मराठी बृहद्कोश

सात मराठी शब्दकोशांतील २,८४,८८८ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

मेतकूट, मेथकूट

मेतकूट, मेथकूट n A kind of sauce. मेतकूट मिळणें Form a close friendship.

वझे शब्दकोश

मेतकूट or मेथकूट

मेतकूट or मेथकूट mētakūṭa or mēthakūṭa n (मेथी & कूट) A sauce composed of rice, several sorts of pulse &c. ground together and made up with spices and curds.

मोल्सवर्थ शब्दकोश

मेतकूट

न० एक तोंडीं लावणें. २ ऐक्य.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

संबंधित शब्द

मेत(थ)कूट

न. १ तांदूळ, निरनिराळ्या डाळी, मोहऱ्या, मेथ्या इ॰ एकत्र दळून केलेलें पीठ व त्यांत दहीं घालून तयार केलेलें एक रुचकर तोंडीलावणें. २ (ल.) मेळ; एकी; दृढ मैत्री. 'शिंदे, बाळोबा व भाऊ यांचें मेतकूट झालें होतें.' -अस्तंभा ९६. [सं. मिथः कूट; मित्र-प्रा. मित + कूट; मेथी + कूट ?] (वाप्र.) ॰जमणें-मिळणें-स्नेह जुळणें; मन मिळणें; सख्य होणें. 'दिल्लीपति अकबराठिकांनीं रजपुताशीं चांगलें वागून त्यांच्या मुलीशीं लग्नें लाविलीं इतकें मेतकूट जमविलें.' -निचं.

दाते शब्दकोश

आकूड

वि. (व.) कुजट; कुबटलेलें. ‘फार दिवस राहि- ल्यानें मेतकूट आकूड लागतें.’ [सं. कूट = वाईट]

दाते शब्दकोश

गूळपीठ      

न.       एकमेकांचा दाट स्नेह; मेतकूट; एकी; सलोखा; एकविचार.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

मित्रभाव

दोघांमध्ये रहस्य आहे, आपपर भाव नाहीं, परस्परांचें मेतकूट जमलें, एकमेकांत मोठी दिलचस्पी-सलगी आहे, गळ्यांत गळे घालताहेत, एकमेकांशिवाय जमत नाहीं, त्यांची यांची रोजची बैठक आहे, स्नेहरज्जूनें बांधले आहेत, अर्धी भाकर मोडून खातील, तो व मी दोन नाहींत, रक्तापेक्षांहि मोठा संबंध आहे दोस्तीचा, एकाला टोचलें तर दुस-याच्या डोळ्यांना पाणी येईल.

शब्दकौमुदी

सौनेग्वत

न. (कु.) गुप्तबेत; कूटमंत्र; मेतकूट. 'त्यांचा काय सोनेग्वत आसा.'

दाते शब्दकोश

वेसवार

पु. १ दोन तीन प्रकारच्या डाळी, धने, हळद, मिरच्या इ॰ पदार्थ तळून किंवा भाजून भाजी इत्यादिकावर घालण्यासाठीं त्याचें जें कूट करतात तो मसाला. २ मेतकूट. ३ (कों.) कच्चा मसाला. 'मांस व वेसवार यांचीं पोटीसें वाता- र्बुदावर बांधावीं.' ऱ्योर २.२६१. [सं. वेशवार] वेस- वाराचें लोणचें-न. मोहऱ्या, मेथ्या, हिंग, हळद इ॰ चें चूर्ण आंत घालून करतात तें लोणचें.

दाते शब्दकोश

गूळ

पु. आटवलेला उंसाचा रस; पदार्थाला गोडपणा येण्यासाठीं रस आटवून केलेला घन पदार्थ; साखरेचा कच्चा प्रकार, अवस्था; तांबडी साखर. [सं. गुड; प्रा. गुल; पाली गुळ; कों. गोड; खा. गूय] (वाप्र.) ॰करणें-उपहास, निंदा करणें. ॰देणें-हातीं देणें-१ लालूच दाखविणें; लांच देणें. २ फसविणें; भुरळ घालणें; झुलविणें; तोंडावर हात फिरविणें. ॰पुर्‍या वाटणें-हौस पुरविणें. गुळमटणें-१ (राजा.) अंबा; चिंच इत्यादींनी गुळमट, गोडसर होणें. २ गुळमटणें; संदिग्ध, अड- खळत बोलणें. म्ह॰ १ गाढवास गुळाची चव काय? २ जो गळानें मरतो त्याला विष कशाला? सामाशब्द- ॰आंबा, गुळंबा-ळांबा, गुळांब-पु. एक पक्वान्न. गुळाच्या पाकांत शिजविलेल्या आंब्याच्या फोडी; गुळाचा मोरंबा. ॰कैरी-स्त्री. (व.) गूळ घालून केलेलें बिन मोहरीचें आंब्याचें लोणचें. ॰खोबरें-न. (गूळ आणि खोबरें यांचा खाऊ). १ (ल.) निवळ फसवणूक; लांच; लालूच. 'गुळखोबरें विलोकुनि भलत्याहि जनासि बाळक वळावा ।' -मोउद्योग ७.९. २ पोकळ भाषण, वचन. ॰चट-चीट-मट-वि. १ थोडेंसें गोड; गोडसर. 'येक्या सगें तें कडवट । येक्या सगें तें गुळचट ।' -दा ११.७. १६. २ (तंजा.) गोड; मधुर. ॰चट, चीट-गूळसाखर वगैरे गोड पदार्थ. गुळण्णा-पु. (गो.) गुळाचा गणपति. [गूळ + अण्णा] गुळत्र- य-न. गूळ, राब, काकवी यांचा समुदाय. 'मद पारा गुळत्र ।' -दा १५.४. १५. गूळदगड-धोंडा-पु. १ गुळाच्या ढेपेंत सांप- डणारा दगढ. 'गुळासारिखा गुळदगड । परी तो कठिण निचाड ।' -दा ८.५. ४७. २ (ल.) ढोंगी, कपटी मनुष्य. ॰धवा-धा- धिवा-धुवा-देवा-धेवा-धावी-पु. केवळ तांबडा नव्हे, केवळ पांढरा नव्हे असा मिश्र रंग; गुळी रंग. -वि. अशा रंगाचा (मोती, इ॰ पदार्थ). ॰धानी-वि. लालसर; गुळधवा रंगाचा (मोती). ॰पापडी-स्त्री. १ एक पक्वान्न; गुळांत पाकविलेल्या रव्याच्या वड्या. २ (राजा.) गुळाच्या पाकांत भाजलेली कणीक वगैरे घालून केलेले लाडू. ३ (ल.) एखाद्यानें मागें अपराध करून समक्ष गोड गोड, कपटी भाषण करणें; गुळगुळ थापडी; गुळमट; गुळवणी ॰पीठ-न. एकमेकांचा दाट स्नेह; मेतकूट; एकी; सलोखा; एक विचार. ॰पोळी-स्त्री. गूळ घालून केलेली पोळी. गुळमट, गुळंबट-१ गुळचट अर्थ १ पहा. २ (गो.) आंबटसर. ॰मारी-- स्त्री. दर उसाच्या मळ्यापाठीमागें २२।। शेर गूळ घ्यावयाचा कर. ॰वणी, गुळेणी, गुळोणी-न. १ गुळ मिश्रित पाणी. २ (कु. व.) गुळाच्या पाण्याचें कालवण (पोळीशीं खाण्यासाठीं). यांत कधीं थोडें पीठहि घालतात. [गूळ + पाणी] ॰वरी, गुळोरी-स्त्री. एक खाद्य. पक्वान्न; गुरोळी पहा. 'मांडा सारखपांडा गुळवरी ।' -एभा २७.२९०.; -ह १०.३४. गुळवा-गुळावा-गुळवी- व्या-गुळ्या, गुळरांध्या-पु. गूळ तयार करणारा. [गुड- वाहक] ॰शील-शेल-शेलें-न. (व.) तांबडा भोपळा उकडून त्यांत दूध, गुळ घालून केलेली खीर. गुळाचा गणपती- गणेश-पुवि. १ आळशी; मंद; गलेलठ्ठ; अचळोजी. २ होयबा; बुळा; दुर्बळ; शेणाचा पोहो. म्ह॰ गुळाचा गणपति गुळाचाच नैवेद्य = वस्तुतः एकच असणार्‍या दोन व्यक्ती; ज्याचें त्यासच देणें. गुळार, गुळहार-गुर्‍हाळ पहा. गुळेरस-पु (हेट.) नारळाचें दूध व गूळ घालून केलेलें पिठाचे गोळे यांचें बनविलेलें एक पक्वान्न.

दाते शब्दकोश