मराठी बृहद्कोश

आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

मातोश्री

मातोश्री mātōśrī f Popular corruption of मातृश्री.

मोल्सवर्थ शब्दकोश

मातृश्री, मातुश्री, मातोश्री

मातृश्री, मातुश्री, मातोश्री f A respectful compellation for a mother.

वझे शब्दकोश

मातुश्री / मातोश्री

(सं) स्त्री० माता, आई.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

संबंधित शब्द

मातृश्री

मातृश्री mātṛśrī f (S) A respectful compellation for a mother; also for any elderly and matronlike female. मातृश्री or, rather, its popular corruptions मातुश्री & मातोश्री are, like बाई, ताई and a few other compellations or titles, often used pl and n Ex. मातोश्री आलीं आहेत, यायाचीं आहेत. And in some districts these words are pl and m.

मोल्सवर्थ शब्दकोश

मातृ

स्त्री. आई [सं.] सामाशब्द- ॰कन्यापरंपरा- स्त्री. माणसांचें नातें बापाकडून न गणतां आईकडून गणण्याची एक विशिष्ट पद्धति. [सं.] ॰गमन-न. स्वमातेशीं अगम्य गमन. [सं.] ॰गया-स्त्री. सिद्धपूर नावाचें क्षेत्र. २ गयेस किंवा सिद्धपुरास केलेले आईचें श्राद्ध. [सं.] ॰गामी-गमनी-वि. मातृगमन करणारा; मात्रागमनी. [सं.] ॰गोत्र-न. १ आईचें कुल, गोत्र. २ -वि. आईच्या कुलासंबंधी. [सं.] ॰घात-पु. मातेची हत्या. [सं.] ॰घातुक-वि. मातृघात करणारा. ॰द्रोह-पु. आईशीं द्वेष. [सं.] ॰द्रोही-वि. मातेशीं द्वेष करणारा. [सं.] ॰पद-न. आई, माता होणें. ॰पक्ष-पु मातृकुल; मातृवंश. [सं.] ॰पितृभक्त- वि. मातापितरांची शुश्रूषा करण्यांत तत्पर. [सं.] ॰बंधु-पु. आईकडचा भाऊ किंवा नातेवाईक. [सं.] ॰भूमि-स्त्री. आपले- पणानें वागण्याचा हक्क असलेली भूमि; जन्मभूमि; माय- भूमि. [सं.] ॰भोजन-न. मुंजीच्या दिवशीं बटूनें उपनयनांग वपनाच्यापूर्वीं मातेसह भोजन करण्याचा समारंभ. यानंतर तो मातेसह एकत्र जेवत नाहीं. [सं.] ॰मंडल-न. दोन भुवया. [सं.] ॰वध-हत्या-पुस्त्री. मातृघात. [सं.] ॰श्री-स्त्री. आईस आदरार्थीं म्हणतात. वडील व प्रौढ स्त्रीस योजावयाचा शब्द. बाई, ताई व इतर बाहत्या नांवाप्रमाणें मातृश्री व ह्याचे अपभ्रंश मातुश्री आणि मातोश्री ह्यांचा पुष्कळदां नपुंसकलिंगी अनेकवचन प्रयोग करतात. उदा॰ मातोश्री आली आहेत. कांही प्रांतांत हे शब्द पुलिंगी अनेकवचनीं योजतात. [सं.] मातृ(त्रु)का-स्त्री. १ वर्णमालेंतील एक वर्ण; अ पासून ह पर्यंत अक्षरें. 'ओंकार मातृकांसकट । तोचि जाणावा कंबुकंठ ।' -एरुस्व १.४२. २ आई अथवा दाई. ३ देवता. ह्या आठ देवता आहेत-ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्राणी, चामुंडा किंवा कौबेरी, चर्चिका. लग्न इ॰ मंगल कृत्यात ह्यांचें पूजन करितात. याहून भिन्नहि मातृका सांगितल्या आहेत व त्यांची संख्या एके ठिकाणीं सोळा व दुसरे ठिकाणीं सात अशी आहे. 'पार्थु अधिष्ठात्री तेथिंची । मातृका गा ।' -ज्ञा ६.१२७. ४ मूर्च्छना; सूर; स्वर. ५ (नृत्य) दोन करणांचा समुदाय. [सं.] ॰का(वर्ण)न्यास-पु. दक्षिणाचार पूजेसंबंधी विधि; एक न्यासविधि. ह्यांत स्वरव्यंजनात्मक पन्नास वर्ण तोंडानें म्हणून शास्त्रविधिप्रमाणें कर्मकर्त्यानें किंवा उपाध्यायानें पूजावयाच्या मूर्तींच्या पन्नास अवयवांस हातानें स्पर्श करावयाचा असतो. ॰का पूजन-स्वमाता इ॰ त्याचप्रमाणें गौरी इ॰ सोळा आणि ब्राह्मी इ॰ सात मिळून तेवीस देवतांचें मंगल कार्यांतील पूजन. गणतति, दुर्गा, वास्तोष्पति व क्षेत्रपाल यांचें पूजनहि मातृकापूजनाबरोबरच होतें. मातृत्व-न. मातेचा संबंध, स्थिति, स्वभाव, धर्म; आईपणा. [सं.] मात्रागमन-न. १ मातेशीं मैथुन. २ (ल.) महापातकांपैकीं एक पातक. [सं. मातृ + गमन] मात्रा- गमनी-वि. १ मातृगमन केल्याचा दोष असलेला. २ (ल.) मादर- चोद; लबाड (मनुष्य). [सं. मातृ + गमनी]

दाते शब्दकोश

आईबाप (आईबाप्)      

पु. अव.       आई व बाप; वडील व मातोश्री; माता व पिता. अव. (वा.) आईबाप उद्धरणे − आईबापावरून वेड्यावाकड्या शिव्या देणे. आईबापावरून पावणे − आईबाप उद्धरणे; वेड्यावाकड्या शिव्या देणे; आईबापांबद्दल वाईट बोलणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

बाइ

बाइ bāi f A term of respectful compellation or mention for one's mother or an elderly female. 2 It is an affix of respect to the names of females gen. Ex.रमाबाई आली आणि आकाबाई गेली. 3 pl and sometimes n sometimes m for Lady, mistress &c. Ex. बाई कोठें गेलीं न कळे. See मातोश्री. 4 C pl The small pox. v ये. बायां बापडीचा Pertaining or relating to weak and helpless females.

मोल्सवर्थ शब्दकोश

डोंगळा, डोंगळी      

वि.       काळी, जाड, मोठी : ‘मातोश्री आनंदीबाई यांनी कोंकणी रिवाजाप्रमाणे दोन्ही मनगटांत डोंगळी पोतीचे सर अडकवणे वगैरे गोष्टींत कधीच आळस आणि विसराळूपणा केला नाहीं.’ –गणपतराव जोशी ४६.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

डोंगळी पोत

स्त्री. मोठी काळी पोत. ‘मातोश्री आनंदीबाई यांनी कोंकणी रिवाजाप्रमाणें मुलाच्या गळ्यांत दृष्टमणी बांधणें दोन्ही मनगटांत डोंगळी पोतीचे सर अड- कवणें, रोज संध्याकाळीं दृष्ट काढणें वगैरे गोष्टींत कधींच आळस आणि विसराळूपणा केला नाहीं.’ –गणपतराव जोशी ४६. [डोंगळा + पोत]

दाते शब्दकोश

कंठणे      

उक्रि.       १. सहन करणे; सोसणे (आजार, दुःख) : ‘कैसा कंठूनिया राहों संवसार ।’ - तुगा ५६५. २. कष्टाने घालविणे, संपविणे; कसातरी काढणे (दिवस, काळ) : ‘रामदास हनुमंतासि म्हणे । मज सर्वथा न कंठे रामाविणें ।’ - संवि २·८६. ३. गतीने मार्ग अतिक्रांत करणे, तोडणे, चालणे (अंतर, रस्ता, प्रवास.) : ‘तै मार्ग न कंठे तेणे । परी कष्टणे अनिवार ।’ - एभा २१·२७. ४. क्षीण होणे; जीव कंठापर्यंत येणे : ‘श्रीमंत मातोश्री पार्वतीबाई फारच कंठली आहेत.’ - ऐलेसं २३५७. [सं. कठ्, कंठ किवा कष्ट]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

ताई

ताई tāī f A term of respectful compellation or mention of a sister or of a female gen. This title, like बाई, मातोश्री, and some others, is often used pl and n. Ex. ताई आलीं, ताई गेलीं; and, in some districts, these words are pl m.

मोल्सवर्थ शब्दकोश

स्त्री. १ वडील बहीण. २ एक प्रतिष्ठित नांव; बहिणीस किंवा कोणत्याहि स्त्रीस बहुमानानें संबोधण्याचा शब्द. स्त्रियांना सन्मानानें संबोधण्याच्या बाई, मातोश्री या शब्दांप्रमाणें ताई हा शब्दहि कांहीं प्रांतातून नपुंसकलिंगी अनेकवचनीं वापरतात. उदा॰ ताई आलीं ताई गेलीं इ॰ तर कांहीं प्रांतांत हा शब्द पुल्लिंगी बहुवचनीं वापरतात. [का. ताय-यी = आई; हिं. ताई = आत्या, चुलती] सामाशब्द- ॰आई-स्त्री. (माण.) एक दैवत. हें मूळचें कोंकणांतील आहे असा समज आहे पण हल्लीं या दैवताचें प्राबल्य माण तालुक्यांतील एक-दोन गांवांतच दिसून येतें. -मसाप ४.४. २५८. ॰बाय-स्त्री. (गो.) १ बहीण २ भावजई. [ताई + बाई]

दाते शब्दकोश

आई

स्त्री. १ जननी; माता. 'आई वदे बा न मानीं संकट' -दावि १६०. २ जगदंभा; देवी; देवींच्या नावापुढें लावावयाचें उपपद; जसें-तुकाई, मरीआई, काळकाई. ३ (संकेतिक) वारकरी पंथांतील लोक ज्ञानेश्वरीस म्हणतात. ४ (सामा.) देवी 'आईच नवसु नाहीं पुरविला' -दावि ३४७. ५ देवी (रोग); फोड्या. ६ लहान मुलाला लडिवाळपणें संबोधितात. [सं. आर्ये, किंवा अयि ? सं. आदि ? प्रा. आइ? ] शिवाय अइ पहा. म्ह॰ १ आईचें दूध कीं गायीचें दूध = दोन समान गोष्टींपैकीं सरसनिरस ठरवितां येत नाहीं अशा वेळीं योजतात. यासारखीच दुसरी म्हण- आई गोड कीं उदार = दुसर्‍याच्या मालमत्तेवर उदारपणा दाखविणें; आयती चैन करणें. ३ आई जेवूं घालीना, बाप भीक मांगू देईना = दोन संकटें आलीं असतां किंवा दोन परस्परविरुद्ध मतांच्या अधिकार्‍यांची मर्जी संभाळावयाची असतां योजतात (इकडे आड तिकडे विहीर याप्रमाणें). ४ एका आईचीं लेंकरें = बंधुभाव दाखविण्या- करितां योजतात. ५ लहानपणीं आई आई, थोरपणीं बाय- लबाई = लहानपणीं आईची आठवण वारंवार होते पण प्रौढपणीं स्त्रीमुळें विसर पडतो. ६ आई मेल्यावर बाप मावसा (निष्काळजी) होतो. ॰आंग- न. आईपणा-मायपणा ज्या अंगापासून येतो तें अंग; स्त्रीचें किंवा प्राण्यांतील मादीचें जननेंद्रिय, व आंतील गर्भा- शयाचा भाग; गुह्यांग. 'बाळंत होतांना तिला त्रास झाला, आईअंग बाहेर आलें' [आई + अंग] ॰काळी- स्त्री. शेतजमीन. ही आई- सारखी पोषक असते म्हणून आदरार्थीं. -गांवगाडा. [आई + काळी = शेतजमीन] ॰पांढर- स्त्री. गांवठाण; गांव ज्या जमिनींत वसतो ती जमीन; ही शेताच्या निरुपयोग म्हणजे साधारण पांढर्‍या रंगाची असते. [आई + पांढरी] ॰पोरका- वि. आईवांचून उघडा पड- लेला; ज्याची आई मेली आहे असें (मूल) ॰बाई स्त्री. १ आई सारखी वयानें श्रेष्ठ, सुस्वभावी अशी बाई; आईप्रमाणें स्त्री. म्ह॰ देई घेई ती आई बाई, न देई ती मसणांत जाई. २ शेजारची बाई; शेजारपाजारची स्त्री; शेजारीण. ३ कोणी तरी बाई. (अनेकवचनी उपयोग). म्ह॰ परीट नागविला तर आयाबाया नागविल्या = पर टाच्या येथें चोरी झाली तर त्यांचे कांहीं जात नाहीं, उलट इतर लोक उघडे पडतात. ॰करणें खुशामत करणें; गोंजारणें. ॰बाप- पु. आई व बाप; वडील व मातोश्री; मातापिता. (अव.) आई व बाप. 'माझीं आईबापें आणि माझे शिक्षक जें मला सांगतात तें कां केलें पाहिजें ?' -मराठी ३ रें पुस्तक (१८७३) पृ. ४१. आई- बापावरून पावणें, आईबाप उद्धरणें- आईबापावरून शिव्या देणें; वेड्यावांकड्या, वाईट शिव्या देणें. ॰माई- स्त्री. व्यापक अर्थानें बाई; एखादी आईसारखी मानलेली स्त्री, माउली; आई- बाई. ॰माई उद्धरणें- आईवरून शिव्या देणें. ॰माई करणें- खुषमस्करी करणें; मनधरणी करणें.

दाते शब्दकोश