मराठी बृहद्कोश

सात मराठी शब्दकोशांतील २,८४,८८८ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

श्रद्धा

स्त्री. १ पूज्य बुद्धि; आदर; भक्ति; भाव; निष्ठा. २ आस्तिक्यबुद्धि; विश्वास. 'मग 'मग श्रद्धायुक्त । तेथिंचे आराधन जें उचित ।' -ज्ञा ७.१४९. ३ इच्छा; अभिलाष; हेतु. 'हो कां वामिलिया मिष्टान्ना । परतोनि श्रद्धा न धरी रसना ।' -एभा २०.१०१. 'पहा हो भिकारिणीची चेष्टा । श्रद्धा करितसे राज्य- पदा ।' -कथा १.५.१२. [सं. श्रत् + धा = ठेवणें] ॰जाड्य- न. श्रद्धेबद्दलचा हट्ट; एखाद्या गोष्टीवर विरुद्ध प्रमाण दिसलें तरी हट्टानें विश्वास ठेवणें. ॰भक्ति-स्त्री. १ ईश्वरासंबंधीं प्रेम व विश्वास; निष्ठा व आदर; अंतःकरणांत दृढभाव व बाहेरून पूजा, सत्कार वगैरे. (क्रि॰ करणें; ठेवणें; असणें). श्रद्धालु- ळू, श्रद्दधान, श्रध्दावान-वि. श्रद्धा ठेवणारा; भाविक; विश्वासी. श्रध्देय-वि. श्रद्धा ठेवण्यास योग्य; विश्वसनीय; विश्वासार्ह.

दाते शब्दकोश

स्त्री. (प्र.) शर्धा. अपानद्वारा सोडलेला वायु; पाद; पर्दन. (क्रि॰ सोडणें; करणें; सरणें; सुटणें; होणें). 'श्रद्धा करिती अधोद्वारें । नाकीं तोंडीं भरे दुर्गंध ।' -एभा २३.५५८. [सं. शृध् = पादणें]

दाते शब्दकोश

श्रद्धा f Reverence; implicit faith or belief.

वझे शब्दकोश

श्रद्धा śraddhā f (S) Reverence or veneration. 2 Implicit faith or belief. 3 (Cant.) Ventris crepitus. v सोड, कर, & सर, सुट, हो.

मोल्सवर्थ शब्दकोश

श्रद्धा ( उदाहरणें )

देवाघरीं झाडा द्यावा लागेल, पाठीराखा परमेश्वर, निर्वाणीचा आधार, अल्ला यार है बेडा पार है, देव मोक्षाचें गांठोडें देईल असा भरंवसा, निर्बलाचें बल राम, निर्वाणीचा एक पांडुरंग, परंतु तेथें भगवन्ताचें अधिष्ठान पाहिजे, अनंत हस्तें कमलावराने देतां किती घेशिल दो कराने ! केवळ नामस्मरणानें पातक्यांचा उद्धार होतो, जसा भाव तसा देव, देव कौल देईल त्याप्रमाणें वागावें, सत्यसंकल्पाचा दाता भगवान्, पाठीशीं परमेश्वर आहे, ईश्वराच्या सूत्राप्रमाणे ऋणानुबंध जडतात, सुखाची गुरुकिल्ली ईश्वराकडे, करावें तसें भरावें, या हाताचे झाडे त्या हाताला द्यावे लागतात.

शब्दकौमुदी

संबंधित शब्द

एकनिष्ठता, एकनिष्ठा      

स्त्री.       १. एकाच व्यक्तीवर, तत्त्वावर पूर्ण श्रद्धा, अढळ विश्वास असणे; एकनिष्ठ असल्याचा गुण; पुरी श्रद्धा; मनःपूर्वकता. २. एकस्थिती; अचांचल्य : ‘जयां विषयाच्या ठायीं । एकनिष्ठता कहीं नाहीं’ - ज्ञा २·११३. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

इमान

न. १ वचन; एकनिष्ठा; सचोटी; 'नबाबांनीं आपला इमान राखिला.' -पदबा १.८९. २ श्रद्धा; विश्वास. 'त्या पंज्या पासी तुमचा इमान असावा.' -मदरु १.११३. [अर. ईमान् = श्रद्धा] ३ इमानपत्र; इमानाची खूण; शपथपत्र. 'इमान पाठविलें' -९६ कलमी ७. ४ सदसद्विवेकबुद्धि; मनोदेवता; अंतर्याम. ॰इत- बार- पु. एकनिष्ठा; सचोटी; प्रमाणिकपणा. ॰करणें-देणें-वचन देणें; शपथ देणें; शपथेवर सांगणें. 'द्यावी शेजेची बाईल पण इमान देऊं नये.' -इपुस्त्रीपो ४२. ॰क्रिया-स्त्री. इमान राखण्या- बद्दल शपथ घेणें. ॰गुंतणें-शपथेंत अडकणें; शपथ घेऊन चुकणें. इमानास जागणें, इमान धरणें-इमान नष्ट न होऊं देणें; इमान जागृत ठेवणें; सचोटी न सोडणें; पूर्वींचे उपकार स्मरणें. ॰प्रमाण-न. १ प्रामाणिकपणा; विश्वासूपणा; सचोटी.२ करार- मदार; आणभाक; शपथक्रिया. ॰भाक-न. आणभाक; करार; अहदपैमान. -रा १५.२७३.

दाते शब्दकोश

इतबार

पु. १ विश्वास; श्रद्धा; भरंवसा. 'आतां इत- बार कोणाचा येत नाहीं. -सभासद २९. २ प्रतिष्ठा; पत; मानपान. 'कोणा इतवार याचा घरीं' -सला ११. [अर. इअतिवार् = विश्वास श्रद्धा] ॰पण-न. श्रद्धाळुपणा; विश्वास; भरंवसा; खात्री. -रा १५.३७२.

दाते शब्दकोश

सरदा-धा

स्त्री. (प्र.) श्रद्धा. भाव; पूज्यता; विश्वास. २ आवड; लालस; गोडी; इच्छा. [सं. श्रद्धा]

दाते शब्दकोश

भाव

पु. १ भक्ति; श्रद्धा; निष्ठा; खात्रीची; भावना. 'माझें मज देती तैसें । परि आनानीं भावीं ।' -ज्ञा ९.३५३. 'असे हो जया अंतरीं भाव जैसा ।' -राम ३५. २ हेतु; अर्थ; मन; अंतःकरणप्रवृत्ति; उद्देश. 'न कळे तो तया सांगितला भाव । आपणासी ठाव नंदाघरीं ।' -तुगा १०. ३ अभिप्राय; आशय; धोरण; वळण; झोंक; गर्भितार्थ. 'रूप तसें विविध तिहीं कां केलें स्पष्ट सांग भावातें ।' -मोसभा ७.६६. ४ मनोविकार; मनोवृत्ति; भावना. जसें-शत्रु-बंधु-क्रोध-दुष्ट-भक्ति-मित्र-भाव. ५ अस्तित्व; असणें. 'एवं कोणेहि परी । अज्ञानभावाची उजरी ।' -अमृ ७.७७. 'जेथें धनाचा भाव तेथें विद्येचा अभाव असें प्रायः असतें.' ६ प्रत्यय किंवा अनुबंध यामुळें होणार्‍या फेरफाराशिवाय असणारा शुद्ध धात्वर्थ; धातूचा मूळ अर्थ. उदा॰ चाल इ॰ धातूपुढें णें हा प्रत्यय चाल धातूचा मूळ दाखवितो. ७ भावकुंडलींतील बारा स्थानांपैकीं प्रत्येक; स्थान. कुंडली पहा. ८ नैसर्गिक स्थिति, धर्म, स्वभाव; प्रकृति. जसें-सत्वभाव; तमोभाव; रजोभाव. 'म्हणोनि सात्विक भावांची मांदी । कृष्णाआंगी अर्जुना आधीं ।' -ज्ञा ८.५६. ९ विकार, वृत्ति, राग, क्रिया, चित्तवृत्ति, हावभाव इ॰ चा वर्ग. ह्याचे पांच प्रकार आहेत. विभाव, अनुभाव, व्यभिचारी भाव, सात्त्विकभाव, स्वार्थीभाव. पैकीं विभाग, अनुभाव व स्थायीभाव हे अनुक्रमें रसाचीं कारणें, कायें व पूर्वरूपें आहेत. १० जीवाची स्थिति, दशा, अवस्था. जसें-उत्पत्ति, स्थिति, लय इ॰ 'ऐसें म्हणे त्यजुनि भाव अहो जिवाचे ।' -वामन भरतभाव ५८. १२ (शब्दाचा) धर्म, गुण, अस्तित्व, विषय, संबंध, अधिकार, अवस्था इ॰ ची स्थिति; संस्कृतांतील ता आणि त्व व प्राकृतांतील पण, पणा, की हे प्रत्यय लागून झालेला शब्दाचा अर्थ. जसें-ब्राह्मणाधिष्ठित भाव तो ब्राह्मणपणा; उग्र-क्रूर-दृढ-सौम्य-शत्रु-बंधु-भाव. 'जयाचेनि संगे ब्रह्मभावो । भ्रांतासहि ।' -ज्ञा ६.१०२. १२ जन्म; अस्ति- त्वांत येणें; उत्पत्ति. १३ (तर्क) पदार्थ. भाव किंवा भावरूप पदार्थ सहा आहेत-द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष आणि समवाय. सातवा पदार्थ अभाव. १४ रति; प्रेम (काव्यातील वर्णनाचा किंवा नाट्य प्रयोगाचा विषय). १५ क्षमता; शक्ति; सामर्थ्य; पराक्रम (शारीरिक किंवा मानसिक). १६ माया; मिष; कपट; आव. 'ध्यान केल्याचा भाव करितो.' -कमं १. १७ लक्षण; प्रकार. 'द्वितीयाध्यायीं ब्रह्मोत्पत्ति । चारी युगांचे भाव कथिती ।' -गुच ५३.२०. १८ इच्छा. 'हाची भाव माझिया जीवा । पुरवी देवा मनोरथ ।' -तुगा ६९९. १९ आवड. 'दुर्योधनें विषान्नें वाढविलीं भीम जेवला भावें ।' -मोआदि १९.१३. २० (नृत्य) अभिनय पहा. [सं. भू-भाव] म्ह॰ जसा भाव तसें फळ. ॰पाहणें- (ना.) परीक्षा करणें; अनुभव घेणें. 'मी सार्‍यांचा भाव पाहिला. या जगांत कोणी कोणाचें नाहीं.' ॰भाजणें- १ दुष्ट हेतु तडीस नेणें.' २ एकाद्यानें केलेलें दुष्ट भाकित प्रत्ययास येणें. ॰सोडणें- १ (भुतानें) पछाडलेल्या माणसास सोडणें. २ मरणें; गतप्राण होणें. ३ नाशाच्या मार्गांत असणें. भावाचा भुकेला-भक्ति, श्रद्धा यांकरितां भुकेला. 'भावाचा भुकेला श्रीपति । आणिक चित्तीं नावडे त्या ।' सामाशब्द- ॰कर्तरि-वि. जेथें क्रियेचा केवल भाव तोच कर्ता असतो आणि क्रियापद नेहमीं नपुंसकलिंगी एक- वचनीं असतें असा (प्रयोग). उदा॰ मला कळमळतें. ॰कर्तृक- वि. (व्या.) भावकर्तरी प्रयोगाचें (क्रियापद). ॰कुंडली-स्त्री. (ज्यो.) तनु, धन इ॰चीं १२ स्थानें दाखविण्यासाठीं बारा राशींचीं घरें ज्यावर दाखविलीं आहेत असें वर्तुळ. कुंडली पहा. ॰गर्भ- पु. १ ग्रंथांतील सारांश. २ अंतस्थ हेतु. ॰गर्भ-गर्भित-वि. १ ध्वनित; गर्भित अर्थाचा. २ ध्वनित अर्थ ज्यांत आहे असें; दिसतो त्यापेक्षां अधिक अर्थ असलेलें (भाषण, लेख इ॰). ॰चलित- वि. (ज्यो.) तन्वादिस्थानीं असून अंशे करून चलित झाला तो (सूर्य किंवा इतर ग्रह). ॰भक्ति-भगत-स्त्री. १ मनः- पूर्वक, श्रद्धा-प्रेमयुक्त, निष्कामपणें केलेली भक्ति; याच्या उलट भयभक्ति. २ एखाद्याविषयीं वाटणारें अत्यंत प्रेम; मनाची ओढ. ॰वाचक नाम-न. (व्या.) प्राणी किंवा पदार्थ यांच्या गुण- धर्माचा बोध करून देणारें नाम. [सं.] ॰वाचकसंख्या-स्त्री. जात नसणारी संख्या; संख्या किंवा परिमाणें यांचा हिस्सा, पट. ॰शबल-न. भावनाविकारांचा गोंधळ; कालवाकालव; अनेक रसांचें मिश्रण. -वि. गोंधळलेल्या भावनांचा. [सं.] ॰शुद्धि-स्त्री. अतःकरणशुद्धि. 'तेणें भावशुद्धीचिया वाटे । विखुरलें विकल्पाचे कांटे ।' -ज्ञा ७.१७०. ॰संकर-पु. मिश्र, संकीर्ण भावना, मनो- विकार. [सं.] ॰संधि-पु. निरनिराळ्या, परस्परविरूद्ध भावना असलेल्या मनाची धरसोडपणाची अवस्था; अंतःकरणांतील मिश्र रसप्रकार. [सं.] ज्ञ-वि. आशय, अभिप्राय जाणणारा; गुणज्ञ. 'पाहातयां भावज्ञां फावती गुण । चिंतामणीचे ।' -ज्ञा ६.२१. भावांतर-न. अर्थांतील फरक, विसंगतपणा. [सं. भाव + अंतर] भावाभाव-पु. अस्तित्वनास्तित्व; खरेंखोटें; चैतन्य आणि जड. 'भावाभावारूप स्फुरे । दृश्य जें हें ।' -ज्ञा १८.११८६. [सं. भाव + अभाव] भावाभास-पु. १ कृत्रिम प्रेम; कवि किंवा नाटककार यांनीं केलेलें प्रेमाचें खोटें वर्णन किंवा प्रदर्शन. २ चुकीचा समज, ग्रह, कल्पना. [भाव + आभास] भावार्थ-पु. १ तात्पर्यार्थ; सारांश. २ भक्तिसार. 'ग्रंथ वदावया निरूपणीं । भावार्थ- खाणी जयामाजी ।' -व्यं २. ३ श्रद्धा; विश्वास; भाव. 'जयाचा भावार्थ जैसा । तयास लाभ तैसा ।' -दा १.१.३८. ४ अंतःकर णाची निष्कपट वृत्ति; प्रामाणिकपणा. -क्रिवि. खरोखर; निःसंशय. 'तो भावार्थ गांवास गेला, मी आपल्यापाशीं का खोटें सांगेन' भावार्थी-वि. १ भाविक. २ साधा; भोळा; सरळ स्वभावाचा. भावि(वी)क-वि. १ श्रद्धावान्; निष्ठावंत. २ संतुष्ट होणारा. 'तिहीं यज्ञभाविकीं सुरीं । जे हे संपत्ति दिधली पुरी ।' -ज्ञा ३.१०४. ३ भक्तियुक्त अंतःकरणाचा. भावि(वी)कजन, भावीजन- पु. श्रद्धायुक्त, निष्ठावंत अंतःकरणाचा. मनुष्य. 'अद्यापि दीपाचे झळ्ळाळ । भावीकजन देखति ।' भावित-वि. १ कल्पिलेलें; चिंतिलेलें; कल्पित. २ ज्यावर भावना किंवा संस्कार केले आहेत असें (औषध). [सं.] भाविला-वि. संस्कार केलेला. -शर. भावी-वे प्रयोग-पु. (व्या.) जेथें कर्त्यावरून अथवा कर्मावरून क्रियापद बदलत नाहीं व सामान्यतः त्याचें रूप नपुसकलिंगी एक वचनी असतें असा प्रयोग. 'मी त्यास मारिलें.' भावुक-न. १ श्रृंगारिक बोलणें. २ कल्याण; हित; क्षेम. 'ऐसा भक्तमयूर चात- कहि जो नेणें दुजीं भावुकें ।' -मोकृष्ण ५५.५१. भावु(वू)क- वि. भक्तियुक्त; निष्ठावंत; भाविक. 'असोत तुज आमुचीं सकल भावुकायुर्बळें ।' -केका ६४. भावेभक्ति-स्त्री. भावभक्ति पहा. भावो-पु. भाव पहा. 'म्हणोनि मज आत्मयाचा भावो । जिहीं जियावया केला ठावो ।' -ज्ञा १०.१४१. भावो सरणें- वाटूं लागणें. -शर. 'तेथ आदिसा पासौनि पार्था । आइ- किजे ऐसीचि अवस्था । दुणावली हे यदुनाथा । भावों सरलें ।' -माज्ञा ६.४८७. (पाठ). भाव्य-वि. उपासना करण्यास योग्य. 'जो इया लटकिया भूतग्रामा । भाव्यु सदा ।' -ज्ञा ९.८४.

दाते शब्दकोश

(सं) पु० हेतु, मुद्दा. २ दर, निरख, ३ आदा, अभिनय. ४ नातें, पणा. ५ भक्ति, श्रद्धा. ६ अस्तित्व, सत्ता. ७ मनोविकार. ८ भावार्थ.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

दृढ

वि. १ (अक्षरशः व ल.) पक्का; घट्ट; कठिण; ज्याचें भेदन, छेदन व चलन करणें कठिण आहे असा. 'हा दृढ पाषाण आहे; हा शस्त्रानें फुटणार नाहीं.' 'तोफेच्या गोळ्यानेंहि भोंक न पडेल अशी दृढ भिंत घालावी.' २ निश्चित; कायम; मुकर. ३ ठाम; पक्का; स्थायिक. ४ पुरतेपणीं निश्चित केलेला; पक्व; अविचल (बेत, विचार, निश्चय). 'निश्चय दृढ असला म्हणजे ईश्वर कृपा करितो.' ५ (सामा.) पक्का; चिवट; चिकट. ६ मनात पक्की ठसलेली, बिंबलेली. 'एकदां ऐकलेली गोष्ट पुनः ऐकली म्हणजे दृढ होते.' या शब्दापासून अनेक सामासिक शब्द बनले आहेत व बनवितां येतात. जसें:-दृढनिश्चय-निर्धार-संकल्प = पक्का, ठाम निश्चय. -वि. पक्क्या निश्चयाचा, निर्धाराचा (मनुष्य) दृढप्रयत्न-अतिशय नेटाचा प्रयत्न, प्रयत्न करणारा. तसेंच दृढसंकेत दृढसंधान-नियम-विश्वास-वैर-निष्ठा-व्रत-तप-सख्य-प्रेम-भक्ति धैर्य-वचन-अनुसंधान-पातिव्रत्य-सौभाग्य इ॰ समास होतात. दृढ-तनु-शरीर-देह, दृढांग = बळकट शरीराचा (मनुष्य, पशु इ॰). सामाशब्द-॰चित्त-पु. एकाग्र चित्त; काळजीपूर्वक दिलेलें लक्ष. (क्रि॰ करणें; देणें). [दृढ + चित्त = मन] ॰प्रतिज्ञ-वि निश्चयी; कितीहि संकटें आलीं तरी निश्चय शिथिल न होऊं देणारा. [दृढ + प्रतिज्ञा = निश्चय] ॰भाजक-पु. (गणित) खालीं बाकी उरूं न देतां कहीं संख्यांस निःशेष भागणारी दुसरी सर्वांत मोठी संख्या; विवक्षित संख्यांचा सर्वांत मोठा साधारण विभाजक. [दृढ + सं. भाजक = भागणारा] ॰भाव-पु ठाम, पूर्ण भक्ति, श्रद्धा, प्रेम. [दृढ + सं. भाव = श्रद्धा, प्रेम] ॰मुग्टि-वि. १ चिक्कू; कृपण; कद्रु; कंजूष; हाताचा जड. २ लगामाचा एक प्रकार. -अश्वप १८५. [दृढ + सं. मुष्टि = मूठ] ॰संधि-वि. १ घट्ट विणीचें; घटमूट. २ दाट; घनदाट; मध्यें फट, विरळ जागा नसलेला. [दृढ + सं. संधि = जोड, सांधा] दृढीकरण-न. १ पक्कें करणें. २ (ख्रि.) रोमी व इंग्लं/?/ य चर्चमध्यें बाप्तिस्भ्याच्या वेळीं लहान मुलांच्या तर्फे जीं वचनें देण्यांत येतात त्यांच्या पूर्ततेची जबाबदारी मुलांनीं प्रौढ झाल्यावर स्वतःवर घेण्याचा विधि. (इं.) कन्फर्मेशन्. -सा. प्रा. १२१. 'पूर्ण खिस्ती होण्याकरितां हीं दोन साक्रमेंतें म्हणजे बाप्तिस्मा व दृढीकरण हीं अवश्य आहेत.' ई. वि. १७८. [सं.] दृढोत्तर-वि. जास्त बळकट; मजबूत. [सं. दढतर अप.]

दाते शब्दकोश

अभाविक

वि. १ देवावर विश्वास न ठेवणारा; श्रद्धा नस- लेला; भाविक नव्हे तो. २ अतर्कित; अकल्पित; आकस्मिक; आगंतुक; विचार न केलेला; चिंतन न केलेला. -न. अल्पत्व; अल्प- राशि; जवळजवळ अभाव. 'त्याचे घरीं भोजनास गेलों परंतु तूप- साखर यांचें अभाविक होते.' [सं. अ + भाव]

दाते शब्दकोश

अभाविक      

वि.       १. देवावर विश्वास न ठेवणारा; श्रद्धा नसलेला; भाविक नव्हे तो. २. अतर्कित; अकल्पित; आकस्मिक; आगंतुक; विचार न केलेला; चिंतन न केलेला.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आदर

पु. १ मान; श्रद्धा; पूज्यबुद्धि. 'गुणा न म्हणतां उणा अधिक आदरें सेविती ।' -केला २३. २ (हुंडी) स्वीकार; सत्कार; होकार. ३ सद्भाव; हौस; आवड. 'तसा रंग श्रीमंत खेळले कलियुगांत अति आदरांत ।' -ऐपो १९८. ४ (सामा.) गौरव; सत्कार; स्वागत; आदरातिथ्य. [सं. आ + दृ; हिब्रू. अधरध] -रातिथ्य न. पाहुणचार (भोजनासंबंधींचा); आदरसत्कार. [आदर + आतिथ्य] ॰उपचार-मान-सत्कार पु. १ पाहुणचार; मानसन्मान; मानमरातब; संभावना; आसन, अभ्युत्थान, भोजन वगैरे देणें.

दाते शब्दकोश

आदर      

पु.       १. मान; श्रद्धा; पूज्यबुद्धी : ‘गुणा न म्हणतां उणा अधिक आदरें रोविती ।’ − केका २३. २. (हुंडी) स्वीकार; सत्कार; होकार. ३. सद्‌भाव; हौस; आवड : ‘तसा रंग श्रीमंत खेळले कलियुगांत अति आदरांत ।’ − ऐपो १९८. ४. (सामान्यतः) गौरव; सत्कार; स्वागत; आदरातिथ्य. ५. अगत्य.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आदरण

न. (कों. गो.) बहुमान; सन्मान; आदर; श्रद्धा; पूज्यबुद्धि; अगत्य.

दाते शब्दकोश

आदरण      

न.       बहुमान; सन्मान; आदर; श्रद्धा; अगत्य. (कों.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अद्वैती      

वि.       अद्वैत तत्त्वज्ञानावर श्रद्धा असणारा. [सं. अद्वैत]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अधर्म

धर्मभ्रष्ट बाट्य, इतोपि भ्रष्टः ततोपिभ्रष्टः, मेले विटाळचांडाळ मानीत नाहींत, विटाळ कालवतात, दिवसेंदिवस सश्रद्ध इसम विरळा, श्रद्धा रोडावली, माणुसकी लोपली, कळी प्रबळ झाला, अधर्माचें अभ्युत्थान झालें, सर्वांनीं धर्मावरच गदा उगारली, जीवनमूल्यें चळलीं, धर्माला ग्लानि आली.

शब्दकौमुदी

अनुपम, अनुपमेय, अनुपम्य      

वि.       १. दुसरी उपमा किंवा तुलना नाही असे; अतुल्य; निरूपम. २. प्रतिस्पर्धी नसलेला. ३. सर्वोत्कृष्ट : ‘आकर्ण अवघ्याचें वचन । ऐशिया श्रद्धा राजा पूर्ण । अनुपम्य प्रश्न पुसेल ॥’ – एभा २·७९१. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अपश्रद्धा      

स्त्री.       चुकीची श्रद्धा.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

असद्वाद      

पु.       १. प्रस्थापित सत्ता व संस्था यांचा संपूर्ण अस्वीकार करणारे मत. २. सर्व मूल्ये, जीवनावरील श्रद्धा व संवादाची शक्यता पद्धतशीरपणे नाकारणारा संशयवादाचा एक प्रकार. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अश्रद्ध      

वि.       श्रद्धा नसणारा; भाव, भक्ती नसलेला. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अश्रद्धेय      

वि.       श्रद्धा ठेवण्यास अयोग्य, नालायक. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अश्रध्द

वि. श्रद्धा नसणारा; भाव, भक्ति नसलेला. [अ + श्रध्दा]

दाते शब्दकोश

अश्रध्देय

वि. श्रद्धा ठेवण्यास अयोग्य-नालायक. [सं.]

दाते शब्दकोश

आस्ति(स्ती)क

वि. १ ईश्वराच्या ठिकाणीं श्रद्धा ठेवणारा; ईश्वर, परलोक, पापपुण्य मानणारा; श्रद्धावान्. याच्या उलट नास्तिक. 'तया आस्तिकांचा आश्रमु । पांडवा गा ।' -ज्ञा ८. १९३. २ (गो.) खाऊनपिऊन सुखी असा (मनुष्य); सुखवस्तु; ऐपतदार; मातबर. -पु. एक ऋषि. यानें जनमेजयाच्या सर्पसत्रां- तून तक्षकाला वांचविलें. निजतेसमयीं साप वगैरेची बाधा होऊं नये म्हणून या ऋषीचें नांव दोन वेळ (आस्तिक-आस्तिक असें म्हणन) घेतात. [सं.]

दाते शब्दकोश

आस्तिक      

वि.       १. ईश्वराच्या ठिकाणी श्रद्धा ठेवणारा; ईश्वर, परलोक, पापपुण्य मानणारा; श्रद्धावान. : ‘तया आस्तिकांचा आश्रमु । पांडवा गा ।’ − ज्ञा ८·१९३. २. खाऊनपिऊन सुखी असा (मनुष्य); सुखवस्तू; ऐपतदार; मातबर. (गो.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आस्तिक्य      

न.       आस्तिकपणा; परमेश्वराबद्दल विश्वास, श्रद्धा : ‘आणि आस्तिक्य जाणावें । नववा गुण ।’ − ज्ञा १८·८४८. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आस्तिक्य, आस्तिक्यबुद्धि

न. स्त्री. आस्तिकपणा; परमेश्वराबद्दल विश्वास, श्रद्धा. 'आणि आस्तिक्य जाणावें । नववा गुण ।' -ज्ञा १८.८४८. 'म्हणोनि अनित्याच्या ठायीं । तयां आस्तिक्यबुद्धि नाहीं ।' -ज्ञा २.१३२. [सं.]

दाते शब्दकोश

आस्था

स्त्री. १ कळकळ; काळजी; 'परी ते आस्थाही न धरी मानसीं ।।' -ज्ञा ४.१९६. २ उत्सुकता; इच्छा; उत्कंठा; पोटाग; याच्या उलट अनास्था. ३ आसक्ति; प्रेम. 'घरावरी तेतुली । आस्था नाही ।' -ज्ञा १३.५९४. ४ आशा; आस; अपेक्षा; (क्रि. करणें.) 'ओंवाळणीचिया आस्था । बहुरूपी सोंग संपादितां ।' -एभा १३.६६७. ५ विश्वास; श्रद्धा. 'पाखांडियाहि आस्था । समूळ होय ।' -ज्ञा ६.१६७. [सं. आ + स्था.]

दाते शब्दकोश

आस्था      

स्त्री.       १. कळकळ; काळजी : ‘परि ते आस्थाही न धरीं मानसीं ॥’ − ज्ञा ४·१९५. २. उत्सुकता; रस; इच्छा; उत्कंठा. याच्या उलट अनास्था. ३. आसक्ती; प्रेम; आपुलकी : ‘घरावरी तेतुली । आस्था नाही ।’ − ज्ञा १३·५९५. ४. आशा; आस; अपेक्षा (क्रि. करणे) : ‘ओवाळणीचिया आस्था । बहुरूपी सोंग संपादितां ।’ − एभा १३·६६७. ५. विश्वास; श्रद्धा : ‘पाखांडियाहि आस्था । समूळ होय ।’ − ज्ञा ६·१६७. ६. आदर [सं. आ+स्था]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अत्यादर

पु. १ विशेष आदर; सत्कार; स्वीकार; सन्मान; अंगीकार. 'असेल अशि आवडी करिशि कां न अत्यादर । ' -केका ६१. २ विशेष प्रेम; श्रद्धा. 'मज हृदयीं सद्गुरु । जेणें तारिलों हा संसार पुरु । म्हणऊनि विशेषें अत्यादरु । विवेकावरी । ' -ज्ञा १.२२. [सं. अति + आदर]

दाते शब्दकोश

अत्यादर      

पु.       १. पूज्यभाव; सत्कार; स्वीकार; सन्मान; अंगीकार : ‘असेल अशी आवडी करिशी कां न अत्यादर ।’ – केका ६१. २. विशेष प्रेम; श्रद्धा : ‘मज हृदयीं सद्‌गुरु । जेणें तारिलों हा संसारपुरु । म्हणऊनिं विशेष अत्यादरु । विवेकावरी ।’ – ज्ञा १·२२. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अविश्वासी, अविश्वासू, अविश्वासूक      

वि.       १. बेभरवशाचा; साशंक; विश्वास, श्रद्धा न ठेवणारा. २. विश्वास, भरवसा ठेवण्याला अयोग्य. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अविश्वासी-सू-सूक-

वि. १ बेभरंवशाचा; सांशक; विश्वास, श्रद्धा न ठेवणारा. २ विश्वास, भरवंसा ठेवण्याला अयोग्य. [सं.]

दाते शब्दकोश

अवीट आवडी      

स्त्री.       अढळ, अक्षय श्रद्धा, प्रेम.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

बुद्धिप्रामाण्य

बुद्धिवाद, डोळस श्रद्धा, तकर्काची कांस धरणें, दिसेल व पटेल तेंच करणें अंधश्रद्धेचे काबील न होणें, बुद्धीच्या प्रकाशांत प्रश्न सोडविणे, आप्तवाक्याचा वरचढपणा झुगारणें, मेंदू सांगेल त्याप्रमाणें करणें, विचाराचा निकष लावणें, कोणी लोक म्हणतात म्हणून न मानणें, बाबा वाक्यं प्रमाणं हा सिद्धान्त न मानणे, डोळे व मन सताड उघडीं ठेवून वागत जाणें, तर्काच्या कसोटीवर घासून उरेल तेंच सत्य समजणें, विवेक हाच ध्रुवतारा, विचार हाच या संसारनौंकेचा तांडेल, भावनाविवश न होणें, धर्मसिंधूही आडवा आला तरी तो बाजूस ठेवणे, विचारशक्तीच्या आगींत जें शुद्ध म्हणून उतरेल तेच स्वीकारणें, शास्त्राच्या पायावर सिद्धान्तांची उभारणी करणें.

शब्दकौमुदी

भावभक्ति

(सं) स्त्री० श्रद्धा, निश्चय.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

भावना

स्त्री. १ कल्पना; मनाचा ग्रह. 'तैसी इये निर्मळ माझ्या स्वरूपीं । जो भूतभावना आरोपी ।' -ज्ञा ९.७९. २ शरीरप्रकृतीची अवस्था. उदा॰ रोग-मरती-वांचती-चढती-भावना. ३ श्रद्धा; निष्ठा; भक्ति; पूज्यभाव; विश्वास. 'भावना राहिली एकाचिया ठायीं । तुका म्हणे पायीं गोविंदाचे ।' -तुगा २४. ४ रसायनादिकांस रसाचीं पुटें, अग्निपुटें इ॰ संस्कार करतात त्यांपैकीं प्रत्येक. 'कां कथिलाचें कीजे रूपें । रसभावनीं ।' -ज्ञा १८.७७४. ५ (बीजगणित) गुणाकाराची एक रीत हिचे अंतर्भावना, समास- भावना, तुल्यभावना असे प्रकार आहेत. ६ जाति; प्रकृति; स्वभाव; स्वाभाविक धर्म. 'त्या आंब्याची भावनाच अशी कीं कोयीपाशीं आंबट असावें.' ७ लक्षणांनी युक्त असलेला रोग; निदानासह एकंदर रोग. ८ स्मृति; आठवण. 'प्रसंगी या नाहीं देहाची भावना । तेथें या वचना कोण मानी ।' -तुगा ३१४. ९ विचार. 'न साहे वियोग करिती रोदना । भ्रमिष्ट भावना देहाचिया ।' -तुगा १०९. १० अस्तित्व. 'भावना म्हणिजे अभाव नसावा । वाटूं नये गोवा अनित्याचा ।' -हंको. [सं.] भावनीय-वि. कल्पना, तर्क, विचार करण्यास योग्य, लायक. [सं.]

दाते शब्दकोश

भक्ति

(सं) स्त्री० भाव, श्रद्धा.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

स्त्री. १ पूजा; भजन. २ अंतःकरणाची प्रवृत्ति; तत्प- रता; श्रद्धा (धर्ममार्गांत). ३ आवड; प्रीति; शौक; आसक्ति; निष्ठा. ४ ऐक्य. -हंको. [सं.] ॰बसणें-क्रि. मान्य होणें; योग्य, चांगला. उचित वाटणें; प्रीति वाटणें. भक्तीचें दुकान घालणें- मांडणें-पसरणें-करणें-क्रि. भक्तीचा डौल, आव घालणें. भक्तीनें आवडणें-क्रि. पराकाष्ठेचा आनंद होणें; अत्यंत शोकी असणें. ॰प्रेम-न. भक्तीचें प्रेम; भक्तियुक्त प्रीति. आसक्ति. ॰भाव-पु. १ भक्तीचा, पूज्यतेचा भाव; भक्तियुक्त वृत्ति; भक्ति- युक्तता. २ आसक्ति; शौक; प्रवृत्ति. [सं.] ॰मान्-मन्त-वि. १ धार्मिक; भजनशील. २ आसक्त; तत्पर. ३ श्रद्धाळु; निष्ठायुक्त. [सं.] ॰मार्ग-पु १ भक्तीनें मुक्ति मिळविण्याचा मार्ग, संप्रदाय; श्रवण, कीर्तन इ॰ साधनांनीं ईश्वराची केवळ भक्ति केल्यानें मुक्ति मिळूं शकते असें ह्या मार्गाचें तत्व आहे. ज्ञानमार्ग व कर्ममार्ग या दोहोंहून भक्तिमार्ग हा भिन्न आहे. २ भक्तितत्व; भक्तीनें देवत्व मिळविण्याचा प्रकार. ३ विधीकडे, कर्मकांडाकडे लक्ष्य न देतां केलेली भक्ति. [सं.] ॰मार्गी-वि. भक्तिमार्गास अनुसरणारा. [सं.] ॰योग-पु. उपासना. [सं.] ॰वेड-न. भक्ती- शिवाय कांहीं न दिसणें; अंधभक्ति. ॰हीन-वि. भक्तिशून्य; भक्ति नसलेला. भक्तीण-स्त्री. १ भक्ति करणारी स्त्री; विशेषतः देवी, भैरोबा इ॰ देवळांतील झाडलोट करणारी बाई (हिच्या ठिकाणीं रोग बरे करण्याची इ॰ शक्ति असते असें मानतात). २ कलावंतीण. ॰भक्त्या-पु. देवभक्त; देवऋषी.

दाते शब्दकोश

भक्तिभाव

पु० मनोभाव, श्रद्धा, भाव.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

डगणे      

अक्रि.       कापणे; थरथरणे; डगमगणे; लटपटणे; डळमळणे. २. (ल.) घाबरणे; भिणे; डरणे; बाजूला सरणे : ‘चित्तें दोन अशा स्थलीं न डगशी कोंबावया तूं जरी ।’ - केक ८४. ३. खचणे; मोडणे; सुटून पडणे (तुळई, भिंत इ.); चळणे; ढळणे : ‘तूं आपली श्रद्धा, भक्ति व धर्म यांपासून डगूं नकोस.’ –पप्रे १२७. ४. भित्रेपणाने मान्य करणे; रुकार देणे; दबणे. ५. कचरणे; कांकू करणे. [ध्व. डक, डग]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

डगणें

अक्रि. १ कांपणें; थरथरणें; डगमगणें. २ (ल.) घाब- रणें; भिणें; डरणें. 'चितें दोन अशा स्थलीं न डगशी कोंबावया तूं जरी ।' -केक ८४. ३ खचणें; मोडणें; सुटून पडणें (तुळई, भिंत इ॰); चळणें; ढळणें. 'तूं आपली श्रद्धा, भक्ती व धर्म यांपा- सून डगूं नकोस.' -पप्रे १२७. ४ भितरेपणानें मान्य करणें; रुकार देणें; दबणें. ५ कचरणें; कांकू करणें. [ध्व. डक-ग]

दाते शब्दकोश

धारणा      

स्त्री.       १. स्मरणशक्ती; बुद्धी. २. अष्टांगयोगातील आठ अंगांपैकी एक; श्वासनिरोध, चितैकाग्रता व सर्व नैसर्गिक वासनांचा निग्रह इ. ३. धीर; धैर्य; मनाचे स्थैर्य : ‘यदृच्छा आहारू न मिळे। तरी धारणेसि न टळे ।’ - एभा ८·३३. ४. ढब; तऱ्हा; विशिष्ट, योग्य पद्धत. ५. सरळ मार्ग अवलंबणे. ६. चिवटपणा. ७. कट्टी करण्याची मापे; बट्टा. ८. निष्ठा; श्रद्धा; आदर. ९. समजूत; कल्पना. [सं. धारणा]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

धर्मभोळा      

वि.       १. धर्मावर आत्यंतिक श्रद्धा असणारा; परमधार्मिक. २. (अनादरार्थी) धर्मवेडा; कट्टर सनातनी.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

धर्मग्लानि

यांचा परलोकापेक्षां इहलोकावरच विश्वास, पाखंडी विचार फोफावले, तत्त्वांना मुरड घालण्याची वृत्ति वाढली, चालूं घडी आपली हा दृष्टिकोन, अंतर्मुखतेची ओळख नसलेला समाज, दिवसें-दिवस धर्मश्रद्ध लोक विरळा, धर्मश्रद्धेच्या परंपरेची साखळी तुटली आहे, धर्मग्रंथ यांना जरी कोळून पाजला तरी फुकट ! बुद्धीपेक्षां युद्धच पसंत, सब-झूट पंथ वाढला, श्रद्धा रोडावली.

शब्दकौमुदी

एकनिष्ठ      

वि.       १. एकाच व्यक्तीवर, तत्त्वावर, वस्तूवर श्रद्धा असलेला; एकावरच दृढनिष्ठा ठेवून चालणारा; अढळ श्रद्धावान : ‘श्रीकृष्ण बोलावें तुवां तैसें । एकनिष्ठ ॥’ − ज्ञा ३·१८. २. (उप.) अट्टल; पक्का; पुरा. जसे :- ‘एकनिष्ठ लबाड, एकनिष्ठ लुच्चा इ. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

एकनिष्ठता, एकनिष्ठा

स्त्री. १ एकनिष्ठ असण्याचा गुण; पुरी श्रद्धा; मनःपूर्वकता. २ एकस्थिति; अचांचल्य. ‘जयां विष- यांच्या ठायीं । एकनिष्ठता कहीं नाहीं ।।’ –ज्ञा २.११३. [सं.]

दाते शब्दकोश

एकतान      

वि.       एकाग्र; तन्मय; लक्षपूर्वक; एकाच गोष्टीकडे मन लागून असलेले. जसे :- गायनेकतान, शृंगारेकतान, अध्ययनेकतान, विषयेकतान, परमार्थेकतान, सत्कर्मेकतान : ‘साऱ्या वृत्ती श्रद्धा आणि भक्तीने एकतान झालेल्या.’ − जज ५३.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

एकविधा भक्ति, एकविधा भक्ती      

स्त्री.       एकाच देवतेवर असलेली श्रद्धा, भक्ती; एकाच ईश्वराची पूजा. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

एकविधाभक्ति

स्त्री. एकाच देवतेवर असलेली श्रद्धा, भक्ति; एकाच ईश्वराची पूजा. [सं. एक + विधा + भक्ति]

दाते शब्दकोश

गजश्रद्धा

गजश्रद्धा gajaśraddhā f (S गज Elephant, श्रद्धा Ventris crepitus.) A term applied to an insignificant result of mighty and imposing preparations and professions; or to a pompous and swelling undertaking which ends in smoke.

मोल्सवर्थ शब्दकोश

गूढशक्तिवाद      

पु.       (तत्त्व.)काही गूढशक्तींच्या मदतीने निसर्गाचे नियंत्रण करता येते अशी श्रद्धा.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

इमान

(न.) वचन. “द्यावी सेजेची बाईल पण इमान देऊं नये” (इपुखिपो ४२). “त्या पाञ्ज्यापासी तुमचा इमान (= श्रद्धा) असावा” (मदरु १|११३).

फारसी-मराठी शब्दकोश

(न.) [अ. ईमान् = श्रद्धा] वचन; एकनिष्ठा; सचोटी. “नबाबांनीं आपला इमान रक्षिला” (पदबा १।८९). इमान देणें = वचन देणें.

फारसी-मराठी शब्दकोश

इमान      

न.       १. वचन; एकनिष्ठा; सचोटी. २. श्रद्धा; विश्वास : ‘त्या पंज्यापासी तुमचा इमान असावा.’— मदरू १·११३. ३. इमानपत्र, इमानाची खूण; शपथपत्र : ‘इमान पाठविलें.’− ९६ कलमी. ७. ४. सदसद्‌विवेकबुद्धी; मनोदेवता; अंतर्याम. [फा.] (वा.) इमान करणे, इमान देणे–वचन देणे; शपथ देणे; शपथेवर सांगणे : ‘द्यावी शेजेची बाईल पण इमान देऊं नये.’ − इपुस्त्रीपो ४२. इमान गुंतणे–शपथेत अडकणे; शपथ घेऊन चुकणे. इमान घेणे–सुरक्षित निघून जाण्याबद्दल वचन घेणे : ‘सुरुंग लावून अर्धा बुरुज पाडला मग ठाणेदार व लोक घाबरले. इमान घेऊन बाहेर निघाले.’− नाग २·२०६. इमान धरणे, इमानास जागणे– इमान नष्ट न होऊ देणे; सचोटी न सोडणे; निष्ठा शाबूत ठेवणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

इतबार, इदबार      

पु.       १. विश्वास; इमान; श्रद्धा : ‘भरवसा आतां इतबार कोणाचा येत नाहीं.’ − सभासद २९. २. प्रतिष्ठा; पत; मानपान : ‘कोणा इतबार याचा घरीं’− सला ११. [अर. एअतिबार]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

जागतेपणा      

पु.       उपासकाला पावणारे, जागृत दैवत : ‘(तडवळ्याच्या) साऱ्या महारांची मारुतीच्या जागतेपणावर श्रद्धा होती.’ – व्यंमाक १३.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

काफर

वि. (मुसलमान लोक मुसलमानेतरांस हा शब्द लावतात) अश्रद्धावान; यहुदी, खिस्ती, अगर मुसलमान धर्म- ग्रंथांवर श्रद्धा न ठेवणारा; परधर्मी; नास्तिक. 'या कलीमध्यें मुसल मान काफर जहाले यांचा संहार करावयाकरितां रहीमनें पैदा केला आहे.' -चित्रगुप्त ७०. 'प्रथम तूं कोण काफर आहेस तें सांग ।' -स्वप १४३. २ (ल.) लुच्चा; लबाड; बदमाश; हराम- खोर. ३ हबशी. काफरी पहा. [अर. काफिर] ॰शाई-स्त्री. काफराचें राज्य. 'यवनांचे मनांत कीं काफरशाई जाहली.' -ऐटि १.१८.

दाते शब्दकोश

काफर, काफिर      

वि.       १. अश्रद्ध; यहुदी, ख्रिस्ती अगर मुसलमान धर्मग्रंथावर श्रद्धा न ठेवणारा; परधर्मी; नास्तिक; पाखंडी : ‘प्रथम तूं कोण काफर आहेत तें सांग !’ - स्वप १४३. २. (ल.) लुच्चा; लबाड; बदमाश; हरामखोर. ३. हबशी. पहा : काफरी [फा. काफिर]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

लोकभ्रम

मनाचीं कोळिष्टकें, बुद्धीचा गंज , भ्रामक कल्पना, विचारशून्य विश्वास, सारासारहीन श्रद्धा.

शब्दकौमुदी

मेधा

स्त्री. १ बुद्धीची तीक्ष्णताः कुशाग्र मति; तीव्र बुद्धि; धारणायिक्त बुद्धि. 'पैं स्वहिता अनुजायिनी । मेधा ते गामी इये जनीं ।' -ज्ञा १०.२७९. २ (श्रद्धा या अर्थीं चुकीनें उपयोग). आवड; चाड; प्रीति. 'तयां बहुत करूनि मेधा । स्वर्गीं आथी ।' -ज्ञा १७.७६. 'त्या मुलावर त्याची मेधा आहे. तितकी याज- वर नाहीं.' [सं.] मेधावी-विनी-वि. बुद्धिमान्; कुशाग्र मतीचा-ची-चें. 'तो भक्तु मेधावी तापिया ।' -ज्ञा १८१५०५. [सं. मेधा]

दाते शब्दकोश

मेधा mēdhā f S Sharpness of understanding, acumen, ready apprehension. 2 (Mistaken for श्रद्धा) Liking to or fondness for.

मोल्सवर्थ शब्दकोश

मनोभाव

(सं) पु० मनोदय, आशय. २ भक्ति, भाव, श्रद्धा.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

निश्चय

पु. १ निर्धार; करार. 'सरकार अधिक पैसा मागतें परंतु द्यावयाचा नाहीं असा निश्चय झाला.' २ निर्णय; ठराव; निकाल; अखेरचा फैसला; ठाम मत. 'दुरून रुपें आहे असा भास झाला, हातीं घेतल्यानंतर शिंपी असा निश्चय ठरला.' ३ विश्वास; पूर्ण खातरी; भरंवसा; श्रद्धा. 'शहाण्या मनुष्याचे वाक्यावर निश्चय ठेऊन चालावें.' ४ खात्रीनें होणारी गोष्ट; सिद्धांत; अवश्यंभाविता. 'सूर्यास्तानंतर रात्र होईल या गोष्टीचा निश्चय आहे.' याच्या उलट दैवघटितत्व. -क्रिवि. खातरीनें; न चुकतां; निंसंशय. [सं.] ॰पूर्वक, निश्चयात्मक-वि. खातरीचा; खचित. निश्चयाचा पहा. -क्रिवि. निश्चय (-क्रिवि.) पहा. निश्चयाचा-वि. १ न बदलणारा; निर्णीत; अचंचल. २ ज्याबद्दल शंका, प्रश्न उत्पन्न होणार नाहीं असा.

दाते शब्दकोश

निश्चय      

पु.       १. निर्धार; करार. २. निर्णय; ठराव; निकाल; अखेरचा फैसला; ठाम मत. ३. विश्वास; पूर्ण खात्री; भरवसा; श्रद्धा. ४. खात्रीने होणारी गोष्ट; सिद्धान्त.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

निष्ठा

(सं) स्त्री० श्रद्धा, विश्वास.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

स्त्री. १ दृढ प्रेम, भक्ति; श्रद्धा; दृढासक्ति (मन किंवा हृदय यांची-एखाद्या वस्तूच्या ठिकाणीं). २ विश्वास; भरंवसा; सत्य अशी बुद्धि; निश्चय; अवलंबन. ३ एकसारखी, एका प्रकारची चाल, आचरण, धंदा. ४ कायम ठाण; जम; अधिष्ठान; स्थापना. ५ शेवट; अखेर; परिणाम; निर्णय; मोक्षदायक स्थिति, मार्ग; शेवटची अवस्था. 'ज्ञान ही निष्ठा म्हणजे सिद्धावस्थेंतील अखेरची स्थिति होऊं शकत्ये.' -गीर ४१२. ६ (काव्य) अवस्था; स्थिति. 'तृषा लागली नाथ ओष्ठामृताची । शरीरासि ज्यावीण निष्ठामृताची ।' ७ मार्ग. 'अवधारीं वीरश्रेष्ठा । ये लोकीं या दोन्ही निष्ठा ।' -ज्ञा ३.३५. [सं. नि + स्था] निष्ठावान-वंत-वि. १ आदर, प्रेम, असलेला; आसक्त; दृढभाव असलेला. २ विश्वास ठेवणारा; श्रद्धाळु; स्थिर वर्तनाचा; शाश्वत मार्गाचा; अचंचलवृत्तीचा.

दाते शब्दकोश

निष्ठा      

स्त्री.       १. दृढ प्रेम; भक्ती; श्रद्धा; दृढासक्ती (मनाची, हृदयाची). २. विश्वास; भरवसा; सत्य; खरी बुद्धी; निश्चय. ३. एकसारखी चाल, आचरण, धंदा. ४. कायम ठाण; जम; अधिष्ठान; स्थापना. ५. शेवट; अखेर; परिणाम; निर्णय; मोक्षदायक स्थिती, मार्ग; शेवटची अवस्था : ‘ज्ञान ही निष्ठा म्हणजे सिद्धावस्थेतील अखेरची स्थिती होऊ शकत्ये.’ - गीर ४१२. ६. अवस्था; स्थिती. ७. मार्ग : ‘अवधारीं वीरश्रेष्ठा । ये लोकीं या दोन्ही निष्ठा ।’ - ज्ञा ३·३५. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

प्रत्यय

न. १ अनुभव; खात्री; प्रतीति. 'सहपरिवारें पळती कामक्रोध । कीं प्रत्यया येतां ब्रह्मानंद ।' -पांप्र ४५.२१. २ भरं- वसा; श्रद्धा; निष्ठा; आत्मविश्वास. ३ (व्याकरण.) नाम व धातु यांस विशेष अर्थ उत्पन्न करण्यासाठीं त्यांना जोडून येणारा शब्द. [सं.] प्रत्ययास येणें-पटणें; अनुभवास येणें. 'म्हणोनि जळो हें झुंज । प्रत्यया नये मज ।' -ज्ञा १.२०८. ॰प्रतिभू-पु. खात्री- लायक जामीन; विश्वासप्रतिभू. [सं.] प्रत्ययित-वि. विश्वास टाकलेला; भरंवसा टाकलेला; विश्वस्त. [सं.] प्रत्ययी-वि. विश्व- सनीय; भरंवशाचा; खात्रीचा; पतीचा. [सं.] प्रत्ययीभूत प्रमाण- न. अनुभवास, दाखला म्हणून येणारें उदाहरण, दृष्टांत, विधान.

दाते शब्दकोश

सद्भाव

पु. १ अस्तित्व; स्थिति. 'म्हणोनि अज्ञान सद्भावो । कोणे परी न लाहो ।' -अभृ ७.२९३. २ साधुत्व; सद्गुणीपणा; सुस्वभाव; सुशीलता. ३ चांगली मनोवृत्ति; श्रद्धा; सद्वृत्ति. 'जे इये स्वप्नींहूनि सद्भावा । नेदावें निघों । ' -ज्ञा ११.६३७. ४ सत्य, योग्य अनुभव; प्रतीति. 'हें आलें मज सद्भावा । आतां तूंचि सर्व ।' -ज्ञा ११ ५३६. [सं. सत् + भाव]

दाते शब्दकोश

सिनें

वि. वेगळें; भिन्न. सिनान पहा. 'मग काजळा आणि मसी । न दिसे विवंचना जैसी । तेवीं श्रद्धा तामसी । सिनीनाहीं ।' -ज्ञा १७.७०. [सं. छिन्न; सु + अन्य ?]

दाते शब्दकोश

शम

शम śama m (S) Stilling, subduing, reducing to nullity or into inoperativeness (of the passions and affections): also stilledness or stillness, subdued state (of the mind and passions); stoicism, apathy, indifference, quietism. This conquest of the mind is one of the six duties incumbent upon the वेदांती. The other five duties are दम Government of the senses and animal appetites; तप Practice of mortification and austerities; तितिक्षा Patience, sufferance, endurance of the good and evil of mortal life; श्रद्धा Reverential faith in the Vedas and Shástras; समाधान Restraining of the mind from external objects and fixing of it stedfastly in contemplation. 2 Stilling, tranquilizing, calming, composing generally: also stillness, tranquillity, quiet and unruffled state generally. 3 Final happiness; emancipation from mundane existence. शमदम or शमदमादि The duties comprehensively of the Vedántist,--शम and so forth. शमदमादि- साधनसंयुक्त Provided with the measures (towards ultimate beatitude) of conquest of the mind and subjugation of the senses and appetites.

मोल्सवर्थ शब्दकोश

पु. १ शांतता; शांति; स्थिरता; स्तब्धता. २ (राग आणि विकार यासंबंधी) इंद्रियदमन; मनोनिग्रह (वेदांती लोकां- वर शम, दम, तप, तितिक्षा, श्रद्धा, आणि समाधान अशी एकं- दर सहा कर्तव्यें लादलीं आहेत). 'ऐसा बुद्धीचा उपरमु । तया नाम म्हणिपे शमु ।' -ज्ञा १८.८३४. शांति; अक्षुब्धता; अक्षोभ. ३ आत्यंतिक सुख; मोक्ष; निर्वाण. ४ औदासीन्य; संन्यस्तवृत्ति; निवृत्ति. ५ योगसिद्धि. 'कर्म हेंच शमाचें कारण होतें.' -गीर ६९६. [सं. शम् = मनोनिग्रह करणें] ॰दम- दमादि-न. वेदांती लोकांची शम, दम आदिकरून कर्तव्य; शम पहा. शमदमादि साधनसमुच्चय. ॰विषम-वि. (पाऊस, भाव, गोग वगैरेसंबंधी लोकरूढ) १ हलके व जाड; कमजास्त; कमी- अधिक; थोडेंफार; मागेंपुढें होणारें. २ थोड्याबहुत फरकाचें; थोडीफार चूक असलेले (हिशेब, विधान, रीत). ३ किंचित् मतभेद असलेलें; थोडेफार गैरसमज झालेलें. शमणें-अक्रि. १ शांत होणें; स्थिर, स्तब्ध, निश्चल होणें; संतुष्ट होणें; समाधान पावणें. 'अत्युग्र भीम काळचि, हें वचन यथार्थ मान रे ! शम रे !' ।' -मोभाष्म १२.२७. ३ ओसरणें; कमी होणें. ४ मरण पावणें; मंरणें. 'जो अधिप कोसलांचा भासत नव्हता रणीं शमा- वासा ।' -मोकर्ण ३.२७. ४ दमणें; थकणें. 'शमले मद्बंधु बहु...' -मोभीष्म १०.१३. [सं. शम्] शमविणें-क्रि. १ शांत करणें; स्थिर करणें; दमन करणें. २ मारणें; नाहीसें करणें. [शम प्रयोजक] शमन-न. १ शांति; शांतता; स्थस्थता; स्तब्धता. २ (वैद्यक) शांतवन; उपशमन; उपशम; तीव्रता कमी करणें; थंडावा आणणें. 'सप्तोपचार' पहा. ३ उपशमक; उपशांतक; उपशमन करणारें औषध; तीव्रता कमी करणारें, वेदना हलक्या करणारें औषध; दुःखहारक औषध. उदा॰ 'पित्याचें शमन सुंठसाखर'. ४ शांत होणें; स्तब्ध होंणे; उपशम होणें; स्थिर होंणे; निवारण. ५ यम. [सं.] शमनीय-वि. शांत होणारें; शांत करण्यासारखें. [सं.] शमित-वि. १ शमलेलें; शांत झालेलें. २ कमी झालेलें; दबलेलें. ३ उपशम पावलेलें; संतुष्ट. [सं.] शमी-वि. सौम्य; शांत; स्तब्ध, स्थिर; सौम्य स्वभावाचा. 'नमिला शमि-लास्य-प्रद शांति-जल-धि एकनाथ तो भावें ।' -मोसन्मणिमाला (नवनीत पृ. ३४७.) [सं.]

दाते शब्दकोश

श्राद्ध

वि. श्रद्धा ठेवणारा; विश्वासी; भविक.

दाते शब्दकोश

सरदा or धा

सरदा or धा saradā or dhā f (Vulgar for श्रद्धा) Worship or adoration. 2 Liking, fondness for, desire after.

मोल्सवर्थ शब्दकोश

तम

पुन. १ (शब्दशः व ल.) अंधार; काळोख; अंधकार. 'पडिलेआ भवतमीं निबिडें । जिया प्रति-भवीं उजियेडे ।' -ॠ २. -ज्ञा १६.३६९. '... जैसा रवि नासी तमा ।' -तुगा ४८०. २ सत्त्वरजादि गुणांपैकीं तिसरा (ज्यापासून काम-क्रोधादि विकार उत्पन्न होतात तो) तमोगुण. 'तैसा बहुवसें तमें । जो सदाचि होय निमे । तेथ श्रद्धा परिणमे । तेंचि होऊनि ।' -ज्ञा १७.६९. ३ (तमापासून उत्पन्न होणारें) अज्ञान; वेडेंपण; मूर्खपणा; मोह; अविचार. 'हें असो किती बोलावें । तरी ऐसें जें देखावें । तें ज्ञान नोहे जाणावें । डोळस तम ।' -ज्ञा १८.५८१. 'तत्कृतबोधाहुनि मज गमलें तम अहित जरि तथापि हित ।' -मोसभा ३.३६. ४ उन्माद; क्रोधाचा आवेश; गर्वाचा ताठा. (क्रि॰ गाणें; करणें; मांडणें). ५ मूर्च्छा; बेशुद्धि. 'वासुनि दांत मुखांत दहांत पडे, मति गाढ तमीं पचली ।' -वामन-सीतास्वयंवर ११. [सं. तमस्] ॰कूप-पु. १ (काव्य.) गाढ अंधारानें युक्त असा खळगा; खांच. 'कीं तमकूपीं पडला गभस्ती ।' २ एक नरक. [तम + सं. कूप = आड] तमारि-री-पु. सूर्य. 'रात्रीची चौपाहरी । वेंचलिया अवधारीं । डोळ्यां तमारी । मिळे जैसा ।' -ज्ञा १८.९६७. [तम + अरि = शत्रु] तमारिसुत-पु. सूर्याचा पुत्र. १ शनि. २ यम. ३ वरुण. 'चालिला तेव्हां तमारिसुत ।'

दाते शब्दकोश

उद्बोधन      

न. १. (तत्त्व.) उद्‌बोधित करण्याची प्रक्रिया; युरोपमधील १८ व्या शतकातील एक तात्त्विक मतप्रवाह. या मतप्रवाहाने पारंपारिक तत्त्वे आणि मूल्ये यांच्याकडे संशयवादी दृष्टिकोनातून पाहण्याचा पायंडा पाडला, व्यक्तिवादाकडे लोकांचा कल झुकविला आणि सार्वजनिक मानवी उत्कर्ष, अनुभवप्रधान वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब आणि अनिर्बंध बुद्धिप्रामाण्यावर अढळ श्रद्धा यांवर भर दिला. २. (शिक्षण) प्राप्त ज्ञानाची उजळणी व त्यात अद्ययावत ज्ञानाची भर. ३. स्वतःचे विचार भोवतालच्या परिस्थितीला जुळतील असे त्यांचे आधुनिकीकरण. ४. आग्रहाने उपदेश करणे; मन वळवणे; हितोपदेश करणे. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उत्क्रान्ति

पुनर्घटना व पुनर्जडण, वाट बदलली, फेरफार पण फार नव्हत, आमूलाग्र बदल, नव्याचे पचतील इतकेच वळसे, रूपान्तर, नदी तीच पात्र बदलले, कायापालट, जुने ठसे बदलले, घाउकाऐवजी फुटकळ बदल, संक्रमण, नव्या युगाचीं पदचिन्हें, नवी श्रद्धा व नवी आशा यांची निर्मिति, जुन्यास नवे धुमारें, तीच धातू नव्या मुशींत, स्थलान्तर जरूर तर पण इच्छान्तर नव्हे, टप्प्याटप्प्याने बदल, एक प्रकारें कवच न फोडतां पिल्लू बाहेर येणें.

शब्दकौमुदी

विश्वास

पु. १ भरंवसा; खात्री; निश्चय; इमानदारी. २ श्रद्धा; मनाचा अनुकूल ग्रह. [ सं. वि + श्वस् = श्वास घेणें] ॰घात- पु. १ विश्वास दाखवून फसवणूक; बेभरंवसा; बेइमानी; दगलबाजी; खोटेपणा. २ (कायदा) विश्वासानें ताब्यांत दिलेल्या मालाचा लबाडीनें गैरशिस्त उपयोग करणें. ॰घातक-घातकी-वि. बेमान; लबाड; खोटा; कृतघ्न. ॰जामीन-पु. खात्रीसाठीं जबा- बदार; विश्वासप्रतिभू. ॰निधि-पु. अत्यंत भरंवशाचा माणूस. ॰प्रतिभू-पु. विश्वासपणाबद्दल हमी घेणारा; एखादा मनुष्य खात्रीलायक आहे म्हणून हवाला देणारा. विश्वासणें-अक्रि. १ भरंवसा धरणें; विश्वास ठेवणें. २ अवलंबून राहणें; भरंवशावर राहणें; हवालीं करणें; स्वाधीन करणें. 'जो दुसऱ्यावरी विश्वासला । त्याचा कार्यभाग बुडाला ।' -दा. ३ (काव्य) खरें, सत्य मानणें. विश्वासला-पु. ज्यानें विश्वास ठेविला आहे असा. 'विश्वा- सला आतुडवीजे चोरा ।' -ज्ञा १६.२६०. विश्वासिक, विश्वासुक, विश्वासू-क-वि. प्रामाणिक; विश्वास ठेवण्या- लायक; भरंवशाचा. 'मित्र माझिये मती । विश्वासिक तूं एक ।' -मुआदि ३५.४८. विश्वासी-वि. १ खात्रीचा; भरंवशाचा. २ भरंवसा ठेवणारा.

दाते शब्दकोश

(सं) वि० पु० निश्चय, पत, प्रामाणिकपणा, श्रद्धा.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

रस

पु. १ चव; रुची; स्वाद; जिव्हेनें खारट, तुरट, गोड इ॰ जो पदार्थाचा धर्म समजतो तो. 'सुरभिदुग्धपान रस मजला समजे ।' -मोअनु २.७. २ चीक; द्रव; पान, फूल, फळ इ॰तील पातळ अंश. ३ ऊंस, आंबा यांतून निघणारा द्रवपदार्थ. ४ अर्क. ५ अन्नाचें रक्त व्हावयापूर्वींचें रूपांतर; शरीरांतील ज्या अन्नापासून रक्त व घाम बनतो ती अन्नाची अवस्था. ६ धातूचें द्रवरूप; कोणत्याहि धातूचा वितळून केलेला द्रवपदार्थ; सोनें, चांदी इ॰ची अग्निसंयोगानें झालेली द्रवरूप स्थिति. ७ (साहित्य) अंतःकर- णाच्या वृत्तीचें कांहीं कारणानें उद्दीपन होतें आणि त्या उद्दीपित झालेल्या वृत्तीच्या अनुभवानें किंवा अवलोकनानें अनुरूप विचार प्रकट करण्याची प्रेरणा होते तिला रस म्हणतात. रस नऊ आहेत- शृंगार, वीर, करुण, अद्भुत, हास्य, भयानक, बीभत्स, रौद्र व शांत. 'तैं नवरससुधाब्धीचा । थावो लाभे ।' -ज्ञा १०.७. ८ (ल.) गोडी; आवड; राम; मनोरमता; मोहकता (प्रसंग, साहित्य, भाषण, व्यापार इ॰ तील.) 'वचनांत कांहीं, रस नाहि पाही ।' -लीलावती. ९ प्रीति; प्रेम; अनुराग. १० कस; योग्यता. 'ऐसि- यांचा कोण मानितो विश्वास । निवडे तो रस घाईं डाईं' -तुगा ३३६२. ११ खाणींतील मीठ; खनिजक्षार; (गंधक, मोर्चूत इ॰). १२ पारा. १३ पुरुषाचें वीर्य किंवा रेत. १४ विष. १५ उत्तेजक द्रव्य (तेल, मसाला, साखर, मीठ इ॰) (संस्कृतमध्यें असे अनेक प्रतिशब्द या शब्दाला आहेत). १६ पाणी. 'तरी नुरोनि वेगळेंपण । रसीं भजिन्नलें लवण ।' -ज्ञा १७.१८. १७ दूध. 'कथा सुरभिंचा रस स्वहित पुष्कळ स्वादुहि ।' -कैका. १८ रसायन; औषध. 'पैं कळांतर गांठीं बांधिजे । मग पुढिलांचे काज कीजे । पूजा घेऊनि रसु दीजे । पीडितांसी' -ज्ञा १७.२८७. १९ नारळाच्या रसांत गूळ मिळवून तयार केलेलें पातळ पेय. [सं.] सामाशब्द- ॰कस-पु. १ रसज्ञता. -शर. २ रसाचा कस; रंग; बहार; गोडी. (क्रि॰ जाणें; घेणें). 'भोग आतां रसकस घे बरी ही संधी साप- डली ।' -प्रला १९९. [रस + कसणें] ॰केळी-स्त्री. (महानु.) रसकेलि; नवरसाची क्रीडा. 'जेही रसकेळि खेळति मनें । कळा- विदांची.' -भाए २७२. [सं. रस + केलि = क्रीडा] ॰गुल्ला- गोल्ला-पु. (व.) एक बंगाली गोड खाद्य पदार्थ; एक प्रकारची मिठाई. ॰द-पु. मेघ. [सं.] ॰पूजा-स्त्री. औषधाबद्दलची किंमत; वैद्याची फी. 'रसपूजा धरोनि पोटीं । वैद्य औषधांच्या सोडी गांठी ।' -एभा ११.१०४४. ॰बाळ-बाळी-बेळी-बेळ-स्त्री. केळयाची एक जात (सोनकेळयाप्रमाणें). [रस + का. बाळे = केळ; का. रसबाळे] ॰भंग-पु. १ गोडी जाणें; काव्यग्रंथ गानादिसंबंधीं वाचकश्रोत्यांचा विरस. २ बेरंग; सौंदर्यनाश. ३ उत्साह, उमेद, यांवर विरजण पडणें. [सं.] ॰भरित-वि. १ रसानें युक्त अगर भरलेलें; रसपूर्ण; (फळ इ॰). २ (ल.) चटकदार; गोड; मनोरंजक; सुंदर (भाषण, वर्णन, इ॰). [सं.] ॰भरू-वि. रसानें भरलेला (फलादि पदार्थ); रसपूर्ण; रसाळ. [रस + भरणें] ॰भावना-स्त्री. पुटें देण्याची रीत; किमयेची रीत. 'परी मात्रेचेनि मापें । दिव्यौषध जैसैं घेपे । कां कथिलाचें कीजे रूपें । रसभावनी ।' -ज्ञा १८.७७४. ॰भोजन-न. ज्या जेवणांत आंबरस हें मुख्य पक्कान्न आहे असें जेवण. ॰मय-वि. (रसपूर्ण) जलमय. 'अद्व- यानंदस्पर्शे । दिठी रसमय जाली असे । ते अश्रु नब्हती जैसें । द्रवत्वचि' -ज्ञा १८.१६०४. ॰रंग-पु. मकरसंक्रांतीचे दिवशीं कुंकु आणि गूळ हीं दोन पात्रांत भरून ब्राह्मणांस, सुवासनीस देतात तो; संक्रातीचें हळदीकुंकू. [रस आणि रंग] ॰राय-पु. (महानु) शृंगारस. 'निर्यास गेलें । रसरायाचें ।' -भाए ९९. ॰वडी-स्त्री. तोंडीलावण्याकरितां मसाल्याच्या रसानें युक्त हरभऱ्याच्या पिठाच्या वड्या करतात त्या; पाटवडी. ॰वंती-स्त्री. १ (प्र.) रसवती; वाणी; वाचा (रसाचें अधिष्ठान मानली जाणारी); वक्तृत्व. २ गोड भाषण. ३ जीभ. ४ एक वनस्पति. ॰वांगें-न. मसालेदार रसानें युक्त असें शिजवून तयार केलेलें सगळें वांगें; भरलेलें वांगें (भाजी). ॰वान्-वि. १ रसभरित-युक्त-पूर्ण. २ चवदार; स्वादिष्ट; मिष्ट. [सं.] ॰विक्रय-पु. (तेल, मीठ, लोणी, साखर, दूध, तूप, इ॰) रसाळ, पोषक पदार्थींची विक्री. शास्त्रांत हा दोष मानला आहे. [सं.] ॰वृत्ति-स्त्री. शृंगारादिक रसभाव. (क्रि॰ प्रकट करणें). 'येथ विभूती प्रतिविभूती । प्रस्तुत अर्जुना सांगिजेती । ते विद्गदा रसवृत्ती । म्हणिपैल कथा ।' -ज्ञा १०.४१. ॰सोय-स्त्री. स्वयंपाक; पक्कान्न. 'जैसी रांधवणी रससोय निकी । करूनियां मोले विकी ।' -ज्ञा २.२५४; -अमृ ५.४३. ॰स्वादन- न. स्त्रियांच्या शृंगारचेष्टांचें वैगरे वर्णन ऐकण्यामध्यें असलेली श्रद्धा, गोडी. 'हावभाव कटाक्षगुण । सुरतकाम निरूपण । तेथ ज्याचें श्रद्धा श्रवण । रसस्वाद त्या नांव' -एभा ११.७०७. ॰ज्ञा-वि. १ रस जाणणारा; रसिक; मर्मज्ञ. 'पुष्पाच्या मकरंदाचा रसज्ञ भ्रमरा- सारखा दुसरा कोणी नाहीं.' २ योग्यता जाणणारा; महत्त्व ओळ- खणारा. ३ रस, भावना, वृत्ति ओळखणारा. [सं.] ॰ज्ञता-स्त्री. रस जाणण्याचा गुण, पात्रता. ॰ज्ञतावात-ज्ञानवात-स्त्रीपु. रस जाणण्याखेरीज बाकी सर्व इंद्रियांची ज्ञानशक्ति यांचा नाश करणारा वात. रसरसणें-अक्रि. १ रसानें पूर्ण भरून असणें. २ (अग्नि) प्रज्वलित असणें; धगधगणें; प्रखरणें. ३ तापणें; जळजळीत असणें; जळजळणें (तापांत अंग, डोळे, उष्णतेनें पाणी, तवा इ॰. ४ ऐन तारुण्यांत, भर ज्वानींत असणें. ५ भर-भरांत असणें (देवी, गोवर, ज्या त्या हंगामांत उत्पन्न होणारे पदार्थ) किंवा संतापानें. 'संजयो विस्मयें मानसीं । आहा करूनी रसरसी । म्हणे कैसे पा देवेसी । द्वंद्व यया' -ज्ञा १४.४११. [रस ध्व.] रसरसीत- शीत-वि. १ रसाळ; रसपूर्ण. २ भर ज्वानीनें युक्त; तारुण्यानें मुसमुसलेली. ३ प्रखर; प्रज्वलित; तापून लाल झालेलें. ४ पिवळा शब्दामध्यें पहा. रसा-रस्सा-पु. १ पुष्पळ रस असलेली भाजी; मसाला इ॰ घालून केलेलें पातळ तोंडीलावणें (बटाटा इ॰चें). २ मांसाचें कालवण. [सं.] रसाधिपति-पु. वरुण. [सं.] रसाभास-पु. १ कृत्रिम, खोटी भावना; अनुचितपणें प्रवृत्त केलेला रस. उदा॰ पशुपक्ष्यादिकांचा शृंगार वर्णन करणें. हा शृंगार- रसाभास झाला. २ अशा तऱ्हेचें काव्य अगर नाटक. ३ स्थायी- भाव नांवाखालीं येणाऱ्या अष्टरसांपैकीं एकाचें केलेलें खोटें आवि- ष्करण; अशा रसाचें (काव्य, नाट्य रूपानें) केलेलें दिग्दर्शन. ४ कांहीं खोट्या बतावणीनें खरी भावना दडवून ठेवणें. [सं.] रसाल-ळ-वि. १ रसभरित; ज्यामध्यें रस पुष्कळ आहे असा (फलादि पदार्थ). २ रसयुक्त; मधुर; गोड. 'केळीचें दळवाडें । हळू पोकळ आवडे । परि फळोनिया गाढें । रसाळ जैसें ।' -ज्ञा १३.२१२. ३ चटकदार; मनोरंजक; आवडेलसें (भाषण). 'आतां टाकून बहुत शब्दजाळ । बोले रामकथा रसाळ ।' ३ बरका फणस यास दुसरें नांव. ४ गमतीचें; विनोदी; हास्यजनक (भाषण). ५ खमंग; चांगलें; मुरलेलें; चमचमीत (पाक, लोणचें, ओला पदार्थ) ७ रसिक; रसज्ञ. 'तूं सांग तो वर तुला रुचला रसाळे ।' -नल ९१. रसाळी-स्त्री. १ (व.) आंबरसाचें जेवण. 'अंबादासपंत खाड्याच्या येथें दरवर्षी एक रसाळी होते.' २ (कों.) उंसाच्या चरकाचें खालचें लांकूड, काठवट, रसिक-वि. १ मर्मज्ञ; गान, काव्य इ॰ रसावर विशेष प्रीति असून त्यांतील मर्म जाणतो तो; सहृदय. २ थट्टा-मस्करी, भाषण इ॰ द्वारा दुसऱ्याच्या आणि आपल्या अंतःकरणप्रवृत्तीस विनोद उत्पन्न करील असा. ३ गमत्या; विनोदी. ४ भावनाप्रधान. ५ चंवदार; स्वादिष्ट; मधुर. ६ (ल.) (काव्य) आल्हाददायक; सुखोत्पादक. [सं.] रसिकत्व-न. १ माधुर्य. २ रसिकता. -ज्ञा १८.३४७. रसिक रसीला-वि. रसाचा खरा खरा भोक्ता; इंष्कबाज. [रसिक + हिं. रसीला = रसदार] रसोत्पत्ति-स्त्री. १ रसाची उत्पत्ति, निर्मिति. २ विनोद; हास्य; करमणूक. [सं.]

दाते शब्दकोश

ध्यान

न. १ मनन; चिंतन. २ (विशेषतः) अष्टांग योगां- तील वृत्तिनिग्रहरूप अंग, प्रकार; मनाची एकाग्रता. ३ विषयाचें आकलन करण्याची शक्ति; लक्ष्य. 'हि गोष्ट ध्यानांत येत नाहीं.' ४ ईश्वराची मूर्ति किंवा चित्र इ॰ कांत आयुधभेद, वीरासनादि स्थितिभेद, उग्रता, सौम्यपणा इ॰ विशिष्ट गुणयुक्त दाखविलेलें स्वरूप, मुद्रा. 'हें ध्यान उग्र आहे, तें ध्यान सौम्य आहे.' 'सुंदर तें ध्यान उभें विटेवरी । कर कटावरी ठेवूनिया ।' -तुगा १. ५ परमेश्वराचें, एखाद्या देवेतेचें स्वरूपवर्णन करणारी कविता, पद इ॰ ६ (व्यापक) विशिष्ट रूप; ढब; मोडणी; डौल; चिन्ह; तर्‍हा; पद्धत. 'दोघे जण सावकारी करितात परंतु तें ध्यान निराळें हें ध्यान निराळें.' 'आमच्या गाण्याचें ध्यानच कांहीं निराळें.' ७ (उप.) गबाल व भोळसट मनुष्यः द्वाड व घाणेरडा मुलगा. 'श्रीमंताच्यापुढें हें ध्यान कां उभें राहणार?' -अस्तभा १९१. ८ लक्ष्य; सावधगिरी; अवधान. 'हे गडी खेळतील, विरं- गुळतील तिकडे ध्यान असूं द्या.' ९ स्मरण; आठवण स्मृति. 'हि गोष्ट मी ध्यानांत ठेविली.' १० शरीरावयवांची विषयग्रहणाविषयीं जागृति; भान जाग्यावर असणें; शुद्धि. 'मी निजून उठलों आहें अजून पुरता ध्यानावर आलों नाहीं.' ११ आवड; पसंति. 'म्यां जें केलें तें त्याच्या ध्यानास येत नाहीं.' [सं.] ध्यानांत घेणें, येणें-(एखादी गोष्ट) विचारांत, लक्ष्यांत घेणें. ध्यानांत येणें-(एखादी गोष्ट) पसंत पडणें; आवडणें; बरी अशी वाटणें. 'हें ऐकून मसलत सर्वांचे ध्यानांत आली.' -भाब ५ ध्यानास लागणें-(एखाद्या गोष्टीचा) ध्यास लागणें; (एखादी गोष्ट) डोक्यांत घोळविणें ध्यानींमनीं-क्रिवि. (ध्यानांत-मनांत) १ अंतःकर- णाच्या अनेक अवस्थाभेदांच्या ज्या वृत्ती त्यांपैकीं एका वृत्तींत (अकरणरूपीं प्रयोग). 'आज पाऊस पडेल हें माझ्या ध्यानींमनीं नढ तें म्हणून मी छत्रीवांचून बाहेर पडलों.' २ अवस्थाभेदांनीं होणार्‍या ज्या अंतःकरणाच्या अनेक वृत्ती त्या सर्वाना व्यापून. याच्या ध्यानींमनीं सर्वदा खेळ, म्हणून स्वप्नांत चावळला तरी बारा, तिरपगडें इ॰ बोलतो.' [ध्यान + मन] सामाशब्द- ॰धारणा- स्त्री. १ (एखाद्या वस्तूचें, मनुष्याचें) बाह्य स्वरूप, चर्या, मुद्रा. २ एकाग्रतेनें केलेलें चिंतन, मनन. (क्रि॰ धरणें; करणें). [ध्यान + धारणा] ॰निष्ठ-वि. ईश्वर स्वरूपाचें ध्यान करण्यांत तत्पर, गढ लेला; एकनिष्ठ, [ध्यान + सं. निष्ठा = निश्चययुक्त श्रद्धा] ॰मुद्रा- स्त्री. १ देवतेचें ध्यान करतेवेळीं धारण करावयाची मुद्रा, शरी- राची ठेवावयाची विशिष्ट स्थिति, बैठक, आसन. २ ध्यान करतें- वेळीं होणारी भ्रुकुटी वाकड्या होणें इ॰ प्रकारयुक्त मुद्रा; चर्या. [ध्यान + सं. मुद्रा = चर्या़] ॰योग-पु. ईश्वरप्राप्तीचें ध्यानरूप, साधन; अमूर्तचिंतन. [ध्यान + योग] ॰ध्यानस्थ-वि. १ ईश्वराचें ध्यान करण्यांत निमग्न झालेला, गढून गेलेला. 'देव आणि भक्त । तन्मय अति ध्यानस्थ ।' २ (अशिष्ट ध्यानस्त) विचार करण्यांत गुंग झालेला; विचारमग्न. 'तुम्हीं गोष्ट सांगितली तेव्हां मी घ्यानस्त होतों म्हणून ऐकिली नाहीं.' [ध्यान + सं. स्था = उभें राहणें]

दाते शब्दकोश

मन

न. १ चित्त; चित्शक्ति; बुद्धि, विचार, तर्क, स्मृति इ॰ चें अधिष्ठान; अंतःकरणचतुष्टय आणि अंतःकरण पंचक पहा. २ अंतःकरण; हृदय; भाव, रस, विकार इ॰ चें अधिष्ठान; सुखदुः खादिकांचें ज्ञान करून देणारें इंद्रिय. ३ सदसद्विवेकबुद्धि; बरें- वाईट समजण्याची शक्ति; अंतर्याम. 'ज्यांचे मन त्यास ग्वाही देतें.' ४ जाणीव; आत्मबोध; भान; सावधपणा; शुद्धि. ५ संकल्पवि- कल्पात्मक अंतःकरणवृत्ति; इच्छा; निश्चयाशक्ति. 'संकल्प विकल्प तेंचि मन ।' -दा १७.८.६. ६ आवड; अंतःकरणाची ओढ, प्रवृत्ति; खुषी; मर्जी. ७ माया ८ प्रेम; लक्ष. [सं.] 'तुजवरिमन ईंचे यापरी कां इयेला ।' -र ४२. ९. ध्यान. म्ह॰ १ मनीं वसें तें स्वप्नीं दिसे. २ मन राजा, मन प्रजा. ३ मनांत एक, जनांत एक. ४ मनांत मांडे, पदरांत धोंडे. ५ मनीं नाहीं भाव, देवा मला पाव. ६ मनीं वसे तें स्वप्नीं दिसें. ७ मान जना, अपमान मना. ८ मन जाणे पापा माय जाणे मुलाचे बापा. ९ मनास मानेल तो सौदा. (वाप्र.) ॰उठणें-उडणें-आवडेनासा होणें; कंटाळा, तिटकारा, वीट येणें. 'ह्या सखलादी अंगरख्यावरून अलीकडे माझें मन उडालें आहे.' ॰कांपणें-दुःख होणें; भीति वाटणें. 'व्यूढोरस्कादिक नव मेले, मन कांपतें कथायाला ।' -मोभीष्म ९.६२. ॰खचणें- कचरणें-हिंमत सुटणें; हातपाय गळाठणें. ॰खाणें-आपण केलेल्या वाईट कृत्याबद्दल स्वतःलाच वाईट वाटणें; टोंचणी लागणें; पश्चात्ताप होणें. ॰गडबडणें-भीतीनें भरणें; गांगारणें; घाबरणें 'गडबडतें मन वेडें, माणुस मीं मीं म्हणोनि बडबडतें ।' -मोशल्य ४.४९. ॰घालणें-देणें-लावणें-मन एकाग्र करणें; लक्ष लावणें. ॰जाणें-इच्छा होणें. ॰तुटणें-मनांत कंटाळा, अप्रीति उत्पन्न होणें; मन पराङ्मुख होणें. म्ह॰ तुटलें मन आणि फुटलें मोतीं सांधत नाहीं. ॰थोड्यासाठीं निसरडें करणें-क्षुल्लक फायद्या- साठीं निश्चयापासून पराङ्मुख होणें. ॰दुग्ध्यांत पडणें-संशयांत पडणें; गोंधळणें. 'आतां माझें मन दुग्ध्यांत पडलें.' -बाळ २.१९५. ॰धरणें-१ एखाद्याच्या मनाप्रमाणें वागणें. २ हांजी हांजी करणें. 'आदर देखोनि मन धरी । कीर्तीविण स्तुती करी ।' -दा २. १०.२५. ॰पाहणें-मनाची परिक्षा करणें; (एखाद्याच्या) मनाचा कल अजमावणें; एखाद्याचे विचार त्याचें भाषण, वागणूक इ॰ वरून ठरविणें. ॰बसणें-लागणें-(कांहीं गोष्ट करावयास) अनु- कूल होणें; अतिशय आवडणें; आसक्त होणें; प्रिय वाटूं लागणें. 'नको कचा मज टाकुनि जाऊं, तुजवरि मन हें बसलें रे ।' ॰मनाविणें-मन वळविणें; मर्जी संपादणें; अनुकूल करून घेणें. ॰मानेल तसें करणें-इच्छेस येईल तसें करणें; स्वैर वर्तन करणें; स्वच्छंदानें वागणें. ॰मारणें-इच्छा मारणें; इच्छा दाबून ठेवणें. ॰मिळणें-उभयतांच्या आवडीनिवडी सारख्या असणें. 'स्त्री- पुरुषांचीं मनें मिळालीं नाहींत तर त्यांचा संसार सुखावह होऊं । शकत नाहीं.' ॰मुंडणें-इच्छा नाहींशी करणें. 'आधीं मन मुंडा व्यर्थ मुंडितां मुंडा ।' -मृ ६५. ॰मोठें करणें-उदारपणा दाखविणें; थोरपणानें वागणें. ॰मोडणें-एखाद्याची आशा विफल करणें; एखाद्याच्या इच्छेविरुद्ध वागणें; दुःख देणें. 'जयाचेनि शब्दें मन मोडे । तो एक पढतमूर्ख ।' -दा २.१०.६. ॰विटणें-कंटाळा, वीट येणें. 'बहुवीरक्षय घडला, तेणें बहुजीवितास मन विटलें ।' -मोभीष्म ११.७४. मनांत आणणें-संकल्प, निश्चय करणें; मना- वर घेणें. मनांत (मनीं) कढविणें-मनांतल्या मनांत रागानें चूर करणें. जळफळावयास लावणें. 'निजतेजें भानुला मनीं कढवी ।' -मोविराट ३.१२०. मनांत (मनीं) कालवणें-अंतःकरणांत अति शय कष्टी होणें; अतिशय दुःख होणें. 'बहुत दुःख मनीं जरिं कालवें । भिउनि ह्यास तयास न बोलवे ।' मनांत गांठ ठेवणें-मनांत वैरभाव, द्वेषबुद्धि, सूड घेण्याची इच्छा जागृत ठेवणें; अढी धरणें. मनांत गांठ बांधणें-घालणें-नीट ध्यानांत धरून ठेवणें; मनांत गोष्ट पक्की ठेवणें. मनांत चरचरणें-मनास काळजी, भीति वाटणें; दुःख होणें. मनांत ठेवणें-एखादी गोष्ट गुप्त राखणें; वाच्यता न करणें. मनांत नवमण जळणें-मनांतल्या मनांत संतापणें; मनांत द्वेष, सूड घेण्याची इच्छा जागृत ठेवणें. मनांत भरणें-पसंत पडणें; आवडणें. मनांत (मनीं) मांडे खाणें- व्यर्थ मनोरथ करणें; मनोराज्य करणें. मनांत (मनीं) म्हणणें-स्वगत बोलणें; स्वतःशीं पुटपुटणें. मनांतल्या मनांत जळणें-आंतल्या आंत जळफळणें; रागानें धुसमत राहणें. मनांतून उतरणें-आवडेनासा होणें; कंटाळा, वीट येणें. मनानें करणें- (कोणाची सल्ला न घेतां) स्वतःच्या विचारानें करणें. मनानें घेणें-मनाचा ग्रह होणें; मत बनणें. मनाला द्रव येणें-मनांत दया, प्रेम इ॰ कोमल भावना उत्पन्न होणें. मनाला लावून घेणें-अतिशय दुःख वाटणें. 'कल्पनेला सुचतील त्या गोष्टी मनाला लावून घेत बसले म्हणजे खाल्लेलं अन्न सुद्धां अंगीं लागा- यचं नाहीं.' -एक ४३. मनावर घेणें-धरणें-एखादी गोष्ट पत्करणें; तींत मन घालणें; सिद्धिस नेण्यास झटणें. 'झटता तुझा सखा तरि होतें हित, परि न हा मनावरि घे ।' -मोभीष्म ३.३. मनावर लिहून ठेवणें-कायमची आठवण ठेवणें; स्मृति- पटलावर कोरून ठेवणें. मनास (मनां) आणणें-१ लक्ष देणें; मानून घेणें. 'आम्ही वेडें बगडें गातों मनाशीं आणा ।' -ऐपो १४२. २ समजून घेणें. 'म्हणे पैल ते कोण ललना । कां तप करिते आणीं मना ।' -ह २६.२९. ३ मनावर घेणें; महत्त्वाचें मानणें; 'मी रागाच्या वेळीं बोललों तें मनास आणूं नका.' मनास येणें-वाटणें-आवडणें; पसंत पडणें. 'वारूबाई! पाहिलीस कां भावजय? येते का मनास?' -पकोघे. मनीं ठेवणें-गुप्त ठेवणें. 'चाल पुरा, हें मनींच ठेवून ।' -मोविराट ६.५२. मनीं जाण होणें-ओळखणें; जाणणें. मनीं धरणें-वागविणें-लक्ष्यांत असूं देणें. 'ह्यालागीं तुम्हाशीं बोधिलें । मनीं धराल म्हणोनिया ।' मनींमानसीं-मनोमानसीं-मनोमनी नसणें-(एखादी गोष्ट) अगदी मनांत देखील आलेली नसणें; स्वप्नींहि नसणें. मनो मन(य) साक्ष-१ मन मनाची साक्ष देतें. ज्यांना परस्परांविषयीं तिटकारा किंवा प्रेम वाटतें अशा मनुष्यास उद्देशून योजतात; एखाद्या गोष्टीबद्दल एकमेकांचे विचार एकमेकांना अंतर्मनाने कळतात या अर्थीं. २ मन स्वतःसाक्षी आहे; स्वतःच्या मनांतील अभिप्राय, उद्देश, भाव इच्छा इ॰ स्वतःस माहीत असतात. साधित शब्द.- मनाचा-वि. मनासंबंधीं; अंतःकरणाचा. मनाची आशा- ओढ-धांव-स्त्री. मनाचा कल, रोंख. सामाशब्द- ॰उथळा- वि. मोकळ्या मनाचा, साधा; छक्केपंजे न जाणणारा. ॰ओळख- स्त्री. एखाद्याच्या मनाची परीक्षा; स्वभावाविषयीं बनविलेलें मत. 'कोणाशीं वाईट बोलूं नये. कां? तर मनओळख होते.' ॰कपटी- वि. दुष्ट अंतःकरणाचा; लबाड. मनःकल्पित-वि. कल्पनेनें, तर्कानें केलेलें; काल्पनिक. मनकवडा-पु. दुसऱ्याचें मन वेधून घेण्याची शक्ति. 'मन माझें मोहिलेंस नकळे आहे तुझ्यापशीं मन- कवडा ।' -प्रला १६१. -वि. दुसऱ्याच्या मनांतील विचार ओळखणारा. ॰कामना-स्त्री. अंतःकरणांतील इच्छा. [मन + कामना] ॰कुजका-वि. हलक्या मनाचा; दुष्ट; विश्वासघातकी. मनःकृत- करणाचा. मनखोडी-स्त्री. मनोविकार. 'देवनाथ तुज हात जोडि मनखोडी सकळ सांडी ।' -देप ६३. मनच्या मनीं-क्रिवि. मनांतल्या मनांत; आपलें म्हणणें काय आहे हें न सांगतां. ॰गाडून-क्रिवि. मन लावून; अंतःकरणपूर्वक; एकाग्रतेनें. ॰देवता-स्त्री. अंतःकरणांतील देवता. १ मन; अंतःकरणांतील तर्क, आशा इ॰ ची प्रेरक शक्ति (क्रि॰ लवणें; वाहणें). 'यंदा सस्ताई होईल कीं महागाई? तुमची मनदेवता कशी लवते?' २ सदसद्विवेकबुद्धि; न्यायबुद्धि. ॰धरणी-स्त्री. मर्जी संपादन करणें; आर्जव; खुशामत. (क्रि॰ करणें) ॰धरणीचा-वि. दुस- ऱ्याचीं आर्जवें, खुशामत करण्याचा ज्याचा स्वभाव आहे असा; मर्जी संपादणारा. ॰पाकुळका, मनाची पाकुळका, मन- पिंगळा-ळी-स्त्री. बऱ्यावाईट गोष्टी करण्याची प्रेरणा करणारी मनांतील देवता; मनोदेवता. मनःपीडा-स्त्री. मानसिक त्रास; दुःख, काळजी इ॰. मनःपूत-क्रिवि. (मनाला जें पवित्र, शुद्ध वाटतें त्याप्रमाणें) मनास येईल तसें; वाटेल तसें. 'कोणी वाटेल तें भलभलतें करूं लागला म्हणजे तो मनःपूत वागतो असें आपण म्हणतों.' -गीर १२५. म्ह॰ मनःपूतं समाचरेत् । मनःपूर्वक- क्रिवि. १ मनापासून २ जाणून बुजून; मुद्दाम. मनःप्रिय-वि. मनाला आनंद देणारें; समाधानकारक. मनभाव-पु. उत्सुकता; श्रद्धा; भक्ति; मनोभाव. 'मनभाव असल्यावांचून कार्य सिद्धिस जात नाहीं.' [सं. मनोभाव] ॰भूक-स्त्री. काल्पनिक, खोटी भूक; नेहमीच्या सरावामुळें वाटणारी भूक. ॰भोळा-वि. साधा; गरीब; निष्कपटी. ॰मन-स्त्री. (व) मनधरणी; खुशामत; आर्जव. ॰मानेसें-क्रिवि. मनास वाटेल तसें; मनःपूत. 'वर्तति मनमानेसें सुरतपदा अपतिका स्त्रिया बटकी ।' -मोसभा ६.२०. ॰मान्य- वि. स्वेच्छाचारी; स्वच्छंदी; बेताल. ॰मिळाऊ-वि. सर्वांशीं मिळून मिसळून राहणारा; गोड स्वभावाचा. ॰मुक्त-क्रिवि. यथेच्छ; अमर्यादपणें; मनमुराद; मनाची इच्छा पूर्ण होईपर्यंत. ॰मुराद- वि. १ मनोहर; आल्हादकारक; आनंददायक. २ विपुल; यथेच्छ; मनसोक्त; मनाची तृप्ति होईल इतकें (जेवणांतील पक्वान्न) [अर. मुराद = ईप्सित] ॰मेळ-वि. १ आवडतें; प्रिय; मनोहर. २ शास्त्र इ॰ चा फारसा विचार न करतां दोन्ही पक्षांच्या संमतीनें झालेलें (लग्न). ॰मोकळ-वि. खुल्या दिलाचा; सरळ; निष्कपट. ॰मोकळें करून-क्रिवि. खुल्या अंतःकरणानें; संकोच, भीति, लाज इ॰ सोडून. ॰मोठा-वि. १ उदार अंतःकरणाचा. २ उदार; सढळ; मोकळ्या हाताचा. ॰मोड-स्त्री. हिरमोड; निराशा. 'नको करूं मनमोड ।' -पला २२.४. ॰मोहतिर-न. मनाचा, मनानें ठरविलेला मुहूर्त; ॰मोहन-वि. मनाला खुष करणारा; रमणीय; आवडता; प्रिय. 'मनमोहन यादवराणा । कोणी जाउनि आणा ।' ॰मौज-स्त्री. १ गमतीचा विचार, कल्पना. २ लहर; नाद; छंद. ॰मौजा-करणें-स्वःच्या (रंगेल, अनिर्बंध) इच्छा तृप्त करणें. ॰मौजी-ज्या-वि. १. लहरी; छांदिष्ट; चंचलबुद्धि. २. मिजास- खोर; दिमाखी. ॰लज्जा-स्त्री. स्वाभविक, नैसर्गिक लाज; मनो- देवतेची टोंचणी; भीति; शरम; शिष्टाचार; संभावितपणा. 'तुला मनलज्जा नाहीं जनलज्जा तर धर.' ॰वळख-स्त्री. मनओळख पहा. ॰मनश्शांति-स्त्री. मनाची शांतता. ॰मनःसंतोष-पु. मनाचें समाधान; मनास होणारा आनंद. मनसमजावणी-समजा वशी-स्त्री. रागावलेल्या, दुःखी, सचित माणसाचें सांत्वन, समा- धान करणें. ॰समजूत-स्त्री. ग्रह; मत; समज; भावना. 'सर्व मनुष्यांची मनसमजूत एकसारखी असत नाहीं.' ॰समर्पण-न. (काव्य) मन अर्पण करणें. मनसाराम-पु. (विनोदानें) मन. 'मनसारामाचे स्वाधीन सर्व इंद्रियें आहेत.' ॰सुटका-स्त्री. मन एखाद्या गोष्टीपासून परावृत्त होणें. ॰सूत्र-न. इच्छानुरूप सत्ता चालविणारें, वागणारें, मन. ॰सोक्त-क्रिवि. यथेच्छ; स्वैर; स्वच्छंद. मनःपूत पहा. 'पशुपक्षी यांचा मनसोक्त व्यवहार आहे.' ॰सोद्दिष्ट-वि. मनांत योजिलेलें, ठरविलेलें, निश्चित केलेलें. मनस्तप्त-वि. १ दुःखदायक. २ अनुतापी; दुःखपीडित. मन- स्ताप-पु. (मनाला होणारा त्रास) दुःख; शोक; पश्चात्ताप; हुर- हुर; खिन्नता इ॰ मन(नः)स्थिति-स्त्री. १ मनाची स्थिति; मान- सिक अवस्था, भावना. २ मन. 'माझी मनस्थिति चंचल आहे.' ॰हलका-वि. दुर्बल; क्षुद्र मनाचा. ॰मनाकळित-वि. मनानें आकलन केलेलें. मनाजीपंत-पु. (विनोदानें) मन. मनाजोगा-वि. जसा हवा तसा; मनासारखा. मनापासून- क्रिवि. खरोखरी; बेंबीच्या देंठापासून; अतिशय; फार. मनापून- क्रिवि. खरोखरीं. मनायोग-ग्य-वि. क्रिवि. स्वेच्छेनें; मर्जीप्रमाणें. मना- सारखा-वि. इच्छेसारखा; आवडीचा; जसा पाहिजे तसा. मनुबाई-स्त्री. मन. मनेच्छ-च्छां-क्रिवि. मनसोक्त; यथेच्छ; मनाचें समाधान होईपर्यंत. 'नदी पुलिनी गंगातिरीं । क्रिडा करिती मनेच्छां ।' [मन + इच्छा] मनेच्छा-स्त्री. मनाची इच्छा; प्रवृत्ति, कल मनेप्सित-न. मनोवांछा; मनाची इच्छा. -. -वि. मनानें इच्छिलेलें; मनोवांछित. [मन + ईप्सित्] मनोगत-न. मनीषा; हेतु; उद्देश; विचार; इच्छा. 'श्रीकृष्णवासातें वांछिती । जाणे श्रीपती मनोगत ।' -एरुस्व १५.१३८. -वि. मनांत असलेलें; ठरविलेलें. 'कुंभाराचा मनोगत जो आकार असतो तो घटावर उत्पन्न होत असतो.' मनोगति-स्त्री. १ मनाची वृत्ति, क्रिया, विचार. २ मनाचा, विचाराचा प्रवेश, पोंच; मनाची धांव; आक- लन. ३ इच्छेचा कल, प्रवृत्ति. 'हा आपल्या मनोगतीनें चालतो- वागतो-करतो.' -वि. मनाप्रमाणें वागणारा, चालणारा; विचारा- प्रमाणें चंचल. -क्रिवि. मनाच्या गतीप्रमाणें; अतिशय, कल्पना- तीत वेगानें. 'आला गेला मनोगती ।' -मारुतिस्तोत्र. मनोगम्य- वि. मनाला जाणतां येण्यासारखें; मनानें आकलन होण्या- सारखें. मनोज-पु. मदन; काम. 'मनोज मध्यस्थ करूं निघाला । ' -सारूह २.६०. मनोजय-पु. मनाचा जय; आत्मनिग्रह; मनो- निग्रह. 'तैसा मनोजयें प्रचारु । बुद्धीद्रियांचा ।' -ज्ञा १६.१८४. मनोजव-वि. मनाच्या गतीनें जाणारा; फार त्वरेनें जाणारा. मनोत्साह-पु. मानसिक उत्साह; आनंद; आवड. 'ज्याचा जसा मनोत्साह तसें तो करितो.' मनोदय-पु. १ हेतु; विचार; आशय. २ इच्छा कल, प्रवृत्ति. मनोद्देश-पु. मनांतील योजना, हेतु, बेत, विचार. मनोधर्म-पु. १ (प्रेम, द्वेष, काम, क्रोध, मत्सर इ॰) अंतःकरणाची भावना, विकार. 'न निघे मनोधर्मीं । अरोचक ।' -ज्ञा १८.६५७. २ मनाची शक्ति (विचार, कल्पना, सदसद्विवेकबुद्धी इ॰). ३ (सामा.) चित्तवृत्ति; मनोगुण. 'आहार मिळाल्या उत्तम । हरिखेजेना मनोधर्म ।' -एभा १८.२३६. ४ मनाचा चंचलता. 'तंव आंतु त्राय मोडे । मनोधर्माची ।' -ज्ञा ६.२११. ५ हेतु; बेत; विचार -वि. मनोगतीप्रमाणें वागणारा. 'सहचरु मनोधर्मु । देवाचा जो ।' -ज्ञा १७.३३. मनोधारण- णा-नस्त्री, मन राखणें; मनधरणी. मनोनिग्रह-पु. मनाला ताब्यांत ठेवणें; मनोजय; संयमन. मनोनीत-वि. मनानें पसंत केलेलें, स्वीकारिलेलें. मनोनुकूल-वि. एखाद्याच्या मनाप्रमाणें; मनाला पसंत पडण्यासारखें. मनोनुभूत-वि. मनानें अनुभविलेलें, सहन केलेलें, उपभोगिलेलें मनोभंग-पु. इच्छा बेत, आशा इ॰ फलद्रूप न होणें; निराशा. मनोभव-पु. १ मदन; काम. २ कामेच्छा; विषयेच्छा. मनोभाव-पु. १ हेतु; विचार. २ भक्ति; श्रद्धा. ३ प्रीति. मनोभावें, मनोभावें करून, मनोभावा- पासून, मनोभावानें-क्रिवि. अंतःकरणपूर्वक; मनापासून; श्रद्धेनें. 'मनोभावें ईश्वराची सेवा करावी.' मनोभिराम-वि. मनाला तुष्ट करणारा; आनंददायक; मोहक; चित्ताकर्षक. 'तेव्हां तरी तारकशक्ति राम । देईल आम्हासि मनोभिराम ।' मनोमय-वि. मनःकल्पित; काल्पनिक; अंतःकरणांतील; मानसिक. मनोमय- कोश-पु. चैतन्याच्या पांच (अन्न-प्राण-मन-विज्ञान-आनंद) कोशांपैकीं तिसरा. पंचकोश पहा. मनोमयसत्यवाद-पु. एकाच वस्तूविषयीं निरनिराळ्या लोकांच्या मनांत सारख्याच कल्पना असतात असें मत; सादृश्यवाद. (इं.) कन्सेप्च्युअ/?/लिझम्. -नीति ४०६. मनोयोग-पु. मन लागणें; लक्ष्य; अवधान. मनोयोग्य- वि. मनपसंत; समाधानकारक; संतोषकारक. मनोरंजक-वि. मनाला रमविणारें; करमणूक करणारें; चित्ताकर्षक. मनोरंजन- न. १ करमणूक; गंमत; मौज. २ मनास वाटणारा आनंद, उल्हास. मनोरथ-पु. इच्छा; बेत; हेतु; उद्देश; योजना. 'तोषूनियां वैकुंठनायक । मनोरथ पूर्ण करील ।' -व्यं ५. मनोरथ-सृष्टी- स्त्री. मनोराज्य; काल्पनिक सृष्टि. मनोरम-वि. १ मनाला रम- विणारें; मोहक. २ आनंददायक; संतोषकारक; मनोरमा-स्त्री. १ सुंदर स्त्री. २ (संकेतानें) बायको; पत्नी. मनोराज्य-न. भावी उत्कर्षाविषयींचे कल्पनातरंग; हवेंतील मनोरे. मनोविकार, मनोविकृति-पुस्त्री. मनांत उद्भवणारे कामक्रोधादि विकार प्रत्येकीं; भावना; मनोवृत्ति. मनोवृत्ति-स्त्री. १ मनाची स्थिति; चित्तवृत्ति; स्वभाव. २ मनाचा व्यापार; विचार, भावना, विकार इ॰ 'ह्या मनोवृत्ति देवपरायण झाल्या.' मनोवेग-पु. मनाची गति; अत्यंत जलद गति. मनोगति पहा. 'मनोवेगें तात्कालीं । पातले विश्वेश्वराजवळी ।' -गुच ४१.१५७ मनोवेद्य-वि. मनानें, अंतःकरणानें जाणतां येण्याजोगें. मनोव्यापार-पु. मानसिक संकल्पादि व्यवहार; विकार, विचार इ॰ मनोहत-वि. निराश; हताश. मनोहर-पु. व्यंकोबाचा प्रसाद (नैवेद्य) -तीप्र २५२. -वि. मोहक; आल्हादकारक; रमणीय; सुंदर. मनोहारी, मनोज्ञ-वि. चित्ताकर्षक; रमणीय; सुंदर; मोहक. मनौनि-क्रिवि. मनापासून; मनांतून 'तैसें मनौनि धनवरी । विद्यमानें आल्या अवसरी ।' -ज्ञा १६.८७. मनौरें-रा-न.पु. मनाची इच्छा. 'कां जे लळेयाचे लळे सरती । मनोरथांचे मनौरे पुरती ।' -ज्ञा ९ ३. बरव्या मनानें-क्रिवि. शुद्ध मनानें; चांगल्या, प्रामाणिक हेतूनें. 'सीता स्वयंवर असें बरव्या मनानें अवलक्षुनि शास्त्र अव- लोकिलें.' मोकळ्या मनानें-क्रिवि. खुल्या दिलानें; स्वतःचें मन, हेतु, भावना इ॰ स्पष्ट रीतीनें सांगून; मन मोकळें करून.

दाते शब्दकोश

गज

पु. हत्ती. [सं.] सामाशब्द-॰कर्णी-वि. हत्तीप्रमाणें कान असलेला. ॰कुंभ-न. हत्तीचें गंडस्थळ. 'स्वर्गातें गजकुंभ भेदुनिन कीं सत्कीर्ति ही धाडिली ।' -वैराग्यशतक, श्लोक ४३. ॰कोंत-पु. १ हत्तीचें गंडस्थळ (?) 'सांबळी झेलितां । गजकोंतीं गुसळितां ।' -शिशु १०४५. २ हत्तीला टोंचण्याचा भाला. [गज + सं. कुंत; म. कोंत = भाला] ॰क्रीडित(करण)-न. (नृत्य) हात अंचित करून कमरेवर ठेवणें, उजवा हात लताहस्त करणें, उजवा पाय दोलित करणें. [सं.] ॰गति-स्त्री. (हत्तीची चाल) गंभीर व रुबाबदार चाल; डौलदार गति, चालणें; ठुमकत जाणें; ऐश्वर्यवान ठमका, तोरा. 'गजगती जगतीप्रति दाविते ।' -वामन, सीतास्वंयवर ५९. 'ठुमकत मुरडत चाले गजगतीं ।' -शांकुतल. -वि. रुबाबदार चालीचा; गजगतीनें विशिष्ट. [सं.] ॰गमा-गामिनी-स्त्री. गज- गतीनें, ऐटीनें चालणारी स्त्री; गजगति स्त्री. [सं.] ॰गौर-री- स्त्री. हत्तीवर ठेवून पूजिलेली पार्वतीची मूर्ति; गजारूढ गौरी. ॰गौरीव्रत-न. १ भाद्रपदांतील स्त्रियांचें एक व्रत; हस्तनक्षत्रीं सूर्यप्रवेश होण्याच्या वेळचें व्रत. यांत सोन्याच्या शंकर, पार्वती व गणपती यांच्या मूर्ती करून त्या सोन्याच्या हत्तीवर बसवून ब्राह्म- णास दान देतात. २ हत्तीवर बसविलेल्या पार्वतीचें पूजन. ॰घंटा- स्त्री. हत्तींचा कळप, समुदाय. 'जैसें न गणिजे पंचाननें । गजघंटांतें ।' -ज्ञा १.९२. [सं. घटा = कळप] ॰घंटा-घांट-स्त्री. १ हत्तीच्या गळ्यांतील घांट. २ (ल.) वाचाट; कर्कश; कजाग स्त्री; (विशेषतः) मोठ्यानें भाषण करणारी स्त्री. ३ गुप्त गोष्ट फोडणारा मनुष्य; ष्याच्या पोटांत कांहीं रहात नाहीं असा. [तुल॰ का. गज्जे = घंटा] ॰चर्म-न. १ हत्तीचें कातडें. २ घोड्याचा एक रोग, यांत अंग वारंवार झाडणें, अंगावर चट्टे पडणें व हत्तीच्या अंगाप्रमाणें अंग खरखरीत होणें हीं लक्षणें होतात. -अश्वप २.२५२. ॰छाया-छायापर्व-स्त्रीन भाद्रपदी अमावस्येला सूर्य व चंद्र हस्तनक्षत्रीं येणें, अशा योगाची पर्वणी; हस्तनक्षत्रीं सूर्य असतां मघानक्षत्रयुक्त त्रयोदशीं येणें या योगासहि गजच्छा यापर्व म्हणतात. ॰झंपा-पु. (ताल) एकताल; याच्या मात्रा पंधरा व विभाग चार असतात. ॰ढाल-ला-ळा-स्त्री. हत्तीवरील मोठा ध्वज; निशाण. 'गजढाला आंदोळती ।' -जै ६७.४८. -पु. निशाणाचा हत्ती. 'लाविला गजढाळा ।' -ऐपो १४. [ढाल = निशाण] ॰दंत-पु. १ (हत्तीचा दांत) हस्तिदंत. २ घोड्याचा हत्ती- सारखा बाहेर आलेला दांत, सुळा; असा घोडा (हा अशुभकारक मानितात). -अश्वप १.१०५. ३ (संयुक्तहस्त) (नृत्य) खांद्या- इतक्या सरळ रेषेंत दोन्ही हातांचीं कोंपरे उंच करणें व डोक्याच्या प्रत्येक बाजूस हाताचीं बोटें एकमेकांस चिकटवून उंच करून त्यांस थोडा खळगा पाडणें. गंजदर-वि. गजेंदर; गजेंद्र पहा. गजनख- न. हत्तीच्या पायाचें नख (हें औषध असतें). ॰नेत्र-त्री-वि. १ हत्तीच्या डोळ्याप्रमाणें डोळे असणारा; बारीक, मिचमिच्या डोळ्यांचा. २ अधु दृष्टिचा; उलट्या बाहुल्या असलेला. ॰पति- पु. १ हत्तींचा धनी; हत्ती बाळगणारा ऐश्वर्यवान माणूस. २ गज- दळाचा सेनापति. ३ (विनोदार्थी) धोतराऐवजीं गजा (पंचा) नेसलेला. ४. 'कां मांदुरी लोकांची घोडा । गजपतिही मानी थोडा ।' -ज्ञा १६.२२५. ५ ओरिसा येथील राजांचे बिरुद. ॰पिंपळी-स्त्री. १ एक औषधी झाड; मिरवेल. २ मिरवेलीवर आलेल्या शेंगा (औषधी). ॰भार-पु. गजदळाचा समावेश असलेलें सैन्य. २ हत्तींचा कळप, झुंड. ॰मस्तकारूढ- वि. १ हत्तीच्या गंडस्थळावर बसलेला. २ (ल.) अतिशय गर्विष्ठ; मगरूर. ॰मुख-न हत्तीचें तोंड. -पु. गणपती देवता. 'नमिला गजमुख ज्याचें सेवुनि मृदु मधुर बोल कानांहीं ।' -मोस्फुटआर्या (नवनीत पृ. २५४). ॰मृत्तिका-स्त्री. (एका विशिष्ट अनुष्ठानांत लागणारी) हत्तीच्या पायाखालची माती; मृत्तिका पहा. ॰राज- पु. मोठा हत्ती; हत्तीच्या बहुमानानें म्हणतात. 'घेतोचि घांस गज- राज कशी बढाई ।।' ॰वदन-पु. गणपती देव. ॰वेल-स्त्री. तांदुळाची एक जात. ॰श्रद्धा-स्त्री. प्रारंभीं मोठा डौल किंवा गाजावाजा दाखविणारें पण परिणामीं अगदींच क्षुद्र ठरणारें काम किंवा त्याचा प्रकार; भपकेदार व विस्तृत पण निरर्थक काम; डोंगर पोखरून उंदीर काढणें. 'हा या प्रयोजनीं हजार रुपये खर्च करील असा डौल दिसतो खरा परंतु शेवटीं गजश्रद्धा झाली नाहीं म्हणजे पुरे !' [गज + श्रद्धा] ॰सिंहासन-न. हत्तीच्या आकाराचें आसन. ॰स्कंधी बसणें-नवीन मिळालेल्या वैभवांत पहिली ओळख विसरणें; गर्वानें फुगणें; आढ्यताखोर होणें. ॰स्नान-न. (हत्तीस स्नान घातल्यावर किंवा त्यानें स्वतः सोंडेनें स्नान केल्यावर तो आपल्या अंगावर पुन्हां धूळ, चिखल उडवितो त्यावरून) निष्फळ प्रयत्न; विपरीत फळ मिळालेला प्रयत्न; बरें होण्याकरितां योजले असतां उलट रोग वाढविणारे उपाय. गंजात लक्ष्मी-स्त्री. १ दाराशीं हत्ती झुलण्याइतकी म्हणजे हत्ती पोसण्याइतकी श्रीमंती; अतोनात श्रीमंती, वैभव. २ (विनोदानें) अतिशय दारीद्र्य; धोतर विकत घेण्यास पैका नसल्यानें गजा (पंचा) विकत घेण्याची पाळी येणें. ३ (विनोदानें) अंगावरील गजकर्ण; नायटे. 'तुला गजांतलक्ष्मी प्राप्त झाली !' [गज + अंत + लक्ष्मी]

दाते शब्दकोश

कर्म

न. १ एखादें काम, कृत्य. 'हें कर्म झालें समरांत जेव्हां । होतास कोठें रणभीरु तेव्हां ।' -वेणीसंहार ३. २. स्नान- संध्या, यज्ञयागादि धार्मिक विधि; याचे नित्य, नैमित्तिक व काम्य असे तीन भेद आहेत. ३ सांप्रतच्या आयुष्यांतील कृति, चाल, आचार, वर्तणूक; यावरून दैव किंवा नशीब अशा अर्थानें योजतात-येथें दैव म्हणजे पूर्वजन्मार्जित पापपुण्याचा भोगवटा होय; पूर्वजन्मकृत आचरण; संचित. 'अरे अरेकर्मा । बारा वर्षें झालीं याच धर्मा ।।' 'या व्यापारांत मीं साफ बुडालों, माझें कर्म ! दुसरें काय ?' 'कर्मबलिवंत', 'कर्मबलवत्तर' 'घोर-कठिण कर्म' या संज्ञा कर्माचें (दैवाचें) वर्चस्व, काठिण्य, निष्ठुरता दाखवितात. ४ विशिष्ट काम; नैतिक कर्तव्य; जाति, धंदा वगैरेंनीं मान- लेलें आवश्यक कृत्य. ५ (व्या.) कर्त्यानें अमुक क्रिया केली हें दाखविणारा शब्द; कर्तृविषयक व्यापाराचें कारक; कर्माची विभक्ति प्रायः द्वितीया असते. 'रामा गाय बांधतो' यांत गाय हें कर्म. ६ उद्योग; कामधंदा; नेमलेलें, विशिष्ट प्रकराचें काम. ७ सुरतक्रिडा; मैथुन; रतिसुख; संभोग. 'त्यानें तिच्याशीं कर्म केलें.' ८ सामान्य क्रिया; ऐहिक व्यापार; मायिक क्रिया. 'माया हा सामान्य शब्द असून तिच्याच देखाव्याला नामरूपें व व्यापाराला कर्म हीं विशिष्टार्थक नामें आहेत.' -गीर २६०. [सं.] (वाप्र.) कर्म दोन पावलें पुढें-नशीब नेहमीं आपल्यापुढें धांवत असतें. ॰आड ठाकणें-कर्म आडवें येणें; आपत्ति ओढवणें. 'अन्न घेवोनि जों निघाली । तों कर्म आड ठाकलें ।' -ह १६.१३०. कर्मानें ओढणें-ओढवणें-दैवाचा पाश येऊन पडणें; दैवाधीन होणें. -नें जागें होणें-दैव अनुकूल होणें. -नें धांव घेणें-दैव पुढें येणें; दैवाकडून प्रतिबंध, अडथळा होणें. -नें पाठ पुरविणें- उभें राहणें-दैवानें मोडता, अडथळा घालणें; कर्म ओढवणें. -नें मागें घेणें-सरणें-दैवानें साहाय्यने करणें; केल्या कर्माचें फळ-न. केलेल्या कृत्याचा परिणाम. 'केल्या कर्माचें फळ बापा । ऐश्वर्य तुज देतील ।' -अमृत, नव ४४३. (सामाशब्द) ॰कचाट- न. प्रारब्धामुळें मागें लागलेलें दुर्दैव, संकट, विपन्नावस्था; कर्म- कटकट; पूर्व जन्मीचें पाप, भोग. 'प्राणी कष्टकष्टोंचि मेले । कर्मकचाटें ।' -दा १८.८.२०. [सं. कर्म + म. कचाट] ॰कटकट- खटखट-स्त्री. १ प्रारब्धयोगानें वांट्यास आलेलें किंवा गळ्यांत पडलेलें व कंटाळा येण्याजोगें कोणतेंहि काम; वरचेवर त्रास देणारें, डोकें उठविणारें, अडथळा आणणारें काम किंवा व्यक्ति; कोणतीहि नशीबीं आलेली पीडा, त्रास, छळ, जाच वगैरे. २ (ल.) जिकिरीचें, नावडतें काम; व्याद. 'मी म्हातारा झालों, माझ्यामागें ही शिकविण्याची कर्म कटकट कशाला ?' 'आतां त्यांची कर्मकटकट आपणांस कशाला हवी' -नि ६७. ३ (ल.) भांडण; तंटा; कटकट. 'तुम्हां दोघांत नेहमीं इतकी कर्मकटकट चालत असते.' -भा ३७. ॰कट्टो-वि. (गो.) हतभागी; कर्मकरंटा. ॰कथन-नी-न. १ कर्मकथा; कर्माची कहाणी. २ (ल.) दुर्दैवी प्रसंगकथन; दुःखदकथा; कर्मकथा पहा. 'ऐसी आमुची कर्मकथनी । तें अनायासें आलें सर्व घडोनी ।' -मक २६. १८५. [सं.] ॰कथा-स्त्री. १ प्रारब्धामुळें भोगलेल्या दुःख, त्रास, दगदग, वगैरेची दुसर्‍याजवळ सांगितलेली गोष्ट, वृत्तांत, कहाणी. २ आत्मश्लाघेचें किंवा रिकामटेकडें भाषण; बाता. ३ एखाद्या प्रसंगाची किंवा कृत्याची खरी व इत्थंभूत हकीकत. ४ कंटाळवाणें, निरर्थक भाषण, बडबड. [सं.] ॰कपाट-न. कर्म- कचाट पहा. [सं.] ॰कहाणी-स्त्री. कर्मकथा पहा. ॰कांड- न. त्रिकांड वेदांतील यज्ञासंबंधींचा कर्ममार्गदर्शक व आचारनिद- र्शक भाग; -मंत्र व ब्राह्मणें मिळून जो वेदभाग त्यास कर्मकांड व उपनिषदांस ज्ञानकांड म्हणतात. 'कर्म कांड तरी जाणें । मुखोद्गत पुराणें ।' -ज्ञा १३.८२८. २ धर्मकर्में, आचारविचार, संस्कार वगैरेना व्यापक अर्थानें हा शब्द लावितात. (सामा.) आन्हिक; नित्यनैमित्तिक आचार. 'कृष्णगीत रुचतां श्रवणातें । कर्मकांड रुचि न दे कवणातें ।।' 'आतां आपलें कर्मकांड अगदीं एकाबाजूस ठेवावें.' -चंद्रगुप्त ३५. ३ कंटाळवाणी, निरर्थक बडबड; कर्मकथा. (क्रि॰ गाणें; सांगणें; बोलणें). ॰कार-वि. १ (गो.) कर्मनिष्ठ. २ शिल्पी; लोहार. [सं.] ॰काल-ळ-पु. धर्मकार्यें करण्यास उचित असलेला काळ, वेळ, समय. [सं.] ॰केरसुणी-स्त्री. कर्मरूपी केर सरसकट झाडणारी, कर्मापासून सोडविणारी केरसुणी. 'तेव्हां तेचि श्रद्धा होये । कर्मकेरसुणी ।' -ज्ञा १७.६४. ॰गति- स्त्री. दैव; प्रारब्ध; नशीब. दैवगति पहा. [सं.] ॰चंडाळ- चांडाळ-पु. (कृत्यानें) निवळ चांडाळ. १ अतिक्रूर, पाषाणहृदयी माणूस. २ स्वैर वर्तनी; धर्मलंड; दुरात्मा. [सं.] ॰चोदना- स्त्री. कर्म करण्याची प्रेरणा. 'कर्मचोदना व कर्मसंग्रह हे शब्द पारिभाषिक आहेत.' -गीर ८३५. [सं.] ॰ज-वि. कर्मापासून उत्पन्न झालेलें. 'सकळ यज्ञ कर्मज' -ज्ञा ८.४६. [सं.] ॰जड-पु. कर्मठ लोक. 'तिन्हीं लोकांचा शास्ता । ईश्वर तो मी नियंता । येणें कर्मजडांची वार्ता । अनीश्वरता छेदिली ।' -एभा १०.६२१. ॰जात-न. सर्व प्रकारचें कर्म; सर्व तर्‍हेचे व्यापार. 'मग सस्य फळपाकांत । तैसें निमालिया कर्मजात । आत्मज्ञान गिंवसित । अपैसें ये ।' -ज्ञा १८.१२९. [सं.] ॰जीव-वि. (गो.) बारीक, लहान प्राणी. ॰दक्ष-वि. धर्माचार व विधि यांत निपुण; कर्मठ; कर्मशील; कर्मनिष्ठ, कर्मिष्ठ यांसारखा उपयोग. 'कर्मदक्षा कर्ममोचका । जयराम कोदंड भंजना ।' [सं.] ॰धर्म-न. (क्क.) पु. (यासमासांतील धर्म शब्द जरी पुल्लिंगी असला तरी बहुतेक सर्व समास नपुंसकलिंगीच आहेत; कारण यांतील प्रधानार्थ कर्म शब्दापासूनच निघालेला असून धर्म शब्द केवळ जोडशब्द आहे) वर्तन; वर्तनक्रम; कृत्य; आचरण. 'जसें ज्याचें कर्मधर्म तशी त्यास फलप्राप्ति,' 'कर्माधर्मानें कोण्ही संपत्ति भोगतो आणि गादीवर बसतो, कोण्ही फांशी जातो.'; 'कोण्हाच्या कर्मधर्मांत कोण्हाचा वांटा नाहीं.' = प्रत्येकाला स्वतःच्या कृत्याबद्दल झाडा दिला पाहिजे. ॰धर्मगुण-पु. कर्म- धर्माचा प्रभाव, शक्ति. कर्मधर्मसंयोग पहा. [सं.] ॰धर्मविर- हित-वि. धर्माज्ञा, धार्मिक व्रतें व कृत्यें ज्यानें सोडलीं आहेत किंवा जो त्यापासून मुक्त झाला आहे असा; ऋषि किंवा साधुजन यांना चांगल्या अर्थीं व उच्छृंखल व धर्मलंड यांना वाईट अर्थीं लावतात. 'आम्हीं कर्मातीत झालों म्हणती' या शब्दाचा अर्थ दोन्हीं प्रकारचा म्हणजे चांगला व वाईटहि आहे. 'झालों कर्म- धर्मविरहित । मना आवडे तो भोग भोगित ।' [सं.] ॰धर्म- संयोग-धर्मयोग-पु. १ स्वतःचें दैव आणि सत्कर्म यांचा संयोग; भाग्य व सदाचार यांचें ऐक्य (पूर्वजन्मार्जित आणि इहजन्मार्जित सत्कृत्यांचें फळ मिळून) २ अकल्पित मेळ; यदृच्छा; प्रारब्धयोग. ॰धर्मसंयोगानें-क्रिवि. अचानक; चम- त्कारिक किंवा अकल्पित मेळ मिळून येऊन; प्रसंगोपात्त; प्रारब्ध- योगानें. 'कर्मधर्मसंयोगानें मी अगदीं सहज बाहेर गेलों तों माझी नजर तिच्याकडे गेली.' -मायेचा बाजार. 'कर्मधर्मसंयोगानें तुमची गांठ पडली आहे तर गोड बोलून काळ लोटावा.' ॰धारय समास-पु. (व्या.) वक्त्याच्या मनांत उभय शब्दांचा भाव ज्यांत समान असतो किंवा उभय शब्दांचा परस्पर उप- मानोपमेयभावसंबंध ज्यांत असतो तो; विशेष्य-विशेषणांचें सान्निध्य असून त्यांचा जो समास घडतो तो; उदा॰ 'भक्तिमार्ग = भक्ति तोच मार्ग, किंवा भक्तिरूप जो मार्ग तो; भवसागर; संसारा- टवि; काळपुरुष.' -मराठीभाषेचेंव्या. २७५. तत्पुरुषसमासाचा एक भेद. [सं.] ॰निष्ठ-वि. कर्मठ पहा. 'जया लाभाचिया आशा । करूनि धैर्यबाहूंचा भरंवसा । घालीत षट्कर्मांचा धारसा । कर्मनिष्ठ ।' -ज्ञा ६.४७४. [सं.] ॰निष्ठा-स्त्री. १ कर्मावर निष्ठा. २ कर्म- योग. 'वैदिक धर्मांत...दोन मार्ग...आहेत, पैकीं एका मार्गास...ज्ञाननिष्ठा व... दुसर्‍यास कर्मयोग किंवा संक्षेपानें नुसता योग अगर कर्मनिष्ठा असें म्हणतात. -गीर ३०१. [सं.] ॰न्यास-पु. १ कर्म किंवा कृत्यें त्याग (पुढील जन्मीं हित व्हावें किंवा फळ मिळावें म्हणून). २ फलन्यास; कर्मा- पासून मिळणार्‍या फलाविषयींच्या इच्छेचा किंवा आशेचा त्याग; निष्कामकर्म. [सं.] ॰फल-न. प्रारब्धापासून मिळणारें फळ; पूर्वजन्मीं केलेल्या पापपुण्याचें चांगलें अगर वाईट असें या जन्मीं भोगावें लागणारें फळ. 'सांडूनि दुधाचि टकळी । गोंवारी गांवधेनु वेंटाळी । किंबहुना कर्मफळीं । तैसें कीजे ।' -ज्ञा १८.१७४. [सं.] ॰फुटका-वि. भाग्यहीन; दुर्दैवी; कमनशिबाचा; अभागी. [कर्म + फुटणें] ॰फुटणें-सक्रि. दुर्दैव ओढवणें; गोत्यांत येणें; नुकसान होणें. ॰बंध-पु. फलाशेनें केलेल्या कर्मामुळें प्राप्त झालेलें बंधन; प्रारब्धप्राप्त स्थिति; मायिक पसारा; ऐहिक मायापाश; प्रपंच; संसार. 'जो पहुडला स्वानंदसागरीं । कर्मबंधीं न पडे तो ।' [सं.] ॰बंधु-पु. व्ययसायबंधु; समव्यवसायी; एकाच प्रकारचें काम करणारा. [सं.] ॰भुवन-न. कर्मरूप घर. 'तेथ न्यावो आणि अन्यावो । हा द्विविधु साधूनि आवो । उभवितां न लवी खेंवो । कर्मभुवनें ।' -ज्ञा १८.४५५. [सं.] ॰भूमि, भूमिका -स्त्री. १ इहलोक; मृत्युलोक; यज्ञादि धार्मिक कृत्यें जेथें करतां येतात ती जागा; कर्म करावयाचें क्षेत्र; रंगभूमि (मर्त्यांची). 'जेथें मनाचा प्रवेशु नाहीं । त्यांची पायवाट ते ठायीं । ऐसें स्वइच्छा विचारितां महीं । आले ते पाही कर्मभूमीसी' -एभा २.१८४. 'परम प्रतापी दशरथपिता । कर्मभूमीस येईल मागुता ।' -रावि १६.८६. [सं.] २ प्राधान्यानें भारतवर्ष. -हंको. ॰भोग-पु. भवितव्य- तेच्या नियामानुरूप मिळणारीं सुखदुःखें सोसणें; दैवाची भरपाई; पूर्वसंचितानुरूप या जन्मीं प्राप्त होणारी स्थिति. 'माझा कर्मभोग चुकत नाहीं.' [सं.] ॰भ्रष्ट-वि. धर्मशास्त्रविहित नित्यनैमित्तिक कर्मांचें आचरण न करणारा; धर्माज्ञा व धर्मकर्म परिपालनाविषयीं उदासीन; कर्तव्यच्युत; कर्तव्यपराङ्मुख. [सं.] ॰मार्ग-पु. १ स्नानसंध्या इ॰ कर्में करण्याची रीत; यज्ञयागादि कर्मरूप ईश्वर- प्राप्तीचा किंवा मोक्षाचा साधनीभूत मार्ग; सत्कृत्यें केल्यानें व धर्माचरणानें मोक्षाला जाण्याचा मार्ग. २ धर्मकृत्यें करण्याचा खरा मार्ग. ३ श्रौत म्हणजे यज्ञयागादि कार्मांचा मार्ग. 'भारतीय तत्त्वज्ञानांत मोक्षाचे कर्ममार्ग, ज्ञानमार्ग व भक्तिमार्ग असे तीन मार्ग सांगितले आहेत.' -ज्ञाको क १३२. [सं.] ॰मार्गी-वि. कर्ममार्गानें जाणारा; जो निष्ठापूर्वक धर्माचरण करून परमेश्वर- प्राप्तिविषयीं झटतो तो. [सं.] ॰मुक्ति-स्त्री. स्नानसंध्यादि नित्य नैमित्तिक कर्में करण्याची आवश्यकता ज्या स्थितींत उरत नाहीं अशी अवस्था; नैष्कर्म्यसिद्धि [सं.] ॰मोचक-वि. कर्ममार्गा- पासून मुक्त करणारें; ऐहिक सुखदुःखापासून सोडविणारें. 'कर्म- दक्षा कर्ममोचका । जयराम कोदंडभंजना ।' [सं.] ॰मोचन- न. कर्ममार्गापासून मुक्तता. ॰योग-पु. १ प्रारब्ध; दैव; यदृच्छा; योगायोग. २ दैवगतीनें घडणारी गोष्ट. -शर. ३ व्यापार; चळवळ किंवा कार्य करण्याचें तत्त्व. -ज्ञाको क १३५. ४ ज्ञान हेंच जरी मोक्षसाधन असलें तरी कर्मशून्य राहणें कधींच शक्य नसल्यामुळें त्यांचें बंधकत्व नाहींसें होण्यास कर्में कधींहि न सोडतां शेवट- पर्यंत तींच निष्कामबुद्धीनें करीत राहण्याचा जो योग तो. -टिसू ४७-४८; याला इंग्रजींत एनर्जीझम असा प्रतिशब्द गीतारह- स्यांत सुचविला आहे. -गीर ३०१ वरील टीप. या योगाचें जें शास्त्र त्यास कर्मयोग म्हणतात व तें आचरणारा तो कर्मयोगी). 'बलवंत (टिळक) कर्मयोगी' -सन्मित्रसमाज मेळा पद्यावली १९२९, पद १. [सं.] ॰लंड-वि. धर्मशास्त्रविहित नित्यनैमित्तिक विधींचें पालन न करणारा; धर्मभ्रष्ट; धर्मविधि व धर्माज्ञेचा धिक्कार करणारा, उपहास करणारा [सं.] ॰लोप-पु. नित्य धार्मिक क्रमां- तील एखादें कर्म सोडणें, न करणें; दीर्घकालपर्यंत नित्य अगर नैमित्तिक कर्मविधि न करणें. [सं.] ॰वाचकधातुसाधित- न. मूळ धातुस 'ला' किंवा 'लेला' हे प्रत्यय लाविले असतां होणारें धातुसाधित. उ॰ केलेला, दिलेला. परंतु यांत 'पढ' धातूचा गण वर्ज्य करून हे प्रत्यय लावितेंसमयीं सकर्मक धातूस 'ई' आगम होतो. उदा॰ ठेविला, अर्पिला, आकर्षिलेला. -मराठी- भाषेचें व्याकरण १७३. [सं.] ॰वाद-पु. १ धर्मविहित कर्मां. नींच मोक्षप्राप्ति होते असें मत. २ मनुष्यास विशिष्ट जन्मांत जें सुखदुःख मिळतें तें त्याच्या पूर्व जन्मांतील कृत्यांचें फल होय असा युक्तिवाद; कर्माचें फळ भोगणें ही कल्पना. -ज्ञाको क १३६. [सं.] ॰वादी-पु. कर्मवादावरच भिस्त ठेवून त्याचें समर्थन करणारा माणूस [सं.] ॰वासना-स्त्री. दैनिक धर्मकृत्यांबद्दलची इच्छा, आवड. [सं.] ॰विधि-पु. (अनेकवचनींहि प्रयोग होतो) धर्मसंबंधीं कृत्यें वगैरेचे नियम, पध्दति, रीति, मार्ग; कोणत्याहि विशिष्ट प्रकारच्या धर्मकृत्याचें सूत्र किंवा विधान. [सं.] ॰विपाक-पु. १ पूर्व जन्मीं केलेल्या पुण्य, पाप वगैरे कृत्यांचें फल पुढील जन्मीं हटकून यावयाचें हा सिद्धांत. २ कर्माची फलनिष्पत्ति; परिणाम. [सं.] ॰वीर-पु. कार्यकर्ता; पराक्रमी मनुष्य. 'कर्मवीर निघुनी गेलो' -संग्राम ४९. [सं.] ॰वेग- कर्माचा वेग-पु. दैवाचा किंवा प्रारब्धाचा जोर, झपाटा, सामर्थ्य, धक्का; पूर्वसंचिताचा प्रभाव. 'कलालाचा भोवरा । जैसा भवे गरगरा । कर्मवेगाचा उभारा । जोंवरी ।' 'जेथें कर्माचा वेग सरे । तेथें धांव पुरे ।' [सं.] २ (अनेक वार केलेल्या) कृत्यांचा जोर, सामर्थ्य, प्रचोदन; संवयीचा जोर; स्वाभाविक प्रेरणा; 'कर्मवेग भलत्याकडे ओढून नेईल.' ॰शील-वि. कर्मा- सक्त; धर्मानें वागणारा; शास्त्रानें संगितलेलीं सर्व धर्मकर्में जो मनापासून काळजीपूर्वक करतो तो. [सं.] ॰संगी-वि. कामांत, धर्मानुष्ठानांत, व्रतनियमनांत सतत गढलेला; याच्या विरुद्ध ज्ञानाभ्यासी [सं.] ॰संग्रह-पु. निरनिराळे व्यवसाय, व्यापार; आपण ज्या क्रिया करतों त्या; मानसिक क्रियेच्या तोडाची बाह्य, प्रत्यक्ष क्रिया. 'कर्मसंग्रह या शब्दानें त्याच मानसिक क्रियेच्या तोडीच्या बाह्य क्रिया दाखविल्या जातात.' -गीर ८३६. [सं.] ॰संचय-पु. कर्मसंग्रह; मनुष्याचे अनेकविध व्यापार, क्रिया; चलनवलनादि कृत्य 'तैसेंचि कर्ता करण कार्य । हा कर्मसंचयो ।' -ज्ञा १८.५१२. [सं.] ॰संन्यास-पु. १ कर्मांचा त्याग; नित्य नैमित्तिकादि कर्में करण्याचें सोडून देणें. २ शारीरिक सोडून इतर सर्व कर्मांचा त्याग (शांकरमत). 'शंकराचार्यांच्या ग्रंथांत कर्मसंन्यासच प्रतिपाद्य आहे.' -टिसू ५ [सं.] ॰सूत्र-न. नित्य धर्मकर्माची व त्यासंबंधीं नियमांची मालिका; कर्तव्यकर्म- परंपरा. 'भवपाश तोडिते शस्त्र । ज्ञान ईश्वराचें विचित्र । परि जिवाचें कैसें कर्मसूत्र । जे अनावडी तेथें विषयीं ।' ॰हीन- वि. धार्मिक नियम, विधि न पाळणारा; धार्मिक नियमाबद्दल काळजी न करणारा. [सं.] म्ह॰ कर्मणो गहना गति: = नशि- बाची गति जाणणें शक्य नाहीं (एखादी वाईट गोष्ट अकल्पित घडली म्हणजे दैववादी मनुष्य ही म्हण म्हणतो.)

दाते शब्दकोश