मराठी बृहद्कोश

सात मराठी शब्दकोशांतील २,८४,८८८ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

लस

लस lasa f ( H) Sanious running; serous excretion.

मोल्सवर्थ शब्दकोश

लस f Sanious running; serous excretion.

वझे शब्दकोश

स्त्री० खरूज वगैरेंतील द्रवांश.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

स्त्री. जखम, फोड इ॰ तून वाहणारें पाणी, द्रवांश; रक्ताच्या पाण्याचा स्त्राव, द्रवांश. [सं. रस, लसिका]

दाते शब्दकोश

लश(ष)कर, लश्क(ष्क-स्क)र

न. १ सैन्य; फौज. २ सैन्य जेथें राहतें तो भाग; कँप; गोट. -पु. नाखवा; खलाशी; किंवा लष्करांतील नोकर; लास्कर. [फा. लश्कर्] (वाप्र.) लष्करच्या भाकरी भाजणें-निष्कारण दुसऱ्याच्या उठाठेवी करणें (पूर्वीं सैन्य एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणीं जाई तेव्हां त्या त्या ठिकाणच्या लोकांना शिपायांच्या भाकरी भाजण्यासाठीं लावीत ह्यावरून हा वाक्प्रचार निघाला आहे). 'पत्र धाडणारा खरोखरच जानकीबाईच्या कळवळयाचा होता की... लष्करच्या भाकरी भाजणारा होता?' -रंगराव लशकरगिरी, लश्क(ष्क) रागिरी-स्त्री. १ सैन्यांतील चाकरी; शिपाईगिरी; स्वारीवर जाणें. २ (उपजीविकेकरितां) लष्कराबरोबर जाणें; लष्करांतील वाणी, शिंपी इ॰ चा धंदा ॰भरती-स्त्री. सैन्यांत नवीन उमेदवार भरणें; (इं.) रिक्रूटिंग. 'लष्करभरतीची चळवळ निघाली तेव्हां सरकार पक्षपाती प्रोफेसरांनीं त्यांचे अभ्यास बुडविले' -केले १. ३१७. लश(ष)करी, लश्क(ष्क)री-वि. सैन्यासंबंधीं. ॰कायदा-पु. युद्धामुळें किंवा बंडाळीमुळें नेहमींचा असलेला कायदा तहकूब होऊन लष्करी अधिकाऱ्यांचा बसलेला अंमल व त्यांचा कायदा; (इं.) मार्शल लॉ. ॰पिवळा गहूं-पु. मोठ्या दाण्याचा पिंवळा व चमकदार गहू. -मुंव्या ४३. ॰बैदा-पु. वाहून नेण्यासारखें लष्करी सामान, बाजारबुणगें.

दाते शब्दकोश

मज(जा)लस, मजालीस

स्त्री. १ दरबार; राजसभा. 'दाद फिर्याद मजालसींत ऐकून घेऊन' -मराचिथोशा ३३. २ सदरेची जागा; बैठकीची जागा; दिवाणखाना. 'महोत्सहामध्यें आपण बसते जागीं नृत्य गायनादि न करवितां बाहेरल्या बाहेर मजलसींत करवावें.' -मराआ ११. ३ थोर, विद्वान, सन्माननीय लोकांची सभा. ४ (सामा.) बैठक; सभा. 'जाउलीच्या मैदानीं बैसले शिपाई मजलाशीं ।' -ऐपो ६७ [अर. मज्लिस्]

दाते शब्दकोश

मज़्लस

(स्त्री.) [अ. मज्लिस्] सभा; बैठक; ज़ल्सा; गाण्याबजावण्याची बैठक; मैफल. “महोत्सहामध्यें आपण बसतेज़ागी नृत्य गायनादि न करवितां बाहेरल्या बाहेर मज़्लसींत करवावें” (मराआ ११).

फारसी-मराठी शब्दकोश

संबंधित शब्द

लशाकोड्या

वि. (राजा.) कोड आणि लस असलेला; गलतकुष्ठ झालेला [लस + कोड] लशी खरूज-स्त्री. लस वाह णारी, ओली खरूज [लस + खरूज]

दाते शब्दकोश

इनॉक्युलेशन

न. १ रोगप्रतिबंधक लस टोचून अंगांत घालणें; (सामा.) टोचणें; देवीकाढणें; २ प्लेग वगैरे होऊं नये म्हणून प्लेगाची लस टोचणें. 'इनॉक्युलेशन हा एक तोडगा आहे. यापासून आल्यास थोडाबहुत गुण येईल.' -टि. २.१३५. [इं.]

दाते शब्दकोश

उल्हास, उल्हासणे, उल्हासी      

पहा : उल्लास, उल्लासणे, उल्लासी [सं. उत्+लस्, लष्] उल्हाळ      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अभिलाष-ख

पु. १ प्राप्तीची इच्छा; हेतु. 'स्वधर्म करणें आवश्यक । तेथें सांडणें फळाभिलाख ।' -एभा १८.३६८. 'म्हणे अर्जुना परियेसीं । जो हा अभिलाषु प्रौढमानसीं ।' -ज्ञा २.२९१. २ लोभ; हांव; हांवरेपणा. ३ दुसऱ्यांच्या द्रव्यांदिकांचा अपहार करण्याची इच्छा; दुसऱ्याचें गिळंकृत करणें; अपहार. 'करितां पर- दारेचा अभिलाष । कोण कधीं पावला यश ।' [सं. अभि + लष् = अभिलाष]. ॰बुद्धि-स्त्री. अपहार करण्याची इच्छा.

दाते शब्दकोश

अभिलषित

वि. इच्छित; इष्ट; प्रिय. 'जो अभिलषित मनोरुचि । पुरविता तो ।' -ज्ञा १.२७. [सं. अभि + लष् = इच्छिणें]

दाते शब्दकोश

बदगें

न. १ फोल; कचरा; सालपट (प्रायः धान्यें, कडधान्यें, फळें इ॰ चा). २ रेव; माती; गाळ; खडा; गदळ (धान्यांतील, साखरेंतील, दारूंतील). ३ क्षतांतील पू अथवा लस. ४ उष्टें (पानांत राहिलेलें).

दाते शब्दकोश

देवी      

स्त्री.       १. देवाची स्त्री. २. अव. मसूरिका; फोड्या; विस्फोटक; एक रोग. त्यांच्या प्रतिबंधासाठी दंडावर टोचलेली लस. यांना कुंभाराच्या देवी, माता म्हणतात. (क्रि.येणे, काढणे, कानपणे, सुकणे.) [सं.] (वा.) देवी चा थाट – अंगावर पुष्कळ दाट देवी येणे. देवी जागवणे – देवीचे एक व्रत; देवीचे जागरण करणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

देवी

स्त्री. १ देवाची स्त्री; मुख्यत्त्वें दुर्गा किंवा भवानी. २ अव. मसूरिका; फोड्या; विस्फोटक; एक रोग. आग्या, कथल्या, चिघळ्या, कोथिंबिर्‍या, खेळत्या, घागर्‍या, मसुर्‍या, सीतळा असे यांचे प्रकार आहेत. यांच्या प्रतिबंधाकरितां दंडावर टोंचलेली लस. यास कुंभाराच्या देवी किंवा माता म्हणतात. (क्रि॰ येणें; काढणें; कानपणें; सुकणें). [सं.] ॰चा थाट-पु. अंगावर पुष्कळ दाट देवी येणें. ॰जागविणें-देवीचें एक व्रत; देवीपुढें जागरण करणें. म्ह॰ (बायकी) १ देवी रडते हगतां प्रसन्न होयगे भक्ता = (निंदार्थी) फाजील स्वार्थीपणा. २ देवी देवळांत पण नायटे मुलखांत = दुर्गुण किंवा दुष्कृत्यें पुष्कळ लांबवर पसरणें.

दाते शब्दकोश

गळणे      

अक्रि.       १. झरणे; पडणे; ढळणे (सुटून, उकलून, मोठा होऊन); वरून खाली पडणे. (फळे, फुले भिंतीचा गिलावा). २. ठिबकणे; पाझरणे; वाहणे (पाणी, दाणे इ. जिन्नस). ३. वाहणे; पाझरणे (भांडे, नाव इ.). ४. निचरणे; लस वाहणे (बरबरीत व्रण, क्षत); वाहणे; झिरपणे (पू). ५. क्षीण होणे; अशक्त होणे : ‘हिंडे वनोवनीं तो अन्नावांचूनि बहु गळाला हो ।’ - मोवन ४·१०४. ६. रोडावणे; हाडकणे. ७. गमावणे; खचणे; नाश पावणे. ८. नाहीसे होणे; अंतर्धान पावणे; मालवणे : ‘सुर असुर तई मी बैसवी वेगळाले । सहजरिपु तरी ते भाव त्यांचे गळाले ।’ - वामन, बालक्रीडा ५१. ९. घालविले जाणे; नापसंत होणे. १०. कमी होणे; उणावणे. ११. खचणे; गमावणे; तुटणे; मृतप्राय होणे (धैर्य, विश्वास, आशा) : ‘त्यावरि पांडुसुतांतें दूरुनि पाहुनि भये गळाले हो ।’ - मोशल्य ३·७३. १२. थकणे : ‘एक स्वव्यसनीं सहाय हय जो होता सखा तो गळे।’ - मोकृष्ण २३·५७. १३. ढळणे; चळणे : ‘निज व्रतापासुनि त्या गळाल्या ।’ - सारुह १·६९. १४. वितळणे (धातू इ.). १५. कचरणे; कांकू करणे (माणसाने). १६. सुटणे; विसरणे (विषय, मुद्दा.) १७. रेतस्खलन होणे; खळणे. १८. फाटणे; जीर्ण होणे; न्यूनता असणे (पुस्तकात पानांची). [सं. गलन]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गळणें

अक्रि. १ झरणें; पडणें; ढळणें (सुटून, उकलून, मोकळा होऊन); पतन पावणें (फळें, फुलें, भिंतीचा गिलावा). 'मोठा वारा येतांच त्या आंब्याचे आंबे पटापट गळले.' २ ठिबकणें; पाझरणें; वाहणें (पाणी, दाणे इ॰ जिन्नस). चाळणीं- तून दाणे गळलें.' ३ वाहणें; पाझरणें (भांडें, नांव इ॰). 'तांब्या गळतो.' ४ निचरणें; लस वाहणें (बरबरीत व्रण, क्षत); वाहणें; झिरपणें (पू); ५ थकणें; दमणें; घटणें; क्षीण होणें; अशक्त होणें. 'हिंडे वनोवनीं तो अन्नावांचूनि बहु गळाला हो ।' -मोवन ४. १०४. ६ चोपणें; अंग सोडणें. ७ गमावणें; खचणें; नाश पावणें. ८ नाहींसें होणें; अंतर्धान पावणें; तहकूब होणें; मालवणें; मागें राहणें. 'सुर असुर तईं मी बैसवी वेगळाले । सहजरिपु तरी ते भाव त्यांचे गळाले ।' -वामन, बालक्रीडा ५१. 'काशीस पन्नास असामी जावयास निघाले त्यांतून पांच गळाले.' ९ घालविलें जाणें; नापसंत होणें. 'चाकरीस सात असामी गेले, तीन राहिले, चार गळाले. ' १० कमी होणें; उणावणें. ११ खचणें; गमावणें; तुटणें; मृतप्राय होणें (धैर्य, विश्वास, आशा सुटून). 'त्यावरि पांडुसुतांतें दूरुनि पाहुनि भये गळाले हो ।' -मोशल्य ३.७३. १२ कचरणें; कांकूं करणें (माणसाणें). १३ सुटणें; विसरणें (विषय, मुद्दा). १४ रेतस्खलन होणें; खळणें. १५ फाटणें; जीर्ण होणें; न्यूनता असणें (पुस्तकांत पानांची). 'कांहीं ग्रंथ गळाला.' १६ (हिं.) वितुळणें (धातु इ॰). १७ थकणें. 'एक स्वव्यसनीं सहाय हय जो होता सखा तो गळे ।' -मोकृष्ण २३.५७. १८ ढळणें; चळणें. 'निज व्रतापासुनि त्या गळाल्या ।' -सारुह १.६९. [सं. गलन; हिं गलना.]

दाते शब्दकोश

गोस्तनदेवी

स्त्री. गाईच्या सडावरील गांठीतून लस काढून माणसाच्या शरीरांत टोचून घालण्याचा डॉ. जेनर यांचा शोध. यामुळें आलेले फोड. [सं. गोस्तन + देवी]

दाते शब्दकोश

हजिरी, हजिरीखरडा -पट -पत्रक -बंद

हजिरी, हजिरीखरडा -पट -पत्रक -बंद hajirī, hajirīkharaḍā -paṭa -patraka -banda m -याद &c., हजीर, हजीरजबाब, हजीरजबाबी, हजीरजामीन, हजीरनीस, हजीरबिगार, हजीरबिगारी, हजीरमजा- लस, हजिरी See under हाजिरी, हाजीर &c.

मोल्सवर्थ शब्दकोश

इंजेक्शन      

न.       १. लस, औषधीद्रव्य इ. पिचकारीने शरीरात घालणे, सोडणे. (क्रि. देणे, करणे); अंतःक्षेपण; सूचिभेदन; सुईटोचणी. २. बस्तिविधी.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कौला लसलसीत      

कोवळा लुसलुशीत; नाजूक; नवीन; ताजा; कोवळा; जोमदार आणि टवटवीत (झुडूप, फळ). [सं. कोमल + लस् = लसित] कौलावण      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खवडा      

पु.       १. डोक्यातील फोड (खरजेसारखा); डोक्यात होणारी खरुज; चाई; उंदरी रोग. या रोगामुळे डोक्यात एक प्रकारचे सुक्ष्म व्रण होतात, त्यांना बारीक अशी पुष्कळ छिद्रे असतात. त्यातून लस वाहते. त्यांना खवडे म्हणतात. २. गुरांच्या अंगावरील खरुज, कथलीचा खवला. ३. खवडे नाहीसे होण्याकरिता गुरांच्या विशिष्ट अवयवावर (ढुंगणावर किंवा गालावर) दिलेला डाग; डागणे. (वा.) खवडा उडणे, खवडा उडवणे, खवडा करणे, खवडा करून टाकणे - १. नासवणे; बिघडवणे; भंगवणे; निष्फळ करून टाकणे. २. फजिती करणे; टर उडवणे; अपमान करणे; खरड काढणे. खवडा जिरवणे, खवडा पाडणे - ताठा उतरवणे; रग मोडणे; फजिती करणे. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खवडा

पु. १ डोक्यांतील फोड (खरजेसारखा); डोक्यांत होणारी खरूज; चाई; उंदरी रोग. (अव. प्रयोग) खरजुडलें, नासकें डोकें, कफ, रक्त व कृमि यांचे प्रकोपामुळें, डोक्यांत एक प्रकारचे सुक्ष्म व्रण होतात, त्यांना बारीक अशीं पुष्कळ छिद्रें असतात, त्यांपासून लस वाहते त्यांना खवडे म्हणतात. -योर २.४२८. २ गुरांच्या अंगावरील खरूज, कथलीचा खवला. ३ खवडे नाहीसे करण्याकरितां गुरांच्या विशिष्ट अवयवावर (ढुंगणावर किंवा गाला- वर) दिलेला डाग; डागणें. [सं. क्षम् प्रा. खव ?] (वाप्र.) ॰उडणें-उडविणें-खवडा करणें अर्थ २ पहा. ॰करणें- करून टाकणें-१ नासणें; बिघडविणें; भंगविणें; निष्फळ करून टाकणें. फजीती करणें, टर उडविणें, अपमान करणें; खरड काढणें. ॰जिरविणें-ताठा उतरविणें; रग मोडणें.

दाते शब्दकोश

लास

लास lāsa m A mark made by actual cautery. v दे, घे. 2 A nautical term. Backing with an oar to turn the head of the boat. Used with वल्हें or नावेस &c., and v धर, कर.

मोल्सवर्थ शब्दकोश

लासा

लासा lāsā a R Commonly लाशा.

मोल्सवर्थ शब्दकोश

लाशा

लाशा lāśā a (लास) Bearing the mark of the cauterizing iron; branded or fired. 2 Having a spot or discoloration resembling the mark of the iron; or having a black and rotten spot in general--a fruit &c.

मोल्सवर्थ शब्दकोश

लशी खरूज

लशी खरूज laśī kharūja f (लस & खरूज) The purulent or running itch.

मोल्सवर्थ शब्दकोश

लशकोड्या

लशकोड्या laśakōḍyā a (लस & कोड) That is covered with leprosy and sanious runnings.

मोल्सवर्थ शब्दकोश

लसलस

स्त्री. १ अतिशय वळवळ; चळवळ. २ उत्कंठा. लसलस-लसां-क्रिवि. १ अतिशय तप्त व क्षुब्ध द्रवपदार्थांच्या, क्षतांत किंवा नासलेल्या फळांत बुजबुजणाऱ्या किड्यांच्या व्यापाराचें दर्शक किंवा शब्दाचें अनुकरण होऊन. २ टवटवीतपणें; टक- मकीतपणें. लसाकफसाक-क्रिवि. (कु.) अघळफघळ. लस- फशीत पहा.

दाते शब्दकोश

लसलसणें

अक्रि. लसलस करणें. १ रसरसणें; सळसळणें; खळबळ करणें (पाणी इ॰). २ क्षत इ॰ कांत किडे इ॰ कांनीं वळवळ करीत असणें; बुजबुजाट होणें. ३ भर येणें; भरज्वानी येणें (तारुण्याची धमक, तेज). ४ लुसलुसणें; टवटवणें; तका- कणें; प्रफुल्लित होणें. ५ अति उत्कंठित होणें. ६ वखवखणें. [सं. लस्. द्वि.] लसलसाट-पु. (लसलसचा अतिशय) बुज- बुजाट; वळवळ. (क्षतांत किंवा नासक्या पदार्थांत किडे इ॰ कांची) [लसलस] लसफशी(सी)त-वि. १ ढील; शिथिल; भोंगळ; घट्ट, अटस नसलेलें (पागोटें, वेणी इ॰) लसलशी (सी) त-वि. १ अतिशय तप्त; फार खवळलेला; उसलसणारा, फसफसणारा (द्रव पदार्थ). २ झपाट्यानें बुजबुजणारे (क्षतां- तील इ॰ किडे); बुजबुजाट असलेलें. ३ लुसलुशीत; टवटवीत; टकमकीत. 'तैसें हृदयीं अष्टदळ । अधोमुख ऊर्ध्वनाळ । अति कोमल लसलसित ।' -एभा १४. ४६५.

दाते शब्दकोश

लसणें

अक्रि. विलसणें; शोभणें. 'म्हणोनि परिहास हा सहज आजि केला लसे ।' -मो कृष्ण ६०.९. [स. ल्स] लसत-वि. उत्कृष्ट; शोभायमान; उज्वल. [सं.] लसती- स्त्री. विलासी, सुंदर स्त्री. -वि. विलसणारी; सुंदर [सं.] लच- त्कांचन-न. तेजदार सोनें. 'एकें लसत्कांचनसम पिंवळे ।' -ज्ञा ११.१३५. [सं.] लसित-न. १ विलास; क्रीडा. २ उल्हास; उत्कंठा.

दाते शब्दकोश

अक्रि. (व.) लचकणें. लसललणें पहा. 'असा वरच्यावर लसलसतोस कां?' [सं. लस्]

दाते शब्दकोश

लसूण

पुस्त्रीन. १ एक वनस्पति. याचें झाड कांद्याप्रमाणें असतें, लसूण स्वादाकारितां मसाल्यांत, चटणींत वगैरे घालतात. याचे अनेक औषधी उपयोग आहेत. २ या वनस्पतीचा कांदा किंवा कांद्याची पाकळी. [सं. लशुन; प्रा. लशुण, लसण] लसणा-ण्या-पु. १ एक रत्न; दुध्या कांचमणि. (सं.) लशुन. ह्यास बहिर्वक आकार दिला असतां त्याचें बिडालाक्ष किंवा मार्जारनेत्री हें रत्न होंतें. ह्याचे रेंग धूम्र, पिंवळट, पांढरट वगैरे. २ (कों.) फणसाचा प्रकार. (बारीक गरे असलेला) [लसूण] लसणी-स्त्री. १ लसणाची पाकळी, कुडी. २ तिच्या आकाराचा स्त्रियांचा एक अलंकार (जवा, तोडा इ॰). ३ वैदूर्यमणि. -वि. १ लसणीच्या पाकळीच्या आकाराचा (मणि इ॰) २ लसणासंबधींचा. [लसूण] ॰जवा-पु. जव्याचा एक प्रकार याच्या कड्या लस- णीच्या कुडीच्या सारख्या असतात. २ लसूणजव्याप्रमाणें जोडणी. ॰बिंब-न. वेताची एक लहान जात. याला पिंगट फूल येतें. ॰सालंमिश्री-स्त्री. सालंमिश्रीची लहान जात. याच्या उलट पंजाबी सालंमिश्री. लसूणबी-स्त्री. लसुणाची पाकळी, कुडी.

दाते शब्दकोश

मदलस-सा

पु. मांडव, छत इ॰चा मध्यभाग; चांदणी 'हिरियांच्या मदलसा झळकती ।' -रावि ३६.५६. 'निळ्याच्या मदलसा जडित । वरी मुक्तांचे राजहंस खेळत ।' -ह २.२२. [सं. मध्य + लस् = विलसणें? मसलंद पहा.]

दाते शब्दकोश

रंद-ध

पु. गळूं; फोड, इ॰मधून निघतो तो रक्तमिश्रित पू; लस. 'त्याच्या कानांत रंद फार झाला आहे.' [सं. रद् ?]

दाते शब्दकोश

रसकस-घस-स्त्री.

१ भांडण; बोलाचाली; वाद; धुसपूस. (क्रि॰ करणें; लावणें; मांडणें). २ कचकच; ताप चढण्यापूर्वी होणारी अवस्था. ३ रोमांच; शहारे. (क्रि॰ येणें; वाटणें). ४ (कु.) अप्रीति. 'लोकांच्या रसकशीमुळें केलेल्या कामांत यश नाहीं' ५ घासाघीस; जिकीर. रसकसणें-क्रि. १ कसकसणें; अंगावर कांटा अगर शहारे येणें; ताप येईलसें वाटणें. २ भांडणें- तंडणें; बोलाचाली होणें, करणें; हुज्जत घालणें. [रसकस] रसकी- स्त्री. (बे.) जखमेंतून गळणारें नासकें पांढरें पाणी; लस.

दाते शब्दकोश

रुधिर

न. १ रक्त. २ -पु. मंगळ हा ग्रह. -वि. तांबडा. [सं.] ॰तंतु-पु. (शारीरशास्त्र) रक्तांतील तंतु, दोर; रक्ता- मधील एक पांढरें तंतुमय द्रव्य. ह्या द्रव्यामुळें रक्त गोठतें. ॰द्रव- पु. रक्ताचे कण ज्यांत असतात असें द्रव द्रव्य; रक्ताधार जल; रक्तकणधारी रस. ॰पेशी-स्त्री. रक्तगोलक; रक्तांत असणारा तांबडा किंवा पांढरा गोलक. ॰लसिका-स्त्री. रक्त थिजल्यावर त्यांतून वेगळें होणारें पाणी; रक्तजल; लस. ॰वाहिनी-स्त्री. रक्त जीतून वाहतें अशी शरीरांतील नळी; नाडी; धमनी; शीर. ॰वाहिनीसमूह-पु. रक्तवाहिन्यांचा समूह. रुधिराभिसरण- न. रक्ताचा शरीरांत सर्वत्र होणार संचार; हृदयांतून सर्व शरीरभर व सर्व शरीराच्या भागांतून परत हृदयांत रक्ताचें जाणेंयेणें. [रुधिर + अभिसरण] रुधिराभि-सरणव्युह-पु. रक्ताभिसरणसंस्था. रुधिराशन-पु. राक्षस. [रुधिर + अशन = खाणें] रुधिरूं-न (महानु.) रक्त. हातीचें रुधिरूं पीतांतीं तान्हैले । तडस भणौनी । -शिशु १०५६. रुधिरोद्गारी-पु. साठ संवत्सरांतील सत्ताव- न्नावा संवत्सर.

दाते शब्दकोश

सडेतोड

वि भीडमुरवत न ठेवतां; रोख ठोक; निखा लस, जळजळीत; कर्णकटु.

दाते शब्दकोश

तडकॉ

पु. (गो.) माणसाच्या अंगावर उठलेल्या देवींच्या फोडांतील लस टोचणें.

दाते शब्दकोश

तडकॉ      

पु.       माणसाच्या अंगावर उठलेल्या देवींच्या फोडातील लस टोचणे. (गो.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तोंड

न. १ ज्यानें खातां वं बोलतां येतें तो शरीराचा अव- यव; मुख; वदन; तुंड. २ चेहरा; हनुवटीपासून डोक्यापर्यंत मस्तकाचा दर्शनी भाग. ३ (सामा.) (एखाद्या वस्तूचा) दर्शनी भाग; पुढचा-अग्रभाग; समोरील अंग. 'या ओझ्याच्या तोंडीं मात्र चांगल्या चांगल्या पेंढ्या घातल्या आहेत.' ४ (फोड, गळूं इ॰ कांचा) छिद्र पडावयाजोगा, छिद्रासारखा भाग; व्रणाचें मुख. यांतूनच पुढें पू, लस इ॰ वाहतात. ५ (कुपी, तपेली, लोटी इ॰ कांचें) पदार्थ आंत घालावयाचें भोंक; द्वार; मार्ग; मुख. ६ (एखाद्या विषयांत, शास्त्रांत, गांवांत, देशांत, घरांत) शिरकाव होण्याचा मार्ग; प्रवेशद्वार. 'ह्या घराचें तोंड उत्तरेस आहे.' ७ (ल.) गुरुकिल्ली. उदा॰ 'एखाद्या प्रांताचें, देशाचें किल्ला हें तोंड होय.' 'व्याकरण भाषेचें तोंड होय.' ८ (वारा इ॰कांची) दिशा; बाजू. ९ धैर्य; दम; उमेद; एखादें कार्य करण्याविषयींची न्यायतः योग्यता. १० एखाद्या पदार्थाचें ग्रहण किंवा त्या पदार्थाचा एखाद्या कर्याकडे विनियोग इ॰ कांचा आरंभ त्या पदार्थाच्या ज्या भागाकडून करि- तात तो भाग. 'भाकरीस जिकडून म्हटलें तिकडून तोंड आहे.' ११ (युद्ध, वादविवाद इ॰कांसारख्या गोष्टींची) प्रारंभदशा. 'वादास आतां कुठें तोंड लागलें.' १२ (सोनारी धंदा) हातोड्याच्या सगळ्यांत खालच्या बाजूस अडिश्रीच्या बुडासारखा जो भाग असतो तो. यानें ठोकलेला जिन्नस सारखा करून घेतात. १३ (सोनारी धंदा) कांबीस गोल आकार देतांनां तिचीं टोंकें जेथें जुळतात तो भाग. १४ (बुद्धिबळें) डाव सुरू करण्याचा प्रकार; मोहरा. 'वजीराच्या प्याद्याचें तोंड.' [सं. तुंड; प्रा. तोंड] (वाप्र.) ॰आटोपणें, सांभाळणें, आवरणें-जपून बोलणें; बोलण्याला आळा घालणें; अमर्याद भाषण, अभक्ष्यभक्षण यांपासून निवृत्त होणें. ॰आणणें- (आट्यापाट्यांचा खेळ) शेवटची पाटी खेळून जाऊन पुन्हां एक एक खेळत येणें; पाणी आणणें; लोण आणणें. ॰आंबट करणें- (एखाद्यानें) असंतुष्ट, निराशायुक्त मुद्रा धारण करणें. तोंड आहे कीं तोबरा-खादाड किंवा बडबड्या माणसास उद्देशून वापरावयाचा, 'किती खातोस' 'किती बोलतोस' या अर्थाचा वाक्प्रचार. ॰उतरणें-(निराशा, आजार इ॰ कांनीं) चेहरा म्लान होणें, सुकणें, फिका पडणें, निस्तेज होणें. ॰उष्टें करणें-(अन्नाचा) एखादा-दुसरा घांस, एक दोन घांस खाणें; जेवणाचें नुसतें नांव करणें. ॰करणें-बडबड, वटवट, बकबक करणें; उद्धटपणानें, निर्लज्ज- पणानें बोलणें. ॰करून बोलणें-निर्लज्जपणें, आपला (लहान) दर्जा सोडून बोलणें. ॰काळें करणें-(उप.) एखादा ठपका, तोहमत अंगावर आल्यामुळें निघून, पळून, निसटून जाणें; हातावर तुरी देणें; दृष्टीस न पडणें (केव्हां केव्हां तोंड हा शब्द वगळला तरी चालतो. जसें:-त्यांनीं काळें केलें). ॰गोड करणें-१ (एखाद्याला) लांच देणें; खूष करणें. २ मेजवानी देणें; गोड खावयास घालणें. ॰गोरेंमोरें करणें-(कोणी रागें भरल्यामुळें, मनास वाईट वाटल्यामुळें) निराशेची, लाजलेपणाची मुद्रा धारण करणें. ॰घालणें-(दोघे बोलत असतां तिसर्‍यानें) संबंध नसतां मध्येंच बोलणें. ॰घेऊन येणें-एखाद्यानें एखाद्यावर सोंपविलेलें काम न करतां त्यानें तसेंच परत येणें. 'असें सर्वांनीं न करावें. जो मामलेदार असें करून तोंड घेऊन येईल त्याचें मुखावलोकन न करितां फिरोन सेवा न सांगतां त्यास घरींच बसवावें.' -मराआ २९. ॰घेणें-१ बोंबलत सुटणें; ताशेरा झाडणें; बोंबलपट्टी करणें. २ तोंडांतून लाल गळावी म्हणून पारा इ॰ तोंड आणणारीं औषधें घेणें. तोंड देणें पहा. 'मी वैद्याकडून तोंड घेतलें आहें.' तोंडचा-वि. १ विरुद्ध, उलट दिशेचा; समोरून येणारा (वारा, ऊन, भरती इ॰). २ ज्याची कर्तबगारी केवळ तोंडांतच, बोल- ण्यांतच आहे, क्रियेंत दिसून येत नाहीं असा. 'तोंडचा शिपाई- कारकून-सुग्रण-खबरदार.' ३ तोंडानें सांगितलेला, निवेदन केलेला; तोंडीं केलेला (व्यवहार, हिशेब, पुरावा इ॰). याच्या उलट लेखी. तोंडचा, तोंडींचा घास काढणें-हिरून घेणें-१ (एखा- द्याची) अगदीं आटोक्यांत आलेली वस्तु, पदरीं पडावयास आलेला लाभ हिसकावून घेणें. २ (एखाद्याच्या) अन्नावर पाणी पाडणें; अन्नांत माती कालविणें; पोटावर पाय देणें. तोंडचा-तोंडींचा घांस देणें-(ल.) (एखाद्यास) अतिशय प्रेमानें, ममतेनें वाग- विणें; प्रसंगविशेषीं आपण उपाशी राहून दुसर्‍यास खावयास देणें. तोंडचा गोड आणि हातचा जड-बोलण्यांत गोड व अघळ- पघळ, पण प्रत्यक्ष पैशाची मदत करण्यांत पूज्य. तोंडचा चतुर- वि. बोलण्यांत पटाईत; वाक्पटु. तोंडचा जार-पु. नुकत्याच जन्मलेल्या मुलाच्या तोंडांतील फेंस; चिकटा; ओंठावरचा जार; जन्मप्रसंगींचा तोंडावरचा पातळ पापुद्रा (विशेषतः तुझ्या, त्याच्या तोंडाचा जार वाळला नाहीं. = तूं, तो अजून केवळ बालक आहेस.' अशा वाक्यांत उपयोग). तोंडचा नीट-वि. १ बोलून भला, चांगला; बोलकाचालका; सौजन्ययुक्त. २ युक्तायुक्त विचार करून बोलणारा. ३ हजरजबाबी; अस्खलित बोलणारा. तोंडचा फटकळ-वि. शिवराळ; उघडतोंड्या; अश्लील, शिवराळ भाषण करणारा. तोंडचा रागीट-वि. जहाल; तिखट; कडक भाषण करणारा. तोंडचा शिनळ-वि. १ इष्कबाज, फंदी म्हणून नांव मिळविण्याची इच्छा करणारा; स्त्रियांची खोटी खुषमस्करी करणारा; स्त्रियांच्या कृपेची खोटीच फुशारकी मारणारा. २ निरर्गल व अश्लील भाषण करणारा; शिवराळ. तोंड(डा)ची गोष्ट-स्त्री. सहजसाध्य, अतिशय सोपी गोष्ट, काम. 'वाघ मारणें तोंडची गोष्ट नव्हे.' तोंड चुकविणें-हातून एखादा अपराध घडला असतां कोणी रागें भरेल या भीतीनें, काम वगैरे टाळण्यासाठीं चुकारतट्टू- पणानें एखाद्यापासून आपलें तोंड लपविणें; दृष्टीस न पडणें; छपून असणें. ॰चे तोंडीं-क्रिवि. प्रत्यक्षाप्रत्यक्ष; तोंडानें; बोला- चालीनें. ॰चे तोंडीं व्यवहार-केवळ तोंडानें बोलून, बोलाचा- लीनें झालेला, होणारा व्यवहार, धंदा. याच्या उलट लेखी व्यव- हार. ॰चें पायचें-न. (कों.) गुरांच्या तोंडास व पायांस होणारा रोग. ॰चे हिशेब-पुअव. कागदांवर आंकडेमोड न करितांमनां- तल्यामनांत कांहीं आडाख्यांच्या; मदतीनें करावयाचे हिशेब. तोंडचें तोंडावरचें पाणी पळणें; उडणें, तोंड कोरडें पडणें-१ (भीतीमुळें) चेहरा फिका पडणें; बावरून,घाबरून जाणें. २ (भीति इ॰ कांमुळें) तोंडांतील ओलावा नाहींसा होणें. तोंड टाकणें-टाकून बोलणें-१ (क्रोधावेशानें) अप शब्दांचा वर्षाव करणें; निर्भर्त्सना करून बोलणें; खरडपट्टी काढणें; अद्वातद्वा बोलणें. 'तूं नोकर-माणसांवर उगीच तोंड टाकलेंस.' २ (घोडा इ॰ जनावरानें) चावण्यासाठीं तोंड पुढें करणें. 'ह्या घोड्याला तोंड टाकण्याची भारी खोड आहे, ती घालविली पाहिजे.' ॰ठेचणारा-फाडणारा-वि. (एखाद्या) उद्धट, बडबड्या माण- सास गप्प बसविण्याची हातोटी ज्यास साधली आहे असा; उद्दामपणानें, गर्वानें बोलणार्‍या व्यक्तीस रोखठोक उत्तर देऊन चूप बसविणारा. [तोंड + ठेचणें] ॰तोडणें-(ना.) एखादी वस्तु मिळ- विण्याकरितां एखाद्याच्या पाठीस लागणें; त्याच्यापुढें तोंड वेंगा- डणें. ॰दाबणें-लांचलुचपत देऊन (एखाद्याचें) तोंड बंद करणें; (एखाद्यास) वश करणें; गप्प करणें. ॰दाबणारा-वि. लांच देऊन (एखाद्या) प्रतिकूल व्यक्तीस वळविणारा; गप्प बसविणारा. [तोंड + दाबणें = बंद करणें] ॰दाबी-स्त्री. (एखाद्यानें) गुप्त बातमी फोडूं नये म्हणून, प्रतिकूल बोलूं नये म्हणून (त्यास) लांच देऊन त्याचें तोंड दाबण्याची, वश करण्याची क्रिया. 'तो गांवकाम- गारांची तोंडदाबी करतो.' -गुजा २१. [तोंड + दाबणें = बंद करणें] ॰दिसणें-एखाद्याची केलेली निर्त्भर्त्सना दुसरी बाजू न कळतां लोकांच्या नजरेस येणें व आपणच वाईट ठरणें (पण ज्याची निर्भर्त्सना केली असेल त्याचें वर्तन सुधारण्याची आशा नसणें ). 'मी तुला रागें भरलों म्हणजे माझें तोंड मात्र दिसेल, पण तूं आपला आहे तसाच राहणार.' ॰देणें- १ पारा वगैरे देऊन तोंडाच्या आंतील त्वचा सुजविण; तोंड आणविणें. 'वैद्य- बोवा म्हणाले कीं त्याला तोंड दिलें आहे.' २ सैन्याच्या अग्रभागीं राहून शत्रूवर हल्ला करणें. ३ (एखाद्याचा) प्रतिपक्षी होऊन राहणें; लढावयाला सिद्ध होणें. ४ (आट्यापाट्यांचा खेळ शेवटची पाटी खेळून परत येणार्‍या गड्याकडे पाटी धरणारानें तोंड फिरविणें. ५ एखाद्या गोष्टीला न भितां तींतून धैर्यानें पार पडण्याची तयारी ठेवणें. ॰धरणें-१ अन्नसेवन करण्याची तोंडाची शक्ति आजार वगैरे कारणांमुळें नाहींशी होणें. 'त्याचें तोंड धरलें आहे, त्याला चमच्याचमच्यानें दुध पाजावें लागतें.' २ (एखा- द्याची) बोलण्याची शक्ति नाहींशी करणें. ३ (एखाद्याला आपल्या) तावडींत, कबजांत आणणें. 'मी त्याचें तोंड धरलें आहे, तो आतां काय करणार !' ॰धुवून येणें-(उप.) एखाद्याची विनंति कधींहि मान्य होणार नाहीं असें म्हणून फेटाळून लावतांना योजण्याचा तिरस्कारदर्शक वाक्प्रचार. ॰निपटणें-(आजार, उपवास इ॰ कारणांमुळें एखाद्याचे) गाल खोल जाणें, चेहरा सुकणें. 'महिनाभर हें मूल तापानें आजारी होतें, त्याचें तोंड पहा कसें निपटलें आहे तें.' ॰पडणें-१ सुरवात होणें. 'लढाईस तोंड पडलें.' २ (गळूं इ॰ कांस) छिद्र पडणें; फुटणें; वाहूं लागणें. ॰पसरणें-वेंगाडणें-१ खिन्नपणाची, केविलवाणी मुद्रा धारण करणें. २ हिनदीनपणानें याचना करणें. ॰पाघळणें-१ न बोला- वयाची गोष्ट कोणाएकापाशीं बोलून टाकणें; बडबडणें. २ (ल.) गुप्त गोष्ट बाहेर फोडणें, फुटूं देणें. ॰पाडणें-एखादें कोडें सोड- विण्यास, वेढा फोडण्यास प्रारंभ करणें; भांडणास सुरवात करणें. ॰पाहणें-१ (एखाद्याच्या) आश्रयाची, मदतीची अपेक्षा करून असणें. 'आम्ही पडलों गरीब, म्हणून आम्हांला सावकाराचीं तोंडें पाहण्याची पाळी वारंवार येते.' २ (एखाद्यानें) स्वतःच्या शक्तीचा, कर्तुत्वाचा अजमास करणें. 'तूं असें करीन म्हणतोस, पण आधीं आपलें तोंड पहा !' ३ बोलणाराचें भाषण नुसतें ऐकणें, पण त्यानें सांगितलेलें करावयास किंवा केलेला बोध अनु- सरावयास प्रवृत्त न होतां स्वस्थ बसून राहणें. 'म्हणती हाणा, मारा, पाडा, घ्या, काय पाहतां तोंडा ।' -मोद्रोण ३.१२५. ॰पाहात-बसणें-काय करावें, कसें करावें या विवंचनेंत असणें. ॰पिटणें-बडबड करणें. 'पश्चिमद्वारींचें कवाड । सदा वार्‍यानें करी खडखड । तैशी न करी बडबड । वृथा तोंड पिटीना ।' -एभा १०.२३१. ॰फिरणें-१ आजारानें, पदार्थाच्या अधिक सेवनानें तोंडाची रुची नाहींशी होणें; तोंड वाईट होणें. २ तोंडांतून शिव्यांचा वर्षाव होऊं लागणें. 'तो रागावला म्हणजे कोणावर त्याचें तोंड फिरेल ह्याचा नेम नाहीं.' ॰फिरविणें-१ तोंडाची चव नाहींशी करणें. २ शिव्यांचा वर्षाव करीत सुटणें. 'तो रागावला म्हणजे तुमच्यावर देखील तोंड फिरवावयाला कचर- णार नाहीं.' ३ वितळत असलेला किंवा तापविला जात अस- लेला धातु इ॰ कानें) रंगामध्यें फरक दाखविणें, रंग पाल- टणें. 'ह्या तांब्यानें अद्याप तोंड फिरविलें नाहीं, आणखी पुष्कळ आंच दिली पाहिजे.' ४ दुसर्‍याकडे पाहणें; विशिष्ट गोष्टी- कडे लक्ष्य न देतां इतर गोष्टींकडे प्रवृत्ति दाखविणें. ५ गतीची दिशा बदलणें; दुसर्‍या दिशेला, माघारें वळणें. ॰फुटणें-१ थंडीमुळें तोंडाची बाह्य त्वचा खरखरीत होणें, भेगलणें. २ (एखाद्याची) फजिती उडणें; पत नाहींशी होणें; नाचक्की होणें; अभिमान गलित होण्याजोगा अपमान, शिक्षा इत्यादि होणें. ॰बंद करणें-१ जीभ आवरणें; जपून बोलणें. २ (एखाद्याला) लांच देऊन गप्प बसविणें, वश करून घेणें. ॰बंदावर राखणें- खाण्याला किंवा बोलण्याला आळा घालणें. 'तूं आपलें तोंड बंदावर राखिलें नाहींस तर अजीर्णानें आजारी पडशील.' ॰बांधणें-लांच देऊन (एखाद्याचे) तोंड बंद करणें; (एखाद्यानें) गुप्त गोष्ट फोडूं नये म्हणून पैसे देऊन त्यास गप्प बसविणें. ॰बाहेर काढणें-१ तोंड दाखविणें; राजरोसपणें समाजांत हिंडणें (बहुधां निषेधार्थी प्रयोग). 'तुरुंगांतून सुटून आल्यावर त्यानें आज दोन वर्षांत एकदांहि तोंड बाहेर काढलें नाहीं.' २ फिरण्यासाठीं, कामकाजासाठीं घराबाहेर पडणें. ॰बिघडणें-तोंड बेचव होणें; तोंडास अरुचि उत्पन्न होणें. विटणें. -॰भर-भरून बोलणें- भीड, संकोच, भीति न धरतां मनमोकळेपणानें भरपूर, अघळपघळ बोलणें; दुसर्‍याचें आणि आपलें समाधान व्हावयाजोगें अघळपघळ बोलणें. ॰भरून साखर घालणें-(एखाद्याचें) तोंड साखरेनें भरणें; (एखाद्याच्या) कामगिरीबद्दल, विजयाबद्दल संतोषादाखल त्याचें तोंड साखरेनें भरणें; (एखाद्याच्या) कामगिरीबद्दल गोड, भरपूर मोबदला देणें. ॰मागणें-(आट्यापाट्यांचा खेळ) लोण घेऊन परत जातांना पाटीवरील गड्यास आपणाकडे तोंड फिर- विण्यास सांगणें. तोंड मागितल्यावर पाटीवरील गडी आपलें तोंड फिरवितो त्यास 'तोंड देणें' म्हणतात. ॰माजणें-१ मिष्टान्न खावयाची चटक लागल्यानें साध्या पदार्थाबद्दल अरुचि उत्पन्न होणें. २ शिव्या देण्याची, फटकळपणानें बोलण्याची खोड लागणें. ॰मातीसारखें-शेणासारखें होणें-(आजारानें) तोंडाची चव नाहींशी होणें; तोंड विटणें, फिरणें; अन्नद्वेष होणें. ॰मिचकणें- दांत, ओंठ खाणें. ॰येणें-१ तोंडाच्या आंतल्या बाजूच्या त्वचेस फोड येऊन ती हुळहुळी होणें व लाळ गळूं लागणें. २ (कर.) लहान मूल बोलूं लागणें. 'आमच्या मुलाला तोंड आलें आहे.' = तो बोलावयास लागला आहे. ॰रंगविणें-१ विडा खाऊन ओंठ तांबडे लाल करून घेणें. २ (ल.) (एखाद्याचें थोबाड) थोबाडींत मारून लाल- भडक करून सोडणें. ॰लागणें-(लढाई, वादविवाद, अंगीकृत कार्य इ॰ कांस) सुरवात होणें. 'तेव्हां युद्धास तोंड लागलें.' -इमं २९०. ॰लावणें-१ (वादविवाद इ॰ कांस) सुरवात करणें. २ प्यावया- साठीं एखादें पेय ओंठाशीं नेणें. ३ ॰वाईट करणें-निराशेची मुद्रा धारण करणें. ॰वाईट होणें-१ तोंडावर निराशेची मुद्रा येणें. २ (ताप इ॰ कांमुळें) तोंडास अरुचि येणें. ॰वांकडें करणें-१ वेडावून दाखविणें. २ नापसंती दर्शविणें. ॰वाजविणें-एकसारखें बोलत सुटणें; निरर्थक बडबड करणें; बकबकणें; वटवट करणें; भांडण करणें. ॰वासणें-१ निराशेनें, दुःखानें तोंड उघडणें व तें बराच वेळ तसेंच ठेवणें. २ याचना करण्यासाठीं तोंड उघडणें, वेंगाडणें. ॰वासून पडणें-शक्तीच्या क्षीणतेमुळें, उत्साह, तेज, वगैरे नष्ट झाल्यामुळें, गतप्राण झाल्यामुळें आ पसरून पडणें. 'तो पडला सिंहनिहमत्तद्विपसाचि तोंड वासून ।' -मोगदा ५.२५. ॰वासून बोलणें-अविचारानें बोलणें. 'ऐसें स्वसख्यांपासीं कां गे वदलीस तोंड वासून ।' -मोउद्योग १३.२०५. ॰विचकणें-दीन मुद्रेनें आणि केविलवाण्या स्वरानें याचना करणें. ॰वेटा(डा)विणें- (काव्य) (एखाद्यास) वेडावून दाखविण्यासाठीं त्याच्यापुढें तोंड वेडेंवाकडें करणें. ॰शेणासारखें पडणें-(लाजिरवाणें कृत्य केल्यानें) तोंड उतरणें; निस्तेज होणें; काळवंडणें. ॰संभाळणें- जपून बोलणें; जीभ आवरणें; भलते सलते शब्द तोंडांतून बाहेर पडूं न देणें; अमर्याद बोलण्यास आळा घालणें. ॰सुटणें- चरांचरां, फडाफडां, अद्वातद्वा बोलूं लागणें. ॰सुरू होणें-बड- बडीला, शिव्यांना सुरवात होणें. ॰सोडणें-१ फडांफडां, अद्वातद्वा बोलूं लागणें; अमर्याद बोलणें. २ आधाशासारखें खात सुटणें; तोंड मोकळें सोडणें. ॰हातीं-हातावर धरणें-तोंडे सोडणें (दोन्ही अर्थीं) पहा. तोंडाचा खट्याळ-फटकळ-फटकाळ-फटकूळ-वाईट-शिनळ-वि. शिवराळ; तोंडाळ; अश्लील बोलणारा. तोंडाचा खबरदार-बहादर-बळकट-वि. बोलण्यांत चतुर, हुषार; बोलण्याची हातोटी ज्याला साधली आहे असा. -तोंडाचा गयाळ, तोंडगयाळ-वि. जिभेचा हलका; चुर- चोंबडा; लुतरा; बडबड्या; ज्याच्या तोंडीं तीळ भिजत नाहीं असा. तोंडाचा गोड-वि. गोड बोलणारा; गोडबोल्या. म्ह॰ तोंडचा गोड हाताचा जड = गोड व अघळपघळ भाषण करणारा पण प्रत्यक्ष कांहींहि मदत, पैसा न देणारा. तोंडाचा जड-वि. रेंगत बोलणारा; फार थोडें बोलणारा; अस्पष्ट भाषण करणारा; तोंडाचा तिखट-वि. खरमरीत, स्पष्ट, झोंबणारें, कठोर भाषण करणारा. तोंडाचा तोफखाना सुटणें-(एखाद्याची) अद्वातद्वा बोल- ण्याची क्रिया सुरू होणें; शिव्यांचा वर्षाव होऊं लागणें. तोंडाचा पट्टा सुटणें-चालणें-अद्वातद्वा बोलणें; शिव्यांचा भडिमार सुरू होणें; तोंडाचा पट्टा सोडणें-(एखाद्यानें) शिव्यांचा भडिमार सुरू करणें; जीभ मोकळी सोडणें; (एखाद्याची) खरडपट्टी आरंभिणें. तोंडाचा पालट-पु. रुचिपालट; तोंडास रुचि येईल असा अन्नांत केलेला फेरबदल; अन्नांतील, खाण्यांतील फरक, बदल. तोंडाचा बोबडा-वि. बोबडें बोलणारा; तोतरा. तोंडाचा मिठा-वि. गोडबोल्या; तोंडाचा गोड पहा. तोंडाचा हलका- वि. चुरचोंबडा; भडभड्या; विचार न करितां बोलणारा; फटकळ. तोंडाचा हुक्का होणें-(व.) तोंड सुकून जाणें. तोंडाची चुंबळ-स्त्री. दुसर्‍यास वेडावून दाखविण्याकरितां चुंबळीसारखी केलेली ओठांची रचना; वांकडें तोंड. तोंडाची वाफ दघडणें- १ मूर्खास उपदेश करतांना, निरर्थक, निरुपयोगी, निष्फळ भाषण करणें. २ ज्यावर विश्वास बसणार नाहीं असें भाषण करणें; मूर्खपणानें बोलणें; वल्गना करणें; बाता मारणें. (या वाक्प्रचारांत दवडणें बद्दल खरचणें गमविणें, फुकट जाणें, घालविणें, काढणें इ॰ क्रियापदेंहि योजतात). तोंडाचें बोळकें होणें-(म्हातारपणामुळें) तोंडां- तील सर्व दांत पडणें. तोंडाचें सुख-न. तोंडसुख पहा. (वरील सर्व वाक्प्रचारांत तोंडाचा या शब्दाऐवजीं तोंडचा हा शब्दहि वापरतात). तोंडांत खाणें, मारून घेणें-१ गालांत चपराक खाणें; मार मिळणें. २ पराभूत होणें; हार जाणें. ३ फजिती झाल्या- नंतर शहाणपणा शिकणें; नुकसान सोसून धडा शिकणें; बोध मिळविणें. तोंडांत जडणें-थोबाडींत, गालांत बसणें (चपराक, थप्पड इ॰). तोंडांत तीळभर न राहणें-अगदीं क्षुद्र अशी गुप्त गोष्टहि पोटांत न ठरणें; कोणतीहि लहानसहान गोष्ट गुप्त ठेवूं न शकणें. तोंडांत तोंड घालणें-१ (ल.) प्रेम, मैत्री इ॰कांच्या भावानें वागणें; मोठ्या प्रेमाचा, मित्रपणाचा आविर्भाव आणून वागणें. २ एकमेकांचें चुंबन घेणें. तोंडांत देणें-(एखाद्याच्या) थोबाडींत मारणें; गालांत चपराक मारणें; तोंडांत बोट घालणें-(ल.) आश्चर्यचकित, थक्क होणें; विस्मय पावणें. तोंडांत भडकावणें-तोंडांत देणें पहा. तोंडांत माती घालणें-खाण्यास अन्न नसणें; अतिशय हाल, कष्ट सोसावे लागणें. तोंडांत माती पडणें-१ (एखाद्याची) उपा समार होणें. २ मरणें. तोंडात शेण घालणें-(एखाद्याची) फजिती करणें; (एखाद्यास) नांवें ठेवणें; खरडपट्टी काढणें. तोंडांत साखर असणें-(गो.) (एखाद्याचें) तोंड, वाणी गोड असणें; गोड बोलत असणें. तोंडांत साखर घालणें-१ तोंड भरून साखर घालणें पहा. २ (उप.) तोंडांत शेण घालणें. 'सावित्री- बाईच्या तोंडांत लोक जेव्हां फारच साखर घालीत, तेव्हां तिनें दोन तीन जुनेरीं एकत्र शिवून जानकीबाईला द्यावी.' -रंगराव. तोंडांत साखर पडणें-(एखाद्याला) आनंदाचा प्रसंग, दिवस येणें. तोंडांतून ब्र काढणें-(तोंडांतून) अधिक-उणें अक्षर काढणें, उच्चारणें. 'आंतल्याआंत चूर होऊन मेलें पाहिजे, तोंडां- तून ब्र काढण्याची सोय नाहीं.' -विकारविलसित. तोंडानें पाप भरणें, तोंडें पाप घेणें-लोकांचीं पातकें उच्चारणें; लोकांचे दोष बोलून दाखविणें; वाईट बोलण्याची हौस यथेच्छ पुरवून घेणें; लोकांचीं पापें उच्चारून जिव्हा विटाळणें. 'कैसीं वो मानुसें । सपाइनि परंवंसें । तोंडे पाप घेती कांइसें । वायां वीण ।' -शिशु २१६. तोंडापुढें-क्रिवि. अगदीं जिव्हाग्रीं; मुखोद्गत. तोंडा- पुरता, तोंडावर गोड-वि. मधुर पण खोटें बोलणारा; दुतोंड्या; वरवर गोड बोलणारा व आंतून कपटी असलेला; उघडपणें प्रिय भाषण करणारा व मनांत निराळेच असणारा. ताडापुरता मांडा-पु. १ भूक भागेल एवढीच पोळी. २ (ल.) जेमतेम गरज भागेल एवढाच जरूर त्या वस्तूचा पुरवठा. तोंडार मारप- (गो.) (एखाद्याच्या) पदरांत चूक बांधणें; वरमण्यासारखें उत्तर देणें. तोंडार ल्हायो उडप-(गो.) फार जलद, अस्ख- लित बोलणें; लाह्या फुटणें. तोंडाला काळोखी आणणें- लावणें-बेअब्रू, नापत करणें. तोंडाला टांकी दिलेली असणें-देवीच्या खोल वणांनीं तोंड भरलेलें असणें; तोंडावर देवीचे वण फार असणें. तोंडाला पाणी सुटणें-(एखादी वस्तु पाहून तिच्यासंबंधीं) मोह उत्पन्न होणें; हांव सुटणें. तोंडाला पानें पुसणें-फसविणें; चकविणें; छकविणें; भोळसाविणें; भोंदणें; तोंडा- वरून हात फिरविणें. 'त्याच्यावर देखरेख करावयाला चार माणसें होतीं, पण त्यानें सर्वांच्या तोंडाला पानें पुसून आपला डाव साधला.' तोंडाला फांटा फुटणें-मूळ मुद्दा सोडून भलतेंच बोलत सुटणें; हवें तसें अमर्याद भाषण करूं लागणें. तोंडावर-क्रिवि. १ समक्ष; डोळ्यांदेखत. २ (ल.) निर्भयपणें; भीड न धरतां. 'मी त्याच्या तोंडावर त्याला लुच्चा म्हणण्यास भिणार नाहीं.' तोंडावर तुकडा टाकणें-(एखाद्यानें) गप्प बसावें, प्रतिकूल बोलूं नये म्हणून त्याला थोडेसें कांहीं देणें. तोंडावर-ला-तोंड देणें-१ (एखाद्यास) विरोध करणें; विरुद्ध बोलणें. २ (एखाद्यास) उद्धटपणानें, अविनयानें, दांडगेपणानें उत्तर देणें; उत्तरास प्रत्युत्तर देणें. तोंडा- वर तोंड पडणें-दोघांची गांठ पडून संभाषण, बोलाचाल होणें. तोंडावर थुंकणें-(एखाद्याची) निर्भर्त्सना, छीःथू करणें; धिक्कार करणें. तोंडावर देणें-तोंडांत देणें पहा. 'काय भीड याची द्या कीं तोंडावरी ।' -दावि ३०२. तोंडावर नक्षत्र पडणें-(एखाद्यानें) तोंडाळपणा करणें; शिवराळ असणें; नेहमीं अपशब्दांनीं तोंड भर- लेलें असणें. 'ह्याजकरिकां तोंडावर नक्षंत्र पडलेल्या पोरास म्या बोलविलें म्हणून हे मला शब्द लावीत नाहींत.' -बाळ २.१४२. तोंडावर पडप-(गो.) थोबाडींत (चपराक) बसणें, पडणें. तोंडावर पदर येणें-१ वैधव्य प्राप्त होणें. 'तिच्या तोंडावर पदर आला म्हणून ती बाहेर पडत नाहीं.' २ लज्जेनें तोंड लपविण्या- जोगी स्थिति होणें. तोंडावर मारणें-(एखाद्याला) पराभूत करणें. तोंडावर सांगणें-बोलणें-(एखाद्याच्या) समक्ष, निर्भीडपणें, बेडरपणें सांगणें, बोलणें. तोंडावरून-तोंडावर हात फिर- विणें-(एखाद्यास) गोड बोलून, फूसलावून, भुलथाप देऊन फस- विणें; भोंदणें; छकविणें. तोंडाशीं तोंड देणें-(हलक्या दर्जाच्या व्यक्तीनें वरिष्ठाशीं) आपला दर्जा विसरून, बरोबरीच्या नात्यानें, अविनयानें बोलणें, व्यवहार करणें. तोंडास काळोखी-स्त्री. मुखसंकोच; ओशाळगत; गोंधळून गेल्याची स्थिति; बेअब्रू; कलंक. तोंडास काळोखी, काजळी लागणें-(एखाद्याची) बेअब्रू, नाचक्की होणें; दुष्कीर्ति होणें; नांवाला कलंक लागणें. तोंडास काळोखी-काजळी लावणें-(एखाद्याचें) नांव कलंकित करणें; बेअब्रू करणें. 'सुनेनें माझ्या तोंडाला काळोखी लावली.' तोंडास कुत्रें बांधलेलें असणें-ताळतंत्र सोडून, अद्वातद्वा, अपशब्द बोलणें; शिव्या देणें. 'त्यानें तर जसें तोंडाला कुत्रेंच बांधलें आहे.' तोंडास खीळ घालणें-निग्रहपूर्वक, हट्टानें मौन धारण करणें. तोंडास तोंड-न. वादविवाद; वाग्युद्ध; हमरी- तुमरी; धसाफसी. -क्रिवि. समक्षासमक्ष; समोरासमोर; प्रत्यक्ष. तोंडास तोंड देणें-१ तोंडाशीं तोंड देणें पहा. २ मार्मिकपणें, खरमरीतपणें उत्तर देणें. तोंडास पाणी सुटणें-(एखाद्या- वस्तूबद्दल, गोष्टीबद्दल) लोभ, मोह उत्पन्न होणें; तोंडाला पाणी सुटणें पहा. 'पोर्तुगीज लोकांची बढती पाहून तिकडच्या दुसर्‍या साहसी लोकांच्या तोंडास पाणी सुटलें.' -बाजी. तोंडास तोंड न दिसणें-(पहांटेस) तोंड न ओळखतां येण्याइतका अंधेर असणें (झुंजमुंजु पहाटेविषयीं वर्णन करितांना हा वाक्प्रचार योजतात). 'अद्याप चांगलें उजाडलें नाहीं, तोंडास तोंड दिसत नाहीं.' तोंडास-तोंडीं बसणें-(श्लोक, शब्द इ॰) स्पष्ट, बिन- चूक, भरभर म्हणण्याइतका पाठ होणें. 'तो श्लोक दहा वेळां पुस्तकांत पाहून म्हण, म्हणजे तो तुझ्या तोंडीं बसेल.' तोंडास येईल तें बोलणें-विचार न करितां, भरमसाटपणानें वाटेल तें बोलणें; अद्वातद्वा, अपशब्द बोलणें. तोंडास-तोंडीं लागणें- १ (एखाद्याच्या) तोंडास तोंड देणें; उलट उत्तरें देणें. २ हुज्जत घालणें; वादविवाद करण्यास तयार होणें. (एखाद्याच्या) तोंडा- समोर-क्रिवि. १ (एखाद्याच्या) समक्ष; समोर; डोळ्यांदेखत. २ अगदीं मुखोद्गत; जिव्हाग्रीं. तोंडापुढें पहा. 'हा श्लोक माझ्या अगदीं तोंडासमोर आहे.' तोंडास हळद लागणें-(एखाद्यास) दोष देणें, नापसंती दर्शविणें अशा अर्थीं हा वाक्प्रचार योजितात. तोंडासारखा-वि. (एखाद्याची) खुशामत, स्तुति इ॰ होईल अशा प्रकारचा; एखाद्याच्या खुशामतीकरितां त्याच्या मतास जुळता. तोंडासारखें बोलणें-(एखाद्याची) स्तुति, खुशामत करण्या- करितां त्याच्याच मताची, म्हणण्याची री ओढणें; त्याचें मन न दुखवेल असें बोलणें. तोंडीं आणणें-देणें-(रोग्यास) लाळ गळण्याचें, तोंड येण्याचें औषध देऊन तोंड आणणें. तोंडीं- काढणें-१ ओकारी देणें; वांती होणें. २ (एखाद्यास त्यानें) केलेले उपकार बोलून दाखवून टोमणा मारणें. तोंडीं खीळ पडणें- तोंड बंद होणें; गप्प बसणें भाग पडणें. 'अवघ्या कोल्यांचें मर्म अंडीं । धरितां तोंडीं खीळ पडे ।' तोंडीं घास येणें-(एखा- द्यास) घांसभर अन्न मिळणें; चरितार्थाचें साधन मिळणें; पोटा पाण्याची व्यवस्था होणें. तोंडीं तीळ न भिजणें-१ (तापानें, संतापून ओरडण्यानें, रडण्यानें) तोंड शुष्क होणें, कोरडें पडणें. २ एखादी गुप्त गोष्ट मनांत न राहणें, बोलून टाकणें; तोंडीं तृण धरणें-(एखाद्यानें) शरण आलों. असें कबूल करणें; शरणागत होणें; हार जाणें (दांतीं तृण धरणें असाहि प्रयोग रूढ आहे). तोंडीं देणें-(एखाद्यास एहाद्या माणसाच्या, कठिण कार्याच्या) सपाट्यांत, तडाख्यांत, जबड्यांत, तावडींत लोटणें, देणें; हाल, दुःख सोसण्यास (एखाद्यास) पुढें करणें. तोंडीं-तोंडास पान- पानें पुसणें-(एखाद्यास) छकविणें; लुबाडणें; भोंदणें; अपेक्षित लाभ होऊं न देणें; स्वतःच्या पोळीवर तूप ओढून घेऊन दुसर्‍यास तोंड पहावयास लावणें. 'त्यानें आपल्या नळीचें वर्‍हाड केलें आणि सर्वांच्या तोंडीं पान पुसलें.' तोंडीं माती घालणें- (एखाद्यानें) अतिशय दुःखाकुल, शोकाकुल होणें. 'ऊर, माथा बडवून, तोंडीं माती घालूं लागली' -भाव ७५. तोंडीं येऊन बुडणें-नासणें-(एखादी वस्तु, पीक इ॰) अगदीं परिपक्वदशेस, परिणतावस्थेस येऊन, ऐन भरांत येऊन, नाहींशीं होणें, वाईट होणें. तोंडीं येणें-१ (पारा इ॰ औषधानें) तोंड येणें. २ ऐन भरांत, परिपक्व दशेस, पूर्णावस्थेस येणें. तोंडीं-रक्त, रगत लागणें-१ वाघ इ॰ हिंस्त्र पशूला माणसाच्या रक्ताची चटक लागून तो माणसावर टपून बसणें. २ (ल.) लांच-लुचपत खाण्याची चटक लागणें. तोंडीं लागणें-(एखाद्यास एखाद्या वस्तूची, खाद्याची चव प्रथमच कळून त्या वस्तूची त्यास) चटक लागणें; आवड उत्पन्न होणें. 'ह्याच्या तोंडीं भात लागला म्हणून यास भाकर आवडत नाहीं.' तोंडीं लागणें-१ (एखाद्याच्या) तोंडास तोंड देणें; उद्धटपणानें, आपला दर्जा विसरून उलट जबाब देणें. २ हुज्जत घालणें; वादविवादास प्रवृत्त होणें; तोंडास लागणें पहा. 'सुज्ञ आहेत ते दूषकांच्या तोंडीं लागत नसतात.' -नि. ३ (युद्ध, भांडण, इ॰कांच्या) आणीबाणीच्या ठिकाणीं, आघाडीस, अग्रभागीं असणें. तोंडीं लावणें-न. जेवतांना तोंडास रुचि आणणारा भाजी, चटणी इ॰ सारखा मधून मधून खावयाचा चमचमीत पदार्थ. तोंडीं लावणें-१ जेवतांना भाजी, चटणी इ॰ चम- चमीत पदार्थानें रुचिपालट करणें. 'आज तोंडीं लावावयाला भाजीबिजी कांहीं केली नाहीं काय ?' २ विसारादाखल पैसे देणें. तोंडें मागितलेली किंमत-स्त्री. (एखाद्या वस्तूची) दुकान- दारानें सांगितलेली व झिगझिग वगैरे न करितां गिर्‍हाइकानें दिलेली किंमत. तोंडें मानलेला-मानला-वि. (तोंडच्या) शब्दानें, वचनानें मानलेला (बाप, भाऊ, मुलगा इ॰); धर्माचा, पुण्याचा पहा. तोंडें वांकडीं करणें-वेडावून दाखविणें; वेडावणें. लहान तोंडीं मोठा घांस घेणें-१ (एखाद्यानें) आपल्या आवांक्या- बाहेरचें काम हातीं घेणें. २ (वडील, वरिष्ठ माणसांसमोर) न शोभेल असें, मर्यादा सोडून, बेअदबीनें बोलणें; वडील माणसांस शहाणपण शिकविणें. जळो तुझें तोंड-(बायकी भाषेंत) एक शिवी. स्त्रिया रागानें ही शिवी उपयोगांत आणतात. म्ह॰ १ तोंड बांधून (दाबून) बुक्कयांचा मार = एखाद्याचा विनाकारण छळ होऊन त्यास त्याविरुद्ध तक्रार करतां न येणें; एखाद्यास अन्यायानें वाग- वून त्याविरुद्ध त्यानें कागाळी केल्यास त्यास बेगुमानपणें शिक्षा करणें. 'बायकांचा जन्म म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार, म्हण- तात तें अक्षरशः खरें आहे.' -पकोघे २ (गो.) तोंडाच्या बाता घरा बाईल भीक मागता = बाहेर मोठमोठया गप्पा मारतो पण घरीं बायको भीक मागते. सामाशब्द- तोंड उष्ट-न. एखादा-दुसरा घांस खाणें; केवळ अन्न तोंडास लावणें; तोंड खरकटें करणें. [तोंड + उष्टें] ॰ओळख-स्त्री. परस्परांचा विशेष परिचय नसतां, चेहरा पाहू- नच हा अमुक आहे असें समजण्याजोगी ओळख; (एखाद्याची) चेहरेपट्टी लक्षांत राहून तीवरूनच त्याला ओळखतां येणें; नांव वगैरे कांहीं माहीत नसून (एखाद्याचा) केवळ तोंडावळाच ओळ- खीचा असणें. 'एखाद्याला वाटेल कीं बाळासाहेबांशीं त्याची तोंड- ओळखच आहे.' -इंप ३७. ॰कडी-स्त्री. १ आंतील तुळयांचीं तोंडें बाहेर भिंतींतील ज्या तुळईवर ठेवतात, ती सलग तुळई. २ कौलारू छपराचे वासे ज्या सलग तुळईवर टेकतात ती छपराच्या शेवटीं, टोंकास असलेली तुळई. ३ गुरांचें दावें जिला बांधतात ती कडी. ४ (सोनारी धंदा) दागिन्याची शेवटची कडी, नाकें; ज्यांत फांसा इ॰ अडकवितात ती (सरी इ॰ सारख्या दागिन्याची) टोंकाची, तोंडाची कडी; (जव्याच्या) मण्याच्या वगैरे तोंडाशीं ठेवलेली कडी. ५ (जमाखर्चाच्या वहींतील जमा आणि खर्च या दोहोंबाजूंचा मेळ. हा मेळ = = = अशा दुलांगीनें, (दुहेरी रेषेनें) दाखविण्याचा प्रघात आहे. 'वहीची खात्याची-तारखेची-तोंडकडी' असा शब्दप्रयोग करितात. (क्रि॰ मिळणें; जुळणें; येणें; उतरणें; चुकणें; बंद होणें). [तोंड + कडी] ॰कळा-स्त्री. चेहर्‍यावरील तजेला; कांति; तेज; टवटवी. (प्र.) मुखकळा. [तोंड + कळा = तेज] ॰काढप-(गो.) उपदंश झालेल्या रोग्यास एक प्रकारचें औषध देऊन त्याच्या तोंडांतून लाळ वाहवितात तो प्रकार. ह्या औषधानें तोंड बरेंच सुजतें. [तोंड + गो. काढप = काढणें] ॰खुरी- स्त्री. (ना.) गुरांचा एक रोग. ॰खोडी-वि. तोंडाळ; टाकून बोलणारा; तोंड टाकणारा; अशी संवय असलेला. 'परम अधम रुक्मी हा महा तोंडखोडी ।' -सारुह ३.७८. [तोंड + खोड = वाईट संवय] ॰घडण-स्त्री तोंडाची ठेवण; चेहरेपट्टी; तोंडवळां. 'या मुलाची बापासारखी तोंडघडण आहे.' [तोंड + घडण = रचना] ॰घशीं- सीं-क्रिवि. १ जमीनीवर पडून तोंड घासलें जाईल, फुटेल अशा रीतीनें. (क्रि॰ पडणें; पाडणें; देणें). 'तो तोंडघसींच पडे करतां दंतप्रहार बहु रागें ।' -मो. २. (आश्रय तुटल्यानें) गोत्यांत; पेचांत; अडचणींत; फजिती होईल अशा तर्‍हेनें; फशीं (पडणें). [तोंड + घासणें] ॰घशी देणें-दुसरा तोंडघशीं पडे असें करणें. ॰चाट्या-वि. खुशामत करणारा; थुंकी झेलणारा; तोंडासारखें बोलणारा. ॰चाळा-पु. १ तोंड वेडेंवाकडें करून वेडावण्याची क्रिया. २ वात इ॰कांच्या लहरीनें होणारी तोंडाची हालचाल, चाळा. ॰चुकाऊ-वू-व्या, तोंडचुकारू-चुकव्या-वि. (काम इ॰ कांच्या भीतीनें) दृष्टि चुकविणारा; तोंड लपविणारा; नजरेस न पडे असा. [तोंड + चुकविणें] ॰चुकावणी-स्त्री. (एखाद्यापासून) तोंड लपविण्याची, स्वतःस छपविण्याची क्रिया. ॰जबानी-स्त्री. तोंडानें सांगितलेली हकीगत, दिलेली साक्ष, पुरावा. -क्रिवि तोंडी, तोंडानें. [तोंड + फा. झबान्] ॰जाब-पु. तोंडी जबाब. ॰झाडणी-स्त्री. तिरस्कारपूर्ण उद्गारांनीं झिडकारणें; खडका- वणें; खरडपट्टी काढणें. ॰देखणा-ला-वि. आपल्या अंतःकरणांत तसा भाव नसून दुसर्‍याचें मन राखण्याकरितां त्याला रुचेल असा केलेला (व्यवहार, भाषण, गो इ॰); खुशामतीचा; तोंडासारखा; तोंडपुजपणाचा. 'प्राणनाथ, मला हीं तोंडदेखणीं बोलणीं आव- डत नाहींत.' -पारिभौ ३५. [तोंड + देखणें = पाहणें] ॰देखली गोष्ट-स्त्री.दुसर्‍याची मर्जी राखण्याकरितां केलेलें, खुशामतीचें भाषण. ॰निरोप-पु. तोंडी सांगितलेला निरोप. 'कृष्णास ते हळुच तोंडनिरोप सांगे ।' -सारुह ४.९. ॰पट्टा-पु. (बायकी). तोंडाचा तोफखाना; अपशब्दांचा भडिमार; संतापानें, जोराजोरानें बेबंदपणें बोलणें. [तोंड + पट्टा = तलवार] ॰पट्टी-स्त्री. (शिवणकाम) तोंडाला शिवलेला पट्टी. 'योग्य तेवढी तोंडपट्टी कातरावी.' -काप्र. १४. ॰पाटिलकी-स्त्री. १ आपण कांहीं न करतां बसल्या जागे- वरून लुडबुडेपणानें दुसर्‍यांना हुकुमवजा गोष्टी, कामें सांगणें (पाटलाला बसल्या जागेवरून अनेक कामें हुकुम सोडून करून घ्यावीं लागतात त्यावरून). २ (उप.) लुडबुडेपणाची वटवट, बडबड; तोंडाळपणा. 'दुसरें कांहीं न झालें तरी नुसती तोंडपाटिलकी करण्यास कांहीं हरकत नाहीं.' -आगर ३.६१. [तोंड + पाटिलकी = पाटलाचें काम] ॰पाठ-वि. पुस्तकाच्या सहाय्यावांचून केवळ तोंडांनें म्हणतां येण्यासारखा; मुखोद्गत [तोंड + पाट = पठण केलेलें] ॰पालटपुस्त्री. १ (अरुचि घालविण्याकरितां केलेला) अन्नांतील फेरबदल. २ अन्नांत फेरबदल करून अरुचि घालविण्याची क्रिया. [तोंड + पालट = बदल] ॰पिटी-स्त्री. १ (वडील, गुरु इ॰ कांची) आज्ञा न मानतां तिचें औचित्य इ॰ कासंबंधीं केलेली वाटाघाट; (वडिलांशीं, गुरूंशीं) उद्धटपणानें वाद घालणें; उलट उत्तर देणें; प्रश्न इ॰ विचारून अडवणूक करणें. 'गुरूंसी करिती तोंडपिटी ।' -विपू १.५७. २ (दगडोबास शिकविण्याकरितां, विसराळू माणसास पुन्हां पुन्हां बजाविण्याकरितां, थिल्लर जनावरास हांकलण्याकरितां करावी लागणारी) व्यर्थ बडबड, कटकट, वटवट. [तोंड + पिटणें] ॰प्रचिती-प्रचीति-स्त्री. खुशामत करण्याकरितां (एखाद्याच्या) व्यक्तिमाहात्म्यास, भाषणास, अस्तित्वास मान देणें; आदर दाख- विणें. [तोंड + प्रचीति] ॰प्रचीतक्रिवि. १ तोंडासारखें; खुशामतीचें; तोंडापुरतें (भाषण, वर्तन इ॰ करणें) २ माणूस ओळखून, पाहून; माणसामाणसांत तारतम्य ठेवून (बोलणें, चालणें, वागणें). ॰प्रचीत बोलणारा-चालणारा-वागणारा-वि. माणसामाणसांत तारतम्य ठेवून चालणारा, बोलणारा, वागणारा. ॰फटालकी -फटालीस्त्री. तोंडाची निरर्थक बडबड, वटवट, टकळी. [तोंड + ध्व. फटां ! द्वि.] ॰फटाला-ल्या-वि. मूर्खपणानें कांहीं तरी बड बडणारा; बकणारा; वटवट करणारा. [तोंड + ध्व. फटां !] ॰फट्याळ-वि. तोंडाचा फटकळ; शिवराळ; तोंडाळ; बातेफरास; अंगीं कर्तृत्व नसून लंब्या लंब्या बाता झोंकणारा. ॰फट्याळी- स्त्री. शिवराळपणा; तोंडाळपणा; वावदूकता. [तोंडफट्याळ] ॰बडबड्या-बडव्या-वि. निरर्थक वटवट, बडबड करणारा: बकबकणांरा टकळी चालविणारा. ॰बंद -बांधणी-पुस्त्री. गाडीच्या चाकाच्या तुंब्यावरील बाहेरील बाजूचें लोखंडी कडें, पट्टी. आंतील बाजूच्या कड्यास कटबंद असें म्हणतात. [तोंड + बंद = बांधणी] ॰बळ-न. वक्तृत्वशक्ति; वाक्पटुता; वाक्चातुर्य. 'आंगबळ न चांगबळ देरे देवा तोंडबळ.' ॰बळाचा-वि. ज्याला बोलण्याची हातोटी, वक्तृत्कला साधली आहें असा; तोंडबळ अस- लेला; भाषणपटु जबेफरास. ॰बाग-स्त्री. (राजा.) चेहरेपट्टी; चेहर्‍याची ठेवण, घडण; मुखवटा. ॰बांधणी-स्त्री. १ तोंडबंद पहा. २ (ढोरांचा धंदा) कातड्याच्या मोटेच्या सोंडेच्या टोंकाकरितां बाजूला शिवलेला गोट. ॰भडभड्या-वि. तोंडास येईल तें बड- बडत, बकत सुटणारा; बोलण्याची, बडबडण्याची हुक्की, इसळी ज्यास येते असा; भडभडून बोलणारा. ॰भर-वि. तोंडास येईल तेवढा; भरपूर. 'हॅमिल्टन यांनीं खर्चवाढीबद्दल तोंडभर मगणी केली होती.' -केले १.१९८. ॰मार-स्त्री. १ रोग्यावर लाद- लेला खाद्यपेयांचा निर्बंध, पथ्य. २ एखाद्यास बोलण्याकरितां तोंड उघडूं न देणें; भाषणबंदी. ३ (ल.) (एखाद्याच्या) आशा, आकांक्षा फोल ठरविणें; (एखाद्याचा केलेला) आशाभंग; मनोभंग; निराशा. (क्रि॰ करणें). ॰मारा-पु. १ शेतीच्या कामाच्या वेळीं पिकांत वगैरें काम करतांना गुरांच्या तोंडाला जाळी, मुंगसें, मुसकें बांधणें. २ (एखाद्यास केलेली) भाषणबंदी; खाद्यपेयांचा निर्बंध. ३ (प्र.) तोंडमार. तोंडमार अर्थ ३ पहा. ॰मिळवणी- स्त्री, १ जमा आणि खर्च यांचा मेळ; तोंडें मिळविण्यासाठीं मांडलेला जमाखर्च. २ ऋणको व धनको यांच्यांतील हिशेबाची बेबाकी, पूज्य. ३ मेळ. -शर. ॰मिळवणी खातें- (जमाखर्च) कच्चें खातें (याचें देणें येणें सालअखेर पुरें करून खुद्द खात्यांत जिरवितात). ॰लपव्या-वि. तोंड लपविणारा; छपून राहणारा; दडी मारून बसणारा. ॰लाग-पु. शिंगें असलेल्या जनावरांच्या तोंडास होणारा रोग; यांत लाळ गळत असते. ॰वळख-स्त्री (प्र.) तोंडओळख पहा. ॰वळण-वळा-नपु. चेहरा; चर्या; मुद्रा; चेहर्‍याची घडण, ठेवण; रूपरेखा; चेहरामोहरा; चेहरेपट्टी; मुखाकृति; मुखवटा. [तोंड + वळ = रचना] ॰वीख-न. (ल.) तोंडानें ओकलेलें, तोंडां- तून निघालेलें, विषारी, वाईट भाषण, बोलणें. [तोंड + विष] ॰शिनळ, शिंदळ-वि. अचकटविचटक, बीभत्स बोलणारा; केवळ तोंडानें शिनळकी करणारा. ॰शेवळें-न. मुंडावळ. -बदलापूर २७७. [तोंड + शेवळें = शेवाळें] ॰सर-क्रिवि. तुडुंब; तोंडापर्यंत; भरपूर. ॰सरता-वि. अस्खलित, तोंडपाठ न म्हणतां येण्या- सारखा; अडखळत अडखळत म्हणतां येण्यासारखा (श्लोक, ग्रंथ इ॰). -क्रिवि. घसरत घसरत; अडखळत; चुका करीत; कसेंबसें; आठवून आठवून. [तोंड + सरणें] ॰सुख-न. १ एखा- द्यानें केलेल्या अपकाराचें शरीरानें प्रतिकार करण्याचें सामर्थ्य नसल्यामुळें केवळ तोंडानें यथेच्छ शिव्यांचा, अपशब्दांचा भडि- मार करून त्यांत सुख मानणें. २ जिव्हा मोकाट सोडून वाटेल तसें बोलण्यांत मानलेलें सुख; यथेच्छ व अद्वातद्वा केलेलें भाषण; (एखाद्याची काढलेली) खरडपट्टी; बोडंती. (क्रि॰ घेणें). ॰सुख घेणें-(एखाद्याची) खरडपट्टी काढणें, हजेरी घेणें; (एखा- द्यावर) शिव्यांचा, अपशब्दांचा भडिमार करणें. ॰सुटका-स्त्री. १ जिभेचा (बोलण्यांतील) स्वैरपणा; सुळसुळीतपणा; वाक्चा- पल्य; जबेफराशी; (भाषण इ॰ कांतील) जनलज्जेपासूनची मोक- ळीक. २ भाषणस्वातंत्र्य; बोलण्याची मोकळीक. ३ तोंडाळपणा; शिवराळपणा. ४ (पथ्य, अरुची, तोंड येणें इ॰ कांपासून झालेली) तोंडाची सुटका, मोकळीक; तोंड बरें होणें; खाण्यापिण्याला स्वातंत्र्य. [तोंड + सुटणें] ॰हिशेबी-वि. अनेक रकमांचा मनांतल्या- मनांत चटकन्‌ हिशेब करून सांगणारा बुद्धिमान (मनुष्य); शीघ्रगणक. ॰तोंडागळा-वि. (तोंडानें) बोलण्यांत, वक्तृत्वशक्तींत अधिक. 'कीं शेषाहूनि तोंडागळें । बोलकें आथी ।' -ज्ञा ९. ३७०. [तोंड + आगळा = अधिक] ॰तोंडातोंडी-क्रिवि. १ समोरासमोर; २ बोलण्यांत; बोलाचालींत. [तोंड द्वि.] ॰तोंडाळ-वि. १ दुसर्‍या- वर तोंड टाकणारा; शिवराळ; भांडखोर. 'लटिकें आणि तोंडाळ । अतिशयेंसीं ।' -दा २.३.१०. २ बडबड्या; वाचाळ. [तोंड] म्ह॰ हाताळ पुरवतो पण तोंडाळ पुरवत नाहीं = शिवराळ माणसा- पेक्षां चोर पुरवतो. ॰तोंडाळणें-उक्रि. बकबक करून गुप्त गोष्ट फोडणें; जीभ पघळणें. [तोंडाळ] ॰तोंडोंतोंड-क्रिवि. तोंडापर्यंत; कंठोकांठ; तुडुंब; तोंडसर.॰तोंडोंळा-पु. तोंडवळा; चेहरेपट्टी. [तोंड + ओळा, वळा प्रत्यय]

दाते शब्दकोश

उल्लास

पु. (विरू.) उल्हास. १ उत्साह; आनंदः प्रस- न्नता; संतोष; सुस्वभाव. 'भाग्य तेथ विलासु । सुख तेथें उल्लासु ।।' -ज्ञा १८.१६३७. २ हौस; आनंद वाटणें; आवड असणें; गोडी लागणें. 'आधींच शंखाचा उल्लास । त्यांत पातला फाल्गुनमास ।।' [सं. उद् + लस्]

दाते शब्दकोश

उल्लासणे      

अक्रि.       आनंदित होणे. [सं. उत्+लस्]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उल्लासणें

अक्रि. आनंदित होणें; संतोषणें; उल्लासयुक्त होणें. 'आला नीरधराभिराम निकटीं हस्तींद्र उल्लासला ।।' -गजेंद्र- मोक्ष (रघुनाथपंडित) ४९. [सं. उद् + लस्]

दाते शब्दकोश

उल्लसित

वि. १ प्रफुल्लित; आनंदित; संतुष्ट; हर्षयुक्त. २ सुशोभित; सतेज; प्रकाशित. [सं. उद् + लस्]

दाते शब्दकोश

उल्लसणें

क्रि. १ विलसणें; प्रकाशित होणें. तेजयुक्त होणें; प्रकट होणें. 'समुद्र कां वायुवशे । तरंगाकार उल्लसे ।।' -ज्ञा १५. ३४४. २ आनंदित होणें; प्रसन्न होणें; संतुष्ट होणें. [सं. उद् + लस् = प्रकाशणें, खेळणें]

दाते शब्दकोश

उलसमार

स्त्री. (गो.) जेवणानंतर येणारा आळस. [सं. लस् = काम करणें, किंवा सं. अलस = आळस]

दाते शब्दकोश

विलास

पु. १ क्रिडा; खेळ; करमणूक; कालविनोदन; करमणूक (विशेषतः स्त्रिया, नर्तकी, गाणारणी बरोबर). २ चैन; मजा; रंगेलपणा; स्वैर भोग. ३ स्त्रियांना प्रेमदर्शक हावभाव; काम- चेष्टा; नखरा (भ्रूसंकेत, लाजणें, मुरडणें वगैरे). [सं. वि + लस्] विलासिनी-स्त्री. विलास करणारी स्त्री. -ज्ञा ९.३२३. 'विलो- कुनि विलासिनी जन पुनःपुन्हा कामुक ।' -केका १०१. विलासी-वि. १ खेळकर; क्रीडासक्त; आनंदी. २ चैनी; कामुक; विषयलोलुप; भोगी; गुलहौशी.

दाते शब्दकोश

विलसणें

अक्रि. १ शोभणें; विराजणें; चमकणें; प्रकाशणें; चकाकणें; झळकणें. -ज्ञा १८.८७७. २ वागणें; वर्तणें; असणें. 'तो कवणीं स्थिती असे । कैसेनि रूपी विलसे ।' -ज्ञा २.२८९. [सं. वि + लस्] विलसित-वि. विराजित; शोभायमान; प्रकाश- मान; तेजस्वी; सुंदर. -न. विलास; चेष्टा.

दाते शब्दकोश