मराठी बृहद्कोश

तेरा मराठी शब्दकोशांमधील ३,००,८७५ शब्दांचा एकत्रित संग्रह

शब्दार्थ

गोधूल, गोधूल मुहूर्त      

स्त्री.       १. सायंकाळचा (गुरे रानातून परत घरी येत असताना त्यांच्या चालण्याने उडालेली धूळ दिसते तेव्हाचा) काळ. २. सूर्यास्तापूर्वीची व नंतरची तीस पळे यामधील काळ. हा लग्नास शुभ मानतात. गोरज मुहूर्त.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गर्गाचार्याचा मुहूर्त

गर्गाचार्याचा मुहूर्त m The period of time from the fifth घटिका before sunrise till the third घटिका or till sunrise.

वझे शब्दकोश

पु. सूर्योदयापूर्वींच्या ५ व्या घटके पासून तिसर्‍या घटकेपर्यंतचा काल किंवा (सामा.) सूर्यो दयापर्यंतची वेळ. हा शुभ मुहूर्त असून गमनास योग्य मानतात उषःकाल; प्रभात. 'गर्गमुहूर्तें प्रयाण रामा श्रुतिवगानें गाइन मी ।'-आप ७२.

दाते शब्दकोश

गर्गाचार्याचा मुहूर्त      

सूर्योदयापूर्वीच्या पाचव्या घटकेपासून तिसऱ्या घटकेपर्यंतचा काल किंवा सूर्योदयापर्यंतची वेळ. हा शुभ मुहूर्त असून गमनास योग्य मानतात; उषःकाल; प्रभात : ‘गर्गमुहूर्ते प्रयाण रामा श्रुतिवर्गानें गाइन मी ।’ − आप ७२. गर्गोड      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

मुहूर्त

मुहूर्त m An hour of 48 minutes. Fig. The fit time.

वझे शब्दकोश

स्त्री. मूर्त; मूर्ति; शब्दाचा अपभ्रंश [सं. मूर्ति]

दाते शब्दकोश

(तं) पु० साडेतीन घटिका. २ नियमित वेळ, शुभ वेळ.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

संबंधित शब्द

लग्न

न. १ सोयरीक; शरीरसंबंध; विवाह. (क्रि॰ करणें. होणें). ३ मूहूर्तावर केलेला विवाहसमारंभ. (क्रि॰ लावणें; लागणें). ४ ऐक्य; साहचर्य. 'मग लग्नीं जेविं ॐकारु । बिंबींचि विलेसे ।' -ज्ञा ८.११६. ५ योग; मुहूर्त; समय. -ज्ञा १६.३०३. 'हनुमान् प्रभुला भेटे ज्या लग्नीं फार चारुतें ।' -मोरामायणें पृ. ६. ६ क्रांतिवृत्तांतील प्रत्येक राशीबरोबर एकमागून एक वर येणारा विषुववृत्ताचा विभाग; विवक्षित कालीं उदयाचलाशीं संलग्न असणारा राशि. ७ राशिचा उदयकाल; राशींत सूर्याचा गमनकाल (अहोरात्रांत एकंदर बारा राशींचीं बारा लग्नें होतात). उदा॰ मेष वृषभ लग्न, उदय-अस्त लग्न. -वि. १ संयुक्त; संबंद्ध; चिकट- लेलें. २ (ल.) निरत; आसक्त; तल्लीन. [सं.] (वाप्र.) ॰नाहणें-विवाहविधींत सांगितलेलीं नहाणीं व दुसरे संस्कार करून घेणें. सामाशब्द- ॰क-पु. हामीदार; जामीन. ॰कळा- स्त्री. लग्नसमारंभामध्यें नवरीच्या चेहऱ्यावर दिसणारें किंवा दिस- तेसें वाटणारें तेज, टवटवी. ॰कार्य-न. मंगल कार्य (लग्न, मुंज गर्भाधान इ.) [सं.] ॰कुंडली-स्त्री. जन्मकालीं पूर्वेकडे उदय पावलेल्या राशीचा दर्शक अंक पहिल्या घरांत मांडून तेथून डावी- कडे क्रमानें प्रत्येक घरांत तकदनुरोधानें राशि व त्या राशींचे ग्रह लिहून तयार केलेलें बारा घरांचें कोष्टक. [सं.] ॰गंडांत-पु. कर्क-सिंह, वृश्चिक-धनु व मीन-मेष या लग्नांच्या संधीची एक घटका (जसे, कर्काची शेवटची अर्धी व सिंहाची पहिली अर्धीं मिळून एक). [सं.] ॰गीत-न. विवाहगीत; मंगलाष्टक. [सं.] ॰गोष्ट- ष्टी-न. एव. अव. १ एखाद्याचा विवाह किंवा दुसरा एखादा इष्ट हेतु सिद्धीस जाण्याकरितां त्या मनुष्याची केलेली शिफारस, प्रशंसा. जसें.-'नोकरी नसली म्हणून काय झालें, तो मुलीवर पांचशेर सोनें घालील अशी आमची खात्रीच आहे' 'हा चांगला पतीचा माणूस आहे, याला हजार रुपये कर्जाऊ दिले तरी चिंता नाहीं इ॰ २ अनुरागाचीं पोकळ किंवा निरर्थक बोलणीं; मदतीचीं आश्वासनें. ॰घटि(ट)का-स्त्री. १ लग्न किंवा मुंज लावण्याकरितां ज्योति: शास्त्रांत शुभ म्हणून सांगतलेला मुहूर्त, वेळ. २ मुहूर्त साधण्या- करितां पाण्यांत टाकलेलें वेळ मापण्याचें अर्धगोलाकृति भांडें; घटि- पात्र. ३ असा निश्चित केलेला आणि साधलेला काल, मुहूर्त. ४ (ल.) अणीबाणीची वेळ, प्रसंग; कांहीं करून अडचण पार पाड- लीच पाहिजे अशी बेळ. 'ब्राह्मण तर जेवावयास बसले, घरांत तूप नाहीं अशी लग्नघटिका खोळंबली आहे म्हणून तुमच्याकडे धांवत तूप मागावयास आलों.' [सं. लग्नघटिका] ॰घर-न. १ ज्यामध्यें लग्नसमारंभ चालला आहे तें घर; जानोशाचें घर. २ (ल.) लग्नां- तल्याप्रमाणें माणसांनीं गजबजलेलें, फार गडबड चालली आहे असें घर. ३ लग्नासारखा भरमसाट खर्च चालला आहे, आनंदी- आनंद आहे असें घर. ॰चिटी-ठी-ठ्ठी-स्त्री. १ लग्नाचा परवाना (सरकारकडून शुद्रादिकांस मिळत असलेला). २ लग्नमुहूर्त ज्यांत आहे असा जोशानें केलेला कागद. ३ लग्न-मुंजीची आमंत्रण- पत्रिका; कुंकोत्री. ॰चु(चू)डा-पु. लग्नांत नवरीस व तिच्या बाजूच्या वऱ्हाडणींस बांगड्या इ॰ भरण्याचा विधि. हा घाण्याच्या पूर्वी होतो. ॰टका-क्का-पु. लग्न लागल्याबद्दल घेण्यांत येणारा सरकारी कर (हा शुद्राकडून घेण्यांत येई). ॰टीप-स्त्री. लग्नाच्या मूहूर्ताची यादी. ॰तीथ-स्त्री. ज्या तिथीस लग्नाचा मुहूर्त येतो ती तिथि. [सं. लग्नतिथि] ॰थर-पुन. लग्नासाठीं घेतलेलें कापड- चोपड. थर पहा. [दे.] ॰नक्षत्र-न. लग्नास शुभ असलेलें नक्षत्र. [सं.] ॰पत्रिका-स्त्री. वधूवरांच्या पत्रिकांवरून लग्नाचा शुभ मुहूर्त नक्की करून उभय कुलांचा उल्लेखासह तो ज्यावर लिहूल ठेवतात तो कागद. लग्नापूर्वी याची पूजा करतात. [सं.] ॰प्याला-पु. (तेली) नवऱ्यामुलानें लग्नासाठीं मुलीकडे जाण्याचा समारंभ; वरघोडा. -बदलापूर २६९. ॰भुज-पु. (ज्यो.) मेषादिक लग्नाचा भुज; चारकांड. ॰मंडप-पु. लग्नसमारंभा- करितां उभारलेला मांडव. [सं.] ॰मास-पु. लग्न करण्यास शुभ म्हणून सांगतलेला महिना; लग्नाचा मोसम. [सं.] ॰मुहूर्त-न. १ लग्नास शुभ अशी वेळ, मुहूर्त. याचे दिवा, गोधूल किंवा गोरज आणि रात्रौ असे तीन प्रकार आहेत. २ (लग्न आणि मुहूर्त = मोहतर, कमी दर्जाचें लग्न). लग्नकार्य पहा. [सं.] ॰वेळा- स्त्री. लग्नघटिका; लग्न लावण्याची वेळ. 'त्रिवेणीसंगमीं तिसी साधियेली लग्न वेळा ।' -मध्व ३९१. ॰शिष्टाई-स्त्री. लग्नाची मध्यस्थी; लग्नासंबंधीं बोलणें; लग्न जुळविणें. ॰शुद्धि-स्त्री. चिंतिल्या कार्याच्या आरंभाकरितां राशींची निर्दोषता, शुभता. [सं.] ॰सराई-स्त्री. लग्नाचा हंगाम, मोसम (मार्गशीर्षापासून ज्येष्ठ महिन्यापर्यंत). ॰साडा-न. १ लग्नांत वधूपक्षाकडून वराच्या आईस देण्यांत येणारें लुगडें. २ (कांहीं प्रांतांत) वराकडून वधूस देण्यांत येणारें उंची वस्त्र (पैठणी). ॰सोह(हा)ळा-पु. लग्न- समारंभांतील मेजवान्या, उत्सव इ॰; विवाहोत्सव. 'लग्नसोहळा ते वेळीं । चार दिवस जाहला ।' लग्नाऊ-वि. लग्नाच्या प्रसंगास उपयोगी, योग्य (अहेरी वस्त्र इ॰). लग्नाचा-वि. लग्नाच्या संबंधाचा (नवरा, बायको). ॰लग्नाक्षता-स्त्रीअव. लग्नांत वरानें व वधूनें परस्परांवर टाकलेले तांदूळ (सामा.) लग्नविधि. लग्नीक-वि. (गो.) बांधलेला. लग्नक पहा. 'कुटुंबाचा मालक आपल्या वहिवाटाचा हिशेष देण्यास लग्नीक आहे.' -गोमांतक रीतीभाति ११. [सं. लग्नक]

दाते शब्दकोश

मुहुर्त

पु. १ दोन घटकांचा काळ. २ (ल.) शुभ वेळा; योग्य समय; उपनयन, विवाह, गृहप्रवेश इ॰ कार्यांस इच्छित ठरविलेली शुभ वेळ. ३ कार्याचा प्रारंभ. ४ समय; ठरलेला वेळ. ५ (ल.) क्षण; अल्प काळ. ६ पुनर्विवाह; म्होतूर; पाट; न्हावेर (म्होतूर हें अपभ्रष्ट रूप रूढ आहे). [सं.] ॰करणें-१ चेत- विणें. -हंको २ (शुभ दिवशीं) आरंभ करणें. 'तरी क्षेत्रज्ञदशे । आत्मा मोटका पैसे । हें देह मी ऐसें । मुहूर्त करी ।' -ज्ञा १४. १४५. ॰पूजन-पूजा-नस्त्री. (लग्नादि विधींत) पत्रिकापूजन; लग्नमुहुर्त लिहिलेल्या पत्रिकेची पूजा. ॰मणि-णी-पु. वधूच्या गळ्यांत (शुभ मुहुर्तावर) बांधतात तो सर. ॰मेढ-स्त्री. लग्न- कार्याकरिता मांडव घालतांना किंवा घर बांधतांना शुभमुहूर्ता- वर रोविलेला पहिला स्तंभ-खांब. ॰मेढ रोवणें-एखादें काम सुरू करणें. साडेतीन मुहूर्त-पुअव. वर्षप्रतिपदा, अक्षयतृतीया व विजया दशमी हे तीन उत्कृष्ट मुहूर्त व कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा अर्धा म्हणजे सापवाद मुहूर्त मिळून साडेतीन मुहूर्त. कित्येक दसरा, दिवाळीचा पाडवा (कार्तिक शु॰ १), गुढी पाडवा. हे तीन व नागपंचमी (किंवा कांहींच्यामतें अक्षयतृतीया) अर्धा मिळून ३ ।। मुहूर्त मानितात.

दाते शब्दकोश

घबाड

न. १ एक शुभ मुहूर्त; सूर्यनक्षत्रापासून चंद्र- नक्षत्रापर्यंत मोजून येणार्‍या संख्येला तीन या संख्येनें गुणून गुणाकारांत चालू तिथि मिळवून आलेल्या संख्येला सातानीं भागून बाकी तीन उरल्यास त्या दिवशीं हा योग येतो असें समजतात. २ (सामा.) शुभ वेळ, मुहूर्त; सुयोग. 'त्याला जेव्हां अक- स्मात एवढें द्रव्य मिळालें त्याजवरून असें दिसतें कीं जातेसमयीं त्यास घबाड साधलें होतें.' ३ (ल.) आकस्मिक लाभ; अना- यासें झालेली मोठी द्रव्यप्राप्ति; लाट. (क्रि॰ मिळलें; साधणें). 'गाण विहंगमें गेला । घबाड अवचित पावला ।' -दावि २७४. 'मी एक पैशाचें घबाढ पाहतों आहें.' -मोर १२. ॰चूक- स्त्री. मोठी चूक; घोडचूक. ॰दैव-न. सुदैव; मोठें भाग्य. ॰माप-न. १ बाजारांत चालणार्‍या शिरस्त्याच्या मापापेक्षां, वजनापेक्षां मोठें माप, वजन. 'हे दहा पायली गहूं आहेत, परंतु त्या घबाड मापानें मोजले असतां आठ पायल्या भरतील.' २ मोठा आहार असणार्‍या माणसाचें पोट; कधीं तृप्त न होणारा कोठा. 'चार माणसांचें अन्न या तुझ्या घबाड मापास पाहिजे.' ॰मुहूर्त-पु. घबाड अर्थ १ पहा. ॰वशिला-पु. दांडगा वशिला; कार्य साधण्याकरितां मोठ्या माणसाकडून घातलेली गळ; ॰षष्ठी-स्त्री. ज्या षष्ठीला घबाड मुहूर्त येतो ती षष्ठी. [घबाड + षष्ठी]

दाते शब्दकोश

अभिजित्

न. २८ वें नक्षत्र. उत्तराषाढा नक्षत्राचा शेवटचा (चौथा) भाग व श्रवण नक्षत्राचा १५ वा अंश एवढ्या कालास अभिजित् नक्षत्र म्हणतात (इं. लायरा). या नक्षत्राचा क्रांतिवृत्ताशीं संबंध नाहीं. हें फारच उत्तरेस आहे. 'तो मी अभिजितू म्हणे हरी ।' -एभा १६.२२१. -पु १ दोन प्रहरचे बारा वाजण्याच्या पूर्वीं एक घटका व नंतर एक घटका मिळून दोन घटकांचा काळ; सुर्योदया- पासून आठवा मुहूर्त. 'वीरांच्या अभिमाना झाला अस्त । मध्यान्हीं आला आदित्य । मुहूर्तीं मुहूर्त अभिजित । समयो उचित लग्नाचा ।' -एरुस्व ७.६४. २ आगंतुक; आकस्मिक; अनपेक्षित ९ (पाहुणा, खर्च, एकादी गोष्ट). 'आम्हीं आहे खटलें यास पुरायाजोगी वर्षाचे खर्चाची बेगमी केली आहे, आतां मध्येंच अभिजित् एकादा खर्च उभा राहिल्यास पुरणार नाहीं. नवें घेतलें पाहिजे.' [सं.]

दाते शब्दकोश

आंतचाल

स्त्री. (ज्योतिष) एक मुहूर्त. सूर्य नक्षत्रापासून दिन नक्षत्रापर्यंत होणार्‍या नक्षत्रांपैकीं आरंभींच्या चार नक्षत्रांचा काल. हा मुहूर्त गाय, म्हैस नेण्या-आणण्यास शुभ मानतात. वरील एकं- दर नक्षत्रांत क्रमानें प्रथमच्या चार नक्षत्रांस आतंचालीचीं व त्या- पुढील तीन नक्षत्रांस बाहेर चालीचीं अशी संज्ञा आहे. [सं. अंतर् + चर्]

दाते शब्दकोश

आतचाल      

स्त्री.       (ज्यो.) एक मुहूर्त. सूर्य नक्षत्रापासून दिन नक्षत्रापर्यंत होणाऱ्या नक्षत्रांपैकी आरंभीच्या चार नक्षत्रांचा काल. हा मुहूर्त गाय, म्हैस नेण्या−आणण्यास शुभ मानतात. वरील एकंदर नक्षत्रांपैकी पहिल्या चार नक्षत्रांस आतचालीची व त्यापुढील तीन नक्षत्रांस बाहेरचालीची अशी संज्ञा आहे. [सं. अंतर्+चर्]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

घबाड      

न.       १. एक शुभ मुहूर्त. सूर्यनक्षत्रापासून चंद्रनक्षत्रापर्यंत मोजून येणाऱ्या संख्येला तीन या संख्येने गुणून गुणाकारात चालू तिथी मिळवून आलेल्या संख्येला सातानी भागून बाकी तीन उरल्यास त्या दिवशी हा योग येतो. २. (सामा.) शुभ वेळ; मुहूर्त; सुयोग. ३. (ल.) आकस्मित लाभ; अनायासे झालेली मोठी द्रव्यप्राप्ती; लाट. (क्रि. मिळणे, साधणे.) : ‘गाण विहंगमें गेला । घबाड अवचित पावला ।’ –दावि २७४.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

मोहतर, मोहतूर, मोहतीर

पु. १ मुहूर्त; अठ्ठेचाळीस मिनिटांचा काल, वेळ. २ (ल.) योग्य काल; शुभकाल; ऋतु, क्षण. ३ शूद्र स्त्रीचें, पुरुषाचें दुसरें लग्न, विधवाविवाह; पाट पहा. (क्रि॰ लावणें; लागणें). [मुहूर्त]

दाते शब्दकोश

निमेष

न. एक कालपरिमाण; क्षण. निमिष पहा. १८ निमेष = १ काष्ठा; २० काष्ठा = १ कला; २० कला = १ क्षण; १२ क्षण = १ मुहूर्त; ३० मुहूर्त = १ अहोरात्र. ॰पुट-न. (नृत्य) खालच्या व वरच्या पापण्या एकमेकीस लावणें. राग आला असतां हा अभि- नय करतात.

दाते शब्दकोश

प्रास्थानिक

न. प्रवासास जाण्याच्या वेळीं शुभ मुहूर्त नस- ल्यास प्रवासास निघण्यापूर्वीं तांदूळ, हळकुंड, पैसा इ॰ ची पुरचुंडी करून दुसर्‍याच्या घरीं ठेवितात ती. प्रस्थान पहा. [सं.] -वि. प्रस्थानासंबंधीं; गमनविषयक (मुहूर्त, साहित्य इ॰).

दाते शब्दकोश

साडे

पु. अव. साडा (अर्धा) याचें अनेकवचन. १ आणखी अर्धा याअर्थी तीनच्या वरच्या संख्यांना लावितात. उदा॰ साडेतीन-चार. २ शिवी, अपशब्द यापुढें आणखी, भरीस अर्धा या अर्थी वापरतात. उदा॰ साडेशिनळीचा-मात्रागमनी- हरामी. [स + अर्ध-प्रा. अड्ढ] ॰तीन-वि. ३ ।। संख्या. कांहीं प्रख्यात व्यक्ति व वस्तू यांचें प्रमाण-मापन दाखविणारी संख्या. उदा॰ साडेतीन तलवार (करी)-भालेकरी-लिहणार, शहणे, इ॰ ॰तीन पीठें-नअव. (देवीचीं) १ तुळजापूरची भवानी. २ कोल्हापूरची अंबाबाई. ३ माहूरची देवी व ३ ।। सप्तशृंगीची देवी. ॰तीन पोशाक-ख-वस्त्रे-पु. नअव. पूर्वीं दरबारांत अधिकार्‍यांना ३ ।। वस्त्रें देत असत ती. १ पागोटें. २ शालजोडी किंवा शेला. ३ पाय- जामा किंवा झगा करण्यासाठीं महामुदी या उंची वस्त्राचा तुकडा, व पटक्यासाठीं किनखापीचा अर्धा तुकडा (अर्धें ठाण). ॰तीन मुहूर्त-पुअव. कोणतेंहि काम करावयास दसरा, बलिप्रतिपदा व वर्षप्रतिपदा (पाडवा). हे तीन अल्यंत उत्कृष्ट मुहूर्त असून अक्षय्यतृतीया किंवा नागपंचमी हे साधारणपणें अर्धवट उत्कृष्ट मुहूर्त समजले जातात. १ चैत्र शु ।। १, २ आश्विन शु ।। १०, कार्तिक शु ।। १ व ३ ।। अक्षय्यतृतीया किंवा नागपंचमी. ॰तीन राव-पुअव. (पेशवाईंतील) १ मुरारराव घोरपडे, २ भवानराव प्रतिनिधि, ३ गोपाळराव पटवर्धन व ३ ।। थोरले माधवराव पेशवे. ॰तीन शहाणे-१ (पेशवाईंतील) १ सखारामबापु बोकील, २ विठ्ठलसुंदर, ३ देवाजीपंत चोरघोडे व ३ ।। नाना फड- णीस. २ (ल.) दीडशाहणा; मूर्ख व बढाईखोर. ॰पंधरें- पन्हरें-न. (१५ ।।) सोनें अस्सल, उत्कृष्ट. १५ ।। रु. भावावरून नांव पडलेसें दिसतें. 'कां साडेपंधरया रजतवाणी । तैशीं स्तुतीची बोलणीं ।' -ज्ञा १०.१५. 'साडे पन्हरेयाचीं सरळें देवो लेइले हातीं ।' -धवळे उ १९. ॰भावार्थी-वि. (उप. निंदाव्यंजक) वरून भोळा पण आंतून पक्का लबाड; बकवृत्ति माणूस. ॰शंभर- वि. (अशुद्ध, अशिष्ट प्रयोग) १०० ।।. ॰सातकी-स्त्री. साडे- सात बिघे जमीन. ॰साती-सातीचा फेरा-स्त्रीपु. १ एखा- द्याची जन्मराशी व तिची मागची आणि पुढची राशी या तीन राशी कमण्याला शनिग्रहाला लागणारा साडेसात वर्षांचा काळ. २ (हा काळ कष्टाचा जातो यावरून ल.) आपत्काल; दुर्दैवाचा फेरा. (क्रि॰ येणें; लागणें).

दाते शब्दकोश

उडदांमुहूर्त

पु. लग्न, मुंज वगैरे समारंभांत आरंभी सुवासिनी उडीद दळण्याचा जो समांरभ करतात तो; उडीद भरण्याचा मुहूर्त, काळ. [उडीद + मुहूर्त]

दाते शब्दकोश

शिव

पु. १ त्रिमूर्तींतील एक देव; संहारकर्त्री देवता; शंकर; महादेव; महेश्वर. २ चैतन्यच आत्मा; जीवापासून निराळें चित्तत्त्व. ३ सत्तावीस योगांपैकीं एकविसावा योग. ४ मोक्ष. ५ (द्विरुक्तीनें शिवशिव) तिरस्कार, नापसंति, खेद, उद्वेगवाचक उद्गार. 'ऐकोनि कृष्ण शिव, शिव ऐसें आधीं म्हणोगि मग हांसे ।' -मोकर्ण ४६. २५. -न. मंगल; कल्याण. -वि. मंगलकारक; कल्याणदायक; सुखदायक. शिवशिव करणें, शिवाशिवा-तिरस्कार, उद्वेग दाखविणें. (क्रि॰ करणें; म्हणणें). शिवावरचा बेल उचलणें- काढणें-घेणें-एक प्रकारचा शपथविधि; शपथ घेणें. शिवा- वरचा बेल चुकेल पण हें चुकणार नाहीं-एखादी न टळणारी गोष्ट दर्शविण्यास योजतात. ॰कळ-स्त्री. (कर.) संचार; अंगांत येणें. ॰कळा-स्त्री. (कर.) राग. ॰चतुर्दशी-स्त्री. माघवद्य चतुर्दशी; महाशिवरात्र. ॰दिनी-स्त्री. एकादशी; शिवरात्र. ॰दीक्षा-स्त्री. (थट्टेनें) अंगाला राख फांसणें, रुद्राक्ष घालणें वगैरे शिवोपासोनेचा व तपस्येचा अंगीकार करणें. (क्रि॰ घेणें). ॰धातु-पु. गोमेद. ॰नद-पु. एका नदीचें नांव. निर्माल्य-नपु. १ शिवदेवतेस वाहिलेलीं फुलें वगैरे. २ शिवस्त; स्वतः न वापरावयाची, घ्यावयाची, उपभोगावयाची दुसऱ्याची वस्तु. याचा शपथेसारखा प्रयोग होतो. ॰पंचाक्षरी मंत्र-पु. ॐ नमः शिवाय हा मंत्र. ॰पदी-स्त्री. १ ज्यामध्यें कल्याणमय शब्द आहेत असें वाङ्मय. २ शंकराच्या स्तुतीपर पवें. ३ शिवाजी महाराजांवर रचलेलीं पदें. ॰पुरी-स्त्री. १ वाराणशी; बनारस; काशी. ॰भैरव-पु. (राग) एक राग. यांत षड्ज, कोमल ऋषभ, तीव्र गांधार, कोमल मध्यम, पंचम, कोमल धैवत, तीव्र निषाद हे स्वर लागतात. पण अवरोहांत निषाद व गांधार हे कोमल देण्याचा प्रघात आहे. जाति संपूर्ण-संपूर्ण, वादी धैवत. संवादी ऋषभ. गानसमय प्रातःकाल. ॰मुहूर्त-पु. सूर्योदयाबरोबरचा पहिला मुहूर्त, साडेतीन घटकांचा काल. ॰योग-पु. सत्तावीस योगांपैकीं एकविसावा योग. ॰रात्र-रात्रि-स्त्री. प्रत्येक महि- न्याची वद्य चतुर्दशी. विशेषेंकरून माघ वद्य चतुर्दशी. ॰रात्र वात-स्त्री. कापसाच्या सुताची १८७।। फेरे अथवा ३७५ पदरांची वात. ही दर शिवरात्रीस लावतात. ॰लग्न-न. (शुभ मुहूर्त) दसरा. [सीमोल्लंघन अप.] ॰लिंग-न. शंकराचें, महा- देवाचें लिंग, पिंडी, प्रतिमा. ॰शक्ति-स्त्री. पुरुषप्रकृति. 'तेवी शिवशक्ति विवंचना तुज मी सांगेन संपूर्ण ।' -एभा २४. ६९. ॰शरणार्थ-पु. लिंगायत लोक नमस्कार शब्दाऐवजीं याचा उपयोग करितात. ॰स्व-न. शिवास अर्पण केलेलें; ज्याचा अपहार करणें पातक होय असें द्रव्य वगैरे. शिवा-स्त्री. १ पार्वती. 'शिवा भवानी रुद्राणी । कां न पावतीच कोणी ।' -एरुस्व ५.७४. २ कोल्ही. शिवात्मा-पु. परमात्मा; जीवा- त्म्याहून निराळा जो आत्मा तो. शिवापुढचा-वि. १ नंदी; नंदीबैल; बैल. २ (ल.) निर्बुद्ध; दगड; मठ्ठ. शिवामूठ-स्त्री. १ विवाह झाल्यापासून पांच वर्षेपर्यंत श्रावणांतील दर सोमवारीं नववधूनें महादेवास अनुक्रमें तीळ, तांदुळ, सातु, मुगाची डाळ व गहूं यांची मूठ वहावयाची असते ती. २ शिवामूठ वहावयाचा विधि, व्रत. शिवालय-न. १ महादेवाचें मंदिर, देवालय. २ स्मशान.

दाते शब्दकोश

आभारण      

न.       १. राजाच्या परिवारातले महत्त्वाचे लोक : ‘मग राजा शंकरदेव राणा महाराज (महाराजांनी) आपले पुरोहित प्रधान पंडित समस्त आभारणा पाचारिले व मुहूर्त पाहून मड्डिपाल देवराणा राजीं बसविला.’ − विंब २. २. पालनपोषणाची जबाबदारी : ‘तयां पांडवांचे आभारण घातलें : कवणा सांघे?’ − उगी १७(३)११६.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अर्ध

न. १ एका पदार्थाचे जे दोन सम विभाग ते प्रत्येकीं; निम्मा तुकडा, अर्धा भाग. २ (समांसात) अर्धा; निम्मा. उ॰ अर्धकोस, अर्धघटिका इ. [सं.] ०कच्चा वि. १ अर्धामुर्धा पिकलेला, तयार झालेला किंवा शिजलेला (फल, धान्य, विद्या, अन्न); अर्धामुर्धा; अपूर्ण; अपुरा. २ पुरें शेवटास न जातां अर्धवट राहिलेलें (काम). ०कंदरा पु. लगामाचा प्रकार. -अश्वप १८५. [सं. अर्ध + कंधरा ०काची वि. अर्धीकच्ची. 'एक अर्धकाचीं तुरटें ।' -एरुस्व १४. १०६. ०कोर स्री. अर्धा चतकोर; (गो.) नितकोर (भाकर). ०घबाड पु.न. एक शुभ मुहूर्त, परंतु घबाडापेक्षां कमी महत्वाचा. घबाड पहा. ०चंद्र पु. १ वद्य किंवा शुध्द अष्टमीचा चंद्र; अर्धा चंद्र. २ अर्ध चंद्राच्या आकारासारखी वस्तु. ३ (गचांडी देतांना हाताचा आकार अर्धचंद्रासारखा होतो म्हणून;) हकालपट्टी. 'या अष्ट मीच्या चंद्राच्या मुहूर्तावर मलाहि अर्धचंद्र मिळाला.' -मूकनायक. 'आणिक म्हणे भृत्यजना । यासी अर्धचंद्राची द्यावी दक्षिणा । देशाबाहेरी या ब्राम्हणा । घाला वहिले ।।' -कथा ५.११.७१. (हा प्रयोग मूळ संस्कृतांतच आहे.) (क्रि॰ देणें, मारणे, मिळणें, इ०). ४ (नृत्य) हाताचीं चार बोटें एकमेकांस लागून ताठ ठेवणें व आंगठा दूर पसरून ठेवणें. ५ अर्धचंद्राकृति (फाळाचा) बाण. ०चंद्री, तंद्री स्री. अर्धवट झोंप, मूर्च्छा. 'बाण भेदिला जिव्हारीं । निदूरथ पडिला धरणीवरी । डोळां लागली अर्धचंद्री । जेवीं खेचरी योगिया ।' -एरुस्व ९.३२. ०चरतीय, जरतीय-वि. अर्धे किंवा अर्धवट काम; अनिश्चित स्वरूपाचें काम; मोघम किंवा अनिश्चित भाषण. 'येतो म्हण किंवा नाहीं म्हण- उगीच अर्धचरतीय सांगूं नको.' [सं. अर्ध + जरा-जरित किंवा जर्ज- रित; अर्ध + चरित]. ०जेवा वि. अर्धवट जेवलेला; अर्ध्या जेवणांतून उठलेला; अर्धपोटी. [अर्ध + जिम्]. ०देशी कापड न. विदेशी सुताचें, हिंदुस्थानांत विणलेले कापड. ०धणी वि. अर्धतृप्त; अर्ध- पोटीं. 'भलतें करीं परी अर्धधणीं । नुठीं कदा ।' -ज्ञा १६.३०. ०नार स्री. स्रीजातींतील षंढ; षंढा; अर्धवट स्री; स्रीधर्मांपैकीं कांहीं बाबतींत उणीव असलेली स्री. [सं. अर्ध + नारी]. ०नारीनटे- श्वर पु. १ अर्धें आपलें (पुरुषांचे) व अर्धें पार्वतीचें (स्रीचें) असें शंकराचें रूप; अर्धनारीश्वर; शिवशक्ति. मोहिनीराज हें विष्णूचें रूप (यांत अर्धा विष्णु व अर्धी अमृतकलश घेतलेली मोहिनी असें अर्धनारीश्वर स्वरूप असतें. नेवासें येथें असा देव आहे). २ अर्धा पुरुष व अर्धी स्री एकत्र. 'अर्धनारीनटेश्वरी । जो पुरुष तोचि नारी ।' -ज्ञा ९.२७०; -एभा ११.३६९. ३ प्रकृतिपुरुष; शिव- शक्ति. 'प्रकृतिपुरुष शिवशक्ति । अर्धनारीनटेश्वर म्हणती ।' -दा २०.३.१०. ०नारीश्वर अर्धनारीनटेश्वर पहा. ०निकुट्टक (अंगहार) -पु. (नृत्य) उजवा पाय नूपुर करून मग तीचारी सोडून भराभर आक्षिप्तचारी त्याच पायानें करणें. नंतर दोन्ही हात फेंकून त्रिक वळविणें व शेवटीं निकुट्टक व कटिचिन्ह हीं करणें. ०निकुट्टित (करण)-न. (नृत्य) खांदा आकुंचित करून त्यावर त्या बाजूचा हात ठेवून बोटें हळु हळु ठोकणें व दुसरा हात आपल्या तोंडासमोर बोटें करुनं ठेवणे. उजवा पाय कुट्टित करणें व डावा पाय स्तब्ध ठेवणें. ०पड-डा वि. अर्धवट पडलेलें-केलेलें-बजा-वलेलें-म्हटलेले; अपुरें साधलेलें, बजावलेले; वरकरणीपणानें केलेलें. (सामा.) अपुरें; वरवर; सरासरी. [अर्ध + पडणें]. ०पद्मासन न. डाव्या पायाची मांडी मोडून बसणें व उजवा पाय मोडून डाव्या पायावर ठेवणें. ०पक्षकीटक पु. (प्राणी.) एक कीटक- वर्ग. यांतील किड्यांचे पुढील अर्धे पंख शृंगी द्रव्यानें कठिण झालेले असतात म्हणून यास हें नांव आहे. -प्राणिमो १०३. ०पिका वि. अर्धवट पिकलेला (फळ वगैरे). [अर्ध + पिकणें]. ०पुडी-वि. अर्धवट; अल्पायुषी (अर्धें झोपेंत जातें म्हणून). 'थोडें जिणें अर्धपुडी काया । गर्व करिती रडाया ।' -दा १८.५.३५. [सं. अर्ध + पुट ?]. ०पोटीं-क्रिवि. अर्धेंच पोट भरलें असतां; पूर्ण न जेवतां; भूक पुरी न भागतां. (क्रि॰ जेवणें, जाणें, असणें, उठणें, राहणें). ०फोड अर्धवट फोडलेलीं लांकडें; ठोकळे. (बुरूड) बांबू उभा चिरून केलेले दोन भाग. ०बाट-गा वि. १ अर्धवट संस्कार झालेला (वाटण्याचा-कुटण्याचा-शिजण्याचा इ०); अर्धवट बन- विलेला; अर्धबोबडा. २ अर्धवट भ्रष्ट झालेला, बाटलेला; जातींतून अर्धवट बाहेर पडलेला; वाळींत टाकलेला. ३ ज्याचा बाप एका जातीचा व आई दुसर्‍या जातीची आहे असा. ४ अर्धवट किंवा वरवर ज्याला माहिती-परिचय आहे असा. ५ (ल.) अर्धवट शिकलेला (विद्यार्थी, कारागीर, पंडित इ०). कडेचा पोहणारा; अतज्ज्ञ. -क्रिवि. अर्धेंमुर्धें करून; अपुरेपणानें; उणेंपणानें. [अर्ध + भ्रष्ट = बाट]. ०बाटे पाऊण मराठे न. १ संकर; पंचमिसळ; खिचडी; धेडगुजरी (भाषा, काम, पदार्थ); बारभाई; बजबजपुरी. २ (ल.) उचछृंखलपणाची वागणूक-आचार. ०बिंब न. १ अर्ध वर्तुळ आणि त्यावरील टिंब. २ (ल.) ओंकाराची-प्रणवाची अर्ध मात्रा. 'जंव मात्रात्रय मावळे । अर्धबिंबीं । '-ज्ञा ८.११५. ०बुकट-बुकुट वि. (राजापुरी) अर्धवट पहा. [अर्ध + बुकटी]. ०बोबडा वि. १ अर्धवट कुटलेलें-चेललेलें-वाटलेलें (मिरे वगैरे). २ शिजतांना अर्धवट राहिलेला-(भात-डाळ इ॰ पदार्थ); मऊ न झालेला, बोटचेपा. ३ (ल.) कसें तरी ओबडधोबडपणें केलेलें काम; बिगारी-वेठ काम. ०भरपोशाख पु. भर पोशाखांतील फक्त्त कांहीं विशिष्ट वस्तुयुक्त मामुली पोशाख. -बडोदें खानगी खातें नियम नोकर पोशाख पा. ३. ०मत्तल्लि(करण) न. (नृत्य) पाय अडखळल्यासारखें करून मागें टाकणें, डावा हात रेचित करणें व उजवा हात कमरेवर ठेवणें. ०मत्स्येंद्रासन न. योगासनांतील एक प्रकार. -संपूर्ण योगाशास्र पा. ३२५. ०मागधी स्री. एक प्राकृत भाषा. जैन धार्मिक ग्रंथ या भाषेंत लिहिले आहेत. हिलाच भारतीय वैय्याकरण आर्षभाषा म्हणत. शौरसेनी व मागधी भाषा प्रदेशांच्यामध्यें अर्धमागधीभाषाप्रदेश होता (म्हणजे हल्लींचा प्रदेश अयोध्या). त्याच्या दक्षिणेकडील मराठी भाषा कांहीं अंशीं या भाषेवरून बनली आहे. प्रचारकाल ख्रि. पू. ४ थ्या शतकाचा शेवट -ज्ञाको अ ४७५. ०मांडणी स्री. अर्धी मांडणी पहा. ०मात्रा स्री. १ ओंकारांतील अर्धीं मात्रा. 'अर्धमात्रापर तें न सांपडे ।' -परमा २.१३. २ एका वेळीं घ्यावयाच्या औषधाच्या प्रमा- णाच्या अर्ध्या इतकें. 'अर्धमात्रा रस देऊनिया जीव । रोग दूरी सर्व करिताती ।' -ब २२२.१; ३ (ल.) औषध; रसायनगुटिका. 'पंचगव्य तेंचि जाण अर्धमात्रा । -ब १०४.५. ४ किंचित्; थोडें. 'हे कृष्णकथा अलौकिक । महादोषासी दाहक । भवरोगासी छेदक । अर्धमात्रा सेविलिया ।' -एरुस्व १८.७५. ५ व्यंजन; अर्धस्वर. ६ संगीतांत स्वर घेतांना घेतलेली विश्रांति; एका मात्रेचा अर्धा काल. ०मुकुल(दृष्टी) स्री. (नृत्य) अर्धवट डोळा उघडणें; पापण्यांचे केंस एकमेकांस लागतील इतके जवळ आणणें. आल्हादकारक सुगंध, सुखस्पर्श ह्या गोष्टी हा अभिनय दर्शवितो. [सं. मुकुल = किंचित् उमललेली कळी]. ०मेला वि. १ अर्धवट मेलेला; थोडासा जिवंत राहिलेला. २ जर्जर; मृतप्राय; व्याकुळ. 'ती भुकेने अर्धमेली झाली आहे.' -पाव्ह २३. ०रथी वि. (रथांत बसून) एका रथ्यासह- वर्तमानहि युद्ध करतां येत नाहीं. तो; रथीहून अल्पवळी. (ल.) कच्चा योद्धा. 'अतिरथ नव्हे रथ नव्हे हा (कर्ण) केवळ अर्धरथचि अविदग्ध ।' -मोउद्योग १२.५८. [सं.]. ०रात्र स्री. मध्यरात्र. ०रेचित(करण) न. (नृत्य) उजवा हात तोंडासमोर नेऊन डोक्या- वर उचलून धरणें व उजव्या पायाकडील भाग किंचित वांकवून तो सूची करून जमिनीवर हळु हळु आपटणें. [सं.] ०रेचित(संयुक्त हस्त)-पु. (नृत्य) डावा हात चतुर व उजवा हात रेचित करणें. [सं.] ०लंड-मर्धलंड-पु. अधलंड, अधलंडमधलंड पहा. ०वट क्रिवि. १ अर्धेंपणानें; अपुरेपणानें; उणीव असलेल्या रीतीनें; वरवर; वरकरणीः मोघमपणें. 'काम पुरतें करावें, अर्ध- वट ठेवूं नये.' [सं. अर्ध + वत्] २ अर्ध्यांत; मध्यभागी; दोन्ही टोंकाच्या मध्यें.-वि. १ अधलामधला; अपुरा; २ (ल.) वेडा; अप्रबुद्ध; कमी समजूत असलेला. 'हा पुरता वेडा नव्हे पुरता शाहणा नव्हे, अर्धवट आहे.' ३ अर्धें वय झालेला; तरणा नव्हे. 'आम्ही म्हैस घेतली ती तरणी नाहीं, अर्धवट आहे.' ०वर्तुल-ळ-न. (गणित.) अर्धें वर्तुळ; वर्तुळाचा निम्मा भाग; व्यास आणि त्यानें कापलेला परिघाचा भाग यांच्यामध्यें जो वर्तु- लाचा भाग सांपडतो तो. -महमा ६. (इं.) सेमि-सर्कल. -विराम- पु. १ अर्धीं विश्रांति; पूर्ण विरामापेक्षां कमी थांबण्याची जागा. २ ती दर्शविण्याचें चिन्ह. ०वेडा वि. वेसडर; मुर्ख; अर्धवट. ०शिजा वि. अर्धवट शिजलेला; पुरता न शिजलेला (भात वगैरे) ०शिशी स्री. अर्धें कपाळ दुखण्याचा रोग; यानें अर्ध्या मस्तकाकडील मानेचा भाग, भुंवई, आंख, कान, डोळा व अर्धें कपाळ-या ठिकाणीं तर- वारीच्या आघातासारखें दुःख होतें. यावर गोकर्णाचें मूळ व फळ पाण्यांत वांटून त्याचें नस्य करावें अथवा मूळ कानांत बांधावें. [सं. अर्ध + शीर्ष] ०सम(वृत्त)-न. ज्यांत दोन दोन उ॰ पहिला आणि तिसरा व दुसरा आणि चौथा हे चरण सारखे असतात तें वृत्त. उ० पुष्पिताग्रा; हरिणीप्लुता; वियोगिनी, अपरवक्त्रा. [सं.] ०सूची (करण)-न. (नृत्य) उजवा पाय सूची करून उजवा हात उपपद्म करणें व डोक्याच्या वरच्या बाजूस नेऊन ठेवणें. ०स्थित(स्वर)-पु. (संगीत) द्व्यर्ध आणि द्विगुण या स्वरांमधील म्हणजे पांचवा, सहावा व सातवा हे स्वर. ०स्वस्तिक(करण)-(नृत्य) पु. पाय स्वस्तिक ठेवून उजवा हात कमरेवर व डावा हात वक्षःस्थलावर ठेवणें. ०स्वर-पु. य्, व्, र्, ल्, हीं व्यंजनें स्वरांबद्दल योजितात म्हणून त्यांस अर्धस्वर किंवा अंतःस्थ वर्ण म्हणतात. ०हार-पु. बारा किंवा चौसष्ट सरांचा हार; एक दागिना.

दाते शब्दकोश

आतली चाल, आतचाल      

स्त्री.       एक मुहूर्त. (राजा.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

भाट

पु. १ राजे, रजवाडे, सरदार इ॰चीं स्तुतिस्तोत्रें गाणा- रांची एक जात व तींतील व्यक्ति. 'भाट वेताळ बंदीजन ।... निज शस्त्रास्त्रीं चालिले ।' -जै १०.४१. हा एक अलुतेदार असून घराण्यांच्या वंशावळी ठेवणें, लग्नें जमविणें, खालच्या वर्गांच्या लोकांस लग्नाचा मुहूर्त काढून देणें अशीं याचीं कामे असत. -भाचसंवृ ६४. २ स्तुतिपाठक. 'दिगंतीचे भूपति । भाट होऊनि वाखाणती ।' -ज्ञा २.२१२. -वि. व्यर्थ, पोकळ बडबड करणारा (माणूस) [सं भट् = बोलणें; हिं.] भाटकीस्त्री. (कु) भाटपक्षी; एक प्रकारचा पक्षी (इं.) लार्क, भाटणें-सक्रि वाजविणें. -शर. भाटवोळापणा-पु. व्यर्थ बडबड. 'जळो ऐसी ब्रीदावळी । भाटवोळीपणाची ।' -तुगा ९७७. भाटि(टी)व-स्त्री. स्तुति; गुणवर्णन 'जयाचिये भाटिवेलागीं । मी कपिल जाहलों ।' ज्ञा १३.९७५. भाटिवकी-स्त्री. स्तुतिपाठकता. 'ज्याच्या पदासि वरदेवसमाज याची । तेही मुखीं करिति भाटिवकी जयाची ।' -आसी ७०.

दाते शब्दकोश

भ्रमण

न. १ मंडलाकार फिरणें. गरगर फिरणें. २ (शब्दशः व ल.). भटकणें; फिरणें; हिंडणें. 'नाहीं केलें तीर्थाचें भ्रमण । पाळिला पिंड करचरण ।' -तुगा ६९२. ३ (ल.) भ्रांति पडणें; बहकणें; कुमार्गास लागणें. ४ एक अशुभ मुहूर्त, अशुभ वेळ. [सं.] ॰चक्र-न. १ (काव्य) इहलोक सत्यस्वरूप आहे असा मनाचा खोटा ग्रह. 'जेणें ब्रह्मादि देवगण । भ्रमणचक्रीं पाडिले ।' २ गति असणार्‍या ग्रहांचें चक्र. 'भ्रमणचक्रीं न भवे । ध्रुव जैसा ।' -ज्ञा १३.४८८. [सं.] ॰प्रवाह-पु. प्रापणप्रवाह. (इं.) कन्व्हेक्शन करंट. ॰शील, भ्रमणीक-वि. भटकणारा; भटक्या. भ्रमणें-अक्रि. १ चक्राकार फिरणें; गिरकी मारणें. २ भटकणें; हिंडणें. ३ (मनानें) धाव घेत सुटणें; भटकणें. ४ भलत्याच मार्गानें जाणें; चुकणें. ५ घाबरणें. 'भ्रमता सहस्त्रनयनहि परि धैर्यजलधि नदीज न भ्रमला ।' -मोभिष्म ११.९९. ६ भुलणें; भुरळणें. 'नातरी महासिद्धी- संभ्रमें । जिंतला तापसु भ्रमें ।' -ज्ञा १.२७१. ७ पाठ दाखविणें; माघार घेणें. 'वत्सा! जरि तूं युद्धीं न भ्रमसिल पावसील सुगतीतें ।' -मोस्त्री ४.१९. भ्रमता-वि. भटकणारा. 'ऐसेनि न राहतयातें राहवी । भ्रमतयातें बैसवी ।' -ज्ञा ६.१६९. भ्रमंती-स्त्री. भ्रमण. [सं.]

दाते शब्दकोश

भट

पु. १ ब्राह्मण, परंतु विशेषतः प्रायः भिक्षुकीवर निर्वाह करणारा. २ जोशी; ज्योतिषी; गणक. 'घटका तिथि भट सांगतां बरवा आहे मुहूर्त।' -ऐपो १३२. ३ भक्षुक ब्राह्मणाच्या नांवापुढें लावावयाचा प्रतिष्ठादर्शक शब्द. जसें-रामभट इ॰. [सं. भट्ट] म्ह॰ भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरी. ॰गोसावी- पु. संसाराचा त्याग करूंन धर्मनिष्ठ बनलेल्या ब्राह्मणास आदरार्थीं म्हणतात. ॰पण, भटकी-नस्त्री. गांवचें उपाध्येपण. 'करितां भटपण आधीं आला मजला उमाप तिटकारा ।' -स्फुटआर्या. ॰मार्ग-पु. (महानु.) महानुभावपंथ. 'नको गा सींगणाः मज भटमार्गीचा उपदेसु असेः' -नागदेवाचार्यस्मृति १७३. भटजी- पु. सामान्यतः ब्राह्मणांस आणि विशेषतः वैदिकास संबोधण्याचा शब्द. भटभाई-पु. उपहासार्थीं ब्राह्मणांस संबोधण्याचा शब्द. भटी-वि. भटासंबंधीं; भटांचा. भटुरगा-पु. (निंदेनें) गुणहीन भटजी, भट. भट्टू-पु. (निंदेनें) भट. म्ह॰ भादव्यांत भट्टू आश्विनांत तट्टू (पुष्ट होतात). भटोबा-पु. व्यवहारज्ञान नस- लेला ब्राह्मण. भटोरखाना-पु. (निंदेनें) ब्राह्मणांचा समुदाय, संघ. [भटोर, भट + खाना] भटोरा-पु. (निंदेनें) भट.

दाते शब्दकोश

चालणे      

उक्रि.       १. गमन करणे; जाणे; मार्ग क्रमण करणे; रस्ता क्रमणे; जाण्यासाठी पावले टाकणे. २. पुढे जाणे; प्रगती होणे; चालू असणे; चालण्याची क्रिया. ३. जाणे; लोटणे; गतीत असणे; कंठिला जाणे (दिवस, भरभराट, आयुष्य); चालू राहणे; वर्षानुवर्ष अस्तित्वात असणे (जिंदगी, रीतरिवाज). ४. चालू असणे; सुरू असणे (काम, यंत्र). ५. विवक्षित, विशिष्ट गतीने, ढबीने, नेकीने गमन करणे, चालण्याची क्रिया करणे. [सं. चल्] (वा.) चमकून चालणे - ऐटीत चालणे : ‘चाले चुकावुनि पुढें चमकोनि घोषा ।’ - आकं ३. चालता घेणे - चालवून घेणे; गुजारा करणे; चालू होणे. चाली घेणे - कूच करणे : ‘विजयादशमीचे मुहूर्त चाली घेतील.’ - ऐको ३७७. चालून जाणे - हल्ला करणे; चढाई करणे; स्वारी करणे : ‘हिंदुस्थान सरकारचें लष्करी धोरण जरी रशिया संबंधाने बचावाचे असले तथापि एकंदरींने चालून जाण्याचेच आहे.’ - लोटिकेले २.३५७.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चक्रवेला      

स्त्री.       चक्रवेळ. फळज्योतिषशास्रातील एक वेळ, मुहूर्त. या मुहूर्तावर आरंभिलेले कार्य रेंगाळते असे समजतात. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

दिनशुद्धी      

स्त्री.       चांगला मुहूर्त; कोणताही अशुभ योग नसणे; शुभदिवस निश्चित करणे. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

दिवा

क्रिवि. दिवसां; उजेडीं. 'दिवा लग्न, दिवा मुहूर्त' [सं.] कीर्ति-पु. १ (ल.) न्हावी; नापित. २ खालच्या वर्गाचा माणूस; ज्याचें नांव रात्रीं घेऊं नये असा. दिवांध-पु. घुबड; दिवाभीत मनुष्य. 'न पाहती जाले दिवांध ।' -यथादी १.९०.

दाते शब्दकोश

गोंधळीक, गोंधळूक      

वि.        गोधूलिक; गोरज (मुहूर्त). (चि. गो.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गोंधळीक-ळूक

वि. (चि. गो.) गोधूलिक; गोरज (मुहूर्त). -न. सांजवेळ; सायंकाळ. 'मग वैराग्याची गोंधळुक । जें ज्ञानाभ्यासाचें वार्धक्य ।' -ज्ञा १८.१०८५. [सं. गोधूलिक] गोंधळ्या-वि. १ घालमेल्या; धांदल्या; अव्यवस्थित(माणूस). २ धांदरट; गफलती; गोंधळलेला.

दाते शब्दकोश

ग्रामजोशी, ग्रामज्योतिषी      

पु.       गावचा जोशी. हा पंचांग सांगणे, पत्रिका पाहणे, मुहूर्त काढणे इ. कामे करतो : ‘आधीं होता ग्रामजोशी । राज्यपद आलें त्यासी । त्याचें हिंडणें राहीना । मूळ स्वभाव जाईना ॥’ –तुगा.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

घडीवट      

स्त्री.       मुहूर्त; घटका : ‘बोले इंद्र सुरपती । जालि घडीवटीयांची आईती । नोवरा येऊंद्या झडती । संभ्रमेंसी ।’ – कालिकापुराण १६·४२.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

घटिका

स्त्री. १ साठ पळें; चोवीस मिनिटें मिळून होणारा काल; घटी; घटका पहा. 'म्हणोनि उपजतखेंवों बुडाली । लग्न- घटिका ।' -ज्ञा ६.४७१. सामाशब्द- ॰यंत्र-न. घटियंत्र; रहाटगडगें; 'उपजे तें नाशें । नाशलें तें पुनरपि दिसे । हें घटिकायंत्र तैसें । परिभ्रमे गा । '-ज्ञा २.१५९. [घटिका = लहान मडकें + यंत्र = चक्र] ॰स्थापना-ना-न. स्त्री. विवाहादि मंगल कार्यांत मुहूर्त साधण्याकरितां बरोबर वेळ मोजण्या करितां सूर्योदय होतांक्षणीं घटिका (पात्र) टाकण्याचा विधि. [घटिका + स्थापन]

दाते शब्दकोश

घटिकास्थापन, घटिकास्थापना      

न. स्त्री. विवाहादी मंगल कार्यात मुहूर्त साधण्यासाठी वेळ मोजता यावा म्हणून सूर्योदय होताक्षणी पाण्यात घटिका (पात्र) टाकण्याचा विधी. घटिगोपुर      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

घटकापात्र, घटिकापात्र      

न.       कालमापनासाठी वापरले जाणारे, तळाशी छिद्र असलेले, धातूचे द्रोणाकृती पात्र. हे पात्र भरून बुडाले की एक घटका होते. लग्नप्रसंगी मुहूर्त साधण्यासाठी या पात्राचा उपयोग करतात.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

होरा

स्त्री. १ (ज्यो.) मोषादि राशीचें-लग्नाचें अर्ध. २ दिवसाचा २४ वा भाग; एक तास; अडीच घटका. ३ भविष्य; भावी घटना सांगणें. 'राजाला पुत्र झालेला आहे असा त्याचा होरा आहे.' ४ मेषादि लग्न. ५ ज्योतिषाचा एक प्रकार. ६ मुहूर्त. 'मंगेल गुर्वंपूजक, साधुनि देईल गर्ग होरा ज्या ।' -मोभीष्म १.७१. ७ अंदाज; अजमास; अट- कळ. (क्रि॰ चालणें; आंत येणें; दिसणें; वहाणें). 'माझा होरा या गोष्टीविषयीं चालत नाहीं.' [सं.] ॰वृत्त-न. तासांचें चक्र.

दाते शब्दकोश

जोशी, जोसी      

पु.       १. गावात पंचांग सांगणारा; भविष्य वर्तविणारा; भिक्षुकी, जोसकी करणारा ब्राह्मण (विशेषतः धंदेवाईक); ग्रामजोशी. पूर्वी ही वृत्ती असे व जोशाला गावात बलुते देण्याचीही वहिवाट असे. २. कुणब्यांतील एक जात; कुडबुडे जोशी (कुणब्यांतील). हे सहदेवी मताचे मुहूर्त, ज्योतिष जाणतात. [सं.ज्योतिषी]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

जोशी-सी

पु. १ पंचांग, कुंडल्या समजून गांवांत सांगणारा; ज्योतिषी; भविष्य वर्तविणारा; भिक्षुकी, जोसकी करणारा ब्राह्मण (विशेषतः धंदेवाईक); ग्रामजोशी. पूर्वीं ही वृत्ति असे व जोशाला गांवांत बलुतें देण्याचीहि वहिवाट असे. २ एक कुणब्यांतील जात; कुडबुडे जोशी (कुणब्यांतील); हे सह- देवी मताचे मुहूर्त, ज्योतिष जाणतात. ३ बगळ्याच्या जातींतील एक पक्षी; कुकुडकुंभा. [सं. ज्योतिषी; प्रा. जोइस, जोइसिअ] जोसकी, जोसपणा, जोसपण-स्त्रीपुन. गांवजोशाची वृत्ति, धंदामं वतन. जोसगंड-पु. जोशास निंदार्थीं म्हणतात.

दाते शब्दकोश

ज्योतिषी      

पु.       १. आकाशातील ग्रहताऱ्यांच्या स्थितीगतींचे शास्त्र जाणणारा, संशोधक. २. फलज्योतिष सांगणारा; जोशी; गणक : ‘पढोनि मुहूर्त चिंतामणी । जाला ज्योतिषी ब्राह्मण ।’ - मध्वक ४३२. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कुतप, कुतूप      

पु.       सूर्योदयापासून आठवा मुहूर्त; मध्यान्हकाळ; पितृयज्ञ करायला योग्य वेळ. [सं. कुतप]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कुतप-तूप

पु. सूर्योदयापासून आठवा मुहूर्त; मध्यान्ह- काळ; पितृयज्ञ करण्यास योग्य वेळ. [सं. कुतप]

दाते शब्दकोश

खा(खां)जें

न. १ पंचखाजे; खारीक, खोबरें, खसखस, खिसमिस, खडीसाखर हे ख नें आरंभ होणारे पांच पदार्थ. पंचखाद्य पहा. 'होळीमध्यें खाजें आहे ।' तें तूं विचारुनी पाहे ।' -रामदास होळीपंचक. २ वाणसौदा; वाण्याकडील सामान. ३ खाजी नांवाची मिठाई. 'घ्या घास मुहूर्त येथें वाढितें खाज्या ।' -प्रला १९४. ४ (कु.) हरभर्‍याच्या पिठाच्या लांबट गोळ्या गुळाच्या पाकांत करतात त्या (खाज्या). ५ एखाद्याच्या आवडीचें खाणें, खाद्य. उदा॰ मेंढरूं हें लांडग्याचें खाजें, उंदीर मांजराचें खाजें. 'आणितो हिमांशुचि जेविं खाजें चकोराचें ।'-ज्ञा ६.२९. 'स्त्री म्हणिजे मेंढिएचें खाजें गा ।' -सूत्रपाठ आचार, उत्तरार्ध २५३. 'ऐसें शरीर बहुताचें मूर्ख म्हणे आमुचें ।' परंतु खाजें जीवाचें । तापत्रैं बोलिलें ।' -दा १.१०.६०. ६ लहान मुलांचा खाऊ; भातुकें; मिठाई. -वि. चमचमीत; आवडतें; सुग्रास (भोजन). 'नहो एंची जुंझ भांडण । तर्‍हीं तु नाहीं खाजें जेवण ।' -शिशु १२०. [सं. खाद्य; प्रा. खज्ज] ॰करु-कार-वि. (गो. महानु.) हलवाई; खाजें करणरा. 'भांडारी खाजेकरू ।' -शिशु ३५४. [खाजे + कर]

दाते शब्दकोश

खाजे      

न.       १. पंचखाजे. खारीक, खोबरे, खसखस, खिसमिस, खडीसाखर हे ‘ख’ ने आरंभ होणारे पाच पदार्थ. पहा : पंचखाद्य : ‘होळीमध्यें खाजें आहे । तें तूं विचारुनी पाहे ।’ - रामदास होळीपंचक. २. वाणसौदा; वाण्याकडील सामान. ३. खाजी नावाची मिठाई : ‘घ्या घास मुहूर्त येथें वाढितें खाज्या ।’ - प्रला १९४. ४. हरभऱ्याच्या पिठाच्या लांबट गोळ्या तळून गुळाच्या पाकात टाकून करतात तो पदार्थ (खाज्या.) (कु.) ५. एखाद्याच्या आवडीचे खाणे, खाद्य. उदा. मेंढरू हे लांडग्याचे खाजे, उंदीर मांजराचे खाजे : ‘आणि तो हिमांशुचि जेविं खाजें । चकोराचें ॥’ - ज्ञा ६·२९. ६. लहान मुलांचा खाऊ; भातुके; मिठाई. ७. (ल.) एखाद्याला खूष करण्यासठी द्यावी लागणारी वस्तू, लाच, चिरीमिरी : ‘पण त्या अगोदर तुला त्या धनाला खाजं द्यावं लागेल.’ - गागो ५०. वि. चमचमीत; आवडते; सुग्रास (भोजन) : ‘नहो एंची जुंझ भांडण । तऱ्हीं तु नाहीं खाजें जेवण ।’ - शिव १२०. [सं. खाद्य]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खडतर आमावास्या

स्त्री. आश्विन, पौष व फाल्गुन अमावास्या; या दिवशीं चोरी करावयास मुहूर्त चांगला असतो अशी समजूत आहे. यावरून हे दिवस चोरांस शुभ असतात. अर्थात्‌ इतर लोकांस ते कष्टकर असतात यावरून.

दाते शब्दकोश

खडतर अमावस्या      

आश्विन, पौष व फाल्गुन अमावस्या. या दिवशी चोरी करायला मुहूर्त चांगला असतो अशी समजूत आहे. हे दिवस चोरांना शुभ असतात. अर्थात इतर लोकांना ते कष्टकर असतात यावरून.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खेटाक      

न.       १. खेकटे; कटकट : ‘चालायचं काय खेटाक काढू नका हं!’ - फगो ३. २. कष्टाचे काम : ‘मुद्दाम हा मुहूर्त साधून मळणीचं खेटाक काढलं.’ - आआशे ७४.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

लग्नमुहूर्त

पु० लग्नाचा मुहूर्त, वेळ.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

निका

वि. १ पवित्र; शुद्ध. 'तुझा गोंधळ निका अंबे कोणी वर्णूं न शके हो ।' -भज १७. २ चांगला; योग्य. 'येरू म्हणे मुहूर्त आहे निका ।' 'राज्यायोग्यचि केवळ तप मात्र करावया बहु निका मी ।' -मोभीष्म ११.३. ३ उत्तम; लायक; उत्कृष्ट; सुंदर. ४ बरोबर; नक्की; नेमका. 'हे श्रोतयांची आशंका । पाहतां प्रश्न केला निका ।' -दा १०.७.१४६. ५ खरा; सत्य. 'म्हणे जय जय जी रघुनायका । सत्यप्रतिज्ञा शब्द निका । तरी मज वरावें रविकुळटिळका । अंतरसाक्ष जाणोनी ।' -वेसीस्व ४.८२. ६ निर्भेळ; शुद्ध; भेसळ नसलेलें. 'हें दूध निकें आहे.' -क्रिवि. स्पष्टपणें; निक्षून; स्पष्ट; उघड; धडधडीत. 'निकें निरोपिलें तुम्ही.' [अर. नकी-क = शुद्ध; स्वच्छ]

दाते शब्दकोश

निंबवड्या

स्त्रीअव. (कों.) एक प्रकारची भाकरी किंवा घावन. 'खळांत (अंगणांत) मुहूर्त मेढीजवळ निंबवड्या फिर- वितात' -मसाप ४.२५६.

दाते शब्दकोश

ओखटी वेळ

स्त्री. वाईट वेळ; अशुभ मुहूर्त.

दाते शब्दकोश

प्रारंभ

सुरुवात, खोलणें, प्रारंभिणें, पायाभरणी, प्रतिष्ठापना, आरंभ, श्री गणेशा, अ ब क, प्रथमावस्था, प्राणप्रतिष्ठा, प्रथमारंभ, ओनामा, १हिली कुदळ - उडी - सलामी - पालवो-धार-अवस्था - तान - पट्टा, पहिला बार- अंकुर-पान्हा-उद्देक -घांस, उद्घाटन, मुहूर्तमेढ रोवली, पहिलें भ्रमण- रडू- पाऊल, त्याची किशोरावस्था, शैशवकाल, अर्भकावस्था, उषःकाल, उमल: ण्याची काळ, दगड बसविला तेव्हां ओम नमो गणपते झालें, एव्हांना कोठे अंड्यातून पिल्लूं बाहेर पडलें, या मूर्तीसाठीं माती कुटली जात होती, सांगाडा घडत होता, बीजरोपणाची अवस्था, मूळ स्टेशन सोडलें तेव्हा, या नदीचा प्रारंभ झाला तेव्हां, फक्त चबुत्रा उभारला, तोंड फाेडलें, मळीची फक्त माती फोडली, टांक कागदाला लावला, या बोटीत पाऊल ठेवलें, पहिला पट्टा ओढला, मुहूर्त केला, पहिला प्रवेश दिला, त्रिराचम्य झालें तेव्हांची गोष्ट.

शब्दकौमुदी

प्रस्थान

न. १ जाणें; निघणें; गमन; प्रयाण. 'प्रस्थान केलें तत्क्षणीं ।' -रंयोवा १.२२९. २ प्रवासास निघण्याचे वेळीं शुभ मुहूर्त नसल्यास तत्पूर्वी एखाद्या शुभवेळीं शेजार्‍याच्या घरीं राहून नंतर प्रवासास निघणें. ३ प्रवासास निघावयाचें असेल तो दिवस अशुभ असल्यास त्यापूर्वीं शुभदिवशीं तांदूळ, पैसा, हळकुंड इ॰ पदार्थांची पुरचुंडी करून ती दुसर्‍याच्या घरीं ठेवतात ती. प्रवासास जातांना ही पुरचुंडी बरोबर घेतात. 'जरा मृत्यूचें प्रस्थान । धवलचामरेंसि आलें जाण । मागूनि यावया आपण । वेळा निरीक्षण करितसे ।' -एभा ९.२६५. ४ प्रवासास निघणें. ५ आगमनाचें चिन्ह; ठाणें. 'निद्रालस्याचें नये प्रस्थान । तैसें करावें प्राणधारण ।' -एभा १८.२४८. ६ (ल.) मरणें. (क्रि॰ गुंडाळणें; अटपणें; बांधणें; नदीवर चालणें). ७ (देवपूजेचीं उपकरणीं, दुकानांतील वस्तू, धंद्याचीं हत्यारें, लेखनाचें साहित्य इ॰ वस्तु) पसरलेल्या असणें; मांडलेल्या असणें. ८ ईश्वरप्राप्तीचे निरनिराळे मार्ग, पद्धती (योग, सांख्य, वेदांत इ॰). ९ कोणत्याहि प्रकारचा मोठेपणा व प्रमुखपणा असलेला मनुष्य; अत्यंत पराक्रमी वीर; विद्वान् मनुष्य; मोहरा; धेंड; प्रकरण; प्रस्थ. १० उच्चाटन. [सं.] ॰करणें-निघून जाणें. ॰ठेवणें- १ उतरणें; बिर्‍हाड ठेवणें. २ निघून जाण्याची तयारी करणें. ॰चालणें-मरणें. ॰त्रय-त्रयी-नस्त्री. उपनिषदें, वेदांत (ब्रह्म) सूत्रें व भगवद्गीता हे तीन ग्रंथ. प्रस्थानी वर्‍हाडी-पुअव. लग्नाच्या मिरवणुकींतील वरपक्षाकडील लोक.

दाते शब्दकोश

पत्रिका

स्त्री. १ जन्मवेळीं जीं तिथि, वार, नक्षत्र, योग, करण वगैरे असतील त्यांचीं नोंद केलेला कागद. २ यावरून काढलेलें शुभाशुभ फल ज्यांत दिलें आहे असें जन्मटिपण; संपूर्ण आयु- ष्याचें भविष्य; कुंडली. ३ लग्न, मुंज इ॰चा मुहूर्त ज्यांत लिहिलेला आहे तो कागद. (पत्रिकापूजनाच्या वेळीं हा लागतो). ३ (काव्य) चिठ्ठी; पत्र; लेखी संदेश. 'प्रणयपत्रिका.' 'कृष्णासी नाहीं विषय गोडी । म्यां पत्रिका लिहिली कुडी ।' -एरुस्व ५.४४. ४ (समासांत) पत्र, लेखी, मजकूर याअर्थी. 'निमंत्रण-कुंकुम-पत्रिका.' [सं.] ॰पूजन-न. लग्न, मुंज इ॰ कार्यांत मुहूर्ताच्या पत्रिकेची केलेली पूजा. पत्रिका अर्थ ३ पहा.

दाते शब्दकोश

पूर्ण

वि. १ भरलेला । २ इच्छा, आकांक्षा इ॰ शेवटास गेली आहे असा; सफल. ३ पुरता; सर्व; कोणत्याहि बाबतींत न्यूनता नसलेला. ४ कुशल; निष्णात. ५ उच्च अवस्थेस पोहोंचलेला. 'आतां आणिक एक गहन । पूर्णाचें चिन्ह । अर्जुना तुज सांगेन । परिस पां।' -ज्ञा २.३५४. [सं. पृ = पूर्ण करणें] सामाशब्द- ॰कंठी- स्त्री. घोड्याचा एक गतिप्रकार. -अश्वप १.१८५. ॰कपोल-पु. (नृत्य) गर्व व उत्साह अशी मनःस्थिति दाखविण्याच्या वेळी गाल फुगीर दाखविणें. ॰काम-वि. १ ज्याचे मनोरथ सफळ झाले आहेत असा; संतुष्ट; तृप्त. २ ऐन उमेदींत असलेला; उत्साही (तरुण). ॰गर्भा-स्त्री. १ गरोदरपणाचे नऊ महिने भरले आहेत अशी स्त्री. १ पुरणपोळी. 'तरी पूर्णगर्भा करूनि सत्वर । भोजन पोटभरी घालावें ।' -भवि ५६.५७. ॰घटिका-स्त्री, लग्न, मुंज, इ॰ विधीसाठीं मुहूर्त दाखविणारी पाण्यांत तरंगत सोडलेली व पूर्ण भरलेली शेवटची घटिका. (क्रि॰ घालणें; भरणें; होणें). ॰घन- वि. सर्वत्र भरून राहणारा; सर्वव्यापक. 'परमात्मा तो पूर्णघन.' ॰चंद्र-पु. पौर्णिमेचा चंद्र; सोळा कलांनीं युक्त असा चंद्र. 'बारे शिष्या तूं पूर्णचंद्र ।' -गुच [सं. पूर्ण + चंद्र] ॰चंद्रोदय-पु. १ पुरें चांदणें पडणें; चंद्र चांगला उगवणें. २ एक औषधी मात्रा. ॰चैतन्य-न. पूर्ण प्रवर्तकत्व, चालकत्व; जीवाची पूर्णता. -वि. चैतन्यानें युक्त; अत्यंत उत्साही, उद्योगी असणारा (परमेश्वर). 'तत् शब्दे पूर्णचैतन्य ते त्वंशब्दे प्रत्येक चैतन्य बोलिजे.' ॰पणा-पु. १ पूर्णत्व; पुरतेपणा; भरपूरपणा. २ कैशल्य; निपुणता. ॰पात्र-न. १ राजादिकांनीं ब्राह्मणास दिलेलें पंचपात्रासारखें भांडें. हें कोणासहि दाखवून धान्यानें भरून घेण्याचा यामुळें हक्क प्राप्त होतो. पुष्कळ भिक्षा मिळावी म्हणून थोरांनीं दिलेलें भिक्षा साधन. २ कांहीं धार्मिक विधींत कलशावर तांदुळ इ॰ नीं भरून ठेवलेलें भांडें यांत आराध्य देवतेची स्थापना करतात. ३ एक कैली माप. -वाडदुबा २३६. ॰पात्री-पु. ज्यास राजाकडून पूर्णपात्र मिळालें आहे असा ब्राह्मण. ॰पुरी-स्त्री. पुरण भरलेली पुरी; साटोरी. 'पूर्णपुरी पूर्णपुरी । प्रेमबोध लाडू त्यावरी ।' -भज ४२. ॰पोळी-स्त्री. पुरणपोळी पहा. 'चोटी मुगदळ बुंदीविशेष । पूर्ण- पोळिया विस्तीर्णपात्रास ।' -नव ९.११७. ॰बोध-वि. अत्यंत ज्ञानी, विद्वान्, तत्त्व जाणणारा (सपुत्रुष). 'मग बोले श्रीगुरु पूर्णबोधु ।' ॰ब्रह्म-न. १ केवळ ब्रह्म; ब्रह्मसार. २ ब्रह्माशीं (परमे- श्वराशीं) तादात्म्य; एकरूपता. ॰भूत-वि. (व्या.) कालनिदर्शक शब्द. ज्या काळीं क्रियेची केवळ पूर्णता किंवा परिसमाप्ति दर्श- विली जाते तो काळ, पूर्णांक-पु. पूर्ण असलेला आंकडा. जसें:- १, २, ३ इ॰ याच्या उलट अपुर्णांक. पूर्णांकगणित-न. पूर्ण आंकड्यांचें गणित. पूर्णागमी-पु. वेद, श्रुति इ॰ पूर्णपणें जाणणारा; वैदिक. 'मृत्य न म्हणे हा श्रोत्री । मृत्य न म्हणे मंत्र यंत्री । पूर्णागमी ।' -दा ३.९.२०. [पूर्ण + आगमी] पूर्णाभिषिक्त, पूर्णाभिषेकी-वि. पूर्णाभिषेक ज्यास झाला आहे असा. [सं.] पूर्णाभिषेक-पु. १ कांहीं धार्मिक विधि समाप्त झाल्यावर ऋत्वि- जानें यजमानावर कलशोदकानें (किंवा शेवटीं भरलेल्या घटिकेंतील उदकानें) केलेलें सिंचन. २ मंत्रोपदेश दिल्यानंतर गुरूनें शिष्यावर केलेला अभिषेक. ३ (ल. उप.) एखाद्या सनुष्याच्या अंगीं असलेल्या सर्व सद्गुण, दुर्गुण इ॰चें अनेकांनीं केलेलें वर्णन. [सं.] पूर्णावतार- पु. सोळा कलांनीं युक्त असा ईश्वराचा अवतार. दशावतारांपैकीं नरसिंह, राम आणि कृष्ण हे तीन अवतार. [सं. पूर्ण + अवतार] पूर्णावस्था-स्त्री. परिपक्कदशा; शेवटास गेलेली स्थिति. [सं. पूर्ण + अवस्था] पूर्णाहंता-स्त्री. पूर्ण आत्मभाव. 'तैसी ते पूर्णां- हंता । कां देहपणें पांडुसुता ।' -माज्ञा १८.४१४. [पूर्ण + अहंता] पूर्णाहुति-स्त्री. १ यज्ञाच्या शेवटीं सर्व देवतांना दिलेली आहुति. 'होईल यागपूर्णाहुति । मग करूं भागस्थिती ।' -कथा १.२. २ (ल.) (सैन्याची) भयंकर कत्तल; रक्तपात; सर्व गारद होणें. 'भाऊसाहेबाबरोबर मोठ्या मोठ्या सरदारांची पूर्णाहुति झाली.' ३ लढाईत मरण; मृत्यु (एकाहि व्यक्तिचा) 'त्याची पूर्णाहुति घेतली.' [सं. पूर्ण + आहुति] पूर्णोदर-न. (नृत्य) टांचांवर उभें राहून श्वास कोंडून धरून पोट थोडें पुढें आणणें. श्वास सोडणें उदररोग दाखविणें वगैरे वेळीं हा अभिनय करितात [पूर्ण + उदर] पूर्णोपमा-स्त्री. (साहित्य) उपमेय, उपमान, सामान्य धर्म आणि साम्य (उपमा)वाचक शब्द हीं उपमेचीं चारहि अंगें ज्या उपमेंत आहेत ती. 'जो धैर्यें धरसा सहस्त्रकरसा तेजें तमा दूरसा ।' इ॰ श्लोक. 'गजा तृणाच्छादित कूप जैसा । नृपा असत्याप्रियचार तैसा । नाशास हो कारण, जो तयांस । येना मुळींही चुकवावयास ।' लुप्तोपमा पहा. [सं. पूर्ण + उपमा]

दाते शब्दकोश

फल

न. १ फळ (वृक्षादिकांचें). (याचे लक्षणेनें पुष्कळ अर्थ निघतात). २ (ल.) संतान; संतति; प्रजा ३ फायदा; लाभ. ४ प्राप्ति; उत्पत्ति; निष्पत्ति; कोणताहि व्यापार, क्रिया यापासून निष्पन्न होणारी गोष्ट. ५ परिणाम; शेवट; अखेर. 'तसेंच त्या लेखाचें अगर ग्रंथाचें कांहीं फल.' -गीर २२. ६ (गणित) त्रैराशिकांतील दुसरें व चवथें पद; दिलेलें प्रमाण, दर व उत्तर; प्रमा- णांक व उत्तरांक. ७ भाला, बाण इ॰ शस्त्राचें टोंक, अग्र; हत्याराचें पातें. ८ नांगराचा फाळ. ९ वर्तुळाचें क्षेत्रफळ. [सं.] सामा- शब्द-॰ग्रंथपु. शकुन, मुहूर्त, लक्षणें इ॰ कांचीं शुभाशुभ फलें सांगणारा फलज्योतिषाचा भाग, असा ज्योतिषग्रंथ. ॰ज्योतिष- न. ग्रहांच्या व नक्षत्रांच्या विशिष्ट स्थितीमुळें मनुष्यावर होणारें परिणाम सिद्धांतरूपानें सांगणारें शास्त्र; ज्योतिष (ज्योतिष हा शब्द खगोलविद्या आणि खगोलांपासून मिळणार्‍या फलांचें ज्ञान या दोहोंसहि लावितात तेव्हां फलज्योतिष ही संज्ञा इंग्रजी अ/?/स्ट्रा- लॉजीला प्रतिशब्द म्हणून नवीन बनविण्यांत आली). ॰त्यागी-वि. आपल्या श्रमाचें फळ (तें मिळण्याच्या वेळींच) मुद्दाम सोडणारा; फलाची इच्छा न करणारा. ॰द-द्रूप-प्रद-वि. १ फल देणारें; फायद्याचें( काम, प्रयत्न, युक्ति, उपाय). 'निगमागमद्रुमफळ । फलप्रद ।' -ज्ञा १८.२. २ फायदेशीर, परिणामकारक झालेला; सफळ; गुणावह. 'सफल फलद कर्म त्याज संन्यास साचा । म्हणुनि उमज होतो कथेच्या रसाचा ।' ॰प्रदान-न. विवाहांतील एक समा- रंभ वाङ्निश्चयाच्या वेळीं नवरीच्या ओटींत नवर्‍याच्या बापानें नारळ वगैरे घालणें. ॰न्यास-पु. आपण केलेल्या कृत्याबद्दल किंवा विशिष्ट सत्कृत्याबद्दल मिळणार्‍या बक्षिसाची आशा सोडणें; त्यावर हक्क न सांगणें; फलत्याग; निष्कामकर्म. ॰भोग्य-वि. फलांच्याद्वारां, निष्पत्तीवरून, उपभोग घेतां येणारें (फळझाड, पैसा, वतनवाडी); ह्याच्या ऊलट स्वतःभोग्य. ॰मान-न. फलनिष्पत्ति. ॰वांछा- च्छा-स्त्री. फळाची, परिणामाची इच्छा; मोबदल्याची आशा. याच्या उलट फलन्यास. 'त्यजुनिहि फलवांछा काम्यकर्में करीती । प्रिय हरिस नव्हे ते सर्व ह्या लोकरीती ।' -वामन, कात्यायनी व्रत ७०. ॰वान्-वि. फलप्रद फलद्रूप. ॰शर्करा-स्त्री. फळांपासून काडलेली साखर; (इं.) फ्रुक्टोज. ॰श्रुति-स्त्री. १ व्रत, स्त्रोत, इ॰ पुण्यकारक कृत्यापासून मिळणारें फळ सांगणारें शास्त्र, ग्रंथविभाग. २ फल; फायदा; निष्पत्ति. 'गोष्ट झाली खरी पण आतां रागें भरून फलश्रुति काय?' [फल + श्रुति = शास्त्र] ॰क्षम-क्षेम-वि. १ फलें धारण करण्यास योग्य; फलद. (शब्दशः व ल॰). २ फलदायक; लाभप्रद; कल्याणप्रद. [सं.फलक्षम] फलाकांक्षा-स्त्री. फलेच्छा, आशा; फलवांच्छा. [सं. फल + आकांक्षा]-कांक्षो-वि. फलाची, मोबदल्याची इच्छा करणारा. फलाफल-न. फायदा-तोटा; नफा- नुकसान. [फल + अफल] फलाशा-स्त्री. फल मिळण्याची इच्छा, आशा (सुपरिणाम, बक्षीस इ॰ची). फलाहार-पु. थोडा उपाहार करणें; फराळ; फळफळावळ, पोहे, इ॰ पदार्थ खाणें; असल्या पदार्थांचें भोजन. [सं. फल + आहार] फलित-न. गर्भित अर्थ; ध्वनि. -वि. १ फळ आलेला (वृक्षलता इ॰). २ (ल.) फायदेशीर, फलद्रूप झालेला. ३ ध्वनित; गर्भित; अध्याहृत (गूढ अर्थ इ॰). [सं.] ॰प्रेरणा-स्त्री. दोन किंवा अधिक प्रेरणांच्या इतकेंच कार्य करणारी प्रेरणा; फलोन्मुख प्रेरणा; परिणत प्रेरणा. (इं.) रिझल्टंट. -यंस्थि ६. फलितार्थंपु. १ गर्भितार्थ; ध्वनितार्थ. 'म्हणोनि ते बुद्धि रचूं । मतवाद हे खांचू । सोलींव निर्वचूं ।फलितार्थुचि ।' -ज्ञा १३.१०४९. २ फलश्रुति; अर्थ २ पहा. [फलित + अर्थ] फलोत्पत्ति-स्त्री. फायदा; नफा; किफायत. [फल + उत्पत्ति] फलोदय-पु. फळ येणें, दिसूं लागणें. [सं. फल + उदय]

दाते शब्दकोश

रोद्द

पु. (खा.) रोज. 'तो रोद्दिही हाक्काली उठीने...' -भिल्ली २७. [रोज; तुल॰ सं. रौद्र; प्रा. रोद्द = अहोरात्रीचा पहिला मुहूर्त]

दाते शब्दकोश

साअत; साईत; सात

(स्त्री.) [अ. साअत्] घटिका; मुहूर्त. “नजुमियास बोलावून साअत पांच घटका रात्रीची ठरली” (राजवाडे ५।२७). “पन्तप्रधान प्रथम स्वारीस निघणार तेव्हां साअत नेक पाहिजे” (राजवाडे ७|१९३). “उदयीक बसावयाची साईत आहे” (राजवाडे ३|३४६). “नेक सात खेमेदाखल जालों” (राजवाडे १९|१०५) “तें (खत) सात-नेक

फारसी-मराठी शब्दकोश

साडा

पु. लग्नामध्यें साडे म्हणून जो सोहळा होतो त्यावेळीं वधूस द्यावयाची साडी. साडी-स्त्री. १ लहान लुगडें २ (ना.) भारी वस्त्र; पैठणी. 'शेले शालू साड्या क्षीरोदक लांबरुंद पाटावें ।' -मो सभा ५.८३. [सं. शाटी; प्रा. साडी; हिं. गु. साडी] साडे-पु. अव. १ लग्नानंतर चवथ्या दिवशीं ऐरणीपूजनाच्या प्रसंगीं वधूवरास वस्त्रें अर्पण करावयाचा सोहळा 'मुहूर्त पाहुनि लाविलें साडे झाले चौदिवशीं ।' -अमृत पुरवणी २.२ या प्रसंगी देतात तीं वस्त्रें. 'साडे आतां जानकीसी । सम- र्पिले पाहिजे ।' -वेसास्व १३.१. ३ (ल.) समाप्ति; शेवट. 'तो हा अमृत इच्छितो संसाराचे साडे ।' -अमृत ११६. साडे करणें-१ खलास करणें; खातें बंद करणें. २ (ल.) काढून लावणें; गचांडी देणें. ३ खरडपट्टी काढणें. साडे चालणें- हाल होणें. 'महाराजांच्या हुकुमानें त्याच्या मुलाचे साडे चालले आहेत.' -विक्षिप्त २.१०९.

दाते शब्दकोश

तारं(रां)बळ

स्त्री. १ त्रेधा; धांदल; तिरपीट; गोंधळ; गडबड; व्यग्रता (लग्न, मुंज इ॰ कांत ताराबल आवश्यक असतें. तें साधण्याकरितां मुहूर्त चुकूं नये म्हणून फार धांदल, घाई करावी लागते त्यावरून तारांबळ पहा.) 'मी आपुल्या गृहींची एक । तारंबळ होतसे ।' -नव २०.५५. २ अडचण; टंचाईची स्थिति; ओढघस्तपणा; खाण्यापिण्याची ददात; आबाळ. [सं. तारा = नक्षत्र + बल = बळ]

दाते शब्दकोश

तारंबळ, तारांबळ      

स्त्री.       १. त्रेधा; धांदल; तिरपीट; गोंधळ; गडबड; व्यग्रता. (लग्न, मुंज इ. वेळी ताराबळ आवश्यक असते. ते साधण्यासाठी, मुहूर्त चुकू नये म्हणून फार धांदल, घाई करावी लागते त्यावरून). २. अडचण; टंचाईची स्थिती; ओढगस्ती; खाण्यापिण्याची ददात, आबाळ. [सं. ताराबल]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तीथ

स्त्री. १ तिथि पहा. २ श्राद्धदिन. [सं. तिथि] (वाप्र.) ॰धरणें-नेमणें-ठरविणें-लग्न वगैरेचा मुहूर्त निश्चित करणें; कार्याचा दिवस ठरविणें. ॰पालन-१ तिथिपालन पहा. ॰वार -पु. सणवार; शुभवार. 'आम्ही नित्य जात नाहीं, तीथवार आला तर जातों.' म्ह॰ तीथ आहे तर भट नाहीं, भट आहे तर तीथ नाहीं = एखाद्या कार्याला दोन गोष्टींची आवश्यकता असते पण पुष्कळदां त्या दोहोंपैकीं एकच अनुकूल असते, दोन्ही एक- दम नसतात.

दाते शब्दकोश

तीथ      

स्त्री.       १. पहा : तिथि, तिथी. २. श्राद्धदिन. [सं.तिथि] (वा.) तीथ धरणे, तीथ नेमणे, तीथ ठरविणे – लग्न इ. कार्याचा मुहूर्त, दिवस ठरवणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तिथिनिश्चय

पु. वरवधू निश्चित झाल्यानंतर ज्योति- षाच्या सहाय्यानें विवाह दिन ठरविण्यांत येतो तो विधि. यास मुहूर्त निश्चय असेंहि म्हणतात. [सं]

दाते शब्दकोश

टक

स्त्री. १ कपाळाचा एकसारखा लागलेला ठणका; कपाळ उठणें. (क्रि॰ लागणें). २ सतत एकाग्र दृष्टीनें पहाण्याचा प्रकार; एकसारखी दृष्टी. (क्रि॰ लावणें; लागणें). 'डोळीया पडलें टकां ।' -ब २३४. ३ अखंड आवाज (एकसारखा पाठ, अभ्यास, ओरड, रडें, भुंकणें, गाणें पाऊस पडणें इ॰चा); सततपणा; अखंडता; टकळी; गुर्‍हाळ. 'एकसारखी भाषणाची पढण्याची- म्हणण्याची-पावसाची-रडण्याची-टक लावली आहे,' -न. १ (काव्य) आश्चर्यामुळें होणारी एकाग्रता, एके ठिकाणीं दृष्टी; नवल; अत्यंत आश्चर्य; आश्चर्याचा अतिरेक; भूल.(क्रि॰ पडणें). 'मागधासी पडलें टक । तटस्थ ठेला मुहूर्त एक ।' -एरुस्व ११. ४५. २ (ळ.) मौन; मुग्धपणा (आश्चर्यानें). 'वर्णितां थोरांसि पडलें टक ।' -भवि २७.८. ३ एकाग्रता; एकसारखी नजर. 'तेथे ताटस्थ्या ताटस्थ्य पडलें । टकासी टक लागलें ।' -ज्ञा ११.१९२. ४ संकट. -मनको. [ध्व व दृश्य. तुल॰ सं. तक् = तग धरणें] ॰टक-स्त्री. १ अखंडपणा सातत्य. २ कंटाळवाणें भाषण; बडबड;टकळी; वटवट. ३ सतत पिरपिर,चिरचिर; रडणें (मुलाचें). (क्रि॰ लावणें; लागणें). -वि. सतत; एकसारखें (पहाणें). ॰क-टकां-क्रिवी. १ अनिमेषदृष्टीने एकसारखें रोखून (क्रि॰ पाहणें) 'तो मूल दिव्याकडे टकटक पाहातो. २ (कानशिलें इ॰) शिलशिलण्यानें; उडण्यानें. (क्रि॰ करणें).

दाते शब्दकोश

उडदा बेगमी, उडदा बेगी      

हत्यारबंद स्त्री; उडदाबेगणी. (हिं.) उडदा मुहूर्त      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

वेळ

पुस्त्री. १ कालविभाग; काळ. २ आतांचा काळ व कांहीं कार्य होण्याचा काळ यांमधील अवकाश, अंतर. 'पेरे होण्यास अझून वेळ आहे म्हणून अधीं घरें शाकारून घ्या.' ३ फुरसत; न गुंतलेला, रिकामा वेळ. 'माझे पाठीसीं काम आहे वेळ सांपडल्यास येईन.' ४ अपेक्षित किंवा योग्य कालापेक्षां जास्त काळ; उशीर (क्रि॰ लावणें, लागणें). 'मला शाळेंत जाण्यास वेळ झाला.' 'वेळ लावला-ली, वेळ लागला-ली.' ५ (स्त्री.) समय; हंगाम; विशिष्ट काल. 'ही वेळ पोथी वाचा- वयाची नव्हे.' ६ दिवसाचा अर्ध भाग; सकाळ किंवा दुपार. ७ तीस घटिकांच्या (रात्रीं किंवा दिवसां.) आठ विभागांपैकीं एक. अमृत, उद्योग, काळ (मृत्यु), चंचळ (चोर), रोग, लाभ, शुभ आणि स्थिर वेळ. यांखेरीज इतर पुष्कळ प्रकारच्या वेळा आहेत, उदा॰ अंधेरी-घोर-घात-राक्षस-वेळ, जाती-येती वेळ इ॰. ८ मुहूर्त. ९ प्रसंग; संधी. -क्रिवि. वेळां पहा. 'तो दिव- सास तीन वेळा जेवतो.' [सं. वेला] ॰दवडणें-व्यर्थ, निष्फळ वेळ घालविणें. ॰मारून नेणें-प्रसंगीं कमीपणा येऊं न देणें; युक्तीनें प्रसंग साजरा करणें; वाणी राखणें. 'केवळ शब्दामात्रें वेळ मारून न नेतां कृति करून दाखविली पाहिजे.' -निचं. ॰वाहणें-बरें किंवा वाईट होण्यास समय अनुकूल होणें. सामा- शब्द- ॰अवेळ-स्त्री. उचित किंवा अनुचित, अनुकूल किंवा प्रतिकूल असा काळ, प्रसंग (विवक्षित कामाविषयींचा). 'वेळ अवेळ आहे चार रुपये जवळ अधिक अंसु द्या.' -क्रिवि. वेळ किंवा अवेळ न पाहतां; वाटेल त्यावेळीं. 'वेळ अवेळ बाहेर जातोस परंतु एथें पिशाचांचा उपद्रव भारी आहे.' ॰काळ-पु. काळ- वेळ पहा. (क्रि॰ येणें; जाणें; गुदरणें; पडणें; टळणें). वेळा काळाला कामास येणें-प्रसंगविशेषीं, अडीअडचणीला उपयोगी पडणें. वेळणेवारचा, वेळणेवारी-विक्रिवि. वेळेप्रमाणें; वेळेनुसार; वेळेच्या चांगल्यावाईट गुणांप्रमाणें व भाषा किंवा कृति याच्या प्रकारानुसार घडणारी (गोष्ट इ॰). अनिष्ट परि- णामाच्या, कृतीच्या, वचनाच्या प्रसंगीं योजतात. 'वेळणेवारचा उगाच तूं बोलतोस काय म्हणून.' [वेळ आणि वार] ॰(अ)न- सार-(वेळेनसार) -वेळेनुसार पहा. ॰नावारीं-क्रि. बरी- वाईट वेळ न पाहतां. वेळअवेळ पहा. म्ह॰ वेळ ना वारीं गाढव आलें पारीं. [वेळ + ना + वार] ॰प्रसंग-पु. काळकल्ला, बळकुबल, वेळअवेळ पहा. ॰भर-क्रिवि. १ सारा दिवस; वरचेवर. 'वेळ भर करसी वेरझारा धाक याचा वाटे मजप्रती ।' -होला ९८. २ अर्धा दिवस पर्यंत. ३ बऱ्याच वेळपर्यंत. ॰मारणारा-माऱ्या- वि. समयसूचक; प्रसंगावधानी. ॰वारींक्रिवि. वेळवारीं पहा. ॰साधणारा-साधु-वि. १ संधी साधून काम करणारा. २ वक्तशीर. वेळा-स्त्री. १ हंगाम; समय; विशिष्ट काळ. २ आवृत्ति- वाचक गणनाकाळ. वेळां-क्रिवि. संख्याचक किंवा गुणवाचक उपसर्ग लावून आवृत्ति दाखविण्यासाठीं योजतात. उदा॰ एक- तीन-बहुत-किती-वेळां. 'एक वेळां सोसीन, दोन वेळां सोसीन, तिसऱ्यानें बोलशील तर तोंडांत खाशील.' वेळाईत-वि. वेळेवर, संकटप्रसंगीं सहाय्य करणारा, मदततीस धांवणारा; कैवारी. -विउ ११.२८. 'तुका म्हणे देव भक्तां वेळाईत । भक्त ते निश्चित त्याचि यानें ।' -तुगा २२७५. [वेळ + आगत ? तुल॰ सिं. वेलाइतो = वेळेवर] वेळपत्रक-न. आगगाड्या, आगबोटी, शाळा इ॰ च्या कार्याचा वेला दाखविणारा तक्ता. (इं.) टाईम-टेबल. वेळाप्रकाशक-पु. (गणित) पट दाखविणारी संख्या; वार संख्याक; गुणक. वेळायित-वेळाईत पहा. 'धावला राघव वेळायितु ।' -दावि १४३. वेळावणें-अक्रि. आबाळणें; वेळेवर गरजेच्या गोष्टी न मिळाल्यानें खंगणें (पीक, जनावर, मूल इ॰). वेळवेळ-स्त्री. १ वेळअवेळ पहा. २ (क) विलंब; उशीर. 'तो अलीकडे वेळावेळानें येऊं लागला आहे.' [वेळ + अवेळ] वेळेन(नु)सार-क्रिवि. १ वेळ, प्रसंग याला अनु- सरून. २ वेळप्रसंगीं; कधींकधीं. वेळेवारचा-वि. वेळेवर अस- लेला. कधीं वेरेवाळचा असा अशुद्ध प्रयोग येतो. वेळेवारीं- क्रिवि. योग्य वेळीं; वेळ टळण्याच्या आधीं; वेळेचा अतिक्रम न होतां. 'तुला चाकरी सोडणें असल्यास वेळेवारींच सांग, नाहींतर आयते वेळेस फसवशील.' वेळोवेळां-क्रिवि. १ वरचेवर; वारं- वार. २ वेळ येइल त्याप्रसंगीं; प्रत्येक वेळीं. [वेळ द्वि.]

दाते शब्दकोश

वली-हद्दी

(स्त्री.) युवराज-नेमणूक; यौवराज्य. “अली. गोहर याचे पुत्र बाहेर काढून वलीहवी करावी हा निश्चय होऊन शुक्रवारचा मुहूर्त करार केला आहे” (राजवाडे १|३६३).

फारसी-मराठी शब्दकोश

याम

पु. १ प्रहर; दिवसाचा आठवा भाग. 'एक याम उरली यामिनी । तों तृषाक्रांत जाहली जननी । ' -पांप्र ११.५. २ तीन तासांचा पहारा. ३ सहनशीलता. ४ थांबणें; विश्रांति; मुक्काम. [सं.] ॰त्रय-न. दिवसाचे किंवा रात्रीचे दोन प्रहर. द्वय-न. १ दिवसाचे किंवा रात्रीचे दोन प्रहर. २ विशेषतः सूर्योंदयानंतरचे दोन प्रहर. यामार्ध-न. वारपरत्वें प्रत्येक दिवशीं अर्धा प्रहरपर्यंत असणारा वाईट मुहूर्त, कुमुहूर्त. [याम + अर्ध] यामिनी-स्त्री. रात्र. [सं.] यामिनीचर-पु. राक्षस; निशाचर. [यामिनी + चर; सं. चर-फिरणें]

दाते शब्दकोश

ग्राम

पु. १ गांव; खेडें. २ (संगीत) सप्तस्वरांतील मुख्य तीन अवधी. याचे प्रकार तीन-षड्जग्राम, मध्यमग्राम व गांधारग्राम. सात स्वरांचा समूह. (इं.) गॅमट. ३ गांवांतील प्रमुख किंवा माननीय माणूस. ४ अरेराव, कचाट्या, जरब बस- विणारा, काचाटींत धरणारा माणूस. 'तो कसला ग्राम त्याज बराबर भांडून तुझा परिणाम लागणार नाहीं.' ५ जमाव; समु- दाय. 'मुतेहिना ऐसा वागे । ग्राम कर्मेंद्रियांचा ।' -यथादि ३. ९२. (समासांत) इंद्रिय-गुण-पुण्य-भूत-स्वर-ग्राम. 'इंद्रिय- ग्रामावरी येणें नाहीं ।' -ज्ञा ५.१०५. [सं.] सामाशब्द- ॰कंटक-कुठार-पु. चहाड्या, निंदा, त्रास, तंटे इ॰ लावणारा; गांवगुंड; गांवची पीडा, ब्याद; दुष्ट, वाईट माणूस. ग्रामकी-स्त्री. गांवजोशी किंवा पाटील इ॰ चें काम; गांवकी. ॰कूळ- केसरी-सिंह-पु. १ (ल.) गांवांतील कुत्रे. 'इया ग्रामसिं- हाचिया ठायीं.' -ज्ञा १३.६८०. २ (ल.) भेदरट माणूस. ॰खर्च-पु. १ गांवचा खर्च. २ फुकट किंवा विनाकारण खर्च; ज्याचा मोबदला नाहीं असा खर्च. ॰जोशी-ज्योतिषी-पु. गांवचा जोशी, हा पंचांग सांगणें, पत्रिका पहाणें, मुहूर्त काढणें इ॰ कामें करतो. 'आधीं होता ग्रामजोशी । राज्यपद आलें त्यासी । त्याचें हिंडणें राहीना । मूळ स्वभाव जाईना ।।' -तुगा. ग्रामज्य-न. ग्राम्य; मैथुन; सुरत क्रीडा. 'ग्रामज्य आठवे चित्तीं ।' -दा २.५. २८. ग्रामणी-पु. १ (काव्य, विद्वानांचें संभाषण) पाटील; गांवचा मुख्य. २ (लौकिक) गांवगुंड, चावट, वाईट, कुटाळ्या, पीडादायक माणूस; ब्याद. 'रामनामें विव- र्जित । ग्रामणीं बोलिजे तें ग्राम्य गीत ।' -एभा ८.१६९. ३ गांवचा महार. -स्त्री. कुटाळकी; गांवकी. ग्रामिणी पहा. 'आनित्य ग्रामणी मस्ती सदा ।' -दा २.३.६. -वि. मुख्य; श्रेष्ठ; प्रमुख. ग्रामणीक-न. हरामखोरपणा; ग्रामणी, ग्रामिणी पहा. 'तरी जी पाहतां हेंहि ग्रामणीक । दिसोनि येतसे कीं निष्टंक ।' -सादि १२.२.१०८. ग्रामण्य-न. १ मुख्यतः जातीसंबंधींचा किंवा इतर गांवकीचा तंटा, खटला. २ बहिष्कार. ३ जातीच्या खट- ल्यासंबंधीं चौकशीसाठीं भरणारी ग्रामसभा; जातगंगा. ॰त्रय- न. (संगीत) ग्राम अर्थ २ पहा. ॰थिल्लर-न. गांवांतील लहा- लसें तळें, डबकें. कीं गतधवेचें यौवन । कीं ग्रामथिल्लराचें जीवन ।' ॰दुर्गा-स्त्री. गांवची कुलदेवी, भवानी; ग्रामाधिका- रिणी देवता. ॰देऊळ-न. गांवांतील सार्वजनिक देऊळ. ॰देव- देवता-दैवत-पुस्त्रीन. १ ग्रामधिकारी-रिणी; गांवचा कुल- देव-देवी. २ या देवतेच्या खर्चास इनाम दिलेली जमीन, उत्पन्न; ग्रामदेवीची जमीन. ॰धर्म-पु. गांवचे धार्मिक विधी, नियम, चालीरिती इ॰ परंपरेनें चालत आलेला गांवचा धर्म. ॰नेत्र-न. (ल.) महार; गांवचा जागल्या. ॰पंचायत-सभा-संस्था-स्त्री. गांवची सर्व व्यवस्था पाहणारी संस्था. खेड्यांतील म्युनिसिपालटी; ग्रामस्वराज्य. ॰पशु-पु. माणसाळलेलें जनावर. ॰बिंदुटी-स्त्री. खेड्यांतील गल्ली, बिदी. 'तव ते गोधनें ग्रामबिंदुटी । अपार मौळी असती चव्हाटी ।' -नव १३.११५. ॰याजक-पु. गांवचा उपा- ध्याय; ग्रामोपाध्याय. ॰लेखक-पु. कुळकर्णी. 'ग्रामलेखक ते स्थळीं ।' -निमा (आत्मचरित्र १.१०१.) ॰सूकर-पु. गांवडुक्कर. ॰स्त-स्थ-वि. गांवांत राहणारा; गांवचा रहिवासी; गांवकरी. 'ऐसें बोलून ग्रामस्तानें.' -नव १०.१६३. 'आतांच भोगूं तरी हे पहाट । ग्रामस्थ येतांचि भरेल हाट ।' ग्रामाचार-पु. ग्रामधर्म पहा. ग्रामांतर न. १ दुसरें गांव. २ आपलें गांव सोडून परगांवीं जाणें. ग्रामाधिकार-कारी-पु. गांवासंबंधीं अधिकार; तो गाजविणारा माणूस; अधिकारी; गांवकामगार. ग्रामाधिपति-पु. पाटील 'ग्रामाधिपतिरूपें श्रीरघुवीरें जाण ।' -सप्र २.३४. ग्रामिणी- स्त्री. हरामखोरी; चहाडी इ॰ ग्रामणीक पहा. ग्रामोपाध्याय- पु. गांवचा उपाध्याय; ग्रामजोशी; ग्रामयाजक पहा. ग्राम्य- वि. १ खेड्यांत झालेला, जन्मलेला; गांवांत उत्पन्न झालेलें किंवा गांवासंबंधीं. २ गांवठी; गांवराणी; गांवढळ; खेडवळ. ३ माण- साळलेला (पशु) याच्या उलट रानटी. ४ लागवडीनें उत्पन्न केलेलें (शेतीचें उत्पन्न); याच्या उलट आपोआप झालेलें. ५ प्राकृत व इतर देशी (भाषा); याच्या उलट संस्कृत. ६ प्रापंचिक; संसारी; याच्या उलट वन्य = जंगलात राहणारा. ७ अश्लील; अशिष्ट; असभ्य. ८ अतिशय विषयासक्त. ग्राम्यगीत-न. १ अश्लील पद, लावणी. २ खेडवळ गाणें, पवाडा इ॰ ग्राम्यधर्म- संभोग; ग्रामज्य पहा. ग्रामस्त्री-स्त्री. वेश्या; रांड. 'ग्राम्य- स्त्रियांचे संगतीं जाणें ।' -एभा ८.१३९. ग्राम्यालाप-पु. १ खेडवळ गप्पागोष्टी. २ लावणी; शृंगारपर कविता. [सं.]

दाते शब्दकोश

मूळ

४, ४ १/२ या वरील उदाहरणांत अनुक्रमें ३ आणि २ हे मूळ प्रकाशक होत. घात प्रकाशक पहा. ॰प्रकृति-स्त्री. आदिमाया. प्रकृति पहा. ॰बंद-ध-पु. वज्रासन; योगशास्त्रांतील एक बंध, आसन. योगा- भ्यासी साधक योनिस्थान दावून आणि गुदद्वार ला संकुचित करून अपानवायूची अधोगति मोडून ती उर्ध्व करितात. त्यायोगें प्राण आणि अपान यांचा संयोग करवितात. मूलस्थानाचें बंधन होतें म्हणून यास मूलबंध म्हणतात. 'त्रिगुणांची वेणी तुझे उडते पाठीं । सावरूनी धरी घाली घाली मू बंदी गांठी ।' -तुगा २५८. ॰बांध-बंद-पु. (क.) शेतांत पाणी अडविण्यासाठीं घातलेला बंधारा. ॰भूत-वि. सर्वांस कारण असलेला; आदिकारण. 'जय जय देव निष्कळ । स्फुरदमंदानंदबहळ । नित्य निरस्ता- खिलमळ । मूळभूत ।' -ज्ञा १८.४. ॰माधव-विना. द्वारके- जवळील एका क्षेत्राचें नांव. 'वचना मानवला बळिदेवो । ऐकोनि हासिन्नला देवाधिदेवो । पाणिग्रहण मूळमाधवो । मुळीचा टावो लग्नासी ।' -एरुस्व १४.३८. ॰माया-स्त्री. आदिमाया. 'म्हणोन हें बोलणें होये । जाणीव मूळमाया ।' -दा १०.१०.१५. ॰मुहूर्त- क्रिवि. प्रथमारंभीं; सुरवातीला. ॰वस-वसा-पु. (कों.) खेडें, शेत इ॰चें खालचें टोंक किंवा बाजू; प्रथम वस्तीची जागा. ॰वैरी- पु. हाडवैरी. 'वृत्रासुर आणि देवेंद्र । मूळवैरी झुंजती ।' -मुविराट ३.१४८. ॰व्याध-धि-धी-स्त्री. एक गुदरोग. मुळव्याध पहा. ॰शोधन-न. उगम किंवा मूळ शोधणें. ॰साडा-पु. (माण.) नवऱ्यामुलीला मूल धाडून व तिच्या सासूला साडीचोळी देऊन तिला परत घरी नेणें; नवरी ववसून नेणें. ॰सूत्र-न. सूत्ररूपानें असलेलें मूळ. 'एवं वेदाचें मूळसूत्र । सर्वाधिकारैकपवित्र ।' -ज्ञा १८.१४२६. ॰स्तंभ-पु. १ मुहूर्तमेढ; घर बांधतांना जोत्यावर प्रथम उभा केलेला खांब. २ ज्यांत विश्वाची रचना, उभारणी वर्णिली आहे असा एक ग्रंथ. ॰स्तंभारोपण-न. मुहूर्तमेढ घालणें-पुरणें; घर बांधावयास सुरवात करणें. ॰स्वभाव- पु. उपजत स्वभाव; जन्मस्वभाव. 'त्याचें येळकोट राहिना । मूळस्वभाव जाईना ।' -तुगा. ॰हारी-पु. मूळ आलेला मुऱ्हाळी पहा. ॰क्षेत्र-न. घर; निवासस्थान; बसतिस्थान. 'गंधर्वनगरीं क्षण एक न राहावें । तैंचि करावें मूळक्षेत्र ।' -तुगा ३५३१.

दाते शब्दकोश

दिन

पुन. दिवस. [सं.] ॰कर-पु. सूर्य. 'काय दिनकरा । कोंबड्यानें केला खरा ।' -तुगा ११७६. [सं. दिन + कर] ॰चर्या- कृत्य-स्त्रीन. १ रोजचा क्रम, राहणी; नित्याची राहणी, खर्च; प्रत्येक दिवशीं करावयाचें काम, कार्यक्रम. २ कसा तरी दिवस घालविणें; पोट भरणें. ३ रोजनिशी, डायरी इ॰. [दिन + चर्या] ॰निर्वाह-पु. दिनचर्या अर्थ २ पहा. [दिन + निर्वाह] ॰मणि- णी-पु. सूर्य; दिनपति; दिनेश. 'भीमकी उल्हासे कमळिणी । कृष्ण दिनमणी देखिलिया ।' -एरुस्व ५.३०. [दिन + मणि] ॰मर्यादा- स्त्री. १ सुर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा काळ. २ कालमर्यादा. ३ सूर्यास्त; सायंकाळ. [दिन + मर्यादा] ॰मान-न. १ दिन- मर्यादा अर्थ १ पहा. दिनावधि; एक दिवसाचा काळ; दिवसाची लांबी. ' मावळला दिनमान मोकाम गीर नदीवर झाला ।' ऐपो ८१. २ परिस्थिति; काळवेळ. 'रोजगारानें चार पैसे मिळतील असें दिनमान राहिलें नाहीं. ' [दिन + मान] ॰रजनी-क्रिवि. दिवसां आणि रात्रीं; रात्रंदिवस; एकसारखें; सतत. [दिन + रजनी] ॰वृध्दि-स्त्री. दोहों सूर्योदयांस एक तिथि भोगायाजोगी जी तिथीची वृद्धि ती; चंद्र व सूर्य यांमध्यें बारा अंशांचें अंतर पडा- वयास एक संपूर्ण दिवसापेक्षां अधिक काळ लागल्यास दुसर्‍या दिवशीं सूर्योदयीं तीच तिथि असते. अशा वेळीं दुसर्‍या दिवसास दिनवृध्दि झाली असें म्हणतात. [दिन + वृध्दि] ॰शुद्धि-स्त्री. चांगला मुहूर्त; कोणताहि अशुभ अथवा कुयोग नसणें. [दिन + शुद्धि] ॰क्षय-पु. सूर्योदयानंतर लागून व्दितीयसूर्योदयाचे पूर्वी संपणारी तिथि; सूर्योदयास एक तिथि असतां दुसरा सूर्योदय होण्यापूर्वीच चंद्र व सूर्य यांमध्यें बारा अंशांपेक्षां अधिक अंतर पडल्यास तिसरी तिथी लागते व मधलीचा लोप होतो तेव्हां म्हणतात. [दिन + क्षय] दिनांत-पु. संध्याकाळ; दिवसाचा शेवट. [दिन + अंत] दिनावधि-धी-स्त्री. १ एक दिवसाचा काल. २ दिरंगाई; आज उद्यांची चालढकल; विलंब; उशीर. [दिन + अवधि] दिनें देवडें-क्रिवि. रोजच्यारोज; एकसारखें, रोज नवीन. 'दिनें देवडें, चोळी लुगडें तिळभर नाहीं चुका । घर नंदाचें गोकुळ नांदे जणुं दुसरी द्वारका । ' -पला ८१.

दाते शब्दकोश

गो

स्त्री. १ गाय. २ बैल (पशु). समासांत-गाईपासून झालेलें; गाईसंबधीं (दुध, चामडें, मांस इ॰). 'अगा गोक्षीर जरी जाहलें । तरी पथ्यासि नाहीं म्हणितलें ।' -ज्ञा २.१८४. [सं.] सामाशब्द- ॰कर्ण- ॰क्रण-न. १ मुलाला दूध पाजावयाचें (गाईच्या कानाच्या आकाराचें) बोंडलें. २ एक वेल व तिचें फूल. ३ बारा ज्योतिर्लिंगांपैकीं एक. हें कुमठें (कानडा जिल्हा) तालुक्यांत आहे. ४ (तजा.) दांड्याचें सारपात्र; कावळा. याचा आकार गोकर्णासारखा असतो. -पु. गाईचा कान. गोकर्णांत येणें- संपुष्टांत, गाकुळांत येणें; संपणें; दरिद्री होणें. गोकर्णिका- कर्णी-स्त्री. एक प्रकारचा लगाम. गोकर्णी-स्त्री. एक वेल, हिचीं फुलें (पांढरीं, निळीं) गाईच्या कानासारखीं असतात. [सं.] गोकु(कू)ल ळ-न. १ श्रीकृष्णाच्या लहानपणच्या वसतीचें गांव. २ गोकुळाष्टमीस नंद, यशोदा, गोप-गोपी, गाईवासरें इ॰ ची पूजा करण्यासाठीं केलेलीं मातीचीं चित्रें. ३ (ल.) स्वैरसं- भोग; व्यभिचार. (क्रि॰ माजविणें). [सं. गा + कुल] गोकु ळांत येणें-१ संकोचित होणें; संपुष्टांत येणें; संपणें. २ आटा- क्यांत येणें (व्यवहार). [विश्वव्यापी कृष्णपरमात्मा ज्याप्रमाणें गोकुळाच्या मर्यादेंत आला त्याप्रमाणें] गोकुळाष्टमी-स्त्री. श्रावण वद्य अष्टमी; या दिवशीं भगवान् श्रीकृष्णाचा जन्म झाला. [सं.] गोकुळासारखें घर-न. मुलाबाळांनीं सुखसंपत्तीनें भरलेलें घर. गोकोश-पु. जमीन मोजण्याचें एक माप: गायीच्या हंबरण्याचा टप्पा; गोरुत; दोन कोसांचें अंतर. गोखडी-स्त्री. गाई उभ्या राहण्याची जागा; गोठण. 'गिलच्यानीं गोखडींत दहा-पांच बैरागी सत्पुरुष होते तेहि बसले ठिकाणीं लबे कले.' -भाब २८ गोखमा-पु. १ गुराखी. २ (ल.) गांवढळ खेड- वळ; शेत्या; नांगर्‍या. गोखरें, गोखोण-रेब/?/-न. (कों) गुरांनीं खाऊन शिल्लक राहिलेलें गुरांच्या पायाखालचें. निरुपयोगी गवत. 'केळीला गोखरेडाचें खत चांगलें [गौ + खूर] गोखाना- पु. १ सरकारी किंवा एखाद्या मोठ्या माणसाचा गायवाडा; गुरांचें खातें. २ गायठाण; गोठा. [सं. गो + फा. खाना] गोग्र- हण-न. गाईचें हरण, चोरी. 'उत्तरगोग्रहण.' 'तृवां गोग्रह- णाचेनि अवसरें । घातलें मोहनास्त्र एकसरें ।' -ज्ञा ११.४६९. [सं.] गोग्रास-पु. १ जेवण्यास बसण्यापूर्वीं गायीसाठीं राखन ठेवलेला अन्नाचा नैवेद्य. २ गाईसाठीं भिक्षा. [सं.] गोचर-न. गुरचरण; गुरचराई. [सं.] गोचर्म-न. १ गाईच कातडें. २ (ल.) जमीन मोजण्याचें एक माप. गाईच्या चामड्याइतकी जमीन; (गाईच्या कातड्याची वादी काढून तिनें वेष्टिलेली जमीन एका माणसानें राजापासून मागून घेतल्याची एक जुनी गोष्ट आहे तिच्यावरून) तीनशें फुट लांब व दहा फूट रुंद या मानाचें क्षेत्र (यांतील धान्य एका माणसास एक वर्ष पुरतें असा हिशोब आहे). [सं.] गोजरूं गोजी-नस्त्री. (प्रेंमानें किंवा तिरस्कार करतेवेळीं योजना) कालवड; वासरी. गोजिव्हा-स्त्री. एक वनस्पति; गोजबान पाथरी; दवली. [सं.] गोठ(ठा)ण-स्त्रीन,. दुपारीं सावलीसाठीं पाण्याजवळ झाडाखालची बसण्याची गुरांची आखर. जागा; गोठा. 'पशु पीडती पर्जन्यें । गळती गाईंची गोठणें ।' -मुसभा ३.७९. [सं. गोष्ठ, गोस्थान म्ह॰ गोठणीच्या गाई माभळभट दान घेई. = हलवायाच्या घरांवर तुळशीपत्र. गोठण घालून बसणें-सभेत अस्ताव्यस्त बसणें. गोठा-ठो-पु. गुरें बांधण्याची जागा; जना- वरे रहाण्याची जागा. [सं. गोष्ठ; प्रा. गोट्ट] गोठापाणी-न. सकाळीं गोठा झाडणें. गुरांच शेण, मूत काढणें इ॰ गोठ्यांतील व्यवस्थेचें काम गोठाव(वि)णें-सक्रि. गोठणांत गुरें जमविणें; गोठ्यांत गुरें घालणें. गोठी-स्त्री. (कों.) वासरांचा लहान गोठा. गोठ्यौचें-क्रि. (गो.) पशूंचें बसणें. [गोठा] गोथवड-स्त्री. (कों.) गुरांची दावण, ठाण; लांब पडळ; कोटंबा. [सं. गोष्ठ- वत्] गोदंती हरताळ-स्त्री. पिवळा हरताळ. गोदण-स्त्री. (बे.) गुरापुढें वैरण टाकण्याची जागा. [गवादणी] गोदन- न. (माण.) लहान गोठा. गोंदरड-स्त्री. (राजा.) गोठ्यांतील केरकचरा, घाण. गोदान, गोप्रदान-न. ब्राह्मणास गाईचें दिलेलें दान. 'प्राचीन काळीं गाय दान मिळणें सोपें होतें, पावली मिळणें कठीण, पण हल्लीं चार आण्यांत गोप्रदान.' -गांगा १४४. गोदान-न. सोळा संस्कारांपैकीं व समावर्तनाच्या वेळीं करावयाचा एक संस्कार. [सं.] गोधन-न. गुरढोरे किंवा त्यांच्या रूपानें संपत्ति. 'धन्य तीं गोधनें कांबळी काष्ठीका ।' -तुगा २०८. गोधूल मुहूर्त, गोंधळिक, गोंधुळूक-पुन. १ सायंकाळचा (गुर रानांतून परत घरी येत असतां त्यांच्या) चालण्यानें उडालेली धूळ दिसते तेव्हांचा) काळ. २ सुर्यास्ता- पूर्वींची व नंतरचीं ३० पळें यामधील काळ; हा लग्नास शुभ मान- तात. गोरज मुहूर्त. गोधूल लग्न-न. १ गोरज लग्न. गोधूल पहा. २ सूर्यास्तसमयीं उदय पावणारी राशी, लग्न. गोधूलिक-वि. गोधूलसंबंधीं (कार्य. लग्न-मुहूर्त). गोधूळ-ळी-स्त्री. गोधूल पहा. गोप-पु. गुराखी, गवळी जात. व तींतील एक व्यक्ति. 'पूजिति सांग नगा ती रीति । सुखाचीच गोप सांगन गाती ।' -मोकृष्ण २४.७. गोपचार-पु. गायरान; गोचरण. गोपद-न. १ गाईचें पाऊल. २ गाईच्या पावलाचा मार्ग, खूण. ३ आंत पाणी भरलेली गोपदाची खूण, डबकें. गोपद्म-न. चातुर्मास्यांत रांगो- ळीनें गाईचीं पावलें नववधू काढतात व पूजा करतात तें. गोपद- चिन्ह. [सं.] गोपवाडा-पु. गवळीवाडा. ' जो नांदवी उत्कट गोपवाडे ।' -सारुह १.७८. गोपाल-ळ-पु. १ गुराखी; गुरें पाळणारा. २ राजा. ३ भगवान श्रीकृष्ण. ४ एक जात व तींतील व्यक्ति; डोंबारी; हे मनगटानें दगड फोडतात, मोठालीं वजनें उचलतात व कसरतीचे खेळ खेळतात, हें गांवकर्‍यांचीं गुरें राखो- ळीला घेतात. -गांगां १२२. गोपाष्टमी-स्त्री. कार्तिक शुद्ध अष्टमी या दिवशीं त्यांची व गाईची पूजा करतात. गोपाळकाला-पु. गोकुळअष्टमीच्या उत्सवाच्या व श्रीकृष्णाच्या इतर उत्सवाच्या शेवटीं करावयाचे खेळ, द्यावयाचा प्रसाद,जेवण इ॰; गोकुळा- ष्टमीच्या पारणेच्या दिवशीं दहीहंडी फोडून तींतील प्रसाद वाट- तात तो. गोपाळखेळ-पु. गोपाळ लोकांची कसरत, खेळ; डोंबार्‍यांचा खेळ. गोपाळीं-क्रिवि. गोरजीं; गोधूललग्नीं. गोपिका, गोपी-स्त्री. गोपालस्त्री; गवळण. 'तुझे कथिति गोपिका विविध तीस बोभाट ते ।' -केका ८६. [सं.] गोप्र- दान-१ गोदान पहा. २ (थट्टेने) शिव्या. 'त्यानें त्यास गोप्र- दानें केलीं.' गोप्रसव-पु. कुनक्षत्रीं जन्मलेलें मूल गाईच्या तोंडापुढें धरतात व असें केल्यानें तें गाईचें मूल होऊन अशुभा- पासून मुक्त होतें, अशा मुलाला म्हणतात. गोप्रसवशांति-स्त्री. कुयोगीं जन्मलेलें मूल गाईच्या मुखांतून जन्मलें अशी भावना धरून कुयोगदोषनाशार्थ करावयाची शांति. गोब्राह्मण-पु. १ गाय आणि ब्राह्मण. २ (ल.) अगदीं साधाभोळा, गरीब ब्राह्मण. गोमय-नपु. गाईचें शेण. 'शुद्ध करूनिया गोमय गोळा । मृति- काकण विरहित ।' [सं.] गोमाशी-स्त्री. घोडे, गाई इ॰ च्या अंगावरील एक मोठी माशी; माशीची एक जात. गोमांस-न. गाईचें मांस; शपथेसारखा किंवा निषेध दाखवीतांना याचा उपयोग करतांत. कारण हिंदूंना गोमांस अगदीं निषिद्ध आहे. 'ही तुमची ठेव मला गोमांसाप्रमाणें आहे.' गोमुख-न. १ तीर्थ इ॰ पवित्र पाणी खालीं पडण्यासाठीं बांधलेलें किंवा बनविलेलें दगडी किंवा धातूचें गाईचें तोंड. २ एका प्रक्रारचें गाईच्या तोंडासारखें वाद्य.'तों वाद्यें शंखभेर्यादी पणवानक गोमुखें ।' -वामन गीतासमश्लोकी १.१३. गोमुखव्याघ्र-पु. १ दिसण्यांत गाई- सारखा सौम्य पण अतिशय क्रूर असा वाघ. २ गाईचें कातडे पांघ- रलेला लांडगा. ३ (ल.) वरून गरीब पण आंतून लुच्चा माणूस. [सं.] गोमुखी-स्त्री. गाईच्या तोंडासारखी काटकोनी जपमा- ळेची पिशवी; हिच्या आंत हात घालून जपाची माळ ओढतात. 'काय मौन धरुनिया गोमुखिला जाळिसी ।' -राला ८७. -पु. (कों.) एक प्रकारच्या नवसांत नियम केल्यामुळें हात न लावतां तोंडानें अन्न उचलून जेवणारा माणूस [सं.] गोमूत्र-न. गाईचें मूत; हे पवित्र मानतात व अपवित्र वस्तूंवर शिंपडून त्या पवित्र करतात. गोमूत्रिका, गोमूत्रिकन्यायगुणाकार-पु. (ज्यो.) गुणाकराचा एक प्रकार. गोमुत्रिकाबंध-पु. काव्याचा एक प्रकार याच्या द्वितीय चरणांत पहिल्या चरणांतील बहुतेक अक्षरें येतात. गोमूत्रवायु-पु. एक नवयुक्त वायु. (इं) आमोनिया. गोमेघ- पु. ज्यामध्यें गाय मारतात तो यज्ञ. [सं.] गोरखी-पु. गुराखी; गुरें (गाई) पाळणारा. 'कवळाचिया सुखें । परब्रह्म झालें गोरखें ।' -तुगा १८१. गोरज पु. गाईची धूळ. गोधूल पहा. 'गोरजें डवरला, मुखचंद्र ।' -ह १८.६३. गोरजमुहूर्त-गोधूलमुहूर्त पहा. गोरस-पु. गाईचें दूध, दहीं, तूप इ॰ गाईपासून होणारे पदार्थ. [सं.] गोरक्ष-रक्षक-पु. १ गुराखी. २ गुरांची रक्षक देवता. ३ नाथपंथांतील गोरखनाथ नांवाची एक प्रसिद्ध व्यक्ति गोरख-गोरखनाथ पहा. गोरक्षण-न. कसायापासून गाय वांच- विणें; गोपालन. गोरा-र्‍हा-पु. गाईचा पाडा, खोंड; धांडा. गोरुव-न गोवत्स. गोरूं, गोरवा, गोरें-न. (राजा. गो.) ढोर, गुरूं, 'गोरु खडबडी बाहिरी ।' -भाए ३९४. गोरो- चन-ना-नस्त्री. गोवर्धन; हें गोमूत्रापासून किंवा कुपित्थाच्या रूपानें गाईच्या ओकण्यापासून, किंवा गाईच्या डोक्यांत उत्पन्न होतें याचा रंग पिवळा. हें रंग, चित्रें औषधें यांत उपयोगी आहे. 'गोरोचनापरिस गौर असें गणावें ।' -र. ६. (लोक समजूत अशी कीं वाजीकरण किंवा स्त्रियांस मोहविण्यांत गोरो- चनाचा उपयोगी होतो). [सं.] गोवंड-डी, गोवडी-पुनस्त्री. जंगल किंवा डोंगरावरील जनावरांची चरण्यास जाण्याची पाऊ- लवाट; गायवाट.[सं. गोवर्तनी] गोवंडास लागणें-येणें- सरळ रस्त्यास लागणें; चालीस लागणें (माणूस, काम). गोवत्स- पुन. गाईचें वांसरूं. गोवत्स द्वादशी-स्त्री. आश्विन वद्य द्वादशी; या दिवशीं गाईची पूजा करितात. गोवपा-स्त्री. गाईच्या आंत- ड्यावरील आवरण; सामान्यतः गाय, बैल यांच्या चरबीस व हाडांतील मगजासहि म्हणतात. [सं.] गोंवर-पु. १ शेणी; न थापलेलें वाळलेलें शेण, वाळलेल्या शेणाचा चुरा. २ गाईनें खाल्यानंतर उरलेला चारा, गळाठा. ३ (कों.) राब. ४ (हेठ.) उकि- रडा. [सं. प्रा. गोवर] गोवरर्कोडा-पु. गोठ्यांतील केरकचरा; शेणमूत. गोवरी-स्त्री. १ वाळलेल्या शेणाची थापडी; शेणी; गोवर अर्थ १ पहा. २ (कु.) शेणखत. ३ राब भाजण्यासाठीं वाळविलेला शेणगोळा. गोवरीची आग-स्त्री. गोवरी जाळली असतां वर राख दिसते परंतु आंत विस्तव असतो यावरून गुप्त परंतु भंयकर वैर. गोवर्‍या मसणांत जाणें-वृद्धपण येणें. मरण जवळ येणें; वय होणें. गोवर्धन-पु. १ मथुरेजवळील टेकडी; इंद्रानें पाडलेल्या पावसापासून गोकुळाचें रक्षण करण्यासाठीं श्रीकृष्णनें याला करंगळीवर धारण केलें व याच्या खालीं गोकु- ळांतील सर्व माणसें आणि पशू सुरक्षित राहिलें. २ कार्तिक शुद्ध प्रतिपदेच्या (बलिप्रतिपदेच्या) दिवशीं भात, शेण, भाजी- पाला इ॰ चा वल्लभसंप्रदायी लोक गोवर्धनासारखा पर्वत करून त्याची पूजा करतात तो. -न. १ गोरोचन. २ महाराष्ट्रांतील एक प्राचीन राष्ट्र हल्लींच्या नाशिक जवळच्या भागांत हें असावें. ॰ब्राह्मण-पु. एक महाराष्ट्रीय ब्राह्मण जात. गाईच्या तोंडें गोवर्धन निवडणें-पंचाईत इ॰ प्रकरणीं ज्याचा विषय त्याच्याच तोंडानें निवाडा करणें. गोवळ, गोवळगोठा-पु. (कों.) गोशाला; गायवाडा; गोठा. गोवळ, गोवळा, गोवाळ- ळी-पु. १ गुराखी; गवळी. ' उगला राहे न करी चाळा । तुज किती सांगों रे गोवळा । -तुगा १२९. २ (राजा.) वयानें मोठा पण पोरकट माणूस; दुधखुळा (निंदार्थीं). [सं. गोपाल; प्रा. गोवाल] गोवारी-पु. गुराखी; गवळी. 'तव गाई आलिया रात्रीं । कच नाहीं आला गोवारी ।' -कथा १.५.८२. गोवाल- पुअव. गंगावन; गाईच्या शेंपटीचे केंस.[सं.] गोवेल-पुस्त्री. एक वेल; ही गुरांना विषकारक असते म्हणतात; भारे बांधण्याच्या कामीं हिचा उपयोग होतो. गोवैद्य-पु. गाईचा वैद्य; गुरांचा वैद्य; पशुवैद्य. गोशत-न. १ शंभर गाई. २ शंभर गाई दान देण्याचें कर्म. [सं.] गोशाला-ळा-स्त्री. गोखाना; गोठा पहा. गोष्ठ-पुन. गोठा. गोष्पद-न. १ गाईचें पाऊल, पावलाचें चिन्ह. २ गोवंडी. ३ गोपदाइतकें माप; गाईच्या खुराखालीं समावेश होईल इतकी जमीन. ४ चिखलांत उमटलेलें वं पाण्यानें भरलेलें गाईचें पाऊल. 'गज गोष्पदीं बुडाला हा दैवा सिंधु शोषिला मशकें ।' -मोद्रोण १.२३. 'गोष्पद मानुनि दिनांत शतदां यमुना वोलांडिली । ' -राला ८१. गोष्पदोपम-वि. गोष्पदाप्रमाणें (४) ओलांडून तरून जाण्यास सुलभ; सहजसुलभ; क्षुद्र; सुगम. 'ईश्वरभजन केलें असतां भव गोष्पदोपम होतो.' गोस्फुरण- न. गाईचें अंग थरारणें, गाईनें भोंवरा करणें. [सं.] गोहण- स्त्री. गव्हाण पहा. गाताडी. गोहन-न. (व.) गाईंच्या कळप. [गोधन] गोहण्या-पु. (व.) गुराखी. गोहत्त्या -हनन- स्त्रीन. १ गाईचा वध. २ गोवधाचें पातक. गोहरा-गोहोरा- पु. गोर्‍हा पहा. म्ह॰-'गोहर्‍याच्यानें शेत पोराच्यानें संसार होता तर मग काय?' गोहोत-न. (राजा.) १ दाणा, कोंडा, पेंड इ॰ गुरासाठीं शिजविलेलें आंबोण, मिश्रण. २ (ल.) घोंटाळा; खिचडी; गोंधळ. गोक्षुर-पु. १ गोखरू; सराटा. २ गाईचा खूर. ३ गाईची पाऊलवाट; गोवंडी. [सं.]

दाते शब्दकोश

घडी

स्त्री. १ घटका; साठ पळांचा अथवा चोवीस मिनि- टांचा अवधि. 'तो अवकाळू मेघु काय घडी । राहत आहे ।' -ज्ञा १७.२५१. २ थोडासा वेळ; क्षण. 'पृथ्वीचिया पैसारा । - माजीं घडी न लागतां धनुर्धरा ।' -ज्ञा १०.२५०. ३ योग्य संधि; वेळ; काळ. 'ही पुन्हां न ये बा घडी ।' –राला ८८. ४ कालमापनाचें साधन; यंत्र; घटका; वाळूचें घडयाळ; घडयाळ इ॰. ५ (सामा.) (इंग्रजी ६० मिनिटांचा; वेळ मोजण्याचें साधारण माप तास असल्यानें तसाऐवजी चुकीनें धडी शब्द वापरतात. [सं. घटी; प्रा. घडि; हिं. गु. उ. बं. पं. घडी] (वाप्र.) (एखाद्याची) घडी भरणें-१ घटका भरणें पहा. 'आला समजूं पिशाच आपण घडी भराय माझी ।' -विक ५५. २ शिक्षा भोगण्याची वेळ येणें; घडा भरणें. घडीघटकेचा गुण-(एखादी गोष्ट अमुक प्रकारेंच कां घडली, तशीच कां घडली नाहीं हें सांगतां येत नसलें म्हणजे वरील वाक्प्रचाराचा उपयोग करतात). एखादी गोष्ट ज्यावेळीं-ज्याक्षणी घडली असेल त्या विवक्षित वेलेचें साम्यर्थ, प्रभाव, गुण. ॰घडी, घडोघडीं-क्रिवि. पुन्हां पुन्हां; वांरवार; पदोपदीं; घटको- घटकीं घडिघडि पहा. [घडी द्वि.] म्ह॰ घडीघडी लांब दाढी = हरघडीला रागावणें चरफडणें किंवा दाढी धरणें. घडीचें घडयाळ-ळें-न. क्षणभंगुर जीवित,शरीर; पाण्यावरचा बुड- बुडा. ॰भर-क्रिवि. घटकाभर; थोडा वेळ. [घडी + भरणें] ॰भरानें-क्रिवि. धोड्या वेळानें घटकाभरानें; एका घटकेनंतर; मागाहून. घडीवट-स्त्री. मुहूर्त; घटका. 'बोलें इंद्र सुरपती । जालि. घडीवटीयांची आईती । नोवरा येऊंद्या झडती । संभ्र- मेंसी ।' -कालिकापुराण १६.४२. [सं. घटी + वर्त; म. घडी + वट]

दाते शब्दकोश

लाभ

पु. १ फायदा; प्राप्ति. 'तुज लाभ काय यांत...।' -मोविराट १.१८६. २ धान्य वगैरे मोजतांना बरकत यावी म्हणून एक अशा अर्थानें वापरतात, नंतर दोन, तीन असें म्हणून माप टाकतात; बरकत पहा. ३ (कु.) शेंकड्यावर दिलेला जास्त माल (नारळ वगैरे). (भेटीचा) ॰देणें-मेटणें; भेट घेणें (आदर दर्शविण्यासाठीं योजतात). लाभा येणें-१ लाभणें. २ अनुभ- वास येणें; समजणें. 'जऱ्ही कैसेनि हे लाभा । जायेचि ना ।' -ज्ञा १५.५४२. सामाशब्द- ॰काळ-पु. फायद्याचा, प्राप्तीचा काळ, वेळ, हंगाम; उत्कर्षकाळ. 'जिवाशीं जडविलेल्या जीवासाठीं अंतकाळाला लाभकाळ समजावें लागतें.' -राजसंन्यास ५. उलट शब्द विनाशकाळ; आपत्काळ. ॰गुण-पु. फायदा; प्राप्ति. 'ह्याच्या मैत्रकीनें मला कांहीं लाभगुण नाहीं.' ॰दायक-वि. ज्याच्या संग्रहानें संग्रहकर्त्यास द्रव्यादि लाभ होतो असा (अश्व, नीळ इ॰ पदार्थ, शुभकर्म, व्यापार इ॰); फायदेशीर. ॰द्दष्टी- स्त्री. लाभाची, फायद्याची इच्छा. -वि. ज्याला केवळ फायद्याची इच्छा आहे असा; ज्यांत त्यांत लाभाची अपेक्षा ठेवणारा. [सं.] ॰लोभ-पु. १ (लाभाचा लोभ) कोणेक कार्यामध्यें मला कांहीं प्राप्त होईल असा जो लोभ असतो तो; लोभदृष्टि. २ (लाभ द्वि.) लाभ; प्राप्ति; फायदा (व्यापकार्थी व सामान्यपणें उपयोग). 'मी तीन वर्षें व्यापार करतों परंतु लाभलोभ म्हटला तर कांहीं एक नाहीं.' ३ प्राप्ति किंवा स्नेह; लाभाची अपेक्षा किंवा लोभाची भावना. 'लाभ लोभ धरुन कोण्ही कोण्हाचें काम करतो.' 'लाभा- लोभावांचून कोण कोण्हाला पुसेल.' ॰वेळ-ळा-स्त्री. १ शुभकाल; लाभदायक वेळ किंवा संधी. 'लाभवेळ पाहून काम केलें असतां अवश्य लाभ होतो.' २ दिवसाच्या किंवा रात्रीच्या आठ भागां- पैकीं एका वेळेचें नांव. वेळ पहा. ॰हानि-स्त्री. नफानुकसान; सुखदुःख. 'ज्या लाभहानि जेथें, नेतो बांधोनिकाळ दाव्यानें ।' -मोकर्ण ४७.६९. लाभणें-१ मिळणें; प्राप्त होणें. 'आज मला भेट लाभेल.' संपादन होणें. २ निष्पन्न होणें; उद्भवणें (फायदा, नफा). ३ उपयोगाचें, फायद्याचें असणें; उपयोगी पडणें. ४ शुभ- कारक, लाभदायक होणें-असणें (मुहूर्त, ग्रहबल इ॰ लग्न, मुंज इ॰ करितां). लाभाईत-वि. लाभदायक. 'घरीं येवोनिया आनंदें बोलतीं । कंन्या आम्हाप्रती लाभाईत ।' -ब ४. लाभागळी- वि. लाभदायक. 'बोलती लीळां लाभागळी ।' -दावि १३१. लाभागोभा-पु. (व्यापकार्थी) नफा; फायदा. [लाभ. द्वि.] लाभाचा-वि. फायद्याचा; लाभदायक. 'त्या वांचुनि यांसीं जो करणें संग्राम तो न लाभाचा ।' -मोविराट. लाभालाभ-पु. १ नफानुकसान; नफातोटा. २ दैव; नशीब. [सं. लाभ + अलाभ] लाभालोभा-पु. (कों.) लाभलोभ पहा. लाभालोभाचा- पु. स्नेह किंवा लाभ यांमुळें जोडलेला, गुंतलेला. 'चौघे लाभा- लोभाचे असले म्हणजे निर्वाह होतो.' लाभावळी-स्त्री. अनेक लाभ. 'तो चिन्हें शुभ पाहुनी नृप म्हणे लाभो न लाभावळी ।' -र ३०. [लाभ + आवलि]

दाते शब्दकोश

तेल

न. तीळ, खोबरें, भुईमूग, चंदन इ॰ पासून पेटण्याजोगा निघणारा एक स्निग्ध व द्रवरूप पदार्थ; पदार्थातील स्निग्ध अंश. [सं.] तैल; प्रा. तेल्ल; आर्मेनियम तेल] (वाप्र.) ॰काढणें-न. १ पिळून, शोषून घेऊन एखाद्या पदार्थाचा रस, सत्व काढणें. २ (ल.) खरपूस चोप देणें; कुटणें. ॰घेणें- (स्त्रीविषयीं हा वाक्प्र- चार योजीत असतात) आपल्या स्वतःला देवाकडे लावणें; एखाद्या देवाच्या उपयोगाकरितां कसबीन बनणें; गरतपणा सोडून भावीन होणें. दिव्यांतील थोडेसे तेल डोक्यावर घालण्यानें ती आपला उद्देश जाहीर करते. म्हणून लग्न झालेली स्त्री तेल खरेदी करणें ह्या अर्थी 'तेल घेणें' असें म्हणत नसून' तेल ठेवणें' असें म्हणते व तिला तेल खरेदी करण्यास सांगावयाचें असल्यास 'तेल घे' म्हणून न सांगता 'तेल ठेव' असें सांगण्याचा रिवाज आहे. ह्या अर्थीं तेल जिरविणें असेंही म्हणत असतात. जसें- 'तिनें येउनिया स्वकरीं । तेल जिरविलें आपले शिरीं ।' ॰चढविणें-उतरविणें- (बायकी) उष्ट्या हळदीचे वेळीं वधूपक्षाकडून वरपक्षकडे आलेलें तेल परटिणीकडून (किंवा ज्याच्या त्याच्या चालीप्रमाणें एखाद्या स्त्रीकडून) वरच्या पावलास, अंगास व डोक्यास आंब्याच्या पानानें तीन वेळ लावणें. आणि तोच अनुक्रम तीन वेळ उलटा करणें:-म्हणजे तेल उतरविणें. (पाठीला) तेल लावून ठेवणें-मार खाण्याची तयारी करून ठेवणें. लागणें-(अंगास तेल लावलेला (अभ्यंग) कोणत्याही कामाला उपयोगी पडत नाहीं यावरून) महाग, दुर्मिळ, अप्रांप्त होणें, असणें (मनुष्य, वस्तु इ॰). ॰घालणें-(एखाद्या कामांत त्या) कामाची खराबी होईल अशी कांहीं तरी वस्तू अथवा भीड मध्यें घालणें. म्ह॰ १ तेल जळें पीडा टळे. २ तेल गेलें तूपगेलें हातीं धुपाटणें आलें = दोन फायद्याच्या गोष्टी असतां मुर्खपणामुळें हातच्या दोन्ही जाऊं फायद्याचा गोष्टी असतां मुर्खपणामुळें हातच्या दोन्ही जाऊं देऊन मनुष्य पुन. कोराकरकरीत राहणें अशा अर्थीं योजितात. सामाशब्द- ॰कट-कटी, तेलगट-वि. १ ओशट; स्निग्धल तेलानें युक्त, लिप्त. २ ज्यांत तेल आहे असा (तीळ, खोबरें, इ॰पदार्थ). [तेल] ॰क(ग)तणें-अक्रि. तेलानें भरणें; माखणें; भिजणें (वस्त्र, शरीरावयव इ॰). ॰कट तजेला-पु. तुळतुळीतपणा; तेलाची चमक. ॰कटाण-स्त्री. तेलकट घाण-वास. ॰कटी-स्त्री. १ तेलाचा चिकट मळ, वळकट्या. २ ओशटपणा. -वि. तेलकट पहा. ॰कार-पु (गो.) तेली; तेल काढणारा. ॰खिस्का-पु. (माण.) खेड्यांतील मनकर्‍याच्या सुवासिनीला लग्नाचें आमंत्रण देण्याकरितां हलदकुंकू. तेल देतात तें तेलगंड-पु तेल्याला तिरस्कानें संबोधितात (न्हावगंड शब्दप्रमाणें). [तेली + गंड प्रत्यय] तेलगोटी-तेलरवा पहा. -गांगा ३३. घडी-स्त्री. जखमे- वर घालण्याकरितां तयार केलेली, तेलांग बुडवून केलेली काप- साची घडी. ॰घाणा-पु. १ तेलाची घाणी; तेल काढण्याचें यंत्र. २ (शूद्रादि जातींत) गणपतिपूजनापासून लग्न लागेपर्यंत ब्राह्मणानें करावयाचें धार्मिककत्य. तेलची-स्त्री. १ तेलांत, तुपांत तळलेली गोड पुरी; पुरणाची पोळी. 'तेलच्या आणि फेण्या गुरोळ्या जाण ।' -अफला ५७. २ कणकेंत तेलमिठाचें मोहन घालून त्याची तळलेली पुरी. -गृशि १.३९५. ॰तवा-पु. तळण्याचा तवा; हा पितळीप्रमाणें असतो. ॰तावन-स्त्री. (ना.) कढई. ॰तिमण-न. तिमण पहा. ॰तूप घालणें-(बायकी) लग्न झाल्यावर पहिलीं पांच वर्षें संक्रांतीच्या दिवशीं तेल, तूप, तिळ- गूळ, हळदकुंकू, विडा इ॰ जिन्नस घेऊन पांच घरीं नवर्‍यामुलीनें नेऊन देण्याची क्रिया. ॰तूप निरांजन-(गो.) तेल गेलें तूप गेलें हातीं निरांजन आलें या म्हणीप्रमाणें वाक्प्रचार. ॰दिवाळी- स्त्री. दिवाळीकरितां पाटलानें तेली लोकांवर बसविलेली तेलाची पट्टी, वर्गणी. ॰धार-स्त्री. पाटलाला वगैरे देण्याकरितां गांवच्या तेल्यावर बसविलेली तेलाची पट्टी. ॰पक-वि. तैलपक्क; तेलांत शिजवलेलें तळलेलें. ॰पाषाण-न. काळे तुळतळीत दगड. ॰फळ-साडी-नस्त्री. (बायकी) लग्नापूर्वी वराकडून वधूला दिली जाणारी देणगी. लग्न लागण्याचे पूर्वीं नवर्‍याकडून नवरीकडे पाठविलेलें तेल, साडी, खोबर्‍याच्या वाट्या, नारळ, हळदकुंकू, फरा- ळाचें सामान, करंज्यालाडू इ॰ सामान; लग्नापूर्वीचा अपुलकीचें व कौतुकाचें चिन्ह दाखविण्याचा हा पहिला प्रकार आहे. ॰बोळ- पु. बाळंतिणीसाठीं लागणार्‍या आवश्यक वस्तू. म्ह॰ पोराचें पोर गेलें आणि तेलबोळाचें मागणें आलें. ॰मीठ-न. किरकोळ वस्तु, पदार्थ; तेलमिटाखालीं-वारीं' इ॰ प्रकारानें कारक विभक्तींमध्यें हा शब्द योजितात व ह्याचा अर्थ 'हिंगतूप' अथवा 'हिंगधूप' ह्यासारखा होतो. ॰येवप-(गो.) (तेल येणें) नवरानवरीकडील एकमेकांकडे तेलहळद येणें. ॰रतीव-पु. प्रत्येय चालू असलेल्या तेलघाण्याच्या मालकानें घ्यावयाचा रोजचा तेलाचा रतीव; कर. ॰रवा-गोष्टी-पुस्त्री. कढत तेलांतून रवा. गोटी इ॰ काढवयाचा एक दिव्याचा प्रकार. तेलांतून वस्तू काढतानां जर हात भाजला नाहीं तर काढणारी व्यक्ति निर्दोषी आहे असें समजतात. दिव्य पहा. -गंगा ३३. -गुजा १३. ॰रांधा-पु. (माण.) देवतेचा स्थापनाविधि व त्यानंतर देवतेस करावयाचा भात. पोळ्या, तेलच्या इ॰ पदार्थांचा नैवेद्य. 'गोट्यांना तेल शेंदूर लावून त्याच दिवशीं रात्रीं तेलरांधा करतात.' -मसाप ४.४. २५८. ॰वण-न. १ तेलफळ पहा. लग्नापूर्वीचा सोहाळा. 'जहालें तेलवण मुहूर्त । अलंकार वाहिले समस्त ।' -कथा ४.८. ५५. २ (आगरी) विवाह- समारंभांत सुपांत दिवे लावून नवरी अगर यांस ओवळाण्याचा विधि. -बदलापुर ३९. ३ दैवज्ञ ब्राह्मणांत विवाहसमारंभांत विड्याच्या पानाला भोंक पाडून तें डोक्यावर धरून त्यांतून मुलीवर तेल पाडण्याचा विधि. -बदलापुर २३६. ॰तेलवण काढणें, घालणें-(ल.) चांगला मार देणें; कुटणें. ॰वरी- स्त्री तेलची पहा. 'घार्‍या तेलवर्‍या विदग्धा ।' -सारुह ६.७८. ॰वात-स्त्री. दिव्यांत तेल घालणें, वाती करणें, दिवे पुसणें इ॰ दिवे लावण्याच्या पूर्वीची तयारी. ॰वाट करणें-१ दिवाबत्ती करणें. २ दिव्यामध्यें तेल व वाती घालणें; दिवे पुसणें. ॰वात घालणें-(बायकी) (दर शनिवारीं मारुतीस) तेल व वात तेथें असलेल्या दिव्यांत नेऊन घालणें व दिवा लावणें. ॰शिपा-पु. (नविक) मोठमोठ्या माशांपासून काढलेलें एक साधारण तेल. नावेच्या बाहेरल्या अंगाला लावण्यास ह्याचा उपयोग करितात. जमाबंदीच्या हिशोबांत या शब्दाबद्दल नुस्ता शिपा येवढाच शब्द आहे. ॰शुभ्रात-स्त्री. एखाद्या प्रसिद्ध देवळांत नंदादीप लावण्या- साठीं आसपासच्या खेड्यापाड्यांवर सरकारी पट्टी बसवून जमविलेलें तेल. [तेल + शुभ + रात्र] ॰ष्टाण-साण-स्त्री. तेलाची घाण. तेलस-सर-वि. १ तेलकट. २ तेलट; ज्यांत तेल जास्त आहे असा. ॰साडी-तेलफळ पहा. 'मग सावित्रीशीं तेलसाडी नेस- विती ।' -वसा ४६. तेलाचा टिकला, तेलाची धार-थोड- केसें तेल. तेलाडे-पुअव. (नवीन बनावट शब्द) जमीनींत तलाचे झरे पाहणारे; तेलपारखी. 'उत्तम वाकबगार पानाडे विहिरीस पाणी कोठें लागेल हें सांगण्यांत पटाईत असतात तसेच इकडे तेलाडेहि असतात.' -सांस २.१३२. [तेल] तेलिया-पु. एक काळा रंग; तेलासारखा तुळतुळीत रंग. [तेल; हिं.] ॰कुमाईत-पु. घोड्याचा एक रंग. यांत केस लाल कमी व काळे जास्त असावे, पाय गुडघ्यापर्यंत काळे असावे व कपाळावर पंधरा ठिपका असावा. ॰पंचकल्याण-वि. चारी पाय पांढरे असणारा तेलिया कुमाईत (घोडा). -अश्वप १.२९. तेली-पु. तिळाचें वगैरे तेल काढून त्याच्यावर उपजीविका करणारी एक जात; तिच्यांतील एक व्यक्ति; तेल काढणारा व विकणारा. [तेल] म्ह॰ तेल्याचा बैल सदां आंधळा. ॰खूट-पु. गांवच्या तेल्यावर प्रयेक घाण्या- बाबत बसविलेला कर. तेलीण-स्त्री. तेल्याची बायको; तेल विकणारी स्त्री. 'तेलिणीशी रुसला वेडा । कोरडी भाकर खातो भिडा ।' -तुगा ३२८४. ॰म्ह॰ तेलणीशीं रुसला अंधारांत बसला. तेली तांबोळी-पुअव. तेली, तांबोळी ह्या जातीच्या आणि इतर हलक्या जातीच्या लोकांस व्यापक संज्ञा; अडाणी बहुसं- ख्याक लोक; हलके, अशिष्ट लोक. [तेली + तांबोळी] तेलीरी- स्त्री. (खा.) तेलांत तळलेली पुरी, तेलची. [तेल + पुरी] तेल्या- वि. तुळतुळीत; चकचकणारा; झगझगीत; तुकतुकीत (रंग). २ तेल्याबोर; घोड्याचा एक रंग. ३ तेलानें लिप्त, माखलेला; तेलकट. [तेल] ॰कुमाईत-तेलिया कुमाईत पहा. ॰खार, टाकण- खार-पु एक क्षार. याला चौकिचा टाकणखार असेंहि म्हणतात.

दाते शब्दकोश

मन

न. १ चित्त; चित्शक्ति; बुद्धि, विचार, तर्क, स्मृति इ॰ चें अधिष्ठान; अंतःकरणचतुष्टय आणि अंतःकरण पंचक पहा. २ अंतःकरण; हृदय; भाव, रस, विकार इ॰ चें अधिष्ठान; सुखदुः खादिकांचें ज्ञान करून देणारें इंद्रिय. ३ सदसद्विवेकबुद्धि; बरें- वाईट समजण्याची शक्ति; अंतर्याम. 'ज्यांचे मन त्यास ग्वाही देतें.' ४ जाणीव; आत्मबोध; भान; सावधपणा; शुद्धि. ५ संकल्पवि- कल्पात्मक अंतःकरणवृत्ति; इच्छा; निश्चयाशक्ति. 'संकल्प विकल्प तेंचि मन ।' -दा १७.८.६. ६ आवड; अंतःकरणाची ओढ, प्रवृत्ति; खुषी; मर्जी. ७ माया ८ प्रेम; लक्ष. [सं.] 'तुजवरिमन ईंचे यापरी कां इयेला ।' -र ४२. ९. ध्यान. म्ह॰ १ मनीं वसें तें स्वप्नीं दिसे. २ मन राजा, मन प्रजा. ३ मनांत एक, जनांत एक. ४ मनांत मांडे, पदरांत धोंडे. ५ मनीं नाहीं भाव, देवा मला पाव. ६ मनीं वसे तें स्वप्नीं दिसें. ७ मान जना, अपमान मना. ८ मन जाणे पापा माय जाणे मुलाचे बापा. ९ मनास मानेल तो सौदा. (वाप्र.) ॰उठणें-उडणें-आवडेनासा होणें; कंटाळा, तिटकारा, वीट येणें. 'ह्या सखलादी अंगरख्यावरून अलीकडे माझें मन उडालें आहे.' ॰कांपणें-दुःख होणें; भीति वाटणें. 'व्यूढोरस्कादिक नव मेले, मन कांपतें कथायाला ।' -मोभीष्म ९.६२. ॰खचणें- कचरणें-हिंमत सुटणें; हातपाय गळाठणें. ॰खाणें-आपण केलेल्या वाईट कृत्याबद्दल स्वतःलाच वाईट वाटणें; टोंचणी लागणें; पश्चात्ताप होणें. ॰गडबडणें-भीतीनें भरणें; गांगारणें; घाबरणें 'गडबडतें मन वेडें, माणुस मीं मीं म्हणोनि बडबडतें ।' -मोशल्य ४.४९. ॰घालणें-देणें-लावणें-मन एकाग्र करणें; लक्ष लावणें. ॰जाणें-इच्छा होणें. ॰तुटणें-मनांत कंटाळा, अप्रीति उत्पन्न होणें; मन पराङ्मुख होणें. म्ह॰ तुटलें मन आणि फुटलें मोतीं सांधत नाहीं. ॰थोड्यासाठीं निसरडें करणें-क्षुल्लक फायद्या- साठीं निश्चयापासून पराङ्मुख होणें. ॰दुग्ध्यांत पडणें-संशयांत पडणें; गोंधळणें. 'आतां माझें मन दुग्ध्यांत पडलें.' -बाळ २.१९५. ॰धरणें-१ एखाद्याच्या मनाप्रमाणें वागणें. २ हांजी हांजी करणें. 'आदर देखोनि मन धरी । कीर्तीविण स्तुती करी ।' -दा २. १०.२५. ॰पाहणें-मनाची परिक्षा करणें; (एखाद्याच्या) मनाचा कल अजमावणें; एखाद्याचे विचार त्याचें भाषण, वागणूक इ॰ वरून ठरविणें. ॰बसणें-लागणें-(कांहीं गोष्ट करावयास) अनु- कूल होणें; अतिशय आवडणें; आसक्त होणें; प्रिय वाटूं लागणें. 'नको कचा मज टाकुनि जाऊं, तुजवरि मन हें बसलें रे ।' ॰मनाविणें-मन वळविणें; मर्जी संपादणें; अनुकूल करून घेणें. ॰मानेल तसें करणें-इच्छेस येईल तसें करणें; स्वैर वर्तन करणें; स्वच्छंदानें वागणें. ॰मारणें-इच्छा मारणें; इच्छा दाबून ठेवणें. ॰मिळणें-उभयतांच्या आवडीनिवडी सारख्या असणें. 'स्त्री- पुरुषांचीं मनें मिळालीं नाहींत तर त्यांचा संसार सुखावह होऊं । शकत नाहीं.' ॰मुंडणें-इच्छा नाहींशी करणें. 'आधीं मन मुंडा व्यर्थ मुंडितां मुंडा ।' -मृ ६५. ॰मोठें करणें-उदारपणा दाखविणें; थोरपणानें वागणें. ॰मोडणें-एखाद्याची आशा विफल करणें; एखाद्याच्या इच्छेविरुद्ध वागणें; दुःख देणें. 'जयाचेनि शब्दें मन मोडे । तो एक पढतमूर्ख ।' -दा २.१०.६. ॰विटणें-कंटाळा, वीट येणें. 'बहुवीरक्षय घडला, तेणें बहुजीवितास मन विटलें ।' -मोभीष्म ११.७४. मनांत आणणें-संकल्प, निश्चय करणें; मना- वर घेणें. मनांत (मनीं) कढविणें-मनांतल्या मनांत रागानें चूर करणें. जळफळावयास लावणें. 'निजतेजें भानुला मनीं कढवी ।' -मोविराट ३.१२०. मनांत (मनीं) कालवणें-अंतःकरणांत अति शय कष्टी होणें; अतिशय दुःख होणें. 'बहुत दुःख मनीं जरिं कालवें । भिउनि ह्यास तयास न बोलवे ।' मनांत गांठ ठेवणें-मनांत वैरभाव, द्वेषबुद्धि, सूड घेण्याची इच्छा जागृत ठेवणें; अढी धरणें. मनांत गांठ बांधणें-घालणें-नीट ध्यानांत धरून ठेवणें; मनांत गोष्ट पक्की ठेवणें. मनांत चरचरणें-मनास काळजी, भीति वाटणें; दुःख होणें. मनांत ठेवणें-एखादी गोष्ट गुप्त राखणें; वाच्यता न करणें. मनांत नवमण जळणें-मनांतल्या मनांत संतापणें; मनांत द्वेष, सूड घेण्याची इच्छा जागृत ठेवणें. मनांत भरणें-पसंत पडणें; आवडणें. मनांत (मनीं) मांडे खाणें- व्यर्थ मनोरथ करणें; मनोराज्य करणें. मनांत (मनीं) म्हणणें-स्वगत बोलणें; स्वतःशीं पुटपुटणें. मनांतल्या मनांत जळणें-आंतल्या आंत जळफळणें; रागानें धुसमत राहणें. मनांतून उतरणें-आवडेनासा होणें; कंटाळा, वीट येणें. मनानें करणें- (कोणाची सल्ला न घेतां) स्वतःच्या विचारानें करणें. मनानें घेणें-मनाचा ग्रह होणें; मत बनणें. मनाला द्रव येणें-मनांत दया, प्रेम इ॰ कोमल भावना उत्पन्न होणें. मनाला लावून घेणें-अतिशय दुःख वाटणें. 'कल्पनेला सुचतील त्या गोष्टी मनाला लावून घेत बसले म्हणजे खाल्लेलं अन्न सुद्धां अंगीं लागा- यचं नाहीं.' -एक ४३. मनावर घेणें-धरणें-एखादी गोष्ट पत्करणें; तींत मन घालणें; सिद्धिस नेण्यास झटणें. 'झटता तुझा सखा तरि होतें हित, परि न हा मनावरि घे ।' -मोभीष्म ३.३. मनावर लिहून ठेवणें-कायमची आठवण ठेवणें; स्मृति- पटलावर कोरून ठेवणें. मनास (मनां) आणणें-१ लक्ष देणें; मानून घेणें. 'आम्ही वेडें बगडें गातों मनाशीं आणा ।' -ऐपो १४२. २ समजून घेणें. 'म्हणे पैल ते कोण ललना । कां तप करिते आणीं मना ।' -ह २६.२९. ३ मनावर घेणें; महत्त्वाचें मानणें; 'मी रागाच्या वेळीं बोललों तें मनास आणूं नका.' मनास येणें-वाटणें-आवडणें; पसंत पडणें. 'वारूबाई! पाहिलीस कां भावजय? येते का मनास?' -पकोघे. मनीं ठेवणें-गुप्त ठेवणें. 'चाल पुरा, हें मनींच ठेवून ।' -मोविराट ६.५२. मनीं जाण होणें-ओळखणें; जाणणें. मनीं धरणें-वागविणें-लक्ष्यांत असूं देणें. 'ह्यालागीं तुम्हाशीं बोधिलें । मनीं धराल म्हणोनिया ।' मनींमानसीं-मनोमानसीं-मनोमनी नसणें-(एखादी गोष्ट) अगदी मनांत देखील आलेली नसणें; स्वप्नींहि नसणें. मनो मन(य) साक्ष-१ मन मनाची साक्ष देतें. ज्यांना परस्परांविषयीं तिटकारा किंवा प्रेम वाटतें अशा मनुष्यास उद्देशून योजतात; एखाद्या गोष्टीबद्दल एकमेकांचे विचार एकमेकांना अंतर्मनाने कळतात या अर्थीं. २ मन स्वतःसाक्षी आहे; स्वतःच्या मनांतील अभिप्राय, उद्देश, भाव इच्छा इ॰ स्वतःस माहीत असतात. साधित शब्द.- मनाचा-वि. मनासंबंधीं; अंतःकरणाचा. मनाची आशा- ओढ-धांव-स्त्री. मनाचा कल, रोंख. सामाशब्द- ॰उथळा- वि. मोकळ्या मनाचा, साधा; छक्केपंजे न जाणणारा. ॰ओळख- स्त्री. एखाद्याच्या मनाची परीक्षा; स्वभावाविषयीं बनविलेलें मत. 'कोणाशीं वाईट बोलूं नये. कां? तर मनओळख होते.' ॰कपटी- वि. दुष्ट अंतःकरणाचा; लबाड. मनःकल्पित-वि. कल्पनेनें, तर्कानें केलेलें; काल्पनिक. मनकवडा-पु. दुसऱ्याचें मन वेधून घेण्याची शक्ति. 'मन माझें मोहिलेंस नकळे आहे तुझ्यापशीं मन- कवडा ।' -प्रला १६१. -वि. दुसऱ्याच्या मनांतील विचार ओळखणारा. ॰कामना-स्त्री. अंतःकरणांतील इच्छा. [मन + कामना] ॰कुजका-वि. हलक्या मनाचा; दुष्ट; विश्वासघातकी. मनःकृत- करणाचा. मनखोडी-स्त्री. मनोविकार. 'देवनाथ तुज हात जोडि मनखोडी सकळ सांडी ।' -देप ६३. मनच्या मनीं-क्रिवि. मनांतल्या मनांत; आपलें म्हणणें काय आहे हें न सांगतां. ॰गाडून-क्रिवि. मन लावून; अंतःकरणपूर्वक; एकाग्रतेनें. ॰देवता-स्त्री. अंतःकरणांतील देवता. १ मन; अंतःकरणांतील तर्क, आशा इ॰ ची प्रेरक शक्ति (क्रि॰ लवणें; वाहणें). 'यंदा सस्ताई होईल कीं महागाई? तुमची मनदेवता कशी लवते?' २ सदसद्विवेकबुद्धि; न्यायबुद्धि. ॰धरणी-स्त्री. मर्जी संपादन करणें; आर्जव; खुशामत. (क्रि॰ करणें) ॰धरणीचा-वि. दुस- ऱ्याचीं आर्जवें, खुशामत करण्याचा ज्याचा स्वभाव आहे असा; मर्जी संपादणारा. ॰पाकुळका, मनाची पाकुळका, मन- पिंगळा-ळी-स्त्री. बऱ्यावाईट गोष्टी करण्याची प्रेरणा करणारी मनांतील देवता; मनोदेवता. मनःपीडा-स्त्री. मानसिक त्रास; दुःख, काळजी इ॰. मनःपूत-क्रिवि. (मनाला जें पवित्र, शुद्ध वाटतें त्याप्रमाणें) मनास येईल तसें; वाटेल तसें. 'कोणी वाटेल तें भलभलतें करूं लागला म्हणजे तो मनःपूत वागतो असें आपण म्हणतों.' -गीर १२५. म्ह॰ मनःपूतं समाचरेत् । मनःपूर्वक- क्रिवि. १ मनापासून २ जाणून बुजून; मुद्दाम. मनःप्रिय-वि. मनाला आनंद देणारें; समाधानकारक. मनभाव-पु. उत्सुकता; श्रद्धा; भक्ति; मनोभाव. 'मनभाव असल्यावांचून कार्य सिद्धिस जात नाहीं.' [सं. मनोभाव] ॰भूक-स्त्री. काल्पनिक, खोटी भूक; नेहमीच्या सरावामुळें वाटणारी भूक. ॰भोळा-वि. साधा; गरीब; निष्कपटी. ॰मन-स्त्री. (व) मनधरणी; खुशामत; आर्जव. ॰मानेसें-क्रिवि. मनास वाटेल तसें; मनःपूत. 'वर्तति मनमानेसें सुरतपदा अपतिका स्त्रिया बटकी ।' -मोसभा ६.२०. ॰मान्य- वि. स्वेच्छाचारी; स्वच्छंदी; बेताल. ॰मिळाऊ-वि. सर्वांशीं मिळून मिसळून राहणारा; गोड स्वभावाचा. ॰मुक्त-क्रिवि. यथेच्छ; अमर्यादपणें; मनमुराद; मनाची इच्छा पूर्ण होईपर्यंत. ॰मुराद- वि. १ मनोहर; आल्हादकारक; आनंददायक. २ विपुल; यथेच्छ; मनसोक्त; मनाची तृप्ति होईल इतकें (जेवणांतील पक्वान्न) [अर. मुराद = ईप्सित] ॰मेळ-वि. १ आवडतें; प्रिय; मनोहर. २ शास्त्र इ॰ चा फारसा विचार न करतां दोन्ही पक्षांच्या संमतीनें झालेलें (लग्न). ॰मोकळ-वि. खुल्या दिलाचा; सरळ; निष्कपट. ॰मोकळें करून-क्रिवि. खुल्या अंतःकरणानें; संकोच, भीति, लाज इ॰ सोडून. ॰मोठा-वि. १ उदार अंतःकरणाचा. २ उदार; सढळ; मोकळ्या हाताचा. ॰मोड-स्त्री. हिरमोड; निराशा. 'नको करूं मनमोड ।' -पला २२.४. ॰मोहतिर-न. मनाचा, मनानें ठरविलेला मुहूर्त; ॰मोहन-वि. मनाला खुष करणारा; रमणीय; आवडता; प्रिय. 'मनमोहन यादवराणा । कोणी जाउनि आणा ।' ॰मौज-स्त्री. १ गमतीचा विचार, कल्पना. २ लहर; नाद; छंद. ॰मौजा-करणें-स्वःच्या (रंगेल, अनिर्बंध) इच्छा तृप्त करणें. ॰मौजी-ज्या-वि. १. लहरी; छांदिष्ट; चंचलबुद्धि. २. मिजास- खोर; दिमाखी. ॰लज्जा-स्त्री. स्वाभविक, नैसर्गिक लाज; मनो- देवतेची टोंचणी; भीति; शरम; शिष्टाचार; संभावितपणा. 'तुला मनलज्जा नाहीं जनलज्जा तर धर.' ॰वळख-स्त्री. मनओळख पहा. ॰मनश्शांति-स्त्री. मनाची शांतता. ॰मनःसंतोष-पु. मनाचें समाधान; मनास होणारा आनंद. मनसमजावणी-समजा वशी-स्त्री. रागावलेल्या, दुःखी, सचित माणसाचें सांत्वन, समा- धान करणें. ॰समजूत-स्त्री. ग्रह; मत; समज; भावना. 'सर्व मनुष्यांची मनसमजूत एकसारखी असत नाहीं.' ॰समर्पण-न. (काव्य) मन अर्पण करणें. मनसाराम-पु. (विनोदानें) मन. 'मनसारामाचे स्वाधीन सर्व इंद्रियें आहेत.' ॰सुटका-स्त्री. मन एखाद्या गोष्टीपासून परावृत्त होणें. ॰सूत्र-न. इच्छानुरूप सत्ता चालविणारें, वागणारें, मन. ॰सोक्त-क्रिवि. यथेच्छ; स्वैर; स्वच्छंद. मनःपूत पहा. 'पशुपक्षी यांचा मनसोक्त व्यवहार आहे.' ॰सोद्दिष्ट-वि. मनांत योजिलेलें, ठरविलेलें, निश्चित केलेलें. मनस्तप्त-वि. १ दुःखदायक. २ अनुतापी; दुःखपीडित. मन- स्ताप-पु. (मनाला होणारा त्रास) दुःख; शोक; पश्चात्ताप; हुर- हुर; खिन्नता इ॰ मन(नः)स्थिति-स्त्री. १ मनाची स्थिति; मान- सिक अवस्था, भावना. २ मन. 'माझी मनस्थिति चंचल आहे.' ॰हलका-वि. दुर्बल; क्षुद्र मनाचा. ॰मनाकळित-वि. मनानें आकलन केलेलें. मनाजीपंत-पु. (विनोदानें) मन. मनाजोगा-वि. जसा हवा तसा; मनासारखा. मनापासून- क्रिवि. खरोखरी; बेंबीच्या देंठापासून; अतिशय; फार. मनापून- क्रिवि. खरोखरीं. मनायोग-ग्य-वि. क्रिवि. स्वेच्छेनें; मर्जीप्रमाणें. मना- सारखा-वि. इच्छेसारखा; आवडीचा; जसा पाहिजे तसा. मनुबाई-स्त्री. मन. मनेच्छ-च्छां-क्रिवि. मनसोक्त; यथेच्छ; मनाचें समाधान होईपर्यंत. 'नदी पुलिनी गंगातिरीं । क्रिडा करिती मनेच्छां ।' [मन + इच्छा] मनेच्छा-स्त्री. मनाची इच्छा; प्रवृत्ति, कल मनेप्सित-न. मनोवांछा; मनाची इच्छा. -. -वि. मनानें इच्छिलेलें; मनोवांछित. [मन + ईप्सित्] मनोगत-न. मनीषा; हेतु; उद्देश; विचार; इच्छा. 'श्रीकृष्णवासातें वांछिती । जाणे श्रीपती मनोगत ।' -एरुस्व १५.१३८. -वि. मनांत असलेलें; ठरविलेलें. 'कुंभाराचा मनोगत जो आकार असतो तो घटावर उत्पन्न होत असतो.' मनोगति-स्त्री. १ मनाची वृत्ति, क्रिया, विचार. २ मनाचा, विचाराचा प्रवेश, पोंच; मनाची धांव; आक- लन. ३ इच्छेचा कल, प्रवृत्ति. 'हा आपल्या मनोगतीनें चालतो- वागतो-करतो.' -वि. मनाप्रमाणें वागणारा, चालणारा; विचारा- प्रमाणें चंचल. -क्रिवि. मनाच्या गतीप्रमाणें; अतिशय, कल्पना- तीत वेगानें. 'आला गेला मनोगती ।' -मारुतिस्तोत्र. मनोगम्य- वि. मनाला जाणतां येण्यासारखें; मनानें आकलन होण्या- सारखें. मनोज-पु. मदन; काम. 'मनोज मध्यस्थ करूं निघाला । ' -सारूह २.६०. मनोजय-पु. मनाचा जय; आत्मनिग्रह; मनो- निग्रह. 'तैसा मनोजयें प्रचारु । बुद्धीद्रियांचा ।' -ज्ञा १६.१८४. मनोजव-वि. मनाच्या गतीनें जाणारा; फार त्वरेनें जाणारा. मनोत्साह-पु. मानसिक उत्साह; आनंद; आवड. 'ज्याचा जसा मनोत्साह तसें तो करितो.' मनोदय-पु. १ हेतु; विचार; आशय. २ इच्छा कल, प्रवृत्ति. मनोद्देश-पु. मनांतील योजना, हेतु, बेत, विचार. मनोधर्म-पु. १ (प्रेम, द्वेष, काम, क्रोध, मत्सर इ॰) अंतःकरणाची भावना, विकार. 'न निघे मनोधर्मीं । अरोचक ।' -ज्ञा १८.६५७. २ मनाची शक्ति (विचार, कल्पना, सदसद्विवेकबुद्धी इ॰). ३ (सामा.) चित्तवृत्ति; मनोगुण. 'आहार मिळाल्या उत्तम । हरिखेजेना मनोधर्म ।' -एभा १८.२३६. ४ मनाचा चंचलता. 'तंव आंतु त्राय मोडे । मनोधर्माची ।' -ज्ञा ६.२११. ५ हेतु; बेत; विचार -वि. मनोगतीप्रमाणें वागणारा. 'सहचरु मनोधर्मु । देवाचा जो ।' -ज्ञा १७.३३. मनोधारण- णा-नस्त्री, मन राखणें; मनधरणी. मनोनिग्रह-पु. मनाला ताब्यांत ठेवणें; मनोजय; संयमन. मनोनीत-वि. मनानें पसंत केलेलें, स्वीकारिलेलें. मनोनुकूल-वि. एखाद्याच्या मनाप्रमाणें; मनाला पसंत पडण्यासारखें. मनोनुभूत-वि. मनानें अनुभविलेलें, सहन केलेलें, उपभोगिलेलें मनोभंग-पु. इच्छा बेत, आशा इ॰ फलद्रूप न होणें; निराशा. मनोभव-पु. १ मदन; काम. २ कामेच्छा; विषयेच्छा. मनोभाव-पु. १ हेतु; विचार. २ भक्ति; श्रद्धा. ३ प्रीति. मनोभावें, मनोभावें करून, मनोभावा- पासून, मनोभावानें-क्रिवि. अंतःकरणपूर्वक; मनापासून; श्रद्धेनें. 'मनोभावें ईश्वराची सेवा करावी.' मनोभिराम-वि. मनाला तुष्ट करणारा; आनंददायक; मोहक; चित्ताकर्षक. 'तेव्हां तरी तारकशक्ति राम । देईल आम्हासि मनोभिराम ।' मनोमय-वि. मनःकल्पित; काल्पनिक; अंतःकरणांतील; मानसिक. मनोमय- कोश-पु. चैतन्याच्या पांच (अन्न-प्राण-मन-विज्ञान-आनंद) कोशांपैकीं तिसरा. पंचकोश पहा. मनोमयसत्यवाद-पु. एकाच वस्तूविषयीं निरनिराळ्या लोकांच्या मनांत सारख्याच कल्पना असतात असें मत; सादृश्यवाद. (इं.) कन्सेप्च्युअ/?/लिझम्. -नीति ४०६. मनोयोग-पु. मन लागणें; लक्ष्य; अवधान. मनोयोग्य- वि. मनपसंत; समाधानकारक; संतोषकारक. मनोरंजक-वि. मनाला रमविणारें; करमणूक करणारें; चित्ताकर्षक. मनोरंजन- न. १ करमणूक; गंमत; मौज. २ मनास वाटणारा आनंद, उल्हास. मनोरथ-पु. इच्छा; बेत; हेतु; उद्देश; योजना. 'तोषूनियां वैकुंठनायक । मनोरथ पूर्ण करील ।' -व्यं ५. मनोरथ-सृष्टी- स्त्री. मनोराज्य; काल्पनिक सृष्टि. मनोरम-वि. १ मनाला रम- विणारें; मोहक. २ आनंददायक; संतोषकारक; मनोरमा-स्त्री. १ सुंदर स्त्री. २ (संकेतानें) बायको; पत्नी. मनोराज्य-न. भावी उत्कर्षाविषयींचे कल्पनातरंग; हवेंतील मनोरे. मनोविकार, मनोविकृति-पुस्त्री. मनांत उद्भवणारे कामक्रोधादि विकार प्रत्येकीं; भावना; मनोवृत्ति. मनोवृत्ति-स्त्री. १ मनाची स्थिति; चित्तवृत्ति; स्वभाव. २ मनाचा व्यापार; विचार, भावना, विकार इ॰ 'ह्या मनोवृत्ति देवपरायण झाल्या.' मनोवेग-पु. मनाची गति; अत्यंत जलद गति. मनोगति पहा. 'मनोवेगें तात्कालीं । पातले विश्वेश्वराजवळी ।' -गुच ४१.१५७ मनोवेद्य-वि. मनानें, अंतःकरणानें जाणतां येण्याजोगें. मनोव्यापार-पु. मानसिक संकल्पादि व्यवहार; विकार, विचार इ॰ मनोहत-वि. निराश; हताश. मनोहर-पु. व्यंकोबाचा प्रसाद (नैवेद्य) -तीप्र २५२. -वि. मोहक; आल्हादकारक; रमणीय; सुंदर. मनोहारी, मनोज्ञ-वि. चित्ताकर्षक; रमणीय; सुंदर; मोहक. मनौनि-क्रिवि. मनापासून; मनांतून 'तैसें मनौनि धनवरी । विद्यमानें आल्या अवसरी ।' -ज्ञा १६.८७. मनौरें-रा-न.पु. मनाची इच्छा. 'कां जे लळेयाचे लळे सरती । मनोरथांचे मनौरे पुरती ।' -ज्ञा ९ ३. बरव्या मनानें-क्रिवि. शुद्ध मनानें; चांगल्या, प्रामाणिक हेतूनें. 'सीता स्वयंवर असें बरव्या मनानें अवलक्षुनि शास्त्र अव- लोकिलें.' मोकळ्या मनानें-क्रिवि. खुल्या दिलानें; स्वतःचें मन, हेतु, भावना इ॰ स्पष्ट रीतीनें सांगून; मन मोकळें करून.

दाते शब्दकोश