आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह!
शब्दार्थ
विदग्ध
विदग्ध vidagdha p (S) Burned to ashes, burned thoroughly. 2 Half-digested, ill-concocted--food. 3 Half-scorched and half-raw--dressed food. 4 Well roast- ed, toasted, or broiled. Ex. शुष्क सुपक विदग्ध चतुर्विधअन्नें उत्तम खाद्य ॥. 5 Clever, capable, skilful.
धावि. १ करपलेलें; जळलेलें. 'शुष्कें अथवा स्निग्धें । सुपक्वें का विदग्धें ।' -ज्ञा १५.९. २ अर्धकच्चें; अर्धवट शिजलेलें (अन्न). ३ अर्धवट करपलेलें व अर्धवट कच्चें (अन्न). ४ उत्तम शिजलेलें; चांगलें भाजलेलें (अन्न वगैरे). 'शुष्कसुपक्व विदग्ध । चतुर्विंध अन्नें उत्तम खाद्य ।' ५ (ल.) कुशल; चतुर; हुशार; निष्णात. [सं. वि + दह्-दग्ध] विदग्धाजीर्ण-न. अन्न अर्धवट पचल्यामुळें होणारें अजीर्ण. यांत घशाशीं आंबट येतें. टार प्रकारच्या अजीर्णांपैकीं एक प्रकार.
विदग्ध वाड्मय
न. अभिजात वाड्मय; ललित व उच्च दर्जाचें वाड्मय [सं.]
संबंधित शब्द
अभिजात, अभिजात्य
वि. १. कुलीन; सभ्य; थोर मनाचा; प्रतिष्ठित; उच्च दर्जाचा : ‘तरि आतां पवित्र तयाचेचि कुळ । अभिजात्य तेचि निर्मळ ।’ – ज्ञा ९·४२१. २. सुसंस्कृत; विदग्ध. ३. प्रिय; मधुर; रमणीय. [सं.]
अभिजात-त्य
वि. १ कुलीन; सभ्य; थोर मनाचा; प्रतिष्ठित; उच्च दर्जाचा. 'तरि आतां पवित्र तयाचेंनि कुळ । अभिजात्य तेंचि निर्मळ ।' -ज्ञा ९.४२१.२ सुसंस्कृत; विदग्ध; इं. क्लासिकल. ॰वाङ्मय-न. विदग्धवाङ्मय; उच्च दर्जाचें वाङ्मय; श्रेष्ठ प्रतीचें- पहिल्या प्रतीचें ग्रंथसाहित्य. (इं. क्लासिकल) [सं.]
अविदग्ध
वि. मूर्ख; अडाणी; अकुशल. [सं. अ + विदग्ध]
वैदग्ध्य
न. १ सुसंस्कृतता; वाड्मयांतील उच्चता. २ कुशलता; कौशल्य; चातुर्य. [सं.-विदग्ध]
विदध्दी
वि. (ना.) आतताई; विक्षिप्त व खोडसाळ. [विदग्ध अप.]
विदग्द
वि. (अप.) विदग्ध. 'तंव विद्गद मालतियां बोलिजे । हा हो जी राहिजे ।' -शिशु ६७२.
विद्वान्
पंडित, ज्ञानी, विदुषी, बृहस्पति, अभ्यासक, विद्यापति, ज्ञानसिंधु, जाणकार, जाणते, ज्ञानसागर, ज्ञानोंदधि, विद्याधन , बहुश्रुत, सर्वज्ञ, विदग्ध, ग्रंथमित्र, ज्ञानसम्राट्, वेदाभ्यासजड, विद्यावान् , वैदिक, सरस्वतींचे लाडके, दशग्रंथी पढिक, विद्यालंकृत, विद्याव्यासंगी, ज्ञानेश्वर, पाश्चात्त्य विद्यापारंगत, विद्यामृतानें अमर झालेले, ज्ञानोदधींत अवगाहन केलेले, विद्या घरीं पाणी भरते आहे, विद्या करतलामूलवत् ज्यांच्याकडे आहे, सरस्वतीचा वरदहस्त, उच्चविद्याविभूषित, पढिक विद्वान.
ज्ञान-कुबेर, विज्ञान-महर्षि, विद्वत्-मेरुमणि, विशेषज्ञ, तज्ज्ञ, ज्ञाता, निष्णात, कसबी, कलानिधि, विद्यारत्न, माहीतगार, विद्वत् - शिरोमणि, विद्वद्रत्न, सुविद्य, प्रकाण्ड पंडित, ज्ञानोपासक, विद्यावाचस्पति , साक्षात् ब्रह्मदेवच, सरस्वतीपुत्र, ज्ञान-लोभी, ज्ञानदीप, विद्वकुलावतंस, विद्याभास्कर, चौदा विद्या चौसष्ट कलांत पारंगत, इंगित ओळखणारे, सरस्वतीचे निस्सीम भक्त, विद्याचूडामणि, तंत्रकुशल, मर्मज्, सभापंडित, राजपंडित, विद्यामहोदधि , विद्यालंकार, विद्या-विभूषण. तेढीचे संब्ंध, पटत नसे, परस्परांत वांकडें असे, एकमेकांस सर्व बारकावे जाणणारे, ज्ञानसिंधूंत मनसोक्त अवगाहन केलेले, पदवीने विभूषित, सुसंस्कृत व बहुश्रुत, अनेक भाषा आत्मसात् केल्या, त्या विषयांतल प्रोफेसरच म्हणा ना ! अनेक विषयांत मज्जन केलेले, नाणावलेले शास्त्रज्ञ, अनेक त-हेच्या सुरस चमत्कारिक माहितीचें पोतडें यांच्याकडे सदैव भरलेले !
दुर्
अ. दुष्टपणा; वाईटपणा, कठिणपणा, दुःख इ॰कांच्या वाचक शब्दापूर्वीं योजावयाचा उपसर्ग. जसें:-दुराचार = वाईट वर्त- णूक; दुर्लभ = मिळण्यास कठिण; दुस्सह = सहन करण्यास कठिण इ॰. याचीं संधिनियमानुरूप दुर्, दुस्, दुष्, दुश् इ॰ रूपें होतात. जसें:- दुर्लभ दुष्कर, दुश्चल, दुस्सह, दुस्साध्य, दुराचार, दुरंत इ. हा उपसर्ग जोडून अनेक सामासिक शब्द बनतात. त्यांपैकीं कांहीं येथें दिले आहेत. दुरंत-वि. १ अपार; अनंत; अमर्याद; अंत लागण्यास कठिण असा (मोह, माया इ॰). २ अतिशय कठिण; तीव्र (दुःख इ॰). [दुर् + अंत = शेवट] दुरतिक्रम-वि. ओलांडून जाण्यास कठिण; दुस्तर; दुर्लंघ्य. २ असाध्य. [दुर् + अतिक्रम = ओलांडणें] दुरत्यय-यी-वि. १ नाश करून टाकण्यास कठिण. २ प्रतिबंध करण्यास, टाळण्यास कठिण; अपरिहार्य. ३ असाध्य (दुःख, आजार, रोग इ॰). अप्रतीकार्य (अडचण, संकट). ४ मन वळ- विण्यास कठिण असा (मनुष्य); दुराराध्य. [दुर् + अत्यय = पार पडणें, जाणें इ॰] दुरदृष्ट-न. दुर्दैव; वाईट अदृष्ट. 'कीं आड आलें दुरदृष्ट माझें ।' -सारुह १.१०. [दुर् + अदृष्ट] दुरधिगम्य- वि. १ समजण्यास कठिण; दुर्बोध; दुर्ज्ञेय. २ दुष्प्राप्य; मिळण्यास कठिण; दुर्गम. [दुर् + सं. अधि + गम् = मिळविणें] दुरभिमान-पु. पोकळ, वृथा, अवास्तव अभिमान; फाजील गर्व. [दुर् + अभिमान] दुरवबोध-वि. दुर्बोध; गूढ. [दुर् + सं. अव + बुध् = जाणणें] दुरा- कांक्षा-स्त्री. दुष्प्राप्य वस्तूचा अभिलाष. [दुर् + आकांक्षा = इच्छा, अभिलाष] दुराग्रह-पु. हट्ट, लोकविरोध, शास्त्रविरोध, संकटें इ॰ कांना न जुमानतां एखाद्या गोष्टीचा पिच्छा पुरविण्याचा हट्ट; अनिष्ट आग्रह. 'न सुखद दुराग्रह सखा हा सर्वाऽनर्थ गेह ठक राया ।' -मोकर्ण ४६.५०. [दुर् = वाईट + आग्रह = हट्ट] दुराग्रही-वि. दुरा- ग्रह धरण्याचा ज्याचा स्वभाव आहे असा; हेकेखोर; हटवादी; हट्टी. [दुराग्रह] दुराचरण, दुराचार-नपु. निंद्य, वाईट, वागणूक; दुर्वर्तन; दुष्ट आचरण. [दुर् = दुष्ट + सं. आचरण = वर्तन] दुराचरणी, दुराचारी-वि. निंद्य, वाईट, दुष्ट वर्तनाचा; बदफैली. [दुराचार] दुरात्मत्व-न. १ दुष्ट अंतःकरण; मनाचा दुष्टपणा. २ दुष्ट कृत्य. 'किमपि दुरात्मत्व घडलें ।' [दुर् = दुष्ट + आत्मा = मन] दुरात्मा- वि. दुष्ट मनाचा (मनुष्य); खट; शठ. [दुर् + आत्मा] दुरा- धर्ष-वि. जिंकण्यास, वर्चस्वाखालीं आणण्यास कठिण. [दुर् + सं. आ + धृष् = जिंकणें] दुराप-वि. मिळविण्यास कठिण; दुर्लभ; अप्राप्य. 'राया, भीष्माला जें सुख, इतरां तें दुराप, गा, स्वापें ।' -मोभीष्म ६.२९. दुराप(पा)स्त-वि. घडून येण्यास कठिण; दुर्घट; असंभाव्य. 'वाळूचें तेल काढणें ही गोष्ट दुरापस्त आहे.' [दुर् + सं. अप + अस् = ] दुराराध्य-वि. संतुष्ट, प्रसन्न करण्यास कठिण, अशक्य; मन वळविण्यास कठिण. 'मोक्षु दुराराध्यु कीर होय । परि तोही आराधी तुझे पाय ।' -ज्ञा ११.९९. [दुर् + सं. आराध्य] दुराशा-स्त्री. निरर्थक, फोल, अवास्तव आशा, दुष्प्राप्य गोष्टीची आशा दुष्ट वासना. 'आम्हास अन्न खावयास मिळेना आणि पालखींत बसण्याची दुराशा धरावी हें चांगलें नव्हे.' 'दुराशागुणें जो नव्हे दैन्यवाणी ।' -राम १६८. [दर् + आशा] दुरासद-वि. कष्टानें प्राप्त होणारें; जिंकण्यास, मिळण्यास कठिण. [दुर् + सं. आ + सद = मिळ विणें] दुरित-न. पाप; पातक; संचितकर्म. 'पुन्हां न मन हे मळो दुरित आत्मबोधें जळो ।' -केका ११९. [दुर् + सं. इ = जाणें] दुरुक्त-न. वाईट, दुष्टपणाचें, अश्लील भाषण; शिवी; अपशब्द; दुर्भाषण; अश्लील बोलणें. [दुर् + उक्ति = बोलणें] दुरुत्तर-न. अप मानकारक, उर्मटपणाचें उत्तर; दुरुक्ति. [दर् + उत्तर] दुरुद्धर-वि. खंडण करण्यास, खोडून काढण्यास कठिण असा (पूर्वपक्ष, आक्षेप, आरोप). 'या सिद्धांतावर दोष दिला हा सर्वांस दुरुद्धर आहे.' [दुर् + सं. उद् + धृ = काढून टाकणें; वर, बाहेर काढणें] दुरूह-वि. दुर्बोध; गूढ; अतर्क्य. 'ईश्वरानें सृष्टि कशी उत्पन्न केली हें सर्वांस दुरूह आहे.' [दुर् + सं. ऊह् = अनुमानणें] दुर्गत-वि. गरीब; दिन; दरिद्री; लाचार. 'झांकी शरपटलानीं आढ्य जसा दुर्गतांसि वस्त्रांनीं ।' -मोभीष्म ९.६५. [दुर् + सं. गत = गेलेला] दुर्गति-स्त्री. १ दुर्दशा; वाईट स्थिति; संकटाची, लाजिरवाणी स्थिति; अडचण; लचांड. २ नरक; नरकांत पडणें. [दुर् + गति = स्थिति] दुर्गंध- गंधी-पुस्त्री. घाण; वाईट वास. -वि. घाण वास येणारें [दुर् = वाईट + सं. गंध = वास] ॰नाशक-वि. (रसा.) दुर्गंधाचा नाश करणारें; (इं.) डिओडरंट्. [दुर्गध + सं. नाशक = नाश करणारा] दुर्गंधिल-वि. (रासा.) आर्सेनिक व मेथिल यांच्या संयोगापासून बनलेला विषारी, दुर्गंधी (पदार्थ) (इं.) कॅको- डिल्. दुर्गम-वि. जाण्यास कठिण (स्थळ, प्रदेश इ॰). [दुर् + सं + गम् = जाणें] दुर्गुण-पु. वाईट गुण; दोष; अवगुण; दुर्मार्गाकडील कल. (क्रि॰ आचरणें). [दुर् + गुण] दुर्गुणी-वि. वाईट गुणांचा; अवगुणी; दुराचरी; दुर्वर्तनी. [दुर्गुण] दुर्घट-वि. धड- वून आणण्यास, घडून येण्यास, सिद्धीस नेण्यास कठिण. [दुर् + सं. घट् = घडणें, घडवून आणणें] दुर्घटना-स्त्री. अशुभ, अनिष्ट गोष्ट घडणें; आकस्मिक आलेलें संकट, वाईट परिस्थिति. [दुर् + सं. घटना = स्थिति] दुर्घाण-स्त्री. दुस्सह घाण; ओरढाण; उग्रष्टाण. [दुर् + घाण] दुर्जन-पु. वाईट, दुष्ट मनुष्य. [दुर् + जन = मनुष्य, लोक] दुर्जय-वि. १ जिंकण्यास कठिण. २ दुस्साध्य; दुस्तर. [दुर + सं. जि = जिंकणें] दुर्जर-वि. पचविण्यास, विरघळ- ण्यास कठिण. [दुर् + सं. जृ = जिरणें] दुर्दम-वि. दमन करण्यास, वर्चस्वाखालीं आणण्यास कठिण. 'तिला इंग्लंडांतील प्रबल व दुर्दम प्रजाजनांच्या अडथळ्याशिवाय दुसरें कोणतेंच नियमन नसे.' -पार्ल ६. [दुर् + दम्] दुर्दर्श-वि. दिसण्यास, पाहण्यास कठिण; अतिशय अस्पष्ट. [दुर् + सं. दृश् = पाहणें] दुर्दशा-स्त्री. अवनतीची, अडचणीची, संकटाची, वाईट, दुःखद स्थिति; दुर्गति; दुःस्थिति. 'भिजल्यामुळें शालजोडीची दुर्दशा जाली.' [दुर् + दशा = स्थिति दुर्दिन-न. १ वाईट दिवस. २ अकालीं अभ्रें आलेला दिवस. ३ वृष्टि. -शर. [दुर् + सं. दिन = दिवस] दुर्दैव-न. कमनशीब; दुर्भाग्य. 'कीं माझें दुर्दैव प्रभुच्या मार्गांत आडवें पडलें ।' -मोसंशयरत्नमाला (नवनीत पृ. ३४९). -वि. कम- नशिबी; अभागी. [दुर् + दैव = नशीब] दुर्दैवी-वि. अभागी; कम- नशिबी. [दुर्दैव] दुर्धर-पु. एक नरकविशेष. [सं.] दुर्धर- वि. १ धारण, ग्रहण करण्यास कठिण. २ दुस्साध्य; दुष्प्राप्य. ३ (काव्य) (व्यापक) बिकट; खडतर; असह्य; उग्र; कठिण. 'तप करीत दुर्धर । अंगीं चालला घर्मपूर ।' ४ भयंकर; घोर; भयानक. 'महादुर्धर कानन ।' [दुर् + सं. धृ = धरणें, धारण करणें] दुर्धर्ष- वि. दुराधर्ष; दमन करण्यास, वर्चस्वाखालीं आणण्यास कठिण; दुर्दम्य; अनिवार्य. [दुर् + धृष् = जिंकणें, वठणीवर आणणें] दुर्नाम- न. अपकीर्ति; दुष्कीर्ति; बदनामी. [दुर् + सं. नामन् = नांव] दुर्नि- मित्त-न. अन्याय्य, निराधार कारण, सबब, निमित्त. [दुर् + निमित्त = कारण] दुर्निर्वह-वि. १ दुःसह; असह्य; सहन करण्यास कठिण; निभावून जाण्यास, पार पडण्यास कठिण (अडचण, संकट). २ दुस्साध्य; दुष्कर; [दुर् + सं. निर् + वह्] दुर्निवार, दुर्निवा- रण-वि. १ निवारण, प्रतिबंध करण्यास कठिण; अपरिहार्य; अनि- वार्य. २ कबजांत आणण्यास कठिण; दुर्दम्य. [दुर् + नि + वृ] दुर्बल-ळ-वि. १ दुबला; अशक्त; असमर्थ. २ गरीब; दीन; दरिद्री. 'ऐसें असतां एके दिवशीं । दुर्बळ द्विज आला परियेसीं ।' -गुच ३८.७. [दुर् + बल = शक्ति] दुर्बळी-वि. (काव्य.) दुर्बळ पहा. दुर्बुद्ध-वि. १ दुष्ट बुद्धीचा; खुनशी वृत्तीचा. २ मूर्ख; मूढ; मंदमति; ठोंब्या. [दुर् + बुद्धि] दुर्बुद्धि-स्त्री. १ दुष्ट मनोवृत्ति; खुनशी स्वभाव; मनाचा दुष्टपणा. 'दुर्बुद्धि ते मना । कदा नुपजो नारायणा ।' -तुगा ७९८. २ मूर्खपणा; अनिष्ट परिणामकारक बुद्धि. -वि. दुष्ट मनाचा; दुर्बुद्ध पहा. [दुर् + बुद्धि] दुर्बोध-वि. समजण्यास कठिण (ग्रंथ, भाषण इ॰) [दुर् + बोध् = समजणें, ज्ञान] दुर्भग-वि. कमनशिबी; दुर्दैवी; भाग्यहीन. [दुर् + सं. भग = भाग्य] दुर्भर-वि. भरून पूर्ण करण्यास कठिण; तृप्त करण्यास कठिण (पोट, इच्छा, आकांक्षा). 'इंद्रियें वज्रघातें तपे उष्ण वरी ज्वाळ । सोसिलें काय करूं दुर्भर हे चांडाळ ।' -तुगा ३५४. -न. (ल.) पोट. 'तरा दुस्तरा त्या परासागरातें । सरा वीसरा त्या भरा दुर्भरातें ।' -राम ८०. [दुर् + सं. भृ = भरणें] दुर्भ्यक्ष्य-वि. खाण्यास कठिण, अयोग्य; अभ्यक्ष्य. [दुर् + सं. भक्ष्य = खाद्य] दुभोग्य-न. कमनशीब; दुर्दैव. -वि. दुर्दैवी; अभागी. [दुर् + सं. भाग्य = दैव] दुर्भावपु. १ दुष्ट भावना; कुभाव; द्वेषबुद्धि. २ (एखाद्याविषयींचा) संशय; वाईट ग्रह; (विरू.) दुष्टभाव. [दुर् + भाव = भावना, इच्छा] दुर्भाषण-न. वाईट, अपशब्दयुक्त, शिवीगाळीचें बोलणें; दुर्वचन पहा. [दुर् + भाषण = बोलणें] दुर्भिक्ष-न. १ दुष्काळ; महागाई. २ (दुष्काळ इ॰ कांत होणारी अन्नसामुग्री इ॰ कांची) टंचाई; कमीपणा; उणीव. [सं.] ॰रक्षित-वि. दासांतील एक प्रकार; आपलें दास्य करावें एतदर्थ दुष्काळांतून वांचविलेला (दास, गुलाम इ॰). -मिताक्षरा-व्यवहारमयूख दाय २८९. [दुर्भिक्ष + सं. रक्षित = रक्षण केलेला] दुर्भेद-वि. बुद्धीचा प्रवेश होण्यास कठिण; दुर्बोध. 'तैसें दुर्भेद जे अभिप्राय । कां गुरुगम्य हन ठाय ।' -ज्ञा ६.४५९. [दुर् + सं. भिद् = तोडणें] दुर्भेद्य-वि. फोडण्यास, तुकडे करण्यास कठिण (हिरा; तट). [दुर् + सं. भेद्य = फोडण्यासारखा] दुर्मति-स्त्री. १ दुर्बुद्धि; खाष्टपणा; कुटिलपणा. २ मूर्खपणा; खूळ; वेडेपणा. -पु. एका संवत्सराचें नांव. -वि. १ दुष्ट बुद्धीचा; खाष्ट स्वभावाचा. २ मूर्ख; खुळा; वेडा. [दुर् + मति = बुद्धि, मन] दुर्मद-पु. दुराग्रहीपणा; हेकेखोरी; गर्विष्ठपणाचा हटवादीपणा. 'किती सेवाल धन दुर्मदा' -अमृतपदें ५८. -वि. मदांध; मदोन्मत्त; गर्विष्ठ. 'सावियाचि उतत होते दायाद । आणि बळिये जगीं दुर्मद ।' -ज्ञा ११.४८०. [दुर् + मद = गर्व] दुर्मनस्क, दुर्मना-वि. खिन्न; उदास मनाचा; विमनस्क; दुःखित. [दुर् + सं. मनस् = मन] दुर्मरण-न (वाघानें खाऊन, पाण्यांत बुडून, सर्प डसून इ॰ प्रकारांनीं आलेला) अपमृत्यु; अपघातानें आलेलें मरण; अमोक्षदायक मरण. [दुर् + मरण] दुर्मि(र्मी)ल-ळ- वि. मिळण्यास कठिण; दुर्लभ. [दुर् + सं. मिल् = मिळणें] दुर्मुख- पु. एका संवत्सराचें नांव. -वि. १ घुम्या; कुरठा; तुसडा; आंबट तोंडाचा. २ तोंडाळ; शिवराळ जिभेचा. 'दुर्मुखी स्त्रीचा त्याग करून । संन्यास ग्रहण करावा ।' [दुर् + मुख] दुर्मुखणें- अक्रि. तोंड आंबट होणें; फुरंगुटणें; गाल फुगविणें; (एखाद्या कार्याविषयीं) उत्साहशून्यतेची चर्या धारण करणें. 'खायास म्हटलें म्हणजे हांसत येतात आणि उद्योगाचें नांव घेतलें म्हणजें लागलेच दुर्मुखतात.' [दुर्मुख] दुर्मुखला-वि. आंबट चेहर्याचा; घुम्या; कुरठा; तुसडा. [दुर्मुख] दुर्मेधा-वि. १ मंदबुद्धीचा. २ दुष्ट स्वभावाचा; दुर्मति. [दुर् + सं. मेधा = बुद्धि] दुर्योग-पु. सत्ता- वीस योगांतील अशुभ, अनिष्ट योगांपैकीं प्रत्येक. [दुर् + योग] दुर्लंघ्य-वि. १ ओलांडता येण्यास कठिण; दुस्तर (नदी इ॰). २ मोडता न येण्यासारखी, अनुल्लंघनीय (आज्ञा, हुकूम, शपथ इ॰) ३ निभावून जाण्यास कठिण (संकट, अडचण इ॰). ४ घालविण्यास, दवडण्यास, क्रमण्यास, नेण्यास कठिण (काळ, वेळ इ॰). [दुर् + सं. लंघ्य = ओलांडावयाजोगें] दुर्लभ-वि. मिळण्यास कठिण; अलभ्य; दुर्मिळ; दुष्यप्राप्य; विरळा. 'अलीकडे आपलें दर्शन दुर्लभ जालें. दुर्ललित-न. चेष्टा; खोडी. 'आमच्या विविध दुर्ललिताबद्दल गुरुजींनीं कसें शासन केलें...' -आश्रमहारिणी ७. [दुर् + सं. ललित = वर्तन, चेष्टा] दुर्लक्ष-न. लक्ष नसणें; हयगय; निष्काळजी- पणा; गफलत; अनवधान. -वि. १ लक्ष न देणारा; अनवधानी; गाफील; बेसावध, 'तुम्ही गोष्ट सांगीतली पण मीं दुर्लक्ष होतों म्हणून ऐकिली नाहीं.' २ दिसण्यास, समजण्यास कठिण; 'ईश्वराचें निर्गुण स्वरूप दुर्लक्ष आहे.' [दुर् + सं. लक्ष्य] दुर्लक्षण- न. १ (मनुष्य, जनावर इ॰ कांचें) अशुभसूचक लक्षण, चिन्ह; दुश्चिन्ह; दोष; वाईट संवय; खोड; दुर्गुण. 'हा घोडा लात मारतो एवढें यामध्यें दुर्लक्षण आहे.' [दुर् + लक्षण = चिन्ह] दुर्लक्षण-णी- वि. १ दुर्लक्षणानें, वैगुण्यानें युक्त (मनुष्य, घोडा इ॰). (विरू.) दुर्लक्षणी. २ दुर्गुणी; दुराचारी; दुर्वर्तनी. दुर्लक्ष्य-वि. १ बुद्धीनें, दृष्टीनें अज्ञेय; अगम्य. २ दुर्लक्ष इतर अर्थीं पहा. [दुर् + सं. लक्ष्य] दुर्लौकिक-पु. अपकीर्ती; दुष्कीर्ति; बेअब्रू; बदनामी; कुप्रसिद्धि. [दुर् + लौकिक = कीर्ति] दुर्वच, दुर्वचन, दुर्वाक्यन. १ वाईट बोलणें; दुर्भाषण; अशिष्टपणाचें, अश्लील, शिवीगाळीचें भाषण. २ अशुभ, अनिष्टसूचक भाषण. [सं. दुर् + वचस्, वचन, वाक्य = बोलणें] दुर्वह-वि. १ वाहण्यास, नेण्यास कठिण. २ सोसण्यास, सहन करण्यास कठिण. [दुर् + सं. वह् = वाहणें, नेणें] दुर्वाड- वि. अतिशय मोठें; कठिण. -शर. प्रतिकूल. [दुर् + वह्] दुर्वात- उलट दिशेचा वारा. 'तुज महामृत्युचिया सागरीं । आतां हे त्रैलोक्यजीविताची तरी । शोकदुर्वातलहरी । आंदोळत असे ।' -ज्ञा ११.३४८. [दुर् + सं. वात = वारा] दुर्वाद-पु. वाईट शब्द; दुर्वच; वाईट बोलणें; भाषण. 'हां गा राजसूययागाचिया सभासदीं । देखतां त्रिभुवनाची मांदी । कैसा शतधा दुर्वादी । निस्तेजिलासी ।' -ज्ञा ११.१०१. [दुर् + वाद = बोलणें] दुर्वारवि. दुर्निवार; अनिवार्य; टाळण्यास, प्रतिकार करण्यास कठिण; अपरिहार्य. २ आवरतां येण्यास कठिण; अनिवार; अनावर. [दुर् + वारणें] दुर्वास-पु. १ (व.) सासुरवास; कष्ट; त्रास; जाच. [दुर् + वास = राहणें] दुर्वासना-स्त्री. वाईट इच्छा; कुवासना; दुष्प्रवृत्ति. [दुर् + वासना] दुर्विदग्ध-वि. विद्येंत न मुरलेला तथापि विद्येचा गर्व वाहणारा; अर्ध्या हळकुंडानें; पिवळा झालेला. [दुर् + सं. विदग्ध = विद्वान्] दुर्विपाक-पु. वाईट परिणाम. [दुर् + सं. विपाक = परिणाम] दुर्विभावनीय-वि. समजण्यास, कल्पना करण्यास कठिण. [दुर् + सं. विभावनीय = कल्पना करतां येण्यासारखें] दुर्वृत्ति-स्त्री. दुराचारी; दुर्व्यसनी; दुर्वर्तनी. [दुर् + सं. वृत्त = वागणूक] दुर्वत्ति-स्त्री. दुराचरण; भ्रष्टाचार; बदफैली. [दुर् + सं. वृत्ति = वर्तन] दुर्व्यसन-न. दुराचरणाची संवय; द्यूत, मद्यपान, वेश्यागमन इ॰कांसारखें वाईट व्यसन. 'दुर्व्यसन दुस्तरचि बहु सूज्ञासहि फार कंप देतें हो' -वत्सलाहरण. [दुर् + व्यसन] दुर्व्यसन-नी-वि. वाईट व्यसन, संवय लागलेला; दुराचारी; बदफैली. (प्र.) दुर्व्यसनी. दुर्व्रात्य-वि. अतिशय दुष्ट; व्रात्य; खोडकर; खट्याळ; (मुलगा अथवा त्यांचें आचरण). [दुर् + व्रात्य = खोडकर, द्वाड] दुर्हृद, दुर्हृदय-वि. वाईट, दुष्ट मनाचा. [दुर् + सं. हृदु, हृदय = मन] दुर्ज्ञेय-वि. समजण्यास कठिण; गूढ; गहन. 'ही पद्धत कशी सुरू झाली असावी हें समजणें दुर्ज्ञेय आहे.' -इंमू ७६. [दुर् + सं. ज्ञेय = समजण्याजोगें] दुःशक- वि. करण्यास कठिण; अशक्यप्राय. [दुस् + सं. शक् = शकणें] दुःशकुन-पु. अपशकुन; अनिष्टसूचक चिन्ह. [दुस् + शकुन] दुश्शील, दुःशील-वि. वाईट शीलाचा; दुराचरणी. [दुस् + शील] दुश्चरित्र-न. पापाचरण; दुष्कृत्य. [दुस् + चरित्र] दुश्चल-वि. (अक्षरशः व ल.) पुढें जाण्यास, सरसावण्यास, चालण्यास कठिण. [दुस् + सं. चल् = चालणें] दुश्चि(श्ची)त-वि. १ (काव्य) अयोग्य, चुकीचा, अपराधी (माणूस, कृत्य). 'अंगुष्ठ धरुनि मस्तकपर्यंत । अखंड दुश्चित आचरलों ।' २ खिन्न; उदास; दुःखी. 'राजा प्रजा पिडी । क्षेत्री दुश्चितासी तोडी ।' -तुगा २९८४. [सं. दुश्चित अप.] दुश्चित्त-वि. १ खिन्न; दुर्मनस्क; दुःखित; उदास; उद्विग्न. 'अबदुल्याची खबर ऐकतां मनांत झाले दुश्चित ।' -ऐपो १३२. २ क्षुब्ध. 'परी कुंडलिनी नावेक दुश्चित्त होती । ते तयातें म्हणे परौती ।' -ज्ञा ६.२३८ [दुस् + चित्त = मन] दुश्चिंत- वि. (काव्य) खिन्न; दुःखी; उदास; दुश्चित्त अर्थ २ पहा. 'डोळे लावुनियां न होतों दुश्चिंत । तुझी परचीत भाव होती ।' [दुश्चित अप.] दुश्चिन्ह-न. अशुभ, वाईट लक्षण; अपशकुन. 'दुश्चिन्हें उद्भवलीं क्षितीं । दिवसा दिवाभीतें बोभाति ।' [दुस् + चिन्ह] दुश्शाप-पु. वाईट, उग्र, खडतर शाप. [दुस् + शाप] दुश्शासन-पुविना. दुर्योधनाचा भाऊ. -वि. व्यवस्था राख- ण्यास, अधिकार चालविण्यास कठिण. [दुस् + शासन = अधिकार चालविणें] दुष्कर-वि. १ करण्यास कठिण; बिकट; अवघड. 'म्हणोनि अभ्यासासि कांहीं । सर्वथा दुष्कर नाहीं ।' -ज्ञा १२.११३. २ दुष्परिणामकारक. -मोल. [दुस् + सं. कृ = करणें] दुष्कर्म-न. वाईट, पापी, दुष्टपणाचें कृत्य; कर्म. [दुस् + कर्म] दुष्कर्मा, दुष्कर्मी-पु. दुष्ट कृत्य करणारा; पापी; दुरात्मा. [दुस् + कर्मन्] दुष्काल-ळ-पु. अतिवृष्टि किंवा अनावृष्टि होऊन पिकें बुडून अन्नाची वाण पडते तो काळ; दुकाळ; महागाई. 'जैसा रोगिया ज्वराहूनि उठिला । कां भणगा दुष्काळु पाहला ।' -ज्ञा ११.४२८. [दुस् + काल] म्ह॰ दुष्काळांत तेरावा महिना = दुष्का- ळांत वर्षाचे बारा महिने काढतां काढतांच मुष्कील पडते. अशा वेळीं अधिक मास (तेरावा महिना) आला म्हणजे संकटातं भर पडते असा अर्थ. दुष्कीर्ति-स्त्री. अपकीर्ती; बदनामी; बेअब्रू. [दुस् = कीर्ति] दुष्कृत-ति-नस्त्री. १ पापकर्म; वाईट कृत्य. 'आणि आचरण पाहातां सुभटा । तो दुष्कृताचा कीर सेल वांटा ।' -ज्ञा ९.४१६. २ कृतींतील. वागणुकींतील दुष्टपणा. [दुस् + कृत- ति] दुष्प्रतिग्रह-पु. जो प्रतिग्रह (दानाचा स्वीकार) केला असतां, स्वीकारणारा अधोगतीस जातो तो; निंद्य प्रतिग्रह; अशुभप्रसंगीं केलेलें दान स्वीकारणें; वाईट कृत्याबाबत स्वीकारलेलें दान इ॰. उदा॰ वैतरणी, शय्या, लोखंड, तेल, म्हैस हे दुष्प्रतिग्रह होत. [दुस् + सं. प्रतिग्रह = दान स्वीकारणें] दुष्प्राप-प्य-वि. दुर्लभ; मिळण्यास कठिण; विरळा; दुर्मिळ. [दुस् + सं. प्र + आप् = मिळ- विणें] दुस्तर-वि. तरून जाण्यास, पार पडण्यास कठिण. 'समुद्रापेक्षां हा संसार मला दुस्तर वाटतो.' -न. (ल.) संकट. 'थोर वोढवलें दुस्तर । तुटलें सासुरें माहेर ।' -एरुस्व ८.५५. [दुस + सं तृ = तरणें] दुस्पर्श-वि. स्पर्श करण्यास कठिण, अयोग्य. [दुस् + सं. स्पृश् = स्पर्श करणें] दुस्संग-पु. दुष्टांची संगत; कुसंगति. [दुस् + संग] दुस्सह-वि. सहन करण्यास कठिण; असह्य. [दुस् + सं. सह् = सहन करणें] दुस्सही-वि. (प्र.) दुस्सह स्सह अप.] दुस्साध्य-वि. १ सिद्धीस नेण्यास, साधावयास कठिण. 'थोर वय झाल्यावर विद्या दुःसाध्य होते.' २ बरा करण्यास कठिण (रोग, रोगी). आटोक्यांत आणण्यास कठिण (शत्रु, अनिष्ट गोष्ट, संकट इ॰). [दुस् + सं. साध्य = साधण्यास सोपें] दुस्स्वप्न-न. १ अशुभसूचक स्वप्न. २ (मनांतील) कुतर्क, आशंका, विकल्प. [दुस् + स्वप्न] दुस्स्वभाव-पु. वाईट, दुष्ट स्वभाव. -वि. वाईट, दुष्ट स्वभावाचा. [दुस् + स्वभाव]