मराठी बृहद्कोश

सात मराठी शब्दकोशांतील २,८४,८८८ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

संबंधित शब्द

रंग

पु. १ केवळ चक्षुरिंद्रियानां जाणतां येतो असा पदार्थांच्या ठिकाणीं जो पांढरेपणा, तांबडेपणा इ॰ वर्ण तो; एखद्या वस्तूवर प्रकाश पडला असतां ती वस्तु ज्या रंगाची असेल त्या रंगाच्या किरणाशिवाय इतर किरण शोषले जाऊन त्या रंगाचे किरणच फक्त बाहेर टाकते. त्यास रंग म्हणतात. -ज्ञाको (र) २. २ रंगाची पूड; पदार्थाला तांबडा, काळा इ॰ कोणताहि वर्ण देण्याचें द्रव्य; रंगविण्याचें द्रव्य. ३ (ल.) तेज; तेजस्विता, चकाकी; भपका; गायन, कीर्तन, तमाशा, भाषण, इ॰ चा लोकांचीं अंतःकरणें रमण्याजोगा पडणारा शोभाविशेष; मजा; शोभा; आनंद. 'आजचे गाण्यास रंग चांगला आला. ' ४ देखणेपणा; उत्कृष्टता; चांगली स्थिति (मनुष्य, वृक्ष, बाग, शेत इ॰ पदार्थांची किंवा संसार, व्यवहार इ॰ ची). 'नुकता संसार रंगास आला तों बायको मेली. ' ५ देखावा; आकार; ढब; डौल; घाट; अंदाज; चिन्ह; परिस्थिति; प्रसंग; संधी. (क्रि॰ दिसणें). 'आज गरमी होती तेव्हां पाऊस पडेलसा रंग दिसतो.' 'उन्हाचा-वाऱ्याचा-आभाळाचा-दिव- साचा-काळाचा-धारणेचा-भावाचा-पिकाचा-चाकरीचा-रंग. ' 'तूं शालजोडी मागशील तर पहा, मागण्याचा रंग आहे. ' ६ सोंगट्यांचे चार भिन्न प्रकार; गंजिफांचे निरनिराळे दहा प्रकार; पत्त्यांच्या चार बाजू प्रत्येकीं. ७ गंमत; मजा; तमाशा; खेळ. 'भंगकरी रंग, अफू करी चाळा, तंबाखू बापडा भोळा. ' ८ रंगण; क्रीडास्थान (नाट्य, नृत्य इ॰ चें); हौदा; आखाडा; रंगभूमी; सभागृह; सभामंडप. 'असें बोलून इकडे तिकडे फिरते आणि रंगांतून पडद्यांत निघून जाते.' -क्रमं २; -मोआदि २६.२१. ९ नवरा; पति (समासांत स्त्रीच्या नांवापुढें योजतात). 'सीतारंग.' १० विचार; बेत. 'जाणत्याचे जाणावे प्रसंग । जाणत्याचे घ्यावे रंग ' -दा १८.२.१२. ११ तऱ्हा; ढोंग. 'बहु शिकला रंग चाळे । खरें खोटें इचे वेळे. -तुगा १३५९. १२ गाणें, बजावणें, नृत्य इत्यादि करमणुकीचा प्रकार. 'आजि कुमारिकेच्या महा- लासी । रंग होतो दिवसनिशीं । ' -शनि २४६. १३ थाटमाट. ' रंग स्वर्गीचा उतरे । ' -दावि ५०४. १४. महत्त्व ' या कारणें कांहीं रंग । राखोन जावें ' -दा १७.७.२१. १५ विवाह, शिमगा इ॰ प्रसंगीं एकमेकांच्या अंगावर केशर इ॰ चें रंगीत पाणी टाकतात तें किंवा तें टाकण्याचा समारंभ. १६ प्रेक्षकांचा किंवा श्रोत्यांचा समुदाय. १७ चुना; सफेती; उजळा. (क्रि॰ देणें). [सं. रञ्ज्-रंग देणें; फा. रङ्ग; हिं. रंग] (वाप्र.) ॰उडणें- १ मूळचा रंग जाणें, फिका होणें; तेज कमी होणें. ॰करणें- मजा मारणें; मौज करणें. ॰खेळणें-विवाहादि प्रसंगीं एकमेकांच्या अंगावर रंग उडविणें. ॰चढणें-अंमल, निशा, मद, धुंदी येणें. ॰दिसणें-एखादी गोष्ट होईलशी वाटणें, आकारास येणें; संभव असणें. 'तरी यापुढें जें एकंदर अवस्थांतर होण्याचा रंग दिसत आहे.' -नि. ॰भरणें-१ भरास येणें; जोमांत येणें; मजा येणें. 'भलत्या प्रसंगीं भलत्या तालाची चीज सुरू केलीत तर रंग भरेल कां ? ' -नाकु ३.४६. २ रंग आणणें. 'रंग भरिती अद्भूत । ' -सप्र १०.८८. ३ तडजोड करणें. -पया १४०. ॰मारणें-- बाजी मारून नेणें. 'रहस्य राखून रंग मारला । ' -ऐपो २५३. ॰राखणें, रंगाची मोट बांधणें-विजयानें, वैभवानें हुरळून न जातां सभ्य आणि सौम्य वर्तन कायम ठेवणें; आपल्या प्रति पक्ष्यांवर वादांत किंवा कांहीं कामांत आपण सरशी मिळविली असतां आपण दिलदारीनें त्याच्याशीं वागणें; त्या सरशीच्या जोरावर त्याच्याशीं कठोरपणा न करणें; त्याला न हिणविणें; अधिक पेंचांत ढकलण्याचा प्रयत्न न करणें. ' त्यानें मी चुकलों असें कबूल केलें तें बस झालें, आतां काय रंगाच्या मोटा बांधा- वयाच्या आहेत ? ' ॰शिंपणें-होळीचे अगर लग्नाचे वेळी रंगाचें पाणी उडविणें, फेकणें; रंग खेळणें. रंगाचा भंग करणें-आनं- दाचा बिरस करणें. रंगांत येणें-तल्लीन होणें; रंगून जाणें. चढणें- शोभा प्राप्त होणें; खुलून दिसणें; पूर्णतेस येणें; विकास पावणें; भरास येणें. रंगास-रंगारूपास आणणें-येणें-चढणें-१ फलद्रूप होणें-करणें; वैभवशाली, सुखावह करणें; आरंभिलेलें कार्य अनुकूल संस्कारादिकांनीं चांगल्या स्थितीला आणणें, येणें. 'माझ्या ग्रंथाचा मी नुसता कच्चा खरडा तयार केला आहे. तो रंगारूपास आणावयास वर्ष दीड वर्ष तरी लागेल. ' २ (तिरस्का- रार्थी) एखाद्या तऱ्हेस, आकृतीस, विशिष्ट अवस्थेस पोंचणें, पोचविणें. ' हा आतां राम म्हणावयाचे रंगास आला. ' सामा- शब्द- ॰आखाडा-पु. कुस्ती खेळण्याची जागा. 'धनुर्याग आरंभिला । मल्लें रंगआखाडा केला । ' -कथा ४.६.३७. ॰काम- न. १ रंग देण्याचें, रंगाचें काम. २ (रंगारी धंदा) धाग्यावर रंग चढवून तो पक्का बसविण्याची क्रिया; (इं.) डाइंग. ॰डाव- बाजी-पुस्त्री. गंजिफा, पत्ते खेळण्याचा एक प्रकार. ॰डी, रंगडी ढंगडी-धंगडी-स्त्री. १ ढंग; चाळा. २ फसगंमत; फसवेगिरी; खोडी; लबाडी; डावपेंच इ॰ (अनेक वचनी उपयोग). [रंग + ढंग] ॰ढंग-नपु. १ युक्ति; कारवाई; फंद; चाळा; लटपट; कावा. (क्रि॰ करणें; मांडणें; चालविणें). २ रागरंग; स्वरूप; एकंदर देखावा. ३ नाचरंग वगैरे; स्वच्छंदी आचरण. रंगणावळ-स्त्री. रंगविण्याबद्दलची मजुरी; रंगविण्याचा खर्च. [रंगणें] ॰दार-वि. १ मनोहर रंग असणारा (पदार्थ, फूल, वस्त्र इ॰) २ रंगेल गमत्या; विनोदी विषयी; चैनी; (माणूस) ३ रंगीत; रंगविलेले; रंगीबेरंगी. ॰देवता-स्त्री. गाणेंबजावणें, कथा पुराण, प्रवचन, व्याख्यान इ॰ कांस जिच्या प्रसादानें रंग येतो, यश मिळतें अशीं एक कल्पित देवता; खेळांत रमणीयता आणणारी देवता. २ खेळांची अधिष्टात्री देवता. [सं.] ॰द्रव्यें-नअव. (रसा.) जीं द्रव्यें सूर्यकिरणांचा कांहीं विशिष्ट भागच फक्त आरपार जाऊं देतात अथवा परावृत्त करतात व बाकीचा भाग नष्ट करून टाकतात तीं द्रव्यें. -ज्ञाको (र) ३. २ रंगविण्याच्या कामीं लागणाऱ्या वस्तू, पदार्थ. ॰नाथ- पु. कृष्ण; श्रीकृष्णाची बालमूर्ति. [सं.] ॰पंचमी-स्त्री. फाल्गुन वद्य पंचमी. या दिवशीं एकमेकांवर रंग उडवितात. ॰पट-पु. रंग- ण्याची खोली; पात्र रंगून तयार होण्याकरितां केलेली जागा; (इं.) ड्रेसरूम, ग्रीनरूम. [सं.] ॰बहार-पु. १ मौज. कमालीचा आनंद; सुख; आनंदाची लूट (क्रि॰ करणें मांडणें; होणें) ' रंगबहार एकांतीं लुटा । घर सुंदर कर पोपटा । ' -प्रला १४०. २ भव्य, आनंददायक दृष्य; थाटमाट. ३ नानाप्रकारच्या करमणुकी, खेळ, कसरती किंवा त्या जेथें चालतात तें ठिकाण. ४ मुबलकता; पीक इ॰ ची आनंदप्रद रेलचेल. 'पिकांचा-धान्याचा-आंब्यांचा-लाड- वांचा-जेवणांचा-रंगबहार. [रंग + बहार] ॰बाजी-स्त्री. पत्त्यांनीं खेळण्याचा एक प्रकार; पत्त्यांतील एक खेळ; रंगडाव. ॰भंग- पु. विरस; आनंदाचा नाश; मध्येंच एकदम येऊन खेळ थांबविणें, बंद करणें; खेळांतील आनंद, गोडी न वाटेल असें करणें. ॰भूमि-स्त्री. १ नाटकगृह; प्रयोग किंवा नाटक करून दाख- विण्याची जागा; सभागृह; सभामंडप. २ मर्दानी खेळांचें मैदान; रणांगण. [सं.] ॰मंडप-पु. कुस्त्या वगैरे खेळण्यासाठीं घातलेला मांडव. [सं.] ॰मंडपी-स्त्री. खेळाची अथवा करमणुकीची जागा. [सं.] ॰महाल-पु. विलासमंदिर; दिवाणखाना; आरसे व तजबिरी लावून सुखोपभोग घेण्यासाठीं केलेलें घरांतील दालन; श्रीमंत लोकांची आरशांनीं, रंगीबेरंगी चित्रांनीं सुशोभित केलेली विलास करण्याची खोली; (विशेषतः) निजण्याची खोली. [फा.] ॰माळ-स्त्री. लग्न वगैरे समारंभाच्या मिरवणुकीपुढची नक्षत्रमाळा; रंगीबेरंगी कागदांचीं अथवा बेगडांचीं फुलें कातरून दोऱ्यांत ओवून काठीला बांधून लग्नकार्यांत धरण्याच्या माळा. [सं. रंग + माला] ॰माळा-स्त्री. १ रांगोळीचीं चित्रें; रांगोळी. 'प्रवर्तोनि गृहकामीं रंगमाळा घालुं पाहती ।' -भूपाळी घनश्यमाची २०. २ सिंहासन अथवा मूर्तीचें देवालय याचे भोवतीं तिन्ही बाजूंनीं बसविलेल्या लाकडी अगर धातूच्या सोंगट्या अथवा निरनिराळ्या आकृतीचीं चिन्हें. ३ नक्षत्रपुंज; तारे. ४ नक्षत्रमाळा; (सामा.) रंगमाळ ॰मूर्तिं-स्त्री. ज्याच्यामुळें समारंभास विशेष शोभा येते असा मनुष्य अथवा मूर्ति; कृष्णाचें बालस्वरूपी लांकडी अथवा धातूचें छायाचित्र; श्रीकृष्णाची मूर्ति. [सं.] ॰मोड-स्त्री. रंगभंग; ऐन भरांत खेळ आला असतां विरस होणें; हिरमोड; उत्साहभंग; आनं- दाचा नाश; खेळाचा चुथडा. ॰रस-पु. आनंद; हर्ष. 'हस्ती सेवकांसुद्धां सकळही लाल रंगसी । ' -हो २०३. ॰राग-पु. राग- रंग पहा. ॰रूप-न. आकार, रंग, वर्ण, चर्या, देखावा इ॰ (फळ, व्यापार, व्यक्ति, इ॰चा); बाह्यस्वरूप. [सं.] ॰रूपास आणणें- चांगल्या स्थितीस आणणें; निरोगी करणें; ऊर्जित दशेस आणणें. ॰रूपास येणें-चढणें-चांगल्या स्थितीस किंवा पूर्णतेस येणें. पोहोचणें. ॰रेज-पु. रंगारी. [फा. रंग्रेझ] ॰रेजी-स्त्री. रंग देणें; रंगविणें; सफेती. [फा.] ॰रोगण-न. १ तेलिया रंग. २ सामान्यतः रंग देणें; साफसूफ करणें वगैरे क्रिया. [रंग-इ-रौघन्] ॰लाल-वि. चैनी (मनुष्य). [रंग] ॰लूट-स्त्री गंजिफांचे खेळां- तील एक शब्द; गंजीफांचे डावांत सर्वांचीं पानें एक रंगाचीच पडलीं असतां तो हुकूम फुकट जातो आणि पानें सर्वांनीं लुटून घ्यावीं असा एक प्रकार आहे ती. ॰लेला ऊंस-पु. गाभ्यांत लाल पड- लेला ऊंस. ॰वट-स्त्री. खेळण्याची जागा; क्रीडांगण; रंगण. 'द्राखे घोंस लांबटी । रंगवटामाजी मिरवती । ' -ख्रिपु १.८.२३. ॰वणी-न. रंगाचें पाणी. [रंग + पाणी] ॰वल्ली-स्त्री. रांगोळीचें चित्र; रांगोळी पहा. [सं.] ॰शाला, रंगांगण-स्त्रीन. नाटकगृह; खेळाचें मैदान; तालीम; नर्तनशाला; जेथें नाटकांतील पात्रें रंग- वितात ती जागा. [सं.] ॰शिला, रंगशिळ-स्त्री. १ दगडी पाटा. २ देवाच्या मूर्तीपुढील मोठी शिळा; पंढरपूरच्या विठोबाच्या पुढील मोठी शिळा (यावर भक्त नाचतात). 'नाचा रंगशिळेवरी । भेट देईगा मुरारी । रामचंद्रहो । ' -भज ८२. [सं.] ॰सभा-स्त्री. १ खेळ अथवा करमणूक यासाठीं असलेली जागा. २ खेळाडू अगर विनोदी मंडळी. (क्रि॰ जमणें; भरणें; मांडणें; चालणें; उठण; मोडणें). ॰सही-स्त्री. तिफांशी खेळांत पक्क्या रंगाच्या चारी सोंगट्या पटाच्या चारी बाजू हिंडून आपल्या पटाच्या डाव्या बाजूकडील घरांच्या ओळींत येऊन बसणें. ॰स्थल-न. रंगण; रंग- भूमि पहा. ' विचक्षणा पडद्यांतून रंगस्थलांत येते. ' -कमं २. रंगाई-स्त्री. (हिं.) रंगणावळ; रंग देण्याची मजूरी, किंमत. 'रंगाऱ्याला कपडे रंगविण्याबद्दल रंगाई द्यावी लागते. ' -विक्षिप्त १.१२. [फा. रंगाई] रंगांगण-न. कुस्त्या, खेळ इ॰ करून दाख- विण्यास योग्य स्थळ; रंगशाला पहा. रंगाचळ-न. (महानु.) रंगाचा भर; आनंद; उत्साह; भर. 'निरुपनांचा रंगाचळी । त्यागाचें आढाळ चाळी । ' -भाए २३७. [रंग + अचल] रंगाची (रंगीत) तालीम-स्त्री. रंगभूमीवर नाटक होण्यापूर्वीं खाजगी रीतीनें सालंकृत प्रयोग करून पाहणें. [इं.] रंगाथिणें-क्रि. रंगविणें; रंगविशिष्ट करणें. 'यया भूतांचेनि संगें । जीवें घेतलीं अनेक सोंगें । विपरीत वासना संगे । रंगाथिला ।' -सिसं ३५.२२२. रंगामेज-पु. १ चितारी २ ढोंगी; दांभिक इसम. [फा. रंगामेझ] रंगामेजी-स्त्री. १ आरसे, चित्रे; इ॰ नीं सुशोभित करणें; दिवाणखाना इ॰ स्थलास नानाप्रकारचे रंगांनीं, चित्रें, वेलबुट्टी काढून शोभेसाठीं चितारण्याचा केलेला संस्कार. 'भीमनाथ केदार राममंदीर रंगामेजींचें ।' -प्रला ७८. २ (ल.) दांभिकता; कृत्रिमता; कुटिलता. रंगारी-पु. कपडे रंग- विणारा; वस्त्रें रंगवून उपजीविका करणाऱ्यांची एक जात. [सं. रंज्; फा.] रंगारीहिरडा-पु. एक प्रकारचें हिरड्याचें झाड व त्याचें फळ (पिवळसर रंगाचें). यालाच जंगली किंवा चांभारी हिरडा म्हणतात. सुरवारी हिरडा हा दुसऱ्या जातीचा आहे. रंगालय-न. नाट्यशाला. [सं.] रंगालां-न. (राजा.) चामडें ताणून घोटण्याचें साधन (हें सुताराच्या पटाशीसारखें पण बोथट धारेचें असतें). [रंगाळें] रंगिन-न. चांदीवर सोन्याचा पत्रा चढवून तयार केलेलें जरतार. रंगिला-वि. रंगेल; ख्यालीखुशा- लीचा; चैनी; विषयी; खेळाडू. [हिं.] रंगी-स्त्री. (बे.) जुगार; जुवा; पत्त्यांतील खेळाचा एक प्रकार. रंगी, रंगीन, रंगील-वि. १ रंगीत; रंगविलेलें. 'तुम्ही रंगीन फेटा पाठविला तो पावला. ' -रा ३२.८९. २. रंगेल पहा. [रंग; महानु] रंगीढंगी-वि. रंगेल; चंगीभंगी; व्यसनी. 'मुलगा रंगीढंगी असूनहि केवळ पैसा पाहून पांचmohsinहजार हुंडयासह त्याच्या ताब्यांत देऊन चाकली.'-हाकांध १८२. रंगीत-वि. रंगी; रंगविलेलें; रंग असलेले; रंग लाविलेला कुसुंबा, हिंगूळ इ. रंगानीं रंगविलेला (पदार्थ, पस्त्र, काष्ठ इ.). रंगीबेरंगी-वि. अनेक रंगाचा. रंगीला-वि. रंगीन; रंगेल; गुलहौशी. रंगेरी-स्त्री. (गंजीफांचा खेळ) अखेरीस म्हणजे सर्व खेळाच्या शेवटीं खेळणाराची अखेरी दोघानीहि मापली, तिघांचेंहि पान एकाच रंगाचें निघालें तर त्यास रंगेरी म्हणतात. रंगेल-ला-ली-वि. १ आनंदी; विनोदि; खेळाडू; खेळकर; चैनी; विषयी; विलासी; ललितकलाप्रिय; गाणें, तमाशा, इ. विषयांचा उपभोग, मस्करी, या विषयावर ज्याची अधिक रुचि असा आनंदी; रसिक; इष्कबाज. रंगविणें-क्रि. १ रंग लावणें, देणें; रंगानें वस्त्रादिक विशिष्ट करणें; शोभिवंन करणें. २ (ल.) तोंडांत देणें; भडकाविणे; मारणें. 'त्याचें तोंडांत दोन रंगविल्या म्हणजे कबूल होईल.' (तोंड) रंगविणें-१ विडा खाणें. २ (ल.) थोबाडांत मारणें. [रंग; रंजू = रंग देणें]

दाते शब्दकोश

अकालिका      

पु.       तांबडसर रंगीबेरंगी पानांचे शोभेचे एक झाड. [इं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अकालिफा

न. (कुण॰ खलिफा) तांबडसर रंगीबेरंगी पानांचें बागेंतील एक शोभेचें झाड. [इं.]

दाते शब्दकोश

अटेपटेदार      

वि.       चट्ट्यापट्ट्याचा; रंगीबेरंगी पट्टे असलेला (पतंग, कपडा वगैरे).

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चित्राबाहाडा      

वि. रंगीबेरंगी. चित्रालंकार      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चित्रान्न

न. १ खिचडी. २ साखरभात. [सं. चित्र = रंगीबेरंगी + अन्न]

दाते शब्दकोश

चित्रविचित्र

ठिपक्या ठिपक्यांचें, पटाईत, पट्ट्यापट्ट्याचें, विविधरंगी, इंद्र-धनुषी रंगाचें, चट्टीपट्टी, रंगीबेरंगी, शबल, बुट्टेदार, धब्बेधब्बेवालें, चितारणे : चित्रणे आकृति काढणें, रंगविणें, चित्र काढणें, रेखाकृति चित्रित करणें, व्यक्तिदर्शन घडविणे, मनश्चक्षूंपुढें उभे करणें, रेखणे, रेखाटणें, रेखांकित करणे, रंगात उतरविणे.

शब्दकौमुदी

चटई

स्त्री. कळक, खजुरी, शिंदी इ॰ कांच्या पानांची किंवा काठ्यांची केलेली हांतरी; अंथरी; विविधप्रकारच्या गवतां- पासून रंगीबेरंगी व तर्‍हतर्‍हेच्या सतरंज्या बनवितात त्याप्रत्येकी [सं. झट् = एकत्र होणें, गुंतणें; हिं.] ॰भरणें-(चांभारी) चट- ईची वीण घालणें. ॰चप्पल-स्त्री. चामड्याच्या वाद्या चटई- सारख्या विणून केलेली चपलांची एक जात; वहाणा ॰चटईची वांक-स्त्री. चटईच्या विणकरीसारखी घडण असणारा स्त्रियांचा एक दंडांत घालावयाचा अलंकार दागिना; हातरीच्या. वाकी.

दाते शब्दकोश

चटर्इ      

स्त्री.       कळक, खजुरी, शिंदी इत्यादिकांच्या पानांची किंवा काट्यांची केलेली हातरी, अंथरी; विविध प्रकारच्या गवतांपासून रंगीबेरंगी व तऱ्हेतऱ्हेच्या सतरंज्या बनवितात त्या प्रत्येकी. [सं. झट्] (वा.) चटर्इ भरणे – (चर्मकार) चप्पलच्या पट्ट्याला चटर्इची वीण घालणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

छेलछबेली      

वि.       लाडकी; सुंदर; मोहक : ‘छेलछबेली रंगीबेरंगी फुले.’ -अआमागो २०.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

छंद

पु. १ शब्दांची गानयोग्य विशिष्ट रचना; काव्याचें वृत्त. 'गायत्री छंद म्हणिजे' -ज्ञा १०.२८२. २ ध्यास; ओढा; आवड (चांगल्या-वाईट गोष्टींची). (क्रि॰ घेणें, धरणें; लागणें). 'असा धरि छंद । जाइ तुटोनिया भवबंद ।' ३ उत्कट इच्छा; आग्रह; हट्ट; नाद; सोस. 'ऐसा नाथिला छंदु अंतःकरणें । घेऊनि ठाके ।' -ज्ञा ६.७४. ४ मर्जीः इच्छा; खुषी. 'यजमानाच्या छंदानें आम्हांस चालवें लागतें.' ५ खोड्या; उनाडपणाचें वर्तन; ख्याली खुशाली. 'ती नाना छंद करून मोकळी झाली' -निंच ४५. ६ कांचेच्या बांगडीवर रंगीबेरंगी लाखेची नक्षी केलेली हातांतील एक प्रकारची बांगडी. ७ नक्षीदार,चांदीच्या जाड सुताचें पायांत घालावयाचें पैंजण ८ वेदांचें एक अंग; छंदःशास्त्राच्या ग्रंथ. [सं.] छंदास लागणें- भरणें = नादीं लागणें; मोहून जाणें. सामाशब्द ॰खोर-वाईक- वि. छांदिष्टः लहरी; नादी ॰फंद-विछंद-पुअव. बाष्कळपणा; खोड्या ढंग; धुमाकूळ; नखरे. (क्रि॰ करणें; मांडणें; लागणें). 'अंजुनि किती दाखवसील छंद फंदडें ।' -होला ८९. ॰मरण- न. इच्छामरण. 'छंदमरण अति दुर्जय अमरांत नसे असी महा- मरता ।' -मोभीष्म ११.१५४. छंदःशास्त्र-न. श्लोकांदिकांच्या रचनेसंबंधीं प्रमाणभूत असणारें शास्त्रः वृत्तशास्त्र. छंदानुरोध-पु. दुसर्‍याच्या कलानें जाणें, आर्जव; खुशामत. छंदिष्ट-वि. १ छंद- खोर पहा. २ चेष्टेखोर; विनोदी. [सं. छंदस्] छंदीफंदी-वि. वाईट चालीचा, संवयीचा; छंदखोर; व्यसनी. छंदोबद्ध-वि. पद्यरूप; कविताबद्ध. छंदोभंग-पु. (काव्य) गणांच्या नियमांचें उल्लंघन गण मोजण्यांतील चूक; वृत्तनियमांचें उल्लंघनः अनियमित रचना. छंदोवती-स्त्री. (संगीत) चौथ्या श्रुतीचें नांव.

दाते शब्दकोश

छंद, छंदू      

पु.       १. वर रंगीबेरंगी लाखेची नक्षी असलेली बांगडी. २. पायात घालावयाचे नक्षीदार पैंजण. ३. स्त्रियांचा एक दागिना : ‘नागबंद छंद पाठीवर । सूर्याची शोभती कोर चंद्रकोर ।’ -ऐपोकेखं २·१९७.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गे(गें)ठा

पु. १ (खा. व.) बैलाच्या गळ्यांतील रंगीबेरंगी मण्यांची अगर कवड्यांची माळ. २ कानांतील एक दागिना (हा मराठ्यांच्या बायका घालतात); गांठ्या पहा. 'कानीं घालुनी गेंठे हो ।' -मध्व ३९. ३ खंडोबाच्या गळ्यांतील एक चांदीचा अलंकार, हा जेवतांना कानावर ठेवावा लागतो. गाठा-ठ्या पहा. (सामा.) एक चांदीचा दागिना. 'महार पोरग्याचे गळ्यांत गेठे ।' -अफला ६६. म्ह॰ गेठे गेले भोंकें राहिलीं. [सं. ग्रंथि?]

दाते शब्दकोश

गेठा, गेटा      

पु.       १. बैलाच्या गळ्यातील रंगीबेरंगी मण्यांची अगर कवड्यांची माळ. २. कानातील एक दागिना. : ‘कानीं घालुनी गेठे हो ।’ - मध्व ३९. ३. खंडोबाच्या गळ्यातील चांदीचा एक अलंकार. पहा : गाठा, गाठ्या (खा. व.) (सामा.) चांदीचा एकद दागिना. हा अलंकार जेवताना कानावर ठेवावा लागतो : ‘महार पोरग्याचे गळ्यात गेठे ।’ - अफला ६६.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

हात

पु. दांडा. 'रंगीबेरंगी टांकाचे हात व कागद अशी खरेदी केली.' -गुजगो ११९.

दाते शब्दकोश

काचचित्र      

स्त्री.       रंगीबेरंगी काचेचे बारीक तुकडे जुळवून केलेली चित्रे, आकृती.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

काळातित्तर      

पु.       रंगीबेरंगी तितर पक्षी.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कातरकाम      

न.       कात्रीने कागद, कापड यांच्या वेगवेगळ्या आकृती करणे : ‘रंगीबेरंगी कागदांच्या कातरकामांनी बांबू मढवून होटेलवाल्यांनी मोठाथाट केला होता.’ - पलको ७७.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कर्बुरित वि.      

रंगीबेरंगी ठिपके असलेला. [सं.] कर्बूर      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

शीट

न. चीट; रंगीबेरंगी कापड. [इं. चिंट्स]

दाते शब्दकोश

सतरंजी, सत्रंजी

स्त्री. १ बिछाईतीचें जाड, रंगीबेरंगी पट्टेदार कापड. २ (मलविद्या) एक कुस्तींतील डाव; हरणफास; जोडी- दाराच्या पिंडरीवरून आपला एक पाय घालून दुसरा त्याच्या मानेवरून आणून दोन्ही पायांस तिढा देऊन त्यास चीत करणें. [फा. शत्रंजी]

दाते शब्दकोश

विचित्र

न. आश्चर्य. -वि. १ चित्रविचित्र; अनेक रंगांचा; नाना रंगी; रंगीबेरंगी; निरनिराळ्या अनेक रंगांनीं युक्त. २ आश्चर्यकारक; अचंबा वाटण्यासारखा. 'पाहे तटस्थभावें दोघांचें रण विचित्र सेना तें ।' -मोकर्ण ९.१९. ३ तऱ्हतऱ्हेचा; नाना प्रकारचा; अनेकविध. 'विचित्र अन्नें वाढिलीं ताटीं ।' 'रचना विशेषें विचित्रीं ।' -ऋ २०. ४ विलक्षण; तऱ्हेवाईक; लोक- विलक्षण. 'कोणी एक वनीं विचित्र पुतळा जेवावया बैसला ।' 'तो फारच विचित्र मनुष्य आहे.' [सं.] ॰ता-स्त्री. वैचित्र्य; भिन्नता; तऱ्हेवाईकपणा; सौंदर्य; नानावर्णयुक्तता; रमणीयता; विस्मयकारिता. 'विचित्रता भूतांचिया ।' -ज्ञा १८.५३९. ॰वाडा-पु. (व. ना.) वैचित्र्य. विचित्रित-वि. विचित्र.

दाते शब्दकोश

विविध

विभिन्न, पृथक्, अनेक प्रकाराचें, हरत-हांचें, नानाविध, भिन्न भिन्न, बहुरंगी, रंगीबेरंगी, वेगवेगळे, बहुविध, नाना, त-हात-हांचे, अनेकविध, वैविध्य, त-हेवाईक, रीतिरीतींचे, चित्रविचित्र, बारा घरची बारा ! हजार त-हांचे, नाना छापांचे -प्रकारचे, बहुरत्ना वसुंधरा, नाना रूपांची, वेगवेगळ्या धाटणीची, भिन्नाभिन्न जातीचें, विविध प्रकारचे, अठरा धान्यांचे कडबोळें, नाना पंथ नाना मतें, भिन्नरुचिहिं लाेक:, पिंडेपिंडे मतिर्भिंना, व्यक्ति तितक्या प्रकृति याचा येथे अनुभव येतो, प्रत्येकाची रीत-त-हा- रंगछटा - मनोभूमि कांहीं वेगळीच, दर एकाचा ढंग अनोखा, भिन्न भिन्न स्वरूपाचीं, त्यांच्या तऱ्हा तऱ्हा किती म्हणून सांगूं ?

शब्दकौमुदी

काच

पु.स्त्री. १ एक कठिण ठिसूळ व पारदर्शक असा पदार्थ; भिंग; वाळू, सोडा, पोटॅश, चुना, अल्युमिना, शिशाचा आक्साइट वगैरेपासून काच तयार करतात. हिच्या अनेक जाती असून प्रत्येकीचे गुणधर्म निरनिराळे आहेत. काचेचे बांगडी, आरसे, छायाचित्र घेण्याची काच वगैरे अनेक पदार्थ करतात. २ स्फटिक; गार (रत्नासारखा जिचा उपयोग होतो ती). ३ पोटॅशचा कोणताहि स्फटिकावस्थेंतील क्षार. ४ डोळ्यांतला काचबिंदु. ५ (माळवी) आरसा. [सं. काच] ॰मारणें - (चांभारी) कांचेनें घासणें. ॰कमळ-न. एक कमळासारखी आकृति; एका वर्तुळाच्या परिघामध्यें ज्यांचे मध्यबिंदु आहेत अशीं वर्तुळें यांत असतात. ॰कागद -पु. सामान्यतः लांकूड वगैरे घांसून गुळगुळीत करण्यासाठीं, यंत्रावर किंवा भांड्यावर चढलेला गंज काढण्यासाठीं वापरण्यांत येणारा काचेचा, वाळूचा, कुरुंदाचा कागद; पॉलिश कपडा; चांदीसोन्याच्या भांड्यांस जिल्हई देण्याकरितां हा वापरतात. कागदावर सरसांत कांचेची पूड, वाळू, कुरुंदाची पूड वगैरे बसवून हा तयार करतात. ॰चित्र- कला -स्त्री. रंगीबेरंगी काचेचे बारीक तुकडे जुळवून केलेलीं चित्रें, आकृती. (इं.) मोसाईक. ॰बंदी -स्त्री. काचेचे तुकडे बसवि- लेली जमीन. ' काचबंदि आणी जळ । सारिखेंचि वाटे सकळ । ' -दा ८.५.४३. ॰बिंदु-बिंब -पुन. एक नेत्ररोग; मोतीबिंदु; डोळ्यांतील बुबुळांत एक काचेप्रमाणें बिंदु येतो व त्यामुळें दिसेनासें होतें. ॰मणी -पु. काचेचा मणी; स्फटिक; एक प्रकारचें रत्न. ॰मिना-पु. काचेच्या रसानें एखादें पात्र मढविणें, चित्रें काढणें. सिलिका, मिनियम् व पोटॅश यांच्या मिश्रणा- पासून तयार करतात. (इं.) एनॅमल. ॰लवण-न. (हिं.) कृत्रिम मीठ. ॰वटी-स्त्री. काचेचा तुकडा; भिंग. ' चिंतामणीचिया साठीं । देईजे फुकटी काचवटी । ' -विपू २.१५. ' ज्यांचे गांठीं नाहीं काचवटीं । परी संतुष्टता नित्य पोटीं । ' -एभा १९.५५९. ' तुका म्हणे दिली चिंतामणीसाठीं । उचित काचवटी दंडवत । ' -तुगा २३५७.

दाते शब्दकोश

कवडी      

स्त्री.       १. कपर्दिका; समुद्रातील एका जलजंतूच्या शरीरावरील कवच. याचा चलनासाठी उपयोग होत असे. एका पैशाला ६४ किंवा ८० कवड्या मिळत असत. तीन प्रकारच्या कवड्या असतात - दही, सगुणी व भवानी : ‘शंख सिंपी धुला कवडे । आधी त्यांचे घर घडे ।’ - दास ९·७·५. २. हाताच्या पायाच्या नखावर जो पांढरा ठिपका असतो तो. ३. विटीदांडूच्या खेळातील एक शब्द. ४. पहा : कवडा ५. ५. रेशीमकाठी वस्त्राच्या काठाची विणकर विरळ झाली असता त्यात उभ्या ताण्याचे दिसणारे पांढरे ठिपके, अंश. ६. डोळ्यातील फूल, वडस. ७. चलनाचा अत्यंत अल्प अंश. ८. सर्पाच्या अंगावरील पांढरे ठिपके. ९. (उप.) दात; कवळी. १०. बुबुळाशिवाय डोळ्याचा पांढरा भाग. ११. कवडीचे झाड. हे लहान असून याला पांढरी फुले येतात. याचा तापावर उपयोग होतो. १२. झोडपलेल्या गव्हाच्या ताटातील कणीस. १३. मुसलमान लोक दाढीचा जो भाग कधीही काढत नाहीत तो; अल्लाचा नूर. १४. दह्याचा घट्ट गोळा; गाठ, गठळी. १५. चिनी मातीच्या रंगीबेरंगी तुकड्यांचा उपयोग करून केलेली जमीन. [सं. कपर्दिका] [त. कव(वु)डि] (वा.) कवडी साठवणे- चिक्कूपणाने पैशांचा साठा करणे. कवडी उलटी पडणे - फासा किंवा डाव उलटा पडणे; गोष्ट अंगावर येणे. कवडी किंमतीचा असणे - निरुपयोगी, कुचकामाचा, टाकाऊ असणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गुल

पु. १ फूल. २ दिव्याची काजळी; कीट. ३ आग- काडीला लावलेलें फास्फरस व गंधक यांचें पूट. ४ हुक्क्यांतील कोळशाचा गोळा, विस्तव. [फा. गुल्] सामाशब्द-गुल(ला) अनार-पु. १ डाळिंबीचें फूल; अनारकली. 'सखे गुलाअनार गुलचमन निशिचा रमण तसा गोजिरा तुझा मुखवटा ।' -होला १०४. २ डाळिंबी रंग. ३ एक झाड; गुलनार पहा. -वि. डाळिंबी रंगाची (शालजोडी, वस्त्र इ॰). [फा. गुल् + अनार् = डाळिंब] ॰कंद-पु. एक लेह; गुलाबाचा फुलांच्या पाकळ्या व खडी- साखर यांचें मिश्रण; गुलाबाचा मुरब्बा. ॰काडी-स्त्री. आग- काडी. ॰केश-पु. कोंबड्याच्या शेंडी-तुर्‍याप्रमाणें असलेलें फूल. ॰गुलाब-पु. गुलाबाचें फूल; गुलाब. ॰गेंद-पु. फुलाचा गुच्छ. 'संगीन कुच भरदार, सजिव सजदार, गुलगेंद उसासले ।' -प्रला ११३. ॰चनी-चिनी, गुलाचीन-स्त्री. फुलाची एक जात; गुलदावरी. ॰चांदणी-स्त्री. एक फूल. ॰चिमणी-स्त्री. पिंवळ्या पोटाची चिमणी (पक्षी). ॰छबू-ब्बू-पु. निशीगंध; हें झाड कंदापासून होतें. फुलें विशेषतः सांयकाळीं उमलतात, त्यांस फार मधुर वास येतो. फूल लांबट असून सफेत रंगाचें असतें व देंठ थोडासा वक्र असतो. -वि. मोहक चेहेरा असलेला (माणूस). [फा. गुलिशब्बो] ॰छडी-जाफिरी-स्त्री. एक प्रकारचें फूल. [फा. गुलिजाफरी] ॰जार-वि. १ नाजूक; सुंदर; मोहक; रमणीय. २ टवटवीत; प्रफुल्ल. ३ संपन्न; ऐश्वर्ययुक्त. 'बाच्छाई तक्त गुलजार दिसे रंगबहार पुण्याची वस्ती ।' -होला १७८. ४ आबाद. 'महाल उंडणगांव वगैरे महाल गुलजार दिले.' -रा ८.२१२. [फा. गुल्झार् = गुलाबांची बाग] ॰टोप-पु. १ एक फूलझाड; व त्याचें फूल. 'पर्यातक गुलटोप गुलगुलित जळीं कमळणवावरी ।' -प्रला १५५. २ कबूतराची जात. ॰तुरा- पु. १ (व.) शंखासुर नांवाचें फूलझाड. २ गुलमोहोर; यास पिवळ्या व तांबड्या रंगाचीं झुपकेदार फुलें येतात. फुलास वास नसतो. याचें मूळ काढ्यांत घालतात, लांकूड बळकट असल्यामुळें खुंटे करतात. 'डवना मरवा गुलतुरा । वाळागीर पडदे आणवा ।' -पला ४.२२. ॰दान-न. १ फुलें ठेवण्याचें पात्र. २ पेटलेला तोडा न विझतां ठेवण्याची लोखंडी पेटी. ३ कात्रीनें दिव्याची कोजळी काढण्याचें पात्र. 'गुलदानें रुप्याचीं' -पया २८७. 'गुल- दानांनीं गूल काढावे.' -पया २८७. ॰दावदी-री-ली-स्त्री. एक फूल व झाड. 'शरिर सुकुमार कीं गुलदावरी ।' -प्रला ११०. ॰नार-१ डाळिंबीचें फूल; गुलअनार. २ डाळिंबाची एक जात; हीस फक्त फुलें येतात, फळ धरत नाहीं. -कृषि ७०१. ॰फूल-न. गोजिव्हा; गुलेगोजबान. -मुंव्या १४०. ॰बदन-वि. गुलाबाच्या फुलासारखा सुंदर देह असणारी (स्त्री). -पु. १ तापत्यांतील (रेशमी वस्त्र) एक भेद, प्रकार; एक प्रकारचें कापड. 'दाविली कंचुकी गुलबदनी ।' -प्रला १४९. 'गुलबदनें रेशमी' -ऐटि ५.२३. २ एक रंग. ॰बस-बाशी, गुलबाक्षी-स्त्री. सांयकाळी फुलणारें एक फुलझाड. याचीं फुलें पांढरी, तांबडीं, जांभळीं वगैरे अनेक प्रकारचीं असतात. 'छतें आरशांचीं बशिवलीं रंग गुल- बासी ।' -प्रला ९२. -न. या झाडाचें फूल. -वि. या फुलाच्या रंगाचें. [फा. गुलि-अब्बास] ॰मखमल-पुस्त्री. एक फूलझाड व त्याचें फूल; गेंद; छेंडू. ॰मस-पु. रानटी पांढरें फूल व त्याचें झाड. ॰मेधी-मेहंधी-स्त्री. मेंदीचा एक प्रकार व त्याचें फूल ॰मोहोर-पु. १ एक फुलझाड. २ (शोभेची दारू) दारूच्या झाडाचा एक प्रकार. एका बांबूस १६ लोखंडी तारा बांधतात, शेंड्याला फुलबाजी व इतरत्र रंगीबेरंगी ज्योती बांधतात, (जळता) भुई नळा दाखविल्याबरोबर ४ मिनिटांत फटफट आवाज होऊन तारा पडतात.

दाते शब्दकोश

काळा

पु. १ (सांकेतिक) बिब्बा; भिलावा. २ (काव्य) श्रीकृष्ण; विठोबा. 'अपयशाचें खापर......त्या काळ्याच्या ढाळक्यावर फुटलें' -नामना १३. ३ काळसर्प. 'जागविला पुच्छीं त्वां देवुनि पद बहु सपूर्वफट काळा ।' -मोउद्योग १२. २१. --वि. १ कृष्णवर्ण; श्याम; काजळाच्या रंगासारखा; तशा रंगानें युक्त असलेला. २ कपटी. 'कृष्ण बाहेर काळा तसाच आंतहि काळा आहे.' -परिभौ २५. [सं. काल; फ्रें. जि. काळो, काळार्दी = जिप्सी माणूस; पो. जि. काळी; फा. कारा; सिं काला; का. करि] काळपूर्वपद असलेले रंग, वर्ण या अर्थांचें सामासिकशब्द- काळजिभ्या-वि. १ शिवराळ तोंडाचा; अनिष्ट बोलणारा; निमदळ; शिव्याशाप देणारा; अचकट विचकट बोलणारा. २ ज्याचें वाईट भाषण खरें होतें असा. ॰टिक्या- वि. १ काळे ठिपके असलेला (घोडा इ॰) घोड्याच्या ७२ अशुभ चिन्हांपैकी हें एक आहे. -मसाप २.५६. ॰तोंड्या- वि. १ दुर्दैवी; अपशकुनी; दुष्ट. २ लज्जित झालेला; गांगरलेला; खजिल. 'स्नेह कैसा सांडिला ध्रुवा आजी । काळतोंडा जाहलों जगामाजीं ।' -चिंतामणिकवी ध्रुवाख्यान. ३ (व.) ओठावर काळे केंस असलेलें(जनावर). ॰ळंदरा-ळुंद्रा-(शिवी) काळ्या उंदरासारखा काळा कुळकुळीत. ॰दांत्या वि. १ काळे दांत अस- लेला (कर्मविपाकावरून असला माणूस पूर्वजन्मीं मांग होता अशी समजूत आहे.) २ (ल.) अशुभकारक; अनिष्टदर्शक; अपशकुनी (माणूस). ३ (ल.) शिव्याशाप देणारा; शिवराळ; निंदक. ॰ळंबन-ळमन-स्त्रीन. अंधारलेली, सर्द हवा; पाऊस, थंडी यांनीं युक्त वांबाळी हवा. [कादंबिनी] ॰बुंडी-बोंडी जोंधळा- पु. जोंधळ्याची एक जात; याचें बोंड काळें असतें. ॰मांजर- पुन. कांडेचोर; ऊद. ॰मुखी-वि. १ काळ्या तोंडाचा; तोंडावर काळे केंस असलेला (घोडा), हा अशुभकारक समजतात. २ सामा- न्यतः काळ्या तोंडाचा. ३ (काव्य) दुष्ट; भयंकर; राक्षसी. 'नागविले प्रतापी थोर थोर । दशवक्त्र काळमुख ।' ॰मुखी गुंज- स्त्री. काळा ठिपका असलेली गुंज. ॰मुख्या-वि. दुर्दैवी; अभागी; अधम; नीच. ॰लोह-न. पोलाद; कालायस. 'काळलोहें डंव- चिलें । वज्रवाटीं बांधिलें ।' -शिशु ५०९. ॰वख-खा-खें-पुन. १ काळोख; अंधार (कांहीं ठिकाणीं चुकीनें काळवसें असा शब्द वापरलेला आहे). 'महामोहाचा काळवखा ।' -भाए १०२. 'कां काळ राहे काळवखा । तो आपणा ना आणिकां ।' -अमृ ४.३६. 'निद्रेचे शोधिले । काळवखें ।' -ज्ञा १२.४९. 'अविद्येचे काळवसे । समूळ गेले तेधवां ।' -भवि ९.१९६. २ काळेपणा; डाग. ॰वट-वि. १ काळसर. २ काळा; काळी (जमीन). [काळा + वत्] ॰वटणें-वंडणें-अक्रि. १ काळें पडणें; मलिन होणें; (ऊन वगैरे लागल्यामुळें शरीर इ॰) अपराध, भय यानीं चेहरा काळा ठिक्कर पडणें; काळानिळा पडणें; हिरवा निळा होणें. २ शेत पीक यांचा फिकटपणा जाऊन टवटवीत होणें; निसवण्याच्या स्थितीस येणें. ३ (काव्य) काळा पडणें. 'ग्रहणीं काळवंडे वासरमणि ।' 'चंद्रबिंब विटाळलें । गुरुद्रोहें काळ- वंडलें ।' -कथा १.२.१५०. ॰वटी-वण-स्त्री. काळिमा; डाग; कलंक; दोष. ॰वंडी-स्त्री. (कों.) कळवटणें, काळवंडणें पहा. ॰वत्री-वथरी-स्त्री. सह्याद्रींतील दख्खनमधील अग्निगर्भ काळा खडक; हा ज्वालामुखीच्या रसाच्या थरांतील उष्णता विसर्जन पावून झाला आहे. -सृष्टि ३८. ॰वदन-वि. काळमुखी (घोडा) पहा. -अश्वप ९४. ॰विद्रें-काळुंद्रा पहा. काळवें-(राजा. कुण.) संध्याकाळची काळोखी. ॰सर-वि. कळवट; किंचित् काळ्या रंगाचा. ॰सरणें-अक्रि. काळवटणें; काळवंडणें पहा. ॰सावळा-वि. काळासावळा; साधारण काळा. (रंग). काळा-नें आरंभ होणारे शब्द (वाप्र.) काळ्याचे पांढरे होणें-एखाद्याचे काळे केस पांढरे होणें; म्हातारपण येणें. पांढर्‍याचे काळे होणें-म्हातारपणांत तरुणपणाचे चाळे करणें; सचोटी सोडून देणें. काळ्या डोईचें मनुष्य-न. (जेव्हां इतर जिवांपेक्षां (प्राण्यांपेक्षां) माणसाची अद्भुत शक्ति वर्णाव- याची असते अशावेळीं हा शब्द माणसास लावतात). काळ्या दगडावरची रेघ-(वाप्र.) टिकाऊ; अक्षय्य; अबाधित अशी गोष्ट; उक्ति; न बदलणारी गोष्ट. 'ही आपली माझी काळ्या दगडावरची रेघ.' -तोबं १७९. सामाशब्द- ॰अबलख-वि. पांढर्‍या अंगावर काळे ठिपके असणारा (घोडा). ॰अभ्रक- पु. काळ्या रंगाचा अभ्रक. ॰आजार-पु. हा भयंकर रोग आसाम व मद्रास इलाख्याच्या एक भागांत होतो. यानें यकृत व प्लीहा फार वाढतात आणि रोज ताप येतो. ॰उन्हाळा-पु. १ अत्यंत कडकडीत उन्हाळा; यामुळें सर्व सृष्ट पदार्थ रखरखीत भासतात. २ कठिण, आणीबाणीची, टंचाईची वेळ; आयुष्याच्या भर- भराटीच्या साधनांचा अभाव. 'तूं काळ्या उन्हाळ्यांत मजजवळ पैका मागतोस काय?' ३ चैत्र व वैशाख हे दोन महिने. ॰उंबर- पु. उंबरे झाडाची एक जात. ॰कभिन्न-कभीन-वि. अत्यंत काळा; लोखंडासारखा काळा. [सं. काल + का. कब्बिण्ण = लोखंड] ॰किट्ट-कीट-कुट्ट-कुळकुळीत-मिचकूट- वि. अतिशय काळा. (किट्ठ, कुट्ठ वगैरे शब्द जोर दाखवितात). लोखंडासारखा किंवा शाईसारखा काळा. काळा जहर पहा. 'हा अमावास्येचा । काळाकुट्ट अंधार' -चंद्रग्र २. ॰कटवा-पु. काळा तीळ. ॰करजत-करंद-वि. काळाकभिन्न. ॰करंद- फत्तर-पु. काळा दगड. 'कृष्णवेणीचें पाणी काळाकरंद फत्तरांतून उसळ्या मारीत' -खेया २९. ॰कुडा-पु. कुड्याच्या झाडांतील एक जात. दुसरा तांबडा कुडा. [सं. कुटज; बं. कुटराज; हिं. कुडा, कौरेया; गु.कडी] ॰कुमाईत-वि. काळ्या रंगांत तेल्या रंगाची झांक असलेला (घोडा.) ॰क्रूम-पु. (चांभारी) विशिष्ट पद्धतीनें कमावलेलें काळें कातडें. ॰खापर-वि. खापरासारखा काळा. ॰गरु-पु. काळ्या रंगाचा अगरु, धूप. 'तत्काळ काळागरु धूप दावी ।' -सारुह ८.७९. ॰गवर-पु. एक शक्तिवर्धक वनस्पति. ॰गहिरा-वि. काळा कुट्ट. ॰गुगळी-पु. गुगळासारखा काळा मासा. ॰गुरा-पु. एक लहान झाड. ॰गोरा वि. १ काळा व गोरा. २ खराखोटा; शुद्धाशुद्ध. ॰चांफा-पु. चाफ्यांतील एक भेद. ॰चित्रक-पु. चित्रक (एक औषधी) झाडाची एक जात. काळचो-पु. (गो.) नीच मनुष्य. -ळांजनी-वि. एकरंगी असून डाव्या खाकेच्या जवळ किंवा छातीवर काळा ठिपका असलेला (घोडा) यामुळें धन्याला मृत्यु येतो अशी समजूत आहे. अश्वप ९६. ॰जहर-ठिक्कर-ढोण-वि. काळाकभिन्न. ॰डगलेवाला- पु. पोलीसचा शिपाई. ॰तित्तर-तीतर पु. रंगीबेरंगी तितर पक्षी. ॰तीळ-पु. कारळा तीळ पहा. ॰दगड-पु. काळवत्री- वथरी पहा. ॰दाणा-पु. एक वेल; हिचें कांडें व शाखा यांवर बारीक कुसें असून पानें कपाशीसारखीं असतात. फुलें फिकट, निळ्या रंगाची घंटेच्या आकाराचीं, व मोठीं असतात. फळ नरम असून आंत तीन पुडें व त्यांत काळें बीं असतें. याचा औषधाकडे उपयोग करतात. -वगु ७.१. [सं. कृष्णबीज, नीलपुष्पी] ॰धोतरा-पु. काळसर-जांभळट धोतर्‍याचें झाड. ॰निळा-वि. काळासांवळा (रंग, चेहरा). ॰फत्तर पु. १ काळवथरी दगड. २ (ल.) अत्यंत मूर्ख; अडाणी माणूस. ॰बगळा-पु. काळ्या पाठीचा बगळा. ॰बाळा-बाहाळा-वि. फिकट काळे किंवा काळे व पांढरे पट्टे अंगावर असलेला (पशु.) ॰बेंदरा-बेंद्रा- वि. काळा व हेंगाडा; विद्रूप. 'मी चांगट फांकडी रूपानें तूं काळा बेंदरा' -पला ५. [काल + हेंदर]? ॰बेरा-वि. काळाबेंदरा (अंगाचा वर्ण, स्वरूप, कपडालत्ता वगैरे). ॰बोळ-पु. बाळंत- बोळ; एका झाडाचा वाळलेला चीक. हा मुलांच्या पोटदुखीवर उपयोगी आहे. ॰भिल्ल-भील-मांग-वीख-वि. काळाकभिन्न. ॰भोपळा पु. भोपळ्याची एक जात; तांबडा भोपळा; गंगाफळ. ॰माजा-पु. मायफळ; माजूफळ. ॰मासी-पु. पित्तपापडा. ॰मुरूम-पु. काळ्या रंगाचा मुरूम. ॰शेंगळ पु. काळ्या रंगाचा एक मासा. ॰सावळा-वि. केवळ काळाहि नाहीं व केवळ गोराहि नाहीं असा (रंग, रंगाचा); साधारण काळा. [सं. काल + श्यामल] ॰सावा-पु. साव्याची काळी जात. ॰सुरमा-पु. डोळ्यांत घालावयाचें एक अंजन; (ब्लॅक सल्फेट ऑफ अँटिमनी). काळें उडीद-पुअव. माष; एक द्विदल धान्य. ॰केस-पुअव. (ल.) तारुण्य व त्यांतील खुमखुमीचा काळ; याच्या उलट पांढरे-करडे केश. ॰तीळ पुअव. काळ्या रंगाचे तीळ, श्राद्धपक्ष, श्रावणी वगैरे कार्यांत उपयोगी पडणारे तीळ. काळेला-रा- वि. काळसर वर्णाचा. काळ्या पाठीचें खोबरें-न. ज्या खोब- र्‍याची पाठ काळी असतें तें, ही खोबर्‍याची एक जात आहे. काळीनें आरंभ होणारे शब्द. काळी-वि. १ रंगानें काळी (स्त्री, मादी वगैरे). स्त्री. -स्त्री. म्हैस (कारण ती रंगानें काळी असते) ज्याचे घरीं काळी त्याची सदा दिवाळी ।' म्ह॰ (व.) काळीकाळीउंदर तिचा सैपाक सुंदर-काळ्या स्त्रीस चढविण्या- साठीं म्हणतात. सामाशब्द- ॰काठी-स्त्री. एक औषधी झुडूप. ॰कांब-१ काळ्याकुट्ट ढगांची रांग. (क्रि॰ येणें; जमणें; उठणें; विरणें; फाकणें). २ (ल.) काळ्या रंगाच्या कुण- ब्यांची (जेवण वगैरेस बसलेली) पंगत. ॰खजुरी-खजूर-खारीक-स्त्री.एक औषधोपयोगी रानखारीक. ही कडू, अग्नि- दीपक व ज्वरनाशक आहे. ॰गुळी-स्त्री. काळा रंग तयार कर- ण्याच्या कामीं उपयोगांत येणारी नीळ. ॰घेटूळ-टोळी-स्त्री. घेडूळचीच एक काळी जात. ॰चंद्रकळा-स्त्री. काळें लुगडें; याचें उभार व आडवण सर्व काळें व किनार कोणत्याहि तर्‍हेची असतें. ॰जिरी-स्त्री. कडू कारळी. ॰तुळस-स्त्री. काळ्या पानांची व मंजिर्‍यांची तुळस; कृष्णतुळस. ॰तेरी-स्त्री. काळ्या रंगाचें अळूं; हें मुळव्याध नाशक, अग्निदीपक, व शौचास साफ करणारें आहे. -योर १.४७. ॰धार-वि. दृश्य क्षितिज; समुद्रांत पहात असतां ज्यापुढें दृष्टी पोंहचत नाहीं तो मर्यादाप्रदेश. -शास्त्रीको. 'त्याची हद्द काळेधारेशीं लागलेली आहे.' -बाळ २.११८. ॰पानवेल-स्त्री. काळ्या रंगाच्या विड्यांच्या पानांची वेल; हिचें पान स्वादिष्ट परंतु तिखट असतें. ॰प्रजा-स्त्री. १ सामान्यपणें मजूरवर्ग. २ बडोदें संस्थानांतील भिल्लासारखी एक जात; (गु.) काली परज. ॰भिंत-स्त्री. उत्तरदिशेस जेथपर्यंत मनुष्याचें गमन होतें तेथील सीमाप्रांत. -शास्त्री. ॰भोपळी-स्त्री. काळ्या भोपळ्याचा वेल. ॰माशी वि. १ मोठी, काळ्या रंगाची, व्रण, क्षत, मेलेलें जना- वर यांवर बसणारी माशी. २ एका जातीचें गवत. ॰मिरची-स्त्री. १ (हिं.) काळ्या मिरच्या येणारी मिरचीची एक विशिष्ट जात. २ काळीं मिरें. ॰मुष्ठी-स्त्री. जारणमारणांतील मूठ (मार- ण्याची). 'काळामुष्ठीची बाधा होतां ।' -नव ६.१५२. ॰मुसळी- स्त्री. एक औषधी वनस्पति व मुळी; मुसळीची काळी जात. ॰रात्र-शिळी रात्र -स्त्री. १ भयंकर रात्र; भयाण रात्र. 'ही काळीरात्र चालली आहे मी खोटें बोललों तर पाहून घेईल.' [काळ + रात्र] २ हा शब्द क्रियाविशेषणासारखा सप्तम्यंत करूनहि योज- तात. जसें:-काळ्याशिळ्या रात्रीं. जास्त माहितीसाठीं बंद खालील भरल्या बंदाखालीं बसणें पहा.३ अमावस्या, मध्यरात्र, अशुभ भाषण, भूतपिशाच्चाचें आगमन (असत्य भाषण व शपथ यांखे रीज) वगैरेसंबंधानेंहि सामान्य रात्रीस हा शब्द लावितात; अरिष्टसूचक रात्र. ॰वसू-स्त्री. एक औषधी वनस्पति; हिचा दुसरा प्रकार पांढरी वसू. ॰वेल-स्त्री. गुरांच्या रोगावर उपयोगी पडणारी एक वेल. ॰साळ-स्त्री. काळ्या रंगाची साळ किंवा भात. काळेंनें आरंभ होणारे शब्द - काळें-न. १ डाग; कलंक; काळिमा; अपकीर्ति. [काळा] (वाप्र.) काळें करणें-तोंड काळें करणें; तोंड लपवून जाणें; दृष्टिआड होणें, फरारी होणें (दोष, अपराध वगैरेमुळें). 'जा कर काळें ।' -कमं २. ॰तोंड घेऊन जाणें-पळून जाणें; पोबारा करणें. 'काळें तोंड घेऊनि । गेला नेणो कोणीकडे ।' सामाशब्द- ॰अळू-न. काळी तेरी पहा. ॰अक्षर-न. कागदावर लिहिलेलें मनोगत, अक्षरें, लेख, पत्र इ॰; यच्चयावत् अक्षरमात्र-शास्त्रीको. 'हा पंडित काळ्या अक्षरांचा अर्थ करील.' ॰कमळ-न. हें हिमालय पर्वतावर बर्फांत उत्पन्न होतें. याला एक हजार पाकळ्या असून त्यांचा घेर एक हातभर असतो -तीप्र ४१. ॰कृत्य-न. कृष्ण कारस्थान; अन्याय. ॰खापर-न. अतिशय काळा माणूस. अपकीर्ति, बद- नाम झालेला, पराभव झालेला, आजारानें कृश, अशक्त झालेला माणूस. ॰गवत-न. एक प्रकारचें गवत. ॰जिरूं-जिरें-न. १ कडू कारळें. २ शहाजिरें [हिं. काली जिरी, सं. कालाजीरक] ॰ढवळें-न. १ संशय; शंका; अनिष्ट कल्पना; अंदेशा. २ काळें बेरें पहा. ॰तेरें-न. काळी तेरी, काळें अळूं पहा. ॰तोंड-पु. स्वतः पासून पुढील पांचवा वंशज (आपल्या पणतूचा मुलगा). -वि. लाजिरवाणीं कृत्यें केल्यानें कलंकित झालेलें तोंड. 'तुझें काळें तोंड दृष्टीआड कर.' ॰थर-वि. काळ्या रंगाचा थर; कार दगड किंवा काळवथरी धोंडा ॰द्राक्ष-न. एक प्रकारच्या काळा मनुका. ॰पाणी-न. १ महासागर. २ अकालीं किंवा अतिशय पडलेल्या पावसाच्या पाण्याचा दोष घालविण्यासाठीं बागेस दिलेलें विहिरीचें पाणी. ३ (ल.) हद्दपारीची शिक्षा व ती भोगाव- यांचें ठिकाण (ही शिक्षा झालेल्या इसमास हिंदुस्तानाबाहेर अंद- मानांत ठेवतात). 'अखेरीस जाल काळ्या पाण्यावर चांगले' -भा १०४. ॰पान-न. काळ्या पानवेलीचें विड्याचें पान. ॰बुबुळ-न. डोळ्याचा काळा भाग (बाहुली व कनीनिका). ॰बेरें-भेरें-ळें-न. १ अनिष्ट संशय; वाईट आकांक्षा; अनिष्ट कल्पना; कुशंका; कपट. (क्रि॰ येणें.) 'हें काळेंबेरें तुझ्या मनांत कोठून आलें?' -गीर ६१२. २ लुच्चेगिरी; डावपेंच; कारस्थान; गिळंकृत करणें; दडपादडपी. ॰भिवरी-स्त्री. काळवथरी पहा. ॰मांजर-नपु. कांडेचोर; ऊद. ॰मिरें-न. काळ्या रंगाचें मिरें. 'मिरूं पहा. ॰मीठ-न. १ पादेलोण. २ खार्‍या माती- पासून उत्पन्न केलेलें मीठ. -रें-न. कडू कारळें.

दाते शब्दकोश