मराठी बृहद्कोश

सात मराठी शब्दकोशांतील २,८४,८८८ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

सतीचें वाण

सतीचें वाण satīcē ṃvāṇa n (The fruits, rice, supárí, sweetmeats &c. of a सती or woman about to immolate herself upon the pyre of her deceased husband.) A term for a business or an undertaking of which, after promise has been made to perform it, the relinquishment or abandonment is utterly inadmissible. सतीचें वाण घेणें-उचलणें-स्वीकारणें-अंगीकारणें To enter upon (a business or work) with a determinedness or desperateness of purpose to carry it to completion. (The first or literal sense is To, accept the वाण or fruits &c. filled into her ओटी or lap;--used of a woman just widowed. सतीचें वाण ठेवणें -मांडणें To lay down a वाण in token of invitation or challenge to undertake some perilous or arduous enterprise.

मोल्सवर्थ शब्दकोश

सतीचें वाण n A term for a business or an undertaking of which, after promise has been made to perform it, the relinquishment is utterly inadmissible. सतीचें वाण घेणें-उचलणें-स्वीकारणें-अंगीकारणें To enter upon (a business or work) with a determinedness or desperateness of purpose to carry it to completion.

वझे शब्दकोश

वाण

वाण vāṇa m n (वर्ण S) Color. Pr. ढवळ्याच्या शेजारीं बांधला पोंवळा वाण नाहीं पण गुण लागला. 2 A specimen or sample, an instance of the color or kind of. वाण पालटणें -फिरणें -बदलणें g. of s. To have one's or its complexion, color, or hue reversed or altered;--used of living beings and of gold, silver, pearls, diamonds &c. वाण मारणें To lose or change color or the general appearance betokening the condition or health (of man or beast); to look wan. Ex. आज घोडा वाण मारल्यासारखा दिसतो.

मोल्सवर्थ शब्दकोश

न. वायन; व्रताच्या सांगतेकरितां ब्राह्मणास सूप, खण, तांदूळ वगैरे साहित्य देतात तें. 'कां वाण धाडिजे घरा । वोवसि- याचें ।' -ज्ञा १७.२८६. [सं. उपायन] सुन्या घरीं वाण देणें-निरुपयोगी स्थानीं सामर्थ्यं वेचणें; बेफायदा सर्कृत्य करणें; विनासाक्ष मोठें कृत्य करणें, दिमाख दाखविणें. वाणक- न. वायन. वाण पहा. 'सर्वस्व समर्पाया धर्मासि ब्राह्मणासि वाण- कसें ।' -मोविराट ६.७७. वाणवसा-वंसा-पु. व्रत; नियम; उपासना. 'अनन्य भावें शरण तुला स्वधर्म अमचा वाणवसा ।' -प्रला ११४. [वाण + वोवसा]

दाते शब्दकोश

वाण vāṇa f (उणा) Deficiency, defectiveness, insufficiency, want, lack. v कर. Ex. खाण्यापिण्याची वाण कराल तर शरीर कसें वागेल; त्याचे घरीं काय पैक्याची वाण; Pr. मिठाची केली वाण आणि लोणच्याला पडली घाण.

मोल्सवर्थ शब्दकोश

स्त्री. न्यूनता; कमीपणा; उणीव; तूट; टंचाई; कम- तरता. 'तयांची न वाण ।' -विक ५. [उणा, ऊन = न्यून] वाणि-णी-स्त्री. उणीव; वाण पहा. 'तया प्रेमळांसिगा कांहीं । या कथामृताचि वाणि नाहीं ।' -रास ३.२८७. 'गालिप्रदानीं न करूनि वाणी ।' -वामन नृहरिदर्पण. वाणेपण-न. न्यून; कम- तरता; उणाव. वाण पहा. 'न करी अवधानाचें वाणेपण ।' -ज्ञा १८.५९४. [वाण]

दाते शब्दकोश

पु. १ वर्ण; रंग. 'साजत मेघा ऐसा वाण ।' -कीर्तन १.७५. म्ह॰ ढवळ्या शेजारी बांधल्या पोवळा वाण नाहीं पण गुण लागला.' २ नमुना; प्रकार; तऱ्हा. लुगड्याचें वाण. 'कर्मी या नामपाठाचे । वाणें सारी ।' -ज्ञा १८.६०३. ३ बाजू. 'तेया क्रुसाचा येके वाणी ।' -ख्रिपु २.४४.४१. [सं. वर्ण; प्रा. वण्ण] ॰चोर-वि. आपलें खरें स्वरूप लपविणारा; वेषधारी; ढोंगी. ॰ढाळ-वि. विटका; रंग, चेहरा, चर्या उतरलेला; निस्तेज; फिका (रत्न, मोती). ॰पालटण-स्त्री. १ वस्त्रपालट. 'श्रीकृष्णासी वाणपालटण । नामरूपाचें वास संपूर्ण ।' -एरुस्व १६.१५४. २ रंग, चर्या, छटा बदलणें. (चेहरा, सोनें, मोतीं, हिरे यांचा). वाण मारणें-कलाहीन होणें; निस्तेज होणें; फिकें पडणें. निःसत्त्व असणें. 'आज घोढा बाण मारल्यासारखा दिसतो.' ॰माऱ्या- वि. निस्तेज; फिका; उतरलेल्या चेहऱ्याचा; दुर्मुखलेला. वाणलग, वाणेलग-वि. अनेक रंगांचें; भिन्नवर्णी; पंचवर्णी. 'वानलगां वस्त्राचे वोसाडे ।' -ऋ १.४.२३. 'वरि शिरा जाळ उमटे । वाणेलग ।' -भाए २०२. वाणवती-स्त्री. वर्ण; छटा. 'ना तरी पण्हरेयां वाणवती ।' -शिशु २९. [वर्ण]

दाते शब्दकोश

वाण vāṇa n (वायन S) वाणक n S Fruits, sweetmeats, and light dishes, also articles of female dress and decoration, presented, on occasions, by persons under some religious observance to Bráhmans or to married women. सुन्या घरीं वाण देणें To be beneficent, virtuous, religious &c. where there is none to acknowledge; to perform labors or make sacrifices where there is none to recompense: also to be ostensibly munificent, or lavish of large-hearted professions where there is none to subject to cost or put to the test; to achieve prodigies or make imposing demonstrations without a witness.

मोल्सवर्थ शब्दकोश

वाण m n Colour. A specimen. n Fruits, &c., presented on occasions, by persons under some religious observance to Brâhmans, &c. f Deficiency.

वझे शब्दकोश

(सं) पु० वर्ण, रंग, चेहरा. २ गरज, तूट, कमीपणा. ३ न० वायन. ४ तऱ्हा.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

वान

वान vāna m (For वाण from वर्ण S) Color, hue, tint, tinge. 2 n An ingredient; a material entering into the composition of; esp. an item of a medicinal compound. 3 Better वाण n q. v. Presents by votaries &c.

मोल्सवर्थ शब्दकोश

वान m Colour. n An ingredient. See वाण.

वझे शब्दकोश

पु. वर्ण; रंग; रूप; प्रकार; तऱ्हा. वाण पहा. 'वान ते सांवळी नांव तें श्रीधर ।' -तुगा ३३६४. ॰सर-वि. तऱ्हेतऱ्हेचे. 'मुदियाचे हीरे । आंगुलिया चेजाचे वानसरे ।' -शिशु ४०३.

दाते शब्दकोश

न. घटकद्रव्य (मिश्रणांतील औषधांतील). 'कांहीं कषायांच्या वानांच्या यादी घोकून पाठ केल्या.' -व्यनि ७६.

दाते शब्दकोश

न. (कों. गो.) उखळ. वाईन, वहान पहा.

दाते शब्दकोश

वाङ् नियम

वाङ् नियम vāṅ niyama m S (वाक् & नियम) वाङ् निश्चय m S (वाक् & निश्चय) A rule imposed or formed of keeping silence for a given period. 2 वाङ् नियम is further A law or rule of speech.

मोल्सवर्थ शब्दकोश

अचळवी वाण      

न.       मकरसंक्रांती दिवशी करावयाचे एक वाण. आदल्या दिवशी विरजून ठेवलेले व हात न लावलेले असे दही पात्रासुद्धा (भांड्यासकट) स्वतःच्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी जिची सर्व मुले जिवंत आहेत अशा सुवासिनीस वाण म्हणून देतात. [सं. अचलवायन]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अवांझ वाण      

न.       अनेक मुले असलेल्या बाईला मूल नसलेल्या बाईने द्यावयाचे वाण : ‘एका बाईने मुद्दाम येऊन बायाला अवांझ वाण अर्पण केले.’ –माजी ८.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अधिक वाण      

न.       अधिक महिन्यात सासूने जावयाला द्यावयाचे वाण.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

नशीब, नशीबवंत or वान्, नशिबाचे ताले

नशीब, नशीबवंत or वान्, नशिबाचे ताले naśība, naśībavanta or vān, naśibācē tālē See under नसीब.

मोल्सवर्थ शब्दकोश

नसीबवंत or वान्

नसीबवंत or वान् nasībavanta or vān a Fortunate, lucky, prosperous.

मोल्सवर्थ शब्दकोश

वान्

नसीबवंत or -वान् a Fortunate, prosperous.

वझे शब्दकोश

वान् vān A Sanskrit affix to nouns ending in अ or आ, or in a consonant of which the inherent short vowel is dropped; forming them into attributives. This is the masculine termination; the feminine and neuter are वती & वत्. Ex. द्रव्यवान्, भाग्यवान्, धूमवान् Rich, fortunate, smoky; एतद्वान्, तद्वान्, पयस्वान् Possessed of this, of that, of water or milk &c. In Maráṭhí however the fem. and neut. terminations are little used. As this affix is taken by nouns ending in अ (inherent) or आ, so the affix मान् is taken by nouns terminating in any other vowel. Ex. धनवान्, लज्जावान्, कीर्त्तिमान्, धीमान्, भानुमान् or अंशुमान्, भ्रूमान्, गोमान्, नौमान्. This affix therefore supplies the deficient power of the affix मान् q. v.

मोल्सवर्थ शब्दकोश

एक संस्कृत प्रत्यय. अंती अ किंवा आ असणाऱ्या नामास हा प्रत्यय लागून विशेषणें होतात, व त्यांचा अर्थ तत्त- द्वस्तुयुक्त असा होतो. उदा॰ धनवान्, भाग्यवान् वगैरे. हा पुल्लिंगी प्रत्यय आहे. स्त्रीलिंगी 'वती' असा आहे. [सं. वत्]

दाते शब्दकोश

वाङ् माधुर्य

वाङ् माधुर्य vāṅ mādhurya n S Sweetness of speech, mellifluence.

मोल्सवर्थ शब्दकोश

वाङ् मुख

वाङ् मुख vāṅ mukha m S (वाच् & मुख) The opening of a speech; an exordium, proëm, preamble.

मोल्सवर्थ शब्दकोश

वाङ् निरोध

वाङ् निरोध vāṅ nirōdha m S See वाग्निरोध.

मोल्सवर्थ शब्दकोश

वान्, नशिबाचे ताले

नशीब, नशीबवंत or -वान्, नशिबाचे ताले See under नसीब.

वझे शब्दकोश

अधिक उत्पन्नाचे वाण      

न.       (कृषी.) गहू व ज्वारी पिकांमध्ये निवड पद्धतीने व संकर पद्धतीने निर्माण केलेली जास्त उत्पन्न देणारी जात.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कुळवंत, वान      

वि.       श्रेष्ठ कुळात जन्मलेला; कुलीन घराण्यातील. [सं. कुल]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उसण, उसणवार, उसणवारी, उसणा, उसणें, उसणें- वाण

उसना, उसनेंवाण पहा. 'मुष्टिभर पोहे उसणे आणुनि । विप्रा हातीं देतसे ।' -ह २९.४९. ' तुझ्या पुत्राचा नंदन । त्यासी मारिलें जैसा मत्कुण । तुजलागीं सांगतां न घेसी उसण । तरी मग आजा कायसा ।।' -जै ८७.४६.

दाते शब्दकोश

उसने वाण      

१.कोणी जे काही केले असेल त्याचा मोबदला देणे; प्रत्युपकार; परत भेट; परत फेड. २. सूड; बदला. उसपण, उसपणी, उसपा      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

वाण आमंत्रण

सर्वसाधारणपणें निमंत्रण. आमंत्रण पहा.

दाते शब्दकोश

वाण धरणें

पाग टाकून मासे धरणें. -आडिमहाका.

दाते शब्दकोश

संबंधित शब्द

सती

स्त्री. १ पतिव्रता; साध्वी; तपस्विनी. 'सती आणि सत्पुरुख । दानशील याज्ञिक ।' -ज्ञा १६.४०२. 'सतीला नाहीं बती हत्ती आहे शिंदळीच्या वरीं ।' -पला १२.२८. २ पति मृत झाला असतां त्याच्या प्रेताबरोबर सहगमन करणारी स्त्री. ३ पार्वती. ४ स्त्री; पत्नी. 'कशी नलसतीच होय दमयंती ।' -र २ सती जागविणें-सती गेलेल्या स्त्रीच्या चितेवर पहारा करणें.सती जाणें -मृतपतींबरोबर सहगमन करणें. सतीचा लाल-पु. १ शब्दश: पतिव्रतेचा पुत्र. २ (ल.) सत्पुरुष; पवित्र मनुष्य. सखीचा लाल या हिंदी वाक्प्रचारावरून चुकीनें. सतीचें वाण-न. सती जाणार्‍या स्त्रीनें त्या प्रसंगीं दिलेलें वाण. यावरून कधीं न मोडतां येणारें वचन; दृढ प्रतिज्ञा; प्राणा- वर बेतली असतांहि न मोडणारा निश्चय. 'सतीचें तें घेतां वाण । बहु कठिण परिणामीं ।' -तुगा ३४१९. 'लाविला जिव्हारीं बाण, घेऊन सतीवाण प्राण देतें' -प्रला १०८. सतीचें वाण घेणें-उचलणें-स्वीकारणें-अंगीकारणें-वरील प्रमाणें द्दढप्रतिज्ञा करणें; एखादी गोष्ट पतकरणें. 'बा निःशंक सतीचें घेवूनि सतीच हर्षती वाण.' -मोशल्य २.३५. सतीचें वाण ठेवणें -मांडणें-वरील प्रमाणें प्रतिज्ञा करावयास सांगणें; पैजेचा विडा मांडणें. [सं.]

दाते शब्दकोश

घेवाणदेवाण

न. (संक्रांत वगैरे प्रसंगीं सुवासिनी स्त्रिया परस्परांना वाण (वायन) देतात-घेतात त्यावरून) १ आपसांतलें (उसनें) देणें-घेणें; देवघेव. २ पैशाचा व्यवहार. ३ (मेजवानी लाभ, नुकसानी, भेट, अहेर इ॰ कांची) परत फेड; परत करणें; प्रतिक्रिया. [घेणें + वाण + देणें + वाण]

दाते शब्दकोश

वाना

पु. १ वान; वाण पहा. विक्रीचा माल; जिन्नस. २ घटकद्रव्य (औषधांतील); वान पहा.

दाते शब्दकोश

वंत

वंत vanta ind (वत् or वान् S) An affix to nouns signifying Possessor; as द्रव्यवंत, धैर्यवंत, भाग्यवंत Rich, courageous, fortunate. Note. Attributives formed from nouns through the use of this affix, as they are formed with great freedom, may not all be looked for in this compendious dictionary. Yet as the grounds and rules upon which are distinguished वान् & मान्, the affixes from which वंत & मंत are respectively derived, are operative, although indeed with less rigor, upon these their derivatives, see the distinction stated under वान् & मान्.

मोल्सवर्थ शब्दकोश

बाळगणारा, धरणारा, धनी या अर्थी नामांना जोडून येणारा प्रत्यय. उदा॰ द्रव्यवंत; भाग्यवंत; धैर्यवंत इ॰ [सं. वत, वान्]

दाते शब्दकोश

अन्न      

न.       १. धान्य वगैरेचा तयार केलेला खाण्याचा पदार्थ; (विशेषतः) भात, भाकरी, भाजी पक्वान्न वगैरे नेहमीच्या खाद्यातील शरीर पोषणार्थ असलेले जिन्नस; आहार; भक्ष्य; भोज्य : ‘मृत्यूचे आघवेंचि अन्न I’ – ज्ञा १८·५६३. २. (सामान्यतः) धान्य. ३. चरितार्थाचे साधन (रोजगार, नोकरी). ४. पक्वान्न; जेवण्याचा पदार्थ. ५. यंत्र इत्यादींची हालचाल चालू राहण्यासाठी द्यावे लागणारे इंधन. (वा.) अन्न अन्न करणे – अन्न अन्न करीत फिरणे – अन्नाकरिता भिक्षा मागणे; दारोदार फिरणे. अन्न अंगी लागणे – पचणे; कामी येणे; उपयोगी पडणे. अन्न चारणे – खाऊ घालणे; जेवू घालणे; पोसणे. अन्न जाणे – भूक असणे; अन्न पचणे; तोंडाला चव असणे. अन्नपरब्रह्म – अन्न हेच परब्रह्म. (ल.) अन्नाशिवाय दुसरे काही महत्त्वाचे नाही (असा माणूस); खादाड. अन्नपाणी तुटणे, अन्नपाणी राहणे – अन्नावर वासना नसणे; तोंडास चव नसणे; भूक कमी होणे. अन्नपाणी सोडणे – अन्न न खाणे; अन्नपाणी टाकणे; उपाशी राहणे. अन्न व खोबरे बरोबर असणे – श्रीमंत पण कंजूष माणसाला लावतात. अन्नाआड येणे, अन्नावर उठणे – एखाद्याच्या उदरनिर्वाहाच्या साधनात व्यत्यय आणणे किंवा ते साधन नाहीसे करणे; पोटावर पाय आणणे. अन्नाचा किडा – १. खादाड. २. नुसता खाऊन स्वस्थ बसणारा माणूस; वृद्ध किंवा लहान मूल. (एखाद्याच्या) अन्नाचा असणे – एखाद्याचा आश्रित असणे. अन्नाचा मारलेला खाली पाही – (तलवारीचा मारलेला वर पाही) = अन्न खाऊ घातल्यास तो नेहमी आपल्याशी नम्र आज्ञाधारक राहतो. परंतु मनुष्यावर प्रहार केल्यास तो उलट प्रतिकार करण्यासाठी मगरूरपणे टवकारून वर पाहू लागतो. (ल.) दयेने, सौम्यतेने माणूस जिंकला जातो, कठोरतेने मनुष्य शत्रू बनतो. अन्नाची लाज धरणे – खालेल्या अन्नाबद्दल उतराई होणे; कृतज्ञता वाटणे. अन्नाचे खोबरे होणे – अन्नाची वाण किंवा दुष्काळ होणे, अन्नाची वाण किंवा दुष्काळ पडणे, (ज्या देशात खोबरे फार कमी व महाग तेथील लोकांच्या तोंडात असलेली म्हण). अन्नाचे पाठी लागणे – निर्वाहाच्या साधनांच्या मागे लागणे; नोकरी करणे, पाहणे. अन्नाचे पाणी करणे, अन्नाचे पाणी होणे – अन्नातील पौष्टिकपणाचा व चवीचा नाश करणे, होणे; अन्न निःसत्त्व व बेचव करणे; (खाण्याच्या वेळी काहीतरी अभद्र, अनिष्ट किंवा भीतिप्रद बोलण्यामुळे). अन्नाच्या गारगोट्या – (गारगोट्यासारखे थंड झालेले) अगदी निवलेले अन्न. अन्नात माती कालविणे, अन्नात माती घालणे – एखाद्याच्या निर्वाहाच्या साधनांचा नाश किंवा बिघाड करणे; पोटावर पाय आणणे; अन्नाआड येणे; नोकरी घालविणे. अन्नात माशी पडणे – माशी अन्नाबरोबर पोटात गेली असता अन्न ओकून पडणे. त्यावरून, अगदी सिद्ध होत असलेल्या कामात अवचित काही अनिष्ट गोष्ट घडून कार्यनाश होणे : ‘त्यागमति । असी कोठुनि आली या भोजनांत हे मासी ।’ – मोआश्रम ३·२९. अन्नामुळे वाळणे – अन्नाच्या अभावामुळे रोड किंवा कृश होणे; खंगणे. अन्नावर अन्न वस्त्रावर वस्त्र – अन्न जिरले नाही तोच पुन्हा अन्न सेवन करणे व एकाच्या ठिकाणी अनेक वस्त्रे घालणे (केव्हाही अहितकारक आहे; यावरून कोणतीही वस्तू चांगली असली तरी मितपणा सोडून एकसारखे अधिक सेवन करू नये.). अन्नावर वाढणे – आश्रयावर लहानाचे मोठे होणे. अन्नास जागणे – (पोशिंद्याला) कृतज्ञ राहणे; ऋणी असणे; उपकार स्मरून उतराई होणे. अन्नास महाग, मोताद – अत्यंत दरिद्री; कंगाल; नेहमीच्या सामान्य गरजांची वाण असलेला; बुभुक्षित. अन्नास याजित होणे – अन्नास महाग होणे; पारखे होणे : ‘घरेदारे प्रपंच केला तो सर्वस्वी हरण होऊन अन्नास याजित जाहलो.’ – ऐसंसाखं ११·२८. अन्नास लावणे – निर्वाहाचे साधन मिळवून देणे; काम, उद्योग, धंदा देणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अन्न

न. १ धान्य वगैरेचा तयार केलेला खाण्याचा पदार्थ; (विशेषत: भात, भाकरी, भाजी, पक्कान्नें वगैरे नेहमींच्या खाद्यां- तील जिन्नस); आहार; भक्ष्य; भोज्य. 'मृत्युचें आघवेंचि अन्न ।' -ज्ञा १८.५६३. म्ह॰ १ अन्नासारखा लाभ (नाहीं) मरणासारखी हानि (नाहीं). २ अन्न तारी, अन्न मारी, अन्नासारखा नाहीं वैरी. ३ अन्नाची वाण, शरीराची घाण. २ (सामान्यतः) धान्य. ३ चरीतार्थाचे साधन (रोजगार, नोकरी ). ४ पक्कान्न जेवण्याचा पदार्थ. 'विचित्र अन्नें वाढिलीं पात्रीं ।' ॰अंगीं लागणें-पचणें; कामीं येणें; उपयोगी पडणें, 'खाल्लें अन्न अंगीं लागत नाहीं' = केलेल्या कर्मापासून किंवा संपादलेल्या वस्तूपासून कांहीं लाभ होत नाहीं. ॰अन्न करणें-करीत फिरणें अन्नाकरितां भिक्षा मागणें, दारोदार फिरणें. 'तुकयाची जेष्ठ कांता । मेली अन्न- अन्न करतां ।' ॰कडे-कांठास ठेवणें भुकेच्या अंदाजाप्रमाणें ताटांत अन्न वाढून घेतल्यानंतर जरुरी लागल्यास घेतां यावें म्हणून बाजूस काढून ठेवणें. ॰ चारणें- खाऊं घालणें; जेवूं घालणें; पोसणें. ॰जाणें भूक असणें; अन्न पचणें; तोंडाला चव असणें. ॰परब्रह्म-न. अन्न हेंच परब्रह्म; (ल.) अन्नाशिवाय दुसरें कांहीं मह- त्वाचें नाहीं (असा माणूस ); खादाड ॰पाणी तुटणें-राहणें; अन्नावर वासना नसणें; तोंडास चव नसणें; भूक कमी होणें. ॰पाणी सोडणें -अन्न न खाणें; अन्नपाणी टाकणें; उपाशी राहणें. ॰व खोबरें बरोबर असणें-श्रीमंत पण कंजुष माणसाला लावतात. अन्नावर अन्न, वस्त्रावर वस्त्र-अन्न जिरलें नाहीं तोंच पुन्हां अन्न सेवन करणें व एकाच्या ठिकाणीं अनेक वस्त्रें पेहेरणें. (केव्हांहि अहितकारक आहे; यावरून कोणतीहि वस्तु चांगली असली तरी मितपणा सोडून एकसारखें अधिक सेवन करुं नये ). आड येणें, -वर उठणें एकाद्याच्या उदरनिर्वाहाच्या साधनास व्यत्यय आणणें किंवा तें साधन नाहीसें करणें; पोटावर पाय आणणें. -चा अन्नानें पोसलेला- वाढलेला 'दास म्हणे तुझ्या अन्नाचा वाधलों साचा ।' -दावि १७. -चा मारलेला खालीं पाही- (तरवारीचा मारलेला वर पाही) = अन्न खाऊं घातल्यास तो नेहमीं आपल्याशीं नम्र आज्ञाधारक राहतो, परंतु मनुष्यावर प्रहार केल्यास तो उलट प्रतिकार करण्यासाठीं मगरूरपणें टंवकारून वर पाहूं लागतो. (ल.) दयेनें, सौम्यतेनें माणूस जिंकला जातो, कठोरतेनें मनुष्य शत्रु बनतो. चा किडा पु. १ खादाड; २ नुसता खाऊन स्वस्थ बसणारा इसम; वृद्ध इसम किंवा लहान मूल. ॰चा पिंड -१ पोष णाची योग्य काळजी घेऊन वाढविलेला (इसम-प्राणी); आश्रित; पोष्य; पोसणा. २ अन्न बंद केलें असतां ताबडतोब मरणारा- म्हातारा, लहान मूल; अन्नाचा किडा. ॰ची क्रिया स्त्री. १ एखा- द्याचें अन्न खाल्ल्यामुळें भासणारें त्याबद्दलचें कर्तव्यकर्म; उपकार; (क्रि॰ टाकणें, धरणें, सोडणें). २ शपथ; भाक (क्रि॰ करणें) -ची लाज धरणें खाल्ल्येल्या अन्नाबद्दल उतराई होणें; कृतज्ञता वाटणें. चें खोबरें होणें- अन्नाची वाण किंवा दुष्काळ होणें-पडणें; (ज्या देशांत खोबरें फार कमी व महाग तेथील लोकांच्या तोंडांत अस- लेली म्हण). चे पाठीं लागणें निर्वाहाच्या साधनांच्या मागें लागणें; नोकरी पाहणें-करणें. -चें पाणी करणें- होणें अन्नांतील पौष्टिकपणाचा व चवीचा नाश करणें, होणें; अन्न नि:सत्व व बेचव करणें; (खाण्याच्या वेळीं कांहींतरी अभद्र, अनिष्ट किंवा भीतिप्रद बोलण्यामुळें). च्यागारगोट्या (गारगोट्यांसारखें थंड झालेलें) अगदीं निवालेलें अन्न. त माती कालविणें- घालणें एखा- द्याच्या निर्वाहाच्या साधनांचा नाश किंवा बिघाड करणें; पोटावर पाय आणणें; अन्नाआड येणें; नोकरी घालविणें. त माशी पडणें माशी अन्नाबरोबर पोटांत गेली असतां अन्न ओकून पडतें त्यावरून- अगदीं सिद्ध होत असलेल्या कामांत अवचित कांहीं अनिष्ट गोष्ट घडून कार्यनाश होणें. 'त्यागमति असी कोठुनि आली या भोज- नांत हे मासी ।' -मोआश्रम ३.२९. मुळें वाळणें-अन्नाच्या अभावामुळें रोड किंवा कृश होणें; खंगणें. वर वाढणें-आश्रया- वर लहानांचे मोठें होणें, 'पेशव्यांच्या अन्नावर वाढलेलीं व पेश- व्यांमुळें नांवारूपास आलेलीं शेंकडों घराणीं जेथें हयात आहेत तेथें पेशव्यांचा शेवटला वंश बंडखोर ठरतो तरी आम्हांस बिल- कुल पर्वा नाहीं. ' -टि ४.१७९. स जागणें (पोषिंद्याला) कृतज्ञ राहणें; ऋणी असणें; उपकार स्मरून उतराई होणें. स महाग-मोताद-अंत्यंत दरिद्री; कंगाल; नेहमींच्या सामान्य गरजांची वाण असलेला; बुभुक्षित. -स लावणें-अन्न लावणें- निर्वाहाचे साधन मिळवून देणें; काम. उद्योग, धंदा देणें.

दाते शब्दकोश

आजेचीर

आजेचीर ājēcīra or -वाण n (आजा & चीर & वाण) The presents (of cloth &c.) made at marriages by the party of the bridegroom to the grandmother of the bride.

मोल्सवर्थ शब्दकोश

चीर

न. वस्त्र; कपडा; (सामा.) अन्तर्वस्त्र. 'पांचवण चीर नेसो देतसा' -भाए १२१. 'जानकी फाडी चीरपदर । अलं- कार बांधोनि समग्र । मारुतीकडे टाकिलें ।' -रावि १५.१८६. -वेसीस्व ९ १५३. [सं.] ॰गुट-न. (नेसावयाचें) लहान वस्त्र; वस्त्राचा तुकडा अंतर्वस्त्र. [सं. चीर = वस्त्र + का. गुट्ट = गुप्त, आतील] ॰चोळी-स्त्री मकरसंक्रातीच्या दिवशीं सुवासिनी स्त्रिया एकमेकीस चोळी आणि लुगड्याचें जें वाण देतात तें. ॰वाण-न. (स्त्रियांत रूढ) वधूच्या नातलग स्त्रियांस अहेर म्हणून वरपक्षाकडून आलेलें लुगडें वगैरे. उदा॰ आजेचीर; मामे- चीर. [चीर + वाण]

दाते शब्दकोश

धैर्य

न. १ धीर; दम, धृति; निश्चय; अढळपणा. २ धाडस; धडाडी. धीर पहा. ३ टणकपणा. 'पृथिवी सांडी जरी धैर्यातें ।' -दाव ३९६. [सं.] -वि. धैर्यवान्. 'तरी धनुर्धरा धैर्या । निकें अवधान देईं बा धनंजया ।' -ज्ञा ९.९७. ॰भंग-पु. निराशा; निरुत्साह; हिरमोड; हिंमत खचणें. [सं. धैर्य + भंग] ॰वान- शाली-वि. सोशीक; दृढनिश्चयी, धैर्याचा. धैर्याचा-वि. धैर्य- वान्; धीराचा. धैर्यावलंबन-न. (धैर्यावलंबन) निश्चय, धारिष्ट याचा अवलंब करणें; धैर्य धरणें. [धैर्य + अवलंबन]

दाते शब्दकोश

कमती

स्त्री. तूट; वाण; कमीपणा. -वि. १ थोडें, अल्प, कमी. 'त्याला प्रसंग फार कमती असत.' म. सहावें पुस्तक (१८७५) १९८. २उणें; उणीव; वाण; कमीपणा. [फा. कमती] ॰बढती-स्त्री. उतारचढ, क्षयवृद्धि. [फा. कमती + सं. वृध्]

दाते शब्दकोश

कस्त

स्त्री. १ खराबी; नुकसान; झीज; तोटा (क्रि॰ सोसणें, खाणें) २ (ल.) उणेपणा; न्यूनता; कमताई; वाण. (क्रि॰ घेणें; खाणें). 'हा कसाही प्रसंग पडला तरी कधीं कस्त घेत नाही.' ३तसदी; परिश्रम; दगदग; त्रास. (क्रि॰ खाणें). शुश्रुषा; मेहनत; खस्ता. 'पावल अस्त रवी मग मस्त ते कस्त करूनि ते दस्त करावे ।' -अकक, राधावर्णन ४. 'नाना जलदीनें रवानगी होण्याची कस्त करीत आहेत' -ख ११.६१५४. 'काकाच्या दुखण्यांत त्यानें फार कस्त खाल्ली' [सं. कष्ट.; हिं. कस्त = वाण, कमताई]

दाते शब्दकोश

मंत

मंत manta An adjunct formed from मत् or मान् S, and attached freely to nouns to turn them into attributives; as बुद्धिमंत, शक्तिमंत. As the grounds and rules upon which are distinguished मान् & वान्, the affixes from which मंत & वंत are respectively derived, are operative, although indeed with less rigor, upon these their derivatives, see the distinction stated under मान् & वान्.

मोल्सवर्थ शब्दकोश

शीण

न. (गो.) उसनें वाण. शीणकाडप-उसनें वाण फेडणें.

दाते शब्दकोश

वाग्नियम

वाग्नियम vāgniyama m (Also वाङ् नियम) A law or rule of speech. 2 See वाङ् नियम.

मोल्सवर्थ शब्दकोश

वाणी

पु. व्यापारी; वैश्य; दुकानदार. [सं. वणिक्] समा- सांत वाणी शब्दांचें पूर्वपदीं वाण असें रूप होतें. सामाशब्द- वाणकूट-गट-गंड-पु. (तिरस्कारार्थीं) वाणी. वाण- जिन्नस-पु. वाण्याकडील माल; किराणा; वाणसवदा. [वाणी + जिन्नस] वाणपण-न. वाणीपणा; व्यापार. वाणपसारा-पु. १ वाण्याच्या दुकानांतील माल; वाणजिन्नसांचें प्रदर्शन. २ (ल.) तऱ्हेतऱ्हेची व विस्तृत मांडणी; एखाद्या कार्यांतील अनेक गोष्टींची वस्तूंची मांडामांड, प्रदर्शन, रचना. ३ अव्यवस्थित रचना; अस्ता- व्यस्तपणा; गोंधळ. ४ (बायकोचा) प्रसूतिसमयीं घोटाळा, अड- चण, कठीण परिस्थिति. (क्रि॰ पडणें). वाणसवदा-सौदा- पु. हिंगजिरें इत्यादि वाण्याच्या दुकानांतील जिन्नस; वाणजिन्नस; किराणा माल. [वाणी + सौदा] वाणिज्य-ज-न. व्यापार; उदीम; वैश्यवृत्ति. 'गौरज्य वाणिज्य कृषि ।' -दा १४.२.१८. -ज्ञा १८.९१३. वाणिया-पु. वाणी पहा. व्यापारी. वाणी ॰उदमी-बकाल-पु. (व्यापक) व्यापारी; दुकानदार; क्रयवि- क्रयादि व्यवहार करणारा. ॰बैलकरी-पु. बैलावरून वाहतुक करणारे. -मसाप २.२.३०. ॰वेव्हार-पु. (सांकेतिक) कर्ज. ॰शाई-वि. वाण्याच्या पद्धतीचें; एका विशिष्ट तऱ्हेचें.

दाते शब्दकोश

वाणी vāṇī f (उणा) Deficiency, insufficiency, want, lack. See ex. under वाण f.

मोल्सवर्थ शब्दकोश

वाणी vāṇī prep (वाण Color &c.) In the manner or similitude of; as or like. Ex. वेड्यावाणी काय बोल- तोस?

मोल्सवर्थ शब्दकोश

वाणोवाण

पु. वाण जिन्नस; माल. -तुगा ४४३२. [वाणी + वाण]

दाते शब्दकोश

विरह

पु. १ वियोग; ताटातूट; दूरीकरण (मित्र, प्रिय- मनुष्य यांचा). 'विरह तापें फुंदे छंद करित जाती ।' -तुगा १३१. २ वियोगजन्य दुःख; ताटातुटीमुळें होणारी पीडा, हुर- हुर; बेचैन. ३ वाण; अभाव; रहितता. [सं.] ॰ज्वर-पु. विरहा- मुळें येणारा ताप; वाटणारें दुःख. विरहाग्नि, विरहानल-न. वियोगजन्य शरीरदाह; विरहामुळें होणारी शरीराची आग. 'अधिका विरहोनळु । उधावतु दिसे ।' -शिशु ७७९. विर- हिणी-स्त्री. पति अथवा वल्लभाचा वियोग झालेली स्त्री. 'विर- हिणी कां जैसी । वल्लभातें ।' -ज्ञा १३.३७४. विरही-पु. १ प्रियेचा वियोग झालेला. २ विहीन; वाण, राहित्य असलेला.

दाते शब्दकोश

धोंड

स्त्री. १ मोठा जड धोंडा; दगड; खूप मोठी शिळा; खडक. 'हे देहदुर्गीचे धोंड । इंद्रियग्रामींचे कोंड ।' -ज्ञा ३. २४२. २ (ल.) व्यापारांत आलेली बूड. ३ सरकारनें लादलेला फार मोठा कर. ४ मोठें संकट; दुःख. ५ दडपणारी काळजीः चिंता. 'उरावर धोंड-गळ्यावर धोंड-डोईवर अथवा माथ्यावर धोंड.' ६ मोठा आळ, आरोप. ७ ओझें; भार. 'हिंदुस्थान दिवसेंदिवस अधिकाधिक दरिद्री होत असून हिंदुस्थान इंग्लंडच्या गळ्यांत एक बोजड धोंड झाली आहे.' -टिव्या. (वाप्र.) ॰डोकीवर चढविणें-देणें-वळविणें, धोंड पडणें, येणें-१ अतिशय द्रव्यनाश होई असें दरवडा इ॰. संकट प्राप्त होणें. 'या व्यापारांत पांच हजारांची मजवर धोंड पडली.' २ एखाद्या मनुष्यावर बळेनें लादणें (काम). ३ कांहीं मागणीविषयीं एखाद्याकडून जुलमानें कबुली घेणें; रुकार मिळविणें. ॰गळ-वि. दगडमय. जींत धोंडे पुष्कळ आहेत अशी (जमीन). ॰दिवस-पु. धर्मकृत्यास योग्य अशा दोन तिथीमधला तिथीवृद्धीमुळें येणारा दिवस. भाकड दिवस. ॰फूल-न. दगडफूल; पावसाळ्यांतील दगडा-लाकडावरची फुलासारखी उगवण. ॰फोड्या-वि. १ पाथरवट. २ (ल.) दगडफोड्या पहा. ॰भट्टी-स्त्री. स्नान केलें नसून स्नान केल्या- सारखें दिसण्यासाठीं गंध, भस्म इ॰कांनीं आपलें शरीर सजविणें; स्नानाशिवाय गंध लावणें. (क्रि॰ करणें). 'येतो हा धोंडभट्टी द्विज करुनि सदा तीर्थ द्याया पदांचे ।' -मसाप ४.३. १६४. -आगर ३.१०. [धोंडा + भट्टी किंवा धोंडभट ब्राह्मण] ॰महिना- मास-पु. पुरुषोत्तममास; अधिकमास; मलमास (या महिन्यांत धर्मकृत्यें होत नाहींत म्हणून). ॰मार-पु. धोंड्यांची मारामारी; धोंड्यांनीं मारणें, खाल्लेला मार; दगडमार. ॰वणी-न. (चव, लज्जत येण्यासाठीं) ज्यांत ठिकरी विझविली आहे असें ताक; ठिकरी तापवून चटका दिलेलें ताक. (निंदार्थीं) ठिकरीचा वास लाविलेलें ताक; ताकतव. [धोंडा + पाणी] ॰वाण, वायण-वण- न. १ अधिकमासांत ब्राह्मणांस दिलेलीं वायनें. २ दिंड; आंत पुरण घालून उकडलेला कणकेचा गोळा; धोंडा पहा. अधिक महिन्यांत याचें वाण देतात. ३ अधिक महिन्यांतील ब्राह्मण- भोजन. ॰शीर-स्त्री. मोठी शीर. १ पायाच्या टाचेवरची शीर. २ हाताची शीर. ३ कानाजवळची शीर. [धोंड + शीर] ॰धोंडा- पु. १ दगड. 'आप्तांसि न या तोंडा दावावें नृपपदावरि पडो धोंडा ।' -मोकृष्ण ५०.२३. २ अधिक महिना; हा प्रत्येक अडीच वर्षांनीं येतो. ३ अधिक महिन्यांत वायनासाठीं, ब्राह्मण- भोजनासाठीं केलेला कणकेचा पुरण घालून उकडलेला गोळा; एक पक्वान्न. ४ (ल.) मूर्ख; दगड; अक्कलशून्य माणूस. ५ कठिण हृदयाचा मनुष्य; निर्दय, पाषाणहृदयी माणूस. म्ह॰ १ देखला धोंडा घेतला कपाळीं = अतिशय चिडखोर आणि आततायी माणसास लावतात. २ पावला तर देव नाहीं तर धोंडा. ३ धोंडा टाकून पहावा पडला तर आंबा नाहीं तर धोंडा. धोंडा लोटणें- घालणें-एखाद्यावर मोठें तुफान आणणें; कचाटें घालणें. धोंडे खणून काढणें-पाया खणून काढणें; निर्मूलन करणें; पाळेंमुळें खणून काढणें; उखडणें; काढून देणें; एखाद्यानें अजीबात निघून जावें म्हणून हात धुवून त्याच्या पाठीस लागणें. धोंडें मारूं लागणें- १ एखाद्यावर चालून जाणें; मारावयास धांवणें. २ (उप.) वेडा होणें; वेड लागणें. धोंड्याखालीं हात सांपडणें-पेचांत, अडचणींत येणें. धोंड्याचे दोर काढणें-१ कृपणापासून पैसे, पाषाणहृदयी मनुष्यापासून दया मिळावयास झटणें; अशक्य गोष्ट करावयाचा प्रयत्न करणें. २ अनुरूप साधनाचें सहाय्य नसतां मोठ्या खुबीनें आणि निश्चयानें मोठे उद्देश सिद्धीस नेणें. धोंड्या- वर धोंडे घालून करणें-द्रव्यादि सहाय्य नसतां नाना प्रकारचे प्रयत्न करून एखादें कार्य करणें; नाना प्रकारच्या युक्त्या योजणें. धोंड्यावर धोंडें घालणें-निष्फळ प्रयत्न करणें; उपयोग नाहीं अशा गोष्टी करणें. धोंड्याशीं कपाळ घासणें-स्वतःस व्यर्थ शिणविणें (मूर्खास शिकविण्यांत इ॰). हातीं धोंडे घेणें-अति- शय चिडणें; मारावयास उठणें. पायावर धोंडा ओढून घेणें- एखादें लचांड पाठीशीं लावून घेणें. पायांवर धोंडा पाडून घेणें-आपल्या अन्नांत माती पाडून घेणें, स्वतःवर संकट आपत्ति ओढवून घेणें. चार ठिकाणीं धोंडे टाकून पाहणें-स्वकार्य साधनार्थ अनेक स्थळीं अनेक प्रयत्न करून पाहणें. वाटोळा धोंडा-पु. दुसर्‍याच्या पेचांत कधीं न सांपडणारा असा धूर्त माणूस. दगड शब्द पहा. धोंडाळ-वि. १ दगडाळ; खडकाळ. २ एक- प्रकारची काळी जमीन; हींत धोंडे फार असल्यानें आंत पाणी राहूं शकतें, म्हणून पिकास फार चांगली समजतात. धोंडी-स्त्री. मोठा दगड; धोंडा; धोंड.

दाते शब्दकोश

अ. १ निषेधार्थी, नकारार्थी शब्द; नाहीं. 'पार्थाचे शर न हे शिखंडीचे ।' -मोभीष्म ११.१०४. 'अति स्वार्थबुद्धी न रे पाप सांचें ।' -राम ९. २ नका; नको. 'न याल न या.' 'न द्याल न द्या.' [सं.] (वाप्र.) नचा पाडा, पाढा, फाडा नन्नाचा पाढा-पु. नकार; कोणतेंहि काम करावयास सांगितलें असतां नाकारणें; नाहीं म्हणणें. नचा पाढा वाचणें-सांगणें- घट(ट्ट)करणें-घोकणें-नेहमी प्रत्येक गोष्ट, काम नाकारणें; प्रत्येक कामास, गोष्टीस नकार देणें. 'ह्याला नचा पाढा पाठ आहे.' = प्रत्येक गोष्टीला, कामाला त्याचा नकार आहे. सामा- शब्द-नकळा-वि. (प्रां.) न जाणणारा; अजाण. -क्रिवि. नकळत, नजाणतेपणानें. [न + कळणें] नकिंचन-वि. अकिंचन; दरिद्री कंगाल. [न + सं. किंचन = कांहींहि] नकार-पु. नाहीं म्हण- ण्याची क्रिया; निषेध; नाकबुली. याच्या उलट होकार. (क्रि॰ करणें, देणें). 'मी त्याजजवळ रुपये मागितले परंतु त्यानें नकार केला.' २ (हुंडी इ॰ काचा) स्वीकार न करणें; न स्वीकारण्याबाबत हुंडीवर मारलेला शेरा. [सं. न + कार] ॰घंटा-पु. अभाव; वाण; नसल्याची खूण. 'घरांत वाजे नकारघंटा ।' -अमृत, सुदामचरित्र २९. [नकार + घंटा] नजाणपणें-क्रिवि. अजाणपणें; नकळत. 'प्राचीन ग्रामपंचायतीची पद्धत जाळल्याकारणानें जाणून अथवा नजाणपणानें माजविलेली कज्जेदलाली...' -खेया २७.

दाते शब्दकोश

अभाव

पु. १ वाण; मुळींच नसणें; असंभव; शून्यता; नास्तित्व. अभावाचे ४ प्रकार.-१ प्रागभाव. २ प्रध्वंसाभाव. ३ अन्योन्याभाव. ४ अत्यंताभाव. उ॰ १ लग्नापूर्वींचें ब्रह्मचर्य. २ मृत्यूनें नाश होणें. ३ पुरुषाचे ठिकाणीं स्त्रीत्वाचा अभाव. ४ बंध्यापुत्र. २ नास्ति- कपणा; नास्तिकबुद्धि. 'अभावाची घेतली नरडी । धाकें उदर तडाडी ।' -दा ५.९.४६. [सं. अ + भू = होणें]. -अभावीं- शअ. १ ऐवजीं; नसला तर. २ असंभव असतां.

दाते शब्दकोश

अभाव      

पु.       १. वाण; मुळीच नसणे; शून्यता; नास्तित्त्व २. नास्तिकपणा; नास्तिकबुद्धी : ‘अभावाची घेतली नरडी । धाके उदरणा तडाडी ।’ – दास ५·९·४६. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अचळागौर

स्त्री. अचळवी वाण जिला द्यावयाचें ती. तिची न्हाऊखाऊ घालून ओटी भरून पूजा करतात.

दाते शब्दकोश

अचळागौर, अचलागौर      

स्त्री.       अचळवी वाण जिला द्यायचे ती स्त्री. तिची न्हाऊ खाऊ घालून ओटी भरून पूजा करतात. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अचळवी

वि. १ अचल, अचळ पहा. ॰वाण-मकर संक्रां- तीला जिचीं सर्व मुलें जिवंत आहेत अशा सुवासिनीस आधल्या दिवशीं विरजून ठेवलेलें व हात न लावलेलें असें दहीं पात्रासुद्धां, स्वतःच्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठीं वाण म्हणून देतात तें. [सं. अचल + वायन]

दाते शब्दकोश

आडधाया

स्त्री. अडचण; नड; वाण. 'वरकड लोकांनीं हरयेक गोष्टीची आडधाये नसे' -पेद १६.४३. [आड + धा]

दाते शब्दकोश

आडधाया, आडधाये      

स्त्री.       वाण; नड; अडचण; अट : ‘कापड पुढें पाठविले तरी कार्यास येर्इल; वरकढ लोकांनी हरयेक गोष्टीची आडधाये नसे.’ − पेद १६·३६.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अडका

पु. १ अर्धा रुका. २ (सामन्यातः) दाम; पैसा. 'शिष्यास न लाविती साधन । न करविती इंद्रियें दमन । ऐसे गुरु अडक्याचे तीन । मिळाले तरी त्यजावे ।।' -दा ५.२.२१.३ रुक्याचा चतु- र्थांश. -शास्त्रीको. म्ह॰-१ अडक्याची देवता (किंवा भवानी), सापिक्याचा शेंदूर; २ जळला तुमचा अडका माझा मुलच लाडका; ३ अडक्याची केली वाण, लोणच्याची केली घाण; ४ (व.) अडक्याचं दिडकं, पैशाचं सव्वा शेर = ज्याला हिशेब करतां येत नाहीं त्याची अशी समजूत करून देणें; ५ हातीं नाही अडका, बाजारांत चालला धडका. ४ जमीनीच्या मोजमापांत अर्धा रुका(६५ बिघे विस्ताराची जमीन). [सं.अर्द्ध रुका; अर्द्धक]. अडक्याचा घोडा-(ल.) थोडक्या प्रयासानें व हलक्या मोलानें मिळणारी वस्तु.

दाते शब्दकोश

अडका aḍakā m A copper piece of money, the half of a रुकाः also in land-measurement, the half of a रुका. Pr. अडक्याची देवता सापिक्याचा शेंदूर. Pr. जळला तुमचा अ0 माझा मूलच लाडका. Pr. अडक्याची केली वाण लोणच्याची केली घाण Answering to Penny wise and Pound foolish. 2 अडका is more commonly understood in the sense of Money or small money (as Argentum &c.) occurring singly, yet more generally in conjunction with पैसा, as पैसा अडका. Pr. हातीं नाहीं अ0 बाजारांत चाल- ला धडका.

मोल्सवर्थ शब्दकोश

अधिक उणा शब्द      

१. मर्यादेचे उल्लंघन करण्यासारखा शब्द; टाकून बोलणे. २. बोलू नये असा शब्द. अधिक उत्पन्नाचे वाण      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अगाबानी

स्त्रि. अंगरख्याची मलमल, कापड; याचें अंग पांढरें व विणकरींत किंवा कशिद्यांत बुटी असते. [तु. आघा + श्रेष्ठ + सं. वर्ण = वाण ]

दाते शब्दकोश

ऐश्वर्य

न. वैभव; प्रतिष्ठा; सत्ता; इच्छित प्राप्तीचें सामर्थ्य. 'आइका यश श्री औदार्य । ज्ञान वैराग्य ऐश्वर्य ।' -ज्ञा ६.३७. 'ऐश्वर्य म्हणजे जें जें इच्छीत तें तें प्राप्त करून घेण्याचें योग-सामर्थ्य.' -गीर १६४. २ प्रभुपणा; प्रभुत्व; वर्चस्व. 'तुज ईश्वरे. श्वराचिया ठायीं । ऐश्वर्य केलें ।' -ज्ञा ११.५६९. ३ ईश्वरी अंश, गुण, सामर्थ्य. 'हा आमुचा ऐश्वर्य योगु । तुवां देखिला की चांगु ।' -ज्ञा ९.८७. ४ (सामा.) समृद्धि; श्रीमंती. [सं.] ॰पीठ-न. ऐश्वर्यस्थान; संपत्तीचें, वैभवाचें माहेरघर. 'की ऐश्वर्यपिठींची देवी सुंदर.' ॰योग-पु. ईश्वरी सामर्थ्य; वैभव. ऐश्वर्य अर्थ ३ पहा. ॰वान वि. १ मोठा; विख्यात; प्रतिष्ठित. २ संपत्तिमान; भरभ- राटींत असणारा. ३ भाग्यशाली; सुदैवी. ऐश्वर्याचा प्राणी-पु. ज्याची सदोदित भरभराट असते अशास म्हणतात; नशीबवान; देवाची कृपा असणारा; भाग्याचा पुतळा; दैवाचा भोपळा.

दाते शब्दकोश

अजेचीर-वाण

न. नवऱ्या मुलीच्या आजीला वरपक्षाकडून लग्नामध्ये दिलेलें मानाचें लुगडें किंवा अहेर. [सं. अजी + चीर = वस्त्र किंवा वाण]

दाते शब्दकोश

अक्षयवाण

न. दीर्घायुष्य व समृद्धि प्राप्त होण्याकरितां सुवासिनी स्त्रिया ब्राम्हणांना जें वायन (नारळ, वस्त्र, तांदूळ इ॰) देतात तें. 'अक्षय वाणें घेऊनि । धावंती नगरीच्या गौळिणी ।' -ह ४.३१. [सं. अक्षय + उपायन-वायन = वाण]

दाते शब्दकोश

अक्षयवाण akṣayavāṇa n (अक्षय & वाण) An offering (of cocoanuts, rice &c.) to Bráhmans by women desirous of long life and prosperity.

मोल्सवर्थ शब्दकोश

आखतदाम      

पु.       पहा : आखतवाडी: ‘एकादशी परडीएचे वाण… आखतदामु गुरवा दीजे’ − पैठण शिला १·८

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अलाभ      

पु.       १. लाभ, मिळकत न होणे. २. जरुरी; पाहिजे असणे; अभाव; वाण. [सं. अ + लाभ; लभ् = मिळणे]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अलाभ

पु. १ लाभ, मिळकत न होणें. २ जरूरी; पाहिजे असणें; अभाव; वाण. 'तुमच्या भेटीचा अलाभ होता ती प्राप्त झाली ।' 'राज्याला कशाचा अलाभ नाहीं.' [सं. अ + लाभ; लभ् = मिळणें]

दाते शब्दकोश

आळागोळा      

क्रिवि.       गोल; वाटोळा : ‘लाल कुसुंबी पागोटी बांधली आळागोळा । खुले मामाजीची निला वाण सावळा शोभला.’ − वलो १०८. [गोळाचे द्वि.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आळागोळा

क्रि.वि. गोल; वाटोळा. ‘लाल कुसुंबी पागोटी बांधली आळागोळा । खुले मामाजीची निळा वाण सावळा शोभला ’ –वलो १०८. [गोळा द्वि.]

दाते शब्दकोश

अप्ती

स्त्री. १ आपत्ति; संकट. २ वाण; उणीव. [सं. आपत्ति; अर. आफत्]

दाते शब्दकोश

अप्ती      

स्त्री.       १. आपत्ती; संकट. २. वाण; उणीव. [सं. आपत्ति]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आप्ति

स्त्री. आपत्ति; वाण. अप्ती पहा. 'त्याप्रमाणें पीक पाण्याचीही दिवसेंदिवस अधिकच आप्ति पडूं लागली.' -धर्माजी ३२. [सं. आपत्ति]

दाते शब्दकोश

आप्ति, आप्ती      

स्त्री.       १. आपत्ती : ‘त्याचप्रमाणे पीकपाण्याचीही दिवसेंदिवस अधिकच आप्ति पडूं लागली.’ − धर्माजी ३२. २. अडचण; कमतरता; वाण. [सं. आपत्ति]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अटाअट

स्त्री. १ वाण; उणीव; टंचाई (पैसा; धान्य यांची). २ कोरडे पडणें; वाळून जाणें; शुष्कपणा (विहीरी, नद्या यांचा). अट-- अट पहा. [अटणें]

दाते शब्दकोश

अटोफळी      

स्त्री.       आठ फळांचे वायन; प्रत्येकी आठ असे आठ ब्राह्मणांना द्यायचे ६४ फळांचे वाण; अठफळी; अष्टफळी. [सं. अष्टफल]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अठोफळी

अटोफळी (वाण) पहा.

दाते शब्दकोश

औक्षण, औक्षवण      

न.       आरती ओवाळणे; आरती वगैरे ठेवलेले तबक किंवा लामणदिवा; लग्नकार्याच्या अथवा इतर शुभप्रसंगी देवाची मूर्ती किंवा ज्याचे मंगलकार्य असेल त्याला सुवासिनीने ओवाळण्यासाठी घेतलेले दीपादियुक्त ताम्हन. (सामा.) ओवाळणे. पहा : अक्षवाण : ‘त्यांचें सुवासिनी स्त्रियांकडून औक्षण होते.’ − ऐरापुविवि २६. (क्रि करणे.) आयुष्यवर्धक विधी. [सं. आयुष्य+वान्]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

औक्षण, औक्षवण

न. आरती ओवाळणें; आरती; निरांजन; आरती वगैरे ठेवलेलें तबक किंवा लामणदिवा. लग्न कार्याच्या अथवा इतर शुभप्रसंगीं देवाची मूर्ति किंवा ज्याचें मंगलकार्य असेल त्यास त्याच्या तोंडाभोंवतीं सुवासिनीनें ओवाळण्यासाठीं घेतलेलें दीपादियुक्त ताम्हन; सदर ताम्हन ओवाळण्याची क्रिया; (सामा.) ओवाळणें. अक्षवाण पहा. 'त्या (वधू) बसल्यावर त्यांचें सुवासिनी स्त्रियांकडून औक्षण होतें.' -ऐरापुविवि २६. (क्रि॰ करणें). आयुष्यवर्धक विधि. [सं. आयुष्य + वान् किंवा वर्धन?]

दाते शब्दकोश

औक्षवंत-वान

वि. (कुण. बायकी) चिरायु; चिरंजीव; आयुष्यमान; उदंड आयुष्याचा. (आशीर्वाद). [सं. आयुष्यवंत- वान्]

दाते शब्दकोश

बाखर

पु. १ पुरण; सारण (करंज्या-साटोर्‍या घालण्याचें, खोबरें, खसखस गूळ किंवा साखर इ॰ चें बनविलेलें). बाकर पहा. 'बाखराचें वाण । सांडुं हें जेवूं जेवण ।' -तुगा ८०५. २ (व.) पाटवडींत भरण्याचा मसाला; मक्याचे दाणे किसून केलेली उसळ किंवा कोहाळ्याच्या मोठ्या फोडींची मसालेदार भाजी. ॰वडा- पु. (व.) हरभर्‍याच्या पिठाचा बाखर घालून तळलेला वडा.

दाते शब्दकोश

बाणी

स्त्री. (व.) प्रकार; तर्‍हा. 'आतां आपण मास्तर बाणी खेळूं.' [वाण]

दाते शब्दकोश

बावधनी

वि. लुगड्याचा एक वाण; याची किनार रेशमी मोठी व चारकोयरी असते.

दाते शब्दकोश

बलिदान

प्राणाची-सर्वस्वाची आहुति, प्राणार्पण, सर्वस्वावर तिलां- जलि, स्वार्थाचा होम, प्राण वेंचले, शिर उतरून दिलें, त्यागाच्या होमकुंडात स्वतःला फेकलें, सर्वस्व बिनतक्रार अर्पिलें, स्वतःचे घर स्वतःच्या हातांनीं पेटविलें, तनमनधन अर्पण केलें, आत्मसमर्पण, मृत्यूच्या जबड्यांत जाणून-बुजून मान दिली, सतीचें वाण बुद्ध्या हातीं घेतलें, जिवावर उदार होऊन पुढें झाला, स्वार्थांची चिता स्वतःच्या हातानें पेटवून दिली, स्वतःस जाळून उदबत्तीप्रमाणें इतरांस सुवास दिला, कोईप्रमाणे स्वतःला पुरून घेऊन जगाला गोड आंबे दिले.

शब्दकौमुदी

बरखाड

स्त्री. (व.) न्यूनता; वाण. 'भाताची बरखाड आली पंक्तींत ।' [बरखास्त ?]

दाते शब्दकोश

भ्रांत होणें

मोताद होणें; न मिळणें; वाण पडणें; 'त्याला मध्यान्ह काळाचीहि भ्रान्त आहे.' [सं. भ्रम्-भ्रान्ति]

दाते शब्दकोश

चिलींपिलीं

नअव. १ मुलेंबाळें; कच्चीबच्चीं; बालबच्चीं. २ मकरसंक्रांतीच्या दिवशीं स्त्रिया ब्राह्मणांस सुगडाचें वाण देतांना त्यांत जीं बारीक बारीक बोळकीं घालतात तीं. [पिलीं द्वि. तुल॰ का. चिल्लिपिल्ली = सर्वत्र पसरलेलें; द्वि.] चिल्यापिल्याची पाटी- स्त्री. (व.) (ल.) मुलेबाळें असलेली स्त्री.

दाते शब्दकोश

चीरचोळी      

स्त्री.       मकर संक्रांतीच्या दिवशी सुवासिनी स्त्रिया एकमेकींना जे चोळी आणि लुगड्याचे वाण देतात ते; लुगडेचोळी : ‘मग म्हाइंमटीं चीर चोळी घेतली.’ − गोप्रच ५२.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

दैव

न. १ नशीब; प्रारब्ध; विधिघटना. २ जातपंचायत-गंगा; जमात; स्वजातीय लोक. [सं.] (वाप्र.) ॰उघडणें-उपटणें- खुलणें-भरभराट होणें; सुखाची प्राप्ति होणें; चांगली ग्रहदशा येणें. ॰उभें राहणें-दैवाचा जोर होणें; प्राक्तनाचा परिणाम घडणें; नशीबानें अकस्मात् सुखदुःखाचा प्रसंग येणें. ॰काढणें, देवास चढणें-भरभराट होणें; पुढें येणें. दैवणें-अक्रि. दैव- वान् होणें; उत्कर्षास चढणें. 'वानूं लाधलों तें दुणेन थावें । दैवलें दैव ।' -ज्ञा १६.३१. ॰फिरणें-नशीब प्रथम चांगलें असतां वाईट स्थिति होणें; वाईट दिवस येणें. दैवाची परीक्षा करणें- पाहणें-एखाद्या गोष्टींत पडलें असतां धोका आहे असें समजूनहि ती गोष्ट करण्याचें साहस करणें; प्रयत्न करून पाहणें. दैवाच्या नांवानें हांका मारणें-नशीबाला बोल लावणें. दैवांतून उतरणें-नष्ट होणें; नामशेष होणें (माणूस; वस्तु). दैवानें उचल करणें-यारी येणें-हात देणें-नशीबानें मदत करणें. दैवानें उपट खाणें-(दैव) पराकाष्ठेचें अनुकूल होणें. दैवानें ओढ घेणें, दैव ओढवणें-वाईट (नुकसानीची) गोष्ट करण्याकडे प्रवृत्ति होणें. दैवानें धांव घेण-करणें-चांगल्या किंवा वाईट गोष्टीकडे अकारण प्रवृत्ति होणें.दैवानें मागें घेणें-पाहणें- सरणें-हटणें-नशीब फिरणें. दैवावर हवाला देणें-नशीबावर सोंपविणें; नशीबावर भिस्त ठेवणें. दैवास येणें-नशीबी येणें; दैवानें एखाद्यावर येणें, गुदरणें. दैवास रडणें-नशीबाच्या नांवानें हाका मारणें; प्राक्तनास दोष देणें, बोल लावणें. म्ह॰ १ धड कांट्यावर घालून दैवास रडणें. २ दैव देतें आणि कर्म नेतें = भाग्यानें झालेला उत्कर्ष कांहीं चुकीनें नाहींसा होणें. ३ मनसा चिंतितं कार्यं दैव मन्यत्तु चिंतयेत् = मनानें कांहीं एक ठरविलें असतां नशीबानें दुसरेंच घडतें. सामाशब्द- ॰गत- गति-स्त्री. देवगत पहा. ॰दशा-स्त्री. १ नशीब; प्रारब्ध; नशी- बाचा फेरा. 'जशी दैवदशा असेल तसें घडेल.' २ भाग्य किंवा वाईट स्थिति. ॰प्रश्न-पु. फलज्योतिष; भविष्य; भाकित सांगणें. (क्रि॰ सांगणें; पहाणें; पुसणें; करणें; उतरणें; प्रत्ययास येणें). ॰फुटका-वि. दुर्दैवी; कमनशीबी. ॰योग-पु. दैवघटित; दैवाचा अनुकूल किंवा प्रतिकूलपणा (आकस्मिक, अकल्पित गोष्ट घडली असतां म्हणतात). दैवयोगें करून-क्रिवि. अकस्मात्; यदृछया; नशीबानें. दैवरेषा-स्त्री. लल्लाट रेषा; ब्रह्मलेख (कपाळीं लिहिलेला) प्राक्तन; विधिलिखित. ॰वश-वि. नशीबाच्या आधीन. ॰वशात्-वशें-क्रिवि. दैवयोगेंकरून; दैवगतीमुळें. ॰वाणी-देववाणी पहा. ॰वाद-पु मनुष्याचें सुखदुःख, यशाप- यश इ॰ सर्व नशीबावर अवलंबून आहेत असें मत; नशीबावर सर्वस्वीं हवाला ठेवण्याचें मत. याच्या उलट प्रयत्नवाद. ॰वादा -वि. वरील मताचा; नशीबावर हवाला ठेवणारा. ॰वान्-वि. नशीबवान्; भाग्यवान. ॰विपाक-पु. नशीबाचा खेळ. ॰हत-वि. कमनशीबी; अभागी. 'दैव हत कुणबी उन्मत्त । अपशब्द बोलत तुकयासी ।' 'अहा कैसा मी दैवहत प्राणी' -बालबोध पाहिलें पुस्तक. ॰हीन-वि. अभागी; दैवहत. ॰ज्ञ-वि. १ ज्योतिषी; भविष्य सांगणारा; जोशी. २ एक ब्राह्मण जात. यांचा धंदा सोनारीचा. दैवागळा, दैवा आगळ-वि. (काव्य) थोर नशीबाचा; दैववान्. 'एवढी हांव तो दैवाआगळा । म्हणऊनि करी ।' -ज्ञा १०.३३२. दवावालेख-पु. दैवरेषा पहा. 'दैवाचा लेख पाठमोरा । मला अंतरला म्हणुनियां तुज ऐसा मोहरा ।' -प्रला १५९. दैवाचा-वि. नशीबवान्. दैवाचा खेळ-पु. नशीबाचा खेळ. दैवाचा पुतळा-पु. नशीबान्; भाग्यशाली. 'जाणें भक्तीचा जिव्हाळा । तोचि दैवाचा पुतळा ।' -तुगा २३१०. दैवाचा भोपळा-पु. कमनशीबी; दुर्दैवी (भोपळा हलका व पोकळ असतो यावरून). दैवाची कहाणी-स्त्री. दुर्दैवाची कथा, गोष्ट. दैवाचे ताले-पुअव. भाग्य; दैव दैवरेषा. ताले पहा. 'असे त्याचे दैवाचे ताले कीं कुत्र्यावर नौबत चाले ?' [दैव + अ. ताला] दैवात्-क्रिवि. यदृच्छेंनें; दैववात् दैवाधीन-दैवाधुरोधी- दैवानुसरी-प्रधान-दैववश पहा. दैवावरचा खेळ-पु. यत्न केल्यानंतर नशीबाच्या हवाल्यावर ठेवलेली गोष्ट.

दाते शब्दकोश

डाळिंब

स्त्रीन. एक झाड व फळ; दाडिम; अनार. [सं. दाडिम; प्रा. दालिम; हिं. बं. दालिम; ऑस्ट्रिक दालिम यावरून सं. दाडिम शब्द बनला. हें फळ इंडो-आर्यन नव्हे. तेव्हां शब्दहि आर्य भाषेंतला नाहीं] ॰पाक-पु डाळिंबाच्या रसांत केशर, वेल- दोडे इ॰ व कांहीं औषधें घालून केलेला पाक. ॰वान-न. डाळिंबी रंगाचें लुगडें. 'डाळिंबवानें जासवानें ।' -वेसीस्व ९. १५०. [डाळिंब + वाण] डाळिंबी-वि. डाळिंबाच्या दाण्याच्या रंगा-आकाराप्रमाणें (चीट). [डाळिंब] डाळिंबी वाळ्या- स्त्रीअव. एक दागिना; एक प्रकारच्या बाळ्या. 'मोतीबाळ्या डाळिंबीबाळ्या त्या गंभीर.'

दाते शब्दकोश

दौलतदार

दौलतदार daulatadāra c दौलतवान् a (दौलत with दार & वान् Affixes.) Rich.

मोल्सवर्थ शब्दकोश

ददा(धा)त, ददाती

स्त्री. १ उणीव; तोटा; वाण; कमतरता; ओढगस्तपणा; आपत्ति (अन्न, वस्त्र इ॰ ची). (क्रि॰ पडणें; प्राप्त होणें; होणें; भोगणें). २ कष्ट; त्रासदायक श्रम, काम; दगदग. 'त्या कामाची ददात केली पण झालें नाहीं.' [सं. ददाति]

दाते शब्दकोश

ददात      

स्त्री.       १. उणीव; तोटा; वाण; कमतरता; ओढघस्ती; आपत्ती. २. कष्ट, त्रासदायक श्रम, काम; दगदग. [सं. ददाति]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

ददात / ददाती / दधात

स्त्री० वाण, गरज, जरूर, तोटा.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

देवाणघेवाण      

न.       १. देवघेव; व्यवहार; व्यापार; देण्याघेण्याची क्रिया. २. उसने वाण; उसने फेडणे (फायदा, तोटा इ.). ३. थोडे–फार देणे किंवा घेणे; थोडीफार सूट देऊन वगैरे केलेली तडजोड.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

देवाणघेवाण

न. १ देवघेव; व्यवहार; व्यापार; देण्या- घेण्याची क्रिया. २ उसनें वाण; उसनें फेडणें. (फायदा, तोटा, इ॰). ३ थोडें फार देणें किंवा घेणें; थोडीफार सूट देऊन वगैरे केलेली तडजोड. [देणें घेणें]

दाते शब्दकोश

दिवाण

दिवाण divāṇa n दिवाणखाना m ( P) A royal hall; a court of audience or of justice; a divan: also a council-chamber. 2 Applied freely in the sense of Saloon, hall, drawing-room &c. 3 दि- वाण is further Any assessment or requirement of Government. v फेड, चुकव, दे, फडशा कर, फिट, चुक. 4 दिवाण is further The Sarkár or Government, the Supreme authority; as खोतीचें वतन दि- वाणांत बहुत दिवस आहे. दि0 चें तेल पदरांत घेणें At whatever loss, damage, or cost, accept the gifts of your patron.

मोल्सवर्थ शब्दकोश

दंपति-ती, दंपत्य

स्त्री. नवरा व बायको; लग्नाचें जोडपें; मेहूण. [सं.] ॰कलह-पु. १ नवराबायकोचें भांडण. २ (यावरून ल.) गोंगाटाचे व रागाचें पण पोकळ भांडण; अकांडतांडव. ॰पूजन- न. धार्मिक विधीच्या समाप्तीस केलेली ब्राह्मण पतिपत्नींची पूजा; उमामहेश्वर किंवा लक्ष्मीनारायण यांच्याप्रीत्यर्थ, वस्त्रालंकार इ॰ उपचारांनीं केलेलें ब्राह्मणदंपतीचें पूजन. ॰भोजन-न. (देवते- प्रीत्यर्थ किंवा व्रतसांगतासिध्द्यर्थ). ब्राह्मण पतिपत्नीस घातलेलें- भोजन. ॰वायन-न. वरलीसारख्या प्रसंगीं दंपत्यास दिलेलें वाण.

दाते शब्दकोश

दरिद्र      

न.       १. गरिबी; कंगालपणा. २. अभाव; न्यूनता; वाण; कमतरता.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

दरिद्र

न. १ गरीबी; निष्कांचनता; कंगालपणा. २ अभाव; न्यूनता; वाण; कमतरता. (अन्न, वस्त्र इ॰ जरुरीच्या पदार्थांचा). -वि. गरीब; गरजू; कंगाल. 'आशा ज्यास दरिद्र तोचि समजे नैराश्य पैं बाणतां ।' (वामन स्पुटश्लोक ७४, नवनीत पृ. १४२. [सं.] ॰दशा-दारिद्रावस्था-स्त्री. गरीबीची, हलाखीची स्थिति. ॰दामोदर-पु.अत्यंत गरीब माणूस; ज्याच्या घरीं अठरा विश्वे दारिद्रय आहे असा मनुष्य; दारिद्रयांचा राजा. ॰नाम संवत्सरे-अत्यंत भिकारी अथवा त्याची स्थिति यांस लावा- वयाचा शब्द. दरिद्रित-वि. गरीबी; आलेला; दैन्यावस्था प्राप्त झालेला. दरिद्री-वि. गरीब; कंगाल; निष्कांचन. २ नीच; कद्रू; कंजूष; चिक्कू. ३ (ल.) अपुरा; न्यून; सडसडीत; रोडका; भिकारी इ॰. ॰नारायण-पु.दरिद्र्यांचा कनवाळू; (ल.) महात्मा गांधी. ॰दरिद्री हाड-न. गरीब हाड; गरीब आईबाप किंवा कुळ यांत जन्मलेला माणूस; हलक्या पैदाशीचें गुरूं.

दाते शब्दकोश

धनवड      

न.       लुगड्याचे एक वाण, प्रकार. याला रेशमी किनार साडेचार पुंजी (इंच) व मध्ये एक पांढरे रुर्इफूल असते.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

धनवड

न. लुगड्याचें एक वाण, प्रकार. यास रेशमी किनार साडेचार पुंजी व मध्यें एक रुइफूल पांढरें असतें. धनवडी पहा. धनवडा-टी-वि. १ धनवड-ट मुलुखांतील, प्रदेशांतील (हा प्रदेश नाशिकपासून पूर्वेकडे ३० मैलांवर सुरू होई). २ कर्नाटकांतील धनवड गांवचें (लुगडें, शेला, पागोटें, जोट इ॰). ॰दांडगा- वि. (धनवडांतील माणसाप्रमाणें) अरेराव; दांडगेश्वर (माणूस).

दाते शब्दकोश

धोंडवाण or धोंडवायण

धोंडवाण or धोंडवायण dhōṇḍavāṇa or dhōṇḍavāyaṇa sometimes धोंडवण n (धोंडा & वाण) The thirty-three dishes of victuals given to Bráर्hmans in the intercalary month. 2 A baked ball of wheaten dough without stuffing presented in this month.

मोल्सवर्थ शब्दकोश

धोंडवाण, धोंडवण, धोंडवन, धोंडवायन      

न.       १. अधिक महिन्यात ब्राह्मणाला दिलेली वायने, दिलेले भोजन. २. दिंड; आत पुरण घालून उकडलेला कणकेचा गोळा; धोंडा. अधिक महिन्यात याचे वाण देतात.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

ढऊर      

स्त्री.       भाताचे एक वाण, प्रकार. (झाडी)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

ढवळा

पु. पांढरा रंग. -वि. पांढरा; सफेत. 'ढवळे गाईचें दूध काढूं । एकल्या एक ठोबें मारूं ।' -तुगा १८४. [सं. धवल] म्ह॰ ढवळ्यापाशीं बांधला पवळा, वाण नाहीं पण गुण लागला.

दाते शब्दकोश

गावगौर      

स्त्री.       सबंध गावात भटकणारी स्त्री; गावभवानी : ‘पोरीबाळीसुद्धा हिणवून पुरेसें करतील कीं, या गावगौरीला हें भिकेचें वाण कुणी वाहिले म्हणून?’ –पुण्यप्रभाव.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गोम

स्त्री. १ पुष्कळ पायांचा एक किडा; गोंब; घोण. 'गोमीस पाय बहुत, एक पाय मोडला तरी उणें पडत नाहीं.' -भाब ८२. २ घोड्याच्या ७२ खोडीं पैकीं एक; शेपटीकडे रोंख असलेल्या परतलेल्या केसांची रेघ, भोंवरा. अशुभचिन्ह-लक्षण पहा. ३ सरळ केसांची गोमाकार रेषा; डोक्याकडील रोखाची असलेली गोम. ही शुभ मानतात. पण डोक्यावर असेल तर अशुभ. ४ (ल.) दोष; ऐब; व्यंग; खोड; गुणामध्यें एखादी उणीव. ५ लुगडें, धोतर इ॰ च्या कांठांतील गोमेसारखा वाण; किनारींतील गोमे सारखी नक्षी. ६ खुबी; मर्म; सार; गुह्य. [प्रा. दे. गोमी; का. गोंबे = शाखा] म्ह॰ गोमेचे पाय तिला भारी नसतात. सामाशब्द- ॰चिवळ-पुन. दोन फाट्यांच्या शेपटीची काळसर चिमणी. ॰पठाडी-स्त्री. १ मोठी गोम. २ (ल.) मोठा दोष; मुख्य मर्म, खुबी. गोमीकांठ-पु. गोमेसारखी वीण अस- लेला वस्त्राचा कांठ. गोमीकांठी-वि. गोमीच्या विणीचें कांठ असलेलें (लुगडें, धोतर इ॰).

दाते शब्दकोश

गरुड

पु. १ पु. १ विष्णूचें वाहन असणारा पक्ष्यांचा राजा; हा चपळ, भव्य, सुंदर व पिंगट पिसार्‍याचा, निर्भय, तीव्रदृष्टि, वेग- वान असतो, म्हणून याला पक्ष्यांचा राजा (खगद्र) म्हणतात. २ गिधाडाची मोठी जात. [स.] (वाप्र.) ॰करणें-अक्रि (कु.) बन- विण; फसविणें. ॰म्ह-गरुडापुढें मशक सामाशब्द-॰घुबड-न. अतिमोठें घुबड. हें टर्की पक्ष्याएवढें असतें. -प्राणिमो ६६. ॰टका-स्त्री. गरुडाचें चित्र काढलेला ध्वज, निशाण, पताका. दिंडी पताका गरुडटके । नामघोषें गर्जत ।' -एभा ११.१२८०. ॰ध्वज-पु. १ गरुडांकित निशाण; गरुडटका. 'अनर्घ्यरत्नीं रत्न- खचित । गरुडध्वज लखलखित ।' -एरुस्व ५.११. २ विष्णु. 'धांव धांव गरुडध्वजा । आम्हां अनाथांच्या काजा । -तुगा १५७९. ॰पक्ष-वि. दोन्ही कुशींवर दोन भोंवरे असणारा (घोडा); हा शुभदायक आहे. -अश्वप १.९१. ॰पक्षक(संयुतहस्त)- पु. (नृत्य) त्रिपताक हस्त एकमेकांत गुंतवून त्यांचे तळहात खालीं नेणें. ॰पक्षी-पु. गरुड. -वि. (व.) दोन्ही बाजूंनीं फांसोळी कमी असलेल (जनावर). ॰पाच-पाचू-पुस्त्री. पाच नांवाचें रत्न; राजनीळ. गरुडपाचूंच्या ज्याती पूर्ण । प्रभामय विराजती ।' -ह २.१६. [सं. गारुत्मत मणी] ॰पार-पु. गरुडाचा पार; विष्णु किंवा त्याचा अवतार याच्या मूर्तीपुढें गरुडाची मूर्ति बसविलेला पार; विठोबाच्या देवळांतील गरुडाची स्थापना केलेला ओटा जागा. गरुडपारावरी उभा राहिलासी ।' -तुगा ८२८. ॰वृक्ष-पु. एक झाड. ॰वेल-स्त्री. गरूळ; गरोळ; गुळवेल पहा. [सं. गडुची] -डासन-न. (हटयोग) याचे चार प्रकार-उभ्याचे दोन व ओणव्याचें दोन. उभे रहावें; नंतर डावे पायानें उजव्या पायास वेढा घालावा व ज्या पायानें वेढा घातला त्याचा आंगठा जमीनी- वर टेंकावा व दोन्हा हात गुडघ्यांवर टेकावित. यांतच पायाची अदलाबदल केल्यानें दुसरा प्रकार होतो. -संयोग ३५२.

दाते शब्दकोश

गुलाल चिकवे      

लुगड्याचा एक प्रकार, वाण. गुलालधारी      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गुलाल चिकवें

न. लुगड्याचा एक प्रकार; वाण.

दाते शब्दकोश

घेवाणदेवाण      

स्त्री.       (संक्रांतप्रसंगी सुवासिनी स्त्रिया परस्परांना वाण (वायन) देतात–घेतात त्यावरून). १. आपसांतले (उसने) देणे–घेणे; देवघेव. २. पैशाचा व्यवहार. ३. (मेजवानी, लाभ, नुकसानी, भेट, आहेर इत्यादिकांची) परत फेड; परत करणे; प्रतिक्रिया.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

हरताळ

पु. बाजार, व्यवहार बंद असणें; प्रत्येक दुका- नास कुलूप लागणें, असणें; बाजारी संप; काम बंद पडणें. [हर + गु ताळुं = कुलूप] ॰पडणें-दुर्मीळ होणें; अत्यंत उणीव असणें; वाण पडणें. ॰बाजारांत पडणें-१ थोर व्यक्ती मेली असतां, किंवा सरकारच्या जुलमाचा निषेध प्रदर्शित करण्याकरिंता व्यापार्‍यांनीं आपापलीं दुकानें खुषीनें बंद ठेवणें; व्यापार- व्यवहार बंद करणें.

दाते शब्दकोश

जिद्दी

हेकेखोर, हट्टी हेकट, मारीन किंवा मरेन अशा जिद्दीचा, सतीचे वाण घेऊन-शीर हातांत घेऊन, जरी ब्रह्मदेव खालीं आला तरी सोडणार नाहीं, जिवावर उदार होऊन, मृत्यूची पाळी आली तरी उलट खायची नाहीं या पणानें, शेंडी तुटो वा पारंबी तुटो-पर्वा नाहीं !

शब्दकौमुदी

काळ

(सं) पु० प्रसंग, वेळ, दशा. २ दुष्काळ. ३ वाण, उणीव. ४ यम. ५ मृत्यु.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

कबाडवान्

पु. (व.) वाण्याच्या दुकानीं मिळणार्‍या चिल्लर औषधी व वाळक्या वनस्पती. [कबाड + वाण = प्रकार]

दाते शब्दकोश

कमी      

वि.       १. न्यून; उणा; वाण असलेला. २. आखूड; त्रुटित; तुटका. [फा. कम] (वा.) कमी करणे − १. काढून टाकणे. २. अंगचुकारपणा करणे : ‘कान्हेररायांनीं ते समयीं कमी केली असे लहानथोर म्हणतात.’ - ऐलेसं २३४०. कमी नसणे - तसाच किंवा तितकाच असणे. कमी लेखणे - १. कमी किंमत देणे. २. खालच्या पायरीवरचा समजणे; वाजवीपेक्षा कमी समजणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कमी

वि. १ न्यून; उणा; वाण असलेला. २ आंखूड. त्रुटित; तुटका. [फा. कम्] ॰पण-णा-पु. १ उणीव; कमतरता. २ हलकेपणा; मानहीनता. [फा. कम्] ॰घेणें-स्वतःचा हीनपणा, चूक, दोष, अपूर्णता कबूल करणें; आपल्याकडे दोष पत्करणें. ॰पेशी-वि. कमीजास्त, चुकभूल. कंपेशी पहा. [फा. कम् + बेश्]

दाते शब्दकोश

कमताई

स्त्री. उणीव; वाण; न्यूनता; कमतरता [फा. कम्]

दाते शब्दकोश

कमताई      

स्त्री.       उणीव; वाण; न्यूनता; कमतरता. [फा. कम्]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कमती      

स्त्री.       तूट; वाण; कमीपणा.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कंटाळ

पु. १ कंटाळा; थकवा. २ वीट; शिसारी; तिर- स्कार. कंटाळा पहा. ॰खोर-वि. कंटाळा करणारा; आळशी; टिवल्याबावल्या करणारा; सुस्त. [कंटाळा + फा. खोर = करणारा] ॰वाणा-वाणी-वि. कंटाळा आणणारा; त्रासदायक. [कंटाळा + वान]

दाते शब्दकोश

कोरवाण or न

कोरवाण or न kōravāṇa or na a (कोरा & वाण Color.) Fresh from the loom and unstarched--a web or cloth. This is the sense amongst clothiers; but, popularly, Of fresh and bright color, new-looking, brand new, spick and span new;--used esp. of cloths, sometimes of pearls, trinkets, metal vessels. 2 n unc Fresh and new-looking quality (of cloths &c.)

मोल्सवर्थ शब्दकोश

कोरवान

वि. कपाळावर केंसाची कोर ठेविली आहे किंवा ठेवण्याचें वय झालें आहे असें (दहाबारा वर्षांचें मूल). कोर पहा; कोर धरणें पहा. [कोर + वान]

दाते शब्दकोश

कोरवाण-न

न. १ अगदीं नवें, कोरें दिसणारें कापड. २ हलक्या किंमतीचें खादी इ॰ कापड. -वि. १ (विणकाम) मागा- वरून काढलेलें परंतु पांजणी न केलेलें (वस्त्र अगर ताणा) हा अर्थ कोमटी लोकांत रूढ आहे. २ (सामा.) अगदीं कोरें कर- करीत; ताजें; नवें (कापड, मोतीं, भांडीं, दागिने वगैरे). [कोरें + वाण]

दाते शब्दकोश

करतुकीचा कांदा

वि. (श्लेशार्थानें) करणारा; कर्तृत्व- वान्. 'गोडे घोडे गाई म्हैशी बैल आदणचुरी । करतुकीचा कांदा तिनदां येतो आंगावरी ।' -पला ८१. [सं. कर्तृत्व]

दाते शब्दकोश

करवला, करवली      

पु. स्त्री.       नवऱ्या मुलीच्या किंवा नवऱ्या मुलाच्या भावाला व बहिणीला लग्नात म्हणतात. विवाहप्रसंगी करवली वधू व वर यांच्या पाठीमागे कऱ्हा (कलश) घेऊन उभी राहत असते. (सामा.) मानकरी, मानकरीण : ‘करवली सुभद्रा वेल्हाळ । चाले सुढाळा उन्मनी ।’ - एरुस्व १६·४२. [सं. करक (कलक) + वान, वती]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

करवला-ली

पुस्त्री. नवर्‍या मुलीच्या किंवा नवर्‍याच्या भावास व बहिणीस लग्नांत विनोदानें म्हणतात. विवाहप्रसंगीं कर- वली वधू व वर यांच्या पाठीमागें हातांत कर्‍हा (कलश) घेऊन उभी रहात असते. (सामा.) मानकरी, मानकरीण. 'करवली सुभद्रा वेल्हाळ । चाले सुढाळा उन्मनी ।' -एरुस्व १६.४२. 'कर- वलीचा मान, सुप्रसन्ना ठेवी घंगाळी ।' -वसा ५४. [सं. करक (कलश) + वान, वती. म. कर्‍हा + वला-ली प्रत्यय]

दाते शब्दकोश

क्षमा

स्त्री. १ अपराध सहन करण्याची क्रिया, धर्म; सहनशीलता; माफी. (क्रि॰ करणें). २ सोशीकपणा; शांति; स्थिरता; सहिष्णुता. 'असंमोहसहन सिद्धी । क्षमा सत्य ।' -ज्ञा १०.८३. ३ पृथ्वी; धरा. 'आणि देवाचेनि क्षमत्वें क्षमा आधारु जाली आहे या भूतग्रामा ।' -ज्ञा ११.५५९. [सं.] ॰पाळ-पु. राजा; भूपति. 'त्वां यज्ञधर्म समेंतचि कथिलें कीं प्रायशः क्षमापाळ ।' मोसभा १.४१. ॰वन्त- वान, क्षमिता, क्षमी-वि. १ क्षमाशील; दया करणारा; सहनशील. 'किंबहुना धैर्यक्षमी । कल्पांतीही ।' -ज्ञा १३. ४९८. २ समर्थ. 'आचरणें नोहे क्षमी । न निघे मनोधर्मी ।' -ज्ञा १८.६५८. क्षमापन-न. शांतवन (राग, दुःख इ॰ चें); समाधान; सांत्वन.

दाते शब्दकोश

कस्त      

स्त्री.       १. खराबी; नुकसान; झीज; तोटा. [क्रि. सोसणे, खाणे.] २. (ल.) उणेपणा; न्यूनता; कमताई; वाण. (क्रि. खाणे.) ३. तसदी; परिश्रम; दगदग; त्रास. (क्रि. खाणे.); शुश्रूषा; मेहनत; खस्ता : ‘नाना जलदीनें रवानगी होण्याची कस्त करीत आहेत.’ - ऐलेसं ११·६१५४. (वा.) कस्त होणे - खस्त होणे; ठार होणे : ‘गणोजी जाधव स्वामीकार्यावरी कस्त जाहले याकरितां याच्या पुत्राचें चालविणें स्वामीस आवश्यक.’ - ऐसंसाखं ६·४०. [फा. कशिदन, हिं. कस्त]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कथावस्तू ( दोष)

कथासूत्र, यांत योगायोगांची मेहेरबानी दिसते, सवंग माल, ध्येयशून्य कथांचा फापट-पसारा, चक्रम् लेखकाचा नवा विक्रम् ! संघर्ष फिका आणि कथानक तोकडे, अफाट कथा, कथानकाची गति थंड झाली आहे, कथेचा सनसनाटी दिलफोडक शेवट, एक सामान्य आणि कच्ची कथा, घटनांची वाण, भारूड रचले आहे, या लघुकथेची भट्टी नीट साधलेली दिसत नाहीं ! कथानक पुढे सरकत नाही. मनाची पक्कड घेईल असें यांत काही नाही, या लिखाणाचा अन्वयार्थ लावावा लागतो, गोष्ट अगदींच एवढीशी असते, कथा येथे कोलमडली, घटनांचे दुवे विस्कळित वाटतात, ठराविक प्रेम-त्रिकोणावर आधारलेली, ही कथा म्हणजे एक मुटकुळे कडबोळे किंवा गोधडीच होय !

शब्दकौमुदी

कुंभार

पु. १ मातीचीं भांडी घडवून त्यावर उपजीविका करणारी एक जात व तींतील व्यक्ति. १२ एक प्रकारची माशी; कुंभारीण. [सं. कुंभकार] म्ह॰-१ (गो.) कुंभाराक मडकीं धड ना = जिन्नस उत्पन्न करणार्‍याला त्याचें दुर्भिक्ष असतें कारण चांगली मडकीं सर्व विकावयाचीं असतात व स्वतः वापरावयास फुटकें तुटकें घ्यावयाचें अशी प्रवृत्ति असते. २ (गो.) कुंभाराक जवा- हीर = अनधिकार्‍यास अधिकार देणें; अयोग्य माणसाला मौल्य- वान वस्तु देणें. ३ कुंभाराची सून कधीं तरी उकिरड्यावर येईलच = जी गोष्ट निश्चितपणें व्हावयाची ती गोष्ट आज ना उद्यां होणारच. ४ कुंभार कुंभारीण सुखी असेल तर मडक्याला काय तोटा = नवरा-बायको सुखी असतील तर मुलांना काय तोटा. ५ कुंभारणीनें कुंभारणीशीं कज्जा केला आणि गाढवाचा कान पिळला = दोघांच्या भांडणांत तिसरा घुसला असतां त्याला मिळणारें प्रायश्चित्त. ॰काम-न. गाडगी-मडकीं (समुदायानें) लग्नकार्याच्या वेळचीं सुगडें इत्यादि कुंभारानें करावयाच्या वस्तू. कुंभारकी-स्त्री. कुंभाराचा धंदा. ॰कुकुड-कुकडा-पु. भारद्वाज पक्षी. कुकुडकुंभा पहा. ॰क्रिया-स्त्री. शूद्र मेला असतां कुंभार जी त्याची उत्तरक्रिया चालवितो ती. ॰खाणी-स्त्री. कुंभाराची मातीची खाण. ॰गवंडी-पु. गवंडीकाम करणारा कुंभार. ॰घाणी-स्त्री. १ कुंभारानें मळून तयार केलेली माती. २ उंसाच्या चिपाडांत राहिलेला रस काढण्याकरितां उपयोगांत आणलेल्या कुंभाराच्या घाणीवरील कर. ३ कुंभाराच्या घाणी- साठीं दिलेलीं उंसाचीं चिपाडें. कुंभारडा-पु. (तिरस्कारानें) कुंभा रास म्हणतात. कुंभारणी-स्त्री. कुंभाराची बायको. ॰वाडा-पु. कुंभाराची आळी; कुंभारांची वस्ती. -राच्या देवी-माता-स्त्री. टोंचलेल्या देवी; गोस्तनी देवी.

दाते शब्दकोश

खाबान

न. बागेंतील फुलाचा ताटवा; वाफा. [फा. खाय- वान]

दाते शब्दकोश

लात-थ

स्त्री. पायाच्या तळव्यानें केलेला प्रहार; लत्ता. 'वधि तया हरि लात-बुक्यातळीं ।' -वामन, नृहरिदर्पण ११७. [सं. लत्ता; फा. लत्] ॰मारणें-१ लाथेनें हाणणें; तुडविणें. (क्रि॰ मारणें, देणें) 'लाथ मारील तेथें पाणी काढील.' (सामर्थ्य- वान्, कर्तबगार माणसाबद्दल म्हणतात.) २ अनादरानें त्यागणें; कस्पटासमान मानणें (रोजगार, कामधंदा. अन्न इ॰). 'प्रपंच हरिणीस लात मारून ।' -नव १५.२६. लाताबुक्यांनीं तुड- विणें-लाथा व गुद्दे मारणें; अतिशय मारणें; फार अवहेलना करणें. बसतां लाथ व उठतां बुक्की-अहोरात्र एकसारख्या लाथा बुक्क्या मारणें; सारखा छळ करणें. लात झोपडें-(लाथ मारली असतां पडणारें झोंपडें) अगदीं काडीमोडीचें घर; टाकाऊ झोपडी (निंदार्थी उपयोग). लातड, लातडा, लातरा, लातिरा-वि. लाथाळ; लात मारण्याचा स्वभाव ज्याचा असा (गोमहिष्यादि पशु). [लात] लात(थ)डणें-लाथा मारणें; लातळणें. [लात] लातबुकी-स्त्री. लाथा आणि बुक्क्या. (सामा.) जोरानें बडवणें; मारणें. [लात + बुकी] म्ह॰ १ लातबुकी भाकरसुखी = पुष्कळ लाथा आणि गुद्दे व भाकरीहि सुकी (कोरडी- तुपाशिवाय); छळ असून शिवाय खाण्याचे हाल. २ लातबुकी आणि सदामुखी = मार असला म्हणजेच नीट असणारा. लात- ळणें-क्रि. १ लाथा मारणें; लाथाडणें (अडेलपणें किंवा स्वभावा- मुळें, जनावरानें) २ (ल.) तिरस्कारपूर्वक झिडकारणें; नाकारणें. लाताखाऊ-वि. नेहेमीं लाथा खाणारा; लतखोर पहा.लाताड- डी-स्त्रीन. लाथ (क्रि॰ मारणें; देणें). लाताड-वि. लातड पहा. लाता(था)ळ, लाता(था)ळें-न. १ दुगाण्या; लाथांचा सुकाळ (अनेक घोडे, गाढव यांच्या); जोराचा लत्ताप्रहार. 'कोप धरिला ताळें बळभुजपरि कंपितें करि लाताळे ।' -मोकृष्ण ५०. २ गोंधळ; लडथडीचें व हमरीतुमरीचें भांडण; कडाक्याचा वाद- विवाद व गोंधळ; बजबजपुरी. [लात] लाताळ, लाताळ्या, लाथाड-ळ-वि. लाथरा; लाथा मारणारा. 'तथापि बहु लाथळी मग अदंड मी हा किती ।' -केका ५४. लाताळणी-स्त्री. लाथा मारणें. लाता(था)ळणें-क्रि. लातळणें; लाथ मारणें. [लात] लाथरा, लाथेरा-वि. लातडा पहा.

दाते शब्दकोश

लबाडनकशी

न. (विणकाम) एक प्रकारचें लुगडें. पोत कोणताहि, किनार रेशमी किंवा सुती, व किनारीमध्यें गोम नसून त्या जागीं पांढरे साधे घर भरून घेतलेलें असें लुगड्याचें वाण.

दाते शब्दकोश

लेखक ( वाईट )

वर्तमानपत्रांत लेखणी- ढकल्याचे काम करणारा, फाटका लेखक, मामुली कथाकार, करंटा कविब्रुव, सुचेल तें ठोका असा यांचा प्रकार ! दिसामाजिं कांहीं तरी तें लिहावें, वाङ्मयीन वाण बरीच, घरटीं किमान एक लेखक आज सांपडतोच; त्यांतलेच हे एक, पुस्तक लिहिण्याची ही लेखिकेची दुसरी खेप आहे, वाङ्मयप्रांतात पहिलटकरीण आहेत, यांची वाड्मयाभिरुचि प्राथमिक स्वरूपांत आढळते, पेन-ढकल्या, लेखणीकुश्या.

शब्दकौमुदी

मैराळभाऊ

पु. ह्या नांवाच्या इसमावरून काटक व बल- वान इसमाबद्दल योजावयाचा शब्द.

दाते शब्दकोश

माकूल

वि. १ प्रौढ; सभ्य; जाणता. २ पसंत; रास्त; न्यायाचें. ३ उदार; सन्मान्य; पूज्य; योग्य. ४ शाहाणा; अक्कल- वान. -पाब १८. 'याजकरितां तुम्ही राजास माकूल करून पर- स्परें...' -वाडबाबा १.१५५. ५ मुबलक. 'सरन्जामही माकूल दिधला जाईल.' -रा ८.२०७. [अर. मअकूल]

दाते शब्दकोश

मान् (मान्, मती, मत्

मान् (मान्, मती, मत् mān (mān, matī, mat m f n) A Sanskrit affix to nouns ending otherwise than in अ or आ, or in a consonant of which the inherent short vowel is dropped; forming them into attributives. Ex. बुद्धिमान्, शक्तिमान्. This affix therefore supplies the deficient power of the affix वान् q. v. Note. This affix, although its forms in gender are given above, is, in Maráṭhí, seldom declined.

मोल्सवर्थ शब्दकोश

मान्, मती, मत्

पुस्त्रीन. (विशिष्ट विद्या, कला, भूषण, वस्तु, चिन्ह इ॰ ज्या जवळ आहे अशा अर्थीनामाला लागून त्याचें विशेषण बनविणारा संस्कृत प्रत्यय. वान्, हा हि असाच प्रत्यय आहे). जसें-बुद्धिमा(वा)न, शक्तिमा(वा)न् इ॰ या प्रत्ययाचीं तिन्ही लिंगाची रूपें जरीं वर दिलीं आहेत तरी यांना विभक्ती प्रत्यय लागून तयार झालेलीं रूपें क्वचितच आढळतात. [सं. मत्]

दाते शब्दकोश

मेहरबान

मेहरबान mēharabāna or -वान a ( P) Kind, favorable, gracious, propitious.

मोल्सवर्थ शब्दकोश

मति

स्त्री. १ बुद्धि; जाणण्याची शक्ति. 'कशी हीन झाली तुझी मति ।' -ऐपो १४६. २. मन; अंतःकरण. ३ विचार; हेतु. बुद्धि पहा. [सं.] ॰चालणें-आकलन होणें. 'आपली बरीच मति चालते.' -विवि ८.३.४७. ॰प्रकाश-वि. ज्ञानवान; बुद्धि- वान. 'विनायका अभयदाता । मतिप्रकाश करीं मज ।' -गुच १.११. ॰भ्रम-विभ्रम-पु. चूक; चुकीचा समज; बुद्धिभ्रंश. 'तियें मूर्ख मतिभ्रमें । मी कर्ता म्हणे ।' -ज्ञा ३.१७८. ॰मंद-वि. बुद्धीनें कमी; जड बुद्धीचा; मठ्ठ. [सं.] ॰मान्-वंत-वि. बुद्धिमान्; शहाणा; धूर्त. 'तंव एकीं मतिवंतीं । या बोलाचिया खंतीं ।' -ज्ञा १३.४०.

दाते शब्दकोश

मतोळा

पु. गोंधळ; घोटाळा; नुकसान. 'नव्हे मतो- ळ्याचा वाण नीच नवा नारायण ।' -तुगा३३०७. [मत]

दाते शब्दकोश

मुगदळ

स्त्री. मूग पेरण्यास योग्य असलेली जमीन. [मूग + दळें] -न. १ मूग भाजून त्याचें केलेलें पीठ. २ अशा पिठाचे लाडू. [मूग + दळणें] मुगवण-न-न. मुगाचे भूस; मुगाचा कोंडा; मुगाचें गुळी. मुगवा-पु. १ बायकांचे एक प्रकारचें, मुगा एवढ्या चौकटी असलेलें वस्त्र; लुगड्याचा एक वाण, प्रकार. २ दुध्या भोपळा. -वि. मुगाएवढ्या चौकटी असलेलें (लुगडें).

दाते शब्दकोश

नागवा

वि. १ नग्न; वस्त्रहीन; नागडा; उघडा; विवस्त्र. २ गरीब; दरिद्री; उघडा; पोरका. ३ दिवाळखोर; धंद्यांत बुडालेला. [सं. नग्न; प्रा. णग्गो; फ्रेंजि. नंगो; आर्मे. न्गलेल] नागवें कोल्हें, नागवी सवाशीण भेटणें-अकल्पित लाभ होणें. 'की भेटला कपटमिष साक्षात् कोल्हाचि नागवा याला ।' -मोसभा ४.६५. नागवें नाचणें-१ अतिशय आनंदानें बेहोष होणें. २ वाटेल तसें अप्रतिबंध वर्तन करणें; स्वैर वागणें. नागव्या गोष्टी सांगणें- करणें-निर्भीडपणें, स्पष्ट, उघडउघड बोलणें. ॰पाऊस- पु. उन असतां पडणारा पाऊस. नागवें-न. १ न्यून; तूट; वाण; उणेपणा; वैकल्य. २ उघडा भाग; अरक्षित भाग. ॰उघडें-न. नग्नता. (ल.) उघडकीस आलेल्या (निंदास्पद) गोष्टी. उदा॰ त्या दारोड्याचें नागवें उघडें सारें समजलें. ॰उदाहरण-न. भिकार, क्षुद्र, किरकोळ दृष्टांत, दाखला. नागा-वि. नंगा; नागडा. नागीवा-नागवा पहा. 'क्षण एक नागीवा पायीं । नचलवे तयाकरितां कांहीं ।' -तुगा ७०२. [नागवा]

दाते शब्दकोश

नागवे      

न.       १. न्यून; तूट; वाण; उणेपणा. २. उघडा, अरक्षित भाग.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

नियंता

(सं) वि० नियम करणारा, त्राता. २ शास्त्र. ३ वाण, तोटा.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

नकारघंटा      

स्त्री.       अभाव; वाण; नसल्याची खूण. (क्रि. वाजवणे).

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

नशीब

न. १ नेमणूक. २ वांटा. ३ दैव; प्रारब्ध. [अर. नसीब्] ॰उघडणें-उचकटणें-भाग्य उदयाला येणें; चांगले दिवस प्राप्त होणें. ॰फुटणें-मोठी आपत्ति येणें; अभागी असणें, होणें. ॰शिकंदर असणें-(एखाद्याचें) दैव चांगलें, भर- भराटीचें, बळकट असणें. -स्वप २२४. नशिबाचे ताले-पुअव. कर्मानुसार घडणार्‍या बर्‍यावाईट गोष्टी; दैवयोग; प्रारब्ध. [नशीब + अर. तालिअ; फा. ताले = ग्रह, दैव] इतर वाक्प्रचार दैव शब्दामध्यें पहा. ॰वंत-वान-वाला-वि. सुदैवी; भाग्यवान. 'हजारो पदरामधें उमराव नशिबवाला ।' -ऐपो २४१. [नशीब + वंत, वाला, वान प्रत्यय]

दाते शब्दकोश

नव्हांड

स्त्री. वाण; तुटवडा; अभाव; (अन्न, धान्य इ॰ कांचा उडालेला) फन्ना; चट्टामट्टा. (क्रि॰ पडणें; होणें). 'धान्याची-गुळाची-तुपाची-अन्नाची-पैक्याची-नव्हांड.' [न + होणें]

दाते शब्दकोश

नव्हांड      

स्त्री.       वाण; कमतरता; अभाव; फन्ना; चट्टामट्टा. (क्रि. होणे, पडणे).

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

ओकारवाणा

वि. अमंगळ; ज्याच्याकडे पाहिलें असतां ओकारी येईल असा घाणेरडा. ‘ ओकारवाणा मुखभाग दावी । जे जे वदे गोष्टिहि ते वदावी ।’ –वामन रुक्मि ११५. [ओकणें + वाण]

दाते शब्दकोश

पिंपळपान or पिंपळवण

पिंपळपान or पिंपळवण pimpaḷapāna or pimpaḷavaṇa or -वाण n (Because of the form of a leaf of the पिंपळ tree.) An ornament (of gold and gems imbedded, surrounded by pearls) for the forehead of a child.

मोल्सवर्थ शब्दकोश

पिंपळवण

पिंपळपान or पिंपळवण or -वाण n An ornament for the forehead of a child.

वझे शब्दकोश

पोवळीं-ळें, पोंवळीं-ळें

न. प्रवाल; पोळें. एक कीटक- जन्य तांबडया रंगाचा दगड; एक रत्न [सं. प्रवाल] पोवळ पाटली-स्त्री. (बायकांचा हातांत घालावयाचा) पोंवळें सोन्यांत मढवून केलेला एक दागिना; पाटली. [पोंवळें + पाटली] पोंवळ सर-पु. पोवळ्याचें केलेलें कंकण. [पोवळें + सर] पो(पों)वळा- विं. धूसर किंवा पोंवळ्याच्या रंगाचें (जनावर, गाय, बैल). म्ह॰ ढवळ्याजवळ बांधला पोवळा वाण नाहीं पण गुण लागला.

दाते शब्दकोश

प्रहेणक

न. वायन; वाण; पाहुणकी; सासुरवाडीहून जांव- यास आलेला खाऊ.

दाते शब्दकोश

प्रज्ञा

स्त्री. १ विचारशक्ति किंवा आकलनशक्ति; ज्ञान; शहाणपण. 'अर्जुना येसणें धेंडें । प्रज्ञापसरेंसीं बुडे ।' -ज्ञा १८. २८९. २ बुद्धि; अक्कल; ज्ञान. 'ऐसा हरिखशोकरहितु । जो आत्म- बोधभरितु । तो जाण पां प्रज्ञायुक्तु । धनुर्धर ।' -ज्ञा २.३००. [सं.] ॰चक्षु-पु. १ जन्मांध असलेला. २ धृतराष्ट्र 'म्हणतोसि तूं हि मीही कीं प्रज्ञाचक्षुचें सदा शिव हो ।' -मोउद्योग ६.१२. -वि. जन्मांध असल्यामुळें बुद्धिं हेच ज्याचे डोळे आहेत असा. [सं.] ॰प्रभात-स्त्री. बुद्धिरूप; प्रातःकाळ. 'जयजय आचार्या । समस्त सूरवर्या । प्रज्ञाप्रभातसूर्या ।' -माज्ञा (पाठभेद) १४.१. ॰वान्- वि. शहाणा; हुशार. ॰वेली-स्त्री. बुद्धिरूप वेल 'माझी प्रज्ञावेली वेल्हाळ । काव्यें होय सुफळ ।' -माज्ञा १४.२१. प्रज्ञात-वि. शहाणा; हुशार; बुद्धिवान; धूर्त; तरतरीत. [सं.]

दाते शब्दकोश

परतण

वि. (कर.) लुगड्याच्या पोतामध्यें चौकटी वाण करण्याकरितां मध्यें पांढरे, हिरवे किंवा दुसऱ्या रंगाचे दोरे, तातू घालतात, ते काठांत न जातां मध्येंच परतून लुगडें विणण्याचा एक प्रकार. अशा लुगड्याचा भाव चार आणे चढ असतो.

दाते शब्दकोश

प्रयत्न

पु. १ मोठा यत्न; परिश्रम; कष्ट. २ शिणवणारें काम; परिश्रमाचें कृत्य; दिर्घोद्योग. ३ (संगीत) गातांना स्वरोच्चारण करा- वयाच्या अगोदर श्वास आंत घेण्याची व नंतर बाहेर सोडण्याची क्रिया. आभ्यंतरप्रयत्न व बाह्यप्रयत्न पहा. ४ (सामा.) श्रम; यत्न; खटपट; कांहीं कार्यार्थ केलेली धडपड. [सं.] म्ह॰ प्रयत्नीं किंवा प्रयत्नांतीं परमेश्वर सामाशब्द- ॰वाद-पु. नशिबावर हवाला न ठेवतां प्रयत्न केल्यानेंच इष्ट परिस्थिति व फळ प्राप्त होतात हें मत. यालाच पौरुषवाद असें नांव आहे. याच्या उलट दैववाद किंवा प्रारब्धवाद. ॰वादी-पु. प्रयत्नवादाप्रमाणें चालणारा किंवा त्याचें समर्थन करणारा. ॰वान्, प्रयत्नी-वि. १ (कामकाजांत) तत्पर; दक्ष; उद्योगी; चिकाटी धरणारा; धाडसी. २ परिश्रम, कष्ट करणारा; कर्म किंवा क्रिया करणारा. याच्या उलट नशिबावर हवाला ठेवून स्वस्थ बसणारा. [सं.]

दाते शब्दकोश

फळण

स्त्री. गाई-जनावरांचा वर्षातील फळण्याचा काळ, हंगाम; फळण्याचें दिवस. [फळणें] फळणावळस्त्री. फळवि- णार्‍यास दिलेली किंमत, पैसा. [फळणें] म्ह॰ अटक्याची कोंबडी टका फळणावळ. फळणी-स्त्री. मादिचें फळणें; फळण्याचा व्यापार. फळणें-अक्रि. १ (शब्दशः व ल.) फळ येण्याच्या स्थितींत असणें. २ (प्रायः ल.) लाभदायक होणें; सफल होणें (काम, युक्ति). ३ प्रसन्न होणें; पावणें (दैव). ४ समृद्ध, भाग्य- वान् होणें (मनुष्य). 'तीं (गुल्में) न जातांच औषधें केलीं । गति फळली कर्माची ।' ५ पुरें होणें; फलास येणें. 'तेज पहा वचनाचें ज्यासि फळाया न लागली घटिका ।' -मोआदि ११.६०. ६ नर जातीकडून संभोगिली जाणें; मैथुनसंस्कार मिळणें; गाभण राहणें (गाय, म्हैस इ॰). 'आमची गाय नुकतीच फळली.' [सं.] फलन; प्र, फलण

दाते शब्दकोश

फुकणी

स्त्री. (व.) वाण; ददात. (क्रि॰ पडणें). 'घरांत काय फुकणी पडली आहे?' [फुंकणें]

दाते शब्दकोश

रक्तवान्

रक्तवान् raktavān m (Formed with रक्त for रंग Color &c. and वान् Affix.) A person who gains his livelihood by selling ink. 2 A person in the families of great men, whose duty it is to supply ink to the establishment and to procure and place the leaves for dinner.

मोल्सवर्थ शब्दकोश

सौभ(भा)ग, सौभाग्य

न. १ सौंदर्य. २ भाग्य; नशीब 'एवढें एक सौभग ।' -ज्ञा १५.१७. ३ ज्याचे योगानें आपणांस मान्यता, शोभा, प्रतिष्ठा, तेज इ॰ लाभतें असा अधिकार, विद्या, वतन, सामर्थ्य इ॰ विषय. ४ सवाष्णपणामुळें काजळ, शेंदूर, कुंकू, मंगळसूत्र, बांगड्या इ॰ वस्तु धारण करण्याचा बायकांचा अधिकार; सुवासिनीत्व. ५ कुंकू, शेंदूर. [सं. सुभग; सौभाग्य] म्ह॰ गौर रुसली आणि सौभाग्य घेऊन बसली = रुसून बसलेल्याची कोण पर्वा करतो अशा अर्थीं योजतात. सौभाग्य मिरविणें लावणें = सौभाग्यवति स्त्रीनें आपला तोरा मिरविणें. सौभा- ग्याचा टिका-सौभाग्याचें चिन्ह, कुंकू. ॰चिन्ह-द्रव्य-न. कुंकू, बांगड्या वगैरे. ॰तंतु-पु. १ मंगळसूत्र. २ (ल.) नवरा. ॰धन-न. नवरा. 'घातला तिच्या दुष्टानें सौभाग्यधनावर घाला ।' -विक १४. ॰वती-स्त्री. सुवासिनी स्त्री. ॰वायन वाण-न. स्वतःला सौभाग्य चिरकाळपर्यंत लाभावें म्हणून सुवा सिनी स्त्रिया सौभाग्यद्रव्यांचें ब्राह्मणांस जें दान (वाण) देतात तें. ॰शुंठी-सुठ-स्त्री. ज्यांत प्रामुख्यानें सुंठ घातलेली असते असा एक औषधी पाक.

दाते शब्दकोश

सग्री

वि. सगर पहा. (विणकाम). पोत कोणताहि, कांठ रेशमी पण त्यांत नक्शी नसून पिंवळ्या अगर पांढर्‍या काड्या असतात असें वाण.

दाते शब्दकोश

शिळासप्तमी

स्त्री. श्रावण शुद्ध सप्तमी. या दिवशी स्त्रिया वाण देतात. [सं. शीतला + सप्तमी]

दाते शब्दकोश

शिळासप्तमी śiḷāsaptamī f The seventh of the light half of Shráwan̤, on which day are certain observances. Originally a woman placed her वाण or offering to the river-god (to restore a drowned man) upon a stone (शिळा) on the river's bank. The observance is, in modern times, with the object of obtaining offspring, or long life and exemption from evil for one's offspring.

मोल्सवर्थ शब्दकोश

सलग; सलंग

वि. एकसंधि; बिनजोड; बिनसांध्याचा; अखंड. 'सुंदरपणाचा सलंग वाण असावा लागतो.' -भाव २३.

दाते शब्दकोश

सोनें

न. १ कांचन; सुवर्ण; पिवळ्या रंगाची जड व मोल- वान अशी एक धातु. २ दसर्‍याचे दिवशीं सीमोल्लंघन करून आल्यावर इष्टमित्रांस देण्यासाठीं आणलेलीं आपट्याचीं पानें. -वि. १ मोलवान; किंमतीचा; महत्त्वाचा; 'सोन्यासारखें मूल.' २ (चुकीनें) साणें; उजेडाकरितां राखलेला धाब्यांतील भोकसा. [सं. सुवर्ण; फ्रें.जि. सोवन, सोने; पोर्तु. जि. सोनकै.] म्ह॰ सोन्याची सुरा झाली म्हणून काय उरीं घालावी ? (वाप्र.) ॰आणि सुंगध-उपयुक्त व सुंदर; फायदेशीर व दिखाऊ. ॰होणें- मरणोत्तर उत्तम गति प्राप्त होणें; चांगलें, चांगल्या परिस्थितींत मरण येणें. सोन्याचा धूर, पाऊस निघणें-पडणें, सोन्यानें दांत किसणें-अतिशय श्रीमंती असणें. सोन्याहून पिंवळा- अतिशय उत्तम. बावन कसी सोनें-१ उत्तम, मुळींच हीण- कस नसलेलें सोनें. २ (ल.) उत्तम, शुद्ध वर्तनाचा, प्रामाणिक मुनुष्य, किंवा वस्तु. सोनें गाळणें-सोन्याचा रस करून आंतील भेसळ काढणें. कांहीं सोन्याचा तर कांहीं सवागीचा गुण असणें-सोनें उजळतांना सवागीचा उपयोग करतात. त्यावरून एखादें महत्कृत्य घडवून आणण्यांत महत्त्वाच्या गोष्टीं प्रमाणें अनुषंगिक गोष्टींचेंहि सहाय्य होणें, थोराप्रमाणें हलक्या- चेंहि सहाय्य लागणें. सोन्याचा दिवस-पु. महत्त्वाचा, आनंदाचा दिवस. सोन्याची सीता-स्त्री. (बायकी) (ल.) नवर्‍याची लाडकी म्हणून नखशिखांत दागिन्यांनीं नटविलेली स्त्री. सोन्याचे दरवाजे होत व ठसठसां लागोत-(व.) मुलगा कसा का होईना पण होवो मग तो त्रोसदायक झाला तरी चालेल. असेना पण वाचो. सोन्याचें हाड-न. नेहमीं उत्कर्ष, भरभराट होणारा माणूस. सामाशब्द- सोनओ(व)ळख- खी-स्त्री. दसर्‍याचें सोनें (आपट्याचीं पानें) वाटतांना झालेली तोंडओळख, ॰कळी-स्त्री. सोनचाफ्याच्या कळ्यांसारखा केलेला सोन्याच्या कळ्यांचा हार. ॰काव-स्त्री. एक जातीचा गेरू. ॰कावळा-पु. १ कुक्कुटकुंभा; भारद्वाज. २ (कों.) कृष्ण- कावळा. ३ पांढरी कावळा (काल्पनिक). ॰कावळा शिवणें- (बालभाषा) आई विटाळशी होणें. ॰किडा-पु. काजवा; कोण- ताहि चमकणारा किडा. ॰कुला सोनक्या, सोना-न्या-वि. लाडका (मुलगा). ॰केतक-की-स्त्री. केळीची एक जात. ॰केळ- स्त्री. एक चांगल्या जातीची केळ. -न. सोनकेळीचें फळ. हें पिवळें धमक व गोड असतें. ॰खत-खात-न. माणसाच्या विष्टामूत्राचें खत. ॰चड-डी; सोनचिडी-चेडी-स्त्री. १ (को.) डोंबार्‍याची (कोल्हाट्याची) चिमणी; खेळ करणारी बायको, बाहुली. २ एक जातीची चिमणी. ३ (गो.) वयस्क कुमारी; घोडनवरी. ॰चाफा(पा)-पु. एक जातीचें चाफ्याचें झाड. याच्या फुलास सोनचापें (फें) म्हणतात. याचा रंग पिवळा व वास मधुर असतो. ॰जुई-स्त्री. पिवळसर फूल येणारी जुई व तिचें फूल ॰टका-क्का-पु. १ एक फूलझाड व त्याचें पिवळसर फूल. २ एक प्रकारचें जुनें सोन्याचें नाणें; (त्यावरून) सोन्याचा तुकडा. ३ आवडत्या मुलास म्हणात. ४ (विणकाम) आरसड व गोल यांचेमध्यें अडकविलेला एक दगड. ॰तरवड- पु. एक जातीचा (पिवळा व तांबडा) तरवड. शंकाशूर पहा. ॰ताव-पु. १ घोड्याचा पाय दुखावला असतां, तापलेल्या तव्या- वर त्याचा पाय ठेवून वर पाणी ओतून द्यावयाचा डाग. २ सोनें तापवून पाण्यांत न बुडवितां निवूं देणें. ३ एखाद्याची खरडपट्टी काढणें; गालीप्रदान करणें. [क्रि॰ बसणें; देणें]. ॰पावडा-वि. (कुत्सितार्थीं) गरीब; दुर्दैवी (माणूस) ॰पितळ-न. स्त्री. उत्तम, चमकणारें पितळ (धातु) ॰फळ-स्त्री. एकजातीचें भात, साळ. ॰मळी-स्त्री. उंसाचा रस कढवितांना ढोरमळीच्या नंतर येणारी मळी. ॰वणी-न. सोनें तापवून तें ज्यांत बुडविलें आहे असें पाणी; हें बाळंतीण किंवा आजारी माणसास देतात. ॰वेल-स्त्री. १ एक जातीचें भात. २ अमरवेल; आकाशवेल; दाभणाएवढी जाड, वृक्षावर पसरणारी, सोन्यासारखे पिवळ्या रंगाचे बारीक धागे असणारी, शेरावर वाढणारी वेल. ३ (ल.) शेळी; मेंढी (यांच्या व्यापारानें बराच पैका मिळतो यावरून). ४ (ल.) नागवेल (हिच्या पानांच्या व्यापारापासूनहि बराच पैका मिळतो यावरून) ॰वै-स्त्री. (महानु.) सोन्याची वात. 'कीं सोनवै कैवल्यपथा । पाजळली ते ।' -शिशु ३०. ॰सळा-वि. १ सोनेरी रंगाचे पट्टे असलेलें, रेशमी किंवा जरतारी (कापड, पीतांबर). 'कासे सोन सळा पांघरे पाटोळा । घननीळ सावळा बाइयानों ।' २ पिवळ- सर (केस, गहूं, घोडा इ॰). सोनुला-वि. सोनकुला पहा. सोनेंनाणें-सोनेंवाणें-न. सोनें, रुपें इ॰ विषय; सोन्याचे दागिने व नाणें किंवा रोकड. सोनेरी-वि. सोन्याच्या रंगाचें; सोन्याचें; आंत सोनें असलेलें (वर्खं, शाई, कलाबतू, मुलमा, रंग, वेलबुट्टीचा कागद इ॰). सोनेरी टोळी-स्त्री. दुसर्‍याला हरतर्‍हेनें फसवून लुबाडणारी धाडशी लोकांची टोळी. सोनेळ- ळें-सोनकेळ-ळें पहा. सोन्नारिंग-न. (गो.) मोसंबें फळ. [सोनें + नारिंग]

दाते शब्दकोश

श्रेयोवान्

श्रेयोवान् śrēyōvān a S (श्रेयस् & वान्) Prosperous, flourishing; having opulence or greatness or happiness.

मोल्सवर्थ शब्दकोश

श्रीमंत

श्रीमंत śrīmanta a (श्री & मंत Affix.) Of fortune and illustrious station; that possesses wealth and greatness; opulent, honorable, noble. Ex. श्रीमंतांचे घरीं जाण ॥ पक्वानांची कायसी वाण ॥. Pr. श्रीमंतानें गू खाल्ला तर औषधासाठीं गरिबानें खाल्ला तर पोटासाठीं For every act of a great man, howsoever extravagant, a vindication or an excuse is sure to be found. 2 Rich, flourishing, opulent;--as a merchant or trader.

मोल्सवर्थ शब्दकोश

सुना

सुना sunā a (शून्य S through or H) Empty, void. Pr. सुन्या घरीं वाण देणें. 2 Naked, bare, barren, empty, dreary, desolate; wanting the proper ornaments, accompaniments, or appendages. सुना जाणें To prove blank or barren; to pass or turn out unprofitable;--as a day, a stake, an essay or effort.

मोल्सवर्थ शब्दकोश

सुना a Empty, void. सुन्या घरी वान देणें Naked, desolate.

वझे शब्दकोश

सुरत्वान

वि. सुंदर. 'प्रतिमा सुरत्वान नाहींत.' -ख ४७९३. [अर. सुरत + वान]

दाते शब्दकोश

स्वार्थत्याग

स्वार्थ-होम, बलिदान, केवळ परहितार्थ झिजणें, लाभनिरपेक्ष, लाभाची अभिलाषा न ठेवतां आत्मनिरपेक्ष सेवा, त्यागी जीवन, परार्थात स्वार्थ पाहणे, निःस्पृह सेवारतता, स्वतःचे म्हणून कांहीं ठेवलेंच नाहीं, कमरेचें सोडून दिलें, सुखावर लाथ मारली, सर्वस्वावर पाणी सोडलें, चीजवस्तु कायमची देऊन टाकली, ऐषआरामाकडे पाठ फिरविली, नोकरीवर लाथ देऊन सतीचें वाण घेतलें, त्यागाची हंडी कांठोकांठ भरली, स्वार्थ- निरपेक्ष सेवा केली.

शब्दकौमुदी

ताले

पुअव. दैवी; प्रारब्धयोग; नशीब. 'रावसाहेबांचें ताले बुलंद ( = उच्च) म्हणोनच ते बाजी सर केली.' -रा १.५२. 'दौलतरावबाबा यांचें तालें विचित्र आहेत.' -ख १२. ६८१७. ह शब्द, दैव, नशीब, प्रारब्ध किंवा अशा अर्थाचा कोणताहि शब्द यासहसुद्धां उपयोगांत आणतात. जसें-दैवाचें तालें. 'संपत्ति मिळणें हे दैवाचें तालें आहेत.' [अर. तालिअ] म्ह॰ 'असे त्याचें दैवाचें तालें कीं कुत्र्यावर नौबत चाले.' तालेवंत-वि. सुदैवी; भाग्यवान; श्रीमान लक्ष्मीवंत. [ताले] ॰वार- वि. दैव- वान; ऐश्वर्यसंपन्न; वैभवशाली; श्रीमत 'राजा जनक तालेवार मांडी सीतास्वयंवर.' -तारामंडळ अंक ३. प्रवेश ३. तालवर (-वि.) पहा. [फा. तालिअवर्] ॰वारी-स्त्री. भाग्य; सुदैवी; श्रीमंती; संपन्न स्थिति; उत्कर्ष; भरभराटीची स्थिति. [फा. तालिअवरी]

दाते शब्दकोश

तालव(वा)र

पुनअव. (एखाद्यास श्रीमंतप्रमाणें) आदर- पूर्वक वागविणें; बरदास्त ठेवणें; मानमरातब, तैनात राखणें. (क्रि॰ करणें; ठेवणें; राखणें). -वि. तालेवार; दैववान; भाग्यवंत. [अर. तालिअ = भाग्य + फा. वर् = वान प्रत्यय]

दाते शब्दकोश

ताण

(सं) पु० राग. २ स्त्री० वाण. ३ अनुकूल वारा. ४ वरचढ, आधिक्य.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

तमाशगी(गा)र, तमासगीर

वि. १ तमाशा पाहणारा; मजा. गंमत पाहाण्यास नेहमीं उत्सुक असलेला. 'कठडयाचे बाहेर तमासगीर लोकांस व्यवस्थेशीर उभें राहूं द्यावें. -(बडोदें) पहिल- वान लोक व कुस्त्यासंबंधीं नियम २४. २ (ल.) प्रेक्षक; तिर्‍हा ईत (गंमत पाहणारा)माणूस; बघ्या. ३ तमाशा करून उपजीविका करणारा तमाशेवाला (गारुडी, जादूगार, डोंबारी, विदूषक, बहुरूपी इ॰). [अर. तमाशा + गीर प्रत्यय]

दाते शब्दकोश

तोहफा

वि. १ नामी; उत्कृष्ट; दुर्मिळ; तर्‍हेवाईक; मूल्य- वान्. 'बादशहा वजीर इत्यादिक यांस कधीं कधीं तोहफा म्हणून कांहीं जिन्नस पाठवीत असतात.' -पेद ८.२२. [अर. तुहफा] २ तोफा पहा.

दाते शब्दकोश

तथागत

वि. पूज्य; श्रेष्ठ. बुद्धास योजिलेलें विशेषण. 'अधिकांत अधिक त्याग केला असेल तर तो तथागत भाग- वान् बुद्धदेव.' -संन्य ख ७१.

दाते शब्दकोश

थार

पु. १ विश्रांतीचें, वस्तीचें ठिकाण; (शब्दशः व ल.) बिर्‍हाड; आश्रम; आधार; थारा; ठिकाण; आश्रय. 'वैकुंठीचा थार केला तिनें ।' -ब ४६७. २ एकसूत्रीपणा; ताळ (भाषण, वर्तणूक यांतील). 'त्याच्या बोलण्यांत, करण्यांत थार नाहीं.' ३ जागा; तळ; हमी; जामीन. जसें:- 'व्याजास-मुद्दलास-अन्नास-दाण्यास- वस्त्रास-पैक्यास-थार.' [सं. स्थान, स्थिर] (वाप्र.) ॰नसणें- (जागा न सांपडणें) वाण असणें (अन्न, धान्य इ॰ ची). थारीं बसणें-पडणें-(शब्दशः व ल.) वसती करणें (वस्तु, मनुष्य, पिशाच यानीं). मडकें थारी बसणें-स्थिर व निर्भय स्थिति प्राप्त होणें.

दाते शब्दकोश

थार      

पु. स्त्री.       १. विश्रांतीचे, वस्तीचे ठिकाण; (शब्दशः व ल.) बिऱ्हाड; आश्रय; आधार; थारा; ठिकाण. २. एकसूत्रीपणा; ताळ (भाषण, वर्तन इ. तील). ३. जागा; तळ. ४. हमी; जामीन. उदा. व्याजाला, मुद्दलाला, अन्नाला इ. थार. [सं. स्थान, स्थिर] (वा.) थार नसणे – जागा न सापडणे; (अन्न, धान्य इ. ची) वाण असणे. थारी बसणे, थारी पडणे – (वस्तू, मनुष्य, पिशाच्च यांनी) वस्ती करणे. थारेस लागणे –शिस्तीत, शेवटास लागणे. थाऱ्यास करणे –आश्रयाला नेणे.(मडके) थारी बसणे –स्थिर व निर्भय स्थिती प्राप्त होणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उडवून घेणें

मोरयाविधि पहा. ‘भिल्ल लोकांतील वाङ्- निश्चयानंतरचा एक विधि. यांत नवरानवरीस एका कमरे. इतक्या अधांतरीं उंच धरलेल्या फळीवर बसवून गाणें गात तालावर वर उडवितात व पुन्हां फळीवर झेलतात.‘ -के १. १२.३६.

दाते शब्दकोश

उपायन      

न.       १. देणगी; भेट; नजराणा; आहेर; उपहार : ‘समर्पिलि उपायनें । राया कृष्णजीतें ॥’ –रास १·११९. २. वायन; वाण. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उपायन

न. १ देणगी; भेट; नजराणा; उपहार. 'समर्पिलिं उपायनें । राया कृष्णजीतें ।।' -राम १.११९; 'समर्पितों याच उपायनाहीं ।' -सारुह १.३४. २ वायन; वाण. [सं. उप + इ]

दाते शब्दकोश

उष्णा, उष्णेंवाण

वि. उसना, उसनें वाण पहा. [उसना अप.]

दाते शब्दकोश

उष्णेंवाण

न. उसनें वाण पहा.

दाते शब्दकोश

वाचा

स्त्री. १ वाक्; वाणी; वागिंद्रिय. २ भाषण; बोलणें; शब्द; वचन; बोल. 'वदलासि न तूं कधींहि अशी वाचा ।' -मोकर्ण ५.३७. ३ आकाशवाणी; अशरीरिणी वाक्. ४ अव- सरणी. [सं. वच् = बोलणें] वाचा उकठणें-पालटणें-परतणें- फिरणें-मुरडणें-बोलणें खुंटणें; बोलणें खोटें पडणें; मागें घेण्याची पाळी येणें; गप्प बसावें लागणें. वाचा नरकांत घालविणें-खोटें बोलणें; वचन मागें घेणें. वाचा फुटणें-बोल- ण्याची शक्ति येणें. वाचा बसणें-बोलण्याची शक्ति नाहींशीं होणें; वाणी खुंटणें; बोबडी वळणें. वाचा विटाळणें-१ खोटें बोलणें; वचन न पाळणें. २ व्यर्थ भीड घालणें; निरर्थक शब्द वेंचणें, खर्च करणें. ॰ट-ल-ळ-वि. बडबड्या; बोलका; बोल- घेवडा; वटवट करणारा. 'वाचाट हा चाट वदोन राहे ।' -सारुह ८.१५. (वाप्र.) ॰दत्त-वि. १ वाग्दत्त; वाणीनें दिलेलें; वाङ्- निश्चित. २ वचनानें दिलेलें; कबूल केलेलें. ॰बरळ-वि. बड- बड्या; बरळणारा. 'गुरूतें वाचाबरळ ।' -विपू २.६. ॰रंभण- न. परिस्फुटता; स्पष्टपणें वाचेनें निदर्शन; बोलण्यांत रूढी. 'राष्ट्रीय शिक्षणाच्या कल्पनेला वाचारंभण किंवा नामधेय अजून मिळालें नव्हतें ।' -टिळकचरित्र १. ॰विदळ-वि. (बो.) वाचाट; वात्रट; अद्वातद्वा बोलणारा. वाचांश-पु. १ (चुकीनें वाच्यांश). शब्द; चकार शब्द; उच्चार (क्रि॰ काढणें; करणें). २ उल्लेख; बोलणें; चर्चा. (क्रि॰ काढणें; निघणें). ३ परिस्फोट; लावालावी. (क्रि॰ करणें). ४ वचन; करार. (क्रि॰ करणें). वाचाशक्ति- स्त्री. १ वक्तृत्त्व; व्याख्यानसामर्थ्य; बोलण्याचें चातुर्य. २ (रूढ) वाचण्यांतील कौशल्य; स्पष्टपणा; वाचनशक्ति. ३ वाचाळपणा. 'तुम्ही अमळसें तोंड आपटून धरीत जा. भारी वाचाशक्ति करूं नका.' -शास्त्रीको. ॰सिद्धि-स्त्री. बोललेलें खरें होण्याचें सामर्थ्य; अमोघवाणी. वाचाळ-वाचाट पहा. 'तुका म्हणे वाचा वाचां- ळतें ।' -तुगा ७०. वाचाळता-स्त्री. बडबड. 'क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे ।' -राम १६५. वाचाळ पंचविशी- स्त्री. बडबड. (क्रि॰ लावणें). 'तिची वाचाळ पंचविशी आतां सारखी चालू झाली ।' -गणपतराव. ॰पंचांग-न. चऱ्हाट; बड- बड; वटवट. ॰वाणा-णी-वि. बोलका; बडबड्या. -क्रिवि. चावटपणें; वाचाटपणें. वाचाळी-स्त्री. बडबड. 'एक म्हणती साडी वाचाळी ।' -दा ८.१०.१९; -ज्ञा १८.१७०९. वाचिक- न. वृत्त; बातमी; हकीकत; वर्तमान. -वि. वाणीसंबंधीं; बोलण्यानें, शब्दानें घडलेलें. ॰कर्म-१ वाणीनें केलेलें काम. (विशेषतः पातक, खोटें, कडू बोलणें वगैरे). ॰प्रतिकार-पु. तोंडानें केलेला विरोध; शाब्दिक विरोध. 'त्यांचा वाचिक प्रतिकारहि आम्हाला करवत नाहीं ।' -केले २.५०३.

दाते शब्दकोश

वाग्निश्चय

वाग्निश्चय vāgniścaya m (वाङ् निश्चय S) A marriage-contract, an affiance.

मोल्सवर्थ शब्दकोश

वानावानाचें

वि. (व.) तऱ्हतऱ्हेचें; वान पहा.

दाते शब्दकोश

वाणें

क्रि. वाजणें; वाजवणें. 'वाती सिंगे पांवे ।' -तुगा २३०; 'सुछंदे टाळघोळ वातु ।' -दाव ८४. 'तेथ गाती वाती ।' -शिशु ३४९. [सं. वान = फुंकलेला ?]

दाते शब्दकोश

वाणेउमट

पु. नाना प्रकार. वाण पहा. -हंको.

दाते शब्दकोश

वानगी

स्त्री. १ नमूना; मासला. २ कोणत्याहि पदार्थाचा थोडासा चवीसाठीं घेतलेला अंश. 'तीं होऊन हळूच आंत शिरती-दे माउली वानगी ।' -केक १४०. ३ जकातीच्या नाके- दारानें जकातीशिवाय कोणत्याहि मालाचा नमुन्याकरितां, चव पाहण्याकरितां म्हणून घ्यावयाचा अंश; शेतांत पिकलेल्या पदा- र्थाचा खंडकऱ्याकडून मालकास मिळावयाचा नमुन्यादाखल अंश. ४ भेट म्हणून आणलेली दूरदेशीची अगर दुर्मिळ वस्तु. [वाण]

दाते शब्दकोश

वाणगी

स्त्री. १ वानगी; नमुना. 'म्हणती वाणगी भक्षाहो ।' मुआदि २९.८७. २ भाजीपाल्यावरील एक कर. 'शेव सबजी व वाणगी देशमुखाचे निमे करार केली असे.' -वाडबाबा १.३. [वाण]

दाते शब्दकोश

वाणीकिणीचा, वाणीतिणीचा, वाणीदेणीचा

वाणीकिणीचा, वाणीतिणीचा, वाणीदेणीचा vāṇīkiṇīcā, vāṇītiṇīcā, vāṇīdēṇīcā a (वाण Scarcity or deficiency, by redup.) Scarce and valuable; rare and precious; scanty or insufficient, and thus prized or esteemed--an article or a material in general.

मोल्सवर्थ शब्दकोश

वाणकी

वि. लहान. 'तगायास तूझी तनू वाणकी रे ।' -वामन, विराट ७.१५५. [वाण = न्यून]

दाते शब्दकोश

वाणमाऱ्या

वाणमाऱ्या vāṇamāṛyā a (वाण Color & मारणें) Of a gloomy, glum, or sad countenance: also a colorless, pallid, or wan complexion.

मोल्सवर्थ शब्दकोश

वानोळा

पु. वानवळा पहा. १ किराणा माल; केणें; विक्रेय जिन्नस. २ देशमुख, देशपांडे यांनीं प्रथम तयार होणाऱ्या फळें, भाज्या वगैरे पदार्थांवरील वाणगी म्हणून घ्यावयाचा अंश. 'सांगितलें परी न सोडसी । घरोघरच्या वानोळ्या ।' -होला १०२. ३ नमूना; मासला. ४ दूरदेशची, बहुमोल, दुर्मिळ वस्तु (भेट म्हणून दिलेली). [वान]

दाते शब्दकोश

वानप्रस्थ

पु. चार आश्रमांपैकीं तृतीयाश्रम (गृहस्थाश्रमा- नंतरचा वनांत राहण्याचा काळ); त्यांत राहणारा ब्राह्मण; वान- प्रस्छ, वानप्रहस्त अशीहीं रूपें आढळतात. ' वानप्रच्छ यती सुस्नात । ' -दाव १९१. 'गृहस्त्याश्रमी वानप्रहस्ती ।' -दा १.८.२४. -न. वानप्रस्थाश्रम. [सं.]

दाते शब्दकोश

वाणवंसा or वाणवसा

वाणवंसा or वाणवसा vāṇavaṃsā or vāṇavasā m (वाण & वसा) A general term for the vows and religious obligations imposed upon themselves by women.

मोल्सवर्थ शब्दकोश

वानवटें

न. भाजकट बीं. 'परी शेंती वानवटें । पेरूं नये ।' -विउ ७.६४, [सं. वाण = अग्नि ?]

दाते शब्दकोश

वायन

वायन n A stone-mortar; See वाण.

वझे शब्दकोश

(सं) न० एक धर्म, वाण.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

न. वाण अर्थ १ पहा. [सं. उपायन]

दाते शब्दकोश

विस्तृत

मोठा, व्यापक, प्रशस्त, विस्तीर्ण, ऐसपैस , चौफेर, चौरस, मोठ्या प्रमाणावर, विशाल, लांबरुंद, वाण मोंठे, पसरलेला, हा मौठा: खूपखूप रुंद, क्षितिजापर्यंत जाणारा, प्रदीर्घ, लांबलचक, आडवातिडवा, नजर पोहोंचणार नाहीं इतका, रुंद बैठकीचा, वेघेंत न मावेल इतका, वडासारखा, अचाट लांब, रुंदच रुंद, लांबच लांब, ज्यावर सूर्य कधीच मावळत नाहीं, मध्यें मैल अंतर पडेल, येथें चार पंक्ती उठतील दान हजारांची सभा भरेल, दोन लग्नकार्यें उरकतील , चार बंगले सहज उठावेत, प्रदक्षिणा करायला मैलभर चालावें लागेल कोठें शेवट होतो तेच कळत नाहीं, कुठल्या कुठे रुंद.

शब्दकौमुदी

व(वं)सा-वोवसा

पु. १ (बायकी) स्वतः लावून घेतलेला नेम, व्रत. (क्रि॰ घेणें; होणें). २ (क.) वाण (संक्रातीचें); सुघड. [सं. उप + आस्-उपासना] वसा(सो)ळी- स्त्री. वसा पूजणारी, व्रत पाळणारी स्त्री.

दाते शब्दकोश

वनस्पती तूप

न. गळिताचें धान्य किंवा इतर वान- स्पतिक तेलापासून घट्ट व पांढरा बनविलेला तुपासारखा पदार्थ.' -चिज ४९४.१९४१.

दाते शब्दकोश

वोवसा

पु. वसा; व्रत; नेम. 'माझें अधिष्ठान घरीं । आणि वोवसें आनाचें करी ।' -ज्ञा ११.८१६; -दा ७.९.२३. [सं. उप + आस्; प्रा. उवास; म/?/ वसा] वोवसणें-व्रत घेणें; ओवसणें पहा. 'गौर वोवसली'. वोवसी-वि. वसा घेतलेला; व्रतस्थ. 'कां वाण धाडिजे घरा । वोवसीयाचे ।' -ज्ञा १७.२८६; -एभा २३.३१९.

दाते शब्दकोश

यत्न

पु. प्रयत्न; उद्योग; खटपट; परिश्रम. [सं. यत् = मेहनत करणें] ॰तः-क्रिवि. प्रयत्नानें; खटाटोपानें; उद्योगानें. ॰वाद-पु. प्रयत्नावर सुखदुःख, उत्कर्षापकर्ष इ॰ गोष्टी अवलंबून आहेत, दैवावर नाहींत असें मानण्याचा सिद्धांत; प्रयत्नवाद. याच्या उलट सिद्धांत दैववाद अथवा प्रारब्धवाद. ॰वादी-पु. यत्न- वादाचें समर्थन करणारा; प्रयत्नवाद मानणारा. ॰वान्, यत्नी- वि. खटपटी; उद्योगशील; प्रयत्न करणारा; उद्योगी.॰सिद्ध- वि. यत्नानें साधलेला; प्रयत्नानें प्राप्त झालेला. सिद्ध पहा.

दाते शब्दकोश

सार

पु.न. १ सत्त्व; तथ्यांश. २ साय; नवनीत; रस; अर्क. ३ तत्त्वांश; तात्पर्य. 'तेंही अति आदरें मानुनी । सार निव- डूनी घेतसे ।' ४ सत्य. 'जरि केवळ सोडिला अहंकार । तरि होय शीघ्र सर्व व्यवहारोच्छेद हें नव्हे सार ।' -मोशांति ३.५२. ५ बल; शक्ति. ६ एक अलंकार. एखाद्या वस्तूचा उत्कर्ष किंवा अप- कर्ष चढत्या किंवा उतरतया पायर्‍यांनीं झाला आहे असें वर्णन असल्या हा अलंकार होतो. उदा॰ 'वाहे महीतें स्वशिरीं फणीन्द्र तो । पाठीवरी कूर्म तयास वाहतो । त्यालाहि घे सागर मांडियेवरी । थोराचिये थोरिव जाण यापरी ।' -वामन. -वि. १ श्रेष्ठ; प्रधान; मुख्य. 'अमृतरसाहूनि हे कथा सार ।' -मोकर्ण २३.१. २ उत्कृष्ट; अतिशुद्ध. 'सार हिर्‍याला गार म्हणति सोनार देत पावली.' -राल ११०. ३ शाश्वत; नित्य. 'सार म्हणिजे शाश्वत । जयास होईल कल्पांत । तें सार नव्हे ।' -दा १४.९. ५. [सं.] ॰वत्ता-स्त्री. श्रेष्ठता; योग्यता. 'आमच्या देशी भाषेचा विस्तार व तिची सारवत्ता.' -भागवत-देशीभाषा ३. ॰वान्- वि. तथ्य, सार असलेला; सरस; भरींव. सारासार-पु. सत्या. सत्य; नित्यानित्य; श्रेष्ठनिष्ठ; तथ्यातथ्य; चांगलेंवाईट. इ॰. 'जे नेणती परदोषगुण । सदा सारासार विचारण ।' [सार + असार] सारासारविचार-पु. सार किती व कोणतें तसेंच असार कोणतें याविषयीं विचार; चांगल्यावाईटाचें तारतम्य दान. -दा १३.१.३१.

दाते शब्दकोश

नाम

न. १ नांव; वस्तुमात्राचें नांव. २ (व्या.) पदार्थाचें नांव. सामान्य, विशेष, व भाववाचक असे नामाचे तीन प्रकार आहेत. -पु. १ उभें गंध; तें लावण्याचा ठसा; रेघ. (सामा.) गंध; कपाळावर लावण्याचें चिन्ह. २ (ल.) घोडा; कुत्रा इ॰कांच्या कपाळा- वर उभा पांढरा पट्टा असतो तो. [सं. नाम; फा.नाम्] ॰करण- न. मुलाचें नांव ठेवण्याचा विधि, संस्कार. हा १६ संस्कारापैकीं एक आहे.॰गावडावि. (कु.) अशिक्षितांचा पुढारी. ॰घोष-पु. १ (पूजा इ॰च्या वेळीं) देवाच्या नावांचा केलेला मोठा गजर; नावांचा घोष. 'मग नामघोषें पिटोनि टाळी ।' २ देवाचें नांव घेणें; भजन. ॰जा-स्त्री. मान; महत्त्व; कीर्ति. 'वडीलवडिलापासून स्वामीकार्य प्रसंगें धन्यास संतोषी करून आपली नाम-जा संपादीत आलेस. -रा ८.१३९. [फा. नाम् = नांव + जाह् = हुद्दा] ॰जात-द-स्त्री. १ नियुक्त, नियोजित अधिकारी. २ नेमणूक; जहागीर. 'कांहीं नामजादा चार पांच लक्ष रुपये मिळतील ऐसें आहे.' -पया ९४. ३ स्वारी. 'त्यांनीं शिर्क्यावरी नामजात रवाना केली.' -रा १५.६. ४ एक पदवी. 'रामाजी माहादेव नामजाद प्रांत साष्टी यास.' -वाडबाबा ३.१९. -वि. १ लौकिक- वान; प्रख्यात. 'हुजूर हशम तालुके मजकुरीं नामजाद आहेत.' -वाडसमा ४.१४३. २ नेमलेला; नियुक्त केलेला. 'ते लोक किल्ल्यावर ठेवावयाचे उपयोगी नसल्यास त्यांस दुसरे जागां नाम- जाद पाठविणें.' -वाडसमा १.२७८. [फा. नाम्झाद्] ॰जादी- स्त्री. १ शौर्याचें कृत्य; नांवलौकिक. २ स्वारी; अभिक्रम. 'मग त्यावरी नामजादी करून रताजी रुपाजी जीवें मारिलें.' -इंम ३४. -सभासद ५४. ॰जोग-वि. हुंडींत ज्या माणसाचें नांव व वर्णन लिहिलेलें असेल त्याच्यापासून ओळखपाळख न घेतां हुंडीची रक्कम त्याला देतां येईल अशा प्रकारची हुंडी. (इं.) ऑर्डर चेक. याच्या उलट शहाजोग. ॰दार-वि. १ कीर्तिमान; सुप्रसिद्ध. 'मुसा मुत्रीम नामदार ।' -ऐपो २२२. २ कायदे- कौन्सिलचा सभासद. एक बहुमानार्थी पदवी. (इं.) ऑनरेबल. 'नामदार गोखले.' ॰दारी-स्त्री १ कीर्ति; लौकिक. नाम- जाद-दी पहा. २ कौन्सिलचें सभासदत्व; सन्मानाचा हुद्दा. ॰देव-पु. १ शिंपी जातींतील एक प्रसिद्ध साधु. २ एक शिंपी जातींतील पोटजात. ॰धातु-पु. नामापासून बनलेला धातु. जसें:-शेवटणें; शेंपटणें; समरसणें. ॰धारक-वि. नेहमीं देवाचें नांव घेऊन मुक्ति इच्छिणारा साधक; भक्तिमार्गी; भजनी. 'एथिचेआ नामधारका । विज्ञापन परिवारिआ मार्गिका ।' -ॠ १०३. 'तरले तरति हा भरंवसा । नामधारकाचा ठसा ।' ॰धारक, नामधारी-वि. १ नांवाजलेला; प्रसिद्ध; स्वतःचें नांव गाजविणारा. 'आम्हांजवळ दाहा नामधारी सरदार आहेत.' २ नुस्त्या नांवाचा; स्वतः कांहीं एक कारभार इ॰ करीत नसतां ज्याच्या नांवावर कारभार इ॰ होतात तो. ३ एकच नांव असलेला; एकाच नांवाचे दोन परस्पर. ४ विद्या, गुण इ॰ कांहीं नसतां निव्वळ मोठें नांव धारण करणारा. 'हा नामधारक शास्त्री आहे.' ॰धेय-न. (काव्य) नांव; नाम. -वि. नांवाचा. ॰ना-नी-स्त्री. कीर्ति; प्रसिद्धि; ख्याति. ॰नाईक-पु. (हेट.) आरमारावरचा अधिकारी; यावरून एक आडनांव. ॰निर्देश-पु. नांवाचा उल्लेख; नांव घेऊन सुचविणें, दाखविणें. ॰निशाण-वि. प्रसिद्ध; विख्यात 'राजे बहाद्दर नामनिशाण ।' -ऐपो २७७. ॰बुरदा-वि. (कागद- पत्रांत) उपरि लिखित; उपर्युक्त; वर उल्लेख केलेला [फा.] ॰मत्र- पु. देवाच्या नांवाचा जप. -ज्ञा १७.१०४. ॰रूप-न. नांवरूप पहा. ॰रूपातीत-वि. १ नांव, रूप, वर्णन इ॰काच्या पलीकडचा (हीं नसलेला) (देव). 'जें का अक्षर अव्यक्त । असें नावरूपातीत । शब्देवीण आनंदत । निजे तेथें निज बाळा ।' २ नांव इ॰ घालवि- लेला; दुर्लौकिकाचा; अवनतावस्थेस आलेला. ३ ऐहिक कीर्ति, मान इ॰कांची पर्वा न करणारा; ऐहिक लाभांना तुच्छ मानणारा. [नाम + रूप + अतीत] ॰वर-वि. प्रसिद्ध; नांवाजलेलें. ॰वाचणी- स्त्री. नांवनिशी. 'कथितो नामवाचणी सारी ।' -अमृत ४४. [नाम + वाचणें] ॰वाच्य-पु. (व्या.) तुतीय पुरुष. ॰विधान-न. नामकरण पहा. ॰शेष-वि. १ ज्याचें नुसतें नांव उरलें आहे असा (मृत, अज्ञातावस्थेंतला माणूस). २ अतिशय निकृष्टावस्थेस पोहों- चलेलें (गांव इ॰) ॰संकीर्तन-न. देवाचें नांव घेणें; भजन करणें; नामघोष. ॰सरी-क्रिवि. नामसदृश; नांवासारखें. 'तेही नामाशी नामसरी । म्हणत असतील जरत्कारी ।' -मुआदि ४.१६. ॰स्मरण- न. मनामध्यें देवाचें नांव घेणें-आठवणें. ॰स्मरण भक्ति-स्त्री. उपासनामार्गांतील नवविधा भक्तीपैकीं तिसरी नामा, नाम्नी- (पुस्त्री) वि. नांवाचा-ची. जसेः-हरीपंत नामा एक पुरुष; गंगा नाम्नी कन्या. नामांकित-वि. प्रसिद्ध; विख्यात; लौकिक अस- लेला. नामाथ(थि)णें-अक्रि. १ (काव्य) प्रसिद्धीस येणें; नांव होणें; नांवाजला जाणें. 'आनंदाचेनि नांवें । नामाथें पैं ।' -सिसं ५.११. २ नांव देणें. नामाथिला-वि. नावांजलेला; नामांकित. 'ऐसे नामाथिले वीर ।' -उषा १५९. नामाभिधान-न. १ नांव. 'तेथील पांड्या भावीक पूर्ण । महादाजीपंत नामाभिधान ।' २ नामांकित माणूस. 'हुजुरातींतले नामाभिधानें ।' -ऐपो २६७. [सं. नाम + अभिधान] नामावलि-ळी-ळ-स्त्री. नांवांची यादी. मुख्तत्वें शिव, विष्णु इ॰कांच्या नावांच्या यादीस लावतात. 'प्रेमभरित अंतरांत वदनीं नामावळी गाती ।' -होला १७. नामो-वि. (गो.) नाम लावणारा. (सारस्वत वैष्णवांना उपहा- सानें योजतात). नाम्या-वि. नाम अर्थ ४ पहा. कपाळावर पांढरा पट्टा असणारा (कुत्रा इ॰).

दाते शब्दकोश

प्रताप

पु. १ योग्यता; अधिकार; प्रभुत्व. २ वैभव; प्रभाव. सामर्थ्य; प्राबल्य. ३ शौर्य; पराक्रम; वीर्य; पौरुष. 'हा संग्रामु काय म्हणिपे । कीं स्वर्गुचि येणें रूपें । मूर्त कां प्रतापें । उदो केला ।' ज्ञा २.१९२. ४ सामर्थ्य; शक्ति; गुण; परिणाम (औषध इ॰चा). 'पापें जळावया समस्त । नामामाजी प्रताप बहुत ।' -रावि १.१५६. ५ उष्णता; दाह. 'सुटला प्रतापाचा वारा ।' -उषा ७४.८३१. 'प्रौढ प्रतापदिनकर' ६ धारवाड वगैरेकडे प्रचारांत असलेलें सुमारें दोन रुपये किंमतीचें एक नाणें; अर्धा होन. -शिचप्र १०३. [सं.] ॰उधळणें-अंगचे दुर्गुण प्रकट करणें. गुण उधळणें पहा. 'त्यांच्या शहाणपणाचा प्रताप त्यांना घरांत उधळूं दे.' -विकार. ॰महिमा-पु. एखाद्याचें शौर्य, पराक्रम, सामर्थ्य इ॰चें तेज, माहात्म्य, मोठेपणा; शौर्याचा प्रभाव. [सं.] ॰रुद्र-वि. भयंकर, उग्र शक्तीचा पराक्रमाचा. (मारुतीचें एक स्वरूप; डावा हात कमरेवर, उजवा उगारलेला व पायाखालीं जंबुमाळी राक्षस तुडविलेला). 'प्रताप रुद्र मारुती । सूर्यमंडळ धरिलें हातीं ।' -रावि ३.२३६. [सं.] ॰लंकेश्वर-पु. एक औषधी मात्रा. ॰वराळी-पु. (संगीत) एक राग, ह्यांत षड्ज, तीव्र ऋषभ, तीव्र गांधार, कोमल मध्यम, पंचम, तीव्र धैवत हे स्वर लागतात. आरोहांत गांधार, निषाद वर्ज्य व अवरोहांत निषाद वर्ज्य. जाति औडुवषाडव वादी ऋषभ, संवादी पंचम. गानसमय रात्रीचा दुसरा प्रहर. ॰वान्, प्रतापी-वि. १ पराक्रमी; सामर्थ्यवान्; शौर्यशाली; शक्तिवान् २ परिणामकारक; गुणकारी; जहाल; कडक (औषध इ॰) [सं.] ॰वीर-प्रतापरुद्र पहा. -रामदासी १५.१७२. ॰शूर-वि. वीर्यशाली; धाडसी. ॰सिंह-वि. सिंहा- प्रमाणें पराक्रमी. राजा, योद्धा इ॰स उद्देशून योजावयाचें विशे- षण. -पु. विशेषनाम. विशेषतः अकबरकालीन मेवाडचा महा- राणा (मृ. १५९७) [सं.] ॰सूर्य-प्रतापार्क-वि. शौर्य व पराक्रम यांत सूर्यासारखा (राजा, योद्धा इ॰). 'अयोध्येचा राजा दशरथ । तो प्रतापार्क रणपंडित ।' -रावि ३.६३. [सं.]

दाते शब्दकोश

सत्त्व

न. १ प्रत्येक वस्तुजातांत असलेल्या तीन गुण किंवा धर्म यांपैकीं (सत्त्व, रज, तम) पहिला. हा सर्व सद्गुणांचा द्योतक आहे. 'सत्त्वाथिलियां आंतु । सत्त्व मी म्हणे अनंतु ।' ज्ञा. १०.२८७. २ अस्तित्व; स्थिति; भाव; अर्थत्व. ३ पदार्थ; वस्तु; द्रव्य (ज्याविषयीं कांहीं गुणधर्मांचें विधान करतां येईल असें द्रव्य, वस्तु). ४ कस; सार; अर्क; सारभूत अंश; तत्त्वांश. 'नराच्या ठायीं नरत्व । जें अहंभाविये सत्त्व ।' ज्ञा ७.३५. 'गुळवेलीचें सत्त्व'. ५ बल; तेज; अभिमान; शक्ति; तत्त्व; जीवंतपणा; पाणी. 'दिसतें सत्त्व असें कीं पडतां न चळेल हेमनगहि वर ।' -मोवन ४.२६०. ६ स्वभाव; स्वभाविक गुण- धर्म. 'सत्त्व टाकिती भाग्यवंत सकळ । चोर पुष्कळ सूटले ।' -ह २९.३२. ७ खरेपणा; सद्गुण; थोरपणा. 'आलिया अतितां म्हणतसां पुढें । आपलें रोकडें सत्त्व जाय ।' -तुगा १२४८. 'याचें स्थिर असो सदा सत्त्व ।' -मोसभा. ६.४२. [सं.अस्]सत्त्व घेणें-पाहणेंकसून परीक्षा घेणें; प्रचीति घेणें; एखाद्याचा बाणा किंवा अभिमान किती टिकतो याची परीक्षा पाहणें. सत्त्व सोडणें-बल, कस, जोर, भरीवपणा, स्वाभाविक गुणधर्म नाहींसे होणें (जमीन, औषध, मंत्र, देव, मूर्ति वगैरे संबंधीं योजतात). सत्त्वास जागणें-सत्त्व राखणें; अडचणीच्या प्रसंर्गींहि आपला मूळ स्वभाव, सद्गुण, अभिमान, नीतिधैर्य, वर्तन यांपासून न ढळणें. 'सत्परिचयेंच जडही समयीं सत्त्वास जागलें हो तें ।' -मो. ॰गुण-पु. पदार्थमात्रांतील तीन गुणांपैकीं पहिला गुण. 'शुद्ध नेणीव तमोगुण । शुद्ध जाणीव सत्त्व गुण ।' -दा २०.३.७. ॰गुणी-वि. सत्त्वगुण ज्यांत विशेष आहे असा.॰धीर-वि. सत्य, इमान, औदार्य,पातिव्रत्य इत्यादि सद्गुण निश्चयानें राख णारा; सत्त्व कधींहि न सोडणारा; सद्गुणी; धैर्यशील; दृढनिश्चयी. ॰निष्ठ-वि. सत्त्व न सोडणारा; सद्गुणी; सचोटीचा; प्रमाणिक वगैरे. ॰पर-वि. सत्त्वास जागणारे. 'जे जे असा सत्त्वपर ।' -उषा ६२. ॰मूर्ति-स्त्री. सत्त्वशील; सत्त्वनिष्ठ, सद्गुणी; प्रामाणिक असा मनुष्य. ॰रक्षण-न. सद्गुण, सत्य, मान, इत्यादि गुणांचें परिपालन; अडचणींतहि सत्त्व न सोडणें. ॰वान- वंत-वि. सत्त्वगुणी; बल, धैर्य, कस, सार, तत्त्व असलेला. ॰शील-सीळ-वि. १ सद्गुणी; प्रामाणिक; नीतिनियमानें वागणारा, सत्प्रवृत्त. 'पवित्र आणि सत्त्वसीळ ।' -दा १.८.१९. २ ज्यांतील कस, किंवा गुणधर्म दिर्घ कालपर्यंत टिकतात असा (पदार्थ, वस्तु). ॰शुद्ध-वि. शुद्ध केलेलें; आंतील निकस भाग काढून सतेज केलेलें (औषध वगैरे). ॰शुद्धि -शोधन-स्त्रीन. औषधी, अथवा वनस्पती वगैरेंची विशुद्धि, स्वच्छ करणें; निकस भाग काढून टाकून सतेज करणें. 'तैसी ते सत्त्वशुद्धि । आगळी ज्ञानेंसी वृद्धि ।' -ज्ञा १४.२२२. २ अंतःकरणशुद्धि. 'आतां सत्त्व शुद्धि म्हणिजे । ते ऐशा चिन्हीं जाणिजे । तरी जळे ना विझे । राखोडीं जैसी ।' -ज्ञा १६.७४. ॰संपन्न-वि. सद्गुणी; सद्वर्तनी; बलयुक्त; सत्त्वांशानें परिपूर्ण. ॰स्थ-वि. १ सद्गुणी; नीतिमान्; सदाचारसंपन्न. २ पथ्यकर; पुष्टीकारक; हितकर; शक्तिवर्धक (अन्न,पदार्थ वगैरे) ॰हरण-न. (शब्दशःव ल.) सदगुण, उत्कृष्टपणा, शील, कीर्ति, मान वगैरेची नागवणूक, हिरावून घेणें; त्याचा त्याग करणें; सदाचाराविषयीं लौकिकाची हानि. ॰हानि- स्त्री. (शब्दः व ल.) सद्गुण, सत्यनिष्ठा, निष्कर्ष, सार वगैरेचा नाश. ॰हीन-वि. निकृष्ट; निकस; गुण,तेज, बल रहित; निःसत्त्व; तेजोहीन; तत्त्वभ्रष्ट. 'सत्त्वहीन मी बहुतापरी । बुद्धि अघोर असे, माझी ।' ॰क्ष(क्षे)मु-वि. सत्त्वगुणसंपन्न. 'देहीं सत्त्वक्षेमु । आरु जैसा । '-भाए ३३५. सत्त्वागळा- वि सत्त्विक; 'सत्त्वधीर सत्त्वागळी ।' दा १.८.२२ सत्त्वाथिला-वि. सत्त्वस्थ; सद्गुणी; सत्त्वगुणयुक्त; सात्त्विक. 'सत्त्वाथिलिया आंतु । सत्त्व मी म्हणे अनंतु ।' -ज्ञा १०.२८७. 'सत्त्वथिला शिबिनृपाळा ।' -आशिबि ६६.४. 'त्यागुणें विष्णुभक्त सत्त्वा- थिला' -ह ३४.१०. सत्त्वान्न-न. पथ्यकर व पौष्टिक खाद्य. सत्त्वापत्ति-स्त्री. ज्ञानी जीवाच्या सप्तभूमिकांतील चौथी भूमिका. -हंको. सत्त्वाशुंठी-स्त्री. १ निरनिराळीं औषधी द्रव्यें घेऊन तयार केलेली एक प्रकारची सुंठ. २ आंतील सर्व कस कायम राहील अशा प्रकारें आल्याची बनविलेली सुंठ. ३ ज्यास नेहमीं औषधें द्यावीं लागतात असें रोगट मूल (विशेषणाप्रमाणें उपयोग). सत्त्वाश्रित-वि. सुद्गुणी व सचोटीचा; प्रामाणिक; विश्वासु; नीतिमान; शुद्ध वर्तनाचा. सत्त्वाची चांगुणा-स्त्री. साध्वी, सद्गुणी स्त्री. [श्रियाळस्त्री चांगुणा या विशेषनामावरून] सत्त्वाची सावित्री-स्त्री. पतिव्रता व सद्गुणी स्त्री. [सावित्री या प्रसिद्ध पतिव्रता स्त्रीवरून]

दाते शब्दकोश

गुण

पु. १ मनोधर्म किंवा पदार्थाचा धर्म; त्यांतील बल; तेज; सत्त्व; अंतःस्थित धर्म; विद्या, कला, सत्य, शौर्य इ॰ धर्म. 'एवं गुण लक्षण ।' -ज्ञा १७.१३१. २ (न्यायशास्त्र) रूप, रस, गंध, स्पर्श, संख्या, परिमाण, पृथक्त्व, संयोग, विभाग, परत्व, अपरत्व, गुरुत्व, द्रवत्व, स्नेह, शब्द, बुद्धि, सुख, दुःख, इच्छा, दोष, प्रयत्न, धर्म, अधर्म, संस्कार हे २४ धर्म. ३ सृष्ट, उत्पन्न केलेल्या वस्तूंचा धर्म. हे गुण तीन आहेत; सत्व, रज, तम. हे ब्रह्मा, विष्णु, शिव यांचें अनुक्रमें लक्षण दर्शवितात. 'गुणीं देवां त्रयी लाविली' -ज्ञा १८.८१७. ४ उत्कृष्टता; योग्यता; व्यंगा- पासून अलिप्तता; निर्दोषता. ५ उपयोग; फायदा; नफा; फल; लाभ. ६ निघालेलें फल, वस्तु, परिणाम, निपज; उत्पन्न. ७ (अंकगणित) गुणून आलेलें फळ; गुणाकार. ८ दोरी; रज्जू. 'हें कर्माचे गुणीं गुंथलें ।' -ज्ञा १३.११०२. 'मुक्तमोती लग संपूर्ण । गुणेविण लेइलासे ।।' -एरुस्व १.३९. ९ प्रत्यंचा; धनु- ष्याची दोरी. 'गेला लक्ष्मण किष्किंधेते गुण जोडुनि चापातें ।' -मोरामा १.५११. १० (समासांत) -पट; प्रमाण; गुणाकार. जसें-अष्टगुण = आठपट; सप्तगुण, इ॰. 'शतकोटिगुणें तदधिक गमला शर निकर विखरितां पार्थ ।' -मोभीष्म ३.५६. ११ उतार; कमीपणा (रोगाचा). १२ (अंकगणित) गुणक. १३ (भूमिती) वर्तुळखंडाची ज्या. १४ दिव्याची वात. 'पै गुणु तेतुला खाय ।' -ज्ञा १३.७१९. १५ परीक्षा उतरण्यासाठीं ठरवि- ण्यांत आलेले संख्यांक; (इं.) मार्क. १६ (व्याक.) संधि करतांना वगैरे स्वराच्या रूपांत होणारा फेरफार. [इचा ए, उचा ओ, ऋचा अर्, लृचा अल्] १७ वधुवरांचें घटित पाहण्याचे अंक. हे ३६ असतात. १८ (ल.) रोग; व्याधि. म्ह॰ अठरा गुणांचा खंडोबा. १९ प्रभाव; परिणाम. 'संपत्ति हें एका तर्‍हेचें मद्य आहे, तें आपला गुण केल्याखेरीज बहुधा सोडणार नाहीं.' -नि ५३. [सं.] (वाप्र.) ॰आठविणें-(मृत, गैरहजर मनु- ष्याच्या) चांगल्या गोष्टी स्मरणें; त्यांचा उल्लेख करणें. ॰उध- ळणें-पसरणें-पाघळणें-स्वाभाविक वाईट, दुष्ट स्वभाव बाहेर पडणें; वाईट गुणांचें आविष्करण करणें. 'पत्र पुरतें झाल्या- वर सदाशिवराव म्हणाले हे आपल्या मातोश्रींनीं कसे गुण उध- ळले पहा!; -रंगराव. ॰काढणें-१ दुर्गुण काढून टाकणें. २ यथेच्छ झोडपणें. 'बोलाचालीनंतर त्यांचे गुण चांगलेच बाहेर काढले.' ॰घेणें, देणें-पिशाचादि बाधा न व्हावी म्हणून देवा- दिकांपासून कौल घेणें, देणें. ॰दाखविणें, गुणावर येणें-खरा स्वभाव दाखविणें. ॰शिकविणें-मारून शहाणा करणें; गुण काढणें ॰सोडणें-विसरणें-सन्मार्ग सोडून वाईट मार्गास लागणें. गुणाची चहा करणें-होणें-सद्गुणावर प्रीति करणें, असणें; चांगल्या गोष्टींचा सन्मान करणें. गुणाची माती करणें- सद्गुणांचा, बुद्धीचा दुरुपयोग करणें; अंगच्या चांगल्या गोष्टी, बुद्धि नासणें. गुणा येणें-सगुण होणें. 'गुणा आला विटेवरी । पीतांबर धारी सुंदर जो ।' -तुगा ७. गुणास येणें-पडणें- १ लागू होणें; फळणें; इष्ट परिणाम होणें. २ चांगल्या रीतीनें वागणें. म्ह॰ १ ढवळ्या शेजारीं बांधला पोंवळा वाण नाहीं पण गुण लागला. २ गुणाः पूजास्थानम् । = गुणामुळे माणसाला आदर प्राप्त होतो; जेथें गुण तेथें आदर. सामाशब्द-गुणक, गुणकांक-पु. (गणित) ज्या संख्येनें गुणतात ती संख्या. गुणक-वि. १ हिशेब ठेवणारा; गणना करणारा. २ मध्य गुणक; विशिष्ट शक्तीचें, गुणाचें मान दाखविणारा वर्ण, जात. [सं.] ॰कथा-स्त्री. १ ईश्वराच्या गुणांचें कीर्तन, प्रशंसन. 'गुणकथा श्रवणादि साधनें । करुनि सेवटीं आत्मनिवेदन.' २ (सामा.) गुण, ईश्वरी देणगी, स्वधर्म इ॰ विषयीं स्तुति. गुणकप्रमाण- न. (गणित) गुणाकारानें वाढणारें संख्येचें प्रमाण. १.४.८. १६. इ॰ प्रमाण; (इं.) रेशिओ. ॰कर-कारक-कारी-गुण- कारीक-वि. (अशुद्ध) १ गुणावह; गुण करणारें, देणारें. २ परिणामी; प्रभावी. गुण-कर-वि. (काव्य) गुणसंपन्न; बुद्धि, सुलक्षण, सद्गुण यांनीं युक्त (मूल). ॰गंभीर-वि. चांगल्या गुणांनीं युक्त. 'उदारधीर गुणगंभीर ।' [सं.] ॰गहिना-स्त्री. गुणवती व रूपवती स्त्री. 'जेव्हां जिवाला वाटेल तुमच्या आतां पाहिजे गुणगहिना ।' -सला ६. ॰गान-गाणें-न. गुणांचें स्तवन, गायन, प्रशंसा, प्रशस्ति; गुणकथा. [सं.] ॰ग्रहण-न. गुण ओळ- खणें; गुणाची चहा; गुणीजनांचा परामर्ष, आदर करणें-उमगणें. [सं.] ॰ग्राम-निधि-पात्र-राशि-सागर, गुणाकर गुणाची रास-खाण-वि. सर्वगुणसंपन्न; सुलक्षणी; सद्गुणी; अनेककलाकोविद. ॰ग्राहक-ग्राही-वि. गुणांचा भोक्ता, चहाता; गुणांचें चीज करणारा; गुण ग्रहण करणारा; दुसर्‍याचे गुण ओळखून संतोष मानणारा. [सं.] ॰घाती-वि. गुणदूषक; निंदक; हेटाळणी करणारा. [सं.] ॰ठेली-स्त्री. गुणांची थैली; गुणखनि. 'सुतारुण्यें तारुण्य गुणठेली ।' -आपू १०. [सं. गुण + स्था-थैली] ॰गुणत:-क्रिवि. गुणाप्रमाणें; गुणा- नुरोधानें. [सं.] गुणत्रय-न. सृष्ट पदार्थांचे सत्त्व, रज, तम हे तीन गुण, धर्म. [सं.] ॰त्रयविरहित-वि. वरील तीनहि गुणां- विरहित असा (ईश्वर); निर्गुण. 'गुणत्रयविरहित अगम्य तूं ।' [सं.] ॰दोष- पुअव. चांगले वाईट गुणधर्म; सुलक्षणें आणि कुल- क्षणें. 'नको माझे कांहीं । गुणदोष घालू ठायीं ।' ॰दोष- परीक्षा-स्त्री. गुणदोषांची चौकशी, छाननी, तपास. ॰धर्म-पु. गुणलक्षण, स्वभाव (बरा किंवा वाईट) गुण अर्थ १ पहा. गुणन-न. १ गुणाकार; मोजणी; गणना. गुणनिधान-निधी-न.गुणांचा साठा; गुणग्राम पहा. 'त्याची कन्या चिद्रत्न लावण्यागुणें गुण- निधान ।' -एरुस्व ३.४६. गुणनीय-वि. गणण्यास, गुण- ण्यास योग्य. ॰पंचक-न. आधिभौतिक वस्तूंचा मूळभूत पांच गुणांचा समाहार (पृथ्वी, आप, तेज, वायु व आकाश, किंवा शब्द, रूप, रस, गंध व स्पर्श). 'गुण पंचकें धरित्री आथिली ।' ॰परिणाम-पु. मूळ वस्तूचें तात्त्विक स्वरूप कायम राहून त्यास दुसरें नांव-रूप प्राप्त होणें. उदा॰ काथ्याची दोरी होणें, दुधाचें दहीं होणें -गीर २३९. ॰परिणामवाद-पु. त्रिगुणात्मक प्रकृ- तींतील गुणांच्या विकासानें किंवा परिणामानें व्यक्त सृष्टि निर्माण होते असें मत (सांख्य मत). -गीर २३८. ॰भूत-वि. १ गौण; दुय्यम प्रतीचें. २ वरून, पासून निवणारें; अनुकल्पित. ॰माया- स्त्री. त्रिगुणांनीं युक्त असलेली माया. 'मुळीं झालीं तें मूळ माया । त्रिगुण झाले ते गुणमाया ।' -दा ११.१.९. -भज ३५. ॰वचन-वाचक-न. गुण दाखविणारें वचन, शब्द, विशेषण. ॰वंत-वान-वि. गुणसंपन्न. ॰विशेषण-न. (व्या.) विशेषणाचा एक प्रकार; हा नामाचे गुण दाखवितो. ॰वेल्हाळ-ळी- विपुस्त्री. (काव्य.) गुणांनीं आकर्षिलेला-ली; मोहित; परितुष्ट. ॰वैषम्य-न. गुणत्रयांचें (सत्व-रज-तम) विषम मिश्रण. याच्या उलट गुणसाम्य. ॰सुशीळ-वि. (काव्य.) गुणी व शीलवान्; चांगल्या गुणांचा, स्वभावाचा. 'पतिसेवे सदा अनुकूल । सत्य वचनीं गुणसुशीळ ।' ॰स्तुति-स्त्री. गुणांची प्रशंसा. ॰हीन- वि. १ गुणविरहित; गुणाशिवाय. २ दुर्गुणी. ॰क्षोभ(भि)णी- माया-स्त्री. माया; त्रिगुणाची साम्यावस्था मोडणारी (माया); मूळ मायेंतील गुप्त असलेले त्रिगुण जेव्हां स्पष्ट होतात तेव्हां तिला गुणक्षोभिणी म्हणतात. 'पष्ट होती संधी चतुरी । जाणावी गुणक्षोभिणी ।' -दा ९.६.६. गुणज्ञ-वि. गुणग्राहक. जाणता (विद्यादि गुणांचा) पहा. गुणांक-पु. (गणित) गुणाकार. गुणांकभागोत्री-स्त्री. १ गुणाकार व भागाकार. २ (व्यापक) अंकगणित; गणित.;तुझा पंतोजी कांहीं गुणांकभागोत्री शिक- वतो कीं नाहीं?' गुणाकार-पु. १ गुणांक; गुणनाचें फळ; गणिताचा एक प्रकार; गुणकांकानें गुण्यांकास गुणणें. याचे कांहीं प्रकार:-कोष्टकी-धांवरा-बैठा-विविध गुणाकार इ॰ कपटसिंधु पहा. २ गुणणें; गुणांकार करणें. [सं. गुण्; म. गुणणें] गुणा कारक-कारी-वि. गुणकारक-कारी पहा. गुणागुण-पु. गुण आणि अवगुण; गुणदोष. गुणाचा-वि. भलेपणा, चांगले गुण अंगीं असणारा. गुणाची खाणी-रास-स्त्री. अनेक प्रकारचे चांगले गुण अंगीं असणारा; विविध गुणांचा गुणांचें गुणपात्र लेंकरू-न. (ल. उप.) अट्टल लुच्चा; लबाड; सोदा. 'गुणाचें गुणपात्र हातीं फुलपात्र.' गुणाढ्य-वि. १ गुणसंपन्न. २ एक प्रसिद्ध कवि. बृहत्कथेचा कर्ता. [सं.] गुणातीत-वि. गुणवि- रहित; निर्गुण. (ईश्वर) गुणानुवाद-पु. गुणांची वाखाणणी; गुणकीर्तन; प्रशंसा. गणानुवादकीर्तन-न. गुणांचें स्तवन. गुणावह-वि. गुण देणारें; गुणकारक; परिणामी; प्रभावी (औषध वगैरे). गुणांश-पु. १ गुणकारीपणा; प्रभाव; सुपरि- णाम. 'हा जें औषध सांगतो त्याचा गुणांश केवढा? ' २ परि- णाम; फळ; यश. 'त्या औषधानें अद्यापि गुणांश आला नाहीं.' गुणित-वि. (गणित) गुणलेलें. गुणें(ण्या)गोविंदें-दानें- क्रिवि. १ शांततेनें; भांडणतटां न करितां; मुकाट्यानें; आनंदानें; स्वेच्छेने. 'पक्षीही लहान । घरटीं बांधून । गुण्यागोविंदानें नांद- ताती ।।' २ मोठ्या स्नेहानें, ममतेनें. 'गुण्यागोविंदें मला दहा वेळ पलंगावर पालवा ।' -प्रला ३ चांगल्या प्रकारानें, रीतीनें. गुणोत्कर्ष-पु. गुणांचें वैपुल्य, विकास, वाढ. गुणो- त्कीर्तन-न. गुणांचें कीर्तन; गुणानुवाद; प्रशंसा. गुणोत्तर-न. (गणित) संख्यांची, दोन परिणामांची पट, हिस्सा, प्रमाण; भूमितिश्रेणींतील पदांमधील ठराविक अंतर; एका संख्येनें दुसरीस भागिलें म्हणजे दोहोंमधील गुणोत्तर निघतें. गुण्य-क्रि. १ जिला गुणावयाचें ती संख्या. २ गुणण्यास योग्य. [सं. गुण् = मोजणें] गुण्यांक-पु. गुण्य संख्या.

दाते शब्दकोश

तीळ

पु. १ गळिताच्या धान्यापैकीं एक. यांत काळे व पांढरे असे दोन प्रकार आहेत. तिळाचें तेल निघतें व त्याची पेंड गुरें खातात. रानतीळ म्हणून तिळाच्या झाडासारखें एक झाड असतें. २ शरीराच्या कातडीवरील नैसर्गिक काळा डाग. तिल अर्थ ३ पहा. ३ डोळ्यांतील काळा ठिपका. 'तिळा करितां पुतळी । दिसों लागे ।' -दा ८.३ ४. कां ते नेत्रद्वयांतील बाहुलाबाहुली । त्यांची तीळपुतळीनें सोयरीक केली ।' -स्वादि ११.१. ५७. -क्रिवि. तिळभर; यत्किंचित्. 'तरी तीळ सनदांचा उजूर न धरितां. -वाडसमा १.१५३ [सं. तिल] (हा शब्द समासांत आला असतां र्‍हस्व उच्चारला जातो यासाठीं र्‍हस्व तीचे सामासिकशब्द व वाक्प्रचार येथें दिले आहेत). (वाप्र.) ॰खाऊन व्रत मोडणें-(एक तीळ खाल्ल्यानेंहि उपवास मोडतो यावरून) थोडक्या लाभाकरितां वाईट गोष्ट करणें. तीळ घालून कूळ उच्चारप-(गो.) विकत श्राद्ध करणें. ॰तीळ-१ थोडें थोडें; जराजरा; किंचित्; अल्प. 'औषध नित्य तिळतीळ खात जा.' २ हळू हळू; धीरेधीरे. म्ह॰ शेजीची केली आस आणि तीळतीळ तुटे मास. ॰तीळ जीव तुटणें-सारखी काळजी, हुरहुर लागणें; अतिशय चिंता वाटणें. 'तिळतीळ तुटे ग जीव सदा चैन नच पडे ।' -सत्य- विजय. ॰तुटणें-सोयर, सुतक (तिलांजलीचा) संबंध सुटणें; नातें तुटणें. ॰दान देणें- १ (मृतमनुष्यास तिलांजली देतात यावरून ल.) तिलांजली देणें; संबंध सोडणें; त्याग करणें. २ एखाद्या पर्व दिवशीं तीर्थाच्या ठिकाणीं स्नान, तिलदान करतात तें. 'ऐसा श्रीकृष्णर्जुन । -संवादसंगमीं स्नान । करूनि देतसे तिळदान । अहंतेचें ।' -ज्ञा १८.१६१९. ॰पापड होणें-(अंगाचा) संताप होणें. 'माझ्या आवडत्या अंगाचा तिळपापड होऊन गेला.' -नाकु ३.३९. ॰तोंडीं तीळ न भिजणें-एखादी गुप्त गोष्ट तोंडांत, मनांत न राहणें. ॰तिळीं असणें-१ (एखाद्याच्या) कह्यांत, अर्ध्या वचनांत असणें. २ (व.) एक रास असणें. ३ (व.) ऐकण्यांत असणें. ॰तिळीं थेंब पडणें-(कपाळावरच्या तिळावर घामाचा थेंब पडणें) संतप्त होणें; अतिशय रागावणें. तिळीं येणें-१ दुसर्‍याच्या कह्यांत, सत्तेंत येणें. तिळागुणी होणें; स्वाधीन होणें. 'देव तिळीं आला । गोडें गोड जीव धाला ।' -तुगा २०३८. २ अनुकूल होणें; सख्य, प्रेम ठेवणें. 'तीळखा तिळीं ये गूळखा गोडसें बोल.' सामाशब्द- ॰काट-न. (कु.) तिळाचें काड; पाचोळा. [सं. तिल + काष्ठ] ॰कूटन. मोहर्‍या, मेथ्या, तीळ इ॰ कुटून केलेली पूड; एक तोंडीलावणें. ॰कोंद-स्त्री. तिळाचें सारण, पुरण कोंद पहा. ॰गूळ-पु. (मकरसंक्रांतीच्या दिवशीं वाटतात ते गूळ मिश्रित तीळ; शर्करामिश्रित तीळ; हलवा. तिळवण पहा. 'तिळगूळ घ्या, गोड बोला.' ॰तुल्य-ल्या- तिळमात्र; तिळप्राय. 'तिळतुल्य नाहीं मनिं डगल्या ।' -मध्व २२० 'मशारनिल्हेच्या अमलास अतःपर तिळतुल्या कजिया न करणें.' -वाडशा १.११७. ॰पुष्प-न. १ तिळाचें फूल. २ (ल.) डोळ्यांत पडलेला डाग, फूल. ॰प्राय-क्रिवि. किंचित्; थोडें; अल्प; 'सोमल तिळप्राय खाल्ला असतां विकार होतो.' ॰भर- राई-मुळीं देखील; थोडें सुद्धां. 'धर्मवासना कांहीं ज्याचें मानसिं तिळभर नाहीं ।' -मध्व ५५२. 'तुजसम अरोळी ढेईल तो उणी नाहीं तिळराई ।' -राला ९. ॰मांडा-पु. (बे.) वर तीळ लावून तयार केलेला मांडा. ॰वडी-स्त्री. १ साखर घालून केलेली तिळाची वडी. २ (राजा.) तोंडीलावण्याकरितां तिळाची अनेक पदार्थ घालून केलेली वडी. 'तिखट तिळवडे, सारबिजवडे ।' -अमृत ३५. ॰वण-स्त्री. (बायकी) लग्न झाल्यानंतर पहिल्या मकरसंक्रांतीस हलवा, तिळाचे लाडू, आहेर वगैरे नवरा-नवरीकडील माणसें परस्परांच्या घरीं पाठवीत असतात तो प्रकार. संक्रांतीच्या सणांतील एक कृत्य; तिळगूळ. [सं. तिल + वायन; म. वाण] ॰वणी-स्त्री. १ तिळगूळ. 'भारत कथा संक्रमणीं । निरोपमरूपें तिळवणी ।' -मुसभा ३.१५३. २ तिळवण पहा. तिळवा, तिळवा लाडू- पु. तीळ वगैरे घालून केलेला तिळाचा लाडू. 'दृढतर तिळवे हे गोड अत्यंत लाडू ।' -सारुह ३.५५. 'तिळवे लाडू अमृतफळें ।' -वसा २६. ॰संक्रांत-स्त्री. १ मकरसंक्रांतीला पाटील- कुळकर्ण्यांचा तिळगूळ घ्यावयाचा हक्क. तिळसें गुळसें-न. (ना.) संक्रांतीचा तीळगूळ. ॰होम-पु. तिळाच्या आहुती देऊन केलेला होम. तिळाचें कोळ-न (माण.) तीळ झाडून घेतल्यानंतर त्याच्या राहिलेल्या काडया, तिळागुणी-नस्त्री. सलोखा; ऐक्य; ऐकमत्य; प्रेमभाव. (क्रि॰ येणें; असणें; होणें). तिळागुणी येणें-(कोणेकास कोणीएक) अनुकूल होणें; दोघांचा प्रीतिभाव होणें. तिळांजळी, तिळांजुळी, तिळांजुळ, तिळोदक- तिलांजली-जुली इ॰ पहा. तिळांजळी देणें-तिलांजली देणें पहा. पूर्णपणें संबंध सोडणें. जे विषयांसि तिळांजळी देऊनि । प्रवृत्तिवरी निगड वाऊनि । मातें हृदयीं सूनि । भोगितांती ।' -ज्ञा ८.१२४. तिळातांदळा-वि. (शिवामूठ इ॰ स्त्रियांच्या धार्मिक- विधींत तीळ व तांदूळ एकत्र करतात त्यावरून ल.) मनमिळाऊ 'तुका म्हणे कान्हो तिळ्यां-तांदळ्या । जिंकें तो करी आपुला खेळ्या ।' -तुगा २५४. [तीळ + तांदूळ] तिळेल, तिळ्येल- न. (कों.) तिळाचें तेल [सं. तिलतैल; प्रा. तिलेल्ल; म. तिळ + एल] तिळोदक-न. १ तिलांजलि पहा. 'त्याचें उत्तर कार्य करि प्रभु साश्रु तिलोदक ओपी ।' -मो रामायणंपचशती अरण्य १२९. २ श्राद्धामध्यें पितरांना उपचार समर्पण करण्यासाठीं तीळ घालून अभिमंत्रित केलेलें पाणी. ॰देणें-(ल.) संबंध तोडणें; त्याग करणें. 'म्हणोनि भलतेणें एथ सद्भावें नाहावें । प्रयागमाधव विश्वरूप पहावें । येतुलेनि संसारासि द्यावें । तिळोदक ।' -ज्ञा ११.१०. -एभा २३.४८७.

दाते शब्दकोश

माय

स्त्री. १ आई. 'तुम्हींहि बळि बांधिला म्हणुनि आमुची माय जी.' -केका ८८. २ (कों.) सासू. [सं. मातृका; लॅ. मॅटर; इं. मदर; प्रा. माउआ; सिं. पं. हिं. माऊ(उ); ते. मम्मा; उर्दू अम्मा, मा; का. अव्वा] म्ह॰ १ माय मरो पण मावशी उरो. २ (व.) माय तशी बेटी गहूं तशी रोटी. (वाप्र.) ॰मावशी नाहीं-मावशी पहात नाहीं-विषयवासना तृप्त करण्यासाठी अगम्यगमन सुद्धा वर्ज्य करणाऱ्या मनुष्यांसंबंधीं म्हणतात. माय विणें-१ आई प्रसूत होणें; मातेनें विशिष्ट गुणांनी युक्त अशा पुत्रास जन्म देणें. २ (ल.) (एखादें काम करण्या- विषयीं) छाती, धाडस, हिंमत होणें. 'मला शिवी देण्याला कोणाची माय व्याली आहें तें पाहतो.' सामाशब्द- ॰आंग- न. १ शरीराचा अतिशय कोमल, नाजूक भाग. २ गुदभ्रंशांतील बाहेर आलेलें आतडें; गुदभ्रंश. ३ बाहेर आलेला गर्भाशय आणि गर्भाशयभ्रंश. ४ योनि; स्त्रियांच्या किंवा मादीच्या जननेंद्रियाच्या आंतील जननविषयक अंग, इंद्रिय. 'तिला बाळंत होतांना फार त्रास झाला व मायआंग बाहेर आलें.' [माय + आंग] ॰आजा- पु. आईचा बाप; मातामह. ॰आजी-स्त्री. आईची आई; मातामही. ॰गोसावीण-स्त्री. राजरा किंवा राजेश्वरी देवीच्या कुलधर्मात सवाष्ण म्हणून सांगितलेली विधवा. या कुलधर्मांत एक घरचें मेहूण, एक बाहेरचें मेहूण, एक ब्राह्मण, एक सुवासिनी, एक ब्रह्मचारी आणि एक विधवा अशीं साडेसात माणसें (ब्रह्मचारी अर्धा माणूस) भोजनास बोलवतात. विधवेला मायगोसावीण म्हणतात व देवी मानून तिचें पूजन करितात. हा कुलाचार पुष्कळ ब्राह्मण कुटुंबांत आहे. माय(ये)चा पूत-पु. १ खऱ्या आईचा पुत्र; पराक्रमी, प्रतापवान, महत्कृत्य करणारा मनुष्य. 'असे परिमाण उत्पन्न करणारा कायदा कोणत्या मायेचा पूत निर्माण करण्यास तयार आहे...' -टि ४.९२. २ निंदा, उपहास इ॰ कर्तव्य अस- तांहि याचा उपयोग करितात. [माय = आई + पूत = पुत्र] मायचि मी, मायचि मी चूत-उद्गा. (कों.) (अश्लील) अपशब्द; एक शिवी. 'तुझ्या मायचि मी चूत साल्या.' ॰झवों-उद्गा. (हेट.) एक शिवी; आईंशीं वाईट कर्म करणारा या अर्थी. ॰थळ-न. आईचें म्हणजे जन्माचें स्थळ; जन्मभूमि. असंतुष्ट पक्षानें आपल्या गांवांत किंवा भोंवरगांवी झालेल्या निकालावर पूर्वग्रहदूषित नस- लेल्या निःपक्षपाती अशा परस्थळीं फिरून चौकशी व्हावी अशी विनंति करतांना योजलेला शब्द. उदा॰ 'हें मी मायथळ मानितों. दुसरें थळ मला द्या.' ॰देश-पु. जन्मभूमि. ॰पोट- न. अतिशय शांततेची व सुरक्षिततेची जागा; आसरा; थारा; लपण्याची जागा; शरणस्थान. -वि. १ आश्रय देणारा; रक्षक; पालक (देव, राजा, धनी, लोक, राज्य, देश, गांव, ठिकाणा इ॰). 'जें अचितां अनाथांचें मायपोट ।' -ज्ञा ८.१९५. २ गरीब; निरुपद्रवी (गाय, घोडा, हत्ती इ॰). ॰बहीण-स्त्री. आदरानें कोणत्याहि स्त्रीविषयीं योजावयाचा शब्द; आईसारखी किंवा बपिणीसारखी मानिलेली स्त्री. 'मायबहिणी विठाबाई । लागला छंद तुझें पायीं ।' [माय + बहीण] ॰बहीण घेणें-(व.) आई- बहिणीवरून शिव्या देणें. ॰बाप-पुअव. आई व बाप; आईबापें. म्ह॰ (व.) माय बाप हेल्या लेकरं पाहिले कोल्ह्या = आईबाप सशक्त व मुलें किडकिडीत. ॰भाषा-बोली-स्त्री. स्वतःची भाषा. माव(उ)ली-स्त्री. १ आईस लडिवाळपणें संबोधण्याचा शब्द. २ (सामा.) आई किंवा आदरणीय, आवडतें वडील स्त्रीमाणूस. ॰मावशी-स्त्री. १ मातेसमान किंवा प्रौढ स्त्री. २ मातृस्थानीय किंवा अनुल्लंघ्यवचन असलेली नातेवाईक स्त्री. (क्रि॰ ओळखणें; जाणणें; मानणें; पाहणें इ॰) गोमांस व शिवस्त. हे शब्द पहा. [माय + मावशी] ॰माहेर-न. १ आईचें घर; माहेर. २ आश्रय; थारा. ३ आश्रयदान; (क्रि॰ करणें). ॰मूर्ति-वि. दिसण्यांत संभावित परंतु महा लुच्चा मनुष्य. ॰(माये)राणी-स्त्री. १ स्त्रिया व खालच्या जातींतील लोक यांनी पूज्य मानलेली पिशाच देवता; एक क्षुद्र देवता. 'जाखमाता मायराणी । बाळाबगुळा मान- विणी ।' -दा ४.५.१६. २ जलदेवता. 'जळीच्या मेसको माये- राणी ।' -दा ३.२.२७. ३ (व.) एक देवी. हिची पूजा दिवा- ळीत होतें. 'आमच्या घरीं मायराणीचा कुलाचार आहे.' ४ (निंदेने) करंजी नावाचें पक्वान्न. म्ह॰ अडक्याची मायराणी सापिक्याचा शेंदूर. मायराणीचे दिवे-पुअव. आंत तेल घालून व वात लावून मायराणीस समर्पण केलेले कणकेचे लहान लहान दिवे. बायकांचा हा आषाढांतील एक कुलाचार आहे, या दिव्या- सारखे कणकेचे दिवे करून बायका खातात म्हणून-मायराणीचे दिवे खाल्ले फिरफिरून घरास येते-असें एखाद्या धीट, लचाळ व त्रासदायक स्त्रीसंबंधी रागानें म्हणतात. ॰वणी-स्त्री. १ कुलीन स्त्री. २ गर्भार स्त्री. 'मायवणीं धाल्या धाय । गर्भ आंवतणें न पाहे ।' -तुगा २३४८. [प्रा.] ॰वत्-न. महारांस आई किंवा पालक यांच्या ठिकाणीं असलेल्या गांवच्या सर्व दुसऱ्या जाती; या जातींपैकीं एक व्यक्ति. ॰वाण-न. (व.) नवऱ्या मुलाच्या आईला द्यावयाचा वाण. 'मायवाणासाठीं लुगडें द्यायला हवें.'

दाते शब्दकोश

गां(गा)व

पुन. १ वस्तीचें ठिकाण; ग्राम; मौजा; खेडें. २ (व्यापक) नगर; शहर. ३ गांवातील वस्ती; समाज. 'यंदा दंग्यामुळें कितीक गांव पळून गेलें.' ४ आश्रय. ५ (दोन गांवांमधील अंतरावरून) चार कोस; योजन; चार ते नऊ मैल अंतर. 'मारीचातें प्रभू शत गांवें पुंखसमीरें उडवी' -मोरा १.१९९. हा शब्द कोंकण आणि देशांत पुल्लिंगी व सामान्य- पणें नपुंसकलिंगी योजतात. समासांत-गांव-कुलकर्णी-चांभार- न्हावी-भट इ॰ याप्रमाणें बारा बलुत्यांच्या नांवापूर्वीं गांव हा शब्द लागून सामासिक शब्द होतात व त्या शब्दावरून त्या त्या बलुतेदाराच्या एक वर्षाच्या कामगिरीवरील हक्काचा बोध होतो. [सं. ग्राम; प्रा. गाम; हिं. गु. गाम; सिं. गांउ; फ्रेंजि. गांव; पोर्तुजि. गाऊ] (वाप्र.) (त्या)गांवचा नसणें-दुसर्‍यावर लोटणें; टाळणें (काम); (त्या) कामाशीं आपला कांहीं अर्था- अर्थी संबंध नाहीं असें दर्शविणें. ॰मारणें-लुटणें; खंडणी बसविणें. 'दौड करून गांव मारूं लागलें' -पया १८८. गांवानांवाची हरकी देणें-सांगणें-(तूं कोठून आलास, तुझें नांव काय आहे सांग इ॰) ज्याच्या अंगात भूतसंचार झाला आहे अशा मनु- ष्यास (भुतास, किंवा झाडास) विचारतात. यावरून पाहुण्यास आपण कोठून आलांत इ॰ नम्रपणें विचारणें. ॰गांवाला जाणें- १ जवळ नसणें. २ (ल.) निरुपयोगी असणें. जसें-'माझे हात कांहीं गांवाला गेले नाहींत' (जवळच आहेत, वेळ आली तर तुला रट्टा मारतील). गांवीं नसणें-पूर्ण अभाव असणें; अज्ञानी असणें; दरकार नसणें; खिजगणतींत नसणें. सामाशब्द- ॰आखरी-क्रिवी. (व.) गांवालगत-शेवटीं-लागून. गांवई- स्त्री. सरकारी जुलुमामुळें आपलें गांव सोडून दुसर्‍या गांवीं केलेली वस्ती; सरकारी हुकुमाची अमान्यता; सरकारी अटींना प्रति- रोध (सार्‍यांत सूट, तहकुबी इ॰ मिळविण्यासाठीं गांवचे सर्व लोक हा उपाय अंमलांत आणतात). ॰कंटक-वि.गांवाची पीडा; गांवाला त्रास देणारा. [सं. ग्राम + कंटक] ॰कबुलात-स्त्री. १ (कों.) वहिवाटदार खोतानें गांवांतील जमिनीचा सारा भर- ण्याबाबत दिलेली कबुली. २ गांवांतील गांवकर्‍यांनीं वहीत किंवा पडीत जमीन कोणती ठेवावी याबद्दल केलेला निश्चय, ठराव. ॰कर पु. १ गांवांतील वृत्तिवंत. -कोंकणी इतिहाससाहित्य लेख ४००. २ (राजा.) गांवच्या शूद्रांतील देवस्कीच्या मानपाना- संबंधातील एक अधिकारी. ३ भूतबाधा नाहींशी करणारा, देवस्की करणारा माणूस; धाडी. -झांमू १०२. ४ गांवचे लोक; रहिवासी; गांवांत घरदार शेताभात असणारा. 'गांवकर म्हणती हो पेटली आग ।' -दावि ३५०. ५ (कु. कों.) पाटील; खोत; पुढारी. ६ (रत्नागिरी) कुणबीवाड्याचा व्यवस्थापक; कुणबी. ॰करी-पु. १ एखाद्या गांवांत ज्याचें घरदार आहें तो त्या गांवचा रहिवासी; गांवांत राहणारा. 'त्या गांवचे सर्व गांवकरी आज देवळाजवळ मिळाले होते.' २ शेतकरी. गांवकी-स्त्री. १ गांवाच्या संबंधीचा हरयेक अधिकार (अमंगल इ॰); गांवचा कारभार. २ गांवसभा; तींत झालेले ठराव. ३ गांवचा विचार; गांवकरी व पुढारी यांनी एकत्र जमून केलेला विचारविनिमय. ४ वतनदारांचा गांवासंबंधाचा परस्पर संबंध व त्यांचा समाईक अंतर्बाह्य व्यवहार. -गांगा १६७ [सं. ग्रामिक] गांवकुटाळ- वि. गांवकुचाळ; गांवांतील निंदक; टवाळ; लोकांची निंदा करणारा. ॰कुठार-वि. १ गांवांतील लोकांवर संकट आणणारा (चहाडी, वाईट कर्म इ॰ करून); गांवभेद्या; कुर्‍हाडीचा दांडा. २ गांवांतील सामान्य लोक. 'दिल्लींतील वाणी, बकाल, बायका देखील गांवकुठार (हे) लश्करच्या लोकांस मारूं लागलें. ' -भाब १६०. ॰कुंप-कुसूं-कोस-नपु. १ गावाच्या भोंवतालचा तट. २ (ल.) वस्त्राचा (रंगीत) कांठ (धोतरजोडा, शेला इ॰ चा रेशमी, कलाबतूचा). ॰कुळकर्णी-पु. गांवचा वतनदार पिढीजात हिशेबनीस; याच्या उलट देशकुळकर्णी (जिल्हा, प्रांत, यांचा कुळकरणी).॰खर न. गांवाची सीमा, हद्द; सीमाप्रदेश; परिकर. [गांव + आखर] ॰खर्च-पु (जमीनमहसुली) गांवचा (धार्मिक समारंभ, करमणूक इ॰चा) (खर्च; पंडित, गोसावी, फकीर इ॰ स द्रव्य, शिधासामुग्री इ॰ देतात त्याचा खर्च. ॰खातें-न. १ (पोलीस; कुळकर्णी वगैरे गांवकामगार लोक. २ गांवचा हिशेब. ॰खिडकी-स्त्री. गांवकुसवाची दिंडी; हिच्या उलट गांव- वेस (दरवाजा). ॰खुरीस-क्रिवि. गावानजीक; जवळपास. ॰गन्ना-क्रिवि. दर गांवास; प्रत्येक गांवाकडून-गणिक-पासून. 'गांवगन्ना चार रुपये करून द्यावे.' 'गावगन्ना ताकीद करून सर्व लोक बोलावून आणा.' ॰गरॉ-वि. (गो.) गावठी. ॰गाडा- पु. गांवांतील सर्व प्रकारचें (तंटे, प्रकरणें, बाबी इ॰) कामकाज; गांवचा कारभार; गांवकी. (क्रि॰ हांकणें; चालविणें; संभाळणें). ॰गाय-स्त्री. आळशी व गप्पिष्ट स्त्री; नगरभवानी. ॰गांवढें- न. गांवें; खेडीं (व्यापक अर्थीं). ॰गिरी-वि. गांवांत उत्पन्न झालेलें, तयार केलेलें; गांवराणी; गांवठी; याच्या उलट घाटी; तरवटी; बंदरी इ॰. ॰गुंड-गुंडा-पु. १ गांवचा म्होरक्या. २ विद्वानांस आपल्या हुशारीनें (वास्तविक विद्या नसतां) कुंठित करणारा गांवढळ. ३ जादुगारांची मात्रा चालूं न देणारा पंचा- क्षरी; गारुड्यास त्याच्याच विद्येनें जिंकणारा. 'जेवी गारुडी- याचें चेटक उदंड । क्षणें निवारीत गांवगुंड ।' -जै २४.९. ४ गांवांत रिकाम्या उठाठेवी करणारा; त्रासदायक माणूस; मवाली; सोकाजी; फुकट फौजदार; ढंगबाजव्यक्ति; खेळ्या. ॰गुंडकी- स्त्री. १ गांवगुंडाचा कारभार; गांवकी. २ (ल.) फसवेगिरी; लबाडी. ॰गुंडांचा खेळ-पु. पंचाक्षरी किंवा जादूगार यांच्याशीं गांवगुंडांचा चढाओढीचा सामना; मुठीचा खेळ. ॰गोहन-पु. (व.) सबंध गांवांतील गाई एकत्र असलेला कळप. ॰गौर-स्त्री. सबंध गांवांत भटकणारी स्त्री. गांवभवानी. 'पोरीबाळीसुद्धां हिणवून पुरेसें करतील कीं, या गांवगौरीला हें भिकेचें वाण कुणी वाहिलें म्हणुन?' -पुण्यप्रभाव ॰घेणी-स्त्री. दरवडा; हल्ला. 'समुद्राचें पाणी सातवा दिसीं करील गांवघेणी ।' -भाए ६९. ॰चलण-णी, गांव चलनी-वि. गांवांत चालणारें (नाणें). ॰चा डोळा-पु. गांवचा वेसकर, महार, जागल्या. ॰चा लोक-पु. गांवांतील कोणी तरी; कोणास ठाऊक नसलेला; परका; अनोळखी. ॰चावडी-स्त्री. गांवांतील सरकारी कामकाजाची जागा; चौकी. ॰जाण्या-वि. गांवदेवतेस वाहिलेलें (मूल). ॰जेवण- जेवणावळ-भोजन-स्त्रीन. १ गांवांतील सर्व जातींना घात- लेलें जेवण. २ गांवांतील स्वजातीस दिलेली मेजवानी. म्ह॰ हें गांव- जेवण नव्हे कीं घेतला थाळातांब्या चालला जेवायला (महत्त्वाच्या गोष्टीची थट्टा करणारास उपरोधिकपणें म्हणतात). ॰जोशी- पु. गांवांतील वृत्तिवंत जोसपण करणारा. ॰झाडा-पु. गावां- तील (शेत इ॰) जमीनींचा कुळकर्ण्यानें तयार केलेला वर्णनपर तक्ता; कुलकर्णीदप्तर. ॰झोंड-पु. १ सर्व गांवापासून कर्ज काढून नागविणारा. २ गांवांतील खट्याळ, खाष्ट माणूस; गांवास त्रास देणारा माणूस. ॰ठण-ठण-न. स्त्री. गांवांतील वस्तीची जागा (अस्तित्वांत असलेली किंवा उजाड झालेली); आईपांढर. [सं. ग्राम + स्थान = म. गांव + ठाण] गांवठा-पु. १ गांवचा एक वतनदान. म्ह॰ गांवचा गांवठा गांवीं बळी. २ खेडवळ; गांवढळ गांवठी-ठू-वि. १ गांवचें; स्थानिक. गावगिरी अर्थ १ पहा. 'बाजारी तुपापेक्षां गांवठी तूप नामी.' २ गांवढळ; खेडवळ. ३ (विशेषतः गांवठू) रानटी; खेडवळ (माणूस, चालरीत). ॰गांवठी- वकील-पु. देशी भाषेंत वकिलीची परीक्षा दिलेला माणूस. इंग्रजी न जाणणारा किंवा वकिलीची मोठी परीक्षा न दिलेला साधा मुखत्त्यार वकील. गांवडुकर-पु. डुक्कराची एक जात; गांवांतच राहणारें डुक्कर; याच्या उलट रानडुक्कर. गांवडें-ढें-पु. अनाडीपण; अडाणीपणा. गांवढ(ढा)ळ-गांवढ्या-वि. १ खेड- वळ; मूर्ख; रानवट; अडाणी, 'खंती करिती कर्माची । ते गावंढे गा ।' -ज्ञा ३.१४५. २ खेड्यांत राहणारा; शेतकरी. ॰ढळकर-पु. (गो.) गांवढळ; खेडवळ; शूद्र. गांवढें-न. लहान खेडें, गांव; शेतकर्‍यांची वाडी; शेतवाडी; 'मला माझें गावर्डेच बरें.' -इसाप- नीति (छत्रे) [सं. ग्रामटिक प्रा. गामड] गांवढेकर-वि. खेडवळ; गांवढ्या. 'तेथें कोणी गांवढेकर कुणबी बसला होता.' -नि १४९. गांवढेकरी-पु. खेड्यांत राहणारा माणूस; गांवकरी. गांवढें गांव-पुन. वाडी; पाडा; खेडें; निवळ शेतकरी राहतात तें गांव. म्ह॰-गांवढे गांवांत गाढवी सवाशीण (गाढवी बद्दल गांवठी असा पाठभेद) = लहान गांवांत क्षुद्र माणसासहि महत्त्व येतें. ॰थळ-न. गांवठण पहा. [सं. ग्राम + स्थल] ॰था-वि. गांवढळ. -शर. ॰दर-री-स्त्री. गांवांच्या लगतची जागा. 'आतांशीं वाघ रात्रीचा गांवदरीस येत असतो.' ॰देवता-देवी-स्त्री. गांवची संरक्षक देवता; ग्रामदेवता. [सं. ग्राम + देवता] ॰धणें-न. गांवचीं गुरें. -शर. [गांव + धन?] गांवधें-न. १ वाडी; खेडें; गांवढें पहा. २ दुसर्‍या खेड्यांतील कामकाज. 'मला गांवधें उपस्थित झालें.' गांवधोंड-स्त्री. १ गांवावर बसविलेली जबरदस्त खंडणी. २ (सामा.) गांवावर आलेलें संकठ, अरिष्ट. [गांव + धोंडा] ॰निसबत इनाम-न. निरनिराळ्या प्रासंगिक खर्चाकरितां किंवा सरकारी खर्चाकरितां काढिलेल्या सार्वजनिक कर्जाच्या फेडीकरितां गांवकर्‍यांनीं गहाण ठेवलेली जमीन. ॰निसबत मिरास-स्त्री. जिचा मालकीहक्क सर्व गांवकर्‍यांकडे मिळून आहे अशी जमीन. ॰नेमणूक-स्त्री. गांवखर्चाकरितां तोडून दिलेला पैका. ॰पडीत-न. गांवांतील बिन लागवडीची, पडीत जमीन. ॰पण-(गो.) ग्रामसभा; गांवकी. 'गांवपण मांडलिया वायसें ।' -सिसं ८.१५७. ॰पाणोठा-था-पु. गांवची नदी- तळ्यावरील पाणी भरण्याची जागा. ॰पाहणी-स्त्री. गांवांतील पीक किंवा शेतजमीन यांची पाटलानें केलेली पाहणी, मोजणी; (सामा.) गांवाची सर्वदृष्टीनें पाहणी. ॰बंदी-वि. गांवांत वस्ती करून असलेला (फिरस्ता नव्हे). ॰बैल-पु. (पोळ्याच्या दिवशींचा) पाटलाचा बैल; हा सर्व बैलांच्या पुढें असतो; हा पाट- लाचा एक मान आहे. ॰महार-पु. (बिगारी इ॰च्या) गांवच्या चाकरीवर असलेला वतनदार महार. ॰मामा-पु. गांवांतील शहाणा माणूस; गांवकर्‍यांवर चरितार्थ चालविणारा व सर्वांशीं मिळूनमिस- ळून असणारा माणूस (उपहासात्मक). ॰मावशी-स्त्री. गांवां- तील कुंटीण; (सामा.) वयस्क व स्वैरिणी स्त्री. ॰मुकादम-पुअव. गांवचे सारे श्रेष्ठ वतनदार. -गांगा ४५. ॰मुकादमी-स्त्री. वतनी ग्रामव्यवस्था. ॰मुनसफ-पु. शेतकर्‍यांचे १० रु. च्या आंतील दावे चालविण्यासाठीं, शेतकी कायद्याप्रमाणें नेमलेला बिनपगारी मुनसफ. -गांगा ७२. ॰मेव्हणी-स्त्री. गांवांतील वेश्या. ॰म्हसन- न. गांवांतील स्मशान. ॰रस-न. गांवांतील घाणेरडें पाणी; लेंडी नाला; लेंडे ओहोळ. 'हां गा गावरसें भरलें । पाणी पाठीं पाय देत आलें ।' -ज्ञा १६.२५. ॰रान-न. १ गांव व त्याच्या आस- पासचा प्रदेश, जमीन. २ गांवची व आसपासची लोकसंख्या. ॰रान-नी-राणी-वि. स्थानिक; गांवठी; घरगुती; रानवट (भाजी, पदार्थ इ॰); याच्या उलट शहरी, पेठी. ॰वर्दळ- स्त्री. गायरानाखेरीज गांवच्या दिमतीस असलेली इतर जमीन. ॰वसाहत-वसात-स्त्री. १ गांवची वसलेली स्थिति, वसती. २ गांवचा वसलेला भाग. ३ गांवची लोकसंख्या. ॰वहीत-न. गांवची लागवडीखालची जमीन. ॰वेस-स्त्री. गांवाच्या तटाचा मोठा दरवाजा. ॰वेसकर-पु. गांवाच्या वेशीवर पहारा करणारा पाळीचा महार; याच्याकडे गांवाचें निकडीचें काम कर- ण्याचें असतें. ॰शाई-स्त्री. खडबडीत चपटें मोतीं, ॰शीव- स्त्रीन. गांव किंवा गांवें (यांना सामान्य संज्ञा); नांवगांव वगैरे माहिती. 'त्याची गांवशीव मला ठाऊक नाहीं.' ॰सई-स्त्री. १ गांवच्या भुताखेतांना दरसाल द्यावयाची ओंवाळणी, बळी (नारळ, कोंबडें इ॰). २ एकूणएक गांववस्ती; गांवकरी; अखिल ग्रामस्थ. ३ भगत सांगेल ते सात किंवा नऊ दिवस गावां- तील यच्चावत् माणसांनीं बाहेर जाऊन राहणें. -बदलापूर ३२०. ॰समाराधना-स्त्री. गांवजेवण पहा. ॰सवाशीण-सवाष्ण- स्त्री. १ (गोंधळ, मोहतूर इ॰ प्रसंगीं) पाटील किंवा चौगुला याच्या बायकोस म्हणतात. २ (ल.) गांवची वेश्या. गांवळी- क्रिवि. गांवोगांव; सर्व गावांतून. 'जेवी निळहारयांची नासे निळी । तो मिथ्यामात उठवी वायकोळी । ते देशीं विस्तारें गांवळी । सांचा सारिखी ।' -ज्ञाप्र ६२७. गांवाची खरवड- स्त्री. गांवास त्रास देणारा, द्वाड माणूस. गांवा-देशानें ओंवा- ळलेला-वि. द्वाड, वाईट म्हणून गांवानें दूर केलेला; कुप्रसिद्ध; गांवाची खरूज (ओवाळणें पहा). गांवांबाहेरचा, गांवा भायला-वि. महार; परवारी. (कु.) गांवाभायला. गावार- न. गांवजेवण गांवीक-वि. (राजा.) सार्वजनिक; गांवचें (शेत, पाणी, खर्च, पट्टी, कधा). गावुंडगो-वि. (गो.) गांवांत राहणारा.

दाते शब्दकोश

दंड

पु. १ काठी; सोटा; छडी; सोडगा; दंडा. २ मार; शिक्षा (शारीरिक). ३ शिक्षा म्हणून घेतलेला पैसा; याचे राजदंड, ब्रह्मदंड जातिदंड असे तीन प्रकार आहेत. सरकारी न्यायपद्धतीनें गुन्हा शाबीत झाला म्हणजे शिक्षेदाखल सर कारांत भरावयास पैसा. ४ खांद्यापासून कोंपरापर्यंतचा हात. ५ केलेल्या, पाडलेल्या भागांच्या खुणांकरितां शेतांत किंवा बागांत घातलेला मातीचा उंचवटा; बांध; गडगा; पाणी जाण्यासाठीं दोहों बाजूंस उंचवटा करून पाडलेली सरी, पाट; (बे.) नदीकिनारा; कांठ; (वस्त्राचे) दोन तुकडे जोडण्याकरितां घात- लेली शिवण. (क्रि॰ घालणें). [प्रा. दंडी = जुन्या वस्त्राचा सांधा] ६ लांबी मोजण्याचें परिमाण, चार हातांची काठी. २००० दंड म्हणजे एक कोस. ७ वेळेचें परिमाण, चोवीस मिनिटें. ८ पैलवानांच्या व्यायामाचा एक प्रकार; जोर. 'आनंत्या नित्यनेम उठतो दंड सवाशें काढितो ।' -ऐपो ६७. (यावरून) एखादें कठिण काम अथवा प्रचंड उद्योग. (क्रि॰ काढणें; पेलणें). ९ क्रमानें उतार असलेली किंवा निमुळती पण लांबट टेंकडी, सोंड (पर्वताची). १० डोंग- राच्या माथ्यापासून पायथ्यापर्यंत असलेला उतार, ओघळ, अरुंद वाट; दंडवाट. ११ पर्वताच्या रांगेची एक लहान शाखा; डोंग- राच्या माथ्यापासून तों पायथ्यापर्यंत वांकडीतिकडी गेलेली खड- कांची ओळ. १२ (कवाईत वगैरे प्रसंगीं केलेला) सैन्याच्या रचनेचा एक प्रकार; रांग; फरा; व्यूह. 'तया दंडीं क्षोभलें । लोकत्रय ।' -ज्ञा १.१६५. १३ ताठ उभें राहण्याची अवस्था. १४ जिंकणें, ताब्यांत, कह्यांत आणणें. १५ अपराधाबद्दल शिक्षा म्हणून घेतलेलें द्रव्य, पैसा; जातींत परत घेण्यासाठीं दिलेलें प्रायश्चित्त. १६ रताळीं, ऊस इ॰ लाव- ण्याकरितां मातीचा केलेला लांबट उंचवटा, वरंबा. १७ तडाका. 'निंदा निस्तेज दंडी । कामलोभावर पडी ।' -ज्ञा १३.४९४. १८ हिंसा. 'ऐसा मनें देहें वाचा । सर्व संन्यासु दंडाचा ।' -ज्ञा १३.३१०. १९ पाठीचा कणा. 'माजी उभारलेनि दंडे । शिरकमल होय गाढें ।' -ज्ञा ६.२०२. [सं.] (वाप्र.) आवळणें, बांधणें, दंडाला काढण्या लावणें-चतुर्भुज करणें; कैद करणें. ॰थोपटणें-१ कुस्ती खेळण्यापूर्वीं दंड ठोकणें; कुस्तीस सिद्ध होणें. २ (ल.) साहसानें अथवा कोणासहि न जुमानतां एखादें कार्य करण्यास उभें राहणें. ॰थोपटून उभें राहणें-(ल.) वाग्युद्धास तयार होणें. ॰दरदरून फुगणें-आपल्याशीं कुस्तीला योग्य असा गडी पाहिला म्हणजे पहिलवानाचे दंड स्फुरण पावून फुगणें. ॰फुर- फुरणें-मारामारीची, कुस्तीची वगैरे उत्कट इच्छा होऊन दंड स्फुरण पावणें. भरणें-तालीम वगैरेमुळें दंड बळकट व जाड होणें. ॰भरणें-शिक्षेदाखल पैसा देणें. दंडास दंड लावून- घांसून-क्रिवि. बरोबरीच्या नात्यानें; सारख्या सन्मानानें. दंडाला माती लावणें-कुस्तीला तयार होणें (कुस्तीपूर्वी दंडास माती लावतात). दंडपासून साधित शब्द- दंडादंडी-स्त्री. मारामारी; काठ्यांची झोडपाझोडपी; कुस्ती; झोंबी. [दंड] दंडायमान-वि. १ (अखंडित काठीप्रमाणें) निर्मर्याद; अपार (वेळ, काळ). २ मध्यें पडलेला; आडवा पडलेला, पसरलेला. [सं.] दंडारणा-पु. सोटा; सोडगा; बडगा. -वि. जाड; स्थूल; घन (वस्तु); बळकट; मजबूत; जाड (मनुष्य, पशु). दंडारा-ळा-वि. (शिवण) ज्यास दंड घातला आहे असें; मध्यें शिवण असणारें (वस्त्र, कपडा). [दंड] दंडावणें-अक्रि. थंडीनें अथवा अवघड श्रमानें ताठणें (शरीर, अवयव). [दंड] दंडासन-न. आळसानें (जमीनीवर) पाय ताणून पसरणें, निजणें; सरळ हात- पाय पसरून आळसानें पडणें. (क्रि॰ घालणें). [सं. दंड + आसन] दंडार्ह-वि. दंड्य; दंड करण्यास योग्य. [सं.] दंडित-वि. १ शिक्षा केलेला. दंड केलेला. २ (ल.) निग्रह केलेला; वश केलेला; मारलेला; ताब्यांत आणलेला. [सं.] दंडिता-वि. १ शिक्षा करणारा; मारणारा; शिक्षा करितो तो. [सं.] दंडिया-पु. १ बारा ते पंधरा हात लांबीचें धोतर, लुगडें. २ बाजाराचा बंदो- बस्त करणारा छोटा अधिकारी; पोलीस मुकादम. [हिं.] दंडी- पु. १ दंड धारण करणारा; संन्याशी. २ द्वारपाल. ३ -स्त्री. अर्ध्या दंडापर्यंत बाह्या असणारी चोळी. [सं.] -वि. १ दंड धारण करणारा. २ दंड म्हणजे उभी जाड शिवण असलेला (कपडा). दंडी-स्त्री. मेण्यासारखें, चार माणसांनीं उचलावयाचें टोपलीचें वाहन. डोंगर चढतांना हींत मनुष्य बसतो व हमाल ही खांद्यावर वाहतात. [हि.] दंडुका-पुस्त्री. (काव्य) हाताचा पुढचा भाग. -मोको. दंडुका, दंडुकणें, दं(दां)डूक, दंडोका-पुन. सोटा; बडगा; दांडकें; काठी; लांकडाचा लहानसा जाड तुकडा; शिपायाच्या हातांतील सोटा. [सं. दंड] दंडुकेशाही-स्त्री. मारहाण किंवा जुलूम करून अंमलगाज विण्याची पध्दति; पाशवी बल; दांडगाई. 'पोलिसांची दंडुकेशाही अलीकडे फारच बोकाळली आहे.' -केसरी १६-४-३०. दंडुक्या- वि. काठीनें मार देण्यास संवकलेला; दांडगा; जबरदस्त. दंडेरा- वि. दंडारा पहा. दंडेल-ली-वि. दांडगा; अरेराव; अडदांड; झोंड; मुख्यत्वें, जो कर्ज परत फेडण्यास नाकबूल असतो तो; दंडुक्या (मनुष्य). दंडेली-स्त्री. अरेरावीची वर्तणूक; दंडेलपणा; दांडगाई; जबरदस्ती; अन्याय; सामर्थ्याचा दुरुपयोग (मुख्यत्वें देणें न देण्यासंबंधीं). दंड्य-वि. १ शिक्षा करण्यास योग्य. २ दंड करण्यास योग्य. [सं.] दंड्याप्रमाणें-क्रिवि. शिरस्त्याप्रमाणें. सामाशब्द- ॰थडक-स्त्री. खांद्याच्या बाहेरच्या भागानें केलेला आघात. [सं. दंड + थडक] ॰दास-पु. दंडाबद्दल गुलाम होऊन राहिलेला मनुष्य. [सं.] ॰धारी-पु. यम. 'नुपेक्षी कदां कोपल्या दंडधारी ।' -राम २७. -वि. १ हातांत काठी असलेला. २ (ल.) संन्यासी. ॰नायक-पु. कोतवाल; पोलिसांचा अधिकारी. 'सवे सारीतु पातीनिलें । दंडनायका पाशीं ।' -शिशु ५०४. ॰नीति- स्त्री. १ नीतिशस्त्र; नीति; संसारांतील वर्तुणुकीचे आणि व्यवहाराचे कायदे, नियम. यालाच दंडनीति, अर्थशास्त्र, व्यवहारशास्त्र, दृष्टार्थ- शास्त्र, हे जवळजवळ पर्यायशब्द आहेत. २ (कायदा) शिक्षा करून दाबांत ठेवण्याचें शास्त्र. हें राजनीतीच्या चार भागांपैकी चवथें होय. ३ अर्थशास्त्र, आन्वीक्षिकी पहा. [सं.] ॰पत्र-न. न्यायांत खोटा ठरला म्हणजे त्यापासून दंड घेण्याचें पत्र. [सं.] ॰पक्ष (करण)-न. (नृत्य) पाय ऊर्ध्वजानु करणें व त्यावर उजवा हात लताख्य करीत राहणें. [सं.] ॰संयुतहस्त-पु. (नृत्य) हात हंसपक्ष करून बाहू पसरून एका हातानें दुसर्‍या हातास एकदां कनिष्ठिकेपासून आरंभ करून आंतील बाजूनें बाहेरच्या बाजूस विळखा घालणें; नंतर कनिष्ठिकेपासूनच पण बाहेरील बाजूनें प्रारंभ करून आंतील बाजूस विळखा घालणें. [सं.] ॰पाणी-पु. शिव; यम. -वि. ज्याच्या हातांत दंड आहे असा; धट्टाकट्टा व दांडगा; गलेलठ्ठ व झोंड; आडदांड. [सं.] ॰पाद-(आकाशी, चारी)- वि. (नृत्य) नूपुरपाय पुढें पसरून क्षिप्त करणें म्हणजे कुंचित पाय उचलून दुसर्‍या पायाच्या बाहेरील बाजूस पोटर्‍यांचें स्वस्तिक होईल अशा प्रकारें टांचेच्या भारावर टेकणें व मग तें स्वस्तिकां- तील पाऊल उचलून पसरणें व खालीं टाकतांना अंचित करून दुसर्‍या पायांत अडकविणें. [सं.] ॰पारुष्य-न. १ कडक, कठोर शिक्षा. २ काठीनें हल्ला करणें; छड्या मारणें; ठोंसे देणें; मारणें (हात, पाय, शास्त्र इ॰ कांनीं). ३ (कायदा) हल्ला; भय प्रदर्शक रीतीनें हात किंवा काठी उगारणें, मारणें. [सं.] ॰पूपिकान्याय-पु. (उंदरानें काठी नेली त्या अर्थीं तिला बांधलेली पोळी खाल्ली हें उघडच होय यावरून) कार्यकारण, अंगउपांग, प्रधानअप्रधान यांचा न्याय; ओघाओघानेंच प्राप्त झालेली गोष्ट. उदा॰ राजाचा जय झाल्यानंतर त्याच्या सेनेचा जय अर्थांतच दंडपूपिकान्यायानें होतो. [सं. दंड = काठी + पूपिका = पोळी + न्याय] ॰प्रणाम-पु. साष्टांग नमस्कार;;लोटांगण. 'दंड प्रणाम करोनिया ।' -गुच ९.९. ॰प्राय-वि. दंडासारखा; साष्टांग (नमस्कार). 'करी दंडप्राय नमन ।' -गुच ४१.१४. ॰फुगडी- स्त्री. (मुलींचा खेळ) परस्परांच्या दंडांना (किंवा खांद्यांना) धरून उभ्यानें फुगडी खेळण्याचा एक प्रकार. [दंड + फुगडी] फुगई- फु(पु)रोई-स्त्री. १ दंडासाठीं केलेली जप्ती; दंड. २ (अधि- कार्‍यानें) बेकायदेशीर बसविलेला दंड; बेकायदेशीर दंड बसविणें. (क्रि॰ घेणें; देणें; भरणें). ॰वळी, कोपरवळी-स्त्री. (व.) (दंडावरची) वांक; स्त्रियांचा एक अलंकार. [दंड + वेली] ॰वाट-स्त्री. १ (उजाड, भयाण असा) लांबच लांब रस्ता; जवळपास गांव, वस्ती नाहीं असा रस्ता. २ टेकड्यांच्या कडेनें गेलेली अरुंद पायवाट. ३ एकमेकास मिळणारे रस्ते. ॰वान्- वि. काठी, दंड, वेत्र इ॰ हातांत घेणार. [सं.] ॰विकल्प- पु. शिक्षेची अदलाबदल; शिक्षा कमी द्यावी कीं अधिक द्यावी याविषयीं विचारणा. [सं.] ॰सरी-स्त्री. (बागेमध्यें) पाणी जाण्याकरितां खणलेला लहानसा पाट, चर, खाचण; तसर्‍यांच्या बाजूचा पाट. [दंड + सरी] ॰स्नान-न. घाई घाईनें केलेलें अर्धवट स्नान; नद्यादिकांच्या ठिकाणीं अंग न चोळतां केकळ दंड मात्र भिजतील अशा प्रकारचें केलेलें स्नान; काकस्नान; पाण्यांत एक बुचकळी मारून केलेलें स्नान. [सं.]

दाते शब्दकोश

अष्ट

वि. आठ संख्या; सामाश्ब्द-अष्टगुण, अष्टादश, अष्ट- विंशति व पुढील शब्द. [सं. अष्टन्] ॰क न. १ आठ पदार्थांचा समुदाय. २ पाणिनीच्या व्याकरणाचे (सूत्रपाठाचे) आठ विभाग आहेत त्यांतील प्रत्येक. ३ ऋग्वेदसंहितेचे पठणाच्या सोयीकरतां आठ भाग केले आहेत, त्यांतील प्रत्येक. ४ आठ श्लोकांचा समूह; एक काव्यरचनापध्दति. उ॰ मंगलष्टकें, करुणाष्टकें. [सं.] -वि. आठ किंवा आठवा. ॰कपाळ्या-वि. १ अष्टांगें-दोन हात, दोन पाय, दोन गुडघे, वक्षःस्थळ आणि कपाळ इतक्यांचा उपयोग करूनहि ज्यास कांहीं मिळत नाहीं तो. २ (ल.) पूर्णपणें दुर्दैंवी; आपद्ग्रस्त; भद्र्या; कपाळकरंटा. ॰कर्णिका-स्त्री. कमळाच्या पाकळ्या. 'माझें हृदय दिव्य कमळ । जें तेजोमय परम निर्मळ । अष्टकर्णिका अतिकोमळ । मध्यें घननीळ विराजे ।' -ह ३५.१. ॰कुलाचल-पु. मेरूच्या चारी दिशांत जे भारतादि वर्ष आहेत त्या प्रत्येकाची मर्यादा करणारे (नील, निषध, विंध्याचल, माल्यवान्, मलय, गंध- मादन, हेमकूट, हिमालय इ॰) आठ पर्वत. अष्टकोन-नी- ण-णी-वि. आठ कोन-बाजू-असलेली, (वस्तु, आकृति). ॰गंध-न. आठ सुगंधी द्रव्यें (चंदन, अगरु, देवदार, कोष्टको- लिंजन, कुसुम, शैलज, जटांमासी, सुरगोरोचन) एकत्र करून केलेलें गंध; (सामा.) उटणें. ॰गुण-वि. आठपट. -पु. आठ गुण. ब्राह्मणाचे आठ गुण-दया, क्षांति, अनसूया, शौच, अना- यास, मंगल, अकार्पण्य, अस्पृहा. बुध्दीचे आठ गुण- शुश्रूषा श्रवण, ग्रहण, धारण, चिंतन, ऊहापोह, अर्थविज्ञान, तत्त्वज्ञान. ॰गोल-गोली-वि. कांठापदरांवर वेलबुट्टी काढलेला (चौपदरी शेला). 'कोणासी पागोटें परकाळा । कोणी मागती अष्टगोली शेला -भक्तावि. ३०.४१. [सं. अष्ट + गो]. ॰गोळी-क्रिवि. सर्वतर्‍हेनें; एकंदर. ॰घाण-स्त्री. अतिशय दुर्गंधी-घाण. [अष्ट + घ्राण]. ॰ताल- झंपाताल पहा. ॰दल-ळ-वि. आठ पाकळ्यांचें; आठ पानांचें; अष्टकोनी; अष्टभुज. -न. १ कमळाच्या आकाराची काढलेली आठ पाकळ्यांची किंवा भागांची आकृति. 'गर्भे रचिली उदंडें । अष्टदळें । -ऋ ७३. २ एक प्रकारची रांगोळी. ३ (ना.) ताम्हण; संध्या- पात्रा; 'एक अष्टदळ आणवा.' ॰दानें-न. अव. आमान्न, उद- कुंभ, भूमि, गोदान, शय्या, वस्त्र, छत्र, आसन हीं आठ वस्तूंचीं दानें और्ध्वदेहिकांत द्यावयाचीं असतात. ॰दिक्पाल-पु. अंत- रिक्षाच्या आठ दिशा पालन करणार्‍या देवता. जसें-पूर्वेंचा इंद्र, आग्नेयीचा अग्नि, दक्षिणेचा यम, नैऋत्येचा नैऋत, पश्चिमेचा वरुण, वायव्येचा मारुत, उत्तरेचा कुबेर (सोम), ईशान्येचा ईश; अष्ट- दिग्पाल. 'इयेवरी सप्तसागर । मध्यें मेरु महाथोर । अष्टदिग्पाळ तो परिवार । अंतरें वेष्टित राहिले ।।' -दा ४.१०.१. ॰दिग्गज- -पु. ऐरावत, पुंडरीक वामन, कुमुद, अंजन, पुष्पदंत, सार्वभौम, सुम- तीक असे अष्ट दिशांस पृथ्वीचे आधारभूत आठ हत्ती आहेत. [सं.] ॰दिशा-स्त्री. आठ दिशा; दिक्चक्राचे आठ भाग-पूर्व, आग्नेय, दक्षिण, नैऋ/?/त्य, पश्चिम, वायव्य, उत्तर, ईशान्य. ॰देह- पु. देहाचे आठ प्रकार-पहिले चार पिंडीं व पुढील चार ब्रम्हांडीं. 'स्थूल, सूक्ष्म, कारण । महाकारण, विराट, हिरण्य । अव्याकृत, मूलप्रकृति जाण । ऐसे अष्ट देह ।' -दा ८.७.४०. ॰धा-वि आठ प्रकारचे; 'भूतें गुण मेळविजे । त्यासी अष्टधा बोलिजे ।' [सं.] ॰धामूर्ति- स्त्री. आठ प्रकारच्या मूर्ती. 'शैली दारुमयी लौही लेप्या लेख्याच सैकती । मनोमयी मणीमयी प्रतिभा अष्टधा स्मृता ।।' -एभा २७.९८-१०३; 'शैली, दारुमयी, लेप्या, लेख्या, सैकती अथवा सूर्यमंडळीं, जळीं, स्थळीं, अष्टमूर्तिस्वरूप श्रीहरीसी पूजावें ।' -अमृतध्रृव ६. अष्टमूर्ति पहा. ॰(देह)प्रकृति-स्त्री. पृथ्वी, पाणी, अग्नि, वायु, आकाश मन, बुद्धि आणि अहंकार मिळून आठ प्रकारे विभागलेली.... प्रकृति.' - गीर ७१५. ॰(विध)प्रकृति-असाहि वाक्प्रचार आहे. सत्व, रज, तम, व मूळ पांच तत्त्वें मिळून आठ प्रकारची प्रकृति. 'पंच भूतें आणि त्रिगुण । ऐसी अष्टधा प्रकृति जाण ।' -दा ६.२.१४. ॰धातू-पु. सोनें, रुपें, तांबें, कथील, शिसें, पितळ, लोखंड, तिखें (पोलाद). कोणी पोलादाच्या ऐवजी पारा धर- तात. 'अष्टधातु सायासें । जेवि विधिजेति स्पर्शें ।' -ऋ २०. ॰धार-वि. आठ धारा असलेलें. 'तंव तेणें साधकें एक अष्टधार आड धरिलें ।' -कृमुरा २२.९६. ॰नायका-नाईका-स्त्री. १ अव. श्रीकृष्णाच्या आठ आवडत्या पत्न्या-रुक्मिणी, सत्यभामा, जांबवंती, कालिंदी (सूर्यकन्या), मित्रवृंदा (अवंतिराजसुता), याज्ञजिती (यज्ञजितकन्या), भद्रा (कैकेयनृपकन्या), लक्ष्मणा (महेंद्रनाथकन्या). २ इंद्राच्या आठ नायका-उर्वशी, मेनका, रंभा, पूर्वचिती, स्वयंप्रभा, भिन्नकेशी, जनवल्लभा, घृताची (तिलोत्तमा). 'अष्टनायिका येऊनि । सर्वा घरीं नृत्य करिती ।' -ह २६.२२८. ३ (साहित्य) वासकसज्जा, विरहोत्कंठिता, स्वाधीनभर्तृका, कल- हातांरिता, खंडिता, विप्रलब्धा, प्रोषितभर्तृका, अभिसारिका. ॰नाग- पु. आठ जातीचे सर्प-अनंत, वासुकी, तक्षक, कर्कोटक, शंख, कुलिक, पद्म, महापद्म. ॰पत्री-वि. १ कोणत्याही विशिष्ट आका- राच्या (क्राऊन, डेमी) छापावयाच्या कागदाचीं आठ पृष्ठें होतील अशा तर्‍हेनें घडी पडणारें छापलेलें (पुस्तक) (इं.) ऑक्टेव्हो. 'पांच पांचशें पानांचे अष्टपत्री सांचाचें एक एक पुस्तक.' ॰पद- पु. १ कोळी वर्गांतील प्राणी-गोचीड, सूतकिडे, विंचू, कातीण वगैरे. (इं.) अर्कनिडा. २ आठ पायांचा काल्पनिक प्राणी. ॰पदरी-वि. आठ पदरांचा (शेला), आठसरांची (माळ), आठ पेडांची, धाग्यांची (दोरी) [सं. अष्ट + पल्लव] ॰पदी स्त्री. १ आठ पदांचा समुदाय. २ आठ चरणांचें एक कवन; कविताप्रकार. ॰पाकूळ न. (लुप्त). आठ पाकळ्यांचें फूल. ॰पाद-अष्टपद पहा. ॰पुत्ना-वि. आठ पुत्र आहेत जिला अशी (स्त्री). सौभाग्यवती स्त्रीला असा आशीर्वाद देतात. ॰पुत्री-स्त्री. विवाहामध्यें वधूला, काठाला हळद लावून नेसावयास दिलेलें शुभ्र वस्त्र. तिला पुष्कळ अपत्यें व्हावींत या इच्छेचें द्योतक. 'फेडिलें मायेचें वधूवस्त्र । अष्टपुत्र्या पीतांबर । नेसली कृष्णमय स्वतंत्र । तेणें सुंदर शोभली ।' -एरुस्व १६.१५. ॰म्ह-अष्टपुत्री मेहुणीकुत्री. ॰पैलू वि. १ ज्याला आठ पैलू (बाजू) आहेत असा (हिरा, रत्न). २ (ल.) हुषार; कलाभिज्ञ; व्यवहारचतुर (इसम). ॰पैलू माळ- (गोफ) स्त्री.घोड्याच्या गळ्यांतील दागिना; आठ पैलू असलेल्या मण्यांची माळ किंवा आठ पदर असलेली माळ. ॰प्रकृति, ॰विधप्रकृति अष्टधाप्रकृति पहा. ॰प्रधान- पु. राज्यकारभारांतील आठ प्रधान-प्रधान, अमात्य, सचीव, मंत्री, डबीर, न्यायाधीश, न्यायशास्त्री, सेनापति. अष्टप्रधानांची पद्धत शिवाजीनें सुरू केली. कांहीं जण वैद्य, उपाध्याय, सचीव, मंत्री, प्रतिनिधी, राजाज्ञा, प्रधान, अमात्य हे आठ मंत्री समजतात 'प्रधान अमात्य सचीव मंत्री । डबीर न्यायाधिश न्यायशास्त्री ।। सेनापती त्यांत असे सुजाणा । अष्टप्रधानीं नृप मुख्य जाणा ।।' हा श्लोक रूढ आहे. ॰फली-ळी,॰फळ-फल- स्त्रीन. अटोफळी पहा. ॰भार पु. ८००० तोळ्यांचा एक भार. असे आठ भार. 'नित्य प्रसवे अष्टभार सुवर्ण । सूर्यासम प्रभा परिपूर्ण ।' -ह २५. १५. ॰भाव पु. अव. (साहित्य.) शरीराचे सत्त्वगुणाचे आठ भाव, प्रकार-स्तंभ, स्वेद, रोमांच, स्वरभंग किंवा वैस्वर्य, कंप किंवा वेपथु, वैवर्ण्य, अश्रुपात, प्रलय. पर्याय-कंप, रोमांच, स्फुरण, प्रेमाश्रु, स्वेद, हास्य, लास्य, गायन. -हंको. 'आठवीया दिवशीं नाश अष्टभावा । अद्वयानुभवासुखें राहे ।।' -ब ११०. 'अष्ट- भावें होऊनि सद्गद । आनंदमय जाहला ।' ॰भैरव पु. भैरव ही शिवगणांतील स्वतंत्र देवता असून तिचीं पुढील आठ स्वरूपें आहेत-असितांग, संहार, रुरु, काल, क्रोध, ताम्रचूड, चंद्रचूड, महा. यांतील कांहीं नांवांऐवजीं कपाल, रुद्र, भीषण, उन्मत्त, कुपति इत्यादि नांवें योजिलेलीं आढळतात. ॰भोग पु. आठ प्रकारचे भोगः- अन्न, उदक, तांबूल, पुष्प, चंदन, वसन, शय्या, अलंकार. ॰म वि. आठवा.-स्त्री. अष्टमा. ॰मंगल वि. (विरू) अष्टमंगळ. १ ज्याचें तोंड, शेपूट, आयाळ, छाती व चार खूर शुभ्र आहेत असा; कित्येकांच्या मतें ज्याचे पाय, शेपूट, छाती व वृषण शुभ्र आहेत व जो कटीप्रदेशीं भोवर्‍यांनीं युक्त (नावांकित) असून ज्याच्या कपाळावर कमलाकृति केसांचें वेटोळें असतें असा (घोडा). २ (सामा.) आठ शुभलक्षणांनीं युक्त असा (घोडा). -न. पुढील आठ मंगल वस्तूंचा समुदाय-ब्राम्हण, अग्नि, गाय, सुवर्ण, घृत, सूर्य, व राजा. कांहींच्या मतें सिंह, वृषभ, गज, पूर्णोदककुंभ, व्यजन, निशाण, वाद्यें व दीप (राज्याभिषेकाच्या समयीं या अष्ट मंगलकारक वस्तू लागतात). ॰मंगलघृत न. वेखंड, कोष्ट, ब्राह्मी, मोहऱ्या, उपळसरी, सेंधेलोण, पिंपळी व तूप या औषधांच्या मिश्रणानें विधियुक्त बनविलेलें तूप. हें बुद्धिवर्धक आहे. -योर २.६७०. ॰महारोग पु. आठ मोठे रोग-वातव्याधि, अश्मरी, कृछ्र (किंवा कुष्ठ), मेह, उदर, भगंदर, अर्श (मूळव्याध), संग्रहणी. महारोग पहा. ॰महासिद्धी- १ अणिमा = शरीर अत्यंत सूक्ष्म होणें; २ महिमा = शरीर मोठें होणें; ३ लघिमा = शरीर वजनांत हलकें होणें; ४ प्राप्ति = सर्व प्राण्यांच्या इंद्रियांशीं त्या त्या इंद्रि- यांच्या अधिष्टात्री देवतांच्या रूपानें संबंध घडणें; ५ प्राकाश्य = ऐकून ठाऊक असलेल्या व स्वर्गादि पारलौकिक स्थानीं, व दिसण्याजोगे इहलोकच्या स्थानीं भोग व दर्शनाचें सामर्थ्य येणें; ६ ईशिता = शक्तीची, मायेची व तिच्या अंशाची ईशाच्या ठिकाणीं व इत- रांच्या ठिकाणीं असणारी प्रेरणा; ७ वशिता = विषय भोगीत असूनहि त्यांच्या ठिकाणीं आसक्त न होणें; ८ प्राकाम्य = ज्या ज्या सुखाची इच्छा करावी तें तें सुख अमर्याद प्राप्त होणें. -एभा १५.४२. ते ४७. ॰मर्यादागिरी- पु. आठ मोठे पर्वत-हिमालय, हेमकूट, निषध, गंधमादन, नील, श्वेत, शृंगवान व माल्यवान. हे जंबुद्रीपांत असून ते त्यांतील नऊ वर्षी (भागां)च्या मर्यादा आहेत. ॰मांगल्य- न. त्रैवर्णिकांचा एक संस्कार. अठांगुळें पहा. ॰मातृका स्त्री. आठ ईश्वरी शक्ती-ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इद्रांणी, कौबेरी, चामुंडा. सामान्यतः कौबेरी सोडून या सात असतात. विवाहादि मंगलप्रसंगीं यांची पूजा करतात. 'वेगे आल्या अष्ट मातृका । एकी चढिन्नली वृश्चिका । वाराही ते सूकरमुखा । वर्‍हाड देखा निघालें ।।' -एरुस्व १४.५८. ॰मांश पु. १ आठवा अंश; भाग. २ (वैद्यक) ज्वर नाहींसा होण्यासाठीं आठभाग पाण्याचे सात भाग आटवून एक अंश उरवितात तो काढा. ॰मी- स्त्री. चांद्रमासांतील प्रतिपदेपासून आठवी तिथी; या महिन्यांतून दोन येतात-शुद्ध व वद्य. ॰मूर्ति स्त्री. पृथ्वी, जल, तेज, वायु, आकाश, सूर्य, चंद्र व ऋत्विज् या परमेश्वराच्या आठ मूर्ती; शंकर; महादेव; अष्टधामूर्ति पहा. ॰योगिनी स्त्री. अव. आठ योगिनी; पार्वतीच्या सख्या; या शुभाशुभ फल देणाऱ्या आहेत-मंगला, पिंगला, धन्या, भ्रामरी, भद्रिका, उल्का, सिध्दा, संकटा. दुसरा पाठ-मार्जनी, कर्पुरा तिलका, मलयगंधिनी, कौमुदिका, भेरुंडा, माताली, नायकी, जया (शुभाचारा). यांत कधीं कधीं सुलक्षणा, सुनंदा हींहि नांवें आढळतात. ॰वक्र अष्टावक्र पहा. ॰वर्ग पु. १ आठ औष- धींचा समुदाय-ऋषभ, जीवक; मेद, महामेद, ऋध्दि, वृध्दि, काकोली, क्षीरकाकोली. २ मौंजीबंधनांत मातृभोजनांत भोजनाच्या वेळीं आठ मुंज्या मुलांना भोजनास बोलावितात तें कर्म ॰वर्ग्य- र्ग्या- पु. अष्टवर्गास जेवणारा बटु; उपनयनाच्या दिवशीं मातृ- भोजनाच्या वेळीं आठ बटू भोजनास बोलावितात ते प्रत्येक. ॰वर्षा- वि. आठ वर्षें वयाची (कुमारिका); (त्यावरून लग्नाला योग्य झालेली) उपवर. ॰वसु- पु. अव. प्रतीमन्वंतरांतील आठ वसू. चालू मन्वंतरांतील धर्मऋषि व दक्षकन्या वसु यांचे पुत्र-धर, ध्रुव, सोम, आप, अनिल, अनल, प्रत्यूष, प्रभास. भागवतांत द्रोण, प्राण, ध्रुव, अर्क, अग्नि, दोष, वसु, विभावसु अशीं नांवें आढळतात. 'इंद्र चंद्र वरुण कुबेर । अष्टवसु गंधर्वकिन्नर ।' -ह २५.१४१ ॰वायन- न. आठ वस्तूंचें दान; हळकुंड, सुपारी, दक्षिणा, खण, सूप, कंठण, धान्य, कांचमणी, या आठ पदार्थांचें वायन (वाण) सौभाग्यसंपादनार्थ लग्नांत आठ ब्राह्मणांपैकीं प्रत्येकाला वधूकडून दिलें जातें. ॰विध समाधि- स्त्री. समाधियोगाचे आठ प्रकार-यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधि. ॰विधा शृंगारनायका- (साहित्य) अष्टनायका पहा. ॰विना- यक- पु. अव. गणतीचीं आठ स्थानें-१ मोरेश्वर गणनाथ, (जेजुरी नजीक मोरगांव जिल्हा पुणें). २ बल्लाळेश्वर (मूळ मुरुड हल्लीं पाली, खोपवली नजीक-जिल्हा कुलाबा). ३ विनायक (कर्जत नजीक मढ-जिल्हा कुलाबा). ४ चिंतामणी (लोणी नजीक थेऊर- जिल्हा पुणें). ५ गिरिजात्मक (जुन्नर नजीक लेण्याद्रि-जिल्हा पुणें). ६ विघ्नेश्वर (जुन्नरनजीक ओझर-जिल्हा पुणें). ७ गणपति (नगर सडकेवर रांजणगांव-जिल्हा पुणें). ८ गजमुख (दौंड नजीक सिध्द- टेक-जिल्हानगर). ॰विवाह- पु. विवाहाचे आठ प्रकार-१ ब्रह्म = सालंकृतकन्यादान; २ गंधर्व = उभयतांच्या अनुमतीनें; ३ राक्षस = जब- रीनें कन्या हरण करून; ४ दैव = यज्ञप्रसंगीं ॠत्विजास कन्यादान करून; ५ आर्ष = गाय, बैल घेऊन कन्यार्पण; ६ प्राजापत्य = धर्माचरणार्थ कन्यापर्ण; ७ असुर = शुक्ल घेऊन; ८ पैशाच = कन्या चोरून आणून पत्नी करणें. सविस्तर माहिती धर्मसिंधु परिच्छेद ३ पूर्वार्ध पहा. ॰सात्विक भाव- अष्टभाव पहा. ॰सावध- वि. पुष्कळ गोष्टींकडे एकदम लक्ष पुरविणारा-देणारा; अष्टवधानी. ॰सिद्धि- अष्टमहा सिद्धि पहा. 'अष्ट सिद्धि चामरें घेऊनी । वरी वारिती अनुदिनीं ।' -ह १.१५. ॰सृष्टी- स्त्री. काल्पनिक, शाब्दिक, प्रत्येक्षा, चित्र- लेपा, स्वप्नी (स्वप्नसृष्टि), गंधर्वा, ज्वरिका (ज्वरसृष्टी), दृष्टी- बंधना. दा- ६.६.५१. [सं.]. ॰क्षार- पु. पळस, निवडुंग, सज्जी, आघाडा, रुई, तीळ, जव व टांकणखार.

दाते शब्दकोश

पाठ

स्त्री. १ कंबरेपासून मानेपर्यंतचा शरीराचा मागचा भाग. २ (ल.) तवा, सहाण, पाट, आरसा इ॰ सारख्या वस्तूच्या मागची, कार्योपयोगी बाजूच्या उलट बाजू. ३ (ल.) मदत; साहाय्य; टेका. (क्रि॰ देणें). 'इंग्रजाचा अन्यायी निघाला पाठ पेशव्याची । म्हणून साहेब लोकांनीं आरंभिली आगळिक दाव्याची ।' -ऐपो ३९७. ४ (ल.) (पृथ्वी, समूद्र इ॰कांचा) पृष्ठभाग; पृष्ठविस्तार; पातळी. ५ साल; बाह्यत्वचा; सालपट. ६ (भरतकाम) टोपी इ॰च्या कपाळपट्टीचा भाग सोडून चांदव्याशीं सभोंवार शिवलेलें कापड. ७ (भरतकाम, शिवणकाम) कंबरे- पासून मानेपर्यंतचा शरीराचा मागचा भाग झांकणारा काप- डाचा तुकडा. ८ मश्रू, किनखाब इ॰कांची दर्शनीय भागाव्यतिरिक्त असलेली दुसरी, मागची, आंतील बाजू. ९ शेळीचें स्त्रीजातीय अपत्य. पिढी या अर्थानें वापरण्यांत येणाऱ्या डोई या शब्दा- प्रमाणें हा शब्द, फक्त बकऱ्याच्या बाबतींत पिढी या अर्थानें वापरतात. ह्या बकरीच्या चार पाटी माझ्या हयातींत झाल्या [सं. पृष्ठ; प्रा. पट्ठ पिठ्ठ, पुट्ठ; हिं. पीठ; गुज. सिं. पुठि; बं. पिट] (वाप्र.) ॰उघडी पडणें-(ल.) पाठाचें भावंड मरणें. ॰उचलणें व्यवसाय सावरणें; गतवैभव परत मिळविणें, मिळणें; गमावलेली शक्ति, तेज इ॰ पुन्हां मिळविणें. याच्या उलट पाठ भुईस लागणें. ॰काढणें-(एखाद्या कामांत) कुचरपणा, अंग चोरपणा करणें. ॰कांपणें-(भिति इ॰कानीं) शरीर थरथर कांपणें. ॰घेणें-१ पाठोपाठ जाणें; पाठलाग करणें; पिच्छा पुरविणें. २ (एखाद्या गोष्टीबद्दल एखाद्यास) सतावणें; गळ घालणें; जेरीस आणणें; राशीस लागणें; खणपटीस बसणें. ३ (एखादें त्रासदायक काम, आजार इ॰ एखाद्याच्या) बोकांडीं बसणें ॰चोरणें-१ (बैल, घोडा इ॰ वाहनास जुंपलेलया जनावरानें) फार ओझें लादलें जाऊं नये म्हणून पाठ आकुंचित करून तें चुकविण्याचा प्रयत्न करणें. २ (एखादें काम करतांना) अग चोरणें; चुकारपणा करणें; पाठ काढणें पहा. ॰झाकणें-(एंखाद्यानें एखाद्याच्या) पाठीवर जन्मास येणें. ॰टाकणें-विश्रांतिसाठीं (जमीन इ॰कावर) अंग आडवे करणें; आडवें पडणें. ॰था(थो)पटणें-(एखाद्यास) उत्तेजनार्थ पाठीवर प्रेमानें थाप मारणें; शाबासकी देणें; वाहवा करणें. 'पाठविला काळानें जाणों थापटुनि पाठ वीर गडी ।' -मोभीष्म ६.४७. 'हनुमंताची पाठी थापटी । प्रेमें संतुष्टी आलिंगी ।' -भाराकिष्किंधा ३.१८. 'लोकग्रणींनीं लोकांची मर्जी संपादण्या- साठीं अथवा त्यांजकडून आपली पाठ थोपटून घेण्यासाठीं त्यांच्या दोषांचें मंडन करणें अत्यंत लज्जास्पद आहे.' -आगरकर. ॰दाखविणें-(युद्ध इ॰कांतून) भीतीनें पळून जाणें; पोबारा करणें. 'त्यांस रडावें मेले असतिल दावूनि जे परा पाठ ।'] -मोशांति ४.३५. [तुल. सिं, पुढि डिअणु = पाठ देणें ॰देणें-१ (युद्धांत शत्रूसमोरून) भीतिनें पळून जाणें; पाठ दाखविणें. 'असुहरखरतरधरगुरुपुत्रा धर्म पाठि दे चुकवी ।' -मोकर्ण ३४.२९. २ मदत, सहाय्य देणें. 'मिथ्यावादाची कुटी आली । तें निवांतचि साहिली । विशेषा दिधली । पाठी जेणें ।' -अमृ ७.१०५. ३ (एखाद्याचा उपदेश, विनंति इ॰कांचा) अव्हेर करणें; आवमानणें; न ऐकणें. 'पितृवचनासी पाठ दिधली ।' -एकनाथ. ४ मुकाट्यानें संकट, विपत्ति इ॰ सहन करणें 'देवोनि पाठ त्याला सर्वहि मी सोशितों मुकाट्यानें ।' -कृ. ना. आठल्ये. 'आल्या प्रसंगाला पाठ दिली पाहिजें.' ॰धरणें-पाठलाग करून पकडणें. ॰निघणें-रिघणें-(स्वतःचें) सरंक्षण व्हावें म्हणून, आश्रयासाठीं एखाद्याच्या मागोमाग जाणें; एखाद्यास शरण जाणें, पाय धरणें. ॰पुरती घेणें-पुरविणें-१ अतिशय आग्रह करणें; गळ घालणें; खणपटीस बसणें. 'मद्वात्सल्यें माझी तूं ही दे म्हणुनि पुरविली पाठ ।' -मोअनुशासन ५.७२. २ (एखाद्या गोष्टीचा, कामाचा) पिच्छा पुरविणें; नेटाचा प्रयत्न चालू ठेवणें. ॰पुरविणें- मदत देणें; साहाय्य, पाठबळ देणें. 'आधींचि देखणी दिठी । वरी सूर्य पुरवी पाठी । तैं न दिसे ऐसी गोठी । केंही आहे ।' -ज्ञा १८.१७३३. ॰पोट सारखें होणें-(उपासमार, आजार इ॰ कानीं) अत्यंत रोड होणें. ॰फोडून निघणें-(एखाद्यानें आपल्या) वडील भावाच्या, बहिणीच्या पाठीमागून जन्मास येणें. ॰भुईस लागणें-(द्रव्य, शक्ति इ॰ बाबतींत एखाद्याची स्थिति) अतिशय खालावणें; असमर्थ होणें; डबघाईस येणें. याच्या उलट पाठ उचलणें. ॰भुईस लावणें-चीत करणें; दडपणें. ॰मऊ करणें-(एखा- द्याच्या) पाठीवर मारणें; बडविणें; पिटणें. 'माझी पाठ मऊ करणें आपणाला नेहमीं हवें असतें.' -गुप्तमंजूष. ॰राखणें-मदत करणें; पाठबळ देणें. 'लोकीं अत्यंत क्षमा करिती । आलियां लोकांचे प्रचिती । मग ते लोक पाठी राखती । नाना प्रकारीं ।' -दा १९.४.२९. ॰वळणें-विवक्षित स्थलाकडे पाठ व्हावयाजोगें फिरणें; पाठमोरें होणें; परत फिरणें. ॰वळणें, पाहणें-मागें वळून पाहणें. ॰सोडणें-१ एखाद्या व्यवसाय, काम इ॰ नेटानें चाल- विण्याचें सोडून देणें. २ एखाद्याच्या गळीं पडण्याचें, खणपटीस बसण्याचें, मागें लागण्याचें सोडून देणें. 'पाठी न सोडिती नको म्हणतांही ।' दावि ३४४. पाठीचे चकदे काढणें-खूप मार देणें; बडविणें. पाठीचे चकदे निघणें-खूप मार बसणें. पाठीचें धिरडें करणें-काढणें-(एखाद्यास) खूप मारून पाठ धिरड्या- सारखी लाल व खरबरीत करणें. 'आई, ही माझी पाठ पहा. हें पाठीचें धिरडें तुझ्या जामदारानें करविलें.' -संभाजी. पाठीचे साल जाणें-१ मार मिळणें. २ (ल. व्यापार इ॰कांत) नुकसान येणें; ठोकर बसणें. ३ लुबाडला, नागविला जाणें. पाठीमागें ठेवणें-(पैसा, माणसें इ॰) मेल्यावर मागें ठेवणें. 'त्या म्हाता- ऱ्यानें पाठीमागें एक पैसाही ठेवला नाहीं.' पाठीमागें देणें- परत देणें. पाठीमागे पडणें-१ (एखादी गोष्ट इ॰) जुनी झाल्यामुळें प्रचारांतून कमी होत जाणें; स्मृतिशेष होणें. २ (एखादी गोष्ट) तीव्रता, महत्व इ॰ बाबतींत कमी होत जाणें. ३ (एखादे काम इ॰) लांबणीवर पडणें; मुदत टळून मागें राहणें. ४ कमी प्रगति होणें; मागें राहणें; मंद गति असणें. पाठीमागें भुंगा लावणें-(एखाद्यास) सतत त्रास देणें; ससे- मिरा लावणें. पाठीमागें लागणें-(एखादी गोष्ट, व्यक्ति इ॰ कांच्या) नादीं लागणें. पाठीमागें सरणें-मागे हटणें; हार खाणें. पाठीवर-क्रिवि. १ (पिच्छा पुरविण्याकरितां, खणपटीस बसण्याकरितां, उत्तेजन देण्याकरितां एखाद्याच्या) मागें; पाठीशीं; मागोमाग (असणें). २ (जन्म इ॰ बाबतींत एखाद्याच्या) नंतर; पाठोपाठ.पाठीवर असणें-१ मालक इ॰कानें देखरेख कर- ण्यास, चाकर इ॰कांची चूक झाली असतां शिक्षा करण्यास आश्रय- भूत, मागें असणें. 'या माणसांच्या पाठीवर कोणी असल्या- शिवाय काम करणार नाहींत.' २ मित्र, बंधु इ॰कांनीं आपत्ति दूर करण्यास (एखाद्याच्या) मागें. पाठीशीं असणें. 'आमच्या पाठीवर ईश्वर आहे.' ३ शत्रूचा नाश, पाठलाग करण्यास मागो- माग असणें. 'चोरांच्या पाठीवर दोनशें स्वार पाठविले आहेत.' ४ संततिक्रमानें कनिष्ठ, सोदरस्थानीं असणें. 'माझ्या पाठीवर पांच भावंडें आहेत.' पाठीवर टाकणें-(एखादें काम) लांबणी- वर टाकणें; दिरंगाईनें करणें. पाठीवर, पाठीला तेल लावून ठेवणें-खरपूस मार खाण्यास तयार होणें, असणें. पाठीला पाय देऊन येणें-(एखाद्याच्या) नंतर, पाठीवर, मागाहून जन्मास येणें (मूल इ॰) (एखाद्याच्या) नंतर अधिकाररूढ होणें (राजा, मंत्री इ॰कानीं). पाठीवरून-अ. नंतर; मागोमाग. पाठी- वरून हात फिरविणें-गोंजारणे; प्रेमानें कुरवाळणें. पाठीवाटे काळीज निघणें-पुरें पारिपत्य होणें, करणें. 'जो कोणी पंतप्रतिनिधीची अखत्यारी सुभेदारी काढूं म्हणेल त्याचें पाठीवाटें काळीज निघेल.' -रा ६.३५७. पाठीशीं-अंगावर; मागें. 'माझ्या पाठीशीं शंभर लचांडें आहेत.' पाठीशीं घेणें-अंगावर घेणें; पतकरणें (काम इ॰). पाठीस काळीज असणें-स्वभावानें धाडसी, साहसी, बेडर असणें. पाठीस पोट लागणें-१ (आजार उपासमार इ॰कानीं) पोट खपाटीस लागणें; रोड होणें. २ उदर- निर्वाहाची जबाबदारी अंगावर असणें; उदरनिर्वाह करण्यास अतिशय श्रम; कष्ट, यातायात पडणें; या अर्थीं पोट पाठीस लागणें असाहि वाक्प्रचार आहे. 'पोट लागलें पाठीशीं । हिंडवितें देशो- देशीं ।' -तुगा ४१९६. पाठीस(ला) लागणें-१ (एखाद्याचा) पिच्छा पुरविणें; पाठलाग करणें. 'पाठीस लागले ते पांडवपांचालभट असें म्हणती ।' -मोशल्य ३.१५. 'तुझ्या पाठीला हा महादेव लागला आहे ना?' -नामना १५. २ खणपटीस बसणें; गळीं पडणें. पाठ घेणें पहा. पाठीसीं-शीं-क्रिवि. (अक्षरशः व लक्षणेनें) (एखाद्याच्या) पाठीमागें. पाठीशीं(सीं) घालणें-१ आश्रय देणें; रक्षण करणें. २ स्वीकारणें. 'रायें पाठिसीं दासी घालितां । तिची सर्वावरी चाले सत्ता ।' -रावि १.४१ (नवनीत पृ. २१४). पाठीशीं घेणें-(एखादें काम इ॰) अंगीकारणें; पत्करणें. पाठीं हटणें-मागें जाणें; मागें पडणें. -देशीभाषा १६. झांकल्या पाठीचा-वि. प्रतिष्ठितपणाचा पांघरुणाखालीं केलेला (गुन्हा, पाप इ॰). उदा॰ विवाहित स्त्रीचें परपुरुषगमन इ॰ झांकल्या पाठीनें-क्रिवि. अब्रूदारपणानें; प्रतिष्ठा न गमवितां. तापल्या पाठीनें-क्रिवि. जोंपर्यंत शरीरांत जोम, ताकद, उत्साह आहे तोंपर्यंत; शरीर शिथिल व दुबळें होण्यापूर्वीं. साधितशब्द- पाठचा-वि. १ (एखाद्याच्या) नंतर, पाठीवर जन्मलेला (भाऊ, बहीण इ॰ भावंड). 'मी तुझ्या पाठची बहीण आहे.' -नामना ११२. २ जीव वांचविण्यासाठीं आश्रयास आलेला. [पाठ] म्ह॰ पोटचा द्यावा पाठचा देऊं नये = प्रसंगविशेषीं पोटच्या मुलालाहि बळी द्यावें परंतु शरण आलेल्यास दगा देऊं नये. पाठला-वि. पाठचा अर्थ १ पहा. पाठीं-क्रिवि. १ एखाद्यावर अवलंबून (अस- लेला मुलाबाळाचा परिवार इ॰) 'माझ्या पाठीं चार पोरें आहेत.' २ मागोमाग; पाठीमागें. 'भीमविजय त्यापाठीं नकुळसहदेव ।' -मोप्रस्थान १.२३. ३ नंतर; मागाहून. 'पाठीं आपण जाइजे । अ-मोल-पणें ।' -शिशु ४७४. 'स्वपद पावलीयापाठीं । जेवीं कां वृत्ति होय उफराटी ।' -एरुस्व १.३१. पाठीकडून-क्रिवि. मागें वळून; तोंड मुरडून. 'दिठी मुखाचिये बरवे । जरी पाठी- कडून फावे । तैं आरिसे धांडोळावे लागती काई ।' -अमृ २.७६. पाठीचा-वि. पाठीवर ओझें वाहून नेणारा (घोडा इ॰). पाठीचा कणा-पु. कंबरेपासून मानेपर्यंतच्या शरीरास ताठपणा देणारा हाडांच्या मणक्यांचा पाठींतील दंड; पृष्ठवंश. पाठीचा कोंका-पु. पोंक; कुबड. पाठीचा तखता-पु. पाठीचा पृष्ठभाग; विस्तृत भाग. पाठीं ना पोटीं-क्रिवि. ज्यास पाठचा भाऊ किंवा पोटीं संतति नाहीं अशा व्यापरहित, बेजबाबदार माणसाच्या स्थितीस उद्देशून वापरावयाचा वाक्प्रचार. पाठीमागचा- मागला-मागील-वि. १ (एखाद्या गोष्टीच्या) नंतर, मागाहून घडलेला; नंतरचा; मागला. २ (वडील भावंडाच्या) पाठीवर, नंतर जन्मास आलेला (भाऊ इ॰ भावंड); पाठचा. पाठी मागून-क्रिवि. १ (एखादा पदार्थ, व्यक्ति इ॰कांच्या) मागच्या बाजूनें; पाठीकडून. 'माझ्या पाठीमागून विस्तव नेऊं नकोस.' २ (एखादी गोष्ट, क्रिया इ॰काच्या) नंतर; पश्चात्. 'बाप मेल्यावर पाठीमागून त्यानें पैसा मिळविला.' ३ (एखाद्याच्या) गैरहजेरींत मागें. 'हा पाठीमागून शिव्या देतो.' [स. पश्चात्; प्रा. पच्छा; पं. पिच्छे; दिं. पीछे, पाछे; गु. पाछुं] पाठीमागें- क्रिवि. १ (एखाद्यावर) अवलंबून; आश्रयाखाली 'त्याच्या पाठीमागें मोठा परिवार आहे.' २ (एखाद्याच्या) पश्चात्, मरणा- नंतर. 'त्यास माझ्या पाठी मागें राज्यावर बसविण्याचा अधि- कार मिळें.' -मसाप २.३. ३ (एखादी क्रिया, गोष्ट इ॰कांच्या) नंतर. ४ गैरहजेरींत; परोक्ष; समक्ष नव्हे अशा रीतीनें. म्ह॰ १ आपली पाठ आपणांस दिसत नाहीं = आपल्या अगदीं सान्नि- ध्यांत घडणाऱ्या पण आपणांस माहीत न पडणाऱ्या गोष्टीस- उद्देशून योजावयाची म्हण. २ पाठीवर मारावें पण पोटावर मारूं नये. = एखाद्यास त्याच्या अपराधाबद्दल देहदंड खुशाल करावा पण त्याच्या निर्वाहाचीं साधनें कमी, नाहींशीं करूं नयेत. सामाशब्द- ॰कांब-स्त्री. बांबूच्या पाठीची, बाहेरील बाजूची काढलेली साल, कांबीट. याच्या उलट पोटकांब = आंतील बाजूची काढलेली कांबीट. [पाठ + कांब] ॰कुळी-कुळीस-कोळी- कोळीस, पाठगुळी-गुळीस, पाठंगुळी, पाठंगुळीस- क्रिवि. (एखाद्याच्या) पाठीवर. (क्रि॰ घेणें; मारणें; आणणें; बसणें). [पाठ] ॰कोरा-वि. एकाच बाजूस लिहिल्यानें दुसऱ्या बाजूस कोरा असलेला (कागद). ॰कोरें-न. एका बाजूस न लिहिलेला कागद. ॰गा-वि. पाठीवर स्वारी, ओझें नेण्यास शिकविलेला (घोडा, बैल). (क्रि॰ करणें; होणें). [पाठ] म्ह॰ शेट शहाणे आणि बैल पाठगे ॰गुली-क्रिवि. (ना) पाठकुळी पहा. ॰जाळ-पु. पाठच्या भावंडाचें मरण इ॰ अनिष्ट गोष्टीचा शोक. [पाठ + जाळ] म्ह॰ पाठजाळ पुरवेल पण पोटजाळ पुरवत नाहीं = पाठच्या भावंडाच्या मृत्यूबद्दलच्या शोकापेक्षां पुत्रशोक अधिक भयंकर असतो. ॰तगड- न. (सोनारी धंदा) (सोनें इ॰ धातूच्या) पत्र्याच्या दागिन्यांतील अथवा, पेटी इ॰ सारख्या दागिन्याच्या मागील, तळचा, दृष्टीस न पडणारा भाग. [पाठ + तगड = तकट, पत्रा] ॰थोपटणी-स्त्री. एखाद्यास उत्तेजन देण्याकरितां त्याची पाठ थोपटण्याची क्रिया; शाबासकी; वाहवा. 'कारण युरोपियन कामदारांच्या ह्या पाठ- थोपटणीनें ते फुशारून जाऊन आपलें दोषार्ह वर्तन पूर्ववत् कायम ठेवतील हें सांगावयास नको.' -टि १.१.४६१. [पाठ + थोपटणें] ॰नळ-पुअव. १ पाठीच्या कण्याच्या दोन्ही बाजूंस असलेले कटि प्रदेशाचे दोन नळाकृति स्नायू. याच्या उलट पोटनळ. २ (ल.) बराच वेळ एकाच स्थितींत बसण्यानें, वातादि विकारानें पोट फुगल्यामुळें पृष्ठवंशाच्या दोन्ही बाजूंच्या कमरेजवळ असलेल्या स्नायूंस आलेला जडपणा, ताठरपणा; त्यानें होणारी पीडा [पाठ + नळ] ॰निघ्या-वि. आश्रयाकरितां, रक्षणाकरितां आलेला; शरण आलेला. [पाठ + निघणें] ॰पलाणें-न. १ (विवाहसमारंभांत रूढ) वरपक्षाकडून वराच्या सासूस चोळखण आणि लुगडें यांच्या अहे- रास विनोदानें दिलेलें नांव. २ पायघड्या संपून विहीणी घरांत शिरतांना वरमातेस वराच्या सासूनें खणलुगड्यांचा करावयाचा अहेर. [पाठ + पलाणें] ॰पुरावा-पु. सहाय्य; मदत; पाठिंबा. [पाठ + पुरविणें] ॰पुराव्या-वि. मदत करणारा; साहाय्य, पाठिंबा देणारा. [पाठ + पुरावा] ॰पोट-न. पणतींत बोळकें उपडें घालून, तें सुतानें बांधून मकरसंक्रांतीच्या दिवशीं स्त्रिया परस्परांस देतात तें वाण. -क्रिवि. दोन्ही बाजूंनी, पृष्ठांवर (लिहिलेला, वाचलेला कागद इ॰). [पाठ + पोट] ॰पोटीं-क्रिवि. समोरासमोर. 'जैसी उदया आणिली गोष्टी । तैसी दाखवा प्रत्यक्षदृष्टी । सूर्य जयद्रथ पाठपोटीं । मिरवा महाराजा ।' -नव १२.८९. [पाठ + पोट] ॰फळी-स्त्री. झाड तोडल्यानंतर त्याचे ओंडे सारखे व चौकोनी करण्यासाठीं त्यांच्या बाहेरील चारी बाजूंनीं काढलेली ओबड- धोबड फळ्यांपैकीं प्रत्येक. [पाठ + फळी] ॰बंद-पु. बैलाला, घोड्याला गाडीला जोडण्याचा बंद, पट्टा. -राको. [पाठ + बंद = पट्टा] ॰बळ-न. इष्टमित्र, भाऊबंद इ॰कांची (एखाद्या कार्यास होणारी) मदत, साहाय्य. [पठ + बळ = शक्ती.] ॰बीळ-बेळ- न. (राजा.) बांबूची बाहेरील बाजूची काढलेली कांबटी, चिपाटी; पाठकांब पहा. [पाठ + बीळ = पाटी इ॰ विणण्याची बांबूची चिपाटी.] ॰मोड-स्त्री. पाठीस कळ येईल अशा तऱ्हेचें (लिहिणें, ओझे वाहणें, खणणें इ॰सारखें) कष्टाचें, परिश्रमाचें काम. [पाठ + मोडणें] ॰मोरा-वि. १ पाठ फिरविलेला; (एखाद्या वस्तूकडे) पाठ करून असलेला. २ (ल.) विमुख; पराङ्मुख; विरुद्ध; उलट झालेला; वक्रदृष्टीनें पाहणार. 'माझें अदृष्ट पाठमोरें देख ।' -ह २९.१७७. 'ईश्वर होता पाठमोरा । नसतींच विघ्नें येतीं घरां ।' -क्रिवि. पाठीकडून; पाठीच्या बाजूनें. [पाठ + मोहरा] ॰राखण- राखणा-राख्या-स्त्रीपु. १ लग्नानंतर नव्यानेंच मुलगी सासरीं जातेवेळीं तिला सोबत म्हणून जाणारें माहेरचें माणूस. २ दिवाळ सणाकरितां जांवई सासुरवाडीस जातेवेळीं त्याच्याबरोबर जाणारें माणूस. ३ साहाय्यकर्ता; मदत करणारा; पाठीराखा; वाली. [पाठ + राखणें] ॰रिगा(घा)वा-पु. (कु.) साहाय्य; पाठबळ. [पाठ + रिघणें] ॰रिघ्या-वि. रक्षणाकरितां आश्रयाची याचना करणारा; शरण गेलेला. [पाठ + रिघणें] ॰लग-पु. (प्रा.) सान्निध्यांत, चिकटून (विद्यादि साधनाकरितां शिष्यानें गुरूजवळ इ॰सारखें) राहणें. 'तूं त्याचा पाठलाग सोडूं नको म्हणजे बरें होईल.' [पाठ + लग] ॰लाग-पु. १ (एखाद्यास पकडण्याकरितां त्याच्या) पाठोपाठ जाणें; पिच्छा पुरविणें; पाठपुरावा. २ तपास; छडा. ॰वटीं-डीं-क्रिवि. (राजा.) (एखादें कार्य आरंभिलें जात असतांना, केलें जात असतांना) पाठपुराव्यास; पाठबळ देण्यास; मागे; पाठीस (असणें). [पाठ] ॰वशास-क्रिवि. पाठीमागें -राको. ॰वळ-न. १ स्वारी वहाण्यासाठीं शिकवून तयार केलेलें जनावर. २ ओझ्याचें जनावर (विशेषतः घोडा). ३ (ल.) कोणतेंहि काम मुकाट्यानें करणारा धट्टाकट्टा किंवा धिम्मा मनुष्य. ४ (ल.) नेहमीं थट्टेचा विषय बनणारा सोशिक मनुष्य. ५ (ल.) गलेलठ्ठ स्त्री. ६ (ल.) रखेली; राख. [पाठ + वळणें] म्ह॰ शेट शाहणा आणि बैल पाठवळ. ॰वळण-न. नवरा मुलगा आपल्या सासूस लुगडें चोळी देतो त्याला विनोदानें म्हणतात. -थोमारो २.३५७. ॰वाड-स्त्री. मदत; पाठपुरावा. [पाठ] ॰शिंगी-गा-ग्या-वि. ज्याचीं शिंगें मागें, पाठीकडे वळलेलीं आहेत असें (जनावर). [पाठ + शिंग] ॰शील-न. (कों.) नारळावरील काथ्याच्या आच्छादनावरील साल, त्वचा; नारळाच्या चोडाची साल. [पाठ + साल] ॰सरीं-क्रिवि. मागच्या बाजूस. पाठाण-न. (को.) १ पाठ; पाठीवर मारतांना किंवा तिच्यावरील फोड इ॰ दुखतांना तिरस्कारानें म्हणतात. 'माझे पाठाणांत कळ आली.' -रोज्यु ९४. २ (राजा.) चोळीचा पाठीचा तुकडा. [पाठ] पाठावळ-ळू-स्त्री. (कों.) घराचें आढें. 'आज घराची पाठावळ बसवावयाची आहे.' [पाठ + वळ प्रत्यय] पाठाळ-न. पाठीवरून ओझें, मनुष्य वाहून नेणारें बैल, घोडा इ॰ जनावर; पाठवळ. 'जो जैसें काम सांगत । तितुकें करी वैष्णव- भक्त । चारा पाणी आणूनि देत । पाठाळे बांधीत निजांगें ।' 'कोस- पर्यंत गिल्चे यांनीं पाठलाग केला, परंतु पाठाळ सक्त शीर (?) होतें म्हणून तशांतून (पार्वतीबाई) निभाऊन गेली.' -भाब १५४. (नवी प्रत). -वि. १ मोठ्या, रुंद पाठीचें (जनावर). २ चांगल्या पाठीचा (घोडा). ३ ओझीं वाहण्याच्या उपयोगाचा (घोडा इ॰ जनावर). [पाठ] पाठीमागून-क्रिवि. नंतर; पश्चात्. पाठुं(ठों)गळीं- क्रिवि. पाठीवर. पाठकुळी पहा. [पाठ] पाठून-क्रिवि. पाठीमागून पहा. पाठेळ-न. ओझ्याचें जनावर; पाठवळ. 'पाठेळ करितां न साहावे वारा । साहेलिया ढोरा गोणी चाले ।' -तुगा २७९३. पाठोपाठ-ठी-ठीं-क्रिवि. १ लागलीच; मागोमाग. २ पाठीमागें; लागोपाठ. 'देव भोळा धांवे भक्तापाठोपाठीं ।' -तुगा १३. [पाठ द्वि.] पाठोवाटा-टीं-ठीं-क्रिवि. १ पाठोपाठ; मागेंमागें; पाठीमागें. 'देखौनि श्रीमूर्ति उघडी । ब्रह्मविद्या डोळे मोडी । मुक्ति धांवे उघडी । पाठोंवाठीं ।' -शिशु ३७२. 'धांवे योषितांचे पाठो- वाटी ।' -एभा ८.१६४. २ वरचेवर; वारंवार; एकामागून एक. 'कां पाठोवाटीं पुटें । भांगारा खारु देणें घटे ।' -ज्ञा १८.१५७. [पाठ द्वि.] पाठोशीं-क्रिवि. पाठीमागें. [पाठ] पाठ्याळ- न. पाठवळ अर्थ १ व २ पहा. [पाठ]

दाते शब्दकोश

दुर्

अ. दुष्टपणा; वाईटपणा, कठिणपणा, दुःख इ॰कांच्या वाचक शब्दापूर्वीं योजावयाचा उपसर्ग. जसें:-दुराचार = वाईट वर्त- णूक; दुर्लभ = मिळण्यास कठिण; दुस्सह = सहन करण्यास कठिण इ॰. याचीं संधिनियमानुरूप दुर्, दुस्, दुष्, दुश् इ॰ रूपें होतात. जसें:- दुर्लभ दुष्कर, दुश्चल, दुस्सह, दुस्साध्य, दुराचार, दुरंत इ. हा उपसर्ग जोडून अनेक सामासिक शब्द बनतात. त्यांपैकीं कांहीं येथें दिले आहेत. दुरंत-वि. १ अपार; अनंत; अमर्याद; अंत लागण्यास कठिण असा (मोह, माया इ॰). २ अतिशय कठिण; तीव्र (दुःख इ॰). [दुर् + अंत = शेवट] दुरतिक्रम-वि. ओलांडून जाण्यास कठिण; दुस्तर; दुर्लंघ्य. २ असाध्य. [दुर् + अतिक्रम = ओलांडणें] दुरत्यय-यी-वि. १ नाश करून टाकण्यास कठिण. २ प्रतिबंध करण्यास, टाळण्यास कठिण; अपरिहार्य. ३ असाध्य (दुःख, आजार, रोग इ॰). अप्रतीकार्य (अडचण, संकट). ४ मन वळ- विण्यास कठिण असा (मनुष्य); दुराराध्य. [दुर् + अत्यय = पार पडणें, जाणें इ॰] दुरदृष्ट-न. दुर्दैव; वाईट अदृष्ट. 'कीं आड आलें दुरदृष्ट माझें ।' -सारुह १.१०. [दुर् + अदृष्ट] दुरधिगम्य- वि. १ समजण्यास कठिण; दुर्बोध; दुर्ज्ञेय. २ दुष्प्राप्य; मिळण्यास कठिण; दुर्गम. [दुर् + सं. अधि + गम् = मिळविणें] दुरभिमान-पु. पोकळ, वृथा, अवास्तव अभिमान; फाजील गर्व. [दुर् + अभिमान] दुरवबोध-वि. दुर्बोध; गूढ. [दुर् + सं. अव + बुध् = जाणणें] दुरा- कांक्षा-स्त्री. दुष्प्राप्य वस्तूचा अभिलाष. [दुर् + आकांक्षा = इच्छा, अभिलाष] दुराग्रह-पु. हट्ट, लोकविरोध, शास्त्रविरोध, संकटें इ॰ कांना न जुमानतां एखाद्या गोष्टीचा पिच्छा पुरविण्याचा हट्ट; अनिष्ट आग्रह. 'न सुखद दुराग्रह सखा हा सर्वाऽनर्थ गेह ठक राया ।' -मोकर्ण ४६.५०. [दुर् = वाईट + आग्रह = हट्ट] दुराग्रही-वि. दुरा- ग्रह धरण्याचा ज्याचा स्वभाव आहे असा; हेकेखोर; हटवादी; हट्टी. [दुराग्रह] दुराचरण, दुराचार-नपु. निंद्य, वाईट, वागणूक; दुर्वर्तन; दुष्ट आचरण. [दुर् = दुष्ट + सं. आचरण = वर्तन] दुराचरणी, दुराचारी-वि. निंद्य, वाईट, दुष्ट वर्तनाचा; बदफैली. [दुराचार] दुरात्मत्व-न. १ दुष्ट अंतःकरण; मनाचा दुष्टपणा. २ दुष्ट कृत्य. 'किमपि दुरात्मत्व घडलें ।' [दुर् = दुष्ट + आत्मा = मन] दुरात्मा- वि. दुष्ट मनाचा (मनुष्य); खट; शठ. [दुर् + आत्मा] दुरा- धर्ष-वि. जिंकण्यास, वर्चस्वाखालीं आणण्यास कठिण. [दुर् + सं. आ + धृष् = जिंकणें] दुराप-वि. मिळविण्यास कठिण; दुर्लभ; अप्राप्य. 'राया, भीष्माला जें सुख, इतरां तें दुराप, गा, स्वापें ।' -मोभीष्म ६.२९. दुराप(पा)स्त-वि. घडून येण्यास कठिण; दुर्घट; असंभाव्य. 'वाळूचें तेल काढणें ही गोष्ट दुरापस्त आहे.' [दुर् + सं. अप + अस् = ] दुराराध्य-वि. संतुष्ट, प्रसन्न करण्यास कठिण, अशक्य; मन वळविण्यास कठिण. 'मोक्षु दुराराध्यु कीर होय । परि तोही आराधी तुझे पाय ।' -ज्ञा ११.९९. [दुर् + सं. आराध्य] दुराशा-स्त्री. निरर्थक, फोल, अवास्तव आशा, दुष्प्राप्य गोष्टीची आशा दुष्ट वासना. 'आम्हास अन्न खावयास मिळेना आणि पालखींत बसण्याची दुराशा धरावी हें चांगलें नव्हे.' 'दुराशागुणें जो नव्हे दैन्यवाणी ।' -राम १६८. [दर् + आशा] दुरासद-वि. कष्टानें प्राप्त होणारें; जिंकण्यास, मिळण्यास कठिण. [दुर् + सं. आ + सद = मिळ विणें] दुरित-न. पाप; पातक; संचितकर्म. 'पुन्हां न मन हे मळो दुरित आत्मबोधें जळो ।' -केका ११९. [दुर् + सं. इ = जाणें] दुरुक्त-न. वाईट, दुष्टपणाचें, अश्लील भाषण; शिवी; अपशब्द; दुर्भाषण; अश्लील बोलणें. [दुर् + उक्ति = बोलणें] दुरुत्तर-न. अप मानकारक, उर्मटपणाचें उत्तर; दुरुक्ति. [दर् + उत्तर] दुरुद्धर-वि. खंडण करण्यास, खोडून काढण्यास कठिण असा (पूर्वपक्ष, आक्षेप, आरोप). 'या सिद्धांतावर दोष दिला हा सर्वांस दुरुद्धर आहे.' [दुर् + सं. उद् + धृ = काढून टाकणें; वर, बाहेर काढणें] दुरूह-वि. दुर्बोध; गूढ; अतर्क्य. 'ईश्वरानें सृष्टि कशी उत्पन्न केली हें सर्वांस दुरूह आहे.' [दुर् + सं. ऊह् = अनुमानणें] दुर्गत-वि. गरीब; दिन; दरिद्री; लाचार. 'झांकी शरपटलानीं आढ्य जसा दुर्गतांसि वस्त्रांनीं ।' -मोभीष्म ९.६५. [दुर् + सं. गत = गेलेला] दुर्गति-स्त्री. १ दुर्दशा; वाईट स्थिति; संकटाची, लाजिरवाणी स्थिति; अडचण; लचांड. २ नरक; नरकांत पडणें. [दुर् + गति = स्थिति] दुर्गंध- गंधी-पुस्त्री. घाण; वाईट वास. -वि. घाण वास येणारें [दुर् = वाईट + सं. गंध = वास] ॰नाशक-वि. (रसा.) दुर्गंधाचा नाश करणारें; (इं.) डिओडरंट्. [दुर्गध + सं. नाशक = नाश करणारा] दुर्गंधिल-वि. (रासा.) आर्सेनिक व मेथिल यांच्या संयोगापासून बनलेला विषारी, दुर्गंधी (पदार्थ) (इं.) कॅको- डिल्. दुर्गम-वि. जाण्यास कठिण (स्थळ, प्रदेश इ॰). [दुर् + सं + गम् = जाणें] दुर्गुण-पु. वाईट गुण; दोष; अवगुण; दुर्मार्गाकडील कल. (क्रि॰ आचरणें). [दुर् + गुण] दुर्गुणी-वि. वाईट गुणांचा; अवगुणी; दुराचरी; दुर्वर्तनी. [दुर्गुण] दुर्घट-वि. धड- वून आणण्यास, घडून येण्यास, सिद्धीस नेण्यास कठिण. [दुर् + सं. घट् = घडणें, घडवून आणणें] दुर्घटना-स्त्री. अशुभ, अनिष्ट गोष्ट घडणें; आकस्मिक आलेलें संकट, वाईट परिस्थिति. [दुर् + सं. घटना = स्थिति] दुर्घाण-स्त्री. दुस्सह घाण; ओरढाण; उग्रष्टाण. [दुर् + घाण] दुर्जन-पु. वाईट, दुष्ट मनुष्य. [दुर् + जन = मनुष्य, लोक] दुर्जय-वि. १ जिंकण्यास कठिण. २ दुस्साध्य; दुस्तर. [दुर + सं. जि = जिंकणें] दुर्जर-वि. पचविण्यास, विरघळ- ण्यास कठिण. [दुर् + सं. जृ = जिरणें] दुर्दम-वि. दमन करण्यास, वर्चस्वाखालीं आणण्यास कठिण. 'तिला इंग्लंडांतील प्रबल व दुर्दम प्रजाजनांच्या अडथळ्याशिवाय दुसरें कोणतेंच नियमन नसे.' -पार्ल ६. [दुर् + दम्] दुर्दर्श-वि. दिसण्यास, पाहण्यास कठिण; अतिशय अस्पष्ट. [दुर् + सं. दृश् = पाहणें] दुर्दशा-स्त्री. अवनतीची, अडचणीची, संकटाची, वाईट, दुःखद स्थिति; दुर्गति; दुःस्थिति. 'भिजल्यामुळें शालजोडीची दुर्दशा जाली.' [दुर् + दशा = स्थिति दुर्दिन-न. १ वाईट दिवस. २ अकालीं अभ्रें आलेला दिवस. ३ वृष्टि. -शर. [दुर् + सं. दिन = दिवस] दुर्दैव-न. कमनशीब; दुर्भाग्य. 'कीं माझें दुर्दैव प्रभुच्या मार्गांत आडवें पडलें ।' -मोसंशयरत्नमाला (नवनीत पृ. ३४९). -वि. कम- नशिबी; अभागी. [दुर् + दैव = नशीब] दुर्दैवी-वि. अभागी; कम- नशिबी. [दुर्दैव] दुर्धर-पु. एक नरकविशेष. [सं.] दुर्धर- वि. १ धारण, ग्रहण करण्यास कठिण. २ दुस्साध्य; दुष्प्राप्य. ३ (काव्य) (व्यापक) बिकट; खडतर; असह्य; उग्र; कठिण. 'तप करीत दुर्धर । अंगीं चालला घर्मपूर ।' ४ भयंकर; घोर; भयानक. 'महादुर्धर कानन ।' [दुर् + सं. धृ = धरणें, धारण करणें] दुर्धर्ष- वि. दुराधर्ष; दमन करण्यास, वर्चस्वाखालीं आणण्यास कठिण; दुर्दम्य; अनिवार्य. [दुर् + धृष् = जिंकणें, वठणीवर आणणें] दुर्नाम- न. अपकीर्ति; दुष्कीर्ति; बदनामी. [दुर् + सं. नामन् = नांव] दुर्नि- मित्त-न. अन्याय्य, निराधार कारण, सबब, निमित्त. [दुर् + निमित्त = कारण] दुर्निर्वह-वि. १ दुःसह; असह्य; सहन करण्यास कठिण; निभावून जाण्यास, पार पडण्यास कठिण (अडचण, संकट). २ दुस्साध्य; दुष्कर; [दुर् + सं. निर् + वह्] दुर्निवार, दुर्निवा- रण-वि. १ निवारण, प्रतिबंध करण्यास कठिण; अपरिहार्य; अनि- वार्य. २ कबजांत आणण्यास कठिण; दुर्दम्य. [दुर् + नि + वृ] दुर्बल-ळ-वि. १ दुबला; अशक्त; असमर्थ. २ गरीब; दीन; दरिद्री. 'ऐसें असतां एके दिवशीं । दुर्बळ द्विज आला परियेसीं ।' -गुच ३८.७. [दुर् + बल = शक्ति] दुर्बळी-वि. (काव्य.) दुर्बळ पहा. दुर्बुद्ध-वि. १ दुष्ट बुद्धीचा; खुनशी वृत्तीचा. २ मूर्ख; मूढ; मंदमति; ठोंब्या. [दुर् + बुद्धि] दुर्बुद्धि-स्त्री. १ दुष्ट मनोवृत्ति; खुनशी स्वभाव; मनाचा दुष्टपणा. 'दुर्बुद्धि ते मना । कदा नुपजो नारायणा ।' -तुगा ७९८. २ मूर्खपणा; अनिष्ट परिणामकारक बुद्धि. -वि. दुष्ट मनाचा; दुर्बुद्ध पहा. [दुर् + बुद्धि] दुर्बोध-वि. समजण्यास कठिण (ग्रंथ, भाषण इ॰) [दुर् + बोध् = समजणें, ज्ञान] दुर्भग-वि. कमनशिबी; दुर्दैवी; भाग्यहीन. [दुर् + सं. भग = भाग्य] दुर्भर-वि. भरून पूर्ण करण्यास कठिण; तृप्त करण्यास कठिण (पोट, इच्छा, आकांक्षा). 'इंद्रियें वज्रघातें तपे उष्ण वरी ज्वाळ । सोसिलें काय करूं दुर्भर हे चांडाळ ।' -तुगा ३५४. -न. (ल.) पोट. 'तरा दुस्तरा त्या परासागरातें । सरा वीसरा त्या भरा दुर्भरातें ।' -राम ८०. [दुर् + सं. भृ = भरणें] दुर्भ्यक्ष्य-वि. खाण्यास कठिण, अयोग्य; अभ्यक्ष्य. [दुर् + सं. भक्ष्य = खाद्य] दुभोग्य-न. कमनशीब; दुर्दैव. -वि. दुर्दैवी; अभागी. [दुर् + सं. भाग्य = दैव] दुर्भावपु. १ दुष्ट भावना; कुभाव; द्वेषबुद्धि. २ (एखाद्याविषयींचा) संशय; वाईट ग्रह; (विरू.) दुष्टभाव. [दुर् + भाव = भावना, इच्छा] दुर्भाषण-न. वाईट, अपशब्दयुक्त, शिवीगाळीचें बोलणें; दुर्वचन पहा. [दुर् + भाषण = बोलणें] दुर्भिक्ष-न. १ दुष्काळ; महागाई. २ (दुष्काळ इ॰ कांत होणारी अन्नसामुग्री इ॰ कांची) टंचाई; कमीपणा; उणीव. [सं.] ॰रक्षित-वि. दासांतील एक प्रकार; आपलें दास्य करावें एतदर्थ दुष्काळांतून वांचविलेला (दास, गुलाम इ॰). -मिताक्षरा-व्यवहारमयूख दाय २८९. [दुर्भिक्ष + सं. रक्षित = रक्षण केलेला] दुर्भेद-वि. बुद्धीचा प्रवेश होण्यास कठिण; दुर्बोध. 'तैसें दुर्भेद जे अभिप्राय । कां गुरुगम्य हन ठाय ।' -ज्ञा ६.४५९. [दुर् + सं. भिद् = तोडणें] दुर्भेद्य-वि. फोडण्यास, तुकडे करण्यास कठिण (हिरा; तट). [दुर् + सं. भेद्य = फोडण्यासारखा] दुर्मति-स्त्री. १ दुर्बुद्धि; खाष्टपणा; कुटिलपणा. २ मूर्खपणा; खूळ; वेडेपणा. -पु. एका संवत्सराचें नांव. -वि. १ दुष्ट बुद्धीचा; खाष्ट स्वभावाचा. २ मूर्ख; खुळा; वेडा. [दुर् + मति = बुद्धि, मन] दुर्मद-पु. दुराग्रहीपणा; हेकेखोरी; गर्विष्ठपणाचा हटवादीपणा. 'किती सेवाल धन दुर्मदा' -अमृतपदें ५८. -वि. मदांध; मदोन्मत्त; गर्विष्ठ. 'सावियाचि उतत होते दायाद । आणि बळिये जगीं दुर्मद ।' -ज्ञा ११.४८०. [दुर् + मद = गर्व] दुर्मनस्क, दुर्मना-वि. खिन्न; उदास मनाचा; विमनस्क; दुःखित. [दुर् + सं. मनस् = मन] दुर्मरण-न (वाघानें खाऊन, पाण्यांत बुडून, सर्प डसून इ॰ प्रकारांनीं आलेला) अपमृत्यु; अपघातानें आलेलें मरण; अमोक्षदायक मरण. [दुर् + मरण] दुर्मि(र्मी)ल-ळ- वि. मिळण्यास कठिण; दुर्लभ. [दुर् + सं. मिल् = मिळणें] दुर्मुख- पु. एका संवत्सराचें नांव. -वि. १ घुम्या; कुरठा; तुसडा; आंबट तोंडाचा. २ तोंडाळ; शिवराळ जिभेचा. 'दुर्मुखी स्त्रीचा त्याग करून । संन्यास ग्रहण करावा ।' [दुर् + मुख] दुर्मुखणें- अक्रि. तोंड आंबट होणें; फुरंगुटणें; गाल फुगविणें; (एखाद्या कार्याविषयीं) उत्साहशून्यतेची चर्या धारण करणें. 'खायास म्हटलें म्हणजे हांसत येतात आणि उद्योगाचें नांव घेतलें म्हणजें लागलेच दुर्मुखतात.' [दुर्मुख] दुर्मुखला-वि. आंबट चेहर्‍याचा; घुम्या; कुरठा; तुसडा. [दुर्मुख] दुर्मेधा-वि. १ मंदबुद्धीचा. २ दुष्ट स्वभावाचा; दुर्मति. [दुर् + सं. मेधा = बुद्धि] दुर्योग-पु. सत्ता- वीस योगांतील अशुभ, अनिष्ट योगांपैकीं प्रत्येक. [दुर् + योग] दुर्लंघ्य-वि. १ ओलांडता येण्यास कठिण; दुस्तर (नदी इ॰). २ मोडता न येण्यासारखी, अनुल्लंघनीय (आज्ञा, हुकूम, शपथ इ॰) ३ निभावून जाण्यास कठिण (संकट, अडचण इ॰). ४ घालविण्यास, दवडण्यास, क्रमण्यास, नेण्यास कठिण (काळ, वेळ इ॰). [दुर् + सं. लंघ्य = ओलांडावयाजोगें] दुर्लभ-वि. मिळण्यास कठिण; अलभ्य; दुर्मिळ; दुष्यप्राप्य; विरळा. 'अलीकडे आपलें दर्शन दुर्लभ जालें. दुर्ललित-न. चेष्टा; खोडी. 'आमच्या विविध दुर्ललिताबद्दल गुरुजींनीं कसें शासन केलें...' -आश्रमहारिणी ७. [दुर् + सं. ललित = वर्तन, चेष्टा] दुर्लक्ष-न. लक्ष नसणें; हयगय; निष्काळजी- पणा; गफलत; अनवधान. -वि. १ लक्ष न देणारा; अनवधानी; गाफील; बेसावध, 'तुम्ही गोष्ट सांगीतली पण मीं दुर्लक्ष होतों म्हणून ऐकिली नाहीं.' २ दिसण्यास, समजण्यास कठिण; 'ईश्वराचें निर्गुण स्वरूप दुर्लक्ष आहे.' [दुर् + सं. लक्ष्य] दुर्लक्षण- न. १ (मनुष्य, जनावर इ॰ कांचें) अशुभसूचक लक्षण, चिन्ह; दुश्चिन्ह; दोष; वाईट संवय; खोड; दुर्गुण. 'हा घोडा लात मारतो एवढें यामध्यें दुर्लक्षण आहे.' [दुर् + लक्षण = चिन्ह] दुर्लक्षण-णी- वि. १ दुर्लक्षणानें, वैगुण्यानें युक्त (मनुष्य, घोडा इ॰). (विरू.) दुर्लक्षणी. २ दुर्गुणी; दुराचारी; दुर्वर्तनी. दुर्लक्ष्य-वि. १ बुद्धीनें, दृष्टीनें अज्ञेय; अगम्य. २ दुर्लक्ष इतर अर्थीं पहा. [दुर् + सं. लक्ष्य] दुर्लौकिक-पु. अपकीर्ती; दुष्कीर्ति; बेअब्रू; बदनामी; कुप्रसिद्धि. [दुर् + लौकिक = कीर्ति] दुर्वच, दुर्वचन, दुर्वाक्यन. १ वाईट बोलणें; दुर्भाषण; अशिष्टपणाचें, अश्लील, शिवीगाळीचें भाषण. २ अशुभ, अनिष्टसूचक भाषण. [सं. दुर् + वचस्, वचन, वाक्य = बोलणें] दुर्वह-वि. १ वाहण्यास, नेण्यास कठिण. २ सोसण्यास, सहन करण्यास कठिण. [दुर् + सं. वह् = वाहणें, नेणें] दुर्वाड- वि. अतिशय मोठें; कठिण. -शर. प्रतिकूल. [दुर् + वह्] दुर्वात- उलट दिशेचा वारा. 'तुज महामृत्युचिया सागरीं । आतां हे त्रैलोक्यजीविताची तरी । शोकदुर्वातलहरी । आंदोळत असे ।' -ज्ञा ११.३४८. [दुर् + सं. वात = वारा] दुर्वाद-पु. वाईट शब्द; दुर्वच; वाईट बोलणें; भाषण. 'हां गा राजसूययागाचिया सभासदीं । देखतां त्रिभुवनाची मांदी । कैसा शतधा दुर्वादी । निस्तेजिलासी ।' -ज्ञा ११.१०१. [दुर् + वाद = बोलणें] दुर्वारवि. दुर्निवार; अनिवार्य; टाळण्यास, प्रतिकार करण्यास कठिण; अपरिहार्य. २ आवरतां येण्यास कठिण; अनिवार; अनावर. [दुर् + वारणें] दुर्वास-पु. १ (व.) सासुरवास; कष्ट; त्रास; जाच. [दुर् + वास = राहणें] दुर्वासना-स्त्री. वाईट इच्छा; कुवासना; दुष्प्रवृत्ति. [दुर् + वासना] दुर्विदग्ध-वि. विद्येंत न मुरलेला तथापि विद्येचा गर्व वाहणारा; अर्ध्या हळकुंडानें; पिवळा झालेला. [दुर् + सं. विदग्ध = विद्वान्] दुर्विपाक-पु. वाईट परिणाम. [दुर् + सं. विपाक = परिणाम] दुर्विभावनीय-वि. समजण्यास, कल्पना करण्यास कठिण. [दुर् + सं. विभावनीय = कल्पना करतां येण्यासारखें] दुर्वृत्ति-स्त्री. दुराचारी; दुर्व्यसनी; दुर्वर्तनी. [दुर् + सं. वृत्त = वागणूक] दुर्वत्ति-स्त्री. दुराचरण; भ्रष्टाचार; बदफैली. [दुर् + सं. वृत्ति = वर्तन] दुर्व्यसन-न. दुराचरणाची संवय; द्यूत, मद्यपान, वेश्यागमन इ॰कांसारखें वाईट व्यसन. 'दुर्व्यसन दुस्तरचि बहु सूज्ञासहि फार कंप देतें हो' -वत्सलाहरण. [दुर् + व्यसन] दुर्व्यसन-नी-वि. वाईट व्यसन, संवय लागलेला; दुराचारी; बदफैली. (प्र.) दुर्व्यसनी. दुर्व्रात्य-वि. अतिशय दुष्ट; व्रात्य; खोडकर; खट्याळ; (मुलगा अथवा त्यांचें आचरण). [दुर् + व्रात्य = खोडकर, द्वाड] दुर्हृद, दुर्हृदय-वि. वाईट, दुष्ट मनाचा. [दुर् + सं. हृदु, हृदय = मन] दुर्ज्ञेय-वि. समजण्यास कठिण; गूढ; गहन. 'ही पद्धत कशी सुरू झाली असावी हें समजणें दुर्ज्ञेय आहे.' -इंमू ७६. [दुर् + सं. ज्ञेय = समजण्याजोगें] दुःशक- वि. करण्यास कठिण; अशक्यप्राय. [दुस् + सं. शक् = शकणें] दुःशकुन-पु. अपशकुन; अनिष्टसूचक चिन्ह. [दुस् + शकुन] दुश्शील, दुःशील-वि. वाईट शीलाचा; दुराचरणी. [दुस् + शील] दुश्चरित्र-न. पापाचरण; दुष्कृत्य. [दुस् + चरित्र] दुश्चल-वि. (अक्षरशः व ल.) पुढें जाण्यास, सरसावण्यास, चालण्यास कठिण. [दुस् + सं. चल् = चालणें] दुश्चि(श्ची)त-वि. १ (काव्य) अयोग्य, चुकीचा, अपराधी (माणूस, कृत्य). 'अंगुष्ठ धरुनि मस्तकपर्यंत । अखंड दुश्चित आचरलों ।' २ खिन्न; उदास; दुःखी. 'राजा प्रजा पिडी । क्षेत्री दुश्चितासी तोडी ।' -तुगा २९८४. [सं. दुश्चित अप.] दुश्चित्त-वि. १ खिन्न; दुर्मनस्क; दुःखित; उदास; उद्विग्न. 'अबदुल्याची खबर ऐकतां मनांत झाले दुश्चित ।' -ऐपो १३२. २ क्षुब्ध. 'परी कुंडलिनी नावेक दुश्चित्त होती । ते तयातें म्हणे परौती ।' -ज्ञा ६.२३८ [दुस् + चित्त = मन] दुश्चिंत- वि. (काव्य) खिन्न; दुःखी; उदास; दुश्चित्त अर्थ २ पहा. 'डोळे लावुनियां न होतों दुश्चिंत । तुझी परचीत भाव होती ।' [दुश्चित अप.] दुश्चिन्ह-न. अशुभ, वाईट लक्षण; अपशकुन. 'दुश्चिन्हें उद्भवलीं क्षितीं । दिवसा दिवाभीतें बोभाति ।' [दुस् + चिन्ह] दुश्शाप-पु. वाईट, उग्र, खडतर शाप. [दुस् + शाप] दुश्शासन-पुविना. दुर्योधनाचा भाऊ. -वि. व्यवस्था राख- ण्यास, अधिकार चालविण्यास कठिण. [दुस् + शासन = अधिकार चालविणें] दुष्कर-वि. १ करण्यास कठिण; बिकट; अवघड. 'म्हणोनि अभ्यासासि कांहीं । सर्वथा दुष्कर नाहीं ।' -ज्ञा १२.११३. २ दुष्परिणामकारक. -मोल. [दुस् + सं. कृ = करणें] दुष्कर्म-न. वाईट, पापी, दुष्टपणाचें कृत्य; कर्म. [दुस् + कर्म] दुष्कर्मा, दुष्कर्मी-पु. दुष्ट कृत्य करणारा; पापी; दुरात्मा. [दुस् + कर्मन्] दुष्काल-ळ-पु. अतिवृष्टि किंवा अनावृष्टि होऊन पिकें बुडून अन्नाची वाण पडते तो काळ; दुकाळ; महागाई. 'जैसा रोगिया ज्वराहूनि उठिला । कां भणगा दुष्काळु पाहला ।' -ज्ञा ११.४२८. [दुस् + काल] म्ह॰ दुष्काळांत तेरावा महिना = दुष्का- ळांत वर्षाचे बारा महिने काढतां काढतांच मुष्कील पडते. अशा वेळीं अधिक मास (तेरावा महिना) आला म्हणजे संकटातं भर पडते असा अर्थ. दुष्कीर्ति-स्त्री. अपकीर्ती; बदनामी; बेअब्रू. [दुस् = कीर्ति] दुष्कृत-ति-नस्त्री. १ पापकर्म; वाईट कृत्य. 'आणि आचरण पाहातां सुभटा । तो दुष्कृताचा कीर सेल वांटा ।' -ज्ञा ९.४१६. २ कृतींतील. वागणुकींतील दुष्टपणा. [दुस् + कृत- ति] दुष्प्रतिग्रह-पु. जो प्रतिग्रह (दानाचा स्वीकार) केला असतां, स्वीकारणारा अधोगतीस जातो तो; निंद्य प्रतिग्रह; अशुभप्रसंगीं केलेलें दान स्वीकारणें; वाईट कृत्याबाबत स्वीकारलेलें दान इ॰. उदा॰ वैतरणी, शय्या, लोखंड, तेल, म्हैस हे दुष्प्रतिग्रह होत. [दुस् + सं. प्रतिग्रह = दान स्वीकारणें] दुष्प्राप-प्य-वि. दुर्लभ; मिळण्यास कठिण; विरळा; दुर्मिळ. [दुस् + सं. प्र + आप् = मिळ- विणें] दुस्तर-वि. तरून जाण्यास, पार पडण्यास कठिण. 'समुद्रापेक्षां हा संसार मला दुस्तर वाटतो.' -न. (ल.) संकट. 'थोर वोढवलें दुस्तर । तुटलें सासुरें माहेर ।' -एरुस्व ८.५५. [दुस + सं तृ = तरणें] दुस्पर्श-वि. स्पर्श करण्यास कठिण, अयोग्य. [दुस् + सं. स्पृश् = स्पर्श करणें] दुस्संग-पु. दुष्टांची संगत; कुसंगति. [दुस् + संग] दुस्सह-वि. सहन करण्यास कठिण; असह्य. [दुस् + सं. सह् = सहन करणें] दुस्सही-वि. (प्र.) दुस्सह स्सह अप.] दुस्साध्य-वि. १ सिद्धीस नेण्यास, साधावयास कठिण. 'थोर वय झाल्यावर विद्या दुःसाध्य होते.' २ बरा करण्यास कठिण (रोग, रोगी). आटोक्यांत आणण्यास कठिण (शत्रु, अनिष्ट गोष्ट, संकट इ॰). [दुस् + सं. साध्य = साधण्यास सोपें] दुस्स्वप्न-न. १ अशुभसूचक स्वप्न. २ (मनांतील) कुतर्क, आशंका, विकल्प. [दुस् + स्वप्न] दुस्स्वभाव-पु. वाईट, दुष्ट स्वभाव. -वि. वाईट, दुष्ट स्वभावाचा. [दुस् + स्वभाव]

दाते शब्दकोश