मराठी बृहद्कोश

तेरा मराठी शब्दकोशांमधील ३,००,८७५ शब्दांचा एकत्रित संग्रह

शब्दार्थ

विलायत

विलायत f A foreign country, England.

वझे शब्दकोश

विलायत vilāyata f एई ( A) A foreign country, but understood esp. of England or Europe. 2 Native or proper country or place of production;--used of animals and plants. 3 Applied to any country viewed as strange or as remarkable for anything.

मोल्सवर्थ शब्दकोश

स्त्री. १ मूळ देश; स्वदेश. २ उत्पत्तिस्थान; मूळचा प्रदेश (प्राणि, वनस्पति वगैरेचा). ३ (रूढ) परदेश; परकीय देश; विशेषतः इंग्लंड, यूरोप. ४ प्रांत; परगणा; प्रदेश; जनपद. 'तेरदळच्या विलायतीस शिवाजी तसवीस देतो.' -शिचप्र ५. 'विलायती खराब पडली होती.' -वाडसनदा १७४. [अर. विलायत्] विलायती-वि. १ परदेशी; इंग्लंडचा; यूरोपीय. 'हिंदुस्थाननें विलायती माल घेणें पातक होईल' -टि ३. २४. २ धूर्त; बिलंदर; कावेबाज; हुषार. ३ परदेशी; चमत्कारिक; लक्ष्यवेधक; असामान्य (याअर्थी कोणत्याहि विचित्र, सुंदर, अजब, कौशल्यपूर्ण वस्तूस लावतात). ४ (ल.) उनाड, उंडगा, खोडकर (मुलें). ॰ऊंस-पु. एक जातीचा ऊंस. ॰कोंबडा-पु. टर्की; गिनी फाउल. ॰गंवत-घास-न. गिनी गवत; लसूणघास. ॰चणा-पु. वाटाणा. ॰चिंच-स्त्री. बारीक पानांचें बारीक शेंगा येणारें एक झाड. ॰थुवर-पु. एक जातीचा थोर; शेर. ॰धोतरा- पु. धोतऱ्याची एक जात. ॰निवडुंग-पुन. फडे निवडुंग; बिन- काट्याचा निवडुंग. ॰बाभळ-स्त्री. एक विशिष्ट वृक्ष. ॰मूग-पु. भुईमूग. ॰मुळा-पु. मुळ्याची एक जात. -वृषि ६१८. ॰मेंदी- धी-स्त्री. एक वासाची मेंदीची जात. ॰वांगी-स्त्री. टोमाटोचें झाड; बेलवांगी. ॰वांगे-न. टोमाटो; बेलवांगे. ॰शेर-पु. एक जातीचा शेर, हुरा. ॰सन-पु. ओरिसा, ओढ्या व बंगालचा कांही भाग यांत चालणारा एक शक. इ. स. ५९२ मध्यें सुरू झाला. सौरवर्ष व चांद्रमास.

दाते शब्दकोश

(पु.) हिंदी अर्थ : पराया देश. मराठी अर्थ : परदेश.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

(आ) पु० मूळ देश, स्थान. २ इंग्रज लोकांचा देश.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

विलायत; बिलायती

(स्त्री.) [अ. विलायत्] प्रान्त; परदेश; इङ्ग्लण्ड; युरोप. “शहाजी महाराज... चित्रदुर्गांत विलायतीमध्यें... मृत्यू पावले” (सभासद ५२). “विलायती खराब पडली होती, त्यास रयतेस धीर भरंवसा! देऊन वसाहत केली आहे” (वाड सनदा १७४).

फारसी-मराठी शब्दकोश

विलाईत,विलायत

स्त्री. १ जन्मभूमि; मूळ देश. २ अफगाणिस्तान; मुसलमानांचा हिंदुस्थानांत येण्यापूर्वींचा मूळ देश. 'आजच लखनौवाले यांची डांक विलाईतपर्यंत बसली आहे. त्यांतून एक बारीची (आखबाराची) लाल थैली आली.' -रा १०.४२४/?/. 'विलायतवाला फौजबंदी करून या प्रांतावर चढाई करून येतो हें वर्तमान आज एक महिनापर्यंत आहे.' -रा १०.४२४.

दाते शब्दकोश

संबंधित शब्द

इलाईत, इलायत      

स्त्री.       परमुलुख; विलायत; परदेश : ‘देश इलाईत । काबीज केलें तळकोंकण ।’ − इपुस्त्रिपो [फा. विलायत]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

इलाईत-यत

स्त्री. विलायत; प्रांत; प्रदेश; मुलूख. 'देश इलाईत । काबीज केलें तळकोंकण' -इपुस्त्रिपो. 'विलयतिर्जन- पदः ।' -राव्यको. जनपदवर्ग १. [अर. विलायत् = प्रांत; देश]

दाते शब्दकोश

दस्त-दराजी

(स्त्री.) [फा. दस्त-दराझी] जुलूम. “बाजे विलायत सिवा मलऊत नामें आपल्या दर्कबजेंत आणून दस्तदराजी करितो” (राजवाडे १७|१६).

फारसी-मराठी शब्दकोश

इलाईत

(स्त्री.) विलायत; मुलूख. “देश इलाईत । काबीज केलें तळकोंकण” (इपुस्त्रिपो १).

फारसी-मराठी शब्दकोश

ईर

वि. वीर पहा. 'असे लढाई झाली पर, खवळले ईर' -ऐपो ३४४. ॰पीर-वि. धाडसी मनुष्य. 'हें पहा मिस् विलायत, मोठेमोठे ईरपीर हा गुंतागुंतीचा प्रश्न सोडवितां सोडवितां थकले' -सु ६५. [सं. वीर अप.]

दाते शब्दकोश

ईरपीर      

वि.       अफाट, उद्योगी, धाडसी मनुष्य : ‘हें पहा मिस् विलायत, मोठेमोठे ईरपीर हा गुंतागुंतीचा प्रश्न सोडवितां सोडवितां थकले.’ − सुदर्शन ६५. [सं. वीरचा अप.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

मुल्कात

स्त्री. प्रांत; विलायत. 'हे कदीम मुल्कात देणें. -इमं ६६. [अर.]

दाते शब्दकोश

(स्त्री.) प्रान्त; विलायत. “हे कदीम मुल्कात देणें” (इम ६६).

फारसी-मराठी शब्दकोश

नव

वि. नऊ. नऊ संख्या. 'हे नवरत्नमाळा गोमटी । जो घाली सद्गुरुच्या कंठीं ।' -एभा १०.२३८. [सं. नव; गुज. नव; झें. नवन्; ग्री. एन्नेअ; लॅ. नोव्हेम्; गॉ. निउन; अँसॅ. निगन्, प्राज. निउन; अज. नेउन; प्राप्र. नेविन्त्स; स्लॅ. देवन्ति; लिथु-देव्यन्ति; हिब्र्यू; नओइ; कँब्रि-नव्] ॰कुलपांचें तारूं- न. लढाऊ गलबत. 'विलायत जंजिरा नवकुलपांचें तारूं ।' -विवि ८.३. ५४. ॰तुकड्यांची चोळी-स्त्री. नऊ तुकडे जोडून केलेली चोळी; इच्या उलट अखंड चोळी, तीन तुकड्यांची चोळी. म्ह॰ नवव्या दिवशीं नवी विद्या. सामाशब्द- ॰कोट (टी)नारायण-पु. १ कोट्याधीश; अतिशय श्रीमंत मनुष्य. 'पण हे विचारांचे नवकोटनारायण आचाराच्या बाबतींत मात्र सुदाम्यापेक्षां दरिद्री आसतात.' -प्रेम २१. २ (विपरीत लक्ष- णेनें) अतिशय दरिद्री; कंगाल मनुष्य. -शास्त्रीको. [नव + कोट नारायण] ॰कोटी कात्यायनी(येणी)-चामुंडा-स्त्रीअव. नऊ कोट देवी, कात्यायनी, चामुंडा. 'नवकोटी कात्यायेणीचा विचार । पिंडीं कोठें ।' -दा ९.५. ३१. 'पहावया श्रीकृष्णाचें लग्न । सकळ दैवतें निघालीं सांवरोन । नवकोटी चामुंडा संपूर्ण । चालती वेगें तेधवां ।' -ह २४.१०५. [नव + कोटी + कात्यायनी, चामुंडा] ॰कोण-पु. (भूमिति) नऊ कोपरे असलेली व नऊ बाजूंनीं मर्या- दित आकृति. -वि. नऊ कोन असलेली. [नव + सं. कोण] ॰खंड- खंडें-नअव. १ पृथ्वीच्या नऊ खंडांचा समुदाय. इलावृत्त, भद्राश्व, हरिवर्ष, किंपुरुष, केतुमाल, रम्यक, भरत, हिरण्मय व उत्तरकुरू हीं नवखंडें होत. दुसरेहि पाठभेद आहेत. (अ) भरत, वर्त्त?, राम?, द्रामाळा (द्रमिल, द्रामिल?), केतुमाल, हिरे (हीरक?), विधि- वस?, महि आणि सुवर्ण. (आ) इंद्र, कशेरु, ताम्र, गभस्ति, नाग, वारुण, सौम्य, ब्रह्म, भरत हे नऊ भाग. -हंको. 'नवखंडें सप्तद्वीपें । छपन्नदेशींच्या रायांचीं स्वरूपें ।' -ह २८.६४. [नव + सं. खंड = तुकडा, पृथ्वीचा भाग] ॰खंड पृथ्वी-स्त्री. जींत नऊ खंडें आहेत अशी पृथ्वी. 'नवखंड पृथ्वी व दहावें खंड काशी.' 'नवखंड पृथ्वीचें दान.' ॰खणी-वि. नऊ खणांची. 'दुखणी काय नवखणी माडी नलगे धरा नखेंदु खणी ।' -मोकृष्ण ८३.१३. 'लावण्याची सकळ संपदा सहज उभी नवखणी ।' -पला ४.३४. [नव + खण] ॰गजी-पुस्त्री. १ (नऊ गजी) नऊ गज लांबीचा सोपा. राजदरबारचा भव्य दिवाणखाना; कचेरी; सदर. 'राजा नवगजींत बैसला ।' -ऐपो १७.२ तंबू; डेरा. 'बाडें सुंदर खाबगे नवगज्या सिद्धाच होत्या घरीं ।' -सारुह ३.४५. 'तमाम येऊनु नऊ गजी आसपास येऊनु उतरीले' -इमं ७. नवगोजी पहा. [नव + गज = एक परिमाण] ॰गुणपुअव. बुद्धि, सुख, दुःख, प्रयत्न, इच्छा द्वेष, संस्कार, पुण्य व पाप असे न्यायशास्त्रांत सांगितलेले नऊ गुण. 'बुद्धि सुख दुःख प्रयत्न । इच्छा द्वेष संस्कारण । पुण्य पाप नवगुण । बोलिजेती ।' -विउ ३.४. -वि. नऊपट. ॰गुण-वि. नऊ दोर्‍यांचें (यज्ञोपवीत इ॰). नऊ फेर्‍यांचें. 'नवगुण तव कंठी ब्रह्मसूत्र प्रभा जे ।' -मुरा बालकांड ११३. [नव + सं. गुण = दोरा] ॰गोजी-पु. डेरा. शामियाना. 'उतर तर्फेसी नवगोजी देऊनु उतरिले.' -इमं ७. ॰ग्रह-पुअव. १ सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि, राहू, व केतु हे नऊ ग्रह. २ (उप. निंदार्थी) जूट; टोळकें; टोळी; कंपू. ३ -न. मंगलकार्यारंभीं करतात ती नऊ ग्रहांची पूजा; ग्रहमख. 'दोन्हीं घरीं नवग्रहें झालीं । देवदेवकें पूजिलीं । -कालिका १६.४१. [नव + ग्रह] ॰चंडी-स्त्री. १ देवीची आराधना (विशेषतः तिच्या स्तोत्राचें, सप्तशतीचें नऊ वेळां पठण करून केलेली). 'जर मला पुत्र- प्राप्ति झाली तर देवीची नवचंडी करीन.' -रत्न १.३. २ नवरात्र; नवरात्र पहा. [नव + सं. चंडी = देवी] ॰छिद्रें-नअव. नवद्वारें पहा. ॰जणी-स्त्रीअव. १ नऊ स्त्रिया. २ (ल.) नवविधाभक्ति. 'अत्यंत शहाण्या सुवासिनी । आणिक आल्या नवजणी । कृष्णाची खुतखावणी । त्या जाणोनी वर्तती ।' -एरुस्व १६.४३ ॰ज्वर- पु. दूषित तापाचा एक अतिशय तीव्र प्रकार; हा ताप नऊ दिवसांच्या मुदतीचा व प्रायः घातुक असतो. [नव + सं. ज्वर = ताप] ॰टकें- न. शेराच्या अष्टमांशाचें, (कैली) अर्ध्या पावशेराचें माप. [नऊ + टांक] ॰टांक-न. अदपावाचें वजन. नवटकें पहा. [नव + टांक; गुज. नवटांक; गो नवटांग] ॰द्वारें-नअव. दोन डोळे, दोन कान, दोन नाकपुड्या, तोंड, गुदद्वार व मूत्रद्वार अशीं मानवी शरीराचीं नऊ द्वारें, छिद्रें. 'नवद्वारें देहीं । तो असतुचि परि नाहीं ।' -ज्ञा ५.७५. ॰नाग-पुअव. १ पुराणांतरीं वर्णिलेले अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक व कालीय ह्या नांवांचे नऊ नाग, सर्प. २ नऊ हत्ती. [नव + सं. नाग = सर्प, हत्ती] ॰नाग- सहस्त्रबळी-वि. नऊ हजार हत्तींचें बळ असलेला. [नव + सं. नाग = हत्ती + बळी = बलवान] ॰नागसहस्त्रशक्ती-स्त्री. नऊ हजार हत्तींचें बळ. 'अंगीं जियेस नवनागषस्त्रशक्ति ।' -आपू ३९ [नव + सं. नाग = हत्ती + सं. सहस्त्र = हजार + सं. शक्ति = बळ] ॰नागोर्‍या-पु. (ना.) चेंडूलगोर्‍यांचा खेळ. ॰नाथ-पुअव. मच्छिंद्र, गोरक्ष, जालिंदर, कानीफा, चरपटी, नागेश, भरत, रेवण व गीहिनी हे नवनारायणाचे अवतार मानतात. प्रकाश, विमर्श, आनंद, ज्ञान, सत्यानंद, पूर्णानंद, स्वभावानंद, प्रतिभावानंद, व सुभगानंद असहि पाठभेद आहे. -नव १.३९. ते ४३. -ज्ञाको (न) ३७ ॰नारायण-कवि, हरि, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पला- यन, आविर्होत्र, द्रुमिल, चमस, व करभाजन. -नव १.२९ ते ३०. ॰नारीकुंजर-पु. नऊ स्त्रियांनीं आपल्या शरीरन्स निरनिराळ्या प्रकारें पीळ व मुरड देऊन (कृष्णाच्या पुयोगसाठीं) बनवि- लेली हत्तीची आकृती. [नव + सं. नारी = स्त्री + सं. कुंजर = हत्ती] ॰निधि-धी-पुअव. कुबेराचे नऊ खजिने. त्याचीं नावें:-महा- पद्म, पद्म, शंख, मकर, कच्छप, मुकुंद, कुंद, नील, आणि खर्व. 'मोल तुमचिया या श्रीचरणरजाचे न होय निधिनवही ।' -मोमंभा १.११२. [नव + सं. निधी = खजिना, सांठा] ॰महाद्वारे-नअव. नवद्वारें पहा. ॰महारोग-पुअव. राजयक्ष्मा, कुष्ट, रक्तपिती, उन्माद, श्वास, मधुमेह, भगंदर, उदर व मुतखडा हे नऊ दुर्धर व भयंकर रोग. [नव + सं. महायोग = मोठा, भयंकर रोग] ॰रंगी-वि. नऊ रंगांनी युक्त (पदार्थ.) ॰रत्नराजमृगांक-पु. (वैद्यक) एक औषधीं रसायन. [नव + रत्न + राजन् + मृग = हरिण + अंक = चिन्ह] ॰रत्नें-नअव. हिरा, माणिक, मोतीं, गोमेद, इंद्रनील, पाच, प्रवाळ, पुष्कराज, वैडूर्य किंवा तोर्लल्ली हिं नऊ प्रकारचीं रत्नें 'नवरत्नांची आंगठी.' ॰रत्नांचा हार-पु. स्त्रियांचा गळ्यांत घालण्याचा एक बहुमोल हार. ॰रस-पुअव. (साहित्य) साहित्य- शास्त्रांत वर्णिलेले शृंगार, विर, करूण, अद्भुत, हास्य, भया- नक, बीभत्स, रौद्र आणि शांत या नांवांचें नऊ रस. जी दैविकीं उदार वाचा । जैं उद्देशु दे नाभिकाराचा । तैं नवरससुधाब्धीचा । थावो लाभे ।' -ज्ञा १०.७. ज्ञाता जो सरसावला, नवरसां-माझिरि शृंगारसा ।' -रा ५ [नव + सं. रस] ॰रसिका-वि. चलाख; त्र- तरीत; आवेशयुक्त; नऊ रसांनीं भरलेलें, पूर्ण (गान, कवन, कथा, वर्णन, ग्रंथ, श्लोक, गवई, कवि, वक्ता इ॰). [नवरस] ॰रात्र-न. १ (सामा.) नऊ अहोरात्रांचा समुदाय. २ (विशेशार्थाणें) चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंतचा काल (रामाचें नवरात्र); तसेंच अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंतचा नऊ दिवसांचा काल. (देवीचें नव- रात्र) यास प्रतिपदेपासून चंपाषष्ठीपर्यंत सहा दिवस खंडोबाचें नवरात्र असतें. ३ वरील कालांत करतात तो देवाचा, देवीचा उत्सव, पूजा. [नव + सं. रात्रि = रात्र] ॰लख-वि. (काव्य) नऊ लक्ष. 'आकाशांत नवलख तारे आहेत.' [नव + लक्ष = शंभर हजार] ॰लक्षणें-नअव. आचार, विनय, विद्या, प्रतिष्ठा, तीर्थदर्शन, निष्ठा वेदपठन, तपस्या व दान हिं ब्रह्मणाचीं नऊ लक्षणें. -शर. ॰लाखा-ख्या-वि. ज्याच्याजवळ नऊ लक्ष रुपये आहेत असा; लक्षाधीश; अतिशय श्रीमंत. 'अपुल्या पुम्ही घरचें नवलाखे मिजाजी ।' -प्रला १७५ [नव + लाख = शंभर हजार] ॰विध- वि. नऊ प्रकारचें. [वन + सं. विधा = प्रकार, भेद] ॰विधभजन- न. नवविधा भक्ति पहा. 'नवविधभजन घडो । तुझिये स्वरूपें प्रीति जडो ।' ॰विध रत्नें-नअव. नवरत्ने पाह. ॰विधा भक्ति-स्त्री. श्रवण = ईश्वराचें गुणवर्णन, चरित्रें इ॰ ऐकणें; कीर्तन = ईश्वराचें चरित्र वर्णन करणें, वाचणें; स्मरण = ईश्वराचे गुण, चरित्र इ॰ आठवणें; पादसेवन = ईश्वराचे पाय धुणें, चेपणें इ॰ सेवा; अर्चन = पूजा करणें; वंदन = नमस्कार करणें; दास्य = चाकरी करणें; सख्य = ईश्वराशीं सलगी करणें; आत्मनिवेदन = ममत्व सोडून ईश्वरास सर्वस्व, स्वतःला अर्पण करणें. या नऊ प्रकारानीं करावयाची ईश्वराची भक्ति, सेवा. 'श्रवण कीर्तन स्मरण । पाद- सेवन अर्चन वंदन । दास्य सख्य आत्मनिवेदन । हे भक्ति नव- विधा पै ।' -विपू ५.२३. -दा १.१. ३. [सं. नवविधा = नऊ प्रकारची + भक्ति = सेवा] ॰सर-वि. नऊ सरांचा (हार इ॰). नव + सर] ॰सुती-स्त्री. जानवें करण्यासाठीं नऊ पदरी वळून केलेला दोरा. [नव + सुत = दोरा] ॰नवांकित-वि. पुठ्ठ्यावर नवाच्या आंकड्यानें चिन्हित (घोडा). [नव + सं. अंकित = चिन्हानें युक्त] नवास्त्र-वि. नवकोण पहा. [नव + सं. अस्त्र = कोण, कोपरा]

दाते शब्दकोश

नवकुलपांचे तारू      

लढाऊ गलबत : ‘विलायत जंजिरा नवकुलपांचं तारू ।’ – विवि ८·३·५४. नवक्लृप्ती      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उचाडपछाड

स्त्री. उलथापालथ; भानगड; घोंटाळा. ‘विलायत सरकारचे सपाट्यांन आमचे सरंजाम बहाल होऊन माघारे आले तस्मात् आतां आमचे सरंजामाची उचाड पछाड होणार नाहीं‘ –इना ४४.

दाते शब्दकोश

उचाडपछाड      

स्त्री.       उलथापालथ; भानगड; घोटाळा : ‘विलायत सरकारचे सपाट्यांत आमचे सरंजाम बहाल होऊन माघारे आले तस्मात् आता आमचे उचाडपछाड होणार नाही.’ − इना ४४.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

विलात

स्त्री. विलायत पहा.

दाते शब्दकोश

दस्त

पुन. १ कर; पट्टी; सारा. २ (गंजीफा) हात (चार पानांचा). ३ (ल.) ताबा; हक्क; सत्ता; अधिकार; अम्मल. 'डोळेझांक करून तसेंच देशास कजिया सोडून यावें तर तमाम दस्त उठेल.' -रा ३.१४९. ४ (जुन्या कागदपत्रांत) हात. ५ (व.) जुलाब; ढाळ. ६ शेला; दुपट्टा. ७ कैद. 'दस्त करा शिवराजाला ।' -ऐपो १४. [फा. दस्त् = हात] दस्त करणें- जबरीनें घेणें; पकडणें; कैद करणें; जिवंत धरणें. सामाशब्द- ॰अंमल-पु. गांवचा वसूल, हिशेब. ॰ऐवज-पु. (कायदा) अक्षरें, अंक किंवा खुणा या साधनांनीं पुरावा म्हणून उपयोग व्हावा या इराद्यानें कांहीं गोष्ट व्यक्त केली आहे असा लेख; हातचा कागद; प्रमाणपत्र; हक्कपत्र; कबाला; करारनामा; सही; ज्याच्या योगानें एखादा मनुष्य कायद्यांत बांधला जातो अशी कोणतीहि गोष्ट (लेख, तोंडीं वचन, खूण, हमी, लिहिलेला कागद इ॰). (इं.) डॉक्युमेंट. [फा. दस्त-आवीझ्] दस्तक-न. १ परवाना. २ (कु.) तोंडी अगर जबानी पुरावा. ३ जकातमाफीचें सरकारी पत्र. ४ आज्ञापत्र. 'मार्गीं मुजाइम न होतां सुखरूप जाऊं देणें म्हणोन दस्तक.' -वाडबाबा २.२४५. [फा.] ॰खत-न. १ हातचा लेख; सही. २ राजाची सही. ३ सही, शिक्का किंवा तो करण्याचा अधिकार. ॰खत दप्तर-न. सह्या घेण्याची व दप्तर ठेवण्याची कचेरी. ॰गिरी-स्त्री. १ मदत; साह्य. 'श्रीमंत माझी दस्तगिरी करतील.' -रा १.१५७. २ स्नेह; कृपा. ॰गीर- वि. कैद; बद्ध. 'इस्मालबेग दस्तगिरींत आला.' -दिमरा २.२६. ॰दराजी-झी-स्त्री. जुलुम; त्रास. 'बाजे विलायत सिवा मल- ऊत नामें आपल्या दर्कबजेत आणून दस्तदराची करितो.' -रा १६.७६. ॰नी-स्त्री. (चिलखताच्या) मुठीची दोरी. [फा.] ॰बाज-पु. १ दस्तक; परवाना; कौल; अभयपत्र. २ अभयहस्त. [फा.] ॰पा(पे)शी-पु. हस्तस्पर्श. ॰बाकी-स्त्री १ जमीनीचा सारा गोळा करून जामखर्च दप्तरी दाखल न केलेली रक्कम; (मामले- दाराच्या) हातीं राहिलेली बाकी; याच्या उलट शिस्तबाकी = योग्य येणें असलेली बाकी. २ शिल्लक (जवळ असलेली). ॰बोसी- स्त्री. हस्तचुंबन. [फा.] ॰माल-पु. भुजवस्त्र -शर. ॰रप्त-पु. बंदोबस्त; जप्तरप्त. 'दस्तरप्त सर्व आपला आहे.' -ऐटी २.७२. ॰रुमाल-पु. खिशांतील हातरुमाल. 'वैराग्याच्या वेगानें फड- कणार्‍या भगव्या झेंड्याला दारूबाजाचें तोंड पुसण्याचा दस्त- रुमाल केला.' -गडकरी-राजसंन्यास ७५. [फा. दस्त + रुमाल्] दस्तकी-पु. (व.) लवाजमा, रुसूम किंवा पोलिटिकल पेन्शन घेण्याची सनद ज्याच्या नांवानें असते तो (घराण्यांतील मुख्य मनुष्य).

दाते शब्दकोश