आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह!
शब्दार्थ
संयमी
संयमी saṃyamī m S One who controls and regulates his passions.
संयमी m One who controls and regulates his passion.
संबंधित शब्द
दांत
वि. १ दमन केलेला; जिंकलेला. २ ज्यानें इंद्रियांवर ताबा मिळविला आहे असा; संयमी. 'बहु शांत दांत विषय- विरत तापसी महा ।' -शापसंभ्रम अंक १. 'शांतदांत तपस्वी पूर्ण । शुची धर्मिष्ट हरिभजनीं मन ।' [सं.]
दांत
वि. १. दमन केलेला; जिंकलेला. २. ज्याने इंद्रियांवर ताबा मिळवला आहे असा; संयमी : ‘बहु शांत दांत विषयविरत तापसी महा ।’ - शापसंभ्रम अंक १. [सं.]
जितेंद्रिय
वि. ज्यानें आपलीं इंद्रियें जिंकलीं आहेत असा; संयमी. 'परी जितेंद्रियासीचि घडे । योग्यतावशें ।' -ज्ञा ४.१४३. [सं]
जितेंद्रिय
वि. ज्याने आपली इंद्रिये जिंकली आहेत असा; संयमी : ‘परी जितेंद्रियासीचि घडे । योग्यतावशे ।’ - ज्ञा ४·१४३. [सं.]
कटि
स्त्री. १ कंबर; देहाचा मध्य भाग; माजी. २ कड (कडेवर घेण्याचें ठिकाण). 'कर कटीवरी ठेऊनियां ।' ३ (नृत्य) नृत्यामध्यें कटिकर्मे पांच आहेतः-कंपित, छिन्न, विवृत्त, उद्वाहित, व रेचित. [सं.] ॰कांची-कंबरपट्टा. 'कटिकांची वरी हिरे थोर । जैसे दिनकर जडियेले ।।' -रावि ८.४९. ॰छिन्न-न. (नृत्य) दोन्ही हात दोन्ही बाजूस वर उचलून पताकाहस्त करून मनग- टांत सैल करून कंबर पुढें मागें हलविणें. ॰तट-न. कंबर; ढुंगण; कनवट. 'वंशी नादनटी तिला कटितटीं खोवोनि पोटीं पटीं ।' -वामन, वनसुधा १८. ॰न्हाण-न. (गो.) कमरेपर्यंतचें स्नान. ॰बंद-वि. १ कटबंद पहा. २ संयमी; ज्यानें कामविकार आटोक्यांत ठेवला आहे असा (पुरुष, स्त्री.) ॰बद्ध-वि. १ कंबर कसलेला. २ तयार. (क्रि॰ होणें; असणें) ॰बंध-पु. १ कंबरपट्टा; कटिबंद; मेखला; कांची. २ भूमेखला; भूवलय; पृथ्वीच्या गोलावरील वातावरणाचा कल्पिलेला पट्टा, प्रांत; अयनवृत्तें आणि ध्रुववृत्तें यांच्यामुळें झालेले भूपृष्ठाचे भाग; हे पुढील प्रमाणें आहेतः-१. उष्णकटिबंध-कर्कवृत्त आणि मकरवृत्त यामध्यें (४७ अंश) आहे. यांत उष्णता फार असते. २ समशीतोष्ण कटिबंध-अयन वृत्त आणि ध्रुववृत्त यांच्यामध्यें (प्रत्येक ४३ अंश) आहे. उत्तरेकडील तो उत्तरसमशीतोष्ण आणि दक्षिणेकडील तो दक्षिण समशीतोष्ण. यांत उष्णता व थंडी समसमान असते. ३ शीत कटिबंध-ध्रुववृत्त आणि ध्रुव यांच्यामध्यें (प्रत्येक २३ ।। अंश) आहे. यांत थंडी फार असते. ३ कटाव; विशिष्ट प्रकारची पद्य- रचना. ॰बंधन-न. कंबरपट्टा; करदोडा. 'कटिबंधनें, अंगझोल परिधानपीतांबर प्रावरणें हे सामग्री आणावी. 'कटिबंध पहा. ॰भ्रांत-न. (तृत्य) उजवा पाय सूचीकरून मग अपविद्ध करणां- प्रमाणें करून कटिरेचित करणें. ॰वात-पु. (ल.) अतिशय कामवासना; विषयलंप- टता (पुरुषाबद्दल वापरतात). -शूलाची व्यथा-स्त्री. बाहेर- ख्यालीपणाचा छंद. ॰संधी-स्त्री. प्रत्येक गात्राचा आदिम भाग. (इं.) कॉक्स.? ॰सम(करण)-न. (नृत्य) पायांचें स्वास्तिक करून एक बाजू थोडी वर करणें. ॰सूत्र-न. करगोटा; करदोडा; कंबरपट्टा; कटिबंद. [सं.] ॰स्नान-कटिन्हाण; पायापासून कंबरेपर्यंतचें अंग धुणें; स्नानाचा एक प्रकार.
कटिबंद
वि. १. पहा : कटबंद. २. संयमी; ज्याने कामविकार आटोक्यात ठेवला आहे असा (पुरुष, स्त्री).
मनस्वी
वि. १ मन स्वाधीन असलेला; मन जिंकणारा; संयमी. 'मृत्यु न म्हणे हा मनस्वी ।' -दा ३.९.२६. २ बेसनद- शीर; स्वैर वर्तनाचा; अमर्याद. ३ स्वच्छंदी; लहरी; छांदिष्ट (काम, वागणूक, स्वभाव, मनुष्य). ४ बेदरकार; निधड्या छातीचा. 'स्वातंत्र्यासारख्या गोष्टी ज्यांना मिळवावयाच्या आहेत अशा जिगीषूंनीं मनस्वी म्हणजे लोकमान्य टिळकांप्रमाणें निधड्या छातीचें झालें पाहिजे.' -धर्मशास्त्रविचार (काणेकृत). ५ पुष्कळ; अतोनात; विपुल; अतिशय. उदा॰ मनस्वी-पाऊस-ऊन-थंडी; मनस्वी-उंच-खोल-लहान इ॰ क्रियाविषेषणाप्रमाणेंहि योजतात. जसें-मनस्वी लिहीतो-वाचतो. मनस्वार-वि. (क्व.) मनस्वी अर्थ ५ पहा.
नोकर (स्तुति)
इमानास जागणारा, कष्ट उपसणारा, उपकार कृतज्ञतापूर्वक स्मरणारा, वक्तशीर, कामाला वाघ, जिभेचा संयमी, सव्वा हात लेखणीचा कारकून, सदा सेवेत मग्न ! आपण बरे कीं आपलें काम बरें, असा कामझोड्या मजूर पाहिजे ! पडेल तें काम नी मिळेल तो दाम, धांवून धांवून करतो, हाताचा जलद, भान रहात नाहीं, जीवापाड मेहनत करतो, सदा कामाला जुंपलेला, मेहनतीची शिकस्त करतो, एवढ्या कामाची दोन तासांत वाट लावील, उच्चपदस्थ प्रथम श्रेणीचे अधिकारी, वेळ सत्कारणीं लावतो, काम चोख बजावतो मुशाहिरा मागून घेतो.
परहेज़गार
(पु.) हिंदी अर्थ : संयमी. मराठी अर्थ : पथ्य पाळणारा.
शांत
पु. १ नवरसांपैकीं एक रस. संसाराची निःसारता, उपरति, सत्यमागम इ॰ वर्णनांत हा योजतात. 'देशियेचेनि नागरपणें । शांतु शृंगारातें जिणें ।' -ज्ञा १०.४२. २ (नृत्य) डोळ्याच्या पापण्या अर्धवट मिटणें, हा शांतरसाचा अभिनय आहे. -स्त्री. शांति (७, १२) पहा. -वि. १ शांतियुक्त; क्षुब्ध नसलेला; निर्विकार; निर्द्वेंषी. २ संतुष्ट; समाधानी. ३ सत्वगुणी; सुशील. (माणूस, स्वभाव, वागणूकसंबंधीं). ४ थंड; गार; शमलेला; विझलेला (अग्नि, दिबा, इ॰).[सं. शम्-शांत होणें] ॰दांत-वि. १ अगदीं शांत; थंड; सोम्य. २ संयमी; मनावर ताबा असणारा. शांतवन-न. १ शांति; उपशमन. २ सांत्वन. 'करी पुत्रांचें समाधान । शांतवन कुंतीचें ।' -मुआ २८.१०३. शांतता-स्त्री. १ शांति; संतोष; समाधान. २ स्थिरस्थावर; राग, क्षोभ, इ॰ चें प्रदर्शन नसणें. ३ निवांतपणा; गडबड नसणें. शांति पहा. शांतविणें-क्रि. शांत करणें; सांत्वन करणें. शांति-स्त्री. १ थांबणें; शमन; उपशमन. 'रोग-क्रोध- ज्वर-शांति'. २ शांतता; स्थिरता; थंडपणा. ३ स्थिर; स्तब्ध अशी स्थिति; निस्तब्धता; स्थिरता; स्वस्थता. ४ मदता; सौम्यत्व; मृदुता. ५ वैराग्य; विरागीपणा; निर्विकारता. ६ समाधान; संतुष्टपणा. ७ दुष्ट पिशाच्च, ग्रह वगैरेची पीडा दूर व्हावी म्हणून करावयाचीं जप, पूजा, मंत्रपठण वगैरे कर्मे. 'अरिष्ट शांति'. ८ धार्मीक समारंभांतील आकस्मिक उद्भव- णारीं संकटें व अशुभ गोष्टी टळाव्यात म्हणून आगाऊ केलेलें कर्म. ९ (ल.) संसारापासून मुक्तता; जीवितकष्टापासून सोड- वणूक; मृत्यु. १० शांत रस. 'जेथ साहित्य आणि शांति । हे रेखा दिसे बोलती ।' -ज्ञा ४.२१८. ११ मोक्ष; ब्रह्म; अंतिम साध्य. 'तयातेंचि गिंवसित । तें ज्ञान पावे निश्चित । जयामाजी अचुंबित । शांति असे.' -ज्ञा ४.१८९. १२ पीडा त्रास वगैरेपासून सुटका; एखाद्या पीडाकारक मनुष्याची केलेली समजूत; तृप्ति; पीडेचें निवारण; शांत. (क्रि॰ करणें, होणें). [सं.] शांतिक, शांतिकर्म-न. १ अरिष्ट; त्रास; पीडा; यांच्या निवारणासाठीं शास्त्रांत सांगितल्याप्रमाणें करावयाचा विधि; शांति; अरिष्ट-निवारक-कर्म. २ (व. गो.) ऋतु- शांतीचा विधि; गर्भाधान. -वि. १ शांतिकारक; शांतता प्रस्था- पक; प्रशमन, उपशमन करणारे. २ आराधणारा; आळवणारा; आराधक; प्रसन्नकारक; शांतिकर-प्रद-कारक-दायक. [सं.] शांतिक पौष्टिक-न. अनिष्ट निरसनार्थ केलेलीं कर्में. [सं.] (अप.) शांतिपुष्टिक, शांतिपाठ-पु. १ बाळ वाळंति- णीला कसलीहि बाधा होऊं नये म्हणोन किंवा एरव्हींहि मांगल्यासाठीं करतात तो वेदमंत्रांचा पाठ; मंत्रांचे पठण. २ (ल.) संकटें, अडचणी किंवा त्रास दूर करण्याची युक्ति, कला. ३ (ल.) एकसारखें जोरजोरानें रागें भरणें; शिव्या देणें. [सं.] ॰शांतिब्रह्म-मैंद-न. १ अतिशय शातंवृत्तीचा मनुष्य, धीर, गंभीर आणि शांत असा माणूस. २ वरून शांत- वृत्ती दाखवून आंतून द्वेष मत्सरानें जळणारा. [सं.] शांति- रस-पु. (साहित्य) नऊ रसांपैकीं एक रस. नवरस, शांत पहा. [सं.] शांतिहोम-पु. अनिष्ट गोष्टी टाळण्याबद्दल केलेलें हवन. [सं.] शांतोदक-पुन. और्ध्व देहिकांत तेराव्या दिवशीं ज्या जाग्यावर मृत्यु घडला असेल त्या जागेच्या शध्यर्थ व मृत्युशमनार्थ केलेली शांति, विधि. [सं.]
वश
वि. १ आधीन; अनुकूल केलेला; ताब्यांत, कह्यांत आणलेला. (क्रि॰ करणें). 'वश करी मन्मथ सकळाला । पण तो हर जाळी त्याला ।' -सौभद्र. २ मंत्रतंत्रांनीं मोहून, भारून टाकलेला, भुरळ पाडलेला. [सं.] ॰क्रिया-स्त्री. १ मंत्रतंत्रानें भारणें, मोहून टाकणें; वशीकरण. २ ताब्यांत ठेवण्याचा प्रकार; स्वाधीन राखणें. ॰वर्ती-वि. आज्ञेंत वागणारा; वश असलेला. 'तेथहि विवेकू परमार्थी । त्याच्या वशवर्ती मी असे ।' -एभा २०.१६९. वशंगत-वि. स्वाधीन झालेला; शरण आलेला; हुकुमाखालीं असलेला. वशता-स्त्री. अधीनता. (समासांत) पर वशता. वशंवद-वि. आज्ञा, स्वामित्व मानणारा. वशात्-शअ. (समासांत पूर्वपदीं दुसरा शब्द असतां उपयोग). वश असल्या- कारणानें; स्वामित्वामुळें; सत्तेनें. (सामा.) योगानें; मुळें. उदा॰ कालवशात्; दैववशात्; द्रव्यवशात्; एतद्वशात् इ॰ वशिता, वशित्व-स्त्रीन. शिवाच्या अष्टमहासिद्धींपैकीं एक. गूढ संस्कारांनीं ही प्राप्त होते. अष्टमहासिद्धी पहा. 'माझे धर्म जेथ वश होती । ते वशिता बोलिजे सिद्धांतीं ।' -एभा १५.४२. वशी-वि. १ इंद्रियें स्वाधीन असलेला; संयमी. २ आधीन असलेला; परतंत्र. वशीकरण-न. १ मंत्रादि साधनांनीं वश करण्याची विद्या (जारणमारणाबरोबर हा शब्द येतो). २ कोणी आपल्याला वश व्हावा म्हणून जें मंत्रादि साधन करतात तें. 'ती मुग्धा कैसी गे । वळवील स्वमिमन वशीकरणें ?' -मोवन ६.६२. वशें-वशात् पहा. 'व्योमवायुवशें । वाढिलेनि गर्भरसें ।' -ज्ञा १४.९९. वश्य-वि. आधीन; अनुकूल; वश असलेला. -ज्ञा १३.१०१२. 'जो वश्य न होय ब्रह्मादिका । तो हो भक्ता स्वाधीन ।' -न. वधूवरें इ॰कांच्या राशींचें आनुकूल्य; पत्रिका जमणें. वश्यकर्णं- वशीकरण (अप.) पहा. 'आकळ सांडून परतीं । लोक वश्यकर्ण करिती ।' -दा १५.१.९.
यम
पु. १ नियमन; ताब्यांत ठेवणें; इंद्रियदमन; राग, विकार, इंद्रियें यांचें दमन; आत्मसंयमन. २ अष्टांग योगांतील पहिलें अंग. तीं आठ अंगें येणेंप्रमाणें:-यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधि. यम या अंगांतील पांच प्रकार, भाग यांबद्दल सामान्यतः योजतात. ते पांच प्रकार याप्रमाणें-अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य व अपरिग्रह. [सं. दे. प्रा. जम; सं. यम् = ताब्यांत ठेवणें] ॰नियम-पुअव. १ आत्मसंयमनासाठीं करावयाचीं कृत्यें; नियोजित व ऐच्छिक व्रतें; अष्टांग योगांतील पहिलीं दोन अंगें. नियमाचे पांच अवयव याप्रमाणेः-शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वरप्रणिधान. 'यम नियय दोघे द्वारपाळ । अखंडित सावध अविकळ । अंतर्बाह्य वृत्ति करूनि निश्चळ । दोघे दोहीं बाहीं । उभें ।' -स्वादि १०.२.२८. २ आत्मसंयमनाचे नियम; यमाचे नियम. ॰नियमसाधनी-वि. इंद्रियें, राग, विकार इ॰ ताब्यांत ठेवणारा; आत्मसंयमी व व्रत- वैकल्यें यथायोग्य करणारा; योगी. यमणें-सक्रि. (काव्य) नियमन करणें. 'यमु म्हणे काय यमावें । दमु म्हणें कवणातें दमावें । ' -ज्ञा ९.१९९. यमन-न. दमन; ताब्यांत ठेवणें; निग्रह; संयमन. [सं.] यमी-वि. १ यमनियमन किंवा यम साधणारा; संयमी; इंद्रियनिग्रही; योगी. २ ताब्यांत ठेवणारा; नियमन करणारा; आंवरून धरणारा.