आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह!
शब्दार्थ
सोशा
सोशा sōśā a (Imit. सों! सों! the sound fancied.) That comes in sudden puffs and gusts, or that comes in a puff--wind.
वि. सों ! सों ! करीत व अकस्मात येणारा, वहाणारा (वारा). [ध्व.]
पु. (सोनारी) एक प्रकारचें तांब्याचें भांडें.
शोशा
(पु.) हिंदी अर्थ : नोक, चिन्ह, अनोखी बात. मराठी अर्थ : टोक, विलक्षण गोष्ट, अेक खूण.
संबंधित शब्द
धुधा
स्त्री. तोफांचा दणका; वाद्यांचा गजगजाट; कडकडाट. पावसाचें किंवा धबधब्याचें धोधो असें मोठ्यानें आपटणें; सोसा ट्याच्या वार्याचा आवाज. इ॰ [ध्व.]
कढ
पु. १. उष्णतेमुळे पाणी इत्यादींना येणारी उकळी; आधण; फार तापल्यामुळे बुडबुडे येतात ती अवस्था. (क्रि. येणे.) २. (ल.) डोक्यावर फार वेळ ओझे घेतल्यामुळे डोक्याला येणारा ताण, शीण, रग. ३. (ल.) उमाळा; गहिवर (प्रेम, दुःख इत्यादिकांचा); स्फुरण; शिरशिरी (भांडण, वादविवाद, शिवीगाळ इत्यादीची) [सं. क्वथ्] (वा.) कढ ओढून घेणे − परस्पर चाललेल्या भांडणाचा संबंध आपणाकडे घेणे; दुसऱ्यावरचा राग आपणावर ओढून घेणे. कढ जिरवणे − एखाद्याचा राग, ताशेरा शमविणे, शांत करणे. कढ सोसणे, कढ काढणे − दम धरणे; धीर धरणे; गैरसोय किंवा त्रास सोसणे : ‘चार महिने माझेसाठीं तुम्ही कढ सोसा.’ − ऐलेसं ६९५५. [सं. क्वथ्]
सोस
पु. १ जबर हांव; तीव्र इच्छा; हव्यास. (क्रि॰ घेणें) २ तहान. ३ तीव्र यत्न. -शास्त्रीको. ॰घेवडी-मावशी-स्त्री. दागिने, वस्त्रें, खाद्यपदार्थ इ॰ विषयीं जबर हांव असलेली स्त्री. [सं. शोष; का. सोसु = हांव; ते सोस = हांव] ॰करणें-हांवरेप- णानें वस्तु मिळण्याची इच्छा करणें. अतिलोभ धरणें. सोसा- सोसानें, सोसेंसोसें-अति उतावीळपणानें; हांवरेपणानें. सोसी-शी-वि. हांवरा; लोभी. सोसणी-स्त्री. हांवरेपणा. 'येथें भिन्नसोसणी । नलगे निरुपणीं करणें तुज ।' -एभा ४.१८.
सोस sōsa m (शोष S) Strong longing or desire. In good or bad sense. v घे. 2 In its other senses the word is viewed rather as corrupted than as derived from शोष, which see throughout. सोसा सोसानें or सोसें सोसें Eagerly, cravingly, with impatient or earnest desire.
वाहटळ-टूळ-टोळ-डूळ
स्त्री. वादळ; तुफान; सोसा- ट्याचा वारा. [सं. वातुल]