आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह!
शब्दार्थ
शास्ता
शास्ता a That punishes. That rules.
शास्ता śāstā a S That punishes: also that governs or rules.
(सं) पु० शासनकर्ता, वागविणारा.
संबंधित शब्द
अमीर
पु. १ थोर किंवा बडा इसम; सरदार; उमराव; उच्च घराण्यांतील मनुष्य. 'धीर वीर किति अमीर होउनि फकीर भिक मागती ।' -ऐपो ३६७. २ आज्ञा करणारा अधिकारी [अर. अमीर = सरदार; श्रेष्ठमनुष्य. आमिर = आज्ञा करणारा; शास्ता. अम्र = आज्ञा; हुकूम सं. मित्र (सूर्य) किंवा अमर = देव, श्रेष्ठ. फा. मिहिर.?]. ॰उमराव-पु. बडे लोक; सरदारमंडळी. [अमीरउम्रा अमीरचें अव.]. ॰उल्-उमरा(व)-अमीरांतील श्रेष्ठ; सरदा- रांचा नायक. (मालोजी घोरपडे यास ही पदवी होती.) ॰उल्- ममालिक-राज्यांतील श्रेष्ठ अधिकारी. ॰राव-एक पदवी. -मदरु १.१२.
अराजक
वि. १ राज्यसत्ता नष्ट करूं पाहणारा; बंडखोर; क्रांतिकारक. २ राजसत्ताविरहित, शास्ता नसलेला (देश). [सं.] ॰कत्व-न. बंडाकडे प्रवृत्ति; अराजकपणा; अराजकता. 'एकादी सुधारणा करणें म्हणजे अराजकत्वाकडे पाऊल टाकणें कीं काय असें लोकांस वाटूं लागलें होते.' -इंभू ३१३.
बेलगाम
अनिर्बंध, उधळलेला, स्वच्छंदी, स्वैर, अनियंत्रित, बेफाट, बेछूट, अनिरुद्ध, कोणाची वेसण वा दाब नाहीं, निरर्गल, उच्छृंखल, बंधनाच्या पलीकडे, ताब्याबाहेर गेलेला, नियंत्रक कोणी राहिलेला नाहीं, स्वैरसंचारी, या गाडीचे ब्रेक्स् मोडले आहेत, वाटेल तेथें जाईंल व वाटेल तें कराल, जीवनास सुकाणूं नाहीं, सैराट, स्वतःचा शास्ता स्वतः, याच्यावर कोणाची मात्रा चालत नाहीं, मनमानी वागणूक.
हुकुमशहा
तानाशाह, सर्वेसर्वा, अनियंत्रित सत्ताधीश, सर्वसत्ताधीश, सर्वप्रबल, शहेनशाह, अनभिषिक्त सम्राट्, सत्तेता हुकमी एक्का, एकमेव शास्ता, कर्ताकरविता एकच, हा एक बाकी शुन्य, तो म्हणेल ती पूर्व दिशा, त्याचा हात धरणारा कोणी नाहीं, कोणी कां म्हणून विचारणार नाहीं.
जीवित
न. जीव; आयुष्य; अस्तित्व; जिणें; प्राणधारणा. -वि जीवंत केलेला; सजीव केलेला. जीवितेश-पु. १ (काव्य) जीविताचा, आयुष्याचा शास्ता (देवता, यम, नवरा, प्रियकर इ॰). २ जिवलग, प्रियकर माणूस. जीवित्व-न. प्राण; आयुष्य; अस्तित्व. जीवित पहा. 'बाळें ओढुनि काढिती बाहेर । जीवि- त्वावरि उदार त्या ।' [जीवित]
कर्मजड
पु. कर्मठ लोक : ‘तिन्ही लोकांचा शास्ता । ईश्वर तो मी नियंता । येणे कर्मजडांची वार्ता । अनीश्वरता छेदली ।’ − एभा १०·६२१.
खावं(विं)द
पु. १ यजमान; सरकार; महाराज; स्वामी; शास्ता. 'आम्हीं जो जाबसाल सांगतों तो खावंदाचे मर्जीस येत नाहीं.' -भाब ६. २ मालक; धनी. 'बाबाजी पाटील निमे मोकदमीचा खावंद.' -चंद्रचूड दप्तर १.२० [फा. खावंद्]
खावंद, खाविंद
पु. १. यजमान; सरकार; महाराज; स्वामी; शास्ता : ‘आम्हीं जो जाबसाल सांगतों तों खावंदाचे मर्जीस येत नाहीं.’ - भाब ६. २. मालक; धनी : ‘बाबाजी पाटील निमे मोकदमीचा खावंद.’ - चंद्रचूड दप्तर १·२०. [फा.]
मजकूर, मज्कूर
पु. १ लेखी माहिती; हकीकत; पत्रां- तील वर्तमान. २ तोंडीं सांगितलेली बातमी, माहिती; बोलणें. ३ हकीकत; गोष्ट. 'त्यानें केवळ कच्चा मजकूर सांगितला.' ४ उल्लेख; निवेदन; आढळ. (क्रि॰ निघणें; येणें; चालणें). ५ किंमत; पाड; हिशेब. 'इराणीचा मजकूर किती? मारून धुडकावून देऊं !' -पाब ३२. ७ युक्ति; उपाय; तजवीज. 'याचा मजकूर काय करावा?' -भाब ४. ६ विचार; मसलत; बेत. 'नबाब शास्ता- खान याची रवानगी करावी असा मज्कूर करून...' -सभासद २६. -वि. १ पूर्वी सांगितलेला; उपरिनिर्दिष्ट (कागदपत्रांत उपयोग). 'मौजे मजकूरचा पाटील गेला.' २ (चुकीनें) चालू; सध्याचा; वर्तमान. जसें:-सालमजकूर; माहेमजकूर. [अर. मझ्कूर्] ॰करणें-भाषण करणें; बोलणें. 'तुम्ही काय मजकूर केला ।' -एपो ४१ मजकूरी-वि. ज्यांत कांहीं मजकूर, हकी- कत, माहिती आहे असा (कागद, भाषण इ॰).
निर्नायक
वि. शास्ता, पुढारी नसलेला (देश, संघ इ॰). [सं.] निर्नायकी-स्त्री. (नायक नसणें) अंदाधुंदी; बेबंदशाही; अराजकता. 'शिक्षणाच्या बाबतींत हल्लीचा काळ निर्नायकीचा आहे.'
निर्नायक
वि. शास्ता, पुढारी नसलेला (देश, संघ इ.). [सं.]
नियंता
वि. नियमन करणारा; शास्ता; अंमल, अधिकार, हुकमत चालवणारा; समाजाला नियम, शिस्त लावणारा (ईश्वर, यमधर्म). [सं.]
नियंता
वि. नियमन करणारा; शास्ता; अंमल, अधिकार, हुकुमत चालविणारा; समाजाला आळा घालणारा (ईश्वर, यमधर्म). 'तरी विश्व हा अनादि ठावो । येथ नियंता ईश्वररावो ।' -ज्ञा १६.२९५. [सं.]
राजा
पु १ नृप; नृपति; भूपाल; नरेंद्र; छत्रपति; लहान राज्यें व थोडक्या प्रजा असलेलें संस्थानिक व सरदार यांसहि हा शब्द लागतो. २ (मंडळीचा, टोळीचा) नायक; मुख्य. ३ सजातीय पदार्थसमुच्चयांत श्रेष्ठ मानलेला तो. ४ अन्न, वस्त्र इ॰ पदार्थ यथास्थित असल्यामुळें ते मिळविण्याचे कष्ट किंवा काळजी ज्यास करावी लागत नाहीं असा मनुष्य. ५ गंजिफांच्या बांजूतील मुख्य. पत्त्यांतील एक चित्राचें पान. ६ बुद्धिबळाच्या खेळांत डावांतील मुख्य मोहरा. ७ वर्षांचा शास्ता म्हणून मानलेला ग्रह; वर्षेशग्रह. ८ (ल.) वेडा; मूर्ख; स्वेच्छ वर्तन करणारा मनुष्य. ९ कसरीच्या राणीस म्हणतात. (समासांत) राजपत्नी; राजपुत्र; राजकन्या; राजगुरु; राजपुरोहित; राजोपाध्याय; राजसभा इ॰ ह्याचे मराठी शब्दाशींहि समास झाले आहेत. जसें- राजपसंत; राजदरबार इ॰. राजपद उत्तरपदीं येणारे नायक या अर्थाचे कांहीं सामासिक शब्द- मृगराज = मृगश्रेष्ठ; तीर्थराज = तीर्थांपैकीं मुख्य, सागर किंवा प्रयाग; तसेंच गजराज; सर्पराज; अश्वराज; द्विजराज; देवराज; कविराज; वैद्यराज; पंडितराज; स्वामिराज; गणराज; भूतराज; यक्षराज; वनराज (आपटा किंवा शमी), वृक्षराज, राज- पद पूर्वंपदीं असलेले कांहीं सामासिकशब्द-राजक्रांति; राजशोभा; राजकृपा; राजचित्त; राजमित्र; राजप्रिय; राजाश्रय; राजाश्रित; राजबुद्बि; राजसखा; राजरंग; राजमहाल; राजवटी इ॰. [सं. राज् = प्रकाशेणें] (वाप्र.) राजापासून रंकापर्यंत-श्रीमंतापासून तों गरीबापर्यंत; सर्व दर्जाच्या लोकांत. 'ब्राह्मणाला राजापासून रंकापर्यंत मान मिळत असे.' राजा याचें राज असें रूप होऊन झालेले कांहीं सामाशब्द- ॰अंबीर-पु. १ (शृंगारिक काव्य) गंभीर स्वभावाचा, सभ्य नायक. -वि. बादशाही; भव्य; नामी; उत्कृष्ट (मनुष्य, देश, पोषाख, बोलण्याची ढब, कोणतीहि गोष्ट). [सं. राजा + अर. अमीर] ॰आवळी-स्त्री. आवळीचा एक प्रकार. या झाडास फळें लहान येतात. हीसच हरपररेवडी, रानआवळी असेंहि म्हणतात. ॰कडी-स्त्री. विशिष्ट प्रकारची कानांतील कडी; एक कर्णभूषण. ॰कवि-पु. दरबारी कवि. [सं.] ॰काज-कारभार- नपु. राज्यकारभार; राज्यासंबंधीं सर्व प्रकारचें काम. ॰कारण- १ राज्यासंबंधीं मसलत; खोल व गूढ मसलत, कल्पना. 'राज- कारण बहुत करावें ।' -दा ११.५.१९. २ गुप्त निमित्त, गूढ (एखाद्या गोष्टीचें). 'भिंतीस किती सारवलें, लिंपिलें तरी चीर पडते याचें राजकरण कांहीं समजत नाहीं.' ३ शासनसंस्थे- संबंधीं गोष्टी; राजनीती; (इं.) पॉलिटिक्स. 'बिझांटबाई तरुण मुलांनीं राजकरणांत पडूं नये असें सांगतात.' -केले १.१९. ॰कारणी-वि. खोल मसलत कारणारा; मुत्सद्दी. ॰कारभार- पु. राज्यव्यवस्था. ॰कारस्थान-न. राजकीय मसलत, कल्पना, बेत, चतुराई; राज्याची मसलत. ॰कार्य-न. १ राजकीय कर्तव्यें, काम; राज्याचीं कामें. २ राजाचें काम. ३ राजाचें शासन, कायदा, कृत्य. [सं.] ॰किंकर-पु. राजाचा चाकर; सरकारी नोकर, शिपाई, जासूद इ॰ [सं.] ॰किशोर-पु. राजाचा मुलगा. [सं.] राजकी-पु. राजाचा नोकर. 'राजकी म्हणती आमुचें घर ।' -दा १.१०.४६. -वि. राजापासून उत्पन्न होणारी; राजाच्या संबंधाची (सत्ता, जुलूम, कृत्यें). याच्या उलट देवकी. 'दुसर्या राज्यांत गेल्यानें राजकी उपद्रव टाळायास येईल पण देवकी उपद्रवापुढें उपाय चालत नाहीं.' [राजीक] राजकीय- वि. राजासंबंधीं; राजाचा; राजविषयक (व्यवहार, कारभार, मनुष्य इ॰) [सं.] ॰कीय कैदी-पु. राजद्रोहामुळें तुरुंगांत कद केलेला राजकरणी पुरुष; सरकारविरुद्ध अराजकता माजविणारा म्हणून कैद केलेला मनुष्य. ॰कीय बंदी-पु, सरकारी कैदेंत अडकलेला कैदी; राजद्रोही बंदिवान. ॰कीय व्यवहार-पु. १ राज्याचें काम. २ राजनीति. [सं.] ॰कीय सभा-स्त्री. राजका- रणासंबंधीं सभा; (इं.) पोलिटिकल मिटिंग. 'क्वचित एखादा सरकारी नोकर आपल्या मुलांना राजकीय सभांना जाण्यास प्रति- बंध करतो.' -केले १.२३३.[सं.] ॰कुमर-कुंवर-री- कुमारी-स्त्री. राजाची कन्या. [प्रा.] ॰कुमार-कुंवर-पु. १ राजाचा मुलगा; राजपुत्र. २ पुनर्वसु नक्षत्र. [सं.] ॰कुल-न. राजघराणें; राजवंश. [सं.] ॰केळ-ळी-ळें-स्त्रीन. केळीची एक जात व तिचें फळ. ॰क्रांत-क्रांती-स्त्रीन. १ राज्याची उलथापालथ; राज्यव्यवस्थेंत मोठी उलाढाल, खळबळ, बदल. २ युद्ध, शत्रूचें आक्रमण इत्यादीमुळें माजलेली गडबड, गोंधळ, वगैरे नासधूस. ३ राजाचा जुलूम, अन्याय. [सं.] ॰गादी-स्त्री. राजाची गादी; सिंहासन. ॰गुह्य-न. राजाचें किंवा राज्यासंबंधीं गुपित, गुढ; गुप्त गोष्ट. ॰गोंड-स्त्री. (शहराचा, गांवचा) मोठा रस्ता. ॰गोंड-पु. गोंडांतील एक श्रेष्ठ जात. ॰गोंडा-पु. पाल- खीच्या दांडीला मध्यभागीं लोंबता बांधलेला, हातांत धरावयाचा गोंडा. ॰घोस-स्त्री एक वेल. हिच्या पानांच्या काढ्याचा देवी इ॰ आजारांत उपयोग करितात. ॰घोळ-स्त्री. घोळ नामक भाजीची एक जात. ॰चिन्ह-न. १ राजेपणाचें चिन्ह; राजाचें छत्र, चामर इ॰ वैभव. २ (सामुद्रिक) नशीबीं सिंहासनावर बसण्याचा योग आहे असें दाखविणारी खूण, लक्षणविशेष किंवा विशेष गोष्ट. (आजानुबाहुत्व इ॰) ३ राजाची मोहोर, शिक्का, किंवा सही (नाणें, पत्र इ॰ कांवरील). ४ (राजाच्या सह्या अस्पष्ट, वाचण्यास कठिण असतात यावरून ल.) फरपट्यांचें, बिरखुडी, वाईट लपेटीचें, दुर्बोध अक्षर. [सं.] ॰टिटवी-स्त्री. पिवळसर रंगाची टिटवी. ॰तिलक-पु. १ राजांमध्यें श्रेष्ठ; सार्वभौम राजा. २ राजाटिळा. ३ राज्याभिषेक. [सं. राजा + तिलक] ॰तुरा-पु. एक फुलझाड व त्याचें फूल. ॰तेज-न. राजाचें तेज, वैभव, ऐश्वर्य. [सं.] ॰तख्त-न. १ राजाचें सिंहासन. २ राजधानी. 'किल्ला रायगड राजतख्त.' -चित्रगुप्त १६७. ॰त्व-न. राजेपणा; राजाधिकार; राजपद. [सं.] ॰दंड-पु. १ राजानें केलेली शिक्षा. २ राजानें बलविलेला दंड. ३ जातिबहिष्कृत केलेल्या मनुष्यास जातींत परत घेतांना त्यानें राजास द्यावयाचा दंड. ४ राजाच्या हातांतील अधिकारदर्शक काठी. ॰दंत-पु. चौकडीचे दांत; पदार्थ तोडावयाचे दांत; पुढील दांत. [सं.] ॰दरबार-१ राजाची कचेरी; न्यायसभा. २ प्रजेचीं गार्हाणीं ऐकण्याकरितां बसावयाची राजाची जागा. ॰दरबारी-वि. राज्यासंबंधी. ॰दर्शन-न. राजाचें दर्शन; राजाची भेट. 'राजदर्शन म्हणजे मोटा लाभ.' [सं.] ॰दुहिता-स्त्री. राजाची मुलगी. 'वर शिशुपाळ ऐकतां । दचकली ते राजदुहिता ।' -एरुस्व २.४१. [सं.] ॰दूत-पु. राजाची नोकर हुजर्या, सेवक; जासूद. [सं.] ॰द्रोह-पु. १ सरकाराबद्दल अप्रीति; राजाविरुद्ध कट, बंड; फितुरी. २ राज्य व राजसत्ता याविरुद्ध गुन्हा. ३ (कायदा) बादशाहाविरुद्ध किंवा ब्रिटिश अमलाविरुद्ध द्वेष, तिरस्कार किंवा बेदिली बोललेल्या किंवा लिहिलेल्या शब्दांनीं किंवा खुणानीं किंवा इतर रीतीनीं उत्पन्न करणें; (इं.) सिडिशन्. ॰द्वार-न. १ न्यायाच्या कचेरीचा राजवाडा; राजदरबार. २ राजवाड्याचा दरवाजा. [सं.] ॰धन- न. राजाचा महसूल, उत्पन्न. [सं.] ॰धर्म-पु. १ राज्यकारभार चालविण्याकरितां मार्गदर्शक असा शास्त्रांत सांगितलेला कायदा, अनुशासन. २ राजास योग्य किंवा शोभणारा गुण, राजगुण. कार्योपदेशकैशल्य, प्रागलभ्य इ॰). 'जे राजधर्म सुरतरू सख मखसे सुखद उत्सवद नाकीं ।' -मोसभा १.१५. ३ राजाचें कर्तव्य विशेष काम. [सं.] ॰धातु-पु. कित्येक कवींनीं लोखंडास हें नांव दिलें आहे । ॰धानी-नगरी-स्त्री. राजाचें राहण्याचें मुख्य शहर. [सं.] ॰धान्य-न. एक धान्य; सांवा. [सं.] ॰धारी- पु. एक प्रकारचा तमाशा. -कलावंतखातें (बडोडें) १३८. ॰निष्ठ- स्त्री. राजाविषयीं, सरकाराविषयीं आदर दाखविणारा. ॰निष्ठा- स्त्री. राजासंबंधीं, सरकारसंबंधीं आदर, पूज्यबुद्धि. 'राज्यपद्धतीं- तील दोष अधिकार्यांच्या नजरेस आणणें हीच खरी राजनिष्ठा.' -टिसू २१५. [सं.] ॰नीति-स्त्री. १ राजव्यवहारशास्त्र. आन्वी- क्षिकी किंवा तर्कविद्या, त्रयी किंवा धर्म विद्या, वार्ता किंवा अर्थ- विद्या व दंडनीति असे चार राजनीतीचे भेद आहेत. २ नीति; नीतिशास्त्र. [सं.] ॰नील-नीळ-न. नीलमणी. [सं.] पंचक- न. ज्यांत राजपासून जुलूम किंवा नासधूस होते असा ज्योति- षीय गणितानें येणाके काल. अग्निपंचक, चौरपचक, मृत्युपंचक, हानिपंचक इ॰ पहा. [सं.] ॰पट्ट-पु. राजाचा शित्ताज; राजाचें ललाटपट्ट. [सं.] ॰पत्नी-स्त्री. राजाची स्त्री; /?/. [सं.] ॰पत्र-न. राजाचें पत्र; देणगीपत्र; सनद. 'ब्राह्मण स्थापिले वृत्ति- क्षेत्रीं । ते ते अक्षयीं राजपत्रीं ।' -मुसभा ६.५६. [सं.] ॰पद- न. राजाचा अधिकार, दर्जा; राजत्व. ॰पद्धति-त-स्त्री. राजास योग्य अशी रीति, चाल, वहिवाट. [सं.] ॰पसंत-द-वि. राजे व अमीर उमराव यांस असणारा; सर्वोत्कृष्ट; उंची; खासा; नामी. [सं. राजा + फा. पसन्द] ॰पिंडा-पु. देखणा व छबी- दार मनुष्य; राजबिंडा. [सं. राजा + पिंड] ॰पीठ-न. १ राजाचें आसन; राजाचें सिंहासन. २ राजाधानीचें शहर. [सं.] ॰पीढी- पु. (महानु.) राजपुरुष. 'रवमदें पातले राजपीढी ।' -गस्तो ४६. [राजा + पिढी] ॰पुत्र-पु. १ राजाचा मुलगा. २ क्षत्रिय. [सं.] ॰पुरी-स्त्री. बादशाही शहर; राजधानी. [सं.] ॰पुरुष-पु. १ सरकारी अधिकारी, नोकर. २ राजाच्या चाकरींतील कोणीहि लहान- मोठा मनुष्य. [सं.] ॰बंदी-पु. राजकैदी; राजकीय गुन्हेगार, बंदिवान. ॰बनसी-वि. राजवंशाचा. हा हिंदुस्थानी शब्द मराठी लावण्यांतून नेहमीं येतो. [राजवंशी; हिं. राजबनसी] ॰बाबती- स्त्री. राजास द्यावयाचा वसुलाचा चौथा भाग. चौथ पहा. ॰बिडा- वि. अतिशय सुंदर व नाजुक पुरुषास म्हणतात; राजसारखा अथवा अत्यंत देखणा; सुंदर आणि तेजस्वी (मनुष्य). [राजा + पिंड] ॰बिदी-स्त्री. राजमार्ग. 'इंद्रियग्रामींचा राजबिंदी ।' -ज्ञा ७.१०६. ॰बीज-वि. १ राजाच्या बीजाचा, वंशाचा. २ (ल.) सुस्वभावी व सुंदर मुलास म्हणतात. ॰बीध-स्त्री. (शहराचा) मुख्य; मोठा रस्ता; राजबिदी. ॰बेत-(को.) राजदंड. [राज वेत्र] ॰भाग-पु. राजाचा भाग; सरकारस द्यावयाचा कोणत्याहि उत्पन्नाचा भाग. [सं.] ॰भार्या-भाजा-स्त्री. राजाची पत्नी; पट्टाभिषिक राणी. 'येरु बोले पाहीन पिता माझा । नको जाऊं मारील राजभाजा ।' -ध्रुवाख्यान ४ (नवनीत पृ. ४११). [सं.] ॰भोग-पु. सरकारचा हक्क. [सं.] ॰भ्रष्ट-वि. राज्यावरून निघा- लेला. ॰मंडल-ळ-न. १ राजांचा समुदाय. २ राजकीय मंडल; राजभृत्य; राजपुरुष; बादशाहा भोंवतालचे अमीरउमराव इ॰ [सं.] ॰मंत्र-पु. राजाचा बेत, उद्देश. [सं.] ॰मद-पु. राज्याचा गर्व, दर्प. [सं.] ॰मंदिर-न. १ सौध; राजवाडा. २ (लावणी, शृंगारविषयक काव्य इ॰ कांत) विलासंमदिर; रंगमहाल; अंत: पुर इ॰ [सं.] ॰महाल-पु. राजवाडा. ॰मान्य-वि. १ राजानें मान देण्यास योग्य; पूज्य; श्रेष्ठ; वरिष्ठ; २ ज्याला पत्र पाठवा- वयाचें असतें किंवा ज्याचा उल्लेख करावयाचा असतो त्याला सन्मानार्थ कागदोपत्रीं हें विशेषण लावतात. ३ सर्वांस पसंत पडेल असें. 'हा एक राजमान्य उपाय आहे ।' [सं.] ॰मार्ग- पु. १ राजाचा हमरस्ता; सार्वजनिक रस्ता. २ (ल.) सर्व लोकांनीं मान्य व पसंत केलेली चाल, वहिवाट, रहाटी. [सं.] ॰माष-पु. एक कडधान्य. [सं.] ॰मुद्रा-स्त्री. १ राजाची मोहार; चिता शिक्का; ठसा. २ राजाच्या छापाचें नाणें. [सं.] ॰मोहरा-मोहोरा-वि. १ शहाणा; शूर किंवा विद्वान् (मनुष्य); विद्या, शौर्य इ॰ गुणांनीं प्रसिद्ध असलेला, तेजस्वी (पुरुष). 'या राज्यांत नानाफडनवीस एक राजमोहरा होता.' २ देखणा व छबीदार (मनुष्य); राजबिंडा. ॰यश-न. राजाचें, राज्याचें यश; कीर्ति. 'राजयश वर्णितां वर्णितां भाट शिणले ।' [सं.] ॰यक्ष्मा- पु. क्षयरोगाचा एक भेद; कफक्षय. [सं.] ॰योग-पु. १ हठयो- गाहून भिन्न असा योगाचा साधा व सोपा प्रकार; प्राणनिरोध इ॰ न करितां अंत:करण एकाग्र करून भगवत्स्वरूपीं लावण्याचा उपाय. 'राजयोगतुरंगीं । आरूढला ।' -ज्ञा १८.१०४७. २ राज्य मिळ- वून देणारा पत्रिकेंतला ग्रहयोग. ३ श्रेष्ठ, सर्वोत्कृष्ठ योग; प्रापं- चिक वैभव व संपत्ति हीं उपभोगीत असतांहि त्यांहून आत्म्याची भिन्नता ओळखून आत्मचिंतनाचा अभ्यास चालू ठेवणें. [सं.] ॰योगी-पु. राजयोग करणारा मनुष्य; हठयोगीच्या उलट. [सं.] ॰रा-स्त्री. (नेहमीं अनेकवचनी उपयोग) कुलाचारच्या प्रसंगीं तबकांत ठेविलेल्या देवीच्या सात मूर्ती. [सं. राजश्वेरी = एक देवी] ॰राज-पु. राजाधिराज; राजांचा राजा; बादशाहा. [सं.] ॰राजेश्वर-पु. सम्राट; बादशाहा; सार्वभोमराजा. [सं.] ॰राणी- स्त्री. राजाची मुख्य पत्नी; पट्टराणी. [सं.] ॰रीति-स्त्री. १ राजांस योग्य अशा रीति, पद्धति, सरणी, मार्ग. २ सर्वमान्य पद्धति. [सं.] ॰रु(रो)शी-स्त्री. सार्वजनिक आणि स्वतंत्र परवानगी; उघड व पूर्ण स्वतंत्रता; मुभा. 'पोरांस सुटीच्या दिवसीं खेळायास राजरूशी असती.' [सं. राजा + फा. रूशन] ॰रू(रो)स- श-ष-क्रिवि. उघडपणें; प्रसिद्धपणें; स्वतंत्रपणें; अनियंत्रितपणें; बेधडक. 'तो राजरोस इराणीच्या दुकानांत जाऊन चहा पितो' २ दिवसाढवळ्या. [सं. राजा + फा. रूशन, रोशन्; रोश-इ-रौशन] राजर्षि-पु. तपश्चर्येनें ज्यानें ऋषि ही उच्च पदवी मिळविली आहे असा क्षत्रिय; तपस्वी क्षत्रिय; राजांमधील ऋषि. 'राजर्षि महर्षि सकळ येथें न्यूनाचि भूमिपाळ सभा ।' -मोसभा १.१०. [सं. राजा + ऋषि] ॰लव्हा-न. १ पक्षिविशेष. याचे मोठा व लहान असे दोन भेद आहेत. ॰लक्षण-न. १ राजत्वाचें सूचक एखादें स्वाभाविक चिन्ह. २ (छत्र, चामर इ॰) राजाचिन्हांपैकीं कोणतेंहि चिन्ह. [सं.] ॰लेख-पु. राजाचें पत्र; सनद. [सं.] ॰वट-वटा-टी-पुस्त्री. १ एखाद्या राजाचा, राज्याचा, अंम- लाचा, कारकीर्दीचा काल; कारकीर्द. 'विक्रमाचे राजवट्यांत सर्व लोक सुखी होते.' २ अंमलाचा, वजनाचा काल; (सामा.) चलतीचा काल. ३ सामान्य चाल, रीत, संप्रदाय, वहिवाट. 'आमचा सकाळीं जेवण्याचा राजवटा नाहीं.' -क्रिवि. राज्यांत; अमलांत; कारकीर्दीत. 'वडिलांचे राजवटा ही गोष्ट घडली नाहीं.' [राज्य + वर्ति] ॰वंटा-पु. हमरस्ता; राजमार्ग. [राजा + वाट] राजवर्खी बांगडी-स्त्री. एक प्रकारची बांगडी. ॰वंश-पु. राजाचें कुल. [सं.] ॰वंश्य-वि. राजाच्या कुळांतील, वंशांतील. [सं.] ॰वनसी-वि. राजघराण्यांतील. [सं. राजवंशी] ॰वळ, राजावळी-स्त्री. राजाचीं अक्षरें (सही); राजाचा शिक्का; राजमुद्रा. 'तर्ही राजावळीचीं अक्षरें ।' -ज्ञा १७.३२२. ॰वांटा-पु. १ मुख्य वांटा, मोठा हिस्सा. 'तो सुखदु:खाचा राजवांटा ।' -ज्ञा ८.१८४. २ राजाचा भाग. ॰वाडा-पु. राजाचा वाडा; राजमंदिर; प्रासाद. ॰विद्या-स्त्री. सर्व विद्यांमध्यें श्रेष्ठ विद्या. 'या दोन्ही कारणांमुळें राजविद्या शब्दानें भक्तिमार्गच या ठिकाणीं विवक्षित आहे असें सिद्ध होतों.' -गीर ४१५. [सं.] ॰विलास-पु. राजाचीं सुखें व करमणुकी; उच्च प्रकारचीं सुखें व क्रीडा. [सं.] ॰विलासी-वि. राजासारखीं सुखें भोगणारा; राजविलास करणारा; राजविलासांचा शोकी. [सं.] ॰वेत्र-न. राजदंड. [सं.] ॰वैद्य-पु. १ वैद्यशास्त्रपारंगत असा उत्तम वैद्य. २ राजाचा वैद्य. [सं.] ॰व्रत बांगडी-स्त्री. बांगडीची एक जात. ॰शक-पु. ज्येष्ठ शुद्ध १३, आनंदनाम संवत्सर, शके १५९६. या वर्षी शिवाजी महाराजांनीं आपल्या राज्योराहणानिमित्त सुरू केलेला शक. कोल्हापूर व इतर कांहीं संस्थानांत हा चालतो. [सं.] ॰शय्या-स्त्री. सिंहासन; राजाची शेज. [सं.] ॰शासन-न. १ राजाची आज्ञा. २ राजा अपराध्यांना जें शासन करतो तें. [सं.] ॰शोभा-स्त्री. राजाची शोभा; राजाचें तेज, कांति इ॰. [सं.] ॰श्रियाविराजित-वि. १ राजाच्या तेजानें व शोभेनें विभूषित; लक्ष्मीनें राजासारखा सुशोभित असा. २ बरोबरीच्या गृहस्थास पत्र लिहावयाचें असतां त्याच्या सन्मानार्थ हा शब्द त्याच्या नांवापूर्वीं विशेषणाप्रमाणें योजतात; पत्राचा मायना. [सं.] ॰श्री-पु. १ राजाची पदवी; राजाचें वैभव; राजासंबंधीं बोलतांना सन्मानार्थ योजावयाचा शब्द. 'एव्हां राजश्रीची स्वारी कचेरीस आहे.' २ सामान्य माणसास पत्र लिहितांना त्याच्या नांवांपूर्वीं हा शब्द आदरार्थं योजतात. ३ (विनोदार्थी) विचित्र, तर्हेवाईक माणूस. ४ (सामा.) गृहस्थ. 'आतां हे राजश्री माज्या भीमास पाणि लावून ।' -मोस्त्री २.२९. ॰सत्ता-स्त्री. १ राजाची सत्ता, कायदे- शीर अधिकार. २ राजाची थोरवी, कदर, भारदस्ती. [सं.] ॰सदन-न. राजवाडा. [सं.] ॰सभा-स्त्री. राजाची सभा, कचेरी; राजाचा दिवाणखाना; दरबार. [सं.] ॰स्थान-न. राजाची राहण्याची जागा. ॰सूय-पुन. सार्वभौम राजानें करावयाचा यज्ञ (हा यज्ञ सार्वभौमत्वाच्या द्योतनार्थ राज्याभिषेक समयीं मांडलिक राजांसह करावयाचा असतो). अथवा राजा (सोम- लता) याचें सवन, (कंडन) ज्यांत करताता तो यज्ञ. 'देवर्षि म्हणें नृप तो सम्राट् प्रभु राजसूयमखकर्ता ।' -मोसभा १.४६. [सं.] ॰हत्या-स्त्री. राजाची हत्त्या; खून. [सं.] ॰हत्यारा-वि. राज- हत्त्या-करणारा. ॰हंबीर-पु. राजअंबीर पहा. ॰हंस-पु. १ चोंच आणि पाय तांबडे व वर्ण पांढरा असा पक्षी. दूध व पाणी एकत्र केलीं असतां त्यांतून दूध तेवढें वेगळें करण्याची शक्ति याला आहे असें मानितात. 'राजहंसाचा कळप पोहताहे ।' -र ९. २ (लावण्या, शृंगारिक काव्य) प्रियकर; नायक. ३ एक झाड. हीं झाडें लहान भुइसरपट असतात; पानें बारीक व जोडलेलीं; यास तांबूस रगाचीं बारीक फुलें व बारीक शेंगा येतात. [सं.] राजांगण-गणें-न. १ राजाच्या, श्रीमंत लोकांच्या वाड्यापुढें रिकामी राखलेली मोकळी जागा. २ राजवाड्याच्या समोरचा चौक. ३ चौसोपी घरास मध्यें असलेलें चतुष्कोणी अंगण. 'पैस नाहीं राजांगणीं ।' -दावि ५०४. [सं.] राजागर-न. १ राजाचा बाग. 'सुटली तरी राजागरीं मरें ।' -एभा ११.५५८. २ रायभोग तांदुळाचें शेत. 'तेणें पिंकती केवळ राजागर ।' -एभा २७.२०२. ॰धिकार- पु. राजाचा अधिकार. [सं.] राजाधिपति, राजाधीश-पु. राजाधिराज. [सं.] राजाधिराज-पु. राजांचा राजा; सार्वभौम; अनेक मांडलिकांवरचा मुख्य राजा. [सं.] राजानुकंपा-स्त्री. राजाची कृपा, दया. [सं.] राजानुग्रह-पु. राजाची प्रसन्नता. [सं.] ॰पुरी-वि. राजापूर गांवासंबधीं (गूळ, हळद, भाषा इ॰). राजाप्रधान सोडणें-(बायकी) चातुर्मासांत भात व वरण हे मुख्य पदार्थ वर्ज्य करणें. राजाभिषेक-पु. राज्यारोहणप्रसंगीं महानद्या, समुद्र इ॰ कांचें पाणी आणून त्यानें अमात्य, पुरोहि- तादिकांनीं मिळून राजावर विधिपूर्वक अभिषेक करावयाचा, राजाला, गादीवर बसविण्याचा समारंभ. [सं.] राजाम्लक-की-पुस्त्री. रायआवळा-ळी पहा. [सं.] राजावर्त, लाजवर्द-पु. हलका, कमी प्रतीचा हिरा (इं.) लपिसलॅझूली. याचा मुख्य रंग निळा; कधीं तांबूस पिवळाहि सांपडतो. [सं.] राजावली-स्त्री. राजांची परंपरा; राजाचें घराणें; राजवंश. [सं.] राजावळ-स्त्री. १ तांदुळाची एक जात. २ तांबड्या रंगाच्या लुगड्याचा एक प्रकार. ३ वर्षाचा अधिपति; मंत्री इ॰ ग्रह दाखविणारा पचांगाच्या आरंभीचा भाग; संवत्सर फल. राजावळी-वि. राजानें काढ- लेली (ओळ). 'तर्ही राजावळीचीं अक्षरें ।' -ज्ञा १७.३२२. राजासन-न. राजाचें सिंहासन; तख्त. [सं.] राजाळूं-न. पांढर्या अळवाची जात. ह्याच्या पानाचा देठ लांब व जाड आणि कांदा मोठा असतो. राजाळें-न. केळ्याची एक जात. राजाज्ञा- पु. राजाच्या प्रधानांपैकीं (अष्टप्रधानांपैकीं नव्हे) एक. -स्त्री. १ राजाची आज्ञा, शासन. २ निखालस व खसखशीत हुकूम; आदेश; आज्ञा. राजिक-वि. राजकीय. 'राजिक देविक उद्वेग चिन्ता ।' -दा ११.३.५. राजी-स्त्री. गंजिफांतील शब्द; राजेरी देणी. [राजा] राजीक-न. १ राजाचा जुलूम; अन्याय; राजापासून उत्पत्र होणारीं सतटें व दु:खें; याच्या उलट दैविक. २ सैन्याच्या स्वार्यांमुळें होणारी नासधूस; धूळधाण. ३ राजाचें काम; लढाई व तिच्यामुळें होणारी अव्यवस्था. ४ क्रांति; बंड. [राजा] राजी बेराजी, राजीक बेराजिक-स्त्रीन. निर्नायकी; बेबंदशाही; एक राजा गादीवरून दूर झाल्यापासून दुसरा येईपर्यंतचा मधील काळ. [राजीक] राजेंद्र-पु. १ राजांचा राजा; बलाढ्य राजा. २ राजअंबीर. [सं.] राजेरजवाडे-पुअव. राजे; संस्थानिक; सरदार इ॰. राजेश्री-वि. १ राजश्री याचें अशुद्ध रूप. २ (ल.) मूर्ख माणुस. 'हे राजेश्री दुसर्याला तोंडघशी पाडण्याऐवजीं आप- णच पडेल.' -के २४.६.३०. राजेश्वरी-स्त्री. शिवाची अथवा ईश्वराची पत्नी; देवी. [सं.] राजेळ-ळी, राजकेळ-स्त्री. न. केळीची एक जात व फळ. हे केळें ६ ते १२ इंच लांब व तिधारी असतें. ह्याचीं सुकेळीं करतात. राजैश्वर्य-न. राजाचें ऐश्वर्य, वैभव, थाटमाट. [राजा + ऐश्वर्य] राजोट-टी, राजोटा-स्त्रीपु. राजवट; राजवटा पहा. राजोट्या-पु. १ कुटुंबांतील कर्ता पुरुष; घरांतील मुख्य कारभारी. २ (ना.) लुडबुड करणारा, चोंबडा मनुष्य. राजोपचार-पु. १ राजत्वास योग्य असे आदर, उपचार; राजास उचित असे उपचार (छत्र धरणें, चवरी-मोरचेल वारणें इ॰). २ सात्विक, सौम्य औषधयोजना, शस्त्रक्रिया इ॰ नाजूक प्रकृतीच्या माणसास सोसण्याजोगा ओषधादि उपचार. [सं. राजा + उपचार] राज्य-न. १ प्रजेपासून कर घेऊन तिचें पालन करणें असा राजाचा अधिकार किंवा काम. २ राजाचा अंमल; हुकमत. ३ राजाच्या सत्तेखालवा प्रदेश. ४ राष्ट्र; कायद्यानें राहण्यासाठीं संघटित झालेलें व एका विशिष्ट देशांत राहणारें लोक (ही व्याख्या वुड्रो विल्सन यांची आहे); किंवा एका ठराविक प्रदेशांत दंडशक्तीच्या सहा- य्यानें न्याय व शांतता प्रस्थापित करण्यासाठीं स्थापित केलेला मनुष्यांचा समाज. ५ कोणत्याहि व्यवहारांत दुसर्यास न जुमा- नतां स्वतंत्रपणें वागण्याजोगें एखाद्याचें आधिपत्य असतें तें. त्याचें घरांत सारें बायकांचें राज्य झालें आहें.' ६ खेळांतील डाव, हार. [सं. राजन्] ॰क्रांत-क्रांति-स्त्री. राज्याधिकार्यांत आणि राज्यपद्धतींत जबरदस्तीनें घडवून आणलेली उलथापालथ. [सं.] ॰घटना-स्त्री. राज्यव्यवस्थेसंबंधीं मूलभूत कायदे वगैरे. ॰घटना मोडणें-राज्यघटनेच्या कायद्यांत ज्या पद्धतीनें राज्य- कारभार चालवा असें नमूद केलें आहे त्याप्रमाणें कारभार चाले- नासा होणें. -के ५.१.३७. ॰घटना राबविणें-मंत्रिमंडळास जे अधिकार दिले आहेत त्यांचा उपयोग लोकहितवर्धनार्थ कराव- याचाच. पण प्रत्यक्ष कायद्याच्या कलमांतील शब्दानें जो अधिकार दिला नसेल तोहि प्रत्यक्ष व्यवहाराला आवश्यक म्हणून पर्यायानें दिला गेला आहे असें म्हणून त्यांचाहि पायंडा पाडणें.' -के ५.१.३७. ॰पद्धति-स्त्री. राज्यकारभाराचा प्रकार. हिचे राज- सत्ताक, प्रजासत्ताक व राजप्रजासत्ताक असे तीन प्रकार आहेत. [सं.] ॰भार-पु. राज्याचा कारभार करण्याची जबाबदारी, भार, ओझों. [सं.] ॰रीति-स्त्री. शासनपद्धति. 'ज्या राष्ट्राची राज्यरीति उत्कृष्ट आहे त्यास धनसमृद्धि अपायकारक होत नाहीं.' -नि ५३. ॰लोट-स्त्री. राज्यक्रांति; राज्य बुडणें. 'झालिया राज्य- लोट ।' -एभा ३०.३५९. ॰व्यवहार-पु. राज्याचें काम. [सं.] राज्यांग-न. राज्याचीं मुख्य अंगें. हीं स्वामी, अमात्य, सुहृत्, कोश, दुर्ग, राष्ट्र, व बल अशीं सात आहेत. यांतच कोणी पौर- श्रेणी व पुरोहित यांचा समावेश करतात. [सं.] राज्याभिलाष-पु. राज्याचा अभिलाष; दुसरे देश जिंकण्याची किंवा त्यावंर राज्य कर- ण्याची महत्त्वाकांक्षा. [सं.] राज्याभिलाषी-वि. राज्याचा अभि- लाष करणारा. [सं.] राज्याभिषिक्त-वि. सिंहासनावर बसविलेला; ज्यास राज्याभिषेक झाला आहे असा; राजश्रीनें युक्त केलेला. [सं.] राज्याभिषेक-पु. राजाला गादीवर बसविण्याच्या वेळीं विधिपूर्वक करावयाचा अभिषेक; राज्याधिकाराचीं वस्त्रें देणें. [सं.] राज्यासन-न. सिंहासन; राजासन पहा. [सं.] राज्योपचार- पु. सरकारी अधिकार्याचें कृत्य. [सं.]
शास्त
स्त्री. शासन; शिक्षा दंड. 'साहेब जे शास्त अथवा गुन्हेगारी घेतील ते आपण कबूल असे.' -रा १६.४७. 'शास्ता- खानास शास्त केली.' -सभासद २९. [अर. सियासत्; सं. शास्]
तीक्ष्ण
वि. १ प्रखर; जहाल; झोंबणारा; बोंचणारा; तीव्र अर्थ १ पहा. टोचणारा. २ अतिशय धार असलेलें पाणीदार; (शस्त्र) ३ इतर अर्थीं तीव्र पहा. ४ तत्पर; उत्साही; हुषार. [सं.] ॰दंड-वि. कडक; कठिण; करडा (शास्ता, राजा, न्याया- धीश). तिक्ष्णाई-स्त्री. १ तिखटपणा, कडकपणा. २ प्रखरता; तीव्रता. ३ (ल.) उत्सुकता; तीव्रता; आवेश कुशाग्रता.
माल
पु. १ मत्ता; वित्त; द्रव्य; संपत्ति. २ जिन्नस; सौदा; विक्रीचा पदार्थ; जिन्नसपान्नस. ३ किंमतीची वस्तु. 'हा आठा रुपयांचा माल आहे.' ४ (कायदा) प्रत्येक जातीची जंगम जिंदगी. ५ जमाबंदी. 'मालाचें (रेव्हेन्यूचें) काम.' -निजाम- विजय १४. १२. ३१. [अर. माल्] (वाप्र.) ॰खाणें-(व.) मेवा, मिठाई इ॰ गोड पदार्थ खाणें. माल केमाल, मालचा माल-वाढ, सुधारणा होणाऱ्या किंवा घट, अपकार होणाऱ्या कामीं लावल्यावरहि ज्याच्यामध्यें बरावाईट असा काहींच बदल होत नाहीं असा पदार्थ (पैसा, माल इ॰). ॰वथरणें-(व.) पीक चांगले येणें; मालावरचा नाग-वि. १ पैशाचा उपयोग न करतां त्याचें केवळ रक्षण करणारा (कृपण मनुष्य). २ श्रमाशिवाय आयती संपत्ति ज्यास मिळालेली आहे असा (इसम). सामासब्द- ॰अस्बाब-पु. चीजवस्त वगैरे संपत्ति. ॰कटनी- काटणी-काटी-स्त्री. १ शेताच्या कापणीसाठीं सरकारची पर- वानगी मिळण्याबद्दल दिलेली रक्कम; फी. २ पिकाची कापणी. ॰काळी-स्त्री. (व. ना.) शेतजमीनीचा सरकारसारा. 'वऱ्हा- डची मालकाळी किती?' ॰खरा-वि. पूर्ण किमतीचा (चेंचलेलें किंवा विरूप झालेलें तरी जें चांगल्या धातूचें असतें असें नाणें इ॰). [माल + खरा] ॰खाना-पु. कोठी. ॰चाटी- चाट्या-पु.शाळेंतील उपगुरु. [माल + चाट्या] ॰जामिनकी- स्त्री. मालजामिनाचा अधिकार, काम. ॰जामीन-पु. मालाचा, पैशाचा जामीन; अमूक रक्कम अमुकवेळीं देईन अशी हमी घेणारा. -रा १६.५०. याच्या उलट हाजीर जामीन. ॰टाल-पु. चोज वस्त; माल आणि इतर सामान. [माल द्वि] ॰दार-वि. (व.) श्रीमंत. 'गावांत मालदार लोक आहेत.' ॰धनी-पु. मालाचा, जिन्नसाचा धनी. ॰पिसा-वि. मालाचा नाश झाल्यानें किंवा तो नष्ट होणाच्या भीतीनें वेड लागलेला. ॰पिसें-न. मालाच्या नाशामुळें किंवा नाशाच्या भयामुळें लागलेलें वेड. ॰बंदी-वि. १ ऐवजदार; किंमतवान; मोलवान. २ घणसर द्रव्याचा. भक्कम (बांधणी, मांडणूक). ॰बिसात-स्त्री. मालमत्ता. ॰मत्ता- स्त्री. (व्यापक.) सर्व धनदौलत, जिंदगी, इष्टेट; रोकड, माल, चीजवस्त इ॰ सामान. [अर. माल + मताअ] ॰मवेश-शी-स्त्री. चीजवस्त; गुरेंढोरें; मालमत्ता. [अर. मवेशी] ॰मसाला-पु. (व्यापक,) १ मिश्रणाचीं द्रव्यें. २ इमारती इ॰ सामान. ३ उपयुक्त वस्तु, सामग्री. [माल + मसाला] ॰मस्त-वि. संपत्तीनें चढलेला; धनवर्गित; धनोन्मत्त. [अर. माल् + फा. मस्त = मत्त] ॰मालिक- पु. धनी. 'तरी मालमालिक व्हा त्याचे ।' -दावि ८. ॰माली- यत-स्त्री. मालमत्ता. 'संस्थानामध्यें मालमालीयत व स्वभाव...' -बाडबाबा १.१३४. ॰मिळ(ळ)कत-स्त्री. माल व चीजवस्त; जंगम व स्थावर मालमत्ता. [अर.] ॰मुद्दल-न. झालेल्या खर्चाच्या किंवा आगाऊ दिलेल्या पैशाच्या बरोबरीचा जिन्नस. उदा॰ माझें मालमुद्दल उभें राहिलें-आलें-हातास लागलें. -क्रिवि. १ बरोबर किंमतीला (क्रि॰ विकणें; विकत घेणें; करणें इ॰). २ मूळ किंमतीला. ॰मोल-वि. योग्य किंमत दिलेला; त्याच्या किंम- तीला घेतलेला, वितलेला, मांडलेला. -क्रिवि. योग्य किंमत देऊन. (क्रि॰ विकत घेणें; विकणें; मांडणें; गहान ठेवणें इ॰). ॰मोल किंमत-स्त्री. योग्य किंमत. ॰वाडी-पु. (को.) कुलवाडी; कूळ; शेतकरी. 'गावांतल्या समद्या कुलवाडी मालवाड्याशीं काय हाय? जो तो कसा तरी उपाश्यानें दीस लोटतोय.' -चैत्रावळ- महाराशष्ट्र शारदा, जून १९३५. ॰शिकाऱ्या-वि. (व.) उत्तम पदार्थावर हात मारावयास संवकलेला. ॰साईर-न. मालावरील जकात. 'कसवो कसवो कराहरा मालसाईर सुधी तुमपर राखो.' -वाडबाबा १.२१. ॰हराऊ-वि. तोटा, नुसकान, खराबी करणारा. (प्राणी, वस्तु, काम याची). माल(ली)क-वि. १ धनी; स्वामी. २ अधिपती; शास्ता; अधिकारी. ३ हक्कदार; जो एखादें काम पहातो किंवा ज्याचें तें काम आहे असा मनुष्य. 'माझा बाप जामीन राहिला आहे तो त्या गोष्टीचा मालक. त्यास काय तें विचारा.' ४ (बायकी) पति; नवरा. ५ (कायदा) एखाद्या कंपनीचा, मंडळाचा गुमास्ता; मॅनेजिंग एजंट. ६ (पुश्तु) टोळीचा नायक. ७ शेतकरी. ८ जमीनदार. [अर. मालिक; मालक] मालकी-स्त्री. धनीपणा; स्वामित्व. सत्ता. [मालक] माल- कीयत-स्त्री. स्वामित्व. 'मालकीयत व खाविन्दी.' -दिमरा १.२०७. [हिं.]माल गुजा(झा)र-पु. १ जमीन खंडानें देणारा, जमीनदार. २ सरकारचा वसूल जमा करून देणारा. ३ (व.) पाटील. [फा. माल्गुझार] ॰गुजा(झा)री-स्त्री. १ सर- कारसारा देणें. २ मालगुजाऱ्याचा हक्क. माल(लि)म-पु. गलबताचा हिशेब व व्यवस्था पाहणारा अधिकारी; नाखवा. मालत, माल- यत, मालियत, मालीयत मालिस्त-स्त्री. जिंदगी; उत्पन्न; वसूल; मालमत्ता. 'त्याची मालयत फारच गेली.' -ख ११.५९५५. 'माणसास न मारावें, मालत घेऊन सोडून द्यावें.' -भाकै २६. [अर. मालीयत] माली-वि. वसुलासंबंधी. 'माली व मुलकी.' -बाडसभा ३.२४. [फा. माली] माली मामला-पु. १ (जकात) किंमतवान माल; जो विकलां असतां पैसा उत्पन्न होईल. असा माल; सर्व खर्च सोसण्याजोगा माल. २ जकातीचें काम. मालीव-वि. (कों.) कांही किमतीचा; विकला असतां कांहीं किंमत येणारा (मौल्यवान जिन्नस). [माल] मालोमाल- वि. किंमतीच्या योग्यतेचा; दिलेल्य पैशाइतक्या किंमतीचा. (विकत घेतलेला जिन्नस). (क्रि॰ विकणें इ॰). [माल द्वि.]
कर्म
न. १ एखादें काम, कृत्य. 'हें कर्म झालें समरांत जेव्हां । होतास कोठें रणभीरु तेव्हां ।' -वेणीसंहार ३. २. स्नान- संध्या, यज्ञयागादि धार्मिक विधि; याचे नित्य, नैमित्तिक व काम्य असे तीन भेद आहेत. ३ सांप्रतच्या आयुष्यांतील कृति, चाल, आचार, वर्तणूक; यावरून दैव किंवा नशीब अशा अर्थानें योजतात-येथें दैव म्हणजे पूर्वजन्मार्जित पापपुण्याचा भोगवटा होय; पूर्वजन्मकृत आचरण; संचित. 'अरे अरेकर्मा । बारा वर्षें झालीं याच धर्मा ।।' 'या व्यापारांत मीं साफ बुडालों, माझें कर्म ! दुसरें काय ?' 'कर्मबलिवंत', 'कर्मबलवत्तर' 'घोर-कठिण कर्म' या संज्ञा कर्माचें (दैवाचें) वर्चस्व, काठिण्य, निष्ठुरता दाखवितात. ४ विशिष्ट काम; नैतिक कर्तव्य; जाति, धंदा वगैरेंनीं मान- लेलें आवश्यक कृत्य. ५ (व्या.) कर्त्यानें अमुक क्रिया केली हें दाखविणारा शब्द; कर्तृविषयक व्यापाराचें कारक; कर्माची विभक्ति प्रायः द्वितीया असते. 'रामा गाय बांधतो' यांत गाय हें कर्म. ६ उद्योग; कामधंदा; नेमलेलें, विशिष्ट प्रकराचें काम. ७ सुरतक्रिडा; मैथुन; रतिसुख; संभोग. 'त्यानें तिच्याशीं कर्म केलें.' ८ सामान्य क्रिया; ऐहिक व्यापार; मायिक क्रिया. 'माया हा सामान्य शब्द असून तिच्याच देखाव्याला नामरूपें व व्यापाराला कर्म हीं विशिष्टार्थक नामें आहेत.' -गीर २६०. [सं.] (वाप्र.) कर्म दोन पावलें पुढें-नशीब नेहमीं आपल्यापुढें धांवत असतें. ॰आड ठाकणें-कर्म आडवें येणें; आपत्ति ओढवणें. 'अन्न घेवोनि जों निघाली । तों कर्म आड ठाकलें ।' -ह १६.१३०. कर्मानें ओढणें-ओढवणें-दैवाचा पाश येऊन पडणें; दैवाधीन होणें. -नें जागें होणें-दैव अनुकूल होणें. -नें धांव घेणें-दैव पुढें येणें; दैवाकडून प्रतिबंध, अडथळा होणें. -नें पाठ पुरविणें- उभें राहणें-दैवानें मोडता, अडथळा घालणें; कर्म ओढवणें. -नें मागें घेणें-सरणें-दैवानें साहाय्यने करणें; केल्या कर्माचें फळ-न. केलेल्या कृत्याचा परिणाम. 'केल्या कर्माचें फळ बापा । ऐश्वर्य तुज देतील ।' -अमृत, नव ४४३. (सामाशब्द) ॰कचाट- न. प्रारब्धामुळें मागें लागलेलें दुर्दैव, संकट, विपन्नावस्था; कर्म- कटकट; पूर्व जन्मीचें पाप, भोग. 'प्राणी कष्टकष्टोंचि मेले । कर्मकचाटें ।' -दा १८.८.२०. [सं. कर्म + म. कचाट] ॰कटकट- खटखट-स्त्री. १ प्रारब्धयोगानें वांट्यास आलेलें किंवा गळ्यांत पडलेलें व कंटाळा येण्याजोगें कोणतेंहि काम; वरचेवर त्रास देणारें, डोकें उठविणारें, अडथळा आणणारें काम किंवा व्यक्ति; कोणतीहि नशीबीं आलेली पीडा, त्रास, छळ, जाच वगैरे. २ (ल.) जिकिरीचें, नावडतें काम; व्याद. 'मी म्हातारा झालों, माझ्यामागें ही शिकविण्याची कर्म कटकट कशाला ?' 'आतां त्यांची कर्मकटकट आपणांस कशाला हवी' -नि ६७. ३ (ल.) भांडण; तंटा; कटकट. 'तुम्हां दोघांत नेहमीं इतकी कर्मकटकट चालत असते.' -भा ३७. ॰कट्टो-वि. (गो.) हतभागी; कर्मकरंटा. ॰कथन-नी-न. १ कर्मकथा; कर्माची कहाणी. २ (ल.) दुर्दैवी प्रसंगकथन; दुःखदकथा; कर्मकथा पहा. 'ऐसी आमुची कर्मकथनी । तें अनायासें आलें सर्व घडोनी ।' -मक २६. १८५. [सं.] ॰कथा-स्त्री. १ प्रारब्धामुळें भोगलेल्या दुःख, त्रास, दगदग, वगैरेची दुसर्याजवळ सांगितलेली गोष्ट, वृत्तांत, कहाणी. २ आत्मश्लाघेचें किंवा रिकामटेकडें भाषण; बाता. ३ एखाद्या प्रसंगाची किंवा कृत्याची खरी व इत्थंभूत हकीकत. ४ कंटाळवाणें, निरर्थक भाषण, बडबड. [सं.] ॰कपाट-न. कर्म- कचाट पहा. [सं.] ॰कहाणी-स्त्री. कर्मकथा पहा. ॰कांड- न. त्रिकांड वेदांतील यज्ञासंबंधींचा कर्ममार्गदर्शक व आचारनिद- र्शक भाग; -मंत्र व ब्राह्मणें मिळून जो वेदभाग त्यास कर्मकांड व उपनिषदांस ज्ञानकांड म्हणतात. 'कर्म कांड तरी जाणें । मुखोद्गत पुराणें ।' -ज्ञा १३.८२८. २ धर्मकर्में, आचारविचार, संस्कार वगैरेना व्यापक अर्थानें हा शब्द लावितात. (सामा.) आन्हिक; नित्यनैमित्तिक आचार. 'कृष्णगीत रुचतां श्रवणातें । कर्मकांड रुचि न दे कवणातें ।।' 'आतां आपलें कर्मकांड अगदीं एकाबाजूस ठेवावें.' -चंद्रगुप्त ३५. ३ कंटाळवाणी, निरर्थक बडबड; कर्मकथा. (क्रि॰ गाणें; सांगणें; बोलणें). ॰कार-वि. १ (गो.) कर्मनिष्ठ. २ शिल्पी; लोहार. [सं.] ॰काल-ळ-पु. धर्मकार्यें करण्यास उचित असलेला काळ, वेळ, समय. [सं.] ॰केरसुणी-स्त्री. कर्मरूपी केर सरसकट झाडणारी, कर्मापासून सोडविणारी केरसुणी. 'तेव्हां तेचि श्रद्धा होये । कर्मकेरसुणी ।' -ज्ञा १७.६४. ॰गति- स्त्री. दैव; प्रारब्ध; नशीब. दैवगति पहा. [सं.] ॰चंडाळ- चांडाळ-पु. (कृत्यानें) निवळ चांडाळ. १ अतिक्रूर, पाषाणहृदयी माणूस. २ स्वैर वर्तनी; धर्मलंड; दुरात्मा. [सं.] ॰चोदना- स्त्री. कर्म करण्याची प्रेरणा. 'कर्मचोदना व कर्मसंग्रह हे शब्द पारिभाषिक आहेत.' -गीर ८३५. [सं.] ॰ज-वि. कर्मापासून उत्पन्न झालेलें. 'सकळ यज्ञ कर्मज' -ज्ञा ८.४६. [सं.] ॰जड-पु. कर्मठ लोक. 'तिन्हीं लोकांचा शास्ता । ईश्वर तो मी नियंता । येणें कर्मजडांची वार्ता । अनीश्वरता छेदिली ।' -एभा १०.६२१. ॰जात-न. सर्व प्रकारचें कर्म; सर्व तर्हेचे व्यापार. 'मग सस्य फळपाकांत । तैसें निमालिया कर्मजात । आत्मज्ञान गिंवसित । अपैसें ये ।' -ज्ञा १८.१२९. [सं.] ॰जीव-वि. (गो.) बारीक, लहान प्राणी. ॰दक्ष-वि. धर्माचार व विधि यांत निपुण; कर्मठ; कर्मशील; कर्मनिष्ठ, कर्मिष्ठ यांसारखा उपयोग. 'कर्मदक्षा कर्ममोचका । जयराम कोदंड भंजना ।' [सं.] ॰धर्म-न. (क्क.) पु. (यासमासांतील धर्म शब्द जरी पुल्लिंगी असला तरी बहुतेक सर्व समास नपुंसकलिंगीच आहेत; कारण यांतील प्रधानार्थ कर्म शब्दापासूनच निघालेला असून धर्म शब्द केवळ जोडशब्द आहे) वर्तन; वर्तनक्रम; कृत्य; आचरण. 'जसें ज्याचें कर्मधर्म तशी त्यास फलप्राप्ति,' 'कर्माधर्मानें कोण्ही संपत्ति भोगतो आणि गादीवर बसतो, कोण्ही फांशी जातो.'; 'कोण्हाच्या कर्मधर्मांत कोण्हाचा वांटा नाहीं.' = प्रत्येकाला स्वतःच्या कृत्याबद्दल झाडा दिला पाहिजे. ॰धर्मगुण-पु. कर्म- धर्माचा प्रभाव, शक्ति. कर्मधर्मसंयोग पहा. [सं.] ॰धर्मविर- हित-वि. धर्माज्ञा, धार्मिक व्रतें व कृत्यें ज्यानें सोडलीं आहेत किंवा जो त्यापासून मुक्त झाला आहे असा; ऋषि किंवा साधुजन यांना चांगल्या अर्थीं व उच्छृंखल व धर्मलंड यांना वाईट अर्थीं लावतात. 'आम्हीं कर्मातीत झालों म्हणती' या शब्दाचा अर्थ दोन्हीं प्रकारचा म्हणजे चांगला व वाईटहि आहे. 'झालों कर्म- धर्मविरहित । मना आवडे तो भोग भोगित ।' [सं.] ॰धर्म- संयोग-धर्मयोग-पु. १ स्वतःचें दैव आणि सत्कर्म यांचा संयोग; भाग्य व सदाचार यांचें ऐक्य (पूर्वजन्मार्जित आणि इहजन्मार्जित सत्कृत्यांचें फळ मिळून) २ अकल्पित मेळ; यदृच्छा; प्रारब्धयोग. ॰धर्मसंयोगानें-क्रिवि. अचानक; चम- त्कारिक किंवा अकल्पित मेळ मिळून येऊन; प्रसंगोपात्त; प्रारब्ध- योगानें. 'कर्मधर्मसंयोगानें मी अगदीं सहज बाहेर गेलों तों माझी नजर तिच्याकडे गेली.' -मायेचा बाजार. 'कर्मधर्मसंयोगानें तुमची गांठ पडली आहे तर गोड बोलून काळ लोटावा.' ॰धारय समास-पु. (व्या.) वक्त्याच्या मनांत उभय शब्दांचा भाव ज्यांत समान असतो किंवा उभय शब्दांचा परस्पर उप- मानोपमेयभावसंबंध ज्यांत असतो तो; विशेष्य-विशेषणांचें सान्निध्य असून त्यांचा जो समास घडतो तो; उदा॰ 'भक्तिमार्ग = भक्ति तोच मार्ग, किंवा भक्तिरूप जो मार्ग तो; भवसागर; संसारा- टवि; काळपुरुष.' -मराठीभाषेचेंव्या. २७५. तत्पुरुषसमासाचा एक भेद. [सं.] ॰निष्ठ-वि. कर्मठ पहा. 'जया लाभाचिया आशा । करूनि धैर्यबाहूंचा भरंवसा । घालीत षट्कर्मांचा धारसा । कर्मनिष्ठ ।' -ज्ञा ६.४७४. [सं.] ॰निष्ठा-स्त्री. १ कर्मावर निष्ठा. २ कर्म- योग. 'वैदिक धर्मांत...दोन मार्ग...आहेत, पैकीं एका मार्गास...ज्ञाननिष्ठा व... दुसर्यास कर्मयोग किंवा संक्षेपानें नुसता योग अगर कर्मनिष्ठा असें म्हणतात. -गीर ३०१. [सं.] ॰न्यास-पु. १ कर्म किंवा कृत्यें त्याग (पुढील जन्मीं हित व्हावें किंवा फळ मिळावें म्हणून). २ फलन्यास; कर्मा- पासून मिळणार्या फलाविषयींच्या इच्छेचा किंवा आशेचा त्याग; निष्कामकर्म. [सं.] ॰फल-न. प्रारब्धापासून मिळणारें फळ; पूर्वजन्मीं केलेल्या पापपुण्याचें चांगलें अगर वाईट असें या जन्मीं भोगावें लागणारें फळ. 'सांडूनि दुधाचि टकळी । गोंवारी गांवधेनु वेंटाळी । किंबहुना कर्मफळीं । तैसें कीजे ।' -ज्ञा १८.१७४. [सं.] ॰फुटका-वि. भाग्यहीन; दुर्दैवी; कमनशिबाचा; अभागी. [कर्म + फुटणें] ॰फुटणें-सक्रि. दुर्दैव ओढवणें; गोत्यांत येणें; नुकसान होणें. ॰बंध-पु. फलाशेनें केलेल्या कर्मामुळें प्राप्त झालेलें बंधन; प्रारब्धप्राप्त स्थिति; मायिक पसारा; ऐहिक मायापाश; प्रपंच; संसार. 'जो पहुडला स्वानंदसागरीं । कर्मबंधीं न पडे तो ।' [सं.] ॰बंधु-पु. व्ययसायबंधु; समव्यवसायी; एकाच प्रकारचें काम करणारा. [सं.] ॰भुवन-न. कर्मरूप घर. 'तेथ न्यावो आणि अन्यावो । हा द्विविधु साधूनि आवो । उभवितां न लवी खेंवो । कर्मभुवनें ।' -ज्ञा १८.४५५. [सं.] ॰भूमि, भूमिका -स्त्री. १ इहलोक; मृत्युलोक; यज्ञादि धार्मिक कृत्यें जेथें करतां येतात ती जागा; कर्म करावयाचें क्षेत्र; रंगभूमि (मर्त्यांची). 'जेथें मनाचा प्रवेशु नाहीं । त्यांची पायवाट ते ठायीं । ऐसें स्वइच्छा विचारितां महीं । आले ते पाही कर्मभूमीसी' -एभा २.१८४. 'परम प्रतापी दशरथपिता । कर्मभूमीस येईल मागुता ।' -रावि १६.८६. [सं.] २ प्राधान्यानें भारतवर्ष. -हंको. ॰भोग-पु. भवितव्य- तेच्या नियामानुरूप मिळणारीं सुखदुःखें सोसणें; दैवाची भरपाई; पूर्वसंचितानुरूप या जन्मीं प्राप्त होणारी स्थिति. 'माझा कर्मभोग चुकत नाहीं.' [सं.] ॰भ्रष्ट-वि. धर्मशास्त्रविहित नित्यनैमित्तिक कर्मांचें आचरण न करणारा; धर्माज्ञा व धर्मकर्म परिपालनाविषयीं उदासीन; कर्तव्यच्युत; कर्तव्यपराङ्मुख. [सं.] ॰मार्ग-पु. १ स्नानसंध्या इ॰ कर्में करण्याची रीत; यज्ञयागादि कर्मरूप ईश्वर- प्राप्तीचा किंवा मोक्षाचा साधनीभूत मार्ग; सत्कृत्यें केल्यानें व धर्माचरणानें मोक्षाला जाण्याचा मार्ग. २ धर्मकृत्यें करण्याचा खरा मार्ग. ३ श्रौत म्हणजे यज्ञयागादि कार्मांचा मार्ग. 'भारतीय तत्त्वज्ञानांत मोक्षाचे कर्ममार्ग, ज्ञानमार्ग व भक्तिमार्ग असे तीन मार्ग सांगितले आहेत.' -ज्ञाको क १३२. [सं.] ॰मार्गी-वि. कर्ममार्गानें जाणारा; जो निष्ठापूर्वक धर्माचरण करून परमेश्वर- प्राप्तिविषयीं झटतो तो. [सं.] ॰मुक्ति-स्त्री. स्नानसंध्यादि नित्य नैमित्तिक कर्में करण्याची आवश्यकता ज्या स्थितींत उरत नाहीं अशी अवस्था; नैष्कर्म्यसिद्धि [सं.] ॰मोचक-वि. कर्ममार्गा- पासून मुक्त करणारें; ऐहिक सुखदुःखापासून सोडविणारें. 'कर्म- दक्षा कर्ममोचका । जयराम कोदंडभंजना ।' [सं.] ॰मोचन- न. कर्ममार्गापासून मुक्तता. ॰योग-पु. १ प्रारब्ध; दैव; यदृच्छा; योगायोग. २ दैवगतीनें घडणारी गोष्ट. -शर. ३ व्यापार; चळवळ किंवा कार्य करण्याचें तत्त्व. -ज्ञाको क १३५. ४ ज्ञान हेंच जरी मोक्षसाधन असलें तरी कर्मशून्य राहणें कधींच शक्य नसल्यामुळें त्यांचें बंधकत्व नाहींसें होण्यास कर्में कधींहि न सोडतां शेवट- पर्यंत तींच निष्कामबुद्धीनें करीत राहण्याचा जो योग तो. -टिसू ४७-४८; याला इंग्रजींत एनर्जीझम असा प्रतिशब्द गीतारह- स्यांत सुचविला आहे. -गीर ३०१ वरील टीप. या योगाचें जें शास्त्र त्यास कर्मयोग म्हणतात व तें आचरणारा तो कर्मयोगी). 'बलवंत (टिळक) कर्मयोगी' -सन्मित्रसमाज मेळा पद्यावली १९२९, पद १. [सं.] ॰लंड-वि. धर्मशास्त्रविहित नित्यनैमित्तिक विधींचें पालन न करणारा; धर्मभ्रष्ट; धर्मविधि व धर्माज्ञेचा धिक्कार करणारा, उपहास करणारा [सं.] ॰लोप-पु. नित्य धार्मिक क्रमां- तील एखादें कर्म सोडणें, न करणें; दीर्घकालपर्यंत नित्य अगर नैमित्तिक कर्मविधि न करणें. [सं.] ॰वाचकधातुसाधित- न. मूळ धातुस 'ला' किंवा 'लेला' हे प्रत्यय लाविले असतां होणारें धातुसाधित. उ॰ केलेला, दिलेला. परंतु यांत 'पढ' धातूचा गण वर्ज्य करून हे प्रत्यय लावितेंसमयीं सकर्मक धातूस 'ई' आगम होतो. उदा॰ ठेविला, अर्पिला, आकर्षिलेला. -मराठी- भाषेचें व्याकरण १७३. [सं.] ॰वाद-पु. १ धर्मविहित कर्मां. नींच मोक्षप्राप्ति होते असें मत. २ मनुष्यास विशिष्ट जन्मांत जें सुखदुःख मिळतें तें त्याच्या पूर्व जन्मांतील कृत्यांचें फल होय असा युक्तिवाद; कर्माचें फळ भोगणें ही कल्पना. -ज्ञाको क १३६. [सं.] ॰वादी-पु. कर्मवादावरच भिस्त ठेवून त्याचें समर्थन करणारा माणूस [सं.] ॰वासना-स्त्री. दैनिक धर्मकृत्यांबद्दलची इच्छा, आवड. [सं.] ॰विधि-पु. (अनेकवचनींहि प्रयोग होतो) धर्मसंबंधीं कृत्यें वगैरेचे नियम, पध्दति, रीति, मार्ग; कोणत्याहि विशिष्ट प्रकारच्या धर्मकृत्याचें सूत्र किंवा विधान. [सं.] ॰विपाक-पु. १ पूर्व जन्मीं केलेल्या पुण्य, पाप वगैरे कृत्यांचें फल पुढील जन्मीं हटकून यावयाचें हा सिद्धांत. २ कर्माची फलनिष्पत्ति; परिणाम. [सं.] ॰वीर-पु. कार्यकर्ता; पराक्रमी मनुष्य. 'कर्मवीर निघुनी गेलो' -संग्राम ४९. [सं.] ॰वेग- कर्माचा वेग-पु. दैवाचा किंवा प्रारब्धाचा जोर, झपाटा, सामर्थ्य, धक्का; पूर्वसंचिताचा प्रभाव. 'कलालाचा भोवरा । जैसा भवे गरगरा । कर्मवेगाचा उभारा । जोंवरी ।' 'जेथें कर्माचा वेग सरे । तेथें धांव पुरे ।' [सं.] २ (अनेक वार केलेल्या) कृत्यांचा जोर, सामर्थ्य, प्रचोदन; संवयीचा जोर; स्वाभाविक प्रेरणा; 'कर्मवेग भलत्याकडे ओढून नेईल.' ॰शील-वि. कर्मा- सक्त; धर्मानें वागणारा; शास्त्रानें संगितलेलीं सर्व धर्मकर्में जो मनापासून काळजीपूर्वक करतो तो. [सं.] ॰संगी-वि. कामांत, धर्मानुष्ठानांत, व्रतनियमनांत सतत गढलेला; याच्या विरुद्ध ज्ञानाभ्यासी [सं.] ॰संग्रह-पु. निरनिराळे व्यवसाय, व्यापार; आपण ज्या क्रिया करतों त्या; मानसिक क्रियेच्या तोडाची बाह्य, प्रत्यक्ष क्रिया. 'कर्मसंग्रह या शब्दानें त्याच मानसिक क्रियेच्या तोडीच्या बाह्य क्रिया दाखविल्या जातात.' -गीर ८३६. [सं.] ॰संचय-पु. कर्मसंग्रह; मनुष्याचे अनेकविध व्यापार, क्रिया; चलनवलनादि कृत्य 'तैसेंचि कर्ता करण कार्य । हा कर्मसंचयो ।' -ज्ञा १८.५१२. [सं.] ॰संन्यास-पु. १ कर्मांचा त्याग; नित्य नैमित्तिकादि कर्में करण्याचें सोडून देणें. २ शारीरिक सोडून इतर सर्व कर्मांचा त्याग (शांकरमत). 'शंकराचार्यांच्या ग्रंथांत कर्मसंन्यासच प्रतिपाद्य आहे.' -टिसू ५ [सं.] ॰सूत्र-न. नित्य धर्मकर्माची व त्यासंबंधीं नियमांची मालिका; कर्तव्यकर्म- परंपरा. 'भवपाश तोडिते शस्त्र । ज्ञान ईश्वराचें विचित्र । परि जिवाचें कैसें कर्मसूत्र । जे अनावडी तेथें विषयीं ।' ॰हीन- वि. धार्मिक नियम, विधि न पाळणारा; धार्मिक नियमाबद्दल काळजी न करणारा. [सं.] म्ह॰ कर्मणो गहना गति: = नशि- बाची गति जाणणें शक्य नाहीं (एखादी वाईट गोष्ट अकल्पित घडली म्हणजे दैववादी मनुष्य ही म्हण म्हणतो.)