मराठी बृहद्कोश

आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

विनीत

विनीत p Humble, meek. Governable. Trained.

वझे शब्दकोश

विनीत vinīta p S Humble, lowly, meek. 2 Governable, tractable, compliant, conformable. 3 Of subdued or of restrained and regulated passions and affections. 4 Trained, broken in, well-instructed and disciplined--a beast.

मोल्सवर्थ शब्दकोश

वि. १ नम्र; लीन; निगर्वीं. २ नियम, शिस्त वगैरे पाळणारा, मानणारा; ताब्यांत, आटोक्यांत राहणारा. ३ मनो- विकार ताब्यांत ठेवलेला; निग्रही. ४ शिकविलेला; सरावाचा; शिस्त लावलेला (पशु वगैरे). [सं. वि + नी]

दाते शब्दकोश

संबंधित शब्द

बरगडी, बरगडा-ळा

स्त्रीपु. फांसळी; छातीचें हाड. बरगड्या, बरगडे-ळे मोडणें- १ बरगड्यांचीं हाडें मोडणें (ल.) अति श्रम करणें; अति श्रमानें भागणें, थकणें. २ (ल.) नम्र व विनीत करणें; नरम करणें; खोडकी जिरविणें; अभिमान उतरविणें (हाडें घुसळूण, यथेच्छ ठोकून).

दाते शब्दकोश

गोप्य

वि. १ गोपनीय; लपविण्यास, छपविण्यास योग्य, अवश्य किंवा शक्य अशा आयुष्य, द्रव्य, गृहच्छिद्र, मंत्र, मैथुन भेषज, दान, मान, अपमान इ॰ नऊ बाबी आहेत. २ गुप्त. 'तुका म्हणे माझ्या वडिलांचें ठेवणें । गोप्य नारायणें न करावें ।' -तुगा १२९८. -न. एक प्रकारचें गहाण; तांब्याची भांडीं इत्यादि संसांरिक वस्तू. या गहाणावर वापरल्यास व्याज मिळत नाहीं. -याज्ञवल्क्यस्मृति, व्यवहाराध्याय एक दागिना (सोनें, चांदी, वळीव रेशीम यांचा). २ विणलेला चाबूक, दोरी, बंद; चांगला वळीव जाड दोरा. ३ कमरेचा करगोटा. ४ एक खेळ; निरनिराळे दोरीचे पदर घेऊन. अनेकजन टिपर्‍या खेळत त्यांचा गोफ विणतात तो; पौराणिक नाटकांतून कृष्णलीलेंत असे गोफ गोप-गोपी रंगभूमीवर विणीत. 'गोपालकृष्णा आतां आपण गोफ खेळूं.' -रासक्रीडा २१ [सं. गुफ्]

दाते शब्दकोश

हलकावणें

अक्रि. १ हलकें होणें; अशक्त, कमी होणें. 'कष्टांचा भारही हलकावत जाईल.' -तुफान २९. २ विनीत, नम्र होणें. -उक्रि. १ हलकें करणें. २ (एखाद्याचा ताठा, गर्व) उतरविणें; खालीं करणें. [हलका]

दाते शब्दकोश

कारमोरी      

वि.       वैशाख महिन्याच्या विणीत जन्मलेले कोकरू (मेंढी वैशाख किंवा कार्तिक महिन्यात विते.). (जुन्नरी)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

लज्जा

स्त्री. १ लाज; विनय; सभ्यता, मर्यादा दर्शविणें. २ लाजरेपणा; लाजाळूपणा. ३ भीड; संकोच. [सं.] म्ह॰ (सं.) एक लज्जां परित्यज्य सर्वत्र विजयी भवेत् ।' ॰कज्जा, लज्जे- कज्जेनें-क्रिवि. लाजेकाजेनें; लाज वाटून. लज्जा(ज्या)यमान- वि. लाजलेला; लज्जित; शरमिंधा. 'नगरीचें लोक लज्जायमान । कपाटें लावूनि बैसति ।' [सं. लज्जमान] लज्जालु-पु. लाजाळू नांवाची वनस्पति. -वि. लज्जायुक्त; लाजाळू. [सं.] लज्जा- वती-स्त्री. लाजाळू नामक वनस्पति. -वि. लाजाळू (स्त्री.). [सं.] लज्जावान्-शील-वि. १ विनीत; मर्यादशील; सभ्य. २ लाजाळू. लज्जित-वि. लाजलेला; शरमिंधा. [सं.] लज्जेचा-वि. १ लज्जावान्-शील पहा. २ लाजिरवाणें; लाज आणणारें (कृत्य).

दाते शब्दकोश

मर्यादा

स्त्री. १ सीमा; शेवट; इयत्ता; कड; हद्द (स्थल, काल, क्रिया इ॰ची). २ (ल.) संप्रदाय-शास्त्रसिद्ध रूढी, बंधन, दाब; नियम; अट. 'जो विप्र आजिपासुनि मद्यप्राशन करील तो पापी । ब्रह्मध्नासम निश्चित असि मर्यादा स्वयें कवि स्थापी ।' -मोआदि ९.५३. ३ शिष्टाचार; वर्तनाचा योग्यपणा; व्यवस्थित सभ्य वागणूक; विनीतता. 'आजकालच्या मुलींना मर्यादाच कमी- मुळींच नाहीं म्हटलें तरीं चालेल.' [सं.] ॰मोडणें-मर्यादा, सीमा ओलांडणें; नियमबाह्य, क्रम सोडून वर्तन करणें. ॰राखणें- आदरानें, शिष्टाचाराप्रमाणें वागणें. मर्याद-शअ. पावेतो; पर्यंत; अखेर. जसें-आकंठमर्याद भोजन केलें; श्रावण-काल-नदी-मर्याद. ॰दृष्टि-स्त्री. नजरकैद; साधी अटक. 'रायें पाचारुनि तंत । मर्याददृष्टित ठेविलें ।' -ज्ञानप्रदीप १०१७. ॰वेल, मर्यादावेल- स्त्री. समुद्रकांठची एक वेल. 'जैसी मर्यादावेल उल्लंघून । प्रवेश नकरी समुद्रजीवन ।' -भवि ॰शीर-ल-ळ-वि. सभ्यपणानें वागणारा; शिष्टाचार न उल्लंघिणारा; विनीत; अदबशीर.

दाते शब्दकोश

मर्यादशीर / ल

वि० आदबशीर, विनीत, विनयशील, (स्त्रियांच्या संबंधानें ) शालीन, लाजाळू.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

निवळणे      

अक्रि.       १. स्वच्छ, तेजस्वी, चकचकीत होणे (डोळे, चेहरा, आकाश इ.). २.(ल.) थंड, शांत, स्वस्थ, सौम्य, गरीब होणे; विचारी, विनीत, नम्र होणे; सुधारणे (दुर्वर्तनी तरुण). ३. पूर्ण तयार झाल्यावर चांगले बनणे (कोवळ्या झाडाचा पहिला बहर वाईट निघतो, पण नंतर चांगला निघू लागतो त्यावरून); मुरणे (कोवळे फळ बेचव असते त्यावरून). ४. भिजल्यामुळे मादकता, उत्तेजकता कमी होणे (तंबाखू इ. ची). ५. निपुण, हुशार होणे; चांगला जम बसणे (एखाद्या कामात, कलेत, शास्त्रात). ६. (चर्मकार.) केस, कान्ही इ. काढून टाकल्यावर (कातडे) पाण्यात ठेवल्याने स्वच्छ होणे. ७. (गोष्ट) स्पष्ट होणे. [सं.निर्मलन]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

निवळणें

अक्रि. १ स्वच्छ, तेजस्वी, चकचकीत होणें (डोळे, चेहरा, आकाश इ॰). 'डोळे निवळले' 'रात्र निवळली.' २ (ल.) थंड, शांत, स्वस्थ, सौम्य, गरीब होणें (रागावलेला माणूस, जनावर), विचारी, विनीत होणें; सुधारणें (दुर्वर्तनी तरुण). ३ पूर्णावस्थेंत आल्यानंतर चांगलें बनणें (कोवळ्या झाडाचा पहिला बहार वाईट निघतो पण पुढें उत्तम निघावयास लागतो त्यास म्हणतात); मुरणें (कोवळें फळ बेचत असतें त्यावरून); 'सुपारी निवळली.' ४ भिजण्यानें मादक गुण कमी होणें (हरीक, तंबाखू इ॰ कांचा); स्पष्ट होणें (गोष्ट). ५ निपुण, हुशार होणें; चांगला जम बसणें (एखाद्या कामांत, कलेंत, शास्त्रांत). ६ (चांभारी) केस, कान्ही, वगैरे काढून टाकल्यावर (कातडें) पाण्यांत ठेवल्यानें स्वच्छ होणें. [सं. निर्मलन] निवळण-न. १ (कों.) निवण अर्थ १ पहा. २ एखाद्या मिश्रणाचा निवळल्यानंतर वर येणारा द्रव; स्वच्छ रस. ३ गढूळ, द्रव शुद्ध करण्याकरितां त्यांत टाकलेला तुरटीसारखा एखादा पदार्थ.

दाते शब्दकोश

परिणत

वि. १ परिपक्व; परिपूर्ण; पूर्णावस्थेस प्राप्त झालेला; प्रौढ. 'जयजय देव अद्वितीय । परिणतोपरमैकप्रिय ।' -ज्ञा १८.९. २ नम्र वांकलेला; वाकणारा. ३ (ल.) लक्ष वेधलेला, वेधणारा; निर्दिष्ठ. [सं.] परिणति-स्त्री. १ पूर्णावस्था; पक्वता. २ वांकलेली अवस्था; विनीत स्थिति ३ नमस्कार; प्रणाम. ४ उत रतेपणा; उतार. ५ निर्दिष्ट स्थिति. ६ (गणित) फल. (इं.) फंक्शन.

दाते शब्दकोश

शाअिस्ता

(वि.) हिंदी अर्थ : शिष्ट, विनीत. मराठी अर्थ : सभ्य, नम्र.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

शालीन

वि. लाजाळू; नम्र; विनीत. शालिनी पहा. [सं.] ॰ता-स्त्री. सभ्यता; विनय; लाजाळूपणा. [सं.]

दाते शब्दकोश

सानुनय

वि. १ नम्र; विनीत. २ सभ्य; मर्यादशील. [स + अनुनय]

दाते शब्दकोश

वचन

न. १ भाषण; बोललेली गोष्ट. २ शब्द; भाष; निश्चयपूर्वक सांगणें. ३ विधान. ४ उक्ति; सूक्त. ५ प्रमाणभूत आधार; प्रामाण्य. 'मुख्य प्रभुचें लक्षण प्रत्यक्ष ज्यास वचन भारती ।' -ऐपो ३२०. ६ (कायदा) करार; प्रतिज्ञा. ७ अव- तरण; ग्रंथांतील उदाहरण. 'सर्व देवांसि नमस्कारिलें । तें एका भगवंतासि पावलें । येदर्थीं येक वचन बोलिलें । आहे तें ऐका ।' -दा ४.६.११. ८ (व्या.) नामाच्या ठिकाणीं एकत्वरुपानें अथवा अनेकत्वरुपानें असलेली अर्थाची उपपत्ति. 'एकवचन; द्विवचन, अनेक -बहुवचन.' [सं.] म्ह॰ वचने किं दरिद्रता = नुसतें बोलण्यांत कमी- पणा कशाला? बोलायला काय जातें? चिठी-ठ्ठी-स्त्री. कर्ज घेतांना लिहून दिलेला रोखा. (इं.) प्रॉमिसरी नोट. 'एखाद्या चुकार ऋणकोनें हिशोबाची भानगड दाखवून बरीचशी सूट घेऊन वचन- चिठी लिहून द्यावी.' -सासं २.१६६. ॰भंग-पु. करार, शपथ मोडणें. ॰भाक-स्त्री. तोंडी करार, व्यवहार. ॰विरोध-पु. वच- नाच्या विरुद्ध वागणें. वचनाचा खरा-धड-वि. वचनाप्रमाणें वागणारा; वचन पाळणारा. 'खरा लोककल्याणेच्छु व देशा- भिमानी पुरुष म्हटला म्हणजे......तो वचनाचा धड असला पाहिजे.' -नि. वचनाच्या आज्ञेंत, अर्ध्या वचनांत असणें, वागणें-अतिशय आज्ञाधारक, विनीत असणें. वचनीं गोवणें-एखाद्याला त्याच्याच शब्दांत, वचनांत गुंतविणें; वचना- नुसार करावयास भाग पाडणें. 'म्हणती श्रीकृष्ण आमुचें जीवन । सत्यभामेसी वचनीं गोवून । कैसें नेतोसी दयार्णवा ।' -ह ३०. १४३. वचनीं राहणें-आज्ञेंत वागणें. 'वचनीं राहुनि काम मनांतिल पुरवी ऐशी त्यजिली रामा ।' -मराठी ६ पु. (१८७५) १७६. वचनावचनी-स्त्री. तोंडी करार, व्यवहार; वचनभाक. वचनीय-वि. १ बोलण्या-सांगण्यासारखें. २ शब्दांनीं व्यक्त करण्यासारखें; वर्णनीय.

दाते शब्दकोश