आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह!
शब्दार्थ
लांच्छन
लांच्छन lāñcchana n (S) A mark in general, but, in Maráṭhí, more especially the discoloration or sports on the moon's disk. 2 A stigma, stain, slur, spot, blot.
लांच्छन n A mark in general. A stigma.
(सं) न० डाग, कलंक, दोष.
लांच्छन, लांछन
न. १ खूण; चिन्ह; डाग (विशेषतः चंद्रावरील). 'मृगलांछन.' 'जो पुरुष चक्रवर्ती होणार त्याचे हातावर कमलाचें लांछन असतें.' २ कलंक; बट्टा; दुर्लौ- किक; बदनामी. 'आतां दोहीं पक्षीं लागलें लांछन । देव भक्त. पण लाजविल ।' -तुगा १५६१. ३ नांव; अभिधान. [सं.] लांछित-वि. १ चिन्हित; खूण असलेला. २ कलंकित; ज्याला डाग आहे असा. 'लांछित चंद्रमा.' निंद्य. [सं.]
संबंधित शब्द
असलाई
असलाई asalāī f (असल q. v.) Primeness, genuineness, excellence, prime quality: also nobility, gentility, highness of family or stock. Ex. असलाईस खोटें काम करणें मोठें लांच्छन; आपली अ0 टाकूं नये. असलाईचा a Prime, genuine, excellent, noble &c.
श्रीवत्स
श्रीवत्स śrīvatsa m S A name of विष्णु. 2 m n also श्रीवत्स- लांच्छन n S श्रीवत्सांक m S The mark (a cross-form curl of hair) on the breast of विष्णु (made by the foot of a Bráhman). See ex. under भ्रमरपडळी.
मृग
पु. १ हरिण; काळवीट. २ सत्तावीस नक्षत्रांपैकीं पांचवें नक्षत्र. ३ मृग नक्षत्राचा पाऊस. ४ सामान्यपणें चतुष्पाद प्राणी; पशु; जनावर. [सं. मृग् = शोधणें] म्ह॰ मृगाचे आधीं पेरावें बोंबेचें आधीं पळावें. सामाशब्द- ॰छाल-छाला-पु. मृगा- जिन; हरिणाचें कातडें. 'शेले शाली शाला दुशाल । स्वीकारा सांडून मृगछाल ।' -नव १७.१३७. ॰जल-ळ-न. अति- उन्हानें जमीन किंवा वाळवंट सडकून तापलें म्हणजे त्या लग- तच्या हवेचे थरहि तापून हलके होतात. ते वर जाऊं लागले म्हणजे हवा पाण्याच्या लाटांप्रमाणें हलूं लागते व ते थर पाण्या- प्रमाणें भासतात अशा रीतीनें होणारा पाण्याचा भास. ॰जल- स्नान-न. अशक्य गोष्ट; खपुष्प. ॰तृषा-तृष्णिका-स्त्री. मृग जळ पिऊन शांत होणारी तृष्णा; अशक्य गोष्ट. ॰नयना- नैना-नेत्री-लोचना-स्त्री. हरिणाच्या डोळ्यांसारखें डोळे अस- लेली स्त्री; सुंदर स्त्री. ॰नाभि-मद-पु. कस्तुरी. 'मृगनामीं रेखिला टिळा ।' -तुगा ४०६९. ॰नीर-न. मृगअळ. ॰पति-राज- वर, मृगेंद्र-पु. (काव्य) पशूंचा राजा; सिंह. ॰बहार-बार- पु. आगोटीच्या सुमारास किंवा मृगनक्षत्राचे वेळीं येणारा बार; पहिला बहर; हत्तीबार, आंबेबार पहा. ॰मद-पु. मृगनाभि पहा. ॰लांच्छन, मृगांक-पु. १ मृगाच्या आकाराचा डाग(चंद्रावरील). २ (काव्य) चंद्र; मृगाची आकृति धारण करणारा. 'कृपेने अंकीं धरिला हरिण । मृगलांछन चंद्रमा ।' -मुआदि ३४.१२. ॰शा- वाक्षी-स्त्री. हरिणाच्या पिलाच्या डोळ्यांसारखे डोळे असलेली, चंचल डोळ्यांची स्त्री; सुंदर डोळ्यांची स्त्री. 'मृगशावाक्षी गुण निधान । उपमा नाहीं स्वरूपातें ।' -शिली १४.१४९. [मृग + शाव = पिलूं + अक्षन् = डोळा] ॰शि(शी)तळाई-शि(शी)तळी- स्त्री. मृगाच्या पावसानें हवेंत आलेला थंडावा. ॰शिर-शीर्ष- न. मृग नक्षत्र. ॰शीर्षक(हस्त)-पु. (नृत्य) मूठ मिटून नंतर आंगठा व करंगळी उभीं करणें. ॰साल-न. मृगनक्षत्राच्या आरंभा- पासून सुरू होणारें वर्ष. या खेरीज दुसरें पाडव्याचें साल, दिवा- ळीचें साल व सुरमन पहा. ॰सेवडी-स्त्री. कृष्णाजिन; हरिणाचें कातडें. 'वरी चोखट मृगसेवडी । माजी धूतवस्त्राची घडी ।' -ज्ञा ६.१८२. मृगांक-पु. चंद्र, मृगलांच्छान पहा. 'उदैला आनंद मृगांकु । मोहा अंधकारीं ।' -भाए २. [मृग + अंक = चिन्ह] मृगाचा किडा-पु. मृगनक्षत्रांत किंवा त्या सुमारास आढळणारा एक तांबडा किडा. मृगांबु-न. मृगजळ. 'ब्रह्मगिरीहूनिं न निघे । आणि समुद्रींही कीर न रिगे । तरी माजीं दिसे वाउगें । मृगांबु जैसें ।' -ज्ञा १५.२३८. [मृग + अम्बु = पाणी] मृगाब्धि, मृगांभ-न. मृगजळ. मृगासन-न. १ बसावयाचें हरिणाचें कातडें २ देवडीच्या दोन बाजूंस असणाऱ्या ओट्यांपैकीं प्रत्येक ओटा. ३ रांगोळीची एक आकृति. ही आठ आठ ठिपक्यांच्या आठ समांतर ओळी व बाजूनें दोनदोन ठिपके देऊन चौपट साधून काढतात. -रंगवल्लिका १.११. मृगी-स्त्री. हरिणी. मृगेंद्र, मृगेश-पु. (काव्य) सिंह. [मृग + इंद्र, ईश] मृगया-स्त्री. शिकार; पारध. [सं. मृग् = शोधणें]