मराठी बृहद्कोश

सात मराठी शब्दकोशांतील २,८४,८८८ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

मूग

मूग m A grain, Phaseolus mungo. मूग खाणें Bear in silence; keep silence.

वझे शब्दकोश

मूग mūga m (मुद्ग S) A grain, Phaseolus mungo. मूग pl खाणें or गिळणें or मुगाचें करणें To bear in silence; to stomach or put up with (abuse, insult): also, sometimes, to keep silence generally.

मोल्सवर्थ शब्दकोश

पु. एक द्विदल धान्य. ह्याचें झाड किंवा वेल सुमारें हातभर उंच वाढतो. आकृति, रंग, वाढ, शेंग हीं सर्व उडदासारखीं असतात. मात्र मुगाची शेंग हिरवट असते. हिरवा, पिवळा व काळ- सर अशा मुगाच्या निरनिराळ्या जाती आहेस. मूग हिंदुस्थानांत सर्वत्र होतो. डाळ पिवळी असून ती पथ्थर आहे. हिच्या उपयोग खिचडी, वरण, मुगदळ इ॰कडे होतो. [सं. मुद्ग; प्रा. मुग्गो]

दाते शब्दकोश

पु० धान्यविशेष.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

संबंधित शब्द

मू(मु)ग

न. मौन; स्तब्धता; मूकत्व. 'वेद वानूनि तंवचि चांग । जंव न दिसे तुझे आंग । मग आम्हां तया मूग । एके पांती ।' -ज्ञा १४.११. [सं. मूक; प्रा. मूग] ॰आरोगणें- खाणें-गिळणें-गिळून बसणें-(कोणी अपमान केला असतां किंवा आपणास उत्तर द्यावयास येत नसतां, उत्तर दिल्यास अनर्थ होईल म्हणून) न बोलतां, स्वस्थपणें, मुकाट्यानें वसणें. 'आरो- गुनी मुग । बैसलासे जैसा बग ।' -तुगा १४६८. 'जो कोणी पुढाकार घेईल त्याला कोणी कांहीं बोललें तरी मूग गिळावे लाग- तात.' -पकोधे. मूक याचें प्राकृत रूप मूग हे आहे. मूग हें धान्य खाण्याचें असल्यानें मौन स्वीकारणें ह्या अर्थीं मूक ह्याचें मूग हें रूप घेऊन खाणें, गिळणें इ॰ धातूंशीं त्याचा प्रयोग केला जातो. वास्तविक मूग धान्याला मौनाशीं संबंध नाहीं.

दाते शब्दकोश

मुगदळ

स्त्री. मूग पेरण्यास योग्य असलेली जमीन. [मूग + दळें] -न. १ मूग भाजून त्याचें केलेलें पीठ. २ अशा पिठाचे लाडू. [मूग + दळणें] मुगवण-न-न. मुगाचे भूस; मुगाचा कोंडा; मुगाचें गुळी. मुगवा-पु. १ बायकांचे एक प्रकारचें, मुगा एवढ्या चौकटी असलेलें वस्त्र; लुगड्याचा एक वाण, प्रकार. २ दुध्या भोपळा. -वि. मुगाएवढ्या चौकटी असलेलें (लुगडें).

दाते शब्दकोश

मुगदळ mugadaḷa f (मूग & दळहें) Ground bearing or fit for the cultivation of the pulse मूग.

मोल्सवर्थ शब्दकोश

मुगदळ f Ground bearing or fit for the cultivation of the pulse मूग.

वझे शब्दकोश

मुगदळ mugadaḷa n (मूग & दळणें) Flour of Múg (Phaseolus Mungo). 2 The sweetmeat-ball made of this flour with ghee and raw sugar.

मोल्सवर्थ शब्दकोश

मुग्याण

मुग्याण mugyāṇa n (मूग & दाणा) Plants (ear and stalk) of मूग as lying to be trodden out. 2 Stalks of मूग after the ear has been trodden out, múg-chaff.

मोल्सवर्थ शब्दकोश

मुगाण

न. जोंधळा किंवा बाजरी यांमध्यें पेरलेलें मूग किंवा अशा तऱ्हेचें दुसरें धान्य. मोघड, मोघण पहा. [मूग + दाणा]

दाते शब्दकोश

मुगाण mugāṇa n (मूग & दाणा) The grain Múg and another, or, generally, any mixed secondary grains, sown amidst जोंधळा or बाजरी. They grow on and ripen after the Holcus (as principal) has been cut and removed.

मोल्सवर्थ शब्दकोश

मुगी

मुगी mugī f (मूग) A diminutive variety of मूग (Phaseolus Mungo). 2 A common term for the squares of the length of a grain of मुग formed on particular cloths: also a लुगडें so figured.

मोल्सवर्थ शब्दकोश

स्त्री. १ मुगाची एक बारीक जात. २ लुगडें, खण इ॰ वरील मुगाएवढी चौकट. -वि. अशा चौकटीनीं युक्त असें (लुगडें, खण, इ॰ [मूग]

दाते शब्दकोश

मुगवा

मुगवा mugavā n (मूग. Because little squares of the length of a grain of मूग are formed on it.) A kind of silk cloth; used as an article of dress by females. 2 The white pompion otherwise called दुध्या.

मोल्सवर्थ शब्दकोश

मुगवा mugavā a Having squares of the length of a grain of मूग--a cloth.

मोल्सवर्थ शब्दकोश

मुगवण or न

मुगवण or न mugavaṇa or na n (मूग) Stalks or chaff of मूग (Phaseolus Mungo).

मोल्सवर्थ शब्दकोश

अठरा

वि. १ एक संख्याविशेष; १८. २ (सांकेतिक) पुराणें (मुख्य पुराणांची संख्या १८ आहे). 'कृष्ण वर्णुनियां श्रेष्ठ । चौघे गर्जताती भाट । अठरा मागध उद्भट । वंशावळी वर्णिती ।।' -एरुस्व ६.७६. तो हा पंढरीचा राणा । पुसा सहा चौं अठरां जणां ।।' -तुगा २५३९. [सं. अष्टादशन्; प्रा. अट्ठदह, अट्ठारस-ह; हिं. अठारह; पं. अठारां; बं. आठार; उ. अठर; गु. अढार; सिं. अडहं]. ॰अखाडे- अखाडा पहा. ॰उपधान्यें- न. अव. सजगुरा, भादली, वरी, नाचणी, बरग, कांग, खपले गहूं, मका, करडई, राजगिरा, मटकी, पावटा, मूग, वाल, कारळा, देवभात, सातू, अंबाडी. (दुसरी गणना) सजगुरा, नाचणी, वरी, मका, मटकी, राजगिरा, शिरस, पांढर- फळी, जिरें, मेथी, वेणुबीज, देवभात, कमलबीज, पाकड, अंबाडी; भेंडीबीज, गोवारी, कुड्याचें बीज, यांमध्ये कोठें कोठें खसखस व पांढरा राळा घालून ही संख्या विसावर नेण्यांत येते. ॰उपपुराणें- उपपुराणें पहा. ॰उपजा(या)ती-स्त्री. अव. अठरापगड जातीं- प्रमाणें ज्या अठरा उपजाती आहेत त्या अशा: भिल्ल, कोळी, मांग, अंत्यज, चांडाळ, पुल्कस, जिनगर, सलतानगर, चर्मक, डोहर (ढोर), भाट, बुरुड, रजक, दांगट, मोचेकरी, खाटिक, लोणारी व कैकाडी. -स्वादि ६.५.३७-३८. ॰कचेरी-स्त्री. (म्है.) राज्य- कारभारांतील सर्व वरिष्ठ खातीं असणारी मोठी कचेरी; सेक्रेटॅरिएट. ॰कारखाने- पु.अव. १ राज्यकारभारांतील खातीं: (अ)उष्टर, खबुतर, जनान, जवाहीर, जामदार, जिकीर, तालीम, तोफ, थट्टी, दफ्तर, दारू, दिवान, नगार, पील, फरास, बंदी, मोदी व शिकार हे अठरा कारखाने (आ) तोप, पील, उष्टर, फरास, शिकार, रथ, जामदार, जवाहीर, जिराईत, नगार, दारू, वैद्य, लकड, इमारती, मुदबख, कुणबिणी, खाजगत, थट्टी. (इ) खजिना, दफ्तर,जामदार, पील, जिराईत, अंबर, फरास, मुदबख, नगार, सरबत, आबदार, शिकार, तालीम, दारू, उष्टर, बकरे, तोप, सराफ. या तीन व आणखीहि कित्येक निरनिराळ्या याद्या सांपडतात. हे सर्व कारखाने सरकारी असून त्यांवर स्वतंत्र अधिकारी असत. सर्वांवर खानगी कारभारी मुख्य असे. 'त्याच्या अठरा कारखान्यांच्या गेल्या कळा । ' -एपो १४२. २ (ल.) मोठ्या संसाराच्या किंवा व्यवहाराच्या शाखा- खातीं. [अठरा + फा. कार्खाना]. ॰खूम- न. लोकांच्या अठरा जाती. सर्व प्रकारचे लोक; अठरापगड जात. 'या गांवांत एक मुकादम नाहीं, अठरा खुमाचे अठरा वेगळाले आहेत;' शिवाय-भाअ १८३४.४७. [अर॰ कौम; फा. खूम = जात,] ॰गुणांचा खंडोबा- पु. (ल.) १ सर्व (दूर्) गुणांनीं भरलेला; लुच्चा किंवा लबाड इसम; अट्टल सोदा. सोळा गुणांच्यावर कडी -जसा नाशिककर हा काशीकरापेक्षां शंभर पटीनें वरचढ तसा हा. २ अक्षयी रोगी; दुखणेकरी; अनेक रोगांनीं- दु:खांनीं व्याप्त. ॰जाती- स्त्री. अव. कुंभार, तेली, कासार, तांबोळी, न्हावी, परीट, कलाल, कोष्टी, झारा (झारेकरी), महार (चांभार), जैन, जती, दुंडे, गुजर, मारवाडी, सोनार, सुतार, हलालखोर (कसाब). -कोको. अठरापगड जाती पहा. ॰टोप(पी)कर- हिंदुस्तानांत आलेले युरोपियन आपल्या निरनिराळ्या देशरिवाजांप्रमाणे टोप्या वापरीत; तेव्हां त्यांना टोपकर असें नांव पडलें. १८ प्रकारचे (युरो- पियन) टोपकर: १ फिरंगी (पोर्तुगीज); २ वलंदेज (हालंड-डच); ३ निविशयान (नार्वेजियन); ४ यप्रेदोर?; ५ ग्रेंग (ग्रीक); ६ रखतार?; ७ लतियान (लाटिन); ८ यहुदिन (ज्यू); ९ इंगरे (इंग्रज); १० फरासीस (फ्रेंच); ११ कसनत्यान (शेटलंडियन केल्टिक?); १२ विनेज (व्हेनेशियन); १३ दिनमार्क (डेन्मार्क; १४ उरुस (आयरिश किंवा रशियन); १५ रुमियान (रुमानियन किंवा रोमन); १६ तलियान (इटालियन); १७ सुवेस (स्विस); १८ प्रेमरयान (पोमेरॅनियन). -भाइ १८३५. दुसरी एक यादी- फिरंगी, इंग्लिश, फ्रान्सीस, सिंध, पावलिस्त, क्रिस्त, ब्रम्हेय, डौन, द्रुप, क्राज, सुस्त, नाग, जर्मिनी, कालील, बांक, चीन, युवरेर, दौंडी. -कोको. यांत नुसते युरोपियन येत नसून हिंदुस्तानाबाहेरील चिनी वगैरेहि लोक येतात 'वडिलांची अठराटोपीकरावर सलाबत आहे.' -विवी. ८.३.५५. ॰तत्वें- न. अव. महान् (बुद्धि), अहं- कार, मन, दहा इंद्रियें आणि पंचतन्मात्रें -गीर १८५. ॰धान्यें- न. मुख्य धान्यें-गहूं, साळ, तूर, जव, जोंधळा, वाटाणा, लाख, चणा, जवस, मसूर, मूग, राळा, तीळ, हरिक, कुळीथ, सावा, उडीद, चवळी. ॰धान्यांचे कडबोळें- न. (भाजणी-अठरा धान्यें भाजून केलेल्या पिठाचा एक खाद्य पदार्थ ). (ल.) १ निरनिराळ्या प्रकारच्या गोष्टीचें मिश्रण. २ अनौरस अपत्य; जारज. ३ भिन्न जातींचा संकर; संकरजात; संकर जातींतील व्यक्ति ॰पगडजात-स्त्री. १ तांबट, पाथरवट, लोहार, सुतार, सोनार, कासार, कुंभार, देवलक (गुरव), धनगर, गौळी, लाडवाणी, जैन, कोष्टी, साळी, चितारी, माली, तेली, रंगारी. -स्वादि ६.५.३५-३६. जशी युरोपियानांत टोप्यांची -अठरा टोप- कर-तशी हिंदु लोकांची पगड्या बांधण्याची तऱ्हा जातीजातींत वेगळी आहे; तेव्हा जितक्या जाती तितके पगड्यांचे प्रकार; या- वरून सर्व जाती किंवा जातींचे लोक; एकूणएक लोक. २ अव्य- वस्थित, मिश्र जनसमूह; नाना धर्मांचा जमाव. 'या यात्रेंत अठरापगड जात मिळाली आहे, तेथें सोंवळें काय पुसतां?' [अठरा + पगडी किंवा पगडा = फाशावरील संख्यावाचक चिन्ह] ॰पद्में वानर- पु. अव. तरुणांचा जमाव, टोळी, सैन्य; वानरसेना. (रामाला मदत करणारीं १८ पद्मे वानरें होतीं). ॰पर्वें- न. अव. महाभारताचीं मुख्य प्रकरणें:-आदि, सभा, वन विराट, उद्योग, भीष्म, द्रोण, कर्ण, शल्य, सौप्तिक, स्त्री, शांति, अनुशासन, अश्वमेघ, आश्रमवासी, मौसल, महाप्रस्थानक व स्वर्गारोहण. ॰पर्वें भारत- न. (ल.) मोठी कंटाळवाणी गोष्ट; लांबलचक, जींत अनेक भारुडें व दुःखप्रसंग भरले आहेत असें कथन; चऱ्हाट. ॰पुराणें-पुराणें पहा. ॰बाबू-लबाड किंवा लुच्च्या लोकांची टोळी; आळशी लोकांचा कंपू; अव्यवस्थित लोकांचे मंडळ; बारभाई. (हल्लीं) कारकून वर्ग. बाबू पहा. [बं. हिं. बाबू = राजेश्री; समान्य; आंइं. इंग्रजी लिहिणारा हिंदु कारकून ] ॰भार वनस्पति-स्त्री. पृथ्वीवरील सर्व वृक्ष-वन- स्पति यांचा समुदाय, 'अठराभार वनस्पतींची लेखणी ।' -व्यं ३१. ॰वर्ण-पु. अठरा (पगड) जाती. यांची एक यादी अशी; ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, कुंभार, गवळी, तेली, पांचाल, (सोनार, सुतार, लोहार, तांबट, पाथरवट, हे पांच मिळून) , कोष्टी, रंगारी, शिंपी, न्हावी, पारधी, महार, धनगर, परीट, मांग व चांभार. ॰विसवे (विश्वे)-वि. अतिशय; बहुतेक परिपूर्ण; जास्त प्रमाणाचें. विश्वा, विसवा पहा. [अठरा विसांश; वीस विसावांचा एक रुक्का, अठरा विसवे म्हणजे दोन विसवा कमी इतकें; बहुतेक पूर्ण] ॰दारिद्र्य (दरिद्र)-न. अतिशय गरिबी. 'त्याच्या घरीं अठरा विश्वे दारिद्र आहे.' 'अठराविश्वे दरिद्र पाणी वाहतें.' ॰विश्वे-पापपुण्य- चौकशी-मुर्ख-धर्म-रोग इ॰ वाक्प्रचार.

दाते शब्दकोश

आंब      

स्त्री.       १. हरभऱ्याला घाटा येण्यापूर्वी त्या रोपांवर संध्याकाळच्या वेळी एक फडके पसरून ठेवतात. सकाळी दवाने ते भिजते व त्यामध्ये हरभऱ्याचे आम्ल शोषून घेतले जाते. हे फडके पिळून जो द्रव मिळतो तीच आंब होय. ही पोटदुखी, मोडशी आणि पटकी यावर देतात. २. लांबट फळे येणारी आंब्याची एक जात. ३. आंबण्याचा धर्म, शक्ती. ४. आंबटपणा; आंबट पदार्थ (चिंच इ.)(गो.); आंबोण; आम्लरस : ‘जाणपणे न पिएति आंब ।’ − शिव ८४. ५. साधे आंबट वरण; सार; चिंचवणी; कढी. [सं. अम्ल] (वा.) आंब ओरपणे – १. दळ, मगज, गीर, काढून घेणे. २. (ल.) एखाद्या पदार्थातील सत्त्वांश काढून घेणे; चांगले तेवढे घेणे. (गो.) आंब रंगात घालणे– (चर्मकारी) बाभळीची साल व हिरडा यांचा रंग रापून थोडा हिणकस झाल्यानंतर त्यात चामडे ठेवणे. आंब पिणे– मूग गिळून बसणे; मौन धरणे : ‘जाणिवा आंब न पिया : तरि हे (चक्रधरस्वामी) काइ होए ऐसें तुम्हीचि विचारा पां’ − लीचउ ५३६.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

असहाय

दावणींतले जनावर, बापशेटीचा माल, मूग गिळले, धमकीखाली प्रतिकारशून्य वांके, गरीब गाय, कोणी वाली नाही, वास्तपूस्त करणारें नाहीं, नेणाऱ्या मागून फरफटत जाई, निराधार, निरुपाय, गत्यंतर नसलेला, त्याच्याशिवाय सद्गत नाहीं, स्वतःवर संतापून जाळण्यापलीकडे काय करणार ? त्याच्या क्षुब्ध मनांत अनेक अर्थशून्य वादळें निर्माण झालीं, दुसरें तरी काय करणार?

शब्दकौमुदी

अठरा धान्यें

अठरा धान्यें aṭharā dhānyēṃ n pl The eighteen superior grains; viz. गहूं, साळ,तूर,जव,जोंधळा,वाटाणा, लांक, चणा, जवस, मसूर, मूग, राळा, तीळ, हरीक, कुळीथ, सावा, उडीद, चवळी, as per Shlok, गोधूम शालि तुवरी यव यावनाल वातान लंक चणका अतसा मसुराः ॥ मुद्ग प्रियंगुतिल कोद्रवकाः कुलित्थाः श्यामाक माष चवला इति धान्यवर्गः ॥ 1 ॥

मोल्सवर्थ शब्दकोश

अठरा उपधान्यें

अठरा उपधान्यें aṭharā upadhānyēṃ n pl The eighteen inferior grains; viz. सजगुरा, भादली, वरी, नाचणी, बरग, कांग, खपले- गहूं, मका, करडई, राजगिरा, मटकी, पावटा, मूग, वाल, कारळा, देवभात, सातू, अंबाडी. Others reckon them thus--सजगुरा, नाचणी, वरी, मका, मटकी, राजगिरा, शिरस, पांढरफळी, जिरा, मेथी, वेणु- बीज, देवभात, कमलबीज, पाकड, अंबाडी, भेंडीबीज, गोवारी, कुढ्याचें बीज, and to these some add two others, making twenty, viz. खसखस & पांढराराळा.

मोल्सवर्थ शब्दकोश

बोधगें

न. मूग, उडीद, मटकी यांचा कोंडा, भूस.

दाते शब्दकोश

बोधगें bōdhagēṃ n Chaff of मूग or of उडीद or of मटकी.

मोल्सवर्थ शब्दकोश

चणक      

पु.       चणा; हरभरा : ‘चणक, मसुर, मूग, उडीद... दश द्विदल जाणावे ॥’- मुआदि १४·११२. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

धान्यपंचक      

न.       गहू, तांदूळ, सातू, तीळ, मूग ही शंकराला लाखोलीवाहण्याला योग्य अशी धान्ये.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गा(गां)ठी

स्त्री. १ खारीक, खोबरें, लवंगा, जायफळ इ॰ची माळ; गाठलें (मुलांचें). २ होळीच्या सणांतील गळ्यांत घालाव- याची साखरेच्या पदकांची माळ (ही होळी-पाडव्याला मुलांना देतात. ३ -पु. (राजा.) अळवाच्या पानांचा गांठलेला तुकडा किंवा त्या पानांची सुपारीएवढया गांठींची दह्यांतील भाजी; अळूवडी. ४ गांठ या स्त्रीलिंगी शब्दाचें अनेकवचन. ५ (गो.) दाण्यांची भाजी. ६ (गो.) मूग इ॰ कडदणांची पातळ भाजी. उ॰ मुगाची, चण्यांची गांठी. ७ अहंकार, आढ्यता. -शर. -वि. हट्टी. [सं. ग्रंथि] ॰कि(चि)राईत, गांठेकि(चि)राईत-न. एक प्रकारचें चिरा- ईत. ॰चा दाम-मान-पु. गांठदाम-सोडावण पहा. गाठींव- वि. गांठलेलें; गांठींनीं कायम केलेलें (हार, माळ). [गांठणें] ॰हळद-स्त्री. गांठी गांठी असलेलीं हळकुंडें.

दाते शब्दकोश

गाठी      

स्त्री.       १. अळव्याच्या पानांची सुपारीएवढ्या गाठींची दह्यातील भाजी; अळूवडी. (राजा) २. दाण्यांची भाजी. (गो.) ३. मूग इ. कडदणांची पातळ भाजी. (गो.) ४. फरसाणमधील हरभरा डाळीचा एक पदार्थ.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गडगडांवचे      

सक्रि.       १. मूग, चणे वगैरे पाटावरून खाली तिरकस लोटून निवडणे. २. नारळाचा कीस बारीक करणे. (गो.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गडगडांवचें

क्रि. १ (गो.) मूग, चणे वगैरे पाटावरून खालीं तिरकस लोटून निवडणें. २ नारळाचा कीस बारीक करणें.

दाते शब्दकोश

घाटा      

पु.       १. पहा : घाटणा, घाटपेरा. २. बाजरी, उडीद, मूग इ. शिजवून व वाटून गुरांकरिता केलेले पौष्टिक खाद्य : ‘एकाचिया घाट्‌या टोके । एका फिके उपचार ।’ – तुगा १८०. ३. जोंधळ्याच्या, बाजरीच्या कण्या शिजवून तयार केलेले खाद्य; भात : ‘ज्या भक्षिती केवळ ताक घाटा ।’ – सारुह ३·१६. ४. मृत जनावर ओढण्यासाठी महारांना देण्यात येणारे धान्य.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

घाटा

पु. १ घाटणा, घाटणेरा पहा. २ बाजरी, उडीद, मूग इ॰ शिजवून व वाटून गुरांकरितां केलेलें पौष्टिक खाद्य. 'एकाचिया घाट्या टोके । एका फिके उपचार । ' -तुगा १८०. ३ जोंधळ्याच्या, बाजरीच्या कण्या शिजवून तयार केलेलें खाद्य; भात. 'ज्या भक्षिती केवळ ताक घाटा । ' -सारुह ३.१६. [घाटणें = ढवळणें, घोंटणें] ॰घुगरी-स्त्री. (ल.) गरीबांचें अन्न; मीठभाकर. 'घाटा घुगर्‍या कोरड्या भाकरी । ' -निगा १००. [घाटा + घुगरी]

दाते शब्दकोश

घाटा ghāṭā m (घाटणें) A stick with a cloth at the end. Used to stir about grain &c. under parching. 2 A stirabout or mash of boiled बाजरी, उडीद, मूग &c. (for cows or cattle): also husked and boiled बाजरी or जोंधळा gen.

मोल्सवर्थ शब्दकोश

इंद्रियदमन

मनोविजय, इच्छाशम, इंद्रियदमन करण्यापेक्षां इंद्रियाची तृप्ति कमी हानिकारक मार्गानें करण्याची संधि दिल्यानें कार्य जास्त सुलभ होते, मनोनिग्रहाच्या या शिकवणुकीचा एक वळसा तर पचविला, इंद्रियदमन म्हणजे मूग गिळून बसणें नव्हे, जो अन्याय मुकाट्याने सहन करतो तो त्या अन्यायांत भागीदार होतो.

शब्दकौमुदी

काळ

पु. (व.) उडीद किंवा मूग यांचे जाडेंभरडें भूस.

दाते शब्दकोश

काळ      

पु.       उडीद किंवा मूग याचे जाडेभरडे भूस; कळण. (व.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कडदण, कडदाण, कडधण, कडधन, कडधान्य      

न.       द्विदल जातीय, डाळी करण्याचे धान्य. (मूग, मठ, उडीद, तूर, मसूर, हरभरा, पावटा, वाटाणा इ.) : ‘दीड विद्या अडीच पांड जमिन गिलाबस (गिमवस) कडधन …’ – समोरा ४·६०. [सं. काष्ठ + धान्य]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कडदण, कडधण, कडधान्य

कडदण, कडधण, कडधान्य kaḍadaṇa, kaḍadhaṇa, kaḍadhānya n (कड from काष्ट S through कट, & धान्य S through दाणा. Growing on little trees.) A general name for leguminous plants and legumes, viz. मूग, मठ, उडीद, तूर, मसूर, हरभरा, करडई, पावटा, वटाणा, लांव &c.

मोल्सवर्थ शब्दकोश

कडदण-दाण-धण-धान्य

न.द्विदलजातीय, डाळी करण्याचे धान्य (मूग, मठ, उडीद, तूर, मसूर, हरभरा, पावटा, वाटाणा इ॰) [सं. काष्ठ + धान्य; प्रा. कट्ट + धन्न]

दाते शब्दकोश

कडधान्य      

न.       पावटा, वाटाणा, मूग वगैरे. [सं. काष्ठधान्यम्]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कढक, कढण      

न.       १. (सामा.) काढा; कढविलेले पाणी; ज्यात काही पदार्थ उकळला आहे असे पाणी; पिठले : ‘कढण काला कालविलें ताक ।’ − निगा १००. २. तूर, मूग वगैरे कडधान्य ज्यात शिजविले आहे असे पाणी; कट; कट्टू. ३. मांसाचे कालवण; मांस शिजविल्यानंतर त्यात आलेला तवंग, मांदे. (वा.) कढक निघणे, कढण निघणे − रंजीस येणे; मेटाकुटीला येणे. (ना.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कढण, क

न. १ (सामा.) काढा; कढविलेलें पाणी; ज्यांत कांहीं पदार्थ उकळला आहे असें पाणी; पिठलें. 'कढण काला कालविलें ताक ।' -निगा १००. २ तूर, मूग वगैरे कडधान्य ज्यांत शिजविलें आहे असें पाणी; कट; कट्टू. ३ मांसाचें काल- वण; मांस शिजविल्यानंतर त्यांत आलेला तवंग, मांदें. [कढ] ॰निघणें-(ना.) रंजीस येणें; मेटाकुटीस येणें.

दाते शब्दकोश

किरगे      

स्त्री.        मूग, धान्य. (गो. ख्रि.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

किरगे

स्त्री. (गो. ख्रि.) मूग, धान्य.

दाते शब्दकोश

कण्ण

न. (गो.) मूग किंवा मुगाच्या डाळीची केलीली गोड कांजी. [सं. कण]

दाते शब्दकोश

कटण      

न.       धान्य कढवून घेतलेले त्याचे पाणी : ‘मूग : ससूर कटण तो यूष म्हणीजे ।’ – वैवस.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कठाण, कठान, कठाणमठाण      

न.       १. मूग, उडीद, तूर वगैरे कडधान्य; कडदण. पहा : काठण २. रब्बीचे पीक. (व.) (वा.) कठाणी ठेवणे– १. कडधान्यासाठी, रब्बीसाठी जमीन राखून ठेवणे. २. उपाशी ठेवणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कठाण-न, कठाणमठाण

न. १ मूग, उडीद, तूर वगैरे कडधान्य; कडदण; काठण पहा. २ (व.) रब्बीचें पीक. 'यंदा कठाण बरें आहे.' कठाणी ठेवणें-१ कडधान्यासाठीं, रब्बीसाठीं जमीन राखून ठेवणें. २ उपाशी ठेवणें. [सं. काष्ठ; प्रा. कठ्ठ + दाणा]

दाते शब्दकोश

खरीप, खरीफ      

पु.       १. कार्तिकात तयार होणारे पीक; पहिले पीक; पावसावरील पीक : ‘अश्विन मासी गारा पडल्या, खरीफ बुडालें.’ - मइसा ३. १६४. २. खरीपाच्या हंगामातील धान्य; पूर्वधान्य (मूग, मटकी, बाजरी इ.) [फा. खर्फ]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खरीप-फ

पु. १ कार्तिकांत तयार होणारें पीक; पहिलें पीक; पावसावरील पीक; गुजराथेंत याला चौमासी पीक म्हणतात. 'अश्विन मासी गारा पडल्या, खरीफ बुडालें. ' -रा ३.१६४. २ खरीपाच्या हंगामांतील धान्य; पूर्वधान्य (मूग, मटकी, बाजरी इ॰). [अर. खरीफ्]

दाते शब्दकोश

मुद्ग

मुद्ग mudga m S (Popularly मूग) A grain, Phaseolus mungo.

मोल्सवर्थ शब्दकोश

पु. मूग धान्य.

दाते शब्दकोश

मुगाभोंपळा

मुगाभोंपळा mugābhōmpaḷā m (मूग & भोंपळा) The white pompion, Cucurbita lagenaria.

मोल्सवर्थ शब्दकोश

मुगाणा

पु. (राजा). भरडलेले मूग; मुगाचा डोळ. [मुग + दाणा]

दाते शब्दकोश

मुगारी or मुंगारी

मुगारी or मुंगारी mugārī or muṅgārī f (मूग) The खरीप or autumnal harvest. Opp. to हिंगारी. Both the words are Canarese, but current about Solápúr.

मोल्सवर्थ शब्दकोश

मुगदाणा

न. (बे.) वेसण; बैल, रेडा इ॰ पशूंच्या नाकांत घातलेली दोरी. [का मूग = नाक + दावणी = दावें; सं. मुख + दामन् = दावें]

दाते शब्दकोश

मुगीमुग

स्त्री. स्तब्धता. [मूग = मूक]

दाते शब्दकोश

मुगट

मुगट mugaṭa a (मूग) Smelling like Mug (Phaseolus Mungo);--used of grain kept long in damp granaries.

मोल्सवर्थ शब्दकोश

पंचधान्यें

पंचधान्यें pañcadhānyēṃ n pl The five grains suitable for offerings, viz. wheat, barley, rice, sesamum, मूग (Phaseolus mungo). One lákh of each of these are offered to Mahádeva in the offering called लाखो- ली. 2 पंचधान्याचा काढा is composed of coriander, andropogon muricatum, dry ginger, cyperus pertenuis, and cinnamon (धणा, वाळा, सुंठ, नागरमोथा, दालचिनी).

मोल्सवर्थ शब्दकोश

रानमूग

रानमूग rānamūga m Wild variety of मूग, Phaseolus (lobatus).

मोल्सवर्थ शब्दकोश

साहणे

सहन करणें, कळ काढणें, ओरडा न करणें, चीप रहाणें, तोंडांतून ब्र न काढणें, जणूं कांहीं कांहीं झालेंच नाहीं असें दाखविणें, अपमान गिळणें, तोंडांतून शब्द न काढतां मार खाणें, बिनतक्रार ऐकून घेणें, बिनबोभाट येऊं देणें, विरोध न करणें, दुस-याला पचूं देणें, ध्यानांतहि न आलेंसें दाखविणें, सगळे मनाआड करून टाकणें, ही कोयनेलची गोळी मी डोळे मिट्टन घेतली, मूग गिळून गप्प.

शब्दकौमुदी

शमी

स्त्री. १ ओक कांटेरी झाड. (दसऱ्याच्या दिवशीं शमीची पूजा करितात). २ या झाडाचा (देवाला वाहण्यास आण- तात तो) पाला. शमीस संवदड म्हणतात. [सं.] ॰धान्य-न. शेंगेंत उत्पन्न होणारें तूर, मूग, वाटाणा वगैरे धान्य. याच्या उलट शूकधान्य. [सं.] ॰पूजन-पूजा-नस्त्री. दसऱ्याच्या दिवशीं शमीच्या झाडाचें केलेलें पूजन, अर्चन.

दाते शब्दकोश

सुडी

सुडी suḍī f (शंड S root. To collect or heap together.) A stack of unthrashed corn; a stack of sheaves (esp. of जोंधळा or बाजरी). Sometimes applied to a pile of sheaves of नाचणी, वरी, राळा, उडीद, मूग &c. 2 A bundle (of grass).

मोल्सवर्थ शब्दकोश

तुसार

तुसार tusāra n तुसारधान्य n (तुष S through तूस & धान्य) The crop (of उडीद, मूग, and various beans) gathered just previously to the खरीप or autumnal harvest.

मोल्सवर्थ शब्दकोश

उकड

स्त्री. १ मोदक वगैरे करण्याकरितां शिजवून केलेलें तांदूळ वगैरेंचें पीठ. (क्रि॰ तिंबणें). -वि. उकडलेला; शिजवलेला. [उकडणें; सं. उत्क्कथ्] ॰आंबा, उकडांबा-पु. पाडाचा आंबा उकडून तोंडीं लावण्यासाठीं करतात तो; तो बरेच दिवस टिकावा म्हणून पाणखारांत घालून ठेवितात. ॰गरे-पु. अव. गरे शिजवून उकडून भाजी करतात ती. फणस जून असला म्हणजे त्याची अशी भाजी करितात. -गृशि १.२०४. ॰पीठ-न. तांदळाचें वगैरे उकडलेले पीठ. ॰पेंडी-स्त्री.(ना.) रव्याला फोडणी देऊन तयार केलेलें एक रुचकर खाद्य. [तुल॰ का. उप्पिट्टु = खारा सांजा] ॰पोळी-स्त्री, उकडींत गव्हाच्या सांजाचें पुरण घालून केलेली पोळी. ॰रस्सा-पु. मांस, हाडे वगैरेपासून तयार केलेला रस्सा. -गृशि २.४९. ॰लोणचें-न. उकडलेल्या लिंबांचें लोणचें, मिरच्या इ॰ ॰हंडी-स्त्री. १ पावटे, भुई- मूग वगैरेंच्या ओल्या शेंगा एका मडक्यांत घालून तें पालथें भुईवर ठेवून त्यावर विस्तव पेटवून उकडतात ती. २ स्वैपाकांत भांडें उलटें करून उकडण्याची एक पद्धत. उकडीचे मोदक-पु. अव. नारळाचा कीस काढून, त्यांत साखर घालून तें पुरण तांदळाच्या पिठाची उकड तयार करून तिच्या पापडींत घालून उकडून तयार केलेला एक पदार्थ.

दाते शब्दकोश

उतवडा      

पु.       (कृषि.)एकाच सरीत बाजरीबरोबर अंबाडी तूर, मूग, मटकी वगैरे धान्य मिसळून पेरणे. [क. उतू =नांगरणे.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उतवडा

पु. (कृषि) एकाच सरींत बाजरीबरोबर अंबाडी, तूर, मूग, मटकी वगैरे धान्य मिसळून पेरणें. [का. उतू = नांगरणें]

दाते शब्दकोश

विलायती

विलायती vilāyatī a ( A) Relating to a foreign country, esp. to England or Europe. 2 Sharp at acquiring prevalence or influence. The word has the import and force, and occurs in the vulgar applications, of the English words Clever, cunning, knowing, knavish, shrewd &c. 3 विलायती, signifying Foreign, is freely applied to exotics of nature and to products of art viewed, not simply as foreign, but as superexcellent, extraordinary, or remarkable; as वि0 ऊस m A kind of sugarcane; वि0 कोंबडा m A turkey; also a Guinea-fowl; वि0 गवत n Lucerne or Medicago sativa; वि0 चना m The garden-pea (common green pea); वि0 चिंच f A small-leaved tree, bearing a small fruit; वि0 थुवर f Slipper plant; See थुवर; वि0 धोतरा m A variety of Thorn-apple. It has thorny leaves, and it bears a yellow flower; वि0 निवडुंग m n The broad-leaved, dark green, unthorny निवडुंग, Euphorbia inermis; वि0 बाभळ f The Parkinsonian tree; वि0 मूग f (Commonly भुईमूग) Ground-nut; वि0 मेंधी f Myrtus communis. Grah.; वि0 वांगी f A plant, and वि0 वांगें Its fruit, the Tomato. See fully under बेलवांगी. वि0 शेर n Slipper-plant. See थुवर. 4 Applied in the sense of Wild, haramscaram, rantipole, mischievous &c. to children.

मोल्सवर्थ शब्दकोश

वरकस

वरकस varakasa a An epithet in common for the inferior cereal grains, i. e. for all except rice, wheat, barley, holcus sorghum, holcus spicatus; also for all the pulses except तूर, हरभरा, वटाणा, मूग, मठ. 2 Fit only for the culture of वरकस--land.

मोल्सवर्थ शब्दकोश

वि. १ तांदूळ, गहूं, बाजरी, जोंधळा इ॰ मुख्य धान्यें व तूर, हरभरा, वाटाणा, मूग, मठ हीं कडधान्यें सोडून इतर हलकें, गौण (धान्य). नाचणी, वरी, हरिक वगैरे. २ अशा हलक्या धान्याला योग्य (जमीन); नापीक; माळरानाची. ३ (विशेषतः भातशेताभोवतालची, गवताची (जमीन). वरकसल-स्त्री. वरकस धान्यें, कडधान्यें यांना सामान्य संज्ञा. वरकशी-वि. वर- कस धान्याच्या पिकालाच योग्य अशी (जमीन). [वर + सं. कृष्]

दाते शब्दकोश

वरंगळणें

अक्रि. घरंगळणें; पाटावरून घरंगळत खालीं सोडून मूग वगैरे धन्यांतील खडे वगैरे निवडून काढणें.

दाते शब्दकोश

धान्य

न. १ भात, गहूं, बाजरी, इ॰ मनुष्याच्या शरीर- पोषणाच्या उपयोगाचा पदार्थ; दाणागोटा. तांदूळ, गहूं, ज्वारी इ॰ तृणधान्यें हरभरा, तूर, उडीद इ॰ द्विदल धान्यें व करडई, तीळ, जवस इ॰ तैलधान्यें असे धान्याचे तीन मुख्य वर्ग आहेत. २ नवरात्रांत देवीपुढें किंवा चैत्रांत गौरीपुढें थोड्याशा मातींत गहूं किंवा भात यांचीं जीं लहान रोपें करतात तीं समुच्चयानें. ३ दसर्‍याच्या दिवशीं पागोट्यांत, टोपींत, खोवण्यांत येणारा गहूं, भात इ॰कांच्या रोपांचा तुरा. ४ धणे. [सं. धान्य; गु; धान्य] (वाप्र.) ॰झटकणें-धान्य साफ करणें, वारवणें. ॰हुडकणें- सक्रि. शोधणें; निवडणें; धुंडणें. पद्धति-एक लांब लोखंडी गज जमीनींन मारून व त्याचा वास घेऊन अमुक ठिकाणीं धान्य पुरलें आहे. असें नेमकें सांगणें. 'लष्करांतील कित्येक लोकांचा धान्य हुड- कून काढण्याचा धंदाच होता.' -ख १०५५. अठरा धान्यांचें कडबाळें-न. अठरा पहा. सामाशब्द- ॰देश-पु. पुष्कळ धान्यें पिकणारा, सुपीक देश. [सं.] ॰पंचक-न. गहूं, तांदूळ, सातू, तीळ व मूग हीं शंकरास लाखोली वाहण्यास योग्य अशीं धान्यें. [धान्य + सं. पंचक = पाचांचा समूह] ॰पंचकाचा काढा- पु. धणे, वाळा, सुंठ, नागरमोथा आणि दालचिनी यांचा काढा. [धान्य = धणे + सं. पंचक = काढा] ॰पलाल न्याय-पु. धान्य म्हटलें म्हणजे त्यामध्यें त्याचा पेंढाहि अंतर्भूत होतो. त्यास वेगळें महत्त्व नसतें. राजाला जिंकल्यावर प्रजाहि स्वभाविकपणें जिंकल्या गेल्या असें मानण्यास हरकत नाहीं. यावरून एखादी मुख्य गोष्ट साध्य, सिद्ध, झाल्यावर तदनुषंगिक बारीकसारीक गोष्टी आपोआपच साध्य, सिध्द होतात. [धान्य + सं. पलाल = पेंढा, गवत] ॰फराळ- पु. उपवासाच्या दिवशीं धान्य भाजून केलेले, कोरडे खाद्य पदार्थ इ॰कानें केलेला फराळ. [धान्य + फराळ] ॰भिक्षा-स्त्री. धान्याची मळणी होत असतांना भिक्षुक गांवोगांव फिरून मिळवितात ती धान्याची भिक्षा, बलुतें. [धान्य + भिक्षा] ॰माप-न. धान्य मोजा- वयाचें माप, परिणाम. उदा॰ शेर, पायरी इ॰. ॰वणवा, वी- पुस्त्री. अकस्मात् धान्य जळून खाक होणें. 'अग्न लागला शेतीं । धान्य वणव्या आणि खडखुती । युक्ष दंड जळोनि जाती । अक- स्मात ।' [सं. धान्य + म वणवा]

दाते शब्दकोश

पंच

वि. पांच; ५ संख्या. [सं.] ॰उपप्राण-पुअव. पांच वायु:-नाग = शिंक येणारा वायु, कूर्म = जांभई येणारा, कृकल = ढेंकर येणारा, देवदत्त = उचकी येणारा व धनंजय = सर्व शरीरांत राहून तें पुष्ट करणारा व मनुष्य मेल्यावर त्यांचे प्रेत फुगविणारा वायु. 'नाग कूर्म कृकल देवदत्त । पांचवा धनंजय जाण तेथ ।' -एभा १३.३२०. ॰कन्या-स्त्रीअ. पांच सुविख्यात पतिव्रता स्त्रिया; अहल्या, द्रौपदी, सीता, तारा आणि मंदोदरी. ॰कर्में-नअव. शरीराचीं मुख्य पांच कामें-ओकणें, रक्तस्त्राव होणें, मलोत्सर्ग, मूत्रोत्सर्ग, नाक शिंकरणें इ॰. किंवा गतीचे पुढील पांच प्रकार:-उत्क्षेपण (वर करणें), अपक्षेपण (खालीं करणें), आकुंचन (आखडणें), प्रसारण (पसरणें) व गमन (जाणें). ॰कर्मेंद्रियें-हात, पाय, वाणी, शिश्न व गुद. कर्मेंद्रिय पहा. ॰कल्याण-णी-वि. १ गुडघ्यापर्यंत पांढरे पाय व तोंडावर पांढरा पट्टा असलेला (घोडा) हा शुभ असतो. -अश्वप १.९०. 'पंच कल्याणी घोडा अबलख ।' ३ (उप.) सर्व अवयव विकृत असलेला (माणूस). ३ (उप.) भाड्याचें तट्टू, घोडा (याला दोन्ही टाचांनीं, दोन्हीं मुठींनीं व दांडक्यानें मारून किंवा तोंडानें चक् चक् करून चालवावें लागतें म्हणून). ४ (उप.) ज्याच्या नाकाला निरंतर शेंबूड असून तो वारंवार मणगटांनीं काढून टिरीस पुसत असणारा असा (पोर). ॰काजय-स्त्री. (गो.) पंचखाद्य पहा. ॰कृष्ण-पुअव. (१) महानुभाव संप्रदायांतील ५ कृष्ण-कृष्णचक्रवर्ती, मातापूर येथील दत्त, ऋद्धिपूरचा गुंडम राउळ, द्वारावतीचा व प्रतिष्ठानचा चांग- देव राउळ. -चक्रधर सि. सूत्रें पृष्ठ २१. (२) हंस, दत्त, कृष्ण, प्रशांत व चक्रधर. -ज्ञाको (म) ७७. ॰केणें-न. मसाल्यांतील मिरी, मोहरी, जिरें, हिंग, दगडफूल इ॰ पदार्थ. ॰केण्याचें दुकान-न. छोटेसें किराण्याचें दुकान. ॰केदार-पुअव. केदार, ममद, तुंग, रुद्र, गोपेश्वर. ॰कोटी-स्त्री. उत्तर हिंदुस्थानांतील शंकराचें तीर्थक्षेत्र. ॰कोण-पु. पांच कोनांची एक आकृति. -वि. पांच कोनांची. ॰कोश-ष-पुअव. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय व आनंदमय अशीं देहाचीं पांच आवरणें. या कोशांचा त्रिदेहाशीं पुढीलप्रमाणें समन्वय करतात-अन्नमयाचा स्थूलदेहाशीं, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, यांचा सूक्ष्म किंवा लिंगदेहाशीं व आनंदमयाचा कारणदेहाशीं. ॰क्रोशी-स्त्री. १ चार, पांच कोसांच्या आंतील गांवें; एखाद्या क्षेत्राच्या भोंवतालची पांचकोस जमीन. 'पुरलें देशासी भरलें शीगेसी । अवघी पंचक्रोशी दुम- दुमीत ।' -तुगा २६१०. ३ (ल.) या गांवांतील जोशाची वृत्ति. ४ पंचक्रोशी यात्रा पहा. ॰क्रोशी यात्रा-स्त्री. क्षेत्राची विशे- षतः काशी क्षेत्राच्या भोंवतालच्या पांच कोसांतील देवस्थानांना प्रदक्षिणा, तार्थाची यात्रा. ॰खंडें-नअव. आशिया, यूरोप, अमे- रिका, अफ्रिका, ओशियानिया. ॰खाज-जें-खाद्य-नपुन. १ ख या अक्षरानें प्रारंभ होणारे खाण्यायोग्य असे पांच पदार्थ (खारीक, खोबरें, खसखस (किंवा खवा) खिसमिस व खडी साखर). -एभा १.०.४९२. 'पूर्ण मोदक पंचखाजा । तूं वऱ्हाडी आधीं ।' -वेसीस्व ३. २ (गो.) नारळाचा खव, गूळ. चण्याची डाळ इ॰ पांच जिन्नसांचा देवाला दाखवावयाचा नैवेद्य. ३ (कों.) तांदूळ किंवा गहू, काजळ, कुंकू, उडदाची डाळ व खोबरें यांचा भूतपिशाचांना द्यावयाचा बळी; या पांच वाणजिनसा. ॰गंगा- -स्त्री १ महाबळेश्वरांतील एक तीर्थ. येथें कृष्णा, वेणा, कोयना, गायत्री (सरस्वती) व सावित्री यांचा उगम आहे. २ काशी क्षेत्रां- तील एक तीर्थ. 'गंगा भारति सूर्यसूनु किरणा बा धूतपापा तसे । पांची एकवटोनि तीर्थ निपजे ते पंच-गंगा असें ।' -नरहरी, गंगा- रत्नमाला १५७ (नवनीत पृ. ४३३). ३ पंचधारा पहा. (क्रि॰ वाहणें). ॰गति-स्त्री. घोड्याच्या पांच चाली-भरपल्ला किंवा चैवड चाल; तुरकी किंवा गाम चाल, दुडकी, बाजी, आणि चौक चाल. यांचीं संस्कृत नावें अनुक्रमें:-आस्कंदित, धौरितक, रेचित, वल्गित, प्लुत. ॰गव्य-न. गाईपासून निघालेले, काढलेले पांच पदार्थ दूध, दहीं, तूप, गोमूत्र, शेण यांचें मिश्रण (याचा धार्मिक शुद्धिकार्याकडे उपयोग करतात). ॰गोदानें-नअव. पापधेनु, उत्क्रांतिधेनु, वैतरणी, ऋणधेनु, कामधेनु. हीं पंचगोदानें और्ध्वदेहिक कर्मांत करतात. ॰गौड-पु. ब्राह्मणांतील पांच पोट जाती-(अ) गौड, कनोज (कान्यकुब्ज), मैथिल, मिश्र व गुर्जर; किंवा सारस्वत, कान्य- कुब्ज, गौड, उत्कल आणि मैथिल. ॰ग्रंथ-पुअव. यजुर्वेदाचे पांच ग्रंथ-संहिता, ब्राह्मण,आरण्यक, पदें आणि क्रम. ॰ग्रही- स्त्री. एका राशींत पांच ग्रहांची युति. [पंच + ग्रह] ॰तत्त्वें-नअव. पंचमहाभूतें पहा. ॰तन्मात्रा-स्त्रीअव. पंचमहाभूतांचीं मूलतत्त्वें, गंध रस, रूप, स्पर्श, शब्द हे गुण. 'प्रकृति पुरुष महत्तत्त्व । पंच, तन्मात्रा सूक्ष्मभाव ।' -एभा १९.१६८ ॰तीर्थ-नअव. हरिद्वार किंवा त्र्यंबकेश्वर येथील गंगाद्वार, कुशावर्त, बिल्वक, नीलपर्वत आणि कनखल हीं पांच तीर्थें. ॰दंती-वि. पांच दांत असलेला (घोडा), सप्तदंती व अशुभलक्षण पहा. ॰दाळी-स्त्रीअव. तूर, हर- भरा, मूग, उडीद व वाटाणा या पांच धान्यांच्या डाळी. ॰देवी- स्त्रीअव. दुर्गा, पार्वती, सावित्री, सरस्वती व राधिका. ॰द्रविड- पुअव. ब्राह्मणांतील पांच पोटजाती-तैलंग, द्राविड, महाराष्ट्रीय, कर- नाटकी व गुर्जर. ॰द्वयी-स्त्री. १ दक्षिणा द्यावयाच्या रकमेचे (ती कमी करणें झाल्यास) पांच भाग करून त्यांतील दोन किंवा तीन ठेवून बाकीचे वाटणें. २ अशा रीतीनें शेत, काम, रक्कम, वस्तु इ॰ची वांटणी करणें. ॰धान्यें-नअव. हवन करण्यास योग्य अशीं पांच धान्यें-गहूं, जव, तांदूळ, तीळ व मूग. महादेवाला याची लाखोली वाहतात. ॰धान्याचा काढा-पु. हा धने, वाळा, सुंठ, नागर- मोथा व दालचिनी यांचा करतात. ॰धार-स्त्री. १ जेवतांना तूप पडलें न पडलें इतकें कमी वाढणें; तुपाच्या भांड्यांत पांच बोटें बुडवून अन्नावर शिंपडणें. २ झाडास पाणी घालण्याची पांच धारांची झारी. 'जगजीवनाचिया आवडी । पंचधार करी वरी पडी ।' -ऋ ७३. ॰धारा-स्त्री. (विनोदानें) तिखट पदार्थ खाल्ला असता किंवा नाकांत गेला असतां दोन डोळे, दोन नाक- पुड्या व तोंड यांतून वाहणाऱ्या पाण्याच्या पांच धारा. ॰धारें -न. देवावर अभिषेक करावयाचें पांच भोंकांचें पात्र. [पांच + धारा] ॰नख-नखी-वि. १ पांच नखें असलेला (मनुष्य, माकड, वाघ). २ ज्यांचें मांस खाण्यास योग्य मानिलें आहे असे पांच नखें असणारे सायाळ, घोरपड, गेंडा, कांसव, ससा इ॰ प्राणी. 'पंचपंच नखा भक्ष्याः ।' -भट्टिकाव्य ६.१३१. ३ छातीवर, खुरावर पांच उभ्या रेषा असणारा (घोडा). हें अशुभलक्षण होय. -अश्वप १.९५. ४ ज्याच्या चार पायांपैकीं कोणत्याहि एका पायाला फाटा फुटल्या- सारखी आकृति असते असा (घोडा). -अश्वप १.९८. ॰नवटे- पुअव. (राजा. कु.) संसारादिकांचा अनेकांनी मिळून अनेक प्रका- रचा केलेला नाश; (एखाद्या संस्थेंत, मंडळांत झालेली) फाटा- फूट; बिघाड. (क्रि॰ करणें). २ गोंधळ; घालमेल; अडचण. [पंच + नव] ॰पक्वान्नें-नअव. १ लाडू, पुरणपोळी इ॰ पांच उंची मिष्टान्नें. २ भारी, उंची खाद्यपदार्थ, जेवण. ॰पंचउषःकाल- पु. सूर्योदयापूर्वीं पांच घटिकांचा काळ; अगदीं पहाट. 'पंच पंच- उषःकालीं रविचक्र निघोआलें ।' -होला १७ ॰पदी-स्त्री. देवापुढें नित्य नियमाने पांच पदें, अभंग भक्तगण म्हणतात ती. 'पंचपदी राम कलिसंकीर्तन ।' -सप्र २१.३६. ॰पर्व-वि. कोणत्याहि एका पायास फरगड्याची आकृति असणारा (घोडा). -अश्वप १.१०२. १०२. ॰पल्लव-पुअव. आंबा, पिंपळ, पिंपरी, वड व उंबर या किंवा इतर पांच वृक्षाचे डहाळे (किंवा पानें). स्मार्त याज्ञिकांत हे कलशामध्यें घालतात. 'पंचपल्लव घालोनि आंत । आणि अशोकें केलें वेष्टित । नरनारी मिळाल्या समस्त । लग्नसोहळिया कारणें ।' -जै ५६.१४. ॰पाखंड-न. जैन, बौद्ध, चार्वक इ॰ पांच मुख्य प्रकारचीं अवैदिक मतें, संप्रदाय. ॰पाखंडी-वि. वरील पाखंड मतांपैकीं कोणत्याहि मताचा अनुयायी. ॰पात्र-पात्री-नस्त्री. पाणी पिण्याचें किंवा इतर उपयोगाचें नळ्याच्या आकाराचें मोठें भांडें. ॰पाळें-न. लांकडाचें, किंवा धातूचें पांच वाट्या अथवा खण असलेलें पात्र. हळद, कुंकु, इ॰ पूजासाहित्य ठेवण्याच्या उपयोगी; किंवा फोडणीचें सामान ठेवण्याच्या उपयोगी पात्र. (गो.) पंचफळें. ॰पुरुषार्थ-पु. धर्म, अर्थ, काम, मोक्ष (सलोकता, समीपता, सरूपता सायुज्यता) व परमप्रेमरूपा-परानुरक्ति- पराभक्ति हें पांच पुरुषार्थ. 'जैसा ज्यासी भावार्थ । तैसा पुरवी मनोरथ । पढिये पंचपुरुषार्थ । तो हरि नांदत वैकुंठी ।' एभा २४.२७०. ॰प्रमाणें-नअव. शब्दप्रमाण, आप्तवाक्यप्रमाण, अनुमानप्रमाण. उपमानप्रमाण व प्रत्यक्षप्रमाण. ॰प्रयाग-पुअव. नंदप्रयाग, स्कंदप्रयाग, रुद्रप्रयाग, देवेंद्रप्रयाग व कणप्रयाग हे पांच प्रयाग. ॰प्रलय-पु. निद्राप्रलय, मरणप्रलय, ब्रह्म्याचा निद्राप्रलय, ब्रह्म्याचा मरणप्रलय, व विवेकप्रलय. ॰प्रवर-पुअव. ब्राह्मणांत कांहीं पंचप्रवरी ब्राह्मण आहेत त्याचे पांच प्रवर असे-भार्गव, च्यावन, आप्नवान, और्व व जामदग्न्य. प्रवर पहा. ॰प्राण- पु. १ प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. हे पांच प्राण प्राण्याच्या आयुष्यास कारणीभूत आहेत. यांचीं स्थानें आणि कार्यें भिन्न भिन्न आहेत. (क्रि.॰ ओढणें; आकर्षणें; सोडणें; टाकणें लागणें). 'देह त्यागुन पंचप्राणीं । गमन केलें तात्कळीं ।' -मुआदि २८.२४. २ (ल.) अतिशय आवडती, प्रियकर वस्तु. 'तो पंचप्राण धन्याचा ।' -संग्रामगीतें ११९. (एखाद्यावर) पंच- प्राण ओवाळणें-पंचप्राणांची आरती करणें-दुसऱ्या- करितां सर्वस्व, प्राणहि देणें; सर्व भावें करून आरती ओवाळणें; खरी, उत्कटभक्ति किंवा प्रेम दाखविणें. 'पंच प्राणांची आरती । मुक्तीबाई ओवाळती ।' ॰प्राणाहु(व)ती-स्त्री. पांच प्राणांना द्याव- याच्या लहान लहान आहुती किंवा घास या त्रेवर्णिकांनीं भोज- नाच्या आरंभीं द्यावयाच्या असतात. पांच आहुती घेणें म्हणजे घासभर, थोडेंसें खाणें. (क्रि॰ घेणें). [पंच + प्राण + आहुती] ॰बदरी- स्त्रीअव. योग, राज. आदि, वृद्ध, ध्यान. या सर्व बदरी बदरी नारा- यणाच्याच रस्त्यावर आहेत. ॰बाण-पु. (काव्य) मदन; कामदेव. मदनाच्या पाच बाणांसाठीं बाण शब्द पहा. ॰बेऊळी-स्त्री. पांच नांग्यांची इंगळी. -मनको. ॰बेळी-स्त्री. बोंबिल, कुटें इ॰ विक्री- करितां एकत्र मिसळलेले लहान मासे. ॰भद्र-वि. सर्व शरीर पिवळें असून पाय आणि तोंड मात्र श्वेतवर्ण असणारा (घोडा). अश्वप १. २१. ॰भूतातीत-वि. १ पंचभूतांपासून अलिप्त, सुटलेला (मुक्त मनुष्य, लिंगदेह). २ निरवयव; निराकार (ईश्वर). ॰भू(भौ)तिक-वि. पांच तत्त्वांनीं युक्त; जड; मूर्त; सगुण. ॰भूतें-नअव. पंचमहाभूतें पहा. भे(मे)ळ-पुस्त्री. पंचमिसळ पहा. अनेक पदार्थांचें मिश्रण -वि. पांच प्रकार एकत्र केलेलें. 'मोहोरा पंचमेळ बरहुकूम पत्र पुरंदर.' -वाडसमा ३.८३. ॰मघा-स्त्रीअव. १ मघा नक्षत्रांत सूर्य आल्या- नंतरचे पांच दिवस. २ मघापासून पुढचीं पांच सूर्यसंक्रमणाचीं नक्षत्रें. ॰महाकाव्यें-नअव. रघुवंश, कुमारसंभव, माघ, किरात, नैषध हीं पांच मोठीं संस्कृत काव्यें. ॰महातत्त्वांचीं देवस्थानें- १ पृथ्वी = कांचीवरम् (कांची स्टेशन). आप-जंबुकेश्वर (श्रीरंगम् स्टेशनपासून १२ मैल). तेज = अरुणाचल (एम्. एस्. एम्. रेलवेच्या मलय स्टेशन नजीक). वायु = कालहस्ती (वरील रेलवेच्या रेणीगुंठा स्टेशनपासून गुडुर रस्त्यावर). आकाश-चिदांबरम् (चेंगलपट रस्त्यावर). ॰महापातकें-नअव. ब्रह्महत्या, मद्यपान, सुवर्णचौर्य, मात्रागमन किंवा गुरुस्त्रीसंभोग व वरील चार महापात- क्यांची संगत. ॰महापातकी-वि. वरील महापातकें करणारा. ॰महाभूतें-नअव. पृथ्वी, आप, तेज, वायु व आकाश हीं पांच. गंध, रस, रूप, स्पर्श व शब्द हीं यांचीं अनुक्रमें सूक्ष्मरूपें होत. यांना पंचसूक्ष्मभूतें असें म्हणतात. पंचमहाभूतांचीं हीं मूलकारणें आहेत. ह्यावरून जगदुत्पत्तिविषयक ग्रंथांतून पंचभूत व पंचतन्मात्रा अशा संज्ञा ज्या येतात त्यांचा अर्थ पंचमहा(सूक्ष्म)भूतें असाच होय तन्मात्र पहा. ॰महायज्ञ, पंचयज्ञ-पुअव. ब्रह्मयज्ञ (वेदाध्ययन), पितृयज्ञ (तर्पण), देवज्ञ (होम, वैश्वदेव), भूतयज्ञ (बलि), मनुष्ययज्ञ (अतिथिसंतर्पण). भोजनाच्यापूर्वी ब्राह्मणानें नित्य करावयाचे हे पांच यज्ञ आहि्नकांपैकीं होत. ॰महासरोवरें- नअव. बिंदुसरोवर (सिद्धपूर-मातृगया), नारायणसरोवर (कच्छ- प्रांतीं मांडवी), मानस सरोवर (हिमालयामध्यें उत्तरेस), पुष्कर (अजमीर), पंपासरोवर (एम्. एम्. एस् रेलवेच्या होसपेट स्टेशननजीक). ॰महासागर-पुअव. उत्तर, दक्षिण, हिंदी, पॅसिफिक व अटलांटिक महासागर. ॰माता-स्त्रीव. स्वमाता, सासू, थोरली भावजय, गुरुपत्नी व राजपत्नी. ॰मिसळ-मेळ- पुस्त्री. १ पांच डाळींचें केलेलें कालवण, आमटी. २ पांचसहा प्रकारच्या डाळी किंवा धान्यें यांचें मिश्रण. ३ (ल.) एका जातीच्या पोटभेदांतील झालेल्या मिश्रविवाहाची संतति, कुटुंब, जात; कोण- त्याहि वेगवेगळ्या जातीच्या संकरापासून झालेली जात; संकर- जात. ४ भिन्न भिन्न पांच जातींतील लोकांचा समाज. ५ (ल.) निरनिराळ्या जातींचा एकत्र जुळलेला समाज. -वि. मिश्र; भेस- ळीचें. 'हे तांदूळ पंचमिसळ आहेत.' ॰मुख-पु. १ शंकर. 'चतुर्मुख पंचमुख । वेगें षण्मुख पातला ।' -एभा ६.२५. २ सिंह ॰मुखी-वि. १ उरावर भोंवरा असून त्यांत पांच डोळे असणारा (घोडा). -मसाप २.५५. २ पांच तोंडांचा (मारुती, महादेव, रुद्राक्ष). ॰मुद्रा-स्त्रीअव. (योग) भूचरी, खेचरी, चांचरी, अगोचरी आणि अलक्ष अशा पांच मुद्रा आहेत. 'योगी स्थिर करूनियां तेथें मन । शनै शनै साधिती पवन । पंचमुद्रांचें अतर्क्य विंदान । तें अभ्यासयोगें साधिती ।' -स्वादि ९.३.६२. ॰रंगी-वि. १ पांच रंगांचें (रेशीम, नाडा इ॰). २ धोतरा, अफू, इ॰ पांच कैफी पदार्थ घालून तयार केलेला (घोटा). ॰रत्नीगीता-स्त्री. भगवद्गीता, विष्णुसहस्त्रनाम, भीष्मस्तवराज, अनुस्मृति व गजेंद्र- मोक्ष हे पांच अध्यात्म ग्रंथ. ॰रत्नें-नअव. सोनें, हिरा, नीळ, पाच व मोतीं किंवा सोनें, रुपें, पोवळें, मोतीं, राजावर्त (हिऱ्याची निकृष्ट जात). ॰रसी-वि. १ पांच (किंवा जास्त) धातूंच्या रसापासून तयार केलेली (वस्तु). २ तोफांचा एक प्रकार. 'पंचरशी आणि बिडी लोखंडी ।' -ऐपो २२५. ॰राशिक- राशि-पुस्त्री. (गणित) बहुराशिक; दोन त्रैराशिकें एकत्र करून तीं थोडक्यांत सोडविण्याचा प्रकार; संयुक्त प्रमाणांतील चार पदांपैकीं संयुक्त गुणोत्तरांतील दोन पदें आणि साध्या गुणोत्तरांतील एक पद हीं दिलीं असतां साध्या गुणोत्तरांतील दुसरें पद काढण्याची रीत. ॰रुखी-रुढ-वि. साधारण; सामान्य; रायवळ; अनेक प्रकारचें; जंगली (लांकूड-सागवान, खैर, शिसवी इ॰ इमारतीस लागणाऱ्या पांच प्रकारच्या लांकडाशिवाय). ॰लवणें-नअव. मीठ, बांगडखार, सैंधव, बिडलोण व संचळ. ॰लवी-वि. (गो.) पंचरसी पहा. ॰लोह-न. तांबें, पितळ, जस्त, शिसें व लोखंड यांचें मिश्रण. ॰वकार-पुअव. व नें आरंभ होणारे व प्रत्येकास लागणारे पांच शब्द शब्द म्हणजे विद्या, वपु, वाचा, वस्त्र आणि विभव. 'विद्यया वपुषा वाचा वस्त्रेण विभवेन वा । वकारैः पंच- भिर्हीनो नरो नाप्नोति गौरवम् ।' ॰वक्त्र-वदन-पु. महादेव. 'भक्तोत्सल पंचवदन । सुंदर अति अधररदन ।' -देप २००. याच्या पांच तोंडांचीं नावें:-सद्योजात, तत्पुरुष, अघोर, वामदेव आणि ईशान. ॰वर्ज्यनामें-नअव. आत्मनाम, गुरुनाम, कृपणनाम, ज्येष्ठापत्यनाम व पत्निनाम. या पांच नामांचा उच्चार करूं नयें. ॰विध-वि. पांच प्रकारचें. ॰विशी-स्त्री. १ पंचवीस वर्षांचें वय. २ पंचवीस वस्तूंचा समूह. पहिल्या पंचवीशींतलें पोरगें-तरणाबांड. ॰विषय-पुअव. (कर्ण, त्वचा, चक्षु, रसना, घ्राण या) पांच ज्ञानेंद्रियांचे अनुक्रमें पांच विषय:-शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध. पंचवीस-२५ संख्या; वीस आणि पांच. ॰विसावा-वि. सांख्य मताप्रमाणें मूल-प्रकृत्यादि जीं चोवीस तत्त्वें आहेत त्यांपलीकडील पंचविसावा (आत्मा). 'तूं परम दैवत तिहीं देंवा । तूं पुरुष जी पंचवीसावा । दिव्य तूं प्रकृति- भावा- । पैलीकडील ।' -ज्ञा १०.१५०. ॰शर-पु. पंचबाण पहा. ॰सार-न. तूप, मध, तापविलेलें दूध, पिंपळी व खडीसाखर हे पदार्थ एकत्र घुसळून तयार केलेलें सार. हें विषमज्वर, हृद्रोग, श्वास, कास व क्षय यांचा नाश करतें. -योर १.३५३. ॰सूत्र-सूत्री-वि. १ पांच दोऱ्यांचें, धान्यांचें, रेषांचें. २ सारख्या लांबीच्या पांच सुतांमध्यें केलेलें, बसविलेलें (शाळुंकेसह बनविलेलें शिवलिंग). 'पंचसूत्री दिव्य लिंग करी । मणिमय शिवसह गौरी ।' ॰सूना-स्त्रीअव. कांडण, दळण, चूल पेटविणें, पाणी भरणें, सारवणें यापासून जीवहिंसादि घडणारे दोष. 'पंचसूना किल्बिषें म्हणूनि । एथें वाखाणिती ।' -यथादी ३.२३. ॰सूक्तें-नअव. ऋग्वेद संहितेंतील पुरुषसूक्त,देवासूक्त, सूर्यसूक्त (सौर), पर्जन्यसूक्त व श्रीसूक्त हीं पांच सूक्तें. ॰सूक्ष्मभूतें-नअव. पंचमहाभूतें पहा. ॰स्कंध-पुअव. सौगतांच्या अथवा बौद्धांच्या दर्शनाला अनुसरून मानवी ज्ञानाचे पांच भाग. म्हणजे रूप, वेदना, विज्ञान, संज्ञा व संस्कार. या शब्दांचे विषयप्रपंच, ज्ञानप्रपंच, आलयविज्ञान संतान, नामप्रपंच आणि वासनाप्रपंच ह्या अनुक्रमें पांच शब्दांनीं स्पष्टी- करण केलें आहे. ॰स्नानें-नअव. पांच स्नानें-प्रातः-संगव- माध्यान्ह-अपराण्ह-सायंस्नान. ॰हत्यारी-वि. १ ढाल, तरवार, तीरकमान, बंदूक, भाला किंवा पेशकबज या पांच हत्यारांनीं युक्त. २ चार पाय व तोंड यांचा शस्त्राप्रमाणें उपयोग करणारें (जनावर-सिंह, वाघ इ॰). ३ (ल.) हुशार; योग्य; समर्थ; संपन्न; सिद्ध असा (मनुष्य). ४ (व्यंग्यार्थी) शेंदाड शिपाई; तिसमारखान. ॰हत्त्या-स्त्रीअव. ब्रह्महत्त्या, भ्रूणहत्त्या, बालहत्त्या, गोहत्त्या व स्त्रीहत्त्या. पंचाग्नि-ग्नी-पुअव. १ चारी दिशांना चार पेटविलेले व डोक्यावरील तप्त असा सूर्य मिळून पांच अग्नी. 'पंचाग्नी गोरांजनें । जें प्राप्त नव्हे ।' -दा ५.६.२९. २ शरीरांतील पांच अग्नी. ३ -वि. पांच श्रौताग्नि; धारण करणारा गृहस्थाश्रमी ब्राह्मण. हे पांच अग्नी-दक्षिणाग्नि; गार्हपत्य, आहवनीय, सभ्य व आवसथ्य हे होत. -ग्नि साधन-न. चारी दिशांनां चार कुंडें पेटवून दिवसभर उन्हांत बसणें. हा तपश्चर्येचा एक प्रकार आहे. याला पंचाग्निसेवन, धूम्रपान असेंहि म्हणतात. 'चोहींकडे ज्वलन पेटवुनी दुपारीं । माथ्यावरी तपतसे जंव सूर्य भारी । बैसोनियां मुनि सुतीक्ष्ण म्हणोनि हा कीं । पंचाग्निसाधन करी अबले विलोकी ।' पंचादुयी- दिवी-दुवी-देवी-स्त्री. पंचद्वयी पहा. [अप.] पंचादेवी-स्त्री. शेताच्या उत्पन्नाचे ५ वांटे करून ज्याचे बैल असतील त्याला ३ व दुसऱ्याला (मालकाला) २ वांटे देण्याची रीत. पंचानन-पु. १ शंकर. २ (सामा.) पांच तोंडांची किंवा बाजूंची वस्तु. ३ सिंह. पंचामृत-न. १ दूध, दहीं, तूप, मध आणि साखर या पांचांचें मिश्रण. यानीं देवाच्या मूर्तीला स्नान घालतात. 'पय दधि आणि घृत । मधु शर्करा गुड संयुक्त । मूर्ति न्हाणोनि पंचामृतें । अभिषेक करिती मग तेव्हां ।' २ शेंगदाणे, मिरच्या, चिंच, गूळ, खोबऱ्याचे तुकडे इ॰ पदार्थ एकत्र शिजवून त्यास तेलाची फोडणी देऊन केलेला पदार्थ. ३ एक पक्वान्न; मिष्टान्न. [सं.] म्ह॰ १ जेवावयास पंचामृत आंचवावयास खारें पाणी. २ पंचामृत खाई त्यास देव देई. ॰मृत सोडणें-(बायकी) चातुर्मासांतील पहिल्या महिन्यांत दूध, दुसऱ्यांत दहीं, तिसऱ्यांत तूप, चौथ्यांत मध व पाचव्यांत (अधिकांत) साखर किंवा पांचवा (अधिक) नस- ल्यास चौथ्यांतच मध व साखर यांनीं युक्त असे पदार्थ न खाणें. ॰मृतानें-पंचामृतें न्हाणणें-पंचामृताच्या पदार्थानीं देवास स्नान घालणें. पंचायतन-न. १ शिव, विष्णु, सूर्य, गणपति व देवी या पांच देवता व त्यांचा समुदाय. या पांच देवतांपैकी प्रत्येक देव- तेस प्राधान्य देऊन शिव, विष्णु, गणपति इ॰ चीं पांच पंचायतनें मानण्याचीहि पद्धत आहे. (गो.) पंचिष्ट २ (ल.) एकचित्त असलेले पांच जण. ३ पंचमहाभूतांचें स्थान; शरीर. 'तें अधिदैव जाणावें । पंचायतनीचें ।' -ज्ञा ८.३६. पंचारती, पंचारत- स्त्री. १ तबकांत पांच दिवे ठेवून आरती ओवाळणें. २ आरती करितां लावलेले पांच दिवे. ३ असे दिवे ठेवण्याचें पात्र. पंचाक्षरी-वि. पंचाक्षरीमंत्र म्हणणारा व अंगांतील भूतपिशाच्च काढणारा; देव- ऋषी. 'पंचाक्षरी काढिती समंध ।' ॰क्षरीकर्म-न. पंचाक्षरीमंत्र म्हणून अंगांतील भूत काढणें. ॰क्षरीमंत्र-पु. १ भूतपिशाच्च काढ्ढन टाकण्याचा पांच अक्षरांचा मंत्र. २ ॐ नमःशिवाय हा मंत्र. पंचास्त्र-न. पंचकोण. -वि. पंचकोणी. [सं.] पंचाळ-स्त्री. (विणकाम) १ पांच पंचांकरितां लावलेला ताणा. २ एक शिवी. -वि. १ फार तोंडाळ, बडबड करणारी (स्त्री). पंचीकरण-न. १ पांच महाभूतांपैकीं प्रत्येकाचा कमीजास्त भाग घेऊन त्या सर्वांच्या मिश्रणानें नवा पदार्थ तयार होणें. -गीर १८१. २ आका- शादि पंचभूतें, त्यांचे देहादिकांच्या उत्पत्तीसाठीं ईश्वरशक्तीनें झालेलें परस्पर संमिश्रण. तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ. हा देह किंवा विश्व हें पंचमहाभूतात्मक कसें आहे याचें विवरण करणारा ग्रंथ. पंचीकृत- वि. पांच मूलतत्वें एकत्र झालेली (स्थिती). पंचेचाळ- चाळीस-ताळ-ताळीस-वि. चाळीसामध्यें पांच मिळवून झालेली संख्या; ४५. पंचेंद्रिय-नअव. पांच इंद्रियें. डोळे, कान, नाक, जिव्हा व त्वचा. यांचीं कामें अनुक्रमें-पहाणें, ऐकणें, वास घेणें, चव घेणें व स्पर्श करणें. पंचोतरा-पु. १ दरमहा दरशेकडा पांच टक्के व्याजाचा दर. २ शेंकडा पांच प्रमाणें द्यावयाचा कर. ३ सरकारसारा वसूल करतांना पांच टक्के अधिक वसूल करण्याचा हक्क. ४ सरकाराकरितां शंभर बिघे किंवा एकर जमीन लागवडी- खालीं आणली असतां पाटलाला पांच बिघे किंवा एकर सारा- माफीनें द्यावयाची जमीन. पंचोतरा, पंचोतरी-पुस्त्री. गव- ताच्या शंभर पेंढ्या किंवा आंबे विकत देतांना पांच अधिक देणें. पंचोपचार-पुअव. गंध, पुष्प, धूप, दीप व नैवेद्य या वस्तू व त्या देवाला समर्पण करणें. पंचोपप्राण-पुअव. नाग, कूर्म, कृकल, देवदत्त व धनंजय हे पांच उपप्राण. कूर्म अर्थ ३ पहा. पंचो- पाख्यानी-वि. १ (पांच प्रकरणांचे पंचोपाख्यान नांवाचा विष्णु- शर्म्याचा नीतिपर एक ग्रंथ आहे त्यावरून) अनेक कथा, संदर्भ, उदाहरण, दृष्टांत इ॰ नीं परिपूर्ण. २ कल्पित; विलक्षण; अद्भुत. ३ अभद्र; शिवराळ (स्त्रिया संबंधीं योजितात). पंच्याऐशी- पंच्याशी-वि. ८५ संख्या. पंच्याण्णव-वि. ९५ संख्या. पंच्याहत्तर-वि. ७५ संख्या.

दाते शब्दकोश