आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह!
शब्दार्थ
रणरण
रणरण raṇaraṇa f (Formed imitatively from the sound fancied.) The fierce glowing or vehement ardor (of the sun at noon &c.) र0 करणें To glow fiercely; to burn with vehement heat--the sun, the body in fever, a fire &c.
स्त्री. भयंकर उन्हाचा ताप; कडक ऊन [ध्व.] ॰करणे-अक्रि. मध्यान्हसमय. ऊन, निखारे, ज्वरविशिष्ट शरीर इ०कांनीं स्पर्शन-दर्शनादि करण्यास अशक्य पडायाजोगी अति- संतप्तता पावणें; भयंकर तापणें, जळणें (सूर्य, तापांतील शरीर, अग्नि, यांनीं). रणरणणें-अक्रि. १ जळजळणें; अत्यंत तप्त होणें (झळीनें); अतिशय उश्णता वाटणें; उकडणें. २ ऊन, निखारे, सूर्य, अग्नी इ॰कांनीं अतिशय संतप्त होणें. रणरणीत-वि. अति- शय जळजळीत; कडक; प्रखर (सूर्य, ऊन्ह, अग्नि, दुपार इ॰.). रणरणीत उन्हाळा-पु. उन्हाळ्यांतील कडकडीत ऊन्ह, उष्ण झळा; (सामा.) हवेंतील प्रखरता. रणरणीत दुपार-स्त्री. उन्हाळ्यांतील ऐनदुपार; मध्यान्हसमय.
संबंधित शब्द
झणझणी, झणझण
स्त्री. १ (अंगावर बुक्की मारल्यानें कानांत होणारा) फणफणाट; वेदना. २ (ऊन पदार्थ खाल्ल्यानें होणारी) तोंडाची आग. ३ (नांगीच्या दंशाची) रणरण.(क्रि॰ येणें; सुटणें; लागणें; उठणें).
रुणा
पु. (कों.) १ झुरणी; सतत होणारें दु:ख; हृद्रोग. २ उतरती कळा. [ध्व. अथवा सं. रणरण]
रुणा ruṇā m C (Imit. or from रणरण S) Grieving and sorrowing for; continual sorrow and pining away. v घे, लाग.