मराठी बृहद्कोश

तेरा मराठी शब्दकोशांमधील ३,००,८७५ शब्दांचा एकत्रित संग्रह

शब्दार्थ

वडिलोपार्जित

वडिलोपार्जित a Ancestral.

वझे शब्दकोश

वि० वंशपरंपरागत.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

संबंधित शब्द

मिरास

स्त्रीन. १ वडिलोपार्जित वतन; दायभाग; वंशपरंपरा संपत्ति; स्थावर मालमत्ता (विशेषतः शेत, जमीन इ॰); वतनदारी. 'निपुत्रिकांचे मिरास तें दिवाणाचें' -रा ८४९. २ जमिनीवरील कर. [अर. मीरास्] ॰पुरणें-गाठोडें पुरणें; महत्वाची गोष्ट एखाद्या ठिकाणीं ठेवलेली असणें. ॰जमीन-स्त्री. वतनदीरीची जमीन; वडिलोपार्जित जमीन. 'जमीनसारा थकला तरी तीन वर्षानंतर मिरासदार परागंदा झाल्याशिवाय मिरास जमीन खालसा करण्याचा सरकारला हक्क नव्हता.' -गांगा १२. ॰झाडा-पु. मिराशीची आणि मिरासदारीची कलमबंदी. ॰दार, मिरास्दार, मिराशी-सी-पु. १ मिराशीचा उपभोग घेणारा; वतनदार; थळकरी; सरकारसारा नियमानें भरून आपलें स्वामित्व कायम ठेवणारा शेतमालक. 'वडगांवीची मोकदमीस कोण्ही मिरास्दार नाहीं.' -रा १७.३२. २ माहार; महारकीचें वंशपरंपरा वतन भोगणारा महार. मिराशीचे चार प्रकार-१ वतनदार, २ मिरास- दार, ३ उपरी, ४ ओवाडकरू. [फा. मीरासीदार्] ॰पट्टी-टी- स्त्री. मिरास जमीनीवरील कर; कायम लावणीचे जमीनीवरील कर. 'मिरासपटी तिसरे सालीं घ्यावी.' -वाडसभा ४.६७. ॰पत्र- न. मिराशीच्या हक्काचा लेख.

दाते शब्दकोश

अग्रजाधिकार      

पु.       १. प्रथम अपत्य म्हणून असणारा अधिकार. २. वडीलोपार्जित इस्टेटीत ज्येष्ठ पुत्र म्हणून वारशाने मिळणारा हक्क. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आनुवंशिक      

वि.       १. अनुवंशामुळे प्राप्त झालेला; आईवडील व इतर पूर्वज यांच्यामुळे अपत्यांमध्ये उतरलेल्या गुणदोषांमुळे निर्माण झालेला. २. पिढीजात; वारशाने मिळालेला; वडीलोपार्जित. (धन, वतन इ.). [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आनुवंशिक

वि. १ वंशपरंपरागत चालत आलेला; बापा- पासून मुलास, त्याच्या मुलास, असे आलेले (गुण, दोष). पिढी- जाद; वारशानें मिळालेला; वडिलोपार्जित (धन, वतन, इ॰) [सं. अनु + वंश]

दाते शब्दकोश

दाई(इ)ज

वि. १ एका कुळांत जन्मल्यामुळें वडिलोपार्जित मिळकतीचा बनलेला भागीदार; हिस्सेदार; दायाद; भाऊबंद. 'अवलाद अफलाद दाइज अगदीं नाहीं.' -वाडबाबा २.३६. २ सगोत्र नात्यामुळें सुतक सोयरे-बाळगणारा; अशौचसंबंधी आप्त; (पुरुष, स्त्री इ॰). ३ (ल.) हितशत्रु; मत्सर, द्वेष करणारा; अशुभचिंतक. [सं. दायाद] ॰गोत्रज-पुअव. एकगोत्रोत्पन्न आप्त; नातलग; भाऊबंद. [दाईज + सं. गोत्रज = गोत्रांत जन्मलेला] ॰जण, दाईजण-पुअव. १ (समुच्चयार्थीं) वंशपरंपरागत मिळकतींतील वारसदार; भाऊबंद. दायाद. (दाईजण हें रूप चुकीनें वापरण्यांत येतें). २ (समुच्चयार्थीं.) (सरकारी कागदपत्रांत) वंशपरंपरा अधि- कार असलेले (सरकारी) गांवकामगार; या अर्थीं 'समस्त दाईजण' असाहि शब्द रूढ आहे. [दाईज + जण = व्यक्ति]

दाते शब्दकोश

दाईज      

वि.       १. एका कुळात जन्मल्यामुळे वडिलोपार्जित मिळकतीचे बनलेले भागीदार; हिस्सेदार; दायाद; भाऊबंद : ‘अवलाद अफलाद दाइज अगदीं नाहीं.’ - वाडबाबा २·३६. २. सगोत्र नात्यामुळे सुतक - सोयेर बाळगणारा. ३. (ल.) हितशत्रू; मत्सर, द्वेष करणारा. [सं. दायाद]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

डांईज      

वि.       १. भाऊबंद; भाई. २. वडिलोपार्जित मालमत्तेतील वाटेकरी. (माण.) पहा : दाईज [सं. दायाद]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

दाय

पु. वारसांना वांटून द्यावयाची मिळकत, जिंदगी; पितृ- धन; (एखाद्या) वारसाचा हिस्सा, वांटा. याचे हिंदुधर्मशास्त्रा- नुसार अप्रतिबंध व सप्रतिबंध (दाय) असे दोन प्रकार आहेत. 'प्रभु दीनबंधु, भूसुर हा दीन, न होय पात्र कां दाया ।' -मोकृष्ण ८.१६१. -मोउद्योग ६.५. [सं.] सामाशब्द- दायजी, दायाद-विपु. १ वारस; पितृधनांत हिश्शाचा हक्कदार; वांटेकरी २ (यावरून ल.) अशौचादि अधिकार बाळगणारा जवळचा नातलग; भाऊबंद. 'रेघ धरून झाल्यावर दायजी, मित्र, सोयरे वगैरे मंडळी वराला विड्याच्या पानांतून मुठींत कांहींतरी..नजराणा देतात.' -मसाप ४.४.२५४. [सं. दायाद; म. दाईज्] दायदु-पु दायाद. 'नव्हे आमुचा दायदु । जरि भणे तुम्हा मीचि बंधु ।' -ॠ ४३. [दायादु] ॰प्राप्त-वि. पित्रांदिकांचा, दायाच्या वाटणींत मिळालेला, आलेला (दास). दासांतील एक प्रकार; ॰भाग-पु. १ मृत माणसाच्या जिंदगीची वारसदारांत वांटणी, विभागणी. २ वडिलोपार्जित मिळकतींतील हिस्सा. ३ दायतत्त्व व दायकम (वारसाहक्क) या संबंधीं जीमूतवाहन यानें लिहिलेला व बंगाल्यांत हिंदु कायद्यांत प्रमाण असलेला ग्रंथ. ॰विभाग-पु. दायभाग अर्थ १, २ पहा. दायाद-पु. १ वारसदार; वडिलो- पार्जित मिळकतीचा दाईज. २ (ल.) पुत्र; मुलगा. 'कृपाचि जननीं तुझी सकल जीव दायाद या ।' -केका ९७. 'त्यावरि देवनदीनें दायादाचे गुणौघ आठविले ।' -मोभीष्म ११.१२६. ३ भाऊ- बंद; जिंदगीचा वाटेकरी. 'कीं खळ दायाद गळा कापी ।' दायाधिकारी-पु. समाईक कुटुंबाच्या मिळकतींत हिस्सा विभागून मागण्याचा अधिकार असलेला पुरुष. [दाय + अधि- कारी]

दाते शब्दकोश

(सं) पु० वडिलोपार्जित हक्क, पिढ्या.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

दायभाग, दायविभाग      

पु.       १. मृताच्या मालमत्तेची वारसदारांमध्ये वाटणी, विभागणी. २. वडिलोपार्जित मिळकतीतील हिस्सा. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गर्भश्रीमंती

वडिलोपार्जित धनसंपत्ति, पिढीजात श्रीमंती, तोंडांत सोन्याचा चमचा धरून जन्मलेले, चालत आलेला पैसा, बापकमाईचा पैसा, थाट आजचा नाही रे; जन्मतांच तो रेशमी कपड्यांत जन्माला आला! यांच्या वडिलांच्या लहानपणी आंघोळीला चांदीच्या घंगाळांतून पाणी घेत असत, आजोबांच्या वेळेपासून घरात मोटार आहे.

शब्दकौमुदी

घरोटी      

स्त्री.       कुटुंबाची सामायिक मालमत्ता; वडिलोपार्जित मिळकत, इस्टेट. (को.) पहा : घरवट

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

जद

(पु.) हिंदी अर्थ : बाप दादासे संपादित संपन्नता. मराठी अर्थ : वडिलोपार्जित धनसंपदा.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

कौलिक

वि. वंशपरंपरागत; वडिलोपार्जित; कुळासंबंधीं. वारशानें आलेलें. [सं. कुल]

दाते शब्दकोश

कौलिक      

वि.       वंशपरंपरागत; वडिलोपार्जित; वारसाने आलेले. [सं. कुल]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

मिरास; तिराशी

(स्त्री.) [अ. मीरास्] वडिलोपार्जित; दायभाग; “तन्ख्यानें कुणब्याकडे किंवा गांवाकडे असलेल्या ज़मिनीस मिरासी व तिचा भोगवटा घेणारास मिरास्दार थळकरी, वतन्दार म्हणत” (गांवगाडा १०); वंशपरम्परा. “हे माझे मिरासी । ठाव तुझ्या पायापासी” (तुकाराम). “निपुत्रिकांचें मिरास तें दिवाणाचें” (राजवाडे ८|४९). “सदर्ह सातां गांवीचीं कुळकर्णे तुम्हांसि मिरासी करून देतों” (राजवाडे १५।२७५).

फारसी-मराठी शब्दकोश

उत्पन्न

वि. जन्मलेले; उत्पत्ति पावलेलें; उद्भूत; तयार झालेले. -न. १ फल; मिळकत; प्राप्ति (शेतकी, नोकरी, धंदा, व्यव- साय यापासून). २ नफा; खर्च वजा जाऊन शिल्लक; लाभ. ३ मूळ ठिकाण; मूळ कारण. [सं. उत् + पद्-पन्न] उत्पन्नास येणें- प्राप्ति होण्याच्या अवस्थेस पोंचणें; नफा, फायदा मिळूं लागणें. फलदायक होणें. ॰भक्षी-वि. हातातोंडाशी गांठ असलेला; रोजच्या- रोज मिळवून खाणारा; आलेलें उत्पन्न लागलीच खाणारा; कांहीं शिल्लक न टाकणारा किंवा टाकण्यास असमर्थ. म्ह॰ उत्पन्न- भक्षी मध्यान्ह दरिद्री. ॰भोक्ता-वि. १ वडिलोपार्जित संपत्ती- वर निर्वाह करणारा. २ हाततोंडाशी गांठ असलेला; उत्पन्नभक्षी. ॰विनष्ट, विनाशी-वि. १ उत्पन्न झाल्याबरोबर नष्ट होणारा; लागलीच नाश, मृत्यु पावणारा. २ क्षणभंगुर; अल्पायुषी.३ निर्जीव; नि;सत्व.

दाते शब्दकोश

उत्पन्नभोक्ता      

वि.       १. वडिलोपार्जित संपत्तीवर निर्वाह करणारा. २. हातातोंडाशी गाठ असलेला; उत्पन्नभक्षी.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

वारस; वारीस

(पु.) [अ. वारिस्] वडिलोपार्जित सम्पत्तीचा हक्कदार; मालक; वाली; कैवारी. “पाटील बाबा जमिनीचा वारस होऊं पाहतो” (जोरा ११७). “गरीब-गुरबांचा वारस ईश्वर आहे” (चिरा ४७).

फारसी-मराठी शब्दकोश

वतन

(न.) [अ. वतन् = जन्मभूमी] “जात, धन्दा, वंशपरम्परागत काम, चाकरी, नेमणूक, उत्पन्न, अधिकार, मानपान, हक्क वडिलोपार्जित मिळकत स्थावर अगर स्थावराच्या योग्यतेची जङ्गम मालमत्ता; जन्मभूमी या सर्वांस वतन शब्द लावतात” (गांवगाडा १६).

फारसी-मराठी शब्दकोश

(आ) न० वडिलोपार्जित मालमत्ता, जमीन, घरदार इत्यादि.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

न. १ वंशपरंपरेची चाकरी, धंदा, अधिकार, नेम- णूक, उत्पन्न; उपजीविकेचे साधन. -गंगा १६. २ मालकीची जागा; जन्मभूमि; घर. ३ इनाम; बक्षीस. 'दिधलों गुरु प्रसाद- प्रभुनें पूर्वोक्तसद्गुणा वतन ।' -मोकर्ण २०. २९. ४ वंशपरंपरा हक्क (जमीन, वृत्ति इ॰ त). [अर. वतन् = जन्मभूमि, घर. तुल॰ सं. वर्तन = उदरनिर्वाह, वेतन] ॰गाडणें-एखाद्या जागीं मालकी, सत्ता असणें (नेहमीं नास्तिपक्षीं उपयोग). 'तूं नित्य येथें येऊनि बसतोस, काय येथें तुझें वतन गाडलें आहे.' ॰गाडलें- न. (गाडलेलें वतन) जुनी किंवा फार दिवस तांब्यात असलेली मिळकत. 'माझी वंशपरंपरा ह्या जागेवर नांदून वतनगाडलें आहे तें मी सोडणार नाहीं' ॰जप्ती-स्त्री. वतनी जमीन किंवा तीवरील उत्पन्नाची जप्ती. ॰दार-पु. वतन असलेला; वतन धारण करणारा. 'वतनदारांची वतनें वतनदारांच्या दुमाला केल्या विरहित पोट- तिडीक लागोन मुलूक मामूर होत नाहीं.' -रा १६.४४ (कायदा) वंशपरंपरेनें सरकारी काम करण्याचा हक्क असणारा इसम. 'तीर्थो- पाध्याय, मंदिरवालें, दरगेवाले, फिरस्ते, हुन्नरी व मनोरंजनाचा धंदा करणारे, भिकारचोरटे वगैरे वतनदार स्वतःला म्हणवितात. ...सर्व गांवकऱ्यांना मग ते कोणत्याहि धंद्यावर पोट चालावोत वतनदार ही सामान्य संज्ञा आहे.' -गांगा १५. [फा.] ॰दार- हिजडा-पु. हिजडा पहा. ॰दारी-दारकी-स्त्री. वतनाचा हक्क, मालकी; वतन असणें. ॰दारीकरी-पु. (वतनदार) (कों.) फार जुना शेतकरी. ॰पत्र-न. वतनाची सनद, दस्तऐवज. ॰बंधु-भाऊ-पु. १ वडिलोपार्जित मिळकतींत हक्क असणारा; भागीदार. २ सह-अधिकारी (वंशपरंपरागत); देशमुखबंधु. वतन- बहिण असाहि शब्द येतो. ॰वाडी-स्त्री. वतन, वतनी शेत, वाडी इ॰ (व्यापकपणें); जमीनजुमला; इस्टेट. 'वतनवाडी पाहून मुलगी देणें तर द्यावी.' वतनी-वि. १ वडलोपार्जित किंवा विकत घेतलेली (जमीन, मालमत्ता इ॰). २ वतनासंबंधी (दस्त- ऐवज, कागदपत्र, इ॰). ३ वतन आहे किंवा जन्म झाला तें (ठिकाण). वतनी मिळकत-स्त्री. (कायदा) वंशपरंपरेने सर- कारी काम करण्याच्या मेहनतान्याबद्दल मिळकत किंवा नफ्त नेमणूक.

दाते शब्दकोश

पूर्व

वि. १ पहिला; अगोदरचा; आधींचा; सुरवातीचा. २ प्राचीन; मागला; गतकालीन. ३ पुढील किंवा मागील (भाग, बाजू इ॰ ). जेथ पूर्वानुक्रमु दिसे । चोखाळत ।' -ज्ञा २.२२३. ४ ज्या दोन गोष्टींत आनुचर्यसंबंध असतो त्यांपैकीं आधींच्या वस्तूस पूर्व व नंतरच्या वस्तूस उत्तर म्हणतात. 'भुललों पूर्व विसरलों सारें । अगीं भरलें नूतन वारें ।' -विक ५. समासांत पूर्वपदीं व उत्तरपदींहि हा शब्द योजितांत. जसें:-द्दष्टपूर्व, श्रुतपूर्व, उक्तपूर्व, पूर्वदृष्ट, वयपूर्व (तरुण इ॰ ). 'वयपूर्व तूप वाढीत वांकोनी ।' -रामदासी २.१५६. सह, बरोबर इ॰ अर्थीं क प्रत्यय लावून (पूर्वक) समासांत योजितात. जसें:-आग्रहपूर्वक. 'ईश्वराचें नाम श्रीशब्दपूर्वक घ्यावें.' ॰कथा- स्त्री. १ संदर्भ लगावा म्हणून पूर्वी सांगून झालेल्या कथेचा जो भाग पुन्हां सारांशरूपानें सांगतात तो. २ मागील हकीकत, इतिहास. ॰कर्म-न. सद्य:स्थितींत सुखदुःखास, कारणीभूत असें मागें किंवा पूर्वजन्मीं केलेलें कर्म; पूर्वींचें कृत्य. म्ह॰ चुलीपाशीं हगावें आणि पूर्वकर्मास रडावें. ॰कालवाचक अव्यय-न. (व्या.) मूळ धातूस ऊन, हून प्रत्यय लागून होणारें अव्यय. उदा॰ करून, बोलून इ॰. ॰ग्रह-पु. प्रथम, पूर्वीं झालेली कल्पना, मत, समज इ॰; आरंभीं झालेला ग्रह (बरावाईट) ॰ग्रहदूषित-वि. पूर्वीच्या मताचा, ग्रहाचा परिणाम झालेला; पूर्वग्रहानें कलुषित असें (मन). (इं.) प्रेजुडिस्ड. ॰ज-पु. आपल्या अगोदरच्या पिढींतील माणूस, पुरुष; वाडवडील. 'धिगधिग तें जिणें पूर्वजांची वृत्ति असोहि हातींची गेली रे ।' -दावि ४१५. -वि. पूर्वीं, आधीं जन्मलेला (बंधु). [सं. पूर्व + ज (जन्मलेला) प्रत्यय] ॰जन्म-नपु. मागला जन्म; हल्लींच्या जन्माच्या पूर्वीचा जन्म. ॰जन्मार्जित-वि. पूर्वजन्मीं संपादन केलेलें (पाप, पुण्य इ॰ ). [सं. पूर्व + जन्म + अर्जित] ॰ठेवा-पु. चालु जन्मांत सुखदुःखास कराणीभुत असा पूर्वजन्मांतील पापपुण्याचा संचय. पूर्वकर्म पहा. ॰दत्त-वि. (पूर्वजन्मीं दिलेले). ह्या जन्मीं बरे वाईट अनुभव येण्यास कारणी- भूत असें पू्र्वजन्मीं केलेलें दानादि कर्म; आपण जसें पूर्वजन्मीं दिलें-आचरलें असतें तसें परमेश्वर या जन्मीं आपणास देतो असा समज. ॰धन-न. वडिलोपार्जित पैसा. 'माझों पूर्वधन । तुम्ही द्यावें ऋण ।' -गुच १.१२०. [पूर्व + धन] ॰धरी-वि. पूर्वापार चालत आलेला; सनातन. 'राउळीची चोरी केली थोरी । ते उपसाहावा जी मुरारी । कां सृष्टिकर्ता पूर्वधरी । भणऔनियां ।' -दाव ३८०. ॰धान्य-न. पावसाळयांत येणारें पीक; खरीपाचें पीक. अग्र- धान्य पहा. ॰पद-न. १ हरिदासानें कथेच्या सुरवातीस घेतलेलें एखादें विधान, सूत्र, नीतिवचन. याचें तो निरनिराळीं उदाहरणें देऊन विवरण करतो व शेवटीं पुन्हां सिद्धांत म्हणून त्याच पदा- वर येतो यावरून. २ समास, वाक्य, कविता इ॰ चें पहिलें पद. ३ (ल.) पूर्वस्थिति. पूर्वपदावर येणें-मध्यंतरीं केलेलें श्रम फुकट जाऊन पुनः पूर्वीच्या वाईट मार्गाकडे वळणें. ॰पक्ष-१ (तर्क, न्याय) वादविवादांत एका पक्षानें केलेली आपल्या मताची मांडणी; दुसरा, विरुद्ध पक्ष याला उत्तर देतो. पूर्वपक्षाचें खंडण किंवा मंडण करणें जरूर असतें. एक बाजूचा उपन्यास. 'पूर्वपक्ष त्यागून सिद्धांत । निरूपण करावें नेमस्त ।' -दा ४.२.१८. २ (कायदा) तक्रार; फिर्यादीचें म्हणणें; वादीचें म्हणणें. ३ सिद्धांत; प्रमेय. ४ महिन्याचा शुद्ध पंधरवडा. ५ आशंकामय स्थिति; माया. 'पूर्वपक्ष म्हणिजे माया । सिद्धांतें जाये विलया ।' -दा २०.३.२०. ६ पूर्वीची अविचल, अविकल स्थिति (मनाची); मूळ सिद्धांतमय स्थिति. 'तुकाराम रूपें येवोनि प्रत्यक्ष । म्हणे पूर्वपक्ष सांभाळीजे ।' -ब २५. ॰पाठ-पु. पूर्वापार चालत आलेली रूढी, प्रघात, रिवाज, वहिवाट. ॰पीठिका-स्त्री. १ पहिली, मागील, पूर्वीची किंवा प्राचीन पद्धत, मार्ग, चाल, रीत इ॰ 'आतां त्यानें साधूपणा धरिला परंतु त्याची पूर्वपीठिका तर बहुत विरुद्ध आहे.' २ (एखादा, वादविवाद किंवा इतर प्रसंग याच्या ) हकिकतीचा पहिला भाग; पूर्वींचा इत्थंभूत वृत्तांत; पूर्ववृत्त; आरंभींचा किंवा मूळचा भाग. ३ ग्रंथाचा प्रास्थाविक भाग; प्रस्तावना. पू(पु)र्वपुजा-पूजा-स्त्री. १ पूर्वपुण्य पहा. 'सांब कृपा परिपुर्ण पूर्व पूजा बहुत चांगली ।' -ऐपो ३२०. २ देवपूजेंत देवतेस अभिषेक करण्यापूर्वीं करावयाची पूजा. पूर्वपुण्य, पुण्याई-नस्त्री. पूर्वजन्मीं सत्कृत्यें करून मिळ- विलेलें पुण्य. ॰पुरुष-पुअव. पूर्वींचें वंशज; पूर्वज. 'मग वोवांडिती स्वर्गस्थ । पूर्वपुरुष ।' -ज्ञा १.२५३. ॰प्रवाह-पु. प्राचीन, पूर्वींचा मार्ग (शब्दाश: व ल). ॰बस्ती-स्त्री. वरचें पोट; ओटीच्या वरचें पोट; छातीचें मध्यपटल व बेंबी यांच्यामधील भाग; मणिपूर. ह्याच्या उलट उत्तरबस्ति. ॰भूमिका-स्त्री. पूर्वस्थल पहा. संन्यास. घेतलिया जाण । पूर्वभूमिका अवलोकन ।' -एभा २३.५०२. ॰मीमांसा-स्त्री. मीमांसाशास्त्राचा एक भाग. हा भाग जैमिनीनें केला असून त्यांत कर्म-मार्गाचें प्रतिपादन आहे; कर्मकांड. 'तैसी हिंसाचि करून अहिंसा । निफजविजे है ऐसा । पैं पूर्वमीमांसा । निर्णो केला । -ज्ञा १३.२२०. उत्तरमीमांसा पहा. ॰रात्र-स्त्री. रात्रीचा पहिला भाग; संध्याकाळपासून मध्यरात्रीपर्यंतचा काळ. ॰रूप- न. १ पूर्वसूचना; (रोगाचें) पूर्वचिन्ह; पूर्वलक्षण. 'कामल (कावीळ) ही पांडूचें पूर्वरूप.' २ आधींचें स्वरूप, आकार; प्रथम दिसूं लागणारीं चिन्हें. ३ कानउघाडणी; आगाऊ दिलेली सूचना. ॰रूप- संधि-पु. (व्या.) ज्यांत दोन स्वरांच्या जागीं प्रथम स्वर कायम होतो असा संधि. ॰रूपज्ञान-न. १ पूर्वचिन्हावरून होणारें ज्ञान; प्रथमचीं लक्षणें; सूचना इ॰ वरून होणारें ज्ञान. २ (वैद्यक) रोगाचा साध्यासाध्य विचार; चिकित्सा. ॰रेषा-खा-स्त्री. कपाळावर लिहून ठेविलेल्या पुढील आयुष्यांतील बऱ्यावाईट भाग्याविषयींच्या गोष्टी; दैव; नशीब; भाग्य; लल्लाटरेषा . 'दास म्हणें पूर्व-रेखा । प्राप्त न टळे ब्रह्मादिकां ।' -रामदासाचें अभंग (नवनीत पृ. १४८ ). ॰वत्-क्रिवि. पूर्वींप्रमाणें; पहिल्यासारखें. ॰वय-न. मनुष्याच्या आयुष्याचा पहिला अर्धा भाग; बालपण; लहानपण. 'पूर्ववयीं चित्त निश्चिंत । तारुण्यीं तेंचि कामासक्त ।' -एभा २०.२७. ॰वयस्क-वि. आयुष्याच्या पहिल्या अर्धांत असलेला; लहान वयाचा; अल्पवयस्क; तरुण. ॰वाद-पु. (कायदा) आधींपासूनचा ताबा असल्याबद्दल तक्रार; पहिल्या भोगवटा-मालकीबद्दलची सबब पुढें करणें. ॰वादी-वि. १ (वादविवादांत) वादविवादास सुरवात करणारा; पूर्वपक्षी. २ (कायदा) तक्रार करणारा; फिर्यादी; वादी. ३ प्रथमचा ताबा, भोगवटा दाखविणारा; पूर्वी पासून चालत आलेली मालकी प्रस्थापित करणाका. ॰वृत्त- वृत्तांत-नपु. पूर्वींचा इतिहास; (एखादा मनुष्य, प्रकरण इ॰ ची) आरंभींची हकीकत; पूर्वकथा; पूर्वपीटिका. ॰वेत-वेट-ठ, पूर्वैट- वि. प्रथमच गाभण असलेली किंवा व्यालेली. [पूर्व + वेत] ॰सदर्भ- पु. (भाषण, कथानक इ॰ चा) पूर्वींचा संबंध. ॰संध्या-स्त्री. (ख्रि.) सणाच्या आदल्या दिवसाची सायंकाळ. (इं.) ईव्ह. 'ज्या कोणत्या सणाला...पूर्वसंध्या आहे, त्यासाठीं नेमलेली सारप्रार्थना पूर्वींच्या संध्याकाळच्या उपासनेंत म्हणावी.' -साप्रा ३९. ॰स्थल-स्थान-न. १ (एखादी गोष्ट, मनुष्य इ॰ ची) पहिली किंवा पूर्वींची स्थिति, ठिकाण, देश, जागा इ॰ २ ज्या ठिकाणा हून निघून देशांतर केलें तें ठिकाण. ॰स्थिति-स्त्री. पहिली किंवा पूंर्वींची अवस्था; प्रकृतिभूत स्थिति. पूर्वांग-न. १ आरंभीचा, प्रास्ताविक भाग, अंश; (एखादें पुस्क, धंदा किंवा काम यांचीं) सुरवातीचीं कामें; प्राथमिक योजना; एखाद्या धार्मिक विधींतील मुख्य कर्मापूर्वीचें कर्म. ह्याच्या उलट उत्तरांग. । २ (संगीत) रागाच्या सा, री, ग, म ह्या चार स्वरांचा समुदाय. पूर्वांग- वादीराग-पु. (संगीत) ज्या रागाचा वादी स्वर त्याच्या पूर्वोगामध्यें असतो असा राग. ह्या वर्गांत येणारे राग दिवसा बारा वाजल्यापासून रात्रीं बारा वाजेपर्यत गाइले जातात. पूर्वापर-वि. १ मागील व पुढील; पूर्वींचें व नंतरचें. 'पूर्वापरसंबंध'. तंव या पूर्वापर बोलाचा । विचारूनि कुमरु पंडूचा । कैसा प्रश्नु हन अव- सरीचा । करिता होईल ।' -ज्ञा ४.२११. २ -क्रिवि. आधीं आणि नंतर; पहिल्यापासून शेवटपर्यंत; अथपासून इतिपर्यंत. 'ग्रंथ पूर्वापर पाहिल्यावांचून लागणार नाहीं । ' 'तया माधवविप्राघरीं । शुभाचारें होती नारी वासना तिची पूर्वापरी । ईश्वरपूजा करितसे ।' -गुच ११.८. [सं.] पूर्वापरविरोध-पु. (ग्रंथादिकांत पहिला व शेवटचा भाग यांत भिन्नता) असंबद्धपणा; विसंगति. पूर्वापरवृत्त-न. समवृत्त; सममंडल; स्थलाच्या माध्यान्ह वृत्ताला लंबरूपानें छेदणारें द्दड्मंडल. -सूर्य ५. [सं.] पूर्वा(र्वां) पार-क्रिवि. १ पूर्वापर पहा. २ पूर्वींपासून; प्रथमपासून; प्राचीनकाळापासून. 'ह्या गांवची पूर्वापार वहिवाट अशीच आहे.' -वि. पूर्वापार पहा. पू्र्वाभ्यास- पु. मागील किंवा पूर्वींची संवय, चिकाटी, अभ्यास इ॰ पूर्वार्वन- न. (प्र. पूर्वार्चन) पूर्वपुण्य पहा. 'होनाजी बाळा म्हणे मुख्य जन्मांतर पूर्वार्चन नीढळीं ।' -होला ८८. [सं.] पूर्वार्ध-पु. स्थलकालादिकाचा पहिला, अलीकडचा, जवळचा अर्धा भाग. ह्याच्या उलट उत्तरार्ध. 'पंधरा अध्याय पूर्वाधे । व्याख्यान झालें सिद्ध । सूत्रप्राय उत्तरार्ध । दाखविला विशद अध्यायार्थें ।' -एभा १६.६९. [सं.] पूर्वावलोकन-न. आधीं किंवा प्रारंभी केलेली पाहणी; पूर्वीं केलेली परीक्षा, विचार इ॰ [सं.] पूर्वाह्ण-पु. सूर्य उगवल्यापासून सहा घटिकेचा तिसरा भाग; दुपारच्या अगो- दरच्या सहा घटिका. पराह्ण, पराण्ह पहा. [सं.] पूर्वेत-ट-ठ- वि. पूर्ववेत (अप.) पहा. पूर्वोत्तर-वि. १ पुढील व मागील; आधींचा व नंतरचा. 'पूर्वोत्तरसंबंध'-क्रिवि. सुरवातीस व शेवटीं; प्रथम व अखेर. २ आरंभापासून अखेरपर्यंत; संपूर्णपणें. 'कथा ऐकणें तर पूर्वोत्तर ऐकावी मग तिचा रस कळतो.' [सं.] पूर्वोत्तर मीमांसा-स्त्री. पूर्व आणि उत्तरमीमांसा; दर्शनांतील कर्मकांड व ज्ञानकांड. 'पूर्वोत्तरमीमांसा दोनी । कुंडलें जाहलीं कृष्णश्रवणीं ।' -एरुस्व १.५२. [सं.]

दाते शब्दकोश

बाप

पु. १ पिता; जनक. २ (बापासारखा ) चुलता (धृतराष्ट्र भीष्मास म्हणतो) कीं माझा वधिला शिखंडिनें बाप ।' -मोकर्ण १.१२. ३ (काव्य.) संस्कृतांतील तात शब्दाप्रमाणें अनुकंपार्हत्वदर्शक संबोधन (लहानाला किंवा सत्कारार्थीं योजतात). 'जरी स्वधर्मैकनिरत । वर्ताल बापा ।'-ज्ञा ३.१०२ -वि. फार; पुष्कळ; मोठा.'बापु उपेगी वस्तु शब्दु ।' -अमृ ६.१. -उद्गा. आश्चर्य किंवा दुःख याचें दर्शक. 'बाप ! अज्ञानाची भुलि कैसी ।' -भाए ३.१५. [सं. पिता, वप्तृ; प्रा. बप्प, बप्पो; का. बाप्प; पोर्तु. जि.पतर्रो, पात (पितृशीं जास्त जुळणारा); आर्मेजि. बाप] म्ह॰ बापास बाप म्हणत नाहीं तो चुलत्यास काका कोठून म्हणणारा?' बापसि बाप न म्हणें ऐशासी काय होय आजोबा ।' -मो. (वाप्र.) बाप(ब)शेटीची पेंड-स्त्री. हवी त्यानें हवी तितकी न्यावी अशी वस्तु; फुकट मिळालेली व वाटेल तशी खर्चिली जाणारी वस्तु, संपत्ति; विपुल व सुसाध्य वस्तु. (बापशेट नांवाच्या श्रीमान् व उदार गृहस्थाच्या नांवावरून हा शब्द रूढ झाला असेल). ॰होऊं लागणें, म्हणविणें, बाप होऊन (करणें, बोलणें)-बापाची किंवा मोठेपणाची जागा घेणें; वर मोठेपणा मिरवणें. (एखाद्याचा) बाप होणें-बाप लागून राहणें-एखाद्यापेक्षां वरचढ असणें; त्रास देणारा असणें.बापाचा माल-एक शिवी; कोणीं उधळेपणानें दुसर्‍याचा माल खर्चू लाग- ल्यास त्यास म्हणतात. बापावरून पवनें-बापाच्या नांवानें, बापावरून शिव्या देणें. बापास बाप न म्हणणें-वाजवी गोष्टींत कोणाचीहि मुर्वत न धरणें. बापास बाप न म्हणणाराभीड मुर्वत न धरणारा; खडबडीत स्वभावाचा. ॰आजांचा धर्म-पु. पूर्वजांचा धर्म; पिढीजात आलेला धर्म. बापई-पु. (माण.) बाप्या; वयांत आलेला पुरुष. ॰घर-न. माहेर.' मग आप-घर त्यागूनि बापघरीं केलिया वस्ति ।' -सप्र ११.४९. ॰जन्मांत- जन्मीं-क्रिवि. सर्व आयुष्यांत; जन्मापासून आजपर्यंत 'मी बाप- जन्मीं कोणाचें उणें उत्तर बोलून घेतलें नाहीं. ' [बाप + जन्म] ॰जादे-दादेपुअव. वाडवडील; पूर्वज. 'दिल्ली याचे बापजाद्याची -गोखंचिशाब १२. [फा. बाब् = पिता + अर. जद्द = आजोबा] ॰पण-न. सामर्थ्य; पितेपण. 'तरि बापपण आपुलें कां दाख- विजेना ।' -ऋ ३४. ॰पोरका-वि. बाप मेल्यामुळें पोरका बनलेला. ॰भाऊ-पु. भाईबंद; भाऊबंद; नातेवाईक; दायाद (वतनांतील वांटेदार). ॰भावकी-स्त्री. १ भाऊबंदकी; नातें. २ दाट परिचय; परमस्नेह. ॰भ्रम-पु. मोठा भ्रम. 'बापभ्रमाचें विंदान । केवढे सायास पक्षियांचे ।' -जै ७७.५४. [बाप = मोठा + भ्रम] ॰माय-स्त्री. (काव्य.) बाप आणि आई (हा शब्द विशेष रूढ नाहीं. रूढ शब्द मायबाप, आईबाप, मातापिता हे आहेत). 'जैसी अबला सासुरां राहे । चित्तीं आठवे बापमाये ।' बापया-य-पु. बाप्या; पुरुष. बापयोद्धा-पु. मोठा योद्धा. 'बापयोद्धा तो निःशंक ।' -जै ७५.१२६. [बाप = मोठा + योद्धा] ॰रोटी, बापु(पो)ती-स्त्री. (हिं.) (शब्दशःअर्थ-बापाची भाकरी, अन्न). वडिलोपार्जित चालत आलेली वतनवाडी, माल- मत्ता. बापा-पु. १ (खा.) बाप. २ बापाचें संबोधन; (आद- रार्थीं हाक मारतांना) अहो ! अरे ! 'अर्थाचा दास पुरुष अर्थ नव्हे पुरुषदास बापा हें ।' -मोभीष्म १.९०. ३ (कों.) एक पिशाचदेव; बापदेव. बापाजी-पु. (संबोधन) मोठ्या माण- साला हाक मारतांना म्हणतात. 'बापाजी ! आम्ही हीं चित्रें तुमचा अनुग्रह चितारी ।' -मोउद्योग ११.५२. बापाला-पु. (गो.) मावशीचा नवरा. बापाशीक झंवरी-वि. (हेट.) एक शिवी. बापाशीं संभोग करणारी. बापिक-पु. कुलपरंपरागत धर्म; हव्यकव्य; कुलधर्म. -वि. कुळांतील; कुलपरंपरागत. 'एथ स्वामीचें काज । ना बापिकें व्याज ।' -ज्ञा १२.६७. बापु-वि. मोठा. -उद्गा. बापरे; अरे बापरे ! 'बापु ! कळा वानु कैसी ।' -ऋ ६. बापु(पू)रज(झ)दा-वि. वंशपरंपरा. 'बापूरजदा घेत जाऊन...' -वाडथोमारो २.१०६. बापु(पो)लभाऊ-भाव-पु. (गो.) चुलत भाऊ. बापु(पो)लयों-पु. (गो.) चुलता. बापुला, बापु(पू)य-स-पु. (गो. कु. कों.) बाप. बापू-पु. आदरार्थीं पुरुषास म्हणतात. बापोलभैण-स्त्री. (गो.) चुलत बहिण. बाप्या, बाप्यो-पु. बाप होण्याच्या वयाचा, वयांत आलेला पुरुष; प्रौढ. (-अव. बापे-प्ये). बाप्यामाणूस-पु. पुरुष. याच्या उलट बाई- माणूस.

दाते शब्दकोश