मराठी बृहद्कोश

आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

वपा

स्त्री. १ हाडामांसाचा चिकचिकीत रस. २ हाडांतील मज्जा. २ काळजावरील केळीच्या कोंवळ्या पानासारखा असणारा पापुद्रा. 'दर्भमुष्टिच्या गर्भि धरुनिया निर्भर पशुच्या वपा ।' राला ८७. ४ चरबी. [सं.] वपिन-न. (शाप.) चरबीचा मुख्य घटक; (इं.) स्टिअरिन याच्या मेणबत्त्या करतात.

दाते शब्दकोश

वपा vapā f S The mucous or glutinous secretion of the flesh or bones. 2 (According to some.) The marrow of the bones. 3 The membrane lining the abdomen and investing the viscera, the peritoneum. 4 Fat or suet.

मोल्सवर्थ शब्दकोश

संबंधित शब्द

अनुस्तरणी

स्त्री. (मूळ वैदिक अर्थ. सूत्रकाळीं अग्नि- होत्र्याच्या उत्तरक्रियेंत गाय मारून तिची वपा काढून तिनें अग्नि. होत्र्याच्या प्रेताचें अच्छादन करीत त्या गाईस वैतरणी म्हणत). हल्लीं उत्तरक्रियेंत वैतरणी तरावयासाठीं देण्यांत येणारी गाय. -आश्वगृसू ४. [सं.]

दाते शब्दकोश

अनुस्तरणी      

स्त्री.       (मूळ वैदिक अर्थ : सूत्रकाळी अग्निहोत्र्याच्या उत्तरक्रियेत गाय मारून तिची वपा काढून तिने अग्निहोत्र्याच्या प्रेताचे आच्छादन करीत. त्या गाईस वैतरणी म्हणत.) उत्तरक्रियेत वैतरणी तरावयासाठी देण्यात येणारी गाय. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)