मराठी बृहद्कोश

सात मराठी शब्दकोशांतील २,८४,८८८ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

संभोग

पु. १ उपभोग; विषयोपभोग; रतिसुख; मैथुन. 'सितेसुंदरी लागी संभोग द्यावा' -राक ४२. २ उपयोग; वापर; सेवन. 'जो श्रद्धेचेनि संभोगें । सुखिया झाला ।' -ज्ञा ४.१८८. ३ शृंगाररसाचा एक प्रकार; संभोगशृंगाराचे उलट विप्रलंभ शृंगार. [सं. सम् + भुज्] संभोगणें-उक्रि. उपभोगणें; सेवन करणें (विशेषतः स्त्रीसुख) संभोगी-वि १ उपभोक्ता; भोक्ता; सेवन करणारा; उपयोग करणारा; वापरणारा. २ विषयी; लंपट; चैनी; रंगेल.

दाते शब्दकोश

संभोग m Enjoyment or fruition. Use.

वझे शब्दकोश

संभोग sambhōga m (S) Enjoyment or fruition: popularly understood of sexual enjoyment. 2 Use or employment. 3 A branch of शृंगाररस,--happy or successful love.

मोल्सवर्थ शब्दकोश

(सं) पु० मैथुन, कामशांति.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

जबरी संभोग      

(न्याय.) बलात्कार; स्त्रीच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी लैंगिक व्यवहार करणे, संग करणे. जबर्जस्त, जबर्दस्त      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

संबंधित शब्द

बटक(कु)रूं, बटकुली, बटकू(कु)र-कुरें

नस्त्रीन. १ (निंदार्थीं) बटीक; दासी; मोलीकरीण. २ -पु. बटकीशीं संभोग करणारा. [बटीक] बटिकरी-बटकी, बटीकस्त्री. मूळची गरज असून पुढें व्यभिचारी झालेली स्त्री व तोच धंदा चालविणारी तिची मुलगी; दासी; मोलकरीण; कुणबीण. 'आहेत कितव पुष्कळ, पुष्कळ त्यांची गृहांत बटकीही ।' -मोसभा ५.३३. बट- कीचा-पुअव. दासीपुत्र. (ग्राम्य शिवी). 'कितीं सांगों तरी न मानिती बटकीचे ।' -दावि ४५०. बटक्या, बटुकर्‍या-रा- पु. दासीशीं संभोग करणारा. म्ह॰ देव झाले लटके ब्राह्मण झाले बटके. बटीक धंदा-काम-न. हलकासलका, दसपणाचा धंदा. बटीकपुरा-पु. गांवांतील दुराचरणी स्त्रियांची पेठ; (सिवराळपणें) स्त्रियांचा जमाव. बटीकपोर-पु. बटकीचें मूल (मुलगा, मुलगी).

दाते शब्दकोश

मैथुन

न. १ संयोग; अंगसंग; स्त्रीपुरुषसमागम; संभोग. २ एकी; समेट; संयोग; संघ. [सं.] ॰वैराग्य-न. बेसुमार संभोग केल्यामुळें दुःखप्रद औदासिन्य व विषाद उत्पन्न होऊन स्त्रीविरक्ति उत्पन्न होणें किंवा कामवासनेंचें संयमन करण्याची इच्छा होणें. [सं.]

दाते शब्दकोश

(सं) न० संभोग, स्त्रीपुरुषसंयोग.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

रति

स्त्री. १ कांहीं विषयाच्या ठायीं प्रीतिपूर्वक आसक्ति, इच्छा. 'कुकर्मीं रति घडे ।'-ज्ञा ३.८२. २ मैथुन; संभोग; स्त्रीसंग. 'रतीचिया बेटा । आदळती कामाचिया लाटा ।' -ज्ञा ७. ७४. ३ मदनाची, कामदेवाची स्त्री. ४ विषय; कामवासना; कामेच्छा; शृंगाररसाचा स्थायीभाव. ५ आनंद; सुख. ६ क्रीडा; विलास. [सं.] ॰चळ-पु. काम; विषयलालसा. 'नाहीं तीळ रतीचळ । तुझी कळा अचळ ।' -पला १.४. ॰नाथ-पु. मदन. [सं.] ॰राय-पु. (महानु.)मदन. 'ते रतिरायाचें माराक कासी । तरि कवण विषयविरु हातवसी ।' -भाए ४४५. ॰युध्द- न. संभोग; सुरतक्रीडा. -नि ८७५. ॰रोदन-न. प्रथम रति- प्रसंगींचें रुदन [सं.] ॰सुख-न. संभोगजन्य सुख; कामशांति. [सं.]

दाते शब्दकोश

(सं) स्त्री० मदनस्त्री. २ प्रीति. ३ प्रमाविशेष. ४ संभोग.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

अभिषंग, अभिसंग      

पु.       १. संगती; संबंध; आसक्ती; आलिंगन; संभोग. २. पराभव. ३. अकल्पित संकट. ४. भूतबाधा. ५. शपथ. ६. शाप; आळ. ७. दुष्कीर्ती. ८. तिरस्कार. ९. मानसिक अशांतता. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अभुक्त

वि. १ ज्याचा उपभोग कोणी घेतला नाहीं असें; न उपभोगालेलें; उपयोग न केलेलें; उपयोगांत न आणलेलें २ न जेवलेला; उपाशी; उपभोग न घेणारा. ३ ज्यानें उपभोग (संभोग) घेतला नाहीं असा (मनुष्य). [सं. अ + भुज्]. ॰मूळ-न. ज्येष्ठा नक्षत्राच्या शेवटच्या चार व मूळ नक्षत्राच्या पहिल्या चार घटिका असा आठ घटिकांचा काळ. [सं.]

दाते शब्दकोश

अभुक्त      

वि.       १. ज्याचा उपभोग कोणी घेतला नाही असा; न उपभोगलेला; उपयोग न केलेला; उपयोगात न आणलेला. २. न जेवलेला; उपाशी; उपभोग न घेणारा. ३. ज्याने उपभोग (संभोग) घेतला नाही असा (मनुष्य). [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अगम्या

स्त्री. विवाहास अयोग्य; जवळच्या नात्याची, सकुल, सगोत्र, भिन्नवर्णीय, किंवा आपणाहून वडील अशी स्त्री. [सं. अ + गम्]. ॰गमन-न. शास्त्रानें संभोगास अयोग्य मानलेल्या -अगम्या स्त्रीशीं संभोग; व्यभिचार.

दाते शब्दकोश

अगम्यागमन      

न.       शास्त्राने संभोगास अयोग्य मानलेल्या स्त्रीशी संभोग; व्यभिचार. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अंगसंग      

पु.       १. शरीराचा संयोग; मीलन; अंगस्पर्श : ‘दीपाचिया अंगसंगा । कोण सुख आहे पतंगा ।’ – एभा ८·७४. २. संभोग; मैथुन; रतिसुख. ३. हातघाई; अंगलट; लठ्ठालठ्ठी; कुस्ती. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अंगसुख

(सं) न० मैथुन, संभोग.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

असविणे      

क्रि.       १. नवीन मृत्तिकापात्र, मडके राबवणे, रापवणे (तापवून व दुधाने भरून). २. (ल.) कौमार्यभंग करणे; एखाद्या कुमारिकेशी संभोग करणे. ३. (सामान्यतः) एखाद्या स्त्रीशी बेकायदेशीर समागम, संग करणे; जारकर्म, व्यभिचार करणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

असविणें

क्रि. १ नवीन मृत्तिकापात्र-मडकें राबविणें-रांपविणें ( तापवून व दुधानें भरून). २ (ल.) कौमार्य भंग करणें; एखाद्या कुमारिकेशीं संभोग करणें. ३ (सामा.) एखाद्या स्त्रीशीं अशास्त्र किंवा बेकायदेशीर समागम-संग करणें; जारकर्म, व्यभि- चार करणें. [सं.आसव?]

दाते शब्दकोश

अवस्वर      

पु.       १. वेळ; प्रसंग; क्षण. पहा : अवसर : ‘ऐसे विवरौनियां श्रीहरी । म्हणितलें तेया अवस्वरीं ।’ –ज्ञा ६·१५२. २. संपादणी प्रयोग : ‘अवस्वरू आईकिला’ –गोप्र १५४. ३. पूजेचा सोहळा : ‘श्रीप्रभूचा ठाई अवस्वरू करावा’ – लीचपू १५५. ४ अध्याय; प्रकरण. ५. संभोग सुख : ‘रंभा आपुला अवस्वरू मागावेया आली’– श्रीच ५५.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

बलात्कार

पु. जबरी संभोग [सं.]

दाते शब्दकोश

भेंडा

पु. (गो.) कंबर. भेंडाक धरप-अक्रि. (गो.) कमरेस धरणें. भेंडावप-अक्रि. (गो.) संभोग करणें.

दाते शब्दकोश

चौढाळणे      

उक्रि.       जातिनिर्बंध, विवाहबंधन तोडून सबगोलंकार होईल अशा तऱ्हेने वागणे; कामुकतेचा अतिरेक करणे; ताळतंत्र सोडून संभोग करणे; चौंडाळणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चौढाळणें

अक्रि.-सक्रि. जातीनिर्बंध, विवाहबंधन तोडून सबगोलंकार होईल अशा तर्‍हेनें वागणें; कामुकतेचा अतिरेक करणें; ताळतंत्र सोडून संभोग करणें; चौंडाळणें. 'बहुत माजला गोवळा । गोकूळ चवढाळिलें सकळ ।' -सक्रि. १ घालमेल; हलवाहलव करून गोंधळ करणें; बिघाड करणें; विचका करणें; अनेकांनीं मिळून एखाद्या कार्याचा विचका करणें. २ बाटविणें. 'चौढाळिलें गोकुळ सर्व येणें ।' -सारुह १.६९. [चौ + ढाळणें = ढवळणें]

दाते शब्दकोश

चिरा      

पु.       कौमार्य; ज्वानी; कुमारीदशा. [हिं.] (वा.) चिरा उखळणे, चिरा उतरणे – कौमार्य नष्ट करणे; वेश्येच्या अनुपभुक्त मुलीशी प्रथम संभोग करणे : ‘चिरा उखळा माझा राव नशा । घेऊन तुम्ही पलंगावर बसा ।’ − पला ४·२५.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चिरा

पु. कौमार्यं; ज्वानी; कुमारीदशा. ॰उखळणें, उतरणें-कौमार्य नष्ट करणें; वेश्येच्या अनुपभुक्त मुलीशीं प्रथम संभोग करणें. 'चिरा उखळा माझा राव नशा । घेऊन तुम्ही पलंगावर बसा ।' -पला ४.२५.

दाते शब्दकोश

चोदणें

उ० वि० झंवणें, संभोग करणें, शिरकविणें, घुसडणें.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

धोंगस      

पु.       सुरत; संभोग. (गो.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

धोंगस

पु. (गो.) सुरत; संभोग.

दाते शब्दकोश

धोरणे      

सक्रि.       मैथुनाद्वारा (स्त्रीला) उपभोगणे; संभोग करणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

धर्षणे      

उक्रि.       १. धाडस, धिटार्इ करणे. २. जबरी संभोग, बलात्कार करणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गंडस      

वि.       (अशिष्ट) १. अनैसर्गिक कृत्य, विपरीत संभोग करवून घेणारा.२. (ल.) दुबळा; निर्बळ; गांडू.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गंडस

वि. (अशिष्ट) १ अनैसर्गिक कृत्य, विपिरीत संभोग करवून घेणारा; त्यावरून २ (ल.) दुबळा; निर्बळ. [गांड]

दाते शब्दकोश

ग्राम्यधर्म      

पु.       संभोग.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गुद

पु. अपानद्वार; पंचकर्मेंद्रियांपैकीं पांचवें इंद्रिय; गांड; बोचा; मलद्वार. 'गुदमेंढ्रा आंतौतीं । चारी अंगुलें निगुतीं ।' -ज्ञा ६.१९५. [सं.] ॰द्वार-न. गुद; अपानद्वार, ॰भ्रंश-पु. शौचाच्या वेळीं अंग बाहेर येणें (अशक्ततेमुळें); एक रोग. ॰मस्ती-स्त्री. मग्रूरपणा. शिरजोरी; उद्धटपणा; दांडगाई. 'त्यानें आपल्या गुदमस्तीनें हातची भाकरी घालविली.' -विक्षिप्त ३.९१. ॰मैथुन-न. अनैसर्गिक संभोग; गांड मारणें. ॰रोग-अंकुर- अर्ष-पु. मूळव्याध. ॰व्रण-न. भगेंद्र. ॰शूल-ळ-पु. अपान- द्वारांतून निघणार्‍या कळा.

दाते शब्दकोश

गुदमैथुन      

न.       अनैसर्गिक संभोग; गांड मारणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

घर्षण

न. दांडगाई; धिटाई; अरेरावी. २ बलात्कार (स्त्री. संभोग); बळजबरीनें उपभोग. [सं.]

दाते शब्दकोश

घर्षणें

उक्रि. जबरी संभोग, बलात्कार करणें; भ्रष्ट करणें. [घर्षण]

दाते शब्दकोश

हिकणें

उक्रि. (अश्लील) संभोग करणें.

दाते शब्दकोश

जाणें

अ० गमन करणें. २ संभोग करणें.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

अक्रि. १ गमन करणें; चालू लागणें; प्रवास करणें; पुढें सरणें; पूर्वस्थळ सोडणें. 'तो या गांवातून पळून गेला.' २ पूर्वस्थळ सोडून विवक्षित स्थळ गांठणें. 'तो उद्यां पुण्यास जाणार आहे. २ निघून जाणें; नाहींसे होणें; नाश पावणें; हरवणें; हल- विलेलें असणें. 'या कोनाड्यांतली वस्तु कधीं जात नाहीं पण आज गेली.' ३ लोटणें; क्रमणें (वेळ). 'हां हां म्हणतां वर्ष गेलें.' ४ छिद्रादिकांत प्रवेश करणें; आंत शिरणें; समाविष्ट करणें. 'या दौतीचे भोकांत लेखणी जात नाहीं.' ५ (विशेषतः भूतकालांत उपयोग) वायां जाणें; नासणें; निरुपयोगी, टाकाऊ होणें. खराबणें. अयथा- योग्य होणें. 'ही बायको चांगली पण कंबरेंत गेली.' 'हा कसला विद्वान पण अभिमानानें गेला.' ६ घडून येणें, होणें (नजरचूक, गुन्हा, योग्य किंवा रूढ मार्गाचें उल्लंघन) 'हा आंगरखा बरा उतरला पण गुंडीजवळ कांहीं गेलें' 'रोज औषध घेत असें त्यांत एक दिवस माझे हातून गेलें, रोगानें बळ केलें' ७ एखाद्यापासून चुकून होणें, घडून येणें (गफलतीनें एखादी चुकीची गोष्ट). 'ती गोष्ट मजपासून गेली खरी.' ८ वजा होणें; कमी होणें; 'दहांतून पांच गेले तेव्हां राहिले पांच.' ९ निर्बल होणें; शक्ति जाणें; गुण जाणें (इंद्रिय, औषध यांचा) १० अनुसरणें; पाठीमागून जाणें; वेधणें; अभिलषित होणें (मन, डोळे, कान, प्रीति इ॰) (वर अथवा कडे शब्दाबरोबर प्रयोग). 'चांगली बायको करूं नये तिजवर लोकांची इच्छा जाते.' ११ दिलें जाणें (शब्द, वचन-भूतकाळीं उपयोग) १२ विझणें (दिवा, प्रकाश, अग्नि). 'झणकार्‍याबरोबर दिवा गेला' १३ र्‍हास, नाश होणें; झिजणें (शरीर). १४ एखाद्या स्त्रीशीं रत होणें; संभोग करणें. १५ कांहीं पदार्थानें विवक्षित कालपर्यंत टिकणें. 'याला धोतरजोडा सहा महिनेपर्यंतसुद्धां जात नाहीं.' कोणत्याहि क्रियापदाच्या वर्तमानकालवाचक विशेषणाबरोबर ह्या क्रियापदाचा उपयोग केला असतां त्याचा अर्थ क्रियासातत्य दर्शविण्याकडे होतो. उदा॰ जसा व्यापार वाढवाल तसा मी पैसा देत जाईन. २ सकर्मक क्रियापदाच्या पूर्णभूतकाळाबरोबर उपयोग केला असतां कर्मकर्तरीचा अर्थ होतो. जसें-तुला शिक्षा केली जाईल. ३ ऊनप्रत्ययांत धातुसाधिताशीं उपयोग केला असतां याचा अर्थ क्रियापूर्णता दर्शविण्याकडे होतो. जसें-तळ्यांतील पाणी आटून गेलें. शरीर वाळून गेलें ४ दुसर्‍या क्रियापदाच्या आज्ञार्थी रूपानंतर ह्या क्रियापदाच्या आज्ञार्थाचा उपयोग केला असतां पहिल्या क्रियापदावर जोर दिला जाऊन, क्रियेचा जोरदार- पणा सिद्ध होतो. जसें-आण जा; ठेव जा; दे जा; कर जा इ॰ [सं. या; प्रा. जा; फ्रेंजि. जा; रशियन या.] (वाप्र.) जाजा येये- स्त्री. निरर्थक पुनः पुनः जाणें येणें; खेपा. 'माझ्यानें हें हजारदां जाजा येये करवत नाहीं.' [जाणें-येणें] जायाचा-जायां, जायांस-प्रसंगविशेषीं उसना घेतलेला; आपल्या हातांतून पुढें- मागें जाणारा; दुसर्‍याचा (कपडा, रत्नें वस्तु). म्ह॰ जायाचें लेणें लाजिरवाणें. गेलामेला, गेलामेला गतला-सर्वस्वी गेला; अजीबात, कायमचा नाहींसा झाला. (माझें, तुझें, त्याचें इ॰) -काय जातें-गेलें? -मला, त्याला, तुला, त्याची काय परवा, किंमत? गेला तो मेला-गेलेलें पुन्हां भरून येत नाहीं. गेलेला असणें-पाहाण्यांत, अनुभवांत, आढळण्यांत, ऐकण्यांत येणें, असणें. 'हें मला गेलेलें आहे. = हें मला ठाऊक आहे.

दाते शब्दकोश

जाणणें

उक्रि. १ समजणें; कळणें; ज्ञान असणें; उमजणें; खात्रीपूर्वक माहीत असणें.'वर्णभेद मनुष्यमात्र जाणतो, पशु जाणत नाहीं.' २ (ल.) ओळखणें; दयेनें,मानानें, गौरवानें वागविणें (जुन्या ओळखीच्या दीन, गरीब माणसास). 'भल्या माणसावर उपकार केला असतां तो जाणतो. ३ जाणीव असणें; मान्य करणें; मानणें; प्रत्युपकाराची, मोबदला देण्याची बुद्धि असणें (नोकरी, श्रम, उपकार याबद्दल) ४ भोगणें; संभोग करणें. ५ गुणविशिष्ट माहीत असणें. 'हा तुम्हांस भला वाटतो पण मी याला पक्का जाणतों.' ६ प्रतिसहकार करणें; लाभानुरूप वागणें. (जनावरांनी). या गाईला खाणें घातलें ती जाणत्ये.' [सं. ज्ञान; प्रा. जाण. फ्रेंजि. जन] न जाणो-कोणास ठाऊक? कोण सांगूं शकेल? असेंहि असेल, असेलहि या अर्थी. जाणत, जाणतजाणत-क्रिवि. जाणूनबुजून; समजूनउमजून; बुद्ध्या; जाणून. जाणतमूर्ख वि. जाणत असून मूर्खपणाचें ढोंग करणारा; ढोंगी मूर्ख. [जाणणें + मूर्ख]

दाते शब्दकोश

जार

पु. १ परस्त्रीशीं संबंध करणारा; उपपति; धगंड. २ प्रियकर; दोस्त; यार (स्त्रीचा). ३ जारकर्म; व्यभिचार. 'ज्यांस न कळतां घडला जार । तिहीं रासमंडळीं खेळला याद- वेंद्र । -ह १८.१०. [सं. जार] ॰कर्म-न. व्यभिचार; बद- फैलीपणा; विवाहित पुरुषानें अगर स्त्रीनें अन्य स्त्रीशीं अगर पुरुषाशीं केलेला संग; परशय्या; परद्वार; व्यभिचार. (कायदा) जिचा नवरा जिवंत असल्याचें माहीत आहे अशा स्त्रीशीं तिच्या नवर्‍याच्या संमतीवाचून केलेला संभोग. ॰कर्मी--वि. जारकर्म करणारा; व्यभिचारीः बदफैली. जारज-वि. अनौरस; जारकर्मा- पासून झालेली (संतति). जारिणी-रीण-स्त्री. व्यभिचारिणी; जारकर्मी स्त्री. 'की वरपंगी जेवीं जारीण । यावी भ्रतार सेवा करून ।' जारीवधू-स्त्री. जारकर्मी स्त्री. 'जारीवधू न्यायज-नेम हारी ।' -मुरामा बाल ८४.

दाते शब्दकोश

जबरीची चोरी      

(कायदा) दरोडा; बळाचा वापर करून केलेली लूट. जबरी संभोग      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

जुगणे      

अक्रि       १. भाग, तुकडे जोडणे; जुळविणे. २. (ल.) जमणे; मिलाफ होणे; एकमत होणे; सिद्धयनुकूल परस्पर सुसंगत होणे (दोन माणसांचे विचार, उपाय, पदार्थ). ३. समजूत पटणे; सख्य होणे; तडजोड होणे (शत्रू, वादी, प्रतिवादी यांची). ४. मिलाफ बसणे; परस्पर जमणे; जुळणे; अनुरूप घटना होणे (काव्याचे चरण इत्यादिकांची). ५. संभोगासाठी स्त्री पुरुषांनी एकवटणे. [सं.युज्.] (वा.) जुगू लागणे - कामक्रीडा करणे; संभोग करणे. ६. अनेक सोंगट्या एका घरात येणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

जवळ

शअ, १ सन्निध्य; निकट; पाशीं (स्थलवाचक, काल- वाचक गोष्टी, पदार्थांचें, मनुष्याचें सादृश्य किंवा नात्याचें निकट- वर्तित्व दाखविण्यासाठीं व्यापकपणें हा शब्द योजितात). २ बरो- बर; स्वाधीन; ताब्यांत. 'त्याचे जवळ द्रव्य आहे.' ३ स, ला, तें या विभक्तिप्रत्ययार्थीहि योजितात. 'त्याजवळ दे.' 'त्याजवळ सांग' वि. १ नजीकचा; निकटचा. 'या रस्त्यानें तें ठिकाण जवळ आहे.' २ नात्याचा; आप्त. [सं. यु, युत; प्रा. जुध; म. जू. जव] (वाप्र.) ॰करणें-१ घरांतल्या माणसांत सामील करणें; विश्वासांत घेणें; सांभाळ करणें; काळजी घेणें. 'पुरुषोत्तमरावांना राघोबादादांनीं जवळ केलें.' -इंप ९. २ एखादी वस्तु निकट आणणें, सन्निध जाणें. 'पाऊस आला लवकर गांव जवळ करा.' ॰उभा करणें-आपल्या समोर येऊं, राहूं, देणें; जवळ करणें; संबंध ठेवणें (नकारार्थी प्रयोग). ॰घेऊन-जवळ आणून; प्रीतीनें; दयेनें; ममतेनें. ॰जाणें-१ समीप जाणें. २ संभोग करणें; गमन करणें; उपभोगणें. ॰धरणें-आपल्या चाकरामध्यें गणना करणें; जवळ करणें पहा. सामाशब्द-॰चा-वि. निकट संबंधीं; निकट- वर्ती (जागा, वेळ, नातें या अनुरोधानें). ॰जवळ-क्रिवि. १ बहुतेक; बहुतांशीं. 'त्यांची परीक्षा उत्तमा जवळजवळ झाली.' २ शेजारींशेजारी; खेटून. ॰नातें-न. १ जवळचा नात्याचा संबंध, आप्तपणा. २ निकट संबंध; संलग्नता. ॰पास-क्रिवि. जवळच; पहा. ॰स(सा)र-क्रिवि. शेजारीं; जवळपास. जवळी, जवळीक-स्त्री. १ सन्निध्य; निकटता; शेजार. 'बीज जळाची जवळीक लाहे ।' -ज्ञा ९. १०९. 'कीं वस्तूचीं जवळींकु जाली ।' -दाव २३७. २ निकट संबंध; जवळची सोयरीक; आप्तपणा. 'नात्याची जशी जवळीक तशी आदराची कोंवळीक.' ३ सलगी; मैत्री. 'हा लुच्चा माणूस याची इतकी जवळीक कामाची नाहीं.' ४ सिद्धि; लाभ. 'परी पुत्रप्राप्तीची जवळीक । न लाभेचि तेणें ऐश्वर्य सुख । परम दुःख त्या वाटे ।' -मुसभा ६.९. -वि. १ जवळ असणारें; जवळचें. 'जें श्रीकृष्णाचिआं जवळिंका ।' -दाव १२. २ अनुचर; सेवक. जवळिकें-क्रिवि. जवळ; सन्निध्य. 'ऐसें बोलोनि सुरासुरगण पाचारिले जवळिकें । -मुआदि ४. १५६. जवळील-वि. जवळचा. जवळून-क्रिवि. १ क्रिवि. पासून (गति दाखवून). 'मी त्याजवळून आलों.' २ शेजारून; बाजूनें. 'तो आमचे गांवाजवळून गेला.' ३ -च्यापासून घेऊन, काढून. 'त्यानें मजजवळून रुपये नेले.' ४ कडून; मार्फत. 'हे भांडें मजजवळून फुटलें.' ५ पैकीं; आंतून; आसमंतांतून; सांन्निध्या- मुळें.

दाते शब्दकोश

झक्कू      

पु.       (अश्लील) मैथुन; स्त्रीसंग; संभोग.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

झक्कू

पु. १ (विटीदांडूचा खेळ) एक संज्ञा; गुण (मार्क) मोजण्याचा परिमाणवाचक शब्द; एक सबंध डाव; गेम; वकट, लेंड इ॰ जिंकल्यावर डाव लागू होऊन एक झक्कू होतो. २ (कर.) उतारीच्या रंगाचें पान नसल्यास दुसर्‍या रंगाचें पान टाकून भारी पानवाल्याला डावांतील सर्व पानें घ्यावयास लावण्याची क्रिया; झब्बू या अर्थी चुकीचा प्रयोग. 'दुर्री टाक म्हणजे झक्कूची ब्याद टळेल.' ३ (अश्लील) मैथुन; स्त्रीसंग; संभोग.

दाते शब्दकोश

झोडणे      

उक्रि.       (ग्राम्य) संभोग करणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

झोडणें

उक्रि. १ बडविणें; कुटणें; झोडणी करणें; मळणें. २ (ल.) चांगलें मारणें; ठोकणें; झोडपणें; कुमलणें. 'वरि बैसले असुर समस्त । त्यांसि झोडून पाडिलें ।' ३ रेटणें; भरडून काढणें; ओबडधोबडपणें भरमसाट करणें (काम, मेहनतीचें काम, व्याख्यान.) ४ (अशिष्ट घशांत कोंबणें; खच्चून भरणें. 'हा पंचवीस लाडू झोडून आणखी घाल म्हणेल.' ५ (ग्राम्य) संभोग करणें; झंवणें. ६ (खेळांत) डाव मारून घेणें. [प्रा. झोडण = पडणें] झोडून घेणें-(गंजिफांचा खेळ) घेणी घेणारानें राजा- बरोबर आणखी एक पान टाकून मारणें; देणी देणारा जर आपल्या सगतचा (उजव्या हाताकडील) असेल व देणीसाठीं उतरलेल्या पानाच्यावरील पान आपल्या हातांत असेल तर राजा- बरोबर तें पान टाकून डाव घेणें. असें केल्यानें या हाताचीं सहा पानें मिळतात. ॰पट्टी-स्त्री. खरपूस मार, चोप ठोक. (ल.) खरड- पट्टी. [झोडणें + पट्टी]

दाते शब्दकोश

झोंबट      

न.       मैथुन; संभोग; ते करणारे जोडपे; झांगडू (विशेषतः सापाचे, प्राण्यांचे).

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

झोंबट

न. मैथुन; संभोग; तें करणारें जोडपें; झांगडू (विशेषतः सापाचें, प्राण्यांचें)

दाते शब्दकोश

झवणें / झंवणें

स० चोदणें, संभोग करणें.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

कंदर्प

पु. १ मदन; कामदेव. 'ऐसा नियतु कां कंदर्पु ।' -ज्ञा ७.५१. 'कोटि कंदर्प लोपती पुढें । ऐसें सुंदर लावण्य रूपडें ।' -संवि १७.१६४. [सं. कदर्प] २ (ल.) कांदा. [सं. कंद + दर्प = कुत्सित दर्प (?)] -र्पाचें घर-न. योनी; स्त्रीजननेंद्रिय; स्मरमंदिर- गृह-कूप. 'कुश्चित कंदर्पाचें घर । म्याचि साचार सेविलें ।' -एभा २६.११२. ॰केली-पु. शृंगार; मदनक्रीडा; सुरतक्रीडा; संभोग. 'तेथ कंदर्पूकेळी खेळतीं युगळें । राजहंसांचीं ।।' -शिशु ६४९.

दाते शब्दकोश

कर्म      

न.       १. एखादे काम, कृत्य : ‘हें कर्म झालें समरांत जेव्हां । होतास कोठें रणभीरू तेव्हां ।’ − वेणीसंहार ३. २. स्नानसंध्या, यज्ञयागादी धार्मिक विधी. याचे नित्य, नैमित्तिक व काम्य असे तीन भेद आहेत. ३. सांप्रतच्या आयुष्यातील कृती, चाल, आचार, वर्तणूक यावरून दैव किंवा नशीब अशा अर्थाने योजतात. ४. विशिष्ट काम; नैतिक कर्तव्य; जाती, धंदा वगैरेंनी मानलेले आवश्यक कृत्य. ५. (व्या.) कर्त्याने अमुक क्रिया केली हे दाखविणारा शब्द; कर्तृविषयक व्यापाराचे कारक; कर्माची विभक्ती प्रायः द्वितीया असते. जसे :− ‘राम गाय बांधतो’ यात गाय हे कर्म. ६. उद्योग; कामधंदा; नेमलेले, विशिष्ट प्रकारचे काम. ७. सुरतक्रिडा; मैथुन; रतिसुख; संभोग. ८. सामान्य क्रिया; ऐहिक व्यापार; मायिक क्रिया : ‘माया हा सामान्य शब्द असून तिच्याच देखाव्याला नामरूपे व व्यापाराला कर्म ही विशिष्टार्थक नामे आहेत.’ − गीर २६०. [सं.] (वा.) कर्म दोन पावले पुढे − नशीब नेहमी आपल्यापुढे धावत असते. कर्म आड ठाकणे − कर्म आडवे येणे; आपत्ती ओढवणे : ‘अन्न घेवोनि जो निघाली । तो कर्म आड ठाकलें ।’ − हरि १६·१३०. कर्म फुटणे − दुर्दैव ओढवणे; गोत्यात येणे; नुकसान होणे. कर्माने ओढणे, कर्माने ओढवणे − दैवाचा पाश येऊन पडणे; दैवाधीन होणे. कर्माने जागे होणे − दैव अनुकूल होणे. कर्माने धाव घेणे − दैव पुढे येणे; दैवाकडून प्रतिबंध, अडथळा होणे. कर्माने पाठ पुरविणे, कर्म उभे राहणे − दैवाने मोडता, अडथळा घालणे; कर्म ओढवणे. कर्माने मागे घेणे, कर्माने मागे सरणे − दैवाने साहाय्य न करणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कुटणे      

उक्रि.       १. चेचणे; चेचून बारीक करणे; पूड करणे : ‘दांभिकता ही हळदी कुटा ।’ - मुआदि १. ६५. काढणे; सोडणे. २. (ल.) ठोकणे; पिटणे; मार देणे : ‘कुटिल प्रजाहि जो गोपीडक तो ब्राह्मणा न कां कुटिल ।’ - मोविराट २. ५. ३. (ल.) एखाद्या विषयाची सूक्ष्म छाननी करणे; अतिशय चर्चा करणे. ४. (टाळ) वाजविणे : ‘तूं कुटतोस कीं नाहीं रोज टाळ ।’ - नामना ६६. ५. (ल.) बलात्काराने संभोग करणे. [क. कुटुक] [सं. कुट्ट = कुटणे]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कुटणें

उक्रि. १ चेचणें; चेचून बारीक करणें; पूड करणें. 'दांभिकता ही हळदी कुटा ।' मुआदि १.६५. २ (ल.) ठोकणें; पिटणें; मार देणें. 'कुटिल प्रजाहि जो गोपीडक तो ब्राह्मणा न कां कुटिल?' -मोविराट ३.५. ३ (ल.) एखाद्या विषयाची सूक्ष्म छाननी करणें; अतिशय चर्चा करणें. ४ (टाळ) वाजविणें. 'तूं कुटतोस कीं नाहीं रोज टाळ?' -नामना ६६. ५ (ल.) बलात्कारानें संभोग करणें. [सं. कुट्ट = कुटणें, ते. कोट्टू; फ्रेंजि. कुर]

दाते शब्दकोश

नाड

स्त्री. १ नाडी; शरीरांतील रक्त ज्या शिरांतून वाहतें ती धमनी; आंतड्याची नळी. २ नाडी (हाताची); रुधिरा- भिसरणक्रियानिदर्शक रक्तवाहिनीचें कार्य. (क्रि॰ पहाणें). ३ फीत (इजारीची). ही साधारण चार फूट लांब असते. ४ (फलज्यो.) नाडी; घटका; नक्षत्रांचा एक भाग. ५ (ल.) लांब पोट. ६ (व.) घोड्याच्या पाठीचा कणा. ७ (गो.) नागलीचें, कणीस नसलेलें काड. ८ (गो.) गुदद्वाराजवळची शीर; आंतडें. [सं. नाडी] (वाप्र.) ॰आटपणें- १ मरणोन्मुख होणें; रुधिरा- भिसरणक्रिया थांबणें. २ (ल.) एखादें कार्य शेवटास नेण्यास असमर्थ होणें; त्या कामीं थकणें. ॰दाखविणें-रोगपरीक्षा करावयाकरितां वैद्यास नाडी दाखविणें. ॰पाहणें-रोगपरीक्षेकरितां नाडी कशी चालते तें हात लावून निरीक्षण करणें; प्रकृति पाहणें. ॰सांप- डणें-युक्तिप्रयुक्तीनें एखाद्याचा स्वभाव ओळखणें. सामाशब्द- ॰बंद-पु. ब्रह्मचारी; केव्हांहि स्त्रीसंग, संभोग न करणारा, न केलेला माणूस. 'नाडबंदा आजवर तूं व्रतस्थ राहिलास । नाहीं दुसरीचा उर उघडा करून पाहिलास ।' -प्रला १९९. ॰बंदी- स्त्री. ब्रह्मचर्य; स्त्रीसंग न करणें.

दाते शब्दकोश

नाडबंद      

पु.       ब्रह्मचारी; केव्हाही स्त्रीसंग, संभोग न केलेला माणूस : ‘नाडबंदा आजवर तूं व्रतस्थ राहिलास । नाहीं दुसरीचा उर उघडा करून पाहिलास ।’ – प्रला १९९.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

नि(नी)ज

स्त्री. झोंप. 'तदुक्तिस जन प्रभो जरि निजेमधें चावळे ।' -केका ७३. [सं. निद्रा] निजगळ-वि. (ना.) झोंपाळू. निजतीक्रिया-स्त्री. प्रेत निजल्या स्थितींत पुरणें. -बदलापूर १७२. निजणें-अक्रि. १ झोंप घेणें; झोंपणें. 'टपकण निज. महार- पोर रात्र शिळी करतील.' (लहान मुलाला लवकर निजविण्या- साठीं म्हणतात). २ आडवें होणें; कलणें; लोळणें. ३ आजारी पडणें; हांतरुणाला खिळणें. ४ (ल.) मरणें. ५ नाश पावणें; बुडणें; नाहींसा होणें. (धंद्यांतील भांडवल, धंदा, व्यापार इ॰). ६ भर- भराटीस न येणें (दैव); मंद चालणें (कामधंदा); नाहींसा होणें (हुकमत, अधिकार); बेचिराख, उजाड होणें (घर, गांव). ७ संभोग करणें. निजलेला मेल्यासारखा-मृतवत निजलेला व मेलेला सारखाच. निजल्या जागीं विकणें-कारवाईनें आपलें काम साधणें; बोटावर नाचविणें. निजून उठणें, उठत असणें(पहांटेस, लवकर)-प्रातःकाळीं झोंपेंतून उठणें किंवा उठ- ण्याची संवय असणें. सावकाश निजणें-शांतपणानें झोंप घेणें; बेफिकीरपणें झोंपणें. निजविणें-सक्रि. झोंपविणें; दुसर्‍याला झोंपू देणें आडवें पसरविणें; निजावयास लावणें. निजसुरा-वि. अर्धवट झोंपलेला अर्धवट जागा; असावध. 'जेणें देहात्मवादी निजसुरा ।' -यथादी १.३८२. निजानीज-स्त्री. सामान्यपणें निजणें; सर्वत्रांचें निजणें; शांतता; सामसूम. निजायाबसायाजोगी-वि. (बायकी) घरकाम करण्यास योग्य झालेली, वयांत आलेली (स्त्री). निजाळू-वि. झोंपाळू; फार, नेहमीं झोंप घेणारा. निजेला-वि. निजलेला; झोंपलेला (माणूस). 'निजेल्यामधें पुछ्य तें लोळताहे ।' -राक १.३३. 'त्यांतील एक कलहंस तटीं निजेला ।' -र ९.

दाते शब्दकोश

निजणे      

अक्रि.       १. झोप घेणे; झोपणे. २. आडवे होणे; कलणे; लोळणे. ३. आजारी पडणे; अंथरुणाला खिळणे. ४. (ल.) मरणे. ५. नाश पावणे; बुडणे; नाहीसा होणे (धंद्यातील भांडवल, धंदा, व्यापार इ.). ६. भरभराटीला न येणे (दैव); मंद चालणे (कामधंदा); नाहीसा होणे (हुकमत, अधिकार); बेचिराख, उजाड होणे (घर, गाव). ७. संभोग करणे. [सं. निद्रा] (वा.) निजल्या जागी विकणे–कारवाईने आपले काम साधणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

निवृत्त

वि. १ मागें फिरलेला; परतलेला अथवा परतविलेला- २ परावृत्त; थांबविलेला. ३ (कांहीं कार्य) टाकून दिलेला; अंग काढून घेतलें आहे, किंवा हात आटोपला आहे ज्यानें असा. ४ जीवयोनींतून मुक्त करणारा. [सं] ॰मांस-वि. मांस न खाणारा; मांसाशन न करणारा. ॰रजस्क-वि. (वय झाल्यामुळें) जिचा विटाळ गेलेला आहे अशी (स्त्री.) ॰रमण-वि. ज्याची संभोग- शक्ति, प्रजननशक्ति गेलेली आहे असा (पुरुष).

दाते शब्दकोश

नपुंसक      

वि.       १. स्त्रीही नाही व पुरुषही नाही अशी (व्यक्ती); हिजडा; तृतीयपंथी; षंढ; संभोग करण्याला असमर्थ (पुरुष). २. पराक्रमहीन; गांडू; दुबळा (पुरुष). ३. शब्दांच्या तीन लिंगांपैकी एक. पहा : नपुंसकलिंग. [सं.] (वा.) नपुंसकाच्या हाती पद्मीण, रंभा–उपभोग घ्यायला असमर्थ व्यक्तीच्या हाती अतिशय सुंदर, बहुमोल वस्तू (पडणे, राहणे इ.); विजोडपणा.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

पाडा उडणें

गाईशीं पाड्याने संभोग करणें.

दाते शब्दकोश

पारदारिक

पु. दुसऱ्याच्या पत्नीशीं संभोग करणारा; परस्त्रीगमनी; व्यभिचारी [सं. पर + दारा]

दाते शब्दकोश

समागम

पु. १ सहवास; संगत; संयोग; संपर्क; सहस्थिति. २ अनुगमन; सती जाणें. २ संभोग; मैथुन. [सं. सम् + आ + गम्]

दाते शब्दकोश

संभोगणें

संभोगणें sambhōgaṇēṃ v c (संभोग) To enjoy; to have fruition of (esp. of a woman carnally).

मोल्सवर्थ शब्दकोश

सुरत

न. १ मैथुन. २ (ल.) ऐक्य. [सं.] ॰क्रीडा- स्त्री. मैथुन; संभोग. सुरती-वि. मैथुनविषयक.

दाते शब्दकोश

टांबलणें

अक्रि. संभोग करणें.

दाते शब्दकोश

टांग उचलणें

संभोग करणें.

दाते शब्दकोश

टंबलणे, टमलणे, टमालणे      

उक्रि.       (ग्राम्य) संभोग करणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

टंबलणें, टम(मा)लणें

उक्रि. (ग्राम्य) संभोग करणें.

दाते शब्दकोश

तंगड, तंगडी      

न.स्त्री.       (निंदार्थी) पाय. पहा : टांगडी. [सं. त्रक्–ख्–ग्] (वा.) तंगडी तोडणे, तंगडी मोडणे –खोड जिरवणे, खोड मोडणे; मर्मावर बोट ठेवणे. तंगड्या उपटनं –राग व्यक्त करणे; असंमतिदर्शक वागणे. (अहि.) तंगड्या गळ्यात टाकणे, तंगड्या गळ्यात पडणे, तंगड्या गळ्यात येणे–कारस्थान स्वतःवरच उलटणे. तंगड्या घासणे –खूप कष्ट घेणे, श्रम करणे. तंगड्या घालणे, तंगड्या देणे –१. दुसऱ्याच्या कामात अडथळा निर्माण करणे. २. परपुरुषाशी सख्य जुळवणे, संभोग करणे. तंगड्या तोडून जाणे, तंगड्या तोडत जाणे, तंगड्या ताणत जाणे –पायाने चालत जाणे; पायपीट करणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तंत्रपाठ

पु. (ग्राम्य सांकेतिक) संभोग; मैथुन.

दाते शब्दकोश

तंत्रपाठ      

पु.       (ग्राम्य, सांकेतिक) संभोग; मैथुन.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उपभोग

पु. १ आस्वाद; विलास; सुख भोगण्याची क्रिया; उपयोग; भोग; भोगवटा. २ अनुभव; स्वतः अनुभवानें मिळवि- लेलें ज्ञान (सुखदुःखाचें). ३ रतिसुख; संभोग. ४ (अर्थशास्त्र) मालाचा खप, उठाव. 'उत्पादन व उपभोग यांमध्यें मोठी खिंड पाडतां कामा नये.' -ज्ञाको (उ.) १९. [सं. उपभुज्]

दाते शब्दकोश

उपभोग      

पु. १. आस्वाद; विलास; सुख भोगण्याची क्रिया; उपयोग; भोग; भोगवटा. २. अनुभव; स्वतः अनुभवाने मिळवलेले ज्ञान (सुखदुःखाचे). ३. रतिसुख; संभोग. ४. (अर्थ.) मालाचा खप, उठाव; गरजांच्या समाधानासाठी वस्तूंचा, सेवांचा केलेला विनियोग : ‘उत्पादन व उपभोग यांमध्ये मोठी खिंड पाडता कामा नये.’ – साको (उ) १९. [सं. उपभुज]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उपस्थ

पु. न. १ स्त्री किंवा पुरुष यांचें जननेंद्रिय; लिंग; योनि; मैथुनेंद्रिय; पंचकमेंद्रियापैकीं एक. २ रथामध्यें सारथ्यानें बसावयाची जागा; गाडीवान बसण्याची जागा. [सं. उप + स्था] ॰निग्रह पु. संभोग, मैथुन न करणें; विषयोपभोगापासून अलिप्तता; ब्रह्मचर्य; विषयनिवृत्ति; असिधाराव्रत.

दाते शब्दकोश

उपस्थनिग्रह      

पु. संभोग, मैथुन न करणे; विषयोपभोगापासून अलिप्तता; ब्रह्मचर्य; विषयनिवृत्ती; असिधाराव्रत. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

विपरीत

वि. १ उलट; विरुद्ध; उफराटें; विचित्र. 'केळि जशा विपरीत तशा उरु पावलें तीं ।' -राधावर्णन अकक २. -ज्ञा १.२१९. 'नये नानाचे मनास जाहलें विपरीत इतरांस ।' -ऐपो ३०६. २ प्रतिकूल; अननुकूल; अप्रसन्न. 'आणि विकारांची जे वारी । ते विपरीत ज्ञानाची परी ।' -ज्ञा १५.५२१. ३ अन्य; भिन्न प्रकारचा. [सं. वि + परि + इ = जाणें] ॰काल-पु. प्रतिकूलसमय; कष्टदशा. ॰भावना-स्त्री. १ विरुद्ध किंवा भिन्न रूप, आकार, स्थितिवगैरे. २ प्रकृतीमध्यें पडलेला फरक. ३ एखाद्यासंबंधी बदललेली वृत्ति, कल्पना वगैरे. ४ (तत्त्व.) देहात्म बुद्धि; जीव व ब्रह्म यांमध्यें भेद आहे किंवा देह हाच आत्मा आहे अशा प्रकारची उलटी समजूत. ॰भोग-पु. पुरुषायित संभोग. 'विपरीत भोग करून मनोरथ कळेल तसा पुरवून ।' -प्रला ११७. ॰राशी-पु. (शाप.) उलट केलेली संख्या. (इं.) इन- व्हर्स फंक्शन. ॰लक्षणा-स्त्री. व्याजोक्ति; औपरोधिक वर्णन. ॰ज्ञान-न. अन्यथाज्ञान; मिथ्याज्ञान; जग सत्य आहे असें म्हणणें. 'विपरीतज्ञान म्हणिजे देखणें । येकाचें येक ।' -दा २०. १.२३. विपरीतज्ञानाचा कोंभ फुटणें-चूक होणें; भ्रम होणें. विपरीतार्थ-पु. परस्पर विरोधी, उलटसुलट अर्थ. 'तरी तितुके हि सत्य देख । विपरीतार्थ न मानिजे ।' विपर्यय-पु. १ विपर्यास; विरुद्धता; उलटेपणा; उरफटेपणा. २ विरुद्ध दशा; प्रतिकूलता (यावरून) कष्टदशा; संकट; चूक; गैरसमज; उलटा- पालट वगैरे. [सं. वि + परि + इ = जाणें] विपर्यस्त-वि. विपरीत केलेलें; विपर्यास केलेलें; उलटलेलें (वाईट अर्थानें). विपर्यास- पु. १ विपरीतपणा; विरुद्धता; उफराटेपणा. २ प्रतिकूलता; विपर्यय पहा. ३ बदल; फरक रूपांतर; अवनति. [सं.]

दाते शब्दकोश

व्यवाय

पु. संभोग; रति. 'तिनें गर्भारपणी आनंदयुक्त व भ्रतारापासून निराळें म्हणजे व्यवायाशिवाय रहावें. '-बाचि २. [सं.]

दाते शब्दकोश

जाणे      

अक्रि.       १. गमन करणे; चालू लागणे; प्रवास करणे; पुढे सरणे; पूर्वस्थळ सोडणे. २. पूर्वस्थळ सोडून विवक्षित स्थळ गाठणे; स्थलांतर करणे. ३. निघून जाणे; नाहीसे होणे; नाश पावणे; हरवणे; हलविलेले असणे. ४. लोटणे; क्रमणे (वेळ). ५. छिद्रादिकांत प्रवेश करणे; आत शिरणे; समाविष्ट करणे. ६. (विशेषतः भूतकालात उपयोग) वाया जाणे; नासणे; निरुपयोगी, टाकाऊ होणे; खराबणे. ७. घडून येणे; होणे (नजरचूक, गुन्हा, योग्य किंवा रूढ मार्गाचे उल्लंघन). ८. एखाद्याकडून चुकून होणे, घडून येणे (गफलतीने एखादी चुकीची गोष्ट). ९. वजा होणे; कमी होणे. १०. निर्बल होणे; शक्ती जाणे; गुण जाणे (इंद्रिये, औषधे यांचा). ११. अनुसरणे; पाठीमागून जाणे; वैधणे; अभिलषित होणे (मन, डोळे, कान, प्रीती इ.) (वर अथवा कडे शब्दाबरोबर प्रयोग). १२. दिले जाणे. (शब्द, वचन – भूतकाळी उपयोग). १३. विझणे (दिवा, प्रकाश, अग्नी). १४. ऱ्हास, नाश होणे. झिजणे (शरीर). १५. एखाद्या स्त्रीशी रत होणे; संभोग करणे. १६. एखादा पदार्थ विवक्षित कालपर्यंत टिकणे. कोणत्याही क्रियापदाच्या वर्तमानकालवाचक विशेषणाबरोबर ह्या क्रियापदाचा उपयोग केला असता त्याचा अर्थ क्रियासातत्य दर्शविण्याकडे होतो. उदा. १. जसा व्यापार वाढवाल तसा मी पैसा देत जाईन. २. सकर्मक क्रियापदाच्या पूर्णभूतकाळाबरोबर उपयोग केला असता कर्मकर्तरीचा अर्थ होतो. जसे :— तुला शिक्षा केली जाईल. ३. ऊनप्रत्ययान्त धातुसाधिताशी उपयोग केला असता याचा अर्थ क्रियापूर्णता दर्शविण्याकडे होतो. जसे :— तळ्यातील पाणी आटून गेले. ४. दुसऱ्या क्रियापदाच्या आज्ञार्थी रूपानंतर ह्या क्रियापदाच्या आज्ञार्थाचा उपयोग केला असता पहिल्या क्रियापदावर जोर दिला जाऊन, क्रियेचा जोरदारपणा सिद्ध होतो. जसे – आण जा; ठेव जा; दे जा; कर जा इ. [सं. या] (वा.) जाजा येये करणे – निरर्थक पुनः पुनः जाणे येणे; खेपा. (क्रि. घालणे)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कर्म

न. १ एखादें काम, कृत्य. 'हें कर्म झालें समरांत जेव्हां । होतास कोठें रणभीरु तेव्हां ।' -वेणीसंहार ३. २. स्नान- संध्या, यज्ञयागादि धार्मिक विधि; याचे नित्य, नैमित्तिक व काम्य असे तीन भेद आहेत. ३ सांप्रतच्या आयुष्यांतील कृति, चाल, आचार, वर्तणूक; यावरून दैव किंवा नशीब अशा अर्थानें योजतात-येथें दैव म्हणजे पूर्वजन्मार्जित पापपुण्याचा भोगवटा होय; पूर्वजन्मकृत आचरण; संचित. 'अरे अरेकर्मा । बारा वर्षें झालीं याच धर्मा ।।' 'या व्यापारांत मीं साफ बुडालों, माझें कर्म ! दुसरें काय ?' 'कर्मबलिवंत', 'कर्मबलवत्तर' 'घोर-कठिण कर्म' या संज्ञा कर्माचें (दैवाचें) वर्चस्व, काठिण्य, निष्ठुरता दाखवितात. ४ विशिष्ट काम; नैतिक कर्तव्य; जाति, धंदा वगैरेंनीं मान- लेलें आवश्यक कृत्य. ५ (व्या.) कर्त्यानें अमुक क्रिया केली हें दाखविणारा शब्द; कर्तृविषयक व्यापाराचें कारक; कर्माची विभक्ति प्रायः द्वितीया असते. 'रामा गाय बांधतो' यांत गाय हें कर्म. ६ उद्योग; कामधंदा; नेमलेलें, विशिष्ट प्रकराचें काम. ७ सुरतक्रिडा; मैथुन; रतिसुख; संभोग. 'त्यानें तिच्याशीं कर्म केलें.' ८ सामान्य क्रिया; ऐहिक व्यापार; मायिक क्रिया. 'माया हा सामान्य शब्द असून तिच्याच देखाव्याला नामरूपें व व्यापाराला कर्म हीं विशिष्टार्थक नामें आहेत.' -गीर २६०. [सं.] (वाप्र.) कर्म दोन पावलें पुढें-नशीब नेहमीं आपल्यापुढें धांवत असतें. ॰आड ठाकणें-कर्म आडवें येणें; आपत्ति ओढवणें. 'अन्न घेवोनि जों निघाली । तों कर्म आड ठाकलें ।' -ह १६.१३०. कर्मानें ओढणें-ओढवणें-दैवाचा पाश येऊन पडणें; दैवाधीन होणें. -नें जागें होणें-दैव अनुकूल होणें. -नें धांव घेणें-दैव पुढें येणें; दैवाकडून प्रतिबंध, अडथळा होणें. -नें पाठ पुरविणें- उभें राहणें-दैवानें मोडता, अडथळा घालणें; कर्म ओढवणें. -नें मागें घेणें-सरणें-दैवानें साहाय्यने करणें; केल्या कर्माचें फळ-न. केलेल्या कृत्याचा परिणाम. 'केल्या कर्माचें फळ बापा । ऐश्वर्य तुज देतील ।' -अमृत, नव ४४३. (सामाशब्द) ॰कचाट- न. प्रारब्धामुळें मागें लागलेलें दुर्दैव, संकट, विपन्नावस्था; कर्म- कटकट; पूर्व जन्मीचें पाप, भोग. 'प्राणी कष्टकष्टोंचि मेले । कर्मकचाटें ।' -दा १८.८.२०. [सं. कर्म + म. कचाट] ॰कटकट- खटखट-स्त्री. १ प्रारब्धयोगानें वांट्यास आलेलें किंवा गळ्यांत पडलेलें व कंटाळा येण्याजोगें कोणतेंहि काम; वरचेवर त्रास देणारें, डोकें उठविणारें, अडथळा आणणारें काम किंवा व्यक्ति; कोणतीहि नशीबीं आलेली पीडा, त्रास, छळ, जाच वगैरे. २ (ल.) जिकिरीचें, नावडतें काम; व्याद. 'मी म्हातारा झालों, माझ्यामागें ही शिकविण्याची कर्म कटकट कशाला ?' 'आतां त्यांची कर्मकटकट आपणांस कशाला हवी' -नि ६७. ३ (ल.) भांडण; तंटा; कटकट. 'तुम्हां दोघांत नेहमीं इतकी कर्मकटकट चालत असते.' -भा ३७. ॰कट्टो-वि. (गो.) हतभागी; कर्मकरंटा. ॰कथन-नी-न. १ कर्मकथा; कर्माची कहाणी. २ (ल.) दुर्दैवी प्रसंगकथन; दुःखदकथा; कर्मकथा पहा. 'ऐसी आमुची कर्मकथनी । तें अनायासें आलें सर्व घडोनी ।' -मक २६. १८५. [सं.] ॰कथा-स्त्री. १ प्रारब्धामुळें भोगलेल्या दुःख, त्रास, दगदग, वगैरेची दुसर्‍याजवळ सांगितलेली गोष्ट, वृत्तांत, कहाणी. २ आत्मश्लाघेचें किंवा रिकामटेकडें भाषण; बाता. ३ एखाद्या प्रसंगाची किंवा कृत्याची खरी व इत्थंभूत हकीकत. ४ कंटाळवाणें, निरर्थक भाषण, बडबड. [सं.] ॰कपाट-न. कर्म- कचाट पहा. [सं.] ॰कहाणी-स्त्री. कर्मकथा पहा. ॰कांड- न. त्रिकांड वेदांतील यज्ञासंबंधींचा कर्ममार्गदर्शक व आचारनिद- र्शक भाग; -मंत्र व ब्राह्मणें मिळून जो वेदभाग त्यास कर्मकांड व उपनिषदांस ज्ञानकांड म्हणतात. 'कर्म कांड तरी जाणें । मुखोद्गत पुराणें ।' -ज्ञा १३.८२८. २ धर्मकर्में, आचारविचार, संस्कार वगैरेना व्यापक अर्थानें हा शब्द लावितात. (सामा.) आन्हिक; नित्यनैमित्तिक आचार. 'कृष्णगीत रुचतां श्रवणातें । कर्मकांड रुचि न दे कवणातें ।।' 'आतां आपलें कर्मकांड अगदीं एकाबाजूस ठेवावें.' -चंद्रगुप्त ३५. ३ कंटाळवाणी, निरर्थक बडबड; कर्मकथा. (क्रि॰ गाणें; सांगणें; बोलणें). ॰कार-वि. १ (गो.) कर्मनिष्ठ. २ शिल्पी; लोहार. [सं.] ॰काल-ळ-पु. धर्मकार्यें करण्यास उचित असलेला काळ, वेळ, समय. [सं.] ॰केरसुणी-स्त्री. कर्मरूपी केर सरसकट झाडणारी, कर्मापासून सोडविणारी केरसुणी. 'तेव्हां तेचि श्रद्धा होये । कर्मकेरसुणी ।' -ज्ञा १७.६४. ॰गति- स्त्री. दैव; प्रारब्ध; नशीब. दैवगति पहा. [सं.] ॰चंडाळ- चांडाळ-पु. (कृत्यानें) निवळ चांडाळ. १ अतिक्रूर, पाषाणहृदयी माणूस. २ स्वैर वर्तनी; धर्मलंड; दुरात्मा. [सं.] ॰चोदना- स्त्री. कर्म करण्याची प्रेरणा. 'कर्मचोदना व कर्मसंग्रह हे शब्द पारिभाषिक आहेत.' -गीर ८३५. [सं.] ॰ज-वि. कर्मापासून उत्पन्न झालेलें. 'सकळ यज्ञ कर्मज' -ज्ञा ८.४६. [सं.] ॰जड-पु. कर्मठ लोक. 'तिन्हीं लोकांचा शास्ता । ईश्वर तो मी नियंता । येणें कर्मजडांची वार्ता । अनीश्वरता छेदिली ।' -एभा १०.६२१. ॰जात-न. सर्व प्रकारचें कर्म; सर्व तर्‍हेचे व्यापार. 'मग सस्य फळपाकांत । तैसें निमालिया कर्मजात । आत्मज्ञान गिंवसित । अपैसें ये ।' -ज्ञा १८.१२९. [सं.] ॰जीव-वि. (गो.) बारीक, लहान प्राणी. ॰दक्ष-वि. धर्माचार व विधि यांत निपुण; कर्मठ; कर्मशील; कर्मनिष्ठ, कर्मिष्ठ यांसारखा उपयोग. 'कर्मदक्षा कर्ममोचका । जयराम कोदंड भंजना ।' [सं.] ॰धर्म-न. (क्क.) पु. (यासमासांतील धर्म शब्द जरी पुल्लिंगी असला तरी बहुतेक सर्व समास नपुंसकलिंगीच आहेत; कारण यांतील प्रधानार्थ कर्म शब्दापासूनच निघालेला असून धर्म शब्द केवळ जोडशब्द आहे) वर्तन; वर्तनक्रम; कृत्य; आचरण. 'जसें ज्याचें कर्मधर्म तशी त्यास फलप्राप्ति,' 'कर्माधर्मानें कोण्ही संपत्ति भोगतो आणि गादीवर बसतो, कोण्ही फांशी जातो.'; 'कोण्हाच्या कर्मधर्मांत कोण्हाचा वांटा नाहीं.' = प्रत्येकाला स्वतःच्या कृत्याबद्दल झाडा दिला पाहिजे. ॰धर्मगुण-पु. कर्म- धर्माचा प्रभाव, शक्ति. कर्मधर्मसंयोग पहा. [सं.] ॰धर्मविर- हित-वि. धर्माज्ञा, धार्मिक व्रतें व कृत्यें ज्यानें सोडलीं आहेत किंवा जो त्यापासून मुक्त झाला आहे असा; ऋषि किंवा साधुजन यांना चांगल्या अर्थीं व उच्छृंखल व धर्मलंड यांना वाईट अर्थीं लावतात. 'आम्हीं कर्मातीत झालों म्हणती' या शब्दाचा अर्थ दोन्हीं प्रकारचा म्हणजे चांगला व वाईटहि आहे. 'झालों कर्म- धर्मविरहित । मना आवडे तो भोग भोगित ।' [सं.] ॰धर्म- संयोग-धर्मयोग-पु. १ स्वतःचें दैव आणि सत्कर्म यांचा संयोग; भाग्य व सदाचार यांचें ऐक्य (पूर्वजन्मार्जित आणि इहजन्मार्जित सत्कृत्यांचें फळ मिळून) २ अकल्पित मेळ; यदृच्छा; प्रारब्धयोग. ॰धर्मसंयोगानें-क्रिवि. अचानक; चम- त्कारिक किंवा अकल्पित मेळ मिळून येऊन; प्रसंगोपात्त; प्रारब्ध- योगानें. 'कर्मधर्मसंयोगानें मी अगदीं सहज बाहेर गेलों तों माझी नजर तिच्याकडे गेली.' -मायेचा बाजार. 'कर्मधर्मसंयोगानें तुमची गांठ पडली आहे तर गोड बोलून काळ लोटावा.' ॰धारय समास-पु. (व्या.) वक्त्याच्या मनांत उभय शब्दांचा भाव ज्यांत समान असतो किंवा उभय शब्दांचा परस्पर उप- मानोपमेयभावसंबंध ज्यांत असतो तो; विशेष्य-विशेषणांचें सान्निध्य असून त्यांचा जो समास घडतो तो; उदा॰ 'भक्तिमार्ग = भक्ति तोच मार्ग, किंवा भक्तिरूप जो मार्ग तो; भवसागर; संसारा- टवि; काळपुरुष.' -मराठीभाषेचेंव्या. २७५. तत्पुरुषसमासाचा एक भेद. [सं.] ॰निष्ठ-वि. कर्मठ पहा. 'जया लाभाचिया आशा । करूनि धैर्यबाहूंचा भरंवसा । घालीत षट्कर्मांचा धारसा । कर्मनिष्ठ ।' -ज्ञा ६.४७४. [सं.] ॰निष्ठा-स्त्री. १ कर्मावर निष्ठा. २ कर्म- योग. 'वैदिक धर्मांत...दोन मार्ग...आहेत, पैकीं एका मार्गास...ज्ञाननिष्ठा व... दुसर्‍यास कर्मयोग किंवा संक्षेपानें नुसता योग अगर कर्मनिष्ठा असें म्हणतात. -गीर ३०१. [सं.] ॰न्यास-पु. १ कर्म किंवा कृत्यें त्याग (पुढील जन्मीं हित व्हावें किंवा फळ मिळावें म्हणून). २ फलन्यास; कर्मा- पासून मिळणार्‍या फलाविषयींच्या इच्छेचा किंवा आशेचा त्याग; निष्कामकर्म. [सं.] ॰फल-न. प्रारब्धापासून मिळणारें फळ; पूर्वजन्मीं केलेल्या पापपुण्याचें चांगलें अगर वाईट असें या जन्मीं भोगावें लागणारें फळ. 'सांडूनि दुधाचि टकळी । गोंवारी गांवधेनु वेंटाळी । किंबहुना कर्मफळीं । तैसें कीजे ।' -ज्ञा १८.१७४. [सं.] ॰फुटका-वि. भाग्यहीन; दुर्दैवी; कमनशिबाचा; अभागी. [कर्म + फुटणें] ॰फुटणें-सक्रि. दुर्दैव ओढवणें; गोत्यांत येणें; नुकसान होणें. ॰बंध-पु. फलाशेनें केलेल्या कर्मामुळें प्राप्त झालेलें बंधन; प्रारब्धप्राप्त स्थिति; मायिक पसारा; ऐहिक मायापाश; प्रपंच; संसार. 'जो पहुडला स्वानंदसागरीं । कर्मबंधीं न पडे तो ।' [सं.] ॰बंधु-पु. व्ययसायबंधु; समव्यवसायी; एकाच प्रकारचें काम करणारा. [सं.] ॰भुवन-न. कर्मरूप घर. 'तेथ न्यावो आणि अन्यावो । हा द्विविधु साधूनि आवो । उभवितां न लवी खेंवो । कर्मभुवनें ।' -ज्ञा १८.४५५. [सं.] ॰भूमि, भूमिका -स्त्री. १ इहलोक; मृत्युलोक; यज्ञादि धार्मिक कृत्यें जेथें करतां येतात ती जागा; कर्म करावयाचें क्षेत्र; रंगभूमि (मर्त्यांची). 'जेथें मनाचा प्रवेशु नाहीं । त्यांची पायवाट ते ठायीं । ऐसें स्वइच्छा विचारितां महीं । आले ते पाही कर्मभूमीसी' -एभा २.१८४. 'परम प्रतापी दशरथपिता । कर्मभूमीस येईल मागुता ।' -रावि १६.८६. [सं.] २ प्राधान्यानें भारतवर्ष. -हंको. ॰भोग-पु. भवितव्य- तेच्या नियामानुरूप मिळणारीं सुखदुःखें सोसणें; दैवाची भरपाई; पूर्वसंचितानुरूप या जन्मीं प्राप्त होणारी स्थिति. 'माझा कर्मभोग चुकत नाहीं.' [सं.] ॰भ्रष्ट-वि. धर्मशास्त्रविहित नित्यनैमित्तिक कर्मांचें आचरण न करणारा; धर्माज्ञा व धर्मकर्म परिपालनाविषयीं उदासीन; कर्तव्यच्युत; कर्तव्यपराङ्मुख. [सं.] ॰मार्ग-पु. १ स्नानसंध्या इ॰ कर्में करण्याची रीत; यज्ञयागादि कर्मरूप ईश्वर- प्राप्तीचा किंवा मोक्षाचा साधनीभूत मार्ग; सत्कृत्यें केल्यानें व धर्माचरणानें मोक्षाला जाण्याचा मार्ग. २ धर्मकृत्यें करण्याचा खरा मार्ग. ३ श्रौत म्हणजे यज्ञयागादि कार्मांचा मार्ग. 'भारतीय तत्त्वज्ञानांत मोक्षाचे कर्ममार्ग, ज्ञानमार्ग व भक्तिमार्ग असे तीन मार्ग सांगितले आहेत.' -ज्ञाको क १३२. [सं.] ॰मार्गी-वि. कर्ममार्गानें जाणारा; जो निष्ठापूर्वक धर्माचरण करून परमेश्वर- प्राप्तिविषयीं झटतो तो. [सं.] ॰मुक्ति-स्त्री. स्नानसंध्यादि नित्य नैमित्तिक कर्में करण्याची आवश्यकता ज्या स्थितींत उरत नाहीं अशी अवस्था; नैष्कर्म्यसिद्धि [सं.] ॰मोचक-वि. कर्ममार्गा- पासून मुक्त करणारें; ऐहिक सुखदुःखापासून सोडविणारें. 'कर्म- दक्षा कर्ममोचका । जयराम कोदंडभंजना ।' [सं.] ॰मोचन- न. कर्ममार्गापासून मुक्तता. ॰योग-पु. १ प्रारब्ध; दैव; यदृच्छा; योगायोग. २ दैवगतीनें घडणारी गोष्ट. -शर. ३ व्यापार; चळवळ किंवा कार्य करण्याचें तत्त्व. -ज्ञाको क १३५. ४ ज्ञान हेंच जरी मोक्षसाधन असलें तरी कर्मशून्य राहणें कधींच शक्य नसल्यामुळें त्यांचें बंधकत्व नाहींसें होण्यास कर्में कधींहि न सोडतां शेवट- पर्यंत तींच निष्कामबुद्धीनें करीत राहण्याचा जो योग तो. -टिसू ४७-४८; याला इंग्रजींत एनर्जीझम असा प्रतिशब्द गीतारह- स्यांत सुचविला आहे. -गीर ३०१ वरील टीप. या योगाचें जें शास्त्र त्यास कर्मयोग म्हणतात व तें आचरणारा तो कर्मयोगी). 'बलवंत (टिळक) कर्मयोगी' -सन्मित्रसमाज मेळा पद्यावली १९२९, पद १. [सं.] ॰लंड-वि. धर्मशास्त्रविहित नित्यनैमित्तिक विधींचें पालन न करणारा; धर्मभ्रष्ट; धर्मविधि व धर्माज्ञेचा धिक्कार करणारा, उपहास करणारा [सं.] ॰लोप-पु. नित्य धार्मिक क्रमां- तील एखादें कर्म सोडणें, न करणें; दीर्घकालपर्यंत नित्य अगर नैमित्तिक कर्मविधि न करणें. [सं.] ॰वाचकधातुसाधित- न. मूळ धातुस 'ला' किंवा 'लेला' हे प्रत्यय लाविले असतां होणारें धातुसाधित. उ॰ केलेला, दिलेला. परंतु यांत 'पढ' धातूचा गण वर्ज्य करून हे प्रत्यय लावितेंसमयीं सकर्मक धातूस 'ई' आगम होतो. उदा॰ ठेविला, अर्पिला, आकर्षिलेला. -मराठी- भाषेचें व्याकरण १७३. [सं.] ॰वाद-पु. १ धर्मविहित कर्मां. नींच मोक्षप्राप्ति होते असें मत. २ मनुष्यास विशिष्ट जन्मांत जें सुखदुःख मिळतें तें त्याच्या पूर्व जन्मांतील कृत्यांचें फल होय असा युक्तिवाद; कर्माचें फळ भोगणें ही कल्पना. -ज्ञाको क १३६. [सं.] ॰वादी-पु. कर्मवादावरच भिस्त ठेवून त्याचें समर्थन करणारा माणूस [सं.] ॰वासना-स्त्री. दैनिक धर्मकृत्यांबद्दलची इच्छा, आवड. [सं.] ॰विधि-पु. (अनेकवचनींहि प्रयोग होतो) धर्मसंबंधीं कृत्यें वगैरेचे नियम, पध्दति, रीति, मार्ग; कोणत्याहि विशिष्ट प्रकारच्या धर्मकृत्याचें सूत्र किंवा विधान. [सं.] ॰विपाक-पु. १ पूर्व जन्मीं केलेल्या पुण्य, पाप वगैरे कृत्यांचें फल पुढील जन्मीं हटकून यावयाचें हा सिद्धांत. २ कर्माची फलनिष्पत्ति; परिणाम. [सं.] ॰वीर-पु. कार्यकर्ता; पराक्रमी मनुष्य. 'कर्मवीर निघुनी गेलो' -संग्राम ४९. [सं.] ॰वेग- कर्माचा वेग-पु. दैवाचा किंवा प्रारब्धाचा जोर, झपाटा, सामर्थ्य, धक्का; पूर्वसंचिताचा प्रभाव. 'कलालाचा भोवरा । जैसा भवे गरगरा । कर्मवेगाचा उभारा । जोंवरी ।' 'जेथें कर्माचा वेग सरे । तेथें धांव पुरे ।' [सं.] २ (अनेक वार केलेल्या) कृत्यांचा जोर, सामर्थ्य, प्रचोदन; संवयीचा जोर; स्वाभाविक प्रेरणा; 'कर्मवेग भलत्याकडे ओढून नेईल.' ॰शील-वि. कर्मा- सक्त; धर्मानें वागणारा; शास्त्रानें संगितलेलीं सर्व धर्मकर्में जो मनापासून काळजीपूर्वक करतो तो. [सं.] ॰संगी-वि. कामांत, धर्मानुष्ठानांत, व्रतनियमनांत सतत गढलेला; याच्या विरुद्ध ज्ञानाभ्यासी [सं.] ॰संग्रह-पु. निरनिराळे व्यवसाय, व्यापार; आपण ज्या क्रिया करतों त्या; मानसिक क्रियेच्या तोडाची बाह्य, प्रत्यक्ष क्रिया. 'कर्मसंग्रह या शब्दानें त्याच मानसिक क्रियेच्या तोडीच्या बाह्य क्रिया दाखविल्या जातात.' -गीर ८३६. [सं.] ॰संचय-पु. कर्मसंग्रह; मनुष्याचे अनेकविध व्यापार, क्रिया; चलनवलनादि कृत्य 'तैसेंचि कर्ता करण कार्य । हा कर्मसंचयो ।' -ज्ञा १८.५१२. [सं.] ॰संन्यास-पु. १ कर्मांचा त्याग; नित्य नैमित्तिकादि कर्में करण्याचें सोडून देणें. २ शारीरिक सोडून इतर सर्व कर्मांचा त्याग (शांकरमत). 'शंकराचार्यांच्या ग्रंथांत कर्मसंन्यासच प्रतिपाद्य आहे.' -टिसू ५ [सं.] ॰सूत्र-न. नित्य धर्मकर्माची व त्यासंबंधीं नियमांची मालिका; कर्तव्यकर्म- परंपरा. 'भवपाश तोडिते शस्त्र । ज्ञान ईश्वराचें विचित्र । परि जिवाचें कैसें कर्मसूत्र । जे अनावडी तेथें विषयीं ।' ॰हीन- वि. धार्मिक नियम, विधि न पाळणारा; धार्मिक नियमाबद्दल काळजी न करणारा. [सं.] म्ह॰ कर्मणो गहना गति: = नशि- बाची गति जाणणें शक्य नाहीं (एखादी वाईट गोष्ट अकल्पित घडली म्हणजे दैववादी मनुष्य ही म्हण म्हणतो.)

दाते शब्दकोश

बाट

पु. १ अपवित्रपणा; विटाळ; बाटणूक; स्वजातींत वाव- रण्याची अयोग्यता (बाटण्यामुळें). (क्रि॰ पडणें; असणें). २ डाग; कलंक; दोष; ठपका; दोष देण्याचा प्रसंग, वेळ. (क्रि॰ ठेवणें; पडणें; असणें; लागणें). -वि. १ लबाड; लुच्चा; लबाडींत व हलकटपणांत हुशार, धूर्त. 'उलीसेंच पोर बाट मोठें । थोरपण असून चहाड खोटें ।' -भज १०५. २ बाटगा; बाडगा; दांडगा; उच्छृंखल, तसेंच कडक, तल्लख, शिरजोर, आवरण्यास कठिण (मनुष्य घोडा, बैल इ॰). [सं. भ्रष्ट; हिं.] ॰गा-बाडगा-वि. १ बाट- लेला; भ्रष्ट; पतित; आचारविचारशून्य; स्वजातींत वावरण्यास अपवित्र, अयोग्य. २ (हलकटपणाच्या व नीचपणाच्या कामांत) हुशार; धूर्त; कुशल; चलाख. ॰गेला, बाडगेला-वि. बाटगा पहा. ॰गी-वि. १ बाटलेली. २ व्यभिचारिणी. ॰णूक, बाटणी- स्त्री. भ्रष्टता; भ्रष्ट होण्याची किंवा केला गेल्याची क्रिया; विटाळ. [वाटणें] ॰नाट-पु. विटाळ; बाटगेपणा; भ्रष्टता (व्यापक). (क्रि॰ पडणें; होणें; असणें). [बाट + नाट] ॰वडा, बाटोडा- पु. बाटाबाट; सर्वत्र भ्रष्टाकार; जिकडेतिकडे झालेली भ्रष्टता; (सामा.) बाटणूक. बाटाबाट-स्त्री. बाटवडा पहा. पवित्र व अपवित्र यांमध्यें भेद न पाळ्यानें किंवा व्यभिचारामुळें झालेला भ्रष्टाकार. बाटीव, बाट्या-वि. बाटलेला; भ्रष्ट झालेला; धर्म- भ्रष्ट. बाटणें-अक्रि. धर्मभ्रष्ट होणें (दुसर्‍या जातीशीं अगर धर्माच्या मनुष्याशीं वैषयिक संभोग, अन्नव्यवहार किंवा निषिद्ध पदार्थ सेवन यामुळें) स्वजातीशीं व्यवहार करण्यास अपवित्र व अयोग्य असणें; (एखादी वस्तु) उपयोगास अयोग्य किंवा अप- वित्र होणें. बाटविणें-सक्रि. विधिपूर्वक धर्मभ्रष्ट करणें; दुसर्‍या धर्मांत नेणें; अमंगलता आणणें; भ्रष्ट करणें (वस्तु किंवा मनुष्य); (गो.) बाटौंचें.

दाते शब्दकोश

ऋतु

पु. १ विशिष्ट कालावधि; हवामानाप्रमाणें मानलेला वर्षाचा एक भाग; हवामानांत नियमानें होणारा फरक; भारतीयकाल- गणनेप्रमाणें दोन महिन्यांचा काळ. हे वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद्, हेमंत व शिशिर असे सहा ऋतु कल्पिले आहेत. यूरोपांत वसंत, ग्रीष्म, वर्षा व शरद असे चारच मानतात. ‘ते ऋतुकळींचा मारुतू । ज्ञानवनांतू जैं रिघे ।।’ –एभा १२.१. २ स्त्रियांचा मासिक विटा- ळाचा काल; स्त्रियांचा रजोदर्शन काल. ३ (ल.) हंगाम; मोसम (झाडावरील फुलां-फळांचा). ४ गर्भधारणेचा काळ; फळण्याचा काळ (पशुपक्ष्यांचा); ज्वानी. ५ सहा संख्येचा गट; ह्यावरून (ल.) सहा ही संख्या. [सं.] ॰काल-१ गर्भधारणेचा काल. हा रजो- दर्शनापासून १६ दिवस असल्यामुळें संभोगास व सुप्रजाजननास योग्य समजला जातो. ‘हेंही वेदें नेमिलें जाण । स्वदारागमन ऋतु काळीं ।’ –एभा २१.१९६ २ ऋतुपरत्वें येणारा काल; ऋतु चालू असलेली वेळ; हंगामा; मोसम. ‘ऋतुकाळें फळें येती पूर्ण । त्यांसि दृष्टिभेती हाटी जाण ।’ –एभा २३.९८. ‘ऋतुकालोद्भव पुष्प-फळ ।’ ॰गण-पु. ऋतूंचा समुदाय; सारे ऋतू. ॰त्त्र-न. तीन ऋतू; उन्हाळा, पावसाळा, हिंवाळा. ' पैं ऋतुत्रय आकाशें । धरुनियाही जैसे ।। ' -ज्ञा १४.२९१. [सं.] ॰दर्शन-न. रजोदर्शन; स्त्रियांस प्रथम प्राप्त होणारा ऋतु, विटाळ; नहाण; ऋतुप्राप्ति. ॰दान-न. संभोग; स्त्रीसमागम. ' ' अर्धरात्रीनंतर भार्येस ऋतुदान करावें.' -सुसु १७. ॰पति-पु. वसंतऋतु. ' जैसें ऋतुपतींचे द्वार । वनश्री निरंतर । वोळगे फळभार । लावण्येसी । ' -ज्ञा ३.१००. (जुनें अप. रूप ऋतिपति. ' फुलबडवा ऋतिपति । बोलका बृहस्पती ।। ' -शिशु ५१. ॰पर्याय-पु. ऋतूंचें परिवर्तन; अनुक्रम; ऋतूंचे पुन्हां- पुन्हां येणें; ऋतूंत बदल. ॰प्राप्ति-स्त्री. रजोदर्शन, ऋतु प्राप्त होणें; नहाण; विटाळशेण. ' मुख्य मुख्य स्मृती आणि सूत्रें हुएनसांगच्या वेळीं प्रचारांत असून पूज्य मानीत असत. या ग्रंथांतून मुलीचा लग्नाचा काळ आठ वर्षापासून ऋतुप्राप्तीपर्यंत सांगितला आहे.' -टि ४.११५. ॰मती-स्त्री. (अप. रूपें-ऋतुवंती-वंता-वती.) १ विटाळशी; प्रथम ऋतु प्राप्त झालेली कन्या; न्हाणोली. २ विटाळ प्राप्त झाल्यापासून १६ दिवसपर्यंत गर्भसंभव होण्यास किंवा गर्भधारणेस योग्य स्त्री; विशेषतः चवथ्या दिवशीं ती अशी अवश्य भोग्य समजतात. ' व्रत व श्राद्ध सांग होऊन ऋतुमतीची इच्छाही पूर्ण होईल. ' -सुसु १७. ॰शांति-शांत-स्त्री. प्रथम रजो- दर्शनसमयीं अनिष्ट मासादिकांचें दूषित फलनाशार्थ करावयाची शांति; गर्भाधानविधि. ' कारण पुढें शुक्राचा अस्त आहे म्हणून कुटुंबाची ऋतुशांति करून घ्या. ' -कफा ९. ॰संपादणें-ऋतुदान करणें; संभो गणें. ' दिवस पांचवा ऋतु संपादून मग जा गुणराशी । ' -पला ९२. ॰स्नाता-त-वि. १ विटाळशेपणानंतर स्नान करून शुद्ध झालेली. २ (चुकीनें) विटाळशी; ऋतुमती; रजस्वला. ' ऋतुस्नात भार्या, जिला चतुर्थ दिवस त्याच दिवशीं एकादशी......आली असेल तर... ' -सुसु १६. ३ संभोगयोग्य; उपभोग्य. 'कां शुनी जैशी ऋतुस्नात । तिसीं भोगूं यती श्वान बहुत.' -एभा १०.५२२. [सं. ऋतु + स्नाता; ऋतुस्नात चुकीचा प्रयोग]

दाते शब्दकोश

जबर-रा

स्त्री. दरारा; वरचढपणा. 'जबर त्यांची सबसे ज्यादा गादीवर दवलतराव शिंदा ।' -ऐपो १५२. -वि. श्रेष्ठ; ताकतवान (माणूस, पशु) जोराचा; सोसाट्याचा (पाऊस, वारा); कठीण; त्रासदायक (काम, ओझें); जंगी; मोठें (घर, नदी, झाड); उभट; कठिण (चढ, चढण); देण्यास कठिण; फार अवाढव्य (किंमत, दर); दुर्घट त्रासदायक (रोग); लांब- लचक; कंटाळवाणा (रस्ता, मार्ग, प्रवास); अगडबंब, अवजड (दागिना) (प्रमाणराहित्य आणि प्रचंडपणा दाखविण्यासाठीं योजतात). [अर. जब्र; फा. झबर्] 'सामाशब्द -॰जंग-पु. लहान तोफ. -वि. शूर; जवानमर्द; लढवय्या. [अर. जब्र + फा- जंग] ॰दस्त-वि १ जुलुमी; अन्यायी; दडप्या. २ श्रेष्ठ; मजबूत; बळकट; मोठ्या योग्यतेचा याच्या उलट जेरदस्त. ३ अदलाबद- लीनें जबर बरोबर योजतात. [फा. झबर्दस्त] म्ह॰ (व.) जबरदस्तका ठेंगा शिरपर = जबरदस्तापुढें कुणाचेंच चालत नाहीं. ॰दस्ती-स्त्री. १ जुलूम; जोर; अन्याय; बलात्कार. 'इंग्रजांची जबरदस्ती सर्वांवर पडली असें. वाटतें.' -ख ११.६०३०. २ आवेशाचें कृत्य, यत्न, श्रम. 'जबरदस्तीनें नदी डोंगरावरून नेली.' जबरा-पु. (छापखाना) मोठा टाईप; मजकुरांतील स्थलनामें व व्यक्तिनामें या टाईपांत घेण्याची वहिवाट आहे. जबरी-स्त्री. जबरदस्ती. 'पादशाही जबरीनें घेईल.' -चित्रगुप्त पृ ३४. [फा. झबरी] जबरीची चोरी-स्त्री. (कायदा) दरोडा; कोणा मनुष्यास जीव घेण्याची वगैरे भीति घालून त्याच्यासमक्ष त्याच्या ताब्यांतून जंगम माल नेणें. ॰जबरी- संभोग-पु. (कायदा) कोणा स्त्रीशीं तिच्या सम्मतीवांचून किंवा भय घालून मिळविलेल्या संमंतीनें किंवा नवर्‍याचें नातें आहे अशी फसवणूक करून केलेला संभोग; बलात्कार.

दाते शब्दकोश

पृष्ट-ष्ठ

न. १ मनुष्यादिकांची पाठ 'कूर्मरूप हो वनमाळी पृष्ठीं धरिली मोदिनी ।' -दशावतारांची भूपाळी पृ. ८. २ मागची बाजू; पाठीमागचा भाग; पिछाडी. ३ कागदाचीं दोन अंगें प्रत्येकीं; पुस्तकाचें पान. ४ पदार्थाची वरची बाजू. ५ (ज्यो. पदार्थ) (गोल इ॰ ची) बाहेरची पातळी. -सूर्य ८. ६ (महत्त्वमापन) जिला फक्त लांबी व रुंदी जाहेत अशी पातळी. (इं.) सर्फेस. ७ (कों.) बसण्याचा लहान पाट. [सं.] सामा शब्द- ॰केंद्र-न. वर्तुळाचा आंस, कणा, ध्रुव. [सं.] ॰केंद्रग- वृत्त-न. एका वर्तुळाच्या ध्रुवांतून जाणारें दुसरें वर्तुळ; गौणवर्तुळ. पृष्ठतोनुपृष्ठ-क्रिवि. १ एका मागून एक; पाठोपाठ; एकाच्या पुढें दुसऱ्याची पाठ येईल अशा तऱ्हेनें (चालत असलेला समाज इ॰ ). २ लागोपाठ; अनुक्रमें. [पृष्ठ + अनु + पृष्ठ] पृष्ठदेश-पु. १ घोडयाचा मध्यभाग आणि कंबरेपासून खुरापर्यंत पश्चिम भाग. -अश्वप १.६४. २ पृष्ठभाग पहा. ॰फल-ळ-न. (महत्त्वमापन) कोण त्याहि घनाकृतीची मर्यादा दाखविणाऱ्या सर्व पृष्ठांच्या क्षेत्र फळांची बेरीज; भरीव पदार्थांच्या वरील भागाचें क्षेत्रफळ. 'परि- घाला व्यासानें गुणिलें असतां गोलाचें पृष्ठफळ निघतें.' -मराठी ६ वें पुस्तक, पृ ३२८. ॰भाग-पु. १ पृष्ठ; पाठ. २ सपाटी; पातळी; सपाटीवरचा भाग. (इं.) सर्फेस. ३ (स्थापत्य) मागली उभारणी. (इं.) बँक् एलेव्हेशन. ॰मात्रा-स्त्री. (के, कै, को, कौ प्रमाणें) अक्षराच्या डोक्यावर न देतां पाठीमागें दिलेली मात्रा. बंगालीप्रमाणें जसें:-सैंधव, कपोत याजबद्दल सधव, क पा त. अशा पृष्ठमात्रा जुन्या कागद पत्रांतून उपयोजीत असत. ॰मैथुन-न. गुदमैथुन; अनैसर्गिक संभोग, बच्चेबाजी. ॰वंश- पु. (शाप.) पाठीचा कणा; मणिस्तंभ. (इं.) स्पाइन, बँकबोन. ॰वंशी-वंशीय-वि. कणा, हाडें इ॰ असलेला (प्राणी). (इं.) व्हेर्टेब्रेट.- प्राणिमो ११. प्राण्यांचे दोन वर्ग आहेत, एकाला पाठीचा कणा असतो तर दुसऱ्याला नसतो. ॰वंशहीन-वि. पाठीचा कणा नसलेला (प्राणिवर्ग). (इं.) इन्व्हर्टेब्रेट. ॰वंशाधर-न. १ शेवटचा कटिमणि; कटिकशेरुका. २ शेवटचा कटिमणि व माकडहाडाच्या वरच्या बाजूचें त्रिकोणाकृति हाड यांमधील प्रदेश. ॰स्वस्तिक-न. (नृत्य.) हात सारखे वेडेवांकडे फेकणें व हात फेकतां फेकतां त्यांचें स्वस्तिक करणें. तसेंच पायांनीं अपक्रांत- आकाशचारी करून अर्धसूचीकरणाप्रमाणें पाठीमागचे बाजूस पायांचे स्वस्तिक करणें. पृष्ठाकृति-स्त्री. (महत्त्वमापन) एक किंवा अनेक रेषांनीं सर्वांगाकडून मर्यादिलेली पातळी. [पृष्ठ + आकृति] पृष्ठांत- पु. पाठीचा खालचा भाग. 'उचलेलें कां नेणिजे । तैसें पृष्ठांत उचलेजे ।' -ज्ञा ६.१९७.[पृष्ठ + अंत] पृष्ठानुसारी(बाहु)- पु. (नृत्य.) बाहू पाठीकडे नेणें.

दाते शब्दकोश

दम      

पु.       १. श्वास; (ल.) प्राण; जीव. २. धाप; सुस्कारा; प्रमाणाधिक श्वासोच्छ्वास; कष्टाने श्वास टाकणे. (क्रि. कोंडणे, खाणे, घेणे, छाटणे, लागणे इ.). ३. स्वतःबद्दलची फाजील कल्पना; अहंमन्यता; अहंकार, महत्त्वाकांक्षा; गर्व; बढाईखोरपणा. ४. क्षण; पळ. ५. जोम; हिंमत; निश्चय; विश्वास; धीर. (क्रि. धरणे.) ६. शक्ती; सत्त्व; चांगलेपणा; सामर्थ्य; (औषधाचा) गुण. ७. श्वास कोंडून धरण्याची शक्ती, अवसान. ८. कायम ओलसरपणा, दमटपणा (जमिनीचा). ९. एखाद्या वाद्यातील (वाजविण्यासाठी कोंडलेली, भरलेली) हवा. १०. वाफ देणे (मंदाग्नीवर ठेवलेल्या अन्नाला). ११. धूम; पखवाज, संबळ इ. चा खर्ज सूर. १२. दृढनिश्चय; सहनशक्ती; उठावणी करण्याची, प्रोत्साहित करण्याची, पाठपुरावा करण्याची शक्ती (संपत्ती, अधिकार, उद्योग यांची); व्यापारधंद्यातील भरभराट, किफायत, गब्बरपणा. १३. धान्याचा सकसपणा जो पदार्थ (केळी, मका इ.) खाल्ला असता लवकर भूक लागत नाही असा त्या पदार्थाचा गुण, कसदारपणा. वस्तूंची अधिक टिकण्याची शक्ती; पुष्कळ वेळ जळत राहण्याची दारूकामाची शक्ती; न तापता पुष्कळ वेळ बार उडण्याची (तोफ, बंदूक इ. ची) शक्ती. १४. (चिलीम, गुडगुडी इ. चा) झुरका. (क्रि. घेणे, पिणे, खेचणे, ओढणे, लावणे.) १५. जोर; शक्ती. १६. धमकी. [सं. दम्; फा.] (वा.) दम टाकणे, दम सोडणे –१. आशा, विश्वास, धैर्य सोडणे. २. श्वास, विश्रांती घेणे. दम देणे –१. धैर्य, प्रोत्साहन, उत्तेजन देणे. २. धमकी देणे; धाकदपटशा दाखवणे. ३. जोराने खडसावणे; भोसडणे. ४. क्षणभर विसावा घेऊ देणे. दम धरणे –१. श्वासावरोध करणे; धीर धरणे. २. थांबणे; विसावा घेणे. ३. धैर्य धरणे. ४. काही वेळ वाट पाहणे. दम पाहणे – एखाद्याच्या अवसानाची, शक्तीची परीक्षा घेणे, करणे. दम भरणे – धमकावणे; खडसावणे; भेडसावणे, तंबी, ताकीद देणे; दहशत घालणे. दम मारणे – १. (गुडगुडी इ. चा) झुरका घेणे. २. आपल्या करामतीची पराकाष्ठा करणे. ३. गट्ट करणे; (पैसा, अन्न इ.) दाबणे. ४. संभोग करणे. (अहि.) दमावर घेणे –घाईशिवाय किंवा न थकता एकसारखे काम करणे. दमास येणे –थकणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

प्रसंग

पु. १ योग्य वेळ, काल, संधि; योग्य स्थल किंवा परिस्थिति. 'जें कार्य करणें तें प्रसंग पाहून करावें' २ येऊन ठेपलेली वेळ; आकस्मिक किंवा एकाएकीं उद्भवलेला काल; कठिण परिस्थिति; संकट. युद्धाच्या प्रसंगीं शूर भीत नाहीं' ३ विपत्ति; आपत्काल; कांहीं दुर्निर्वह संकटाचा समय. (क्रि॰ पडणें; येणें; गुदरणें; उद्भवणें). 'त्या गृहस्थावर प्रसंग गुदरला आहे.' ४ योग; संबंध; दळण- वळण; व्यवहार 'तुमचा आमचा नेहमीं घेण्यादेण्याचा प्रसंग आहे.' ५ नित्य, वारंवार दिसणारी, घडणारी गोष्ट; नित्य आढ- ळून येणें; नित्य संबंध; गांठ. 'कोंकणांत भाताशीं प्रसंग, देशांत भाकरीशीं प्रसंग' ६ (वादविवाद, चर्चा इ॰ साठीं) सभा; जमाव; एकत्र जमणें. 'काल पंडित मिळाले होते आणि एकादशीविषयीं मोठा प्रसंग झाला.' ७ (भाषण, पुस्तक इ॰चा) विभाग; प्रकरण; अध्याय. 'वर्ग ऋचा श्रुतिस्मृति । अघे स्वर्ग स्तबक जाती । प्रसंग मानें समास पोथी । बहुधा नामें ।' -दा १२.५.४. ८ चर्चेचा विषय. ९ (ल.) लाभ; प्राप्ति. 'कां वार्षिये आणिजे मेघु । मेघें वृष्टिप्र- संगु ।' -ज्ञा १८.३५५. १० कथा; गोष्ट 'बरें ऐसा प्रसंग जाला । जाला तो होऊन गेला ।' -दा १४.८.१. ११ भाषणाचा ओघ. 'म्हणोनि आम्हीं हा प्रसंगु । आदरिला ।' -विपू १.८७. १२ (ल.) भेद; प्रकार. 'स्थूळाचें मूळ तें लिंग । लिंगामधें हे प्रसंग ।' -दा १६.७.३५. १३ (ल.) फलप्राप्ति. 'याकारणें ज्ञानमार्ग । कळाया धरावा सत्संग । सत्संगेंविण प्रसंग । बोलोंचि नये ।' -दा ४.४.२१. १४ सुरतसुख; मैथुन; संयोग. 'ओठ कांहो सुकले गोपी- मानस राजीवभृंगा । प्रवर्तला कांहीं म्हणा तुम्ही रात्रीं स्त्रीच्या प्रसंगा ।' -होला १४. १५ युद्ध; सामना. 'भीष्मद्रोण निमाले येउनि प्रसंग कर्णाशीं ।' -स्फुट आर्या. [सं.] (वाप्र.) ॰घडणें-संग, संयोग घडणें; संभोग होणें; सुरतसुख भोगणें. ॰थाटणें-चांगल्या तर्‍हेनें पार पाडणें. 'न ये गातां नीट अर्थान्वय सांगूं । थाटूनि प्रसंगु भरूं रंग ।' -दावि २७३. ॰मारून नेणें- काढणें-संपादणें-शेवटास लावणें-वेळ मारून नेणें; संकटांतून किंवा अडचणींतून यशस्वी तर्‍हेनें पार पडणें. ॰प्रसंगास येणें-अगदीं निकडीच्या वेळीं येणें; अगदीं जरूरीच्या किंवा योग्य वेळीं येणें; ऐनप्रसंगीं येणें. प्रसंगीं असणें-राहणें-वागणें- चालणें-निभणें-वेळेवर हजर असणें. सामाशब्द-प्रसंगता- त:- क्रिवि. ओघानें; प्रसंगानुसार. 'जी व्यापकपण बोलतां । निरुपाधिक जें आतां । स्वरूप प्रसंगता । बोलिले देवो ।' -ज्ञा १५.४४६. [सं. प्रसंगतः] ॰मान-न. प्रसंगास उचित असें कार्य, गोष्ट; योग्य वेळ. 'विद्या उदंडचि सिकला । प्रसंगमान चुकतचि गेला । तरी मग तये विद्येला । कोण पुसे ।' -दा १२.२.३०. ॰वशात्-वशें-क्रिवि. १ वेळेनुसार; प्रसंगानुसार; कारणपरत्वें; कर्मधर्मसंयोगानें. 'अजाण जाणिजे कैसें । ऐसें म्हणिसी प्रंसगवशें । २ कदाचित्‌. -शर. ॰विशेषीं-क्रिवि. कारणपरत्वें; कांहीं विशिष्ट समयीं. ॰संगति-स्त्री. प्रस्तुत विषयाच्या निरूपणाच्या ओघानें आलेला दुसर्‍या विषयाचा संबंध. 'ब्रह्मज्ञानाचे प्रकरणीं विषयाचें विवरण प्रसंगसंगतीनें केलें पाहिजे.' ॰साधणारा-वि. संधीचा उपयोग करून घेण्यांत हुषार; वेळेचा उपयोग करणारा. ॰सिद्धि- स्त्री. एखादें कार्य करीत असतां दुसरें कार्य सहजासहजी केलें जाणें किंवा घडून येणें. ॰ज्ञान-न १ प्रसंगानें प्राप्त होणारें ज्ञान; प्रसं- गोपात्त येणारें ज्ञान. २ समयसूचकता; हरजबाबीपणा. ॰ज्ञानी- वि. १ वेळ, प्रसंग जाणणारा; प्रसंगाचें महत्त्व ओळखणारा. २ सम- यसूचक; हजरजबाबी प्रसंगागत-वि. प्रसंगाला, वेळेला साजेल अशा वेळीं आलेला, येऊन पोहोंचलेला, घडलेला. [प्रसंग + आगत] ॰प्रसंगानुरूप-क्रिवि. प्रसंगाला साजेल, योग्य दिसेल असा; प्रसंगानुसार; वेळेनुसार. प्रसंगावधान-न. संकटसमयीं भांबावून न. जाणें; योग्य वेळीं युक्ति सुचणें. 'प्रत्यक्ष प्रसंगच प्रसंगावधान शिकवीत असतो' -शिवपावित्र्य नाटक ८८ [सं.] प्रसंगो- पात-त्त-क्रिवि. योग्य वेळीं; प्रसंगाच्या ओघांत; यथाकाळीं; प्रसंगानुसार; प्रसंगाच्या अनुरोधानें. 'तुम्ही मुजरत गोष्ट काढूं नका प्रसंगोपात निघाल्यास बोला.' [प्रसंग + उपात्त]

दाते शब्दकोश

विकणें

सक्रि. मोल घेऊन देणें; विक्रय करणें; किंमत घेऊन देऊन टाकणें. 'पिता विकी कन्यासुता । हें अपूर्व काय गा ताता ।' -कथा १.५.१७१. -अक्रि. १ कांहीं किंमतीस दिला जाणें; विनिमय होणें. २ (ल.) पटणें; मान्य होणें; चांगला व योग्य म्हणून चालणें. 'एथें तुमचें शाहणपण विकणार नाहीं.' [सं. वि + क्री; प्रा. विक्कणय] म्ह॰ पिकेल तसें विकेल. विक- णाऊ-वि. विकावयास ठेवलेला, मांडलेला, पुढें केलेला; विकाऊ. विकणी-स्त्री. विक्रय; विक्री. 'युदु म्हणे तिसां पासौनि विकणी । करितों गुरुथें ।' -ख्रिपु २.४५.३३. विकलेला असणें-१ एखाद्याच्या आधीन असणें; त्याचा गुलाम असणें. २ (प्रेम किंवा कृपा यांनी) खुषीचा गुलाम बनणें, असणें. विकत-ता-क्रिवि. मोलानें; विक्रींत; पैसा देऊन (क्रि॰ घेणें; मिळणें; देणें.) [विकणें] (वाप्र) विकत घेणें-१ खरेदी करणें; मोलानें घेणें. २ (ल.) प्रेमानें किंवा उपकारानें एखाद्यास गुलाम करणें. 'राम म्हणे साधो त्वां वांचविलें, घेतलें विकत मातें ।' -मोवन ११.१३०. २ (एखादा अनर्थ) मुद्दाम आपणांवर ओढून आणणें. 'सावध रे कां घेसी मंदा खळनायका विक्त मरण ।' -मोविराट ४.४४. (वाप्र.) विकतआळ-विकत खरूज पहा. ॰कज्जा, विकता कज्जा-कलागत-कुरापत-पुस्त्री. आपल्या हट्टानें, मूर्ख- पणानें आपणावर ओढून घेसलेलें भांडण, लचांड; नसता उप- द्व्याप. ॰खरूज-खोकला, विकता खोकला-पु. स्वतःच्या पैशांनी, कृतीनीं, ओढून घेतलेला त्रास, लचांड. ॰घोर-पाप- पीडा-फजिती-मौत-रोग-लचांड-विघ्न-श्राद्ध-पुनस्त्री. (सामान्य अर्थानें) विकत खोकला; आपणच स्वतःवर ओढ- वून घेतलेलें संकट, त्रास इ॰. 'हें पाहून शेटजी भिऊन जाऊन आपल्यावर अंगावर घेतलेलें विकत श्राद्ध टाकून देतील असें पुष्क- ळांस वाटलें.' -टि ४.९०. विकतश्राद्ध घेऊन सव्यापसव्य करणें-(मृताची उत्तरक्रिया, श्राद्ध करण्यास वारस नसल्यास कोणी तरी त्या वेळेपुरता वारस होतो यावरून) आपल्या मागें कांहीं तरी उपद्व्याप, लचांड लावून घेऊन त्रास भोगीत बसणें. ॰तंटा-पु. विकत कज्जा पहा. विकता-१ विकत पहा. २ विकणारा. -पाटण शिलालेख, शके ११२८. ३ विकाऊ. 'कीं संभोग- सुखाचिये हाटधारणें । विकते देखौनि सुखाचें केणें ।' -शिशु ४७. विकताईचा-वि. विकत घेतलेला. 'गुरें विकताईच्या पेंढ्यांवर पाळावीं लागतात.' -बदलापूर २२. विकतेकरी-पु. रोजच्या खाण्याचे, खर्चाचे जिन्नस विकत घेणारा मनुष्य; स्वतः शेतीभाती इ॰ न करणारा, खाद्यादि उत्पन्न न करणारा केवळ विकत घेऊन निर्वाह करणारा मनुष्य. [विकणें] विकाऊ- वि. विक्रीस ठेवलेला; विकणाऊ पहा. विक्या-वि. विकणारा; विक्रेता. (समासांत) ताक-तूप-दूध-पान-विक्या.

दाते शब्दकोश

ऊर      

पु. न.       १. पोटावरचा आणि गळ्याखालचा पुढल्या अंगाचा भाग; छाती : ‘किंवा व्याघ्र व्याघ्रा भेदी प्रखरें शिलीमुखें उर गा ।’ − मोभीष्म ९·२४. २. (स्त्रियांचे) स्तन; वक्षःस्थल : ‘तों तों तिचा ऊर भरींव दिसोनि येतो.’ − नळ ७०. [सं. उरस्] (वा.) ऊर उलणे– अतिशय दुःख होणे : ‘परतेल काय ऐकुनि हें साध्वींचीं उरेचि उलतिल कीं ।’ − मोवन १२·९८. ऊर काढून चालणे − ऐटीत चालणे; बेमुर्वत वागणे. ऊर दडपणे – भय, लाज, मत्सर वगैरेंनी धैर्य नाहीसे होणे; उत्साह नष्ट होणे; भीती वाटणे. ऊर दबणे, ऊर बसणे – गांगरून जाणे; भयचकित होणे. पहा : ऊर उलणे, ऊर दाटणे, ऊर भरणे – (दुःख, प्रीती यामुळे) गहिवरून येणे; छाती भरून येणे; बांध बसणे. ऊर पिकणे – १. कफ दाटणे व त्यामुळे घसा बंद होणे; अतिश्रमाने छातीला ताण बसणे. २. (ल.) त्रास, छळ होणे. ऊर पिकवणे – त्रास देणे : ‘पदोपदीं येऊनिं शीकवीला । तथापि तेणे उर पीकवीला ॥’ − सारुह २·१४. ऊर फाटणे - कल्पनातीत दुःख होणे. पहा : ऊर उलणे, ऊर दबणे : ‘फाटे उर शोकाने बहु निंद्य क्षत्रधर्मत्या वाटे ॥’ − मोअश्व ५•३९. ऊर फुटेपर्यंत काम करणे – सहन होणार नाही इतके श्रम करणे. ऊर फुटणे – १. दुःख असह्य होणे. २. (स्त्रियांना उद्देशून) स्तनांचा उद्गम होण्याच्या वयाला येणे. ३. हृदयविकार होणे; छाती फुटून निकामी होणे (घोडा). ४. शोकाने, काळजीने व्याकूळ होणे; दुःख असह्य होणे; उरी फुटणे. ५. हिंमत चालणे, होणे.(व.) ऊर फोडणे, ऊर फोडून काम करणे - १. अतिशय श्रम करणे. २. आहाराबाहेर काम करून गळाटणे; मेट्यास येणे. ऊर बडवणे – छातीवर हात मारून शोक करणे; दुःखशोक प्रदर्शनार्थ छातीवर हात मारणे. ऊरस्फोड करणे, ऊर फोडणे – अतिशय श्रम करणे. ऊरापोटी करणे, उरापोटी धरणे, उरापोटावर उचलणे – १. अतिशय श्रम करून काम करणे, चालविणे, उचलणे. पहा : ऊर फोडणे : ‘अहो! उरापोटीं करीन कसें तरी झालं ।’ − एकच प्याला. २. प्रेमाने वागवणे; छातीशी धरणे; घट्ट मिठी मारणे. ऊराला हात लावणे − सत्यता, आत्मविश्वास, निश्चय, धमक दाखवण्यासाठी छातीला हात लावणे. ऊरावर घालणे – (शिवी) मनात नसताना नाइलाजाने एखाद्याला देणे, देणे भाग पडणे : ‘गोणीभर होन ब्राह्मणांच्या उरावर घातले.’ − नामदेव नाटक १०५. ऊरावर असणे – एखाद्यावर अधिकार चालवणे − सत्ता असणे; एखाद्याच्या डोक्यावर असणे. ऊरावर घेणे – १. अतिशय कठीण काम पार पाडण्यासाठी अंगावर घेणे, स्वीकारणे. २. (ल). (शिवी−स्त्रियांच्या बाबतीत) संभोग देणे, उरावर धोंडा ठेवणे. – १. (ल.) स्वतःचे मनोविकार दाबून धरणे; मन घट्ट करणे; भावना दडपणे. २. एखाद्याला अतिशय कठीण काम करायला सांगणे; (पूर्वी मोगलाइत सरकारी वसूल करण्यासाठी शेतकऱ्यांच्या उरावर धोंडा ठेवीत असत यावरून) सक्ती करणे : ‘कोणी तुमच्या उरावर धोंड ठेवली होती?’ − नाकु ३·१५. ऊरावर बसणे – १. छातीवर बसणे; बोकांडी बसणे. २. (ल.) टाळता न येणारे काम अंगावर येऊन पडणे, त्यामुळे असहाय्यता येणे. ३. मागे लागून निकडीने काम करून घेणे. ४. पुरुषाने एखाद्या स्त्रीवर बलात्कार करणे; स्त्रीसंभोग करणे. ऊरावर हात ठेवणे, ऊरावर हात लावणे, ऊरावर हात ठेवून सांगणे, ऊरावर हात ठेवून बोलणे, ऊरावर हात लावून बोलणे – शपथपूर्वक वचन देणे; एखाद्याबद्दल खात्रीने सांगणे. ऊराशी धरणे– १. आलिंगन देणे. २. नम्रपणाने प्रार्थणे. ३. काही झाले तरी (हाती घेतलेले काम) शेवटाला नेण्याचा निश्चय करणे. ४. स्वीकारणे; पत्करणे; आपले म्हणणे न सोडणे. ऊरावर शेगडी – अतिशय दुःख, विवंचना; त्रास. ऊराशी बाळगणे − (इच्छा) मनात ठेवणे; एखादी इच्छा किंवा ध्येय डोळ्यांसमोर ठेवणे. ऊरास लावणे, ऊरी पोटी धरणे – दादा - बाबा करणे; मन वळविणे. पहा : ऊराशी धरणे. ऊरावर डोंगर घेणे, ऊराउरी डोंगर घेणे – कठीण काम स्वीकारणे; अतिशय दगदग करणे; न पेलणारी जबाबदारी स्वीकारणे. ऊरावर डोंगर घेणे, ऊरी डोंगर पुरी काट्या घेणे– (छातीवर पर्वत घेणे व नदीच्या पुरातून काटेकुटे ओढून काढणे) पोटासाठी अगदी दगदगीचे काबाडकष्ट करून सर्व तऱ्हेचे उपाय करून पाहणे. ऊरीपोटी करणे − अतिशय श्रम करणे. पहा : ऊरापोटी करणे. ऊरी फुटणे − पहा : ऊर फुटणे : ‘इतका अभ्यास करून उरीं फुटायचं आहे कां काय?’ − गी. ऊरी भरणे − १. दमणे : ‘उरीं भरली ऊरपोट । केली चळवळ झाली घाबरी ॥’ − पला २. २. स्त्रियांच्या स्तनांचा उद्गम होणे; ऊर भरणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

ऊर

पु. १ पोटावरचा आणि गळ्याखालचा पुढल्या अंगाचा भाग; छाती. 'उरु कुहिजेल जळें । आसुवांचेनी ।।' -ज्ञा १३. ५६०. 'किंवा व्याघ्र व्याघ्रा भेदी प्रखरें शिलीमुखें उर गा ।' -मोभीष्म ९.२४. २ (स्त्रियांचे) स्तन; वक्षःस्थल. 'तों तों तिचा उर भरींव दिसोनि येतो.' -नळ ७०. [सं. उरस्; प्रा. उर] म्ह॰ ऊरीं केश माथां टक्कल = एका बाजूनें मिळविणें व दुसर्‍या बाजूनें गमावणें. ॰उलणें-अतिशय दुःख होणें. 'परतेल काय ऐकुनि हें साध्वींची उरेंचि उलतिल कीं ।' -मोवन १२.९८. ॰काढून चालणें-ऐटींत चालणें; बेमुर्वत वागणें. ॰दड- पणें-भय, लाज, मत्सर वगैरेनीं धैर्य नाहींसें होणें; उत्साह नष्ट होणें; छातीस धक्का बसणें; निराशा वाटणें. ॰दबणें-बसणें- गांगरून जाणें; भयचकित होणें. ऊर उलणें पहा. ॰दाटणें-भरणें- (दुःख, प्रीति यामुळें) गहिंवरून येणें; छाती भरून येणें; बांध बसणें. ॰पिकणें-१ कफ दाटणें व त्यामुळें घास बंद होणें; अति श्रमानें छातीस ताण बसणें. २ (ल.) त्रास, छळ होणें. ॰पिक- विणें-त्रास देणें. 'पदोपदीं येउनि शीकवीला । तथापि तेणें उर पीकवीला ।।' -सारुह २.१४. ॰फाटणें-अतिशय दुःख होणें; ऊर उलणें-दबणें पहा. 'फाटे उर शोकानें बहु निंद्य क्षत्रधर्म त्या वाटे ।।' -मोअश्व ५.३९. ॰फुटणें-१ (स्त्रियांना उद्देशून). स्तनांचा उद्गम होण्याच्या वयास येणें 'ती ऊर फुटण्याच्या वयांत आली आहे.' २ हृदयविकार होणें; छाती फुटून निकामी होणें (घोडा). ३ शोकानें, काळजीनें व्याकुळ होणें; उरीं फुटणें. ४ (व.) हिंमत चालणें. 'पुरांत उडी टाकून धारेपर्यंत पोहत आला पण पुढें ऊर फुटेना.' ॰फोडणें-१ अतिशय श्रम करणें. २ आहाराबाहेर काम करून गळाठणें; मेट्यास येणें. ॰बडविणें-दुःख-शोकप्रदर्शनार्थ छातीवर हात मारणें. उरस्फोड करणें-ऊर फोडणें; अतिशय श्रम करणें. उरापोटीं-करणें, धरणें, उरापोटावर उचलणें-अति- शय श्रम करून काम करणें, चालविणें, उचलणें; ऊर फोडणें. 'अहो ! उरापोटीं करीन कसें तरी झालं !' -एकचप्याला. 'ती आपल्या मुलांना उरींपोटीं धरते.' उरावर घालणें-(शिवी) इच्छा नसतांना एखा- द्यास देणें, द्यावयास भाग पडणें; 'गोणीभर होन ब्राह्मणांच्या उरावर घातले.' -नामदेव नाटक १०५. उरावर असणें-एखाद्यावर अधि कार चालवणें-सत्ता असणें; एखाद्याच्या डोक्यावर असणें. उरावर घेणें-१ अतिशय कठिण काम पार पाडण्यासाठीं अंगावर घेणें, स्वीकारणें. २ (ला.) (शिवी-स्त्रियांच्या बाबतींत) संभोग देणें. उरावर धोंडा ठेवणें-१ स्वतःचे मनोविकार दाबून धरणें; स्वतःवर जोर चालविणें. २ एखाद्यास अतिशय कठिण काम करावयास सांगणें (पूर्वीं मोंगलाईंत सरकारी वसूल करण्यासाठीं शेतकर्‍याच्या उरावर धोंडा ठेवीत असत यावरून). सक्ति करणें; 'कोणी तुमच्या उरावर धोंड ठेवली होती?' -नाकु ३. १५. उरावर बसणें-१ छातीवर बसणें. २ (ल.) टाळतां न येणारें काम अंगावर येऊन पडणें; त्या- मुळें असहाय्यता येणें. ३ मागें लागून निकडीनें काम करून घेणें. ४ पुरुषानें एखाद्या स्त्रीवर बलात्कार करणें; स्त्रीसंभोग करणें. उरा- वर हात ठेवणें-लावणें, ठेवून-लावून-सांगणें-बोलणें- जोरानें वचन देणें; एखाद्याबद्दल खात्रीनें सांगणें. 'या श्लोकाचा अर्थ मला समजला आहे, असें मी उराला हात लावून तुला सांगतों' उराशीं धरणें-१ आलिंगन देणें. २ नम्रपणानें प्रार्थणें. ३ कांहीं झालें तरी (हातीं घेतलेलें काम) शेवटास नेण्याचा निश्चय करणें; सतत (गोष्ट) स्मरणांत ठेवणें. ४ स्वीकारणें; पतकरणें; आपलें म्हणणें; न सोडणें. उरावर शेगडी-अतिशय दुःख; विवंचना; त्रास. उराला हात लावणें-सत्यता, आत्मविश्वास, निश्चय. धमक दाखविण्यासाठीं छातीस हात लावणें. उरास लावणें-उरीं पोटीं धरणें-दादाबाबा करणें; मन वळविणें. उराशीं धरणें पहा. उराची- शिंप-शिंपी-स्त्री. (निंदाव्यंजक) खोल छाती; छातीचा खळगा. उराचा तख्ता-पु. भरदार छाती. उराचा पांजरा-पिंजरा- पु. क्षीणतेमुळें छाती वरील सर्व हाडें दिसणें; छातीचा सांपळा. उरावरचा गोहो-धगड-पु. १ ज्या व्यक्ती-अगर वस्तूविषयीं एखाद्यास सतत भीति वाटते ती वस्तु; उरावरील दडपण; धोंड. २ नवरा; जार. [कों. गोहो = नवरा] उरीं डोंगर घेणें-कठीण काम स्वीकारणें; अतिशय दगदग करणें. उरीं डोंगर पुरीं काट्या घेणें-(छातीवर पर्वत घेणें व नदीच्या पुरांतून काटेकुटे ओढून काढणें) पोटासाठीं अतिशय दगदगीचे काबाडकष्ट करून सर्व तर्‍हेचे उपाय करून पाहाणें. उरीं पोटीं करणें-अतिशय श्रम करणें उरापोटीं करणें पहा. उरीं फुटणें-ऊर फुटणें पहा. 'इतका अभ्यास करून उरीं फुटायचं आहे का काय?' -मी (आपटे). उरीं भरणें-१ दमणें. 'उरीं भरली ऊरपोट । केली चळवळ झाली घाबरी ।।' -पला २. 'तो सक्तमजुरी करून उरीं भरला.' २ स्त्रियांच्या स्तनांचा उद्गम होणें; ऊर भरणें. ॰तूट- स्त्री. (उराशीं धरण्यांत, मिठी मारण्यात अडथळा, प्रतिबंध, व्यत्यय यावरून) वियोग; विरह. (क्रि॰ करणें; होणें). ॰दुखी- स्त्री. १ उरांतील दुःख. २ (ल.) मत्सर; हेवा. ॰पाकीट-न. (क. शिवण) छातीवरचा खिसा. [ऊर + इं. पॉकेट = खिसा] ॰फोड- स्त्री. उरस्फोड; अतिशय दगदगीचें व संकटमय काम; श्रम; उद्योग. -वि. असे श्रम पडणारें, फार मेहनतीचें (काम) ॰भेट-स्त्री. छातीस छाती लावणें; मिठी मारून भेटणें.

दाते शब्दकोश

बाप

पु. १ पिता; जनक. २ (बापासारखा ) चुलता (धृतराष्ट्र भीष्मास म्हणतो) कीं माझा वधिला शिखंडिनें बाप ।' -मोकर्ण १.१२. ३ (काव्य.) संस्कृतांतील तात शब्दाप्रमाणें अनुकंपार्हत्वदर्शक संबोधन (लहानाला किंवा सत्कारार्थीं योजतात). 'जरी स्वधर्मैकनिरत । वर्ताल बापा ।'-ज्ञा ३.१०२ -वि. फार; पुष्कळ; मोठा.'बापु उपेगी वस्तु शब्दु ।' -अमृ ६.१. -उद्गा. आश्चर्य किंवा दुःख याचें दर्शक. 'बाप ! अज्ञानाची भुलि कैसी ।' -भाए ३.१५. [सं. पिता, वप्तृ; प्रा. बप्प, बप्पो; का. बाप्प; पोर्तु. जि.पतर्रो, पात (पितृशीं जास्त जुळणारा); आर्मेजि. बाप] म्ह॰ बापास बाप म्हणत नाहीं तो चुलत्यास काका कोठून म्हणणारा?' बापसि बाप न म्हणें ऐशासी काय होय आजोबा ।' -मो. (वाप्र.) बाप(ब)शेटीची पेंड-स्त्री. हवी त्यानें हवी तितकी न्यावी अशी वस्तु; फुकट मिळालेली व वाटेल तशी खर्चिली जाणारी वस्तु, संपत्ति; विपुल व सुसाध्य वस्तु. (बापशेट नांवाच्या श्रीमान् व उदार गृहस्थाच्या नांवावरून हा शब्द रूढ झाला असेल). ॰होऊं लागणें, म्हणविणें, बाप होऊन (करणें, बोलणें)-बापाची किंवा मोठेपणाची जागा घेणें; वर मोठेपणा मिरवणें. (एखाद्याचा) बाप होणें-बाप लागून राहणें-एखाद्यापेक्षां वरचढ असणें; त्रास देणारा असणें.बापाचा माल-एक शिवी; कोणीं उधळेपणानें दुसर्‍याचा माल खर्चू लाग- ल्यास त्यास म्हणतात. बापावरून पवनें-बापाच्या नांवानें, बापावरून शिव्या देणें. बापास बाप न म्हणणें-वाजवी गोष्टींत कोणाचीहि मुर्वत न धरणें. बापास बाप न म्हणणाराभीड मुर्वत न धरणारा; खडबडीत स्वभावाचा. ॰आजांचा धर्म-पु. पूर्वजांचा धर्म; पिढीजात आलेला धर्म. बापई-पु. (माण.) बाप्या; वयांत आलेला पुरुष. ॰घर-न. माहेर.' मग आप-घर त्यागूनि बापघरीं केलिया वस्ति ।' -सप्र ११.४९. ॰जन्मांत- जन्मीं-क्रिवि. सर्व आयुष्यांत; जन्मापासून आजपर्यंत 'मी बाप- जन्मीं कोणाचें उणें उत्तर बोलून घेतलें नाहीं. ' [बाप + जन्म] ॰जादे-दादेपुअव. वाडवडील; पूर्वज. 'दिल्ली याचे बापजाद्याची -गोखंचिशाब १२. [फा. बाब् = पिता + अर. जद्द = आजोबा] ॰पण-न. सामर्थ्य; पितेपण. 'तरि बापपण आपुलें कां दाख- विजेना ।' -ऋ ३४. ॰पोरका-वि. बाप मेल्यामुळें पोरका बनलेला. ॰भाऊ-पु. भाईबंद; भाऊबंद; नातेवाईक; दायाद (वतनांतील वांटेदार). ॰भावकी-स्त्री. १ भाऊबंदकी; नातें. २ दाट परिचय; परमस्नेह. ॰भ्रम-पु. मोठा भ्रम. 'बापभ्रमाचें विंदान । केवढे सायास पक्षियांचे ।' -जै ७७.५४. [बाप = मोठा + भ्रम] ॰माय-स्त्री. (काव्य.) बाप आणि आई (हा शब्द विशेष रूढ नाहीं. रूढ शब्द मायबाप, आईबाप, मातापिता हे आहेत). 'जैसी अबला सासुरां राहे । चित्तीं आठवे बापमाये ।' बापया-य-पु. बाप्या; पुरुष. बापयोद्धा-पु. मोठा योद्धा. 'बापयोद्धा तो निःशंक ।' -जै ७५.१२६. [बाप = मोठा + योद्धा] ॰रोटी, बापु(पो)ती-स्त्री. (हिं.) (शब्दशःअर्थ-बापाची भाकरी, अन्न). वडिलोपार्जित चालत आलेली वतनवाडी, माल- मत्ता. बापा-पु. १ (खा.) बाप. २ बापाचें संबोधन; (आद- रार्थीं हाक मारतांना) अहो ! अरे ! 'अर्थाचा दास पुरुष अर्थ नव्हे पुरुषदास बापा हें ।' -मोभीष्म १.९०. ३ (कों.) एक पिशाचदेव; बापदेव. बापाजी-पु. (संबोधन) मोठ्या माण- साला हाक मारतांना म्हणतात. 'बापाजी ! आम्ही हीं चित्रें तुमचा अनुग्रह चितारी ।' -मोउद्योग ११.५२. बापाला-पु. (गो.) मावशीचा नवरा. बापाशीक झंवरी-वि. (हेट.) एक शिवी. बापाशीं संभोग करणारी. बापिक-पु. कुलपरंपरागत धर्म; हव्यकव्य; कुलधर्म. -वि. कुळांतील; कुलपरंपरागत. 'एथ स्वामीचें काज । ना बापिकें व्याज ।' -ज्ञा १२.६७. बापु-वि. मोठा. -उद्गा. बापरे; अरे बापरे ! 'बापु ! कळा वानु कैसी ।' -ऋ ६. बापु(पू)रज(झ)दा-वि. वंशपरंपरा. 'बापूरजदा घेत जाऊन...' -वाडथोमारो २.१०६. बापु(पो)लभाऊ-भाव-पु. (गो.) चुलत भाऊ. बापु(पो)लयों-पु. (गो.) चुलता. बापुला, बापु(पू)य-स-पु. (गो. कु. कों.) बाप. बापू-पु. आदरार्थीं पुरुषास म्हणतात. बापोलभैण-स्त्री. (गो.) चुलत बहिण. बाप्या, बाप्यो-पु. बाप होण्याच्या वयाचा, वयांत आलेला पुरुष; प्रौढ. (-अव. बापे-प्ये). बाप्यामाणूस-पु. पुरुष. याच्या उलट बाई- माणूस.

दाते शब्दकोश

ग्राम

पु. १ गांव; खेडें. २ (संगीत) सप्तस्वरांतील मुख्य तीन अवधी. याचे प्रकार तीन-षड्जग्राम, मध्यमग्राम व गांधारग्राम. सात स्वरांचा समूह. (इं.) गॅमट. ३ गांवांतील प्रमुख किंवा माननीय माणूस. ४ अरेराव, कचाट्या, जरब बस- विणारा, काचाटींत धरणारा माणूस. 'तो कसला ग्राम त्याज बराबर भांडून तुझा परिणाम लागणार नाहीं.' ५ जमाव; समु- दाय. 'मुतेहिना ऐसा वागे । ग्राम कर्मेंद्रियांचा ।' -यथादि ३. ९२. (समासांत) इंद्रिय-गुण-पुण्य-भूत-स्वर-ग्राम. 'इंद्रिय- ग्रामावरी येणें नाहीं ।' -ज्ञा ५.१०५. [सं.] सामाशब्द- ॰कंटक-कुठार-पु. चहाड्या, निंदा, त्रास, तंटे इ॰ लावणारा; गांवगुंड; गांवची पीडा, ब्याद; दुष्ट, वाईट माणूस. ग्रामकी-स्त्री. गांवजोशी किंवा पाटील इ॰ चें काम; गांवकी. ॰कूळ- केसरी-सिंह-पु. १ (ल.) गांवांतील कुत्रे. 'इया ग्रामसिं- हाचिया ठायीं.' -ज्ञा १३.६८०. २ (ल.) भेदरट माणूस. ॰खर्च-पु. १ गांवचा खर्च. २ फुकट किंवा विनाकारण खर्च; ज्याचा मोबदला नाहीं असा खर्च. ॰जोशी-ज्योतिषी-पु. गांवचा जोशी, हा पंचांग सांगणें, पत्रिका पहाणें, मुहूर्त काढणें इ॰ कामें करतो. 'आधीं होता ग्रामजोशी । राज्यपद आलें त्यासी । त्याचें हिंडणें राहीना । मूळ स्वभाव जाईना ।।' -तुगा. ग्रामज्य-न. ग्राम्य; मैथुन; सुरत क्रीडा. 'ग्रामज्य आठवे चित्तीं ।' -दा २.५. २८. ग्रामणी-पु. १ (काव्य, विद्वानांचें संभाषण) पाटील; गांवचा मुख्य. २ (लौकिक) गांवगुंड, चावट, वाईट, कुटाळ्या, पीडादायक माणूस; ब्याद. 'रामनामें विव- र्जित । ग्रामणीं बोलिजे तें ग्राम्य गीत ।' -एभा ८.१६९. ३ गांवचा महार. -स्त्री. कुटाळकी; गांवकी. ग्रामिणी पहा. 'आनित्य ग्रामणी मस्ती सदा ।' -दा २.३.६. -वि. मुख्य; श्रेष्ठ; प्रमुख. ग्रामणीक-न. हरामखोरपणा; ग्रामणी, ग्रामिणी पहा. 'तरी जी पाहतां हेंहि ग्रामणीक । दिसोनि येतसे कीं निष्टंक ।' -सादि १२.२.१०८. ग्रामण्य-न. १ मुख्यतः जातीसंबंधींचा किंवा इतर गांवकीचा तंटा, खटला. २ बहिष्कार. ३ जातीच्या खट- ल्यासंबंधीं चौकशीसाठीं भरणारी ग्रामसभा; जातगंगा. ॰त्रय- न. (संगीत) ग्राम अर्थ २ पहा. ॰थिल्लर-न. गांवांतील लहा- लसें तळें, डबकें. कीं गतधवेचें यौवन । कीं ग्रामथिल्लराचें जीवन ।' ॰दुर्गा-स्त्री. गांवची कुलदेवी, भवानी; ग्रामाधिका- रिणी देवता. ॰देऊळ-न. गांवांतील सार्वजनिक देऊळ. ॰देव- देवता-दैवत-पुस्त्रीन. १ ग्रामधिकारी-रिणी; गांवचा कुल- देव-देवी. २ या देवतेच्या खर्चास इनाम दिलेली जमीन, उत्पन्न; ग्रामदेवीची जमीन. ॰धर्म-पु. गांवचे धार्मिक विधी, नियम, चालीरिती इ॰ परंपरेनें चालत आलेला गांवचा धर्म. ॰नेत्र-न. (ल.) महार; गांवचा जागल्या. ॰पंचायत-सभा-संस्था-स्त्री. गांवची सर्व व्यवस्था पाहणारी संस्था. खेड्यांतील म्युनिसिपालटी; ग्रामस्वराज्य. ॰पशु-पु. माणसाळलेलें जनावर. ॰बिंदुटी-स्त्री. खेड्यांतील गल्ली, बिदी. 'तव ते गोधनें ग्रामबिंदुटी । अपार मौळी असती चव्हाटी ।' -नव १३.११५. ॰याजक-पु. गांवचा उपा- ध्याय; ग्रामोपाध्याय. ॰लेखक-पु. कुळकर्णी. 'ग्रामलेखक ते स्थळीं ।' -निमा (आत्मचरित्र १.१०१.) ॰सूकर-पु. गांवडुक्कर. ॰स्त-स्थ-वि. गांवांत राहणारा; गांवचा रहिवासी; गांवकरी. 'ऐसें बोलून ग्रामस्तानें.' -नव १०.१६३. 'आतांच भोगूं तरी हे पहाट । ग्रामस्थ येतांचि भरेल हाट ।' ग्रामाचार-पु. ग्रामधर्म पहा. ग्रामांतर न. १ दुसरें गांव. २ आपलें गांव सोडून परगांवीं जाणें. ग्रामाधिकार-कारी-पु. गांवासंबंधीं अधिकार; तो गाजविणारा माणूस; अधिकारी; गांवकामगार. ग्रामाधिपति-पु. पाटील 'ग्रामाधिपतिरूपें श्रीरघुवीरें जाण ।' -सप्र २.३४. ग्रामिणी- स्त्री. हरामखोरी; चहाडी इ॰ ग्रामणीक पहा. ग्रामोपाध्याय- पु. गांवचा उपाध्याय; ग्रामजोशी; ग्रामयाजक पहा. ग्राम्य- वि. १ खेड्यांत झालेला, जन्मलेला; गांवांत उत्पन्न झालेलें किंवा गांवासंबंधीं. २ गांवठी; गांवराणी; गांवढळ; खेडवळ. ३ माण- साळलेला (पशु) याच्या उलट रानटी. ४ लागवडीनें उत्पन्न केलेलें (शेतीचें उत्पन्न); याच्या उलट आपोआप झालेलें. ५ प्राकृत व इतर देशी (भाषा); याच्या उलट संस्कृत. ६ प्रापंचिक; संसारी; याच्या उलट वन्य = जंगलात राहणारा. ७ अश्लील; अशिष्ट; असभ्य. ८ अतिशय विषयासक्त. ग्राम्यगीत-न. १ अश्लील पद, लावणी. २ खेडवळ गाणें, पवाडा इ॰ ग्राम्यधर्म- संभोग; ग्रामज्य पहा. ग्रामस्त्री-स्त्री. वेश्या; रांड. 'ग्राम्य- स्त्रियांचे संगतीं जाणें ।' -एभा ८.१३९. ग्राम्यालाप-पु. १ खेडवळ गप्पागोष्टी. २ लावणी; शृंगारपर कविता. [सं.]

दाते शब्दकोश

महत्

वि. १ मोठा; बडा; विस्तृत. २ (ल.) थोर; वरच्या दर्जाचा; उत्कृष्ट; कोणत्याहि गुणांत श्रेष्ठ. जसें-महाबुद्धिमान्, महालबाड; महासोदा. महत् हा शब्द कर्मधारय आणि बहुव्रीहि समासांत महा असा होतो आणि तत्पुरुष समासांत तसाच राहतो. जसें-महादेव, महाबाहु व महत्पूजा; महत्सेवा. ३ अतिशय; फार; अत्यंत. जसें-महाप्रचंड; महातीक्ष्ण इ॰ [सं.] महतामहत्-वि. (व.) मोठ्यांतला मोठा; सर्वांत मोठा. महत्तत्व-न. सत्व, रज, तम या तीन गुणांची साम्यावस्था; मूळमाया; गुणसाम्य. 'सत्त्वगुणापासून महत्तत्व उत्पन्न झालें.' -टिले ४.३६१. महत्तमसाधारण भाजकपु. दिलेल्या सर्व संख्यांना पूर्ण भाग जाईल अशी सर्वांत मोठी संख्या. महदंतर-न. फार मोठें अंतर, तफावत; वेगळेपणा. महदहंबुद्धि-स्त्री. महत्तत्त्व; अहंकार- बुद्धि. 'एवं महदहंबुद्धि । मनें महाभूत समृद्धि ।' -माज्ञा १५.१०५. महदादिदेहांत-क्रिवि. महत्तत्त्वापासून स्थूलदेहापर्यंत. 'महदादि देहांतें । इयें आशेषेंही भूतें ।' -ज्ञा ९.६७. महद्ब्रह्म-न. मूळ ब्रह्म. 'तया महद्ब्रह्मातें व्याली । दैविकी इच्छा ।' -ज्ञा ११.५११. महद्भूत-वि. विलक्षण; असामान्य; चमत्कारिक. महद्वर्त्त-न. गोलाचें वर्तुळ; खगोलीय वृत्त. महती-स्त्री. मोठेपणा; महत्त्व. 'त्याचेनि माझी त्रैलोकीं ख्याती । मज महती त्याचेनी ।' -एभा १४.२६९. महतीवीणा-स्त्री. नारदाच्या वीणेचें नांव. महत्त्व-न. मोठेपणा; योग्यता; लौकिक; प्रतिष्ठा; किंमत. महती पहा. 'रायाजी पाटिल महत्त्व रक्षी ।' ऐपो ३२. उतरणें- योग्यता; प्रतिष्ठा; कमी होणें. ॰वाढविणेंफुशारकी, बढाई मारणें. ॰दर्शक-वि. पदार्थाचें माप, लांबी, रुंदी इ॰ दाखवि- णारें (परिमाण). ॰मापन-न. गणितशास्त्राचा एक विभाग; आकारमान मोजण्याची विद्या; मापनशास्त्र. महत्त्वकांक्षा- -स्त्री. मोठेपणाची इच्छा, हांव; जिगीषा. 'कर्तबगार लोकांच्या वेडाला महत्त्वाकांक्षा म्हणतात.' -विधिलिखित २१. महा-वि. १ महत् पहा. २ थोर; बडा. 'हे एक महा आहेत.' 'तो काय एक महा आहे.' ॰अर्बुद-न. एक हजार दशकोटि ही संख्या. ॰ऊर-पु. (अप.) महापूर; अतिशय मोठा पूर. ॰एकादशी- स्त्री. आषाढशुद्ध व कार्तिक शुद्ध एकादशी. ॰कंद-पु. १ मोठ्या जातीचा कंद. २ लसूण. ॰कल्प-पु. ब्रह्मदेवाच्या शंभर वर्षांचा काल; ब्रह्मदेवाचें आयुष्य; महाप्रलय; कल्प पहा. ॰काल-ळ- पु. १ प्रलय काळचा शंकराचा अवतार. 'महाकाळ उभा चिरीन बाणीं ।' २ बारा ज्योतिर्लिंगांपैकीं एक (उज्जनी येथील). ॰काली-स्त्री. १ पार्वती. २ प्रचंड तोफ; महाकाळी. -शर. ॰काव्य-न. वीररसप्रधान, मोठें, अभिजात, रामायण-महा- भारताप्रमाणें काव्य; (इं.) एपिक. 'आर्ष महाकाव्यांत कोण- कोणते गुण असावे याबद्दल पुढें विवेचन येईलच.' ॰काश-न. अवकाश; अफाट पोकळी. याच्या उलट घटाकाश, मठाकाश. [महा + आकाश] ॰कुल-कुलीन-वि. थोर, उच्च कुलांतील; कुलीन. ॰खळें-न. मोठें अंगण. ॰गाणी-नी-वि. गानकुशल. 'उत्तर देशींच्या महागणी । गुर्जरिणी अतिगौरा ।' -मुरुंशु १२२. ॰गिरी-पु. मोठा पर्वत; हिमालय. 'किं मक्षिकाचेनि थडकें । महागिरी पडों शकें ।' -एकनाथ-आनंदलहरी ४२. -स्त्री. १ तीनशें खंडीपर्यंत वजन नेणारें जहाज, गलबत; मालाचें तारूं; 'सबब त्यांजकडे दोन महागिऱ्या भरून गवत व एक महागिरी- भर लांकडे देविलीं असें,' -समारो ३.१६. २ मोठें तारूं; शिबाड; बतेला. ॰ग्रह-ग्राह-पु. मोठी सुसर; मोठा मगर. 'गज करवडी महाग्राह ।' -एरुस्व १०.८० -एभा २०.३५०. ॰जन- पु. १ काही गुण, विद्या इ॰ मुळें थोर, श्रेष्ठ माणूस. 'परंतु हृदयीं महाजन भयास मी मानितों ।' -भक्तमयूरकेका ७५. ३ व्यापारी; उदमी; सावकार. ३ गाव, कसबा इ॰ तील व्यापाराला नियम, शिस्त घालून देणारा, त्यावर देखरेख करणारा व कर वसूल करणारा सरकारी अधिकारी. ह्या अर्थीं महाजनी असाहि शब्द आहे. ४ पंच ॰जनकी-स्त्री. महाजनांचे काम, अधिकार. ॰डोळा-पु. एक मासा. -प्रणिमो ८१. ॰तल-न. सप्तपातालांपैकीं एक; नाग व असुर यांचें स्थान. ॰ताप-पु. (तंजा.) शोभेच्या दारूचा एक प्रकार; चंद्रज्योति. महताब पहा. ॰तेज-न. १ ब्रह्म २ सूर्य. 'हें अपार कैसेनि कवळावें । महातेज कवणें धवळावें.' -ज्ञा १.७४ महात्मा-पु. १ महानुभव पंथांतील व्यक्ति. ३ मोटा धैर्यवान, पराक्रमी मनुष्य. 'तैसें महात्मा वृक्षमुळीं । असावें खांड देउळीं ।' -भाए ४९३. गौतमबुद्ध, गांधी यांस संबोधितात. -वि. १ थोर मनाचा; उदार; महानुभाव. 'परते धर्म महात्मा, स्तविला बहु नारदादि साधूंनीं ।' -मोभीष्म १.९९. [महा + आत्मा] ॰दंदी- वि. महामत्सरी; कट्टर द्वेष्टा. 'छंदी फंदि महादंदि । रावण पडिला तुझ्या बंदि ।' -ज्ञानप्रदीप २६६. [सं. महाद्वंद्वी] ॰दशा-स्त्री. (ज्योतिष) कुंडलीतींल मुख्य ग्रहाची बाधा अंतर्दशा पहा. ॰दान- न. (मोठें दान) हत्ती इ॰ षोडशदानांपैकीं एक; षोडशमहादानें पहा. ॰देव-पु. १ शंकर; शिव. 'महादेव म्हणावया कारण । ब्रह्मयासि. जाण या हेतू ।' -एभा १३.२७९. २ (विणकाम) हातमागाच्या फणीचा मरचा अवयव, दांडा फळी. हा आणि तळाचा दांडा किंवा पार्वती मिळून फणीची चौकट होते या फणीच्या चौकटीस महादेवपार्वती किंवा हात्यादांडी असेंहि म्हणतात. ॰देवाचें देणें- न. कंटाळवाणें व दीर्घकाल टिकणारें काम. ॰देवापुढचा-वि. (शब्दशः) नंदी; (ल.) मूर्ख; निर्बुद्ध. ॰देवी-स्त्री. १ पार्वती; दुर्गा. २ एक प्रकारची वनस्पति. हिचें बीं महादेवाच्या पिंडीच्या आकाराप्रमाणें असतें. ॰देवी सहादेवी-स्त्री. (माण.) चैत्री पौर्णिमेस तिन्हीसांजचे वेळीं एखाद्या भिंतीवर जीं महादेवी सहादेवी म्हणून दोन गंधाचीं बाहुलीं काढून त्यांची पूजा कर- तात तीं. -मसाप ४.४.२५९. ॰दैव-(माण.) सर्व जातींचे लोक. ॰द्वार-न. (मंदिराचा किंवा राजवाड्याचा) बाहेरचा किंवा मुख्य दरवाजा. 'भक्त गर्जती महाद्वारीं । त्यांसी द्यावे दर्शन ।' -भूपाळी विठ्ठलाची पृ २२. ॰द्वीप-न. (मोठें बेट) खंड. 'तयाफळाचे हें महाद्वीप । पातली प्रभु ।' -ज्ञा १६.३२. ॰नदी-स्त्री. मोठी नदी; उगमापासून शंभर योजनांवर वाहात जाणारी नदी. ॰न मी-स्त्री. १ आश्विन शुद्ध नवमी; नवरात्राचा शेवटचा दिवस. २ रामनवमी. -शास्त्रीको ॰नवरात्र-न. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून विजयादशमीपर्यंतचा काल. ॰नस- पु. स्वयंपाकघर. ॰नक्षत्र-न. सूर्यनक्षत्र ॰नाड-पु. महाजना- सारखा एक वतनदार. 'महाजन व महानाड पेठ मजकूर याचें नांवें सनद कीं,' -थोमारो १.५४. [महा + नाड-डु] ॰निंब-पु. एक प्रकारचें झाड. ॰निद्रा-स्त्री. मरण; मृत्यु. 'तिसरें प्रमाण महा- निद्रा म्हणजे मृत्यु हें होय?' -टि ४.४८१. महानुभाव-पु. श्रीचक्रधरानें स्थापिलेला एक द्वैतवादी पंथ. या पंथात श्रीकृष्ण- भक्ति प्रमुख आहे. [महा + अनुभाव] -वि. १ ज्यानें कामक्रोधादि विकार जिंकले आहेत असा; महात्मा. २ उदार, थोर पुरुष. एवं पिंडारकीं ऋषि सर्व । शापानुग्रही महानुभाव ।' -एभा १.३३६. ३ प्रशस्त अनुभवाचा; ब्रह्मानुभवी. 'ऐसे जे महानुभाव । जे दैविये प्रकृतीचें दैव ।' -ज्ञा ९ १९४. ४ विद्या, बुद्धि, पराक्रम इ॰ गुणांनीं श्रेष्ठ मनुष्य; महाप्रतापी. ॰नेटका-वि. परिपूर्ण; पूर्णपणे; व्यवस्थित. 'यज्ञ मुनिचा राखे महानेटका ।' -मोरामायणें त्रिःसप्तमंत्रमय रामा- यण ३. ॰नैवेद्य-पुन. पंचपक्वान्नमय अन्नाचें ताट वाढून देवाला दाखवितात तो नैवेद्य (साखर, दूध इ॰चा छोटा नैवेद्य होतो). ॰न्यास-पु. पूजा करतांना शरीराच्या विवक्षित भागांना स्पर्श करून करावयास न्यास. याचाच दुसरा प्रकार लघुन्यास. ॰पड-पु. (महानु.) महापट; ध्वज. 'आहो जी देवा । पैलु देखिला महा- पडांचा मेळावा ।' -शिशु १०३३. [महापट] ॰प(पं)थ-पु. १ मृत्यु; मरण; मृत्यूची वाट. 'न देशील सत्यवंत । तरी करीन हाचि महापंथ ।' -वसा ६.८. २ निर्याणाचा मार्ग. 'लागले महापंथी तत्काळाची ।' -एभा ३१.२९८. ॰पद-न. ब्रह्मपद. 'कीं श्रुति हे महापदीं । पैठी जाहली ।' -ज्ञा १३.३७१. ॰पद्म-पु. १ एकं, दहं, शतं ह्या श्रेणींतील तेराव्या स्थानची संख्या (एकावर बारा शून्यें इतका आकडा) २ कुबेराच्या नवनिधींपैकीं एक निधि. नवविधी पहा. ॰पातक-न. ब्रह्महत्या, दारू पिणें, सुवर्णाची चोरी, गुरूच्या पत्नीबरोबर किंवा स्वतःच्या मातेबरोबर संभोग आणि यापैकीं एखादें पातक करणाराशीं मैत्री, अशा पांच मोठ्या पातकांपैकीं प्रत्येक. ॰पातकी-वि. १ ज्याच्या हातून महापातक घडलें आहे असा. २ अत्यंत पापी; दुराचारी. म्ह॰ अवसानघातकी महापातकी. ॰पाप-पी-महापातक-की पहा. ॰पीठ-न. विष्णूच्या चक्रानें झालेले शक्ती-पार्वतीच्या शरीराचे तुकडे ज्या ठिकाणीं पडले असें मानतात त्या अत्यंत पवित्र स्थानापैकीं प्रत्येक. अशीं स्थानें साडेतीन आहेत. तुळजापूर, मातापूर आणि कोल्हापूर, हीं तीन व अर्धे सप्तशृंग. औट पीठ पहा. ॰पुरुष-पु. १ ईश्वर. २ साधु- पुरुष; सत्पुरुष; ब्रह्मनिष्ठ मनुष्य. 'महापुरुषाचें चित्त । जालिया वस्तुगत ।' -ज्ञा १३. ७८९. ३ मेलेल्या ब्राह्मणाचें पिशाच्च. ॰पू(पु)जा-स्त्री. व्रतसमाप्ति इत्यादि विवक्षित प्रसंगास अनुसरून करतात ती मोठी पूजा. ॰पूर-पु. नदीस येणारा मोठा पूर, लोंढा. 'महापूरें झाडें जाती । तेथे लव्हाळे राहती ।' -तुगा १०४३. ॰प्रयास-पु. मोठे परिश्रम, कष्ट, प्रयत्न, खटाटोप. ॰प्रलयपु. १ प्रत्येक ४३२००००००० वर्षांनीं होणारा सर्व जगाचा नाश. २ ब्रह्मदेवाच्या शंभर वर्षांनीं होणारा सर्व (देव, ब्राह्मण, साधू, ब्रह्मा यासह) विश्वाचा नाश. 'जो ब्रह्याच्या स्थूळ देहाचें मरण । तो महाप्रलय जाण ।' महाकल्प पहा. ॰प्रयासपुअव. फार मोठे कष्ट, श्रम, प्रयत्न. ॰प्रसादपु. १ धार्मिक किंवा देवाच्या उत्सवा- नंतर वाटतात तो फुलें, मिठाई, जेवण इ॰ रूप प्रसाद. २ देव, गुरु इ॰पासून मिळालेली प्रसादाची वस्तु (कृपा, अनुग्रह म्हणून). ३ (शब्दशः व ल.) मोठी कृपा, अनुग्रह 'महाप्रसादाचेनि हरिखें । सप्रेम सुखें डुल्लती ।' ॰प्रस्थानन. (मोठा प्रवास) १ यथार्थ ब्रह्मज्ञानानंतर येणारा मृत्यु. २ (ल) मरण; मृत्यु ॰प्राणपु. १ मोठ्या जोरानें व प्रयासानें केलेला उच्चार: हकारयुक्त उच्चार २ जोरानें आणि प्रयासानें उच्चारण्याचा वर्ण. जसें-ख, घ, छ, झ, ठ, ढ, थ, ध, फ, भ, आणि ह अल्पप्राण आणि बाह्य प्रयत्न पहा. ॰फणी-पु. मोठा साप. ॰फल-ळ-न. मोठे, उत्कृष्ट फळ; नारळ. फणस इ॰ ॰बलि-ळी-पु. पिशाच्चादिकांस संतुष्ट कर- ण्यासाठीं मांस, अन्न इ॰ चा बलि, अर्पण करावयाचा पदार्थ ॰बळी-वि. अत्यंत प्रबळ, सामर्थ्यवान्. 'महाबळी प्राणदाता सकळां उठवी बळें ।' -मारुतिस्तोत्र. ॰बळी बुटी-स्त्री. रुंदट पानाचें आलें. ॰भाग-वि. १ अतिशय भाग्यवान् 'नित्य निष्काम अतिप्रीतीं । मज भजती महाभाग ।' -एभा २४ ३३५. २ सद्गुणी; सद्वर्तनी. ॰भारत-न. व्यासप्रणीत कौरव-पांडवाच्या युद्धाचें भारतीयांचे पवित्र असें एक महाकाव्य; महापुराण ॰भूत-न. पृथ्वी, आप तेज, वायु आणि आकाश ह्या पंचमहाभूतांपैकीं प्रत्येक. 'तरी होसी गा तूं परब्रह्म । जें या महाभूता विसंवतें धाम ।' -ज्ञा १०. १४९. ॰भेड-वि. अत्यंत भितराः भेकड. 'मग विरा- टाचेनि महाभडें उत्तरें ।' -ज्ञा ११ ४६९. ॰मणि-पु. मौल्यवान् रत्न; हिरा, माणिक इ॰ 'कांचोटी आणि महामणी । मेरू मषक सम नव्हे ।' -ह १ ८४. ॰मति-मना-वि. थोर अंतःकरणाचा; उदार मनाचा; महात्मा. ॰मंत्र-पु. निरनिराळ्या देवतांचा मुख्य मंत्र. जसें-गायत्री हा ब्राह्मणाचा महामंत्र. 'महामंत्र आत्मप्रा- प्तीची खाणी ।' ॰मंत्री-पु. मुख्यप्रधान; मुख्य मंत्री सल्लागार. ॰महोपाध्याय-पु. मोठ्या शास्त्राला देतात ती एक सन्मानाची सरकारी पदवी. ॰म/?/त्र-पु. हत्ती हांकणारा; महात. 'मुरडावया मत्त हस्ती । महामात्र दोन्हीं हस्तीं । अंकुश हाणी तैसा श्रीपती । मर्मोद्धाटनें करितसे ।' -यथादी २.१६. ॰माया-स्त्री. १ पार्वती; दुर्गा. २ जगदुत्पादक शक्ति; सर्व संसाराला, प्रपंचाला कारणीभूत अशी देवता; आदिमाया; मूलप्रकृति ३ जहांबाज कजाग बायको. ॰मार-पु. मोठा मार, फटका. 'शुक्रबाणाचा महामारु ।' -मुवन ३.३८. ॰मारी-स्त्री. १ महामृत्यु. 'तेथ अचेतना झुंजारीं । न मरत्या महामारीं ।' -एभा २८.२५०. २ (ल.) प्राणसंकट. 'तिचेनि योगें महामारी पातली हे जाणिजे ।' -मुवन ७.१८७. ३ पटकी या सांथीचा रोग. ४ या रोगाची अधिष्ठात्री, दुर्गादेवी. ५ जिवापाड श्रम; शिकस्तीचा प्रयत्न. ६ हाणाहाणी; मारामारी; मोठें युद्ध. 'दोघे झुंजतां महा- मारी' -मुवन ३.३६. 'तैसी मांडिली महामारी ।' -कथा २.२.६०. ॰मृत्यू-पु. मरण; मृत्यू (अपमृत्युविषयीं बोलतांना उपयोग) जसें- 'अपमृत्यूचा महामृत्यु झाला.' ॰मृत्युंजय- (वैद्यक) एक औषध. ॰यंत्र-न. तोफ. ॰यज्ञ-याग-पु. मोठा यज्ञ; पंच महायज्ञांपैकीं प्रत्येक; पंचमहायज्ञ पहा. 'तरी महायाग- प्रमुखें । कर्मे निफज नाही अचुकें ।' -ज्ञा १८. १६६. ॰यात्रा- स्त्री. १ काशीयात्रा. २ (ल.) मरण; मृत्यु. 'आधीं पेशवाई सकट सगळ्यांना महायात्रेला धाडीन.' -अस्तंभा १६२. महा- प्रस्थान पहा. ॰रथ-रथी-पु. १ शस्त्रास्त्रांत प्रवीण असून दहा हजार धनुर्धारी योद्ध्यांबरोबर एकटाच लढणारा योद्धा. 'महारथी श्रेष्ठ । द्रुपद वीरु ।' -ज्ञा १.९८. २ (ल.) अत्यंत शूर, कर्तब- गार पुरुष किंवा मोठा वक्ता. ॰रस-न. १ ब्रह्म. २ पक्वान. -मनको. ॰राज-पु. १ सार्वभौम राजा; सम्राट. २ (आदरार्थी) श्रेष्ठ माणूस. ३ जैन, गुजराथी वैष्णव लोकांचा गुरु. ॰रात्रि- स्त्री. महाशिवरात्र माघ वद्य चतुर्दशी. ॰राष्ट्र-नपु. मराठे लोकाचा देश; उत्तरेस नर्मदानदी, दक्षिणेस कर्नाटक, पूर्वेस तैलंगण आणि पश्चिमेस समुद्र यांनीं मर्यादित असलेला प्रदेश; मुंबई इलाख्यां- तील एक विभीग. ॰राष्ट्र-राष्ट्रीय-वि. महाराष्ट्रदेशासंबंधाचे (लोक, भाषा, रिवाज इ॰). ॰राष्ट्र-भाषा-स्त्री. मराठी भाषा; संस्कृत-प्राकृत भाषेपासून झालेली एक देशी भाषा. ॰राष्ट्री- एक जुनी प्राकृत भाषा. ॰रुख-पु. एक प्रकारचे झाड; महावृक्ष. 'कर्वत लागला महारुखा । म्हणे पुढती न दिसे निका ।' -मुआदि ३३.२९. ॰रुद्र-पु. १ रुद्राभिषेकाचा एक प्रकार; अकरा लघुरुद्र; लघुरुद्राच्या उलट शब्द महारुद्र. २ मारुती. 'महारुद्र आज्ञेप्रमाणें निघाला ।' -राक १.१. ॰रुद्रो-पु. (गु.) बाजरीची मोठी जात हिचें काड फार उंच होतें -कृषि २७७. ॰रोग-पु. १ अत्यंत दुःखदायक असा रोग. याचे आठ प्रकार आहेत-वात- व्याधि, अश्मरी, कृछ्र, मेह, उदर, भगंदर. अर्श आणि संग्रहणी. कांहींच्या मतें हे नऊ आहेत; त्यांत राजयक्ष्मा हा एक जास्त असून कृछ्राऐवजीं कुष्ठ व संग्रहणीच्या ऐवजीं ग्रहणी अशीं नांवें आहेत. २ रक्तपिती; गलित कुष्ठ. महार्घ-वि. १ महाग; दुष्प्राप्य. 'महार्घ येथें परमार्थ जाला ।' -सारुह १.२१. २ मौल्यवान् [सं. महा + अर्घ] महार्णव-पु. मोठा समुद्र; महासागर. 'वनीं रणीं शत्रु-जलाग्निसंकटी । महार्णवीं पर्वत-वास दुर्घटीं ।' -वामन स्फुट श्लोक ३५. (नवनीत पृ. १३७.) -न. १ (ल.) मोंठें, दीर्घकाल चाललेलें भांडण; युद्ध; लढाई. 'दोघां मांडलें महार्णव । दाविती बळ प्रौढीगौरव ।' -निगा २४. २ प्रसिद्धि; डांगोरा; जघन्यत्व. ३ लहान काम, प्रकरण, गोष्ट इ॰ ला मोठें रूप देऊन सांगणें; राईचा पर्वत करणें. 'एवढ्याशा गोष्टीचें त्वां लागलेंच महार्णव केलेंस.' [सं. महा + अर्णव] ॰लय-पु. १ आश्रयस्थान; आश्रम; धर्मशाळा. २ देऊळ. ३ परमात्मा. ४ भाद्रपद वद्यपक्षां- तील पितरांप्रीत्यर्थ केलेलें श्राद्ध; पक्ष; मृतपितृकानें भाद्रपद शुद्ध पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत दररोज करावयाचें श्राद्ध. हें रोज करणें अशक्य असल्यास १५ दिवसांतून एका उक्त दिवशीं करावें. [महा + आलय] ॰लक्ष्मी-स्त्री. १ विष्णुपत्नी २ अश्विन शुद्ध अष्टमीस पूजावयाची एक देवता, त्या देवतेचे व्रत. ३ भग- वती; कोल्हापूरची देवी. ४ (ना.) ज्येष्ठागौरी; भाद्रपद शुद्ध नव- मीस पूजा करावयाच्या देवता. ॰लिंग-न. बारा ज्योतिर्लिंगांपैकीं प्रत्येक. ॰वटी, माहावटी-स्त्री. राजमार्ग. 'हे कपटाची कस(व)टी । अनृत्याची माहावटी ।' -भाए ७५५. ॰वस्त्र-न. उंची, सुंदर वस्त्र; प्रतिष्ठित वस्त्र; शालजोडी इ॰ ॰वाक्य-न. वेदांतील जीवब्रह्माचें ऐक्य दाखविणारें तत्त्वमसि आदि वाक्य हीं चार वेदांची चार आहेत. 'तो महावाक्याचेनि नांवें । गुरुकृपे- चेनि थांवें ।' -ज्ञा १८.४०४. २ गायत्री मंत्र. ॰वात-पु. (तासीं ८० मैल वेगाचा) सोसाट्याचा वारा; झंझावत; तुफान. 'महावात सूटला म्हणुनि का कंप येत भूघरा ।' -सौभद्र. ॰विषुव-न. मेष संपात; हरिपद. ॰वृत्त-न. ज्या वृत्ताची पातळी गोलाच्या मध्य बिंदूतून जाते तें वृत्त; मोठें वर्तुळ. ॰वोजा-वि. मोठ्या थाटांची; तेजस्वी. 'संतोषोनी महाराजा । सभा रचित महवोजा ।' -गुच ३४. ९७. [महा + ओजस्] ॰व्याधि-पु. महारोग; रक्तपिती. ॰शब्द- पु. बोंब; शंखध्वनि. ॰शय-पु. १ थोर पुरुष; महात्मा, २ मोठ्या माणसांस महाराज रावसाहेब याप्रमाणे संबोधावयाचा शब्द. [सं. महा + आशय; बं. मॉशे; फ्रें मुस्ये (माँसिय)] ॰शिवरात्र-त्रि-स्त्री. माघ वद्य चतुर्दशी. ॰शून्य-न. जें कांहींच नाहीं असें जें शून्यास अधिष्ठानरूप ब्रह्म तें; परब्रह्म. 'आतां महा- शून्याचिया डोहीं । जेथ गगनासीचि ठावो नाहीं ।' -ज्ञा ६. ३१५. ॰महाष्टमी-स्त्री. अश्विन शुद्ध अष्टमी. ॰सरणी-स्त्री. स्वर्गमार्ग. ' होउनि सुयोधनाचा शोकार्त वरो पिता महास- रणी ।' -मोभीष्म ११.१५. ॰सागर-पु. पृथीवरील पाण्याचा सागराहून मोठा सांठा; मोठासमुद्र. उदा॰ हिंदी महासागर. ॰सिद्धांत-पु. एकमेवाद्वितीयं ब्रह्म हा मुख्य सिद्धांत. 'आणि महासिद्धांतापासीं । श्रुति हारपती शब्देंसीं ।' -ज्ञा १५.४३४. ॰सिद्धि-स्त्री. अष्टमहासिद्धी पहा. 'जेथ महासिद्धींचीं भांडारें । अमृताचीं कोठारें ।' -ज्ञा ६.३२१. ॰सुख-न. ब्रह्मसुख; ब्रह्म साक्षात्कार. 'जेथ परमानंदु केवळु । महासुखाचा ।' -ज्ञा १.१४. ॰स्म(श्म)शान-न. काशीक्षेत्र. 'सदाशिव बैसता निजासनीं । महाश्मशानीं निजवस्ती ।' -एभा २.३१. ॰क्षेत्र-न. काशी- क्षेत्र. -रा ३.४७६. ॰महेंद्र-पु. १ हिंदुस्थानांतील पर्वताच्या सात रांगांपैकीं एक. २ इंद्राचें नांव. 'हें महेंद्रपदही पाविजेल । परि मोह हा न फिटेल ।' -ज्ञा २.६५. [महा + इंद्र] महेश, महेश्वर-पु. शिव; शंकर. [महा + ईश्वर] महेश्वरी पातळ-न. महेश्वर नांवाच्या गांवी (इंदूर संस्थान) तयार झालेलें वस्त्र, पातळ. 'आधींच कंबर बारिक त्यावर महेश्वरी पातळ कसलें ।' -होला ८९. महोत्सव, महोत्साह-पु. मोठा उत्सव; आनंद- दायक प्रसंग. [महा + उत्सव] महोदधि-पु. १ महासागर; मोठा समुद्र. ' महोदधीं कां भिनले । स्त्रोत जैसे ।' -ज्ञा १५.३१७. २ हिंदीमहासागर [महा + उदधि] महोदय-पु. माघ किंवा पौष महिन्यांत सोमवारी सूर्योदयीं अमावस्यारंभ श्रवण नक्ष- त्राचा मध्य आणि व्यतिपाताचा शेवट यांचा योग; एक मोठें पर्व. [महा + उदय] महौजा-वि. तेजस्वी; ज्याचें तेज मोठें आहे असा; सामर्थ्यवान् 'पुरुष श्याम महौजा ओढित होता बळेंचि मजला जो ।' -मोवन १३.८८. [महा + ओज] महान्-वि. १ मोठा; विस्तृत; थोर. २ उशीरा पिकणारें (धान्य, पीक); गरवें ३ दोन किंवा अनेक वर्षें टिकणारें (झाड, मिरची, कापूस, पांढरी तूर इ॰).

दाते शब्दकोश

अंग

न. (अप.) आंग. १ शरीर; देह. 'पै जयाचेनि अंगसगें ।' -ज्ञा ९.२६९. 'अंगाला वारा लागेल, आंत जा !' २ अवयव; इंद्रिय; गात्र. 'अति क्षीणता पावलीं सर्व आंगें.' -दावि २४२. ३ (ल.) कोणत्याहि गोष्टीचा घटक, विभाग. 'हत्ती, रथ, घोडेस्वार आणि पायदळ हीं प्राचीन काळीं सैन्याचीं चार अंगें समजलीं जात असत.' ४ बाजू; दिशा. दारा अंग = (व.) दरवाज्यामागें किंवा जवळ. 'आठै आंगें पोळती । वसूधरेचीं ।' -शिशु ७४८. 'किल्ल्याचें आंग भिउनि फिरंग भार हा पळतो कानड्याचा.' -ऐपो १८३. 'तुमचें पागोटें मागल्या अंगानें बैडौल दिसतें.' ४ वेदांग; वैदिक वाङ्मयापैकीं विशिष्ट ग्रंथ- समूहास संज्ञा. उदा॰ शिक्षा, ज्योतिष, निरुक्त, इ. ५ एखाद्या कामांत असलेला हात, घेतलेला भाग किंवा संबंध. 'त्या मसलतींत रामाजीपंतांचें अंग आहे.' ६ चोरून मदत किंवा मिलाफ; आश्रय; फुस. 'ह्या चोराला कोतवालाचें अंग आहे.' 'ही सासूबरोबर भांडते, हिला नवर्‍याचें अंग आहे.' ७ अधि- ष्ठान; ठिकाण; शरीर; देह (एखाद्या गुणदोषाचा कर्ता, पात्र). 'ही चोरी ज्याचे अंगीं लागेल त्यास मी शासन करीन,' 'त्याच्या अंगीं चित्रकलेचा गुण आहे.' ८ (एखाद्या वस्तूचा किंवा कार्याचा) गौण, अप्रधान; भाग. उ॰ विवाहामध्यें होम हा प्रधान आहे, अवशिष्ट कर्में अंगें होत. ९ खूण. 'अनुभवाचीं आंगें जाणें ।' -दा ५.९.२२. १० आंतड्याचा गुदद्वाराबाहेर येणारा भाग, किंवा प्रसूतीनंतर योनीच्या बाहेर येणारा भाग. (सामा.) गुदद्वार. 'आंगीं सारी बर्फ कुणाच्या छत्री गाजर मुळा । मेणबत्तीचा खेळ चालला' -विक्षिप्त १.१३५. ११ विशिष्ट काम करण्याची पात्रता, ताकद, क्षमता, बुद्धि. १२ आपल्या बाजूचा माणूस (मोठ्या अधिकावरील); पुरस्कर्ता, तरफदारी करणारा; वशिला 'दरबारांत अंग असल्यावांचून क्रांतिवृत्तावरचा बिंदु, अंश. (अस्तलग्नाच्या उलट). १४ (संगीत) प्रबंधाचा पोटविभाग; रागवाचक स्वरसमुदाय; हे विभाग सहा आहेत:- स्वर, विरुद्ध, पद, तेनक, पाट, ताल. १५ (ताल) तालाचें मात्रानियमानें झालेलें कालप्रमाण हीं अंगें सात आहेत:-अणु- द्रुत, द्रुतविराम, लघु, लघुविराम, गुरु व प्लुत. १६कौशल्य; चातुर्य; कल. 'त्याला गाण्याचें अंग आहे.' १७ मगधाच्या पूर्वेचा जुना बंगाल देश; सध्यांचे मोंघीर, भागलपूर, पूर्णिया इ॰. जिल्हे यांत येतात. याचा उल्लेख अथर्ववेदांत आलेला आहे. पुढील काळीं शोण, गंगा या नद्यांच्या आसपासचा प्रदेश; कर्णाचें राज्य. १८ आचारांग सूत्रांपैकीं एक जैन आगम ग्रंथ. १९ स्वतः, खुद्द. आंगें असाहि प्रयोग आढळतो. 'दीप वांचूनि दिवा लाहे । तै आंग भुललाचि कीं ।' -अमृ ३.२०. 'राहोनि गुप्त धृष्ट- द्यूम्नें तच्छोध लाविला आंगें ।' -मोआदि ३४.१८. २० प्रकार. 'घालाघालीचें आंग सांधौं कैसें । चालितां बिंबु न दिसें ।' -शिशु १००६. 'कारभाराचें सांगावें अंग कैसें ।' -दा ११.५.२३. -शअ. (व.) कडे. उ॰ 'भिंतीअंग' (वाप्र.) ॰ओढविणें- आपल्या आंगावर घेणें; स्वतः पुढें होणें; (एखाद्या कार्योत- कडे). 'आपुलेंचि अंग तुम्हीं वोडविलें । त्याचें निवारिलें महा दुःख ।' ॰काढणें-काढून घेणें-१ स्वतः एखाद्या कामांतून माघार घेणें; संबंध तोडणें (एखाद्या कामांतून). 'मी त्या कामांतून आपलें अंग काढून घेतलें आहे.' २ (कु. गो.) दच- कणें. 'आंग काडप.' ॰घालणें-१ हात घालणें; मदत करणें; मन घालणें. 'या कामांत तूं जर अंग घातलेंस तर फार सोय होईल.' २ दुःखामुळें (जमिनीवर पडणें.) 'ऐकोनियां आंग घाली पृथ्वीवरी ।' -दा ३.५.३०. ॰घासणें-झीज सोसणें. 'परांजप्यांनीं प्रामाणिकपणानें अंग घासून... स्वतःची स्कीम करून कार्यास लागावें' -केले १.२६३. ॰घेणें-भरणें-१ लठ्ठ होणें. २ (गो. 'आंग घेवप.') (कामांत) भाग घेणें. ॰न घेणें-पुढें न सरसावणें; भाग न घेणें. ॰चढणें-सदरांत पडणें; वर्गांत येणें. 'जें विधीसी नातुडे । तें निषेधाचें अंग चढे ।' -एभा ७.६९. ॰चढून येणें-(व.) ताप भरणें, चढणें. ॰चोरणें-जोगावणें-१ अंग राखून काम करणें; टंगळमंगळ करणें; चुकारपणा करणें. 'संत सेवेसी अंग चोरी ।वृष्टी न पडो तयावरी ।' २ शरीराचा भाग आकुंचित करणें (मार चुकविण्या- साठीं). 'असा अंग चोरतोस म्हणून नीट लागत नाहीं.' ॰जड करणें-(गो. 'अंग जड करप') एखाद्या कामांत भाग घेण्याचें टाळूं पहाणें. ॰जड जाणें-(गो. 'आंग जड जापव.') अंगावर कांटा उभा राहणें. ॰झांकणें-लपविणें- स्वतःची बाजू किंवा भाग (कामांतील) दाबून, गुप्त ठेवणें. ॰झाडणें-साफ नाहीं म्हणून सांगणें; नाकबूल करणें. 'आंग झाडिती न ममें । येणें बोलें ।' -ज्ञा १७.३७२. ॰टाकणें-१ अशक्त होणें; वाळणें. 'आई गेल्यापासून बाळानें अंग टाकलें आहे.' २ जोरानें देह जमिनीवर टाकणें. ३ विश्रांती- साठीं आडवें होणें; कसें तरी अस्ताव्यस्त पसरणें. 'घरीं जाऊन केव्हां अंग टाकीन असें मला होतें.' ॰टेकणें-आश्रय करणें. 'योगें आंग टेकिलें योगीं ।' -अमृ ९.२६. ॰दर्शविणें- एखाद्या गोष्टींत किंवा व्यवहारांत हात किंवा संबंध आहे असें भासविणें. ॰दाखविणें-एखाद्या कामांत कौशल्य दाखविणें; फड जिंकणें. ॰न दाखविणें-अंग असल्याचें लपविणें; मागें रहाणें, जबाबदारी टाळणें. (गो. आंग दाखैना जापव.') ॰देणें-१ मदत करणें; हातभार लावणें. २ प्रवृत्त होणें; वळणें. 'सुखा अंग देऊं नये ।' ॰दोडपणें, दुडपणें, दुमडणें- (गो. 'आंग दोडप.') अंगं चोरणें. ॰धरणें-१ ताठरणें; संधिवातानें शरीर आंखडणें. २ लठ्ठ होणें; ताकद येणें. ॰मरणें- अर्धांगवायूनें शरीर अथवा एखादा अवयव बधिर होणें. ॰मारणें- १ अंग चोरणें पहा. २ जोरानें अंग आंत घुसविणें. 'मीं दाटींतून अंग मारलें.' ॰मुरडणें-मुरडणें; मागें पहात दिमा- खानें जाणें; ठमक्यानें जाणें; 'नवी साडी नेसून पोर पहा कशी अंग मुरडीत चालली आहे.' ॰मोडून काम करणें- खपणें; श्रम करणें; अतिशय मेहनत करणें; जिवाकडे न पाहतां काम करणें; जीव पाखडून काम करणें. ॰मोडून येणें-तापानें अंगावर कांटा येणें; कणकणणें; कसकसणें. 'तदुपरि अविलंबे आंग मोडून आलें ।' -सारूह ३.५७. ॰येणें-(गो. 'आंग यॅवप.') १ लठ्ठ होणें. २ प्रसूति समयीं गुह्यांग बाहेर येणें. ॰रक्षण करणें, राखणें-वांचविणें-अंग चोरणें; आपला बचाव करणें. 'यश रक्षावें न आंग लेंकांहीं ।' -मोउद्योग १०.६१. 'वत्सें भीमें एकें काय करावें? न अंग राखावें ।' -मोभीष्म ३.४. ॰सांवरणें-१ तोल सांवरणें., २ गेलेली ताकद पुन्हां मिळविणें; पूर्व स्थितीवर येणें. ॰सोडणें- (गो. 'आंग सोडप') खंगत जाणें. ॰हलकें होणें-(गो. आंगं ल्हवु जावप.') हायसें वाटणें; (जबाबदारींतून) मोकळें झाल्याबद्दल समाधान वाटणें. 'अंगा-नें आरंभ होणा रे वाप्र. -खांद्यावरचें-(बायकी) (ल.) दागदागिने. -खालची, खालची बायको-स्त्री. राख; उपस्त्री. -खालीं घालणें- स्वतःच्या चैनीसाठीं अथवा उपभोगासाठीं राखणें (वेश्या, परस्त्री, इ॰). -खालीं पडणें-१ सवयीचें होणें. २ भोग देणें; रतिसुख देणें-वेणें. -चा आंकडा होणें-आंकडीनें पेटके येणें; अंग वांकडें होणें. -चा आळापिळा करणें-१ अंग पिळवटणें; आळेपिळे देणें. २ अतिशय श्रम करणें. -चा खकाणा करणें-(व.) संताप करून घेणें. -चा खुर्दा होणें- (श्रमानें) अतिशय श्रमानें अंग ठणकणें; गलितगात्रें होणें; मणके ढिले होणें. -चा हुरपळा-भडका होणें-अंग अतिशय तापणें (तापानें, संतापानें); लाही होणें; आग होणें. -ची आग-लाहकी-होळी होणें-रागानें, संतापानें अंगाची आग होणें. -ची चौघडी करणें-१ शरीराच्या चार घड्या करणें (डोंबार्‍याच्या कसरतींत). २ सर्व अंग पोटाशीं घेऊन निजणें (थंडी, ताप इ॰ मुळें). -ची लाही होणें-अंगाचा हुरपळा होणें पहा. १ उन्हानें अतिशय अंग तापणें; काहिली होणें; भडका होणें. २ अतिशय संताप येणें (जोंधळा इ॰ धान्याची भाजून लाही होते त्याप्रमाणें); 'तें तिजला खपलें नाहीं । अंगाची झाली लाही ।' -विक १७. -ची लाही करणें- संतापविणें; खिजविणें; भाजणें; जाचणें. -चें आंथरूण करणें- स्वतःबद्दलची काळजी सोडून सर्व प्रकारच्या संकटांना तोंड देणें; एखाद्याचें काम करण्यासाठीं स्वतःच्या जीविताची पर्वा न करणें. 'त्याचें लग्न व्हावें म्हणून म्या अंगाचें अंथरूण केलें तरी त्यानें त्याचा कांहीं उपकार मानला नाहीं.' -चें आंथरूण होणें- (तापामुळें) अशक्तता येणें; उठवणीस येणें; मरगळीस येणें. -चें कातडें काढून जोडा शिवणें-(एखाद्याविषयीं) अतिशय कृतज्ञता, आदरबुद्धी दाखविणें. -चे चकदे काढणें- (मांसाचे तुकडे करून काढणें) जोरानें बेदम मरणें; अंगाची सालडी काढणें. -चे-चा तिळपापड होणें-रागानें शरीराची लाही होणें. 'मी दहांच्या तोंडून ऐकलं आणि माझ्या अंगाचा असा तिळपापड झाला कीं सांगतां पुरवत नाहीं.' -मोर १५. -चे धुडके उडविणें-(शरीराच्या) लकतर्‍या काढणें; चेंदा- मेंदा करणें; फार झोडपणें. 'त्या बदमाषानें त्याच्या अंगाचे नुसते धुडके उडविले.' -चें पाणी करणें-होणें-अतिशय श्रम करणे (त्यामुळें अंगास पाणी, घाम येणें). 'अंगाचें पाणी करूनच या हतभाग्या आयुष्याचे दिवस मला लोटले पाहिजेत.' -पाव्ह ९९. -च्या चिंध्या करणें-१ (व.) अंग ओरखडणें. २ त्रास देणें. -अंगांत मांग शिरणें-शरिरांत अतिशय क्रोधाचा संचार होणें. (मांग हा फार क्रूर समजला जातो यावरून). -त येणें-वारें शिरणें-१ भूतसंचार होणें. २ अति उत्कंठेनें काम करणें. -त शीळकळा येणें-(माण.) अंगांत देव येणें, वारें येणें. -निराळा-बाहेर-टाकणें-झोंकणें- सोडणें-झिडकाविणें-(कामधंदा, जबाबदारी) सोडून देणें; माथ्यावर, अंगावर न घेणें. 'पेशव्यांनीं आम्हाला आंगाबाहेर टाकलें आहे.' -अस्तंभा २४. -निराळें करणें-अंगाबाहेर टाकलें पहा. -बरोबर होणें, -त बसणें-एखादा कपडा अंगास बरोबर बसणें, ठीक होणें, बेताचा होणें; -ला लावणें- १ अंगांला तेल वगैरे चोपडणें. 'नवी नवरी म्हणून अंगाला लावीन म्हटलें; नाहीं !' -झांमू. २ बाळंतिणीचें अंग रगडणें, चोळणें. (एका) -वर असणें-होणें- एका कुशीवर निजणें किंवा आनं- दानें अंग रोमांचित होणें. 'वृत्तश्रवणें आला सर्वांगीं आमुच्या पहा कांटा ।' -मोकर्ण १८.१. -वर काढणें- आजार वगैरे सोसणें. -वर कोसळणें-कोसळून पडणें-ओघळणें- १ रागानें एखाद्याच्या अंगावर चालून जाणें, पडणें. २ संकट आपत्ति वगैरे गुदरणें; जबाबदारी येणें; आपत्तींत सांपडणें. -वर गोण किंवा गोणी येणें-(व.) अंगावर जोखीम किंवा जबाबदारी येणें. -वर घेऊन-स्वतःवर जबाबदारी घेऊन; आपलें म्हणून; कैवार घेऊन (क्रि॰ करणें; बोलणें; सांगणें; पुसणें; विचारणें). -वर घेणें-१ मुलास प्यावयास घेणें, देणें; थान देणें. २ स्वतःवर जबाबदारी घेणें. ३ आपला म्हणणें, अतिशय प्रीति दाखविणें. -वर तुटणें-तुटून पडणें-हल्ला करणें; धांवून जाणें; एकदम चालून जाणें. -वर देणें-जामिनकी किंवा गहाण न घेतां वैयक्तित जबाबदारीवर कर्ज वगैरे. -वर देणें-बांधणें-भरणें-पोसणें-करणें इ॰-स्वतःच्या जबाब- दारी-साधन-संचयावर देणें, बांधणें वगैरे. -वर पडणें-येणें- १ शिरावर पडणें; विक्रींत नफा होईल म्हणून जो माल खरेदी केला तो अडीअडचणीमुळें. भाव उतरल्यामुळें आपल्याजवळ पडून राहणें; तोटा भरून देण्याची जोखीमदारी अंगावर येणें. २ गळ्यांत येणें; एखादा धंदा अगर काम करण्यास भाग पडणें. ३रागानें चालून जाणें; वसकन अंगावर येणें. ४हल्ला करणें; चालून येणें. -वर पिणें, खाणें-(मुलानें) स्तनप्राशन करणें; स्तनप्राशन करण्याइतकें लहान असणें. -वर शेकणें-तोटा होणें (व्यापारांत); बुड येणें (रुपये, व्यवहार, इ॰ ची); कुमांड येणें. -वरचें-वि. दूध पिणारें (मूल). -वरचें जाणें- (बायकी) महिन्याच्या महिन्यास तरून स्त्रीच्या शरीरांतून जसें दूषित रक्त बाहेर जातें तसें अवेळीं जाऊ लागलें; धुपणी रोग होणें. -वरचें तोडणें-तान्ह्या मुलाचें अंगावर पिणें बंद करणें. -वरून वारा जाणें-अर्धांगवायु होणें. 'भूतपिशाच्य लागलें । अंगावरून वारें गेलें ।' -दा ३.७.५५. -स कुयला लागणें- मत्सरानें किंवा संतापानें हिरवा-निळा होणें; मिरच्या लागणें; अतिशय राग येणें. -स झोबणें-(व.) अंगास स्पर्श करणें; धरणें. -स मुंग्या येणें-वातादि विकारामुळें अंगाला एक प्रका- रची बधिरता येणें. -स बसतें येणें-अंगाला बरोबर बसेल असें होणें (कपडा इ॰). 'नोकरलोकांच्या अंगास बसते येतील असे पोषाख करण्यांत यावेत.' -खानगींतील नोकरांचे पोषाख (बडोदें) ७ -स-अंगीं-येणें- १ व्यापारांत बूड येणें; नुक- सान होणें; ठोकर बसणें. 'मिरच्यांचा व्यापार अंगास आला.' २अंगांत बाणणें. 'मराठीच्या अंगीं आलेली क्षीणता क्षणता क्षणमात्रहि झांकली जाणार नाही.' -नि. -स येणें-होणें-अंगाबरोबर होणें. -स-आंगीं-लावणें-१ पुष्टिकारक होणें; लठ्ठ होणें. २एखादा दोष किंवा गुन्हा अंगावर शाबीत होणें, लागू होणें. 'तेथें व करितां चोरी । आंगीं लागे ।' -दा ६.१.७२. ३तोटा सोसावा लागणें; ठोकर बसणें; अंगावर शेकणें. -स लावणें- १ (बायकी) स्नानाच्या अगोदर तेल व हळद अंगाला लावणें, चोळणें. २बाळंतिणीच्या अंगाला तेल लावणें. -स लावणें- लादणें-चिकटविणें; शाबीत करणें (गुन्हा, अपराध). -आंगीं- यानें आरंभ होणारे वाप्र. -असणें-जवळ, पदरीं असणें; ठायीं असणें. 'हा दोष माझ्या आंगीं नाहीं.' -आणणें-१ आपल्या- वर घेणें; ताबा घेणें. २ आपल्या ठिकाणीं असूं देणें; स्वाधीन राखणें. 'हा गुण आंगीं आणण्याचा प्रयत्न कर.' ॰आद- ळणें-अंगास चिकटणें, कोसळणें. 'अंगीं आदळतो शोक.' -दावि ४२३. अंगीं(एका आंगीं)-अंगें-उणा-वि. १आई- बाप मेलेला; पोरका; विधवा; विधुर. २ व्यंगी; लुळा; कमीपणा असलेला; एका पायानें लंगडा; ३(ल.) सरळ, ताठ नसलेला; उणेपणा असलेला; कमजोर बाजू असलेला; लुच्चा; जाणून- बुजून अपराधी. म्ह॰ आंगीं उणा तर जाणे खाणाखुणा = ज्याला आपला कमीपणा ठाऊक आहे तो लोकांची टीका आपल्याला चिकटवून घेतो. ॰खिळणें-शरीरांत भिनणें. ॰घुमारणें-भूत लागणें; अवसर येणें. आणि आंगीं घुमारिलें.' -दावि १५६. -चा उतारा-वि. अंगावरून ओवाळून दिलेला, काढून टाकलेला जिन्नस (वस्त्र, अलंकार इ॰). 'तुझें अंगीचा उतारा । तो मज देई गा दातारा ।' -भज ४२. -ची सावली करणें-(स्वतः- चा) आश्रय देणें. 'आपुलिये अंगींची सावली । अहोरात्र करुनि तया रक्षी ।' -जिरणें-सरावाचें होणें; मुरणें. -ताठा भरणें- गर्विष्ठ होणें. 'अंगीं भरलासे ताठा । वळणीं न ये जैसा खुंटा ।' -तुटणें-अशक्त होणें; वाळणें; रोड होणें (मूल). -नसणें- १ जातीनें अनुभव, माहिती नसणें. २स्वतःचा नसणें; मुळचा नसणें. 'इतका उद्धटपणा त्याच्या आंगीं नाहीं.' -पडणें- १ सहाय, पक्षपात करणें. 'हा अविद्येचा अंगीं पडे.' -अमृ ६.६. २ संवय होणें. अंगीं मुरणें पहा. -फुटणें- १ लठ्ठ होणें; गुब- गुबीत होणें. २ एखादा रोग अंगावर स्पष्ट दिसणें, वाहणें (रक्त- पिती इ॰). -बसणें-सुगम असणें; संवय होणें. -बिर्‍हाड देणें-करणें-शरीरांत थारा देणें; हृदयांत, अंतःकरणांत बाळगणें; आस्त्रा देणें (दुर्गुण, पापवासना इ॰ ना). -माशा मारणें-आळशी बनणें. -(माशीं) भरणें-लठ्ठ होणें. -मिरच्या, कुयले, लागणें-झोंबणें- (एखाद्यानें मर्म काढलें असतां) रागानें जळफळणें. -मुरणें-१ संवयीचा होणें. २ हाडीं शिरणें; शरीरांत (ताप) भिनणें. ३ जिरणें; बाहेर न येणें (देवी, गोवर). -येणें-अंगांत भुताचा संचार होणें; अवसर येणें; भूत- बाधा होणें. 'शूद्र येक त्याचे आंगीं आला बोले ।' -रामदासी २.११. -लागणें-अन्न पचणें; लठ्ठ होणें. 'त्याच्या अंगीं अन्न लागलें.' -वाजणें-(बाजणें) अंगांत शिरणें; शोभणें. 'थोर- पण अंगीं वाजे नाना' -दावि ६५. अंगीं-गें-१ स्वतः, जातीनें. म्ह॰ 'अंगें केलें तें काम । पदरीं असे तो दाम ।' 'अंगें करिताती आपण । दोघे जण मिळोनी ।' -एभा ७.५७८. 'अंगें धावे कार्यासमान ।' -नव १६.१७५. २ च्या वतीनें, मार्फत (प्रतिनिधी). दादा अंगे वयनी सोयरी. अंगें, आंगें- शअ. जवळ; बाजूस. 'पाण्याचा तांब्या बापूचे आंगें होता.' -बाळ २.६८. म्ह॰ १ अंगीं (माझ्या इ॰) का माशा मेल्या आहेत = काय (मी) आळशी आहें, का माझा धंदा काय माशा मारीत बसण्याचा आहे? २ आली अंगावर तर घेतली शिंगावर = सहजासहजीं, आगाऊ न ठरवितां एखादी गोष्ट अंगा- वर येऊन पडली असतां, आडवी आली असतां ती करणें (बैलाच्या शिंगांच्या टप्प्यांत कोणी आला तर तो त्याला शिंगावर घेण्याला कमी करीत नाहीं यावरून, आयता मिळालेला फायदा करून घेणें हा अर्थ). ३ अंगापेक्षां बोंगा मोठा; अंगापेक्षां बोंगा, कोठें जासी सोंगा = (शरीरापेक्षां धोतराचा अथवा लुगड्याचा पुढचा भाग मोठा) खर्‍यापेक्षां जास्त योग्यतेची ऐट मारणें. सामाशब्दः ॰अंग, आंगप्रत-क्रिवि. पृथक् पृथक्; अलग अलग; इसमवार; प्रत्येकीं. ॰उद्धार-पु. (प्र.) अंगोद्धार. १ (काव्य) शरीराची, देहाची मुक्तता. २ तीर्थांत स्नान करणें; तीर्थस्नान; देहशुद्धि. ३ (योग) पोटांतील आंतडीं तोंडांतून बाहेर काढून स्वच्छ करणें; धौती; धुतीपुती. [अंग + उद्धार] ॰उधार-वि. अंगावर दिलेलें, केलेलें (कर्ज, उधारी); स्वतःच्या पतीवर केलेली उधारी. ॰ओलाचें-न. (कों.) जिच्यांत पाणी सांठविण्याची शक्ति आहे असें शेत, जमीन; उन्हाळ्यांत पाणी न देतां हिच्यांतून पीक काढतात. ॰कंप-पु. शरीरास कंप सुटणें; थर- कांप होणें. [सं.] ॰कल-पु. शरीराचा तोल, वांक. [सं.] ॰कवळी-स्त्री. (काव्य) आलिंगन; मिठी; पक्कड. 'परस्परें अंगकवळी होतां । आनंदिलीं उभयतां ।' -मोल. [अंग + कव- ळणें] ॰कष्ट-पु. शारीरिक श्रम. [सं.] ॰कळा-स्त्री. शरीराचें तेज, कांति; मुसमुशीतपणा (निरोगावस्थेंत). ॰काठी-स्त्री. अंगबांधा; अंगयष्टि; शरीराचा बांधा, ठेवण. (अंगलट-लोट- ठेवण-वटा-वठा-वळण हें शब्द शरीराचें स्वरूप, कांति, भरदार- पणा इ॰ दाखवितात तर अंगकाठी-बांधा-यष्टी हे रचना, बांधणी दाखवितात). ॰काडू-ढू-ढ्या-वि. अंग काढणारा; पळपुट्या; जबाबदारी टाळून निसटूं पाहणारा (संकट, अडचणी असतांना); काम चुकारू; माघार घेणारा. [अंग + काढणें] ॰कार्श्य-न. शरी- राचा लुकडेपणा; सडपातळपणा; कृशता. [सं.] ॰गडी-पु. पोटां- तील भिडू; पित्त्या; (सोंगट्या, पत्ते इ॰ खेळांत) भिडूंचा तोठा असतां आपणच त्यांच्या वाटचें खेळणें, म्हणजे आपणच एक कल्पित भिडू आहों असें मानणें. ॰ग्रह-पु. आचके, पेटका, गोळा येणें. [सं.] ॰चपळाई-चापल्य-स्त्रीन. अंगांतील चपळपणा; स्वतःसिद्ध चापल्य. ॰चुकाऊ-र-रू, -चोर-वि. कामांत कुचराई करणारा; मनापासून, नेटानें काम न करणारा. 'अंगचोर वाग्वीर-पटूंचें पेव कसें फुटलें ।' -सन्मित्र समाज मेळा पृ. १३. १९२९. ॰च्छाया-स्त्री. १अंगाची सावली. २(ल.) आश्रय. 'तंव वैकुंठपिठींचें लिंग । जो निगमपणाचा पराग । जिये जयाचेनि हें जग । अंगच्छाया ।' -ज्ञा १७.४६. ॰छेद-विच्छेद-स्त्री. शरीराचा एखादा अवयव कापणें. [सं.] ॰ज-वि. अंगापासून झालेला. -पु. स्वतःचा पुत्र; मुलगा; औरस. ॰जा-स्त्री. स्वपुत्री. ॰जड-वि. जड शरीराचा; लठ्ठ; फोपसा; अगडबंब; मंद; आळशी. ॰जूठ-स्त्री. मल्लयुध्द; कुस्ती; झटापट. [सं. अंग + युध्द -जुध्द-जुट्ठ] ॰जोर-पु. अंगबळ; शरीराची ताकद, शक्ति. (असे धेडगुजरी समास मराठी भाषेंत पुष्कळ झाले आहेत). [सं. अंग + फा. जोर] ॰झाप-स्त्री. पेंढार्‍यांपैकीं कोणी एखादा पेंढारी झटापटींत मारला गेल्यास त्याला तात्पुरती मूठमाती देण्याची जी चाल होती तीस म्हणत. ठग लोकांत, त्यानीं मारलेल्याला तात्पुरती मूठमाती देण्याची पध्दत; पुढें त्या मृताला सवडीनें नीट लपवून ठेवीत. [अंग + झापणें-झांकणें] ॰झोंक-पु. शरीराचा तोल, कल. [अंग + झोंक] ॰झोल-पु. (काव्य) छातीवरील बंदांचा लांब अंगरखा. ॰ठसा-ठाण-ठेवण-पुनस्त्री. अंगाची ठेवण; अंग- काठी. 'भीमा ऐसा अंगठसा । माझिये दृष्टी दिसतसे ।' -मुसभा ६. १५३. २ (ल.) बळ; सैन्य. -होकै १ ॰ठोळा-ळी-पु. स्त्री. हातांच्या किंवा पायाच्या बोटांत घालावयाचें एक वेढें, वेढणें. (मराठ्यांत स्त्रिया व मुलें बहुधा वापरतात). [अंगुष्ठ] ॰तुक- न. अंगाचें वजन. 'तरी लोहाचें आंगतुक । न तोडितांचि कनक । केलें जैसें देख । परिसें तेणें ।' -ज्ञा १७.२१६. [अंग + तुक] ॰तोल -पु. अंगझोंक पहा. ॰त्राण-न. शरीरसंरक्षक साधन; चिलखत; बख्तर; कवच. 'गोधांगुळें घालिती हस्तीं । अंगत्राणें बांधिलीं ।' -पांप्र ३२.६५. ॰त्वानें-त्वें क्रिवि. (अंगत्व याची तृतीया) प्रतिनिधि म्हणून; एखाद्या करितां; एखाद्याच्या नांवानें-तर्फें-आश्र- यानें, मार्गदर्शकत्वाखालीं; वतीनें. 'मला न फावल्यास मी आपल्या अंगत्वानें दुसरा कोणी पाठवीन.' ॰दट-वि. १ अंगास घट्ट बसणारें, दाटणारें. २दृढ; बळकट. 'आत्मविषयीं आंतुवट । साधन जें आंगदट ।।' -ज्ञा १६.४५. -पु. (कर्ना.) अंगर- ख्याच्या आंत घालावयाची कोपरी. [सं. अंग + दृढ] ॰देण्या- वि. प्रत्यक्ष शेत कसणारा शेतकरी; शारीरिक श्रम करणारा पक्ष. ॰देवता-स्त्री. उपदेवता (कर्मांतील जी मुख्य देवता तिच्या अंगभूत असणारी). २ (ल.) सेवक; चाकर; भोंवतालची मंडळी. [सं.] ॰धट-वि. उद्धट; असभ्य; शिरजोर. [अंग + धुष्ट] ॰ध(धि)टाई-स्त्री. १ केवळ शारीरिक बळ. पाशवी बळ, शक्ति (चातुर्य, युक्ति यांच्या विरुद्ध). २ रानटी जुलूम; आंग- मर्दी. ॰धार-आंगधार पहा. ॰धुणें-न. १ (बायकी) स्नान; अंघोळ. २ (व.) न्हाणीघर. ॰न्यास-पु. देवतास्थापनेच्या वेळीं, धर्मविधि करतांना निरनिराळे मंत्र म्हणून देवतेच्या प्रतिमेला ६ किंवा १६ स्थानीं स्पर्श करावयाचा विधि; संध्या वगैरे कर- तांना स्वतःच्या शरीराच्या निरनिराळ्या स्थानीं स्पर्श करावयाचें कर्म. [सं.] ॰परिवर्तन-न. उलटें करणें (शरीर इ॰); एका बाजूवरून दुसर्‍या बाजूला वळणें. 'आषाढमासीं शयन ।भाद्रपद- मासीं अंगपरिवर्तन । कार्तिकीं उद्बोधन ।' [सं.] ॰पात-पु. १शरीराचा र्‍हास; लुकडेपणा; क्षीणता. २ (कड्यावरून) स्वतःस खालीं लोटून घेणें. ३ शरीरास किंवा एखाद्या अवयवास पक्षघात होणें. ४ अंग बाहेर येणें (गुह्येंद्रियाचा भाग). [सं.] ॰पांथी- स्त्री. खासगत वांटा; सरकतीच्या व्यवहारांत सावकारानें आपली सरकत ठेवली असतां सावकारीचे पांथीहून निराळी सरकतीसंबंधें जी त्याची नफ्याची पांथी असते ती. २ अंगवांटा. [अंग + पंक्ती] ॰पिळा-मोड-पु. अंगादिक पिळणें; आळस आला असतां किंवा भूतसंचारामुळें अंगास दिले जाणारे आळेपिळे; आळोखेपिळोखे; तापानें अंग कसकसणें. ॰पीडा-बाधा-स्त्री. नैसर्गिक विकार; शरीरास जडलेली व्याधि किंवा रोग (भूत- पीडेच्या उलट). [सं.] ॰प्रत्यंग-न. अवयवांसकट शरीर; पूर्ण शरीर. [सं.] ॰प्रस्थान-न. प्रत्यक्ष प्रवासास निघण्यापूर्वीं एखाद्या शुभ मुहुर्त साधण्यासाठीं आपलें घर सोडून जवळपास दुसर्‍याच्या घरीं स्वतः रहावयास जाणें. [सं.] ॰बल न. शारी- रिक शक्ति; ताकद; अंगधटाई. 'अवनीतीनें वर्तो नये । आंग- बळें ।' -दा २.२.२२. [सं.] ॰बांधा-पु. शरीराची ठेवण. ॰भंग-पु. १ अंगाचे सांधे धरणें; अशक्तपणा वाटणें. २ अंग- विक्षेप; शरीराचे निरनिराळे चाळे, हावभाव, चेष्टा. 'अंगभंग बहु दाविती रंगीं । रामरंग सुखसिंधु तरंगीं ।' ॰भंगवात-पु. अंगभंग रोग; ज्यामुळें हा रोग होतो तो वातदोष. ॰भर-भार-क्रिवि. शरीराच्छादनापुरतें (वस्त्र). 'अंगभर वस्त्र, पोटभर अन्न.' -पु. (ल.) शक्ति; जोर. 'एर्‍हवीं प्राप्तें मतांतरें । थातंबूनि आंगभरें ।' -ज्ञा १३.३१८. ॰भर होणें-(ना.) १ फजिती ॰उडणें. २भार होणें. ॰भा-स्त्री. अंगकांति. 'अंगभा विलोकितां तटस्थ जाहली सभा ।' -(अनंत) सीतास्वयंवर ८९. ॰भूत- वि. एखाद्या वस्तूचा भाग, अंश; अवलंबी; समाविष्ट; तदंत- र्गत; संबंधीं; आश्रयी. 'सीमंतपूजन हें विवाहाचें अंगभूत होय.' 'ज्वराच्या अंगभूत अरुचि असतेच.' [सं.] ॰मर्दन- न. अंग रगडणें; चंपी; मालिश. [सं.] ॰मर्दाई-मर्दी-स्त्री. पौरुष; शक्ति; केवळ शारीरिक बळ; अंगधटाई. [सं. अंग + फा. मर्दी = पौरुष] ॰मस्ती-पाशवी शक्ति; दांडगाई; उद्धटपणा. [सं. अंग + फा. मस्ती = दांडगाई] ॰मार्दव न. शरीराचा नाजूकपणा. [सं.] ॰मास-न. (व्यापकपणें) शरीर या अर्थीं 'माझें अंगमास दुखतें.' 'तिचें अंगमास शेकलें पाहिजे.' ॰मेह- नत-स्त्री. शारीरिक श्रम; प्रत्यक्ष कष्ट. [सं. अंग + अर. मिहनत् = श्रम, कष्ट] ॰मेहनती-त्या-वि. शारीरिक कष्ट करून पोट भरणारा; कष्टाळू; पोषाखीच्या उलट. २स्वतःशेत कसणारा; शेतकरी. ॰मेळ-पु. अंगसंग; संबंध. 'तियेचेनि अंगमेळें ।' -विपू १.१०३. [अंग + मिळणें] ॰मोड-स्त्री. अतिशय मेह- नत करणें; कष्ट करणें; सक्त मेहनत. ॰मोडा-पु. १ आळेपिळे (आळस घालविण्यासाठीं). (क्रि॰ देणें.) 'निद्रेनें व्यापिली काया ।आळस आंगमोडे जांभया ।' -दा १८.९.२. २ ताप भरण्यापूर्वीं अंग कसकसणें; अंग मोडून येणें. (अव. अंगमोडे. 'अंगमोडे येऊं लागले.' [अंग + मोडणें; बं. अंगमोडा] ॰यष्टी-रचना-स्त्री. शरीराचा बांधा, ठेवण. [सं.] ॰रस- पु. वनस्पतीच्या पानांचा, पाणी न घालतां काढलेला रस; आप- रस पहा. [सं-] ॰राख्या-वि. अंग राखून काम करणारा (आळसामुळें, अप्रामाणिकपणानें); अंगचोर; चुकार. ॰राग- पु. १ सुंगधी उटणें; उटी; लेप; चोपडण 'श्रमघर्मानें रणिं वीरांचा अंगराग पसरला ।' -सुसु नाटक २१. २ उटीचें द्रव्य (अरगजा, केशर, इ॰). [सं.] ॰रेटा-पु. अंगानें दिलेला, शरीरानें दिलेला धक्का, ठोसा. 'गाड्यास अंगरेटा दे म्हणजे चालता होईल.' [अंग + रेटणें] ॰रेटाई-स्त्री. अंगाची धक्का- बुक्की; मस्ती; ठोसेठोशी; अंगधटाई. ॰रोग-पु. शरीरास होणारा स्वाभाविक रोग (पिशाच्चबाधेनें किंवा देवतापराधानें न होणारा). ॰लग-वि. १ (जात, मैत्री, नोकरी इ॰ संबंधानें) जडलेला; संबंधीं; संबंध असलेला. २ जिव्हाळ्याचा; जवळचा; -पु. १ नातेवाईक; स्नेही. 'तुझा पिता तरी विरोचन । तो आमुचा अंगलग जाण ।' -कथा २.६.८८. 'अवघे अंगलग तुझे वधियेले वीर ।' -तुगा ३९२. २ समागम. 'संताचेनि अंगलगें । पापातें जिणणें गंगें ।' -ज्ञा १२.१७७. ३ आश्रय; साहाय्य. 'परब्रह्मींचेंनि अंगलगें । सृष्ट्यादि कार्य माया करूं लागे।' -विउ ११.१६. 'देवा मंदराचेनि अंगलगें ।' -ज्ञा ११. २५७. ॰लट-लोट-वटा-वठा-स्त्री. पु शरीराची ठेवण, कांति, तेज. अंगकाठी पहा. 'तेची अंगलट गोरी आसा' 'माझी आंगलट त्यावेळीं कांहींशीं पातळ होती' -विवि ११.८.२०४. [सं. अंगयष्टिः; प्रा. अंगलठ्ठी-अंग लट; किंवा अंग + लोष्ट] ॰लट घेणें-स्वतः होऊन जबाबदारी पत्करणें. ॰लट येणें- १ अंगास चिकटणें; तोट्यांत येणें. २ अंगाला चिकटणें; धक्काबुक्की करणें; खोडी काढणें. (अंगलट जाणें असाहि प्रयोग आढळतो). ॰लीन- वि. अंगांत मुरलेलें; शरीरांत गुप्त असलेलें. 'सद्वैद्यें जैसें दोषा । अंगलीना ।' -ज्ञा १६.४२. ॰लेणें-न. अंगावरचा दागिना; अलंकार. 'नाना अळंकार अंगलेणीं ।' -सप्र २.५. ॰लोट १ अंगलट पहा. २ अंगभार; अंगाचें वजन, पतन. 'मस्तकीं वाहती करुनि मोट ।भूमीं टाकिती जैसा घट । तळीं पाषाण होती पिष्ट । आंगलोटें दोघांच्या ।।' -मुसभा ७.३२. ॰वख-पु. अंगप्रदेश. 'जलतेया गिरिचेया आंगवखां ।' -राज्ञा ११.४२०. [अंग + वक्ष?] ॰वटा-क्रिवि.स्वाधीन. [अंग + वत्] ॰व (वा)टा-शेतांत उत्पन्न झालेल्या मालाच्या तीन (शेतमालक, बैल-नांगर मालक व शेत कसणारा) वांट्यांपैकीं शेत कसणार्‍याचा वांटा. [अंग + वाटा] ॰वण-स्त्री. १ सरा- वाच्या योगानें आलेली योग्यता; संपादन केलेली कार्यक्षमता; वाकबगारी. ' ऐसी अंगवण नाहीं मज देवा । '-तुगा ४४९५. 'वातात्मजासि म्हणे यदुनंदन । जरी तुज असेल आंगवण । यांतून एक स्त्रीरत्न । तुवां घ्यावें स्वेच्छेनें ।।' -जै ११.६. २ पराक्रम; शौर्य; जोर; उत्साह. (व.) खटपट; प्रयत्न. आंगवन असाहि प्रयोग. 'जळो तुमचें दादुलेपण । नपूंसकाहूनि हीन । वृथा गेली आंगवण । काय वदन दावितां ।।' -एरुस्व ८.६. ' नीलजां कैची आंगवण ।।' -उषा १४२३. ३ शरीरावस्था. 'तंव भीम- सेनाची आंगवण ।। कृष्णधर्म पाहाती ।' -जै ६.७०. ४ देवीचा वण; तीळ; चट्टा. (क्रि ॰ पडणें, उठणें, येणें, जाणें ). ५ उपा- सना; भक्ति; (गो.) (देवाला केलेला ) नवस. 'कीं वीरश्रीची धरितां अंगवण । प्रताप विशेष वाढे पै ।' -रावि ११.६. ६ सराव; नित्यक्रम; वहिवाट. 'ऐसें करितां पापाचरण । तयासी आलें वृद्धपण । पुत्र जाहाले अति दारुण । तरी आंगवण न सांडी ।।' -रावि १.१११. ७(ल.) साहाय्य; मदत. 'या परी चतुरंग- सेना । मिसळली रणकंदना । आपुलालिया अंगवणा । गज रथ रणा आणिती' -एभा ३०.११७. ८ द्वंद्व युद्ध; झुंज. ' तेआं भीड भीमसेना । जुंझतां बहुती आंगवणा । परतिजे ऐसी हांव कह्वणा । उपजेचिना ।।' -शिशु ८७८.[अंगवलन किंवा अंगापण-अंगा- वण] ॰वणा-वि. शूर. 'तो अक्रूर आंगवणा पुढां चाले ।' -शिशु ५४५. ॰वत-सामर्थ्य; अभिमान. 'आतां हा जळता वारा कें वेंटाळे । कोणाही विषा भरलें गगन गिळे । महाकालेंसि खेळें । आंगवत असे' -ज्ञा ११. ४०५ ॰वला-वि. जवळचा; अनुकूल; स्वाधीन. ॰वसा-(झाडाचें) साल, पाला, शेंडा. 'अशोकाचे अंगवसे । चघळिले कर्‍हेनि जैसे ।' -ज्ञा ११. ४१४. ॰वसें-न. रूप. ? -मनको. ॰वस्त्र-न. १ उपरणें; उत्तरीय; उपवस्त्र. ' नुसत्या अंगवस्त्रानिशीं तो घराबाहेर पडला.'२ लंगोटी (गौरवार्थी). [सं.] ३ (ल.) प्रेमपात्र; ठेवलेली स्त्री; रखेली; उपस्त्री. [अंगना + उपस्त्री = आंगोवस्त्रि-आंगोवस्त्र असा हा शब्द बनला आहे. वस्त्र (कपडा) याशीं याचा कांहीं संबंध नाहीं असें राजवाडे म्हणतात-भाअ १८३२ ] 'मला तर असें आठवतें आहेकीं, त्या वेळच्या खाजगी शाळेच्या एका मास्त- रास सकाळची शाळा असतां शाळेंतील विद्यार्थी त्याच्या आंग- वस्त्राच्या घरांतून कित्येकदां बोलावून आणत असत !' -टि ४. २९१. वाप्र. एका अंगवस्त्रानें निघणें-भाऊबंदांशीं बेबनाव होऊन एक उपरण्यानिशीं कांही एक तनसडी न घेतां घराबाहेर निघणें. ॰वळ-पु. आगवळ, आगूळ. अगवळ पहा. -नागा १२८. (-शर) ॰वळण- पु. अंगलट; अंगाची, शरीराची ठेवण. ॰वळणीं पडणें-सरावाचें होणें (हा शब्द प्रथमा विभक्तींत क्वचित योजितात). 'जी भाषा आम्ही...बोलतो त्यांतील शब्दांचे उच्चार आमच्या आंगवळणीं पडलें असल्यामुळें...' -टि ४. ४०१. ॰वळा-पु १ अंगाचे आळेपिळे; आळसामुलें येणारी जांभई. अंगपिळा पहा. २ मुलांची चळवळ. ३ सांगाती, सोबती; संबंधी; सहवासी. 'नित्य त्या सेवकाजवळा । अंगें अंग- वळा तूं होशी ।' -एभा ६३९४. ४ अंगकाठी. ॰वळेकार-वि. भारी; शक्तिमान्. 'सेजवळ सहवासी । आंगवळे-कारूं विश्वासी ।' -शिशु ५०५. ॰वाटा-पु. १ अंगवटा पहा. २ (व्यापारधंदा) भांडवल उभारल्याखेरीज प्रत्यक्ष काम करणा- राचा वांटा. ३ अंगपांथी पहा. ॰वाटेकरी-पु. अंगवाटा घेणारा. ॰वाण-पु. (कु.) नवस 'देवाक आंगवाण केली हा.' [अंग + वाणी] ॰वात-पु. चालतांना वेगानें उत्पन्न होणारा वारा; अंगवारा; गतिमान् वस्तूपासून उत्पन्न होणारा वायू. ॰वाला- वि. (गो.) अंगांत घालण्याचा; आंगाचें. ॰विकार-विकृति- पु. स्त्री. शारीरिक रोग. ॰विक्षेप-पु. हावभाव; अभिनय; चाळा; अंगचेष्टा; हातवारे. [सं.] ॰वृद्धि-स्त्री. शरीराची वाढ (रोगामुळें झालेली-अंतर्गळ, अंडवृद्धि; इ॰). [सं.] ॰वेग- पु. १ शरीराचा वेग; चालण्याचा जोर अंगवात. २ शरीर वाढत असतांना त्याला आंतून मिळणारा जोर. ॰वैकल्प-न. १ शरी- राचा अधूपणा; लुळेपणा; व्यंग. २(ल.) (धार्मिक विधींतील महत्त्वाचा भाग गाळल्यामुळें) येणारी न्यूनता; अपूर्णता; दोष; वैगुण्य. ॰श:-क्रिवि. एकेक भाग घेऊन; भागशः; खंडशः. ॰शैंथिल्य-न. शरीराचा ढिलेपणा; थलथलीतपणा; मांद्य (अंग- दार्ढ्य याच्या उलट). ॰संकोच-पु. १ शरीराचें आकुंचन; अंग चोरणें. 'किं अंगसंकोचें पारधी । टपोनि तत्काळ मृग साधी ।' २ आकुंचनाची स्थिति; आकुंचन; संकुचितपणा. [सं.] ॰संग-पु. १ शरीराचा संयोग, मीलन; अंगस्पर्श. 'दीपाचिया अंगसंगा । कोण सुख आहे पतंगा ।' -एभा ८.७४. 'दुरून बोल, अंगसंग कामाचा नाहीं.' २ संभोग; मैथुन; रतिसुख. 'घडे भक्ति जैसी मनाच्या प्रसंगें । न. साधे तसी माझ्या अंगसंगें ।' ३ हातघाई; अंगलट; लठ्ठालठ्ठी; कुस्ती. [सं.] ॰सफाई-स्त्री. शरीराची अथवा कामाची चपळाई; अंगचापल्य. [सं. अंग + फा. सफाई] ॰सरकती-पु. अंगवांटेकरी पहा. ॰संस्कार- पु. १ अभ्यंगस्नान वगैरे; शरीरावर संस्कार. २ अंगस्पर्श; शरीरसंयोग. [सं.] ॰सामर्थ्य-न. शारीरिक बळ; अंगजोर. [सं.] ॰साळ्या-वि. नाणें पाडण्याचें काम न करतां इतर कामें करणारा सोनार. (टंकसाळ्याच्या विरुद्ध). अकसाळ्या पहा. ॰सिक-न. अंगावरील वस्त्र. 'आंगसिकें वेढुं भणौनि । सर्वज्ञांचीं ।।' -ॠ ७०. 'आंगसीकें दिह्नली उदारें । भणे कवी भास्करू ।।' -शिशु २३२. ॰सुख-न. रतिसुख; संभोगसुख. 'द्यावा निजांगसुख लाभ वधूजनांतें ।' [सं.] ॰सुटका-स्त्री. १ एखाद्या संकटांतून किंवा आडचणींतून कांहीं नुकसान किंवा इजा न होतां सुटणें. २ मुक्तता. 'हेंकाम मी पतकरलें आहे यांतून माझी अंगसुटका झाल्याशिवाय तुम्हांकडे कसा येऊं?' ॰सुस्ती-स्त्री. शरीरमांद्य; जाड्य. ॰सूट-वि. चपळ; हलक्या अंगाचा; सुटसुटीत; मोकळा. ॰सौष्ठव-न. शरीराचा बांधे- सूदपणा; सौंदर्य. [सं.] ॰स्तनें-न. लेंकरूं. -शर? ॰स्वभाव- पु. जन्मजात अथवा उपजत स्वभाव; नैसर्गिक वृत्ति. [सं.] ॰हार-पु. (नृत्य) सहा किंवा सहापेक्षां जास्त करणांचा समु- दाय. हे अंगहार ३२ आहेत:-स्थिरहस्त; पर्यस्तक; सूचीविद्ध; अपविद्ध; आक्षिप्त; उद्धट्टित; विष्कंभ; अपराजित; विष्कंभापसृत; मत्ताक्रीड; स्वस्तिकरेचित; पार्श्वस्वस्तिक; वृश्चिकापसृत; भ्रमर; मत्तस्खलित; मदाद्विलसित; गतिमंडल; परिच्छिन्न; परिवृत्त; वैशाख रेचित; परावृत्त; अलातक; पार्श्वच्छेद; विद्युद्भांत; उद्वृत्तक; आलीढ; रेचित; आच्छुरित; आक्षिप्तरेचित; संभ्रांत; अपसर्प व अर्धनिकुट्टक. ॰हीन-वि. व्यंग; न्यून; अपूर्ण; अवयवरहित (शरीर). 'कां अंगहीन भांडावें । रथाची गति ।।' -ज्ञा १७. ३८९. -पु. मदन. -स्त्री. वेश्या; पण्यांगना. 'अंगहीन पडपे । जियापरी ।' -ज्ञा १७.२५६.

दाते शब्दकोश