मराठी बृहद्कोश

आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

मेहुणा

मेहुणा mēhuṇā m A wife's brother. 2 A sister's husband.

मोल्सवर्थ शब्दकोश

मेहुणा m A wife's brother; a sister's husband.

वझे शब्दकोश

पु. (माध्यंदिन) मामेभाऊ.

दाते शब्दकोश

मेहुणा / व्हणा

पु० बहिणीचा नवरा, बायकोचा भाऊ.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

संबंधित शब्द

मेहु(हु)ण

न. भोजनादिकांस बोलविलेलें, लग्न झालेलें जोडपें; दांपत्य; नवराबायको. [सं. मिथुन; प्रा. मिहुण] मेहुणा- पु. १ बायकोचा भाऊ. २ बहिणीचा नवरा. ३ (व.) आतेचा किंवा मामाचा मुलगा. [देप्रा. मेहुणिआ = साला, मामाचा मुलगा] मेहुणचार-पु. (पाहुणा शब्दापासून पाहु- णचाराप्रमाणें मेहुणा शब्दापासून साधित) १ मेहुण्याचें आदरा- तिथ्य. २ (ना.) थट्टेनें नातें. [मेहुणा] मेहुणिआ-स्त्री. मेहुणी. [दे.] मेहुणी-स्त्री. १ मामाची मुलगी. २ आतेची मुलगी. ३ (कों.) बायकोची बहिण. म्ह॰ राजाची राणी पाटलाची मेहुणी.

दाते शब्दकोश

बहीण

स्त्री. १ आपल्याच आईबापांची कन्या; भगिनी. २ चुलत-आते-मामे-बहीण इ॰ ३ वडील बहीण. ४ (निंदार्थीं) गुणांत, वर्तणुकींत एखादीची बरोबरी, वरचढपणा करणारी स्त्री. [सं. भगिनी; प्रा. बहिणी; गु. बेन; सिं. भेणु; पं. भैण; फ्रेंजि. फेन] म्ह॰ बहिणीमुळें भावोजी सोयरा. ॰जवाई-जांवाई- पु. (व.) मेहुणा; बहिणीचा नवरा. ॰तीज-बीज-स्त्री. कार्तिक शुद्ध तृतीया आणि द्वितीया; भाऊबीज. बीजेस बहीण भावास ओवाळतो व तीजेस भाऊ तिची वस्त्रालंकारांनीं संभावना करतो. ॰पणा-पु. मेहुण्याचें नातें. 'ऐसा कष्टविला आमुचा पति । त्या बहिणपणा आग लागो ।' -जै ७१.१०१. ॰भावंडें-नअव भाऊ आणि बहिणी (समुच्चयानें). ॰भावा-पु. (राजा.) एकाच आईकडून नातें; भाऊ, बहीण; सहोदरपणा. म्ह॰ बहीणभाव्या व सासू जावया. ॰लेक-पु. (ना.) बहिणीचा मुलगा; भाचा. ॰वळा-स्त्रीअव. बहिणींची मालिका. [बहीण + ओळ] बहिणीस- स्त्री. (कों.) (अशिष्ट) बहीण. बहिणुली-स्त्री. लाडकी बहीण. 'द्रौपदि हे बहिणुली ।' -देप ४८. बहिणोई-पु. (व.) बहिणीचा नवरा; मेहुणा. [बहीण + नाहो (-नवरा) बहिणोहो-बहिणोई]

दाते शब्दकोश

मेहुणचार

मेहुणचार mēhuṇacāra m (Formed from मेहुणा in imitation of पाहुणचार from पाहुणा. Used mostly as a burlesque term.) Entertainment of a मेहुणा.

मोल्सवर्थ शब्दकोश

मेहुणचार m Entertainment of a मेहुणा.

वझे शब्दकोश

आतेबहिण-भाऊ

स्त्री. पु. (तंजा.) तंजावरांत मातुलकन्या परिणय होतो म्हणून यांना मेहुणी, मेहुणा म्हणतात.

दाते शब्दकोश

भाम

पु. मेहुणा.

दाते शब्दकोश

भाणा-ण

स्त्री. बहीण. 'आक्षत भरली भाणा । दुजा ब्राह्मण मेहुणा ।' -दा ३.३.१०. [सं. भगिनी]

दाते शब्दकोश

भावो

पु. (कु. राजा.) मेहुणा. भावोजी पहा.

दाते शब्दकोश

कारकुनाची मेहुणी

कारकुनाची मेहुणी kārakunācī mēhuṇī f (Because, as constantly mislaid and thus missing, it is supposed to jeer the Kárkún. See मेहुणा) A term for Scissors.

मोल्सवर्थ शब्दकोश

मेव्हणचार, मेव्हणा, मेव्हणी, मेव्हूण

मेव्हणचार, मेव्हणा, मेव्हणी, मेव्हूण mēvhaṇacāra, mēvhaṇā, mēvhaṇī, mēvhūṇa Commonly and preferably मेहुणचार, मेहुणा &c.

मोल्सवर्थ शब्दकोश

मेव्हणचार, मेव्हणा-णी, मेव्हूण

(प्र.) मेहुणचार, मेहुणा इ॰ पहा.

दाते शब्दकोश

मेवणा, मेवणी, मेवुणचार, मेवूण

मेवणा, मेवणी, मेवुणचार, मेवूण mēvaṇā, mēvaṇī, mēvuṇacāra, mēvūṇa Properly मेहुणा &c.

मोल्सवर्थ शब्दकोश

मंडवारी

पु. (परदेशी तेली) लग्नसमारंभांत मांडवांत मधला खांब मेहुणा पुरतो व त्याबद्दल मानाचा म्हणून जो सवा आणा त्याला मिळतो तो. -बदलापूर २७१. ॰साण्या-पु. तेल्यांत जातीचे पंच येऊन त्यांनीं विवाहमंडप स्थापणें. -बदला- पूर २७.

दाते शब्दकोश

साला

पु. १ बायकोचा भाऊ; मेहुणा. -एरुस्व ७.७५. 'हे कोण बायकोचे साले.' -अमृत ११८. २ बहिणीचा नवरा. (या अर्थानें आज फारसा रूढ नाहीं). ३ एक शिवी 'बायकोनें सांवरलं म्हणून ठीक, नाहीं तर साल्यापासून सुरवात होती.' -के १.७.३०. [सं. श्याल (क); प्रा. साल; हिं. साल; पं. साळा] सालीवि. १ बायकोची बहीण (विशेषतः धाकटी). 'साल्या मेहुण्या घरास येती । फराळाच्या बसती पंक्ती ।' -अमृत. २ बायकोच्या भावाची पत्नी. 'साली अथवा मेहुणी । रूपवंत कुशल तरणी । स्त्रियेच्या बाळंतपणा आणी । तो एक मूर्ख ।' -मुमूल ८३. [सं. श्याली; प्रा. साली] सालेपण-न. मेव्ह- ण्याचें नातें. 'झणें लाज धरिसी मनीं । सालेपणें तुजसी केला बाकरु ।' -धवळे उ १०.

दाते शब्दकोश

शालक

पु. मेहुणा; बायकोचा भाऊ किंवा बहिणीचा नवरा. साला. 'शालक लक्ष्मी बघती केवळ नच त्या जरि गुण- बिंदु ।' -सौभद्र. [सं. श्यालक]

दाते शब्दकोश

सवासा

पु. १ सपत्नीक; सुवासिनीचा नवरा. २ मेहुणा. -बदलापूर २६९.

दाते शब्दकोश

स्वगुण

समुद्र हा पिता चंद्रमा बंधु रमा भगिनी मेहुणा द्वारकेचा हरि असा शंख दारोदारीं भीक मागे.

शब्दकौमुदी

श्याल-लक

पु. बायकोचा भाऊ; शालक; साला; मेहुणा. 'श्यालें तुझ्या नृपाळा...' -मोकर्ण १५.१६. 'धर्म म्हणे श्यालक हो, प्रसवावे सद्यशोर्थ सुत नातें ।' -मोभीष्म ३. १९. [सं.]

दाते शब्दकोश

टाचेचे काळीज      

१. मेहुणा; बायकोचा भाऊ (पायाच्या टाचेला जसे टोचणे सहन होत नाही तसे बायकोच्या भावाला वाकडे बोललेले तिला सहन होत नाही यावरून). २. अतिशय आवडती बायको. ३. (ल.) अतिशय आवडते माणूस, वस्तू इ.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

टाचेचें काळीज

टाचेचें काळीज ṭācēcē ṅkāḷīja n (The heart of the heel. As the heel is delicately sensible to pricking, pinching &c., so is one's wife to raillery or bantering addressed to her brother.) A term for one's मेहुणा or wife's brother. 2 A term for a beloved wife or a sweetheart.

मोल्सवर्थ शब्दकोश

न. १ मेहुणा; बायकोचा भाऊ (पायाच्या टांचेला जसें टोंचणें सहन होत नाहीं तसें बायकोच्या भावाला वांकडें बोललेलें तिला सहन होत नाहीं यावरून). २ अतिशय आवडती बायको. ३ (ल.) अतिशय आवडतें माणूस; प्रियपात्र; प्यारी वस्तु; जिवाचा कलिजा.

दाते शब्दकोश

अक्षत      

स्त्री.       १. तांदळाचा न मोडलेला दाणा. २. अभिमंत्रित केलेले किंवा अभिमंत्रित करण्यासाठी घेतलेले तांदूळ; लग्न, मुंज इ. समारंभात उत्सवमूर्ती व्यक्तींच्या डोक्यावर टाकण्याकरिता, देवतांच्या कपाळी लावण्याकरिता किंवा लग्न, मुंज इत्यादीचे आमंत्रण देण्याकरिता घेतलेले तांदूळ. ३. लग्न–मुंज प्रसंगीच्या आमंत्रणाकरिता निघणारी मिरवणूक (देवास आणि शिष्ट लोकांस अक्षत देण्यासाठी). ४. कपाळावर लावलेल्या गंधात काळ्या रंगाचा जो टिकला लावतात तो किंवा ते गंध. ५. (सामान्यतः) तांदूळ. [सं.] (वा.) अक्षत काढणे, अक्षत फिरविणे, अक्षत निघणे– समारंभाचे निमंत्रण करण्याकरिता मिरवणूक निघणे. अक्षत घेणे – निमंत्रणाचा स्वीकार करणे. अक्षत टाकणे – १. एखाद्या घरावर अक्षत टाकून आतील बोलणे ऐकणे. हा शकून पाहण्याचा एक प्रकार आहे. २. (देवावर) पूजेसाठी आवाहन केलेल्या देवतेचे विसर्जन करणे. ३. एखाद्या गोष्टीवरील हक्क सोडून देणे. ४. लग्नात वधूवरांवर तांदूळ टाकणे; लग्न लावणे : ‘अक्षत टाकिली जैसी । मांदिये वरी ।’ –ज्ञा १८·७२३. अक्षत देणे– विवाहादी समारंभास निमंत्रण करणे. डोक्यावर अक्षत पडणे, डोक्यावर अक्षता पडणे – विवाह होणे तोंडावर अक्षत पडणे, तोंडावर अक्षता पडणे – मनसोक्त वाटेल तसे बोलणे. अक्षत भरणे – शेस भरणे; भांगात कुंकू वा अक्षत भरणे : ‘अक्षत भरिली भाणा । दुजा ब्राह्मण मेहुणा । आला होता पाहुणा । स्त्रियेस मूळ ।’ – दास ३·३·१०. चुलीस अक्षत लावणे – १. घरातील सर्व माणसांस, कुटुंबास भोजनास बोलावणे केल्यामुळे चूल न पेटवणे. २. (वेशीस) गावभर, सर्व लोकास आमंत्रण करणे. ३. भाकीत करणे. ४. गुंतवून घेणे; प्रयुक्त होणे. अक्षत वाहणे – (मूर्तीवर) अभिमंत्रित तांदूळ देवावर टाकणे, वाहणे. वाटाण्याच्या अक्षता लावणे – साफ नाकारणे. (वाटाणे वाटोळे असल्यामुळे कपाळास चिकटून राहत नाहीत म्हणून).

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अक्षत

स्त्री. १ अभिमंत्रित केलेले किंवा अभिमंत्रित करण्या- साठीं घेतलेले तांदूळ; लग्न, मुंज इ॰ चें आमंत्रण देण्याकरतां घेतलेले तांदूळ. २ लग्न-मुंज प्रसंगींच्या आमंत्रणाकरतां मिरवणूक निघते ती (देवास आणि शिष्ट लोकांस अक्षत देण्यासाठीं). ३ कापळीं लावलेल्या गंधांत काळ्या रंगाचा जो टिकला लानतात तो किंवा तें गंध. ४ (सामा.) तांदूळ. वाप्र -वाटाण्याच्या अक्षता लावणें = साफ नाकारणें; (वाटणे वाटोळे असल्यामुळें कपाळास चिकटून राहत नाहींत म्हणून). अक्षत कढणें-फिरविणें-निघणें- समारंभाचें निमंत्रण करण्याकरतां मिरवणूक निघणें. अक्षत टाकणें- १ एखाद्या घरावर अक्षत टाकून आंतील लोक काय बोलतात तें ऐकणें. हा एक शकून पाहण्याचा प्रकार आहे. २ (देवावर) पूजेकरतां आव्हान केलेल्या देवतेचें विसर्जन करणें. ३ एखाद्या गोष्टीवरील सत्त्व सोडून देणें. ४ लग्नांत वधूवरांवर तांदूळ टाकणें; लग्न लावणें. ‘अक्षत टाकिली जैसी । मांदिये वरी ।’ –ज्ञा १८.७२३. अक्षत देणें- विवाहादिसमारंभास निमंत्रण करणें. अक्षत घेणें- निमंत्रणाचा स्वीकार करणें. डोक्यावर अक्षत(ता)पडणें- विवाह होणें. ॰टाकणें- लग्न लावणें, करून देणें. तोंडावर अक्षत पडणें- मनसोक्त, वाटेल तसें बोलणें. अक्षत भरणें- शेंस भरणें. ‘अक्षत भरिली भाणा । दुजा ब्राह्मण मेहुणा । आला होता पाहुणा । स्त्रियेस मूळ ।’-दा ३.३.१०. अक्षत लावणें- (घरास, चुलीस) घरांतील सर्व माणसांस, कुटुंबास भोजनास बोलावणें केल्यामुळें चूल न पेटविणें. अक्षत लावणें- (वेशीस) गांव- भर-सर्व लोकांस आमंत्रण करणे. अक्षत लावणें- १ भाकीत करणें. २ गुंतवून घेणें; प्रयुक्त होणें. अक्षत वाहणें- (मूर्तीवर) अभिमंत्रित तांदूळ देवावर टाकणें-वाहणें. म्ह॰ या या माझ्या कपाळाच्या अक्षता पहा = दुसऱ्याला विनाकारण हांक मारणाऱ्या किंवा बोलवणाऱ्या मनुष्याबद्दल रागानें म्हणतात. वरतीं अक्षता, मध्यें गोपीचंदन खालीं रक्षा (अंगारा)-तोंडाशीं हिरवा, मध्यें गोपीचंदनासारखा मऊ व तळाशीं रक्षा झालेला असा भात; चांगला न शिजलेल्या भाताचें विनोदप्रचुत, खुबीदार वर्णन. वैष्णवीभात पहा. – वि. १ अभंग; इजा न झालेला; शाबूत; धडधाकट; संबंध. ‘अक्षतधनु तोंवरि हें वीरशिरोरत्न नावरायाचें’-मोद्रोण ३.१२१. २ पतिसमागम न झालेली (स्त्री); तीन पुनर्भूंपैकी. पुनर्भू पहा. अनुप- भुक्त स्त्री. [सं. अ + क्षत]

दाते शब्दकोश

भाऊ

पु. १ बंधु; भ्राता. 'मग जगदीश्वर तेथुनि त्याचा विन- वावयासि भाउ निघे ।' -मोउद्योग ७.३४. २ (सांकेतिक) चुलत- बंधु, मामेबंधु, आतेबंधु, मावसबंधु इ॰ जवळचा नातेवाईक. ३ एकच धंदा, संस्था, व्यवसाय इ॰तील माणसें; दोस्त; सहकारी. ४ एक बहुमानार्थीं उपपद. जसें-हरीभाऊ, बाळाभाऊ इ॰ ५ सदाशिव- राव पेशवे. -पया १४८. परशुराम त्रिंबक पटवर्धन. -पया ४९५. [सं. भ्रातृ; प्रा. भाउ] ॰गर्दी-स्त्री. १ (पानिपत येथें भाऊसाहेब पेशवे यांनीं घनघोर युद्ध केलें केलें त्यावरून ल.) निकराचें युद्ध; 'सव्वा लक्ष फौजेनिशी भाऊगर्दी होऊन प्यादेमात कशी झाली.' -भाब १. २ (ल.) अंदाधुंदी; धामधूम. 'सवेचि झाली भाऊगर्दी ।' -अफला ६५. [भाऊ + फा. गर्दीं = नाश] ॰पण-पणा-बंद- बंदकी-बंदी-नपुस्त्री. १ बंधुत्वाची वागणूक. २ बंधुत्वाची स्थिति, संबंध. ३ (यावरून ल.) मित्रत्वाचें, सलगीचें नातें; सख्य. ४ भावाभावांतील वितुष्ट, तंटा. ॰बंद-पु. नातेवाईक; दायक; आप्त. ॰बहिणी-स्त्री. एक मुलींचा खेळ. -मखेपु २९६. ॰बीज- स्त्री. कार्तिक शुद्ध द्वितीया. या दिवशीं बहीण भावास बोलावून त्याचा सन्मान करते व भाऊ तीस द्रव्यवस्त्रालंकारादि -ओवाळणी घालतो. [भाऊ + बीज = द्वितीया] ॰वळ-स्त्री. भाऊबंदांच्या क्रमानें वतनाचा प्राप्त होणारा भोगवटा. [भाऊ + आवलि] भाऊवळीनें असाहि प्रयोग रूढ आहे. भाऊ(ओ)जी, भाऊ-ओ-पु. १ नवर्‍याचा भाऊ; दीर. २ बहिणीचा नवरा. ३ नवर्‍याचा मित्र; दीराप्रमाणें असणारा इसम. ४ (कों.) बायकोचा भाऊ; मेहुणा. [भाऊ + जी = आदरार्थीं प्रत्यय]

दाते शब्दकोश

लागणें

अक्रि. (ह्या क्रियापदाचा संलग्न, संयुक्त किंवा संबद्ध होणें, जुळणें, चिकटणें, जडणें असा मूळचा एकच अर्थ आहे. परंतु अनेक नामांशीं आणि शब्दांशीं उपयोग केल्यामुळें यांस अनेक भिन्न अर्थांच्या छटा आल्या आहेत. त्यांपैकीं सर्वसामान्य व कांहीं विशेष खालीं दिल्या आहेत) १ स्पर्श करणें; शिवणें. 'तूं त्याला लागूं नको. विटाळ होईल.' 'परि सावध व्हा लागो शुचि व्हाया हृदयलोह या परिसा ।' -मोभीष्म ६.११. २ लावणें; आंत घालणें; खुपसणें (रोप, झाड इ॰); लागवड, पेरणी करणें (जमीनीची). 'वाफा, अळें, सरी लागली.' ३ मूळ धरणें; रुजणें; चांगलें जीव धरणें; एक जीव होणें (लावलेलीं रोपें, कलमें) ४ मार बसणें; आघात होणें (शस्त्र इ॰चा). ५ (ल.) मनाला बोंचणें; परिणामकारक होणें; अंतःकरणाला भिडणें (रागें भरणें, शब्दांचा मार). -दा १०.८.२७. ६ बंद होणें; मिटणें; गच्च बसणें. (दरवाजा, खिडक्या, झांकण, पापण्या, डोळे). ७ योग्य प्रकारें जुळणें; जोडलें जाणें (शब्दशः व ल.) (तुकडे, विभाग, कविता, शब्द). ८ बरोबर होणें; लागीं बसणें; नीट सामावणें. ९ प्रचारांत असणें; रूढ असणें (तऱ्हा, पद्धति, रीत). १० चिकटणें; जडणें; आंगवळणीं पडणें (दुर्गुण, खोड, रोग). ११ येणें; उत्पन्न होण; आसक्ति होणें (भूक, तहान, खोकला, कंप इ॰). १२ निघणें व चालू होण; प्रारंभ होऊन सुरू असणें (स्थल आणि काल यांतील पदार्थ आणि प्रसंग, विशिष्ट परिमाण किंवा प्रकार). 'एथून मावळ संपलें आणि देश लागला.' 'या अध्यायापासून ग्रंथ कठीण लागला.' 'तेव्हांपासून ह्याचा त्याचा कलह लागला.' 'हें काय सोपें लागलें आहे? १३ बरेंवाईट कळणें; विशिष्ट प्रकाराचे किंवा जातीचें म्हणून समजणें, वाटणें. 'आंबे खाऊन पहा, गोड लागले तर घ्या.' 'त्याला बरी गोष्ट जरी सांगितली तरी वाईट लागते.' १४ प्राप्त होणें; मिळणें (नोकरी चाकरी, नेमणूक). 'इतकी खटपट करून अखेर त्याला नोकरी लागली.' १५ नातें किंवा संबंध असणें; नात्याच्या संबंधानें असणें. 'तुझा तो काय मेहुणा लागतो.' १६ आढळणें; भेटणें; रस्त्यांत मार्गांत येणें; पुढें येणें. 'वाटेनें चार नद्या लागतात, 'तुम्ही वाचीत जा आणि पुढें येणें. 'वाटेनें चार नद्या लागतात, 'तुम्ही वाचीत जा आणि पुढें वृत्तश्लोक लागेल तेथें ठेवा.' १७ फळ धरणें; बहर येणें; वृक्ष फलोत्पा- दनाच्या स्थितीस येणें. 'ह्या प्रांताचे माड लागूं लागले म्हणजे असे लागतात कीं एका एका माडास हजार हजार नारळ लागतात.' १८ करपणें; बिघडणें; बुडाशीं जळणें. 'भात बुडाशीं लागला.' १९ कामांतून जाणें; खराब, घाण होणें; डागळणें; कुजण्यास, सडण्यास आरंभ होणें; बुरशीनें व्याप्त होणें. 'लांकूड लागलें.' २० चिकटणें; चिकटून राहाणें. 'उदंड उपाधी तरी थोडी, लागोंच नेदी.' -दा ९.१०.५. २१ बसणें जडणें; बिलगणें (मन). 'चित्त तें लागलें तुझें पायीं ।' -दावि ५६. २२ चावणें; दंश करणें; झोंबणें (साप, विंचू, चिकट पदार्थ). २३ हल्ला, आघात होणें. 'त्याला विंचू लागला' 'मला ठेंच लागली-दगड लागला.' २४ पडणें; धाड येणें (मेकाड, मोवा इ॰ची); व्यापणें; ग्रासणें; (मेकाड इ॰नीं झाड). २५ परिणाम करणें; अनिष्ट व उपद्रव होईल असें करणें; (मादक पदार्थ, वाईट हवा, पाणी, उपवास, शिव्याशाप इ॰नीं). २६ जनावर, माणूस इ॰ची पाठ, पाय इ॰ गात्रांस (खोगीर, जोडा, लगाम इ॰च्या घर्षणानें) इजा होणें; घसटणें; खरचटणें; चोळवटणें; सोलवटणें. 'जोडा लागला.' २७ नेहेमींच्या एखाद्या आजारानें पछाडलें जाणें (जनावर). २८ पूर्णपणें व योग्य रीतीनें मिसळलें जाणें (साखर, तिखट, मीठ वगैरे अन्नांत एखादा पदार्थ). २९ घालविण्याची जरूरी पडणें; खर्चिला जाणें; व्यय होणें (पैसा, पदार्थ, वेळ). 'याच्या लग्नास पांचशें रुपये लागले.' ३० पाहिजे असणें; गरज असणें; सुस्थितीस पूर्णतेस जरूर असणें; (सामा. एखादी गोष्ट) (गरज, नड, उपयोगाचा प्रसंग) उत्पन्न होणें. 'क्षत्रियासि लागल्या अनुपत्ती । पूर्वोक्त करावी वणिग् वृत्ति ।' -एभा १७.४६२. ३१ योग्य स्वरांत बसणें; स्वरानुकूल असणें (गळा, आवाज, वाद्य, सूर). ३२ पेटणें; दीप्तियुक्त होणें (दिवा, विस्तव); चेतणें (आग). ३३ प्रत्यक्ष आरंभ होणें; मुख्य विधि, संस्कार याला सुरवात व्हावयाची वेळ येणें (लग्न, मुंज इ॰ विधीची). ३४ (बोलतांना) अडखळणें (माणूस, जीभ, शब्द). ३५ चालू होणें; क्रिया सुरू होणें; गति मिळणें, (एंजिन, यंत्र इ॰). ३६ चालणें; समर्थ, कार्यक्षम असणें (आपल्या विशिष्ट कार्यांत); उपयोगास येणें. 'जंग चढला आहे म्हणून चाकू लागत नाहीं.' ३७ तीक्ष्ण होणें; धारेनें युक्त होणें. 'दोन चाकू लागले आहेत, बाकींचे लागावयाचे आहेत.' ३८ निश्चित किंवा ठरलेलें असणें; न सुटण्यासारखें जोडलेले किंवा पाठीमागें लागलेलें असणें. 'उपजत्या प्राण्यास मरण हें लागलेंच आहे.' 'संसाराचें कृत्य हें रोज लागलेंच आहे' ३९ सुरू होणें; सतत चालू असणें; एकसारखा असणें; एकसारखा राहणें, घडणें (पाऊस, थंडी, उष्णता). 'कालपासून पाऊस सारखा लागला आहे.' ४० मग्न, गुंतलेला असणें. ४१ मनांत योजिलेला किंवा स्वाभाविक परिणाम होणें; यश येणें; उपयोग होणें. ४२ जुगणें; मैथुन चालणें, करणें (पशु, पक्षी यांमध्यें नरानें मादीशीं) (निंदार्थी माणसालाहि लावतात). ४३ योग्य स्थितीला येणें; फलदायी होणें (गाय, म्हैस इ॰ दूध देऊं लागणें, झाड फळाला येणें). ४४ संबद्ध, मालकीचा असणें; कार्यक्षेत्रांतील, कक्षेंतील, अधिकारांतील असणें. ४५ विवक्षित स्थितींत असणें; विवक्षित गुण, जात, धर्म असणें; विशिष्ट परिस्थिती असणें. 'मी कां श्रीमंत लागलों आहें? सर्वांस शाल- जोड्या द्या म्हणतां तो.' 'हा काय मुसलमान लागला!' ४६ लावणें; अंगीं लागू करणें (गुन्ह्याचें कृत्य); करावयासाठीं, पार पाडण्यासाठीं एखाद्या व्यक्तीवर लादलेलें असणें; सोपविलेलें असणें (कर्तव्य, काम इ॰). 'हें काम मजकडे लागलें.' ४७ सक्तीचें, आवश्यक, जरूर असणें; करणें-भोगण भाग पडणें. 'ह्याचे हातून न झालें तर तुम्हास जावें लागले.' 'हा पळून गेला तर रुपये तुम्हाला द्यावयास लागतील.' ४८ अडकणें; गुंतणें. 'कोठें तुझा जाउनि हेतु लागे ।' -सारुह २.९४. ४९ झपाटणें; पछाडणें; अंगात येणें; बाधा होणें. 'चिंतूला चिंचेवरची हडळ लागली.' ५० (शौच, मूत्रविसर्जन इ॰) क्रियेची इच्छा होणें. 'शौचास-मुतावयास लागली.' ५१ (क्रियापद ऊं, आवयास इ॰ प्रत्यय लागून त्यांचे पुढे 'लागणें' हें क्रियापदातील आलें असतां) क्रिया सुरू करणें; आरंभणें; घडणें; लागूं होणें. 'तो तें करूं किंवा करावयास लागला'; 'तो मारूं लागला-देऊं घेऊं-खाऊं-बोलूं बसा- वयास करावयास लागला.' ५२ क्रियापदांतील 'वें' ह्या प्रत्य- यापुढें 'लागणें' क्रियापद आलें तर आवश्यक होणें, अनिवार्य होणें असे अर्थ होतात. 'त्याला जावें लागलें.' ५३ बरोबर, बाजूला असणें; मदत करणें. 'हा धोंडा मला उचलूं लाग'; 'हें काम मला करूं लाग' ५४ नांगर टाकण्याच्या स्थितीत येणें; कडेला येणें; स्थिरावणें; गति खुंटणें (जहाज, होडी). ५५ (ल.) अगतिक होणें; हालचाल बंद पडणें. [सं. लग् लग्न; प्रा. लग्ग; हिं. गु. लांगना] म्ह० लागें बोट वाढे पोट = नुसतें निमित्त होऊन एखादें वाईट काम होऊन जाणें. (एखाद्यास-ला) लागला जाणें- १ ऋणी होणें, असणें; मिंधा असणें. 'त्वां मला दोन पैसे दिलेस म्हणून मी कां तुला लागला गेलों?' 'मी काय तुझे चार चवल लागतों?' २ जास्त परिचयाचा, आसक्त असणें. लागून असणें- १ (स्नेह, लोभ, इ॰ मुळें) अगदीं चिकटला असणें; तंत्रानें किंवा मर्जीप्रमाणें वागणें. २ एखाद्या स्त्रीनें एखाद्याशीं व्यभि- चारसक्त असणें. ३ मग्न, गुंतलेलें असणें. लागून जाणें-नवरा सोडून दुसऱ्यापाशीं राहणें (एखाद्या स्त्रीनें). कानास-कानीं-लागणें- गुप्त गोष्टी बोलणें; कुजबुजणें 'किती लागती परस्पर कानीं । मधुर भाषणी ।' -रत्न १०. पाणी लागणें-१ एखाद्या ठिकाणच्या हवेचा, चालीरीतींचा मनावर, वागणुकीवर परिणाम होणें. 'विदेशी लागलें पाणी ।' -दा ३.६.२५. २ एखाद्या ठिकाणची हवा बाधणें. ३ (पुसणें) एखाद्याकडे येणें असलेली रक्कम बुडणें; नाहीसें होणें. पायीं लागणें-नम्र होणें; नमस्कार, वंदन करणें. 'समर्थपायीं राजराजेंद्र लागती ।' -सप्र ३.६६. लागत-न. (गु.) भाडें; खर्च. 'अगाऊ लागत भरून पावती मिळविली पाहिजे.' -(बडोदे) खानगी खातें, लागतीचें नियम ४. लागत- खेवों-क्रिवि. लागतांच. लागतगुण-पु. संगतीचा परिणाम- गुण; संबंध जडल्यानें येणारा गुण. 'कोणाचा कोणास लागतगुण असतोच.' लागता गुण-पु. (बायकी) माणूस, संपत्ति, उत्कर्ष, वस्तु जोडण्याचा गुण; संपादन करण्याचा, मिळविण्याचा गुण. लागता जुगता-वि. मार्गावर आणलेला; योग्य क्रमांत, रागेंत लावलेला; पायावर उभा केलेला. [लागणें + जुगणें] लागता वळगता-वि. (गु.) संबंधी; संबद्ध. 'जबाबदार इसमानें आपले ताब्यांतील व लागते वळगते नोकर लोकांस वरचेवर माहिती देत जावी.' -(बडोदें) आगी पासून बचाव ४. लागतें-न. संबंध. 'न बुझावितां मतें । न फिटे आक्षेपाचें लागतें ।' -ज्ञा १३.३२७. लागन-क्रि. (खा.) मनाला वाटणें. लागरा-वि. १ मादक; अंमली; खाल्ली असतां लागणारी (सुपारी, औषध, इ॰). २ खराब झालेला; किडीनें खाल्लेला; किडका (धान्य, फळ, लांकूड इ॰). लागीर-स्त्री. न. १ पिशाच; भूत. २ पिशाच-भूत-समंध- बाधा; पछाडणी. (क्रि० लागणें; काढणें; निघणें). -वि १ किडकें; सडकें. २ किडण्यासारखें किडण्याजोगें (लांकूड, धान्य). ३ नास-नुकसान-दुखापत पोंचेल असा. ४ लागलेला. ५ बाधा झालेला; पछाडलेला. ६ चिकटलेला; चिकट. ७ मादक; माजगा; अंमली. ८ वाईट परिणाम करणारा; अहितकारी. ९ दुसऱ्याचें प्रेम, लोभ, दया, जडवून-लावून घेणारा; लाडिक. लागीर होणें- बाधा होणें; लागणें (भूत, पिशाच्च).

दाते शब्दकोश

लागणें lāgaṇēṃ v i (लग S To be near or with. This verb is, of all the verbs in the Maráṭhí language, the most extensively and variously applied. The meaning is but one, and, by one general definition therefore, it may substantially be expressed; but it is a multifarious meaning; and, as such, that it may be discerned through the multiplicity of its respects and relations, it must also be exhibited in particular uses, and elucidated and established by familiar examples.) To come or arise unto; to come into contact, connection, or correspondence with; to have suitableness, agreeableness, or harmonious relation; to meet, befal, betide; to touch, hit, reach, stick to, refer to, bear on; to fit, suit, sit with, apply to. See the subjoined senses and illustrations. 1 To touch. Ex. तू त्याला लागूं नको विटाळ होईल. 2 To be planted, set, inserted;--as plants or graffs: also to be planted or set with--ground; as वाफा लाग- ला, अळें लागलें, सरी लागली. 3 To take root or seat; to be fixed congenially and vitally;--as plants set, cions engraffed. 4 To hit, strike, light on; to come in contact with hurtfully or sensibly--a weapon &c.: to touch, figuratively; to affect or take effect upon; to come home unto;--as abuse, reproof. Pr. बोलेल लेंकी लागेल सुने. 5 To close or shut; to fall together or to;--as doors or shutters, covers or lids, eyelids or eyes. 6 To be duly joined to or with, lit. fig;--as pieces, parts, verses, words. 7 To suit; to be adapted or accommodate to. 8 To get on foot or into vogue;--as fashions or ways. 9 To be contracted by; to fix itself unto;--as a vice, trick, ill habit: also to be caught by; to happen unto;--a disease or an ailment. 10 To arise upon or in and form an affection of;--as hunger, thirst, hiccough, panting, trembling &c. 11 To arise and proceed; to take commencement or origin and continue;--as bodies in space, events in time, any particular quality or quantity. Ex. एथून मावळ संपलें आणि देश लागला; तेथून पुढें भरवस्तीचे गांव लागतील; ह्या अध्यायापासून ग्रंथ कठीण लागला; तव्हांपासून ह्याचा त्याचा कलह लागला; हें काय शहर लागलें आहे; हें काय सोपें लागलें आहे. 12 To appear, as to its quality, unto the senses or mind of; to be perceived or apprehended by as of some particular nature, or as subsisting in some particular manner. Ex. आंबे खाऊन पहा गोड लागले तर घ्या; त्याला बरी गोष्ट जरीं सांगितली तरीं वाईट लागती. 13 To be found or got by;--as service, employment. 14 To be related or connected generally. Ex. तुझा तो काय मेहुणा लागतो. 15 To meet, fall in the way of, come before. Ex. वाटेनें चार नद्या लागतात; तुम्ही वाचीत जा आणि पुढें वृत्तश्लोक लागेल तेथें ठेवा. 16 To bear;--as fruit-trees: also to arise upon; to be borne or produced;--fruit. Ex. त्या प्रांतचे माड असे लागतात कीं एका एका माडावर हजार हजार नारळ लागतात. 17 To be corrupted, tainted, corroded, dirtied; to be affected with a blemish or damage;--a thing in general. 18 To stick or adhere to. 19 To bite or sting;--as snakes, scorpions, pungent substances. 20 To fall upon;--blight or mildew: also to be affected with blight;--a plant. 21 To act or take effect upon; to operate or work upon hurtfully or disagreeably;--as intoxieating or narcotic substances, bad air or water, fasting, angry imprecations &c. 22 To be affected with some one of the disorders incidental and usual;--esp. a horned beast. 23 To enter into and form the substance of; to be duly concocted and assimilated;--said of food. 24 To be expended or consumed in or upon;--as money, materials, time. 25 To be required or wanted; to be necessary to the well-being or perfect state of;--a thing in general: also to arise unto;--a want, need, occasion for. 26 To be duly pitched;--the throat or voice, a musical instrument or its tone: also to be set or tuned. 27 To be kindled;--a light or fire: also to be on fire;--as a house or thing. 28 To begin indeed; to enter into full activity or being; to be advanced to the stage at which the main or principal ceremony is under performance;--as a wedding or thread investiture. 29 To stutter, falter, hesitate. In this sense the person, his tongue, or his words may, any one, become the subject of the verb. 30 To begin to work; to get into action or motion;--as an engine, a machine. 31 To work on, in, at; to act in its peculiar manner on its proper subject. Ex. जंग चढला आहे म्हणून चाकू चांगला लागत नाहीं. 32 To be whetted or sharpened. Ex. दोन चाकू लागले आहेत बाकीचे लावायाचे आहेत. 33 To be fixed or settled upon; to be attached to inseparably or closely. Ex. उपजल्या प्राण्यास मरण हें लागलेंच आहे; संसाराचें कृत्य हें रोज लागलेंच आहे. 34 To be applied unto; to be occupied or engaged in. 35 To set in; to take place for continuance;--as rain, cold, heat. 36 To have the intended or natural effect; to answer, take, succeed. 37 To bear upon; to gall, pinch, rub;--as a load, the saddle, the back of a beast: also to receive or sustain galling or abrasion;--the back. 38 To be joined with the female in sexual congress;--used of birds and beasts, and, revilingly, of man. 39 To appertain to; to be the concern, province, proper office or business of. 40 To be arrived at the proper state or stage;--as a she-animal that has begun to yield milk, a tree that has begun to bear fruit. 41 To be; to have some certain condition, quality, or accident. Ex. मी का श्रीमंत लागलों आहें सर्वांस शालजोड्या द्या म्हणतां तो; मी काय कोठ्यधीश लागलों आहें; हा काय मुसलमान लागला. 42 To be fixed upon or attached to;--an act as criminal &c. upon or to a person as the perpetrator, or a duty or work upon a person to execute it. 43 To be incumbent or obligatory upon; to be necessary to be done or suffered by. Ex. ह्याचे हातून न झालें तर तुम्हास जावें लागेल; हा पळून गेला तर रुपये तुम्हाला द्यावयास लागतील. 44 (In conjunction with a verb having the termination ऊं or आवयास) To begin; to begin to do or to be; to act upon or to take place. Ex. तो मारूं लागला; देऊं -घेऊं -खाऊं -बोलूं -बसावयास -करावयास -&c. लागला; युद्ध होऊं लागलें; दिवस लांब होऊं or व्हावयास लागले. 45 शौचास लागणें, मुतायास लागणें &c. in con. To get the desire to stool or to make water. 46 To be with or on the side of helpfully; to set one's self unto or towards. Ex. हें ओझें मला उतरूं लाग; हें काम मला करूं लाग. 47 To come to anchor; to come to. 48 To come to a stand still; to be confuted, posed, non-plussed. लागला जाणें with ला or स of o. To become indebted or bounden unto; as त्वां मला दोन पैसे दिल्हेस म्हणून मी का तुला लागला गेलों? 2 To be in close intimacy with. लागून असणें To be closely engaged upon, about, at, with, in. लागून जाणें To leave her husband and dwell with another;--said of a wife.

मोल्सवर्थ शब्दकोश

देव

पु. १ ईश्वर; देवता. २ परब्रह्म; परमेश्वर; आदितत्त्व; शिव; जगन्नियंता. ३ मूर्ति; लांकूड दगड, धातु इ॰ कांची मूर्ति; जींत विधिपूर्वक देवत्वाची प्रतिष्ठापना केलेली असते अशी मूर्ति. ४ स्वर्गांत राहणारी इंद्रादि दिव्य पुरुष. ५ (नाटक, काव्य) राजा; श्रेष्ठ. 'तो सहदेवहि देवा ! येतां त्वत्सूनुच्या कृपाणातें । क्षितिवरि पाडी..' -मोकर्ण १४.२८. ६ यक्ष, किन्नर इ॰ उपदेव. अंगांत येणारें वारें. [सं. दिव् = प्रकाशणें; झें. दिव्, दएव = देव; ग्री. झ्यूस, थिऑस्; लॅ, जोव्हिस्; प्रा. आइस्लंडीक. तीवर = देव; प्रा. ज. झिओ; लिथु. देवस्; स्ला. दीना = दिवस] (वाप्र.) ॰देव करितां- क्रिवि. पुष्कळ प्रयत्न, हांजीहांजी, प्रार्थना करून. ॰दिसणें- (व.) हाल होणें. 'बायको मेल्यावर देव दिसतील.' ॰देव्हा- र्‍यांत नसणें-मालक(मन) ठिकाणावर नसणें. ॰नवसाला पावणें-इच्छित फळ मिळणें. 'भूप म्हणे कर्णा हा जरि अर्जुन देव पावला नवसा ।' -मोविराट ३.८८. ॰पावणें-मनाजोगी गोष्ट घडणें. ॰बाप्पा करणें-(बालभाषा) नमस्कार करणें. 'तो देवबाप्पा कर म्हणाला त्याबरोबर तिनें हात जोडून नमस्कार केला.' -सुदे ५ ॰होऊं लागणें-अरेराव, दंडेल होऊं लागणें, होणें. वरचढपणा गाजविणें. देवाकडे जाणें-मरणें. देवाचें नांव घेणें-कार्याला प्रारंभ करणें. देवाची(चे) आण, देवाचेण- स्त्री. देवाची शपथ. देवाच्यान-देवाची आण, शपथ. देवानें ड वी देणें-नकार मिळणें (उजवी = रुकार); मनांत कांहीं हेतु धरून मूर्तीच्या डाव्या-उजव्या अंगास फुलें किंवा अक्षता चिकट- वितात. त्या वरील प्रमाणें पडल्या असतांना समजावयाचा प्रकार. देवानें भरणें, धरणें-भरणें मध्यें पहा. देवानें मारणें-देवाची अवकृपा होणें. देवावरची तुळस, फूल, बेल काढणें- उचलणें-१ देवावरील निर्माल्य काढणें. २ शपथ घेण्याचा एक प्रकार. देवावर हवाला घालणें-देणें-देवावर विश्वास टाकणें, भरंवसा ठेवणें; सर्वस्वी अवलंबून असणें. देवावर हात ठेवणें- शपथ घेणें देवाशीं बसविणें-(गो.) अंगांत वारें, देव आण- ण्यास सांगणें. देवास-ला करणें-देवाची करणी. देवाची इच्छा याअर्थीं एखादें अघटित कार्य घडून आलें असतां तोंडांतून निघणारा उद्गार. देवास पेंचणें-शत्रूवर संकट आणण्यासाठीं देवाला बांधणें. देवासारखा बसणें-चुपचाप बसणें. न देवाय न धर्माय-कोणत्याच चांगल्या कार्याकरितां (पैसा, श्रम) उपयोगी न पडणें. देवास शिताळ देणें-देवाला स्नान घालणें. म्ह॰ १ मानला तर देव नाहीं तर धोंडा. २ (बायकी) देव नाहीं देव्हारीं, धुपाटणेवाला उड्या मारी. ३ देव देतो आन् कर्म नेतं. ४ देवाचें नांव आणि आपला गांव = दुसर्‍याच्या नांवावर स्वतःचा फायदा करणें. सामाशब्द- ॰ऋण-न. देवाचें कर्ज. हें यज्ञयागादिकांनीं फेडतात व त्यामुळें मनुष्यास सुखप्राप्ति होते. या- प्रमाणें दुसरीं ऋषिऋण व पितृऋण हीं अनुक्रमें अध्ययन व तर्पण यांनीं फेडावयाचीं असतात. ॰ऋषि-पु. देवर्षि; नारद. [अप.] ॰कला-ळा-स्त्री. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर तींत येणारें तेज, वैभव, शक्ति इ॰. देवासारखें ओज, कांति. [सं.] म्ह॰ टाकीचे घाव सोसावे तव्हां देवकळ पावावी. ॰कांचन-न. कांचन फूलझाडांतील एक जात किंवा त्याचें फूल. ॰कापशी- कापशीण-स्त्री. कापसाच्या झाडांतील एक प्रकार. याचें फूल जांभळें असतें, याच्या कापसास देवकापूस म्हणतात. याच्या बोंडांत वेणीसारखी एक मोठी बी असते. -कृषि ३८३. ॰कार्य- न. १ देवाची पूजा. २ कुळधर्मानुसार कुळदेवटेची पूजा, अनुष्ठान, जेवण इ॰देवकी-स्त्री. देवस्की पहा. -वि. देव किंवा पिशाच्च यांच्यापासून घडणारी पीडा, बाधा, उपद्रव, भाकीत, शकुन इ॰ देवकी चमत्कार-पुअव. देव पिशाच्च यांचा चमत्कार. याच्या उलट (किंवा याला जोडून) राजकी. अस्मानीसुलतानी याप्रमाणें. ॰कुंडी-स्त्री. (व.) लग्नाचे अगोदरचे दिवशीं बोहल्याच्या जवळ शास्त्रोक्त रीतीनें ठेवावयाचीं मडकीं. ॰कुंभा-पु. (कों.) कुंभा किंवा दुधाणी नांवाचें फूलझाड. ॰कृति-कृत्य-स्त्रीन. १ ईश्वरी करणी; दैविक घटना. २ धार्मिक कृत्य, विधि. ॰केळी-स्त्री. सामान्य कर्दळी नांवाचें फूलझाड. ॰खर्च-पु. देवपूजेचा खर्च किंवा या खर्चाकरितां बसविलेला कर. ॰खळ-अव. (ना.) (तिर- स्कारार्थीं) घरांतील देवाच्या मूर्ती. ॰खोली-स्त्री. देवघर. ॰गण- पु. जन्मनक्षत्रावरून मनुष्याचे देव, मनुष्य व राक्षस असे तीन वर्ग करतात त्यांपैकीं प्रथम. मनुष्यगण पहा. ॰गणपत-न. (सोंग- ट्यांचा खेळ) देवाला द्यावयाचा पहिला हात, दान. ॰गत-ति- स्त्री. १ नशीबाचा फेरा; दैवयोगानें प्राप्त होणारी दशा, स्थिति. २ (ल.) मृत्यु. ३ (गो.) विटाळशी असतांना मेलेल्या स्त्रीचें पिशाच्च. -वि. दैवी (कृत्य, नाश इ॰). ॰गाय-स्त्री. मखमली किडा; गोसाई. मृगाच्या पावसांत यांची उप्तत्ति होते. ॰गांधार-पु. एक राग. यांत षड्ज, तीव्र ऋषभ, कोमल गांधार, कोमल मध्यम, पंचम, कोमल धैवत, कोमल निषाद हे स्वर लागतात. आरोहांत ऋषभ व धैवत वर्ज्य. जाति औडव-संपूर्ण. वादि षड्ज, संवादी पंचम. वेळ दिवसाचा दुसरा प्रहर. ॰गिरी-पु. १ एक राग यांत षड्ज, तीव्र ऋषभ, तीव्र गांधार, कोमल मध्यम, पंचम, तीव्र धैवत, तीव्र निषाद हे स्वर लागतात. जाति संपूर्ण-संपूर्ण. वादी षड्ज. संवादी पंचम, गानसमय दिवसाचा पहिला प्रहर. हा बिलावल रागाचा एक प्रकार आहे. २ दौलताबादचें जुनें नांव. ॰गुरु-पु. बृहस्पति. ॰गृह-घर-न. १ देव ठेवण्याची खोली. २ मंदिर. ॰घाई-स्त्री. देवापुढें ढोल वाजविण्याची विशिष्ट गति, प्रकार.॰घाट-पु. देवळास जाण्यासाठीं बांधलेली वाट-रस्ता. ॰चार-पु. ग्रामदेवीचें दूतरूपी पिशाच्च; पिशाच्चगण. [सं. देव + चार; देवाप्सरस] ॰जन-पु. देवळांतील चाकरनोकर. ॰जी-जी धसाडा-पु. १ माक- डाच्या खेळांतील पुरुषाचे कपडे घातलेला माकड. यांतील माकडीणीला रत्नी म्हणतात. २ (ल.) अडाणी, कुरूप माणूस; विद्रूप मनुष्य. म्ह॰ (व.) देवजीधसाड्या पुंजाइ पाद्री-नवरा हाण. मार करणारा व बायको गरीब असें जोडपें. ॰झाड-न. (कों.) देवानें किंवा पिशाच्चानें झपाटलेला मनुष्य.॰ठिकें-न. गांवांच्या सीमांचा तंटा देवापुढें दिव्य करून तोडल्यामुळें महाराला (इनाम) मिळालेली बिन सार्‍याची जमीन. ॰डांगर-पु. काळा भोंपळा; चाकी. हें फळ दुध्या, मुगा अथवा मुगवा, काशीफळ यांच्याहून निराळें आहें.॰डांगरी-स्त्री. १ देवडांगराचा वेल. २ घोसाळीचा वेल. ३ देवताड. ॰त-न १ देव. २ (ल.) लाडका; आवडता. [सं. दैवत] ॰तरु-पु १ पिंपळ, मंदार, पारिजातक, संतान, कल्पवृक्ष, हरिचंदन यांना उद्देशून लावतात. २ जुनें व पवित्र असें कोणतेहिं झाड. ॰तवार-पु. (रा.) कुळदेवतेच्या पूजेचा दिवस. [देव + सं. तिथिवर-त्योहार-तेहवार-तवार] ॰ताळा-वि. फाजील कर्मठ; देवदेव करणारा.॰ताळें-न फाजील कर्मठपणा. ॰ती/?/-न. तीर्थ पात्र ॰त्तर-त्रा-स्व-न. (कायदा) देवाला दिलेली मिळकत, देणगी.॰त्रयी-स्त्री. ब्रह्मा, विष्णु, महेश. 'जयातें देवत्रयी कहीं नायके ।' -ज्ञा ११.१४७. ॰त्व-न. देव- पण; देवाची स्थिति; अवस्था.॰त्त-पु. १ पांच उपप्राणांपैकीं एक. 'ज्याकरितां जांभया येती । तो म्हणावा देवदत्त ।' -यथादी १८.१००४. २ अर्जुनाचा शंव. 'जाता कुरुकटकावरि वाजविला दिव्य देवदत्त दर ।' -मोविराट ४.२. ३ एक विशेषनाम; बुद्धाचा मेहुणा. -वि. १ देवानें दिलेलें. २ कोणीएक; कोणी तरी उदाहर- णार्थ घेतलेली व्यक्ति. 'देवदत्त लठ्ठ न दिवसा खात नाहीं' ॰दया-स्त्री. १ परमेश्वरी कृपा. २ (ल.) देवाच्या दयेनें प्राप्त झालेली संपत्ति; गुरेंढोरें, मालमत्ता, मुलेंबाळें इ॰. ॰दरबार- न. १ देऊळ. २ सभामंडप. याच्या उलट राजदरबार. 'देवदरबारीं खोटें बोलूं नये.' ॰दर्शन-न. १ देवाचें दर्शन. २ विवाहानंतर सपत्नीक देवाच्या भेटीस जाणें; लग्नानंतरची ओव्हर-वधूवरयात्रा. ॰दार-दारू-पु. हिमालय इ॰ ठिकाणीं उप्तन्न होणारा वृक्ष हा फार उंच व दिसण्यांत सुंदर असतो. हा शें-दोनशें वर्षें वांचतो. जस- जसे हे वृक्ष जून होतात तसतसे बळकट होऊन उपयुक्त होतात. याचें इमारतीलांकूड होतें. यापासून टर्पिनतेल काढतात. लाल, तेल्या, काष्ट इ॰ याचे प्रकार आहेत.॰दारी-वि. देवदाराच्या. लांकडाचें केलेलें; देवदारासंबंधी. ॰दाली-स्त्री. देवडांगरी. ॰दासी-स्त्री. मुरळी; भावीण; दक्षिणेंत देवास वाहिलेली कुमारिका असा अर्थ रूढ आहे. हिचा धंदा देवाची सेवा व नृत्य- गायन करणें. ॰दूत-पु. (ख्रि.) १ देवाचा दूत-निरोप्या जासूद. २ देवाची सेवा करून त्याचा हुकूम बजावणारा स्वर्गीय बुद्धि- विशिष्ट आत्मा; (इं.) एंजल याचा पर्याय. 'जेव्हां मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवानें येईल व त्याजबरोबर सर्व देवदूत येतील तेव्हां तो आपल्या वैभवी राजासनावर बसेल.' -मत्त २५.३१. ॰देव-पु. १ देवपूजा; धार्मिक विधि, आचार किंवा पूजाअर्चा. (क्रि॰ करणें). २ देवांचा देव; विष्णु. महादेव.॰देव करणें- पूजाअर्चा करणें; कळकळीनें प्रार्थना करणें; अतिशय श्रम करणें. ॰देवक-न.देवक पहा. ॰देवतार्चन-न. देवतार्चन पहा. ॰देव्हारा-पु. पुष्कळ देवता, सिद्धपुरुष, साधु यांची भक्ति, प्रार्थना इ॰ करणें (दुखणें वगैरे संकटाच्या निवारणाकरितां). 'देवदेव्हारे केले बहुत । औषधासी नाहीं गणित ।' ॰द्वार-न. १ मंदिराचें दार. २ मंदिर; देवस्थान; पवित्र जागा; धार्मिक कृत्यें करण्याची जागा. ॰धर्म-पु. १ देवदेव; देवपूजा वगैरे. २ कांहीं इष्ट सिद्धीविषयीं किंवा अनिष्ट निरसानार्थ कुलग्रामदेवतादिकांस नवस करणें, कौल लावणें इत्यादि. ३ नैमित्तिक धार्मिक कृत्य याच्या उलट नित्यधर्म. ॰उठविणें-दुसर्‍यानें पिशाचादि क्षुद्र- देवतांमार्फत उत्पन्न केलेली पीडा वगैरे दूर होण्याकरितां शांति वगैरे सारखीं कृत्यें करणें. देवाधर्माचा-वि. देव, पिशाच यांच्यापासून उप्तन्न झालेला (रोग इ॰). याच्या उलट अंग- रोग. देवाधर्मानें टाकलेला-वि. जातिबहिष्कृत; धर्मबाह्य. ॰धान्य-न. १ ज्याचा नैवेद्य देवास अर्पण करावयाचा असें धान्य (तांदूळ, गहूं इ॰). २ रानांत आपोआप उगवणारें देव- भात वगैरे धान्य. ॰धूप-पु. देवापुढें लावावयाचा सुवासिक धूप- ॰नदी-स्त्री. १ (काव्य) गंगा; भागीरथी नदी. 'धर्म म्हणे धर्मा ज्या देवनदी प्रसवली महाभागा ।' -मोशांति ६.३०. २ आकाश- गंगा. ॰न(ना)ळ-पु बोरूची एक जात. 'मीं जाण देवनळही स्वकरीं धराया ।' -र २७. ॰नागरी-स्त्री. बालबोधी (संस्कृत) लिपी; संस्कृत भाषेची व ग्रंथांची लिपि. [देवनगर ] ॰निंदक-वि. देवांची निंदा करणारा; नास्तिक. ॰निंदा-स्त्री. देवांची निंदा. ॰पण-पणा-पुन. १ देवधर्म अर्थ २ पहा. २ देवलाळा. ३ (गो.) अंगांत येऊन प्रश्नांचीं उत्तरें देणें.॰पळही-ळहें-स्त्रीन कापसाची एक जात; देवकापशी; देवकापूस. -ऋ ६८. (टीप)॰पाट-पु. देवाचा व पूजा करण्याकरितां बसण्याचा पाट. ॰पाण-न. (कु.) नैमित्तिक देवस्की; देवपणा. ॰पिसा-वि.देवासाठीं वेडा झालेला. ॰पिसें-पिसा-शी-नस्त्री. फाजील धर्मनिष्टपणा. ॰पूजास्त्री. देवतार्चन पहा.॰पूजा वाढणें-(ल.) मगरूर होणें; थोडीशी प्रतिष्ठा वाढल्यामुळें फुगणें. 'गांड भरे आणि देवपूजा वाढे.' ॰पुरी- स्त्री. १ वाटेल त्या येणार्‍याजाणार्‍यास मोकळीक असलेलें घर. २ (ल.) धर्मशाळा.॰प्रतिष्टा-स्त्री. १ मंदिरांत केलेली नव्या मुर्तींची स्थापना. २ विवाहादि संस्कारांच्या आरंभीं करावयाची देवतांची स्थापना; देवक बसविणें. ॰प्रश्न-पु. १ देवाला कौल लावणें. २ (फलज्योतिष) ग्रह पाहणें. (क्रि॰ करणें; पाहणें; येणें; उतरणें). ॰बाभ(भृ)ळ-स्त्री. कंकर; कंकरी; काळी बाभूळ. सामान्य बाभळीसारखा हिचा वृक्ष मोठा होत नाहीं. फुलें पिवळीं असतात या झाडास लाख येते. पिसाळलेल्या कुत्राच्या कोल्ह्याच्या विषावर उपयोगी आहे. देवबाभळीचें मूळ थंड पाण्यांत १ ते ४ तोळेपर्यंत उगाळून त्यांत पाणी घालून पाजावें. हें प्रत्यहीं दोनदां याप्रमाणें ७ दिवस द्यावें. पथ्य करावें -वगु ४.३०. ॰बुद्धि-स्त्री. १ देवाविषयीं आस्तिक्यबुद्धि. २ चराचर विश्व देवमय पाहण्याची दृष्टि. याच्या उलट पाषण-पर्वतबुद्धि ॰ब्राह्मण-पु. १ यात्रेच्या सांगतेप्रीत्यर्थ ब्राह्मणभोजन घालणें. २ यात्रेच्या ठिकाणीं देवाची पूजा व ब्राह्मणभोजन करणें. ३ लग्न- मुंजीचेपूर्वी प्रथम जेवण करतात तें. ॰भक्ति-स्त्री. १ देवाची सेवा २ (कों.) पिशाच्चउपद्रव नाहींसा करण्यासाठीं अंगारा लावणें; आपल्या अंगीं पिशाच्चाचा संचार करून घेणें इ॰ ॰भक्त्या-वि. पंचाक्षरी; मांत्रिक; देवऋषी. ॰भात-न. आपोआप उगवणारें भात; एक उपधान्य. हें डोंगरांत पाणथळ जागीं पिकतें. उपवासाच्या दिवशीं खातात. ॰भाषा-स्त्री.स/?/त भाषा. ॰भूमि-स्त्री. १ पवित्र भूमि. २ यज्ञयाग करावयाची किंवा जीमध्यें नद्या, मंदिरें वगैरे आहेत अशी पवित्र जागा, प्रांत. ॰भोळा-वि. साधासुधा; निरंतर देवसेवेंत निमग्न असल्यामुळें जगांतील उलाढालीशीं संपर्क नसलेला; सात्त्विक (माणूस). ॰मंगळ-वि. ज्याच्या कटीवर, उरावर. शिरावर व कपाळावर मिळून चार पांच भोवरें असतात असा (घोडा) -अश्वप १.९०.॰मण-मणि-वि ज्याचें ऊर सोडून वरीलभागीं कंठाचें खाली भोंवरा आहे असा (घोडा). हा शुभलक्षणी होय. -अश्वप १९२. 'बाहात्तर खोडी परी देवमण कंटी ।' -तुगा १६७५.॰मात-वि. देवाकडे सर्वस्वीं लक्ष असलेला; धार्मिक. ॰मय-वि. देवरूप बनलेला. ॰माणूस-पु. निरूपद्रवी, विश्वासु, निष्कपटी माणूस. ॰मातृक-वि. पावसाच्या पाण्यानें जेथें पीक होतें असा (देश). याच्या उलट नदी-जलमातृक. ॰मासा-पु. एक प्रकारचा मासा; याची लांबी ४५ ते ८० फूट असून हा मांसाहारी आहे. जबड्याची उंची माणूस उभा राहील इतकी असते. हा शेपटीनें मोठ्या नांवा फोडतो. याचें तेल व जबड्याचें हाड उपयुक्त व किंमतवान असते. ॰मुलुक-पु.नर्म- देच्या उत्तरेकडील हिंदुस्थान देश याच्या उलट राक्षसी मुलुक = दक्षिणहिंदुस्थान. ॰यज्ञ-न. जेवणाच्या पूर्वीं करावयाचा एक यज्ञ; वैश्वदेव; पंचमहायज्ञ पहा. ॰यात्रा-स्त्री. देवाची मिरवणूक. ॰यान-न. देवाकडे नेणारा मार्ग; उत्तरायण. ॰योनि-स्त्री. उपदेव; विद्याधर, अप्सरा, यक्ष, राक्षस, गंधर्व, किन्नर, पिशाच, गुह्यक, सिद्ध, भूत इ॰ ॰रसपण-न. देवऋषी, मांत्रिकपणाचें काम, धंदा. ॰राज-पु. इंद्र. ॰रुखा-पु. ब्राह्मणांतील एक पोटजात. ॰रुखी-स्त्री. १ मंदिरांतील गाभारा. २ (कु.) (देवळांतील देव ठेवण्याचा) कोनाडा. ॰रुषी-शी-लशी-पु. देवभक्त्या पहा. ॰लशी-पु. अंगांतील भूत काढणारा मांत्रिक. ॰रुसकी-रसकी-लसकी-स्त्री. देवरसपण पहा. ॰रूपी- वि. देवाच्या रूपासारखा; देवाच्या रूपांतील देवर्षि-पु. स्वर्गांतील ऋषी. यांत नारद, अत्रि, मरीची, भरद्वाज, तुंबुरु इ॰ चा समावेश होतो. 'शक म्हणे कर हरिहर-विजयांचें आशु गान देवर्षे ।' -मोविराट ६.२४. देवल-लक-पु. १ देवापुढें ठेवलेली दक्षिणा इ॰ वर उदरनिर्वाह करणारा ब्राह्मण. २ दक्षिणा घेऊन धर्मकृत्यें करणारा; भिक्षुक. ३ गुरव. 'कुंभार देवळक तथा धनगर ।' -स्वादि ६. ५.३५. ॰लंड-वि. १ देवास तुच्छ मानणारा. २ नास्तिक. ॰लोक-पु. स्वर्ग. ॰वाणी-स्त्री. १ संकृत भाषा. 'देववाणी गीर्वाण संस्कृत ।' -दावि वेळ. ३८९. २ आकाशवाणी. ॰वेळ-स्त्री. सकाळची वेळ ॰वृक्ष-पु. देवतरु पहा. ॰व्रत-पु. भीष्माचार्य. 'अंतुळें पितृप्रसादें मंडित देवव्रता असामान्य ।' -मोकर्ण ५०.७४. ८.४८. ॰शिल्प-न. मूर्ति, रथ, यज्ञकुंड वगैरे संबंधाचें शिल्प. ॰सभा-स्त्री. इंद्रसभा. ॰साख-पु. एक राग. यांत षड्ज, तीव्र ऋषभ, कोमल गांधार, कोमल, मध्यम, पंचम, कोमल धैवत, कोमल निषाद हे स्वर लागतात. जाति संपूर्ण-संपूर्ण. वादी षड्ज. संवादी मध्यम. गानसमय दिवसाचा पहिला प्रहर. हा एक कानड्या रागाचा प्रकार आहे. ॰साजुज्य-न. देवांत लय होणें; विलीन होणें. ॰साळी-स्त्री. (व) देवभात; न पेरतां उगवलेल्या साळी. ऋषिपंचमीला याचे तांदूळ खातात. देवसू-वि. (राजा. कु.) देवाला दिलेली, वाहिलेली (जमीन, उप्तन्न इ॰) देवस्की- स्त्री. १ देवभक्ति पहा. २ गांवदेवतेचा वार्षिक उत्सव. ३ देवाला कौल लावणें. ॰स्थळ पु. पुण्यभूमि. ॰स्थानन. १ पुण्यभूमि. २ देवाला अर्पण केलेली जमीन किंवा उप्तन्न. ३ देवाचें संस्थान. ॰स्थापन-ना-नस्त्री. देवप्रतिष्ठा पहा. देवस्व-सू-न. देवस्थान अर्थ २ पहा. देवळ-न. देऊळ; मंदिर. [सं. देवालय] देवळची घांट-स्त्री. देऊळघांट पहा. देवळी-स्त्री. १ देवरुखी पहा. २ लहान देऊळ. देवळी-पु. भावीण; तिची संतति. यांच्याकडे दिवें लावणें, वाद्यें वाजविणें इ॰ कामें पिढीजात असतात. यांची स्वतंत्र जात मानितात. देवाईल-न. देऊळ. 'बरें जालें तुझें केलें देवाईल । लेकरें बाईल उपेक्षिली ।' -तुगा ६५५. देवांगण-न. १ देवळांतील अंगण. २ त्या अंगणांत उभे राहून घ्यावयाची शपथ. 'शून्याचीं देवांगणें । प्रमाणासी ।' -अमृ ७.१०२. ३ गंधर्व नगर. ४ मिथ्या कल्पना. देवांगना-स्त्री. १ स्वर्गांतील अप्सरा. २ भावीण; देवळी; देवदासी. देवागार-न. (काव्य.) देवघर. देवांगें-न. (महानु.) पीतांबर. 'काढिलीं देवांगें चांग रत्नें कनक भरिएले परिएळा ।' -धवळे पूर्वार्ध ३९. देवाधर्माचा-वि. देवाधर्मासंबंधीं; पवित्र; धार्मिक (काम, वस्तु, व्यक्ति). देवा- धिदेव-पु. १ देवदेव अर्थ २ पहा. २ विष्णु, महादेव. देवाना प्रियः-१ देवाचा लाडका. २ संन्यासी. ३ (ल.) मूर्ख. देवान्न-न. १ देवभात पहा. २ पक्वान्न इ॰ उत्तम अन्न. 'निंदिती कदान्न इच्छिती देवान्न । पाहाताती मान आदराचा ।' -तुगा २८२७. देवापगा-स्त्री. देवनदी; भागीरथी; गंगा. [सं. देव + आपगा] देवापुढचा(पुढें)देव-पु. १ महादेवापुढचा नंदी. २ (ल.) मूर्खशिरोमणी. देवार्चन, देवावाहन, देवोत्थापन्- देवता खालीं पहा. 'जनार्दनस्वामी करिती देवार्चन ।' -रामदासि २.७२. देवालय-न. देऊळ; मंदिर. देवाज्ञा-स्त्री. (ल.) मृत्यु. (क्रि॰ होणें; येणें). देवींधर्मीं-क्रिवि. १ देवधर्मामध्यें. 'पाटाची बायको देवींधर्मीं उपयोगी पडत नाहीं.' २ देवधर्माला, व्रत वैकल्यें किंवा धार्मिक आचारविचार, धार्मिक उपाय, उपचार करून; प्रश्न पाहून. (क्रि॰ पाहणें, विचारणें). 'हें संकट टळावें म्हणून देवींधर्मीं विचारून पहा.' देवोत्थान-न. चातुर्मास संपल्यावर कार्तिक शुक्ल एकादशीस विष्णूचें जागें होणें आणि उठणें. या एकादशीस प्रबोधिनी एकादशी म्हणतात. [सं.]

दाते शब्दकोश