आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह!
शब्दार्थ
लावण्य
लावण्य n Beauty, loveliness, prettiness. Saltness.
लावण्य lāvaṇya n S Beauty, loveliness, prettiness: also handsomeness or comeliness or gracefulness of figure. 2 Saltness, the taste or the property of salt.
न. १ सौंदर्य; रूप. ज्ञा १.४. २ शोभा; दिमाख. ३ खारटपणा; क्षारता. [सं.] ॰खाणी-स्त्री. (सौंदर्याची खाण) बायकांच्या अंगची सुंदरता व मोहकपणा या गुणांना उद्देशून हा शब्द योजतात. (सामा.) सुंदरी. 'लावण्यखाणी । हस्तिनी- वरुन उतरे ते क्षणीं ।' अत्यंत, अपरंपार सौन्दर्य असणाऱ्या व्यक्तीला म्हणतात.
(सं) न० सुस्वरूपता, सौंदर्य, रूप.
संबंधित शब्द
अडखुळा
पु. १ अडवणूक; आडकाठी; प्रतिबंध; विरोध. २ खोळंबा; खोटी; विलंब. –वि. १ भयभीत; भेदरलेला; स्तंभित. ‘ तथा वासुदेवाचे कुमर । रामकृष्ण लावण्य उदार । जेहीं अड़खुले केले असुर । धाकुटेपणीं ।।’ -नरुस्व २९२. २ बोलतांना चाचरणारा, लागणारा; तोतरा. [अडखळणे]
आगंतुक
(विरू.) अगांतुक. -वि. १ आकस्मिक; अनपे- क्षित; अवचित प्राप्त. २ पाहुणा; नेहमीं राहणारा नव्हे तो; नवखा; उपरी; फिरस्ता; वाटसरू; पांथस्थ; परकी. ३ जेवणाच्या वेळीं कोणी न बोलावतां अवचित आलेला (मनुष्य); अगांतुक. ४ (शाप.) विजातीय; वेगळा; परकीय; आपातातः प्राप्त. 'या रीतीनें केलेल्या शिर्यांत पुष्कळ आगंतुक द्रव्यें असतात.' -सेंपू २.४५. ५ शाश्वत नसणारें (सुख, दुःख, लाभ, इ॰). -क्रिवि. (चुकीनें) आकस्मिक; एकदम; एकाएकीं. ॰खर्च-पु. अनपेक्षित, एकदम, एकाएकी उपस्थित झालेला खर्च. ॰गुण-पु. अंगीं नव्हेत असे अभ्यासानें येणारे गुण. 'रूप लावण्य अभ्यासितां नये । सहज गुणास न चले उपाये । कांहीं तरी धरावी सोये । आगंतुक गुणाची ।' -दा २.८.३१. ॰लाभ-पु. १ अकस्मात, अकल्पित घडलेला फायदा; घबाड. २ आड मिळकत. ॰वृत्ति-स्त्री. अगां- तुकी; आगंतुकी; भोजनाच्या वेळीं आमंत्रण नसतां अवचित जाऊन जेवण्याची पद्धति. ॰व्रण-पु. (वैद्यक) कांहीं प्रसंगाने पडलेलें, नैसर्गिक नसलेलें क्षत किंवा खौंद; शारीरव्रणाच्या उलट.
आगंतुक गुण
पु. अंगी नसलेले पण अभ्यासाने येणारे गुण : ‘रूप लावण्य अभ्यासितां नये । सहज गुणास न चले उपाये । कांहीं तरी धरावी सोये । आगंतुक गुणाची ।’ − दास २·८·३१.
अव्याकृति
वि. सुंदर; सुरूप. 'शेषशयना अव्याकृति । घन- श्याम तूं लावण्य जोती । '-मक ३२. १६२. [सं. अ + वि + आकृति]
भासळणें
अक्रि. लुप्तप्रभ होणें; दिपणें; तेजानें झाको- ळणें. 'आंगी बाळवयसा असे । परि लावण्य तिहीं लोकांवरी दिसे । जयाचे या रूपाचेनि प्रकाशें । भासळोत चंद्रसूर्य ।।' -नरुस्व ३३०. [सं. भा]
छवि
स्त्री. प्रकाश; कांति; तेज; लावण्य; सौंदर्य; शोभा. [सं. छवि; तुल॰ फा. शबीह]
छवि, छवी
स्त्री. १. प्रकाश; कांती; तेज; लावण्य; सौंदर्य; शोभा : ‘तेवीं निंदोपाधी आंतगर्वी । मंद जाहली प्रज्ञा छवी ।’ -एभा ५·१७५. २. प्रतिकृती; छाया; छायाचित्र. [सं.]
धज
स्त्री. १ डौल; ऐट; चांगली ढब; लकब; हातोटी. २ (विशेषतः अंगाच्या बांध्यांचा, रूपाचा) देखणेपणा; रेखीवपणा; लावण्य; रूप. ३ घोड्याचा उंचपणा; घोड्याच्या मानेचा ऐटदार बांक. ४ धाडस. [सं. ध्रज् = गतौ; हिं. धज = डौल, स्वरूप; गु धज = सुरेख, देखणा] ॰देणें-(एखाद्या कार्यास) खांदा, नेट, धीर देणें; (एखादें कार्य करण्यास) पुढें सरसावणें. ॰मारणें-(गर्दीतून) घुसणें; वाट काढणें; मार्ग काढून पुढें येणें.॰दार-वि. १ भव्य; सुरेख (मनुष्य इ॰); घाटदार; उमदा व ठसठसीत (दागिना, जिन्नस इ॰). याच्या उलट किरकोळ; क्षुद्र इ॰ २ (ल.) उदार; सढळ हाताचा; दानशूर; सत्कार्यप्रेमी. [धज + फा. दार् प्रत्यय]
धज
स्त्री. १. डौल; ऐट; चांगली ढब; लकब; हातोटी. २. (विशेषतः अंगाच्या बांध्याचा, रूपाचा) देखणेपणा; ठसठशीतपणा; रेखीवपणा; लावण्य; रूप. ३. घोड्याचा उंचपणा; घोड्याच्या मानेचा ऐटदार बाक. ४. धाडस. [सं. धृज्; हिं.; गु.]
हुस्न
न. १ सौंदर्यच लावण्य. २ चांगलेपणा. 'यांतील हुस्न लिहिलें.' -रा ७; खलप २.१०६. [अर. हुस्न्]
जिवळणे
अक्रि. जिव्हारी लागणे : ‘जिया मदन जिवळिला ऐसे निज लावण्य’ - पंचो १०७·८.
कंदर्प
पु. १ मदन; कामदेव. 'ऐसा नियतु कां कंदर्पु ।' -ज्ञा ७.५१. 'कोटि कंदर्प लोपती पुढें । ऐसें सुंदर लावण्य रूपडें ।' -संवि १७.१६४. [सं. कदर्प] २ (ल.) कांदा. [सं. कंद + दर्प = कुत्सित दर्प (?)] -र्पाचें घर-न. योनी; स्त्रीजननेंद्रिय; स्मरमंदिर- गृह-कूप. 'कुश्चित कंदर्पाचें घर । म्याचि साचार सेविलें ।' -एभा २६.११२. ॰केली-पु. शृंगार; मदनक्रीडा; सुरतक्रीडा; संभोग. 'तेथ कंदर्पूकेळी खेळतीं युगळें । राजहंसांचीं ।।' -शिशु ६४९.
खुब(प)सुरत
वि. अतिशय सुंदर; देखणा; उत्तम; सौंदर्यशाली; लावण्यपूर्व; मनोहर. [फा. खूब = सुंदर + सूरत् = रूप] खुपसुरती-सुर्तीस्त्री. सौंदर्य; लावण्य. 'मुखचंद्राची काय वर्ण खुपसुर्ती ।' -आक्रुराचा पाळणा (पाळणे संग्रह) २०.
खुपसुरती, खुपसुर्ती
स्त्री. सौंदर्य; लावण्य : ‘मुखचंद्राची काय वर्णु खुपसुर्ती ।’ - अक्रूराचा पाळणा (पाळणेसंग्रह) २०.
सौंदर्य
न. सुंदरपणा. लावण्य; देखणेपणा; उत्कृष्ट रूप [सं.]
(सं) न० लावण्य, स्वरूप.
सुंदरी
मुग्धा, मुग्धसुंदरी, मदन-पुतळी, राजबिंडी, कोमलांगी, चारुगात्री, स्वरूपसुंदर, रूपाढ्य, सौंदर्यपुतळी, चटक चांदणी, चंद्रानना, इंदुमुखी, रति, अप्सरा, लावण्यवती, शुभदर्शना, लावण्यलतिका, सौंदर्यखनि, रूपवती, सुरूपा, सुरेखा, शुभांगी, सुरयुवती, किन्नरी, मदनिका, लावण्यसंपन, रूपाने उजवी, स्वरूपसुंदर राणी, सुरूपतेची देणगी असलेली, सुडौल ललना, हा मोहाचा प्याला, ही गोड लांच, नाजूक-साजूक, देखणी सुरत, कुणालाहि मोह घालील, चारचौघांत उठून दिसणारी, रेखीव कांति व सौंदर्यं, दाहक मादक मुग्ध सौंदर्य, सात्त्विक लावण्य, कोणीहि कौतुकाने मान वळवून दुस-यांदा पहावें असें सौंदर्य.
स्वरूप
न. १ स्वतःचें रूप, आकार. ढब, चेहरा. २ मुद्रा; तोंडवळा; हुबेहुब रूपरेषा. ३ प्रकृति; स्वभाव ४ लावण्य; सौंदर्य. ५ आत्मस्वरूप. 'आंतु मीनलेनि मनोधर्में । स्वरूपप्राप्तीचेनि प्रेमें ।' -ज्ञा ८.९३. ६ महत्त्व; वैशिष्ट्य. 'मग मत्सस्वरूप काय ब्राह्मण आले दुरूनि जेवाया । त्यांसि तुझी भगिनी हे बा न नमुनि जरि म्हणेल जेवा या ।' -भोवन ८.१९. स्वरूपता-स्त्री. चार मुक्तींपैकीं एक; ईश्वरासारखें रूप होणें; स्वरूपता. 'स्वरूपचि व्हावें ते स्वरूपता । तिसरी मुक्ति ।' -दा ४.१०२४. स्वरूप प्राप्ति-स्त्री. ब्रह्ममय होणें. स्वरूपवान-वि. सुंदर, देखणा. स्वरूपस्थिति-स्त्री. १ प्रकृति; भावना इ॰ ची अवस्था. २ ब्रह्म- स्वरूप होणें. ३ नैसर्गिक अवस्था. स्वरूपाकार-वि. ब्रह्मस्वरूप झालेला. स्वरूपी-वि. तत्सदृश; तल्लक्षणवान; तदाकार.
तडे
न. ताटस्थ्य : ‘जेथिचें लावण्य पांतां । जगाचेया डोलेया तडे पडत ।’ – वह २३६.
येवा
पु. १ येणें, आगम, आगमन, ह्या अर्थीं जावा शब्दा- शींच प्रयोग होतो. २ दुसऱ्याकडून येणें असलेला पैसा. 'पांचशें रुपये लोकाकडे येवा आहे. ' ३ (ल.) लाभ; प्राप्ति; मिळालेला नफा. ४ शोभा; लावण्य; रूप; देखणेपणा. 'दोन तोळे सोन्यानें कसा येवा आला. 'योग्यता; शोभिवंतपणा; प्रशस्तपणा. (वस्त्रें, भूषणें यांचा ). 'काळ्या मनुष्याला मोत्यांचा येवा असतो. ' [येणें] म्ह॰-उदंड खाल्ला मेवा तर येईना अर्धभाकरीचा येवा. सामाशब्द- ॰जावा-पु. येणेंजाणें; घरोबा; राबता; भेटीस जाणेंयेणें, दळणवळण. [येणें + जाणें] ॰देवी-स्त्री. जमा व खर्च; घेणी व देणी; व्यापार; व्यवहार. [येणें + देणें]
दिव्य
वि. १ दैवी; स्वर्गीय. 'तो धांवला घटोत्कच दिव्य निधानस्थ यक्षसा राया ।' -मोभीष्म ५.४९. २ अतिशय सुंदर; सुरेख; लावण्यसंपन्न. ३ लोकोत्तर; अलौलिक. 'दिव्यौषध जैसें रोगिया ।' -ज्ञा १७.३९३. [सं.] ॰उत्पात-पु. दैवी चमत्कार-तारा तुटणें, वीज पडणें, प्रकाश दिसणें इ॰. ॰कळा- स्त्री. घशांतील गांठ. ॰चक्षु-दृष्टि-नस्त्री. अज्ञान; दृष्टीआड अस- णार्या वस्तु पाहण्याची दैवी दृष्टि; ज्ञानदृष्टि. -वि. १ अशी दृष्टि असणारा. 'तुवां सहजें दिव्यचक्षु केला ।' -ज्ञा ११.२९२. २ सुंदर दृष्टि असणारा. ॰तेजन. सूर्य. 'उजळोनि दिव्य तेजा हातिवा ।' -ज्ञा १६.२३. ॰देह-पु. १ अलौकिक, तेजस्वी देह; स्वर्गांत राहणार्याचें अमलीन, निर्जर शरीर. २ (ल.) सुदृढ व सुंदर शरीर. ॰देही-वि. दिव्यदेह असणारा. ॰पक्ष-वि. एकरंगी व ज्याच्या अंगावर कोठेंहि भोंवरा नाहीं असा (घोडा). हा सुलक्षणी समजतात. -अश्वप १.९१. ॰पादुका-स्त्रीअव. देव किंवा ॠषि यांनीं आपल्या भक्तास दिलेल्या व ज्या घातल्या असतां इच्छित स्थळीं सहज जातां येतें अशा खडावा. ॰प्रकाश-पु. १ दैवी, स्वर्गीय प्रकाश. २ आत्मज्ञान. ॰बाण-पु.दैवी शक्तीचा बाण; आपलें काम करून परत भात्यांत येणारा असा बाण. हा रामा- जवळ होता अशी कथा आहे. ॰रस-पु. अमृत. ॰रूप-न. १ सुंदर रूप; लावण्य; दिव्यदेह. २ आत्मा. ॰वर्ष-न. देवांचें वर्ष; ब्रह्मदेवाचें वर्ष. 'अनेक दिव्य सहस्त्रवर्षीं । तप करिती महाॠषी ।' -गुच २.२२५. ॰सुमनवृष्टि-स्त्री. स्वर्गीय फुलांचा वर्षाव; स्वर्गांतून होणारी फुलांची वृष्टि. (देवांना आनंद झाल्यावेळीं अशी वृष्टि) होते). ॰स्थान-न. स्वर्ग;स्वर्लोक; देवस्थान; देवलोक. ॰ज्ञान- न. १ अतींद्रिय ज्ञान. २ ईश्वरी ज्ञान. ३ आत्मज्ञान. ॰ज्ञानी-स्त्री. दिव्य ज्ञान असणारा. दिव्यान्न-न. देवान्न पहा. दिव्योपदेश- पु. ब्रह्मज्ञानाच उपदेश.