मराठी बृहद्कोश

नऊ मराठी शब्दकोशांमधील २,६२,७३६ शब्दांचा एकत्रित संग्रह

शब्दार्थ

वतन

न. १ वंशपरंपरेची चाकरी, धंदा, अधिकार, नेम- णूक, उत्पन्न; उपजीविकेचे साधन. -गंगा १६. २ मालकीची जागा; जन्मभूमि; घर. ३ इनाम; बक्षीस. 'दिधलों गुरु प्रसाद- प्रभुनें पूर्वोक्तसद्गुणा वतन ।' -मोकर्ण २०. २९. ४ वंशपरंपरा हक्क (जमीन, वृत्ति इ॰ त). [अर. वतन् = जन्मभूमि, घर. तुल॰ सं. वर्तन = उदरनिर्वाह, वेतन] ॰गाडणें-एखाद्या जागीं मालकी, सत्ता असणें (नेहमीं नास्तिपक्षीं उपयोग). 'तूं नित्य येथें येऊनि बसतोस, काय येथें तुझें वतन गाडलें आहे.' ॰गाडलें- न. (गाडलेलें वतन) जुनी किंवा फार दिवस तांब्यात असलेली मिळकत. 'माझी वंशपरंपरा ह्या जागेवर नांदून वतनगाडलें आहे तें मी सोडणार नाहीं' ॰जप्ती-स्त्री. वतनी जमीन किंवा तीवरील उत्पन्नाची जप्ती. ॰दार-पु. वतन असलेला; वतन धारण करणारा. 'वतनदारांची वतनें वतनदारांच्या दुमाला केल्या विरहित पोट- तिडीक लागोन मुलूक मामूर होत नाहीं.' -रा १६.४४ (कायदा) वंशपरंपरेनें सरकारी काम करण्याचा हक्क असणारा इसम. 'तीर्थो- पाध्याय, मंदिरवालें, दरगेवाले, फिरस्ते, हुन्नरी व मनोरंजनाचा धंदा करणारे, भिकारचोरटे वगैरे वतनदार स्वतःला म्हणवितात. ...सर्व गांवकऱ्यांना मग ते कोणत्याहि धंद्यावर पोट चालावोत वतनदार ही सामान्य संज्ञा आहे.' -गांगा १५. [फा.] ॰दार- हिजडा-पु. हिजडा पहा. ॰दारी-दारकी-स्त्री. वतनाचा हक्क, मालकी; वतन असणें. ॰दारीकरी-पु. (वतनदार) (कों.) फार जुना शेतकरी. ॰पत्र-न. वतनाची सनद, दस्तऐवज. ॰बंधु-भाऊ-पु. १ वडिलोपार्जित मिळकतींत हक्क असणारा; भागीदार. २ सह-अधिकारी (वंशपरंपरागत); देशमुखबंधु. वतन- बहिण असाहि शब्द येतो. ॰वाडी-स्त्री. वतन, वतनी शेत, वाडी इ॰ (व्यापकपणें); जमीनजुमला; इस्टेट. 'वतनवाडी पाहून मुलगी देणें तर द्यावी.' वतनी-वि. १ वडलोपार्जित किंवा विकत घेतलेली (जमीन, मालमत्ता इ॰). २ वतनासंबंधी (दस्त- ऐवज, कागदपत्र, इ॰). ३ वतन आहे किंवा जन्म झाला तें (ठिकाण). वतनी मिळकत-स्त्री. (कायदा) वंशपरंपरेने सर- कारी काम करण्याच्या मेहनतान्याबद्दल मिळकत किंवा नफ्त नेमणूक.

दाते शब्दकोश

(न.) [अ. वतन् = जन्मभूमी] “जात, धन्दा, वंशपरम्परागत काम, चाकरी, नेमणूक, उत्पन्न, अधिकार, मानपान, हक्क वडिलोपार्जित मिळकत स्थावर अगर स्थावराच्या योग्यतेची जङ्गम मालमत्ता; जन्मभूमी या सर्वांस वतन शब्द लावतात” (गांवगाडा १६).

फारसी-मराठी शब्दकोश

वतन n An hereditary estate, office, due. वतन गाढणें Have proprietorship or right at a place.

वझे शब्दकोश

वतन vatana n ( A One's native country.) An hereditary estate, office, right, due; any hereditary right whether in land or in office. व0 गाडणें g. of s. (To have a patrimony lying buried.) To have proprietorship or right at a place. Always neg. con. or neg. implication. Ex. तू नित्य एथें येऊन बसतोस काय एथें तुझें व0 गाडलें?

मोल्सवर्थ शब्दकोश

(आ) न० वडिलोपार्जित मालमत्ता, जमीन, घरदार इत्यादि.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

(पु.) हिंदी अर्थ : जन्मभूमि. मराठी अर्थ : जन्म स्थान.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

हम वतन

(वि.) हिंदी व मराठी अर्थ : स्वदेशी.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

हुब्ब अुल् वतन

(स्त्री.) हिंदी अर्थ : देश. मराठी अर्थ : प्रेम.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

जला वतन

(वि.) हिंदी अर्थ : देशसे निकाला हुआ. मराठी अर्थ : हद्दपार, निर्वासित.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

संबंधित शब्द

सर

पु. १ डोकें. २ (ल.) मुख्य; श्रेष्ठ; वरचढ. 'या सर्वावर हरिपंत सर आहे.' हुद्यापूर्वींहि मुख्य या अर्थीं जोड- तात. उदा॰ सरदेशपांडे; सरदेशमुखी; सर सुभेदारी इ. ३ (ल.) प्रमुख; नेता; चालक (संस्था, मंडळ वगैरेचा). ४ (गाय, म्हैस, वगैर शब्दांनंतर योजल्यास) संख्या (डोकीं) दाखवितो. उदा॰ गाय सर एक, म्हैस सर तीन = एक गाय, तीन म्हैशी. 'बैल सर पांचशें पाठविले.' -रा १२८. प्राण्यांची संख्या दाखविणेंस सर व वस्तूंची संख्या दाखविण्यास सुमार शब्द योजीत. उदा॰ उंटें सर बारा, नारळ सुमार पंचवीस. सर करणें-जिंकणें; पादक्रांत करणें (किल्ला, प्रदेश वगैरे); फत्ते करणें; तडीस नेणें (काम, काज). [फा. सर्] ॰कान(नू)गो-पु. देशपांड्यासारखा एक अधिकारी. -रा १२.२१५. [फा.] ॰कानगोपण-न. सरकानगोपणाचें वतन. 'संस्थान मजकूर येथील सर मंडलोईपण व सरकानगोपणाचें नवीन वतन रामचंद्र बल्लळ यास करून दिल्हें आहे.' -वाडबाबा ३.३५. ॰कारकून-पु. वरिष्ठ प्रतीचा कारकून. 'फक्त अष्टप्रधान सरकारकुनास पालख्या दिल्या.' -शिचप्र २२. ॰खत-न. १ सरकारकडे वेळोवेळीं भरणा केलेल्या रकमांची क्रमानें केलेली नोंद; पावती; कौलनामा. २ विक्रयपत्र; सरकारनें विकत घेत- लेल्या मालाची पावती. ॰खवास-पु. मुख्य नोकर; अनुचरा- धिपति. 'सरदेशमुख म्हणून देऊन सरखवाशी व देहुड्यांकडील चौकी पहारे व कारखाने यांस ...' -मराचिथोशा १०. ॰खेल- पु. १ खास पथकाधिकारी; स्वारांच्या पथकावरील अधिकारी; ध्वजवृंदाधिकारी. २ मराठेशाहींतीक एक पदवी; आंग्रे सरदारांची पदवी. 'तुळाजी आंगरे सरखेल यांजकडून अंमल दूर करून ...' -वाडबाबा ३.५३. ॰खेली-स्त्री. सरखेलाचा अधिकार, हुद्दा, पदवी, काम. ॰खोत-पु. मुख्य खोत. 'सर खोत व फुट खोत पुढें सुटीचा कज्या राहिला नाहीं.' -समारो १५५. ॰गावडा-पु. खेड्यांतील एक कामगार, अधिकारी; धनगरांचा मुख्य. ॰गुर्‍हो- रो-पु. १ किल्लयावरील शिबंदींतील एक अधिकारी; जमादार. २ पंथाचा मुख्य, महंत. [फा.] ॰चश्मा-चष्मापु. प्रमुख; अध्यक्ष; चालक; पुढारी; धुरीण; नायक (सभा, मंडळ, खातें वगैरेचा). [फा.] ॰तपासणी-स्त्री. एखाद्या साक्षीदाराची हजर करणार्‍या पक्षानें घेतलेली जबानी. ॰तरम-पु. मुख्य मोजणीदार; शिरस्तेदार. 'हुजुर कचेरी हेची दोनी तटा । सरतरम तेथीचिया महान् लाटा ।' -पैमा १.१९. ॰ताज-पु. मुख्य; प्रमुख [फा.] ॰दफ्तर- नपु. सरकारी कामकाज व तें करण्याचा अधिकार. भाइअ १८३४. ॰देशपांडे-ड्या-पु. देशपांड्यांवरील मुख्य; मुख्य देशपांडे. ॰देशमुख-पु. देशमुखांतील मुख्य; सर्व देशमुखांहून वरिष्ठ पदवीदार. बर्वे घराण्याचा इतिहास १७; -रा २१.५९. ॰देशमुखी-स्त्री. सरदेशमुखाचा हक्क; मोंगलांचे अंमलांतील प्रांतांवर मरांठ्यांनीं बसविलेला कर. हा उत्पन्नाच्या दशांश किंवा साडेबारा टक्के असे. ही बाब छत्रपतीची खासगीकडे खर्च होत असे. -थोमारो २.९१. ॰देसगत-स्त्री. सरदेशमुखी. 'तालुके नवलगुंद देखील सरदेसगत निसबत गोविंद भिकाजी.' -समारो ३.२५. ॰नामा-पु. पदवी; किताब; पत्रारंभींचा मायना; आड- नांव. २ प्रास्ताविक मजकूर. [फा. सर्नामा] ॰नोबत-नौबत- द-पु. ज्यास स्वतंत्र नोबत, (नगारा) मिळाली आहे असा सैन्याधिकारी; सेनापति; सेनानी. 'जयसिंगराव निकम सरनो- बत दिमत पागा हुजूर.' -समारो ४.५१. [फा.] ॰पंत-पु. मुख्य न्यायाधीश. 'या स्थापिलेल्या वरिष्ठ कोर्टामध्यें मुख्याधिपत्य सर पंत मोरो काशीनाथ अभ्यंकर यांजकडे दिलें होतें.' -बडोद्या- तील राज्यकर्ते ३३९. ॰परस्त-पु. पालनकर्ता; पालक. [फा.] ॰परस्ती-पु. पालकत्व. [फा.] ॰पागा-स्त्री. हुजूरपागा; मुख्य सरकारी घोडदळ. ॰पागे-पाग्या-पु. राज्यांतील सर्व पागांवरील मुख्य अंमलदार. ॰पाटील-पु. जिल्ह्याच्या वसूलीवर देखरेख करणारा व त्याबद्दल शेंकडा कांहीं तरी रकम मिळणारा अधिकारी. ॰पेच-पु. शिरपेच; पगडींत खोवावयाचा तुरा. [फा.] ॰पोतदार-पु. सर्व पोतदारांवरील मुख्य; मुख्य सरकारी खजि- न्यावरील अधिकारी; नाणीं पारखून घेणारा कामगार. ॰पोस- पु. १ आच्छादन; झांकण; वरून पसरलेलें कापड, रुमाल. (अन्नाचें ताट, पगडी वगैरे वरील) 'कोणी सरपोसवरुन पस- रिति ।' -प्रला ११३.२३२. 'सरपोस जरी, बाराचा' -समारो ४. ११९. २ (ल.) गुप्तपणा; गुपित. 'आजपावेतो सरपोस राखिला.' -ख ९.५०४२. [फा.] ॰बस्त-स्ता-वि. १ बंद; लपविलेलें. २ कांहीं ठराविक सारा देणारा, सर्व सारा न देणारा (जहागीर- दार). ॰बागे-पु. बागांवरील देखरेख कारणारा अधिकारी. 'ते सरदार ढमढेरे यांजकडे सरबागे म्हणून होते' -ह. ना. आपटे चरित्र. ॰बांध-पु. मुख्य बांध. -मसाप २.३.७८. ॰बार- गिरी-बारगी-स्त्री. आधिपत्य; सैन्यांतील हुद्दा. 'पन्नास घोडि- याचे सरबारगी तुम्हांसी दिली आहे. -रा १५.३९८. ॰बुलंद- वि. प्रमुख; किर्तिमान; उच्चपदाधिष्ठित. ॰मजमु-स्त्री. मुजुम- दारांवरील अधिकार्‍याचें पद, अधिकार. 'साल मजकुरीं कमावीस तुम्हांस सांगितली त्याची सरमजमु मशारनिल्हेकडे सांगितली असे.' -वाडबाबा ३.७६. ॰मंडलोईपण-न. परगण्यावरील एका अधिकार्‍याचें पद. 'व संस्थान मजकूर येथील सर मंडलो- ईपण व सर कानगोपणाचें नवीन वतन रामचंद्र बल्लाळ यास करून दिल्हें असे.' -वाडबाबा ३.३५. [सर + मंडलवाही + पण] ॰मास्तर-पु. हेडमास्तर; मुख्य शिक्षक. 'शाळेचे सर मास्तर स्वभावानें मोठे गर्विष्ठ होते.' -नि ६५८. ॰मुकादम-मोक- दम-पु. सुभ्यांतील एक अधिकारी; मुकादमांवरील मुख्य. -शारो १४१. ॰मुख्य-पु. संस्थानचा, प्रांताचा मुख्य; होळकरांचा किताब. ॰लष्कर-पु. सेनाकर्ते; स्वतः सैन्य जमवून सेनापतीचें काम करणारा. -शिचप्र ६. ॰सब्ज-वि. १ ताजा; हिरवा. २ (ल.) तेजीचा; नशीबवान्. ॰सब्जी-स्त्री. (ल.) भरभराट; तेजी. 'ज्यांत पातश- हाची सरसब्जी ते गोष्ट पातशहांस अर्ज करावी.' -दिमरा १.६२. ॰वाद-पु. गोंधळ; घोंटाळा. ॰सम्त-पु. तरफेचा मुख्य. सम्मतचा मुख्य. ॰सुभा-सुभेदार-पु. सुभेदारांवरील मुख्य अंमलदार; त्याची पदवी, हुद्दा, अधिकार. ॰हवलदार- हवाला-पु. मुख्य हवालदार; एक सैन्यांतील अधिकारी. 'तालुके अंजनवेल येथील सर हवाला.' -समारो ३.१७.

दाते शब्दकोश

अज्रा मऱ्हामत

क्रिवि. कृपेनें; कृपादत्त; बक्षीस. 'हें वतन... यास अज्रा मऱ्हामत वतन करून दिलें असें.' -रा ८.४७ [फा. अझ् राह् + अर. मर्हमत् = कृपा]

दाते शब्दकोश

अजरामरामत, अजरामऱ्हामत      

क्रिवि.       कृपादत्त; कृपेने दिलेले (बक्षीस) : ‘हे वतन यास अजरामऱ्हामत वतन करून दिल्हे असे....’ – मइसा ८·४७. [फा.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कानगोई

स्त्री. कानुगोचें काम अगर वतन. 'सर्कार मज्कूर येथील कानगोईचें वतन.' -रा १२.१७४.

दाते शब्दकोश

कानगोई      

स्त्री.       कानुगोचे काम अगर वतन : ‘सर्कार मज्कूर येथील कानगोईचें वतन.’ - मइसा १२·१७४.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कानगोई; कानगोई

(स्त्री.) कानुगोचें काम अगर वतन. “सर्कार मज्कूर येथील नगोईचें वतन” (राजवाडे १२।१७४).

फारसी-मराठी शब्दकोश

मिरास

स्त्रीन. १ वडिलोपार्जित वतन; दायभाग; वंशपरंपरा संपत्ति; स्थावर मालमत्ता (विशेषतः शेत, जमीन इ॰); वतनदारी. 'निपुत्रिकांचे मिरास तें दिवाणाचें' -रा ८४९. २ जमिनीवरील कर. [अर. मीरास्] ॰पुरणें-गाठोडें पुरणें; महत्वाची गोष्ट एखाद्या ठिकाणीं ठेवलेली असणें. ॰जमीन-स्त्री. वतनदीरीची जमीन; वडिलोपार्जित जमीन. 'जमीनसारा थकला तरी तीन वर्षानंतर मिरासदार परागंदा झाल्याशिवाय मिरास जमीन खालसा करण्याचा सरकारला हक्क नव्हता.' -गांगा १२. ॰झाडा-पु. मिराशीची आणि मिरासदारीची कलमबंदी. ॰दार, मिरास्दार, मिराशी-सी-पु. १ मिराशीचा उपभोग घेणारा; वतनदार; थळकरी; सरकारसारा नियमानें भरून आपलें स्वामित्व कायम ठेवणारा शेतमालक. 'वडगांवीची मोकदमीस कोण्ही मिरास्दार नाहीं.' -रा १७.३२. २ माहार; महारकीचें वंशपरंपरा वतन भोगणारा महार. मिराशीचे चार प्रकार-१ वतनदार, २ मिरास- दार, ३ उपरी, ४ ओवाडकरू. [फा. मीरासीदार्] ॰पट्टी-टी- स्त्री. मिरास जमीनीवरील कर; कायम लावणीचे जमीनीवरील कर. 'मिरासपटी तिसरे सालीं घ्यावी.' -वाडसभा ४.६७. ॰पत्र- न. मिराशीच्या हक्काचा लेख.

दाते शब्दकोश

सुख

न. समाधान; मनास वाटणारी स्वस्थता; आराम; आनंद, चैन; अनुकूल अनुभव; शांतता व विश्रांति; करमणूक व उपयोग; शांति. (समासांत) आत्म-रति-विषय-इंद्रिय-सुख (समासांत पूर्वपदीं-विशेषणार्थीं) सुखकर; सुखसाध्य; सुख- खाद्य इ॰ [सं.] म्ह॰ सुखंच मे शयनंच मे-चैनींत राहून झोपा ताणणें. (वाप्र.) सकलसुखसंपत्तिवसति-सर्व प्रकारच्या सुखाची व समृद्धीची खाण (खुषमस्करी किंवा हितचिंतनाच्या वेळीं उपयोगांत आणावयाचा शब्द). सुखाचा विचार-पु. समाधानाची कल्पना. सुखाचा भाऊबंद-भागी-वाटेकरी- सोबती-पु. शाळुसोबती; ताज्या घोड्यावरील गोमाशा. केवळ चैनीच्या वेळचा सोबती. सुखाचा शब्द-पु. गोड, सभ्य भाषा; मनास समाधान वाटेल असें भाषण; मृदु भाषण. सुखानें सुखें-सुखें = सुखेनैव-क्रिवि. आनंदानें; तत्परतेनें; अंतःकरण- पूर्वक; सहजरीतीनें. सुखास पडणें-येणें-वाटणेंसोपें, होणें; बरें वाटणें. सामाशब्द- ॰कर-दायक-सुखावह-वि. सुख देणारें, ॰ढाळ-पु. फार त्रास न देणारें जुलाबाचें औषध व त्यामुळें होणारा जुलाब. [सुख + ढाळ] ॰दुःखभोक्तृत्व-न. सांसा- रिकास किंवा जीवात्म्यास भोगावे लागणारे सुखदुःखाचे अनुभव. ॰निद्रा-स्त्री. गाढ झोंप. ॰प्रसव-पु. विनाआयास होणारी प्रसूति. ॰भाक्-भोगी-वि. १ सुखी; सुखें भोगणारा; सुखाचा वांटेकरी. २ अत्यंत विषयासक्त ॰भाग-पु. सुखकारक, सोपा वांटा, ठेवा. ॰मांस-पु. समृद्धीमुळें शरीर सुटणें. (क्रि॰ येणें; चढणें). ॰रीण-न. जरूरी नसतां चैनीसाठीं काढलेलें किंवा सुखानें, सोईनें फेडतां येईल असें कर्ज. ॰रूपवि. सुखी; खुशाल; संकटरहित. -क्रिवि. कांहीं त्रास किंवा अडथळा न होतां; सुखानें; सुरक्षितपणें; सुखेनैव. ॰वंत-वि. सुखी. ॰वस्ती-स्त्री. १ कोठेंहि सुखानें राहणें, मुक्काम करणें. २ वतन, जमीन, वतन- वांडी, कामधंदा यासंबंधीची काळजी मागें नसून केवळ पूर्वार्जित धनसंचयावर कोणत्याहि गांवीं चैनीखातर राहणें. -वि. सुख- वस्तू; श्रमरहित जीवन कंठणारा; जीवनाकरितां परिश्रम करावे न लागणारा. ॰वास-पु. सुखवस्ती अर्थ १ व २ पहा. ॰वासी- स्त्री. (व.) गवती चटई (बसण्याची). -वि. सुखवस्ती (-वि.) पहा. ॰विणें-अक्रि. सुख देणें; आनंदित करणें. ॰शयन-न. ॰शेज-स्त्री. १ (शृंगारिक काव्य) चांगला पलंग, अंथरूण इ॰ २ सुखकारक झोप. ॰शय्या-स्त्री. सुखशयन अर्थ १ पहा. २ परलोकीं सुख व्हावें म्हणून ब्राह्मणास दान करावयाचा पलंग, बिछाना इ॰; मृतशय्या पहा. ॰संतोष-समाधान- पु.न. आनंद आणि शांति; स्वास्थ व सुखोपभोग; विश्रांति आणि तृप्ति. ॰संतोषानें-क्रिवि. १ आनंदीपणें. २ स्वेच्छेनें; स्वतःच्या राजीखुशीनें; अक्कलहुषारीनें; कोणाच्या जबरदस्ती विरहित. ॰सोहळा, सुखाचा सोहळा-पु. विवाह, मुंज इ॰ प्रसंगीं करावयाचें न्हाणे माखणें, मिरवणूक, अलंकारधारण, प्रीति- भोजन इ॰ (क्रि॰ भोगणें). ॰स्पर्श-वि. ज्याच्या स्पर्शापासून आनंद मिळतो असा. ॰सुखांगणें-अक्रि. १ केवळ चैनींत गुरफटणें; सुखांतच मग्न राहणें (निंदार्थी); हालअपेष्टा सोसल्यानंतर सुखी बनणें. [सुख + अंग] सुखाचा धनी-प्राणी-जीव, सुखा- नंद-पु. १ सुखासमाधानांत आयुष्य, घालणारी व्यक्ति; सुखानें निर्वाह होणारा माणूस. २ दयाळु, स्नेहाळु, पुरुष. सुखाचा वांटा-पु. सुखमय स्थिति, ठेवा. (क्रि॰ उचलणें; घेणें; भोगणें). सुखाचा वारा-पु. १ संतोषदायक बातमी, वार्ता. २ गोड, सुखकारक शब्द, बोलणें; सुखाचा शब्द. सुखाची आईंबाई- स्त्री. ऐश्वर्यांतील सहचारिणी; सुखापुरती झालेली मैत्रीण. सुखाची घडी-स्त्री. सुखदायक वेळ, प्रसंग. (क्रि॰ येणें; उगवणें; चालणें). सुखाची भाकर-री-स्त्री. सुखकारक उद्योग; विनात्रासाचा धंदा, नोकरी किंवा अशा परिस्थितींतील सुख. सुखाचें माहेर-न. सुख मिळणारें ठिकाण; आजोळ; आनंद देणारी जागा. 'वक्षस्थळ तैसें रुंदावलें । सर्व सुखाचें माहेर ।' सुखाचें शरीर-न. सुखोपभोगानें पोसलेलें शरीर; निरोगी काया. सुखाड-न. सुख. -वि. सुखकारक. सुखा(खां)डणेंअक्रि. (काव्य) सुख पावणें; आनंदांत गर्क होणें; फार संतुष्ट होणें. 'निजसुखें सुखाडला ।' सुखादुःखाचा सोबती-सोबतीण-पु.स्त्री. जिवलग मित्र, नवरा; जिवलग मैत्रीण; बायको. सुखानुभव- सुखानुभूती-पु.स्त्री. सुखसंतोषाची जाणीव. सुखानुभव- वि. सुखाचा अनुभव घेणारा. सुखापा(वा), सुखोपा-पु. सुख; शांति. सुखापुरी-पु. एक गोसाव्यांचा पंथ; (निदार्थी) आनंदी मनुष्य; चैनी, सुखी इसम. [सुख + पुरी] सुखार्थीं- सुखैषी-वि. सुख इच्छिणारा. सुखावणें-अक्रि. सुखाडणें पहा. आनंद पावणें; सुखाची चट लागणें व त्यामुळें आळस उत्पन्न होणें. सुखावह-वि. सुखकर; सुख देणारें. सुखाविणें-उक्रि. सुखी व समाधानी करणें; आनंदी व संतुष्ठ करणें. सुखासंतो षानें-संतोषें-समाधानानें-क्रि.वि. सुखसंतोषें पहा. सुखा- सन-न. सुखानें बसतां येईल अशी पालखी, मेणा इ॰ वाहन. सुखासुखी(खीं)-क्रिवि. १ सुखसंतोषें पहा. २ उगाच; निष्कारण. सुखास्वाद-पु. सुखाचा उपभोग. -वि. स्वादिष्ट- पणाचा; चवाचा. सुखिया-वि. १ सुख भोगणारा; सुखी. २ समाधानी; संतोषी, आनंदी; चैनी; मौजा मारणारा. सुखीस्व- भाव-पु. समाधानी स्वभाव. सुखें सुखेनैव-क्रि.वि. १ सुखानें. सुखसंतोषें पहा. २ अनायासें. सुखोत्पत्ति-स्त्री. १ सुखाचा उदय. २ सामन्यतः सुख; चैन.

दाते शब्दकोश

आधार

पु. १ आश्रय; टेंका; धीर; (अक्षरशः व लाक्षणिक) धारण करण्याची, सहनकरण्याची शक्ति; दिलेला आश्रय. 'सर्व जगतास पृथ्वीचा आधार आहे.' सामाशब्द-आधार-गत-चलन-च्युत-भूत-भ्रष्ट-स्थान-स्थित-इ॰ २ निर्वाहाच्या साधनाची मदत; आश्रय; आसरा. 'जवळ पैसा नाहीं आणि कशाचे आधारागर लग्न आरंभावें.' ३ (ल.) फूस; मदत; कृपा; संमति; मान्यता; अधिकार; ४ प्रमाण; बळ. 'तुम्हीं वतन माझें म्हणतां याला आधार कशाचा म्हणाल तर भोगवटा.' ५ (योग.) षट्चक्रांपैकीं पहिलें; शिश्न व गुद यांच्या मधील मुलाधारचक्र; याचा रंग तांबडा व पाकळ्या चार असून त्या प्रत्येकीवर 'वं, शं, षं, सं,' हे वर्ण असतात. 'मग कुंडलि- नियेचा टेंभा । आधारीं केला उभा ।' -ज्ञा १२.५१०. -विउ १.४८. ६ (व्या.) सप्तमी विभक्तीचा अर्थ अधिकरण (आंत, वर, कडे). ॰लावणें-आश्रय देणें; मदत करणें; पाठपुरावा घेणें. -स लावणें-(एखाद्या गोष्टीचा) शेवटपर्यंत छडा-तपास-शोध लावणें-करणें. -स लागणें-(एखाद्या गोष्टीच्या) मूळापर्यंत जाणें; थार्‍यास लागणें. -स पंथ-पु. एखादी गोष्ट समजण्यासाठीं, सिद्ध करण्यासाठीं लागणारी कारणपरंपरा, साधन, लक्षण; विशेषतः नकारात्मक उपयोग. 'मला ओळखीचा वाटला म्हणून त्यास विचारीत होतों परंतु त्याणें आधारास पंथ लागूं दिला नाहीं.' (क्रि॰ लावणें; लागणें; दिसणें; असणें) म्ह॰ १ 'आधाराला मधार' २ 'म्हातारा नवरा कुंकवाला आधार.' ॰कमळ-चक्र-न. (योग) आधार अर्थ ५ पहा. 'आधारचक्रीं सूक्ष्म प्राण ।' -एभा १२. ३१२. [सं.] ॰द्रुम-पु. आधारचक्र. आधार अर्थ ५ पहा. 'चरणतळें देव्हडीं आधारद्रुमाच्या बुडीं ।' -ज्ञा ६.१९३. पत्र-न. पत्राव- ळीस मधोमध लावलेलें लहानसें वेगळें पत्र; ताटाखालचें पान. २ पोथी-पुस्तकांत दोन्ही बाजूस लावलेला जाड कागद वगैरे पुष्टीपत्र. ३ प्रमाणपत्र; आधारवचन, ॰बहाल-न. ज्यावर छपराचा सर्व भार असतो तें. ॰बिंदु-पु. (शाप.) तरफ; टेकू (इं.) फलक्रम. ॰मुद्रा-स्त्री योगशास्त्रापैकीं दहा मुद्रांतील एक. शोधूनि आधारमुद्रा बरवी ।' -ज्ञा ८.४९. [सं.] ॰शक्ति-१ (योग.) मूलाधारचक्र; आधार अर्थ ५ पहा. 'आधारशक्तीचिया अंकीं ।' -ज्ञा १२.५. २ अधिष्ठान; माया; ब्रह्म.

दाते शब्दकोश

अजिँसबब, अजसबब      

अ.       याकरिता; म्हणून; या कारणास्तव : ‘अजिंसबब वतन चालविणे मौकुफ राहिले होते.’ – थोमारो २५·१९. [फा.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अजिसबब

क्रिवि. याकरितां; याकारणास्तव. ‘ अजि सबब वतन चालविणें मौकुफ राहिलें होतें.’ –थोमारो २५.१९. [फा.]

दाते शब्दकोश

अनागम

वि. ज्याचा आरंभींचा अगर सुरवातीचा काल माहीत नाहीं असा; पूर्वापार; अति प्राचीन; स्मृतिकालातीत (वतन, मालमत्ता, हक्क, रिवाज). [सं. अ + आ + गम्]

दाते शब्दकोश

अनागम      

वि.       ज्याचा आरंभीचा अथवा सुरुवातीचा काल माहीत नाही असा; पूर्वापार; अतिप्राचीन; स्मृतिकालातील (वतन, मालमत्ता, हक्क, रिवाज). [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अनभोग      

पु.       भोगवटा; भोगण्याचा हक्क; ताबा; अंमल : ‘सदर लिहिलेप्रमाणे आम्हांस वतन व इनाम गाव अनभोग जाहले; त्यात तफावत नाही.’– दसकैया २५४.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आनुवंशिक

वि. १ वंशपरंपरागत चालत आलेला; बापा- पासून मुलास, त्याच्या मुलास, असे आलेले (गुण, दोष). पिढी- जाद; वारशानें मिळालेला; वडिलोपार्जित (धन, वतन, इ॰) [सं. अनु + वंश]

दाते शब्दकोश

आनुवंशिक      

वि.       १. अनुवंशामुळे प्राप्त झालेला; आईवडील व इतर पूर्वज यांच्यामुळे अपत्यांमध्ये उतरलेल्या गुणदोषांमुळे निर्माण झालेला. २. पिढीजात; वारशाने मिळालेला; वडीलोपार्जित. (धन, वतन इ.). [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अप्रतिबंध

वि. १ अडथळा न केलेलें; अटकाव, हरकत नस- लेलें; २ (कायदा) अनिर्बंध; निर्विवाद; तंटा, भांडण किंवा वाढ नस- लेलें (वतन वगैरे). ॰दाय-पु. ज्या मिळकतीवर जन्मतःच सत्ता प्राप्त होते म्हणजे सत्ता प्राप्त होण्यास कोणत्याहि प्रकरचा अटकाव नसतो ती मिळकत; बापरोति (इं.) अनऑब्स्ट्रक्टेड हेरिटेज; याच्या उलट सप्रतिबंध-दाय. ॰व्यापर-पु. खुला व्यापर; आयात व निर्यात मालावर जकात न घेण्याची पद्धति. (इं.) फ्री ट्रेड. 'अर्थ- शास्त्रावरील इंग्रजी पुस्तकांत अप्रतिबंध व्यापाराचें जें महत्त्व गाईलें असतें,' -टि १.५१६. [सं.]

दाते शब्दकोश

अप्रतिबंध      

वि.       १. अडथळा न केलेले; अटकाव, हरकत नसलेले. २. (कायदा.) अनिर्बंध; निर्विवाद; तंटा, भांडण किंवा वाद नसलेले (वतन वगैरे.). [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अवटी      

पु.       १. (कारखान्यातून धान्यादिकांचे) मोठ्या प्रमाणावर माप करणारा; मापारी. २. वजन–मापावर देखरेख ठेवणारा; ज्याच्या स्वाधीन सरकारी वजनमापे असतात असा अधिकारी; बाजारात आलेले धान्य, माल मापणारा अधिकारी. ३. सर्व शेतातील उत्पन्न मोजून त्यानुसार सरकारसारा ठरवणारा अधिकारी. मोगली अमलात हा वतनदार असे पण मराठी राजवटीत त्याचे वतन काढून घेतले.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अवटी

पु. १ (कारखान्यांतून धान्यादिकांचें) मोठया प्रमा- णावर माप करणारा; मापारी. २ वजन-मापावर देखरेख ठेवणारा; ज्याच्या स्वाधीन सरकारी वजनमापें असतात असा अधिकारी; बाजारांत आलेलें धान्य, माल मापणारा अधिकारी. ३ सर्व शेतांतील उत्पन्न मोजून त्या अनुरोधानें सरकारसारा ठरविणारा अधिकारी. मोंगली अंमलांत हा वतनदार असे पण मराठी राजवटींत त्याचें वतन काढून घेतलें. -समारो २.२१५. [सं. आवृत्; म. अवट ?]

दाते शब्दकोश

बाधेकरी

बाधेकरी bādhēkarī m A person residing in a village in which he has not, and his fathers had not, any वतन or land-property. 2 A person residing in one village and cultivating land belonging to another.

मोल्सवर्थ शब्दकोश

बाहु

१ सबंध हात; भुज. २ वरचा हात; दंड. ३ सरळ- रेषांनीं बनलेल्या आकृतीची बाजू; बहुकोणाची बाजू. ४ काटकोन त्रिकोणाचा पाया. ५ भुज शब्द अर्थ ५ पहा. ६ (नृत्य.) खांद्यापासून मनगटापर्यंतचा भाग. नृत्यामध्यें बाहूच्या योगानें केले जाणारे पुढील दहा अभिनय सांगितले आहेत- १ अधोमुख, २ ऊर्ध्व- संस्थ, ३ तिर्य्क, ४ अंचित, ५ अपविरुद्ध, ६ प्रसारित, ७ स्वस्तिक, ८ उद्वेष्टित, ९ मंडळगति व १० पृष्ठानुसारी. [सं.] ॰ज-पु. क्षत्रिया. 'प्रभु बाहुजकुलमाणि ।' -आय २८. [वै. 'बाहूराजन्यःकृतः ।' -ऋग्वे १०.१०८.] ॰दंडपु. १ वरचा हात; दंड; २ सबंध हात. 'हीरांगदें शोभति बाहुदंडी ।' -सारुह ८.१५२. [सं.] ॰बल- बळ-न. शरीरसामर्थ्य; मनगटांतील ताकद-शक्ति; कपट, मंत्रतंत्र युक्ति इ॰ निरपेक्ष केवळ शारिरीक शक्ति. [सं.] ॰भूषण-न. दंडांत बांधण्याचा अलंकार. [सं.] ॰मूल-न. खाक; काख; बखोटा. [सं.] ॰युद्ध-न. द्वंद्वयुद्ध; मल्लयुद्ध; कुस्ती. [सं.] ॰वट-न. १ हात. -शर. २ दंडावरील दागिना. 'वांकि, बाहुवटें, बाजुबंद, बाळी ।' -आपू १८. ॰वीर्य-न. बाहुबल. [सं.] ॰स्फुरण- न. बाहूनां स्फुरण चढणें; हात शिवशिवणें (युद्धाकरतां इ॰). [सं.] बाहुटा-टी-पु. न. १ बाहुमूला(खाके) पासून कोपरा- पर्यंतचा हात. २ खांद्याच्या सांध्याचा भाग; बखोटा. ३ स्त्रियांचें एक बाहुभूषण; वांकी. बाहुळा-पु. (राजा.) बखोटा; बाव्हळा; बाहू-पु. हात; भुज. (अशुद्ध) बाहूझोंबी-स्त्री. द्वंद्वयुद्ध; कुस्ती. 'तुम्हीं बाहूझोंबी घेतां म्हणोन ।' -ह १९.१४०. बाहू- फुगणें-(एक शौर्याचें लक्षण) हात फुरफुरणें. बाहे-पु. १ बाहु; हात. 'सप्राणें आफळली बाहे ।' -उषा १४.१९. २ (ल.) आधार. 'मोडूनि श्रद्धेची बाहे ।' -ज्ञा १७.४१४.

दाते शब्दकोश

बाज

क्रिवि. उलट; उलट पक्षीं. 'बाज गुन्हाई माझें वतन घेऊन.' -रा १५.१६. [फा. बाझ्]

दाते शब्दकोश

स्त्री. १ खाट; खाटलें; वाजलें. २ (गो.) पलंग. [सं.] वह्] बाजट, बाजलें-न. लहान खाट. ॰वट-न. १ लहान खाट. २ बाजेची दोरी. -पु. ३ (कों.) चौरंग.

दाते शब्दकोश

बाज़

[फा. बाझ्] उलट; उलटपक्षीं. “बाज़ गुन्हाई (= अन्यायानें) माझें वतन घेऊन माझे तीन खून केले आहेत” (राजवाडे १५|१६).

फारसी-मराठी शब्दकोश

बांधे

न (को.) मालक नसल्यामुळें गांवजमिनींत सामील केलेली पडित जमीन. बा(बां)धेकरी-पु. १ राहत्या गांवांत बापजाद्यांचें किंवा स्वतःचेंहि वतन किंवा जमीन नसलेला मनुष्य. २ एका गांवांत राहून दुसर्‍या गांवची जमीन करणारा मनुष्य. 'गांवचा वतनदार असोन खोत परागंदा जाहला आहे आणि गांवची खोती बांधेकरी करीत असेल त्यास स्वामित्व करार करून घ्यावें. ' -वाडथोमारो २.४४. ३ (कों.) नवीन वस्ती करणारा किंवा पडीत जमीन लावणारा शेतकरी.

दाते शब्दकोश

बे-वारीस;

बेवारशी निवारशी. “बेवारीस वतन असलें तर तहकीक करून देणें” (वाड-सनदा १९६).

फारसी-मराठी शब्दकोश

ब-हाल

वि. १ प्रसन्न; खूष. २ पूर्ववत् कामावर नेमलेला. ३ क्षमा केलेला. ४ बक्षीस दिलेला. 'कसबे मज्कूरची मोकदमी तुम्हास बहाल करून.' -रा १५.२७८.५ पुन्हां स्थापिलेलें; परत दिलेलें. 'वतन बहाल वजारी.' -थोमारो १.६५. ६ (व.) कायम असलेला, टिकलेला. -क्रिवि. पूर्ववत्. 'याजकरितां लाडाचे चौथे दफेची इबारत ब-हाल ठेवणें जरूर.' -रा ७.९२. [फा. बहाल] ॰करणें-सक्रि. १ कृपावंत होऊन देणें. २ खालच्या कोर्टाची हुकुमनामा कायम करणें. (मामलत, सनद इ॰ कोणा एकास) ॰करणें-एखाद्यास पुन्हां तो अधिकार देणें. ॰मर्जी- स्त्री. प्रसन्नता; खुशमर्जी. बहाली-स्त्री. १ अनुकूलता; प्रसन्नता. २ स्थापना; ठाम करणें (अधिकारांत, उद्योगांत). ३ क्षमा; माफी; कृपा. 'मशारनिल्हेस बहालीचीं पत्रें पाठविलीं.' -दिमरा. १. १२०. ४ (मागें तगिरी शब्द जोडून) एखाद्या कामावरून कमी केलेल्या नोकराची कामावर पुनः नेमणूक. तगिरी बहाली पहा; पुनः नेमणूक (सरकारी अधिकार्‍यांची, नोकरांची). 'जर्नेल इष्टवरिष्ट यास हिंदुस्थानचे फौजेचा बहाली-बर्तर्फीचा मुख्त्यार केला आहे.' -दिमरा १.१२८. ५ चढती कमान; बढती; उत्कर्ष. 'जीवबादादा परशुरामपंताची दिसदिस बहाली ।' -ऐपो २२५. बहाली-मेहेर- बानगीं-स्त्री. दया; लोभ.

दाते शब्दकोश

बुद्रुक; बुद्रुख; बुजृग

[फा. बुझुर्ग] वृद्ध, थोर “सर्कारीहून बुजृगांपासून... बाजीराव पण्डित प्रधान यासी पर्गणे मज्कूरची वतन देशमुखी अज़ कदीम इनायत असे” (वाड-मा १|६५). “तोतयाचे चौकशीसाठीं बुद्रुख ज़मा करितात” (खरे ६।२७१२). “एकाएकी लढाई बिघडोन बुद्रुख भाऊसाहेब सर्कार-कामास येऊन कैलासवासी जाले” (खरे ११|६०९८).

फारसी-मराठी शब्दकोश

बूड

बूड būḍa n The bottom, foot, lower part (of a thing in general). 2 Smearing the bottom (of a pot or vessel) with ashes and earth. v घे g. of o. 3 The root of a tribe or race: esp. an original and a yet subsisting family holding a share of a वतन: also such share. Ex. ह्या गांवांत पाटिलकीचीं मुख्य चार बुडें आहेत. बूड टेकणें (Cant.) To sit; to bring one's stern to anchor. बुडीं At the bottom of.

मोल्सवर्थ शब्दकोश

भातें

न. १ ठराविक पगारापेक्षां जो नोकरास माल, वाट- खर्च, भाडेंतोडें इ॰ साठीं अधिक पैसा देतात तो; भत्ता. २ (कायदा) भत्ता. 'भातें वादीनें प्रथम द्यावें.' -न्यासे २४. ३ सावकार, सरकार इ॰ कडून आपणाकडे आलेल्या मनुष्यास आपण त्याच्या खोळंबा इ॰ च्या भरपाईसाठीं द्यावयाचें द्रव्य. भत्ता पहा. ४ पोटगी; खाद्य. 'ऐसें युक्तीचेनि हातें । जें इंद्रिया वोपिजे भातें ।' -माज्ञा ६.३५२. ५ वतन -शर. [सं. भक्त; हिं.]

दाते शब्दकोश

भाऊबळ

भाऊबळ bhāūbaḷa f (Line or series of brothers.) Enjoyment of a वतन or patrimony according to turn in a line of brethren. Also भाऊबळीनें.

मोल्सवर्थ शब्दकोश

चौधरकी

स्त्री. चौधरीचें काम; चौधरीपणाचें वतन; हक्क. ‘रूपराम चौधरी हा पानशांच्या तोफखान्यांत चौधर- कीच्या कामावर होता.’

दाते शब्दकोश

चकबंदी       

स्त्री.       १. जमीन, शेत, वतन यांच्या चतुःसीमा ठरविणे, मर्यादा घालून देणे. २. जमिनीची आकारणी, सारा ठरविणे; साऱ्याचा दर निश्चित करणे; आणेवारी काढणे; गाव वसाहतीस आणण्याच्या कामाची अंगे मुख्यतः तीन १) नापीक जमीन पिकाऊ करणे. २) पिकांचे व गावकरी आणि शेतकरी ह्यांचे रक्षण करणे आणि ३) राज्यातील सर्व जमिनीचे मोजमाप करून सारा-आकारणी करणे. ह्या तिन्ही गोष्टींस त्या वेळी लावणी, संचणी व उगवणी आणि चकबंदी, टकबंदी आणि जमाबंदी ही नावे होती. - अमराअ १·१४६. ३. पोलिस किंवा महसूल अधिकार क्षेत्राची मर्यादा. २. पोलिस किंवा महसूल अधिकार क्षेत्राची मर्यादा.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चकबंदी

स्त्री. १ जमीन, शेत, वतन यांच्या चतु:सीमा ठरविणें, मर्यादा घालून देणें. २ जमिनीची आकारणी, सारा ठरविणें; सार्‍याचा दर निश्चित करणें; आणेवारी काढणें. [चक + बंदी]

दाते शब्दकोश

चुङ्गाल

(पु.) [फा. चुङ्गाल्] पन्ज़ा. “बहुत खुश्वक्त जाले कीं ज़बर्दस्ताच्या चुड्गालापासून गरिबाचें वतन खुलास जालें” (राजवाडे २०।४९).

फारसी-मराठी शब्दकोश

चुंगाल      

पु.       १. पंजा, पकड २. (ल.) जुलूम; जबरदस्तीचा ताबा : ‘बहुत खुशवक्त झाले कीं जबरदस्ताच्या चुंगालापासून गरिबांचे वतन खलास जाले.’ − मइसा २०·४९. [सं. चतुर + अंगुली]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चुंगाल

पुं. १ पंजा. २ (ल) जुलूम, जबरदस्तीचा ताबा. 'बहुत खुश्वख्त जालें कीं जबरदस्ताच्या चुंगालापासून गरिबाचें वतन खलास जालें.' -रा २०.४९. [चुंगल पहा. फा. चुंगाल्]

दाते शब्दकोश

डांगे

पु. जकात घेणारा अधिकारी. 'सौदळच्या पराड- कर मंडळीकडे डांगी पतकीचें वतन चालत असे.' -मोघ २. [डांग = डोंगर]

दाते शब्दकोश

देह, देहे

पु. गांव. 'मसूर परगणाची दसमुखी देह सत्तावन आपले वडील करीत होते.' -इमं ३३. 'एकूण तेवीस देहे येथील.' -वाडसमा ६.११४. [फा. दिह्] देह-ब-देह-गांवोगांव. 'देह व देह लावणी करील.' -रा १६.४२. देहाय, दहेहाय, देहाये- पुअव. १ गावें; गांवगन्ना. 'जकायती बंदरें व देहाय परगणे मजकूरचें वतन करार करून दिलें असे.' -वाडबाबा १.१२. ॰झाडा-पत्रक-वारझाडा-बाकी-वसूल-देह झाडा इ॰ पहा. देहेझाडा- पट्टी-स्त्री. खेडेगांवचें नोंदपत्रक देहवार-क्रिवि. गाववार. देहेवार झाडा-पत्रक-पुन. देहेझोडा पहा. या प्रमाणें इतर सामासिक शब्द देहेवार-इजार-पट-जमाबंदी-बाकी-वसूल इ॰.

दाते शब्दकोश

देशगावडा

पु. देशकुळकर्णी. 'खंडोजी बिन दमाजी थोरात देशगावडे प्रा/?/ पुणे ता/?/. जुनर येथील देशगावडकीचे वतन तुम्ही व तुमचे वोशपरंपरेने आनभऊन वतनाची सेवा करून आसणें.' -पेद ३१.५५. [देश + का. गौडा]

दाते शब्दकोश

देशगावडकी

स्त्री. देशकुळर्ण्याचें वतन. वर पहा.

दाते शब्दकोश

दिवाण

दिवाण divāṇa n दिवाणखाना m ( P) A royal hall; a court of audience or of justice; a divan: also a council-chamber. 2 Applied freely in the sense of Saloon, hall, drawing-room &c. 3 दि- वाण is further Any assessment or requirement of Government. v फेड, चुकव, दे, फडशा कर, फिट, चुक. 4 दिवाण is further The Sarkár or Government, the Supreme authority; as खोतीचें वतन दि- वाणांत बहुत दिवस आहे. दि0 चें तेल पदरांत घेणें At whatever loss, damage, or cost, accept the gifts of your patron.

मोल्सवर्थ शब्दकोश

दिवाण-न, दिवाणजी

न. १ मुख्य प्रधान; कारभारी; कायदेमंडळांतील मंत्री. (इं.) मिनिस्टर २ मोंगली अंमलांत जमाबंदीखात्याचा प्रांतांतील मुख्य अधिकारी, कारकून. [अर. दैवान; फा. दीवान्] (वाप्र.) ॰चें तेल पदरांत घेणें-कांहींहि नुकसान होवो आपल्या धन्याची देणगी स्वीकारणें. सामाशब्द- ॰असामी-स्त्री. १ चरितार्थाकरितां असलेली सरकारी नेमणूक; सरकारी नोकरी, चाकरी. २ सरकारी कामगार. ॰इ-आम-पु. प्रजेचे अर्ज ऐकण्याचा दिवाणखाना; सार्वजनिक दरबारची जागा. ॰इ-खास-पु. बादशहाची खाजगी बैठकीची जागा; खाशांची बैठक. ॰खाना, दिवाण-पु. १ राजसभागृह. २ अर्ज ऐकण्याची, न्यायदानाची सदर कचेरी. मंत्र्याचें सभास्थान. 'तुका म्हणे धरुनि हात । नाही नेलें दिवाणांत ।' -तुगा १४१५. ३ बैठकीची जागा; कचेरी. ४ सरकारी कर-मागणी. (क्रि॰ फेडणें; चुकविणें; देणें; फडशा करणें; फिटणें; चुकणें). ५ सरकार; मुख्य सत्ता. 'खोतीचें वतन दिवाणांत बहुत दिवस आहे.' 'निपुत्रिकांचें मिरास तें दिवाणाचें.' -रा ८.४९. [फा. दिवानखान] ॰गिरी- स्त्री. दिवाणाचें काम; प्रधानकी; वजिरात. ॰चावडी-स्त्री. न्यायकचेरी; सरकारी काम करण्याची जागा; सरकारी कोरट कचेरी. (क्रि॰ करणें; पाहणें; भोगणें; नेणें; आणणें; घालणें; देणें). ॰दरबार-पु. १ राजसभा; न्यायकचेरी. २ सरकारी न्यायसभेकडून चौकशी. 'या गोष्टीचा दिवाण दरबार झाला.' ३ (ल.) कुप्रसिद्धि; बोभाटा. ॰दस्त-देणें-धारा-सारा- नपु. सरकारी कर; शेतसारा; सरकारदेणें. 'ग्रामस्थ म्हणती त्या अवसरा । देणें लागतो दिवाण धारा ।' 'दिवाण दस्त भारी या- मुळें रयत लावणी करीत नाहीं.' -थोमारो २.१. ॰दुय्यम-पु. नायबदिवाण; मुख्य दिवाणाच्या हाताखालचा अधिकारी.

दाते शब्दकोश

द्रोण, द्रोणा

पु. १ पळस वगैरे पानांचें, पातळ पदार्थ ठेव- ण्याचें, चुया टोंचून केलेलें एक पात्र. २ लांकूड, दगड, लोखंड इ॰ कोरून केलेलें, गुरांना पाणी पाजण्याचें किंवा नदी तरून जाण्याचें पात्र; डोणी. ३ (धान्य इ॰) मोजण्याचें माप; अर्धा मण. 'जोडी सात्मजदार द्रोणमित व्रीहि पंधरा दिवसीं ।' -मोवन ८.३. ४ द्रोणाचार्य; महाभारतांतील कुरुगुरु. [सं.] हातापायाचे द्रोण होणें-हातपाय आंखडणें. द्रोणकाक-पु. १ गिधाड. २ डोम कावळा. ॰माशी-स्त्री. साधी माशी (द्रोणावर बसते म्हणून). ॰वत-न. द्रोणाच्या उपयोगी पान. द्रोणी-स्त्री. डोणी पहा.

दाते शब्दकोश

दुमाला

वि. १ दोन मालक असणारा गांव, वतन. २ जमीन- महसुलासंबंधी सरकारच्या हक्कापुरता कोणा मनुष्यास सर्वांशीं अगर अंशतः दिलेला हक्क. 'पुणें तालुक्यांत दुमालेगांव पंचवीस आणि खालसा पौंणशे.' ३ सरकारखालसातीकडे नसून लोकांकडे पर- भारें माफीनें चालणारा गांव, जमीन इ॰. याचे इनाम, सरंजाम, इसाफत, अग्रहार, पासोडी, हाडवळा, खैरात, बालपरवर्षी, नान- परवर्षी, सरदेशमुखी, चौथाई, जाहागिर, मोकसा, साहोत्रा, वेचणी, गिराणी, पसाइत, चाकराइत, वजीफा, गिरास, सौदिया, वांटा इ॰ बावीस प्रकार आहेत. -इनाम २५. ४ स्वाधीन; हस्तगत. 'मौजे मजकूर हा गांव यांचे दुमाला करून... ...' -वाडसमा २९५. ५ पूर्वींच्या मालकाचा निर्वंश झाल्यावर सर- कारजमा होणारें (इनाम) [दु = दोन + माल = मत्ता; फा. दुबाल्] दुमाला, दुबाला, दुमाळा-ळे-क्रिवि. ताब्यांत. 'पैकीं नीम चावर आपले दुमाला केले आहे.' -शिवचरित्र साहित्य २.१६३. 'कुलबाब, कुलकानू दुबाला असे' -शिवचरित्र साहित्य २.१६३. दुमाल अम्मल-पु. दोन सरकारांचा अम्मल; सरकारी व जहा- गिरी असे दोन अम्मल; दोन मालकांचा ताबा. [दुमाला + अम्मल] दुमाल झाडा-पु. १ दुमाले गांवांची यादी. २ दुमाल जमिनींच्या मालकीसंबंधीं सरकारी चौकशी. दुमाल- दार-पु. दुमाले गांवाच्या (दोन) मालकांपैकीं प्रत्येक; इनाम- दार. 'माजगांव तर्फ सातारा हा गांव दुमालदारखेरीजकरून बाकी सुभाकडील अम्मल बेगमीबद्दल पेस्तर सालापासून लावून दिला.' -वाडसमा १.३६. दुमाल पत्र-न. नवीन अम्मलदार आला असतां इनामदारास जुन्या अंमलदारापासून आपल्या इनामांचें इनाम पत्र लिहून दाखल्यादाखल आणावें लागत असे तें. -भाअ १८३२. दुमाले(ल)गांव-पुन. १ दोन मालकांच्या अमला- खालचा गांव. २ पुढें सरकारजमा होणारा गांव; (सामा.) खालसा गांव. [दुमाला + गांव] दुमाले(ल)पत्र-न. हुंडी बरो- बर खुलाशाबाबत दिलेलें पत्र; जोडलेलें पत्र. [दुमाला + पत्र]

दाते शब्दकोश

दुमाला, दुमाल, दुमाळा, दुमाळे, दुबाला      

वि.       १. दोन मालक असणारा (गाव, वतन). २. जमीन–महसुलासंबंधी सरकारच्या हक्कापुरता एखाद्या मनुष्याला सर्वांशी अगर अंशतः दिलेला हक्क. ३. सरकारखालसातीकडे नसून लोकांकडे परभारे माफीने चालणारा (गाव, जमीन इ.). ४. स्वाधीन; हस्तगत : ‘मौजे मजकूर हा गांव यांचे दुमाला करून…’ – वाडसमा २·९५. ५. पूर्वीच्या मालकाचा निर्वंश झाल्यावर सरकारजमा होणारे (इनाम). [फा. दुबाल्]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गिरास

स्त्री. गीराशी लोकांचें वतन. 'गिरास पूर्वी- प्रमाणें आम्ही घेत आलों त्याप्रमाणें महालकरी देत नाहीं.' -दुबारो ५.१६४. [गिराशी]

दाते शब्दकोश

गोत, गोतगंगा, गोतपत, गोतपात, गोतवळ, गोतवळा      

न. स्त्री. पु.       १. भांडण, बहिष्कार इत्यादीच्या चौकशीसाठी जमलेली जातीची सभा, पंचायत; जातीचे कोर्ट; निवाडाकचेरी. २. (सामुदायिक) एकत्रित झालेली जात; सबंध जातकुल; गोत्रज. ३. (सामुदायिक) नातेवाईक मंडळी; सगेसोयरे; भाऊबंद : ‘सांडून सर्वहि गोत ।’ - दास २·१·९. ४. नाते. ५. आलुतेबलुते. ६. (पेशवाईतील) धार्मिक किंवा सामाजिक अपराधाच्या चौकशीसाठी किंवा दत्तक, वाटणी, वतन इत्यादींचा निर्णय देण्यासाठी भरणारी गावातील सरकारी कामगार, वतनी अधिकारी, आलुतेबलुते व प्रतिष्ठित माणसे यांची न्यायनिवाडा करण्याची सभा. या सभेने दिलेला निवाडा सरकारही सहसा फिरवीत नसे. [सं. गोत्र] (वा.) गोत मिळणे, गोतगंगा मिळणे, गोतपत मिळणे, गोतपात मिळणे, गोतवळ मिळणे, गोतवळा मिळणे - १. एकत्र जुळणे, जथणे. २. मिसळणे; संयोग,एकजीव होणे. ३. एकमत होणे; जुळणे (मुद्दे, गोष्टी). ४. सख्य होणे. ५. पूर्वापर गोष्टींचा संबंध जुळणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गोत, गोतगंगा-गोतपत-पात-गोतवळ-वळा

नस्त्रीपु. १ भांडण, बहिष्कार इ॰ च्या चौकशीसाठीं जमलेली जातीची सभा, पंचायत; जातीचें कोर्ट; निवाडाकचेरी. २ (सामुदायिक) एकत्रित झालेली जात; सबंध जात; गोत्रज. ३ (सामुदायिक) नातेवाईक मंडळी; सगेसोयरे; भाऊबंद. 'सांडून सर्वहि गोत ।' -दा २.१.९. ४ नातें. ५ आलुतेबलुते. ६ (पेशवाईंतील) धार्मिक किंवा सामाजिक अपराधांच्या चौकशी- साठीं किंवा दत्तक, वांटणी, वतन इ॰चा निर्णय देण्यासाठीं भरणारी गांवांतील सरकारी कामगार, वतनी अधिकारी, अलुते- बलुते व प्रतिष्ठित माणसें यांची न्यायनिवाडा करण्याची सभा; हिनें दिलेला निवाडा सरकारहि सहसा फिरवीत नसे. [सं. गोत्र] (वाप्र.) ॰मिळणें-१ एकत्र जुळणें, जथणें. २ मिस- ळणें; संयोग, एकजीव होणें. 'ताकाचें व तेलकट भाजीचें गोत मिळत नाहीं.' ३ एकमत होणें; जुळणें (मुद्दे, गोष्टी). ४ सख्य होणें. ५ पूर्वापर गोष्टींचा संबंध जुळणें. म्ह॰ कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ = स्वकीयांशीं फितूर होणारा माणूस. सामाशब्द- ॰घोडा-पु. १ अगम्यगमन करणारा माणूस. २ अशिक्षित, अक्षर- शत्रु असें मोठें मूल; पोळ; म्हशा. ३ कुटुंबांतील शुंभ, ढ माणूस. ॰पत-पात, गोताई-स्त्री. १ जातिबहिष्कृत, गुन्हेगारास शुद्ध करून पुन्हां जातींत घेण्याच्या वेळचा संस्कार; प्रायश्चित्ताचें जातजेवण. २ जातसभा (मराठ्यांत); पतितास आपल्या पंक्तीस घेऊन जात त्याला पावन करते तो विधि. ॰पत्र-न. वंशावळ. ॰पुड्या-स्त्रीअव. (खा.) देवप्रतिष्ठा. 'गोतपुड्या बांधून टाक' = देवप्रतिष्ठा बसव. ॰महजर-पु. गोतसभेनें; दिलेलें निकालपत्र, निकाल; थळपत्र. गोताई-स्त्री. १ गोतसभा; ग्रामसभा. २ गोत- पत अर्थ १ पहा. गोतावळ-ळें, गोतावळा, गोतोळा- गोत; गोतसभा; गोतगंगा. [सं. गोत्र + आवलि. म. गोत + ओळ]

दाते शब्दकोश

गत

वि. १ गेलेला; नष्ट निघून गेलेलाः जुना; मागचा, समा- सांत-गत-दरिद्र-धन-बुद्धि-भय-मान-लज्जा-श्रम-सन्मान; गताभिमान, गतावसान, गतेंद्रिय, गत-धीर-धेर्य-प्रतिष्ठ. २ कडे, आंत जाणें, आंत स्थिरावणें किंवा बसणें. 'अंतर्गत, मध्यगत, हस्तगत,' ॰होणें- १ लोटणें; गुजरणें; जाणें; घालवणें (वेळ, काळ) २ निघून गेलेला असणें (या जगांतून); नष्ट होणें; मरणें. म्ह॰-गतं न शोच्यम् । = गेल्याचा शोक वृथा न करावा. सामाशब्द- ॰कथा-स्त्री. होऊन गेलेली, जुनी, प्राचीन काळची गोष्ट; मागें घडलेला वृत्तांत. ॰काळ-पु. गेलेले दिवस; पुराणकाळ; भूतकाळ. ॰कुळी-कूळ-वि. १ माणसांनीं किंवा शेतकर्‍यांनीं ग्रामत्याग केल्यानें पडून राहिलेली (जमीन, शेत, वतन, मिरास). २ मालक किंवा कोणाचा वंशपरंपरेचा हक्क नसलेली (जमीन इ॰). अशी जमीन गांवच्या मालकीची समजून गांवकरी तिची विल्हेवाट लावीत किंवा सरकार ती इनाम देत असे. ३ पूर्वज. -गांगा २१२. ॰कूळ-न. देशांतराम उठून गेलेलें किंवा नष्ट पावलेलें कुंटुब. २ जमीन सोडून दिलेलें कूळ, शेतकरी. ॰गोष्ट-स्त्री. गत कथा पहा. ॰चेतन-वि. हालचाल नष्ट झालेला; मूर्च्छा आलेला; देहभानावर नसलेला. [सं.] ॰तेजस्क, तेज-वि. १ निस्तेज; प्रकाश कमी झालेला किंवा नाहींसा झालेला. २ (ल.) कांति, शोभा, वैभव यांनीं हीन [सं.] ॰धवा-स्त्री. विधवा [सं.] 'मगरिगतधवा ते आणि निर्वीर्य योद्धे ।' -वामन भरत भाव ३. ॰पराक्रम-वि. दुर्बळ; शक्तिहीन. [सं.] ॰प्राण- वि. १ मृत मेलेला. २ (ल.) भ्रांतचित्त; भयभीत; शुद्धी गेलेला. ॰भर्तुका-स्त्री. विधवा; गतधवा पहा. [सं.] ॰मत-स्त्री. (सुलांच्या बोलींत) एकोपा; सल्ला; गुप्त विचार किंवा उद्देश. ॰रस-वि. शुष्क; सुकें; रस नाहींसा झालेला [सं.] ॰वयस्क- वि. वयस्कर; वयातीत; वृद्ध. [सं.] ॰वर्ष-न. गतसाल; मागचें वर्ष [सं.] ॰वित्त-वि. दरिद्री; कफल्लक; खंक. [सं.] ॰विश्वास- वि. विश्वास, भरंवसा, उमेद, अवसान गेलेला. [सं.] ॰वीर्य- वि. १ पुरुषत्त्वहीन; षंढ. २ (ल.) नेभळा; हताश; दुर्बल. [सं.] ॰शक्ति-सामर्थ्य-वि. बलहीन; गततेजस्क पहा. [सं.] ॰श्री, -लक्ष्मी,-संपत्ति,-सौभाग्य-वि. दरिद्री; दैवहीन; अभागी. [सं.] ॰सत्त्व-वि. निर्जीव; निर्वीय; दुर्बळ. [सं.] ॰साल-न. गतवर्ष पहा. [गत + फा. साल]

दाते शब्दकोश

गतकुळी, गतकूळ      

वि.       १. माणूस वा शेतकऱ्याच्या ग्रामत्यागाने पडून राहिलेली (जमीन, शेत, वतन, मिरास). २. मालक किंवा कोणाचा वंशपरंपरेचा हक्क नसलेली (जमीन इ.) अशी जमीन गावच्या मालकीची समजून तिची विल्हेवाट लावीत किंवा सरकार ती इनाम देत असे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गुमास्ता

पु. १ मुनीम; प्रतिनिधी; मुखत्यार; कारभारी; अडत्या; बातमीदार; मुतालीक. 'प्रधान यांचे गुमास्ते व आमात्यांचे वगैरे यांणीं काम तूर्त करावें.' -मराचिस ८. २ (कायदा) कोणत्याहि व्यवहारांत दुसर्‍या ऐवजीं प्रतिनिधी- दाखल वागण्याकरितां मोबदला देऊन नेमलेला मनुष्य, एजंट. ३ (वतन कायदा) वतनी नोकरीचें काम करण्याकरितां नेम- लेला बदली इसम. -वि. पाठविलेला. [फा. गुमाश्ता] गुमास्त (स्ते)गिरी-स्त्री. १ गुमास्त्याचें काम मुतालिकी; एजंटी. २ प्रतिनिधित्व. 'नामाजी लांडा पुणेहून गुमास्तगिरी देऊन कार्यात मावळास पाठविला.' -इंम ५६.

दाते शब्दकोश

गुमास्ता      

पु.       १. मुनीम; प्रतिनिधी; मुखत्यार; कारभारी; अडत्या; बातमीदार; मुतालीक : ‘प्रधान यांचे गुमास्ते व आमात्याचे वगैरे यांणीं काम तूर्त करावें.’ - मराचिस ८. २. (कायदा.) कोणत्याही व्यवहारात प्रतिनिधी म्हणून मोबदला देऊन नेमलेला मनुष्य, एजंट. ३. (वतन कायदा) वतनी नोकरीचे काम करण्याकरिता नेमलेला बदली इसम.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गयाल, गयाळ, गयाळी      

वि.       १. बिनवारस. २. पडीक; सोडलेली; टाकलेली (मिरास, वतन, जमीन, घर) : ‘गांव गयाळी पडलें.’ - थोमारो २·१६५. ३. परागंदा; देशोधडी झालेला (मनुष्य, कुटुंब). (राजा) ४. बेपर्वा; भिकार; नालायक. ५. अजागळ; गचाळ; बावळा; गाईसारखा भित्रा; गरीब; गबाळ : ‘गयाळाचें काम हिताचा आवारा ।’ - तुगा ३१२८. ६. ज्याला स्वतःला ज्ञान नाही व सांगितलेले समजत नाही असा; मूर्ख; गैदी; खुळा; भोंगळसुती; अव्यवस्थित; गोबरागणेश (मनुष्य). ७. अयोग्य; घाण; फुसकी; वाईट (वस्तू.) [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गयाल-ळ, गयाळी

वि. १ बिनवारस. २ पडित; सोड- लेली; टाकलेली (मिरास, वतन जमीन, घर). 'गांव गयाळी पडलें.' -थोमारो २ १६५. ३ (राजा.) परागंदा; देशोधडी झालेला (मनुष्य, कुंटुब). 'सकारचे उपद्रवामुळें त्या गांवचीं दहा कुळें गयाळ झालीं.' ४ बेपरवा. ५ अजागळ; गचाळ; बावळा; गाईसारखा भित्रा; गरीब; गबाळ. 'गथाळाचें काम हिताचा आवारा ।' -तुगा ३१२८. ६ ज्यास स्वतः ज्ञान नाहीं व सांगि- तलेले समजत नाहीं असा; मूर्ख; गैदी; खुळा; भोगळ्सुती; अव्यव- स्थित; गोबरागणेश (मनुष्य); गयावळ अर्थ ४ पहा. ७ अयोग्य; गचाळ; घाण; फुसकी; वाईट (वस्तु). [सं. गत; प्रा गय; हिं गया; गु. घेला]

दाते शब्दकोश

हकराई

वि. हक्कदार; हक्क असलेले. 'तुम्हास जाहा- गीर व मनसब व महाल व वतन हकराई लोकासहित दिल्ही.' -पेद १५.८६.

दाते शब्दकोश

हुब्बेवतन

न. स्वदेशप्रेम. 'कबुतरानां उडविण्याची आम्ही फार खटपट करीत असूं पण तीं कसचीं जातात. त्यांच्या तही हुब्बेवतन असतेंच.' -उत्तरेकडील भिंती. [फा. हुब्बु-इ- वतन]

दाते शब्दकोश

इजाफत

इजाफत ijāphata f ( A More, or Addition.) इजा- फतगांव n m A village held in permanent farm by an Inámdár. So called from its having been added to the वतन or इनाम. 2 इजाफत is further understood as That department in which presents and offerings to and from Rajas or foreign states are brought to account. Hence इजा- फतखर्च Disting. from मुजाफत & मुजाफतखर्च. 3 इजा- फत whether as n f or as a is also used in its proper senses, Addition, moreness, and more.

मोल्सवर्थ शब्दकोश

इलाखा, इलाका      

पु.       १. हक्क; ताबा; सत्ता अवलंबन : ‘रघुनाथराव इलाखा राखणार नाही.’− ऐलेख ७·३५७३. २. परिवार; बायकामाणसे; खटला : ‘सर्व रायगडावरी संभाजीराजे यांचा इलाखा (परिवार) राहिला.’− मराचिथोशा २५. ३. संबंध : ‘तुम्हांसी त्याचा इलाखा नाहीं’− सभासद ४२. ४. परगणा; प्रांत; शहरहद्द; राज्यकारभाराची विशिष्ट भौगोलिक मर्यादा : ‘या देशांत इंग्रजांची प्राबल्यता जाहलिया अगोदरी नवाब मुहम्मद अली खानाचें इलाकेंत आम्हीं होतों.’− तंरा १००. ५. पालखीच्या दांडीस लावायचे लहान गोंडे. ६. वसुलीवर वरात; तनखा; वतन. [फा.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

इलाखा-का

पु. १ हक्क; ताबा; सत्ता अवलंबन. 'रघुनाथ- राव इलाखा राखणार नाहीं.' -ख ७.३५७३. २ परिवार; बायका- माणसें; खटला. 'सर्व रायगडावरी संभाजीराजे यांचा इलाखा (परिवार) राहिला.' -मराचिथोशा २५; -ख ८३५. ३ संबंध. 'तुम्हांसी त्याचा इलाखा नाहीं.' -सभासद ४२. ४ परगणा; प्रांत; शहरहद्द; राज्यकारभाराची विशिष्ट भौगोलिक मर्यादा. 'हा गांव पुणें इलाख्यांत आहे आणि तो नगर इलाख्यांत आहे.' 'या देशांत इंग्रजांची प्राबल्यता जाहलिया अगोदरी नबाब मुहम्मद अली खानाचें इलाकेंत आम्हीं होतों.' -तरा १००. ५ पालखीच्या दांडीस लावावयाचे लहान लहान गोंडे. ६ वसुलीवर वरात; तनखा; वतन. [अर. इलाका]

दाते शब्दकोश

जेवण

न. भोजन; खाणें; अन्न भक्षण करण्याचा व्यापार. (क्रि॰ जेवणें; करणें). २ जेवणाचे पदार्थ; वाढलेलें अन्न. ३ आहार; खाण्याचें प्रमाण. [सं. जेमन. पं. जेंउणा] ॰कार-पु. (कु.) श्राद्धाच्या दिवशीं पितरांच्या नांवें जेवावयास बोलाविलेला मनुष्य (हा शब्द ब्राह्मणेतरांत रूढ आहे). ॰खाण, जेवणें खाणें- न. १ अन्न; खाद्य; खाण्याचे पदार्थ. २ (सामा.) भोजन; खाणें. 'त्याच्या घरीं जेवण्याखाण्याची सोई नाहीं' ३ खाण्यापिण्याचा व्यापार. 'आमचें जेवणखाण आटपेतों अजून चार घटका लाग- तील.' ॰घर-न. १ (कों.) घरांतील भोजनाची जागा; स्वयंपाक- घर. 'ती जेवणघरांत गेली' -बाळ. २ हॉटेल; खाणावळ. सन १८५३ सालीं मुंबईस हिंदूंच्या फराळाच्या दुकानांस जेवणघर म्हणत असत. ॰रात्र स्त्री. (व.) जेवणाची वेळ होण्याइतकी रात्र; सुमारें ८।९ वाजण्याची वेळ. जेवणवेळ पहा. ॰वत-न. जेवण्याच्या उपयोगाचें पान (केळ वगैरेचें). 'केळीची डांग मोठी असली तर चांगलीं पांच जेवणवतें होतात.' [जेवण + पत्र] ॰वार-पु. ज्या दिवशीं उपवास करावयाचा नसतो असा दिवस, तिथि. [जेवण + वार] ॰वेळ स्त्री. भोजनकाल. थोरली जेवण वेळ = रात्रीं ९ वाजतां. धाकली जेवण वेळ = सकाळीं ७ वाजतां. जेवणाईत-पु. १ जेवणारा माणूस २ पंगतीस घेतलेला आश्रित. जेवणावळ-स्त्री. १ मेजवानी; भोजनसमारंभ. (क्रि॰ करणें). २ जेवण्याबद्दचा खर्च. ३ (मुंबईस, जुन्या काळीं) जेवणघर; खाणावळ; हॉटेल. [जेवणें]

दाते शब्दकोश

जला, जलावतन      

न.       हद्दपारी; वतनापासून दूर करणे; वतन काढून घेणे. (क्रि. करणे.) : ‘हांडे याचे पारपत्य जला−वतन करणे.’ – सनदा ७०. [अर.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

जला-वतन

न. हद्दपारी; वतनापासून दूर करणें; वतन काढून घेणें. (क्रि॰ करणें). 'हांडे याचें पारपत्य जला-वतन करणें.'-वाडसनदा ७०. [अर. जला = हद्दपारी]

दाते शब्दकोश

जोशी-सी

पु. १ पंचांग, कुंडल्या समजून गांवांत सांगणारा; ज्योतिषी; भविष्य वर्तविणारा; भिक्षुकी, जोसकी करणारा ब्राह्मण (विशेषतः धंदेवाईक); ग्रामजोशी. पूर्वीं ही वृत्ति असे व जोशाला गांवांत बलुतें देण्याचीहि वहिवाट असे. २ एक कुणब्यांतील जात; कुडबुडे जोशी (कुणब्यांतील); हे सह- देवी मताचे मुहूर्त, ज्योतिष जाणतात. ३ बगळ्याच्या जातींतील एक पक्षी; कुकुडकुंभा. [सं. ज्योतिषी; प्रा. जोइस, जोइसिअ] जोसकी, जोसपणा, जोसपण-स्त्रीपुन. गांवजोशाची वृत्ति, धंदामं वतन. जोसगंड-पु. जोशास निंदार्थीं म्हणतात.

दाते शब्दकोश

जोसकी, जोसपण, जोसपणा, जोसीक      

स्त्री. पु. न.       गावजोशाची वृत्ती, धंदा, वतन.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कदीम, कदीमी      

वि.       प्राचीन; पुरातन; जुनापुराणा; फार दिवसांचा (चाकर, वतन, धर्म, वहिवाट इ.) : ‘खेंचून वाड्याबाहेर काढले कदीम शिपायाला ।’ - ऐपो ३९८. [फा. कदीम]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कदीम-मी

वि. प्राचीन; पुरातन; जुनापुराणा; फारा दिवसांचा. (चाकर, वतन, धर्म, वहिवाट इ॰). 'खेंचुन वाड्या- बाहेर काढलें कदीम शिपायाला । -ऐपो ३९८. 'पाटील कुळ- कर्णी शेटे महाजन कदीम हकदारी ।' -पला ७०. [अर. कदीम-मी]

दाते शब्दकोश

कम्तर

कमी. “त्यांत अन्तर आम्ही व आमचे वंशज लेकरांचे लेकरीं वतन वगैरे चालविण्याविषयीं कम्तर करणार नाही.”

फारसी-मराठी शब्दकोश

खळ

न. खळें पहा. १ शेतांतील धान्य मळणीची जागा, आळें. २ (कों.) आंगण, उघडी जागा. सामाशब्द॰ उडगल- (कर्ना.) खळें झाडणें. ॰पुंजी-स्त्री. खळ्यावरचें धान्य मापतांना प्रत्येक मोठया राशींतून घेतलेले लहान ढीग. मराठा अमदानींत ही सरकारी दस्तुरी समजली जाई. ॰यज्ञ-खलयज्ञ पहा. ॰वट-न. शेतमाल तयार होऊन खळ्यावर धान्याच्या राशी पडूं लागतात तो हंगाम, काल. -गंगा ९९. ॰वटणी-स्त्री. मळणीकरितां धान्याच्या पेंढया एकत्र जमा करणें. ॰वळ-न. रास काढून नेल्यानंतर खळ्यावर इकडे तिकडे पडलेलें धान्य. हा गांवच्या महाराचा हक्क आहे. ॰वाडी-स्त्री. अनेक शेतकर्‍यांचीं खळीं असलेली गांवाच्या बाहेरची कुंपण घातलेली जागा; खळ्यांचा समुदाय. 'खळवाडेकडे गेला निघोनि ।' -दावि २८. [खळ + वाडी]

दाते शब्दकोश

खलास

[अ. खलास्] मुक्त; समाप्त; खतम. “बहुत खुश्वक्त ज़ाले कीं ज़बर्दस्ताच्या चुगालांपासून गरिबाचें वतन खलास जालें (राजवाडे २०।४९).

फारसी-मराठी शब्दकोश

खलास

वि. १ सरलेला; खर्वल्यानें नाहींसा झालेला; वेंचलेला; खतम. २ शेवटास गेलेला; संपलेला; पूर्ण झालेला; समाप्त. ३ मुक्त; सुटलेलें; मोकळें झालेलें. 'बहुत खुश्वक्त जालें. कीं जबर्दस्ताच्या चुगालांपासून गरीबाचें वतन खलास जालें.' -रा २०.४९. [अर. खलास् = मोकळें]

दाते शब्दकोश

खलास      

वि.       १. सरलेला; खर्चल्याने नाहीसा झालेला; वेचलेला. २. शेवटास गेलेला; संपलेला; पूर्ण झालेला; समाप्त. ३. मुक्त; सुटलेले; मोकळे झालेले : ‘बहुत खुश्वक्त जाले कीं जबर्दस्ताच्या चुगालांपासून गरिबाचें वतन खलास जालें’ - मइसा २०·४९. [फा.] (वा.) खलास करणे - ठार मारणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खुर्द(र्दा)सानक

स्त्री. १ भुक्त अन्न. २ (ल.) हातांतून गेलेलें परत न घेतां येणारें इनाम, जमीन, वतन. सानक पहा. [फा. खुर्दन् = खाणें + सानक = ताट]

दाते शब्दकोश

खुर्द सानक, खुर्दा सानक      

स्त्री.       १. भुक्त अन्न. २. (ल.) परत न मिळणारे इनाम, जमीन, वतन. पहा : सानक

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

लें(ले)करूं

न. मूल; बालक; बाळ. (पुत्र किंवा कन्या या अर्थी.) 'तरी सकृप बाप तूं म्हणसि नायके लेंकरूं ।' -केका ९२. लेकरालेकरीं, लेंकुरालेंकुरीं-क्रिवि. १ वाडवडिलां- पासून (चालत असलेलें वतन, हक्क, इ॰); मुलापासून त्याच्या मुलाकडे अशा क्रमानें; वंशपरंपरेनें. २ मुलांत; मुलांशीं; मुलांमध्यें इ॰ [लेकरूं द्वि.] ॰बाळ, लेकरेंबाळें-न. एव. अव. मुलेंबाळें; लहान मुलें; मुलेंबिलें; कुटुंबांतील लहानमोठीं मुलें (सामान्यत्वें- करुन.) लेंकुरडा-वि. लहानसा; पोरकट. 'न्हाण आलें शोभेना अंगाचा बांधा लेकुरडा ।' -प्रला ९९. लेकुरछंद-पु. १ मुलांत मिसळण्याचा छंद, हौस, आवड; मुलांचा शोक; लहान मुलांसारखें वागण्याचा स्वभाव. 'अरे तूं एवढा मोठा झालास तरी लेकुरछंद टाकीत नाहींस.' २ पोरकटपणाचा नाद; बालिश हट्ट. 'आई- बापावांचून मुलाचे लेंकुरछंद दुसरा कोण पुरवील?' लेंकुरपण- पणा-नपु. १ बाल्यावस्था; शैशवावस्था. २ पोरपणा; बालि- शता. लेंकुरवा-वि. (राजा.) पोरकट; बालिश; लहानसा. लेकुरवाला-ळावि. १ मुलेंबाळें असलेला. 'लेकुरवाळी बाईल म्हणतें आतां याला झोंका ।' -मध्व. २ ज्याला आवडे कोंब किंवा बारीक फाटे आहेत असें (हळकुंड). लेंकुरसमजूत- स्त्री. पोरबुद्धि; लहान मुलाचें ज्ञान. लेंकुरस्वभाव-पु. पोर- स्वभाव; बालिशपणा; लहान मुलाचा स्वभाव. [लेंकरूं + स्वभाव]

दाते शब्दकोश

मैयत

वि. १ मेलेला; माजी; इहलोक सोडून गेलेला. २ निर्जीव झालेलें; विनाशित (घराणें, कुल). ३ करपलेलें (पीक). [अर. मयत] ॰अर्जी-स्त्री. मयत इसमासंबंधींचा अर्ज. ॰कयास-पु. संशयित मृत मनुष्यास मरणाच्या कारणाचा तपास किंवा त्यासंबंधीं बनविलेलें मत, विचार. ॰चौकशी- तपासणी-स्त्री. मृत इसमाच्या संबंधानें केलेली विचारपूस. ॰जिंदगी-स्त्री. १ मृत इसमाची राहिलेली, त्यानें टेवलेली मालमत्ता. २ बेवारशी, योग्य वारसदार हक्कदार, नाहीं अशी मालमत्ता. ॰पंचनामा-पु. मृत इसमाच्या चौकशीचा केलेला पंचनामा. ॰पाहणी-स्त्री. जळुन गेलेल्या किंवा रोग पडून नष्ट झालेल्या पिकांची पाहणी. ॰माल-पु. मयत जिंदगी पहा. ॰मोकद्दमा-पु. मृत इसमासंबंधीं चौकशीचा, मोकद्दम. ॰याद- स्त्री. १ मयत झालेल्या लोकांची केलेली यादी, फेरिस्त. २ मृत इसमांच्या चौकशीचे निकालाचे ठेवलेले कागदपत्र. ॰वारीस- पु. बेवारशी वतन, मालमत्ता.

दाते शब्दकोश

मालें

न. दंडाच्या फेडीकरितां, तुरुंगांत पडलेल्या नातें- वाइकाच्या सुटकेकरितां किंवा जप्त झालेली जमीन, वतन पुनः मिळण्याकरितां गळ्यांत नांगर अडकवून दारोदार भिक्षा मागून द्रव्य मिळवणें. (क्रि॰ मागणें). 'काष्ठाचा नांगर गळ्यांत । खांड- श्मश्रु वाढलें बहुत । ब्राह्मण आला मालें मागत । करा साहित्य म्हणतेस ।' ॰करी-पु. मालें मागत फिरणारा मनुष्य.

दाते शब्दकोश

महार

पु. एक अंत्यज, अस्पृश्य जाति; अतिशूद्र; परवारी पहा. [सं. महा + अरि किंवा आर्य; महा + अर (पर्वताच्या गुहेंत राहणारा); मृत + हर = मेलेलें जनावर ओढणारा; मेर = गांवाची कड?] ॰म्ह महाराची आई चांभार घेऊ (मला काय त्याचें). ॰कचका- पु. जोराजोराचें, आरडाओरड्याचें भांडण (महार नेहमीं भांडतात त्याप्रमाणें). ॰कवडी-स्त्री. एक जातीची कवडी. ॰कावळा- पु. डोंबकावळा. ॰कीस्त्री. १ गांवच्या महाराचें काम, हक्क, वतन, अधिकार. २ (ल.) कोणतेंहि हलकें, नीच, कष्टाचें कामं. ॰गजालस्त्री. गडबड; गोंगाट; दंगल; आरडाओरड. ॰चावडीस्त्री. अस्पृश्यांना गांवच्या चावडींत येऊन बसता येत नाहीं म्हणून बहुतेक खेड्यांत गांवचावडीखेरीज दुसरी एक चावडी असते ती. -गांगा ५५. ॰पुंज-पु. शेतकऱ्यांनीं आपल्या उत्पन्नांतील जो भाग गांवच्या महाराचा हक्क म्हणून सरकारांत भरावयाचा तो. ॰पोर-पु. न. गांवांतील हलक्या जातीचे लोक ॰पोरगा-पु. पागेमध्यें घोड्याची नोकरी करण्यासाठीं ठेवलेला महारजातीचा मनुष्य. ॰भादवीस्त्री. भाद्रपद महिन्यांत देवीच्या यात्रेकरितां येणारा खर्च भागावा म्हणून महाराला जमिनीच्या उत्पन्नापैकीं द्यावयाचा भाग, किंवा कांहीं देणगी. ॰महारकी- स्त्री; महाराच्या इनाम जमिनीवरील कर. ॰व(वा)डा-वण-पुन. १ महार लोकांची राहण्याची जागा. २ (ल.) सोंवळ्याओवळ्या- संबंधानें अतिशय अव्यवस्था. 'त्याचे घरीं सारा महारवाडा आहे. मी कांहीं जेवावयास जात नाहीं.' म्ह॰ जेथें गांव तेथें महारवडा. ॰शिसोळा-हडीळा-हडकी-रहाटीपुस्त्री. गांवचीं मेलेलीं गुरें टाकण्यासाठीं महाराला नेमून दिलेली जागा. महारडा-पु. (तिरस्कारार्गी) महार. ॰महारवी-वि. महार लोकांनीं तयार केलेली (टोपली, केरसुणी, सूत इ॰).

दाते शब्दकोश

महारकी

स्त्री० त्रास, कटकट. २ महाराचें वतन.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

महतकदीम

वि. फार पूर्वींचें; फार प्राचीन. येकूण देहे चार व देशमुखी वतन महतकदीम राजश्री स्वामी आहे.' [महत् + कदीम] महतकद्दम पहा.

दाते शब्दकोश

मिनत्वारी

(स्त्री.) मिनत; मनधरणी. “यावरी आपण तुमची मिनत्वारी केली कीं हें वतन देसपाण्डपण तुम्ही घेणें आणि आपणांस सोडविणें” (भाइसम १८३४ षावृ १४१).

फारसी-मराठी शब्दकोश

मोहरीर-ल

पु. लेखक; देशपांड्याचा गुमास्ता; सार्वजनिक अधिकारी; देशपांड्याचा मदतनीस. [अर. मुहर्रिर] मोहरिरी- स्त्री. मोहरीराचा उद्योग पगार किंवा वतन; मोहरीराचें कर्तव्य, अधिकार किंवा पगार.

दाते शब्दकोश

मोकूफ-ब

वि. क्रिवि. स्थगित; थांबलेलें; रहित; बंद. 'वतन चालविण मोफूक राहिलें होतें.' -थोमारो १.६५. 'दोन दिवस मोकूब जाले आहेत.' -पेद ६.२०३. [अर. मव्कूफ]

दाते शब्दकोश

मुबादला; मोबादला

[अ. मुबादला=बदला] ऐवजी, बदली. “हाली महाराज कृपाळू होऊन मोबादला मुर्तज़ाबादचें वतन तुम्हांस देऊन चालविलें” (राजवाडे ६|१३१). “किनवीचे मुबादला दुसरा येणार तो अद्याप आला नाहीं.” (राजवाडे ७|१२९).

फारसी-मराठी शब्दकोश

मुखत्यार

मुखत्यार mukhatyāra a ( A) Absolute, free, that is under no control, or is at full liberty to act; a plenipotentiary or any one to whom full powers have been delegated. 2 An hereditary officer,--the agent appointed by the co-sharers of a वतन to carry on the duties of the office.

मोल्सवर्थ शब्दकोश

मुखत्यारनामा

मुखत्यारनामा mukhatyāranāmā m मुखत्यारपत्र n A power of attorney: also the credentials of an envoy at a foreign court; of a wakíl with reference to his client; of a mercantile agent from his principal; of the agent appointed by the co-sharers of a वतन &c. &c.

मोल्सवर्थ शब्दकोश

मुल्ला

पु. मुलाना पहा. ॰गिरी-स्त्री. मुलाण्याला मिळ- णारें वतन.

दाते शब्दकोश

मुळ्या

पु. १ काष्ठौषधी विकणारा मनुष्य. २ ग्रामजोशी; गांवजोशी; ज्योतिषी. ३ (राजा.) वतन, अधिकार इ॰चा मूळचा भोक्ता. ४ वयोवृद्ध गृहस्थ; जुन्या पिढीचा म्हतारा. ५ मूळ नक्षत्रावर जन्मलेला, द्वाड, खोडकर, दुष्ट, उपद्रवी मनुष्य. [मूळ]

दाते शब्दकोश

परागंदा

वि. १ भटक्या; दुर्दशा प्राप्त झाल्यामुळें घरा- बाहेर भटकत फिरणारा; घरदार वतन इ॰ सोडून देशांतरी गेलेला; देशत्यागी. 'आपण समस्त गांवकरी यांस साक्ष ठेऊन परागंदा जालों आहें.' -वाडसमा २.२१७. 'आम्ही दहा वर्षें परागंदा होतों म्हणून वतनाचा भोगवटा आम्हांकडे नवता.' २ घर सोडून बाहेर गेलेला; फरारी. (क्रि॰ होणें; असणें). ३ अस्ताव्यस्त; विखुरलेलें; विकीर्ण. [फा. तुल सं परांगत] ॰जमीन-स्त्री. परागंदा झालेल्या माणसाची जमीन. हीवरचा त्याचा हक्क बुडा- लेला असतो.

दाते शब्दकोश

परसाइ

न. (ठाणें कों.) जुन्या काळचें सरकारी अधि- काऱ्याची बरदास्त ठेवण्याबद्दलचें एक राजकीय वतन. [परसणें]

दाते शब्दकोश

फरमान-ना, फर्मान-ना

पुन. राजाचा हुकूम; आज्ञा; सनद; आज्ञापत्र (वतन, नेमणूक इ॰ संबंधीं). 'यांसही फर्मान आला आहे.' -रा ८.२१७. [फा. फर्मान; हिं. फरमाना] ॰बाडी- स्त्री. फर्मान घेण्यासाठीं जागा, दरबार; दरबार-डेरा. 'त्यानें बल- मगडसन्निध येऊन फर्मान-बाडी उभी करून फर्मान खिलत घेतला.' -रा ६.५९२. [फा. फर्मान् + बाडी = घर, बारी]

दाते शब्दकोश

रगत

न. रुधिर; रकत; रक्त पहा. 'कृष्णा ताटांत तें धरी रगत ।' -मोविराट ६.९३. ॰ओढ-न. रक्तओढ पहा. [रक्त] ॰रोटी-स्त्री. (रक्तांत केकेली भाकरी) १ (ल) सैन्यांतील नोकरी; जीमध्यें जीव धोक्यांत असतो अशी नोकरी. २ (ल) लढाईंत केकेल्या कामाबद्दल मिळालेलें वतन इ॰. ॰रोडा-रक्तरोडा पहा.

दाते शब्दकोश

सौभ(भा)ग, सौभाग्य

न. १ सौंदर्य. २ भाग्य; नशीब 'एवढें एक सौभग ।' -ज्ञा १५.१७. ३ ज्याचे योगानें आपणांस मान्यता, शोभा, प्रतिष्ठा, तेज इ॰ लाभतें असा अधिकार, विद्या, वतन, सामर्थ्य इ॰ विषय. ४ सवाष्णपणामुळें काजळ, शेंदूर, कुंकू, मंगळसूत्र, बांगड्या इ॰ वस्तु धारण करण्याचा बायकांचा अधिकार; सुवासिनीत्व. ५ कुंकू, शेंदूर. [सं. सुभग; सौभाग्य] म्ह॰ गौर रुसली आणि सौभाग्य घेऊन बसली = रुसून बसलेल्याची कोण पर्वा करतो अशा अर्थीं योजतात. सौभाग्य मिरविणें लावणें = सौभाग्यवति स्त्रीनें आपला तोरा मिरविणें. सौभा- ग्याचा टिका-सौभाग्याचें चिन्ह, कुंकू. ॰चिन्ह-द्रव्य-न. कुंकू, बांगड्या वगैरे. ॰तंतु-पु. १ मंगळसूत्र. २ (ल.) नवरा. ॰धन-न. नवरा. 'घातला तिच्या दुष्टानें सौभाग्यधनावर घाला ।' -विक १४. ॰वती-स्त्री. सुवासिनी स्त्री. ॰वायन वाण-न. स्वतःला सौभाग्य चिरकाळपर्यंत लाभावें म्हणून सुवा सिनी स्त्रिया सौभाग्यद्रव्यांचें ब्राह्मणांस जें दान (वाण) देतात तें. ॰शुंठी-सुठ-स्त्री. ज्यांत प्रामुख्यानें सुंठ घातलेली असते असा एक औषधी पाक.

दाते शब्दकोश

शेरणी

स्त्री. १ नवस फेडण्याकरितां वाटलेली मिठाई, प्रसाद, खिरापत. 'यात्रेकरू गरुडाची पूजा करून शेरणी वाटतात.' -तीव्र. ४८. २ देवापुढें ठेवण्याकरितां किंवा भेट देण्याकरितां तयार केलेली गुळाची लहान ढेप. ३ नजराणा; दंड. 'तुमचे माथां वतन संबंधे शेरणी दुतर्फा रुपये ५०० करार केले असेत.' -वाडशाछ १.२८३. [फा. शीरीनी-शिर्नि = गोडी; मिठाई; प्रसाद. सं. श्रेणी-शेरणी -भाअ १८३३.]

दाते शब्दकोश

शिळोत्तरा पाटीलकी

स्त्री. खार धरावयाची असतां अथवा मिठागर करतांना समुद्राचें किंवा खाडीचें पाणी अड- विण्याकरितां जो बंधारा बांधावयाचा असतो त्यास जें एक द्वार राखलेलें असतें तेथें एक शिळा बसवीत. (शीळ पहा). या द्वाराची व शिळेची देखरेख ठेवण्याकरितां जो मनुष्य नेमलेला असतो त्यास जो हक्क किंवा वतन दिलेलें असतें ती.

दाते शब्दकोश

समाईक

वि. १ अविभक्त; अनेकस्वामिक; अनेकांच्या मालकीचा; (माल, जमीन, वतन, हक्क). २ पातीचा; भागी- दारीचा (धंदा, व्यापार). [सं. सम् + ई = जाणें] ॰कुटुंब-न. ज्याची सर्व जिंदगी एकत्र असून वांटे झाले नाहींत असें कुटुंब; अविभक्त कुल.

दाते शब्दकोश

संपादक

पु. १ वर्तमानपत्र, मासिक, मोठा ग्रंथ याची मांडणी, जुळणी करणारा जबाबदार लेखक. २ एखादा जुना ग्रंथ प्रती तपासून टीपा वगैरे देऊन तयार करणारा. -वि. १ मिळ- विणारा; कमावणार; अर्जन करणारा. २ वतन, जहागीर, हक्क, मालमत्ता वगैरे प्रथम मिळविणारा, संपादन करणारा. ३ विवा- हादि समारंभाचा मुख्य शासक, व्यवस्थापक, कार्यकर्ता, कारभारी. [सं. पादणें]

दाते शब्दकोश

संपादक sampādaka a (S) That acquires, attains, obtains, gets: also that accomplishes, achieves, effects. 2 The acquirer or first possessor of a वतन &c. 3 The manager, director, or master at a wedding or similar occasion.

मोल्सवर्थ शब्दकोश

सोई, सोय

स्त्री. १ परिस्थितीची अनुकूलता; कामधंदा, व्यापार, उदीम इ॰ चा फायदा, फुरसत, समाधान, ज्यांत लाभेल अशी परिस्थिति. २ अनुक्रम, व्यवस्था, रचना इ॰ लावणें, करणें 'पोथ्या सोईनें लाव.' ३ अनुकूलतेचें, व्यवस्थेचें इ॰ साधन; उपजीविकेचें; धंद्याचे (चाकरी, वतन, शेत) इ॰ सुखदायक साधन, मार्ग. ४ आश्रय, आधार; विश्रांतिस्थान. -ज्ञा १७.२२९. [सं. सु = चांगलें + ईर = जाणें] ॰करणें-१ व्यवस्था लावणें. २ (व.) ठोकणें. ॰बसविणें-(ना.) खोडकी, नांगी मोडणें. ॰वार-सार-स्कर-वि. असावी तशी सोय, फायदा असणारा; लाभदायक; सुखकर (उद्योग, धंदा इ॰). ॰सुमार-पु. प्रसंगाचें औचित्य किंवा अनुकूळता; योग्यपणा; व्यवस्थितपणा; मेळ; योग्य काळ वेळ, संधि; मागचें पुढचें धोरण; समजसपणा. 'त्याचे खर्चाला आणि तुझ्या करण्याला सोई सुमार नाहीं.' ॰सोईनें-क्रिवि. बेताबेतानें; हळू हळू; सौम्यपणें; परिस्थितीस अनुसरून (पैसा देणें, घेणें इ॰).

दाते शब्दकोश

तहाहयात, तहहयात, तहाहयाद, तहहयाद      

क्रिवि.       आजन्म; आयुष्यभर; मरेपर्यंत. (हा शब्द वतन, इनाम, करार इ.कांच्या दस्तऐवजात योजतात.) [फा. ता – हायात्]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तहांहयात-द

क्रिवि. यावज्जीव; आजन्म; आयुष्यभर; मरेपर्यंत (हा शब्द वतन, इनाम, करार इ॰ कांच्या दस्तऐवजांत योजि- तात). [फा. ता-हायात्]

दाते शब्दकोश

तकशी(सी)म, तक्षीम

स्त्री. १ वतन, गांवचा खर्च इ॰ कांचा वांटा, विभाग, फाळणी, वांटणी, हिस्सा, भाग. २ विशिष्ट नियमांनीं संघटित असलेला समाज, संघ, वर्ग, जाति, मंडळ, कंपनी. [अर. तक्सीम] ॰दार-पु. वाटेकरी; भागीदार (जमीन, हक्क, मालमत्ता इ॰चा). ॰दारी-स्त्री. १ तक्शीम- दाराचा हक्क; वाटणी; भाग. २ तक्सीमदाराच्या हक्कानें मिळा- वयाचा द्रव्याचा हिस्सा; भागीदारी. [तक्सीमदार]

दाते शब्दकोश

तक्षीम      

स्त्री.       १. वतन; गावचा खर्च इ. चा वाटा; विभाग; फाळणी; वाटणी; हिस्सा; भाग. २. विशिष्ट नियमांनी संघटित असलेला समाज, संघ, जात, वर्ग, मंडळ. [फा. तक्सीम]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तलब

(स्त्री.) [अ. तलब्] पगार; वतन; बोलावणें, समन्स. “हें जाणून त्यास तलब करून हुजूर आणिला” (चित्रगुप्त ७८).

फारसी-मराठी शब्दकोश

तसरीफ

तसरीफ tasarīpha f ( A) Investing with a splendid robe in token of approbation (as kings and nobles invest musicians and sport-makers when pleased with their performance); investing generally with an honorary dress: also conferring of articles of apparel upon village or public officers: also the articles conferred: also a वतन or land bestowed in lieu of पोषाक or apparel.

मोल्सवर्थ शब्दकोश

तसरीफ, तसरीब , तस्त्रीफ      

स्त्री.       १. राजेलोक गवई, तमासगीर इ. ना खूष होऊन देतात ते मानाचे वस्त्र, पोशाख इ. (सामा.) आहेर; नजराणा : ‘पावल्याचा जाब दिधला लिहून । तसरीफ देऊन पाठविला । ’ – तुगा ४४३६. २. गावकामगार, सरकारी नोकर यांना बहुमानाचा पोशाख इ. देण्याचा विधी. ३. बहुमानाच्या पोशाखाऐवजी दिलेले वतन, जमीन. ४. आगमन. [हिं., अर. तश्रीफ]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तसरीफ-ब

स्त्री. १ गवई तमासगीर इ॰ लोकांस (राजे लोक खूष होऊन) देतात तें मानाचें वस्त्र, पोशाख इ॰ (सामा.) अहेर; नजराणा. 'पावल्याचा जाब दिधला लिहून । तसरीफ देऊन पाठविला ।' -तुगा ४४३६. २ गांवकामगार, सरकारी नोकर इ॰ कांना बहुमानाचा पोशाख इ॰ देण्याचा विधि. ३ बहु- मनाचीं वस्त्रे, जिन्नस, इ॰ ४ बहुमानाचा पोशाखाऐवजीं दिलेलें वतन, जमीन. ५ (गो.) भेट; नजराणा (फळें, मिठाई, इ॰ चा). [हिं. अर. तश्रीफ्] ॰ल्याख-वि. नजर करण्यास योग्य (वस्त्र, पोशाख इ॰).

दाते शब्दकोश

तुर्काण

न. तुर्कस्थान. (ल.) -वि. तुर्कांचा ताबा. 'रामाचें वतन जालें तुर्काण ।' -भात्रै १०.३. ११५.

दाते शब्दकोश

तुर्काण      

वि.       तुर्कांचा ताबा : ‘रामाचें वतन जालें तुर्काण ।’ – भात्रै १०·३·११५.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उपाधिक      

न.       उपाध्येपण; उपाध्येपणाची वृत्ती किंवा वतन : ‘त्यावरून कलहवृद्धि होऊन उपाधिक तुम्ही अमानत ठेवले ते येक वर्ष अमानतच राहिले.’ –पेठेदभा २·३.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उपाधपण, उपाध्यपण, उपाधीक

नस्त्री. १ उपाध्या- याची वृत्ति, काम; पौरोहित्य; जोसकी; भिक्षुकी. २ उपाध्या- यास मिळणारी बिदागी, वेतन, प्राप्ति, दक्षणा. ३ उपाध्यायास असणारें वतन. [सं. उपाध्याय]

दाते शब्दकोश

उपरी

वि. १ गांवांत जमीन, वतन नाहीं असा; मिरासदार नसणारा; तात्पुरता राहणारा; स्वतःची मालकी नाहीं अशा जागीं राहणारा. २ (ल.) उडाणटप्पू; आगापिछा नसलेला. 'एखादा उपरी पोर धरून आणून स्वर्गाचे दरवाजे मोकळे करून घेतल्याचें सुख मानून घ्यावयाचें ' -टि ४.१८. म्ह॰ उपरे आले आणि धनी झाले. ३ खंडानें, कौलानें जमीन करणारा; खंडकरी; खेडूत; थलकरी याच्या यलट; ४ वरिष्ठ; वरचा. 'चित्त्यास शिकारीचे सवईसाठीं उपरी अधिकार्‍याच्या परवानगीनें नेणें.' -चिमा. (बडोदें) २८. -क्रिवि. नंतर; पुढें; वर उपरि पहा. 'उपरि; बोले रामललना ।' -रावि २०.१३९. (पत्रांतून) आशीर्वाद उपरी; विनंती उपरी, इ॰ -स्त्री. माडी 'मग ते सप्तखणांची उपरी । तेथें ठेविली राये कुमरी ।।' -कथा १.६.३५. -पु. उंचवटा. 'स्वामिपूजेसि ते अवसरीं । स्थळ केलें उपरीवरी ।' -संवि १३.१३८. (गो.) [सं.] उपरि; सिं. ओपिरो; गु. उपरी; हिं. उपर]

दाते शब्दकोश

उपरी      

वि. १. गावात जमीन, वतन नाही असा; मिरासदार नसणारा; तात्पुरता राहणारा; स्वतःची मालकी नाही अशा जागी राहणारा. २. (ल.) उडाणटप्पू; संबंध नसलेला : ‘एखादा उपरी पोर धरून आणून स्वर्गाचे दरवाजे मोकळे करून घेतल्याचे सुख मानून घ्यावयाचें’ – लोटिकेले ४·१८. ३. खंडाने, मोलाने जमीन करणारा; खंडेकरी; खेडूत. थलकरी याच्या उलट. ४. वरिष्ठ; वरचा : ‘चित्त्यास शिकारीचे सवईसाठीं उपरी अधिकाऱ्याच्या परवानगीनें नेणें.’ – चिमा (बडोदे) २८.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

वाडी

स्त्री. १ कुंपण घातलेली लहान बाग; बगीचा; वृक्ष- समूह; राई. 'नातरी सांडून कल्पतरूची वाडी ।' -भाए ६२२; -ज्ञा ८.१४०. २ वाडगें; आवार; वाडकलें; मळा. ३ मोठ्या गांवाजवळील लहान वस्ती; झोंपड्यांचा समूह; लहान गांव. 'जेथ पांतां चहूं कडी । अठरा गाउआं बहिरि वाडी ।' -शिशु ३२१. [सं. वाटिका; प्रा. वाडिआ; गु. हिं. वाडी; बं. वाटी] ॰वतन- न. वतनवाडी पहा. वाड्या-पु. वाडीचा वतनदार; वाडीवाला; घरंदाज; शेतीवाडीचा मालक.

दाते शब्दकोश

वाटाणा

वाटाणा vāṭāṇā m ( H) A pea, Pisum sativum. वाटाण्याची अक्षत f A term for a flat refusal. v लाव, दे. See under अक्षत.

मोल्सवर्थ शब्दकोश

वाटण

वाटण vāṭaṇa n (वाटणें) Grinding finely with a muller, levigation. 2 The matter levigated or taken to be levigated.

मोल्सवर्थ शब्दकोश

वाटणा

वाटणा vāṭaṇā m (Commonly वाटाणा) A pea, Pisum sativum.

मोल्सवर्थ शब्दकोश

वेतन

न. १ मजुरी; पगार; केलेल्या कामाचा मोबदला; बिदागी. 'वरदास दाससेना हे नाथा वेतनास मागे हें ।' -मोकृष्ण ८४.२०. -मोवन ४.१७७. २ (विशेषतः) सालीना नेमणूक (पूर्वीं पुराणिक, पोतनीस, फडनीस इ॰ ना देत ती). 'गांवकाम- गारा शिवाय वतनपद्धतीला फांटा मिळाला व चाकरीबद्दल वतना- ऐवजी वेतन देण्याची पद्धत चालली.' -गांगा ६८. [सं.] ॰गुरु-पु. भाडोत्री, निव्वळ पगारी मास्तर. -टिव्या. वेतनी- वि. १ वेतन ठरवून कांहीं कामास लावलेला (गाडी, मजूर, पुराणिक, आश्रित इ॰). 'मृत्यु न म्हणे वेतनी । वेतन धर्ता ।' -दा ३.९. १३. २ कांहीं कामाबद्दल एखाद्याला रोख पैसे किंवा पगार न देतां त्याच्या मोबदला बक्षीस दिलेला (गांव, हक्क, अधिकार इ॰). वतन पहा. ३ वेतनासंबंधाचा (तंटा, हिशेब इ॰). ४ भाडोत्री; पगारी.

दाते शब्दकोश

वग

स्त्री. १ कृपादृष्टि; मेहेरबानी; आश्रय (मोठ्या लोकांचा). २ ओळखदेख; स्नेदभाव; शरीरसंबंध; वळण (अगत्यवाद पडण्या- जोगें). ३ वशिला; शिफारस. ४ प्रतिष्ठा; पत. 'जगजीवनाची बहीण खांसा सुंद्राबाई दमाजीच्या भावास (दिली) आहे. तिकडे यास वग मोठी आहे.' -ब्रच २४७. [अर. वक्अ] ॰वशिला- वसीलत-पुस्त्री. वग पहा. 'आमचा वग-वशिला पायां- खेरीज नाहीं.' -ख १.१६८. 'परंतु वग-वसीलतीमुळें भिडेनें कागद पत्र करून घेऊन जोरावरीनें वतन खातात' -वाडसनदा १३३.

दाते शब्दकोश

वग-वशिला

(पु.) वग-वसीलत (स्त्री.) पत-मध्यस्थी. “आमचा चग-वशिला पायांखेरीज़ नाही” (खरे १|१७८). “दर्बारीं यांचा बग-बशिला कोणी नाहीं” (खरे ९३२). “परन्तु वग-वसीलतीमुळें भिडेनें कागद-पत्र करून घेऊन जोरावरीनें वतन खारीज” (वाड-सनदा १४३).

फारसी-मराठी शब्दकोश

विच्छिन्न

वि. १ तुटलेलें; विभागित; भाग अलग झालेलें. २ छिन्नभिन्न; पूर्ण मोडलेलें; चुराडा झालेलें; नष्ट. ३ (ल.) मोडलेला; उल्लंघन केलेला; अतिक्रमण केलेला (नियम, विधि, वगैरे). 'ज्या मनुष्यांचे कुलधर्म विच्छिन्न झाले त्यांना हें जनार्दना ! नरकवास निश्चयेकरून घडतो.' -गीर ६१०. ४ बंद पडलेला; स्थगित; लुप्त; खंडित; बाधित; प्रतिबंध, हरकत आलेला (वंशपरंपरेचें वतन, हक्क, व्यवहार, धंदा, स्थिति वगैरे ). 'तुका म्हणे होय दरिद्र विच्छिन्न ।' -तुगा १९७. [सं. वि + च्छिद्] ॰किरण-पु. पृथक्कृतकिरण. (इं.) स्पेक्ट्रम. ॰किरणदर्शक- पु. प्रकाशपृथक्करणयंत्र. (इं.) स्पेक्ट्रॉस्कोप. ॰किरण-पु. पृथक् झालेल्या प्रकाशाचा पट्टा. (इं.) स्पेक्ट्रम.

दाते शब्दकोश

वळ

पु. १ दोरी, सूत इ॰ स असणारा पीळ. २ (बुरूड- काम) टोपलीच्या तोंडाला तीन कामट्यांचा देतात तो गोठ. ३ वळवळ; तळमळ; अतिशय उत्कंठा. [सं. वल्; म. वळणें] वळई-स्त्री. १ भूस इ॰ ठेवण्यासाठीं करतात ती वाटोळी, भोंवतालून बंद केलेली जागा. २ भूस इ॰ ची वाटोळी, भोंवतालून कडब्याच्या पेंढ्या लावलेली रास. ३ कडबा, गवत, कणसें न खुड- लेली ताटें इ॰ ची रास, गंज, गंजी. 'तृणाचे वळई माजी देखा । कैशी उगी राहे दीपकलिका । ' -रावि १५.११८. ४ वळी; वळकटी. [सं. वलय, वलयित; प्रा. वलइय] वळकटी-कुटी- कोटी-स्त्री. १ गुंडाळी (कागद, कपडा, इ॰ ची); गुंडाळलेली वस्तु. २ घडी; दुमड; मोड; सुरकुती. ॰कुटी-सुरकुटी-स्त्री. वळकची अर्थ २ पहा. (अव. प्रयोग) वळकुट्या सुरकुट्या. ॰खर- वि. पीळ घातलेली; पीळदार (दोरी, सूत इ॰). ॰वट-न. १ खिरीसाठीं पिठाचा वळून केलेला बोटवा, शेवया इ॰ पदार्थ. 'वळ- वटाची नवलपरी । एक पोकळें अभ्यंतरीं । एकें वर्तुळें साजिरीं । सुमनाकारीं पै एक । ' -एरुस्व १४.१११; -मुवन ११.१२४. २ दळणवळण; घरोबा; परस्पर व्यवहार. ॰वटी-वंटी-स्त्री. गुंडाळी; वळकटी पहा. ॰वळ-ळा-ळी-स्त्रीपु. १ साप, किडा इ॰ च्या अंगास मोडी पडत असें त्याचें चलनवलन. २ (ल.) एका कुशीवरून दुसऱ्या कुशीस वळावें, लोळावें इ॰ चळवळ. ३ चुट- पुट; अस्वस्थ करणारी उत्कंठा; तळमळ. (क्रि॰ करणें; येणें). 'मार्थ पाहे घरिंची राटावळी । करी भोजनाची वळवळी ।' -ख्रिपु २.३६.१६. ४ चडफड; धुसफुस. ५ कंड; खाज (गळूं, इ॰ ची). (क्रि॰ सुटणें; येणें). ६ हालचाल; तंटा; कुरापत. 'फिरंगी वळवळ करतां राहत नाहींत.' -पया १२२. ७ चप- ळाई; एकसारखें चलनवलन. ८ (कु) रग. (क्रि॰ जिरणें; जिरविणें). ॰वळ-ळां-क्रिवि. १ नागमोडीनें; किड्याप्रमाणें वळवळ करून. २ गडगडत; लोटांगणें घालीत; चक्करें खात (जाणें). ३ भरभर; घाईघाईनें; तोंडाला येईल तसें; अचावचा (बोलणें, खाणें, लिहिणें). ॰वळणें-१ नागमोडीप्रमाणें अंगविक्षेप करणें; आळेपिळे देणें. २ वेदनांनीं तडफडणें; तळ- मळणें; विवळणें. ३ अस्वस्थ असणें (दुःख, उत्कंठा इ॰ मुळें). अत्युत्सुक होणें. ॰वळाट-पु. अतिशय वळवळ; चुळबुळ; अस्वस्थता. ॰वळ्या-वि. १ गडबड्या; धांदऱ्या. २ अस्वस्थ; बेचैन असणारा. ॰शेण-शेणी-शिणी-नस्त्री. गोंवरी (थाप- लेली). याच्या उलट रानशेण-णी. वळापिळा-पु. आळा- पिळा; अंगविक्षेप (पिशाचसंचारादि कारणामुळे होणारा). [वळणें + पिळणें] ॰वळावळ-स्त्री. उत्कंठा; चुळबुळ; अस्वस्थता. वळावळी-क्रिवि. तडकाफडकीं; त्वरेनें. -शर.

दाते शब्दकोश

वर्‍हाडपांडे

पु. वर्‍हाडांतील एक देशपांड्याप्रमाणें वतनदार वर्ग. हा प्राचीन असून यास वतन इनामे नाहींत. कामें करतात तीं रोखीच्या मोबदल्यांत करतात.' -के ३.१०. १९४२.

दाते शब्दकोश

वरसल

स्त्री. वतन इ॰ चा उपभोग घेण्याची पाळी. वर्षल पहा.

दाते शब्दकोश

वतनदार

(फा) सा० वतन असलेला.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

वतनदार c A holder of a वतन.

वझे शब्दकोश

वतनदार vatanadāra c ( P) A holder of a वतन.

मोल्सवर्थ शब्दकोश

वतनदारी

वतनदारी vatanadārī f ( P) also वतनदारकी f The holding of a वतन.

मोल्सवर्थ शब्दकोश

वतनदारी f The holding of a वतन.

वझे शब्दकोश

वतनगाडलें

वतनगाडलें vatanagāḍalēṃ n (For गाडलेलें वतन) A buried patrimony or estate; i. e. an ancient property, or a long-standing possession in a family. Ex. माझी वंशपरंपरा ह्या जागेवर नांदून व0 आहे तें मी सोडणार नाहीं.

मोल्सवर्थ शब्दकोश

वतनी

वतनी vatanī a ( P) Obtained by inheritance or purchase; held in one's own right--land, tenement, estate. 2 Relating to वतन--a document, a deed.

मोल्सवर्थ शब्दकोश

जिथें वतन आहे अगर जन्म झाला ते.

फारसी-मराठी शब्दकोश

वतनपत्र

वतनपत्र vatanapatra n The titledeed of a वतन, the muniment or miniment.

मोल्सवर्थ शब्दकोश

वतनपत्र n The title-deed of a वतन, the muniment.

वझे शब्दकोश

वतनवाडी

वतनवाडी vatanavāḍī f (वतन & वाडी) Patrimonial lands and tenements comprehensively; estate and suchlike. Ex. व0 पाहून मुलगी देणें तर द्यावी.

मोल्सवर्थ शब्दकोश

येऊनजाऊन

येऊनजाऊन yēūnajāūna ad (येणें & जाणें To come and to go.) As an occasional comer and goer; not abidingly or permanently; occasionally. Ex. मी एथें नेहमी राहणार नाहीं ये0 असेन. 2 At the last; at the utmost or furthermost; after all; as the extreme or ultimate act, measure, means. Ex. वरकड सारी दौलत संपली आतां ये0 वतन राहिलें. 3 Constantly or continually; as ये0 हाच धंदा.

मोल्सवर्थ शब्दकोश

क्रिवि. १ प्रसंगानें; कायमचें नव्हे; मधून मधून यावें जावें अशा प्रकारें. 'मी येथें नेहमीं राहणार नाहीं, येऊन जाऊन असेल. ' २ सरतेशेवटीं; बाकी; शेवटचें कृत्य. उपाय साधन म्हणून. 'वरकड सारी दौलत संपली आतां येऊनजाऊन वतन राहिलें. ' ३ फार तर. ' तूं येऊनजाउन मारशील, आणखी काय करणार आहेस?' ४ नेहमी; सतत. 'येऊनजाऊन हाच धंदा. ' [येणें + जाणें]

दाते शब्दकोश

वर्ष

न. १ संवत्सर; बारा महिन्यांचा काळ; साल. २ सांवत्सरिक श्राद्ध; वर्षश्राद्ध. 'सारी वर्षे प्रयागीं प्रभु पदनिरतां त्यांसि भेटोनि तारी ।' -मो रामायणें २१. [सं.; तुल॰ फ्रेंजि. वेर्स] ॰गणना-स्त्री. वर्ष मोजण्याची पद्धत. याच्या सौर व चांद्र अशा दोन गणना आहेत. ॰गांठ-स्त्री. वाढदिवस. (पूर्वीं दरसाल जन्मदिवशीं दोरीला एकेक गांठ देऊन त्या गांठींवरून वय मोज- ण्याची चाल असे). ॰धात-स्त्री. वर्षाचें सामर्थ्य; वर्षफल (मानवी व्यवहारावर परिणाम करणारें). (क्रि॰ जपणें; सांभा- ळणें). [वर्ष + धातु = वीर्य] ॰प्रतिपदा-स्त्री. चैत्र शुद्ध १; गुढीपाडवा. ॰फल-न. ज्योतिषाच्या आधारें नव्या वर्षांत घड- णाऱ्या गोष्टींचें केलेलें भविष्य (पाडव्याच्या दिवशीं हें वाच- तात); वर्षभविष्य. ॰वीण-वि. वर्षाला विणारी (गाय, म्हैस). ॰वृद्धि-स्त्री. एकाच राशींत गुरु राहतो तें वर्ष. ॰सण-पु. लग्नाला वर्षं पूर्ण होतें त्या प्रसंगीं जांवयास दिलेली मेजवानी, अहेर इ॰. वर्षल-स्त्री. वतन इ॰ उपभोगण्याच्या पाळीचें वर्ष; उत्पन्नाचें वर्ष. -पु. वर्षाचा वतनदार, पाळीदार. वर्षाचा दिवस-सण-पु. १ वर्ष श्राद्धांचा दिवस. २ वाढदिवस. ३ सणाचा दिवस. (तो दिवस वर्षांतून एकदांच येतो म्हणून). 'वर्षाचा हा सण । करावा गोड सख्या आपण ।' -प्रला. वर्षादिसाचा दिवस-पु. वर्षाचा दिवस अर्थ १, २ पहा. वर्षानकाळ-वर्ष-क्रिवि. १ प्रतिवर्षीं. २ अनेक वर्षें (टिकणें, इ॰). 'नवऱ्याला सोडून बायकांनीं वर्षानवर्ष माहेरीं राहणें म्हणजे वनवासच होय.' -सवतीमत्सर ९४. [वर्ष आणि (अन्) वर्ष] वर्षायु-वि. (खा.) एक वर्ष टिकणारा. कापसाची एक जात. वर्षास(श)न-न. वार्षिक नेमणूक; उदरनिर्वाहासाठीं ब्राह्मण इ॰कास प्रतिवर्षीं नियमानें धन, धान्यं इ॰ देतात तें (याबद्दल चाकरी करावी लागत नाहीं). २ दरवर्षीं करावयाची गोष्ट, देण्याचे द्रव्य इ॰ 'तंव इंद्राचें वर्षासन । प्रतिवर्षी करावें हवन ।' -कथा ४.५.९३. वर्षासनदार-पु. वर्षासन असणारा माणूस; नेमणूक- दार. वर्षिल-पु. पालटवाटा. -आडिवऱ्याची महाकाली (प्रस्ता- वना) ११. वर्षल पहा. वर्षिलदार-वि. वर्षाच्या पाळीचा हक्कदार. वर्षोगणति-स्त्री. वर्षांत, वर्षांनीं मोजणें. -क्रिवि. वर्षांनीं (मोजणें इ॰). ॰वर्षोवर्ष-क्रिवि. १ कित्येक वर्षें; वर्षें पर्यंत. २ दरसाल. वर्सल-स्त्री. वर्षल पहा.

दाते शब्दकोश

हक्क

पुन. १ अधिकार; मालकी; वारसा. २ देशमुख, देशपांडे, महाजन इ॰ पिढीजाद महाल-गांव-अधिकार्‍यांचा गाववसुलींतला किंवा पिकाचा वांटा, हिस्सा; वर्षासन. 'आम्ही मोहिब्बाचे हक्कामध्यें हमेशाचे दर्गामध्यें शुक्रगुजारी करीत असतो.' -ब्रच ५.२४०. ३ (ल.) धंदा; उद्योग; काम. 'झाडावर चढणें हा वानराचा हक्क आहे.' ४ पगार; प्राप्तव्य. 'ज्याजती होईल तितकी किंमत करून त्याच्या हक्कांत धरावी.' -सभासद २३. ५ नेमणूक. 'पाटील कुळकर्णीं यांसी हक्क बांधून दिला.' -सभासद २५. ६ सत्य. [अर. हक्क्] ॰करणें-देहांतशिक्षा करणें. -मदरु १.१६. ॰होणें-मरणें. हक्का-(का)टक्कां(कां)त येणें, हक्काटकास येणें-१ तावडींत, सपाट्यांच सांपडणें; आटो- क्यांत येणें; हातांत-अवसानांत-टप्प्यांत-कक्षेंत-आवांक्यांत- अधिकारांत येणें २ मर्जीस येणें; संमत होणें. ३ आंकड्यांत, हिशेबांत बसणें. हक्काटक्यांत जाणें-गुजरणें-उरकणें- अटपणें-आटोपणें-मरणें-भर तारुण्यांत, ऐन उमेदींत मरणें, नष्ट होणें. ॰अदाव-पु. १ हक्क रुसूम पहा. २ (सामान्यतः) हक्क. ॰जवारी-स्त्री. हक्कदारपणा. -शर. ॰टक-टाक-पु. १ देशमुख इ॰. पिढीजाद गांवकामगारांना रोख द्यावयाचे पैसे. २ (सामान्यतः) हक्क. ॰ताला-उच्च ईश्वर. हकताला पहा. ॰दस्तुरी-स्त्री. १ हक्क आणि वहिवाट; हक्क आणि ठरलेली बलुतीं, वतन. २ (सामान्यतः) हक्क. ॰दार-वि. १ वार्षिक वसुलाचा किंवा पिकाचा अंशतः मालक. २ वारस; वांटेकरी. [फा] ॰दारी-स्त्री. १ हक्कदाराचा भाग, वांटा. २ हक्क धारण करणें; हक्क. ॰माल-पु. सत्तेचा माल; हक्काचें स्वामित्व; आपला योग्य हक्क आहे असा माल. 'हा पदार्थ माझा हक्कमाल आहे, माझा मला द्यावा.' 'बक्षीस कांहीं देणार होतां तें न द्याल तर न द्या पण चाकरीचा पैसा तो तर माझा हक्कमाल आहे.' हक्क- नहक्क, हकनाहक-क्रिवि. १ बरोबर असो कीं नसो; न्यायानें किंवा अन्यायानें; सकारण किंवा अकारण; कशाहि रीतीनें अविचारानें. २ नाहक पहा. [फा. हक्-ना-हक्] ॰रसूम- रुसूम-लाजिमापुअव. १ देशपांडे इ॰ पिढीजात अधिका- र्‍यांचे हक्क आणि विशेष अधिकार; वतनदारी हक्क वगैरे. २ हक्क व भोगवटा; विशेषाधिकार; कायदेशीर हक्क व प्रस्थापित मालकी. ॰हराम-हरामाचा-वि. वाजवी व न्याय; बरोबर कायदे- शीर. 'हक्क हरामाचा पैसा-अधिकार-वृत्ति-मिळकत.' (हराम शब्दाचा गैर कायदा असा मूळ अर्थ वाईट असतां मराठींत या वाक्प्रचाराला सोवळेंपणा आलेला आहे). हक्काहरामाचा पहा. ॰हलाल-हलालाचा-वि. वाजवी; न्याय्य; कायदेशीर. [अर-हलाल् = कायदेशीर] ॰हवाल-पु. सुस्थिति; भरभराट; (पीक, बाजारभाव, पाऊस, व्यक्ति इ॰ ची). ॰हिशेब-शोब- पु. हक्क आणि येणें; बरोबर, खरा हिशेब-हिशेबी येणें. हक्काचे दाणे-खळें झाल्यावर मळण मातेरें व चांगले दाणें कांहीं महारास सोडावे लागतात तो हक्क. हक्का हिशेबाचा-वि. निर्विवाद हक्काचा, मालकीचा. हक्का हरामाचा-वि. १ न्याय्यान्याय्य रीतीनें मिळविलेला; भल्याबुर्‍या मार्गानें केलेला (पैसा). २ अन्याय्य; अप्रामाणिक; लबाडीचा (धंदा, काम, पैका इ॰.)

दाते शब्दकोश

वड

पु. एक झाड; वट. हें झाड फार पवित्र मानिलें जातें व औषधीही आहे. याच्या स्त्री. व पुरुष अशा दोन जाती आहेत. [सं. वट; प्रा. वड] ॰पिकणें-(ल.) अनेकांना नोकरी व उपजीविकेचें साधन निघणें, तयार होणें. म्ह॰ वड पिकला आणि कावळ्याला मुखरोख झाला, किंवा वडास आलीं वडफळें काव- ळ्यास आलें रूं (रोग) = चांगले दिवस आले असतां उपभोगाचें सामर्थ्य जाणें. वडाची लाल पिंपळाला लावणें-१ खऱ्याचें खोटें व खोट्याचें खरें करणें. २ नसतां संबंध जोडणें; भलत्या गोष्टीचा संबंध प्रस्तुताशीं लावणें. ३ वळणें; कपटानें फिरणें, बदलणें. ॰काळिका-स्त्री. वडवागूळ. 'कीं दिनउदयीं शाखेवर । वड- काळिका झोंबती ।' -नव १२.१८४. [सं. वट + कालिका] ॰जखीण-स्त्री. वडाच्या झाडावरील स्त्री. पिशाच; हडळ; ॰जाई-स्त्री. एक क्षुद्र देवता. -खेया. ॰पिंपळ-(वडापिंपळास फळें धरत नसल्यानें निरुपयोगी यावरून) ब्रह्मचारी; फटिंग (निंदार्थी उपयोग). ॰पुनव-स्त्री. वटपौर्णिमा पहा. ज्येष्ठांतील पौर्णिमा. ॰रुख-पु. वडाचें झाड. 'तया वडरुखाखालि येजुतातु देखिला ।' -पंच २.१. ॰वत-न. (प्र.) वटव्रत पहा. ॰वतें-न. अव. नूतन विवाहित स्त्रिया वडपुनवेचे दिवशीं वाणें वाटण्याला जो समारंभ करतात तो. ॰वाघू(घू)ळ-न. एक पक्षी; वागळ, वागूळ पहा. ॰सावित्री-स्त्री. वटसावित्री पहा. वडांगळें-न. वडाचें फळ. वडाची पुनव-पूर्णिमा-स्त्री. ज्येष्ठी पौर्णिमा; या दिवशी सुवा- सिनी वडाची पूजा करतात. वडावरची जखीण-स्त्री. १ रागानें, तिरस्कारानें अज्ञान व्यक्तीबद्दल वापरतात. २ वडजखीण पहा.

दाते शब्दकोश

मंडल-ळ

न. १ वर्तुळ; वलय; घेर; परिघ; चक्र. २ चंद्र, सूर्य इ॰चें बिंब. 'प/?/मंडळ आणि चंद्रमा । दोनी नव्हती सुवर्मा ।' -ज्ञा १४.४०५. ३ प्रांत; क्षेत्र; वीस किंवा चाळीस योजना- पर्यंतचा आसमंतांतील प्रदेश; भोंवतालचा प्रांत. ४ बारा चक्र- वर्ती राजांनी ज्या प्रांतावर राज्य केलें तो प्रांत, राष्ट्र. ५ (यावरून) प्रांत; देश; राज्य. जसें-कुरुमंडल. ६ समुदाय; समूह; सभा; समाज; टोळी. ७ वर्तुळाकार ठिपके असलेले कोड. ८ देवतेची स्थापना करण्यासाठीं काढलेली एक गूढ वर्तुळाकार आकृति. व्रतोद्यापनप्रसंगीं देवतांची स्थापना करण्यासाठीं विशिष्ट रंगानें रंगविलेलीं सर्वतोभद्र, लिंगतोभद्र इं॰मडळें प्रत्येकीं. ९ एक निरुपद्रवी सर्प. १० देवास नैवद्य दाखवितांना पात्राखालीं पाण्याची (चौकोनी, वर्तुळाकार, त्रिकोणी इ॰) काढलेली आकृति. ११ सैन्याची वर्तुळाकार रचना. १२ चुन्याच्या घाणीची वर्तु- ळाकार चाकोरी. १३ बेचाळीस दिवसांचा काल. 'त्यासि एक मंडळ सांग । पठणें करूनि कार्यसिद्धी ।' -व्यं ९४. १४ (समा- सांत) शरीराचा तो तो भाग. जसें-मस्तक-कुच-कर्ण-मंडल. 'तेआं नाभिमंडळा आगाधा । समवेत ब्रह्में पेलिलें दोंदा ।' -ऋ ९०. १५ (कु.) समुद्राच्या तळाशीं असलेले खडक. १६ राज- मंडल. [सं. मंडल] ॰फिरणे-वर्तुळाकार, गोल फिरणें. मंडळावर धरणें-मंडलाकार, वाटोळें फिरविणें (घोडा इ. स.). ॰गति (बाहु)-पु. (नृत्य.) बाहू वर्तुळाकार फिरविणें. ॰देवतास्त्री. अव. १ एखाद्या व्रताच्या आरंभी सर्वतोभद्र, लिंगतोभद्र इत्यादि मंडलांवर पूजिल्या जाणाऱ्या देवता. २ (ल.) राजाच्या बरोबरचे सरदार, प्रधान. ३ राजसभा; दरबार. ४ कोणत्याहि सरदाराचा, थोरमाणसाचा लवाजमा. ॰वत्-क्रिवि. वर्तुळाप्रमाणें; वाटोळा; चक्राकार. ॰वत-न. अनेक पानें चोयांनीं टोंचून जेवणासाठीं केलेलें जेवणाचें पान; पत्रावळ. [मंडळ + पत्र] ॰स्वस्तिक (करण)-न. (नृत्य) ऐंद्र स्थानांत उभें राहणें व हातांचे स्वस्तिक करणें व आपल्या समोर बसलेल्या मनुष्याला अभिमुख दिसतील असे तळहात वर ठेवणें. मंडली-ळी-स्त्री. १ मनुष्यांचा जमाव, समुदाय, संघ. २ (कायदा) एकमेकांशीं भागी- दारी असणाऱ्या माणसांचा समुदाय, मंडळ (इं.) फर्म. ३ स्पर्श केल्याबरोबर वेटोळें करून बसणारा अनेक पायांचा एक किडा, वाणी. ४(ख्रि.) सार्वत्रिक मंडळी; पिता, पुत्र व पवित्र आत्मा असा जो सनातन एकच देव त्याजवर भाव ठेवून स्वतःस ख्रिस्ती म्हण- विणाऱ्या पृथ्वीवरील सर्व लोकांचा संघ. (इं.) एक्लेशिया. 'आणखी मी तुला सांगतों कीं, तूं पेत्र (खडक) आणि या खडकावर मीं. आपली मंडळी रचीन.' -मत्त १६.१८. ४ (ख्रि.) स्थानिक मंडळी; ईश्वरोपासना, शुद्धाचरण व खिस्ताच्या राज्याचा विस्तार हे हेतू पुढें ठेवून विधिपूर्वक स्थापित झालेला व सार्वजनिक उपा- सनेसाठीं नियमितपणें एकत्र जमत असलेला खिस्ती लोकांचा संघ. (इं.) काँग्रिगेशन. ५ (गहूं, बाजरी, भात इ॰) पिकाच्या पेंढ्यांची वर्तुळाकार गंजी. ६ पति किंवा पत्नी परस्परांविषयीं बोलतांना योजितात. मंडली(ळी) क-पु. १ मंडळ, थवा, पथक इ॰ चा नायक. २ मांडलिक. 'उखरडा धाधाविलें । मंड- ळीकु निघालें ।' -शिशु ५०४. मंडलेश्वर-पु. १ सार्वभौम राजा. २ मांडलिक राजा. [मंडल + ईश्वर]

दाते शब्दकोश

हत्ती

हत्ती hattī m (हस्ती S) An elephant. Pr. हत्तीबरोबर बैलाचें वारगोळें. 2 The thirteenth nakshatra or lunar mansion. Note. This asterism is properly named हस्त, being designated by a hand, not by an elephant. It is by popular understanding, howsoever extensive or established, or howsoever inclusive of the erudite or educated, that it is named हत्ती, and that it acquires references and associations as outpouring heavy rain. Pr. पडेल हत्ती तर पाडील भिंती. Pr. हत्तीला अंकुश केवढा असतो How huge the elephant, how little the goad! How small a rudder rules a ship! दारांत हत्ती झुलणें (The wagging of an elephant at the door of.) A phrase significant of wealth or prosperity. हत्ती गेला आणि शेपटाशीं अटकला Applied to any great undertaking or matter successfully conducted to the last stage and there stopped or ruined. Applied also to the ready swallowing of the camel but giving up before the gnat. हत्ती चालतो आणि कुत्रे भोंकतात The elephant marches on, and heeds not the barking curs. हत्तीचें उथाण or न The sultriness which characterizes the prevalence of the हत्ती-नक्षत्र (i. e. हस्तनक्षत्र). हत्तीच्या अहारामध्यें लाखों मुंग्यांचा अहार चालतो Myriads of the little folk find their subsistence in the table-establishment of one grandee. हत्तीच्या गंडस्थळीं बसणें To sit in or to be exalted into high honor and dignity. हत्तीच्या दांतांसारखे दांत असणें (To have teeth to eat with and teeth to display.) To be a dissembler or doubledealer. हत्तीच्या पायांत or पावलांत सगळ्यांचे पाय or सगळ्यांचीं पावलें All subordinates are included in the chief; or all minors are disposed of in the disposing of the principal. हत्तीवर बसणें To be drunk or boozy. हत्तीशीं टक्कर घेऊं नये Strive not with the mighty. हत्तीस ओढाळ कोण म्हणेल Who dares to notice the exactions or encroachments of the great? हत्तीसा- रखें वतन A gigantic (extensive) estate. हत्ती होऊन लांकडे खाणें मुंगी होऊन साखर खाणें Be lofty and proud, and thou shalt eat sticks (--the elephant eats kaṛbá); be lowly and humble, and thou shalt eat sugar.

मोल्सवर्थ शब्दकोश

पु. १ सोंड असलेलें एक प्रचंड जनावर; गज; कुंजर; वारण. २ नक्षत्रमालेंतील १३ वें नक्षत्र; हस्त. म्ह॰ पडेल हत्ती तर पाडील भिंती. ३ (जरतार) तूर ज्यांत फिरते तो खांब. ४ बुद्धिबळांतील एक मोहरें. [सं. हस्तिन्; प्रा. हत्थि] म्ह॰ १ हत्तीला अंकुश केवढा असतो ! (मोठ्याला लहानहि भारी होतो). २ हत्ती गेला व शेंपटाशीं अडकला-एखादें प्रचंड काम अखेरपर्यंत सुरळीत होऊन शेवटीं मात्र नासणें. ३ हत्ती चालतो आणि कुत्रे भोंकतात-श्रेष्ठांचा मत्सर करणारे लोक असतात पण त्यांचें कांहीं चालत नाहीं. ४ हत्तीबरोबर बैलाचें वारगोळें. दारांत झुलणें-अत्यंत श्रीमंती असणें. (वाप्र.) हत्तीचा अंकुश-पु. (ल.) चोपून काम करून घेणारा. हत्तीचा पाय-पु. १ (ल.) ज्याच्या औदार्यानें, श्रीमतीनें पुष्कळ लोकांचा संसार सुखानें चालतो अशी व्यक्ती, काम, धंदा, नोकरी, इस्टेट इ॰. २ एक खेळ. ॰दांत-पुन. हत्तीचा दांत; हस्तीदंत. ॰दांती-वि. हस्तिदंती (काम, वस्तु इ॰). ॰पाव- न. पांढरें रेशीम. ॰बार-पु. हस्तनक्षत्राच्या पावसानें येणारें पीक. दुसरीं दोन पीकें-मगवार, आंबेबार. ॰भोग-पु. एक प्रकारचा जाड तांदूळ. ॰महाल-पु. हत्तीखाना. ॰सोंड-पु. एक मुलांचा खेळ. हत्तीण-स्त्री. हत्तीची मादी. हत्तीचें उथाण-न. हस्तनक्षत्राच्या वेळचा अतिशय उकाडा. हत्तींच्या आहारांत लाखो मुंग्यांचा आहार चालणें-थोरांच्या खर्चांत अनेक गरीबांचा आपोआप समावेश होणें. हत्तीच्या गंडस्थळीं बसणें-थोर वैभवास चढणें. हत्तीच्या दांतासारखे दांत असणें-दुटप्पी वर्तन असणें. (हत्तीच्या खायचे दांत व दाखवाव- याचे दांत निराळे असतात यावरून). हत्तीच्या पायांत- पावलांत-सगळ्यांचे पाय-पावलें-मुख्य व्यक्तींत हाताखालील सर्व व्यक्तींचा समावेश आपोआप होतो. हत्तीवर बसणें-मदांध होणें; दारूनें मत्त होणें. हत्तीशीं टक्कर घेऊं नये-बलिष्ठाशीं वैर करूं नये. हत्तीस ओंढाळ कोण म्हणेल ? -थोरांचें बिंग बाहेर कोण फोडील ? हत्तीसारखें वतन- अलोट संपत्ति; वैभव. हत्ती होऊन लांकडें खाणें, मुंगी होऊन साखर खाणें-मोठे (गर्विष्ठ) पणानें आपदा येतात तर नम्रतेनें सुख लाभतें. हत्तीचें मढें-प्रेत-१ अवाढव्य, बोजड, न पेलणारें प्रकरण, काम. २ फार कंटाळवाणें, त्रासदायक काम. (क्रि॰ पुराणें; उचलणें). 'मला हत्तीचे मढें पुरवयाचें आहे.' हत्तीच्या पायानें जाणें-फार सावकाश जाणें (रोग, इ॰) ॰खाना-पु. हत्ती ठेवण्याची जागा; पीलाखाना.

दाते शब्दकोश

वृत्त

न. १ भकित. 'घघरोरीं बोलवी वृत्तें ।' -विपू ७.४७. २ आचरण; वर्तन; पद्धत; वहिवाट; शिरस्ता. 'शील त्याचें अत्युच्चरम्य वृत्त । -टिक ६९. ३ उद्योग, धंदा; निर्वाहाचें साधन म्हणून व्यवसाय; वृत्ति पहा. ४ बातमी; वार्ता; हकीकत; माहिती. सांग तें वृत्त तुझ्या जननीला ।' -आकृचरित्र १८. ५ छंद; कवितेच्या प्रत्येक चरणांत किती अक्षरें असावींत याचें मापन. ६ वर्तुल; मंडळ; गोलाला कोठेंहि सरळ पातळीनें कापिलें असतां होणारा वर्तुळाकार. ७ गोल पदार्थ; गोळा. -वि. वर्तुलाकार; वाटोळें; मंडलाकार. [सं.] ॰खंड-न. (गणित) वर्तुळाचा अर्धा भाग; वृत्तांश; (इं.) सेक्टर. ॰चिति-वर्तुळस्तंभ; नळ, पंचपात्र यासारखा आकार. (इं.) सिलिंडर. ॰पत्र-न. १ वर्तमानपत्र; जाहीर बातमी, खबर किंवा तत्संबंधी कांही मतप्रदर्शन, टीका, जाहिराती इ॰ ज्यांत असतात तें पत्र. ॰पाली-स्त्री. परीघ (वर्तु- ळाचा). [सं.] ॰मध्य-पु. वर्तुळाचा मध्यबिंदु; केंद्र. [सं.] वृत्तांश-पु. (भूमिति) वृत्तखंड पहा. [सं.] वृत्तांत-पु. वृत्त; बातमी; वार्ता; माहिती; हकीकत. [सं.] वृत्ति-स्त्री. १ आचरण; वृत्त; शिरस्ता; वहिवाट. २ रीत; ओळ; पद्धत; वर्तनक्रम; निर्वाहक्रम. 'हरिनीं श्ववृत्ति वरिली ।' -मोविराट १.१००. ३ धंदा; पेशा; निर्वाहाचा उद्योग; चरितार्थाचें साधन. -ज्ञा १८.८२०. 'सांचविले वृत्ति करुनि पक्कापक्की उंदुंवरीं बदरी ।' -मोकृष्ण ८७.६६. 'सुज्ञ प्रभु तूं यांतें दंडाया, वृत्ति द्यावया स्वामी ।' -मोसभा ३.७४. 'गुरुचे शेती न चढे वारी । प्राणत्यजीन निर्धारी । गुरुचें वृत्तिनिमित्त ।' -गुच १६.५४. ४ आवृत्ति; नेहमीं उपयोग, वापर (विशिष्ट अर्थानें एखादा शब्द किंवा वाक्प्रचार याचा). ५ मनाची स्थिति, भावना (राग, करुणा, भीति, काळजी इ॰ ची); मनोव्यापार. 'रडत रडत मूर्छेमाजि वृत्ती बुडाल्या ।' -वामन, भामाविलास (नवनीत पृ. ९९). -ज्ञा ९.२५२. -एभा ७.२८४. (समासांत) उदास-औदार्य- खिन्न-तामस-प्रसन्न-म्लान-शांत-शोक-संतोष-सौम्य-हर्ष-हास्य-वृत्ति. ६ (साहित्य) काव्य-नाट्यप्रबंध रचनेचे चार प्रकार-कौशिकी, भारती, सात्वकी व आरमटी प्रत्येकीं. ७ टीका; विवरण; स्पष्टीकरण. टीका पहा. ८ वर्तुळ किंवा वर्तुळाचा परीघ; वृत्त पहा. ९ स्फूर्ति; स्फुरण. मनको. १० वाचकता, व्यंजकता, लक्षणा इ॰ अर्थबोधाचे प्रकार प्रत्येकीं. ११ शेत; इनाम जमीन; वतन; सालीना मिळणारी रक्कम. वृत्ति राजाला काढून घेतां येत नाहीं किंवा बक्षिसहि देतां येत नाहीं. -भाद्विसंवृ. 'अनादि जे प्रकृती । सांख्य जियेतें गाती । क्षेत्र हे वृत्ती । तियेची जाणा ।' -ज्ञा १३.३५. 'नव्हे मठपति । नाहीं चाहुरांची वृत्ति ।' -तुगा १८१६. 'होता वृत्ति राखीत ।' -गुच १९.४. १२ स्वभाव; धर्म. [सं.] ॰क-पु. वतनदार. 'अगा मानस हें एक । माझ्या स्वरूपीं वृत्तिक ।' -ज्ञा १२.९७. ॰च्छेद-च्छेचन-पु. न. वंशपरंपरागत असलेल्या निर्वाहसाधनाचा नाश; वतनजप्ती; वंशपरंपरागत हक्क काढून घेणें. [सं.] ॰पत्र-न. ज्यावर किंवा ज्यामुळें वृत्ति नेमून दिली जातें तें पत्र; आज्ञा-वतनपत्र. ॰पंथ-पु. वृत्तीचा, व्यापा- राचा मार्ग. 'ते भेदली वृत्तिपंथे । वायुशक्ति गा एथें । कर्मकारण चौथें । ऐसें जाण ।' -ज्ञा १८.३४३. ॰शास्त्र-न. व्यापार, धंदा इ॰ चा विचार-चर्चा करणारें शास्त्र; अर्थशास्त्र. (इं.) एकॉनॉ- मिक्स. -मसाप २.३.१०३. ॰शून्य-वृत्तिरहित. 'शून्य सांडोनि निरवकाश । तेंचि कृष्णहृदय सावकाश । संती केला रहिवास । वृत्तिशून्य होउनी ।' -एरुस्व १.३८. ॰स्थिति-स्त्री. समस्थिति; दोन्हीं बाजूस वजन व तोल सारखें राहतील अशी स्थिति. (इं.) ईक्विलिब्रियम. 'पक्ष्यांची आकृतीहि त्यांच्या वृत्तिस्थितीस फार सुंदर रीतीनें जमतें.' -मराठी ६ वें पुस्तक (१८७५). ५. ॰मंत-मान-वंत-वि. १ उपजींविकासाधन जी जोशीपणा इ॰ नियम वृत्ति ती ज्यास आहे तो; वतनदार. २ स्थिर; स्थायिक. वृत्तीचा विचका-पु. १ एखाद्याच्या निर्वाहाच्या साधनाचा नाश, वृत्ति बुडणें. २ वृत्ति गेलेली स्थिति. वृत्यंश-पु. संपत्ति, हक्क किंवा निर्वाह साधन यांतील भागी. [सं.] वृत्यंशी, वृत्यांशी-वि. वृत्तींतील वांटेकरी, भगीदार. [सं. वृत्त्यंशी]

दाते शब्दकोश

खोल

वि. ओंड; गंभीर; उथळ अथवा सखल नसलेलें किंवा त्याच्या उलट. २ (ल.) आंतल्या गांठीचा; मख्ख. 'अती खोल तो बोल बोलेल कैचा ।' -दावि १५१. ३ शहाणा; धूर्त; धोरणी; विद्वान. ४ गहन; गूढ; दुर्बोध; उथळ, दिखाऊ नसलेला. 'कारण पाहूं जातां फार खोल आहे असें नाहीं.' -नि ७१. ५ (उतार दाखविणार्‍या शब्दाबरोबर योजना) उभा; सुळाचा. ६ कठिण; दुर्लभ. 'वेंचितां फुकाचे बोल । केवढें खोल अभागीयां ।' -तुगा ७०१. [दे. प्रा. खोल्ल; तुल॰ का. कोळ्ळ = लवण, दरा; सं. कुहर] खोलटणें, खोलगटणें-अक्रि. १ खोलगट होणें; खांचखळगे पडणें; दबणें (पावसानें जमीन इ॰). २ खोल जाणें; आंत जाणें; ओढलें जाणें (डोळे, गाल, पोट). ३ आंकडे मोडणें; शेपखळी पडणें; ढुंगणाच्या बाजूस खळ्या पडणें; प्रसूतीचिन्हांनीं युक्त होणें (गाय, म्हैस यानीं विण्याच्या पूर्वीं). खोलणें- उक्रि. १ जास्त खोल करणें (विहीर, खड्डा). २ स्पष्ट करणें; फोड करणें. ३ पुढें चालणें. 'दिहा खोलणें रात्रीं जागोवा ।' -ज्ञा १६.३४०. ॰पाण्यांत शिरणें-(ल.) जास्त तपशिलांत जाणें; बारकाईनें शोध घेणें; एखाद्या व्यवहारांत फार मन घालणें; एखाद्या विचाराच्या दुर्बोध भागाचें ज्ञान करून घेण्याचा प्रयत्न करणें; आपल्या आवांक्या पलीकडे जाणें. खोलवणें-उक्रि. (सोनारी) खोलगट आकार देणें. खोलविणें-उक्रि. खोल करणें; एखाद्या धातूच्या गोळ्याचा पाहिजे तसला खोलवा बन- विणें; भोंक पाडणें. २ खोल बसेल असें लावणें. 'पंचाग्नीची दगडी । खोलवीजती शरीरालागीं ।' -ज्ञा १७.२५५. खोलून खोलून विचारणें-खोदखोदून पुसणें; घोळघोळून पहाणें. सामाशब्द- ॰कट-गट, खोलट-वि. १ किंचित् खोल. २ सखल; दबलेली (जमीन). खोलगा-पु. खळगा; खांच; खड्डा; दबलेला भाग; खळण. खोलणी-ण्या-पु. १ (सोनारी) चांदीच्या पत्र्यास खोलावा आणून भांड्याचा आकार आणण्याचा हातोडा. २ (कासारी) पत्रा खोलण्याचें साधन. ॰बुद्धि-स्त्री. अतिशय शहाणपण; गूढ मसलत, उपाय युक्ति इ॰ -वि. खोल बुद्धीचा पहा. ॰बुद्धीचा-वि. फार शहाणा; अत्यंत मुत्सद्दी, धोरणी, मसलतीचा. जो विषय घेतला त्यांत तरबेज; त्यांतील एकूण एक मख्खी जाणणारा. ॰वट-वाट-वि. १ किंचित् खोल. २ सखल (जमीन); बदखल (जागा; खंदक, खोल चर, घळ). ॰वटा- पु. खोलपणा; खोली. ॰वणा-पु. खोलणी पहा. ॰वत-न. सामता; आरी; गिरमिट. खोलवा-पु. खळगा; दबका; लहान भोंक; आंत दबलेली जागा.

दाते शब्दकोश

पोर

पु. लहान मुलगा; पोरगा. १ -स्त्री. लहान मुलगी; पोरगी. लहान मूल; बच्चा. २ जनावराचें लहान पिल्लूं; पाडस; बछडें. -वि. (गो.) पोरका; अनाथ. [सं. पुत्रक; का. पोर] म्ह॰ पोरा आणि बुद्धि तेरा. ॰कट-वि. पोरासारखें; पोराला शोभणारें. पोरका-वि. १ लहान मुलाचें; मुलाला, शोभणारें; भव्य, गंभीर, प्रौढ इ॰ नव्हें तें (भाषण, वस्त्र इ॰). २ (कों.) आईबापांवांचून असलेला; अनाथ. उदा॰ 'बापपोरका, आई- पोरका.' ॰किडा-पु. धान्य खाणारा एक लहान किडा; टोका; क्षुद्र कीटक. ॰खाद्या-वि. जिचीं मुलें लवकर मरतात अशी (स्त्री). ॰खेळ-पु. १ मुलांचा इटीदांडू इ॰ खेळ. २ पोरासारखें हसणें, उड्या मारणें इ॰ ३ घेणें देणें इ॰ व्यवहारांचें मर्यादा सोडून मनस्वी वर्तन. ४ (ल.) सहज करतां येणारी गोष्ट पोरगा-पु. १ मुलगा; पोर. २ खिजमतगार पोर; पोर्‍या; लहान वयाचा नोकर. ३ स्त्रीवेष घेतलेला नाचणारा पोर. ४ लेकवळा; गुलाम [पुत्रक] पोरगी- स्त्री. मुलगी. पोरगें-न. लहान मूल. ॰गळ-वि. पोरकट पहा. ॰चेष्टा-स्त्री. पोरखेळ अर्थ २ व ३ पहा. मुलाचें नाचणें, बागडणें. ॰जिन्नस-पुस्त्री. (निंदार्थी) लहान मुलगा; पोरसौदा; पोर. पोरटा-टी-टें-पुस्त्रीन. (निंदार्थी किंवा रागानें) पोरगा-गी-गें; कारटा. ॰पिसा-वि. १ पोरांचा अतिशय शोकी; मुलांची फार आवड असणारा. २ अपत्यप्राप्तिसाठीं अतिशय उत्कंठित झालेला. ॰पिसें-न. १ पोरांचा बेसुमार शोक. २ अपत्यप्राप्तिसाठीं बे- सुमार उत्कंठा. ॰बुद्धि-स्त्री. अपक्व बुद्धि. -वि. अपक्वबुद्धीचा. ॰वट-वि. पोरांचा आचारविचारासारखा; पोरकट पहा. [पोर + वत्] ॰वडा-वाडा-वंडा-पु. पोरांचा समुदाय; सुळसुळाट; मुलांचा पुष्कळ भरणा असलेलें कुटुंब; घर, गांव, राज्य इ॰ च्या कारभारामध्यें प्रौढ, अनुभवी मनुष्य नसल्यामुळें होणारी अव्य- वस्था, किंवा अननुभवी लोकांचें प्राधान्य. 'नुस्ता पोरवडा घरीं न कवडा चित्तीं बरा नीवडा ।' -असु ५. [पोर + वाडा = घर] ॰वय-न. लहानपण; लहान वय. 'संसार सुखास अहल्या आंचवली पोरवयांत ।' -विक १६ ॰वाला-वि. १ मुलेंबाळें असलेला (कुटुंबी पुरुष-स्त्री). २ (ल.) लेंकुरवाळें; फांटे फूट- लेलें (हळकुंड). ॰समजूत-स्त्री. लहान मुलाची बुद्धि; अल्प समजूत. ॰सौदा-पु. लहान मुलगा; पोरजिन्नस. 'हा पोरसौदा असून बरा शहाणा आहे.' -वि पोरवय; मुलासारखा. [पोर + फा; सौदा = माल] पोरांडी-डें-स्त्रीन. (उपहासानें) पोर वडा पहा. [पोर + रांड] -वि. पोरें व बायका मात्र आहेत असें. [सं. पुत्ररंड] पोरापोरका-वि. आईबाप आणि मित्र नस- लेला; अनाथ (मुलगा). [पोरका + पोर] पोरापोरीं, पोरा- सोरीं-क्रिवि. १ पोरांमध्यें; पोरांकडून; पोरांनीं. २ एका मुलापासून दुसर्‍या मुलाला अशा रीतीनें वंशपरंपरेनें (वतन, वारसा इ॰ जाणे). पोरीटोरी-स्त्रीअव. (निंदार्थीं) मुली. 'पोरीटोरी गोरी काळी सार्‍या पाहुनि कविराय बाला ।' -राला ५४. पोरेंबाळें-लेकरें- सोरें-नअव. मुलें लेकरें; (व्यापक) मुलेंबाळें. [सं. पुत्रक + सोद- रक] पोरी-वि. (कु.) पोरका; आईबाप नसलेला. पोरोडा- पोरवडा पहा. पोर्या, पोर्‍या-पु. १ पोरगा अर्थ १ ते ३ पहा. २ (कों.) पोरकिडा. ३ (प्र.) पोहरा पहा. ४ बताणा, बच्चा पहा.

दाते शब्दकोश

गाय

स्त्री. १ धेनु. दूध देणारा एक माणसाळलेला चार पायांचा सस्तन प्राणी. २ (ल.) गरीब. ३ स्वभावानें गरीब; सात्विक; अनाथ; दीन माणूस. ४ एका जातीचें काळ्या रंगाचें झुरळ; एक पक्षी. ५ पारी पहा. ६ एक वनस्पति; लहान इंद्रा- वण; कडुंवृदावन. (अव. गायी रूप एव. हि वापरतात). [सं. गो- गाव(म्); प्रा. गावी; झें-गाओ] (वाप्र.) ॰गोवणें-आक्षे- पित, अयोग्य स्थळी मुलगी देणें. ॰चिखलांत अडकणें- अडचणीत, पेंचांत सांपडणें. ॰माय सारखी-दोन्हीहि आपल्या दुधानें पोषण करतात म्हणून. ॰गायवाना करणें-(व.) काकळूत करणें गयावया करणें पहा. 'गया गायवाना करू लागला तेव्हां सोडलें.' ॰होणें-दीन, दुबळा होणें; (दुर्दैवानें, दुखण्यानें) रंजीस येणें. 'उगिच अबोला धरिला । कांही भिउन असावें हरिला । झालें मी गाय ।' -प्रभाकर, पदें. गायीचा खूर तिखट-अनाथाचा वाली ईश्वर. गायीनें माणीक गिळणें- जेथें फार मोठा तोटा सोसल्यावांचून किंवा पाप केल्यावांचून बूड भरून येत नाहीं तेथें योजतात. गायी पाण्यावर आणणें-गाल फुगवून रडणें. गायीवासराची ताडातोड करणें-नातेवाईकांत भेद करणें; त्यांचा संबंध तोडणें (विशेषतः मायलेकरांची ताडातोड). गायीवासराची भेट करणें- जवळचे आप्त, स्नेही, नातेवाईक भेटविणें; त्यांना एकत्र आणणें. गायीसारखां हंबरडा फोडणें-मोठयानें कळवळून आक्रोश करणें (मुलाने). म्ह॰ १ गायीनें गाय फळत नाहीं = एका गरिबाला दुसर्‍या गरिबास मदत करवत नाहीं. २ दुभत्या गाईच्या लाथा गोड = लाभसाठी माणूस अपमनहि सहन करतो. ३ अल्लाची गाय = फार गरीब माणूस इ॰ ४ अडकली गाय फटके खाय = अडचणीत सांपडल्यावर हालअपेष्टा सोसाव्याच लागतात. ५ कसा- यास गाय धारजिणी = दुष्टापुढें निमूटपणें वावरतात पण गरीबाला मात्र छळतात. सोनाराने कान टोंचणें याअर्थीं. ६ एकानें गाय मारली तरी दुसर्‍यानें वासरूं मारूं नये = एकानें चुकी केली तर दुसर्‍यानें तरी करूं नये. सामाशब्द- ॰कवाड-कैवारी-पु. एक आडनांव. गायक्या-वि. गुराखी. ॰चाळा-पु. लहान मुलांचा एक खेळ. ॰तुरी-स्त्री. (गो.) गायत्री. ॰तोंड्या-डा-वि. लाजाळू; भितरा. ॰दूम-वि. गोपुच्छासारखा निमुळता. [फा. गांवदूम] ॰नाखें-वि. १ (गो.) निर्लज्ज. २ अर्धकच्चे. ॰पारख-स्त्री. गुरांची परीक्षा किंवा वैद्यकी. ॰पारखी-पु. गुरांचा परीक्षक किंवा वैद्य. ॰मुख-न. गाईचें तोंड, पाणी वहाण्यासाठीं केलेलें (लांकूड, दगड यांचे). ॰रट-न. (निंदार्थीं) गाय. गायरा-पु. गुराखी. गायरान-न. १ गोचार; कुरण. २ नापीक, माळ जमीन. गायरूं-न १ (निंदार्थीं किंवा लडि वाळपणें) गाय. गायरट पहा. २ (ल.) सौम्य, गरीब, निरुप द्रवी माणूस. 'तो गरीब बापडा गायरूं.' ३ (गो.) वयांत आलेली गाय. ४ (बे.) अगदीं लहान जातीची कोंकणी गाय. ॰वट-न. (चांभारी) गोचर्म. ॰वाडा-पु. गोठा. 'गंगा आपली पाटी (शेणाची) घेऊन गायवाड्यांत गेली.' -माझे हाल मीच सोसूं जाणें ६ (उषा ग्रंथमाला). गायीचा गो(ह)रा-पु. १ कृतघ्न माणूस. २ मूर्ख; ढ मनुष्य. ३ वासरूं; बैल. ४ (ल.) गांगरलेला माणूस; वेडा. गायीचा पुत्र पहा. 'गाईचे गोरे जाले' -भाब १२३. गायीचा पुत्र, गायीचें बाळ-मूल, गायीचा बाप-पु. नपु. बैल. (ल.) टोणपा; मूर्ख माणूस.

दाते शब्दकोश

जमीन

स्त्री. १ भूमी; धरणी; भुई; नद्या, समुद्र आणि वातावरण यांखेरीजची जागा. २ पृथ्वीचा पृष्ठभाग; अंतर; जागा. 'येथून दहा कोस जमीन चाललें म्हणजे समुद्र लागेल.' ३ शेत; लागवडीची जागा. 'राजापूर प्रांतीं सगळा कातळ आहे. जमीन थोडी.' ४ गच्ची; मजल्यावरची भुई अथवा पेंडाची तयार केलेली भुई. ५ वस्त्राच्या बाजूच्या कांठांमधील आंतील अंग; तवा. ६ चित्राची पार्श्वभूमि. ७ (ल.) मूळ आधार. भूई पहा. जमि- नीचे प्रकार:- पड जमीन = नापीक जमीन. वहित जमीन = लागव- डीची जमीन. तणेली जमीन = गवत माजलेली जमीन. करळ-चोपण- खळगट जमीन = कांहीं खोलीवर चुनखडीसारखा टणक थर अस- लेली; हींतून पाणी लवकर झिरपत नाहीं. आगरी जमीन = समुद्र किनारीं, नदीच्या किवा खाडीच्या काठीं असणारी रेताड जमीन. हींत रेतीपेक्षां मातीचा अंश अधिक असल्या- मुळें नारळीच्या बागा करतात. कागदाळी = गोवा, कारवार कडील सुपारी, वेलदोडे यांच्या लागवडीची जमीन; मध्यम काळी = देशाव- रील जमीन. हींत २ ते ४ फूट माती असून खालीं मुरूम असतो. भारी काळी जमीन = मोठया नद्यांच्या खोर्‍यांतील पंधरा-वीस फूट खोल काळी माती असलेली जमीन; कूर्याट जमीन = (कों.) डोंगराच्या उतारावर ठिकठिकाणीं बांध घालून केलेली भात जमीन. केवटा जमीन = मळईच्या वरची काळी अथवा तांबूस जमीन. खाजण- खारी जमीन = खाडी अडवून केलेली; हीस गझणी, कनटूर, सापळ, भाटी इ॰ नावें आहेत. पुळणवट = (कों.) वाळूची किंवा रेताड जमीन हींत नारळाची लागवड होते. हीस रेवे, रेवट, शीट्टा इ॰ नावें आहेत. बांधणरब्बी = (कों.) ओढ्यानाल्यांच्या काठीं बांध घालून केलेली जमीन. बावळ, खरी = (कों.) डोंगराच्या माथ्या- वरील कातळांत भोंवतालाची माती येऊन झालेली. मळखंडी = ह्या जमीनी गाळानें तयार झालेल्या असतात. त्यांचीं खांचरें बनवीत नाहींत. त्या देशांतील जिराईत जमिनीसारख्या मोकळ्या ठेवितात. अशा जमिनीवर ठाणें, कुलाबा जिल्ह्यांत पावसाळी गवत होतें. या प्रकारच्या जमिनींत मानवट म्हणून एक भेद आहे. घाटावरील करळ जमीन व कोंकणांतील मानवट जमीन यांत बरेंच साम्यआहे. मळई = नदीकांठची, गाळानें सांचलेली. वायंगण = (राजा.) पावसाळी भात काढल्यावर रब्बीच्या वेळीं डोंगरांतील पाटाच्या पाण्यावर भाताचें दुसरें पीक काढितां येणारी. वरकस = डोंगराच्या उतारा- वरील जमीन. हिचें भरोड असें दुसरें नांव आहे. हिचे प्रकार दोन:- डोंगरी व माळ पहिलीची मशागत हातांनीं खणून करतात. जंगली भागांत हिच्यांत कुमरा-डाहळी या पद्धतीनें नाचणी, वरी, सावा, खुरासणी तीळ इ॰ पिकें काढितात. दुसरींत बैलाची नांगरट करितां येते. शेळ जमीन = डोंगराच्या खोलगट भागांत असणारी व सतत पाण्याचा झिरपा असणारी. मळी जमीन = दरीच्या पाय- थ्याशीं असणारी जमीन. हीस बैलू, गादळ अशीं दुसरीं नांवें आहेत. पाणथळ जमीन = स्वभाविक खोलगटपणामुळें पावसाळ्यांत पाणी सांचणारी जमीन. हीस कारूगद्दे असें दुसरें नावं आहे. मक्कीजमीन = डोंगराच्या उतरणीवर एकाखालीं एक बांध घालून केलेली जमीन. हीस मॉलॉय, आढी, मॉरोड अशी दुसरीं नावें आहेत. [फा. झमीन्; झेन्द, झेम] (वाप्र.) ॰अस्मान एक होणें- १ सपाटून पाऊस पडणें; धुरळा. धुकें यांनीं दिशा धुंद होणें. २ (ल.) अतिशय गर्विष्ठ होणें. ॰अस्मानाचें अंतर-फार मोठें अंतर, तफावत. ॰उकरणें-अंगठ्यांनी भुई उकरणें (संकटग्रस्त, भीति- ग्रस्त होऊन थोडा टापेनें जमीन उकरतो तसें). ॰ओढणें-जमीन लागवडीस आणणें. ॰धरणें-१ आजारीपणामुळें अंथरुणाला खिळणें. २ रागाला वश होणें. ॰माडी ठेवणें-बागाईत पिकाक- रितां जमीन रिकामी ठेवून बाकीच्यांत एकच पीक काढणें. ॰वाफेला येणें-पेरण्याच्या हंगामाला येणें. ॰सोडणें-१ जमिनींतून वर येणें, दिसणें (पीक). २ (ल.) दुखणें, दारिद्र्य इ॰ तून वर येणें, उठणें. जमिनीवर पाय नसणें-चपळ घोडा, जलद पळणारा, गडबड्या माणूस यांसंबंधीं योजीतात. -स पाठ(अंग) लागणें-वर पडणें-दुखण्यानें किंवा अतिशय दारिद्र्यानें पीडणें. -स पाय लागणें-रोगमुक्त होणें.-स मिळणें-सर्वस्वी नाश होणें (अक्षरशः आणि ल). म्ह॰ जमीन बादशहाची लेक माय- बापाची सामाशब्द-॰उत्पन्न-न १ जमीनीचें उत्पन्न. २ सारा किंवा वसूल. ॰जुमला-पु. खेडेगांवांतील सगळी जमीन, घर, दार, वतन वाडी, कुरणें यांस व्यापक अर्थानें म्हणतात. [फा. झमीन + अर. जुम्ला = सर्व] ॰झाडा-पु. जमीनी, गांव, खेडें, यांची एक विस्तृत याद, यादी. ॰दार-पु. वंशपरंपरेचे सरकारी वतनदार, कामदार; जसें-देशमुख-देशपांड्या, (कोठेंकोठें) पाटील, कुलकर्णी. जमीन- दार, जमीदार-पु. १ (व.) इंग्रजीपूर्वीच्या राज्यांतील सनदी सरंजामी माणसें. २ स्वतःसाठीं मेहनताना म्हणून कांहीं टक्के (शेंकडा दहा टक्के) वसूल कापूस घेऊन बाकीचा वसूल उगवून सरकारांत पाठविणारा; वतनदार. [फा. झमीदार, झमीन्दार] ॰दार व कुळें-पुनअव. शेतीच्या उपयोगाच्या बर्‍याच जमिनी स्वतःच्या मालकीच्या असलेला सधन मनुष्य, त्या जमिनीचे वेगवेगळे गट करून ते जमिनीची लागवड करणार्‍या गरीब लोकांस ठराविक मुदतीपुरते देतो व त्यापासून जमिनीच्या भाड्याबद्दल कर (खंड) घेतो, अशी व्यवहारांत जमिनीचे मालकास जमीनदार व जमीन करणार्‍यास कळ अशी संज्ञा आहे. जमीनदारी-स्त्री. १ जमीन- दाराचा हक्क, हुद्द, धंदा; जमीनखंड इ॰ २ (ल.) लुच्चेगिरी; छक्केपंजे. ॰दारी मत-न (ल.) लबाडीचें, खोटें मत. [फा. ॰दारी जमा-स्त्री. जमीनदाराकडून येणार सरकारसारा, वसूल. ॰दोस्त-वि. १ (कुस्ती) जमीनीला खिळविलेला; लोळविलेला. २ सर्वस्वीं नाश झालेला; फन्ना झालेला. ॰धारा-स्त्री. जमी- नीचा कर; सारा. ॰नीस-नवीस-पु. १ शेत, जमीन, पिकें इत्यादींची पहाणी करून सारा ठरविणारा अधिकारी. २ (क.) दप्तरदार. [फा. जमीन + नवीश] ॰बाब-स्त्री सारा कर. ॰महसूल-पु. जमीनबाब जमीनीपासून कराच्या रूपानें होणारें सरकारी उत्पन्न. ॰माजणी-स्त्री. जमीनीचें क्षेत्र मोजून जमा- बंदी करणें. ॰शिरस्ता-पु. जमिनीची पहाणी करून प्रत लावून ठरविलला सरकारसारा. ' ॰सांड-क्रिवि. (राजा.) जमिनीपासून निराळें (उचललेलें ओझें).

दाते शब्दकोश

माय

स्त्री. १ आई. 'तुम्हींहि बळि बांधिला म्हणुनि आमुची माय जी.' -केका ८८. २ (कों.) सासू. [सं. मातृका; लॅ. मॅटर; इं. मदर; प्रा. माउआ; सिं. पं. हिं. माऊ(उ); ते. मम्मा; उर्दू अम्मा, मा; का. अव्वा] म्ह॰ १ माय मरो पण मावशी उरो. २ (व.) माय तशी बेटी गहूं तशी रोटी. (वाप्र.) ॰मावशी नाहीं-मावशी पहात नाहीं-विषयवासना तृप्त करण्यासाठी अगम्यगमन सुद्धा वर्ज्य करणाऱ्या मनुष्यांसंबंधीं म्हणतात. माय विणें-१ आई प्रसूत होणें; मातेनें विशिष्ट गुणांनी युक्त अशा पुत्रास जन्म देणें. २ (ल.) (एखादें काम करण्या- विषयीं) छाती, धाडस, हिंमत होणें. 'मला शिवी देण्याला कोणाची माय व्याली आहें तें पाहतो.' सामाशब्द- ॰आंग- न. १ शरीराचा अतिशय कोमल, नाजूक भाग. २ गुदभ्रंशांतील बाहेर आलेलें आतडें; गुदभ्रंश. ३ बाहेर आलेला गर्भाशय आणि गर्भाशयभ्रंश. ४ योनि; स्त्रियांच्या किंवा मादीच्या जननेंद्रियाच्या आंतील जननविषयक अंग, इंद्रिय. 'तिला बाळंत होतांना फार त्रास झाला व मायआंग बाहेर आलें.' [माय + आंग] ॰आजा- पु. आईचा बाप; मातामह. ॰आजी-स्त्री. आईची आई; मातामही. ॰गोसावीण-स्त्री. राजरा किंवा राजेश्वरी देवीच्या कुलधर्मात सवाष्ण म्हणून सांगितलेली विधवा. या कुलधर्मांत एक घरचें मेहूण, एक बाहेरचें मेहूण, एक ब्राह्मण, एक सुवासिनी, एक ब्रह्मचारी आणि एक विधवा अशीं साडेसात माणसें (ब्रह्मचारी अर्धा माणूस) भोजनास बोलवतात. विधवेला मायगोसावीण म्हणतात व देवी मानून तिचें पूजन करितात. हा कुलाचार पुष्कळ ब्राह्मण कुटुंबांत आहे. माय(ये)चा पूत-पु. १ खऱ्या आईचा पुत्र; पराक्रमी, प्रतापवान, महत्कृत्य करणारा मनुष्य. 'असे परिमाण उत्पन्न करणारा कायदा कोणत्या मायेचा पूत निर्माण करण्यास तयार आहे...' -टि ४.९२. २ निंदा, उपहास इ॰ कर्तव्य अस- तांहि याचा उपयोग करितात. [माय = आई + पूत = पुत्र] मायचि मी, मायचि मी चूत-उद्गा. (कों.) (अश्लील) अपशब्द; एक शिवी. 'तुझ्या मायचि मी चूत साल्या.' ॰झवों-उद्गा. (हेट.) एक शिवी; आईंशीं वाईट कर्म करणारा या अर्थी. ॰थळ-न. आईचें म्हणजे जन्माचें स्थळ; जन्मभूमि. असंतुष्ट पक्षानें आपल्या गांवांत किंवा भोंवरगांवी झालेल्या निकालावर पूर्वग्रहदूषित नस- लेल्या निःपक्षपाती अशा परस्थळीं फिरून चौकशी व्हावी अशी विनंति करतांना योजलेला शब्द. उदा॰ 'हें मी मायथळ मानितों. दुसरें थळ मला द्या.' ॰देश-पु. जन्मभूमि. ॰पोट- न. अतिशय शांततेची व सुरक्षिततेची जागा; आसरा; थारा; लपण्याची जागा; शरणस्थान. -वि. १ आश्रय देणारा; रक्षक; पालक (देव, राजा, धनी, लोक, राज्य, देश, गांव, ठिकाणा इ॰). 'जें अचितां अनाथांचें मायपोट ।' -ज्ञा ८.१९५. २ गरीब; निरुपद्रवी (गाय, घोडा, हत्ती इ॰). ॰बहीण-स्त्री. आदरानें कोणत्याहि स्त्रीविषयीं योजावयाचा शब्द; आईसारखी किंवा बपिणीसारखी मानिलेली स्त्री. 'मायबहिणी विठाबाई । लागला छंद तुझें पायीं ।' [माय + बहीण] ॰बहीण घेणें-(व.) आई- बहिणीवरून शिव्या देणें. ॰बाप-पुअव. आई व बाप; आईबापें. म्ह॰ (व.) माय बाप हेल्या लेकरं पाहिले कोल्ह्या = आईबाप सशक्त व मुलें किडकिडीत. ॰भाषा-बोली-स्त्री. स्वतःची भाषा. माव(उ)ली-स्त्री. १ आईस लडिवाळपणें संबोधण्याचा शब्द. २ (सामा.) आई किंवा आदरणीय, आवडतें वडील स्त्रीमाणूस. ॰मावशी-स्त्री. १ मातेसमान किंवा प्रौढ स्त्री. २ मातृस्थानीय किंवा अनुल्लंघ्यवचन असलेली नातेवाईक स्त्री. (क्रि॰ ओळखणें; जाणणें; मानणें; पाहणें इ॰) गोमांस व शिवस्त. हे शब्द पहा. [माय + मावशी] ॰माहेर-न. १ आईचें घर; माहेर. २ आश्रय; थारा. ३ आश्रयदान; (क्रि॰ करणें). ॰मूर्ति-वि. दिसण्यांत संभावित परंतु महा लुच्चा मनुष्य. ॰(माये)राणी-स्त्री. १ स्त्रिया व खालच्या जातींतील लोक यांनी पूज्य मानलेली पिशाच देवता; एक क्षुद्र देवता. 'जाखमाता मायराणी । बाळाबगुळा मान- विणी ।' -दा ४.५.१६. २ जलदेवता. 'जळीच्या मेसको माये- राणी ।' -दा ३.२.२७. ३ (व.) एक देवी. हिची पूजा दिवा- ळीत होतें. 'आमच्या घरीं मायराणीचा कुलाचार आहे.' ४ (निंदेने) करंजी नावाचें पक्वान्न. म्ह॰ अडक्याची मायराणी सापिक्याचा शेंदूर. मायराणीचे दिवे-पुअव. आंत तेल घालून व वात लावून मायराणीस समर्पण केलेले कणकेचे लहान लहान दिवे. बायकांचा हा आषाढांतील एक कुलाचार आहे, या दिव्या- सारखे कणकेचे दिवे करून बायका खातात म्हणून-मायराणीचे दिवे खाल्ले फिरफिरून घरास येते-असें एखाद्या धीट, लचाळ व त्रासदायक स्त्रीसंबंधी रागानें म्हणतात. ॰वणी-स्त्री. १ कुलीन स्त्री. २ गर्भार स्त्री. 'मायवणीं धाल्या धाय । गर्भ आंवतणें न पाहे ।' -तुगा २३४८. [प्रा.] ॰वत्-न. महारांस आई किंवा पालक यांच्या ठिकाणीं असलेल्या गांवच्या सर्व दुसऱ्या जाती; या जातींपैकीं एक व्यक्ति. ॰वाण-न. (व.) नवऱ्या मुलाच्या आईला द्यावयाचा वाण. 'मायवाणासाठीं लुगडें द्यायला हवें.'

दाते शब्दकोश

काम

न. १ गोष्ट; कार्य; व्यापार; कृत्य. २ धंदा; उद्योग; हातीं घेतलेला व्यवसाय. 'तुमच्या मुलाला काय काम आहे?' ३ क्रिया; कृति करण्याचा व्यापार. 'कर्माचें काम सरे । विरमे मन ।' -ज्ञा ७.१७७. ४ सामान्यतः कोणताहि व्यवहार, बाबत; 'या कामांत माझा एक वांटेकरी आहे.' ५ गरज; प्रसंग; प्रयोजन. 'सध्यां मला चाकूचें काम नाहीं.' ६ उपयोग; पात्रता; उपयुक्तता; सोईस्करपणा. 'हें हत्यार त्याच्या कामास पडेल.' [सं. कर्म; प्रा. कम्म; सिं. कमु; हिं. गु. काम; सीगन कम] (वाप्र.) ॰काढणें- १ सपाटून त्रास देणें; मन मानेल तसें वाग- विणें; सतावणें; छळणें. २ (ल.) खोड मोडणें; कुंठित करणें; नक्षा उतरणें; खरडपट्टी काढणें; जेरीस आणणें. ३ ठार मारणें. 'सन १८७३ सालीं होन्याकोळ्यानें बंड केलें व मारवाड्यांचें काम काढलें.' -गुजा ५९. ॰चोरणें-अंग राखून, कुचराईनें रेंगाळत, काम करणें. ॰नसणें-निरुपयोगी, निष्फळ होणें; (एखाद्या वस्तूची) गरज नसणें. ॰बजावणें-करणें; पार पाडणें; तडीस नेणें. ॰मनावर घेणें-१ महत्वाचें समजणें; किंमत देणें. २ करण्याविषयीं उद्युक्त होणें; कळकळीनें झटणें. ॰साधणें-वाटेल तें झालें तरी काम तडीस नेणें, संपविणें, पुरें करणें. कामात काम करून घेणें-उकरणें-मोठें काम चाललें असतां त्याच्या साधनांनीं त्याच जातीच्या लहानशा प्रकारचें काम साधून घेणें. 'कामांत काम भज मना राम ।' -मांत पडणें-१ एखाद्या कामांत, धंद्यांत, व्यवसायांत भाग घेणें, पत्करणें. २ पराभूत होणें; अयशस्वी होणें (उद्योगांत, धंद्यांत). -मांत पाणी शिरणें- व्यवहारांत, धंद्यांत तोटा होणें. -मांतून जाणें-निरुपयोगी होणें. -मा नये-(काव्य) उपयोगी नाहीं. -मा येणें-उपयोगी पडणें. 'सहदेव मात्र कामा आला करि विक्रम प्रकाम रणीं ।' -मोकर्ण ३८.३१. 'तुला कामा येतील वेल्हाळे ।' -र १२. -माला येणें-१ पत्करणें; सहन केलें जाणें. 'तूं अशा रीतीनें वागलास तर तें माझ्या कामाला येणार नाहीं.' २ उपयोगी पडणें. 'कठिण समय येतां कोण कामासि येतो?' -र १०. -माला-स येणें-लढाईंत स्वामीकार्यार्थ मरण येणें. -मावर पडणें-१ उपयोगी होणें. २ योग्य होणें; बरोबर असणें (कृति, रीत, काम इ॰). कामीं असणें-१ (व.) कामावर असणें. २ नोकर असणें. -मीं येणें-कामाला-स येणें पहा. 'गोखल्यांच्या निशाणाभोंवतीं पांचशें वीर कामीं आले.' -विवि. १०.१०.२२९. -मीं लावणें-१ उपयोग करणें. २ वेठीस धरणें. म्ह॰ १ (क.) काम करत्या बैलाला मारणें = ऐकणा- रालाच पुन्हां पुन्हां काम सांगणें. २ (गो.) काम केल्यावर दान दिवप = काम केल्यावर दाम (मजुरी) देणें. ३ खांदा देऊन काम करणें = झटून, मनःपूर्वक काम करणें. ४ कामांत भट पडणें = काम बिघडणें. ५ कामापुरता मामा, ताकापुरती आजी (गरज सरो वैद्य मरो याअर्थी) काम साधून घेण्यापुरतें गोड गोड बोलणें. (सामाशब्द) ॰करी-पु. मजूर; हेलकरी; नोकर. [सं. कर्म + कर] ॰करी वर्ग-पु. मजुरांचा समुदाय; मजूर लोक. ॰करी संघ- पु. मजुरांचें मंडळ; मजुरांची संस्था; जूट. ॰कर्दा-पु. कार्यकर्ता. 'बहुकामकर्दा म्हणावी शहाणा ।' -दावि १४७. ॰काज-न. लहानमोठें काम; कोणतेंहि काम, धंदा. ॰कारभार-पु. कोर्ट- कचेरींतील किंवा सरकारी कामकाज. ॰गत-स्त्री. १ कामगिरी; उद्योग; करावयाचें काम. 'म्यां घरची कामगत पत्करली.' २ मजुरांचा मेळा. ॰गार-पु. १ सरकारी नोकर (मंत्री, चिट- णीस, एखाद्या दर्जाचा अधिकारी). 'राजसे समस्त सुरवर । ते तंव माझे कामगार ।' -कथा ३.४.१९. २ सामान्यतः वरिष्ठ प्रतीचा मजूर (कारखान्यांतील). ३ कार्यकर्ता. 'कामगार आणि आंगचोर । येक कैसा ।' -दा १२.७.२९. [कर्मकार] ॰गिरी-गारी-स्त्री १ कामधंदा; करावयाचें काम; उरकावयाचें काम. २ काम उरकणें, करणें; बजावणी; ३ कारागिरी; करामत. 'कामगारी व्हावयाची असल्यास त्याप्रमाणें नायब खानगी कारभारी यास कळवून...' -कलावंतखातें (बडोदें) ४२. ४ विशेष काम. [काम + फा. गिरी] ॰चलाऊ-वि. तात्पुरता उपयोगी पडणारा; वेळ मारून नेतां येण्यासारखा; खपण्या- सारखा; साधारण. ॰चुकार-रू-चुकवू-व्या-वि. कामाची टोलवाटोलवी करणारा; सोंगाड्या; कुचराई करणारा; चुकार- तट्टू, अंगचोर. ॰चोरपणा-पु. अंगचोरी. 'त्यांच्यांत काम- चोरपणा अधिक असता तर ते खात्रीनें अधिक काळ जगले असते. -विचारविलास १०८. ॰जोड-वि. कामांत तत्पर; कामांत गढलेला (क्वचित प्रचार पण दामजोड = पैशाकडे दृष्टि असणारा, याच्या विरुद्ध हा शब्द योजतात). ॰झोड्या-वि. सपाटून काम करणारा; ओबडधोबडपणें काम संपविणारा; दडपून काम करणारा. [काम + झोडणें] ॰ठ-ठा-नस्त्री. दुकान; व्यापार. 'तेव्हां कर्ता रिगे कामठां । कर्तुत्वाच्या ।' -ज्ञा १८.३५८. २ (व.) कारखाना; यंत्र; टांकसाळ. 'गांवाखातीये औधे मिळौनि कामठा घालिती ।' -चक्रधर सिद्धांतसूत्र ८९. 'गुणत्रयाच्या पडतें । कामठां जे ।' -ज्ञा १५.४८०. [कर्म + स्थान] ॰ठ-वि. (राजा.) उद्योगी; मेहनती. [कर्मठ] ॰दार पु. सरकारी नोकर; अधिकारी; अंमल- दार. ॰धंदा-कामकाज पहा. ॰बोध-पु. कामोद नांवाचा एक- राग; राग पहा. ॰लाट्या-वि. कसें तरी करून काम उरकविणारा (मजूर). [काम + लाटणें] ॰वट-न. १ कामकरी; मजूर. 'येक भाणवसीं कामवटें ।' -उषा ७.७३. २ कौशल्य. 'कीं विश्वकर्म्याचें कामवट । खांब सोडविले निघोट ।' -कालिका पुराण ६.१८. ॰साधु वि. आपमतलबी; स्वार्थी; स्वतःचें तेवढें काम करून घेणारा. ॰सू-वि. नेहमीं काम करणारा; कष्टाळु; काम करण्यांत पटाईत; उद्योगी; व्यासंगी. [कर्मशूर-कामसूअ-कामसू-भाइ १८३४.] कामाकार-पु. अंकितपणा. 'आणि ज्ञानाचेनि कामा- कारें ।' -ज्ञा १६.६०. -माचा-वि. १ उपयुक्त; कामाला उपयोगी पडणारा (पदार्थ, माणूस) २ कामांत गुंतलेला (ज्याला कामधंदा आहे असा); उद्योगी; रिकामा नव्हे तो. -माचा गाडा -पु. १ येईल तें काम करणारा माणूस; मेहनतीचें काम करणारा पुरुष. २ भरपूर काम. (क्रि॰ ओढणें.) -माचा जड-वि. आळशी; मंद; धिम्मा; सुस्त. -मारा-री-रें-पुन. कामकरी; सेवक; दास; दासी; चाकर. 'माझी होतील कामारीं ।' -ज्ञा १६. ३५३. 'वेद तयाचे सेवक । विधिविवेक कामारी ।' -एभा ७.१११. 'नाना उपचारीं । सिद्धी वोळगती कामारी ।' -तुगा २७८. जेआचिये घरींचीं कामारी ।' -दाव २७८. 'जैसी ते कामारी दासी पाहें ।' -ब ४६९. 'लागले लक्षावधि कामारी ।' -कृमुरा ६१.१०६. [कर्मकार-री] -मारीपण-न. सेवावृत्ति; दास्यत्व. 'इया कामारिपणें भुक्ति मुक्ति । देती भाविक जनांसि ।' -स्वानु १०.१.८.

दाते शब्दकोश

बे

शअ. वांचून; विरहित; अभाव दाखविणारा उपसर्ग. याचा फारशी किंवा हिंदी शब्दांशीं समास होतो व हा शब्द नेहमीं पूर्वपद असतो. [फा. बी; तुल॰ सं. विना; हिं. बिन] ज्यांच्या पूर्वपदीं बे शब्द येतो असे अनेक सामासिक शब्द आहेत. त्यांतील कांहीं पुढें दिले आहेत. सामाशब्द- ॰अकली-वि. मूर्ख; बेवकूब. [फा. बी + अक्ल्] ॰अदब-बी-स्त्री. अपमान; असभ्यता; अमर्यादा; अनादर. [फा. बी + अदबी] ॰अदाई-स्त्री. स्वामिद्रोह; विरोध. अबरु-अब्रू-स्त्री. दुर्लौकिक; अपकीर्ति; फजिती. [फा. बी + आब्रू] अबस-क्रिवि. वृथा; व्यर्थ; निष्फळ. ॰आब-पु. अपमान; बेअब्रू. -वि. अपमान झालेला. [फा. बी + आब्] ॰आराम- वि. अस्वस्थ; आजारी. [फा. बी + आराम्] ॰आरामी-स्त्री. अस्वास्थ्य. [फा.] ॰इज्जत-ती-स्त्री. अप्रतिष्ठा. ॰इज्जती-वि. गैरअबरूदार; हलकट. [फा.] ॰इतबार-पु. गैरविश्वास; गैरभरंवसा. [फा.] ॰इतल्ला-क्रिवि. गैरमाहीत; बे-दखल; बडतर्फ. 'त्याचे कार्कून बे-इतल्ला केले.' -रा १०.११०. [फा.] ॰इनसाफ- इनसाफी-पुस्त्री. अन्याय; न्यायाचा अभाव. -वि. अन्यायाचा; अन्यायी. [फा.] ॰इमान-इमानी, बेमान-वि. कृतघ्न; अप्रामाणिक; बेभरंवशाचा. [फा. बी + ईमान् = अधर्मी] ॰इमानी- इमानकी-स्त्री. खोटेपणा; अप्रामाणिकता; कृतघ्नता; विश्वास- घातकीपणा. ॰इलाज-वि. निरुपाय; नाइलाज. [फा.] ॰उजूर- क्रिवि. १ कांहीं न सांगतां; बिनतक्रार. 'या दिवसांत पोटास न मिळे तेव्हां लोक चाकरी बे-उजूर कैसी करितील? '-रा १०.५७. २ विलंबरहित; बेधडक. [फा.] ॰कदर-क्रिवि. निर्धास्तपणें. ॰कम-ब-कास्त-क्रिवि. कांहीं कमी न करतां; साद्यन्त; जसेंच्यातसें. [फा. बी + कम् + उ + कास्त्] ॰करारी- स्त्री. अनिश्चिती; तहमोड. 'त्याजकडून बेकरारीच्या चाली सुरू होतात.'-रा ७.१९ ॰कस-वि. नि:सत्त्व; कमजोर; बेचव; शुष्क. ॰कानू-स्त्री. अन्याय; जुलूम. ॰कानून-कानू-वि. बेकायदेशीर; कायद्याचा भंग करून केलेलें. [फा.] ॰कायदा-पु. कायदेभंग; कायद्यासंबंधाचा अभाव. ॰कायदा-कायदेशीर- वि. नियमबाह्य; गैरकायदेशीर; जुलमी; नियमाचें उल्लंघन करणारा; नियमाला सोडून असलेला [फा. बी + काइदा] ॰कार-वि. १ निरुद्योगी; बे-रोजगारी; रिकामा. २ (व.) निरर्थक; व्यर्थ; उगाच. ३ (ल.) हैराण; निरुपयोगी. 'तिन्ही मोर्चे मिळोन निमे माणूस दुखणियानीं बेकार आहे.' -पेद ३.१८ [फा.] ॰कार- चावडी-स्त्री. (को.) रिकामपणाच्या, निरर्थक गप्पागोष्टी. ॰कारी- स्त्री. रिकामपणा; निरुद्योगीता; बेरोजगारपणा. [फा. बीकारी] ॰किलाफ-पु. मैत्री; सख्य; संशयनिवारण. [अर. खिलाफ् = वैर] ॰कुबी-स्त्री. मूर्खपणा; गाढवपणा; मौखर्य. [फा. बेवकुफी] ॰कुसूर-क्रिवि. न. चुकतां; बिलाकसूर; पूर्णपणें. [फा. बी + कुसूर्] ॰कूब-वि. मूर्ख; वेडगळ; वेडझंवा [फा. बेवकुफ] ॰कैद-स्त्री. शिस्तीचा अभावं; स्वैर वर्तन; अव्यवस्थितपणा; कायदा, नियम किंवा शिस्त यांचे उल्लंघन. -वि. बेशिस्त; स्वैर; अनियंत्रित. -क्रिवि. स्वैरपणानें; कोणत्याहि तर्‍हेचा कायदा किंवा नियम न मानतां. [फा. बी + कैदी] ॰कैदी-वि. स्वैर; कायदा, नियम, नियंत्रिण इ॰ न पाळणारा; बेशिस्त. ॰कौली-वि. बिगर कौलाचा; अभयपत्रविरहित. ॰खत्रे-क्रिवि. निःशंकपणें. 'बेखत्रे हुजूर यावें.' -जोरा १०५. ॰खबर-क्रिवि. असावध; गाफीलपणें. [फा. बी + खबर्] ॰खबर्दार-वि. गैरसावध. [फा.] ॰खर्च-खर्ची-वि. १ खर्च केल्याशिवाय झालेलें, केलेलें; फुकटंफाकट. २ खचीं जवळ नाहीं असा; निर्धन; कृपण. [फा. बी + खर्च्] ॰खातरी-स्त्री. अविचार. 'चार कोटींची मालियत जवळ असतां कंजूषपणानें सर्दारास बेखात- रीनें निरोप दिल्हा.' -जोरा १०९. गर्द-वि. वृक्षरहित; झाडी नसलेलें. 'मुलूख अगदीं वीसपंचवीस कोसपर्यंत बे-गर्द, वेचिराख जाहला.' -पाब १४ [फा. बगिर्द] ॰गार-गारी-बिगार, बिगारी पहा. ॰गुन्हा-पु. गुन्ह्यापासून मुक्तता, सुटका.-वि. गुन्हा नसलेला; अपराधांतून मुक्त झालेला. -क्रिवि. गुन्हा नसतांना. 'बक्षीस बेगुन्हा कैद केलें. ' -जोरा १०५ [फा.] ॰गुमान-नी-वि. बेपर्वा; गर्विष्ठ; उन्मत्त; निःशंक; मुर्वत नसणारा. [फा. बेगुमान्] ॰चतुर-वि. मूर्ख. ॰चरक-क्रिवि. निर्भयपणें; धडाक्यानें; निर्भीडपणें; बेधडक. ॰चव-वि. रुचिहीन; कवकवीत; नीरस; निचव. ॰चाड-वि. चाड नसलेला; लज्जाहीन; उद्धट. ॰चिराख- ग-वि. दीपहीन; ओसाड; उध्वस्त; वस्तीरहित; उजाड. [फा. बी + चीराघ् = दिवा] ॰चूक-वि. बिनचूक; बरोबर; चुका केल्या- शिवाय. [फा. बी + हिं. चूक] ॰चैन-वि. अस्वस्थ; कांहींहि सुचत नाहीं असा [फा. बी + हिं चैन] ॰चोबा-पु. खांबाशिवाय असलेला लहान तंबू. [फा. बीचोबा] ॰छूटपणा-पु. आळा, बंध नसणें; स्वैराचार; स्वच्छंदीपाणा. ॰जबाब-क्रिवि. उद्धट- पणानें; बेपर्वाईनें (बोलणें, उत्तर देणें). [फा. बी + जवाब्] ॰जबाबदार-वि. स्वतःवरची जोखीम न ओळखणारा; जोखीम न ओळखून स्वैर वागणारा. बेजबाबदार राज्यपद्धति-स्त्री. लोकमतास जबाबदार नसलेली राज्यपद्धति. ॰जबाबी-वि. १ उद्धट; उर्मट; बेमुर्वतखोर. २ तासाचे ठोके न देणारें (घड्याळ). [फा. बी + जवाब् = निरुत्तर] ॰जबर-क्रिवि. निर्भयपणें; निःशंक- पणें; बेधडक; जोरानें; उठाव करून; धाक न बाळगतां. 'आमच्या भले लोकांनीं बेजबर घोडीं घालून कित्तूरकरास मोडून वोढ्यापर्यंत नेऊन घातला. ' -ख ५.२३८८ [फा.] ॰जात-वि. (अशिष्ट) हलक्या किंवा निराळ्या जातीचा. ॰जान-वि. निर्जीव; ठार. [फा.] ॰जाब-वि. बेगुमान; बेमुलाजा; बेजबाबदार. [फा.] ॰जाबता-पु. अन्याय; ठरावाविरुद्ध गोष्ट; अविचारी भाषा. 'आम्ही टोंचून घेणार नाहीं, असेना असे मरून जाऊं असे बेजाबता बोलत होते.' -टिकळचरित्र, खंड १. ॰ज्यहा-जा- जहा-वि. फाजील; अनाठायीं; अनुचित; अयोग्य; अमर्याद; अकालीन; रुष्ट; उधळपट्टीचा. [फा.बी + जा] बेजार-वि. १ हैराण; त्रस्त; दमलेले; थकलेला (श्रम, दुःख, कटकट यांमुळें). २ दुखाण्यानें हैराण झालेला; दुखणाईत. [फा. बिझार्] बेजारी- स्त्री. त्रास; हैराणी; थकवा. ॰डर-न. ड्रेडनॉट नांवाचें जंगी लढाऊ जहाज. -वि. न भिणारी; न डरणारा. बेडर पहा. [हिं. डर] ॰डौल-वि. कुरूप; बेढब; घाट किंवा आकार चांगला नसलेला. ॰ढंग-पु. दुराचरण; स्वैराचार; बेताल वागणूक; सोदेगिरी. [हिं.] ॰ढंग-गी-वि. दुराचरणी; व्यसनी; स्वैराचारी. [हिं.] ॰ढब- वि. बेडौल; कुरूप; विक्षिप्त; ढबळशाई; चांगला घाट, आकार नसलेला; ओबडधोबड. [हिं.] ॰तकबी-वि. असमर्थ; ना-तवान. [फा. बेतक्विया] ॰तकसी(शी)र, बेतक्शी(तकसी)र- स्त्री. अपराधापासून, गुन्ह्यापासून, भुक्तता. -वि. निरपराधी; नाहक; निर्दोषी. [फा. बी + तक्सीर] ॰तमा-स्त्री. १ निर्लोभि वृत्ति. २ बेफिकीरपणा; बेपरवा; उदासीनपणा. -वि. १ निर्लोभी; निरिच्छ. २ बेपरवा; बेगुमान; गर्विष्ठ; निष्काळजी; बेसावध; काळजी, कळकळ न बाळगणारा. -क्रिवि. बेगुमानपणें. 'खांद्यावर टाकून पदर बोले बेतमा । लग्नाच्या नवऱ्याशीं बोले बेतमा ।' -पला. [फा] ॰तमीज-वि. (ना.) उद्धट; असभ्य. [फा. बे + तमीज] ॰तर्तुद-स्त्री. तजविजीचा अभाव; अव्यवस्था. ॰तर्‍हा-स्त्री. असाधारणपणा; वैलक्षण्य; चमत्कारिकपणा. -वि. विलक्षण; चमत्कारिक; असाधारण; भारी; अतिशय. 'याउपर उपेक्षा करून कालहरण केलियास नाबाबाचे दौलतीस बे-तर्‍हा धक्का बसेल.' -रा. ५.१६६. [फा. बी + तरह्] ॰ताब-वि. असमर्थ; क्षीण; हतधैर्य. ' मातुश्री अहल्याबाई यांस शैत्यउपद्रव होऊन पांचसात दिवस बे-ताब होती.' -मदाबा १.२१८ [फा. बी + ताब्] ॰ताल- ळ-वि. १ गायनांत तालाला सोडून असलेलें (गाणें-बजावणें). २ ताल सोडून गाणारा, वाजविणारा. ३ (ल.) अमर्याद; अनियं- त्रित; स्वैर; उधळ्या. [हिं.] ॰तालूक-वि. गैरसंबंधीं; संबंध नसलेला; भलता. [फा. बे + तअल्लुक = संबंध] ॰दखल-वि. १ अधिकारच्युत; बेईतल्ला. २ गैरमाहीत. [फा. बी + दख्ल्] ॰दम-वि. दम कोंडला जाईपर्यंत; निपचीत पडेपावेतों दिलेला (मार); थकलेला; दमलेला; निपचीत. [फा.] ॰दरद-दी-दर्द- दर्दी-वि. १ बेफिकीर; बेगुमान; मागेंपुढें न पाहणारा; भय न बाळगितां स्वच्छंदपणें वागणारा. २ बारीकसारीक विचार न पाहणारा. ३ निर्घृण; क्रूर; दया नसलेला. [फा.] ॰दस्तूर-पु. अन्याय; नियमाविरहित गोष्ट; गैरशिरस्ता. ॰दस्रतूई-स्त्री. (गो.) उधळेपणा. [फा.] ॰दाणा-दाना-पु. १ आंत बी नाहीं असें द्राक्ष. हें लहान, गोड, गोल, बिनबियांचें असतें. २ सुकविलेलें द्राक्ष; किसमिस. [फा.] ॰दाणा डाळिंब-न. दाण्यांत बीं नसलेलें डाळिंब. ॰दाद-स्त्री. बेबंदशाही; अन्याय; जुलूम. [फा.] ॰दार-क्रिवि. जागृत; तयार. 'नबाब बेदार जाले.' -रा ७.८३ [फा.] ॰दावा-पु. सोडचिठ्ठी; नामागणी; हक्क सोडणें. ॰दावा पत्र-फारखती-नस्त्री. हक्क सोडल्याबद्दल, नसल्याबद्दल लिहून दिलेला कागद; सोडचिठ्ठी. ॰दिक(क्क)त-क्रिवि. बेलाशक; बिनहरकत; बिनतक्रार; बेउजूर; निःशंकपणें. [फा.] ॰दिल- दील-वि. उदासीन; असंतुष्ट; दुःखी कष्टी. [फा.] ॰दील होणें-बिथरणें. ॰दिली-स्त्री. १ असंतुष्टता; औदासीन्य; निरु त्साह. २ रुष्टता; मनाचा बेबनाव. ॰दुवा-स्त्री. अवकृपा; शाप. [अर.] ॰धडक-क्रिवि. बिनघोक; निर्धास्तपणें; निर्भय; बेलाशक. [हिं.] ॰धरी-वि. धरबंद नसलेला; नियंत्रण नसलेला; मोकाट; स्वैर. [बे + धर] ॰नवा-वि. अधीर; असहाय; निर्धन; भुकेला. 'पादशहा बेनवा होऊन खानास लिहीत. ' -मराचिथोर ५३. [फा.] ॰नहाक-नाहक-क्रिवि. विनाकारण; उगीचच्याउगीच; कारण नसतांना; हक्कनहक्क, हक्कनाहक्क पहा. ॰निगा-स्त्री. दुर्लक्ष; अपरक्षण. [फा.] ॰निसबत-क्रिवि. बेलाशक; काहींहि विचार न करतां; मनांत कोणातीहि शंका न बाळगतां; बेपर्वाइनें; एकदम. [फा.] ॰निहायत-न्याहत-क्रिवि. निःसीम; अपार; परकाष्ठेचा. [फा.] ॰पडदा-वि. १ पडदा नसलेला; उघडपणें; कोणत्याहि तऱ्हेची गुप्तता न राखतां. २ (ल.) मानखंडित. क्वचित् नामाप्रमाणें उपयोग करितात. -पु. १ उघड गोष्ट; २ (ल.) मानखं डना. [फा.] ॰परवा-पर्वा-वि. निष्काळजी; निर्भय; बेगुमान. [फा.] ॰परवाई-पर्वाई-स्त्री. निष्काळजीपणा; बेगुमानी; स्वैरावृत्ति. [फा. बी + पर्वाई; तुला॰ सं द्विप्रव्राजिनी] ॰पाया- वि. गैरकायदा; नियमाविरुद्ध. ॰फंदी-वि. १ व्यसनी; दुराचारी; स्वैर. बेशुद्ध. २ खट्याळ; उच्छृंखल; खोडकर (मूल). ॰फाम-वि. १ बेसावध; बेशुद्ध. २ निश्चिन्त; गाफिल; अनावर; मस्त; तुफान; बेभान. 'शत्रू माघार गेला म्हणून बेफाम नाहीं, सावधच आहों.' -ख ७.३३१०. [फा. बी + फह्म्] ॰फामी-स्त्री. गैर- सावधपणा; गाफिली; निश्चिन्ती; खातर्जमा; दुर्लक्ष. ' या विश्वा- सावर बेफामी जाली याजमुळें दगाबाजीनें निघोन गेला. ' -दिमरा १.२५२. ॰फायदा-वि. गैरफायदेशीर; तोट्याचें; अव्यवस्थित. ॰फिकि(की)र-स्त्री. निष्काळजीपणा. -वि. १ निष्काळजी; बेपर्वा; अविचारी. २ निश्चिंत; निर्धास्त; संतुष्ट. [फा. बी + फिक] ॰फिकिरी-स्त्री. निष्काळजीपणा; गाफिली; निःशकपणा. ॰बंद- पु. अराजकता; शिस्तीचा अभाव; गोंधळ. 'हुजरातीमध्यें बेबंद सर्वथा हिऊं देऊं नये.' -मराआ १४ -वि. अव्यवस्थित; मुक्त; व्यवस्था, बंदोबस्त, कायदा, शिस्त इ॰ नसलेला; बेशिस्त; अराजक. [फा.] ॰बंदशाई-ही, बेबंदाई-बंदी-स्त्री. १ अव्यवस्था; गोंधळ; मोंगलाई; अनायकी; अंदाधुंडी; अराजकता. २ जुलूम. ' सांगुं किती दुनियेवर बेबंदी । ही मस्लत खंदी । ' -राला १०६. ॰बदल-वि. १ बदललेला. २ बंडखोर. 'गुलाम कादर- खान पादशहासी बेबदल होऊन... ' -दिमरा १.२००. [फा.] ॰बनाव-पु. भांडण; तेढ; तंटा; बिघाड. ॰बर्कत-स्त्री. अवनति; हलाखी; तोटा. [फा.] ॰बहा-वि. अमोल; किंमत करतां येणार नाहीं असें. [फा.] ॰बाक-वि. निर्भीड; बेडर. [फा.] ॰बाक-ग, बेबाकी-स्त्री. अशेष फडशा; कर्जाची पूर्ण फेड. -वि. निःशेष; संपूर्ण; कांहींहि शिल्लक, बाकी न ठेवतां फेडलेलें (कर्ज). [फा.] ॰बारत-स्त्री. बेइतबार; अविश्वास. ॰बुनियाद-बुन्याद-स्त्री. अन्याय; राखरांगोळी; नाश. 'आम्ही मदारुल महाम व फारांसीस तिघे मिळून इंग्रेजांची बेबुनियाद करूं.' -रा १०.१९९ [फा. बुनियाद् = पाया] ॰बुदी-बुद-स्त्री. १ नाश; खराबी; अभाव. २ नाबूद. [फा.] ॰भरंवसा-भरोसा-पु. अविश्वास; संशयितपणा; खात्री नसणें. [हिं.] ॰भरोशी-वि. खात्री किंवा भरंवसा अगर विश्वास ठेवतां येणार नाहीं असा; फसव्या. ॰मजगी-स्त्री. वितुष्ट; अरुचि; बेबनाव. 'पादशहांची व गुलामकादार यांची बेमजगी होऊन... 'दिमरा १.१९९. [फा.] ॰मनसबा-मन्सबा- पु. अविचार; खराब मसलत. [फा.] ॰मब्लग-मुब्लक- मोब्लक-वि. असंख्य; अपरिमित. [अर. मब्लघ्] ॰मारामत- स्त्री. नादुरुस्ती. 'आरमाराची बेमरामत जाली.' -वाडसमा २.१९५ -वि. नादुरुस्त; दुरुस्तीची जरूर असलेलें; दुरुस्तीवांचून असलेलें; अव्यवस्थित. [फा.]॰ मर्जी-स्त्री. इतराजी; अवकृपा; मर्जीविरुद्ध वर्तन. [फा.] ॰मलामत-वि. कीर्तिवान्. [अर. मलामत = दूषण] ॰मस्लत-स्त्री. अविचार. ' स्त्रीनायक, बालनायक आणि बेमस्लत, तीन गोष्टी येके ठिकाणीं; चौथा अहंकार; तेव्हां ईश्वर त्या सर्दारीची अब्रू ठेवील तर ठेवो. ' -खपल २.७० [फा.] ॰मान-मानी-मानकी-गी-बेइमान इ॰ पहा. ॰मानगिरी - स्त्री. बेइमानी; हरामखोर. ॰मार-वि. १ किंवा हल्ला करतां न येण्यासारखा (किल्ला). २ अतिशय; कमालीचा; जोरदार; विपुल; भरपूर, बेसुमार इ॰. उदा॰ बेमार-पाऊस-वारा-ऊन्ह-धूळ- लढाई-पीक-धान्य-आंबे इ॰ (पडतो-सुटला-पडतें-उडते-चालती-झालें-पिकले इ॰ क्रियापदांस जोडून उपयोग). ३ आजारी; दुखणाईत. ४ थकलेला; दमलेला; बिमार. ५ (व.) वस्ती नसलेलें; उपयोगांत नसलेलें (घर, वस्तु). [फा.] ॰मारी-स्त्री. १ आजार; आजारीपण; दुखणें. २ शिणभाग; थकवा; अशक्तता. ॰मालूम- वि. माहीत न होण्याजोगें; दिसणार नाहीं, ओळखतां येणार नाहीं, शोधतां येनार नाहीं असें; जाणण्यास कठिण; हुबेहुब. 'नवीन माहितीचा जुन्या पद्धतीशीं बेमालूम सांधा जोडणें कठिण आहे.' -टि ४.२७१ [हिं.] ॰मुनासीब-मुनास्रब-वि. अयोग्य; गैरवाजवी; बुद्धीला न पटणारे; अयुक्त. [हिं.] ॰मुन्सफी-स्त्री. अन्याय. 'हिंदू मुसल्मान, ईश्वराचे घरचे दोन्ही धर्म चालत असतां मुसल्मानानें हिंदूचे जाग्यास उपद्रव करावा हे बे-मुन्सफी.' -पया १० [फा.] ॰मुरवत-मुर्वत-क्रिवि. असभ्यपणें शिष्टाचाराला सोडून; भीड, पर्वा इ॰ न बाळगतां. [फा.] ॰मुरवत-ती, ॰मुर्वत-ती-वि. कठोर; निर्दय; निर्भीड; निर्भय; बेमुलाजा. [फा.मुरुवत् = माणुसकी] ॰मुलाजा-मुलाहिजा- क्रिवि. कांहीं न पाहतां; दयामाया सोडून; निष्ठूरपणें; बेमुर्वतपणें. [अर.मुलाहझा = पर्वा, विचार] ॰मोताद-वि. बेसुमार; असंख्य; अपरिमित. [अर. मुअत्द्द = संख्या, परिमित] मोयीं(ई)न- मोइनी-मोहीन-वि. १ अनियमित; ठरावबाह्य. २ अपरिमित; असंख्य. [फा. बी + मुअय्यन्] ॰मोहर-स्त्री. बिन शिक्क्याचें; शिक्का नसलेलें; गैरमोहरबन्दी.'कित्येक दफ्तरें सर्वमोहर व कितेक बे-मोहरेची.'-रा, खलप २.९. [फा.] ॰मोहीम-- वि.मोहीम न करणारा; उपजीविकेकरतां किंवा धंद्या-उद्योगा- करितां खटपट न करणारा; घरबशा; बाहेर न जाणारा. [फा.] रंग-पु. विरस; खराबी; मौजेचा (मान, कींती, सौदर्य इ॰चा) भंग; अपमान; फजीति. -वि. ज्याचा रंग बिघडला आहे असा. [हिं.] ॰राजी-वि. असंतुष्ट. [फा.] ॰रुख्सत-क्रिवि. पर्वा- नगीवांचून. [अर. रुख्सत् = परवानगी] ॰रू(रों)ख-पु. १ दुसरी- कडे तोंड फिरविणें; दिशा बदलणें. २ प्रेमाचा अभाव. -वि. अप्रसन्न; उदासीन; रुष्ट; विन्मुख. [फा. रुख् = दिशा] ॰रोजगार-री- वि. निरुद्योगी; बेकार; रिकामा. [फा.] ॰लगाम-मी-वि. १ लगाम नसलेला. २ लगामाला दाद न देणारा. ३ (ल.) अनियंत्रित; स्वैर; मोकाट; बेताल. ४ आडवळणी; जाण्यायेण्यास सोयीचें नसलेलें; एकीकडे असलेलें; गैरसोयीचें (शेत, घर). -क्रिवि. एकीकडे; एका बाजूला; आडरस्त्यावर. [फा. बी + लिगाम्] ॰लगामीं पडणें- १ भलत्या मार्गाला लागणें; बहकणें; स्वैर बनणें. २ हयगय होणें; आबाळ होणें. ॰लाग-पु. निरुपायाची किंवा नाइलाजाची स्थिति. 'माझा बेलाग झाला.' -वि. १ जो घेण्याला किंवा ज्यावर मारा करण्याला कठीण आहे असा; दुःस्साध्यं; अवघड; बळकट (किल्ला). २ दुःस्साध्य; दुराराध्य; अप्राप्य; आचरण्यास कठीण असा (विषय). ३ सुधारण्याला कठीण; निरु- पायाचा; दुःसाध्य (रोग, विषय). -क्रिवि. १ मदतीवांचून; उपायावाचून; निरुपायानें; नालाजानें. २ निराधार; आधारावांचून. ३ तडकाफडकीं; ताबडतोब; एका क्षणांत. [फा. बी + म. लागणें] ॰वकर-वक्र-वि. फजीत; मानखंडित; अपमानित. [फा. बीवकर्] ॰वकरी-स्त्री. मानखंडना; अप्रतिष्टा; निर्भर्त्सना. [फा.] ॰वकूब (फ)बेकूब-वि. मूर्ख; खुळसट; अजाण; अडाणी अज्ञान. [फा. बेवकूफ] ॰वकूबी-फी-स्त्री. मूर्खपणा; मूढता. ॰वजे-स्त्री.(व.) गैरसोय; गैरव्यवस्था; गैररीत; विलक्षण प्रकार. [बिवजेह] ॰वतन- क्रिवि. हद्दपार; जलावतन. [अर. वतन् = जन्मभूमि] ॰वसवसा- वस्वसा-वस्वास-क्रिवि. निर्भयपणें; निश्चिन्त; शांतपणें; बे- दिक्कत; निर्भीडपणें. [अर. वस्वास, वस्वसा = भीति, काळजी] ॰वारशी-वारशीक-वारीस-वि. ज्यावर कोणाचा हक्क, वारसा नाहीं असा; निवारशी; योग्य हक्कदार, मालक किंवा वारसा नसलेला. [अर. वारिस् = वडीलोपारर्जित संपत्तीचा हक्कदार] ॰वारसा-पु. वारसाहक्क नसणें; वारस नसणें. ॰वारा-पु. कर्ज- फेड; कामकाज उरकून टाकणें; उलगडा; सांठा, पैसाइ॰ चा निकाल लावणें. [हिं.] ॰शक-वि. १ निर्धास्त; निःशंक; धीट. २ निर्लज्ज. -क्रिवि. १ निःशंकपणें; बेलाशक; निःसंशय २ निर्लज्जपणें. [फा. बी + शक्क्] ॰शरम-श्रम-वि. निर्लज्ज; पाजी; निलाजरा [फा. बे + शर्म्] ॰शरमी-श्रमी-स्त्री. निर्लज्जपणा; पाजीपणा. ॰शर्त- स्त्री. बिनशर्तपणा. -क्रिवि. बिनशर्त; अट न ठेवतां; आढेवेढे न घेतां. [अर. शर्त् = अट, नियम] ॰शिरस्ता-पु. गैरवहिवाट; गैररीत; वहिवाटीच्या विरुद्ध. [फा. सर्रिश्ता = वहिवाट, नियम] ॰शिस्त-स्त्री अव्यवस्था -वि. गैरशिस्त; अव्यवस्थित; अनि- यमित (मनुष्य, वर्तन, भाषण). [फा.] ॰शुद्ध-वि. गैरसावध; (मूर्च्छा इ॰ कांनीं) शद्धिवर, भानावर नसलेला; धुंद; अचेतन; जड. [फा. बी + सं. शुद्धि] ॰शुभह-क्रिवि. निःसंशय. 'बेशुभह शिकस्त खाऊन फरारी होतील.' -पया ४८२.[फा] ॰शौर- वि. बेअकली; मुर्ख; बेवकूब. [अर शुऊर् = अक्कल] ॰सतर- वि. अप्रतिष्ठित; मानखंडीत. [अर. सित्र = पडदा] ॰सनद- सनदी-वि. बेकायदेशीर; सनदेविरहीत. 'श्रीमंत दादासाहेब येऊन त्या उभयतांसी सलूक करणार नाहींत व बेसनद पैसाही मागणार नाहींत.' -रा ६.३८२. ॰समज-पु. (ना.) गैरसमज. -वि. अडाणी. [हिं.] ॰सरंजाम-वि. सामुग्रीविहीन; शिबंदी शिवाय. [फा.] ॰सरम-स्त्रम-(अशिष्ट) बेशरम पहा. ॰सावध- वि. १ लक्ष नसलेला; तयार नसलेला; निष्काळजी; गैरसावध. २ बेशुद्ध; शुद्धीवर नसलेला. [हिं.] ॰सुमार-वि. अमर्याद; अति- शय; अपरिमित; मर्यादेच्या, अंदाजाच्या बाहेर. [फा. बीशुमार्] ॰सुमारी-स्त्री. अपरिमित. ॰सूर-वि. बदसूर; सुरांत नस- लेला (आवाज-गाण्याचा, वाजविण्याचा). [हिं.] ॰हंगाम-पु. १ अवेळ; भलता काळ-वेळ. २ (ल.) दंगा. 'हे बेहंगाम कर- णार.'-ख १२०५. [फा.] ॰हतनमाल-हतन्माल-हन- तमाल-पु. बेवारशी म्हणून सरकारांत जमा झालेला माल, संपत्ति. [फा. बी + तन् + माल्] ॰हतन-मावशी--स्त्री. बेहतनमाल व बटछपाई या संबंधींच्या कामाचें खातें. ॰हतर-हत्तर-हेत्तर- वि. अधिक चांगले; श्रेयस्कर.[फा. बिह्त्तर; तुल॰ इं. बेटर] ॰हतरी-हेत्तरी-स्त्री. बरेपणा; सुधारपणा. ॰हद-द्द-स्त्री-स्त्री. परा- काष्ठा; अमर्यादपणा; अतिशयितता; बेसुमारपणा. -वि अतिशय; पराकाष्टेचा; बेसुमार; अमर्याद; निःस्सीम. [फा. बी + हद्द] ॰हया, हय्या-वि. उद्धट; निर्लज्ज; बेशरम; निलाजरा. [फा.] ॰हाल- पु. दुर्दशा. -वि.दुर्दशाग्रस्त; दुःखार्त. 'चिमट्यानें मांस तोडून बेहाल करून मारिला.'-जोरा ८५. [फा. बी + हाल्] ॰हिक्मत- स्त्री. मुर्खपणा. [हिं.] ॰हिम्मत-ती-स्त्री. भ्याडपणा. [हिं.] वि. हतधैर्य; भ्याड; भित्रा. ॰हिसा(शे)ब-वि. १ अयोग्य; गैरविचाराचें; अनुचित. २ अगणित; हिशोबाबाहेरील; हिशोब करतां येणार नाहीं असें. [फा.] ॰हुकूमी-स्त्री. अवज्ञा; बंडखोरी. ॰हुजूर-क्रिवि. १ एखाद्याच्या गैरहजेरीत. २ (चुकीनें) एखा- द्याच्या समक्ष. [फा.] ॰हुर्म(रम)त-ती-स्त्री. अप्रतिष्ठा; मान- खंडना; अपमान; अकीर्ति. -वि. मानखंडीत; पत घालवून बसलेला; मान नाहींसा झालेला. [फा.] ॰हुशार-वि. गाफील; गैरसावच. ॰हुशारी-स्त्री. बेसावधपणा; गाफिलगिरी. [फा.] ॰होश-ष- वि. बेशुद्ध; धुंद; तर्र; गाफील; मुर्ख; विचारशक्ति नाहींशी झालेला. [फा. बीहोश्] ॰होशी-स्त्री. बेशुद्धी.

दाते शब्दकोश

रांड

स्त्री. १ (निंदार्थी) विधवा. २ दासी; कलावंतीण; वेश्या. ३ (तिरस्कार, राग किंवा अनाथ स्थिति दाखवावयाची असतां) स्त्रीजात; बायको. 'तुझी रांड रंडकी झाली.' -नामना १२. ४ (निरुद्योगीपणा, नवरा मेलेल्या स्त्रीच्या स्थिती- प्रमाणें) बिघडलेली, अतिशय खलावलेली स्थिति; दुर्दशा. 'यंदा शोतों चांगलीं आलीं होती पण आंत पाणी शिरून अवधी रांड झाली.' ५ (निंदेनें) भित्रा, नीच, नामर्द मनुष्य; युद्धांतून पळून जाणारा सौनिक. 'म्यां न वधावें पळतां चाला मारूनि काय रांडा या ।' -मोकर्ण ३५.६०.[सं. रंडा] म्ह॰ रांडेच्या लग्नाला छत्तीस विघ्नें. (वाप्र.) रांडेवा-वि. १ बेकायदेशीर संबंधापासून झालेला. २ (ग्राम्य.) पादपूरणार्थक किंवा उद्गारवाचक शब्द. ३ एक ग्राम्य शिवी. रांडेचा, रांडचा मारलेला-वि. स्त्रीवश; स्त्रीलंपट रांडे(डि)च्यानो-उद्गा॰ (बायकी) रखेली पासून झालेल्या मुलांना उद्देशून बोललेल्या शब्दावरून पुष्कळदा आश्वर्य व्यक्त करण्याकरितां पण क्वचित् निर्थकपणें निघणारा उद्गार. रांडवोचून पाणी पीत नाहीं-आपल्या बायकोला एखादा कठोर शब्द बोलल्यावांचून तो पाण्याचा थेंब सुद्धां पीत नाहीं (सतत शिव्या देणार्‍या नवर्‍यासंबंधीं म्हणतात). रांडेहून रांड- वि. बुळा; अतिशय बायक्या (मनुष्य). सामाशब्द- ॰अंमल-पु. १ स्त्रीराज्य. २ नेभळा, अयशस्वी कारभार. ॰काम-न. १ बायकोचें काम; गृहकृत्य. २ विधवेचें काम; बाहेरील आडकाम किंवा रानांतील गवत कापणें व सर्पण गोळा करणें इ॰ काम. ॰कार- भार-पु. १ बायकी कारभार. २ स्त्रियांचा कारभार; स्त्रियांचीं कृत्यें. ३ (निंदेनें) भिकार, मूर्खपणाचीं कृत्यें; दुबळीं कृत्यें. ॰खळी-वि. (गो.) विधवा झालेली. खांड-स्त्री. स्त्रियांस लाववयाचा रांड, बाजारबसवी, बटीक इ॰ अर्थाचा अभद्र शब्द, शिवी. 'मी त्याची कांहीं गोष्ट बोलिलें नसतां उगीच मेला मला रांडखांड म्हणतो.' [रांड द्धि.] ॰गळा-पु. १ टिपेचा सूर; तृतीय सवन. २ बायकी आवाज. [रांड] ॰गांठ-स्त्री. विशिष्ट आका- राची गांठ; ढिली गांठ. बाईलगांठ पहा. याच्या उलट पुरुषगांठ. ॰गाणें-गार्‍हाणें-न. पिरपिर; बायकी कुरकूर; बायकी विनंति; रडगाणें. (क्रि॰ गाणे; सांगणें). रांडगो-पु. (गो.) वेश्येचा मुलगा, किंवा विधवेस अनीतीच्या मार्गानें झालेला मुलगा. ॰चाल-स्त्री. भित्रेपणा; नामर्दपणा; बायकीपणा. ॰छंद-पु. रंडीबाजीचा नाद; रांडेचें व्यसन. ॰छंदी-वि. रंडीबाजीची संवय लागलेला; रांडगा. ॰तगादा-पु. (कुण.) (सार्‍याच्या किंवा कर्जाच्या) पैशाची (पिठ्या शिपायानें नव्हे) कुळाकडे सौम्य रीतीनें केलेली मागणी. ह्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यास आपणास मुखत्यारी आहे असें कुणबी मानतो. बडग्याच्या विनंतीशिवाय दुसर्‍या कोणत्याहि विनंतीस दाद न देण्याबद्दल हा वर्ग कित्येक पिढ्या प्रसिद्ध आहे. कुणबी पहा. ॰पण-न. १ (कों.) वैधव्य. २ नाश; नादानपणा. 'कां घेतां रांडपण ठरून भाऊ नाना ।' -ऐपो ११६. ॰पाटा-पु. वैधव्य. (क्रि॰ भोगणें; येणें; मिळणें; प्राप्त होणें; कपाळीं येणें). [रांड + पट्ट] ॰पिसा-वि. रांडवेडा; अतिशय रांडछंदी; रंडीबाज; बाईलवेडा; स्त्रैण. ॰पिसें-न. रांड- वेड; रांडेचा नाद. ॰पोर-न. १ (व्यापक) बायकामुलांसह एखाद्या ठिकाणचे सर्व रहिवासी; गांवांतल्या बायकोपारांसुद्धां सर्व लोक. 'आज कथेला झाडून रांडपोर आलें होतें.' २ एखा- द्याच्या पदरीं असलेलें. बायको, मुलें इ॰ कुटुंब, खटलें. ३ रंडकीचें मूल. ४ दासीपुत्र; वेश्यासुत. [रांड + पोर] रांडपोर- कीं राजपोर-रंडकीचा मुलगा किंवा राजाचा मुलगा हे दोघेहि- अनियंत्रित व अशिक्षित असतात; दोघेहि बेबंद व निर्धास्त असतात. ॰पोरें-नअव. घर, गांव, देश यांतील मुख्य कर्त्या पुरुषाहून इतर बायका, मुलें इ॰ सर्व माणसें. ॰बाज-वि. रंडीबाज; बाहेरख्याली. [हिं.] ॰बाजी-स्त्री. बाहेख्याली- पणा; रंडीबाजी. [हिं.] ॰बायल-स्त्री. (गो.) विधवा स्त्री. ॰बेटा-पु. रांडलेक. 'तुका म्हणे कोरान्न रांड । बेटा भांड मागेना कां ।' -तुगा २९८३. ॰बोडकी-स्त्री. विधवा स्त्री. 'त्या रांडबोडकीनें लन्न जुळलन् ।' -मोर ११. ॰भांड-स्त्री. (निंदार्थीं) रंडकी; बाजारबसवी; बटीक. [रांड द्वि.] ॰भांडण- न. १ बायकांचें भांडण. २ (ल.) बिन फायदेशीर, निरर्थक गोष्ट. ॰भाषण-न. बायकी, नामर्द, दीनवाणें भाषण. ॰मस्ती- स्त्री. १ पतिमरणानंतर विधवेस येणारा लठ्ठपणा व जोम. २ (ल.) नियंता न हींसा झाल्याबरोबर एखाद्या माणसास येणारी टवटवी; चपळाई, धिटाई. ॰माणूस-न. १ (दुर्बलत्व दाखवावचें असतां) स्त्री; स्त्रीजाति; स्त्रीमात्र. २ (तिरस्कारार्थीं) बुळा, निर्जीव, बायक्या मनुष्य; भित्रा मनुष्य. [रांड + माणूस] ॰मामी- स्त्री. (करुणेनें) विधवा स्त्री. ॰मांस-न. (निदार्थीं) पतीच्या मृत्यू- नंतर विधवा स्त्रियांस एकटें राहतां आल्यामुळें व मोकळेपणा मिळाल्यामुळें कधीं कधीं येणारा लठ्ठपणा. (क्रि॰. चढणें; येणें). [रांड + मांस] ॰मुंड-स्त्री. १ केशवपन केलेली, अनाथ न अनु- कंप्य अशी विधवा. २ (शिवी) रांड; बोडकी; अकेशा थेरडी; विधवा. [रांड + मुंड] ॰रळी-स्त्री. विधवा किंवा विधवेसा- रखी; (व्यापक.) विधवा. 'रांडरळी म्हणती हा मेला बरें झालें' [रांड + रळी] ॰रागोळी-स्त्री. (व्यपक.) रंडीबाजी व बदफैली. [रांडद्वि.] ॰रांडोळी-स्त्री. १ विधवा किंवा तिच्या सारखी स्त्री. रांडरळी पहा. २ शिंदळकी. ३ बायकांशीं संगत ठेवणें; रंडीबाजी. ॰रूं-न. विधवा स्त्री. ॰रोट-रोटा-पु. आपल्या मरणानंतर बायको विधवा होईल यासाठीं लग्नाच्या वेळीं नवर्‍यानें तिच्या तर्तुदीकरितां दिलेलें वेतन; बाइलवांटा; रांडरोट्याची चाल मुख्यत्वें गुजराथेंत आहे. [हिं.] ॰रोटी-स्त्री. लढाईंत पडलेल्या किंवा सरकारकामी आलेल्या माणसाच्या बायकोस निर्वाहाकरितां दिलेली जमीन इ॰. [हिं.] ॰लें(ल्यों)क-पुन. १ रंडापुत्र; विधवेचा मुलगा; एक शिवी. 'काय केलें रांडलेंका । तुला राजी नाहीं तुका ।' २ (व.) मेलें या शब्दाप्रमाणें वाक्याच्या आरंभीं किंवा मध्यें निरर्थक योजतात. 'आम्हास नाहीं रांडलेक असं येत !' ॰वडा-पु. सर्व बायकामाणसें; घरांत सत्ताधारी पुरुष नसल्यामुळें होणारें स्त्रियांचें प्राधान्य. २ बाजारबसवी, रांड, बटीक इ॰ शब्दप्रचुर शिच्या; शिवीगाळ; गालिप्रदान. (क्रि॰ गाणें; गाजविणें; ऊठविणें) 'किती रांडवडे । घालुनि व्हालरे बापुडे ।' -तुगार २ ७४६. [रांड + वाडा] ॰वळा-पु. स्त्रियांच्या कडाक्याच्या भांडणांतील शिवी; रंडकी; रांड, भटकी, बाजारबसवी इ॰ शिव्यांची माळता. (क्रि॰ गाणें; वाजवणें). [रांड + आवलि] ॰वांटा-पु. वैधव्य. ॰वांटा कपाळीं येणें-विधवा होणें. ॰वाडा-पु. कुंटणखाना; वेश्यांची आळी. ॰व्यसन-न. रांडेचा नाद, छंद. ॰व्यसनी-वि. रांडबाज. ॰सांड-स्त्री. विधवा. [रांड + सांडणें किंवा रांड द्वि.] ॰सांध-स्त्री. विधवेचा कोपरा. [रांड + संधि] ॰सांधीस बसणें-घरांत उदास होऊन बसणें (रागानें एखा- द्यास म्हणतात). रांडक-वि. (कों.) विधवा झालेली. 'सडा मफलीस व रांडक बायको व भिकारी बैरागी हे निमदस्ती.' [रांड] रांडका-पु. विधुर; ज्याची बायको मेली आहे असा पुरुष. [रांड] रांडकी-स्त्री. विधवा. (तिरस्कार दया दाखवितांना). [रांड] रांडगा-वि. (राजा. तंजा.) रंडीबाज. २ -पु. (बे.) महार जातीचा बलुतेदार. याला वतन इनाम जमीन असते. याचा हक्क कर्णाटकांतील लक्ष्मीच्या जत्रेंत रेडा मारण्याचा असतो. हल्लीं ह्या शब्दास अपभ्रष्टता येऊन तो शिवीदाखल योजिला जातो. रांडरूं-न. (तिरस्कारानें) विधवा स्त्री. [रांड] रांडव-वि. १ रंडकी झालेली; विधवा (स्त्री). २ बायकोच्या मरणानें उघडा झालेला; मृतपत्नीक; विधुर. [रांड] रांडवणें-अक्रि. विधवा होणें; रांडावणें पहा. [रांड] रांडवा-स्त्री. विधवा स्त्री. 'रांडवा केलें काजळ कुंकूं ।' -एभा ११.९६६. रांडा पोरों-नअव. १ कुटुंबांतील कनिष्ठ दर्जाचीं माणसें (बायका, मुलें व कुणबिणी). २ समाजांतील हलक्या दर्जाचे लोक. ॰रोटा-पु. विधवांनीं करा- वयाचें सामान्य आडकाम. (दळण, कांडण, मोल मजुरी इ॰). रांडाव-वि. (गो.) विधवा. रांडावणें-अक्रि. १ विधवा- पणाच्या केविलवाण्या स्थितीस प्राप्त होणें. २ (ल.) फिसकटणें; मोडावणें; नासणें; बिघडणें; भंग पावणें (व्यापार, मसलत, काम) (विशेषत: या लाक्षणिक अर्थानेंच हा शब्द योजतात). 'त्याणीं मागें संसार चांगला थाटला होता पण थोरला भाऊ मेल्यापासून रांडावला.' [रांड] रांडावा-स्त्री. (माण.) बालविधवा; बाल- रांड. रांडरांड-स्त्री. १ रंडक्यांतली रंडकी; अतिशय अनाथ व असहाय रंडकी. २ (ल.) नामर्द, बुळा, अपात्र, नालायक, मनुष्य. ३ पराकाष्ठेचा अनाथ किंवा निराधार मनुष्य. रांडुल-स्त्री. (गो.) (अनीतीच्या मार्गानें) विधवेस झालेला मुलगी. रांडूल- स्त्री. (कों.) विधवा स्त्रीला उपहासानें म्हणतात. रांडे-उद्गा. एक शिवी. 'भांडे तृष्णेसीं द्विज भारार्त, म्हणे यथेष्ट घे रांडे !' -मोअश्व ६.७५. [रांड, संबोधन] रांडचा-वि. रांडलेक. -उद्गा. आश्वर्यवाचक उद्गार. 'अग रांडेचें ! पांच वर्षांचें पोर पहा किंग कशी पोथी वाचतो.' रांडेचा आजार-पु. गर्मी. रांडेच्या- उद्गा. (प्रेमळ) एक शिवी. 'आहा रांडेच्या !...' -देप ६२. रांडोळी-स्त्री. १ (करुणेनें, तिरस्कारानें) विधवा स्त्री. २ विधवे- प्रमाणें वागवणूक. ३ कुचाळी, थट्टा. 'करितां गोपिकांसी रांडोळी ।' -एभा ६.३६५. ४ मारामारी; कत्तल. 'निकरा जाईल रांडोळी ।' -एरुस्व ६.९. ५ क्रीडा. ६ नाश. 'कीं भीष्मदेवें चरणातळीं ।' केली कामाची रांडोळी ।' -जै २४.७ [रांड] रांड्या, रांड्या राऊजी, रांड्या राघोजी-वि. १ रंडीबाज; रांडव्यसनी; रांडछंदी. २ बायक्या; बाइल्या; नामर्द. ३ बाईलवेडा. ४ रांड्याराघोबा, रांड्यारावजी, बायकांत बसून किंवा त्यांजबरो- बर फिरून गप्पा मारण्यांत आनंद मानणारा (मनुष्य); गप्पीदास; चुलमावसा. म्ह॰ रांड्या रावजी आणि बोडक्या भावजी. [रांड] रांढरुं, रांढूं-न. (तिरस्कारार्थीं) विधवा स्त्री. रांडरू पहा. [रांड]

दाते शब्दकोश

रान

न. १ जंगल; वन; विशेषत: जंगलांतील खुजा, ठेंगण्या झाडाझुडपांचा समुदाय. २ तळवट; माळ; रुक्ष प्रदेश; नापीक व निर्जन प्रदेश. ३ मनुष्यास उपभोग्य असा भाजी-पाला इ॰ कांहून भिन्न असें तण, गवत, उपद्रवी-निरुपयोगी वनस्पती इ॰ 'भाजीचे वाफ्यांत कोठें कोठें रान रुजलें आहे तें उपटून टाक.' ४ शेतांत उगवणारें गवत; तन. ५ शेत. ६ झाडी; राई; बन; वृक्षवाटिका. 'बंदर किनार्‍यास सारें नारळींचें रान.' ७ देश; प्रदेश; भाग. 'मारवाडदेश म्हणजे उंटाचें रान.' 'त्या रानचे मनुष्यास हें रान मानत नाहीं.' ८ विदेश; परका मुलुख. 'परस्परें या रानांतील उमराव व रजवाडे यांस पत्रें देऊन तुमची कुमक करवितों.' -भाव १३. ९ (ल.) फार मोठी वाढलेली हजामत. प्रदेश ह्या सामान्य अर्थी रान शब्दा- पूर्वीं विशेषणात्मक शब्द जोडल्यानें त्याचा विशेष अर्थ होतो; उदा॰ डोंगररान; खडकरान; धोंडेरान किंवा गोटेरान; वनजररान गवतरान; माळरान इ॰ तसेंच काळें रान, पांढरें रान, चिक्कणरान काळया-पांढर्‍या-चिक्कण मातीचा प्रदेश. नवें रान = पूर्वीं जंगल किंवा माळ असून नुकतीच लागवडीस आणलेली जमीन [सं. अरण्य; प्रा. रण्ण] म्ह॰ (गो.) रान झालें लागीं घरां जाली पैस = म्हातारपण प्राप्त होणें, मरण जवळ येणें या अर्थीं. (वाप्र.) ॰उठणें-लोक खवळणें; क्रुद्ध होणें. 'म्युनिसिपल इमारतीवर संयुक्त निशाण लावण्याचा ठराव हुजूरपक्षानें फेटाळला त्यामुळें शहरांतील रान उठलें होतें.' -के २२.७.३०. ॰उठविणें- जागाविणें-पारधीकरितां धडधड आवाज करून सावजांना जागें करणें. झाडींतून पारध, सावज बाहेर हुसकणें. 'रान उठविल्या- शिवाय, जागविल्याशिवाय शिकार कशी सापडेल ?' ॰काढणें- १ जंगल-जमीन लागवडीस आणणें. २ झाडें झोडपून व ओर- डून ओडडून शिकार उठवणें. ३ रानाचा, जंगलाचा शोप लावणें. ॰खवळणें-१ एखाद्यावर खवळणें; उठणें (रान, श्वापदें). २ अतिशय क्षुब्ध होणें, (राग, भूक, लोभ, काम इ॰ कानीं). 'लवकर जेवायला वाढा, आज इकडे रान फार खवळलें आहे.' ॰घेणें-१ रानांत पळून जाणें (गुरांनीं). २ (ल.) वेढंग मार्गाचा स्वीकार करणें; बारगळणें. ३ रानांत शिरणें पहा. ॰बदलणें- सोडणें-पारखें होणें-(ल.) आपलें मन किंवा उद्देश बद- लणें; एखाद्यासंबंधीचा आपला विचार फिरविणें; आपला पूर्वींचा मुद्दा सोडून देणें. ॰भारणें-१ सर्व प्रदेशावर जादू पसरणें; मंत्र टाकणें. 'तमाम गारोडी रान भारतो तसा प्रकार त्यानें केला.' -भाव २४. २ (ल.) यथास्थित पैसे चारणें. ॰मानणें-त्या देशाची हवा इ॰ प्रकृतीस मानवणें, पसंत पडणें. 'कोंकणच्या माणसास हें रान मानवत नाहीं.' ॰हांकणें- (शिकार उठविण्याकरितां) झाडें झोडपणें व आरडाओरड करणें. रानांत, आडरानांत पडणें-एकटें सापडणें; उदास होणें. रानांत शिरणें-(ल.) (संभाषणप्रसंगीं) सरळ मार्ग सोडून अयोग्य गोष्ठी सांगत बसणें; विषयांतर करणें; बहकणें. रानीं रिघणें-अरण्य सोविणें. 'ब्रह्म- सुकाळु लाघला ते ही । जे रानीं रिगाले ।' -ऋ १६. रिकाम्या रानीं-क्रिवि. बेफायदेशीर; व्यर्थ; निरर्थक; फुकट; (बोलणें, चालणें). 'आतां एथें काम नाहीं काज नाहीं. रिकाम्यारानीं कशाला बसावें, रहावें, फिरावें इ॰.' रान या शब्दापुढें पक्षी, पशु व वनस्पति यांचीं नांवें जोडून रानटी किंवा व माणसाळलेला, न लागवड केलेला या अर्थीं बरेच समास होतात. जसें.-रानडुक्कर; रान- मांजर; रानकेळ; रानउडीद; रानतूर; रानपडवळ; रानमटकी; रान- मसूर; रानमाठ; रानमूग इ॰. तसेंच रावआंबा-केळी-कोंबडा-जेवण. या व यासारख्या दुसर्‍या अनेक सामासिक शब्दांत /?/ ह्याचा रानांत राहणारा किंवा होणारा असा अर्थ होतो; कांहीं विशिष्ट सामाशब्द- ॰आंबा-पु. वृक्षविशेष. ॰आलें-न. रानांत होणारें आलें. ॰आळू-न. तेरें अळूं. हें पर्जन्यकाळीं उगवतें; याचा रंग पाढरा, हें फार थंड आहे याची भाजी चागली होते. ॰कट- वि. खेडवळ; गांवढळ; वनांतील (मनुष्य, पशु). [रान] ॰कंद-पु. एक कंद. ॰करी-पु. रान्या; गवत, ताकूडफाटा इ॰ आणण्याकरितां रानांतच फिरणारा माणूस. ॰काढ्या-वि. शिकार कर- ण्यासाठीं रान काढण्याकरिता लावलेला (मनुष्य); पारध्याकरितां सावज कचाटयांत आणणारा. ॰कांदळ-न. एक वन्य वृक्ष. ॰कापशी-स्त्री. रानांतील कापशीचें झाड; देवकापशी, देवपळ्ही- हून भिन्न व पिळ्हेशीं जुळणारी. हिचें बीं लहान व वाटोळें असून देवकापशीचें मोठें व लांबट असतें. ॰कापूस-पु. रानकापशीचा कापूस. ॰कोवळा-पु. कावळ्याच्या जातींतील जंगली पक्षी. ॰केळ-ळी-स्त्री. केळीची जंगली जात. हिच्या पानावर जेवतात. कांदा उकडून किंवा वाळवून त्याचें पीठ करून खातात; कवदर व ही एकच. कवदर पहा. ॰कौबडा-डी-डें-पुस्त्रीन. जंगली कोंबडा. ॰खरडा-पु. जंगलखरडा पहा. ॰गट-वि. १ खेडवळ; गांवढळ. २ वन्य; लागवडीशिवाय उगवणारा. [रान] ॰गांजा-ज्या-पु. एक औषधी मूळ; सालवण. याचीं पानें बेलाप्रमाणें त्रिदळ असून यास निरनिराळया रंगाचीं फुलें येतात. याचें मूळ सर्व प्रकारचे तापा- वर गुणकारी आहे. ॰गाय-स्त्री. तार्तरी देशांतील गाय; वनगाय. ॰गोवरी-स्त्री. जंगलांत सांपडणारें इतस्तत: पडलेलें शेण, शेणी. याच्या उलट शेण थापटून लावलेली गोवरी. ॰घेवडा-पु. एक वेल. ॰घोळ-स्त्री. घोळ नामक भाजीचा एक प्रकार. हिचें पान रंगानें तांबूस चरबट असतें. ॰चा राजा-पु. भील किंवा कात- करी. ॰चिमणी-स्त्री. १ चिमणीसारखा एक लहान पक्षी. २ जांभळीं व पांढरीं फुलें येणारें एक झाड. ॰जाई-स्त्री. उंच वाढ- णारें वेलासारखें झुडुप. ॰जेवण-न. वनभोजन; रानात किंवा झाडाखालीं केलेलें जेवण. रानट, रानक(ग ट-वि. १ रानांत राहणारा; रानटी; अज्ञानी. 'होतां तापत्रयार्त त्वरित भववनीं रक्षितां रानटाचा ।' -केका १२२. २ आडगांवीं राहणारा; शहर, कचेरी, गरबार इ॰ ठिकाणीं न जाणारा; अडाणी (मनुष्य). ३ जींत भात, गहूं इ॰न येतां गवत फार उगवतें अशी जमीन. ॰टाकळी-स्त्री. टाकळीची एक जात. रानटी-ठी-वि. १ रानासंबंधीं; आपो- आप उगवणारा. २ गांवढळ; खेडवळ; रीतभात नसलेला. [रान] ॰टोणगा-पु. जंगली टोणगा; रेडा. ॰टोळ-पु. टोळाची एक जात. ॰डुक(क्क)र-पुन. भुइमूग, ऊंस, भात इ॰ पिकांचा फन्ना उडविणारें रानटी जनावर. ॰तरवड-पु. तरवडाची एक जात. ॰तीळ-पु. काळा तीळ पहा. ॰तुळस-स्त्री. एक वनस्पति; वैज- यंती, ही तुळशीसारखीच असते. पानें मात्र मोठीं असतात. हिला मंजिर्‍या येतात. बीं काळें, किंचित् तांबूस व खसखशीएवढें असून पाण्यांत घातलें असतां फुगतें. हें तुकुमराई (सबजाचें बीं) प्रमाणें असतें. यासहि तुकुमराई म्हणतात. ॰र-स्त्री. एक लहान पिवळ्या फुलांचें झुडुप. ॰तेरडा-पु. तेरड्याची एक जंगली जात. ॰दांडगा- वि. आडदांड; रानटी; धिप्पाड; राक्षसी काम करणारा. ॰दांडगे- पुअव. सर्व तर्‍हेचीं शस्त्रें घेऊन शत्रूचा किंवा लुटारू घाडीचा प्रति- कार करण्याकरितां जाणारा शेतकरी किंवा खेड्यांतील लोकांचा समुदाय. ॰निंबू-न. राननिंबोणीचें फळ. निंबोणी-निंबूण- स्त्री. एक मोठें कोटेरी झाड. ॰निवडुंग-पुन. जंगली निवडुंग. ॰पासरा-पु. दुकानदारीची झिंबड. ॰पाळ-वि. नापीक; भुकिस्त; बरड; माळवजा (भातजमीन). ॰पिंपळ-पु. पारोसा पिंपळ; एक झाड. ॰बाजरी-स्त्री. गवतासारखी वनस्पति. ॰भरी-क्रिवि. रानोमाळ. 'रानभरी झाले साधारण ।' -एभा २३.३१६. ॰भरी- भरू-वि. १ भयभीत; घाबरलेला; पलायमान; परागंदा (पशु, मनुष्य). 'महा वारण जे उन्मत्त । दैत्यें सोडिले तयावरते । तमास प्रल्हाद सिंह दिसत । मग ते होत रानभरी ।' २ (ल.) चैनीकरितां इतस्तत: भटकण्याच्या हेतूनें ज्यानें आपली बायका- पोरें सोडली आहेत असा. [रान + भरणें] ॰भरू होणें-१ रस्ता चुकणें; आडरस्त्यास जाणें. २ गोंधळणें; घाबरणें; घाबरें होणें. ॰भाजी-स्त्री. १ लागवडीशिवाय उगविणारी भाजी. २ वनांत होणारी खाद्य वनस्पति. ॰मटकी-स्त्री. रानांत होणारी मटकी, मठ. ॰मसूर-स्त्री. एक जंगली झाड; हीं झाडें महाबळेश्वराकडे पुष्कळ होतात; ह्यांचें बीं मसुरासारखें असतें. ॰माजर-पुन. जंगली मांजर; मोठा व धाकटा असे याचे दोन मेद आहेत. ॰माणुस- न. १ एक प्रकारचा वानर. २ (ल.) रानटी; खेडवळ माणूस. ॰मूग-पु. रानात होणर्‍या मुगाची जात. ॰मोगरा-पु. अरुंद पानाची जाई. ॰म्हैस-स्त्री. जंगली म्हैस. ॰रावताण-णी- नस्त्री. रावताण पहा. ॰वट-स्त्री. मोठ्या रस्त्यापासून फुटलेली रानास जावयाची वाट 'पुढच्या आंब्याजवळ वाट उजवी फुटली आहे ती रानवट आहे.' -वि. १ जंगली; लागवड न केलेली व साफ न केलेली (जमीन). २ खेडवळ; गांवढळ; रानटी (मनुष्य). ३ वन्य आपोआप उगवणारा (वृक्ष, वन- स्पती). ॰वत-न. (राजा.) वन्य वृक्षांचें पान; ज्यांचीं पानें सामान्यत: भोजनाकरितां, पुड्याकरितां उपयोगी पडत नाहींत अशा झाडाचें पान. [रान + पत्र] ॰वन-न. (व्यापक) रान; जंगली प्रदेश; रानांच फिरणें, वन्य पदार्थांवर उपजीविका करणें किंवा निर्वाहाकरितां वन्य पदार्थ शोधणें. (क्रि॰ करणें; पाहणें; फिरणें; हिंडणें). 'रानवन मला व्हाव्याचें-किंवा भी करीत असतों.' [रान + वन] रानवा-पु. लागवडीस न आणलेली पडीत जमीन; जंगल; रान. 'गांवाला रानवा असल्यावांचून तृणकाष्ठाची सोय होत नाहीं.' रानवाट-स्त्री. जंगली व रानवट प्रदेशाकडे जाणारी वाट. ॰वाळूक-न. (थट्टेनें, ल.) दगड. ॰वाळूक चारणें-(ल.) दगड मारणें. ॰शकट्ट-पु. एका जातीचें श्वापद. 'रानशकट्ट आणी रीसें ।' -दा ३.७.९. ॰शेकट-पु. रानशेवगा पहा. ॰शेण-शेणी-गवरी-स्त्री. १ रानांत पडलेलें गाई-म्हशीचें वाळलेलें शेण, याच्या उलट वळशेण. २ जेव्हां एखाद्या मनुष्याचें ज्ञान, समज, सामर्थ्य किंवा संपत्ति यासंबंधीं पूर्णपणें निषेध दाख वाववाचा असतो तेव्हां उपमानाप्रमाणें योजलेल्या (शेण, गोवर्‍या, माती, धूळ, दगड, धोंडा, राख इ॰) शब्दापैकीं हा एक शब्द आहे. उदा॰ त्याला रानशेणीचें पीठ समजतें ? = त्याला काय समजतें ? ॰शेर-पु. एक वनस्पति; हुरा. ॰शेवगा-पु. एक झाड. सामा- न्यत: रानेशर. ॰सठ(ट)वी-स्त्री. सठवीचें रूप धारण करणार्‍या देवीचें किंवा दुर्गेंचें नांव. 'उच्छिष्टचांडाळी रानसटवी जखणी ।' -ह १३.६८. ॰सावज-न. रानांतील जंगली पशु. 'कीं रानींचें रानसावज उन्मत्त ।' -नव २२.१३१. ॰सिवार-न. शिवारां- तील जंगल. 'गांवचें रानसिवार खोताची सत्ता आहे.' -मसाप २.५९. ॰सोडवण-स्त्री. रान तोडून साफ केल्याबद्दलची जकात. -अस्पृ ३८. ॰सो(व)र-सोरु-पु. रानटुक्कर. 'रानसोवर बळकट ।' -कालिका २२.१९.[रान सूकर-सूअर-वर] ॰हळद- दी-स्त्री. एक वनस्पति. ॰हुरा-पु. सामान्यत: रानशेर. राना- वळी-स्त्री. एक लहान फुलझाड. हिचा औषधांत उपयोग करतात. रानी-परज-स्त्री. सुरतपासून नवापूरपर्यंत राहणारे रानटी लोक. रानोमाळ-क्रिवि. १ रानांत आणि माळांत. २ तजावजा; अव्यवस्थित; अस्ताव्यस्त रीतीन; पांगून. 'तैसे ब्राह्मण रानो- माळ । भयें करूनि फळतात ।' ३ (ल.) पसरल्यासारखें; इकडे तिकडे अस्ताव्यस्त फेकल्यासारखें. 'वार्‍यानें पोथीचीं पत्रें रानो- माळ झाली.' [रान + माळ] रानोरान-क्रिवि. रानांतून आणि वनांतून; दरीखोर्‍यांतून; सर्व देशभर. 'माझी गाय चुकली म्हणून मी रानोरान फिरलों' [रान द्वि.] रान्या-वि. रानावनां तील; खेडवळ; गांवढळ; रानकरी; रानट. [रान]

दाते शब्दकोश

पाणी

न. १ उदक; जीवन; जल; सलिल. 'पाणियां छाय दुनावली । परिमळाचि ।' -शिशु ६२८. 'चोखे पाणिया न्हाली ।' -वसा २५. २ पाऊस; पर्जन्य. ३ हत्यारें भट्टींत तापवून नंतर तीं पाण्यांत बुडवून त्यांच्या आंगीं आणिलेली दृढता. (क्रि॰ देणें; चढविणें; उतरणें). ४ (ल. एखाद्याच्या अंगांतील) धमक; अवसान; वीर्य; शक्ति; तेज. 'आलें न रजपुतांचें परि यवनां सर्व हरवितां पाणी ।' -विक ६८. ५ (मोत्यें, रत्न, हिरा इ॰कांचें) तेज; कांति; झकाकी. 'नाना मुक्ताफळांचें पाणी ।' -दा १६.४.१६. ६ चेहऱ्यावरील टवटवी; कांति; तजेला. ७ धातूंचें भांडें इ॰कांस सोनें, चांदी इ॰कांचा देतात तो मुलामा; झिलई. ८ शस्त्र इ॰ घासून त्याच्या धारेस आणलेली तीक्ष्णता; कडकपणा.(क्रि॰ देणें; पाजणें). 'नाना शस्त्रांमधें पाणी ।' -दा १६.४.१६. ९ अब्रू; लौकिक, कीर्त्ति. (क्रि॰ जाणें; उतरणें; चढणें). १० (राग, गाणें इ॰कांची) नीरसता; रुक्षपणा; रसहीनता. ११ (डोळ्यांतील) चमक; तेज. १२ अश्रू. 'दुर्गा देवीच्या डोळ्यांतून पाणी येऊं लागलें.' -विवि ८.३.४९. पाणी याचें समासांत पूर्वपदीं 'पाण' असें रूप होऊन अनेक सामासिक शब्द होतात. उदा॰ पाणकोंबडा, पाणघोडा, पाणलोट इ॰ सामासिक शब्द पहा. [सं. पानीय; प्रा. पाणिअ; गुज. पाणी; हिं. पानी; फ्रें. जिप्सि. पनी; पोर्तु जिप्सी. पानी] (वाप्र.) ॰उतरणें-१ पराभूत, पराजित होणें. 'पाणिपतच्या लढाईनंतर मराठ्यांचें पाणी उतरल्या- नंतर निजमास संधी सांपडली.' -विवि ८.६.१०९. २ अब्रू जाणें; अपकीर्ति होणें. 'ज्या स्नेहानें पाणी उतरतें, तो स्नेह रुपयें पाण्यांत टाकून राखावा, त्यापेक्षां रुपये राखावे हें फार चांगलें आहे.' -बाळ २.३. ३ (डोळे इ॰कांतील) तेज, चमक, कमी होणें. 'तिच्या सतेज डोळ्यांचें पाणी उतरूं लागलें.' -पाव्ह ५४. ॰ओळखणें- जोखणें-(एखाद्याच्या अंगांतील) गुण, धमक, धैर्य, विद्वत्ता इ॰ कल्पनेनें ताडणें. (अंगाचें, रक्ताचें) ॰करणें-अतिशय खपणें; कष्ट करणें; फार मेहनतीनें (एखादें काम, कर्तव्य इ॰) करणें. म्ह॰ रक्ताचें पाणी हाडाचा मणी. ॰काढून टाकणें-सक्रि. (रसा.) (एखाद्या पदार्थांतील) द्रव, द्रवांश नाहींसा करणें, घालविणें. (इं.) डीहायड्रेट्. ॰कोंडणें-(सैन्य इ॰कांचें) पाणी बंद करणें; त्यास पिण्यास पाणी मिळूं न देणें. 'कडबा दाणा बंद कोंडिलें पाणी कहर वर्षला ।' -ऐपो २३६. ॰घालणें-१ (बायकी) (विटाळशी इ॰ स्त्रीस जेवतांना) पाणी वाढणें, देणें. २ (बायकी) (विटाळशीस, बाळंतिणीस स्नान घालून शुद्ध करून घेणें. ३ नाश करणें; खराबी- करणें; गमावून बसणें. 'ह्यानें आपल्या हातानें आपल्या रोजगारावर पाणी घातलें,' ४ (ल.) (एखाद्या गोष्टीच्या) अभिवृद्ध्यर्थ प्रयत्न करणें, जोपासनेबद्दल उपाय करणें. ५ (एखाद्या वस्तूवर) पाणी सोडणें; त्याग करणें. ६ (कों.) सर्पाचें विष उतरविण्यासाठीं सर्प चावलेल्या मनुष्यास मंत्रित पाणी पिण्यास देणें व अंगावर घालणें ७ वृक्ष इ॰कांच्या वाढीला जरूर तें पाणी त्यांच्या मुळांशीं ओतणें. ॰चढणें-महत्त्व प्राप्त होणें; वीरश्री, त्वेष संचरणें. 'थोरासंगें दुर्बळास पाणी चढे ।' -पला ४.१९. ॰छाटणें-कापणें-१ (पोहणारानें, बोटीनें आपल्या अंगच्या जोरानें) पाणी दुभंगलें पुढें सरणें. २ (पोहणाराच्या, नावेच्या) गतीमुळें पाणी दुभंगलें जाणें. ॰जाळणें-(ल.) करडा अंमल चालविणें; क्रूरपणाचीं कृत्यें करणें. ॰जोखणें-ओळखणें-(एखाद्याची) कर्तृत्वशक्ति, धमक, विद्वत्ता, पराक्रम इ॰ अजमावणें. ॰तावणें-(एखाद्याच्या नांवानें, नांवा- वर, नावांविषयी इ॰ शब्दांसह प्रयोग असल्यास-एखाद्याचें) मरण, अनिष्ट इच्छिणें. (शवदहनासाठीं नेतांना तें उचलण्यापूर्वी, पाणी तापवून त्यास स्नान घलितात त्यावरून हा अर्थ). ॰तुटणें-(पोहणाराच्या, नावेच्या गतीनें) पाणी दुभंगलें जाणें. 'पेनोवेणां दळ बहुतें मीनलें । वाटे पाणी तुटलें ।' -शिशु ५७८. ॰तुंबविणें-(धरण इ॰ बांधून) पाणी कोंडून धरणें. ॰तोडणें- पाणी छाटणें अर्थ १ पहा. ॰दाखविणें-(कर.) (शेतकऱ्यांत रूढ) (गुरांस) पाणी पाजून आणणें; पाण्यावर नेणें ॰देखील न घोटणें-(एखाद्याचे) प्राण कंठीं येणें; मरणासन्न होणें; पाणी घशाखालीं उतरण्याइतकाहि अवकाश, धीर नसणें. ॰देणें-१ पोलादाच्या अंगी नरमपणा, कडकपणा, चिवटपणा इ॰ निरनिराळे गुण आणण्यकरितां तें भिन्न भिन्न ठराविक प्रमाणांत तापवून पाण्यांत बुडविणें. या क्रियेचे कडक पाणी, नरम पाणी, जांभळें पाणी, पिवळें पाणी इ॰ निरनिराळे भेद आहेत. -ज्ञाको प ७४. 'पाणी देण्याच्या कृतीनें लोखंडांत फेरफार होतात.' पदाव १.१५५. २ शस्त्र इ॰कांस धार लावणें. ३ (मृताचा) श्राद्धविधि करून (त्याला) तिलांजलि देणें; (सामा.) तर्पण करणें. ॰देणें-सोडणें-१ (एखादी वस्तु इ॰) गमावून बसणें. २ सोडून देणें; आशा सोडणें; (वस्तू इ॰कांचा) उत्सर्ग करणें (एखाद्या वस्तूचें दान देतांना तीवर थोडेसें पाणी-आपला हक्क नाहींसा करण्याचें द्योतक म्हणून-सोडण्याचा प्रघात आहे त्यावरून हा अर्थ). (कर्माला 'वर' अथवा 'ला' हे प्रत्यय लावून प्रयोग). 'मागें एक पुढें एक । दोनी मिळुनि विठ्ठल देख । ऐसी होतांचि मिळणी दिलें संसारासि पाणी ।' -एकनाथ ॰पडणें-फुकट जाणें; निरुपयोगी होणें; खराब होणें; दर्जा, गुण, महत्त्व, उपयुक्तता इ॰ बाबतींत मागें पडणें; नाश पावणें. कर्म- स्थानीं असलेल्या शब्दास 'वर' हें शब्दयोगी अव्यय जोडून प्रयोग जसें:-रोजगारावर-पोटावर-संसारावर-कामावर-स्नेहावर-पाणी पडलें. 'त्या कार्यावर तर सर्वस्वीं पाणीच पडलें असतें .' -इंप ८. ॰पाजणें-१ (मृतास) तिलांजली देणें; प्रेतदहन होत असतांना प्रेताच्या कपाळमोक्षानंतर चितेभोवतीं सच्छिद्र मडक्यानें पाण्याची धार धरणें; श्राद्ध इ॰ करून तर्पण करणें. २ (ल.) (एखाद्यास) मरेमरेतों खूप मारणें, बडवणें. (१ ल्या अर्थावरून रूढ). ३ पराजित करणें; जिंकणें; चीत करणें. ॰पाणी करणें-१ तहानेनें 'पाणी द्या' 'पाणी द्या' असें म्हणत सुटणें; एकसारखें पाणी मागत राहणें. २ (एखादें जनावर मनुष्य इ॰कांस फार) राबवून, पादाडून बेदम करणें. ३ (अन्न, वस्त्र, पदार्थ इ॰कांची) पूर्णपणें नासाडी करणें. ॰पाणी होणें-१ पुनःपुन्हां पाणी पिण्याची प्रवृत्ति (मिष्ठान्न खाण्यानें, उन्हाच्या त्रासानें) होणें. २ (एखाद्या वस्तूचा) नाश, खराबी होणें. 'हे कठोर मांस झडून जाईल तर किंवा याचें पाणी पाणी होईल तर किती बहार होईल.' -विकार- विलसित ॰पिऊन भांडणें-वाद करणें-(ल.) नेटानें व जोराजोरानें, आवेशानें भांडणें. ॰फिरणें-(बडोदें) व्यर्थ, फुकट जाणें; पाणी पडणें पहा. 'सेनापतीच्या चातुर्यावर व सैनिकांच्या शौर्यावर पाणी फिरतें.' सेवामाहात्म्य १०. ॰भरणे-वाहणें- घालणें-(एखाद्याच्या घरीं विद्वत्ता, संपत्ति, विशिष्ट व्यक्ति इ॰कानीं) बटकीप्रमाणें राबणें; दास्य पत्करून राहणें; वश असणें (एखाद्याच्या घरीं या शब्दासह प्रयोग). 'रूपाचेनि आहे । ऐरावतु पाणि वाहे ।' -शिशु ५०८. 'उद्योगाच्या घरीं ऋद्धिसिद्धि पाणी भरी ।' ॰मरणें-१ (एखाद्याचें) धैर्य गळणें; गर्भगळित होणें; धाबें दणाणणें. २ एखाद्या गोष्टींत किंवा हिशेब, भाषण इ॰कांत) खोटेपणा, पोकळपणा, लबाडी इ॰ असणें. ॰मागूं न देणें-एकदम, तडाक्यासरशीं ठार करणें (मरतांना पाण्याकरितां मनुष्य तडफडतो, पाणी मागत असतो त्यावरून हा वाक्प्रचार). 'तुला मी बडविलें तर पाणी मांगू देणार नाहीं.' ॰मारणें- पाणी कापणें-छाटणें पहा. ॰मुरणें-१ (एखाद्याचें भाषण, वर्तन इ॰कांत कांहीं तरी संशयास्पद असा) कमीपणा, वैगुण्य, दोष, मर्मस्थान असणें. २ भिंत वगैरेंत पाणी जिरणें. ॰लागणें-१ वाईट पाणी पिण्यांत आल्यानें आजारी होणें; पाणी बाधणें. 'कैक जणाला पाणी लागलें मासोळी मागें खारी ।' -ऐपो ३५४. २ ज्याची संगति धरली असेल त्याचे किंवा जेथें कांहीं काळ रहिवास आला असेल त्या ठिकाणचे गुणदोष, ढंग अंगीं जडणें. (आंत) ॰शिरणें-(धंदा, रोजगार, काम इ॰कास) अवदशा; उतरती कळा येणें; नासाडी होणें; फसगत होणें; आंत बट्यांत येणें. ॰शोषून घेणें-(रसा.) (एखाद्या पदार्थांतील) द्रव रस शोषून घेणें; (इं.) डेलिक्विस्. ॰सारणें-(व.) आंघोळीसाठीं पाणी उपसणें. ॰सोडणें-१ (ब्राह्मणास दिलेल्या दानावर पाणी सोडलें म्हणजे दानाची सांगता होऊन त्यावरचें आपलें स्वामित्व नाहींसें होऊन ब्राह्मणाकडे जातें या धार्मिक कल्पनेवरून पुढील अर्थ) (एखादी वस्तु) स्वेच्छेनें कायमची देऊन टाकणें; (एखाद्या वस्तूचा) त्याग करणें. 'हे स्त्री नव्हे प्रतिष्ठा तुमची जरि ईस सोडितां पाणी ।' -मोविराट १.१०३. २ (ल.) (एखाद्या वस्तूची) आशा सोडणें, ती गेली असें समजून स्वस्थ बसणें. ३ (एखादी वस्तु, भावना इ॰) नाइलाजास्तव सोडण्यास, तिच्याकडे दुर्लक्ष कर- ण्यास, विसरून जाण्यास, नाश करावयास तयार व्हावें लागणें. 'परि त्याहीं आम्ही त्या प्रेमासि रणांत सोडिलें पाणी ।' -मोद्राण १७.९०. ॰होणें-(एखाद्या वस्तूची) खराबी, नाश होणें; नाहींसें होणें. 'त्या दुःखाचें तुमच्या दर्शनानें पाणीच होऊन गेलें.' -रत्न ५.२. पाण्याआधीं वळण बांधणें-नदी, ओढा इ॰कास पूर येण्यापूर्वींच पुराच्या पाण्याचा निकाल लाव- ण्याची व्यवस्था करणें. २ (ल.) भावी संकटाची उपाययोजना आधींच करून ठेवणें. 'पाण्याआधीं वळण बांधितां उत्तम. नाहीं तर शेणामेणाचे लोखंडाचे जालियावर पुढें भारी पडेल.' -भाव ८३. पाण्याचा कांटा मोडणें-अग्निसंयोगानें पाणी कोमट होणें, करणें (अतिशय थंड पाणी अंगावर घेतल्यास अंगावर कांटा उभा राहतो, किंवा तें अंगाला कांट्याप्रमाणें बोचतें ह्यावरून वरील अर्थ). पाण्यची गार गोठणें-पाणी गोठून बर्फ होणें. पाण्यांत घाम येणें-(एखाद्यानें) अतोनात संतापणें; रागानें अंगाचा भडका होणें. पाण्यांत घालणें-बुडविणें; नाश करणें; खराब करणें. 'संसार घातला पाण्यांत । स्वतें समस्त बुडविलें ।' पाण्यांत जाणें-व्यर्थ होणें; फुकट जाणें. 'नानाची मुत्सद्देगिरी सारी पाण्यांत जात असली तर ...' -नि. पाण्यांत दिसणें-(ल. एखादी व्यक्ति एखाद्याच्या) द्वेषास पात्र होणें, असणें.पाण्यांत पडल्यासारखें होणें-फजीत होणें; लाजिरवाणें होणें. 'मग देवाला लाज वाटली. पाण्यांत पडल्यासारखें झालें.' -नामना ६९. पाण्यांत पाहणें-(एखाद्याचा एखाद्यानें) अतिशय द्वेष करणें (एखाद्याचा कट्टा शत्रु किंवा त्याला ज्याचा अतिशय दरारा आहे अशी व्यक्ति भीतीमुळें त्यास सर्वत्र जळीं, स्थळीं, काष्ठीं, पाषाणीं दिसूं लागते त्यावरून). पाण्यानें वाती पाजळणें-(महानु.) अशक्य गोष्ट शक्य करूं पाहणें. 'अवो दुजी कनुधार लागती । तरि पाणिअ/?/ वाति पाजळती ।' -शिशु ६७५. पाण्यापेक्षां, पाण्याहून पातळ करणें-(एखाद्याची) फजिती, पाणउतारा, तेजोभंग करणें; फार लाजविणें. 'नामचि करि पाण्याहुनि पातळ यश भास्करादि तेजांचे ।' -मोवन १२.५०. पाण्यावर घालणें- नेणें-(कर.) (गुरांना) पाणी पाजण्यासाठीं विहीर, नदी इ॰कांवर नेणें. पाण्यावर लोणी काढणें-(कर. ल.) अतिशय कंजूषपणा करणें. गळ्याशीं पाणी लागणें-१ पाणी गळ्यापर्यंत येणें. २ (कर्ज इ॰ गोष्टींची) पराकाष्ठा होणें. दुसऱ्याच्या ओंजळीनें पाणी पिणें-१ दुसरा पाजील तेवढेंच पाणी पिऊन स्वस्थ बसणें. २ (ल.) दुसरा सांगेल तसें मुकाट्यानें वागणें. उन्हा पाण्यानें घर जाळणें-जळणें-(ल.) खोट्या आरोपानें, निंदेनें रसातळास नेणें, जाणें; (एखाद्याचा) नाश करणें, करूं पाहणें, होणें (अकरण- रूपांत योजितात व हें घडणें अशक्य असें दर्शवितात). खोल पाण्यांत शिरणें-१ आपल्या आवांक्याबाहेरचें काम शिरावर घेणें. २ (एखाद्या गोष्टीची) फाजील चिकित्सा करणें. ३ (एखादें गूढ, गुपित) उकलण्याचा प्रयत्न करणें. पाणी केस तोडतें- पाण्याच्या अतिशय जोराच्या प्रवाहाचें वर्णन करतांना योजितात. पाणी खाल्लेला-वि. पाण्यांत ठेवल्यामुळें आंत पाणी मुरलेला. पाण्यांतील पावप्यादे-जलसंचारांत प्रवीण; आरमारांतील प्रबळ लोक. 'इंग्रज लोंक पाण्यांतील पावप्यादे.' -इतिहाससंग्रह-ऐति- हासिकचरित्र ११५. पाण्यापाण्यानें-क्रिवि. नदीच्या कांठा- कांठानें. पाण्यापेक्षां शीतळ-वि. अत्यंत सोशीक; सौम्य; शांत; गंभीर स्वभावाचा. पाण्यावर-क्रिवि. नदीच्या कांठीं. 'कऱ्हेच्या पाण्यावर.' -ख ३१९३. पाण्यावरचा बुडबुडा, पाण्या वरची रेघ-पुस्त्री. (ल.) क्षणभंगुर, अशाश्वत वस्तु. क्षणभंगुरता- दर्शक इतराहि वाक्प्रचार आहेत ते पुढें दिले आहेत:-जलबुद्बुद; धुळीवरचें सारवण; दुपारची सावली; विजेचें चमकणें; विजेसारखा; वीजच; अभ्रच्छाया; आभाळाची सावली; कमलिनीवरचा बिंदु; काजव्याचा उजेड; खुंटावरचा कावळा; तेरड्याचा रंग (तीन दिवस); शिराळशेटाचें राज्य; आवाहन व विसर्जन बरोबर; औट घटिकेचें राज्य; घडीचें, घटिकेचें घड्याळें; उपळवणी; तृणाचा शेक; पुष्करपत्रतोयतरल; पळतें पीक इ॰. 'चिताडसी कां? चित्र जिवाचें पाण्यावरच्या रेघांनीं ।' -वाग्वैजयंती-गोविंदाग्रज. पाण्यास आश्रय-आसरा-पु. अतिशय तहानेल्यानें उपाशे पोटीं पाणी पिणें आरोग्यदृष्ट्या अनिष्ट असतें, म्हणून आधीं अन्नाचे एक दोन घांस खाऊन नंतर पाणी पितात. अन्नाच्या ह्या दोन-तीन घांसांस, अल्पांशास उद्देशून हा वाक्प्रचार योजतात.म्ह॰ १ पाण्यांत राहून माशांशीं वैर करूं नये = आपल्या कार्यक्षेत्रांतील मंड- ळीशीं वैर करूं नये. त्यांच्याशीं मिळूनमिसळून वागण्यांतच फायदा असतो. २ (हिं.) पाणी तेरा रंग कैसा, जिसमें मिलाया वैसा = जशी वेळ येईल तसें वागणें. ३ पाण्यापासून जवळ सोयऱ्यापासून दूर = मनुष्यानें पाण्याच्या जवळ राहणें सोईचें असतें, तसेंच सोयऱ्या- पासून दूर रहावें म्हणजे प्रेमांत बिघाड करणाऱ्या गोष्टी टाळतां येतात. ४ पाण्यांत म्हैस बाहेर मोल = अनिश्चित, आगामी गोष्टी- विषयीं, निरर्थक चर्चेस, चिकित्सेस उद्देशून ही म्हण योजितात. सामाशब्द- पाणआघाडा-पु. आघाड्याची एक जात. हा आघाडा सूज, कफ, खोकला, वायु, शोष यांचा नाश करतो. -वगु १.९. [पाणी + आघाडा] ॰उतार-पु. १ नदींतून चालून जातां येण्याजोगा, कमी पाणी असलेला मार्ग. २ (नदी इ॰काचें) ओसरणें; कमी होणें. 'गंगेसि भंग बहु पाणउतार होतो ।' -र २. [पाणी + उतार] ॰उतारा-पु. १ मानखंडना; तेजोभंग; अपमान; क्षुद्रपणानें लेखून (एखाद्याची) केलेली विडंबना; अवहेलना. २ (क्व) पाणउतार पहा. [पाणी + उतरणें] ॰कणीस-न. ओहळांत, ढोंपरभर पाण्यांत कसईच्या झाडाप्रमाणें होणारें पुरुषभर उंचीचें एक झाड. याचीं पानें बाजरीच्या पानांसारखीं असून याचें कणीस बाजरीच्या कणसासारखेंच असतें. हें कणीस वाळवून त्यावरील कापूस चकमक पेटविण्यास घेतात. हें तेलांत बुडवून पेटविलें असतां काकड्याप्रमाणें जळतें. -वगु ४.६२. रामबाण. ॰कसर-स्त्री. पाटस्थळाच्या पाण्याकरील कर, पट्टी. 'गांवची पाणकसर गेल्यावर्षापासून दीडपट वाढविण्यांत आली.' -के १९.७.३०. [पाणि + कसर] ॰काठी- स्त्री. १ (गो.) विहीरींतून पाणी बाहेर काढण्याचें एक साधन. ओकती पहा. २ (ल. गो.) उठाबशी. [पाणी + काठी] ॰काडो- पु. (कु.) शेतांस पाणी काढून पैरीप्रमाणें आळीपाळीनें वाटून देणारा; पाणकाढा. हा शेतकऱ्यांनीं आपसांत पाण्याविषयी तंटा होऊं नये म्हणून निवडलेला असतो. [पाणी + काढणें] ॰कापड- न. जखमेवर, शरीराच्या कापलेल्या भागावर बांधतात ती ओल्या वस्त्राची चिंधी. [पाणी + कापड] ॰कांदा-कंद-पु. नदींत होणारा एक विशिष्ट कंद. यास नागदवणीच्या फुलासारखीं फुलें येतात. -वगु ४.६३. [पाणी + कांदा] ॰कावळें-न. (विशेषतः गुरांची) गर्भोदकाची पिशवी. पाणकी-स्त्री. पाणी भरण्याची मजुरी कर- णारी स्त्री. 'कुणि विधवा ठेविता घरामधें पाणकी ।' -ऐपो ३६९. पाणकुकडें-कोंबडें-न. घशांत किंवा जिभेच्या खालच्या बाजूस होणारा एक विकार. ॰कुक्कुट-पु. (महानु.) पाणकोंबडा. 'चंद्र चकोरा चोखटीं । वोळे अमृतधारी आतुटी । ते गोडपणें पाण- कुक्कुटी । लाहिजे कैसा ।' -ऋ ५२. [पाणी + सं. कुक्कुट = कोंबडा] ॰कोंबडा-डें-पुन. १ जलचर पक्षी. 'पाणकोंबडे कोंबडे । वडवाघुळा घुबडे ।' -दावि २४४. २ चंद्राभोवतालीं पडणारें खळें. [पाणी + कोंबड] ॰केश-पुअव. शेवाळ. ॰कोंबडी-स्त्री. एक जलचर कोंबडी. ॰कोळी-पु. मासे खाणारा एक पक्षी. -प्राणिमो ५७. ॰क्या-पु. १ लोकांच्या घरीं पाणी भरून त्यावर उपजीविका करणारा मनुष्य. 'एखादा पाणक्या नवरा मिळता तरी पतकरता.' -मोर ३४. २ (ल.) निरक्षर व धटिंगण मनुष्य. [सं. पानीयक-पाणकअ-पाणका-पाणक्या. -राजवाडे (ग्रंथ- माला).] ॰खार-पु. (कों.) उकडआंबे इ॰ खारविण्यासाठीं पाण्यांत मीठ घालून केलेला खार. [पाणी + खार] ॰गहूं-पु. मोटेच्या, पाटाच्या पाण्यानें होणारा गहूं. [पाणी + गहूं] ॰घर- न. १ पाणी तापवून स्नान करण्याकरितां असलेली खोली; न्हाणी- घर. २ विहीर इ॰ खणतांना जेथें पाणी लागतें तो जमिनींतील खोल थर. [पाणी + घर] ॰घोडा-पु. आफ्रिका खंडांत मोठ्या नद्यांत, सरोवरांत आढळणारा एक अजस्त्र पण निरुपद्रवी प्राणी. याचा रवंथ करणाऱ्या प्राण्यांत समवेश होतो. याचा रंग काळसर तपकिरी असतो. याच्या कातड्याच्या ढाली करतात. -ज्ञाकोप ६७. (इं) हिपॉपोटेमस् [पाणी + घोडा] ॰घोणस-पु. पाण्यांत असणारी सापाची एक निरुपद्रवी जात. [पाणी + घोणस] ॰चक्की- स्त्री. पाण्याच्या जोरानें, साहाय्यानें चालणारी चक्की. [पाणी + चक्की] ॰चट-वि. १ ज्यास गोडी कमी आहे असा (द्रव पदार्थ); बेचव. २ (ल.) शुष्क; बाष्कळ; नीरस; अर्थशून्य (बोलणें, लेखन, गाणें, बोलणारा, लिहिणारा, गाणारा इ॰). 'शेवटीं आपल्या निस्सीम भक्तांकडूनहि वरच्या सारख्या पाणचट प्रशंसे- पेक्षां अधिक कांहीं सर्टिफिकीट मिळूं नये ...' -टि १.१.२६४. [पाणी + छटा] ॰चूल-स्त्री. पाणघरांतील, स्नानाचें पाणी इ॰ तापविण्याची चूल. 'तेथें पाणचुलींत विस्तव घालून त्यावर पाणी तापत ठेविलें.' -कोरकि ५१२. [पाणी + चूल] ॰चोरा-रा-पु. गारोड्याजवळील पाणी भरण्याचें सच्छिद्र पात्र. 'पाणचोऱ्याचें दार । वरील दाटलें तें थोर ।' -तुगा २५८३. [पाणी + चोर] ॰जंजाळ-न. (कों.) पर्जन्य, पाण्याचा पूर इ॰कानीं जिकडे तिकडे होते ती जलमय स्थिति. 'बहू पाणजंजाळ देखोनि डोळां ।' -राक १.३२. [पाणी + जंजाळ] ॰जांवई-पु. (थट्टेनें) जांवयाचा भाऊ; पडजांवई. [पाणी + जांवई] ॰झुकाव-पु. पाणी बाजूनें टिपकवून लावण्यासाठीं दरवाज्यावर केलेलें झुकाऊ कारनिस, गलथा; पाणकारनिस. -राको ५९२. [पाणी + झुकविणें] ॰झेली- स्त्री. (चेंडू, विटीदांडू इ॰ खेळांत) झाडावरून खालीं पडतांना किंवा पाण्यांतून चेंडू, कोललेली विटी इ॰ जमिनीवर पडण्यापूर्वीं झेलणें. याच्या उलट आणझेली. [पाणी + झेलणें] ॰टका- टक्का-पु. पाटस्थळ जमिनीवरील एक लहानसा कर. [पाणी + टक्का] ॰टिटवी-स्त्री. तांबडा कल्ला असलेली टिटवीची एक जात. पाणड्या, पाणाडी-ड्या-वि. जमीनींत कुठें किती खोल खणलें असतां पाणी लागेल हें काहीं आडाख्यांच्या सहाय्यानें जाणणारा. [पाणी] पाणढाळ-पु. पाणी वाहून जाण्याजोगा जमीन, छपराचें पाखें इ॰कांस दिलेला, असलेला उंचसा उतार; सखलपणा. -वि. पाणी वाहून जाण्यायोग्या उतारानें युक्त, उंच उतारीची (जमीन इ॰). [पाणी + ढाळ = उतार] ॰ताव-पु. सोनें, चांदी इ॰ तापवून पाण्यांत बुडवून त्याचा कस पाहण्याची पद्धत; याच्या उलट सुकताव = सोनें इ॰ तापवून नुसतेंच थंड करणें. [पाणी + ताव] ॰तीर-पु. (युद्धशास्त्र) स्फोटक व ज्वालाग्राही पदार्थांनीं भरलेलें चिरूटासारखें निमुळत्या आकाराचें एक युद्धोपयोगी साधन. याचा व्यास दीड-दोन फूट असून लांबी सहा यार्ड असते. याच्या आघातानें मोठमोठीं जहाजें समुद्राच्या तळाशीं जातात. (इं.) टॉर्पेडो. -ज्ञाको (प) ६७. 'गेल्या महायुद्धांत योजलेल्या अनेक शस्त्रास्त्रांत पाणतीराचा पहिला नंबर लागेल.' -ज्ञाको. प ६७. [पाणी + तीर = बाण] ॰तुटी-वि. जींतील रसांश, द्रवांश कमी झाला आहे अशी, कांहींशी पिकलेली (पालेभाजी). [पाणी + तुटणें] ॰थरा-पु. घराच्या जोत्याच्या सर्वांत वरच्या थरांतील दगड, चिरा; पाटथर पहा. ॰थरी-स्त्री. १ आंत्रपेशी; प्लीहा. २ प्लीहेचा एक विकार; पोटांतील चीप. ३ प्लीहा, आंत्रपेशी वाढणें. [पाणी + थर] ॰थळ-स्त्रीन. १ पाऊस गेल्यानंतरहि जेथील ओल जात नाहीं व उन्हाळ्यांतहि खणलें असतां पाणी लागतें अशी जमीन. 'आणि पाणथळ असे तेथें भात लावी.' -पाव्ह ११. २ पाटाच्या पाण्यानें भिजणारी जमीन. [पाणी + थळ] ॰दळ-न. (क्व.) पाणथळ अर्थ १ पहा. [पाणी + दळ] ॰दिवड-स्त्रीन.. (कों.) पाण्यांतील सापाची निर्विष जात. [पाणी + दिवड] ॰दोरी-स्त्री. विहीरींतून पाणी काढण्याच्या उपयोगाची दोरी; बारीक दोर. [पाणी + दोरी] ॰नेचा-पु. पाण्यांत. दलदलींत उगव णारी एक वनस्पति; (इं.) हायड्रोटेरिडि. -ज्ञाको. अ २२१. [पाणी + नेचा] ॰पट्टी-स्त्री. पाणकापड पहा. ॰पिकलें, पाण- पीक-न. (कों.) ज्या पिकास सबंध पावसाळ्यांतील पावसाची जरूरी असतें तें पीक; पहिलें पीक; खरीप. याच्या उलट रब्बीचें पीक. [पाणी + पिकणें, पीक] ॰पिता-वि. १ फार पाणी खाल्लेलें; फाजील पावसानें नासलेलें (पिकाचें कणीस इ॰). २ (ल.) पचपचीत; पाणचट; पचकळ; मुळमुळीत (भाषण, कारभार, मस- लत, व्यवहार, गोष्ट, काम इ॰). ३ (झटकन् पाणी पिण्यासारखें) तलख; चलाखीचें; तडफेचें (कृत्य, कृति इ॰). ४ रोखठोक, चोख; स्पष्ट (जबाब, जाब, उत्तर इ॰). [पाणी + पिणें] ॰पिशी-स्त्री. फाजील पावसामुळें न भरलेलें, पोचट राहिलेलें धान्याचें कणीस. ॰पिसा-वि. पर्ज्यनातिरेकामुळें पोंचट, दाणें झडून गेलेलें, दाण्यांनीं न भरलेलें (कणीस इ॰). ॰पिसें-न. वेड; वेडगळपणा; भ्रमिष्टपणा. -शर. -मनको. -वि. वेडगळ; खुळचट. -मनको. [पाणी + पिसें] ॰पेटी-स्त्री. (स्थापत्यशास्त्र) पाण्यांत काम करतेवेळीं पाणी आंत येऊं नये म्हणून कामाभोंवतीं बसविलेली उभ्या फळ्यांची मुंढे मारून केलेली पेटी. (इं.) कॉफरडॅम्. -राको ३६/?/ [पाणी + पेटी] ॰पोई-स्त्री. १ वाटसरूंना, आल्यागेल्यांना पाणी पाजण्या- साठीं केलेली सोय; पन्हेरी. 'येइ भाई येथ पाही । घातलीसे पाणपोई ।' -यशोधन. २ अशा ठिकाणीं आल्यागेल्यांस पाणी देण्याची क्रिया. [पाणी + पोई] ॰फोल-न. (राजा.) भाताच्या फुलांवर पाऊस अतिशय पडल्यामुळें त्यामध्यें होणारें फोल, पोचटपणा; असलें न भरलेलें पोचट कणीस. [पाणी = पाऊस + फोल = पोचटपणा] ॰बुड-स्त्री. पाटाच्या पाण्यानें भिजणाऱ्या जमीनी- वरील कर. [पाणी + बुडणें] ॰बुड-पु. (कों.) पाणकोंबड्यासारखा एक पक्षी. [पाणी + बुड] ॰बुडा-ड्या, पाणिबुड्या- पाणबुड्यी-पु. १ मासे धरणारा कोळी. 'तरी माशालागीं भुलला । ब्राह्मण पाणबुडां रिघाला ।' -ज्ञा १६.४५१. २ पाण्याच्या तळाशीं असलेल्या वस्तू वर काढण्याकरितां पाण्यांत बुडी मारून बराच वेळ पाण्यांत राहण्याचा सराव ज्यास आहे तो; समुद्रांत बुडी मारून मोत्यें वर काढणारा. 'ते वाक्समुद्रिचे पाणबुडे । कीं सारासारसीमेचे गुंडे ।' -ऋ २४. ३ एक प्रकारचा पक्षी. [पाणी + बुडणें] ॰बुडी-स्त्री. १ पाण्यांत मारलेली बुडी; सुरकांडी. (क्रि॰ मारणें). २ पाण्याच्या पृष्ठभागाखालून संचार करणारी युद्धोप- योगी नौका. (इं.) सब्मरीन्. 'तें आरमार पाणबुड्यांच्या आघातामुळें इतउत्तर आपली पूर्वकामगिरी देण्यास कितपत समर्थ राहील....' -टि ३.३.३४८. [पाणी + बुडी] ॰बुडीत-वि. पुरानें, पावसानें जलमय झालेली (जमीन, पीक). [पाणी + बुडणें] ॰बोदाड-वि. (ना.) पाणथळ; दलदलीची (जमीन). [पाणी + बुडणें] ॰भर-भरजमीन-स्त्री. १ नवीनच खोदलेल्या विहि- रीच्या पाण्यानें, ओढ्याच्या, पाटाच्या पाण्यानें भिजणारी शेत जमीन. २ पुराच्या पाण्यानें भिजणारी जमीन. ३ असल्या जमीनीवरील सरकारी सारा. [पाणी + भरणें + जमीन] ॰भर जिराईत-स्त्री. पाटाच्या पाण्यानें भिजणारी परंतु कोरड म्हणून गणली गेलेली जमीन. [पाणभर + जिराईत] ॰भरणीचा- भरीत-भरिताचा-वि. १ पाटाचें पाणी मिळणारें (शेत, मळा इ॰). याच्या उलट कोरडवाय-वाही. २ पाटाच्या, विहिरीच्या पाण्यानें तयार झालेलें, काढलेलें (पीक इ॰). ॰भरा-वि. १ विहिरीच्या, पाटाच्या पाण्याची जरूरी असलेला (गहूं, जोंधळा इ॰). २ सदर पाण्यानें भिजणारी (जमीन). [पाणी + भरणें] ॰भऱ्या-भर्या-पु. पाणक्या; पाणी भरण्याचा धंदा करणारा. [पाणी + भरणें] ॰भाकरी-स्त्री. नदीच्या, तलावाच्या पाण्याच्या पृष्ठभागावर खापऱ्या फेकण्याचा मुलांचा खेळ; भाकरीचा खेळ. 'तें गलबत वाऱ्याच्या सोसाट्यांत सांपडून मुलांच्या पाणभाकरीच्या खेळांतल्या खापरीप्रमाणें भलतीकडे गेलें.' -कोरकि ७७. [पाणी + भाकरी] ॰मांजर-न. मांजरासारखा एक जलचर प्राणी. [पाणी + मांजर] ॰मोट, पाणमोटली-की-मोटळी, पाण्याची मोट-स्त्री. प्रसूतीसमयीं गर्भ बाहेर पडण्यापूर्वी गर्भोदकानें भर- लेली गर्भाशयांतून बाहेर पडणारी पिशवी. (क्रि॰ येणें; पडणें; फुटणें; निघणें) [पाणी + मोट, मोटली = चामड्याची मोठी पिशवी] ॰रस-पु. पूर्वीं रस काढून घेतलेल्या आंब्यांवर पाणी ओतून ते हालवून, चेंदून पुन्हां त्यांपासून काढलेला पाणचट रस. [पाणी + रस] ॰रहाट-पु. पाण्याच्या साहाय्यानें चालणारा रहाट; पाणचक्की. [पाणी + रहाट] पाणरॉ, पाणसर्प-पु. (गो.) पाण्यांत असणारी सापाची एक जात. [पाण + सर्प] पाणलव्हा-पाणलांव-पु. (कों.) पक्षिविशेष; यास निबुड असेंहि म्हणतात. [पाणी + लाव, लांव्हा = पक्षिविशेष] ॰लोट-पु. १ पाणी; वाहून जाईल असा उतार; पाणढाळ २ टेकडीची, डोंगराची उतरती बाजू; उतरण. ३ पाण्याचा जोराचा प्रवाह; लोंढा; झोत; धोत. ४ डोंगरमाथा; जेथें पाणी पडलें असतां तेथें न थांबतां दोहोंबाजूंस वाहून जातें अशी डोंगर माथ्याची धार. उदा॰ सह्याद्रीचा पाणलोट. [पाणी + लोट] ॰वटा-ठा, पाणवथ-वथा-पु. नदी इ॰कांवर गांवचे लोक जेथें पिण्यासाठीं पाणी भरणें, वस्त्रें धुणें इ॰ क्रिया करतात तें ठिकाण. 'दिवसा पाणवठा म्हणुनियां रात्र आम्ही ही धरली ।' -रासक्रिडा १२. 'पौलपट्टणीं येऊनि शुद्ध । पाणवथीं बैसला ।' -नव १८.४३. [पाणि + वर्त्तिकः-वटा] म्ह॰ बारा कोसांवरचा पाऊस, शिंवेचा राऊत, पाणवठ्याची घागर बरोबर गांवांत येतात. ॰वड-स्त्री. पाण्याचे रांजण, घागरी, डेरे इ॰ भरून ठेवण्यासाठीं (घरांत) केलेला ओटा, ओटली. [पाणी + ठाव] पाणवडा- वाडा-पु. पाणवठा पहा. 'क्लेशगांविंचा उकरडां । भवपुरिचां पानवाडां ।' -राज्ञा १६.४०५. [पाणि + वर्त्तिकः] पाणवसा-पु. (कों.) गाई, म्हशी इ॰ गुरांच्या जीवनास हेतुभूत असणारें (गांवचें) पाणी, गवत इ॰ समुच्चयानें; पाणसा. [पाणी + वास] ॰वळ-न. (कों.) पावसाळ्यानंतर कांहीं काळपर्यंत जींत ओलावा टिकून राहतो अशी जमीन; पाणथळ अर्थ १ पहा. २ -वि. बेचव; पाणचट. पाणचट अर्थ १ पहा. [पाणी + ओल] ॰वाट-स्त्री. १ पाणी वाहून जाण्यासारखा उतार; सखल पृष्ठभाग; ओहळ; पाणलोट. 'पाणी पाणवाटें जैसें । आपणचि धांवे ।' -दा ७.९.११. २ पाण्याची वाट. [पाणी + वाट] ॰वारू-पु. (प्राचीन पौराणिक कथांत रूढ) होडी; नाव. [पाणी + वारू = घोडा] ॰शाई- स्त्री. तारस्वार काढण्याकरितां मृदंग इ॰कास लोहकीट इ॰काच्या लुकणाचा, शाईचा देतात तो पातळ थर; याच्या उलट भरशाई. [पाणी + शाई] ॰शेंग-स्त्री. (ल.) मासळी. [पाणी + शेंग] ॰शोष-पु. पाणपोस पहा. [पाणी + सं. शोष = सुकणें] ॰सरकी- स्त्री. पाणसर्‍याचें काम, हुद्दा. पाणसरा पहा. [पाणसरा] ॰सरडें- न. पाण्यांत असणारी एक निर्विष सापाची जात. [पाण + सरडा] ॰सरडें-न. रहाटाची माळ सरूं नये म्हणून बसवितात तें प्रति- बंधक लांकूड. [पाणी + सरा = आडवीतुक्ई] ॰सरा-पु. डोंगराच्या घाटांतील वंशपरंपरागतचा जकातदार. याला वतन व ठराविक हक्क असत. घाटदुरुस्तीचें काम याच्याकडे असे. [पाणी + सरणें ?] ॰सळ-साळ-स्त्री. १ (गवंड्याचा धंदा) बांधकाम इ॰ सम- पातळींत आहे कीं नाहीं हें पाहण्याचें गवंड्याचें साधन; साधणी. (इं.) लेव्हल् बॉटल. २ समपातळी. 'भिंतीचें बांधकाम थराचें असेल तर भिंतीच्या प्रत्येक १८ इंच उंचीस माथा पाणसळींत आणावा व त्यावर पातळ चुन्याचा रद्दा करून घालावा.' -मॅरट १४. ३ पाणी वाहून जाईल असा उतार. [पाणी + सळ] पाणसा-पु. गुराढोरांच्या जीवनोपयोगी असें (एखाद्या ठिका- णचें) गवत व पाणी; पाणवस. 'ह्या गांवचा पाणसा गुरांस मानवत नाहीं.' ॰साप-पु. पाण्यांत असणारी सर्पाची जात. [पाणी + साप] ॰सापूड-स्त्री. घर इ॰कांच्या छपराच्या खालच्या बाजूस वाशांच्या टोंकांजवळ कामट्यांच्या, रिफांच्या, ओंबणाच्या शेवटीं बांधतात ती जाड कामटी; सापूड. [पाणी + सापूड] ॰सासरा-पु. (विनो- दानें) जांवयाच्या भावानें आपल्या भावाच्या सासर्‍यास विनोदानें, थट्टेनें उल्लेखण्याची संज्ञा. जांवयाच्या भावास पाणजांवई असें थट्टेनें म्हणतात त्याप्रमाणेंच हाहि शब्द आहे. ॰सासू-स्त्री. पाण- जांवयानें स्वतःच्या भावाच्या सासूस थट्टेनें उल्लेखण्याची संज्ञा. [पाणी + सासू] ॰साळ-वि. (क्व.) समपातळींत असलेली (जमीन इ॰) [पाणसळ] ॰साळ करणें-जमीन इ॰ समपातळींत आहे कीं नाहीं तें पाहणें. ॰साळ-स्त्री. प्रवासी, वाटसरू इ॰कांना पाणी पुरविण्याच्या सोयीकरतां रस्त्याच्या बाजूस बांधलेली छपरी इ॰; पाणपोई. [पाणी + सं. शाला = घर] ॰साळ, पाण- सळी भात-स्त्रीन. पाटच्या, विहीरीच्या पाण्यावर केलेलें (मळा इ॰तील) भाताचें पीक. [पाणी + साळ] ॰सुरुंग-पु. समुद्रांतील आगबोटी इ॰कांचा नाश करण्याकरितां समुद्राच्या पृष्ठभागाखालीं योजून ठेवण्याचें सुरुंगासारखें आधुनिक युद्धो- पयोगी साधन. 'बंदरांत घातलेल्या पाणसुरुंगांनीं व पाण- बुड्यांनीं हें समुद्रावरील वर्चस्व पोखरण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.' -टि ३.३.३५०. [पाणी + सुरुंग] ॰सोस, पाणशोष, पाणसोक-पु. १ ताप इ॰कांत पुनः पुनः लागणारी अतिशय तहान; घशास पडणारी कोरड. २ प्रकृतीला होणारा एक (पुनः पुनः तहान लागण्याचा) विकार. [पाणी + शोष = कोरडें पडणें, होणें] ॰सोळा-पु. दिवडाच्या जातीचा, बांड्या रंगाचा, पाण्यांत राहणारा एक निर्विष साप. -बदलापूर ३४७. पाणि- ढाळ-पु. १ ओहोटी. 'अनुरागाचा निरु ताउनी । पाणिढाळु ।' -ज्ञा ७.९९. २ पाण्याचा ओघ खालीं सोडून देणें. 'पाणिढाळु गिरीशें । गंगेचा केला ।' -ज्ञा १८.१६८८. [पाणी + ढाळणें] पाणीपद-न. (महानु.) तेजाचें स्थान; गांभीर्य; ढाळ. 'परि जाणतां उपहासावें । बोलांचें पाणिपद निहाळावें ।' -शिशु ३६५. [पाणी = तेज + पद = स्थान] पाणिपात्र-न. पाणी प्यावयाचें भांडें. 'एकें हरितलें पाणिपात्र । एकें नेलें पीठ पवित्र ।' -एभा २३.५२०. [पाणि + पात्र = भांडें] पाणिय(ये)डा-पु. (महानु.) पाणवठा. 'आत्मगंगेचां पाणियेडां । थोकला अज्ञान-सीहांचा दडा ।' -भाए १०६. [पाणी + वटा, ठाव] पाणियाडा-डें-ढें- पुन. १ पाण्याचा सांठा; तळें. 'सतरावियेचें पाणियाडें । बळिया- विलें ।' -ज्ञा ९.२१४. 'शुक्रें धरिलें पाणियाडें । अवर्षण पडे बहुकाळ ।' -भाराबाल १.७८. २ जलपात्र. -माज्ञा-कठिणशब्दांचा कोश. [पाणीवडा] पाणिलग-वि. पाण्याच्या सान्निध्यानें राहणारा. 'पाणिलगें हंसें । दोनी चारी सारसें ।' -ज्ञा ६.१७७. [पाणि + लग] पाणिवथा-पु. पाणवठा पहा. पाणिवैद्य-पु. (कों.) विषार इ॰ उपद्रवावर पाणी अभिमंत्रून देणारा वैद्य. [पाणि + वैद्य] पाणीकांजी-न. (व्यापक.) पाणी काढणें व भरणें इ॰ गृहसंबंधीं कामांविषयीं व्यापक अर्थीं योजावयाचा शब्द. [पाणी + कांजी] पाणीचोर-पु. पाणचोर पहा. 'जैसें पाणी चोराच्या द्वारीं । वरील रंध्र दाटिजे जरी ।' -विपू २.६६. [पाणी + चोर] पाणीटाळ-पु. ओहोटी. -हंको, -शर, -मनको. पाणिढाळ अर्थ १ पहा. [पाणी + ढाळ] पाणी तावणें-न. (ना.) आंघोळीचें पाणी तापविण्याचें भांडें किंवा जागा. [पाणी + तावणें] पाणी- दाम-पु. पाणीपट्टी. [पाणी + दाम = किंमत] पाणीदार-वि. १ ज्याच्या अंगीं चांगलें पाणी, तेज आहे असा (हिरा, रत्न, मोत्यें इ॰). २ तीक्ष्ण; चांगल्या धारेचें (शस्त्र इ॰). ३ तेजस्वी; स्वाभिमानी; रग, धमक इ॰कानीं युक्त (मनुष्य, पशु इ॰). [पाणी + फा. दार = युक्त] पाणीपट्टी-स्त्री. म्युनिसिपालिटी इ॰ स्थानिक संस्था नगरवासीयांकडून पाणीपुरवठ्याबाबत घेतात तो कर. 'म्युनिसिपालिटीनें पाणीपट्टी वाढविली.' -के १७.६.३०. [पाणी + पट्टी = कर] पाणीपण-न. पाण्याचा भाव. 'कां गंगा- यमुनाउदक । वोघबळें वेगळिक । दावि होऊनि एक । पाणीपणें ।' -ज्ञा १८.५२. [पाणी + पण = भाववाचक नामाचा प्रत्यय] पाणीपाऊस-पु. १ नद्या, तळीं, विहीरी इ॰कांना पाण्याचा पुरवठा करून देणारा पाऊस. 'पीकपाऊस आहे, पाणीपाऊस अझून नाहीं.' २ पाऊस, पीक इ॰; पाऊसपाणी. [पाणी + पाऊस] पाणीपिसा-वि. स्नान करणें, कपडे धुणें इ॰ पाण्याच्या व्यापारांचें ज्यास वेड आहे असा. पाणीपिसें पहा. 'एक राखे एक शंखे । एक ते अत्यंत बोलके । पाणीपिशीं झाली उदकें । कुश- मृत्तिकें विगुंतलीं ।' -एभा १४.२०९. [पाणी + पिसा = वेडा] पाणीभरा-वि. पाणभरा पहा. पाणीवळ-पु. पाण्यांतला मळ. 'तेणें बहुतीं जन्मीं मागिलीं । विक्षेपांचीं पाणिवळें झाडिलीं ।' -ज्ञा ६.४७१. पाणीशेणी-न. झाड-सारवण, पाणी भरणें इ॰ गृहसंबंधीं स्त्रीनें करावयाचीं कृत्यें समुच्चयानें. [पाणी + शेण] पाणेरा-रें-पुन. पाणी भरलेलीं भांडीं ठेवण्याकरितां केलेली चिरेबंदी ओटली. [पाणी] पाणोटा-ठा, पाणोथा-पु. १ पाणवठा पहा. २ (बे.) नदीचा उतार. [पाणी]

दाते शब्दकोश