मराठी बृहद्कोश

आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

वली आग-घ, वली कूस, वली खरूज, वलें, वलेटा-ता, वलेटें-तें, वलेंपालें

ओली आग, ओलीकूस इ॰ पहा.

दाते शब्दकोश

वळी

स्त्री. १ जनावराच्या पाठीला लागूं नये म्हणून खोगिराखालीं दोन उशा एकत्र शिवतात ती; खोगिराखालची गादी. 'ठेवितां वरि पळैक वळीते । घाबरोनि धरणी कवळी ते । ' -किंगवि २५; -मोउद्योग १३.३१. २ वळकटी; गुंडाळी. ३ रास; गंज. 'वळी पोथ्यांच्या ह्या तुम्हि असुर रीती शिकवितां । ' -वामन नृहरिदर्पण १.३७. ४ सुरकुती; घडी; दुमड. 'भीतरीं वळी न धरे । कोठ्यामाजी संचरे । ' -ज्ञा ६.२१७. ५ (विण- काम) तातूला तातू जोडणें; सांधणी पहा. [वळणें] ॰मूठ-पु. १ वळी आणि मूठ. खोगीर समुच्चयार्थी. (क्रि॰ कसणें; बांधणें; आवळणें; घालणें; ठेवणें). 'चवकीदारानें वळीमूठ नेली उचलून हक्काची । ' -पला ७०. २ गोणी. ३ लग्नांत वधूमातेला देण्यांत येतें तें खणलुगडें.

दाते शब्दकोश

वळी f A line, row. A roll. Fig. A course; fashion.

वझे शब्दकोश

स्त्री. १ रांग; ओळ; पंक्ति. 'जेथें वळी धरुनि पंच- नळी बसे ते । ' -र ४६. २ लिहिण्यासाठीं ओढलेली रेघ; ओळ. ३ (ल.) तऱ्हा; पद्धत; वळण; धोरण. ४ सुरकुती; वळकटी (शरीरावरील). ५ (कु.) वाफा. [सं. आवलि]

दाते शब्दकोश

वळी vaḷī f (आवलि S) A line, row, rank. 2 A line as drawn by the pen, or a line of writing. 3 fig. Course, fashion, line of deportment or procedure. 4 A corrugation or wrinkle (esp. abdominal).

मोल्सवर्थ शब्दकोश

वळी vaḷī f (वळणें) A stuffed roll or pad placed across and underneath the packsaddle. 2 A roll, a thing rolled up. 3 Uniting threads together. A term of the loom. See सांधणी.

मोल्सवर्थ शब्दकोश

स्त्री० गुंडाळी, वळकटी.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

वली

पु. १ साधु; संत; सत्पुरुष. २ मालक; धनी; पालक. [अर.] ॰अहद-पु. १ वारस. २ युवराज. 'अली गोहरचे पुत्रास वली अहद केलें.' -रा १.३६३. ॰नियामत-न्यामत-वि. आश्रयदाता; श्रीमंत (पदवी). 'वलीन्याभत रावसाहेब पंडित प्रधान.' -रा १०.१६५. [अर. वली-निअमत्] ॰हद-पु. वली- अहद पहा. युवराज. 'त्याचे पुत्रास बाहेर काढून वलीहद केलें.' -रा १.३६२. ॰हद्दी-स्त्री. यौवराज्य. -रा १.३६३.

दाते शब्दकोश

वली valī m ( A) A saint, sage, devotee, a sacred personage in general.

मोल्सवर्थ शब्दकोश

(पु.) हिंदी अर्थ : मालिक, हाकिम, साधु. मराठी अर्थ : मालक, शासक, साधु.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

वळई

वळई vaḷī f (वलय S) A ring or an enclosed space (for keeping chaff &c. for cattle). 2 A circular pile of chaff surrounded and peaked (for its support and preservation) with bundles of कडबा; a pile of कडबा, सरम, or grass. 3 A roll or cylindrical mass of unthrashed bundles of wheat.

मोल्सवर्थ शब्दकोश

स्त्री. (हेट.) माजघर. [दे. प्रा. वलय = घर]

दाते शब्दकोश

स्त्री. (कों. कुण) जमीन करणें.

दाते शब्दकोश

वली बाळंतीण

वली बाळंतीण valī bāḷantīṇa f A recent puerperal female. She is so named during ten days after her delivery.

मोल्सवर्थ शब्दकोश

वल्ली, वली

(पु.) [अ. वली] साधू; वेडसर; विक्षिप्त; वेडा-पीर.

फारसी-मराठी शब्दकोश

पो(पों)वळ, पो(पों)वळी

स्त्री. १ देवळाच्या भोंवतालची भिंत. २ (कों) पाट, कालवा यांत पाणी सोडण्याकरितां ठेव- लेलें दारें; दार.

दाते शब्दकोश

रो(रों)वळी

स्त्री. १ तांदूळ, भाजी धुणें इ॰ उपयोगाची विशिष्ट आकाराची बांबूची परडी; दुरडी. २ पुष्कळ बारीक बारीक भोकें पाडून वरील उपयोगाकरितां केलेली धातूची परडी; चाळणी. [का. ओरोळगि] रो(रों)वळणें-सक्रि. (तांदुळ इ॰) रोवळींत घालून धुणें. रो(रों)वळा-पु. मोठी रोंवळी.

दाते शब्दकोश

वली अहद

(पु.) हिंदी व मराठी अर्थ : युवराज.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

संबंधित शब्द

चिरमी      

स्त्री.       १. मनुष्याचे शरीर, लाकूड, फळ इ. तील रसांश कमी झाल्यामुळे वरील त्वचा आकुंचित होऊन पडलेली सुरकुती पडलेली वळी. २. वस्त्र इ. पडलेली वळी. [सं. चीर]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

वेळ

स्त्री. वळी (गंधादिकाची) ? 'ज्याच्या कपाळाची वेळ । सुर सकळ वांछिती ।' -भारा बाल ६.५६. [वळी]

दाते शब्दकोश

वळ

पु. १ दोरी, सूत इ॰ स असणारा पीळ. २ (बुरूड- काम) टोपलीच्या तोंडाला तीन कामट्यांचा देतात तो गोठ. ३ वळवळ; तळमळ; अतिशय उत्कंठा. [सं. वल्; म. वळणें] वळई-स्त्री. १ भूस इ॰ ठेवण्यासाठीं करतात ती वाटोळी, भोंवतालून बंद केलेली जागा. २ भूस इ॰ ची वाटोळी, भोंवतालून कडब्याच्या पेंढ्या लावलेली रास. ३ कडबा, गवत, कणसें न खुड- लेली ताटें इ॰ ची रास, गंज, गंजी. 'तृणाचे वळई माजी देखा । कैशी उगी राहे दीपकलिका । ' -रावि १५.११८. ४ वळी; वळकटी. [सं. वलय, वलयित; प्रा. वलइय] वळकटी-कुटी- कोटी-स्त्री. १ गुंडाळी (कागद, कपडा, इ॰ ची); गुंडाळलेली वस्तु. २ घडी; दुमड; मोड; सुरकुती. ॰कुटी-सुरकुटी-स्त्री. वळकची अर्थ २ पहा. (अव. प्रयोग) वळकुट्या सुरकुट्या. ॰खर- वि. पीळ घातलेली; पीळदार (दोरी, सूत इ॰). ॰वट-न. १ खिरीसाठीं पिठाचा वळून केलेला बोटवा, शेवया इ॰ पदार्थ. 'वळ- वटाची नवलपरी । एक पोकळें अभ्यंतरीं । एकें वर्तुळें साजिरीं । सुमनाकारीं पै एक । ' -एरुस्व १४.१११; -मुवन ११.१२४. २ दळणवळण; घरोबा; परस्पर व्यवहार. ॰वटी-वंटी-स्त्री. गुंडाळी; वळकटी पहा. ॰वळ-ळा-ळी-स्त्रीपु. १ साप, किडा इ॰ च्या अंगास मोडी पडत असें त्याचें चलनवलन. २ (ल.) एका कुशीवरून दुसऱ्या कुशीस वळावें, लोळावें इ॰ चळवळ. ३ चुट- पुट; अस्वस्थ करणारी उत्कंठा; तळमळ. (क्रि॰ करणें; येणें). 'मार्थ पाहे घरिंची राटावळी । करी भोजनाची वळवळी ।' -ख्रिपु २.३६.१६. ४ चडफड; धुसफुस. ५ कंड; खाज (गळूं, इ॰ ची). (क्रि॰ सुटणें; येणें). ६ हालचाल; तंटा; कुरापत. 'फिरंगी वळवळ करतां राहत नाहींत.' -पया १२२. ७ चप- ळाई; एकसारखें चलनवलन. ८ (कु) रग. (क्रि॰ जिरणें; जिरविणें). ॰वळ-ळां-क्रिवि. १ नागमोडीनें; किड्याप्रमाणें वळवळ करून. २ गडगडत; लोटांगणें घालीत; चक्करें खात (जाणें). ३ भरभर; घाईघाईनें; तोंडाला येईल तसें; अचावचा (बोलणें, खाणें, लिहिणें). ॰वळणें-१ नागमोडीप्रमाणें अंगविक्षेप करणें; आळेपिळे देणें. २ वेदनांनीं तडफडणें; तळ- मळणें; विवळणें. ३ अस्वस्थ असणें (दुःख, उत्कंठा इ॰ मुळें). अत्युत्सुक होणें. ॰वळाट-पु. अतिशय वळवळ; चुळबुळ; अस्वस्थता. ॰वळ्या-वि. १ गडबड्या; धांदऱ्या. २ अस्वस्थ; बेचैन असणारा. ॰शेण-शेणी-शिणी-नस्त्री. गोंवरी (थाप- लेली). याच्या उलट रानशेण-णी. वळापिळा-पु. आळा- पिळा; अंगविक्षेप (पिशाचसंचारादि कारणामुळे होणारा). [वळणें + पिळणें] ॰वळावळ-स्त्री. उत्कंठा; चुळबुळ; अस्वस्थता. वळावळी-क्रिवि. तडकाफडकीं; त्वरेनें. -शर.

दाते शब्दकोश

मळ

पु. १ घाण; केरकचरा; रेंदा. २ विष्ठा. 'मज उपज- तांचि मळसा त्याजिलें याहून काय अत्याग ।' -मोभीष्म १२.५६. ३ पाप; पापवासना. 'जाऊनिया मळ । वाळवंटीं नाचती ।' -तुगा ७६७. ४ कमीपणा. 'म्हणे कर्मनिष्ठां मळु । ठेविला देखों ।' -ज्ञा १८.६२. ५ दोष. 'म्हणे तुम्ही निष्पाप निर्मळ । तंव तुमचेनि दर्शनें तत्काळ । नासती सकळ कळिमळ । ऐसे निजनिर्मळ तुम्ही सर्व । ' -एभा २.२४३. -स्त्री. (राजा.) अंगावरच्या मळाची वळी; मळी. [सं. मल] मळई-स्त्री. १ पावसानें किंवा नदीच्या प्रवाहानें वहात आलेली माती, पानें, कचरा इ॰. २ अशा जागेवर केलेलें बागाईत. ३ मासे धरण्याचें जाळें. -बदलापूर. ४ साय. (प्र.) मलई पहा. मळकट-न. १ पाप. 'जें त्रिविधीं मळकटां । तूं सांडिलासि सुभटा ।' -माज्ञा १५.५८१. २ मळाचें पुट; थर 'तें कळिमळांचीं मळकटें । नामोद्वाटें नासती ।' -एभा ४.२५३. -वि. मळलेला; घाणेरडा; मलिन. मळकटणें-अक्रि. मळणें; घाणेरडें, मलिन होणें. मळकटा-पु. मळाचा थर, लेप. 'धुऊनिया मळकटा । बुद्धीचा तेणें ।' -ज्ञा १८.१०११. मळका-वि. घाणे- रडा; मळलेला; मलिन. मळकी-स्त्री. १ नदीच्या प्रवाहाबरोबर आलेला गाळ. २ गाळ सांठून झालेला जमीन; मळई. ३ (बे.) अशा जमिनीवर केलेली लागवड. मळई पहा. मळको(खो)रा- वि. मळकट रंगाचें, नवीनपणाचा तजेला कमी झाला आहे असें (नाणें). मळघा(खा)ऊ-घाव-वि. १ जो मळला असला तरी मळलेला दिसत नाहीं असा (रंग). २ कष्ट, आजार इ॰ न चर- फडतां सोसणारा. ३ बाहेरून सुंदर पण आतून घाणेरडा दिसणारा (मनुष्य, पदार्थ). मळगा(घा)वणें-सक्रि. खराब, घाण करणें; मळविणें; मलिन करणें. मळणें-अक्रि. १ मलिन, घाण होणें. २ मोहानें व्याप्त होणें. 'मळलें होतें मन, परि केलें त्वां शुद्ध, तुजकडे वळलें ।' -मोकर्ण ४३.२३. मळमास,मळयागर मळशुद्धि-मल्मास इ॰ पहा. मळविणें-सक्रि. १ मळानें युक्त करणें; घाणेरडें करणें. २ (पराभव इ॰नीं तोंड) उतरविणें. 'पळवी सुयोधनातें, त्यासकट तदाश्रिताननें मळवी ।' -मोविराट ६.१४४. मळाचा कोठा-पु. मलाशय. मळी-स्त्री. १ अंगावरच्या मळाचा वळी. २ पावसानें किंवा नदीच्या प्रवाहा- बरोबर वाहून येतो तो गाळ (सामा.) चिखल. 'आता गंगेचे एक पाणी । परि नेलें आनानी वाहणीं । एक मळी एक आणि । शुद्धत्व जैसें ।' -ज्ञा. १७.१९६. ३ नदीकाठची बागाइती जमीन; मळई. 'काळी मळी पांढरा चोळ । परी ते केवळ वसुधाची ।' -एभा ४.२६०. ४ अशा जमिनीवर केलेली बागाइती शेती, लाग- वड. ५ साखर, गूळ इ॰ शुद्ध करताना निघतो तो मळ. ६ कोण- त्याहि पदार्थावर येते ती मळकट साय. ७ (राजा) मोठ्या शेतात बांध घालून पाडतात तें लहान खोचें, भाग प्रत्येकी. ८ (व.) नदी- कांठची पडीत जमीन. ९ (न्हावी धंदा) डोक्यातील मळ काढण्या- साठीं कोईचें केलेलें साधन. -वि. (जुन्नरी) मळकट, धुरकट रंग असलेली (मेंढीं). 'ही मेंढी मळी आहे.' मळी(ळि)ण-वि. १ मळलेला; घाणेरडा; ओंगळ; अस्वच्छ. २ (ल.) पापानें युक्त; पापी; दोषी. ३ तयार नसलेली; विसरलेली (विद्या, कला इ॰) ४ म्लान; मलूल. 'कुंथाच्या ढेंकरे न देवेल पुष्टी । रूप दावी कष्टी मळिण वरी ।' -तुगा २८७६. [सं. मलिन]

दाते शब्दकोश

आढी      

स्त्री.       पीळ; वळी; सुरकुती.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अधोवाक      

पु.       (भूशा.) कमानीच्या उलट वाक असणारी, (खाली वाकलेली) वली.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

असममित      

वि.       (भूशा.) प्रमाणबद्ध किंवा समप्रमाणात नसलेली; दोन्ही बाजूंचा कल सारखा नसलेली (वली).

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अठी      

स्त्री.       १. कपाळावरील सुरकुती; अढी; वळी; मोहरममधील सैली. पहा : अटी. २. बैदुलाच्या खेळात बैदूल उडविणाऱ्या बोटाला आधार म्हणून जो आंगठा टेकतात तो. (क्रि. धरणे). ३. मिठी; ऐक्य. [का. अड्ड]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अठी

स्त्री. कपाळावरील सुरकुती; अढी; वळी. 'एक ह्यास पाहतां दृष्टी । कपाळासी घातली अठी ।।' २ मनांतील गांठ किंवा विपरीत वाईट ग्रह. ३ सैली; अटी (१) पहा. ४ मिठी; ऐक्य. [का. अड्ड]. (क्रि॰ धरणें). घालणें १ कपाळ संकुचित करणें; नाखुशी- तिरस्कार दाखविणें २ अलिंगिणें; कवटाळणें. ॰कमरेस घालणें- कमरेस विळखा घालणें; मिठी मारणें.

दाते शब्दकोश

औलिया

(पु.) हिंदी अर्थ : वली का बहु०. मराठी अर्थ : महात्मा, संत.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

आवली

स्त्री. पंक्ति; ओळ; रांग; पंगत. सामाशब्द-रोमा- वली; रत्नावली; पद्यावली इ॰ [सं.]

दाते शब्दकोश

अवलिया

पु. १ साधु; संत; पुण्यात्मा; पुण्यपुरुष; परमे- श्वराच्या चिंतनांत मग्न असणारा; विदेही. २ (ल.) लहरी ३ स्वच्छंदी; छांदिष्ट मनुष्य. [अर. अव्लीबा; वली = साधु यांचे अव.]

दाते शब्दकोश

अवलिया-औलिया

(पु.) [अ. अव्लिया अनेक व. वली चें] साधू.

फारसी-मराठी शब्दकोश

अव्यभिचार

पु. एकनिष्ठता; अनन्यता; एकाग्रता. 'घणा- वली आवडी । अव्यभिचारें चोखडी ।' -ज्ञा १५.५. अव्यभि- चारित-वि. सदोदित; अखंडित. -न्यायप. १६८. अव्यभि- चारी-वि. सर्वसाधारण, सामान्य नव्हे असा; योग्य; बरोबर; आव- श्यक; विवक्षित. [सं.]

दाते शब्दकोश

बट, बटला, बटलाई-लुई-लोई

पु. १ (व.) लहान लोटा; वाटोळ्या बुडाचें लहान घडीव भांडें; चरवी; कांसांडी. 'माही पानी तायाची बटलोई दवडली.' = माझी पाणी तापविण्याची चरवी हर- वली. २. बुटुकुली. 'बटलोईंत तूप ठेव.' [सं. बटु]

दाते शब्दकोश

बुआड

स्त्री. बोबडी. 'एके एके स्थळीं चौर्‍याशी लक्ष वेडी । सांगता बुआड वळी ।' -योसं २०९. [?]

दाते शब्दकोश

भाजी

भाजी bhājī f (S) Fruits, herbs, or roots in general dressed to be eaten with the solid articles of food. 2 A general or common term for plants, and their fruits, flowers, leaves, and roots, that are used as vegetables. 3 A term in Iṭí dánḍú or trapstick. भाजी करणें (कागदाची, पांघरुणाची &c.) To make a mess of. भाजी काची g. of s. Said to or of one who invariably expresses dissatisfaction with whatever persons, or circumstances, or things. Nullus Aristippum placuit vel color, vel status, vel res. वली भाजी आणि वाळली भाजी Green (i.e. retaining sap or freshness) and dried (i.e. dried artificially) vegetables.

मोल्सवर्थ शब्दकोश

चिरमी

स्त्री. १ मनुष्याचें शरीर, लांकूड, फळ इ॰ कांतील रसांश कमी झाल्यामुळें वरील त्वचा आकुंचित होऊन पडलेली सुरकुती. २ वस्त्र इ॰कांस पडलेली वळी. [चीर]

दाते शब्दकोश

चक्रनामा

पु. नियमांचा तक्ता; नियमसंग्रह; नियमा- वली. 'शास्त्री व गुरु पाठशालेंत विद्यार्थि याचे वहिवाटीकरिता चकनामे करितील त्याप्रमाणे गुरुनी व विद्यार्थी याणी वागत असावे' -पेद ८२.६.

दाते शब्दकोश

चुरमटी, चुरमुटी      

स्त्री.       सुरकुती; वळी; चिरमी.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चुटी, चुट्टी      

स्त्री.       चिरूट; सिगार; तंबाखूच्या पानाची विडीप्रमाणे ओढण्यासाठी केलेली वळी; चुट्टा. [क.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चुटी, चुट्टी

स्त्री. १ चिरूट; सिगार; तंबाखूच्या पानाची विडीप्रमाणें ओढण्यासाठीं केलेली वळी; चुट्टा. २ चिमूट.

दाते शब्दकोश

चूण      

स्त्री.       वळी; सुरकुती; चुणी; वळकटी; मुरड; निरी; चीण; वस्त्राची मुरडलेली, सुरकुतलेली अवस्था. [सं. चूण्]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चूण

स्त्री. वळी; सुरकुती; चुणी; वळकटी; मुरड; निरी; वस्त्राची मुरडलेली, सुरकुतलेली अवस्था. [सं. चूण् = आकसणें; आखूड होणें] ॰कस-स्त्री. कातण्याचें, चुण्या पाडण्याचें हत्यार. चुणकस पहा. [चूण + फा. खेंचणें, ओढणें या अर्थीं कस प्रत्यय]

दाते शब्दकोश

धिरणें

अक्रि. १ धीर, दम धरणें; धिरानें घेणें; थांबणें, उता- वळी किंवा घाई न करणें; वाट पहाणें. 'तुम्ही जर वर्ष दोन वर्षें रुप- यांस दम धिराल तर घेतों.' 'पांचशें रूपयेपावेतों मला भलता कोण्ही धिरेल.' २ (सामा.) थांबणें; खोळंबणें. ३ (राजा.) वर्ज करणें; टाळणें; सोडणें; वांचून राहणें (मद्य, मांस, इ॰) [धीर]

दाते शब्दकोश

एकावली

स्त्री. १ एक अर्थालंकार; पदांची श्रेणी; यांत पहिल्या वस्तूशीं दुसर्‍या वस्तूचा, दुसरीशीं तिसरीचा असा सांखळीप्रमाणें विशेषणरूप संबंध असतो. 'राज्यांत समृद्ध पुरें, उंच पुरांतिल गृहें, गृहांत जन- । उद्योगशील सारे, उद्योग स्तुत्य देति- विपुल धन ।।' (यांत राज्य, पुरें, गृहें, जन, उद्योग आणि धन अशा सहा पदार्थांची एक श्रेणी दिसते). -अर्थालंकारांचें निरूपण १७९. २ एकावळी पहा. 'नवरत्नांचें देवाचें पदक आणखी एका- वली कोठें आहेत?' -नाना ८३. [सं.]

दाते शब्दकोश

गिरिपिंड      

पु.       (भूशा.) चोहोबाजूंनी विभंग अथवा वळी असलेला व मध्ये उठून दिसणारा मोठा डोंगर.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गमक

न. १ दाखला; पुरावा; कारण. 'ईश्वरास भजावें एतद्विषयीं वेदशास्त्रपुराणादि अनेक गमकें आहेत.' २ आश्वा- सन; आश्रय; अंगिकार केल्याचा मुद्दा; साक्ष; मंजुरी; आघार; प्रमाण. ३ -स्त्री. (संगीत) तान; ऐकणाराच्या मनास आनंद वाटेल अशा प्रकारें स्वरास कंप देणें; आलाप. जोर व गमक या तीनपैकीं एक. शास्त्रांत असल्या प्रकारचें गमक कांहींच्या मतें १०,१५ व २२ वर्णितात. तथापि प्रचलित गायनांत त्याचा व्यवहार योग्य प्रकारें केलेला दृष्टीस पडत नाहीं व गमकांचें योग्य स्वरूपहि ग्रंथांत वर्णिलेल्या वर्णनावरून ध्यानांत येत नाहीं. यांचीं नांवें ग्रंथांत अशीं आहेत-स्फुरित, कंपित, लीन, आंदोलित- वलि, त्रिभिन्न, कुरुल, आहत, हुफित, इ॰. ४ -वि. सूचक. [सं. गमक = जाणण्यास कारणीभूत होणें] गमकेची तान-स्त्री. गमकयुक्त तान.

दाते शब्दकोश

गुंज

पु. १ कट. 'तिला आपल्या गुंजांत घेतां कामां नये.' -विवि १०.९.२१०. २ जमाव. 'मोंगलाची गुंज बळा वली म्हणजे भारी पडेल.' -पेद १.५२. [का. गुंजु]

दाते शब्दकोश

गव्हला      

पु.       १. बोटवा; दुधात भिजविलेल्या गव्हाच्या पिठाची किंवा सपिटाची दोन बोटात वळून केलेली लांबट वळी. याची खीर करतात. २. गव्हाच्या रुचीचे एक फळ. [क. गवुलि] [सं. गोधूम वलयम्]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गव्हला

१ बोटवा; दुधांत भिजविलेल्या गव्हाच्या पिठाची किंवा सपिठाची दोन बोटांत वळून केलेली लांबट वळी (याची खीर करतात). अनेकवचनी गव्हले. २ गव्हाच्या रुचीचें एक फळ. [गहूं]

दाते शब्दकोश

जोंधळा

जोंधळा jōndhaḷā m A cereal plant or its grain, Holcus sorghum. Eight varieties are reckoned, viz. उता- वळी, निळवा, शाळू, रातडी, पिवळा जोंधळा, खुंडी, काळबोंडी जोंधळा, दूध मोगरा. There are however many others as केळी, अरगडी, डुकरी, बेंदरी, मडगूप &c.

मोल्सवर्थ शब्दकोश

झावळी

स्त्री. (कों.) ताडामाडाचा, पोफळाचा, सुरमाडाचा झांप, फांदी (विणलेली किंवा साधी). सामान्यतः सावळी असा शब्द आहे पण मुंबईच्या आसपास झावळी हा शब्द वापरतात.' 'सरळ सोट सुरमाड येकावर येक जिवट झावळी ।' -प्रला १५४. [सं. छाया + वली]

दाते शब्दकोश

झोळण

स्त्री. चोळ; झोळ; फुगवट (वस्त्र, छत इ॰चा) २ सुरकुती; वळी; आंठी. [झोळ]

दाते शब्दकोश

झोळण      

स्त्री.       १. चोळ; झोळ; फुगवट (वस्त्र, छत इत्यादींचा). २. सुरकुती; वळी; आठी.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

झुरली      

स्त्री.       सुरकुती; वळी; दुमड : ‘गुंग, लख्ख, झुरली खळखळणारा.’ – सामा ६३.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

झुरळी

स्त्री. १ सुरकुती; वळी; चिरमी; वळकटी (मांस, फळ, वस्त्र इ॰ ला पडणारी); शिथिल चामड्याला पडलेली सुर- कुती. २ दुमड; दूण; घडी. [हिं. झुल्री; सं. झल्लरी]

दाते शब्दकोश

झुरळी      

स्त्री.       १. सुरकुती; वळी; चिरमी; वळकटी (मांस, फळ, वस्त्र इ.ला पडणारी) शिथिल चामड्याला पडलेली सुरकुती. २. दुमड; दूण; घडी. [सं.झल्लरी]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

झुरतडी      

स्त्री.       सुरकुती; वळी. (व.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

झुरतडी

स्त्री. (व.) सुरकुती; वळी.

दाते शब्दकोश

को(कों)वळीक

स्त्री. १ कोंवळेपणा; (अप्रौढतेंतील) नाजूकपणा, अशक्तपणा. (अपक्वपणांतील). २ तारुण्याचा बहर; टवटवीतपणा. ३ मृदुपणा. 'आणि महाबोधीं कोंवळीक । दुणा वली ।' -ज्ञा १.३४. 'कोवळीक घाली सिरणें, शिरस पुष्पेंसी ।' -भाए २६. -वि. कोवळी.

दाते शब्दकोश

करवला-ली

पुस्त्री. नवर्‍या मुलीच्या किंवा नवर्‍याच्या भावास व बहिणीस लग्नांत विनोदानें म्हणतात. विवाहप्रसंगीं कर- वली वधू व वर यांच्या पाठीमागें हातांत कर्‍हा (कलश) घेऊन उभी रहात असते. (सामा.) मानकरी, मानकरीण. 'करवली सुभद्रा वेल्हाळ । चाले सुढाळा उन्मनी ।' -एरुस्व १६.४२. 'कर- वलीचा मान, सुप्रसन्ना ठेवी घंगाळी ।' -वसा ५४. [सं. करक (कलश) + वान, वती. म. कर्‍हा + वला-ली प्रत्यय]

दाते शब्दकोश

करवली

करवली karavalī f In marriages. A term for the sister (or female officiating) of the bride or bridegroom. From कऱ्हा the water pot which she bears, and वाली or वली affix. 2 ( H) The art or business of a horse-musketeer.

मोल्सवर्थ शब्दकोश

लौकिक

वि. उघड; जाहीर; ज्ञात; परिस्फुटित. 'नान- वली, दिघी भुजे ये जागा जमाव ठेवून किनारा बंद करावा म्हणजे केला मनसबा लौकिक न होता सिघी होईल.' -पेद ३३.२०. [लोक-लौकिक]

दाते शब्दकोश

माको

स्त्री. एक क्षुद्र देवता. 'जेथें माको असे तराळी ...मेसको वळी शोभनिका ।' -भारा. अयो. ३.७.

दाते शब्दकोश

मानवळ

न. (गो.) मानेचा भाग. 'जातांना तिची पाठमोरी आकृति व भरीव अंबाड्याखालचें गौरवर्ण मानवळ त्याला खरोखरच सुंदर वाटलें होतें.' -अंधारांतील वाट. [सं.] मान + वली]

दाते शब्दकोश

मळी

(सं) स्त्री० पाक करतांना साखरेंतून निघणारा मल. २ मळाची वळी, वळकटी.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

मु(मू)ठ, मुठवळी, मुठी, मुट्ट

स्त्री. बैलाचें खोगीर. मूठ पहा. 'चवकीदारानें वळी मुठ नेली उचलून हक्काची ।' -पला ७०. [मूठ]

दाते शब्दकोश

नाह(हा)ण

न. १ नहाण पहा. अभ्यंगपूर्वक स्नान. २ स्त्रीचें प्रथम रजोदर्शन. [सं. स्नान; प्रा. ण्हाण; हिं. न्हाना] नाहणणें- उक्रि. १ (दुसर्‍यास) स्नान-न्हाऊं घालणें. २ (ल.) बुडविणें; फसविणें; लुबाडणें; बुडला-फसला जाणें. 'पन्नास रुपयाला तें कूळ नाहणलें.' रक्तानें-घामानें नाहणणें-रक्त, घाम इ॰कांनीं अंग चिंब होणें, करणें; अतिशय रक्त, घाम वाहणें, येणें. ॰माखण-न. (मुख्यत्वें स्त्रियांचें व मुलांचें) अभ्यंगस्नान; नहाण. ॰वणी-स्त्री. देवाच्या अभ्यंगस्नानाचें पाणी; तीर्थ. [नहाणें + पाणी] ॰वली, नाह(हा)णुली, नाहणे(णो)ली-स्त्री. पहि- ल्यानेंच रजोदर्शन झालेली स्त्री; प्रथम ऋतुमती, रजस्वला. [नहाण + वाली] ॰वेणी-स्त्री. (तंजा) स्त्रिया न्हाल्यानंतर पोकळ वेणी घालतात ती. नाहणी, न्हाणी-स्त्री. १ देवळांतील तीर्थकुंड; देवळांतील देवस्नानाचें पाणी बाहेर जींत पडतें ती जागा. २ विटाळशीची मोरी; विटाळशीच्या स्नानाची जागा. ३ (सामा.) मोरी; गटार; सांडपाण्याची खांच. 'देह नित्य मूत्राची नाहणी ।, -भारा बाल ९.१०. ४ स्नानाची जागा; नहाणीघर; स्नानगृह. 'सेवीन उच्छिष्ट लोळेन अंगणीं । वैष्णवांचे नाहणीं होईन किडा ।' -तुगा ११००. नाहणें-अक्रि. १ स्नान करणें; अंग धुणें. 'म्हणोनि भलतेणें एथ सद्भावें नाहावें ।' -ज्ञा ११.१०. २ रजस्वला होणें; विटाळशी होणें (विटाळशीला चवथ्या दिवशीं स्नान घालतात त्या- वरून). 'ती स्त्री पंधरा वर्षें नाहती आहे पण तिला मूल होत नाहीं.' नाहूं लागणें-१ विटाळशी होऊं लागणें. २ वयांत येणें; पदर येणें. 'ही स्त्री नाहूं लागली.' ऊन पाणी-थंड पाणी- गंगा नाहणें-ऊन, थंड किंवा गंगेच्या पाण्यानें स्नान करणें. नाहूं घालणें-१ (लहान मुलास) नाहणमाखण करणें; तेल लावून स्नान घालणें. २ दुसर्‍यास स्नान घालणें. नाहतीधुती-स्त्री. १ नहाण येऊन प्रौढदशा पावलेली स्त्री; वयांत आलेली स्त्री. २ नेहमीं वेळच्यावेळीं विटाळशी बसणारी स्त्री. ३ विटाळ न गेलेली, म्हातारी न झालेली स्त्री. नाहवणी-न. नाहणवणी पहा. नाहाण, नाहाणघर-नहाण, नहाणघर पहा.

दाते शब्दकोश

नोकरी (निंदा )

वर हात नी खालीं लाथ, गांवचा राजा गांवांत बळी परदेशीं गाढवें वळी, जास्त काम कमी दाम, जन्मा आला हेला पाणी वाहतां मेला, नोकरीचा चरक, शुद्ध गुलामगिरी, सुळावरची पोळी, नोकरीच्या रुपेरी शृंखला, अळवावरचें पाणी, उभी चाकरी, मास्तरकीच्या नव्वद टिकल्यांवर उदरनिर्वाह, पोट जाळण्यासाठीं पोटाची-खळगी भरण्यासाठी हें सर्व, पोट पाठीला लागलें आहे ना ? नोकरीचा खुंट पकडला, रेट, डेट आणि वेट यांखेरीज असतें काय पोस्टांत ? सर्वांची तब्येत राखतांना कावून गेलों, ही एक हरकामी पोरगी अन्नावारी मिळाली.

शब्दकौमुदी

पांजी

स्त्री. १ टोंक; अग्र; अग्रभाग. 'येऱ्हवीं अभक्तवादें आम्हामांजी । वाचेची पांजी विटाळली नाहीं ।' -एभा ५३०२. २ शेतकऱ्यांचा एक कुळाचार. यांत देवतेला, पाशाचाला कोंबडें किंवा बकरा वली देऊन तो प्रसाद म्हणून खातात. ३ भूत, पिशाच इ॰कांस शांत करण्याकरितां अन्नबली समर्पण करण्याचा विधि. (क्रि॰ करणें). ४ सदर विधिनें समर्पण केलेला अन्नबली. (क्रि॰ देणें). 'इंद्राचि पांजी आपणचि खाय । त्याचिया क्रोधें पाउसाचें भय ।' -निगा ८४. ५ (ल.) (एखाद्यास) कुंठित, चकित, निरुत्तर करणें; घोटाळ्यांत पाडणें; मति गुंग करणें; कोडें. (क्रि॰ करणें). [दे]

दाते शब्दकोश

पेळू-ळूं, पेळव-ए

पुस्त्री. १ (कों.) कापसाची वळी; सुंभ वळावयाकरितां काथ्याचा वातीसारखा केलेला आकार. २ गुरांचा एक रोग. पेळूं-न. (को.) गुरांच्या पेळूसारखें मनुष्यास होणारें खांडूक, उठाणू. [पीळ]

दाते शब्दकोश

परमणी

स्त्री. (विणकाम) बैलीवर पसरलेलीं सुतें कुंच्यानें साफ करण्याची क्रिया. याच्यानंतर पाजणी, सांदणी, पोपती (वळी) ह्या क्रिया करतात.

दाते शब्दकोश

परमणी paramaṇī f Weaver's term. Disentangling or clearing the threads just drawn on the बैली by working the brush up and down upon them. After this operation comes पाजणी Starching, then सांडणी Uniting the threads, then पोपती or वळी Clearing of the threads in preparation for stretching them upon the loom.

मोल्सवर्थ शब्दकोश

पुणी

स्त्री. पिंजलेल्या कापसाची वळी; पेळू. [गु.]

दाते शब्दकोश

फाळा

पु. १ फाडून काढलेला वस्त्राचा तुकडा; चिंधी; चिर- फळी; धांदोटी. २ वाधडा; वाभारा. (क्रि॰ काढणें; निघणें; जाणें). ३ कातलेल्या रेशमाची गुंडी; वळी; मोठी परती. अशा १४ वळ्यांचा एक थाक किंवा अर्धा शेरिया होतो. ४ कर; सारा. 'फाळा लाविला उदंड ।' -दावि ३७७. ५ वांटपाचा भाग; हिस्सा. फाळा फाडणें-पट्टीचें, सार्‍याचें वांटप करणें.

दाते शब्दकोश

शेवई-य

स्त्री. गहूं किंवा तांदूळ यांचें पीठ भिजवून त्याची केलेली बारीक व लांब वळी. यांची खीर करतात. [शेव] शेवगो-पु. (कु.) शेवया गाळण्याचें यंत्र.

दाते शब्दकोश

शोभनिका

स्त्री. गोवरी; शेणी. 'येथें माको असे तराळी । ...मेसको वळी शोभनिका ।' -भारा अयो ३.७.

दाते शब्दकोश

सरसगिरी

स्त्री. बरसात; पावसाची सर येणें; वळि- वाचा पाऊस पडणें. 'उष्ण काळांत सरसगिरी झाल्यास पाऊस पडों लागल्यास पाणी धरावें लागतें यास्तव गवंडे अलिकडे उष्ण काळांतच पाठवावे.' -वसईची मोहीम.

दाते शब्दकोश

सुरकु(क) (खु)ती

स्त्री. वस्त्र, चामडें इ॰ वरील चुणी, वळी, चिरमी; आकुंचन. [का. सुर्कु] सुरकुतणें-अक्रि. सुर- कुत्या पडणें.

दाते शब्दकोश

त्रिवली-ळी

स्त्री. पोटाला पडणार्‍या तीन वळ्यांचा, वळकुट्यांचा समुदाय. 'सागरीं लहरींची नव्हाळी । तैसी उदरीं त्रिगुण त्रिवळी ।' -एरुस्व १.३६. 'त्रिवळी मग तयेची स्पष्ट मोडोनि गेली ।' सारुह २.२८. [सं. त्रि + वली = ओळ, वळकुटी]

दाते शब्दकोश

उकिरवळ्या

स्त्री. अव. पोपडे; उकीर पहा. 'जमीनीच्या उकिरवळ्या...' -सूर्योदय १८४. उखरवळी पहा. [उकीर + वळी]

दाते शब्दकोश

उंडण-णी

स्त्री. उंडी; उंडीचें झाड. हें कोंकणात होतें. याची पानें सुरांगीच्या पानांसारखी मोठीं, गुळगुळीत, स्वच्छ असून पत्रा- वळी करतां येण्यासारखीं असतात. फूल पांढरे, सुवासिक असतें. फळें सुपारी एवढीं असून बियांचे तेल जाळावयाच्या उपयोगी पडतें. त्यास उंडेल म्हणतात. हें खरोखर औषधी आहे. -वुग १. ६०. [सं. पुन्नाग.]

दाते शब्दकोश

उष्टावळ

स्त्री. पंगत जेवून उठल्यावर जें उष्टें राहतें तें; उष्टें अन्न; उष्टेंखरकटें. 'जेविले ते संत मागें उष्टावळी । अवघ्या पत्रा- वळी करुनी झाडा ।।' -तुगा २०३०. 'हा प्रभाकर म्हणजे धुंडि- राजपंतांच्या घरच्या उष्टावळीवर वाढलेला तुम्हां सर्वांचा एक जन्माचा गुलाम आहे.' -भा ८२. [सं.उच्छिष्ट + आवलि = पंगत]

दाते शब्दकोश

वळहई

वळहई vaḷahī f Commonly वळई.

मोल्सवर्थ शब्दकोश

वल्ही

वल्ही valhī m A saint &c. See वली.

मोल्सवर्थ शब्दकोश

वळ्हई

स्त्री. वळई पहा.

दाते शब्दकोश

वळही or वळहई

वळही or वळहई vaḷahī or vaḷahī f Usually and preferably वळई.

मोल्सवर्थ शब्दकोश

वळही, वळ्हई

स्त्री. गंज. (प्र.) वळई पहा.

दाते शब्दकोश

वळकटी / कुटी

स्त्री० आंथरुणाची गुंडाळी. २ वळी.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

वल्ली

वल्ली vallī m (Or वली) A saint or reverend person in general. 2 fig. (Because devotees are privileged.) A wild, wilful, lawless fellow, a libertine.

मोल्सवर्थ शब्दकोश

वल्ली, वल्ही

पु. १ साधु; वल्ली पहा. 'वल्ली पीर पैगंबर ।' -दावि ४७४. २ विक्षिप्त, विचित्र, स्वच्छंदी माणूस; वेडापीर. 'साक्रेटीस हा अथेन्स शहरांतील एक विलक्षण व्यक्ति किंवा वल्ली होऊं लागला होता.' -साक्रेसं ८. [अर. वली]

दाते शब्दकोश

वलवटी

स्त्री. वळी; सुरकुती. 'टवटवीत गाल नाहिं पडली कुठें वलवटी ।' -प्रला ११५. [सं. वल् + वटी प्रत्यय]

दाते शब्दकोश

वर्ति-र्ती

स्त्री. १ दिव्याची वात; बत्ती. २ (वैद्यक) सळई; बत्ती. हिचा उपयोग स्त्रियांच्या गुह्येंद्रियांत औषध घालण्यासाठीं होतो. ३ (गर्भाशय इ॰चें) छिद्र रुंदावण्यासाठीं केलेली कापसाची वळी; विस्तारक. [सं. वर्त्ती]

दाते शब्दकोश

अढी      

स्त्री.       १. पायावर पाय ठेवून तिडा देऊन बसण्याची रीत. २. फाल्गुन अमावस्येच्या दिवशी शकुन पाहून पीकपाण्यासंबंधी भविष्य सांगण्याची एक रीत. ३. धान्याच्या राशीवर कडब्याच्या पेंढ्या घालून केलेले छप्पर. ४. गाई, म्हशी यांचे दूध काढताना त्यांना घालण्यात येणारा भाला (लाथ मारू नये म्हणून दाव्याने पाय बांधणे). ५. दोरीचा वेढा, विळखा, दुमड, मुरड, गुंता. पहा : अढा ६. (ल.) अडचण, बाधा; नड : ‘ऐशिया निरूपण घडमोडी । तुझेनि बोले पडे अढी ।’ – एभा २०·५६. (क्रि. उलगडणे; पडणे). ७. तेढ; मनातील गाठ; विपरीत ग्रह; हट्ट; अनिष्ट शंका; विचार; रुसवा. (क्रि. धरणे, पडणे). (वा.) (मनात) अढी धरणे – मनात वैरबुद्धी बाळगणे. अढीला येणे – हट्टाला पेटणे : ‘चार जोडे हाना पर म्यां म्हनून पुढं न्हाई यायचा, ग्यानबा अढीला आला.’ – पेरणी ११३. ८. कपाळावरील सुरकुती, वळी : ‘भृकुटिये आढी घालोनी ।’ – रावि १०·३९. ९. रहाटगाडग्यामधील रव्यांच्या वरील आडवे लाकूड. (यावर माळ टाकलेली असते.) १०. मिठी : ‘चरणी घालुनियां अढी । कांसव गजाते पैं ओढी ॥’ – मुआ ५·१०८. ११. स्वयंपाकासाठी खणलेले चर. (व.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

भोंगळ-ळा

वि. १ सैल; ढिले; न आवळलेलें (गाठोडें, गठ्ठा, पोशाख इ॰). २ सैल कपडे घालणारा; अजागळ (मनुष्य). ३ अर्धवट; मूर्ख (मनुष्य). ४ अव्यवस्थित; ढिलाईचा (धंदा, काम). ५ पोकळ; कमजोर; भरींव नसलेला (वासा, खांब, दाणा इ॰). ६ हलकी; पोकळ (कवडी). ७ ज्याचें भोंक मोठें झालें आहे असा (मोती). ८ (व.) नागवा; नागडा; वस्त्रहीन; उघडा. [भोंक/?/] ॰कवडी-स्त्री. (ल.) अजागळ, वेडसर मनुष्य. ॰जमा- खर्च-रकम-पुस्त्री केवळ दाखविण्यापुरता सरासरी अव्यवस्थित- पणें ठेविलेला जमाखर्च किंवा दर्शनी रक्कम; निश्चित नव्हे अशी रक्कम. ॰तारीख-स्त्री. कोणत्याहि तारखेचा न जमलेला जमाखर्च. ॰पणा-पु. सैलपणा; ढिलाई; अव्यवस्थिपपणा. '...आणि फुकट भत्ता देणें यांत सरकारचा भोंगळपणा आहे.' -इनाम १३४. ॰भट-पु. अजागळ, नेभळट ब्राह्मण; पोकळभट. ॰वही-स्त्री. अव्यवस्थित; जमाखर्चाची वही. ॰सुती-सूत्री-वि. सैल; नेभ- ळट; अव्यवस्थित; ढिलाईचा; अजागळ (काम, धंदा, भाषण, वागणूक, वक्ता, मजूर इ॰). भोंगळणें-सक्रि. (कों.) ढिला, सैल; अव्यवस्थित होणें (गठ्ठा, गाठोडें, पोशाख इ॰). भोंगळी- स्त्री. (अशिष्ट) गचाळ, नेभळट, अव्यवस्थित, हिडीस स्त्री. भोंगळी-स्त्री. १ नळींतील पोकळी. (यावरून) २ नळी; नळकाडें; सुरळी; वळी. 'नंतर कागदाचे भोंगळींत भरून... कडबोळीं कर- तात.' -अग्नी ३. ३ (कों.) पाणी वहावयासाठीं माड इ॰ झाडाचा पोखरलेला नळ. ४ पोकळी. ५ कवलारू घरांवरील कौलें पडूं नयेत म्हणून वळचणीस ठोकलेली पट्टी; गजभोंगळी पहा. ६ (अशिष्ट) ढुंगण; कुल्ले. ॰कुलूप, भोंगळीचें कुलूप-न. नळीच्या आकाराचें देशी कुलूप.

दाते शब्दकोश

योग

पु. १ जुळणी; जोड; मिलाफ; संग; संयोग; संलग्नता; लग्न. 'योग पुढें भृगुसवें तिचा घडतां ' -मोआदि ३.६. २ परस्पर संबध; ऋणानुबंध; संगत. 'तिला नहाण यावें आणि तिचा दादला मरावा असा योग होता ' (समासांत) कालयोग; दैवयोग; प्रारब्धयोग इ॰ ३ आध्यात्मिक अथवा भाविक भक्ति अगर ध्यान, चिंतन करून होणारें ब्रह्मैक्य; ध्यानपूजा, मानसपूजा, समाधि व त्यासंबंधीं नियम व आसनें; प्राणायागादिक साधनांनीं चित्त- वृत्तीचा किंवा इंद्रियांचा निरोध करणें. ४ मार्ग; साधन; आत्म- साधन या अर्थीं भक्तियोग, कर्मयोग, ज्ञानयोग इ॰ ' संक्षेपानें नुसता योग अगर कर्मनिष्ठा असें म्हणतात. ५ खगोलाचे २७ भाग; ज्यावरून चंद्र सूर्याचें अक्षांक्ष रेखांश मोजतात ते; ते योग असे- विष्कंन; प्रीति, आयुष्मान्, सौभाग्य, शोभन, अतिगंड, सुकर्मा, धृति, शूल, गंड, वृद्धि, ध्रुव, व्याघात, हर्षण, वज्र, सिद्धि, व्यतीपात, वरीयान्, परीघ, शिव, सिद्धि, साध्य, शुभ, शुक्क, ब्रह्मा, ऐंद्र व वैधृति असे २७ योग आहेत. ज्योतिषी २८ योग मानतात. ६ संबंध; जवळ येणें. 'ग्रहांचे कालांश (वस्तुतः भोग) सूर्याच्या इतकें झाले म्हणजे त्याचा सूर्याशीं योग झाला किंवा युति झाली असें म्हणतात. ' -सूर्य २३. ७ उपाय- योजना; वस्तूचा उपयोग, विनियोग; कार्यार्थ साधना, प्रयत्न. ८ इष्टता; योग्यता; समत्व. ९ (गणित) रक्कम; रास; बेरीज. १०. साधन; युक्ति. 'एकच योग (साधन अगर युक्ति) आहे. ' -गीर ५६. ११ मिठी. १२ कवळा. १३ कार्यकुशलता. १४ संधि. 'योग बरवा हा पुन्हां घडेना ।' -दावि २४२. १५ (वैद्यक) इलाज; उपाय; औषध. 'आमवायूवर एरंडेलाचा योग प्रशस्त आहे.' १६ मोठा लाभ. 'मग योग योग ऐसा सहसा उठला वळी महा शब्द । ' -मोकर्ण ७.३५. १७ जारणमारण; जादूटोणा. १८ ईश्वरी संकल्प. १९ समाधिशास्त्र. २० तत्वज्ञान. २१ व्युत्पत्ति; व्युत्पत्तिमूलक अर्थ. २२ सूत्र; नियम; कायदा. २३ (ज्यो.) विशिष्ट तिथि, वार, नक्षत्र यांचें सहचर्य येणें. उदा॰ रविवारीं हस्त आलें असतां त्यास अमृतसिद्धि योग म्हणतात. [सं. युज् = जोडणें] सामाशब्द- ॰च्युत-पु. योगभ्रष्ट. -ज्ञा ६.४४८. ॰धर्म-पु. कर्तव्य; सद्गुण, अथवा योग्याचें विशेष कर्म; त्यापैकीं दहा विशेष आहेत-अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्या, अपरिग्रह (हे पांच यम व) शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर- प्रणिधान (हें पांच नियम होत). दुसरी गणना अशी आहे- अहिंसा, सत्य, अक्रोध, त्याग, शांति, अपैशुन, दया, अलोभ, मार्दव, लज्जा. कांहीं दम, क्षम, अचापल्य, तेज, तितिक्षा, हे यांतच गणतात. ॰निद्रा-स्त्री. विश्वप्रलयानंतरची व विश्वोत्त्पत्तीपूर्वीची ब्रह्मदेवाची झोंप; ईस्वराची निद्रावस्था; योगमाया; सहजस्वरूप- स्थिति. -ज्ञा ५.७८. ॰निष्ठा-स्त्री. योगपरायणता. -ज्ञा २.३१५. ॰पट-पु. १ श्रेष्ठ भोग. २ संन्याशदीक्षेचा एक प्रकार. संन्याशानें धारण करावयाचीं विशिष्ट वस्त्रें. ३ (ल.) संन्यास घेतल्यावर त्यासंबंधीं पाळावयाचे नियम वगैरे. 'ते योगपटाची मवणी । जीवीं अनियम चिंतवणी । ' -ज्ञा १६.३३२. ॰भूमिका-स्त्री. योग्याचीं विशिष्ट अवस्था, स्थिति. 'द्रष्टादृश्यांचिया ग्रासीं । मध्यें उल्लेख विकासी । योगभूमिका ऐसी । अंगीं वाजे । ' -अमृ ७.१८५. ॰भ्रष्ट-वि. योगसाधनांत कांहीं प्रत्यवाय घडल्यामुळें पुनर्जन्म पाव- लेला. ॰माया-स्त्री. ईश्वराची जी मायारूप शक्ति ती; भ्रम; माया; माया व ब्रह्म पहा. ॰मुद्रा-स्त्री. खेचरी, भूचरी, चाचरी, अगो- चरी, आलेख इ॰ पांच योगमुद्रा; यांचीं स्थानें अनुक्रमें नादबिंदु, नासिका, नेत्र, कर्ण व आकाश हीं होत. 'खेचरी भूचरी चाचरी । अगोचरी आलेख यापरी । माजी समरसली खेचरी । नादबिंदूसी । ' -कथा ७.४.७३. ॰राज गुग्गुल-ळ-पु. एक प्रकारचें रसायन; मात्रा. ॰रूढ-वि. व्युत्पतीनें ज्यांचा प्राप्त अर्थ व रूढ अर्थ हे जुळतात असा (शब्द). जसे- अंगरखा; जलधर; पंकज; भूधर. कांहीं शब्द यौगिक, कांहीं रूढ आणि कांहीं योगरूढ असतात. ॰शास्त्र-न. चित्ताची एकाग्रता करण्याच्या साधनासंबंधींचें शास्त्र; ज्यामध्यें प्राणायामादिद्वारां अंतःकरणाच्या एकाग्रतेचा उपाय सांगितला आहे असें सहा शास्त्रांतील एक शास्त्र. ॰सार-पु. विचार. ॰क्षेम-पुन. निर्वाह; चरितार्थ; उदरपोषण. 'यांचे योग- क्षेमाबद्दल मौजे वडू तर्फ पाबल पैकीं इनाम.' -शाछ १.३६. योगक्षेम चालविणें-एखाद्या मनुष्यास पाहिजे असेल तें मिळ- वून देणें; संसाराची एकंदर व्यवस्था पाहणें; उदरनिर्वाहाची तज- वीज करणें. 'जे मला अनन्यभावें शरण येतात त्यांचा योगक्षेम मी चालवितों. ' योगानंद-पु. योगाभ्यासानें होणारा आनंद; पांच आनंदापैकीं शेवटचा. योगाभ्यास-पु. हटयोगादिकांचा अभ्यास, शिक्षण; योगशास्त्राचा अभ्यास; चित्तवृत्तींचा निरोध करून ध्यानादिकांचा केलेला अभ्यास. योगायोग-पु. १ दैव- गति; अनपेक्षित अशी घडलेली कांहीं गोष्ट; बनाव. २ अनुकूल काळ आणि प्रतिकूळ काळ. 'योगायोग पाहून वागावें. ' योगा- रूढ-वि. योगी; योगनिष्णात. 'तोच पुरुष योगारूढ म्हणजे पूर्ण योगी झाला.' -गीता ६९४. ॰योगासन-न. योगाभ्यास करणाऱ्या योग्याची विशेष प्रकारच्या पद्धतीनें वसण्याची रीत. योगिनी-स्त्री. १ दुर्गादेवीची परिचारिका. या ६४ आहेत. २ योगाभ्यासाची स्त्री; जोगीण. [सं.] योगी-पु. १ योगसाधन करणारा; योगमार्गास लागलेला मनुष्य. -ज्ञा ६.३९. २ योगसाध- नांचा उपयोग जादुगिरीच्या रूपानें करून लोकांस चमत्कार दाख विणारा मनुष्य. ' भारतीय वाङ्मयांत योगी याचा अर्थ बडा जादू- गार असा होतो. ' -ज्ञाको (य) ६५. ३ (सामा.) संन्याशी अथवा भक्त. योगेश्वर-पु. १ श्रेष्ठ योगी; सर्वांत श्रेष्ठ प्राणी; नांवाजलेला योगी; भक्त; संन्यासी; साधु. २ कृष्ण.

दाते शब्दकोश

मांग

पु. एक हिंदु जात व तींतील व्यक्ति. फाशी देण्याचें काम यांचेकडे असे; यांच्यांतील कांहीं सांकेतिक शब्द- हिडका = मारामारी. कुडतुल = पेटी. धादल, खडल = फोडणें. कुडपळ = गाडी. गांगल = चांभार. पेडणें = पळून जाणें. खुमर = दार. तवला = खुनासहित, दरोडा. शेग = मालाचा वाटा. पेडम, भुरा = युरोपियन. हलक, हलवा = सोनें किंवा चोरीचा माल. दुबक, फुकणी = बंदूक. कूड, कुडच = घर. नादी, खवडी = घरफोडी. बे, बोय = दिवा. चिलड = कुलूप. खारपे, दमुल = पैसा. ऊन = चांदणें. झुकीर, मुलसी = पोलीस. ताड = दोरी. हुरकत, पेडा, हुराकडा = पळ. तोलकला = निजला. निल- गंटी = काठी. कडूल, कटनूल = तलवार; हत्यार. मूच, नली = चोरी. इ॰ -गुजा. [सं. मातंग] (अंगांत) मांग शिरणें-येणें-रागावणें; त्वेष चडणें. ॰गारु(रो)डी-पु. मांगांतील एक पोटजात. हे म्हशी विकतात व भादरतात. यांच्या टोळ्या गांवाबाहेर पालांत उतरतात; ढोल बाजवून नजरबंदीचा खेळ करतात. धान्य, मेंड्या इ॰ चोर- तात. ॰गारूड-न. १ मांगगारुड्याची जादुगारी; मूठ फेकणें. मांगटा-डा-पु. १ (निंदार्थी) मांग. २ मांगाचा भाट व उपाध्याय. अस्पृ ४७. मांगणी-स्त्री. मांग जातीची स्त्री. मांगणीचा पत्री- स्त्री. अमावस्या, संक्रांत किंवा महापर्व आलें असतां भीक मागत फिरणाऱ्या मांगणीच्या टोपलींत (दुःखें व ग्रहबाधा नाहींशी करण्यांत हिचा उपयोग होतो म्हणून) टाकलेलीं द्रव्यें (धान्य, तेल, मीठ इ॰). मांगणीचें पत्तर-न. वरील भीक मागणाऱ्या मांग- णीचें तरसाळे, पोखरलेला भोपळा. मांग हृदय-यी-वि. निष्ठुर अंतःकरणाचा; निर्दय; पाषाणहृदय. [मांग + हृदय] मांग(गो) ळी-स्त्री. १ थोरल्या दिवाळीच्या दिवशीं मांग लोक मोळाचा ओढण्याकरितां दोर करून चावडीवर ठेवितात तो. २ मुंजींत मुंज्याच्या कमरेस बांधावयाची मोळाची दोरी. 'आणि स्वध- र्माची मांगळी । बांधे वाचेच्या पिंपळी । ' -ज्ञा १३.६५८. [मांग + वळी] मांगिणी-स्त्री. एक क्षुद्र देवता. 'पूजा जोगिणी मांगिणी ।' -दावि ६३. मांगेला-पु. गुजराथेंत मांगास म्हणतात.

दाते शब्दकोश

पाडणें

सक्रि. १ खालीं येईल असें करणें; पडेल असा करणें; जमीनदोस्त करणें; तोडून टाकणें (झाड इ॰). 'म्हणती हाणा मारा पाडा ह्या काय पाहतां तोंडा ।' -माद्रोण ३.१२५. २ मागें टाकणें. 'वावदळ पाडूनि ठाये । साबळु डाहारला आहे ।' -ज्ञा १७.१४३. ३ (एखादा व्यवहार, धंदा इ॰) मोडणें; मोडून टाकणें; दाबून टाकणें; नाहींसा करणें. ४ घालणें; ठेवणें; टाकणें. 'काळ मोरानि न सोडी । यातना भोगवी गाढी । सवेंचि गर्भवासीं पाडी ।' -एभा १०.४२७. ५ विभागणें; भाग करणें. 'नियमाप्रमाणें वर्षांत दोन हप्ते पाडणें.' -(बडोदें). रवानगी खात्यांतील आर्डर्लीरूम संबंधीं नियमाची दुरुस्ती १. ६ कैदी करणें. -पया १०२. या धातूच्या अर्थाच्या निरनिराळ्या अनेक छटा निरनिराळ्या संद- र्भानें भाषेंत रूढ आहेत. त्या सर्वाचा जोरानें खालीं आणणें, ठेवणें. करणें इ॰ गर्भितार्थ आहे. मारणें, लावणें, घासणें यांच्या वर्गांतीलच हा धातू आहे. निरनिराळ्या नामांच्या संबंधांत या क्रियापदाचे निरनिराळे अर्थ होतोत. त्यांपैकीं कांहीं पुढें दिले आहेत. इतर ठिकाणीं संदर्भावरून अर्थ समजण्यास कठिण जाणार नाहीं. [सं. पातम्; प्रा. पाड, हिं. पाडना] (वाप्र.) उजेड, नांव पाडणें = कीर्ति मिळविणें; कीर्तीनें लोकांस दिपविणें. कोष्टक, क्रम पाडणें = कोष्टक करणें, क्रम लावणें. चाल, सराव, संवय पाडणें = एखादी पद्धत रूढ करणें; संवय लावणें. जमाव पाडणें = एकत्र जमाव करणें. 'घोडीं, हत्ती देणे ऐसें करून फौज व जमाव पाडिला.' -मराचिथोरा ४०. जिलब्या, बुंदी पाडणें = जिलबी-बुंदीच्या कळ्या तयार करणें. तक्ते पाडणें = लांकडाच्या मोठ्या ओंड्याच्या फळ्या करवतून काढणें. तुटी, ताटातूट पाडणें = एकमेकांपासून तोडणें; ताटातूट, वियोग, करणें. 'ऐसी लोकीं पाडिली तुटी । नव्हे राधेसी कृष्णभेटी ।' -ह ८.९९. दार, खिडकी, भोक पाडणें = (भिंत, कुंपण इ॰स) दार खडकी, भोंक इ॰ करणें, ठेवणें. पाऱ्या पाडणें = डोंगर इ॰कांत खणून, खोदून पायऱ्यांच्या आकृती करणें. पैका, रुपये पाडणें = श्रमानें पैसा मिळविणें. फणीला दांते पाडणें = बोथट झालेल्या फणीला दांते तयार करणें. मुरकुंडी पाडणें = नाश करणें. 'अकस्मात घालोनि धाडी । थोरथोरांची पाडी मुरकुंडी ।' -जै ७८.४५. रण पाडणें = युद्धांत शत्रूंना मारणें, ठार करणें. 'अभिमन्युनें रण पाडिलें देखोन । आश्चर्य करिती कृष्णार्जुन ।' -पांप्र ४५.८५. रस्ता पाडणें = पूर्वीं रस्ता नसलेल्या ठिकाणीं रस्ता चालूं करणें; रस्त्याची वहिवाट करणें. रुपये पाडणें = टांकसाळींतून रुपयांचीं नाणीं काढून प्रचारांत आणणें. रेघा पाडणें = रेघा, ओळी ओढणें, काढणें, आंखणें. वळी करणें = कापड इ॰ दुमडणें; कापड इ॰ दुमडीनें, सळानें युक्त करणें. विटा पाडणें = साच्यानें माती इ॰च्या विटा तयार करणें. विहीर पाडणें = विहीर खणणें. शेत पाडणें = नवीनच लागवडीस आणलेल्या जमीनीचा लागवडीस सोईस्कर असा तुकडा, भाग करणें. शोध, ठिकाण पाडणें = (एखादी वस्तु) शोधून काढणें; तपास लावणें. समजूत, उमज पाडणें = (एखादी गोष्ट एखाद्याच्या) डोक्यांत उतरवून देणें, समजावून सांगून स्पष्ट करणें इ॰ (वाप्र.) पाडून नेणें-लढाईंत जिंकणें; काबीज करणें. 'तेथें सदाशिव यमाजी यांणीं लोकांचीं घोडीं, उंटें, पाडून नेलीं होतीं.' -थोमारो १ १७. पाडून देणें, घेणें- (सौदा इ॰ ठरवितांना माल वगैरे) किंमत इ॰ कमी करून देणें, घेणें. पाडापाड-स्त्री. १ (घर इ॰ ) पाडण्याची अव्याहत क्रिया. २ लूटालूट. [पाडणें द्वि.]

दाते शब्दकोश

नर

पु. १ मनुष्य. २ (माणूस, जनावर, पक्षी इ॰ तील) पुरुष; पुरुषजात; सर्वजातीय पुरुष व्यक्तिमात्र. ३ (तुंबजोड इ॰) जोडीच्या पदार्थांतील मोठा पदार्थ. ४ अर्जुन. 'वत्सांच्या बहु शोकीं कृष्णा बुडतां तिला म्हणे नर तो ।' -मोमंभा १.१६. ५ पुराणपुरुष; आदिपुरुष; परमपुरुष. ६ घोडा. 'कोतल नर कोत- वाल वारण मगनमस्त किल करित ।' -ऐपो २००. ७ (ल.) मळ- सूत्री खिळा; दाराच्या झडपानां असलेल्या लोखंडी पट्टींत-मादींत बसणारा चवकटीचा खिळा. ८ (ल.) उंसाच्या चरकांतील तीन लाटांपैकीं मधली किंवा दोन लाटांतील उजवी लाट; नवरा. ९ बुद्धिबळांतील सोंगटी. १० (मुद्रण) (ल.) टंककृतींत पोलादी खिळ्यावर घासून तयार केलेला ठसा; इं. पंच्; याच्या उलट मादी = मेट्रिस. ११ मोती डोळ्यासमोर धरल्यास आंतील बाजूस चिरल्यासारखीं दिसणारी रेघ; करवा पहा. १२ अंकुर; कोंब. -शे ३.६. १३ (कु.) वाशांतील, वाळलेल्या कळकांतील उभा घट्ट तंतु. १४ नखाच्या मुळावरचें उचकटलेलें कातडें. १५ (ज्यो.) उन्नतांश ज्या. [सं. नर = पुरुष, मनुष्य; फा. नर्] (वाप्र.) ॰मोडून नारायण घडणें-(एखादी वस्तु इ॰) घडणें व मोडणें व पुन्हां घडणें; त्याच त्याच गोष्टीची घडामोड करणें. नराचा आंख-पु. (बिडाचा कारखाना) उंसाच्या चरकाच्या मधली वृत्तचिती किंवा नर बसविण्यासाठीं त्याच्या मधोमध असलेल्या भोंकांत बसविण्याचा आंख. नराचें चाक-न. (बिडाचा कार- खाना) चरकांतील वरची पाटली आणि मधली वृत्तचिती यांच्या दरम्यान बसविण्याचें दंतुर चाक. नरो वा कुंजरो वा-(अश्व- त्थामा या नांवाचा मनुष्य कीं हत्ती युद्धांत मारला गेला हें मला माहित नाहीं अशा प्रकारचें गुळमुळीत उत्तर धर्मराजानें द्रोणा- चार्यास देऊन त्यास चकविलें त्यावरून) एखाद्या गोष्टीविषयीं पूर्ण अज्ञान, औदासिन्य इ॰ दर्शविण्याकरितां दिलेलें संदिग्ध उत्तर; कानावर हात ठेवणें; माहीत नाही असें दाखविणें. म्ह॰ १ नरा हराहुन्नरा = मनुष्याला हजारों धंदे व क्लृ/?/प्त्या करतां येण्या- सारख्या आहेत. २ (हिंदी) नर करे तो नरका नारायण होजाय = मनुष्यानें मनावर घेतलें तर तो वाटेल तें कार्य करूं शकेल, किंब- हुना तो ईश्वरहि बनूं शकेल. सामाशब्द- ॰कपाल-न. (मृत) माणसाच्या डोक्याची अस्थिमात्रावशिष्ट कवटी. [सं. नर + सं. कपाल = कवटी] ॰कुंजर-पु. १ गणपति; गजानन; गजवदन. 'ते कंबल आणि अश्वतर । त्याहीं हृदयीं चिंतिला नरकुंजर ।' -कथा ५.६. १२४. २ नरश्रेष्ठ; मनुष्यांत श्रेष्ठ; नरवर. [सं. नर + कुंजर = हत्ती] ॰केसरी-पु. १ नरसिंह. २ सिंहाप्रमाणें शूर मनुष्य; नरश्रेष्ठ. [सं. नर + केसरिन् = सिंह] ॰जन्म-पु. मनुष्य- योनि; मनुष्याचा जन्म. 'नरजन्मामधिं नरा करुनि घे नरनारा- यण गडी ।' -राला ८७. [नर + जन्म] ॰तनु-स्त्री. मनुष्यदेह. 'दैवें नरतनु सांपडली मूढा कशि तुज भुल पडली' -शिवदिन केसरी (नवनीत पृ. ४४६) [नर + सं. तनु = देह] ॰तबेला-पु. (व.) फक्त, पुष्कळ पुरुषच राहतात अशी जागा; पुरुषांचें वठार. [नर + फा. हिं. तबेला] ॰तुरंगम-पु. (ज्यो.) एक नक्षत्र- पुंज. 'सप्तर्षि, ध्रुवमत्स्य, ययाति, नरतुरंगम वगैरे राशींची ओळख मुलांना करून देतां येईल.' -अध्यापन २००. [नर + सं. तुरंगम = घोडा] ॰त्व-न. पौरुषत्व. 'नराच्या ठायीं नरत्व । अहंभाविये सत्व ।' -ज्ञा ७.३५. ॰देव-पति-पु. मनुष्यरूपांतील देव; राजा; नृपति. 'कां तया नरदेव म्हणो नये ।' -दावि ३०५. [नर + सं. देव, पति] ॰देह-पु. नरजन्म; मनुष्याचें रूप. नरतनु पहा. 'नरदेह वायां जाय । सेवीं सद्गुरूचे पाय ।' -तुगा ४४९७. [नर + देह] ॰नारायण-पुअव. विष्णूच्या अंशापासून उत्पन्न झालेले दोन प्राचीन ऋषी. यांचेच अवतार पुढें अर्जुन व श्रीकृष्ण हे झाले अशी पुराणांतरीं कथा आहे. -शर. अर्जुन व श्रीकृष्ण. 'नरनारायण सेनानी, ज्या जगतीं जोड दिसेना ।' -विक ७४. [नर = अर्जुन + नारायण = श्रीकृष्ण] ॰पट्टी, पाटी-स्त्री. आटे पाडावयाची वस्तु घट्ट धरणारें यंत्र. यांत दोन बाजूस हात व मध्यें चपटा भाग असतो. चपट्या भागांत निर- निराळ्या आकारमानांचीं भोंकें असतात. [नर( = नर अर्थ ७ पहा) + पट्टी, पाटी] ॰पति-पु. १ राजा. २ पायदळांतील सैनिकांचा मुख्य. -हंको. [नर + पति] ॰पशु-पु. (निंदार्थीं) पशुप्रमाणें वर्तन करणारा; मुर्ख व अधर्मी मनुष्य; दांडगा व निर्दय मनुष्य; नराधम. [नर + पशु] ॰पातें-न. नखें काढण्याचें यंत्र; नराणी. ॰बलि-पु. १ यज्ञांत बलि द्यावयाचा मनुष्य. २ ज्यांत मनुष्यास बळी देतात तो यज्ञ; नरमेध. [नर + सं. वलि = आहुति] ॰भू-स्त्री. प्राचीन काळीं हिंदूंना माहित असलेल्या जगाचा मध्यभाग; मध्य- वर्ती देश; भरतखंड. [नर + सं. भू = जमीन, पृथ्वी] ॰मादी- स्त्री. १ जोडीच्या दोन पदार्थांतील (युग्मांतील) पुरुष व स्त्री. उदा॰ पायांत घालावयाचे जोडे, बूट, अंगारख्याच्या बाह्या, उंसाच्या चरकांतील लाटा इ॰ यांपैकीं नर मोठा असतो व मादी नरापेक्षां किंचित् लहान असते; दोन वस्तू मिळून होणार्‍या पदार्थोपैकीं नर हा भारी असून मादींत शिरणारा असतो. उदा॰ बिजागरीचा खिळा, कुरडईच्या सोर्‍यांतील दट्ट्या इ॰. २ जोडीच्या दोन पदार्थांतील स्त्रीपुरुषसंबंध; लहानमोठेपणा. ३ (व्यापक) (दोन पदार्थ, व्यक्ति इ॰ कांतील) श्रेष्ठकनिष्ठभाव; तरतमभाव; बरेवाईटपणा; उजवा-डावा प्रकार. 'मोत्यांत नरमादी असतच आहे.' ४ उंसाच्या चरकांतील लाटा. ५ बिजागरी. ६ एक प्रकारचें कुलूप. [नर + मादी; फा. नर्मादा] ॰मेध- पु. मनुष्ययज्ञ; ज्यांत नरबली देतात तो यज्ञ. 'युद्धांत पराभव होऊं नये म्हणून प्राचीन ग्रीक, गॉल, सेमाईट व हिंदु लोक नर- मेध करीत असत.' -ज्ञाको न. २६. [नर + सं. मेध-यज्ञ] ॰यान- न. मनुष्यांनीं वाहून नेण्याचें वाहन, बसून जाण्याचें साधन. उदा॰ पालखी, मेणा, डोली, रिक्षा इ॰. 'अश्वगजादि आरोहण । शेष- शयन गरुडासन । महामहोत्सव नरयान । रथोत्सव जाण करावा ।' -एभा २९.२६०. [नर + सं. यान = वहन, वाहन] ॰योनि-स्त्री. नरजन्म; मनुष्ययोनि. [नर + सं. योनि = जन्म] ॰लवंग-स्त्री. लवंगांची एक जात. -मुंव्या १५०. ॰वर-वि. नरश्रेष्ठ; थोर; उदार (मनुष्य). 'नरवर कृष्णासमान ।' -स्वयंवर नाटक. [नर + सं. वर = श्रेष्ठ] ॰वाहन-न. नरयान पहा. [नर + सं. वाहन] ॰सिंह, नरशा, नरशिं(सि)य-पु. १ विष्णूचा चवथा अवतार. 'भाऊनि नरसिंया केला नवस । तो प्रगटोनि स्वप्रीं वदे मातेस ।' -दावि १९. २ (ल.) सिंहासारखा उग्र व पराक्रमी पुरुष; पुरुष श्रेष्ठ. [नर + सं. सिंह] ॰सिंहजयंती-पु. नृसिंहावताराचा दिवस; वैशाख शुद्ध चतुर्दशी. [नरसिंह + जयंती = जन्मदिवस] ॰सिंहाव- तार-पु. दैत्यांचा राजा हिरण्यकशिपु याचा वध करण्यासाठीं श्रीविष्णूनें धारण केलेलें सिंहाकृति मनुष्याचें रूप, अवतार. [नर- सिंह + अवतार = प्रकट होणें, रूप घेणें] ॰सिंहावतार घेणें- (ल.) अतिशय रागावणें; कोपाविष्ट होऊन उग्र स्वरूप धारण करणें. ॰हर-हरदेव-पु. नरसिंह अर्थ १ पहा. [नर + हरि, हर, हरदेव] ॰हरदेवाची पालखी-स्त्री. नरसिंहाची पालखी. हिला उचलण्याचें पुण्य स्वतःला लाभावें म्हणून हिच्या दांडयास खांदा लावण्यास भक्तमंडळी फार उत्सुक असते. तेव्हां साहजिक गोंधळ, अव्यवस्था होते. २ (त्यावरून ल.) जें काम करावयाला बर्‍याच लोकांची मदत अवश्य आहे व ज्याची जबाबदारी कोणा एका विशिष्ट व्यक्तिवर नसते व जें काम चांगल्या रीतीनें झाल्याची किंवा न झाल्याची कोणी पर्वा करीत नाहीं असें-अर्थांत वेळीं अवेळीं, केव्हां तरी कसें तरी व्हावयाचें-काम; अव्यवस्थित रीतीनें केवळ लोकांच्या मर्जीनुरूप घडून येणारें काम, गोष्ट; बारभाई कारभार. ॰हरी-पु. नरसिंह. [नर + सं. हरि-सिंह] नराधिप, नरेंद्र, नरेश, नरेश्वर-पु. राजा; नृपति. - १५.४५. 'तो बोलता झाला शुकयोगींद्र । परिसता नरेंद्र परीक्षिती ।' -एभा १.१८३. [नर + सं. अधिप, इंद्र ईश, ईश्वर = श्रेष्ठ, पालन- कर्ता, रक्षणकर्ता] नरेंद्रमंडळ-न. माँटफर्ड सुधारणान्वयें दिल्लीस स्थापन केलेलें हिंदी संस्थानिकांचें मंडळ; राजांची सभा. (इं.) चेंबर ऑफ् प्रिन्सेस्. [नरेंद्र । मंडळ = सभा, समिति] नरोत्तम- पु. १ नारायण; पुरुषोत्तम. २ -वि. नरश्रेष्ठ; मनुष्यांत उत्तम असलेला. [नर + उत्तम] नरोबा-पु. नरसिंह; नरहरि. 'नरोबाची कृपादृष्टी । जाल्या कोण्ही नाहीं कष्टी ।' -मध्व ३०६.

दाते शब्दकोश

ति

वि. (प्र.) तीन; संख्यावाचक उपसर्ग, प्रत्यय; जसें- तिमजला, तिकोनी = तीन मजल्यांचा, तीन कोपर्‍यांचा. [सं. त्रिः; प्रा. ति] सामाशब्द-तिकटणें-न. १ शेतामध्यें तीन बांध (वरोळ्या) एका ठिकाणीं असतात तें ठिकाण. २ तीन रस्ते एकत्र मिळ- तात तें ठिकाण. ३ तीन काठ्या वगैरे एकत्र बांधून केलेली रचना; तिकटी. [त्रिकूट] तिकटी-स्त्री. १ तीन काठ्या जुळवून केलेली एक त्रिकोणाकृति रचना. २ त्रिकोण. [सं. त्रिकाष्ठ; प्रा. तिकठ्ठ. त्रिकूट] तिकटें-न. १ लांकडी त्रिकोण (स्मशानांत अग्नि नेण्यासाठीं, विहिरीतून पदार्थ काढण्यासाठीं इ॰ केलेला तीन कामट्या, लांकडे यांचा). २ त्रिदळ; त्रिखंड पान (पळस, बेल, निगुडी इ॰चें). ३ तीन पानांची पत्रावळ. ४ (पंढरपूरकडे) तिफण; तीन नळकांड्यांची पाभर. ५ लांकडाची तिवई. (गो.) तीन काठ्यांची घडवंची. [सं. त्रिकाष्ठ; प्रा. तिकट्ठ. तुल. त्रिकूट] तिकडी-वि. तीन कड्यांची. 'जैं कहीं अवचटें । हे तिकडी सांखळ तुटे ।' -ज्ञा १६. ४३८. [ति = तीन + कडी] तिकळा-ळी-ळें-वि. तिखुळा पहा. तिकांडी-स्त्री. एक गवत. 'तिकांडी घोडेकुसळी ।' -गीता २. ५२८६. [ति = तीन + कांडें = पेर] तिकांडें-ढ्या-न. मृगशीर्ष नक्षत्रपुंजांतील तीन तारे; शिवाचा बाण. लुब्धक पहा. [सं. त्रिकांड] तिकुटी-स्त्री. त्रयी; तिघांची जोडी; त्रिकूट. 'गुणीं देवां त्रयी लाविली । गुणीं लोकीं तिकुटी पाडिली ।' -माज्ञा १८.८१७. [सं. त्रिकूट] तिकोनी-वि. तीन कोपर्‍यांचा-कोरांचा-कोनांचा. [सं. त्रिकोण] तिक्कई-स्त्री. तिर्खई; एकदम तीन तीन खडे घेऊन सागरगोटे; खडे इ॰ खेळण्याचा मुलींचा खेळ. याप्रमाणें दुर्खई; पांचखई इ॰ संज्ञा. [सं. त्रिक; म. तिक + ई प्रत्यय] तिक्कल- स्त्री. गंजिफांच्या खेळांत अनुक्रमानें लागलेलीं एकाकडे आलेलीं तीन पानें. तिक्का-पु. तीन चिन्हें असलेलें गंजिफांचें पान; तिव्वा. तिखणी-स्त्री. (घराचे) तीन खण, भाग. -वि. तीन खण अस- लेलें; तीन खणी (घर इ॰). [ति = तीन + खण] तिखळा-ळी- ळें-तिखुळा-ळी-ळें पहा. तिखुळा-ळी-ळें-वि. तीन मुलगे अथवा मुलींच्या पाठीवर झालेला (मुलगा, मुलगी किंवा सामा- न्यतः मूल). तिगस्त-न. १ गेल्या वर्षाच्या मागचें वर्ष. 'तिगस्त बाकी-वहिवाट इ॰.' २ गंजिफांच्या खेळांतील एक संज्ञा, डावां- तील एक विशिष्ट काल; गंजिफांच्या खेळांत तिन्ही खेळणारांचा एक तरी हात होणें. [तीन + फा. गस्त = गत] तिगस्तां-क्रिवि. गेल्याच्या मागील सालीं. [तिगस्त] तिगुण-वि. १ त्रिगुण. २ तिप्पट. [सं. त्रिगुण अप.] तिगुणी-वि. तिहेरी; त्रिगुणात्मक. 'जो अविद्येचिया चिंधिया । गुंडूनि जीव बाहुलिया । खेळवीतसे तिगुणिया । अहंकाररज्जु ।' -ज्ञा १८.९१५. तिघई-वि. तीन गस्ते असलेलें, एकापुढें एक तीन वठारें असलेलें (घर). तिघड- पु. (राजा) तीन आंबे, नारळ इ॰चा घड. तिघड-वि. (कों.) दर तीन लोटे बांधून झाले म्हणजे एक खापेकडाची जुळी वग- ळावी अशा रीतीनें लोटे बांधलेली (रहाटाची माळ). -क्रिवि. माळ तिघड होईल अशा रीतीनें (बांधणें). तिघडी-स्त्री. १ तिहेरी घडी (कापड, कागद इ॰ची). २ तिहेरी घडी घातलेली, तिपदरी वस्तु. -वि. तीन घड्या घातलेली. [ति = तीन + घडी] तिघस्त-न. तिगस्त अर्थ २ पहा. तिजवर-पु. १ तिसर्‍यांदा लग्न करीत असलेला माणूस. २ तीन लग्नें केलेला मनुष्य. [तिजा + वर] तिधारा-री-वि. १ तीन धारा-कडा असलेला. 'तिधारां अंदु फीटलियां । चरणींचिआ ।' -शिशु ७१६. २ तीन कांठ किंवा काड्या असलेलें (धोतर इ॰). [ति + धारा] तिधारी- निवडुंग-पुन. एक जातीचा निवडुंग. याच्या पेरास तीन कांट्यांच्या रांगा असतात; याच्या उलट फड्यानिवडुंग. तिधारें- न. नकसगाराचें एक हत्यार. तिपट-वि. (सामा.) तिप्पट पहा. तिपटी-स्त्री. तिप्पट संख्या अथवा परिमाण. तिपडें-न. (नाट्य) बकर्‍याचे केंस वळून गंगावनाच्या आकाराची स्त्री नटाकरितां तयार केलेली तीनपदरी वेणी. -पौराणिक नाटकाचा काळ. तिपदरी- वि. तीन घड्यांचें किंवा तीन पदर असलेलें (कापड; दोर इ॰). तिपाई-(व.) तीन पायांची घडवंची; तिवई. (बिडाचा कार- खाना) डेरा तयार करण्यासाठीं मातींत रोंवण्याचे लांकडी धीरे व गोलाकार लोखंडी गज. तिपाठी-वि. तीन वेळां वाचून, ऐकून पाठ म्हणणारा. तिपांडी-स्त्री. (कों.) तीन पांड भातजमीनीची प्रत्येक वीस पांडांच्या बिघ्यामागें रयतेस दिलेली जमीनीची सूट. तिपानी-स्त्री. एक लहान वेल. श्वास, व्रण, विष यांची नाशक. -वगु ४.१. -वि. तीन पानें असलेलें; त्रिदल (झाड, अंकुर). [सं. त्रिपर्णी] तिपायी-स्त्री. तिवई. -वि. तीन पाय असलेलें (जनावर; वस्तु). [तीन + पाय] तिपिकी-वि. एका वर्षांत तीन पिकें देणारी (जमीन). तिपुडी-वि. १ तीन कप्पे, खण असणारी (पेटी). २ तीन पूड असलेला मृदुंग. [सं. तिपुटी] तिपेडणें- सक्रि. तीन पेड देणें; वळणें. तिपेडी-ढी-वि. तीन पेडांनीं केलेली (दोरी, वेणी इ॰). तिपेरीस्त्री. नाचणीची एक हळवी जात. हिच्या काडास तीन पेरें आलीं म्हणजे कणीस येतें. -वि. तीन सांधे, पेरीं असलेलें (बोट इ॰). तिप्पट-स्त्री. तीन पट संख्या; तिप्पटपणा. -वि. १ तीनदां जमेस धरलेली (संख्या) त्रिगुणित. २ तीन घड्यांचे; तिपदरी (कापड इ॰) तिफण-णी-न.स्त्री. तीन नळ्या, फण असलेली पाभर, पेरण्याचें यंत्र. [ति + फण] तिफण- स्त्री. (व.) चार एकर (जमीन). तिफसली-वि. तीन पिकें ज्या जमिनींत निघतात ती जमीन. तिफांटा-पु. जेथें रस्ता, नदी. किंवा झाडाच्या खोडाच्या तीन बाजू फुटतात ती जागा. तिफांशी- सी-वि. १ तीन फाशांनी खेळावयाचा (सोंगट्यांचा एक खेळ). २ तीन फाशांनीं युक्त (दोरी इ॰). [ति + फास] तिबक-स्त्री. खेळांत विटी उडली असतां खालीं पडण्यापूर्वी दांडूनें तीनदां मारणें. 'हबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडूं । खेळू विटी दांडू ।' -भज ११३. [ति + ध्व. बक्?] तिबंदी-स्त्री. दोन वरखां (पानां) चा एक बंद याप्रमाणें तीन बंदांची केलेली कागदाची घडी. तिब्राद- वि. (पोर्तु.) तिप्पट. [पोर्तु. त्रेस्दो ब्रादो] तिमजला-ली- वि. १ तीन मजल्यांची (इमारत). २ तीन, तिहेरी काठांचा (शेला, धोतर इ॰). ३ तीन तळ (डेक) असलेलें (जहाज). तिय्यम-वि. तिसर्‍या दर्जाचें. 'दुय्यम, तिय्यम अधिकारी.' -सूर्यग्र ३४. तिय्या-पुस्त्री. (पत्त्यांचा खेळ). तिर्री; तीन ठिपक्यांचे पान. [ति = तीन] तिरकानी-रेघ-ओळ-स्त्री. कागदाच्या पडलेल्या चार मोडींपैकीं तीन मोडींमध्यें काढलेली रेघ. [सं. त्रि-तिर् + कान, रेघ] तिवई-स्त्री. १ तीन पायांची घडवंची; तिपाई. २ (कों.) तिवटें; भाताचीं रोपें उपटतांना शेतांत बसण्याठीं घेतात ती पायांची तीन घडवंची. तिपाई पहा. [सं. त्रिपदी; प्रा. तिवई] तिवटणां-(महानु) तीन वाटा मिळ- तात ती जागा; चौक; नाका; तिवठा. 'कलियुगाचा तिवटणां.' -भाए १०९. [सं. त्रि + वर्त्मन्; प्रा. तिवट्ट] तिवटी-स्त्री. (गो. कों.) अवयवाची वक्रता. 'पाय तिवटीं पडला.' [सं. त्रिवर्कि; प्रा. तिवट्टी] तिवटें-तिवई अर्थ २ पहा. तिवठा-पु. १ तीन रस्ते मिळतात ती जागा. २ तिवडा अर्थ १,२ पहा. [सं. त्रि + वर्त्मन्; प्रा. तिंवट्ट] तिव(वं)डा-पु. १ मळणी कर- ण्याकरितां खळ्याच्या मध्यभागीं पुरलेला खांब. 'हनुमंत तिवडा मध्यें बळें । पुच्छ पाथी फिरवितसे ।' -रावि २०.१९५. ३ शेतांत धान्य वारवण्यासाठीं उपयोगांत आणावयाची एक तीन पायांची घडवंची. ३ एक ताल अथवा गति. [सं. त्रि + पद] तिवण-१ त्रिदळ. २ तिहेरी घडी, पदर (कापडं, कागद इ॰ ची). तिव- णता-वि. (राजा.) तिघडी; तिहेरी; तिपदरी (कागद; कापड वगैरे). तिवणा-वि. तीन पानांचा; त्रिदळ. 'त्रिविध अहं- कारु जो एकु । तो तिवणा अधोमुखु । डिरु फुटे ।' -ज्ञा १५.९५. -एभा ११.१८८. [सं. त्रिपर्ण; प्रा. तिवण्ण] तिवधां-पु. अनेक गांवांच्या सीमा ज्या ठिकाणीं मिळतात ती जागा. [सं. त्रि + बंध किंवा वृंद; प्रा. तिबंद] तिवनी-स्त्री. (व.) (पळसाचें) त्रिदळ; तिवण. तिवनें-न. तिघांचा समुदाय. तिवनें-वि. तीन पानांचें. तिवण-णा पहा. [सं. त्रिपर्ण; प्रा. तिवण्ण] तिवल-पु. (तीन वेळ) दीड आणा. [तीन + वेळ = अर्धा आणा] तिवळी- स्त्री. (गो.) पोटावर पडणारी तीन वळ्यांची आठी. त्रिवळी पहा. [सं. त्रि + वली] तिंवा-पु. (गो.) दगडाचा अगर मातीचा केलेला चुलीचा पाय. २ तिव्हा; तिवई; तिनपायी; तिवारी (ज्यावर उभें राहून उपणतात ती). तिवडा अर्थ २ पहा. [सं. त्रि + पदा; प्रा. तिवय] तिवाट-ठा-पु. तीन रस्ते एकत्र मिळण्याची जागा. तिवठा पहा. फाटाफूट; ऐक्यभंग. 'केला तुवां देखत भर्तृघात । क्षणें तिवाटा रचिल्या तिघांत ।' -वामन, भरतभाव ७. [त्रि + वर्त्मन्; प्रा. तिवट्ट म. तिवाट] तिवारा-पु. (माळवी) तीन दारें असलेला दिवाणखाना. [सं. त्रि + द्वारिका; प्रा. ति + वारिआ; हिं. तिबारा] तिवारी-स्त्री. (व.) तिवडा अर्थ २ पहा. तिन- पायी (जीवर उभें राहून उपणतात ती) तिवा पहा. तिवाशी- वि. तीन वाशांचें केलेलें (घर, खोपट इ॰ उपहासार्थी). [तीन + वांसा] तिवाळ-स्त्री. एकसंध विणलेले तीन पंचे; तीन पंच्यांचें कापड; चवाळें पहा. तिवाळी-स्त्री. एक कापडाची जात. -मुंव्या १२३. [ति + आळें] तिवेती-वेत-वि. तीनदां व्यायलेली (गाय इ॰) [ति + वेत] तिवेळा-ळां-ळीं-क्रिवि. तिन्हीवेळां; सकाळीं, दुपारी, संध्याकाळीं; त्रिकाळ. तिव्वा-वा-पु. (गंजिफा, पत्त्यांचा खेळ) तिर्री; तीन ठिपके असलेलें पान. तिव्हडा, तिव्हा-पु. तिवडा अर्थ २ पहा. तिव्हाळ-पु. (महानु.) तीन रस्ते एकत्र होतात ती जागा; तिवाठा. 'तेथचि तिव्हाळां प्रकास- दर्शन ।' -ॠ ११८. तिशिंगी-वि. तीन शिंगांचा (पशु). [तीन + शिंग] तिशेंड्या-पु. (डोक्यावरच्या तीन शेंड्यांवरून) मारवाडी (निंदाव्यंजक शब्द). [ति + शेंडी] तिसडी-स्त्री. १ तीन वेळां अथवा तिसर्‍यांदा तांदूळ कांडणें. तिसडीनें सडणें. २ (ल.) बारीक चौकशी; छडा [तीन + सडणें] तिंसड-डा- डी-वि. तीन वेळ सडलेले (तांदूळ). [ति = तीन = सडणें] तिसढ-स्त्री. तिसर्‍यानदां करणें (काम इ॰) तिसड-वि. तीन थानांचें (जनावर). [तीन + सड] तिसाला-लां-विक्रिवि. लागो- पाठ तीन वर्षांसंबंधीं; तीन वर्षांकरितां; त्रैवार्षिक (हिशेब, बाकी इ॰). [हिं.] तिस(सा)रणी-स्त्री. तिसारणें पासून धातुसा- धित नाम. -क्रिवि. तिसर्‍यांदा. तिस(सा)रणें-सक्रि. तिस- र्‍यांदा करणें. -अक्रि. (कोंबडा) तिसर्‍यांदा आरवणें. [तिसरा] तिसुती-स्त्री. १ तिहेरी, तीन पदरी-फेरी दोरा; दोरी (जानवे इ॰ चा). 'तिसुतीला पीळ भरून झाला आहे, आतां नऊसुती करा- वयाची आहे.' २ तीन कुटुंबांचा आपापसांतील लग्नसंबंध. तिर- कूट अर्थ ३ पहा. -वि. तीन सुतांची, धाग्यांची, पदरांची (दोरी). [तीन + सुती] तिस्ती-स्त्री. (प्र.) तिसुती. (कों.) (जानव्याचें) पातीवर मोजलेलें सूत गुंडाळून ठेवतात ती गुंडाळी. [सं. त्रि + सूत्र, त्रिसुती] तिहोत्रा-पु. दरमहा दरशेंकडा तीन असा व्याजाचा दर. [तीन + उत्तर]

दाते शब्दकोश

दंड

पु. १ काठी; सोटा; छडी; सोडगा; दंडा. २ मार; शिक्षा (शारीरिक). ३ शिक्षा म्हणून घेतलेला पैसा; याचे राजदंड, ब्रह्मदंड जातिदंड असे तीन प्रकार आहेत. सरकारी न्यायपद्धतीनें गुन्हा शाबीत झाला म्हणजे शिक्षेदाखल सर कारांत भरावयास पैसा. ४ खांद्यापासून कोंपरापर्यंतचा हात. ५ केलेल्या, पाडलेल्या भागांच्या खुणांकरितां शेतांत किंवा बागांत घातलेला मातीचा उंचवटा; बांध; गडगा; पाणी जाण्यासाठीं दोहों बाजूंस उंचवटा करून पाडलेली सरी, पाट; (बे.) नदीकिनारा; कांठ; (वस्त्राचे) दोन तुकडे जोडण्याकरितां घात- लेली शिवण. (क्रि॰ घालणें). [प्रा. दंडी = जुन्या वस्त्राचा सांधा] ६ लांबी मोजण्याचें परिमाण, चार हातांची काठी. २००० दंड म्हणजे एक कोस. ७ वेळेचें परिमाण, चोवीस मिनिटें. ८ पैलवानांच्या व्यायामाचा एक प्रकार; जोर. 'आनंत्या नित्यनेम उठतो दंड सवाशें काढितो ।' -ऐपो ६७. (यावरून) एखादें कठिण काम अथवा प्रचंड उद्योग. (क्रि॰ काढणें; पेलणें). ९ क्रमानें उतार असलेली किंवा निमुळती पण लांबट टेंकडी, सोंड (पर्वताची). १० डोंग- राच्या माथ्यापासून पायथ्यापर्यंत असलेला उतार, ओघळ, अरुंद वाट; दंडवाट. ११ पर्वताच्या रांगेची एक लहान शाखा; डोंग- राच्या माथ्यापासून तों पायथ्यापर्यंत वांकडीतिकडी गेलेली खड- कांची ओळ. १२ (कवाईत वगैरे प्रसंगीं केलेला) सैन्याच्या रचनेचा एक प्रकार; रांग; फरा; व्यूह. 'तया दंडीं क्षोभलें । लोकत्रय ।' -ज्ञा १.१६५. १३ ताठ उभें राहण्याची अवस्था. १४ जिंकणें, ताब्यांत, कह्यांत आणणें. १५ अपराधाबद्दल शिक्षा म्हणून घेतलेलें द्रव्य, पैसा; जातींत परत घेण्यासाठीं दिलेलें प्रायश्चित्त. १६ रताळीं, ऊस इ॰ लाव- ण्याकरितां मातीचा केलेला लांबट उंचवटा, वरंबा. १७ तडाका. 'निंदा निस्तेज दंडी । कामलोभावर पडी ।' -ज्ञा १३.४९४. १८ हिंसा. 'ऐसा मनें देहें वाचा । सर्व संन्यासु दंडाचा ।' -ज्ञा १३.३१०. १९ पाठीचा कणा. 'माजी उभारलेनि दंडे । शिरकमल होय गाढें ।' -ज्ञा ६.२०२. [सं.] (वाप्र.) आवळणें, बांधणें, दंडाला काढण्या लावणें-चतुर्भुज करणें; कैद करणें. ॰थोपटणें-१ कुस्ती खेळण्यापूर्वीं दंड ठोकणें; कुस्तीस सिद्ध होणें. २ (ल.) साहसानें अथवा कोणासहि न जुमानतां एखादें कार्य करण्यास उभें राहणें. ॰थोपटून उभें राहणें-(ल.) वाग्युद्धास तयार होणें. ॰दरदरून फुगणें-आपल्याशीं कुस्तीला योग्य असा गडी पाहिला म्हणजे पहिलवानाचे दंड स्फुरण पावून फुगणें. ॰फुर- फुरणें-मारामारीची, कुस्तीची वगैरे उत्कट इच्छा होऊन दंड स्फुरण पावणें. भरणें-तालीम वगैरेमुळें दंड बळकट व जाड होणें. ॰भरणें-शिक्षेदाखल पैसा देणें. दंडास दंड लावून- घांसून-क्रिवि. बरोबरीच्या नात्यानें; सारख्या सन्मानानें. दंडाला माती लावणें-कुस्तीला तयार होणें (कुस्तीपूर्वी दंडास माती लावतात). दंडपासून साधित शब्द- दंडादंडी-स्त्री. मारामारी; काठ्यांची झोडपाझोडपी; कुस्ती; झोंबी. [दंड] दंडायमान-वि. १ (अखंडित काठीप्रमाणें) निर्मर्याद; अपार (वेळ, काळ). २ मध्यें पडलेला; आडवा पडलेला, पसरलेला. [सं.] दंडारणा-पु. सोटा; सोडगा; बडगा. -वि. जाड; स्थूल; घन (वस्तु); बळकट; मजबूत; जाड (मनुष्य, पशु). दंडारा-ळा-वि. (शिवण) ज्यास दंड घातला आहे असें; मध्यें शिवण असणारें (वस्त्र, कपडा). [दंड] दंडावणें-अक्रि. थंडीनें अथवा अवघड श्रमानें ताठणें (शरीर, अवयव). [दंड] दंडासन-न. आळसानें (जमीनीवर) पाय ताणून पसरणें, निजणें; सरळ हात- पाय पसरून आळसानें पडणें. (क्रि॰ घालणें). [सं. दंड + आसन] दंडार्ह-वि. दंड्य; दंड करण्यास योग्य. [सं.] दंडित-वि. १ शिक्षा केलेला. दंड केलेला. २ (ल.) निग्रह केलेला; वश केलेला; मारलेला; ताब्यांत आणलेला. [सं.] दंडिता-वि. १ शिक्षा करणारा; मारणारा; शिक्षा करितो तो. [सं.] दंडिया-पु. १ बारा ते पंधरा हात लांबीचें धोतर, लुगडें. २ बाजाराचा बंदो- बस्त करणारा छोटा अधिकारी; पोलीस मुकादम. [हिं.] दंडी- पु. १ दंड धारण करणारा; संन्याशी. २ द्वारपाल. ३ -स्त्री. अर्ध्या दंडापर्यंत बाह्या असणारी चोळी. [सं.] -वि. १ दंड धारण करणारा. २ दंड म्हणजे उभी जाड शिवण असलेला (कपडा). दंडी-स्त्री. मेण्यासारखें, चार माणसांनीं उचलावयाचें टोपलीचें वाहन. डोंगर चढतांना हींत मनुष्य बसतो व हमाल ही खांद्यावर वाहतात. [हि.] दंडुका-पुस्त्री. (काव्य) हाताचा पुढचा भाग. -मोको. दंडुका, दंडुकणें, दं(दां)डूक, दंडोका-पुन. सोटा; बडगा; दांडकें; काठी; लांकडाचा लहानसा जाड तुकडा; शिपायाच्या हातांतील सोटा. [सं. दंड] दंडुकेशाही-स्त्री. मारहाण किंवा जुलूम करून अंमलगाज विण्याची पध्दति; पाशवी बल; दांडगाई. 'पोलिसांची दंडुकेशाही अलीकडे फारच बोकाळली आहे.' -केसरी १६-४-३०. दंडुक्या- वि. काठीनें मार देण्यास संवकलेला; दांडगा; जबरदस्त. दंडेरा- वि. दंडारा पहा. दंडेल-ली-वि. दांडगा; अरेराव; अडदांड; झोंड; मुख्यत्वें, जो कर्ज परत फेडण्यास नाकबूल असतो तो; दंडुक्या (मनुष्य). दंडेली-स्त्री. अरेरावीची वर्तणूक; दंडेलपणा; दांडगाई; जबरदस्ती; अन्याय; सामर्थ्याचा दुरुपयोग (मुख्यत्वें देणें न देण्यासंबंधीं). दंड्य-वि. १ शिक्षा करण्यास योग्य. २ दंड करण्यास योग्य. [सं.] दंड्याप्रमाणें-क्रिवि. शिरस्त्याप्रमाणें. सामाशब्द- ॰थडक-स्त्री. खांद्याच्या बाहेरच्या भागानें केलेला आघात. [सं. दंड + थडक] ॰दास-पु. दंडाबद्दल गुलाम होऊन राहिलेला मनुष्य. [सं.] ॰धारी-पु. यम. 'नुपेक्षी कदां कोपल्या दंडधारी ।' -राम २७. -वि. १ हातांत काठी असलेला. २ (ल.) संन्यासी. ॰नायक-पु. कोतवाल; पोलिसांचा अधिकारी. 'सवे सारीतु पातीनिलें । दंडनायका पाशीं ।' -शिशु ५०४. ॰नीति- स्त्री. १ नीतिशस्त्र; नीति; संसारांतील वर्तुणुकीचे आणि व्यवहाराचे कायदे, नियम. यालाच दंडनीति, अर्थशास्त्र, व्यवहारशास्त्र, दृष्टार्थ- शास्त्र, हे जवळजवळ पर्यायशब्द आहेत. २ (कायदा) शिक्षा करून दाबांत ठेवण्याचें शास्त्र. हें राजनीतीच्या चार भागांपैकी चवथें होय. ३ अर्थशास्त्र, आन्वीक्षिकी पहा. [सं.] ॰पत्र-न. न्यायांत खोटा ठरला म्हणजे त्यापासून दंड घेण्याचें पत्र. [सं.] ॰पक्ष (करण)-न. (नृत्य) पाय ऊर्ध्वजानु करणें व त्यावर उजवा हात लताख्य करीत राहणें. [सं.] ॰संयुतहस्त-पु. (नृत्य) हात हंसपक्ष करून बाहू पसरून एका हातानें दुसर्‍या हातास एकदां कनिष्ठिकेपासून आरंभ करून आंतील बाजूनें बाहेरच्या बाजूस विळखा घालणें; नंतर कनिष्ठिकेपासूनच पण बाहेरील बाजूनें प्रारंभ करून आंतील बाजूस विळखा घालणें. [सं.] ॰पाणी-पु. शिव; यम. -वि. ज्याच्या हातांत दंड आहे असा; धट्टाकट्टा व दांडगा; गलेलठ्ठ व झोंड; आडदांड. [सं.] ॰पाद-(आकाशी, चारी)- वि. (नृत्य) नूपुरपाय पुढें पसरून क्षिप्त करणें म्हणजे कुंचित पाय उचलून दुसर्‍या पायाच्या बाहेरील बाजूस पोटर्‍यांचें स्वस्तिक होईल अशा प्रकारें टांचेच्या भारावर टेकणें व मग तें स्वस्तिकां- तील पाऊल उचलून पसरणें व खालीं टाकतांना अंचित करून दुसर्‍या पायांत अडकविणें. [सं.] ॰पारुष्य-न. १ कडक, कठोर शिक्षा. २ काठीनें हल्ला करणें; छड्या मारणें; ठोंसे देणें; मारणें (हात, पाय, शास्त्र इ॰ कांनीं). ३ (कायदा) हल्ला; भय प्रदर्शक रीतीनें हात किंवा काठी उगारणें, मारणें. [सं.] ॰पूपिकान्याय-पु. (उंदरानें काठी नेली त्या अर्थीं तिला बांधलेली पोळी खाल्ली हें उघडच होय यावरून) कार्यकारण, अंगउपांग, प्रधानअप्रधान यांचा न्याय; ओघाओघानेंच प्राप्त झालेली गोष्ट. उदा॰ राजाचा जय झाल्यानंतर त्याच्या सेनेचा जय अर्थांतच दंडपूपिकान्यायानें होतो. [सं. दंड = काठी + पूपिका = पोळी + न्याय] ॰प्रणाम-पु. साष्टांग नमस्कार;;लोटांगण. 'दंड प्रणाम करोनिया ।' -गुच ९.९. ॰प्राय-वि. दंडासारखा; साष्टांग (नमस्कार). 'करी दंडप्राय नमन ।' -गुच ४१.१४. ॰फुगडी- स्त्री. (मुलींचा खेळ) परस्परांच्या दंडांना (किंवा खांद्यांना) धरून उभ्यानें फुगडी खेळण्याचा एक प्रकार. [दंड + फुगडी] फुगई- फु(पु)रोई-स्त्री. १ दंडासाठीं केलेली जप्ती; दंड. २ (अधि- कार्‍यानें) बेकायदेशीर बसविलेला दंड; बेकायदेशीर दंड बसविणें. (क्रि॰ घेणें; देणें; भरणें). ॰वळी, कोपरवळी-स्त्री. (व.) (दंडावरची) वांक; स्त्रियांचा एक अलंकार. [दंड + वेली] ॰वाट-स्त्री. १ (उजाड, भयाण असा) लांबच लांब रस्ता; जवळपास गांव, वस्ती नाहीं असा रस्ता. २ टेकड्यांच्या कडेनें गेलेली अरुंद पायवाट. ३ एकमेकास मिळणारे रस्ते. ॰वान्- वि. काठी, दंड, वेत्र इ॰ हातांत घेणार. [सं.] ॰विकल्प- पु. शिक्षेची अदलाबदल; शिक्षा कमी द्यावी कीं अधिक द्यावी याविषयीं विचारणा. [सं.] ॰सरी-स्त्री. (बागेमध्यें) पाणी जाण्याकरितां खणलेला लहानसा पाट, चर, खाचण; तसर्‍यांच्या बाजूचा पाट. [दंड + सरी] ॰स्नान-न. घाई घाईनें केलेलें अर्धवट स्नान; नद्यादिकांच्या ठिकाणीं अंग न चोळतां केकळ दंड मात्र भिजतील अशा प्रकारचें केलेलें स्नान; काकस्नान; पाण्यांत एक बुचकळी मारून केलेलें स्नान. [सं.]

दाते शब्दकोश