मराठी बृहद्कोश

सात मराठी शब्दकोशांतील २,८४,८८८ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

वकल

वकल vakala n ( A Wife and family, and pop. a harlot.) Any branch or division (of a business or concern); a department, province, region, sphere: also the establishment or apparatus, the agents, instruments, and operations appertaining. The word is freely used. Ex. स्वयंपाकाचें वकल ह्या खोलींत असूं द्या आणि पालखीचें वकल पुढचे चौकांत.

मोल्सवर्थ शब्दकोश

न. १ पत्नी. २ कुटुंब; खटलें. 'जोंवरि मिलविशि पैसा तोंवरी कुटुंब सारें तुझें वकल ।' -राला १०. ३ (व.) आप्तपरिवार; नातेंगोतें. 'आमच्या वकलांत अशी मुलगी नाहीं.' ४ रांड; वेश्या. 'वकील आणि वक्कस हे दोन, वकार वर्जावेत !' ५ भडवा; कुंटण्या. -व्यनि २५. ६ खातें; क्षेत्र; शाखा; प्रकरण; खटलें. 'स्वयंपाकाचें वकल या खोलींत असूं द्या आणि पाल- खीचें वकल पुढचे चौकांत.' [अर. वक्ल्]

दाते शब्दकोश

वकल n (Generally wrongly pronounced as वक्कल.) Any branch; a department. A harlot.

वझे शब्दकोश

न. भाडोत्री कूळ. 'आम्ही आपल्या परसू- दाराकडे एक वकल ठेवलें आहे.' २ हंगामावर धान्य घेण्याच्या बोलीनें ज्यानें काम करावयाचें असें कूळ. 'माझ्या- कडे १० वकले आहेत.'

दाते शब्दकोश

(आ) न० स्त्री० कुटुंब. २ वेश्या.३ बिऱ्हाड, स्थान.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

संबंधित शब्द

वाकळ

वाकळ vākaḷa f (वाक) A quilt composed of pieces. 2 A tattered garment; an article of apparel reduced to shreds and fluttering rags. 3 Applied to a slovenly and disorderly woman (ragged slut); also to an aged and haggard woman.

मोल्सवर्थ शब्दकोश

वक्कल

वकल पहा.

दाते शब्दकोश