मराठी बृहद्कोश

सात मराठी शब्दकोशांतील २,८४,८८८ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

वेश्या

स्त्री. १ द्रव्याकरितां वाटेल त्याला आपल्या शरी- राचा विक्रय करणारी स्त्री; रांड; कसबीण. 'वेश्या म्हणजे जोड्यांतल्या खड्यासारख्या आहेत, लवकर निघत नाहींत आणि खुपल्यावांचून रहात नाहींत.' -मृ ५०. २ कलावंतीण; नायकीण; नर्त्तकी. [सं.] ॰गमन-न. रंडीबाजी. ॰वृत्ति-व्यवसाय- स्त्रीपु. शरीरविक्रय; कसब; भगवृत्ति. वेश्याचार्य-पु. वेश्यांचा मालक; वेश्या बाळगणारा. [वेश्या + आचार्य] वेश्यागार, वेश्यालय, वेश्याश्रय-पुन. वेश्या राहतात तें ठिकाण, घर; कुंटणखाना. [वेश्या + आगर, आलय, आश्रय]

दाते शब्दकोश

वेश्या f A dancing girl; a harlot.

वझे शब्दकोश

वेश्या vēśyā f (S) A dancing girl; a woman of whom the appointed profession is public dancing and harlotry: also a harlot or courtesan generally. Ex. वेश्यांची संगत धरिली ॥ नटव्यांजवळी सदा बैसे ॥.

मोल्सवर्थ शब्दकोश

(सं) स्त्री० वारांगना, कसबीण, नायकीण.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

पण्यांगना

(सं) स्त्री० वेश्या, रांड, कसबीण.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

स्त्री. वेश्या; कसबीण; बाजारबसवी. 'जें व्याघ्राचें क्षेत्र । जें पण्यांगनेचें मैत्र । जें विषयविज्ञानयंत्र । सुपू- जित ।' -ज्ञा ८.१४६ [सं. पण्य + अंगना]

दाते शब्दकोश

संबंधित शब्द

वेश्या

रखेली, राख, ठेवलेली बाई, अंगवस्त्र, पात्र, रक्षा, उपस्त्री, विसांव्याची जागा, रंडी, रांड, बाजारबसवी, वारांगना, पण्यांगना, नाटकशाळा, गणिका, कसबीण, बाजारी माल, वारयोषिता, मुरळी, भोगदासी, सर्वांची इच्छाराणी, अखंड सौभाग्यवती, देहविक्रीचें जीवन कंठणारी, सा-या गांवची उतारपेठ, शरिराचा बाजार मांडणारी, सौंदर्य बेचन करणारी.

शब्दकौमुदी

वार

पु. १ दिवस; अहोरात्र; आठवड्यांतील प्रत्येक दिवस. उदा॰ रवि-सोम-मंगळ-बुध-गुरु-शुक्र-शनि-वार. 'त्या शुद्ध सत्त्व तनुला भेट गुरुवंधु ज्यांत तो वार ।' -मोकृष्ण ८१.१. 'चार दिवस बाजार तेथिचा वार करूनि लवकरि ।' -राला १६. २ ठराविक दिवस; आठवड्यांतील ठराविक दिवस; ब्राह्मणास, विद्यार्थ्यास जेवावयास घालण्याचा दिवस. 'गरीब मुलें वारानें उदरनिर्वाह करतात.' -टिले ४.१६५. ३ नियमित दिवस; पाळीचा दिवस (वेश्येस यजमानाकडे जाण्याचा-यावरून वार- वधू, वारांगना, वारयोषित्, वारयुवति, वारनारी, वारस्त्री इ॰ शब्द बनलें). 'ज्याचा वार तयासचि हेतु पुसो कीं कसा स्वअरि खचला ।' -मोआदि ३१.६९. 'देवीपुढें नाचत वारनारी ।' -सारुह ८.६१. ४ आठवडा (तोच वार पुन्हां येण्याला लागणारा काळ यावरून). 'तो गेल्याला आज दोन वार झाले.' ८ (ना.) आठवड्याच्या हप्त्यांनीं फेडावयाचें कर्ज. 'मी बुटीचा वार काढला आहे.' -क्रिवि. वेळां; आवृत्तिवाचक अव्यय; एकवार, अनेक- वार; त्रिवार; दोनवार. वार करणें-असणें-नियमित वारीं उपवास करणें. ॰कर-करी-पु. १ ठराविक वारीं जेवावयास येणारा विद्यार्थी, ब्राह्मण, खंडोबाचा भक्त इ॰ २ ठराविक वारीं वसूल करावयाचा हप्ता उगविण्याकरितां फिरणारा सावकाराचा मनुष्य, कारकून. वारनारी-स्त्री. वेश्या. वारमध्यें पहा. वार- मुख्या-स्त्री. मुख्य वारांगना. 'मधें मधें चालति वारमुख्या ।' -सारुह ८.५०. वारयुवति-स्त्री. वेश्या. वार पहा. वारवधू- स्त्री. वेश्या. वार पहा. वारस्त्री-स्त्री. वेश्या. वार पहा.

दाते शब्दकोश

बसवी

स्त्री. वेश्या. 'जाणोजी सेवाले याचे हवेलीजवल येक बसवी राहत होती तिचे घर लुटुन आनले.' -पेद ६.५. [सं. वेश्या; बसु = बैल; बसवी = गाय]

दाते शब्दकोश

खानगी

स्त्री दासी; वेश्या; नायकीण. 'सलाबतजंग ... दोन जनाने, हत्ती व कांहीं खानग्या घेऊन गेले होते.' -रा १. १९७. [फा. खानगी = वेश्या]

दाते शब्दकोश

रंडा

स्त्री. १ विधवा स्त्री; रंडकी. २ जारिणी; स्वैर स्त्री. [सं.] रंडका-वि. १ गरीब; निरुपयोगी. २ विधवा (स्त्री.) अगर विधुर (पुरुष). ३ (ल.) नागवा; उघडा; नंगा; कफल्लक; दरिद्री; कृपण; करुणास्पद स्थिति असलेला. ४ फायदा नसलेला; निरुपयोगी. [रंडा] ॰अमल-पु. बायक्या, जनानी, नामर्द स्त्रीबुद्धि मनुष्याचा कारभार. रंडगोलक-पु. गोलक नांवाचा वर्ग व त्यांतील व्यक्ति; विधवेच्या ठायीं जारापासून उत्पन्न झालेली संतति. रंडागीत-न. १ विधवेची कहाणी, गीत. २ विधवेच्या शोकासारखें गाणें. (ल. वाईट काव्यास म्हणतात). 'रंडागीतानि काव्यानि' [सं.] ॰पंडित-वि. बायकांत निर्लज्जपणें बोलणारा; थापा मारणारा; बढाई मारणारा. [सं.] रंडापति-वि. १ ज्यानें रांड बाळगिली आहे असा. रंडीबाज; छिनाल. २ (ल.) बांयक्या; बाइलबुद्धया; ॰पुत्र-पु. आई विधवा झाल्यावर अगर बाप मेल्यावर जन्मास आलेला पुत्र, मुलगा. [सं.] ॰प्रिय-वि. १ विधवांची आवड असलेला. २ बाइलवेडा; स्त्रीचा नादी; स्त्रीलंपट; स्त्रैण. रंडी-स्त्री. (हिं.) १ वेश्या; नाचणारी स्त्री. २ दासी; रखेली. ३ पत्त्याचे खेळांतील राणी. [सं. रंडा] रंडी- बाज-वि. वेश्या इ॰ रंडीचें ज्यास व्यसन आहे तो; बाहेर- ख्यांली, व्यभिचारी; परस्त्रीगमनी; वेश्यागमनी. रंडीबाजी- स्त्री. १ वेश्यागमन; बाहेरख्यालीपण. २ (क्व.) रड्डीऐवजीं उपयोग करतात. रंडुला, रंडोला-वि. १ बायक्या. २ स्त्रैण; बाइल- बुद्धया. [रांड] रंडेय-पु. रंडीपुत्र; वेश्यापुत्र; विधवापुत्र; अनौरस मुलगा.

दाते शब्दकोश

वेसवा

स्त्री. १ वेश्या; कसबीण. २ गरती असून व्यभि- चार करणारी स्त्री. ३ (सामा.) छचोर, बेढंगी स्त्री. ४ (शिवी) निर्लज्ज स्त्री. [सं. वेश्या]

दाते शब्दकोश

वेसवा vēsavā f (वेश्या S) An adulterous or wanton woman; a woman (married or widowed, i.e. not of that class of which whoredom is the appointed profession) indulging in lewd amours; a strumpet or harlot.

मोल्सवर्थ शब्दकोश

(सं) स्त्री० वेश्या, रांड.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

येसवा

स्त्री. १ वेश्या. वेसवा पहा. २ (बायकी) भांड- खोर, तंडणारी, तोंडाळ बाई. 'बाई येसवाच आहे.' [सं. वेश्या]

दाते शब्दकोश

सामान्य

न. १ सर्वसाधारणपणा; समानता; अनेक व्यक्ती किंवा जाती यांशीं संबंध. २ जातीचा, प्रकाराचा धर्म, गुण. 'आंबा, पिंपळ, ताड, माड, इत्यादि सर्व वृक्षांवर वृक्षत्व म्हणून एक सामन्य राहतें.' ३ साहित्यांतील एक अलंकार. एखादी वस्तु इतर तत्सदृश वस्तूंच्या सान्निध्यांत असल्यानें जेव्हां ओळखूं येत नाहीं तेव्हां हा अलंकार होतो. उदा॰ 'तडागांत जलक्रीडा करायास्तव सांगन । तो गेला, परि पद्मांत नोळखे अंगनानन ।'. -वि. १ सर्वसाधारण; सर्वांना लागू पडणारें; सर्वांचें. 'सकळांस जें मान्य । तेंचि होतसे सामान्य ।' -दा १५.६.६. २ साधारण प्रतीचा; मध्यम. चांगला आणि वाईट, उच्च आणि नीच यांमधला. 'जैसें सत्रीं अन्न जालें । कीं सामान्या बीक आलें ।' -ज्ञा १३.७००. [सं.] ॰नाम- न. (व्या.) वस्तु-पदार्थमात्राचें नांव. याच्या उलट विशेष- नाम. ॰पक्ष-पु. मध्यम मार्गं; मधला पक्ष, प्रकार. ॰रूप-न. (व्या.) विभक्तिप्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागण्या- पूर्वीं नामाचें जें रूप बनतें तें. उदा॰ घोडा, लांकूड, आज्ञा यांना चा, नें, स, ला, पासून, पाशी, वर इ॰ लागतांना घोड्या, लाकडा, आज्ञे अशी रूपें होतात. ॰लक्षण-न. साधा- रण, जातिगत विशेष, चिन्ह. ॰लिंग-न. ज्या नामाचें (पुरुष किंवा स्त्री) लिंग निश्चित करतां येत नाहीं तेव्हां त्याचें लिंग सामन्य समजतात. उदा॰ मूल, मी, तूं, इ॰. ॰शासन-न. अविशिष्ट, सर्वत्र लागू पडणारा हुकूम, कायदा, आज्ञा. ॰सर्वनाम- न. जें सर्वनाम साधारणपणें कोणत्याहि नामाबद्दल येतें तें. उदा॰ कोणी, कांहीं, सर्व, अमुक, इ॰. ॰स्त्री-स्त्री. वेश्या. 'पात्रें भाट नागारी । सामान्य स्त्रिया काजुवारी ।' -ज्ञा १७.२९६. सामान्यतः-क्रिवि. १ साधारण प्रकारें; सामन्य रातीनें. २ सर्व जातीला धरून; व्यक्तिशः नव्हे अशा प्रकारें. ३ अविशिष्ट; सार्वत्रिकपणें. ४ व्यापक रीतीनें; बहुसंख्येला, मोठ्या भागाला धरून. ५ बहुशः; नेहमीं. ६ एकंदरीनें; एकूण. सामन्या- स्त्री. वेश्या; बटीक. 'सामान्या भली आंग । न शिवे तंव ।' -ज्ञा १८.२५०.

दाते शब्दकोश

नायक

पु. १ मुख्य; म्होरका; पुढारी; सेनापति; स्वामी; धनी; सूत्रधार. उदा॰ सेना-ग्राम-नट-नायक. रघुनायक, यदु- नायक. -ज्ञा १.१०३. २ मुख्य पात्र, ज्याचें चरित्र काव्य नाट- कांत वर्णिलें जातें किंवा ज्याच्या चरित्राच्या अनुरोधनें संविधा- नक रचलें जातें तो पुरुष. (हा नायिकेचा नवरा असतोच असें नाहीं). ३ (पोवाडा, लावणी इ॰) श्रृंगारिक काव्यामध्यें ज्याचे आश्रयानें श्रृंगार वर्णितात तो; प्रधान वर्णनीय पुरुष (स्त्रीला नायिका म्हणतात). ४ गळ्यांतील हाराच्या मधलें रत्न. ५ नाईक पहा. ६ पति; स्वामी. 'करुनि वंदन जानकीनायका ।' ७ (साहित्य) चार प्रकारच्या नायकांपैकीं प्रत्येक. नायकचतुष्टय पहा. [सं. नी = नेणें, नायक] ॰चतुष्टयन. (साहित्यशास्त्र) धीरोदात्त, धीरप्रशांत, धीरललित आणि धीरोद्धत असे चार- नायक. नायक हा यश, प्रताप, धर्म, काम, अर्थ या उद्दिष्टांप्रमाणें वागत असल्याचें दाखवितात. ॰डा-पु. महारजातीचा म्होरक्या; महारांतील पुढारी. ॰वडा-डी, वाडा-डी, नाईक(कु)व (वा)डी-पु. १ पूर्वींचा जमीनमहसूल वसूल करणारा शिपाई. २ (नायकवडा) रामोशी, बेरड, यांचा म्होरक्या, नाईक. ३ जासूद; ४ पायदळांतील किंवा किल्यावरच्या दहा, वीस मनुष्यांवरचा अधिकारी. 'वसंतांची नायकवडी । खोचीति कोकि- ळांची धाडी ।' -भाए ४३४. ५ सेनापति नायक. 'न मिळतां नायकवडी । दळांची आइती थोडी ।' -शिशु ४८०. ॰वाडी- स्त्री. नायकवाड्याचें काम. नायका-स्त्री. कथानकांतील, काव्यांतील, समूहांतील वगैरे ख स्त्री; स्त्रीनायक नायिका पहा. 'जे लक्ष्मी मुख्य नायका । न मनेचि एथ ।' -ज्ञा ९.३७६. नायकी-स्त्री. १ नायकाचें काम व हुद्दा. २ मालकी; स्वामित्व. -वि. १ मालकीचे; स्वामित्वाचे. २ पुढारी; मुख्य असलेलें (राज्य, जात ). ३ (संगीत) गायानांत निरनिराळ्या रागां- तील चीजा म्हणण्याचें गुरूपासून संपादन केलेलें (ज्ञान). नायकी- कानडा-पु. (संगीत) एक राग. ह्या रागांत षड्ज, तीव्र ऋषभ, कोमल गांधार, कोमल मध्यम, पंचम, कोमल निषाद हे स्वर लाग- तात. जाति षाडव षाडव. वादी मध्यम संवादी षड्ज. गायनसमय मध्यरात्र. नायकीण-स्त्री. १ नायकाची बायको; नायिका. २ कारखान्यांत दाहा पांच स्त्रियांवर अधिकार, हुकमत गाजविणारी स्त्री; मुकादमीण. ३ मालकीण; धनीण; सत्ताधीश स्त्री. ४ नाचणा- रीण; कलावंतीण; गाणारीण अविवाहित स्त्री; कंचनी; वेश्या. ५ (गो.) वेश्या; व्यभिचारी स्त्री. रखेली. म्ह॰ नायकिणीच्या पोराळ दिसाची बापुय ना रातची आवय ना = नायकिणीच्या मुलाला दिवसाचा बाप दिसणें शक्य नाहीं व रात्रीच्या वेळीं आई मिळणें शक्य नाहीं. नायको-पु. (कु.) दशावतारांतील सूत्रधार (याच्याकडे फक्त पदें म्हणण्याचें वगैरे काम असतें). नायक्या बैल-पु. बैलांच्या रांगेंतील पुढचा बैल.

दाते शब्दकोश

अक्षय सवाशीण, अक्षय सवाष्ण      

स्त्री.       १. जिचा पती परागंदा होऊन बराच काळ लोटला आहे व परत येण्याचा संभव नाही अशी स्त्री. २. (ल.) वेश्या; कलावंतीण; नायकीण. [सं. अक्षय + सुवासिनी]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अक्षयसवाशीण, अक्षयसवाष्ण

स्त्री. १ जिचा पति परागंदा होऊन गेल्यामुळें मुद्दापत्ता नाहीं असा बराच काळ गेला आहे, बहुधा येण्याचा संभव नाहीं अशी स्त्री. २. (उप.ल.) वेश्या; कलावंतीण; नायकीण. [सं. अक्षय + सुवासिनी]

दाते शब्दकोश

अखंड सौभाग्यवती      

स्त्री.       जिला सतत सौभाग्यसुख लाभले किंवा लाभणार आहे अशी स्त्री; अविधवा. २. (ल.) वेश्या.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अनंगदानी

स्त्री. वेश्या. [सं. अनंग + दान]

दाते शब्दकोश

अनंगदानी      

स्त्री.       वेश्या. [सं. अनंग + दान]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अंगरस

(सं) पु० पाणी घातल्याखेरीज काढलेला रस. अंगलट, अंगलोट, (सं) न० अंगाचें वळण, ठेवण, बांधा. अंगवस्त्र, (सं) न० धोतर, उपरणें. २ वेश्या.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

अप्सरा

स्त्री. स्वर्गोतील स्त्रिया, वेश्या; (ह्या समुद्रमंथनकालीं अपः म्हणजे पाणी यापासून उत्पन्न झाल्या). गंधर्वोगना; देव- लोकींच्या नृत्यांगना. यांचीं प्रख्यात ७ कुळें आहेत. (१ घृताची, २ मेनका, ३ रंभा, ४ ऊर्वशी, ५ तिलोत्तमा, ६ सुकेशी, ७ मंजु- घोषा). 'येउनि वराप्सरा अवलोकी राजन्यसंगरा ज्या जी ।' -मोभीष्म २.१०. (ल.) सुंदर स्त्री. [सं. अप्सरस्; अप् + सृ]

दाते शब्दकोश

अपविक्रय करणे      

सक्रि.       नीच कामासाठी, वेश्या व्यवसायासाठी विकणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आवा      

स्त्री.       १. बाई : ‘असली तरवार बहादुर आवा आमासनी साफ बायकू नको.’ − बाय २·३. २. राख; रक्षा; ३. ठेवलेली स्त्री; रंडी; वेश्या; व्यभिचारी स्त्री. [सं. अंबा, का. अव्वा]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अवा

स्त्री. १ आवा; बाई. अवाजी पहा. २ राख; ठेवलेली स्त्री; रक्षा. ३ रंडी; वेश्या; व्यभिचारी स्त्री. [कां. अव्वा-व्वे = आई, आजी, पोक्त बाई. कु. आवो. तुल॰ सं. अंबा]

दाते शब्दकोश

बावन-न्न

वि. ५२ ही संख्या. ॰कसन. उत्तम सोनें. 'बावनकसाची नाणीं ।' -वेसीस्व ७.५७. [बावन + कस] ॰कशी वि. १ अतिशय शुद्ध व उत्तम; बावन वेळां शुद्ध केलेलें; (सोन्याच्या शुद्धतेचे बावन कस धरले तर) बावनहि कस ज्याचे उतरतात असें. 'सोनेंच बावनकशी न कसें म्हणावें ।' -र ६. २ (ल.) पवित्र; निर्दोष; प्रामाणिक; (मनुष्य, पदार्थ इ॰). [बावनकस] ॰ख(खा)णी-स्त्री. (पुणें.) वेश्यांची गल्ली (शुक्रवार पेठेंत खाजगी- वाल्यांच्या पिछाडीस बावनखणांची एक चाळ होती. तींत वेश्या राहात असत त्यावरून). ॰बत्तिशा-बाविशास्त्रीअव. बारा- बाविशा पहा. ॰बीर-पु. १ एक देवता समूह. २ पराक्रमी किंवा हुषार इसम. ३ (नाग. निंदार्थीं) शूर; पराक्रमी. म्ह॰ एक ठेंच खाई तो बावनबीर होई; बावन ठेंचा खाई तो गद्धा होई. [हिं.] ॰मातृ(त्रु)कास्त्रीअव. ॐ कारापैकीं अ, उ, म या तीन मात्रा व वरील बिंदु ही अर्धमात्रा मिळून साडेतीन मात्रा व त्या पासून पुढें बावन १६ स्वर व ३६ व्यंजनें मिळून ५२ मातृका. ॐकार आणि स्वर व व्यंजनें मिळून ५२ मुळाक्षरें. 'आकार उकार मकार । अर्धमात्राचें अंतर । औटमात्रा तदनंतर । बावन मात्रुका ।' -दा १२.५.९. [बावन + मातृका अक्षर] ॰मुद्रा- स्त्रीअव. चंदनाच्या गंधाच्या मुद्रा, ठसा. 'बावनमुद्रा बुद्धिसमुद्रा परखुणमुद्रा सुवर्णमुद्रा दे आमुच्या ।' -पला ४. ॰बावन्नी-स्त्री. (गो.) पत्यांच्या खेळांत तेरा हात करून मिळालेला विजय.

दाते शब्दकोश

बसविणें

सक्रि. १ बसायास लावणें. 'व्रजावन करावया बसविलें नखाग्रीं धरा ।' -केका ५. २ पक्कें करणें; बांधणें; स्थिर करणें (कोणत्याहि स्थितींत). ३ माथीं मारणें; सोंपणें; लादणें. ५ भोगावयास लावणें; वर आणणें; गुदरविणें (कांहीं अनिष्ट). ६ योग्य करणें; जमविणें; लावणें; जुळविणें; मिळविणे. ७ स्थापणें (राज्य, सत्ता, कानू, विधि, वहिवाट). ८ (बायकी) न्हाणवलीस मखरांत ठेवणें (गर्भाधानाच्या पूर्वीं). [बसणें] बसवी-स्त्री. १ (बाजारांत बसणारी) वेश्या; कसबीण; निर्लज्जत्वादि गुणविशिष्ट गरती स्त्री २ जंगम मताची कसबीण. -शास्त्रीको. ३ देवळी; मुरळी. [बसणें]

दाते शब्दकोश

भावीण

स्त्री. १ देवीच्या सेवेला जिणें वाहून घेतलें आहे अशी स्त्री; मुरळी; देवदासी. या वर्गांतील पुरुषांना देवळी म्हण तात. २ नायकीण; वेश्या. 'कलावंतिणी व भाविणी यांस निखालस संतति नसेल...' -गोमांतक रीतिभाती पृ. ९. [भाव] भावि- णीचा कासोटा-पु. (ल.) मालकाची परवानगी आहे किंवा नाहीं ह्याचा विचार न करतां वाटेल त्यानें वापरावी अशी वस्त्र, पात्र इ॰ कोणतीहि वस्तु.

दाते शब्दकोश

भक्तीण

स्त्री० भक्ति करणारी. २ वेश्या.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

दुकानदारी      

स्त्री.       दुकानदाराचे काम; धंदा; व्यापार. [क.] (वा.) दुकानदारी फैलावणे – (गोसावी, वेश्या इ. नी) लबाड्यांचे जाळे पसरणे; अनेकांवर पाश टाकणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

धर्मशाळा, धर्मसाळा      

स्त्री.       वाटसरू लोकांना उतरण्यासाठी बांधलेली वास्तू. [सं. धर्मशाला] (वा.) धर्मशाळेचे उखळ – (धर्मशाळेतील उखळाचा कोणीही उपयोग करतात यावरून) वेश्या.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गावमेव्हणी      

स्त्री.       गावातील वेश्या.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गावसवाशीण, गावसवाष्ण      

स्त्री.       १. (गोंधळ, मोहतुर इ. प्रसंगी) पाटील किंवा चौगुला याच्या बायकोला म्हणतात. २. (ल.)गावची वेश्या.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गणिका

स्त्री. वेश्या; कलावंतीण; कसबीण; रांड. 'भिक्षा मागुनि दारोदारीं फेडिन ॠण गणिकेचें ।' -मृच्छ ३५. [सं.]

दाते शब्दकोश

(सं) स्त्री० वेश्या, विश्वयोषिता, रांड, कसबीण.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

गणिका      

स्त्री.       वेश्या; कलावंतीण; कसबीण : ‘भिक्षा मागुनि दारोदारीं फेडिन ऋण गणिकेचें ।’ - मृच्छ ३५. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गोवेकरीण      

स्त्री.       गोव्यातील वेश्याव्यवसाय करणारी स्त्री : ‘महाराष्ट्रात गोवेकरीण ह्या शब्दाचा अर्थ विशिष्ट प्रांतातील वेश्या असा आहे.’ –राले ९४.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

ग्राम्यस्त्री      

स्त्री.       वेश्या; रांड : ‘ग्राम्यस्त्रियांचे संगतीं जाणें ।’ –एभा ८¿१३९.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

हट-ट्ट

पु. बाजार; मंडई; विशषतः फिरता बाजार, जत्रा. [सं. हट्ट] म्ह॰ १ हटीं जेवण मठीं निद्रा. (स्वैराचार दाखविण्या- साठीं योजतात). २ हट गोड आहे परंतु हात गोड नाहीं. (बाजारी माल चांगला आहे पण तयार करणारा चांगला नाहीं). हटास ओघळ जाणें-रेलचेल, समृद्धि असणें. ॰करीकरीण-पु. स्त्री. १ बाजारकरी; बाजारकरीण. २ बाजारांत विक्री करणारा माणूस, स्त्री; दुकानदार. ॰कोरी-पु. हटकरी पहा. 'राम्याराम्या लांब दोरी, हटकोर्‍याच्या भाकर्‍या चोरी.' ॰बाजार-पु. बाजारहाट. 'कुटुंबवत्सळ खर्च पदरीं । म्हणवूनि धावे हटबाजारीं ।' ॰वट- स्त्री. फळें; भाजीपाला विकण्याची जागा; भाजीबाजार. ॰विला- सिनी-स्त्री. वेश्या; बाजारबसवी. [सं.] हटाऊ-वि. १ बाजारासंबंधीं; बाजारी. २ हलका; क्षुद्र; नीच. म्ह॰ हटाऊ गुरु आणि शिटाऊ-पटाऊ-भेटाऊ चेला.

दाते शब्दकोश

जन्मसवाशीण, जन्मसौभाग्यवती      

स्त्री.       १. अहेवपणी मरणारी स्त्री. २. (ल.) वेश्या.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

झुलवा

पु. (मुसलमानांत) वेश्या किंवा विधवा हिस स्वस्त्री म्हणून बाळगतांना तिच्याशीं लग्नविधीप्रमाणें करावयाचा एक विधि. (क्रि॰ लावून घेणें). [झुलविणें?]

दाते शब्दकोश

झुलवा      

पु.       वेश्या, जोगतीण किंवा विधवा हिला स्वस्त्री म्हणून बाळगताना लग्नविधीप्रमाणे करायचा एक विधी.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कलावंतीण

स्त्री. १ कळवंतीण; गायिका; वेश्या; नर्तकी; नायकीण; कलावती पहा. ह्या बाया उत्सवांत, यात्रेंत, बैठकींत गाणें करतात. 'स्वर्गांतील जी प्रमुख कलावंतीण मेनका तिची मुलगी शकुंतला' -नाकु ३. २. [सं. कलावती]

दाते शब्दकोश

स्त्री० नायकीण, वेश्या, कंचनी.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

कलावंतीण      

स्त्री.       १. कळवंतीण; गायिका; नर्तकी. २. वेश्या; नायकीण. ह्या स्त्रिया उत्सवात, यात्रेत, बैठकीत गाणे करतात : ‘स्वर्गातील जी प्रमुख कलावंतीण मेनका तिची मुलगी शकुंतला…’ - नाकु ३·२. पहा : कलावती [सं. कलावती]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कलावती

स्त्री. १ नर्तकी, नायकीण, वेश्या. [सं.] २ तुंबरूच्या वीणेचें नांव [सं. कला + वत्]

दाते शब्दकोश

कलावती      

स्त्री.       १. कलेत निपुण असलेली स्त्री. २. नर्तकी. ३. नायकीण; वेश्या. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कंचनी      

स्त्री.       नाचणारी बाई; कसबीण; वेश्या; कलावंतीण; नर्तकी : ‘त्या कंचनीविषयी तुम्हास कसे काय वाटते?’ – विवि १०·५ - ७·१२२.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कसबीण

स्त्री० वेश्या, रांड.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

स्त्री. नाचणारी स्त्री; वेश्या; शरीरविक्रय करून त्या पैशावर चरितार्थ चालविणारी स्त्री. कलावंतीण पहा. [कसब]

दाते शब्दकोश

कसबीण      

स्त्री.       नाचणारी स्त्री; वेश्या; शरीरविक्रय करून त्या पैशावर चरितार्थ चालवणारी स्त्री. पहा : कलावंतीण [फा. कस्ब]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कस्बीण; कज़्बीण

(स्त्री.) वेश्या; कलावन्तीण; गुञ्जन-स्त्री.

फारसी-मराठी शब्दकोश

कुंटणु      

पु.       वेश्या व्यवसायातील दलाल : ‘मातुगा । कुंटणु । भेडु । कांपिरा ।’ - कला ८.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कुटुर्‍याची चोळी

स्त्री. (गो.) वेश्या वगैरे स्त्रिया घालतात अशी विशिष्ट प्रकारची, घट्ट बसणारी चोळी.

दाते शब्दकोश

कवडा

पु. १ मोठी कवडी. 'आयुष्याचे तीन कवडे । विषयाचें चाडें कदा न करी ।' -एंभा ३.५६१. 'जैसा वेश्या- भोगीं कवडा वेंचे । मग दारहि चेपूं न ये तियेचें ।' -ज्ञा ९. ३२९. 'नुसता पोरवडा । घरीं न कवडा चित्तीं बरा नीवडा ।' -आसु ४९. 'नेदी फुटका कवडा । चोरीं घातला दर्वडा' -दावि २८४. २ (ल.) डोळ्यावर येणारा सारा; डोळ्यांतील फूल; कवडी. ३ विखुरलेले, विस्कळीत मेघ, ढग. ४ (चांभारधंदा) गिरणींतील साच्यांस लागणारें कातडें. ५ दह्याचा किंवा नासलेल्या दुधाचा घट्ट व कापतां येणारा गोळा; गांठ; गठली. 'दुग्धीं कांजीचा थेंबु पडे । तेणें दुग्धाचे होती कवडे ।' -भारा १०.६७. [सं. कपर्दिक] ॰मिरविणें -क्रि. निषाणी, चिन्ह, लक्षण दाखविणें, खेळणें (देवीचा भुत्या किंवा आराधी देवीचा अलं- कार म्हणून आपल्या गळ्यांत कवड्यांची माळ घालतो यावरून) कोणत्याहि गोष्टीचें वैभव मिरविणें. 'आपले कवित्वाचा कवडा । मिरवी सधन सभेपुढें ।' ॰गहूं, कवड्या गहूं -पु. एक प्रकारचा गहूं. खापल्या गहूं पहा.

दाते शब्दकोश

खानगी      

स्त्री.       दासी; वेश्या; नायकीण : ‘सलाबतजंग .... दोन जनाने, हत्ती व कांही खानग्या घेऊन गेले होते.’- मइसा १·१९७. [फा.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

लवण्डी

(स्त्री.) [फा. लवन्द्] वेश्या; दासी; रखेली.

फारसी-मराठी शब्दकोश

लवंडी

स्त्री. १ बटीक; दासी. २ वेश्या. ३ रखेली. [फा. लवन्द्; हिं. लौंडी] लवंडी(डि)चा-वि. (एक शिवी) नीचोत्पन्न; जारज. हा शब्द शिवी देण्यांत, निंदा करण्यांत योज- तात. 'कुणिकुन आला लवंडिचा घातक ।' -ऐपो १२६.

दाते शब्दकोश

मालजादी

स्त्री. वेश्या; रांड; कसबीण; वेश्याकन्या. [फा. माल्झादा = रंडीपुत्र]

दाते शब्दकोश

मौल

न. कपट, इंद्रजाल. मौलाचा बाजार-मौला- बाजार व मिनाबाजार भरविण्याची पूर्वी चाल होती. या बाजारांत मालाची विक्री करण्यास बहुधा वेश्या किंवा स्त्रिया असत. त्या मालाची मागतील तितकीच किंमत द्यावी लागे. आणि एकदा रक्कम किंवा माल मागितल्यावर तो घ्यावाच लागे असा नियम असे. हा बाजार रात्रीस भरे ह्याचाच दुसरा प्रकार खोट्या रकमा (वस्तु) किंवा रकमेचें रूपांतर करून बहुत किंमतीची रक्कम थोड्या किंमतीस द्यावयाची. यासच मौलाचा बाजार म्हणतात. 'तेव्हां छद्मी जयपूरवाल्यांनीं शहरांत मौलाचाचा बाजार भरविला । ' -मल्हारराव चरित्र ६८.

दाते शब्दकोश

मिस्सी लावणें

मिस्सी लावणें missī lāvaṇēṃ To initiate, or invest with the title to exercise the profession of वेश्या, by rubbing मिस्सी over the teeth. This is a rite amongst the कळवांतीण -females, and is performed by the नायकीण. 2 To perform the ceremony of taking a woman into concubinage.

मोल्सवर्थ शब्दकोश

नायकीण

स्त्री० मुकादमीण. २ कसबीण, वेश्या.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

नायकीण      

स्त्री.       १. नायकाची बायको; नायिका. २. कारखान्यात दहापाच स्त्रियांवर अधिकार, हुकमत गाजविणारी स्त्री; मुकादमीण. ३ मालकीण; धनीण; सत्ताधीश स्त्री. ४. नाचणारीण; कलावंतीण; गाणारी अविवाहित स्त्री. ५. वेश्या; रखेली; व्यभिचारी स्त्री. (गो.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

नगरभवानी      

स्त्री.       १. गावभर भटकणारी, रिकामटेकडी स्त्री. २. वेश्या.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

नटी / नटवी / नटिनी

(सं) स्त्री० नाचणारी, वेश्या. २ सूत्रधाराची बायको.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

पात्र

(सं) न० भांडें. २ योग्य. ३ पान. ४ नदीची रुंदी. ५ वेश्या.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

पात्र, पात्री

न. १ (सामा.) भांडें; ताट, तबक, पेला, वाटी, पातेली इ॰ 'घरी द्यावया अन्न हस्तांत पात्री ।' -नरहरि गंगारत्नमाला १५५. (नवनीत पृ. ४३३). २ कांहीं एक पदार्थ ठेवायास आधारभूत वस्तु. जसें:-पेला, उथळें, जलाशय, अन्ना- शय, मलाशय इ॰ प्रतिग्राहक (दान, आशिर्वाद, शाप इ॰चा); खाण; समुद्र; निधि (गुण, दुर्गण इ॰चा). ३ नदीचा प्रवाह जेथून जातो त्या जागेची रुंदी. 'आकारे द्विगुणित पात्र होय तीचें ।' ४ (नाट्य) वेष; सोंग; भूमिका. ५ अतिथी. 'या सदुदारा- पासुनि पात्रें वरिती गुणानुरूपार्थ ।' -मोकर्ण ११.१६. ६ (व.) पत्रावळ. ७ वेश्या; राख; रखेली. -वि. १ योग्य; लायक; युक्त. जसें:-प्रशंसापात्र-निंदापात्र-दानपात्र-मोहपात्र इ॰ 'परि पात्र होय गुरुमखसुकृतें तो सुतलाभा जीन ।' -मोरामायणपंच शनी-बाल २. २ आधार. 'करितां आज्ञाभंग क्षोभाचें पात्र जाहले चवघे ।' -मोआदि ११.६७. [सं.] ॰नाचविणें-उधळेपणानें राहणें, वर्तणें. पात्रांत राख कालविणें-जीवनाच्या किंवा निर्वाहाच्या साधनांचा नाश करणें. पात्रावरून उठविणें-(ल.) उपजीविकेचें साधन काढून टाकणें, नाहींसें करणें. पात्रीं बसणें- पानावर भोजनास बसणें. पात्रें पुजणें-पानावर थोडेंसे नांवाला वाढणें; वाढलेसें करणें. पात्रें वाढणें-१ जेवणाचीं पानें मांडणें. २ (ल.) साज मांडणें; सर्व तयारी करणें. म्ह॰ पात्र पाहून दान करावें. ॰वस्त्र-न. (व्यापक) भांडींकुडीं व कपडेलत्ते; संसारांतील अवश्य लागणार्‍या वस्तू.

दाते शब्दकोश

पात्रा

स्त्री. नर्तकी; नाचणारी; नायकीण; वेश्या; रांड. [सं. पात्र]

दाते शब्दकोश

पुंश्चली

स्त्री. स्वैरिणी; वेश्या; व्यभिचारिणी. 'पुरुष सदा स्त्री अनुराग । परी सहसा न करवे प्रसंग । त्यासि पुंश्चलीचा घडल्या संग । ते बाधी निलाग हावभावीं ।' -एभा २६.१७५. [सं.] ॰चरित्र-न. वेश्यावृत्ति; व्यभिचारवृत्ति. [सं. पुंश्चली + चरित्र]

दाते शब्दकोश

फटरांड

स्त्री. हलकट वेश्या. फट पहा.

दाते शब्दकोश

राख

(सं) स्त्री० रक्षा, रखा, भस्म, राखंडी. २ रांड, वेश्या, राखलेली स्त्री.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

रामजानी

स्त्री. एक संकर जातीय स्त्री; वेश्या. 'गुलाब मुसलमान धर्माची रामजानी होती.' -म्हावम्हा. [हिं. राम- जनी]

दाते शब्दकोश

रांड

स्त्री. १ (निंदार्थी) विधवा. २ दासी; कलावंतीण; वेश्या. ३ (तिरस्कार, राग किंवा अनाथ स्थिति दाखवावयाची असतां) स्त्रीजात; बायको. 'तुझी रांड रंडकी झाली.' -नामना १२. ४ (निरुद्योगीपणा, नवरा मेलेल्या स्त्रीच्या स्थिती- प्रमाणें) बिघडलेली, अतिशय खलावलेली स्थिति; दुर्दशा. 'यंदा शोतों चांगलीं आलीं होती पण आंत पाणी शिरून अवधी रांड झाली.' ५ (निंदेनें) भित्रा, नीच, नामर्द मनुष्य; युद्धांतून पळून जाणारा सौनिक. 'म्यां न वधावें पळतां चाला मारूनि काय रांडा या ।' -मोकर्ण ३५.६०.[सं. रंडा] म्ह॰ रांडेच्या लग्नाला छत्तीस विघ्नें. (वाप्र.) रांडेवा-वि. १ बेकायदेशीर संबंधापासून झालेला. २ (ग्राम्य.) पादपूरणार्थक किंवा उद्गारवाचक शब्द. ३ एक ग्राम्य शिवी. रांडेचा, रांडचा मारलेला-वि. स्त्रीवश; स्त्रीलंपट रांडे(डि)च्यानो-उद्गा॰ (बायकी) रखेली पासून झालेल्या मुलांना उद्देशून बोललेल्या शब्दावरून पुष्कळदा आश्वर्य व्यक्त करण्याकरितां पण क्वचित् निर्थकपणें निघणारा उद्गार. रांडवोचून पाणी पीत नाहीं-आपल्या बायकोला एखादा कठोर शब्द बोलल्यावांचून तो पाण्याचा थेंब सुद्धां पीत नाहीं (सतत शिव्या देणार्‍या नवर्‍यासंबंधीं म्हणतात). रांडेहून रांड- वि. बुळा; अतिशय बायक्या (मनुष्य). सामाशब्द- ॰अंमल-पु. १ स्त्रीराज्य. २ नेभळा, अयशस्वी कारभार. ॰काम-न. १ बायकोचें काम; गृहकृत्य. २ विधवेचें काम; बाहेरील आडकाम किंवा रानांतील गवत कापणें व सर्पण गोळा करणें इ॰ काम. ॰कार- भार-पु. १ बायकी कारभार. २ स्त्रियांचा कारभार; स्त्रियांचीं कृत्यें. ३ (निंदेनें) भिकार, मूर्खपणाचीं कृत्यें; दुबळीं कृत्यें. ॰खळी-वि. (गो.) विधवा झालेली. खांड-स्त्री. स्त्रियांस लाववयाचा रांड, बाजारबसवी, बटीक इ॰ अर्थाचा अभद्र शब्द, शिवी. 'मी त्याची कांहीं गोष्ट बोलिलें नसतां उगीच मेला मला रांडखांड म्हणतो.' [रांड द्धि.] ॰गळा-पु. १ टिपेचा सूर; तृतीय सवन. २ बायकी आवाज. [रांड] ॰गांठ-स्त्री. विशिष्ट आका- राची गांठ; ढिली गांठ. बाईलगांठ पहा. याच्या उलट पुरुषगांठ. ॰गाणें-गार्‍हाणें-न. पिरपिर; बायकी कुरकूर; बायकी विनंति; रडगाणें. (क्रि॰ गाणे; सांगणें). रांडगो-पु. (गो.) वेश्येचा मुलगा, किंवा विधवेस अनीतीच्या मार्गानें झालेला मुलगा. ॰चाल-स्त्री. भित्रेपणा; नामर्दपणा; बायकीपणा. ॰छंद-पु. रंडीबाजीचा नाद; रांडेचें व्यसन. ॰छंदी-वि. रंडीबाजीची संवय लागलेला; रांडगा. ॰तगादा-पु. (कुण.) (सार्‍याच्या किंवा कर्जाच्या) पैशाची (पिठ्या शिपायानें नव्हे) कुळाकडे सौम्य रीतीनें केलेली मागणी. ह्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यास आपणास मुखत्यारी आहे असें कुणबी मानतो. बडग्याच्या विनंतीशिवाय दुसर्‍या कोणत्याहि विनंतीस दाद न देण्याबद्दल हा वर्ग कित्येक पिढ्या प्रसिद्ध आहे. कुणबी पहा. ॰पण-न. १ (कों.) वैधव्य. २ नाश; नादानपणा. 'कां घेतां रांडपण ठरून भाऊ नाना ।' -ऐपो ११६. ॰पाटा-पु. वैधव्य. (क्रि॰ भोगणें; येणें; मिळणें; प्राप्त होणें; कपाळीं येणें). [रांड + पट्ट] ॰पिसा-वि. रांडवेडा; अतिशय रांडछंदी; रंडीबाज; बाईलवेडा; स्त्रैण. ॰पिसें-न. रांड- वेड; रांडेचा नाद. ॰पोर-न. १ (व्यापक) बायकामुलांसह एखाद्या ठिकाणचे सर्व रहिवासी; गांवांतल्या बायकोपारांसुद्धां सर्व लोक. 'आज कथेला झाडून रांडपोर आलें होतें.' २ एखा- द्याच्या पदरीं असलेलें. बायको, मुलें इ॰ कुटुंब, खटलें. ३ रंडकीचें मूल. ४ दासीपुत्र; वेश्यासुत. [रांड + पोर] रांडपोर- कीं राजपोर-रंडकीचा मुलगा किंवा राजाचा मुलगा हे दोघेहि- अनियंत्रित व अशिक्षित असतात; दोघेहि बेबंद व निर्धास्त असतात. ॰पोरें-नअव. घर, गांव, देश यांतील मुख्य कर्त्या पुरुषाहून इतर बायका, मुलें इ॰ सर्व माणसें. ॰बाज-वि. रंडीबाज; बाहेरख्याली. [हिं.] ॰बाजी-स्त्री. बाहेख्याली- पणा; रंडीबाजी. [हिं.] ॰बायल-स्त्री. (गो.) विधवा स्त्री. ॰बेटा-पु. रांडलेक. 'तुका म्हणे कोरान्न रांड । बेटा भांड मागेना कां ।' -तुगा २९८३. ॰बोडकी-स्त्री. विधवा स्त्री. 'त्या रांडबोडकीनें लन्न जुळलन् ।' -मोर ११. ॰भांड-स्त्री. (निंदार्थीं) रंडकी; बाजारबसवी; बटीक. [रांड द्वि.] ॰भांडण- न. १ बायकांचें भांडण. २ (ल.) बिन फायदेशीर, निरर्थक गोष्ट. ॰भाषण-न. बायकी, नामर्द, दीनवाणें भाषण. ॰मस्ती- स्त्री. १ पतिमरणानंतर विधवेस येणारा लठ्ठपणा व जोम. २ (ल.) नियंता न हींसा झाल्याबरोबर एखाद्या माणसास येणारी टवटवी; चपळाई, धिटाई. ॰माणूस-न. १ (दुर्बलत्व दाखवावचें असतां) स्त्री; स्त्रीजाति; स्त्रीमात्र. २ (तिरस्कारार्थीं) बुळा, निर्जीव, बायक्या मनुष्य; भित्रा मनुष्य. [रांड + माणूस] ॰मामी- स्त्री. (करुणेनें) विधवा स्त्री. ॰मांस-न. (निदार्थीं) पतीच्या मृत्यू- नंतर विधवा स्त्रियांस एकटें राहतां आल्यामुळें व मोकळेपणा मिळाल्यामुळें कधीं कधीं येणारा लठ्ठपणा. (क्रि॰. चढणें; येणें). [रांड + मांस] ॰मुंड-स्त्री. १ केशवपन केलेली, अनाथ न अनु- कंप्य अशी विधवा. २ (शिवी) रांड; बोडकी; अकेशा थेरडी; विधवा. [रांड + मुंड] ॰रळी-स्त्री. विधवा किंवा विधवेसा- रखी; (व्यापक.) विधवा. 'रांडरळी म्हणती हा मेला बरें झालें' [रांड + रळी] ॰रागोळी-स्त्री. (व्यपक.) रंडीबाजी व बदफैली. [रांडद्वि.] ॰रांडोळी-स्त्री. १ विधवा किंवा तिच्या सारखी स्त्री. रांडरळी पहा. २ शिंदळकी. ३ बायकांशीं संगत ठेवणें; रंडीबाजी. ॰रूं-न. विधवा स्त्री. ॰रोट-रोटा-पु. आपल्या मरणानंतर बायको विधवा होईल यासाठीं लग्नाच्या वेळीं नवर्‍यानें तिच्या तर्तुदीकरितां दिलेलें वेतन; बाइलवांटा; रांडरोट्याची चाल मुख्यत्वें गुजराथेंत आहे. [हिं.] ॰रोटी-स्त्री. लढाईंत पडलेल्या किंवा सरकारकामी आलेल्या माणसाच्या बायकोस निर्वाहाकरितां दिलेली जमीन इ॰. [हिं.] ॰लें(ल्यों)क-पुन. १ रंडापुत्र; विधवेचा मुलगा; एक शिवी. 'काय केलें रांडलेंका । तुला राजी नाहीं तुका ।' २ (व.) मेलें या शब्दाप्रमाणें वाक्याच्या आरंभीं किंवा मध्यें निरर्थक योजतात. 'आम्हास नाहीं रांडलेक असं येत !' ॰वडा-पु. सर्व बायकामाणसें; घरांत सत्ताधारी पुरुष नसल्यामुळें होणारें स्त्रियांचें प्राधान्य. २ बाजारबसवी, रांड, बटीक इ॰ शब्दप्रचुर शिच्या; शिवीगाळ; गालिप्रदान. (क्रि॰ गाणें; गाजविणें; ऊठविणें) 'किती रांडवडे । घालुनि व्हालरे बापुडे ।' -तुगार २ ७४६. [रांड + वाडा] ॰वळा-पु. स्त्रियांच्या कडाक्याच्या भांडणांतील शिवी; रंडकी; रांड, भटकी, बाजारबसवी इ॰ शिव्यांची माळता. (क्रि॰ गाणें; वाजवणें). [रांड + आवलि] ॰वांटा-पु. वैधव्य. ॰वांटा कपाळीं येणें-विधवा होणें. ॰वाडा-पु. कुंटणखाना; वेश्यांची आळी. ॰व्यसन-न. रांडेचा नाद, छंद. ॰व्यसनी-वि. रांडबाज. ॰सांड-स्त्री. विधवा. [रांड + सांडणें किंवा रांड द्वि.] ॰सांध-स्त्री. विधवेचा कोपरा. [रांड + संधि] ॰सांधीस बसणें-घरांत उदास होऊन बसणें (रागानें एखा- द्यास म्हणतात). रांडक-वि. (कों.) विधवा झालेली. 'सडा मफलीस व रांडक बायको व भिकारी बैरागी हे निमदस्ती.' [रांड] रांडका-पु. विधुर; ज्याची बायको मेली आहे असा पुरुष. [रांड] रांडकी-स्त्री. विधवा. (तिरस्कार दया दाखवितांना). [रांड] रांडगा-वि. (राजा. तंजा.) रंडीबाज. २ -पु. (बे.) महार जातीचा बलुतेदार. याला वतन इनाम जमीन असते. याचा हक्क कर्णाटकांतील लक्ष्मीच्या जत्रेंत रेडा मारण्याचा असतो. हल्लीं ह्या शब्दास अपभ्रष्टता येऊन तो शिवीदाखल योजिला जातो. रांडरूं-न. (तिरस्कारानें) विधवा स्त्री. [रांड] रांडव-वि. १ रंडकी झालेली; विधवा (स्त्री). २ बायकोच्या मरणानें उघडा झालेला; मृतपत्नीक; विधुर. [रांड] रांडवणें-अक्रि. विधवा होणें; रांडावणें पहा. [रांड] रांडवा-स्त्री. विधवा स्त्री. 'रांडवा केलें काजळ कुंकूं ।' -एभा ११.९६६. रांडा पोरों-नअव. १ कुटुंबांतील कनिष्ठ दर्जाचीं माणसें (बायका, मुलें व कुणबिणी). २ समाजांतील हलक्या दर्जाचे लोक. ॰रोटा-पु. विधवांनीं करा- वयाचें सामान्य आडकाम. (दळण, कांडण, मोल मजुरी इ॰). रांडाव-वि. (गो.) विधवा. रांडावणें-अक्रि. १ विधवा- पणाच्या केविलवाण्या स्थितीस प्राप्त होणें. २ (ल.) फिसकटणें; मोडावणें; नासणें; बिघडणें; भंग पावणें (व्यापार, मसलत, काम) (विशेषत: या लाक्षणिक अर्थानेंच हा शब्द योजतात). 'त्याणीं मागें संसार चांगला थाटला होता पण थोरला भाऊ मेल्यापासून रांडावला.' [रांड] रांडावा-स्त्री. (माण.) बालविधवा; बाल- रांड. रांडरांड-स्त्री. १ रंडक्यांतली रंडकी; अतिशय अनाथ व असहाय रंडकी. २ (ल.) नामर्द, बुळा, अपात्र, नालायक, मनुष्य. ३ पराकाष्ठेचा अनाथ किंवा निराधार मनुष्य. रांडुल-स्त्री. (गो.) (अनीतीच्या मार्गानें) विधवेस झालेला मुलगी. रांडूल- स्त्री. (कों.) विधवा स्त्रीला उपहासानें म्हणतात. रांडे-उद्गा. एक शिवी. 'भांडे तृष्णेसीं द्विज भारार्त, म्हणे यथेष्ट घे रांडे !' -मोअश्व ६.७५. [रांड, संबोधन] रांडचा-वि. रांडलेक. -उद्गा. आश्वर्यवाचक उद्गार. 'अग रांडेचें ! पांच वर्षांचें पोर पहा किंग कशी पोथी वाचतो.' रांडेचा आजार-पु. गर्मी. रांडेच्या- उद्गा. (प्रेमळ) एक शिवी. 'आहा रांडेच्या !...' -देप ६२. रांडोळी-स्त्री. १ (करुणेनें, तिरस्कारानें) विधवा स्त्री. २ विधवे- प्रमाणें वागवणूक. ३ कुचाळी, थट्टा. 'करितां गोपिकांसी रांडोळी ।' -एभा ६.३६५. ४ मारामारी; कत्तल. 'निकरा जाईल रांडोळी ।' -एरुस्व ६.९. ५ क्रीडा. ६ नाश. 'कीं भीष्मदेवें चरणातळीं ।' केली कामाची रांडोळी ।' -जै २४.७ [रांड] रांड्या, रांड्या राऊजी, रांड्या राघोजी-वि. १ रंडीबाज; रांडव्यसनी; रांडछंदी. २ बायक्या; बाइल्या; नामर्द. ३ बाईलवेडा. ४ रांड्याराघोबा, रांड्यारावजी, बायकांत बसून किंवा त्यांजबरो- बर फिरून गप्पा मारण्यांत आनंद मानणारा (मनुष्य); गप्पीदास; चुलमावसा. म्ह॰ रांड्या रावजी आणि बोडक्या भावजी. [रांड] रांढरुं, रांढूं-न. (तिरस्कारार्थीं) विधवा स्त्री. रांडरू पहा. [रांड]

दाते शब्दकोश

स्त्री० रंडकी. २ वेश्या, कसबीण.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

रखाऊ

वि. रखेली. राख; वेश्या. [राखणें]

दाते शब्दकोश

रंभा

स्त्री. १ कदलीवृक्ष; केळ. 'जाणिजे योगपीठीचा भैरवु । काय हा आरंभ रंभेचा गौरवु ।' -ज्ञा ६.४६२. 'जैसी रंभा ताडिली । शुंडादंडें वारणें' -ह २.१३४. २ स्वर्गांतील सुंदर स्त्री; एक अप्सरा; देवांगना. 'नाना रंभेचेनिही रूपें । शुकीं नुठिजेचि कंदर्पे ।' -ज्ञा १६.१२७. ३ वेश्या. ४ (उप.) स्थूल, कुरूप व अव्यवस्थित वस्त्राची, पिंजारलेल्या केसांची बाई, विशेषतः मुलगी. [सं.] ॰तृतीया-स्त्री. १ मार्गशीर्ष शुद्ध तृतीया. २ या तिथीचें व्रतविशेष. ॰नंदन-पुत्र-पु. कापूर. 'अग्नीस विझवावया रंभानंदन । आवेशेंकरून लोटला ।' -रावि १४.१७६.

दाते शब्दकोश

रंडी

स्त्री० रांड, वेश्या, कसबीण.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

सोयरा

पु. १ लग्नामुळें झालेला आप्त; नातेवाईक. २ वेश्या, बटीक इ॰ चा भाड्या, संभोगार्थ ठेविलेला कायमचा माणूस; जार. म्ह॰ १ धरील तो सोयरा, वर्म पाहील तो वैरी.' २ सोयर्‍यांत साडू, हत्यारांत माडू, भोजनांत लाडू-या सर्वांचा सोयीनें फायद्याकडे उपयोग होतो. ॰धायरा-जन-पु. नाते- वाईक; स्नेही; सोबती; (व्यापकार्थीं अव. प्रयोग) (गो.) सोयधायरा. [सोयरा द्वि.] सोयरी-स्त्री. १ आप्त स्त्री. २ ठेवलेली स्त्री; रखेली. सोयरीक-स्त्री. १ सोयरगत पहा, विवाहसंबंध. २ (ना.) लग्नांत नवरीस दागिने घालण्याचे वेळचा विधि. सोयरें माणूस-न. नातेवाईक.

दाते शब्दकोश

सुळी

स्त्री. (तंजावर) देवदासी; कलावंतीण; नायकीण. [का. सूळे = वेश्या; देवदासी]

दाते शब्दकोश

स्वैर-री

वि. स्वेच्छ पहा. स्वच्छंदी; उनाड; आडदांड. [सं.] ॰गति-स्त्री. १ स्वेच्छाचार पहा. २ -वि. स्वेच्छाचारी पहा. ॰गामी-वृत्त-त्तिवि. स्वेच्छाचारी पहा. स्वैरिणी- स्त्री. उनाड स्त्री; व्यभिचार करणारी बाई; स्वच्छंदी स्त्री; वेश्या.

दाते शब्दकोश

ठेवलेली

स्त्री. रांड; वेश्या; राख. (व.) ठेवली.

दाते शब्दकोश

उघडभावई

स्त्री. स्वैर स्त्री; वेश्या; निर्लज्य स्त्री.

दाते शब्दकोश

उघडभावई      

स्त्री.       १. उघडपणा; काही प्रतिबंध, आडोसा नाही अशी स्थिती. (व.) २. (ल.) स्वैर स्त्री; वेश्या; निर्लज्ज स्त्री.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उष्टी

वि. उष्टा पहा. ॰कल्पना-स्त्री. नवीन नसणारी, पूर्वीं कोणी काढलेली कल्पना; उष्टा विचार. उष्टा अर्थ ५ पहा. ॰पत्त्रा वळ-स्त्री. (ल.) अनेकांनीं उपभोगिलेली स्त्री; व्यभिचारी स्त्री; वेश्या. ॰स्त्री-स्त्री. उपभोगिलेली स्त्री; कौमार्य नष्ट झालेली स्त्री; क्षतयोनि स्त्री. ॰हळद-स्त्री. लग्नांत वधूच्या अंगास लाविल्यानंतर राहिलेली हळद; ही नंतर वराच्या अंगास लावावयास नेतात.

दाते शब्दकोश

वाणसी

स्त्री. वेश्या; पण्यांगना. 'वाणसियेचे उभले । कोण न रिगे ।' -ज्ञा १३.७००. [सं. वाणिक् + स्त्री]

दाते शब्दकोश

वारांगना

(सं) स्त्री० वेश्या, कसबीण.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

स्त्री. वेश्या. वार पहा.

दाते शब्दकोश

वारांगना, वारयोषिता

स्त्री. वेश्या; पण्यांगना; अनेकांस उपभोग देणारी स्त्री; या शब्दाचा वार म्हणजे दिवस याशीं संबंध नाहीं. [सं. वार = समूह + अंगना = स्त्री]

दाते शब्दकोश

वार्षी, वारिषी

स्त्री. १ पर्जन्यकाळ; पावसाळा; वर्षा- ऋतु; वृष्टि. 'अथवा धनाकाळी आकाशा । वार्षिये जेवी ।' -ज्ञा ९.११९. २ वेश्या. 'वार्षियेचे उभळें । कोण न रिगे ।' -माझा (पाठ) १३.७०१. [सं. वृष्]

दाते शब्दकोश

वारविलासिनी

स्त्री. वेश्या; वारवधू; वार पहा.

दाते शब्दकोश

वावाटी माशी

स्त्री. १ गबाळ, ओंगळ स्त्री; वेश्या; पोतेरें; जोगवसा; माभळभटीण. २ सोनकिडा.

दाते शब्दकोश

वकार

पु. हे तीन आहेत. वकील, वैद्य व वक्कल (वेश्या).

दाते शब्दकोश

वकल

न. १ पत्नी. २ कुटुंब; खटलें. 'जोंवरि मिलविशि पैसा तोंवरी कुटुंब सारें तुझें वकल ।' -राला १०. ३ (व.) आप्तपरिवार; नातेंगोतें. 'आमच्या वकलांत अशी मुलगी नाहीं.' ४ रांड; वेश्या. 'वकील आणि वक्कस हे दोन, वकार वर्जावेत !' ५ भडवा; कुंटण्या. -व्यनि २५. ६ खातें; क्षेत्र; शाखा; प्रकरण; खटलें. 'स्वयंपाकाचें वकल या खोलींत असूं द्या आणि पाल- खीचें वकल पुढचे चौकांत.' [अर. वक्ल्]

दाते शब्दकोश

वृषल

पु. १ शूद्र; कुणबी. २ चंद्रगुप्त राजा. ३ बहिष्कृत झालेला, अधार्मिक दुराचारी माणूस. [सं.] वृषल स्त्री-स्त्री. १ शूद्र स्त्री. 'दासी वेश्या भुजगणेसीं । वृषल स्त्री रजस्वलेसी ।' -गुच २९.२२५. 'माझ्यावर कुभांड रचून मला वृषली ठरविलें.' -चंद्रगुप्त ५८ २ व्यभिचारिणी. ३ लग्नापूर्वीं रजोदर्शन होत अस- लेली ऋतुमती स्त्री. वृषलीपति-पु. ज्यानें उपभोगार्थ शूद्र स्त्री बाळगिली आहे असा ब्राह्मण.

दाते शब्दकोश

वृथा

क्रिवि. व्यर्थ; विनाकारण; निष्फळ. [सं.] ॰दान- न. निष्फळ, बिन किफायतशीर देणगी (खुशामत्या, वेश्या, मल्ल इ॰ स दिलेलें बक्षीस, खेळांत घालविलेला पैसा). [सं.] ॰पुष्ट-पु. (व्यर्थ खाऊन माजलेला) १ आळशी; निरुद्योगी निरुपयोगी. 'सार सेविजे श्रेष्ठीं । असार घेइजे वृथापृष्टी ।' -दा ६.९.१०.२ फुकटखाऊ; भोजनभाऊ; खाऊपासरी. [सं.]

दाते शब्दकोश

अखंड(डी)

वि. १ संपूर्ण; सगळा; अत्रुटित. २ तुकडे नस- लेला; एकसंधी; सलग; तुकडे जोडून न केलेला. -क्रिवि. सतत; अप्रतिबद्ध; न थांबतां; निरंतर. 'अखंड बोलो आवडे ।' -ज्ञा १५. ४४८. [सं. अ + खंड]. ॰क्रम-पु. पत्त्याच्या बिझिक (पाट) च्या खेळांत हुकमाच्या एक्क्यापासून दहिल्यापर्यंतची एकसारखी रांग (सीक्वेन्स); यास २५० मार्क असतात. -पाट १६. ॰चोळीस्त्री. बाह्याविना सर्व सलग अवयवांची-लाग, पखे, ठुशा (कोरा) व पाठ-जोड नसलेली चोळी. ॰दंड-वि. एक- सारखा चालणारा, असणारा. 'शत वर्षें अखंड दंड । पर्जन्य वितंड पैं वर्षे ।। -एभा. ३.१६८. ॰दंडायमान-वि. अमर्याद; अनंत; घटका, पळें, दिवस, वर्षे इ॰ कालविभागविरहित. ॰द्वादशी-स्त्री. मार्गशीर्ष शुद्ध द्वादशी. ॰पद-(ग.) बीजगणितांतील मूळ प्रकाशक नसलेलें अकरणी पद. ॰श्रेढी-स्त्री. (ग.) गणितांतील एक श्रेढीप्रकार; यांतील पदें क्रमानें खंड न पडतां एकसारखीं असतात. ॰सौभाग्य- न. १ अव्याहत, एकसारखी, सतत भरभराट-ऐश्वर्य-कल्याण. २ केव्हांहि वैधव्य प्राप्त न होणें; नवऱ्याच्या आधीं मरणें. [सं.] ॰सौभाग्यवती-स्त्री. जिला सतत सौभाग्यसुख लाधलें किंवा लाध- णार आहे अशी स्त्री; अविधवा. २ (ल.) वेश्या. ॰स्वारी-स्त्री. सर्व लवाजम्यासहित. 'अखंड स्वारी रायाची निघाली चौथीच्या अमलामधीं' -प्रला. ३०९. ॰ज्ञान- न. १ सतत ज्ञानमय स्थिति; स्थिर शुद्धि. २ संयोजीकरणानें होणारें ज्ञान. खंडज्ञान पहा. [सं.]

दाते शब्दकोश

साधारण

वि. १ सामान्य; सर्वांस लागू पडेल असें; अविशिष्ट. २ समाईक; सार्वत्रिक. 'द्यूतीं साधारण धन पण करुनि नव्हेचि एक हारविता ।' -मोसभा ५.५२. ३ उत्कृष्ट नव्हे व टाकाऊहि नव्हे असें मध्यम प्रतीचें. न- १ सर्व- सामान्य नियम, रीत. २ एका वर्गांतील सर्व वस्तूंना, व्यक्तीनां लागू पडणारा, त्यांच्या ठिकाणचा गुणधर्म. -पु. १ चवे- चाळीसावा संवत्सर. २ सामान्य लोक. -एभा २३.३१६. [सं.] ॰अवयव-पु. (गणित) दोन किंवा अधिक संख्यांत जो एकच अवयव असतो तो. ॰कार्य-न. व्यक्तीचें विशेषें करून नव्हे असें कार्य. ॰गति-स्त्री. साधी, नेहमीची, विशेष नसणारी गति. (इं.) सिंपल मोशन. ॰देश-पु. ज्यांत झाडी व डोंगर मध्यम प्रमाणांत असून पाऊसहि मध्यम प्रमाणांतच पडतो तो देश. ॰धर्म-पु. सर्वसामान्य, सर्वांना लागू पडणारा धर्म. ॰पक्ष-पु. उत्तम व निकृष्ट या दोन पक्षांमधील पक्ष; मध्यम पक्ष. ॰फुलबाजी-स्त्री. इंग्रजी फुलबाजीचा एक प्रकार. -अग्नि २०. ॰भाजक-पु. (गणित) दोन संख्यांस ज्या सामान्य अवयवाने निःशेष भाग जातो तो. ॰सभा- स्त्री. संस्थेच्या घटनानियाप्रमाणें सर्व सभासदांची वर्षांतून एकदां किंवा अनेकदां ठराविक वेळीं भरावयाची सभा. (इं.) जनरल मीटिंग. ॰स्त्री-स्त्री. वेश्या; हलकी स्त्री; अकुलीन, भाडोत्री स्त्री. साधारण्य-न. साधारणपणा; सामान्यत्व; याच्या उलट वैशिष्ट्य, विशेषता.

दाते शब्दकोश

नगर

न. १ मोठ्या वस्तीचें व सर्व पदार्थ जेथें मिळूं शक- तात असें ठिकाण; शहर. 'म्हणे दक्षिण देशिं महिलारोप्य नाम नगर.' -पंच १.५. २ (विशेषार्थानें) अहमदनगर, सातारा, इ॰ ३ अहमदनगर. [सं.] सामाशब्द- ॰करी-वि. शहरवासी; शहरी; नागरी. 'गांवढेकरी उंदीर आणि नगरकरी उंदीर.' -छत्रे- कृत इसापनीति. ॰तळ-न. (काव्य.) जीवर नगर वसलें आहे ती जमीन. 'नगरतळ दणाणिते । भयंकर घोष किंकाटत ।' [नगर + तळ = खालची बाजू] ॰नायक-पु. शहरांतील मुख्य सावकार, पेढीवाला; नगरशेट. [नगर + सं. नायल = पुढारी] ॰नायकी- स्त्री. नगरनायकाचा हुद्दा, काम. [नगरनायक] ॰पाल-पु. कोत- वाल; पोलीस. [नगर + सं. पाल् = रक्षण करणें] ॰पालिका-स्त्री. शहराचें आरोग्य, शिक्षण इ॰ बाबींचा कारभार करणारी स्थानिक संस्था; (इं.) म्युनिसिपल कमिटी. [नगर + सं. पाल् = रक्षण, पोषण करणें] ॰पिता-पु. नगरसंस्थेचा, म्युनिसिपल कमिटीचा सभासद; (इं.) सिटीफादर्. [नगर + सं. पिता = बाप] ॰प्रदक्षिणा-स्त्री. १ देवाच्या मूर्तीची, छबिन्याची शहराच्या भोंवतालीं काढलेली मिरवणूक. २ शहराभोंवतीं, सर्व शहर फिरणें. ३ (ल.) रिकाम- पणीं गांवभर (भिक्षा मागत, देवदर्शन करीत) हिंडण्याची क्रिया. [नगर + सं. प्रदक्षिणा] ॰भवानी-स्त्री. १ गांवभर भटक्या मार- णारी, रिकामटेकडी स्त्री. २ वेश्या. 'अपशकून करण्यासाठीं रुक्का- सानी या नगरभवानीला उभें केलें.' -महाराष्ट्र १७.४. ३०. [नगर + (उप)भवानी = देवी] ॰भवान्या-पु. आळशी, बेढंगी, बदफैली मनुष्य. 'पण तूं रे?-तूं रे नगरभवान्या नाच्ये पोर्‍ये घेवोनी । -केक १५५. [नगरभवानीचें पुल्लिंगी रूप] ॰भोजन- न. (व.) गांवजेवण. ॰रचना-स्त्री. शहराची सर्व सोयी व्हाव्यात अशी मांडणी; शहराची व्यवस्थित पद्धतशीर मांडणी; (इं.) टाऊनप्लॅनिंग. ॰लेखक-पु. कुळकर्णी. 'नगर लेखकांच्या दिव्य- मंदिरीं । -सप्र १.२३. ॰शेट-पु. गांवचा पुढारी; श्रेष्ठी; मोठा व्यापारी. ॰हेर-पु. (काव्य) शहरांतील गुप्त बातमी काढणारी टोळी, तींतील व्यक्ति. 'म्हणे सत्य बोलिला नगरहेर ।' [नगर + हेर = गुप्तपणें बातमी काढणारा] नगराध्यक्ष-पु. शहराच्या स्थानिक संस्थेच्या, म्युनिसिपल कमिटीचा अध्यक्ष; (इं.) प्रेसिडेंट. [नगर + अध्यक्ष = मुख्य] नगरी-स्त्री. लहान नगर; गांव. [सं.] -वि. अहमदनगरचा. 'नगरी रेशीम भरणें.' [नगर = अहमदनगर] ॰पैसा-पु. अहमदनगर येथील प्राचीन राजवटीतील पैसा. नगरीय-वि. शहरासंबंधीं; नगरासंबंधीं. [नगर]

दाते शब्दकोश

दुकान

न. १ विक्रीसाठीं ते ते पदार्थ मांडून बसण्यासाठीं केलेलें घर, जागा; विक्रीची जागा; मांडामांड. २ सोनार, लोहार, क्रांसार इ॰ कांचें ते ते पदार्थ घडण्याठीं केलेलें घर, कारखाना. ३ (ल) विकण्यासाठीं मांडून ठेवलेल्या पदार्थांचा समुदाय. ४ लोहार, सोनार, कांसार इ॰ कांची उपकरणसामग्री. 'मी दुकान आटोपून येतों.' 'तुम्ही गोफ करविणार असलां तर मी दुकान घेऊ येतों.' ५ कांहीं एक व्यवहारार्थ अनेक पदार्थांचा पडलेला, मांडलेला पसारा. 'तुम्ही पोथ्यांचें दुकान मात्र मांडून ठेविता, शास्त्रार्थ काहींच ठरत नाहीं.' ६ (गो.) दारूचा पिठा; गुत्ता. ७ वस्तूंचें मांडलेलें प्रदर्शन; बाजार. [अर; दुक्कान्; फा. दुकान; म. दुखण-रामा] (वाप्र.) ॰घालणें-स्थापणें-रचणें-मांडणें- १ (अक्षरशः) पदार्थांच्या विक्रीसाठीं मांडामांड करणें. २ (ल.) (एखाद्या स्त्रीनें) प्रसिद्धपणें द्रव्य घेऊन व्यभिचार करूं लागणें; कसविणीचा धंदा करूं लागणें; अनाचारानें वागणें. ॰पसरणें-पसार मांडणें. 'रे ! काय दवाग्निपुढें पसरूनि दुकान कानन रहातें ।' -मोउद्योग १३.१०८. ॰मोडणें-दुकान बंद करणें; धंदा, व्यापार इ॰ पारन निवृत्त होणें. ॰वाढणें-(एखाद्याची) गिर्‍हाईकी वाढणें; धंदा, व्यापार भरभराटीस येणें. सामाशब्द- ॰कार-पु. (गो.) दारू विकणारा. ॰दार-पु. दुकानाचा मालक; दुकान चालविणारा माणूस; वाणी. ॰दारी-स्त्री. दुकानदाराचें काम, धंदा; व्यापार-धंदा. [फा. दुकान्दारी] ॰दारी फैलाविणें-(गोसावी, वेश्या इ॰ कांनीं) लबाड्यांचें जाळें पसरणें; अनेकांवर पाश टाकणें. ॰पट्टी-स्त्री. दुकानावरील, व्यापारावरील सरकारी कर. ॰सरकत-स्त्री. दुकानांतील भागीदारी. [सरकत = भागीदारी] ॰सरकती-वि. दुकानांतील भागीदार.

दाते शब्दकोश

बाजार

पु. १ मंडई; दाट; पण्यवीथिका; दुकानें मांडून क्रयविक्रय जेथे चालतो तो; पेठ; गंज (बाजार, हाट व गंज यांच्या अर्थांत थोडा भेद आहे. बाजार म्हणजे रोज किंवा आठवडयानें किंवा नियमित वारीं भरणारा. हाट म्हणजे फक्त नियमित वेळींच भरणारा बाजार व गंज म्हणजे बाजारपेठ. २ खरेदीविक्री, क्रय- विक्रयाकरितां जमलेला समुदाय. ३ (ल.) प्रसिद्धि; बोभाटा; बभ्रा; गवगवा. ४ (ल.) गोंधळ; पसारा; अव्यवस्था; अव्यवस्थित कुटुंब किंवा घर. ५ (ल. कु.) मासळी. [फा. बाझार] म्ह॰ बाजारांत तुरी भट भटणीला मारी. (वाप्र.) ॰करणें-पाहिजे असलेली वस्तु बाजा- रांत जाऊन विकत आणणें, घेणें. ॰मांडणें-अनेक पदार्थ इतस्ततः अव्यवस्थितपणें पसरणें. ॰भरविणें-अनेक माणसें-ज्यांचा कांहीं उपयोग नाहीं परंतु घोंटाळा मात्र होतो अशीं-एके ठिकाणीं गोळा करणें. ॰भरणें-(ल.) कलकलाट करणें; गोंधळ माजविणें; पसारा पसरणें. गेला बाजार तरी-किमानपक्षीं; निदान; कमीतकमी; बाजार होऊन गेल्यावर विकला तरी. 'गेला बाजार तरी त्या पागोटयाचें पांच रुपयें मिळतील.' बाजारच्या भाकरी भाजणें-नसत्या उठाठेवी करणें; लुडबुड करणें; विनाकारण मध्येंच तोंड घालणें. (वेड्यांचा) बाजार पिकणें-बलबलपुरी होणें; सर्वच मूर्ख माणसें जमणें; टमटम राज्य होणें. बाजारांत पांच पायलीनें (विकणें मिळणें)-अत्यंत स्वस्त दरानें; माती- मोलीनें (नकारार्थीं योजना) उभ्या बाजारांत-भर बाजारांत; सर्वांसमक्ष (जाहीर करणें, सांगणें). सामाशब्द- ॰अफवा- अवाई-गप्प-बातमी-स्त्री. निराधार बातमी; कंडी; निराधार वार्ता; चिलमी गप्प. [फा. बाजार + अर्थ. अफवा, अवाई, गप्प] ॰करी-वि बाजारांत विकणारा किंवा विकत घेणारा (मनुष्य); दुकानदार किंवा गिर्‍हाईक. [बाजार + करणें] ॰खोर-वि. (नाग.) जगाला तमाशा दाखविणारा; खाजगी गोष्टी चवाठ्यावर आणणारा. [फा.] ॰चलन-चलनी-वि. बाजारांत चालू असलेलें, चालणारें (नाणें). ॰निरख-पु. १ बाजारभाव; बाजारांतील दर, -वि. अठ्ठ्ल; बिलंदर. 'बाजारनिरखा सोदा.' -क्रिवि. प्रसिद्धपणें; सर्व लोकांत; गाजावाजा करून; बेइज्ज्त करून. (नेहमीं वाईट अर्थानें उपयोग). (क्रि॰ करणें). 'त्याची बाजारनिरख फजिती झाली.' ॰पट्टा-पु. (गुळाची अडत) कसर; दरशेंकडा साधारणतः १२ आणेप्रमाणें कापलेली रक्कम. ॰फसकी-गी-स्त्री. बाजारांत विक्री- साठीं येणार्‍या मालावरील सरकारी पट्टी (पसाभर धान्य घेणें). ॰बट्टा-पु. प्रमाण मानलेल्या नाण्याशीं बाजारांतील इतर नाण्यांचे दर, प्रमाण. ॰बसका-पु. बाजारांतील दुकानांवरील कर. -वाडमा ९.७०. ॰बसवी-बसणी-बुणगी-बुंदगी, बाजाराचीखाट, बाजारीण-वि. वेश्या; कसबीण. [फा. बाझार + सं. उपवेशनी] ॰बसव्या-वि. (ल.) निर्लज्ज; अडाणी व दांडगा; शिवराळ व भांडखोर; असभ्य. ॰बुणगें-न. १ फौजेबरोबर असणारी अवांतर माणसें; फौजेबरोबर असणारे दुकानदार इ॰ गैरलढाऊ लोक; कर खान. २ कामाशिवाय जमलेला मनुष्यसमुदाय. ३ (ल.) फट- कुर्‍यांचा अगर चिंधोट्यांचा गठ्ठा; कतवार; निपटारा; सामुग्री. [फा. बाजार बुन्गाह्] ॰बैठक-स्त्री. बाजारांतील किंवा यात्रेंतील दुकाना- वरील कर. ॰भरणा-भरती-पुस्त्री. १ बाजारांत फक्त ठेवण्याच्या किंमतीची परंतु मोलहीन, कुचकामाची वस्तु; खोगीरभरती. २ (ल.) नीच व निरुपयोगी मनुष्य. ॰भाव-पु. बाजारांत चालू असलेला दर; बाजारनिरख. ॰महशूर-वि. बाजारांत लहानापासून थोरापर्यत सर्वांना माहित असलेला; गाजावाजा झालेला; प्रसिद्ध. ॰वाडा-पु. १ बाजार भरण्याची जागा; मंडई. २ (ल.) अव्य- वस्थित कुटुंब किंवा घर. ॰शिरस्ता-पु. बाजारांतील सामान्य वहिवाट, चाल, (रिवाज दर इ॰ चा). [बझार + फा. सर्रिश्ताह्] ॰हाट-स्त्री. बाजारपेठ; बाजारखरेदी. बाजारी-वि. १ बाजारा- संबंधीं; बाजारचा; पेटेंतील. २ ऐकीव. 'कागदो पत्रींचें वर्तमान नव्हे बाजारी आहे.' -ख. ८.३९७६. ३ (ल.) नीच; हलकट; असंभावित; लुच्चा. ४ सामान्य; साधारण; भिकार; वाईट (वस्तु).

दाते शब्दकोश

राम

पु. १ परशुराम, रामचंद्र, बलराम यांस सामान्य संज्ञा. २ (ल) सामर्थ; तथ्य; जीव. 'त्या उपरण्यांत आतां कांहीं राम उरला नाहीं.' ३ (सांकेतिक) सीता किवा सीताबाई हें जसें अधेलीस त्याप्रमाणें राम हें रुपयास नांव आहे. ४ वाईट बातमी ऐकली असतां किंवा दुसर्‍यानें बोललेल्या दोषादिकांचा निषेध कर्तव्य असतां हा शब्द उच्चारतात. [सं. रम् = रमणें] (वाप्र.) ॰नसणें-(मारुतीला सीतेंनें प्रसन्न होऊन दिलेल्या तिच्या गळ्यांतील रत्नहाराचें एक एक रत्न त्यानें फोडून पाहिलें पण त्यांत रामाची मूर्तीं त्यास दिसेना म्हणून तें व्यर्थ समजून तो सर्व हार त्यानें फोडून टाकला ह्या कथेवरून) सत्व, अर्थ नसणें. ॰म्हणणें-होणें-(मरतांना माणसाच्या तोंडांत रामाचें नांव यावें अशी हिंदूची समजूत आहे ह्यावरून) मरणें; मरण्यास सिद्ध होणें; मरणोन्मुख होणें. रामाचें नांव, रामचर्चा-एखाद्या गोष्टीचा पूर्ण अभाव होता असें जोरानें सांगावयाचें असतां योज- तात. 'अजून तरी त्याला पश्चात्ताप झाला होता म्हणाल, तर रामाचें नांव.' सामाशब्द- ॰कली-ल्ली(भैरव)-स्त्री. (राग) ह्या रागांत षडूज, कोमल ऋषभ, तीव्र गांधार, कोमल मध्यम, पंचम, कोमल धैवत, तीव्र निषाद हे स्वर लागतात. जाति संपूर्ण- संपूर्ण वादी पंचम. संवादी ऋषभ. गानसमय प्रात:काल. वरील स्वरांशिवाय तीव्र मध्यम व कोमल निषाद ह्या स्वरांचा विशिष्ट प्रयोग रागवाचक असाच दिसतो. 'प्रभात समयीं रामकली ।' -दावि १८६. [रामकेलि] ॰कां(का)टी-ठीं-स्त्री. बाभळीची एक जात. हिला पुळाटी किवा रामबाभळ असेंहि म्हणतात. ही सामान्य बाभळीपेक्षां अधिक उंच, सरळ व गेंददार असते. ॰कांठी-वि. पांढरे रेशमी कांठ असलेलें (वस्त्र). ॰कुंड-न. १ नाशकास गोदावरीवर असलेलें एक कुंड, तीर्थ (स्नान करणें, मृताच्या अस्थी टाकणें इ॰ करितां). २ (यावरून) कोणत्याहि नदीकाठी असलेलें असें कुंड, तीर्थ. ॰कोदंड-न. रामाचें धनुष्य. 'जसें चातकाला घनाचें चि पाणी । स्वभक्तां तसे राम कोदंड- पाणी ।' [सं.] ॰कृष्णपंथ-पु. आराध्य देवाचीं नावें (राम, कृष्ण, गोविंद, हरि इ॰) उच्चारण्याचा पंथ, संप्रदाय. 'ज्ञानदेवा जिणें नामावीण व्यर्थ । रामकृष्ण पंथ क्रमियेला ।' गोळा-पु. (रामनव- मीच्या फराळाकरितां केलेला) ताकांत भिजविलेल्या लाहीपिठाचा गोळा. ॰चंद्र-पु. दशावतारांतील सातवा अवतार; दाशरथी राम ॰चर्चा-क्रिवि. पूर्णपणें एखाद्या गोष्टीची नाकबुली किंवा अभाव जोरानें दाखवावयाचा असतां भाषण-संप्रदायांत योजावयाचा शब्द. 'तो तुम्हाला किती सांगो, पण मी त्याला रामचर्चा एक अक्षरहि बोललों नाहीं.' [सं. राम + चर्चा = उच्चारणें, नाव घणें] ॰जन्म-नपु १ रामाचा जन्मदिवस. २ रामनवमीचा उत्सव. [सं.] ॰जनी-स्त्री. गाणारी कसबीण, वेश्या. 'गावांत गाणार्‍या राम- जन्या पांचपंचवीस होत्या.' -विक्षिप्त १.५९. [राम + जानी] ॰जयंती-स्त्री. १ रामजन्माचा वार्षिक उत्सव. २ चैत्र शु॰ ९. [सं.] ॰टेकी-वि. रामटेक नामक गांवासंबंधीं (विड्याचीं पानें इ॰). ॰टोला-पु. १ विटीदांडूच्या खेळांत विटीवर दांडूनें मारलेला पहिला टोला. (क्रि॰ मारणें.) २ (ल.) जोराचा प्रहारा (काठीचा, मुठीचा). ३ मोठी व जाड भाकरी. ४ (सामा.) मोठी, प्रचंड वस्तु. [राम = प्रकर्ष, जोर] ॰त(ती)ळ-न. (गुज. कों.) कारळे. ॰तुरई-स्त्री. एक भाजी. ॰तुळस-स्त्री. तुळशीची एक जात. ॰थडी-स्त्री. पितळेचे मोहरे मणी. -गुजा १७. ॰दास-पु. १ एक प्राचीन महाराष्ट्रीय राजकारणी साधु ह्यानीं ठिकठिकाणीं मठ स्थापून धर्मजागृति केली. ह्यांचे दासबोध, मनाचे श्लोक, राम- गीता, दासगीता इ॰ ग्रंथ प्रसिद्ध आहेत. २ (सांकेतिक) एक- आणा. ॰दासी-शी-पु. श्रीसमर्थ रामदास यानीं स्थापिलेल्या संप्रदायांतील मनुष्य. दासी मल्लार-पु. (संगीत) एक राग. यांत षड्ज, तीव्र ऋषभ, कोमल गांधार, कोमल मध्यम, पंचम, तीव्र धैवत, कोमल निषाद हे स्वर लागतात. जाति संपूर्ण-संपूर्ण. वादी मध्यम, संवादी षड्ज गानसमय रात्रीचा दुसरा प्रहर. ॰दूत-पु. मारुती; वानर. [सं.] ॰नगरी-वि. १ रामनगर संबंधीं. २ तांबडे पंख असलेला व आकारानें जाड असलेला (राघू). ॰नवमी-स्त्री. चैत्र शुद्ध नवमी; रामाचा जन्म दिवस. ॰नामी-वि. रामाचें नांव असलेली (आंगठी). ॰पंचायतन- न. राम, लक्ष्मण, सीता, भरत, शत्रुघ्न आणि मारुती यांचा समु- दाय. ॰पत्री-स्त्री. खोटी, नकली जायपत्री. मायपत्री व ही एकच. ॰पाहरा-पाहरा पारा-पु. सूर्योदयापासून पहिले तीन तास; पहिला प्रहर; पवित्र, देवाधर्माचा काल. 'रामपहार्‍यांत खोटें बोलूं नको, खरें सांग.' ॰पात्र-न. पाणी पिण्याचें पितळी भांडें; फुलपात्र. [सं.] ॰पुरी लडी-स्त्री. रेशमाची एक जात. -मुंव्या ९७. ॰प्रतिज्ञा-स्त्री. सत्य व खात्रीचें वचन. [सं.] ॰फळी-फळ-स्त्री एक फळझाड व त्याचें फळ. हें झाड बरेंच उंच असतें. पानें अशोकाच्या पानांसारखीं लांबट असतात फळ मोठें असून रंग तांबूस असतो. चवीस सीताफळापेक्षां किंचित् गोड. हें वातहारक आहे. [सं. गुज. रामफल] ॰बाण-पु. १ रामानें सोडलेला बाण. हा कधींहि व्यर्थ जात नसे. (यावरून ल.) २ खात्रींचें, ठाम, अचूक वचन, करार, भविष्य इ॰ 'त्याची प्रश्न म्हणजे रामबाण, कधीं खोटा व्हावयाचा नाहीं.' -वि. कधीं न चुकणारें, अचुक गुणकारी (औषध इ॰) [सं.] ॰बाण औषध-न. हटकून गुण करणारें औषध ॰बाभळ- स्त्री. बाभळीचा एक भेद. रामकांटी पहा. राम बोलो भाई राम-पु. (गुज.) प्रेतास नेतांना मोठ्यानें म्हणावयाचे शब्द. ॰मं(मां)-दार-पु. एक वृक्ष; मांदाराचा, रुईचा एक भेद. 'डाळिंब सावरी राममांदार ।' [सं.] ॰रग(गा)डा-पु. पराकाष्ठेची दाटी, गर्दी (लोकांची, काळजींची, कामांची, उद्यो- गांची). [राम = पुष्कळ + रगडा] ॰रट्टा-पु. १ मोठा प्रहर; रपाटा (काठीचा, मुठीचा). (क्रि॰ दाखविणें; देणें). ३ कचका; भार (अवाढव्य उद्योगाचा, कामाचा). ४ घोटाळ; गोंधळ. ५ दाटी; चेप; गर्दीं. [राम = अतिशय + रट्टा] ॰रस- पु. मीठ. [प्रा.] ॰रक्षा-स्त्री. १ रामाचें एक सुप्रसिद्ध स्तोत्र. २ हें स्तोत्र म्हणून अभिमंत्रिलेली विभूति, राख. ३ (निंदार्थीं) लाहीपीठ, बाळंतलिंबाचीं पानें, मिरच्या इ॰ कांची रास. [सं.] ॰राज्य-न. १ ज्यांत लोकांचें सर्व शत्रूंपासून रक्षण केलें जातें व त्यांजवर न्यायानें व चांगल्या रीतीसें राज्य केलें जातें असें राज्य; श्रीरामचंद्रानें केलें तसें उत्कृष्ट, सुखाचें व शांततेचें राज्य. २ रागें भरण्यास कोणी नसल्यामुळें (मुलनीं) केलेंलें स्वैर वर्तन. 'घरांत तीन दिवस कोणी वडील मनुष्य नव्हतें. तेव्हां मुलांनीं रामराज्य चालविलें होतें.' [सं.] (वाप्र.) ॰राज्य करणें-१ सुरक्षितपणें व सुखानें राहणें. २ निर्भयपणें वागणें. ॰राम-पु. ब्राह्मणाशिवाय इतर लोक दुसर्‍याच्या सत्कारार्थ एका हातानें वंदन करतांना जो शब्द उच्चारतात तो; अशा प्रका- रच्या नमस्कारासंबंधीं शब्द. हा पत्रलेखनांतहि योजितात. [राम] ॰राम ठोकणें-एखाद्याचा निरोप घेणें; त्यास सोडून जाणें. 'परीक्षा झाल्यानंतर शाळेला रामराम ठोकला.' ॰रामी- स्त्री. १ परस्परानीं परस्परास रामराम करणें. २ रामराम करतां येण्यापुरती ओळख. ३ सामान्यत: रमारमी. [रामराम] ॰रोट-पु. (ना.) जाड पोळी, रोटी. -वि. धटिंगण; आडदांड. ॰लीला-स्त्री. आश्विन महिन्यांत उत्तरहिंदुस्थानांत काहीं ठिकाणीं रामाच्या चरित्राचे केलेले नाटकप्रयोग. [सं.] ॰वचन- न. सत्य भाषण, वचन. [सं.] ॰वरदा(यि)येनी-स्त्री. तुळजा पूचरी भवानी. 'रामवरदायेनी ते कुळस्वामिणी ।' -रामदासीं २.१. [रामवरदायिनी] रामाचें राज्य-न. रामराज्य पहा. रामानुज-पु. वैष्णवांमधील एक पंथ, भेद. [सं.] रामानु- जाचार्य-पु. वैष्णव धर्मपंथांतील एक पंथप्रवर्तक. ह्यानें वेदांत- सार, वेदार्थसंग्रह, वेदांतदीप, ब्रह्मसूत्रें व भगवद्गीतेवरील भाष्य हे ग्रंथ रचिले. रागानुजाचार्याच्या पंथांतील लोक दक्षिण हिंदुस्थानांत पुष्कळ आहेत. -ज्ञाको (र) १८. [सं.] रामायण-न. १ राम- चरित्रवर्णनपर वाल्मीकीनें लिहिलेलें महाकाव्य; रामकथा; राम- कथावर्णनपर काव्य. २ (ल.) लांबलचक, कंटाळवाणी गोष्ट; चव्हाट. 'आमचें एकदा रामायण संपू द्या. मग तुम्ही दुसरी गोष्ट काढा.' ४ अस्ताव्यस्त पसारा; घालमेल; गोंधळ. 'ह्या पोरानें धान्याचें आणि कागदापत्राचें रामायण केलें.' [सं.] म्ह॰ ताकापुरतें रामायण = आपलें कार्य साधण्यापुरतें आर्जव करणें. रामेश्वर-पु. शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकीं दक्षिणेंतील एक स्थान. [सं.] रामा-स्त्री. १ सुंदर, रमणीय स्त्री. २ (सामा.) स्त्री. 'पीडित दशाननाला त्या श्वेतद्वीपवासिनी रामा ।' -मो रामायणें १.१५३. [सं.]

दाते शब्दकोश

गां(गा)व

पुन. १ वस्तीचें ठिकाण; ग्राम; मौजा; खेडें. २ (व्यापक) नगर; शहर. ३ गांवातील वस्ती; समाज. 'यंदा दंग्यामुळें कितीक गांव पळून गेलें.' ४ आश्रय. ५ (दोन गांवांमधील अंतरावरून) चार कोस; योजन; चार ते नऊ मैल अंतर. 'मारीचातें प्रभू शत गांवें पुंखसमीरें उडवी' -मोरा १.१९९. हा शब्द कोंकण आणि देशांत पुल्लिंगी व सामान्य- पणें नपुंसकलिंगी योजतात. समासांत-गांव-कुलकर्णी-चांभार- न्हावी-भट इ॰ याप्रमाणें बारा बलुत्यांच्या नांवापूर्वीं गांव हा शब्द लागून सामासिक शब्द होतात व त्या शब्दावरून त्या त्या बलुतेदाराच्या एक वर्षाच्या कामगिरीवरील हक्काचा बोध होतो. [सं. ग्राम; प्रा. गाम; हिं. गु. गाम; सिं. गांउ; फ्रेंजि. गांव; पोर्तुजि. गाऊ] (वाप्र.) (त्या)गांवचा नसणें-दुसर्‍यावर लोटणें; टाळणें (काम); (त्या) कामाशीं आपला कांहीं अर्था- अर्थी संबंध नाहीं असें दर्शविणें. ॰मारणें-लुटणें; खंडणी बसविणें. 'दौड करून गांव मारूं लागलें' -पया १८८. गांवानांवाची हरकी देणें-सांगणें-(तूं कोठून आलास, तुझें नांव काय आहे सांग इ॰) ज्याच्या अंगात भूतसंचार झाला आहे अशा मनु- ष्यास (भुतास, किंवा झाडास) विचारतात. यावरून पाहुण्यास आपण कोठून आलांत इ॰ नम्रपणें विचारणें. ॰गांवाला जाणें- १ जवळ नसणें. २ (ल.) निरुपयोगी असणें. जसें-'माझे हात कांहीं गांवाला गेले नाहींत' (जवळच आहेत, वेळ आली तर तुला रट्टा मारतील). गांवीं नसणें-पूर्ण अभाव असणें; अज्ञानी असणें; दरकार नसणें; खिजगणतींत नसणें. सामाशब्द- ॰आखरी-क्रिवी. (व.) गांवालगत-शेवटीं-लागून. गांवई- स्त्री. सरकारी जुलुमामुळें आपलें गांव सोडून दुसर्‍या गांवीं केलेली वस्ती; सरकारी हुकुमाची अमान्यता; सरकारी अटींना प्रति- रोध (सार्‍यांत सूट, तहकुबी इ॰ मिळविण्यासाठीं गांवचे सर्व लोक हा उपाय अंमलांत आणतात). ॰कंटक-वि.गांवाची पीडा; गांवाला त्रास देणारा. [सं. ग्राम + कंटक] ॰कबुलात-स्त्री. १ (कों.) वहिवाटदार खोतानें गांवांतील जमिनीचा सारा भर- ण्याबाबत दिलेली कबुली. २ गांवांतील गांवकर्‍यांनीं वहीत किंवा पडीत जमीन कोणती ठेवावी याबद्दल केलेला निश्चय, ठराव. ॰कर पु. १ गांवांतील वृत्तिवंत. -कोंकणी इतिहाससाहित्य लेख ४००. २ (राजा.) गांवच्या शूद्रांतील देवस्कीच्या मानपाना- संबंधातील एक अधिकारी. ३ भूतबाधा नाहींशी करणारा, देवस्की करणारा माणूस; धाडी. -झांमू १०२. ४ गांवचे लोक; रहिवासी; गांवांत घरदार शेताभात असणारा. 'गांवकर म्हणती हो पेटली आग ।' -दावि ३५०. ५ (कु. कों.) पाटील; खोत; पुढारी. ६ (रत्नागिरी) कुणबीवाड्याचा व्यवस्थापक; कुणबी. ॰करी-पु. १ एखाद्या गांवांत ज्याचें घरदार आहें तो त्या गांवचा रहिवासी; गांवांत राहणारा. 'त्या गांवचे सर्व गांवकरी आज देवळाजवळ मिळाले होते.' २ शेतकरी. गांवकी-स्त्री. १ गांवाच्या संबंधीचा हरयेक अधिकार (अमंगल इ॰); गांवचा कारभार. २ गांवसभा; तींत झालेले ठराव. ३ गांवचा विचार; गांवकरी व पुढारी यांनी एकत्र जमून केलेला विचारविनिमय. ४ वतनदारांचा गांवासंबंधाचा परस्पर संबंध व त्यांचा समाईक अंतर्बाह्य व्यवहार. -गांगा १६७ [सं. ग्रामिक] गांवकुटाळ- वि. गांवकुचाळ; गांवांतील निंदक; टवाळ; लोकांची निंदा करणारा. ॰कुठार-वि. १ गांवांतील लोकांवर संकट आणणारा (चहाडी, वाईट कर्म इ॰ करून); गांवभेद्या; कुर्‍हाडीचा दांडा. २ गांवांतील सामान्य लोक. 'दिल्लींतील वाणी, बकाल, बायका देखील गांवकुठार (हे) लश्करच्या लोकांस मारूं लागलें. ' -भाब १६०. ॰कुंप-कुसूं-कोस-नपु. १ गावाच्या भोंवतालचा तट. २ (ल.) वस्त्राचा (रंगीत) कांठ (धोतरजोडा, शेला इ॰ चा रेशमी, कलाबतूचा). ॰कुळकर्णी-पु. गांवचा वतनदार पिढीजात हिशेबनीस; याच्या उलट देशकुळकर्णी (जिल्हा, प्रांत, यांचा कुळकरणी).॰खर न. गांवाची सीमा, हद्द; सीमाप्रदेश; परिकर. [गांव + आखर] ॰खर्च-पु (जमीनमहसुली) गांवचा (धार्मिक समारंभ, करमणूक इ॰चा) (खर्च; पंडित, गोसावी, फकीर इ॰ स द्रव्य, शिधासामुग्री इ॰ देतात त्याचा खर्च. ॰खातें-न. १ (पोलीस; कुळकर्णी वगैरे गांवकामगार लोक. २ गांवचा हिशेब. ॰खिडकी-स्त्री. गांवकुसवाची दिंडी; हिच्या उलट गांव- वेस (दरवाजा). ॰खुरीस-क्रिवि. गावानजीक; जवळपास. ॰गन्ना-क्रिवि. दर गांवास; प्रत्येक गांवाकडून-गणिक-पासून. 'गांवगन्ना चार रुपये करून द्यावे.' 'गावगन्ना ताकीद करून सर्व लोक बोलावून आणा.' ॰गरॉ-वि. (गो.) गावठी. ॰गाडा- पु. गांवांतील सर्व प्रकारचें (तंटे, प्रकरणें, बाबी इ॰) कामकाज; गांवचा कारभार; गांवकी. (क्रि॰ हांकणें; चालविणें; संभाळणें). ॰गाय-स्त्री. आळशी व गप्पिष्ट स्त्री; नगरभवानी. ॰गांवढें- न. गांवें; खेडीं (व्यापक अर्थीं). ॰गिरी-वि. गांवांत उत्पन्न झालेलें, तयार केलेलें; गांवराणी; गांवठी; याच्या उलट घाटी; तरवटी; बंदरी इ॰. ॰गुंड-गुंडा-पु. १ गांवचा म्होरक्या. २ विद्वानांस आपल्या हुशारीनें (वास्तविक विद्या नसतां) कुंठित करणारा गांवढळ. ३ जादुगारांची मात्रा चालूं न देणारा पंचा- क्षरी; गारुड्यास त्याच्याच विद्येनें जिंकणारा. 'जेवी गारुडी- याचें चेटक उदंड । क्षणें निवारीत गांवगुंड ।' -जै २४.९. ४ गांवांत रिकाम्या उठाठेवी करणारा; त्रासदायक माणूस; मवाली; सोकाजी; फुकट फौजदार; ढंगबाजव्यक्ति; खेळ्या. ॰गुंडकी- स्त्री. १ गांवगुंडाचा कारभार; गांवकी. २ (ल.) फसवेगिरी; लबाडी. ॰गुंडांचा खेळ-पु. पंचाक्षरी किंवा जादूगार यांच्याशीं गांवगुंडांचा चढाओढीचा सामना; मुठीचा खेळ. ॰गोहन-पु. (व.) सबंध गांवांतील गाई एकत्र असलेला कळप. ॰गौर-स्त्री. सबंध गांवांत भटकणारी स्त्री. गांवभवानी. 'पोरीबाळीसुद्धां हिणवून पुरेसें करतील कीं, या गांवगौरीला हें भिकेचें वाण कुणी वाहिलें म्हणुन?' -पुण्यप्रभाव ॰घेणी-स्त्री. दरवडा; हल्ला. 'समुद्राचें पाणी सातवा दिसीं करील गांवघेणी ।' -भाए ६९. ॰चलण-णी, गांव चलनी-वि. गांवांत चालणारें (नाणें). ॰चा डोळा-पु. गांवचा वेसकर, महार, जागल्या. ॰चा लोक-पु. गांवांतील कोणी तरी; कोणास ठाऊक नसलेला; परका; अनोळखी. ॰चावडी-स्त्री. गांवांतील सरकारी कामकाजाची जागा; चौकी. ॰जाण्या-वि. गांवदेवतेस वाहिलेलें (मूल). ॰जेवण- जेवणावळ-भोजन-स्त्रीन. १ गांवांतील सर्व जातींना घात- लेलें जेवण. २ गांवांतील स्वजातीस दिलेली मेजवानी. म्ह॰ हें गांव- जेवण नव्हे कीं घेतला थाळातांब्या चालला जेवायला (महत्त्वाच्या गोष्टीची थट्टा करणारास उपरोधिकपणें म्हणतात). ॰जोशी- पु. गांवांतील वृत्तिवंत जोसपण करणारा. ॰झाडा-पु. गावां- तील (शेत इ॰) जमीनींचा कुळकर्ण्यानें तयार केलेला वर्णनपर तक्ता; कुलकर्णीदप्तर. ॰झोंड-पु. १ सर्व गांवापासून कर्ज काढून नागविणारा. २ गांवांतील खट्याळ, खाष्ट माणूस; गांवास त्रास देणारा माणूस. ॰ठण-ठण-न. स्त्री. गांवांतील वस्तीची जागा (अस्तित्वांत असलेली किंवा उजाड झालेली); आईपांढर. [सं. ग्राम + स्थान = म. गांव + ठाण] गांवठा-पु. १ गांवचा एक वतनदान. म्ह॰ गांवचा गांवठा गांवीं बळी. २ खेडवळ; गांवढळ गांवठी-ठू-वि. १ गांवचें; स्थानिक. गावगिरी अर्थ १ पहा. 'बाजारी तुपापेक्षां गांवठी तूप नामी.' २ गांवढळ; खेडवळ. ३ (विशेषतः गांवठू) रानटी; खेडवळ (माणूस, चालरीत). ॰गांवठी- वकील-पु. देशी भाषेंत वकिलीची परीक्षा दिलेला माणूस. इंग्रजी न जाणणारा किंवा वकिलीची मोठी परीक्षा न दिलेला साधा मुखत्त्यार वकील. गांवडुकर-पु. डुक्कराची एक जात; गांवांतच राहणारें डुक्कर; याच्या उलट रानडुक्कर. गांवडें-ढें-पु. अनाडीपण; अडाणीपणा. गांवढ(ढा)ळ-गांवढ्या-वि. १ खेड- वळ; मूर्ख; रानवट; अडाणी, 'खंती करिती कर्माची । ते गावंढे गा ।' -ज्ञा ३.१४५. २ खेड्यांत राहणारा; शेतकरी. ॰ढळकर-पु. (गो.) गांवढळ; खेडवळ; शूद्र. गांवढें-न. लहान खेडें, गांव; शेतकर्‍यांची वाडी; शेतवाडी; 'मला माझें गावर्डेच बरें.' -इसाप- नीति (छत्रे) [सं. ग्रामटिक प्रा. गामड] गांवढेकर-वि. खेडवळ; गांवढ्या. 'तेथें कोणी गांवढेकर कुणबी बसला होता.' -नि १४९. गांवढेकरी-पु. खेड्यांत राहणारा माणूस; गांवकरी. गांवढें गांव-पुन. वाडी; पाडा; खेडें; निवळ शेतकरी राहतात तें गांव. म्ह॰-गांवढे गांवांत गाढवी सवाशीण (गाढवी बद्दल गांवठी असा पाठभेद) = लहान गांवांत क्षुद्र माणसासहि महत्त्व येतें. ॰थळ-न. गांवठण पहा. [सं. ग्राम + स्थल] ॰था-वि. गांवढळ. -शर. ॰दर-री-स्त्री. गांवांच्या लगतची जागा. 'आतांशीं वाघ रात्रीचा गांवदरीस येत असतो.' ॰देवता-देवी-स्त्री. गांवची संरक्षक देवता; ग्रामदेवता. [सं. ग्राम + देवता] ॰धणें-न. गांवचीं गुरें. -शर. [गांव + धन?] गांवधें-न. १ वाडी; खेडें; गांवढें पहा. २ दुसर्‍या खेड्यांतील कामकाज. 'मला गांवधें उपस्थित झालें.' गांवधोंड-स्त्री. १ गांवावर बसविलेली जबरदस्त खंडणी. २ (सामा.) गांवावर आलेलें संकठ, अरिष्ट. [गांव + धोंडा] ॰निसबत इनाम-न. निरनिराळ्या प्रासंगिक खर्चाकरितां किंवा सरकारी खर्चाकरितां काढिलेल्या सार्वजनिक कर्जाच्या फेडीकरितां गांवकर्‍यांनीं गहाण ठेवलेली जमीन. ॰निसबत मिरास-स्त्री. जिचा मालकीहक्क सर्व गांवकर्‍यांकडे मिळून आहे अशी जमीन. ॰नेमणूक-स्त्री. गांवखर्चाकरितां तोडून दिलेला पैका. ॰पडीत-न. गांवांतील बिन लागवडीची, पडीत जमीन. ॰पण-(गो.) ग्रामसभा; गांवकी. 'गांवपण मांडलिया वायसें ।' -सिसं ८.१५७. ॰पाणोठा-था-पु. गांवची नदी- तळ्यावरील पाणी भरण्याची जागा. ॰पाहणी-स्त्री. गांवांतील पीक किंवा शेतजमीन यांची पाटलानें केलेली पाहणी, मोजणी; (सामा.) गांवाची सर्वदृष्टीनें पाहणी. ॰बंदी-वि. गांवांत वस्ती करून असलेला (फिरस्ता नव्हे). ॰बैल-पु. (पोळ्याच्या दिवशींचा) पाटलाचा बैल; हा सर्व बैलांच्या पुढें असतो; हा पाट- लाचा एक मान आहे. ॰महार-पु. (बिगारी इ॰च्या) गांवच्या चाकरीवर असलेला वतनदार महार. ॰मामा-पु. गांवांतील शहाणा माणूस; गांवकर्‍यांवर चरितार्थ चालविणारा व सर्वांशीं मिळूनमिस- ळून असणारा माणूस (उपहासात्मक). ॰मावशी-स्त्री. गांवां- तील कुंटीण; (सामा.) वयस्क व स्वैरिणी स्त्री. ॰मुकादम-पुअव. गांवचे सारे श्रेष्ठ वतनदार. -गांगा ४५. ॰मुकादमी-स्त्री. वतनी ग्रामव्यवस्था. ॰मुनसफ-पु. शेतकर्‍यांचे १० रु. च्या आंतील दावे चालविण्यासाठीं, शेतकी कायद्याप्रमाणें नेमलेला बिनपगारी मुनसफ. -गांगा ७२. ॰मेव्हणी-स्त्री. गांवांतील वेश्या. ॰म्हसन- न. गांवांतील स्मशान. ॰रस-न. गांवांतील घाणेरडें पाणी; लेंडी नाला; लेंडे ओहोळ. 'हां गा गावरसें भरलें । पाणी पाठीं पाय देत आलें ।' -ज्ञा १६.२५. ॰रान-न. १ गांव व त्याच्या आस- पासचा प्रदेश, जमीन. २ गांवची व आसपासची लोकसंख्या. ॰रान-नी-राणी-वि. स्थानिक; गांवठी; घरगुती; रानवट (भाजी, पदार्थ इ॰); याच्या उलट शहरी, पेठी. ॰वर्दळ- स्त्री. गायरानाखेरीज गांवच्या दिमतीस असलेली इतर जमीन. ॰वसाहत-वसात-स्त्री. १ गांवची वसलेली स्थिति, वसती. २ गांवचा वसलेला भाग. ३ गांवची लोकसंख्या. ॰वहीत-न. गांवची लागवडीखालची जमीन. ॰वेस-स्त्री. गांवाच्या तटाचा मोठा दरवाजा. ॰वेसकर-पु. गांवाच्या वेशीवर पहारा करणारा पाळीचा महार; याच्याकडे गांवाचें निकडीचें काम कर- ण्याचें असतें. ॰शाई-स्त्री. खडबडीत चपटें मोतीं, ॰शीव- स्त्रीन. गांव किंवा गांवें (यांना सामान्य संज्ञा); नांवगांव वगैरे माहिती. 'त्याची गांवशीव मला ठाऊक नाहीं.' ॰सई-स्त्री. १ गांवच्या भुताखेतांना दरसाल द्यावयाची ओंवाळणी, बळी (नारळ, कोंबडें इ॰). २ एकूणएक गांववस्ती; गांवकरी; अखिल ग्रामस्थ. ३ भगत सांगेल ते सात किंवा नऊ दिवस गावां- तील यच्चावत् माणसांनीं बाहेर जाऊन राहणें. -बदलापूर ३२०. ॰समाराधना-स्त्री. गांवजेवण पहा. ॰सवाशीण-सवाष्ण- स्त्री. १ (गोंधळ, मोहतूर इ॰ प्रसंगीं) पाटील किंवा चौगुला याच्या बायकोस म्हणतात. २ (ल.) गांवची वेश्या. गांवळी- क्रिवि. गांवोगांव; सर्व गावांतून. 'जेवी निळहारयांची नासे निळी । तो मिथ्यामात उठवी वायकोळी । ते देशीं विस्तारें गांवळी । सांचा सारिखी ।' -ज्ञाप्र ६२७. गांवाची खरवड- स्त्री. गांवास त्रास देणारा, द्वाड माणूस. गांवा-देशानें ओंवा- ळलेला-वि. द्वाड, वाईट म्हणून गांवानें दूर केलेला; कुप्रसिद्ध; गांवाची खरूज (ओवाळणें पहा). गांवांबाहेरचा, गांवा भायला-वि. महार; परवारी. (कु.) गांवाभायला. गावार- न. गांवजेवण गांवीक-वि. (राजा.) सार्वजनिक; गांवचें (शेत, पाणी, खर्च, पट्टी, कधा). गावुंडगो-वि. (गो.) गांवांत राहणारा.

दाते शब्दकोश

ग्राम

पु. १ गांव; खेडें. २ (संगीत) सप्तस्वरांतील मुख्य तीन अवधी. याचे प्रकार तीन-षड्जग्राम, मध्यमग्राम व गांधारग्राम. सात स्वरांचा समूह. (इं.) गॅमट. ३ गांवांतील प्रमुख किंवा माननीय माणूस. ४ अरेराव, कचाट्या, जरब बस- विणारा, काचाटींत धरणारा माणूस. 'तो कसला ग्राम त्याज बराबर भांडून तुझा परिणाम लागणार नाहीं.' ५ जमाव; समु- दाय. 'मुतेहिना ऐसा वागे । ग्राम कर्मेंद्रियांचा ।' -यथादि ३. ९२. (समासांत) इंद्रिय-गुण-पुण्य-भूत-स्वर-ग्राम. 'इंद्रिय- ग्रामावरी येणें नाहीं ।' -ज्ञा ५.१०५. [सं.] सामाशब्द- ॰कंटक-कुठार-पु. चहाड्या, निंदा, त्रास, तंटे इ॰ लावणारा; गांवगुंड; गांवची पीडा, ब्याद; दुष्ट, वाईट माणूस. ग्रामकी-स्त्री. गांवजोशी किंवा पाटील इ॰ चें काम; गांवकी. ॰कूळ- केसरी-सिंह-पु. १ (ल.) गांवांतील कुत्रे. 'इया ग्रामसिं- हाचिया ठायीं.' -ज्ञा १३.६८०. २ (ल.) भेदरट माणूस. ॰खर्च-पु. १ गांवचा खर्च. २ फुकट किंवा विनाकारण खर्च; ज्याचा मोबदला नाहीं असा खर्च. ॰जोशी-ज्योतिषी-पु. गांवचा जोशी, हा पंचांग सांगणें, पत्रिका पहाणें, मुहूर्त काढणें इ॰ कामें करतो. 'आधीं होता ग्रामजोशी । राज्यपद आलें त्यासी । त्याचें हिंडणें राहीना । मूळ स्वभाव जाईना ।।' -तुगा. ग्रामज्य-न. ग्राम्य; मैथुन; सुरत क्रीडा. 'ग्रामज्य आठवे चित्तीं ।' -दा २.५. २८. ग्रामणी-पु. १ (काव्य, विद्वानांचें संभाषण) पाटील; गांवचा मुख्य. २ (लौकिक) गांवगुंड, चावट, वाईट, कुटाळ्या, पीडादायक माणूस; ब्याद. 'रामनामें विव- र्जित । ग्रामणीं बोलिजे तें ग्राम्य गीत ।' -एभा ८.१६९. ३ गांवचा महार. -स्त्री. कुटाळकी; गांवकी. ग्रामिणी पहा. 'आनित्य ग्रामणी मस्ती सदा ।' -दा २.३.६. -वि. मुख्य; श्रेष्ठ; प्रमुख. ग्रामणीक-न. हरामखोरपणा; ग्रामणी, ग्रामिणी पहा. 'तरी जी पाहतां हेंहि ग्रामणीक । दिसोनि येतसे कीं निष्टंक ।' -सादि १२.२.१०८. ग्रामण्य-न. १ मुख्यतः जातीसंबंधींचा किंवा इतर गांवकीचा तंटा, खटला. २ बहिष्कार. ३ जातीच्या खट- ल्यासंबंधीं चौकशीसाठीं भरणारी ग्रामसभा; जातगंगा. ॰त्रय- न. (संगीत) ग्राम अर्थ २ पहा. ॰थिल्लर-न. गांवांतील लहा- लसें तळें, डबकें. कीं गतधवेचें यौवन । कीं ग्रामथिल्लराचें जीवन ।' ॰दुर्गा-स्त्री. गांवची कुलदेवी, भवानी; ग्रामाधिका- रिणी देवता. ॰देऊळ-न. गांवांतील सार्वजनिक देऊळ. ॰देव- देवता-दैवत-पुस्त्रीन. १ ग्रामधिकारी-रिणी; गांवचा कुल- देव-देवी. २ या देवतेच्या खर्चास इनाम दिलेली जमीन, उत्पन्न; ग्रामदेवीची जमीन. ॰धर्म-पु. गांवचे धार्मिक विधी, नियम, चालीरिती इ॰ परंपरेनें चालत आलेला गांवचा धर्म. ॰नेत्र-न. (ल.) महार; गांवचा जागल्या. ॰पंचायत-सभा-संस्था-स्त्री. गांवची सर्व व्यवस्था पाहणारी संस्था. खेड्यांतील म्युनिसिपालटी; ग्रामस्वराज्य. ॰पशु-पु. माणसाळलेलें जनावर. ॰बिंदुटी-स्त्री. खेड्यांतील गल्ली, बिदी. 'तव ते गोधनें ग्रामबिंदुटी । अपार मौळी असती चव्हाटी ।' -नव १३.११५. ॰याजक-पु. गांवचा उपा- ध्याय; ग्रामोपाध्याय. ॰लेखक-पु. कुळकर्णी. 'ग्रामलेखक ते स्थळीं ।' -निमा (आत्मचरित्र १.१०१.) ॰सूकर-पु. गांवडुक्कर. ॰स्त-स्थ-वि. गांवांत राहणारा; गांवचा रहिवासी; गांवकरी. 'ऐसें बोलून ग्रामस्तानें.' -नव १०.१६३. 'आतांच भोगूं तरी हे पहाट । ग्रामस्थ येतांचि भरेल हाट ।' ग्रामाचार-पु. ग्रामधर्म पहा. ग्रामांतर न. १ दुसरें गांव. २ आपलें गांव सोडून परगांवीं जाणें. ग्रामाधिकार-कारी-पु. गांवासंबंधीं अधिकार; तो गाजविणारा माणूस; अधिकारी; गांवकामगार. ग्रामाधिपति-पु. पाटील 'ग्रामाधिपतिरूपें श्रीरघुवीरें जाण ।' -सप्र २.३४. ग्रामिणी- स्त्री. हरामखोरी; चहाडी इ॰ ग्रामणीक पहा. ग्रामोपाध्याय- पु. गांवचा उपाध्याय; ग्रामजोशी; ग्रामयाजक पहा. ग्राम्य- वि. १ खेड्यांत झालेला, जन्मलेला; गांवांत उत्पन्न झालेलें किंवा गांवासंबंधीं. २ गांवठी; गांवराणी; गांवढळ; खेडवळ. ३ माण- साळलेला (पशु) याच्या उलट रानटी. ४ लागवडीनें उत्पन्न केलेलें (शेतीचें उत्पन्न); याच्या उलट आपोआप झालेलें. ५ प्राकृत व इतर देशी (भाषा); याच्या उलट संस्कृत. ६ प्रापंचिक; संसारी; याच्या उलट वन्य = जंगलात राहणारा. ७ अश्लील; अशिष्ट; असभ्य. ८ अतिशय विषयासक्त. ग्राम्यगीत-न. १ अश्लील पद, लावणी. २ खेडवळ गाणें, पवाडा इ॰ ग्राम्यधर्म- संभोग; ग्रामज्य पहा. ग्रामस्त्री-स्त्री. वेश्या; रांड. 'ग्राम्य- स्त्रियांचे संगतीं जाणें ।' -एभा ८.१३९. ग्राम्यालाप-पु. १ खेडवळ गप्पागोष्टी. २ लावणी; शृंगारपर कविता. [सं.]

दाते शब्दकोश

जन्म

पु. न. १ उत्पत्ति; प्रसव. २ आयुष्यमान. 'मी जन्मांत खोटें बोललों नाहीं.' ३ (समासांत) जन्मापासून, एकंदर आयुष्यभर; जसें-जन्म-करंटा-खोड-गांठ इ॰ [सं. जन् = उत्पन्न होणें] (वाप्र) ॰घेणें-अस्तित्वांत येणें. ॰जाणें-(आळसामध्यें) आयुष्य खर्च होणें. जन्मणें- १ उत्पन्न होणें. जन्मास येणें; निपजणें; उपजणें. २ जन्म देणें जन्म देखणें-पहाणें-येणें- (ल.) ऋतुस्नात होणें; न्हाण येणें. ॰देणें-बाळंत होणें; प्रसूत होणें. जन्माचा-१ जन्मप्रभृति; जन्मापासून. जसे जन्माचा रोग = वंशपरंपरेचा, जन्मापासून असलेला रोग. जन्माचा रोगी = जन्मापासून आजारी. २ जन्मभर टिकणारे; जसें-जन्माचा जोडा- सोबती = अत्यंत ऋणानुबंधी मित्र; पतिपत्नीसंबंध. जन्माचा पत्कर घेणें-एखाद्याच्या पालनपोषणाची जबाबदारी जन्मभर अंगावर घेणें. -चा पाटा वरवंटा घेणें-एखाद्यास जन्मभर पोसणें, त्याच्यासाठीं श्रम घेणें. -ची आठवण राहणें- १ जन्मभर स्मरण ठेवणें; कधींहि विस्मृति न होणें. २ पक्की अद्दल घडणें. -चे कर्मीं-कर्मीं-जन्मांतून एकदां होणारी, वारंवार न होणारी गोष्ट, कृत्य. नामाशीं याचा क्रियाविशेषणासारखा उपयोग करितात. 'त्यानें जन्माचेकर्मी एक मुंज केली परंतु दमडी दमडी दक्षिणा दिली.' तून जाणें-(क.) निरुपयोगी होणें. (कर्तव्यशून्यमाणसा- संबधीं योजतात). जन्मास घालणें-अस्तित्वांत आणणें. ॰घालणारास रडणें-जन्मदात्याच्या नांवानें खडे फोडणें. जन्मास- येणें-अस्तित्वांत येणें. नवा जन्म होणें-एखाद्या भयंकर अप- घातांतून किंवा रोगांतून उठणें. अन्य जन्मीं-दुसर्‍या जन्मांत. ॰म्ह १ जन्मीं नाहीं तें कर्मी (अनिष्ट गोष्ट दाखवितांना म्हणतात). २ जन्मा आला हेला आणि पाणी वाहतां मेला. सामाशब्द- ॰करंटा-वि जन्मापासून दरिद्री, दुर्दैवी. ॰कर्म-न. १ आयुष्यांतील विशेष काम; आश्रमधर्म. २ उत्पत्ति आणि कार्य; आयुष्यांतील एकं- दर हकीकत 'तूं काय समजलास? तुझें जन्मकर्म मला ठाऊक आहे.' ॰काल-ळ-पु. १ जन्माची वेळ. २ जन्मपत्रिका. ३ सर्व आयुष्य. म्ह॰ जी खोड बाळा ती जन्मकाळा. ॰कुटाळ, जन्माचा टाळ-पु. नेहमींचा कुचेष्टा करणारा; नेहमीं कुटाळी करणारा. ॰कुंडळी-स्त्री. ज्या लग्नावर जन्म होतो त्या लग्नकाळ ग्रहांच्या स्थितीचें कोष्टक. ॰कुर्‍हाड-स्त्री. (ल.) नेहमींचा त्रास देणारा गांव कुटाळ सतत त्रास देणारा. ॰खुट-पु. (खोखोचा किंवा खोक- डाचा खेळ) सीमेवरचे, दोन टोंकांवरचे गडी (माणूस किंवा वस्तु). ॰खाड-स्त्री. जन्मापासून लागलेला किंवा हाडीं मासीं खिळलेला दुर्गुण. ॰गांठ-स्त्री. १ जन्मभर टिकणारा संबंध. २ वाढदिवस [सं. जन्म + ग्रंथि] ॰गुण-पु. स्वाभाविक गुणधर्म. ॰चुडेल चुढेल-स्त्री. (निंदार्थी) भांडखोर, कजाग स्त्री ॰जन्मांतरीं- ॰जन्मीं-क्रिवि. पूर्वीपासून झालेल्या सर्व जन्मांमध्यें आणि ह्या जन्मांत अनेक जन्मांत. ॰जुगाक-क्रिवि. (गो.) आजन्मः प्राण असेपर्यत. ॰जुग-वि. जन्मभर पुरेल असें 'जन्मजग हातांत । विभृतिचा गोळा ।' -अमृत १२८. ॰जोड-स्त्री. जन्मभर पुरेल इतका साठा. ॰जोडा-पु. जन्मगांठ पहा. ॰टिपण-न. जन्म- पत्रिका. ॰तः-क्रिवि. १ जन्मापासूनः जन्मामध्यें. 'जन्मतः वाईट गोष्ट मजपासून घडली नाहीं.' २ स्वाभाविक; स्वभावतः 'कोणी जन्मतः शहाणा असतो कोणी पढून होतो.' जन्मतिथि-स्त्री वाढदिवस जन्मकालची मिति. ॰दगदगी-वि. नेहमीं काळजीचा, नेहमींचा चिंताकांत ॰दरिद्री-भिकारी-वि. जन्मापासून भिकारी. ॰दिन-दिवस-पु. वाढदिवस; जन्मतिथि ॰नक्षत्र-न ज्या नक्षत्रावर जन्म झाला तें. ॰नाम-नांव-न. जन्मनक्षत्राच्या संबंधानें अवकहडा चक्रावरून (बारशाच्या दिंवशीं) ठेवलेलें नांव. ॰पंक्ती-पत्र-पत्रिका-पत्री-स्त्रीनस्त्री. जन्माच्या वेळचें वर्ष, तिथि, राशी, कुंडली इ॰ लिहिलेला कागद व त्यावरून सगळ्या जन्मा- मधील घडणार्‍या गोष्टींचें तयार केलेलें कोष्टक; जन्मटिपण 'याची करा जी जन्मपंक्ती ।' -कथा ५.४.१५. ॰पाश-पु. जन्म, आयुष्य संपेपर्यंत मागें लागलेलें संकट, लचांड. ॰प्रभृति-क्रिवि. जन्म झाल्यापासून. ॰भाषा-स्त्री. मातृभाषा; मायभाषा; मूल जन्मापासून जी भाषा बोलतें ती. ॰भूमि-भूमिका-स्त्री. माय- देश; जेथें जन्म झाला ती जागा. ॰मरण-न. जन्मणें आणि मरणें; यांची परंपरा; जन्ममरणाची आवृत्ति. 'पुनरपि जननं पुनरपि मरणं ।' ॰मरणाधीन-वि. जन्ममृत्यूच्या स्वाधीन. ज्या गोष्टीस जन्म व मृत्यु लागलेले आहेत अशी (अशाश्वतपणा दाखविणारी). ॰मर्याद- क्रिवि. मृत्यु येईपर्यंत; सर्व जन्मभर; आजीव ॰मास-पु. ज्या महिन्यांत जन्म झाला तो महिना ॰योग-पु. जन्मकालीन ग्रहांची शुभाशुभ फलसूचक स्थिति. ॰राशि-रास-पुस्त्री. ज्या राशीवर जन्म झाला ती, जन्मकालीं चंद्र ज्या राशीस असेल ती रास ॰रोग-पु. जन्मापासून जडलेला रोग. ॰रोगी-वि. जन्मा- पासून आजारी; नेहमींचा दुखणेकरी. ॰लग्न-न. जन्मकालीं जी राशीउदय पावत असेल ती. ॰लिखित-जन्मपत्र पहा. ॰वर- भर-क्रिवि. आयुष्यभर 'जन्मवरी स्वार्थ केला ।' -दा ३.५.५०. ॰वित-वि जन्म देणारा. ॰व्रती-जन्मभर व्रत घेणारा, आचरणारा. ॰सवाशीण-सौभाग्यवती-स्त्री. १ सौभाग्यानें मरणारी २ (ल.) वेश्या ॰सळ वि. जन्मापासून खोडकर; त्रासदायक (मूल) ॰सांड-स्त्री. जन्मापासून एखाद्या गोष्टी- पासून पराङमुखता (क्रि॰ देणः करणें) ॰साफल्य-सार्थक्य- न आयुष्यांतील ध्येयाची सिद्धी. ॰सावित्री-स्त्री. १ (आशी- र्वाद देतांना) जन्मसवाशीण 'तूं जन्मसावित्री होसी । चंद्रार्कवरी राहसी ।' -कथा १.२..१७०. २ (ल.) पांघरण्याचें किंवा नेसावयाचें जें कधीं धुतलें जात नाहीं असें वस्त्र ॰सोंवळा-वि. १ जन्म सावित्री अर्थ २ पहा. २ (पवित्र समारंभामध्यें) तसलें सोंवळें नेसणारा ॰सौभाग्य-न. जन्मापासून चांगलें नशीब. ॰स्थ- वि. जन्मलग्नामध्यें असलेला जन्माच्या वेळेचा (ग्रहकुंडलींतील). ॰स्थान-न. १ जन्मभूमि. २ जन्मलग्न. ॰स्थानीं लघुशंका करणें-१ मातृगमन; मात्रागमन. २ (ल.) उपकार करणारावर अपकार करणें; कृतघ्नता. ॰स्वभाव-पु. जन्मापासूनची वृत्ति, वागण्याची तर्‍हा. जन्माची प्रकृति. -ची गांठ-विवाहासारखा कधीं न तुटणारा संबंध. -ची जोड-१ जन्मजोड पहा. २ पतिपत्नी-बापलेक संबंध. ची भाकरी-बेगमी-जन्मभर टिक- णारें पोटापाण्याचें साधन. -ची साट-जन्माची भाकर पहा. जन्माचें सार्थक-जन्मांतील ध्येय, उद्देश, हेतु. (क्रि॰ करणें). जन्मांतर-न. १ दुसरा जन्म (मागचा किंवा पुढचा). २ नशीब; दैव 'म्या पालखीत बसावें असें माझें जन्मांतर नाहीं.' ॰आठविणें-लहानपणचे दिवस आठविणें. ॰उपटणें-नशीब चांगलें अथवा वाईट अनुभवास येणें. ॰काढणें-(ल.)-बद्दलचा अस्सल दस्तैवज शोधून काढणें. ॰सापंडणें-मिळणें-हातास लागणें-वरील प्रकरचा दस्तैवज मिळणें, सांपडणें. ॰पाहणें- शोधणें-तपासणें-जन्मपत्रिका पाहणें; संसारांतील कामकाज पाहणें. ॰फुटणें-नशीब फुटणें; दुर्दैव ओढवणें. जन्मांतरीं न घडणें-न होणें-सबंध जन्मांत न होणें. जन्मांतर-कथा- गोष्ट-हकिकत-स्त्री मागच्या आयुष्यांतील गोष्ट किंवा वाईट कृत्य. जन्मांतर(रीं)चा-वैरी-दुष्मन-दावेदार-वि. मागील जन्मामधील शत्रुः याच्या उलट जन्मांतरींचा मित्र, सहकारी. (वाप्र.) जन्मांतरींचा द्वेष-वैर, मैत्री-ऋणानुबंध इ॰ वगैरे. जन्मां- तरचें ज्ञान-न लहान मूल किंवा प्राणी यांच्यामधील दिसून येणारी उपजत बुद्धि जन्मांतरयोग-पु. मागच्या जन्मीं केलेल्या चांगल्या कृत्यामुळें या जन्मीं सुख मिळतें ही कल्पना. जन्मादा- रम्य-क्रिवि. जन्मापासून (आतांपर्यंत). जन्मांध-वि. जन्मा- पासून किंवा उपजत आंधळा. जन्माष्टमी-स्त्री. गोकुळअष्टमी. श्रावण वद्य अष्टमी. जन्माक्षर-न. पंचांगामध्यें अवकहडा चक्रांत जन्मनक्षत्राला जें अक्षर असतें तें. जन्मोजन्म-जन्मीं-क्रिवि. या व पुढील जन्मांत; अनेक जन्मांत; निरंतर. जन्मजन्मांतरीं पहा. जन्मोत्तरी-जन्मोत्री-स्त्री. जन्मपत्र पहा. 'वरिष्ठें वर्तविली जन्मोत्री । यासी दोन पुत्र आणि येक स्त्री ।' -कथा ३.३.७१.

दाते शब्दकोश

अंग

न. (अप.) आंग. १ शरीर; देह. 'पै जयाचेनि अंगसगें ।' -ज्ञा ९.२६९. 'अंगाला वारा लागेल, आंत जा !' २ अवयव; इंद्रिय; गात्र. 'अति क्षीणता पावलीं सर्व आंगें.' -दावि २४२. ३ (ल.) कोणत्याहि गोष्टीचा घटक, विभाग. 'हत्ती, रथ, घोडेस्वार आणि पायदळ हीं प्राचीन काळीं सैन्याचीं चार अंगें समजलीं जात असत.' ४ बाजू; दिशा. दारा अंग = (व.) दरवाज्यामागें किंवा जवळ. 'आठै आंगें पोळती । वसूधरेचीं ।' -शिशु ७४८. 'किल्ल्याचें आंग भिउनि फिरंग भार हा पळतो कानड्याचा.' -ऐपो १८३. 'तुमचें पागोटें मागल्या अंगानें बैडौल दिसतें.' ४ वेदांग; वैदिक वाङ्मयापैकीं विशिष्ट ग्रंथ- समूहास संज्ञा. उदा॰ शिक्षा, ज्योतिष, निरुक्त, इ. ५ एखाद्या कामांत असलेला हात, घेतलेला भाग किंवा संबंध. 'त्या मसलतींत रामाजीपंतांचें अंग आहे.' ६ चोरून मदत किंवा मिलाफ; आश्रय; फुस. 'ह्या चोराला कोतवालाचें अंग आहे.' 'ही सासूबरोबर भांडते, हिला नवर्‍याचें अंग आहे.' ७ अधि- ष्ठान; ठिकाण; शरीर; देह (एखाद्या गुणदोषाचा कर्ता, पात्र). 'ही चोरी ज्याचे अंगीं लागेल त्यास मी शासन करीन,' 'त्याच्या अंगीं चित्रकलेचा गुण आहे.' ८ (एखाद्या वस्तूचा किंवा कार्याचा) गौण, अप्रधान; भाग. उ॰ विवाहामध्यें होम हा प्रधान आहे, अवशिष्ट कर्में अंगें होत. ९ खूण. 'अनुभवाचीं आंगें जाणें ।' -दा ५.९.२२. १० आंतड्याचा गुदद्वाराबाहेर येणारा भाग, किंवा प्रसूतीनंतर योनीच्या बाहेर येणारा भाग. (सामा.) गुदद्वार. 'आंगीं सारी बर्फ कुणाच्या छत्री गाजर मुळा । मेणबत्तीचा खेळ चालला' -विक्षिप्त १.१३५. ११ विशिष्ट काम करण्याची पात्रता, ताकद, क्षमता, बुद्धि. १२ आपल्या बाजूचा माणूस (मोठ्या अधिकावरील); पुरस्कर्ता, तरफदारी करणारा; वशिला 'दरबारांत अंग असल्यावांचून क्रांतिवृत्तावरचा बिंदु, अंश. (अस्तलग्नाच्या उलट). १४ (संगीत) प्रबंधाचा पोटविभाग; रागवाचक स्वरसमुदाय; हे विभाग सहा आहेत:- स्वर, विरुद्ध, पद, तेनक, पाट, ताल. १५ (ताल) तालाचें मात्रानियमानें झालेलें कालप्रमाण हीं अंगें सात आहेत:-अणु- द्रुत, द्रुतविराम, लघु, लघुविराम, गुरु व प्लुत. १६कौशल्य; चातुर्य; कल. 'त्याला गाण्याचें अंग आहे.' १७ मगधाच्या पूर्वेचा जुना बंगाल देश; सध्यांचे मोंघीर, भागलपूर, पूर्णिया इ॰. जिल्हे यांत येतात. याचा उल्लेख अथर्ववेदांत आलेला आहे. पुढील काळीं शोण, गंगा या नद्यांच्या आसपासचा प्रदेश; कर्णाचें राज्य. १८ आचारांग सूत्रांपैकीं एक जैन आगम ग्रंथ. १९ स्वतः, खुद्द. आंगें असाहि प्रयोग आढळतो. 'दीप वांचूनि दिवा लाहे । तै आंग भुललाचि कीं ।' -अमृ ३.२०. 'राहोनि गुप्त धृष्ट- द्यूम्नें तच्छोध लाविला आंगें ।' -मोआदि ३४.१८. २० प्रकार. 'घालाघालीचें आंग सांधौं कैसें । चालितां बिंबु न दिसें ।' -शिशु १००६. 'कारभाराचें सांगावें अंग कैसें ।' -दा ११.५.२३. -शअ. (व.) कडे. उ॰ 'भिंतीअंग' (वाप्र.) ॰ओढविणें- आपल्या आंगावर घेणें; स्वतः पुढें होणें; (एखाद्या कार्योत- कडे). 'आपुलेंचि अंग तुम्हीं वोडविलें । त्याचें निवारिलें महा दुःख ।' ॰काढणें-काढून घेणें-१ स्वतः एखाद्या कामांतून माघार घेणें; संबंध तोडणें (एखाद्या कामांतून). 'मी त्या कामांतून आपलें अंग काढून घेतलें आहे.' २ (कु. गो.) दच- कणें. 'आंग काडप.' ॰घालणें-१ हात घालणें; मदत करणें; मन घालणें. 'या कामांत तूं जर अंग घातलेंस तर फार सोय होईल.' २ दुःखामुळें (जमिनीवर पडणें.) 'ऐकोनियां आंग घाली पृथ्वीवरी ।' -दा ३.५.३०. ॰घासणें-झीज सोसणें. 'परांजप्यांनीं प्रामाणिकपणानें अंग घासून... स्वतःची स्कीम करून कार्यास लागावें' -केले १.२६३. ॰घेणें-भरणें-१ लठ्ठ होणें. २ (गो. 'आंग घेवप.') (कामांत) भाग घेणें. ॰न घेणें-पुढें न सरसावणें; भाग न घेणें. ॰चढणें-सदरांत पडणें; वर्गांत येणें. 'जें विधीसी नातुडे । तें निषेधाचें अंग चढे ।' -एभा ७.६९. ॰चढून येणें-(व.) ताप भरणें, चढणें. ॰चोरणें-जोगावणें-१ अंग राखून काम करणें; टंगळमंगळ करणें; चुकारपणा करणें. 'संत सेवेसी अंग चोरी ।वृष्टी न पडो तयावरी ।' २ शरीराचा भाग आकुंचित करणें (मार चुकविण्या- साठीं). 'असा अंग चोरतोस म्हणून नीट लागत नाहीं.' ॰जड करणें-(गो. 'अंग जड करप') एखाद्या कामांत भाग घेण्याचें टाळूं पहाणें. ॰जड जाणें-(गो. 'आंग जड जापव.') अंगावर कांटा उभा राहणें. ॰झांकणें-लपविणें- स्वतःची बाजू किंवा भाग (कामांतील) दाबून, गुप्त ठेवणें. ॰झाडणें-साफ नाहीं म्हणून सांगणें; नाकबूल करणें. 'आंग झाडिती न ममें । येणें बोलें ।' -ज्ञा १७.३७२. ॰टाकणें-१ अशक्त होणें; वाळणें. 'आई गेल्यापासून बाळानें अंग टाकलें आहे.' २ जोरानें देह जमिनीवर टाकणें. ३ विश्रांती- साठीं आडवें होणें; कसें तरी अस्ताव्यस्त पसरणें. 'घरीं जाऊन केव्हां अंग टाकीन असें मला होतें.' ॰टेकणें-आश्रय करणें. 'योगें आंग टेकिलें योगीं ।' -अमृ ९.२६. ॰दर्शविणें- एखाद्या गोष्टींत किंवा व्यवहारांत हात किंवा संबंध आहे असें भासविणें. ॰दाखविणें-एखाद्या कामांत कौशल्य दाखविणें; फड जिंकणें. ॰न दाखविणें-अंग असल्याचें लपविणें; मागें रहाणें, जबाबदारी टाळणें. (गो. आंग दाखैना जापव.') ॰देणें-१ मदत करणें; हातभार लावणें. २ प्रवृत्त होणें; वळणें. 'सुखा अंग देऊं नये ।' ॰दोडपणें, दुडपणें, दुमडणें- (गो. 'आंग दोडप.') अंगं चोरणें. ॰धरणें-१ ताठरणें; संधिवातानें शरीर आंखडणें. २ लठ्ठ होणें; ताकद येणें. ॰मरणें- अर्धांगवायूनें शरीर अथवा एखादा अवयव बधिर होणें. ॰मारणें- १ अंग चोरणें पहा. २ जोरानें अंग आंत घुसविणें. 'मीं दाटींतून अंग मारलें.' ॰मुरडणें-मुरडणें; मागें पहात दिमा- खानें जाणें; ठमक्यानें जाणें; 'नवी साडी नेसून पोर पहा कशी अंग मुरडीत चालली आहे.' ॰मोडून काम करणें- खपणें; श्रम करणें; अतिशय मेहनत करणें; जिवाकडे न पाहतां काम करणें; जीव पाखडून काम करणें. ॰मोडून येणें-तापानें अंगावर कांटा येणें; कणकणणें; कसकसणें. 'तदुपरि अविलंबे आंग मोडून आलें ।' -सारूह ३.५७. ॰येणें-(गो. 'आंग यॅवप.') १ लठ्ठ होणें. २ प्रसूति समयीं गुह्यांग बाहेर येणें. ॰रक्षण करणें, राखणें-वांचविणें-अंग चोरणें; आपला बचाव करणें. 'यश रक्षावें न आंग लेंकांहीं ।' -मोउद्योग १०.६१. 'वत्सें भीमें एकें काय करावें? न अंग राखावें ।' -मोभीष्म ३.४. ॰सांवरणें-१ तोल सांवरणें., २ गेलेली ताकद पुन्हां मिळविणें; पूर्व स्थितीवर येणें. ॰सोडणें- (गो. 'आंग सोडप') खंगत जाणें. ॰हलकें होणें-(गो. आंगं ल्हवु जावप.') हायसें वाटणें; (जबाबदारींतून) मोकळें झाल्याबद्दल समाधान वाटणें. 'अंगा-नें आरंभ होणा रे वाप्र. -खांद्यावरचें-(बायकी) (ल.) दागदागिने. -खालची, खालची बायको-स्त्री. राख; उपस्त्री. -खालीं घालणें- स्वतःच्या चैनीसाठीं अथवा उपभोगासाठीं राखणें (वेश्या, परस्त्री, इ॰). -खालीं पडणें-१ सवयीचें होणें. २ भोग देणें; रतिसुख देणें-वेणें. -चा आंकडा होणें-आंकडीनें पेटके येणें; अंग वांकडें होणें. -चा आळापिळा करणें-१ अंग पिळवटणें; आळेपिळे देणें. २ अतिशय श्रम करणें. -चा खकाणा करणें-(व.) संताप करून घेणें. -चा खुर्दा होणें- (श्रमानें) अतिशय श्रमानें अंग ठणकणें; गलितगात्रें होणें; मणके ढिले होणें. -चा हुरपळा-भडका होणें-अंग अतिशय तापणें (तापानें, संतापानें); लाही होणें; आग होणें. -ची आग-लाहकी-होळी होणें-रागानें, संतापानें अंगाची आग होणें. -ची चौघडी करणें-१ शरीराच्या चार घड्या करणें (डोंबार्‍याच्या कसरतींत). २ सर्व अंग पोटाशीं घेऊन निजणें (थंडी, ताप इ॰ मुळें). -ची लाही होणें-अंगाचा हुरपळा होणें पहा. १ उन्हानें अतिशय अंग तापणें; काहिली होणें; भडका होणें. २ अतिशय संताप येणें (जोंधळा इ॰ धान्याची भाजून लाही होते त्याप्रमाणें); 'तें तिजला खपलें नाहीं । अंगाची झाली लाही ।' -विक १७. -ची लाही करणें- संतापविणें; खिजविणें; भाजणें; जाचणें. -चें आंथरूण करणें- स्वतःबद्दलची काळजी सोडून सर्व प्रकारच्या संकटांना तोंड देणें; एखाद्याचें काम करण्यासाठीं स्वतःच्या जीविताची पर्वा न करणें. 'त्याचें लग्न व्हावें म्हणून म्या अंगाचें अंथरूण केलें तरी त्यानें त्याचा कांहीं उपकार मानला नाहीं.' -चें आंथरूण होणें- (तापामुळें) अशक्तता येणें; उठवणीस येणें; मरगळीस येणें. -चें कातडें काढून जोडा शिवणें-(एखाद्याविषयीं) अतिशय कृतज्ञता, आदरबुद्धी दाखविणें. -चे चकदे काढणें- (मांसाचे तुकडे करून काढणें) जोरानें बेदम मरणें; अंगाची सालडी काढणें. -चे-चा तिळपापड होणें-रागानें शरीराची लाही होणें. 'मी दहांच्या तोंडून ऐकलं आणि माझ्या अंगाचा असा तिळपापड झाला कीं सांगतां पुरवत नाहीं.' -मोर १५. -चे धुडके उडविणें-(शरीराच्या) लकतर्‍या काढणें; चेंदा- मेंदा करणें; फार झोडपणें. 'त्या बदमाषानें त्याच्या अंगाचे नुसते धुडके उडविले.' -चें पाणी करणें-होणें-अतिशय श्रम करणे (त्यामुळें अंगास पाणी, घाम येणें). 'अंगाचें पाणी करूनच या हतभाग्या आयुष्याचे दिवस मला लोटले पाहिजेत.' -पाव्ह ९९. -च्या चिंध्या करणें-१ (व.) अंग ओरखडणें. २ त्रास देणें. -अंगांत मांग शिरणें-शरिरांत अतिशय क्रोधाचा संचार होणें. (मांग हा फार क्रूर समजला जातो यावरून). -त येणें-वारें शिरणें-१ भूतसंचार होणें. २ अति उत्कंठेनें काम करणें. -त शीळकळा येणें-(माण.) अंगांत देव येणें, वारें येणें. -निराळा-बाहेर-टाकणें-झोंकणें- सोडणें-झिडकाविणें-(कामधंदा, जबाबदारी) सोडून देणें; माथ्यावर, अंगावर न घेणें. 'पेशव्यांनीं आम्हाला आंगाबाहेर टाकलें आहे.' -अस्तंभा २४. -निराळें करणें-अंगाबाहेर टाकलें पहा. -बरोबर होणें, -त बसणें-एखादा कपडा अंगास बरोबर बसणें, ठीक होणें, बेताचा होणें; -ला लावणें- १ अंगांला तेल वगैरे चोपडणें. 'नवी नवरी म्हणून अंगाला लावीन म्हटलें; नाहीं !' -झांमू. २ बाळंतिणीचें अंग रगडणें, चोळणें. (एका) -वर असणें-होणें- एका कुशीवर निजणें किंवा आनं- दानें अंग रोमांचित होणें. 'वृत्तश्रवणें आला सर्वांगीं आमुच्या पहा कांटा ।' -मोकर्ण १८.१. -वर काढणें- आजार वगैरे सोसणें. -वर कोसळणें-कोसळून पडणें-ओघळणें- १ रागानें एखाद्याच्या अंगावर चालून जाणें, पडणें. २ संकट आपत्ति वगैरे गुदरणें; जबाबदारी येणें; आपत्तींत सांपडणें. -वर गोण किंवा गोणी येणें-(व.) अंगावर जोखीम किंवा जबाबदारी येणें. -वर घेऊन-स्वतःवर जबाबदारी घेऊन; आपलें म्हणून; कैवार घेऊन (क्रि॰ करणें; बोलणें; सांगणें; पुसणें; विचारणें). -वर घेणें-१ मुलास प्यावयास घेणें, देणें; थान देणें. २ स्वतःवर जबाबदारी घेणें. ३ आपला म्हणणें, अतिशय प्रीति दाखविणें. -वर तुटणें-तुटून पडणें-हल्ला करणें; धांवून जाणें; एकदम चालून जाणें. -वर देणें-जामिनकी किंवा गहाण न घेतां वैयक्तित जबाबदारीवर कर्ज वगैरे. -वर देणें-बांधणें-भरणें-पोसणें-करणें इ॰-स्वतःच्या जबाब- दारी-साधन-संचयावर देणें, बांधणें वगैरे. -वर पडणें-येणें- १ शिरावर पडणें; विक्रींत नफा होईल म्हणून जो माल खरेदी केला तो अडीअडचणीमुळें. भाव उतरल्यामुळें आपल्याजवळ पडून राहणें; तोटा भरून देण्याची जोखीमदारी अंगावर येणें. २ गळ्यांत येणें; एखादा धंदा अगर काम करण्यास भाग पडणें. ३रागानें चालून जाणें; वसकन अंगावर येणें. ४हल्ला करणें; चालून येणें. -वर पिणें, खाणें-(मुलानें) स्तनप्राशन करणें; स्तनप्राशन करण्याइतकें लहान असणें. -वर शेकणें-तोटा होणें (व्यापारांत); बुड येणें (रुपये, व्यवहार, इ॰ ची); कुमांड येणें. -वरचें-वि. दूध पिणारें (मूल). -वरचें जाणें- (बायकी) महिन्याच्या महिन्यास तरून स्त्रीच्या शरीरांतून जसें दूषित रक्त बाहेर जातें तसें अवेळीं जाऊ लागलें; धुपणी रोग होणें. -वरचें तोडणें-तान्ह्या मुलाचें अंगावर पिणें बंद करणें. -वरून वारा जाणें-अर्धांगवायु होणें. 'भूतपिशाच्य लागलें । अंगावरून वारें गेलें ।' -दा ३.७.५५. -स कुयला लागणें- मत्सरानें किंवा संतापानें हिरवा-निळा होणें; मिरच्या लागणें; अतिशय राग येणें. -स झोबणें-(व.) अंगास स्पर्श करणें; धरणें. -स मुंग्या येणें-वातादि विकारामुळें अंगाला एक प्रका- रची बधिरता येणें. -स बसतें येणें-अंगाला बरोबर बसेल असें होणें (कपडा इ॰). 'नोकरलोकांच्या अंगास बसते येतील असे पोषाख करण्यांत यावेत.' -खानगींतील नोकरांचे पोषाख (बडोदें) ७ -स-अंगीं-येणें- १ व्यापारांत बूड येणें; नुक- सान होणें; ठोकर बसणें. 'मिरच्यांचा व्यापार अंगास आला.' २अंगांत बाणणें. 'मराठीच्या अंगीं आलेली क्षीणता क्षणता क्षणमात्रहि झांकली जाणार नाही.' -नि. -स येणें-होणें-अंगाबरोबर होणें. -स-आंगीं-लावणें-१ पुष्टिकारक होणें; लठ्ठ होणें. २एखादा दोष किंवा गुन्हा अंगावर शाबीत होणें, लागू होणें. 'तेथें व करितां चोरी । आंगीं लागे ।' -दा ६.१.७२. ३तोटा सोसावा लागणें; ठोकर बसणें; अंगावर शेकणें. -स लावणें- १ (बायकी) स्नानाच्या अगोदर तेल व हळद अंगाला लावणें, चोळणें. २बाळंतिणीच्या अंगाला तेल लावणें. -स लावणें- लादणें-चिकटविणें; शाबीत करणें (गुन्हा, अपराध). -आंगीं- यानें आरंभ होणारे वाप्र. -असणें-जवळ, पदरीं असणें; ठायीं असणें. 'हा दोष माझ्या आंगीं नाहीं.' -आणणें-१ आपल्या- वर घेणें; ताबा घेणें. २ आपल्या ठिकाणीं असूं देणें; स्वाधीन राखणें. 'हा गुण आंगीं आणण्याचा प्रयत्न कर.' ॰आद- ळणें-अंगास चिकटणें, कोसळणें. 'अंगीं आदळतो शोक.' -दावि ४२३. अंगीं(एका आंगीं)-अंगें-उणा-वि. १आई- बाप मेलेला; पोरका; विधवा; विधुर. २ व्यंगी; लुळा; कमीपणा असलेला; एका पायानें लंगडा; ३(ल.) सरळ, ताठ नसलेला; उणेपणा असलेला; कमजोर बाजू असलेला; लुच्चा; जाणून- बुजून अपराधी. म्ह॰ आंगीं उणा तर जाणे खाणाखुणा = ज्याला आपला कमीपणा ठाऊक आहे तो लोकांची टीका आपल्याला चिकटवून घेतो. ॰खिळणें-शरीरांत भिनणें. ॰घुमारणें-भूत लागणें; अवसर येणें. आणि आंगीं घुमारिलें.' -दावि १५६. -चा उतारा-वि. अंगावरून ओवाळून दिलेला, काढून टाकलेला जिन्नस (वस्त्र, अलंकार इ॰). 'तुझें अंगीचा उतारा । तो मज देई गा दातारा ।' -भज ४२. -ची सावली करणें-(स्वतः- चा) आश्रय देणें. 'आपुलिये अंगींची सावली । अहोरात्र करुनि तया रक्षी ।' -जिरणें-सरावाचें होणें; मुरणें. -ताठा भरणें- गर्विष्ठ होणें. 'अंगीं भरलासे ताठा । वळणीं न ये जैसा खुंटा ।' -तुटणें-अशक्त होणें; वाळणें; रोड होणें (मूल). -नसणें- १ जातीनें अनुभव, माहिती नसणें. २स्वतःचा नसणें; मुळचा नसणें. 'इतका उद्धटपणा त्याच्या आंगीं नाहीं.' -पडणें- १ सहाय, पक्षपात करणें. 'हा अविद्येचा अंगीं पडे.' -अमृ ६.६. २ संवय होणें. अंगीं मुरणें पहा. -फुटणें- १ लठ्ठ होणें; गुब- गुबीत होणें. २ एखादा रोग अंगावर स्पष्ट दिसणें, वाहणें (रक्त- पिती इ॰). -बसणें-सुगम असणें; संवय होणें. -बिर्‍हाड देणें-करणें-शरीरांत थारा देणें; हृदयांत, अंतःकरणांत बाळगणें; आस्त्रा देणें (दुर्गुण, पापवासना इ॰ ना). -माशा मारणें-आळशी बनणें. -(माशीं) भरणें-लठ्ठ होणें. -मिरच्या, कुयले, लागणें-झोंबणें- (एखाद्यानें मर्म काढलें असतां) रागानें जळफळणें. -मुरणें-१ संवयीचा होणें. २ हाडीं शिरणें; शरीरांत (ताप) भिनणें. ३ जिरणें; बाहेर न येणें (देवी, गोवर). -येणें-अंगांत भुताचा संचार होणें; अवसर येणें; भूत- बाधा होणें. 'शूद्र येक त्याचे आंगीं आला बोले ।' -रामदासी २.११. -लागणें-अन्न पचणें; लठ्ठ होणें. 'त्याच्या अंगीं अन्न लागलें.' -वाजणें-(बाजणें) अंगांत शिरणें; शोभणें. 'थोर- पण अंगीं वाजे नाना' -दावि ६५. अंगीं-गें-१ स्वतः, जातीनें. म्ह॰ 'अंगें केलें तें काम । पदरीं असे तो दाम ।' 'अंगें करिताती आपण । दोघे जण मिळोनी ।' -एभा ७.५७८. 'अंगें धावे कार्यासमान ।' -नव १६.१७५. २ च्या वतीनें, मार्फत (प्रतिनिधी). दादा अंगे वयनी सोयरी. अंगें, आंगें- शअ. जवळ; बाजूस. 'पाण्याचा तांब्या बापूचे आंगें होता.' -बाळ २.६८. म्ह॰ १ अंगीं (माझ्या इ॰) का माशा मेल्या आहेत = काय (मी) आळशी आहें, का माझा धंदा काय माशा मारीत बसण्याचा आहे? २ आली अंगावर तर घेतली शिंगावर = सहजासहजीं, आगाऊ न ठरवितां एखादी गोष्ट अंगा- वर येऊन पडली असतां, आडवी आली असतां ती करणें (बैलाच्या शिंगांच्या टप्प्यांत कोणी आला तर तो त्याला शिंगावर घेण्याला कमी करीत नाहीं यावरून, आयता मिळालेला फायदा करून घेणें हा अर्थ). ३ अंगापेक्षां बोंगा मोठा; अंगापेक्षां बोंगा, कोठें जासी सोंगा = (शरीरापेक्षां धोतराचा अथवा लुगड्याचा पुढचा भाग मोठा) खर्‍यापेक्षां जास्त योग्यतेची ऐट मारणें. सामाशब्दः ॰अंग, आंगप्रत-क्रिवि. पृथक् पृथक्; अलग अलग; इसमवार; प्रत्येकीं. ॰उद्धार-पु. (प्र.) अंगोद्धार. १ (काव्य) शरीराची, देहाची मुक्तता. २ तीर्थांत स्नान करणें; तीर्थस्नान; देहशुद्धि. ३ (योग) पोटांतील आंतडीं तोंडांतून बाहेर काढून स्वच्छ करणें; धौती; धुतीपुती. [अंग + उद्धार] ॰उधार-वि. अंगावर दिलेलें, केलेलें (कर्ज, उधारी); स्वतःच्या पतीवर केलेली उधारी. ॰ओलाचें-न. (कों.) जिच्यांत पाणी सांठविण्याची शक्ति आहे असें शेत, जमीन; उन्हाळ्यांत पाणी न देतां हिच्यांतून पीक काढतात. ॰कंप-पु. शरीरास कंप सुटणें; थर- कांप होणें. [सं.] ॰कल-पु. शरीराचा तोल, वांक. [सं.] ॰कवळी-स्त्री. (काव्य) आलिंगन; मिठी; पक्कड. 'परस्परें अंगकवळी होतां । आनंदिलीं उभयतां ।' -मोल. [अंग + कव- ळणें] ॰कष्ट-पु. शारीरिक श्रम. [सं.] ॰कळा-स्त्री. शरीराचें तेज, कांति; मुसमुशीतपणा (निरोगावस्थेंत). ॰काठी-स्त्री. अंगबांधा; अंगयष्टि; शरीराचा बांधा, ठेवण. (अंगलट-लोट- ठेवण-वटा-वठा-वळण हें शब्द शरीराचें स्वरूप, कांति, भरदार- पणा इ॰ दाखवितात तर अंगकाठी-बांधा-यष्टी हे रचना, बांधणी दाखवितात). ॰काडू-ढू-ढ्या-वि. अंग काढणारा; पळपुट्या; जबाबदारी टाळून निसटूं पाहणारा (संकट, अडचणी असतांना); काम चुकारू; माघार घेणारा. [अंग + काढणें] ॰कार्श्य-न. शरी- राचा लुकडेपणा; सडपातळपणा; कृशता. [सं.] ॰गडी-पु. पोटां- तील भिडू; पित्त्या; (सोंगट्या, पत्ते इ॰ खेळांत) भिडूंचा तोठा असतां आपणच त्यांच्या वाटचें खेळणें, म्हणजे आपणच एक कल्पित भिडू आहों असें मानणें. ॰ग्रह-पु. आचके, पेटका, गोळा येणें. [सं.] ॰चपळाई-चापल्य-स्त्रीन. अंगांतील चपळपणा; स्वतःसिद्ध चापल्य. ॰चुकाऊ-र-रू, -चोर-वि. कामांत कुचराई करणारा; मनापासून, नेटानें काम न करणारा. 'अंगचोर वाग्वीर-पटूंचें पेव कसें फुटलें ।' -सन्मित्र समाज मेळा पृ. १३. १९२९. ॰च्छाया-स्त्री. १अंगाची सावली. २(ल.) आश्रय. 'तंव वैकुंठपिठींचें लिंग । जो निगमपणाचा पराग । जिये जयाचेनि हें जग । अंगच्छाया ।' -ज्ञा १७.४६. ॰छेद-विच्छेद-स्त्री. शरीराचा एखादा अवयव कापणें. [सं.] ॰ज-वि. अंगापासून झालेला. -पु. स्वतःचा पुत्र; मुलगा; औरस. ॰जा-स्त्री. स्वपुत्री. ॰जड-वि. जड शरीराचा; लठ्ठ; फोपसा; अगडबंब; मंद; आळशी. ॰जूठ-स्त्री. मल्लयुध्द; कुस्ती; झटापट. [सं. अंग + युध्द -जुध्द-जुट्ठ] ॰जोर-पु. अंगबळ; शरीराची ताकद, शक्ति. (असे धेडगुजरी समास मराठी भाषेंत पुष्कळ झाले आहेत). [सं. अंग + फा. जोर] ॰झाप-स्त्री. पेंढार्‍यांपैकीं कोणी एखादा पेंढारी झटापटींत मारला गेल्यास त्याला तात्पुरती मूठमाती देण्याची जी चाल होती तीस म्हणत. ठग लोकांत, त्यानीं मारलेल्याला तात्पुरती मूठमाती देण्याची पध्दत; पुढें त्या मृताला सवडीनें नीट लपवून ठेवीत. [अंग + झापणें-झांकणें] ॰झोंक-पु. शरीराचा तोल, कल. [अंग + झोंक] ॰झोल-पु. (काव्य) छातीवरील बंदांचा लांब अंगरखा. ॰ठसा-ठाण-ठेवण-पुनस्त्री. अंगाची ठेवण; अंग- काठी. 'भीमा ऐसा अंगठसा । माझिये दृष्टी दिसतसे ।' -मुसभा ६. १५३. २ (ल.) बळ; सैन्य. -होकै १ ॰ठोळा-ळी-पु. स्त्री. हातांच्या किंवा पायाच्या बोटांत घालावयाचें एक वेढें, वेढणें. (मराठ्यांत स्त्रिया व मुलें बहुधा वापरतात). [अंगुष्ठ] ॰तुक- न. अंगाचें वजन. 'तरी लोहाचें आंगतुक । न तोडितांचि कनक । केलें जैसें देख । परिसें तेणें ।' -ज्ञा १७.२१६. [अंग + तुक] ॰तोल -पु. अंगझोंक पहा. ॰त्राण-न. शरीरसंरक्षक साधन; चिलखत; बख्तर; कवच. 'गोधांगुळें घालिती हस्तीं । अंगत्राणें बांधिलीं ।' -पांप्र ३२.६५. ॰त्वानें-त्वें क्रिवि. (अंगत्व याची तृतीया) प्रतिनिधि म्हणून; एखाद्या करितां; एखाद्याच्या नांवानें-तर्फें-आश्र- यानें, मार्गदर्शकत्वाखालीं; वतीनें. 'मला न फावल्यास मी आपल्या अंगत्वानें दुसरा कोणी पाठवीन.' ॰दट-वि. १ अंगास घट्ट बसणारें, दाटणारें. २दृढ; बळकट. 'आत्मविषयीं आंतुवट । साधन जें आंगदट ।।' -ज्ञा १६.४५. -पु. (कर्ना.) अंगर- ख्याच्या आंत घालावयाची कोपरी. [सं. अंग + दृढ] ॰देण्या- वि. प्रत्यक्ष शेत कसणारा शेतकरी; शारीरिक श्रम करणारा पक्ष. ॰देवता-स्त्री. उपदेवता (कर्मांतील जी मुख्य देवता तिच्या अंगभूत असणारी). २ (ल.) सेवक; चाकर; भोंवतालची मंडळी. [सं.] ॰धट-वि. उद्धट; असभ्य; शिरजोर. [अंग + धुष्ट] ॰ध(धि)टाई-स्त्री. १ केवळ शारीरिक बळ. पाशवी बळ, शक्ति (चातुर्य, युक्ति यांच्या विरुद्ध). २ रानटी जुलूम; आंग- मर्दी. ॰धार-आंगधार पहा. ॰धुणें-न. १ (बायकी) स्नान; अंघोळ. २ (व.) न्हाणीघर. ॰न्यास-पु. देवतास्थापनेच्या वेळीं, धर्मविधि करतांना निरनिराळे मंत्र म्हणून देवतेच्या प्रतिमेला ६ किंवा १६ स्थानीं स्पर्श करावयाचा विधि; संध्या वगैरे कर- तांना स्वतःच्या शरीराच्या निरनिराळ्या स्थानीं स्पर्श करावयाचें कर्म. [सं.] ॰परिवर्तन-न. उलटें करणें (शरीर इ॰); एका बाजूवरून दुसर्‍या बाजूला वळणें. 'आषाढमासीं शयन ।भाद्रपद- मासीं अंगपरिवर्तन । कार्तिकीं उद्बोधन ।' [सं.] ॰पात-पु. १शरीराचा र्‍हास; लुकडेपणा; क्षीणता. २ (कड्यावरून) स्वतःस खालीं लोटून घेणें. ३ शरीरास किंवा एखाद्या अवयवास पक्षघात होणें. ४ अंग बाहेर येणें (गुह्येंद्रियाचा भाग). [सं.] ॰पांथी- स्त्री. खासगत वांटा; सरकतीच्या व्यवहारांत सावकारानें आपली सरकत ठेवली असतां सावकारीचे पांथीहून निराळी सरकतीसंबंधें जी त्याची नफ्याची पांथी असते ती. २ अंगवांटा. [अंग + पंक्ती] ॰पिळा-मोड-पु. अंगादिक पिळणें; आळस आला असतां किंवा भूतसंचारामुळें अंगास दिले जाणारे आळेपिळे; आळोखेपिळोखे; तापानें अंग कसकसणें. ॰पीडा-बाधा-स्त्री. नैसर्गिक विकार; शरीरास जडलेली व्याधि किंवा रोग (भूत- पीडेच्या उलट). [सं.] ॰प्रत्यंग-न. अवयवांसकट शरीर; पूर्ण शरीर. [सं.] ॰प्रस्थान-न. प्रत्यक्ष प्रवासास निघण्यापूर्वीं एखाद्या शुभ मुहुर्त साधण्यासाठीं आपलें घर सोडून जवळपास दुसर्‍याच्या घरीं स्वतः रहावयास जाणें. [सं.] ॰बल न. शारी- रिक शक्ति; ताकद; अंगधटाई. 'अवनीतीनें वर्तो नये । आंग- बळें ।' -दा २.२.२२. [सं.] ॰बांधा-पु. शरीराची ठेवण. ॰भंग-पु. १ अंगाचे सांधे धरणें; अशक्तपणा वाटणें. २ अंग- विक्षेप; शरीराचे निरनिराळे चाळे, हावभाव, चेष्टा. 'अंगभंग बहु दाविती रंगीं । रामरंग सुखसिंधु तरंगीं ।' ॰भंगवात-पु. अंगभंग रोग; ज्यामुळें हा रोग होतो तो वातदोष. ॰भर-भार-क्रिवि. शरीराच्छादनापुरतें (वस्त्र). 'अंगभर वस्त्र, पोटभर अन्न.' -पु. (ल.) शक्ति; जोर. 'एर्‍हवीं प्राप्तें मतांतरें । थातंबूनि आंगभरें ।' -ज्ञा १३.३१८. ॰भर होणें-(ना.) १ फजिती ॰उडणें. २भार होणें. ॰भा-स्त्री. अंगकांति. 'अंगभा विलोकितां तटस्थ जाहली सभा ।' -(अनंत) सीतास्वयंवर ८९. ॰भूत- वि. एखाद्या वस्तूचा भाग, अंश; अवलंबी; समाविष्ट; तदंत- र्गत; संबंधीं; आश्रयी. 'सीमंतपूजन हें विवाहाचें अंगभूत होय.' 'ज्वराच्या अंगभूत अरुचि असतेच.' [सं.] ॰मर्दन- न. अंग रगडणें; चंपी; मालिश. [सं.] ॰मर्दाई-मर्दी-स्त्री. पौरुष; शक्ति; केवळ शारीरिक बळ; अंगधटाई. [सं. अंग + फा. मर्दी = पौरुष] ॰मस्ती-पाशवी शक्ति; दांडगाई; उद्धटपणा. [सं. अंग + फा. मस्ती = दांडगाई] ॰मार्दव न. शरीराचा नाजूकपणा. [सं.] ॰मास-न. (व्यापकपणें) शरीर या अर्थीं 'माझें अंगमास दुखतें.' 'तिचें अंगमास शेकलें पाहिजे.' ॰मेह- नत-स्त्री. शारीरिक श्रम; प्रत्यक्ष कष्ट. [सं. अंग + अर. मिहनत् = श्रम, कष्ट] ॰मेहनती-त्या-वि. शारीरिक कष्ट करून पोट भरणारा; कष्टाळू; पोषाखीच्या उलट. २स्वतःशेत कसणारा; शेतकरी. ॰मेळ-पु. अंगसंग; संबंध. 'तियेचेनि अंगमेळें ।' -विपू १.१०३. [अंग + मिळणें] ॰मोड-स्त्री. अतिशय मेह- नत करणें; कष्ट करणें; सक्त मेहनत. ॰मोडा-पु. १ आळेपिळे (आळस घालविण्यासाठीं). (क्रि॰ देणें.) 'निद्रेनें व्यापिली काया ।आळस आंगमोडे जांभया ।' -दा १८.९.२. २ ताप भरण्यापूर्वीं अंग कसकसणें; अंग मोडून येणें. (अव. अंगमोडे. 'अंगमोडे येऊं लागले.' [अंग + मोडणें; बं. अंगमोडा] ॰यष्टी-रचना-स्त्री. शरीराचा बांधा, ठेवण. [सं.] ॰रस- पु. वनस्पतीच्या पानांचा, पाणी न घालतां काढलेला रस; आप- रस पहा. [सं-] ॰राख्या-वि. अंग राखून काम करणारा (आळसामुळें, अप्रामाणिकपणानें); अंगचोर; चुकार. ॰राग- पु. १ सुंगधी उटणें; उटी; लेप; चोपडण 'श्रमघर्मानें रणिं वीरांचा अंगराग पसरला ।' -सुसु नाटक २१. २ उटीचें द्रव्य (अरगजा, केशर, इ॰). [सं.] ॰रेटा-पु. अंगानें दिलेला, शरीरानें दिलेला धक्का, ठोसा. 'गाड्यास अंगरेटा दे म्हणजे चालता होईल.' [अंग + रेटणें] ॰रेटाई-स्त्री. अंगाची धक्का- बुक्की; मस्ती; ठोसेठोशी; अंगधटाई. ॰रोग-पु. शरीरास होणारा स्वाभाविक रोग (पिशाच्चबाधेनें किंवा देवतापराधानें न होणारा). ॰लग-वि. १ (जात, मैत्री, नोकरी इ॰ संबंधानें) जडलेला; संबंधीं; संबंध असलेला. २ जिव्हाळ्याचा; जवळचा; -पु. १ नातेवाईक; स्नेही. 'तुझा पिता तरी विरोचन । तो आमुचा अंगलग जाण ।' -कथा २.६.८८. 'अवघे अंगलग तुझे वधियेले वीर ।' -तुगा ३९२. २ समागम. 'संताचेनि अंगलगें । पापातें जिणणें गंगें ।' -ज्ञा १२.१७७. ३ आश्रय; साहाय्य. 'परब्रह्मींचेंनि अंगलगें । सृष्ट्यादि कार्य माया करूं लागे।' -विउ ११.१६. 'देवा मंदराचेनि अंगलगें ।' -ज्ञा ११. २५७. ॰लट-लोट-वटा-वठा-स्त्री. पु शरीराची ठेवण, कांति, तेज. अंगकाठी पहा. 'तेची अंगलट गोरी आसा' 'माझी आंगलट त्यावेळीं कांहींशीं पातळ होती' -विवि ११.८.२०४. [सं. अंगयष्टिः; प्रा. अंगलठ्ठी-अंग लट; किंवा अंग + लोष्ट] ॰लट घेणें-स्वतः होऊन जबाबदारी पत्करणें. ॰लट येणें- १ अंगास चिकटणें; तोट्यांत येणें. २ अंगाला चिकटणें; धक्काबुक्की करणें; खोडी काढणें. (अंगलट जाणें असाहि प्रयोग आढळतो). ॰लीन- वि. अंगांत मुरलेलें; शरीरांत गुप्त असलेलें. 'सद्वैद्यें जैसें दोषा । अंगलीना ।' -ज्ञा १६.४२. ॰लेणें-न. अंगावरचा दागिना; अलंकार. 'नाना अळंकार अंगलेणीं ।' -सप्र २.५. ॰लोट १ अंगलट पहा. २ अंगभार; अंगाचें वजन, पतन. 'मस्तकीं वाहती करुनि मोट ।भूमीं टाकिती जैसा घट । तळीं पाषाण होती पिष्ट । आंगलोटें दोघांच्या ।।' -मुसभा ७.३२. ॰वख-पु. अंगप्रदेश. 'जलतेया गिरिचेया आंगवखां ।' -राज्ञा ११.४२०. [अंग + वक्ष?] ॰वटा-क्रिवि.स्वाधीन. [अंग + वत्] ॰व (वा)टा-शेतांत उत्पन्न झालेल्या मालाच्या तीन (शेतमालक, बैल-नांगर मालक व शेत कसणारा) वांट्यांपैकीं शेत कसणार्‍याचा वांटा. [अंग + वाटा] ॰वण-स्त्री. १ सरा- वाच्या योगानें आलेली योग्यता; संपादन केलेली कार्यक्षमता; वाकबगारी. ' ऐसी अंगवण नाहीं मज देवा । '-तुगा ४४९५. 'वातात्मजासि म्हणे यदुनंदन । जरी तुज असेल आंगवण । यांतून एक स्त्रीरत्न । तुवां घ्यावें स्वेच्छेनें ।।' -जै ११.६. २ पराक्रम; शौर्य; जोर; उत्साह. (व.) खटपट; प्रयत्न. आंगवन असाहि प्रयोग. 'जळो तुमचें दादुलेपण । नपूंसकाहूनि हीन । वृथा गेली आंगवण । काय वदन दावितां ।।' -एरुस्व ८.६. ' नीलजां कैची आंगवण ।।' -उषा १४२३. ३ शरीरावस्था. 'तंव भीम- सेनाची आंगवण ।। कृष्णधर्म पाहाती ।' -जै ६.७०. ४ देवीचा वण; तीळ; चट्टा. (क्रि ॰ पडणें, उठणें, येणें, जाणें ). ५ उपा- सना; भक्ति; (गो.) (देवाला केलेला ) नवस. 'कीं वीरश्रीची धरितां अंगवण । प्रताप विशेष वाढे पै ।' -रावि ११.६. ६ सराव; नित्यक्रम; वहिवाट. 'ऐसें करितां पापाचरण । तयासी आलें वृद्धपण । पुत्र जाहाले अति दारुण । तरी आंगवण न सांडी ।।' -रावि १.१११. ७(ल.) साहाय्य; मदत. 'या परी चतुरंग- सेना । मिसळली रणकंदना । आपुलालिया अंगवणा । गज रथ रणा आणिती' -एभा ३०.११७. ८ द्वंद्व युद्ध; झुंज. ' तेआं भीड भीमसेना । जुंझतां बहुती आंगवणा । परतिजे ऐसी हांव कह्वणा । उपजेचिना ।।' -शिशु ८७८.[अंगवलन किंवा अंगापण-अंगा- वण] ॰वणा-वि. शूर. 'तो अक्रूर आंगवणा पुढां चाले ।' -शिशु ५४५. ॰वत-सामर्थ्य; अभिमान. 'आतां हा जळता वारा कें वेंटाळे । कोणाही विषा भरलें गगन गिळे । महाकालेंसि खेळें । आंगवत असे' -ज्ञा ११. ४०५ ॰वला-वि. जवळचा; अनुकूल; स्वाधीन. ॰वसा-(झाडाचें) साल, पाला, शेंडा. 'अशोकाचे अंगवसे । चघळिले कर्‍हेनि जैसे ।' -ज्ञा ११. ४१४. ॰वसें-न. रूप. ? -मनको. ॰वस्त्र-न. १ उपरणें; उत्तरीय; उपवस्त्र. ' नुसत्या अंगवस्त्रानिशीं तो घराबाहेर पडला.'२ लंगोटी (गौरवार्थी). [सं.] ३ (ल.) प्रेमपात्र; ठेवलेली स्त्री; रखेली; उपस्त्री. [अंगना + उपस्त्री = आंगोवस्त्रि-आंगोवस्त्र असा हा शब्द बनला आहे. वस्त्र (कपडा) याशीं याचा कांहीं संबंध नाहीं असें राजवाडे म्हणतात-भाअ १८३२ ] 'मला तर असें आठवतें आहेकीं, त्या वेळच्या खाजगी शाळेच्या एका मास्त- रास सकाळची शाळा असतां शाळेंतील विद्यार्थी त्याच्या आंग- वस्त्राच्या घरांतून कित्येकदां बोलावून आणत असत !' -टि ४. २९१. वाप्र. एका अंगवस्त्रानें निघणें-भाऊबंदांशीं बेबनाव होऊन एक उपरण्यानिशीं कांही एक तनसडी न घेतां घराबाहेर निघणें. ॰वळ-पु. आगवळ, आगूळ. अगवळ पहा. -नागा १२८. (-शर) ॰वळण- पु. अंगलट; अंगाची, शरीराची ठेवण. ॰वळणीं पडणें-सरावाचें होणें (हा शब्द प्रथमा विभक्तींत क्वचित योजितात). 'जी भाषा आम्ही...बोलतो त्यांतील शब्दांचे उच्चार आमच्या आंगवळणीं पडलें असल्यामुळें...' -टि ४. ४०१. ॰वळा-पु १ अंगाचे आळेपिळे; आळसामुलें येणारी जांभई. अंगपिळा पहा. २ मुलांची चळवळ. ३ सांगाती, सोबती; संबंधी; सहवासी. 'नित्य त्या सेवकाजवळा । अंगें अंग- वळा तूं होशी ।' -एभा ६३९४. ४ अंगकाठी. ॰वळेकार-वि. भारी; शक्तिमान्. 'सेजवळ सहवासी । आंगवळे-कारूं विश्वासी ।' -शिशु ५०५. ॰वाटा-पु. १ अंगवटा पहा. २ (व्यापारधंदा) भांडवल उभारल्याखेरीज प्रत्यक्ष काम करणा- राचा वांटा. ३ अंगपांथी पहा. ॰वाटेकरी-पु. अंगवाटा घेणारा. ॰वाण-पु. (कु.) नवस 'देवाक आंगवाण केली हा.' [अंग + वाणी] ॰वात-पु. चालतांना वेगानें उत्पन्न होणारा वारा; अंगवारा; गतिमान् वस्तूपासून उत्पन्न होणारा वायू. ॰वाला- वि. (गो.) अंगांत घालण्याचा; आंगाचें. ॰विकार-विकृति- पु. स्त्री. शारीरिक रोग. ॰विक्षेप-पु. हावभाव; अभिनय; चाळा; अंगचेष्टा; हातवारे. [सं.] ॰वृद्धि-स्त्री. शरीराची वाढ (रोगामुळें झालेली-अंतर्गळ, अंडवृद्धि; इ॰). [सं.] ॰वेग- पु. १ शरीराचा वेग; चालण्याचा जोर अंगवात. २ शरीर वाढत असतांना त्याला आंतून मिळणारा जोर. ॰वैकल्प-न. १ शरी- राचा अधूपणा; लुळेपणा; व्यंग. २(ल.) (धार्मिक विधींतील महत्त्वाचा भाग गाळल्यामुळें) येणारी न्यूनता; अपूर्णता; दोष; वैगुण्य. ॰श:-क्रिवि. एकेक भाग घेऊन; भागशः; खंडशः. ॰शैंथिल्य-न. शरीराचा ढिलेपणा; थलथलीतपणा; मांद्य (अंग- दार्ढ्य याच्या उलट). ॰संकोच-पु. १ शरीराचें आकुंचन; अंग चोरणें. 'किं अंगसंकोचें पारधी । टपोनि तत्काळ मृग साधी ।' २ आकुंचनाची स्थिति; आकुंचन; संकुचितपणा. [सं.] ॰संग-पु. १ शरीराचा संयोग, मीलन; अंगस्पर्श. 'दीपाचिया अंगसंगा । कोण सुख आहे पतंगा ।' -एभा ८.७४. 'दुरून बोल, अंगसंग कामाचा नाहीं.' २ संभोग; मैथुन; रतिसुख. 'घडे भक्ति जैसी मनाच्या प्रसंगें । न. साधे तसी माझ्या अंगसंगें ।' ३ हातघाई; अंगलट; लठ्ठालठ्ठी; कुस्ती. [सं.] ॰सफाई-स्त्री. शरीराची अथवा कामाची चपळाई; अंगचापल्य. [सं. अंग + फा. सफाई] ॰सरकती-पु. अंगवांटेकरी पहा. ॰संस्कार- पु. १ अभ्यंगस्नान वगैरे; शरीरावर संस्कार. २ अंगस्पर्श; शरीरसंयोग. [सं.] ॰सामर्थ्य-न. शारीरिक बळ; अंगजोर. [सं.] ॰साळ्या-वि. नाणें पाडण्याचें काम न करतां इतर कामें करणारा सोनार. (टंकसाळ्याच्या विरुद्ध). अकसाळ्या पहा. ॰सिक-न. अंगावरील वस्त्र. 'आंगसिकें वेढुं भणौनि । सर्वज्ञांचीं ।।' -ॠ ७०. 'आंगसीकें दिह्नली उदारें । भणे कवी भास्करू ।।' -शिशु २३२. ॰सुख-न. रतिसुख; संभोगसुख. 'द्यावा निजांगसुख लाभ वधूजनांतें ।' [सं.] ॰सुटका-स्त्री. १ एखाद्या संकटांतून किंवा आडचणींतून कांहीं नुकसान किंवा इजा न होतां सुटणें. २ मुक्तता. 'हेंकाम मी पतकरलें आहे यांतून माझी अंगसुटका झाल्याशिवाय तुम्हांकडे कसा येऊं?' ॰सुस्ती-स्त्री. शरीरमांद्य; जाड्य. ॰सूट-वि. चपळ; हलक्या अंगाचा; सुटसुटीत; मोकळा. ॰सौष्ठव-न. शरीराचा बांधे- सूदपणा; सौंदर्य. [सं.] ॰स्तनें-न. लेंकरूं. -शर? ॰स्वभाव- पु. जन्मजात अथवा उपजत स्वभाव; नैसर्गिक वृत्ति. [सं.] ॰हार-पु. (नृत्य) सहा किंवा सहापेक्षां जास्त करणांचा समु- दाय. हे अंगहार ३२ आहेत:-स्थिरहस्त; पर्यस्तक; सूचीविद्ध; अपविद्ध; आक्षिप्त; उद्धट्टित; विष्कंभ; अपराजित; विष्कंभापसृत; मत्ताक्रीड; स्वस्तिकरेचित; पार्श्वस्वस्तिक; वृश्चिकापसृत; भ्रमर; मत्तस्खलित; मदाद्विलसित; गतिमंडल; परिच्छिन्न; परिवृत्त; वैशाख रेचित; परावृत्त; अलातक; पार्श्वच्छेद; विद्युद्भांत; उद्वृत्तक; आलीढ; रेचित; आच्छुरित; आक्षिप्तरेचित; संभ्रांत; अपसर्प व अर्धनिकुट्टक. ॰हीन-वि. व्यंग; न्यून; अपूर्ण; अवयवरहित (शरीर). 'कां अंगहीन भांडावें । रथाची गति ।।' -ज्ञा १७. ३८९. -पु. मदन. -स्त्री. वेश्या; पण्यांगना. 'अंगहीन पडपे । जियापरी ।' -ज्ञा १७.२५६.

दाते शब्दकोश

बहु

वि. १ पुष्कळ; अतिशय; अनेक. (समासांत) बहुपाद = पुष्कळ पायांचा; बहुभुज = पुष्कळ हातांचा; बहुप्रिय = पुष्कळांस प्रिय; बहु-भक्ष-गुण-तंत्री-पर्ण-पत्र इ॰ २ -क्रिवि. फार; अधिक. 'तैसा कुरुपतिचा मी कीं बहु राज्यार्पणादि यदुपकृती ।' -मोभीष्म १२.५९. [सं.] म्ह॰ बहुरत्ना वसुंधरा. ॰कशास-क्रिवि. फार काय. 'हरी व्यसन पाप हें बहुकशास काया धवा ।' -केक ७४. ॰ऋणी- वि. पुष्कळांचा देणेकरी; बहुत ऋण असलेला. म्ह॰ बहु उवा त्यास खाज नाहीं, बहुऋणी त्यास लाज नाहीं. [सं.] ॰काल-क्रिवि. पुष्कळ वेळपर्यंत; बहुतकाळ. ॰कोण-पु. चोहोंपेक्षां जास्त बाजूंची सरलरेषाकृति. -महमा ७. ॰गुणित-वि. अनेक मिळून एकाप्रमाणें दिसणारा. -ज्योतिःशास्त्राचीं मूलतत्त्वें. ॰गुणी-वि. १ पुष्कळ गुण असणारा; पुष्कळ गोष्टी ज्यास करतां येतात असा; पुष्कळ कामीं किंवा उपयोगी लावतां येण्यासारखा (मनुष्य, वस्तु). २ एक श्लेषात्मक रचना; ठोंब्या; बईल. 'बहुगुणी ईश्वरभजनीं लक्षाचा मनुष्य मोटेयोग्य.' या वाक्यांतील पहिल्या तीन शब्दांतील आद्याक्षरें घेतल्यास बईल असा शब्द बनतो व तो मोटेयोग्य म्हणजे मोट ओढण्यास योग्य ठोंब्या असा श्लेष यांत आहे. [सं.] ॰च्रक-वि. वाचाळ; बडबड्या; चावट. 'बहुचकासीं करूं नये । मैत्री कदां ।' -दा २.२.२५. [सं. बहुवाचक] ॰चकै-स्त्री. भ्रमिष्टपणा; चावटी; बहकलेपणा. 'बहुचकै ज्ञातया । आणिली जेणें ।' -ज्ञा १८.५३९. ॰जिन(न्न)सी-वि. आंत पुष्कळ जिन्नस असणारा; अनेक प्रकारचा. 'दशक अष्टादशक बहुजिन्नसी ।' -दा १८. ॰त्र-क्रिवि. पुष्कळ मार्गांनीं, ठिकाणीं. [सं.] ॰त्व-न. १ पुष्कलता. २ (प्रबंध) रागालापांत एखाद्या स्वर अनेक वेळां घेणें. [सं.] ॰दुधी-वि. पुष्कळ दूध देणारी (गाय, म्हैस). 'अखुड शिंगीं अल्पमोली बहुदुधी अशी (गाय) मिळणें कठिण.' [बहु + दूध] ॰धा-वि. (काव्य) नाना प्रकारचा. 'पाहें मुनिप्रसादें करुनि चम- त्कार उदित बहुधा मीं ।' -मोअनु ७.९७. -क्रिवि. १ पुष्कळ मार्गांनीं, प्रकारांनीं. २ पुष्कळ अंशीं; बहुतकरून; बहुशः; बहुतेक. [सं.] बहुधा नाहीं-क्रिवि. क्वचित्, बहुशः; कधींहि न; फार क्वचित्. बहुधाकार-पु. अव. १ अनेक प्रकारचे आकार. 'ऐसे बहुधाकारी वर्तती । बहुचि होउनी ।' -ज्ञा ९.२५८. २ -न. (ल.) जग. ॰धानक-स्त्री. माया; प्रकृति. 'गुणत्रयरूपी पदार्थभेदाचीं बीजें तींत आहेत म्हणून बहुधानक.' -गीर १५८. ॰धान्य-पु. साठसंव- त्सरांतील बारावा संवत्सर. ॰नायकी-स्त्री. पुष्कळांचें राज्य, सत्ता; बहुराजकी; (ल.) झोटिंगपादशाही; अंदाधुंदी. बारनायकी पहा. ॰पतिकत्व-न. एक पति जिंवत असतां दुसरा किंवा अनेक पति करणें. [सं.] ॰पत्नीकत्व-न. लग्नाची बायको जिवंत असतां दुसर्‍या एक किंवा अनेक स्त्रियांशीं लग्न करणें. [सं.] ॰पाद-पादी प्राणी- पु. अनेक पाय असणारा प्राणी. या वर्गांतील प्राण्यांच्या पायाला अणीदार टोंक असतें व पुढील दोन पायांच्या पंजांत विषाच्या गाठी असतात. गोचीड, घोण हे या वर्गांत येतात. [सं.] ॰प्रजा- वि. पुष्कळ संतति, मुलेंबाळें, परिवार असलेला. [सं.] ॰प्रद- वि. उदार; सढळ हाताचा. [सं.] ॰बीज-वि. पुष्कळ बियांचा. [सं.] ॰बोलका-वि. वाचाट; बडबड्या. ॰भाग्य-(राज्य, कुटुंब इ॰ना कारण असें) पुष्कळांचें दैव. [सं.] ॰भाष(स)-भाषी- वि. १ बहुबोलका. २ पुष्कळ भाषा जाणणारा; दुभाषी. [सं.] ॰मत-न. साधारणतः अधिक लोकसंख्येचें मत; अर्ध्यापेक्षां अधिक मतें. -वि. पुष्कळांस मान्य. 'भीष्म म्हणे बा ! बहुमत साधुचि, न तसे सदा असु ज्ञात्या ।' -मोभीष्म १.८१. [सं.] ॰मान-पु. आदर; मान; सन्माननीय आगतस्वागत. [सं.] ॰मूत्रता-स्त्री. मेहाचा एक प्रकार; बहुमूत्ररोग. [सं.] ॰मूत्रमेह-रोग-पु. बेसुमार मूत्रस्त्राव होणारा रोग; मधुमेह. यांत कृशत्व, घाम येणें, तोंडास दुर्गंधि, जीभ, डोळे व कान यांस ओलसरपणा, खोकला, अरुचि, कोरड, दाह, थकवा इ॰विकार असून लघवी पिवळी होते. [सं.] ॰मूल्य-मोली-वि. मौल्यवान; उंची. म्ह॰ बहुमोली अल्प- संतोषी. ॰युक्पद-वि. (गणित) पुष्कळ पदांचा. [सं.] ॰ये-वि. बहुत. 'तेथ परिवारु बहुये । अघडता कीं ।' -अमृ ९.३८. [सं. बहु] ॰रंगी-वि. १ नानारंगी; चित्रविचित्र. २ बहुगुणी; हरहुन्नरी. ३ प्रसंगानुवर्ती; वेळ पडेल तसें वागणारा. [सं.] ॰रत्नावसुं- धरा-नानारत्नासुंधरा पहा. [सं.] ॰राशिक-न. (गणित) न. एखाद्या परिमाणाचें दोन किंवा अधिक परिमाणांशीं असणारें प्रमाण. [सं.] ॰रूप-न. १ नाट्य; अभिनय; सोंगें घेणें; विडं- बन इ॰. २ जगदाकार; विश्व. 'जो भेटतखेंव सरे । बहुरूप हें ।' -अमृ २.९. -वि. अनेक प्रकारचा, रूपांचा; नानाविध. [सं.] ॰रूपत्व-न. (रसा.) अनेकाकारत्व. इं. ऑल्ट्रोइझम, आल्ट्रोपी यास प्रतिशब्द. ॰रूपी-पु. नाचणारे, सोंगें आणणारे, नकल्ये इ॰ लोकांच्या वर्गांतील एक व्यक्ति; नाना प्रकारचीं सोंगें घेऊन उप- जीविका करणारा. 'कळावंत बहुरूपी ।' -दावि ४७४. ॰वचन- न. (व्या.) अनेकवचन; अनेकत्वद्योतक वचन. [सं.] ॰वचनान्त- वि. शेवटीं बहुवचनी प्रत्यय असलेला (शब्द, क्रियापद). [सं.] ॰वस-स्त्री. १ वेश्या; कसबीण. २ गवगवा; बोभाटा; गाजा- वाजा. (क्रि॰ करणें). -वि. १ वाचाळ. २ (काव्य.) मोठा; बहुत; पुष्कळ; फार; नानाविध; विस्तृत. 'तैसा बहुवस संसार ।' -एभा २२.४६०. -क्रिवि. १ पुष्कळअंशीं. 'म्हणे हें आवडे बहुवस ।' २ (प्रायः बहवस) बेबंद; स्वैर इ॰. ३ सर्वज्ञ. -मनको. ॰वसपण-न. १ सर्वज्ञता. 'आपुलेनि बहुवसपणें । श्रीकृष्ण म्हणे ।' -ज्ञा ६.१०७. २ सर्वत्र राहण्याचा धर्म; व्यापकता. 'कीं वायूचिया बहुवसपणें । अभ्रीं दिंगत लक्षिजे येक क्षणें ।' -स्वादि १०.२.३५. ॰वार-वाडें-क्रिवि. पुष्कळदां; अनेकवेळ; अनेक- प्रसंगीं. 'प्रियाकुचतटीं जिहीं न बहुवार पत्रावळी ।' -केका ७. [सं.] ॰विध-वि. पुष्कळ प्रकारचा; नानाविध. [सं.] ॰वें- क्रिवि. फार; पुष्कळ. 'तया ठासी बहुवें पाडें । मागांचि तूं ।' -ज्ञा १७.१२. [प्रा.] ॰व्रीहि-पु. (व्या) एक समास. यांत कोणतेंहि पद प्रधान नसून सबंध सामासिक शब्द त्याहून निराळ्या अशा नामाचें विशेषण असतो. उदा॰ चतुर्भुज; शशिशेखर इ॰. [सं.] ॰शः-शा-क्रिवि. पुष्कळअंशीं; बहुतकरून; बहुधा. 'बहुशा छेदिता जो दशकंठ ।' -दावि १७४. [सं.] ॰श्रुत- वि. ज्यानें पुष्कळ ऐकिलें आहे असा; पुष्कळ गोष्टीचें थोडथोडें ज्ञान असलेला; सामान्य माहिती असलेला. [सं.] ॰सम्मत- न. सामान्य मत, अभिप्राय. (क्रि॰ पडणें; होणें; असणें; घेणें). ॰साल-ळ-क्रिवि. १ (काव्य) पुष्कळ. 'बहुसाल मारिले भुरके ।' -मोउद्योग ७.७७. २ नित्य; नेहमीं; सदोदित; वारंवार. ३ पुष्कळ वर्षेंपर्यंत; लांब अवधिपावेतों. ॰सालपण-न. नाना- प्रकार. 'गुरु ऐसें जें म्हणणें । तेंही आहे बहुसालपणें ।' -एभा ३.२७५. ॰सुखवाद-पु. (तत्त्वज्ञान) आधिभौतिक सुखवादांतील एक श्रेष्ठ पंथ; जनहितवाद; पुष्कळांचें पुष्कळ सुख अगर हित जेणें करून होईल ते करणें अशा प्रकारचें नीतितत्व. 'बेथाम, भिल्ल वगैरे पंडित 'बहुसुखवाद' पंथाचे पुरस्कर्ते आहेत.' -ज्ञाको (ब) ६७. [सं.] ॰क्षम-वि. अतिशय सोशीक; धीराचा. [सं.] ॰ज्ञ- वि. पुष्कळ जाणणारा. [सं.]

दाते शब्दकोश

पर

न. १ ब्रह्म; परमेश्वर. 'पर सुखाची उर्मी ।' -ऋ १. २ वस्तु (ब्रह्म). 'आतां अर्जुना आणिक कांहीं एक । सांगेन मी आइक । जे विचारें पर लोक । वोळखिती ।' -ज्ञा २.१२५. ३ -पु. शत्रु; अरि. 'कुरु कटकाला बहु भय देती गर्जुनि सिंहसे पर ते ।' -मोभीष्म ५.६२. [सं.] -वि. १ आत्मीय नव्हे असा; परका; परकीय; विदेशी. (समासांत) परचक्र-देश-मुलुख इ॰ २ दुसरा; इतर; भिन्न; निराळा; वेगळा. 'आप आणि पर नाहीं दोन्ही ।' -तुगा २११७. 'कपटादरें वळो पर, परि परमेश्वर कसा वळेल हरी ।' -मोउद्योग ७.१०. ३ संबंध असलेला; अनुसरणारा; (एखाद्यास) वाहिलेला; आधिन; जोडलेला. 'ज्ञानपर शास्त्र तुम्ही कर्मपर लावूं म्हणतां तर लागणार नाहीं.' 'लोकनिंदापर भाषण करूं नयें.' ४ अद्भुत; असाधारण; अपूर्व. ५ श्रेष्ठ; उच्च; थोर. 'जो पतीहून पर ।' -रास १.२६७. ६ नंतरचा. -क्रिवि. पलीकडे. 'ईश्वर स्वरूप मायेचे पर आहे.' ज्याच्या पूर्वपदीं हा शब्द येतो असे अनेक तद्धित व सामासिक शब्द आहेत. त्यांतील कांहीं पुढें दिले आहेत. परका-खा-वि. १ दुसरा; बाहेरचा; परकीय; अनो- ळखी (माणूस). २ नवीन; निराळी; वेगळी (वस्तु) [सं. परकीय] परकाई-खाई-स्त्री. १ परकेपणा (माणसाचा). २ नवलाई; नावीन्य (वस्तूचें). [परका] ॰कामिनी-स्त्री. दुसऱ्याची बायको; परदारा; परस्त्री. 'मन हें ओढाळ गुरूं परधन परकामिनीकडे धावें ।' -मोरोपंत (कीर्तन १.२४.) ॰काय(या)प्रवेश-पु. मंत्रादि सिद्धीनें आपला देह सोडून एखाद्या प्रेतांत किंवा दुसऱ्याच्या देहांत शिरणें; ती विद्या. परकी, परकीय-वि. १ परका पहा. अनोळखी; नवीन (माणूस). २ दुसऱ्यासंबंधीं; दुसऱ्याचा. परकीया-स्त्री. दुसऱ्याची बायको (प्रेमविषयक तीन वस्तूंपैकीं एक). ॰कोट-पु. एक तटाच्या बाहेरचा दुसरा तट; पडकोट. ॰क्रांति-स्त्री. (ज्यो.) क्रांतिवृत्ताचा वांकडेपणा. ॰गति-स्त्री. स्वर्ग. 'परगति पावों पाहसि, पर पदरीं फार पाहिजे शुचिता ।' -मोआदि २४.५६. ॰गमन-न. स्वस्त्री किंवा पति सोडून दुसऱ्याशीं व्यभिचार करणें; व्यभिचार. ॰गृह-घर-न. १ दुसऱ्याचें घर. २ दुस- ऱ्याच्या घराचा आश्रय घेणें. 'तो फार गर्भश्रीमंत आहे, त्याला परगृह माहीत नाहीं.' ३ व्यभिचार; परगमन पहा. ॰घर निवारण-न. इतःपर दुसऱ्याच्या मदतीची आवश्यकता न पडेल अशी स्थिति (देणगी). ॰गोत्री-वि. निराळ्या गोत्राचा. 'श्राद्धास परगोत्री ब्राह्मण बोलवावे.' ॰चक्र-१ स्वारी करणारें सैन्य. २ शत्रूची स्वारी, हल्ला, चढाई. 'परचक्र कोठें हरिदासांच्या वासे । न देखिजे तद्देशे राहातिया ।' -तुगा ६४६. ३ परकीय अंमल, ताबा. ॰छंद-वि. दुसऱ्याच्या स्वाधीन, ताब्यांत अस- लेला; दुसऱ्याच्या तंत्रानें मर्जीनें चालणारा; पराधीन. ॰तंत्र- वि. १ दुसऱ्याच्या स्वाधीन, ताब्यांत असलेला; दुसऱ्याच्या तंत्रानें चालणारा. २ (ल.) शरीर. 'हा लोकु कर्में बांधिला । जो पर तंत्रा भूतला । तो नित्ययज्ञातें चुकला । म्हणोनियां ।' -ज्ञा ३.८४. ॰तत्त्व-न. परब्रह्म. 'तैसी प्रकृति हे आड होती । ते देवेंचि सारोनि परौती । मग परत्व मझिये मती । शेजार केलें ।' -ज्ञा ११.७६. ॰तीर-न. (नदी इ॰च्या) पलीकडचा, दुसरा कांठ, तीर. ॰त्र-न. १ परलोक; याच्या उलट अरत्र. 'म्हणोनि देवो गोसावी । तो धर्माधर्मु भोगवी । आणि परत्राच्या गांवी । करी ते भोगी ।' -ज्ञा १६; ३०६; -दा २.४.१९. २ (महानु.) परमे- श्वर पद; परमार्थ. 'कव्हणी परत्र पाहौनि न बोले । निःप्रपंचु ।' -ऋ ४४. -क्रिवि. नाहींतर; अन्यथा; अन्यत्र. ॰त्रगति-स्त्री. दुसरी स्थिति; परलोक; स्वर्ग. (क्रि॰ साधणें; होणें; मिळणें). ॰त्र साधन-न. परलोक किंवा स्वर्ग मिळविणें. ॰त्व-न. १ दूरपणा; पलीकडे असणें. २ परकेपणा; दुजा भाव. ३ दुसरेपणा. 'म्हणोनि परत्वें ब्रह्म असें । तें आत्मत्वें परियवसे । सच्छब्द या रिणादोषें । ठेविला देवें ।' -ज्ञा १७.३७७. ॰थडी-परतीर पहा. 'त्यासि भवार्णवपरथडी । तत्काळ रोकडी मी पाववीं ।' -एभा १७.४४०. 'क्रमावी पावोनि परथडी ।' -सिसं ८.२७२. ॰थळ्या-वि. परस्थ. 'पंच ब्राह्मण वगैरेस विडे देऊन नंतर परथळ्या कोणीं असल्यास त्यास विडा देतात.' -बदलापूर ३७. [पर + स्थल] ॰दरबार-न. पेशव्यांच्या बरोबरीच्या राजांस किंवा त्यांच्या वकीलांस वगैरे पेशव्यांकडून दिलेल्या नेमणुका, जवाहीर, कापड वगैरे नोंदण्याचें हिशेबाचें सदर. ॰दार-पु. दुसऱ्याची बायको. [सं. परदारा] ॰दार-न. परद्वार; व्यभिचार परद्वार पहा. ॰दारगामी-वि. परदारा भोगणारा; व्यभिचारी. ॰दारा-स्त्री. दुसऱ्याची बायको; परदार. 'परदारादिक पडे । परी विरुद्ध ऐसें नावडे । मग शेळियेचेनि तोंडें । सैंघ चारी ।' -ज्ञा १४.२२९. 'परदारा परधन । आम्हां विषसमान ।' ॰दुःखेन दुःखित-वि. दुसऱ्याच्या दुःखाने दुःखित होणारा. 'परदुःखेन दुःखिता विरला.' ॰देश-पु. १ स्वदेशाहून भिन्न देश; परकीय देश. २ दुसऱ्या देशांत केलेला प्रवास. ॰देशी-पु. १ परका; दुसऱ्या देशांतील माणूस; स्वदेश सोडून परदेशांत आलेला मनुष्य इ॰ २ उत्तरहिंदुस्थानी माणूस; पुरभय्या. -वि. परका. दुसऱ्या देशांतील (माल) ॰द्वार-न. १ परदारागमन पहा. स्वस्त्रीखेरीज अन्य स्त्रीशीं (वेश्या सोडून) गमन करणें; व्यभि- चार. 'वालभे परद्वार केलें । कोढी कोणी होय ।' -ज्ञा १६.३०५. २ पतीखेरीज अन्य पुरुषाशीं कुलीन स्त्रीनें केलेलें गमन; जारकर्म. (क्रि॰ करणें) 'घरस्वामि सोडुनी नारि ज्या परद्वार करिती ।' -होला १६६. ॰द्वारी-वि. व्यभिचारी; जारकर्म कराणारी (स्त्री, पुरुष). 'मैद भोंदु परद्वारी । भुरटेकरी चेटकी ।' -दा २.३.३१. ॰धन-न. १ दुसऱ्याचा पैसा. 'परदारा परधन । आम्हां विषस- मान ।' २ (ल.) मुलगी. कारण लग्न झाल्यावर ती परक्याची होते. ॰धारजिणा-वि. (निंदार्थी) दुसऱ्याच्या उपयोगीं पडणारा; दुसऱ्याला फायदेशीर, उपकारक (स्त्री, मुलगा, नोकर). ॰नार-नारी-स्त्री. दुसऱ्याची बायको. 'परधन परनारी । आम्हां विषाचिया परी ।' 'परनार विषाची धार घात करि जीवा ।' ॰न्यास-वि. वाटेल त्यास शिव्या इ॰ देण्यास लावणारा. (एक वातविकार). ॰पाकरुचि-वि. नेहमीं दुसऱ्याच्या घरीं जेवणारा; परान्नभोजी. [पर + पाक + रुचि] ॰पांडित्य-न. (निंदार्थी) (स्वतः त्याप्रमाणें न वागतां) दुसऱ्याला उपदेश करणें. ॰पार-पु. १ पलीकडचा कांठ-किनारा; परतीर. 'तेथ भक्त संत सज्ञान नर । स्वयें पावविशी परपार ।' -एभा २०.५. २ (भवाच्या पलीकडचा तीर) मोक्ष. 'जेणें पाविजे परपार । तिये नावं यात्रा पवित्र ।' -एभा २१.५८. ॰पीडा-स्त्री. १ दुसऱ्याला त्रास, दुःख देणें. 'परपीडेसारखें पाप नाहीं.' (क्रि॰ करणें; देणें). २ दुसऱ्याचें दुःख. ॰पुरुष-पु. १ परका माणूस. २ (बायकी) नवरी, भाऊ, इ॰ जवळचे आप्त सोडून इतर माणूस. ३ ईश्वर; परमेश्वर. ॰पूर्व स्त्री-स्त्री. स्वैरिणी. व्यभिचारिणी स्त्री. ॰पेठ-स्त्री. १ दुसरें गांव. २ हुंडीची तिसरी प्रत; एक हुंडी गहाळ झाली असतां दुसरी देतात तिला पेठ म्हणतात व तीहि गहाळ झाली तर जी तिसरी देतात ती. ॰बुद्धि-स्त्री. दुसऱ्याची बुद्धि, अक्कल. -वि. दुसऱ्याच्या बुद्धीनें, तंत्रानें चालणारा. ॰भाग्योपजीवी-वि. दुसऱ्याच्या नशीबावर जगणारा; आश्रित; पोष्य; पराधीन. ॰मार-पु. दुसऱ्याच्या नाश. 'प्रतिष्ठीन परमारु । यागवरी ।' -ज्ञा १६.३६०. ॰मार्ग-पु. १ परमेश्वराचा मार्ग; परमार्थ. 'जेथ कैवल्य वस्तु सांटवे । परमार्गु वाहाति सदैवें । जेआंलागिं ।' -ऋ १००. २ महानुभाव धर्म. 'तो नमस्करूं परमार्गु । दातारांचा ।' -ऋ ६. ॰मुलूख-पु. परदेश. ॰रत-वि. व्यभिचारी (स्त्री, पुरुष). ॰राज्य-न. १ दुसऱ्यांचें, परक्या लोकांचें राज्य; परकीय सरकार. २ परकीय लोकांचा अंमल, ताबा. याच्या उलट स्वराज्य. ॰रूपसंधि-पु. (व्या.) दोन्ही स्वरांच्या जागीं पुढला स्वर मात्र होतो असा संधि. ॰लक्ष्मी नारायण-वि. उसन्या, दान मिळालेल्या संपत्तीवर डौल मिरवणारा. ॰लोक-पु. १ मृत्यू- नंतर प्राप्त होणारा लोक, ठिकाण (स्वर्ग, नरक, इ॰); मृत्यूनंतरची स्थिति. २ (व्यापक) अक्षय सुखकल्याणाच्या जागा प्रत्येकीं (कैलास, वैकुंठ. इ॰) ॰लोकवासी होणें-मरणें; मृत्यु पावणें. ॰वधू-स्त्री. दुसऱ्याची भार्या; परदारा. ॰वश-वि. दुसऱ्याच्या ताब्यांत असणारा; पराधीन; परतंत्र. ॰वशता-स्त्री. पारतंत्र्य; पराधीनता. 'फारचि बरी निरयगति, परवशता शतगुणें करी जाच ।' -मोविराट १.५६. ॰वस्तु-स्त्री. १ उत्कृष्ट वस्तु; श्रेष्ठ वस्तु. 'विद्येसारखी परवस्तु नाहीं.' -न. परब्रह्म. [सं.] ॰शय्या- स्त्री. व्यभिचार; परपुरुषाशीं त्याच्याच घरीं संग करणें. ॰शास्त्र- न. (महानु.) श्रेष्ठ शास्त्र; ब्रह्मविद्या; अध्यात्म. 'आक्षेप परिहारीं निर्धारू । करितां परशास्त्र विचारू ।' -ऋ २३. ॰स्त-स्थ-वि. १ परक्या गावांत किंवा देशांत रहाणारा; परगांवचा. २ (ल.) तटस्थ; तिऱ्हाईत; निःपक्षपाती. ॰स्त्री-स्त्री. आपल्या स्त्रियेवांचून इतर स्त्री; दुसऱ्याची बायको. 'नका लाऊं जिवलगा प्रीत तुम्ही परस्त्रीचे ठाई ।' -होला १०८. ॰स्थळ-न. दुसरी जागा, स्थळ. (ज्याच्या विरुद्ध निकाल झाला तो दुसरी कडील निका- लाची खटपट करतांना वापरतो). ॰स्व-न. दुसऱ्याची मालमत्ता, धन. ''नातरी परस्वापहारें । जें सुख अवतरे ।' -ज्ञा १८.८०७. ॰स्वाधीन-वि. परतंत्र; परवश. म्ह॰ परस्वाधीन जिणें व पुस्तकी विद्या उपयोगी नाहीं. ॰हस्तगत-वि. दुसऱ्याच्या हातांत गेलेलें.

दाते शब्दकोश

सर्व

वि. १. सगळा; सगळे भाग मिळून; सारी रास, संख्या, प्रमाण. २ प्रत्येकजण मिळून; सगळा गट; जमाव; समूह. ३ सगळा काल, अवधि, विस्तार वगैरे. ४ पूर्ण; संपूर्ण; अवघा; पुरता; परिपूर्ण; सबंध; न वगळतां पूर्णांश. [सं. सर्; प्रा. सब्ब; सिं. सभु; पं. सभ; हि. सब. सं. षर्द् = जाणे] ॰कर्ता-वि. सगळें करणारा; उत्पत्तिकर्ता; सगळें बनविणारा; अवघ्याची रचना करणारा. ॰काल-क्रिवि. १ सगळा वेळभर; सर्व अवधि संपेपर्यंत; सर्व वेळीं; विवक्षित सगळा कालभर. २ सतत; नेहमीं; सर्वदा; सदोदित. ॰कालीन-वि. शाश्वत; सर्वकाल टिकणारें. ॰खपी-वि. १ ज्याच्या ठिकाणीं कोणत्याहि वस्तूचा उपयोगी अथवा निरुपयोगी, अवश्य अथवा अनवश्यक अशा सर्व वस्तूंचा खप होतो असा. २ ज्याला कोणतीहि, कसलीहि वस्तु चालते असा. ३ सर्वांकरितां खपणारा, काम करणारा; कोणा- साठींहि परिश्रम करण्यास तयार असा. ॰गत-वि. सर्वव्यापक; सर्वव्यापी; सर्व ठिकाणीं ज्याचें अस्तित्व, वास्तव्य आहे असा. 'चैतन्य आहे सर्वगत । तें तत्त्वज्ञ संत । स्वीकारिती ।' -ज्ञा २. १२६. ॰गामी-वि. सर्वव्यापक; सर्वत्र ज्याचें गमन आहे असा; सगळीकडे जाणारा. ॰गुणसंपन्न-वि. सगळ्या गुणांनीं युक्त; सर्व तऱ्हेनें पूर्ण; सर्व चांगल्या गुणांचें अधिष्ठान. ॰जनीन-वि. सार्वजनिक; सर्व लोकांसंबंधी. ॰जाण-वि. सर्वज्ञ; सगळें ज्ञान असणारा; सर्व जाणणारा. 'काय पूजातें मी नेणें । जाणावें जी सर्व जाणें ।' -तुगा ११५८. ॰जित् वि. १ सर्व जिंकणारा; सर्वांचें दमन करणारा; सर्वांस ताब्यांत ठेवाणारा. २ सर्वांहून श्रेष्ठ; वरिष्ठ. ॰त:-क्रिवि. १ सर्व दिशांनीं; सगळीकडे; सर्व बाजूंनीं; दशदिशां. २ सर्वत्र; पूर्णपणें; विश्वभर. ॰तंत्रस्वतंत्र-वि. अनिर्बंध; स्वैर. 'अशा अघांत्री व सर्व- तंत्रस्वतंत्र लोकांनीं हिंदु महासभेच्या निर्णयाकडे पाहून नाकें मुरडावीं यांत आश्चर्य नाहीं.' -सांस २.१६४. ॰तीर्थ-पु. समुद्र; सागर. 'गंगा न सांडितां जैसा । सर्वतार्थ सहवासा । वरपडा जाला ।' -ज्ञा १८.९०९. ॰तोभद्र-पुन. १ देवता स्थापनेसाठीं एक विशिष्ट मंडल काढतात तें. २ चारी दिशांस द्वारें असलेला प्रासाद, राजवाडा, मंदिर. 'रेखिलीं परिकरें । सपुरें सर्वतो- भद्रें ।'-ऋ ७३. ३ सैन्यरचनेचा एक प्रकार; एक विशिष्ट व्यूह. ४ अनेक प्रश्नांस एकच उत्तर योग्य असतें असें कोंडें, कूट. ५ एक प्रकारचें चित्रकाव्य; कोणत्याहि दिशेनें वाचलें तरी एकच प्रकारचा श्लोक व अर्थ येईल अशी रचना. ॰तोमुखपु. एक सोम- याग, यज्ञ. -वि. सर्व बाजूंनीं तोंड असलेला; कोणत्याहि वाजूनें पाहिलें तरी समोर तोंड येईल असा (देवता, पाणी, आकाश, गोल). ॰त्र-क्रिवि. सर्व ठिकाणीं, स्थळीं, जागीं; सगळीकडे; सर्व दिशांस. 'ईश्वर सर्वत्र आहे.' -वि प्रत्येक; सगळे; सर्व. 'सर्वत्रांस दक्षिणा दिली.' ॰था-क्रिवि. सर्व बाजूंनीं; सर्व मार्गांनीं, दिशांनीं; सर्व उपायांनीं; पूर्णपणें; मुळींच; नि:शेष; निश्चित; खचित; केव्हांहि. 'मज आपणपें सर्वथा नाहीं । मन बुद्धिठायीं । स्थिर नोहे ।' -ज्ञा १.१९५. 'मना सर्वथा पापबुद्धि नको रे ।' -राम ॰थैव-क्रिवि. केव्हांहि; सर्व प्रकारें, दिशांनीं, बाजूंनीं. ॰दर्शी-द्रष्टा-वि. सर्वसाक्षी; सर्व पाहणारा; ज्यास सगळें दिसतें असा. ॰दा-क्रिवि. नेहमीं; सतत; सर्वकाळीं. ॰दु:खक्षय-पु. सर्व दु:खांपासून मुत्त्कता; मोक्ष. ॰धन-न. (गणित) श्रेढींतील सर्व पदांची बेरीज. -छअं १७३. ॰नाम-न. (व्या.) स्वत: विशिष्टार्थद्योतक नसतां पूर्वापरसंबंधानें कोणत्याहि नामाबद्दल योजतां येतो असा शव्द. ॰नियंता-वि. सर्वांवर ताबा चालविणारा; सर्वांचें नियमन करणारा. ॰न्यास-पु. सर्वसंगपरित्याग; सर्वधन, कुटुंब, आप्तेष्ट, संसार वगैरे सर्व गोष्टी सोडून देणें; सर्व ऐहिक गोष्टी टाकून देणें, त्यांपासून अलिप्तता, मुक्तता. ॰पाक-पु. खीर; क्षीर. ॰पित्री अमावास्या-स्त्री. भाद्रपद महिन्यांतील अमावास्या (या दिवशीं सर्व पितरांचें श्राद्ध करितात यावरून). ॰प्रायश्चित-न. सर्व पातकांबद्दल एकाच वेळीं घ्यावयाचें प्रायश्चित्त; सर्व पापांचें परिमार्जन, क्षालन; सर्व दोषां- पासून मुत्त्कता. 'सर्वप्रायश्चित्त घेण्याचा त्यांनीं जो निश्चय केला ...' -आगर ३.१३५. ॰प्रिय-वि. सर्वांचा आवडता; लोकप्रिय; विश्वमित्र. ॰ब्रह्मी-वि. सर्व विश्व ब्रह्मरूप आहे जसें केवळ तोंडानें बोलून एकंकार करणारा आचारभ्रष्ट. 'लेकुरें सर्व ब्रह्मी झालीं.' -सप्र १९.४०. ॰भक्ष-भक्षक-भोत्त्का- वि. वाटेल तें खाणारा; खाण्याच्या कामीं कोणताहि निर्बंध न पाळणारा; स्वच्छ अस्वच्छ, भक्ष्य, अभक्ष्य न पहातां अघोरी- पणें खाणारा. अग्नि, शेळी, कावळा वगैरेसहि हा शव्द लावतात. ॰भांवें-क्रिवि. काया-वाचा-मनें करून; सर्व भावयुक्त. 'तैसा स्त्रीदेहीं जो जीवें । पडोनिया सर्वभावें ।' -ज्ञा १३.७९०. 'जगीं वंद्य तें सर्वभावें करावें' -राम ॰भूतभूतांतर-वि. सर्व वस्तूंच्या ठिकाणीं वास करणारा; सर्वव्यापी; विश्वव्यापीं; विश्वव्यापक (ईश्वर). ॰मय-वि. सर्वव्यापी; सर्वगत (ईश्वर). ॰मान्य-वि. सर्वांस संमत, पसंत, कबूल. ॰मान्य-मान्य इनाम-न. सर्व कर माफ असलेलें इनाम; सर्वांना कबूल असें इनाम; गांवसंवंधीं इनाम; याबद्दल सनद नसते. ॰राष्ट्रीय कायदा-पु. राष्ट्रांराष्ट्रांतील व्यवहार नियंत्रण करणारा नियम. ॰रूप-रूपी-वि. सर्वव्यापी; सर्वांचें स्वरूप आहे असा; विश्वरूपी (ईश्वर) 'अनादि अविकृतु । सर्वरूप ।' -ज्ञा २.१५०. ॰लिंगी- पु. कोणताहि विशिष्ट पंथ न अनुसरणारा बैरागी. ॰वल्लभा-स्त्री. वेश्या; वारांगना. ॰विध-क्रिवि. सर्वप्रकारें. ॰वेत्ता-वेदी-वि. सर्वज्ञ; सर्वसाक्षी; त्रिकालज्ञ. ॰वेषी-वि. बहुरूपी; अनेक प्रका- रचे वेष धारण करणारा. ॰व्यापक-व्यापी-वि. सर्वत्र असणारा; विश्वव्यापी; सर्वत्र भासणारा. ॰व्रणपु. गळूं; करट. ॰श:-क्रिवि. सर्व दिशांनीं, बाजूंनीं, मार्गांनीं, रीतीनीं; पूर्णपणें; निखालस; दरोबस्त; नि:शेष. ॰शाक-ख-स्त्री. १ अनेक प्रकारच्या भाज्या एकत्र करून केलेली भाजी. २ आलें. ॰शास्ता-वि. सर्वांवर सत्ता, अधिकार गाजविणारा. ॰शोधी-वि. सर्वोचें निरी क्षण करणारा; सर्व वस्तूंची परीक्षा घेणारा; जिज्ञासु; चिकित्सक; परीक्षक; शोधक. ॰संगपरित्याग-पु. सर्वसंन्यास; सर्व ऐहिक वस्तूंचा त्याग; पूर्ण वैराग्य, विरक्ति. ॰संग्रह-पु. सर्व वस्तूंचा साठा, संचय; संकीर्ण, मिश्र संचय. ॰सपाट-क्रिवि. अभेद; सर्वत्र सम स्थिति; मोकळें. 'आत्मा नसतां सर्व सपाट चहूंकडे ।' -दा १६.८.१०. ॰संमत-वि. सर्व मान्य; सर्वांस पसंत, कबूल असलेलें. ॰समर्थ-वि. सर्वशक्तिमान; सर्वसत्ताधारी; सर्वा- धिकारी. ॰सह-वि. सर्व सहन करणारा; सर्व गोष्टींचा भार वाहणारा. ॰सहवर्तमान-वि. सर्वांसह; सर्वांस बरोबर घेतलेला; सर्वांनी युक्त. ॰साधन-न. सर्व गोष्टींची सिद्धता; सर्व गोष्टी घडवून आणणें; सर्व कार्यें साधणें, करणें, बनाव बनविणें. ॰साधन- साधनी-वि. सर्व गोष्टी साधणारा, सिद्ध करणारा, घडवून आणणारा. ॰साधारण-सामान्य-वि. सर्वांस लागू होणारा; सर्वांस सम असा; सर्वांचा समावेश करणारा. 'मला नाहीं तुमचे सर्वसामान्य सिद्धांत समजत.' -सुदे ३७. ॰साक्षी- वि. सर्व पाहणारा; सर्व भूतांच्या ठायीं असणारा; ज्यास सर्व दिसतें असा (ईश्वर). 'नसेन दिसलों कसा नयन सर्वसाक्षी रवि ।' -केका ४. ॰सिद्ध-वि. सर्व परिपूर्ण; (सर्व गुणादि- कांनीं युक्त; सर्व लक्षणांनीं युक्त; संपूर्ण; सर्वांग परिपूर्ण (ईश्वर). ॰सिद्धि-स्त्री. सर्व इच्छांची पूर्ति; सर्वकाम पूर्ति. ॰सिद्धार्थ- वि. सर्व इच्छापूर्ति झालेला; सर्व हेतु साध्य झालेला. ॰सुखा- नंद-वि. सर्व सुख व आनंद प्राप्त झालेला; सुखांचा आनंद ज्याच्या ठिकाणीं आहे असा (ईश्वर). ॰सोंवळा-वि. १ नेहमींचा शुद्ध, सोंवळा, पवित्र. जन्मसोंवळा (एखादा मनुष्य स्नान न करतांच सोंवळें नेसला असतां त्यास उपरोधिकपणें म्हणतात). २ नेहमींच पवित्र, शुद्ध, सोंवळें असलेलें (रेशमी वस्त्र, धाबळी वगैरे) (हीं कधीं न धुतलीं तरी सोंवळीं मानण्यांत येतात यावरून). ॰स्पर्शी-वि व्यापक; सर्वांचा समावेशक. 'एकंदर ठराव सर्वस्पर्शी समाधानका- रक केला.' -केले १.३०९. ॰स्व-न. १ सर्व धन; सर्वसंपत्ति; सर्व मालमत्ता, चीजवस्त वगैरे; स्वत:च्या मालकीचें सर्व. 'सर्वस्व हारवावें की जिकावें न भीरु तूं पण हो.' -मोसभा ६.९५. २ तन, मन, धन; 'तैसें सर्वस्वें कर्म अनुष्ठी । परि फळ न सुखे दिठी ।' -ज्ञा १८.५९० मी सर्वस्वयां तैसें । सुभटांसी ।' -ज्ञा १.१११. ३ तत्त्वांश; सार; ॰स्वदंड-पु. सर्व संपत्ति जप्त करणें; सर्व मालमत्ता खालसा करणें; सर्व हिरावून घेणें. ॰स्वहर-हर्ता-हारक-हारी-पु. सर्व धन हरण करणारा, घेणारा, लुबाडणारा. ॰स्वहरण-हार-नपु. सर्व संपत्तीची लूट; सर्व धन हिरावून घेणें; सर्व नाश. ॰स्वामी-पु. १ सर्व बिश्वाचा प्रभू; सर्व सत्ताधारी, जगत्पति; सार्वभौम. २ सर्वस्वाचा मालक, धनि; सर्व वस्तूंचा धनि. ॰स्वीं-स्वें-क्रिवि. १ तनमनधनेंकरून; सर्व वस्तुमात्रासह. २ पूर्णपणें; पुरतेपणीं; एकंदर; अगदीं; सर्व प्रकारें; निखालस. उदा॰ सर्वस्वीं सोदा, लुच्चा, लबाड, हरामी वगैरे. ॰हर- हर्ता-हारक-हारी-वि. सर्व हरण करणारा; लुबाडणारा. ॰हरण-न. संपूर्ण नागवणूक; नाडणूक. ॰ज्ञ-वि. सर्व जाणणारा; त्रिकालज्ञ; पूर्ण ज्ञानी;सर्वसाक्षी; सर्व वेत्ता. 'तुम्हां सर्वज्ञांच्या समाजीं । देयावें अवधान हे माझी । विनवणी सल- गीची ।'-ज्ञा ९.२ सर्वंकष-वि. सर्वांस कसोटीस लावणारा. सर्वाग-न. १ सर्व शरीर; देह; शरीराचे सर्व अवयव. २ सांग- वेद; षडंगसहित वेद. सर्वांगरोग-वात-पु. पक्षघाताप्रमाणें सर्व शरीरास वातविकार होतो तो. -योर १.७५५. सर्वांगा- सन-न. साफ उताणें निजून हात जमीनीवर टेकणें व त्यांवर जोर घेऊन खांद्यापर्यंतचा भाग व पाय वर उचलून ताठ करून स्थिर होणें. -संयो ३५०. सर्वांगीण-वि. सर्व शरीर व्यापणारा; सर्व अंगांसंबंधीं. सर्वांगें-क्रिवि. एकचित्तानें; एकाग्रतेनें. 'जो सर्वांगें श्रोता ।' -दा ७.१.२८. सर्वांची मेहुणी-स्त्री. १ मुरळी; भावीण. २ वेडसर स्त्री. सर्वांतर- वि. सर्वांच्या अंतकरणांत राहणारा. 'मज सर्वांतरानें कल्पिती । अरि मित्र गा ।' -ज्ञा ९.१६६. सर्वांतोडीं-क्रिवि. सर्वां- मुखीं; प्रत्येकाच्या मुखांत; ज्याच्या त्याच्या तोंडांतून. सर्वा- त्मना-क्रिवि. १ मनोभावें करून; अंत:करणपूर्वक; तनमन- धनें करून. 'धन कामासि निजमुख । सर्वात्मना नाहीं देख ।' -एभा २३.४३५. २ पूर्णपणें; सर्वस्वी; निखालस. 'हा सर्वात्मना लबाड आहे.' ३ मुळींच; अगदीं; केव्हांहि; कोण- त्याहि तऱ्हेनें; साफ (नाहीं-निषेधार्थक शब्दाबरोवर उपयोग). 'मजपासून ही गोष्ट सर्वात्मना घडावयाची नाहीं.' -रा ३. ३०१. सर्वात्मा-पु. सर्व प्राणिमात्राच्या ठिकाणीं असलेला जीवात्मा, चैतन्य, (ईश्वर). सर्वाथाई-क्रिवि. सर्वथा (अप- भ्रंश). 'अशा पुण्यरूपें नृप न सोडी भोग सर्वाथाई ।' -ऐपो ४०९. सर्वाधिकार-पु. पूर्ण सत्ता; सर्वांवर सत्ता, ताबा, वर्चस्व. सर्वाधिकारी-पु. प्रमुख; मुख्य; सर्वासत्ताधीश; (म्हैसूरच्या राजाचा हैदरपूर्वी मुख्य प्रधान). सर्वांधीत- वि. सर्व अध्ययन झालेला; सर्व विषय शिकलेला; निष्णात. -शिदि ११८. सर्वानुभूति-स्त्री. सर्व जगाचा, अनेक प्रका- रचा, अनेक गोष्टींचा अनुभव. सर्वान्नभक्षक-भक्षी-भोजी- वि. १ वाटेल तें खाणारा; सर्व प्रकारचें अन्न ज्यास चालतें असा. २ अधाशी; अधोरी. सर्वाबद्ध-वि. सर्व तऱ्हेनें स्वतंत्र; मोकाट; स्वैर; पूर्ण स्वतंत्र; असंबद्ध; नियमांनीं बद्ध नव्हे असे; विसंगत; (मनुष्य, चाल, वागणूक, कार्य, काव्य, भाषण वगैरे). सर्वांर्थीं-वि. सर्व वस्तूंची इच्छा करणारा; लोभी; महत्त्वाकांक्षी वगैरे. सर्वार्थी, सर्वार्थें-क्रिवि. सर्व प्रकारामें; सर्वस्वी; हरतऱ्हेनें; प्रत्येक दृष्टीनें 'वैश्य व्यव- सायांत जाण । दिसतो निपुण सर्वार्थीं ।' सर्वाभ्य-वि. क्रिवि. सर्व प्रकारें; सर्व तऱ्हेचा; सर्व कामांतील. 'सर्वाभ्य कारभारी.' -चित्र २. सर्वारिष्ट-न. सर्व जगावरील सामान्य संकट; सर्वसामान्य पीडा; अनेक लोकांस बाधक किंवा अनेक प्रका- रचें संकट, पीडा, बाधा. सर्वांशिक, सर्वांशी-वि. सर्व भागांशीं संबंध असलेलें; एकदेशीयाच्या उलट. सर्वांशीं- क्रिवि. पूर्णपणें; सर्व प्रकारें; सर्व तऱ्हेनें. सर्वाशीं संपूर्ण, सर्वावयवीं संपूर्ण-वि. सर्व विभागांनीं, अवयवांनीं युक्त; परिपूर्ण; सबंध. सर्वाशुद्ध-वि. अनेक अशुद्धें असलेला; सर्वं प्रकारें दोषयुक्त; चुक्यांनीं भरलेला (ग्रंथ वगैरे). सर्वीय- वि. सर्वांचा; सर्वाशीं संबंध असलेला; सगळ्यांचा; विश्वाचा; जागतिक. सर्वें-नअव. सगळीं. 'दु:ख भोगिलें आपुलें जीवें । तेथें कैचिं होतीं सर्वें ।' -दा ३.१०.४४. सर्वेश, सर्वे- श्वर-पु. १ परमेश्वर; जगदीश. 'तया स्वधर्मी सर्वेश्वरीं । न भजेल जो ।' -ज्ञा ३.१०४. २ सम्राट; सार्वभौम; सर्वाधीश. सर्वेश्वर(री)वाद-पु. विश्वांत सर्वत्र परमेश्वर भरलेला आहे असें मत. (इं.) पॅन थीइझम्. सर्वै-क्रिवि. सर्वहि; पूर्णपणें; सर्वस्वीं. 'अकस्मात तै राज्य सर्वै बुडालें ।' -राम. सर्वो- त्कर्ष-वि. अत्यंत महत्त्वाचें; सर्वोत्तम. 'सांप्रत हे येश आगाध भ्रीनें आपले पदरीं सर्वोत्कर्ष घातलें.' -पेद ३.१८१. सर्वोत्कृष्टवि. १ अत्युत्तम; सर्वोत्तम; सर्वश्रेष्ठ (ईश्वर). २ सत्य; न्याय्य; रास्त. सर्वोपकार-पु. सर्वांचें कल्याण; सर्वावर केलेले उपकार; जमदुपकार सर्वोपकरी-वि. जगास कल्याणकारक: सर्वांस उपकारक लाभदायक. सर्वोपयोगी- वि. सर्व कार्यांस उपयुक्त; कोणत्याहि कामास उपयोगी. सर्वोपरी-क्रिवि. सर्व प्रकारानीं; सर्व रातीनीं; सर्व पद्धतीनीं; सर्व तऱ्हानीं. [सर्व + परी] 'समर्थ जाणोनि सर्वोपरी ।' -मुआदि ३३. २ सर्वोपरी-वि सर्वश्रेष्ठ; वरिष्ठ; उत्कृष्ट; उत्तम. 'शिखराथिलियां सर्वोपरी । मेरु तो मी ।' ज्ञा १०. २२७. -क्रिवि. श्रेष्ठपणें; वरिष्ठपणें; उत्तम रीतीनें. [सर्व + उपरि] सर्वौषधि-स्त्री. शतावरी; एक वनस्पति. सर्ब्यांस- ला-सनाम द्वि. (अशिष्ट) सर्वांचा. 'तो सर्व्यांला मुजरे करतो ।' -ऐपो ४३१.

दाते शब्दकोश

धर्म

पु. १ धार्मिक विधियुक्त क्रिया, कर्में; परमेश्वरासंबं- धीचें कर्तव्य; ईश्वरोपासना; परमेश्वरप्राप्तीचीं साधनें; परमेश्वरप्रा- प्तीचा मार्ग, पंथ. 'करितो धारण यास्तव धर्म म्हणावें प्रजांसि जो धरितो ।' -मोकर्ण ४१.८१. २ मनुष्यप्राण्यास सदाचरणास लावणारें व परमेश्वरचिंतनाचा मार्ग दाखवून देणारे ख्रिश्चन, यहुदी, हिंदु, इस्लामी वगैरे पंथ. 'मुख्यमुख्य नितितत्त्वांबद्दल सर्व धर्मांची एकवाक्यता आहे. '३ शास्त्रांनीं घालून दिलेले आचार, नियम; पवित्र विधी, कर्तव्यें. पंचपुरुषार्थांपैकीं एक. ४ दान; परोपकारबुद्धीनें जें कोणास कांहीं देणें, किंवा जें कांहीं दिलें जातें तें; दानधर्माचीं कृत्यें; परोपकारबुद्धि. 'अंधळयापांगळ्यांस धर्म करावा. ' 'महाराष्ट्रीयांपेक्षां गुजराथ्यांत धर्म अधिक.' ५ सद्गुण; शास्त्रोक्त वागल्यानें अंगीं येणारा नौतिक. धार्मिक गुण. 'कर्तव्यकर्म, नीति, नीतिधर्म किंवा सदाचरण यांसच धर्म असें म्हणतात. '-गीर ६५. ६ स्वाभाविक गुण; गुणधर्म; नैसर्गिक प्रवृत्ति. 'गाईनें दूध देणें हा गाईचा धर्म आहे.' 'पृथ्वीस वास येणें पृथ्वीचा धर्म. ' ७ कर्तव्यकर्म; रूढी; परंपरेनें, शास्त्रानें घालून दिलेला नियम उदा॰ दान करणें हा गुहस्थ धर्म, न्यायदान हा राजाचा धर्म, सदाचार हा ब्राह्मणधर्म, धैर्य हा क्षत्रिय धर्म. याच अर्थानें पुढील समास येतात. पुत्रधर्म-बंधुधर्म-मित्रधर्म-शेजार- धर्म इ॰ ८ कायदा. ९ यम. 'धर्म म्हणे साध्वि बहु श्रमलीस स्वाश्रमासि जा मागें ।' -मोविराट १३.६५. १० पांडवांतील पहिला. 'कीं धर्में श्वानू सरता । केला सर्वथा स्वर्गलोकीं ।' -एभा १.१०९. ११ धर्माचरणाचें पुण्य. 'ये धर्मचि, पुत्र स्त्री कोष रथ तुरग करी न सांगतें ।' -मोभीष्म ११.२६. १२ (शाप.) गुण- धर्म' स्वाभाविक लक्षण ' दोन किंवा अधिक पदार्थांचें एकमेकां- वर कार्य घडून त्यांपासून जेव्हां असा नवा पदार्थ उप्तन्न होतो कीं त्याचे धर्म मूळ पदार्थांच्या धर्मांपासून अगदीं भिन्न असतात, तेव्हां त्या कार्यास रसायनकार्य असें म्हणतात.' -रसापू १. (वाप्र.) धर्म करतां कर्म उभें राहणें-पाठीस लागणें-दुसर्‍यावर उपकार करावयला जावें तों आपल्यावरच कांहींतरी संकट ओढवणें. धर्मखुंटीस बांधणें- (जनावराला) उपाशीं जखडून टाकणें; ठाणावर बांधून ठेवणें. [धर्मखुंटी]धर्म जागो-उद्गा. (विशिष्ट गोष्टीचा संबंध पुन्हां न घडावा अशाविषयीं) पुण्य उभें राहो. धर्म पंगु-(कलियुगांत धर्म एक पायावर उभा आहे. त्याचें तीन पाय मागील तीन युगांत गेले. यावरून ल.)धर्म अतिशय दुबळा, अनाथ आहे या अर्थी. धर्माआड कुत्रें होणें- दानधर्माच्या आड येणार्‍याला म्हणतात. धर्माचा- १ धर्मासंबंधीं (पैसा, अन्न इ॰). २ मानलेला; उसना; खरा औरस नव्हे असा (पुत्र, पिता. बहीण इ॰). ३ फुकट; मोफत.'धर्माची राहण्याला जागा दिली आहे.' -पारिभौ २७. धर्माची वाट बिघडणें-मोडणें-एखाद्या दानधर्माचा ओघ थांबणें, थांबविणें. धर्माचे पारीं बसणें-१ दुसर्‍याचे पैसे खर्चीत रिकामटेकडें बसणें; धर्मावर काळ कंठणें. २ सद्गुणांचें चांगलें फल मिळणें; सदाचारामुळें चांगलें दिवस येणें. ३ सदोदित दानधर्म करणें. धर्मकृत्ये आचरणें.धर्मावर लोटणें- टाकणें-सोडणें-एखाद्याच्या न्यायबुद्धिवर सोंपविणें.धर्मा- वर सोमवार सोडणें-स्वतः झीज न सोसतां परभारें होईल तें पाहणें. -संम्ह. धर्मास-क्रिवि. (कंटाळल्यावरचा उद्गार) कृपा- करून; मेहेरबानीनें; माझे आई ! याअर्थीं. 'माझे रुपये तूं देऊं नको पण तूं एथून धर्मास जा ! ' 'मी काम करतों, तूं धर्मास नीज.' धर्मास भिऊन चालणें-वागणें-वर्तणें-करणें-धर्माप्रमाणें वागणें. धर्मास येणें-उचित दिसणें; पसंतीस येणें; मान्य होणें. 'मी तुला सांगायचें तें सांगितलें आतां तुझे धर्मास येईल तें कर.' म्ह॰ १ धर्मावर सोमवार = (दानधर्म करणें). कांहीं तरी सबबीबर, लांबणीवर टाकणें. -मोल. २ धर्माचे गायी आणि दांत कांगे नाहीं. ३ आज मरा आणि उद्यां धर्म करा. ४ धर्मादारीं आणि मारामारी. ५ धर्मस्य तत्वं निहितं गुहायाम् = धर्माचें रहस्य गुहेमध्यें ठेवलेलें असतें. (गुढ किंवा अज्ञेय असतें). धर्माचें खरें तत्त्व गहन, अगम्य आहे. ६ धर्मस्य त्वरिता गतिः = धर्मास विलंब लावूं नये या अर्थीं. सामाशब्द- ॰आई-माता-स्त्री. (ख्रि.) कांहीं चर्चेसमध्यें लहान मुलांचा बाप्तिस्मा होतो तेव्हां त्यांस ख्रिस्तीधर्मास अनुसरून वळण व शिक्षण देण्यांत यावें म्हणून त्यांच्या मातेहून भिन्न अशी जी स्त्री आपणावर जबाबदारी घेते ती. (इं.) गॉडमदर. 'प्रत्येक मुलीला एक धर्मबाप व दोन आया पाहिजेत.' -साप्रा ९०. ॰कर्ता-पु. १ धर्म करणारा; परोपकारी माणूस. २ न्यायाधीश; जज्ज. ३ (दक्षिण हिंदुस्थान) देवळाचा व्यवस्थापक, कारभारी. ॰कर्म-न. १ वर्तन; आचार; एखाद्याचीं कृत्यें. कर्मधर्म पहा. 'ज्याचें त्यास धर्मकर्म कामास येईल.' २ शास्त्रविहित कर्में, आचरण; धार्मिक कृत्यें. [सं. धर्म + कर्म] ॰कर्मसंयोग-पु. प्रारब्धयोग; कर्म- धर्मसंयोग पहा. ॰कार्य-कृत्य-न. धार्मिक कृत्य; परोपकाराचें कार्य; (विहीर, धर्मशाळा इ॰ बांधणें, रस्त्यावर झाडें लावणें; देवळें बांधणें; अन्नसत्रें स्थापणें इ॰). २ धार्मिक विधि, व्रत; धर्मसंस्कार. [सं.] ॰कीर्तन-धर्माचें व्याख्यान-प्रवचन-पुराण. 'किंबहुना तुमचें केलें । धर्मकीर्तन हें सिद्धि गेलें ।' -ज्ञा १८. १७९२. [सं.] ॰कुढाव-पु. (महानु.) धर्मरक्षक. 'कीं धर्म- कुढावेनि शाङ्र्गपाणी । महापातकांवरी सांघीतली सांघनी ।' -शिशु ३५. [धर्म + कुढावा = रक्षण] ॰खातें-न. १ धर्मासाठीं जो खर्च करितात त्याचा हिशेब ठेवणारें खातें; धार्मिक खातें. २ धर्मार्थ संस्था; लोकोपयोगी, परोपकारी संस्था. [सं. धर्म + खातें] ॰खूळ-वेड-न. धर्मासंबंधीं फाजील आसक्ति; अडाणी धर्म- भोळेपणा; धर्माबद्दलची अंधश्रद्धा. [म. धर्म + खूळ] ॰गाय- स्त्री. १ धर्मार्थ सोडलेली गाय. धर्मधेनु पहा. २ चांगली, गरीब गाय. 'कढोळाचें संगती पाहे । क्षणभरी गेलिया धर्मगाये ।' -एभा २६.४२. ॰ग्रंथप्रचारक-पु. (ख्रि.) ख्रिस्ती धर्म शास्त्र व तत्संबंधीं इतर पुस्तकें विकणारा, फेरीवाला; (इं.) कल्पो- र्चर. 'सदानंदराव काळोखे यांनीं एक तप धर्मग्रंथप्रचारकाचें काम मोठ्या प्रामाणिकपणें केलें.' [सं. धर्म + ग्रंथ + प्रचारक] धर्मतः- क्रिवि. धर्माच्या, न्यायाच्या दृष्टीनें; न्यायतः; सत्यतः; खरें पाहतां. ॰दान-न. दानधर्म; धर्मादाय. 'एक करिती धर्मदान । तृणास- मान लेखती धन ।' [सं.] ॰दारीं कुत्रें-न. परोपकाराच्या कृत्यास आड येणारा (नोकर, अधिकारी); कोठावळा. ॰दिवा दिवी-पुस्त्री. धर्मार्थ लावलेला दिवा. 'जे मुमुक्षु मार्गीची बोळावी । जे मोहरात्रीची धर्मदिवी ।' -ज्ञा १६.६५. ॰द्वार-न. कौल मागणें; ईश्वराला शरण येणें. [सं.] ॰धेनु-स्त्री. १ धर्मार्थ सोड- लेली गाय. 'ऐसेनि गा आटोपे । थोरिये आणतीं पापें । धर्मधेनु खुरपें । सुटलें जैसें ।' -ज्ञा १६.३२९. २ हरळी; दुर्वा. -मनको [सं.] ॰ध्वज-पु. १ धर्माची पताका; धर्मचिन्ह; धर्माचा डौल, प्रतिष्ठा; (क्रि॰ लावणें; उभारणें; उभविणें; उडणें). २ (ल) धर्माचा फाजील पुरस्कर्ता. [सं. धर्म + ध्वज] ॰ध्वजी-वि. धर्म- निष्ठेचा आव आणणारा ढोंगी-भोंदू माणूस. ॰नाव-स्त्री. येणार्‍या- जाणारानीं तरून जावें म्हणून नावाड्यास वेतन देऊन नदीवर जी धर्मार्थ नाव ठेवलेली असते ती; धर्मतर; मोफत नाव. [धर्म + नांव] ॰निष्पत्ति-स्त्री. कर्तव्य करणें; धर्माची संपादणूक. [सं.] ॰नौका-पु. धर्मनाव पहा. ॰न्याय-पु. वास्तविक न्याय; निःप- क्षपात, धर्माप्रमाणें दिलेला निकाल. 'तुम्ही उभयतांचें वृत्त श्रवण करून धर्म न्याय असेल तो सांगा.' [धर्म + न्याय] ॰पत्नी- स्त्री. १ विवाहित स्त्री. -ज्ञा १८.९४२. २ सशास्त्र (अग्निहोत्रादि) कर्माकरितां योग्य अशी प्रथम विवाहाची (दोन तीन पत्न्या असल्यास) ब्राह्मण स्त्री. [सं.] ॰पंथ-पु. १ धर्माचा, परो- पकाराचा, सदाचरणाचा मार्ग. 'सदां चालिजे धर्मपंथ सर्व कुमति टाकोनि ।' 'धर्मपंथ जेणें मोडिले । त्यास अवश्य दंडावें ।' २ धार्मिक संग, समाज. 'ख्रिस्तीधर्मपंथ.' [सं.] ॰परायण- वि. क्रिवि. १ परोपकारार्थ; धार्मिककृत्य म्हणून; धर्मासाठीं. २ धर्मार्थ; मोफत; (देणें, काम करणें). ३ पक्षपात न करतां; धर्मावर लक्ष ठेवून (करणें; सांगणें; बोलणें इ॰). 'धर्मपरायण बोलणारे पंच असल्यास धर्मन्याय होईल.' ॰परिवर्तन-न. (ख्रि.) धर्ममतें बदलणें; धर्मांतर. (इं.) कॉन्व्हर्शन. 'नारायण वामन टिळक यांचें १८९५ सालीं धर्मपरिवर्तन झालें.' [सं. धर्म + परिवर्तन] ॰पक्षी-पु. धर्मोपदेशक; पाद्री; पुरोहित. 'तो जातीचा धर्मपक्षी होता.' -इंग्लंडची बखर भाग १.२७२. [धर्म + पक्षी = पुरस्कर्ता] ॰पिंड-पु. १ पुत्र नसणार्‍यांना द्यावयाचा पिंड. २ दुर्गतीला गेलेल्या पितरांना द्यावयाचा पिंड. [धर्म + पिंड] ॰पिता-पु. धर्मबाप पहा. ॰पुत्र-पु. १ मानलेला मुलगा. २ उत्तरक्रियेच्या वेळीं पुत्र नसलेल्यांचा श्राद्धविधि करणारा तज्जा- तीय माणूस; धार्मिक कृत्यांत पुत्राप्रमाणें आचरणारा माणूस. 'धर्मपुत्र होऊनि नृपनायक ।' -दावि ४९१. ३ दत्तक मुलगा, इस्टेटीला वारस ठरविलेला. ॰पुरी-स्त्री. १ तपस्वी, विद्वान वगैरे ब्राह्मण ज्या क्षेत्रांत राहतात तें क्षेत्र; धार्मिक स्थल. २ ज्याच्या घरीं पाहुण्यांचा नेहमीं आदर सत्कार केला जातो तें घर; पाहुण्यांची वर्दळ, रहदारी असणारें घर. [सं.] ॰पेटी-स्त्री. धर्मादाय पेटी; धर्मार्थ पैसे टाकण्यासाठीं ठेवलेली पेटी. (देऊळ; सामाधि; धर्मार्थ संस्था वगैरे ठिकाणीं). [सं. धर्म + पेटी] ॰पाई- ॰पोवई-स्त्री. १ प्रवाशांसाठीं, गरिबांसाठीं अन्न पाणी वगैरे फुकट मिळण्याची केलेली व्यवस्था; धर्मार्थ अन्नोदक दान. २ अशी व्यवस्था जेथें केलेली असते तें ठिकाण; अन्नछत्र; धर्मशाळा. ॰प्रतिष्ठा-स्त्री. १ धर्माचा गौरव; सन्मान; डौल. २ धर्माची स्थापना. 'धर्मप्रतिष्ठा तो सिध्दु । अभयहस्तु ।' -ज्ञा १.१३. [सं.] ॰प्रधान-वि. १ धर्मरूप पुरुषार्थाविषयीं तत्पर; धार्मिक वृत्तीचा. २ धर्म ज्यांत प्रमुख आहे असा (विषय, हेतु इ॰). ॰बंधु-पु. मानलेला भाऊ; भावाच्या जागीं असणारा माणूस; स्वतःच्या धर्माचा अनुयायी; स्वधर्मीय. [सं.] ॰बाप-पु. (ख्रि) कांहीं चर्चेसमध्य लहान मुलांचा बाप्तिस्मा होतो तेव्हां त्यांस खिस्तीधर्मास अनु- सरून वळण व शिक्षण देण्यांत यावें म्हणून जबाबदारी घेणारा पित्याहून निराळा पुरुष. (इं.) गॉडफादर. 'ज्या प्रत्येक मुलाचा बाप्तिस्मा करावयाचा आहे त्याला दोन धर्मबाप व एक धर्मआई पाहिजे.' -साप्रा ९०. [धर्म + बाप] ॰बुद्धि-स्त्री. धर्म करण्याची मनाची प्रवृत्ति; धर्माचरणाविषयीं आस्था. 'या चोराला तुम्ही गरीब मानून घरीं जेवायला घालितां ही धर्मबुद्धि कामाची नव्हे.' [धर्म + बुद्धि] ॰भोळा-वि. १ धर्मावर अंधश्रद्धा असणारा, परम धार्मिक. २ (अनादरार्थी) धर्मवेडा; कट्टर सनातनी. (इं.) सुपरस्टिशस. 'बॅरिस्टर, या धर्मभोळ्या खुळचट लोकांत तुम्ही आपल्या वाईफला एक मिनिटहि ठेवणं म्हणजे तिच्या सगळ्या लाइफचं मातेरं करण्यासारखं आहे.' -सु ८. ॰भ्राता-पु. धर्म- बंधु पहा. ॰मर्यादा-स्त्री. धर्मानें घालून दिलेली मर्यादा, बंधन, शिस्त; धार्मिक नियंत्रण. [सं.] ॰मार्ग-पु. धर्माचा, सदा- चरणाचा, परोपकाराचा मार्ग. [सं.] ॰मार्तंड-पु. १ धर्माचा श्रेष्ठ अनुयायी; पुरस्कर्ता; धर्मभास्कर; एक पदवी. २ (उप.) धार्मिकपणाचें अवडंबर, ढोंग माजविणारा. 'भीतोस तूं कशाला, मोडाया हें सुधारकी बंड । आहोंत सिद्ध आम्हीं पुण्यपुरींतील धर्ममार्तंड ।' -मोगरे. ॰युद्ध-न. युद्धशास्त्राच्या नियमाप्रमाणें चाललेली लढाई; सारखें संख्याबल; सारख्या शस्त्राअस्त्रांनीं सज्ज अशा दोन पक्षांमधील न्यायीपणाचें युद्ध; न्याय्ययुद्ध; निष्कपट युद्ध. 'तों अशरीरिणी वदली उत्तर । धर्मयुद्ध नव्हे हें ।' -पाप्र ४५.३९. [सं] ॰राज-पु. १ यमधर्म. २ जेष्ठ पांडव, युधिष्ठिर युधिष्ठिर हा फार सच्छील असल्यामुळें त्याला धर्माचा अवतार सम जत. ३ (ल.) धर्मनिष्ठ, सात्त्विक मनुष्य ४ धर्माप्रमाणें भोळा- भाबडा माणूस. [सं.] ॰राजाची बीज-स्त्री. कार्तिकशुद्ध द्वितीया; भाऊबीज; यमद्वितीया. [सं. धर्मराज + म. बीज] ॰राज्य-न. ज्या राज्यांत सत्य, न्याय आणि निःपक्षपात आहे असें राज्य; सुराज्य; सुखी राज्य [धर्म + राज्य] ॰लग्न-न. धर्मविवाह पहा. ॰लड- वि. (अश्लील) नास्तिक; धर्मकृत्यें न करणारा; धर्माला झुगारून देणारा. याच्या उलट धर्ममार्तंड. 'सदर ग्रंथांत महाराष्ट्र धर्मलंड अतएव त्याज्य असें एका गंधर्वानें म्हटलें आहे.' -टि ४. [सं. धर्म + लंड = लिंग] ॰लोप-पु. धर्माची ग्लानी; अधर्माचा प्रसार. [सं.] ॰वणी-पु. (कुंभारी) तिलांजळीच्या वेळचा कुंभारी मंत्र. -बदलापूर ७२. [धर्म + पाणी] ॰वाट-स्त्री. १ शरण आलेल्या शत्रूवर दया दाखवून त्यास करून दिलेली वाट. 'तुज युद्धीं कैंचें बळ । धर्मवाट दिधली पळ ।' -एरुस्व ११.३७. २ खुला, मोकळा, बिन धोक, अनिर्बंध रस्ता, मार्ग. [सं. धर्म + वाट] ॰वान्-वि. धार्मिक; परोपकारी; सदाचरणी; सात्त्विक. [सं.] ॰वासना-स्त्री. दानधर्म, धार्मिक कृत्यें करण्याची इच्छा; धर्मबुद्धि. [सं. धर्म + म वासना] ॰निधान-न. धर्माचा खजीना, ठेवा, सांठा. 'रचिलीं धर्मनिधानें । श्रीनिवृत्तीदेवें ।' -ज्ञा ११.९. [सं.] ॰विधि-पु. धार्मिककृत्य, संस्कार. [सं.] ॰विपाक-पु. धार्मिक कृत्यांचा परिणाम, फल. सत्कृत्यांचें फल. विपाक पहा. [सं.] ॰विवाह-पु. गरिबाचें स्वतःच्या पैशानें करून दिलेलें लग्न; धर्मादाय लग्न. [सं.] ॰वीर- पु. १ स्वधर्मार्थ प्राणार्पण करणारा; धर्मासाठीं लढणारा. 'स्वधर्म- रक्षणाकरितां मृत्यूच्या दाढेंत उडी टाकणार्‍या धर्मवीराची ती समाधि होती.' -स्वप १०. २ धर्माचें संरक्षण, संवंधन करणारा; धर्माचा वाली; ही एक पदवीहि आहे. 'धर्मवीर चंद्रोजीराव आंग्रे.' ३ (ख्रि) रक्तसाक्षी. (इं.) मार्टिर. [सं.] ॰शाला-ळा, धर्म- साळ-स्त्री. वाटसरू लोकांना उतरण्याकरितां बांधलेलें घर; धर्मार्थ जागा; पांथस्थांच्या विश्रांतीची जागा. 'मढ मंडप चौबारी । देखे धर्मसाळां ।' -ऋ २०. [धर्म + शाला] ॰शाळेचें उखळ-न. (धर्म- शाळेंतील उखळाचा कोणीहि उपयोग करतात ल.) वेश्या; पण्यां- गना. म्ह॰ धर्मशाळेचे उखळीं येत्याजात्यानें कांडावें. ॰शास्त्र- न. १ वर्णाश्रम धर्माचें प्रतिपादक जें मन्वादिप्रणीत शास्त्र तें आचार व्यवहारादिकांसंबंधीं नियम सांगणारें शास्त्र, ग्रंथ. २ समाजाच्या शिस्तीसाठीं, धार्मिक आचरणाकरितां, सामाजिक संबंधाकरितां (लग्न वगैरे संस्थांबद्दल) विद्वानांनीं घालून दिलेले नियम किंवा लिहिलेले ग्रंथ. धर्माविषयीचें विवेचन केलेला ग्रंथ. ३ ख्रिस्तीधर्माचें शास्त्र. (इं.) थिऑलॉजी. याचें सृष्टिसिद्ध (नॅचरल), ईश्वरप्रणीत (रिव्हील्ड), सिद्धांतरूप (डागमॅटिक), पौरुषेय (स्पेक्युलेटिव्ह), व सूत्रबद्ध (सिस्टिमॅटिक) असे प्रकार आहेत. ४ (सामा.) कायदेकानू. [सं.] ॰शास्त्री-वि. धर्मशास्त्र जाणणारा. [सं.] ॰शिला-स्त्री. सती जाणारी स्त्री पतीच्या चितेवर चढतांना ज्या दगडावर प्रथम उभी राहते तो दगड. या ठिकाणीं उभी असतां ती सौभाग्यवायनें वाटतें. ही शिला स्वर्गलोकची पायरी समजतात. 'धर्म शिलेवर उभी असतांना थोरल्या माधवराव पेशव्यांची स्त्री रमाबाई हिनें नारायणराव पेशव्यांचा हात राघोबांच्या हातीं दिल्याचें प्रसिद्ध आहे.' -ज्ञाको (ध) ४४. 'धर्मशिळेवर पाय ठेविता दाहा शरीरा का करितो ।' -सला ८३. ॰शिक्षण-न. धर्माचें शिक्षण; धार्मिक शिक्षण. 'ज्या धर्म शिक्षणानें पुरुषाचा स्वभाव अभिमानी, श्रद्धाळु, कर्तव्यदक्ष व सत्यनिष्ठ बनेल तें धर्मशिक्षण -टिसू ११६. ॰शील-ळ-वि. शास्त्राप्रमाणें वागणारा; धार्मिक सदाचरणी; सद्गुणी. [सं.] ॰श्रद्धा-स्त्री. धर्माविषयीं निष्ठा; धर्मावर विश्वास. 'राष्ट्रोत्कष स धर्मश्रद्धा पुढार्‍यांच्याहि अंगीं पाहिजें.' -टिसू ११७. ॰संतति-संतान-स्त्रीन. १ कन्यारूप अपत्य (कारण कन्या कुटुंबाबाहेर जाते). २ दत्तक मुलगा. [सं.] ॰सभा- स्त्री. १ न्याय कचेरी; न्यायमंदिर; कोर्ट. २ धार्मिक गोष्टींचा निकाल करणारी मंडळी; पंचायत. [सं.] ॰समीक्षक, ॰जिज्ञासु-पु. (ख्रि.) धर्मसंबंधानें विचार करणारा; शोध कर णारा; पृच्छक. (इं.) एन्क्वायरर. 'धर्म समीक्षकांच्या शिक्षकांना उपयोगी पडतील अशा पुस्तकांची बरीच जरूरी आहे.' -ज्ञानो ७.५. १९१४. [सं.] ॰संमूढ-वि. कर्तव्य कोणतें हें ज्यास निश्चित कळत नाहीं असा. -गीर २५. ॰संस्कार-पु. धार्मिक संस्कार; धर्मविधी. ॰संस्थान-न. १ पुण्य क्षेत्र; धर्माचें, सदाचरणाचें स्थान. २ पूजा, अर्चा वगैरे करण्यासाठीं ब्राह्मणास दिलेलें गांव; अग्रहार. ३ (व्यापक) धर्मार्थ, परोपकारी संस्था, सभा. ॰संस्था- पन, ॰स्थापन-न. १ नवीन धर्मपंथाची उभारणी. 'धर्म स्थापनेचे नर । हे ईश्वराचे अवतार । जाले आहेत पुढें होणार ।' -दा १८.६. २०. २ धर्माची स्थापना; धर्मजागृति. [सं.] ॰सिद्धांत- स्वीकार-पु. (ख्रि.) उपासनेच्या वेळीं आपल्या धर्मश्रद्धेचे आविष्करण करण्याकरितां विवक्षित सिद्धांतसंग्रह म्हणून दाखविणें. (इं.) कन्फेशन् ऑफ फेथ. [सं.] ॰सिंधु-पु. धर्मशास्त्रावरचा एक संस्कृत ग्रंथ. यांत अनेक धर्मकृत्यांचें विवेचन केलेलें असून शुभाशुभ कृत्यांचा निर्णय सांगितला आहे. पंढरपूरचे काशिनाथ अनंतोंपाध्याय यांनीं इ. स. १७९१ त हा रचिला. ॰सूत्रें-नअव. ज्ञान व कर्म- मार्ग यांची संगति लावून व्यावहारिक आचरणाची सांगोपांग चर्चा करणारा प्राचीन ग्रंथ. सूत्रें पहा. [सं.] ॰सेतु-पु. धर्म- मर्यादा. [सं.] ॰ज्ञ-वि. १ धर्मशास्त्र, विधिनियम उत्तम प्रकारें जाणणारा. २ कर्तव्यपर माणूस; कर्तव्य जागरूक. धर्माआड कुत्रें-न. सत्कृत्याच्या, परोपकाराच्या आड येणारा दुष्ट माणूस. धर्मदारीं कुत्रें पहा. धर्माचरण-न. धार्मिक आचार; सदा- चरण. [सं. धर्म + आचरण] धर्माचा कांटा-पु. सोनें वगैरे मौल्यवान जिन्नसाचें खरें वजन लोकांस करून देण्यासाठीं विशिष्ट स्थलीं ठेवलेला कांटा; धर्मकांटा. वजन करवून घेणार्‍यांकडून मिळालेला पैसा धर्मादाय करतात. धर्माचा पाहरा-पु. सकाळचा प्रहर (सूर्योदयापूर्वीं दीड तास व नंतर दीड तास). धर्माची गाय-पु. (धर्मार्थ मिळालेली गाय). १ फुकट मिळालेला जिन्नस. म्ह॰ धर्माचे गायी आणि दांत कां गे नाहीं = फुकटचा जिन्नस किंवा काम क्कचितच चांगलें असतें. २ कन्या; मुलगी (कारण ही दुसर्‍यास द्यावयाची असते). -वि. गरीब निरुपद्रवी मनुष्य. धर्मात्मा-पु. (धर्माचा आत्मा, मूर्तिमत धर्म). १ धर्म- शील, धार्मिक प्रवृत्तीचा माणूस. २ धर्म करण्याकडे ज्याची प्रवृत्ति आहे असा. ज्यानें अनेक धर्मकृत्यें केलीं आहेत असा. [सं.] धर्मादाय-व-पु. १ धर्मार्थ जें दान तें; देणगी; भिक्षा. २ सर- कारांतून धर्मकृत्यांसाठीं प्रतिवर्षीं काढून ठेवलेली रक्कम; या कामीं ठराविक धान्य देण्यासाठीं दर गांवाला काढलेल्या हुकूम. -वि. मोफत; फुकट; धर्मार्थ. -क्रिवि. धर्म म्हणून; दान देण्याकरितां; धर्मार्थ. ॰टाकणें-सोडणें-देणें-धर्मार्थ देणें; दानधर्मासाठीं आपला हक्क सोडणें. धर्मादाय पट्टा-स्त्री. देऊळ, उत्सव इ॰ चा खर्च चालविण्यासाठीं किंवा एखाद्याच्या मदतीसाठीं, लोकांवर बसवितात ती वर्गणी. धर्माधर्मीं-धर्मींनें-क्रिवि. धार्मिक व उदार लोकांच्या मदतीनें अनेकांनीं धर्मार्थ हात लाविल्यानें; फुकट; स्वतः पैसा खर्च करण्यास न लागतां. 'लेखक ठेवून लिहिलें तर पुस्तक होईल नाहींतर धर्माधर्मीं ग्रंथ तडीस जाणार नाहीं.' [सं. धर्म द्वि.] धर्माधर्मीवर काम चाल- विणें-पैसा खर्च न करतां फुकट काम करून घेणें. धर्मा- धर्मीचा-वि. धार्मिक लोकांकडून मिळविलेला; धर्मार्थ (फुकट) मिळविलेला; अनेकांनीं हातबोट लावल्यामुळें संपादित (पदार्थ, व्यवहार). धर्माधिकरण-पु. १ धर्माचारांचें नियंत्रण. २ शास्त्रविधींची पाळणूक होते कीं नाहीं हें पाहाण्यासाठीं, नीति- नियमांवर लक्ष ठेवण्यासाठीं खातें, सभा. ३ धर्मशास्त्रांची अंमल- बजावणी. ४ सरकारी न्यायसभा; न्यायमंदिर. धर्माधिकार-पु. १ धर्मकृत्यांवर देखरेख करण्याचा अधिकार. धार्मिक गोष्टींवर नियंत्रण. २ न्यायाधीश. धर्माधिकरण पहा. [धर्म + अधिकार] धर्माधिकारी-पु. १ धर्मासंबंधीं गोष्टी पहाणारा वरिष्ठ अधि- कारी. धर्माधिकरणाचा अधिकारी. २ न्यायाधीश. धर्माध्यक्ष-पु. सरन्याधीश; धर्मगुरु; राजा. [धर्म + अध्यक्ष] धर्मानुयायी, धर्मानुवर्ती, धर्मानुसारी-वि. १ धर्माप्रमाणें चालणारा, वागणारा; सद्गुणी; सदाचरणी. २ एखाद्या धर्मपंथांतील माणूस. धर्मानुष्ठान-न. १ धर्माप्रमाणें वर्तन; पवित्र, सदाचारी जीवन. २ धार्मिक संस्कार, विधि. ३ धार्मिक कृत्य; सत्कृत्य. धर्मार्थ-क्रिवि. १ परोपकार बुद्धीनें; दान म्हणून देणगी म्हणून. २ मोफत; फुकट. धर्मार्थ जमीन-स्त्री. धार्मिक गोष्टींसाठीं दिलेली जमीन (देवस्थानास किंवा धर्मादायास दिलेली); इनाम जमीन. धर्मालय-न. १ धर्मस्थान; धर्मक्षेत्र; ज्या ठिकाणीं धार्मिक कृत्यें चालतात तें स्थळ. 'जें धर्मालय म्हणिजे । तेथ पांडव आणि माझें ।' -ज्ञा १.८३.२ धर्मशाळा. धर्मावतार-पु. अतिशय सत्वशील व पवित्र माणूस; प्रत्यक्ष धर्म. [धर्म + अवतार] धर्मासन-न. न्यायासन; न्यायाधीश बसण्याची जागा; न्याय- देवतेची जागा. धर्मित्व-वि. गुणित्व. 'जे धर्मधर्मित्व कहीं ज्ञानाज्ञाना असे ।' -अमृ ७.२८३. धर्मिष्ट-वि. धार्मिक; सत्त्वशील; सदाचरणी. धर्मी-वि. १ धर्मानें वागणारा; सदाचरण ठेवणारा; न्यायी; सद्वर्तनी. २ ते ते गुणधर्म अंगीं असणारा. (विषय, पदार्थ). ३ धर्मीदाता; उदार; धर्म करणारा. धर्मीदाता- पु. धर्मकरण्यांत उदार, मोठा दाता (भिक्षेकर्‍यांचा शब्द). धर्मोडा-पु. स्त्रियांचें एक व्रत; चैत्र महिन्यांत ब्राह्मणाच्या घरीं धर्मार्थ रोज नियमानें एक घागरभर पाणी देणें. [धर्म + घडा] धर्मोपदेश-पु. धर्माची शिकवण; धर्मांसंबंधी प्रवचन, उपदेश, धर्मोपदेशक-पु. गुरु; धर्माचा उपदेश करणारा. धर्मोपा- ध्याय-पु. धर्माधिकारी. धर्म-वि. १ धर्मयुक्त; धर्मानें संपादन केलेलें; धर्मानें मिळविलेलें; धर्मदृष्टया योग्य. 'उचित देवोद्देशें । द्रव्यें धर्म्यें आणि बहुवसें ।' -ज्ञा १७.३६०. २ (महानु.) वंद्य. 'जें पांता जालीं धर्म्यें । वित्त रागांसि ।' -ऋ २०. धर्म्यविवाह- पु. धर्मशास्त्रोक्त विवाह; सर्व धार्मिक संस्कारांनिशीं झालेला विवाह.

दाते शब्दकोश