तेरा मराठी शब्दकोशांमधील ३,००,८७५ शब्दांचा एकत्रित संग्रह
शब्दार्थ
रकम
रकम rakama f ( A) An item or article (of an account). 2 An amount or a sum (of money). 3 An appointed quantity; an allowance; a dose. रकमेस आणणें To bring up to a good amount; to make a saleable (i. e. remunerative or profitable) article (of any piece of merchandise). And रक- मेस येणें To come up to a good amount. 2 To come into calculation; to be reduced to a definite estimate;-used of a trade, and, thence, of any transaction, occurrence, or person.
रकम f an item. A sum. An appointed quantity.
रक्कम; रकम
(स्त्री.) [अ. रकम्] द्रव्यसङ्ख्या; ऐवज़; कलम; लेख; पत्रिका. “पेशावरचे सुभेदारास रक्कम सादर जाली कीं पुलाची तयारी करविणें” (दिमरा २|५७).
रकम, रक्कम
स्त्री. १ हिशोबाची बाब; कलम; गोष्ट; अंकराशि. २ खूण; चिन्ह; हस्ताक्षर; लेख. ३ (व.) जात; प्रकार; तऱ्हा. ४ चीजवस्त; डाग; दागिना. 'चांदीच्या रकमा एकशेर आदपाव वजनाच्या...' -विक्षिप्त १.११. ५ विशिष्ट द्रव्यसंख्या; परिमित द्रव्य; ऐवज. ६ पोटगी; भत्ता; खर्ची. ७ कोणत्याहि पदार्थाचें विशिष्ट प्रमाण. ८ तह, ठराव, करार वगैरेचें कलम. -पया ३२०. [अर. रक्म्] रकमेस आणणें-मोठा ऐवज करणें; किंमतदार बनविणें; वस्तु फायदेशीर करणें. रकमेस येणें-१ किंमतवान होणें; मूल्यवान होणें. २ (ल.) जेर येणें. 'तो इतका उद्दाम घोडा होता पण त्या चाबुकस्वाराचे हातीं जातांच दोन दिवसांत रकमेस आला.' ३ हिशेबांत धरण्याइतकी किंमत येणें; व्यापार, देवघेव, अगर व्यवहार वगैरेची किंमत निश्चित होणें; मूल्य ठरविण्याइतकें निश्चित स्वरूप प्राप्त होणें. ॰पात-स्त्री. दागदागिने. 'शिरसाळकर व वालूजी हुजऱ्या हे माझे घरी जाऊन माझी रकमपात घेऊग गेले. ' -विक्षिप्त २.७९. ॰बंद-वार-क्रिवि. एकेक बाब घेऊन; कलमवार; अंशाअंशानें. रकमाला-पु. १ बाबींची, जिनसांची यादी; वस्तूंचा हिशेब. २ जमाबंदी; जमीनमहसूलाचें हिशेबपत्र; राजलेख. -राव्य ९.२५. ॰रकमी-वि. १ ठराविक; निश्चित; कायम (जमाबंदी). २ कलमी. रकमेरकमेचा-वि. (ना.) तऱ्हेतऱ्हेचा.
रकम / रक्कम
(आ) स्त्री० ऐवज, जमा, हंशील. २ क्रम. ३ कलम. ४ चीज, जिन्नस, वस्तु.
संबंधित शब्द
सोड
स्त्री. १ कर्ज इ॰ ची सूट; अशी सूट दिलेली रकम. २ मोकळीक देणें; अटकाव करतां जाऊं देणें; उपेक्षेची मोक- ळीक; सवलत; मुक्ताता; ३ परवानगी. ४ काडीमोड; सोडचिठ्ठी (लग्नाची). [सोडणें] ॰खत-चिठ्ठी-पत्र-स्त्री. १ सोड- णुकींचे पत्र; सांडखत; आपल्या मालकींतून सोडलेल्या (गांव, शेत, किल्ला इ॰ च्या) वस्तूच्या मोकळिकेविषयीचें आज्ञापत्र; सांड- पत्र; सूटपत्र. २ ज्यावरून कोणी मनुष्य आपला विवाहित संबंध तोडतो असा लेख. ॰धांव-स्त्री. (उद्योग धंदा) सोडून, निघून जाणें; टाकून, पळून जाणें; धरसोड करणें. ॰पेंढी- स्त्री. मोठ्या (गवत इ॰ च्या) भार्यांतून विक्रीसाठीं बांधलेली लहान पेंढी. ॰बांध-स्त्री. १ वरचेवर मोकळें करणें व बांधणें. २ असल्या प्रकरचा धंदा, नोकरी. 'घोड्यांची सोडबांध मजकडे होती, आंता निराळा घोडक्या ठेवला.' ॰मुंज-स्त्री. मुलाच्या उपनयनाचे वेळीं त्याचे कमरेस जी मुंज (गवताची दोरी) बांधलेली असते ती सोडण्याचा विधि; गृहस्थाश्रमांत प्रवेश करण्याची मोकळीक; समावर्तन संस्कार. ॰मोकळ-स्त्री. १ सोडून मोकळें करणें (गवताचा भारा इ॰). २ काम इ॰ ची साधारण मोकळीक; सोडवणूक; पशु, नोकर इ॰ वर फारसा दाब न ठेवणें. (क्रि॰ करणें; देणें). ३ कर्ज; सारा इ॰ पैकीं कांहीं रकम सोडून देणें. ४ सोडमोकळीक; विसकटलेली; मोकळीक दिलेली, विसाव्याची, फुरसतीची स्थिति. ॰वण-वणी-वणूक- स्त्री. १ मुक्तता; मुक्त होणें; मुक्ततेची स्थिति; मोकळीक; स्वतंत्रता; सुटका. २ मुक्ततेचा कोणताहि उपाय. ३ पळवाट; छिद्र; अपवाद. ४ सोडवणी; मळ्यांतील पाटांतून वहाणारें पाणी (शेलण्यानें शिंपडलेलें नव्हे). ॰व(वि)णें-१ जाऊं देणें; सुटे असें करणें; मोकळें करणें; बंधमुक्त करणें. २ कांहीं प्रसंगीं भिंतीवर चित्रें, रांगोळी, आकृति; प्रतिमा इ॰ काढणें; रेघोट्या ओढणें. ३ मालकाडून काढून घेणें. ४ गूढ, उखाणा इ॰ उक- लणें. ५ (गणित) प्रश्नाचें बरोबर उत्तर देणें. ॰वून ठेवणें- हातचा राखून ठेवणें; पळवाट काढून ठेवणें; सुटण्याच्या उपा- याची तरतूद पूर्वींच करून ठेवणें. ॰सांड-स्त्री. कर्ज इ॰ ची सूट; या सुटीची रकम. सोडण-न. १ (कों.) नारळाचें चोड; नारळावरील तंतुमय आवरण. २ (ल.) हट्टी; चिकट माणूस. सोडणी-स्त्री. १ सोडवणूक. २ (ल.) मोक्ष. -ज्ञा १८.४४. सोडणूक-स्त्री. १ मुक्तता. २ ताटातूट; वियोग; संबंध सोडणें. ३ जाऊं देणें. ४ पळवाट; सुटण्याचा मार्ग. सोडणें-उक्रि. १ मोकळें करणें; खुलें करणें; बंधन, करार यांतून मुक्त करणें; वचक, घोटाळा, त्रास; संकट यांतून वांचविणें. २ वेगळें, विभक्त होणें; ताटातूट करणें; गांठ, बंधन इ॰ खुलें करणें; उलगडणें;संबंध, जोडणी, मांडणी इ॰ विजोड करणें. ३ सामन्यतः जाऊं देणें; असूं देणें; राहूं देणें; सूट (कर्ज, दोष) देणें; सोडून देणें; हात काढून घेणें; मुक्त, सहन, माफ, क्षमा करणें; शरण येणें; टाकणें; फेकणें; ओतणें; गाळणें; निथळणें (घाम, इ॰); शिलगाविणें (तोफ, बंदूक इ॰); सुटणें पहा. ४ धावविणें; पळविणें; दमविणें (घोडा, इ॰). ५ कोणत्याहि धातूच्या ऊन प्रत्ययांत रूपापुढें हें क्रियापद योजल्यास ती क्रिया पूर्णपणें करणें असा अर्थ होतो. टाकणें पहा. उदा॰ करून सोडणें; देऊन सोडणें इ॰ ६ प्रगट करणें. 'विश्वविकासित मुद्रा । जया सोडी तुझी योगनिद्रा ।' -ज्ञा १७.१. म्ह॰ (व.) सोडला तर पळतो, धरला तर चावतो (साप). दुष्टाशीं निकट संबंध ठेवल्यास आपली इज्जत घेतो, न ठेवल्यास तो शेफारतो. [सं. छोरणम्]
शिलक-शिल्लक
स्त्री. बाकी; खर्च वजा जातां उरलेली रकम; अवशेष; शेष (द्रव्य, धान्य, पदार्थ वगैरे). [अर. सल्ख्] ॰झाडा-पु. हिशेब, जमाखर्च पुरा होऊन काढलेली बाकी. (क्रि॰ काढणें; उतरणें). ॰बंद-पु. ज्या कागदावर जमाखर्च लिहून शिलक काढतात तो कागद; आढावा; हिशेबपत्रक; जमाखर्चाचा तक्ता. ॰बाकी-स्त्री. हिशोब पुरा होऊन राहिलेली रकम. ॰साखळी- स्त्री. १ दररोज किंवा महिनेवार हिशेब पुरे करून काढीत आण- लेली बाकीची परंपरा. २ जमाखर्च तपासून काढलेला पडताळा; जमाखर्चाची तपासलेली तोंडमिळवणी; बिनचूकपणा, हिशेबाची खात्रीशीर मिळवणी. (क्रि॰ मिळविणें; नेसवणें; मिळणें; जमणें). शिलका-वि. शेलका; निवडक; उत्तम; सुंदर; वेचक. शिलकी- वि. १ राहिलेला; बाकी; उर्वरित. २ संग्रहांतील; जपून ठेवलेला; राखीव. ॰डागिनें-पुअव. राखीव, उत्तम, उत्कृष्ट पदार्थ, वस्तु, वस्त्र-पात्र, अलंकार वगैरे.
यशोधन
न. पतीबद्दल रकम; साकदाम; धंदा विक- तांना घ्यावयाची रकम. 'लोकशिक्षण मंडळी लि. करतांना आपण यशोधन काय घेतलेंत ?' -महाराष्ट्र मार्च ४२. [सं.]
आइन
कायदेबाज; कायदेपंडित; कायद्याच्या ज्ञानाचा फायदा घेऊन दुसऱ्यास फसविणारा. ॰नर्तन वर्तन -न. जमिनदारास इनामगांवच्या उत्पन्नांतून मिळणारी ठराविक विशेष बाब, रकम.
अमर्याद
वि. १ (लोक, शास्त्र इ॰ च्या) मर्यादेच्या किंवा योग्य सीमेच्या पलीकडे गेलेला: ठराविक मर्यादा उल्लंघन करणारा; स्वैर; स्वेच्छाचारी; मोकाट; अव्यवस्थित; (ल.) फंदी; अनाचारी; चैनी. २ अतिशय; अत्यंत; प्रमाणाबाहेर; बेसुमार; कल्पनेच्या- आटोक्याच्या बाहेर; विपुल (क्रिया, रकम, गुण, इसम वगैरे.) [सं. अ + मर्यादा]
अंत
पु. १ शेवट; निकाल; परिणाम. २ मृत्यु; मरण. 'आतां असे अंत समीप आला ।' -सारुह १.१८. ३ (वैद्यक- निदान) रोगाची पांचवी अवस्था; प्रकार; निकाल. (रोगांतून उठणें किंवा मरणें). ४ (गणित) श्रेणीची शेवटची रकम; पद. ५ (ल.) शेवट; ठाव; खोली; तळ. 'ह्या विहिरीच्या पाण्याचा अंत लागत नाहीं.' ६ अवसान; अंतिम स्वरूप; कठिण परीक्षा; कसोटी. 'कोणाचा अंत पाहिल्यावांचून देव कोणावर कृपा करीत नाहीं.' 'इतका वेळ माझा कां अंत बघायचें झालें ?' -बाय २.४. ७ कर्तृत्वाची पराकाष्ठा; सीमा; दम; तथ्य. 'ह्या धोतरांत आतां कांहीं अंत राहिला नाहीं.' 'त्या घोड्याचा अंत पाहून दाहा कोस न्या.' ८ समाप्ति; पूर्णपणा. 'माझा ग्रंथ अद्यापि अंतास गेला नाही.' ९ कड; तीर; टोंक. उ॰ वनान्त; वस्त्रान्त. ॰पाहाणें-कसाला लावणें; छळणें; गांजणें; निघेल तितकें काम काढणें. 'धाव रे रामराया किती अंत पहासी ।' -रामदास. ॰पुरणें-काल समीप येणें. मरण ओढविणें. 'माझा तों पुरलासे अंत । ' -ह ३१.२२०. ॰लागणें-सर्व समजणें; अखेर सांपडणे; शेवट दिसणें; ठाव लागणें. अंताला लागणें-शअ. व्यवस्थित पार पडणें. शेवटास जाणें. 'हें कार्य एकदांचें अंताला लागलें.'
अवधि
स्त्री. कालमर्यादा. [सं. ] ॰अरवार -न. मुदत गहाण; व्याजाकरितां ठरलेल्या मुदतीपर्यंत जमिनीचा उपभोग घेण्याच्या करारानें ठेवलेलें गहाण. भोगवट्यास दिलेलें ताबें गहाण. ॰क्रय -पु. ठरलेल्या मुदतींत रकम परत केली नाहीं तर गहाण जमीन खरेदी समजावयाची असा गहाणाचा प्रकार
आयन-इ-मइमूम
पु. रकम परत करावयाच्या गहाणवट वस्तु. [अर.]
बाब
(आ) स्त्री० भाग, रकम. २ काम, काज. ३ कर.
बाब; बाबत
(स्त्री.) [अ. बाब्] रकम; कलम; गोष्ट. त्याबाबत=त्यासम्बन्धी. बाबत्वार कलम्वार. बा-यक्-दिगर एकमेकांशीं. “बा-यक-दिगर मन्सबा करूं लागले कीं” (साने-पयाव ४७३).
बकाया
पु. शेष; बाकी; येणें असलेली बाकी रकम. 'फीचा पांच आणे बकाया मजकडेस आहे.' [हिं]
बुर्द
(पु.) हिंदी अर्थ : मुफ्त में मिलनेवाली रकम. मराठी अर्थ : फुकट मिळालेलें धन.
भेंडा
पु. १ (इमारतीच्या उपयोगाची) मातीची कच्ची वीट; मातीचें ढेकूळ. 'संसप्तकांत झाला मग्न जसा सागरोदरीं भेंडा ।' -मोकर्ण ३०.२७. २ घोड्याच्या गुडघ्यावर होते ती गांठ; भेंडी. ३ मुद्दल तुंबून फुगलेली रकम; ढीग (व्याज, कर्ज इ॰ची). (क्रि॰ जमणें; करणें; घालणें; असणें; वाढणें; फुगणें; फेडणें; फिटणें).
दखलबाद
दखलबाद dakhalabāda a ( & A Esp. in official papers.) Known unto; come within the experience or knowledge of. 2 Comprised or included;--used with such words as -कलम-जमा-खर्च-जमाखर्च-मजकूर- रकम.
धारा
पु. १ (भाडें, विक्री. चाकरी, धंदा इ॰ व्यवहारा- विषयींचा) संप्रदाय, शिरस्ता, वहिवाट, नियम. 'शिवाजी महा- राज यांचे वेळचे धारे यांनीं राज्य चालवावें.' -मराचिथोशा ३२. 'दहा कोसांस एक रुपया द्यावा असा आमच्या गांवांत भाड्याचा धारा पडला आहे.' २ (शेत जमीन, बागाईत इ॰ कांवरील) सरकारी कर, वसूल, सारा. [सं. धृ; म. धारा; प्रा. धार. हिं धारा; गु. धारो] सामाशब्द- ॰करी-पु. धारेकरी पहा. [धारा + कर] ॰पेंडोळा-पु. १ (व्यवहारांतील, बोली करण्याचा, मोल ठर- विण्याचा) नेहमींचा, साधारणपणें पडलेला शिरस्ता, वहिवाट, नियम. २ पूर्वापार, परंपरागत पद्धत, वहिवाट. 'शेतीचा धारापेंडोळा त्या कुणब्यानें मिळविला.' ३ (ल.) कुटुंबाचा वंश- परंपरागत लौकिक, सोयरीकसंबंध, लागाबांधा इ॰. (क्रि॰ मिळणें, पटणें, लागणें, मिळवणें, दाखविणें, लावणें). 'तुमचा आमचा धारापेंडोळा मिळाला म्हणजे मुलगी देईन.' [धारा = सरकारी सार्याची रकम + पेंडोळा = शेतीची मर्यादा, बांध] ॰सभा-स्त्री. (गुं.) कायदेमंडळ; कायदेकौन्सिल. 'या गार्हाण्यांची दाद लाव- ण्याच्या त्या कालच्या मार्गाचेच हल्लींच्या काळीं न्यायखातें, धारा सभा असें भाग पडलें आहेत.' -पार्ल १५. [धारा = नियम + सभा; गु. धारासभा] ॰धारेएहसान-न. सरकारनें कृपेनें कमी केलेला सारा. [धारा + अर = इहसान् = कृपा, उपकार] धारेएहसानी-वि. जीवरील सारा कमी केलेला आहे अशी (जमीन इ॰). [धारे एहसान] धारेकरी-पु. ज्याला सरकारसारा भरावा लागतो असें कूळ; धार्यानें जमीन घेणारा; इजारदार. यास खरेदी, विक्री, गहाण इ॰ कांचे सर्व हक्क असतात. खोती गांवांत खोतातर्फें धारे करी धारा भरतो. धारेकरी खोतास नफा देत नाहीं. धारे पेंडोळेंन. धारापेंडोळा पहा. धारेबंदी-स्त्री. सरकारी शेतसारा ठरविणें.-वि बांधलेल्या, ठरींव धार्याचें शेत, कुळ. [धारा + बंदी] धारेमाप-न. ऐनजिनसी सारा घेण्याचें सरकारी माप. [धारा + माप]धारेशुद्धि-वि. धार्याला, वहिवाटीला धरून असलेलें; कायदेशीर; रीतसर असलेला. [धारा + शुद्ध = बरोबर]
एकमुस्त
क्रिवि.एकमुठी; एकदम; एकरकमी. 'सर्व रकम एकमुस्त पाठविली असती तर पेटीच्या मालकांसहि अंदेशा आल्यावांचून राहिला नसता.' -श्रमसाफल्य ५.३. [एक + मुस्ता]
एकमुस्त
क्रिवि. एकमुठी; एकदम; एकरकमी :‘सर्व रकम एकमुस्त पाठविली असती तर पेंटीच्या मालकांसहि अंदेशा आल्यावाचून राहिला नसता.’ - श्रमसाफल्य ५·३. [फा. यकमुश्त]
एकरकम
स्त्री. निरनिराळ्या बाबींची एकत्र बेरीज. [एक + रकम]
एकरकम-रकमी
क्रिवि. एकदम; एका रकमेनें; एकमुठी; एकठोक. 'एकरकमी पुष्कळ पैसा मिळण्यास देशांतरीं फिरल्या- शिवाय इलाज नाहीं. -माप्र ९. [एक + रकम]
गुजारत-ती
स्त्री. १ मार्फत; द्वारभूतता; मध्यस्थी (माण साची). 'तेंही...निळो कृष्ण यांचे गुजारतीनें विदित केलें कीं' -इमं १३१. २ (सावकारी) कायदेशीर विद्यमानता; समक्षता; साक्ष. 'मी खर्या माणसाच्या गुजारतीनें तुला रुपयें देईन.' ३ (जमाखर्च) खर्डा, कीर्द इ॰त अमुकाचे गुजारतीनें (कडोन, मार्फत या अर्थीं) गुजारत अमुक असें लिहितात. 'अ कडोन आपली रकम येणें होती ती अच्या पत्रावरून बनें क बरोबर पाठ विली, तर या रकमेस ब ची गुजारत व क ची हस्तें लिहावीं.' ॰वार-क्रिवि. गुजारतीसह; कायदेशीर साक्षीसह. जसें-गुजार- तवार अर्ज्या-पावत्या-तपासणी-वसूल-पटी. ॰हाय-स्त्रीअव. (सावकारी) कायदेशीर साक्षी. [गुजारत + हाय, अव. प्रत्यय]
हुंडी
स्त्री. १ परस्थळीं पैसे पाठवावयाचे असतां आपल्या ठिकाणच्या सावकारच्या दुकानीं सदर रक्कम व वरखर्च इ॰ साठीं थोडेसे पैसे दिले असतां तो दुसर्या ठिकाणच्या साव- काराला सदर रकम देण्याबद्दल देतो तें पत्र. २ (ल.) अवि- वाहित मुलगी. ३ (ल.) देशांतरी गोत्रज मरण पावल्याबद्दलचें वर्तमान, पत्र इ॰; त्याच्या मरणानें आलेलें आशौच [सं. हुड् = स्वीकारणें ? हिंदी हुंडी] ॰लावणें-देणें-हुंडीपत्र नेऊन देणें. ॰चिट्टी-पत्र-स्त्रीन. हुंडीचा कागद; हुंडी अर्थ १ पहा. ॰पांडी-स्त्री. (सामान्यतः) हुंडी-पत्र इ॰ कागद. हुंड- णावळ, हुंडावण-स्त्री. हुंडीबद्दलचा बट्टा; कमिशन; बटाव. [हिं.]
ईरकामणे
क्रि. रक्कम लिहिणे : ‘ खुशनुदी ईरकाम करीत गेले पाहिजे.’ − आंपव्य ५७ [फा. रकम]
मेह(हे)र
स्त्री. १ कृपा; दया; दयादृष्टि. 'इलाहीचे हुकुमें व बडेखान यांचे मेहेर आमचे जागा होती.' -बप्र ३०८. २ कींव. -चित्रगुप्त ३४. -पु. भर्तुगत्त विधवावेतन; घटस्फोट कर- तांना पतीनें पत्नीस द्यावयाची करार केलेली रकम. [फा. मिह्र्] सामाशब्द- ॰नजर-स्त्री. कृपादृष्टि; दयादृष्टि. ॰बा(वा)न- वि. १ कृपाळु; उपकारी; अनुग्रही; बहाल. २ अर्जांत अधि- काऱ्याच्या नांवामागें जोडावयाचें उपपद. [फा. मेहर्बान्] ॰बा(वा)नी-बा(वा)नगी-स्त्री. कृपा; दया; अनुग्रह; उपकार; बहाली. [फा. मेहेरबानगी]
महिना
पु. १ साधारणपणें तीस दिवसांचा काल; मास. २ मासिक वेतन; ह्या अवधीचा पगार. 'माझे सरकारांतून सहा महिने यावयाचे आहेत.' [सं. मास; फा. माहीना;] महि- न्याच्या कांठीं-क्रिवि. महिना भरल्यावर; महिनाभर काम केल्यावर. 'महिन्याचे काठीं शंभर रुपये मिळतात.' महिनखत- न. (ना.) दरमहिन्याला ठराविक रकम फेडण्याच्या करारानें केलेलें खत. महिनदारीण-स्त्री. (ना. व.) मोलकरीण. महिने- करू, महिने(न)दार-पु. १ दर महिन्याला अमुक पगार अशा ठरावानें कामाला लाविलेला नोकर. २ आळीपाळीनें एक एक महिना काम करावें अशा वांटणीप्रमाणें त्या त्या महिन्याची ज्याची पाळी असेल तो इसम. महिनेभरु-पु. कामाकडे लक्ष न देता माझा महिना भरतो केव्हां व मला पगार मिळतो केव्हां अशा बुद्धीनें काम करणारा नोकर; भाडोत्र/?/; नोकर. महिन(न) माल, महिने(न)महाल-वि. मासिक; महिन्याच्या बोलीनें लाविलेला, ठरविलेला (चाकर, चाकरी, पगार, रोजमुरा, खर्च, जमावसूल, हिशेब). महिने(न)माह-क्रिवि. महिन्यास; प्रत्येक महिन्याला; दरमहा. 'महिनेमहा खर्चाचा ताळा.' -स्वारी- नियम ४०. महिनेवाला-पु. (कु.) देवळाच्या उत्पन्नातून ज्याला दर महिन्यास ठराविक धर्मादाय मिळतो तो मनुष्य.
मखलाशी-सी, मख्ल(ख्ला)शी
स्त्री. १ हिशेब, कागदपत्र इ॰ मंजूर करणें; तो बरोबर आहे असा, मान्यतेचा, पसंतीचा शेरा; (सामा.) मान्यता; मंजूरी. २ सनद, नेमणूक, इनाम, दस्तऐवज इ॰ मंजूर झाल्याबद्दलचा सरकारचा शिक्का, निशाणी, सही. 'यांचे यादींत मखलासी जाहली असे.' -वाडदुबा ८४. ३ एकाखालीं एक रकम मांडून केलेली गोळा- बेरीज; तेरीज ४ वादाचा निकाल; निर्णय. ५ फार देणें, घेणें असतां सरकार इ॰ पासून थोड्या द्रव्यानें करून घेतलेली तोड. 'याची मखलशी करून खरा होईल त्याचे स्वाधीन करावी,' वाडबाबा २.७१. ६ (ल.) साफसुफी; सारवासारव; वरवरची बोळवण. ७ (ल.) टीका; मल्लीनाथी; भाष्य [अर. मुखल्लस् = शुद्ध, बिनचूक] ॰करणे-सुधारणा करणें; नीटनेटकें स्वरूप देणें. 'जें मनांत होतें तें एकदम बाहेर पडलें. आतां किती जरी कळाकुसरी आणखी मखलाशी केली तरी मी फसायची नाहीं.' -जग हें असें आहे.
नग
पु. १ डोईंत घालण्याचा स्त्रियांचा एक दागिना. -शाको. 'वेणीचे जे नग सर्वही करीन । नको धरूं सीण मनीं कांहीं ।' -तुगा २९५९. २ (सामा.) रत्न; दागिना; अलंकार. 'नग पाहतां जैसें सुवर्ण । तैसा त्रिजगद्रूप मी नारायण ।' -ह १६.१५९. 'रडतां काढिले पांच सात नग । वस्त्राखंडीं मग बांधीले म्यां ।' -मोसीतागीत ५७. (नवनीत पृ. २५८) ३ (वस्तु, उपकरणें इ॰ कांची मोजदाद करताना) वस्तु; डाग; रकम; जिन्नस. 'सरी, पाटल्या वगैरे मिळून सर्व १० नग आहेत.' ४ लेखनांत हत्तींच्या संख्येचा निर्देश करतांना संख्यावाचक शब्दापूर्वी योजाव- याचा शब्द. जसें:- हत्ती नग दहा. ५ अंगठींत बसविलेला हिरा, खडा. 'चोज काय भुवनत्रय पोटीं । वाहसी नग तसा नग बोटीं ।' -र ५९. ६ कच्चा रेशमाची लड. याच्या उलट कंकरी. नगास नग देणें-एका जिन्नसाबद्दल दुसरा (कसाही) जिन्नस देणें. ॰झाडा- पु. डागांची, नगांची, जिन्नसांची मोजदाद; गणती करणें; जिन्न- सांचा हिशेब. [नग + झाडा = गणती करणें] ॰नगोटा-टें-पुन. (व्यापक) जडजवाहीर; दागदागिने वगैरे; लहानमोठे नग इ॰. 'नगनगोटे घडवायाचे मज कौतूक मोठें ।' -होला ८०. [नग + नगोटा = जवाहीर, अलंकार] ॰वज-पुन. (व्यापक) दागदागिने; जडजवाहीर वगैरे; नगनगोटें इ॰ 'आतां कैची वेणीफणी । आतां नाहींत लुगडीं लेणीं । न्हाण नगवज पापिणी । भोगेल कैचें ।' -स्वादि २.१. ६०. 'जवाहीर नगवज ध्यावे.' -पेद ६.६६. 'त्याजपाशीं रोकड विशेष नाहीं, परंतु हजार-पांचशांचा नगवज आहे.' [नग + ऐवज?]
नग
पु. १. स्त्रियांचा डोक्यात घालण्याचा एक दागिना. २. (सामा.) रत्न; दागिना; अलंकार. ३. (वस्तू इ. मोजताना) वस्तू; डाग; रकम; जिन्नस. ४. लेखनात हत्तींच्या संख्येचा निर्देश करताना संख्यावाचक शब्दापूर्वी योजण्याचा शब्द. ५. अंगठीत बसवलेला हिरा, खडा. ६. कच्च्या रेशमाची लड. [फा.] (वा.) नगास नग देणे–एका वस्तूऐवजी दुसरी (कशीही) वस्तू देणे.
नगन
स्त्री. शत्रूच्या, सरकारच्या कचाट्यांतून शहरास, गांवास सोडविण्याकरितां गावांतील श्रीमान् लोकांनीं शत्रूस सर- कारास देऊं केलेली रकम. -विल्सनकोश [सं. नग्न; नागवण?]
निवळ
स्त्री. १ पातळ पदार्थांतील जडांश खालीं बसून वर राहिलेला द्रवांश; गाळ बुडाशीं बसून वर राहिलेला शुद्ध, स्वच्छ पदार्थ. २ (गो. कु.) भाताची पेज किंवा पेजेचें पाणी. ३ ठोक रकम. -वि. १ स्वच्छ; शुद्ध; निर्मळ (पाणी, डोळे, आकाश इ॰). २ (ल.) अकपट; अकृत्रिम; शुद्ध; प्रांजळ. ३ नुसतें; फक्त; केवळ. -क्रिवि. स्पष्टपणें; स्वच्छपणें; केवळ; निःसंशय; निर्विवाद; प्रांजळ- पणें; अकृत्रिमपणें; ढोंग, अवडंबर इ॰ न करतां. 'या पदार्थाचे निवळ दाहा रुपये येतील.' [सं. निर्मल] ॰गांठ-स्त्री. स्वस्थ- तेची, शांतपणाची गांठ, भेट. २ दिलसफाईची, मोकळेपपणाची मुलाखत. ॰नितळ-वि. १ स्वच्छ; शुद्ध; घाण, गदळ याविरहित. २ थंड आणि शांत; संथ व प्रसन्न; स्वस्थ आणि सौम्य. ॰शंख- वि. १ शुद्ध व शंकासारखें स्वच्छ (पाणी, लोणी). २ (ल.) शुद्ध मूर्ख अथवा टोणपा; अत्यंत दरिद्री (माणूस).
नकास
पु. गुरें विकत घेणारानें दलालास द्यावयाची रकम; बाजारदस्तुरी; जकात. 'सालाबाद तूप व तांदूळ भांडे व नकासची (जकातीची) शिबंदी..' -थोमरो २.७१. [अर. नख्खास = गुरांचा बाजार]
पेशकश(श्क)-ष, पेशकसी-शी
पु. देणगी; मानपान; वंशपरंपरागत हक्क इ॰ मिळाला असतां त्याबद्दल सरकारास द्यावा लागणारा नजराणा, खंडणी, रकम. 'त्या फर्देवर पातशहानीं दस्तक केलें माकूल पेशकस सरकारांत दिधलिया देऊं.' -दिमरा १.२४०. [फा. पेश्कश]
ऋण
कर्ज, देणी, अॅडव्हान्स्, आगाऊ उचल, काढलेले पैसे, घेतलेली हात-उसनी रकम, उसनवारी करून आणलेला जिन्नस, बिनव्याजी पण परत करावयाची देणगी, चारचौघांकडून उभे केलेले पैसे, परत-फेडीच्या बोलीवर जमा केलेला पैका, कर्ज फिटते पण व्याजाखाली ऋणको मरतो, तुम्ही झोपलेले असा जागे असा धंदा करीत असा किंवा नसा इकडे कर्जा वरील व्याज वाढतच असते ! कर्ज हा दहा फणांचा नाग आहे-मुद्दल ही एक फणा तर व्याज बाकी नऊ फणा, बाजीरावहि सावकारांपुढे गोगलगाय होई, रणांगण गाजविणारे देण्यापायीं रडकुंडीस येतात, देणाऱ्याचा हात वर व घेणाऱ्याचा हात खाली असतो, कर्जाखाली असणाऱ्या मनुष्याच्या सत्प्रवृत्ति हळूहळू पण निश्चित चुरडल्या जातात, कर्जबाजारी इसम सद्गुणी असणे कठीण, स्वकमाईपेक्षां कर्जाचा पैसा चटकन् खर्च होतो ! ऋणाच्या पिंजऱ्यांत शिरणे सोपें; त्यांतून बाहेर निघणे कठीण, ऋण काढून सण करणे आत्मघातकीपणाचे आहे.
शेकणें or शेंकणें
शेकणें or शेंकणें śēkaṇē or ṃśēṅkaṇēṃ v c ( H) To warm one's self before a fire: also to foment (a limb or member) with heated cloths, leaves, or medicaments. 2 fig. To affect with a loss (in some bargain or dealing); to burn. Besides this proper use there is a popular use making the word expressing the loss or burn (e. g. हानि, तोटा, पैका, रुपये, व्याज, रकम, काम) to be the subject of the verb; as माझ्या अंगावर or मजवर सगळा पैका शेकला or व्याज शेकलें, instead of (as passively and elliptically construed) मी शेकलों &c.
सहल
सहल sahala ad ( A) Easily, conveniently, agreeably, without labor, trouble, or inconvenience. Ex. देणें जें आहे तें थोडें थोडें देत गेलें म्हणजे स0 पडतें एकदाच थोर रकम द्यायास अवघड.
शिलक-ख
स्त्री. बत्ती; सरबत्ती; फैर. 'त्या वेळेस इक- डून दोन शिलका म्हणजे फैरा एक क्षणांत केल्या' -रा ३.१९१. 'तोफखान्याला शिलक दिली ।' -ऐपो २१३. [अर. शल्क] शिलक(ग)णें-अक्रि. पेट घेणें; पेटणें; आग लागणें; चेतणें. शिलका(गा)वणें-विणें-सक्रि. १ पेटविणें; आग लावणें; चेतविणें; बत्ती देणें. २ (ल.) चेतना देणें; उठावणी देणें; भडक- विणें. शिलका(गा)वण-णी-स्त्री. १ पेटविण्याची, आग लावण्याची क्रिया. २ (ल.) साऱ्यासाठीं तगादा करावयास पाठ- विलेल्या मनुष्यानें स्वतःकरितां जबरीनें कांहीं रक्कम घेणें. ३ अशा प्रकारें घेतलेली रकम. ४ मुदतींत काम न केल्याबद्दल दररोज घ्यावयाचा दंड. ५ वसूल केलेला पैसा जवळ ठेवल्याबद्दल, अफरा- तफर केल्याबद्दल घ्यावयाचा दंड. शिलगून देणें-(व.) पेट- विणें.
शिस्त
वि. योग्य; लायक; शोभेसेंच बिनचूक; बरोबर. [फा. शुस्त धुतलेलें] ॰बाकी-स्त्री. वसूली; येणें राहिलेली रकम; थकबाकी. ॰वार-वि. पद्धतशीर; योग्य प्रकारचें; शोभेसें; साजेसें; नियमानुसार. शिस्तवी करणें-नेम धरणें.
संख्या
स्त्री. १ अंक; आंकडा; आंख. २ गणना; मोज दाद; इयत्ता. 'संख्या न करवे कोणासी ।' -ज्ञा ७.१६३. [सं.] ॰मोजणें-नणना करणें; मोजदाद करणें; रकम किती तें काढणें. सांगणें. संख्यात-धावि. मोजलेलें; गणलेलें. संख्यान-न. मोजण्याची क्रिया; गणन. संख्यावत्-वान्-वि. विद्वान्; संख्या जाणणारा. 'चांद्र शरन्मानें हे संख्या संख्यावदातृता घडती ।' -मोविराट ४.६४. संख्यावाचक-वि. संख्या दाख- विणारा विशेषणांचा एक प्रकार; एक, दोन, तीन वगैरे. संख्याविशेषण-वि. संख्या दाखविणारा विशेषणांचा प्रकार. याचे संख्यावाचक, संख्यापूरक, संख्यावृत्तिवाचक व संख्यांश- वाचक असे चार प्रकार आहेत.' -मभाव्या १३८. संख्येय- वि. मोजण्याजोगें; गणना करावयाचें; गणण्यास शक्य.
सूट
स्त्री. १ (कर्ज इ॰ तून) माफ केलेली, सोडलेली रकम. २ (गुलाम, बंदी इ॰ स) बंधनांतून मुक्तता; सुटका; सोडवणूक. ३ रांगेंत मध्यें पडणारा खंड; दोन पदार्थांतील अंतर; फट. ४ (ना.) वीर्यस्खलन. ५ (व.) वाळलेली मिरची. [सुटणें] ॰पत्र-न. सोडचिठ्ठी; सांडपत्र; सांडखत. ॰मोकळ- स्त्री. १ कांहीं काळापुरती केलेली सुटका. (क्रि॰ असणें; होणें; चालणें; भोगणें; देणें). २ कर, दस्तुरी, कर्ज इ॰ तून मिळालेली सूटरकम; सोडमोकळ. [सुटणें + मोकळें होणें] ॰साट = सांड- तूट-स्त्री. सूट अर्थ १ पहा; सूटमोकळ अर्थ २ पहा.
सूत
न. १ धागा; दोरा; तार; रेषा, तंतु (विशेषतः कापसाचा). २ (ल.) संधान; संबंध (आश्रय, आधार इ॰ चा); मार्ग; उपाय (मिळविण्याचा, संपादण्याचा, साध्य करण्याचा) नात्यागोत्याचा संबंध. ३ नासकें फळ. ४ जखम इ॰ मध्यें धाग्याप्रमाणें आढळणारा एक जंतु. ५ कापडाचें वीण- काम; वीण. ६ (ल.) समेट; स्नेहभाव; मित्रत्वाचा संबंध. ७ अगदीं थोडी लांबी दाखविणारें माप; एकअष्टामांश इंच. ८ लांकूड कापण्यासाठीं त्यावर खूण करावयाची दोरी. ९ चातुर्य; शहाणपण. [सं. सूत्र] (वाप्र.) सुताचा तो़डा-१ दोर्याचा तुकडा. २ (ल.) क्षुल्लक रकम, वस्तु. 'शंभर रुपये दिले त्यांपैकीं सुताचा तोडा हातीं लागला नाहीं.' सुतानें सूत लागणें-एका गोष्टीच्या शोधानें दुसरीचा शोध लागणें. सुतानें स्वर्गास जाणें-स्वर्ग गांठणें-किंचित सुगावा लागतांच त्यावरून तर्कानें एकंदर सर्व गोष्टीचें स्वरूप ओळखणें. सुतास (सूर्तीं) किंवा सुतींपातीं लागणें-सुरळीतपणें चालू लागणें; नीट व्यवस्था लागणें. सुतास-सुतीं-सुतीपातीं चालणें, लावणें-सुरळीत असणें, लावणें. ॰बांधणें-संबंध जोडणें; धागा लावणें (नातेंगोतें, मित्रत्व इ॰ चा). (मूठभर)सूत बांधणें-देणें(स्नेहदर्शक चिन्ह म्हणून एखाद्यास). पागोटें देणें. ॰असणें-स्नेहसंबंध असणें; जुळतें असणें. ॰जमणें-मैत्री जमणें. (नाकाशीं) सूत धरणें-(मरणोन्मुख अवस्थेंत श्वासो- च्छ्वास चालला आहे कीं नाहीं हें पाहण्यास नाकाशीं सूत धरतात. यावरून) मरणोन्मुख अवस्था. सूत नसणें-मैत्री नसणें. सामा- शब्द- ॰काडी-स्त्री. (कोष्टी) जिच्या भोंवतीं सूत गुंडाळलेलें असतें ती काडी; गणा; रिकांडी. सुतणें-सक्रि. वेष्टणें. -शर. ॰परमें-न. परम्याचा एक प्रकार; लघवींतून सुतासारखे जंतू जाणें ॰पाड-पु. न. सणंगाची वीण व किंमत. 'हें सणंग सुतापाडास बरें आहे.' ॰पात-पोत-पु. कापडाचें विणकाम, बनावट; वीण.
तन्खा; तनखा
(पु.) [फा. तन्खाह्] पगार; वेतन; खर्ची; वरान; रकम देण्याचा हुकूम. “व तनखाही (=वसूल ही) हर्दू तपियाचा दिवाणांत देत नाहींस” (राजवाडे १५।२७१). “तुम्हांकडे सर्दारुल्मुलुक बहादूर यांनीं पर्गणे पालीम एथील ऐवजीं तन्खा केली त्या बाबत ऐवज़ येणें” (राजवाडे २२।१०१).
तसर
न. १ ऐनजिनसी सार्याच्या ऐवजीं शेतकर्यानें सर- कारास द्यावयाची वसुलीची नक्त रकम; ही ऐन गल्ल्याच्या एक- चतुर्थांश असे. याला कोंकणांत नक्तखंड म्हणतात. 'चवथाई गल्याचे तसरे दर खंडीस रुपये पंधराप्रमाणें.' -वाडसमा २.२३१. सामाशब्द- ॰कोंबडा-भोंपळा-पु. सरकारी अधिकारी सर- कारी कामानिमित्त एखाद्या गांवीं गेला असतां त्याच्या सरबराई- करितां गांवकर्यांनीं द्यावयाचा कोंबडा, भोंपळा किंवा भाजी.
ठाम
वि. १ कायमचा; दृढ; घट्ट; ठरलेलें; स्थिर; नक्की निश्चित; पक्का. जसें- ठाम मेख-ठाम बोलणें-ठाम किंमत. (क्रि॰ करणें). २ बेरीज, रक्कम, हिशेब, जमाखर्च इ॰ शब्दांबरोबर योजल्यास = नक्की बेरीज इ॰-कायमची रक्कम-सर्व रक्क मिळवून किंवा वजाकरून राहि- लेली वट्ट रकम. ३-क्रिवि. यथाअंश; यथाप्रमाण; मापाप्रमाणें; टंकोटंक (वजन, माप या संबंधीं याचा उपयोग करितात). 'त्या वजनानें आणलेलें तूप या वजनानें ठाम भरलें.' [हिं.]
ठोक
ठोक ṭhōka a Thick, solid, substantial--metal vessels, ornaments &c. 2 fig. Eminent (as to learning, wisdom, wealth). 3 Whole or round--a number: in the lump or mass; with the whole or by large quantities; wholesale;--used with रकम, बेरीज, माल, सौदा, खरिदी and similar words.
वि. १ जाड; भरींव; जड; ठळक; भक्कम. (धातूंचीं भांडीं, दागिने). २ (ल.) श्रेष्ठ; प्रसिद्ध; चोख. (शिक्षण, शहाणपण,) धन इ॰ मध्यें). ३ पूर्ण; फुटकळ नसलेलें; सर्व (नंबर, संख्या); सर्वसहित; समुदायानें; मोठया प्रमाणांत; घाऊक; ठोकळ; एक- दम जमेस धरलेलें (रकम, बेरीज, माल, सौदा, खरेदी इ॰). 'हिशेब ठोक समजा हो ।' -दावि २४२. ठोकबंद-वि. घाऊक; एकदम; सर्व. ठोक विक्री-विकरी-स्त्री. घाऊक विक्री; सट्टयानें किंवा एकदम विक्री. याच्या उलट किरकोळ विक्री.
थोक, थोकविकरी
ठोक इ॰ पहा. थोकबंद-वि. पूर्ण; सर्व; परिपूर्ण (रकम, बेरीज).
थोकबंद
थोकबंद thōkabanda a Whole, complete, round--a number, an item. Used with रकम, बेरीज, and similar words.
उणें
वि. वजा करावयाचा, कमी करावयाचा भाग, अंश; ऋणांश. ॰चिन्ह-न. एका रकमेंतून दुसरी रकम वजा करावयाची असतां या दुसऱ्या रकमेमागें जें आडव्या रेघेचें-असें चिन्ह करतात तें ; ऋणचिन्ह.
वाजिबात
(स्त्री.) हिंदी अर्थ : आवश्यक कर्तव्य और कार्यक्रम, बाकी रकम. मराठी अर्थ : महत्त्वाचें कार्य व कार्यक्रम, शेष धन.
वापस
वापस vāpasa ad ( P) A term of revenue. Back, in return; as वा0 करणें To bring back or return to account (as to the treasury) monies not at present to be paid out; and as वा0 जमा, वा0 रकम, वा0 रुपये, वा0 तारीख &c. 2 -करणें To deduct.
वणी
स्त्री. गाई कुरणांत चारण्याबद्दल द्यावयाची रकम; चरणावळ. 'या लोकीं अर्ज केला ऐशास गाईची वणी तों एकं- दर माफ केली आहे. म्हैसीची वणी घ्यावयाचा तह आहे.' -रा २०.२७३. [सं. वन]
दखल
पु. १ प्रवेश. ' लढाई न होतां किल्ल्यांत दखल झाला. ' -राज ५.६२. २ ढवळाढवळ. ३ ताबा. 'कुल राज्य आपलें, देखील कर्नाटकहि आपणांस सारें दखल आहे.' -चित्रगुप्त १२०. -वि. १ (हिशेबांत इ॰) प्राप्त झालेला; पोहोंचलेला. २ मांडलेलें; लिहिलेलें. ३ ज्ञात; परिचित; श्रुत (एखादें काम, गोष्ट). (क्रि॰ करणें; देणें; सुचविणें; कळविणें). 'राजबीज खरें हें...सर्वांस दखल आहे.' -राज ८.१९८. [अ. दख्ल] ॰गिरी-स्त्री. १ माहिती; परिचय; प्रावीण्य (काम. ज्ञान इ॰संबंधीं). 'चारशें वर्षेंपर्यंत कोठें दखलगिरी अगर नांवही नाहीं.' -वाडबाबा २.१५. २ देखरेख, नजर ठेवणें (कामकरी लोकांवर). (क्रि॰ राखणें; ठेवणें). ३ बातमी देणें; माहिती सांगणें. (क्रि॰ करणें; देणें). ४ ढवळाढवळ; मध्यें पडणें. 'बापाजी मुसल्मान यासी दखलगिरी करावयास गरज नाहीं.' -राज १५.२९. ५ (ल.) उत्पन्न. 'तुम्हास कांहींच पर्गणेयांत दखलगिरी न जाली.' -राज १.२३१. ॰बाज-द-वि. (विशेषेंकरून कागदपत्रांत) कागदोपत्रीं समाविष्ट; माहीत अस- लेला; अनुभवांत असलेला; दाखल केल्यानंतर नमूद. 'त्यापैकीं मजुरा द्यावयाचे करार केले तें दखलबाज बार केले असेत.' -वाडसमा १.१७५. २ नमूद केलेला; प्रविष्टं केलेला. (समासांत पुढील शब्दांशीं जोडून दखलबाद-कलम-जमा-खर्च-मजकूर- रकम). [अ.] ॰दाद-स्त्री. १ (विशेषेंकरून सरकारी कागदपत्रांत रूढ). मिळविलेली माहिती; अनुभव. २ (निकालांत न लागलेल्या प्रकरणांची) नोंद; टिपण. (क्रि॰ करणें). [अ.]
माप
न. १ प्रमाणानें मोजून निश्चित करण्याचें साधन; (वजन, सांठा, लांबी, वेळ इ॰) मोजण्याची, गणण्याची क्रिया. (क्रि॰ करणें; चालवणें; घेणें; मांडणें; लावणें.) 'आज भाताचें माप चालले आहें.' २ गणना; गणनेनें निश्चित करणें. 'आंब्याचें माप झालें म्हणजे खुरद्याचें माप घे.' ३ (सामा) मापण्यानें निश्चित केलेलें मान, करिमाण. 'दहा खंडी माप भरलें; (सामा.) माप- ण्याचें साधन. (वजन, सांठा, लांबी इ॰चें) उदा॰ वजनी माप, कैली माप, धान्य माप, कापडाचें माप. इ॰, मापण्याचें कोणतेंहि साधन. ४ मापलेला, परिमित भाग. 'त्या खाचरांत चार मापें आहेत.' ५ (खा.) बारा डोळे किंवा चार पायली. डोळा अर्थ १० पहा. [सं. मा = मोजणें] ॰देणें-घेणें-मापून देणें, घेणें. ॰कुतऱ्यानें नेणें-एखादी गोष्ट गतगोष्टींपैकीं एक होणें; एखाद्या गोष्टीची गतगोष्टींत गणना होणें. (पदरी) ॰घालणें-एखादी गोष्ट अमान्य करणारास ती अनेक प्रमाणांनी खरी करून पटवून देणें. ॰लागणें-मापी लागणें-कमी कमी होणें. 'मापीं लागलें शरीर ।' -दा ३.९.१. (आपल्या) मापानें मोजणें-आपल्या स्वतःच्या (प्रमाण असलेल्या) मापानें मोजणें. माप आणि महापाप-खोटें माप घालणें महापाप होय. सामाशब्द- ॰पट्टी- ऐनजिनसी सारा घेतांना धान्य मापण्याबाबत शेतकऱ्यावर बस- विलेला कर. ॰वरताळा-वर्ताळा-पु. १ धान्याच्या साऱ्याच्या खंडीमागें सरकारनें हक्कानें मागितलेला वरकतावळा. २ (कों.) कुळांकडून धान्य घेतांना माप घेण्यासाठीं हक्क म्हणून ठरीव खंडा- पेक्षा एकचौसष्टांश किंवा एकअष्टमांश जास्त घेतलेला माल, रकम. मापटें-न. साठप्याचें माप; अर्धा शेर, एक अषटमांश पायली; निठवें. म्ह॰ (व.) आपलं तें मापटं दुसऱ्याचं तें दीड पायली. मापणें- सक्रि. (वजन, साठपा, लांबी, वेळ यांच्या) मापानें निश्चित करणें; मोजणें; तोल करणें; मेंज घेणें. [सं. मा; झें. मा; ग्री. मेजिओ; लॅ॰ मेतिओर] मापन-न. मापणें; मोजणें; माप घेणें. मापड्या, मापारी, मापेली-वि. १ (सरकारी कोठ्या, बाजार माल यांतील) सरकारी धान्य मापणारा. २ (सामा.) मापणारा. 'आयुष्य मोजायाला बैसला मापारी । तूं कांरे व्यापारीं संसाराच्या ।' मापारकी-स्त्री. मापाऱ्याचा धंदा. मापारी- स्त्री. धान्य इ॰ मोजण्याचें फरा नावाचें एक मांप. मापी-वि. १ साठप्याच्या मापानें निश्चित केलेला. २ मापानें मोजण्यासारखें; साठप्याचें; वजनीच्या उलट. माप दाखविणाऱ्या शब्दांच्या पूर्वी हा शब्द जोडून येतो. जसें मापी खंडी-मण-शेर. मापीव, मापित-वि. मापलेला. ह्याच्या उळट तोलीव, मोजीव.
दाम
पु. १ पैसा; रोकड. २ किंमत; मूल्य; मोल. 'दाम रोख काम चोख.' ३ एक जुनें तांब्याचें नाणें. हें नाणें मूळचें तांब्याचें होतें परंतु पुढें ते चलनांत राहिलें नसून केवळ हिशे- बाच्या सोयीसाठीं याचा जमाखर्च इ॰ कांत उपयोग होऊं लागला. अकबराच्या कारकीर्दींत दाम तांब्याचा असून त्याचें वजन १ तोळा ८ मासे ७ रति होतें व चाळीस दामांचा रुपया मानला जात असे. औरंगजेबाच्या वेळीं ४६ १/३ दामांचा रुपया मानीत. त्यानंतरच्या काळीं एका रुपयाची किंमत ८० व ९० दाम यांच्या दरम्यान मधून मधून बदलणारी अशी होती. उत्तर हिंदुस्थानांत साधारणपणें एका पैशाचे पंचवीस दाम मानितात. कोठें कोठें तीस दामांचा आणा मानितात तर कांहीं ठिकाणीं साठ दामांचा आणा हें प्रमाण आहे. -कर्णेश्वर शिलालेख (शके ११०२) यांत हा शब्द आहे. 'राजा करी तैसे दाम । चाम तेही चालती ।' -तुगा ३६६०. [सं. द्रम्म; प्रा. दम्म = सोन्याचें नाणें ग्री. ड्राक्म्न] म्ह॰ १ दाम करी काम बिबी करी सलाम् = सर्व गोष्टी पैशानें साध्य होतात, किंबहुना स्त्रीसुद्धा पैशाने वश करतां येते. सामाशब्द- ॰चुंबक-जोड-जोड्या-वि. कृपणपणा करुन पैशाशीं पैसा जोडणारा; कवडीचुंबक. ॰चोरी-स्त्री. (क्व.) पैशाची चोरी याच्या उलट चामचोरी = गुरेंढोरें चोरणें. ॰जड-वि. फार किंमतीचें; महाग. ॰दुक(का)ळ-पु. पैशाचा, रोकडीचा तुटवडा. ॰दुप(प्प)ट- दुसा-स्त्री. व्याजासहित झालेली मूळ मुद्दलाच्या दुप्पट रकम. [दाम + दुप्पट = द्विगुणित] ॰दुपटीचा नियम-पु. धनकोनें ॠणको- पासून कोणत्याहि एका वेळीं मुद्दलापेक्षां अधिक व्याज न घेण्या- बद्दलचा हिंदु धर्मशास्त्राचा नियम. दामाजीपंत-पु. १ (सांके- तिक) (पैसा हीच एक व्यक्ति समजणें) पैसा; रोकड. -ख ३२.४७. २ पंधराव्या शतकांतील एक साधुवृत्तीचा कमाविसदार. दामोदर-न. १ ऐश्वर्यसंपन्न महाल, दालन. 'तंव देखिलें महा- द्वार । जेथ एकवीस खनांचें दामोदर ।' -शिशु ३३७. २ हवेली; इमारत; मंदिर. 'सोळा सहस्त्र अंतःपुरें । गगनचुंबित दामोदरें ।' -महिकथा १.९७. -वि. श्रीमंत; धनाढ्य; द्रव्यसंपन्न; गर्भश्रीमंत [दाम = पैसा + सं. उदर = पोट] दामोदरपंत-पु (संकेतिक) पैसा. दामाजीपंत पहा. 'दामोदरपंतांचें ठिकाणच नाहीं.' -ख ३२५५. [दाम + उदर + पंत]
नजर
स्त्री. १ वरिष्ठाची कृपा संपादन करण्यासाठीं त्यास भेट म्हणून दिलेली वस्तु; उपायन. (क्रि॰ करणें). २ बडे लोक मुलाखतीच्या वेळीं परस्परांस भेट म्हणून देतात त्या वस्तूंपैकीं प्रत्येक; नजराणा. (क्रि॰ करणें). ३ बापाच्या गादीवर, हुद्यावर बसतेसमयीं मुलानें सरकारास अगर सरकारच्या प्रतिनिधीस द्याव- याची जुन्या राजवटींतील खंडणी. मराठी अमलांत ही खंडणी फक्त जहागिरदार अगर इतर सरकारी नोकर यांच्याकडून घेतली जात असे. दत्तकाच्या बाबतींत मात्र ती सर्वांकडून घेतली जात असे. ४ (ल.) भेट; मुलाखत. ५ (सामा.) भेटीची वस्तु; अहेर; नजराणा. नजराणा पहा. [अर. नझ्र] सामाशब्द- ॰कारखाना-पु. घाटाजवळ राजापुर तालुक्यांत जंगलांतील लांकडें तोडण्याचा दिलेला मक्ता. -मोल. ॰खोलाई-स्त्री. शेतां- तील पीक कापण्याची परवानगी मिळण्याकरितां खेड्यांनीं, गांवांनीं द्यावयाचा कर. ॰गलबत-जहाज-न. गलबतांवरील कर. [नजर + गलबत] ॰घी-न. सरकारी नोकरांच्या बरदास्तीकरितां गांवकर्यांनां द्यावें लागणारें तूप. [नजर + हिं. गुज. घी = तूप] ॰तोफेजात-स्त्री. नजराणा. 'इंड्ग्रेज नजर-तोहफेजातशिवाय सव्वीस लक्ष रुपये दर्साल हुजरांत देत होते.' -ऐटि १८. ॰नज राणा-पु. (व्यापक) कनिष्टांनीं वरिष्टांना सादर, अर्पण केलेल्या वस्तु इ॰; बड्या लोकांनीं भेटीच्या वेळीं परस्परांस नजर केलेल्या वस्तु; नजर अर्थ १,२ पहा. [नजर + नजराणा] ॰नियाज-न्याय- पु. नजराणा. 'हल्लीं तुम्हाशी भेटीचा पैगाम करितील व नजर- निजाय कबुल करितील.' -पया ८१. 'खुर्शीवर शहाजादेस बसवून तमाम सर्दारांनीं नजर-न्याय केले.' -ख ८.४२२५. [नजर + फा. नियाझ्] ॰पट्टी-स्त्री. १ धान्याचा प्रत्येक खंडी- मागें द्यावा लागणारा कर. २ नजर म्हणून द्यावयाची रकम जम- विण्यासाठीं बसविलेली पट्टी, वर्गणी, कर. [नजर + पट्टी] ॰पागा- स्त्री. नजर देण्याकरितां ठेवलेल्या घोड्यांची पागा. 'एक घोडा त्यांस द्यावयाचा तो नजरपागेपैकीं देणें.' -वाडसमा १. १५८. [नजर + पागा] ॰भेट-स्त्री १ सरकारी अंमलदारास प्रथम भेटीच्या वेळीं दिलेला नजराणा. २ जमाबंदीच्या वेळीं प्रत्येक पाटलानें सरकारास द्यावयाची एक रूपयाची नजर. [नजर + भेट] ॰मुबारक-ख-स्त्री. भेटीचा नजराणा; मंगल अभिनंदनपर भेट 'ह्याचपासून नजर-मुबारखी घेऊन पुढें मुलुकास कौल सादर केला.' -इस १ चांदबिबी १०. [नजर + अर. मुबारक् = शुभ; मंगल] ॰स्वारी-स्त्री. पिकांवरून घोडदळ, पायदळ, इ॰ कांची स्वारी नेऊं नये म्हणून शेतकर्यांनीं स्वारीवाल्यांस द्यावयाची खंडणी. [नजर + स्वारी]
ताळा
पु. १ (हिशेब, भिन्नभिन्न हकीगती, गोष्टी, उपन्यास, साधनें इ॰ कांतील) मेळ; जुळणी; एकवाक्यता; अविरोध; जुळते- पणा; सुसंगतपणा. (क्रि॰ घेणें; पडणें; पाहणें; मिळणें). 'कदापि नाहीं वचनास ताळा ।' -सारुह ३.१३. 'त्यांच्या कामांचे ताळे कसे घ्यावयाचे ह्या संबंधानें मोहनरावांनीं माहिती करून घेतली.' -कोरकि ४५. २ (केलेल्या भाकिताशीं नंतर घडून आलेल्या गोष्टीचा, आलेल्या अनुभवाचा) मेळ; जुळतेपणा; प्रत्यय; पड- ताळा; दृक्प्रत्यय; प्रचीति; प्रतीति. (क्रि॰ येणें; मिळणें). 'म्हणोनि येळील न करावें । पाहणें तें येथेंचि पाहावें । ताळा पडतां राहावें । समाधान ।' -दा १९.५. १७. 'आपल्या उपपत्तीस ताळा मिळतो कीं नाहीं याचा फार विचार न करतां...' -नि ८१६. ३ एखाद्या गोष्टीचा खरेपणा इ॰ दुसर्या प्रमाणानें ताडून, अजमावून पाह- ण्याची क्रिया; (अंकगणित) उत्तर बरोबर आहे कीं चूक आहे हें पाहण्याची वेगळी रीत. ४ सत्यत्वबुद्धि. -मनको. [सं. ताल] ॰घालणें-मेळ बसविणें; एकवाक्यता करणें. 'तुका म्हणे ताळा घातला आडाखीं । ठावें होतें सेकीं आडविसी ।' -तुगा १२३८. (एखाद्या गोष्टीचा दुसर्या गोष्टीशीं-ह्याचा त्याचा) ॰ताळा पाहणें-घेणें-दोन गोष्टींची, वस्तूंची परस्परांशीं तुलना करणें, परस्परांशीं ताडून पाहणें. ताळ्यास-ताळ्यावर येणें-नीट मार्गाला लागणें; स्वैरपणा सोडून देऊन सुमार्गानें चालणें; शुद्धीवर येणें. ॰तोळा-पु. ताळमेळ; व्यापक अर्थानें ताळा शब्दाबद्दल वापरतात. ताळा पहा. [ताळा द्वि.] ॰वाळा-पु. ताळमेळ. -शर. [ताळा द्वि.] ताळेबंद-पु. (ताळा पडणारा बंद) १ खतावणी, रोजखर्डा इ॰ कांवरून गेला महिना, साल इ॰ कांहीं मुदतीच्या जमाखर्चाचा केलेला हिशेबाचा खर्डा, लिहिलेला झाडा. ताळेबंदावरून पुढील सालचा अजमास (बजेट) करितात. २ जवळील (हातांतील) शिल्लक आणि खर्चीं पडलेल्या रकमा, जमेकडील रकमा इ॰कांवरून निघणारी शिलक यांचा मेळ दाख- विणारें खजिन्यांतील पत्रक. ३ प्रांताच्या तपशीलवार हिशेबावरून थोडक्यांत काढलेला सरकारी गोषवारा. -इनाम ५०-५१. ताळेबंद गोषवारा-पु. ताळेबंदाचा संक्षिप्त खर्डा, सारांश; टिपण. ताळेबंदजमा, ताळेबंदीजमा-स्त्री. जमाबंदीचा सर- कारी ठरवानें ठरलेल्या वसुलाचा व मागाहून आढळलेल्या बाबींचा समावेश करणारें सदर. याच्या उलट जमाबंदी जमा किंवा किस्तंबदी जमा. [ताळेबंद + जमा] ताळेबंदबाकी-स्त्री. ताळेबंद जमेंतील वर्षाअखेरीची (वसुलाची) बाकी; ताळेबंदजमेंत दाख- विलेली वसूल व्हावयाची बाकी रकम. [ताळेबंद + बाकी]
सर
पु. १ डोकें. २ (ल.) मुख्य; श्रेष्ठ; वरचढ. 'या सर्वावर हरिपंत सर आहे.' हुद्यापूर्वींहि मुख्य या अर्थीं जोड- तात. उदा॰ सरदेशपांडे; सरदेशमुखी; सर सुभेदारी इ. ३ (ल.) प्रमुख; नेता; चालक (संस्था, मंडळ वगैरेचा). ४ (गाय, म्हैस, वगैर शब्दांनंतर योजल्यास) संख्या (डोकीं) दाखवितो. उदा॰ गाय सर एक, म्हैस सर तीन = एक गाय, तीन म्हैशी. 'बैल सर पांचशें पाठविले.' -रा १२८. प्राण्यांची संख्या दाखविणेंस सर व वस्तूंची संख्या दाखविण्यास सुमार शब्द योजीत. उदा॰ उंटें सर बारा, नारळ सुमार पंचवीस. सर करणें-जिंकणें; पादक्रांत करणें (किल्ला, प्रदेश वगैरे); फत्ते करणें; तडीस नेणें (काम, काज). [फा. सर्] ॰कान(नू)गो-पु. देशपांड्यासारखा एक अधिकारी. -रा १२.२१५. [फा.] ॰कानगोपण-न. सरकानगोपणाचें वतन. 'संस्थान मजकूर येथील सर मंडलोईपण व सरकानगोपणाचें नवीन वतन रामचंद्र बल्लळ यास करून दिल्हें आहे.' -वाडबाबा ३.३५. ॰कारकून-पु. वरिष्ठ प्रतीचा कारकून. 'फक्त अष्टप्रधान सरकारकुनास पालख्या दिल्या.' -शिचप्र २२. ॰खत-न. १ सरकारकडे वेळोवेळीं भरणा केलेल्या रकमांची क्रमानें केलेली नोंद; पावती; कौलनामा. २ विक्रयपत्र; सरकारनें विकत घेत- लेल्या मालाची पावती. ॰खवास-पु. मुख्य नोकर; अनुचरा- धिपति. 'सरदेशमुख म्हणून देऊन सरखवाशी व देहुड्यांकडील चौकी पहारे व कारखाने यांस ...' -मराचिथोशा १०. ॰खेल- पु. १ खास पथकाधिकारी; स्वारांच्या पथकावरील अधिकारी; ध्वजवृंदाधिकारी. २ मराठेशाहींतीक एक पदवी; आंग्रे सरदारांची पदवी. 'तुळाजी आंगरे सरखेल यांजकडून अंमल दूर करून ...' -वाडबाबा ३.५३. ॰खेली-स्त्री. सरखेलाचा अधिकार, हुद्दा, पदवी, काम. ॰खोत-पु. मुख्य खोत. 'सर खोत व फुट खोत पुढें सुटीचा कज्या राहिला नाहीं.' -समारो १५५. ॰गावडा-पु. खेड्यांतील एक कामगार, अधिकारी; धनगरांचा मुख्य. ॰गुर्हो- रो-पु. १ किल्लयावरील शिबंदींतील एक अधिकारी; जमादार. २ पंथाचा मुख्य, महंत. [फा.] ॰चश्मा-चष्मापु. प्रमुख; अध्यक्ष; चालक; पुढारी; धुरीण; नायक (सभा, मंडळ, खातें वगैरेचा). [फा.] ॰तपासणी-स्त्री. एखाद्या साक्षीदाराची हजर करणार्या पक्षानें घेतलेली जबानी. ॰तरम-पु. मुख्य मोजणीदार; शिरस्तेदार. 'हुजुर कचेरी हेची दोनी तटा । सरतरम तेथीचिया महान् लाटा ।' -पैमा १.१९. ॰ताज-पु. मुख्य; प्रमुख [फा.] ॰दफ्तर- नपु. सरकारी कामकाज व तें करण्याचा अधिकार. भाइअ १८३४. ॰देशपांडे-ड्या-पु. देशपांड्यांवरील मुख्य; मुख्य देशपांडे. ॰देशमुख-पु. देशमुखांतील मुख्य; सर्व देशमुखांहून वरिष्ठ पदवीदार. बर्वे घराण्याचा इतिहास १७; -रा २१.५९. ॰देशमुखी-स्त्री. सरदेशमुखाचा हक्क; मोंगलांचे अंमलांतील प्रांतांवर मरांठ्यांनीं बसविलेला कर. हा उत्पन्नाच्या दशांश किंवा साडेबारा टक्के असे. ही बाब छत्रपतीची खासगीकडे खर्च होत असे. -थोमारो २.९१. ॰देसगत-स्त्री. सरदेशमुखी. 'तालुके नवलगुंद देखील सरदेसगत निसबत गोविंद भिकाजी.' -समारो ३.२५. ॰नामा-पु. पदवी; किताब; पत्रारंभींचा मायना; आड- नांव. २ प्रास्ताविक मजकूर. [फा. सर्नामा] ॰नोबत-नौबत- द-पु. ज्यास स्वतंत्र नोबत, (नगारा) मिळाली आहे असा सैन्याधिकारी; सेनापति; सेनानी. 'जयसिंगराव निकम सरनो- बत दिमत पागा हुजूर.' -समारो ४.५१. [फा.] ॰पंत-पु. मुख्य न्यायाधीश. 'या स्थापिलेल्या वरिष्ठ कोर्टामध्यें मुख्याधिपत्य सर पंत मोरो काशीनाथ अभ्यंकर यांजकडे दिलें होतें.' -बडोद्या- तील राज्यकर्ते ३३९. ॰परस्त-पु. पालनकर्ता; पालक. [फा.] ॰परस्ती-पु. पालकत्व. [फा.] ॰पागा-स्त्री. हुजूरपागा; मुख्य सरकारी घोडदळ. ॰पागे-पाग्या-पु. राज्यांतील सर्व पागांवरील मुख्य अंमलदार. ॰पाटील-पु. जिल्ह्याच्या वसूलीवर देखरेख करणारा व त्याबद्दल शेंकडा कांहीं तरी रकम मिळणारा अधिकारी. ॰पेच-पु. शिरपेच; पगडींत खोवावयाचा तुरा. [फा.] ॰पोतदार-पु. सर्व पोतदारांवरील मुख्य; मुख्य सरकारी खजि- न्यावरील अधिकारी; नाणीं पारखून घेणारा कामगार. ॰पोस- पु. १ आच्छादन; झांकण; वरून पसरलेलें कापड, रुमाल. (अन्नाचें ताट, पगडी वगैरे वरील) 'कोणी सरपोसवरुन पस- रिति ।' -प्रला ११३.२३२. 'सरपोस जरी, बाराचा' -समारो ४. ११९. २ (ल.) गुप्तपणा; गुपित. 'आजपावेतो सरपोस राखिला.' -ख ९.५०४२. [फा.] ॰बस्त-स्ता-वि. १ बंद; लपविलेलें. २ कांहीं ठराविक सारा देणारा, सर्व सारा न देणारा (जहागीर- दार). ॰बागे-पु. बागांवरील देखरेख कारणारा अधिकारी. 'ते सरदार ढमढेरे यांजकडे सरबागे म्हणून होते' -ह. ना. आपटे चरित्र. ॰बांध-पु. मुख्य बांध. -मसाप २.३.७८. ॰बार- गिरी-बारगी-स्त्री. आधिपत्य; सैन्यांतील हुद्दा. 'पन्नास घोडि- याचे सरबारगी तुम्हांसी दिली आहे. -रा १५.३९८. ॰बुलंद- वि. प्रमुख; किर्तिमान; उच्चपदाधिष्ठित. ॰मजमु-स्त्री. मुजुम- दारांवरील अधिकार्याचें पद, अधिकार. 'साल मजकुरीं कमावीस तुम्हांस सांगितली त्याची सरमजमु मशारनिल्हेकडे सांगितली असे.' -वाडबाबा ३.७६. ॰मंडलोईपण-न. परगण्यावरील एका अधिकार्याचें पद. 'व संस्थान मजकूर येथील सर मंडलो- ईपण व सर कानगोपणाचें नवीन वतन रामचंद्र बल्लाळ यास करून दिल्हें असे.' -वाडबाबा ३.३५. [सर + मंडलवाही + पण] ॰मास्तर-पु. हेडमास्तर; मुख्य शिक्षक. 'शाळेचे सर मास्तर स्वभावानें मोठे गर्विष्ठ होते.' -नि ६५८. ॰मुकादम-मोक- दम-पु. सुभ्यांतील एक अधिकारी; मुकादमांवरील मुख्य. -शारो १४१. ॰मुख्य-पु. संस्थानचा, प्रांताचा मुख्य; होळकरांचा किताब. ॰लष्कर-पु. सेनाकर्ते; स्वतः सैन्य जमवून सेनापतीचें काम करणारा. -शिचप्र ६. ॰सब्ज-वि. १ ताजा; हिरवा. २ (ल.) तेजीचा; नशीबवान्. ॰सब्जी-स्त्री. (ल.) भरभराट; तेजी. 'ज्यांत पातश- हाची सरसब्जी ते गोष्ट पातशहांस अर्ज करावी.' -दिमरा १.६२. ॰वाद-पु. गोंधळ; घोंटाळा. ॰सम्त-पु. तरफेचा मुख्य. सम्मतचा मुख्य. ॰सुभा-सुभेदार-पु. सुभेदारांवरील मुख्य अंमलदार; त्याची पदवी, हुद्दा, अधिकार. ॰हवलदार- हवाला-पु. मुख्य हवालदार; एक सैन्यांतील अधिकारी. 'तालुके अंजनवेल येथील सर हवाला.' -समारो ३.१७.