आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह!
शब्दार्थ
शहाजोग
शहाजोग a Creditable. Payable to bearer.
शहाजोग śahājōga ( H) Creditable, reputable, trustworthy (esp. as understood by mercantile people, and applied both to persons and to business). 2 An epithet of a hunḍí which bears this word upon it, importing that the person presenting it is worthy and may be trusted with the cash; answering to payable to bearer. 3 Applied also to rupees and other pieces of money so manifestly good that they may be received without any troublesome examination.
वि० भरंवशालायक, विश्वसनीय.
संबंधित शब्द
धनीजोग
धनीजोग a Payable to the person who purchases — हुंडी or bill: as disting. from शहाजोग.
धनीजोग dhanījōga a (धनी & योग्य) Payable to the person who purchases it--a हुंडी or bill: as disting. from शहाजोग.
नामजोग
वि. हुंडीत ज्या माणसाचे नाव व वर्णन लिहिले असेल त्याच्यापासून ओळखपाळख न घेता हुंडीची रक्कम त्याला देता येईल अशी हुंडी; (इं.) ऑर्डर चेक, याउलट शहाजोग.
धनी
पु. १ मालक; स्वामी; यजमान. २ जबाबदार माणूस; कर्ता पुरुष; ज्यास शास्त्र, रुढी वगैरेमुळें अधिकार प्राप्त झाला आहे असा लायक माणूस. 'उगवणीस धनी तुम्ही रहाल तर याला रुपये देतों.' 'तुम्ही बोलायाचे मात्र धनी हातानें कांहीं व्हावयाचें नाहीं.' 'ब्राह्मण यज्ञोपवीताचा धनी.' -वि. समृद्ध. 'ऐसा शिष्य तया स्थानीं । बुडला असे प्रवाह पाणी । गुरूची वृत्ति झाली धनी । उदकें पूर्ण परियेसा ।' -गुच १६.६०. [सं. धनिन्] म्ह॰ धन्याचें नांव गण्या चाकराचें नांव रुद्रोजीबाबा पाटील = हलके काम करतांना मोठ्या आकांक्षा धरण्यासंबंधीं म्हणतात. २ धनी ना गोसावी = बेवारसी घर, जमीन, माल इ॰ ३ धन्याला धत्तूरा आणि चाकराला मलीदा = योग्य हक्कदाराला कांहीं मिळत नाहीं त्यावेळीं वापरतात. ॰गोसावी-मी-पु. (व्यापक अर्थानें) मालक; यजमान; स्वामी; अधिकारी. ॰जोग-वि. हुंडी विकत घेणार्यास-ज्याच्या नांवाची ती असेल त्यास-जिचे पैसे द्यावयाचे असतात अशी (हुंडी). (इं.) ऑर्डर. याच्या उलट शहाजोग = ज्याच्या हातीं ती असेल त्यास द्यावयाची. (इं.) बेअरर. [धनी + योग्य] धनीण-स्त्री. मालकीण; यजमानीण; धन्याची बायको. [धनी स्त्री.] म्ह॰ धनिणीस धक्का कुंटणीस टक्का. धनीधावण्या-वि. काळजी वाहणारा; जबाबदारी घेणारा. रक्षणकर्ता; सहाय्यकारी. 'गरिबांचा धनीधावण्या ईश्वर.' धनीपण-णा-नपु. मालकी हक्क; स्वामित्व 'धनीपणा पडला आईकडे.' -मृ ३९.
नाम
न. १ नांव; वस्तुमात्राचें नांव. २ (व्या.) पदार्थाचें नांव. सामान्य, विशेष, व भाववाचक असे नामाचे तीन प्रकार आहेत. -पु. १ उभें गंध; तें लावण्याचा ठसा; रेघ. (सामा.) गंध; कपाळावर लावण्याचें चिन्ह. २ (ल.) घोडा; कुत्रा इ॰कांच्या कपाळा- वर उभा पांढरा पट्टा असतो तो. [सं. नाम; फा.नाम्] ॰करण- न. मुलाचें नांव ठेवण्याचा विधि, संस्कार. हा १६ संस्कारापैकीं एक आहे.॰गावडावि. (कु.) अशिक्षितांचा पुढारी. ॰घोष-पु. १ (पूजा इ॰च्या वेळीं) देवाच्या नावांचा केलेला मोठा गजर; नावांचा घोष. 'मग नामघोषें पिटोनि टाळी ।' २ देवाचें नांव घेणें; भजन. ॰जा-स्त्री. मान; महत्त्व; कीर्ति. 'वडीलवडिलापासून स्वामीकार्य प्रसंगें धन्यास संतोषी करून आपली नाम-जा संपादीत आलेस. -रा ८.१३९. [फा. नाम् = नांव + जाह् = हुद्दा] ॰जात-द-स्त्री. १ नियुक्त, नियोजित अधिकारी. २ नेमणूक; जहागीर. 'कांहीं नामजादा चार पांच लक्ष रुपये मिळतील ऐसें आहे.' -पया ९४. ३ स्वारी. 'त्यांनीं शिर्क्यावरी नामजात रवाना केली.' -रा १५.६. ४ एक पदवी. 'रामाजी माहादेव नामजाद प्रांत साष्टी यास.' -वाडबाबा ३.१९. -वि. १ लौकिक- वान; प्रख्यात. 'हुजूर हशम तालुके मजकुरीं नामजाद आहेत.' -वाडसमा ४.१४३. २ नेमलेला; नियुक्त केलेला. 'ते लोक किल्ल्यावर ठेवावयाचे उपयोगी नसल्यास त्यांस दुसरे जागां नाम- जाद पाठविणें.' -वाडसमा १.२७८. [फा. नाम्झाद्] ॰जादी- स्त्री. १ शौर्याचें कृत्य; नांवलौकिक. २ स्वारी; अभिक्रम. 'मग त्यावरी नामजादी करून रताजी रुपाजी जीवें मारिलें.' -इंम ३४. -सभासद ५४. ॰जोग-वि. हुंडींत ज्या माणसाचें नांव व वर्णन लिहिलेलें असेल त्याच्यापासून ओळखपाळख न घेतां हुंडीची रक्कम त्याला देतां येईल अशा प्रकारची हुंडी. (इं.) ऑर्डर चेक. याच्या उलट शहाजोग. ॰दार-वि. १ कीर्तिमान; सुप्रसिद्ध. 'मुसा मुत्रीम नामदार ।' -ऐपो २२२. २ कायदे- कौन्सिलचा सभासद. एक बहुमानार्थी पदवी. (इं.) ऑनरेबल. 'नामदार गोखले.' ॰दारी-स्त्री १ कीर्ति; लौकिक. नाम- जाद-दी पहा. २ कौन्सिलचें सभासदत्व; सन्मानाचा हुद्दा. ॰देव-पु. १ शिंपी जातींतील एक प्रसिद्ध साधु. २ एक शिंपी जातींतील पोटजात. ॰धातु-पु. नामापासून बनलेला धातु. जसें:-शेवटणें; शेंपटणें; समरसणें. ॰धारक-वि. नेहमीं देवाचें नांव घेऊन मुक्ति इच्छिणारा साधक; भक्तिमार्गी; भजनी. 'एथिचेआ नामधारका । विज्ञापन परिवारिआ मार्गिका ।' -ॠ १०३. 'तरले तरति हा भरंवसा । नामधारकाचा ठसा ।' ॰धारक, नामधारी-वि. १ नांवाजलेला; प्रसिद्ध; स्वतःचें नांव गाजविणारा. 'आम्हांजवळ दाहा नामधारी सरदार आहेत.' २ नुस्त्या नांवाचा; स्वतः कांहीं एक कारभार इ॰ करीत नसतां ज्याच्या नांवावर कारभार इ॰ होतात तो. ३ एकच नांव असलेला; एकाच नांवाचे दोन परस्पर. ४ विद्या, गुण इ॰ कांहीं नसतां निव्वळ मोठें नांव धारण करणारा. 'हा नामधारक शास्त्री आहे.' ॰धेय-न. (काव्य) नांव; नाम. -वि. नांवाचा. ॰ना-नी-स्त्री. कीर्ति; प्रसिद्धि; ख्याति. ॰नाईक-पु. (हेट.) आरमारावरचा अधिकारी; यावरून एक आडनांव. ॰निर्देश-पु. नांवाचा उल्लेख; नांव घेऊन सुचविणें, दाखविणें. ॰निशाण-वि. प्रसिद्ध; विख्यात 'राजे बहाद्दर नामनिशाण ।' -ऐपो २७७. ॰बुरदा-वि. (कागद- पत्रांत) उपरि लिखित; उपर्युक्त; वर उल्लेख केलेला [फा.] ॰मत्र- पु. देवाच्या नांवाचा जप. -ज्ञा १७.१०४. ॰रूप-न. नांवरूप पहा. ॰रूपातीत-वि. १ नांव, रूप, वर्णन इ॰काच्या पलीकडचा (हीं नसलेला) (देव). 'जें का अक्षर अव्यक्त । असें नावरूपातीत । शब्देवीण आनंदत । निजे तेथें निज बाळा ।' २ नांव इ॰ घालवि- लेला; दुर्लौकिकाचा; अवनतावस्थेस आलेला. ३ ऐहिक कीर्ति, मान इ॰कांची पर्वा न करणारा; ऐहिक लाभांना तुच्छ मानणारा. [नाम + रूप + अतीत] ॰वर-वि. प्रसिद्ध; नांवाजलेलें. ॰वाचणी- स्त्री. नांवनिशी. 'कथितो नामवाचणी सारी ।' -अमृत ४४. [नाम + वाचणें] ॰वाच्य-पु. (व्या.) तुतीय पुरुष. ॰विधान-न. नामकरण पहा. ॰शेष-वि. १ ज्याचें नुसतें नांव उरलें आहे असा (मृत, अज्ञातावस्थेंतला माणूस). २ अतिशय निकृष्टावस्थेस पोहों- चलेलें (गांव इ॰) ॰संकीर्तन-न. देवाचें नांव घेणें; भजन करणें; नामघोष. ॰सरी-क्रिवि. नामसदृश; नांवासारखें. 'तेही नामाशी नामसरी । म्हणत असतील जरत्कारी ।' -मुआदि ४.१६. ॰स्मरण- न. मनामध्यें देवाचें नांव घेणें-आठवणें. ॰स्मरण भक्ति-स्त्री. उपासनामार्गांतील नवविधा भक्तीपैकीं तिसरी नामा, नाम्नी- (पुस्त्री) वि. नांवाचा-ची. जसेः-हरीपंत नामा एक पुरुष; गंगा नाम्नी कन्या. नामांकित-वि. प्रसिद्ध; विख्यात; लौकिक अस- लेला. नामाथ(थि)णें-अक्रि. १ (काव्य) प्रसिद्धीस येणें; नांव होणें; नांवाजला जाणें. 'आनंदाचेनि नांवें । नामाथें पैं ।' -सिसं ५.११. २ नांव देणें. नामाथिला-वि. नावांजलेला; नामांकित. 'ऐसे नामाथिले वीर ।' -उषा १५९. नामाभिधान-न. १ नांव. 'तेथील पांड्या भावीक पूर्ण । महादाजीपंत नामाभिधान ।' २ नामांकित माणूस. 'हुजुरातींतले नामाभिधानें ।' -ऐपो २६७. [सं. नाम + अभिधान] नामावलि-ळी-ळ-स्त्री. नांवांची यादी. मुख्तत्वें शिव, विष्णु इ॰कांच्या नावांच्या यादीस लावतात. 'प्रेमभरित अंतरांत वदनीं नामावळी गाती ।' -होला १७. नामो-वि. (गो.) नाम लावणारा. (सारस्वत वैष्णवांना उपहा- सानें योजतात). नाम्या-वि. नाम अर्थ ४ पहा. कपाळावर पांढरा पट्टा असणारा (कुत्रा इ॰).
उभा
वि. १ ताठ; वर; खडा; आडवा नसलेला; न वांकलेला; न बसलेला. 'उभा राहून किती वेळ बोलशील ? ये, इथें झोपा- ळ्यावर बैस.' २ सरळ दिशेंत असलेला; लांबीच्या अनुषंगानें सरळ रेषेंत असणारा (रस्ता). याच्या उलट आडवा (रस्ता). ३ चालू; सुरू असलेला (धंदा वगैरे). 'माझें घर बांधण्याचें काम उभें आहे.' ४ न कापलेलें; शेतांत उभें असलेलें (पीक वगैरे). 'शेतांतील उभें पीक शत्रूनें कापून नेलें.' ५ तयार; उत्सुक; पुढें आलेला; सिद्ध. 'त्याचें घर विकत घेण्यास कोणी उभा रहात नाहीं.' ६ सतत; अढळ; जागृत; पक्का; तीव्र (द्वेष, दावा वगैरे). 'त्या दोघांमध्यें उभा दावा आहे.'. ७ संपूर्ण; सर्व; अथपासून इतिपर्यंत (संवत्सर, साल, वर्ष वगैरे). 'उभ्या वर्षात धंद्यामध्यें कांहीं फायदा झाला नाहीं.' ८ सारखा; चालू असलेला; खळ न पडणारा; फार वेळ टिकणारा; अविरत (पाऊस, वारा वगैरे). 'उभ्या पावसांत शेतलावणीचें काम चालु होतें.' ९ सरळ धारा पडत आहेत असा (पाऊस). १० थेट समोरून येणारा; तोंडावर येणारा; विरुद्ध दिशेकडून येणारा (वारा वगैरे). 'वारा उभा असल्यामुळें गलबताची गति खुंटली, मंद झाली.' ११ गति नसलेला; थांबलेला; स्थिर. [सं. ऊर्ध्व; प्रा. उब्भ; सिं. उभो; वं. उबु] ॰करणें क्रि. १ थांबविणें; गति बंद करणें; स्तब्ध करणें. 'गाडी उभी कर.'. २ बंद करणें; तात्पुरता थांबविणें; कांहीं काळ थोपविणें (धंदा, काम वगैरे). 'मंदीमुळें सध्यां धंदा उभा केला आहे.' ३ रचणें; उभारणें; तयार करणें. 'पोलिसांनीं खोटा खटला उभा केला.' ४ (बायकी) धुतांना लांब वस्त्र एका पदरापासून दुसर्या पदरापर्यंत सारखें करून घेणें. ५ उत्पन्न करणें, आणणें. 'शिवाजीमहाराजांच्या नेत्रांतून देखील अश्रू उभे केले.' -इंप १०६. ६ आडवी पडलेली वस्तु लंबरेषेंत ठेवणें. 'समई आडवी पडली आहे ती उभी कर पाहूं !' ॰होणें-थांबणें; तात्पुरता बंद होणें; विश्रांति घेणें. ॰धरणें-निर्बंधांत ठेवणें; कडक शिस्तींत वागविणें; जांचणूक करणें; त्रास देणें (धनकोनें रिणकोस, मुलानें आईस वगैरे). 'केव्हांपासून यानें मला अगदीं उभें धरिलें आहे, जरा घे तरी !'. ॰जाळणें-अत्यंत हाल करणें; अतिशय त्रास देणें; छळणें. ॰ठाकणें-उत्पन्न होणें; समोर येणें. 'संगतीच्या लोकांचा भोग । उभा ठेला ।' -दा १२.९.२४. ॰नाहणें सर्वांग भरून येणें, पाझरणें, निथळणें (घाम, रक्त वगैरेनीं). ॰राहणें-१ मिळणें; प्राप्त होणें; लाभणें (फायदा, नफा वगैरे); परत मिळविणें; वसूल होणें; संपादन करणें. 'व्यापारांत घातलेलें माझें भांडवल अद्यापि सारें उभें राहिलें नाहीं.' २ घडणें; जवळ येणें; निकट येणें (एखादी गोष्ट किंवा कृत्य); प्राप्त होणें; आवश्यक होणें. ३ साहाय्य करण्यास पुढें येणें, तयार होणें, सिद्ध होणें. 'बहुत जन वास पाहे । वेळेसी तत्काळ उभा राहे ।।' -दा १९.४.११ ४ एखाद्या संकटांतून वर येणें; नशीब काढणें. ५ पोटांत गोळा उभा राहणें; संकट येणें. 'उपस्थित होणें. ६ आड येणें; अडचण, प्रति- बंध होणें; पुढें येणें. त्यावेळीं एक गोष्ट उभी राहिली, तेणेंकरून माझा बेत जागाच्याजागींच राहिला.' 'माझ्या मुलीचें लग्न उभें राहिलें आहे, तुम्हाला द्यावयाला मजजवळ पैसे नाहींत.' ७ उप्तन्न होणें; मिळणें; प्राप्त होणें (किंमत वगैरे). 'या मालाचे रुपये पांच हजार उभे राहिले कीं, माझे वडील भाग्योदय मान- तील.' -विवि. १०.५.१९७. ८ अनुकूल होणें. 'उभें राहिलें भाग्य विभीषणाचें ।' -राक १.७१. ॰इंद्र करणें पुन्हां सुरुवात करणें; नव्यानें आरंभ करणें (काम, धंदा वगैरेस). ॰छेद-पु. (गणित, स्थापत्य, चित्रकला ) एखादी वस्तु उभी (ओळंब्यांत) वरपासून खालपर्यंत कापली असतां दिसणारें दृश्य. ॰तांब्या-पु. राजापुराकडील उभंट आकाराचा पितळेचा किंवा तांब्याचा लोटा. ॰दांडा-पु. १ उभा, सरळ खांब. २ (ल.) सरळ व्यवहार; सरळ वर्तन; युक्तीचें, कुशलतेचें वर्तन. [उभा + दंड] ॰दावा-पु. हाड- वैर; अक्षय, कायमचें वैर. म्ह॰ जावा जावा, उभा दावा. (उभें) दोन प्रहर-पु. उभीदुपार पहा. 'आपल्या झोपड्यां- वर उभ्या दोन प्रहरीं चांगलें ऊन पडतें.' -पाव्ह २७. ॰दोरा- पु. धांवदोरा; कच्ची शिवण; टीप याच्या उलट. ॰नासणें सर्व नाश होणें; तात्काळ नासणें. 'जे शब्दीं वदोनि उभा । संसार- नासी ।।' -दा १.२.९. ॰पाहारा-पु. १ खडा पाहारा; अत्यंत काळजीपूर्वक, डोळ्यांत तेल घालून केलेली राखण. २ सारखें उभें राहणें, वसावयास फुरसत न मिळणें; एकसारखे कष्ट; विश्रांतीचा अभाव. 'दिवसभर्याच्या उभ्या पाहार्यांत अंग भरून येऊन रात्रीं मेलं केव्हां एकदां आडवी होईन असं होऊन गेलं.' -नाट्यछटा (फाटक) २. ३ (ल.) एकसारखी केलेली चाकरी, सेवा; एखाद्या आजार्याची एकसारखी केलेली सारखी शुश्रूषा. ॰पाऊस-पु. मोठा, सरळ धारांनीं पडणारा पाऊस; न खळणारा पाऊस. ॰बाजार-पु. १ या टोंकापासून त्या टोंकापर्यंत सर्व बाजार; सगळी बाजारपेठ. 'तूं दिलेल्या रंगाची लोंकर उभ्या बाजारांत मिळत नाहीं.' २ भरबाजार; बाजाराचा मध्य भाग; चव्हाटा. 'उभ्या बाजारांत कथा । हें तों नावडे पंढरीनाथा ।।' ॰मार्ग- पु. १ राजरस्ता; सार्वजनिक रस्ता; रहदारीचा रस्ता; मोठा रस्ता; हमरस्ता. २ या टोंकापासून त्या टोंकापर्यंत सर्व, सगळा रस्ता. ३ सरळ रस्ता; आडवा नसलेला, वांकडातिकडा नसलेला रस्ता. ४ (ल.) सरळ, प्रामाणिकपणाचें वर्तन; शहाजोग व्यवहार. उभ्यामार्गानें जाणें, येणें-न. सरळ मार्गानें, न थांबतां, वांकडें- तिकडें न जातां जाणें. ॰माल-पु. तयार झालेलें, पण न कापलेलें शेतांतील पीक. उभ्या मालाची पाहाणी-स्त्री. शेतांतील पिकाचा अंदाज. म्ह॰ उभ्यानें यावें ओणव्यानें जावें = वेळ प्रसंग पाहून वर्तन करावें, नम्रतेनें वागावें.