मराठी बृहद्कोश

आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

वर्म

न. १ नाजुक, हळवा, दुखरा भाग. २ (ल.) नाजुक जागा; मर्म. 'वर्मीं खोंचला रुक्मिया ।' -एरुस्व ६.४४. ३ ज्याचा उल्लेख केल्यास राग येतो अशी गोष्ट; बिंग; जिव्हार. ४ रहस्य; तत्त्व च सार. -ज्ञा ५.९६. 'तो आत्यंतिक क्षेमाचें वर्म । भागवत- धर्म उपपादी ।' -एभा २.२७७. ५ मख्खी; खुबी; गुह्य. 'देव सख्यत्वें राहे आपणाशीं । हें तों वर्म आपणाचिपासीं ।' -दा ४.८.१२; -अमृ ५.५०. ६ बळी पडण्याचें, वश होण्याचें साधन. 'बायकांचें वर्म म्हणजे दागिने.' -शारदा ३२. ७ महत्त्वाची गोष्ट. 'सर्व काहीं धर्म आणि कर्माऽकर्म । चुकलिया वर्म व्यर्थ जाती ।' -रामदास स्फुट अभंग (नवनीत पृ. १५१) [सं. मर्म] ॰कर्म-न. १ उखाळीपाखाळी. 'हांसोनियां काढिति वर्मकर्मा ।' -आ उमारमासंवाद १. २ छिद्र; व्यंग. (बहुधां अनेकवचनी प्रयोग, उदा॰ वर्मे कर्में). ॰स्पर्श-वि. मनाला झोंबणारें; लाग- णारें (भाषण) -ज्ञा १३.२७०; 'कां वर्मस्पर्शवचनीं निंदितां । मुक्तासी व्यथा उपजेना ।' -एभा ११.४६७. वर्मणें-क्रि. वर्म जाणणें ? -अमृ ५.५०. वर्मी-वि. १ मर्मभेदक; बोंचक; टोंच- णारें (भाषण इ॰). २ मर्में, बिंगें, व्यंग, दोष जाणणारा. ३ गूढ, मर्म, रहस्य जाणणारा (एखाद्या धंद्याचें, यंत्राचें, कृतीचें); तज्ज्ञ. ४ मर्मज्ञ; मार्मिक; आंतला अर्थ, रहस्य जाणणारा (एखाद्या ग्रंथां- तील, वचनांतील). ५ कांहीं गुह्य गोष्टी, बिंगें असणारा; वर्म काढ- लेलें खपत नाहीं असा. 'वर्मी पुरुषास चौघामध्यें सभाकंप सुटतो.'

दाते शब्दकोश

स्त्री. वरम पहा.

दाते शब्दकोश

वर्म n A sore and quickly sensible place; a touchy point. An affix to the name of क्षत्रिय as कृष्णवर्मा.

वझे शब्दकोश

(न.) [?अ. वर्म्] गळूं, नाजूक-ज़ागा.

फारसी-मराठी शब्दकोश

वर्म varma n ( A Tumor or imposthume.) A sore and quickly sensible place; a tender and irritable part: also a vital member or organ; a mortal spot. This literal sense is not so general as the following figurative sense arising from it; viz. A touchy point; a vulnerable part; a matter or subject (such as a secret foible, failing, slip) upon which, at the very naming of it, passion rises. 2 If the derivation above suggested be correct, the signification set down should be viewed as involving the whole import of the word; but as the word is indisputably common also in all the senses and applications of the word मर्म, it possibly may from it have been formed, through that ignorance or heedlessness with which, as the source and spring of formations, the proficient in Maráṭhí is abundantly conversant; and thus even the compounds वर्मभेद, वर्मस्थल, वर्मस्थान &c. may sometimes be met with. Turn to मर्म for full explication and illustration.

मोल्सवर्थ शब्दकोश

वर्म varma n (S) Armour or mail. 2 An affix to the names of men of the Kshatriya tribe; as कृष्णवर्मा क्षत्रिय. वर्में चर्में छेदणें (To pierce through armour and skin.) To pierce deeply, thoroughly, vitally, lit. fig.

मोल्सवर्थ शब्दकोश

न. गळूं; दुखणें. [अर. वरम]

दाते शब्दकोश

न. चिलखत; कवच. [सं. वर्मन्] वर्म-र्मा-क्षत्रिय जातीच्या नांवापुढें लावण्यांत येणारा प्रत्यय. उदा॰ कृष्णवर्मा. वर्में चर्में छेदणें-(कवच, कातडी यांतून पार खुपसणें) आंत- पर्यंत, आरपार भेदणें. (ल. व शब्दशः)

दाते शब्दकोश

(सं) न० मर्म. २ उणेपणा.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

वरम

(पु.) हिंदी अर्थ : सूजन, सोजिश. मराठी अर्थ : सूज, सुजेनें फुलणें.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

स्त्री. (व.) १ शेत पेरल्यानंतर शेतांत उठणाऱ्या मातीच्या उंच रांगा. २ पाणी जाण्यासाठीं बागाइतींत केलेल्या मातीच्या वरवंड्या.

दाते शब्दकोश

संबंधित शब्द

वरमणें

वरमणें varamaṇēṃ v i (वर्म S) To be touched in a tender or sore place, lit. fig; to be pricked to the heart; to be stung to the quick: also to be ashamed or mortified at one's वर्म or secret failings being discovered. Pr. नाक खाजविलें नकटें वरमतें.

मोल्सवर्थ शब्दकोश

अक्रि. १ नाजुक भागाला धक्का लागणें. (ल.) अंतःकरणाला झोंबलेला असणें; खोंचला जाणें; मर्मभेद पावणें. २ वर्म काढल्यामुळें ओशाळणें; शरमणें. 'कृष्णेच्या देव रमे स्मरतां विस्मय रमा मना दे वरमे ।' -मोकृष्ण २९.६१. ३ खिन्न होणें. 'सर्व बळासह कीशवरा प्रभुच्या अनुजाहिरणीं वरमाया ।' -मो रामायणें १.२८७. [सं. मर्म] म्ह॰ नाक खाजविलें नकटें वरमतें.

दाते शब्दकोश

अनुलोम

वि. योग्य क्रमानें उत्पन्न झालेला किंवा जन्मलेला (विशेषत: संकरजातीविषयीं उपयोग); उच्च वर्णाचा ब्राह्मण क्षत्रियादि पुरुष व त्याहून खालच्या वर्णोतील स्त्री यापासून झालेली संतति. -क्रिवि. योग्यक्रमानें; व्यवस्थित पद्धतीनें; नैसर्गिक पद्धती- प्रमाणें किंवा रीतीनें; शिस्तवार. २ (ल.) अन्वय. 'अनुलोम प्रतिलोम । विवंचना वाढेल दुर्गम । हें न करितां सांख्य सुगम् । आकळे तें वर्म सांगेन ।' - एभा २४.६०३. [सं. अनु + लोम = केश ] ॰ज पु. अनुलोम विवाहापासून झालेली संतति. 'हीन वर्णाची जे नारी । उत्तम पुरुषाचा गर्भ घरी । जे अनुलोम संसारी । शास्त्रकारी बोलिजे ।' -एभा २०.३२. ॰विलोम वि. नैसर्गिक पध्दतीनें व त्या विरुद्धहि असलेलें; योग्य क्रमानें असलेलें व नसलेलें; उलटसुलट; उरफाटें सुरफाटें. अनुलोमविलोमश्लोक- पु. सुलटा किंवा उलटा वाचला असतां सारखाच वाचला जाणारा श्लोक. उ॰ मुरुज बंध.'या माता ममतामाया ।'

दाते शब्दकोश

अनुलोम      

वि.       १. योग्य क्रमाने उत्पन्न झालेला किंवा जन्मलेला (विशेषतः संकर जातीविषयी उपयोग); उच्च वर्णाचा पुरुष व खालच्या वर्णातील स्त्री, यापासून झालेली संतती. २. (ल.) अन्वय : ‘अनुलोम प्रतिलोम । विवंचना वाढेल दुर्गम । हें न करितां सांख्य सुगम । आकळे तें वर्म सांगेन ।’ – एभा २४·६०३. ३. (आयु.) स्वाभाविक दिशेस अनुसरून असणारा.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आंतुवट

वि. आंतील; अंतरंगांतील. 'मी देव तो भक्तशुद्ध । हा बाहेरी नांवाचाचि भेद । आंतुवट पाहतां बोध । सच्चिदानंद जनि ऐक्यें ।' -एभा २१.४७१. -न. अंतरंग हृद्गत; गुप्त, गुह्य गोष्ट. 'हें आंतुवट तुज वर्म । दाविजत असे ।' -ज्ञा ८.२०३. [सं. अंतर् + वर्ती]

दाते शब्दकोश

असार

वि. १ निःसत्व; सारहीन. २ खोटें; मिथ्या; निकामी; पोकळ. 'असार जीवित.' 'येथें एक वर्म पाहिजे धीर । परि म्या लेखिलें असार ।' -तुगा ७११. 'असार म्हणिजे नासिवंत । सार म्हणिजे तें शाश्वत' -दा १४.९.५. [सं.]

दाते शब्दकोश

बेजें, बेंझें

न. १ युक्ति; वर्म. 'चुकलयां त्यागाचें बेंझें । केला सर्व त्यागहि होय वोझें।' -माझा १८.१३४. २ दुबेळकें; फाटक. [प्रा.]

दाते शब्दकोश

बीज

न. १ बी; फळाच्या आंतील कठीण भाग. २ धान्या- दिकांचें बीं. 'मुडाहूनि बीज काढिलें । मग निर्वाळलिये भूमीं पेरिलें ।' -ज्ञा ९.३६. 'शुद्धबीजा पोटीं । फळें रसाळ गोमटीं ।' -तुगा २२७२.'बीज तैसें फळ येत असे गोड ।' -ब १२३.२. ३ खाण; कुल; बिजवट बी. ४ पुरुषाचें वीर्य; रेत. ५ कारणीभूत किंवा मूळ मुद्दा; गोष्ट. क्रिया, मूल; कारण; उगम; आधार; निमित्त. 'दर्शना बीजें तेथें । जाणीव आणी ।' -अमृ ७.११९. ६ खोल हेतु; भाव; इंगित; वर्म; अभिप्राय; गूढार्थ.' हे तुम्ही म्हणतां ह्यांत बीज काय !' 'नातरी अर्जुना हें बीज । पुढति सांगिजेल तुज ।' -ज्ञा ९.३४. ७ संख्या किंवा परिमाणें यांबद्दल अक्षरें योजून करा- वयाचें गणित; बीजगणित. ८ गूढमंत्राक्षर. ' परी म्यां अभ्यासिला जो सबीज । तो स्वामी ऐकावा ।'-जै ६३.१७. [सं.] म्ह॰ यथा बीज तथा अंकुर = बीज तसा अंकुर; झाड तसें फळ.भ्रष्ट किंवा भर्जित बीज -अंकुरत नाहीं, भर्जित किंवा भ्रष्ट बीजास अंकुर नाहीं, भाजलें बीज उगवत नाहीं, भाजलेल्या बीजास मोड येत नाहीं-निष्काम, निस्स्वार्थी, निवळ अध्या त्मिक, ईशप्रीति प्रेरित अशा कृत्यांना फळ येत नाहीं म्हणजे पुढल्या जन्मी मिळणारें चांगलें वाईट फळ येत नाहीं. त्यांच्या कर्त्याला श्रेष्ठ सुख जो मोक्ष तोच प्राप्त होतो. समाशब्द- ॰कणिका- स्त्री. लहान बीज. 'सविस्तर वटत्व जैसें । बीजकणिकेमाजीं असे ।' -ज्ञा ९.४१९. ॰कोश, बीजाशय-पु. फुलांतील एक भाग; बीजाची पिशवी. [बीज + कोश, आशय = सांठा अर्थ] ॰गणित-न. गणिताचा एक प्रकार; अव्यक्त गणित; बीज अर्थ ७ पहा. (इं.) आलजेब्रा. ॰गर्भ-वि. स्वाभाविक; प्रकृतिज. 'बीजगर्भ गुण अर्थात्‌ आपल्यामध्यें संक्रांत होतात.' -नीति ३२१ ॰बेंदूर-पु. १ शूद्रांचें विधी; उत्सव; चाली संप्रदाय इ॰ समुच्चयानें (क्रि॰ करणें) 'आपण आपले कुणबी आपणांस आपला बीजबेंदूरच बरा.' २ शेंदूर, गूळ; बैलांचीं चित्रें, फुलांच्या माळा इ॰ चे नजराणे शेतकरी लोक पाटील, कुळकर्णी, देशमुख इ॰ ना देतात तो. [बीज आणि बेंदूर हे दोन सण] ॰भरण-न. बीं भरण पहा ॰भाव-पु. बीज- रूप अव्यक्त. 'जयाची कां बीज भावो । वेदांतीं केला ऐसा आवो ।' -ज्ञा १५.५१२ ॰मंत्र-पु. १ (महानु.) जादूटोणा; मंत्रतंत्र. 'जिए कामाचेनि बीजमंत्रे । फिटेति ना ।-शिशु ८०१. २ मूलमंत्र. ॰मार-वि. पेरलेल्या बिजाइतकेंसुद्धां धान्य देत नाहीं अशी (जमीन). [बीज + मारणें] ॰मुद्रा-स्त्री. बीजाचा आकार; बीजाकार. 'कां बीजमुद्रेआंतु । थोके तरू समस्तु ।' -ज्ञा १३.९५ ॰वर्म-न. मुख्य गोष्ट; रहस्य. ॰संस्कार-पु. एखाद्या प्राचीन सर्वमान्य ग्रंथादिकांत उणा किंवा अधिक फरक करणें.' त्यानें पूर्वींच्या ग्रंथांत सुधारणा केली आहे; ही सुधारण कोठें स्वतंत्र रूपानें दिली आहे व कोठें बीजसंस्काराच्या रूपानें सांगितली आहे.' -टि ४ ४२२.बीजांकित-वि. बीजक्षरानें अंकित, लांछित, परिवेष्टित. 'रामनाम बीजांकित ।' [सं. बीज + अंकित]बीजांकुरन्याय- पु. १ परस्परांत असलेला कार्यकारणसंबंध; जसें-बीजापासून अंकुराची उप्तत्ति आणि अंकुरापासून बीजाची उत्पत्ती.' आधीं झाड कां बी.' याप्रमाणें दोन परस्पर संबद्ध गोष्टींची कालानुपूर्वता ठरवितां येत नाहीं तेव्हा द्दष्टांत देतात. 'अभिमानी जो विश्वांस । तो चतुराननाचा अंश । त्यासीं ऐक्य मानी हा विश्वास । बीजांकुर- न्यायें । ' २ जसें बी तसें फळ; जसें कर्म तसा परिणाम. [बीज + अंकुर + न्याय] बीजांकुरभाव-पु. बीजाची अंकुरावस्था.' घन- अज्ञान सुषुप्ती । तो बीजांकुरभावो म्हणती ।'-ज्ञा १५.८९. [बीज + अंकुर + भाव] बीजारोप-रोपण-पुन. १ बीज पेरणें. २ कोणत्याहि कार्याचें किंवा परिणामफलाचें मूळ घालून ठेवणें. 'करी राम कथा बीजारोपण ।' -रावि १. [सं. बीज + आरोप, आरोपण] बीजाक्षर-पु. १ मूळाक्षर; २ मंत्राक्षर; मंत्राचें आद्याक्षर, बीज अर्थ ६ पहा. [बीज + अक्षर] बीजिका-स्त्री. बीज; बी. 'जे भवद्रुमबीजिका । जे प्रपंचाची भूमिका ।'-ज्ञा १५.८२.

दाते शब्दकोश

बरा

वि. १ चांगला; गुणांचा; मध्यम वर्गाचा; चालण्या- जोगा; योग्य. २ ठीक प्रकृतीचा; आरोग्य असणाराळ; रोगनिर्मुक्त. ३ सुमाराचा; बराच; पुष्कळ नसला तरी पुरेपूर. ४ (ल.) शहाणा. 'केवळ बाळचि इच्छी विधुसि धरायासि कां बरा इच्छी ।' -मो २ चागंल्या, नीट रीतीनें. 'देव म्हणे बैस बरा ।' -मोभीष्म ४. १९. [सं. वरम्] बरा घेणें-चांगल्या तर्‍हेनें, खूप देणें (मार, ठपका इ॰). खरडपट्टी काढणें. बर्‍यावर असणें-एखाद्याचें चांगलें इच्छिणें. बर्‍या बोलानें-वाजीनें-क्रिवि. गोडीगुलाबीनें राजीखुषीनें; स्वतःची चूक कबूल करून. 'या चळवळीवरील अत्या- चाराचे आरोप बर्‍याबोलानें परत घ्यावेत.' -के २७.५.३०. बर्‍याशा झाडाची साल काढून र्‍हावप-(गो.) चांगल्या माणसाच्या आधारानें राहणें. बरावाईट-वि. १ साधारण चांगला; मध्यम; बरासा; चालचलाऊ. २ (कु. ल.) आत्महत्या; मरण. 'जिवाचा बरांवायट करूंक बगता.' बरीगत-गती-स्त्री. धडगत; आशाजनक स्थिति (बहुधां नकारार्थींप्रयोग). 'त्या रोग्याची बरी गत दिसत नाहीं.' बरें-न. १ कल्याण; क्षेम; भरभराट. २ हित; नफा; फायदा; चांगलें. -क्रिवि. १ ठीक; चांगलें; योग्य; मान्य. २ पाद- पुरणार्थक शब्द. 'काय बरें यास उदाहरण ?' ३ ठीक; फार चांगलें; होय (रुकार, कबुली, मान्यता इ॰ विवक्षित असतां) [बरा] म्ह॰ ज्याचें करावें बरें तो म्हणतो कर माझें खरें. (एखाद्यास-ला) बरें मागणें-चांगलें व्हावें अशी इच्छा, प्रार्थना करणें. ॰पाहणें- क्रि. चांगलें म्हणून समजणें; कल्याण चिंतणें. 'पंढरीचे ब्राह्मण देखतील कोणी । बरें मजलागोनी न पाहती ।' -तुगा. बरेंपण जावप-क्रि. (गो.) मैत्री जमणें. बरेंवाईट-न. दैवानें येणारें दुखणें; मरण; नाश इ॰; आरोग्यादिक बरें व रोगादि वाईट.

दाते शब्दकोश

बरव

स्त्री. बरवेपणा; शोभा. 'जैशी नाकेवीण बरव । कां शिरेंवीण अवयव ।' -एभा १४.२५७. [सं. वरम्; म. बरवा] बरव(वं)ट-टा, बरंवटा-वि. गोजिरवाणें; सुंदर; चांगलें; देखणें; छान; सुरेख; उत्कृष्ट; उत्तम. 'ठाइं ठाइं बरवट । निवृत मंडीत घाट ।' -ऋ १८. बरवणें-अक्रि. शोभणें. प्रतिबिंब किंवा अनु- मापक । तैसें द्वैतमिसें येक । बरवतसे ।' -अमृ १.२६. बरवंटा- वि. (ल.) पतिव्रता; शुद्धाचारी. 'आम्ही गौळणी बरवंटा । जातों मथुरेच्या हाटा ।' -होला ९. बरवा-वी-वें-वि. १ (काव्य.) चांगला; छानदार. 'बरविया बरवंटा घनमेघसांवळा । वैजयंती माळा गळां शोभे ।' -तुगा ३ २ सुंदर; नामी; निवडक इ॰ [बरा] म्ह॰ बाहेर बरवा आंत हिरवा. ॰काळ होणें-(व.) काळ अनुकूल होणें; आर्थिक परिस्थिति अनुकूल येणें; भरभराट होणें. बरवेपण- न. सौंदर्य. 'मग अलंकारी बरवेपण । निवाडु दावी ।' -ज्ञा १.४४.

दाते शब्दकोश

बरवा

पुस्त्री (राग.) या रागांत षड्ज, तीव्र ऋषभ, कोमल गांधार, कोमल मध्यम, पंचम, तीव्रधैवत, कोमल व तीव्र निषाद हे स्वर असतात. जाती औडव-संपूर्ण. वादी ऋषभ, संवादी पंचम. गानसमय सर्वकाळ. [सं. वरम् ?]

दाते शब्दकोश

भावज्ञ

वर्म जाणणारा, गुणज्ञ (ज्ञानेश्वरी अध्याय ६, ओवी २१)

ज्ञानेश्वरीमधील कठीण शब्दांचे अर्थ (राज्य मराठी विकास संस्था प्रकाशित)

चाळु

पु. टाकून बोलणें. 'उपहासु चाळु । वर्म स्पर्शु ।' -ज्ञा १३.२७०. [चाळा]

दाते शब्दकोश

चौख(खु)रणें

सक्रि. जखडून बांधणें; चारी बाजूंनीं ताणून बांधणें; चौखारणें पहा. 'पार्था तें गा तम । रचूनि ऐसें वर्म । चौखुरी देहात्म । मानियातें ।' -ज्ञा १४.१७७. 'मोघरी मार बुधलेमार । चौखरून डंगारणेंमार ।' -दा ३.७.६५. [चौ + खूर]

दाते शब्दकोश

चौखरणे, चौखुरणे      

सक्रि.       जखडून बांधणे; चारी बाजूंनी ताणून बांधणे. पहा : चौखारणे : ‘पार्था तें गा तम । रचूनि ऐसें वर्म । चौरी देहात्म । मानियातें I’ − ज्ञा १४·१७७.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चिड(ढ)वणी

स्त्री. खिजवणी (एखाद्यास) कुत्सित बोलून, त्याचें वर्म काढून राग आणणें, चिडविणें. [चिडणें] ॰च्या गोष्टी-स्त्रीअव. राग, संताप, चीड आणणार्‍या गोष्टी. ॰चें भाषण-न. मनोवृत्तींना चालना देणारें भाषण; चेतविणारें भाषण; राग आणणारें भाषण.

दाते शब्दकोश

चिडवणी, चिढवणी      

स्त्री.       खिजवणी; (एखाद्याला) कुत्सित बोलून, त्याचे वर्म काढून राग आणणे, चिडवणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

छद्म      

न.       १. कपट; लबाडी लुच्चेगिरी; कपटाचा वेष. समासांत छद्मकृती, छद्मभाषण. छद्मवाक्य, छद्मवेश, छद्मव्यवहार : ‘छद्में कल्याण नसे ऐकावें प्रथम हें सदुक्तपण ।’ − मोसभा ६·१०३. २. उपरोधिक भाषण किंवा त्यातील खोच; वर्म. ३. इंगित; मतलब; गर्भितार्थ (कविता, वाक्य यांचा). [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

छद्म

न. १ कपट; लुच्चेगिरी; कपटाचा वेष. समासांत-छद्म-कृति-भाषण-वाक्य-वेश-व्यवहार. 'छद्में कल्याण नसे ऐकावें प्रथम हें सदुक्तपण । -मोसभा ६ १०३. २ व्यंग; दोष; छिद्र; उणेपणा. 'कोणाचें छद्म दहाजणांत काढूं नये.' ३ उपरोधिक भाषण किंवा त्यांतील खोंच; वर्म. 'त्यास गर्भ श्रीमंत म्हणून म्हणतांच खूष झालाल, पण आंतील छद्म त्याला समजलें नाहीं.' ४ इंगित; मतलब; गर्भितार्थ (कविता, वाक्य. यांचा). 'ह्या श्लोकां- तील छद्म निघाल्यावांचून तो चागंला समजणार नाहीं. '[सं.]

दाते शब्दकोश

दंश

गूढ वर्म, मर्म (ज्ञानेश्वरी अध्याय ६, ओवी २९१)

ज्ञानेश्वरीमधील कठीण शब्दांचे अर्थ (राज्य मराठी विकास संस्था प्रकाशित)

पु. १ नांगी मारणें; डसणें. २ चावा, डांस. ३ (ल.) मुद्दा; खोंच; वर्म; मर्म (भाषणाचें कामाचें). 'हा दंशु जंव नये हातां ।' -ज्ञा ९.१३६. ४ (ल.) आकस; डाव; चुरस; अदा- वत; हाडवैर. ५ (ल.) ग्रंथांतील कठिण भाग; गूढाभिप्राय. ६ डांस; वनमक्षिका. 'कौरवभट दंश मशक विजयधनुर्वल्लि काय ती चवरी ।' -मोभीष्म ११.५३. [सं.] दंशक-वि. डसणारा. दंशन-न.चावा; डसणें; दंश. दंशित-वि. चावलेला; डसलेला. दंशी-वि. १ चावणारा. २ मत्सरी; खुनशी; मनांत द्वेष धरणारा; डंखी.

दाते शब्दकोश

दंश      

पु.       १. नांगी मारणे; डसणे. २. चावा; ढास. ३. (ल.) मुद्दा; खोच; वर्म; मर्म (भाषणाचे, कामाचे). ४. (ल.) आकस; चुरस; अदावत; हाडवैर. ५. (ल.) ग्रंथातील कठीण, गूढ भाग. ६. डास : ‘कौरवभट दंश मशक विजयधनुर्वल्लि काय ती चवरी ।’ - मोभीष्म ११·५३. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

घरा      

पु.       १. (काटा, गळू इत्यादींमुळे अंगाला पडलेले) छिद्र; भोक; लहान घर. (काही जाऊन बसेल असे). २. (सामा.) छिद्र; भोक. पहा: घर: ‘धरिल कसा सद्रस तो, ज्या कलशाच्या घरा बुडाला च ।’ –मोअनु ८·३९. ३. जखम; व्रण; क्षत. घरा पाडणे, घरा पडणे – टोचून बोलणे; एखाद्याचे वर्म काढणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

घरा-रे-पाडणें-पडणें

एखाद्याचें वर्म काढणें; टोचून बोलणें; काळजास धक्का बसेल असें उणें भाषण करणें. 'पडले हाते हृदया धर्मोक्तें धिरडियासि जेवि घरे ।' -मोद्रोण २३.८७.

दाते शब्दकोश

जिव्हाळा      

पु.        १. आत्मा; सार; मर्म; मुख्य तत्त्व : ‘नेणती मुक्तीचा जिव्हाळा ।’ - एरुस्व ७·४३. २. मर्मस्थल; वर्म. ३. जीवित; प्राण; चैतन्याचे उगमस्थान; आधार : ‘नामरूपा तूंचि जिव्हाळा ।’ - एरुस्व १६·९२.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

जिव्हाळा

पु. १ उगम; उत्पत्ति; मूळ; झरा. 'या विहि- रीचा जिव्हाळा लहान आहे यामुळें पाणी थोडें.' २ आत्मा; सार; मर्म; मुख्य तत्त्व. 'नेणती मुक्तीचा जिव्हाळा ।' -एरुस्व ७.४३. 'जाणें भक्तीचा जिव्हाळा ।तोचि दैवाचा पुतळा ।' -तुगा, कीर्तन १.१२. ३ पोहोंच; आवांका; धारणाशक्ति. 'मुलाचा जिव्हाळा पाहून अभ्यास सांगा.' ४ कळवळा; काळजी; उत्कंठा; जीव लागणें; मन जडणें. 'दुखणेकर्‍याच्या शुश्रूषेस जिव्हाळ्याचा माणूस असावा' ५ (वीणा, इतर तंतुवाद्यें) घोडी आणि तारा जेथें एकत्र होतात त्या बिंदूवर जो कापूस लावतात तो; झारा. ६ मर्मस्थल; वर्म. ७ जीवित; प्राण; चैतन्याचें उगमस्थान; आधार. 'नामरूपा तूंचि जिव्हाळा ।' -एरुस्व १६.९२. 'विश्वाचा जिव्हाळा, व्यवहा- राचा जिव्हाळा.' ८ लाभ. 'तेतुला जिव्हाळा । मानावा हा ।' -ज्ञा १३.१०८९. ९ माया; ममता. [सं. जीव + आलय] जिव्हाळी- स्त्री. १ एखाद्या मर्माची जागा; नाजुक, वर्माचा भाग (नखाच्या, शिंगाच्या खालचा किंवा कानाच्या मागचा); सचेतन मांसाचा भाग; मर्मस्थान (क्रि॰ लावणें; लागणें). २ विण्याचा झारा. जिव्हाळा अर्थ ५ पहा. [जीव + आलय] जिव्हाळी-जिव्हाळीला लावणें-लागणें-मर्मभेद होणें; (अक्षरशः व ल॰) जिवाला लागून राहणें. जिव्हाळ्याचा-वि. अत्यंत मैत्रीचा; जिवलग; मायेचा; काळजीचा; कळकळीचा. 'तो गाजुदीखान याच्या जिव्हाळ्याचा होता.' -भाब २०. 'माझ्या जिव्हाळ्याचा एथें कोण्ही नाहीं म्हणून तूं मला मारतोस.'

दाते शब्दकोश

कर्मेंवर्में

नअव. वाईट कृत्यें; दोष; उणीवा; छिद्रें. (क्रि॰ काढणें). [सं. कर्म + वर्म]

दाते शब्दकोश

कर्मवर्म

न. छिद्र; दोष; कच्चेपणा; उणेपणा. 'मोर्चे- बंदी करणें तेव्हां गोवलकोटची कर्मेवर्मे मनास आणून मोर्चे घालावे लागतात.' -पेद ३.११६. [सं. कर्म + वर्म]

दाते शब्दकोश

कुळपट

न. १ गुप्त दोष; वर्म; व्यंग; खोडी. २ दोष; चूक, गुन्हा. (क्रि॰ काढणें; निघणें.)

दाते शब्दकोश

कुळपट      

न.       १. गुप्त दोष; वर्म; व्यंग; खोडी. २. दोष; चूक; गुन्हा. (क्रि. काढणे, निघणे.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कुळपट्या

वि. कुळपटें, वर्म, खोडी व्यंगें वगैरे काढणारा; गुह्य फोडणारा. [कुलपट]

दाते शब्दकोश

कुळपट्या      

वि.       कुळपटे, वर्म, खोडी, व्यंगे वगैरे काढणारा; गुह्य फोडणारा.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कुस्पृष्ट, कुस्पिष्ट      

न.       खोड; वर्म; न्यून; उणे; चूक; दोष. (क्रि. काढणे, निघणे.) [सं. कु + स्पर्श - स्पृष्ट]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कुस्पृष्ट-स्पिष्ट

न. खोड; वर्म; न्यून; उणें; चूक; दोष. (क्रि. काढणें; निघणें). [सं. कु + स्पर्श-स्पृष्ट]

दाते शब्दकोश

खा(खां)च

स्त्री. १ खड्डा; खळगा; खोंचा. २ (ल.) व्यापारांतील बूड, तोटा. (क्रि॰ येणें; होणें; पडणें; बसणें). [खचणें; का कच्चु = खोंचा, खळी] ॰खव (ब)ळ-खळगा- खोबळा-स्त्रीपु. खाचंखड्डा; खाचंखळी; खोलगीं बिळें (व्यापक रीतीनें) (सामा.) खाचं. 'चालते समयीं खाचंखळगा पाहून चालवें म्ह॰ जिकडे गेली बाला तिकडे खास खबळा. ॰खोंच-स्त्री. चढउतार; उंचसखल' विषमता (भिंत, जमीन यांची )' भिंत रचली मात्र आहे, परंतु तिच्या खांचाखोंचा काढिल्या नाहींत. ' २ वाढ व घट; न्यूनाधिक्य; कमजास्तपणा. बारीकसारीक दोष (हिशेब, नक्कल, मसुदा, यांत ).' ह्या मसू- द्यांत खाचंखोंच असल्यास काढून तो साफ लिहा. ' ३ गायनांतील खटके; आवाजांत चढउतार; उच्चनीच स्वर. ४ मर्म; वर्म; बिंग. 'यांतील बारीक खांचाखोंचा मला पूर्ण माहित आहेत. ५ भाषणांत, लेखनांत अलंकार ज्यांमुळे साधतो ती शब्दयोजना

दाते शब्दकोश

खाचखोच      

स्त्री.       १. चढउतार; उंचसखळ; असमानता (भिंत, जमीन यांची). २. वाढ व घट; न्यूनाधिक्य; कमजास्तपणा; बारीकसारीक दोष (हिशेब, नक्कल, मसुदा यांत.) ३. गायनातील खटके; आवाजात चढउतार; उच्चनीच स्वर. ४. बारकावा; सूक्ष्मज्ञान; मर्म; वर्म; बिंग. ५. भाषणात, लेखनात चढउतार ज्यामुळे साधतो ती शब्दयोजना. ६. खुपणारी जागा, शब्द इ.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खर्मवर्म

न. व्यंग; वर्म; दोष; चूक; दुष्कृत्य; बिंग; काळेंबेरें. (सामा. अव. प्रयोग) खर्मेंवर्में. (क्रि॰ काढणें; सांगणें; उच्चारणें; बोलणें), ‘तुला लोकांची खर्मेंवर्में काढाव- यास कोणी सांगितलें ?’ [सं. कर्मवर्म]

दाते शब्दकोश

खर्मवर्म      

न.       व्यंग; वर्म; दोष; चूक; दुष्कृत्य; बिंग. (सामान्यतः अव. प्रयोग, खर्मेवर्मे.) (क्रि. काढणे, सांगणे, बोलणे.) [सं. कर्मवर्म]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खुसप(पु)ट

न. १ गुप्त दोष; व्यंग; न्यून; चीड येण्या- जोगें किंवा अप्रतिष्ठा व्हावयाजोगें वर्म, चुकी; गुंजावीस; बारीक- सारीक दोष. (क्रि॰. काढणें). २ (अव.) अल्प, क्षुद्र, संदिग्ध टीका, शेरा, भाषण; गोडीगुलाबीनें व निकाल लागेल अशा रीतीनें जास्त महत्त्वाची गोष्ट पुढें मांडण्यासाठीं बोलणें (विनंति, खरडपट्टी); हातीं घेतलेल्या कामापासून परावृत्त करण्यासाठीं काढलेल्या अडचणी; आक्षेप. ३ भांडणास कारण किंवा निमित्त; कळ; कुरापत; खोडी. (क्रि॰ काढणें; निघणें). ॰रचणें- मांडणें-(भांडण उकरून काढण्यासाठीं) एखाद्याचे न कळत झालेले अपराध, चुक्या, व्यंगें ओळीनें पुढें मांडणें, ठेवणें. [कसपट, कुसपट; सं. कुशपत्र ?]

दाते शब्दकोश

खुसपट, खुसपुट      

न.       १. गुप्त दोष; व्यंग; न्यून; चीड येण्याजोगे किंवा अप्रतिष्ठा होण्याजोगे वर्म, चुकी; बारीकसारीक दोष. (क्रि. काढणे.) २. भांडणाला कारण किंवा निमित्त; कळ; कुरापत; खोडी. (क्रि. काढणे, निघणे.) (वा.) खुसपट रचणे, खुसपुट रचणे, खुसपटे मांडणे, काढणे - (भांडण उकरून काढण्यासाठी) एखाद्याची न कळत झालेली आगळीक, चुका यांचा पाढा वाचणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खूण

स्त्री. १ चिन्ह, ज्यानें एखादी गोष्ट जाणली जाते किंवा समजली जाते तें लक्षण; ठिपका; निशाणी; व्यंजन; संकेत- चिन्ह. ' हळूच खुणें सांगतसे । ' -नव १२.१८८ २ (विशेषतः) क्षेत्रसीमा चिन्ह; शींव. ३ संकेत; इशारा (डोकें हलविणें, हात- वारे, नेत्रसंकेत इ॰ क्रियेनें दिलेला). सूचना; सांकेतिक सूचना; उल्लेख; पर्यायोक्ति. (गुप्तरूपानें आपला अभिप्राय दुसर्‍यास सम- जावा म्हणून केलेला) ४ वर्म; मर्म; लक्षण. 'या खुणा तूं कहीं । चुकों नकों ।' -ज्ञा ९.१३४. [सं. क्षुण्ण; का. खून] (वाप्र.) ॰धरणें-ध्यानांत ठेवणें. ॰पाळणें-आज्ञा पाळणें; मनोगता- प्रमाणें वागणें.' नव्हे तयाची खूण पाळिळी । ' -ज्ञा १८.९१४. म्ह॰ दादाची खूण वहिनी जाणें = एखाद्याचें मर्म त्याचा जव- ळच्या माणसास ठाऊक असणें. समशब्द- ॰खाण-स्त्री. खुणा, संकेत, मनोगत, सूचना, चिन्हें यांस व्यापक शब्द. खूण पहा. ॰गांठ-स्त्री. १ (एखाद्या गोष्टीची) आठवण होण्यासाठीं किंवा ती सोडून देण्यासाठीं वस्त्रास किंवा त्याच्या पदरास मारिलेली गाठं. २ (ल.) खात्री. म्ह॰ विश्वास कीं खूणगांठ. ॰मुद्रा-स्त्री. इशारा, चिन्ह, निशाणी, मुद्रा, ठसा, अंक इ॰ मोधम शब्दा- बद्दल आणि व्यापक अर्थानें योजतात. एखादी खूण किंवा सर्व खूणा. खूण पहा.

दाते शब्दकोश

खूण      

स्त्री.       १. चिन्ह; ज्यावरून एखादी गोष्ट जाणली जाते किंवा समजली जाते ते लक्षण; ठिपका; निशाणी; व्यंजन; संकेतचिन्ह : ‘हळूच खुणें सांगतसे ।’ - नव १२·१८८. २. (विशेषतः) क्षेत्रसीमाचिन्ह; शीव. ३. संकेत; इशारा (डोके हालवणे, हातवारे, नेत्रसंकेत इ. क्रियेने दिलेला); सूचना; सांकेतिक सूचना; उल्लेख; पर्यायोक्ती (गुप्त रूपाने आपला अभिप्राय दुसऱ्याला समजावा म्हणून केलेला). ४. वर्म; मर्म;लक्षण : ‘या खुणा तूं कहीं । चुकों नको ।’ - ज्ञा ९·१३४. [सं. क्षुण्ण] (वा.) खूण धरणे - ध्यानात ठेवणे. खूण पाळणे - आज्ञा पाळणे; मनोगताप्रमाणे वागणे : ‘नव्हे तयाची खूण पाळिली ।’ - ज्ञा १८·९१४. खूण पुरणे - खूण पटणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

माथा-थें

पुन. १ डोक्याचा अग्रभाग; टाळू २ कपाळ. 'अजायुद्ध होतें तेव्हां माथ्यासी माथा आपटतो.' ३ डोकें. ४ घुसळावयाच्या रवीचा माथला;एखाद्या तसल्या वस्तूचें डोकें. ५ शिखर; टेंबा; शेंडा (पर्वत, झाड इ॰ चा). ६ लाक्षणिक अर्थां- करितां डोई पहा. माथां-क्रिवि. (काव्य) डोक्यावर. 'धर्म- प्रसाद माथां आंगी भगवत्प्रसाद दृढ वर्म ।' -मोकर्ण ११.९. [सं. मस्तक; प्रा. माथअ; पं. मथ्था; सिं. मथो; हिं. बं. माथा; गु. माथुं] म्ह॰ १ उरीं केस माथा टक्कल. २ पोटांत जळें माथ्यांत कळे. (वाप्र.) ॰तुकविणें-आनंदाने मस्तक डोलविणें. 'तियांचे भाॐ वाणिता । कवींसी माथा तुकविणें ।' -शिशु ६००. माथां मारणें-एखाद्यावर सोंपविणें; विश्वासणें; हवालणें; लावणें; अंगा- वर टाकणें (काम, धंदा). माथां वाहणें-फुलें इ॰ डोक्यावर सम- र्पण करणें. 'वाटे इषुंनीं माथां धीर गुरु म्हणोनि वाहिला काय? ।' -मोभीष्म ११.१२१. (उजळता)माथा होणें-आलेला अपवाद इ॰ दूर होणें. माथीं बसणें-एखाद्यावर लादलें जाणें. माथ्यांत राख घालणें-वैतागणें. माथ्यार पदर गांड उक्ती-(गो.) वरचा देखावा उत्तम राखणें पण आंत कांहींच अर्थ नसणें. माथ्यावर चढविणें-लडिवाळपणें वाटेल तसें वागूं देणें; डोक्यावर घेणें. माथ्यावरचा पदर टाकणें-उत- रणें-पडणें-वेश्या बनणें (बहुतेक सभ्य स्त्री डोकीवरून पदर घेते यावरून). माथ्या वैयलयान हुवार वचप-(गो.) डोकीवरून पाणी जाणें; गंगेत घोडे न्हाणें; एखाद्या कामाची मेहनतीची शिकस्त होणें याअर्थी. सामाशब्द- माथफळी-स्त्री. गोसावी, बैरागी लोक कुबडीवजा टेकण्यासाठी घेतात त्या साध- नाची वरील आडवी फळी. माथाकूट-स्त्रीन. १ (मूर्खास शिक- विणें, हटवाद्याशीं वाद करणें इ॰) कंटाळा आणणारा, त्रास- दायक व बिनफायदेशीर धंदा, काम. २ एखाद्या गोष्टी बद्दल चीड व शीण आणणारा हट्ट धरून बसणें; एकसारखी बडबड; त्राग्याची मागणी (वाक्यांत काम, छंदा. उद्योग इ॰ शब्दाबरोबर योजतात). ॰फोड-स्त्री. माथेफोड. ॰रोग-पु. गुरांचा एकरोग. -शे ६.४८. ॰शूळ-पु. १ भयंकर डोकेदुखी. २ एक सरळ वाढणारी वनस्पति. माथाटी-स्त्री. माथोटी पहा. माथें-न. शिर; मस्तक. 'संक- टांत तीच म्हणोनी उंच करी माथें ।' -विक ६ [सं. मस्तक] (वाप्र.) ॰करणें-(कु.) (विधवांनी) केशवपन करणें. ॰पिक- वणें-डोकें उठवणें; त्रास देणें. ॰फिरणें-वेडा होणें; अतिशय रागावणें. 'माझें माथें फिरलें.' ॰बोडविणें-हजामत करविणें.' सामाशब्द- ॰माथेकळी-स्त्री. आंगरख्याची एक कळी, भाग. ॰फळी-स्त्री. उंसाच्या चरकांतील नवरानवरीचे माथे जीत बस- विलेले असतात ती आडवी फळी. ॰फिरू-पु. संतापी; अविचारानें भलतेंच कृत्य करणारा; भ्रमिष्ट. ॰फोड-स्त्री. माथाकूट पहा. -वि. कठिण व त्रासदायक; चीड व शीण आणणारें (काम). ॰सूळ-पु. डोकेंदुखी. माथो-पु. (चि.) मस्तक; कपाळ; (सामा.) वरचा भाग. माथोट, माथोटी-नस्त्री. १ बैलाच्या शिंगाच्या मुळाशीं बांधलेली दोरी. २ अशी दोरी जेथें बांधतात तो बैलाच्या डोक्याचा भाग. ही दोरी बैलाला पकडण्याच्या उपयोगी पडते व हिला कासरा लावतात. ३ शिंगाभोवतालचें गोंडे इ॰ ज्यास बांधलेले असतात तें बंधन. ४ डोंगराचा माथा. [माथा + अट] माथ्या-थ्यो-पु. १ रवी इ॰ चा माथा, बोंड. २ (चि.) रवी. माथ्याचा-वि. (गुज.) हेकेखोर; हट्टी.

दाते शब्दकोश

मर्म

(सं) न० खुबी, तत्त्व, युक्ति, तात्पर्य. २ जीवनस्थान, ज्या ठिकाणीं प्रहार झाल्यानें तत्काळ मरण येतें असा शरीराचा भाग, वर्म.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

न. १ गूढ शक्ति; सुप्त गुणधर्म; कार्यसाधक गुण (यांचे अनुमान कार्यावरून होतें). 'सर्व पदार्थांमध्यें जीं ईश्वरानें मर्में ठेविलीं आहेत तीं कोणास समजतात.' २ (शरीरादिकाचा) नाजूक भाग, अवयव; जिव्हाळी; वर्म. ३ छिद्र; उणेपणा; व्यंग. 'मर्म उघडितां, मानी पुरुष बुडाले त्रपेंत, जड तरले ।' -मोआदि २४.४७. ४ रहस्य; गूडार्थ; खरा आंतला हेतु (भाषण, लेख इ॰चा,); तात्पर्य. ५ मेख; मुद्दा; खोंच; रोंख. ६ कला; खुबी; गूढविद्या; युक्ति; गुरुकिल्ली (एखादें कोडें, रचना, क्रिया, धंदा इ॰ ची). 'अद्यपि श्लोक लावण्याचें मर्म तुला समजलें नाहीं.' 'घड्याळांतलें मर्म कळत नाहीं.' ७ शत्रु; अरि; नाशक; भंजक; उलट आणि प्रतिक्रिया करणाऱ्या गुणांची वस्तु. 'केळ्याचें मर्म तूप, गव्हाचें मर्म कांकडी.' [सं.] ॰भेद-पु. १ नाजुक भागावर केलेला आघात; जिव्हाळीं झालेली जखम. २ (ल.) जिव्हाळीं लागणें, झोंबणें; मर्मस्पर्श. ३ कट, युक्ति, बेत शोधून काढणें; खुबी, रहस्य हुडकणें; बिंग बाहेर काढणें; गूढपरिज्ञान. ४ एखा- द्याचा उणेपणा. व्यंग, दोष इ॰ चा स्फोट करणें; एखाद्याच्या मनाला झोंबेल अशा गोष्टी उघड करणें. ॰भेदक-भेदी, वेधक वेधी-वि. जिव्हाळीं स्पर्श करणारा; नाजूक भागाला जखम करणारा; बिंगें उघडकीस आणणारा (अक्षरशः व ल). ॰वेत्ता-वि. मर्म जाणणारा; मर्मज्ञ. ॰स्थल-स्थान-न. १ नाजूक भाग; जिव्हाळीं. २ (ल.) दोष. उणीव असलेलें स्थान; व्यंग. ॰स्पृक्- वि. नाजूक भागावर स्पर्श करणारा, जखम करणारा; चावा घेणारा (अक्षरशः व ल.); मर्मभेदी. ॰ज्ञ-वि. १ मर्म, गूढ, खुबी जाणणारा. २ अत्यंत कुशल; निपुण; पंडित. मर्मण-वि. मर्मज्ञ (अप.) 'मानवा सुजाणा मर्मणा सुजाणा ।' -देप ११३. मर्मान्वेषण-न. एखाद्याचें मर्म, उणेपणा शोधून काढणें; छिद्रा- न्वेषण. (अक्षरशः व ल.) मर्मान्वेषी-वि. मर्म, दोष, उणें शोधणारा; छिद्रान्वेषी. मर्मी-वि. १ गुप्त, गूढ, गोष्ट जाणणारा. २ एखाद्या गोष्टींत अत्यंत निपुण; कुशल; मर्मज्ञ. ३ मर्मभेदी; भेदक; झोंबणारें; टीकात्मक (भाषण). मर्मीक-वि. (प्र.) मार्मिक पहा. मर्मोद्घाटक-वि. एखाद्याचें मर्म, दोषस्थल, कमीपणा उघडकीस आणणारा; मर्मभेदी. मर्मोद्घाटन-न. एखाद्याचें व्यंग, उणें, दोष उघडकीस आणणें; मर्मभेद.

दाते शब्दकोश

निरोध

पु. १ प्रतिबंध अटकाव; कैद; अडथळा. 'बेझंट- बाईंचा निरोध करून ...स्वराज्याच्या चळवळीस धोका आण- ण्यांत शहाणपणा कोणता?' -टि ३.३४१. २ नियमन; संयमन; बंधन; प्रतिकार. [सं.] निरोधकवि. १ दाब, आटोका, ताबा, बंधन इ॰त ठेवणार; दमन करणारा. २ अटक, प्रतिकार करणारा; अडथळा आणणारा निरोधणें-सक्रि. १ निग्रह, दमन, संयमन करणें. 'परी कर्मेंद्रियप्रवृत्ती । निरोघुनि ।' -ज्ञा ३.६४. २ बंधन, ताबा इ॰मध्यें ठेवणें; अटकाव; हरकत करणें. ३ रुद्ध करणें; आडवणें; रोखणें. -एभा ६.३२२. 'वर्म जाणती त्या एकल्या एकटा । बैसतील वाटा निरोधूनि ।' -तुगा १४.निरोधन-न. १ निग्रह दमन दाब; बंधन. २ अटकाव; प्रतिकार; अडथळा. (इं.) पिकेटिंग. 'विदेशी कापड विकण्याबद्दल अहमदाबाद स्वयंसेवकांनीं निरोधन करून अन्नत्याग केला.' -के २.१२.३०.

दाते शब्दकोश

निरोधणें

निरोधणें nirōdhaṇēṃ v c (Poetry. निरोधन) To restrain or confine; to control or check; to obstruct or impede. Ex. वर्म जाणति त्या एकला एकवटा ॥ बैसतील वाटा निरोधुनि ॥.

मोल्सवर्थ शब्दकोश

परिणाम

पु. १ शेवट; निकाल; अखेरी; सार; फळ; निष्पत्ति. 'पापचा परिणाम नर्क.' २ (व्यापक. सामा.) सुख- कारक शेवट (धंदा, काम वगैरेचा); सिद्धि. ३ अडचणींतून निभा- वून गेलेली गोष्ट; यशस्वी निकाल; धडगत (नकारार्थी प्रयोग). (क्रि॰ लागणें). 'पांचशे रुपये दिल्यावाचून माझा परिणाम लागणार नाहीं.' ४ आकार, स्थिति यांचे रूपांतर; बदल; अवस्थांतर स्थित्यंतर. 'पाण्याचा धूमरूप परिणाम होऊन त्याचा पुन्हा पर्जन्यरूप परिणाम होतो. ५ अंतिम अवस्था; अखेर; चरमा- वस्था. ६ (ल.) ब्रह्म. 'जो निजानंदें धाला । परिणामु आयुष्या आला । पूर्णते जाहला । वल्लभु जो ।' -ज्ञा १२.१७१. [सं.] परिण(णा)मणें-१ परिणामाला पावणें. 'ऐसे स्वानुभवविश्रामें । वैराग्यमूळ जें परिणमे । तें सात्त्विक येणें नामें । बोलिजे सुख ।' -ज्ञा १८.७९३. २ पालटणें; बदलणें. 'चुकलें मत्प्राप्तीचें वर्म । तो धर्म अधर्म परिणमे ।' -एभा १४.२९९. ३ परिपक्व होणें. ४ विस्तारणें. 'सोनें परिणामलें सांखळें । कीं साडे पन्हरें जालें कडि- वळें ।' -ऋ ९३. ॰कार्य-न. पूर्व कारणाचा लोप होऊन जें त्यास रूपांतर प्राप्त होतें त्याचें नांव. जसें-दूध मूळ कारण लोपून त्याचें झालेलें दहीं हे रूपांतर. -हंको. ॰दाह-पु. १ मरण्याच्या वेळीं शरीराची होणारी आग, जाळ, भडका, दाह. २ अन्नपचन होत आल्यावर पोटांत उठणारी आग (रिकाम्या पोटांत ही उठते). ॰शुद्ध-वि. ज्याचा शेवट गोड होतो तें; सुपरिणामी; सुखपर्यवसयी. ॰शूल-पु. १ चांगलें अन्नपचन झालें नसतां पोटांत उठणारी कळ. २ अन्नपचन पुरें झालें असतां पोटांत होणारी आग. परिणामदाह अर्थ २ पहा. ३ मरणाच्या वेळच्या वेदना; शेवटची धडपड. ४ कोणताहि असाध्य रोग.

दाते शब्दकोश

फरळ

न. (ब.) १ पसरट व झुपकेदार अशी झाडाची तोडलेली फांदी. २ (व.) वेल उंच चढण्याकरितां लावलेली काटकी. ३ पेरणीनंतर वरम बुजविण्याकरितां फिरविण्याची फास. [फर + ळ प्रत्यय]

दाते शब्दकोश

फसाटी

स्त्री. (व.) दोरास बांधलेला कांट्यांचा भर; फरळाचा फास (ज्वारीचे पेरणीनंतर वर्म पडतात ते बुजवण्या- करितां). एका फसाटींत चार दोटे असतात. [फास + काटी]

दाते शब्दकोश

रंध्र

न. १ छिद्र; भोंक; वेज. २ भगदाड; डोंगरांतील गुहा. ३ (ल.) व्यंग; उणीव; दोष; न्यून; बिंग. ४ (ल.) नाजूक भाग; मर्म; वर्म. [सं.] ॰शलाका-स्त्री. छिद्र पाडण्याचें हत्यार. रंध्रान्वेषण-न. १ भोंक, छिद्र शोधून काडणें. २ न्यून पाहणें; उणीव, बिंग, मर्म शोधणें, हुडकून काढणें. [सं.] रंध्रा- न्वेषी-वि. छिद्रान्वेषी; दोष काढणारा. [सं.] रंध्रिका-स्त्री. एक वाद्य. 'ढोल दमामे मृदंग चंग । शंख रंध्रीका स्वरशृंग ।' -स्वादि ८.५.९५.

दाते शब्दकोश

सोयरा

पु. १ लग्नामुळें झालेला आप्त; नातेवाईक. २ वेश्या, बटीक इ॰ चा भाड्या, संभोगार्थ ठेविलेला कायमचा माणूस; जार. म्ह॰ १ धरील तो सोयरा, वर्म पाहील तो वैरी.' २ सोयर्‍यांत साडू, हत्यारांत माडू, भोजनांत लाडू-या सर्वांचा सोयीनें फायद्याकडे उपयोग होतो. ॰धायरा-जन-पु. नाते- वाईक; स्नेही; सोबती; (व्यापकार्थीं अव. प्रयोग) (गो.) सोयधायरा. [सोयरा द्वि.] सोयरी-स्त्री. १ आप्त स्त्री. २ ठेवलेली स्त्री; रखेली. सोयरीक-स्त्री. १ सोयरगत पहा, विवाहसंबंध. २ (ना.) लग्नांत नवरीस दागिने घालण्याचे वेळचा विधि. सोयरें माणूस-न. नातेवाईक.

दाते शब्दकोश

सोयरा sōyarā m (स्वीय S Own.) A connection, one related by marriage. Pr. सोई धरील तो सो0 वर्म पाहील तो वैरी. 2 A term for the gallant or man kept by a dancing girl, slave-girl, or other prostitute. सोयरें माणूस n A person of kin, a kins-man or -woman.

मोल्सवर्थ शब्दकोश

उगविणें

सक्रि. १ गुत्यांतून मोकळें करणें; स्पष्ट करणें; फोड करणें. 'सांगितलें संतीं तुम्हां उगवुनी । गर्भासी येउनी यमदंडा ।' -तुगा १५. २ उल्लेखून दाखविणें 'हें कलम तुम्ही खरें म्हणतां परंतु तुमचे हातचें टांचण आहे त्यांत उगवलेलें नाहीं.' ३ चढून वर येणें. 'तुम्ही खोळंबा न करतां तर घाट उगवून एव्हांना पार गेलों असतों.' ४ (कों. गो.) सूड घेणें. ५ संकट निवारणें. 'उगवावया हंसगीत । सुनिश्चित सांगितलें ।' -एभा १६.४२; 'असें वर्म सांगून श्रीहरीनें उगविलें सांकडें' -पला ५४.६ (गो.) केंस विंचरणें; गुंता काढणें. 'आगो दिवो लाँच्या पयली केंस उगोंक सांग.' [सं. उद् + गम्]

दाते शब्दकोश

उखाळी, उखाळीपाखाळी, उखाळीवाखाळी

स्त्री. वर्म; वैगुण्य; दोष; व्यंग; कमीपणा बाहेर काढणें; वैगुण्य काढून केलेलें भांडण. (क्रि॰ काढणें.) 'उखाळ्या पाखाळ्या काढोनि भांडावें । वर्दळीस यावें काय त्यांनी ।' [उखळणें द्वि.]

दाते शब्दकोश

उखाळी, उखाळीपावाखाळी,      

स्त्री.       वर्म; वैगुण्य; दोष; व्यंग; कमीपणा बाहेर काढणे; वैगुण्य काढून केलेले भांडण. (क्रि. काढणे) : ‘कडमड्याचे जोशी एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढीत.’ − असामी १०. [उखळणेचे द्वि.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उण-खु-खूण

स्त्री. १ हेतु; मनोगत; कामना. 'नायट्यांभेण । न मोडिजे नागांची आण । तैसी पाळी उणखुण । स्त्रियेची जो ।।' -ज्ञा १३.८००. २ वर्म; रहस्य. 'म्हणोनि एक एकाधीन । जाणती उणखूण येरयेरां ।' -निगा १७७. ३ प्रत्यय; अनुभव. 'तें शोधित- सत्वाचें लक्षण । हें मी जाणें उणखूण ।' -एभा ११.७२५. ४ ओळखण्याचें लक्षण; चिन्ह; खाणाखूणा. 'एकधां विभागे अंतःकरण । त्याची उणखूण निज लक्षण ।' 'ऐकोनियां उणखुणेसी । चरफडी जैसी वोव्हळ ।' -एभा २३.९७३. [उणें + खूण]

दाते शब्दकोश

उणखुण, उणखूण      

स्त्री. १. हेतू; मनोगत; कामना : ‘नायट्यांभेण । न मोडिजे नागांची आण । तैसी पाळी उणखुण । स्त्रियेची जो ॥’- ज्ञा १३·८०१. २. वर्म; रहस्य : ‘म्हणोनि एक एकाधीन । जाणती उणखूण येरयेरां ।’- निगा १७७. ३. प्रत्यय; अनुभव : ‘तें शोधित सत्त्वाचें लक्षण । हे मी जाणें उणखूण ।’ -एभा ११·७२५. ४. ओळखण्याचे लक्षण; चिन्ह; खाणाखुणा : ‘ऐकोनियां उणखुणेसी । चरफडी जैसी विव्हळ ।’ -एभा २३·९७३.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

ऊणखूण      

स्त्री.       १. वर्म; रहस्य; गुपित; न कळणारी गोष्ट. पहा : उणखूण : ‘हे जिव्हारांची ऊणखूण । तुज संपूर्ण सांगितली ।’ − एभा ११·१५६०. २. प्रचीती; वाटाघाट; खात्री पटवणें; चर्चा : ‘रिघोनि सद्गुरूस शरण । काढून शुद्ध निरूपण । याची करिसी ऊणखूण । प्रत्यक्ष आतां ।’ − दास ६·१०·५२. ३. कमीअधिकपणा.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

ऊणखूण

स्त्री. १ वर्म; रहस्य. उणखूण पहा. 'हे जिव्हा- रींची ऊणखूण । तुज संपूर्ण सांगीतली ।' -एभा ११.१५६०.२ प्रचीति; वाटाघाट; चर्चा. 'रिघोनि सद्गुरूस शरण । काढून शुद्ध निरूपण । याची करिसी ऊणखूण । प्रत्यक्ष आतां ।' -दा ६.१०. ५२. उणखूण पहा.

दाते शब्दकोश

उर्मी

वि. वर्मी; गुप्त; गूढ; सांकेतिक. 'त्यास हालींहि पत्रें आलीं त्यास गुह्य लिहिलें. आम्हीं मराठें, उर्मी काय जाणों; प्रकट ल्याहावें म्हणजे समजण्यांत येईल. -रा १०. ९६. [सं. वर्म?]

दाते शब्दकोश

वेज-जें, वेझ-झें

न. १ मोतीं, मणी, रत्नें इ॰ ना पाडलेलें भोंक; छिद्र. 'तया ब्रह्मस्वरूपाचा गुणीं । भणौनि सुवेंझु भरले मुक्तामणी ।' -ऋ २४. -उषा १७२९. २ सुई, दाभण इ॰ चें भोंक; नेढें. (क्रि॰ पाडणें). ३ (सामा.) छिद्र; भोंक. 'पडलें काळिजा वेज देवौघनागाचें तेज ।' -मोरामायणें १. २५२.९६. ४ वर्म; लक्ष्य; केंद्र. 'चुकलिया त्यागाचें वेझें । केला सर्व त्यागुही होय वोझें । निषिद्धें त्या सर्वत्र जुंझे । वीतराग ते ।' -ज्ञा १८.१३४. [सं. वेध; प्रा. वेज्झ; का वेज्ज] वेझ देणें- भोंक पाडणें. 'प्रज्ञा फळतया अर्था वेझ देणे जें ।' -ज्ञा १८. ८६३; -शिशु १०३७. वेजीं पडणें-वेजीं उतरणें पहा. 'आतां नथ नका लपवूं. तीं उतरलेली वेजीं पडलेलीं मोतीं दिसूं देत सर्वांना.' -भाऊ ४८. वेजीं उतरणें-मोतीं, माणिक इ॰ चें भोंक, तार, रेशीम इ॰च्या सततच्या घर्षणानें मोठें होणें (वेज मोठें झाल्यास किंमत कमी होते). 'शिंदे होळकर एवढे लढते सरदार असतां त्यांची केवळ हिंमत हरली. वेंजीं उतरलीं.' -भाब १०४. वेज टिकली-स्त्री. (सोनारी) ज्यांतून तार ओढली जाते तें लोखंडीपट्टीला पांडलेलें भोंक. वेझपट्टी-स्त्री. (सोनारी) चांदी-सोन्याचें सूत अगर तार ओढण्याची, भोकें असलेली पट्टी; जंतरपट्टी.

दाते शब्दकोश

विरमणें

अक्रि. विरमणें पहा. लज्जित होणें; शरमणें; द्रवणें. 'तैसे सधीर परी विरमलें । हृदय तयाचें ।' -ज्ञा २. ३. [सं. वर्म]

दाते शब्दकोश

विरमणें viramaṇēṃ v i (वर्म S) To be touched in a tender or sore place, figuratively; to be stung to the quick.

मोल्सवर्थ शब्दकोश

विरंबणें

अक्रि. १ ओशाळणें; लाजणें; खाली पहाणें; थिजणें; विरमणें. २ पचपचीत होणें; कचकचीत, बेचव होणें (भात). [म. वरमणें; सं. वर्म]

दाते शब्दकोश

वराम

वराम varāma n The stern (of a ship or boat).

मोल्सवर्थ शब्दकोश

वर्मेंकर्में

वर्मेंकर्में varmēṅkarmēṃ n pl (वर्म & कर्म) The follies, foibles, failings, secret slips and trippings (of a person, as exposed or brought forth in array against him). v काढ g. of o. Sometimes वर्मकर्म occurs--A folly, foible &c.

मोल्सवर्थ शब्दकोश

वर्मी

वर्मी varmī a (वर्म q. v.) Poignant, piercing, pricking, cutting, stinging, probing--speech &c. 2 That is acquainted with the secret foibles, faults, trippings, dishonorable points of. 3 That is familiar or intimate with the turnings and windings, the mysteries and intricacies, the art or trick (of a process or business, of a machine or contrivance). 4 That pierces into or discerns the latent meaning or purpose (of a passage in a book, of a speech &c.); that apprehends or knows the point, sting, bearing, aim, drift. 5 That has tender or touchy places. Ex. वर्मी पुरुषास चैघामध्यें सभाकंप सुटतो.

मोल्सवर्थ शब्दकोश

वर्मणें

वर्मणें varmaṇēṃ v i (वर्म) This word, being pronounced as वरमणें, should be so written. See वरमणें.

मोल्सवर्थ शब्दकोश

हाड

न. १ अस्थि; हाडूक. २ (ल.) मूळ जात; उत्पत्ति. 'त्या मनुष्याचें हाड खरें.' ३ अंगकाठी; शरीररचना; बांधा (जनावर, माणूस इ॰ चा). [सं. हड्ड; हिं. हड्डी] म्ह॰ १ हाड तितकें शेंपूट जाड तोंड जेवण वाढ. २ (गो.) हाडली पड खाल्ली पड-हातावरचें पोट हाडचा-वि. १ मूळचा; जातीचा; वर्णाचा. 'हा हाडाचा ब्राह्मण.' २ स्वभावाचा. 'हाडाचा गरीब आहे.' एका हाडाचा-हाडामासाचा-वि. एकाच जातीचा, कुळाचा. हाडाचा खंबीर-कणखक-कठीण-बळकट-खबरदार-वि. कणखर प्रकृतीचा-शरीराचा-बांध्याचा शरीरानें मजबूत. हाडाचा खरा-चांगला-भला-अस्सल; जातीवंत; टिकाऊ (मनुष्य, वस्तु). 'हा रुपया वरून वाईट दिसतो पण हाडाचा खरा आहे.' हाडांचा चुना-चुरा-चूर- हाडांचीं काडें-हाडांचें पाणी-हाडांचे मणी-हाडांच्या फुंकण्या-करणें-हाणें-शरीर झिजविणें; फार परिश्रम करणें. शरीर खराब होणें; रोडावणें; झिजणें. हाडांला-हाडीं खिळणें-१ सर्व अंगांत मुरणें, शिरणें; दृढमूल होणें (भावना, रोग, गुण, दुर्गुण). हाडाला-हाडीं लागणें-१ (जिव्हारीं लागणें; वर्मीं लागणें. २ त्रासदायकपणें चिकटणें. ३ (मूल, कर्ज, धंदा इ॰ बद्दल). फार काळजी लागणें; अभ्यास-चिंता-शोध इ॰चा विषय होणें. हाडांला-हाडीं-फासण्या घालणें- मारणें-जिव्हारी टोचून बोलणें; एखाद्यास लागेल असें बोलणें. हाडांवर-हाडीं घाव घालणें-१ वर्म मर्मच्छेंद करणें. २ कडक रीतीनें कठोरपणें वागविणें. हाडावर चोट असणें-(वना.) तोशीस लागणें. हाडांशीं लग्न लावणें-म्हातार्‍याशीं किंवा अत्यंत रोडक्या माणसाशीं मुलीचें लग्न लावणें. हाडीं विसा- वणें-हाडीं शिरणें व तेथें थांबणें (जबर शत्रूचें शत्रुत्व, स्वतःच्या दुष्कृत्याचा पश्चात्ताप, असाध्य रोग). हाडीं शुद्ध-जातीनें, मकानें शुद्ध, चांगला. हाडें उजविणें-भाजणें-शेकणें-कसें /?/ लग्न करणें; लग्न होणें. (अविवाहित, ब्रह्मचारी मृत झाला असतां /?/ प्रेताचा समावर्तन व विवाह संस्कार करून मग दहन करतात. हा /?/संस्कार कसा तरी उरकून घ्यावा लागतो. यावरून ल.) हाडं घुसळणें-१ अतिशय काम करणें. २ सतावणें; गांजणें; जर्जर करणें. हाडें निघणें-पडणें-हाडें दिसणें; फार अशक्त, रोड होणें. हाडें मोडणें-घुसळणें-खिळखिळीं करणें- अतिशय गांजणें; निष्ठुरपणानें छळणें; त्रास देणें. सामाशब्द- ॰कपाळ्या-वि (हाडाच्या कपाळाचा-कपाळावर नशीब लिहिलें असतें म्हणून) दुर्दैंवी; कमनशिबी; कपाळकरंटा. हाडकपाळी- वि. हेकड; शिरजोर; सैरट; बेपर्वा; उपदेश; ताकीद इ॰स न जुमा- नणारा. हाडकी-स्त्री. १ लहान हाड. २ मेलेल्या जनावरांचीं हाडें इ॰ ठेवण्यासाठीं महारांना दिलेली जमी. हडकी पहा. हाडकुरकुटी-स्त्री. हाडीज्वर. हाडकुळा-ळी-ळें-वि. हाडें निघालेला; अशक्त; रोड. हाडकेंकाडकें-नअव. १ शेतीचीं जना- वरें व आउतें. २ झिजलेलें व हाडहाड उरलेलें शरीर (क्रि॰ होणें; रहाणें; उरणें). हाडखाईर-न. हाडवैर. 'म्हणोनि समर्थेंसीं वैरा । जया पडिलें हाडखाईरा ।' -ज्ञा १३.५५०. हाडखाऊ-वि. (तिरस्कारार्थीं) मांसभक्षक (शूद्र-यवनादिक जाती) हाडगळ- वि. रोडका; हाडें वर निघालेला; कृश. [हाड + गळणें] हाडगात- न. शरीरयष्टि, बांधा. 'हा पोटानें दुबळा झाला आहे पण हाड- गात मोठें आहे.' [हाड + गात्र] हाडजर, हाडीं ज्वर-पु. हाडांत मुरलेला ताप. हाडति-हडौति-स्त्री. गळ्याखालच्या अर्धचंद्राकार हाडावरील खळगा. 'मुख मळिण वदन उभा हाड- तिथे घोणे ।' -तुगा १२२. हाडपरब-पु. (व.) पितृपक्ष. हाडपेर-न. अंगकाठी. हाडगात पहा. हाडबोड-पु. (गो.) मासळीचा डोकें इ॰ भाग. हाडभाऊपणा-पु. भाऊबंदकी. 'वडीलकीचे अथवा हाडभाऊपणा सिद्ध करणारे महजर सांपडतात.' -अडिवर्‍याची महालक्ष्मी ६. हाडमोडी-स्त्री. एक बांडगुळा- सारखी वेल. हिला पानें नसून शेराप्रमाणें कांड्या असतात. हाडवळा-पु. हाडोळा पहा. हाडवैर-न. अत्यंत तीव्र व फार जुनें वैर. हाडशिंगारी-सांधण-स्त्री. एक वेल. हाडसंद- संधी-स्त्री. (बे.) हाडशिंगरी पहा. त्रिधारी कांडवेल. ही ठेचून ३ दिवस मोडलेल्या हाडावर बांधल्यास तें बरें होतें. हाडहाड- हाडोहाड-क्रिवि. प्रत्येक हाडांत. हाडळ-वि. हाडकुळा पहा. हाडांचा पंजर-सांपळा-पु. हाडांचा सांगाडा हाडी जखम- स्त्री जबर दुखापत हाडींज्वर-ताप-पु. हाडज्वर पहा. हाडूक- न. लहान हाड. (गळ्याशीं-दाराशीं) हाडूक बांधणें-१ एखादी बाई ठेवून घेणें, रखेली राखणें. २ त्रासदायक काम अंगा- वर ओढून घेणें. हाडूक दाराशीं-दाराला-रोवणें-लावणें, पुरणें-जातीबहिष्कृत करणें. हाडेंकाडें-नअव. हाडांचा सांपळा; कृश शरीर. (क्रि॰ होणें; रहाणें; उरणें -शरिराचें). हाडोहाड- क्रिवि. हाडहाड पहा. हाडोळा-ळी-पुस्त्री. १ महाराला दिलेली जमीन. हडोळी पहा. २ असल्या जमीनीचें उत्पन्न. हाड्या-पु. १ (खा. व.) कावळा. 'जाय उडून रे हाड्या । नको करूं काव काव ।' -कोलते २ (खा.) गाडी जमीनीवर टेकण्याचें जुंवाखालील लांकूड, खुंटा. -वि. १ हाडकुळा. २ फार हट्टी; हेकड. हाडा रजपूत-पु. फार हेंकट माणूस. (रजपु- तांच्या स्वभावावरून पुढील म्हण आहेच). 'कुवा (विहिर) टळे पण रजपूत ना टळे.' हाड्यावर्ण-व्रण-पु. हड्यावर्ण पहा. हाडांत खोल गेलेला व्रण.

दाते शब्दकोश

मुद्रा

स्त्री. १ ठसा किंवा शिक्का उठविण्याचें साधन. २ छाप; शिक्का; ठसा. ३ शिक्क्याची आंगठी; ठसा उम- टविण्याची आंगठी; (सामा.) आंगठी. 'हळूच मारुती सद्गुणस- मुद्रा । वर्णी मग मुद्रा मज दावी ।' -मोमीतागीत (नवनीत पृ. २६०). ४ गोसावी लोकांचें लांकडाचें किंवा कासवाच्या पाठीचें कर्णभूषण, 'कान फाडूनिवां मुद्रा ते घालिती । नाथ म्हणविती जगामाजीं ।' -तुगा २८२९. ५ वैष्णव आपल्या अंगावर गोपीचंदनानें शंख. चक्र, रामनाम इ॰ चे उठवितात ते ठसे प्रत्येकी ६ नाणें; विशेषतः रुपया. उदा॰ ताम्रमुद्रा = पैसा; रौप्यमुद्रा = रुपया; सुवर्ण- मुद्रा' = मोहर, पुतळी इ॰ 'ओंवाळूनी श्रीकृष्णासी । अनंत मुद्रा याचकांसी । देऊनि आभर केलें त्यासी । मागों आणिकांसी विसरले ।' -एरुस्व १७.८. ७ चेहेऱ्याची ठेवण; चर्या; तोंडवळा. ८ पूजेच्या वेळीं धेनु, शंख इ॰ रूप करतात ती हाताच्या बोटांची रचना. ९ कर्तृत्वाच्या दृष्टीनें रूप, आकार इ॰ 'ह्याची मुद्रा लहान आहे पण मोठ्या पुरुषाला जें होणार नाहीं तें काम आज ह्यानें केलें.' १० पदार्थ ओळखतां यावा म्हणून त्याच्यावर केलेलें चिन्ह; खूण. ११ कासली नांवाच्या झाडाचें फळ; हें मुद्रेसारखें असतें. १२ योगविद्येंत अथवा धार्मिक विधींत सांगितलेली कम- रेच्यावरील भागाची, हातांच्या बोटांची ठेवण किंवा विशिष्ट मुखचर्या. या मुद्रा चार आहेत. -गोचरी, अगोचरी, चाचरी, व ज्ञान. कोणी कोणी खेचरी, भूचरी, चांचरी, अगोचरी, अलक्षी किंवा अलक्ष्य मुद्रा. अशा मुद्रा मानितात. याशिवाय ध्यानमुद्रा, शांतमुद्रा, काम- मुद्रा, क्रोधमुद्रा इ॰ मुद्रांचे प्रकार आहेत. [सं.] (वाप्र.) ॰देणें-१ दीक्षा देणें (विशेषतः वैष्णव संप्रदायाची). २ वर्म सांगणें; गूढ ज्ञान सांगणें. 'ते मुद्रा श्रीगोरक्षराया । दिधली मीनीं ।' -ज्ञा १८. १७५४. ॰पडणें-वळण येणें; चेहेऱ्यावर आविष्कार होणें. 'बाहेर युक्तीची मुद्रा पडे । तंव आंत सुख वाढे ।' -ज्ञा ६.३५. ॰लावणें- समाप्ती सूचक शिक्का देणें; खूण करणें. 'म्हणोनि नवमींचिया अभिप्रायां । सहसा मुद्रा लावावया । विहाला मी वायां । गर्व कां करूं ।' -ज्ञा १०.३२. सामाशब्द-मुद्रांकित-वि. शिक्का असलेला; चिन्हयुक्त. 'तुका म्हणे तैसा मी एक पतित । परि मुद्रांकित जालों तुझा ।' -तुगा १३७३. मुद्राचिरी-स्त्री. दानपत्र; बक्षीसपत्र (सही शिक्क्याचे). 'तो द्रोण द्रुपदा विनवी नम्रोत्तरी । कीं मज द्यावी मुद्राचिरी । जें वोविला होतासि वक्त्रीं । अर्धराज्याची ।' -कथा ५.११.६९. ॰दोष-पु. १ प्रसन्नतेचा अभाव. २ लज्जा वगैरे सारखा विकार. 'छत्रपते, कर्तबगारीच्या आपल्या जगज्जे- तृत्वापुढें धीटपणें उभें राहताना सुद्धां स्वतांच्या शून्यत्वामुळें मुद्रादोष पतकरावे लागतात.' -शिवचरणी. (पु. पां. गोखलेकृत) ॰धारी-पु. १ सरकारी कागदावर शिक्के मारणारा; सरकारी शिक्का ज्याच्या जवळ असतो तो; शिक्क्यावरील अधिकारी. (ह्या वरून सामा) कोणीहि कोणताहि अधिकार, पदवी इ॰ चें चिन्ह धारण करणारा. 'राजश्री मुद्राधारी व लेखक किल्ले चंदनगड यांसी आज्ञा.' -वाडशाछ १.१२४. २ बाहू, कपाळ, छाती इ॰ वर गोपी- चंदनाच्या मुद्रा ज्यानें लावल्या आहेत असा. (यावरून ल.) ३ वैष्णव. ४ मुद्रा इ॰ लावणारा किंवा करणारा आणि त्यायोगानें आपल्या धार्मिकतेचा गाजावाजा करणारा; दांभिक; भक्तीचा टेंभा मिरविणारा. ५ पूजा किंवा धान्य करण्यास योग्य अशी मुद्रा किंवा आव दाखविणारा. ॰हीन-वि. १ ज्याचा चेहेरा पाहून कोणाला त्याच्या विषयीं आदर किंवा दारात वाटत नाहीं असा. २ ज्याचा चेहरा टवटवीत दिसत नाहीं असा; विद्रूप चेह- ऱ्याचा मुद्रिका-स्त्री. मुद्रा अर्थ १ ते ३ व ५, ६ पहा.

दाते शब्दकोश