आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह!
शब्दार्थ
मळ
मळ maḷa m (मल S) Dirt, filth, feculence, foulness. For compounds besides those occurring below see under मल.
पु. १ घाण; केरकचरा; रेंदा. २ विष्ठा. 'मज उपज- तांचि मळसा त्याजिलें याहून काय अत्याग ।' -मोभीष्म १२.५६. ३ पाप; पापवासना. 'जाऊनिया मळ । वाळवंटीं नाचती ।' -तुगा ७६७. ४ कमीपणा. 'म्हणे कर्मनिष्ठां मळु । ठेविला देखों ।' -ज्ञा १८.६२. ५ दोष. 'म्हणे तुम्ही निष्पाप निर्मळ । तंव तुमचेनि दर्शनें तत्काळ । नासती सकळ कळिमळ । ऐसे निजनिर्मळ तुम्ही सर्व । ' -एभा २.२४३. -स्त्री. (राजा.) अंगावरच्या मळाची वळी; मळी. [सं. मल] मळई-स्त्री. १ पावसानें किंवा नदीच्या प्रवाहानें वहात आलेली माती, पानें, कचरा इ॰. २ अशा जागेवर केलेलें बागाईत. ३ मासे धरण्याचें जाळें. -बदलापूर. ४ साय. (प्र.) मलई पहा. मळकट-न. १ पाप. 'जें त्रिविधीं मळकटां । तूं सांडिलासि सुभटा ।' -माज्ञा १५.५८१. २ मळाचें पुट; थर 'तें कळिमळांचीं मळकटें । नामोद्वाटें नासती ।' -एभा ४.२५३. -वि. मळलेला; घाणेरडा; मलिन. मळकटणें-अक्रि. मळणें; घाणेरडें, मलिन होणें. मळकटा-पु. मळाचा थर, लेप. 'धुऊनिया मळकटा । बुद्धीचा तेणें ।' -ज्ञा १८.१०११. मळका-वि. घाणे- रडा; मळलेला; मलिन. मळकी-स्त्री. १ नदीच्या प्रवाहाबरोबर आलेला गाळ. २ गाळ सांठून झालेला जमीन; मळई. ३ (बे.) अशा जमिनीवर केलेली लागवड. मळई पहा. मळको(खो)रा- वि. मळकट रंगाचें, नवीनपणाचा तजेला कमी झाला आहे असें (नाणें). मळघा(खा)ऊ-घाव-वि. १ जो मळला असला तरी मळलेला दिसत नाहीं असा (रंग). २ कष्ट, आजार इ॰ न चर- फडतां सोसणारा. ३ बाहेरून सुंदर पण आतून घाणेरडा दिसणारा (मनुष्य, पदार्थ). मळगा(घा)वणें-सक्रि. खराब, घाण करणें; मळविणें; मलिन करणें. मळणें-अक्रि. १ मलिन, घाण होणें. २ मोहानें व्याप्त होणें. 'मळलें होतें मन, परि केलें त्वां शुद्ध, तुजकडे वळलें ।' -मोकर्ण ४३.२३. मळमास,मळयागर मळशुद्धि-मल्मास इ॰ पहा. मळविणें-सक्रि. १ मळानें युक्त करणें; घाणेरडें करणें. २ (पराभव इ॰नीं तोंड) उतरविणें. 'पळवी सुयोधनातें, त्यासकट तदाश्रिताननें मळवी ।' -मोविराट ६.१४४. मळाचा कोठा-पु. मलाशय. मळी-स्त्री. १ अंगावरच्या मळाचा वळी. २ पावसानें किंवा नदीच्या प्रवाहा- बरोबर वाहून येतो तो गाळ (सामा.) चिखल. 'आता गंगेचे एक पाणी । परि नेलें आनानी वाहणीं । एक मळी एक आणि । शुद्धत्व जैसें ।' -ज्ञा. १७.१९६. ३ नदीकाठची बागाइती जमीन; मळई. 'काळी मळी पांढरा चोळ । परी ते केवळ वसुधाची ।' -एभा ४.२६०. ४ अशा जमिनीवर केलेली बागाइती शेती, लाग- वड. ५ साखर, गूळ इ॰ शुद्ध करताना निघतो तो मळ. ६ कोण- त्याहि पदार्थावर येते ती मळकट साय. ७ (राजा) मोठ्या शेतात बांध घालून पाडतात तें लहान खोचें, भाग प्रत्येकी. ८ (व.) नदी- कांठची पडीत जमीन. ९ (न्हावी धंदा) डोक्यातील मळ काढण्या- साठीं कोईचें केलेलें साधन. -वि. (जुन्नरी) मळकट, धुरकट रंग असलेली (मेंढीं). 'ही मेंढी मळी आहे.' मळी(ळि)ण-वि. १ मळलेला; घाणेरडा; ओंगळ; अस्वच्छ. २ (ल.) पापानें युक्त; पापी; दोषी. ३ तयार नसलेली; विसरलेली (विद्या, कला इ॰) ४ म्लान; मलूल. 'कुंथाच्या ढेंकरे न देवेल पुष्टी । रूप दावी कष्टी मळिण वरी ।' -तुगा २८७६. [सं. मलिन]
मळ maḷa f R (Usually मळी) A roll of the sordes or scurf of the body.
(सं) पु० (मल पहा.)
पु. मल पाहा.
मळ m Dirt, filth.
हाताचा मळ
हाताचा मळ hātācā maḷa m See हातचा मळ amongst the phrases of हात.
मल
मल mala m n (S) Dirt, filth, foulness. 2 Excretion of the body; as serum, semen, blood, marrow, urine, fæces, earwax, nails, phlegm, tears, rheum, sweat. 3 Dregs, sediment, dross, rust, feculence or recrement gen. 4 fig. Evilmindedness or evil intent, malignity, moral corruption. Mem. For compounds besides those occurring below in order see under मळ.
पु. १ घाण; केर; कचरा. २ शरीरांतील विष्ठा, मूत्र, घाम, शेंबूड, रक्त, नखें, अश्रू इ॰ उत्सर्ग. ३ गाळ; रेंदा. ४ गंज; कीट; तांबरा. ५ दुष्ट वासना; दुःस्वभाव; नैतिक पाप. 'स्ववत्स मल भक्षिती परि न सर्वथा बाटती ।' -केका ५८ मळ पहा. [सं.] ॰द्वार-न. ज्या वाटेनें विष्ठा पडते तो शरीराचा भाग; गुद. ॰पृष्ठ-न. पुस्तकाच्या आरंभीचें कोरें पान. ॰मास-पु. अधिक महिना. 'मलमास क्रमल्या नंतर... घेऊन जाणें.' -पेद ८.३८. ॰मूत्र-न. (भीतीमुळें) विष्ठा, मूत्र यांचा उत्सर्ग होणें. (क्रि॰ करणें; होणें). 'व्याघ्र पाहतांच मलमूत्र झालें.' ॰वस्त्र- न. केरकचऱ्यापासून रक्षण करण्यासाठीं घातलेलें वस्त्र (देवाची मूर्ती इ॰वर); गवसणी; खोळ. ॰विसर्ग-विसर्जन-पुन. पोटां- तील मळाचा उत्सर्ग; झाडा. मलमूत्र पहा. (क्रि॰ करणें; होणें). ॰शुद्धि-स्त्री. पोटांतील मळाचा उत्सर्ग झाल्यामुळें वाटणारी आंतड्यांची शुद्धता; शौच. ॰स्नान, मलापकर्षस्नान-न. केवळ शरीर स्वच्छ करण्यासाठींच केलेलें स्नान; याच्या उलट मंगलस्नान; अभ्यंगस्नान. मलावरोध मलावष्टंभ-पु. शौचास साफ न होणें; बद्धकोष्टता. मलाशय, मलाचा कोठा-पु. आत- ड्यांतील मलाची पिशवी; मलमार्ग. मलिन-वि. १ घाणेरडा; मळलेला; मळकट; खराब. २ आचारहीन; पातकी. 'मलिन कुटिल नीरस जडअजड पुनर्भवपणें हि कच साचा' -मोआदि ३.६४. 'बांधी मणिभ्रमे बहु फुगला मलिन स्वभाव कपटानें ।' -मोसभा ४.५५. ४ अपवित्र; अमंगल; आत्मशुद्धतेकडे दुर्लक्ष करणारा. ५ अस्पष्ट; निस्तेज; उपस्थित नसलेली (आवृत्ति नसल्यानें विद्या इ॰) मलोत्सर्ग, मलोत्सर्जन-पुन. मलविसर्ग पहा.
मल m n Dirt. Dregs. Excretion of the body. Fig. Evil-mindedness.
हातचा मळ
हातचा मळ hātacā maḷa m See explained amongst the phrases under हात.
अंगचा मळ
पु. स्वतःच्या शरीराची घाण; एखाद्यास अगदी निरुपयोगी असलेली वस्तू.
मल(लि)कंबरी
वि. मलिकंबराच्या अमदानींत सुरू झालेली (मोजणी, दर, धारा, शिरस्ता, तनखा, कमाल इ॰). [मलिकंबर]
मळ(ळि)वट
पु. मग्न,मुंज इ॰ प्रसंगीं स्त्रियांनीं कपाळभर लाविलेले कुंकू किंवा पुरुषांनीं तसेंच लाविलेलें गंध; गंधलेप (क्रि॰ भरणें; लावणें). 'तेही केलें कृष्णार्पण । निजभाळीं मळवट ।' -एरुस्व १.६२. 'ललाटीं शोभे मळिवट । मृगमदाचा ।' -कथा ३. १५.३१. -न. (कुंभारी धंदा) चाकावर तयार केलेलें व थोपटण्या- पूर्वींचें मडकें. -बदलापूर ६६. -वि. फार मेळी सांचून तयार झालेली (पांढरी जमीन). -कृषि १५.
संबंधित शब्द
मैल
पु. घाण; खळखळ; मल. 'जळती चित्त मैल सर्वथा ।' -विपू १.६९. [सं. मल; सं. मल् = धारण करणें] ॰खोर-वि. मळकट रंगाचा; घाण दडवणारा; मळखाऊ (रंग). मैला-पु. नरक; घाण. [सं. मल् = धारण करणें] मैलो-पु. (कु.) मळ. [म. मैला]
(सं) पु० मल, घाण.
मैल maila m f (मल S through H) Dirt. Little used.
हग
पु. मल; विष्ठा; गू (मनुष्य, पशु इ॰ चा). [सं. हद्] ॰ओक-वकस्त्री. (पटकींतील) जोराचे ढाळ, ओकारी वगैरे. [हगणें + ओकणें] हगटणें-अक्रि. (क्रोध-तिरस्कारार्थी) हगणें. 'ससें उठलें कुत्रें हगटलें.' हगुटणें पहा. हगणवट-न. जना- वराचें गुदद्वार. हगणें-उक्रि. १ मल, विष्ठा शरीराबाहेर टाकणें; मलविसर्जन करणें. २ बाहेर टाकणें, पडणें (डोळ्यांतील चिपडें, पू). ३ वर टाकणें-येणें (समुद्रांतील घाण). ४ वर, बाहेर फेंकणें, येणें (जात्याचा खिळा ढिला झाल्यामुळें पीठ). (हें क्रियापद सकर्मक व अकर्मकहि आहे). म्ह॰ हगल्या पेक्षां निप- टणें बरें. हगंद(दा)री, हगदारी-स्त्री. सार्वजनिक शौचाची जागा; परसाकडेची जागा. जेथें मल, विष्टा, घाण पडते अशी जागा. [हगणें + दरी] ॰मुती-मूत-स्त्री. भीतीनें, तीव्र वेदनेनें मलमूत्र विसर्जनाची होणारी घाई; धास्तीनें मलमूत्र विसर्जन होणें. (क्रि॰ सुटणें; लागणें). हगरड-स्त्री. १ ढेंडाळी; हगवण. २ विष्टा. घाण इ॰ ढीग. हगरडा-रडें, हगिरडा-डें, हगु- रडा-डें-वि. १ शौच्याहून आल्यावर ढुंगण न धुतलेला. २ (ल.) अपुरा; अर्धवट राहिलेला; मध्येंच बंद पडलेला (काम, धंदा इ॰). ३ बिघडलेलें; खराब झालेलें (काम इ॰). ४ घाणे- रडें; ओंगळ; किळसवाणें. ५ क्षुल्लक; निरुपयोगी; बिनकिंमतीचें. हगरा-वि. १ सदोदित हगणारा. २ (ल.) भित्रा; भ्याड. ३ (व्यापक) वाईट; ओंगळ; घाण; किळसवाणी (व्यक्ति, वस्तु, गोष्ट इ॰). ४ क्षुद्र; गबाळ; निरुपयोगी; कुटकामाचा. हगरी- रें-स्त्रीन. १ शौचासाठीं केलेली व्यवस्था; ठाकोली. २ शौचाची लांकडी घडवंची; गलबतावरील मलविसर्जनाची जागा. ३ या घडवंचीचें भोंक. ४ (गुर्हाळ) चुलण्यांतील राख ज्या थारो- ळ्यांतून खालीं पडतें त्याचें भोंक. ५ (हगरी) शेतांत ठिक- ठिकाणीं ठेवलेल्या खताच्या राशी-प्रत्येकीं. ६ शेतांत खत न्याव- याच्या गाडींत खत भरण्यांसाठीं असलेल्या कुरकुलाचें मागील दार, झडप. हगरें-न. (अशिष्ट) १ सोरा; यवक्षार. २ टाईप पाडण्याचें यंत्र. हगली, मुतली, हगलेंमुतलें-स्त्री.न. १ क्षुद्र; बारीकसारीक गोष्टी; लहानसहान चुका, अपराध, गैरवर्तन (दुसर्या- जवळ गार्हाणी केलेलें). २ एखाद्याच्या साध्या, स्वाभाविक, खासगी गोष्टी. (क्रि॰ सांगणें; कानावर घालणें; पाहणें). 'हा दिवाण चाकर लोकांचीं हगलींमुतलीं राजाच्या कानावर घालतो.' ३ (लहान मुलाच्या) हगण्यानें भरलेलें कपडें; गुवेलें. हगवण- स्त्री. अतिसार; वारंवार शौचास होणें. म्ह॰ फुकाची भाजी हग- वणीस काळ. हगवणकर-करी-वि. हगवणीचा आजार अस- लेला. हगवणें-विणें-सक्रि. १ शौचास, परसाकडेस बसविणें (मूल इ॰). २ (ल.) ओशाळणें; लाजविणें; गोंधळविणें; दांत पाडणें. ३ नाश करणें; नायनाट करणें; घाबरून सोडणें; रडकुंडीस आणणें; बिघडविणें (सल्ला, युक्ति, धाडसाचें काम). ४ बलात्का- रानें काढणें; परत देण्यास भाग पाडणें (पैसा इ॰). हगाड- स्त्री. हगंदरी पहा. हगीरडामुतीरडा-वि. हगरडा अर्थ १ पहा. हगिरडें-न. फुरसें (एक जातीचा साप). हगीर-वि. हगरा पहा. हगीरमुतीर-वि. (ल.) घाबरगुंडी झालेला; अतिशय गोंधळलेला; दुःख, भीति इ॰ मुळें देहमान सुटलेला; पांचावर धारण बसलेला. हगुटणें-अक्रि. १ परसाकडेस घाई होणें; परसाकडेस लागणें. २ हगणें; हगटणें पहा. ३ (ल.) गर्भगळित होणें. ४ घाबरगुंडी उडणें; उगीच घाईत असणें. [हग + उठणें] हगूट-पु. परसाकडेची घाई. गुदद्वारावाटे नुकताच बाहेर पड- लेला किंवा पडत असलेला मळ; विष्टा. हगूर-वि. हलका. हगेरा, हगोला-वि. गुवानें भरलेला, बरबटलेला (कपडा). हगेरें, हगोलें-न. गुवानें भरलेलें वस्त्र, दुपटें; गुवेलें. हग्या, हगिया-वि. १ शौचास बसलेला, निघालेला. २ शौचास नेण्याचा (तांब्या, जोडा इ॰). 'दुराणी हगियांसी (जोड्यांनीं) मारूं लागले.' -भाव १४०. ३ हगावयास लावणारा. ४ (ल.) अतिशय जोराचा (मार इ॰).
(सं) पु० मल, गू.
अंगचा
अंगचा aṅgacā gen. of अंग used adj Of the body, material, or substance of; not advectitious or extraneous: as अं0 खांब A post or pillar formed out of the material (wood, stone &c.) composing the structure; अं0 जोड Enlargement springing from the main building or article; addition consisting in further development; अंगचें देऊळ A temple carved out of the surrounding substance (rock, earth &c.) 2 Pertaining or relating to self; of one's own body or one's native stock; not derived or acquired. Ex. अंगची कळा Intrinsic or inherent brilliancy or brightness: also native skill, ingenuity, art, cleverness. अं0 मळ (or हातचा मळ) The dirt of one's body. A term used by the receiver of a gift in depreciating it. Ex. अं0 मळ द्यायाचा नाहीं He will not give even the dirt of his body. Used of a miser. 3 Of one's own (making, doing, authorship, origination). 4 Of one's own invention, machination, or evil devising; i.e. forged or fabricated. 5 Peculiar or proper to self; personal, private. NOTE.--In variations or modifications of the above senses numerous valuable words occur. Ex. अं0 कल्पक One naturally inventive or ingenious. अं0 कसबी One that by his personal labor and skill makes the common things, executes the common repairs &c. as occasion arises. अं0 कारिगर or कारागीर-गाणारा-चितारी &c. An artificer, a singer, a painter &c. of Nature's teaching. अं0 झरा A steady spring; a spring independent of supply from rain. अं0 धणी A person free from command or control; one's own master. अं0 लिहिणार One who executes his own writing work (not employing an amanuensis). अं0 वक्ता Eloquent through native talent. अं0 शाहणा Clever or capable by nature. अंगची गोष्ट One's personal affair or concern: also a matter of one's own invention or devising. v सांग. अंगची बुद्धि Native sense or understanding.
वि. १ शरीराचा; बाहेरचा नव्हे; स्वाभाविक. २ स्वतःचें जन्मजात; जातीचें; उसनें न घेतलेलें; अंगभूत. ३ स्वतःच्या डोक्यांतील, कर्तबगारीचा, करणीचा, शोधाचा, दुसर्यानें शिकविलेला नव्हे असा. ४ स्वतःच्या योजनेचा; कल्प- नेचा. (ल.) थोतांडाचा; कवटाळपणाचा; बनावट; खोडसाळ. ५ व्यक्तिविशेषाचा; खासगत; पडद्याचा; एकांतीचा. वरील अर्थांत कमीजास्त फरक होऊन पुढील कांहीं शब्द झालेले आहेत. ॰कल्पक-वि. स्वभावतः नवीन गोष्टी शोधून काढणारा; जात्याच शोधक, तीव्र बुद्धीचा. ॰कसबी-वि. स्वतःच निर- निराळ्या वस्तू मेहनतीनें व स्वतःच्या चतुराईनें नीट करणारा; नेहमीं लागण्यार्या वस्तू तयार करणारा. ॰कारागीर-कारिगर- गाणारा-चितारी, इ॰-वि. जन्मतःच कुशल-कलावान्-गवई- चितारी इ॰. ॰खांब-पु. इमला ज्या सामानाचा (लांकूड, दगड इ॰ चा केला असेल) त्याच सामानाचा तयार केलेला खांब. ॰जोड-पु. मुख्य इमारतीपासून अथवा वस्तूपासून झालेली वाढ; जास्ती वाढविण्यासाठीं घातलेली भर. ॰झरा-पु. पाव- साळ्यांतच केवळ उत्पन्न होणारा नव्हे तर सतत पाणी वाहणारा जमिनींतील जिवंत झरा. 'या विहिरीला अंगचे झरेच पुष्कळ आहेत, पावसाळी एकदोन असतील.' ॰धणी-स्वतःचा मालक; कोणाचा चाकर नव्हे तो. ॰मळ-पु. स्वतःच्या शरी- राची घाण; एखाद्यास अगदीं निरुपयोगी असलेली वस्तु. जसें:- तो अंगचा मळ द्यावयाचा नाहीं. (कंजूष माणसाबद्दल योज- तात). ॰लिहिणार-वि. लेखक वगैरे न ठेवतां स्वतःचें लेखन स्वतः करणारा. 'मोरोपंत अंगचा लिहिणार होता.' ॰वक्ता- वि. उपजत वक्ता. ॰शहाणा-वि. स्वभावसिद्ध शहाणा; चतुर. ॰ची कळा-स्त्री. स्वतःच्या अंगचे नैसर्गिक तेज, चातुर्य, हुशारी. ॰ची गोष्ट-वैयक्तिक किंवा स्वतःचें काम, धंदा; स्वतः काढलेली कल्पना. (क्रि॰ सांगणें) ॰ची बुद्धि-स्त्री. उपजत शहाणपण. ॰चें देऊळ-न. खडकांत, डोंगरांत कोरून काढलेलें देऊळ.
किटण
न. १ थर रूपानें जमलेला मळ, घाण (कुजलेलें शेण, गवत, काटक्या इ॰); जुन्या लोखंडावर गंज चढून राहिलेला अवशिष्ट भाग; लोखंड गाळतांना अगर नंतर त्याला चढणारी जळ; सामान्यतः धातूवरील कलंक, मळ, गंज; तेलाची चिकटी; भांड्याला लागून राहिलेला जळका अन्नांश; दातांवरील जमलेला मळ. २ विट, कौल इ॰ जास्त भाजल्यामुळें त्यावर येणारे दग- डासारखे काळे गोळे; खंगर. ३ तापलेले लोखंड घणानें ठोकीत असतां उडणारे जळके कण; ठिणग्या. [का. किट्ट; सं. कृष्ण-किट्ट]
(सं) न० कीट, सांचलेला मळ.
शेंब, शेम
स्त्री. १ श्लेष्मा; शेंबूड; नाकांतून होणारा स्त्राव २ आंतड्यांतील मळ, स्त्राव, विष्टा; आम; आंब. ३ घोड्याट्या नाकांतून होणारा स्त्राव, मल, निर्यास. ४ नाकांतून स्त्राव होण्याचा रोग (घोड्याचा); शेंबा. [सं. श्लेष्मन्; प्रा. सिंभ] शेंबडा- ड्या, शेंबडेरा-वि. १ शेंबूड असलेलें; शेंबडानें भरलेलें; चोंद- लेलें (नाक). २ शेंबडानें भरलेलें नाक असलेला. ३ (ल.) अज्ञान; कळत नसलेला; अल्पवयीन. शेंबा-पु. १ घोड्याच्या नाकांतून होणारा स्त्राव. २ या स्त्रावाचा रोग. शेंबूड-पु. १ नाकांतील वाहणारा श्लेष्मा, चिकट बुळबुळीत स्त्राव, मल, घाण. हा वाळून खपली धरल्यास त्यास मेकूड म्हणतात. २ (ल.) दिव्याची काजळी, मस. [सं. श्लेऽमोदक-भाइअह १८३३] म्ह॰ मी हसत्ये लोकां शेंबूड माझे नाका. शेंबुडांत लोळणें-(ल.) संसारात गुरफटून राहणें. शेंबूड फेडणें-नाक शिंकरून टाकणें. शेंबूडकिडा-पु. (बे.) गोगलगाय; पीक; पिकळी.
बेरी
स्त्री. १ ओशट पदार्थांतील मळ; तेल-तुपांत असणारा मळ, घाण इ॰ ; बेरकट. २ गुळाची मळी.
छाटणें
छाटणें chāṭaṇēṃ v c ( H) To clip, cut, pare, cut off. 2 To pick, sort, part off; to separate into classes. Ex. व्यापारी लोक फळें सरसकट घेऊन छाटून विकितात. 3 To wash (clothes) slightly, i. e. without putting them into the boiler. 4 To cut clean asunder; to cut smack through; as गळा छाटला or तरवारीनें चार केळी छाटल्या. 5 To knock off; to remove dirt, straws, rubbish &c. by some light and smart process. Ex. हलवायाजवळ साखर दिल्ही म्हणजे मळ छाटून देईल; देशचे पाण्यानें वस्त्राचा मळ कसा छाटतो! 6 To reduce or retrench (allowances, expenses):
गू
पु. १ विष्टा (मनुष्याची); हाग. २ धातूचा गंज; मळ. ३ डोळ्यांतील पू, मळ. ४ (ल.) दारू. [सं.] (वाप्र.) गूकाडी करणें-(काडीनें गू चिवडणें) १ एखाद्याचे दोष पुन्हां पुन्हां उच्चारणें. २ अतिशय त्रास देणें. ३ अतिशय अपकीर्ति करणें. ४ नासविणें; बिघडविणें; खराब करणें. गूचा भाऊ- पाद पादाचा भाऊ गू-दोघेही सारखेच बदमाष लुच्चे. गू चिवडणें-(ल.) वेडें होणें; बावचळणे. गूजाळणें-१ अंगां- तील पिशाच्च जाण्यासाठीं अंगांत येणार्यापुढें विष्टा जाळतात तो प्रयोग. २ (ल.) एखाद्याला अगदीं खिजविणारें, अपमानाचें, चिडविणारें कृत्य करणें. गू जाळून धूर घेणें-वाईट कृत्य करून त्याचा आनंद मानणें, त्याची मौज करणें, पाहणें. म्ह॰ गूवांत धोंडा टाकावा आणि शिंतोडा घ्यावा = वाईट वर्तणुकीचें फळ भोगणें. गुवावरून ओढणें-अतिशय फजीती, अपमान करणें, छी थू करणें. सामाशब्द-गूघाण-स्त्री. वाईट परिस्थिती. 'कोल्हापुरांत न भूतो न भविष्यति अशी राज्यव्यवस्थेचे कामीं गूघाण झाली असें इतिहास बोलतो.' -केका आर्या ७. -वि. वाईट; त्याज्य. गूघाण करणें-नासणें; बिघडणें. गूमाणूस- पु. घाणेरडा, अव्यवस्थित माणूस. गुवांतील कवडी घेणारा- वि. अतिशय कंजूष. गुवावरची माशी-स्त्री. एक प्रकारची माशी.
पु० विष्ठा, हग, मल.
गू
पु. १. विष्टा (मनुष्याची); हाग. २. धातूचा गंज; मळ. ३. डोळ्यातील पू, मळ. ४. (ल.) दारू. [सं.] (वा.) गूकाडी करणे - १. काडीने गू चिवडणे. २ (ल.) एखाद्याचे दोष पुनः पुन्हा उच्चारणे. ३. (ल.) अतिशय त्रास देणे. ४. (ल.) अतिशय अपकीर्ती करणे. ५. (ल.) नासवणे; बिघडवणे; खराब करणे. (वा.).गू चिवडणे - वेडे होणे; बावचळणे. गू जाळणे - १. अंगातील पिशाच्च जाण्यासाठी अंगात येणाऱ्यापुढे विष्टा जाळण्याचा प्रयोग. २. एखाद्याला अगदी खिजविणारे, अपमानाचे, चिडविणारे कृत्य करणे. गू जाळून धूर घेणे - वाईट कृत्य करून त्याचा आनंद मानणे, त्याची मौज करणे, पाहणे. गुवावरून ओढणे - अतिशय फजिती, अपमान करणे; छीथू करणे.
कानकोरणी, कानकोरणे, कानखोरणी, कानखोरणे
स्त्री. न. कानातील मळ काढण्याची, पुढे वाटी असलेली धातूची लहानशी काडी; कानातला मळ काढण्याचे साधन.
किटण
न. १. मळाचा थर, घाण (कुजलेले शेण, गवत, काटक्या इ.); जुन्या लोखंडावर गंज चढून राहिलेला अवशिष्ट भाग; लोखंड गाळताना अगर नंतर त्याला चढणारी जळ; सामान्यतः धातूवरील कलंक, मळ, गंज, तेलाची चिकाटी; भांड्याला लागून राहिलेला जळका अन्नांश; दातांवर जमलेला मळ. २. वीट, कौल इ. जास्त भाजल्यामुळे त्यावर येणारे दगडासारखे काळे गोळे; खंगर. ३. तापलेले लोखंड घणाने ठोकत असताना उडणारे जळके कण; ठिणग्या. [सं. किट्टम्]
कळ
स्त्री. १ भांडण; कलागत; तंटा; खोडी. (क्रि॰ काढणें; लावणें). 'ऐसें गोत्रचि दोहीं दळीं । उदित जालें असे कळी ।' -ज्ञा १.१८४. 'तिनें घरांतल्या घरांत बारीक कळ लाव- ण्यास अगोदरच प्रारंभ केला होता.' -रंगराव. 'एलवड्यावर पहिल्यानें जाउन केली कळ ।' -ऐपो ३८७. २ कुरापत; भांड- णाचें कारण. (क्रि॰ काढणें). 'आम्हासि ग्रह नाहीं अनुकूळ । नसती उत्पन्न होते कळ ।' -शनि १८२. 'मी म्हणतो कीं त्वां कळ काढली.' -बाळ २.४५. [सं. कलि] म्ह॰ बोलतां कळ धुतां मळ = उत्तर-प्रत्युत्तरानें भांडण वाढतें आणि वरवर धुतल्यानें अधिक अधिक मळ सुटत जातो.
कळ kaḷa f (कलह S) Quarreling, brawling, contending. v काढ. Pr. बोलता कळ धुता मळ Quarrel is aggravated by speaking (answering again): dirt is brought out by washing.
खाणें
खाणें khāṇēṃ v c (अद S) To eat. 2 To peculate, embezzle, swallow bribes; to pick and appropriate fraudulently. 3 To swallow up; to take in; to absorb or devour. 4 To take up; to consume--as a building or other work consumes materials. 5 To receive or sustain; to be the subject of (a beating, heat, cold). 6 To inhale (the air). 7 To take (an oath). 8 To eat up; to overcome or subdue utterly. 9 To omit, skip, leave out (words or letters in speaking or writing). 10 Used as चावणें & डसणें in the sense of To bite. Ex. साप खाई पोट रितें (or रिकामें or उपाशी) The serpent bites, but he fills not his belly. Used also of the Biting of dogs and of certain venomous reptiles and insects and troublesome vermin: also of the Gnawing of bodily uncleanness; as मळ खातो; and, मळ, वा, पिसा &c. being implied, it takes as its subject डोकें or डोई or केश; as माझें डोकें (or डोसकें, डोकसें, शीर &c.) खातें; माझे केश खातात. 11 To gnaw, corrode, peck, bite--sin, a crime, मन or evil conscience. Ex. किं पापियासी निजपातक जेवी खातें ॥. 12 To gnaw, lit. fig.--disagreeing food, bile, offensive speech: also to swallow up or ruin--an enterprise or undertaking. खाऊं जाणे तो पचवूं जाणे He who embezzles or peculates knows how to make it all appear well accounted for. खाऊन जेवून खुशाल or सुखी One that is in easy circumstances, in enjoyment of competence and comforts. खाण्यामुळें हीनशक्त होणें To grow or be feeble from want of food. खायाप्यायाचे दिवस The joyous and jocund days (of youth); the bright and happy hours (of the morning of life). 2 The season of prosperity. खावेना तर खावेना लवंडून ही देवेना? (Though I cannot eat it myself, yet can I not upset it? Expressive of a spirit like that of the Dog in the manger.
उक्रि. १ भक्षणें, जेवणें. २ तनाखोरी करणें; गिळंकृत करणें; लांच खाणें; हरामखोरींने किंवा लबाडीनें आत्मसात् करणें. ३ गिळणें; गट्ट करणें; ग्रासणें; चट्ट करणें. ४ घेणें; फस्त करणें (इमारत सामानसुमान संपविते तसें). 'त्या घरानें हजार वांसे खाल्ले' ५ सोसणें; सहन करणें (मार, उष्णता, थंडी). 'त्यानें एक छडी खाल्ली.' ६ आंत घेणें (हवा); ७ घेणें (शपथ); ८ ग्रासून टाकणें, पूर्णपणें वश करणें. (औषध, मनुष्य). ९ पराभव करणें. 'काशीकरानें रंगनाथशास्त्र्यास एका क्षणांत खाऊन टाकलें.' १० गाळणें, टाकणें, सोडणें (बोलण्यांत अथवा लिहिण्यांत अक्षरें) ११ चावणें; डसणें. 'साप खाई पोट रितें' = दुसर्यास चावल्यानें सापाचें पोट भरत नाहीं. (कुत्रीं, विषारी किरडें, किडे, जीवाणूं यांच्याहि चावण्यास लावतात. तसेंच शारीरिक अस्वच्छतेबद्दल योज- तात. 'मळ खातो, उवा खातात, पिसा खातात.' = उवा, पिसा ह्या माझ डोकें (डोकसें, डोसकें, शीर) खातात म्हणजे चावतात, त्रास देतात. १२ तोडणें; टोचणें; मनाला बोचणें (पाप, गुन्हा, मन, पाप बुद्धि). 'कीं पापियासि निज पातक जेंवि खातें ।' १३ (ल.) कुरतडणें; डवचणें; तोडणें (वाईट अन्न, पित्त, मानहानीचें भाषण). १४ एखाद्या जोखमीच्या कामानें एखाद्याचा नाश करणें; 'या कंत्राटानें त्याला पुरें खाल्लें.' १५ खर्च करणें. 'तूं माझा अर्धा तास खाल्लास' १६ मारणें; बळकावणें. 'वजिरानें उंट खाल्ला.' १७ भोगणें; सेवणें (विसावा, चैन). -अक्रि. १ भक्षणें; भक्षणें आणि जगणें; अन्न घेणें, घालणें (भोजन करणें असा या क्रियापदाचा अर्थ होत नाहीं. 'जेवणें' पहा). २ दुखणें (डोकें, डोसकें, डोई, शीर, माथा, कपाळ इ॰) -अकर्तुक क्रि. (ला. शीं जोडून). कोणी खातो, तोडतो अशी आंत भावना वेदना, होणें. [सं. खादन; प्रा. खाण; सिं. खाइणु; तुल॰ फा. खाईदन = कुरतडणें] (वाप्र.) खाईन खाईन करणें-अधाशीपणा करणें; खाण्यास धाधावलेला असण; खा खा करणें. खाऊन ढेकर देणें-दुस- र्याच्या वस्तूचा अभिलाष धरून ती आपलीशी करणें, गिळंकृत करणें, आत्मसात करणें. खाण्यामुळें हीनशक्त होणें- खाण्याच्या अभावामुळें अशक्त होणें. खाण्यां तुटणें-क्षुधा किंवा पचनशक्ति कमी होणें. खायाप्यायाचे दिवस-तारुण्यां- तील आनंदाचे व उल्हासाचे दिवस; आयुष्यांतील सुखाचे दिवस जीव-प्राण-खाणें-दुसर्यास फार त्रास देणें. दांत ओंठ खाणें-अतिशय रागावणें म्ह॰ १ खाई त्याला खवखवे (खव खवणें म्हणजे घशांत कंडू सुटणें यावरून) = जो वाईट काम करतो त्याच्या पोटांत तें डांचत असतें असा अर्थ; चोराच्या मनांत चांदणें. २ खाईन तर तुपाशी नाहीं तर उपाशी = मी म्हणेन तें ऐकलें तर ठीक आहे, नाहींतर मी रुसून बसणार असा हट्ट घेऊन बसणें याअर्थीं.
खळमळ
खळमळ khaḷamaḷa m (खळ & मळ) The starch, size, and dirt (as of new cloth). 2 (मळ by redup.) Dirt, filth, rubbish, esp. mucky or nasty rubbish.
पु. १ नवीन कापडाची खळ, मळ इ॰ २ (मळाची द्वि.) घाण; रेंदा; गाळसाळ; केरकचरा. 'नद्यादिकांस एकदां पूर येऊन गेला म्हणजे खळमळ धुवून जाऊन पाणी स्वच्छ होतें. ' [खळ + मळ; तुल॰ सं किलिमल]
मळवा
पु. (कु.) खडकावरचा मळ खाणारा मासा. मळयो पहा. [मळ]
निर्मल-ळ
वि. १ मळ, अपवित्रता नसलेला; शुद्ध; स्वच्छ; पवित्र; (लक्षणेनें व शब्दशः) माती नसलेलें (वस्त्र); ढग नस- सलेलें (आकाश); कपट नसलेली (बुद्धि). इ॰ २ निर्भेंळ; मिश्रण, मिसळ नसलेला. [सं. निर् + मल] ॰वाचणें-स्पष्ट, सुबोध, घडाघडा वाचणें. 'श्रीमंत महाराज पेशवे बसूनि सकळ पाताड वाची निर्मळ ।' -ऐपो २६२.
ओकारा-री
पुस्त्री. १ वांती; कळमळून, उन्मळून येणें; उलटी. ओक पहा. २ (विशे. ओकारा) तोंडांत घातलेला घांस पुरता गिळला न जातां बाहेर पडतो तो. ३ (ल.) त्रास; मळ- मळ; कंटाळा; वीट; किळस. (क्रि॰ येणें) [ओ करणें; का. ओक्करिसु-ओंकणें; सिं. ओकार]
साबण, साबू
पु. मळ धुवून काढण्याचा एक रासा- यनिक पदार्थ; मळ काढून टाकण्याचें साधन. 'साबण सांडुनि गेरूसि नाशिलें संन्यास घेतला काचारे ।' -मुपदें ३. 'जैसें वस्त्र स्पर्शिल्या साबणीं । सकाळ मळाची होय हानी ।' -नव २४.१४८. [अर. साबून्] साबण माती-स्त्री. कपडे स्वच्छ करण्याची खारी माती; मुलतानी माती. (इं.) फुल्लर्स अर्थ. -पदाव ५३. साबूंचें झाड-न. रिठा.
शौच
न. १ शुद्धि; दोष, मल यांचें क्षालन; संमार्जन; प्रायश्चित्तादि विधीन दोषापहरण (आंतर किंवा वाह्य). २ स्वच्छता; पावित्र्य; शुद्ध स्थिति; शुचित्व. ३ मल; पुरीष; मलो- त्सर्ग; मलशुद्धि. [सं. शुच् = शुद्ध करणें] ॰कूप-पु. संडास; पाय खाना; शेतखाना. ॰विधि, शौचाचार-पु १ मलोत्सर्ग; बहि- र्दिशागमन; मलशुद्धि. २ प्रातर्विधि; हातपाय, तोंड धुणें; स्नान आचमन करणें. शौच्य-न. शौच पहा. 'शौच्य आच्मन करणें ।' -दा ११.३.१६.
शिट, शिंट
स्त्री. पक्ष्यांचा मल, विष्टा. शीट पहा. शिटवा- पु. (राजा.) वाघळाची, पाखराची विष्टा; शीट, शिटणें-क्रि. विष्टा टाकणें. (पक्ष्यादिकांनीं); मळ थोडा पडत असेल तेव्हां लहान मुलांसंबंधींही उपयोग करितात. २ घोडीनें उनाड सुटून हलक्या प्रतीच्या घोड्यांपासून मैथुन करून घेणें. शिटवा-पु. (राजा.) वटवाघूळ, पक्षी इ॰ ची विष्टा, शिट पहा. शिटाऊ, शिटाव, शिटवा-वि. (ग्राम्य) १ एखाद्या मरतुकड्या घोड्यापासून झालेलें (शिंगरू), शिटलेल्या घोडीपासून झालेला वाईटसाईट (घोडा इ॰) २ (ल.) क्षुद्र, अकुलीन हरामी इसामाबदल वाप- रावयाचा अपशब्द; छाकटा; हलकट; पाजी; हीन; नीच. ३ (अशिष्ट) धूर्त; हुषार; लबाड; बिलंदर, सोदा अशा अर्थानें लहान मुलाबद्दल योजतात. ॰बंदर-न. लबाड, सोदे, भामटे वगैरे तऱ्हेच्या लोकांनीं भरलेलें बंदर. 'गुरुजी ह्यापरिचे । शिष्य शिटाऊ बंदराचे.' ॰बंदरी-वि. धूर्त; ठक; लबाड; सोदा. शिटाचें शिंगरू-न. शिटलेल्या घोडीपासून झालेलें शिंगरू; हीन अवलादीचें शिंगरूं. शिटावणें-क्रि. लबाड, लुच्या बनणें, होणें; खोड्या करण्यास प्रवृत्त होणें; बिघडणें (मुलासंबंधीं प्रयोग). [शिटाव]
कलि-ली
पु. १ कृतत्रेताद्वापारादि चार युगांतील शेवटचें, चालू युग; कलहाचा किंवा दुर्बुद्धीचा काळ; कांहींच्या मतें या युगाचा आरंभ ख्रिस्ती शका पूर्वीं तीनशें, कांहींच्या मतें ३१०१ व कांहींच्या १३७० वर्षांपूर्वीं झाला. याचा अवधि ४३२००० वर्षे आहे व तो अवधि संपला म्हणजे सर्व जगाचा प्रलय होणार आहे. २ भांडण; तंटा; कलह. 'नर्मींच कलि प्रगटे ।' -मोमंभा ३. २३. ३ कलि- युगाची देवता. 'सांभाळा जी ब्रीदावळी । तुम्ही कां कलिसारिखे ।' -तुगा १४५८. ४ दशावतारी गंजीफांतील शेवटचा रंग. ५ बिब्बा; भिलावा. ६ पाप. 'गर्तिच्या बाटविल्या त्वां मुली । काय वाढ- विसिल हा कली' -राला ४०. ७ युद्ध. 'करिति महागजसमान गाढ कली ।' -मोआदि २८. ३६. ८ मत्सर. 'तच्चित्तीं शिरला अनर्थ मूलक कली ।' -विक ३१. ॰काल -पु. कलियुगांतील दिवस; अज्ञानमय, त्रासदायक, संकटकारक काल. कळिकाळ पहा. [सं.] - चा पहारा -पु. राक्षसी निर्दयता; दुष्टपणा किंवा बेबंदी घडून आली असतां उच्चारावयाचा शब्द. ॰द्रुम-पु. १ बेहडा, त्याचें झाड व फळ. २ बिब्याचें झाड व त्याचें फळ. [सं.] ॰पुरुष -पु. १ वाईट, भांडखोर मनुष्य; दुष्ट मनुष्य. २ नाटकां- तील नायकाचा प्रतिस्पर्धी; खळपुरुष; दुष्ट पात्र. 'आपल्या नित्याच्या ओळखीचा जो कलिपुरुष' -विचारविलास ४१. [सं.] ॰मल -पु. कलियुगांतील पापवासना; दुष्ट वासना; दुर्बुद्धि; दोष; पातकें. 'एका जनार्दनीं रसाळा । कथा कलिमल नाशिनी ।' -एरुस्व ९. ६६. [सं. कलि + मल] ॰महात्म्य-न. कलियुगापासून उद्भवणारे परिणाम, संकटें इ॰ कलियुगाचें वर्चस्व; अंमल, प्रभाव. [सं.] ॰युग-न. कलि-ली अर्थ १ पहा. युगचतुष्टयांतील चवथें युग. ॰युगवर्ष-न. शालिवाहन शकापूर्वीं ३१७९ या वर्षीं (ख्रिपू. ३१०२ ता. १८ फेब्रुवारी) भारतीय युद्ध झालें त्यानंतर थोडक्याच दिवसांनीं कलियुग सुरू झालें. -ज्ञाको क १७५. ॰युगाचा ब्रह्मा-पु. कल्पक व चतुर पुरुष; बुद्धिवान मनुष्य. ॰संचरणें -क्रि. मनुष्य भांडण्याच्या बेतास आला म्हणजे त्याच्या संबंधानें म्हणतात. 'ह्याच्या मनांत, पोटांत कली संचरला'
तळ
पु. १. (एखाद्या पदार्थाचा) खालचा भाग; बूड. २. जमीन; जमिनीचा पृष्ठभाग. ३. (झाड, छप्पर इ.कांच्या) खालील जागा, जमीन. ४. सैन्य, स्वारी इ.कांची मुक्कामाची जागा; छावणीचा गोठ; शिबिर; व्यापारी, प्रवासी, लमाण, गाड्या, घोडी इ.कांच्या मुक्कामाची जागा, अड्डा. ५. पृष्ठभाग; सपाट भाग. जसे :–हाताचा, पायाचा तळ. ६. वस्तूंच्या राशीने व्यापलेली जागा; वस्तू ज्या ठिकाणी असेल ती जागा. (वस्तू हलवताना, तेथून दुसरीकडे नेताना सापेक्षतेने या शब्दाचा उपयोग करतात). ७. विस्तृत व सपाट भूभाग; मैदान. ८. बूट, जोडा इ.कांचा खालचा (ज्यावर पाय टेकतात तो) भाग; तळवा; जोड्याच्या तळव्यांतील चामड्याचा तुकडा. ९. नाश; रसातळ : ‘मानी मेलाचि जरी दुर्जय तरि निजशतात्मजरिपु तळा ।’ – मोस्त्री २·२२. १०. तांडा. (वणजारी) [सं. तल; फ्रें. जि. तलै] (वा.) तळ घालून बसणे, तळ मारणे – १. (एखाद्या ठिकाणी) कायमवस्तीच्या इराद्याने राहणे, उतरणे; आसन, ठाण मांडणे. २. दुसऱ्याचा पैसा गिळंकृत करून, लुबाडून बेदरकारपणे स्वस्थ आणि निर्धास्त राहणे. तळ झाडणे – (सर्व सामग्री, बेगमी इ.) खाऊन फस्त करणे. तळ थांबणे – (एखाद्याचे) आसन स्थिरावणे; जन्माची सोय लागणे; थाऱ्याला, ठिकाणी लागणे. तळ न थांबणे – एखाद्याला कायम भटकंतीच करावी लागणे; एका जागी स्थिर होऊ न शकणे. तळ लागणे, तळ पडणे – (सामग्री, बेगमी इ.) जवळ जवळ फस्त होणे, संपण्याच्या बेताला येणे. तळची आग मस्तकास जाणे, तळपायाची आग मस्तकास जाणे – (कर्त्याची षष्ठी) रागाने नखशिखांत संतप्त होणे; अतिशय राग येणे. तळचे मडके हाणणे, तळचे मडके फोडणे – मुळावरच घाव घालणे; समूळ नाश करणे. तळहातचा फोड असणे, तळहातावरचा फोड असणे – एखादी वस्तू, व्यक्ती अत्यंत प्रिय, जिव्हाळ्याची असणे. तळहातचा मळ असणे, तळहाताचा मळ असणे – एखादे काम अगदी सहज, अत्यल्प श्रमाने करता येत असणे. तळहाताच्या (तळहातावरच्या) फोडासारखा वागविणे, तळहाताच्या (तळहातावरच्या) फोडासारखा बाळगणे, तळहाताच्या (तळहातावरच्या) फोडासारखा मानणे – (एखाद्या वस्तूची, व्यक्तीची) अतिशय काळजी घेणे. तळहाताला केस येणे – अशक्य गोष्ट शक्य कोटीत येणे. (तळहाताला कधीच केस येत नाहीत त्यावरून.) तळहातावर शिर घेणे – जिवाची तमा न बाळगणे; (एखाद्या कार्यासाठी) मरणही पत्करण्यास तयार होणे. तळाने तळ येणे, तळावर तळी करणे – पावलावर पाऊल टाकून पाठलाग करीत येणे : ‘सवाईजी भितात की शत्रू राजश्रीच्या तळाने तळ येतील.’ – पेद १५, पृ. १९. तळावर बसणे, तळावर राहणे – १. विपन्नावस्थेस, अवदशेस येणे; अकिंचन होणे. २. घरी बसणे; सामाईकीच्या वाटणीतील भागास मुकणे. (चोर, लुटारू यांच्यापैकी घरी बसणाऱ्याला लुटीचा भाग देत नाहीत, त्यावरून). ३. धंद्याच्या ठिकाणी, नेहमीच्या जागी असणे. तळावर बसविणे – एखाद्याला सामाईक वाटणीतील भाग न देणे.
हात
हात hāta m (हस्त S) A hand: also an arm, the whole arm: also the fore arm. 2 A cubit measured by the hand and fore arm, or from the elbow to the tip of the middle finger. 3 Side, right or left. Ex. आमचें घर सरकारवाड्याचे उजव्या हातास आहे. 4 Province, sphere, the compass, reach, or range of power or right. Ex. तुझें कार्य करणें हें माझ्या हातांत नाहीं; हातांतून सुटलेली मामलत ती सुटलीच सुटली. In this sense हात is used only in the oblique cases. 5 Person or self; the hand as representing the agent in action. Ex. अपराधावांचून शिवी देणें हें माझ्या हातानें घडणार नाहीं. 6 Possession. Ex. सांप्रत माझ्या हातीं पैसा नाहीं. 7 A beat (upon a drum or tabor or other musical instrument played with the hand): also any particular play or exercise or diversity of manœuvring (at fencing, cudgeling, single sticks, or other manual exercitation). 8 Skill or power of performance (with respect to works or actions belonging to the hand). Ex. त्याला चित्र काढण्याचा हात चांगला आहे विणण्याचा हात चांगला आहे परंतु मृदंग वाजवायाचा हात जर म्हटला तर तो मलाच. 9 The key of, a key considered as the hand of a lock. 10 A hand at the games with Sonkṭyá &c. 11 A helpmate, mate, underling, assistant. 12 (Commonly हत्ता) The stone, piece of wood &c. as the rest of the hands in the performance of दंड. 13 An application of the hand; a passing over of the hand (as in giving a coating of paint, a wash of whitewash, a smearing of dung). 14 A stroke or an act of the hand in many variations of the sense. 15 A curved piece of wood attached to the कातरी of an oilmill. हात अटोपणें To draw in the hand (from any work or act in which one has been largely and freely engaged). हात करणें with वर of o. To lay violent hands upon, to beat. हात घालणें To lay or put hand to (to perform or do). 2 To lay hand upon (in order to seize). हात चालणें g. of s. To have power, prevalence, capability, means &c.; to be able. हात चेपणें g. of o. To squeeze a bribe into the hand of. हात टेंकणें (To lay the hands, in order to support the now heavy body, upon the knees.) To become or be old and infirm. हात दाखविणें To indicate by the hand; to point the hand. 2 To punish so as to impress; to make one's hand felt by. 3 To pay off (an injury). 4 To manifest one's agency in some injurious manner. हात देणें To lend a helping hand to. 2 To lay (a pilfering or predatory) hand upon. 3 To play a good stick (upon sweetmeats &c.) हात धरून जाणें g. of o. To flee to the arms and protection of;--used of a married woman fleeing from her husband to the house of another man. हात धुवून पाठीस लागणें To pursue with determined and deadly purpose. हात पाय गाळणें To lose courage; to shrink from; to suffer one's spirits to sink or efforts to cease; to drop the hands. 2 Lit. To lose strength of limbs. हात पाय चोळणें To fret and fume, gnash and chafe (at the mention of); to vent curses and imprecations (upon the head of). हात पाय पसरणें To begin to dally or dawdle with a work on which despatch was promised or expected. 2 To plead or exhibit utter helplessness or utter unconcern with respect to a work, to complete or to undertake which there is reluctance, or failure or want of the means. 3 g. of s. To extend or enlarge itself beyond the computed or customary limits;--as a business or work; also to come forward with additional demands. 4 To stretch out the limbs in dying. हात पाय पांघरून or पोटाळून बसणें To sit with the hands enfolded with clothes or laid upon the breast; i. e. to sit unoccupied and idle. हात पाय फोडणें or लावणें (also फुटणें or लागणें) Lit. To furnish with arms and legs. To add items or matter (to the original mass or stock): also to dress up, trick out, embellish &c.: also to enlarge and swell (a work, a bill or list of expenses &c.) by subsequent additions: also to polish, finish, make plausible and probable (a fraudful statement or story) by ingenious fictions or lies. हात मारणें To lay rapacious hands upon; to attack and seize (money &c.) 2 To lay the hand upon in order to operate or perform upon (in various modes). 3 To lay violent hand upon. हात राखणें To restrain the hand; to refrain or forbear in a measure. हात राखून Refrainingly, forbearingly, sparingly. हात लावणें (To apply or lay the hand to.) To touch, take up, come to &c. in order to execute or to assist. हात वळणें g. of s. To be skilful or apt in or at through practice. हाताचें पायांवर लोटणें To drive off (a present affliction or a present call for action) unto another day. हाता तोंडास येणें To come to the state of maturity or capability of yielding its proper fruit or good; to approach to the state of readiness for the enjoyment, use, or advantage of;--as a wife (i. e. a married female child), a son, a field, a work generally. हातावर असणें To be manageable, governable &c. with perfect ease; to lie altogether lightly upon the hand;--as worldly concerns or a business in general. हातावर तुरी देऊन पळणें or हातावर तुरी देणें To run away from openly, boldly, in a defying or deriding manner. हातावर येणें or हाताबोटावर येणें To be arrived close at hand; to be come almost within touch, grasp, reach &c.;--any event or object. हातावर येणें or लागणें or दूध देऊं लागणें To yield her milk without the presence of her calf, and without the presenting of पान्हवण (food placed before her to induce the descent of the milk into the udder), but simply upon the application to her udder of the hand;--as a cow, buffalo &c. हातावर शीर घेऊन असणें (To have one's head perpetually in one's hand.) To be constantly engaged in, or be ever ready to engage in, desperate or dangerous enterprises or deeds. हातावर संसार करणें or पोट भरणें To live by the labor of one's hands; to obtain one's bread by toiling for it (whether by working or by begging):--in opposition therefore to Living upon a patrimony &c. हातावर हात देऊन or मारून पळणें or जाणें To run away from before one's eyes. हातास हात लागणें Hand to touch hand: (as the hand of a giver that of the receiver &c.) हातीं धरणें To take under protection or into patronage. हातीं पायीं डेव- णें -धावणें -येणें -रेवणें (To come into the hands and feet.) To be felt as having occasioned heaviness and languor;--food eaten. हातीं पायीं पडणें or लागणें g. of o. To be very suppliant, submissive, or humbly importunate unto or with. हातीं पायीं उतरणें or मोकळा होणें or सुटणें To be delivered and be altogether out of danger;--used of a puerperal woman or female animal. To the above phrases in order add the following, also in order:--हात ओला or वला तर मैत्र भला नाहीं तर पडला अबोला Our friend is friendly whilst our hand is full. हात ओढविणें To strike out the hand (as to catch hold of). 2 To hold out the hand (before the face of) in mocking, teasing, daring, supplicating &c. हात कापून देणें (आपला) To bind one's self under a written engagement. Also हात गुतणें To have one's hands tied. हात गाहण ठेवणें To leave a hand in pledge with a god; i. e. to vow to forbear the use (in eating &c.) of the right hand for a period. हातचा अंवळा, हातचा मळ, हातचें कांकण &c. Terms used as standards of illustration for a manifest truth or an evident matter; agreeing with Sun at noonday &c. हातचा मळ is further used as an illustration of Facility (of any work)--facility like that of washing one's hands. Further used, like अंगचा मळ q.v., by the receiver of a gift in depreciating it. हातच्या धारणेनें घेणें To pommel soundly. हात जोडणें To fold the palms together (in supplication or in respectful attention.) हात झाडणें To reject utterly (an offer, a proposal, a petition &c.) 2 To cast off or give up in despair. हात टाकणें To throw the arms far and high in swimming, so as to advance by rising and springing. See झापा टाकणें. हात टाकणें with वर of o. To lay hand upon; i. e. to beat or strike. हात तोडणें To pass a bond or written engagement; as म्यां त्याचे जवळ हात तोडून दिल्हा. हात दाखविणें or दाविणें To show one's hand to a chiromancer (and have ill fortune predicted). Pr. हात दावून अवलक्षण चिंतणें. हात दाबणें g. of o. To bribe. हात धुणें To wash one's hands (of a business or matter.) हात नाचविणें To move about the hand (before the face of) in jeering, defying &c. हात पाय Arms and legs. This compound occurs constantly in the sense of Members, in contrad. from Body; and it forms numerous phrases; as हात पाय खोडणें To have one's limbs convulsively contracted and agitated. हात पाय गळणें g. of s. To lose flesh and substance of limbs. हात पाय गुंडाळणें g. of s. To draw up (gather one's self together) in the last agonies. 2 g. of o. To confine or obstruct; to deprive of all power of action. हात पाय चोळणें with वर of o. To make demonstrations of purposed vengeance or injury against. हात पाय झाडणें To kick and toss (as in the agonies of death). 2 fig. To make vehement and unavailing efforts. हात पाय ताणणें To stretch one's limbs. हात पाय पाखडणें To fling and kick about (as in death or in a passion). हात पाय हालविणें To begin to stir, act, work, move. हात पाय फुटणें g. of s. To become adept in knavish arts and ways, to get fledged. हात पाय फुटणें (दौलतीला, धनाला, द्रव्याला &c.) To acquire wings --riches. See other applications under हात पाय फोडणें. हात पाय मोकळे करणें To free one's limbs (as by exercise). हात पाय मोडणें g. of o. To break the power of; to reduce to impotence. 2 To obstruct or hinder effectually; to stop or to prevent. हात पाय मोडणें or मोडून येणें To have the prostration premonitory of fever. हात पाय रोड्या पोट लोड्या हात पाय काड्या पोट ढेऱ्या Phrase expressive of emaciation of limbs together with distension of belly. हात पाय सोडणें To stretch out the limbs (in the last agonies). हात फिरे तेथें लक्ष्मी फिरे तोंड फिरे तेथें अवदसा फिरे The hand of the diligent maketh rich; the mouth of the talker bringeth misfortune. हात बोट लावणें To lend a helping hand. हात धरणें g. of o. To bribe. हात मोडणें g. of s. To be reduced to helplessness. 2 (To break one's hand through non-acceptance.) To refuse a gift offered. हात वाहणें g. of s. To have one's hand pass upon; i. e. to act upon, to affect. हात सोडणें To withdraw one's patronage or favor from. 2 To drop the society or the acquaintance of. हाताखालीं घालणें To put or take under rule or governance: also to put or take into care and keeping. हाताचे लाडू होणें g. of s. To have one's hands contracted and closed through the itch. हातांत कंकण बांधणें with विषयीं of o. To set up pretensions to; to make profession of. हातांत हात घालणें To put a douceur or bribe into the hand of. 2 To take to and go off with another man;--used of a married female. हाता तोंडाशीं गांठ पडणें To make a bellowing whilst beating the mouth with the hand. 2 To lift food into the mouth, to eat. हाता पायांचा चौरंग होणें To be bowed into four--to have one's body and limbs contracted--through rheumatism or cramp. हाता पाचांचे डगळे or डघळे होणें -पडणें -मोडणें g. of s. To have one's limbs quivering or tremulous with feebleness (trembling as the leafy spray). हाता पायांचे ढीग पडणें or होणें g. of s. To be helpless (through sickness, sudden terror &c.); to be thrown all of a heap; to be all of a lump. हाता पायाच्या फुंकण्या होणें g. of s. To become exceedingly emaciated. हातां पायां पडणें To fall (as in supplication) at the feet of. हातावर आणणें -काढणें -घेणें To bring away or take up (i. e. borrow money) without laying down any deposit (as security). हातावर दिवस काढणें or लोटणें To spend the day under many efforts. हातावर मिळविणें To live from hand to mouth. हातावर हात मारणें or देणें To clap hand upon hand (in agreeing to some bargain or proposal). हातास, हाता or हातीं चढणें To get into the hand, i. e. to be got; as तो किल्ला माझ्या हातीं चढला; अदत्तापासून पैसा हातीं चढत नाहीं; नवनीत मथनावांचून ॥ हाता न चढे सहसाहि ॥. हातीं धरणें (तोंड, जिव्हा or जीभ, पोट, इंद्रिय &c.) To take or bear in the hand (the mouth, tongue, belly, membrum &c.); i. e. to set at large with all license; to give full swing to (the mouth to eat, the tongue to abuse, the sexual members and organs to their function, the appetites and passions to their several lustings and indulgences). हातीं धोंडे घेणें To rise against and be ready to stone (or beat, abuse &c.) हातीं भोपळा घेणें To set up the trade of beggary. हातीं मेटीं Upon hands and knees; with the hands resting lazily upon the knees; i. e. idlingly or dawdlingly. Ex. दिवस गेला हा0 चांदण्याखालीं कापूस वेटी. See हेटीमेटी. अडव्या हातानें घेणें To take or get clandestinely, furtively, underhand, huggermugger. 2 (To cast off from one's side or wing.) To flout; or to disallow and ignore contumeliously. 3 To scold, beat &c. vehemently; to give it to finely. -चारणें To feed or physic (a horse) by putting the hand into his mouth sideways. -देणें To give clandestinely or underhand. -मारणें To strike with a back-blow. आपला हात जगन्नाथ (Because at Jagannáth it is the custom for every one to take as much as he will of the victuals. ) Expressive of plentifulness and full liberty to enjoy it. दोहो हातांचे चार हात करणें (or होणें) To double one's hands (means of acquiring or performing) by marriage; to add unto one's self a wife. रिकाम्या हातानें With empty hand; i. e. without the necessary or proper means, materials, instruments, apparatus &c. ह्याचा हात कोण धरीसा आहे Who is there to excel or to match him? who has ability to arrest his hand? who can say, What doest thou? ह्या हाताचें ह्या हातास कळूं न देणें Not to let the left hand know what the right hand doeth. ह्या हाताचें ह्या हातावर Phrase used in affirming that evil deeds soon and surely meet their recompense.
पु. १ हस्त; बाहु; खांद्यापासून बोटांपर्यंत शरीराचा भाग. कोपरापासून बोटांपर्यंतचा भाग. २ कोपरापासून मधल्याबोटाच्या टोकापर्यंतचें माप. 'हा पंचा साडेचार हात भरला.' ३ उजवी किंवा डावी बाजू, तरफ. 'आमचें घर वाड्याचे उजव्या हातास आहे.' ४ ताबा; आटोका; अधिकार; खातें. 'तुझें काम करणें माझ्या हातीं नाहीं.' (कारक विभक्तींत प्रयोग). ५ स्वतः व्यक्तिगत मनुष्य. 'अपराधावांचून शिवी देणें हें माझ्या हातानें घडणार नाहीं.' ६ स्वामित्व; कबजा; मालकी; ताबा. 'साप्रंत माझ्या हातीं पैसा नाहीं.' ७ हातानें वाजविण्याच्या वाद्यावर मारलेली हाताची थाप. ८ डाव; खेळ (काठी, लाठी, पट्टा इ॰ शस्त्रांचा). 'पट्ट्याचे दोन हात करून दाखव.' ९ कर्तृत्वशक्ति; अंग; हस्तकौशल्य (एखाद्या विषयांतील, कलेंतील). 'त्याचा चित्र काढण्याचा हात चांगला आहे.' १० कुलुपाची किल्ली; चावी. 'कुलवाचा हात इकडे दे बघूं.' ११ सोंगट्या, पत्ते इ॰ खेळांतील डाव, खेळण्याची पाळी, खेळ; खेळणारा गडी. 'अजून आमच्यांतील एक हात खेळवयाचा आहे.' १२ हस्तक; मदतनीस; साहाय्यक; हाताखालचा मनुष्य. १३ ज्यावर दंड, जोर काढावयाचे तो लांकडी, दगडी ठोकळा; हत्ती १४ (रंग देणें, सारवणें इ॰ कामीं) वरून हात फिरविणें; हातानें दिलेला थर, लेप. १५. ठोंसा; तडाखा; हस्तक्रिया (भिन्नभिन्न प्रसंगीं त्या त्या अर्थांनीं) १६ (तेली-घाणा) कातरीस जोडलेला वांकडा लाकडी तुकडा. १७ हात टेकावयासाठी, हातानें धरावयाचा कोणताहि पदार्थाचा भाग. 'खुर्चींचे-रहाटाचे-हात. १८ हाताच्या आका- राची कोणतीहि वस्तु. १९ (सोनेरी) हातांतील दागिना सैल करण्याचें एक हत्यार. २० (नृत्य) दोन हातांनीं मिळून करा- वथाचे अभिनयाचे प्रकार. हे ४० प्रकारचे आहेत. २१ (शिंपी) कापड मोजण्याचें बारा तसूंचें एक माप; गज. २२ पान्हा (नट- बोलट फिरविण्याचा). [सं. हस्त; प्रा. हत्थ; हिं. गु. हाथ; ब. हात; आर्में. जि. हथ, अथ; पॅलेस्टाईनजि. हस्त; पोर्तुंजि. बस्त] म्ह॰ १ हात ओला तर मैत्र भला-नाहींतर पडला अबोला- जोपर्यंत माणूस दुसर्यास देत असतो तोंपर्यंत त्याच्याशीं सगळे मित्रत्वानें वागतात. २ हात घशांत घातला तरी कोरडाच = कितीहि मदत केली तरी बेइमान राहणारा. ३ हातपाय रोड्या, पोट लोड्या; हातपाय काड्या, पोट ढेर्या = पोटाचा तटतटीतपणा व अवयवांचा रोडकेपणा. ४ हात फिरे तेथें लक्ष्मी फिरें, तोंड फिरे तेथें अवदसा फिरे = उद्योगी माणसाचा हात श्रीमंती आणतो तर नुसत्या बडबड्याच्या हातून कांहींच होत नाहीं उलट दारिद्र्य येतें. ५ आपला हात जगन्नाथ (जगन्नाथपुरीस आपल्या हातानें वाटेल तेवढा प्रसाद घेतां येतो त्यावरून) वाटेल तेवढें व तसें घेणें; प्राचुर्य. ६ हातचें सोडून पळत्याचे पाठीस लागूं नये = जें खात्रीनें आपलें आहे (आपणांस मिळावयाचेंच आहे) तें सोडून जें अनिश्चित आहे तें मिळविण्याच्या नादीं लागूं नये. ७ हातच्या कांकणास आरसा कशाला ? (हातांतील कांकण डोळ्यानें दिसण्या- सारखें आहे, आरसा आणणें वेडेपणा) = जी गोष्ट उघड सिद्ध आहे ती दाखविण्यास पुराव्याची जरूरी नाहीं. ८ हातपाय र्हावलें काम करूं वायले = नाइलाज होणें. ९ हातपाय लुलें तोंड चुरचुरां चाले = अशक्त पण तोंडाळ, मुजोर माणूस. १० हातभर लांकूड नऊ हात ढलपी = अतिशयोक्ति करणें. ११ हातांत नाहीं अडका बाजारांत चालला धडका = जवळ कवडीं नाहीं पण डौल बादशहाचा. (वाप्र.) ॰आंखडणें-देण्यासाठीं पुढें केलेली वस्तु एकदम मागें घेणें; देण्याचें प्रमाण कमी करणें, बंद करणें. ॰आटोपणें-मारणें इ॰ हातांनीं करावयाची कोणतीहि क्रिया बंद करणें. ॰आवरणें-१ हात आटपणें. २ कोणत्याहि कृत्यापासून परावृत होणें. 'ऐकेल वचन माझें आवरिल द्वेषिकाळ हात रणीं ।' -मोकर्ण ४६.४४. ॰इचकणें-(व.) हात मोडणें. ॰उगारणें-उचलणें-(एखा- द्यास) मारावयास प्रवृत होणें. ॰उचलणें-१ स्वयंस्फूर्तीनें, आपण होऊन बक्षीस देणें. २ हातीं घेणें (काम, धंदा). ॰ओढविणें- १ घेण्यासाठीं झांप टाकणें. २ विटंबना, करण्यासाठीं तुच्छता दर्शविण्यासाठीं तोंडापुढें हात करणें. ॰ओंवाळणें-तुच्छता दर्शविणें. ॰करणें-१ लाठी मारणें; शस्त्राचा वार करणें. हात टाकणें. 'स्त्रीचे अंगावर हात करूं नये.' २ पट्टा, बोथाटी वगैरेचे डाव करणें; फिरविणें. ३ वादविवाद, युद्ध करणें. ॰कापून-देणें- गुंतणें-लेखी करारकरून स्वतःस बांधून देणें. ॰खंडा असणें- एखादें कार्य (हुन्नर) हमखास पार पाडण्याचें कौशल्य, पटाईत- पणा अंगीं असणें. ॰गहाण ठेवणें-उजवा हात देवास वाहून कोणत्याहि कामीं त्याचा उपयोग करावयाचा नाहीं असा नवस करणें. २ कोणत्याही कामास हात न लावणें. ॰घालणें-१ (एखादें काम) पत्करणें; करावयास घेणें. २ एखादी वस्तु घेणें, धरणें, शोधणें यासाठीं हात पुढें करणें. 'मग विभु वसनासी त्याचिया हात घाली ।' -आनंदतनय. ३ (एखाद्या कामांत, व्यवहांरांत) ढवळाढवळ करणें; आंत पडणें. ॰घेणें-(पत्त्यांचा खेळ) हुकूम मारून अगर भारी पान मारून दस्त करून घेणें. ॰चढणें-प्राप्त होणें. 'अनुताप चढविया हात । क्षणार्धं करी विरक्त ।' -एभा २६.२०. हाताचा आंवळा-मळ, हातचें कांकण-उघडउघड गोष्ट; सत्य. ॰चा मळ-अत्यंत सोपें कृत्य; हात धुण्यासारखें सोपें काम; अंगचा मळ. ॰चालणें-१ हातांत सत्ता, सामर्थ्य, संपत्ति असणें, मिळविणें, मिळणें. १ एखादी गोष्ट करतां येणें. 'कशिद्यावर माझा हात चालत नाहीं.' ॰चाल- विणें-हत्यार चालविणें (संरक्षणार्थ). 'न्यायाच्या अभावीं ज्याला त्याला हात चालवावेसें वाटणें रास्तच होईल.' -टि १. २२. ॰चेपणें-लांचाचे पैसे मुकाट्यानें एखाद्याचे हातांत देणें. ॰चोळणें-फार राग आला असतां तळहात एकमेकांवर घासणें; कुंठितगति होऊन स्वस्थ बसावें लागणें. 'शल्य सुयोधन वाक्यें कोपे चोळी करें करा...।' -मोकर्ण २१.१३. ॰जोडणें-१ नमस्कार, प्रार्थना, विनंति करणें. २ शरण जाणें, येणें. 'अपराध फार केले परि आतां हात जोडिले स्वामी ! ।' -मोआर्याकेका. ३ नको असलेला पदार्थ हात जोडून आर्जवानें दूर सारणें; अव्हे- रणें. 'दानश्री त्याहुनि बहु दुग्धासहि हात जोडितो मीन ।' -मोबृहद्द ८. ॰झाडणें-१ झिडकारणें; नापंसत ठरविणें. २ निराशेनें सोडून देणें. ३ एखादें काम उरकून मोकळें होणें. ॰टाकणें-१ पोहतांना पाण्यावर हात मारणें. २ (एखाद्यावर) प्रहार करणें; मारणें. 'बायकोमाणसाच्या अंगावर हात टाकणें तुम्हाला शोभत नाहीं.' ॰टेकणें-१ काम करण्यास असमर्थ असल्यानें पराभव पावल्याचें कबूल करणें. २ म्हातारपणानें अशक्त होणें. ३ दमणें; थकणें; टेकीस येणें. ॰तोडणें-स्वतःच्या लेखानें आपणांस बांधून घेणें. ॰थावरणें-हात आवरणें; आटो- पणें. '...थावरूनि हातरणीं ।' -मोस्त्री ६.५१. ॰दाखविणें- दावणें-१ हस्तसामुदिक जाणण्यासाठीं जोशापुढें तळहात करणें. २ अहितकारक परिणाम करणें. ३ स्वतःची शक्ति, सामर्थ्य दाख- विणें. 'शक्रादि देव असते तरि त्यांसहि दावितोंचि हात रणीं ।' -मोभीष्म ३.४. ४ नाडीपरीक्षा करण्यासाठीं वैद्यापुढें हात करणें. ५ हातानें एखादी वस्तु दर्शविणें. ६ बडवून काढणें; पारिपत्त्य करणें; सूड घेणें; उट्टें काढणें. म्ह॰ हात दावून अवलक्षण चिंतणें, करणें. ॰दाबणें-लांच देणें. 'त्यानें आपल्यास मदत करावी म्हणून त्याचे हात दाबावे असें एकदां मनांत येतें.' -विवि १०. ९ २१०. ॰देणें-१ मदत करणें; तारणें. 'घडतां अधःपतन मज पुण्यें देतिल न हात परिणामीं ।' -मोआदि १९.३२. २ चोरणें; उचलेगिरी करणें. ३ खाद्यापदार्थावर ताव मारणें. ४ (बायकी, छप्पापाणी) छप्पू घातलेल्या मुलीस इतर मुलीनीं (तिनें उठावें म्हणून) हस्तस्पर्श करणें. ॰धरणें-१ अडविणें; हरकत करणें; स्पर्धा करणें; बरोबरी करणें. २ लांच देणें. ॰धरून जाणें- विवाहित स्त्रीनें एखाद्या परपुरुषाबरोबर पळून जाणें; जाराबरोबर निघून जाणें. ॰धुणें-(ल.) एखाद्या कामांतून आपलें अंग काढून घेणें. ॰धुवून पाठीस लागणें-एखाद्या नाश करण्याविषयीं हट्टानें प्रवृत्त होणें; चिकाटी धरून एखाद्याचा पाठलाग करणें. ॰न बनणें-(व.) विटाळशी होणें; गुंता येणें. ॰नाचविणें-चेष्टा करण्यासाठीं दुसर्याचे तोंडापुढें हातवारे करणें. हात ओवाळणें पहा. ॰पडणें-१ एखादें काम अनेकांनीं लागून संपविणें; एखादा खाद्यपदार्थ अनेकांनीं एकसमयवच्छेनेंकरून फन्ना करणें. २ (ना.) जिवंतपणीं भेट नाहीं पण दहनापूर्वी तरीं प्रेताचें दर्शन होणें. ॰पसरणें-भीक मागणें. ॰पाय खोडणें-१ अवयव आंख- डणें; विव्हल होणें. २ एखाद्यास प्रतिबंध, अडचण करणें. ॰पाय गळणें-गाळणें-१ अशक्त होणें; रोडावणें. २ खचून जाणें; नाउमेद होणें; गलितधैर्य होणें. ॰पाय गुंडाळणें-१ अंत- काळच्या वेदनांनीं हातपाय आंखडणें; कियाशक्ति रहित होणें. २ हरकत, अडथळा करणें. ॰पाय चोळणें-१ सूड घेण्याची प्रतिज्ञा करणें; चरफडणें. २ रागानें तरफडणें; शिव्याशाप देणें. ॰पाय झाडणें-१ हातपाय गुंडाळणें अर्थ १ पहा. २ सुटकेसाठीं हातापायांचा उपयोग करणें. ३ धडपड करणें; चरफडणें. ॰पाय ताणणें-सुखानें, निष्काळजीपणानें हातपाय पसरून पडणें. ॰पाय धोडावप-(गो.) आटापिटा करणें. ॰पाय पसरणें- १ हातपाय गुंडाळणें अर्थ १ पहा. २ मर्यादेच्या, आटोक्याच्या बाहेर जाणें; जास्त जास्त व्याप वाढविणें; पसारा वाढविणें. म्ह॰ भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरी. ३ काम होत नसल्यास सबबी सांगणें; कामांत आळस करणें (काम करीन असें वचन दिलें असतां). ४ मागणी वाढत जाणें, अधिकाधिक आक्रमण करणें. ॰पाय पाखडणें-अंतकाळच्या वेदनेनें, फार संतापानें हातपाय झाडणें. ॰पाय पांघरून-पोटाळून बसणें-आळशा- सारखें बसणें; जेठा मारून बसणें. ॰पाय फुटणें-१ उधळपट्टी सुरू होणें; संपत्तीला (जाण्यास) पंख फुटणें. 'दौलतीला अलीकडे हातपाय फुटुं लागले आहेत.' ३ लुच्चेगिर्या करण्यांत तरबेज होणें. २ थंडीनें हातपायास भेगा पडणें. ॰पाय फोडणें-लावणें- फुटणें-लागणें-१ मूळ गोष्टींत, अंदाजांत भर घालणें; वाढ विणें. २ नटविणें; थटविणें; अलंकृत करणें. ३ मागून वाढविणें (काम, दर, खर्च इ॰). ४ लबाड्या इ॰ नीं सजवून उजळून दाखविणें. ॰पाय मोकळे करणें-फेरफटाका करून हातपाय सैल, हलके करणें; फिरणें; सहल करणें. ॰पाय मोडणें-मोडून येणें-टाकणें-१ तापापूर्वीं अंग मोडून येणें; निरंगळी येणें. २ बलहीन, निःसत्त्व करून टाकणें; हरकत घेणें. ॰पाय सोडणें -अंतकाळच्या वेदनांनीं हातपाय ताणणें, ताठ होणें. ॰पाय हालविणें-उद्योग, परिश्रम, कष्ट इ॰ करणें; स्वस्थ न बसणें. ॰पोचणें-कृतकृत्य होणें (ढुंगणाला हात पोंचणें असा मूळ प्रयोग). ॰फाटणें-रुची वाढणें. 'जेथें जिव्हेचा हातु फाटे ।' -ज्ञा १८.२४९. ॰फिरणें-लक्ष जाणें; व्यवस्थित ठेवण्याची काळजी घेणें; साफसफाई करणें. ॰फेरविणें-१ लहान मुलास प्रेमानें कुरवाळणें. 'प्रेमें मजवरुनि हात फिरवूनी ।' -मोउद्योग १३.१८३. २ पुन्हां उजळणी, उजळा देणें. ॰बसणें-१ एक- सारखें लिहीत, वाचीत इ॰ राहणें. २ अक्षरांचें वळण बसणें; तें पक्कें होणें. ३ एखादें काम उत्तम प्रकारें करतां येणें; मनांत ठसणें; विशिष्ट क्रिया करण्याची सफाई हातास प्राप्त होणें. ॰बांधणें-१ मर्यादा घालणें; स्वैर होऊं न देणें. २ अडथळा आणणें. ॰बोट लावणें-भार लावणें-मदत करणें. ॰भिजणें-१ दक्षणा देणें; (गो.) हात भिजविणें. २ लांच देणें; हात ओले करणें. ॰मारणें-१ बळकाविणें (पैसा इ॰) देणें. २ अधाशीपणानें खाणें; ताव मारणें. ३ एखाद्या वस्तूवर विविध क्रिया करणें. ॰मिठ्ठीला येणें-(माण.) हाताहातीं होईपर्यंत भांडणें. ॰मिळविणें-१ घाव घालणें. 'तस्कारानें जलदीकरून हात मिळविला जाऊन ।' -ऐपो ३९०. २ (कुस्ती) सलामी घेणें. ॰मोडणें-१ असहाय्य, मित्रहीन होणें. २ मिळत असलेली देणगी, बक्षीस नाकारणें. ॰राखणें- कुचराई करणें. ॰राखून खर्च करणें-काटकसरीनें खर्च करणें. ॰लागा ना-(गो.) विटाळशी होणें. ॰लावणें-मदत करणें. ॰वसणें-क्रि. हस्तगत होणें. 'ते ज्ञाननिष्ठा जेथें हातवसे ।' -ज्ञा १८.१२४८; -भाए २४०. ॰वहाणें-१ हत्यार चालविणें. 'परि परमप्रिय अर्जुन त्यावरि याचा न हात वाहेल ।' -मोउद्योग १२.५४. २ प्रवृत्त होणें; कार्य करणें. ॰वळणें-१ सराव, परि- पाठ इ॰ नें हातास सफाई येणें. २ (एखाद्या गोष्टीस, कृत्यास) प्रवृत्त होणें. ॰सैल सोडणें-सढळपणें खर्च करणें. ॰सोडणें-१ पूर्वीप्रमाणें कृपा, लोभ न करणें. २ संगति. ओळख सोडणें. ॰हातांत देणें-लग्न लावणें. 'एखाद्या तरुणीचा हात माझ्या हातांत दे.' -भा ४९. ॰हालवीत येणें-काम न होतां रिकामें परत येणें. हातणें-क्रि. सारवणें. हाताखालीं घालणें-देख. रेखीखालीं, अंमलखालीं, कबज्यांत, ताब्यांत घेणें. हातां चढणें- प्राप्त होणें. 'जरी चिंतामणी हातां चढे ।' -ज्ञा ३.२३; -एभा १०.२८२. हाताचें पायावर लोटणें-आजची अडचण उद्यां- वर ढकलणें; आजचें संकट लांबणीवर टाकणें. हाताचे लाडू होणें-खरजेनें हाताच्या मुठी वळणें, त्या न उघडणें. हाताच्या धारणेनें घेणें-मारणें; बुकलणें. हातांत कंकण बांधणें- एखाद्या गोष्टीची प्रतिज्ञा करणें; चंग बांधणें (यजमानानें यज्ञ करावयाच्या पूर्वी हातांत दीक्षासूत्र बांधण्याच्या चालीवरून). हातांत हात घालणें-१ लांच देणें. २ मैत्रीच्या भावानें वागणें, प्रेम करणें. ३ विवाहसंबंध घडवून आणणें. ४ विवाहित स्त्रीनें परपुरुषाशीं संबंध ठेवणें; निघून जाणें. हातातोंडाशीं गांठ पडणें-१ घास तोंडांत पडणें; खावयास सुरुवात करणें; जेवणा- खेरीज इतरत्र लक्ष न जाणें. २ एखाद्या कार्यास घाईनें आरंभ होणें. ३ बोंब मारणें. हातातोंडास येणें-१ तारुण्यावस्था प्राप्त होणें (लग्न झालेली स्त्री, तरुण मुलगा इ॰). २ फल देण्याच्या स्थितीस येणें. हातापायांचा चौरंग होणें-पेटके वगैरेमुळें हातपाय आंखडणें. हातापायांचे डगळें होणें- पडणें-मोडणें-अशक्तपणानें अंगास कंप सुटणें; अंग शिथिल होणें. हातापायांचे ढीग पडणें-होणें-भीतीनें, आजारानें अशक्त असहाय्य होणें. हातापायांच्या फुंकण्या होणें- अशक्ताता, निर्बलता येणें. हाता(तीं) पायां(यीं) पडणें- १ गयावया करणें; प्रार्थना करणें. २ शरण जाणें; नम्र होणें; दया याचिणें. हाताबोटावर येणें, हातावर येणें-आतां होईल, घटकाभर्यानें होईल अशा स्थितीस येणें; हस्तगत कबज्यांत, साध्य होण्याच्या अगदी बेतांत असणें. हाताला चढणें-प्राप्त होणें. 'संसार कशाचा जरि न हाताला चढली ।' -राला ११२. हाताला येईल तें-जें कांहीं हातांत सांपडेल तें; ज्याचेवर हात पडेल तें. हाताल लागणें-गमावलेल्या, फुकट गेलेल्या, नासलेल्या, बिघडलेल्या वस्तूंतून अल्प अंश मिळणें. 'कापडांत पैसें घालूं नका, त्यांतून हाताला कांहीं सुद्धां लागणार नाहीं.' हाताला वंगण लावणें-लांच देणें. -राको १३३७. हाताला हात लावणें-१ पति पुण्याहवाचनादि धर्मसंस्कारास बसला म्हणजे पत्नीनें त्याच्या हातास नुसता हात लावणें (म्हणजे तिलाहि त्याचें फळ मिळतें). २ स्वतः कांहीं न करतां दुसर्यानें केलेल्या कामाच्या फळांत वांटेकरी होणें; दुस- र्याच्या कार्याला अनुमति देणें. हातावर असणें-पूर्णपणें साध्य असणें. हातावर घेणें-आणणें-काढणें-तारण, गहाण न ठेवतां पैसे उसनें आणणें, काढणें, घेणें. हातावर तुरी देणें-देऊन पळून जाणें-हातावर हात देऊन-मारून पळणें-पळून जाणें-फसविणें; डोळ्यादेखत फसवून पळून जाणें; देखत देखत भुल- विणें. 'सुभद्रा काबीज करण्यासाठीं श्रीकृष्ण परमात्म्याच्या मदतीनें बलिरामाच्या हातावर ज्या तुरी दिल्या... तें पाहून तरी आम्हांस कधीं विषाद झाला आहे काय ?' -आगर. हातावर दिवस काढणें-लोटणें-मोठ्या कष्टानें संसार चालविणें. हातावर धरणें-हातांवर संभाळीत राहावयास लावणें (मुलीनें). 'यानें मला सकाळपासून हातावर धरिलें.' हातावर पाणी पडणें- भोजनोत्तर आंटवणें. 'हातावर पाणी पडलें कीं चालला बाहेर.' हातावर पिळकणें-लांच देणें. हातावर पोट भरणें-संसार करणें-अंगमेहनत, भिक्षा, नौकरी करून उपजीविका करणें. हातावर मिळविणें-मिळवावें व खावें अशा स्थितींत राहणें. हातावर येणें-जवळ येऊन ठेपणें. हातावर येणें-लागणें- दूध देऊं लागणें-थानास वासरूं न लावतां किंवा पान्हवण (सरकी इ॰) पुढें न ठेवतां जनावरानें दूध देणें, पान्हवणें. हातावर शीर घेऊन असणें-कोणतेंहि धाडसाचें कृत्य कर- ण्यास सदां सिद्ध असणें. हातावर हात चोळणें-रागानें तळ- हात एकमेकांवर घासणें; चरफडणें. 'इंद्रें स्वतातघातक पाठीसीं घातला म्हणोनि करें । कर चोळी...' -मोआदि ७.४०. हाता- वर हात मारणें-१ एखादी गोष्ट, सट्टा इ॰ पटला म्हणजे दुस- र्याचे हातावर आपला हात मारणें. २ वचन देणें. हातास हात लावणें-(देणार्याच्या, घेणार्याचे हातास स्पर्श होणें) द्रव्यलाभ होणें. हातास-हातां-हातीं चढणें-प्राप्त होणें. 'तो किल्ला माझ्या हातीं चढला.' 'नवनींत मंथनावांचून । हातां न चढे सहसाहि ।' हातीं धरणें-१ स्वतःच्या देखरेखीखालीं घेणें; एखाद्यास आपल्या आश्रयाखालीं घेणें. २ निरंकुशपणें मोकाट सोडणें (जीभ, तोंड, पोट इ॰ इंद्रियें). हातीं धोंडे घेणें-१ विरुद्ध उठणें. २ वेड्यासारखें करणें. हातींपायीं (अन्न इ॰) डेवणें-धावणें-येणें-रेवणें-जाड्य, सुस्ती येणें; शिव्या देण्यास तयार होणें. हातींपायीं उतरणें-सुटणें-मोकळी होणें-सुखरूपपणें बाळंत होणें हातींपायीं पडणें, लागणें- अतिशय विनवण्या, काकुळत्या करणें. हातीं भोपळा घेणें- देणें-भिक्षा मागणें, मागावयास लावणें. आडव्या हातानें घेणें-१ चोरून; चोरवाटेनें घेणें. २ झिडकारणें; भोसडणें; तुच्छता दाखविणें; कचकावून खडकाविणें; मारणें. आडव्या हातानें घेणें, चारणें-बाजूनें, तोंडांत हात घालून खाऊं घालणें; औषधोपचार करणें (घोडा इ॰स). (देणें-चोरून देणें-मारणें- मागल्या बाजूनें मारणें-ठोकणें). एका हाताचीं बोटें पण सारखीं नाहींत-सारख्या परिस्थितींतील माणसें असलीं तरी त्यांच्यांत थोडाफार फरक असतो. दोहों हाताचे चार हात करणें-होणें-लग्न करणें, होणें या हाताचे त्या हातावर- क्रिवि. ताबडतोब; जेव्हांचे तेव्हांच (दुष्कृत्याची फेड लवकर व खात्रीनें मिळते या अर्थीं). या हाताचें त्या हातास कळूं न देणें-अत्यंत गुप्तपणें करणें. रिकाम्या हातानें-जरूं- रीच्या साधनां-उपकरणां-सामग्रीखेरीज; कांहीं काम न करतां. याचा हात कोण धरीसा आहे ? -याच्या वरचढ, बरो- बरीचा कोण आहे ? याचा हात धरण्याची शक्ति कोणास आहे ? हातांत काय तागडू मिळाला-(व) कोणता फायदा झाला ? हातांत नारळाची आई (नरोटी) देणें-भिक्षा मागावयास लावणें. सामाशब्द- ॰अनार-पु. शोभेच्या दारूचा एक प्रकार. ॰इंद-न. (कों.) खेंकडे पकडण्याचें जाळें. ॰उगावा-पु. १ एखाद्या किचकट, अडचणीच्या कामांतून, धंद्यांतून अंग काढून घेणें. २ सूड; पारिपत्य. (क्रि॰ करणें). ३ कर्जाची उगराणी; घातलेलें भांडवल परत मिळविणें. [हात + उगवणें] ॰उचल-स्त्री. १ पेढींतून स्वतःची रक्कम आतां थोडी मग अशा रीतीनें खर्चण्यास घेणें. २ मूळ भांडवल; मुद्दल. उचल मध्यें पहा. ॰उचला-वि. १ आप- खुषीनें, हात उचलून दिलेला (पदार्थ). २ ज्याचा स्वतः करण्याबद्दल पत्कर घेतला आहे असा (व्यवहार, उद्योग). ॰उसना-ना-वि. थोडा वेळ उसना घेतलेला; लवकर परत करण्याच्या बोलीनें आणलेला (त्यामुळें लेख इ॰ लिहून न घेत दिला-घेतलेला). ॰उसणें-नें-न. थोड्या मुदतींत परत कर- ण्याच्या बोलीनें (लेख करून न देतां) उसनी घेतलेली रक्कम. ॰कडी-स्त्री. हातांतील बेडी. 'मन सिंतरील विवेकासीं । यालागी हात कडिया दोहींसीं ।' -एभा २३.९५१. ॰कर- वत-पुस्त्री. हातानें चालविण्याची लहान करवत. ॰करवती- स्त्री. लहान हात करवत. ॰करीण-स्त्री. अचळाला हात लावतांच (वासरूं न सोडतां किंवा आंबोण न ठेवतां) पान्हा सोडून दूध देणारी गाय; म्हैस. इच्या उलट पान्हावणकरीण. ॰कापें-न. (गो.) लांडी, बिन बाह्यांची बंडी. ॰काम-न. हस्तकौशल्याचें काम (यांत्रिक कामाच्या विरुद्ध); हस्तव्यवसाय. (इं.) हँडफ्रॅक्ट. ॰कैची-कचाटी- स्त्री. आलिंगन; मिठी. ॰खंड-वि. १ मधून मधून कामांत सोडवणूक करणारा; मदतनीस (मूल, मित्र, शेजारी); अडल्या वेळीं आपल्या कामीं उपयोगी पडणारा. २ हात खंडा पहा. [हात + खंड = खळ, विसावा] ॰खंडा-वि. निष्णात, करतलामलकवत् असलेली; म्हणाल त्यावेळीं तयार (विद्या, कला). ॰खर्च-पु. किरकोळ खर्च; वरखर्च. ॰ख(खं)वणी- स्त्री. लहान खवणी. ॰खुंट-खुंटा-पु. (विणकाम) वशारन पसरलेल्या लांबीपाशीं असलेल्या समोरच्या खांबापासून मागा पाशीं बसण्याच्या जागेजवळ उजवीकडे दोरी बांधावयाची खुंटी. ॰खुरपणीचें लोणी-न. हातखुरप्या नारळाचें खोबरें. ॰खुरपा-वि. हातानेंच आंतील खोबरें खरवडून काढण्याजोगा (कोंवळा नारळ). ॰खुरपें-न. १ हातखुरपा नारळ. २ गवत काढण्याचा लहान विळा. ॰खे(खो)रणें-न. कलथा; उलथणें; झारा. (क्रि॰ लावणें-अन्नास, पैक्यास = पैका उकळण्याचा सपाटा). म्ह॰ हातखेरणें असतां हात कां जाळावा. ॰खेवणें-न. १ हातवल्हें. २ मदतनीस; हाताखालचा माणूस. ॰खेव्या-व्या-पु. हातखेवणें अर्थ २ पहा. ॰खोडा-पु. हात अडकविण्याचा सांपळा. 'चंद्रसूर्याचा हातखोडा । काळा कैसेनि घालिजे ।' -भाए ५४९. ॰गाडी-स्त्री. हातानें ढकलून चालविण्याची गाडी. ॰गुंडा-धोंडा-पु. १ हातानें फेकण्या-उचलण्या-जोगा दगड. 'कुश्चीतभावाचे हातगुंडे ।' -ज्ञाप्र २६५. २ असला दगड हातानें जेथवर फेंकला जाईल तितकें अंतर. ॰गुण-पु. (बरेंवाईट करण्याचा योग, गुण) नशीब; हातीं (काम, माणूस) धरणाराचा प्रारब्धयोग. हस्तगुण पहा. ॰घाई-स्त्री. १ हातानें वाजवावयाचें वाद्य जोराजोरानें, आवेशानें वाजविणें. २ (ल.) उतावळेपणा; जोराची हाल चाल. (क्रि॰ हातघाईवर, हातघाईस येणें-मारामारी करणें). ॰चरक-पु. १ हातानें फिरवून रस काढावयाचा चरक. २ हात घाणी. ॰चलाख-वि. चोर; उचल्या. ॰चलाकी-खी-स्त्री. हस्तचापल्य; लपवाछपवी; नजरबंदीचा कारभार (गारुडी, सराफ इ॰ चा). ॰चाळा-पु. १ हाताचा अस्थिरपणा; चुळबुळ; हातानें कांहीं तरी उगीच करीत रहावें अशी लागलेली खोड; हातचेष्टा. (क्रि॰ लागणें). २ अशा प्रकारानें होणारें नुकसान. (क्रि॰ करणें). ३ सदोदित हात गुंतलेला असणें; त्यांत निमग्न असणें (वाढता धंदा, व्यापार, खेळ इ॰ त); देवघेवीचा मोठा उद्योग. ॰चिठी-चिटी-ट्टी-स्त्री. १ अधिकार्यानें शिक्का- मोर्तब न करतां आपल्या हातच्या निशाणीनेंच पुरी केलेली चिठी, हुकूम. २ कोणाहातीं पाठविलेली चिठी-चपाटी. ॰चे हातीं- च्या हातीं, हातोहातीं-किवि. लेगच; ताबडतोब; आतांचे आतां; क्षणार्धांत पटकन् (करणें, घडणें). 'ही गडी हाताचे हातीं जाऊन येईल.' 'हाताचे हातीं चोरी-लबाडी-शिंदळकी' इ॰. ॰चोखणें-चुंफणें-न. तान्ह्या मुलास चोखण्यासाठीं हातांत देण्याची वस्तु. ॰जतन-स्त्री. हातानें केलेली मशागत (मालीस इ॰); रोज वक्तशीर घेतलेली काळजी. 'हा घोडा नुसत्या हातजतनानें इतका हुशार आहे.' ॰जुळणी-स्त्री. (ठाकुर) लग्न लागल्यानंतर मुलानें मुलीचे दोन हात धरणें. -बदलापूर १३८. ॰झाड-स्त्री. आपोआप उगवलेलें नसून मुद्दाम लाविलेलें झाड. ॰झाडणी-स्त्री. राग, तिरस्कार इ॰ नें हात झटकणें. ॰झालणा-पु. हातजाळें; हातविंड. ॰झोंबी-स्त्री. परस्परांचे हात धरून केलेली झटापट; हिसकाहसकी; झगडा. ॰तुक-न. १ हातानें वजन करणें. 'नव्हती हाततुके बोल ।' -तुगा ३४२३. २ अटकळ; अजमास. 'मग त्यागु कीजे हात- तुकें ।' -ज्ञा १८.१३१. ॰दाबी-स्त्री. लांच. 'मालकानें हात- दाबी केली म्हणजे माल त्यांना परत देतात.' -गुजा ६७. ॰धरणें-न. (खा.) सोधणें; स्वयंपाकघरांतील भांडीं उतरणें इ॰ चें फडकें. ॰धरणी माप-न. माप भरतांना त्याचे शेवटास डावा हात धरून, मापापेक्षां थोडें जास्त धान्य घेऊन केलेलें माप. बोटधरणी माप पहा. ॰धुणी-स्त्री. १ राजाच्या हात- धुणारास दिलेलें इनाम इ॰. २ स्वयंपाकघरांतील मोरी. ॰धोंडा- पु. १ हातानें उचलण्याजोगा धोंडा. २ धोंडा हातानें फेंकला असतां जेथवर जाईल इतकें अंतर; टप्पा. ॰नळा-पु. हातांत धरून सोडण्याचा, शोभेची दारू भरलेला नळा. ॰नळी-स्त्री. चपटें कौल. ॰निघा-गा-हातजतन पहा. हातजपणूक. ॰नेट- क्रिवि. १ (व.) हाताचा जोर, भार देऊन. २ (व.) हाता- जवळ. ॰पडत-पात-वि. हातीं असलेलें; अगदीं जवळ असणारें; लागेल त्यावेळीं ताबडतोब मिळणारें. ॰पहार-स्त्री. हातभर लांबीची पहार. ॰पा-हातोपा-पु. अंगरखा इ॰ ची बाही. ॰पाटिलकी-स्त्री. १ हातानें ठोकणें; चोपणें, बदडणें. तोंड- पाटिलकीचे उलट. २ बोलण्यापेक्षां प्रत्यक्ष कृति, काम. 'तोंड- पाटिलकी सगळ्यांस येते हातपाटिलकी कठीण.' ३ हस्तचापल्य; उचलेगिरी. ॰पाणी-न. १ लग्नांत रासन्हाणीचे वेळीं वधूच्या सासूनें तिचे हातांवर ओतावयाचें पाणी. (क्रि॰ घालणें). २ लग्नांत मांडव परतण्याचे दिवशीं सासूनें सुनेची बोहोल्यावर ओटी भरून, किंवा मांडवांत न्हातेवेळीं नवर्यानें केशरी रंगांत बुडवून तिचे हातांत घालवयाची अंगठी. ३ लग्नांत मुलाच्या हाताखालीं मुलीचा हात ठेवून त्यांवर समंत्रक पाणी घालणें. -बदलापूर २०५. ॰पान-पु. कोंका पडण्यापूर्वींचें केळीचें पान. ॰पान्हा- पु. हातकरीण गाय, म्हैस इ॰ नें सोडलेला पान्हा (वासरूं किंवा अंबोण दाखविल्याशिवाय). हातपान्ह्यास लगाणें, येणें, हातपान्ह्याची गाय इ॰ प्रयोग. ॰पालवी-स्त्री. हात पोंहो- चेल इतक्या उंचीवरील पाला. ॰पावा-वि. (कों.) हाताच्या आटोक्यांतील, हात पोहोंचेल इतक्या उंचीवरील (वेलीचें फूल इ॰ किंवा खोली-विहिरींतील पाणी इ॰). [हात + पावणें] ॰पिटीं-स्त्री. १ झोंबाझोंबी; गुद्दागुद्दी. २ (ल.) हातघाईची मारामारी. 'तंव राउतां जाली हातपीटी ।' -शिशु ९६८. [हात + पिटणें] ॰पेटी-स्त्री. हातानें भाता चालवून वाजवावयाची बाजाची पेटी; हार्मोनियम. २ सरकारी कामाचे कादगपत्र ठेवण्याची पेटी. -स्वभावचित्रें २४. ॰पाळी-स्त्री. चेंडूफळीचा एक प्रकारचा खेळ. -मखेपु ५६. ॰फळ-न. (बे.) मेर ओढण्याचें फळ. ॰फळी, हातोफळी-क्रिवि. हातोहातीं; लवकर. ॰बळ-न. हस्तसामर्थ्य. 'हातबळ ना पायबळ, देरे देवा तोंडबळ.' ॰बांधून डंकी-स्त्री. (कुस्ती) जोडीदारास खालीं आणल्यावर त्यानें आपला एक पाय धरला तर आपण दुसर्या पायानें जोडीदाराचे पाठीवरून झोंका घेऊन उडी मारून त्यास चीत करणें. ॰बेडी-स्त्री. कैद्याच्या हातांत अडकवावयाची बेडी; हातकडी. ॰बोनें-न. हातांत घेत- लेलें भक्ष्य. 'बुद्धीचेनि शाकें । हातबोनें निकें ।' -ज्ञा ६.२८२. ॰बोळावन-स्त्री. हातांनीं मार्गाला लावणें. 'जाणो नेदी योग्यता । ग्रहीं हातबोळावन करितां ।' -भाए ३४९. ॰भाता-पु. हातांत घेऊन फुंकावयाचा भाता; लहान भाता. ॰भार-पु. मदत; साहाय्य (विशषतः द्रव्याचें). (क्रि॰ लावणें). ॰भुरकणा- भुरका-वि. हातानें भुरकून खावयाजोगा (पेयपदार्थ). ॰भुर- कणें-भुरकें-वरील प्रकारचा पातळ पदार्थ. ॰भेटी-स्त्री. प्रेमानें हातांत हात घालणें. -एभा २८.५९२. ॰मांडणी-स्त्री. पैसे पावल्याची पोंच म्हणून पैसे नेणार्याची खतावणीवर घेतलेली सही. ॰मात-स्त्री. हात टेकणें. ॰मेटी हेटीमेटी-क्रिवि. आळसांत; निरुद्योगीपणानें; हातांवर व गुडघ्यावर टेकून रमतगमत (दिवस इ॰) घालविणें. 'दिवस गेला हातमेटीं चांदण्या खाली कापूस वेटी.' ॰रगाडा-पु. उसाचा हातचरक. ॰रवी-स्त्री. घुसळखांब, मांजरी यांचे विरहित हातानेंट फिरविण्याची लहानरवी. ॰रहाट- पु. हातानें ओढून पाणी काढण्याचा लहान रहाट. ॰रिकामी- स्त्री. विधवा स्त्री. -बजलापूर १७४. ॰रिती-वि. (महानु.) रिकामी विधवा. -स्मृतिस्थळ. ॰रुमाल-पु. १ तोंड वगैरे पुसण्याचा लहान रुमाल. २ नित्योपयोगी कागदपत्रें ठेवण्याच्या दप्तराचा रुमाल; चालता रुमाल; त्यांतील कागदपत्रांचें बंडल. ॰रोखा- पु. दस्तक; चिठी; आज्ञापत्र. 'पाराजीपंत वाघ यांस हातरोखा वरचेवर पाठवून अति आग्रहें अंतरवेदींत घालविलें.' -भाव १०२. ॰लाग-पु. हाताचा टप्पा. ॰लागास-लागीं येणें-असणें- कक्षा, आंवाका, आटोका, अवसान इ॰ त येणें, असणें. ॰लागा- लाग्या-वि. अनुकूल असणारा. 'तुमचे हातलागे लोक असतील.' -वाडबाबा १.६. ॰लावणी-स्त्री. १ वेश्येचा चिरा उतरणें; कौमार्यभंग. (क्रि॰ करणें). २ हाताची पेरणी; लागवण. -वि. हातपेरणीचें. ॰लावा-व्या-वि. हाताळ; चोरटा; चोरी करण्या- साठीं हात फुरफुरत असलेला. ॰वजन-न. १ जिन्नस हातांत घेऊन केलेलें वजन. २ अशाप्रकारें वजन काढण्याची लायकी. ॰वटी- हातोटी-स्त्री. १ हस्तकौशल्य; हस्तचातुर्य. २ (सामा.) कसब; नैपुण्य; चलाखी. 'अहो चंद्रकांतु द्रवता कीर होये । परि ते हात- वटी चंद्री कीं आहे ।' -ज्ञा ९.२९. ३ विशिष्ट पद्धत, रीत, प्रकार. [हिं.] भाषणाची-पोहण्याची-व्यापाराची इ॰ हातोटी. ॰वडा- हातोडा-पु. सोनार, कासार इ॰ चें ठोकण्याचें हत्यार. ॰वडी हातोडी-स्त्री. लहान हातोडी. ॰वणी-न. १ हात धुतलेलें पाणी. २ (कों.) हातरहाटाचें पाणी पन्हाळांतून जेथें पडतें तेथील जमीनीचा उंच केलेला भाग; हातणी. ॰वल्हें-न. हातानेंच वल्हवावयाचें लहान वल्हें. ॰वश-वि. हस्तगत. ॰वशी-स्त्री. हात उगारणें. -शर. ॰वळा, हातोळा-पु. हातवटी पहा. म्ह॰ गातां गळा; शिंपता मळा, लिहितां हातवळा. ॰वारे-पु.अव. हातानीं केलेलें हावभाव; हाताची हालचाल. ॰विंड-न. (राजा.) हाता झालणा पहा. ॰विरजण-न. अजमासानें घातलेलें विरजण ॰विरजा-विरंगुळा-वि. कामांत मदत करण्याच्या लायक, लायकीस झालेला (पुत्र, शिष्य, उमेदवार इ॰) [हात + विरजणें] ॰शिंपणें-न. सोडवणी न देतां शेलणें इ॰ साधनानें भाजी- पाल्यास उडवून द्यावयाचें पाणी; असें पाणी शिंपणें. ॰शेकणें-न. (उसाचा चरक) चुलाण्यांत जाळ घालणारास त्याच्या मेहनती बद्दल द्यावयाचा गूळ. ॰शेवई-स्त्री. हातानें वळलेली शेवई; याचे उलट पाटशेवई. ॰सर-न. बायकांचा हातांतील एक दागिना, गजरा. 'हे पाटल्या हातसरांस ल्याली ।' -सारुह ६.२६. ॰सार- वण-न. खराटा, केरसुणी न घेतां हातानें जमीन इ॰ सारवणें. ॰सुख-न. १ दुसर्यास, शत्रूस हातानें मारूंन त्यामुळें अनुभवि- लेलें सुख (क्रि॰ होणें). २ हातानें दिलेला मार. ॰सुटका-स्त्री. १ एखाद्या व्यवहारांतून, धंद्यांतून स्वतः अंग काढून घेणें; मोकळें होणें. २ हातविरजा पहा. ३ हाताचा सढळपणा. ॰सुटी-स्त्री. औदार्य. 'हे हातसुटीक्षीरसागरा । वांचौनि नाहीं ।' -भाए ७६९. ॰सुतकी-स्त्री. पाथरवटाचें दगड फोडण्याचें हत्यार. ॰सूत-न. चातीवर हातानीं काढलेलें सूत. ॰सोकी(के)ल-सोका-वि. हाताच्या संवयीचा; अंगाखांद्यावर घेण्यास संवकलेला. 'केल कुत्रा हातसोंका ।' 'घडो नेदि तीर्थयात्रा.' -तुगा २९५४. ॰सोडवण-नस्त्री. हातसुटका अर्थ १,२ पहा. ॰सोरा-र्या सुरा-र्या-पु. कुरड्या इ॰ करण्याचा सांचा. ॰हालवणी-स्त्री. प्रवाशांवरील एक जुना कर (त्यांच्या हात हालवण्याच्या क्रियेबद्दल हा कर असे). हातचा-वि. १ हातानें दिलेला; स्वाधीनचा; हातांतला; हातानें निर्मिलेली, मिळविलेली, दिलेली (वस्तु, काम, उत्पादन इ॰). 'शुद्राचे हातचें पाणी स्नानसंध्येस घेऊं नये.' 'रोग्यास औषध देणें मनुष्याच्या हातचें आहे-आयुष्य घालणें नाहीं.' २ (अंकगणित) पूर्णांकाची बेरीज करतांना बेरजेच्या संख्येंतला अंक ज्या स्थानाचा त्या स्थानीं मिळविण्याकरितां उरलेला अंक. (क्रि॰ येणें; रहाणें; ठेवणें). ३ लवकर हातीं येणारें; अवसानांतील. ४ ताब्यांतील; कबजांतील. म्ह॰ 'हातचें सोडून पळत्याचे पाठीस लागूं नये.' ॰चा पाडणें-१ हातां- तील सोडणें. २ एखाद्यास त्याचे ताब्यांतील वस्तू्स मुकविणें. ॰चा-धड-नीट-वि. नीटनेटकें काम करणारा (लेखक, कारागीर). ॰चा फोड-पु. फार प्रिय माणूस. तळहाताचा फोड पहा. ॰चा मळ-पु. सहज घडणारी गोष्ट. 'सरळ, सोपी आणि बालिकाबोध भाषा कशी वापरावी हें म्हणजे माझ्या हाताचा मळ आहे.' -कीच. ॰चा सुटा-वि. सढळ हाताचा. हातवा-पु. १ (बायकी) गौरीपूजनाचे सणांत हळदीकुंकवानें हात भिजवून जमिनीवर छाप मारणें. २ लग्नांत नवर्याच्या मिरवणुकीच्या मागें धरावयाचा कणकेचा दिवा. ३ घोड्याचा खरारा, साफ करण्याचा काथ्याचा पंजा. ४ काडवात मनको. ५ (कर्हाड) न्हाणवली बसवितांना, मखर बांधावयाचे ठिकाणीं, कुंकू पाण्यांत भिजवून हातानें पांच उलटे पांच सुलटे ठसें उठविणें. हातळ, हाताळ-ळु-वि. चोरण्याची संवय असलेला; चोर; भामटा. हातळणें, हाताळणें-उक्रि. १ हात लावणें; चोळ- वटणें; चिवडणें, २ हाताळ माणसानें वस्तू् चोरणें. हातळी, हाताळी, हाताळें-स्त्रीन. १ घोड्याचा काथ्या इ॰ चा खरारा. २ भात्याची बोटांत, हातांत अडकवावयाची चामड्याची वादीं. ३ (कर.) भाकरी. हाता-पु. हातांत राहील इतका जिन्नस, पसा (फळें, फुलें इ॰ पांच-सहा इ॰ संख्येचा संच एकेक वेळ हातांत घेऊन बाजूस ठेवतात). हाताखालचा-वि. १ मदतनीस; हाता- खालीं काम करणारा. २ उत्तम परिचयाचा; माहितींतील. ३ हातां- तील; कबज्यामधील; स्वाधीन. ४ दुय्यम; कमी दर्जाचा. हाता- खालीं-क्रिवि. १ सत्तेखालीं; दुय्यम प्रतींत. २ स्वाधीन. ३ जातांजातां; हातासरशीं; सहजगत्या. 'मी आपला घोडा विका वयास नेतोंच आहे, मर्जीं असली तर हाताखालीं तुमचाहि घोडा नेईन आणि विकीन.' हाताचा उदार, मोकळा, सढळ- वि. देणगी इ॰ देण्यांत सढळ. हाताचा कुशल-वि. हस्त कौशल्यांत निपुण, प्रवीण. हाताचा जड-बळकट-थंड-वि. १ चिक्कू; कृपण. म्ह॰ हाताचा जढ आणि बोलून गोड. २ मंद (लेखक). हाताचा जलद-वि. काम करण्यांत चलाख हाताचा फटकळ-वि. फटाफट मारणारा; मारकट. हाताचा बाण-पु. वर्चस्व, पगडा, वजन पाडणारें कृत्य, गोष्ट (क्रि॰ गमावणें; दवडणें; सोडणें). हाताजोगता-वि. १ हातांत बसेल; मावेल; धरतां येईल असा. २ हात पोहोचण्याजोगें. हाता- निराळा-वेगळा-वि. १ पूर्ण; पुरा; सिद्ध केलेला; पुन्हां हात लावण्याची जरूरी राहिली नाहीं असें (काम, धंदा इ॰). 'हा दुर्निवह कोश एकदां हातानिराळा झाला म्हणजे दुसरें काम घेतां येईल.' २ -क्रिवि. एकीकडे; बाजूस. 'कामापुरती भांडीं वहिवाटींत ठेवा वरकड हातानिराळीं ठेवा.' हातापद्धति-स्त्री. दलाल माल घेणार्याच्या हातावर रुमाल टाकून गुप्तरीतीनें मालाची किंमत माल घेणार्याकडून अजमावतो ती पद्धत. हाताची थट्टा-स्त्री. थट्टेंनें मारणें (थापटी इ॰); चापट देणें. (तोंडी थट्टा नव्हे्). हाता(तो)फळी-स्त्री. गुद्दागुद्दी; मारामारी; कुस्ती; हातझोंबी; धक्काबुक्की. 'मजसीं भिडे हातोफळी ।' -ह १९.१४३. -क्रिवि. पटकन्; चट्दिशी; तत्काळ; हातावर हात मारून. [हात + फळी] हातावरचा संसार-हातावरचें पोट-पुन. मजुरी, कामधंदा करून स्वतःचें कसेंतरी पोट भरणें (क्रि॰ करणें; चालविणें) थोड्या पगाराची, कष्टाची नोकरी करून उदरनिर्वाह. हातावीती- क्रिवि. हातोहात पहा. 'सर्वज्ञ हातावीती पुढें जाती ।' -पुच. हातासन-न. हातवटी. 'अन्योपदेशाचेनि हातासनें ।' -ज्ञा ६.११९. हातासरसां-क्रिवि. त्याच हातानें, प्रकारानें; तसेंच; त्याच बरोबर; चालू कामांत आहे तोंच. 'उष्टी काढतो आहेस तों हातासरशीं भांडीं घास मग हात धू.' हातिणें-अक्रि. मारणें. -मनको. हातिवा-स्त्री. काडवात. 'उजळोनि दिव्य तेजा हातिवा ।' -ज्ञा १६.२३. हातुवसीया-विय एक हात अंतरा- वरील. 'हातवसिया कळागंगा पार्वती ।' -धवळे ३१ हातोणी- स्त्री. (व.) खरकटें पाणी; हातवणी. हातोपा-हातपा पहा. हातोपात-ती-क्रिवि. एका हातांतून दुसर्या हातांत. वरचेवर; हातोहात. -ज्ञा १८.१५६. हातोरी-क्रि. (ना.) हातानें; साहा- य्यानें. हातोवा-पु. (महानु.) अंजली; ओंजळ. 'हातोवा केवि आटे अंभोनिधि ।' -भाए २१७. हातोसा-पु. मदत; हातभांर. (क्रि॰ देणें), हातोहात-ती-क्रिवि. १ हातचेहातीं; हातोपात. २ चटकन्; भरदिशीं. (क्रि॰ येणें = मारामारी करणें). 'हिंवांळ्याचे दिवसांत दुपार हातोहात भरतें.' हातोळा-हात- वळा पहा. हातोळी-स्त्री. (व.) लग्न. हात्या-पु. १ पाणर- हाटाचा दांडा. २ घोडा घासण्याची पिशवी; खरारा. हाताळी अर्थ १ पहा. ३ मागाच्या फणीची मूठ. ४ काहिलींतील गूळ खरवड- ण्याचें खुरपें. ५ (कर.) मोठी किल्ली.
आदिमळ
पु. सृष्टिरचनेच्या वेळी मायेच्या तमोभागातून बाहेर पडल्यावर जीवाने लावून घेतलेला मळ : ‘तैसा परमेश्वरप्रवृत्ती जीवासि आदिमळु लागला असे’ − दृपा १९.
अमेध्य
वि. १. हवन करण्यास अयोग्य; अपवित्र; घाणेरडे; कुजके; बिघडलेले (अन्न, वस्त्र इ.) : ‘मग केवळ ये देह खोडा । अमेध्योदकाचा बुडबु़डा ।’ – ज्ञा १६·३१७. २. विष्टा; मल. [सं.]
अमेध्य
वि. अप. अमेद्य-शर. १ हवन करण्यास अयोग्य; अपवित्र; घाणेरडें; कुजकें; बिघडलेलें (अन्न. वस्त्र इ.) 'मग केवळ ये देह खोडां । अमेध्योदकाचा बुडबुडा ।' -ज्ञा १६.३१७.२ विष्टा; मल; गू. [सं.]
अमल
पु. १ मलरहित; शुद्ध; स्वच्छ. 'उघडी अमल राजीव- नयन ।' -रावि ६.२४८. २ आवळी; शिकेकाई; खडीसाखर. [सं. अ + मल]
अंधळ्यांची माळका or माळ
अंधळ्यांची माळका or माळ andhaḷyāñcī māḷakā or māḷa f A string of blind men. 2 fig. A line or long succession of the ignorant and foolish.
आंत्रावरोध
पु. यात आतड्यातील मल नेहमीप्रमाणे ढकलला जात नाही; आतड्यांत मलोत्सर्जनात उत्पन्न झालेला अडथळा. [सं.]
आंत्रावरोध
पु. एक रोग. यांत आतड्यांतील मल नेहमीं- प्रमाणें ढकलला जात नाहीं. आतड्यांत उत्पन्न झालेला अडथळा. [सं.]
अपान
पु. १ पंचप्राणापैकीं दुसरा, अधोगामी वायु; हा गुद- प्रदेशीं राहतो; पाद. 'मग अपानाग्नीचे मुखीं । प्राणद्रव्यें देखीं ।' -ज्ञा ४.१४५. 'कंठीं उदान गुदीं अपान ।' -दा १७.८.१२ 'प्राणपानांची चुकामुकी । जाहली होती बहुकाळ कीं ।' -एभा ९. ११८. २ गुरुद्वार ३ आंत येणारा श्वास. -गीर ६७८. (हा अर्थ नेहमींच्या अर्थाहून भिन्न आहे.) [सं.] ॰द्वार न. गुरुद्वार, मल- द्वार. ॰वायु पु. १ गुरुद्वारीं स्थिर झालेला वायु. २ पाद; अपान पहा. [सं.]. ॰रंधद्वय न. शिश्न व गुद. 'अपानरंध्रद्वया-। माझारीं धनंजया ।' -ज्ञा १८.१०३६. 'अपानीं मेखा मारणें' = गांडीत खुंटी ठोकणें, पूर्वीच्या शिक्षांपैकीं एक. 'कानीं खुंट्या आदळती । अपानीं मेखा मारिती ।' -दा ३.७.७३. [सं.]
आपापाचा माल गपापा
आपापाचा माल गपापा āpāpācā māla gapāpā A phrase formed to express the popular sentiment that Property acquired easily is consumed lavishly; agreeing with the Persian
अर्थात्
क्रिवि. १ कारणामुळें; कारणास्तव; अवश्य परिणा- मानें. ओघानेंच; साहाजिकच; आपोआप. 'वस्त्र धुतलें असतां अर्थात मळ जाईलच.' २ वस्तुतः वास्तविक; परिणामीं; अंतीं; फल दृष्टीनें पाहतां. [सं. अर्थ पंचमी विभक्ति]
बेरकट
न. १ वाईट व बेरीच्या योगानें घट्ट झालेलें तेल किंवा तूप. २ बेरी; ओशट पदार्थातील मळ. -वि. बेरी असलेलें; रेंद्याचें; माळानें युक्त (तेल, तूप). [बेरी + कट] ॰णें-अक्रि. समई, दिवा, तेलाचें भांडे इ॰ तेल-तुपांतील बेरीमुळें वाईट होणें; भांडें, दिवा इ॰ वर बेरी बसणें. बेरकूट, बेरकुटणें-बेरकट व बेरकटणें पहा.
बिट्टा
पु. मलविसर्जननाची इच्छा नसतां किंवा प्रयत्न न करतां गुदावाटे भीति, अति कष्ट इ॰ कारणामुळें बाहेर पडलेला मळ. ॰वासणें-ताणणें-मोकळा होणें- बाहेर पडणें- निघणें- १ हगणें. २ (ल.) गाळण उडणें; अति श्रम, भीति इ॰ नीं सुचेनासें होणें, जीव नकोसा होणें, खंगणें इ॰. 'सुपें टोपलीं बिगार वाहतां वाहतां बिट्टा वासला ।' -अफला ६८. [? सं. विष्टा]
बळस-सें
पुन. जन्माच्या वेळीं बालकाच्या, पशूच्या तोंडांतून निघणारा पांढरा व चिकट द्रव; नाकातोंडांतून निघणारा फेंस, मळ. 'विष्टा मूत्र आणि बळस ।' -दा ३.५.४४ [का. ?] बळसट-न. १ घट्ट कफ; चिकट रक्ताचा सकळां. २ कोणताहि आजार, रोग, साथ इ॰ मिरवणूक कडून गांवाच्या वेशीबाहेर पोंचविणें.
बुळका,बुळकां(कं-कुं)डी, बुळक-की
पुस्त्री. १ अतिसारामुळें एकदम व आपोआप बाहेर पडणारा पातळ मळ; हगवण. २ फुटलेल्या किंवा फाटलेला पत्रातून, बारदानांतून बाहेर पडत असलेल्या पदार्थाची धार. ३ गुरांचा एक स्पर्शजन्य रोग, पटकी, देवी इ॰ [बुळकण]
बुरा,बुरू
वि. १ वाईट. विशेषतः मला ह्या शब्दाबरोबर योजतात.'भल्या बुर्या मारी । होतां कोणी न विचारी ।'-तुगा ३७४०. २ (चुकीनें उपयोग) बुळा; नपुंसक. ३ कृतघ्न. 'नाना वसो घातला चारू । माथां तुरंबिला बुरू । '-ज्ञा १७.२८१. ४ बुरशी; साका; कीट; मळ. [हिं.] बुराई, बुरेपणा-स्त्रीन. वाईटपणा. विशेषतः भलाई, भलेपणा ह्या शब्दाबरोबर योजतात.
बुरशी-सी
स्त्रीपु. १ दमटपणामुळें पदार्थावर होते ती सूक्ष्म वनस्पतिरूप वाढ; बुरा; केनशी; केंडशी; भुरी. (क्रि॰ येणें; चढणें). २ दांतांवरील किटण. [सं.बुरा] बुरशेल-ला-वि. १ ज्याला बुरशी आली आहे असा; बुरसलेला. २ (ला.)घाणेरडा; ओंगळ; गचाळ (मनुष्य.)बुरसटणें-अक्रि. घाणेरडें, ओंगळ होणें (विशेषतः तोंड, शरीर). बुरसणी-स्त्री. बुरसणें; बुरशी येणें, बुरसणें, बुरसावणें, बुरशेणें-अक्रि. १ बुरशीनें युक्त होणें; बुरा येणे. २ साका चढल्यामुळें जीभ, कीट चढल्यामुळें दांत घाणेरडे होणें, असणें. [बुरशी] बुरसा-पु. १ बुरशी; केनशी; भुरी; घाण. २ बुरशीमुळें पडणारा डाग. ३ आरशावरील पारा गेल्यामुळें झालेला कांचेचा उघडा भाग. -वि. घाणेरडा; ओंगळ; गचाळ. बुरसाविणें-सक्रि. १ मळ बुरशी, कीट साका, इ॰ नीं (अंग, भांडें, जीभ, दांत इ॰)युक्त करणें. २ हिडीस, ओंगळ दिसें असें करणें. 'हा स्नान करतांना आंग चोळावें तें चोळीत नाहीं, बुरसावून मात्र येतो.'[बुरसा]
बुरूस
पु. डोळ्यांतील मळ, चिपडें, गू. [बुरसा?]
भेरड
न. डोळ्यांतींल गू, मळ.
भस्म
न. १ राख; रक्षा; विभूति. २ वैद्यकक्रियेनें धातूची केलेली रक्षा. [सं.] ॰क रोग-पु. यांत कफ क्षीण झाला असतां स्वस्थानीं वाढलेलें पित्त वाताला अनुसरून जठराग्नीला अत्यंत वाढवितें. तहान, दाह, मूर्च्छा, भोंवळ, खोकला, सूज; मळ, शुष्क होणें, मोह व श्रम हीं लक्षणें होतात. -योर १.४८२. [सं.] भस्मणें-अक्रि. (काव्य) भस्म होणें. 'भस्मासुर भस्मला हे मात ।' सामाशब्द- ॰कोथळा-पु. १ (ल.) जंगी प्रमाणांत, अरबट चरबट अन्न गडप करणारें पोट. २ खादाड, अधाशी मनुष्य. ॰रंग-रंगी- वि. भस्माच्या रंगाचा; भस्मी. ॰रोग-पु. कितीहि खाल्लें तरी क्षुधा शान्त होत नाहीं असा रोग; जेवढें खावें तेवढें भस्म व्हावें पण अंगीं लागूं नये असा रोग. ॰रोगी-वि. १ भस्मरोगानें पीडिलेला. २ (निंदेनें) पुष्कळ खाऊनहि किडकिडीत आणि रोगीच राहणारा. ३ सदा रोगी असलेला. [सं.] ॰वर्ण-वि. भस्माच्या रंगाचा. [सं.] ॰सात्-क्रिवि. भस्माप्रमाणें; भस्माच्या स्थितींत, स्थितीस. (क्रि॰ करणें; करून टाकणें; होणें). [सं.] ॰सात् करणें-सक्रि. जाळून राख करणें. ॰स्नान-न. पाण्याच्या अभावीं शरीराला भस्म चोळणें. जेथें वैद्यशास्त्ररीतीनें जलस्नान निषिद्ध केलें आहे तेथें स्नानाचा गौणकल्प. [सं.] भस्मासुर- पु. १ सर्वांस जाळून टाकण्याची शक्ति असलेल्या एका दैत्याचें नांव. 'तरी काय मी भस्मासुरु । अर्जुन म्हणे ।' -ज्ञा २.३८. -वि. विध्वंस करणारा. ३ (ल.) अतिशय खादाड. [सं.] भस्मी- वि. १ भस्माच्या रंगाचा. २ सोनेरी कलाबतूच्या नक्षीनें अलंकृत (शेला, पागोटें इ॰ पोशाख). भस्मीकरण-न. (रसा.) एखाद्या द्रव्याचें भस्मांत रूपान्तर करणें. [सं.] भस्म्या-वि. (निंदेने) कितीहि खावयास घातलें तरी लठ्ठ होत नाहीं, अंगी लागत नाहीं असा; ज्याचें पोट भरत नाहीं असा (मनुष्य); भस्मरोगी. भस्म्या रोग होणें-अक्रि. अति खादाडपणा करणें.
भस्रा
(सं) पु० भाता, वाऱ्याचें साधन. २ भरभरीत मल, भसरा.
चिकटा
पु. १. केसांना, कातडीला चिकटून आलेला मळ; केसांचा चिकटपणा. २. पावसाची बारीक सर पडल्यावर होणारा जमिनीचा चिकचिकीतपणा. ३. जखमेतून वाहणारा चिकट पू. इ.; गाई, म्हशी इत्यादिकांच्या स्तनांतून येणारा चिकट दुग्धांश. ४. धान्यावर रोगरूपाने येणारा चिकट पदार्थ; बुरशी. ५. दळताना जात्याच्या तळीस चिकटलेले पीठ. ६. रोगट हवेने झाडांना, जनावरांना होणारा रोग. ७. पक्षी पकडण्यासाठी केलेला चिकट पदार्थ. जिभेवर बसतो तो पांढरा साका. (वा.) चिकटा पडणे - पिकांवर पानउवा पडणे. चिकटा, चिकटे
चिकटा
पु. १ केसांस, कातडीस चिकटून असलेला मळ; केसांचा चिकटपणा. २ पावसाची बारीक सर पडल्यावर होणारा जमिनीचा चिकचिकीतपणा. ३ जखमेंतून वाहणारा चिकट पू इ॰; गाई, म्हशी इ॰ कांच्या स्तनांतून येणारा चिकट दुग्धांश. ४ डाळी- वर किंवा धान्यावर रोगारूपानें येणारा चिकट पदार्थ; बुरसा. ५ एक प्रकारचें गवत. ६ दळतांना जात्याच्या तळीस चिकटलेलें पीठ. ७ रोगट हवेनें झाडांना, जनावरांना होणारा रोग. ८ पक्षी पकडण्याकरितां केलेला चिकट पदार्थ. [चिकट] ॰पडणें-क्रि. पिकांवर पानउवा पडणें.
चिकटी
स्त्री. १. केसांतील चिकट मळ. २. घामटपणा; ओंगळपणा. ३. जात्याच्या तळीस पीठ चिकटल्यामुळे जात्यास येणारा चिकटपणा; नव्या धान्याचा चिकटपणा. ४. चिंचोक्याची खळ.
चिकटी
स्त्री. १ केसांतील चिकट मळ. २ घामटपणा; ओंगळपणा. ३ जात्याच्या तळीस पीठ चिकटल्यामुळें जात्यास येणारा चिकटपणा; नव्या धान्याच्या चिकटपणा. ४ चिंचोक्याची खळ.
चिपड
न. डोळ्याला येणारा चिकट पांढरा मळ; डोळ्यां- तील चिकट मळाचा तंतु; तुकडा. 'डोळांनिघतीं चिपडें । नाकीं दटलीं मेकडें ।' -दा ३.१.२१. [सं. चिपिट]
चिपड, चिपडा
न. डोळ्याला येणारा चिकट पांढरा मळ, मळाचा तंतू; तुकडा : ‘डोळा निघतीं चिपडें । नाकीं दाटलीं मेकडे ।’ - दास ३·१·२१.
चिपडा
पु. डोळ्यांतील चिकट मळ, गू, पू. -वि. १ चिकटा आलेला (डोळा). 'पाहों न शकति कोण्ही जन डोळे भानुतें जसे चिपडे ।' -मोअनु १.२७. २ चिपडलेल्या डोळ्याचा; मिचमिच्या डोळ्याचा (मनुष्य). 'चिपडे अमंगळ तीं पोरें । प्रिय कृष्णासी अद्भुत रें ।' -रासक्रीडा २२. [सं. चिपिट]
चिपडें
न. डोळ्यांतील चिकट मळ. [चिपड]
चिरकी
स्त्री. चिरकांडी; जोरानें उडणारी पाण्याची, रक्ताची, रसाची, मूत्राची धार. २ पिचकारी. ३ आंतड्याचा एक विकार, आमांशामुळें थोडा थोडा विसर्जिलेला मळ. [चिरकणें] ॰स येणें-अक्रि. (कों.) थकणें; दमणें; जिकीरीस येणें.
चिरकी
स्त्री. १. पहा : चिळकांडी, चिपळी. २. आतड्याचा एक विकार; आमांशामुळे थोडा थोडा विसर्जिलेला मळ. (वा.) चिरकीस येणे - थकणे; दमणे; जिकीरीला येणे.
चोरीचा माल
चोरीचा माल cōrīcā māla m Stolen goods or a stolen article.
छाट
पु. १ खाप; तुकडा; धांदोटी. २ तोडावयाचा किंवा तोडलेला भाग (पाहिजे असलेला आकार यावा म्हणून). ३ खालीं उरलेला गाळसाळ; निवडून टाकलेला भाग. ४ वर्गीकरण; निवड. 'हीं शंभर मोत्यें सारखीं नाहींत छाट करून प्रती लावा.' ५ (हिं.) वांती.-वि. (ना.) लबाड; धूर्त; धुरंदर. [सं. खंडन; हिं.] ॰छूट-स्त्री. १ छाट अर्थ १ पहा. २ कापणें ढलपा. ३ (ल.) छाटणी. छाटणी- स्त्री. कापणी; तोडण्याची क्रिया. छाट पहा. छाटणें-सक्रि. १ कापणें; तोडणें; भादरणें; कातरणें. २ खुडणें. ३ वर्गवारी लावणें; निवडणें. 'व्यापारी लोक फळें सरसकट घेऊन छाटून विकतात. ४ भट्टींत न घालतां वस्त्र चुबकून धुणें. ५ झटकन कापणें. 'तरवारीनें गळा छाटला.' ६ हलक्या हातानें मळ नाहींसा करणें; झाडणें. ७ कपात करणें (पगार, खर्च यांत). ८ गप्पा मारणें; वादविवाद करणें (गप्पा, राजकीय वर्त- मान). ९ (पाणी वगैरे) शिंपडणें. १० श्वास, दम कोंडून धरणें. ११ कत्तल करणें (सैन्याची). १२ प्रवाहांतील पाण्याची धार हातानें तोडीत पोहणें, या अर्थाचे पुढील शब्दहि आहेत. कत्तल करणें-उडविणें; खांडोळी करणें; लेखण्या करणें; सांकटणें; लोथी, लोदी. पाडणें; खापालणें; गुच्चे पाडणें; सफा उडविणें; (कफ, रोग) छाटणें-या रोगासंबंधी चर्चा करून निदान करणें. [सं. खंडन. हिं छांटना]
छाटणे
सक्रि. १. भट्टीत न घालता वस्त्र चुबकून धुणे. २. हलक्या हाताने मळ काढून टाकणे.
दारुणा
पु० रोगविशेष, मल.
दडा
पु. १. बूच; नाक, कान इ. च्या छिद्रात बसलेला मळ; दट्ट्या; (ल.) अडथळा. २. विश्वास; भरवसा; खात्री; आश्वासन. ३. लपून, छपून बसणे; दडणे : ‘याचा दडा हुजूर राहील.’ – वाडबाबा १७८. (क्रि. मारणे). ४. लपून बसलेली सैन्याची टोळी. ५. (लपून दरोडा घालणारा) पेंढारी. – शास्त्रीको. ६. चेंडू.
दडा
पु. १ बूच; नाक, कान इ॰ च्या छिद्रांत बसलेला प्रति- बंधक मळ; दट्ट्या; (ल.) अडथळा, अवष्टंभ. २ विश्वास; भरोंसा; खात्री; आश्वासन. ३ लपून, छपून बसणें; लपून बसण्याची जागा; दडण. 'याचा दडा हुजूर राहील.' -वाडबाबा १७८. (क्रि॰ मारणें). ४ छपून बसलेली सैन्याची टोळी. ५ (छपून दरोडा घालणारा) पेंढारी -शास्त्रीको ६ चेंडू. [दडणें]
ढेमा
पु. नाकांतील मळ
ढेमा
पु. नाकातील मळ.
धेंडळणे, धेंडाळणे
अक्रि. गुदद्वाराने पातळ मळ वारंवार पडत असल्याने गळून जाणे, थकणे.
ढेर
पु. डोळ्यांतून बाहेर आलेला चिकट मळ; पू.
ढेर
पु. डोळ्यातून बाहेर आलेला चिकट मळ; पू.
ढिला माल
ढिला माल ḍhilā māla m (Slack stuff or material) A term for an effeminate, impotent, or ineffcient person; a poor thing, a poor piece.
धुणी
स्त्री. १ पूर्णपणें धुणें; घासणें; स्वच्छ करणें; धुतलें जाणें; धुपणी. 'सकळ पापा होऊनी धुणी ।' -एभा २.५२८. २ (ल.) निशेःषपणें जाण्याचा व्यापार (शरीर, शेत इ॰ मल, रोग, खत इ॰कांचा); लुबाडणी; नागवण; सफ्फा होणें; नाश. 'कर्माकर्मा धुणी सहजेंचि ।' -एभा ५.४८४. 'अतिसारामुळें शरीराची धुणी झाली.' 'पोरानें रांडछंदास लागून घराची धुणी केली. ' ३ धुण्याची जागा. ४ निवारण; दुष्परिणामाची संकटाची टाळणी; निरसन. 'म्हणे मी तुम्हां न देखिलें मुनी ! वायां शापिलें मजलागुनी । तरी या शापाची धुणी । कैसेन होय ।' -कथा २.७. ११८. [धुणें]
गाळ
पु. १. गदळ; मळ; घाण; केरकचरा. २. चिखल; रेंदा; राब; रबडी. ३. एखाद्या पदार्थातून गाळून किंवा निवडून अंश काढून घेतल्यावर राहिलेला अवशिष्ट भाग; वगळ. ४. साका; तळाशी राहिलेला भाग, अंश. [सं. गल = गळणे]
गाळ
पु. १ गदळ; मळ; घाण; केरकचरा. २ चिखल; रेंदा; रबडी. ३ एखाद्या पदार्थांतून गाळून किंवा निवडून चांगला अंश काढून घेतल्यावर राहिलेला अवशिष्ट भाग; वगळ. 'चांगलीं वांगीं होतीं तीं संपलीं आतां गाळ राहिला आहे.' ४ सांका; तळाशीं राहिलेला भाग, अंश. [सं. गल् = गळणें] ॰वट किंवा गाळवी-वि. रेंदा, दलदल, चिखल असलेली किंवा नदीचा गाळ वाहून जमलेली (जमीन); ही नदीच्या तीरावर असल्यानें पुराच्या वेळीं गाळ येऊन तो तींत सांचतो त्यामुळें हींत उत्तम पीक येतें. ॰वंड-न. गाळवट जमीन. ॰साळ-पु. रेंदा; चिखल; कचरा. [गाळ द्वि.]
गाळा
पु. १. मळ; गाळ; रेंदा; गाळल्यानंतर राहिलेला साका. २. नदीला पूर येऊन गेल्यानंतर काठावरील झाडांना अडकून पडलेला पातेरा, केरकचरा; चिखल; मळी. ३. स्वच्छ पिंजलेला कापूस.
गाळा
पु. १ मळ; गाळ; रेंदा; गाळल्यानंतर राहिलेला साका. २ नदीला पूर येऊन गेल्यानंतर कांठावरील झाडांस अड- कून पडलेला पातेरा, केरकचरा; चिखल; मळी. ३ स्वच्छ पिंज- लेला कापूस. [गाळणें]
गाळणे
उक्रि. १. वस्त्रातून किंवा छिद्रयुक्त पात्रातून ओतून चाळणे; स्वच्छ करणे. २. (ल.) रद्द करणे; बाजूला टाकणे; परतविणे; घालविणे; वाटेला लावणे. ३. ढाळणे (अश्रू, केस, पिसे). ४. घालणे (अंडी). ५. वर्जणे; वगळणे; टाकणे (माणूस, वस्तू, गोष्ट). ६. अंग काढून घेणे. ७. शुद्ध करणे; चकचकीत करणे (धातूचे जिन्नस विस्तवात घालून). ८. यंत्रात दाबून पिळून काढणे; तेल, अर्क काढणे (गळिताचे धान्य, बी यांचे). ९. मळ, गाळ काढणे (विहीर, तळे, धरण यातील) : ‘प्राज्य प्रीतिद झालें सुहृदांला गाळिलें जसें आज्य ।’ –मोसभा ७·३. १०. (अवसान हातपाय इ. शब्दास जोडून) धीर सोडणे; कच खाणे; खचणे. ११. रस करणे; वितळविणे; पातळ करणे. [सं. गालय]
गाळणें
अक्रि. १ वस्त्रांतून किंवा छिद्रयुक्त पात्रांतून ओतून चाळणें; स्वच्छ करणें. २ रद्द करणें; बाजूस टाकणें; परतविणें; घालविणें; वाटेस लावणें. ३ ढाळणें (अश्रु, केंस, पिसें). ४ घालणें (अंडीं). ५ वर्जणें; वगळणें; टाकणें (माणूस, वस्तु, गोष्ट). 'सगळा गांव बोलावला पण चार घरें गाळलीं.' ६ शुद्ध करणें; चकचकीत करणें (धातूचे जिन्नस विस्तवांत घालून). ७ यंत्रांत दाबून पिळून काढणें; तेल, अर्क काढणें (गळिताचें धान्य, बीं यांचें). ८ (अवसान हातपाय इ॰ शब्दास जोडून) धीर सोडणें; कच खाणें; खचणें. ९ रस करणें; वितळविणें; पातळ करणें. १० स्वच्छ करणें; मळ, गाळ काढणें (विहीर, तळें, धरण यांतील). 'प्राज्य प्रीतिद झालें सुहृदांला गाळिलें जसें आज्य ।' -मोसभा ७.३. [सं. गल् = गळण]
गदळ
न. १ घाण; गढूळपणा, राड (प्रवाही पदार्थांतील) २ गा, मैल, कचरा, मळ. ३ केर; धूळ; भूस; तूस (धान्यां तील). ४ (सामा.) एखाद्या वस्तूतील निरुपयोगी भाग; ५ गाळसाळ; हेंदळ; घुरळा. ६ माजलेलें व घाणेरडें गवत; रान -पु. (ल.) अव्यवस्था; गोंधळ; घोंटाळा; धांदल) वस्तु, कामकाज यांतील). -वि. १ घाणेरडें; मळकट; मलीन; गढूळ; भिकार; क्षुल्लक; कवडीमोल ओंगळ; हिडिस. (पाणी, माणूस, वस्तु, गोष्ट). २ घोंटाळ्याचें; गडबडीचें; घालमेली; गबाळी (कृत्य, पुस्तक, लेख). ३ क्षुभित (वाईट मनोविकारांच्या जोरानें मन) जसें दुःखी, संतप्त, मत्सरी, संशयी इ॰ [सं. गलित-गलिद-गलद, गदल हिं. गदला. तुल॰ का. गदडु = वाईट वास]
गदळ, गदळपण
न. १. घाण; गढूळपणा, रेंदा, राड (प्रवाही पदार्थातील) २. गाळ; कचरा; मळ. ३. केर; धूळ; तूस; भूस (धान्यातील). ४. (सामा.) एखाद्या वस्तूतील निरुपयोगी भाग. ५. गाळसाळ; हेंदळ; धुरळा. ६. माजलेले व घाणेरडे गवत; रान.
गन्दगी
(स्त्री.) हिंदी अर्थ : मैलापन, नापाकी, ग़लीज़, मलीनता. मराठी अर्थ : अस्वच्छता, अशुद्धता, मल.
गणेशधौती
स्त्री. एरंडेलांचे बोट गुदद्वारात फिरवून मळ काढणे.
गंजणें
अ० जंग बसणें, खराब होणें, मळ चढणें.
गर
स्त्री. १ घोड्याच्या छातींतील व घशांतील किंवा माने वरील एक रोग अथवा खाज. (क्रि॰ भरणें). २ खरारा न केल्यामुळें घोड्याच्या अंगावर जमलेला मळ. [सं. गर = रोग?]
गर
स्त्री. १. घोड्याच्या छातीतील, घशातील किंवा मानेवरील एक रोग अथवा खाज. (क्रि. भरणे.) २. खरारा न केल्यामुळे घोड्याच्या अंगावर जमलेला मळ.
गर्द खोर
(वि.) हिंदी अर्थ : जो मिट्टी या धूलसे जल्दी मैला न हो. मराठी अर्थ : मळ खाऊ.
गुबार
पु. १. मळ; धूळ : ‘दिलांतील गुबार झाडून निघोन प्रांजळ व्हावें.’ - मइसा ५·७५. २. संशय : ‘बोलण्यांत कोणत्या गोष्टींचा पडदा व गुबार राहिला नाहीं.’ - ऐलेसं ९·४·८४२. [फा.]
गुबार
(पु.) [अ. घुबार] मल; गर्द; संशय; किलाफ. “निखालसतेचीं बोलणीं बोलले; इतक्यानें गुबार निघाला” (खरे ९।४६६६). “निखालसीच्या बोलण्याचा मज्कूर, तर बोलण्यांत कोणत्या गोष्टीचा पड्दा व गुबार राहिला नाहीं” (खरे ९।४८४२). “दिलांतील गुबार झाडून निघोन प्राञ्जळ व्हावें” (राजवाडे ५।७५).
गुबार
पु. १ मळ; धूळ. 'दिलांतील गुबार झाडून निघोन प्रांजळ व्हावें.' -रा ५.७५. २ संशय; किलाफ. 'बोलण्यांत कोणत्या गोष्टींचा पडदा व गुबार राहिला नाहीं.' -ख ९. ४८४२. [अर. घुबार]
घळा(ळ)मेळ
स्त्री. मोकळ्या मनाचा, स्नेहभावाचा संबंध, दळणवळण, व्यवहार. घळामेळीचा-वि. विशेष सल- गीचा; दाट परिचयाचा. [घळमळीत; घळणें + मळ]
घोंगण
न. गोळा केलेला कचरा; गळहाटा; राडा; खळ- मळ; घाण; खिचडी (अशा वस्तूवर माशा घों घों करतात त्यावरून शब्दप्रयोग) [ध्व. घों; घोंगणें]
हाजत रफा करना
हिंदी अर्थ : आवश्यकता पूरी करना मराठी अर्थ : मल त्याग करणें, आवश्यकता पूर्ण करणें.
हगरी
स्त्री० ज्यांतून मल शौचकूपांत पडतो ते छिद्र असलेला दगड व तें छिद्र.
हिडशा-शी-सा
वि. घाणेरडा; किळसवाणा; ओंगळ; बीभत्स; हिडीस (व्यक्ति, वस्तु इ॰). [सं. हिड् = धिक्कारणें, हिडीस] हिडसणें-उक्रि धिक्कारणें; अपमान करणें; विटंबना करणें; कस्पटाप्रमाणें लेखणें; हिडीसफिडीस करणें. हिडसा- विणें-उक्रि. १ झिडकारणें; धुडकाविणें. २ घाण करणें; मळ- विणें; लिडबिडीत करणें (भांडीं इ॰). 'भांडीं सारीं हिडसा- वून टाकलीं कीं हो बेट्यानें? हिडी(ड)स-न. उकीरडा; घाण; खातेरें. -वि. हिडशा पहा. [सं. हिड] हिडीस- पि(फि)डीस-न. अनादराची, तुच्छतेची वागणूक. -क्रिवि. धिक्कारून; धुडकावून; तिरस्कारानें (क्रि॰ करणें).
जाळ
पु. मळ, घाण (धातूतील).
जळप, जळंप
पु. १ दाह; प्रखर उष्णता. ' धेनु गोप तया जळपानें । या विषानल चढे जळपानें ।' २ क्रोधाचा आवेश; अतिशय संताप. ३ ज्या व्यवहाराचा द्दढ अभ्यास झाला असेल त्याचें स्वप्न पडणें. (क्रि॰ पडणें).-स्त्री. जळ; धातूचा रस केल्या- वर, तापविल्यावर निघालेला मळ, वाया गेलेल्या, जळालेला भाग. [जळ + प्रत्यय] जळापणें-क्रिवि. (कु.) चिडणें चवताळणें बडबडणें; जळपणें पहा. [सं. जल्प]
जंत
पु. पक्काशयांत उत्पन्न होणारे वाटोळे, चपटे, निळे, काळे कृमी; हे फार वाढले म्हणजे आमाशयाकडे येतात व त्यामुळें श्वासो- च्छावास, ढेकर यांस घाण येते. यांचे पांच प्रकार यांच्या हाल- चालीनें मळ पातळ होतो व शूल, अशक्तता, फिकटपणा, अग्नि- मांद्य, वगैरे विकार होतात. -योर १.५१५. [सं. जंतु] ॰वाताळें- न. जंतामुळें फुगणारें पोट. ॰विकार-पु. पोटांत जंत झाल्या मुळें होणारा बिघाड. जंतांचा उपद्रव-पु. जंतांपासून होणारी पीडा; दुःख.
जवाची माळ
जवाची माळ javācī māḷa f A wreath or string of the golden bits called जव.
काहूर
न. १. दाट काळोख; सामान्यतः अंधारी (विशेषतः दाट व काळेकुट्ट ढग आभाळात आले असताना पडलेली.) (क्रि. येणे, उठणे.). २. (ल.) काळा डाग; कलंक; काळिमा; मळ. (क्रि. आणणे.) ३. (ल.) मोठे संकट; कचाटी; आपत्ती. (क्रि. येणे, गुजरणे, आणणे.) ४. कुभांड; आळ. ५. निंदा व टीका यांचा भडिमार : ‘पुण्यास आमच्यावर काय झालं आहे काहूर’ - पलको ३४९. कहर या अर्थी चुकीने वापरतात. (वा.) काहूर माजणे - अनेक गोष्टी एकत्र येऊन गोंधळ होणे : ‘मनात विचारांचे काहूर माजले होते.’ - श्रीयो १. २३२. काहूर माजविणे - वादळ निर्माण करणे, वाद उपस्थित करणे.
काहूर
न. १ दाट काळोख; सामान्यतः अंधारी (विशे- षतः दाट व काळेकुट्ट ढग आभाळांत आले असतां पडलेली). (क्रि॰ येणें; उठणें.) २ (ल.) काळा डाग; कलंक; काळिमा; मळ. (क्रि॰ आणणें). ३ (ल.) मोठें संकट; कचाटी; आपत्ति. (क्रि॰ येणें; गुजरणें; आणणें). ४ कुभांड; आळ. ५ कहर या अर्थीं चुकीनें योजतात. ॰बाहूर-वि. कावराबावरा. [फा. कहर्]
काजुला
पु. १ (कु.) समई मालवल्यानंतर लुकलुकणारें वातीचें टोंक; काजळी; गूल. २ (कु.) कानांतील मळ. [सं. कज्जल]
काजुला
पु. १. समई मालवल्यानंतर (शांत झाल्यानंतर) लुकलुकणारे वातीचे टोक; काजळी; गूल. (कु.) २. कानातील मळ. [सं. कज्जल]
कान्होला
पु. तान्ह्या मुलाच्या कानातून निघणारा पांढरा मळ, कानवा; कानविळ.
कान्होला
पु. तान्ह्या मुलाच्या कानांतून निघणारा पांढरा मळ. कानवा, कानविल.
कानिवला
पु. कानातील मळ. (गो.)
कानिवला
पु. (गो.) कानांतील मळ
कानकोंडा
पु. कानातील मळ.
कानुला
पु. (गो.) कानांतील मळ
कानवा
पु. कानातील मळ.
कानविळे
न. कानातील मळ. (कु.)
कांबरे
न. डोळ्यातील वाळलेला मळ; चिपड. (को.)
कांबरें
न. (कों.) डोळ्यांतीला वाळलेला मळ; चिपड. [केंबरें?]
काट
पु. १ घट्ट राड; राप; गंज; मळ. 'भीतरीं जिव्हा तें चामखंड । असत्य कांटें कांटलीं ।' -एभा ११.५९५. 'अनेक दोषांचे कांट । जे जे गादलें निघोंट । होती हरिनामें चोखट । क्षण एक न लागतां ।' -तुगा २४९८. २ (महानुभाव.) कपड्यावरील वेलबुट्टीचें (लाख, चीक वगैरेचें) लुकण, खडीचा रंग; कापडा- वरील डाग. 'कषायाचें काट । फेडूनि कीजे धुवट ।' -भाए २८३.
काट
पु. १. घट्ट राड; राप; किटण; डाग; मळ : ‘अनेक दोषांचे कांट । जे जे गादलें निघोट । होती हरिनामें चोखट । क्षण एक न लागतो ।’ - तुगा २४९८. २. कपड्यावरील बेलबुट्टीचे (लाख, चीक, वगैरेचे) लुंकण, खडीचा रंग; कापडावरील डाग : ‘कषायाचे काट । फेडूनि कीजे धुवट ।’ - भार २८३·३. बाभळीच्या शेंगा किंवा आवळ्याचा आळवून घट्ट केलेला रस. [सं.]
काटणें
अक्रि. मळणें, मलीण होणें; राप चढणें; लेप चढणें. 'तैसिया वदनीं प्रळयरुधिरें । काटलिया दाढा ।' -ज्ञा ११.३४५. 'जे काटली नित्य महानृतानें ।' -सारुह १.२८. 'धुळीनें काटलें आकाश ।' [काट = मळ]
कॅप
न. (गो.) (एखाद्या पदार्थावर मळ, कीट सांचून झालेली) खपली; कपची; कपचा पहा.
कीड
वि. १ खोटें; वाईट. 'तैसें शुद्ध सत्त्वा आड । आहे रजतमाचें कवाड । तें भेदणेंयातें कीड । म्हणावें का ।' -ज्ञा १७.३१२. २ मळ; गंज. 'कीड झाडावया दृष्टीं । रज देऊनि पाठीं पोटीं । सुवर्ण घालितां पुटीं । झळकत उठी निजतेजें ।' -एभा १०.६३. [कीट]
किडाळ
वि. (महानु.) मळ; किटाळ. ‘नातें कमीचिये ठाई सकळ । अहंकाराचे किडाळ । जाळिता ऐसे गमे । ’ –जांस्व २६०. [सं. किटाळ]
कील
पु. १ मेख; खिळा; पाचर; अडसर; बहुधा जात्याच्या खुंट्यास म्हणतात. २ गुडगुडींत सांचलेला मळ; मशेरी. ३ शंकु (छायायंत्रावर सावली पाडणारा). [सं. कील् = बांधणें]
कील
पु. १. मेख; खिळा; पाचर; अडसर. बहुधा जात्याच्या खुंट्याला म्हणतात. २. गुडगुडीत साचलेला मळ; मशेरी. ३. शंकु (छायायंत्रावर सावली पाडणारा). ३. (वै.) पावलातील एक लहान अस्थी. ४. मेद. [सं.]
किल्बि(ल्मि)ष
न. १ पाप; दोष; 'ऐशा किल्बिषापासूनी । सुटे यज्ञशेष तें भक्षूनी ।' -यथादी ३.२२३. २ (ल.) घाण; मळ. [सं. किल्मिष]
किल्बिष, किल्मिष
न. १. पाप; दोष : ‘ऐशा किल्बिषापासूनी । सूटे यज्ञशेष तें भक्षूनी ।’ – यथादी ३·२२३. २. (ल.) घाण; मळ. [सं.]
किनट्ट्या
पु. मळ. (व.)
किटाळ, किटळ
न. १. विस्तवाची ठिणगी; फुणगी (गवत, काटक्या जळत असताना उडणारी) : ‘मधून मधून विस्तवाच्या ठिणग्या व किटाळें निघत.’ – पाव्ह ५७. २. आळ; दोषारोप; संकट; अरिष्ट; हिणकसपणा : ‘ह्यानें हें आमच्यावर उगाच किटाळ आणलें आहे.’ – स्वप १४८. ३. मळ. [क. किडि = ठिणगी]
किट्ट
न. मळ; किटण; कीट; घाण; बुरशी; गुंज. [सं.]
किट्ट
न. १. मळ; किटण; कीट; घाण; बुरशी; गंज : ‘काजळून किट्ट झालेल्या कंदिलाच्या काचेतून…’ – गणूराया १५१. २. पचनानंतर उरलेला शरीराला निरुपयोगी असा भाग.
कलच
पु. कीट (अंगावर घट्ट बसलेलें); घाण; किटण; मळ.
कलच
पु. कीट (अंगावर घट्ट बसलेले); घाण; किटण; मळ.
कळकट न.
१. कलंक; मळ; गंज; तांब्या वगैरे तांब्याच्या भांड्यावर आंबटाचा स्पर्श झाला असताना उत्पन्न होणारा हिरवट विषारी पदार्थ. २. घाण (कपडे, भांडी यांवरील). [त. कळंगम] [सं. कलंक] वि.
कळकट
न. १ कलंक; मळ; गंज; तांब्या वगैरे तांब्याच्या भांड्यावर आंबटाचा स्पर्श झाला असतां उत्पन्न होणारा हिरवट विषारी पदार्थ. २ घाण (कपडे, भांडीं यांवरील). [सं. कलंक]
कल्मश, कल्मष, कल्मक्ष
न. १. चिखल; राड; रेंदा; कोणताही मळ; घाण. २. पाप; अंतःकरणातील दुष्ट विचार : ‘या कल्मषाची थोरी । सांगेन तुज ॥’ - ज्ञा १·२४२. [सं.]
कल्मश-ष
न. १ चिखल; राड; रेंदा; कोणताहि मळ; घाण. २ पाप; अंतःकरणांतील दुष्ट विचार. 'या कल्मषाची थोरी । सांगेन तुज ।' -ज्ञा १.२४२. 'त्वद्दर्शनें कल्मश सर्व गेलें' -नर- हरी गंगारत्नमाला ३० (नवनीत, पृ. ४१९). [सं.]
कनवा
पु. कानांतील मळ. [कर्णवर्ती?]
कंजूश-ष-स
वि. कद्रू; कवडीचुंबक; कृपण; चिक्कू. [सं. कर्ण + जुष्; प्रा. कण्णझूस?; हिं. कंजूस = कानांतील मळ खाणारा, कृपण]
कोनां,कोनी, कोने
न. स्त्री.न. (चि.) पेरे; हाता- पायांच्या नखांत मळ वगैरे शिरून तो भाग कुजल्यासारखा होतो, सुजतो व ठणका लागतो तो विकार. [सं. कोण]
कोंडा
पु. १. धान्याचे मूळ, सालपट, तूस इ. : ‘देवा कळणा अथवा कोंडा ।’ - तुकाराम (नवनीत ४४८). २. (ल.) ताप निवाल्यानंतर अंगावरून निघणारा एक प्रकारचा भुसासारखा पदार्थ, सालपटे, मळ (क्रि. जाणे.) २. खपली, पापुद्रा. (वा.) कोंड्याचा मांडा करणे - १. सुगरणपणा अंगी असणे. २. अगदी निकृष्ट परिस्थितीतही चांगले कार्य करून दाखविणे; साध्या गोष्टीच्या मदतीनेही चांगल्या गोष्टी करणे. ३. (ल.) अडून न बसणे; गोड करून घेणे; समाधानी राहणे.
कोंना, कोंनी, कोंने
पु. स्त्री. न. पेरे; हातापायांच्या नखात मळ वगैरे शिरून तो भाग कुजल्यासारखा होतो, सुजतो व ठणका लागतो तो विकार. (चि.) [सं. कोण]
कोरणे
उक्रि. १. एखाद्या पदार्थावरील थोडा थोडा अंश नाजूक रीतीने काढणे; पोखरणे; खोदणे; नकसणे (आकार देण्यासाठी किंवा आतील भाग काढण्यासाठी) : ‘तो काष्ठें कोरूं धांवे ।’ -ज्ञा १८·७१९. २. कान, दात यातील मळ काढणे. ३. एखाद्याचे द्रव्य त्याच्या नकळत थोडे थोडे युक्तिप्रयुक्तीने बळकावण्याचा व्यापार, उद्योग. [क. कोरे = खोदणे, भोक पाडणे] (वा.) दात कोरून पोट भरणे - अतिशय कंजूषपणा करणे.
कोरणें
उक्रि. १ एखाद्या पदार्थावरील थोडा थोडा अंश नाजुक रीतीनें काढणें; पोखरणें; खोदणें; नकसणें (आकार देण्यासाठीं किंवा आंतील भाग काढण्यासाठीं). २ कान, दांत यांतील मळ काढणें. ३ नकसकाम करणें. ४ (ल.) एखाद्याचें द्रव्य त्याला नकळत थोडेंथोडें युक्तीप्रयुक्तीनें बळकाविण्याचा व्यापार, उद्योग. [का. कोरे = खोदणें, भोंक पाडणें; तुल॰ इं. कार्व्ह] (वाप्र.) दांत कोरून पोट भरणें-अतिशय कंजुष- पणा करणें. म्ह॰ दांत कोरून पोट भरत नाहीं.
कोठली
स्त्री. पोटातील आतडे; आतड्यातील मळ : ‘बालपणिचिं कोठलीं । बाहिरी घाली ।’ - राज्ञा ६·२१६.
करतलामल, करतलामलक, करतलामलकवत
वि. क्रिवि. (हातात प्रत्यक्ष असलेला आवळा जसा सर्व बाजूंनी पाहता येतो त्याप्रमाणे). १. सिद्ध; स्पष्ट; उघड; ज्याचे सर्व बाजूंनी ज्ञान झाले आहे असे; ज्याला दुसऱ्या प्रमाणाची गरज नाही असे; संशयातील : ‘वेदशास्त्राचा मथितार्थ । झाला करतलामलकवत् ।’ - एभा ११·१०४९. २. (ल.) अवगत झालेली; हातचा मळ बनलेली; अत्यंत सुलभ; साध्य (विद्या, कला, शास्त्र वगैरे) : ‘महाराष्ट्र व संस्कृत या दोन्ही भाषा मोरोपंताला करतलामल होत्या.’ - नि ७६५. ३. स्वाधीन; सुगम : ‘सारा भूगोल ज्यास करतलामलकवत् आहे त्यास एखाद्या रानांत नेऊन सोडला किंवा त्याच्या हाती जहाजाचें सुकाणूं दिलें तर काय मौज होईल बरें ।’ - नि [सं. कर+तल+आमलक]
करतलामल, करतलामलक, करतलामलकवत्
विक्रिवि. (हातांत प्रत्यक्ष स्थित असलेला आवळा जसा सर्व बाजूंनीं पाहतां येतो त्याप्रमाणें) १ सिद्ध; स्पष्ट; उघड; ज्याचें सर्व बाजूंनीं ज्ञान झालें आहे असें; ज्यास दुसरे प्रमाणाची गरज नाहीं असें. असंशयित' 'वेदशास्त्राचा मथितार्थ । झाला करतला- मलकवत ।' -एभा ११.१०४९. 'ते करतलामलकसे दूरूनि दिसले अशेष मग तीतें । ' -मोस्त्री ४.३. २ (ल.) अवगत अस- लेली; हातचा मळ बनलेली; अत्यंत सुलभ; साध्य (विद्या, कला, शास्त्र वगैरे). 'चतुर्दश विद्या चौसष्ट कला । करतळामळ जयासी सकळा ।' -ह ३१.८. 'महाराष्ट्र व संस्कृत या दोन्ही भाषा मोरोपंताला करतलामल होत्या' -नि ७६५. ३ स्वाधीन; सुगम. 'सारा भूगोल ज्यास करतलामलकवत् आहे त्यास एखाद्या रानांत नेऊन सोडला किंवा त्याच्या हातीं जहाजाचें सुकाणूं दिलें तर काय मौज होईल बरें !' -नि [कर + तल + आमलक]
कृष्णागर-गरु
पु. एक प्रकारचा चंदन. 'कृष्णागर मल- यागर परिमळ । देवदार वृक्ष तेथें ।' -ह २३.१००. [सं. कृष्ण + अगरु]
कृष्णावळ
पु. कांद्याला विनोदानें म्हणतात. कारण तो उभा चिरला म्हणजे शंखाकृति व आडवा चिरला म्हणजे चक्रा- कृति दिसतो व शंख, चक्र हीं कृष्णाचीं आयुधें आहेत. 'आग- स्तीचें मूत्र मळ । लावुनि म्हणती कृष्णावळ ' -तुगा २८२४. [सं. कृष्ण + वलय + कृष्णावळ]
कसमळ
स्त्री. मळ; घाण. 'अवघाच माल खळ्यांत आणून कसमळ काढून स्वानंदाची रास करणें ।' -भज १२३. -वि. ओंगळ; दुराचारी. 'नये राहों उभें कसमळापाशीं ।' -तुगा २६९. [स. कश्मल्]
कसमळ
स्त्री. मळ; घाण:‘अवघाच माल खळ्यांत आणून कसमळ काढून स्वानंदाची रास करणें ।’ - भज १२३.
कश्मल, कश्मळ
न. १. घाण; कचरा; दूषित वस्तू : ‘जैसा गांवींचिया कश्मळा । उकरडा होय येकवळा ॥’ - ज्ञा १८·६५०. २. पाप; मल; दोष. वि.
कश्मल-ळ
न. १ घाण; कचरा; दूषित वस्तु. 'जैसा गांवींचिया कश्मळा । उकरडा होय येकवळा ।' -ज्ञा १८. ६५०.-वि. आक्षिप्त; खराब झालेलें. 'तें कश्मळ आठवी । आचरण जें ।' -ज्ञा १८.६२०. 'पाहतां देहो अतिकश्मळ' -एभा २०. १४६. 'कवण वधु वरीते, कश्मला कोणपा या ?' -आसि ३८. २ पाप; मल; दोष. -वि. पापी; दूषित; अमंगल. [सं.]
कस्तूरी
(सं) स्त्री० एका प्रकारचे हरणाचे नाभींतला मल.
कटणे
अक्रि. १. अतिशय मळणे (शरीर, वस्त्र इ.); मळ बसणे; किटणे. २. विटणे; नकोसे होणे.
कटणें
अक्रि. १ अतिशय मळणें (शरीर, वस्त्र इ॰); मळ बसणें; किटणें. २ एखाद्या गोष्टींत निपुण, तरबेज, तयार होणें. ३ विटणें; नकोसें होणें;किटणें. 'तेंच तेंच रडगाणें ऐकून कान कटलें.' [कट]
खाणे
उक्रि. १. भक्षण करणे. २. गिळंकृत करणे; लाच खाणे; हरामखोरीने किंवा लबाडीने हडप करणे. ३. गिळणे; गट्ट; करणे; ग्रासणे; चट्ट करणे; ग्रासून टाकणे, पूर्णपणे वश करणे (औषध, मनुष्य). ४. संपवणे; फस्त करणे. ५. गाळणे, टाकणे, सोडणे (बोलण्यात अथवा लिहिण्यात अक्षरे.) ६. चावणे; डसणे. उदा. ‘साप खाई पोट रितें’ - दुसऱ्याला चावल्याने सापाचे पोट भरत नाही. कुत्री, विषारी किडे, जिवाणू यांच्या चावण्यालाही लावतात. तसेच शारीरिक अस्वच्छतेबद्दल योजतात. जसे :- मळ खातो, उवा खातात, पिसवा खातात = उवा, पिसवा ह्या माझे डोके खातात म्हणजे चावतात, त्रास देतात. ७. तोडणे; टोचणे; मनाला बोचणे (पाप, गुन्हा, मन, पापबुद्धी) : ८. (ल.) कुरतडणे; डिचवणे; तोडणे (वाईट अन्न, पित्त, मानहानीचे भाषण.) ९. एखाद्या जोखमीच्या कामाने एखाद्याचा नाश करणे. १०. मारणे; बळकावणे. ११. भोगणे; सेवणे (विसावा. चैन) १२. सोसणे; सहन करणे. (मार, उष्णता, थंडी) १३. आत घेणे. (हवा.) [सं. खादन] १४. घेणे (शपथ). १५. पराभव होणे. [सं.] १६. खर्च करणे. [सं.] [सं. खादन] (वा.) खा खा करणे, खा खा लागणे, खा खा सुटणे, खाईन खाईन करणे - अधाशीपणा करणे; खाण्यासाठी धाधावलेला असणे. खाऊन ढेकर देणे - दुसऱ्याच्या वस्तूचा अभिलाष धरून ती हडप करणे, गिळंकृत करणे. खाण्या तुटणे - क्षुधा किंवा पचनशक्ती कमी होणे. खाण्यापिण्याचे दिवस, खायाप्यायाचे दिवस - तारुण्यातील आनंदाचे व उल्हासाचे दिवस; आयुष्यातील सुखाचे दिवस. जीव खाणे, प्राण खाणे, डोके खाणे - दुसऱ्याला फार त्रास देणे. खाऊ की गिळू करणे, दात ओठ खाणे - अतिशय रागावणे. खायला उठणे - एखाद्यावर हल्ला करणे. खाल्ल्या घरचे वासे मोजणे - कृतघ्न होणे; उपकारकर्त्याचे ऋण विसरणे.
खात
पुन. १ शेतांत घालावयाचें खत. 'खात मूत भस्म मिळोन । पुन्हा पृथ्वी ।' -दा १५.४.८. २ केरकचरा (खतासाठीं उपयोगी); गाळसाळ; उकिरडा; मळ; (कु.) चिखल. [खत]
खात
न. १. शेतात घालायचे खत : ‘खात मूत भस्म मिळोन । पुन्हा पृथ्वी ।’ - दास १५·४·८. २. केरकचरा (खतासाठी उपयोगी); गाळसाळ; उकिरडा मळ चिखल. (कु.)
खीळ
स्त्री. १ दरवाजाला लावण्याचें, लोखंडाचें किंवा लांक डाचें केलेलें आडकण; अडसर; खुंटी; शंकु. २ शिडीच्या पायर्या प्रत्येकी. ३ लांकडांचा सांधा जोडावयासाठीं मारलेला खिळा. ४ खिळा. ५ स्तनाग्रांतील दुग्धप्रतिबंधक मळ. (क्रि॰ बसणें; फोडणें) ६ हाडांचा सांधा; खुबा; जसें-कोपराची-ढोपराची-दंताची- मनगटाची-पायाची-खीळ. ७ (व.) गळूं अथवा खांडूक याच्या तोंडावर जमलेली पुवाची गोळी, खडा. खिळा पहा. ८ शिवळ. [सं. कीलक] (वाप्र.) ॰फोडणें-जनावर व्याल्यानंतर त्याच्या स्तनांतून दुधाच्या चार धारा काढणें. ॰बसणें-घालणें-अडथळा आणणें. म्ह॰ चालत्या गाडीस खीळ = सुरळीतपणें चालत अस- लेल्या कामांत विघ्न आणणें.
खीळ
स्त्री. १. स्तनाग्रातील दुग्धप्रतिबंधक मळ. (क्रि. बसणे, फोडणे.) (वा.) खीळ फोडणे – जनावर व्याल्यानंतर त्याच्या आचळातून दुधाच्या चार धार काढणे. २. गळू अथवा खांडूक यांच्या तोंडावर जमलेली पुवाची गोळी, खडा. (व.) पहा : खिळा [सं. कीलक]
खिळा
पु. १. खीळ; मेख; लोखंडाची अणकुचीदार वस्तू. २. छापण्याचा ठसा, टाईप. ३. गाडीच्या जोखडातील भोकात (बैलाला दुसरीकडे खांदा वळविता येऊ नये म्हणून) बसवण्याची खुंटी, शिवळ. (माण.) ४. गाय, म्हैस यांच्या आचळातून दूध बाहेर निघण्यास प्रतिबंध करणारा आतील मळ. हा जनावर व्याल्यानंतर काढावा लागतो. ५. रचलेल्या दगडांचा ढीग, वरंडा; एखादी शंकूच्या आकाराची रचना. ६. जमिनीतून नुकताच बाहेर येणारा अंकुर. ७. तीन अथवा चार गावांच्या सीमा एकत्र मिळण्याचे ठिकाण. [सं. कीलक]
खिळा
पु. १ खीळ; मेख; लोहशंकु; लोखंडाची अणकुची- दार वस्तु. २ गाय, म्हैस यांच्या स्तनांतून दूध बाहेर निघण्यास आंतील प्रतिबंध करणारा मळ, हा जनावर व्याल्यानंतर काढावा लागतो. ३ रचलेल्या दगडांचा ढीग, वरंडा; एखादी शंक्वाकृति रचना. ४ जमिनींतून नुक्ताच बाहेर येणारा अंकूर. ५ तीन अथवा चार गांवांच्या सीमा एकत्र मिळण्याचें ठिकाण. ६ छापण्याचा ठसा, टाईप ७ (माण) गाडीच्या जोखडांतील भोकांत (बैलास दुसरी- कडे खांदा वळवितां येऊं नये म्हणून) बसविण्याची खुंटी, दांडा, शिवळ. खिळ्याचे प्रकार-स्क्रू, टेकस, कुर्हाडी, तारेचा. [सं. कीलक; प्रा. खीलओ; गु. खिळो; बं. ओरि. खील, खिला]. म्ह॰ खिळ्यासाठीं नाल गेला, नालासाठीं घोडा गेला, घोड्या- साठीं स्वार गेला, एवढा अनर्थ खिळ्यानें केला = क्षुल्लक चुकी- पासून परंपरेनें मोठा अनर्थ गुदरतो. ॰जोडणार-पु. ठसे, टाइप जुळविणारा, कंपाझिटर. ॰पट्टी-स्त्री. १ घराचें लोखंडी काम. 'घर तर झालें खिळापट्टी व्हायाची आहे.' २ कपाळावर लावि- लेल्या तांबडया गंधाच्या दोन ओळी व त्यांत सुपारी जाळून तिचा किंवा कस्तुरीचा लाविलेला टिळा. त्यावरून खिळेपट्टी करणें-लोकांच्या घरीं जेवणें. 'आज कोठें खिळेपट्टी झाली?' ॰माणी-वि. लोखंडी खुंटी व तिच्या भोवतीं लोखंडी मायणी असणारें (जातें). किलेमाणी पहा. ॰खिळारें-खिळोरें पहा.
खळखळीत
वि. १ खळखळणारा; आवाजदार; खळखळ आवाज काढणारा. २ फडफडीत; कोरडा; ज्यांतील शीतनशीत मोकळें झालें असा (भात); वाळलेली (द्विदल धान्याची शेंग). ३ स्वच्छ; साफ; मळ किंवा घाणीपासून मुक्त (चांगलें धुतलेलें कापड, भांडें, समुद्राच्या पाण्यानें धुतलेला खडक, यांच्या बद्दल योजतात). ४ डुळडुळीत; गळगळीत (कालवण, ताक). [खळखळ]
खळखळीत
वि. १. खळखळणारा; आवाजदार; खळखळ आवाज काढणारा. २. फडफडीत; कोरडा; ज्यातील शीत न शीत मोकळे झाले आहे असा (भात); वाळलेली (द्विदल धान्याची शेंग.) ३. स्वच्छ; साफ; मळ किंवा घाण नसलेले. (चांगले धुतलेले कापड, भांडे, समुद्राच्या पाण्याने धुतलेला खडक यांच्याबद्दल योजतात.) ४. डुळडुळीत; गळगळीत (कालवण, ताक.).
खर
स्त्री. १. कचरा; घाण; अनेक प्रकारचा मळ. २. श्वेत प्रदरातील पांढरा साका; लघवीतून पडणारे वीर्याचे कण. ३. जमीन भाजण्याकरिता टाकलेल्या टहाळांवरील जुने गवत, पाने, काटक्या, शेणकूट इ. चा कचरा; राब. ४. मुरूम किंवा बारीक खडी. ५. विहिरीतून खणून काढलेली माती; गाळ इ. ६. रस करताना राखेत अथवा मातीत पडलेले सोन्या-रुप्याचे कण. ७. नदीच्या तळची वाळू; पाण्यातील गाळ, घाण; पाण्याचा तळ. (गो.) ८. (सोनारी) कोळशाची बारीक पूड. ही पाण्यात घोटून तिचा थर मुशीच्या आतून देतात. [सं. क्षर]
खर
स्त्री. १ कचरा; घाण; अनेक प्रकारचा मळ. २ श्वेत प्रदरांतील पांढरा सांका; लघवींतून पडणारे वीर्याचे कण. ३ आकाशांतील पांढरे, कापसासारखे ढग; पातळ पसरलेलें अभ्र. ४ आकाशांतील संध्याकाळचा रंग, आरक्त रंग. ५ जमीन भाजण्या- करितां टाकलेल्या टहाळांवरील जुनें गवत, पानें, काटक्या; शेण- कूट इ॰ चा कचरा; राब. ६ मुरूम किंवा बारीक खडी. ७ विहिरींतून खणून काढलेली माती; गाळ इ॰. ८ रस करतांना राखेंत अथवा मातींत पडलेले सोन्या-रुप्याचे कण. ९ नदीच्या तळची वाळू; पाण्यांतील गाळ, घाण; (गो.) पाण्याचा तळ. १० (नाविक) माल भिजूं नये म्हणून बांकांवर पसरलेलीं लांकडें. ११ (सोनारी) कोळशाची बारीक पूड; ही पाण्यांत घोटून तिचा थर मुशीच्या आंतून देतात. १२ (कु.) दंव. [सं.]
खरड
स्त्री. १ घाई-घाईनें लिहिलेला, कागद अथवा लेख, आकृती, खर्डा, आराखडा. २ रेघोट्या; चिरखुडया. ३ खरडपट्टी; पाणउतारा; निर्भर्त्सना. (क्रि॰ काढणें; निघणें). ४ धातु शुद्ध करतांना तिचे भोंवतीं जमणारी राख व माती (ही धातूपासून खरडून काढलेली असते म्हणून हा शब्द); खरडून काढलेला भाग. ५ (गो.) टक्कल.६ (गो.) केसांत सांचणारा मळ. [सं. क्षर्; प्रा. खरड = लेपणें; ध्व. खर?]सामाशब्द- ॰घाशा-वि. (उपहासार्थी) सरासरी लेखन जाणणारा, परंतु त्यांतील मर्म न जाणणारा (कारकून). २ अकुशल; बिनकसबी (लेखक, न्हावी, सुतार). [खरडणें + घासणें] ॰निशी-स्त्री. १ गिचमिड; वेडेंवांकडें लिखाण, लेखन.२ खर्डेघाशी. ॰नीस-निशा-वि. वाईट लेखक. (खरड + नवीस). ॰पट्टी-स्त्री. १ खरड पहा. कडाक्याची निर्भर्त्सना; दटावणी; जोराची चापणी; बोडती; भोसडपट्टी; दोष किंवा अपराध दाखवून रागानें झाडलेला ताशेरा. (क्रि॰ काढणें; निघणें). २ तोटा, नुकसान सोसावयास लावणें. (क्रि॰ काढणें; निघणें).
खरड
स्त्री. १. घाईघाईने लिहिलेला कागद अथवा लेख, आकृती, खर्डा, आराखडा. २. रेघोट्या; चिरखुड्या. ३. खरडपट्टी; पाणउतारा; निर्भर्त्सना. (क्रि. काढणे, निघणे.) ४. धातू शुद्ध करताना तिच्याभोवती जमणारी राख व माती (ही धातूपासून खरडून काढलेली असते म्हणून हा शब्द); खरडून काढलेला भाग. ५. टक्कल. (गो.) ६. केसात साचणारा मळ. (गो.) [सं. क्षर]
खस्तापुरी
स्त्री. खस्त असलेली, चिखली, गदळ, गाळ सांठ लेली, खारी, जिच्यावर समुद्राच्या लाटा मधून-मधून येऊन आपटतात किंवा जिच्यावर गांवांतील घाण, मळ, टाकतात, अथवा जिच्यावर पावसानें घाण वाहून येते ती जमीन [खस्त]
खत
न. उत्तम पीक यावें म्हणून शेतांत घालावयाचें केर- कचरा-शेणकूट वगैरेचें कुजलेलें मिश्रण; राब. [दे. प्रा खत्त = गोबर] खतणें-अक्रि. मलीन होणें; खराब होणें; सांचणे. 'जो नुच्चारी हरि नामासी । पाप त्यापाशीं खतलें ।' -एभा ५८९. ॰मुताचा-वि. खत घातलेला-लें (शेत वगैरे). ॰मूत-न. राब. ॰मूत एक असणें-एकाच कुलांतील, वंशांतील असणें (गुरु वगैरे). ॰मूत ओळखणें-दुधावरून गाय-म्हैस ओळखणें ॰वड, खताड-न. १ उकिरडा. २ गू, मल. -वि. १ मलमूत्राची; उकरडयाची (जागा). २ खतमूख घातलेलें (शेत). ॰विणें- सक्रि. खत घालणें (शेतात).
खट
स्त्री. १. कुंधा झालेली शेतजमीन; वखरण्यात न आलेली जमीन. (व.) २. अंगावर, पदार्थावर चढलेले घाणीचे कीट; मळ; केरकचरा. (क्रि. पडणे, जमणे.) (वा.) खट काढणे - १. सपाटून, जोराने मारणे. २. खरडपट्टी काढणे. खटी खापरी लागणे, जाणे - १. अंग घाणेरडे, खरबरीत होणे. २. (ल.) संपुष्टात येणे; नष्ट होणे (धंदा, कारखाना, काम); उधळणे; नाहीसे होणे; धुळीला मिळणे (दौलत); नेस्तनाबूत, जमीनदोस्त होणे (इमारत इ.). [सं. खट = गवत, घाण]
खट
स्त्री. १ (व.) कुंधा झालेली शेतजमीन; वखरण्यांत न आलेली जमीन. 'या शेतांत खटा फार पडल्या.' २ अंगा- वर, पदार्थांवर चढलेले घाणीचें कीट, मळ केरकचरा. (क्रि॰ पडणें; जमणें). [सं. खट = गवत, घाण; क्षत] (वाप्र.) ॰काढणें, टाकणें-(घाण काढणें). १ सपाटून, जोरानें मारणें. २ तासड- पट्टी काढणें; खरडपट्टी काढणें. खटीं खापरीं लागणें, जाणें, मिळणें-१ आजारामुळें अंग घाणेरडें, खरबरीत होणें. २ (ल.) संपुष्टांत येणें; नष्ट होणें (धंदा, कारखाना, काम); उधळणें; नाहींसें होणें; धुळीस मिळणें (दौलत); नेस्तनाबूद होणें; जमीनदोस्त होणें (इमारत, गांव). याप्रमाणें खटीं खापरीं लावणें, मिळविणें.
खता
स्त्री. १. संकटाची धास्ती, चिंता. २. तोटा; नुकसान. ३. दोष; अपराध; उल्लंघन : ‘वतन्दार खरा, कोणे गोष्टीस खता नाहीं.’ - मइसा ८·४४. ४. संशय; किल्मिष; किंतू; मळ : ‘मग निःशेष खता फिटे । मानसींचा ।’ - ज्ञा ४·२०७. [फा. खता = चूक, दोष]
खता
स्त्री. १ संकटाची हुरहुर; चिंतायुक्त भीति. २ तोटा; नुकसान. ३ दोष; अपराध; उल्लंघन. 'वतन्दार खरा, कोणे गोष्टीस खता नाहीं.' -रा ८.४४. 'अतःपर नबाब खता करितील, कदाचित् काळक्रम दुर्बुद्धी निर्माण जाली तर केलें पावतील.' -इम १९६. ४ संशय; किल्मिष; किंतु; मळ. 'मग निःशेष खता फिटे । मानसींचा ।' -ज्ञा ४.२०८. [अर. खता = चूक, दोष] म्ह॰ 'दया उधार खता रोकडी' = दया दाखविल्याचें फळ कालांतरानें मिळतें पण अपराधाबद्दल ताबडतोब शिक्षा होते.
खतवड, खताड
न. १. उकिरडा. २. गू; मल.
खुंट
पु. १. गाय, म्हैस यांच्या आचळातून दूध येण्यास प्रतिबंध करणारा मळ. २. दूध न देणारा जनावराचा सड; मुका, आंधळा सड.
खुंट
पु. १ खालीं राहिलेला भाग; खोड; कांड; सोट; बुंधा (झाड, झुडुप, शेपूट, केरसुणी, हजामत झाल्या नंतरचे केंस इ॰ चा). 'समूळ फोडियेले खुंट ।' -एरुस्व १०.७६. २ (मासे मारण्यासाठीं समुद्र किंवा नदी यांत) रोविलेला खांब, डांभ. ३ ज्यामध्यें फाळ बसवितात तें नांगराचें टोंक; खुळसा; कोळसा. ४ गाय, म्हैस यांच्या आचळांतून दुध येण्यास प्रति- बंध करणारा मळ. ५ गोफण, जाळें, शिंकें करण्याकरितां दोरीचे दोन पदर अथवा पेड तिरकस बाहेर ओढले जातात त्यापैकीं शेवटचे तंतू पुन्हां याच रीतीनें बाहेर काढले जाऊन वळले जातात, अशा शेवटच्या तंतूपैकीं प्रत्येकास खुंट म्हणतात. ६ दुध न देणारा जनावराचा सड; मुका, आंधळा सड. ७ पृथ्वीचे चार कोपरे, 'हिंदू देश कोण खुंट चारी ।' -तुगा ११८. 'चार खुंट जहागीर. ८ दणकट शरीराची गाय, म्हैस, जनावर किंवा स्त्री. 'काळवीट खुंट खरे, '-ऐपो २४२. ९ मध्यम आकाराचा केळीचा कोंब, खोड, मोना (मोठया केळीस चिकटलेला किंवा निराळा काढलेला). १० चार रस्त्यांचा चौक; चौहाट; अड्डा. ११ रस्त्याचें टोंक; शेवट. १२ (ल.) कुटुंब; घरदार; त्यापैकीं एक व्यक्ति; वंशाची शाखा; वंशांतील मूल; वंशाचें फल; संतान. १३ बुगडीचें मळसूत्र ज्यांतून जातें तो भाग; बुगडीचा, कुड्यांचा कानां- तील भाग. १४ अंगरख्याच्या बाहीच्या चुण्या जींत एकत्र करतात ती पट्टी अथवा गजासारखी शिवण. १५ (ल.) आधारस्तंभ; आश्रयदाता. १६ (आंधळ्या कोशिंबिरीच्या खेळांत) आंधळ्याचें सोंग घेणाराचें डोळे झांकणारा मुलगा; भोग्या. १७. (गो.) कुंपणाची काटी. १८ (कों.) तुकडा. १९ खोखोच्या खेळांतील न हालणारा गडी. 'होऊनियां खुंट बसा जपून.' -मोग- र्यांची कविता, मराठी तिसरें पुस्तक खेळ ५ पृ. ४८. २० (ढोरधंदा) अत्यंत आखूड सळ. २१ कांठ; कोपरा. 'खेटितां कुंप कांटी खुंट दरडी न पाहे ।' -तुगा ३४९. २२ स्वारी; उतारू (गाडीमधील). २३ खांब; मेढ. 'मग परमस्नेहाचा खुंट उभवोन । गरके घालिती त्यासवें ।' -नव २४.१५५. २४ जनावरास बांधण्यासाठीं जमीनींत गाडलेला लांकडी खुंटा; दांडकें. २५ वाघूर लावण्यासाठीं ठोकलेल्या लांकडाच्या मेढी; खुटला. -वि. (गो.) ताठ; नीट. [सं. कुठ्-कुंठ् = स्तम्भित होणें; प्रा. खुंट; तुल॰ का. कुंटु = लंगडा] (वाप्र.) ॰होणें-हट्ट धरून खुंटा सारखें ताठ व स्तब्ध बसणें. ॰ळणें-वाल इ॰ चा एक एक दाणा लावण्यासाठीं जमीनींत खुंटीनें, किंवा काठीनें टोचा, भोंक पाडणें, टोवणे. खुंटास खुंट उभा राहणें-होणें-एक जातो तोंच त्याच्या जागीं दुसरा येणें; गेलेल्याची जागा नवीन येणारानें भरून काढणें; खंड पडल्याची जागा भरून काढणें. खुंटास खुंट घेणें -जशास तसें करणें; उसनें फेडणें. खुंटासारखा उभा राहणें-असणें-खुंटणें-खुंटाप्रमाणें ताठरणें, ताठ उभा राहणें. ॰म्ह -आजा मेला नातु झाला खुंटास खुंट उभा राहिला. खुंटावरचा कावळा = घरदार, वतनवाडी, बायकामुलें नसलेला, वाटेल तेथें राहणारा माणूस. सामाशब्द ॰कन-कर-दिनीं दिशीं-क्रिवि. तीव्र व हलक्या आवाजानें; खाडदिशीं (दोन काष्ठांचा परस्परांना लागून होणारा शब्द) (क्रि॰ वाजणें). चुटकी, टाळी यांच्या होणार्या आवाजांप्रमाणें शब्द होऊन ॰कळी-स्त्री. बगलकळी; अंगरख्याच्या पाठीमागचा त्रिकोणी तुकडा. बगलेंतील पेशकळी आणि आगा असे दोन तुकडे व खुंट- कळी मिळून अंगरख्याची एक बाजू होते. ॰खुंटण-न. खुंट अर्थ १-२ पहा. ॰पान-न. (राजा.) केळीच्या गाभ्यापासून निध- णारें शेवटचें आणि कोंक्याच्या पूर्वीं येणारें आंखूड पान. ॰बरा-पु. खुंटी. खुंटा पहा. ॰बावली-स्त्री. १ (राजा.) एक प्रकारची बाहुली. २ उंचीवरचा पदार्थ काढण्यासाठीं चवड्यांवर उभें राहणें. (क्रि॰ करणें). अशा रीतीनें खुंटबावलीवर उभें राहणें. ३ (निंदेनें). काम न करणारी व खुंट्यासारखी तिष्ठत रहाणारी स्त्री. ॰बाळी-स्त्री. स्त्रियांचे एक कर्णभूषण. 'खुंटबाळ्या साध्या बाळ्या त्याजवर ।' -अफला ५५. ॰भाजी-स्त्री. विशेष विस्तार व्हावा म्हणून पुन्हां पुन्हां अग्रें खुडून राखिलेली भाजी; खुंटापासून किंवा मुळापासून निघालेला कोंब व त्याची भाजी. ॰रोग-पु १ पुष्कळ दिवस खुंटास बांधून ठेवल्यामुळें पशूंना येणारा रोडके- पणा किंवा होणारा आजार. २ (ल.) अशा बैठेपणापासून होणारा आजार, रोग. ॰रोगी -वि. खुंटरोग झालेला. खुंटला-पु. (व.) गाडीच्या दोन बाजूंस (आंतील सामान बाहेर पडूं नये म्हणून) लाविलेले खुंट प्रत्येकी. ॰सार-वि. (गो.) खुंटासारखा.
लेप
पु. १ सारवण; माखण. २ अंगाला लावण्याची चंदन इ॰ची उटी. ३ चुना, चिखल इ॰चा भिंत इ॰वर केलेला गिलावा. ४ भिंत इ॰वरील रंगानें किंवा चुना इ॰नीं काढलेलें किंवा लिंप- लेलें चित्र. 'निर्जीव लेपें हार गिळिला ।' -शनि ३६५. 'लेपाचां देउळीं न बैसावें ।' -सूत्रपाठ ४०. ५ भात, भाजी इ॰चा हात, भांडें इ॰ना चिकटून राहिलेला अंश; खरकटें. ६ बाधा; दोष; विटाळ; मळ; बाह्यात्काराची संलग्नता. 'जेथ न संचरे पुण्यपाप । जें सूक्ष्म अति निप्कंप । गुणत्रयादि लेप । न लगति जेथ ।' -ज्ञा २.२३६. ७ रंग; वरचा रंग; मुलामा. 'तें आनंदचित्रींचे लेप ।' -ज्ञा ६.२५६. ८ ओढा; सारवण; ओढा घालण्याचें द्रव्य; दुख- णारें किंवा ठणकणारें गात्र इ॰वर झाडाचीं पानें इ॰चा बांधण्याचा ठेंचा. [सं. लिप् = लिपणें; लावणें] लेपटणें, लेपणें- सक्रि. १ लेप देणें; माखणें; ओढा घालणें. २ लिंपणें; लिंपून आकृति तयार करणें. 'तेथें हंसमयूर कोकिळा । नाना प्रकारचे लेपिले ।' -शनि १३२. ३ एखाद्या पदार्थाचा दुसऱ्यास लेप लागणें; दोष लागणें; स्पर्श होणें. 'विहित भंगाचा कर्दम । तुज लेपला नाहीं कीं ।' -मुसभा ३.४. लेपन-न. १ ओढा घालणें; लिंपणें; लेप देणें. २ लेप देण्याचा पदार्थ. लेपवणी-न. १ खरकटीं भांडीं, हात इ॰ धुतलेलें अन्नांशयुक्त पाणी. २ (कु.) गुरांना द्यावयाचें पाणी; पेज वगैरे मिश्रित कदान्न. लेपवळ- न. (राजा) खरकटें; जेवण झाल्यानंतर ताटांत राहिलेले अन्नाचे अवशेष; खरकट्याचा पसारा. लेपाटा-पु. औषध, चिखल इ॰चा वेडावांकडा व जाडा लेप; ओढा. (क्रि॰ लावणें; देणें). लेपाळणें-सक्रि. लेप लावणें; माखणें. लेपाळा-पु. भोंडीं, हात इ॰वर तेल, तूप इ॰चा जमलेला थर. (क्रि॰ बसणें; लागणें; जमणें; दाटणें). -वि. १ लेप देण्यास योग्य; लिंपण्याजोगा; लेप देण्यास जरूर असलेला. लेप्य-न. चित्र. 'जैसे सप्तरंग भरोनि जाण । लेप्य काढिलें चिताऱ्यानें ।' -कथासारामृत ७.४२. -वि. लिंपलेला; लिंपून तयार केलेला. 'लेप्या लेख्या ज्या मूर्ति जाण । त्यांसि करावे ना स्नान । इतरां मूर्तींसि स्नपन । यथाविधान करावें ।' -एभा २७.१२२.
लिफाप-पा-फा
पु. पत्रवेष्टन; पाकीट; लखोटा; मळ- पृष्ठ. [अर. लिफाफा]
ल(लं)व
स्त्री. १ (दाढी, मिश्री, डोकें इ॰ ठिकाणीं असणाऱ्या राठ केसावांचून) पाठ, पोट, हात, पाय इ॰ अव- यवांवरील बारीक, मऊ केस; अंगावरील केस. २ प्राण्यांच्या कातडीवरील मऊ केस; लोंकर. ३ खराऱ्यानें निघालेले घोड्याच्या अंगावरचे केस व मळ. [सं. लोम = लव]
मैळ
पु. मळ. मैळ-वि. मलिन. मैळणें-स्त्री. मलिन होणें; मळणें. 'तरि तें पंधरेपण न मैळे ।' -ज्ञा ८.३९. [सं. मलिन-मइल-मैल-मैळ]
मैळें
न. (महानु.) वस्त्र. 'तया अनुरागाचेया चोळे । रापे ईंद्रियांचे मैळें ।' -भाए ७९६. [सं. मल् = धारण करणें]
माळ
माळ māḷa m An elevated and extended tract of ground, esp. as somewhat stony or sterile; a plain, a down, a heath. 2 A loft. It is floored with bamboos, thus differing from माडी & माळा.
माळ māḷa f (माला S) A garland, a wreath, a string of flowers. 2 A row of petals, a corol. Esp. in comp. with the numerals; as एकमाळ, दुमाळ, तिमाळ. 3 A string of gems or beads; a necklace; a rosary. 4 fig. A string, line, series; a regular succession or concatenation of things in general (as of waterpots around a waterwheel, of laborers to pass from hand to hand, of persons, legend-expounders, priests &c. to officiate by turns): also the rope of a waterwheel to which the pots are fastened. v लाव, लाग. 5 A day of the नवरात्र;--because a fresh string of flowers is used every day of this period. Ex. आजची कितवी माळ आहे. 6 The roll of सूत around the wheel passing on to the चात or whirler. In spinning or drawing threads.
माल
माल māla m ( A) Property or possessions. 2 Goods, wares, merchandise, commodities. 3 An article or a thing considered with relation to worth or value. Ex. हा आठा रुपयांचा माल आहे. मालचा माल (The commodity or thing itself; the article exactly in statu quo ante.) A phrase used of money, goods &c. of which, after such application or employment as might augment or improve, or diminish or injure it or them, no change has taken place whether for better or for worse.
माळ घालणें
माळ घालणें māḷa ghālaṇēṃ To cast a garland around the neck (of a male or a female) as a token of electing for one's husband or wife. Ex. लग्नार्थीं हिंडता भू- मंडळ ॥ त्यासीं राजकन्या घाली माळ ॥. माळ (or सं- साराची-कामाची-माळ) घालणें (-पडणें) To cast upon one (or to fall upon one) the management of worldly affairs or of a business.
माला
माला mālā f (S) A garland, a string or wreath of flowers. 2 A string of beads, a necklace, a rosary. 3 A line or row.
माला mālā m (Or मालू) A whitish and unctuous earth with which writing-boards &c. are rubbed.
माळा
माळा māḷā m The room formed by overlaying with slight sticks the cross beams of a house, a loft. 2 An erection or a stand in a cornfield for the person that watches it: also a stand generally to see or look out from. 3 Scaffolding (of a building).
मालके माल
मालके माल mālakē māla A phrase from H. See मालचा माल.
में(मे)कण
न. (राजा.) कानांतील मळ; कर्णमल.
मेण
न. १ मधाच्या पोळ्यांतून निघणारा चिकट, घट्ट, चरबीसारखा पदार्थ; मधूच्छिष्ट. २ जनावराच्या शरीरांतून किंवा वनस्पतीपासून काढण्यांत येणारा वरील सारखा पदार्थ; तेलाची बेरी. ३ (कु.) मासे मारण्याकरितां केलेलें विषारी औषध. -वि. (ल.) मऊ व चांगला शिजलेला पदार्थ (तांदूळ डाळ, इ॰). [फा. मोम्] (वाप्र.) ॰काढणें-(ल.) खूप चोपणें, झोडणें, मारणें. ॰घालणें-(कु.) मासे धरण्यासाठीं त्रिफळे, गेळफळ, निवळकांडें इ॰ कुटून पाण्यांत घालणें. ॰स्वस्त होणें-(मनुष्य) लठ्ठ व गुलगुलीत होणें. ॰होणें-१ नरमावून सौम्य, शांत होणें. २ शिजून मेणाप्रमाणें होणें (भात, डाळ इ॰). मेणाची चोटली कढयता-ओढून चंद्रबळ आणणें. मेण(णा)वणें-विणें-१ मेण, तेलाच्या तळची बेरी, तेलांत भिजवलेली चिंध्यांची राख इ॰ नीं सूप, टोपलीं इ॰ मढविणें; त्यांस लेप देणें. २ (ल.) गोंडस, लठ्ठ बनणें. सामाशब्द. ॰कट-न. १ (समई, तेलातुपाचें भांडें यांस चिक- टून असणारी) तेलाची घाण, मळ, चिकटा, बेरी. -वि. १ घाण तेलानें, तुपानें माखलेला; मेणचट; तेलकट; ओशट (वास). [मेण + कट] मेणक(कु)टणें-अक्रि. मेणकट लागणें; घाण तेला- तुपानें माखलें जाणें (भांडें). ॰कापड-न. मेण लावलेलें एक प्रकारचें कापड. ॰गट, मेण-कुटला-वि. अतिशय शिजविल्यानें मऊ व मेणासारखा झालेला (भात). [मेण] ॰गट, ॰कुटलें-न. जास्त शिजविल्यानें बिघडलेला भात. ॰गटी-स्त्री. जास्त शिजवि लेल्या भाताचा मऊपणा व मेणचटपणा. [मेणगट] ॰गुट होणें- अक्रि. एकजीव होणें; मिसळणें. ॰गोळी-स्त्री. १ मेणाची गोळी. २ (ल.) मऊ, नरम, सौम्य मनुष्य. ॰घुणा-ण्या-वि. सौम्य, शांत, गंभीर मुद्रेचा पण मनाचा कुढा, लबाड मनुष्य; न बोलणारा, आंतल्या गांठीचा इसम. ॰चट-वि. १ मेणचट; कण्या न पडलेलें (तूप). २ मऊ व मेणासारखा शिजलेला (भात). ३ गिच्च व पचपचीत (शिजविण्यांत बिघडलेलें अन्न). ४ मंद; ढील; गयाळ; सुस्त; निर्जीव; उत्साह, धैर्य, पाणी नसणारा. ५ कृपण; कंजूष (मेणचाटणारा). ॰चोट-चोट्या-वि. १ नपुसंक; निर्बल; नामर्द. २ जड; रेंगाळणारा; मेंग्या मारवाडी. ३ भोळ- सट; भोळानाथ. ॰तेल-न. (गो.) तेलांत शिजवलेलें मेण; (स्त्रिया कुंकु लावतांना हें मेणतेल कपाळास लावून त्यावर पिंजर लावतात). ॰बत्ती-स्त्री. मेणानें मढविलेली वात; मेणाचा दिवा. [फा. मोम, मूम + बत्ती] ॰बाजार-पु. जररोज दुकानासाठीं पालें द्यावयाचीं व तीं रात्रीं काढावयाचीं अशीं दुकानें असलेला बाजार; जुना बाजार. हा मुख्य रस्त्यांत नेहमीच्या दुकानाशीं समांतर ओळींत भरवितात. आयते तयार केलेले कपडे व जुनेपाने जिन्नस यांत विक्रीस मांडतात. ॰बाजारी-पु. १ मेणबाजारांतील दुकानदार, माल विकणारा. २ (ल.) पत नसलेला, बेअब्रूचा माणूस. ॰बावली-स्त्री. १ (ल.) लहान, सुबक, नेटकी व चपल स्त्री. २ गरीब, दुसऱ्याच्या तंत्रानें चालणारी नवरी, बायको. ॰वला-वि. (प्र.) मेणोला; मेणा पहा. ॰वात-स्त्री. मेणबत्ती पहा. मेण्या-ण्या-वि. मेण, तेलाचा-तुपाचा गाळ, जाळलेल्या चिंध्या, शेण्यांची राख इ॰ कांच्या मिश्रणानें लेपलेला (हारा, टोपलें, सूप, पाटी, इ॰). [मेण] मेणाचा-वि. १ मऊ; अशक्त; कम- कुवत. २ नरम; निर्जीव. ३ अयोग्य; अक्षम. ४ धिक्कार, तिरस्कार दाखविण्याकरितां नेहमीं योजतात. उदा॰ तूं कोण मेणाचा मला सांगायला ? ॰मेणाळ-स्त्री. (जरतारी धंदा) मेण असलेली, मेणयुक्त तार. मेणी-स्त्री. १ तेलकट काजळ; मस; घाण. २ केसांच्या वळलेल्या जटा. ३ (ठाणें) काकडीची एक जात. -कृषि ४८२. मेणी मोडशी-स्त्री. जुनाट, फार दिवसांची मोडशी. [मेण्या + मोडशी] मेणें-न. १ (कों.) जिच्या चिकानें मासे आंधळे होऊन सहज सांपडतात अशी नदी इ॰च्या प्रवाहांत टाकतात ती एक वनस्पति; कांड्याहुरा. २ माशांना मारण्याकरितां, गुंगी आणण्याकरितां नदींत टाकलेटा चिकचिकीत द्रव्याचा पदार्थ. मेणे डोळे-पुअव. डोळे आले असतां त्यांतून अतिशय पू वाहणारे, फार बरबरणारे डोळे; बरबरीत, पुवाचे डोळे; शेणे डोळे; याच्या उलट काटे डोळे. मेणें वावर-न. (रब्बीच्या पेरणीकरितां) नांगरून, खत घालून, राखून ठेवलेलें वावर. मेणोला, मेणोल-वि. मेणा पहा. मेण्या-वि. १ मऊ; दुबळा; नामर्द; गरीब. २ मंद; धारिष्ट नसलेला; निर्जीव. [मेण] मेण्यामारवाडी-पु. दिसण्यांत भोळा पण कावेबाज इसम; सौम्य मुद्रेचा पण शठ मनुष्य. मेण्या साप- पु. १ सापाची एक जात. २ (ल.) गुप्तपणें आकस धरून नाश करणारा मनुष्य.
मळा
मळा maḷā m (माला S) A plantation of fruits or vegetables, an orchard &c.: also a tract of ground fit to be so used, i.e. alluvial or rich and low and level. 2 A species of sesamum.
मळभ-ब
न. अभ्र; आभाळ; ढगांचा समुदाय. २ आकाशाची अभ्राच्छादित स्थिति. ३ (बे. कु.) आकाश. [सं. मल + अभ्र मळभभर-क्रिवि. पुष्कळ; अतिशय; बेसुमार (बोलणें; खाणें) मळभी-स्त्री. (समुदायांतून) निराळा झालेला ढग; लहान ढग. मळबट-स्त्री. (कु. गो.) अभ्र; मेघाचा समुदाय. मळाब-न. (कु.) १ अभ्र; ढग. २ ढगांनीं युक्त असें आकाश.
मलद्वार
मलद्वार maladvāra n (S मल Fæces, द्वार Door.) The anus.
मळगावणें or मळघावणें
मळगावणें or मळघावणें maḷagāvaṇē or mmaḷaghāvaṇēṃ v c (मळ & गावणें) To dirty, soil, befoul.
मळगी
स्त्री. (कर्ना.) मलई; मळीची जमीन [सं. मल]
मळी
स्त्री. मळईची जागा; नदीकांठाचा गाळाचा प्रदेश. 'ढवळपूरचे मळीस मुकाम असतां सवाई जयसिंग माळवे प्रांताचा सुभेदार त्याची भेट नानासाहेबांनीं घेऊन बोलणें होऊन तहाचें बोलणें ठरलें.' -रा २. पेश ९१. [मल]
(सं) स्त्री० पाक करतांना साखरेंतून निघणारा मल. २ मळाची वळी, वळकटी.
मळी maḷī f (मळ) A roll, as rubbed up, of the scurf of the body. 2 Mud and garbage brought by rains or a river, alluvium. Hence 3 A river-sidespot as suitable for a plantation or garden: also the plantation or garden thereon. 4 Sugar-skimmings: also skimmings or scum in general. 5 R A little division in a field; a plat, plot, bed.
मळई
मळई maḷī f (मळ) Mud and garbage brought by rains or the river, alluvial depositions. 2 The garden or plantation thereon. 3 A seine or large fishing net. 4 (Preferably मलई) Cream.
मळीण
मळीण maḷīṇa a (मलिन S or from मळ) Dirty, filthy, foul. 2 Foul figuratively; soiled with crime or vice. 3 Rusty, not fresh or ready--learning &c.
मळका
मळका maḷakā a (मळ) Dirty, foul, filthy.
मळकोरा
मळकोरा maḷakōrā a (Formed from मळ & कोरा, in humorous opposition to घणकोरा) Somewhat tarnished, that has lost the gloss of newness--a coin.
मळमळ
स्त्री. १ पित्तामुळें, कळकट पदार्थ खाण्यांत आल्या- मुळें वाती होईलसें वाटणें; उमासा (क्रि॰ येणें). २ (ल.) कांहीं संशय आल्यामुळें मनास वाटणारी अस्वस्थता; चित्ताची संशया- त्मकता. (क्रि॰ फेडणें; घालणें; फिटणें; जाणें). 'माझ्या घराचा झाडा घेईन तुम्ही आपल्या मनाची मळमळ फेडून टाका.' [ध्व.] मळमळणें-अकर्तृकक्रि. वांती होईल अशा भावनेनें युक्त होणें- उमदळणें; उमसणें. 'मला मळमळतें'; 'पोटांत मळमळतें. मळ; मळी-स्त्री. वीट; तिटकारा; उमासा. मळमळीत-वि. १ बेचव; पाणचट; योग्य प्रमाणापेक्षां कमी मालमसाला असलेला (खाद्य- पदार्थ). २ पाणचट; कवकवीत (फळ) ३ बेंगरूळ; सौम्य; बेडौल (मनुष्य). ४ नीरस; तडफ नसलेलें (गाणें, भाषण, वागणूक). ५ ओंगळ; तेजहीन; घाणेरडें दिसणारें; बोजड (धातूचें भांडें, शस्त्र, हत्यार). ६ ढिला; सैल; अव्यवस्थित; नीटनेटका नसलेला (पदार्थ, कामाची पद्धत). म्ह॰ मळमळीत सौभाग्यापेक्षां झळझळीत वैधव्य बरें.
मलमूत्र
मलमूत्र malamūtra n (S मल Fæces, मूत्र Urine.) Discharging before and behind (through terror). v कर, हो. Ex. व्याघ्र पाहतांच म0 झालें Ventris timore laxatio.
मळणें
मळणें maḷaṇēṃ v i (मळ Dirt.) To contract dirt; to get dirtied.
मलपृष्ठ
मलपृष्ठ malapṛṣṭha n (S मल Dirt, पृष्ठ Page.) The outer or first page of a book left unwritten because exposed to be dirtied, the fly-leaf.
मळवटी
मळवटी maḷavaṭī f (मळ & वटणें) A roll (as rubbed up) of the sordes or scurf of the body.
स्त्री. अंगावरच्या मळाची वळवटी; मळी. [मळ + वटणें]
मलय
पु. १ हिंदुस्थानच्या पश्चिम किनाऱ्यावरील अरबी समुद्राला समांतर अशी एक पर्वताची रांग; मलबारघाट. २ ह्या पर्वताच्या लगतची किनाऱ्याची पट्टी; मलबारप्रांत. ३ मलाया द्वीपकल्प. [सं. द्रा. मल्ये = पर्वत] मलयाग(गी)र-पु. मलय- पर्वतावरील चंदनाची एक उंची जात. 'कृष्णागर मलयागर परि- मळ । देवदार वृक्ष तेथें ।' -ह २३.१००. [सं. मलय + अगरु] मलयानिल-पु. मलयपर्वतावरील सुगंधी वारा. 'सहजें मलया- निलु मंदु सुगंधु । तया अमृताचा होय स्वादु ।' -ज्ञा ४.२२०. मलयी-वि. मलाया द्वीपकल्पासंबंधाचा (रहिवासी, जिन्नस).
मोहन
वि. मोवन पहा. कणीक किंवा कोणतेंहि पीठ मळ- तांना त्यास मऊपणा आणण्यासाठीं त्यांत घातलेलें तूप, तेल.
मोळ
पु. कानांतील मळ.
नारिकेल
नारिकेल nārikēla m or नारिकेली f S The Cocoanut-tree, Cocos nucifera. Some of the Indian trees may be learned from ex. नारीकेली पूगी रातांजन ॥ मल- यागर सुवास चंदन ॥ अशोक खर्जूरी सघन ॥ आम्र धात्री खिरणीया ॥ वट पिंपळ फणस निंब ॥ दाळिंबी सौबरी मंदार कदंब ॥ अंजीर पारिभद्र नभ ॥ भेदीत गेले दिस- ति ॥ चंपक फुलले जाई जुई ॥ मोगरे मालती बकूळ पाही ॥ शेवती अगस्ती वृक्ष ठायीं ठायीं ॥ वेष्टूनि वल्ली चढिनल्या ॥.
नातवंड
न० नातरूं, मुलाचें किंवा मुलीचें मल.
निर्मळ, निर्मल
वि. १. मळ नसलेला; शुद्ध; स्वच्छ; पवित्र. (ल. व शब्दशः) माती नसलेले (वस्त्र); ढग नसलेले (आकाश); कपट नसलेली (बुद्धी) इ. २. निर्भेळ. [सं.निर्मल]
निरोलणे, निरोळणे
सक्रि. मळ काढून स्वच्छ करणे; मशागत करणे. [सं.निर्मल]
निरूहबस्ती
स्त्री. मल व अन्य दोष बाहेर काढून टाकण्यासाठी पिचकारीच्या साहाय्याने दिलेले औषध; एनिमा.
नर
पु. १ मनुष्य. २ (माणूस, जनावर, पक्षी इ॰ तील) पुरुष; पुरुषजात; सर्वजातीय पुरुष व्यक्तिमात्र. ३ (तुंबजोड इ॰) जोडीच्या पदार्थांतील मोठा पदार्थ. ४ अर्जुन. 'वत्सांच्या बहु शोकीं कृष्णा बुडतां तिला म्हणे नर तो ।' -मोमंभा १.१६. ५ पुराणपुरुष; आदिपुरुष; परमपुरुष. ६ घोडा. 'कोतल नर कोत- वाल वारण मगनमस्त किल करित ।' -ऐपो २००. ७ (ल.) मळ- सूत्री खिळा; दाराच्या झडपानां असलेल्या लोखंडी पट्टींत-मादींत बसणारा चवकटीचा खिळा. ८ (ल.) उंसाच्या चरकांतील तीन लाटांपैकीं मधली किंवा दोन लाटांतील उजवी लाट; नवरा. ९ बुद्धिबळांतील सोंगटी. १० (मुद्रण) (ल.) टंककृतींत पोलादी खिळ्यावर घासून तयार केलेला ठसा; इं. पंच्; याच्या उलट मादी = मेट्रिस. ११ मोती डोळ्यासमोर धरल्यास आंतील बाजूस चिरल्यासारखीं दिसणारी रेघ; करवा पहा. १२ अंकुर; कोंब. -शे ३.६. १३ (कु.) वाशांतील, वाळलेल्या कळकांतील उभा घट्ट तंतु. १४ नखाच्या मुळावरचें उचकटलेलें कातडें. १५ (ज्यो.) उन्नतांश ज्या. [सं. नर = पुरुष, मनुष्य; फा. नर्] (वाप्र.) ॰मोडून नारायण घडणें-(एखादी वस्तु इ॰) घडणें व मोडणें व पुन्हां घडणें; त्याच त्याच गोष्टीची घडामोड करणें. नराचा आंख-पु. (बिडाचा कारखाना) उंसाच्या चरकाच्या मधली वृत्तचिती किंवा नर बसविण्यासाठीं त्याच्या मधोमध असलेल्या भोंकांत बसविण्याचा आंख. नराचें चाक-न. (बिडाचा कार- खाना) चरकांतील वरची पाटली आणि मधली वृत्तचिती यांच्या दरम्यान बसविण्याचें दंतुर चाक. नरो वा कुंजरो वा-(अश्व- त्थामा या नांवाचा मनुष्य कीं हत्ती युद्धांत मारला गेला हें मला माहित नाहीं अशा प्रकारचें गुळमुळीत उत्तर धर्मराजानें द्रोणा- चार्यास देऊन त्यास चकविलें त्यावरून) एखाद्या गोष्टीविषयीं पूर्ण अज्ञान, औदासिन्य इ॰ दर्शविण्याकरितां दिलेलें संदिग्ध उत्तर; कानावर हात ठेवणें; माहीत नाही असें दाखविणें. म्ह॰ १ नरा हराहुन्नरा = मनुष्याला हजारों धंदे व क्लृ/?/प्त्या करतां येण्या- सारख्या आहेत. २ (हिंदी) नर करे तो नरका नारायण होजाय = मनुष्यानें मनावर घेतलें तर तो वाटेल तें कार्य करूं शकेल, किंब- हुना तो ईश्वरहि बनूं शकेल. सामाशब्द- ॰कपाल-न. (मृत) माणसाच्या डोक्याची अस्थिमात्रावशिष्ट कवटी. [सं. नर + सं. कपाल = कवटी] ॰कुंजर-पु. १ गणपति; गजानन; गजवदन. 'ते कंबल आणि अश्वतर । त्याहीं हृदयीं चिंतिला नरकुंजर ।' -कथा ५.६. १२४. २ नरश्रेष्ठ; मनुष्यांत श्रेष्ठ; नरवर. [सं. नर + कुंजर = हत्ती] ॰केसरी-पु. १ नरसिंह. २ सिंहाप्रमाणें शूर मनुष्य; नरश्रेष्ठ. [सं. नर + केसरिन् = सिंह] ॰जन्म-पु. मनुष्य- योनि; मनुष्याचा जन्म. 'नरजन्मामधिं नरा करुनि घे नरनारा- यण गडी ।' -राला ८७. [नर + जन्म] ॰तनु-स्त्री. मनुष्यदेह. 'दैवें नरतनु सांपडली मूढा कशि तुज भुल पडली' -शिवदिन केसरी (नवनीत पृ. ४४६) [नर + सं. तनु = देह] ॰तबेला-पु. (व.) फक्त, पुष्कळ पुरुषच राहतात अशी जागा; पुरुषांचें वठार. [नर + फा. हिं. तबेला] ॰तुरंगम-पु. (ज्यो.) एक नक्षत्र- पुंज. 'सप्तर्षि, ध्रुवमत्स्य, ययाति, नरतुरंगम वगैरे राशींची ओळख मुलांना करून देतां येईल.' -अध्यापन २००. [नर + सं. तुरंगम = घोडा] ॰त्व-न. पौरुषत्व. 'नराच्या ठायीं नरत्व । अहंभाविये सत्व ।' -ज्ञा ७.३५. ॰देव-पति-पु. मनुष्यरूपांतील देव; राजा; नृपति. 'कां तया नरदेव म्हणो नये ।' -दावि ३०५. [नर + सं. देव, पति] ॰देह-पु. नरजन्म; मनुष्याचें रूप. नरतनु पहा. 'नरदेह वायां जाय । सेवीं सद्गुरूचे पाय ।' -तुगा ४४९७. [नर + देह] ॰नारायण-पुअव. विष्णूच्या अंशापासून उत्पन्न झालेले दोन प्राचीन ऋषी. यांचेच अवतार पुढें अर्जुन व श्रीकृष्ण हे झाले अशी पुराणांतरीं कथा आहे. -शर. अर्जुन व श्रीकृष्ण. 'नरनारायण सेनानी, ज्या जगतीं जोड दिसेना ।' -विक ७४. [नर = अर्जुन + नारायण = श्रीकृष्ण] ॰पट्टी, पाटी-स्त्री. आटे पाडावयाची वस्तु घट्ट धरणारें यंत्र. यांत दोन बाजूस हात व मध्यें चपटा भाग असतो. चपट्या भागांत निर- निराळ्या आकारमानांचीं भोंकें असतात. [नर( = नर अर्थ ७ पहा) + पट्टी, पाटी] ॰पति-पु. १ राजा. २ पायदळांतील सैनिकांचा मुख्य. -हंको. [नर + पति] ॰पशु-पु. (निंदार्थीं) पशुप्रमाणें वर्तन करणारा; मुर्ख व अधर्मी मनुष्य; दांडगा व निर्दय मनुष्य; नराधम. [नर + पशु] ॰पातें-न. नखें काढण्याचें यंत्र; नराणी. ॰बलि-पु. १ यज्ञांत बलि द्यावयाचा मनुष्य. २ ज्यांत मनुष्यास बळी देतात तो यज्ञ; नरमेध. [नर + सं. वलि = आहुति] ॰भू-स्त्री. प्राचीन काळीं हिंदूंना माहित असलेल्या जगाचा मध्यभाग; मध्य- वर्ती देश; भरतखंड. [नर + सं. भू = जमीन, पृथ्वी] ॰मादी- स्त्री. १ जोडीच्या दोन पदार्थांतील (युग्मांतील) पुरुष व स्त्री. उदा॰ पायांत घालावयाचे जोडे, बूट, अंगारख्याच्या बाह्या, उंसाच्या चरकांतील लाटा इ॰ यांपैकीं नर मोठा असतो व मादी नरापेक्षां किंचित् लहान असते; दोन वस्तू मिळून होणार्या पदार्थोपैकीं नर हा भारी असून मादींत शिरणारा असतो. उदा॰ बिजागरीचा खिळा, कुरडईच्या सोर्यांतील दट्ट्या इ॰. २ जोडीच्या दोन पदार्थांतील स्त्रीपुरुषसंबंध; लहानमोठेपणा. ३ (व्यापक) (दोन पदार्थ, व्यक्ति इ॰ कांतील) श्रेष्ठकनिष्ठभाव; तरतमभाव; बरेवाईटपणा; उजवा-डावा प्रकार. 'मोत्यांत नरमादी असतच आहे.' ४ उंसाच्या चरकांतील लाटा. ५ बिजागरी. ६ एक प्रकारचें कुलूप. [नर + मादी; फा. नर्मादा] ॰मेध- पु. मनुष्ययज्ञ; ज्यांत नरबली देतात तो यज्ञ. 'युद्धांत पराभव होऊं नये म्हणून प्राचीन ग्रीक, गॉल, सेमाईट व हिंदु लोक नर- मेध करीत असत.' -ज्ञाको न. २६. [नर + सं. मेध-यज्ञ] ॰यान- न. मनुष्यांनीं वाहून नेण्याचें वाहन, बसून जाण्याचें साधन. उदा॰ पालखी, मेणा, डोली, रिक्षा इ॰. 'अश्वगजादि आरोहण । शेष- शयन गरुडासन । महामहोत्सव नरयान । रथोत्सव जाण करावा ।' -एभा २९.२६०. [नर + सं. यान = वहन, वाहन] ॰योनि-स्त्री. नरजन्म; मनुष्ययोनि. [नर + सं. योनि = जन्म] ॰लवंग-स्त्री. लवंगांची एक जात. -मुंव्या १५०. ॰वर-वि. नरश्रेष्ठ; थोर; उदार (मनुष्य). 'नरवर कृष्णासमान ।' -स्वयंवर नाटक. [नर + सं. वर = श्रेष्ठ] ॰वाहन-न. नरयान पहा. [नर + सं. वाहन] ॰सिंह, नरशा, नरशिं(सि)य-पु. १ विष्णूचा चवथा अवतार. 'भाऊनि नरसिंया केला नवस । तो प्रगटोनि स्वप्रीं वदे मातेस ।' -दावि १९. २ (ल.) सिंहासारखा उग्र व पराक्रमी पुरुष; पुरुष श्रेष्ठ. [नर + सं. सिंह] ॰सिंहजयंती-पु. नृसिंहावताराचा दिवस; वैशाख शुद्ध चतुर्दशी. [नरसिंह + जयंती = जन्मदिवस] ॰सिंहाव- तार-पु. दैत्यांचा राजा हिरण्यकशिपु याचा वध करण्यासाठीं श्रीविष्णूनें धारण केलेलें सिंहाकृति मनुष्याचें रूप, अवतार. [नर- सिंह + अवतार = प्रकट होणें, रूप घेणें] ॰सिंहावतार घेणें- (ल.) अतिशय रागावणें; कोपाविष्ट होऊन उग्र स्वरूप धारण करणें. ॰हर-हरदेव-पु. नरसिंह अर्थ १ पहा. [नर + हरि, हर, हरदेव] ॰हरदेवाची पालखी-स्त्री. नरसिंहाची पालखी. हिला उचलण्याचें पुण्य स्वतःला लाभावें म्हणून हिच्या दांडयास खांदा लावण्यास भक्तमंडळी फार उत्सुक असते. तेव्हां साहजिक गोंधळ, अव्यवस्था होते. २ (त्यावरून ल.) जें काम करावयाला बर्याच लोकांची मदत अवश्य आहे व ज्याची जबाबदारी कोणा एका विशिष्ट व्यक्तिवर नसते व जें काम चांगल्या रीतीनें झाल्याची किंवा न झाल्याची कोणी पर्वा करीत नाहीं असें-अर्थांत वेळीं अवेळीं, केव्हां तरी कसें तरी व्हावयाचें-काम; अव्यवस्थित रीतीनें केवळ लोकांच्या मर्जीनुरूप घडून येणारें काम, गोष्ट; बारभाई कारभार. ॰हरी-पु. नरसिंह. [नर + सं. हरि-सिंह] नराधिप, नरेंद्र, नरेश, नरेश्वर-पु. राजा; नृपति. - १५.४५. 'तो बोलता झाला शुकयोगींद्र । परिसता नरेंद्र परीक्षिती ।' -एभा १.१८३. [नर + सं. अधिप, इंद्र ईश, ईश्वर = श्रेष्ठ, पालन- कर्ता, रक्षणकर्ता] नरेंद्रमंडळ-न. माँटफर्ड सुधारणान्वयें दिल्लीस स्थापन केलेलें हिंदी संस्थानिकांचें मंडळ; राजांची सभा. (इं.) चेंबर ऑफ् प्रिन्सेस्. [नरेंद्र । मंडळ = सभा, समिति] नरोत्तम- पु. १ नारायण; पुरुषोत्तम. २ -वि. नरश्रेष्ठ; मनुष्यांत उत्तम असलेला. [नर + उत्तम] नरोबा-पु. नरसिंह; नरहरि. 'नरोबाची कृपादृष्टी । जाल्या कोण्ही नाहीं कष्टी ।' -मध्व ३०६.
नरक
पु. यमनगरींतील विष्टा, रक्त, पू इ॰ घाण पदार्थांनीं भरलेली, पापी लोकांनां यातना भोगण्याची जागा. याचे ८४ प्रकार आहेत. पापी लोकांसाठीं मृत्यूनंतरचें स्थान, लोक. २ (ल.) विष्टा; मल; घाणीचा संचय; (सामा.) विष्टा; गू. ३ विष्णूनें मार- लेला एक राक्षस. ४ (ख्रि.) ईश्वरी सहवासाचा व तज्जन्य आध्या- त्मिक अनुग्रहाचा अभाव. 'विरह तुझारे नरक भयंकर । भासे प्रलयानल पेटे ।' -उसं २९३. ५ (ख्रि.) सैतान व दुरात्मे यांचें वसतिस्थान. तुझें संपूर्ण शरीर नरकांत टाकलें जावें यापेक्षां तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा यांत तुझें बरें आहे.' -मत्त ५.२९. [सं.] (वाप्र.) ॰अंगावर घेणें-(एखाद्याचें) वाईट, दुष्कीर्तिकारक काम अंगावर घेणें. ॰उपसणें-(एखाद्याच्या) घाणे- रड्या गोष्टी, कृत्यें बाहेर काढणें; (एखाद्या) घाणेरड्या गोष्टीची, प्रश्नाची शहानिशा, चर्चा करणें. ॰तोंडांत सांठविणें-तोंडांत नेहमीं अपशब्द, ग्राम्य शब्द भरलेले असणें; नेहमीं ग्राम्य, अश्लील, शिविगाळीचें भाषण करणें. -काची वाट दाखविणें-(एखाद्यास) दुर्मार्गप्रवृत्त करणें; वाईट उदाहरण घालून देणें. -काची सामुग्रीस्त्री. १ (नरकवासास पात्र करणार्या) दुष्कृत्यांचा समुदाय. २ (रागानें) संसार. ३ (रागानें) नकोशी, तिरस्करणीय गोष्ट, काम. -काचें खापर-टोपलें-न. विष्टेनें भरलेलें टोपलें. २ खापर. ३ (ल.) कर्ज; आंतबट्ट्याचा धंदा; तिरस्कारणीय, नकोशी गोष्ट, काम, लोकापवाद, अपकीर्ति इ॰. (क्रि॰ येणें; फुटणें; डोइ- वर येणें; फुटणें; घेणें). -कांत जीभ घालणें-१ खोटें बोलणें. २ घाणेरड्या गोष्टीचें अभिवचन देणें. -कांत धोंडा टाकून शिंतोडा घेणें-१ घाणेरडीं कृत्यें करण्यांत पुरुषार्थ, समाधान मानणें. २ वाइटाशीं संबंध ठेवून त्याचा वाईट परि- णाम भोगणें. -कांत पचणें-घाणेरड्या, किळसवाण्या जागेंत, परिस्थितींत खितपत पडणें. -कानें अंग भरणें-(ल.) कर्जाखालीं बुडणें; पराकाष्ठेचें कर्जबाजारी होणें. -कासारखा घाणेरा-वि. नरकाप्रमाणें तिरस्कारणीय, नकोसा वाटणारा (दारुड्या, तगादेदार, धरणेकरी, गळग्रह, नकोशी गोष्ट इ॰). -कासारखें घाणणें-(एखादी गोष्ट, व्यक्ति इ॰) नरका- प्रमाणें तिरस्कारणीय वाटणें. -कीं धजा-ध्वजा लावणें- ज्यामुळें नरकांत श्रेष्ठंपणा गाजेल अशीं घाणेरडीं कृत्यें करणें. लोकांच्या नरकांत बुडणें-लोकांचें पराकाष्ठेचें देणें होणें; लोकांच्या कर्जांत बुडणें. सामाशब्द- ॰कुंड-न १ पापी मनुष्य मरणोत्तर ज्यांत खितपत पडतो असें नरकाचें कुंड. अशीं ८६. कुंडें आहेत. २ (ल. तिरस्कारार्थी) स्त्रीचा गर्भाशय. 'नऊ मासपर्यंत प्राण्यास नरकुंडांत वास घडतो.' [सं. नरक + कुंड] ॰केंस- पुअव. (मुलास) उपजत असलेले, गर्भावस्थेंत आलेले, जन्मल्या- पासूनच असलेले केंस. [नरक + केंस] ॰चतुर्दशी-स्त्री. विष्णूनें नरकासुराचा वध केला तो आश्विन वद्य चतुर्दशी दिवस. या दिवशीं पहांटेस चंद्रोदयीं अभ्यंगस्नान करून यमतर्पण करावयाचें असतें. [नरक = नरकासूर + चतुर्दशी] ॰पाल-ळ-पु. यम. 'स्तुत होय स्वःपाळा केव्हां जी जी म्हणे नरकपाळा ।' -मोसभा ६.९१. [नरक + सं. पाल् = रक्षण करणें] ॰वणी-न. घाणेरडें व दुर्गंधयुक्त पाणी. [नरक + पाणी] ॰वासपु. १ नरकांत राहणें. २ (ल.) गर्भवास. ३ (एखाद्या) घाणेरड्या किंवा आपत्ति भोगाव्या लाग- णार्या जागेंत राहणें. ४ अधर्मस्थल. [नरक + वास = राहणें] नर- काड-डी, नरकड-स्त्री. घाणीची व दुर्गंधयुक्त जागा; गुखाडी. 'सोंगाच्या नरकाडीं । तुका बोडोनिया सोडी ।' -तुगा २८१९. [नरक]
नरक
पु. १. यमनगरीतील विष्ठा, रक्त, पू इ. घाण वस्तूंनी भरलेली, पापी लोकांना मृत्यूनंतर यातना भोगण्याची जागा. याचे ८४ प्रकार आहेत. २. (ल.) विष्ठा; मल; घाणीचा संचय; (सामा.) गू. ३. विष्णूने मारलेला एक राक्षस. ४. (ख्रि.) ईश्वरी सहवासाचा व तज्जन्य आध्यात्मिक अनुग्रहाचा अभाव. ५. (ख्रि.) सैतान व दुरात्मे यांचे वसतिस्थान [सं.] (वा.) नरक अंगावर घेणे–वाईट, दुष्कीर्तिकारक काम अंगावर घेणे. नरक उपसणे–एखाद्याच्या घाणेरड्या गोष्टी, कृत्ये बाहेर काढणे; त्यांची शहानिशा, चर्चा करणे. नरक तोंडात साठवणे–तोंडात नेहमी अपशब्द, ग्राम्य शब्द भरलेले असणे; नेहमी अश्लील, शिविगाळीचे भाषण करणे. नरकाची वाट दाखविणे–एखाद्याला वाईट कामाकडे प्रवृत्त करणे; वाईट उदाहरण घालून देणे. नरकाची सामुग्री –१. नरकवासाला पात्र करणाऱ्या दुष्कृत्यांचा समुदाय. २. (रागाने) संसार. ३. (रागाने) नकोशी, तिरस्करणीय गोष्ट, काम. नरकाचे खापर, टोपले–कर्ज; आतबट्ट्याचा धंदा; लोकापवाद; अपकीर्ती इ. (क्रि. येणे, फुटणे, घेणे, डोईवर येणे.). नरकात जीभघालणे–१. खोटे बोलणे. २. घाणेरड्या गोष्टीचे अभिवचन देणे. नरकात धोंडा टाकून शिंतोडे घेणे–१. घाणेरडी कृत्ये करण्यात पुरुषार्थ, समाधान मानणे. २. वाईटाशी संबंध ठेवून त्याचा वाईट परिणाम भोगणे. नरकात पचणे, नरकात पिचणे–घाणेरड्या, किळसवाण्या जागेत, परिस्थितीत खितपत पडणे. नरकाने अंग भरणे– (ल.) कर्जाखाली बुडणे; पराकाष्ठेचे कर्जबाजारी होणे. नरकी धजा लावणे, नरकी ध्वजा लावणे–ज्यामुळे नरकात श्रेष्ठपणा गाजेल अशी घाणेरडी कृत्ये करणे. लोकांच्या नरकात बुडणे–लोकांचे पराकाष्ठेचे देणे होणे; लोकांच्या कर्जात बुडणे.
ओंकीर
पु. (गो.) डोळ्यांतून निघणारा मळ, पू; उकीर अर्थ ३ पहा.
पाखाना
(पु.) हिंदी अर्थ : संडास, मल, पुरीव. मराठी अर्थ : शौच्चालय, शौच्च, मूत्र.
पानकी
स्त्री. एक रोग; अंगाचा दाह, मळ पातळ होणें, अंतर्बाह्य पिवळटपणा आणि डोळ्याला पांढरेपणा हीं लक्षणें यांत होतात. -योर १.५३५.
पिलूं-ल्लूं, पिलें
न. पशु, पक्षी इ॰ कांचें लहान पोर; बालक; बच्चा; छावा. [दे. पीलुक, पिल्ह; प्रा. पीलुअ = बच्चा; शावक. ता. पिल्लेइ. तेल. पिल्ल; का. पिल्ले; मल. पिल्ले; दे. लॅ. प्युए- ल्लस, प्युएल्ला = मूल]
प्रकोप
प्रकोप prakōpa m S Excess, overabundance, prevalence, predominance (of the humors of the body &c.) Ex. पित्तप्रकोप, वातप्रकोप, कफप्रकोप, धातुप्रकोप, मल- प्रकोप, ज्वरप्रकोप. 2 Violent anger, furious passion, rage.
पुढारां
शअ. (काव्य.) १ पुढें; समोर. 'प्रकट तिजपुढारां जाहला राजमौळी ।' -र ॰४०. २ निमित्तानें. 'कां पितृवचन पुढारां । सीतेचिया वियोगद्बारां । रीसा आणि वानरां । उद्धरी निशा- चरां रघुनाथ ।' -एभा १६.३३३. -क्रिवि. (काव्य.) १ पुढें; कालांतरानें. 'मग ते दयाळू द्वारपाळ । म्हणती नाथा न करी तळ मळ । तुम्हां मायलेकरांचा मेळ । ईश्वर करील पुढारां ।' -नव १५ ३७.. २ पुढें होऊन; आगाऊ; अगोदर.
पुढि(ढी)ल
वि. १ पुढचा; अगोदरचा-नंतरचा (स्थल कालसंबंधीं); पुढचा पहा. २ अन्य; दुसरा; लोक. 'आपुले अंगीचें मळ । पुढिलीं क्षाळितां सकळ ।' -एभा २३.७२. 'केल्याविण निखंदूं नये । पुढिलांसी कदा ।' -दा २.२.१२. ३ पुढें येणारी; भावी (पिढी, लोक). 'पुढिला सिकवण । ते घ्यावी आपण ।' -दावि १०३. ४ पुढें-खालीं-यानंतर येणारी, सांगितलेली (गोष्ट, मुद्दा इ॰ ). ५ जवळचा. -ज्ञा ३.१७७. [पुढें. तुल॰ सं. पुरस्; अर्धमागधी. पुरिल्ल] सामाशब्द- ॰पाय-पु. प्रवृत्ति; प्रपंचा- कडील वृत्ति. 'ऐसाही जरी विपायें । सांडूनि पुढील पाये । सर्वें- द्रियांसि होये । पाठिमोरा जो ।' -ज्ञा १०.७२. पुढिल्ल्यो- क्रिवि. (कर.) (विटीदांडूचा खेळ) विटीच्या पुढल्या टोकापासून (मोजणें). पुढीं-क्रिवि. पुढयांत; पोटाशीं. 'घेऊन पुढीं नुसती सौख्यांत विडी तोडावी ।' -प्रला १६०.
पुसणें
उक्रि. १ (कागद, शरीर, वस्त्र इ॰ चा मळ, फडकें इ॰ नें) घासून नाहींसा करणें; साफ करणें; चोळून स्वच्छ करणें. २ नाहींसें होणें; करणें; नष्ट करणें; नाश करणें. 'तें उगाणिलें मज कर्म । तेव्हांचि पुसिलें मरणजन्म ।' -ज्ञा ९.४०४. 'शूरांचें शौर्य तें कैसें । शत्रूंचें निःशेष नांवचि पुसे । ' -एभा १७.१४५. ३ कोरडें करणें. ४ लिहिणें या क्रियापदाबरोबर निरर्थक योजितात. 'त्याला लिहितां पुसतां येत नाहीं.' म्हणजे त्याला मुळींच लिहितां येत नाहीं. तो अडाणी; अशिक्षित; निरक्षर आहे. [सं. स्पृश्; प्रोच्छन-पुंछण-पूंसणें-पुसणें-राजवाडे ग्रंथमाला]
पुट
न. १ (हात, कान, पानें इ॰) दुमटून केलेली पोकळी; द्रोण; घडी; पुडा. (समासांत) अंजलीपुट; चंचुपुट; पर्णपुट; कर्ण- पुट इ॰ २ अर्धगोल; अर्धवर्तुळ. ३ औषधादिकांस एकदां केलेला संस्कार, क्रिया, पातळ थराचा लेप; उदा॰ ओषधादिक भाजण्या- वाळविण्यासाठीं विस्तव, ऊन, हवा इ॰त एक वेळ ठेवणें; तसेंच एखाद्या रसानें एक वेळ माखणें किंवा त्या रसांत बुडविणें (क्रि॰ देणें ). (समासांत) अग्निपुट, सूर्यपुट, औषधपुट, रसपुट इ॰ 'माझे या विरहाग्निचेनि पुटें । जिवाचें आंगार आटे ।' -भाए १७०. ४ पुट देण्याचा पदार्थ (रस, लेप इ॰). ५ (ल) मूस भट्टी 'सोनें जेवी पुटीं पडे । मळ तुटे वाणी चढे । तेवीं गुरुसेवा जडत्व मोडे । चित्तशुद्धी जोडे निर्दुष्ट ।' -एभा ३३८८. 'जैसें पुटीं पडतां सुर्वणं । तेजस्वी दिसे दैदिप्यमान ।' ६ संकोचित जागा. 'तैशी सुबद्ध आटली । पुटीं होती दाटली । ते वज्रासनें चिमुटली । सावध होय ।' -ज्ञा ६.२२५. ७ तेज. 'कृष्ण अंगा जडलेपणें विजूशीं पुट जालें चौगुणें ।' -एरुस्व १.२६. ८ घोड्याच्या पृष्ठभागाच्या ठिकाणीं कंबरेपर्यंत ज्या दोन बाजू असतात त्या प्रत्येक. -अश्वप १.६३. ९ (नृत्य.) पापण्यांच्या द्वारां केलेला अभिनय. नृत्यामध्यें पापण्यांचे नऊ प्रकारचे अभिनय करतात ते-सम, उन्मेष, प्रसृत, कुंचित, निमेष, पिहित, विवर्तित, स्फुरित व विलोकित. 'लागती कटाक्ष सर्पाचिया पुटी । कळहारिये जिवाचिये ।' -भाए ४५३. १० पूड; पुडी. समासांत नासिका, नासा, घ्राण ह्या शब्दांबरोबर योजतात. जसें- नासिकापुट इ॰ [सं.] सामाशब्द- ॰पाक-पु. १ औषधादिकांच्या सभोंवार पानें घालून व वर माती लावून तीं भट्टींत भाजण्याची क्रिया. २ मूशीमध्यें सोनें वितळविणें. [सं. पुट + पाक] पुटी- करण-न. (भूशास्त्र) पुटें बसणें; थर बसणें; एकावर एक लेप बसणें, गाळाच्या निरनिराळया तऱ्हा निवडल्या जाऊन प्रत्ये- काचे निरनिराळे व्यवस्थित थर एकावर एक रचले जातात त्यास पुंटीकरण म्हणतात. -भू ४६. [पुट + करण]
पुत्रवंतीची माळा
पुत्रवंतीची माळा putravantīcī māḷā f A necklace of the seeds of पुत्रवंती worn by women having male offspring.
पूर्वग्रह
दूषित दृष्टिकोन, पूर्वग्रह-दूषित नजर , रंगीत चष्मा, पूर्व- कल्पना, गैरसमज, चुकीचा ग्रह, विकृत दृष्टि, कावीळ झाल्याप्रमाणें पाहणे, मेंदूची कोळिष्टकें, मनावर चढलेला गंज, विचारशक्तीवर सांचलेला मळ, दृष्टिकोन संकुचित करणारी खोल अढी, पुराव्याशिवाय सिद्धान्त बांधणें, डोळ्यांतील वडस. पूर्व-सिद्धता, प्राथमिक आंखणी, रूपरेषा ठरविली, ब्लू-प्रिंट केलें, आराखडा बनविला, मोजमापे घेतली, कच्चा खड्डी तयार केला, आगाऊ जागा निश्चित केल्या, स्थूलमानाने आद्य अंदाज घेतला, योजना पूर्व-तयारी बजेट बसविलें, प्लॅन केला, रंगीत तालमी घेतल्या, रेषा मारल्या, कागदावर उतरली, कागदी घोडे प्रथम तयार केले, टिप्पणी व याद्या झाल्या, स्केच काढलें, मोडणी व घाट आगाऊ निश्चित केला, ढांचा बनविला, मार्ग पसंत केला, प्राथमिक मांडामांड झाली.
फेड
स्त्री. १ (कर्ज, उपकार इ॰) परत, मोबदला देऊन टाकणें; निरास करणें; ऋणविमोचन. २ पूर्ति (नवस, वचन इ॰ची). [फेंडणें] म्ह॰ अपकाराची फेड उपकारानें करावी. फेडणें-सक्रि. १ नेसलेलें वस्त्र, बांधलेली गांठ इ॰) सोडणें; सैल करणें. 'फेडि वस्त्र सतीचें जेव्हां उघडें करावया आंग ।' -मोकर्ण ४९.७. २ (महानु.) परिहारणें; उतरणें; हरण करणें. 'जी हाची तुमचा पाहुं- नरू । जें एकें वळें फेडावा भारू । उमपपणाचा ।' -शिशु ७५. ३ (कर्ज, उपकार, नवस शंका इ॰) बाकी न ठेवणें; निःशेष करणें; फेड करणें. 'तरी माझें मनीचा भावो । तो फेडाजी संदेहो ।' -कथा १.२.१६. ४ कातरणें; काढणें. तंव त्याचिं नखें फेडावया वारिकु घरासि आला ।' -पंच ५.१. ५ दुर करणें; नाहीसें करणें; उघड करणें. 'फेडिला डोळियांचा कवळ । धुतला गुणदोषांचा मळ ।' -तुगा ७१२. ६ स्वच्छ करणें; शिंकरणें; धुणें; काढून टाकणें (नाक, शेंबूड, घाण). ७ एका भांड्यांतून दुसर्या भांडयांत घालणें, ओतणें. [फिटणें प्रयोजक; सं. स्फिटित; प्रा. फिडिअ] म्ह॰ होतील बाळ तर फेडतील काळ.
फलमाची माळ
फलमाची माळ phalamācī māḷa f A string of the coin फलम,--an ornament for the neck.
राबणी राबणूक
स्त्री. १ येजा; वापर; जावा येवा; राहणें; जन्म घालविणें. २ संवयीचा, परिचित होणें. ३ पहारा; चाकरी. 'सर्वेंद्रियाच्या आंगणीं । विवेक करी राबणी ।' -ज्ञा १४.२०६. ३ (व्यापक) लागवड; नांगरणी; शेतीचें काम. 'दहा बिघे जमीनीची राबणी करावयास शंभर रुपये तरी खर्चास पाहिजेत.' [राबणें] रा(रां)बणें-अक्रि. १ संवयीचें होणें; परिचित होणें (परक्या कळपाशीं गाय इ॰, नुकतांच शाळेंत घाललेला मुलगा, घरांस रानमांजर, ओझ्यास खांदा, पाठ इ॰). २ चांगला मळ- लेला असणें (रस्ता); वारंवार लिहिल्यामुळें शाईंनें सारवल्या- सारखा होणें (खर्डा).
रज
पु. न. १ धुळीचा कण; धूळ. 'नकुळ रजाहीं मळ- वुनि सर्वांगाला वनासि गेला हो ।' -मोसभा ७.६३. २ फुला- तील परागाचा कण; ३ सोनें इ॰ चा एक बारीक कण. ४ मनुष्याचे जे तीन गुण (सत्त्व, रज, तम) त्यांतील दुसरा. ५ स्त्रियांचा मासिक विटाळ. ६ घांसून साफ करावयाची पूड. 'आरि- सयालागीं सांचावें । अधिकें रज ।' -माज्ञा १८.१४०. [सं.] (वाप्र.) रजाचा गज करणें-१ राईचा डोंगर करणें; अति- शयोक्ति करणें; थोड्याचें जास्ती करणें; एकाचे दहा करणें; अगदीं क्षुल्लक वस्तूला अतोनात महत्त्व देणें; ज्यांत कांहीं अर्थ नाहीं अशा गोष्टी फुगवून सांगणें; पराचा कावळा करणें. २ पुष्कळ काळ पोसणें व चांगला वाढीला लावणें; लहानाचें मोठें करणें. रजःकण-पु. धुळीचा कण, बिंदु. [रज + कण] रजरेण-पु. धुळीचा कण. [रज + रेणु] रजोगुण-पु. सत्त्व, रज, तम, या तीन गुणांपैकीं दुसरा; कामक्रोधादि मनोविकार या गुणाच्या प्राबल्यानें उत्पन्न होतात. [सं.] रजोगुणी-वि. ज्यामध्यें रजोगुण पुष्कळ व प्रधान आहेत तो; विकारी; विषयी; कामुक. [सं.] रजोदर्शन-न. ऋतुदर्शन; ऋतुप्राप्ति; न्हाण; अगदीं पहिलें विटाळशीपण. [सं.] रजस्वला-वि. स्त्री. विटाळशी; ऋतुमती स्त्री; ऋतुस्नात; अस्पर्श स्त्री. हिला पहिल्या दिवशी चांडाली, दुसऱ्या दिवशीं ब्रह्मघातिनी, तिसऱ्या दिवशीं रजकी समजतात. 'कृष्णा म्हणे सभेंत न न्यावें मज, मी रजस्वला आंगा ।' -मोसमा ५.५. [सं.] रजी-स्त्री. घूळ; धुराळा. [रज]
साबण; साबू
(पु.) [अ. साबून्] मळ धुवून काढण्याचें फेंस उत्पन्न करणारें मिश्रण.
सडकणें
उक्रि. १ गारा, पावसाचे मोठे थेंब, खडे वगैरेनीं मारणें. २ दोरी, छडी वगैरेनीं ताडण करणें. ३ लाथ, दुगाणी वगैरे झाडणें. ४ लांकूड, दगड वगैरे साफ न करतां सुमाराचा आकार येईल असें कुर्हाड किंवा सुतकी वगैरेनीं सरासरी तासणें. ५ धुवा- वयाचें वस्त्र दगडावर जोरजोरानें आपटणें. ६ मळ, कीट निघून जावें म्हणून धातूचा तुकडा ऐरणीवर घणानें जोरानें ठोकणें. ७ सरासरी बारीक अंश वेगळा होई असें मोठ्यानें पाखडणें, उभळणें. सामान्यतः कोणतीहि गोष्ट सरासरी घाईघाईनें जोर- जोरानें, निष्काळजीपणानें करणें. [ध्व?]
सकोमळ
वि. मृदु; नाजुक; लुसलुशीत; कोमळ. 'सको- मळ सरिसे । सुबुद्ध राहती आपैसे ।' -ज्ञा ६.१८३. [सं. सुकोमल]
शमल
न विष्टा; घाण; मळ; मैला. [सं.]
संबंध
पु. संयोग; संसर्ग; नातें; योग; धागादोरा. २ (ल.) विवाह; लग्न. 'रेवतीबाई रामरावाच्या द्वितीयसंबं धाच्या पत्नी होत्या.' -कोरकि ४२९. ३ मृत ब्राह्मणाचें पिशाच्च. [सं. सम् + बंध् = बांधणें] संबंधन-न. जोडणें; संयो- जन; संयोग; परस्परांस निगडित करणें. संबंधम्-पु. मल बारांत नायर लोकांत प्रथम विवाहविधीनंतरचा जो स्त्रीपुरुष व्यवहार होतो तो. संबंधी-पु. आप्त; नातेवाईक; नातलग. 'मूर्खें म्यांच बुडविले संबंधी बंधु आप्त शोकांत ।' -मोभीष्म ११. २. -वि. संबंधाचा; नात्याचा; संबंध असलेला; संयोजित; निगडित; युक्त; तद्विषयक. उदा॰ ग्राम-पुण्य-सुख-पाप-गृह- संबंधी. संबंधीक-वि. १ संबंधाच; विषयींचा; संयोजित. २ राक्षसी स्वभावाचा. ३ पिशाच्च, संबंध विषयक. संबंधी सर्वनाम-न. सर्वनामाचा एक प्रकार; दुसर्या नामाशीं अथवा सर्वनामाशीं संबंध असणारें किंवा दाखविणारें सर्वनाम.
संवदण, सौंदण, संवदणी, सौंदणी
स्त्री. परटाचें कपडे धुण्याचें भांडें. 'मळ खाय संवदणी । करी आणिकांची उज ळणी ।' -तुगा २४०१. 'मोरी संवदणी तेही आप ।' -दा १३.१०.१५. 'तरी संवदणी न मानावी । मलिन जैसी ।' -ज्ञा १८.१४१. [सं. शोधनी?]
सफाई
स्वच्छता, टापटीप, नीटनेटकेपणा आणणें, गाळ चिखल घाण गदळ डाग मळ कचरा कोळिष्टके दगडगोटा शेणमाती धूळ गंज किटण ओशटपणा झटकणें वा काढून टाकणें, गलिच्छपणा दूर करणें, झाडू मारणें, केरसुणी-झटकणी फिरविणें, झाड-सफाई, केरवारा, झाडझूड, घासून स्वच्छ करणें, पॉलिश देणें, विसळणें, घाण खरवडणें, बेणणें, पुसून घेणें, धुणें, निवडणें, पाखडणें, ब्रश मारणें, कुंचलणें.
ससा भानोशीं आला
ससा भानोशीं आला sasā bhānōśī ṃālā (The hare is come to the stove.) The desired thing or matter is ready to hand.
टा(टां)च
स्त्री. १ पायाची खोट. २ घेणेकर्यानें किंवा सरकारनें घर इ॰ वर आणलेली जप्ती; हुकुमनाम्याची बजावणी. [टंक] उंच टाच करून वागणे, टांचेला माती (मळ) न लागूं देणें = लक्ष्यपूर्वक व शुद्धाचरणानें वागणें; निरुपद्रवी व निष्क- लंक असणें. टांचा घासणें-तडफडणें; मरणसमयीं पाय झाडणें.
टाच
स्त्री. पावलाची मागील खालची बाजू; पायाची खोट. [सं. तञ्च्] (वा.) टाच वर करणे – उंच होणे; मानाने वागणे. उंच टाच करून वागणे, टाचेला माती (मळ) न लागू देणे – लक्षपूर्वक व शुद्धाचरणाने वागणे; निरुपद्रवी व निष्कलंक असणे. टाचा घासणे – तडफडणे; मरणसमयी पाय झाडणे.
टाच or टांच
टाच or टांच ṭāca or ṭāñca f The heel. उंच टाच करून वागणें or टाचेला माती or मळ न लागू देणें (To walk with elevated heel, so as to tread upon no dirty thing.) To conduct one's self heedfully and holily; to walk as "harmless and blameless."
टाळें
न. १ कुलूप. ' बंद करितसें सदनद्वार । कडी टाळें देऊनियां ।' -नव २४.१२. २ कुलुपाच्या किंवा घडयाळाच्या खालचें किंवा वरचें अंग, बाजू. ३ पाण्याच्या नळामधील वार्या- साठीं असलेलें उभें दार, त्या दाराची फळी; जमीनींतील मोरी- मधील मळ काढण्यासाठीं जें मधोमध दार ठेवतात तें. टाळी पहा.
तेलकटी
स्त्री. १. तेलाचा चिकट मळ, वळकट्या. २. ओशटपणा.
तिंबणें
अक्रि. १ पूर्णपणें ओलें होणें; भिजणें. २ मळ- ल्यामुळें उत्तम भिजणें (कणीक). ३ भिजल्यामुळें आंबणें (तांदूळ). ४ (मावळ) रोडावणें; कृश होणें (खावयास पुरेसें न मिळाल्यामुळें मनुष्य, जनावर). -सक्रि. १ पूर्णपणें ओलें करणें रंगात अथवा पाण्यांत); भिजविणें; चिंब करणें (पावसांत.) २ कणीक भिजवून चिकट व मऊ होईल अशी चांगली मळणें. ३ (ल.) सडकून तुडविणें; चोपणें. ४ आंबवणें (ओलें पीठ). ५ दहीं, दूध, वडे मिसळून बोडण तयार करणें. [सं. तिम् = भिजणें]
टोकरणे
सक्रि. १. कुरतडणे; उकरणे; कोरणे. २. (कान, दात इ.तील) मळ काढणे. [सं. त्रौक्]
तरंज
स्त्री. १ पाण्यावरील (तेल इ॰ कांचा) तरंग; तवंग; पातळ थर; तरंग अर्थ ३ पहा. २ डोळ्यांतील मळ इ॰ कांचा पातळ पापुद्रा, पटल; भुरी; साका. तरंग अर्थ ४ पहा.
त्याग
पु. १ सोडणें; टाकून देणें; वर्जणें. २ (वेदांत). कर्मफल सोडून देणें. 'यया कर्मफलत्यागातें । त्यागु म्हणती पैं जाणते । एवं त्याग संन्यास तूतें । परिसविले ।' -ज्ञा १८.१२५. ३ दान; अहेर; बिदागी; संभावना. 'पदोपदीं नाना त्याग ।' -एरुस्व १५.१२८. ४ गोंधळी, भराडी, डौरकरू इ॰ कांना त्यांच्या कामा- बद्दल द्यावयाची बिदागी, मजुरी. [सं.] ॰भोग-पु. उपभोगणें व दुसर्यास देणें, दान करणें [सं. त्याग + भोग = उपभोग] त्यागाभोगापुरता-वि. उपभोग घेण्यास व दुसर्याला देण्यास, दान करण्यास पुरेल इतका (पैसा, संपत्ति, धान्य इ॰). [त्याग- भोग + पुरणें] त्यागणें-सक्रि. १ सोडणें; टाकणें; वर्जणें. २ (काव्य) टाकणें; उत्सर्ग करणें (मल, विष्टा इ॰). 'लांगूल उभारूनि धावि- न्नला वृषभ । त्यागिलें वीरे लेंडचि त्यावेळीं ।' [त्याग] त्यागी- वि. १ संसार व सांसारिक बंधनें ज्यानें टाकिलीं, तोडिलीं आहेत असा (मनुष्य); विरक्त; वैराग्ययुक्त. २ दान देणारा; दान- शूर. ३ सोडलें, त्याग केला आहे ज्यानें असा (मनुष्य). (समासांत) फलत्यागी = फलाचा त्याग केला आहे ज्यानें असा; -कर्मत्यागी-गृहत्यागी-देशत्यागी इ॰. [त्यागणें]
त्यागणे
सक्रि. १. सोडणे; टाकून देणे; वर्जणे. २. उत्सर्ग करणे (मल, विष्ठा इ.). [सं.त्यज्]
उद्धाट
पु. १ घर्षण. २ (ल.) घोष. 'तैं कळिमळांचीं मळ- गटें । नामोध्दाटें नासती ।।' -एभा ४.२५३. [सं. उद् + हन्-हत्]
उकडणे
उक्रि. १. शिजवणे; उष्णता लावून पदार्थ मऊ करणे : ‘तेणें सर्वही उकडती । अस्तिमांस ॥’ − दास ३·१·३०. २. हवेत उष्णता भासणे; गुदमरणे. ३. (सोनारी.) (कढवलेल्या तेलाने) मळ किंवा घाण काढून टाकणे. [सं. उत्+क्वथ्]
उकडणें
उक्रि. १ शिजविणें; उष्णता लावून पदार्थ खाण्या- जोगा मऊ करणें. 'तेणें सर्वही उकडती । अस्तिमांस ।।' -दा ३. १.३०. २ हवेंत उष्णता भासणे; गुदमरणें. 'जळचरें उकडोनिया मरति ।' 'येथें दाटीमुळें उकडतें.' ३ (सोनारी धंदा) (उका- ड्याच्या तेलानें) मळ किंवा घाण काढून टाकणें. [सं. उत् + क्कथ्; का. उक्कु = उतूं येणें; शिजणें]
उकरमणे
अक्रि. तवा वगैरेवरील खरवड, जळका अंश, खपल्या वगैरे दूर होणे; भांडे, वस्त्र वगैरेचे पापुद्रे, मळ, वगैरे सुटून येणे. उकराई
उकरमणें
अ.क्रि. तवा वगैरेवरील खरवड, जळका अंश, खपल्या वगैरे दूर होणें; भांडें, वस्त्र वगैरेंचे पापुद्रे, मळ वगैरे सुटून येणें. [उकरणें अप.]
उमाळा
वि. (ना.) ओंगळ; मळका; घाणेरडा. [सं. उद् + मल्]
उमाळा
वि. ओंगळ; मळका; घाणेरडा. [सं. उद्+मल्]
उमाळा-ळी
पुस्त्री. १ मळमळ; पोटांतील खळबळ; कळ- मळ; उमळ. २ हुंदका; उकळी; आवेग; उसळी; लहर (राग, प्रेम, दुःख, शोक वगैरे विकारांची). 'स्वानंदाचे उमाळे देती । सारा- सार विचारें तळपति ।' ३ तीव्र इच्छा. 'देहे खंगतां सर्व जाळी उमाळी.' -दावि १७८. ४ उकळी; कढ; ऊत (पाणी, दूध वगैरे पदार्थांचा). ५ सुटका; सोडवणूक; मुक्तता; मोकळीक (एखादा धंदा, कार्य वगैरेतून). (क्रि॰ पडणें). ६ लोट; गर्दी; हल्ला; उठाव. 'तो देखौनि यादवांचा उमाळा । एरी सिंहनादु दीन्हला ।।' -शिशु १०४१; 'तैसे दृश्याचे डाखळे । नाना दृष्टीचे उमाळे ।' -अमृ ७.१४३. ७ उद्भव; जोर; प्रभाव. 'जेयांचा देखौनि उमाळा । पळे महामोहाचा पाळा ।' -शिशु ३८४. 'भंगोनि विघ्नांचा उमाळा.' -मुआदि ३५.१०२. [सं. उद् + मूल; तुल॰ का. उम्मलु = श्वास घेण्यास येणारी अडचण, कफ] ७ (काव्य.) ज्वाला; झोत; लोळ; तरंग (आग, वीज वगैरेचा). 'कोटी रविशशि तेज उमाळा ।।' -दावि ३३५. 'जैसे कल्पांतविजूचे उमाळे ।' -रावि १.१२. [का. उम्मळ = उष्णता] ॰पडणें-अतिशय पाऊस झाल्या- मुळें पिकें कुजावयास लागणें. उमळ पडणें पहा. उमाळीं-उमा- ळीस-उमाळ्यां-उमाळ्यास पडणें-येणें-उघडकीस येणें; माहीत होणें; दिसणें; आढळणें; बभ्रा होणें.
उमेळा
वि. ओंगळ; मळका; घाणेरडा. (ना.) [सं. उद्+मल्]
उमेळा
वि. (ना.) ओंगळ; मळका; घाणेरडा. [सं. उद् + मल्]
उमले
न. मळमळ. [सं. उद्+मल्]
उमळणे
अक्रि. धुणे; खळबळणे (वस्त्रे, भांडी वगैरे). (कु.गो.) [सं. उद्+मल्]
उमलणे
अक्रि. १. विकासणे; फुलणे : ‘तें उमललें अष्टदळ । ठेऊं वरी ॥’ –ज्ञा १५·६. [क. मलर] २. भेग पडणे; फुटणे; उकलणे. ३. सैल होणे; विरघळणे (कपड्यावरचा मळ, चुन्याची कळी, मातीचे ढेकूळ वगैरे). ४. फुगणे; लाही होण्याजोगे फुगणे (भिजत घातलेले धान्य वगैरे). ५. प्रफुल्लित होणे; उल्हासयुक्त होणे (मन वगैरे). ६. प्रकट होणे; उत्पन्न होणे : ‘परी एकी केधवां गेली । शाखा कोडी केधवां जाली । हें नेणवे जेवीं उमललीं । आषाढ अभ्रें ॥’ –ज्ञा १५·१२५.
उमलणें
अक्रि. १ विकासणें; फुलणें. 'तें उमलेलें अष्टदळ । ठेऊं वरी ।। 'ज्ञा १५.६. २ भेग पडणें; फुटणें; उकलणें. ३ सैल होणें; विरघळणें ( कपड्यावरचा मळ, चुन्याची कळी, मातीचें ढेंकूळ वगैरे). 'वरचें खरकटें उमललें म्हणजे मग भांडे घांस.' ४ फुगणें; लाही व्हावयाजोगें फुलणें. (भिजत घातलेलें धान्य वगैरे); ५ प्रफुल्लित होणें; उल्हासयुक्त होणें (मन वगैरे). ६ प्रकट होणें; उत्पन्न होणें. 'परी येकी केधवां गेली । शाखाकोडी केधवां जाली । हें नेणवे जेवीं उमललीं । आषाढअभ्रें ।' -ज्ञा १५. १२५. -उक्रि. १ उचलणें; उखळणें (वाकवून घट्ट बसविलेलें खिळ्याचें टोंक वगैरे.). २ सुटें करणें; उघडणें; खोलणें (कोयंड्याचीं मिळ- विलेलीं दोन टोकें वगैरे ). ३ क्षार लावून तापवून सांधणें, एकत्र करणें (सोन्याच्या दागिन्याची टोकें). ४ सोलणें; मोकळें करणें; काढून टाकणें (धान्य भिजवून त्याचीं सालें वगैरें). [सं. उद् + मील-उन्मीलन; प्रा. उम्मीलण]
उमळणें
उक्रि. (कु. गो.) धुणें; खळबळणें (वस्त्रें, भांडीं वगैरे). [सं. उत् + मल्]
उमळवटी
स्त्री. ओकारी; कंटाळा, 'पहिल्या पहिल्यांदा तांदूळ किती घ्यायचे, डाळ किती घ्यायची, तिखटमीठ किती घालायचं वगैरे माहिती विचारून मी आईला उमळवटी आणली.' -वत्सला १३९. [सं. उद् + मल]
उमळवटी
स्त्री. ओकारी; कंटाळा : ‘पहिल्या पहिल्यांदा तांदूळ किती घ्यायचे, डाळ किती घ्यायची, तिखटमीठ किती घालायचं वगैरे माहिती विचारून मी आईला उमळवटी आणली.’ –वत्सला १३९. [सं. उद्+मल्]
उरकमणें
सक्रि. स्वच्छ करणें; घासून-पुसून काढणें; निर्मळ करणें (भांड्याचें खरकटें, कपड्याची घाण वगैरे). -अक्रि. विलग होणें; सुटणें; निघून येणें (भांड्यास, वस्त्रास लागलेली, खरवड, कपच्या, घाण, मळ वगैरे).
उसकणे
सक्रि. विसकटणे; अव्यवस्थित करणे : ‘जैसा उदक कुंभ साचार येथे । तो मळ उसके जेथे तेथें ।’ –नव १२·९. [सं. उत्+ध्वक्=जाणे, हलणे]
उसकणें
क्रि. विसकटणें; अव्यवस्थित करणें. 'जैसा उदक कुंभ साचार येथें । तो मळ उसके जेथें तेथें ।' -नव १२.९. [सं उत् + ष्वक् = जाणें, हालणें; प्रा. उस्सक; उत् + शकल]
उत्सर्ग
पु. (वै.) शरीरातून बाहेर टाकलेली वस्तू; विष्ठा; मळ. [सं.]
वामळ or वामाळ
वामळ or वामाळ vāmaḷa or vāmāḷa f (व्योम & मल) Raw and cold or dull weather; haziness and dampness of weather. See under खार. v पड, हो, अस, जा.
विमल-ळ
वि. १ निर्मल; स्वच्छ; शुद्ध; निर्दोष. 'दोहीं वेगळें सारासार । विमळब्रह्म ।' -दा १२.५.१४. २ मंगल; शुभ (काल, प्रसंग). 'प्रहर दोन्ही निशा विमल क्षणी । प्रगटला निज उत्तम लक्षणी ।' [सं. वि + मल]
विरेक
पु. १ रेच; ढाळ; मलविसर्जन. २ मल; विष्ठा. [सं. वि + रिच्-रेच] विरेचन-न. १ मलशुद्धि; हगवण; झाडा; ढाळ; रेच. २ ढाळक; रेचन; मलशुद्धिकारक औषध. [सं.]
वीर्य
न. १ शुक्र; रेत. २ पराक्रम; प्रभाव; सामर्थ्य; जोम; श्रेष्ठता. ३ पदार्थमात्राचेअंगीं जो तत्कार्यार्थ संपादक शक्तीविशेष असतो तें. 'देशी वनस्पति गोळा करून त्यांचे गुणधर्म व त्यांतील वीर्यें आणि उपयुक्त पदार्थ यांची माहिती करून घेण्याच्या मागें लागला.' -सेंपू २.१०.४ कस; रग; बल; निश्चय; चिकाटी; धैर्य (जडाजड वस्तूंमधील). (समासांत) मंदवीर्य, हतवीर्य, नष्टवीर्य, उष्णवीर्य, तीव्रवीर्य; इ॰ ५ शौर्य; वीरता. [सं. वीर् = पराक्रमी होणें] ॰वान्-वि. १ ज्याच्या शरीरांत शुक्र किंवा रेत आहे असा. २ (ल.) बलवान्; जोमदार; गुणवान; श्रेष्ठ. ३ संपादनशक्ति किंवा चिकाटी असलेला; समर्थ. ४ शूर; पराक्रमी; धैर्यशील. [सं.] ॰विलास-पु. पराक्रमाचें कृत्य. -वि. पराक्रम हाच ज्याचा खेळ आहे, हातचा मळ आहे असा. 'एंव मागील जैसे तैसें । तेणें देखिले वीर्यविलासें ।' -ज्ञा ११.६६३. ॰हीन-वि. बल- हीन; शौर्यरहित; शक्तिहीन; निर्बल. ॰शाली-वि. वीर्यवान पहा. वीर्यावीर-वि. शूरत्वानें शूर. 'तुका म्हणे वीर्यावीर । संतधीर समुद्र ।' -तुगा १८१४.
विष्टा-ष्ठा
स्त्री. मल; गू; मलोत्सर्ग. ' शाक्तीची शूकरी माय । विष्ठा खाय विदीची ।' -तुगा ४१५. [सं.]
विष्ठा
(सं) स्त्री० मल, गू.
वळवंजी
स्त्री. (राजा.) गोमेची एत जात. हिच्या अंगास चिकट मळ असून तो रात्रीं चकाकतो. -शास्त्रीको.
वंग
पु. कलंक; मळ; घाण. -ज्ञा १०.३१३. 'तुज म्यां अज्ञानपणें वंग । समतेचा लाविला ।' -स्वानु ४.१.१६. [देप्रा. वंक = कलंक]
दस्त
पुन. १ कर; पट्टी; सारा. २ (गंजीफा) हात (चार पानांचा). ३ (ल.) ताबा; हक्क; सत्ता; अधिकार; अम्मल. 'डोळेझांक करून तसेंच देशास कजिया सोडून यावें तर तमाम दस्त उठेल.' -रा ३.१४९. ४ (जुन्या कागदपत्रांत) हात. ५ (व.) जुलाब; ढाळ. ६ शेला; दुपट्टा. ७ कैद. 'दस्त करा शिवराजाला ।' -ऐपो १४. [फा. दस्त् = हात] दस्त करणें- जबरीनें घेणें; पकडणें; कैद करणें; जिवंत धरणें. सामाशब्द- ॰अंमल-पु. गांवचा वसूल, हिशेब. ॰ऐवज-पु. (कायदा) अक्षरें, अंक किंवा खुणा या साधनांनीं पुरावा म्हणून उपयोग व्हावा या इराद्यानें कांहीं गोष्ट व्यक्त केली आहे असा लेख; हातचा कागद; प्रमाणपत्र; हक्कपत्र; कबाला; करारनामा; सही; ज्याच्या योगानें एखादा मनुष्य कायद्यांत बांधला जातो अशी कोणतीहि गोष्ट (लेख, तोंडीं वचन, खूण, हमी, लिहिलेला कागद इ॰). (इं.) डॉक्युमेंट. [फा. दस्त-आवीझ्] दस्तक-न. १ परवाना. २ (कु.) तोंडी अगर जबानी पुरावा. ३ जकातमाफीचें सरकारी पत्र. ४ आज्ञापत्र. 'मार्गीं मुजाइम न होतां सुखरूप जाऊं देणें म्हणोन दस्तक.' -वाडबाबा २.२४५. [फा.] ॰खत-न. १ हातचा लेख; सही. २ राजाची सही. ३ सही, शिक्का किंवा तो करण्याचा अधिकार. ॰खत दप्तर-न. सह्या घेण्याची व दप्तर ठेवण्याची कचेरी. ॰गिरी-स्त्री. १ मदत; साह्य. 'श्रीमंत माझी दस्तगिरी करतील.' -रा १.१५७. २ स्नेह; कृपा. ॰गीर- वि. कैद; बद्ध. 'इस्मालबेग दस्तगिरींत आला.' -दिमरा २.२६. ॰दराजी-झी-स्त्री. जुलुम; त्रास. 'बाजे विलायत सिवा मल- ऊत नामें आपल्या दर्कबजेत आणून दस्तदराची करितो.' -रा १६.७६. ॰नी-स्त्री. (चिलखताच्या) मुठीची दोरी. [फा.] ॰बाज-पु. १ दस्तक; परवाना; कौल; अभयपत्र. २ अभयहस्त. [फा.] ॰पा(पे)शी-पु. हस्तस्पर्श. ॰बाकी-स्त्री १ जमीनीचा सारा गोळा करून जामखर्च दप्तरी दाखल न केलेली रक्कम; (मामले- दाराच्या) हातीं राहिलेली बाकी; याच्या उलट शिस्तबाकी = योग्य येणें असलेली बाकी. २ शिल्लक (जवळ असलेली). ॰बोसी- स्त्री. हस्तचुंबन. [फा.] ॰माल-पु. भुजवस्त्र -शर. ॰रप्त-पु. बंदोबस्त; जप्तरप्त. 'दस्तरप्त सर्व आपला आहे.' -ऐटी २.७२. ॰रुमाल-पु. खिशांतील हातरुमाल. 'वैराग्याच्या वेगानें फड- कणार्या भगव्या झेंड्याला दारूबाजाचें तोंड पुसण्याचा दस्त- रुमाल केला.' -गडकरी-राजसंन्यास ७५. [फा. दस्त + रुमाल्] दस्तकी-पु. (व.) लवाजमा, रुसूम किंवा पोलिटिकल पेन्शन घेण्याची सनद ज्याच्या नांवानें असते तो (घराण्यांतील मुख्य मनुष्य).
रोग
पु. १ मोठें दुखणें; आजार; प्रकृतींतील बिघाड; शरीरप्रकृतींत उत्पत्र होणारी विकृति. २ शरीर प्रकृतींत बिघाड उत्पत्र करणारें कारण. 'त्याचें पोट दाबून पाहिलें, चांगला आंब्या- एवढा रोग हाताला लागला.' ३ (फळांफुलांतील) नासका अगर किडका भाग; रोगोत्पादक किंवा प्रकृतींत बिघाड करणारा भाग. 'अगस्त्याचे फुलांतील मधली काडी तो रोग आहे. तो काढून टाक.' ४ विकृतिकारक पदार्थ;रोगकारक वस्तु, अत्र इ॰ 'हे धडधडीत किडके तांदूळ दिसतात आणि पैसा खर्चून हा रोग कशाला आणिलास?' ५ दुसऱ्याचें चांगलें पाहुन होणारें दु:ख किंवा त्रास; ज्यामुळें अंत:करणास व्यथा होते असा रोग (चिंता, मत्सर इ॰). ६ तिरस्करणीय, घाणेरडा, रोगट, कुसकट पशु किंवा मनुष्य. [सं. रुज् = रोग होणें] ॰ग्राम-पु. रोगांचें वसतिस्थान; शरीर. ॰निदान-न. रोगाची परीक्षा; कोणता रोग झाला आहे हें ठरविणें. ॰भावना-स्त्री. रोगांचीं लक्षणें; उदा॰ क्षयरोग- भावना; पित्तज्वरभावना; पांडुरोगभावना. २ लक्षणें दिसूं लागलीं आहेत असा रोग. ३ रोगपरीक्षा; रोग ठरविणें. ४ पिशाचबाधा. ॰मल्ल-पु. सदां रोगी; रोग व दुखणीं यांनीं जर्जर झालेला मनुष्य; रोगिष्ट माणूस. ॰मसाला-वि. (ना.) रोगानीं जर्जर झालेला; रोगेल; मरतुकडा (तिरस्कारार्थी उपयोग). ॰राई-स्त्री. १ लहानमोठे रोग; दुखणींपाखणीं. २ वाईट गुण; उपद्रवकारक धर्म; विकृति उत्पन्न करणारे एखाद्या वस्तूचे गुण. 'ताकाला ठिकरी दिली म्हणजे त्याची रोगराई चट जाते.' [रोग + राई. सं. राजि = ओळ] ॰लक्षण-न. १ एखाद्या दुखण्याचीं लक्षणें; रोगाची भावना. २ रोगाचीं पूर्वसूचक लक्षणें; होणाऱ्या रोगाचें सूचक चिन्ह. रोगवणी-न. १ रोगाचीं बीजें बरोबर वाहून नेऊन कोठा स्वच्छ करणारें रोग्याच्या पोटांतून बाहेर पडणारें पाणी, मल, ओकारी इ॰ २ भाजीपाल्यांतील शिजवून किंवा आंबवून काढलेला अहितकर रस, पाणी. ३ रोग आणणारा पाऊस. उदा॰ आश्लेषा नक्षत्राचा पाऊस; पिकावर रोग आणणारा पाऊस. [रोग + पाणी] ॰वारें-न. रोगराई; क्षुल्लुक दुखणें. 'समर्था कदा रोगवारें नको रे । -वेसीस्व (प्रस्तावना १२). ॰वेळ-ळा-स्त्री. तीस घटकांपैकीं विशिष्ट ३।।। घटका. वेळ शब्द पहा. रोगट-वि. १ रोगानें किंवा दुखण्यानें पछाडलेला; आजारी. २ खुरटलेला; मुरडलेला; रोग झालेला (भाजीपाला, फळें इ॰) रोगटणें-अक्रि. १ रोग होणें; विकृति जडणें; आजारी पडणें. २ (झाड, वेल, फळ, फूल इ॰) खुरटणें; मुरडणें; कीड लागणें. [रोगट] रोगणें-अक्रि. (कों.) रोगानें झिजणें; क्षीण होणें; रोड होणें. रोगपणें-अक्रि. रोगानें पीडणें; रोग होणें. 'नव्हे पचपचीत तनु रोगपली ।' -प्रला २१९. रोंगा-वि. (राजा.) १ रोडका; कृश अंगाचा; रोगट; आजारी दिसणारा. २ सुकट व आंबट चेहऱ्याचा; रुसलेल्या चेहऱ्याचा. रोगड्या-ळ्या-वि. आजारी; रोगानें झिजलेला; अशक्त; नाजूक प्रकृतीचा; रोड. रोंगाळणें-अक्रि. १ रोगट असणें, होणें; अजा- रानें अशक्त होणें. २ रेंगाळणें; झिजणें. [रोंगा] रोगिष्ट-ष्ठ- वि. रोगी; आजारी; कांहीं तरी रोग जडलेला; सतत आजारी; रोगट शरीराचा. [सं. रोगिष्ट] रोगी, रोगिया-वि. (काव्य) १ ज्याला पंडू, क्षय, दम, कुष्ट, मेह इ॰ चिरस्थायी रोग जडला आहे असा; रोगिष्ट; प्रकृतिस्वास्थ्य बिघडलेला; आजारी; दुखणा- ईत. 'का जिव्हालंपट रोगिया। अन्नें दूषी धनंजया ।' -ज्ञा १८. १३६. २ अहितावह; अपथ्यकर; रोगकारक. रोगीण-स्त्री. देवीची भक्तीण. या नेहमीं आजारी असतात. भावीण पहा. रोगेणें, रोंघणे-अक्रि. (राजा. कों.) रोगणें पहा. रोगेल, रोगेला, रोगलेला, रोग्या-वि. रोगट; नाजूक प्रकृतीचा; रोगिष्ट; सदा रोगी; रोगाड्या. रोगी-वि. (कु.) आळशी.
गणेश
पु. शिवपार्वतीचा पुत्र गणपती; गजानन; बुध्दिदाता व विघ्नहर्ता देव; म्हणून विद्यारंभीं किंवा ग्रंथरचनेच्या प्रारंभीं याचे स्तवन करतात; जसें:-श्रीगणेशायनमः; शिवगणांचा नायक; 'देवा तूंचि गणेशु ।' -ज्ञा १.२. लेखक किंया ग्रंथकर्ता यांचा हा आदर्श मानला जातो. (ज्याप्रमाणें बृहस्पति = सर्वोत्कृष्ट वक्ता; मारुती किंवा हनुमान = उड्डाणपटु; भीमसेन किंवा दुर्वास = खादाड माणूस; कुंभकर्ण = अत्यंत झोपाळू; कदर्यु = फार चिकु; कर्ण किंवा बली = अतिशय उदार). [सं. गण + ईश] म्ह॰-(गो.) १ गणेसा गाण झरौन गणेसा तिबॉ = इकडचें तिकडे व तिकडचें इकडे (असा घोटाळा) करणें. २ गणेशाचें हाले दोंद, चंडिकेचा जातो प्राण- सामाशब्द-॰कंद-कांदा-पु. बांडगुळाच्या जातीची एक वन- स्पति. ॰कुंड-पु. गणपतीचें छेदलेलें मस्तक ज्यांत टाकलें असें नर्मदा नदींतील एक कुंड. [सं.] ॰गोमा-पु. (विरू.) गोमा गणेश. लांडा कारभारी; लुडबुडया माणूस; लटपट्या पुरुष. ॰चतुर्थी-स्त्री. गजाननाचा जन्मदिवस भाद्रपद शुद्ध चतुर्थी. ॰टेबल-पु. (उप.) कानस्टेबल, विशेषत; गोरा सार्जंट. 'या सर्वांनीं एका यःकश्चित गणेशटेबलाच्या म्हणण्यावरून प्रथम अशा ढोबळ चुका कराव्या.' -टि १.३९५. ॰टोपी- स्त्री. (मुलांच्या खेळांतील किंवा क्षेत्रतील शब्द) एखाद्याला बडविण्यापूर्वीं कोणीं मारलें हें त्यास न समजावें म्हणून त्याच्या डोक्यावर घातलेला वस्त्राचा घुंगट; असें घुंगट एखाद्यास घालण्याची क्रिया. (क्रि॰ घालणें). ॰टोपी घालणें- (ल.) १ मूर्ख बनविणें; चेष्टा करणें. २ फसविणें; लुबाडण; टोपी घालणें. ॰थापटी-स्त्री. होळीच्या सणांतील एक खेळ. एखाद्यास गणेशटोपी घालून डोकीवर थापट्या मारणें किंवा धोतराच्या तोब्यानें चोपणें; चोपणार्यास ओळखलें म्हणजे ज्याला चोपलें त्याच्यावरील डाव जातो. ॰धौती-स्त्री. एरंडे- लाचें बोट गुदद्वारांत फिरवून मळ काढणे; यानें वद्धकोष्ठता नाहींशी होते. -संयोग ३६०. ॰पट्टी-स्त्री. पुढील दरवाज्याच्या वरची आडवी पट्टी; कपाळपट्टी दाबवटा; हिच्यावर मधोमध गणपतीची मूर्ति कोरलेली असते. सुलकेपट्टी पहा. ॰पूजा-स्त्री. १ गणपतीचें पूजन. २ कथा इ॰ समारंभांत वाटलेली खिरापत. म्ह॰ (गो.) गणेशपुजेकं फुटको नाल (नारळ) = प्रथमग्रासे मक्षिकापात, आरंभींच अपशकून होणें. ॰वात-स्त्री. कापसाची २१ सुतांची ४ बोटें रुंदीची वात; या वाती गणेशचतुर्थींपासून दररोज दोन याप्रमाणें वर्षभर लावतात किंवा एकदम लक्ष वाती लावतात. ॰वेल-स्त्री. आकाशवेल. शोत्सव-पु. गणपतीचा भाद्रपद महिन्यांतील उत्सव.
कान
पु. १ श्रोत्र; कर्णेद्रिय; श्रवणेंद्रिय; शरीराच्या ज्या अवयवामुळें आपणास ऐकूं येतें तो अवयव. २ (ल.) कढई, मोदकपात्र किंवा या सारख्या भांडयाच्या कड्या; सामान्यतः कानाच्या आका- राची वस्तु. ३ दागिने घालण्यासाठीं कानाला पाडलेलें भोंक. 'माझा भिकबाळीचा कान बुजला आहे.' ४ बंदुकीचा काना किंवा रंजक; दारू पेटविण्याचें छिद्र; बत्ती लावावयाची जागा. [सं. कर्ण] (वाप्र.) ॰उघडणें-केलेल्या मूर्खपणाचीं कृत्यें समजणें (स्वतःची व दुसर्याचीं); डोळे उघडणें; एखादी गोष्ट स्पष्ट करून दाखविणें; समजूत पटविणें; ॰उघडून सांगणें- बजावून सांगणें; स्पष्ट सूचना देणें. ॰उपटणें, धरणें, पिळणें, पिरगळणें-शिक्षा करण्यासाठीं कान धरून पिळविटणें, ओढणें; शिस्त लावणें. 'त्याला जिंकून जिवंत पकडून त्याचे कान उपटल्या- शिवाय आम्ही राहणार नाहीं.' -बाय २.२. ॰कापणें-कापून हातावर देणें- वरचढ करणें; कडी करणें; वर ताण करणें; मात करणें; फसविणें. 'दुकानदारानें माझा चांगला कान कापला' ॰किटणें-एखादी गोष्ट पुन्हां पुन्हां ऐकविण्यामुळे वीट, कंटाळा येणें. ॰खडा-डी लावणें-सूचना देणें; मनावर ठसेल असें सांगणें. ॰खडी लावून घेणें-स्वतःला शिक्षा लावून घेऊन चुकी सुधारणें. ॰झाडणें- १ स्पष्ट नाकारणें; ऐकून न घेणें; कानावर येऊं न देणें; निषेध करणें. 'स्वर्गा जाणें हें सांडी । भवविषयीं कान झाडी ।' -ज्ञा १३.६१७. २ उपदेश झिडकारणें, न मानणें. ॰टवकारून, पसरून, ऐकणें-लक्ष देणें; पूर्ण लक्ष देऊन ऐकणें. 'भाषण करणार म्हटल्याबरोबर त्यांनीं कान टवकारून पहावें.' के ३१.५.३०. ॰टोचणें-१ कानाला भोंक पाडणें. २ (ल.) फूस देणें; चिथावणें; चढविणें. ३ कानउघाडणी करणें; झाडणें; ताशेरा झाडणें; खरडपट्टी काढणें. (सोनारानें) कान टोचणें-तिर्हाइतानें कानउघाडणी करणें. ॰देणें-लक्ष देणें. 'श्रीरामराजा देतेस कान ।' -दावि ७८०. ॰धरणें-शासन करणें. ॰धरून-पिळून घेणें-वादाची वस्तु बळजबरीनें कब- ज्यांत, ताब्यांत घेणें. ॰निवणें-थंड होणें-बरें वाटणें; आव- डती किंवा जिच्याबद्दल उत्कंठा लागलेली अशी गोष्ट ऐकून संतोष होणें ॰पसरून ऐकणें-पूर्ण लक्ष देऊन ऐकणें (पण कृति न करणें). ॰पाडणें-१ धैर्य सुटणें; निराश होणें. २ आपल्या तांठ्याला आळा बसलासें वाटणें; गरीब बनणें; माघार घेणें. ३ ऐकूं येत नाहीं असें सोंग करणें; काणा डोळा करणें. 'कान पाडुनि बसे धरणीसी ।' -किंगवि २.२०. 'मी ह्याविषयीं कान पाड- णार नाही.' -बाळ २.१५. ॰पिळून घेणें-स्वतःचा मूर्खपणा कळून आल्यामुळें व त्याचे दुष्परिणाम भोगल्यानंतर पुन्हां तसें न वागण्याबद्दल दृढ निश्चय करणें. ॰पूर ओस करून बसणें- बहिर्याचें सोंग घेणें; ऐकूं येत नाहीं असें भासविणें. ॰पूर ओस पडणें-बहिरा होणें. ॰फुंकणें-१ कानांत मंत्र सांगणें; उपदेश देणें. २ चुगली करणें; मनांत भरविणें; चाहाडी, लावालावी करणें. ॰फुटणें-बहिरा होणें (पूर्ण, अर्धवट). ॰भरणें- भारणें-चहाड्या करणें; कानांत सांगणें; चिथविणें. -॰येणें- ऐकण्याची शक्ति येणें. ॰लांबणें-१ वयानें जसेजसें मोठें होते जाईल तसतशी अक्कल कमी होत जाणें (लहान मुलाविषयीं). २ (गाढवाचे कान लांब असतात यावरून) गाढव होणें. ॰होणें- लक्ष देणे; सावध होणें; सावधपणानें वागणें. कानाआड- मागें-वरून- ऊ न जाणें-उपदेश, शिक्षा, ताकीद वगैरेचा एखाद्यावर उपयोग न होणें. -चा चावा घेणें-खोट्या नाट्या गोष्टी सांगून दुसर्याचें मन कलुषित करणें. -चे कानवले होणें-कान वाकडें, (कानोल्याप्रमाणें) पिळवटलेले होणें. -चे किडे झाडणें-१ परनिंदा श्रवणदोषापासून मुक्त करणें; किल्मिष घालविणें; मनांतील गैरसमज, अढी दूर करणें. २ (कानांत किड्यांचा प्रवेश झाला आहे अशा समजुतीनें) बरोबर समजूत पाडणें; हितवाद सांगणें; चांगली खरडपट्टी काढणें. -त खुंट्या मारणें-१ बहिरें होणें. २ पूर्वींचा एक शिक्षेचा प्रकार, 'कानीं खुंट्या आदळिती । अपानीं मेखा मारिती ।' -दा ३.७.७३. -त जपणें-कानांत पुटपुटणें; गुप्त रीतीनें बोलणें, सुचविणें; कानमंत्र देणें; चहाडी करणें. -त तुळशी घालणें-घालून बसणें-१ ऐकूं येत नाहीं असें भासविणें, सोंग करणें. २ माया- पाश झुगारून दिल्याचा आविर्भाव आणणें; उपरति झाल्याचें दाख- विणें; विरक्तीचें सोंग आणणें. -त तेल घालून निजणें-अति- शय दुर्लक्ष करणें; पूर्णपणें उदासीन असणें. -त भरणें-चुगल्या करणें; एखाद्याचें वाईट करण्याविषयीं भरी भरणें. -त भेंड घालणें-(व.) बहिरेपणाचें सोंग घेणें; न ऐंकणे -त वारें भरणें-उच्छृंखल होणें; एखद्या गोष्टीचा पूर्ण विचार न करतां हुरळून जाणें. 'ही गरीब गाय कानांत वारें भरल्यामुळें उधळली आणि सैरवैरा धांवून अखेर चिखलांत रुतली' -सु ६१. (या) कानानें ऐकणें-त्या कानानें-सोडणें-मनांत मुळींच न ठेवणें, राखणें. -पाठीमागें टाकणें-दुर्लक्ष करणें 'फुकटच्या उपदेशा- प्रमाणें त्यांच्या निरोप कानापाठीमागें टाकणार नसाल तर सांगतों' -सु १०५. -बाहेर-वेगळा करणें-दुर्लक्ष करणें; उदासीन राहणें. -मध्यें-त- मंत्र सांगणे, फुकणें-चिथविणें; चेताविणें. -मागें टाकणें १ उपदेश शिकवण, सूचना इ॰ कडे लक्ष न देणें. २ दुर्लक्ष करणें. 'शत्रूचा समाचार अगोदर घेतला पाहिजे. घरचीं भांडणें तूर्त कानामागें टाकलीं पाहिजेत.' -बाजीराव. -ला खडा लावणें-मूर्खपणाचें किंवा दुष्टपणाचें काम पुन्हां न करण्या- विषयीं निश्चय करणें (कानाच्या पाळीच्या मागें खडा लावून दाबण्याचा पूर्वीं शिक्षेचा एक प्रकार होता). -वर (उजव्या डाव्या) पडणें-निजणें-लेटणें एका कुशीकर (डाव्या-उजव्या) निजणें. -वर मान ठेवणें-आळशीपणानें किंवा निष्काळजीपणानें बसणें. -वर येणें-ऐकणें; श्रुत होणें; 'येणार पुढें पुष्कळ आलें आतांचि काय काना तें ।' -भोभीष्म ७.६. -वर हात ठेवणें-त बोटें घालणें,कान-झांकणें-१ एखादी गोष्ट मुळींच माहीत नाहीं अगर तींत आपला बिलकुल संबंध नाहीं असें दाखविणें; नाकारणें; नाकबूल जाणें. २ एखादी मनाविरुद्ध गोष्ट ऐकवत नाहीं म्हणून कानांत बोटें घालणें. 'तो हा वधिला केलें कर्म अमित साधु घातसें मोठें । खोटें हें म्हणतिल शिव शिव कर्णी घालतील बुध बोटें. ।' -मोस्त्री ४.३६. -वरून जाणें १ कान चाटून जाणें; २ (ल.) थोडासा तोटा होणें. ३ ऐकलेलें असणें. -शीं कान लावणें-गुप्त रीतीनें मिळून मसलत, खलबत करणें. -शीं लागणें, कानीं लागणें-कानांत सांगणे; हळूच बोलणें; गुप्त रीतीनें सुचविणें -स कोन न कळूं-न लागूं देणें-अतिशय गुप्तपणा राखणें. 'आणि झाल्यावर सुद्धां कानास कोन लागूं नये ही तर खबर- दारी घेतलीच पाहिजे.' -सु १०.८. -स दट्टे-दडे बसणें- बहिरा होणें. कानीं कपाळीं रडणें-ओरडणें-सदोदित, नेहमीं बुद्धिवाद करीत असणें; नेहमीं, पुन्हां पुन्हा सांगणें. -नीं कोचीं बसणें-लागणें-(चोरून ऐकण्यासाठीं) कानाकोपर्यांत, अड- चणींत बसणें, कानोसा घेणें. -नीं मनीं नसणें-एखाद्याची कल्पना नसणें; कधींच न ऐकलेलें, मनांत नसलेलें ऐकणें. -नीं सात बाळ्या असणें-(लहान मुलांच्या भाषेंत) (ऐकावयाचेंच नाहीं असा निश्चय दाखवावयाचा असतां) ह्या कानाचें ह्या कानास कळूं न देणें; अतिशय गुप्तपणा ठेवणें. म्ह॰ (व.) १ कानाची कोन झाली नाहीं = कुणालाहि कळलें नाहीं. २ कानामागून आलें महालिंग (तिखट) झालें; = मागून आलेला किंवा वयानें लहान असा माणूस जेव्हां वरचढ होतो तेव्हां योजतात. ३ मुढ्या कानाची पण अभिमानाची = अंगांत दोष असून अभिमानयुक्त. ४ (गो.) कान मान हालवप = एखादी गोष्ट करण्यासाठीं उत्सुकता दाखविणें. ५ (गो.) कान फुंक म्हळ्यार व्हान फुंकता = एक सांगि- तल्यावर दुसरेंच करणें. ६ (गो.) कानाचा पोळा आनी पोटाची चिरी वोढता तितली वाढता = संवयीनें संवय वाढते. ७ कान आणि डोळे यांच्यांत चार बोटांचें अंतर = पाहिलेलें व ऐकिलेलें यांत केव्हां केव्हां अंतर असतें, ऐकलेलें तितकें विश्वसनीय नसतें, पुढें खोटें ठरण्याचा संभव असतो. ८ कानामागून आलें शिंगट ते झालें अति तिखट-(कानाच्या नंतर शिंगें उद्भवतात म्हणून) एखादा उपटसुंभ मागून येऊन एकाएकीं मोठ्या पदाला चढला व पहिल्या लोकांना शिकवूं लागला-त्रास देऊं लागला तर त्यास म्हणतात. यावरून कानामागून येणें व तिखट होणें. सामाशब्द-॰आढा-पु. (बैल- गाडी) गाडी उतरणीवर असतां किंवा बैल बेफाम असला तर तो ताब्यांत रहावा म्हणून कासर्यानें बैलाच्या कानाला टाकलेला वेढा. ॰कडी-स्त्री. (लोखंडी काम) कानाच्या आकाराचा पत्रा कापून त्याला जें एक लांबट तोंड ठेवतात तें वळवून त्यांत बसविलेली कडी. अशा दोन बाजूस दोन कड्या असतात. ॰कवडा-पु. कान- खवडा पहा. ॰कळाशी-सी-स्त्री. (घोडा, बैल इ॰ च्या) कानाची व डोक्याची ठेवण, आकार. 'अस्सल जरदी घोडी भिवरथडी वर बसली चांदणी । कानकळाशीं फेरफटक्यामध्यें कोणी तरी दिली आंदणी ।' -पला ४.२१. ॰कात्रा-पु. (गो.) पाण्या- वर तरंगणारा एक लहान मासा. -मसाप ३.३.१५७ -वि. कान कापलेला; कानफाट्या. ॰कारी-स्त्री. (विणकाम) ताणा ताणून धर- णारी एक धनुकली. ॰किरळी-कीड-कुरकुटी-कुरटी-स्त्री. (कों.) कानास होणार एक रोग; कानाची कीड. ॰कुडें-न. कानां- तील कुडें; एक अलंकार. [कर्ण + कुंडल; कण्णकुड्डळ-कानकुडें.] ॰कुलाय-स्त्री. (गो.) कान झाकेपर्यंतचा डोक्यावर घालण्याचा निमुळता टोप. [सं. कर्ण + कुलाया = घर, झांकण] ॰कूण-स्त्री. १ गुणगुण; बाजारगप्प. २ कुजबूज; कुरकूर. ३ तक्रार; कां कूं; अनिश्चित वर्तन. [कान + कुणकुण] ॰कूस-अनिश्चितता; कां कूं; चालढकल; कानकूण अर्थ ३ पहा. [कान + ध्व. कुस्] ॰केस-पुअव. (नुकत्याच विधवा झालेल्या स्त्रीचें) केशवपन करणें व अलंकार काढून घेणें. (क्रि॰ करणें.) ॰कोंडा-वि. १ (आश्रयदाता, उपकारकर्ता, ज्याला आपलीं अंडींपिल्लीं, दोष माहीत आहेत अशा माणसासमोर) लज्जित; मुग्ध; खजिल; कुंठित; ओशाळा; भय- चकित झालेला; मिंधा. 'गुरुज्ञानाचें अंजन नसतां कानकोंडा प्रपंच फोल ।' -अमृत १९. 'ईश्वरी कानकोंडा जाला । कुटुंब- काबाडी ।' -दा ३.४.४७. 'मी कानकोंडा जाहलों दुर्मती ।' -भावि ५५.१०६. २ ऐकूं येत नाहीं असें ढोंग करणारा. -पु. दुर्लक्ष; ऐकूं येत नसल्याचें सोंग. 'तुजविषयीं कानकोंडा करुं काय मी आतां ।' -दावि ८२. [कान + कोंडणें] ॰कोंडा-पु. कानां- तील भुसकट, मळ. ॰कोंडीं-गाडा, कानागाडा-स्त्रीपु. बहिरे- पणाचें सोंग घेणें; दुर्लक्ष करणें; कां कूं करणें; अळंटळं करणें; ऐकण्या न ऐकण्याबद्दल अनिश्चितता. (क्रि॰ करणें). [कान + कोंडा] ॰कोंडा-डी-वाटणें-शरमिंधें होणें, वाटणें. ॰कोंडें-वि. लाजिरवाणें. कानकोंडा-डी पहा. 'ऐसी परस्त्रीची संगत । घडतां जनांत कानकोंडें । -महिकथा २८.१००. -न. १ दुर्लक्ष; 'केली नाही चिंता नामीं कानकोंडें । अंती कोण्या तोंडें जात असे ।' -रामदास (नवनीत पृ. १५२.) २ भिडस्तपणा. 'कानकोंडें साहो नये ।' -दा १४.१.६. ॰कोपरा-पु. वेडावांकडा भाग; कान किंवा कोपरा; पुडें आलेला भाग (शेत, घन पदार्थ इ॰ चा) चतुरस्त्र, वर्तुल इ॰. आकारविरहित जे क्षेत्रादिकांचे अंश असतात तो. ॰कोरणी-णें-कानांतील मळ काढण्याची, पुढें वाटी असलेली धातूची लहानशी काडी; कानमळ काढण्याचें हत्यार. ॰खडी-स्त्री. सूचना; ताकीद. 'मी त्यास कानखडी लावली.' ॰खवडा-पु. वास- रांच्या कानाला होणारा एक रोग; तो नाहींसा होण्यासाठीं वास- राच्या कानांत एक कथलाची बाळी घालतात. ॰खीळ-स्त्री. १ (बैल- गाडी) चाक पडूं नये किंवा जागेवरून मागेंपुढें सरकूं नये म्हणून आंसास घातलेली कडी, कुणी. २ (औत) जेथें दोन शिवळा जोखडास असतात त्यांतील बाहेरील शिवळ. ॰खोरणें-(ना.) कानकोरणी-णें पहा. ॰गच्ची-स्त्री. १ पट्टा अगर वस्त्र यांनीं कान झांकणें, बांधणें. (क्रि॰ करणें; बांधणें). २ खोट्या, अनिष्ट गोष्टी ऐकूं नये म्हणून कानावर हात ठेवणें; आपल्या कानीं सातबाळ्या करणें. (क्रि॰ करणें). [कान + गच्च] ॰गोष्ट- स्त्री. कानांत सांगितलेली गोष्ट; रहस्य; कर्णमैथुन. ॰घसणी- स्त्री. १ कानगोष्ट पहा. २ कुजबूज; आळ. 'जाणोनि कान घसणी हरि चालियेला' -अकक. कृष्ण कौतुक ५४. ॰घुशी-घुसणी-स्त्री. (गोट्यांचा खेळ) हाताच्या बोटांनीं आपला कान धरून त्याच हाताच्या कोपरानें गोटी उडविण्याचा प्रकार. ॰घोण-स्त्री. गोम नांवाचा सरपटणारा किडा; घोण; कर्णजूलिका; कर्णकोटी. हा कानांत शिरतो ॰चा कोन-पु. क्रिवि. कानाच्या कोपर्यांत; अगदीं जवळ; कोठेंहि; किंचित् (ऐकूं न येणें, परिस्फुटता न करणें). 'म्या त्याची लबाडी कानाच्याकोनाला कळूं दिली नाहीं.' 'कानाचाकोन समजला नाहीं.' ॰चिट्-पु. खेळांतील समाईक गडी; राहाट्या. ॰चिपी-स्त्री. १ कानाचा वरचा भाग पिरगळणें; कानपिचकी. (शाळेंतील पंतोजीच्या शिक्षेचा अथवा मुलांच्या खेळांतील शिक्षेचा एक प्रकार). (क्रि॰ घेणें). २ खेळांत लबाडी केल्याबद्दल शिक्षा म्हणून स्वतःचा कान पिरगळून घेणें. (क्रि॰ घालणें.) ॰चिंबळी-(कों.) कानचिपी पहा. (क्रि॰ घेणें. ॰चोर-वि. (गो.) ऐकून न ऐकलेसें करणारा. ॰टाळ- ठाळ-ळी-ळें-ठळ्या-ठाळ्या-टाळीं-ळें-(अव.) (बसणें क्रियापदास जोडून) बधिर होणें; दडे बसणें; कानाचे पडदे बंद होणें. ऐकूं न येणें (थंडी, वारा, मोठा आवाज इ. मुळें). -गलि ३.१७ २ (उघडणें क्रियापदाला जोडून) बहिरेपणा जाणें; ऐकूं येऊं लागणें. ३ समजण्याला, शिकविण्याला योग्य होणें; डोळे उघ- डणें; ताळ्यावर येणें. ४ ताळ्यावर आणणें. [कर्ण + स्थळ] ॰टोपी-पु. कान, कपाळ झांकणारी टोपी; माकडटोपी; कान- पट्टीची टोपी. ॰पट-स्त्री. (व.) कानशील; कानाजवळील गाल व कपाळ यांमधील भाग. ॰पट्टी-स्त्री. १ कानगच्ची अर्थ १ पहा. कान झांकतील अशा तर्हेनें डोक्याला गुंडाळणें. २ कान- पट; कान-शील. 'भाल्याची जखम कानपट्टीस लागली.' -भाब ५७. ॰पिसा-वि. (कों.) कानाचा हलका; भोळ- सर; खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवणारा. ॰पिळा-ळ्या-पु. (लग्नांत) नवर्यामुलीचा भाऊ. नवरीच्या हातांत लाजाहोमाच्या वेळेस लाह्या घालतो व नवरामुलगा त्याचा कान पिळतो, त्या- बद्दल त्याला नवर्यामुलाकडून कानपिळ्याचें अगर कानपिळणीचें पागोटें मिळतें तो मान. ॰फट-ड-स्त्रीन. कानशील; गालफड; कानाच्या पुढील गालाचा प्रदेश (विशेषतः थोबाडींत मारतांना ह्या शब्दाचा उपयोग करतात. जसें-मी तुझें कानफड सुजवीन, फोडीन; कानफडांत मारीन. [सं. कर्ण + फलक] ॰फटा-फाटा- टी-ट्या-डी-पु. नाथपंथ व त्या पंथांतील गोसावी. ह्यांचीं परं- परा आदिनाथापासून आहे. यांच्यांत प्रख्यात असे नऊ नाथ होऊन गेले. हे शैवमतानुयायी आहेत. हे कानाच्या पाळीस मोठें भोंक पाडून त्यांत काचेच्या किंवा लाकडाच्या गोल चकत्या घाल- तात. ह्यांच्या गळ्यांत शिंगी, पुंगी असते. हे किनरीबर गोपीचंद राजाचीं गाणीं म्हणतात. 'व्याघ्रांबर गजचर्मांबर परिधान शुद्ध कानफटा । ' -प्रला ५. [कान + फाट] कानफटा (इ.) नांव पडणें-क्रि. दुर्लौकिक होणें; नांव बद्दू होणें. कानफाट्यांच्या वर्त- नाबद्दल लोक सांशक असतात त्यावरून लोकांत एकदां शंका उत्पन्न झाली कीं ती जात नाहीं. उदा॰ म्ह॰ एकदां कानफाट्या नांव पडलें म्हणजे जन्मभर तें तसेंच राहतें, त्यावरून एकदां दुष्कृत्य केलें म्हणजे त्याचा कलंक जन्मभर राहतो. ॰फुटी-स्त्री. १ एक औषधी वेल. २ (हेट.) कडधान्यांतील एका गवताचें बीं. ॰फुशी- स्त्री. कानगोष्ट; कानांत पुटपुटणें; कुज बूज. ॰फोडी-स्त्री. अजगंधा वनस्पति; तिळवळ. ॰भेरा-भायरा-वि. बहिरट. ॰मंत्र- मंत्री-पुस्त्री. कानांत सांगितलेली गोष्ट; गुप्त मसलत. ॰वडा-वि. १ एका कुशीवर, बाजूवर निजलेला; आडवा झालेला. (क्रि॰ निजणें; पडणें; होणें). 'ना येणेसीं मुख वांकडें । करूनि ठाकाल कान- वडे ।' -ज्ञा १८.१६९३. 'परि ते कानवडि परांमुख निजेली होती ।' -पंच ३.१५. 'कोणी कानवडे निजती -दा १८. ९.७. २ पराङ्मुख. 'दुर दुर जासी निघुन बघुन लगबगुन होसि कां कानवडा ।' -प्रला १६२. -पु. दाराचें झांकण, वस्त्राचा आडपडदा. -शर ॰वडें-क्रिवि. कानवडा पहा. एका कुशीवर, बाजूवर. 'तिएं धारेचेनि दडवादडें । नावेकु मुखचंद्र कानवडें ।' -शिशु ७१२. 'नये अळसे मोडूं अंग । कथे कानवडे ढुंग ।' -तुगा २४१३. ॰वसा-पु. कानोसा; दूरचा शब्द कान देऊन एकाग्रतेनें ऐकण्याची कृति. (क्रि॰ घेणें; लावणें; लावणें) ॰वळ-पु. कानामागें होणारा एक रोग. ॰वळा-वि. कानवडा पहा. (क्रि॰ असणें; निजणें; पडणें). -पु. (पशूच्या) डाव्या कानाखालीं दिलेल्या डागाची रेघ. ॰वळे-पुअव. गालावर आलेले कानाच्या बाह्य अंगावरील केंस. कानवा-व्ह-ळा-पु. कानोसा. (क्रि॰ घेणें; लावणें). ॰विळें-न. (कु.) कानांतील मळ ॰वेणी, कानशीलवेणी-स्त्री. लहान मुलांच्या कानावरील केसांची घातलेली वेणी. ॰वेरी-क्रिवि. कानापर्यंत; कानाविरी. 'जे अनर्थाचे कानवेरी ।' -ज्ञा ९.१८२. ॰शिरा-स्त्रीअव. कानाजवळच्या शिरा. 'कानशिरा दुखतात, धमकतात, उठल्या.' ॰शील-सल-सूल, कानाड-न. १ कानाच्या जवळचा, गाल व कपाळ यांमधील भाग 'कानसुलां भाली । आंगें कूट जालीं ।' -शिशु ९७०. 'घोर जाहली हातफळी । हाणिताती कानसुली । एकमेकां ।' -कथा ५.१७.१४१. 'याच कानसुलीं मारीतसे हाका ।' -तुगा १८०५. २ गालफड; चेहर्याची एक बाजू; कानठाड; कानफट. [कर्णशिरस्] ॰सर-पु. बैलाच्या कान व शिंगाभोंवतीं बांधावयाची रंगीत सुती दोरी. ॰साक्षी-पु. ऐकींव माहिती सांगणारा साक्षीदार. काना-नें आरंभ होणारे सामा- शब्द-कानाकोचा-वि. कानाला कटु, कर्कश, वाईट लागणारें; कर्णकटू (भाषण, इ॰) 'आणि कां कानेंकोचें बोले ।' -तुगा २७३५. ॰कोचा-कोपरा-१ उंचवटे व भेगा. पृष्ठभागीं विष- मता (जागा, वस्तू इ॰ ची). २ (ल.) एकूण एक भाग. 'मी घराचा कानाकोपरा शोधला.' [कान + कोपरा, कोचा] ३ पुढें मागें झालेला, भाग; उंचसखल भाग; गट्टू व खड्डा. कानाकोपर्याचें भाषण- न. गुपचुपीचें भाषण; कुजबूज; गुप्तपणाचें बोलणें; खाजगी, घरगुती बोलणें. -चा आदळ-वि. ज्याच्या पोटांत कोणतीहि गोष्ट राहात नाही असा; बहकणारा; बडबड करणारा. -चा जड- वि. १ अर्धवट बहिरा; बहिरट. २ (ल.) ज्याला सांगून लवकर समजत नाहीं असा. -चा टप्पा-पु. हांकेचे अंतर. -चा तिखट-वि. तीक्ष्ण श्रवणेंद्रियाचा. -चा पडदा-पु. ध्वनीचा आघात होऊन नाद उत्पन्न होणारें कानांतील तंबूर; ध्वनिलहरी ज्यावर आदळल्यामुळें कंप उत्पन्न होऊन ऐकूं येतें तो पातळ पापुदरा. -वर लेखणी ठेवणारा, बाळगणारा-वि. हुषार; वाकबगार कारकून, लेखक यास म्हणतात. -चा हलका-खरी खोटी गोष्ट सांगितली असतां तीवर सहज विश्वास ठेवणारा; चहाडखोराचें खरें मानणारा.
तेल
न. तीळ, खोबरें, भुईमूग, चंदन इ॰ पासून पेटण्याजोगा निघणारा एक स्निग्ध व द्रवरूप पदार्थ; पदार्थातील स्निग्ध अंश. [सं.] तैल; प्रा. तेल्ल; आर्मेनियम तेल] (वाप्र.) ॰काढणें-न. १ पिळून, शोषून घेऊन एखाद्या पदार्थाचा रस, सत्व काढणें. २ (ल.) खरपूस चोप देणें; कुटणें. ॰घेणें- (स्त्रीविषयीं हा वाक्प्र- चार योजीत असतात) आपल्या स्वतःला देवाकडे लावणें; एखाद्या देवाच्या उपयोगाकरितां कसबीन बनणें; गरतपणा सोडून भावीन होणें. दिव्यांतील थोडेसे तेल डोक्यावर घालण्यानें ती आपला उद्देश जाहीर करते. म्हणून लग्न झालेली स्त्री तेल खरेदी करणें ह्या अर्थी 'तेल घेणें' असें म्हणत नसून' तेल ठेवणें' असें म्हणते व तिला तेल खरेदी करण्यास सांगावयाचें असल्यास 'तेल घे' म्हणून न सांगता 'तेल ठेव' असें सांगण्याचा रिवाज आहे. ह्या अर्थीं तेल जिरविणें असेंही म्हणत असतात. जसें- 'तिनें येउनिया स्वकरीं । तेल जिरविलें आपले शिरीं ।' ॰चढविणें-उतरविणें- (बायकी) उष्ट्या हळदीचे वेळीं वधूपक्षाकडून वरपक्षकडे आलेलें तेल परटिणीकडून (किंवा ज्याच्या त्याच्या चालीप्रमाणें एखाद्या स्त्रीकडून) वरच्या पावलास, अंगास व डोक्यास आंब्याच्या पानानें तीन वेळ लावणें. आणि तोच अनुक्रम तीन वेळ उलटा करणें:-म्हणजे तेल उतरविणें. (पाठीला) तेल लावून ठेवणें-मार खाण्याची तयारी करून ठेवणें. लागणें-(अंगास तेल लावलेला (अभ्यंग) कोणत्याही कामाला उपयोगी पडत नाहीं यावरून) महाग, दुर्मिळ, अप्रांप्त होणें, असणें (मनुष्य, वस्तु इ॰). ॰घालणें-(एखाद्या कामांत त्या) कामाची खराबी होईल अशी कांहीं तरी वस्तू अथवा भीड मध्यें घालणें. म्ह॰ १ तेल जळें पीडा टळे. २ तेल गेलें तूपगेलें हातीं धुपाटणें आलें = दोन फायद्याच्या गोष्टी असतां मुर्खपणामुळें हातच्या दोन्ही जाऊं फायद्याचा गोष्टी असतां मुर्खपणामुळें हातच्या दोन्ही जाऊं देऊन मनुष्य पुन. कोराकरकरीत राहणें अशा अर्थीं योजितात. सामाशब्द- ॰कट-कटी, तेलगट-वि. १ ओशट; स्निग्धल तेलानें युक्त, लिप्त. २ ज्यांत तेल आहे असा (तीळ, खोबरें, इ॰पदार्थ). [तेल] ॰क(ग)तणें-अक्रि. तेलानें भरणें; माखणें; भिजणें (वस्त्र, शरीरावयव इ॰). ॰कट तजेला-पु. तुळतुळीतपणा; तेलाची चमक. ॰कटाण-स्त्री. तेलकट घाण-वास. ॰कटी-स्त्री. १ तेलाचा चिकट मळ, वळकट्या. २ ओशटपणा. -वि. तेलकट पहा. ॰कार-पु (गो.) तेली; तेल काढणारा. ॰खिस्का-पु. (माण.) खेड्यांतील मनकर्याच्या सुवासिनीला लग्नाचें आमंत्रण देण्याकरितां हलदकुंकू. तेल देतात तें तेलगंड-पु तेल्याला तिरस्कानें संबोधितात (न्हावगंड शब्दप्रमाणें). [तेली + गंड प्रत्यय] तेलगोटी-तेलरवा पहा. -गांगा ३३. घडी-स्त्री. जखमे- वर घालण्याकरितां तयार केलेली, तेलांग बुडवून केलेली काप- साची घडी. ॰घाणा-पु. १ तेलाची घाणी; तेल काढण्याचें यंत्र. २ (शूद्रादि जातींत) गणपतिपूजनापासून लग्न लागेपर्यंत ब्राह्मणानें करावयाचें धार्मिककत्य. तेलची-स्त्री. १ तेलांत, तुपांत तळलेली गोड पुरी; पुरणाची पोळी. 'तेलच्या आणि फेण्या गुरोळ्या जाण ।' -अफला ५७. २ कणकेंत तेलमिठाचें मोहन घालून त्याची तळलेली पुरी. -गृशि १.३९५. ॰तवा-पु. तळण्याचा तवा; हा पितळीप्रमाणें असतो. ॰तावन-स्त्री. (ना.) कढई. ॰तिमण-न. तिमण पहा. ॰तूप घालणें-(बायकी) लग्न झाल्यावर पहिलीं पांच वर्षें संक्रांतीच्या दिवशीं तेल, तूप, तिळ- गूळ, हळदकुंकू, विडा इ॰ जिन्नस घेऊन पांच घरीं नवर्यामुलीनें नेऊन देण्याची क्रिया. ॰तूप निरांजन-(गो.) तेल गेलें तूप गेलें हातीं निरांजन आलें या म्हणीप्रमाणें वाक्प्रचार. ॰दिवाळी- स्त्री. दिवाळीकरितां पाटलानें तेली लोकांवर बसविलेली तेलाची पट्टी, वर्गणी. ॰धार-स्त्री. पाटलाला वगैरे देण्याकरितां गांवच्या तेल्यावर बसविलेली तेलाची पट्टी. ॰पक-वि. तैलपक्क; तेलांत शिजवलेलें तळलेलें. ॰पाषाण-न. काळे तुळतळीत दगड. ॰फळ-साडी-नस्त्री. (बायकी) लग्नापूर्वी वराकडून वधूला दिली जाणारी देणगी. लग्न लागण्याचे पूर्वीं नवर्याकडून नवरीकडे पाठविलेलें तेल, साडी, खोबर्याच्या वाट्या, नारळ, हळदकुंकू, फरा- ळाचें सामान, करंज्यालाडू इ॰ सामान; लग्नापूर्वीचा अपुलकीचें व कौतुकाचें चिन्ह दाखविण्याचा हा पहिला प्रकार आहे. ॰बोळ- पु. बाळंतिणीसाठीं लागणार्या आवश्यक वस्तू. म्ह॰ पोराचें पोर गेलें आणि तेलबोळाचें मागणें आलें. ॰मीठ-न. किरकोळ वस्तु, पदार्थ; तेलमिटाखालीं-वारीं' इ॰ प्रकारानें कारक विभक्तींमध्यें हा शब्द योजितात व ह्याचा अर्थ 'हिंगतूप' अथवा 'हिंगधूप' ह्यासारखा होतो. ॰येवप-(गो.) (तेल येणें) नवरानवरीकडील एकमेकांकडे तेलहळद येणें. ॰रतीव-पु. प्रत्येय चालू असलेल्या तेलघाण्याच्या मालकानें घ्यावयाचा रोजचा तेलाचा रतीव; कर. ॰रवा-गोष्टी-पुस्त्री. कढत तेलांतून रवा. गोटी इ॰ काढवयाचा एक दिव्याचा प्रकार. तेलांतून वस्तू काढतानां जर हात भाजला नाहीं तर काढणारी व्यक्ति निर्दोषी आहे असें समजतात. दिव्य पहा. -गंगा ३३. -गुजा १३. ॰रांधा-पु. (माण.) देवतेचा स्थापनाविधि व त्यानंतर देवतेस करावयाचा भात. पोळ्या, तेलच्या इ॰ पदार्थांचा नैवेद्य. 'गोट्यांना तेल शेंदूर लावून त्याच दिवशीं रात्रीं तेलरांधा करतात.' -मसाप ४.४. २५८. ॰वण-न. १ तेलफळ पहा. लग्नापूर्वीचा सोहाळा. 'जहालें तेलवण मुहूर्त । अलंकार वाहिले समस्त ।' -कथा ४.८. ५५. २ (आगरी) विवाह- समारंभांत सुपांत दिवे लावून नवरी अगर यांस ओवळाण्याचा विधि. -बदलापुर ३९. ३ दैवज्ञ ब्राह्मणांत विवाहसमारंभांत विड्याच्या पानाला भोंक पाडून तें डोक्यावर धरून त्यांतून मुलीवर तेल पाडण्याचा विधि. -बदलापुर २३६. ॰तेलवण काढणें, घालणें-(ल.) चांगला मार देणें; कुटणें. ॰वरी- स्त्री तेलची पहा. 'घार्या तेलवर्या विदग्धा ।' -सारुह ६.७८. ॰वात-स्त्री. दिव्यांत तेल घालणें, वाती करणें, दिवे पुसणें इ॰ दिवे लावण्याच्या पूर्वीची तयारी. ॰वाट करणें-१ दिवाबत्ती करणें. २ दिव्यामध्यें तेल व वाती घालणें; दिवे पुसणें. ॰वात घालणें-(बायकी) (दर शनिवारीं मारुतीस) तेल व वात तेथें असलेल्या दिव्यांत नेऊन घालणें व दिवा लावणें. ॰शिपा-पु. (नविक) मोठमोठ्या माशांपासून काढलेलें एक साधारण तेल. नावेच्या बाहेरल्या अंगाला लावण्यास ह्याचा उपयोग करितात. जमाबंदीच्या हिशोबांत या शब्दाबद्दल नुस्ता शिपा येवढाच शब्द आहे. ॰शुभ्रात-स्त्री. एखाद्या प्रसिद्ध देवळांत नंदादीप लावण्या- साठीं आसपासच्या खेड्यापाड्यांवर सरकारी पट्टी बसवून जमविलेलें तेल. [तेल + शुभ + रात्र] ॰ष्टाण-साण-स्त्री. तेलाची घाण. तेलस-सर-वि. १ तेलकट. २ तेलट; ज्यांत तेल जास्त आहे असा. ॰साडी-तेलफळ पहा. 'मग सावित्रीशीं तेलसाडी नेस- विती ।' -वसा ४६. तेलाचा टिकला, तेलाची धार-थोड- केसें तेल. तेलाडे-पुअव. (नवीन बनावट शब्द) जमीनींत तलाचे झरे पाहणारे; तेलपारखी. 'उत्तम वाकबगार पानाडे विहिरीस पाणी कोठें लागेल हें सांगण्यांत पटाईत असतात तसेच इकडे तेलाडेहि असतात.' -सांस २.१३२. [तेल] तेलिया-पु. एक काळा रंग; तेलासारखा तुळतुळीत रंग. [तेल; हिं.] ॰कुमाईत-पु. घोड्याचा एक रंग. यांत केस लाल कमी व काळे जास्त असावे, पाय गुडघ्यापर्यंत काळे असावे व कपाळावर पंधरा ठिपका असावा. ॰पंचकल्याण-वि. चारी पाय पांढरे असणारा तेलिया कुमाईत (घोडा). -अश्वप १.२९. तेली-पु. तिळाचें वगैरे तेल काढून त्याच्यावर उपजीविका करणारी एक जात; तिच्यांतील एक व्यक्ति; तेल काढणारा व विकणारा. [तेल] म्ह॰ तेल्याचा बैल सदां आंधळा. ॰खूट-पु. गांवच्या तेल्यावर प्रयेक घाण्या- बाबत बसविलेला कर. तेलीण-स्त्री. तेल्याची बायको; तेल विकणारी स्त्री. 'तेलिणीशी रुसला वेडा । कोरडी भाकर खातो भिडा ।' -तुगा ३२८४. ॰म्ह॰ तेलणीशीं रुसला अंधारांत बसला. तेली तांबोळी-पुअव. तेली, तांबोळी ह्या जातीच्या आणि इतर हलक्या जातीच्या लोकांस व्यापक संज्ञा; अडाणी बहुसं- ख्याक लोक; हलके, अशिष्ट लोक. [तेली + तांबोळी] तेलीरी- स्त्री. (खा.) तेलांत तळलेली पुरी, तेलची. [तेल + पुरी] तेल्या- वि. तुळतुळीत; चकचकणारा; झगझगीत; तुकतुकीत (रंग). २ तेल्याबोर; घोड्याचा एक रंग. ३ तेलानें लिप्त, माखलेला; तेलकट. [तेल] ॰कुमाईत-तेलिया कुमाईत पहा. ॰खार, टाकण- खार-पु एक क्षार. याला चौकिचा टाकणखार असेंहि म्हणतात.
हर
वि. प्रत्येक; दरएक. उदा॰ हरघडी-वखत-रस्ता-गांव-जागा इ॰ [फा.] ॰उपाय-पु. दरएक इलाज, युक्ति, साधन; सर्व, नाना इलाज, युक्तया (विशेषतः अव. प्रयोग). ॰एक-वि. १ प्रत्येक; जो जो कोणी तो तो. 'हरएक मनुष्या- समागमें पत्र पाठवून संतोषवीत असावें.' २ कसलाहि; कोणा- चाहि. 'जुने लोक यांस हरएक उपद्रव न केला.' -मराचिस २८. ॰एकरंगी-वि. निव्वळ एकाच रंगाचा (घोडा). हें अशुभ लक्षण आहे. अशुभ चिन्हें पहा. ॰कशी-वि. कशीबशी; हर- एक. 'हरकशी निभावणूक करून तंजावरपर्यंत आले.' -पेशवे॰ महाराष्ट्र २४४. ॰कसबी-वि. १ हरएक कौशल्याचें काम करणारा; अष्टपैलू कारागीर. २ हरकामी. ॰काम-न. प्रत्येक किंवा कोणतेंहि काम, धंदा; वेळीं उपस्थित होईल तें काम. ॰कामी- काम्या-वि. १ जरूर पडेल तें तें काम करण्यास तयार असलेला; अशा बोलीनें ठेवलेला (माणूस). २ कोणतेंहि किंवा दरेक प्रका- रचें काम करण्यास समर्थ असलेला. कोणतेहिं काम करण्यास ज्याचे हात वळतात असा. ३ अनेक प्रकारें उपयुक्त होणारी (वस्तु). ॰कोण्ही-कोणी-वि. १ भलतासलता कोणी. २ प्रत्येक जण; दरएक. ॰घडी-क्रिवि. वारंवार. प्रत्येकीक्षणीं; नेहमीं; घटकोघटकीं. ॰जिन्नस-पु. सर्व तर्हेचा माल; जिन्नस; किरकोळ व्यापारी वस्तू. ॰जिन्नस-सी-वि. हरएक, अनेक जातीचा- प्रकारचा; सर्व प्रकारचा. 'त्याचे दुकानीं लहान मोठे गोड आंबट असे हरजिनशी आबें आहेत.' ॰तर्हा-स्त्री. प्रत्येक रीत, योजना, युक्ति, साधन इ॰ (विशेषतः अव, प्रयोग); नाना तर्हा-प्रकार. [फा.] ॰दम-क्रिवि. हरघडी. ॰दमख्याली-पु. १ दरेकक्षणीं नवीन कल्पना, लहर, ख्याल. २ (अव.) अनेक युक्तया, यत्न, बेत, योजना, साहसें, श्रम. 'हरदमख्याल करून त्यानें लग्न केलें.' ३ शोध- कता; कल्पकता; हिकमत. 'ज्याचे अंगीं हरदमख्याल नाहीं असला एकमार्गीं काय उपयोगी ?' ॰दमख्याली-वि. १ फार उलाढाल्या करणारा; चळवळ्या; उद्योगी; युक्तिबाज. २ (ल.) लहरी. '(शिंदे) जात्या हरदमख्याली... कसें करितील याचा विश्वास नाहीं.' -ख ७.३२. ३ लबाड. 'त्यांत तो (हैदर) हरदमाख्याली आहे.' -ख १०९६. ॰प्रयत्न-प्रेत्न-पु. प्रत्येक प्रकारची खटपट, श्रम, योजना. २ (अव.) सर्व प्रकारच्या खटपटी इ॰. ॰बयाज-द- बहाणा-पु. दरएक सबब; ढोंग, युक्ति, कावा, खोटी कहाणी (अपराध्यानें पुढें केलेली). (क्रि॰ करणें). ॰बाबी-बाब-वि. दरेक बाबीसंबंधीचें (बाब = जमाबंदीचा प्रकार). जसे-हरबाबी बंद-कागद-हिशेब-वसूलबाकी इ॰. ॰भास-वि. फार हुशार; अष्ट- पैलु; सर्व गोष्टींत निपुण; बहुगुणी. ॰भांस-वि. १ वरील शब्द पहा. २ सर्व प्रकारचा; जातीचा, तर्हेचा, नानाविध. ॰मळ- माळ-स्त्री. १ माणसें, गुरें इ॰ ची चालणारी रांग, ओळ, जाणार्यायेणार्यांची माळका. (क्रि॰ लावणें; लागणें; चालणें; टळणें; मोडणें). २ नेमलेली, ठरविलेली वेळ. (क्रि॰ संभाळणें; साधणें; टळणें; चुकणें). ३ परिचय; घसट; वावर. ॰युक्ती-स्त्री. दरेक उपाय, योजना, बेत, मसलत; (अव.) सर्व उपाय इ॰. ॰येक-वि. हरएक पहा. ॰वख्त-क्रिवि. हरघडी. ॰वळ-स्त्री. हरमाळ अर्थ १ पहा. ॰साव-न. चोर, शत्रू इ॰ धाडीवर, सर्व प्रकारचीं शस्त्रास्त्रें घेऊन उठलेला गांवकर्यांचा, शेतकर्यांचा समूह, थवा. (क्रि॰ उठणें, मिळणें). ॰हमेश-शा-क्रिवि. नेहमीं. ॰हुन(न्न)र-न. प्रत्येक कौशल्य, युक्ति, कसब; (अव.) सर्व कलाकौशल्य. ॰हुन(न्न)री-वि. हरकसबी; हरहुन्नर जाणणारा.
सप्त
वि. सात ही संख्या. [सं.] ॰ऋषि-पुअव. १ प्रत्येक मन्वंतरांतील सात ब्रह्मर्षि. यांच्या नांवांबद्दल एकवाक्यता नाहीं. सध्याच्या मन्वतरांतील सप्तर्षि-कश्यप, अत्रि, भरद्वाज, विश्वा- मित्र, गौतम, जमदग्नि व वसिष्ठ. अन्यत्र मरीचि, अत्रि, अंगि- रस, पुलस्ति-स्त्य, पुलह, ऋतु व वसिष्ठ अशीं नांवें आढळतात. सप्तर्षि अथवा ऋक्ष नक्षत्रांतील हे सात तारे आहेत. 'कश्य- पादि प्रासिद्ध । सप्तऋषी ।' -ज्ञा १०.९२. २ (सांकेतिक) सातारा शहर. 'पानगांवचा राजा सप्तऋषीस येत आहे' -रा ८.१८३. 'सप्तऋषि गिरिवरी माझी प्रतिष्ठा' -सप्र ५.१३. ॰क-न १ सातांचा समुदाय २ वि. सातवा ॰कंचुक-वि. (पंचमहा- भूतें अहेकार व महत्तत्त्व हीं) सात आवरणें, वेष्टणें असलेला. 'त्यामध्यें सप्तकंचुक पिंड ।' -दा १६.७.१५. 'सप्तकंचुक ब्रह्मांड ।' -दा १५.८.२९. ॰कर-पु. अग्नि. ॰करनेत्र-पु. शिव; अग्निनेत्र. ॰करणें-नअब. (ज्यो.) बव, बालव, कौलव, तैतिल, गर, वणिज व विष्टि. हीं सात करणें. ॰कुलाचल-पुअव. सात मोठे पर्वत. महेन्द्र, मलय, सह्य, शुक्तिमान्, गंधमादन, विंध्य, पारियात्र ॰कोण-पु सात कोण असणारी सरळ रेषांनीं मर्यादित आकृति. ॰क्या-वि. सात, सात दिवसांची अगर वर्षांची मर्यादा धरून तप करणारा. 'नव नाडी, बावन आड, तेथें एक सप्तक्या ब्राह्मण तप करीत आहे' -काहणी. विष्णूची. ॰खणी- पु. स्त्री. सात खणांचा महाल. 'तया मागें सप्तखणी । शोभे कनक बालार्कवर्णी ।' -कथा १.६.१५६. ॰गणी-गाणी-स्त्री. दुंडा- पैसा; ढबू पैसा. ॰गोदावरी तीर-न. गोदावरी ज्या प्रदेशांत सप्तधा होऊन समुद्रास मिळते तो प्रदेश. ॰ग्रही-स्त्री. सात ग्रहांची एका राशींत युति. ॰चिरंजीव-पुअव. अश्वत्थामा, बलि व्यास, हनुमान, बिभीषण, कृप व परशुराम हे सात पुरुष मरणा- तीत आहेत अशी समजूत आहे. ॰चैतन्य-न. मुख्य, शाश्वत अथवा ब्रह्मचैतन्य व इतर सहा मायिक चैतन्यें तीं -ईश, जीव, प्रमाण प्रमातृ, प्रमेय, फल. ॰जिह्व-पु अग्नि. ॰ति-वि. ७० ही संख्या. ॰दंती-वि. सात दांत असलेला (घोडा) (कुलक्षणी). ॰दश-वि. १७ ही संख्या. ॰द्वीप-पुअव. पृथ्वीचे सात मोठाले विभाग. जंबु, कुश, प्लक्ष, शाल्मली, क्रौंच, शाक व पुष्कर. 'नव खंडें सप्तद्वीपें । छपन्न देशींच्या रायांचीं स्वरूपें ।' -ह २८.६४. ॰द्वीपवती-द्वीपा-स्त्री. पृथ्वी. 'आले सप्त ही सागर । सहित सप्तद्वीपवती ।' -भूपळी विष्णूची. ॰धा-क्रिवि. सात प्रकारचा, सात ठिकाणीं, सात प्रकारांनीं. ॰धातु-पुअव. शरीरांतील सात रस, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा व शुक्र. अन्यत्र-वसा, रुधिर, मांस, भेद, मज्जा, अस्थि व स्नायु. अन्यत्र-अस्थि, नाडी, मज्जा, मांस, त्वचा, रक्त व नख आणि केश मिळून. 'मग सप्त धातूंच्या सागरीं । तहानेला घोंट भरी ।' -ज्ञा ६.२३५. या सप्तधातूंचे मल अथवा उपधातु. रस-कफ;रक्त-पित; मांस-नाक, कान, डोळे यांचा स्त्राव; मेद-घाम; अस्थि-केश व नखें; मज्जा- स्निग्धता; शुक्र-ओज. २ सोनें, रुपें, तांबें, कथिल, नाग, तीक्ष व कासें. अन्यत्र-सोनें, रुपें, ताबें, शिसें, जस्त, पितळ, लोखंड. ॰धान्यें-नअव. सातू, गहूं, साळ, तीळ, राळे, सावे, हरभरे ॰नद-पुअव. शोण, सिंधु, हिरण्यवाह, कोक, घर्घर, लोहित व शतद्रु. यांपैकीं दोहोंबद्दल ब्रह्मपुत्र व शिवनद धरतात. ॰पदार्थ- पुअव. न्यायशास्त्रांतील सात पदार्थ-द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय व अभाव. ॰पदी-पदीक्रमण-स्त्रीन. विवाह- विधीमध्यें लाजाहोमानंतर वधूवरांनीं समागमें सात पावलें जाण्याचा विधि. 'विवाह होम झाला संपूर्ण । सप्तपदी पाणीग्रहण ।' -एरुस्व १६.२६. ॰पर्ण-पु. एक वृक्ष. -न एक खाद्य-द्राक्षें, डाळिंब, खजूर यांचा रस व साखर, मध व तूप व इतर मसाला घालून केलेलें. -वि. सात पानांचें (झाड). ॰पर्वत-पुअव सप्त कुलाचल, पहा. ॰पाताल-न. अव. अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल, व पाताल. 'अतळ वितळ, सुतळ महातल आणि तळातळ । रसातळ आणि पाताळ । सातवें तें ।' -कथा ६.४.७९. ॰सप्तपाताळी घालणें-पडणें-जाणें- पुन्हां केव्हांही डोकें वर काढतां येऊं नये अशी अवस्था होणें. ॰पुर्या-स्त्रीअव. अयोध्या, मथुरा, माया (हरिद्वार), काशी, कांची, अवंतिका (उज्जयिनी), व द्वारावती -एभा १८. १५०. 'सप्तपुर्या तीर्थें अगाघें । जेथें वसती ब्रह्मवृंदें ।' -ह. ३३.१०१. ॰पुंजा-स्त्रीअव. विवाहविधीमध्यें सप्तपदीसाठीं घात- लेल्या तांदुळाच्या सात राशी. 'सप्तपुंजा भोंवती बाळें ।' -वसा ५१. ॰प्रकृति-धाप्रकृति-विधा प्रकृति-स्त्रीअव. प्रकृति पहा. १ सात स्वभावधर्म. २ राज्याचे मुख्य सात आधार-राजा, मंत्रि, नगर, भूमि, कोश, सेना, मित्र. ॰भूमिका-स्त्रीअव. १ ज्ञानी जीवाच्या सात भूमिका-शुभेच्छा, विचारणा, तनुमानसा, सत्त्वापति, असंसक्ति, पदार्थाभाविनी व सूर्यावगाहिनी. २ भक्ति, ज्ञान, वैराग्य व सलोकता, समीपता, सरुपता व सायुज्यता. 'सप्त- भूमिका परब्रह्मीं' -सप्र ७.४२. ॰भूषणें-नअव. पुरुषाचीं सात भूषणें. 'पुरुषांलागीं सप्त भूषणें । तिन्हीं वस्त्रें कनकवर्णें । द्वाद- शांगीं अलंकार लेणें । स्त्रियांस देणें तैसेंचि ।' -ह ३४.६२. ॰म- वि. सातवा. ॰मातृका-स्त्रीअव. ब्रह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्राणी व चांमुडा. ॰मी-वि. १ पंधरा तिथीं- पैकीं सातवी तिथि. २ सातवी विभक्ति. ॰मृत्तिका-स्त्रीअव. गज, अश्व, रथ, चतुष्पथ, गोष्ठ, वल्मीक व हाट अथवा संगम या सात ठिकाणची विधीकरितां लागणारी माती. ॰रंग-पुअव. तांबडा, नारिंगी, पिंवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा हे सूर्यकिरणाच्या पृथक्करणानें किंवा इन्द्रधनुष्यांत दिसणारे रंग. ॰रात्र-न. सात रात्रींचा काल. ॰राशिक-न. त्रैराशिकाप्रमाणें सात राशीचें गणित. सप्तर्षि-पुअव. सप्तऋषि पहा. ॰वारा-पु (नाविक) सप्तऋषींकडून वाहणारा वारा. ॰लोक-पुअव. भूलोक (पृथ्वी); भुवर्लोक (पृथ्वी व सूर्य यांमधील), स्वर्लोक (सूर्य व ध्रुव यांमधील इंद्रादि देवतांचा), महर्लोक (सूर्य व नक्षत्रांचा), तपोलोक (तपस्वी लोकांचा), जनलोक(ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रांचा) व सत्यलोक (ब्रह्मदेवाचा). ॰विध लक्षण-व्यसनें-नअव जारण, मारण, विध्वंसन, स्तंभन, मोहन, वशीकरण व उच्चाटण 'जारण मारण विध्वंसन । स्तंभन मोहन, वशीकरण । उच्चाटण हें सप्तलक्षण ।' -विपू १.५३. 'सप्तवेसनीं जयाचें मन । तो एक मूर्ख ।' -दा २.१.१६ ॰शती-स्त्री. १ मार्कंडेय पुरा- णांतील सातशें श्लोकांची देवीची स्तुति; चंडीपाठ. २ सातशें श्लोकांचा ग्रंथ; भगवद्निता. 'कीं गीता हे सप्तशती । मंत्रप्रति- पाद्य भगवती ।' -ज्ञा १८.१६६६. ३ हालाची गाथासप्तशती. ॰शैल, सप्ताद्रि-पुअव. सप्तकुलाचल पहा. ॰समुद्र-सागर- पुअव. क्षार, इक्षुरस, सुरा, घृत, क्षीर, दधि व शुद्धोदक समुद्र. 'इयेवरी सप्तसागर । मध्यें मेरू महा थोर ।' -दा ४.१०.१४. ॰सूर-पुअव. षड्ज, ऋषभ, गांधार, मध्यम, पंचम, धैवत व निषाद हे संगीतांतील सात सूर. ॰स्कंध-पुअव. वायुमंडलाचे सात भाग. आवह अथवा अवाह (भूमिपासून मेघमंडलापर्यंत), प्रबह अथवा प्रवाह (मेघमंडलापासून सूर्यमंडलापर्यंत), उद्वह (तिसर्या मंडलांतील), सह (चंद्रमंडलापासून नक्षत्रमंडला- पर्यंत), विवह अथवा वैवह (नक्षत्रमंडलापर्यंत), षठापरा (शनिमंडलापासून सप्तर्षिपर्यंत), परिवाह (सप्तर्षिपासून ध्रुवार्पंयत). ॰स्वर-पुअव. सप्तसूर पहा. ॰स्वर्ग-पुअव सप्त- लोक पहा. ॰हरीतकी-स्त्री अव. हरड्याच्या सात जाती. विजया, रोहिणी, पूतना, अमृता, चेतकी, अभया व जीवंती; अन्यत्र-अभया, चेतकी, पथ्या, पूतना, हरीतकी, जया व हैमा- वती. ॰क्षार-पुअव. (सात औषधी क्षार)तिल, अपामार्ग, करंज, पलाश, अर्क, यव, चिंचा. यांबद्दल पाठमेदहि आढळतात, अष्टक्षार पहा. ॰सप्ताद्रि-पुअव. सप्तकुलाचल पहा. सप्ता- वस्था-स्त्रीअव. अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्षज्ञान, अपरोक्ष ज्ञान, शोकभंग व निरंकुशा तृप्ति. सप्ताश्व-पु. ज्याचे रथास सात घोडे आहेत असा; सूर्य. सप्तास्त्र-पु. सप्तकोन -वि. सप्तकोनी. सप्ताह-पु. १ सात दिवसांचा काल; आठवडा. २ सप्ताह पारायण-न. सात दिवसांत एखाद्या ग्रंथाचें वाचन. सप्तोपचार-पुअव. वैद्यक शास्त्रांतील सात निरनिराळे उप- चाराचे प्रकार. पाचन, रेचन, क्केदन (स्वेदन), शमन, मोहन, स्तभ्भन, वर्द्धन.
गैर
अ. निराळेपणा, भिन्नपणा दाखविणारा परंतु सामा- न्यतः अभाव किंवा अन्यथाभावदर्शक अरबी अव्ययशब्द किंवा प्रत्यय. याचा मनसोक्त (विशेषतः हिंदुस्थानी शब्दांबरोबर) उपयोग करितात. या शब्दाचें पुढील कांहीं अर्थ होतात- १ इतर; अन्य. 'गैर पथकें येऊन मोर्चेबंदी केली आहे.' -रा १२.१२५. २ अयोग्य; अन्यायाचा. 'हें तुम्हीं गैर केलें' -मदरु १.१०६. ३ (नामाच्या किंवा विशेषणाच्या प्रारंभीं जोडल्यास) अवास्त- विक, उलट; विपरीत. ४ विना; वांचून. 'गैर अन्याय मला गांजतो.' 'गैर अपराध दंड घेऊं नये.' [अर. घैर = निराळा, व्यतिरिक्त] (वाप्र.) ॰अदबी-स्त्री. असभ्यता; अपमान; अनादर. 'गैर अदबी बोलला सबब पातशाहा यास राग येऊन डोळे काढिले.' -मदरु २.७०. ॰अदा-वि. रद्द; न पटलेलें. 'शिंदे कडील वरात आली तर मग गैरअदाही व्हावयाची नाहीं.' -ख १०. ५२.७९. ॰अब्रू स्त्री. अप्रतिष्ठा. 'गैर-अब्रू फारशी न करणें.' -वाडबाबा २.७५. ॰अमली-वि. परस्वाधीन; दुसर्याचें. 'चार लक्षाचे भरतीस अमली महालांपैकीं बेरीज कमी आल्यास गैर- अमली महाल आहेत त्यांपैकीं भरतीस कमाल आकाराचे बेर- जेचा महाल लावून देणें.' -रा १०.३२१. ॰आबादी-वि. ओसाड; उजाड; बेचिराख. ॰आरामी-स्त्री. अवस्थता. 'हज्र- तांचे शरिरास दोन दिवस गैरआरामी] आहे.' -दिमरा २.३२. ॰इतबार-पु अविश्वास. 'तमाम फौजेस गैरइतबार जाहला.' -भाब ८०. ॰इमान-न. इमान नसणें; द्रोह; अनिष्ठा. 'आमचें गैरइमान असतें तरी आम्हीं आजपर्यंत येथें तुम्हापाशीं न ठरतों.' -भाब १११. ॰कबजी-वि. परस्वाधीन; गैरअमली पहा. 'सरं- जाम गैरकबजी, कांहीं सुटला त्यांत वस्ती नाहीं.' -ख २.९४२. ॰कायदा-वि. बेकायदेशीर; असनदशीरे. (इं.) इल्लीगल. ॰कायदा मंडळी-स्त्री. (कायदा) गुन्ह्याचें कृत्य करण्याच्या इराद्यानें पांच किंवा पांचाहून अधिक एकत्र जमलेले इसम. (इं.) अन्लॉफुल असेंब्ली. ॰किफायत-स्त्री. तोटा; नुकसान. 'किफायत, गैरकिफायत समयासमयास चित्तांत आणून किफा- यतीचीं कामें करीत आलां, पुढें त्याचप्रमाणें करावीं' -रा १. ३४६. ॰कौली-वि. परवाना किंवा अभयपत्र न दिलेलें; बिगर परवाना. -मराआ. ॰खर्च-पु. १ जादा, किरकोळ खर्चं. २ गैर- वाजवी, अयोग्य खर्च. ॰खुशी-षी-वि. नाकबूल; नाखूष; रुष्ट. 'खुषी किंवा गैरखुषी असा हा कौल बायकांशी ।' -पला १०४. ॰चलन-नी-वि. १ चालू नसलेलें (नाणें). २ (ल.) अव्यव- स्थित; बेशिस्त; अशिष्ट (वर्तन). ॰चलन-स्त्री. १ चलनाचा अभाव; चलन नसणें. २ (क्व.) गैर वर्तन; बदचाल. ॰चाकर- वि. बडतर्फ; माजूल. 'जखमी जाहले त्यांस गैरचाकर करून जागिरा तगीर करविल्या.' -जोरा ७५. ॰जप्त-वि. गैरअ- मल; गैरकबजी; परस्वाधीन. 'गैरजप्त देश साधावें.' -चित्रगुप्त ११०. ॰जबाब-पु. उद्धटपणाचें, अनादराचें उत्तर. ॰दस्त- स्ती-वि. सरकारसार्याची सूट असलेली (जमीन). ॰नफा- फायदा-पु. तोटा; नुकसान. 'येणेंकडून तुमचा गैरनफा जाहला.' -जोरा १४. 'अत्यंत वोढ केल्यास पाटीलबावांचा गैर फायदा आहे.' -जोरा ४७. ॰प्रकारचा-वि. १ इतर; भिन्न; दुसरा. २ चमत्कारिक; हास्यापद; तर्हेवाईक; विलक्षण. ॰बर्दार-वि. बहार नसलेला; फळहीन. 'पोकळी गैर-बर्दार, शेंडे वाळलेल्या आहेत.' -रा ११.७९. ॰मजुरा-क्रिवि. (हिशेब) मजुरा (वजा) टाकल्याशिवाय; वजावाट न करितां. [गैर + मजुरा-मुजरा] ॰मंजूर-वि. नामंजूर; रद्द. 'अप्टणांनीं जापले जागा वाजवी असतां गैरमंजूर करून एकपक्षी तह केला.' -रा १२.१२२. ॰मर्जी-स्त्री. अवकृपा; रुष्टता; इतराजी; नाराजी. ॰मसलत- मनसुबा-स्त्रीपु. मूर्खपणाचा, वेडगळपणाचा बेत, कट, योजना. ॰महसर्दार-वि. अप्रतिष्ठित. -रा ८.४३. [अर. मआसिर = थोरवी] ॰महसूल-पु. जुलमी करांपासून किंवा अन्याय्य मार्गानें काढलेला वसूल; योग्य सरकारसार्याविरहीत वसूल. 'विजा- पुराहून एक हवालदार गैरमहसूल पैदागिरी कबुल करून आला.' -इऐ ५.१००. ॰माकूल-मूर्ख; अडाणी; गैर; वाईट. 'कार्बारास खलेल करणें हें गैरमाकूल गोस्टी आहे.' -रा १८.३३. -क्रिवि. मूर्खपणें. 'लोक गैरमाकूल आम्हांस न कळत वर्तले तरी त्याची बद्लामी आपणावरी न ठेववी.' -रा ८.१०. ॰मान्य-वि. अमान्य; असमंत. ॰मार्ग-पु. गैरशिस्त आचार, रीत; दुराचरण. ॰माहीत-वि. १ अपरिचित; अनोळखी. २ अजाण; नेणता. 'साठे आहेत ते गैरमाहीत.' -ख ७.३५५१. ॰माहीतगार- वि. अज्ञानी; अडाणी. ॰मिराशी-वि. वंशपरंपरा मालकी नस- लेला. 'मातकदीम मिरासी खरी जाहली. काणव मजकूर गैर- मिरासी मुतालीक ऐसे जाहले.' -इऐ ५.१०२. ॰मेहनत- स्त्री. निरुद्योग. 'परंतु मेहनत, गैर-मेहनत सर्व एक ईश्वरी क्षोभानें वायां गेल्या.' -ऐ ५. ॰मेहेरबानी-स्त्री. अवकृपा; इतराजी. 'सांगितल्यावरून मनांत गैर मेहेरबानी न धरावी.' -रा ८. १०. ॰मोसम-हंगाम-पु. अवेळ. 'गैर मोसमांत (पौष वद्य १२ स) आंबे आले यावरून कौतुक वाटलें.' -रा २२.५. ॰रजावंद-वि. नाराज; नाकबूल. 'तो क्रियेस गैररजावंद जाहला.' -वाडशाछ १३२. [फा.] ॰रहा-रीत-स्त्री. बद- चाल; अयोग्य रीत; वाईट आचरण. -वि. बदचालीचा-सलु- काचा. 'भुजंगराव याची वर्तणूक गैररहा दिसते.' -ख ११. ५७७६. ॰राजी-वि. असंतुष्ट; नाराज. 'पाटसकर गैर-राजी जाले.' -रा ६.२६. ॰राबता-वि. १ बंदी; मनाई; खंड (मार्ग, मिळणें, येणें-जाणें, वहिवाट, चाल यांमध्यें). 'नाना फडणीस लष्करांतून आल्यापासून गैरराबता बहुत करूं लागले. कोणाचीच गांठ पडत नाहीं.' -ख ८.४१५१. २ वहिवाट, चाल यामध्यें अनभ्यास; अपरिचय; अवापर; वळण नसणें. ॰रास्त-वि. गैर- वाजवी; असत्य; खोटा. ॰रुजू-वि. १ गैरहजर. २ मंजूर किंवा दाखल किंवा मान्य न केलेले (हिशेब). ॰लायक वि. अयोग्य; नालायक; अनुचित. ॰वळण-न १ गैरराबता. 'त्या मार्गास सध्यां गैरवळण जाहे.' २ एकीकडे असणें; आडवळण; दळण- वळण नसणें. 'हा गांव गैरवळणांत पडला.' ३ गबाळ, वाईट लिखाण. ४ सरावांत नसणें; सवंय नसणें; निरुपयोग. ॰वाका- पु. खोटी किंवा बनावट गोष्ट; गैरसमजूत; लबाडी. 'ऐसा गैर- वाका सांगितला.' -रा ८.५२. -वि. वेडावांकडा -शर [फा. घैर्-वाकिअ] ॰वाजवी-वाजिवी-वि अयोग्य; अनुचित; फाजील; अन्याय्य. 'त्याचा अभिमान गैर-वाजवी याणीं नच- धरावा.' -रा १२.७९. [फा. घैर् + वाजिवी] ॰वाजवी दाब- पु. (कायदा) अयोग्य वजन. (इं.) अनड्यू इन्फ्लुअन्स. ॰वास्तविक-वि. खोटा; असत्य; वस्तुस्थितीस सोडून. ॰विलग-क्रिवि. आडबाजूस; आडवळणी. -वि. (विलगसाठीं चुकीनें योजलेला) न मिळणारा; न जुळणारा. ॰विल्हईस- विल्हेस-विल्हे- क्रिवि. आपल्या (योग्य) ठिकाणाच्या विरुद्ध जागी; भलतीकडे. ॰विल्हेस लागणें-पडणें-१ दुसरीकडे किंवा चुकीच्या ठिकाणी लागण; क्रमवार नसणें. २ योग्य ठिकाणाहून गहाळणें; गमावणें. ३ गोंधळ होणें, अव्यवस्थित असणें, ॰शर्ती- स्त्री. माफीजमीन म्हणून ठरविल्यानंतर जिला इतर दुसर्या कोणत्याही अटी पाळावयाच्या नसतात अशी जमीन. ॰शिस्त- वि. बेशिस्त; अव्यवस्थित; विना रीतभात; नियमबाह्य; असभ्य; फाजील (माणूस, वर्तन, भाषण). -स्त्री. बेशिस्तपणा; अव्यवस्थितपणा; अयोग्यपणा. अनियमितपणा. ॰शेरा- शरा-वि. धर्मशास्त्रविरहीत. 'काजीपासून गैरशेरा अमल होऊन आला.' -वाडसनदा १५- [अर.घैर् + शरअ = धर्मशास्त्र] ॰संधी- स्त्री. अवेळ; गैरमोसम; अवकाळ. ॰सनदी-वि. १ बेसनदशीर; बेकायदेशीर; सनदेनें अधिकृत नसलेलें. २ जादा मंजुरीशिवाय. 'गैर-सनदी खर्च करावयाची सरकारची आज्ञा नाहीं.' -ख ५. २३५३. ॰समजाविशी-स्त्री. (कायदा) गैरसमजूत; (इं.) मिस्रिप्रेझेंटेंशन. ॰समजूत-स्त्री. उलट, चुकीची समजूत; चूक. ॰सल्ला-सलाह-गैरमसलत पहा. 'हे कंपणी इंग्रजबहादूर यांचे सलाहानें अगर गैर सलाहानें ...' -रा २२.१२५. ॰साल-वि. अनिश्चित वेळेचा; वर्ष नमूद नसलेला. 'गुणनवरे यांनी कागद एक काढिला, तो बहुतां दिवसांचा, गैर-साल ।' -रा ६.८९. ॰सावध-वि. १ बेसावध; गाफील. २ बेशुद्ध; मूर्छित. ॰साळ- वि. १ खोटसाळ; सरकारी टांकसाळींतून न पाडलेलें. इतर ठिकाणाचें म्हणजे हिणकस, कमी किंमतीचें (नाणें). 'गैरसाळ तामगिरी । कोणी नवी मुद्रा करी ।' -दा १०.८.१४. (त्यावरून) खोटा; बनावट; लबाडीचा. २ (ल.) बेशिस्त; अनभ्यासी; गांवढळ; अडाणी; (माणूस); अयोग्य; अनुचित (वर्तन). ३ अशिष्ट; अडाणी; हलका; राकट; बेडौल; गावठी इ॰ ॰सोई-य-स्त्री. अडचण; त्रास; हाल; अप्रशस्तता. ॰सोईचा-वि. अडचणीचा; सोईचा, सुखकर नसलेला. ॰हंगाम-पु. गैरमोसम पहा. 'त्यास गैरहंगाम, हल्ली खरबुजीं तयार मिळालीं ते आठ सेवसी पाठ- विलि असेत.' -रा ३.३१२. ॰ह(हा)जीर-वि. मोजदादीच्या वेळीं समक्ष नसलेला; अविद्यमान; अनुपस्थित. [फा.] ॰हिसा (शे)बी-स्त्री. अन्याय; अव्यस्थितपणा. -क्रिवि. अन्यायानें. 'आपले जागिरींत नाहक गैरहिसाबी पादशाह खलल करवि- ताती ।' -इमं ६७. ॰हुकुमा-वि. अनधिकृत; संमति, आज्ञा नसलेले; नामंजूर. ॰हुर्मत-स्त्री. अप्रतिष्ठा; बेअब्रू.
तळ
पु. १ (एखाद्या पदार्थाचा) खालचा भाग, बूड. २ जमीन; जमीनीचा पृष्ठभाग. 'दोन्हीं दळभारां देषतां । तो प्रद्मने (प्रद्युम्नें) आणीला तळा ।' -उषा १४१५. ३ (झाड, छपर इ॰ कांच्या) खालील जागा, जमीन. 'लपे आत्मभ्रांतिछाया । आप- णयां तळीं ।' -ज्ञा १६.१०. ४ सैन्य; स्वारी इ॰ कांची मुक्कामाची जागा छावणीची गोठ; शिबिर; कँप. (क्रि॰ घालणें, देणें; मांडणें; धरणें; पडणें; येणें; सोडणें). 'महाराणीसाहेबांचा तळ बडोदें मुक्कामीं ज्या राजवाड्यांत मुक्काम असेल तेथील पाहरे'-बडोदें, राज- महाल, कामगारी-कारकून नियम ७. ५ पृष्ठभाग; सपाट भाग. जसें- हाताचा पायाचा, तळ. 'ऐसे चारी हे सरळ । करचरणतळ ।' -ज्ञा १४.१०३. 'पृथ्वीतळ उलथों पहात ।' -ज्ञा १.१५६. ६ व्यापारी, प्रवासी, लमाण, गाड्या, घोडीं इ॰ कांच्या मुक्कामाची जागा, अड्डा. ७ एखाद्या ठिकाणीं कांहीं काळ झालेलें सैन्याचें वास्तव्य; मुक्काम; छावणी; कँप. ८ एखाद्या पदार्थाच्या राशीनें व्यापलेली जागा; पदार्थ ज्या ठिकाणीं असेल ती जागा. (पदार्थ हलवितांना, तेथून दुसरीकडे नेतांना सापेक्षतेनें या शब्दाचा उपयोग करतात). 'आंबे सगळेच नेऊं नकोस, कांहीं तळावर ठेव., ९ विस्तृत व सपाट भूभाग; मैदान; सपाट प्रदेश. 'या तळाची प्रदक्षिणा चार कोसांची आहे.' बूट, जोडा इ॰ कांचा खालचा (ज्यावर पाय टेकतात तो) भाग; तळवा; जोड्याच्या तळव्यांतील चामड्याचा तुकडा. ११ (-न.) कुंभाराच्या चाकाच्या मध्याची फळी. १२ नाश; रसातळ. 'मानी मेलाचि जरी दुर्जय तरि निजशतात्मजरिपु तळा ।' -मोस्त्री २. २२. १३ (वणजारी) तांडा. [सं. तल; फ्रें. जि. तलै = खालीं, आंत] (वाप्र.) ॰करणें-मुक्काम करून राहणें; डेरा देणें; बिर्हाड लावणें. ॰घालून बसणें-१ (एखाद्या ठिकाणीं) कायम वस्तीच्या इरा- द्यानें राहणें, उतरणें; आसन, ठाण मांडणें. २ दुसर्याचा पैसा गिळं- कृत करून, लुबाडून बेदरकारपणें स्वस्थ आणि निर्धास्त राहणें. तळ मारणें. तळची-तळपायाची आग मस्तकास जाणें- (कर्त्याची षष्ठी) रागानें नखशिखांत संतप्त होणें; अतिशय राग येणें. तळचें मडकें हाणणें-फोडणें-(मडक्याच्या उतरंडीं- तील सर्वांत खालचें मडकें फोडणें) (ल.) मुळावरच घाव घालणें; समूळ नाश करणें. ॰झाडणें-(ल.) (सर्व सामग्री, बेगमी इ॰) खाऊन फस्त करणें. ॰थांबणें-(एखाद्याचें) आसन स्थिरावणें; जन्माची सोय लागणें; थार्यास, ठिकाणीं लागणें (कर्त्याची षष्ठी). ॰न थांबणें-(कर्त्याची षष्ठी) एखाद्याच्या पायाला भोवरा पडणें; बूड स्थिर नसणें; भटकभोंवरी करणें. ॰मारणें-तळ घालून बसणें; अर्थ २ पहा. ॰लागणें-पडणें-(कर्माची षष्ठी). (सामग्री, बेगमी इ॰) जवळ जवळ फस्त होणें, संपण्याच्या बेतांत येणें. तळावर बसणें-राहणें-१ विपन्नावस्थेस येणें; अवदशेस येणें; अकिंचन होणें. २ (ल.) घरीं बसणें; समाई- कीच्या वांटणींतील भागास मुकणें (चोर, लुटारू त्यांच्यापैकीं घरीं बसणार्यास लुटीचा कांहींही भाग दत नसत त्यावरून.) ३ धंद्याच्या ठिकाणीं, नेहमीच्या जागीं असणें. (एखाद्यास) तळावर बसविणें-एखाद्यास समाईक वांटणींतील भाग देणें; त्याच्या कपाळीं वाटाण्याच्या अक्षता लावणें. सामाशब्द- ॰काठी- स्त्री. शिडाचें कापड तळाशीं लांब ताणण्याकरितां वापरलेली काठी. ॰कोंकणन- सह्याद्री आणि समुद्र यांमधील देश; कोंकण- पट्टीचा दक्षिण भाग; गोवें मुलुख व त्याजवळचा प्रदेश. ॰खंड-न. (कों.) १ जात्याची खालची तळी; (सामा.) जात्याच्या दोन तळ्यांपैकीं कोणतीहि एक याअर्थी खालचें वरचें तळखंड असाहि शब्द प्रयोग करतात. २ खालचा भाग; तळ; उदा॰ भिंतीचें तळ- खंड. ३ फणसाच्या चारखंडास आंतून चारीसारखा अंश (पाती) असतो व वर कांटे असतात त्यांच्यामध्य जो दळदार भाग असतो तो. ॰खडा-पु. खांब ज्यावर बसवितात तो दगड; उथळ्याचा दगड. ॰खप-पु. (माल, व्यापारी जिन्नस इ॰ कांचा) स्थानिक, तळावर होणारा, गावांतल्या गांवांत होणारा खप. 'या मालाचा तळखप कमी.' -मुंव्या ४९. ॰घर-न. १ घराच्या तळमज- ल्याच्या खालीं (जमीनीच्या पोटांत) मनुष्य इ॰ कांस राह- ण्यासारखें केलेलें स्थळ; खोली; दालन; भुईघर. २ (कु.) माडी असलेल्या घराचा तळमजला. -शास्त्रीको. ॰घाट-पु. १ पर्वताचा पायथा. पर्वताच्या पायथ्यालगतचा प्रदेश; घाटबुडी पहा. सह्याद्री- खालचा प्रदेश. [तळ + घाट] ॰चेपणी-स्त्री. १ धान्याचा कणगा इ॰ कांचें तळ धान्य इ॰ कानीं भरून, चेपून सारखें करण्याचा व्यापार. २ एखादें मोठें भांडें, कणगा इ॰ कांचें बूड व्यापेल इतकें पदार्थ धान्य इ॰ कांचें परिमाण. 'घागरभर रसानें या काहिलीची तळचेपणी मात्र होईल.' [तळ + चेपणी] ॰जमीनस्त्री. भात- जमीन. -शे ३.४. [तळ + जमीन] ॰झाडा-पु. १ (घर, खोली इ॰) पूर्णपणें रिकामें करणें. २ खालपासून वरपर्यंत, कोना- कोपर्यांतून केलेली, घेतलेली (घर इ॰ कांची) झडती; झाडा; तपासणी. ३ (खाद्य पदार्थ, धान्याची बेगमी इ॰). खाऊन फस्त; चट्ट, निःशेष करणें; (सामा.) (एखाद्या पदार्थाचा, बेगमीचा खाऊन केलेला) चट्टामट्टा; निःशेषता; फन्ना; फडशा. ४ (स्वयं- पाक, यज्ञ, इमारत इ॰ करितां) जमीन झाडून, सारवून, साफसूफ करण्याची क्रिया. ५ (सैन्य इ॰ काचा) मुक्काम उठल्यानंतर ज्या ठिकाणीं तळ असेल तेथें कांहीं जिन्नस वगैरे राहिला आहे कीं काय हें पाहण्याकरितां केलेला शोध; तपासणी; तळशोधणी. ॰तूट-स्त्री. व्यापारी जिन्नसांची स्थानिक तूट; तुटवडा. 'तोच माल खरेदी करून पाठवा असें लिहिल्यास त्या निशाणीचा माल बाजारांत तळतूट असल्यास कमी किंमतीचा माल असला तरी ज्यास्त किंमत देऊन घ्यावा लागतो. -मुंव्या ५३. ॰पाय-पु. पावलाचा खालचा भाग; पायाचा तळवा. ॰पायाची आग मस्तकास जाणें- तळची आग मस्तकास जाणें पहा. ॰पूस-स्त्री. १ खाद्यपदार्थ खाऊन सप्पा, फस्त, निःशेष करणें; (सामा.) (खाद्यपदार्थांचा खाऊन पाडलेला) फडशा; फन्ना; चट्टामट्टा. तळझाडा अर्थ ३ पहा. २ नायनाट. [तळ + पुसणें] ॰बूड-१ वृक्ष इ॰ कांचा बुंधा; तळ; खालचा भाग. 'तंव तंव होती थोराडें । अकर्माचीं तळबुडें । आणि जन्मशाखा पुढेंपुढें । घेती धांव ।' -ज्ञा १५.१६८. २ खळ्यां- तील, धान्याच्या पेंवांतील (धान्य इ॰ नें युक्त) गाळसाळ; गदळ; झाडणी. हा महारांचा हक्क असतो. ॰वट-पुन. १ माळ जमीनीचा प्रदेश; मैदान. २ डोंगराच्या पायथ्यालगतचा सपाट भूप्रदेश. ३ खालचा भाग; अधोभाग. 'ना तरी कढेयातळवटीं । जैसा आपुलाचि बोलु किरीट । पडिसादु होऊनि उठी । निमित्त- योगें ।' -ज्ञा ४.७५. (इमारत इ॰ कांचा) पायाचा भाग; पाया. 'पाया शोधूनि धरातळीं । तळवट बांधिला रत्नप्रवाळीं ।' -मुसभा २.२३. ॰वटीं-शअ. खालीं; खालच्या भागांत. 'आकाशचि वर्षे नीर । तें तळवटीं बांधे नाडर ।' -ज्ञा १८.३२२. 'कुंकुमातळवटीं टिक लागे ।' ॰वणी-न. (क्व.) जमीनीवरील (नदी, नाले, ओढे, तळीं इ॰ काचें) पाणी. 'वळवणी आलें तळवणी घेऊन गेलें.' [तळ + पाणी] ॰वाट-स्त्री. भुयाराची वाट; चोरवाट. ॰शोधणी- स्त्री. सैन्य इ॰ कांचा तळ उठल्यानंतर त्या ठिकाणीं कांहीं राहिलें कीं काय तें पुरतेपणीं पाहण्याची क्रिया; तळझाडा अर्थ ५ पहा. [तळ + शोधणें] ॰सरा-सरी-स्त्री खांबाचा तळखडा; उथळा. ॰सांड-क्रिवि. जमीनीपासून निराळें; तळापासून उचललेल्या स्थितींत (ओझें इ॰ असणें); जमीनसांड; भुईसांड. [तळ + सांडणें] तळहात, तळात-थ, तळाटा-ठा-पु. हाताचा तळवा. [तळ + हात] ॰हातचा, हातावरचा फोड-पु.(ल.) अत्यंत प्रिय व नाजूक वस्तु; अत्यंत प्रिय व जिव्हाळ्याची व्यक्ति (तळहातावर झालेल्या फोडास किंचित्हि धक्का लागूं नये म्हणून आपण फार जपतों या- वरून). तळहाताच्या फोडासारखें वागविणें-बाळगणें- मानणें-(एखाद्या वस्तूची, व्यक्तीची) अतिशय काळजी घेणें; जिवापाड जपणें. तळहाताचा मळ-पु. (ल.) अल्प श्रमानें होणारें कोणतेंहि काम; सहज लीलेनें करतां येण्याजोगी गोष्ट. 'चित्रें काढणें हें त्याला तळहाताच्या मळाप्रमाणें आहे.' या अर्थीं हाताचा मळ असाहि शब्दप्रयोग रूढ आहे.' तळहाताला केंस येणें-अशक्य गोष्ट शक्य कोटींत येणें (तळहाताला कधींच केंस येत नसतात त्यावरून हा अर्थ). तळहाताला केंस न येणें-अस- मर्थ नसणें; अंगांत धमक असणें. तळहातावर शीर घेणें- जिवाची तमा न बाळगणें; (एखाद्या कार्यासाठीं) मरणहि पत्करण्यास तयार होणें. तळाची आरी-स्त्री. (चांभारधंदा) जोड्याचा तळ शिवण्याची आरी. तळातळन. सप्त पातालापैकीं चौथें पाताल. तलातल पहा. 'इणें जे नर बुडविले । ते नेले तळातळा ।' -जै ६४.१९. [सं. तलातल]
लोक
पु. १ जन; मनुष्य; मानवजात; जनता; समाज. 'तूं मात्र शहाणा, लोक काय वेडे आहेत?' (सामा.) लोक- मर्यादा-रीति-लज्जा इ॰ (बहुधां अनेकवचनी प्रयोग). २ वर्ग; विशिष्ट समाज, संघ; जाता; (या अर्थीं पूर्वशब्दाशीं समास होऊन उपयोग.) उदा॰ ब्राह्मणलोक, शू्द्रलोक, गवईलोक, शिपाईलोक, देवलोक, पिशाचलोक इ॰ ३ राष्ट्र; देश; राज्य; प्रांत. 'प्रौढ होतां संपूर्ण लोक आले खरेच उदयाला ।' -ऐपो ३०४. -एभा १०. ६०४. ४ राजे, सरदार इ॰ कांजवळ किल्ला, शहर इ॰कांचें रक्षण करण्याकरतां ठेवलेलीं माणसें; सैन्य; संत्री; शिपाईनोकर. ५ भुवन; जग; मानवजात; समूह. 'देहक्रिया आवघी । न करविता होय बरवी । जैसा न चलतेनि रवी । लोकु चाले ।' -ज्ञा ८.१८७. ६ परका माणूस; तिऱ्हाईत इसम; अनोळखी मनुष्य. 'आज आपल्याकडे लोक आले आहेत.' ७ मनुष्य; इसम; माणूस. 'जो दाखवील मजला कृष्णार्जुन तो न लोक सामान्य ।' -मोकर्ण २६. १८. ८ जगाचे, विश्वाचे भाग. प्रामुख्यानें तीन लोक आहेत. स्वर्गलोक, मर्त्य किंवा मृत्युलोक, आणि पाताळलोक. पुढील सप्त- लोकहि मानण्यांत येतात. भूलोक, भुवर्लोक, स्वर्लोक, महर्लोक, जनलोक, तपोलोक, सत्यलोक. ह्यांशिवाय प्रत्येक देवतेचा एकेक लोक कल्पिलेला आहे. उदा॰ इंद्रलोक, चंद्रलोक, ब्रह्मलोक, विष्णु- लोक इ॰ 'जैं लोकांचीये व्यवस्था न पडे । जैं या त्रिभुवनाचें कांहीं न मांडे ।' -ज्ञा १०.९५. ९ सद्गति; स्वर्गलोक; मरणोत्तर चांगली अवस्था. 'मनुवंशीं जन्मुनियां जालों अनपत्य मीं न लोक मला ।' -मोमंत्ररामायण बालकांड २०. १० प्रदेश; ठिकाण. 'अवधड स्थळीं कठीण लोक । तेथें राहणें नेमक ।' -दा १५.२. २४. [सं.] म्ह॰ १ लोकां सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण = लोकांना उपदेश करावयाचा व स्वतः मात्र त्याप्रमाणें वागा- वयांचे नाहीं. २ लोक आणि ओक. = लोकमत हें अतिशय वाईट, तिरस्करणीय, ओकारीप्रमाणें त्याज्य असें जाहे, या अर्थी उपयोग. लोकांचीं घरें (किंवा दारें) पुजणें-सारखें लोकांच्या घरीं जाणें; या घरांतून त्या घरांत असें नेहमीं लोकाकडे जाणें. सामाशब्द- ॰कथा-स्त्री. १ दंतकथा; लोकांत प्रचलित अस- लेली परंतु ऐतिहासिक आधार नसलेली गोष्ट; कल्पित गोष्ट; परंपरागत गोष्ट. २ एक प्रकारचें वाङ्मय. प्राचीन काळापासून लोकांच्या तोंडीं असलेल्या गोष्टी, कहाण्या; लौकिक सारस्वत. (इं) फोकलोअर. ॰गंगा-स्त्री. समाज; लोकसमुदाय. 'जात- गंगेला व लोकगंगेला भ्यालें पाहिजे.' -भाऊ १९. ॰गान-न. ज्ञानपदगीत; खेडवळ लोकांचें गाणें. ॰ग्रह-पु. लोकमत; लोकांची एखाद्या गोष्टीविषयींची समजूत, कल्पना. ॰चर्चा-स्त्री. जनते- मधील चर्चा; गप्पा; लोकांत चर्चिली किंवा बोलली जाणारी गोष्ट. ॰जवाई-पु. (ना.) जांवई. -शर. ॰तंत्र-न. लोकमत; जनतेचा कल; प्रजेचें म्हणणें, प्रवृत्ति. 'सरकारनें लोकतंत्रानेंच राज्यकार- भार हांकावा.' -केसरी २.१२.३०. -वि. लोकनुवर्ती; लोकांना जबाबदार. 'सरकार हें अधिक लोकतंत्र झालें पाहिजें.' -केले १.६४. ॰त्रय-न. तीन लोक; स्वर्ग, मृत्यु व पाताळ. ॰धार- जिणा-वि. १ लोकमताला मानून वागणारा (परंतु स्वतःच्या किंवा धन्याच्या हिताबद्दल निष्काळजी); स्वतःच्यापेक्षां, स्वकी- यांच्यापेक्षां लोकांच्या हिताला जपणारा. २ लोकांची काळजी करणारा; लोकाभिमुख. ॰नाथ-पु. १ एक औषधी रसायन. २ राजा; देव. 'लोकनाथ, जगन्नाथा. प्राणनाथा पुरातना ।' -मारुतिस्तोत्र. ॰नायक-पु. लोकांचा पुढारी. 'लोकनायकाचें कर्तव्य फारच खडतर आहे.' -टि १.४६७. ॰नियुक्त-वि. लोकांनीं नेमलेला, निवडलेला. ॰नीति-स्त्री. लोकरीत; वागण्याची सामान्य पद्धत; समाजास मान्य गोष्ट; प्रघात; चालरीत. ॰नुत-वि. लोकांकडून प्रशंसा केला गेलेला; लोकांनीं स्तविलेला. ॰परी-स्त्री. लोकरीत. 'लोकपरीनें वर्तती जनीं ।' -दावि २६६. ॰पक्ष-पु. लोकांची बाजू; प्रजापक्ष. याच्याविरुद्ध राजपक्ष, सर- कारपक्ष. 'फेरोजशहांनीं आणीबाणीच्या प्रसंगीं लोकपक्ष संभा- ळला.' -टि १.४२२. ॰पाल-ळ-पु. १ राजा; प्रजेचा पालन कर्ता; नृप. 'म्हणवितां स्वतां लोकपाळा !' -विक ४०. २ इंद्र, यम इत्यादि लोकाचा स्वामी; अष्टदिक्पाल पहा. 'इहीं लोकपाळ केले । लोकपाळीं विविध, लोक स्त्रजिले ।' -ज्ञा १०.१०२; -एभा १०.६०३. ॰प्रवाद-पु. बातमी; लोक- वार्ता; वदंता; किंवदंती; जनप्रवाद (सामान्यत: वाईट अर्थानें). 'लोकप्रवाद कायकाय कंड्या पिकवील तें सांगतां येत नाहीं.' -नि ४३४. ॰प्रवाह-पु. सर्वसाधारण चालरीत, वागणूक; लोक- रीत. ॰प्रशस्त-वि. लोकसंमत; लोकमान्य; रुढीला धरुन. अस- लेला. ॰प्रसिद्ध-वि. १ सर्वप्रसिद्ध; लोकांमध्यें अतिशय माहित असलेला; लोकांमध्यें प्रचलित. २ सर्वसाधारण; सामान्य. ॰प्राणेश-पु. (लोकांच्या प्राणांचा भालक, धनि.) वायु; हवा. ॰बंधु-पु. १ लोकांचा भाऊ; लोकहितकर्ता. 'लोकबंधू जो होय रवी ऐसा ।' -नल. २ सूर्य. ॰बाह्य-वि. १ (लोकांच्या सामान्य वागणुकीहून किंवा समजुतीहून निराळा) विचित्र; विलक्षण; चम- त्कारिक. २ लोकांना प्रिय नसणारें; लोकविरुद्ध. ॰बोली-स्त्री. लोकांचें बोलणें; लौकिक बोली. 'गुणा निर्गुणा आणिलें लोक- बोलीं ।' -दावि २६६. ॰भय-भीति-नस्त्री. जनतेची भीति; लोकप्रवादाची भीति; जनलज्जा. ॰भांड-वि. भांडखोर; बडबड्या. -तुगा. ॰भाषा-स्त्री. १ सामान्य जनतेची भाषा, बोली. २ बोलण्यांतील भाषा; वाक्प्रचार. ३ अडाणी भाषाप्रयोग; असं- स्कृत बोली. ॰मत-न. सामान्य जनसमूहाचा अभिप्राय; लोकांचें म्हणणें; त्यांचे विचार. 'ज्या वसाहतींत लोकमतदर्शक कायदे- मंडळें आहेत त्यांस या कायद्यानें आपल्या शासनपद्धर्तीत फेर- फार करवून घेण्याचे अधिकार देतांना हा निर्बंध घालून ठेवला.' -वस्व १३६. ॰मतानुवर्ती-वि. लोकांच्या मताप्रमाणें असलेला; लोकतंत्राप्रमाणें चालणारा. [लोक + मत + अनुवर्ती] ॰मर्यादा-स्त्री. १ जनरूढी; पडलेली वहिवाट; प्रचार. २ जन- लज्जा. ३ जनाचा मान; लोकांविषयीं आदरभाव. (क्रि॰ राखणें; ठेवणें; पाळणें; धरणें; बावगणें). ॰माता-स्त्री. लक्ष्मी; लोकजननी. 'न सेविती हे जरी लोकमाता ।' -सारुह २. १८. ॰मांदी-स्त्री. लोकांचा समूह; गर्दी. 'त्वरें चालती धांवती लोक मांद्या । पुरी वोस ते रात्र जेथें अयोध्या ।' -मुरामायणें अयोध्या ४३. ॰मान्य-वि. १ लोकांना मान्य; प्रिय. २ लोकांचा पुढारी नेता. 'लोकमान्य हा शब्द उच्चारतांच मनांतून ही पदवी तुम्ही मान्यच करतां.' -केले १.२७६. बाळ गंगाधर टिळक यांना लाव- ण्यांत आलेली, येणारी पदवी. 'गोखल्यांची इंग्लंडांतील काम- गिरी' -(विश्ववृत्त एप्रिल १९०६) या लेखांत प्रथम वि. का. राज- वाडे यांनीं वापरली. ॰रंजन-न. १ लोकांची करमणूक. २ लोकांना संतोष, सुख होईल असें आचरण; लोकांना खूष ठेवणें. ॰रमण- वि. लोकांनां संतुष्ट करणारा. 'पूर्णब्रह्म स्वयें श्रीकृष्ण । बळी बळिराम लोकरमण ।' -एभा १.२.३. ॰राजक-राज्य- न. लोकमतानुवर्ती शासनसंस्था. (इं.) डेमॉक्रसी. 'लोकराजकाचे दोष त्यांना स्पष्ट दिसत होते.' -महाजनि (मनोरंजन-आगरकर अंक). ॰रीति-रीत-स्त्री. लोकांची वागण्याची पद्धत; जन- रीतिरिवाज; सामान्य वागणूक. ॰लचांड-न. लोकांच्या नाखु- षीनें होणारा त्रास; येणारी अपत्ति, लोकांच्या अवकृपेचें संकट. म्ह॰ सगळें लचांड पुरवेल पण लोकलचांड पुरवणार नाहीं. ॰लज्जा-लाजस्त्री. लोकमर्यादा पहा. १ लोकमताला मानणें; लोकांना जुमानणें. २ जनलज्जा; लोकभय; लोकांची वाटणारी शरम. ॰लोकपाळ-पुअव. १ देशाचे किंवा समाजाचे पुढारी लोक; प्रतिष्ठितवर्ग (व्यापकार्थी). २ राजा व त्याचे अधिकारी (लवाजम्यासह). ३ फौज; शिपाई. ॰वाद-वार्ता-स्त्री. पु. जनवार्ता; वदंता; कंडी; लोकप्रवाद पहा. 'लोकवार्तेला गति मिळाली कीं ती किती फोफावेल याचा नियम नाहीं.' -इंप ३७. ॰विद्या-स्त्री. समाजशास्त्र. -मसाप २.२१९. ॰व्यवहार- पु. लोकप्रवाह; सामान्य रीत; जनरीत; सर्वसाधारण वागणूक. ॰शाही-स्त्री. लोकांच्या सत्तेखालीं त्यांच्या संमतीनें चालणारी व त्यांच्याच हिताची अशी राज्यपद्धति. ॰शिरस्ता-पु. सामान्य परिपाठ; सामान्य रीत; लोकांची वागण्याची पद्धत; राहटी; रूढी. ॰संख्या-स्त्री. एका विशिष्ट स्थानी. राहणाऱ्या एकंदर सर्व लोकांची गणती. ॰संग्रह-पु. समाजव्यवस्थेचें रक्षण; लोकसंस्थेचें संरक्षण; अनेक अनुयायी मिळविणें; लोककल्याण; लोकदीक्षा; स्वतःला निराळ्या रीतीनें वागण्यास प्रत्यवाय नसतांहि लोकांनीं आचारभ्रष्ट होऊं नये म्हणून स्वतःच्या इच्छेविरुद्ध कांहीं आचा- रांचा स्वीकार करून लोकांची जूट राखणें. 'ज्ञानी पुरुषांनीं यथाधिकार धर्मसंस्थापनेसारखीं लोकसंग्रहाचीं कामें करावीं.' -टिसू ५. 'तया लोकसंग्रहालागीं । वर्ततां कर्मसंगीं । तो कर्मबंधु आंगीं । वाजेलनी ।' -ज्ञा ३.१७५. ॰सत्ताक-सत्तात्मक- वि. लोकांची सत्ता असलेलें; लोकमतानुवर्ती; राजा नसून लोकां- कडून राज्यकारभार चालणारी (शासनपद्धति). 'लोकसत्तात्मक राज्यपद्धतींत लोकच राजे असतात.' -गांगा २६. ॰संपादणी- स्त्री. लोकांचीं मनें अनुकूल करुन घेणें; लोकांची खुशामत; लोकांच्या मर्जीकरितां केलेली बतावणी. 'जैसि बहुरुपियांची रावो राणी । स्त्रीपुरुषभावो नाहीं मनीं । परी लोकसंपादणी । तैशीच करिती ।' -ज्ञा ३.१७६. ॰समजूत-स्त्री १ सर्वसाधारण लोकांचें मत; सामान्य समजूत. २ (एखाद्या मनुष्याविषयीचें किंवा पदार्था विषयींचें) लोकांचें यथायोग्य ज्ञान; समाधान; योग्य जाणीव. ३ केवळ लोकांचें समाधान (आपलें किंवा आपल्या बाजूचें समा- धान न मानतां फक्त लोकसमाधान) पहाणें ॰साहित्य-न. लोकांच्या जिव्हाग्रीं परंपरेनें वावरत असलेलें कथात्मक वा गीता- त्मक वाङ्मय. हें लिखित असेलच असें नाहीं. याचीं उदाहरणें- कहाण्या, सावित्रीचें गाणें; कावळाचिमणीच्या गोष्टी; ठकसेनाच्या गोष्टी. इ॰ ॰सिद्ध-वि. लोकांत रुढ असलेलें; लोकांत चालू अस- लेलें; प्रचलित; वहिवाटींत असलेलें. ॰स्थिति-स्त्री. एकंदर जन- तेची सामान्य स्थिति; लोकांची परिस्थिति. 'गाड्या घोड्यांतून हिंडणाऱ्या गृहस्थापेक्षां गरिबांनाच लोकस्थिति अधिक चांगली समजते.' -टि २.८०. ॰स्फीति-स्त्री. लोकप्रसिद्धि. 'स्वामींची नजर खाद्यसमृद्धीवर, त्यांच्या पुरस्कर्त्यांची लोकस्फीतीवर व इतरेजनांची केवळ मौजेवर.' -नि ६१९. ॰हितैषी-वि. जन- तेचें हित इच्छिणारा; लोकांचें कल्याण पाहणारा. [लोक + हितैषी; हित + इष् = इच्छिणें] लोकाग्रणी-पु. लोकश्रेष्ठ; लोकांचा पुढारी; नेता. [लोक + अग्रणी] लोकाग्रह-पु. लोकांची उत्कट इच्छा; जनतेचा आग्रह. लोकाचळ-पु. स्वर्गादि लोकरुपी पर्वत; जगरुप पर्वत. 'एऱ्हवीं जगदाकाराचें सिरें । जें चिरस्थानीयांचे धुरे । ब्रह्म- भुवन गा चवरें । लोकाचळाचें ।' -ज्ञा ८.१५४. [लोक + अचल] लोकाचार-पु. रूढी; लोकांची रीत; प्रघात; वहिवाट; लोकरीत. 'अंतरनिष्ठ तितुके तरले । अंतरभ्रष्ट तितुके बुडाले । बाह्याकारें भरंगळले । लोकाचारें ।' -दा १८.१.२४. लोकांतर-न. परलोक; (स्वर्ग, नरक इ॰) मृत्युलोकाहून निराळा दुसरा लोक. [लोक + अंतर] लोकांतीं-क्रिवि. लोकांमध्यें; जाहीर रीतीनें; उघडउघड. 'एकांतीं लोकांतीं करूं गदारोळ । लेश तोही मळ नाहीं येथें ।' -तुगा १९९१. लोकातीत-वि. अलौ- किक; लोकांवेगळें; या लोकीं न सांपडणारें. [लोक + अतीत] लोकानुकूल्य-न. लोकांची अनुकूलता; जनमान्यता; लोककृपा; लोकप्रसिद्धि. [लोक + आनुकूल्य] लोकापवाद-पु. लोकांनीं केलेली निंदा; जनापवाद; लोकप्रवाद. [लोक + अपवाद] लोकालोक-पु. सप्तद्वीपात्मक पृथ्वीला तटबंदीसारखा असलेला पर्वत; सप्तद्वीपा पृथिवी व सप्तसमुद्र यांना वेढणारा व सूर्य- मंडळापर्यंतचा अवकाश व्यापून टाकणारा असा एक महान् विस्तृत पर्वत. लोकालोकीं-क्रिवि. १ तिऱ्हाइतांकडून तिऱ्हाइतांमार्फत. २ विशेष पुरावा नाहीं अशा प्रकारें लोकांच्या तोंडून ऐकिलेलें. 'ही खबर मी लोकालोकीं ऐकिलेली आहें.' लोकी(कि)क- पु. १ लौकिक; कीर्ति; यश. 'बहु लोकिक सांडूं नये ।' -दा १४.१.६८. २ प्रसिद्धि; चांगल्या किंवा वाईट रीतीनें लोकांस माहीत असणें. -वि. या लोकांतील; 'प्रपंच संपादणें लोकिक ।' -दा २.७.९. [सं. लौकिक] लोकिकीं-क्रिवि. (काव्य) लोकांत; लोकसमुदायांत. 'पुत्रसंतान नस्तां दुःखी । वांज नांव पडिलें लोकिकीं ।' -दा ३.३.३२. लोकेषणा, लोकेशना- स्त्री. १ लोकांनीं आपणास बरें म्हणावें अशी इच्छा; कीर्तींची इच्छा. 'वैराग्यें तनु शुष्क करावें सोडुनि लोकेशना ।' -देप ६७. २ स्वर्गादि लोकांच्या प्राप्तीची इच्छा. ३ लोकांमध्यें चांगली किंवा वाईट प्रसिद्धि; लोकमान्यता किंवा दुर्लौकिक. 'मुलखांत लोकेशना होती.' -पेद २१ ११२. [सं. लोकेषणा] लोकोक्ति-स्त्री. १ म्हण. २ ज्यांचा रूढ अर्थच घ्यावयाचा, शब्दश: अर्थ घ्यावयाचा नाहीं असे शब्द समुच्चयानें; वाक्प्रचार. उदा॰ डोळ्यांत तेल घालून राहणें; डोक्यांत राख घालणें इ॰. ३ (साहित्य) ज्या वाक्याला वाक्प्रचारानें चारुता आली आहे असें वाक्य. 'हरिच्या पुन्हां पुन्हां कां काड्या नाकांत घालिशी शशका ।' [लोक + उक्ति] लोकोत्तर-वि. अलौकिक; असामान्य; असा- धारण. [लोक + उत्तर] लोकोद्धार-पु. मानव जातीचा उद्धार; कल्याण; मोक्ष; जननमरणापासून मानवाची सोडवणूक; लोकांची उन्नति, प्रगति. [लोक + उद्धार] लोकोपकार-पु. केवळ लौकि- काच्या संरक्षणार्थ करण्याचा शिष्टाचार; जी करण्याला शास्त्राज्ञा किंवा आपली इच्छा नसून केवळ लोकमर्जीकरतां आपण करतों ती गोष्ट, कृति. [लोक + उपचार]
पाणी
न. १ उदक; जीवन; जल; सलिल. 'पाणियां छाय दुनावली । परिमळाचि ।' -शिशु ६२८. 'चोखे पाणिया न्हाली ।' -वसा २५. २ पाऊस; पर्जन्य. ३ हत्यारें भट्टींत तापवून नंतर तीं पाण्यांत बुडवून त्यांच्या आंगीं आणिलेली दृढता. (क्रि॰ देणें; चढविणें; उतरणें). ४ (ल. एखाद्याच्या अंगांतील) धमक; अवसान; वीर्य; शक्ति; तेज. 'आलें न रजपुतांचें परि यवनां सर्व हरवितां पाणी ।' -विक ६८. ५ (मोत्यें, रत्न, हिरा इ॰कांचें) तेज; कांति; झकाकी. 'नाना मुक्ताफळांचें पाणी ।' -दा १६.४.१६. ६ चेहऱ्यावरील टवटवी; कांति; तजेला. ७ धातूंचें भांडें इ॰कांस सोनें, चांदी इ॰कांचा देतात तो मुलामा; झिलई. ८ शस्त्र इ॰ घासून त्याच्या धारेस आणलेली तीक्ष्णता; कडकपणा.(क्रि॰ देणें; पाजणें). 'नाना शस्त्रांमधें पाणी ।' -दा १६.४.१६. ९ अब्रू; लौकिक, कीर्त्ति. (क्रि॰ जाणें; उतरणें; चढणें). १० (राग, गाणें इ॰कांची) नीरसता; रुक्षपणा; रसहीनता. ११ (डोळ्यांतील) चमक; तेज. १२ अश्रू. 'दुर्गा देवीच्या डोळ्यांतून पाणी येऊं लागलें.' -विवि ८.३.४९. पाणी याचें समासांत पूर्वपदीं 'पाण' असें रूप होऊन अनेक सामासिक शब्द होतात. उदा॰ पाणकोंबडा, पाणघोडा, पाणलोट इ॰ सामासिक शब्द पहा. [सं. पानीय; प्रा. पाणिअ; गुज. पाणी; हिं. पानी; फ्रें. जिप्सि. पनी; पोर्तु जिप्सी. पानी] (वाप्र.) ॰उतरणें-१ पराभूत, पराजित होणें. 'पाणिपतच्या लढाईनंतर मराठ्यांचें पाणी उतरल्या- नंतर निजमास संधी सांपडली.' -विवि ८.६.१०९. २ अब्रू जाणें; अपकीर्ति होणें. 'ज्या स्नेहानें पाणी उतरतें, तो स्नेह रुपयें पाण्यांत टाकून राखावा, त्यापेक्षां रुपये राखावे हें फार चांगलें आहे.' -बाळ २.३. ३ (डोळे इ॰कांतील) तेज, चमक, कमी होणें. 'तिच्या सतेज डोळ्यांचें पाणी उतरूं लागलें.' -पाव्ह ५४. ॰ओळखणें- जोखणें-(एखाद्याच्या अंगांतील) गुण, धमक, धैर्य, विद्वत्ता इ॰ कल्पनेनें ताडणें. (अंगाचें, रक्ताचें) ॰करणें-अतिशय खपणें; कष्ट करणें; फार मेहनतीनें (एखादें काम, कर्तव्य इ॰) करणें. म्ह॰ रक्ताचें पाणी हाडाचा मणी. ॰काढून टाकणें-सक्रि. (रसा.) (एखाद्या पदार्थांतील) द्रव, द्रवांश नाहींसा करणें, घालविणें. (इं.) डीहायड्रेट्. ॰कोंडणें-(सैन्य इ॰कांचें) पाणी बंद करणें; त्यास पिण्यास पाणी मिळूं न देणें. 'कडबा दाणा बंद कोंडिलें पाणी कहर वर्षला ।' -ऐपो २३६. ॰घालणें-१ (बायकी) (विटाळशी इ॰ स्त्रीस जेवतांना) पाणी वाढणें, देणें. २ (बायकी) (विटाळशीस, बाळंतिणीस स्नान घालून शुद्ध करून घेणें. ३ नाश करणें; खराबी- करणें; गमावून बसणें. 'ह्यानें आपल्या हातानें आपल्या रोजगारावर पाणी घातलें,' ४ (ल.) (एखाद्या गोष्टीच्या) अभिवृद्ध्यर्थ प्रयत्न करणें, जोपासनेबद्दल उपाय करणें. ५ (एखाद्या वस्तूवर) पाणी सोडणें; त्याग करणें. ६ (कों.) सर्पाचें विष उतरविण्यासाठीं सर्प चावलेल्या मनुष्यास मंत्रित पाणी पिण्यास देणें व अंगावर घालणें ७ वृक्ष इ॰कांच्या वाढीला जरूर तें पाणी त्यांच्या मुळांशीं ओतणें. ॰चढणें-महत्त्व प्राप्त होणें; वीरश्री, त्वेष संचरणें. 'थोरासंगें दुर्बळास पाणी चढे ।' -पला ४.१९. ॰छाटणें-कापणें-१ (पोहणारानें, बोटीनें आपल्या अंगच्या जोरानें) पाणी दुभंगलें पुढें सरणें. २ (पोहणाराच्या, नावेच्या) गतीमुळें पाणी दुभंगलें जाणें. ॰जाळणें-(ल.) करडा अंमल चालविणें; क्रूरपणाचीं कृत्यें करणें. ॰जोखणें-ओळखणें-(एखाद्याची) कर्तृत्वशक्ति, धमक, विद्वत्ता, पराक्रम इ॰ अजमावणें. ॰तावणें-(एखाद्याच्या नांवानें, नांवा- वर, नावांविषयी इ॰ शब्दांसह प्रयोग असल्यास-एखाद्याचें) मरण, अनिष्ट इच्छिणें. (शवदहनासाठीं नेतांना तें उचलण्यापूर्वी, पाणी तापवून त्यास स्नान घलितात त्यावरून हा अर्थ). ॰तुटणें-(पोहणाराच्या, नावेच्या गतीनें) पाणी दुभंगलें जाणें. 'पेनोवेणां दळ बहुतें मीनलें । वाटे पाणी तुटलें ।' -शिशु ५७८. ॰तुंबविणें-(धरण इ॰ बांधून) पाणी कोंडून धरणें. ॰तोडणें- पाणी छाटणें अर्थ १ पहा. ॰दाखविणें-(कर.) (शेतकऱ्यांत रूढ) (गुरांस) पाणी पाजून आणणें; पाण्यावर नेणें ॰देखील न घोटणें-(एखाद्याचे) प्राण कंठीं येणें; मरणासन्न होणें; पाणी घशाखालीं उतरण्याइतकाहि अवकाश, धीर नसणें. ॰देणें-१ पोलादाच्या अंगी नरमपणा, कडकपणा, चिवटपणा इ॰ निरनिराळे गुण आणण्यकरितां तें भिन्न भिन्न ठराविक प्रमाणांत तापवून पाण्यांत बुडविणें. या क्रियेचे कडक पाणी, नरम पाणी, जांभळें पाणी, पिवळें पाणी इ॰ निरनिराळे भेद आहेत. -ज्ञाको प ७४. 'पाणी देण्याच्या कृतीनें लोखंडांत फेरफार होतात.' पदाव १.१५५. २ शस्त्र इ॰कांस धार लावणें. ३ (मृताचा) श्राद्धविधि करून (त्याला) तिलांजलि देणें; (सामा.) तर्पण करणें. ॰देणें-सोडणें-१ (एखादी वस्तु इ॰) गमावून बसणें. २ सोडून देणें; आशा सोडणें; (वस्तू इ॰कांचा) उत्सर्ग करणें (एखाद्या वस्तूचें दान देतांना तीवर थोडेसें पाणी-आपला हक्क नाहींसा करण्याचें द्योतक म्हणून-सोडण्याचा प्रघात आहे त्यावरून हा अर्थ). (कर्माला 'वर' अथवा 'ला' हे प्रत्यय लावून प्रयोग). 'मागें एक पुढें एक । दोनी मिळुनि विठ्ठल देख । ऐसी होतांचि मिळणी दिलें संसारासि पाणी ।' -एकनाथ ॰पडणें-फुकट जाणें; निरुपयोगी होणें; खराब होणें; दर्जा, गुण, महत्त्व, उपयुक्तता इ॰ बाबतींत मागें पडणें; नाश पावणें. कर्म- स्थानीं असलेल्या शब्दास 'वर' हें शब्दयोगी अव्यय जोडून प्रयोग जसें:-रोजगारावर-पोटावर-संसारावर-कामावर-स्नेहावर-पाणी पडलें. 'त्या कार्यावर तर सर्वस्वीं पाणीच पडलें असतें .' -इंप ८. ॰पाजणें-१ (मृतास) तिलांजली देणें; प्रेतदहन होत असतांना प्रेताच्या कपाळमोक्षानंतर चितेभोवतीं सच्छिद्र मडक्यानें पाण्याची धार धरणें; श्राद्ध इ॰ करून तर्पण करणें. २ (ल.) (एखाद्यास) मरेमरेतों खूप मारणें, बडवणें. (१ ल्या अर्थावरून रूढ). ३ पराजित करणें; जिंकणें; चीत करणें. ॰पाणी करणें-१ तहानेनें 'पाणी द्या' 'पाणी द्या' असें म्हणत सुटणें; एकसारखें पाणी मागत राहणें. २ (एखादें जनावर मनुष्य इ॰कांस फार) राबवून, पादाडून बेदम करणें. ३ (अन्न, वस्त्र, पदार्थ इ॰कांची) पूर्णपणें नासाडी करणें. ॰पाणी होणें-१ पुनःपुन्हां पाणी पिण्याची प्रवृत्ति (मिष्ठान्न खाण्यानें, उन्हाच्या त्रासानें) होणें. २ (एखाद्या वस्तूचा) नाश, खराबी होणें. 'हे कठोर मांस झडून जाईल तर किंवा याचें पाणी पाणी होईल तर किती बहार होईल.' -विकार- विलसित ॰पिऊन भांडणें-वाद करणें-(ल.) नेटानें व जोराजोरानें, आवेशानें भांडणें. ॰फिरणें-(बडोदें) व्यर्थ, फुकट जाणें; पाणी पडणें पहा. 'सेनापतीच्या चातुर्यावर व सैनिकांच्या शौर्यावर पाणी फिरतें.' सेवामाहात्म्य १०. ॰भरणे-वाहणें- घालणें-(एखाद्याच्या घरीं विद्वत्ता, संपत्ति, विशिष्ट व्यक्ति इ॰कानीं) बटकीप्रमाणें राबणें; दास्य पत्करून राहणें; वश असणें (एखाद्याच्या घरीं या शब्दासह प्रयोग). 'रूपाचेनि आहे । ऐरावतु पाणि वाहे ।' -शिशु ५०८. 'उद्योगाच्या घरीं ऋद्धिसिद्धि पाणी भरी ।' ॰मरणें-१ (एखाद्याचें) धैर्य गळणें; गर्भगळित होणें; धाबें दणाणणें. २ एखाद्या गोष्टींत किंवा हिशेब, भाषण इ॰कांत) खोटेपणा, पोकळपणा, लबाडी इ॰ असणें. ॰मागूं न देणें-एकदम, तडाक्यासरशीं ठार करणें (मरतांना पाण्याकरितां मनुष्य तडफडतो, पाणी मागत असतो त्यावरून हा वाक्प्रचार). 'तुला मी बडविलें तर पाणी मांगू देणार नाहीं.' ॰मारणें- पाणी कापणें-छाटणें पहा. ॰मुरणें-१ (एखाद्याचें भाषण, वर्तन इ॰कांत कांहीं तरी संशयास्पद असा) कमीपणा, वैगुण्य, दोष, मर्मस्थान असणें. २ भिंत वगैरेंत पाणी जिरणें. ॰लागणें-१ वाईट पाणी पिण्यांत आल्यानें आजारी होणें; पाणी बाधणें. 'कैक जणाला पाणी लागलें मासोळी मागें खारी ।' -ऐपो ३५४. २ ज्याची संगति धरली असेल त्याचे किंवा जेथें कांहीं काळ रहिवास आला असेल त्या ठिकाणचे गुणदोष, ढंग अंगीं जडणें. (आंत) ॰शिरणें-(धंदा, रोजगार, काम इ॰कास) अवदशा; उतरती कळा येणें; नासाडी होणें; फसगत होणें; आंत बट्यांत येणें. ॰शोषून घेणें-(रसा.) (एखाद्या पदार्थांतील) द्रव रस शोषून घेणें; (इं.) डेलिक्विस्. ॰सारणें-(व.) आंघोळीसाठीं पाणी उपसणें. ॰सोडणें-१ (ब्राह्मणास दिलेल्या दानावर पाणी सोडलें म्हणजे दानाची सांगता होऊन त्यावरचें आपलें स्वामित्व नाहींसें होऊन ब्राह्मणाकडे जातें या धार्मिक कल्पनेवरून पुढील अर्थ) (एखादी वस्तु) स्वेच्छेनें कायमची देऊन टाकणें; (एखाद्या वस्तूचा) त्याग करणें. 'हे स्त्री नव्हे प्रतिष्ठा तुमची जरि ईस सोडितां पाणी ।' -मोविराट १.१०३. २ (ल.) (एखाद्या वस्तूची) आशा सोडणें, ती गेली असें समजून स्वस्थ बसणें. ३ (एखादी वस्तु, भावना इ॰) नाइलाजास्तव सोडण्यास, तिच्याकडे दुर्लक्ष कर- ण्यास, विसरून जाण्यास, नाश करावयास तयार व्हावें लागणें. 'परि त्याहीं आम्ही त्या प्रेमासि रणांत सोडिलें पाणी ।' -मोद्राण १७.९०. ॰होणें-(एखाद्या वस्तूची) खराबी, नाश होणें; नाहींसें होणें. 'त्या दुःखाचें तुमच्या दर्शनानें पाणीच होऊन गेलें.' -रत्न ५.२. पाण्याआधीं वळण बांधणें-नदी, ओढा इ॰कास पूर येण्यापूर्वींच पुराच्या पाण्याचा निकाल लाव- ण्याची व्यवस्था करणें. २ (ल.) भावी संकटाची उपाययोजना आधींच करून ठेवणें. 'पाण्याआधीं वळण बांधितां उत्तम. नाहीं तर शेणामेणाचे लोखंडाचे जालियावर पुढें भारी पडेल.' -भाव ८३. पाण्याचा कांटा मोडणें-अग्निसंयोगानें पाणी कोमट होणें, करणें (अतिशय थंड पाणी अंगावर घेतल्यास अंगावर कांटा उभा राहतो, किंवा तें अंगाला कांट्याप्रमाणें बोचतें ह्यावरून वरील अर्थ). पाण्यची गार गोठणें-पाणी गोठून बर्फ होणें. पाण्यांत घाम येणें-(एखाद्यानें) अतोनात संतापणें; रागानें अंगाचा भडका होणें. पाण्यांत घालणें-बुडविणें; नाश करणें; खराब करणें. 'संसार घातला पाण्यांत । स्वतें समस्त बुडविलें ।' पाण्यांत जाणें-व्यर्थ होणें; फुकट जाणें. 'नानाची मुत्सद्देगिरी सारी पाण्यांत जात असली तर ...' -नि. पाण्यांत दिसणें-(ल. एखादी व्यक्ति एखाद्याच्या) द्वेषास पात्र होणें, असणें.पाण्यांत पडल्यासारखें होणें-फजीत होणें; लाजिरवाणें होणें. 'मग देवाला लाज वाटली. पाण्यांत पडल्यासारखें झालें.' -नामना ६९. पाण्यांत पाहणें-(एखाद्याचा एखाद्यानें) अतिशय द्वेष करणें (एखाद्याचा कट्टा शत्रु किंवा त्याला ज्याचा अतिशय दरारा आहे अशी व्यक्ति भीतीमुळें त्यास सर्वत्र जळीं, स्थळीं, काष्ठीं, पाषाणीं दिसूं लागते त्यावरून). पाण्यानें वाती पाजळणें-(महानु.) अशक्य गोष्ट शक्य करूं पाहणें. 'अवो दुजी कनुधार लागती । तरि पाणिअ/?/ वाति पाजळती ।' -शिशु ६७५. पाण्यापेक्षां, पाण्याहून पातळ करणें-(एखाद्याची) फजिती, पाणउतारा, तेजोभंग करणें; फार लाजविणें. 'नामचि करि पाण्याहुनि पातळ यश भास्करादि तेजांचे ।' -मोवन १२.५०. पाण्यावर घालणें- नेणें-(कर.) (गुरांना) पाणी पाजण्यासाठीं विहीर, नदी इ॰कांवर नेणें. पाण्यावर लोणी काढणें-(कर. ल.) अतिशय कंजूषपणा करणें. गळ्याशीं पाणी लागणें-१ पाणी गळ्यापर्यंत येणें. २ (कर्ज इ॰ गोष्टींची) पराकाष्ठा होणें. दुसऱ्याच्या ओंजळीनें पाणी पिणें-१ दुसरा पाजील तेवढेंच पाणी पिऊन स्वस्थ बसणें. २ (ल.) दुसरा सांगेल तसें मुकाट्यानें वागणें. उन्हा पाण्यानें घर जाळणें-जळणें-(ल.) खोट्या आरोपानें, निंदेनें रसातळास नेणें, जाणें; (एखाद्याचा) नाश करणें, करूं पाहणें, होणें (अकरण- रूपांत योजितात व हें घडणें अशक्य असें दर्शवितात). खोल पाण्यांत शिरणें-१ आपल्या आवांक्याबाहेरचें काम शिरावर घेणें. २ (एखाद्या गोष्टीची) फाजील चिकित्सा करणें. ३ (एखादें गूढ, गुपित) उकलण्याचा प्रयत्न करणें. पाणी केस तोडतें- पाण्याच्या अतिशय जोराच्या प्रवाहाचें वर्णन करतांना योजितात. पाणी खाल्लेला-वि. पाण्यांत ठेवल्यामुळें आंत पाणी मुरलेला. पाण्यांतील पावप्यादे-जलसंचारांत प्रवीण; आरमारांतील प्रबळ लोक. 'इंग्रज लोंक पाण्यांतील पावप्यादे.' -इतिहाससंग्रह-ऐति- हासिकचरित्र ११५. पाण्यापाण्यानें-क्रिवि. नदीच्या कांठा- कांठानें. पाण्यापेक्षां शीतळ-वि. अत्यंत सोशीक; सौम्य; शांत; गंभीर स्वभावाचा. पाण्यावर-क्रिवि. नदीच्या कांठीं. 'कऱ्हेच्या पाण्यावर.' -ख ३१९३. पाण्यावरचा बुडबुडा, पाण्या वरची रेघ-पुस्त्री. (ल.) क्षणभंगुर, अशाश्वत वस्तु. क्षणभंगुरता- दर्शक इतराहि वाक्प्रचार आहेत ते पुढें दिले आहेत:-जलबुद्बुद; धुळीवरचें सारवण; दुपारची सावली; विजेचें चमकणें; विजेसारखा; वीजच; अभ्रच्छाया; आभाळाची सावली; कमलिनीवरचा बिंदु; काजव्याचा उजेड; खुंटावरचा कावळा; तेरड्याचा रंग (तीन दिवस); शिराळशेटाचें राज्य; आवाहन व विसर्जन बरोबर; औट घटिकेचें राज्य; घडीचें, घटिकेचें घड्याळें; उपळवणी; तृणाचा शेक; पुष्करपत्रतोयतरल; पळतें पीक इ॰. 'चिताडसी कां? चित्र जिवाचें पाण्यावरच्या रेघांनीं ।' -वाग्वैजयंती-गोविंदाग्रज. पाण्यास आश्रय-आसरा-पु. अतिशय तहानेल्यानें उपाशे पोटीं पाणी पिणें आरोग्यदृष्ट्या अनिष्ट असतें, म्हणून आधीं अन्नाचे एक दोन घांस खाऊन नंतर पाणी पितात. अन्नाच्या ह्या दोन-तीन घांसांस, अल्पांशास उद्देशून हा वाक्प्रचार योजतात.म्ह॰ १ पाण्यांत राहून माशांशीं वैर करूं नये = आपल्या कार्यक्षेत्रांतील मंड- ळीशीं वैर करूं नये. त्यांच्याशीं मिळूनमिसळून वागण्यांतच फायदा असतो. २ (हिं.) पाणी तेरा रंग कैसा, जिसमें मिलाया वैसा = जशी वेळ येईल तसें वागणें. ३ पाण्यापासून जवळ सोयऱ्यापासून दूर = मनुष्यानें पाण्याच्या जवळ राहणें सोईचें असतें, तसेंच सोयऱ्या- पासून दूर रहावें म्हणजे प्रेमांत बिघाड करणाऱ्या गोष्टी टाळतां येतात. ४ पाण्यांत म्हैस बाहेर मोल = अनिश्चित, आगामी गोष्टी- विषयीं, निरर्थक चर्चेस, चिकित्सेस उद्देशून ही म्हण योजितात. सामाशब्द- पाणआघाडा-पु. आघाड्याची एक जात. हा आघाडा सूज, कफ, खोकला, वायु, शोष यांचा नाश करतो. -वगु १.९. [पाणी + आघाडा] ॰उतार-पु. १ नदींतून चालून जातां येण्याजोगा, कमी पाणी असलेला मार्ग. २ (नदी इ॰काचें) ओसरणें; कमी होणें. 'गंगेसि भंग बहु पाणउतार होतो ।' -र २. [पाणी + उतार] ॰उतारा-पु. १ मानखंडना; तेजोभंग; अपमान; क्षुद्रपणानें लेखून (एखाद्याची) केलेली विडंबना; अवहेलना. २ (क्व) पाणउतार पहा. [पाणी + उतरणें] ॰कणीस-न. ओहळांत, ढोंपरभर पाण्यांत कसईच्या झाडाप्रमाणें होणारें पुरुषभर उंचीचें एक झाड. याचीं पानें बाजरीच्या पानांसारखीं असून याचें कणीस बाजरीच्या कणसासारखेंच असतें. हें कणीस वाळवून त्यावरील कापूस चकमक पेटविण्यास घेतात. हें तेलांत बुडवून पेटविलें असतां काकड्याप्रमाणें जळतें. -वगु ४.६२. रामबाण. ॰कसर-स्त्री. पाटस्थळाच्या पाण्याकरील कर, पट्टी. 'गांवची पाणकसर गेल्यावर्षापासून दीडपट वाढविण्यांत आली.' -के १९.७.३०. [पाणि + कसर] ॰काठी- स्त्री. १ (गो.) विहीरींतून पाणी बाहेर काढण्याचें एक साधन. ओकती पहा. २ (ल. गो.) उठाबशी. [पाणी + काठी] ॰काडो- पु. (कु.) शेतांस पाणी काढून पैरीप्रमाणें आळीपाळीनें वाटून देणारा; पाणकाढा. हा शेतकऱ्यांनीं आपसांत पाण्याविषयी तंटा होऊं नये म्हणून निवडलेला असतो. [पाणी + काढणें] ॰कापड- न. जखमेवर, शरीराच्या कापलेल्या भागावर बांधतात ती ओल्या वस्त्राची चिंधी. [पाणी + कापड] ॰कांदा-कंद-पु. नदींत होणारा एक विशिष्ट कंद. यास नागदवणीच्या फुलासारखीं फुलें येतात. -वगु ४.६३. [पाणी + कांदा] ॰कावळें-न. (विशेषतः गुरांची) गर्भोदकाची पिशवी. पाणकी-स्त्री. पाणी भरण्याची मजुरी कर- णारी स्त्री. 'कुणि विधवा ठेविता घरामधें पाणकी ।' -ऐपो ३६९. पाणकुकडें-कोंबडें-न. घशांत किंवा जिभेच्या खालच्या बाजूस होणारा एक विकार. ॰कुक्कुट-पु. (महानु.) पाणकोंबडा. 'चंद्र चकोरा चोखटीं । वोळे अमृतधारी आतुटी । ते गोडपणें पाण- कुक्कुटी । लाहिजे कैसा ।' -ऋ ५२. [पाणी + सं. कुक्कुट = कोंबडा] ॰कोंबडा-डें-पुन. १ जलचर पक्षी. 'पाणकोंबडे कोंबडे । वडवाघुळा घुबडे ।' -दावि २४४. २ चंद्राभोवतालीं पडणारें खळें. [पाणी + कोंबड] ॰केश-पुअव. शेवाळ. ॰कोंबडी-स्त्री. एक जलचर कोंबडी. ॰कोळी-पु. मासे खाणारा एक पक्षी. -प्राणिमो ५७. ॰क्या-पु. १ लोकांच्या घरीं पाणी भरून त्यावर उपजीविका करणारा मनुष्य. 'एखादा पाणक्या नवरा मिळता तरी पतकरता.' -मोर ३४. २ (ल.) निरक्षर व धटिंगण मनुष्य. [सं. पानीयक-पाणकअ-पाणका-पाणक्या. -राजवाडे (ग्रंथ- माला).] ॰खार-पु. (कों.) उकडआंबे इ॰ खारविण्यासाठीं पाण्यांत मीठ घालून केलेला खार. [पाणी + खार] ॰गहूं-पु. मोटेच्या, पाटाच्या पाण्यानें होणारा गहूं. [पाणी + गहूं] ॰घर- न. १ पाणी तापवून स्नान करण्याकरितां असलेली खोली; न्हाणी- घर. २ विहीर इ॰ खणतांना जेथें पाणी लागतें तो जमिनींतील खोल थर. [पाणी + घर] ॰घोडा-पु. आफ्रिका खंडांत मोठ्या नद्यांत, सरोवरांत आढळणारा एक अजस्त्र पण निरुपद्रवी प्राणी. याचा रवंथ करणाऱ्या प्राण्यांत समवेश होतो. याचा रंग काळसर तपकिरी असतो. याच्या कातड्याच्या ढाली करतात. -ज्ञाकोप ६७. (इं) हिपॉपोटेमस् [पाणी + घोडा] ॰घोणस-पु. पाण्यांत असणारी सापाची एक निरुपद्रवी जात. [पाणी + घोणस] ॰चक्की- स्त्री. पाण्याच्या जोरानें, साहाय्यानें चालणारी चक्की. [पाणी + चक्की] ॰चट-वि. १ ज्यास गोडी कमी आहे असा (द्रव पदार्थ); बेचव. २ (ल.) शुष्क; बाष्कळ; नीरस; अर्थशून्य (बोलणें, लेखन, गाणें, बोलणारा, लिहिणारा, गाणारा इ॰). 'शेवटीं आपल्या निस्सीम भक्तांकडूनहि वरच्या सारख्या पाणचट प्रशंसे- पेक्षां अधिक कांहीं सर्टिफिकीट मिळूं नये ...' -टि १.१.२६४. [पाणी + छटा] ॰चूल-स्त्री. पाणघरांतील, स्नानाचें पाणी इ॰ तापविण्याची चूल. 'तेथें पाणचुलींत विस्तव घालून त्यावर पाणी तापत ठेविलें.' -कोरकि ५१२. [पाणी + चूल] ॰चोरा-रा-पु. गारोड्याजवळील पाणी भरण्याचें सच्छिद्र पात्र. 'पाणचोऱ्याचें दार । वरील दाटलें तें थोर ।' -तुगा २५८३. [पाणी + चोर] ॰जंजाळ-न. (कों.) पर्जन्य, पाण्याचा पूर इ॰कानीं जिकडे तिकडे होते ती जलमय स्थिति. 'बहू पाणजंजाळ देखोनि डोळां ।' -राक १.३२. [पाणी + जंजाळ] ॰जांवई-पु. (थट्टेनें) जांवयाचा भाऊ; पडजांवई. [पाणी + जांवई] ॰झुकाव-पु. पाणी बाजूनें टिपकवून लावण्यासाठीं दरवाज्यावर केलेलें झुकाऊ कारनिस, गलथा; पाणकारनिस. -राको ५९२. [पाणी + झुकविणें] ॰झेली- स्त्री. (चेंडू, विटीदांडू इ॰ खेळांत) झाडावरून खालीं पडतांना किंवा पाण्यांतून चेंडू, कोललेली विटी इ॰ जमिनीवर पडण्यापूर्वीं झेलणें. याच्या उलट आणझेली. [पाणी + झेलणें] ॰टका- टक्का-पु. पाटस्थळ जमिनीवरील एक लहानसा कर. [पाणी + टक्का] ॰टिटवी-स्त्री. तांबडा कल्ला असलेली टिटवीची एक जात. पाणड्या, पाणाडी-ड्या-वि. जमीनींत कुठें किती खोल खणलें असतां पाणी लागेल हें काहीं आडाख्यांच्या सहाय्यानें जाणणारा. [पाणी] पाणढाळ-पु. पाणी वाहून जाण्याजोगा जमीन, छपराचें पाखें इ॰कांस दिलेला, असलेला उंचसा उतार; सखलपणा. -वि. पाणी वाहून जाण्यायोग्या उतारानें युक्त, उंच उतारीची (जमीन इ॰). [पाणी + ढाळ = उतार] ॰ताव-पु. सोनें, चांदी इ॰ तापवून पाण्यांत बुडवून त्याचा कस पाहण्याची पद्धत; याच्या उलट सुकताव = सोनें इ॰ तापवून नुसतेंच थंड करणें. [पाणी + ताव] ॰तीर-पु. (युद्धशास्त्र) स्फोटक व ज्वालाग्राही पदार्थांनीं भरलेलें चिरूटासारखें निमुळत्या आकाराचें एक युद्धोपयोगी साधन. याचा व्यास दीड-दोन फूट असून लांबी सहा यार्ड असते. याच्या आघातानें मोठमोठीं जहाजें समुद्राच्या तळाशीं जातात. (इं.) टॉर्पेडो. -ज्ञाको (प) ६७. 'गेल्या महायुद्धांत योजलेल्या अनेक शस्त्रास्त्रांत पाणतीराचा पहिला नंबर लागेल.' -ज्ञाको. प ६७. [पाणी + तीर = बाण] ॰तुटी-वि. जींतील रसांश, द्रवांश कमी झाला आहे अशी, कांहींशी पिकलेली (पालेभाजी). [पाणी + तुटणें] ॰थरा-पु. घराच्या जोत्याच्या सर्वांत वरच्या थरांतील दगड, चिरा; पाटथर पहा. ॰थरी-स्त्री. १ आंत्रपेशी; प्लीहा. २ प्लीहेचा एक विकार; पोटांतील चीप. ३ प्लीहा, आंत्रपेशी वाढणें. [पाणी + थर] ॰थळ-स्त्रीन. १ पाऊस गेल्यानंतरहि जेथील ओल जात नाहीं व उन्हाळ्यांतहि खणलें असतां पाणी लागतें अशी जमीन. 'आणि पाणथळ असे तेथें भात लावी.' -पाव्ह ११. २ पाटाच्या पाण्यानें भिजणारी जमीन. [पाणी + थळ] ॰दळ-न. (क्व.) पाणथळ अर्थ १ पहा. [पाणी + दळ] ॰दिवड-स्त्रीन.. (कों.) पाण्यांतील सापाची निर्विष जात. [पाणी + दिवड] ॰दोरी-स्त्री. विहीरींतून पाणी काढण्याच्या उपयोगाची दोरी; बारीक दोर. [पाणी + दोरी] ॰नेचा-पु. पाण्यांत. दलदलींत उगव णारी एक वनस्पति; (इं.) हायड्रोटेरिडि. -ज्ञाको. अ २२१. [पाणी + नेचा] ॰पट्टी-स्त्री. पाणकापड पहा. ॰पिकलें, पाण- पीक-न. (कों.) ज्या पिकास सबंध पावसाळ्यांतील पावसाची जरूरी असतें तें पीक; पहिलें पीक; खरीप. याच्या उलट रब्बीचें पीक. [पाणी + पिकणें, पीक] ॰पिता-वि. १ फार पाणी खाल्लेलें; फाजील पावसानें नासलेलें (पिकाचें कणीस इ॰). २ (ल.) पचपचीत; पाणचट; पचकळ; मुळमुळीत (भाषण, कारभार, मस- लत, व्यवहार, गोष्ट, काम इ॰). ३ (झटकन् पाणी पिण्यासारखें) तलख; चलाखीचें; तडफेचें (कृत्य, कृति इ॰). ४ रोखठोक, चोख; स्पष्ट (जबाब, जाब, उत्तर इ॰). [पाणी + पिणें] ॰पिशी-स्त्री. फाजील पावसामुळें न भरलेलें, पोचट राहिलेलें धान्याचें कणीस. ॰पिसा-वि. पर्ज्यनातिरेकामुळें पोंचट, दाणें झडून गेलेलें, दाण्यांनीं न भरलेलें (कणीस इ॰). ॰पिसें-न. वेड; वेडगळपणा; भ्रमिष्टपणा. -शर. -मनको. -वि. वेडगळ; खुळचट. -मनको. [पाणी + पिसें] ॰पेटी-स्त्री. (स्थापत्यशास्त्र) पाण्यांत काम करतेवेळीं पाणी आंत येऊं नये म्हणून कामाभोंवतीं बसविलेली उभ्या फळ्यांची मुंढे मारून केलेली पेटी. (इं.) कॉफरडॅम्. -राको ३६/?/ [पाणी + पेटी] ॰पोई-स्त्री. १ वाटसरूंना, आल्यागेल्यांना पाणी पाजण्या- साठीं केलेली सोय; पन्हेरी. 'येइ भाई येथ पाही । घातलीसे पाणपोई ।' -यशोधन. २ अशा ठिकाणीं आल्यागेल्यांस पाणी देण्याची क्रिया. [पाणी + पोई] ॰फोल-न. (राजा.) भाताच्या फुलांवर पाऊस अतिशय पडल्यामुळें त्यामध्यें होणारें फोल, पोचटपणा; असलें न भरलेलें पोचट कणीस. [पाणी = पाऊस + फोल = पोचटपणा] ॰बुड-स्त्री. पाटाच्या पाण्यानें भिजणाऱ्या जमीनी- वरील कर. [पाणी + बुडणें] ॰बुड-पु. (कों.) पाणकोंबड्यासारखा एक पक्षी. [पाणी + बुड] ॰बुडा-ड्या, पाणिबुड्या- पाणबुड्यी-पु. १ मासे धरणारा कोळी. 'तरी माशालागीं भुलला । ब्राह्मण पाणबुडां रिघाला ।' -ज्ञा १६.४५१. २ पाण्याच्या तळाशीं असलेल्या वस्तू वर काढण्याकरितां पाण्यांत बुडी मारून बराच वेळ पाण्यांत राहण्याचा सराव ज्यास आहे तो; समुद्रांत बुडी मारून मोत्यें वर काढणारा. 'ते वाक्समुद्रिचे पाणबुडे । कीं सारासारसीमेचे गुंडे ।' -ऋ २४. ३ एक प्रकारचा पक्षी. [पाणी + बुडणें] ॰बुडी-स्त्री. १ पाण्यांत मारलेली बुडी; सुरकांडी. (क्रि॰ मारणें). २ पाण्याच्या पृष्ठभागाखालून संचार करणारी युद्धोप- योगी नौका. (इं.) सब्मरीन्. 'तें आरमार पाणबुड्यांच्या आघातामुळें इतउत्तर आपली पूर्वकामगिरी देण्यास कितपत समर्थ राहील....' -टि ३.३.३४८. [पाणी + बुडी] ॰बुडीत-वि. पुरानें, पावसानें जलमय झालेली (जमीन, पीक). [पाणी + बुडणें] ॰बोदाड-वि. (ना.) पाणथळ; दलदलीची (जमीन). [पाणी + बुडणें] ॰भर-भरजमीन-स्त्री. १ नवीनच खोदलेल्या विहि- रीच्या पाण्यानें, ओढ्याच्या, पाटाच्या पाण्यानें भिजणारी शेत जमीन. २ पुराच्या पाण्यानें भिजणारी जमीन. ३ असल्या जमीनीवरील सरकारी सारा. [पाणी + भरणें + जमीन] ॰भर जिराईत-स्त्री. पाटाच्या पाण्यानें भिजणारी परंतु कोरड म्हणून गणली गेलेली जमीन. [पाणभर + जिराईत] ॰भरणीचा- भरीत-भरिताचा-वि. १ पाटाचें पाणी मिळणारें (शेत, मळा इ॰). याच्या उलट कोरडवाय-वाही. २ पाटाच्या, विहिरीच्या पाण्यानें तयार झालेलें, काढलेलें (पीक इ॰). ॰भरा-वि. १ विहिरीच्या, पाटाच्या पाण्याची जरूरी असलेला (गहूं, जोंधळा इ॰). २ सदर पाण्यानें भिजणारी (जमीन). [पाणी + भरणें] ॰भऱ्या-भर्या-पु. पाणक्या; पाणी भरण्याचा धंदा करणारा. [पाणी + भरणें] ॰भाकरी-स्त्री. नदीच्या, तलावाच्या पाण्याच्या पृष्ठभागावर खापऱ्या फेकण्याचा मुलांचा खेळ; भाकरीचा खेळ. 'तें गलबत वाऱ्याच्या सोसाट्यांत सांपडून मुलांच्या पाणभाकरीच्या खेळांतल्या खापरीप्रमाणें भलतीकडे गेलें.' -कोरकि ७७. [पाणी + भाकरी] ॰मांजर-न. मांजरासारखा एक जलचर प्राणी. [पाणी + मांजर] ॰मोट, पाणमोटली-की-मोटळी, पाण्याची मोट-स्त्री. प्रसूतीसमयीं गर्भ बाहेर पडण्यापूर्वी गर्भोदकानें भर- लेली गर्भाशयांतून बाहेर पडणारी पिशवी. (क्रि॰ येणें; पडणें; फुटणें; निघणें) [पाणी + मोट, मोटली = चामड्याची मोठी पिशवी] ॰रस-पु. पूर्वीं रस काढून घेतलेल्या आंब्यांवर पाणी ओतून ते हालवून, चेंदून पुन्हां त्यांपासून काढलेला पाणचट रस. [पाणी + रस] ॰रहाट-पु. पाण्याच्या साहाय्यानें चालणारा रहाट; पाणचक्की. [पाणी + रहाट] पाणरॉ, पाणसर्प-पु. (गो.) पाण्यांत असणारी सापाची एक जात. [पाण + सर्प] पाणलव्हा-पाणलांव-पु. (कों.) पक्षिविशेष; यास निबुड असेंहि म्हणतात. [पाणी + लाव, लांव्हा = पक्षिविशेष] ॰लोट-पु. १ पाणी; वाहून जाईल असा उतार; पाणढाळ २ टेकडीची, डोंगराची उतरती बाजू; उतरण. ३ पाण्याचा जोराचा प्रवाह; लोंढा; झोत; धोत. ४ डोंगरमाथा; जेथें पाणी पडलें असतां तेथें न थांबतां दोहोंबाजूंस वाहून जातें अशी डोंगर माथ्याची धार. उदा॰ सह्याद्रीचा पाणलोट. [पाणी + लोट] ॰वटा-ठा, पाणवथ-वथा-पु. नदी इ॰कांवर गांवचे लोक जेथें पिण्यासाठीं पाणी भरणें, वस्त्रें धुणें इ॰ क्रिया करतात तें ठिकाण. 'दिवसा पाणवठा म्हणुनियां रात्र आम्ही ही धरली ।' -रासक्रिडा १२. 'पौलपट्टणीं येऊनि शुद्ध । पाणवथीं बैसला ।' -नव १८.४३. [पाणि + वर्त्तिकः-वटा] म्ह॰ बारा कोसांवरचा पाऊस, शिंवेचा राऊत, पाणवठ्याची घागर बरोबर गांवांत येतात. ॰वड-स्त्री. पाण्याचे रांजण, घागरी, डेरे इ॰ भरून ठेवण्यासाठीं (घरांत) केलेला ओटा, ओटली. [पाणी + ठाव] पाणवडा- वाडा-पु. पाणवठा पहा. 'क्लेशगांविंचा उकरडां । भवपुरिचां पानवाडां ।' -राज्ञा १६.४०५. [पाणि + वर्त्तिकः] पाणवसा-पु. (कों.) गाई, म्हशी इ॰ गुरांच्या जीवनास हेतुभूत असणारें (गांवचें) पाणी, गवत इ॰ समुच्चयानें; पाणसा. [पाणी + वास] ॰वळ-न. (कों.) पावसाळ्यानंतर कांहीं काळपर्यंत जींत ओलावा टिकून राहतो अशी जमीन; पाणथळ अर्थ १ पहा. २ -वि. बेचव; पाणचट. पाणचट अर्थ १ पहा. [पाणी + ओल] ॰वाट-स्त्री. १ पाणी वाहून जाण्यासारखा उतार; सखल पृष्ठभाग; ओहळ; पाणलोट. 'पाणी पाणवाटें जैसें । आपणचि धांवे ।' -दा ७.९.११. २ पाण्याची वाट. [पाणी + वाट] ॰वारू-पु. (प्राचीन पौराणिक कथांत रूढ) होडी; नाव. [पाणी + वारू = घोडा] ॰शाई- स्त्री. तारस्वार काढण्याकरितां मृदंग इ॰कास लोहकीट इ॰काच्या लुकणाचा, शाईचा देतात तो पातळ थर; याच्या उलट भरशाई. [पाणी + शाई] ॰शेंग-स्त्री. (ल.) मासळी. [पाणी + शेंग] ॰शोष-पु. पाणपोस पहा. [पाणी + सं. शोष = सुकणें] ॰सरकी- स्त्री. पाणसर्याचें काम, हुद्दा. पाणसरा पहा. [पाणसरा] ॰सरडें- न. पाण्यांत असणारी एक निर्विष सापाची जात. [पाण + सरडा] ॰सरडें-न. रहाटाची माळ सरूं नये म्हणून बसवितात तें प्रति- बंधक लांकूड. [पाणी + सरा = आडवीतुक्ई] ॰सरा-पु. डोंगराच्या घाटांतील वंशपरंपरागतचा जकातदार. याला वतन व ठराविक हक्क असत. घाटदुरुस्तीचें काम याच्याकडे असे. [पाणी + सरणें ?] ॰सळ-साळ-स्त्री. १ (गवंड्याचा धंदा) बांधकाम इ॰ सम- पातळींत आहे कीं नाहीं हें पाहण्याचें गवंड्याचें साधन; साधणी. (इं.) लेव्हल् बॉटल. २ समपातळी. 'भिंतीचें बांधकाम थराचें असेल तर भिंतीच्या प्रत्येक १८ इंच उंचीस माथा पाणसळींत आणावा व त्यावर पातळ चुन्याचा रद्दा करून घालावा.' -मॅरट १४. ३ पाणी वाहून जाईल असा उतार. [पाणी + सळ] पाणसा-पु. गुराढोरांच्या जीवनोपयोगी असें (एखाद्या ठिका- णचें) गवत व पाणी; पाणवस. 'ह्या गांवचा पाणसा गुरांस मानवत नाहीं.' ॰साप-पु. पाण्यांत असणारी सर्पाची जात. [पाणी + साप] ॰सापूड-स्त्री. घर इ॰कांच्या छपराच्या खालच्या बाजूस वाशांच्या टोंकांजवळ कामट्यांच्या, रिफांच्या, ओंबणाच्या शेवटीं बांधतात ती जाड कामटी; सापूड. [पाणी + सापूड] ॰सासरा-पु. (विनो- दानें) जांवयाच्या भावानें आपल्या भावाच्या सासर्यास विनोदानें, थट्टेनें उल्लेखण्याची संज्ञा. जांवयाच्या भावास पाणजांवई असें थट्टेनें म्हणतात त्याप्रमाणेंच हाहि शब्द आहे. ॰सासू-स्त्री. पाण- जांवयानें स्वतःच्या भावाच्या सासूस थट्टेनें उल्लेखण्याची संज्ञा. [पाणी + सासू] ॰साळ-वि. (क्व.) समपातळींत असलेली (जमीन इ॰) [पाणसळ] ॰साळ करणें-जमीन इ॰ समपातळींत आहे कीं नाहीं तें पाहणें. ॰साळ-स्त्री. प्रवासी, वाटसरू इ॰कांना पाणी पुरविण्याच्या सोयीकरतां रस्त्याच्या बाजूस बांधलेली छपरी इ॰; पाणपोई. [पाणी + सं. शाला = घर] ॰साळ, पाण- सळी भात-स्त्रीन. पाटच्या, विहीरीच्या पाण्यावर केलेलें (मळा इ॰तील) भाताचें पीक. [पाणी + साळ] ॰सुरुंग-पु. समुद्रांतील आगबोटी इ॰कांचा नाश करण्याकरितां समुद्राच्या पृष्ठभागाखालीं योजून ठेवण्याचें सुरुंगासारखें आधुनिक युद्धो- पयोगी साधन. 'बंदरांत घातलेल्या पाणसुरुंगांनीं व पाण- बुड्यांनीं हें समुद्रावरील वर्चस्व पोखरण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.' -टि ३.३.३५०. [पाणी + सुरुंग] ॰सोस, पाणशोष, पाणसोक-पु. १ ताप इ॰कांत पुनः पुनः लागणारी अतिशय तहान; घशास पडणारी कोरड. २ प्रकृतीला होणारा एक (पुनः पुनः तहान लागण्याचा) विकार. [पाणी + शोष = कोरडें पडणें, होणें] ॰सोळा-पु. दिवडाच्या जातीचा, बांड्या रंगाचा, पाण्यांत राहणारा एक निर्विष साप. -बदलापूर ३४७. पाणि- ढाळ-पु. १ ओहोटी. 'अनुरागाचा निरु ताउनी । पाणिढाळु ।' -ज्ञा ७.९९. २ पाण्याचा ओघ खालीं सोडून देणें. 'पाणिढाळु गिरीशें । गंगेचा केला ।' -ज्ञा १८.१६८८. [पाणी + ढाळणें] पाणीपद-न. (महानु.) तेजाचें स्थान; गांभीर्य; ढाळ. 'परि जाणतां उपहासावें । बोलांचें पाणिपद निहाळावें ।' -शिशु ३६५. [पाणी = तेज + पद = स्थान] पाणिपात्र-न. पाणी प्यावयाचें भांडें. 'एकें हरितलें पाणिपात्र । एकें नेलें पीठ पवित्र ।' -एभा २३.५२०. [पाणि + पात्र = भांडें] पाणिय(ये)डा-पु. (महानु.) पाणवठा. 'आत्मगंगेचां पाणियेडां । थोकला अज्ञान-सीहांचा दडा ।' -भाए १०६. [पाणी + वटा, ठाव] पाणियाडा-डें-ढें- पुन. १ पाण्याचा सांठा; तळें. 'सतरावियेचें पाणियाडें । बळिया- विलें ।' -ज्ञा ९.२१४. 'शुक्रें धरिलें पाणियाडें । अवर्षण पडे बहुकाळ ।' -भाराबाल १.७८. २ जलपात्र. -माज्ञा-कठिणशब्दांचा कोश. [पाणीवडा] पाणिलग-वि. पाण्याच्या सान्निध्यानें राहणारा. 'पाणिलगें हंसें । दोनी चारी सारसें ।' -ज्ञा ६.१७७. [पाणि + लग] पाणिवथा-पु. पाणवठा पहा. पाणिवैद्य-पु. (कों.) विषार इ॰ उपद्रवावर पाणी अभिमंत्रून देणारा वैद्य. [पाणि + वैद्य] पाणीकांजी-न. (व्यापक.) पाणी काढणें व भरणें इ॰ गृहसंबंधीं कामांविषयीं व्यापक अर्थीं योजावयाचा शब्द. [पाणी + कांजी] पाणीचोर-पु. पाणचोर पहा. 'जैसें पाणी चोराच्या द्वारीं । वरील रंध्र दाटिजे जरी ।' -विपू २.६६. [पाणी + चोर] पाणीटाळ-पु. ओहोटी. -हंको, -शर, -मनको. पाणिढाळ अर्थ १ पहा. [पाणी + ढाळ] पाणी तावणें-न. (ना.) आंघोळीचें पाणी तापविण्याचें भांडें किंवा जागा. [पाणी + तावणें] पाणी- दाम-पु. पाणीपट्टी. [पाणी + दाम = किंमत] पाणीदार-वि. १ ज्याच्या अंगीं चांगलें पाणी, तेज आहे असा (हिरा, रत्न, मोत्यें इ॰). २ तीक्ष्ण; चांगल्या धारेचें (शस्त्र इ॰). ३ तेजस्वी; स्वाभिमानी; रग, धमक इ॰कानीं युक्त (मनुष्य, पशु इ॰). [पाणी + फा. दार = युक्त] पाणीपट्टी-स्त्री. म्युनिसिपालिटी इ॰ स्थानिक संस्था नगरवासीयांकडून पाणीपुरवठ्याबाबत घेतात तो कर. 'म्युनिसिपालिटीनें पाणीपट्टी वाढविली.' -के १७.६.३०. [पाणी + पट्टी = कर] पाणीपण-न. पाण्याचा भाव. 'कां गंगा- यमुनाउदक । वोघबळें वेगळिक । दावि होऊनि एक । पाणीपणें ।' -ज्ञा १८.५२. [पाणी + पण = भाववाचक नामाचा प्रत्यय] पाणीपाऊस-पु. १ नद्या, तळीं, विहीरी इ॰कांना पाण्याचा पुरवठा करून देणारा पाऊस. 'पीकपाऊस आहे, पाणीपाऊस अझून नाहीं.' २ पाऊस, पीक इ॰; पाऊसपाणी. [पाणी + पाऊस] पाणीपिसा-वि. स्नान करणें, कपडे धुणें इ॰ पाण्याच्या व्यापारांचें ज्यास वेड आहे असा. पाणीपिसें पहा. 'एक राखे एक शंखे । एक ते अत्यंत बोलके । पाणीपिशीं झाली उदकें । कुश- मृत्तिकें विगुंतलीं ।' -एभा १४.२०९. [पाणी + पिसा = वेडा] पाणीभरा-वि. पाणभरा पहा. पाणीवळ-पु. पाण्यांतला मळ. 'तेणें बहुतीं जन्मीं मागिलीं । विक्षेपांचीं पाणिवळें झाडिलीं ।' -ज्ञा ६.४७१. पाणीशेणी-न. झाड-सारवण, पाणी भरणें इ॰ गृहसंबंधीं स्त्रीनें करावयाचीं कृत्यें समुच्चयानें. [पाणी + शेण] पाणेरा-रें-पुन. पाणी भरलेलीं भांडीं ठेवण्याकरितां केलेली चिरेबंदी ओटली. [पाणी] पाणोटा-ठा, पाणोथा-पु. १ पाणवठा पहा. २ (बे.) नदीचा उतार. [पाणी]