक्षेप; टोमणा, टोला; जिव्हारी लागणारी व झोंबण्यासारखी टीका. (क्रि. मारणे.) ७. काळजी. चिंता; आस्था; हुरहुर; पर्वा; दरकार : ‘मनासि चटका म्हणुनी तव पदीं लगबग येत बालिका ।’ - स्वयंवर. ८. सांडसाने दिलेला डाग; चरका. (क्रि. देणे, लावणे.) ९. मोरचूद वगैरे लावून सोने अग्नीत तापवणे. (क्रि. देणे.) १०. (जहल्लक्षणेने) वरील कृत्याला लागणारी साधनसामग्री, द्रव्यसाहित्य, साधनीभूत पदार्थांचा संच. ११. मिऱ्याचे तिखट; तिखट चटणी विशेषतः हरभऱ्याची डाळ वाटून दही व ओल्या मिरच्या घालून करतात तो. १२. (राहिलेल्या अर्थासाठी) पहा : चटक, चरका [सं.चट्]
चटका
पु. १ दाह; भाजणारी उष्णता; तलखाई; प्रखरता; (सूर्य, अग्नि किंवा तापलेला पदार्थ यांपासून उत्पन्न होणारी); ताप. २ ऊन किंवा तिखट पदार्थ खाल्ल्यानें घशाशीं होणारी आग; अशी आग होण्याचा गुणधर्म. (क्रि॰ लागणें). ३ पोळल्यामुळें किंवा तिखट पदार्थ खाल्ल्यामुळें होणार्या तात्कालिक वेदना, दुःखावेग. (क्रि॰ बसणें). ४ पोळल्यामुळें पडलेला डाग, जखम. ५ अंतःकरणाला होणार्या वेदना; मनस्ताप; आधि; चरका; संताप; मानसिक यातना; चुटपूट; रुखरुख. (क्रि॰ बसणें, लागणें). 'मी सोडुनि आलों तटका । तो जिवा लागला चटका ।' -मध्व २२०. ६ व्यंगोक्ति; औपरोधिक मर्मभेदी भाषण; प्रतिक्षेप; टोमणा, टोला; जिव्हारी लागणारी व झोंबण्यासारखी टीका. (क्रि॰ मारणें) ७ काळजी; चिंता; आस्था; कळकळ; पर्वा; दरकार. 'मनासि चटका म्हणुनी तव पदीं लगबग येत बालिका ।' -स्वयंवर नाटक. ८ विरह; दुःख; हुरहुर; एखादी वस्तु परत मिळण्याविषयीं लागलेली उत्कंठा, चटक; चुटपूट; ध्यास; छंद; तहान. (क्रि॰ लागणें; लावणें; बसणें). 'च च चटका लागतां पावसी पद उंच ।' -दावि २१३. 'लोभ हरीचा लटका...लावुनि गेला चटका.' 'तो माळी दादव्या केला । तो विहिरींत पडून मेला । त्याचें कांहीं वाटत नाहीं मला । सख्याचा चटका लागुनि गेला ।' ९ सांडसानें दिलेला डाग; चरका. (क्रि॰ देणें; लावणें). 'बसतेचि चटके लावीत । शुद्धावरि मूर्खत्वें ।' १० मोरचूत वगैरे लावून सोनें अग्नींत तापविणें. (क्रि॰ देणें). ११ (जहल्लक्षणेनें) या कृत्यास लागणारी साधनसामुग्री, द्रव्य- साहित्य, साधनीभूत पदार्थांचा संच. १२ व्यापारांत ठोकर, तोटा, थप्पड, अद्दल. (क्रि॰ बसणें; लागणें). 'जामीनकी विषयीं मला असा चटका बसला आहे कीं पुन्हां जन्मांत कोणास जामीन राहूं नये.' १३ मिर्याचें तिखट; तिखट चटणी; विशेषतः हरभर्याची डाळ वाटून दहीं व ओल्या मिरच्या घालून करतात तो. १४ (को.) खमंग काकडी. १५ (राहिलेल्या अर्थांसाठीं) चटक, चरका पहा. [सं. चट् = जखम करणें; म. चाटणें, झाजरणें, घसटून जाणें] म्ह॰ (व.) चटकामटका तोंडाला फाटकें धोतर गांडीला = खायला चम मीत हवें व अंगावर फाटके कपडे चालतात अशा माणसाला म्हणतात.
दारुण
वि. १. घोर; भयंकर (युद्ध इ.). २. कठोर; मर्मभेदी; रागाचे (भाषण). ३. क्रूर; हिंस्त्र; रानवट (मनुष्य). ४. जालीम; कडक; जबरदस्त. (सामा.) भयंकर; कठीण; दुःसह. [सं.]
दारुण
वि. १ घोर; भयंकर (युद्ध इ॰). 'चैद्य मीनले सन्नद्ध । होईल युद्ध दारुण ।' -एरुस्व ५.३७ २ कठोर; मर्मभेदी; रागाचें (भाषण.) ३ क्रूर; हिंस्त्र; रानवट (मनुष्य). ४ जालीम; जबरदस्त; कडक. (सामा.) भयंकर; कठिण; दुःसह. 'आलें तुज जवळि मरण । यम गांजितिल दारुण ।' [सं.] ॰नक्षत्र-न. मूळ, आश्लेषा, आर्द्रा व ज्येष्ठा या नक्षत्रांपैकीं प्रत्येक.
कानेकोचे
पुअव. १ कोन व कोंपरे, खांचा खोंचा. २ (ल.) गूढार्थ; आंतील खुबी; रहस्य; मर्म. (क्रि॰ लागणें; जाणणें; समजणें; पाहणें). [काना = कोन, कोंपरा + कोंचा = खोचा] ॰भाषण न. खोंचदार, बोचणारें, मर्मभेदी, अपमानकारक भाषण.
कानकोचे भाषण
खोचदार, बोचणारे, मर्मभेदी, अपमानकारक भाषण. कानकोपरा
कहरी
[फा. कहरी] प्राणहारक; मर्मभेदी. “ज़खमा शस्त्रांच्या कहरी लागून मृत्यू पावले” (चित्रगुप्त ७०).
कहरी, कहऱ्या, कहारी
वि. १. भयंकर; क्रूर; अतिशय कडक; निष्ठुर : ‘पारिपत्यहि कहरी होत असतें.’ - ऐलेसं ८·४३३९४. २. अतिशय विषारी; जालीम; जलाल (साप, विंचू वगैरे). ३. प्रखर; फणफणणारा; पोळणारा (ताप, कपाळ दुखणे, आजार, ऊन). ४. (व्यापक) पराकाष्ठेचे; बेसुमार; अतिशय दुःखद; भयंकर; प्रचंड (ओझे, मजल, कोस, पर्वत, अरण्य इ.). ५. आवेशाचे; रानटी; अद्वातद्वा (रडणे, खरडपट्टी काढणे वगैरे). ६. प्राणहारक; मर्मभेदी : ‘जखमा शस्त्रांच्या कहरी लागून मृत्यू पावले.’ - चित्रगुप्त ७०. [फा. कहर]
कहरी-र्या, कहारी
वि. १ भयंकर; क्रूर; अतिशय कडक; निष्ठुर. 'पारिपत्यहि कहरी होत असतें.' -खरे ८.४३९४. २ अतिशय विषारी; जालीम; जलाल (साप, विंचू वगैरे). ३ प्रखर; फणफणणारा; पोळणारा (ताप, कपाळ दुखणें, आजार, ऊन). ४ (व्यापक) पराकाष्ठेचें; बेसुमार; अतिशय दुःखद; भयंकर; प्रचंड (ओझें, मजल, कोस, पर्वत, अरण्य इ॰) ५ आवेशाचें; रानटी; अद्वातद्वा (रडणें, खरडपट्टी काढणें वगैरे). ६ प्राणहारक; मर्मभेदी. 'जखमा शस्त्रांच्या कहरी लागून मृत्यु पावले.' -चित्रगुप्त ७०.
कटु
वि. १ तिखट (मूळ अर्थ तिखट असा असून पुढें कडू असा झाला). 'संस्कृतांत कटु म्हणजे तिखट आणि तिक्त म्हणजे कडू असा अर्थ असून...' -गीर ८२१. तिक्त याचाहि मूळ अर्थ कडू असा असून पुढें तिखट असा झाला. २ कडू. 'कटवम्ल लवण मेलें । गर्भवतीचे पुरती डोहळे ।' -एभा १०.४३०. ३ तीव्र; उग्र; भयंकर. ४ अप्रिय; वाईट; दुःखदायक; मर्मभेदी (भाषण इ॰). ५ (ल.) आवेशपूर्ण; जळजळीत; जहाल; तापट. [सं.] ॰करंज-पु. करंजाचें झाड व फळ; र्हे कडू व ज्वरनाशक असतें. ॰तुंबी-स्त्री. कडू भोपळा. ॰फल-न. १ कारली. २ कडू पडवळ; कंकोळ इ॰. ॰रोहिणी-स्त्री. काळी कुटकी, कटुकी. ॰वाण-न. (रत्ना.) १ नापीक जमिनीची कायमधारा पद्धतीनें वंशपरंपरागत दिलेली देणगी. २ अशी देणगी दिलेली जमीन. [सं.]
कटु, कटू
वि. १. तिखट (मूळ अर्थ तिखट असा असून पुढे कडू असा झाला) : ‘संस्कृतांत कटु म्हणजे तिखट आणि तिक्त म्हणजे कडू असा अर्थ असून…’ − गौर ८२१. तिक्त याचाही मूळ अर्थ कडू असा असून पुढे तिखट असा झाला. २. कडू : ‘कटवम्ल लवण मेलें । गर्भवतीचे पुरती डोहाळे ।’ – एभा १०·४३०. ३. तीव्र; उग्र; भयंकर. ४. अप्रिय; वाईट; दुःखदायक; मर्मभेदी (भाषण.) ५. आवेशपूर्ण; जळजळीत; जहाल; तापट. [सं.]
कठोर
वि. १ टणक; कठिण (दगड, लांकूड, इ॰). 'विस्तीर्ण वर्तुळ उदग्र कठोर भारी । वर्धिष्णू ते स्तन तिचे कनकानुकारी ।' -र १५. २ निर्दय; दयाशून्य (अंतःकरण, मन). ३ तीक्ष्ण; बोचणारें; मर्मभेदी (भाषण). ४ कर्कश; भसाडा (आवाज); याच्या उलट कोमळ; मृदु. ५ सक्तीची; कडक; निष्ठुर (शिक्षा, वागणूक). [सं.] ॰वर्ण-पु. कव- र्गादि पांच वर्गापैकीं प्रत्येकांतील आरंभींचे दोन व शषस हे वर्ण.
कठोर
वि. १. टणक; कठीण (दगड, लाकूड इ.) : ‘विस्तीर्ण वर्तुळ उदग्र कठोर भारी । वर्धिष्णु ते स्तन तिचे कनकानुकारी ।’ – र १५. २. निर्दय; दयाशून्य (अंतःकरण, मन). ३. तीक्ष्ण, बोचणारे, मर्मभेदी (भाषण). ४. कर्कश, भसाडा, (आवाज). ५. सक्तीची, कडक, निष्ठुर (शिक्षा, वागणूक). ६. अवघड : ‘क्रिया कठोर तऱ्हीं तेणे’ – राज्ञा १८. ९२७.७. मोठे; प्रचंड. [सं.]
खोचक
वि. मनाला लागेल असे (बोलणे, लिहिणे); प्रत्यक्ष उल्लेख न करता मर्मभेदी उल्लेख, टीका. (करणे)
खरडपट्टी
टाफरून बोलणे, सुनावणे, खरड-राड काढणे, जामणे, छेडणे, तासंपट्टी-हजामत - कोरडी- उलटीसुलटी - गुळगुळीत- झाडपट्टी कानउघडणी-खेटरपूजा-भोसडपट्टी करणे, गुरकावणे शब्दप्रहार, मर्मभेदी भाषण, वाक्ताडण, दटावणी, सपाटून हजेरी घेणे, पितर उद्धरणे, बोधपाठ देणे, ताशेरा झाडणे, झोड उठविणे, व्याख्यान पाजणे, बोलून बोलून पार भुस्कट पाडणे, काय कमी पूजा केली ? शाब्दिक कानपिचक्या-अहेर, उपदेशाचे वळसे, तिखट भाषण, शोभा करणे, तांगडून बोलणे, कठोर शब्दांची फैर झाडणे, रोकड्या शब्दांत सुनावणे, स्पष्ट शब्दांत जाणीव देणे, खडसून जाब विचारणे, हा फटकारा अगदी ओल्या वादीचा होता! बोलणीं खावी लागतात, फैलावर घेणे, वाक्-बाणांनी लचके तोडणे !
वज्र
पुन. १ इंद्राचें आयुध; (सामा.) अमोघ शस्त्र. २ हिरा. 'माणिक मोती प्रवाळ । पाचि वैडूर्य वज्र नीळ ।' -दा ८. ६.३४.३ वीज; विद्युत्. ४ वज्रतुंड पहा. -पु. १ सत्तावीस योगां- पैकीं पंधरावा. २ जाज्वल्य, दहशत बसविणारा माणूस (योद्धा, शास्त्री). हा शब्द पहिल्या पदीं येऊन पुष्कळ समास होतात कांहींचे अर्थ पुढें दिले आहेत. ॰आंगठी-स्त्री. त्रिकोनाकृति कोंदणांत हिरा व तीन कोनांवर तीन रत्नें बसविलेली अशी आंगठी. -देहु ४९. ॰कपाट-न. वज्राचें, हिऱ्याचें कवाड, दार. 'मुक्तिचे वज्रकपाट । कामीनि हे ।' -भाए ७५६. कवच-न. वज्राचें, वज्रासारखें अभेद्य चिलखत. 'जैसें वज्रकवच लेइजे । मग शस्त्रांचा वर्षावो साहिजे ।' -ज्ञा २.१३२; -एभा १५.७. ॰कीट-पु. खवल्या मांजर. ॰कीटकी-स्त्री. (महानु.) एक रोग-जंतु. 'कव्हणा एका अंताचीए सवडी वज्रकीटकी लागली असे ।' -दृष्टांत- पाठ २. ॰कृत-वि. घट्ट; घट्ट बसेल असें केलेलें. ॰गर्भ-स्त्री. एक प्रकारची भिकबाळी. (बं.) गिमडा. -देहु ४५. ॰गांठ-स्त्री. पक्की, न सुटणारी गांठ. 'कर्माच्या वज्रगांटीं । कळासे तो ।' -ज्ञा १८.३९२. ॰घात-पु. १ वज्राचा प्रहार, तडाखा. २ (ल.) मोठा आपत्ति; नुकसान; संकट. ॰चुडेदानचुडेदान पहा. -ह ११.१३७. ॰चूडेमंडित-वि. १ हिऱ्याच्या कंकणांनीं विभूषित, शोभायमान असलेले (हात); 'वजचूडेमंडित हस्त । अवतार मुद्रा दाही झळकत ।' -ह २७.८०. २ पत्रांतून सुवासिनी स्त्रियांस लिहावयाचा मायना. अक्षय टिकणारे चुडे हातांत असणारी; (ल.) अखंड सौभाग्यवती. ॰जिव्ह-वि. खोंचदार, कडक भाषा वापरणारा. ॰जिव्हा-स्त्री. खोंचदार, कडक भाषण. ॰टीक-टीका- स्त्री. स्त्रियांचा गळ्यांतील एक दागिना. ॰तडक-पु. वीज. -ख्रिपु. ॰तुंड-पु. वज्राचा एक जातीचा दगड. स्फटिक, चंद्रकांत आणि अभ्रक या पदार्थांच्या कणांच्या अनियमित मिश्रणानें हा झालेला असतो. (इं.) ग्रॅनाईट. ॰देह-पु. वजाप्रमाणें अभेद्य, बळकट शरीर; रोगरहित, ताकदवान शरीर. ॰देही-वि. असें शरीर अस- लेला; फार बलाढ्य. ॰द्रोह-पु. दीर्घकालचा व फार तीव्र असा द्वेष. ॰द्रोही-वि. हाडवैरी. ॰धर-पु. इंद्र. ॰धार-वि. तीक्ष्ण धार असलेलें; तिखट (शस्त्र). नाद-निर्घोष-पु. विजेचा कड- कडाट. ॰पंजर-पु. (वज्राचा पिंजरा) दुर्भेद्य किल्ला, आश्रयस्थान; निर्भय आसरा. 'तरि शरणांगतां वज्रपंजर । तेहिं कां म्हणवावें ।' -भाए ६१४. -तुगा ७०६. ॰पथ्य-न. फार अवघड, कठिण पथ्य. ॰परीक्षा-स्त्री. १ हिऱ्यांची परीक्षा. २ (ल.) कठिण कसोटी; फार अवघड तपासणी. ॰पाणि-पु. इंद्र. 'कृपा भाकिता जाहला वज्रपाणी ।' ॰पात-पु. १ वज्रायुधाचा प्रहार. २ वीज कोसळणें; पडणें. ॰पाणी-वि. मोठा पातकी. -एभा २७.४९४. ॰प्रयोग- पु. १ फार अवघड प्रयोग, उपाय. २ मांत्रिक जादूगाराचा विशिष्ट मंत्रप्रयोग. ॰प्रहार-पु. वज्रपात पहा. ॰प्रायवि. १ वज्रासा- रखा कठीण (पदार्थ). २ वज्रासारखा अमोघ आघात असणारा (बाण, मुष्टि इ॰). ३ अतिशय वजनदार, खंडण करण्यास अव- घड (मुद्दा). ४ झोंबणारें; मर्मभेदी; हृदयांत सलेल असें (भाषण, इ॰). ॰बटू-पु. एक झाड. -न. त्याचें फळ. बजरबटू पहा. ॰बाण-वि. वज्रासारखे घातक बाण असलेला. ॰बुद्धि-स्त्री. १ खंबीर मन. २ उत्कृष्ट ग्रहणशक्ति. विशेषणासारखाहि उपयोग. ॰मणि-पु. हिरा. ॰मय-वि. १ वज्राचा, हिऱ्याचा केलेला. २ अतिशय कठीण. ॰महाग-वि. अतिशय महाग. ॰महागाई- स्त्री. अतिशयित, भरमसाट महागाई. ॰महाग्या-वि. अतिशय महाग विकणारा. ॰माला-स्त्री. हिऱ्याची माळ. ॰मिठी-स्त्री. फार घट्ट मिठी. 'मग तोंडा कां वज्रमिठी पाडिजे ।' -ज्ञा ७. १५२. ॰मुष्टि-पु. मल्लाचें एक आयुध. हें मुठीला लावतात. -स्त्रीपु. लोखंडासारखी, कठीण मूठ. २ (बडोदें) एक खेळ. -खाला ८०. ३ लुतीचा कांदा. सरण पहां. -वि. १ लोखंडासारखी मारक मूठ असलेली. 'मी वज्रमुष्टि... ।' -स्वयंवर. २ वज्रमुष्टि हत्यारानें लढणारा, हत्यार वापरणारा. ॰मूठ-स्त्री. वज्रमुष्टि पहा. ॰मूली- मूळ-स्त्री, एक झुडूप; रानउडीद. ॰योग-पु. वज्रासन; हट- योग. 'एक वज्रयोग क्रमें । सर्वाहार संयमें ।' -ज्ञा ४.१४७. ॰लेप-पु. १ चुन्यामध्यें कात, गूळ इ॰ सरंजाम घातल्यामुळें दृढता आलेला चुना. २ अशा चुन्याचा दगड इ॰ वर करतात तो लेप. ३ (ल.) अक्षयता; अविनाशता; चिरंतनपणा (वचन, निश्चय, संस्था इ॰ चा). याअर्थी विशेषणासारखा उपयोग; पक्कें; काययचें; स्थिर; अभंग. 'महापापां प्रायश्चित्तविधान । वज्रलेप पूर्ण गुरुवाक्यावज्ञा ।' -भाराबाल ११.२७९. ४ (महानु.) दृढता आणणारा पदार्थ. 'ना तो संशृतीसि ताठ । वज्रलेप ।' -ऋ ११. ॰लेप होणें-पक्कें, कायम होणें. 'आमच्या आजे सासुबाई एकदां कोणाचें नांव घ्यावयाचें नाहीं असें म्हणाल्या कीं मग तें वज्रलेप झालेंच समजावें !' -पकोघे. ॰वाट-स्त्री. (महानु.) वज्राचें वेष्टण. 'काळ लोहें डवरिलें । वज्रवाटीं बांधिलें ।' -शिशु. [सं. वज्र + वृत्त; प्रा. वट्ट] ॰वाणी-स्त्री. कठोर, झोंबणारें भाषण. -वि. असें भाषण करणारा. ॰वीर्य-न. वानराचें वीर्य (शुक्र). हें इतकें उष्ण असतें म्हणतात कीं त्यामुळें दगडहि उलतात. -वि. १ अमोघ, पराक्रमी वीर्याचा (माणूस-ज्याचीं मुलें फार सशक्त आहेत अशा- बद्दल. हें विशेषण योजतात). २ उत्साही; पराक्रमी; निश्चयी; सहनशील; ताकदवान इ॰. ॰शरीर-न. वज्रदेह पहा. ॰शरीरी- वि. वज्रदेही. ॰शलाका-स्त्री. घरावर वीज पडूं नये म्हणून लावतात ती तार. ॰शील-(व.) वरिष्ठ; वरचढ. 'सगळ्या कार- कुनांत तो वज्रशील होऊन बसला.' ॰संकल्प-पु. न फिरणारा निश्चय; दृढनिश्चय. ॰संकल्प-पी-वि. फार दृढनिश्चयी. ॰सांखळ-ळी-स्त्री. अभेद्य, अखंड्य कोटिक्रम. 'तार्किकां- चिया वज्रसांखळा ।' -शिशु २५. ॰हस्त-वि. वज्राप्रमाणें कठीण हाताचा. ॰हस्तेंक्रिवि. फार जोरानें. 'तों मुकुंदरायें काय केलें । वेताचे छडीस पडताळिलें । मारिते जाहले वज्रहस्तें ।' -संवि २०.११६. ॰हृदय-यी-वि. १ कठोर अंतःकरणाचा; अति निर्दय. २ अति निग्रही; निधड्या छातीचा. ॰क्षार-पु. एक औषधी क्षार. मीठ, सेंधेलोण, पादेलोण, टाकणखार, बागडखार, जवखार, सज्जीखार, या खारांचें विशिष्ट कृतीचें केलेलें औषध. वज्रांगी-स्त्री. चिलखत; कवच. 'वज्रांगी लेइला तैशी प्रलयमेघांची ।' -शिशु १००१. -ज्ञा ६.४७५. [वज्र + अंग] वज्राग्नि-पु. १ मूलबंधापासून उत्पन्न होणारी उष्णता; वज्रासनरूप अग्नि. -ज्ञा १२.५०. २ विद्युल्लताग्नि; विजेचा अग्नि. 'वज्राग्नी- चिया जाळीं । करूनि सप्तधातूंची होळी ।' -ज्ञा ११.३७७. [वज्र + अग्नि] वज्राघात-पु. १ वीज पडणें. 'शिरिं वज्राघातचि गमला ।' -संग्रामगीतें १२. २ (ल.) भयंकर संकट, आपत्ति. [वज्र + आघात] वज्राधिकार-पु. अनेक पिढ्या एका कुटुं- बांत असलेला अधिकार. [वज्र + अधिकार] वज्रानल-पु. वीज; विजेचा लोळ. [वज्र + अनल] वज्रांबट-वि. अतिशय आंबट. [वज्र + आंबट] वज्राभ्यास-पु. गुणाकाराचा एका प्रकार; वज्र- वध. [वज्र + अभ्यास] वज्रावळ, वज्राळें-स्त्री. न. एका वेलीच्या बियांची, मण्यांची केलेली माळ. मुलाला दृष्ट लागूं नये म्हणून ही त्याच्या गळ्यांत बांधतात. [वज्र + आवळी] वज्रासन-न. १ (योग.) एक आसन. मुसलमान नमाज पढावयास बसतात त्याप्रमाणें बसून हात जोडणें. -संयोग ३२०. -एभा ६. १२७. २ मूळबंध; आधारबंध. -ज्ञा ८.४९. ३ स्थिर, दृढ- आसन (जसें घोड्यावर). ४ (ल.) दृढपणें धारण करणें (अधिकार, सत्ता). [वज्र + आसन] वज्रास्त्र-न. इंद्राचें आयुध; वज्र; विद्युतास्त्र. [वज्र + अस्त्र] वज्राहत-वि. वज्राचा प्रहार ज्यावर झाला आहे असा. [वज्र + आहत] वज्रिका-वि. (संगीत) दहाव्या श्रुतीचें नांव. वज्री-स्त्री. पाय घांसण्यास उपयोगी असा कठीण, खरखरीत दगड, वीट, धातूचा पदार्थ इ॰ -पु. इंद्र. वज्रेश्वरी, वज्राबाई-योगिनी-स्त्री. एक देवता. वज्रोप- चार-पु. कडक उपचार, उपाय. [वज्र + उपचार]
साखर
स्त्री. इतर पदार्थ गोड करण्यासाठीं वापरण्यांत येणारा एक पीठ, रेती यासारखा गोड पदार्थ; शर्करा; खांड. ऊंस, बीट इ॰ पासून ही तयार होते. 'साखर वाढिली रायपुरी ।' -मसाप २.१. [सं. शर्करा; प्रा. सक्करा; फा. शकर्; तुल॰ फ्रें. स्युक, सॅकरीन; इं. शुगर] म्ह॰ १ साखर (साखरेचा) खाणार त्यास देव देणार. २ साखर खाईल तर ढेकर देईल. ३ हातावर साखर आणि मानेवर कातर ( = मनांत कपट पण बाहेर वर्तन गोड). (वाप्र.) साखर खावप-(गो.) साखरपुडा करणें; लग्न ठर- विणें. साखर पेरणें-पसरणें-१ गोड गोड बोलून वश करण्याचा प्रयत्न करणें. २ तोंड देखल्या गोड बोलणें. साखरेची साल काढणें-अतिशय सूक्ष्म व बारीक परीक्षा, छाननी करणें; नसता कीस काढणें (निंदार्थीं वापरतात). 'पारिभाषिक शब्दाच्या बाबतींत इतकी घासाघीस करणें हें साखरेची साल काढण्यासारखें वेडेपणाचें आहे.' -(पावशे) मराठींतील अजा- गलांचें उच्चाटन. साखरेची साल काढणारा-अतिशय कडक, खाष्ट, बारकाव्याच्या दोषैकदृष्टी माणसाबद्दल निंदार्थीं वापरतात. साखरेनें तोंड भरणें, तोंड भरून साखर घालणें-चांगलें गोड बक्षीस देणें; तोंड गोड करणें. सामाशब्द. ॰किडा-पु. १ नुसत्या साखरेवर उपजीविका करणारा एक किडा. २ (ल.) ज्यास साखर फार आवडते असा माणूस. ॰गोटी-स्त्री. एक लहान पण गोड आंब्याची जात. ॰गोळा-पु. लाडू; पक्कान्न. 'इंग्रजी झाल्यापासून दारूगोळा तर गेलाच पण साखरगोळाही दुर्मिळ झाला.' -टि १.४००. ॰चुंबा-पु. चुंबन; गोड पापा. 'अरु- णानें नभःश्रीचा साखरचुंबा घेतला.' -विविधवृत्त खासअंक (स्त्री हृदय) १९२८. ॰चौथ-स्त्री. (महारी) भाद्रपद वद्य ४. -बदलापूर १७४. या दिवशीं चतुर्थीचा उपास पाळतात. ॰जांब- भ-पु. गुलाबी जांब. ॰झोंप-पु. अरुणोदयाच्या वेळची झोंप (ही फार सुखकर वाटते म्हणून नांव). 'लग्न म्हणजे संसाराचा सू्र्योदय होण्याच्या आधींची ही साखरझोंप होय.' -रंकाचें राज्य ७. ॰नातें-सक्करनातें पहा. ॰निंबी-लिंबीस्त्री. गोड लिंबाचें झाड. ॰निंबू-लिंबू-न. गोड लिंबू. हें फळ नारिंगाएवढें असून औषधी आहे. ॰निंबोळीस्त्री. एक लहान फळ. 'वरि मंडप साखरनिंबोळ्याचे घोंस पोसलो ।' -अमृत ३४. ॰पाड्या-पु. एक मुलांचा खेळ. 'विटीदांडू, चेंडूलगोर्या, लपंडाव, कावडी । साखरपाड्या, भोंवरें, चक्रगोट्या परवडी ।' होला ५४. साखर पेंढ्या?. ॰पाणी-न. साखर व पाणी. हें पाहुण्यास अतिथ्य म्हणून देत. १ लिंबाचें सरबत. २ (व्यापक) फराळाचे पदार्थ. ॰पारा-पु. तूपसाखर व रवा यांच्या वड्या. [फा. शकर्-पारा] ॰पुडा-पु. १ विवाहनिश्चयाच्या प्रसंगीं वधूच्या हातांत साख- रेचा पुडा देऊन इतरांस पानसुपारी वांटतात तो समारंभ; औप- चारिक वाङ्निश्चय. 'तिच्या सासरच्या मंडळींनीं मुलीला घरीं नेऊन साखरपुडाहि केला.' —स्वप ६५. २ अशा वेळीं देतात तो साखरेचा पुडा. ॰पुरी-स्त्री. भेजवानींत मुख्य पक्कान्न पुरी असेल तेव्हां योजतात (कारण तीबरोबर साखर वाढतात.) ॰पेंढ्या-भाद्रपद-आश्विन महिन्यांतील गवताच्या पेंढ्यानीं खेळा- वयाचा एक खेळ. ॰पोळी-स्त्री. पुरणासारखी साखर घालून तयार केलेली पोळी. -गृशि ३८५. ॰फुटाणा-पु. वेलदोड्याचा दाणा- फुटाणा इ॰ वर साखरेचा पाक चढवून करवंदाएवढी करतात ती गोळी; एक मिठाईचा पदार्थ. ॰फेणी-स्त्री. साखरेचा मोठा बत्तासा. 'साखरफेणी वाढिली ।' -मसाप २.१. ॰बोंड-न. पिठांत साखर घालून तळलेलें भजें. ॰भातपु. साखर व केशर घालून केलेला भात; केशरी भात. 'साखरभात वाढला बरा ।' -मसाप २.१. ॰मांडा-(कर्ना) मांडा (हा साखरेशीं खातात यावरून). ॰रंगी-वि. गुळी साखरेच्या रंगाचें (वस्त्र). ॰लाडू-पु. बरीचशी साखर घालून तयार केलेला पिठाचा लाडू. ॰वडी-ळी-स्त्री. एक गोड पक्वान्न. ॰सुपारीस्त्री. साखरपुडा पहा. 'साखरसुपारी वाटिती सुंदर नारी ।' -वसा ४६. साखरी गोडांबी-स्त्री. साखरेच्या पाकानें मढवून फुटाण्याप्रमाणें केलेली काजूची बी. साखरेचा-पु. (सांकेतिक) मुका; चुंबन. साखरेची सुरी-स्त्री. (ल.) वरून गोड पण मर्मभेदी भाषण, असें भाषण करणारा, गोड बोलून मान कापणारा मनुष्य. 'या चांडा- ळाच्या उरांत साखरेची सुरी भोंसकून केंसानेंच मान कापली पाहिजे.' -संभाजी साखरोळी-स्त्री. मोहन घालून केलेलें रवा किंवा तांदु- ळाच्या पिठाचें पुरीसारखें पक्कान्न. -गृशि ३९३. [साखर + पोळी]