मराठी बृहद्कोश

आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

माधवी

माधवी mādhavī f (मधु Honey.) Spirituous liquor distilled from honey. The three kinds of spirits are गौडी, माधवी, पैष्ठी.

मोल्सवर्थ शब्दकोश

माधवी mādhavī f (S) A large creeper bearing white and fragrant flowers, Gœrtnera racemosa.

मोल्सवर्थ शब्दकोश

स्त्री. मधापासून गाळलेलें मद्य. गौडी, माधवी, पैष्टी हीं तीन प्रकारचीं मद्ये आहेत. [सं. मधु = मध]

दाते शब्दकोश

माधवी mādhavī m (माधव) A personage of the stage. He is the Buffoon or Interlocutor with the audience between the acts or scenes.

मोल्सवर्थ शब्दकोश

माधवी f Spirituous liquor distilled from honey. A creeper. m A personage of the stage. The buffoon.

वझे शब्दकोश

स्त्री. चंद्राची सतरावी कळा. 'नेणों ते कैसी चांदिणे यांची माधवी । जडा समुद्रातें ही माजवी । भरि- तेयाचे निमिसें वोल्हावी । पृथ्वियेसी ।' -नरुस्व ५०५. [सं.]

दाते शब्दकोश

माध्वी

माध्वी mādhvī f S A spirituous liquor made from the blossoms of Bassia latifolia: also spirit in general.

मोल्सवर्थ शब्दकोश

(सं) स्त्री० मद्यविशेष.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

स्त्री. १ मोहाच्या फुलाचें मद्य. २ (सामा.) मद्य.

दाते शब्दकोश

संबंधित शब्द

घडणे      

उक्रि.       १. स्पर्श करणे; शिवणे. या क्रियापदाचा प्रयोग करताना कर्त्याची नेहमी प्रथमाच पाहिजे. कर्ता तृतीयेचा नसावा. २. भेटणे : ‘नातरीं उद्यानीं माधवी घडे ।’ –ज्ञा १४३.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

घडणें

उक्रि. १ स्पर्श करणें; शिवणें. 'तो शूद्र मला घडला.' या क्रियापदाचा प्रयोग करतांना कर्त्याची नेहमीं प्रथमाच पाहिजे. कर्ता तृतीयेचा नसावा. २ भेटणें 'नातरी उद्यानीं माधवी घडे ।' -ज्ञा १.४३. [सं. घृष्-घृष्ट-घट्ट = घांसणें; स्पर्शणें]

दाते शब्दकोश

इनाम

न.१ कोणत्याहि अटीशिवाय शाश्वत, वंशपरंपरेची स्थावर अशी देणगी; वृत्ति; इनामांत पुढील प्रकार आहेत. -वतनी (सनदी) व गांवनिसबत. वतनींत गैरउपयोगी (न्हावी, सुतार, चांभार, चौघुला, शेट्या, मांग, कुंभार, पोतदार, महाजन, कुडबुडे जोशी इ॰) व उपयोगी (उपाध्याय, गुरव, गांवज्योतिषी, जंगम, काजी, मुलाणा, मुजावर इ॰), परगणे वतनदार (देशमुख, देशपांडे, देश- कुलकर्णी, नाडगौडा, नाडकर्णी, सरदेसाई, सरदेशपांडे, सरदेशमुख, सरपाटील, निरखीदार, देशगत, घाटपांडे, देसाई), गांवनौकर (पाटील, कुलकर्णी, मतादार, माधवी, महार, तराळ, बळीकर इ॰), क्षेत्रोपाध्ये. गांवनिसबत (पासोडी, देवस्थान, हाडोळी, मावळी, धर्मादाय, देणगी, वतनदारी इ॰). सनदी म्हणजे सरकारी करा- पासून मुक्त व कायमचें दिल्याबद्दल सनद मिळते तें. शराकती दुमाला म्हणजे गांवांतील उत्पन्नांतून गांवकामगाराचा खर्च वजा जातां बाकी राहणार्‍या उत्पन्नांत सरकाराची हिस्सेरस्सी असते ती. शिवाय अग्रहार, भाकरी, चोळीबांगडी, देवस्थान, कदीम, जदीद, जात, जुडी, कोल्हाटी, मळीकी, राजकीय, साधणूक शेतसनदी, योगक्षेम, इसाफत, नौकरी, वतनीवजीफा, आलतमघा इ॰ इ॰ ऐन इनामतीमध्यें ब्राह्मणांचीं अग्रहारें व बादशहाचे पीर आणि थडगीं, मशिदी आणि देवस्थानें, फकीर इनाम, मोईन, काजी-मुलाणा, फकीर-तपस्वी, अन्नछत्र वगैरे बाबी येत. -भाअ १८३३.१३८. २ देव,ब्राह्मण वगैरेंना दिलेली भूमि वगैरे. ३ मालकी हक्क न देतां देणें, घेणें, खाणें, सोडणें. 'हा माड यानें इनाम खाल्ला.' 'आम्ही गाईचें दूध काढीत नाहीं, वासरे इनाम पितात.' ४ (सामा.) कोणतेंहि बक्षीस; नजर; देणगी. [अर. इन्आम] ॰इक्राम-पु. भेट; देणगी, बक्षीस, वृत्ति. -वाडसभा २.१९६. [अर.] ॰इजाफत- न. देणगी वाढवून देणें; देणगीची वाढ; इनामांत घातलेली भर (कांही कामगिरी केल्याचा मोबदला म्हणून वाढवून दिलेलें इनाम.) ॰इजाफतदार-वि. इनाम इजाफत मिळालेला; वाढलेलें इनाम उपभोगणारा. ॰चिटणावळ-स्त्री. इनामावरील सरकारी बाब किंवा कर. [हिं.] ॰चिठ्ठी-पु १ वेगवेगळ्या इनामांची यादी, तपशील (जिल्ह्यातील किंवा तालुक्यांतील). २ इनामपत्र; इनामपट्टा, इनामखत. ॰चौकशी स्त्री. इनामपाहणी पहा. ॰चौथाई-स्त्री. इनामाचा चौथा हिस्सा (सरकारांत भरणा करा- वयाचा). ॰जमीन स्त्री. एखाद्या मोठया कामगिरीबद्दल सरका- रांतून बक्षीस मिळालेली सारामाफीची जमीन. ॰तिजाई-स्त्री. १ इनाम जमिनीच्या उत्पन्नाचा तिसरा हिस्सा. हा कर सरकार सहा किंवा दहा वर्षांनी वसूल करी. -शारो ४०.२ पूर्ण अथवा सर्वस्वी इनाम नसलेल्या इनामी जमिनीवरील सार्‍याचा तिसरा भाग. 'इदलशाही दिवाणांत हक्कचौथाई व इनामतिजाईच नव्हती' -रा ३.११७. [फा.] ॰दार-पु. इनाम धारण करणारा; इनामी जमिनीचा मालक; वतनदार. [फा. इन् + आम् + दार] ॰नोकरी-स्त्री. गांव, महाल परगणा यांची महसुली, फौजदारीसंबंधानें गावकी, घरकी कामें करणार्‍या गांवकामगांरांनां व परगणे अमलदारांना इनाम जें देण्यांत आलें तें; काळीचें उत्पन्न, (स्वामित्व नव्हे;) म्हणजे महसूल घेण्याचा अधिकार; किंवा इनाम जमीन धारण करणार्‍यांना महसुलाची सर्वस्वीं अथवा अंशतः सूट देण्यांत आली ती. इनाम मिळकती दोन प्रकारच्या असतात. -प्रत्यक्ष (दुमाला) आणि अप्र- त्यक्ष (परभारा). पहिल्या प्रकारांत इनामदारांना सबंध गांव, महाल किंवा गांवांतील सर्व जमीन दुमाला करून देत आणि धारा वसूल करण्याचा राजाधिकार हा त्यांना देत. दुसर्‍या प्रकारचें इनाम ऐन किंवा नक्त किंवा ऐनजिनसी असे. धारा वसूल करून आपल्या खजिन्यांतून सरकार इनामदारांना जी ठराविक नेमणूक रोकडीनें आदा करी तिला नक्त इनाम म्हणत आणि जमीन धारण करणाराकडून इनामदार परस्पर ठराविक घुगरी म्हणजे दर बिघ्यास किंवा नांगरास धान्याचीं अमुक मापें घेत ती; अथवा बाजारहाटांत विकावयास आलेल्या मालाची शेव-फसकी किंवा वाणगी घेत ती, यांना परभाराहक्क किंवा ऐनजिनसी इनाम म्हणतात. -गागा २९.४०. ॰पट्टी-ताजम-स्त्री. पु. इनामदारावर बसविलेली पट्टी, कर. हा कर दर तीन वर्षांनी जेवढें उत्पन्न असेल तेवढा बसवीत, जेवढें त्या वर्षाचें उत्पन्न असेल तेवढा घेत. ॰पत्र-न. इनाम दिल्यासंबंधींचें खत, सनद; इनाम दिल्याचें राजपत्र; सर- कारनें कोणास इनाम दिल्यास त्याबद्दल पुढील चार सरकारी हुकूम निघत-(अ) खुद्द इनाममदारास, (आ) इनाम गांव अथवा जमीन ज्या परगण्यांत आहे त्या परगण्याच्या मामलेदारास, (इ) त्याच परग- ण्याच्या देशमुख देशपांड्यास, (ई) इनाम असलेल्या गांवच्या पाटील-कुलकर्णी वगैरे मुकदमास. ॰परभारा-पु. सरकारांतून न घेतां परभारें गांवाकडून वसूल करण्यांत येणारें इनाम ॰पासोडी- स्त्री. गांवकामगारांना जी किरकोळ जमीन इनाम देतात त्याबद्दल व्यापकतेनें योजावयाचा शब्द. जसें:-पाटलास पासोडीसाठीं; कुल कर्ण्यास रुमालासाठीं, पोतदारास घोंगडीसाठीं; महारास जोडया- साठीं; भठास धोतरासाठीं, वगैरे इनाम दिलेल्या जमिनीबद्दल. ॰पाहणी-स्त्री. दिलेल्या इनामजमिनींची पाहणी, तपासणी. ॰फैजावी-स्त्री. जमिनीवरील सरकारसार्‍याच्या एकतृतीयांशाइतका दरसाल सरकारांत करावयाचा भरणा. [अर.]

दाते शब्दकोश

कामिना-नी-णा-णी

स्त्री. १ प्रियकर स्त्री; सुंदर स्त्री; शृंगारचेष्टा करणारी स्त्री; प्रियतमा. 'काय चंचळु मासा । कामिनी कटाक्षु जैसा ।' -ज्ञा १४.१७०. 'ऐशीं सहस्त्र ज्या सुंदरा कामिनी । माजीं मुखरणी मंदोदरी ।' -तुगा ३४६३. 'बगुन कामिणी तुला नगरच्या पडतिल बीमार' -मृ १८. 'गौडी माध्वी पैष्टी । तीन मद्य प्रगट जनीं । चौथें मद्य तें कामिनी ।' [सं.] २ सामान्य अर्थानें स्त्री. [सं. कम्]

दाते शब्दकोश

कामिनी

कामिनी kāminī f (S) and in poetry, कामिना or णा f An amorous woman, a loving or a beloved woman, a mistress. 2 A woman gen. Ex. गौडी माध्वी पैष्ठी ॥ तीन मद्य प्रगट जनीं ॥ चौथें मद्य तें का0 ॥ दुर्गंध न्हाणी पापाची ॥.

मोल्सवर्थ शब्दकोश

माधव

पु. १ विष्णु. २ वैशाखमास. 'मधुमाधव वसंत युक्तू । कृष्ण म्हणे तो मी ऋतू ।' -एभा १६.२२०. ३ वसंतऋतू. ४ (मधूचे वंशज, संबंधी) कृष्ण; सात्यकी. [सं.] ॰लठ-पु. एक फुलझाड व त्याचें फूल. माधवी-स्त्री. वसंतकाळ. 'ना तरी उघाना माधवी घडे ।' -ज्ञा १.४३. [सं. माधव] माधवी-पु. नाटकांतील विदूषक; दशावताराच्या खेळांतील सोंगासारखें हास्य- रसोत्पादक सोंग. २ -स्त्री. पांढरी व सुवासिक फुलें येणारा एक वेल; मधुमालती.

दाते शब्दकोश

सिकार

पु. १ सुरतोपभोग; विषयसुख; कामसेवन. 'माधवी मंडपाचे विणे । तेथ पक्षिय सिकारपणें । देवाचीं रूपकें वानें। गाती बनकरीं सवें ।।' -नरुस्व ७९४.२ श्रुतीधर; सूर धरणारा. 'उभयां ठाकौनि रायापुढें । सिकार खुणाविलें सवंगडे । हात उचलौनि आसी पढे । जे दुभे मनोरथु ।।' -नरुस्व १७४. [सं.सीत्कार]

दाते शब्दकोश

वारुणी

स्त्री. १ पश्चिमदिशा. २ मद्य; दारू. 'वारुणी माध्वी मघोदक । आवश्यक सेविती ।' -एभा १३.१२०. ३ एक अस्त्रविद्या. 'तुज विद्याभार्गवी वारुणी ।' -वामन निगमसार १.४५. -वि. वरुणदेवतेसंबंधी; वरुणदेवताधिष्टित. [सं. वरुण]

दाते शब्दकोश

राय

पु. राजा; नृप. राव पहा. 'ऐसें सांगोनि रायासी ।' -एरुस्व ६.४७. [सं. राजा; प्रा. राआ-या; हिं. गुज. राय] सामाशब्द- ॰आवळी-आवळा-स्त्रीपु. राय आंवळयाचें झाड व त्याचें फळ. ह्यास हरपररेवडी असेंहि म्हणतात. ॰कुरा-री- पु. स्त्री. एक कोंकणी झाड. डाक घेऊन जाणारे शिपाई रात्रीच्या वेळी ह्याच्या लांकडाचा दिवटीसारखा उपयोग करतात. ॰केळ- स्त्रीन. केळीची एक जात व तिचें फळ, हें तांबड्या जातीच्या केळ्यासारखें असतें. [दे.] ॰गिडगिडी-स्त्री. (महानु.) लहान नगारा. 'रायगिडागिडी बोबाडिआं ।' -शिशु १०५३. ॰घणस- पु. सर्पाची एक जात. -प्राणिमो ७०. ॰घोळ-स्त्री. एक प्रका- रची भाजी. ॰धडक-पु. (महानु.) घाय; धाव. 'मग रायधडक निशान लागला ।' -संत राजी. रु १३.५. ॰पण-न. राजेपणा. 'स्वप्नीचेनि जै अवतरे । रायपणें ।' -ज्ञा १५.३४०. ॰पुरी-वि. रायपूर शहरासंबंधीं (साखर, लुगडें, खण इ॰) -पु. (सांकेतिक) भामट्या. ॰बोर-स्त्री. न. एक वृक्ष व त्याचें फळ. ॰भुलावण- स्त्री. राजास भुलवणारी किंवा मोह घालणारी स्त्री; सुंदर व मोहक स्त्री. ॰भोग-पु. तांदुळाची एक जात. -वि. राजानें खाण्या- जोगा; उत्तम (पदार्थ). [सं. राज + भोग] ॰माड-पु. १ (कों.) ज्यापासून माडी काढतात तें माडाचें झाड. २ सरकारी हक्काचा माड. ॰मुनी-स्त्री. एक फुलझाड व त्याचें फूल. ॰राजेंद्र-पु. (पोवाडे काव्य) राजाच्या एखाद्या प्रधानाची पदवी. ॰विनोदी- वि. बहुरूपी व माकडचेष्टा करणारा; मस्कर्‍या; नकल्या; माधवी. 'दंडीगाणें टेहलकरी । रायविनोदी ।' -दावि ४७४. ॰शेवती- स्त्री. एक फुलझाड; शेवतीचा एक प्रका. ॰स्थळ-न. राजधानी. 'पू्र्वकालच्या राजधान्या अशाच किल्ल्यावर करीत. नाहींतर मैदानांतलें रायस्थळ शत्रु केव्हां येऊन लुटून नेईल याचा नेम नसे.' -के ९.२.३७. राया-पु. डौलानें बोलतांना फांकडे, फंदी, अफीणबाज इ॰ कांनीं स्वत:स लावलेली ऐश्वर्याची व वैभवाची पदवी. [सं. राज् = प्रकाशणें; राय] (वाप्र.) रायाप्पा नाइ- काचा फराळ करणें-थंडा फराळ करणें; फक्त पाणी पिणें.

दाते शब्दकोश