आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह!
संबंधित शब्द
कथा
स्त्री. १ गोष्ट; रचलेली गोष्ट; कल्पित गोष्ट; कहाणी. 'कथा बोलूं हे मधुर सुधाधारा । ' -र १. २ हकीकत; वर्णन. 'स्मरला स्मरहर भरला कंठ न वदवेचि ते कथा राहो ।' -मोसभा १.३३. ३ टाळ, मृदंग, वीणा इ॰ साधनांनीं हरिदास देवादिकांचें गुणवर्णन करतात ती; कीर्तन; देवादिकांच्या गोष्टी सांगणें; हा एक सार्वजनिक करमणुकीचा, परमार्थ साधनाचा प्रकार आहे. 'चार्तुमासांत बहुतेक देवळांतून कथा चालतात. ' ४ केलेलें कृत्य; काम; (पराक्रमाचा) प्रंसग; पराक्रम. 'गेला माधव लोक सोडुन किती गाऊं तयाच्या कथा ।'; 'अशा त्याच्या कथा आहेत बाबा !' ५ (ल.) महत्व; वजन; पर्वा; मातब्बरी (मनुष्य, वस्तु वगैरेंची) किंमत पहा. 'तो दुसरा ब्रह्मा करील उत्पन्न । मग ऐसियाची कथा कोण ।' -नव १६.६८. 'क्षुद्र पशु पक्ष्यांची काय कथा पांचही महाभूतें ।' -विद्याप्रशंसा (चिपळूणकर). ७. ६ भाषण; म्हणणें; सांगणें. ७ हकीकत; ग्रंथार्थ; विषय. 'तूं संतस्तवनीं रतसी । कथेची से न करिसी ।' -ज्ञा ५.१४१. [सं.] ॰होणें-क्रि. केवळ कथेंत राहणें; नुसती कथा बनणें (खरें अस्तित्व नसणें);स्मृतिरूपाने अस्तित्व असणें. कथेची गति- स्त्री. कथा सुरू, चालू असणें; कथेचा ओघ, प्रवाह. 'जेव्हां कथेची गति हे वदावी । धनुष्यभंगीं रस रौद्र दावी ।' -वामन-सीता- स्वयंवर ४९. -नुसंधान-न. वृत्तवर्णनाचा संदर्भ, संबंध; गोष्टीची, हकीकतीची संगति. ॰प्रसंग-पु. १ गोष्टीचा, संभाष- णाचा ओघ. २ गोष्टींतील, वर्णनांतील प्रसंग. ॰बांधणें-क्रि. कथा रचणें, लिहिणें; पद्यमय रचनेंत चरित्र लिहिणें. 'तथापि बांधेन कथा विचित्रा ।' -सारुह १.३०. ॰भाग-पु.१ पुराण किंवा इतर ग्रंथांतील राजे वैगेरेचे पराक्रम, गोष्टी, चरित्रें इ॰ चें वर्णन ज्यांत आहे असा भाग. २ कीर्तनांतील आख्यान; कीर्त- नाचा विषय. ३ विशिष्ट प्रसंगाचें वर्णन; हकीकत. [सं.] -मृत- न. अमृताप्रमाणें गोड, चित्त रंजन करणारी गोष्ट. कथारस पहा. 'कालिंदिचें जीवन शुद्ध केलें । कथामृताला जग हें भुकेलें' -वामन-हरिविलास १.२४. [सं.] ॰रस-पु. (कथेंतील गोडी) १ प्रतिपादनाची सुंदर हातोटी; उत्तम प्रकारें अलंकारादिकांनीं कथाभाग सजविणें; कथाशृंगार. 'हरिदासानें कथारस चांगला केला.' २ साधें भगवद्गुणानुवाद, कीर्तन, कथा (अलंकार इ॰ सजावटीविरहित). 'कथारस काय निघाला होता ?' [सं.] ॰रूप ग्रंथ-पु. १ वर्णनांनीं, हकीकतींनीं भरलेला किंवा इति- हासपर ग्रंथ; ज्यांत आख्यानें, गोष्टी आहेत असा गद्य ग्रंथ; बखर. २ गद्यमय ग्रंथ; प्रबंध. ॰लाप-पु. वर्णन; कथा सांगणें. 'व्यापारांतर टाकुनी तव कथलापासि जे आदरी ।' -र ६. ॰वार्ता-स्त्री. गप्पा, गोष्टी. 'त्या दोघी महालांत बसून परस्पर कथा- वार्ता करीत होत्या. ' -राणी चंद्रवती १६४. ॰शेष-वि. कथा- रूपानें उरलेला; स्मृतिरूपानें अवशिष्ट राहिलेला; सत्कार्यादिरूप कथा मात्र ज्याची राहिली आहे असा; कथेवरूनच ज्याची माहिती मिळते असा (मृत, गत मनुष्य). 'दुराग्रही प्रवर्तोन योग्यायोग्य कार्य न विचारतां स्वांगें संपादित होत्साता स्थळोस्थळीं अपमान पावोन कथाशेष जाहला ' -मराआ ५. ॰संदर्भ (चुकीनें) संदर्प-पु. भाषणांतील पूर्वापर संबंध, वृत्तवर्णानांतील संगति. कथानुसंधान पहा. [सं.]
शिला
स्त्री. १ मोठा दगड; पाषाण; खडक. 'जशी पद- रजें शिला परि असे न हे शापिली ।' -केका ३६. २ पाटा; पदार्थ वांटावयाचा सपाट दगड. ३ उबंरा; उंवरठा. [सं.] ॰कुसुम- न. दगडफूल; धोंडफूल. ॰जतु-जित-पु. एक औषधी पदार्थ (हा दगडांतून पाझरतो असें म्हणतात); (इं.) बिटुमेन. ॰धातु-स्त्री. एक अल्युमिनियमयुक्त पांढरी माती; एक प्रकारचा खडा. ॰पट्ट-पु. पाटा. ॰पुत्र-पु. दगडी रूळ; चुन्याच्या घाणीचें चाक. ॰पुष्प-न. शिलाकुसुम पहा. ॰रस-पु. एक सुगंधी चिकट पदार्थ. ॰राशी-पु. मोठा दगड; पर्वत. 'मोठें- मोठे पर्वत मोडी फोडीहि जी शिलाराशी । विद्युल्लता नरें ती केली संदेशहारिका दासी ।' -विद्याप्रशंसा. ॰लेख-पु. दगडावर कोर- लेलीं अक्षरें. शिलोच्चय-पु. पर्वत.
विद्या
स्त्री. १ ज्ञान; विद्वत्ता. 'विद्या याचा अर्थ ज्ञान असाच विवक्षित आहे ।' -गीर २७३. २ ब्रह्मज्ञान; ब्रह्मा- त्मैक्यज्ञान. 'यासच विद्या असेंहि म्हणतात ।' -गीर २७२. ३ उपासनामार्ग; ज्ञानप्राप्तीचें साधन. 'विद्या म्हणजे ईश्वर- प्राप्तीचा मार्ग आणि तो ज्या प्रकरणांत सांगितला असतो त्यालाहि विद्या हेंच नांव अखेर देण्यांत येतें ।' -गीर २०४. ४ कला. (चित्र, रंग वगैरे) चौदाविद्या पहा. [सं. विद् = जाणणें] ॰गुरु-पु. १ शिक्षण देणारा, शास्त्रादि ज्ञान देणारा गुरु. पर- मार्थज्ञान देणारा मोक्षगुरु म्हणतात. २ अध्यापक; कोणत्याहि विषयांत प्रावीण्य मिळवलेला विद्वान मनुष्य. ॰धन-न. १ ज्ञान- रूप संपत्ति. 'ऐसें एकचि विद्याधन अद्भुत गुण न हा दुजांत वसे ।' -विद्याप्रशंसा. २ अविभक्त कुटुंबांतील भागीदारानें स्वतःच्या विद्येपासून मिळविलेलें धन. हें स्वकष्टार्जित म्हणून खासगी समजलें जातें. ॰परिषद-स्त्री. शिक्षणपरिषद. 'मुसलमानांनी अल्लीगड येथें विद्यापरिषद भरली होती.' -टि १.२६८. ॰पात्र-न. विद्येचें स्थान; विद्वान मनुष्य. 'विद्यापात्रें कळापात्रें ।' -दा १.८. २३. ॰पीठ-न. १ विद्यामंदिर; ज्ञानमंदिर; विद्या शिकविणारी संस्था, स्थान. २ विश्वविद्यालय; (इं.) युनिव्हर्सिटी. ॰बंधु- पु. गुरुबंधु; सहाध्यायी. ॰वान्-वि. (विरू.) विद्यावंत; विद्वान; विद्येंत प्रवीण, निपुण; शास्त्री. ॰वेतन-न. शिष्यवृत्ति; विद्या- र्थ्यास आर्थिक मदत. 'दोन होतकरु विद्यार्थ्यांस सरकारी विद्या- वेतन देऊन युरोपांत पाठविण्यांत आलें.' -ऐरा ५६. (प्रस्तावना) विद्यानंद-पु. ज्ञानापासून होणारा आनंद. विद्यानुराग-पु. विद्येची आवड, गोडी; विद्याप्रेम. विद्यानुरागी-वि. विद्येची आवड असणारे. 'अ/?/नराणीचे कारकीर्दीत बहुतेक सर्व विद्यानुरागी लोक राजनतिविषयक...' -इंमू ४५०. विद्याभ्यास-पु. शास्त्राचें अध्ययन; शिक्षण. विद्यार्थी-पु. १ शिकणारा; अभ्यास करणारा; विद्यार्जन करणारा. २ (ऐतिहासिक कागदपत्रांत) शागीर्द. ३ शिष्य; चेला; विद्येकरितां गुरुची सेवा करून राहणारा. विद्या- लय-न. शाळा.