आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह!
शब्दार्थ
मिराशी
वि. १ मिरासदार; वतनदार. २ भंडारी. 'मिराशी म्हणजे भंडारी म्हणून त्यास भंडारवाडा असें म्हणतात' -गोराघ ११३.
पु. मुसलमानांतील एक अस्पृश्य जात. -के १७. ४.३६.
मिराशी or सी
मिराशी or सी mirāśī or sī m ( H) मिरासदार c ( P) A person enjoying a मिरास, a landed proprietor. 2 This word is applied to the Mahárs of a village entitled hereditarily to the Mahár's portion, and often to Mahárs in general. Of the Miráshí four classes are made; viz. वतनदार in general, मिरासदार, उपरी, ओवांडकरू.
मिरास्दार; मिराशी
(पु.) [फा. मीरासीदार्] मिराशीचा उपभोग घेणारा. “वडगांवीची मोकदमीस कोन्ही मिरास्दार नाहीं” (राजवाडे १७|३२).
संबंधित शब्द
मिरास; तिराशी
(स्त्री.) [अ. मीरास्] वडिलोपार्जित; दायभाग; “तन्ख्यानें कुणब्याकडे किंवा गांवाकडे असलेल्या ज़मिनीस मिरासी व तिचा भोगवटा घेणारास मिरास्दार थळकरी, वतन्दार म्हणत” (गांवगाडा १०); वंशपरम्परा. “हे माझे मिरासी । ठाव तुझ्या पायापासी” (तुकाराम). “निपुत्रिकांचें मिरास तें दिवाणाचें” (राजवाडे ८|४९). “सदर्ह सातां गांवीचीं कुळकर्णे तुम्हांसि मिरासी करून देतों” (राजवाडे १५।२७५).
गैर-मिराशी
वंशपरम्परा मालकी ज्याची नाही असा. “निवाडा केला जे रामरामे महाजन मिरासदार; मातकदीम मिरासी सरी जाहली. काणव मज्कूर गैर मिरासी मुतालीक ऐसे जाहले.” (इऐ ५।१०२). “हे दोघेजण गैरमिरासी असोन दखल करितात” (वाड-सनदा १२२).
गैरमिराशी
वि. वंशपरंपरा मालकी नसलेला : ‘मातकदीम मिरासी खरी जाहली. काणव मजकूर गैर मिरासी मुतालीक ऐसे जाहले.’ - इऐ ५·१०२.
खाल(लि)सा
पु. १ साक्षात् सरकारपासून धारण केलेली अथवा जिच्या वसुलाचा सरकार एकटेंच मालक आहे अशी जमीन, गांव, अथवा प्रांत. २ खोताच्या अभावीं सरकारनें वहिवाटलेल्या जमिनी; जहागीर किंवा इनाम नसलेली जमीन. 'नैबानें कुल बिसादी लुटून खालसा केली.' -रा १५.१३. ३ सरकारजप्त जमीन, गांव. ४ संस्थानाच्या अंमलांतील नसून इंग्रजसरकारचे अंमलाखालील गांव, जमीन. 'मोंगल अंमलांत सांपडलेला महाराष्ट्र, खालसा महाराष्ट्रापेक्षां अधिक दुर्दैवी.' -के १७।५।१९३०. ५ मिरासी खेरीज सरकारच्या वहिवाटीला असलेली कीर्दसार जमीन. -गांगा १३.६ मुसलमानी अमदानीं- तील जमाबंदी खातें. -वि. १ खास सरकारी (जमीन, सैन्य, तोफखाना इ॰). २ संस्थांनी नव्हे असा (प्रांत, जमीन इ॰). ३ सरकारजमा, जप्त. [फा. खलिसा] ॰मुलुक-पु. इंग्रज सर- कारचा प्रांत
खालसा, खालिसा
पु. १. थेट सरकारकडून मिळालेली अथवा जिच्या वसुलाचे सरकार एकटेच मालक आहे अशी जमीन, गाव अथवा भाग. २. खोताच्या अभावी सरकारने वहिवाटलेल्या जमिनी; जहागीर किंवा इनाम नसलेली जमीन. ३. सरकारजप्त जमीन, गाव : ‘नैबानें कुल बिसादी लुटून खालसा केली.’ - मइसा १५·१३. ४. संस्थानाच्या अंमलातील नसून इंग्रजी सरकारच्या अमलाखालील प्रदेश : ‘मोगल अंमलांत सापडलेला महाराष्ट्र, खालसा महाराष्ट्रापेक्षां अधिक दुर्दैवी.’ - के १७·५·१९३०. ५. मिरासी खेरीज सरकारच्या वहिवाटीला असलेली कीर्दसार जमीन. ६. मुसलमानी अमदानीतील जमाबंदी खाते.
गैर
अ. निराळेपणा, भिन्नपणा दाखविणारा परंतु सामा- न्यतः अभाव किंवा अन्यथाभावदर्शक अरबी अव्ययशब्द किंवा प्रत्यय. याचा मनसोक्त (विशेषतः हिंदुस्थानी शब्दांबरोबर) उपयोग करितात. या शब्दाचें पुढील कांहीं अर्थ होतात- १ इतर; अन्य. 'गैर पथकें येऊन मोर्चेबंदी केली आहे.' -रा १२.१२५. २ अयोग्य; अन्यायाचा. 'हें तुम्हीं गैर केलें' -मदरु १.१०६. ३ (नामाच्या किंवा विशेषणाच्या प्रारंभीं जोडल्यास) अवास्त- विक, उलट; विपरीत. ४ विना; वांचून. 'गैर अन्याय मला गांजतो.' 'गैर अपराध दंड घेऊं नये.' [अर. घैर = निराळा, व्यतिरिक्त] (वाप्र.) ॰अदबी-स्त्री. असभ्यता; अपमान; अनादर. 'गैर अदबी बोलला सबब पातशाहा यास राग येऊन डोळे काढिले.' -मदरु २.७०. ॰अदा-वि. रद्द; न पटलेलें. 'शिंदे कडील वरात आली तर मग गैरअदाही व्हावयाची नाहीं.' -ख १०. ५२.७९. ॰अब्रू स्त्री. अप्रतिष्ठा. 'गैर-अब्रू फारशी न करणें.' -वाडबाबा २.७५. ॰अमली-वि. परस्वाधीन; दुसर्याचें. 'चार लक्षाचे भरतीस अमली महालांपैकीं बेरीज कमी आल्यास गैर- अमली महाल आहेत त्यांपैकीं भरतीस कमाल आकाराचे बेर- जेचा महाल लावून देणें.' -रा १०.३२१. ॰आबादी-वि. ओसाड; उजाड; बेचिराख. ॰आरामी-स्त्री. अवस्थता. 'हज्र- तांचे शरिरास दोन दिवस गैरआरामी] आहे.' -दिमरा २.३२. ॰इतबार-पु अविश्वास. 'तमाम फौजेस गैरइतबार जाहला.' -भाब ८०. ॰इमान-न. इमान नसणें; द्रोह; अनिष्ठा. 'आमचें गैरइमान असतें तरी आम्हीं आजपर्यंत येथें तुम्हापाशीं न ठरतों.' -भाब १११. ॰कबजी-वि. परस्वाधीन; गैरअमली पहा. 'सरं- जाम गैरकबजी, कांहीं सुटला त्यांत वस्ती नाहीं.' -ख २.९४२. ॰कायदा-वि. बेकायदेशीर; असनदशीरे. (इं.) इल्लीगल. ॰कायदा मंडळी-स्त्री. (कायदा) गुन्ह्याचें कृत्य करण्याच्या इराद्यानें पांच किंवा पांचाहून अधिक एकत्र जमलेले इसम. (इं.) अन्लॉफुल असेंब्ली. ॰किफायत-स्त्री. तोटा; नुकसान. 'किफायत, गैरकिफायत समयासमयास चित्तांत आणून किफा- यतीचीं कामें करीत आलां, पुढें त्याचप्रमाणें करावीं' -रा १. ३४६. ॰कौली-वि. परवाना किंवा अभयपत्र न दिलेलें; बिगर परवाना. -मराआ. ॰खर्च-पु. १ जादा, किरकोळ खर्चं. २ गैर- वाजवी, अयोग्य खर्च. ॰खुशी-षी-वि. नाकबूल; नाखूष; रुष्ट. 'खुषी किंवा गैरखुषी असा हा कौल बायकांशी ।' -पला १०४. ॰चलन-नी-वि. १ चालू नसलेलें (नाणें). २ (ल.) अव्यव- स्थित; बेशिस्त; अशिष्ट (वर्तन). ॰चलन-स्त्री. १ चलनाचा अभाव; चलन नसणें. २ (क्व.) गैर वर्तन; बदचाल. ॰चाकर- वि. बडतर्फ; माजूल. 'जखमी जाहले त्यांस गैरचाकर करून जागिरा तगीर करविल्या.' -जोरा ७५. ॰जप्त-वि. गैरअ- मल; गैरकबजी; परस्वाधीन. 'गैरजप्त देश साधावें.' -चित्रगुप्त ११०. ॰जबाब-पु. उद्धटपणाचें, अनादराचें उत्तर. ॰दस्त- स्ती-वि. सरकारसार्याची सूट असलेली (जमीन). ॰नफा- फायदा-पु. तोटा; नुकसान. 'येणेंकडून तुमचा गैरनफा जाहला.' -जोरा १४. 'अत्यंत वोढ केल्यास पाटीलबावांचा गैर फायदा आहे.' -जोरा ४७. ॰प्रकारचा-वि. १ इतर; भिन्न; दुसरा. २ चमत्कारिक; हास्यापद; तर्हेवाईक; विलक्षण. ॰बर्दार-वि. बहार नसलेला; फळहीन. 'पोकळी गैर-बर्दार, शेंडे वाळलेल्या आहेत.' -रा ११.७९. ॰मजुरा-क्रिवि. (हिशेब) मजुरा (वजा) टाकल्याशिवाय; वजावाट न करितां. [गैर + मजुरा-मुजरा] ॰मंजूर-वि. नामंजूर; रद्द. 'अप्टणांनीं जापले जागा वाजवी असतां गैरमंजूर करून एकपक्षी तह केला.' -रा १२.१२२. ॰मर्जी-स्त्री. अवकृपा; रुष्टता; इतराजी; नाराजी. ॰मसलत- मनसुबा-स्त्रीपु. मूर्खपणाचा, वेडगळपणाचा बेत, कट, योजना. ॰महसर्दार-वि. अप्रतिष्ठित. -रा ८.४३. [अर. मआसिर = थोरवी] ॰महसूल-पु. जुलमी करांपासून किंवा अन्याय्य मार्गानें काढलेला वसूल; योग्य सरकारसार्याविरहीत वसूल. 'विजा- पुराहून एक हवालदार गैरमहसूल पैदागिरी कबुल करून आला.' -इऐ ५.१००. ॰माकूल-मूर्ख; अडाणी; गैर; वाईट. 'कार्बारास खलेल करणें हें गैरमाकूल गोस्टी आहे.' -रा १८.३३. -क्रिवि. मूर्खपणें. 'लोक गैरमाकूल आम्हांस न कळत वर्तले तरी त्याची बद्लामी आपणावरी न ठेववी.' -रा ८.१०. ॰मान्य-वि. अमान्य; असमंत. ॰मार्ग-पु. गैरशिस्त आचार, रीत; दुराचरण. ॰माहीत-वि. १ अपरिचित; अनोळखी. २ अजाण; नेणता. 'साठे आहेत ते गैरमाहीत.' -ख ७.३५५१. ॰माहीतगार- वि. अज्ञानी; अडाणी. ॰मिराशी-वि. वंशपरंपरा मालकी नस- लेला. 'मातकदीम मिरासी खरी जाहली. काणव मजकूर गैर- मिरासी मुतालीक ऐसे जाहले.' -इऐ ५.१०२. ॰मेहनत- स्त्री. निरुद्योग. 'परंतु मेहनत, गैर-मेहनत सर्व एक ईश्वरी क्षोभानें वायां गेल्या.' -ऐ ५. ॰मेहेरबानी-स्त्री. अवकृपा; इतराजी. 'सांगितल्यावरून मनांत गैर मेहेरबानी न धरावी.' -रा ८. १०. ॰मोसम-हंगाम-पु. अवेळ. 'गैर मोसमांत (पौष वद्य १२ स) आंबे आले यावरून कौतुक वाटलें.' -रा २२.५. ॰रजावंद-वि. नाराज; नाकबूल. 'तो क्रियेस गैररजावंद जाहला.' -वाडशाछ १३२. [फा.] ॰रहा-रीत-स्त्री. बद- चाल; अयोग्य रीत; वाईट आचरण. -वि. बदचालीचा-सलु- काचा. 'भुजंगराव याची वर्तणूक गैररहा दिसते.' -ख ११. ५७७६. ॰राजी-वि. असंतुष्ट; नाराज. 'पाटसकर गैर-राजी जाले.' -रा ६.२६. ॰राबता-वि. १ बंदी; मनाई; खंड (मार्ग, मिळणें, येणें-जाणें, वहिवाट, चाल यांमध्यें). 'नाना फडणीस लष्करांतून आल्यापासून गैरराबता बहुत करूं लागले. कोणाचीच गांठ पडत नाहीं.' -ख ८.४१५१. २ वहिवाट, चाल यामध्यें अनभ्यास; अपरिचय; अवापर; वळण नसणें. ॰रास्त-वि. गैर- वाजवी; असत्य; खोटा. ॰रुजू-वि. १ गैरहजर. २ मंजूर किंवा दाखल किंवा मान्य न केलेले (हिशेब). ॰लायक वि. अयोग्य; नालायक; अनुचित. ॰वळण-न १ गैरराबता. 'त्या मार्गास सध्यां गैरवळण जाहे.' २ एकीकडे असणें; आडवळण; दळण- वळण नसणें. 'हा गांव गैरवळणांत पडला.' ३ गबाळ, वाईट लिखाण. ४ सरावांत नसणें; सवंय नसणें; निरुपयोग. ॰वाका- पु. खोटी किंवा बनावट गोष्ट; गैरसमजूत; लबाडी. 'ऐसा गैर- वाका सांगितला.' -रा ८.५२. -वि. वेडावांकडा -शर [फा. घैर्-वाकिअ] ॰वाजवी-वाजिवी-वि अयोग्य; अनुचित; फाजील; अन्याय्य. 'त्याचा अभिमान गैर-वाजवी याणीं नच- धरावा.' -रा १२.७९. [फा. घैर् + वाजिवी] ॰वाजवी दाब- पु. (कायदा) अयोग्य वजन. (इं.) अनड्यू इन्फ्लुअन्स. ॰वास्तविक-वि. खोटा; असत्य; वस्तुस्थितीस सोडून. ॰विलग-क्रिवि. आडबाजूस; आडवळणी. -वि. (विलगसाठीं चुकीनें योजलेला) न मिळणारा; न जुळणारा. ॰विल्हईस- विल्हेस-विल्हे- क्रिवि. आपल्या (योग्य) ठिकाणाच्या विरुद्ध जागी; भलतीकडे. ॰विल्हेस लागणें-पडणें-१ दुसरीकडे किंवा चुकीच्या ठिकाणी लागण; क्रमवार नसणें. २ योग्य ठिकाणाहून गहाळणें; गमावणें. ३ गोंधळ होणें, अव्यवस्थित असणें, ॰शर्ती- स्त्री. माफीजमीन म्हणून ठरविल्यानंतर जिला इतर दुसर्या कोणत्याही अटी पाळावयाच्या नसतात अशी जमीन. ॰शिस्त- वि. बेशिस्त; अव्यवस्थित; विना रीतभात; नियमबाह्य; असभ्य; फाजील (माणूस, वर्तन, भाषण). -स्त्री. बेशिस्तपणा; अव्यवस्थितपणा; अयोग्यपणा. अनियमितपणा. ॰शेरा- शरा-वि. धर्मशास्त्रविरहीत. 'काजीपासून गैरशेरा अमल होऊन आला.' -वाडसनदा १५- [अर.घैर् + शरअ = धर्मशास्त्र] ॰संधी- स्त्री. अवेळ; गैरमोसम; अवकाळ. ॰सनदी-वि. १ बेसनदशीर; बेकायदेशीर; सनदेनें अधिकृत नसलेलें. २ जादा मंजुरीशिवाय. 'गैर-सनदी खर्च करावयाची सरकारची आज्ञा नाहीं.' -ख ५. २३५३. ॰समजाविशी-स्त्री. (कायदा) गैरसमजूत; (इं.) मिस्रिप्रेझेंटेंशन. ॰समजूत-स्त्री. उलट, चुकीची समजूत; चूक. ॰सल्ला-सलाह-गैरमसलत पहा. 'हे कंपणी इंग्रजबहादूर यांचे सलाहानें अगर गैर सलाहानें ...' -रा २२.१२५. ॰साल-वि. अनिश्चित वेळेचा; वर्ष नमूद नसलेला. 'गुणनवरे यांनी कागद एक काढिला, तो बहुतां दिवसांचा, गैर-साल ।' -रा ६.८९. ॰सावध-वि. १ बेसावध; गाफील. २ बेशुद्ध; मूर्छित. ॰साळ- वि. १ खोटसाळ; सरकारी टांकसाळींतून न पाडलेलें. इतर ठिकाणाचें म्हणजे हिणकस, कमी किंमतीचें (नाणें). 'गैरसाळ तामगिरी । कोणी नवी मुद्रा करी ।' -दा १०.८.१४. (त्यावरून) खोटा; बनावट; लबाडीचा. २ (ल.) बेशिस्त; अनभ्यासी; गांवढळ; अडाणी; (माणूस); अयोग्य; अनुचित (वर्तन). ३ अशिष्ट; अडाणी; हलका; राकट; बेडौल; गावठी इ॰ ॰सोई-य-स्त्री. अडचण; त्रास; हाल; अप्रशस्तता. ॰सोईचा-वि. अडचणीचा; सोईचा, सुखकर नसलेला. ॰हंगाम-पु. गैरमोसम पहा. 'त्यास गैरहंगाम, हल्ली खरबुजीं तयार मिळालीं ते आठ सेवसी पाठ- विलि असेत.' -रा ३.३१२. ॰ह(हा)जीर-वि. मोजदादीच्या वेळीं समक्ष नसलेला; अविद्यमान; अनुपस्थित. [फा.] ॰हिसा (शे)बी-स्त्री. अन्याय; अव्यस्थितपणा. -क्रिवि. अन्यायानें. 'आपले जागिरींत नाहक गैरहिसाबी पादशाह खलल करवि- ताती ।' -इमं ६७. ॰हुकुमा-वि. अनधिकृत; संमति, आज्ञा नसलेले; नामंजूर. ॰हुर्मत-स्त्री. अप्रतिष्ठा; बेअब्रू.