तेरा मराठी शब्दकोशांमधील ३,००,८७५ शब्दांचा एकत्रित संग्रह
शब्दार्थ
मेढ
मेढ mēḍha f A forked stake. Used as a post. Hence a short post generally whether forked or not. Pr. हातीं लागली चेड आणि धर मांडवाची मेढ. 2 The polar star.
मेढ f A forked stake. The polar star.
खळ्याची मेढ
खळ्याची मेढ khaḷyācī mēḍha f The post of a treading floor.
स्त्री. तिवडा.
मेध
पु. १ यज्ञ. (समासांत) अश्वमेध; नरमेध इ॰ २ आहुति; बळी; यज्ञिय पशु. [सं. मेध् = मारणें] मेध्य-वि. १ बळी देण्यास योजलेला, योग्य. २ (हवनीय) पवित्र; शुद्ध. 'तयाचि परी खाद्याखाद्य । न म्हणे निंद्यानिद्य । तोंडा आवडे तें मेध्य ।' -ज्ञा १८.५६०. [सं.]
मेध mēdha m S Sacrifice. In comp. as अश्वमेध, नरमेध.
मेध m Sacrifice.
खळ्याची मेढ
तिवडा; खळ्याच्या मध्यावर रोवलेला खांब. खं
मेढ / ड
स्त्री० दुबेळकें असलेलें लांकूड, आधारस्तंभ.
संबंधित शब्द
मेढी-ढें
स्त्रीन. मेढ, मेढा पहा. १ लहान मेढ. २ आडव्या फळीस. तुळईस धीर देण्यासाठीं खांबासारखा उभा केलेला दुबेळका किंवा बिन दुबेळका लहान खुंट. ३ खळ्यांत मधोमध पुरलेला खांब; तिवडा. 'जेवि खळांत वृषांचा घेरा सर्वत्र मेढिला होतो ।' -मोआश्रम ५.८८. [मेढ] मेढीचें केल-ळ-न. (कों.) १ मेढीच्या वरच्या बाजूस लांकूड ठेवण्यासाठीं राखलेले सुमारें हात भर लांबीचे दोन फांटे; दुबेळकें. २ मेढीचा शेंडा. मेढेकरी-पु. आधारस्तंभ; आधार; अवष्टंभ. मेढ्या पहा. मेढेकोट-पु. मेढा; लकडकोट; लांकडाचें केलेलें दाट, मदबूत कुंपण [मेढा] मेढेजोशी-पु. १ जमीनींत खुंटे पुरून तिथि इ॰ कांची गणना करणारा जोशी. २ भविष्यकथन, शकुन पाहणें, शुभाशुभ काल सांगणें, पंचांग करणें इ॰ धंदे करणाऱ्यांचा एक वर्ग किंवा त्यांतील एक व्यक्ति हे शूद्र असून मेढेमताचे अनुयायी असतात. मेढेमत पहा. ३ (उप.) गांवचा पिढीजाद, वतनदार जोशी. ४ महा- रांचा धर्मगुरु. दाकोता पहा. मेढेदाई, मेढेदाईक-वि. शेजा- ऱ्याच्या आवारापासून आपलें आवार भिन्न करण्यासाठीं आपल्या हद्दीवर कुंपण घालणारा शेत इ॰ चा मालक. [मेढा + दाय] मेढेबंदी-स्त्री. मेढेकोट. मेढेंमत-न. उत्तरध्रुवाच्या ताऱ्याव- रून बसविलेलें एक ज्योतिषमत. शूद्रांत हें मत प्रचलित आहे. याकरून मेढेजोशी किंवा डौरीजोशी यांचा वर्ग निघाला. [मेढ = ध्रुवतारा + मत] मेढ्या-वि. (कुटुंब, सैन्य, मंडळी इ॰ कांचा) आधारस्तंभ असलेला; मेढेकरी; पुढारी; मुख्य. २ लबाडीच्या, लुच्चेगिरीच्या कामांत तरबेज असलेला. ३ मेढेजोशी पहा. [मेढ]
मांडव, मांडौ
पु. १ (लग्न, मुंज इ॰ शुभकार्याकरितां घातलेला) मंडप; आच्छादिलेली जागा; शमीआना. २ द्राक्षी इ॰ वेल चढून फैलावण्याकरितां केलेला कमानदार रस्ता. ३ देवास अर्पण केलेला इमला. ४ (खा.) झाल; ऐरणीदान करण्याचें वंशपत्र. [सं. मंडप] म्ह॰ चुटक्याचें मांडव = पोकळ प्रतिष्ठेचें बोलणें. 'मियासाहेबांनी चुटक्याचें मांडव यथास्थित रचून...' -नि. ॰खंडणी-खण्णी-स्त्री. शूद्र लोकांत होणाऱ्या लग्न व इतर विशिष्ट धार्मिक प्रसंगीं जोशी, उपाध्याय यांचा दक्षिणेचा हक्क. ॰डाहाळे-पुअव. मांडवावर पसरण्याचे, लावण्याचे वृक्षाचे डहाळें. -ऐरापु ६३. ॰देवता-प्रतिष्ठा-शोभा-(प्र.) मंडप- देवता इ॰ पहा. ॰परतणी-णें-स्त्रीन. लग्नसमाप्तीनंतर वधूपक्षानें वरपक्षास दिलेली मेजवानी, जेवणावळ. [मांजव + परतनी] ॰मेड-ढ-स्त्री. मांडवाची पहिल्यानें पुरलेली, मुख्य मेढ; सामा- न्यातः मेढ. ॰मेड(ढ) रोवणें-(ल.) मनापासून काम करा- वयास लागणें, आरंभिणें. मांडवस, मांडव आवस-स्त्री. १ फाल्गुन वद्य अमावास्या. या दिवशी शेतकरी लोक सालदार ठेवतात. मांडवी-स्त्री. १ देवावर टांगावयाची लांकडी जाळीदार चौकट; मंडपी; भाळी. २ (राजा.) देवळातील मूर्ति जेथें स्थापन केलेली असतें तो गाभारा. ३ लहान मांडव. 'हे कामाची मांडवी ।' -ज्ञा १३.९९१. ४ बंदरांतील आयात निर्गत मालाकरितां केलेली वखार, कोठी, दकातघर. बाजार उभारण्यासाठीम जागा. -वसईची मोहीम. ५ (ना.) विड्याच्या पानांची एक जात. [मांडव]
मे(में)ढ-ढी
स्त्री. १ (को.) वरच्या टोकास दुबेळकें अस- लेलें, छपरासाठीं, मांडवासाठीं जमिनींत पुरून जें उंच उभें करि- तात. असे लाकूड. २ आंखूडखांब. ३ (कों.) गुरें बांधण्याचा खुंटा. ४ ध्रुवतारा. ५ आधारस्तंभ. ६ दोरीचा पीळ. [सं. मेठि- थि-धि; प्रा. मेंढि] म्ह॰-हातीं लागली चेड आणि धर मांड- वाची मेढ. मे(में)ढकी-कें-स्त्रीन. लहान मेढ.
मेड
स्त्री. १ (प्र.) मेढ पहा. २ आधारस्तंभ. ३ मेख. मेडका-पु. मेढ; खुंट (विशेषतः दुबेळकें असलेला).
मेड mēḍa f (Usually मेढ q. v.) मेडका m A stake, esp. as bifurcated.
बेखांदी-दें
स्त्रीन. (कर.) लहान मेढ. [बे + खांदी]
डेळ, डेळके, डेळकी, डेळी
न. स्त्री. १. बेळके; दुबेळके लाकूड; फाटे फुटलेले लाकूड; मेढ. २. (ल.) आधार.
डेळ,डेळकें, डेळकी, डेळी
नस्त्री. १ बेळकें; दुबेळकें लांकूड; फांटे फुटलेलें लांकूड, मेढ. २ (ल.) आधार; मेढा.
धिगी
स्त्री. १. टेकू; टेकण; वजन खाली येऊ नये म्हणून लावतात ती मेढ. २. कैची; मोरवा; आडव्या तुळ्यांची चौकट; (इं.) कपल. [सं. स्थग्]
धिगी
स्त्री. १ (गो.) टेंकू; टेंकण; वजन खालीं येऊं नये म्हणून लावतात ती मेढ. 'माड कलल्यास, उन्मळून पडूं नये म्हणून धिगी लावतात.' २ कैची; मोरवा; आडव्या तुळयांची चौकट; (इं.) कपल. [सं. स्थग्]
गिग्गी
स्त्री. (क.) लहान दुबेळकें; मेढ.
गिग्गी
स्त्री. लहान दुबेळके; मेढ. (कर)
कुडामेढीचा
कुडामेढीचा kuḍāmēḍhīcā a Composed of कूड wall of laths or wattled sticks, and मेढ a stake; i. e. Poor, mean, humble, hovel-like;--used with -खोपट-कुटि-झोंपडें- घर-वाडा &c.
कुडामेढीचा a Composed of कूड and मेढ; poor, mean, hovel-like-used with खोपट, झोंपट &c.
वि. कुड व मेढी यांचें; चंद्रमौळी; फाटकें तुटकें; मोडकेंतोडकें (खोपट, झोपडी, वाडा). [कूड + मेढ]
कुडघई
स्त्री. (कों.) लहान व बारीक, दुबेळक्यासारखी कुडांत घालण्याची मेढ. [कुड + गई]
कुडघर्इ
स्त्री. लहान व बारीक, दुबेळक्यासारखी कुडात घालण्याची मेढ. (को.)
खुंट
पु. १. खांब;मेढ : ‘मग परमस्नेहाचा खुंट उभवोन । गरके घालिती त्यासवें ।’ - नव २४·१५५. २. जनावराला बांधण्यासाठी जमिनीत गाडलेला लाकडी खुंटा; दांडके. ३. वाघूर लावण्यासाठी ठोकलेल्या लाकडाच्या मेढी. (वा.) खुंट होणे - हट्ट धरून खुंटासारखे ताठ व स्तब्ध बसणे. खुंटासारखा उभा राहणे, असणे, खुंटणे - खुंटाप्रमाणे ताठरणे, ताठ उभा राहणे. खुटास खुंट घेणे - जशास तसे करणे; उसने फेडणे.
मेढा
पु. १ दुबळकें असलेला खुंट; खांब; डांग. 'दाटूनु वैराग्याचा मेढा । ' -उषा १२५. २ खुंटांची दाट उभारणी; कुंपण; लाकडी कोट; कठडा. ३ उभ्या लाकडांचा कोट. 'भृकुटीचे मेढे चढवीले । ' -अकक २. उद्ववचिद्धनकृत शुकरंभासंवाद १३. ४ पाठीराखा; पाठिंबा देणारा. ५ दोऱ्यांतील तेढ, अढी. ६ त्रिशूळ. ७ धनुष्य; धनुष्याची कांबीट 'मेढा निगुती वाहिला ।' -एरुस्व १०.२५. 'बळें मेढा वोढिला ।' -एरुस्व ९.१८. ८ ढाल. -शर. [मेढ] (वाप्र.) ॰वाहणें-प्रतिज्ञा करणें. 'वाऊनि मेढा चालिला । ' -एभा १२.१५१. 'भार्गवरामाचा तो वाहियला मेढा ।' -मध्व ५३. मेढावि(व)णें-उक्रि. एखाद्या जागेच्या भोंवती मेढी पुरून कुंपण करणें; आवार घालणें. [मेंढा]
मेढेमत
मेढेमत mēḍhēmata n (मेढ Polar star, मत Dogma or sect.) A persuasion or an order or a set of tenets and notions amongst the Shúdra-people. Founded upon certain astrological calculations proceeding upon the North star. Hence मेढेजोशी or डौरीजोशी.
मेढी
मेढी mēḍhī f (Dim. of मेढ) A small bifurcated stake: also a small stake, with or without furcation, used as a post to support a cross piece.
मेढकी
मेढकी mēḍhakī f मेढकें n (Dim. of मेढ) A small stake or post, esp. as bifurcated.
मेढ्या
मेढ्या mēḍhyā a (मेढ Stake or post.) A term for a person considered as the pillar, prop, or support (of a household, army, or other body), the staff or stay. 2 Applied to a person acquainted with clandestine or knavish transactions. 3 See मेढे- जोशी.
मेंढा
पु. १ एडका; मेष. २ सरळ नसलेलें, वांकलेलें टोंक (काठी, शिंग इ॰ चें). -वि वाकलेली; टोंक असलेली (काठी, शिंग). [सं. मेढ्र; प्रा. मेढ; हिं. मेंढा] ॰येणें-मस्ती येणें. ॰बैल-पु. ज्याचीं शिंग मागल्या बाजूस वळलेलीं आहेत असा बैल. मेंढी-स्त्री. मेंढरांतील स्त्री-जात. [मेंढा] ॰गरव्हार- गव्हार-स्त्री. प्रसूतीनंतर विटाळशी न होतां गर्भिणी होणारी स्त्री. मिंधीं पहा. मेंढें-न. मेंढरूं (नर किंवा मादी). [मेंढा]
मेटी
स्त्री. मेढ; खांब.
मुहुर्त
पु. १ दोन घटकांचा काळ. २ (ल.) शुभ वेळा; योग्य समय; उपनयन, विवाह, गृहप्रवेश इ॰ कार्यांस इच्छित ठरविलेली शुभ वेळ. ३ कार्याचा प्रारंभ. ४ समय; ठरलेला वेळ. ५ (ल.) क्षण; अल्प काळ. ६ पुनर्विवाह; म्होतूर; पाट; न्हावेर (म्होतूर हें अपभ्रष्ट रूप रूढ आहे). [सं.] ॰करणें-१ चेत- विणें. -हंको २ (शुभ दिवशीं) आरंभ करणें. 'तरी क्षेत्रज्ञदशे । आत्मा मोटका पैसे । हें देह मी ऐसें । मुहूर्त करी ।' -ज्ञा १४. १४५. ॰पूजन-पूजा-नस्त्री. (लग्नादि विधींत) पत्रिकापूजन; लग्नमुहुर्त लिहिलेल्या पत्रिकेची पूजा. ॰मणि-णी-पु. वधूच्या गळ्यांत (शुभ मुहुर्तावर) बांधतात तो सर. ॰मेढ-स्त्री. लग्न- कार्याकरिता मांडव घालतांना किंवा घर बांधतांना शुभमुहूर्ता- वर रोविलेला पहिला स्तंभ-खांब. ॰मेढ रोवणें-एखादें काम सुरू करणें. साडेतीन मुहूर्त-पुअव. वर्षप्रतिपदा, अक्षयतृतीया व विजया दशमी हे तीन उत्कृष्ट मुहूर्त व कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा अर्धा म्हणजे सापवाद मुहूर्त मिळून साडेतीन मुहूर्त. कित्येक दसरा, दिवाळीचा पाडवा (कार्तिक शु॰ १), गुढी पाडवा. हे तीन व नागपंचमी (किंवा कांहींच्यामतें अक्षयतृतीया) अर्धा मिळून ३ ।। मुहूर्त मानितात.
ओथंबा
पु. १ (झाडाला, वेलीला) आश्रयासाठीं लाव- लेला डांब, मेढ. २ (ल.) आश्रय; आधार; आश्रयदाता; आधारकर्ता; ठेपा. 'तोहि सर्वसाक्षी ओथंबा ।' -निगा २९. ३ झोक; हेलकावा. (क्रि॰ घेणें). ४ (गो.) ओथेंबे; पाव- साची सर संपल्यावर झाडाच्या पानांवरून पावसाचें पाणी टप- टप गळतें ते थेंब. [ओथंबणें]
स्थाणु
पु.न. १ खांब. २ खुंटा; काठी; झाडाचें खोड; मेढ. ३ दहावा रुद्र. -वि. भक्कम; स्थिर; गच्च. [सं.]
ठुणी, ठुनी
आखूड डेळ; मेढ : ‘आंतून दोन ठुण्यांचा आधार दिला होता.’ - शिळान ६४. ठुनका, ठुणका
नर
पु. १ मनुष्य. २ (माणूस, जनावर, पक्षी इ॰ तील) पुरुष; पुरुषजात; सर्वजातीय पुरुष व्यक्तिमात्र. ३ (तुंबजोड इ॰) जोडीच्या पदार्थांतील मोठा पदार्थ. ४ अर्जुन. 'वत्सांच्या बहु शोकीं कृष्णा बुडतां तिला म्हणे नर तो ।' -मोमंभा १.१६. ५ पुराणपुरुष; आदिपुरुष; परमपुरुष. ६ घोडा. 'कोतल नर कोत- वाल वारण मगनमस्त किल करित ।' -ऐपो २००. ७ (ल.) मळ- सूत्री खिळा; दाराच्या झडपानां असलेल्या लोखंडी पट्टींत-मादींत बसणारा चवकटीचा खिळा. ८ (ल.) उंसाच्या चरकांतील तीन लाटांपैकीं मधली किंवा दोन लाटांतील उजवी लाट; नवरा. ९ बुद्धिबळांतील सोंगटी. १० (मुद्रण) (ल.) टंककृतींत पोलादी खिळ्यावर घासून तयार केलेला ठसा; इं. पंच्; याच्या उलट मादी = मेट्रिस. ११ मोती डोळ्यासमोर धरल्यास आंतील बाजूस चिरल्यासारखीं दिसणारी रेघ; करवा पहा. १२ अंकुर; कोंब. -शे ३.६. १३ (कु.) वाशांतील, वाळलेल्या कळकांतील उभा घट्ट तंतु. १४ नखाच्या मुळावरचें उचकटलेलें कातडें. १५ (ज्यो.) उन्नतांश ज्या. [सं. नर = पुरुष, मनुष्य; फा. नर्] (वाप्र.) ॰मोडून नारायण घडणें-(एखादी वस्तु इ॰) घडणें व मोडणें व पुन्हां घडणें; त्याच त्याच गोष्टीची घडामोड करणें. नराचा आंख-पु. (बिडाचा कारखाना) उंसाच्या चरकाच्या मधली वृत्तचिती किंवा नर बसविण्यासाठीं त्याच्या मधोमध असलेल्या भोंकांत बसविण्याचा आंख. नराचें चाक-न. (बिडाचा कार- खाना) चरकांतील वरची पाटली आणि मधली वृत्तचिती यांच्या दरम्यान बसविण्याचें दंतुर चाक. नरो वा कुंजरो वा-(अश्व- त्थामा या नांवाचा मनुष्य कीं हत्ती युद्धांत मारला गेला हें मला माहित नाहीं अशा प्रकारचें गुळमुळीत उत्तर धर्मराजानें द्रोणा- चार्यास देऊन त्यास चकविलें त्यावरून) एखाद्या गोष्टीविषयीं पूर्ण अज्ञान, औदासिन्य इ॰ दर्शविण्याकरितां दिलेलें संदिग्ध उत्तर; कानावर हात ठेवणें; माहीत नाही असें दाखविणें. म्ह॰ १ नरा हराहुन्नरा = मनुष्याला हजारों धंदे व क्लृ/?/प्त्या करतां येण्या- सारख्या आहेत. २ (हिंदी) नर करे तो नरका नारायण होजाय = मनुष्यानें मनावर घेतलें तर तो वाटेल तें कार्य करूं शकेल, किंब- हुना तो ईश्वरहि बनूं शकेल. सामाशब्द- ॰कपाल-न. (मृत) माणसाच्या डोक्याची अस्थिमात्रावशिष्ट कवटी. [सं. नर + सं. कपाल = कवटी] ॰कुंजर-पु. १ गणपति; गजानन; गजवदन. 'ते कंबल आणि अश्वतर । त्याहीं हृदयीं चिंतिला नरकुंजर ।' -कथा ५.६. १२४. २ नरश्रेष्ठ; मनुष्यांत श्रेष्ठ; नरवर. [सं. नर + कुंजर = हत्ती] ॰केसरी-पु. १ नरसिंह. २ सिंहाप्रमाणें शूर मनुष्य; नरश्रेष्ठ. [सं. नर + केसरिन् = सिंह] ॰जन्म-पु. मनुष्य- योनि; मनुष्याचा जन्म. 'नरजन्मामधिं नरा करुनि घे नरनारा- यण गडी ।' -राला ८७. [नर + जन्म] ॰तनु-स्त्री. मनुष्यदेह. 'दैवें नरतनु सांपडली मूढा कशि तुज भुल पडली' -शिवदिन केसरी (नवनीत पृ. ४४६) [नर + सं. तनु = देह] ॰तबेला-पु. (व.) फक्त, पुष्कळ पुरुषच राहतात अशी जागा; पुरुषांचें वठार. [नर + फा. हिं. तबेला] ॰तुरंगम-पु. (ज्यो.) एक नक्षत्र- पुंज. 'सप्तर्षि, ध्रुवमत्स्य, ययाति, नरतुरंगम वगैरे राशींची ओळख मुलांना करून देतां येईल.' -अध्यापन २००. [नर + सं. तुरंगम = घोडा] ॰त्व-न. पौरुषत्व. 'नराच्या ठायीं नरत्व । अहंभाविये सत्व ।' -ज्ञा ७.३५. ॰देव-पति-पु. मनुष्यरूपांतील देव; राजा; नृपति. 'कां तया नरदेव म्हणो नये ।' -दावि ३०५. [नर + सं. देव, पति] ॰देह-पु. नरजन्म; मनुष्याचें रूप. नरतनु पहा. 'नरदेह वायां जाय । सेवीं सद्गुरूचे पाय ।' -तुगा ४४९७. [नर + देह] ॰नारायण-पुअव. विष्णूच्या अंशापासून उत्पन्न झालेले दोन प्राचीन ऋषी. यांचेच अवतार पुढें अर्जुन व श्रीकृष्ण हे झाले अशी पुराणांतरीं कथा आहे. -शर. अर्जुन व श्रीकृष्ण. 'नरनारायण सेनानी, ज्या जगतीं जोड दिसेना ।' -विक ७४. [नर = अर्जुन + नारायण = श्रीकृष्ण] ॰पट्टी, पाटी-स्त्री. आटे पाडावयाची वस्तु घट्ट धरणारें यंत्र. यांत दोन बाजूस हात व मध्यें चपटा भाग असतो. चपट्या भागांत निर- निराळ्या आकारमानांचीं भोंकें असतात. [नर( = नर अर्थ ७ पहा) + पट्टी, पाटी] ॰पति-पु. १ राजा. २ पायदळांतील सैनिकांचा मुख्य. -हंको. [नर + पति] ॰पशु-पु. (निंदार्थीं) पशुप्रमाणें वर्तन करणारा; मुर्ख व अधर्मी मनुष्य; दांडगा व निर्दय मनुष्य; नराधम. [नर + पशु] ॰पातें-न. नखें काढण्याचें यंत्र; नराणी. ॰बलि-पु. १ यज्ञांत बलि द्यावयाचा मनुष्य. २ ज्यांत मनुष्यास बळी देतात तो यज्ञ; नरमेध. [नर + सं. वलि = आहुति] ॰भू-स्त्री. प्राचीन काळीं हिंदूंना माहित असलेल्या जगाचा मध्यभाग; मध्य- वर्ती देश; भरतखंड. [नर + सं. भू = जमीन, पृथ्वी] ॰मादी- स्त्री. १ जोडीच्या दोन पदार्थांतील (युग्मांतील) पुरुष व स्त्री. उदा॰ पायांत घालावयाचे जोडे, बूट, अंगारख्याच्या बाह्या, उंसाच्या चरकांतील लाटा इ॰ यांपैकीं नर मोठा असतो व मादी नरापेक्षां किंचित् लहान असते; दोन वस्तू मिळून होणार्या पदार्थोपैकीं नर हा भारी असून मादींत शिरणारा असतो. उदा॰ बिजागरीचा खिळा, कुरडईच्या सोर्यांतील दट्ट्या इ॰. २ जोडीच्या दोन पदार्थांतील स्त्रीपुरुषसंबंध; लहानमोठेपणा. ३ (व्यापक) (दोन पदार्थ, व्यक्ति इ॰ कांतील) श्रेष्ठकनिष्ठभाव; तरतमभाव; बरेवाईटपणा; उजवा-डावा प्रकार. 'मोत्यांत नरमादी असतच आहे.' ४ उंसाच्या चरकांतील लाटा. ५ बिजागरी. ६ एक प्रकारचें कुलूप. [नर + मादी; फा. नर्मादा] ॰मेध- पु. मनुष्ययज्ञ; ज्यांत नरबली देतात तो यज्ञ. 'युद्धांत पराभव होऊं नये म्हणून प्राचीन ग्रीक, गॉल, सेमाईट व हिंदु लोक नर- मेध करीत असत.' -ज्ञाको न. २६. [नर + सं. मेध-यज्ञ] ॰यान- न. मनुष्यांनीं वाहून नेण्याचें वाहन, बसून जाण्याचें साधन. उदा॰ पालखी, मेणा, डोली, रिक्षा इ॰. 'अश्वगजादि आरोहण । शेष- शयन गरुडासन । महामहोत्सव नरयान । रथोत्सव जाण करावा ।' -एभा २९.२६०. [नर + सं. यान = वहन, वाहन] ॰योनि-स्त्री. नरजन्म; मनुष्ययोनि. [नर + सं. योनि = जन्म] ॰लवंग-स्त्री. लवंगांची एक जात. -मुंव्या १५०. ॰वर-वि. नरश्रेष्ठ; थोर; उदार (मनुष्य). 'नरवर कृष्णासमान ।' -स्वयंवर नाटक. [नर + सं. वर = श्रेष्ठ] ॰वाहन-न. नरयान पहा. [नर + सं. वाहन] ॰सिंह, नरशा, नरशिं(सि)य-पु. १ विष्णूचा चवथा अवतार. 'भाऊनि नरसिंया केला नवस । तो प्रगटोनि स्वप्रीं वदे मातेस ।' -दावि १९. २ (ल.) सिंहासारखा उग्र व पराक्रमी पुरुष; पुरुष श्रेष्ठ. [नर + सं. सिंह] ॰सिंहजयंती-पु. नृसिंहावताराचा दिवस; वैशाख शुद्ध चतुर्दशी. [नरसिंह + जयंती = जन्मदिवस] ॰सिंहाव- तार-पु. दैत्यांचा राजा हिरण्यकशिपु याचा वध करण्यासाठीं श्रीविष्णूनें धारण केलेलें सिंहाकृति मनुष्याचें रूप, अवतार. [नर- सिंह + अवतार = प्रकट होणें, रूप घेणें] ॰सिंहावतार घेणें- (ल.) अतिशय रागावणें; कोपाविष्ट होऊन उग्र स्वरूप धारण करणें. ॰हर-हरदेव-पु. नरसिंह अर्थ १ पहा. [नर + हरि, हर, हरदेव] ॰हरदेवाची पालखी-स्त्री. नरसिंहाची पालखी. हिला उचलण्याचें पुण्य स्वतःला लाभावें म्हणून हिच्या दांडयास खांदा लावण्यास भक्तमंडळी फार उत्सुक असते. तेव्हां साहजिक गोंधळ, अव्यवस्था होते. २ (त्यावरून ल.) जें काम करावयाला बर्याच लोकांची मदत अवश्य आहे व ज्याची जबाबदारी कोणा एका विशिष्ट व्यक्तिवर नसते व जें काम चांगल्या रीतीनें झाल्याची किंवा न झाल्याची कोणी पर्वा करीत नाहीं असें-अर्थांत वेळीं अवेळीं, केव्हां तरी कसें तरी व्हावयाचें-काम; अव्यवस्थित रीतीनें केवळ लोकांच्या मर्जीनुरूप घडून येणारें काम, गोष्ट; बारभाई कारभार. ॰हरी-पु. नरसिंह. [नर + सं. हरि-सिंह] नराधिप, नरेंद्र, नरेश, नरेश्वर-पु. राजा; नृपति. - १५.४५. 'तो बोलता झाला शुकयोगींद्र । परिसता नरेंद्र परीक्षिती ।' -एभा १.१८३. [नर + सं. अधिप, इंद्र ईश, ईश्वर = श्रेष्ठ, पालन- कर्ता, रक्षणकर्ता] नरेंद्रमंडळ-न. माँटफर्ड सुधारणान्वयें दिल्लीस स्थापन केलेलें हिंदी संस्थानिकांचें मंडळ; राजांची सभा. (इं.) चेंबर ऑफ् प्रिन्सेस्. [नरेंद्र । मंडळ = सभा, समिति] नरोत्तम- पु. १ नारायण; पुरुषोत्तम. २ -वि. नरश्रेष्ठ; मनुष्यांत उत्तम असलेला. [नर + उत्तम] नरोबा-पु. नरसिंह; नरहरि. 'नरोबाची कृपादृष्टी । जाल्या कोण्ही नाहीं कष्टी ।' -मध्व ३०६.
खुंट
पु. १ खालीं राहिलेला भाग; खोड; कांड; सोट; बुंधा (झाड, झुडुप, शेपूट, केरसुणी, हजामत झाल्या नंतरचे केंस इ॰ चा). 'समूळ फोडियेले खुंट ।' -एरुस्व १०.७६. २ (मासे मारण्यासाठीं समुद्र किंवा नदी यांत) रोविलेला खांब, डांभ. ३ ज्यामध्यें फाळ बसवितात तें नांगराचें टोंक; खुळसा; कोळसा. ४ गाय, म्हैस यांच्या आचळांतून दुध येण्यास प्रति- बंध करणारा मळ. ५ गोफण, जाळें, शिंकें करण्याकरितां दोरीचे दोन पदर अथवा पेड तिरकस बाहेर ओढले जातात त्यापैकीं शेवटचे तंतू पुन्हां याच रीतीनें बाहेर काढले जाऊन वळले जातात, अशा शेवटच्या तंतूपैकीं प्रत्येकास खुंट म्हणतात. ६ दुध न देणारा जनावराचा सड; मुका, आंधळा सड. ७ पृथ्वीचे चार कोपरे, 'हिंदू देश कोण खुंट चारी ।' -तुगा ११८. 'चार खुंट जहागीर. ८ दणकट शरीराची गाय, म्हैस, जनावर किंवा स्त्री. 'काळवीट खुंट खरे, '-ऐपो २४२. ९ मध्यम आकाराचा केळीचा कोंब, खोड, मोना (मोठया केळीस चिकटलेला किंवा निराळा काढलेला). १० चार रस्त्यांचा चौक; चौहाट; अड्डा. ११ रस्त्याचें टोंक; शेवट. १२ (ल.) कुटुंब; घरदार; त्यापैकीं एक व्यक्ति; वंशाची शाखा; वंशांतील मूल; वंशाचें फल; संतान. १३ बुगडीचें मळसूत्र ज्यांतून जातें तो भाग; बुगडीचा, कुड्यांचा कानां- तील भाग. १४ अंगरख्याच्या बाहीच्या चुण्या जींत एकत्र करतात ती पट्टी अथवा गजासारखी शिवण. १५ (ल.) आधारस्तंभ; आश्रयदाता. १६ (आंधळ्या कोशिंबिरीच्या खेळांत) आंधळ्याचें सोंग घेणाराचें डोळे झांकणारा मुलगा; भोग्या. १७. (गो.) कुंपणाची काटी. १८ (कों.) तुकडा. १९ खोखोच्या खेळांतील न हालणारा गडी. 'होऊनियां खुंट बसा जपून.' -मोग- र्यांची कविता, मराठी तिसरें पुस्तक खेळ ५ पृ. ४८. २० (ढोरधंदा) अत्यंत आखूड सळ. २१ कांठ; कोपरा. 'खेटितां कुंप कांटी खुंट दरडी न पाहे ।' -तुगा ३४९. २२ स्वारी; उतारू (गाडीमधील). २३ खांब; मेढ. 'मग परमस्नेहाचा खुंट उभवोन । गरके घालिती त्यासवें ।' -नव २४.१५५. २४ जनावरास बांधण्यासाठीं जमीनींत गाडलेला लांकडी खुंटा; दांडकें. २५ वाघूर लावण्यासाठीं ठोकलेल्या लांकडाच्या मेढी; खुटला. -वि. (गो.) ताठ; नीट. [सं. कुठ्-कुंठ् = स्तम्भित होणें; प्रा. खुंट; तुल॰ का. कुंटु = लंगडा] (वाप्र.) ॰होणें-हट्ट धरून खुंटा सारखें ताठ व स्तब्ध बसणें. ॰ळणें-वाल इ॰ चा एक एक दाणा लावण्यासाठीं जमीनींत खुंटीनें, किंवा काठीनें टोचा, भोंक पाडणें, टोवणे. खुंटास खुंट उभा राहणें-होणें-एक जातो तोंच त्याच्या जागीं दुसरा येणें; गेलेल्याची जागा नवीन येणारानें भरून काढणें; खंड पडल्याची जागा भरून काढणें. खुंटास खुंट घेणें -जशास तसें करणें; उसनें फेडणें. खुंटासारखा उभा राहणें-असणें-खुंटणें-खुंटाप्रमाणें ताठरणें, ताठ उभा राहणें. ॰म्ह -आजा मेला नातु झाला खुंटास खुंट उभा राहिला. खुंटावरचा कावळा = घरदार, वतनवाडी, बायकामुलें नसलेला, वाटेल तेथें राहणारा माणूस. सामाशब्द ॰कन-कर-दिनीं दिशीं-क्रिवि. तीव्र व हलक्या आवाजानें; खाडदिशीं (दोन काष्ठांचा परस्परांना लागून होणारा शब्द) (क्रि॰ वाजणें). चुटकी, टाळी यांच्या होणार्या आवाजांप्रमाणें शब्द होऊन ॰कळी-स्त्री. बगलकळी; अंगरख्याच्या पाठीमागचा त्रिकोणी तुकडा. बगलेंतील पेशकळी आणि आगा असे दोन तुकडे व खुंट- कळी मिळून अंगरख्याची एक बाजू होते. ॰खुंटण-न. खुंट अर्थ १-२ पहा. ॰पान-न. (राजा.) केळीच्या गाभ्यापासून निध- णारें शेवटचें आणि कोंक्याच्या पूर्वीं येणारें आंखूड पान. ॰बरा-पु. खुंटी. खुंटा पहा. ॰बावली-स्त्री. १ (राजा.) एक प्रकारची बाहुली. २ उंचीवरचा पदार्थ काढण्यासाठीं चवड्यांवर उभें राहणें. (क्रि॰ करणें). अशा रीतीनें खुंटबावलीवर उभें राहणें. ३ (निंदेनें). काम न करणारी व खुंट्यासारखी तिष्ठत रहाणारी स्त्री. ॰बाळी-स्त्री. स्त्रियांचे एक कर्णभूषण. 'खुंटबाळ्या साध्या बाळ्या त्याजवर ।' -अफला ५५. ॰भाजी-स्त्री. विशेष विस्तार व्हावा म्हणून पुन्हां पुन्हां अग्रें खुडून राखिलेली भाजी; खुंटापासून किंवा मुळापासून निघालेला कोंब व त्याची भाजी. ॰रोग-पु १ पुष्कळ दिवस खुंटास बांधून ठेवल्यामुळें पशूंना येणारा रोडके- पणा किंवा होणारा आजार. २ (ल.) अशा बैठेपणापासून होणारा आजार, रोग. ॰रोगी -वि. खुंटरोग झालेला. खुंटला-पु. (व.) गाडीच्या दोन बाजूंस (आंतील सामान बाहेर पडूं नये म्हणून) लाविलेले खुंट प्रत्येकी. ॰सार-वि. (गो.) खुंटासारखा.
पाऊल
न. १ पायाचा घोट्याखालचा भाग; तळवा. 'बोले तैसा चाले । त्याचीं वंदावीं पाउलें.' 'वाजे पाऊल आपुलें । म्हणे मागें कोण आलें ।' 'सुकुमार पाउलें पोळती ।' -मुक्तेश्वर हरिश्चंद्राख्यान १९६ (नवनीत पृ. १९४). २ चालतांना दोन्ही पायांत, पायांच्या तळव्यांत पडणारें अंतर. 'ह्या खोलीची लांबी पंधरा पावलें व रुंदी अकरा पावलें आहे.' ३ पायाच्या तळ- व्याची उमटलेली खूण, ठसा, चिन्ह, आकृति. ४ चालण्याची ढब, गति, तऱ्हा; चाल. 'आमच्या तट्टाला तुर्की पाऊल चांगलें साधलें.' ५ चालण्याचा वेग. 'रामाचें पाऊल हरीच्यापेक्षां सावकाश आहे.' ६ पायाच्या तळव्याची लांबी. 'सगळ्यांचीं पावलें हत्तीच्या पाव- लांत' ७ (ल.) कारस्थान. ८ (ल.) कल; स्वभाव. [सं. पद् = चालणें] (वाप्र.) ॰उचलणें-उचलून चालणें-जलदीनें, झर- झर पावलें टाकून चालणें; त्वरा करणें. ॰ओळखणें-जाणणें समजणें-(एखाद्याचा) स्वभाव, कल इ॰ जाणणें. ॰जपून टाकणें-ठेवणें-एखादी गोष्ट, कृत्य इ॰ विचारपूर्वक करणें; काळजीपूर्वक वर्तन करणें. ॰पडणें-शिरणें-(एखाद्या विष- यांत) गति होणें. ॰पुढें ठेवणें-एखाद्या कार्याचा भार शिरावर घेण्यास तयार होणें. ॰पुढे पडणें-(एखाद्या कार्याची) प्रगति होणें; (कार्य) वाढीस लागणें; पुढें पुढें जाणें; वाढणें. ॰बाहेर टाकणें-अनीतीनें वागणें; वांकडें पाऊल टाकणें. 'पोरीनें पाऊल बाहेर टाकल्यापासून बापानें बाहेर टाकावयाचें सोडलें आहे.' -प्रेमसंन्यास. ॰माघार घेणें-काढणें-(एखाद्या गोष्टीपासून, कार्यापासून) परावृत्त होणें; हटणें; माघार घेणें; पाय काढणें. ॰मोजत चालणें-१ सावकाश चालणें. २ गंभीरपणानें चालणें. ॰वांकडें पडणें-सरळमार्ग सोडून आडमार्गानें, अनीतीच्या मार्गानें जाणें; दुर्वर्तन (व्यभिचारादि) घडणें. 'तरुण विधवांच्या हातून वांकडें पाऊल पडण्याचा संभव असतो, असें म्हणणाऱ्यांनी त्या गोष्टीच्या प्रतिबंधार्थ काय केलें आहे?' वाटेचें पाऊल आड वाटेस पडणें-घडूं नये अशी गोष्ट प्रमादानें घडणें. (एखाद्याच्या) पाउलावर पाऊल ठेवणें-(एखाद्याचें) सर्व गोष्टींत अनुकरण करणें. (पाऊल हा शब्द बऱ्याच अर्थात व वाक्प्रचा- रांत सामान्यतः पाय शब्दाप्रमाणें आहे. आणखी बरींच उदाहरणें व वाक्प्रचार पाय शब्दांत पहा.) म्ह॰ १ चोराचीं पावलें चोर ओळखतो = चोराला चोर पुरतेपणीं ओळखूं शकतो. २ जेथें जावें तेथें पाऊलभर पाणी = अपुरें ज्ञान. सामाशब्द. ॰बुद्धि-बुद्ध- बुध्द्य-स्त्री. १ क्षणिक बुद्धि; मनाची चंचलता; छांदिष्टपणा; लहरीपणा. २ -वि. (क्व.) चंचल मनाचा; छांदिष्ट; क्षणिक वृत्तीचा; लहरी. [पाऊल + बुद्धि] ॰बुध्द्या-वि. पाऊलबुद्धि अर्थ २ पहा. [पाऊल + बुद्धि] ॰मेड-ढ-स्त्री. (गो.) गोठ्याच्या बाजूचा लहान खांब. [पाऊल + मेढ = खांब] ॰वाट-वट-स्त्री. घोडें, गाडी इ॰ ज्या वाटेनें जाऊं शकत नाहीं, फक्त मनुष्यास जातां येईल अशी अरुंद वाट; पायवाट. [पाऊल + वाट]
ताक
न. १ दहीं घुसळून लोणी काढून घेतल्यावर राहिलेला द्रव पदार्थ. 'घरीं कामधेनु पुढें ताक मागे ।' -राम ६३. 'रसिकीं घ्यावी कशास रुचि ताकीं ।' -मोभीष्म १०.४. २ सत्त्वहीन, नीरस पेय, पदार्थ. 'झाला घालाया घृत-वर्ण नभाचा परासु कवि ताकीं ।' -मोस्त्री ४.३९. [सं. तक; प्रा. तक्क] (वाप्र.) ताकाचें पाणी, ताकाचाथेंब-नपु. १ ताकाचा थोडा अंश; थोडेसें ताक. २ ताक; ताकवणी, दह्याची कवडी, दुधाची धार, लोण्याचा कण इ॰ शब्दांप्रमाणें वरील शब्द ताकाचें अतिशय लहान परिमाण, अंश दर्शवितो. ताका मिठाक गांठ-(गो.) १ ताक व मीठ यांची (कशीतरी) भेट. २ (ल.) काटकसर करून कसा तरी केलेला संसार. ताकाला जाऊन भांडें, गाडगें, लपविणें-दुसर्याजवळ कांहीं मागावयाचें झालें तर तें उघडउघड किंवा सरळ न मागतां आढेवेढे घेऊन मागणें; दुसर्याची याचना करण्याचें पत्करून याच- नेकरितां तोंड वेंगाडण्यास कचरणें. ताकास तूर लागूं न देणें- (एखाद्या गोष्टीचा दुसर्यास) बिलकूल थांग लागूं न देणें; टाळाटाळी करून स्वतःच्या मनांतील विचार दुसर्यास समजूं न देणें. ता म्हणतां ताकभात समजणें- १ ताकभात शब्द पूर्ण उच्चारला जाण्याच्या अगोदर किंवा त्यांतील ता उच्चारल्याबरो- बर पुढील क, भा, त हीं अक्षरें तर्कानें ओळखणें. २ (ल.) स्थळ, काळ, वृत्त व वर्तमान इ॰ कडे लक्ष देऊन कोणतीहि गोष्ट चटकन तर्कानें जाणणें; त म्हणतां तपेलें समजणें. (धर्माचें) ताक पिणें- एखादी वस्तु (तीहि क्षुल्लक) घरीं मिळणारी असून दुसर्यापासून तिचा अभिलाष धरणें. 'कोण वर्तणुक कसी रोज स्वदृष्टीनें पहातां । समजुन पुरतेपणें ताक कां धर्माचें पितां ।' -होला १०८. म्ह॰ १ जिच्या घरीं ताक तिचें वरती गेलें नाक = ज्या बाईच्या घरीं ताक होतें तिला फार तोरा असतो. २ ताकापुरतें रामायण = ताक मिळ विण्यापुरतें गोड बोलून ताक देणार्या बाईस खूष करणें. (ल.) आपलें काम साधण्यापुरतें दुसर्याचें आर्जव करणें. २ जेवढें ताक (मिळण्याचा संभव असेल) तेवढीच खुशामत; ताक थोडें तर खुशामतहि थोडीच. सामाशब्द- ॰कण्या-स्त्रीअव. गरीबीचें अन्न जाडेंभरडें जेवण; मीठभाकर. [ताक + कण्या] म्ह॰ ये रे माझ्या मागल्या ताक कण्या चांगल्या = (ल.) कितीहि उपदेश, कान उघडणी इ॰ केली, मूळची परिस्थिति बदलली तरी जो आपला पूर्वींचा हट्ट, हेका, अवगुण सोडीत नाहीं त्याला उद्देशून ही म्हण योजतात. ॰कण्याचा-वि. (उप.) अगडबंब; भोपळसुती; झोड- काम्या. [ताक + कण्या] ॰घाटा-पु. ताक व ज्वारीचा भरडा; जाडें भरडें अन्न; ताककण्या; कांदाभाकर. 'ज्या भक्षिती केवळ ताक घाटा ।' -सारुह ३.१६. ॰तई-तय-तव-तेय-तेव- त्येय-त्येव-तोय-तोव-स्त्री. फोडणीचें ताक; कढी; मठ्ठा. [ताक + तोय = पाणी?] ॰पाणी-न. १ (व्यापक) दहीं घुसळणें, ताक करणें, लोणी काढणें इ॰ व्यापार. (क्रि॰ करणें). २ ताक, दहीं इ॰ ३ जाडेंभरडें अन्न; ताककण्या. ४ (ल.) अल्पाहार; थोडें जेवणखाण. 'शेजारीं दहा पांच ब्राह्मणांचीं घरें आहेत तेथें सम- यास ताक पाणी मिळतें.' [ताक + पाणी] ॰पिठ्या-वि. ताक व पीठ येवढ्या सारख्या लहान बिदागीवरच पुराण सांगणारा (पुरा- णिक), कथा करणारा (हरिदास); (सामा.) अल्पविद्य; बाताड्या; तुटपुंज्या ज्ञानाचा. [ताक + पीठ] ॰पिरा-वि. १ ताक पिणारा. २ (ल.) घामट; घाणेरडा ओंगळ. 'गौळीयांची ताकपीरें । कोण काय पोरे चांगलीं ।' -तुगा ३६८४. [ताक + पिणें] ॰मेढ-मेढी-स्त्री. घुसळखांब. [ताक + मेढ = खांब] ॰वणी-न. फार पाणी घातलेलें, अतिशय पातळ, पाणचट ताक. [ताक + पाणी]