मराठी बृहद्कोश

सात मराठी शब्दकोशांतील २,८४,८८८ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

मोहजाल

मोहजाल n-पाश m The snare of the world.

वझे शब्दकोश

मोहजाल mōhajāla n (S) The snare of the world; the fascination or fetters of one's family, friends, property, and other illusory objects.

मोल्सवर्थ शब्दकोश

मोहजाल / मोहपाश

(सं) न० मायापाश, मायाजाल.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

संबंधित शब्द

आशा

स्त्री. १ अपेक्षा; आकांक्षा. 'आशा अमर आहे.' २ इच्छा; वासना; मन. 'पेरू पाहिले तेव्हां माझी आशा त्यांजवर गेली.' ३ आवड; प्रेम; लोभ. 'आतां या फाटक्या आंगरख्याची आशा कशाला धरतोस । एखाद्यास देऊन टाक.' ४ दिशा. 'धेनु कुरुनीं वळिल्या येवूनि उत्तराशेला' -मोविराट ६.६३. [सं.] ॰कार-वि. आशा करणारा; आशावादी. ॰दुराशा-स्त्री. बरी- वाईट इच्छा; अपेक्षा; माया; लोभ; आशा आणि भीति. 'आशा दुराशात्यजा । आधिं तो उमजा । स्वहित समजा । दुर्भाव टाका दुजा । मुक्तीस लावा ध्वजा ।' ॰धोशी-वि. (गो.) हांवरा. 'किते आशां धोशी रे बाबा मनीस हॉ' ॰निराशा-स्त्री. आशा आणि निराशा; आशेची निराशा. म्ह॰ आशेसारखें दुसरें दुःख नाहीं आणि निराशे सारखें सुख नाहीं. आशेची निराशा होणें-अपेक्षा, आशा, हेतु फलद्रूप न होणें; हिरमोड होणें. ॰पाश-पु. १ संसारांतील अपेक्षा, इच्छा, हेतु, यांचें जाळें; मोहजाळ; विषयजाल. २ (व्यापक.) जगराहाटी; जग. ॰बद्ध-वि. १ आशापाशांत सांपडलेला; सांसा- रिक, आशा, अपेक्षा यांनीं जखडलेला; लोभी; हांवरा. 'आशा- बद्ध बोलो नये । विवेकेवीण चालो नये ।' -दा १४.१.७७. २ आशावादी; आशायुक्त. ॰भंग-पु. निराशा; हिरमोड. ॰भूत-वि. (निंदाव्यंजक) (प्र.) आशाळभूत; हांवरा; लोभी. ॰वाद-पु. जगांत दुःखापेक्षां सुख अधिक आहे आणि जगांत अखेर सत्या- चाच किंवा सत्पक्षाचाच विजय होणार आहे असें प्रतिपादन कर- णारें मत. (इं.) ऑप्टिमिझम. ॰वान-वादी-वि. (विरू.) आशा- वंत-आशाविष्ट = आशायुक्त. आशा ठेवणारा. [सं.]

दाते शब्दकोश

आशापाश      

पु.       १. संसारातील अपेक्षा, इच्छा, हेतू यांचे जाळे; मोहजाल; विषयजाल. २. (व्यापक) जगराहाटी; जग. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अविद्या

स्त्री. १ विद्या नसणें; अज्ञान; अजाणपणा. 'हे चिदंश अविद्येमुळें आत्मस्वरूप विसरून आपण जीव असें मानून संसारांचा पडले.' -शास्त्रीको. २ माया; अवास्तविक गोष्टी खर्‍या मानणें. 'तेथें मायेच्या प्रपंचासच अविधा ही संज्ञा आहे' -गीर २०८. 'परमात्म्याचीं दोन आवरणें -स्थूलदेह, लिंगदेह- आहेत या कल्पनेच्या मुळाशीं अविद्या आहे.' ॰पसारा-पु. अज्ञानाचा प्रसार, व्याप; मायाजाल; मोहजाल. 'स्त्री केवळ अविद्याप- सारा.' -द्योपाधि-पु. अविद्या-अज्ञान याची उपाधि; अज्ञानरूपी आवरण. उपाधि पहा. [सं.]

दाते शब्दकोश

जाल

जाल jāla n (S) A net. 2 A number of things strung or gathered together; as केशजाल Dressed hair; वर्णजाल The alphabet; वृक्षजाल A forest or grove; शब्दजाल A vocabulary. Also नक्षत्रजाल, ग्रहजाल, पक्षजाल, पदजाल, गृहजाल, तृणजाल, बाणजाल or शरजाल, तंतुजाल, शस्त्रजाल, मेघजाल, धूमजाल. 3 Used fig. in the significations of Net or entanglement; as कर्मजाल, भवजाल, मायाजाल, मोहजाल, विषयजाल.

मोल्सवर्थ शब्दकोश

मोहपाश

मोहपाश mōhapāśa m (S) The snare of the world; the fascination or fetters of illusory objects. See मोहजाल.

मोल्सवर्थ शब्दकोश

मोह

पु. १ मूर्च्छा; बेशुद्धि; चित्तभ्रम; भुरळ; भारणी; मोहन; भुलावण; भूल. २ प्रेम; माया, दया, कींव, सहानुभूति इ॰ ना चेतविणाऱ्या विषयांचा क्षुब्ध लोभ; मोहन. 'द्रोणाला दुःशासन कथितां दे भीष्म हानि मोहातें ।' -मोभीष्म ११.१३२.३ सदसद्- विवेकबुद्धीचा, जाणिवेचा लोप; विस्मरण; घोटाळा; मतिभ्रम; भुलवण. 'निजदोषें व्यसनातें पावुनि मोहीं निमग्न नसती कीं ।' -मोकर्ण १.६.४. अज्ञान; मूर्खपणा; आत्मज्ञानाचा अभाव असल्या मुळें जगांतील सर्व विषय, सर्व दृश्य जगत खरें आहे असा भास होऊन त्याचा उपभोग व वैषयिक सुख घेण्याकडे प्रवृत्ति होणें. ५ आवड; शोक; प्रीती; प्रेमाचें वेड; प्रेमाचा अतिरेक. 'परिभूप- पुत्र मोहें केला पहिल्या परीस ही अंध ।' -मोरोपंत. ६ चूक. [सं. मुह्] मोहक-वि. १ भुरळ पाडणारें; भ्रम उत्पन्न करणारें; गुंतविणारें; गुंगविणारे. २ आकर्षक; रमविणारें; चित्त हरण कर- णारें. [सं.] ॰पाश-पु. मोहरूप जो पाश तो; संसाराचें जाळें; भ्रामक विषयांचें बंधन. मोहजाल पहा. ॰यंत्र-न. नळा (शोभेच्या दारूचा); फुलबाजी. 'मोहयंत्री सुमनमाला । अग्निपुष्पें भासती डोळा । फुलें म्हणती अबळा । पाहता डोळां ते राखा ।' -एरुस्व १५.११८. मोहा, मोहाचा-वि. मोहक किंवा उत्कृष्ट गुणाचा-(एका प्रका- रच्या नारळाबद्दल किंवा सुपारीबद्दल उपयोग). मोहाचा नारळ नारळी-माड-सुपारी-पुस्त्री. ज्यांची गोडी इतर नारळ, सुपा- रीपेक्षां अधिक असते तो नारळ, सुपारी इ॰. या नारळाचें खोंबरे गोड असून तें खाल्ल्यावर चोथा रहात नाहीं; सुपारीहि गोड असतें. -कृषि ७०३. मोहाथिणें-क्रि. (काव्य) मोहनी पाडणें; भुरळ किंवा भुलवन पडणें; भुलून जाणें; मोहीत होणें. 'अवश्य म्हणोनि तीर्थेंश्वरी मोहाथिली अनुवादे ।' मोहाळणें-क्रि. मोह पावणें. ॰मोहित-वि. मोह पावलेला; भुललेला; भुरळ पडलेला; मोहानें व्याप्त असा; लुब्ध. मोहरात्रि-स्त्री. श्रावण वद्य अष्टमी. (या रात्रीं कृष्णानें कंसदूतास मोह पाडला यावरून). मोह- जाल-जाळ-न. मायेच्या योगानें संसारांत उत्पन्न होणारा मोहाचा पाश; संसाराचें, जगांतील पसाऱ्याचें जाळें; कुटुंब, इष्ट- मित्र, मालमत्ता व इतर भ्रामक विषय यांची भूल, भुरळ. 'तां घेतले ये मज मोहजाळीं ।' -सारुह १.१९. मोहणें-उक्रि. भुलणें; भुलावणें; वश करून घेणें; वश होणें; मोह पडेल असें करणें; भारणें; व्यामोह उत्पन्न होणें, करणें; भुलविणें; भुलणें; चित्त भ्रमणें, भ्रम- विणें. 'मन मोहिलें नंदाच्या नंदनें ।' मोहन-वि. १ मोहविणारें; आकर्षक. २ भुलविणारें; भूल पाडणारें; भ्रामक. 'एक म्हणे कुब्जेनें लाविला चंदन । त्यांत कांहीं घातलें मोहन । तरीच भुलला जगज्जीवन । कौटिल्य पूर्ण केलें तिनें ।' -ह २१.१७७. -न. १ (वैद्यक) गुंगी आणणें; भूल देणें; बेहोष पाडणें. -ज्ञा १३.९९५. २ भुरळ मूर्च्छा; भ्रम. गुंगी, निद्रा आणणारें औषध. मोहन- भूत-न. एक प्रकारचें भूत, पिशाच. मोहनमाळ-माला-स्त्री. सोन्याच्या मण्यांची गळ्यांत घालावयाची एक विशिष्ट माळ. मोहनास्त्र-न. एखाद्या इसमावर मोहनी टाकण्याचें अस्त्र; जें शत्रूवर सोंडलें असतां त्याला मूर्च्छा येते असें एक अस्त्र. मोह (हि)नी-स्त्री. १ भूल; भुलावण; मोहन. २ मोह घालण्याचीं कृत्यें; वश करण्याचीं किंवा भूल घालण्याचीं, भुलविण्याचीं कृत्यें (क्रि॰ घालणें). एखाद्यास भुलविण्याकरितां उपयोगांत आणण्याचे मंत्र. ३ विष्णूनें अमृतमंथनाच्या वेळीं घेतलेले सुंदर स्त्रीचें रूप. [सं. मुह् = बेशुद्ध होणें] मोहिनी-स्त्री. १ मोहन; प्रलोभन; भुलवन; भुरळणें; चित्तभ्रम; बुद्धिभ्रम; मोह करणारी. २ समुद्र- मंथनप्रसंगीं भगवंतानीं जें मोहिनीचें रूप घेतलें होतें तें; भुरळ पाडणारी. 'कथा भुवन मोहिनी अशि न मोहिनी होय ती ।' -केका १०३. [सं. मुह्] मोहिरें-न. (महानु.) मोहक वस्तु; मोहविणारें 'तो दाउनि माया वेषाचें मोहिरें । जेथ चरित्रें करी' -ऋ ४२

दाते शब्दकोश