तेरा मराठी शब्दकोशांमधील ३,००,८७५ शब्दांचा एकत्रित संग्रह
संबंधित शब्द
अभिविन्यसन
न. (वाणिज्य.) प्रदर्शन; प्रगटीकरण; वातायन.
गोखला
१. कोनाडा. २. गवाक्ष; खिडकी; वातायन; जाळी; झरोका. पहा : गोख, गोखडा [सं. गवाक्ष] गोखा
गोखला
१ कोनाडा. २ गवाक्ष; खिडकी; वातायन; जाळी; झरोका. गोख, गोखडा पहा. [सं. गवाक्ष, गोअक्ष- गोख + ल]
खिडकी
स्त्री. १. गवाक्ष; वातायन; तावदान; जाळी; झरोका; बारी; मागचे दार; दिंडी; फाटक; वेसकट; पक्षद्वार (गुप्तदार); हवा व उजेडाकरिता केलेले लहान दार : ‘त्या खिडकीस एक लहानशी दुसरी खिडकी होती.’ - धकु ५३. २. (ल.) क्षुल्लक, लंगडी सबब; पळवाट; सुटण्यास जागा, सवड. ३. देवळाच्या गाभाऱ्याच्या दोन्ही बाजूंना गज किंवा गरादे लावून तयार केलेल्या पडव्या. (गो.) [सं. खडक्किका]
खिडकी
स्त्री. १ गवाक्ष; वातायन; जाळी; झरोका; बारी; मागचें दार; दिंडी; फाटक; वेसकट; पक्षद्वार (गुप्तदार); हवा व उजेडाकरितां केलेलें लहान दार. 'त्या खिडकीस एक लहानशी दुसरी खिडकी होती' -धर्माजीरावाचें कुटुंब पृ. ५३. २ (ल.) क्षुल्लक, लंगडी सबब; पळवाट; सुटण्यास जागा, सवड. ३ (गो.) देवळाच्या गाभार्याच्या दोन्ही बाजूंस गज किंवा गरादे लावून तयार केलेल्या पडव्या. [सं. पक्षद्वारं खडक्किका-त्रिकांड शेष; सं. खडक्किका; प्रा.खडुकी अथवा खडक्किआ, खडक्की; का. किडकी; हिं. खिडकी; ते. किटिकी] ॰दार-वि. चौकडीदार; पोफळी; खिडकीच्या आकाराची वेलपत्ती काढलेलें; एकाआड एक रंगाच्या चौकडीचें व जाड सुतांनीं स्पष्ट मर्यादा दाखविणारें (कापड). [हिं. खिडकीदार]
ventilation
वातायन