आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह!
शब्दार्थ
व्यसन
व्यसन vyasana n (S) Inordinate liking or taking to, addictedness: also a bad habit; a vitious practice or trick. 2 S A sin, a vice, a criminal pursuit. 3 S Devoted attachment or intent application to. 4 S A calamity. समान व्यसनाचें सख्य Union or consociation of persons of the same habits, pursuits, likings: also that union which consists in or which is effected by sameness of habits &c. 2 Union &c. of persons affected by one common calamity: also union produced by a common calamity.
व्यसन n Addictedness. A bad habit; a vice. A calamity.
न. १ आसक्ति; चट; नाद; छंद. 'जो गुरुसेवा व्यसनें सव्यसनु निरंतर ।' -ज्ञा १३.४४३. २ वाईट, दृष्ट संवय; खोड. ३ अडचण. 'सांगें पैलतीरा जावें । ऐसें व्यसन कां जेथ पावे ।' -ज्ञा ३.४७. ४ पाप; गुन्हा; दुराचरण. ५ तन्मयता; एकसारखें लक्ष. ६ संकट; आपत्ति. 'नीच व्यसनीं बुडतां निंदिति देवास न स्वकर्मास ।' -मोकर्ण [सं.] समान व्यसनाचें सख्य-न. १ एकाच व्यवसायाच्या, आवडीच्या, संवयीच्या माणसांची एकी. २ संवय इ॰ च्या सारखेपणामुळें होणारें सख्य. ३ सारख्याच संकटात पडलेल्याचें सख्य. ४ सामान्य विपत्तीमुळें होणारें सख्य. व्यसनाईत-वि. १ व्यसनी. २ (ल.) अभि- लाषी. 'आम्ही व्यसनाईतु आवघे । कांहीं जाणौचिना ।' -ऋ २८. व्यसनी, व्यसनीक-वि. १ खोडी, चट, संवय अस- लेला; दुराचरणी. २ नादी; छांदिष्ट.
(सं) न० आवड, रुचि. २ खोड, वाईट सवय, आदत.
व्यसन
चट, चटक, तल्लफ, हुक्की, घाणेरडी संवय, गलिच्छ खोडी, अनावश्यक आवश्यकता, पाहिजेच अशी वस्तु; न मिळाली तर माथे फिरल असें झालेंय, एक वेळ जेवणावांचून अडणार नाहीं पण यावांचून अडेल.
संबंधित शब्द
चिकटणें
१ चिकटपणामुळें एक पदार्थ दुसर्या पदा- र्थांशीं संलग्न होणें. २ (ल.) एक पदार्थ दुसर्याच्या अगदीं जवळ येणें. 'संपत्ति आली म्हणजे सोयरींधायरीं बळेंच येऊन चिकटतात.' ३ एक पदार्थ, वस्तु दुसर्यास लागून असणें. 'माझें घर त्याच्या घरास चिकटून आहे.' ४ खोडी, सवय, व्यसन जडणें. 'त्याला विडीचें व्यसन चिकटलें.'
अड्डेबाज
वि. अड्ड्यावर जाणारा; अड्ड्यात पडून असणारा; अड्ड्यावर जाण्याचे व्यसन असणारा.
अलुका, अलुकी
पु. स्त्री. व्यसन; भूक. पहा : अळका
आलुका, आलुकी, आलुकेपण
१. व्यसन, भूक : ‘कसा प्रीतीचा आलुका देव ।’ – किंसुदाम ३०. २. आळ : ‘ते आळुकी नोहे नुरोधिं । बोलातें एया ॥’ − राज्ञा १५·२२२. आलुता, आलुते
अनन्य
वि. १ एकरूप. 'सोऽहंबोधें तयाच्या ठायीं । अनन्यु होय ।' -ज्ञा १८.१३९७. २ एकमेव; एकटा. 'येणेंपरी परिस- तांचि तया अनन्या ।' -नल. १२१. ३ एकनिष्ठ; दुसऱ्याच्या आश्रय न घेतलेला. 'जो मज होय अनन्य शरण ।' -ज्ञा ९.२८८; 'जाति कुळ नाहीं तयासी प्रणाम । अनन्या अनन्य तुका म्हणे ।।' -तुगा ६९. ४ अन्योन्य; परस्पर. 'न तुटे अनन्यमिळणी योग । भिन्न विभाग दावितां ।' -एभा २४.२७. ५ एकाकी; अनाथ; ज्यास दुसरा कोणी तारणारा नाहीं असा; ज्यास दुसरा उपासनाविषय, देव, आश्र- यदाता वगैरे नाहीं असा. 'अनन्यास रक्षीतसे चापपाणी ।' -राम ३५. ६ स्वकीय; आपला; स्वत:चा (मुलगा, मूल).'पायें अनन्य लोटुनि लावलें काय अन्य थानातें ।' -मोभीष्म ४.५ ७ अद्वैत. ॰गति-क-वि. एकनिष्ठ; दुसरा मार्ग किंवा उपाय नसलेला; अगदीं अवलंबून असलेला. 'ऐसे अनन्यगतिचें चित्तें । चिंतितसांते मातें ।' -ज्ञा ९.३३७. 'हें अनन्यगतीचें मज । आथी व्यसन ।' -ज्ञा १८. १३४९. ॰भक्ति-स्त्री. केवळ एका (देवा) चीच भक्ति. ॰भाव- पु. १ अंत:करणांत एकच एक विचार असणें; नि:सीमभक्ति; कळ- कळ; आस्था; एकनिष्ठता. २ सरळभाव; प्रामाणिकपणा; साळसूद- पणा; कपटराहित्य. (याच्या उलट दुजाभाव). ॰विषय-वि. केवळ एकच विषय असलेला; एकचित्त; एकनिष्ठ; एकदिलाचा. ॰वृत्ति, ॰मनस्क-वि. एकाच पदार्थावर, मन ध्यान किंवा लक्ष असलेला; सावधानचित्त; एकाग्रचित्त. ॰वेद्य-वि. दुस- ऱ्याला जाणतां न येण्यासारखें; स्वत:लाच समजणारें; आपल्या अनु- भवानेंच जाणतां येणारें; दुसऱ्यास त्याची जाणीव करून देतां न येण्यासारखें (ब्रह्म, सुख, मनांतील गुप्त गोष्ट इ॰). ॰शरण-वि. दुसरा आसरा किंवा आधार नसलेलें; दुसरा ठाव नसलेलें; एकाच आश्रयावर अवलंबून असलेलें. ॰साधारण, ॰सामान्य-इतरत्र न आढळणारें; अलौकिक; सामान्यत: न दिसणारें (धैर्य, शौर्य इ॰).
अंक
पु. १ संख्या; आंकडा (१, २, ३ इ॰); आंख (अंक- गणितांतील). 'अंकें जैसीं शून्यें सद्य:कार्यक्षमें, न तीं अन्यें ।' -मोवन ६.३५. २ खूण; चिन्ह; छाप; शिक्का. 'अंक तो पडिला हरिचा मी दास ।' -तुगा १३३८. ३ नाटकाचा एक भाग; कथाभागाला किंवा संविधानकाला विरोध दाखविणार नाहींत असे जे नाटकाच्या कथानकाचे विभाग त्यांना अंक म्हणतात. असे अंक चारपासून बारापर्यंत असतात. अलीकडील सुमारें २५ वर्षांतील गद्य-पद्य नाटकें तीन अंकाचीं असतात. 'शाकुंतल नाटकाचा चौथा अंक फार बहारीचा आहे.' -नाकु ३.१. ४ मांडी. 'आधार शक्तीचिया अंकीं । वाढविसी कौतुकीं ।' -ज्ञा १२.५. ५ (डोळ्याजवळचा) आंख. भुंवई व कान यामधील जागा. ६ डाग; कलंक. 'सुत हो ! शुद्धांस कसें आतळलें व्यसन अंक हा रविला ।' -मोसभा ७.४२. ७ नियतकालिकाचा (वर्त- मानपत्र, मासिक इ॰) एक भाग, अनुक्रम, संख्या, नंबर. 'साग्र हकीगत लांबलचक असलेमुळें पुढील अंकावर ठेवणें भाग आहे.' -विक्षिप्त १.१४. [सं. अंक (अंक् = खूण करणें, मोजणें); लॅ. अंकस्; ग्री. ओग्कोस] ॰गणित-न. अंक किंवा व्यक्त संख्या यांचा विचार ज्यांत केलेला असतो तें शास्त्र. भास्कराचार्यांनीं याला 'पाटीगणित' असें म्हटलें आहे. याची उभारणी संख्येच्या कल्पनेवर असल्यामुळें या शास्त्राची उत्पत्ति व्यापाराचें मूळस्वरूप जें विनिमय त्यापासून फार प्राचीन काळीं झाली असावी. बीजगणिताच्या (अक्षरगणिताच्या) उलट याचे पूर्णांकगणित व अपूर्णांकगणित असे दोन भाग आहेत. यांत बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्ग, वर्गमूळ, घन, घन- मूळ असे आठ प्रकार येतात. 'अंकगणिती कोट्या काढून नेटि- वांस फसविण्याचे दिवस आतां राहिले नाहींत.' -टि २.५२३. ॰गति-स्त्री. (हिशेबाचे) आंकडे मांडण्याची किंवा मोजण्याची पद्धत. ॰चक्र-न. (ज्योतिष) कालगणना चक्र. हें चक्र ५९ वर्षांचें असतें. या कालगणनेंत वर्षारंभ भाद्रपद शु. १२ ला समज- तात. ६ किंवा ॰ ज्याच्या शेवटीं आहे तें वर्ष गणनेंत धरीत नाहींत. मद्रास इलाख्यांतील गंजम जिल्ह्यांतील लोक ओंको किंवा अंक नांवाच्या चांद्रसंवत्सरचक्रानुसार वर्ष मानितात. -ज्ञाको (अं) २७. ॰चालन-न. (ज्योतिष) अंकांचीं किंवा गणिती कोष्टकें, सारण्या; निरनिराळ्या काळांना जुळतील असा अंकांचा फरक. ॰जाल-न. आंकड्यांचें कोष्टक, सारणी, (पंचांगाचें गणित सोपें करण्यासाठीं तयार केलें). [अंक + जाल] ॰पट्टी-स्त्री. (कापडाच्या गांठीमधील) कापडाच्या अनुक्रमाची, किंमतीची किंवा इतर माहितीची चिठ्ठी; बीजक. आंकपट्टी पहा. ॰पाश-पु. संख्यारचनेसंबंधीं प्रकार. (इं.) परम्युटेशन. [सं.] ॰मोडणी-स्त्री. १ आंकडेमोड; हिशेब. २ अंक मांडण्याची पद्धत (डावीकडून उजवीकडे किंवा उजवीकडून डावीकडे). ३ बोटें मोडून अंक मोजणें. [अंक + मोडणी] ॰राशि-स्त्री. संख्याची मालिका; ओळ; रकमा (बेरजेसाठीं). [सं.] ॰लिपी-स्त्री. १ संख्या- लेखनपद्धति (आंकड्यांची-अक्षरांची नव्हे), आंकडे लिहिण्याची पद्धति, अठरा लिपीपैकीं एक. २ ज्यांत पाढे वगैरे लिहिले आहेत असें पुस्तक; उजळणीचें पुस्तक. [सं.] ॰स्थल-स्थान-न. (अंकगणित) आंकड्यांची जागा. 'गणितांत अंकस्थानें नऊ आहेत.' [सं.]
अफीण-म
स्त्री. अफू; खसखशीच्या बोंडांतील वाळलेला मादक किंवा कैफ आणणारा चीक. याचें पीक हिंदुस्थानांत विशेषतः माळव्यांत येतें. हें झाड ३ ते ५ फूट उंच असून, फळास दोडा म्हणतात. त्यांतील बीं तें खसखस होय. अफू खाण्यानें निशा येते. ही अतिसारावर देतात. अफूच्या उतारावर मोहरीचें पीठ, रिठ्याचें पाणी देणें. अफू अग्निदीपक, पाचक, वीर्यस्तंभक आहे. [सं. अहिफेन; हिं आफीम-ण; बं. अफेवा; गु. अफे-फीण. अर. अफ्यून; इं. ओपियम. ग्रीक ऑपिआन, ओपॉस = वनस्पतीचा चीक]. ॰सारखा जीव ओढणें-लागणें = अतीशय आवड किंवा उत्कंठा असणें; ओढा असणें. ॰उतरवणें-(व.) एकाद्याचीं चांगली खोड जिरवणें. ॰बाज-वि. अफूचें व्यसन असणारा. [अफीण + बाझ; अर. अफ्यून]
अफिण्या, अफिमी, अफिम्या
वि. अफूचे व्यसन असणारा.
अफिण्या, अफिमी-म्या
वि. अफू खाण्याचें व्यसन असणारा; अफीण पहा.
असक्त
वि. १. विरक्त; उदासीन. २. व्यसन, छंद नसलेला. ३. अशक्त. [सं.] (वा.) असक्ति उपनणे – आजारी पडणे : ‘नृसींही भांडारेकारासि असक्ति उपनली ।’ –लीचपू १·२५.
आसक्ति, आसक्ती
स्त्री. १. लोभ; तत्परता; तल्लीनपणा; लंपटता; भक्ती; व्यासंग; हव्यास : ‘परी कर्मफळीं आसक्ती । धरूनियां ।’ − ज्ञा २·२४५. २. मन जडणे; अनुरती; प्रेम; गोडी. ३. अतिशय आवड; मिळण्याची तीव्र इच्छा; व्यसन. [सं.]
असंग
पु. १. संगतीचा अभाव. २. छंद, व्यसन, आवड नसणे.
बाजी
स्त्री. १ पत्ते, गंजिफा, सोंगट्या यांचा खेळ, क्रीडा; २ (ल.) सरशी; बाणा; बाजू; डाव. 'एकवेळ बाजी विस्कटली म्हणून पराक्रमी पुरुष स्वस्थ बसत नाहींत.' -ख ११.६१००. ३ (पत्त्यांचा खेळ) रंग; बाजू. ४ हात किंवा वाटलेले पत्ते; जिंकलेला डाव. ५ खेळाचि समाप्ति. ६ (ल.) मसलत. 'यासाठीं अवघ्यांनीं साहित्य पुरवून बाजी सेवटास न्यावी.' -पेद ५.२४. ७ (ल.) बाणा. ८ घोड्याची एक चाल. (क्रि॰ धरणें; चालणें; येणें; जाणें; उभारणें). ९ (ल.) सवय; व्यसन अशा अर्थीं शब्दाला जोडून उपयोग. उदा॰ दारू-सट्टे-बाजी इ॰ [फा. बाझी] ॰अंगावर येणें-देणें-हरणें; हरविणें. ॰कार-वि. कर्ता; उत्पा- दक. 'सर्वांचे सम्मते या करण्याचे बाजीकर रघुनाथ बिडवई.' -रा ७.३९. [फा.]
बहु
वि. १ पुष्कळ; अतिशय; अनेक. (समासांत) बहुपाद = पुष्कळ पायांचा; बहुभुज = पुष्कळ हातांचा; बहुप्रिय = पुष्कळांस प्रिय; बहु-भक्ष-गुण-तंत्री-पर्ण-पत्र इ॰ २ -क्रिवि. फार; अधिक. 'तैसा कुरुपतिचा मी कीं बहु राज्यार्पणादि यदुपकृती ।' -मोभीष्म १२.५९. [सं.] म्ह॰ बहुरत्ना वसुंधरा. ॰कशास-क्रिवि. फार काय. 'हरी व्यसन पाप हें बहुकशास काया धवा ।' -केक ७४. ॰ऋणी- वि. पुष्कळांचा देणेकरी; बहुत ऋण असलेला. म्ह॰ बहु उवा त्यास खाज नाहीं, बहुऋणी त्यास लाज नाहीं. [सं.] ॰काल-क्रिवि. पुष्कळ वेळपर्यंत; बहुतकाळ. ॰कोण-पु. चोहोंपेक्षां जास्त बाजूंची सरलरेषाकृति. -महमा ७. ॰गुणित-वि. अनेक मिळून एकाप्रमाणें दिसणारा. -ज्योतिःशास्त्राचीं मूलतत्त्वें. ॰गुणी-वि. १ पुष्कळ गुण असणारा; पुष्कळ गोष्टी ज्यास करतां येतात असा; पुष्कळ कामीं किंवा उपयोगी लावतां येण्यासारखा (मनुष्य, वस्तु). २ एक श्लेषात्मक रचना; ठोंब्या; बईल. 'बहुगुणी ईश्वरभजनीं लक्षाचा मनुष्य मोटेयोग्य.' या वाक्यांतील पहिल्या तीन शब्दांतील आद्याक्षरें घेतल्यास बईल असा शब्द बनतो व तो मोटेयोग्य म्हणजे मोट ओढण्यास योग्य ठोंब्या असा श्लेष यांत आहे. [सं.] ॰च्रक-वि. वाचाळ; बडबड्या; चावट. 'बहुचकासीं करूं नये । मैत्री कदां ।' -दा २.२.२५. [सं. बहुवाचक] ॰चकै-स्त्री. भ्रमिष्टपणा; चावटी; बहकलेपणा. 'बहुचकै ज्ञातया । आणिली जेणें ।' -ज्ञा १८.५३९. ॰जिन(न्न)सी-वि. आंत पुष्कळ जिन्नस असणारा; अनेक प्रकारचा. 'दशक अष्टादशक बहुजिन्नसी ।' -दा १८. ॰त्र-क्रिवि. पुष्कळ मार्गांनीं, ठिकाणीं. [सं.] ॰त्व-न. १ पुष्कलता. २ (प्रबंध) रागालापांत एखाद्या स्वर अनेक वेळां घेणें. [सं.] ॰दुधी-वि. पुष्कळ दूध देणारी (गाय, म्हैस). 'अखुड शिंगीं अल्पमोली बहुदुधी अशी (गाय) मिळणें कठिण.' [बहु + दूध] ॰धा-वि. (काव्य) नाना प्रकारचा. 'पाहें मुनिप्रसादें करुनि चम- त्कार उदित बहुधा मीं ।' -मोअनु ७.९७. -क्रिवि. १ पुष्कळ मार्गांनीं, प्रकारांनीं. २ पुष्कळ अंशीं; बहुतकरून; बहुशः; बहुतेक. [सं.] बहुधा नाहीं-क्रिवि. क्वचित्, बहुशः; कधींहि न; फार क्वचित्. बहुधाकार-पु. अव. १ अनेक प्रकारचे आकार. 'ऐसे बहुधाकारी वर्तती । बहुचि होउनी ।' -ज्ञा ९.२५८. २ -न. (ल.) जग. ॰धानक-स्त्री. माया; प्रकृति. 'गुणत्रयरूपी पदार्थभेदाचीं बीजें तींत आहेत म्हणून बहुधानक.' -गीर १५८. ॰धान्य-पु. साठसंव- त्सरांतील बारावा संवत्सर. ॰नायकी-स्त्री. पुष्कळांचें राज्य, सत्ता; बहुराजकी; (ल.) झोटिंगपादशाही; अंदाधुंदी. बारनायकी पहा. ॰पतिकत्व-न. एक पति जिंवत असतां दुसरा किंवा अनेक पति करणें. [सं.] ॰पत्नीकत्व-न. लग्नाची बायको जिवंत असतां दुसर्या एक किंवा अनेक स्त्रियांशीं लग्न करणें. [सं.] ॰पाद-पादी प्राणी- पु. अनेक पाय असणारा प्राणी. या वर्गांतील प्राण्यांच्या पायाला अणीदार टोंक असतें व पुढील दोन पायांच्या पंजांत विषाच्या गाठी असतात. गोचीड, घोण हे या वर्गांत येतात. [सं.] ॰प्रजा- वि. पुष्कळ संतति, मुलेंबाळें, परिवार असलेला. [सं.] ॰प्रद- वि. उदार; सढळ हाताचा. [सं.] ॰बीज-वि. पुष्कळ बियांचा. [सं.] ॰बोलका-वि. वाचाट; बडबड्या. ॰भाग्य-(राज्य, कुटुंब इ॰ना कारण असें) पुष्कळांचें दैव. [सं.] ॰भाष(स)-भाषी- वि. १ बहुबोलका. २ पुष्कळ भाषा जाणणारा; दुभाषी. [सं.] ॰मत-न. साधारणतः अधिक लोकसंख्येचें मत; अर्ध्यापेक्षां अधिक मतें. -वि. पुष्कळांस मान्य. 'भीष्म म्हणे बा ! बहुमत साधुचि, न तसे सदा असु ज्ञात्या ।' -मोभीष्म १.८१. [सं.] ॰मान-पु. आदर; मान; सन्माननीय आगतस्वागत. [सं.] ॰मूत्रता-स्त्री. मेहाचा एक प्रकार; बहुमूत्ररोग. [सं.] ॰मूत्रमेह-रोग-पु. बेसुमार मूत्रस्त्राव होणारा रोग; मधुमेह. यांत कृशत्व, घाम येणें, तोंडास दुर्गंधि, जीभ, डोळे व कान यांस ओलसरपणा, खोकला, अरुचि, कोरड, दाह, थकवा इ॰विकार असून लघवी पिवळी होते. [सं.] ॰मूल्य-मोली-वि. मौल्यवान; उंची. म्ह॰ बहुमोली अल्प- संतोषी. ॰युक्पद-वि. (गणित) पुष्कळ पदांचा. [सं.] ॰ये-वि. बहुत. 'तेथ परिवारु बहुये । अघडता कीं ।' -अमृ ९.३८. [सं. बहु] ॰रंगी-वि. १ नानारंगी; चित्रविचित्र. २ बहुगुणी; हरहुन्नरी. ३ प्रसंगानुवर्ती; वेळ पडेल तसें वागणारा. [सं.] ॰रत्नावसुं- धरा-नानारत्नासुंधरा पहा. [सं.] ॰राशिक-न. (गणित) न. एखाद्या परिमाणाचें दोन किंवा अधिक परिमाणांशीं असणारें प्रमाण. [सं.] ॰रूप-न. १ नाट्य; अभिनय; सोंगें घेणें; विडं- बन इ॰. २ जगदाकार; विश्व. 'जो भेटतखेंव सरे । बहुरूप हें ।' -अमृ २.९. -वि. अनेक प्रकारचा, रूपांचा; नानाविध. [सं.] ॰रूपत्व-न. (रसा.) अनेकाकारत्व. इं. ऑल्ट्रोइझम, आल्ट्रोपी यास प्रतिशब्द. ॰रूपी-पु. नाचणारे, सोंगें आणणारे, नकल्ये इ॰ लोकांच्या वर्गांतील एक व्यक्ति; नाना प्रकारचीं सोंगें घेऊन उप- जीविका करणारा. 'कळावंत बहुरूपी ।' -दावि ४७४. ॰वचन- न. (व्या.) अनेकवचन; अनेकत्वद्योतक वचन. [सं.] ॰वचनान्त- वि. शेवटीं बहुवचनी प्रत्यय असलेला (शब्द, क्रियापद). [सं.] ॰वस-स्त्री. १ वेश्या; कसबीण. २ गवगवा; बोभाटा; गाजा- वाजा. (क्रि॰ करणें). -वि. १ वाचाळ. २ (काव्य.) मोठा; बहुत; पुष्कळ; फार; नानाविध; विस्तृत. 'तैसा बहुवस संसार ।' -एभा २२.४६०. -क्रिवि. १ पुष्कळअंशीं. 'म्हणे हें आवडे बहुवस ।' २ (प्रायः बहवस) बेबंद; स्वैर इ॰. ३ सर्वज्ञ. -मनको. ॰वसपण-न. १ सर्वज्ञता. 'आपुलेनि बहुवसपणें । श्रीकृष्ण म्हणे ।' -ज्ञा ६.१०७. २ सर्वत्र राहण्याचा धर्म; व्यापकता. 'कीं वायूचिया बहुवसपणें । अभ्रीं दिंगत लक्षिजे येक क्षणें ।' -स्वादि १०.२.३५. ॰वार-वाडें-क्रिवि. पुष्कळदां; अनेकवेळ; अनेक- प्रसंगीं. 'प्रियाकुचतटीं जिहीं न बहुवार पत्रावळी ।' -केका ७. [सं.] ॰विध-वि. पुष्कळ प्रकारचा; नानाविध. [सं.] ॰वें- क्रिवि. फार; पुष्कळ. 'तया ठासी बहुवें पाडें । मागांचि तूं ।' -ज्ञा १७.१२. [प्रा.] ॰व्रीहि-पु. (व्या) एक समास. यांत कोणतेंहि पद प्रधान नसून सबंध सामासिक शब्द त्याहून निराळ्या अशा नामाचें विशेषण असतो. उदा॰ चतुर्भुज; शशिशेखर इ॰. [सं.] ॰शः-शा-क्रिवि. पुष्कळअंशीं; बहुतकरून; बहुधा. 'बहुशा छेदिता जो दशकंठ ।' -दावि १७४. [सं.] ॰श्रुत- वि. ज्यानें पुष्कळ ऐकिलें आहे असा; पुष्कळ गोष्टीचें थोडथोडें ज्ञान असलेला; सामान्य माहिती असलेला. [सं.] ॰सम्मत- न. सामान्य मत, अभिप्राय. (क्रि॰ पडणें; होणें; असणें; घेणें). ॰साल-ळ-क्रिवि. १ (काव्य) पुष्कळ. 'बहुसाल मारिले भुरके ।' -मोउद्योग ७.७७. २ नित्य; नेहमीं; सदोदित; वारंवार. ३ पुष्कळ वर्षेंपर्यंत; लांब अवधिपावेतों. ॰सालपण-न. नाना- प्रकार. 'गुरु ऐसें जें म्हणणें । तेंही आहे बहुसालपणें ।' -एभा ३.२७५. ॰सुखवाद-पु. (तत्त्वज्ञान) आधिभौतिक सुखवादांतील एक श्रेष्ठ पंथ; जनहितवाद; पुष्कळांचें पुष्कळ सुख अगर हित जेणें करून होईल ते करणें अशा प्रकारचें नीतितत्व. 'बेथाम, भिल्ल वगैरे पंडित 'बहुसुखवाद' पंथाचे पुरस्कर्ते आहेत.' -ज्ञाको (ब) ६७. [सं.] ॰क्षम-वि. अतिशय सोशीक; धीराचा. [सं.] ॰ज्ञ- वि. पुष्कळ जाणणारा. [सं.]
बंधारण
न. १ कायदा; शासन; कानू; विधि. २ नियम; मर्यादा; ठराव. '... दुमाले गांव किती व नक्त खर्च किती या विषी बंधारण करून...' -इनाम ५०. ३ (गु.) धारा. ४ (गु.) गोठवण. ५ (गु.) व्यसन. ६ (गु.) पाटा. [सं. बंध + धारण]
भांग
स्त्री. १ एक मादक वनस्पती. २ ह्या वनस्पतिपासून केलेलें पेय; घोटा. (क्रि॰ छानणें). 'तुला या पुण्याच्या वाळ- वंटावर भांग छानत बसलेला पाहिला म्हणजे मला अन्नपूर्णा नग- रींतील आमच्या लहानपणची आठवण होते.' -भाऊ २१. ३ भांगेच्या झाडाचीं वाळलेलीं पानें, शेंडे, कळ्या इ॰; गांजा (क्रि॰ ओढणें). [सं. भंगा] भांगेमध्यें तुळस-वाईट आईबापांच्या पोटीं झालेलें चांगलें अपत्य; वाइटांत चांगली गोष्ट. भांग- भुरका-पु. १ भांग, गांजा, तंबाखू इ॰ निवळ चैनीचे पदार्थ (समुच्चयानें). 'पचीं पडे मद्यपान । भांगभुर्का हें साधन ।' -तुगा २८१९. २ उधळपट्टी; नासाडी. (क्रि॰ करणें). ३ संसारांतील कमी महत्त्वाचा, किरकोळ बाबतीचा खर्च. (क्रि॰ करणें; खालीं उडविणें). 'पैशाचा-मालाचा-जिंदगीचा-भांगभुरका केला.' भांगीट-ड-ळ, भांगी, भांग्या-वि. भांग पिण्याचें व्यसन लागलेला; भंगट.
भंग
स्त्री. भांग. [सं. भंगा] ॰भंगट-ड-वि. १ भांग पिण्याचें व्यसन असलेला. २ (ल.) अमर्याद, उधळेपणा करणारा. 'त्याचा खर्च भंगड आहे अशानें तो कर्जबाजारी होईल.' ३ (व.) उधळ्या. ॰भंगी-वि. भंगट. भंगीचंगी-पु. चंगीभंगी; व्यसनी; रंडीबाज. 'असा भंगीचंगी गृहवधु तया काय करणें ।' -उमाविलास ४. ॰भंगेरा-री-वि. भांग तयार करणारा, विकणारा. ॰भंग्या-वि. भंगट.
चहाबाज
वि. चहाचे व्यसन असलेला : ‘जपानी लोक पट्टीचे चहाबाज आहेत.’ – जजदि १०३.
चिकटणे
सक्रि. १. चिकटपणामुळे एक पदार्थ दुसऱ्या पदार्थाशी संलग्न होणे. २. (ल.) एक पदार्थ दुसऱ्याच्या अगदी जवळ येणे. ३. एक पदार्थ, वस्तू दुसरीस लागून असणे. ४. खोडी, सवय, व्यसन जडणे. [सं. शीक्.]
चट
स्त्री. १ चव; आवड; आस्वाद; गोडी. २ चटक; नाद; संवय; गोडी लागल्यामुळें चैन न पडणें; व्यसन. 'अखंडित चटे त्यांनीं लावियेला कान्हां । आवडे तयाचे संकल्प वाहाती मना ।' -तुगा १३२. [सं. चाटु; म. चाटणें; का. चटा]
चट
स्त्री. १. चव; आवड; आस्वाद; गोडी. २. चटक; नाद; सवय, गोडी लागल्यामुळे चैन न पडणे; व्यसन : ‘अखंडित चटे त्यांनी लावियेला कान्हां । आवडे तयाचे संकल्प वाहती मना ।’ - तुगा १३२.
चटावणे
अक्रि. १. गोडी, चटक, छंद लागणे, जडणे. २. खोड, सवय, व्यसन, छंद, रीत, पद्धत लागणे, जडणे, पडणे; सवकणे. पहा : चकसणे [स. चप्]
चटावणें
अक्रि. चट लागणें. १ गोडी, चटक, छंद, लागणें, जडणें. २ खोड, संवय, व्यसन, छंद, रीत, पद्धत लागणें, जडणें, पडणें; संवकणें; चकसणें पहा. [म. चट]
चटक
स्त्री. १. रुची; गोडी; चट; व्यसन; जडलेली आवड; नाद; चव (क्रि. लागणे.) : ‘कादंबऱ्या वाचण्याची ज्यास एकदा चटक लागते त्यास मग दुसरें काहींच वाचावेसें वाटत नाही.’ - नि ७५. २. दुर्व्यसन; खोड. ३. प्रिय वस्तूच्या वियोगामुळे व ती वस्तू पुन्हा मिळावी अशी उत्कंठा लागल्यामुळे होणारे दुःख, मनस्ताप, चटका, हुरहूर. (क्रि. लावणे, लागणे, बसणे.) : ‘चटक लाउनी सोडावें । भल्या मनुष्यासी ।’ - दास १९·२·१३.
चवणा, चवना
पु. १. आवड; गोडी; चटक. २. व्यसन; खोड; वाईट सवय; दुर्गुण; चाळा. ३. लाड, नखरा; चोचला : ‘जिभेचे चवणे करायचे.’ – हेतोप्रबो ४९.
चवणा-ना
पु. १ आवड; गोडी; चटक. २ व्यसन; खोड; वाईट संवय; दुर्गुण; चाळा. 'एवढ्या पोरास तंबाखूचा चवणा लागला हें ठीक नव्हे.' ३ नखरा. [चव, चवणें]
छंदफंद
पु. अव. रंगढंग; छादिष्टपणा; नखरे; व्यसन : ‘तोच त्यांचा उच्छृंखल छंदफंद होय.’ -अंया ७.
दारुडा, दारुड्या, दारूबाज
वि. दारुचे व्यसन असणारा.
धाम
स्त्री. १. रोगाची साथ. (गो.) २. (ल.) कोणत्याही गोष्टीचा अनेकांना एकदम लागलेला नाद, व्यसन, इसळी, वेड. ३. हुल्लड; दंगा.
धाम
स्त्री. १ (गो.) रोगाची सांथ; २ (ल.) कोणत्याहि गोष्टीचा अनेकांस एकदम लागलेला नाद, व्यसन, इसळी वेड, खवखव. 'गांवांत तापाची धाम आली आहे.'
धांडाळ, धांडाळे
न. व्यसन; छंदफंद : ‘अनेका धांडाळे याचा येथ असो नेदावे.’ - उच १.
धांडाळें
न. (महानु.) धंदा; व्यसन; उठाठेव; काम. 'अनेका धांडाळे याचा येथ असो नेदावे.' -उच १.
ढांढाळ
न. उठाठेव; नसता उद्योग; छंदफंद; व्यसन : ‘सांपें आवैचेया नागदेयाची ढांढाळें आइकीजति ना :’ –लीचपू २·२५१.
ढंढाळ
न. छंदफंद; व्यसन.
धोटा
पु. १. गांजाचा अंमल; गांजा पिणे; गांजाचे व्यसन. २. अधाशीपणाने, गटगटा पिणे. (क्रि. लावणे).
धोटा
पु. गांजाचा अंमल; गांजा पिणें; गांजाचें व्यसन.
धुनक, धुनूक
स्त्री. रुचि; चव; छटा; चुणूक; स्वाद. 'कल्याणामध्यें मल्हाराची धुनक.' २ अस्पष्ट आवाज (अंतरावरून येणारा). (क्रि॰ येणें; निघणें). ३ अस्पष्ट आणि हळू आवाज, नाहींसा होत जाणारा ध्वनि (क्रि॰ चालणें). ४ लोकांत उठलेली अफवा; भुमका; कुणकूण. (क्रि॰ निघणें). ५ नुसती थोडी ओळख, पुसट कल्पना. ६ धुंदूक. ७ (व.) नाद; व्यसन. 'तरुण वयांत त्याला निराळीच धुनक होती, त्याचें नोकरीकडे विशेष लक्ष नव्हतें.' [सं. ध्वनि किंवा धु यति]
धुनक, धुनूक
स्त्री. १. रुची; चव; छटा; चुणूक; स्वाद. २. अस्पष्ट आवाज (दूर अंतरावरून येणारा). ३. नाहीसा होत जाणारा ध्वनी. (क्रि. चालणे). ४. लोकांत उठलेली अफवा; भुमका; कुणकुण. (क्रि. निघणे). ५. नुसती, थोडी ओळख; पुसट कल्पना. ६. पहाट; धुंदूक. ७. नाद; व्यसन. (व.) [सं. ध्वनि]
एकव्यसनी
वि. एक मताचे; सारख्याच संवयी असलेले; एक राहणीचे (लोक वगैरे). [सं. एक + व्यसन]
गांजेकस
वि. गांजा ओढण्याचें व्यसन असणारा; गांजा पहा. [हिं.]
गांजेकस
वि. गांजा ओढण्याचे व्यसन असणारा; गंजेटी.
गंजाडा
वि. गांजाचे व्यसन असणारा : ‘गंजाडा बाप चिलमीच्या गुंगीत गावात फिरे.’ - बाब ५३.
घेणे
सक्रि. (घेणे ह्या क्रियापदाचे निरनिराळ्या संबंधात अनेक प्रयोग होतात. उत्पादन–घर–चालीवर–जागा–शेवट–तोंडीवर–त्वरेवर–घाव–परीक्षा–पाठ–रान इ. अनेक शब्दांना जोडून घेणे या क्रियापदाचा होतो. त्याचप्रमाणे देणे, टाकणे, मारणे, घालणे व पाडणे या धातूंप्रमाणे अनेक धातुसाधितांना जोडूनही घेणे शब्दाचा प्रयोग करतात. उदा. आटोपता घेणे, आखडता घेणे, काढता घेणे. श्वास, रजा, सूड इ. शब्दांना जोडूनही घेणे या क्रियापदाचा उपयोग होतो. शिवाय उपयोग करणे, गिळणे, सहन करणे, सोसणे (रोग, व्यसन इ.) जडवून घेणे इ. अनेक अर्थ होतात.
सक्रि. १. जोडणे; सामील करणे; वाढविणे. २. स्वतःला जोडणे; जडवून घेणे; लावून घेणे (सवय, खोड, व्यसन).
घर
न. १. राहण्यासाठी बांधलेली जागा; वाडा. २. एका कुटुंबातील (एके ठिकाणी) राहणारी मंडळी; कुटुंब; (सांकेतिक) पुनर्विवाहित स्त्रीला पहिल्या पतीपासून झालेला मुलगा. ३. गृहस्थाश्रमधर्म; संसार; प्रपंच; (ल.) नवरा किंवा बायको. ‘हा जिन्नस घरात दाखवून आणतो.’ –विवि १०·४·७; ‘आमच्या घरांतल्यांनी दादासाहेबांना दारूचें व्यसन लावलें.’ – एकच प्याला. ४. एखाद्या व्यवसायात जुटीने काम करणारी माणसे, मंडळी, संस्था; अडतीची जागा. ५. एखादी वस्तू सुरक्षितपणे ठेवण्यासाठी केलेल धातूचे, लाकडाचे आवरण, वेष्टण, कोश, उदा. चष्म्याचे घर. ६. पेटीतील, टाइपाच्या खणातील कप्पा, खण, खाना. ७. सोंगट्यांच्या, बुद्धिबळाच्या पटावरील, पंचांगातील (प्रत्येक) चौक; चौरस; मोहऱ्याचा मूळचा चौरस; मोहऱ्याचा मारा. ८. (ज्यो.) कुंडलीच्या कोष्टकांतील भावदर्शक स्थान. ९. घराणे; वंश; कुळ. १०. (वर्तमानपत्राचा, पत्रकाचा, कोष्टकाचा) रकाना, सदर : ‘येऊन जाऊन पत्रप्रकाशकास स्वतःचा असा मजकूर दर खेपेस पराकाष्ठा दोन तीन घरें घालणें येतें.’ – नि १५. ११. (मधमाशाचे पोळे वगैरेतील) छिद्र : ‘केळीच्या सोपटाचीं घरें ज्यांनीं पाहिली असतील……..’ – मपु ६·२२५. १२. ठाणे; ठिकाण : ‘कुबल, बांकी घरें । शिवराजाच्या हाता आलीं ।’ – ऐपो ९. [सं. गृह] (वा.) घर आघाडणे – घर जळून खाक होणे. (को.) घर उघडणे – १. लग्न करून संसार थाटणे. २. एखाद्याचे लग्न करून देऊन त्याचा संसार मांडून देणे. घर उभारणे, घर उभे करणे – संसारातील अडचणी दूर करून ते सुरळीत चालू करणे. घर करणे – १. बिऱ्हाड करणे; राहण्यास जागा घेऊन तीत जेवणखाण इ. गोष्टी करायला लागणे. २. (त्रासदायक वस्तूंनी) ठाणे देणे; राहणे; वास्तव्य करणे : ‘माझ्या हृदयांत घर करून बसून त्याने मला घायाळ केलें.’ – बाय ३·३. घर खाली असणे – १. घर मोकळे असणे. २. घरातील पुरुषमनुष्य मृत्यू पावणे : ‘कासीबा देशपांडे यांचा घर खालीं होता. त्याची बायको तिसी कासीबा देशपांड्या गेला.’ – ऐसंसाखं ४·१०७. घर खाली करणे – घर सोडून जाणे; घर मोकळे करून देणे. घर घालणे – (एखाद्याच्या) घराचा नाश करणे. घर घेणे – १. (सामा.) लुबाडणे; लुटणे; नागविणे; बुचाडणे : ‘मग रेणुकेनें बोलिलें । अहो जेऊनि कैसें घेतलें ।’ – कापु २३¿४०. २. (एखाद्याचा) नाश करणे : ‘म्हणती जन्मोनि द्रौपदीनें । आमचें घर घेतलें तिणें ।’ – जै ७१¿९९. ३. (त्रासदायक वस्तू) घर करून बसणे, ठाणे देऊन बसणे. पहा : घर करणे २. घर चालविणे – प्रपंचाची, संसाराची जबाबदारी वाहणे. घर जोडणे – इतर घराण्यांशी, जातींशी, लोकांशी इ. मैत्री, शरीरसंबंध घडवून आणणे; मोठा संबंध, सलोखा उत्पन्न करणे : ‘लक्ष्मीपतीचें घर थोर जोडे ।’ –सारुह २¿१. घर डोक्यावर घेणे – आरडाओरड करून घर दणाणून सोडणे; घरात दांडगाई, कलकलाट, दंगामस्ती करणे. घर तुटणे – मैत्रीचा, नात्याचा संबंध नाहीसा होणे; स्नेहात बिघाड होणे. दुसऱ्याचे घर दाखवणे – १. आपल्या घरी कोणी त्रासदायक मनुष्य आला असता काही युक्तीने त्याला दुसऱ्याच्या घरी लावून देऊन आपला त्रास चुकविणे; (एखाद्याची) ब्याद, पीडा टाळणे. २. घालवून देणे; घराबाहेर काढणे. घर धरणे – १. घरात बसून राहणे; घराच्या बाहेर न पडणे, संकटाच्या, दंगलीच्या वेळी पळून जाणे, पळ काढणे, गुंगारा देणे. २. (रोग इत्यादींनी शरीरावर) अंमल बसविणे; एखादा आजार पक्केपणाने जडणे. ३. चिकटून राहणे; चंचलपणा न करता एकाच ठिकाणी भिस्त ठेवून असणे. ४. (बुद्धिबळात, सोंगट्यात) सोंगटी एकाच घरात ठेवून घर अडविणे. घर धुणे, घर धुऊन नेणे – एखाद्याचे असेल नसेल ते लबाडीने गिळंकृत करणे; हिरावून नेणे; नागविणे; बुचाडणे; लुबाडणे; लुटणे; अगदी नंगा करणे : ‘शंभर वर्षांनी घर धुऊन नेल्यानंतर ही ओळख आम्हांस पटूं लागली आहे.’ –टिव्या. घर निघणे – नवऱ्याला सोडून दुसऱ्या मनुष्याबरोबर नांदणे; दुसऱ्याच्या घरात, कुटुंबात निघून जाणे : ‘माझें घर निघाली.’ – वाडमा २¿२०९. घर नेसविणे – घरावर गवत घालून ते शाकारणे; घर गवत इत्यादिकांनी आच्छादणे; घर शिवणे. घर पाहणे –१. (एखाद्या) घराकडे वक्रदृष्टी करणे; (रोगाचा, मृत्यूचा) घरावर पगडा बसणे; घरात शिरकाव करणे. २. (बायकी) वधूवरांचे योग्य स्थळ निवडणे : ‘सुशील तारेने आपल्या पुण्यबलाच्या साह्याने योग्य घर पाहून….’ – रजपूतकुमारी तारा. ३. घरी जाणे, मुलाबाळांत जाणे. घर पालथे घालणे –हरवलेली वस्तू शोधण्यासाठी घराचा कानाकोपरा धुंडाळणे. घर पुजणे –१. आपले काम करून घेण्यासाठी एखाद्याच्या घरी आर्जवे, खुशामत करण्यास वारंवार जाणे. २. (घरे पुजणे) आपला उद्योग न करता दुसऱ्यांच्या घरी चकरा मारणे. घर फोडणे –१. संसार आटोपणे, आवरणे. २. कुटुंबातील माणसांत फूट पाडणे; घरात वितुष्ट आणणे. ३. घराला भोक पाडून आत (चोरी करण्यासाठी) शिरकाव करून घेणे. घर बसणे –कर्ता मनुष्य नाहीसा झाल्यामुळे, दुर्दैवाच्या घाल्यामुळे कुटुंब विपन्नावस्थेला पोचणे; घरांची वाताहत, दुर्दशा होणे. घर बसविणे –संसार थाटणे; घर मुलाबाळांनी भरून टाकणे. स्त्रीच्या विवाहोत्तर जीवनात या वाक्प्रचाराचा उपयोग करतात. घर बुडणे –१. कुटुंबाची नासाडी, दुर्दशा होणे; कुटुंब धुळीला मिळणे. २. संतती नसल्यामुळे वंशाचा लोप होणे. घर बुडविणे – १. (एखाद्याच्या) कुटुंबाचा विध्वंस करणे; संसाराचा सत्यानाश करणे. २. घराला काळिमा आणणे. घर भरणे – १. दुसऱ्याला बुडवून, त्यांची उपेक्षा करून आपण श्रीमंत बनणे. २. दुसऱ्याचे घर लुटणे व स्वतः गबर होणे. घर भंगणे – कुटुंब मोडणे, विस्कळीत होणे; कुटुंबाला उतरती कळा लागणे; कुटुंबाचा नाश होणे; मंडळीत फूट पडणे. घर मारणे – घर लुटणे. घर मांडणे, थाटणे – (संसारोपयोगी जिन्नसांनी) घर नीटनेटके करणे; घराची सजावट करणे. घर म्हणून ठेवणे – एखादी वस्तू, सामान प्रसंगविशेषी उपयोग पडावी म्हणून संग्रही ठेवणे; प्रत्येक वस्तू जतन करून ठेवणे. घर रिघणे – पहा : घर निघणे. घर लागणे – घर भयाण भासणे. (एखाद्याचा मुलगा अथवा पत्नी वारली असता घरातील भयाण स्थिती वर्णन करताना ह्या वाक्प्रचाराचा उपयोग करतात.) घराचा उंबरठा चढणे – घरात प्रवेश करणे. घराचा खांब, घराचे धारण, घराचे पांघरूण – घरातील कर्ता माणूस; घरातला मुख्य; घरमेढा. घराचा पायगुण –घरामुळे घडणाऱ्या शुभाशुभ गोष्टी; घरातील माणसांची वागणूक, वर्तणूक, वर्तन, शिस्त, घराचे पुण्य पाप. घराचा पायगुणच तसा, घरची खुंटी तशी –कुटुंबातील माणसाची वागण्याची रीत असेल त्याप्रमाणे; एखाद्या कुटुंबातील माणसांची सर्वसाधारण अशा वाईट व्यसनाला, खोडीला, सवयीला उद्देशून म्हणतात. घराचा वासा ओढणे –एखाद्या कामधंद्यासाठी आवश्यक असलेले साधन, वस्तू, गोष्ट नाहीशी करणे; एखाद्या मोठ्या कामातून फार जरुरीचे साधन नाहीसे करणे; अडवणूक करणे. खाल्ल्या घराचे वासे मोजणे –कृतघ्न होणे; केलेला उपकार विसरणे. घरात पैशाचा धूर निघणे, घरात सोन्याचा धूर निघणे –घरची अतिशय श्रीमंती असणे. घराला रामराम ठोकणे –घर सोडून जाणे : ‘आज या घराला रामराम ठोकण्यापेक्षा घटकाभर जुलमाचा रामराम पत्करला.’ –भा ९०. घरावर काट्या घालणे, घरावर गोवरी ठेवणे, घरावर निखारा ठेवणे –एखाद्याच्या कुटुंबाची धूळधाण, बदनामी करणे. घरावर कुत्रे चढविणे – (गोव्याकडे घरावर कुत्रे चढल्यास घर सोडावे लागते यावरून) १. एखाद्याच्या घरात कलागती, भांडणे लावून देणे, तंटे उत्पन्न करणे. २. दुष्टावा करणे; अडचणीत आणणे. घरावर गवत रुजणे –घर ओसाड, उजाड पडणे. घरावर तुळशीपत्र ठेवणे –घरादाराचा त्याग करणे; संसाराबद्दल पूर्णपणे अनासक्त होणे. घरास आग लावणे –एखादे दुष्कृत्य करून घराचा नाश करणे. घरास काटी लागणे –घर उद्ध्वस्त होणे; घरात कोणी न राहणे. घरास काटी लावणे – १. घराच्या भोवती काटे, काटक्या लावून येणे- जाणे बंद करणे. २. घर उजाड, उद्ध्वस्त, ओसाड करणे. घरास येणे – अवस्थेप्रत येणे. घरास हाड बांधणे, घरावर टाहळा टाकणे – (एखाद्याला) वाळीत टाकणे; समाजातून बहिष्कृत करणे; जातीबाहेर टाकणे. घरास राखणे – १. घराचे रक्षण करणारा मनुष्य. २. (ल.) थोडासा संचय, शिल्लक, साठा, संग्रह. घरी बसणे – (एखादा मनुष्य) उद्योगधंदा नसल्यामुळे, सोडून दिल्यामुळे घरी रिकामा असणे; बेकार होणे. घरी पाणी भरणे – (एखादा मनुष्य, गोष्ट) एखाद्याच्या सेवेत तत्पर असणे; त्याला पूर्णपणे वश असणे. घरी बसवणे – अधिकारावरून किंवा कामावरून काढून टाकणे : ‘किचनेरलाही घरी बसविण्याचा त्याचा विचार होता.’ –पम ४०३. घरी येणे – (एखादी स्त्री) विधवा झाल्यामुळे सासरच्या आश्रयाच्या अभावी पितृगृही, माहेरी परत येणे; विधवा होणे : ‘कुटुंब मोठे, दोन बहिणी घरी आलेल्या.’ –मनोरंजन आगरकर अंक.
हुक्का-का
पु. १ गुडगुडी. २ ज्वालाग्राही द्रव्यांनीं भरलेलें पात्र; बाँब. 'दारूगोळा. बाण, हुके.' -मराआ ५. [अर. हुक्का] ॰पाणी-न. खाणेंपिणें इ॰ व्यवहार. ॰पाणी बंद करणें- जातीबहिष्कृत करणें; वाळींत टाकणें. हुक्केबरदार-पु. गुडगुडी तयार करून देणारा चाडर. [फा. हुक्कबर्दार] हुक्केबाज-वि. गुडगुडीचें व्यसन असणारा.
हवि
न. होमांत टाकावयाचें (तूप, भात इ॰) द्रव्य, पदार्थ; बली. [सं. हविस्] हवित्रि-स्त्री. होमकुंड. हविष्य-न. १ हवन करावयास योग्य वस्तु; हवि. २ व्रतादि दिवशीं भक्षणीय असा शुद्ध पदार्थ (गोधूम, गोदुग्ध इ॰). ३ (ल.) वरील पदार्थ खाण्याचें व्रत, नियम, बंधन. ४ (उप.) नेहमीची लोकाचारा- विरुद्ध किंवा स्वैर वागणूक, वहिवाट, नेम, प्रघात, व्यसन. 'या गांवांत सर्व त्याचें हविष्य आहे.' हविष्यान्न-पु. हवि; हविष्य अर्थ १ पहा. २ तांदूळ, गहू इ॰ धान्य व तूप, दूध इ॰ हबनीय पदार्थ. ३ हे पदार्थ खाऊन रहावयाचें एक व्रत. [सं. हविष्य + अन्न]
इल्लत
वि. (व.) व्यसनी; खोडकर; द्वाड; उपद्व्यापी. 'इल्लत माणूस आहे तो.' -स्त्री. (व.) व्यसन; खोड; दोष; रोग. 'कोणाला विडीची तर कोणाला गांजाची इल्लत असते.' [अर. इल्हाद् = अधार्मिकता; नास्तिक्य]
इंद्रिय
न. १. शरीराचे विशिष्ट कार्य करणाऱ्या किंवा बाह्य जगाचा वेगवेगळ्या प्रकारे अनुभव घेणाऱ्या शरीराच्या भागांपैकी प्रत्येक. अवयव; गात्र; ज्ञानाचे, कर्माचे साधन असलेला शरीराचा भाग. एकूण इंद्रिये अकरा. पाच ज्ञानेंद्रियें, पाच कर्मेंद्रिये व मन : ‘अकराही इंद्रियवृत्ती । कैशा लागती भगवद्भक्ती ।’ − एभा २·२९३. २. पुरुषांचे जननेंद्रिय. [सं.] (वा.) इंद्रिय हाती धरणे–जार कर्माचे अतिशय व्यसन असणे; अति विषयासक्त असणे; उन्मत्त होणे.
इंद्रिय
न. १ ज्ञानाचें किंवा कर्माचें साधन जो शरीराचा भाग तो. इंद्रियें ११ आहेत. -(अ.) पंचज्ञानेंद्रीयें-डोळे, कान, नाक, रसना व त्वचा हीं अनुक्रमें रूप, शब्द, गंध, रस व स्पर्श यांचें ज्ञान करून देतात. (आ) पांच कमेंद्रियें-पाय, हात, मलद्वार, मुत्रद्वार, व जिव्हा हीं अनुक्रमें गति, देणेंघेणें, मलोत्सर्ग, मूत्रत्याग व बोलणें हीं कर्मे; करतात. व (इ) मन-हें संकल्पविकल्प करतें. 'अकराही इंद्रियवृत्ती । कैशा लागती भगवद्भक्ती ।' -एभा २.२९३. पंचज्ञानेंद्रियें व पंच कर्मेंद्रीयें यांखेरीज पुढील चार अंतरिंद्रियें आहेत-मन, बुद्धि, चित्त आणि अहंकार. (सामा.) इंद्रिय म्हणजे बाह्य वस्तु जाणण्याची साधनशक्ति; आरंभीं इंद्रिय शब्द येऊन होणारे सामासिक शब्द-इंद्रिय- दमन; इंद्रियनिग्रह; इंद्रियनियामक; इंद्रियगोचर; इंद्रियविषय; इंद्रिय- वश; इंद्रियाधीन; इंद्रियजेता; इंद्रियनियामक; इंद्रियनिग्रही; इंद्रीयतर्पण. २ पुरुषाचें जननेंद्रिय; लिंग. [सं.] इंद्रिय हातीं धरणें-जार कर्माचें अतिशय व्यसन असणें; अति विषयासक्त असणें. ॰गम्य-वि. इंद्रियांना आलकन होणारें-कळणारें; इंद्रियगोचर. -यागम्य-वि. इंद्रियांना आकलन न होणारें; इंद्रियागोचर; इंद्रियातीत. ॰ग्राम-पु. १ इंद्रिय- समूह; सर्व इंद्रियें. २ इंद्रियांचें स्थान, शरीर, देह. ॰जुलाब-पु. १ मुत्ररेच; मूत्रढाळ; मूत्राधिक्य होण्याचें औषध. २ बहुमूत्र, मूत्रवृद्धि. ॰दमन-१ इंद्रियांना कह्यांत, स्वाधीन ठेवणें. २ विषया- कडे इंद्रियांचा ओढा नाहींसा करण्याचा योगसाधनादि उपाय. ॰विज्ञानशास्त्र-न. इंद्रियांच्या रचनेची, व्यापारांची माहिती देणारें शास्त्र. (इं.) फिजिऑलॉजी.
जिनबाजी
स्त्री. १. लढाईचे व्यसन. २. कूच करण्याची तयारी : ‘कळो लागली जिनबाजी’ - मला ८५.
जुगार
पु. द्रव्यप्राप्तीच्या लोभानें किंवा नशिबाची परीक्षा पाहण्याकरितां कर्मणुकीच्या खेळांत पैसे लावून खेळणें; जुवा; द्यूत; शर्यत. [सं. द्यूतकार; प्रा. जूआर] जुगारी-र्या-वि. जुगार खेळणारा; जुगारीचें व्यसन असलेला.
जुगारी, जुगाऱ्या
वि. जुगार खेळणारा; जुगारीचे व्यसन असलेला.
कारणीभूत
वि. कारण झालेला; जबाबदार : ‘हे व्यसन बोकाळायला द्रव्यदृष्टीही बरीच कारणीभूत होते.’ - भासं १३८.
खूळ
न. वेड; भ्रमिष्टपणा; चळ; छंद; वेडी समजूत. (क्रि. पडणे, लागणे.) [क. कूळ] (वा.) खूळ पिकणे - बंड, खूळ, दंगा वाढत जाणे. खूळ लागणे - १. वेड लागणे. २. (ल.) नाद, व्यसन लागणे.
खूळ
न. १ वेड; भ्रमिष्टपणा; चळ; छंद; वेडी समजूत. (क्रि॰ लागणें). २ (बंडखोर, लुटारू, दरोडेखोर इ॰ ची) टोळी; जमाव. ३ गोंधळ व दंगल, जाळपोळ व लुटालूट (बंडखोर किंवा लुटारूंची धाड यामधील); दंगल; भांडण; उपद्रव; त्रास. (क्रि॰ मातणें; माजणें; उभें राहणें; उठणें; मांडणें; घालणें; लावणें; उठवणें). 'हिंदुस्थानांत एक नजीबखाना मात्र, खूळ राहिलें आहे.' -भाव ४७. ४ अडथळा; आडकाठी; उपाधि; पीडा (माणसें, वस्तु, प्रसंग यांच्यासंबंधीं अनियंत्रितपणें योजतात). (क्रि॰ पाडणें; पडणें). ५ (सामा.) बंड. 'किल्ला दिल्यानें खूळ करतील.' -रा १२.१६८. ६ गुरांचा एक रोग. -नाको. [का. कूळ = वेडा] ॰पिकणें-(बंड, खूळ, दगा) वाढत जाणें. ॰लागणें-१ वेड लागणें. २ (ल.) नाद, व्यसन लागणें.
लकब
स्त्री. १ वाईट संवय, रीत; दुर्गुण; खोड. 'दुस- ऱ्यास वेडावूं लागल्यापासून त्याला तोतरें बोलण्याची लकब लागली.' २ धाटणी; पद्धति; शैली; ढब. ' बोलण्याची चालण्याची, लिहिण्याची लकब.' ३ आसक्ति; व्यसन. [अर. लकब् = टोपण नांव]
लो
पु. (काव्य) लय; नाद; छंद; व्यसन. 'पुढें लो लागला खेळाचा ।' -दा ३.२.२२. [लय]
लष्टन-म
न (व.) १ व्यसन. 'हें लष्टन नवें लागलें.' २ लचांड.
माड
पु. नारळाचें झाड. म्ह॰ आडो माडो समुद्रासारखा वाढो (मुलाला न्हावूं घालतांना स्त्रिया म्हणतात). = माडाप्रमाणें उंच व समुद्राप्रमाणें विस्तार पावो या अर्थी. ॰उतरणें, वहाणें- माडाची माडी काढणें व विकणें. सामाशब्द- ॰पीर-पु. ताडी पिण्याचें व्यसन असणारा; नारळसंत. [माड + फा. पीर] ॰बाग- पु. (हेट.) नारळीच्या झाडांचा बाग. माडागूण, मांडागूल- ळ-नपु. (कों.) नारळी, ताड यांस येणारा शेवटचा सुयरा, कोंका, पोय. [माड + अगूळ, अग्र] माडागौड-पु. (गो.) माडीपासून तयार केलेला गूळ.
नादावणे
अक्रि. १. (फुटक्या भांड्याचा) बद्द आवाज होणे. २. (ल.) (भांड्यात) दोष असणे; फुटके, व्यंगयुक्त असणे. ३. बाहेर फुटणे; स्फोट होणे. ४. आसक्त होणे; नादी, मागे लागणे. ५. नावाचा बोभाटा, दुष्कीर्ती होणे (व्यभिचार, व्यसन इ.मुळे); लोकांच्या चर्चेचा विषय होणे. ६. एखाद्याच्या वर्तनामुळे काही नुकसान, तोटा झाला असा समज करून घेऊन त्या माणसासंबंधी उपरोधाने, रागाने बोलणे.
निर्ढावणे
उक्रि. १. सहन करण्याची सवय होणे. २. (मडके) पाझरण्याचे थांबणे; पाझरणार नाही असे करणे; वापरामुळे अधिक उपयुक्त होणे. ३. व्यसन इ.विषयी निर्लज्ज होणे; गुन्हे करण्यात सराईत होणे.
पडकणें
अक्रि. संवय लागणें; सोकणें (चांगल्या किंवा वाईट अर्थी); चटक, व्यसन. छंद लागणें; लालचावणें; सोकावणें; नादीं लागणें; चटावणें; संवकणें; लुब्ध होणें. 'पाहतां कृष्णस्वरू- पासी । आराणुक नाहीं डोळियांसी । यालागीं न .येती दृश्यापाशीं । कृष्णसुखासी पडकले ।' -एरुस्व १८.२३. [सं. प्रतिकरण]
पेटें
न. नदींतून तरण्याकरितां अनेक भोंपळें एकत्र बांधून केलेलें साधन; तराफा; सांगड; लहान नाव; पेटी. 'कारभाराचें व्यसन खोटें । जैसें फुटके पेटें ।' -अमृत ११३. [हिं. पेठा = भोंपळा] पेटेकरी-पु. १ माणसानां वरील पेट्यावर बसवून नद्यादिकांतून नेणारा इसम; सांगडवाला; नावाडी. २ ज्याच्याजवळ पेटें आहे तो.
पुरढणें, पुरढावणें
अक्रि. १ (मातीचें मडकें इ॰ कांहीं विशिष्ट कृतीनें) मजबूत करणें, होणें; रांपाविणें. निरढावणें पहा. २ (ल.) कोणत्याहि व्यसनांत पक्के करणें, मुरविणें. -अक्रि. फार व्यसन लागणें; निरढावणें; मुरणें.
फंद
पु. १ कट; बेत; बंड; कारस्थान (बहुधा वाईट गोष्टींचें, सरकार इ॰ च्या विरुद्ध). (क्रि॰ रचणें; करणें; योजणें). 'वादभेद निंदा हे फंद काळाचें । गोवितील वाचे रिकामिकें ।' -तुगा ३५७. 'फसाद लांबविणें मुनासब नाहीं ज्या प्रकारें फंद मोडेल तें करावें.' -रा ५.१७७. २ दुर्गुण; व्यसन; वाईट संवय; ढंग (द्यूत, जुगार, सुरापान, परस्त्रीगमन इ॰). ३ छंद; नाद; खोड. 'दे टाकुनि हे छंद वावुगे फंद विषयाची काय मजा ।' -अफला ६१. ४ प्रेमसंबंध; प्रेमविलास; चोरून परस्त्रीशीं संबंध ठेवणें. 'वाटतो तुशी करावा फन्द । गडे हा पूर्वीचा ऋणानुबन्ध ।' -पला ३२. ५ धुंदी; उन्माद. 'यशाच्या फंदात निमग्न झाले होते. तों गर्वाचें घर खालीं.' -भाब ८२. ६ कौटिल्य; फसवणूक. ७ थट्टा; कुचेष्टा. -शर [फा. फन्द] ॰छंद-पुअव. छक्केपंजें; फसवणूक; ठकबाजी. (प्र.) छंदफंद पहा. ॰फरेब-पु. कौटिल्य; लबाडीचे डावपेंच. 'ब-फजल-इलाहि आँमेहेर्बां दूरंदेश व कुलाह्पोश याचे फंदफरेबास खूब वाकीफ.' -पया ४६३. [फा. फन्द + फरेब] ॰फरेबी-वि. कुटिल; धूर्त; लबाड. ॰फितुरी-फितूर-स्त्रीपु. १ (व्यापक) कट; फितूरी; बंडखोरपणा; दगलबाजी; स्वामिद्रोहाचें कारस्थान; दगा इ॰ २ बंडाळी; क्रांति. ॰फुरई-स्त्री. १ (सामा.) बंडावा; दगलबाजींचीं, स्वामिद्रोहाचीं कृत्यें. २ बंडखोरीबद्दल दंड. [फंद द्वि.] फंदी-वि. १ वाईट नाद असलेला; छंदी; व्यसनी (माणूस). दगलबाज; फंदफितूर करणारा. 'दोघेहि फन्दी व मकरी. त्यांची उपेक्षा करणें सलाह दौलत नाहीं' -रा १९.१००. ३ विलासी; षोकी; चैनी. ४ (व.) लुच्चा. [फंद] ॰छंदी-वि. (प्र.) छंदी- फंदी; दुष्ट कारस्थानें रचण्याकडें प्रवृत्ति असलेला; कुलंगडीं करणारा. ॰फांकडा-वि. छानछोक; नखरेबाज; चैनी; विलासी. [छंद]
सख्य
सख्य sakhya n (S) Companionship, consociation: also friendship or amity. Ex. of comp. साधुसख्य, राज- सख्य, स्त्रीसख्य, दुष्टसख्य, सत्सख्य, विद्वत्सख्य, मित्रसख्य. 2 Fellowship or communion with the Deity. Ex. ह्यासी आठ पायरिया देदीप्यमान ॥ श्रवण मनन कीर्त्तन ॥ पादसेवन चौथें पैं ॥ अर्चन वंदन दास्य सख्य ॥. समानशीलाचें सख्य Union or association together of persons of congenial disposition: also that union which consists in congeniality of disposition. समानव्यसनाचें सख्य See under व्यसन. समानशील- व्यसनैषुसख्यं Friendship (is or must be) with persons of congenial dispositions and similar habits.
समान
समान samāna a (S) Even, level, smooth. 2 Like, similar, equal. In this sense useful compounds occur, and others wait to be evoked by the proficient. Ex. समानगोत्र, स0 जाति -धर्म -दुःख -सुख- दुःख -बल -सामर्थ्य -पराक्रम, -प्रताप -विभव -विक्रम -व्यसन, समानोद्देश, समानोद्योग &c. Such, being of obvious sense or power, occur not in order. 3 One, same, identical.
सट्टा
पु. १ सौदा; व्यवहार; विनिमय. २ जोखमीचा व्यापार, व्यवहार; पुढें मालाची किंमत चढेल किंवा उतरेल याचा अंदाज बांधून आगाऊ केलेला व्यवहार. ३ मक्ता; कंत्राट; ठेका. [देप्रा. सट्ट = विनिमय; हिं. सट्टा] सट्टाबट्टा-पु. व्यापारी व्यवहार; देवघेव; विनिमय; अदलाबदल; सराफी. सट्टेबाजी- स्त्री. सट्टा करण्याचा नाद, खोड, व्यसन. सट्टी-स्त्री. (व.) वशिला; शिफारस; संधान. 'त्यानें कोणीकडून सट्टी लावली कळलें नाहीं पण नोकरी मात्र शानदार पटकावली.'
तापणें
अक्रि. १ (सूर्य, अग्नि, ज्वर इ॰ कांच्या योगानें पर्वत, शरीर इ॰ तप्त होणें. २ (ल.) (काम, क्रोध इ॰ विकारांनी) क्षुब्ध, संतप्त, उद्दीपित होणें; संतापणें; रागावणें. ३ (ल.) (दुःख, शोक इ॰ कानीं) तळमळणें; व्याकुळ, घाबरें होणें; पोळणें; 'अनुदिनि अनुतापें तापलों रामराया ।' -रामदास-करुणाष्टक १. (नवनीत पृ. १७०). 'करूं वरि कृपा हरूं व्यसन दीन हा तापला ।' -केका ९. ४ (विषयवासना, तृष्णा) चेतणें; उद्दीपित, प्र/?/ब्ध होणें; विकोपास जाणें. ५ (व.) शेकणें. [ताप] (वाप्र.) गळा तापणें-कांही वेळ गायन केल्यानें कंठांतून बराच मोठा स्वर निघावा अशी दशा होणें. तापल्या तव्यावर (पोळी) भाजून घेणें-एखाद्या कार्यांत दुसरें कार्य सहजासहजीं होण्यासारखें असल्यास अवश्य करून घेणें; वाहत्या गंगेत हात धुणें. तापल्या पाठीनें-क्रिवि. अंगांत उमेद, जोम, ताकद आहे तोंपर्यत. म्ह॰ तापल्या पाण्याला चव नसते. मैत्रीचा एकदां भंग झाला तर ती पुन्हां पूर्ववत् सुखकारक होत नाहीं.
ताऱ्या
वि. १. दारूबाज; अंमली, मादक पदार्थांचे व्यसन असणारा. २. कंटाळा येईपर्यंत एकाच गोष्टीची घोकणी, जपमाळ घेऊन बसलेला.
तार्या
वि. १ दारूबाज; अमंली; मादक पदार्थांचें व्यसन असलेला. २ कंटाळा येईपर्यंत एकाच गोष्टीची घोकणी, जपमाळ घेऊन बसणारा. [तार = धुंदी]
तलब
स्त्री. १ वाईट व्यसन; खोड; चटक; चट. २ व्यसनी मनुष्यास व्यसनाच्या पदार्थाच्या सेवनाची होणारी तीव्र इच्छा, हुक्की. ३ पगार; तनखा; मजुरी; मुशाहिरा. तुंबलेला पगार. ४ सावकारानें, सरकारनें कुळाकडे केलेली पैशाची, वसुलाची मागणी, तगादा. 'अविंदाचें राज्य बेदरीं असतां । कागद पाहतां तलब केली ।' -तुग ४४३६. ५ सरकारी बोलावणें; ह्ज्जर राहण्याबद्द- लचा हुकूम; (इं.) समन्स्. 'बोलाविलें तैं करोनि तलब ।' -दावि २०२. 'हें जाणून त्यास तलब करून हुंजूर आणिला.' -चित्रगुप्त ७८. ६ समन्स बजावणार्या, वसुलाचा तगादा करणार्या शिपा- याचा रोजमुरा, मजुरी. ७ (सामा.) बोलण्याची क्रिया; आमंत्रण; बोलावणें. 'देखोनियां राजा संतोष पावला । म्हणे व्यर्थ त्याला तलब केली ।' तलफ पहा. ८ वरात; मागणी. 'त्यास आपली तलब रुपये एक हजार.' -वाडबाबा १४१. [अर. तलब्] सामाशब्द- ॰तनखा-तन्खा-स्त्री. पगारखर्ची. 'पाचशें गोर्यांची तलब तनखा वरचेवर तुम्ही पाठवीत जावी.' -दिमरा २.१०६. ॰दार- वि. १ व्यसनाच्या पदार्थाची तलब ज्यास येते तो. २ पगारदार. ३ पैशाची, वसुलाची मागणी, तगादा करणारा; (इं) बेलिफ्. ४ चौकशी करणारा. तलबाना, तल्बाना-पु. १ वसुलाचा तगादा करणार्या सरकारी शिपायास, बेलिफास कुळानें द्यावयाचा भत्ता, रोजमुरा; तगाद्याची दस्तुरी; (इं.) प्रोसेस् फी. 'नाजराणा व तल- बाना वगैरे कुलबाब पाहिजें.' -वाडबाबा १.४९. २ (सामा.) रोजमुरा पगार; मुशाहिरा. 'सोळा रोज प्रत्यह तल्बाना गाडदी यांस द्यावा; लागतो.' -ख १.४४४. [फा. तल्बाना] तलबी- वि. व्यसनी; तलफी पहा. [तबल]
तलब
स्त्री. १. वाईट व्यसन; खोड; चटक; चट. २. व्यसनी मनुष्याला होणारी व्यसनाच्या पदार्थांच्या सेवनाची तीव्र इच्छा; हुक्की. ३. पगार; तनखा; मजुरी; मुशाहिरा; तुंबलेला पगार. ४. सावकाराने, सरकारने कुळाकडे केलेली पैशाची, वसुलाची मागणी; तगादा : ‘अविंदाचें राज्य बेदरीं असतां । कागद पाहतां तलब केली ।’ – तुगा ४४५६. ५. सरकारी बोलवणे; हजर राहण्याबद्दलचा हुकूम : ‘बोलाविलें तैं करोनि तलब ।’ – दावि २०२. ६. समन्स बजावणाऱ्या, वसुलाचा तगादा करणाऱ्या शिपायाचा रोजमुरा, मजुरी. ७. (सामा.) बोलावण्याची क्रिया; आमंत्रण; बोलावणे. ८. वरात; मागणी : ‘त्यास आपली तलब रुपये एक हजार.’ – वाडबाबा १४१. [अर.तलब्]
वारणें
उक्रि. १ परावृत्त होणें, करणें; प्रतिबंध करणें; प्रति- कार करणें; टाळणें; चुकविणें; बाजूस करणें, सारणें (एखादें अनिष्ट वगैरे). 'शरणागत व्यसन तों स्वयें वारणें ।' -केका ५६. २ हात वगैरे हालवून घालवून देण, दूर करणें, हांकून देणें (माशा वगैरे). 'तुम्हां लागोनिलियां गौमासिया । तरि वारां जा कां ।' -शिशु २१९. ३ फेडून टाकणें; मुक्त करणें (कर्ज वगैरे). ४ फिरविणें; हलविणें; ढाळणें (चवरी, मोरचेल वगैरे ). 'तें चामरे वारिती निर्विकारी ।' -सारुह ५.२९. ५ सांगण; कथन करणें. 'वैद्य पथ्य वारूनि जाये ।' -ज्ञा ३.८. ६ वाटेस लावणें; संभावना करण. 'भाटातें उचितीं वारितू ।' -शिशु ५२१. -अक्रि. १ (सांके- तिक) मरणें. २ संपणें; नाहींसें होणें; दूर होणें; टळणें; निभावणें. 'हळू हळू त्यांचें पुण्य जातें वाड । वारतें हें जाड तिमिराचें ।' -तुगा ४०. 'हल्लीं गडबडही वारली ।' -समारो १.९. [सं. वा् = टाळणें]
वेसण
(सं) स्त्री० व्यसन, वाईट सवय. २ बैलादिकांच्या नाकांतील दोरी.
वेसन
वेसन vēsana n (Properly व्यसन) Inordinate liking or taking to, addictedness: also a bad habit; a vitious practice or trick.
वेसन n (Prop. व्यसन.) Addictedness. A bad habit.
वीस
वि. २० संख्या. [सं. विंश(ति); प्रा. वीस; पं. बीह; सिं. वीह; फ्रें. जि. वीश-स] म्ह॰ वीसां नाहींतर तिसां नाहीं तर जशाचा तसा = विसाव्या वर्षी शहाणपण नाहीं आलें तर तिसाव्या वर्षीं येईल पण तिसाव्या वर्षीहि न आलें तर मात्र तो (मनुष्य) आहे तसाच जन्मभर राहणार. विशी एकूणविशी- वीस होते ते एकूण वीस होणें म्हणजे कमी प्रमाण असणें. 'आतां आपली प्रकृती कशी आहे? कांहीं विशी एकूणविशी वाटतें का?' -रंगराव ॰नखी-नखीचा-वि. १ (ना.) वीस पाय असलेला (एक क्षुद्र विषारी प्राणी). २ स्त्रीबद्दल सांकेतिक शब्द. -संगीत घोटाळा ११. ३ वीस बोटें असलेला (कुत्रा इ॰ प्राणी). ४ गरमी रोग. वीस नखीची-नखांची बाधा-स्त्री. १ (बायकी) गर्भारपण; पोटिशी राहणें. 'कसला रोग अन् कसलें काय? -वीस नखांची बाधा झालेली.' -झांमू. २ गरमी. ३ व्यभिचाराचें व्यसन. वीसोवा-पु. विसावा हिस्सा. पाटण शिलालेख शके ११२८. [सं. विंशोपक]
रंडा
स्त्री. १ विधवा स्त्री; रंडकी. २ जारिणी; स्वैर स्त्री. [सं.] रंडका-वि. १ गरीब; निरुपयोगी. २ विधवा (स्त्री.) अगर विधुर (पुरुष). ३ (ल.) नागवा; उघडा; नंगा; कफल्लक; दरिद्री; कृपण; करुणास्पद स्थिति असलेला. ४ फायदा नसलेला; निरुपयोगी. [रंडा] ॰अमल-पु. बायक्या, जनानी, नामर्द स्त्रीबुद्धि मनुष्याचा कारभार. रंडगोलक-पु. गोलक नांवाचा वर्ग व त्यांतील व्यक्ति; विधवेच्या ठायीं जारापासून उत्पन्न झालेली संतति. रंडागीत-न. १ विधवेची कहाणी, गीत. २ विधवेच्या शोकासारखें गाणें. (ल. वाईट काव्यास म्हणतात). 'रंडागीतानि काव्यानि' [सं.] ॰पंडित-वि. बायकांत निर्लज्जपणें बोलणारा; थापा मारणारा; बढाई मारणारा. [सं.] रंडापति-वि. १ ज्यानें रांड बाळगिली आहे असा. रंडीबाज; छिनाल. २ (ल.) बांयक्या; बाइलबुद्धया; ॰पुत्र-पु. आई विधवा झाल्यावर अगर बाप मेल्यावर जन्मास आलेला पुत्र, मुलगा. [सं.] ॰प्रिय-वि. १ विधवांची आवड असलेला. २ बाइलवेडा; स्त्रीचा नादी; स्त्रीलंपट; स्त्रैण. रंडी-स्त्री. (हिं.) १ वेश्या; नाचणारी स्त्री. २ दासी; रखेली. ३ पत्त्याचे खेळांतील राणी. [सं. रंडा] रंडी- बाज-वि. वेश्या इ॰ रंडीचें ज्यास व्यसन आहे तो; बाहेर- ख्यांली, व्यभिचारी; परस्त्रीगमनी; वेश्यागमनी. रंडीबाजी- स्त्री. १ वेश्यागमन; बाहेरख्यालीपण. २ (क्व.) रड्डीऐवजीं उपयोग करतात. रंडुला, रंडोला-वि. १ बायक्या. २ स्त्रैण; बाइल- बुद्धया. [रांड] रंडेय-पु. रंडीपुत्र; वेश्यापुत्र; विधवापुत्र; अनौरस मुलगा.
शुद्धि
स्त्री. १ शुद्धता; स्वच्छता; पावित्र्य; निर्मलता; निर्दोषता; निष्पापता. 'तया काळातें नुलंघणें । देशशुद्धिही साधणें ।' -ज्ञा १८.६३६. २ शोधन; स्वच्छ, निर्मल, पवित्र करण्याची क्रिया. उदा॰ देहशुद्धि; पात्रशुद्धि; स्थलशुद्धि. ३ बरोबर, विनचुक, निर्दोष करण्याची क्रिया, किंवा तशी स्थिति; निर्दोषता; निष्पापता; बिनचूकपणा. ४ ऋजुता; सरळपणा; चांगलेपणा; अशुभता; अमंगलता यांपासून अलिप्तता. उदा॰ दिनशद्धि; नक्षत्रशद्धि. ५ देहभान; जागरूकता; सावधानता; स्मृति; चेतना; आठवण; सावधपणा; मूर्छना, बेशुद्धि, भ्रांति, भ्रम यांपासून अलिप्तता. 'यांची कां रे गेली बुद्धी. नाहीं तरायाची शुद्धि ।' -तुगा ३५५. ६ शोध; तपास; विचारणा; खबर; बातमी; वार्ता. 'त्यानें सांगितली त्याला माझी शुद्धि । त्या कवीची बुद्धि समदृष्टि ।' -मोअभंग (नवनीत पृ. २६०). 'जगचि हें होय जाये । तो शुद्धिही नेणें ।' -ज्ञा ५.७९. [सं. शुध्] शद्धीवर आणणें-देहभानावर आणणें; मार्गा- वर आणणें; योग्य दशेप्रत आणणें. शुद्धीवर येणें-देहभाना- वर येणें; सावध होणें; योग्य मार्गावर येणें; दोष, व्यसन टाकून देणें. ॰पत्र-न. १ ग्रंथांतील चुकांची दुरुस्ती दाखविणारें पान, पत्रक; शोधपत्र. २ एखाद्या मनुष्यास पातकक्षालनार्थ प्राय- श्चित्त देऊन शद्ध करून घेतल्याचा दाखला; परधर्मांतील गृह- स्थास प्रायश्चित्तादि विधीनें शुद्ध करून स्वधर्मांत अगर जातींत घेतल्याबद्दलचें प्रमाणपत्र. ॰सूची-स्त्री. शद्धिपत्र; शोधपत्र; चुका व त्यांची दुरुस्ती यांचें पत्रक.
घेणें
सक्रि. १ स्वीकारणें; अंगीकारणें; (आपल्या) हातांत येईलसा करणें. 'त्यांत घेऊं ये तितुकें घ्यावें ।' -दा १५.९.३२. 'घेयीं तूं मधुपर्क पावन बरें सद्धेमपात्रीं असे ।' -निमा १.१३. २ धरणें; पकडणें; हिसकणें; झोंबाडणें. 'जे घेय हातीं बरवी विपंची ।' -सारुह १.२. ३ लागणें; बसणें; मिळणें (मार इ॰). 'तेथें गेलास तर मार घेशील.' ४ समजणें; मानणें. 'येथ दुजें नाहींचि घेई । सर्वत्र मी गा ।' -ज्ञा १५.४११. ५ ऐकणें. 'वाक्य घेऊनि हरुषली आई ।' -दावि १६०. 'तुवां सजणे हा समाचार घेतां' -र ११. ६ समाविष्ट, प्रविष्ट, अंतर्भूत करणें; आंत येऊं देणें. 'त्या माणसास जातींत घेतलें.' ७ कवटाळणें; कैवार घेणें; पत्करणें; स्वीकारणें; अंगीकारणें; उचलणें (पक्ष, बाजू, धर्म इ॰). 'त्यानें ख्रिस्ती धर्म घेतला.' ८ कबूल, मान्य करणें; मान्यता देणें; संमति, अनुमोदन देणें; ग्राह्य समजणें. 'त्या आशंकेचें ह्यानें समाधान केलें तें तुम्ही घेतलें काय ?' ९ योग्यता, किंमत जाणणें (गुणांची); आदरणें; चांगलें लेखणें (गुणाबरोबर उपयोग). १० मनांत आणणें, बाळगणें, ठेवणें (शंका, संशय, तिरस्कार इ॰). 'मागें हांसति गौळणी हरिपुढें ह्या घेतलीसे भ्रमें ।' -आकृष्ण ३८. ११ आविर्भाव आणणें; पांघरणें; बळेनें धारण करणें (वेड, सोंग इ॰). १२ (भय, रोग, मोह इ॰ कांच्या) ताब्यांत जाणें; (ज्वर, भय, मोह, दुखणें इ॰ कानीं). घेरलें जाणें; व्यथित होणें 'आणि तेणें आपुलेपणाचेनि मोहें । तुम्ही संत घेतले असा बहुवें ।' -ज्ञा ९.१७. 'नुघडि नेत्र घे भीतिला ।' -केका १०. १३ मुकवणें; हरण करणें; नाश करणें; बुडविणें (प्राण, शील इ॰). १४ छाटणें; तोडून टाकणें; कापणें. 'तुझें नाक-कान घेईन.' 'ह्या भोताचे शेंडे चार चार बोटें घेतले म्हणजे पडणार नाहीं.' १५ लागणें; आवश्यकता असणें; खर्ची पाडणें; खपवणें; अटवणें; खाणें (वेळ, स्थळ, शक्ति). 'हें काम दोन वर्षें घेईल.' 'हें गांठाळ लांकूड फोडण्यास फार बळ घेतें.' १६ खडकावणें; खडसणें; ठोक देणें; मारणें. 'मी त्याला भल्लें घेतलें.' १७ विशिष्ट आचरण, वर्तन, कृति करणें (उ॰ शोध, वाद, गांठ, लढाई, माप घेणें); शोध घेणें = तपास करणें; चौकशी करणें; वाद, लढाई घेणें = वाद, लढाई उपस्थित करणें; माप घेणें = मोजणें (लांबी, रुंदी इ॰ मध्यें); उडी घेणें = उडी टाकणें; गांठ घेणें = बांधणें इ॰. १८ हस्तगत करणें; मिळवणें; पैदा करणें; शोधून, मिळवून आणणें; संपादन करणें (खबर, बातमी, चाहूल, पायरव). १९ हातानें देणें; उचलून देणें; जवळ नेणें. (ह्या अर्थीं नेहमी आज्ञार्थींच प्रयोग होतो). 'ती दौत इकडे घ्या.' २० जोडणें; मिळविणें; स्वतःवर आणणें; ओढून घेणें (उपहास, निंदा, मार); विषय होणें (निंदा, मार इ॰ चा). 'अरे पोरा दाटीमध्यें तुडवून घेशील.' 'मारून, हांसून, घांसून, नागवून घेशील.' २१ पलीकडे जाणें; ओलांडणें (डोंगर, विशिष्ट स्थिति); संपविणें; शेवटास नेणें; सिद्धीस नेणें (प्रवास, मजल इ॰). 'त्यानें दहा कोसांची मजल घेतली.' २२ जोडणें; सामील करणें; वाढविणें. 'हा ओटा फार अरुंद झाला, आणखी दोन हात घे.' २३ स्वतःस जोडणें; जडवून घेणें; लावून घेणें (संवय, खोड, व्यसन). २४ आणणें; घालणें; माथीं मारणें; अंगाला चिकटविणें (आरोप, आळ, बालंट, तुफान). २५ (एखाद्या वस्तूनें दुसर्या वस्तूचा स्वतःवर) परिणाम होऊं देणें; विकार पावणें; परिणाम लागू करून घेणें. 'ओलें लांकूड आग घेत नाहीं.' 'तेलकट वस्त्र पाणी घेत नाहीं.' २६ जवळ येऊं देणें, पाजणें. 'ती गाय वासरूं घेत नाहीं.' २७ मारणें; बळी घेणें; नाश करणें. 'ही नदी, हें तळें, ती विहीर वर्षांत एक माणूस घेते.' 'माझा भाऊ भुतानें घेतला.' २८ जाणें; पळून जाणें; एखाद्याचा आश्रय करणें. 'काळयवन भेणें थोर । तेणें घेतलें गिरिकंदर ।' २९ स्थापणें; ठेवणें; आदरानें स्पर्श करणें 'येऊनि तुजजवळीं । चरण घेतिल तव भाळीं ।' -रत्न १७. ३० वळणें; कल होणें; एखादी गोष्ट करावयास तयार होणें (मन इ॰ नी). 'त्यामुळें ह्याचा शब्दशः अर्थ करण्यास आमचें मन घेत नाहीं.' -मसाप २.११७. ३१ (बुद्धिबळांचा खेळ) एकानें दुसर्याचें मोहरें मारणें (कित्येक वेळीं क्रियापदाच्या पुढें घेणें याचें रूप मन सोक्तपणें लावतात. अशा ठिकाणीं तें कारक हा क्रियेचा कर्ता आहे असें दाखवितें; तर कांहीं ठिकाणीं शब्दावर जोर देण्या- करितां त्याचा उपयोग करतात; विशेषतः कर्त्याविषयीं जोरानें बोलावयाचें असल्यास क्रियापादास जोडून घेणें याचा प्रयोग करतात. परंतु सामान्यतः अशा वाक्यरचनेनें विशेष अर्थ ध्वनित होत नाहीं व वाक्य चांगल्या रीतीनें पुरें करण्याकरतांच केवळ याचा उपयोग करतात. 'पोरानें हात पोळून घेतला.' कांहीं वेळां एखादी क्रिया आटोपून, उरकून टाकणें या अर्थीं पूर्वकालवाचक धातुसाधितास घेणें हा शब्द जोडतात. उ॰ स्नान करून घ्या; मी भात शिजवून घेतों; हें तुम्ही शिजवून घ्या. इतक्या ब्राह्मणांस गंध लावून घेतों आणि वाटी स्वाधीन करतों).' घेऊं देणें-या शब्दसंहतीचा उपयोग पूर्वकालवाचक धातु- साधितांना जोडून करतात. अशा वेळीं त्याचा अर्थ एखाद्यास एखाद्या क्रियेचा विषय, त्या क्रियेच्या आधीन होऊं देणें किंवा एखाद्यानें स्वतःकरतां एखादी गोष्ट करणें असा होतो. जसें- 'रडून-जेवून-पिऊन-बसून-उठून-धुवून-घेऊं दे.' घे म्हटल्या, घे म्हटल्यावर-क्रिवि. (जी जी गोष्ट, कृत्य करतां येईल ती ती गोष्ट, कृत्य करण्याला जे धडकावतात अशा अडदांड व तापट लोकांच्या रीतीला अनुलक्षून हा विशिष्ट प्रयोग रूढ झाला आहे) उतावीळपणानें; एकदम; विचार न करतां. 'तो घे म्हटल्या शिव्या देणार नाहीं.' घ्या-क्रि. इकडे पहा; हं पहा (लक्ष्य वेध- ण्याकरतां याचा उपयोग करतात). (घेणें ह्या क्रियापदाचे निरनिराळ्या संबंधांत अनेक प्रयोग होत असल्यानें ह्या स्थळीं सर्व देतां येणें शक्य नाहीं). उत्थापन-वर-चालीवर- जागा-शेवट-तोडीवर-त्वरेवर-घाव-परीक्षा-पाठ-रान-इ॰ अनेक शब्दांना जोडून घेणें या क्रियापदाचा प्रयोग होतो. त्याचप्रमाणें देणें; टाकणें; मारणें; घालणें व पाडणें या धातूं- प्रमाणें अनेक धातुसाधितांना जोडूनहि घेणें शब्दाचा प्रयोग करतात. उ॰ आटोपतां-कांकरतां-चालतां-काढतां-घेणें. श्वास, रजा, सूड इ॰ शब्दांना जोडूनहि घेणें या क्रियापदाचा उपयोग होतो. शिवाय उपयोग करणें; गिळणें; सहन करणेः सोसणें (रोग, व्यसन इ॰); जडवून घेणें इ॰ अनेक अर्थ होतात. म्ह॰ घेऊं जाणतो, देऊं जाणत नाहीं. [सं. ग्रह्; प्रा. गेण्ह; झें. गेरेप्; गॉ. ग्रेइप; जर्म. ग्रेफ; लिथु. ग्रेब्जु; स्ला. ग्रॅबल्जु; हिब्रू ग्रबैम; ग्री. ग्रीफॉस; लॅ. गेरो; पोलि. गार्निआक]
मोडणें
सक्रि. १ तोडून खाली टाकणें, पाडणें; नाश करणें; बिघाड करणें, (इमारत इ॰); विस्कळित करणें; भग्न करणें; नाहींसें करणें (मोडणें आणि तोडणें ह्या दोन्हीहि क्रियापदांचा हा सर्वसामान्य अर्थ आहे. तरी पण दोहोंच्या अर्थांत बराच भेद आहे. (तोडणें पहा.) तोडणें याचा अर्थ कांहीं तरी मोठें, अचा- नक. भयंकर कृत्य करून तीक्ष्णधारी जोरकस हत्याराचा उपयोग करून किंवा जोरानें किंवा एकदम हिसकून एखाद्या वस्तूचा नाश करणें. आणि मोडणें म्हणजे पदार्थाच्या आकारांत, स्थितींत बदल करणें. उदा॰ रान तोडणें आणि रान मोडणें हे दोन वाक्प्रचार घेतले तर पहिल्यांतील तोडणें याचा अर्थ रानांतील झाडें तोडून, छाटून, खांडून नाहींशी करणें व मोडणें याचा अर्थ रानांतील झाडाझुडूप काढून साफसफाई करणें असा अर्थ ध्वनित होतो.) जसें:-देशपद्धति मोडणें. 'त्याचें लग्न त्यानें मोडलें.' २ तुकडे करणें; भाग किंवा अवयव वेगवेगळे करणे (यंत्राचे इ॰). ३ वांक- वून तुकडा करणें (कांठी, वेत, लांकूड इ॰चे) खुडणें. (धान्याचीं कणसें, भुट्टे इ॰). 'जादुगारानें काठी मोडलेली आम्ही पाहिली.' ४ तोडणें; नाहींसा करणें (मैत्री, संगत, दुकानदारी, व्यवहार इ॰). ५ विस्कळित होणें; विस्कट होणें; पांगापांग होणें (बाजार, मंडळी, सभा, कौन्सिल इ॰ची). 'म्हैस उधळल्यामुळें सभा मोडली.' ६ खुरादा किंवा नाणें करून आणणें (मोहरा, रुपया यांचें) 'एक रुपया मोडून नाणें, खुर्दा घेतला.' पैसे करणें; (दागि- न्याचे, धातूच्या भांड्याचें). विक्री करून पैसे घेणें (जनावरांचे, वस्तूचे). ७ भंग करणें; अडथळा करणें; बिघाड करणें (झोपेचा, शांततेचा, चालू कामाचा, उद्योगाचा इ॰). ८ बिघडविणें; नाखूश करणें; अवमानणें (मन, मर्जी, इच्छा, हेतु). 'पितृसत्यपालना प्रभु कैकेयीचें न चित्त मोडून ।' -मोरामायणें १.४८४. ९ बिघाड करणें; रचना, जुळणी नाहींशी करणें; विस्कटणें (पागोटें, निऱ्या इ॰). १० नाहींशी करणें; ओसाड पाडणें; (वस्ती, गांव, वसाहत). ११ खंडण करणें; पाडाव करणें (पक्ष, मत, वाद, इ॰चा). १२ खर्च करणें; नाश करणें; गमावणें; घालविणें; बुडविणें (वेळ, काळ, दिवस). १३ जोर हटविणें, नाहींसा करणें; शमविणें; दाबून टाकणें; घालविणें. (तहान, भूक, काळजी, संशय, भय). १४ जिरवणें; कमी करणें; घालविणें (खोड, व्यसन, गर्व, इ॰). १५ स्थिरस्थावर करणें; सांत्वन करणें; नाहींसें करणें (भांडण, झगडा, दंगा). १६ भंग करणें; अतिक्रमण करणें; उल्लंघन करणें (कायदा, हुकूम, आज्ञा, वचन, करार इ॰). १७ रद्द करणें; बंद करणें; काढून टाकणें (कायदा; नियम, विधी, संस्कार, समारंभ). १८ दिवाळें काढणें; नाश करणें; मोडतोड करणें. १९ पुसून टाकणें; नाहींशी करणें; खरडून टाकणें; मागमूस दिसूं न देणें. 'गाडीची वाट फेसाटीन मोडावी.' मोडणें हें तोडणें या क्रियापदाहून भिन्न आहेच परंतु याच अर्था- सारखें भासणारें फोडणें या क्रियापदाहूनहि भिन्न आहे. फोडणें पहा. मोडून टाकणें-काढणें-१ म्हणणें किंवा बोलणें खुंटविणें; गोंधळविणें; कुंठित करणें; निरुत्तर करणें. २ पराजित करणें; फजित करणें. 'त्याचा हा परिपाक आजि दिसतां या पंडिता मोडिलें ।' -सारुह ६.६४.
मोडणें mōḍaṇēṃ v c (मुट or मुड S) To break. This is the general sense both of this verb and of the verb तोडणें, but the implications and aspects of the two verbs are very different: the difference however it is not difficult to apprehend and state. तोडणें implies Severing or sundering by some violent action (not by pounding, or by beating with anything ponderous or massive, but) by forcible application of some edged instrument, or by sudden and smart pulling. तोडणें therefore is Hewing, hacking, slashing, chopping, cleaving, riving, splitting, lopping; also snapping, bursting, rending, ripping, plucking: whereas मोडणें is to be explained as implying Dissolution or destruction of the FORM OF STATE, and whether with or without violence. मोडणें therefore is Battering, bruising, shattering, smashing, demolishing, razing, crushing, routing, scattering, disbanding, quashing, subduing, taming (i. e. reducing to humbleness or weakness), violating, infringing, stopping (causing to cease), interrupting, disturbing, suspending &c. &c., and almost throughout the senses both literal and figurative of all these words. Attentive study of the following particular significations and popular applications of this verb, and also of those appearing under तोडणें, will empower the learner to discern the sense BREAK pervading the explication of both the verbs; to apprehend the distinction here made betwixt them; and both to understand them in the mouths of the people, and to apply and use them upon his own occasions. 1 To break down; to demolish, to destroy, to raze (a building). 2 To break up; to break into its parts or elements (a machine or compacture). 3 To break by bending (काठी, वेत, लाकूड, a stick &c.): also to break off or to bend down (कणसें, भुटे, heads of corn). 4 To break up or to break off (मैत्रकी, संगत, दुकानदारी, व्यवहार, friendships, associations, business). 5 To break up; to dissolve, disband, dismiss (बाजार, मंडळी, a market, a council, any meeting or assembly): to rout, disperse, scatter (an army, a crowd). 6 To break, reduce, change (मोहरा, रुपये, high monies into low): to break down; to reduce into the metal (नाणीं, डागिने, coins, trinkets): to turn into cash; to dispose of by sale (an animal or an article). 7 To break up; to destroy, disturb, interrupt (sleep, quiet, any settled state or any proceeding business). 8 To break, destroy, displease (मन, मर्जी, one's mind, desire, purpose, pleasure). 9 To break up; to destroy the structure, order, or fashion of (पागोटें, निऱ्या, any arrangement or adjustment). 10 To break up, depopulate, desolate (वस्ती, a village or a habitation). 11 To break, knock down, redargue, confute (पक्ष, मत, वाद, a side, cause, dogma, argument). 12 To spend, destroy, consume, kill (वेळ, काळ, दिवस, time, days). 13 To break the force of; to quench, extinguish, appease, settle, remove (तहान, भूक, काळजी, संशय, भय). 14 To break; to bring down, suppress, subdue (खोड, व्यसन, गर्व, खय, vices, tricks, pride, conceit). 15 To break; to put down, quell, crush, compose, settle (an insurrection, tumult, quarrel). 16 To break, infringe, violate (laws, orders, promises, engagements). 17 To abrogate or abolish (ordinances, rites, customs). 18 To reduce to bankruptcy or to ruin, to break. 19 To efface, obliterate, extinguish, annihilate. Used in numerous applications; and answering to Blot out, wipe out, rub out, make to cease. Pr. गाडीची वाट फेसाटीनें मोडावी. 20 मोडणें, as signifying To break down into some other form or state, is contradistinguished, not only from तोडणें To break by cutting or sudden pulling, but also from फोडणें To break or burst open. See फोडणें. Again, मोडणें To break down &c. and तोडणें To cut (down, up, off) are well contradistinguished in the phrases रान मोडणें & रान तोडणें, the first importing To abolish the woody form or character of a place; the second, To hew down or to lop the trees--the first, to destroy or remove the woodiness, the second, to hew the wood. Again, मोडणें, तोडणें, & फोडणें may be distinguished thus:--घर मोडणें To break down a house; घर तोडणें To break up a house; i. e. to disperse or divide the members of a household; घर फोडणें To break through or into a house. Lastly, मोडणें, as from the Sanskrit root मुट To destroy the form or state, is but the Latin Mut-o To change. गांव-रान-घरें मोडणें To go over or roam through a village, a wild, houses or dwellings; with implication (generally) of unprofitable trudging. मोडून काढणें or टाकणें To foil or non-plus in argument; to confound, confute, pose.
रांड
स्त्री. १ (निंदार्थी) विधवा. २ दासी; कलावंतीण; वेश्या. ३ (तिरस्कार, राग किंवा अनाथ स्थिति दाखवावयाची असतां) स्त्रीजात; बायको. 'तुझी रांड रंडकी झाली.' -नामना १२. ४ (निरुद्योगीपणा, नवरा मेलेल्या स्त्रीच्या स्थिती- प्रमाणें) बिघडलेली, अतिशय खलावलेली स्थिति; दुर्दशा. 'यंदा शोतों चांगलीं आलीं होती पण आंत पाणी शिरून अवधी रांड झाली.' ५ (निंदेनें) भित्रा, नीच, नामर्द मनुष्य; युद्धांतून पळून जाणारा सौनिक. 'म्यां न वधावें पळतां चाला मारूनि काय रांडा या ।' -मोकर्ण ३५.६०.[सं. रंडा] म्ह॰ रांडेच्या लग्नाला छत्तीस विघ्नें. (वाप्र.) रांडेवा-वि. १ बेकायदेशीर संबंधापासून झालेला. २ (ग्राम्य.) पादपूरणार्थक किंवा उद्गारवाचक शब्द. ३ एक ग्राम्य शिवी. रांडेचा, रांडचा मारलेला-वि. स्त्रीवश; स्त्रीलंपट रांडे(डि)च्यानो-उद्गा॰ (बायकी) रखेली पासून झालेल्या मुलांना उद्देशून बोललेल्या शब्दावरून पुष्कळदा आश्वर्य व्यक्त करण्याकरितां पण क्वचित् निर्थकपणें निघणारा उद्गार. रांडवोचून पाणी पीत नाहीं-आपल्या बायकोला एखादा कठोर शब्द बोलल्यावांचून तो पाण्याचा थेंब सुद्धां पीत नाहीं (सतत शिव्या देणार्या नवर्यासंबंधीं म्हणतात). रांडेहून रांड- वि. बुळा; अतिशय बायक्या (मनुष्य). सामाशब्द- ॰अंमल-पु. १ स्त्रीराज्य. २ नेभळा, अयशस्वी कारभार. ॰काम-न. १ बायकोचें काम; गृहकृत्य. २ विधवेचें काम; बाहेरील आडकाम किंवा रानांतील गवत कापणें व सर्पण गोळा करणें इ॰ काम. ॰कार- भार-पु. १ बायकी कारभार. २ स्त्रियांचा कारभार; स्त्रियांचीं कृत्यें. ३ (निंदेनें) भिकार, मूर्खपणाचीं कृत्यें; दुबळीं कृत्यें. ॰खळी-वि. (गो.) विधवा झालेली. खांड-स्त्री. स्त्रियांस लाववयाचा रांड, बाजारबसवी, बटीक इ॰ अर्थाचा अभद्र शब्द, शिवी. 'मी त्याची कांहीं गोष्ट बोलिलें नसतां उगीच मेला मला रांडखांड म्हणतो.' [रांड द्धि.] ॰गळा-पु. १ टिपेचा सूर; तृतीय सवन. २ बायकी आवाज. [रांड] ॰गांठ-स्त्री. विशिष्ट आका- राची गांठ; ढिली गांठ. बाईलगांठ पहा. याच्या उलट पुरुषगांठ. ॰गाणें-गार्हाणें-न. पिरपिर; बायकी कुरकूर; बायकी विनंति; रडगाणें. (क्रि॰ गाणे; सांगणें). रांडगो-पु. (गो.) वेश्येचा मुलगा, किंवा विधवेस अनीतीच्या मार्गानें झालेला मुलगा. ॰चाल-स्त्री. भित्रेपणा; नामर्दपणा; बायकीपणा. ॰छंद-पु. रंडीबाजीचा नाद; रांडेचें व्यसन. ॰छंदी-वि. रंडीबाजीची संवय लागलेला; रांडगा. ॰तगादा-पु. (कुण.) (सार्याच्या किंवा कर्जाच्या) पैशाची (पिठ्या शिपायानें नव्हे) कुळाकडे सौम्य रीतीनें केलेली मागणी. ह्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यास आपणास मुखत्यारी आहे असें कुणबी मानतो. बडग्याच्या विनंतीशिवाय दुसर्या कोणत्याहि विनंतीस दाद न देण्याबद्दल हा वर्ग कित्येक पिढ्या प्रसिद्ध आहे. कुणबी पहा. ॰पण-न. १ (कों.) वैधव्य. २ नाश; नादानपणा. 'कां घेतां रांडपण ठरून भाऊ नाना ।' -ऐपो ११६. ॰पाटा-पु. वैधव्य. (क्रि॰ भोगणें; येणें; मिळणें; प्राप्त होणें; कपाळीं येणें). [रांड + पट्ट] ॰पिसा-वि. रांडवेडा; अतिशय रांडछंदी; रंडीबाज; बाईलवेडा; स्त्रैण. ॰पिसें-न. रांड- वेड; रांडेचा नाद. ॰पोर-न. १ (व्यापक) बायकामुलांसह एखाद्या ठिकाणचे सर्व रहिवासी; गांवांतल्या बायकोपारांसुद्धां सर्व लोक. 'आज कथेला झाडून रांडपोर आलें होतें.' २ एखा- द्याच्या पदरीं असलेलें. बायको, मुलें इ॰ कुटुंब, खटलें. ३ रंडकीचें मूल. ४ दासीपुत्र; वेश्यासुत. [रांड + पोर] रांडपोर- कीं राजपोर-रंडकीचा मुलगा किंवा राजाचा मुलगा हे दोघेहि- अनियंत्रित व अशिक्षित असतात; दोघेहि बेबंद व निर्धास्त असतात. ॰पोरें-नअव. घर, गांव, देश यांतील मुख्य कर्त्या पुरुषाहून इतर बायका, मुलें इ॰ सर्व माणसें. ॰बाज-वि. रंडीबाज; बाहेरख्याली. [हिं.] ॰बाजी-स्त्री. बाहेख्याली- पणा; रंडीबाजी. [हिं.] ॰बायल-स्त्री. (गो.) विधवा स्त्री. ॰बेटा-पु. रांडलेक. 'तुका म्हणे कोरान्न रांड । बेटा भांड मागेना कां ।' -तुगा २९८३. ॰बोडकी-स्त्री. विधवा स्त्री. 'त्या रांडबोडकीनें लन्न जुळलन् ।' -मोर ११. ॰भांड-स्त्री. (निंदार्थीं) रंडकी; बाजारबसवी; बटीक. [रांड द्वि.] ॰भांडण- न. १ बायकांचें भांडण. २ (ल.) बिन फायदेशीर, निरर्थक गोष्ट. ॰भाषण-न. बायकी, नामर्द, दीनवाणें भाषण. ॰मस्ती- स्त्री. १ पतिमरणानंतर विधवेस येणारा लठ्ठपणा व जोम. २ (ल.) नियंता न हींसा झाल्याबरोबर एखाद्या माणसास येणारी टवटवी; चपळाई, धिटाई. ॰माणूस-न. १ (दुर्बलत्व दाखवावचें असतां) स्त्री; स्त्रीजाति; स्त्रीमात्र. २ (तिरस्कारार्थीं) बुळा, निर्जीव, बायक्या मनुष्य; भित्रा मनुष्य. [रांड + माणूस] ॰मामी- स्त्री. (करुणेनें) विधवा स्त्री. ॰मांस-न. (निदार्थीं) पतीच्या मृत्यू- नंतर विधवा स्त्रियांस एकटें राहतां आल्यामुळें व मोकळेपणा मिळाल्यामुळें कधीं कधीं येणारा लठ्ठपणा. (क्रि॰. चढणें; येणें). [रांड + मांस] ॰मुंड-स्त्री. १ केशवपन केलेली, अनाथ न अनु- कंप्य अशी विधवा. २ (शिवी) रांड; बोडकी; अकेशा थेरडी; विधवा. [रांड + मुंड] ॰रळी-स्त्री. विधवा किंवा विधवेसा- रखी; (व्यापक.) विधवा. 'रांडरळी म्हणती हा मेला बरें झालें' [रांड + रळी] ॰रागोळी-स्त्री. (व्यपक.) रंडीबाजी व बदफैली. [रांडद्वि.] ॰रांडोळी-स्त्री. १ विधवा किंवा तिच्या सारखी स्त्री. रांडरळी पहा. २ शिंदळकी. ३ बायकांशीं संगत ठेवणें; रंडीबाजी. ॰रूं-न. विधवा स्त्री. ॰रोट-रोटा-पु. आपल्या मरणानंतर बायको विधवा होईल यासाठीं लग्नाच्या वेळीं नवर्यानें तिच्या तर्तुदीकरितां दिलेलें वेतन; बाइलवांटा; रांडरोट्याची चाल मुख्यत्वें गुजराथेंत आहे. [हिं.] ॰रोटी-स्त्री. लढाईंत पडलेल्या किंवा सरकारकामी आलेल्या माणसाच्या बायकोस निर्वाहाकरितां दिलेली जमीन इ॰. [हिं.] ॰लें(ल्यों)क-पुन. १ रंडापुत्र; विधवेचा मुलगा; एक शिवी. 'काय केलें रांडलेंका । तुला राजी नाहीं तुका ।' २ (व.) मेलें या शब्दाप्रमाणें वाक्याच्या आरंभीं किंवा मध्यें निरर्थक योजतात. 'आम्हास नाहीं रांडलेक असं येत !' ॰वडा-पु. सर्व बायकामाणसें; घरांत सत्ताधारी पुरुष नसल्यामुळें होणारें स्त्रियांचें प्राधान्य. २ बाजारबसवी, रांड, बटीक इ॰ शब्दप्रचुर शिच्या; शिवीगाळ; गालिप्रदान. (क्रि॰ गाणें; गाजविणें; ऊठविणें) 'किती रांडवडे । घालुनि व्हालरे बापुडे ।' -तुगार २ ७४६. [रांड + वाडा] ॰वळा-पु. स्त्रियांच्या कडाक्याच्या भांडणांतील शिवी; रंडकी; रांड, भटकी, बाजारबसवी इ॰ शिव्यांची माळता. (क्रि॰ गाणें; वाजवणें). [रांड + आवलि] ॰वांटा-पु. वैधव्य. ॰वांटा कपाळीं येणें-विधवा होणें. ॰वाडा-पु. कुंटणखाना; वेश्यांची आळी. ॰व्यसन-न. रांडेचा नाद, छंद. ॰व्यसनी-वि. रांडबाज. ॰सांड-स्त्री. विधवा. [रांड + सांडणें किंवा रांड द्वि.] ॰सांध-स्त्री. विधवेचा कोपरा. [रांड + संधि] ॰सांधीस बसणें-घरांत उदास होऊन बसणें (रागानें एखा- द्यास म्हणतात). रांडक-वि. (कों.) विधवा झालेली. 'सडा मफलीस व रांडक बायको व भिकारी बैरागी हे निमदस्ती.' [रांड] रांडका-पु. विधुर; ज्याची बायको मेली आहे असा पुरुष. [रांड] रांडकी-स्त्री. विधवा. (तिरस्कार दया दाखवितांना). [रांड] रांडगा-वि. (राजा. तंजा.) रंडीबाज. २ -पु. (बे.) महार जातीचा बलुतेदार. याला वतन इनाम जमीन असते. याचा हक्क कर्णाटकांतील लक्ष्मीच्या जत्रेंत रेडा मारण्याचा असतो. हल्लीं ह्या शब्दास अपभ्रष्टता येऊन तो शिवीदाखल योजिला जातो. रांडरूं-न. (तिरस्कारानें) विधवा स्त्री. [रांड] रांडव-वि. १ रंडकी झालेली; विधवा (स्त्री). २ बायकोच्या मरणानें उघडा झालेला; मृतपत्नीक; विधुर. [रांड] रांडवणें-अक्रि. विधवा होणें; रांडावणें पहा. [रांड] रांडवा-स्त्री. विधवा स्त्री. 'रांडवा केलें काजळ कुंकूं ।' -एभा ११.९६६. रांडा पोरों-नअव. १ कुटुंबांतील कनिष्ठ दर्जाचीं माणसें (बायका, मुलें व कुणबिणी). २ समाजांतील हलक्या दर्जाचे लोक. ॰रोटा-पु. विधवांनीं करा- वयाचें सामान्य आडकाम. (दळण, कांडण, मोल मजुरी इ॰). रांडाव-वि. (गो.) विधवा. रांडावणें-अक्रि. १ विधवा- पणाच्या केविलवाण्या स्थितीस प्राप्त होणें. २ (ल.) फिसकटणें; मोडावणें; नासणें; बिघडणें; भंग पावणें (व्यापार, मसलत, काम) (विशेषत: या लाक्षणिक अर्थानेंच हा शब्द योजतात). 'त्याणीं मागें संसार चांगला थाटला होता पण थोरला भाऊ मेल्यापासून रांडावला.' [रांड] रांडावा-स्त्री. (माण.) बालविधवा; बाल- रांड. रांडरांड-स्त्री. १ रंडक्यांतली रंडकी; अतिशय अनाथ व असहाय रंडकी. २ (ल.) नामर्द, बुळा, अपात्र, नालायक, मनुष्य. ३ पराकाष्ठेचा अनाथ किंवा निराधार मनुष्य. रांडुल-स्त्री. (गो.) (अनीतीच्या मार्गानें) विधवेस झालेला मुलगी. रांडूल- स्त्री. (कों.) विधवा स्त्रीला उपहासानें म्हणतात. रांडे-उद्गा. एक शिवी. 'भांडे तृष्णेसीं द्विज भारार्त, म्हणे यथेष्ट घे रांडे !' -मोअश्व ६.७५. [रांड, संबोधन] रांडचा-वि. रांडलेक. -उद्गा. आश्वर्यवाचक उद्गार. 'अग रांडेचें ! पांच वर्षांचें पोर पहा किंग कशी पोथी वाचतो.' रांडेचा आजार-पु. गर्मी. रांडेच्या- उद्गा. (प्रेमळ) एक शिवी. 'आहा रांडेच्या !...' -देप ६२. रांडोळी-स्त्री. १ (करुणेनें, तिरस्कारानें) विधवा स्त्री. २ विधवे- प्रमाणें वागवणूक. ३ कुचाळी, थट्टा. 'करितां गोपिकांसी रांडोळी ।' -एभा ६.३६५. ४ मारामारी; कत्तल. 'निकरा जाईल रांडोळी ।' -एरुस्व ६.९. ५ क्रीडा. ६ नाश. 'कीं भीष्मदेवें चरणातळीं ।' केली कामाची रांडोळी ।' -जै २४.७ [रांड] रांड्या, रांड्या राऊजी, रांड्या राघोजी-वि. १ रंडीबाज; रांडव्यसनी; रांडछंदी. २ बायक्या; बाइल्या; नामर्द. ३ बाईलवेडा. ४ रांड्याराघोबा, रांड्यारावजी, बायकांत बसून किंवा त्यांजबरो- बर फिरून गप्पा मारण्यांत आनंद मानणारा (मनुष्य); गप्पीदास; चुलमावसा. म्ह॰ रांड्या रावजी आणि बोडक्या भावजी. [रांड] रांढरुं, रांढूं-न. (तिरस्कारार्थीं) विधवा स्त्री. रांडरू पहा. [रांड]
दुर्
अ. दुष्टपणा; वाईटपणा, कठिणपणा, दुःख इ॰कांच्या वाचक शब्दापूर्वीं योजावयाचा उपसर्ग. जसें:-दुराचार = वाईट वर्त- णूक; दुर्लभ = मिळण्यास कठिण; दुस्सह = सहन करण्यास कठिण इ॰. याचीं संधिनियमानुरूप दुर्, दुस्, दुष्, दुश् इ॰ रूपें होतात. जसें:- दुर्लभ दुष्कर, दुश्चल, दुस्सह, दुस्साध्य, दुराचार, दुरंत इ. हा उपसर्ग जोडून अनेक सामासिक शब्द बनतात. त्यांपैकीं कांहीं येथें दिले आहेत. दुरंत-वि. १ अपार; अनंत; अमर्याद; अंत लागण्यास कठिण असा (मोह, माया इ॰). २ अतिशय कठिण; तीव्र (दुःख इ॰). [दुर् + अंत = शेवट] दुरतिक्रम-वि. ओलांडून जाण्यास कठिण; दुस्तर; दुर्लंघ्य. २ असाध्य. [दुर् + अतिक्रम = ओलांडणें] दुरत्यय-यी-वि. १ नाश करून टाकण्यास कठिण. २ प्रतिबंध करण्यास, टाळण्यास कठिण; अपरिहार्य. ३ असाध्य (दुःख, आजार, रोग इ॰). अप्रतीकार्य (अडचण, संकट). ४ मन वळ- विण्यास कठिण असा (मनुष्य); दुराराध्य. [दुर् + अत्यय = पार पडणें, जाणें इ॰] दुरदृष्ट-न. दुर्दैव; वाईट अदृष्ट. 'कीं आड आलें दुरदृष्ट माझें ।' -सारुह १.१०. [दुर् + अदृष्ट] दुरधिगम्य- वि. १ समजण्यास कठिण; दुर्बोध; दुर्ज्ञेय. २ दुष्प्राप्य; मिळण्यास कठिण; दुर्गम. [दुर् + सं. अधि + गम् = मिळविणें] दुरभिमान-पु. पोकळ, वृथा, अवास्तव अभिमान; फाजील गर्व. [दुर् + अभिमान] दुरवबोध-वि. दुर्बोध; गूढ. [दुर् + सं. अव + बुध् = जाणणें] दुरा- कांक्षा-स्त्री. दुष्प्राप्य वस्तूचा अभिलाष. [दुर् + आकांक्षा = इच्छा, अभिलाष] दुराग्रह-पु. हट्ट, लोकविरोध, शास्त्रविरोध, संकटें इ॰ कांना न जुमानतां एखाद्या गोष्टीचा पिच्छा पुरविण्याचा हट्ट; अनिष्ट आग्रह. 'न सुखद दुराग्रह सखा हा सर्वाऽनर्थ गेह ठक राया ।' -मोकर्ण ४६.५०. [दुर् = वाईट + आग्रह = हट्ट] दुराग्रही-वि. दुरा- ग्रह धरण्याचा ज्याचा स्वभाव आहे असा; हेकेखोर; हटवादी; हट्टी. [दुराग्रह] दुराचरण, दुराचार-नपु. निंद्य, वाईट, वागणूक; दुर्वर्तन; दुष्ट आचरण. [दुर् = दुष्ट + सं. आचरण = वर्तन] दुराचरणी, दुराचारी-वि. निंद्य, वाईट, दुष्ट वर्तनाचा; बदफैली. [दुराचार] दुरात्मत्व-न. १ दुष्ट अंतःकरण; मनाचा दुष्टपणा. २ दुष्ट कृत्य. 'किमपि दुरात्मत्व घडलें ।' [दुर् = दुष्ट + आत्मा = मन] दुरात्मा- वि. दुष्ट मनाचा (मनुष्य); खट; शठ. [दुर् + आत्मा] दुरा- धर्ष-वि. जिंकण्यास, वर्चस्वाखालीं आणण्यास कठिण. [दुर् + सं. आ + धृष् = जिंकणें] दुराप-वि. मिळविण्यास कठिण; दुर्लभ; अप्राप्य. 'राया, भीष्माला जें सुख, इतरां तें दुराप, गा, स्वापें ।' -मोभीष्म ६.२९. दुराप(पा)स्त-वि. घडून येण्यास कठिण; दुर्घट; असंभाव्य. 'वाळूचें तेल काढणें ही गोष्ट दुरापस्त आहे.' [दुर् + सं. अप + अस् = ] दुराराध्य-वि. संतुष्ट, प्रसन्न करण्यास कठिण, अशक्य; मन वळविण्यास कठिण. 'मोक्षु दुराराध्यु कीर होय । परि तोही आराधी तुझे पाय ।' -ज्ञा ११.९९. [दुर् + सं. आराध्य] दुराशा-स्त्री. निरर्थक, फोल, अवास्तव आशा, दुष्प्राप्य गोष्टीची आशा दुष्ट वासना. 'आम्हास अन्न खावयास मिळेना आणि पालखींत बसण्याची दुराशा धरावी हें चांगलें नव्हे.' 'दुराशागुणें जो नव्हे दैन्यवाणी ।' -राम १६८. [दर् + आशा] दुरासद-वि. कष्टानें प्राप्त होणारें; जिंकण्यास, मिळण्यास कठिण. [दुर् + सं. आ + सद = मिळ विणें] दुरित-न. पाप; पातक; संचितकर्म. 'पुन्हां न मन हे मळो दुरित आत्मबोधें जळो ।' -केका ११९. [दुर् + सं. इ = जाणें] दुरुक्त-न. वाईट, दुष्टपणाचें, अश्लील भाषण; शिवी; अपशब्द; दुर्भाषण; अश्लील बोलणें. [दुर् + उक्ति = बोलणें] दुरुत्तर-न. अप मानकारक, उर्मटपणाचें उत्तर; दुरुक्ति. [दर् + उत्तर] दुरुद्धर-वि. खंडण करण्यास, खोडून काढण्यास कठिण असा (पूर्वपक्ष, आक्षेप, आरोप). 'या सिद्धांतावर दोष दिला हा सर्वांस दुरुद्धर आहे.' [दुर् + सं. उद् + धृ = काढून टाकणें; वर, बाहेर काढणें] दुरूह-वि. दुर्बोध; गूढ; अतर्क्य. 'ईश्वरानें सृष्टि कशी उत्पन्न केली हें सर्वांस दुरूह आहे.' [दुर् + सं. ऊह् = अनुमानणें] दुर्गत-वि. गरीब; दिन; दरिद्री; लाचार. 'झांकी शरपटलानीं आढ्य जसा दुर्गतांसि वस्त्रांनीं ।' -मोभीष्म ९.६५. [दुर् + सं. गत = गेलेला] दुर्गति-स्त्री. १ दुर्दशा; वाईट स्थिति; संकटाची, लाजिरवाणी स्थिति; अडचण; लचांड. २ नरक; नरकांत पडणें. [दुर् + गति = स्थिति] दुर्गंध- गंधी-पुस्त्री. घाण; वाईट वास. -वि. घाण वास येणारें [दुर् = वाईट + सं. गंध = वास] ॰नाशक-वि. (रसा.) दुर्गंधाचा नाश करणारें; (इं.) डिओडरंट्. [दुर्गध + सं. नाशक = नाश करणारा] दुर्गंधिल-वि. (रासा.) आर्सेनिक व मेथिल यांच्या संयोगापासून बनलेला विषारी, दुर्गंधी (पदार्थ) (इं.) कॅको- डिल्. दुर्गम-वि. जाण्यास कठिण (स्थळ, प्रदेश इ॰). [दुर् + सं + गम् = जाणें] दुर्गुण-पु. वाईट गुण; दोष; अवगुण; दुर्मार्गाकडील कल. (क्रि॰ आचरणें). [दुर् + गुण] दुर्गुणी-वि. वाईट गुणांचा; अवगुणी; दुराचरी; दुर्वर्तनी. [दुर्गुण] दुर्घट-वि. धड- वून आणण्यास, घडून येण्यास, सिद्धीस नेण्यास कठिण. [दुर् + सं. घट् = घडणें, घडवून आणणें] दुर्घटना-स्त्री. अशुभ, अनिष्ट गोष्ट घडणें; आकस्मिक आलेलें संकट, वाईट परिस्थिति. [दुर् + सं. घटना = स्थिति] दुर्घाण-स्त्री. दुस्सह घाण; ओरढाण; उग्रष्टाण. [दुर् + घाण] दुर्जन-पु. वाईट, दुष्ट मनुष्य. [दुर् + जन = मनुष्य, लोक] दुर्जय-वि. १ जिंकण्यास कठिण. २ दुस्साध्य; दुस्तर. [दुर + सं. जि = जिंकणें] दुर्जर-वि. पचविण्यास, विरघळ- ण्यास कठिण. [दुर् + सं. जृ = जिरणें] दुर्दम-वि. दमन करण्यास, वर्चस्वाखालीं आणण्यास कठिण. 'तिला इंग्लंडांतील प्रबल व दुर्दम प्रजाजनांच्या अडथळ्याशिवाय दुसरें कोणतेंच नियमन नसे.' -पार्ल ६. [दुर् + दम्] दुर्दर्श-वि. दिसण्यास, पाहण्यास कठिण; अतिशय अस्पष्ट. [दुर् + सं. दृश् = पाहणें] दुर्दशा-स्त्री. अवनतीची, अडचणीची, संकटाची, वाईट, दुःखद स्थिति; दुर्गति; दुःस्थिति. 'भिजल्यामुळें शालजोडीची दुर्दशा जाली.' [दुर् + दशा = स्थिति दुर्दिन-न. १ वाईट दिवस. २ अकालीं अभ्रें आलेला दिवस. ३ वृष्टि. -शर. [दुर् + सं. दिन = दिवस] दुर्दैव-न. कमनशीब; दुर्भाग्य. 'कीं माझें दुर्दैव प्रभुच्या मार्गांत आडवें पडलें ।' -मोसंशयरत्नमाला (नवनीत पृ. ३४९). -वि. कम- नशिबी; अभागी. [दुर् + दैव = नशीब] दुर्दैवी-वि. अभागी; कम- नशिबी. [दुर्दैव] दुर्धर-पु. एक नरकविशेष. [सं.] दुर्धर- वि. १ धारण, ग्रहण करण्यास कठिण. २ दुस्साध्य; दुष्प्राप्य. ३ (काव्य) (व्यापक) बिकट; खडतर; असह्य; उग्र; कठिण. 'तप करीत दुर्धर । अंगीं चालला घर्मपूर ।' ४ भयंकर; घोर; भयानक. 'महादुर्धर कानन ।' [दुर् + सं. धृ = धरणें, धारण करणें] दुर्धर्ष- वि. दुराधर्ष; दमन करण्यास, वर्चस्वाखालीं आणण्यास कठिण; दुर्दम्य; अनिवार्य. [दुर् + धृष् = जिंकणें, वठणीवर आणणें] दुर्नाम- न. अपकीर्ति; दुष्कीर्ति; बदनामी. [दुर् + सं. नामन् = नांव] दुर्नि- मित्त-न. अन्याय्य, निराधार कारण, सबब, निमित्त. [दुर् + निमित्त = कारण] दुर्निर्वह-वि. १ दुःसह; असह्य; सहन करण्यास कठिण; निभावून जाण्यास, पार पडण्यास कठिण (अडचण, संकट). २ दुस्साध्य; दुष्कर; [दुर् + सं. निर् + वह्] दुर्निवार, दुर्निवा- रण-वि. १ निवारण, प्रतिबंध करण्यास कठिण; अपरिहार्य; अनि- वार्य. २ कबजांत आणण्यास कठिण; दुर्दम्य. [दुर् + नि + वृ] दुर्बल-ळ-वि. १ दुबला; अशक्त; असमर्थ. २ गरीब; दीन; दरिद्री. 'ऐसें असतां एके दिवशीं । दुर्बळ द्विज आला परियेसीं ।' -गुच ३८.७. [दुर् + बल = शक्ति] दुर्बळी-वि. (काव्य.) दुर्बळ पहा. दुर्बुद्ध-वि. १ दुष्ट बुद्धीचा; खुनशी वृत्तीचा. २ मूर्ख; मूढ; मंदमति; ठोंब्या. [दुर् + बुद्धि] दुर्बुद्धि-स्त्री. १ दुष्ट मनोवृत्ति; खुनशी स्वभाव; मनाचा दुष्टपणा. 'दुर्बुद्धि ते मना । कदा नुपजो नारायणा ।' -तुगा ७९८. २ मूर्खपणा; अनिष्ट परिणामकारक बुद्धि. -वि. दुष्ट मनाचा; दुर्बुद्ध पहा. [दुर् + बुद्धि] दुर्बोध-वि. समजण्यास कठिण (ग्रंथ, भाषण इ॰) [दुर् + बोध् = समजणें, ज्ञान] दुर्भग-वि. कमनशिबी; दुर्दैवी; भाग्यहीन. [दुर् + सं. भग = भाग्य] दुर्भर-वि. भरून पूर्ण करण्यास कठिण; तृप्त करण्यास कठिण (पोट, इच्छा, आकांक्षा). 'इंद्रियें वज्रघातें तपे उष्ण वरी ज्वाळ । सोसिलें काय करूं दुर्भर हे चांडाळ ।' -तुगा ३५४. -न. (ल.) पोट. 'तरा दुस्तरा त्या परासागरातें । सरा वीसरा त्या भरा दुर्भरातें ।' -राम ८०. [दुर् + सं. भृ = भरणें] दुर्भ्यक्ष्य-वि. खाण्यास कठिण, अयोग्य; अभ्यक्ष्य. [दुर् + सं. भक्ष्य = खाद्य] दुभोग्य-न. कमनशीब; दुर्दैव. -वि. दुर्दैवी; अभागी. [दुर् + सं. भाग्य = दैव] दुर्भावपु. १ दुष्ट भावना; कुभाव; द्वेषबुद्धि. २ (एखाद्याविषयींचा) संशय; वाईट ग्रह; (विरू.) दुष्टभाव. [दुर् + भाव = भावना, इच्छा] दुर्भाषण-न. वाईट, अपशब्दयुक्त, शिवीगाळीचें बोलणें; दुर्वचन पहा. [दुर् + भाषण = बोलणें] दुर्भिक्ष-न. १ दुष्काळ; महागाई. २ (दुष्काळ इ॰ कांत होणारी अन्नसामुग्री इ॰ कांची) टंचाई; कमीपणा; उणीव. [सं.] ॰रक्षित-वि. दासांतील एक प्रकार; आपलें दास्य करावें एतदर्थ दुष्काळांतून वांचविलेला (दास, गुलाम इ॰). -मिताक्षरा-व्यवहारमयूख दाय २८९. [दुर्भिक्ष + सं. रक्षित = रक्षण केलेला] दुर्भेद-वि. बुद्धीचा प्रवेश होण्यास कठिण; दुर्बोध. 'तैसें दुर्भेद जे अभिप्राय । कां गुरुगम्य हन ठाय ।' -ज्ञा ६.४५९. [दुर् + सं. भिद् = तोडणें] दुर्भेद्य-वि. फोडण्यास, तुकडे करण्यास कठिण (हिरा; तट). [दुर् + सं. भेद्य = फोडण्यासारखा] दुर्मति-स्त्री. १ दुर्बुद्धि; खाष्टपणा; कुटिलपणा. २ मूर्खपणा; खूळ; वेडेपणा. -पु. एका संवत्सराचें नांव. -वि. १ दुष्ट बुद्धीचा; खाष्ट स्वभावाचा. २ मूर्ख; खुळा; वेडा. [दुर् + मति = बुद्धि, मन] दुर्मद-पु. दुराग्रहीपणा; हेकेखोरी; गर्विष्ठपणाचा हटवादीपणा. 'किती सेवाल धन दुर्मदा' -अमृतपदें ५८. -वि. मदांध; मदोन्मत्त; गर्विष्ठ. 'सावियाचि उतत होते दायाद । आणि बळिये जगीं दुर्मद ।' -ज्ञा ११.४८०. [दुर् + मद = गर्व] दुर्मनस्क, दुर्मना-वि. खिन्न; उदास मनाचा; विमनस्क; दुःखित. [दुर् + सं. मनस् = मन] दुर्मरण-न (वाघानें खाऊन, पाण्यांत बुडून, सर्प डसून इ॰ प्रकारांनीं आलेला) अपमृत्यु; अपघातानें आलेलें मरण; अमोक्षदायक मरण. [दुर् + मरण] दुर्मि(र्मी)ल-ळ- वि. मिळण्यास कठिण; दुर्लभ. [दुर् + सं. मिल् = मिळणें] दुर्मुख- पु. एका संवत्सराचें नांव. -वि. १ घुम्या; कुरठा; तुसडा; आंबट तोंडाचा. २ तोंडाळ; शिवराळ जिभेचा. 'दुर्मुखी स्त्रीचा त्याग करून । संन्यास ग्रहण करावा ।' [दुर् + मुख] दुर्मुखणें- अक्रि. तोंड आंबट होणें; फुरंगुटणें; गाल फुगविणें; (एखाद्या कार्याविषयीं) उत्साहशून्यतेची चर्या धारण करणें. 'खायास म्हटलें म्हणजे हांसत येतात आणि उद्योगाचें नांव घेतलें म्हणजें लागलेच दुर्मुखतात.' [दुर्मुख] दुर्मुखला-वि. आंबट चेहर्याचा; घुम्या; कुरठा; तुसडा. [दुर्मुख] दुर्मेधा-वि. १ मंदबुद्धीचा. २ दुष्ट स्वभावाचा; दुर्मति. [दुर् + सं. मेधा = बुद्धि] दुर्योग-पु. सत्ता- वीस योगांतील अशुभ, अनिष्ट योगांपैकीं प्रत्येक. [दुर् + योग] दुर्लंघ्य-वि. १ ओलांडता येण्यास कठिण; दुस्तर (नदी इ॰). २ मोडता न येण्यासारखी, अनुल्लंघनीय (आज्ञा, हुकूम, शपथ इ॰) ३ निभावून जाण्यास कठिण (संकट, अडचण इ॰). ४ घालविण्यास, दवडण्यास, क्रमण्यास, नेण्यास कठिण (काळ, वेळ इ॰). [दुर् + सं. लंघ्य = ओलांडावयाजोगें] दुर्लभ-वि. मिळण्यास कठिण; अलभ्य; दुर्मिळ; दुष्यप्राप्य; विरळा. 'अलीकडे आपलें दर्शन दुर्लभ जालें. दुर्ललित-न. चेष्टा; खोडी. 'आमच्या विविध दुर्ललिताबद्दल गुरुजींनीं कसें शासन केलें...' -आश्रमहारिणी ७. [दुर् + सं. ललित = वर्तन, चेष्टा] दुर्लक्ष-न. लक्ष नसणें; हयगय; निष्काळजी- पणा; गफलत; अनवधान. -वि. १ लक्ष न देणारा; अनवधानी; गाफील; बेसावध, 'तुम्ही गोष्ट सांगीतली पण मीं दुर्लक्ष होतों म्हणून ऐकिली नाहीं.' २ दिसण्यास, समजण्यास कठिण; 'ईश्वराचें निर्गुण स्वरूप दुर्लक्ष आहे.' [दुर् + सं. लक्ष्य] दुर्लक्षण- न. १ (मनुष्य, जनावर इ॰ कांचें) अशुभसूचक लक्षण, चिन्ह; दुश्चिन्ह; दोष; वाईट संवय; खोड; दुर्गुण. 'हा घोडा लात मारतो एवढें यामध्यें दुर्लक्षण आहे.' [दुर् + लक्षण = चिन्ह] दुर्लक्षण-णी- वि. १ दुर्लक्षणानें, वैगुण्यानें युक्त (मनुष्य, घोडा इ॰). (विरू.) दुर्लक्षणी. २ दुर्गुणी; दुराचारी; दुर्वर्तनी. दुर्लक्ष्य-वि. १ बुद्धीनें, दृष्टीनें अज्ञेय; अगम्य. २ दुर्लक्ष इतर अर्थीं पहा. [दुर् + सं. लक्ष्य] दुर्लौकिक-पु. अपकीर्ती; दुष्कीर्ति; बेअब्रू; बदनामी; कुप्रसिद्धि. [दुर् + लौकिक = कीर्ति] दुर्वच, दुर्वचन, दुर्वाक्यन. १ वाईट बोलणें; दुर्भाषण; अशिष्टपणाचें, अश्लील, शिवीगाळीचें भाषण. २ अशुभ, अनिष्टसूचक भाषण. [सं. दुर् + वचस्, वचन, वाक्य = बोलणें] दुर्वह-वि. १ वाहण्यास, नेण्यास कठिण. २ सोसण्यास, सहन करण्यास कठिण. [दुर् + सं. वह् = वाहणें, नेणें] दुर्वाड- वि. अतिशय मोठें; कठिण. -शर. प्रतिकूल. [दुर् + वह्] दुर्वात- उलट दिशेचा वारा. 'तुज महामृत्युचिया सागरीं । आतां हे त्रैलोक्यजीविताची तरी । शोकदुर्वातलहरी । आंदोळत असे ।' -ज्ञा ११.३४८. [दुर् + सं. वात = वारा] दुर्वाद-पु. वाईट शब्द; दुर्वच; वाईट बोलणें; भाषण. 'हां गा राजसूययागाचिया सभासदीं । देखतां त्रिभुवनाची मांदी । कैसा शतधा दुर्वादी । निस्तेजिलासी ।' -ज्ञा ११.१०१. [दुर् + वाद = बोलणें] दुर्वारवि. दुर्निवार; अनिवार्य; टाळण्यास, प्रतिकार करण्यास कठिण; अपरिहार्य. २ आवरतां येण्यास कठिण; अनिवार; अनावर. [दुर् + वारणें] दुर्वास-पु. १ (व.) सासुरवास; कष्ट; त्रास; जाच. [दुर् + वास = राहणें] दुर्वासना-स्त्री. वाईट इच्छा; कुवासना; दुष्प्रवृत्ति. [दुर् + वासना] दुर्विदग्ध-वि. विद्येंत न मुरलेला तथापि विद्येचा गर्व वाहणारा; अर्ध्या हळकुंडानें; पिवळा झालेला. [दुर् + सं. विदग्ध = विद्वान्] दुर्विपाक-पु. वाईट परिणाम. [दुर् + सं. विपाक = परिणाम] दुर्विभावनीय-वि. समजण्यास, कल्पना करण्यास कठिण. [दुर् + सं. विभावनीय = कल्पना करतां येण्यासारखें] दुर्वृत्ति-स्त्री. दुराचारी; दुर्व्यसनी; दुर्वर्तनी. [दुर् + सं. वृत्त = वागणूक] दुर्वत्ति-स्त्री. दुराचरण; भ्रष्टाचार; बदफैली. [दुर् + सं. वृत्ति = वर्तन] दुर्व्यसन-न. दुराचरणाची संवय; द्यूत, मद्यपान, वेश्यागमन इ॰कांसारखें वाईट व्यसन. 'दुर्व्यसन दुस्तरचि बहु सूज्ञासहि फार कंप देतें हो' -वत्सलाहरण. [दुर् + व्यसन] दुर्व्यसन-नी-वि. वाईट व्यसन, संवय लागलेला; दुराचारी; बदफैली. (प्र.) दुर्व्यसनी. दुर्व्रात्य-वि. अतिशय दुष्ट; व्रात्य; खोडकर; खट्याळ; (मुलगा अथवा त्यांचें आचरण). [दुर् + व्रात्य = खोडकर, द्वाड] दुर्हृद, दुर्हृदय-वि. वाईट, दुष्ट मनाचा. [दुर् + सं. हृदु, हृदय = मन] दुर्ज्ञेय-वि. समजण्यास कठिण; गूढ; गहन. 'ही पद्धत कशी सुरू झाली असावी हें समजणें दुर्ज्ञेय आहे.' -इंमू ७६. [दुर् + सं. ज्ञेय = समजण्याजोगें] दुःशक- वि. करण्यास कठिण; अशक्यप्राय. [दुस् + सं. शक् = शकणें] दुःशकुन-पु. अपशकुन; अनिष्टसूचक चिन्ह. [दुस् + शकुन] दुश्शील, दुःशील-वि. वाईट शीलाचा; दुराचरणी. [दुस् + शील] दुश्चरित्र-न. पापाचरण; दुष्कृत्य. [दुस् + चरित्र] दुश्चल-वि. (अक्षरशः व ल.) पुढें जाण्यास, सरसावण्यास, चालण्यास कठिण. [दुस् + सं. चल् = चालणें] दुश्चि(श्ची)त-वि. १ (काव्य) अयोग्य, चुकीचा, अपराधी (माणूस, कृत्य). 'अंगुष्ठ धरुनि मस्तकपर्यंत । अखंड दुश्चित आचरलों ।' २ खिन्न; उदास; दुःखी. 'राजा प्रजा पिडी । क्षेत्री दुश्चितासी तोडी ।' -तुगा २९८४. [सं. दुश्चित अप.] दुश्चित्त-वि. १ खिन्न; दुर्मनस्क; दुःखित; उदास; उद्विग्न. 'अबदुल्याची खबर ऐकतां मनांत झाले दुश्चित ।' -ऐपो १३२. २ क्षुब्ध. 'परी कुंडलिनी नावेक दुश्चित्त होती । ते तयातें म्हणे परौती ।' -ज्ञा ६.२३८ [दुस् + चित्त = मन] दुश्चिंत- वि. (काव्य) खिन्न; दुःखी; उदास; दुश्चित्त अर्थ २ पहा. 'डोळे लावुनियां न होतों दुश्चिंत । तुझी परचीत भाव होती ।' [दुश्चित अप.] दुश्चिन्ह-न. अशुभ, वाईट लक्षण; अपशकुन. 'दुश्चिन्हें उद्भवलीं क्षितीं । दिवसा दिवाभीतें बोभाति ।' [दुस् + चिन्ह] दुश्शाप-पु. वाईट, उग्र, खडतर शाप. [दुस् + शाप] दुश्शासन-पुविना. दुर्योधनाचा भाऊ. -वि. व्यवस्था राख- ण्यास, अधिकार चालविण्यास कठिण. [दुस् + शासन = अधिकार चालविणें] दुष्कर-वि. १ करण्यास कठिण; बिकट; अवघड. 'म्हणोनि अभ्यासासि कांहीं । सर्वथा दुष्कर नाहीं ।' -ज्ञा १२.११३. २ दुष्परिणामकारक. -मोल. [दुस् + सं. कृ = करणें] दुष्कर्म-न. वाईट, पापी, दुष्टपणाचें कृत्य; कर्म. [दुस् + कर्म] दुष्कर्मा, दुष्कर्मी-पु. दुष्ट कृत्य करणारा; पापी; दुरात्मा. [दुस् + कर्मन्] दुष्काल-ळ-पु. अतिवृष्टि किंवा अनावृष्टि होऊन पिकें बुडून अन्नाची वाण पडते तो काळ; दुकाळ; महागाई. 'जैसा रोगिया ज्वराहूनि उठिला । कां भणगा दुष्काळु पाहला ।' -ज्ञा ११.४२८. [दुस् + काल] म्ह॰ दुष्काळांत तेरावा महिना = दुष्का- ळांत वर्षाचे बारा महिने काढतां काढतांच मुष्कील पडते. अशा वेळीं अधिक मास (तेरावा महिना) आला म्हणजे संकटातं भर पडते असा अर्थ. दुष्कीर्ति-स्त्री. अपकीर्ती; बदनामी; बेअब्रू. [दुस् = कीर्ति] दुष्कृत-ति-नस्त्री. १ पापकर्म; वाईट कृत्य. 'आणि आचरण पाहातां सुभटा । तो दुष्कृताचा कीर सेल वांटा ।' -ज्ञा ९.४१६. २ कृतींतील. वागणुकींतील दुष्टपणा. [दुस् + कृत- ति] दुष्प्रतिग्रह-पु. जो प्रतिग्रह (दानाचा स्वीकार) केला असतां, स्वीकारणारा अधोगतीस जातो तो; निंद्य प्रतिग्रह; अशुभप्रसंगीं केलेलें दान स्वीकारणें; वाईट कृत्याबाबत स्वीकारलेलें दान इ॰. उदा॰ वैतरणी, शय्या, लोखंड, तेल, म्हैस हे दुष्प्रतिग्रह होत. [दुस् + सं. प्रतिग्रह = दान स्वीकारणें] दुष्प्राप-प्य-वि. दुर्लभ; मिळण्यास कठिण; विरळा; दुर्मिळ. [दुस् + सं. प्र + आप् = मिळ- विणें] दुस्तर-वि. तरून जाण्यास, पार पडण्यास कठिण. 'समुद्रापेक्षां हा संसार मला दुस्तर वाटतो.' -न. (ल.) संकट. 'थोर वोढवलें दुस्तर । तुटलें सासुरें माहेर ।' -एरुस्व ८.५५. [दुस + सं तृ = तरणें] दुस्पर्श-वि. स्पर्श करण्यास कठिण, अयोग्य. [दुस् + सं. स्पृश् = स्पर्श करणें] दुस्संग-पु. दुष्टांची संगत; कुसंगति. [दुस् + संग] दुस्सह-वि. सहन करण्यास कठिण; असह्य. [दुस् + सं. सह् = सहन करणें] दुस्सही-वि. (प्र.) दुस्सह स्सह अप.] दुस्साध्य-वि. १ सिद्धीस नेण्यास, साधावयास कठिण. 'थोर वय झाल्यावर विद्या दुःसाध्य होते.' २ बरा करण्यास कठिण (रोग, रोगी). आटोक्यांत आणण्यास कठिण (शत्रु, अनिष्ट गोष्ट, संकट इ॰). [दुस् + सं. साध्य = साधण्यास सोपें] दुस्स्वप्न-न. १ अशुभसूचक स्वप्न. २ (मनांतील) कुतर्क, आशंका, विकल्प. [दुस् + स्वप्न] दुस्स्वभाव-पु. वाईट, दुष्ट स्वभाव. -वि. वाईट, दुष्ट स्वभावाचा. [दुस् + स्वभाव]
नाद
पु. १ आवाज; ध्वनि; शब्द (मुख्यत्वें पुष्कळ वेळ टिकणारा). 'ते दोन्ही नाद भिनले । तेथ त्रैलोक्य बधिरभूत जाहलें ।' -ज्ञा १.१२८. २ (ल.) शोक; छंद; वेड; ध्यास. 'अजुन खुळा हा नाद पुरेसा कैसा होइना ।' शारदा १.१. ३ मध्यमा नावांची वाचा. -अमृ ५.६३. -ज्ञा ६.२७६. ४ श्रवणसुख. [सं. नद् = वाजणें] नादांत असणें, नादी लागणें-भरणें, पडणें, लावणें-एखाद्याच्या विशेष छंदीं लागणें; लगामीं असणें; आशा लावून ठेवणें; कामांत गर्क होणें; गुंतविणें. 'मी गेलों तेव्हां तो लिहिण्याच्या नादांत होता.' 'हा गृहस्थ त्या रांडेच्या नादीं लागला.' ॰जाणें- १ (भांडें वगैरेस तड पडली असतां) आवाज बद्द होणें. २ पत, नांव जाणें; प्रसिद्ध झाल्यामुळें गुप्त गोष्टीचें महत्त्व कमी होणें. ॰तुटणें-वरील प्रकारच्या नादांतून सुटणें, मुक्त होणें. ॰दवडणें, घालविणें-पत, अब्रू, नांव घालविणें; ॰लावणें-छंद, वेड लावणें; अशा लावणें; कच्छपीं, भजनी लावणें; नांदीं लावणें; 'त्यानें देतों असा नाद लाविला आहे.' नादानें नाद-भांडणापासून भांडण. (क्रि॰ होणें; चालणें; वाढणें; लागणें). ॰खार-वि. १ नादिष्ट; छंद घेतलेला; भजनीं लागलेला; एखाद्या गोष्टीचा हव्यास वेतलेला; एकदां ज्या नादास लागला त्याच नादानें चालणारा. २ दुसर्यास आशा दाखवून आपल्या भजनीं लावणारा; कह्यांत ठेवणारा. ॰बिन्दुस्थान, नादस्थान, नादबिंद- न. १ ताळू. 'प्रथम नादबिंद मिळवणी होता एकांतर ।' - भज ५६. २ शरीरांतील निरनिराळ्या ठिकाणाहून नाद उत्पन्न होतो असें ठिकाण. अशीं स्थानें तीन आहेत तीः- ह्र्दय, कंठ व शीर्ष. ॰ब्रह्म- न. १ नादरूपानें अवतरलेलें ब्रम्ह; सुस्वर गायन. २ भजनांतील वाद्यांचा मोठा आवाज; दुमदुमाट. 'टाळ वीणा मृदंगघोष । नाद- ब्रह्माची आली मूस ।' ३ वरील वाद्यांच्या घोषामुळें वाटणारा आनंद व त्याचें दिग्दर्शन. 'तंतवितंत घन सुस्वर । ऐसें नादब्रह्म परिकर ।' ॰लुब्ध-वि. १ नाद श्रवणामुळें मोहित झालेला; सुस्वरानें गुंग झालेला. २ गायनानें लवकर मोहित होणारा. नादाची जाति-स्त्री. (संगीत) ज्या योगानें एका नादापासून दुसरा नाद वेगळा करतां येतो अशा प्रकारचा प्रत्येक नादाच्या अंगांतील गुण. ॰वाद-पु. १ भांडणाचा; फाजील व्यर्थ असा मांडलेला वाद; गलका; भाषण इ॰. (क्रि॰ करणें; लावणें; लागणें; तुटणें). २ शोक; छंद; दुरासक्ति; वायफळ प्रवृत्ति. नादा वादांत पडणें-क्षुल्लक लोभांत गुंतणें; नादीं लागणें, भरणें पहा. नादावणें-अक्रि. १ (फुटक्या भांड्याचा) बद्द आवाज होणें; फुटका नाद येणें. २ (ल.) (भांड्यास) ऐब, दोष असणें; फुटकें, व्यंगयुक्त असणें. ३ बाहेर फुटणें; बोभाटा होणें; स्फोट होणें. ४ आसक्त होणें; नादीं, मागें लागणें. ५ नांवाचा बोभाटा, दुष्कीर्ति होणें (व्यभिचार, व्यसन इ॰मुळें); लोकांच्या चर्चेचा विषय होणें. ६ एखाद्याच्या वर्तनामुळें कांहीं नुकसान, तोटा झाला असा समज करून घेऊन त्या माणसासंबंधीं उपरोधिकपणानें रागानें हा शब्द योजतात. नांव गाजविणें, काढणें. उदा॰ 'गाई हात- पान्ह्यास लाविली होती पण मूर्ख नादावला म्हणून दूध देईनासी झाली.' -सक्रि. वाजविणें, नाद करणें (भांडें इ॰चा). नादसळु- पु. वैखरी; आदिवाणि, वाचा. -मनको. नादाळ-ळ्या, नादिष्ट, नादी-नाद्या-वि. १ छांदिष्ट; ध्यास घेणारा; हट्टी. २ नाद- खोर; भजनीं, नादीं लागलेला. नादाळ-वि. मोठा आवाज अस- लेलें (वाद्य इ॰). 'वाजती नादाळ भेरी ।' -वसा ४८. नादाळी-स्त्री. १ अपकीर्ति; बभ्रा; दुष्कीर्ति. २ आळ; आरोप; कुभांड; बालंट (क्रि॰ करणें, घेणें). ३ प्रचंड नाद; गर्जना. [नाद + आळी] नादित-वि. वाजणारें; वाजविलेलें; दुमदुमित; ध्वनित. [नाद] नादेश्वर-पु नादब्रह्म पहा. 'गातां तूं ओंकांर टाळी नादेश्वर ।' -तुगा ३७७९.
अग्नि
पु. १ विस्तव; आग; अनल. २ पंचमहाभूतांतील एक देवता. ३ जठराग्नि; (ल.) भूक. ४ आग्नेयी दिशा व तिचा अधि- पति. ५ यज्ञीय देवता; गार्हपत्य, आहवनीय व दक्षिणाग्नि असे तीन त्रैताग्नि व सभ्य आणि आवसथ्य मिळून पंचाग्नि. ६ तीन संख्येचा वाचक. ७ चित्रकादि जठाराग्नि प्रदीप्त करणाऱ्या वनस्पती. [सं.]. ॰घेणें-दारूगोळ्याचा मार सहन करणें. ॰देणें-प्रेत जाळणें; उत्तरक्रिया करणें. ॰चा पाऊस पडणें-अग्निवर्षाव होणें; एकदम अनेक संकटें-जुलूम कोसळणें, गुदरणें. ॰आराधना- शत्रूंचीं गांवखेडीं, शेतें-भातें जाळणें. -ख २०९९. ॰कण-पु. विस्तवाची ठिणगी; स्फुल्लिंग; फुणगी. ॰कमळ-न.योगशास्त्रांतील एक संज्ञा. भुवयांच्यामध्यें अग्निनामक कमळ आहे तें विद्युद्वर्ण असून त्याला दोन पाकळ्या आहेत. तेथ 'हं' 'क्षं' हीं बीजचिन्हें आहेत. -बिउ १.५३. ॰कार्य-न. उपनयनानंतर बटूनें ब्रह्मचारी धर्माप्रमाणें करावयाचा होम; अग्नि-उपासना. ॰काष्ठ-न. निखारा; पेटलेलें लांकूड; विस्तव. ॰काष्ठ भक्षणें- १ अग्निप्रवेश करणें; अग्नींत उडी टाकून मरणें. 'अर्जुन म्हणे हेचि शपत । जरी मोडोनि पडेल सेत । तरी मी अग्निकाष्टें भक्षीन सत्य ।' -ह ३२.१६९. २ सती जाणें. 'आपला पति मृत झाल्याची खबर कानीं पडतांच तिनें अग्निकाष्ठें भक्षण करण्याचा निश्चय केला'. ॰काष्ठ अॅसिड- (पायरोलिग्निअस अॅसिड) हें लांकडांतून कच्च्या स्वरूपांत निघतें. -सेंपू २.४२. ॰कुंड-न. होमाच्या वेळीं अग्नि ठेवण्या- करितां केलेला खड्डा, पात्र; वेदी. ॰कुमार-पु. अजीर्ण, कॉलरा, वातजन्य रोग यांवरील पारा, गंधक, बचनाग टांकणखार वगैरेचें केलेलें औषध, रसायन. -योर १.५०२. ॰क्रीडा-स्त्री. दारुकाम; आतषबाजी; दारूगोळ्याचा भडिमार; फटाके, दारू उडविणें. ॰खांब-पु. तप्तलोहस्तंभ; शिक्षेचा एक प्राचीन प्रकार; नरक- यातनांपैकीं एक; यम लोकींची एक शिक्षा. 'तप्तभूमीवरी चाल- विती । अग्निखांबासहि कवळविती ।।'. ॰चक्र-न. १ षट्चक्रांपैकीं एक; अग्निकमळ पहा. -एभा १२.३३५. २ शकुन, फलज्योतिष यांतील एक संज्ञा; शांतिकर्मासाठीं अग्नि कोठें आहे हें पहावयाचें चक्र. शुक्ल प्रतिपदेपासून चालू तिथीपर्यंत मोजून त्या संख्येंत एक मिळवावा व रविवारापासून चालू वारापर्यंतची संख्या मिळवावी व त्या संख्येस ४ नी भागावें. बाकी शून्य किंवा तीन उरल्यास अग्नि पृथ्वीवर असून शुभ होय; २ उरल्यास अग्नि पाताळीं व १ उरल्यास अग्नि स्वर्गलोकीं होय; हे दोन्ही अग्नि शांतिकर्मास अशुभ होत -धसिं २८४. [सं.]. ॰ज खडक-पृथ्वीच्या पोटां- तील अग्नीनें आंतील पदार्थांचा रस होऊन त्यापासून बनणारा खडक; लाव्हा. -भू ७८. ॰ज्वाला-स्त्री. अग्निशिखा; ज्योत; जाळ. ॰तीर्थ-न. तीर्थ पहा. ॰दिव्य-न. दिव्य पहा. ॰नाश- पु. श्रोत स्मार्त अग्नि विझून जाणें; अग्निहोत्रांतील अग्नि नष्ट होणें; (याबद्दल प्रायश्चित घ्यावें लागतें). ॰नौका-स्त्री. आग- बोट; वाफर; स्टीमर. ॰पंचक-न. फलज्योतिषांतील एक योग; हा घातक असून त्यांत अग्नीपासून भय असतें. यासारखेंच चौरपं॰ ,मृत्युपं॰ ,राजपं॰ वगैरे योग आहेत. शुक्ल प्रतिपदेपासून चालू तिथीपर्यंत मोजून त्यामध्यें चालू लग्न मिळवून त्या संख्येस नवानीं भागून बाकी दोन राहिल्यास तें अग्निपंचक होय. हें सर्व गृहकर्मास वर्ज्य मानितात. -मुमा. [सं.]. ॰परीक्षा-स्त्री. अग्नि- दिव्य पहा. ॰पात्र-न. (शिंपी.) इस्त्री यंत्र; कपडा कडकडीत करण्याचें यंत्र; इस्तरी पहा. ॰पुट-न. रसायन, औषधें, मात्रा वगैरे करण्यास त्यांना अग्नीची आंच देऊन जो संस्कार करितात तें. ॰प्रद-वि.पाचक; अग्निवर्धक; अग्निदीपक. ॰प्रवेश-पु. १ स्वतःस जाळून घेणें. २ सती जाणें; अग्निकाष्ठ भक्षणें पहा. 'पुत्रवंत्या स्त्रिया विशेष । तिहिं न करावा अग्निप्रवेश ।।' ॰बाण-पु, दारूनें वर उडवावयाचा बाण; दारूचा बाण; अग्न्यस्त्र. ॰मणी-पु. एक काल्पनिक रत्न; सूर्यमणि; रविकांत. सूर्यकांत मणी पहा. ॰माद्य- न. अपचनाचा रोग; जठराग्नि प्रदीप्त नसणें; भूक न लागणें. ॰मापक-पु. न. अत्युष्णतामान मोजण्याचें यंत्र; पायरॉमीटर. ॰मुख-न. १ हिंग एक भाग, वेखंड २ भाग, पिंपळी ३ भाग, सुंठ ४ भाग, ओवा ५ भाग, हिरडेदळ ६ भाग, चित्रकमूळ ७ भाग व कोष्ठ ८ भाग यांचे चूर्ण. हें अग्निमांद्यावर देतात. -योर १. ४९३. २ देव. ३ ब्राह्मण. ॰यत्र-न. १ बंदूक; तोफ. 'यांच्या अग्नियंत्रशौंडत्वाची तारीफ व्हायला वेळेनुसार चुकायची नाहीं.' -नि ८०८. २ दारूकाम; आतषबाजी. 'भरूनी रजतमाचें औषध । करूनी अग्नियंत्र सन्नद्ध । कृष्णापुढें अतिविनोद । एक प्रबुद्ध दाविती ।।' -एरुस्व १५.११७. ॰रथ-पु. आगगाडी. ॰रोहिणी- स्त्री. काळपुळी पहा. ॰वर्ण-वि. अग्नीसाररखा तांबडा लाल (रंग); रक्तकांति. ॰वर्धक-वि. पाचक. ॰वर्धन-न. पचन; जठराग्नीचें उद्दीपन. ॰विच्छेद-पु. अग्निनाश; पत्नी मृत झाली असतां अथवा इतर कारणांनीं अग्निहोत्र बंद पडणें. (याबद्दल प्रायश्चित्त सांगितलें आहे). ॰वृद्धि-स्त्री. अग्निवर्धन; पचनशक्तीची वाढ; जठराग्नि प्रदीप्त होणें; आहाराचें प्रमाण वाढविणें. ॰शस्त्र-न. बंदूक, तोफ वगैंरे दारूनें उडणारें हत्यार. ॰शाला-स्त्री. अग्न्यागार; अग्निगृह; अग्नि ठेवण्याची जागा; यज्ञशाळा; होमशाळा. ॰शिखा-स्त्री. अग्नीची ज्वाळा; अग्निज्वाळा. ॰ष्टुत्-पु. (ख्रि) 'एंबर डेज' या इंग्रजी शब्दाचा पर्याय; राखेचे दिवस; ज्यांची दीक्षा होणार आहे त्यांच्यासाठीं प्रार्थना करण्याचे दिवस. 'उपोषणमंडळाशिवाय या चर्चच्या प्रार्थनासंग्रहांत अग्निष्टुत्, अनुनय व कित्येक विशिष्ट दिव- सांच्या पूर्वीं करावयाचीं प्रदोषोपोषणें...सांगितलीं आहेत'. -ना वा. टिळक. उ. मं. ३. [सं. अग्नि + स्तु.]. ॰ष्टोम-पु. सप्तसोमसंस्थां (यज्ञा) पैकीं एक; सोमयाग; यज्ञ. ॰ष्वात्त-पु. अव. पितृदेवता, ज्यांस मंत्राग्नि मिळालेला आहे असे; ज्यांनी जिवंतपणीं अग्निहोत्र पाळलें नाहीं असे; मरीचीपुत्रांपैकीं पितर; जिवंतपणीं श्रौताग्नि ज्यांनीं ठेवला नाहीं (अग्निष्टोमादि याग केले नाहींत) असे पितर (सायण). ॰सेवा-स्त्री. अग्नीची उपासना, पूजा. ॰स्थान-न. अग्निकमळ-चक्र पहा. 'आकळलेनी योगें । मध्यमा मध्यमार्गें । अग्निस्थानौनि निगे । ब्रह्मरंध्रा ।।' -ज्ञा ८.९४. ॰होत्र-न. १ श्रौता- ग्नीची उपासना; सकाळसायंकाळ अग्नीला होम देऊन अग्नि सतत राखण्याचें व्रत. २ (थट्टेनें) धूम्रपान; विडी ओढणें. ॰होत्री-पु. अग्निहोत्र पाळणारा; (थट्टा) तंबाकू ओढण्याचें व्यसन असणारा. ॰स्नान-न. (व.) एक तांब्याभर पाण्यांत स्नान करणें.
घर
न. १ रहावयासाठीं बांधलेली जागा; वाडा. २ एका कुटुंबांतील (एके ठिकाणीं) राहणारी मंडळी; कुटुंब. ३ गृहस्था श्रमधर्म; संसार; प्रपंच. 'त्याला नोकरी लागतांच त्यानें स्वतंत्र घर थाटलें' ४ एखाद्या व्यवसायांत जुटीनें काम करणारीं माणसें, मंडळी, संस्था; अडतीची जागा. ५ (उंदीर, चिचुंदरीं इ॰ काचें) बीळ; घरटें. ६ एखादा पदार्थ शिरकवण्यासाठीं केलेला दरा, भोंक, खोबण, खांचण. 'भिंतीस घर करून मग खुंटी ठोक.' ७ (मालकाच्या इच्छेविरुद्ध मिळविलेलें, बळकावलेलें) वस्तीचें ठिकाण. 'कांट्यानें माझ्या टाचेंत घर केलें.' ८ एखादी वस्तु सुरक्षितपणें ठेवण्यासाठीं केलेलें धातूचें, लांकडाचें आवरण, वेष्टण, कोश. उ॰ चष्म्याचें घर. 'माझ्या चष्म्याचें घर चामड्याचें आहे.' ९ पेटींतील, टाइपाच्या केसींतील कप्पा, खण, खाना. १० सोंगट्याच्या, बुद्धिबळांच्या पटावरील, पंचांगा- तील (प्रत्येक) चौक; चौरस; मोहर्याचा मुळचा चौरस; मोहर्याचा मारा. 'राजा एक घर पुढें कर' 'घोडा अडीच घरें (एकाच वेळीं) चालतो.' ११ (ज्यो.) कुंडलीच्या कोष्टकां- तील सूर्य, चंद्र इ॰ ग्रहांचें स्थान. १२ घराणें; वंश; कुळ. 'त्याचें घर कुलीनांचें आहें.' 'त्याच्या घराला पदर आहे.' = त्याच्या वंशात परजातीची भेसळ झाली आहे.' १३ उत्पत्तिस्थान; प्रांत, प्रदेश, ठिकाण, ठाणे (वारा, पाउस, प्रेम, विकार, रोग इ॰ काचें); 'सर्वज्ञतेचि परि । चिन्मात्राचे तोंडावरी । परि ते आन घरीं । जाणिजेना ।' -अमृ ७.१३०. 'कोंकण नारळाचें घर आहे.' १४ रोग इ॰ कांच्या उत्त्पतीचे कारण, मूळ, उगम, जन्मस्थान, खाण. 'वांगें हें खरजेंचें घर आहे.' 'आळस हें दारिद्र्याचें घर आहे.' १५ वादांतील आधारभूत मुद्दा, प्रतिष्ठान. गमक, प्रमाण. १६ सतार इ॰ वाद्यांतील सुरांचें स्थान; सनईसारख्या वाद्याच्या दोन भोकांमधील अंतर; सता- रीच्या दोन पडद्यांमधील अंतर. १७ शास्त्र, कला इ॰ कांतील खुबी, मर्म, रहस्य, मख्खी, किल्ली. 'तुम्ही गातां खरे पण तुमच्या हातीं गाण्याचें घर लागलें नाहीं.' 'गुणाकार, भागाकार हें हिशेबाचें घर.' १८ सामर्थ्य; संपत्ति; ऐपत; आवांका; कुवत. 'जें कांहीं करणें तें आपलें घर पाहून करावें.' १९ मृदंग इ॰ चर्मवाद्यांच्या, वादी, दोरी इ॰ परिच्छेदातनें परिच्छिन्न प्रांत, जागा. २० (संगीत) तान, सूर यांची हद्द, मर्यादा, क्षेत्र. २१ (अडचणीच्या, पराभवाच्या वेळीं) निसटून जाण्या- साठीं करून ठेवलेली योजना; आडपडदा; पळवाट; कवच; 'हा घर ठेवून बोलतो.' २२ खुद्द; आपण स्वतः; स्वतःचा देह- म्ह॰ इच्छी परा तें येई घरा.' २३ (वर्तमानपत्राचा, पत्र- काचा, कोष्टकाचा रकाना, सदर. (इं.) कॉलम. 'येऊन जाऊन पत्रप्रकाशकास स्वतःचा असा मजकूर दर खेपेस पराकाष्ठा दोन तीन घरें घालणें येतें.' -नि १५. २४ वयोमानाचा विभाग; कालमर्यादा. 'हा नवा गृहस्थ पन्नाशीच्या घरांत आला होता.' -कोरकि ३२. २५ (मधमाशीचें पोळें वगैरेतील) छिद्र. 'केळीच्या सोपटाचीं घरें ज्यांनी पाहिली असतील' -मराठी सहावें पुस्तक पृ. २२५. (१८५७) २६ ठाणें; ठिकाण. 'कुबल, बांकी घरें । शिवराजाच्या हाता आलीं' -ऐपो ९. २७ बायको; स्वस्त्री. 'घरांत विचारा.' घर उघडणें पहा. [सं. गृह; प्रा. घर; तुल॰ गु. घर; सिं. घरु; ब. घर; आर्मेंजि. खर; फ्रेजि. खेर; पोर्तु. जि केर.] (वाप्र.) ॰आघाडणें-(कों.) घर जळून खाक होणें. ॰उघडणें-१ लग्न करून संसार थाटणें. 'नारोपंतांनी आतां घर उघडलें आहे, ते पूर्वीचें नारोपंत नव्हत!' २ एखा- द्याचें लग्न करून देऊन त्याचा संसार मोडून देणें. 'सदुभाऊंनीं आपली मुलगी त्या भटाच्या मुलास देऊन त्याचें घर उघडलें' ॰करणें-१ विर्हाड करणें; रहावयास जागा घेऊन तींत जेवण- खाण इ॰ व्यापार करावयास लागणें. 'चार महिनें मी खाणाव- ळींत जेवीत असे, आतां घर केलें आहें.' २ (त्रासदायक वस्तूंनीं) ठाणें देणें; रहाणें; वास्तव्य करणें. 'कांट्यानें माझ्या टांचेंत घर केलें.' 'माझ्या हृदयांत घर करून बसून त्यानें मला घायाळ केलें.' -बाय ३.३. ॰खालीं करणें-घर सोडून जाणें; घर मोकळें करून देणें. 'गावांत प्लेगचें मान वाढतें असल्यामुळें सर्वानी आपापलीं घरें खालीं केलीं.' ॰घालणें- (एखाद्याच्या) घराचा नाश करणें. ॰घेणें-१ (सामा.) लुबा- डणें; लुटणें; नागविणें; बुचाडणें. 'मग रेणुकेनें बोलिलें । अहो जेऊनि कैसें घर घेतलें ।' -कालिकापुराण २३.४०. 'ज्या ठिकाणीं वादविवादाचा किंवा भांडणाचा काहीं उपयोग नसतो त्या ठिकाणीं पडून घर घेणें यांतच मुत्सद्दीपणा असतो.' -चंग्र ८४. २ (एखाद्याचा) नाश करणें. 'म्हणती जन्मोनि द्रौपदीनें । आमचें घर घेतलें तिणें ।' -जै ७१.९९. ३ (त्रासदायक वस्तु) घर करून बसणें, ठाणें देऊन बसणें; घर करणें अर्थ २ पहा. ॰चालविणें-प्रपंचाची, संसाराची जबाबदारी वाहणें. म्ह॰ घर चालवी तो घराचा वैरी. ॰जोडणें-इतर घरण्यांशीं, जातीशीं, लोकांशीं इ॰ मैत्री, शरीरासंबंध घडवून आणणें; मोठा संबंध, सलोखा उत्पन्न करणें. 'लक्ष्मीपतीचें घर थोर जोडे ।' -सारुह २.१. याच्या उलट घर तुटणें. ॰डोईवर घेणें-आरडा ओरड करून घर दणाणून सोडणें; घरांत दांडगाई, कलकलाट, धिंगामस्ती करणें. 'वडील माणसें घरीं नाहींत हें पाहुन मुलांनी घर डोईवर घेतलें.' ॰तुटणें-मैत्रीचा, नात्याचा संबंध नाहींसा होणें; स्नेहांत बिघाड होणें. (दुसर्याचें) ॰दाखविणें- १ आपल्या घरीं कोणी त्रासदायक मनुष्य आला असतां कांहीं युक्तीनें त्याला दुसर्याच्या घरीं लावून देऊन आपला त्रास चुकविणें; (एखाद्याची) ब्याद, पीडा टाळणें. २ घालवून देणें; घराबाहेर काढणें. ॰धरणें-१ घरांत बसून राहणें; घराच्या बाहेर न पडणें (संकटाच्या, दंगलीच्या वेळीं पळून जाणें, पळ काढणें, गुंगारा देणें, निसटणें याच्या उलट). २ (रोग इ॰ नीं शरीरावर) अंमल बसविणें; एखादा आजार पक्केपणानें जडणें. 'दम्यानें त्याच्या शरीरांत घर धरलें.' ३ चिटकून राहाणें; चंचलपणा न करतां एकाच ठिकाणीं भिस्त ठेवून असणें. ४ (बुद्धिबलांत, सोंग- ट्यांत) सोंगटी एकाच घरांत ठेवून घर अडविणें. ॰धुणें,धुवून नेणें-१ एखाद्याचें असेल नसेल तें लबाडीनें गिळंकृत करणें; हिरावून नेणें; नागविणें; बुचाडणें. 'तुम्ही कारकुनावर फार भरंवसा टाकून राहूं नका, तो संधि सांपडल्यास तुमचें घर धुवावयास कमी करणार नाहीं.' २ नागविणें; लुबाडणें; लुटणें; अगदीं नंगा करणें. 'शंभर वर्षांनीं घर धुवून नेल्यानंतर ही ओळख आम्हांस पटूं लागली आहे.' -टिव्या. घर ना दार देवळीं बिर्हाड-फटिंग, सडा, ज्याला घरदार नाहीं अशा भणंगास उद्दे- शून अथवा ज्याला बायकामुलांचा संसाराचा पाश नाहीं अशाला उद्देशून या शब्दसंहतीचा उपयोग करतात. ॰निघणें-(स्त्रीन) नव- र्याला सोडून दुसर्या मनुष्याबरोबर नांदणें; (सामा.) दुसर्याच्या घरांत, कुटंबांत निघून जाणें. 'माझें घर निघाली.' -वाडमा २. २०९. ॰नेसविणें-घरावर गवत घालून तें शाकारणें; घर गवत इ॰ कानीं आच्छादणें; (कों.) घर शिवणें. ॰पहाणें-१ (एखाद्याच्या) घराकडे वक्रदृष्टी करणें; (रोगाचा, मृतत्युचा) घरावर पगडा बसणें; घरात शिरकाव करणें). 'कालानें एखाद्याचें घर पाहिलें कीं तें बुडालेंच म्हणून समजावें.' 'म्हातारी मेल्याचें दुःख नाहीं पण काळ घर पाहतो.' २ (बायकी) वधूवरांचें योग्य स्थळ निवडणें. 'सुशील तारेनें आपल्या पुण्यबलाच्या साह्यानें योग्य घर पाहून... ... ...' -रजपूतकुमारी तारा- (आनंदी रमण.) ॰पालथे घालणें-(घर, गांवइ॰) १ हरव- लेली वस्तु शोधण्यासाठीं घराचा कानाकोपरा धुंडाळणें. 'त्या बाईनें आपला सोन्याचा फुटका मणि शोधण्यासाठीं सारें घर पालथें घातलें.' २ सर्व घरांत; गावांत हिंडणें; भटकणें. 'त्या मुलाला रांगतां येऊं लागल्यापासून तें सारें घर पालथें घालूं लागलें आहें.' ॰पुजणें-१ आपलें काम करून घेण्यासाठी एखा- द्याच्या घरीं आर्जवें, खुशामत करण्यास वारंवार जाणें. २ (घरें पुजणें) आपला उद्योग न करतां दुसर्यांच्या घरीं भटक्या मारणें. ॰फोडणें- १ संसार आटोपणें, आंवरणें. २ कुटुंबातील माणसात फूट पाडणें; घरात वितुष्ट आणणें. 'बायका घरें फोड- तात.' ३ घरास भोंक पाडून आंत (चोरी करण्यासाठीं) शिर- काव करून घेणें; घर फोडतो तो घरफोड्या. ॰बसणें-कर्ता मनुष्य नाहींसा झाल्यामुळें, दुर्दैवाच्या घाल्यामुळें कुटुंब विपन्ना- वस्थेस पोहोंचणें; घराची वाताहत, दुर्दशा होणें. ॰बसविणें- संसार थाटणें; घर मुलाबाळानीं भरून टाकणें (स्त्रीच्या विवाहोत्तर जीवनाच्या बाबतींत या वाक्प्रचाराचा उपयोग करतात). 'माझी बायको मेली म्हणून मीं मुलाचें लग्न करून दिलें, म्हटलें कीं सून तरी घर बसविल.' ॰बुडणें-१ कुटुंबाची नासाडी, दुर्दशा होणें; कुटुंब धुळीस मिळणें. २ संतति नसल्यामुळें वंशाचा लोप होणें. ॰बुडविणें-१ (एखाद्याच्या) कुटुंबाचा विध्वंस करणें; संसाराचा सत्यनास करणें. २ घरास काळिमा आणणें. ॰भंगणें-कुटुंब मोडणें, विस्कळित होणें; कुटुंबास उतरती कळा लागणें; कुटुंबाचा नाश होणें; मंडळीत फूट पडणें. 'बापलेकांत तंटे लागस्यामुळें तें घर भंगले.' ॰भरणें-१ दुसर्यास बुडवून, त्यांची उपेक्षा करून आपण श्रीमंत बनणें. २ दुसर्याचें घर लुटणें, धुणें. व स्वतः गबर होणें. घर भलें कीं आपण भला-लोकांच्या उठा- ठेवींत, उचापतींत न पडतां आपल्या उद्योगांत गर्क असणारा (मनुष्य). ॰मांडणें-थाटणें-(संसारोपयोगी जिन्नसांनीं) घर नीटनेटकें करणें; घराची सजावट करणें. ॰मारणें-घर लुटणें. घर म्हणून ठेवणें-एखादी वस्तु, सामान प्रसंगविशेषीं उपयोगी पडण्याकरितां संग्रही ठेवणें; प्रत्येक वस्तु जतन करून ठेवणें. ॰रिघणें-घर निघणें पहा. 'घर रिघे जाई उठोनि बाहेरी ।' ॰लागणें-घर भयाण भासणें (एखाद्याचा मुलगा अथवा पत्नी वारली असतां घरांतील भयाण स्थिति वर्णिताना ह्या वाक्प्रचा- राचा उपयोग करतात). घराचा उंबरठा चढणें-घरांत प्रवेश करणें. 'जर तूं माझ्या घरची एखादीहि गोष्ट बाहेर कोणाला सांग- शील तर माझ्या घराचा उंबरठा चढण्याची मी तुला मनाई करीन.' घराचा पायगुण-घरांतील माणसांची वागणूक, वर्तणूक, वर्तन, शिस्त; घराचें पुण्य पाप. घराचा पायगुणच तसा, घरची खुंटी तशी-कुटुंबांतील माणसाची वागण्याची रीत असेल त्याप्रमाणें; एखाद्या कुटुंबांतील माणसांच्या सर्वसाधारण अशा वाईट व्यसनास खोडीस, संवयीस उद्देशून म्हणतात. घराचा वासा ओढणें- ज्याच्यामुळें एखादें काम, धंदा चालावयाचें व जें नसल्यास बंद पडावयाचें असें साधन, वस्तु, गोष्ट ओढणें; एखाद्या मोठया कामांतून फार जरूरीचें साधन नाहींसें करणें; अडबणूक करणें. 'आमच्या मंडळींतून पाटीलबुवानीं रामभाऊस फितविलें, आतां आम्हीं काय करूं शकूं! त्यानीं आमच्या घराचा वासाच ओढला. खाल्ल्या घराचे वासे मोजणें-कृतघ्न होणें; केलेला उपकार विसरणें. घरांत, घरीं- (ल.) पतीनें पत्नीबद्दल शिष्ट- संप्रदायानें वापरण्याचा शब्द. याच्या उलट पत्नी नवर्या संबंधीं बोलतांना 'बाहेर' या शब्दाचा उपयोग करते. 'तुम्हांला पदार्थ दिला तर घरांत मनास येणार नाहीं.' 'हा जिन्नस घरांत दाखवून आणतों.' -विवि १०.५-७.१२७. घरांतले-विअव. (बायकी) नवरा; पति; तिकडचे; तिकडची स्वारी. 'आमच्या घरांतल्यांनीं दादासाहेबांना दारूचें व्यसन लावलें.' -एकच प्याला. घरांतील मंडळी-स्त्री. (सांकेतिक) बायको; पत्नी. 'पाहूं घरांतील मंडळीस कसाकाय पसंत पडतो तो.' -विवि ७. १०. १२७. घरांत पैशाचा-सोन्याचा धूर निघणें-निघत असणें-घरची अतिशय श्रीमंती असणें; घरांत समजणें- कुटुंबांतील तंटा चव्हाट्यावर न आणणें; घरांतल्याघरांत तंटा मिटविणें; आपापसांत समजूत घडवून आणणें. घराला राम- राम ठोकणें-घर सोडून जाणें. 'आज या घराला रामराम ठोकण्यापेक्षां घटकाभर जुलमाचा रामराम पतकरला.' -भा ९०. घरावर काट्या घालणें-गोवरी ठेवणें-निखारा ठेवणें- एखाद्याच्या कुटुंबाची धूळधाण, बदनामी करणें; घरावर कुत्रें चढविणें- (गोव्याकडे घरावर कुत्रें चढल्यास घर सोडावें लागतें यावरून) १ एखाद्याच्या घरांत कलागती. भांडणें लावून देणें, तंटे उत्पन्न करणें. २ दुष्टावा करणें; अडचणींत आणणें. घरावर गवत रुजणें- घर ओसाड, उजाड पडणें. घरास आग लावणें-(ल.) एखादें दुष्कृत्य करून घराचा नाश करणें. घरास कांटी लागणें-घर उध्वस्त होणें; घरांत कोणी न राहणें. घरांस कांटी लावणें-१ घराच्या भोवतीं कांटे, काटक्या लावून येणें-जाणें बंद करणें. २ (ल.) घर उजाड, उध्वस्त, ओसाड करणें. घरास हाड बांधणें, घरावर टाहळा टाकणें- (एखाद्यास) वाळींत टाकणें; समाजांतून बहिष्कृत करणें; जाती- बाहेर टाकणें. (शेत, जमीन, मळा, बाग) घरीं करणें- स्वतः वहिवाटणें. घरीं बसणें-(एखादा मनुष्य) उद्योगधंदा नसल्यामुळें, सोडून दिल्यामुळें घरीं रिकामा असणें; बेकार होणें. 'तो एक वर्ष झालें घरीं बसला आहे.' (एखाद्याच्या) घरीं पाणी भरणें-(एखादा मनुष्य, गोष्ट) एखाद्याच्या सेवेंत तत्पर असणें; त्यास पूर्णपणें वश असणें. 'उद्योगाचे घरीं । ऋद्धिसिद्धि पाणीभरी.' घरीं येणें-(एखादी स्त्री) विधवा झाल्यामुळें सासरच्या आश्रयाच्या अभावीं पितृगृहीं, माहेरीं परत येणें; विधवा होणें. 'कुटुंब मोठें, दोन बहिणी घरीं आलेल्या.' -मनोरंजन आगरकर अंक. घरीं तसा दारीं देवळीं तसा बिर्हाडीं, घरीं दारीं सारखाच-सर्व ठिकाणीं सारखाच वागणारा; (सामा.) सर्वत्र उपद्रवकारक असलेला (मनुष्य, मूल); जसा स्वतःच्या घरीं उपद्रवकारक तसाच दुसर्याच्या घरीं उपद्रवकारक असलेला (मनुष्य, मुलगा). आल्या घरचा-वि. पुनर्विवाहित स्त्रीस पहिल्या नवर्यापासून झालेला (मुलगा). म्ह॰ १ घर फिरलें म्हणजे घराचे वांसेहि फिरतात = (एखाद्या) घरांतल्या मुख्याची खपा मर्जी, नाराजी झाली तर घरांतलीं लहानमोठीं नोकरचाकर सर्वच माणसें त्याच्या विरुद्ध उठतात. सामाशब्द- ॰असामी-स्त्री १ वतनवाडी; जमीनजुमला; मालमत्ता. २ घरकामासंबंधाचा मनुष्य; घराकडचा माणूस. ॰कज्जा-पु. घरां- तील तंटा; कौटुंबिक भांडण; गृहकलह. ॰करी-पु. पत्नीनें नवर्यास उद्देशून वापारावयाचा शब्द; घरधनी; कारभारी; यज- मान; घरमालक. 'माझे घरकरी गांवाला गेले.' ॰करीण- स्त्री. पतीनें पत्नीविषयीं वापरावयाचा शब्द; कारभारीण. 'माझ्या घरकरणीला तिच्यामुळें आराम वाटतो.' -कोरकि ३१५. २ घरधनीण; घरची मालकीण; यजमानीण. ॰कलह-पु. घरांतील भांडण; घरांतील माणसांचें दायग्रहणादिविषयक भांडण; आपसां- तील भांडण; अंतःकलह. ॰कसबी-पु आपल्या अक्कलहुषारीनें घरगुती जरूरीचे जिन्नस घरच्याघरीं तयार करणारा व घरची मोडतोड दुरुस्त करणारा मनुष्य; घरचा कारागीर; बाहेर काम करून उपजीविका न करणारा माणूस. ॰कहाणी-काहणी-स्त्री. (वाईट अर्थीं उपयोग) घरांतल्या खाजगी गोष्टीचें कथन. ॰कान्न-स्त्री. (गो.) घरधनीण; बायको; घरकरीण. [सं. गृह + कान्ता]. ॰काम-न. घरगुती काम. घरासंबंधीं कोणतेंहि काम; प्रपंचाचें काम. 'बायकांचा धंदा घरकामाचा लावतात.' ॰काम्या-वि. घरांतील कुटुंबांतील किरकोळ कामें करण्यास ठेवलेला नोकर, गडी; घरांतील काम करणारा. [घरकाम] ॰कार-री-पु. (गो. कु.) १ नवरा, पति. २ घरचा यजमान; घरधनी; मालक. [सं. गृह + कार] घरकरी पहा. ॰कारणी-पु. घरचें सर्व काम पाहणारा; कारभारी, दिवाणजी; खाजगी कारभारी. ॰कुंडा-पु. (कों.) १ पक्ष्याचें घरटें; कोठें. २ (ल.) आश्रय- स्थान; 'आम्हीं तुझ्या विश्रांतीचा घरकुंडा सोडतांच हे आमचे अद्वैतज्ञानाचे पांख आम्हांस तोलत नाहींसे होऊन आम्ही खालीं पडों लागलों.' -दादोबा, यशोदा पांडुरगी. [सं. गृह + कुंड] ॰कुबडा-कुबा-कोंबा-घरकोंग्या-कोंडा-कुंडा-कोंघा-कोंबडा-घुबड-पु. (घरांतला घुबड, कोंबडा इ. प्राणी) (दुबळ्या व सुस्त माणसाला-प्राण्याला तिरस्कानें लावावयाचा शब्द). नेहमीं घरांत राहाणारा; एकलकोंड्या; माणुसघाण्या; चारचौघांत उठणें, बसणें, गप्पा मारणें इ॰ ज्यास आवडत नाहीं असा, कधीं बाहेर न पडणारा मनुष्य; घरबशा. ॰कुल्ली- वि. (गो.) बहुश; घराबाहेर न पडणारी (स्त्री.); घर- कोंबडी. ॰केळ-स्त्री. (प्रां.) गांवठी केळ. घरीं लावलेलीं केळ. ॰खटला-लें-पुन १ घरचा कामधंदा; गृहकृत्य; प्रपंच, शेतभात इ॰ घरासंबंधीं काम. २ घराची, कुटुंबाची काळजी, जबाबदारी- अडचणी इ॰ ३ गृहकलह; घरांतील भांडण. ॰खप्या-वि. घरांतील धुणें, पाणी भरणें, इ॰ सामान्य कामाकरितां ठेवलेला गडी; घरच्या कामाचा माणूस; घरकाम्या पहा. [घर + खपणें = काम करणें, कष्ट करणें] ॰खबर-स्त्री. घरांतील व्यवहारांची उठाठेव-चौकशी; घराकडची खबर, बातमी. 'उगाच पडे खाटे वर तुज कशास व्हाव्या घरखबरा ।' -राला २२. [घर + खबर = बातमी] ॰खर्च-पु कुटुंबपोषणाला लागणारा खर्च; प्रपंचाचा खर्च. ॰खातें-न. घरखर्चाचें मांडलेलें खातें; खानगी खातें. ॰खास(ज)गी-वि. घरांतील मालमत्ता, कामें कारखाना इ॰ संबंधीं; घरगुती बाबीसंबंधीं; घरगुती, खासगी व्यवहारबाबत. ॰गणती-स्त्री. १ गांवांतील घरांची संख्या. २ गांवांतील घरांची मोजणी, मोजदाद. ३ गांवांतील घरांच्या मोजणीचा हिशेब, तपशील. (क्रि॰ करणें; काढणें) [घर + गणती = मोजणी] ॰गाडा- पु. संसाराचीं कामें; जबाबदारी; प्रपंचाची राहाटी; प्रपंच; संसार; घरखटला. (क्रि॰ हांकणें; चालवणें; सांभाळणें). ॰गुलाम-पु. घरांतील नोकर; गडी. 'चौदाशें घरगुलाम मुकले या निजपा- यांला ।' -ऐपो ३१३. ॰गोहो-पु. चुलीपाशीं, बायकांत, आश्रि- तांत शौर्य दाखविणारा मनुष्य; गेहेशूर; घरांतील माणसांवर जरब ठेवणारा पण बाहेर भागुबाईपणा करणारा पुरुष. [घर + गोहो = नवरा, पुरुष] ॰घरटी-स्त्री. दारोदार; एकसारखी फेरी घालणें (क्रि॰ करणें). 'चंद्र कथुनि मग महेंद्रगृहीं घरघरटी करित वायां ।' -आमहाबळ १९.१ ॰घाला-ल्या, घरघालू-वि. १ खोड साळ; फसवाफसवी करणारा; बिलंदर. 'भिजल्या पोरी कशी होरी ग हे घरघाली ।' -राला ४०. २ कुळाची अब्रू घालवणारा; घर- बुडव्या; दुसर्याचें घर बुडविणारा किंवा व्यसनादिकांनी आपलें घर बुडवून घेणारा. 'कशी घरघाली रांड बसली आम्हां गिळून ।' -राला ४६. ३ सर्व नाश करणारा. 'भयानका क्षिति झाली घर- घाली रुद्रविंशति जगिं फांकली ।' -ऐपो ३६८. [घर + घालणें; तुल॰ गु. घरघालु = द्रोही, खर्चीक] ॰घुशा-सा-वि. सर्व दिव- सभर उदासवाणा घरांत बसणारा; घरबशा, घरकोंबडा; घरकु- बडा पहा. [घर + घुसणें] ॰घुशी-सी-स्त्री. नवर्याचें घर सोडून दुसर्याच्या घरांत नांदणारी; दुसर्याचा हात धरून गेलेली विवा- हित स्त्री. 'कोण धांगड रांड घरघुशी ।' -राला ७८. [घर + घुसणें] ॰घेऊ-घेणा-वि. घराचा, कुटुंबाचा नाश, धुळधाण करणारा; घरघाला; घरबुडव्या; दुसर्यास मोह पाडून, फसवून त्याचें घर बळकावणारा. 'जळो आग लागो रे ! तुझि मुरली हे घरघेणी ।' -देप ८०. 'लांबलचकवेणी, विणुन त्रिवेणी, घर- घेणी अवतरली ।' -प्रला १११. [घर + घेणें] ॰चार, घरा- चार-पु. १ कुटुंबाची रीतभात; घराची चालचालणूक; कौटुं- बिक रूढी, वहिवाट. म्ह॰ घरासारखा घरचार कुळासारखा आचार. २ गृहस्थधर्म; संसार; प्रपंच. -जै १०६. 'दुःखाचा घरचार निर्धन जिणें भोगावरी घालणें ।' -किंसुदाम ५०. [सं. गृहाचार; म. घर + आचार = वर्तन] ॰चारिणी, ॰चारीण- स्त्री. (काव्य.) गृहपत्नी; घरधनीण; यजमानीण; घरमालकीण. 'शेवटीं नवनीत पाहतां नयनीं । घरचारिणी संतोषे ।' [सं. गृहचा- रिणी] ॰जमा-स्त्री. घरावरील कर; घरपट्टी. घरजांव(वा)ई- पु. बायकोसह सासर्याच्या घरीं राहणारा जांवई; सासर्यानें आपल्या घरींच ठेवून घेतलेला जांवई; सासर्याच्या घरीं राहून तेथील कारभार पाहणारा जांवई. 'तो संसाराचा आपण । घर जांवई झाला जाण । देहाभिमानासि संपूर्ण । एकात्मपणमांडिले ।।' -एभा २२.५९२. [घर + जांवई] ॰जांवई करणें-सक्रि. १ (एखाद्यास) सर्वसंपत्तीसह कन्यादान करणें; जांवयाला घरीं ठेवून घेणें, त्याला आपली जिंदगी देणें. 'त्याला त्यांनीं घरजां वईच केला आहे.' -इंप २७. २ (उप.) एखादी उसनी घेत- लेली वस्तु लाटण्याच्या हेतूनें, मालकानें परत मिळण्याविषयीं तगादा लावीपर्यंत, ठेवून घेणें. ॰जांवई होऊन बसणें-अक्रि. आपल्यावर सोपविलेल्या कामाचा किंवा धंद्याचा नफा किफायत आपल्याच कामीं लावणें, आपणच घेऊन टाकणें. ॰जिंदगी, जिनगानी-स्त्री. १ घरांतील सामानसुमान, उपकरणीं, भांडी- कुंडीं, द्रव्याव्यतिरिक्त इतर मालमत्ता; घरांतील जंगम चीजवस्त; मिळकत. २ (सामा.) मिळकत; इस्टेट. 'पादशहाची घरजि- नगानी समग्र लुटून.' -ख ८.४२२४. [घर. फा. झिंदगी, झिंद- गानी = मालमत्ता,जन्म,संसार] ॰जुगूत-जोगावणी-स्त्री. १ काटकसर; मितव्यय; थोडक्यांत घराचा निर्वाह. २ घरांतील जरूरीची संपादणी; कसाबसा निर्वाह. 'एक म्हैस आहे. तिणें घर जुगूत मात्र होत्ये.' -शास्त्रीको [घर + जुगुत = युक्ति + जोगवणी = प्राप्तीची व खर्जाची तोंडमिळवणी] ॰टका-टक्का-पु. घरपट्टी घरजमा; घरावरील कर. ॰टण-णा-घरठाण अर्थ २ घरवंद पहा. ॰टीप-स्त्री. १ गांवांतील घरांची गणती. (क्रि॰ करणें; काढणें). २ घरमोजणीचा हिशेब, तपशील; घरगणती पहा. [घर + टीप = टिपणें, लिहिणें] (वाप्र.) ॰टीप काढणें-करणें- घेणें-(ल.) (शोधीत, लुटीत, मोजीत, आमंत्रण देत) गांवां- तील एकहि घर न वगळता सर्व घरांची हजेरी घेणें; कोणतीहि क्रिया, रोग, प्रादुर्भाव गांवांतील एकहि घर न वगळतां होणें. 'यंदा जरीमरीनें ह्या गांवाची घरटीप घेतली.' ॰टोळ- स्त्री. (कों.) प्रत्येक घराचा झाडा, झडती. 'त्या गांवची घरटोळ घेतली तेव्हां चोर सांपडला.' घरडोळ पहा. ॰ठा(ठ)ण- न. १ घर ज्या जागेवर बांधलेलें आहे ती इमारत बांधून राहण्याच्या कामासाठीं उपयोगांत आणलेला जमीनीचा विभाग. -लँडरेव्हिन्यू कोड. २ मोडलेल्या घराचा चौथरा; पडक्या घराची जागा. घरवंद पहा. [सं. गृहस्थान; म. घर + ठाणा-ण] ॰ठाव-पु. १ नवरा; पति; संसार. 'मुदतींत आपल्याकडे नांदण्यास न नेल्यास मी दुसरा घरठाव करीन.' २ अनीति- कारक आश्रय; रखेलीचा दर्जा; रखेलीस दिलेला आश्रय. 'निरांजनीला मुंबईंत एका गुजराथी धनवानानें चांगला घरठाव दिला होता.' -बहकलेली तरुणी (हडप) ८. ॰डहुळी-डोळी, -डोळा-स्त्री. १ घराचा झाडा, झडती, झडती; बारीक तपासणी. 'मग थावली ते वाहटुळी । सैंघ घेऊनि घरडहुळी । -ज्ञा ६.२१६. 'तया आधवियांचि आंतु । घरडोळी घेऊनि असें पाहतु ।' -ज्ञा ११.५८६. २ प्रत्येक घराची केलेली झडती. (क्रि॰ घेणें). [घर + डहुळणें = ढवळणें] ॰डुकर-न. १ गांवडुकर; पाळीव डुकर. २ निंदाव्यजक (कुटुंबांतील) आळशी, निरुद्योगी स्त्री. [घर + डुकर] ॰तंटा-पु. गृहकलह; घरांतील भांडण. [घर + तंटा] ॰दार-न. (व्यापक) कुटुंब; घरांतील माणसें, चीचवस्त इ॰ प्रपंचाचा पसारा, खटलें; [घर + दार] (वाप्र.) घरदार खाऊन वांसे तोंडीं लावणें-सारी धनदौलत नासून, फस्त करून कफल्लक बनणें; ॰दार विकणें-घर व त्यांतील मालमत्ता विकणें; सर्व स्थावर जिंदगी घालविणें. म्ह॰ एक पाहुणा म्हणजे घरदार पाहुणें = एका पाहुण्यासाठीं कांहीं मिष्टान्न केलें तर तें घरांतील सर्व मंडळींस वाढावें लागतें. ॰देणें-न. घरपट्टी; घरटका. ॰धणी- नी-पु. १ यजमान; गृहपति; घरांतील कर्ता माणूस. 'निर्वीरा धरणी म्हणे घरधणी गोंवूनी राजे पणीं ।' -आसी ५२. २ पति; नवरा; घरकरी. 'मग घरधन्यास्नी पकडूनश्येनी न्ये.' = बाय २.२. ॰धंदा-पु. घरांतील कामधाम; गृहकृत्य. [घर + धंदा] ॰धनीण-स्त्री. १ घरमालकीण; यजमानीण. २ पत्नी; बायको; घरकरीण. 'माझी घरधनीण फार चांगली आहे.' -विवि ८.२. ४०. ॰नाशा-वि. घराचा, कुटुंबाचा नाश, धुळधाण कर णारा; घरघाल्या. [घर + नासणें] ॰निघ(घो)णी-स्त्री. १ घरनिघी पहा. २ (क्क.) घरभरणी अथवा गृहप्रवेश शब्दाबद्दल वापर- तात. केव्हां केव्हां या दोन्हीहि शब्दांबद्दल योजतात. [घर + निघणें] ॰निघी-स्त्री. वाईट चालीची. दुर्वर्तनी, व्यभिचा रिणी स्त्री; घरांतून बाहेर पडलेली, स्वैर, व्यभिचारिणी स्त्री. 'कीं घरनिघेचें सवाष्णपण ।'-नव १८.१७२. [घर + निघणें = निघून जाणें, सोडणें] ॰निघ्या-पु. १ स्वतःचें कुटुंब, घर, जात सोडून दुसर्या घरांत, जातींत जाणारा; दुर्वर्तनी, व्यभिचारी मनुष्य. २ एखाद्या व्यभिचारिणी स्त्रीनें बाळगलेला, राखलेला पुरुष; जार. [घर + निघणें] ॰पटी-ट्टी-स्त्री. १ घरटका; घरदेणें; घरावरील कर; हल्लींसारखी घरपट्टी पूर्वीं असे. मात्र ती सरकारांत वसूल होई. पुणें येथें शके १७१८-१९ मध्यें घरांतील दर खणास सालीना ५ रु. घरपट्टी घेत. मात्र घरांत भाडेकरी किंवा दुकानदार ठेवृल्यास घेत. स्वतःचें दुकान असल्यास, किंवा भाडे- करी नसल्यास घेत नसत. -दुसरा बाजीराव रोजनिशी २७९- ८०. 'पंचाकडे घरपट्टी बसविण्याचा अधिकार आला.' -के १६.४. ३०. २ एखाद्या कार्याकरितां प्रत्येक घरावर बसविलेली वर्गणी. [घर + पट्टी = कर] ॰पांग-पु. निराश्रितता; आश्रयराहित्य. 'तंव दरिद्रि- यासी ठाव तत्त्वतां । कोणीच न देती सर्वथा । जेथें घरपांग पाहतां । बाहेर घालिती पिटोनि ।।' -ह २९.३५. [घर + पांग = उणीव] ॰पांड्या-पु. घरांतल्याघरांत, बायकांत बडबडणारा, पांडित्य दाखवणारा. [घर + पांड्या = गांवकामगार] ॰पाळी-स्त्री. (सरका- रला कांहीं जिन्नस पुरविण्याची, सरकाराचा विवक्षित हुकूम बजावण्याची, भिकार्यांना अन्न देण्याची इ॰) प्रत्येक घरावर येणारी पाळी, क्रम. [घर + पाळी] ॰पिसा-वि. ज्याला घराचें वेड लागलें आहे असा; घरकोंबडा; घरकुंडा; [घर + पिसा = वेडा] ॰पिसें-न. घराचें वेड; घरकुबडेपणा; घर सोडून कधीं फार बाहेर न जाणें. [घर + पिसें = वेड] ॰पोंच, पोंचता-वि. घरीं नेऊन पोंचविलेला, स्वाधीन केलेला (माल). [घर + पोहोंच विणें] ॰प्रवेश-पु. नवीन बांधलेल्या घराची वास्तुशांति करून त्यांत रहावयास जाण्याचा विधि. (प्र.) गृहप्रवेश पहा. [म. घर + सं. प्रवेश = शिरणें] घरास राखण-स्त्री. १ घराचें रक्षण करणारा मनुष्य. २ थोडासा संचय, शिल्लक, साठा, संग्रह. 'सगळा गूळ खर्चूं नको घरास राखण थोडकासा ठेव.' घर म्हणून पहा. ॰फूट-स्त्री. आपसांतील दुही, तंटेबखेडे; गृहकलह; घर, राज्य इ॰ कांतील एकमतानें वागणार्या माणसांमध्यें परस्पर वैर. द्वेषभाव. [घर + फूट = दुही, वैर] ॰फोड-स्त्री. घरांतील माणसांत कलि माजवून देणें, कलागती उत्पन्न करणें. [घर + फोडणें = फूट पाडणें] ॰फोडा-स्त्री. १ (कायदा) एखाद्याच्या घरांत त्याच्या संमतीवाचून कुलूप-कडी काढून, मोडून किंवा मार्ग नाहीं अशा ठिकाणीं मार्ग करून (चोरी करण्याकरितां) प्रवेश करणें; (पीनलकोडांतील एक गुन्हा). २ घराची भिंत वगैरे फोडून झालेली चोरी. (इं.) हाउस् ब्रेकिंग. [घर + फोडणें] ॰फोड्या-वि. १ घरांत, राज्यांत फूट पाडणारा, दुही माजविणारा; घरफूट कर. णारा. २ घरें फोडून चोरी करणारा. [घर + फोडणें] ॰बंद-पु. १, (कों.) घरांची वस्ती, संख्या. 'त्या शहरांत लाख घरबंद आहे. [घर + बंद = रांग] २ घराचा बंदोबस्त; घरावरील जप्ती; घर जप्त करणें; घराची रहदारी बंद करविणें; चौकी-पहारा बसविणें. 'एकोनि यापरी तुफान गोष्टी । क्रोध संचरला राजयापोटीं । पाहारा धाडूनि घरबंदसाठीं । ठेविला यासी कारागृहीं ।' -दावि ४५६. [घर + बंद = बंद करणें] ॰बशा-वि. उप. घरकोंबडा; घरांत बसून राहणारा. [घर + बसणें] ॰बसल्या-क्रिवि. घरीं बसून; नोकरी, प्रवास वगैरे न करतां; घरच्याघरीं; घर न सोडतां. (ल.) आयतें; श्रमविना. (क्रि॰ मिळणें; मिळवणें). 'तुम्ही आपले पैसे व्याजीं लावा म्हणजे तुम्हांला घरबसल्या सालीना पांचशें रुपये मिळतील.' ॰बाडी-स्त्री. बेवारसी घरांचें भाडें (ब्रिटीशपूर्व अमदानींत, कांहीं शहरांतून सरकार हें वसूल करीत असे). घरवाडी पहा. ॰बार-न. घरदार; घरांतील मंडळी व माळमत्ता; संसार; प्रपंचाचा पसारा. 'तेवि घरबार टाकून गांवीचे जन ।' -दावि ४१२. 'घरबार बंधु सुत दार सखे तुजसाठिं सकळ त्यजिले ।' -देप २७. [सं. गृह + भृ; म. घर + भार; हिं घरबार; गु. घरबार] ॰बारी-पु. १ कुटुंबवत्सल; बायकोपोरांचा धनी; गृहस्थाश्रमी; संसारी. 'भार्या मित्र घरबारिया ।' -मुवन १८.७१. २ घरधनी; घरकरी; नवरा; पति. 'कां रुसला गे माझा तो घरबारी ।' -होला १४८. [सं. गृह + भृ; म. घरबार; हिं. घरबारी; गु. घरबारी] म्ह॰ ना घरबारी ना गोसावी = धड संसारीहि नाहीं कीं बैरागी नाहीं अशा मनुष्याबद्दल योजतात. ॰बारीपणा-पु. गृहस्थ- पणा; कर्तेपणा. 'पुरुषास घरबारीपणा प्राप्त होतो.' -विवि ८.२. ३५. [घरबारी] ॰बुडवेपणा-पु. १ घराचा नाश करण्याचें कर्म. २ देशद्रोह; स्वदेशाशीं, स्वदेशीयाशीं, स्वराज्याशीं बेइमान होणें. 'हा प्रयत्न त्यांच्या इतर प्रयत्नाप्रमाणेंच घर- बुडवेपणाचा आहे हें आम्ही सांगावयास नकोच.' -टि १.५४८. [घर बुडविणें] ॰बुडव्या-वि. अत्यंत त्रासदायक; दुसर्याच्या नाशाची नेहमीं खटपट करणारा; घरघाल्या; स्वतःच्या, दुसर्याच्या घरादारांचा नाश करणारा; देशद्रोही. [घर + बुडविणें] ॰बुडी, ॰बुड-स्त्री. १ (एखाद्याच्या) संपत्तीचा, दौलतीचा नाश; सर्वस्वाचा नाश. २ एखादें घर, कुटुंब अजिबात नष्ट होणें; एखाद्या कुळांचें, वंशाचें निसंतान होणें. [घर + बुडणें] ॰बेग(ज) मी-स्त्री. कुटुंबाच्या खर्चाकरितां धान्यादिकांचा केलेला सांठा, पुरवठा, संग्रह; प्रपंचासाठीं केलेली तरतूद. [घर + फा. बेगमी = सांठा] ॰बेत्या-पु. (राजा.) घराची आंखणी करणारा. (इं.) इंजिनिअर. [घर + बेतणें] ॰बैठा-वि. घरीं बसून करतां येण्या- सारखें (काम, चाकरी, धंदा); बाहेर न जातां, नोकरी वगैरे न करतां, स्वतःच्या घरीं, देशांत करतां येण्याजोगा. २ घरांत बसणारा (नोकरी, चाकरीशिवाय); बेकार. -क्रिवि. (सविभक्तिक) घरीं बसून राहिलें असतां; घरबसल्या पहा. [घर + बैठणें] ॰भंग- पु. १ घराचा नाश, विध्वंस. 'जिवलगांचा सोडिला संग । अव- चिता जाला घरभंग ।' -दा ३.२. ६०. २ (ल.) कुळाचा, कुटुंबाचा नाश; कुलनाश. [घर + भंग] ॰भर-वि. (कर्तुत्वानें, वजनानें) घर, कुटुंब भरून टाकणारा-री; घरांत विशेष वजन असणारा-री; घरांतील जबाबदार. -क्रिवि. घरांत सर्व ठिकाणीं, सर्वजागीं. 'त्यानें तुला घरभर शोधलें.' [घर + भरणें] ॰भरणी- स्त्री. १ गृहप्रवेश; नवीन बांधलेल्या घरांत राहण्यास जाण्याच्या वेळीं करावयाचा धार्मिक विधि; वास्तुशांति; घररिघणी पहा. २ पतीच्या घरीं वधूचा प्रथम प्रवेश होताना करण्याचा विधि; नव- वधूचा गृहप्रवेश; गृहप्रवेशाचा समारंभ; वरात; घररिगवणी; घर- रिघवणी. 'वधूवरें मिरवून । घरभरणी करविली ।' -र ४८. ॰भरवण-णी-स्त्री. (गो. कु.) गृहप्रवेश; वरात; घरभरणी अर्थ २ पहा. [घर + भरवणें] ॰भाऊ-पु. कुटुंबांतील मनुष्य; नातलग; कुटुंबांच्या मालमत्तेचा, वतनवाडीचा वांटेकरी; हिस्सेदार; दायाद. ॰भाट-पु. १ (कु.) घराच्या आजूबाजूची आपल्या माल- कीची जागा, जमीन; घरवाडी; विसवाट. २ (गो.) घराशेजा- रचा, सभोंवारचा नारळीचा बाग. [घर + भाट] ॰भांडवल- न. १ कुटुंबांतील मालमत्ता, जिंदगी, इस्टेट. २ एखाद्याचा खाजगी द्रव्यनिधि, ठेव; उसना काढलेला, कर्जाऊ काढलेला पैसा, द्रव्यनिधि याच्या उलट. [घर + भांडवल] ॰भांडवली- वि. घरच्या, स्वतःच्या भांडवलावर व्यापार करणारा. [घर- भांडवल] ॰भाडें-न. दुसर्याच्या घरांत राहण्याबद्दल त्यास द्यावयाचा पैसा, भाडें. [घर + भाडें] ॰भारी-पु. (प्र.) घरबारी. १ घरबारी पहा. २ ब्रह्यचारी, संन्यासी याच्या उलट; गृहस्था- श्रमी. ॰भेद-पु. कुटुंबाच्या माणसांतील आपसांतील भांडण, तंटा; फाटाफूट; घरफूट. ॰भेदी-द्या-वि. १ स्वार्थानें, दुष्टपणानें परक्याला, शत्रूला घरांत घेणारा; फितूर; देशद्रोही. २ घरचा, राज्याचा, पक्का माहितगार; घरचीं सर्व बिंगें ज्यास अवगत आहेत असा. म्ह॰ घरभेदी लंकादहन = घरभेद्या मनुष्य लंका जाळण्यार्या मारुतीप्रमाणें असतो. ३ घरांतील, राज्यांतील कृत्यें, गुप्त बातम्या बाहेर फोडणारा; घर फोडणारा. 'घरभेद्या होऊनि जेव्हां ।' -संग्रामगीतें १४०. ४ घरांत, कुटुंबांत, राज्यांत, तेटें, कलह, लावणारा. ॰भोंदू-वि. १ लोकांचीं घरें (त्यांना फसवून) धुळीस मिळवणारा. २ (सामा.) ठक; बिलंदर; प्रसिद्ध असा लुच्चा; लफंगा (मनुष्य). [घर + भोंदू = फसविणारा] ॰महार- पु. राबता महार. ॰मारू-र्या-वि. शेजार्यास नेहमीं उपद्रव देणारा; शेजार्याच्या नाशविषयीं नेहमीं खतपट करणारा. ॰माशी-स्त्री. घरांत वावणारी माशी; हिच्या उलट रानमाशी. ॰मेढा-मेंढ्या-पु. घरांतील कर्ता, मुख्य मनुष्य; कुटुंबाचा आधारस्तंभ; घराचा खांब पहा. [सं. गृह + मेथि; प्रा. मेढी; म. घर + मेढा = खांब] ॰मेळीं-क्रिवि. आपसांत; घरीं; खाजगी रीतीनें; आप्तेष्टमंडळीमध्यें (तंठ्याचा निवडा. तडजोड करणें). 'घरमेळीं निकाल केला.' [घर + मेळ; तुल॰ गु. घरमेळे = आप- सांत] ॰मोड-स्त्री. मोडून तें विकणें. 'कांहीं दिवसपर्यंत येथें घरमोडीचा व्यापार उत्तम समजला जात होता.' -टि १. १६९. [घर + मोडणें] ॰राखण-स्त्री. १ (प्रा.) घराची पाळत; रक्षण; पहारा. २ घरराखणारा; घरावर पहारा ठेवणारा. [म. घर + राखणें] ॰राख्या-वि. घराचें रक्षण करणारा; घराचा पहा- रेकरी; घरराखण. [घर + राखणें] ॰रिघणी, ॰रिघवणी-स्त्री. १ बांधलेल्या घरांत प्रवेश करतेवेळीं करावयाचा धार्मिक- विधि घरभरणी अर्थ १ पहा. २ घरचा कारभार; घरकाम. 'रचून विविध देहकुटी । तो घररिघवणी परिपाठी ।' -विपू ७. १२८. [घर + रिघणें = प्रवेश करणें] ॰रिघणें-घरांत येणें, प्रवेश करणें. 'घररिघे न बाहतां भजकाच्या ।' -दावि १६१. ॰लाठ्या-वि. (महानु.) घरांतील लाठ्या, लठ्या; घरपांड्या; गृहपंडित; घरांत प्रौढी मिरविणारा; रांड्याराघोजी. 'ऐसेआं घरलाठेआं बोला । तो चैद्यु मानवला ।' -शिशु ८९९. [घर + लठ्ठ?] ॰वट-ड-स्त्री. १ (कु. गो.) एखाद्या कुटुंबाची सर्वसाधारण, समायिक जिंदगी, मालमत्ता; कुटुंबाचें, संस्थेचें सर्वसाधारण काम, प्रकरण. घरोटी पहा. २ (गो.) कूळ; कुटुंब; परंपरा. ३ अनुवंशिक, रोग, भूतबाधा इ॰ आनुवांशिक संस्कार. [सं. गृह + वृत्त; प्रा. वट्ट] ॰वण-न. (कों.) घरपट्टी; घरासंबंधीं सरकार देणें. ॰वणी- न. घराच्या छपरावरून पडणारें पावसाचें पाणी. याचा धुण्याकडे उपयोग करतात. [सं. गृह. म घर + सं. वन, प्रा. वण = पाणी] ॰वंद-पु. (राजा.) घरटणा; पडक्या घराचा चौथरा; पडलेल्या घराची जागा. -वि. घरंदाज; कुलीन; खानदानीचा. 'शहर पुणें हरहमेष भरलें वाडें बांधिती घरवंदानी ।' -ऐपो ४२०. [गृहवंत?] ॰वरौते-स्त्री. १ घरवात; प्रपंच; संसारकथा; घरवात पहा. २ -न. वनरा- बायको; दापत्य; जोडपें. 'तीं अनादि घरवरौतें । व्यालीं ब्रह्मादि प्रपंचातें ।' -विउ ६.५ 'पुढती घरवरौतें । वंदिलीं तिये ।' -अमृ १.४९. [गृह + वृत्-वर्तित्] ॰वसात-द- स्त्री. १ वसति; रहाणें; वास; मुकाम. २ घराची जागा आणि सभोंवतालचें (मालकीचें) आवार, परसू, मोकळी जागा, अंगण. [घर + वसाहत] ॰वांटणी, ॰वांटा ॰हिस्सा- स्त्रीपु. घराच्या मालमत्तेंतील स्वतःचा, खाजगी, हिस्सा, भाग. [घर + वांटणी] ॰वाडी-स्त्री. (कों.) ज्यांत घर बांधलेलें, असतें तें आवार; वाडी. कोणाच्या अनेक वाड्या असतात, त्यापैकीं जींत धन्याचें घर असतें ती वाडी. [घर + वाडी] ॰वात-स्त्री. संसार; प्रपंच; संसाराच्या गोष्टी; प्रपंचाचा पसारा; घरवरौत; घरकाम. 'घरवातें मोटकीं दोघें । जैं गोसावी सेजे रिगे । दंपत्यपणें जागे । स्वामिणी जें ।।' -अमृ १.१३. 'ऐसी तैं घरवात वाढली । खातीं तोंडें मिळालीं ।' -दा ३.४. ६. [सं. गृहवार्ता] ॰वाला-वि. १ घराचा मालक. २ (खा.) नवरा; घरधनी; पति. [घर + वाला स्वामित्वदर्शक; प्रत्यय; तुल॰ गु. घरवाळो] ॰वाली- वि. (खा.) बायकों; पत्नी; घरधनीण. 'माझ्या घर- वालीनें साखर पेरतांच त्यानें सर्व सांगितलें ।' -राणी चंद्रावती ५३. [घर + वाली; गु. घरवाळी] ॰वासी-वि. कुटुंबवत्सल; प्रपंचांत वागणारा. [घर + वास = राहणें] ॰वेडा- वि. १ घरपिसा. २ बाहेर राहून अतिशय कंटाळल्यामुळें घरीं जाण्यास उत्सुक झालेला; (इं.) होमसिक्. ॰शाकारणी-॰शिवणी-स्त्री. घरावरील छपराची दुरुस्ती करणें; घरावर गवत वगैरे घालून पाव- सापासून संरक्षणाची व्यवस्था करणें; घराच्या छपराचीं कौलें चाळणें. [घर + शाकरणें, शिवणें] ॰शोधणी-स्त्री. १ स्वतःचीं खाजगी कामें पहाणें. २ स्वतःच्या साधनसामर्थ्याचा विचार करणें; स्वतःची कुवत अजमावणें. [घर + शोधणें] ॰संजोग- पु. १ एखाद्या कामास लागणारा घरचा संरजम. 'त्या हरदा- साचा घरसंजोग आहे.' = कीर्तनास लागणारीं साधनें तबला, पेटी, टाळ इ॰ हीं त्या हरदासाच्या घरचींच आहेत. २ काटकसरीचा प्रपंच; घरजुगूत; घरव्यवस्था. ३ सुव्यवस्थित घरांतील सुखसोयी, समृद्धता. [घर + सं. संयोग, प्रा. संजोग + सरंजाम] ॰संजो- गणी-स्त्री. घरसंजोग अर्थ २ पहा. घरजुगूत; काटकसर; मितव्यय. ॰समजूत-स्त्री. घरांतल्याघरांत, आपआपसांत स्नेह भावानें. सलोख्यानें केलेली तंट्याची तडजोड, समजावणी. ॰संसार-पु. कुटुंबासंबंधीं कामें; घरकाम; प्रपंच. ॰सारा-पु. घरावरील कर; घरपट्टी; घरटक्का. [घर + सारा = कर] ॰सोकील- वि. घरीं राहून खाण्यास सोकावलेला; घरीं आयतें खाण्यास मिळत असल्यानें घर सोडून बाहेर जात नाहीं असा; घराची चटक लागलेला (बैल, रेडा इ॰ पशु). [घर + सोकणें] ॰स्थिति- स्त्री. १ घराची स्थिति; घरस्थीत पहा. २ गृहस्थाश्रमधर्म; संसार; प्रपंच. 'ॠषीस अर्पिली कन्या शांती । मग मांडिली घरस्थिति ।' -कथा ३.३. ६३. [सं. गृहस्थिति] ॰स्थीत-स्त्री. घराची, कुटुं- बाची रीतभात, चालचालणूक, वर्तक, आचार, स्थिति. म्ह॰ अंगणावरून घरस्थीत जाणावी = अंगणाच्या चांगल्या किंवा वाईट स्थितीवरून त्या घारांतील मंडळीचा आचार कसा आहे तें समजतें. शितावरून भाताची परीक्षा या अर्थी. [घर + स्थिति अप.] घराचा खांब, घराचा धारण, घराचें पांघरूण-पुन. (ल.) घरांतील कर्ता माणूस; घरांतला मुख्य; घरमेढ्या. घराचार-पु. १ संसार; प्रपंच; गृहस्थाश्रमधर्म; घरकाम. 'परी अभ्यंतरीं घराचार माडें ।' -विपू ७.१३८. 'यापुरी निज नोवरा । प्रकृती गोविला घरचारा ।' -एभा २४.३२. -कालिकापुराण ४.३५. २ (ल.) पसारा; व्याप 'तेथ वासनेचा घराचार । न मांडे पैं ।' -सिसं ४.२०७. ३ घरां- तील मंडळींची राहटी, रीतभात, आचरण, वागणूक, व्यवहार. 'वंध्यापुत्राचा घराचार । तैसा जीवासि संसार ।' -एभा २६. ३०. [सं. गृह + आचार] घराचारी-वि. १ घरंदाज. २ नवरा; पति; घरकरी; ददला. 'ऐशिया स्त्रियांचे घराचारी । खराच्या परी नांदती ।' -एभा १३.२१४. [घराचार] घरास राखण- स्त्री. १ घरांचें रक्षण करणारा मनुष्य. २ थोडासा संचय, शिल्लक, सांठा, संग्रह. 'सगळा गूळ खर्चू नको घरास राखण थोडकासा ठेव.' घर म्हणून पहा. घरींबसल्या-क्रिवि. घरबसल्या पहा. घरोपाध्या-पु. कुलोपाध्याय; कुलगुरु; कुलाचा पुरोहित, भटजी. [घर + उपाध्याय; अशुद्ध समास]