मराठी बृहद्कोश

आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

सळय or यी

सळय or यी saḷaya or yī f Commonly सळई.

मोल्सवर्थ शब्दकोश

शल्य

शल्य n A peg. A thorn. A dead fætus remaining in the womb.

वझे शब्दकोश

न. १ कांटा; टांचणी; कुसळ; टोंचणारा पदार्थ. शलका पहा. 'जया जन्ममृत्यूचें । हृदयीं शल्य ।' -ज्ञा १३. ५५३. २ न वाढतां पोटांत राहिलेला गर्भ; सल. ३ (ल.) टोंचणारें दुःख; सल; मनाला लागून राहिलेला अपमान; सलणी; तापदायक, दुःखदायक व्यथा; पीडा; मनाला टोंच- णारी गोष्ट. ४ बांधीत असलल्या इमारतीखालील जागेंतील प्रेत, केस, हाडें वगैरे अशुभ पदार्थ. हा काढून टाकला नाहीं तर त्याची बाधा होते. ५ बाणाग्र. ६ शरीरांत राहिलेला (कांटा, सुई, बाण, इ॰ चा) अंश. [सं.] ॰तंत्र-शास्त्र-न. वैद्यकीय शस्त्रविद्या; शरीरांत असलेले आगंतुक पदार्थ कसे काढावे या विषयींचें शास्त्र; शरीरव्यवच्छेदन शास्त्र. [सं.]

दाते शब्दकोश

शल्य śalya n (S) A peg, a pin, a spike, a thorn, a stub or snag, any similar thing considered as a piercing body. Note. This is rather the proper or primitive than the common sense of the word. The following are the current senses and applications. 1 A splint, splinter, or fragment remaining in the flesh. 2 A dead fœtus remaining in the womb. 3 fig. An injury or insult rankling and festering; an occurrence or an act of which the remembrance is pungently painful; a troublesome or an afflictive occurrence; a plague, pest, bore: a thorn in all its figurative senses. 4 Any mischiefworking thing (as a corpse, a bone &c.) left below the ground on which a house is rising. This must be dug up, or the house will be haunted &c.

मोल्सवर्थ शब्दकोश

पु. एक पौराणिक राजा; नकुल-सहदेवाचा मामा. 'शल्य म्हणे रे सूता बडबड करितोसि फार मद्यपसा ।' -मोकर्ण २९.३५. [सं.]

दाते शब्दकोश

(सं) न० टोचणारा पदार्थ, टोंक, कुसळ.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

सळ्य

स्त्री. विटीदांडूच्या खेळांतील एक संज्ञा.

दाते शब्दकोश

संबंधित शब्द

शैल्य

न. शल्य याचा अपभ्रंश. शल्य पहा.

दाते शब्दकोश

शैल्य śailya n (Corr. from शल्य q. v.) A splint or splinter lodged in the flesh &c.

मोल्सवर्थ शब्दकोश

शेल

न. टोंक; शल्य. 'तैसा नोहोटे दुर्वाक्य शेलीं । सेलिला सांता ।' -ज्ञा १३.४९६. [सं. शल्य]

दाते शब्दकोश

सल

नपु. १. शल्य; शस्त्रादिकाचें टोंक; कांटा; मांसांत रुतलेला अणकुचीदार पदार्थ; कूस. 'सल सिलका आणि सराटें ।' -दा ३.७.४. २ पोटांत न वाढतां राहिलेला गर्भ; गर्भाशयांत राहिलेला मृत गर्भ. 'सल आडवें गर्भपात ।' -दा ३.६.४७. ३ (ल.) मनांत खुपत असलेलें अपमान वगैरेचें दु:ख; दु:खकारक स्मृति; त्रासदायक गोष्ट; पीडाकारक निमित्त. 'सलें गेलीं चित्तीं भय दशमुखाच्याहि धसलें ।' -मोरामायणें १.४१०. ४ वठलेलें झाड, शाखा. 'विसर विजती सलें । सलतीं तियें ।' -ज्ञा १६.१४६. ५ बीं पेरलें असतां उगवलेला कोंवळा अंकुर हा विषारी असतो व जनावरानें खाल्ला असतां त्यास रोग होतो. किरळ पहा. 'सल खाऊन गुरें मेली.' ६ साल; त्वचा. 'कलि- युगांत कोरडीं । चहुंयुगांचीं सलें सांडी ।' ज्ञा १५.१२९. ७ -स्त्री. (कों.) उसण; सलक. [सं. शल्य; प्रा. साल] सल चढणें-विषाद वाटणें. सलीं लागणें-पोटांत सल वाढल्या- मुळें झिजून आजारी पडणें. सलणें-अक्रि. १ बोचणें; टोंचणें; खुपणें. 'आंगीं देहाची लुती जिती । जेणें आली तें चित्तीं । सलेना जया ।' -ज्ञा १३.७३१. २ (ल.) न खपणें; सहन न होणें; डोळ्यांत खुपणें; मनाला टोंचून, लागून राहणें; रुखरुख लागणें (केलेल्या चुकीची, दोषाची). 'आचरणें खोटीं । अपराधाची केलीं सलताही पोटीं ।' -तुगा १८८५.

दाते शब्दकोश

(सं) न० शल्य. २ खरटा झालेला पोटांतला गर्भ.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

सल sala m n (शल्य S) A dead fœtus remaining in the womb. Ex. पराचें लग्न मोडीत ॥ तरीं स्त्रीस सल राहे पोटांत॥. 2 A splint or fragment remaining in the flesh. 3 fig. An injury or insult remaining rankling and festering in the mind; an occurrence or an act of painful remembrance; a troublesome or an afflictive occurrence; a plague, pest, bore; a thorn in its figurative senses. 4 A dried tree or branch. 5 m The cord by which the scabbard of a sword is connected with the hilt and secured. 6 A disease of cattle. See किरळ. Ex. सल खाऊन (or लागून) गुरें मेलीं. सलीं लागणें To be affected with sickliness and wasting from having a dead fœtus in the womb.

मोल्सवर्थ शब्दकोश

अष्टांग

पु. १ शरीराचीं आठ अंगें:-दोन हात, उर. कपाळ, दोन नेत्र, ग्रीवा, कटि; दुसरा पर्याय- दोन हात, उर, भाल, दोन पाय, दोन गुडघे; तिसरा-दोन हात, दोन पाय, दोन गुडघे, वाचा, मन; चौथा पर्याय-हात, पाय, गुडघे, छाती, मस्तक, दृष्टि, मन, वाणी. -एभा २०.२९१ २ (सामा.) सर्व शरीर; सबंध देह. अष्टांगीं पहा. 'आरोग्यता तुका पावला अष्टांगीं ।' -तुगा ३९५८. ३ अष्टविध समाधि पहा. 'अष्टांग अभ्यासिला योगु तेणें ।' -ज्ञा ९.४२२. ४. आठपट. ५ वैद्यकशास्त्राचे आठ भाग:-शल्य, शालाक्य, कायचिकित्सा, भूतविद्या, कौमारभृत्य, अगदतंत्र, रसा- यनतंत्र, वाजीकरणतंत्र. ६ स्मृतीचीं अष्टांगें:-कायदा, न्यायाधीश, पंच, लेखक, ज्योतिष, सोनें, अग्नि, पाणी. ७ पूजेचीं अष्टांगें:- पाणी, दूध, तूप, दहीं, दर्भ, तांदूळ, जव, सर्षप. ८ मैथुनाचीं अष्टांगें:- स्मरण, कीर्तन, क्रीडा, दर्शन, गुह्यभाषण, चिंतन, निश्चय, संयोग. ९ बुध्दीचीं अष्टांगें:-शुश्रूषा, श्रवण, ग्रहण, धारण, चिंतन, ऊहापोह, अर्थविज्ञान, तत्त्वज्ञान. ॰नमन-पात-प्रमाण- न. पु. हात, पाय, गुडघे, वक्षस्थल, मस्तक, दृष्टि, मन व वाणी हीं आठ अंगें जमीनीवर टेकून नमस्कार करणें. अतिशय आदरार्थीं नम्रतापूर्वक नमस्कार. -एभा २०.२९१. ॰योग्य- अष्टविध समाधि पहा. 'येक संगती अष्टांगयोग _ नाना चक्रें ।।' -दा ५.४.२४. ॰लवण- न. पादेलोण, ओवा, आमसुलें, आम्लवेतस हीं एकएक भाग, दाल- चिनी, वेददोडे व मिर्‍यें हीं अर्धा भाग व साखर सर्वच्या बरोबर घालून केलेलें चूर्ण. हें अग्निदीपक आहे. ॰साधन- अष्टविध समाधि पहा. 'योगी करिती अष्टांगसाधन । त्यांसीही नव्हे ऐसें दर्शन । ' -ह ८.१८२. [सं.]

दाते शब्दकोश

डाचणे      

उक्रि.       १. पहा : डचडचणे. २. (स्वतःचा मूर्खपणा किंवा दुसऱ्याचे वर्मी भाषण) मनात सलणे; घोळत असणे; बोचणे; शल्य राहणे; खुपणे. (या अर्थी अकर्तृक प्रयोगही होतो.). ३. त्रास देणे; छळणे; गांजणे. [सं. दंश]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

डाचणें

उक्री. १ डचडचणें; घशाशीं जळजळणें, येणें; पोटांत खुपणें; सलणें(पित्तविकारामुळे, तिखट-मसालेदार पदार्थ खाण्यांत आल्यामुळें). २ (स्वतःचा मूर्खपणा किंवा दुस- र्‍याचें वर्मी भाषण, पीडा यांच्या आठवणीमुळें) मनांत सलणें; घोळत असणें; बोचणें; शल्य राहणें.(या अर्थीं अकर्तृक प्रयोगहि होतो). ३ (जाचणें बद्दल चुकीनें) त्रास देणें; छळणे; गांजणें. [ध्व. डच; किंवा सं. दंश-दशन; म. डसणें]

दाते शब्दकोश

कीसार      

न.        शल्य.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

किसार      

न.        शल्य; कसपट.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

किसार

न. शल्य; कसपट. -शर सोहिमह.

दाते शब्दकोश

कुळक

न. इच्छा; हेतु? 'म्यां देखिलें नाहीं पुत्रमुख । हेचि राहिलें असे कुळक ।' -कथा ३.१५.५४. शल्य? [सं. कीलक?]

दाते शब्दकोश

खोचा      

पु.       १. धोतराचा ओचा, सोगा, खोवण्याचा भाग. २. पोचा; खोमा; धस लागून फाटणे. ३. (मांसात शिरलेले) टोक; शल्य. ४. सड पीत असताना वासराने गाईला मारलेली ढुसणी, हुंदडा. ५. (गाईचे दूध पिता येऊ नये म्हणून वासराच्या तोंडास बांधलेली) भाळी; लाकडी चौकट. ६. खुंटाळे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खों(खो)चा

पु. १ धोतराचा ओंचा, सोगा, खोवण्याचा भाग. २ पोंचा; खोमा; धस लागून फाटणें. ३ (मांसांत शिर- लेलें) टोंक; शल्य. ४ थान पीत असतांना वासरानें गाईस मार- लेली ढुसणी, हुंदडा. ५ (गाईचें दुध पितां येऊं नये म्हणून वास- राच्या तोंडास बांधलेली) भाळी; लाकडी चौकट. ६ खुंटाळें. -शर. [खोंचणें]

दाते शब्दकोश

खुडुस      

न.       शल्य : ‘श्रीमंत दादासाहेब अकस्मात इंदुरास आले त्यास जाऊं द्यावे तरी राज्यात खुडुस रहाते.’ - मशिंयांक ५.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खुपणे      

उक्रि.       १. टोचणे; बोचणे; दुःख देणे; पीडा करणे (काटा, केस, शल्य यांनी) : ‘यथार्थ तरी खुपणें । नाहीं कवणा ॥’ - ज्ञा १६·१२०. २. दुखावणे; सलणे (डोळा इ.). ३. (ल.) डोळ्यात किंवा मनात काट्याप्रमाणे, शल्याप्रमाणे बोचणे, सलणे : ‘अंतरीं मृदु लोणी तैसा । कोणाही सहसा खुपेना ॥’ - भाराबाल ११·२४६. ४. पश्चात्ताप होणे. ५. मनात डाचणे; मनाला खाणे; अस्वस्थता उत्पन्न करणे : ‘परि तुझा बोल होता खुपत । हृदयामाजीं ।’ - कथा ५·११·१६१. [सं. क्षुभ]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खुपणें

उक्रि.१ टोंचणें; बोंचणें; दुःख देणें; पीडा करणें (कांटा, केस, शल्य यांनीं). 'यथार्थ तरी खुपणें । नाहीं कवणा ।' -ज्ञा १६.१२०. २ दुखावणें; सलणें (डोळा इ॰). ३ (ल.) डोळ्यांत किंवा मनांत कांट्याप्रमाणें, शल्याप्रमाणें बोंचणें, सलणें. 'अंतरीं मृदु लोणी तैसा । कोणाही सहसा खुपेना ।।' -भाराबाल ११.२४६. ४ अनुतप्त होणें; पश्चाताप होणें. ५ मनांत डांचणें; मनाला खाणें; अस्वस्थता उत्पन्न करणें. 'परि तुझा बोल होता खुपत । हृदयामाजीं ।' कथा ५.११.१६१. [सं.क्षुभ्; प्रा.खुभ किंवा खुप्प + निमग्न होणें?]

दाते शब्दकोश

मदनवृक्ष

पु. गेळीचें झाड. मरुबक; श्वसन; करहाटका, शल्य. -मसाप ४५.३. [सं.]

दाते शब्दकोश

निसल      

वि.       बरड (जमीन) : ‘निसले भूमी संस्कारु करावा :’ - लीचउ १४६. [सं.निः + शल्य]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

साळ

साळ sāḷa f ई or ए (Or सायाळ from शल्य S) A porcupine.

मोल्सवर्थ शब्दकोश

साळ, साळई

स्त्री. साळू; सायाळ. अंगावर लांब कांटेरी पिसें असणारें जनावर. [सं. शल्य] साळजिवाद-न. साळ पहा. साळपीस-न. साळू जनावराचें पीस. साळशीट-त- द-न. १ साळपीस. २ साळू. साळशीस्त्री. साळू. साळिंदर, सार्ळिद्र-द्री-द्रें-साळशीट पहा. साळी-ळू-स्त्री. सायाळ जनावर.

दाते शब्दकोश

साळई

साळई sāḷī f (सल्लकी or शल्य S) A porcupine.

मोल्सवर्थ शब्दकोश

साळी

साळी sāḷī f (शल्य or सल्लकी S) A porcupine.

मोल्सवर्थ शब्दकोश

साळू

साळू sāḷū f (शल्य S) A porcupine.

मोल्सवर्थ शब्दकोश

सायाळ

स्त्री. एक प्राणी. याच्या अंगाला लांब लांब कांटे असतात; साळू. 'त्यांतून देती व्याघ्र आरोळ्या । अस्वलें दिवा- भितें सायेळ्या ।' -होला ११४. [सं. शल्य; हिं. सष्यल्]

दाते शब्दकोश

सायाळ sāyāḷa f (शल्य S through H) A porcupine, Hystrix cristata. 2 n A porcupine's quill.

मोल्सवर्थ शब्दकोश

सड

पु. १ धस; ठोंब; खुंट; ज्वारी वगैरे कापल्यानंतर शेतांत राहणारा बुडखा, खुंटारा, धसाडी, शल्य. २ (ल.) (अश्लील) जननेंद्रिय; (बैल किंवा रेडा यांचें) लिंग. ३ (ल.) आंचळ; स्तन; आसड; थान. ४ (डुकराचा किंवा इतर प्राण्याचा) राठ केस. सड आवळणें-शेळीचे स्तन कोंकरानें दूध पिऊं नये म्हणून बांधून ठेवणें.

दाते शब्दकोश

शेलणें

सक्रि. १ (महानु.) विधणें; जखम करणें. 'नवनिशित तिहीं शेलितू यादवातें ।' -गस्तो ५७. २ (कों.) सोलणें; शेंगा वगैरे फोडणें. [सं. शल्य]

दाते शब्दकोश

सळ

न. द्वेष; वैर; दावा; वांकडेपणा. 'पतंगु जैसा सळें । दीपाचेनि ।' -ज्ञा १८.६१८. [सं. शल्य]

दाते शब्दकोश

पु. १ अभिमान; आग्रह; हट्ट ईर्षा. 'म्हणौनि कामाचेनि बळें । जो विषय सेऊं पाहे सळें ।' -ज्ञा १६.४५४. 'अहंकारें सांडिलें सळ । वियोगु देखौनिया ।' -ऋ १०१. 'बळियाचीं आम्ही बाळें । असों निर्भर या सळें ।' -तुगा १८१८. २ बळ; झपाटा; उसळी; ऊर्मी; आवेश. 'तैसा नुठी जया सळू । कामोमींचा ।' -ज्ञा १५.३०२. 'हाणित थाप मुखांत सळानें ।' -आ नवरस चरित्र ११७. [स. शल्य]

दाते शब्दकोश

न. २ पीक कापल्यावर उरणारा धस; सड; कापलेला बुडखा किंवा त्यास फुटलेला अंकुर. [सं. शल्य]

दाते शब्दकोश

सळ, सल

न. बाणाग्र; टोंचणी; लोखंड लांकूड वगैरेचा अणीदार बोंचणारा तुकडा. हृदयीं तप्तलोहाचें सळ । साहों येईल चिरकाळ । परी दुष्ट शब्दाची जळजळ । मरणान्तींहि शमेना ।' -मुआदि १८.४१. [सं. शल्य]

दाते शब्दकोश

शलल

न. १ साळशिंदर; साळूच्या अंगांवरील कांटा. २ (ल.) कंटक; कांटा. 'तें भीमवपु विनाशर, शल्यवपु जसें विनाशलल, नाहीं ।' -मोद्रोण १२.४२. [सं. शल्य]

दाते शब्दकोश

सल्ल

न. सल पहा. 'तें जीवित सल्ल मीं मानी । पळपत विरहाग्नी ।' -ऋ ६५. [सं. शल्य]

दाते शब्दकोश

सलणें

सलणें salaṇēṃ v i (सल or शल्य) To prick; to feel (be felt) as sharply painful;--as a thorn or a splint lodged in the flesh. 2 fig. To be offensive in the sight of; to be an eye-sore unto: also to fester in the mind, to rankle;--as an injury or insult received: to be biting or stinging unto;--as the remembrance of crimes committed.

मोल्सवर्थ शब्दकोश

समेत

वि. जुळलेला; संलग्न; संबद्ध (विषय, गुण, क्रिया, कारक वगैरे). -शअ. सह; बरोबर; सहित; समवेत; युक्त. 'निज सैन्य समेत शल्य जो मामा. ।' -मोकर्ण ७.४५. [सं. सम् + इ = जाणें] समेत बाबती-क्रिवि. बाबतीसह (परगण्याच्या अधिका- र्‍यांच्या हक्कांसह, ते हक्क धरून). 'त्या शेतास समेतबावती पांच मण भात पडतें.' समेत जवाहिर-क्रिवि. जवनाहिरासह. -पेद २०. २.

दाते शब्दकोश

श्राव्य

वि. श्रवण करण्यास, ऐकण्यास, योग्य; ऐकण्या- जोगें; ऐकावयाचें ऐकूं येईल असें. 'हितसत्य श्राव्य तें वदे शल्य ।' -मोकर्ण (नवनीत पृ. ३३५.) श्राव्यत्व-न. ऐकण्याविषयीं योग्यता. 'श्राव्यत्वें तरी माधुर्य । पायीं घाली ।' -ज्ञा १६. ११८.

दाते शब्दकोश

सत्ळी

पुस्त्री. सळई; शलाका; शल्य. 'तो सुरणांतु सत्ळी घालावा.' वैद्यक बाड ८१.८८.

दाते शब्दकोश

उपसळा

वि. खोडकर; त्रासदायक; उपद्रव देणारें; वाईट वर्तनाचें (मूल वगैरे). [सं. उप + शल्य]

दाते शब्दकोश

उपसळा      

वि. खोडकर; त्रासदायक; उपद्रव देणारे; वाईट वर्तनाचे (मूल वगैरे). [सं. उप + शल्य]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उपसळो

पु. १ उपसर्ग; त्रास; उपद्रव; उद्वेग (उंदीर, मांजर, कुत्रा वगैरेपासून होणारा). २ कटकट; त्रास (मुलें वगैरेंचा); छळवाद; सतावणी; (क्रि॰ आणणें; देणें). [सं. उप + शल्य]

दाते शब्दकोश

दात      

पु.       १. चावण्याच्या, फाडण्याच्या उपयोगी तोंडातील दृश्य अस्थिविशेषांपैकी प्रत्येक; दंत. २. (ल.) (फणी, करवत, दंताळे इ. चा) दाता; फाळ; नांगराचे टोक; डंगाचे टोक. ३. हस्तिदंत. ४. द्वेषबुद्धी; मत्सर; दावा; डाव; दंश. [सं. दंत] (वा.) दात, दात ओठ खाणे, चावणे - रागाने दातावर दात घासणे, दातांनी ओठ चावणे; अतिशय चिडणे; रागावणे. दात काढणे, दात दाखवणे - दात विचकून, फिदीफिदी हसणे. दात किरकिटीस येणे - विपन्नावस्था, अन्नान्नदशा होणे; हलाकीची परिस्थिती येणे. दात कोरणे - इकडून-तिकडून खटपटीने जमवणे; अडचणीने मिळवणे. दात खाऊन, ओठ खाऊन - मोठ्या रागाने व अवसानाने. दात खाऊन अवलक्षण करणे, दात चावून अवलक्षण करणे - (प्रतिकार करण्याचे सामर्थ्य नसताना) रागाचा दुबळा आविर्भाव आणून, शिव्याशाप देऊन स्वतःचे हसे करून घेणे. दात खीळ-खिळी बसणे - निरुत्तर होणे; एखाद्यापुढे बोलता न येणे. दात झिजणे - निष्फळ उपदेश केल्याने, केलेल्या विनवण्या व्यर्थ गेल्याने, शिकवलेला विषय मूर्ख विद्यार्थ्याला न समजल्याने तोंडाला फुकट शीण, श्रम होणे. दात धरणे, दात असणे, दात ठेवणे, दात राखणे, दात बाळगणे - द्वेष, मत्सर करणे; डाव धरणे; पूर्वीचे शल्य मनात ठेवून एखाद्याच्या नाशासाठी टपून बसणे. दात पडणे - (एखाद्याची) फटफजिती, नाचक्की होणे. दात पाजवणे-एखादी वस्तू (विशेषतः खाण्याची) मिळण्याजोगी नसताना तिच्याबद्दल उत्कंठित, आतुर होणे. दात पाडणे - (एखाद्याची) फजिती करणे; वादात पराजित करणे; टोमणा मारणे; निरुत्तर करणे; विरोधकांचे सर्व मार्ग बंद करणे; अद्दल घडवणे. दात पाडून हातावर देणे - कंबख्ती काढणे; पारिपत्य करणे; उट्टे फेडणे (विशेषतः धमकावणी देताना उपयोग). दात लागप - पैसे पदरी असणे; खाऊनपिऊन सुखी असणे. (गो.) दात वठणे, दात लागणे - (उच्चारलेला शाप एखाद्यावर) फलद्रूप होणे. दात वासणे - हाती घेतलेले कार्य शेवटाला नेता येत नाही म्हणून निराश होऊन स्वस्थ बसणे. दात वासून पडणे - १. आजाराने अशक्त होऊन अंथरुणाला खिळणे. दात विचकणे - १. उपहासाने हसणे. २. याचना करणे; काही मिळवण्यासाठी एखाद्याला विनवणे. दातकिची खाणे - (रागाने) कचाकच, कडकड दात चावणे. दात निसकीस येणे - १. त्वेष, स्फुरण, आवेश इ. नी युक्त होणे. २. जिवावर उदार होणे : ‘मल्हारराव यांचे इरेनें दातनिसकीस येऊन मोठमोठे खेतांत जीवाअधिक केली.’ - भाब ११. दाताओठांवर जेवणे - चोखंदळपणाने जेवणे. दाताखाली घालणे, दाताखाली धरणे - करडा, सक्त अंमल चालवणे; कडकपणाने वागवणे; अतिशय छळणे; गांजणे. दाताची मिरवणूक काढणे - स्वतःचे हसे करून घेणे. (कर.) दाताचे विष - मत्सराने, जळफळाटाने काढलेले विषारी उद्गार; शिव्याशाप. दाताचे विष बाधणे - १. पहा : दात वठणे. २. दुसऱ्याला बाधेल असा शाप देण्यास समर्थ असणे. दाताच्या कण्या करणे, घुगऱ्या होणे - १. विनवण्या, याचना करून, व्यर्थ उपदेश किंवा शिकविण्याचा निरर्थक खटाटोप करून दात झिजवणे; तोंड शिणवणे. २. अनेकवार सांगणे, विनवणे. दातावर मारायला पैसा नसणे - अगदी अकिंचन, निर्धन असणे, बनणे, होणे; जवळ एकही पैसा नसणे. दातावर मांस नसणे - १. पैशाचे पाठबळ नसणे; दारिद्र्याने ग्रस्त होणे : ‘आपल्या तर दांतांवर मांस नाहीं. कुटुंब एवढें थोरलें...’ - पकोघे. २. कोणाशीही भांडण्याचे किंवा कोणालाही इजा करण्याचे सामर्थ्य अंगी नसणे. दातावर येणे - अंगावर येणे; व्यवहार आतबट्ट्याचा होणे. दाताला दात लावून असणे, दातास दात लावून असणे, दाताला दात लावून निजणे, दातास दात लावून निजणे, दाताला दात लावून बसणे, दातास दात लावून बसणे, दाताला दात लावून रहाणे, दातास दात लावून रहाणे - तोंड मिटून, काही न खाता, उपाशी, न बोलता बसणे, रहाणे इ. दाती घेणे, दातावर येणे - एखाद्या कार्यात अपयश येणे; व्यापार इ. मध्ये नुकसान होणे. दाती तृण, दाती तण, दाती कड्याळ धरणे - मान तुकवणे; नम्रपणा स्वीकारणे; शरण येणे; पराभव मान्य करणे. दाती बळ धरणे - अतोनात मेहनत, धडपड, नेट करणे; प्रयासाने, नेटाने काम करणे. दाती येणे - १. रागाने दात-ओठ खाणे; भांडायला प्रवृत्त होणे : ‘येकीस येकी ढकलून देती । येताति येकीवरी एक दांतीं ।’ - सारुह ७·६०. २. फार अडचणीत, पेचात येणे, सापडणे. (एखाद्याचे)दात त्याच्याच घशात घालणे - एखाद्याची लबाडी बाहेर काढून त्याची फजिती करणे; (एखाद्याची) लबाडी त्याच्यावरच उलटवणे. सोन्याने दात किसणे - पैशाच्या राशीत लोळणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

काटा      

पु.       १. अणकुचीदार, तीक्ष्ण टोक असलेली, जी बोचली असताना रक्त काढते अशी काडी; बाभळीचा, बोरीचा दाभणासारखा टोचणारा अवयव : ‘सर्प कपाळीं कांटा नेहटे । कां सापसुरळीचे पुच्छ तुटे ।’ - भारा बाल ८·३५. २. सुई : ‘काटा आणिला । मेग सींउ बैसले ।’ - लीचउ २९. ३. (भयाने, थंडीने वगैरे) अंगावर उभे राहणारे शहारे; रोमांच. ४. (अव.) तापानंतर अंगावर येणारा खरखरीतपणा अथवा उठणाऱ्या बारीकपुटकुळ्या; पुरळ. ५. (अव.) तापाच्या पूर्वी अंगावर येणारी शिरशिरी; रोमांच; कसर. ६. विंचवाच्या नांगीचे पुढचे तीक्ष्ण टोक. ७. जो कुलुपाच्या दांडीत असतो व मागे सरतो तो कुलपादिकाचा खिळा. ८. वेळू, बांबू वगैरेंना येणारा तुरा, मोहोर, फुलोरा. ९. कंबर, मान, पाठ, यांच्या आतील बाजूला आधारभूत असलेला अस्थिविशेष. १०. गुणाकार, भागाकार यांचा ताळा पाहण्यासाठी अंक मांडण्याकरिता घातलेली चौफुली (ल.). ११. वजनाने विकलेल्या वस्तूंवर जे काही वजन कटते देतात ते. पहा : कडता. १२. काट्यासारखी शरीराला बोचणारी कोणतीही वस्तू (माशाचे हाड, चक्राचा दाता, घड्याळाचा हातकाटा, खडबडीत लगामाचे टोक, करवतीचा दाता, जेवणातील वापरायचे दाताळे - काटा, जनावरे किंवा भाजीपाला यावरील खरखरीत केस व लव इ.) : ‘काटा बराबर एकांवर एक आला.’ - रासक्रिडा ७. १३. हलवा, इतर मिठाई यावरील टोके, रवा. (क्रि. येणे, उमटणे, वठणे, उठणे.) १४. (वस्त्रोद्योग) वशारन करताना इकडून तिकडे (वशारन पुढे सरकण्यासाठी) फिरवायचे लाकूड. १५. सुताराचे एक हत्यार. (कु.) १६. (ल.) त्रास देणारा माणूस, व्याधी, शल्य, पीडा, शत्रू. १७. तराजूच्या दांडीमधील उभा खिळा : ‘जरि कांटा कलताए देवांचा । जेउता राजमठु ।’ - ऋ ३९. १८. काटा असलेला तराजू (विशेषतः सोनाराचा, सराफाचा) : ‘मेरूचिया वजनासपाहीं । कांटिया घातली जैसी राई ।’ - हरि ६०·१६१. [सं. कंटक] (वा.) काटा उपटणे - १. त्रासदायक प्राणी, शत्रू, गोष्ट नाहीशी करणे. (कर. व.) २. समूळ नाहीसा करणे, काढून टाकणे. काटा काढणे - आपल्या मार्गात असलेल्या, आपल्याला पदोपदी नडवणाऱ्या शत्रूला दूर करणे : ‘वसुदानाच्या पुत्रें जो अभिमुख काशिराजतो वधिला । कांटाचि काढिला तो जाणो तव सूनुच्या मनामधिला ।’ - मोकर्ण ४·१५. काटा मारणे - १. काट्याने सिद्ध करणे. २. अंगात (तापाची) कसर येणे. ३. काटेकोरपणे बरोबर आहे असे दाखविणे; चुकीचा तराजू वापरून वजनात खोट आणणे. काटा मोडणे - १. विंचू चावणे. (व.) २. पाणी किंचित उष्ण होणे. ३. पायात काटा घुसणे. काट्याचा नायटा होणे - काटा मोडल्यावर लगेच तो काढला नाही तर त्या ठिकाणी नायटा होतो, म्हणजे आरंभी क्षुल्लक वाटणाऱ्या वाईट गोष्टीचे पुढे मोठे हानिकारक परिणाम कधी कधी होतात. काट्याने काटा काढणे – एका दुष्टाच्या हातून परभारे दुसऱ्या दुष्टास शासन होईल असे करणे. काट्याप्रमाणे सलणे - सतत त्रासदायक होणे; दुखःकारक होणे; मत्सर, हेवा, द्वेष वाटणे. काट्यावर ओढणे, काट्यावर घालणे - वस्त्र काट्यावर ओढले असताना फाटते त्यावरून दुःखात घालणे; दुःखात लोटणे : ‘त्यांत (कौरव सैन्यात) मरेनचि शिरतां काट्यावरी घालितां चिरे पट कीं ।’ - मोविराट २. ४१. काट्यावर येणे - १. (बैलगाडी) आसाच्या दोन्ही बाजूला समतोल वजन होणे. २. (ल.) (मूल) खळीला येणे; रडायचे न थांबणे. ३. सहनशक्तीची परिसीमा होणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

दांत

पु. १ चावण्याच्या, फाडण्याच्या उपयोगीं तोंडांतील दृश्य अस्थिविशेषांपैकीं प्रत्येक; दंत. २ (ल.) (फणी, करवत, दंताळें इ॰ कांचा) दांता; फाळ; नांगराचें टोंक; डंगाचें टोंक. ३ हस्तिदंत. 'सहदेव नकुळ घेउनि दांतीं सिंहासनीं पृथा बसली ।' -मोशांति ५.४३ ४ द्वेषबुद्धि; मत्सर; दावा; डाव; वंश. 'त्याचा दांत आहे.' 'तो दांत राखितो.' [सं. दंत; पहा. हिं. दांत; सिं. डंदु] (वाप्र.) -उठणें-दांतांनीं धरलेल्या पदार्थावर दांताच्या खोलगट खुणा उमटणें. ॰ओठ खाणें-चावणें-रागानें दांतांवर दांत घासणें; दांतानीं ओंठ चावणें; अतिशय चिडणें; रागावणें. ॰काढणें-दाखविणें-दांत विचकून, फिदिफिदी हंसणें. ॰किची खाणें-(ना.) (राग इ॰ कानीं) कचाकच, कडकड दांत- चावणें. किरकिटीस येणें-विपन्नावस्था, अन्नान्नदशा प्राप्त- होणें; अति निकृष्ट परिस्थितीनें ग्रस्त होणें. ॰खाऊन-ओठ खाऊन-मोठ्या रागानें व अवसानानें. 'नरवर गरधरखरतर शर करकर दांत खाउनी सोडी ।' -मोशल्य २.८४. ॰खाऊन- चावून अवलक्षण करणें-(प्रतिकार करण्याचें सामर्थ्य नसतां) रागाचा दुबळा आविर्भाव आणून, शिव्याशाप देऊन स्वतःचें हंसें करून घेणें. ॰खाणें-चावणें-(रागानें चडफडून, झोंपेंत) दांतांवर दांत घासणें. 'कोपें खातात दांत बा हेर ।' -मोस्त्री ४.२६. ॰खीळ-खिळी बसणें-१ (सन्निपातादि दोषांमुळें) वरील दांत व खालचे दांत एकमेकांस घट्ट चिकटून बसणें. 'रामनाम घेतां तुझी बैसे दांतखीळ ।' -एकनाथ २ (ल.) निरुत्तर होणें; एखाद्या पुढें बोलतां न येणें. ॰खोचरणें- दांताच्या फटींत, खळग्यांत काडी, कोरणी घालून अडकलेले अन्नाचे कण इ॰ काढणें. ॰झिजणें-(ल.) निष्फळ उपदेश केल्यानें, केलेल्या विनवण्या व्यर्थ गेल्यानें, शिकविलेला विषय मूर्ख विद्यार्थ्यास ण समजल्यानें तोंडाला फुकट शीण, श्रम होणें. ॰धरणें-असणें-ठेवणें-राखणें-बाळगणें-(एखाद्याशीं) द्वेष, अदावत, मत्सर करणें; (एखाद्यावर) डाव धरणें; पूर्वींचें शल्य मनांत ठेवून (एखाद्याच्या) नाशासाठीं टपून बसणें. ॰निस- कीस येणें-त्वेष, स्फुरण, आवेश इ॰ कानीं युक्त होणें; जिवावर उदार होणें. 'मल्हारराव यांचे इरेनें दातनिसकीस येऊन मोठेमोठे खेतांत येऊन जीवाअधिक केली.' -भाब ११. [दांत + सं. निकष = घासणें] ॰पडणें-(एखाद्याची) फटफजिती, नाचक्की होणें; पराजित, फजित होणें. ॰पाजविणें-एखादी वस्तु (विशेषतः खाण्याची वस्तु) मिळण्याजोगी नसतां तिच्याबद्दल उत्कंठित, आतुर होणें. ॰पाडणें-(एखाद्याची) फजिती करणें; (एखा- द्यास) वादांत पराजित करणें; टोमणा मारणें; निरुत्तर करणें. 'इतका खोटें बोलणारा तूं असशील असें मला वाटलें नव्हतें. नाहींतर दोन चार साक्षी ठेवून तुझे चांगले दांत पाडले असते.' -त्राटिका अंक ४, प्र. ३. ॰पाडून हातावर देणें-(अशिष्ट) (एखा- द्याची) कंब्ख्ती काढणें; पारिपत्य करणें; उट्टें फेडणें (विशेषतः धमकावणी देतांना उपयोग). ॰लागप-(गो) पैसे पदरीं असणें; गबर असणें; खाऊन पिऊन सुखी असणें. ॰वठणें-लागणें- उच्च्चारलेला शाप (एखाद्यावर) फलद्रूप होणें. 'त्याच्यावर तया चेट- कीचा दांत वठला' = त्याला चेटकीच्या शापाचें वाईट फळ मिळालें, त्याला शाप भोंवला. ॰वासणें-(ल.) हातीं घेतलेलें कार्य शेवटास नेववत नाहीं म्हणून निराश होऊन स्वस्थ बसणें. ॰वासून पडणें-१ आजारानें अशक्त होऊन अंथरुणास खिळणें. २ मेहनत फुकट गेल्यानें हिरमुसलें होऊन बसणें. दांत वासणें पहा. 'वासुनि दांत मुखांत दहांत पडे मति गाढ तमीं पचली ।' -वामन-सीतास्वयंवर ११. ॰विचकणें-१ उपहास करून हंसणें. 'जो ऐसा प्रभु त्या जना न विचकूं दे दांत, बाहे रहा । वैकुठींच सदा..' -मोरोपंत. 'प्रेमदांत पावुनियां श्रम दांत क्षुद्र विचकिती कीं जे ।' -भक्तमयूरकेका ६५. २ याचना करणें; कांहीं जिन्नस मिळविण्याकरितां एखाद्यास विनविणें. ॰होंठ खाणें-चावणें-दांत ओंठ खाणें पहा. दातां ओठांवर जेवणें-चोखंदळपणानें जेवणें. दांतांखाली घालणें- धरणें-(एखाद्यावर) करडा, सक्त अंमल चालविणें; कडकपणानें वागविणें; अतिशय छळणें; गांजणें. दांतांची मिरवणूक काढणें-(कर.) (एखाद्यानें) स्वतःचें हंसें करून घेणें. दांताचें विष-न.मत्सरानें, जळफळाटानें काढलेले विषारी उद्धार; शाप; अभिशाप; शिव्याशाप. दांताचें विष बाधणें-१ (एखाद्याचे) शापोद्गार फलद्रूप होणें; दांत वठणें लागणें पहा. २ दुसर्‍यास बाधेल असा शाप देण्यास समर्थ असणें. दांतांच्या कण्या करणें-१ विनवण्या, याचना करून व्यर्थ उपदेश करून, शिकविण्याचा निरर्थक खटाटोप करून दांत झिजविणें; तोंड शिणविणें. २ अनेक- वार सांगणे, विनविणें. 'एक कांबळा पासोडी द्या म्हणून दातांच्या कण्या केल्या.' -नामना ५४. दांतांच्या-कण्या घुगर्‍या होणें-व्यर्थ याचना करून, उपदेश करून, शिकविण्याचा निरर्थक खटाटोप करून तोंड शिणणें; फार व निरर्थक बोलावें लागणें. 'हांका मारतां मारतां माझ्या दांतांच्या कण्या झाल्या.' -पकोघे. दांता- वर मरावयाला पैसा नसणें-अगदीं अकिंचन, निर्धम असणें, होणें, बनणें; जवळ एकहि पैसा नसणें नसणें. दांतावर मांस नसणें-१ (ल.) पैशाचें पाठबळ नसणें; दारिद्रानें ग्रस्त होणें. २ (दुसर्‍याशीं) भांडण्याचें, (दुसर्‍यास) इजा करण्याचें सामर्थ्य अंगी नसणें. 'उगीच भरीस भरल्याप्रमाणें लग्नांत खर्च केला. आपल्या तर दांतांवर मांस नाहीं. कुटुंब एवढें थोरलें.. असें शंकर मामंजींचें रडगाणें चालूं होतें.' -पकोघे. दांतास दांत लावून असणें-निजणें-बसणें-राहणें-तोंड मिटून, कांहीं न खातां, उपाशीं असणें, निजणें, बसणें इ॰ दांतीं घेणें, दातांवर येणें- (एखाद्या) कार्यांत अपयश येणें; (व्यापार इ॰ कांत) नुकसान, तोटा येणें. दांती तृण-तण-कड्याळ धरणें-मान तुकविणें; नम्रपणा स्वीकारणें; शरण येणें; पराजय कबूल करणें. दांतीं बळ धरणें-आतोनात मेहेनत, धडपड, नेट करणें; प्रयासानें, नेटानें काम करणें. दांतीं येणें-१ (एखाद्यावर) रागानें दांत- ओंठ खाणें; दांत ओंठ खाऊन भांडण्यास प्रवृत्त होणें. 'येकीस एकी ढकलून देती । येताति येकीवरि एक दांतीं ।' -सारुह ७.६०. २ फार अडचणींत, पेचांत, येणें, सांपडणें. (एखाद्याचे) दांत त्याच्याच घशांत घालणें-(एखाद्याची) लबाडी बाहेर काढून त्याच्या पदरांत माप घालून त्याची फजिती करणें; (एखा- द्याची) लबाडी त्याच्यावर उलटविणें. सोन्यानें दांत किसणें- (ल.) पैशाच्या राशींत लोळणें. हसतां हसतां दांत पाडणें- हंसून, गोड गोड बोलून फजिती करणें, टोमणे मारणें, निरु- त्तर करणें, कुंठित करणें. दांत कोरून कोठें पोट भरत नसतें-भलत्याच कामीं चिक्कूपणा करून चालत नाहीं. मोठया कार्यास क्षुद्र साधन पुरत नसतें; क्षुल्लक बाबींत काटकसर करून मोठा खर्च भागत नसतो. आपलेच दांत आपलेच ओंठ-१ शिक्षा करणारा आपणच आणि ज्याला शिक्षा करावयाची तोहि आपल्यांतलाच अशी स्थिति असते तेव्हां भांडणारे दोन्ही पक्ष निवाडा, शिक्षा करणाराला सारखेच जवळचे स्वकीय असल्यामुळें दोहोंपैकी कोणाचेंहि बरेंवाईट करतां येत नाहीं अशा वेळीं योज- तात. २ स्वतःच्याच दुष्कर्माचें फळ भोगतांना स्वतःलाच दोष द्यावा लागतो. खावयाचे दांत वेगळे, दाखवावयाचे दांत वेगळे- हत्तीला देखाव्याचे बाहेर आलेले मोठे सुळे आणि चावण्या- करितां तोंडांत निराळे असलेले असे दोन प्रकारचे दांत अस- तात त्यावरून वर दाखवावयाचें एक आणि मनांत भलतेंच असा- वयाचें अशा रीतीचें ढोंग. म्ह॰ दांत आहेत तर चणे नाहींत. आणि चणे आहेत तर दांत नाहींत. = पूर्ण सुदैव कधींहि लाभत नाहीं, त्यांत कांहीं तरी कमीपणा असतोच. एक गोष्ट अनुकूल आहे, पण तिचा उपयोग होण्यास जी दुसरी गोष्ट आवश्यक असते ती अनुकूल नसते अशा वेळीं योजतात. सामाशब्द- ॰इळा-पु. दांतरा, दांते पाडलेला कोयता. ॰कडी-स्त्री. (राजा.) दांतखिळी. (क्रि॰ बसणें). ॰कस-स्त्री. (तोंडातून निघालेले) शब्द; उद्गार; भाषण; विशेषतः अशुभसूचक शब्द, भाकित इ॰ बत्तिशी पहा. (क्रि॰ बांधणें; लागणें) [दांत + कस] ॰कस(सा)ई-पु. नेहमीं अशुभ भविष्यें सांगणारा व ज्याचीं तसलीं अशुभ भविष्यें खरीं ठरतात असें मानलें जातें असा मनुष्य. [दांत + कसाई = खाटिक] -कसळ-ळी-कसाळ-ळी, किसळ-ळी-स्त्री. १ एक सारखें, नेहमीं दांत खाणें, शिव्याशाप देणें, ताशेरा झाडणें इ॰ युक्त दुर्भाषण. २ अभद्रसूचक, अशुभ भाषण, अमंगल भाषण; बत्तिशी. (क्रि॰ बांधणें). -वि. १ नेहमीं दांत खाणारा; शिव्याशाप देणारा; ताशेरा झाडणारा. २ नेहमीं अनिष्ट, अभद्र, अशुभ भविष्य सांगणारा. बत्तिशी वठविणारा-रें. (व्यक्ति, भाषण). दांतकसा- ळीस येणें-दांत खाऊन असणें, येणें. 'दांत कसाळीस येऊन.. इंग्रज.. आला.' -रा १०.८१. [दात + कसला = आयास, श्रम, छळ] ॰किरकंड्या-स्त्रीअव. (व.) दांत खाणें; शिव्याशाप देणें; दांत किरकीट अर्थ १ पहा. 'दांतकिरकंड्या खाल्ल्या माझ्यावर.' ॰किरकीट-किरकिटी-स्त्री. १ दांत खाणें; शिव्याशाप देणें. (क्रि॰ देणें). २ (ल.) हट्टानें, घुमेपणानें मौन धरून स्वस्थ बसणें. (क्रि॰ देणें). ३ (बायकी भाषा.) आर्जव, विनवण्या, गयावया करून उसनें मागणें; दांतांच्या कण्या करणें (तिन्ही अर्थी अनेकवचनी प्रयोग). [दांत + किरकीट = ध्व. दांत खाण्यानें होणारा शब्द] ॰केणें-न. (एखाद्याचें) नेहमींचें, नित्याच्या जेवणाचें अन्न, भक्ष. [दांत + केणें = धान्य, भाजीपाला इ॰ व्यापारी जिन्नस] ॰कोरणें-दांतांत अडकलेला पदार्थ, अन्नाचे कण इ॰ कोरून काढण्याची चांदी, तांबें इ॰ धातूची अणकुचीदार, लहान व बारीक सळई. ॰खिळी-खीळ-स्त्री. १ सन्निपातामुळें वरचे व खालचे दांत परस्परांत घट्ट बसून तोंड उघडतां न येणें. (क्रि॰ बसणें; मिटणें; लागणें, उघडणें). २ न बोलणें; मौनव्रत. [दांत + खीळ = खिळा] ॰घशीं-क्रिवि. तोंडघशीं. 'या रांडा घरघाल्या सख्या तूं पडशी दांतघशीं ।' -सला १०. [दांत + घसणें] ॰चिना- पु. दांत घट्ट करण्याचें औषध; दंतमंजन; (विरू.) दारशिणा; (व.) दाच्छना पहा. [सं. दंत + शाण] ॰पडका-गा-पड्या-वि. १ ज्यांचे दांत पडले आहेत असा. २ दांत पडल्यामुळें विरूप दिसणारा. [दांत + पडणें] ॰वडा-पु. (गो.) लहान मुलास दांत आल्यानंतर, त्याच्यावरून ओंवाळून मुलांकडून लुटवावयाच्या वाड्यांपैकीं प्रत्येक. ॰वडे काढप-(गो.) मुलास दांत आल्यानंतर लहान लहान वडे त्याच्यावरून ओंवाळून ते मुलांकडून लुटविणें. ॰वण-न. १ एक टोंक चावून शेवटास गोंडेदार केलेली, दांत घांस- ण्याची बाभळ, निंब इ॰ झाडाची लहान काडी. २ दंतमंजन; दांत घासण्यासाठीं केलेली पूड. (व.) दातवन. ३ दांतचिना; दांतांस लावून ते काळे करण्याचें औषध. [सं दंतवर्ण; प्रा दंतवण; गुज. दांतवण] ॰वाकें-न. शेतीच्या कांहीं आउतांचे, अवजारांचे दांते आंत वांकविण्याचें एक हत्यार [दांत + वांकणें]

दाते शब्दकोश

काटा, कांटा

पु. १ अणकुचीदार, तीक्ष्ण टोंक असलेली, जी बोचली असतां रक्त काढते अशी काडी; बाभळीचा, बोरीचा दाभणासारखा टोंचणारा अवयव. 'सर्प कपाळीं कांटा नेहटे । कां सापसुरळीचें पुच्छ तुटे ।' -भारा बाल ८.३५. २ (भयानें, थंडीनें वगैरे) अंगावर उभे राहणारे शहारे; रोमांच. ३ (अव.) तापानंतर अंगावर उभे खरखरीतपणा अथवा बारीक पुटकुळ्या अस- तात तो; पुरळ. ४ (अव.) तापाच्या पूर्वीं अंगावर येणारी शिर- शिरी; रोमांच; कसर. ५ विंचवाच्या नांगीचें पुढचें तीक्ष्ण टोंक. ६ कुलुपादिकाचा खिळा, जो कुलुपाच्या दांडींत बसतो व मागें सरतो तो. ७ वेळू, बांबू वगैरेंना येणारा तुरा; मोहोर; फुलोरा. ८ कंबर, मान, पाठ यांच्या आंतील बाजूस आधारभूत असलेला अस्थि- विशेष. ९ गुणाकार भागाकार यांचा ताळा पाहण्यासाठीं अंक मांडण्याकरितां घातलेली चौफुली (x). १० राघु, मैना इत्यादि कांच्या गळ्यांत होणारा एक रोग. ११ वजनानें विकलेल्या वस्तूं- वर जें कांहीं वजन कटतें देतात तें. कडता पहा. १२ नदी किंवा समुद्रांतील पाण्याखालीं झांकलेला खडक. १३ काट्यासारखी शरीरास बोचणारी कोणतीहि वस्तु (माशाचें हाड, चक्राचा दांता, घड्याळाचा हातकांटा, खडबडीत लगामाचें टोंक, करवतीचा दांता, जेवणांतील वापरावयाचें दांताळें-कांटा, जनावरें किंवा भाजीपाला यांवरील खरखरीत केंस. लव इ॰). 'काटा बराबर एकावर एक आला.' -रासक्रीडा ७. १४ हलवा, इतर मिठाई यांवरील टोंकें, रवा. (क्रि॰ येणें; उमटणें; वठणें उठणें). १५ (विणकाम) वशारन करतांना इकडून तिकडे (वशारन पुढें सरकण्यासाठीं) फिरवावयाचें लांकूड. १६ (व.) थेंब. 'घरांत तेलाचा एक कांटा नाहीं. ' -वशाप ५१.१२. ४७८. १७ (कु.) सुताराचें एक हत्यार. १८ (ल) त्रास देणारा माणूस, व्याधि, शल्य, पीडा, शत्रु. ' धर्माच्या हृदयांतिल काढितसे मी समूळ कांटा हो । ' १९ तराजूच्या दांडीमधील उभा खिळा. ' जरि कांटा कलताए दैवांचा । जेउता राजमठु । ' -ऋ ३९. २० काटा असलेला तराजू (विशेषतः सोनाराचा, सराफाचा). ' मेरूचिया वजनास पाहीं । कांटिया घातली जैशी राई । ' -ह ३०.१६१. [सं.कंटक, प्रा. कंटओ, अप. कंटउ; त्सीगन; फ्रे. जि. कंडो. ते काटा] ॰उपटणें-१ (क.व.) त्रासदायक प्राणी, शत्रु, गोष्ट, नाहींशी होणें. २ (व. ष.) समूळ नाहींसा करणें, काढून टाकणें. ॰काढणें -आपल्या मार्गांत असलेल्या, आपणांस पदोपदीं नडवणार्‍या शत्रूस दूर करणें. ' वसुदानाच्या पुत्रे जो अभिमुख काशिराज तो वधिला । कांटाचि काढिला तो जाणो तव सूनुच्या मनामधिला । ' -मोकर्ण ४.१५. ॰मारणें-१ काट्यानें सिद्ध करणें. २ अंगांत (तापाची) कसर येणें. ॰मोडणें-१ (व.) विंचू चावणें. २ किंचित उष्ण होणें. 'थंड पाण्याचा थोडा कांटा मोडला.' कांट्याचा नायटा होणें -कांटा मोडल्यावर लगेच तो काढला नाहीं तर त्या ठिकाणीं नायटा होतो म्हणजे आरंभीं क्षुल्लक वाटणार्‍या वाईट गोष्टीचे पुढें मोठे हानिकारक परिणाम कधीं कधीं होतात. कांटयानें कांटा काढणें-एका दुष्टाच्या हातून परभारें दुसर्‍या दुष्टाचें शासन होईल असें करणें. ' कांट्यानें काढितात कांटा कीं. ' काट्याप्रमाणें सलणें -सतत त्रासदायक होणें; दुःखकारक होणें; मत्सर, हेवा, द्वेष वाटणें. काट्यावर ओढणें-दुःखांत घालणें; वस्त्र कांट्यावर ओढलें असतां फाटतें त्यावरून. काट्यावर घालणें-दुःखांत लोटणें. ' त्यांत (कौरव सैन्यांत) मरेनचि शिरतां कांट्यावरि घालितां चिरे पट कीं । ' -मोविराट ३.४१. कांट्यावर येणें - (बैलगाडी) आंसाच्या दोन्ही बाजूंला समतोल वजन होणें. ॰धारवाडी -अगदीं बरोबर तोल दाखविणारा कांटा. ' टीका करणार्‍याच्या हातांत नेहमीं धारवाडी कांटा असला पाहिजे. ' कांटेकाळजी-अतिशय सूक्ष्म काळजी; चिंता. ' नवीन गव्हर्नर हे काट्याकाळजीनें व निःपक्षपातबुद्धीनें आपलें काम करतील. ' -टि १.४३३. ॰भर-(बायकी) थोडें. ' आज तिच्या दुखण्याला कांटाभर मागचें पाऊल आहे. ' ॰रोखण-स्त्री. (कु.) लांकडांत खांच, रेघ, पाडण्याच्या उपयोगी सुताराचें एक हत्यार; खतावणी; फावडी. ॰कणगी-(गो.) कणगर; कनक पहा.

दाते शब्दकोश

हात

पु. १ हस्त; बाहु; खांद्यापासून बोटांपर्यंत शरीराचा भाग. कोपरापासून बोटांपर्यंतचा भाग. २ कोपरापासून मधल्याबोटाच्या टोकापर्यंतचें माप. 'हा पंचा साडेचार हात भरला.' ३ उजवी किंवा डावी बाजू, तरफ. 'आमचें घर वाड्याचे उजव्या हातास आहे.' ४ ताबा; आटोका; अधिकार; खातें. 'तुझें काम करणें माझ्या हातीं नाहीं.' (कारक विभक्तींत प्रयोग). ५ स्वतः व्यक्तिगत मनुष्य. 'अपराधावांचून शिवी देणें हें माझ्या हातानें घडणार नाहीं.' ६ स्वामित्व; कबजा; मालकी; ताबा. 'साप्रंत माझ्या हातीं पैसा नाहीं.' ७ हातानें वाजविण्याच्या वाद्यावर मारलेली हाताची थाप. ८ डाव; खेळ (काठी, लाठी, पट्टा इ॰ शस्त्रांचा). 'पट्ट्याचे दोन हात करून दाखव.' ९ कर्तृत्वशक्ति; अंग; हस्तकौशल्य (एखाद्या विषयांतील, कलेंतील). 'त्याचा चित्र काढण्याचा हात चांगला आहे.' १० कुलुपाची किल्ली; चावी. 'कुलवाचा हात इकडे दे बघूं.' ११ सोंगट्या, पत्ते इ॰ खेळांतील डाव, खेळण्याची पाळी, खेळ; खेळणारा गडी. 'अजून आमच्यांतील एक हात खेळवयाचा आहे.' १२ हस्तक; मदतनीस; साहाय्यक; हाताखालचा मनुष्य. १३ ज्यावर दंड, जोर काढावयाचे तो लांकडी, दगडी ठोकळा; हत्ती १४ (रंग देणें, सारवणें इ॰ कामीं) वरून हात फिरविणें; हातानें दिलेला थर, लेप. १५. ठोंसा; तडाखा; हस्तक्रिया (भिन्नभिन्न प्रसंगीं त्या त्या अर्थांनीं) १६ (तेली-घाणा) कातरीस जोडलेला वांकडा लाकडी तुकडा. १७ हात टेकावयासाठी, हातानें धरावयाचा कोणताहि पदार्थाचा भाग. 'खुर्चींचे-रहाटाचे-हात. १८ हाताच्या आका- राची कोणतीहि वस्तु. १९ (सोनेरी) हातांतील दागिना सैल करण्याचें एक हत्यार. २० (नृत्य) दोन हातांनीं मिळून करा- वथाचे अभिनयाचे प्रकार. हे ४० प्रकारचे आहेत. २१ (शिंपी) कापड मोजण्याचें बारा तसूंचें एक माप; गज. २२ पान्हा (नट- बोलट फिरविण्याचा). [सं. हस्त; प्रा. हत्थ; हिं. गु. हाथ; ब. हात; आर्में. जि. हथ, अथ; पॅलेस्टाईनजि. हस्त; पोर्तुंजि. बस्त] म्ह॰ १ हात ओला तर मैत्र भला-नाहींतर पडला अबोला- जोपर्यंत माणूस दुसर्‍यास देत असतो तोंपर्यंत त्याच्याशीं सगळे मित्रत्वानें वागतात. २ हात घशांत घातला तरी कोरडाच = कितीहि मदत केली तरी बेइमान राहणारा. ३ हातपाय रोड्या, पोट लोड्या; हातपाय काड्या, पोट ढेर्‍या = पोटाचा तटतटीतपणा व अवयवांचा रोडकेपणा. ४ हात फिरे तेथें लक्ष्मी फिरें, तोंड फिरे तेथें अवदसा फिरे = उद्योगी माणसाचा हात श्रीमंती आणतो तर नुसत्या बडबड्याच्या हातून कांहींच होत नाहीं उलट दारिद्र्य येतें. ५ आपला हात जगन्नाथ (जगन्नाथपुरीस आपल्या हातानें वाटेल तेवढा प्रसाद घेतां येतो त्यावरून) वाटेल तेवढें व तसें घेणें; प्राचुर्य. ६ हातचें सोडून पळत्याचे पाठीस लागूं नये = जें खात्रीनें आपलें आहे (आपणांस मिळावयाचेंच आहे) तें सोडून जें अनिश्चित आहे तें मिळविण्याच्या नादीं लागूं नये. ७ हातच्या कांकणास आरसा कशाला ? (हातांतील कांकण डोळ्यानें दिसण्या- सारखें आहे, आरसा आणणें वेडेपणा) = जी गोष्ट उघड सिद्ध आहे ती दाखविण्यास पुराव्याची जरूरी नाहीं. ८ हातपाय र्‍हावलें काम करूं वायले = नाइलाज होणें. ९ हातपाय लुलें तोंड चुरचुरां चाले = अशक्त पण तोंडाळ, मुजोर माणूस. १० हातभर लांकूड नऊ हात ढलपी = अतिशयोक्ति करणें. ११ हातांत नाहीं अडका बाजारांत चालला धडका = जवळ कवडीं नाहीं पण डौल बादशहाचा. (वाप्र.) ॰आंखडणें-देण्यासाठीं पुढें केलेली वस्तु एकदम मागें घेणें; देण्याचें प्रमाण कमी करणें, बंद करणें. ॰आटोपणें-मारणें इ॰ हातांनीं करावयाची कोणतीहि क्रिया बंद करणें. ॰आवरणें-१ हात आटपणें. २ कोणत्याहि कृत्यापासून परावृत होणें. 'ऐकेल वचन माझें आवरिल द्वेषिकाळ हात रणीं ।' -मोकर्ण ४६.४४. ॰इचकणें-(व.) हात मोडणें. ॰उगारणें-उचलणें-(एखा- द्यास) मारावयास प्रवृत होणें. ॰उचलणें-१ स्वयंस्फूर्तीनें, आपण होऊन बक्षीस देणें. २ हातीं घेणें (काम, धंदा). ॰ओढविणें- १ घेण्यासाठीं झांप टाकणें. २ विटंबना, करण्यासाठीं तुच्छता दर्शविण्यासाठीं तोंडापुढें हात करणें. ॰ओंवाळणें-तुच्छता दर्शविणें. ॰करणें-१ लाठी मारणें; शस्त्राचा वार करणें. हात टाकणें. 'स्त्रीचे अंगावर हात करूं नये.' २ पट्टा, बोथाटी वगैरेचे डाव करणें; फिरविणें. ३ वादविवाद, युद्ध करणें. ॰कापून-देणें- गुंतणें-लेखी करारकरून स्वतःस बांधून देणें. ॰खंडा असणें- एखादें कार्य (हुन्नर) हमखास पार पाडण्याचें कौशल्य, पटाईत- पणा अंगीं असणें. ॰गहाण ठेवणें-उजवा हात देवास वाहून कोणत्याहि कामीं त्याचा उपयोग करावयाचा नाहीं असा नवस करणें. २ कोणत्याही कामास हात न लावणें. ॰घालणें-१ (एखादें काम) पत्करणें; करावयास घेणें. २ एखादी वस्तु घेणें, धरणें, शोधणें यासाठीं हात पुढें करणें. 'मग विभु वसनासी त्याचिया हात घाली ।' -आनंदतनय. ३ (एखाद्या कामांत, व्यवहांरांत) ढवळाढवळ करणें; आंत पडणें. ॰घेणें-(पत्त्यांचा खेळ) हुकूम मारून अगर भारी पान मारून दस्त करून घेणें. ॰चढणें-प्राप्त होणें. 'अनुताप चढविया हात । क्षणार्धं करी विरक्त ।' -एभा २६.२०. हाताचा आंवळा-मळ, हातचें कांकण-उघडउघड गोष्ट; सत्य. ॰चा मळ-अत्यंत सोपें कृत्य; हात धुण्यासारखें सोपें काम; अंगचा मळ. ॰चालणें-१ हातांत सत्ता, सामर्थ्य, संपत्ति असणें, मिळविणें, मिळणें. १ एखादी गोष्ट करतां येणें. 'कशिद्यावर माझा हात चालत नाहीं.' ॰चाल- विणें-हत्यार चालविणें (संरक्षणार्थ). 'न्यायाच्या अभावीं ज्याला त्याला हात चालवावेसें वाटणें रास्तच होईल.' -टि १. २२. ॰चेपणें-लांचाचे पैसे मुकाट्यानें एखाद्याचे हातांत देणें. ॰चोळणें-फार राग आला असतां तळहात एकमेकांवर घासणें; कुंठितगति होऊन स्वस्थ बसावें लागणें. 'शल्य सुयोधन वाक्यें कोपे चोळी करें करा...।' -मोकर्ण २१.१३. ॰जोडणें-१ नमस्कार, प्रार्थना, विनंति करणें. २ शरण जाणें, येणें. 'अपराध फार केले परि आतां हात जोडिले स्वामी ! ।' -मोआर्याकेका. ३ नको असलेला पदार्थ हात जोडून आर्जवानें दूर सारणें; अव्हे- रणें. 'दानश्री त्याहुनि बहु दुग्धासहि हात जोडितो मीन ।' -मोबृहद्द ८. ॰झाडणें-१ झिडकारणें; नापंसत ठरविणें. २ निराशेनें सोडून देणें. ३ एखादें काम उरकून मोकळें होणें. ॰टाकणें-१ पोहतांना पाण्यावर हात मारणें. २ (एखाद्यावर) प्रहार करणें; मारणें. 'बायकोमाणसाच्या अंगावर हात टाकणें तुम्हाला शोभत नाहीं.' ॰टेकणें-१ काम करण्यास असमर्थ असल्यानें पराभव पावल्याचें कबूल करणें. २ म्हातारपणानें अशक्त होणें. ३ दमणें; थकणें; टेकीस येणें. ॰तोडणें-स्वतःच्या लेखानें आपणांस बांधून घेणें. ॰थावरणें-हात आवरणें; आटो- पणें. '...थावरूनि हातरणीं ।' -मोस्त्री ६.५१. ॰दाखविणें- दावणें-१ हस्तसामुदिक जाणण्यासाठीं जोशापुढें तळहात करणें. २ अहितकारक परिणाम करणें. ३ स्वतःची शक्ति, सामर्थ्य दाख- विणें. 'शक्रादि देव असते तरि त्यांसहि दावितोंचि हात रणीं ।' -मोभीष्म ३.४. ४ नाडीपरीक्षा करण्यासाठीं वैद्यापुढें हात करणें. ५ हातानें एखादी वस्तु दर्शविणें. ६ बडवून काढणें; पारिपत्त्य करणें; सूड घेणें; उट्टें काढणें. म्ह॰ हात दावून अवलक्षण चिंतणें, करणें. ॰दाबणें-लांच देणें. 'त्यानें आपल्यास मदत करावी म्हणून त्याचे हात दाबावे असें एकदां मनांत येतें.' -विवि १०. ९ २१०. ॰देणें-१ मदत करणें; तारणें. 'घडतां अधःपतन मज पुण्यें देतिल न हात परिणामीं ।' -मोआदि १९.३२. २ चोरणें; उचलेगिरी करणें. ३ खाद्यापदार्थावर ताव मारणें. ४ (बायकी, छप्पापाणी) छप्पू घातलेल्या मुलीस इतर मुलीनीं (तिनें उठावें म्हणून) हस्तस्पर्श करणें. ॰धरणें-१ अडविणें; हरकत करणें; स्पर्धा करणें; बरोबरी करणें. २ लांच देणें. ॰धरून जाणें- विवाहित स्त्रीनें एखाद्या परपुरुषाबरोबर पळून जाणें; जाराबरोबर निघून जाणें. ॰धुणें-(ल.) एखाद्या कामांतून आपलें अंग काढून घेणें. ॰धुवून पाठीस लागणें-एखाद्या नाश करण्याविषयीं हट्टानें प्रवृत्त होणें; चिकाटी धरून एखाद्याचा पाठलाग करणें. ॰न बनणें-(व.) विटाळशी होणें; गुंता येणें. ॰नाचविणें-चेष्टा करण्यासाठीं दुसर्‍याचे तोंडापुढें हातवारे करणें. हात ओवाळणें पहा. ॰पडणें-१ एखादें काम अनेकांनीं लागून संपविणें; एखादा खाद्यपदार्थ अनेकांनीं एकसमयवच्छेनेंकरून फन्ना करणें. २ (ना.) जिवंतपणीं भेट नाहीं पण दहनापूर्वी तरीं प्रेताचें दर्शन होणें. ॰पसरणें-भीक मागणें. ॰पाय खोडणें-१ अवयव आंख- डणें; विव्हल होणें. २ एखाद्यास प्रतिबंध, अडचण करणें. ॰पाय गळणें-गाळणें-१ अशक्त होणें; रोडावणें. २ खचून जाणें; नाउमेद होणें; गलितधैर्य होणें. ॰पाय गुंडाळणें-१ अंत- काळच्या वेदनांनीं हातपाय आंखडणें; कियाशक्ति रहित होणें. २ हरकत, अडथळा करणें. ॰पाय चोळणें-१ सूड घेण्याची प्रतिज्ञा करणें; चरफडणें. २ रागानें तरफडणें; शिव्याशाप देणें. ॰पाय झाडणें-१ हातपाय गुंडाळणें अर्थ १ पहा. २ सुटकेसाठीं हातापायांचा उपयोग करणें. ३ धडपड करणें; चरफडणें. ॰पाय ताणणें-सुखानें, निष्काळजीपणानें हातपाय पसरून पडणें. ॰पाय धोडावप-(गो.) आटापिटा करणें. ॰पाय पसरणें- १ हातपाय गुंडाळणें अर्थ १ पहा. २ मर्यादेच्या, आटोक्याच्या बाहेर जाणें; जास्त जास्त व्याप वाढविणें; पसारा वाढविणें. म्ह॰ भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरी. ३ काम होत नसल्यास सबबी सांगणें; कामांत आळस करणें (काम करीन असें वचन दिलें असतां). ४ मागणी वाढत जाणें, अधिकाधिक आक्रमण करणें. ॰पाय पाखडणें-अंतकाळच्या वेदनेनें, फार संतापानें हातपाय झाडणें. ॰पाय पांघरून-पोटाळून बसणें-आळशा- सारखें बसणें; जेठा मारून बसणें. ॰पाय फुटणें-१ उधळपट्टी सुरू होणें; संपत्तीला (जाण्यास) पंख फुटणें. 'दौलतीला अलीकडे हातपाय फुटुं लागले आहेत.' ३ लुच्चेगिर्‍या करण्यांत तरबेज होणें. २ थंडीनें हातपायास भेगा पडणें. ॰पाय फोडणें-लावणें- फुटणें-लागणें-१ मूळ गोष्टींत, अंदाजांत भर घालणें; वाढ विणें. २ नटविणें; थटविणें; अलंकृत करणें. ३ मागून वाढविणें (काम, दर, खर्च इ॰). ४ लबाड्या इ॰ नीं सजवून उजळून दाखविणें. ॰पाय मोकळे करणें-फेरफटाका करून हातपाय सैल, हलके करणें; फिरणें; सहल करणें. ॰पाय मोडणें-मोडून येणें-टाकणें-१ तापापूर्वीं अंग मोडून येणें; निरंगळी येणें. २ बलहीन, निःसत्त्व करून टाकणें; हरकत घेणें. ॰पाय सोडणें -अंतकाळच्या वेदनांनीं हातपाय ताणणें, ताठ होणें. ॰पाय हालविणें-उद्योग, परिश्रम, कष्ट इ॰ करणें; स्वस्थ न बसणें. ॰पोचणें-कृतकृत्य होणें (ढुंगणाला हात पोंचणें असा मूळ प्रयोग). ॰फाटणें-रुची वाढणें. 'जेथें जिव्हेचा हातु फाटे ।' -ज्ञा १८.२४९. ॰फिरणें-लक्ष जाणें; व्यवस्थित ठेवण्याची काळजी घेणें; साफसफाई करणें. ॰फेरविणें-१ लहान मुलास प्रेमानें कुरवाळणें. 'प्रेमें मजवरुनि हात फिरवूनी ।' -मोउद्योग १३.१८३. २ पुन्हां उजळणी, उजळा देणें. ॰बसणें-१ एक- सारखें लिहीत, वाचीत इ॰ राहणें. २ अक्षरांचें वळण बसणें; तें पक्कें होणें. ३ एखादें काम उत्तम प्रकारें करतां येणें; मनांत ठसणें; विशिष्ट क्रिया करण्याची सफाई हातास प्राप्त होणें. ॰बांधणें-१ मर्यादा घालणें; स्वैर होऊं न देणें. २ अडथळा आणणें. ॰बोट लावणें-भार लावणें-मदत करणें. ॰भिजणें-१ दक्षणा देणें; (गो.) हात भिजविणें. २ लांच देणें; हात ओले करणें. ॰मारणें-१ बळकाविणें (पैसा इ॰) देणें. २ अधाशीपणानें खाणें; ताव मारणें. ३ एखाद्या वस्तूवर विविध क्रिया करणें. ॰मिठ्ठीला येणें-(माण.) हाताहातीं होईपर्यंत भांडणें. ॰मिळविणें-१ घाव घालणें. 'तस्कारानें जलदीकरून हात मिळविला जाऊन ।' -ऐपो ३९०. २ (कुस्ती) सलामी घेणें. ॰मोडणें-१ असहाय्य, मित्रहीन होणें. २ मिळत असलेली देणगी, बक्षीस नाकारणें. ॰राखणें- कुचराई करणें. ॰राखून खर्च करणें-काटकसरीनें खर्च करणें. ॰लागा ना-(गो.) विटाळशी होणें. ॰लावणें-मदत करणें. ॰वसणें-क्रि. हस्तगत होणें. 'ते ज्ञाननिष्ठा जेथें हातवसे ।' -ज्ञा १८.१२४८; -भाए २४०. ॰वहाणें-१ हत्यार चालविणें. 'परि परमप्रिय अर्जुन त्यावरि याचा न हात वाहेल ।' -मोउद्योग १२.५४. २ प्रवृत्त होणें; कार्य करणें. ॰वळणें-१ सराव, परि- पाठ इ॰ नें हातास सफाई येणें. २ (एखाद्या गोष्टीस, कृत्यास) प्रवृत्त होणें. ॰सैल सोडणें-सढळपणें खर्च करणें. ॰सोडणें-१ पूर्वीप्रमाणें कृपा, लोभ न करणें. २ संगति. ओळख सोडणें. ॰हातांत देणें-लग्न लावणें. 'एखाद्या तरुणीचा हात माझ्या हातांत दे.' -भा ४९. ॰हालवीत येणें-काम न होतां रिकामें परत येणें. हातणें-क्रि. सारवणें. हाताखालीं घालणें-देख. रेखीखालीं, अंमलखालीं, कबज्यांत, ताब्यांत घेणें. हातां चढणें- प्राप्त होणें. 'जरी चिंतामणी हातां चढे ।' -ज्ञा ३.२३; -एभा १०.२८२. हाताचें पायावर लोटणें-आजची अडचण उद्यां- वर ढकलणें; आजचें संकट लांबणीवर टाकणें. हाताचे लाडू होणें-खरजेनें हाताच्या मुठी वळणें, त्या न उघडणें. हाताच्या धारणेनें घेणें-मारणें; बुकलणें. हातांत कंकण बांधणें- एखाद्या गोष्टीची प्रतिज्ञा करणें; चंग बांधणें (यजमानानें यज्ञ करावयाच्या पूर्वी हातांत दीक्षासूत्र बांधण्याच्या चालीवरून). हातांत हात घालणें-१ लांच देणें. २ मैत्रीच्या भावानें वागणें, प्रेम करणें. ३ विवाहसंबंध घडवून आणणें. ४ विवाहित स्त्रीनें परपुरुषाशीं संबंध ठेवणें; निघून जाणें. हातातोंडाशीं गांठ पडणें-१ घास तोंडांत पडणें; खावयास सुरुवात करणें; जेवणा- खेरीज इतरत्र लक्ष न जाणें. २ एखाद्या कार्यास घाईनें आरंभ होणें. ३ बोंब मारणें. हातातोंडास येणें-१ तारुण्यावस्था प्राप्त होणें (लग्न झालेली स्त्री, तरुण मुलगा इ॰). २ फल देण्याच्या स्थितीस येणें. हातापायांचा चौरंग होणें-पेटके वगैरेमुळें हातपाय आंखडणें. हातापायांचे डगळें होणें- पडणें-मोडणें-अशक्तपणानें अंगास कंप सुटणें; अंग शिथिल होणें. हातापायांचे ढीग पडणें-होणें-भीतीनें, आजारानें अशक्त असहाय्य होणें. हातापायांच्या फुंकण्या होणें- अशक्ताता, निर्बलता येणें. हाता(तीं) पायां(यीं) पडणें- १ गयावया करणें; प्रार्थना करणें. २ शरण जाणें; नम्र होणें; दया याचिणें. हाताबोटावर येणें, हातावर येणें-आतां होईल, घटकाभर्‍यानें होईल अशा स्थितीस येणें; हस्तगत कबज्यांत, साध्य होण्याच्या अगदी बेतांत असणें. हाताला चढणें-प्राप्त होणें. 'संसार कशाचा जरि न हाताला चढली ।' -राला ११२. हाताला येईल तें-जें कांहीं हातांत सांपडेल तें; ज्याचेवर हात पडेल तें. हाताल लागणें-गमावलेल्या, फुकट गेलेल्या, नासलेल्या, बिघडलेल्या वस्तूंतून अल्प अंश मिळणें. 'कापडांत पैसें घालूं नका, त्यांतून हाताला कांहीं सुद्धां लागणार नाहीं.' हाताला वंगण लावणें-लांच देणें. -राको १३३७. हाताला हात लावणें-१ पति पुण्याहवाचनादि धर्मसंस्कारास बसला म्हणजे पत्नीनें त्याच्या हातास नुसता हात लावणें (म्हणजे तिलाहि त्याचें फळ मिळतें). २ स्वतः कांहीं न करतां दुसर्‍यानें केलेल्या कामाच्या फळांत वांटेकरी होणें; दुस- र्‍याच्या कार्याला अनुमति देणें. हातावर असणें-पूर्णपणें साध्य असणें. हातावर घेणें-आणणें-काढणें-तारण, गहाण न ठेवतां पैसे उसनें आणणें, काढणें, घेणें. हातावर तुरी देणें-देऊन पळून जाणें-हातावर हात देऊन-मारून पळणें-पळून जाणें-फसविणें; डोळ्यादेखत फसवून पळून जाणें; देखत देखत भुल- विणें. 'सुभद्रा काबीज करण्यासाठीं श्रीकृष्ण परमात्म्याच्या मदतीनें बलिरामाच्या हातावर ज्या तुरी दिल्या... तें पाहून तरी आम्हांस कधीं विषाद झाला आहे काय ?' -आगर. हातावर दिवस काढणें-लोटणें-मोठ्या कष्टानें संसार चालविणें. हातावर धरणें-हातांवर संभाळीत राहावयास लावणें (मुलीनें). 'यानें मला सकाळपासून हातावर धरिलें.' हातावर पाणी पडणें- भोजनोत्तर आंटवणें. 'हातावर पाणी पडलें कीं चालला बाहेर.' हातावर पिळकणें-लांच देणें. हातावर पोट भरणें-संसार करणें-अंगमेहनत, भिक्षा, नौकरी करून उपजीविका करणें. हातावर मिळविणें-मिळवावें व खावें अशा स्थितींत राहणें. हातावर येणें-जवळ येऊन ठेपणें. हातावर येणें-लागणें- दूध देऊं लागणें-थानास वासरूं न लावतां किंवा पान्हवण (सरकी इ॰) पुढें न ठेवतां जनावरानें दूध देणें, पान्हवणें. हातावर शीर घेऊन असणें-कोणतेंहि धाडसाचें कृत्य कर- ण्यास सदां सिद्ध असणें. हातावर हात चोळणें-रागानें तळ- हात एकमेकांवर घासणें; चरफडणें. 'इंद्रें स्वतातघातक पाठीसीं घातला म्हणोनि करें । कर चोळी...' -मोआदि ७.४०. हाता- वर हात मारणें-१ एखादी गोष्ट, सट्टा इ॰ पटला म्हणजे दुस- र्‍याचे हातावर आपला हात मारणें. २ वचन देणें. हातास हात लावणें-(देणार्‍याच्या, घेणार्‍याचे हातास स्पर्श होणें) द्रव्यलाभ होणें. हातास-हातां-हातीं चढणें-प्राप्त होणें. 'तो किल्ला माझ्या हातीं चढला.' 'नवनींत मंथनावांचून । हातां न चढे सहसाहि ।' हातीं धरणें-१ स्वतःच्या देखरेखीखालीं घेणें; एखाद्यास आपल्या आश्रयाखालीं घेणें. २ निरंकुशपणें मोकाट सोडणें (जीभ, तोंड, पोट इ॰ इंद्रियें). हातीं धोंडे घेणें-१ विरुद्ध उठणें. २ वेड्यासारखें करणें. हातींपायीं (अन्न इ॰) डेवणें-धावणें-येणें-रेवणें-जाड्य, सुस्ती येणें; शिव्या देण्यास तयार होणें. हातींपायीं उतरणें-सुटणें-मोकळी होणें-सुखरूपपणें बाळंत होणें हातींपायीं पडणें, लागणें- अतिशय विनवण्या, काकुळत्या करणें. हातीं भोपळा घेणें- देणें-भिक्षा मागणें, मागावयास लावणें. आडव्या हातानें घेणें-१ चोरून; चोरवाटेनें घेणें. २ झिडकारणें; भोसडणें; तुच्छता दाखविणें; कचकावून खडकाविणें; मारणें. आडव्या हातानें घेणें, चारणें-बाजूनें, तोंडांत हात घालून खाऊं घालणें; औषधोपचार करणें (घोडा इ॰स). (देणें-चोरून देणें-मारणें- मागल्या बाजूनें मारणें-ठोकणें). एका हाताचीं बोटें पण सारखीं नाहींत-सारख्या परिस्थितींतील माणसें असलीं तरी त्यांच्यांत थोडाफार फरक असतो. दोहों हाताचे चार हात करणें-होणें-लग्न करणें, होणें या हाताचे त्या हातावर- क्रिवि. ताबडतोब; जेव्हांचे तेव्हांच (दुष्कृत्याची फेड लवकर व खात्रीनें मिळते या अर्थीं). या हाताचें त्या हातास कळूं न देणें-अत्यंत गुप्तपणें करणें. रिकाम्या हातानें-जरूं- रीच्या साधनां-उपकरणां-सामग्रीखेरीज; कांहीं काम न करतां. याचा हात कोण धरीसा आहे ? -याच्या वरचढ, बरो- बरीचा कोण आहे ? याचा हात धरण्याची शक्ति कोणास आहे ? हातांत काय तागडू मिळाला-(व) कोणता फायदा झाला ? हातांत नारळाची आई (नरोटी) देणें-भिक्षा मागावयास लावणें. सामाशब्द- ॰अनार-पु. शोभेच्या दारूचा एक प्रकार. ॰इंद-न. (कों.) खेंकडे पकडण्याचें जाळें. ॰उगावा-पु. १ एखाद्या किचकट, अडचणीच्या कामांतून, धंद्यांतून अंग काढून घेणें. २ सूड; पारिपत्य. (क्रि॰ करणें). ३ कर्जाची उगराणी; घातलेलें भांडवल परत मिळविणें. [हात + उगवणें] ॰उचल-स्त्री. १ पेढींतून स्वतःची रक्कम आतां थोडी मग अशा रीतीनें खर्चण्यास घेणें. २ मूळ भांडवल; मुद्दल. उचल मध्यें पहा. ॰उचला-वि. १ आप- खुषीनें, हात उचलून दिलेला (पदार्थ). २ ज्याचा स्वतः करण्याबद्दल पत्कर घेतला आहे असा (व्यवहार, उद्योग). ॰उसना-ना-वि. थोडा वेळ उसना घेतलेला; लवकर परत करण्याच्या बोलीनें आणलेला (त्यामुळें लेख इ॰ लिहून न घेत दिला-घेतलेला). ॰उसणें-नें-न. थोड्या मुदतींत परत कर- ण्याच्या बोलीनें (लेख करून न देतां) उसनी घेतलेली रक्कम. ॰कडी-स्त्री. हातांतील बेडी. 'मन सिंतरील विवेकासीं । यालागी हात कडिया दोहींसीं ।' -एभा २३.९५१. ॰कर- वत-पुस्त्री. हातानें चालविण्याची लहान करवत. ॰करवती- स्त्री. लहान हात करवत. ॰करीण-स्त्री. अचळाला हात लावतांच (वासरूं न सोडतां किंवा आंबोण न ठेवतां) पान्हा सोडून दूध देणारी गाय; म्हैस. इच्या उलट पान्हावणकरीण. ॰कापें-न. (गो.) लांडी, बिन बाह्यांची बंडी. ॰काम-न. हस्तकौशल्याचें काम (यांत्रिक कामाच्या विरुद्ध); हस्तव्यवसाय. (इं.) हँडफ्रॅक्ट. ॰कैची-कचाटी- स्त्री. आलिंगन; मिठी. ॰खंड-वि. १ मधून मधून कामांत सोडवणूक करणारा; मदतनीस (मूल, मित्र, शेजारी); अडल्या वेळीं आपल्या कामीं उपयोगी पडणारा. २ हात खंडा पहा. [हात + खंड = खळ, विसावा] ॰खंडा-वि. निष्णात, करतलामलकवत् असलेली; म्हणाल त्यावेळीं तयार (विद्या, कला). ॰खर्च-पु. किरकोळ खर्च; वरखर्च. ॰ख(खं)वणी- स्त्री. लहान खवणी. ॰खुंट-खुंटा-पु. (विणकाम) वशारन पसरलेल्या लांबीपाशीं असलेल्या समोरच्या खांबापासून मागा पाशीं बसण्याच्या जागेजवळ उजवीकडे दोरी बांधावयाची खुंटी. ॰खुरपणीचें लोणी-न. हातखुरप्या नारळाचें खोबरें. ॰खुरपा-वि. हातानेंच आंतील खोबरें खरवडून काढण्याजोगा (कोंवळा नारळ). ॰खुरपें-न. १ हातखुरपा नारळ. २ गवत काढण्याचा लहान विळा. ॰खे(खो)रणें-न. कलथा; उलथणें; झारा. (क्रि॰ लावणें-अन्नास, पैक्यास = पैका उकळण्याचा सपाटा). म्ह॰ हातखेरणें असतां हात कां जाळावा. ॰खेवणें-न. १ हातवल्हें. २ मदतनीस; हाताखालचा माणूस. ॰खेव्या-व्या-पु. हातखेवणें अर्थ २ पहा. ॰खोडा-पु. हात अडकविण्याचा सांपळा. 'चंद्रसूर्याचा हातखोडा । काळा कैसेनि घालिजे ।' -भाए ५४९. ॰गाडी-स्त्री. हातानें ढकलून चालविण्याची गाडी. ॰गुंडा-धोंडा-पु. १ हातानें फेकण्या-उचलण्या-जोगा दगड. 'कुश्चीतभावाचे हातगुंडे ।' -ज्ञाप्र २६५. २ असला दगड हातानें जेथवर फेंकला जाईल तितकें अंतर. ॰गुण-पु. (बरेंवाईट करण्याचा योग, गुण) नशीब; हातीं (काम, माणूस) धरणाराचा प्रारब्धयोग. हस्तगुण पहा. ॰घाई-स्त्री. १ हातानें वाजवावयाचें वाद्य जोराजोरानें, आवेशानें वाजविणें. २ (ल.) उतावळेपणा; जोराची हाल चाल. (क्रि॰ हातघाईवर, हातघाईस येणें-मारामारी करणें). ॰चरक-पु. १ हातानें फिरवून रस काढावयाचा चरक. २ हात घाणी. ॰चलाख-वि. चोर; उचल्या. ॰चलाकी-खी-स्त्री. हस्तचापल्य; लपवाछपवी; नजरबंदीचा कारभार (गारुडी, सराफ इ॰ चा). ॰चाळा-पु. १ हाताचा अस्थिरपणा; चुळबुळ; हातानें कांहीं तरी उगीच करीत रहावें अशी लागलेली खोड; हातचेष्टा. (क्रि॰ लागणें). २ अशा प्रकारानें होणारें नुकसान. (क्रि॰ करणें). ३ सदोदित हात गुंतलेला असणें; त्यांत निमग्न असणें (वाढता धंदा, व्यापार, खेळ इ॰ त); देवघेवीचा मोठा उद्योग. ॰चिठी-चिटी-ट्टी-स्त्री. १ अधिकार्‍यानें शिक्का- मोर्तब न करतां आपल्या हातच्या निशाणीनेंच पुरी केलेली चिठी, हुकूम. २ कोणाहातीं पाठविलेली चिठी-चपाटी. ॰चे हातीं- च्या हातीं, हातोहातीं-किवि. लेगच; ताबडतोब; आतांचे आतां; क्षणार्धांत पटकन् (करणें, घडणें). 'ही गडी हाताचे हातीं जाऊन येईल.' 'हाताचे हातीं चोरी-लबाडी-शिंदळकी' इ॰. ॰चोखणें-चुंफणें-न. तान्ह्या मुलास चोखण्यासाठीं हातांत देण्याची वस्तु. ॰जतन-स्त्री. हातानें केलेली मशागत (मालीस इ॰); रोज वक्तशीर घेतलेली काळजी. 'हा घोडा नुसत्या हातजतनानें इतका हुशार आहे.' ॰जुळणी-स्त्री. (ठाकुर) लग्न लागल्यानंतर मुलानें मुलीचे दोन हात धरणें. -बदलापूर १३८. ॰झाड-स्त्री. आपोआप उगवलेलें नसून मुद्दाम लाविलेलें झाड. ॰झाडणी-स्त्री. राग, तिरस्कार इ॰ नें हात झटकणें. ॰झालणा-पु. हातजाळें; हातविंड. ॰झोंबी-स्त्री. परस्परांचे हात धरून केलेली झटापट; हिसकाहसकी; झगडा. ॰तुक-न. १ हातानें वजन करणें. 'नव्हती हाततुके बोल ।' -तुगा ३४२३. २ अटकळ; अजमास. 'मग त्यागु कीजे हात- तुकें ।' -ज्ञा १८.१३१. ॰दाबी-स्त्री. लांच. 'मालकानें हात- दाबी केली म्हणजे माल त्यांना परत देतात.' -गुजा ६७. ॰धरणें-न. (खा.) सोधणें; स्वयंपाकघरांतील भांडीं उतरणें इ॰ चें फडकें. ॰धरणी माप-न. माप भरतांना त्याचे शेवटास डावा हात धरून, मापापेक्षां थोडें जास्त धान्य घेऊन केलेलें माप. बोटधरणी माप पहा. ॰धुणी-स्त्री. १ राजाच्या हात- धुणारास दिलेलें इनाम इ॰. २ स्वयंपाकघरांतील मोरी. ॰धोंडा- पु. १ हातानें उचलण्याजोगा धोंडा. २ धोंडा हातानें फेंकला असतां जेथवर जाईल इतकें अंतर; टप्पा. ॰नळा-पु. हातांत धरून सोडण्याचा, शोभेची दारू भरलेला नळा. ॰नळी-स्त्री. चपटें कौल. ॰निघा-गा-हातजतन पहा. हातजपणूक. ॰नेट- क्रिवि. १ (व.) हाताचा जोर, भार देऊन. २ (व.) हाता- जवळ. ॰पडत-पात-वि. हातीं असलेलें; अगदीं जवळ असणारें; लागेल त्यावेळीं ताबडतोब मिळणारें. ॰पहार-स्त्री. हातभर लांबीची पहार. ॰पा-हातोपा-पु. अंगरखा इ॰ ची बाही. ॰पाटिलकी-स्त्री. १ हातानें ठोकणें; चोपणें, बदडणें. तोंड- पाटिलकीचे उलट. २ बोलण्यापेक्षां प्रत्यक्ष कृति, काम. 'तोंड- पाटिलकी सगळ्यांस येते हातपाटिलकी कठीण.' ३ हस्तचापल्य; उचलेगिरी. ॰पाणी-न. १ लग्नांत रासन्हाणीचे वेळीं वधूच्या सासूनें तिचे हातांवर ओतावयाचें पाणी. (क्रि॰ घालणें). २ लग्नांत मांडव परतण्याचे दिवशीं सासूनें सुनेची बोहोल्यावर ओटी भरून, किंवा मांडवांत न्हातेवेळीं नवर्‍यानें केशरी रंगांत बुडवून तिचे हातांत घालवयाची अंगठी. ३ लग्नांत मुलाच्या हाताखालीं मुलीचा हात ठेवून त्यांवर समंत्रक पाणी घालणें. -बदलापूर २०५. ॰पान-पु. कोंका पडण्यापूर्वींचें केळीचें पान. ॰पान्हा- पु. हातकरीण गाय, म्हैस इ॰ नें सोडलेला पान्हा (वासरूं किंवा अंबोण दाखविल्याशिवाय). हातपान्ह्यास लगाणें, येणें, हातपान्ह्याची गाय इ॰ प्रयोग. ॰पालवी-स्त्री. हात पोंहो- चेल इतक्या उंचीवरील पाला. ॰पावा-वि. (कों.) हाताच्या आटोक्यांतील, हात पोहोंचेल इतक्या उंचीवरील (वेलीचें फूल इ॰ किंवा खोली-विहिरींतील पाणी इ॰). [हात + पावणें] ॰पिटीं-स्त्री. १ झोंबाझोंबी; गुद्दागुद्दी. २ (ल.) हातघाईची मारामारी. 'तंव राउतां जाली हातपीटी ।' -शिशु ९६८. [हात + पिटणें] ॰पेटी-स्त्री. हातानें भाता चालवून वाजवावयाची बाजाची पेटी; हार्मोनियम. २ सरकारी कामाचे कादगपत्र ठेवण्याची पेटी. -स्वभावचित्रें २४. ॰पाळी-स्त्री. चेंडूफळीचा एक प्रकारचा खेळ. -मखेपु ५६. ॰फळ-न. (बे.) मेर ओढण्याचें फळ. ॰फळी, हातोफळी-क्रिवि. हातोहातीं; लवकर. ॰बळ-न. हस्तसामर्थ्य. 'हातबळ ना पायबळ, देरे देवा तोंडबळ.' ॰बांधून डंकी-स्त्री. (कुस्ती) जोडीदारास खालीं आणल्यावर त्यानें आपला एक पाय धरला तर आपण दुसर्‍या पायानें जोडीदाराचे पाठीवरून झोंका घेऊन उडी मारून त्यास चीत करणें. ॰बेडी-स्त्री. कैद्याच्या हातांत अडकवावयाची बेडी; हातकडी. ॰बोनें-न. हातांत घेत- लेलें भक्ष्य. 'बुद्धीचेनि शाकें । हातबोनें निकें ।' -ज्ञा ६.२८२. ॰बोळावन-स्त्री. हातांनीं मार्गाला लावणें. 'जाणो नेदी योग्यता । ग्रहीं हातबोळावन करितां ।' -भाए ३४९. ॰भाता-पु. हातांत घेऊन फुंकावयाचा भाता; लहान भाता. ॰भार-पु. मदत; साहाय्य (विशषतः द्रव्याचें). (क्रि॰ लावणें). ॰भुरकणा- भुरका-वि. हातानें भुरकून खावयाजोगा (पेयपदार्थ). ॰भुर- कणें-भुरकें-वरील प्रकारचा पातळ पदार्थ. ॰भेटी-स्त्री. प्रेमानें हातांत हात घालणें. -एभा २८.५९२. ॰मांडणी-स्त्री. पैसे पावल्याची पोंच म्हणून पैसे नेणार्‍याची खतावणीवर घेतलेली सही. ॰मात-स्त्री. हात टेकणें. ॰मेटी हेटीमेटी-क्रिवि. आळसांत; निरुद्योगीपणानें; हातांवर व गुडघ्यावर टेकून रमतगमत (दिवस इ॰) घालविणें. 'दिवस गेला हातमेटीं चांदण्या खाली कापूस वेटी.' ॰रगाडा-पु. उसाचा हातचरक. ॰रवी-स्त्री. घुसळखांब, मांजरी यांचे विरहित हातानेंट फिरविण्याची लहानरवी. ॰रहाट- पु. हातानें ओढून पाणी काढण्याचा लहान रहाट. ॰रिकामी- स्त्री. विधवा स्त्री. -बजलापूर १७४. ॰रिती-वि. (महानु.) रिकामी विधवा. -स्मृतिस्थळ. ॰रुमाल-पु. १ तोंड वगैरे पुसण्याचा लहान रुमाल. २ नित्योपयोगी कागदपत्रें ठेवण्याच्या दप्तराचा रुमाल; चालता रुमाल; त्यांतील कागदपत्रांचें बंडल. ॰रोखा- पु. दस्तक; चिठी; आज्ञापत्र. 'पाराजीपंत वाघ यांस हातरोखा वरचेवर पाठवून अति आग्रहें अंतरवेदींत घालविलें.' -भाव १०२. ॰लाग-पु. हाताचा टप्पा. ॰लागास-लागीं येणें-असणें- कक्षा, आंवाका, आटोका, अवसान इ॰ त येणें, असणें. ॰लागा- लाग्या-वि. अनुकूल असणारा. 'तुमचे हातलागे लोक असतील.' -वाडबाबा १.६. ॰लावणी-स्त्री. १ वेश्येचा चिरा उतरणें; कौमार्यभंग. (क्रि॰ करणें). २ हाताची पेरणी; लागवण. -वि. हातपेरणीचें. ॰लावा-व्या-वि. हाताळ; चोरटा; चोरी करण्या- साठीं हात फुरफुरत असलेला. ॰वजन-न. १ जिन्नस हातांत घेऊन केलेलें वजन. २ अशाप्रकारें वजन काढण्याची लायकी. ॰वटी- हातोटी-स्त्री. १ हस्तकौशल्य; हस्तचातुर्य. २ (सामा.) कसब; नैपुण्य; चलाखी. 'अहो चंद्रकांतु द्रवता कीर होये । परि ते हात- वटी चंद्री कीं आहे ।' -ज्ञा ९.२९. ३ विशिष्ट पद्धत, रीत, प्रकार. [हिं.] भाषणाची-पोहण्याची-व्यापाराची इ॰ हातोटी. ॰वडा- हातोडा-पु. सोनार, कासार इ॰ चें ठोकण्याचें हत्यार. ॰वडी हातोडी-स्त्री. लहान हातोडी. ॰वणी-न. १ हात धुतलेलें पाणी. २ (कों.) हातरहाटाचें पाणी पन्हाळांतून जेथें पडतें तेथील जमीनीचा उंच केलेला भाग; हातणी. ॰वल्हें-न. हातानेंच वल्हवावयाचें लहान वल्हें. ॰वश-वि. हस्तगत. ॰वशी-स्त्री. हात उगारणें. -शर. ॰वळा, हातोळा-पु. हातवटी पहा. म्ह॰ गातां गळा; शिंपता मळा, लिहितां हातवळा. ॰वारे-पु.अव. हातानीं केलेलें हावभाव; हाताची हालचाल. ॰विंड-न. (राजा.) हाता झालणा पहा. ॰विरजण-न. अजमासानें घातलेलें विरजण ॰विरजा-विरंगुळा-वि. कामांत मदत करण्याच्या लायक, लायकीस झालेला (पुत्र, शिष्य, उमेदवार इ॰) [हात + विरजणें] ॰शिंपणें-न. सोडवणी न देतां शेलणें इ॰ साधनानें भाजी- पाल्यास उडवून द्यावयाचें पाणी; असें पाणी शिंपणें. ॰शेकणें-न. (उसाचा चरक) चुलाण्यांत जाळ घालणारास त्याच्या मेहनती बद्दल द्यावयाचा गूळ. ॰शेवई-स्त्री. हातानें वळलेली शेवई; याचे उलट पाटशेवई. ॰सर-न. बायकांचा हातांतील एक दागिना, गजरा. 'हे पाटल्या हातसरांस ल्याली ।' -सारुह ६.२६. ॰सार- वण-न. खराटा, केरसुणी न घेतां हातानें जमीन इ॰ सारवणें. ॰सुख-न. १ दुसर्‍यास, शत्रूस हातानें मारूंन त्यामुळें अनुभवि- लेलें सुख (क्रि॰ होणें). २ हातानें दिलेला मार. ॰सुटका-स्त्री. १ एखाद्या व्यवहारांतून, धंद्यांतून स्वतः अंग काढून घेणें; मोकळें होणें. २ हातविरजा पहा. ३ हाताचा सढळपणा. ॰सुटी-स्त्री. औदार्य. 'हे हातसुटीक्षीरसागरा । वांचौनि नाहीं ।' -भाए ७६९. ॰सुतकी-स्त्री. पाथरवटाचें दगड फोडण्याचें हत्यार. ॰सूत-न. चातीवर हातानीं काढलेलें सूत. ॰सोकी(के)ल-सोका-वि. हाताच्या संवयीचा; अंगाखांद्यावर घेण्यास संवकलेला. 'केल कुत्रा हातसोंका ।' 'घडो नेदि तीर्थयात्रा.' -तुगा २९५४. ॰सोडवण-नस्त्री. हातसुटका अर्थ १,२ पहा. ॰सोरा-र्‍या सुरा-र्‍या-पु. कुरड्या इ॰ करण्याचा सांचा. ॰हालवणी-स्त्री. प्रवाशांवरील एक जुना कर (त्यांच्या हात हालवण्याच्या क्रियेबद्दल हा कर असे). हातचा-वि. १ हातानें दिलेला; स्वाधीनचा; हातांतला; हातानें निर्मिलेली, मिळविलेली, दिलेली (वस्तु, काम, उत्पादन इ॰). 'शुद्राचे हातचें पाणी स्नानसंध्येस घेऊं नये.' 'रोग्यास औषध देणें मनुष्याच्या हातचें आहे-आयुष्य घालणें नाहीं.' २ (अंकगणित) पूर्णांकाची बेरीज करतांना बेरजेच्या संख्येंतला अंक ज्या स्थानाचा त्या स्थानीं मिळविण्याकरितां उरलेला अंक. (क्रि॰ येणें; रहाणें; ठेवणें). ३ लवकर हातीं येणारें; अवसानांतील. ४ ताब्यांतील; कबजांतील. म्ह॰ 'हातचें सोडून पळत्याचे पाठीस लागूं नये.' ॰चा पाडणें-१ हातां- तील सोडणें. २ एखाद्यास त्याचे ताब्यांतील वस्तू्स मुकविणें. ॰चा-धड-नीट-वि. नीटनेटकें काम करणारा (लेखक, कारागीर). ॰चा फोड-पु. फार प्रिय माणूस. तळहाताचा फोड पहा. ॰चा मळ-पु. सहज घडणारी गोष्ट. 'सरळ, सोपी आणि बालिकाबोध भाषा कशी वापरावी हें म्हणजे माझ्या हाताचा मळ आहे.' -कीच. ॰चा सुटा-वि. सढळ हाताचा. हातवा-पु. १ (बायकी) गौरीपूजनाचे सणांत हळदीकुंकवानें हात भिजवून जमिनीवर छाप मारणें. २ लग्नांत नवर्‍याच्या मिरवणुकीच्या मागें धरावयाचा कणकेचा दिवा. ३ घोड्याचा खरारा, साफ करण्याचा काथ्याचा पंजा. ४ काडवात मनको. ५ (कर्‍हाड) न्हाणवली बसवितांना, मखर बांधावयाचे ठिकाणीं, कुंकू पाण्यांत भिजवून हातानें पांच उलटे पांच सुलटे ठसें उठविणें. हातळ, हाताळ-ळु-वि. चोरण्याची संवय असलेला; चोर; भामटा. हातळणें, हाताळणें-उक्रि. १ हात लावणें; चोळ- वटणें; चिवडणें, २ हाताळ माणसानें वस्तू् चोरणें. हातळी, हाताळी, हाताळें-स्त्रीन. १ घोड्याचा काथ्या इ॰ चा खरारा. २ भात्याची बोटांत, हातांत अडकवावयाची चामड्याची वादीं. ३ (कर.) भाकरी. हाता-पु. हातांत राहील इतका जिन्नस, पसा (फळें, फुलें इ॰ पांच-सहा इ॰ संख्येचा संच एकेक वेळ हातांत घेऊन बाजूस ठेवतात). हाताखालचा-वि. १ मदतनीस; हाता- खालीं काम करणारा. २ उत्तम परिचयाचा; माहितींतील. ३ हातां- तील; कबज्यामधील; स्वाधीन. ४ दुय्यम; कमी दर्जाचा. हाता- खालीं-क्रिवि. १ सत्तेखालीं; दुय्यम प्रतींत. २ स्वाधीन. ३ जातांजातां; हातासरशीं; सहजगत्या. 'मी आपला घोडा विका वयास नेतोंच आहे, मर्जीं असली तर हाताखालीं तुमचाहि घोडा नेईन आणि विकीन.' हाताचा उदार, मोकळा, सढळ- वि. देणगी इ॰ देण्यांत सढळ. हाताचा कुशल-वि. हस्त कौशल्यांत निपुण, प्रवीण. हाताचा जड-बळकट-थंड-वि. १ चिक्कू; कृपण. म्ह॰ हाताचा जढ आणि बोलून गोड. २ मंद (लेखक). हाताचा जलद-वि. काम करण्यांत चलाख हाताचा फटकळ-वि. फटाफट मारणारा; मारकट. हाताचा बाण-पु. वर्चस्व, पगडा, वजन पाडणारें कृत्य, गोष्ट (क्रि॰ गमावणें; दवडणें; सोडणें). हाताजोगता-वि. १ हातांत बसेल; मावेल; धरतां येईल असा. २ हात पोहोचण्याजोगें. हाता- निराळा-वेगळा-वि. १ पूर्ण; पुरा; सिद्ध केलेला; पुन्हां हात लावण्याची जरूरी राहिली नाहीं असें (काम, धंदा इ॰). 'हा दुर्निवह कोश एकदां हातानिराळा झाला म्हणजे दुसरें काम घेतां येईल.' २ -क्रिवि. एकीकडे; बाजूस. 'कामापुरती भांडीं वहिवाटींत ठेवा वरकड हातानिराळीं ठेवा.' हातापद्धति-स्त्री. दलाल माल घेणार्‍याच्या हातावर रुमाल टाकून गुप्तरीतीनें मालाची किंमत माल घेणार्‍याकडून अजमावतो ती पद्धत. हाताची थट्टा-स्त्री. थट्टेंनें मारणें (थापटी इ॰); चापट देणें. (तोंडी थट्टा नव्हे्). हाता(तो)फळी-स्त्री. गुद्दागुद्दी; मारामारी; कुस्ती; हातझोंबी; धक्काबुक्की. 'मजसीं भिडे हातोफळी ।' -ह १९.१४३. -क्रिवि. पटकन्; चट्दिशी; तत्काळ; हातावर हात मारून. [हात + फळी] हातावरचा संसार-हातावरचें पोट-पुन. मजुरी, कामधंदा करून स्वतःचें कसेंतरी पोट भरणें (क्रि॰ करणें; चालविणें) थोड्या पगाराची, कष्टाची नोकरी करून उदरनिर्वाह. हातावीती- क्रिवि. हातोहात पहा. 'सर्वज्ञ हातावीती पुढें जाती ।' -पुच. हातासन-न. हातवटी. 'अन्योपदेशाचेनि हातासनें ।' -ज्ञा ६.११९. हातासरसां-क्रिवि. त्याच हातानें, प्रकारानें; तसेंच; त्याच बरोबर; चालू कामांत आहे तोंच. 'उष्टी काढतो आहेस तों हातासरशीं भांडीं घास मग हात धू.' हातिणें-अक्रि. मारणें. -मनको. हातिवा-स्त्री. काडवात. 'उजळोनि दिव्य तेजा हातिवा ।' -ज्ञा १६.२३. हातुवसीया-विय एक हात अंतरा- वरील. 'हातवसिया कळागंगा पार्वती ।' -धवळे ३१ हातोणी- स्त्री. (व.) खरकटें पाणी; हातवणी. हातोपा-हातपा पहा. हातोपात-ती-क्रिवि. एका हातांतून दुसर्‍या हातांत. वरचेवर; हातोहात. -ज्ञा १८.१५६. हातोरी-क्रि. (ना.) हातानें; साहा- य्यानें. हातोवा-पु. (महानु.) अंजली; ओंजळ. 'हातोवा केवि आटे अंभोनिधि ।' -भाए २१७. हातोसा-पु. मदत; हातभांर. (क्रि॰ देणें), हातोहात-ती-क्रिवि. १ हातचेहातीं; हातोपात. २ चटकन्; भरदिशीं. (क्रि॰ येणें = मारामारी करणें). 'हिंवांळ्याचे दिवसांत दुपार हातोहात भरतें.' हातोळा-हात- वळा पहा. हातोळी-स्त्री. (व.) लग्न. हात्या-पु. १ पाणर- हाटाचा दांडा. २ घोडा घासण्याची पिशवी; खरारा. हाताळी अर्थ १ पहा. ३ मागाच्या फणीची मूठ. ४ काहिलींतील गूळ खरवड- ण्याचें खुरपें. ५ (कर.) मोठी किल्ली.

दाते शब्दकोश

अठरा

वि. १ एक संख्याविशेष; १८. २ (सांकेतिक) पुराणें (मुख्य पुराणांची संख्या १८ आहे). 'कृष्ण वर्णुनियां श्रेष्ठ । चौघे गर्जताती भाट । अठरा मागध उद्भट । वंशावळी वर्णिती ।।' -एरुस्व ६.७६. तो हा पंढरीचा राणा । पुसा सहा चौं अठरां जणां ।।' -तुगा २५३९. [सं. अष्टादशन्; प्रा. अट्ठदह, अट्ठारस-ह; हिं. अठारह; पं. अठारां; बं. आठार; उ. अठर; गु. अढार; सिं. अडहं]. ॰अखाडे- अखाडा पहा. ॰उपधान्यें- न. अव. सजगुरा, भादली, वरी, नाचणी, बरग, कांग, खपले गहूं, मका, करडई, राजगिरा, मटकी, पावटा, मूग, वाल, कारळा, देवभात, सातू, अंबाडी. (दुसरी गणना) सजगुरा, नाचणी, वरी, मका, मटकी, राजगिरा, शिरस, पांढर- फळी, जिरें, मेथी, वेणुबीज, देवभात, कमलबीज, पाकड, अंबाडी; भेंडीबीज, गोवारी, कुड्याचें बीज, यांमध्ये कोठें कोठें खसखस व पांढरा राळा घालून ही संख्या विसावर नेण्यांत येते. ॰उपपुराणें- उपपुराणें पहा. ॰उपजा(या)ती-स्त्री. अव. अठरापगड जातीं- प्रमाणें ज्या अठरा उपजाती आहेत त्या अशा: भिल्ल, कोळी, मांग, अंत्यज, चांडाळ, पुल्कस, जिनगर, सलतानगर, चर्मक, डोहर (ढोर), भाट, बुरुड, रजक, दांगट, मोचेकरी, खाटिक, लोणारी व कैकाडी. -स्वादि ६.५.३७-३८. ॰कचेरी-स्त्री. (म्है.) राज्य- कारभारांतील सर्व वरिष्ठ खातीं असणारी मोठी कचेरी; सेक्रेटॅरिएट. ॰कारखाने- पु.अव. १ राज्यकारभारांतील खातीं: (अ)उष्टर, खबुतर, जनान, जवाहीर, जामदार, जिकीर, तालीम, तोफ, थट्टी, दफ्तर, दारू, दिवान, नगार, पील, फरास, बंदी, मोदी व शिकार हे अठरा कारखाने (आ) तोप, पील, उष्टर, फरास, शिकार, रथ, जामदार, जवाहीर, जिराईत, नगार, दारू, वैद्य, लकड, इमारती, मुदबख, कुणबिणी, खाजगत, थट्टी. (इ) खजिना, दफ्तर,जामदार, पील, जिराईत, अंबर, फरास, मुदबख, नगार, सरबत, आबदार, शिकार, तालीम, दारू, उष्टर, बकरे, तोप, सराफ. या तीन व आणखीहि कित्येक निरनिराळ्या याद्या सांपडतात. हे सर्व कारखाने सरकारी असून त्यांवर स्वतंत्र अधिकारी असत. सर्वांवर खानगी कारभारी मुख्य असे. 'त्याच्या अठरा कारखान्यांच्या गेल्या कळा । ' -एपो १४२. २ (ल.) मोठ्या संसाराच्या किंवा व्यवहाराच्या शाखा- खातीं. [अठरा + फा. कार्खाना]. ॰खूम- न. लोकांच्या अठरा जाती. सर्व प्रकारचे लोक; अठरापगड जात. 'या गांवांत एक मुकादम नाहीं, अठरा खुमाचे अठरा वेगळाले आहेत;' शिवाय-भाअ १८३४.४७. [अर॰ कौम; फा. खूम = जात,] ॰गुणांचा खंडोबा- पु. (ल.) १ सर्व (दूर्) गुणांनीं भरलेला; लुच्चा किंवा लबाड इसम; अट्टल सोदा. सोळा गुणांच्यावर कडी -जसा नाशिककर हा काशीकरापेक्षां शंभर पटीनें वरचढ तसा हा. २ अक्षयी रोगी; दुखणेकरी; अनेक रोगांनीं- दु:खांनीं व्याप्त. ॰जाती- स्त्री. अव. कुंभार, तेली, कासार, तांबोळी, न्हावी, परीट, कलाल, कोष्टी, झारा (झारेकरी), महार (चांभार), जैन, जती, दुंडे, गुजर, मारवाडी, सोनार, सुतार, हलालखोर (कसाब). -कोको. अठरापगड जाती पहा. ॰टोप(पी)कर- हिंदुस्तानांत आलेले युरोपियन आपल्या निरनिराळ्या देशरिवाजांप्रमाणे टोप्या वापरीत; तेव्हां त्यांना टोपकर असें नांव पडलें. १८ प्रकारचे (युरो- पियन) टोपकर: १ फिरंगी (पोर्तुगीज); २ वलंदेज (हालंड-डच); ३ निविशयान (नार्वेजियन); ४ यप्रेदोर?; ५ ग्रेंग (ग्रीक); ६ रखतार?; ७ लतियान (लाटिन); ८ यहुदिन (ज्यू); ९ इंगरे (इंग्रज); १० फरासीस (फ्रेंच); ११ कसनत्यान (शेटलंडियन केल्टिक?); १२ विनेज (व्हेनेशियन); १३ दिनमार्क (डेन्मार्क; १४ उरुस (आयरिश किंवा रशियन); १५ रुमियान (रुमानियन किंवा रोमन); १६ तलियान (इटालियन); १७ सुवेस (स्विस); १८ प्रेमरयान (पोमेरॅनियन). -भाइ १८३५. दुसरी एक यादी- फिरंगी, इंग्लिश, फ्रान्सीस, सिंध, पावलिस्त, क्रिस्त, ब्रम्हेय, डौन, द्रुप, क्राज, सुस्त, नाग, जर्मिनी, कालील, बांक, चीन, युवरेर, दौंडी. -कोको. यांत नुसते युरोपियन येत नसून हिंदुस्तानाबाहेरील चिनी वगैरेहि लोक येतात 'वडिलांची अठराटोपीकरावर सलाबत आहे.' -विवी. ८.३.५५. ॰तत्वें- न. अव. महान् (बुद्धि), अहं- कार, मन, दहा इंद्रियें आणि पंचतन्मात्रें -गीर १८५. ॰धान्यें- न. मुख्य धान्यें-गहूं, साळ, तूर, जव, जोंधळा, वाटाणा, लाख, चणा, जवस, मसूर, मूग, राळा, तीळ, हरिक, कुळीथ, सावा, उडीद, चवळी. ॰धान्यांचे कडबोळें- न. (भाजणी-अठरा धान्यें भाजून केलेल्या पिठाचा एक खाद्य पदार्थ ). (ल.) १ निरनिराळ्या प्रकारच्या गोष्टीचें मिश्रण. २ अनौरस अपत्य; जारज. ३ भिन्न जातींचा संकर; संकरजात; संकर जातींतील व्यक्ति ॰पगडजात-स्त्री. १ तांबट, पाथरवट, लोहार, सुतार, सोनार, कासार, कुंभार, देवलक (गुरव), धनगर, गौळी, लाडवाणी, जैन, कोष्टी, साळी, चितारी, माली, तेली, रंगारी. -स्वादि ६.५.३५-३६. जशी युरोपियानांत टोप्यांची -अठरा टोप- कर-तशी हिंदु लोकांची पगड्या बांधण्याची तऱ्हा जातीजातींत वेगळी आहे; तेव्हा जितक्या जाती तितके पगड्यांचे प्रकार; या- वरून सर्व जाती किंवा जातींचे लोक; एकूणएक लोक. २ अव्य- वस्थित, मिश्र जनसमूह; नाना धर्मांचा जमाव. 'या यात्रेंत अठरापगड जात मिळाली आहे, तेथें सोंवळें काय पुसतां?' [अठरा + पगडी किंवा पगडा = फाशावरील संख्यावाचक चिन्ह] ॰पद्में वानर- पु. अव. तरुणांचा जमाव, टोळी, सैन्य; वानरसेना. (रामाला मदत करणारीं १८ पद्मे वानरें होतीं). ॰पर्वें- न. अव. महाभारताचीं मुख्य प्रकरणें:-आदि, सभा, वन विराट, उद्योग, भीष्म, द्रोण, कर्ण, शल्य, सौप्तिक, स्त्री, शांति, अनुशासन, अश्वमेघ, आश्रमवासी, मौसल, महाप्रस्थानक व स्वर्गारोहण. ॰पर्वें भारत- न. (ल.) मोठी कंटाळवाणी गोष्ट; लांबलचक, जींत अनेक भारुडें व दुःखप्रसंग भरले आहेत असें कथन; चऱ्हाट. ॰पुराणें-पुराणें पहा. ॰बाबू-लबाड किंवा लुच्च्या लोकांची टोळी; आळशी लोकांचा कंपू; अव्यवस्थित लोकांचे मंडळ; बारभाई. (हल्लीं) कारकून वर्ग. बाबू पहा. [बं. हिं. बाबू = राजेश्री; समान्य; आंइं. इंग्रजी लिहिणारा हिंदु कारकून ] ॰भार वनस्पति-स्त्री. पृथ्वीवरील सर्व वृक्ष-वन- स्पति यांचा समुदाय, 'अठराभार वनस्पतींची लेखणी ।' -व्यं ३१. ॰वर्ण-पु. अठरा (पगड) जाती. यांची एक यादी अशी; ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, कुंभार, गवळी, तेली, पांचाल, (सोनार, सुतार, लोहार, तांबट, पाथरवट, हे पांच मिळून) , कोष्टी, रंगारी, शिंपी, न्हावी, पारधी, महार, धनगर, परीट, मांग व चांभार. ॰विसवे (विश्वे)-वि. अतिशय; बहुतेक परिपूर्ण; जास्त प्रमाणाचें. विश्वा, विसवा पहा. [अठरा विसांश; वीस विसावांचा एक रुक्का, अठरा विसवे म्हणजे दोन विसवा कमी इतकें; बहुतेक पूर्ण] ॰दारिद्र्य (दरिद्र)-न. अतिशय गरिबी. 'त्याच्या घरीं अठरा विश्वे दारिद्र आहे.' 'अठराविश्वे दरिद्र पाणी वाहतें.' ॰विश्वे-पापपुण्य- चौकशी-मुर्ख-धर्म-रोग इ॰ वाक्प्रचार.

दाते शब्दकोश