मराठी बृहद्कोश

आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

वळचण

वळचण vaḷacaṇa f The bottom or lower edge of a छप्पर or thatch. v बांध. Hence understood in the sense of Eaves. Pr. भुकेलें गुरूं व0 ओढतें (A hungry bullock &c. pulls at the edge of the thatch.) Used of evil deeds being prompted by hunger or necessity. वळचणीचें पाणी अढ्याला (जात नाहीं -गेलें -चढलें &c.) The water of the eaves (does not rise, or is risen) to the ridge.

मोल्सवर्थ शब्दकोश

स्त्री. १ (कों. राजा.) घराच्या मूळ पायाच्या बाहेरचा पागोळ्यांच्या आंतील प्रदेश. २ घराच्या पाख्याचा अग्र प्रदेश. 'जाणोनियां अग्नि लाविला घरीं । तो जाळूनियां सर्वही भस्म करी । मा नेणतांही ठेविला वळचणीवरी । तोही करी तैसेंचि । ' -एभा ३०.२९९. (क्रि॰ बांधणें). ३ पागोळी; पावळी. [सं. वलभिस्थान - वहलचाण-वळीचाण-वळचाण-वळचण. -भाअ १८३२] म्ह॰-भुकेलें गुरूं वळचण ओढतें. (वाप्र.) वळ- चणीचा वासी-पु. (ल.) खेंटून असलेला शेजारी (विशेषतः ऋण, उसनेपासनें यासंबंधीं योजतात). वळचणीची पाल-स्त्री. आडून कानवसा घेणारी व्यक्ति. वळचणीचें पाणी आढ्याला (जात नाही-गेलें-चढलें नाहीं)-(पाणी खालून वर जात नाहीं यावरून) लहानाला मोठें होणें अशक्य.

दाते शब्दकोश

वळचण f The bottom of a छप्पर, eaves.

वझे शब्दकोश

स्त्री० पागोळीच्या खालची जागा.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

संबंधित शब्द

निगोळी      

स्त्री.       १. पागोळी; वळचण. २. पागोळ्यांतून पाऊस गळणे; वळचण गळणे. [सं. नि+गल्]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

निगोळी

स्त्री. १ पागोळी; वळचण. २ पागोळ्यांतून पाऊस गळणें; वळचण गळणें. [सं. नि + गल् = गळणें]

दाते शब्दकोश

अस्मान

न. आकाश; अंतराळ; स्वर्ग. ‘अस्मानीं फत्तेची ध्वजा लागली.’ –चित्रगुप्त ३३. ‘अस्मानहि बुडालें तरी (मराठे) आपल्या मर्दानगीस अंतर करणार नाहींत.’ –मरि ३.७१. ॰गिरी- पु. चांदवा; छत; चांदणी; मांडवाचें आच्छादन; मांडव; छप्पर; वळचण. ॰चपेटा- पु. १ परमेश्वरी कोप; मोठा प्रलय; संकट; दैवी आपत्ति; अरिष्ट. २ (व्योजोक्ति) आकाशांत उड्डाण करणारा घोडा ( एकाद्या रद्दी, टाकाऊ, निकामी घोडयास म्हणतात ). -ची परी- स्त्री अप्सरा; सुंदर स्त्री. ‘तबियतखानाचें सर्व लक्ष्य हातीं लागलेल्या अस्मानचच्या परीकडे होतें.; -स्वप ४२९. ॰तारा -पु १ आकाशांत चमकणारा तारा; चांदणी. २ धूमकेतु; उल्का. (क्रि॰ तुटणें ). ३ सुंदर, चपळ घोडयाबद्दल अगर खंद्या घोडेस्वाराविषयीं, तसेंच उत्तम गवई उत्तम लेखक, उत्तम बजवय्या इत्यादिकांची प्रसंशा करतेसमयीं म्हणतात. अस्मान तारा तुटणें-१ उल्का- पात होणें; तारे निखळून पडणें. २ निरर्थक बडबड करणें. अस्मान जमीनीची तफावत- स्त्री. महदंतर; फार मोठें अंतर. ‘त्या सुमारास व या लिहिण्यास पाहतां अस्मान-जमिनीची तफा- वत.’ –ख १२९५. अस्मान ठेंगणें होणें- स्वर्ग दोन बोटें उरणें; ताठयाचा-गर्वाचा कळस होणें. ‘नवऱ्याच्या पगारामुळें तर तिला अगदीं अस्मान ठेंगणें झालें होतें.’ –पकोघे [फा. आस्मान् = आकाश ]

दाते शब्दकोश

अस्मान-गिरी

(स्त्री.) [फा. आस्मान् -गीर्] वळचण; माण्डव; छप्पर.

फारसी-मराठी शब्दकोश

अस्मानगिरी      

पु.       चांदवा; छत; चांदणी, मांडवाचे आच्छादन; मांडव; छप्पर; वळचण.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

भिं(भि)त

स्त्री. १ दिवाल, भित्ति; मातीची किंवा दगड विटा वगैरेची उभी रचना. २ नेत्रांस अंधत्व आणणारा विकार. [सं. भित्ति] सामाशब्द- भितखंड-न. (ना.) भिंताड. भित- खांब, भिंताडखांब-पु. भिंतींत बसविलेला खांब. भितड-डी- स्त्री. (कु.) वळचण; घराच्या भिंतीच्या बाजूला काढलेली पडवी. भिंतनागोरी पाणी-स्त्री. भिंतीजवळ नागोरीनें (चेंडूनें) खेळणें; दोन गड्यांनीं एक काठी व दोन चेंडू घेऊन भिंतीस लागून असलेल्या मोकळ्या जागीं खेळण्याचा एक खेळ. -मखेपु ५१. ॰फोड्या-वि. घरफोड्या. भितबड-स्त्री. (गों.) भिंतीचा आधार. ॰सरी-स्त्री. (कु.) भिंतीवरील लाकडाची पट्टी. भिंताड- न. १ घराच्या भिंतीशिवाय दुसरी कोणतीहि भिंत; अनाच्छादित भिंत (बाग, किल्ला, पडकें घर यांची); लहान भिंत. २ (सामा.) भिंत (तिरस्कारार्थीं). भिंतीवरचें लिहिणें-न. कांहीं प्रसंगीं स्त्रियांनीं भिंतीवर काढलेलीं गोपुरें, आकृति. भिंतीची चिमणी- स्त्री. भिंतीस लावण्याचा दिवा. भितोडी, भिती-स्त्री. (गो.) घरासभोंवारची, भिंतीला लागून असलेली जमिनीची पट्टी.

दाते शब्दकोश

चर

भुयार, गुहा, बीळ, खळी, विवर, छिद्र, भोक, खड्डा, खळगा, खबदाड, भोसका, विहीर, रंध्र, भेग, चीर, खांच, पन्हाळी, फांटा, खोबण, चकारी, चाकोरी, घट्टा, चरा, रेषा, फरा, खोल धार, धडी, शार, खोलपट्टी, दुमड, वळचण, खंदक, दरी, घळई, गल्ली, मार्ग, खिंडार, खिंड, खिडकी, गटार, खोरें, दरड, भगदाड, घळण, नेटें, बसलेला भाग, पंचपात्रे, आंत गेलेली तळी, कोनाडा, द्रोण, दबलेली बाजू, खिसा, कप्पा, भांडे, खालवर-खालीं सरलेला भाग, बसका तुकडा, मारती बाजू, उतार, उतरंड.

शब्दकौमुदी

धारन      

स्त्री.       १. रांग. २. समूह. ३. वळचण. ४. बोळ. (झाडी) [सं. धोरणी; क. धारणी]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गवाळी      

स्त्री.       भिंत व वळचण यामधील मोकळी जागा. (व.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गवाळी

स्त्री. (व.) भिंत व वळचण यामधील मोकळी जागा.

दाते शब्दकोश

हीड

स्त्री. (कों.) वळचण.

दाते शब्दकोश

जै      

स्त्री.       भिंत व छप्पर यांमधील जागा; (काही पदार्थ ठेवण्यासाठी) भिंतीच्या शेवटावरील जागा; वळचण. पहा : जई

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

लव

स्त्री. पागोळी; वळचण. 'लवेचें पाणी दक्षिणेस काढून दिलें.' -भाइसंम.

दाते शब्दकोश

निवांतलें

न. (सांके) अंगावर उंदीर मुतला असतां होणारा आजार. 'त्याला निवांतलें झालें.' 'निवांतल्याचा उपद्रव-बाधा.' [नीव = वळचण + आंतला]

दाते शब्दकोश

ताळवार

स्त्री. (तंजा.) पडवी; वळचण. [ता. ताळ्वारम्]

दाते शब्दकोश

ताळवार      

स्त्री.       पडवी; वळचण. (तंजा.)[त. ताळवारम्]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

वळण

स्त्री. (व.) वळचण पहा.

दाते शब्दकोश