मराठी बृहद्कोश

आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

व्याजोक्ति

व्याजोक्ति vyājōkti f S Disguised or covert speech; speech whether allusive and darkly expressive of the mind of the speaker, or fraudulently disguised and designed to deceive.

मोल्सवर्थ शब्दकोश

लघूक्ति (व व्याजोक्ति )

तुमच्या कैवाराची तितकीशी जरूरी नाहीं, झाला हा प्रकार चांगला का ? प्रेम असेल पण ते जाणवत नाहीं, दहा लाखाची इस्टेट तेव्हां 'त्यांना विशेष असें कांहीं कमी पडत नव्हतें, त्यांनीं केलेला हा गौरव सत्यापेक्षां मुत्सद्देगिरीचा वाटला ही गोष्ट कांहीं त्याच्या कार्यक्षमतेचे प्रशस्तिपत्र नव्हे, चुकलों-त्रिवार चुकलें सौंदर्यांबाबत तंग परिस्थिति आहे.

शब्दकौमुदी

संबंधित शब्द

अस्मानचपेटा      

पु.       १. परमेश्वरी कोप; मोठा प्रलय; संकट; दैवी आपत्ती; अरिष्ट. २. (व्याजोक्ती) आकाशात उड्डाण करणारा घोडा. (एखाद्या रद्दी, टाकाऊ, निकामी घोड्यास म्हणतात).

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कडोविकडीचा      

वि.       १. कडोविकडीने भरलेले, केलेले (भाषण, अर्थ, कल्पना, लिहिणे, गाणे, नाचणे, वाजविणे इ.); अन्योक्ती, व्याजोक्ती, व्यंग्योक्तीचा; उपरोधिक; औपरोधिक : ‘कडोविकडीचे विचार सुचले ।’ − ऐपो २१४. २. युक्त्या; मसलती; डावपेच यांनी युक्त (क्रिया, हावभाव, वागणूक इ.); शिताफी इत्यादीने भरलेले : ‘कडोविकडीचीं विवरावीं । अंतःकर्णे ॥’ − दास १९·१०·१०. ३. खुबीदार; कुशल; चतुराईने अलंकृत; झील, कंप, आघात, छाया, उडणी, झोक यांनी भरलेले (गाणे, नाचणे, वाजविणे) : ‘ठेवी कडोविकडीची ठिवण हो । अक्षरी मोत्यांची ववण । लय लाऊन करती श्रवण हो ।’ − प्रला १२२.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कर्मविपर्यास      

पु.       व्याजोक्ति, उपरोध.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खो(खों)च

स्त्री. १ ठोका; घाव; खोंक; बोंच. २ खंड; खांच. ३ पुढें आलेलें टोंक; कांटा; अणकुची; खोचाटा. ४ (ल.) व्यापारांतील तोटा; नुकसान; धक्का. ५ रोष; असंतोष. 'मज- विषयीं त्यांचे मनांत खोंच आली. '६ गाण्यातील स्वरभेद, खुबी. 'त्या ख्यालामध्ये त्यानें दहा खोंची घेतल्या.' ७ खुबी; मर्म; तात्पर्य, रस (गोष्ट, बनाव, प्रसंग, भाषण यांतील) 'त्याच्या बोलण्याची खोंच माझ्या लक्षांत आली.' ८ व्यंगोक्ति; व्याजोक्ति; उपरोध. ९ बाणांचा टप्पा. 'पुढें बाणाच्या खोचेचे तफावतीनें उभें राहिले.' -इमं २८९. [सं. कुच्] (वाप्र.) ॰मारणें-मर्मभेदक टीका करणें. 'मोठमोठ्या इंग्रजी ग्रंथकारांची कोणास खोंचा मारण्याची रीत किती संभावितपणाची व रामबाण असते हें ठाऊक असेलच.' -नि ९. सामाशब्द- ॰कील-वि. संकुचित; अडच- णीचें; कोंदट. ॰खांच-स्त्री. खांचखोंच (वर्णव्यत्यास) पहा.

दाते शब्दकोश

खोच      

स्त्री.       १. ठोका; घाव; खोक; बोच. २. खंड, खाच. ३. पुढे आलेले टोक; काटा; अणकुची; खोचाटा. ४. (ल.) व्यापारातील तोटा; नुकसान; धक्का. ५. रोष; असंतोष. ६. व्यंगोक्ती; व्याजोक्ती; उपरोध. ७. बाणांचा टप्पा : ‘पुढें बाणाच्या खोचेचे तफावतीनें उभे राहिले.’ - इमं २८९. [सं. कुच] (वा.) खोच मारणे - मर्मभेदक टीका करणे : ‘मोठमोठ्या इंग्रेजी ग्रंथकारांची कोणास खोंचा मारण्याची रीत किती संभावितपणाची व रामबाण असते हें ठाऊक असेलच.’ - नि ९.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

निंदक, निंदखोर

वि. निंदा करणारा; दोषारोप करणारा; दुसर्‍याचे अवगुण सांगणारा; चहाडखोर. निंदणें-सक्रि. निंदा करणें; चहाडी करणें; दोष वर्णन करणें. निंदन-न. निंदा पहा. निंदनीय-वि. निंदा करण्यास योग्य; निंद्य; निंदेस पात्र. निंदा-स्त्री. दोषवर्णन; कुटाळी; निभर्त्सना; अवगुण सांगणें; शिव्या देणें; दोषारोप करणें; चहाडी. [सं.] ॰परस्तुति- फलकस्तुति वाक्य-उपरोधिक भाषण; व्याजोक्ति; स्तुतीचा खोटा बहाणा करून केलेली निंदा. निंदाखोर-खाऊ-वि. निंदक पहा. निंदित-वि. १ निंदा, निर्भर्त्सना केलेला; दोष दिलेला. २ शास्त्रांनीं निषिद्ध मानिलेला; असमंत. निदेजणें-सक्रि. निंदा करणें. -शर (चांगदेव, पासष्टी ६५.) निंद्य-वि. निंदेस पात्र; निंदनीय; दुषणीय; दोषयुक्त.

दाते शब्दकोश

ऑपार

स्त्री. (गो.) उपमा; व्याजोक्ति. 'आपार माल्ली' = टोमणा दिला.

दाते शब्दकोश

प्रहसन

न. १ एक हास्यरसप्रधान रूपक; फार्स. याच्या संविधानकांत व्याजोक्ति व एखाद्या गोष्टीचा उपहास केलेला असतो. २ मोठा हंशा. [सं.]

दाते शब्दकोश

टापर

स्त्री. १ घोड्यानें मारलेली लाथ. (क्रि॰ मारणें). २ बोटांच्या पेर्‍यांनीं डोक्यावर केलेला आघात. (क्रि॰ मारणें). ३ डोईस बांधावयाचें फडकें; टापशी. (क्रि॰ घालणें; घेणें). टापरण, टापरा-नपु. (टापरणेंपासून) मर्मभेदक शब्द; टोमणा; व्याजोक्ति; ठोसा; आघात (अपराध, उपकार, कृपा इ॰ संबंधानें). (क्रि॰ ठेवणें; टापरा मारणें). ॰वाजणें-(ना.) दिवाळें निघणें; फडशा पडणें; संपणें.

दाते शब्दकोश

टीका (कुत्सित )

भलेपणाची झिलई आहे इतकेंच, चिल्लर आक्षेप घेतले आहेत, तिरकस परीक्षण, लेखणीची नागमोडी चाल दिसून येते, कुचोद्यपणाने टीका करून घेतली, केवळ शब्दच्छल, आडून गोळ्या, टोंच मारली आहे, कोमट स्तुति, थंडें कौतुक, चकणा उल्लेख, जळका आनंद प्रगट केला आहे, कारल्याहून कडू, टीकेची वाममार्गी चिखल - फेक, व्याजोक्ति- व्यंगोक्तिपूर्ण, वक्रोक्तीने बरबटलेले स्तंभ, आडमार्गी कोटिक्रम, सरळ सोडून आडरानांत शिरतात, खोडसाळपणाची व व्यक्तिगत, कुचकीं मनें प्रकटवलीं, शिंतोडे उडविले आहेत, नाक मुरडलें आहे, केवळ विविध वैगुण्यांची जाणीव करून देणारी, यांत पदोपदीं व्यंग व उपहास ध्वनित होतो, अशा टीकेनें रसिकांच्या अंगाचा तिळपापड होतो, या टीकेला उत्तर म्हणून हे पुस्तक डोक्यावर फेकून मारावेंसें वाटतें ! जिभेची मिरमिर शमविण्यासाठी ही टीका आहेसे दिसतें.

शब्दकौमुदी

टणका, टणकारा

पु. १ विंचवाच्या नांगीचा ठणकारा; दंश; फणकारा. (क्रि. मारणें). २ (ल.) टोमणा; मर्मभेदक भाषण; व्याजोक्ति; व्यंगोक्ति; खोंचदार भाषण. (क्रि॰ मारणें; मारून जाणें). [ध्व.]

दाते शब्दकोश

टोमणा, टोमणे      

पु. न.       १. (विटीदांडू) विटीला मारलेला टोला, रट्टा, आघात. २. (ल.) व्याजोक्ती; खोच; मर्मभेदक टीका; टचका; छद्मी भाषण; शब्दांचा मार. [क.; सं. स्तुभ्]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

टोमणा-णें

पुन. १ (विटीदांडू) विटीला मारलेला टोला, रट्टा, आघात. २ (ल.) व्याजोक्ति; खोंच; मर्मभेदक टीका; टचका; छद्मी भाषण. [का.]

दाते शब्दकोश

तुक्का, तुका      

पु.       १. पात्याऐवजी तोंडाशी गोळा असलेला बोथट बाण. २. (ल.) गुप्त निंदा; कावेबाजीचा फटका किंवा टोमणा; व्यंग्यार्थ; व्याजोक्ती. (क्रि. टाकणे, मारणे, ठेवणे). ३. आळ; आरोप. (वा.) तुका मारणे – १. नेम मारणे. २. महत्कृत्य करणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तुक्का-का

पु. १ पात्याऐवजीं तोंडाशीं गोळा असलेला बोथट बाण. २ (ल.) गुप्त निंदा; कावेबाजीचा फटका अथवा टोमणा; व्यंग्यार्थ; व्याजोक्ति. (क्रि॰ टाकणें; मारणें; ठेवणें). ३ आळ; आरोप. उदा॰ 'त्या चोरीचा तुक्का हा मजवर ठेवून गेला.' [फा. तुक्का] म्ह॰ लागला तर तीर नाहींतर तुक्का.

दाते शब्दकोश

ठसठाबरा

पु. १ टोमणा; व्याजोक्ती; व्यंगोक्ति; तडाखा. (क्रि॰ देणें). २ पाहुण्यास हलक्या प्रकारें वागविणें (भाताऐवजी कांजी, कढण इ॰ देऊन); पाहुण्याचा अनादर. [ठस = ध्वनि + ठोंबरा = तडाखा] (वाप्र.) ॰वाटाण्याची अक्षत-तोंडावर रोखठोक, कडक, स्पष्ट खडखडीत उत्तर. (क्रि॰ देणें; लावणें).

दाते शब्दकोश

ठसठोंबरा      

पु.       १. टोमणा; व्याजोक्ती; व्यंगोक्ती, तडाखा. (क्रि. देणे). २. पाहुण्याला कमी प्रतीची वागणूक देणे; पाहुण्याचा अनादर. (वा.) ठसठोंबरा वाटाण्याची अक्षत देणे, ठसठोंबरा वाटाण्याची अक्षत लावणे - तोंडावर रोखठोक, कडक, स्पष्ट, खडखडीत, भीडभाड न धरता नकारात्मक उत्तर देणे; विनंती अमान्य करणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उरोध      

पु.       व्याजोक्ती; उलट अर्थी बोलणे; उपरोध. [सं. उपरोध]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उरोध

पु. उपरोध; औपरोधिक भाषण; व्याजोक्ति. 'उरोधु वादुबळु । प्राणीतापढाळु । उपहासु चाळु । वर्मस्पर्शु ।।' -ज्ञा १३. २७०. [उपरोध अप.]

दाते शब्दकोश

विपरीत

वि. १ उलट; विरुद्ध; उफराटें; विचित्र. 'केळि जशा विपरीत तशा उरु पावलें तीं ।' -राधावर्णन अकक २. -ज्ञा १.२१९. 'नये नानाचे मनास जाहलें विपरीत इतरांस ।' -ऐपो ३०६. २ प्रतिकूल; अननुकूल; अप्रसन्न. 'आणि विकारांची जे वारी । ते विपरीत ज्ञानाची परी ।' -ज्ञा १५.५२१. ३ अन्य; भिन्न प्रकारचा. [सं. वि + परि + इ = जाणें] ॰काल-पु. प्रतिकूलसमय; कष्टदशा. ॰भावना-स्त्री. १ विरुद्ध किंवा भिन्न रूप, आकार, स्थितिवगैरे. २ प्रकृतीमध्यें पडलेला फरक. ३ एखाद्यासंबंधी बदललेली वृत्ति, कल्पना वगैरे. ४ (तत्त्व.) देहात्म बुद्धि; जीव व ब्रह्म यांमध्यें भेद आहे किंवा देह हाच आत्मा आहे अशा प्रकारची उलटी समजूत. ॰भोग-पु. पुरुषायित संभोग. 'विपरीत भोग करून मनोरथ कळेल तसा पुरवून ।' -प्रला ११७. ॰राशी-पु. (शाप.) उलट केलेली संख्या. (इं.) इन- व्हर्स फंक्शन. ॰लक्षणा-स्त्री. व्याजोक्ति; औपरोधिक वर्णन. ॰ज्ञान-न. अन्यथाज्ञान; मिथ्याज्ञान; जग सत्य आहे असें म्हणणें. 'विपरीतज्ञान म्हणिजे देखणें । येकाचें येक ।' -दा २०. १.२३. विपरीतज्ञानाचा कोंभ फुटणें-चूक होणें; भ्रम होणें. विपरीतार्थ-पु. परस्पर विरोधी, उलटसुलट अर्थ. 'तरी तितुके हि सत्य देख । विपरीतार्थ न मानिजे ।' विपर्यय-पु. १ विपर्यास; विरुद्धता; उलटेपणा; उरफटेपणा. २ विरुद्ध दशा; प्रतिकूलता (यावरून) कष्टदशा; संकट; चूक; गैरसमज; उलटा- पालट वगैरे. [सं. वि + परि + इ = जाणें] विपर्यस्त-वि. विपरीत केलेलें; विपर्यास केलेलें; उलटलेलें (वाईट अर्थानें). विपर्यास- पु. १ विपरीतपणा; विरुद्धता; उफराटेपणा. २ प्रतिकूलता; विपर्यय पहा. ३ बदल; फरक रूपांतर; अवनति. [सं.]

दाते शब्दकोश

वाच्यालंकार

वाच्यालंकार vācyālaṅkāra m S A rhetorical ornament; a figure of the sentiment or sense. वाच्यालंकार (or properly and commonly अर्थालंकार) is contradistinguished from शब्दालंकार. The first is Deflection or affection of the sense of the sentence; the second is Change (from literal to metaphorical) of the sense of a word; the first is Figure, the second is Trope. The वाच्यालंकार or Figures are enumerated at one hundred and fifteen, the शब्दा- लंकार or Tropes, at five. These hundred and fifteen figures, omitted under the proper word अर्था- लंकार, are inserted here:--उपमालंकार, अनन्वय, उपमेयोपमा, प्रतीप, रूपक, परिणाम, उल्लेख, स्सृतिमान्, भ्रांतिमान्, ससंदेह, अपन्हुति, उत्प्रेक्षा, अतिशयोक्ति, तुल्ययोगिता, दीपक, प्रतिवस्तूपमा, दृष्टांत, निदर्शना, व्यतिरेक, विनोक्ति, समासोक्ति, परिकर, परिकरांकुर, श्लेष, अप्रस्तुतप्रशंसा, प्रस्तुतांकुर, पर्यायोक्त, व्याजनिंदा, व्याजस्तुति, आक्षेप, विरोधाभास, विभावना, विशेषोक्ति, असंभव, असंगति, विषम, विचित्र, अधिक, अल्प, अन्योन्य, विशेष, व्याघात, कारणमाला, एकावली, माला- दीपक, यशासंख्य, पर्याय, परिवृत्ति, परिसंख्या, विकल्प, समुच्चय, समाधि, प्रत्यनीक, काव्यार्थापत्ति, काव्यलिंग, अर्थांतरन्यास, विकस्वर, प्रौढोक्ति, संभावना, मिथ्याध्य- वसिति, ललित, प्रहर्षण, विषादन, उल्लास, अवज्ञा, अनुज्ञा, लेश, मुद्रा, रत्नावली, तद्गुण, पूर्वरूप, अतद्गुण, उत्कर्ष, मीलित, सामान्य, उत्तर, चित्र, सूक्ष्म, व्याजोक्ति, विवृतोक्ति, युक्ति, लोकोक्ति, छेकोक्ति, वक्रोक्ति, स्वभावोक्ति, भाविक, अत्युक्ति, निरुक्ति, प्रतिषेध, विधि, हेतु, रसवत्, प्रेयस्, ऊर्जस्वित्, समाहित, भावोदय, भावसंधि, भावश- बलता. For the definitions and exemplifications of these figures see प्रतापरुद्रग्रंथ & काव्यप्रकाश. Note. The above वाच्यालंकार are, not one hundred and fifteen, but ninety-eight; because the enumera- tion presents, not the divisions and subdivisions, but the main word simply.

मोल्सवर्थ शब्दकोश

वाच्य

न. १ उद्दिष्ट; बोलावयाची, सांगावयाची गोष्ट; व्याख्यानाचा विषय. -ज्ञा १८.१६८२. २ (व्या.) प्रयोग. कर्तुवाच्य; (कर्तरि); कर्मवाच्य; (कर्मणि). -वि. १ बोल- ण्यास, उल्लेख करण्यास योग्य, शक्य, इष्ट, जरूरीचें. -ज्ञा ११. ४४. २ कर्तृविषयक; विधेयात्मक; गुणवाचक; शक्यतावाचक वगैरे (शब्द). ३ विशेषणाप्रमाणें विभक्ति रूपें होणारें. ४ दूषणीय; अश्लाध्य. 'जो आपल्या धर्मांतील वाच्यस्थलें दाख- वील तो पाखंडी ।' -आगर ३.२८. [सं.] वाच्यता-स्त्री. चर्चा; गवगवा; प्रसिद्धि; सांगत फिरणें. (क्रि॰ करणें). वाच्यार्थ-पु. १ शब्दशः अर्थ; स्पष्टार्थ. २ जें बोलावयाचें तें; बोलण्यांतील उद्दिष्ट. वाच्यांश-पु. भाषण; शब्द; बोललेली किंवा बोलावयाची गोष्ट; वाचांश असाहि प्रयोग करतात. 'वाच्य वाचक वाच्यांश । त्रिपु- टीत ज्याचा सत्ता अंश ।' -ज्ञानप्र ३२१. वाच्यालंकार- पु. भाषणांतील, वाक्यांतील सौंदर्यदर्शक स्थल; सामान्यतः यांस अर्थालंकार म्हणतात-शब्दालंकार याच्या उलट. यांपैकीं कांहीं पुढें दिले आहेतः-उपमा; अनन्वय; उपमेयोपमा; प्रतीप; रूपक; परिणाम; उल्लेख; स्मृतिमान्; भ्रातिमान्; ससंदेश; अपह्नुति; उत्प्रेक्षा; अतिशयोक्ति; तुल्ययोगिता; दीपक; प्रतिवस्तूपमा; दृष्टांत; निदर्शना; व्यतिरेक; विनोक्ति; समासोक्ति; परिकर; परि करांकुर; श्लेष; अप्रस्तुतप्रसंशा; प्रस्तुतांकुर; पर्यायोक्त; व्याजनिंदा; व्याजस्तुति; आक्षेप; विरोधाभास; विभावना; विशेषोक्ति; असं- भव; असंगति; विषम; विचित्र; अधिक; अल्प; अन्योन्य; विशेष; व्याघात; कारणमाला; एकावली; मालादीपक; यथासंख्य; पर्याय; परिवृत्ति; परिसंख्या; विकल्प; समुच्चय; समाधि; प्रत्यनीक; काव्यार्थापत्ति; काव्यलिंग; अर्थांतरन्यास; विकस्वर; प्रौढोक्ति; संभावना; मिथ्याध्यवसिति; ललित; प्रहर्षण; विषादन; उल्लास; अवज्ञा; अनुज्ञा; लेश; मुद्रा; रत्नावली; तद्गुण; पूर्वरूप; अत- द्गुण; उत्कर्ष; मीलित; सामान्य; उत्तर; चित्र; सूक्ष्म; व्याजोक्ति; विवृत्तोक्ति; युक्ति; लोकोक्ति; छेकोक्ति; वक्रोक्ति; स्वभावोक्ति; भाविक; अत्युक्ति; निरुक्ति; प्रतिषेध; विधि; हेतु; रसवत्; प्रेयस्; ऊर्जस्वित्; समाहित; भावोदय; भावसंधि; भावशबलता. इ॰ यांचें वर्णन काव्यप्रकाश किंवा प्रतापरूद्र वगैरे साहित्यावरील ग्रंथांत पहावें.

दाते शब्दकोश