मराठी बृहद्कोश

नऊ मराठी शब्दकोशांमधील २,६२,७३६ शब्दांचा एकत्रित संग्रह

शब्दार्थ

मुढोजी मुका

मुढोजी मुका muḍhōjī mukā m A term (by a person resisting his arrogance) for an overbearing or domineering fellow.

मोल्सवर्थ शब्दकोश

पु. चढेल, मिजासखोर मनुष्य (एखा- द्याची मिजास जिरविण्याकरतां म्हणतात).

दाते शब्दकोश

मुका

मुका m A kiss. a Dumb; mute, silent.

वझे शब्दकोश

मुका mukā m A kiss. v घे g. of o.

मोल्सवर्थ शब्दकोश

मुका mukā a Dumb. 2 Mute or silent. 3 fig. Wanting a head, blind--a guineaworm, a boil, tumor, pustule: not having its kernel yet formed or its milk so abundant as to flop and sound within--a cocoanut: that do not readily germinate on being steeped--particular pulses &c.; or that remains hard or unpuffed by steeping--a grain: unexpanded--a bud, sprout, leaf: working without noise--sugarmills, waterwheels &c.

मोल्सवर्थ शब्दकोश

वि. १ बोलता येत नसलेला; न. बोलणारा; वाचा नसलेला. २ रागानें किंवा हिरवटपणानें बोलत नाहीं असा; स्तब्ध. ३ शांत बसलेला. ४ तोंड नसलेलें (गळूं, फोड) डोकें किंवा तोंड नसलेला (नारू). ५ न वाजणारा; अगदीं कोंवळा; आंत गर नसून पाणी भरलेला (नारळ). ६ चाड; न भिजलें जाणारें; मोड न येणारें (कडधान्य). ७ न उमललेली; न फुललेली (कळी). ८ आवाज न करता चालणारें (रहाटगाडगें, चरक, यंत्र इ॰) [सं. मूक; का मुत्तु, मुद्दु] म्ह॰ मुक्याचे मनी मंगळवार (मंगळवारी कोणताहि बेत करूं नयें अशी समजूत आहे त्यावरून). (वाप्र.) ॰मुलगा होणें-प्रथम न्हाण येणें. ॰रहाणें-(बागलाणी) गप्प बसणें. मुकावणें-मुकें होणें; स्तब्ध बसणें. 'मुकावल्या वेदश्रुती ।' -परमा १.१८. सामाशब्द- ॰गोवर-पु. ज्यांत अंगावर पुटकुळ्या पुरळ योत नाहीं असा गोंवर. ॰दंद-पु. मुका दाबा पहा. ॰दावा-पु. गुप्त द्वेष; डूक. ॰नारळ-पु. कोंवळा असल्यामुळें न वाजणारा नारळ. ॰मार- मारा-पु. १ वैरामुळें किंवा दुष्टपणानें जादूटोण्याच्या योगानें किंवा शापांनीं केलेला गुप्त नाश हानि. २ पुराव्याला कांहीं खुणा वगैरे राहाणारा नाहीत असा दिलेला अंगावर मार. ॰मैद- म्हसोबा, मुकी मण्यार-पुस्त्री. (निदार्थी) हिरवट, तिरसट मनुष्य. मुकी अर्जी-स्त्री. एखाद्याची नालस्ती करण्यासाठीं बिन- सहीचा किंवा खोट्या सहिनें केलेला अर्ज. मुकी कमान-स्त्री. चपटी कमान. मुकी वस्तु, मुकें जनावर-स्त्रीन. गाय म्हैस इ॰ जनावरें. 'मुकी वस्तु निघातें मारी ।' -दा २.१.६६. मुके गळूं-न. तोंड न पडलेलें गळूं. ॰गाळ-न. एक मुलींचा खेळ. ॰दंद-मुका दावा पहा. ॰फळ-फूल-पान-न. कोंवळें किंवा पक्क न झालेलें फळ; न उमलेलें, कळीच्या स्थितींत असलेले फूल, पान. ॰फुल-न. एक मुलींचा खेळ. ॰भिजाणे-पुअव. भजलेले परंतु मोड न फुटलेले दाणे (हरभरा, पावटा इ॰चे) मुकाणा-पु. मुकणा पहा.

दाते शब्दकोश

पु० चुंबन. २ जन्मवहिरा, बिलकुल बोलतां येत नाहीं तो. ३ आवाज न करणारा. ४ ठुस्सा.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

पु. चुंबन. (क्रि॰ घेणें). [ध्व. मुख]

दाते शब्दकोश

मुका दावा

मुका दावा mukā dāvā m Silent or secret hatred, grudge.

मोल्सवर्थ शब्दकोश

मुका दंद

मुका दंद mukā danda m See मुकें दंद.

मोल्सवर्थ शब्दकोश

मुका(क्का)म

पु. १ थोडा काल राहण्याची, उतरण्याची, तळ देण्याची जागा; आश्रयस्थान; आसरा; विश्रांति घेण्याचें ठिकाण. २ रहाणें; अवस्थान; तळ देणें; एखाद्या ठिकाणीं थोडा वेळ थांबणें. ३ वास्तव्याचें ठिकाण; वस्ती; बिऱ्हाड; राहण्याचें गांव. उदा॰ (पत्रातून) मु. पुणें. मुंबई इ॰ ४ (ल.) कुंठितावस्था; विश्रांति; टप्पा; पायरी; मध्यंतरीचें थांबणें. [अर. मुकाम्] मुकामात, मुक्कामात-स्त्री. वस्ती; 'शहराच्या पूर्वेंस चारा आहे तेथेंच मुकामात करावी.' -रा. १.१५६. [अर. मुकामत्]

दाते शब्दकोश

संबंधित शब्द

चुंबन

न. १ मुका घेण्याची क्रिया. २ मुका. ३ आकर्षण. (क्रि॰ घेणें; देणें) [सं.]

दाते शब्दकोश

(सं) न० मुका.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

चुंबन

मुका, पापा, चुंबा, साखर चुंबा, अधरामृतसेवन, ओष्ठपीडन, ओष्ठमीलन, अधरपान, ओठांवर ओठ टेकविणे, अधरसुधाप्राशन, दोहोत विभागून पुन्हां अख्खी राहणारी वस्तू ! जें दिलें अथवा घेतलें तरी अर्थ एकच ते म्हणजे चुंबन, मुळांत कांहीं नाहीं तें तोडून दान करण्याचा अयशस्वी प्रथत्न, वेडेचार करण्याच्या करारावर केलेलें शिक्कामोर्तब, चौथाई-सरदेशमुखी, प्रेमाची जकात-बसुली, हृदयाचा मुका मार, प्रेमाचा विसार, तोंडाला तोंड देणे, निसटत्या भेटीची पुसटती जाणीव, अनुरागाने दुसऱ्यावर घेतलेलें तोंडसुख, प्रेमाच्या हिशोबाची तोंडमिळवणी.

शब्दकौमुदी

चुंबन, चुंबा      

न.       १. मुका घेण्याची क्रिया. २. मुका. ३. आकर्षण. (क्रि. घेणे, देणे.) [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

मुकामैंद

मुकामैंद mukāmainda m मुकाम्हसोबा m (मुका Dumb, म्हसोबा A certain plebeian god.) मुकीमण्यार f (मुका & मण्यार A species of snake.) Reviling terms for a person stupidly taciturn or sulkily silent.

मोल्सवर्थ शब्दकोश

मुकद्दम

पु. (निदार्थी) मुका मनुष्य. [मुका]

दाते शब्दकोश

मुकद्दम mukaddama m ( A) A title of the पाटील or managing authority of a village; also of each of the वतनदार. 2 An officer in some villages, deputy of or ranking next to the देशमुख. 3 The head man, chief, captain, of a caste or body (as of guides, peons, dooley bearers, public laborers). 4 (Ludicrously, from मुका, from the similarity of sound of the two words) A dumb person.

मोल्सवर्थ शब्दकोश

अबोल, अबोलका, अबोलणा, अबोल्या      

वि.       १. मुखस्तंभ; बडबड न करणारा; जास्त बोलावयास नको असलेला; मितभाषी : ‘आत्मा अबोलणा स्वयें । परि तोचि बोलतो म्हणावा निश्चयें ।’ – यथादि ४·३०७. २. गाण्यातला विशिष्ट स्वरयुक्त जो बोल त्या विरहित असा : ‘कां न सज्जितां वीणा । तो नाद जो अबोलणा ।’ – अमृ. ५·४१. ३. मुका; स्तब्ध : ‘एक सदा गाती नाचती । एक तो होती अबोलणे ।’ – एभा २·६३१.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अबोल, अबोलका-णा, अबोल्या

वि. १ मुखस्तंभ; बडबड न करणारा; जास्त बोलावयास नको असलेला; मितभाषी. 'आत्मा अबोलणा स्वयें । परि तोचि बोलतो म्हणावा निश्चयें ।' -यथादी ४.३०७.२ गाण्यांतला विशिष्ट स्वरयुक्त जो बोल त्या विरहित असा. 'कां न सज्जितां वीणा । तो नाद जो अबोलणा ।' -अमृ ५.४१. ३ मुका; स्तब्ध. 'एक सदां गाती नाचती । एक ते होती अबोलणें ।' -एभा २.६३१. [सं. अ + बोलणें]

दाते शब्दकोश

अधर

वि. खालचा, तळचा; हलका. -पु. अधरदिशा; अध:- खस्वस्तिक; अधोबिंदु. -पु. १ खालचा ओंठ. २ (सामान्यत:) ओंठ. 'जीवशिव एकाकार । तैसे मिनले दोन्ही अधर ।।' -एरुस्व १.५७.३ (नृत्य अभिनय) खालच्या ओंठानें (अधरानें) दाख- विले जाणारे अभिनय. याचे सहा प्रकार आहेत. विकूणन, कंपन, विसर्ग, विनिगूहन, संदष्टक व समुद्र. ॰चावणें-चावून खाणें- क्रि. रागानें ओंठ चावणें; अतिशय रागांत असणें. 'परमसंताप वाटला तेव्हां । अधर चावून खातसे ।।' ॰पान-ओंठांचें चुंबन; मुका. ॰पुट-(काव्य) दोन्ही ओंठ. (अंजलिपुटाप्रमाणें शब्द ). 'बत्तीस हिरकण्या एकवळीनें विराजती अधरपुटीं । '-रामृत-न, ओंठांच्या चुंबनापासून मिळणारा अमृततुल्य रस (इतका मधुर).

दाते शब्दकोश

अधरपान      

न.       ओठांचे चुंबन; मुका. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अंडगडी      

पु.       १. (सोंगट्या इ. खेळ) हाताखालचा खेळगडी, पित्तू. २. पोटातला गडी, एखादा गडी कमी असता त्याच्याबद्दल आपणच खेळणे; मुका गाडी. ३. मदतनीस; सोबती; अडगडी. ४. हस्तक; पहा : अंगगडी

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

बेट

बेट bēṭa n An island. 2 A cluster or clump of trees or shoots springing from one stock (as of the Plantain or Bamboo): any clump or plump of trees of one kind. 3 A Bamboo or Plantain, &c. planted in order to have a clump spring from it. 4 fig. A cluster or dense body (as of relatives or friends). Ex. बेट सावंताचें भारी पडलें मुका- शाचे नात्यानें गांवची वेठ बेगार घेत गेले. बेटीं लागणें To come to shore or a shallow; to touch the bottom--a swimmer. 2 fig. To arrive at form and figure; to assume the definiteness and standing of approaching completion--a work or business.

मोल्सवर्थ शब्दकोश

बोस / बोसा

(पु.) हिंदी अर्थ : चुम्बन. मराठी अर्थ : मुका.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

चुंबक

वि. १ (ल.) चुंबन, मुका घेणारा; स्त्रीलंपट; विषयी. २ कृपण; कद्रू; कंजुष; कवडीचुंबक. 'द्वाड आपेसी वोंगळ । चाळक चुंबक लच्याळ ।' -दा २.३.२८. [चुंबणें]

दाते शब्दकोश

चुंबक      

वि.       १. (ल.) चुंबन, मुका घेणारा; स्त्रीलंपट; विषयी. २. कृपण, कद्रू; कंजूष; कवडीचुंबक : ‘द्वाड आपेसी वोंगळ । चाळक चुंबक लच्याळ ।’ − दास २·३·२८ ३. प्रत्येक विषयात तोंड घालणारा : ‘जो निंदकू नास्तिकु । ज्ञानेविण चंबकु’ − विस १५६. [सं. चुम्ब]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चुंबणे      

उक्रि.       मुका, चुंबन घेणे. [सं. चुंबन]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चुंबणें

उक्रि. मुका, चुंबन घेणें. [सं. चुंबन; फ्रें. जि. चुंब, चुम]

दाते शब्दकोश

(सं) उ० वि० मुका घेणें. २ ओढणें.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

चुप्प, चुपचाप

क्रिवि १ गप्प; स्तब्ध; गुपचुप; मुका- ट्यानें; कांहीं आवाज न करतां. २ -उद्गा. गप्परहा; बोलूं नको; खामोष. [सं. चुप्-मंदयां गतौ-राजवाडे ग्रंथमाला; हिं. चुप, चुपचाप; लिथु कोप; जर्म. हुफेन; इं. हॉप]

दाते शब्दकोश

गुंग

वि. १ बेभान; मूढ; धुंद; जड; निपचित (ज्वर, झोंप, दुःख, निशा इ॰ नीं). २ गर्क; तल्लीन; निमग्न (एखाद्या विद्येचा अभ्यास, व्यासंग यांत). ३ थक्क; आश्चर्ययुक्त; मोहपावून परावृत्त; स्तम्भित (शास्त्रांतील कठिण अंश पुरतेपणीं मनांत न आल्यामुळें इ॰). ४ एखाद्या विषयांत एकतानता झाल्यामुळें इतर व्यवसायांत अनासक्त, विरक्त. [फा. गुंग = मुका]

दाते शब्दकोश

(पु.) हिंदी अर्थ : गूँगा, गूंगापन. मराठी अर्थ : मुकेपणा, मुका.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

गुंगणें

अक्रि. १ धुंद, जड, मूढ, सुस्त होणें. (मूर्च्छा, निशा, झोंप यांनीं) २ मागें लागणें; भुलणें; वेडावणें. 'त्या रांडेच्या पाठीमागें राजेश्री गुंगले.' ३ हळूच जाणें; निसटणें; सट- कणें. ४ तल्लीन, गर्क होणें; निमग्न असणें. ५ गुंग होऊन डुलूं लागणें; थक्क होणें. [फा. गुंग, गुंगा = मुका]

दाते शब्दकोश

गुरू

पु. गोंवर, देवी या दुखण्याचे वाहणारे फोड. मुका- गुरु-न वाहणारे फोड. [का. गुरुळें = खळी, छिद्र]

दाते शब्दकोश

हुका

हुका hukā m Commonly हुक्का (the or hukká), but written thus esp. when conjoined with मुका; as हुकामुका Smoking and kissing, loose and low intercourse between the sexes, low dalliance or wantoning.

मोल्सवर्थ शब्दकोश

हुका(क्का), हुकामुका

पु. १ धूम्रपान व चुंबन. २ स्त्रीपुरुषांचा स्वैर संबंध; विलास; विहार; क्रीडा. [हुक्का + मुका]

दाते शब्दकोश

कोक, कोकशास्त्र

न. कामशास्त्र; रतिरहस्यशास्त्र. हा ग्रंथ कोक कवींनें केल्यामुळें या ग्रंथास कोकशास्त्र हे नांव पडलें. यांत संभोगाचे, वशीकरणाचें, कामविकाराबद्दलचें व स्त्री-पुरू- षांच्या गुणावगुणांचें वर्णन आहे. कित्येकांच्या मतें चक्रवाक पक्ष्यांच्या (कोक) परस्पर मिलनोत्सुकतेवरून हा ग्रंथ लिहिला आहे (दिवसा चक्रवाक नर व मादी एकत्र असून रात्रीं त्यांचा वियोग होतो अशी कविकल्पना आहे). 'कोकीं नाहीं ठेलें । भारत तरीं म्हणितलें ।' -ज्ञा १३.८३०. 'कोकशास्त्रींची अधिष्ठात्री ।' -एभा ११.५१९. 'नातरी कोकंशास्त्राचे पुस्तकांत । बांधिले जैसे वेदांत ।' कोकशाळा-स्त्री. नाटकशाळा. 'कोकशाला नाट- कशाला दासी यांचा घ्याल मुका ।' -राला ८५.

दाते शब्दकोश

कोकशाळा      

स्त्री.       नाटकशाळा : ‘कोकशाला नाटकशाला दासी यांचा घ्याल मुका ।’ - राला ८५.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खुंट

पु. १ खालीं राहिलेला भाग; खोड; कांड; सोट; बुंधा (झाड, झुडुप, शेपूट, केरसुणी, हजामत झाल्या नंतरचे केंस इ॰ चा). 'समूळ फोडियेले खुंट ।' -एरुस्व १०.७६. २ (मासे मारण्यासाठीं समुद्र किंवा नदी यांत) रोविलेला खांब, डांभ. ३ ज्यामध्यें फाळ बसवितात तें नांगराचें टोंक; खुळसा; कोळसा. ४ गाय, म्हैस यांच्या आचळांतून दुध येण्यास प्रति- बंध करणारा मळ. ५ गोफण, जाळें, शिंकें करण्याकरितां दोरीचे दोन पदर अथवा पेड तिरकस बाहेर ओढले जातात त्यापैकीं शेवटचे तंतू पुन्हां याच रीतीनें बाहेर काढले जाऊन वळले जातात, अशा शेवटच्या तंतूपैकीं प्रत्येकास खुंट म्हणतात. ६ दुध न देणारा जनावराचा सड; मुका, आंधळा सड. ७ पृथ्वीचे चार कोपरे, 'हिंदू देश कोण खुंट चारी ।' -तुगा ११८. 'चार खुंट जहागीर. ८ दणकट शरीराची गाय, म्हैस, जनावर किंवा स्त्री. 'काळवीट खुंट खरे, '-ऐपो २४२. ९ मध्यम आकाराचा केळीचा कोंब, खोड, मोना (मोठया केळीस चिकटलेला किंवा निराळा काढलेला). १० चार रस्त्यांचा चौक; चौहाट; अड्डा. ११ रस्त्याचें टोंक; शेवट. १२ (ल.) कुटुंब; घरदार; त्यापैकीं एक व्यक्ति; वंशाची शाखा; वंशांतील मूल; वंशाचें फल; संतान. १३ बुगडीचें मळसूत्र ज्यांतून जातें तो भाग; बुगडीचा, कुड्यांचा कानां- तील भाग. १४ अंगरख्याच्या बाहीच्या चुण्या जींत एकत्र करतात ती पट्टी अथवा गजासारखी शिवण. १५ (ल.) आधारस्तंभ; आश्रयदाता. १६ (आंधळ्या कोशिंबिरीच्या खेळांत) आंधळ्याचें सोंग घेणाराचें डोळे झांकणारा मुलगा; भोग्या. १७. (गो.) कुंपणाची काटी. १८ (कों.) तुकडा. १९ खोखोच्या खेळांतील न हालणारा गडी. 'होऊनियां खुंट बसा जपून.' -मोग- र्‍यांची कविता, मराठी तिसरें पुस्तक खेळ ५ पृ. ४८. २० (ढोरधंदा) अत्यंत आखूड सळ. २१ कांठ; कोपरा. 'खेटितां कुंप कांटी खुंट दरडी न पाहे ।' -तुगा ३४९. २२ स्वारी; उतारू (गाडीमधील). २३ खांब; मेढ. 'मग परमस्नेहाचा खुंट उभवोन । गरके घालिती त्यासवें ।' -नव २४.१५५. २४ जनावरास बांधण्यासाठीं जमीनींत गाडलेला लांकडी खुंटा; दांडकें. २५ वाघूर लावण्यासाठीं ठोकलेल्या लांकडाच्या मेढी; खुटला. -वि. (गो.) ताठ; नीट. [सं. कुठ्-कुंठ् = स्तम्भित होणें; प्रा. खुंट; तुल॰ का. कुंटु = लंगडा] (वाप्र.) ॰होणें-हट्ट धरून खुंटा सारखें ताठ व स्तब्ध बसणें. ॰ळणें-वाल इ॰ चा एक एक दाणा लावण्यासाठीं जमीनींत खुंटीनें, किंवा काठीनें टोचा, भोंक पाडणें, टोवणे. खुंटास खुंट उभा राहणें-होणें-एक जातो तोंच त्याच्या जागीं दुसरा येणें; गेलेल्याची जागा नवीन येणारानें भरून काढणें; खंड पडल्याची जागा भरून काढणें. खुंटास खुंट घेणें -जशास तसें करणें; उसनें फेडणें. खुंटासारखा उभा राहणें-असणें-खुंटणें-खुंटाप्रमाणें ताठरणें, ताठ उभा राहणें. ॰म्ह -आजा मेला नातु झाला खुंटास खुंट उभा राहिला. खुंटावरचा कावळा = घरदार, वतनवाडी, बायकामुलें नसलेला, वाटेल तेथें राहणारा माणूस. सामाशब्द ॰कन-कर-दिनीं दिशीं-क्रिवि. तीव्र व हलक्या आवाजानें; खाडदिशीं (दोन काष्ठांचा परस्परांना लागून होणारा शब्द) (क्रि॰ वाजणें). चुटकी, टाळी यांच्या होणार्‍या आवाजांप्रमाणें शब्द होऊन ॰कळी-स्त्री. बगलकळी; अंगरख्याच्या पाठीमागचा त्रिकोणी तुकडा. बगलेंतील पेशकळी आणि आगा असे दोन तुकडे व खुंट- कळी मिळून अंगरख्याची एक बाजू होते. ॰खुंटण-न. खुंट अर्थ १-२ पहा. ॰पान-न. (राजा.) केळीच्या गाभ्यापासून निध- णारें शेवटचें आणि कोंक्याच्या पूर्वीं येणारें आंखूड पान. ॰बरा-पु. खुंटी. खुंटा पहा. ॰बावली-स्त्री. १ (राजा.) एक प्रकारची बाहुली. २ उंचीवरचा पदार्थ काढण्यासाठीं चवड्यांवर उभें राहणें. (क्रि॰ करणें). अशा रीतीनें खुंटबावलीवर उभें राहणें. ३ (निंदेनें). काम न करणारी व खुंट्यासारखी तिष्ठत रहाणारी स्त्री. ॰बाळी-स्त्री. स्त्रियांचे एक कर्णभूषण. 'खुंटबाळ्या साध्या बाळ्या त्याजवर ।' -अफला ५५. ॰भाजी-स्त्री. विशेष विस्तार व्हावा म्हणून पुन्हां पुन्हां अग्रें खुडून राखिलेली भाजी; खुंटापासून किंवा मुळापासून निघालेला कोंब व त्याची भाजी. ॰रोग-पु १ पुष्कळ दिवस खुंटास बांधून ठेवल्यामुळें पशूंना येणारा रोडके- पणा किंवा होणारा आजार. २ (ल.) अशा बैठेपणापासून होणारा आजार, रोग. ॰रोगी -वि. खुंटरोग झालेला. खुंटला-पु. (व.) गाडीच्या दोन बाजूंस (आंतील सामान बाहेर पडूं नये म्हणून) लाविलेले खुंट प्रत्येकी. ॰सार-वि. (गो.) खुंटासारखा.

दाते शब्दकोश

खुंट      

पु.       १. गाय, म्हैस यांच्या आचळातून दूध येण्यास प्रतिबंध करणारा मळ. २. दूध न देणारा जनावराचा सड; मुका, आंधळा सड.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

मौन

न. गप्प किंवा स्तब्ध बसणें; न बोलणें; गुपचुप बसणें; मुकेपणा; निश्शब्दता; विवक्षित कालपर्यंत भाषण न करितां राहण्याचा जो व्यापार तो. 'नकळे हृदयीचें महिमान । जेथें उपनिषदा पडलें मौन । तेथेंही संचरले सज्जन । देहाभिमान सांडोनी । ' -एरुस्व १.३७. २ अबोलपणा; स्तब्धता; अनालापिता; अनाकापवृत्ति. -वि. मुका; न बोलणारा; स्तब्ध किंवा गपचूप बसणारा. [सं.] ॰मुद्रा-स्त्री. शांतपणाची, न बोलण्याची किंवा अबोलपणाची मुद्रा; अबोलपणानें राहण्याची प्रवृत्ति दर्शविणारी चेहऱ्याची ठेवण. [सं.] ॰व्रत-न. कांहीं मुदतीपर्यंत न बोलण्याचा नियम, नेम; कांहीं कालपर्यंत मौन वृत्तीनें राहण्याचें धरलेलें व्रत. (क्रि॰ धरणें.) [सं.] मौनावणें-क्रि. स्तब्ध राहणें; अबोलपणानें असणें; एखाद्यानें स्वतःची शांतवृत्ति राखणें; चुप बसणें, होणें. 'प्रेमें विकासलीं कमळें शुद्ध । गुंजावरती कृष्ण षट्पद । ऐकोनि गंधर्व जाहले स्तब्ध । सामवेद मौनावलें । ' -एरुस्व ३.६. 'स्वंयें शेष मौनावला स्थीर पाहे । ' -राम १५८. मौनी- वि. १ स्तब्ध; मौनव्रत घेतलेला; निश्शब्द; अबोल; अल्पभाषी; अनालापी; भाषणविरक्त. २ जगापासून पराड्मुख होऊन ज्यानें आपलें सर्व विकार (कामक्रोध इ॰) जिंकले आहेत असा; वन- वासी; अरण्यवासी; वानप्रस्थ; ऋषि (धार्मिक). मौन्य-न. १ स्तब्धता; मौन; शांतता. २ मुकेपणा; अबोलपणा; अनालापिता; अनालापवृत्ति. [सं. मौन] मौन्य(न) पणें-क्रिवि. स्तब्ध; मुकाट्यानें. 'बस तुं मौनपणें अथवा उगा । ' -वामनचरित्र १४ (नवनीत प्र. ११०)

दाते शब्दकोश

मोमा

पु. (महानु.) मुका; चुंबन 'नमस्कारीति मोमे देति ।' -पूजावसर. [ध्व.]

दाते शब्दकोश

मोना

मोना mōnā a (मौन S) Dumb. 2 Mute. 3 For figurative applications see मुका.

मोल्सवर्थ शब्दकोश

(सं) वि० मुका, मूक.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

मोनई, मोनवत

स्त्री. केळीच्या पानाचा शेंड्याकडचा भाग; पानाचे जे तान भाग करतात त्यांपैकीं शेवटचा, तिसरा भाग. आगोतली [सं. मौन; मोना = मुका]

दाते शब्दकोश

मोनजात

स्त्री. मुकें जनावर, पशु; मुका प्राणी. [सं. मौन + म. जात]

दाते शब्दकोश

मोनवा, मोना

पु. (कों.) १ केळीच्या खुंटाच्या किंवा ताड माड इ॰ च्या मध्यांतून जें नवीन (सुरळीसारखें) पान निघतें तें; सुयरा; कोंब. ह्याच अर्थी मुनवा असेंहि रूप आहे. २ केळीच्या खुंटांच्या मुळाशीं जो नवीन कोंब फुटतो तो किंवा असा कोंब तेथून काढून दुसरीकडे लाविलेला असतो तो. 'केळीचा मोना जोरांत आहे.' -वि. १ मुका; न बोलणारा. २ असंतोष इ॰ कारणांमुळें मुद्दाम बोलत नाहीं असा; निःशब्द. ३ (कु.) बागुल- बोवा. [सं. मौन] मोनेपण-(कों.) मुकेपणा. मोनाभक्ष्य-न. (कु.) अंडें.

दाते शब्दकोश

मुकामार or रा

मुकामार or रा mukāmāra or rā m (मुका & मारा) Destroying, injuring, tormenting, or teasing secretly, covertly, indirectly (as by charms and incantations, by language offensive to delicate feelings &c. &c.) 2 Any muffled or covered kind of beating or any punching or thumping so as to avoid the shed- ding of blood (and thus furnishing evidence or trace of one's deed).

मोल्सवर्थ शब्दकोश

मुकाणा

मुकाणा mukāṇā m (मुका & दाणा. A dumb or blind grain.) A grain (of corn or pulse generally) remaining hard and unaffected amongst grains puffed by steeping; a grain which will not swell and make लाही: also a quantity of such grains.

मोल्सवर्थ शब्दकोश

मुकाट्यां, मुकाट्यानीं, मुकाट्यानें

मुकाट्यां, मुकाट्यानीं, मुकाट्यानें mukāṭyā, mmukāṭyānī, mmukāṭyānēṃ ad (मुका) Silently, mutely, quietly, without uttering a syllable.

मोल्सवर्थ शब्दकोश

मुकें दंद

मुकें दंद mukē ndanda n (मुका & द्वंद्व) Silent hatred or spite; displeasure or dislike unexpressed; sullenness.

मोल्सवर्थ शब्दकोश

मुकें जनावर

मुकें जनावर mukē ñjanāvara n (मुका & P) A dumb creature, a brute, a beast.

मोल्सवर्थ शब्दकोश

मुकण

मुकण mukaṇa n (मुका & कण) A shrunken and light grain of any द्विदळ or pulse: also a quantity of such grains. 2 In some parts मुकण is Hard or unsolved grains after steeping or boiling.

मोल्सवर्थ शब्दकोश

मुकणा

मुकणा mukaṇā m (मुका & दाणा) A grain (of any pulse) not softened after steeping or boiling.

मोल्सवर्थ शब्दकोश

मुकणा-णा

नपु. १ निःसत्व व हलका असलेला कडधा- न्याचा दाणा; अशा दाण्याची रास. २ (क्व.) शिजल्यानंतर किंवा भिजल्यानंतर टणक राहिलेला दाणा. चाड; -वि. उदास; उदासीन वृत्तीचा [मुका + दाणा] ॰हत्ती-पु. १ बिन सुळ्याचा हत्ती; दंतहिन हत्ती. २ (ल.) ठेंगू व ढेरपोट्या इसम. मुकणी- तूर-स्त्री किडकी तूर; रोगट दाणा असल्यामुळें नासून जिची चांगली डाळ होत नाहीं अशी तूर.

दाते शब्दकोश

मुकणीतूर

मुकणीतूर mukaṇītūra f (मुका Unexpanded, and तूर) Blasted and withered तूर (Cytisus Cajan).

मोल्सवर्थ शब्दकोश

मूक

वि. मुका; वाचा नसलेला. [सं.] ॰गायन-गान- न. (ल.) अशक्य गोष्ट; अविद्यमान वस्तु; खपुष्प, शशश्रृंग इ॰ प्रमाणें. ॰त्व-न. मुकेपणा. [सं. मूक]

दाते शब्दकोश

ओष्ठ आखादणे      

मुका घेणे : ‘कोन्ही ओष्ठही नाचतां । मुख मुखी घालुनि आखा दिलें ।’ - भोल. ओष्ठपादी      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

पापा

पु. (बालभाषा) लहान मुलाचा मुका, चुंबन. [ध्व.]

दाते शब्दकोश

पु० लहान मुलाचा मुका.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

ताकट

वि. १ ताकमिश्रित; ताकाच्या अंशानें युक्त (लोणी, तूप). २ ताक पिणारा; ताकपिरा. 'शाहाणपणें वेद मुका । गोपिका त्या ताकटी ।' -तुगा ३२८१. [ताक]

दाते शब्दकोश

उगामुगा

उगामुगा ugāmugā ad decl (उगा & मुका, or उगा by redup. ) Silently and still; without speaking or moving. See उगा.

मोल्सवर्थ शब्दकोश

अ. (खा.) स्वस्थ; बोलल्यावांचून; गपचीप. [उगा + मुका]

दाते शब्दकोश

उमा      

पु.       मुका; चुंबन. (गो.) [क. उम्मु=चुंबन]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उमा

पु. (गो.) मुका; चुंबन. -ख्रिपु [ध्व. का. उम्मु = चुंबन]

दाते शब्दकोश

वाचक

पु. शब्द; भाषणाचा विभाग, तुकडा, अवयव; वाक्य; शब्दसमूह. -वि. १ दर्शक; दाखविणारा; अर्थाचा. उदा॰ काल-देश-स्थल-वृक्ष-अग्नि-वाचक. 'अन्य व्यावृत्ति सिद्ध । वाचक नव्हें ।' -अमृ ५.१३. २ वाचणारा. 'मुका होय वाचकाचा ।' -अमृ ६.६७. ३ महारांचा धर्मगुरु. -अस्पृ ४२. [सं. वच्] वाचणी-स्त्री. १ वांचन; लिहिलेल्या अक्षरांचें उच्चारण. २ वाचावयाचा धडा; पाठ. वाचणें-क्रि. लिहिलेलीं अक्षरें उच्चारणें; पठण करणें. (गो.) वाचप. [सं. वच् = बोलणें] वाचन-न. पठणक्रिया; वांचण्याची क्रिया; अभ्यास; पठण.

दाते शब्दकोश

विटाळसपण

ऋतु आला, रजोदर्शन झालें, मुका मुलगा झाला, पाळी आली, मासिक ऋतुदर्शन, बाहेरची झाली, तांब्या उपडा झाला, मासिक पाळी, 'बैठा' सत्याग्रह, हक्काची सुट्टी, अस्पर्श झाली, मासिक धर्म, बंधारा फुटला रजस्वला झाली, धरण फुटलें !

शब्दकौमुदी

सिद्ध

पु. १ ईश्वरप्रेरित ग्रंथकार, लेखक. उदा॰ व्यास. २ भूत-भविष्य-वर्तमानाचें ज्ञान असलेला; द्रष्टा; साधु. ३ आणि मादि सिद्धी प्राप्त झालेली; योगी. ४ मुक्त पुरुष. -दा ५.१०. १०. ५ एक उपदेवांचा वर्ग व त्यांतील व्यक्ति. 'येर सुरसिद्ध किन्नर ।' -ज्ञा ११.५०.६. ६ (ज्यो.) एकविसावा योग. [सं.] -वि. १ संपविलेलें; पुरें केलेलें. २ स्थापित केलेलें; सत्य म्हणून दाखवून दिलेलें; पुराव्यानें खरें केलेलें; प्रस्थापित. ३ निकाल केलेलें; तोडलेलें (भांडण, खटला) ४ बनविलेला; तयार केलेला; रचलेला (नियम, घटना, कायदा). ५ पकविलेलें; शिजविलेलें. (अन्न). 'जैसी सिद्धसाध्य भोजनीं । तृप्ती एकी ।' -ज्ञा ३. ३८. ६ घेण्याजोगें; तयार केलेलें (घोटून, द्रव्यें मिसळून- औषध). ७ तयार ठेवलेला, असलेला (कामास योजावयाचा माणूस, जनावर इ॰); मुद्दाम खोळंबला, वाट पहात अस- लेला; राखून ठेवलेला; सज्ज; तयार. ८ कुशल; निष्णात. ९ शाबूत; धडधाकट 'जंव हें सकळ सिद्ध आहे । हात चाला- वया पाय ।' -तुगा ७२९. १० प्रत्यक्ष; मूर्तिमंत 'जरी प्रकटे सिद्ध सरस्वती । तरी मुका आथी भारती ।' -ज्ञा १.७८.११ अकृत्रिम; सहज असणारा. 'नित्यसिद्ध परमशुद्ध माझें स्वरुप शुद्ध जाणती ।' -एभा ११.११२७. १२ पूर्णावस्था प्राप्त झालेले. 'वांचोनि कर्मारंभ उचित । न करितांचि कां सिद्धवत । -ज्ञा ३.४५. १३ (व्या.) गुणधर्मयुक्त; मूर्त. याच्या उलट साधित = अमूर्त. १४ (भाषा.) मूळ; अव्युत्पन्न (शब्द). याच्या उलट साधित शब्द. (समासांत) (सिद्ध शब्द उत्तरपदीं असतांना) -अनुभव-उपाधि-औषधी-क्रिया-न्याय-लोक- व्याकरण-स्वभाव-सिद्ध. ऊन प्रत्ययांत धातुसाधितांपुढे नेहेमीं हा शब्द येतो. उदा॰ करून-भोगून-शिकून सिद्ध. (वाप्र.) सर्वसिद्ध आणि चुलीस पोतेरें-तयारी होण्याच्या फार आधीं तयारी झाल्याचें सांगणाराबद्दल वापरतात. ॰तत्त्व-न. ब्रह्म. ॰ता-स्त्री. तयारी; सर्व सिद्ध असणें. ॰पादुका-स्त्रीअव. ज्या पायांत घातल्यानें वाटेल तिकडे जाण्याची शक्ति प्राप्त होते अशा पादुका. 'करवीर क्षेत्रीं दत्तात्रयें सिद्धपादुका ।' -सप्र ३.२०. ॰पुरुष-पु. १ अणिमादि सिद्धी प्राप्त झालेला; योगी; मांत्रिक. २ ब्रह्मस्वरूपीं विलीन झालेला. ॰प्रज्ञा-स्त्री. पूर्वजन्मांतली या जन्मीं मिळणारी बुद्धि. 'तिये सिद्धप्रज्ञेचेनि लाभे । मनाचि सारस्वतातें दुभे ।' -ज्ञा ६.४५४. ॰मौळी-वि. श्रेष्ठ सिद्ध पुरूष. 'जयजयाजी सिद्धमौळी ।' -गुच २०.२. [सिद्धी + मौली] ॰योग-पु. बाळहिरडे आणि जिरें यांचें चूर्ण. हें अतिसारांत तांदुळाच्या धुवणांतून घेतात. -योर १.४१५. ॰रस-पु. १ अमृत. 'कुंकमाचें भरींव । सिद्धरसाचें वोतींव ।' -ज्ञा ६.२५५. २ पारा. ॰लाडू-पु. संकष्टी चतुर्थींस कणकेच्या उकडीचे केलेले लाडू; मुटकुळीं. -ह ८.१६. ॰वट-पु. कामना पूर्ण करणारा वड. 'त्या सिद्धवटा सावित्री संपूर्ण । सीता देखून नवस करी ।' ॰वत्-क्रिवि. सिद्ध झाल्याप्रमाणें; गृहीत धरून. 'एका विष- याचा वाद पडल्यास इतर विषय सिद्धवत् घ्यावे लागतात.' -वि. (शाप.) गृहीत; खरें मानून चाललेलें. 'सिद्धवत् पदें.' (इं.) पॉस्चुलेट्स. [सं.] ॰साधक-पु. अव. एकाच कपटकारस्थानां- तील मंडळी. आपलें ऐक्य बाहेर समजूं न देतां, संगनमतानें दुसर्‍याला फसविण्यासाठी एकमेकांचा पुरस्कार करणारे (एकानें सिद्ध पुरुष बनावयाचें व दुसर्‍यानें त्याचें स्तोम माजवावयाचें) [सिद्ध + साधक] ॰साधन-न. १ सिद्धीचे अद्भुत चमत्कार दाखविणें; जादू; किमया. २ सिद्ध असलेली वस्तु पुन्हां सिद्ध करण्यास लागणें. तर्कशास्त्रांत हा एक दोष मानला जातो. 'तूं चोर आहेस असें चोरालाच म्हटलें असतां सिद्धसाधन दोष होतो.' ॰स्थाली-स्त्री. पाहिजे तें अन्न पाहिजे तेंव्हा विपुल निघावें अशी (कोणी सिद्ध पुरूषानें दिलेली) थाळी, पात्र. सिद्धणें- क्रि. १ सिद्ध करणें. 'तुलदाइयां बैलां सिद्धंवै ।' -पाटणशिलालेख शके ११२८. २ सिद्धीस जाणें 'मोक्षमूल कृपाजीवन । जेणें सिद्धे ।' -ज्ञाप्र ६१. सिद्धाई-स्त्री. १ चमत्कार; सिद्धसाधन. २ दैवी शक्ति प्राप्त होणें. सिद्धि पहा. सिद्धानुवाद-पु. सिद्ध गोष्टीचें वर्णन 'तरी सिद्धानुवाद लाहों । आवडी करुं ।' -अमृ १०.१२. [सिद्ध + अनुवाद] सिद्धान्न-न शिजणें, इ॰ संस्का- रानें सिद्ध झालेलें अन्न; तयार, खाण्यालायक अन्न [सिद्ध + अन्न] सिद्धार्थ-वि. १ ज्याचा उद्देश, मनोरथ सिद्धीस गेला आहे असा. २ गौतमबुद्ध [सिद्ध + अर्थ] सिद्धार्थी-पु. त्रेपन्नावा संवत्सर. सिद्धावस्था-स्त्री. जीवन्मुक्तावस्था; ब्राह्मी- स्थिति. -गीर ३६७. [सिद्ध + अवस्था] सिध्दाश्रम-पु. १ सिद्धावस्थेस पोंचलेल्या मुनीचा आश्चम. 'जावें सिद्धाश्रमातें ।' -रावि ७.१०. २ हिमालयांतील नरनारायणाश्रम. 'सिद्धाश्र- मासि पावे विश्व जया सिद्ध सादना गाते ।' -मो उद्योग ८.२७. [सिद्ध + आश्रम] सिद्धासन-न योगासनाचा एक प्रकार. कामवासना नाहींशी करण्याला याचा उपयोग होतो. -संयोग ३२३. [सिद्ध + आसन] सिद्धि-स्त्री. १ दैवी शक्ति; अणिमा इ॰ अष्टमहासिद्धी. 'देखें विषय हे तैसे । पावती सिद्धि चेनि मिषें ।' -ज्ञा २.३१३. २ आश्चयकारक, अपूर्व सामर्थ्य, कौशल्य ३ तपश्चर्येचें किंवा देवता भक्तीचें फल. ४ परिपूर्णता; समाप्ति; संपादन; उद्दिष्ट साध्य होणें. 'तें मनोरथ संगें नव्हे । एर्‍हवीं सिद्धि गेलेंचि आहे ।' -ज्ञा १३.१३३. ५ पुराव्यानें स्थापना, संस्थिति; प्रस्थापित होणें (मुद्दा, बाजू, आरोप इ॰). शाबिती. 'अंतःकरणही अनादि । प्रवाहरूपें त्याची सिद्धी ।' -एभा १३.२४५. ६ निर्णय; निकाल; तडजोड (भांडण, खटलें इ॰ ची). ७ घटना; बनावणी; मांडणी (कायदा, नियम, इ॰ ची). ८ सिद्धता; तयारी; (अन्न, औषध इ॰ ची) ९ सज्ज असणें (बदली किंवा इतर काम करण्यास माणूस, जनावर इ॰). १० कौशल्य; नैपुण्य; वाकबकारी (योगसामर्थ्य, किमया इ॰ त). ११ मुक्ति; ब्रह्मस्थिति; निर्वाण. 'तैसें न होणें निपजे । तें नैष्कर्म्य सिद्ध जाणिजे । सर्व सिद्धींत सहजें । परम हेंचि ।' -ज्ञा १८. ९८०. १२ यश; विजय, उत्कर्ष. १३ सामग्री; साहित्य. 'घरीं त्याच्या आहे सर्व सिद्धी ।' -रामदासी २.११८.१२ [सं.] सिद्धीस-आणणें-नेणें-पुरें करणें; तडीस नेणें; यशस्वी रीतीनें पुरें होणें, तडीस जाणें. ॰स्थान-न. मूळ ठिकाण.

दाते शब्दकोश

वडील

पु. बाप; तीर्थरूप. 'सकळांस आनंद जहाला । म्हणती आमुचा वडील आला ।' -दा ३.४.२३. -वि. १ वाड- वडील; बाप, आजा, पणजा इ॰ पूर्वज. 'जे हे वडिल सकल आपुले । वधावया दिठी सूदले ।' -ज्ञा १.२६४. २ वयानें मोठा. 'तयामाजीं तो मदन । हरीचा वडील नंदन ।' -कथा १.३.१३९. ३ विद्या, मान, इ॰नीं श्रेष्ठ, मोठा. ४ (सामा.) श्रेष्ठ; थोर. -ज्ञा ३.१५८. ५ विस्तृत; लांबलचक; मोठा. 'हा आहे वडील वृत्तांत ।' -वसा ७३. ६ फार; अतिशय. 'च्याऱ्ही दीस भरले वडील उछायें ।' -धवळे उ ४०. [सं. वृद्ध; प्रा. वड्डिअ; देप्रा. वड्डिल] ॰की-स्त्री. १ घराण्याचा कारभार पाहण्याचा अधिकार. पेशवाईंत देणें-यादीवर मालक पेशवे 'द्यावे' असा शेरा व वडिवकीचा अधिकार असलेले त्यांचे कारभारी 'देवावें' असा शेरा मारीत. -अधिकारयोग ५२-५३ पहा. २ वडीलपणा. ॰घराणें-न. कुटुंबातील मोठ्या माणसाचें (विभक्त झाल्यावर) घराणें; वडील भावाचें घर. ॰तक्त-न. वडील घराणें पहा. 'वडील तक्ताची जागा सबब समाईक जोशी याकडे ठेवली आहे.' -मसाप २.२.५८. ॰धारा-रें-पुन. (वडील आणि लहान) घराण्यात शिस्त राखण्याचा अधिकार असलेली व्यक्ति; घराण्यातील वडील माणूस. 'त्यांनी माझा मुका घेण्यास तोंड पुढें केलेंच तर मी वडीलधारा न ओळखतां एकदम त्यांच्या मिशा उपटी.' -बहक- लेली तरुणी ६. ॰परंपरा-स्त्री. पूर्वजांची, वडील माणसांची मालिक. ॰परंपरागत-वि. पूर्वजांपासून चालत आलेली; पिढी- जात. ॰मान-पु. वडीलकीचा मान; पिढीजाद हक्क. 'होळीपोळीचा वडीलमान मुकद्दमाकडे आहे.' वडलाई, वडलाबाई-स्त्री. आपल्या लहान भावंडांवर अधिकार गाजविणें (निंदार्थी उपयोग). वडलांचा अडकित्ता-पु. (ल.) सुपारी फोडण्यास घेतलेले दगड. वडलांचा आहणा-पु. जुनी म्हण. वडलावडली-वि. वाड- वडलांच्या वेळचें; परंपरागत; प्राचीन. -क्रिवि. वाडवडलापासून; वंशपरंपरा. 'वटलावडली भार असे जन पडती ।' -ऐपो २६९. वडलोपार्जित, वडिलार्जित-वि. वाडवडलांनी संपादिलेलें, ठेविलेलें (द्रव्य). [वडील + उपार्जित किंवा अर्जित] वड- लोंबा-पु. आपल्या लहान भावंडावर अधिकार गाजवणारा भुलगा; दादा. वडलोवडलीं-क्रिवि. वंशपरंपरागत. वडला- वडली पहा.

दाते शब्दकोश

अंड

न. १ अंडकुली; वृषण. २ कस्तुरीमृगाची कस्तुरी असलेली नाभी; नाफा. ३ कंवठ; अंडें पहा. ४ (व.) रुईचें, सरकी काढलेल्या कापसाचें आंख, [सं.] ॰काढणें-बडविणें- खच्ची करणें (पशूस). अंडाखालीं खाजवणें-हां जी हां जी करणें; खुशामत करणें; लोणी लावणें. ॰गाळणें १ खचणें; लट पटणें; गळाठणें. २ भीतीनें मागें घेणें, राहणें. ॰ब्रह्यांडास- कपाळीं-जाणें-तिरपीट उडणें; पांचावर धारण बसणें; धीर खचणें.॰म्हणजे उंबरफळ म्हणणें-अतिशय मद्दड किंवा मूर्ख असणें; अडाणी, दगड असणें. अंडाचें निवणें करून बसणें-अंडावर अंड घालून बसणें-अंडावर बुक्क्या मारणें-(व.) आळशीपणानें काम न करतां बसून राहाणें; स्वस्थ बसणें. अगदीं आळशी माणसाबद्दल वापरतात.अंडा- वरमूत गळणें-पडणें-(व.) १ अतिशय अशक्त व असहाय्य होणें; निर्बल, कमकुवत असणें. २ (ल.) मेंग्या, भागुबाई, षंढ होणें, असणें. -स येणें-वार्धक्यामुळें कमजोर व मलूल, कम. ताकद होणें; लुळाखुळा होणें. ॰-स लोणी लावणें-हां जी हां जी करणें; मिनतवारी करणें; कांहीं कार्य साधून घेण्यासाठीं फार आर्जव करणें; खुशामत करणें. (दुसर्‍याच्या) अंडानें विंचू मारणें-दुसर्‍याच्या नफानुकसानीची पर्वा न करतां त्याजकडून परभारें आपलें काम करून घेणें; पाहुण्याच्या हातानें साप मार- विणें. ॰उबारा-पु. (ल.) माया; गर्भ श्रीमंती. -वि. (नवीन घातलेल्या अंड्याच्या उबेप्रमाणें) उबट; किंचित गरम; कोंबट. ॰कटाह-पु. १ विश्व, ब्रह्यांड; खगोलाचा दृश्य गोलार्ध. २ ब्रह्मांडाभोंवतीं असलेलें अष्टधा प्रकृतीचें आवरण किंवा कवच. 'दुज्या पदें अंडकटाह फोडी ।' -(वामन) नवनीत १११. [अंड + कटाह = कढई] ॰कुली-कुलें-कूल-स्त्रीन. वृषण, अंड; (लहान मुलाचें). २ दोन्हीं वृषणें; सबंध आंड. ॰कोश-ष-पु. अंडावरचें आवरण आंतील वृषणासह; वृषण; अंडाशय. २ ब्रह्मांडकोशाचा संक्षेप. 'भागीरथी अंडकोश फोडून आली.' ॰गडी-१ (सोंगट्या इ॰ खेळ) हाताखालचा खेळगडी, पित्तू. २ पोटांतला गडी, एकादा गडी कमी असतां त्याच्याबद्दल आपणच खेळणें; मुका गडी. ३ मदतनीस; सोबती; अडगडी. ४ हस्तक; बगल्या; सर्व अर्थीं अंगगडी पहा. ॰गोल-गोलक-पु. वृषण; अंड. [सं.] ॰ज-वि. अंडापासून जन्मलेलें. २ अंड्यापासून उत्पन्न होणारा प्राणिवर्ग (पक्षी, सर्प; इ॰). -न. पक्ष्याचें पिल्लूं. 'तूं माझी पक्षिणी मी तुझें अंडज ।' -नामना ६२. [सं. अंड + ज] ॰त्रास-पु. (शब्दशः-अंडकुल्या वर उचलाया- जोगी अवस्था) अतिशय भीति; तिरपीठ; त्रेधा; पांचावर धारण. 'करी अंडत्रासें वरिकर दुजा, जो भय हरी ।' -मृत्तिका- भक्षण (वामन) ४. ॰दोरी-स्त्री. खोगीर आवळतांना जनाव राच्या अंडावरून आवळला जाणारा व पाठीमागें बांडगें यास बांधण्यांत येणारा पट्टा, मुठीची दोरी. ॰धरणी-स्त्री हां जी हां जी; मिन्नतवारी; खुशामत; शेंपूट घोळणी; अंडमळणी पहा. ॰पंचा-पु. अतिशय अरुंद पंचा. ॰बंध-पु. मंदिराच्या शिख- रावरील अंडाकार गोळा; घुमटी. ॰बुली-स्त्री. लहान मुलाच्या करदोड्याच्या किंवा घागर्‍यांच्या मधोमध घालण्यासाठीं (बुली- सारखा) केलेला सोन्याचा किंवा चांदीचा एक दागिना. ॰मळणी, ॰मळणी-चोंटमळणी-स्त्री. (कुण.) हां जी हां जी; हलकीं कामें करून किंवा फाजील स्तुति करून मर्जी संपादणें; खुशामत. [अंड + मळणें] ॰विकार-विकृति-पुस्त्री. अंडाला होणारा रोग. ॰वृद्धि-स्त्री. अंतर्गळ; अंड वाढणें (वाताच्या उपद्रवानें). ॰स्थिति-स्त्री. प्राणी अंड्यांत असण्याची अवस्था. -प्राणिमो १००.

दाते शब्दकोश

साखर

स्त्री. इतर पदार्थ गोड करण्यासाठीं वापरण्यांत येणारा एक पीठ, रेती यासारखा गोड पदार्थ; शर्करा; खांड. ऊंस, बीट इ॰ पासून ही तयार होते. 'साखर वाढिली रायपुरी ।' -मसाप २.१. [सं. शर्करा; प्रा. सक्करा; फा. शकर्; तुल॰ फ्रें. स्युक, सॅकरीन; इं. शुगर] म्ह॰ १ साखर (साखरेचा) खाणार त्यास देव देणार. २ साखर खाईल तर ढेकर देईल. ३ हातावर साखर आणि मानेवर कातर ( = मनांत कपट पण बाहेर वर्तन गोड). (वाप्र.) साखर खावप-(गो.) साखरपुडा करणें; लग्न ठर- विणें. साखर पेरणें-पसरणें-१ गोड गोड बोलून वश करण्याचा प्रयत्न करणें. २ तोंड देखल्या गोड बोलणें. साखरेची साल काढणें-अतिशय सूक्ष्म व बारीक परीक्षा, छाननी करणें; नसता कीस काढणें (निंदार्थीं वापरतात). 'पारिभाषिक शब्दाच्या बाबतींत इतकी घासाघीस करणें हें साखरेची साल काढण्यासारखें वेडेपणाचें आहे.' -(पावशे) मराठींतील अजा- गलांचें उच्चाटन. साखरेची साल काढणारा-अतिशय कडक, खाष्ट, बारकाव्याच्या दोषैकदृष्टी माणसाबद्दल निंदार्थीं वापरतात. साखरेनें तोंड भरणें, तोंड भरून साखर घालणें-चांगलें गोड बक्षीस देणें; तोंड गोड करणें. सामाशब्द. ॰किडा-पु. १ नुसत्या साखरेवर उपजीविका करणारा एक किडा. २ (ल.) ज्यास साखर फार आवडते असा माणूस. ॰गोटी-स्त्री. एक लहान पण गोड आंब्याची जात. ॰गोळा-पु. लाडू; पक्कान्न. 'इंग्रजी झाल्यापासून दारूगोळा तर गेलाच पण साखरगोळाही दुर्मिळ झाला.' -टि १.४००. ॰चुंबा-पु. चुंबन; गोड पापा. 'अरु- णानें नभःश्रीचा साखरचुंबा घेतला.' -विविधवृत्त खासअंक (स्त्री हृदय) १९२८. ॰चौथ-स्त्री. (महारी) भाद्रपद वद्य ४. -बदलापूर १७४. या दिवशीं चतुर्थीचा उपास पाळतात. ॰जांब- भ-पु. गुलाबी जांब. ॰झोंप-पु. अरुणोदयाच्या वेळची झोंप (ही फार सुखकर वाटते म्हणून नांव). 'लग्न म्हणजे संसाराचा सू्र्योदय होण्याच्या आधींची ही साखरझोंप होय.' -रंकाचें राज्य ७. ॰नातें-सक्करनातें पहा. ॰निंबी-लिंबीस्त्री. गोड लिंबाचें झाड. ॰निंबू-लिंबू-न. गोड लिंबू. हें फळ नारिंगाएवढें असून औषधी आहे. ॰निंबोळीस्त्री. एक लहान फळ. 'वरि मंडप साखरनिंबोळ्याचे घोंस पोसलो ।' -अमृत ३४. ॰पाड्या-पु. एक मुलांचा खेळ. 'विटीदांडू, चेंडूलगोर्‍या, लपंडाव, कावडी । साखरपाड्या, भोंवरें, चक्रगोट्या परवडी ।' होला ५४. साखर पेंढ्या?. ॰पाणी-न. साखर व पाणी. हें पाहुण्यास अतिथ्य म्हणून देत. १ लिंबाचें सरबत. २ (व्यापक) फराळाचे पदार्थ. ॰पारा-पु. तूपसाखर व रवा यांच्या वड्या. [फा. शकर्-पारा] ॰पुडा-पु. १ विवाहनिश्चयाच्या प्रसंगीं वधूच्या हातांत साख- रेचा पुडा देऊन इतरांस पानसुपारी वांटतात तो समारंभ; औप- चारिक वाङ्निश्चय. 'तिच्या सासरच्या मंडळींनीं मुलीला घरीं नेऊन साखरपुडाहि केला.' —स्वप ६५. २ अशा वेळीं देतात तो साखरेचा पुडा. ॰पुरी-स्त्री. भेजवानींत मुख्य पक्कान्न पुरी असेल तेव्हां योजतात (कारण तीबरोबर साखर वाढतात.) ॰पेंढ्या-भाद्रपद-आश्विन महिन्यांतील गवताच्या पेंढ्यानीं खेळा- वयाचा एक खेळ. ॰पोळी-स्त्री. पुरणासारखी साखर घालून तयार केलेली पोळी. -गृशि ३८५. ॰फुटाणा-पु. वेलदोड्याचा दाणा- फुटाणा इ॰ वर साखरेचा पाक चढवून करवंदाएवढी करतात ती गोळी; एक मिठाईचा पदार्थ. ॰फेणी-स्त्री. साखरेचा मोठा बत्तासा. 'साखरफेणी वाढिली ।' -मसाप २.१. ॰बोंड-न. पिठांत साखर घालून तळलेलें भजें. ॰भातपु. साखर व केशर घालून केलेला भात; केशरी भात. 'साखरभात वाढला बरा ।' -मसाप २.१. ॰मांडा-(कर्ना) मांडा (हा साखरेशीं खातात यावरून). ॰रंगी-वि. गुळी साखरेच्या रंगाचें (वस्त्र). ॰लाडू-पु. बरीचशी साखर घालून तयार केलेला पिठाचा लाडू. ॰वडी-ळी-स्त्री. एक गोड पक्वान्न. ॰सुपारीस्त्री. साखरपुडा पहा. 'साखरसुपारी वाटिती सुंदर नारी ।' -वसा ४६. साखरी गोडांबी-स्त्री. साखरेच्या पाकानें मढवून फुटाण्याप्रमाणें केलेली काजूची बी. साखरेचा-पु. (सांकेतिक) मुका; चुंबन. साखरेची सुरी-स्त्री. (ल.) वरून गोड पण मर्मभेदी भाषण, असें भाषण करणारा, गोड बोलून मान कापणारा मनुष्य. 'या चांडा- ळाच्या उरांत साखरेची सुरी भोंसकून केंसानेंच मान कापली पाहिजे.' -संभाजी साखरोळी-स्त्री. मोहन घालून केलेलें रवा किंवा तांदु- ळाच्या पिठाचें पुरीसारखें पक्कान्न. -गृशि ३९३. [साखर + पोळी]

दाते शब्दकोश

वाक्-ग्

स्त्री. वाणी; भाषण; आवाज; वाचा; बोलण्याची शक्ति किंवा इंद्रिय. [सं. वाक्] सामाशब्द-॰चतुष्टय-न. वाणीचे चार प्रकार -परा, पश्यंती, मध्यमा व वैखरी. ॰चातुर्यं-न. बोलण्यांतील कौशल्य; वक्तृत्व. ॰चापल्य-न. १ बोलण्यांतील अस्खलितपणा, चतुरता. २ बडबड; वटवट; भरमसाटपणें बोलणें; अतिशय बोलणें. ॰पटु-वि. बोलण्यांत कुशल, तरबेज; पंडित; वक्ता. ॰पंडित-पु. (उप) ताडकन् उत्तर देणारा मनुष्य; वाचा- कुशल; तडकाफडकी उत्तर देणारा. ॰पथ-पु. संभाषण; भाष- णाचा ओघ. 'नुसतीच शांतिकथा । आणिजेल कीर वाक्यपथा ।' -ज्ञा १३.११५५. ॰पाटव-न. बोलण्यांतील चातुर्य, कौशल्य; वक्तृत्व. ॰पांडित्य-न. बोलण्यांतील तत्परता; सद्यः-प्रत्युत्तर देण्याची कला. ॰पारुष्य-न. कठोर भाषण; खरडपट्टी; शिवी- गाळी; दुर्भाषण. ॰प्रचार-पु. भाषेंतील संप्रदाय; म्हणी; विशिष्ट शब्दसमूहास वारंवार उपयोजिल्यामुळें विशिष्ट अर्थ येण्याचा प्रकार; रूढी. ॰प्रतिबंध-पु. १ भाषणबंदी; बोलण्याचें थांबविणें; गप्प करणें, बसविणें; तोंड बंद करणें; कुंठित करणें. २ स्तब्धता; शांतता; निःशब्दता. ॰सरणी-स्त्री. बोलण्यांतील अस्खलितपणा; वाक्प्रवाह; शैली. ॰सिद्धि-स्त्री. शब्दांतील अमोघता; बोललेला शब्द खरा होण्याची शक्ति. ॰सुक्रुत-न. वचन. 'म्हणूनु वाक्सु- क्रुत दिधलें.' -मंगळवेढें लेख, ग्रंथमाला. ॰सृष्टि-स्त्री. बोलण्यां- तील चातुर्य, विविधता, कौशल्य. 'हे वाक्सृष्टि एके वेळे । देखतु माझे बुद्धीचे डोळे ।' -ज्ञा १४.२०. ॰स्तम्भ-पु. बोलण्यांत अडखळणें; थांबणें; वाग्रोध; गहिंवरामुळें वगैरे बोलतांना कुंठित होणें. वाग्जल्प-ना-पुस्त्री. वल्गना; बडबड; वटवट; लबलब; टकळी. ॰जाल-न. शब्दपांडित्य; बडबड; वटवट; पोकळ भाषण. 'वाग्निश्चयाचें वाग्जालिक । शब्द शास्त्रें सोडिलीं ।' -एरुस्व २.३७; -ज्ञा १३.२०. ॰दंड-पु. १ धमकी; खरडपट्टी शब्दताडन. २ वाचेचा संयम; भाषणावर नियंत्रण. ॰दत्त-वि. १ वाङ्निश्चय झालेला; शब्दांनीं दिलेला; विवाहवचन दिलेला. २ तोंडी वचन दिलेला; शब्दांनीं संमत केलेला; वचनांकित. ॰दान-न. १ वाङ्निश्चय; विवाहाचा करार; वरवधूयोजना. २ तोंडी करार; वचन. ॰दुष्ट-वि. १ अभद्र बोलणारा; अपशब्द बोलणारा. २ चुकीचें बोलणारा; चुकीची भाषा वापरणारा. ॰देवता-स्त्री. वाणीची देवता; सरस्वती. ॰दोष-पु. १ वाणीची अशुद्धता; चुकीचे उच्चार. २ अपशब्द; निंदा; अश्लीलता. ३ जिव्हाभ्रंश; चुकून शब्द बाहेर पडणें; वाक्स्खलन. ॰धज-ध्वज- पु. १ वाणीरूप पताका. २ प्रसिद्धी; दवंडी. 'स्वधर्मु वाग्ध्वजीं । बांधी नेणे ।' -ज्ञा १३.२०७. ॰नियम-ङ्नियम-पु. १ भाषेसंबंधीं, बोलण्यासंबंधीं नियम, विधि. २ भाषणबंदी; बोल- ण्यावरील नियंत्रण. ३ मौन; मूकत्व. 'वाङ्नियम सदैव विहित कां गमला । ' -मोसभा ३.७. ॰निरोध-ङ्निरोध-पु. १ बोलणें कुंठित करणें; गप्प करणें. २ वाचेवरील संयम; निःशब्दता; शांतता. ॰निश्चय-ङ्निश्चय-पु. लग्नाचा करार; वरवधूयोजना; वरवधू निश्चित करण्याचा विधि. ॰बाण-पु. कठोर शब्द; टोंच- णारें, बोंचणारे शब्द; कटु वाचा. 'लागति वाग्बाण काळजाला कीं ।' -मोभीष्म १०.८. ॰ब्रह्म-न. वेद. 'एकीं वाग्ब्रह्म अभ्यासें थोकडें केलें ।' -ज्ञा १२.११२. ॰भव-वि. वाचिक; वाचेपासून होणारें. 'वाचे वसे तें वाग्भव । तप जाणावें ।' -ज्ञा १७.२२३. ॰मय-ङ्मय-न. साहित्य; भाषेंतील ग्रंथसंपत्ति; गद्यपद्यादि ग्रंथसमूह. -वि. १ शब्दांस अनुसरून; मूळ वचनाप्रमाणें; वाणि- रूप. 'विवरण जाला वाङ्मय । संपूर्ण पर्याय नवमिचा ।' -ज्ञान- प्रपीप ७७९. २ वाचिक; शब्दमय. 'एवं शारीर जें तप । तयाचें दाविलें स्वरूप । आतां आईक निष्पाप । वाङ्मय तें ।' -ज्ञा १७.२१५. ॰मयी-स्त्री. वाणी; वकृत्त्व. 'जी एकमात्र भूषण पुरुषाप्रति तीहि वाङ्मयी देवी ।' -गोविंदाग्रज. ॰मात्रा-स्त्री. सेकंद; क्षण. ॰माधुर्य-न. वाणीची मोहकता, मधुरता, गोडी; रसाळपणा. वाग्मी-वि. १ बोलण्यांत पटाईत; चतुर; वक्ता. २ बोलघेवडा; बोलका; वटवट करणारा; वावदूक. ॰मुख-न. आरं- भीचे शब्द; सुरुवातीचें वाक्य. ॰युद्ध-न. वादविवाद; आवेश- युक्त व जोराची चर्चा; तोंडातोंडी. ॰रोध-पु. १ बोलण्याची मनाई; तोंड बंद पाडणें; गप्प करणें. २ स्तब्धता; मूकता. ॰वज्र- न. शब्दशस्त्र; वाचारूप हत्यार; शाप. ॰वल्लरा-वल्ली-विला- सिनी-स्त्री. सरस्वती; वाणीची देवता. ॰वाद-पु. वादविवाद; वितंडवाद. 'पाखंडाचे दरकुटे । मोडी वाग्वाद अव्हांटे ।' -ज्ञा १२.१४. ॰विलास-पु. १ शब्दकौतुक; शाब्दिक करमणूक; वाणीची क्रीडा; वाणीची प्रभाव. 'जैसें सरस्वतीपुढें मूढें बहुत । वाग्विलास दाविती ।' २ भाषाविनोद; शाब्दिक करमणूक. ॰वीर- शूर-वि. बोलण्यांत धीट, शूर, पटाईत. ॰वृद्धि-स्त्री. व्याख्यान- विस्तार; स्पष्टीकरण. 'आतां गीतार्थाची मुक्तमुदी । लावी माझिये वाग्वृद्धी ।' -ज्ञा १८.२७. ॰व्यय-पु. व्यर्थ बडबड; निरर्थंक भाषण, बोलणें; शब्दांची व्यर्थ काथ्याकूट. ॰व्यापार-पु. बोला- चाली; गप्पासप्पा; भाषण; परस्पर बोलणें, चालणें. 'तेध कें नाग्व्यापारा । अवकाशु असे ।' -ज्ञा १८.१.३०. ॰शून्य- सून्य-वि. वाचाहीन; मुका; बोलतां येत नाहीं असा. 'मज वाक्सुन्यास वजवावें ।' -दा १.२.२.

दाते शब्दकोश