आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह!
शब्दार्थ
यौवन
यौवन yauvana n S Youth or mature age; adolescence or puberty.
यौवन n Youth or mature age; puberty.
(सं) न० तारुण्य, ज्वानी.
न. तारुण्य; वयांत येणें; पूर्ण वाढ (शरीराची) [सं. युवन्-तरणा] ॰कंटक-पु. तरुणपणीं तोंडावर येणारे फोड अगर पुटकुळ्या; तारुण्यपीटिका. [सं.] ॰पीटिका-स्त्री. कफवातपित्त यापासून शेवरीच्या काट्यासारख्या पुटकुळ्या तारुण्यांत मनुष्याच्या तोंडावर येत असतात त्या. [सं.]
अप्राप्त यौवन
वि. वयात न आलेला; यौवनावस्था प्राप्त न झालेला; कोवळा. [सं.]
संबंधित शब्द
युवन
न. १ यौवन; तारुण्य. 'जो कैवल्यकुसुमाचा आमोदु । नातरि ब्रह्मविद्येचा युवनमदु । ' -भाए ३७. २ स्तन. 'सदैव युवन पाजिती । दुद मरिये । ' -ख्रिपु २.२.१५४. [सं. यौवन; हिं. जोबन]
नव
वि. १ नवीन; नवें; नूतन. 'नव नव नवल कराया न धरी लेशहि इचीच आळस भा ।' -मोसभा १.१०. 'या नव नवल नयनोत्सवा ।' -मानापमान २ कोमल; चिमुकलें; लहान. 'श्याम चतुर्भुज मुकुट कुंडलें । सुंदर दंडल नव बाळ ।' -तुगा ४२४०. [सं.नव. झें. नव; ग्री. नेऑस्; लॅ. नोवुस्; ऑस्क. नुवल; अँसॅ. निवे, निव; गॉ. निउयिस्; लिथु. नौयेस्; स्लॅ. नोवु; हिब्रूयू. नुअ] ॰कीर्द-स्त्री. प्रथम लागवड. 'नवकीर्दीस कोठें कोठें नांगरीत होते तें काम सोडून या धंद्यास लागले.' -ख ९५९. -वि. नवीनच लागवडीस आणलेली (जमीन). [नव + फा. कीर्द्; फा. नौकीर्द्] ॰खरीद-वि. नव्यानें खरेदी केलेलें. ॰गंध- पु. नवीन, ताजा सुवास. ॰घड-वि. नवीन घडलेलें; नवट (भांडें). [नव + घडणें] ॰चांद-पु. १ आमावास्येनंतर नवीनच, प्रथम दिसणारा चंद्र; शुद्ध द्वितीयेचा चंद्र. २ अमावस्या (इं.) न्यू मून. [नव + चांद = चंद्र] ॰जवान-वि. १ तरुण; ज्वानींत आलेला. २ अनभिज्ञ; नेणता; अजाण. 'बहुतकरून सर्व नव्जवान आहेत.' -रा ५.५४. [नव + फा. जवान् = तरुण; फा. नव्जवान्] ॰जवानी- स्त्री. १ तारुण्य; नवयौवन; ज्वानी. २ नेणतेपणा; अजाणपणा. 'तत्रापि नवजवानी आहे. कोणेसमयीं काय करील कळत नाहीं.' -ख ८.३९२६. [नवजवान] ॰जीवन-न. १ पुनर्जन्म. २ चरि- त्राचें, आयुष्यक्रमाचें पालटलेलें स्वरूप; नवचैतन्य; नवी उमेद; स्फूर्ति. [नव + सं. जीवन] नव(वे)तर-वि. अलीकडील; अलीकडचा; नवा. -क्रिवि. अलीकडे. नवथर पहा. [गु. नव- तर] नवथर-ळ-वि. अलीकडचा; नुकताच होऊन गेलेला, अस्तित्वांत आलेला; अलीकडील काळांतील. -क्रिवि. अलीकडे; नव्यानें; नुकतेंच कांहीं दिवसांपूर्वी. 'सूर्याला दुसरी स्थलांतर कर- ण्याची गति असून तिनें सूर्यमाला शौरिनामक पुंजाकडे जात असते असें डॉक्टर हर्शल ह्यास नवथर आढळलेलें आहे.' -सूर्य ३९. 'पण त्या नवथरच इकडे आल्या असल्यामुळें कोणाशींही विशेष सलगीनें बोलणें त्यांना शक्य नव्हतें.' -नपुक २६. [नव + थर] नवथळ-पुस्त्री. (ना. व.) तरुण पिढी; तरुण मंडळी. [नवथर] ॰दिगर, नौदिगर-न. १ (सरकारी अंमलदारांत रूढ) अनिष्ट फेरबदल; भांडणाला व हुकूम, करार इ॰ मोडण्याला प्रवृत्त होणें; वितंडवाद; विरोध; हरकत; तक्रार. (क्रि॰ करणें; लावणें; मांडणें; घडणें; पडणें). 'करार जाहला असतां त्यास नव्दिगर करावें म्हणावें हें कसें घडेल.' -रा ३.२०६. २ (केलेला) ठराव, करार इ॰ नाकबूल करणें; (त्याबाबत) बदलून जाणें; भलतेंसलतें, कमजास्त बोलणें. 'कांहीं नौदिगर करून बिघाड करूं म्हणाल तर आम्ही तुमचे रफीक नाहीं.' -रा १.५२. 'ह्यांत आम्ही नवदिगर केल्यास सरकारचे गुन्हेगार होऊं.' ३ (क्क.) -वि. नाकबूल; बेइमान. 'मी ऐकेनच ऐकेन, नवदिगर व्हावयाचा नाहीं.' [फा. नव् = नवीन + फा. दिगर् = दुसरें, इतर] ॰दौलत्या-वि. नुकताच, नव्यानेंच श्रीमंत झालेला, वैभवास चढलेला; अधव्याचा, उपटसुंभ श्रीमंत. [नव + दौलत] ॰धान्य-न. १ नवें धान्य, दाणा- गोटा. २ (राजा.) दरवर्षीं पिकणार्या नवीन धान्याच्या भक्षणाचा संस्कार; कुळाचार. ३ तांदुळाची एक जात. [नव + धान्य] ॰नवती-स्त्री. तारुण्याची आरंभदशा; यौवनारंभ; मुसमुसणारें यौवन. 'नवनवती आली रसा.' [नव + नवती = तारुण्य] ॰निगा- दास्त, नौनिगादास्त-स्त्री. १ नवी फौजबंदी, फौजभरती; नवीन ठेवलेली फौज. 'परंतु प्रस्तुत नौनिगादास्त करीत आहेत.' -रा १.५६. 'नवनिगादास्तीचें लोक त्रिकूट.' -रा ७.७१. २ तयारी. [फा. नव + निगादास्त] ॰निशत-निशित-वि. नुक- तीच, नवीन धार लावून तीक्ष्ण केलेला; नवीनच पाजविलेला, परजलेला. 'देवा नवनिशतीं शरीं । वावरोनी यांच्या जिव्हारीं ।' -ज्ञा २.४८. [नव + सं. निशित = तीक्ष्ण] ॰पंकज माळिका- स्त्री. ताज्या, नव्या कमलांची माळ. 'कपटनागर सुंदर बाळिका । करयुगीं नवपंकज माळिका ।' -मुराअरण्यकांड २१. [नव + सं. पंकज = कमल + सं. मालिका = माळा] ॰पाषाणयुग-न. (भूशास्त्र) अत्यंत प्राचीन पाषाणयुगाचा उत्तरार्ध; (इं.) निऑलिथिक एज्. [नव + पाषाण = दगड + युग] ॰पुसती, पुस्ती-स्त्री. नवें लेखन. 'पुनरपि मार्गी काढी जें धर्मरहस्य जेंवि नवपुसती ।' -मोवन १३.७०. [नव + म. पुस्ती] ॰भक्त-वि. १ नव्या गोष्टींचा शोकीन. २ नवीन देवाचा भक्त? नुकतेंच धर्मांतर केलेला, बाडगा, वाटलेला या अर्थीं चुकीनें रूढ. [नव + सं. भक्त = भजणारा, आवड असणारा] ॰यौवना-स्त्री. नवतरुणी; तारुण्य- कलिका; तारुण्याच्या भरांत आलेली स्त्री. [नव + सं. यौवन = तारुण्य] ॰रंगडा-वि. नित्य नवा रंग, तर्हा करणारा. 'नव- रसांचा रसिक । नवरंगडा मीच एक ।' -एभा १२.१९७. [नव + रंग] ॰रान-न. नुकतीच, प्रथमच लागवडीस आणलेली जमीन. [नव + म. रान] ॰रोज, नौरोज-पु. १ नवीन वर्षाचा आरंभ- दिन. २ पारशांची वर्षप्रतिपदा. ३ मोंगल बादशहा आपल्या राज्यारोहण दिनापासून जो नवीन जुलुस सन सुरू करीत त्याच्या आरंभीचा दिवस. ४ जुलुस सनाच्या आरंभीच्या दिवशीं करा- वयाचा उत्सव, समारंभ वगैरे. 'अकबरानें ज्या वेळीं आपला दिन ई इलाही नांवाचा नवीन धर्म प्रचारांत आणला त्यावेळीं नवरोजचा सण सुरू केला.' -ज्ञाको (न) ३८. [फा. नव्रोझ्] ॰वधू-स्त्री. नुकतेंच लग्न झालेली मुलगी; नवी नवरी, 'नववधू प्रिया मी बावरतें ।' -तांबे. [सं. नव + सं. वधू] ॰विद्वेषी- वि. पुराणप्रिय; सनातनी; सुधारणेचा द्वेष करणारा. 'सुधारक आणि नवविद्वेषी असे समाजामध्यें दोन पक्ष उत्पन्न होऊन...' -टि १.३४०. [नव + सं. विद्वेषी = द्वेष करणारा] ॰शिका-खा- वि. १ नुकताच शिकूं लागलेला; (एखाद्या) व्यवहारांत, धंद्यांत नुकताच पडलेला; नवखा. २ (कु.) प्रथमच गरोदर झालेली (स्त्री, जनावर); प्रथमतः लागास आलेलें, फळ धरणारें (फणस इ॰ झाड). ३ अदुभुत; विलक्षण; असाधारण; अपूर्व. [नव + शिकणें] ॰शीक-ख-वि. नुकताच शिकूं लागलेला; नवशिका अर्थ १ पहा. [नव + शिकणें] ॰सर-वि. नवीन; अलीकडचा. -क्रिवि. अलीकडे; नुकतेंच; थोड्या दिवसांपूर्वीं. नवथर पहा. [नव + सं. सदृश] ॰स(सा)रणी-स्त्री. दुरुस्त करणें; नवा दिसेलसा करणें. [नवसरणें] ॰हिंदु-वि. (गो.) पुन्हां हिंदुधर्मांत आलेला; धर्मांतर केलेला (हिंदु); शुद्धीकरण होऊन हिंदु झालेला. 'पणजी येथील न्यायाधिशानें नवहिंदूंनीं जन्मनोंदणीची नोंद न केल्यामुळें खटले भरले.' -के २,१२. ३०. [नव + हिंदु] नवांकित-पु. नवीनच दीक्षा दिलेला शिष्य. 'विश्वनाथ नामा पंडित । खंडित ज्ञानी अखंडित । आशंका खंडोनिया नवांकित । प्रेरिला अंकित उत्तरपंथें ।' -सप्र १०.२९. [नव + सं. अंकित] ॰नवान्न-न. नव- धान्य सर्व अर्थीं पहा. [नव + अन्न] ॰पूर्णिमा-स्त्री. नवें धान्य खाण्यास सुरवात करण्याचा दिवस. हा प्रायः कोंकणांत आश्विन शु. १५ व देशांत माघ शु. १५ हा असतो. कोंकणांत तांदूळ व देशांत गहूं हीं मुख्य असल्यानें कोंकणांत व देशांत वर सांगितलेल्या भिन्न भिन्न तिथींना हा कुळधर्म केला जातो. अन्यत्र नवी, नवें पहा. [नवान्न + सं. पूर्णिमा] नवोढा-स्त्री. १ नवीन लग्न झालेली, नवपरिणीत स्त्री. नववधू. 'सुंदर वनिता प्रिया नवोढा ।' -अमृत ५२. २ अनुपभुक्त स्त्री; अक्षतयोनि; लग्न होऊन अद्याप पुरुषप्राप्ति न झालेली स्त्री. [नव = नव्यानें + सं. ऊढ = विवाहित]
अज्ञातयौवना
अज्ञातयौवना ajñātayauvanā f S (अज्ञात Unknown, यौवन Youth.) A girl not yet acquainted with the feelings and symptoms proper to puberty.
अंकुरित
वि. १ अंकुर फुटलेला; उगवलेला. २ (ल.) स्पष्ट झालेला, दिसूं लागलेला, प्रादुर्भूत. शरीराच्या ठिकाणीं दिसूं लागलेली (तारूण्यावस्था, इ॰). उदा॰ अंकुरित यौवन = वयांत आलेला-ली. [सं.]
अप्राप्तयौवन
अप्राप्तयौवन aprāptayauvana a S (न-ना m f अप्राप्त Unattained, यौवन Youth.) Unadult, adolescent, of immature age.
अत्यंत
क्रिवि. वि. अतिशय; फाजील; फार; मनस्वी; बेसुमार; अमर्यादपणें; बहुत; बेहद्द. [सं.] ॰स्वजन पु. निक- टचा, अगदीं जवळचा नातलग; अति प्रीतीचा माणूस. 'दारा पुत्र धन यौवन । बंधु सेवक अत्यंतस्वजन ।'
अत्यंतस्वजन
अत्यंतस्वजन atyantasvajana m S One connected by the most intimate ties: also any person or thing exceedingly precious unto. Ex. दारा पुत्र धन यौवन ॥ बंधु सेवक अ0
अवस्थाद्वय
न. मानवी जीविताच्या दोन अवस्था – १. पूर्वावस्था (बाल्य, यौवन) व उत्तरावस्था (प्रौढत्व, वार्धक्य). २. जागृतावस्था व सुप्तावस्था; जागृती–निद्रा. ३. आयुष्याच्या दोन स्थिती – सुख, दुःख. [सं.]
बहार
(स्त्री.) हिंदी अर्थ : वसंत, आनंद, यौवन. मराठी अर्थ : प्रफुल्लता, बहर.
ग्रामथिल्लर
ग्रामथिल्लर grāmathillara n (Poetry.) A village pond or pool. Ex. किं गतधवेचें यौवन ॥ किं ग्रामथिल्लरींचें जीवन ॥ अनामिकाचें रम्य सदन ॥.
जोबन
जोबन jōbana m (यौवन S through H) A breast or bubby (of a woman).
पु. १ (स्त्रीचा) स्तन; कुच; थान. 'तंग चोळी छातीवर जोबन कोवळे रसरसले ।' -होला ८९. २ तारुण्य; ज्वानी. [सं. यौवन; प्रा. जोब्वन; हिं जोबन]
जोम
जोम jōma m n (यौवन S) Compactness; thickset or strongknit state; fullness and vigor of make and appearance: also force, power, strength (as the product of compactness of make).
पुन. १ घटमुठपणा; दार्ढ्य; घट्टपणा; शरीराच्या बांध्याचा व चेहर्याचा तजेला, भरदारपणा २ शरीरांतील बल; जोर; शक्ति; बळकटी (बांध्याच्या घटमुठपणामुळें). ३ जोर; दम; अवसान [सं. यौवन; प्रा. जोव्वण] जोमांत असणें-१ (माण.) झोकांत किंवा थाटांत असणें २ जोरांत असणें; उत्साह- युक्त असणें. ॰दार-वि. १ घटमुठ; दृढ; आवेशी. २ शक्तिमान; बळकट; जोरदार. ३ दमदार; अवसानयुक्त.
ज्वान, ज्वानकट्टा, ज्वानपठ्ठा, ज्वानमर्द, ज्वान- मर्दी, ज्वामर्दी, ज्वा(नि)नी, ज्वानोदिवानी
जवान इ॰ पहा. 'अंगीं तारुण्याचा बहर ज्वानिचा कहर, मारिते लहर, मदन तलवार ।' -राला ११३. [फा. जुवान्-नी; सं. यौवन]
ज्वानी
(फा) स्त्री० तारुण्य, यौवन.
काय जाळावें, काय जळे
काय जाळावें, काय जळे kāya jāḷāvē, ṅkāya jaḷē Phrases importing Burn it! rot it! out with it! what can be done with it! Ex. जैसें विगतविधवेचें स्वरूप ॥ यौवन काय जाळावें ॥. Ex. काय जळे दिवसभर अभद्र बोलणें.
कोरडें तप
कोरडें तप kōraḍē ntapa n Dry, barren, spiritless तप or austere devotion. Ex. जळो जळो त्याचा प्रताप ॥ काय चाटावें को0 ॥ जैसें विंगत विधवेचें स्वरूप ॥ यौवन काय जाळावें ॥.
नौजवानी
(स्त्री.) हिंदी अर्थ : नव यौवन. मराठी अर्थ : तारुण्य.
नवनवती
स्त्री. तारुण्याची आरंभदशा; यौवनारंभ; मुसमुसणारे यौवन.
नवती
स्त्री. १ तारुण्यदशा; यौवन; तारुण्याचा भर; ज्वानी २ वसंत ॠतूंत नागवेलीस नवीं फुटण्याची अवस्था; (सामा.) नवी पालवी. 'नवतीची पानें खावयास चांगलीं.' ३ तरुणी. -शर. [नव]
रंग चूना या टपकना
हिंदी अर्थ : यौवन अुमड़ना मराठी अर्थ : वयांत येणें.
तारुण्य
यौवन, जवानी, ऐन उमेद, ज्वानी, विशी- पंचविशीचें वय , कोवळे वय, उमेदीचें वय, जीवनाची मध्यान्ह, उमलत्या जीवनाचा काळ, सळसळणाच्या रक्ताचें वय, विषयासक्ततेचीं वर्षे-कालांश, उमडती जवानी, ऐन उमेदीचीं वर्षे, मोरपंखी कल्पनांनीं फुलविलेला जीवनकाळ, जेव्हा स्वप्नांचा सडा पडतो तो काल, ज्या काळांत भावनात्मक क्षुधा मोठी असते, मन सौंदर्य-पिपासु असतें, एक मुलायम स्वप्न, स्वप्निल कालखंड, कांहींहि घातलें तरी शोभून दिसेल असें वय, जीवनांतील मादक भर्जरी सौख्याचे दिवस, गाफील क्षण, तारुण्यांत सारीं सौंदर्ये रमणी-रूपानें प्रतीत होत असतात. युवतिदर्शनानें सारें भाव -विश्व हादरून निघण्याचें वय.
तारुण्य
(सं) न० तरुणावस्था, ज्वानी, यौवन.
न. तरुणपण; यौवन; ज्वानी; मनुष्याच्या वयाच्या सोळाव्या वर्षापासून चाळीसाव्या वर्षापर्यंतचा काळ. [सं.] -ण्यावस्था-स्त्री. तरुणपणाची अवस्था; तारुण्य. [तारूण्य + सं. अवस्था = स्थिति]
तरुण
वि. तरणा; जवान; युवक, बाल्यावस्था संपून प्रौढ दशेला आलेला. [सं] सामाशब्द- ॰पण-न. तारुण्य; यौवन. ॰पिढी-स्त्री. नवी प्रजा; तरुण लोक. 'देशाची उन्नति व्हावयाची असेल तर ती जोमदार तरुणपिढीच्याच हातून.' -टिसू ९६. ॰सूर्य-पु. मध्यान्ह; मध्यान्हकाल [तरुण + सूर्य] -णास्थि- स्त्रीन. कोमलास्थि; मृद्वस्थि [तरुण + अस्थि = हाड] तरुणी-स्त्री. तरणी; तरुण स्त्री. युवती; सोळावर्षांपासून बत्तीस वर्षांपर्यंतच्या स्त्रीला तरुणी म्हणतात. -योर १.१३०.
विगत
वि. १ गेलेला; गत. २ वेगळा केलेला; वियुक्त. ३ (समासांत) ज्याचें गेलेलें आहे असा. जसें-विगतैश्वर्य = ऐश्वर्य गेलेला; विगत-स्त्री-संपत्ति-प्राण-मत्सर-काम; विगतक्रोध, विगतधवा. गत शब्द पहा. [सं.] ॰विधवा-स्त्री. (शुद्ध प्रयोग विगतधवा). (काव्य) विधवा स्त्री. 'कोरडें तप । जैसें विगत विधवेचें स्वरूप । यौवन काय जाळावें ।' ॰विषय-वि. विरक्त; वैराग्यशील. 'जयजय देव सकळ । विगतविषयवत्सल ।' -ज्ञा १८.३. [सं.] ॰विषयवत्सल-वि. विषयवासना दवडलेल्यांचा कैवार घेणारा. [सं.] ॰श्रीक-वि. १ भिकेस लागलेला; विपत्ती- प्रत पावलेला. २ दुर्दैवी; हतभाग्य; अकृतार्थ. [सं. वि + गत + श्री]
विगतविधवा
विगतविधवा vigatavidhavā f (Poetry. An incorrect formation but of constant occurrence. विगत Departed, विधवा Female bereaved of her husband.) A widow. Ex. कोरडें तप ॥ जैसें विगतविधवेचें स्वरूप ॥ यौवन काय जाळावें ॥; also तरिं विगतविधवेसिं जारण ॥ तेचि गर्भस्थानीं मी पावों ॥.
नवा
वि. १ नवीन; नूतन; अस्तित्वांत येऊन फार दिवस झाले नाहींत असा. २ (एखाद्या कार्यांत, व्यवहारांत, धंद्यांत) नवशिका; अनभ्यस्त; (नवशिक्या माणसास अनुलक्षून) अंग- वळणी न पडलेलें (त्याचें कार्य). 'या कामांत तो नवा आहे आणि हें कामहि त्यास नवें आहे.' ३ उपयोग इ॰कानीं मलिन, अस्ताव्यस्त, जर्जर, जुना न झालेला. 'ही शालजोडी नवी आहे.' ४ अभूतपूर्व; अपूर्व; अपरिचित; अदृष्टपूर्व. 'आज नवें झाड पाहिलें' 'आज यांनीं नवाच श्लोक म्हटला.' ५ न उपभोगिलेला, उपयोगिला गेलेला. 'ही स्त्री अझून नवी आहे कोणी भोगिली नाहीं. ६ नुकतीच ज्यानें (कार्याचीं, कारभाराचीं) सूत्रें हातांत घेतलीं आहेत असा (कारभारी, त्याचा कारभार) -शास्त्रीको. ७ तरुण. नव पहा. [सं. नव; प्रा. नवओ; सिं. नओ; हिं. नया; फ्रें. जि. नेवो] (वाप्र.) ॰जुना करणें-जुना बदलून नवा घेणें, करणें (करारनामा, हिशेब, करार, अंमलदार इ॰). ॰जुना होणें- नवीनपणा, नवखेपणा नाहींसा होणें; परिचित होणें; वहिवाटला जाणें. नवीजुनी ओळख-स्त्री. पुन्हां नव्यानें करून घेतलेला, नवा केलेला जुना परिचय. नवीजुनी सोयरीक-स्त्री. पुन्हां नव्यानें जोडलेला (एखाद्या व्यक्तीचें मरण इ॰सारख्या कांहीं कारणामुळें तुटलेला) संबंध, सोयरीक. नवी नवती-स्त्री. नव- यौवन; तारुण्याचा भर; ऐन ज्वानी; नवनवती पहा. नवी नवरी- स्त्री. १ नुकतेंच लग्न झालेली मुलगी. २ (उप.) स्वाभाविकपणें जी गोष्ट माहीत असायला पाहिजे ती माहीत नसलेला, माहीत नसल्याचा आव आणणारा, लाजाळु मुलगा, मुलगी. नवी नवाई, नवी नवा(व्हा)ळ, नवी नवलाई, नवी नवाळी-स्त्री. १ नव्यानें, नुकतेंच निघालेलें (प्रतिवर्षीं होणारें) धान्य, फळ इ॰; नवान्न. ' हे पेरू पाठवायाजोगे नव्हेत परंतु नवीनवाळ म्हणून पाठवावे.' २ वर्षाच्या नवधान्याच्या, नवीन, अपूर्व व सुंदर वस्तु. नवें जग-न. अमेरिका व ओशियानिया हीं दोन खंडें. यांचा शोध अलीकडेच लागल्यानें त्यांस हें नांव आहे. नवेंजुनें-न. १ (राज्य इ॰कांत) जुने अधिकारी काढून नवीन नेमण्याचा प्रकार. २ जुन्या वस्तू देऊन नवीन घेण्याचा, परस्पर बदलण्याचा प्रकार. नवें टाकणें-(ना.) नवीन उपक्रम सुरू करणें; दीर्घकालानंतर एखादी गोष्ट करणें. नव्या उमेदीचा-वि. तारुण्याच्या जोमानें, उत्साहानें व महत्वाकांक्षांनीं परिपूर्ण; (अजून) जगाचे कटु अनुभव ज्याला आले नाहींत असा उत्साही व महत्वकांक्षी (तरुण मनुष्य). नव्याची पुनव-स्त्री. आश्विनांतील व माघी (मार्गशीर्ष-शास्त्रीको?) पौर्णिमा; नवान्नपूर्णिमा पहा. नव्याच्यानें, नव्यानें-क्रिवि. प्रथमच; नवीन म्हणून. 'या रणपटु योद्ध्याची ओळख आमच्या स्वराज्या- वरील कादंबऱ्या वाचणारांना नव्यानें करून देण्याची आवश्यकताच नाहीं. ' -स्वप ५९. नव्याजुन्याचा मेळ-नवे आचार, नवे विचार त्यांचें सार व जुन्या आचारविचारांचा विचार करून योग्य असेल तें घेऊन ऐक्य करणें. नव्या(वे)ताण्याचा-वि. १ विणून तयार होऊन फार दिवस झाले नाहींत असें (वस्त्र इ॰). २ अशा वस्त्राचें सूत इ॰म्ह॰ १ नवें नवें जेवी सवें = पाहुणा नवीन आहे तोंपर्यंत घरमालक त्याला बरोबर पंक्तीला घेऊन कांहीं दिवस जेवतो, पुढें परिचय झाल्यावर मात्र हेळसांड व्हावयास लागते. २ नवें नवें नि खाटल्याभवतें भवें. ३ नवी विटी नवें राज्य, नवी विटी नवा डाव. (विटीदांडूच्या खेळांत विटी बदलून नवी घेतली तर सर्वच बदलतें त्याप्रमाणें) = एखाद्या कारभारांत नवीन कारभारी आला तर त्याचें सर्वच तंत्र नवीन असतें. ४ जुने डोळे आणि नवे चाळे, तमाशे. ५ नवां दिवशीं नवी विद्या. ६ नव्याचे नऊ दिवस = कोण- तीहि गोष्ट नवी आहे तोंपर्यंत (कांहीं दिवस) लोक तिचें कौतुक करितात. त्या वस्तुचा नवेपणा व लोकांचें कौतुक फार दिवस टिकत नाहीं. सामाशब्द- ॰आडसाली-वि. उंसाचा एक प्रकार. नवीन लागवड केलेला एक वर्षाआड पीक देणारा ऊंस. ॰करकरीत-वि. अगदीं नवा; पूर्णपणें नवा; कोरा करकरीत; करकरीत पहा. ॰तरणा-तरणाफोकवि. जवानमर्द; ज्वानींत असलेला; तारुण्याच्या भरांत असलेला (पुरुष). ॰नूतन-वि. अगदीं नवा; कोरा करकरीत. [नवा + सं. नूतन = नवा]
काय
सना. १ कशाचा? कसला? कोणता? 'आनृण्य न जोडावें तरि आम्ही अर्थ जोडिला काय' -मोभीष्म १२.६०. 'प्रसाद मग काय तो जरि निवरिना लाघवा ।' -केका ६६. २ जें; जें काय. 'तो काय देईल तें घेऊन ये.' ३ किती मोठा; केवढा; 'हा काय हो मूर्ख ।' 'दुःखामयेंचि सरलें, सुख काय सांगें ।' -वामन स्फुटश्लोक ६९, (नवनीत पृ. १४१.) ४ (गो.) मुळींच; कांहीं सुद्धां. 'पांचा नळांत जेव्हां काय दिसे- नाचि भेद लव तीस' -मोवन. ४.७१. 'लोभ केलिया कायही नुरे' -नरहरी गंगाधररत्नमाला ३४. (नवनीत पृ. ४२०). ५ तुच्छतादर्शक. 'हा काय रत्नभोक्ता मारू अनुताप पावुनी हाका ।' -मोआदि ३२.१७. 'जिउबा बोले गर्जून मोगल काय आणिला जिन्नस ।' -विवि ८.४.८०. ६ एखाद्या समुच्चयांतील निरनिराळ्या वस्तु, किंवा निरनिराळे प्रकार दाखविणारें सर्वनाम. 'सजगुरा काय, जोंधळा काय, गहूं काय, जो जिन्नस पाहिजे तो आहे.' ७ द्विरुक्ति (काय काय); संख्याविस्तार, भेद याबद्दल आश्चर्य दाखविण्या- साठीं, एखाद्या पदार्थाचा विशेषपणा किंवा भिन्नपणा दाखविण्या- साठीं. 'मी कायकाय त्याचे गुण सांगू?' 'त्यानें काय काय तुला सांगितलें किंवा कायकाय पदार्थ तुला दिले. म्ह॰ १ (गो.) कांय दीस सुनेचे कांय दीस मायेचे = कांहीं दिवस सुनेचे कांहीं सासूचे. २ काय करूं कसें करूं = कांहींच न सुचणें. ॰एक-कांहीं; किती; कोणी; कित्येक. 'काययेक उपजतां मरती' -तुगा ७२५. ॰क- कांहीं एक; कोणतें. 'दिनानाथ द्वारकाधीश साह्य जरी तरी कायक न करी' -राला ११. ॰गे बाई तरी-क्रिवि. (बायकी)एक वाक्प्रचार. (आश्चर्यदर्शक). ॰की-कोण जाणें; ठाऊक नाहीं अशा अर्थाचें उत्तर. 'माझा बैल इकडून गेला काय? उत्तर:-काय कीं.' ॰जाणें-कोण जाणतो? कोणाला ठाऊक? कोण सांगेल? (अशिष्ट लोकांत हा प्रयोग रूढ आहे.)' ॰जाळणें-(निरुप- योगी, कुचकामाच्या वस्तूस अनुलक्षून एक वाक्प्रचार) काय उपयोग? काय जाळावें (जळे) नेऊनि ' -दावि २१०. 'जैसें विगत विधवेचें स्वरूप । यौवन काय जाळावें ।' 'काय जळ्ळें दिवसभर अभद्र बोलणें?' ॰तो-(तिरस्कारदर्शक) कःपदार्थ; यःकश्चित. ॰माय-(कु.) कांहीं [काय द्वि. कांहीं बाही] ॰म्हणून-कशाकरितां ॰लें-ह्यलें-(ना.) कशाला? कशाकरितां? कां म्हणून? ॰शी-सी-सें-कितीशी? कोणती? कशाची? काय होय? कशाचें? कशाला? क्षुद्रतादर्शक; कःपदार्थ. 'दयानिधी तुम्हां- पुढें जनकथा अशा कायशा ।' -केका २६. 'इतरांची शक्ति कायशी ।' -दावि ४०५. 'ब्रह्मविद्येची गोष्टी । त्यांसी कायसी ।' -विपू १. ५७. 'तया साम्यता कायसी कोण आतां' -राम ६०. 'समर्था- घरीं कायसें उणें' -दावि २१. ॰सया-कशाला? कशाचें? 'सांगा कवण तें ब्रह्म । कायसया नाम कर्म ।' -ज्ञा ८.२. ॰सा- वि. १ (अनिश्चितार्थीं) एखादी गोष्ट निश्चित न आठवतां तिची साधारण आठवण असतां योजतात. 'त्यानें कायसा निरोप सांगितला होता पण मी विसरलों.' २ कशासारखा. ३ कशाचा. 'जनीं मूर्ख हो बोल कायसा आतां -दावि १७८. ४ कशासाठीं? कशाकरितां? काय फायद्याचा? काय उपयोग? 'तेथें कायसा या ग्रंथाचा उद्यम ।' -विपू ७.१५४. ॰साच-वि. कसाचसा; कसासाच; बरोबर वर्णन करतां येत नाहीं असा, अशासारखा; चमत्कारिक; आश्चर्य उत्पन्न करणारा. ॰साठीं-(व.) कशा- साठीं. ॰सें-न. कांहींसें. 'असेंच कायसें तुम्हीं म्हणाला होता खरें!' -अस्तंभा ६६. ॰सेसें-क्रिवि. कांहीं तरी एक. मुलांसाठीं बाईसाहेबानीहि कायसेसें केलें आहें.' -कोरकि २६. ॰सेना -नी-नें-कशानें; कोणत्या कारणानें. 'कायसेनी पाहुणेरु क्षीर- सागरा ।' -ज्ञा १०.११. 'तें तूं म्हणसी कायसेन । ऐक सांगेन उद्धवा ।' -एभा २९.८३६. ॰होय-काय पर्वा आहे? काय उपयोग आहे? 'आंधळ्याला बगीच्या काय होय.' -नि ५१०.
ग्राम
पु. १ गांव; खेडें. २ (संगीत) सप्तस्वरांतील मुख्य तीन अवधी. याचे प्रकार तीन-षड्जग्राम, मध्यमग्राम व गांधारग्राम. सात स्वरांचा समूह. (इं.) गॅमट. ३ गांवांतील प्रमुख किंवा माननीय माणूस. ४ अरेराव, कचाट्या, जरब बस- विणारा, काचाटींत धरणारा माणूस. 'तो कसला ग्राम त्याज बराबर भांडून तुझा परिणाम लागणार नाहीं.' ५ जमाव; समु- दाय. 'मुतेहिना ऐसा वागे । ग्राम कर्मेंद्रियांचा ।' -यथादि ३. ९२. (समासांत) इंद्रिय-गुण-पुण्य-भूत-स्वर-ग्राम. 'इंद्रिय- ग्रामावरी येणें नाहीं ।' -ज्ञा ५.१०५. [सं.] सामाशब्द- ॰कंटक-कुठार-पु. चहाड्या, निंदा, त्रास, तंटे इ॰ लावणारा; गांवगुंड; गांवची पीडा, ब्याद; दुष्ट, वाईट माणूस. ग्रामकी-स्त्री. गांवजोशी किंवा पाटील इ॰ चें काम; गांवकी. ॰कूळ- केसरी-सिंह-पु. १ (ल.) गांवांतील कुत्रे. 'इया ग्रामसिं- हाचिया ठायीं.' -ज्ञा १३.६८०. २ (ल.) भेदरट माणूस. ॰खर्च-पु. १ गांवचा खर्च. २ फुकट किंवा विनाकारण खर्च; ज्याचा मोबदला नाहीं असा खर्च. ॰जोशी-ज्योतिषी-पु. गांवचा जोशी, हा पंचांग सांगणें, पत्रिका पहाणें, मुहूर्त काढणें इ॰ कामें करतो. 'आधीं होता ग्रामजोशी । राज्यपद आलें त्यासी । त्याचें हिंडणें राहीना । मूळ स्वभाव जाईना ।।' -तुगा. ग्रामज्य-न. ग्राम्य; मैथुन; सुरत क्रीडा. 'ग्रामज्य आठवे चित्तीं ।' -दा २.५. २८. ग्रामणी-पु. १ (काव्य, विद्वानांचें संभाषण) पाटील; गांवचा मुख्य. २ (लौकिक) गांवगुंड, चावट, वाईट, कुटाळ्या, पीडादायक माणूस; ब्याद. 'रामनामें विव- र्जित । ग्रामणीं बोलिजे तें ग्राम्य गीत ।' -एभा ८.१६९. ३ गांवचा महार. -स्त्री. कुटाळकी; गांवकी. ग्रामिणी पहा. 'आनित्य ग्रामणी मस्ती सदा ।' -दा २.३.६. -वि. मुख्य; श्रेष्ठ; प्रमुख. ग्रामणीक-न. हरामखोरपणा; ग्रामणी, ग्रामिणी पहा. 'तरी जी पाहतां हेंहि ग्रामणीक । दिसोनि येतसे कीं निष्टंक ।' -सादि १२.२.१०८. ग्रामण्य-न. १ मुख्यतः जातीसंबंधींचा किंवा इतर गांवकीचा तंटा, खटला. २ बहिष्कार. ३ जातीच्या खट- ल्यासंबंधीं चौकशीसाठीं भरणारी ग्रामसभा; जातगंगा. ॰त्रय- न. (संगीत) ग्राम अर्थ २ पहा. ॰थिल्लर-न. गांवांतील लहा- लसें तळें, डबकें. कीं गतधवेचें यौवन । कीं ग्रामथिल्लराचें जीवन ।' ॰दुर्गा-स्त्री. गांवची कुलदेवी, भवानी; ग्रामाधिका- रिणी देवता. ॰देऊळ-न. गांवांतील सार्वजनिक देऊळ. ॰देव- देवता-दैवत-पुस्त्रीन. १ ग्रामधिकारी-रिणी; गांवचा कुल- देव-देवी. २ या देवतेच्या खर्चास इनाम दिलेली जमीन, उत्पन्न; ग्रामदेवीची जमीन. ॰धर्म-पु. गांवचे धार्मिक विधी, नियम, चालीरिती इ॰ परंपरेनें चालत आलेला गांवचा धर्म. ॰नेत्र-न. (ल.) महार; गांवचा जागल्या. ॰पंचायत-सभा-संस्था-स्त्री. गांवची सर्व व्यवस्था पाहणारी संस्था. खेड्यांतील म्युनिसिपालटी; ग्रामस्वराज्य. ॰पशु-पु. माणसाळलेलें जनावर. ॰बिंदुटी-स्त्री. खेड्यांतील गल्ली, बिदी. 'तव ते गोधनें ग्रामबिंदुटी । अपार मौळी असती चव्हाटी ।' -नव १३.११५. ॰याजक-पु. गांवचा उपा- ध्याय; ग्रामोपाध्याय. ॰लेखक-पु. कुळकर्णी. 'ग्रामलेखक ते स्थळीं ।' -निमा (आत्मचरित्र १.१०१.) ॰सूकर-पु. गांवडुक्कर. ॰स्त-स्थ-वि. गांवांत राहणारा; गांवचा रहिवासी; गांवकरी. 'ऐसें बोलून ग्रामस्तानें.' -नव १०.१६३. 'आतांच भोगूं तरी हे पहाट । ग्रामस्थ येतांचि भरेल हाट ।' ग्रामाचार-पु. ग्रामधर्म पहा. ग्रामांतर न. १ दुसरें गांव. २ आपलें गांव सोडून परगांवीं जाणें. ग्रामाधिकार-कारी-पु. गांवासंबंधीं अधिकार; तो गाजविणारा माणूस; अधिकारी; गांवकामगार. ग्रामाधिपति-पु. पाटील 'ग्रामाधिपतिरूपें श्रीरघुवीरें जाण ।' -सप्र २.३४. ग्रामिणी- स्त्री. हरामखोरी; चहाडी इ॰ ग्रामणीक पहा. ग्रामोपाध्याय- पु. गांवचा उपाध्याय; ग्रामजोशी; ग्रामयाजक पहा. ग्राम्य- वि. १ खेड्यांत झालेला, जन्मलेला; गांवांत उत्पन्न झालेलें किंवा गांवासंबंधीं. २ गांवठी; गांवराणी; गांवढळ; खेडवळ. ३ माण- साळलेला (पशु) याच्या उलट रानटी. ४ लागवडीनें उत्पन्न केलेलें (शेतीचें उत्पन्न); याच्या उलट आपोआप झालेलें. ५ प्राकृत व इतर देशी (भाषा); याच्या उलट संस्कृत. ६ प्रापंचिक; संसारी; याच्या उलट वन्य = जंगलात राहणारा. ७ अश्लील; अशिष्ट; असभ्य. ८ अतिशय विषयासक्त. ग्राम्यगीत-न. १ अश्लील पद, लावणी. २ खेडवळ गाणें, पवाडा इ॰ ग्राम्यधर्म- संभोग; ग्रामज्य पहा. ग्रामस्त्री-स्त्री. वेश्या; रांड. 'ग्राम्य- स्त्रियांचे संगतीं जाणें ।' -एभा ८.१३९. ग्राम्यालाप-पु. १ खेडवळ गप्पागोष्टी. २ लावणी; शृंगारपर कविता. [सं.]
कोरडा
वि. १ अनार्द्र; शुष्क; जलहरित; आर्द्रताविरहित. 'ते रेड भरतही तसा रडे जोंवरी नयन होति कोरडे ।' -वामनभरत भाव १६. म्ह॰ कोरड्याबरोबर ओलेंहि जळतें = अपराध्याबरोबर निरपराधी गरीबहि चिरडला जातो. २ नुसतें; कोरड्यास बरोबर कांहीं नसलेलें; दूध, दहीं, वगैरे पातळ पदार्थांचें कालवण नस- लेलें (अन्न). ३ नक्त (जेवणाशिवाय मजूरी); उक्ते. 'मला कोरडे तीन रुपये मिळतात.' ४ (लक्षणेनें निरनिराळ्या ठिकाणीं हा शब्द योजतात. -जसे) औपचारिक; शुष्क; पोकळ; वर- कांती; निष्फळ; बिनहंशिलाचा; बिनफायद्याचा; निरर्थक; ओला (विशेषतः ओलाव्याचा) याच्या उलट. 'किं वेदांतज्ञाना- वांचून । कोरडी व्यर्थ मतिशून्य।' 'बारा वर्षें पढत होतों परंतु कोरडा.' कोरडा-आदर, मान, प्रतिष्ठा-ममता-बोलणें-व्यवहार -श्रम इ॰ पहा. ५ व्यर्थ, फुकट. 'हिंडणवारा कोरडा । तैसा जया' ज्ञा १३.६८९. 'कांहीं लाभावाचून कोरडी खटपट कोण करतो.' ६ (ल.) वांझ. म्ह॰ 'कोरड्या अंगीं तिडका, बोडक्या डोईं लिखा.' सामाशब्द- ॰अधिकार-पु. १ नुसता पोकळ, नांवाचा अधिकार. २ बिनपगारी अम्मल, हुद्दा; बिनावेतन काम. ॰अभि- मान-पु. पोकळ मिजास; रिकामा डौल; अज्ञानी अहंकार. ॰आग्रह-पु. वरवरचें आमंत्रण; इच्छा नसतांनां बाह्यात्कारें बोला- वणें. पैठणी आग्रह. ॰आदर-पु. औपचारिक सन्मान. मनांत कांहीं पूज्यभाव नसतां बाह्यात्कारें केलेला गौरव. (विवाहादि समारंभांत) शाब्दिक सन्मान. ॰खडक-पु. १ अतिशय कठिण, टणक खडक. खडक पहा. २ (ल.) अडाणी. ३ कोरडा पाषाण पहा. ॰टांक-वि. (अतिशयितता व्यक्त करण्यासाठीं) अतिशय शुष्क, कोरडी (नदी, विहीर, तलाव वगैरे). [कोरडा + टांक = बिंदु, कण] ॰डौल-पु. रिकामा दिमाख; खोटा बडिबार, मोठेपणा. ॰दरमहा-पगार-मुशारा-पु. नक्त वेतन (जेवणाशिवाय) ॰द्वेष-पु. विनाकारण मत्सर. ॰धंदा-पु. आंत बट्याचा, बिन नफ्याचा उद्योग. ॰पाषाण-पु. १ कठीण, ठणठणीत दगड. २ (ल.) उपदेशाप्रमाणें आचरण न करणारा असा माणूस; चांगल्या गोष्टीचा परिणाम न झालेला माणूस. म्ह॰ लोकां सांगे ब्रह्मज्ञान । आपण कोरडा पाषाण. ॰ब्रह्मज्ञानी-वि. भोंदू; ढोंगी. स्वतः ब्रह्मज्ञानाचा अनुभव नसलेला पण लोकांना त्याचा उपदेश करणारा मनुष्य. ॰मान-पु. पोकळ, रिकामा, काम न करतां मिळणारा, दिलेला मान; कोरडा-आदर पहा. ॰विचार-पु. १ निष्फळ, निरर्थक चौकशी शोध. २ निष्क्रिय बडबड, विचार. ॰विश्वास-पु. वरवरचा विश्वास. ॰व्यवहार- पु. १ कोरडा धंदा पहा. २ रिकामा, निष्कारण उद्योग. ॰सत्कार- पु. १ पोकळ, वरवर सन्मान. २ गैरफायद्याचा मानमरातब; निर- र्थक बडेजाव. ॰सा-वि. वाळल्याप्रमाणें; शुष्कप्राय. ॰स्नेह-पु. वरवरची प्रीति; पोकळ मैत्री. कोरडेकष्ट ॰श्रम-पु. (अव.) विनाफायदा, निरर्थक श्रम; व्यर्थ मेहनत. कोरड्या टांकाचा हिशेब-हिशोब-हिसाब-पु. ज्यांत यत्किंचितहि फेरबदल करण्यासाठीं लेखणीचा टांक शाईंत बुडविला गेला नाहीं असा स्वच्छ, शुद्ध, बिनचुक लिहिलेला जमाखर्च, तक्ता; चोख हिशेब. (क्रि॰ देणें; करणें) ॰कोरड्यास-ला, कोरडेशास-ला, कोरड्याशास-ला-क्रिवि. (कोरडा-याचें विभक्तीरूप) भाकर इत्यादि कोरडी खाववत नाहीं म्हणून त्याबरोबर धेण्या. करितां (तूप, वरण वगैरे पातळ कालवण); तोंडी लावण्यास (गो.) कोरड्याक, -न. कालवण; तोंडीलावणें. 'आज कोरड्याशास काय केलें ? -कढी केली, भाजी केली.' कोरडी-वि. शुष्क; वाळलेली; कोरडा पहा. सामाशब्द- ॰आग-स्त्री. भयंकर मोठी आग. याचे उलट, ओली आग = अतिवृष्टीनें होणारें नुकसान. म्ह॰ कोरडी आग पुरवते पण ओली आग पुरवत नाहीं. = पाठीवर मारलेलें चालतें पण उपासमार झालेली सोसवत नाहीं. ॰ओकारी-स्त्री. १ घशांत बोटें घालून मुद्दाम काढलेली ओकारी. सकाळीं तोंड धुतांना घशांत बोटें घालून काढलेले खाकारे. (क्रि॰ देणें; काढणें). २ ओकारी येतेसें वाटणें. (क्रि॰ येणें). पोटांत ढवळल्याप्रमाणें होऊन मळमळ सुटते आणि थुंकी पडते, हृदयांत पीडा होते, ओकारी येते परंतु अन्न पडत नाहीं, अशा वेळीं म्हणतात. -योर १.२७७. ॰सवाशीण-स्त्री. जेवणाखेरीज ओटी भरून कुंकू लावून जिची बोळवण करतात अशी सवाशीण. ब्राह्मणेतरांच्या घरीं अशी ब्राह्मण सवाशीण बोलावितात. ॰किटाळ-स्त्री. १ (शब्दशः) कोरडी ठिणगी. २ (ल.) तोहंमत; आळ. (क्रि॰ घालणें; उठवणें; घेणें). ॰किरकिर-स्त्री. विनाकारण कटकट, तक्रार, पिरपीर, भुणभुण; निष्कारण त्रास. ॰खाकरी-स्त्री. कोरडी ओकारी पहा. (क्रि॰ देणें, काढणें) [खाकरणें] ॰चाकरी-स्त्री. १ वेतन, मजुरी घेतल्याशिवाय चाकरी; निर्वेतन सेवा. २ रोख पैसा घेऊन जेव- णाशिवाय चाकरी; कोरडा दरमहा. ॰जांभई-जांभळी-स्त्री. श्रमामुळें आलेली (झोंपेमुळें नव्हे) जांभई. ॰दारू-स्त्री. वाय. बाराची दारू; वायबार. ॰प्रतिष्ठा-स्त्री. औपचारिक मानसन्मान. हातीं पैसा नसतां अगर अंगांत कर्तबगारी नसतां मिरवलेला डौल. कोरडा मान पहा. ॰भिक्षा-स्त्री. तांदूळ, गहूं, वगैरे धान्याची भिक्षा (शिजविलेलें अन्न, माधुकरी शिवाय). ॰ममता-माया- स्त्री. वरकांती दाखविलेलें प्रेम; लोकाचारास्तव दाखविलेला सभ्यपणा. ॰मेजवानी-स्त्री. अन्नाशिवाय मेवामिठाईंची आणि फळफळावळीची मेजवानी; उपहार. ॰मैत्री-स्त्री. वरवरचें प्रेम; अंतःकरणापासून प्रेमनाहीं अशी मैत्री. -ड्या गाथा-स्त्री. अव. बनावट बातम्या; भुमका; कंड्या. [कोरडी + गाथा] कोरडें-वि. वाळकें; निष्फळ; शुष्क. कोरडा-डी पहा. सामाशब्द- कोरडें खाणें-आवश्यक वस्तूंचा अभाव भासणें; आवश्यक म्हणून इच्छिणें त्यामुळें त्रास होणें (निषेधार्थीं रचना). 'मी काय त्यावांचून कोरडें खातों' = तें नाहीं म्हणून माझें नडतें कीं काय ? ॰अंग- न. वांझपणा; वांझ कूस. ॰काम-न. १ विटाळशेपणीं व पांचवे दिवशीं न्हाऊन शुद्ध होण्यापूर्वीं करावयाचें काम. 'चौथ्या दिवशीं बायका कोरडे काम करतात.' २ वेळ घालविण्याकरितां केलेलें सटरफटर काम. ॰तप-न. श्रद्धाहीन, भक्तिहीन तपश्चर्या, आरा- धना. 'जळो जळो त्याचा प्रताप । काय चाटावें कोरडें तप । जैसें विगतधवेचें स्वरूप । यौवन काय जाळावें ।' ॰बोलणें, भाषण-न. वरकांती, मनापासून नव्हे असें भाषण, बडबड. ॰ब्रह्मज्ञान-न. आचरण नसतां सांगितलेला वेदांत, परमार्थविद्या; बकध्यान; भोंदूपणा, ढोंग. ॰वैर-न. निराधार द्वेष, मत्सर. ॰वैराग्य-न. विषयाचा खरा तिटकारा आल्याखेरीज दाख- विली जाणारी पोकळ विरक्ति; साधूपणाचें ढोंग; निवृत्तिमार्गाची बतावणी. ॰सुख-न. उपभोगाशिवाय सुख; नांवाचा आनंद. कोरडया अंगीं तिडका-१ गर्भ नसतां बाळंतपणाच्या वेदना भासविणें. २ ढोंग; भोंदूपणा.