मराठी बृहद्कोश

सात मराठी शब्दकोशांतील २,८४,८८८ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

शहाणपण, शहाणीव, शाहणीव

न. स्त्री. हुषारी; धूर्तता; अक्कल; चातुर्य; चांगली समजूत. 'हृदयीं सांवरिती शहाणीव ।' -मुआ ४१. ५७. 'दावोत कोणी शाहणीव लाघव ।' -दावि ३१२. [शहाणा]

दाते शब्दकोश

संबंधित शब्द

गाणी

वि. गाणारीण, गायिका; गानी. 'जेथें सरस्वती- सारखी गाणी ।' -कालिका ४.९. गाणीक-वि. गायक; गाणारा. -न. गायनचातुर्य. गाणीव-न. १ गायनचातुर्य. 'गाणीव जाणीव शहाणीव । वोंवाळूनि सांडावी सर्व ।' -एभा ११.७३८. २ गाणें. 'बहिरीयापुढें हृषीकेशा । गाणीव करा ।' -ज्ञा ११.१५७. [गाणें]

दाते शब्दकोश

गाणीक, गाणीव      

न.       १. गायनचातुर्य : ‘गाणीव जाणीव शहाणीव । वोंवाळूनि सांडावी सर्व ।’ –एभा ११·७३८. २. गाणे : ‘बहिरीयापुढें हृषीकेशा । गाणीव करा ॥’ –ज्ञा ११·१५७.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

शहाणपण

शहाणपण n शहाणीव f Shrewdness, sagacity.

वझे शब्दकोश

शहाणपण śahāṇapaṇa n शहाणीव f (Poetry.) Shrewdness, knowingness, understanding, sagacity, good sense.

मोल्सवर्थ शब्दकोश