मराठी बृहद्कोश

सात मराठी शब्दकोशांतील २,८४,८८८ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

सत

सत sata n Popular form of सत्व, but used esp. in the sense Cream, pith, marrow, essence, substance; and in the sense Virtue, vigor, spirit, potency, strength. Also for the phrases सत घेणें, सत सोडणें, सतास जागणें &c. see under सत्व.

मोल्सवर्थ शब्दकोश

सत sata ind (सात) The term used in multiplying by 7 any of the numbers above unity. Ex. तीन सतें एकवीस.

मोल्सवर्थ शब्दकोश

न. (राजा.) सत्य; देवाशपथ, देवाघरचें फूल घेऊन सांगणें. [सत्य] सतनागत-निरुपाय; नाइलाज; दुसरा मार्ग नसणें; कांहीं इलाज न चालणें. 'नवऱ्याला नवरीवांचून सतना- गत'. सतपत-स्त्री. (व्यापार) साख व पत; चांगला लौकिक; सचोटी व पत; विश्वासूपणा. [सत + पत] सतीपतीचा-वि. नेकीचा; सचोटीचा; विश्वासु. सतीपतीनें-क्रिवि. नेकीनें; सचोटीनें.

दाते शब्दकोश

न. सत्त्व याचें संक्षिप्त रूप. सार; सद्गुण; तत्त्व; बल; सामर्थ्य; तेज. (वाप्र.) सत घेणें, सोडणें, सतास जागणें-सत्त्व पहा.

दाते शब्दकोश

अ. साताची पट दाखविण्याकरितां योजितात. तीन सतें एकवीस. [सं. सप्त]

दाते शब्दकोश

शत

वि. शंभर. 'भारताचें शतें सात । सर्वस्वंगीता ।' -ज्ञा १८.१६६१. [सं.] म्ह॰ शतं तत्र पंचोत्तर शतं (शंभर तेथें एकशें पाच) ऐशीं तेथें पंचायशी (खर्च करण्यास काय हरकत ?). [सं.] ॰क-न. शेंकडा; शंभराचा समुदाय. [सं.] ॰कूट-वि. शेंकडों तुकडे झालेला; शतधा भिन्न. 'तेथ ब्रह्मकटाह शतकूट । हो पाहत असे ।' -ज्ञा १.१४७. 'वाटे उर्वीं शतकूट । होऊन जाईल क्षणार्धें ।' -पांप्र ४१.२२. ॰कृत्य-न. १ (शतक्रतूबद्दल चुकीचा शब्दप्रयोग) शंभर अश्वमे यज्ञ करण्यासारखें अचाट कृत्य; शंभर यज्ञांचें कार्य. २ (ल.) एखादें अचाट काम; महात्कृत्य. शतक्रतु पहा. ३ विशेष प्रकारची चटणी, रायतें. ॰कृत्य करणें-पुण्य करणें; चांगली गोष्ट करणें. ॰क्रतु-पु. १ इंद्र. २ शंभर अश्वमेध यज्ञ हे केले असतां यजमानाला इंद्रपद मिळतें. ३ (ल.) मोठा विजय; मोठा पराक्रम; मोठें शौर्य; अचाट कृत्य. 'जन्मास आल्यापासून एक तळें बांधलें एवढा कायतो शत- क्रतु केला.' [सं.] ॰गुण-वि. शंभरपट. 'शतगुणें स्नेहो वाढला तिसी ।' -एभा ७.६०१. [सं.] ॰घृत-न. शंभर वेळां धूवून स्वच्छ केलेलें तूप (औषधाकरितां). [सं.] ॰घ्नी-स्त्री. (शंभरांची हत्त्या करणारा) लोखंडी भाले, खिळे बसविलेला एक ठोकळा; एक विशिष्ट हत्यार; कारलें; शेंकडों लोक मारण्याचें जुनें आयुध. 'पट्टिश बाण लोहवृश्चिक उरण । दशघ्नया आणि शतघ्न्या ।' -ह २२.३४. २ एक प्रकारची तोफ; उल्हाटयंत्र. 'शतघ्नी नामक अस्त्रें उंच प्रदेशावर नेऊन ठेवावीं.' -हिंलई २४. ॰चिंध्या-स्त्री. शंभर जागीं फाटलेलें वस्र; नेसतां किंवा वापरतां न येण्याइतकें फाटकें वस्त्र; लक्तऱ्या. ॰चूर-वि. शंभर तुकडे झालेलें. शतकूट पहा. 'घट घायें कीजे शतचूर ।' -एभा २२. ४२७. ॰चूर्ण-न. अगदीं चुरा; तुकडे तुकडे झालेले, पडलेले आहेत अशी स्थिति; पार चुराडा. 'फुटोनि होय शतचूर्ण ।' -अमृ ७.६७. 'एकेचि घातें शतचूर्ण ।' -एरुस्व ८.४६. -वि. चुरा झालेला; विभिन्न. [सं. शत + चूर्ण] ॰च्छंदी-वि. (शंभर लुच्चेगिऱ्या, फंद असणारा) फंदी; बेढंगी; वाईट चालीचा. ॰च्छिद्र-वि. शेंकडों भोकें पडलेला; चाळण झालेला (कागद, वस्त्र इ॰). ॰जर्जर-वि. शंभर ठिकाणीं फुटलेली; शेंकडों ठिकाणीं खिळखिळी झालेली. शतचूर्ण पहा. 'यालागीं शतजर्जर नावे । रिगोनि केविं निश्चिंत होआवें ।' -ज्ञा ९.४९०. [सं.] ॰तंत्रीवीणा-स्त्री. एक वाद्य. 'सारमंडळ' पहा. ॰तारका-स्त्री. १ सत्तावीस नक्षत्रांपैकीं चोविसावें नक्षत्र (शंभर ताऱ्यांचें मिळून झालेलें). २ (ल.) एखाद्यास अनेक मुली असल्या म्हणजे थट्टेनें म्हणतात. [सं.] ॰द्वार-वि. शंभर द्वारें, दरवाजे, भोंकें वगैरे असलेलें. [सं.] ॰धा-क्रिवि. १ शंभरदां; शंभरवेळां. २ शकडों प्रकारांनीं. 'कैसा शतधा दुर्वादीं । निस्तेजिलासी ।' -ज्ञा ११.१०१. [सं.] ॰धृति-पु. १ ब्रह्मदेव. २ इंद्र. ॰धौत-वि. शंभरवेळां धुतलेलें (तूप वगैरे). ॰पत्र-न. १ एक जातीचें कमळ. २ सेवतीचें फूल. -वि. शंभर पाकळ्या, पानें असलेलें (कमळ). [सं.] ॰पत्रनेत्रा-स्त्री. कमलाक्षी (स्त्री). 'तेथूनि तूं मजसि ने शत-पत्र-नेत्रा ।' -नवनीत पृ. ९७. [सं.] ॰पत्रिका-स्त्री. एक फुलझाड; शेवंती. [सं.] ॰पद-पाद- पदी-स्त्री. घोण; गोम. ॰पदी-स्त्री. शतपावली; जेवणानंतर अन्नपचनक्रिया सुलभ होण्यासाठीं फेऱ्या घालणें, थोडें चालणें. [सं.] ॰पावली-स्त्री. शतपदी पहा. ॰भाग-वि. (शाप.) शंभर भाग ज्याचे पाडले आहेत असें. (इं.) सेंटिग्रेड. -रसामू ३०. शतंभीष्म-पु. १ (शंभर भीष्म; भीष्माचार्या सारखे पुष्कळ, एका हून एक बलबान) आपल्या सामर्थ्याची बढाई मारणाऱ्याबद्दल निंदार्थी शब्दप्रयोग; अनेक वरचढ, अधिकाधिक पराक्रमी पुरुष. 'तूं आपली एवढी प्रतिष्ठा कशास सांगतोस. तुजसारखे असे शतं- भीष्म पडले आहेत.' 'ऐसे दाते शतंभीष्म बहुत आहेत.' -शिवाजीचें चरित्र 'तुझ्या सारखे मी पुष्कळ शतंभीष्म लोळ- विले आहेत.' २ वृद्ध; विशेष ज्ञानी पुरुष. ॰मख-पु. १ शंभर यज्ञ करणारा; इंद्र. 'जें शतमखा लोक सायासें । तें तो पावें अनायासें । कैवल्यकामु ।' -ज्ञा ६.४४१. २ शंभर यज्ञ 'जें शतमखींहीं आंगवणें । नोहेचि एका ।' -ज्ञा ८.२६५. [सं.] ॰मखोत्तीर्ण-वि. (शंभर यज्ञ करून पार झालेला) शंभर यज्ञ पूर्ण झाल्यामुळें इंद्रपद मिळालेला; इंद्र. 'जें शतम- खोत्तीर्णकरा । आरूढोनि असे ।' -ज्ञा १०.२४०. [शत + मख + उत्तीर्ण] ॰मान-वि. १ शंभराचें माप, मोज; शंभर संख्या भर णारें. 'शतमान आयुष्य.' २ (सांकेतिक) शंभर रुपये दक्षिणा 'तेथें तुम्हास काय मिळाले ? शतमान किंवा एक शतमान मिळालें.' ॰मारी-वि. १ शंभर रोगांवर रामबाण उपाय करणारा निष्णात (वैद्य). २ (ल) शंभर रोग्यांना मारक किंवा त्यांची हत्या करणारा (वैद्य). ॰मूर्ख-पु. (शंभरपटीनें, शंभरमूर्खां इतका मूर्ख) अत्यंत मूर्ख, अज्ञानी; शुद्ध, केवळ मूर्ख; महामूर्ख. [सं.] ॰वर्ष- वार्षिक-वि. १ शंभर वर्षें टिकणारें, चालणारें; शंभर वर्षांच्या मुदतीचें. २ शंभर वर्षांतून एकदां येणारें. ३ शंभर वर्षांचा; शंभर वर्षें जगलेला; शतायुषी. ४ शंभर वर्षांसंबंधीं. [सं.] ॰वृद्ध-पु. शतायु; शंभर वर्षांचा. 'जे तो शतवृद्ध आहे । नेणों कैचा ।' -ज्ञा १३.५८४. ॰श:-अक्रिवि. शेंकडों; शेंकड्यानें, शंभर शंभर अशा संख्येनें मोजलें जाणारें. [सं.] ॰शाख-वि. (शंभर फांद्या, अंगें, विभाग असलेला) विविध प्रकारचा; बहुविध; नानाविध; असंख्य प्रकारांनीं युक्त. [सं.] शताधीश, शतायु शतायुषी-पु. १ शंभरांचा स्वामी-मालक; शंभर लोकांवरील अधिपति. २ (थट्टेनें) ज्याच्या जवळ शंभर रुपये आहेत तो. शंभर वर्षें वयाचा, शंभर वर्षे जगणारा. [सं.] शताळशी-सी-वि. अतिशय आळशी; आळश्यांचा राजा. [सं. शत + आळशी] ॰शती-स्त्री. शेंकडा; शे. [सं.] (समासांत उपयोग) द्वि-त्रिशती. शतं-न. शतकृत्य पहा. 'रान सुटले...शतं केले.' -ख ९७४. -वि. शंभर. [सं.] शतं जीव-अ. (शंभर वर्षें जग) एक आशीर्वाद; लहान मुलांस शिंक आली असतां त्याची आई अथवा कोणी प्रौढ स्त्रिया उच्चार- तात. शिंक आली असतां आयुष्यहानि होते अशी भावना आहे त्यावरून. 'शतंजीव शिंकतां आळवीसी वो ।' -मध्व १५. [सं.]

दाते शब्दकोश

शत śata a (S) A hundred. शतं तत्र पंचोत्तर शतं Where we are spending or giving a hundred what matters five over?

मोल्सवर्थ शब्दकोश

शत a A hundred. शतक n A century or a cento.

वझे शब्दकोश

(सं) वि० शंभर, १००

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

सत्

सत् sat a S True, real, actual, truly existing. 2 True, good, excellent, virtuous, right, fit, proper, true or good in the most extensive sense. Only in comp. and thus abundantly. Ex. सत्कर्म, सत्- कल्पना, सत्कृत, सत्पुत्र, सत्संग, सत्पुरुष, सद्गुण, सद्विद्या, सद्वासना, सत्समागम, सत्सेवा, सदाचार, सद्गति, सद्गुरु, सद्गृहस्थ, सद्धर्म, सद्भाव. Of these, as they are current and useful words, and as they are not instantly recognizable and reducible by the student, the major portion will be inserted in order.

मोल्सवर्थ शब्दकोश

सत् sat n S The true (i. e. real, substantive, self-subsisting) being;--a designation of Brahm as the real and sole substance of the (illusively) material universe. सत् here has no implication of moral truth or moral goodness. 2 m A holy being, a saint.

मोल्सवर्थ शब्दकोश

सत् a True, real, actual. True, good, excellent, right, fit. Only in comp. Ex. सत्कर्म, सदाचार. m A saint. n A true — designation of ब्रह्म as the real substance of the (illusory) material universe.

वझे शब्दकोश

(सं) वि० चांगलें.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

षट्

षट् ṣaṭ S Six. As षष् is the word, षट् & षड् are used only in comp. as षटकोण, षटप्रकार, षडस्र, षडगुणित &c.

मोल्सवर्थ शब्दकोश

षट् a Six

वझे शब्दकोश

(सं) वि० सहा.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

सट

सट saṭa f (षष्ठी S) The sixth day of either half-month. 2 A female divinity, a form of Durgá. 3 Worship of Durgá. See under सठी.

मोल्सवर्थ शब्दकोश

सट f (A corrupt form of षष्ठी.) Name of दुर्गा. Worship of दुर्गा.

वझे शब्दकोश

स्त्री. १ शुद्ध व वद्य पक्षांतील सहावा दिवस; पष्ठी. (व.) विशेषतः मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी हा खंडोबाचा दिवस; चंपा- षष्ठी. २ एक देवता; सठी; दुर्गा देवता. ३ या देवतेची उपासना, पूजा. ४ षष्ठिपूजा. ही बाळंतिणीच्या सहाव्या दिवशीं करतात. [सं. षष्ठी] सटवणी-न. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी अथवा चंपाषष्ठीच्या सुमा रास पडणारा पाऊस. सटवणें, सटावणें-अक्रि १ षष्ठी देवतेची बाधा होणें; मूल जन्मल्यापासून सहाव्या दिवशीं मृत होणें, अगर, आजारी पडून त्या योगानें पुढें मरणें. 'अहारे अर्जुना सटवलें बाळा ।' -ह ३६.१३३. २ (ल.) नाश पावणें; क्षय पावणें. 'गुरु भक्ति ते सटवली । एकाएकीं ।' -दा ५.२.६०. ३ गर्भपात होणें; नासावणें. 'बंध्यागर्भ सटवे संपूर्ण । तैं जन्ममरण मुक्तांसि ।' -एभा २२.४०८. सटवला-वि. सटवीनें मारलेला; जन्माच्या सहाव्या दिवशीं मेलेला, बाधा झालेला. 'सटवल्याचें बारसें । कोणी न करितीचि उल्हासें ।' -एभा २८.११४. सटवा-वि. वाईट. सटवाई, सटवी-स्त्री. १ षष्ठी देवता; सटी; एक क्षुद्र देवता; ही लहान मुलांस उपद्रव देते. हिची मूल जन्मल्यानंतर सहावे दिवशीं पूजा करतात. 'येक म्हणती सटवाई ।' -दा १३. ८.१२. 'तेवींचि सटवीचिये रातीं । न विसंबिजे जेवीं वाती ।' -ज्ञा १८.८३७. २ (ल.) कुटाळ, दुष्ट स्त्री; एक स्त्रियांस उद्देशून वापरावयाचा अपशब्द. 'माझ्या पायीं कांग म्हणून सटवे ?' -बावं २.२. ३ (ल.) (व.) सटवीची बाधा. सटवीचीं अक्षरें, सटवीचें लिहिणें-नअव. ब्रह्मलिखित; सटवीनें मुलाच्या कपा ळावर लिहिलेला लेख; प्रारब्ध. सटवीपूजन-पु. षष्ठी देवतेचें मुलाच्या सहाव्या दिवशीं करावयाचें पूजन. सटवामल्हारी-पु. अर्धवट, बावळट मनुष्य. सटावणी, सटावणें-सटवणी-णें पहा. सटी-स्त्री. सट पहा. षष्ठी देवता. 'आणी वाचून जाते सटी ।' -दा १०.६.३४.

दाते शब्दकोश

आतोनात or स्त

आतोनात or स्त ātōnāta or sta ad (Better अतोनात q. v.) Exceedingly.

मोल्सवर्थ शब्दकोश

अतोनात or स्त

अतोनात or स्त atōnāta or sta ad (Formed out of अतः नास्ति S) Excessively, exceedingly, in the superlative degree.

मोल्सवर्थ शब्दकोश

बासट or ष्ट

बासट or ष्ट bāsaṭa or ṣṭa a ( H) Sixty-two.

मोल्सवर्थ शब्दकोश

बरखास or स्त

बरखास or स्त barakhāsa or sta a ( P) Risen or broken up--an assembly.

मोल्सवर्थ शब्दकोश

नालिश or स्त

नालिश or स्त nāliśa or sta or स्ती f sometimes नालस्त or स्ती f ( P) A complaint, a representation of injury and application for redress. v सांग. 2 Evil (as spoken or known concerning); faults and delinquencies or trespasses (as viewed as grounds of blame). v सांग. Ex. हा माझ्या नालिस्ती or नालि- स्त्या सांगतो; तुझ्या नालिस्ती मला ठाऊक आहेत.

मोल्सवर्थ शब्दकोश

पुस्तापास or स्त

पुस्तापास or स्त pustāpāsa or sta f ( H) Close and minute questioning. v कर, घे.

मोल्सवर्थ शब्दकोश

फकत or स्त

फकत or स्त phakata or sta ad ( A) Only, merely, simply solely.

मोल्सवर्थ शब्दकोश

शिलेपोस or स्त

शिलेपोस or स्त śilēpōsa or sta a ( P Clothed in armour. ) This Persian word is among the thousand Persian and Arabic words which are become current in Maráṭhí under significations connected only by the faintest shade of similitude with those proper to them in the tongue to which they belong. It is applied in the sense of Equipped and prepared; provided with all accountrements, apparatus, furniture, gear necessary; efficient for and waiting for (a start, an expedition, a work or service of activity and energy); and it is used largely of men, armies, beasts, ships, carts &c.

मोल्सवर्थ शब्दकोश

सत ना गत

सत ना गत f A vulgar phrase employed to signify, with neg. con., Indispensableness, the conditio fine qua non. No — — getting on without.

वझे शब्दकोश

अध:स्त(स्थ)ळीं

क्रिवि. (बायकी) १ खालीं; अधो- दिशेकडे. २ अभरवशीं (पडणें, पाडणें) [सं. अध: + तल किंवा स्थल]. ॰पहावयास लावणें-मानखंडना करणें; फजिती करणें; तोंडघशीं पाडणें. 'त्या मेल्यानें मला अधस्थळीं पाहायाला केलें.'

दाते शब्दकोश

भिभि(भी)स्त

वि. भीरु; भेकड; भित्रा. [सं. भीत]

दाते शब्दकोश

दिपु(पो)ष्ट, दिपुष्टेल

न. दिवा विझल्यानंतर राहिलेलें तेल. [दीप + उष्टें]

दाते शब्दकोश

एकल सट      

(ग.) एकचएक, एकाकी संख्या-मेळ. एकलहरी      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

एकरूप सट      

(ग.) एकमेकांशी पूर्ण जुळणारी आकड्यांची मांडणी. एकरूपीकरण      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

घष्ट(स्ट)णें

सक्रि. १ घांसणें. 'जो सांपडला काळचपेटीं । पडपडों । पुनरपि होईल कष्टी । थाक न लागे घष्टिला च घष्टी ।' -दावि २२८. २ कष्टानें काढणें, कंठणें (वेळ, काळ). 'मनीं राम वेष्टी बळें काळ घष्टी ।' -दावि २१६. [घष्टा]

दाते शब्दकोश

जि(जु)स्त

वि. (गो.) बरोबर. [इं. जस्ट; फ्रें. पो. जुस्त]

दाते शब्दकोश

फेरि(री)स्त

न. टांचण; यादी; सूची; अनुक्रमणिका; फाईल; फर्द; पट; फर्दा. 'सन १८३५ सालीं हें दप्तर प्रांतवार व माहालवार लावून फेरिस्त तयार करण्यासत्व अमानतदार यांचे स्वाधीन केलें.' -इनाम ५९. [फा. फिह्रस्त]

दाते शब्दकोश

रजिस्ट(ष्ट)र

न. १ नोंदवही; नोंद. २ पोस्टाकडून पावती घेऊन जोखमीचे कागदपत्र पोस्टाच्या विशेष संरक्षणानें पाठवितात तें. [इं.] ॰करणें-नोंदणें; नोंद करणें; पोस्टाच्या विशिष्ट सुरक्षित पद्धतीनें पाठविणें.

दाते शब्दकोश

स्त

बरखास or-स्त a Risen or broken — assembly.

वझे शब्दकोश

फकत or-स्त ad Only, merely, simply.

वझे शब्दकोश

तिष्ठ(ष्ट)णें

अक्रि. वाट पाहणें; मार्गप्रतीक्षा करणें; खोळं- बणें. [सं. स्था-तिष्ठ] तिष्ठत बसणें-राहणें-असणें-वाट पहात बसणें; खोळंबून राहणें; प्रतीक्षा करणें; अडून राहणें. 'अश्व- मेघादि सुकृतें यासी । फळ घेवूनि तिष्टती ।' -मुआदी १३.३५.

दाते शब्दकोश

तंदुर(रु)स्त

वि. निरोगी; निकोप प्रकृतीचा. 'मी आनंदी व तंदुरस्त आहे.' -आपटे-दिवाकर दृष्टि १०. [फा. तन् = शरीर + फा. दुरुस्त् = निर्दोष; बरोबर]

दाते शब्दकोश

संबंधित शब्द

षट्, षड्, षण्, षष्

वि. सहा संख्या; समासांतहि उपयोग करतात [सं. षट्] (पुढील सामाशब्द 'षट्' या पदाशीं जोडून झालेले आहेत). ॰क-न. सहांचा समुदाय. ॰कर्ण-वि. सहा कानांचा. ॰कर्णी-क्रिवि. तीन इसमांच्या कानीं गेलेली. म्हणजे प्रसिद्धिस, उघडकीस आलेली (दोन माणसांत केलेला म्हणजे चार कानीं गेलेला, गुप्त विचार उघड होत नाहीं, तीन इसमांस तो कळला तर तो फुटतो). (क्रि॰ होणें; फुटणें). ॰कर्म-कर्में-न अव. १ ब्राह्मणांचीं, अध्ययन, अध्यापन, यजन, याजन, दान, प्रतिग्रह हीं कर्में. २ जारण, मारण, उच्चाटन, मोहन, स्तंभन, विध्वंसन हीं मंत्र व तंत्र विद्येंतील कर्में. ३ ब्राह्मणाच्या उप- जीविकेंचीं सहा साधनें-कणवृत्ति, प्रतिग्रह, याचना किंवा भिक्षावृत्ति, कृषि, वाणिज्यवृत्ति, गोरक्ष, वार्धुषिकवृत्ति (साव- कारी). ४ (हटयोग) धौती, कपालभाति, त्राटक, नेति, वस्ति, नौली. ॰कर्मी-वि. षट्कर्में करणारा. ॰कोण-पु. १ सहा कोनी आकृति. २ इंद्राचें वज्र. -वि. सहा कोनांचा. ॰चक्र-पु. अव. (हटयोग) देहाच्या ठायीं असलेलीं सहां पद्या- कार चक्रें-मूलाधार किंवा आधार, लिंग, नाभी, हृत्, कंठ, मूर्ध. यांना पद्में असेंहि म्हणतात. हीं देहाच्या मधील नाडीवर असतात. या नाडीस भागीरथी म्हणतात. तिच्या दोन्हीं बाजूंस दोन नाड्या यमुना व सरस्वती या नांवाच्या आहेत. या चक्रांना आणखीहि इतर नांवें आहेत तीं-कूर्म, अनंतशेष, आधार, अनाहत, अधिष्ठान, नाभी, जठराग्नि, मणिपूर किंवा पद्म, मानस, कर्पूर (याचे शेवटास ब्रह्मरंध्र असतें), गरुड, गोल्हाट, त्रिगांति इ॰ (क्रि॰ भेद करणें). ॰दर्शनें-न. अव. सौर, शाक्त, गाणपत्त्य, शैव, वैष्णव, स्कांद; किंवा सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, मीमांसा व वेदांत ॰पद-पदी-पुस्त्री. १ भ्रमर, भुंगा. २ ऊ. ३ (ल.) घोडेस्वार (घोड्याचे चार व स्वाराचे दोन मिळून सहा पाय म्हणून). -वि. सहा पायांचा (ऊ, टोळ, भुंगा इ॰). -स्त्री. सहा चरणांचें कडवें असलेली कविता. ॰प्रमाण-न. जीव आणि अंतःकरणपंचक मिळून सहांचें प्रमाण. ॰प्रज्ञ-वि. गुण, संपत्ति, सुख, ब्रह्मानंद, जगाची प्रकृति, ब्रह्मज्ञान जाणणारा. अर्थ, पुरुषार्थ पहा. ॰बाहु-वि. सहा हातांचा षड्भुज. ॰शास्त्रें-न. अव. १ (षडंगें) छंद, निरुक्त, व्याकरण, ज्योतिष, शिक्षा, कल्पसूत्र. २ दोन न्याय, दोन मीमांसा, सांख्य, योग; किंवा (षड्दर्शनें) न्याय, वैशेषिक, मीमांसा, वेदांत सांख्य, पातंजल योग. ॰शास्त्रसंपन्न-शास्त्री-वि. १ वरील सहा शास्त्रें जाणणारा. २ (ल.) विद्वान, पंडित. (पुढील सामाशब्द 'षड्' या पदास जोडून आहेत). ॰अंग, षडंग- न. १ दोन हात, दोन पाय, कमर, डोकें हीं शरीराचीं अंगें. २ वेदांचीं व्याकरण, छंद, ज्योतिष, निरुक्त, कल्पसूत्र, शिक्षा हीं उपांगें. ३ -वि. सहा अवयवांचा, अंगभूत वस्तूंचा. ॰अंग- न्यास-पु. हृदय, शिर, शेंडी, शरीर, नेत्र, यांना स्पर्श करून टाळी वाजविणें (पूजा, जप, मंत्रसिद्धि) इ॰ प्रसंगीं म्हणतांना. ॰गुण-पु. अव. संपूर्ण ऐश्वर्य, धर्म, यश, श्री, ज्ञान, वैराग्य हे किंवा धर्म, वीर्य, कीर्ति, द्रव्य, दान, वैराग्य, हे ईश्वराचे संपूर्ण गुण, या गुणांनीं संपन्न तो. षड्गुणैश्वर्य संपन्न-पु. ईश्वर, देव. -वि. १ संधि, विग्रह, यान, आसन, द्वैधीभाव, समाश्रय ही राजनीतीचीं मुख्य अंगें असलेला. २ कोणत्याहि सहा गुणांचा किंवा तत्त्वांचा समुदाय असलेला. ॰अंगुल-ली(ळी)-वि. सहा बोटांचा. ॰ग्रही-स्त्री. एका राशींत सहा ग्रहांची युति. ॰अब्द-न. सहा दिवसांचें प्रायश्चित्त. ॰अक्षर-न. 'कांहीं येत नाहीं'. एखाद्या मूर्खास थट्टेनें योजावयाचा शब्द. ॰अक्षरी मंत्र-न. १ सहा अक्षरांचा कोणत्याहि मंत्र. २ मूर्ख, शंख, अज्ञानी. ॰आनन-पु. १ कार्तीकस्वामी. २ -वि. सहा बाजूंचा. ॰ऊर्मि-स्त्री. अव. शोक, मोह, क्षुधा, तृषा, जन्म, मरण. ॰ज-पु. (संगीत.) सात स्वरांपैकीं पहिला स्वर; गाण्याचे प्रारंभीं, गायक आपल्यास योग्य असा जो ध्वनि मापून घेतो तो. यास ३६ इंच लांबीच्या तारेचा ध्वनि व २४० आंदोलनें पाश्चात्य शास्त्रकारांनीं धरिलीं आहेत. [सं. षट् + ज] ॰ज ग्राम- पु. (संगीत) आठ शुद्ध स्वरांचा समुदाय. ॰दर्शनें-न. अव. 'षट्- दर्शनें पहा. ॰भांतर-न. सूर्यंचंद्राचें अवरोधन; दोहोंमध्यें पृथ्वी येणें. ॰भाव-विकार-रिपु-वैरी-अरी-वर्ग-पु. अव. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे मनुष्याच्या मनाचे शत्रु समजले गेलेले सहा विकार. ॰भाव-पु. अव. जायते (अन्म), अस्ति (अस्तित्व), वर्धते (वाढ), विपरिणमते (प्रौढ होणें), अपक्षीयते (क्षीणता), नश्यति (मृत्यु) हे शरीराचे विकार. ॰भुज-पु. १ षट्कोण. २ -वि. सहा हातांचा किंवा बाजूंचा ॰रस, षड्रस-पु. १ कटु, अम्ल, मधुर, लवण, तिक्त, कषाय हे अन्नाचे रस. २ -वि. स्वादिष्ट, रुचकर (अन्न); असल्या अन्नाच्या मेजवानीस 'षड्सभोजन' म्हणतात. ॰षड्रिपु- वरील 'षड्भाव' पहा. ॰वर्ग-पु. १ 'षड्भाव' पहा. २ -वि. सहा वस्तूंचा समूह. ॰शास्त्री-शास्त्रें-पु न. षट्शास्त्री पहा. षडस्त्र-न. १ षट्कोण. २ -वि. सहा कोनांचा. षड्ऋतु- पु. अव. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरत्, हेमंत, शिशिर. षडैश्वर्य-न. 'षडगुणैश्वर्य' पहा. (पुढील शब्द 'पण्' शीं योजलेले आहेत). ॰मास-पु. सहा महिन्यांचा काल. सहामाही. ॰मास्य-वि. सहा महिन्यासंबंधीं. ॰मुख-पु. षडानन पहा. ॰मुखी-मुद्रा-स्त्री. (हटयोग) कानांचीं २ भोंकें, २ डोळे, २ नाकपुड्या या हातांच्या बोटांनीं दाबून करावयाची एक मुद्रा. (यापुढील शब्द 'षष्' शीं योजलेले आहेत). षष्ठ- वि. सहावें. षष्टी-ष्ठी-स्त्री. १ पंधरवड्यांतील सहावी तीथ. २ सहावी विभक्ति. ३ दुर्गादेवी, सटवी. ४ (ल.) फजीती. -वि. ५ साठ. षष्ठीपूजन-न. प्रसूतीच्या सहाव्या दिवशीं दुर्गा व इतर देवता यांची करावयाची पूजा. षाडव (राग)-पु. ज्यास सहा स्वर लागतात व एक वर्ज्य असतो असा राग. षाडव औडुव-पु. ज्याच्या आरोहांत सहा स्वर व अव रोहांत पांच स्वर लागतात तो राग. षाडवतान-स्त्री. सहा स्वरांची तान. षाडव-षाडव-पु. ज्याच्या आरोहांत सहा व अवरोहांत सहा स्वर असतात असा राग. षाडव-संपूर्ण-पु. ज्याच्या आरोहांत सहा व अवरोहांत सात स्वर असतात तो राग.

दाते शब्दकोश

सत ना गत

सत ना गत sata nā gata f (सत्य, ना, गति Neither solid truth nor steady standing or abiding.) A vulgar phrase employed to signify, with neg. con., Indispensableness, the must be, the conditio sine qua non. Ex. नवऱ्याला नवरीवांचून स0; प्रयत्न केल्यावांचून स0 No help--no remedy--no doing or getting on without.

मोल्सवर्थ शब्दकोश

अंबष्ठ (ष्ट)

पु. ब्राह्मण बाप व वैश्य आई यांपासून झालेली संतति; अशांची जात. 'अंबष्ट आणि मूर्धावसिक्त ।' -एभा २०.३३. [सं.]

दाते शब्दकोश

सत्

पु. साधु; पवित्र पुरुष. -न. १ त्रिकालाबाधित अस्ति- रूपी तत्त्व; ब्रह्म. -वि. १ वास्तविक; यथातथ्य; खरें; यथा- स्थित. २ योग्य; रास्त; उत्तम; गुणवान्; खरें; चांगलें; ऋजु; (हा शब्द बहुधा समासांत येतो उदा॰ सत्कर्म, सत्कल्पना, सत्कृत्य, सत्संग, सत्पुरुष, सद्गुण, सद्विद्या, सद्वासना, सत्सेवा, सदाचार, सद्गति, सद्गुरु वगैरे). [सं.] सत्कर्म-न. चांगलें काम; पुण्यकृत्य. सत्कवन, सत्कविता-नस्त्री. चांगलें काव्य; धार्मिक काव्य; पवित्र गीत. सत्कवि-पु. चांगला कवि; संत- कवि; प्रतिभावान कवि. सत्काल-पु. योग्य काल; पुण्यकर्मांत घालविलेला काल. सत्कालक्षेप-पु. पुण्यकृत्यांत वेळ घाल- विणें; सत्कृत्यांत खर्च केलेला वेळ. सत्काव्य-न. चांगलें काव्य; धर्मिक, नीतिपर काव्य; उत्तम प्रतीची कविता. सत्कीर्तन-न. उत्तम पुरुषांचें गुणगान्; सज्जनांची स्तुति. सत्कृति-स्त्री. पुण्यकृत्य; चांगलें काम; योग्य काम; धर्मिक कार्य. सत्क्रिय-वि. चांगल्या कृतीचें; वर्तनाचें. सत्क्रिया- स्त्री. १ चांगलें कर्म; चांगली कृति. 'हे सत्क्रियाचि आच- रावी ।' -ज्ञा २.२६६. २ आदर; सन्मान. सत्ख्याति-स्त्री. ख्याति पहा. सच्चर्चा-स्त्री. धार्मिक बाबीसंबंधीं खल; पुण्यकारक वादविवाद; चांगल्या प्रकारचा वाद, खल. सत्तम- वि. सर्वश्रेष्ठ; सर्वोत्तम; सर्वोत्कृष्ट. 'शबरास म्हणे नृपसत्तम ।' सत्तीर्थ-न. १ विशेष पुण्यदायक क्षेत्र, यात्रेचें ठिकाण; पुण्य- भूमि. २ आदराचें, भाव असलेलें ठिकाण, जागा, व्यक्ति. सत्पथ-पु. चांगला, योग्य, सरळ, पुण्यकारक मार्ग; सन्मार्ग. सत्पात्र-वि. योग्य; लायख; कोणतेंहि दान करण्यास, मान देण्यास, सन्मान करण्यास योग्य (मनुष्य). सत्पात्रीं दान- न. योग्य, पुण्यशील पुरुषास दिलेली देगणी. सत्पाळ-वि. (राजा.) कसदार दुधाची; चांगलें लोणी येणारें दूध देणारी (गाय, म्हैस वगैरे). सत्पुत्र-पु. १ गुणी, कर्तव्यदक्ष मुलगा. २ त्रैवर्णिक स्त्रीपासून झालेला मुलगा. सत्पुरुष-पु. पुण्यवान्, उदार, धार्मिंक मनुष्य; साधु; संत. सत्प्रचीत, प्रचीति- ती-स्त्री. वास्तविक, चांगला अनुभव. सत्प्रिय-वि. १ सत्पुरु- षांस, साधुसंतांस, चांगल्या लोकांस आवडणारा. २ साधुसंता- बद्दल, चांगल्या गोष्टींबद्दल, व्यक्तींबद्दल आवड असणारा. सत्शिष्य-पु. निष्ठावान, श्रद्धावान् शिष्य. सत्शूद्र-पु. १ आपल्या धर्माप्रमाणें योग्य तो आचार पाळणारा शूद्र जातीं- तील मनुष्य. २ गवळी व न्हावी यांचे आचार इतर शूद्रांपेक्षां चांगले असतात म्हणून त्यांस म्हणतात. सत्संग-सत्संगति- पुस्त्री. साधुसंतांशीं, पुण्यवान् पुरुषांशीं, सद्गुणी माणसाशीं सहवास, मैत्री, संबंध वगैरे. 'सत्संगति सत्फळदा सुज्ञासि पचे पचे न येरा हे ।' -मोवन ८.७. 'सत्संगें देव सांपडला ।' -दा १८.८.१३.

दाते शब्दकोश

गुजस्त; गुदस्त

[फा. गुझश्त्] गत; झालेलें. “बरें; जाहली ती गुदस्त” (खरे ७।३५२६). “दिगर चन्द मुदत गुज़स्त जाहली” (राजवाडे ३।९०). “असो; जें झालें तें गुज़श्त; पुढें काय तज्वीज़ सफाई करावी?” (राजवाडे ५।१६६).

फारसी-मराठी शब्दकोश

खटकर्म

न. १ षट्कर्म-वेदाध्यापन, वेदाध्यापन, यजन, याजन, दान व प्रतिग्रह हीं ब्राह्मणाचीं सहा (षट्) कर्में होत; निर्वा- हाचीं सहा कर्में; कणवृत्ति (खळ्यांतील दाणे वेंचणें), प्रतिग्रह, भिक्षा, कृषि, वाणिज्य व गोरक्ष. [सं. षट् + कर्म] २ (ल.) त्रासदायक; चेंगट; रेंगाळत चालणारें, तिरस्कार वाटणारें काम. [सं, शठ + कर्म]

दाते शब्दकोश

रुक्म

न. सुवर्ण; सोनें. 'दासी शत दासहि शत आठ महा नाग रुक्मरथ सोळा ।' -मोउद्योग ७.२. [सं.] ॰पुंख-वि. सोन्याचें पुच्छ, पिसारा असलेला (बाण). 'रुक्म पुंख सरले ।' -कृमृरा २५.५४. रुक्मांभ-वि. सोन्यासारखी कांति असलेलें. 'रूप रुक्मांभ संकाश ।' -गुच ३६.३८८.

दाते शब्दकोश

अधिक

वि. १ जास्त; पुष्कळ; फार. (ल.) नकोसा; नावडता. 'मावशींना चंद्रिका जशीं अधिक झाली तशी चंद्रशेखरांना कांहीं झाली नव्हती.' -निचं ११८. २ अधिक मोठें; गुरुतर. ३ वर; पेक्षां जास्त. उ॰ गुणाधिक = गुणांनीं वरचढ; रसाधिक = रसेंकरून अधिक, चांगली चव असलेला. ४ जास्त; वर-समासांत संस्कृत संख्यावाचक शब्दांच्या मध्यें. उ॰ एकाधिक शत. ५ विशेष; पटाईत; निष्णात; अट्टल; असाधारण (वाईट अर्थीं-द्वाड, दांडगा, खोडकर मूल). ६ जादा; वाढीचा (महिना अधिक-मास). [सं.] ॰होणें-१ संपणें; कमी होणें. 'करंडयांतलें कुंकू अधिक झालें.' २ वाजवीपेक्षां जास्त पिकणें; अविकणें (फळ वगैरे). ॰अलंकार-एक अलंकार; यांत कार्यनिष्पत्तीची सामुग्री पूर्ण असूनहि कार्य होत नाहीं म्हणून उप- रोधपर वर्णन असतें. उ॰ 'ज्या उदरांत सकलहि लोकत्रय सावकाश राहतसे । त्यांतचि मुनिवरदर्शन होतां आनंद तो न मावतसे ।।' -साचं ४४. ॰आगळा-थोडेसें वर; थोडें जास्त. 'अधिक आगळे चार रुपये लागले तरी चिंता नाहीं.' ॰उणा-वि. १ कमीजास्त २ लहानमोठा. ३ बरावाईट. ॰उणा शब्द-पु. मर्यादेचें उल्लंघन करण्या. सारखा शब्द; टाकून बोलणें. ॰प्रसंग-पु. दंगामस्ती; भांडण; उप- मर्द. 'अधिक प्रसंग करशील तर एका क्षणांत तुझं तोंड कायमचें बंद करीन.' -अस्तंभा १२४. ॰भेट-स्त्री. साक्षात्कार. -मनको. ॰महिना-मास-सूर्यसंक्रांतिरहित चांद्रमास; चांद्रवर्षोत सुमारें दर तीन वर्षोनीं येणारा तेरावा महिना. हा महिना ३२ महिने १६ दिवस आणि ४ घटका इतक्या कालानंतर पुन: येतो. इष्ट शकांत ९२८ वजा करून १९ नें भागावें; बाकी १,४,६,७,८,१०,१२, १४,१५,१७,१८ अशी राहिल्यास अधिक येत नाहीं; ०,२, ३,५,८,११,१३,१६ राहिल्यास अनुक्रमें वैशाख, आश्र्विन, चैत्र, श्रावण, ज्येष्ठ, आषाढ, भाद्रपद, हे महिने अधिक होतात. बारा वर्षांत चैत्र, ज्येष्ठ, श्रावण, हे अधिक होतात. अठरा वर्षानीं आषाढ अधिक. चोवीस वर्षानीं भाद्रपद अधिक. १४१ वर्षांनीं आश्र्विन अधिक. ७०० वर्षांनीं अधिक कार्तिक येतो. कार्तिकापुढील चार महिने अधिक होत नाहींत व आश्र्विनाचे पूर्वीं क्षयमास होत नाहीं. -ज्ञाको (अ) १५२. अधिकस्याधिकं फलम्-अधिक केल्यास अधिक प्राप्ति होते; अधिक प्रयत्न केल्यास अधिक यश मिळतें.

दाते शब्दकोश

अजिर      

न.       अंगण; चौक; खुली जागा : ‘होय असृक स्त्रोत : शत वाहे समराजिरीं खळखळाते ।’ – मोद्रोण २·२३. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अजिर

न. अंगण; चौक; खुली जागा. 'होय असृक स्त्रोतः शत वाहे समराजिरीं खळखळांतें ।' -मोद्रोण २.२३. [सं.]

दाते शब्दकोश

अकाल

पु. १ अयोग्य वेळ. २ दुष्काळ; दुर्भिक्ष. ३ शीखांचा ईश्वर. 'सत श्री अकाल' [सं. अ + काल]. ॰गमन-न. अवेळीं जाणें. ॰ज-वि. अवेळीं जन्मलेला. ॰जन्म-पु. अवेळीं जन्म. मरण- मृत्यु- न. पु. अवेळीं मरण. ॰वृष्टि-स्त्री. अवेळीं पडलेला पाऊस.

दाते शब्दकोश

अखंड(डी)

वि. १ संपूर्ण; सगळा; अत्रुटित. २ तुकडे नस- लेला; एकसंधी; सलग; तुकडे जोडून न केलेला. -क्रिवि. सतत; अप्रतिबद्ध; न थांबतां; निरंतर. 'अखंड बोलो आवडे ।' -ज्ञा १५. ४४८. [सं. अ + खंड]. ॰क्रम-पु. पत्त्याच्या बिझिक (पाट) च्या खेळांत हुकमाच्या एक्क्यापासून दहिल्यापर्यंतची एकसारखी रांग (सीक्वेन्स); यास २५० मार्क असतात. -पाट १६. ॰चोळीस्त्री. बाह्याविना सर्व सलग अवयवांची-लाग, पखे, ठुशा (कोरा) व पाठ-जोड नसलेली चोळी. ॰दंड-वि. एक- सारखा चालणारा, असणारा. 'शत वर्षें अखंड दंड । पर्जन्य वितंड पैं वर्षे ।। -एभा. ३.१६८. ॰दंडायमान-वि. अमर्याद; अनंत; घटका, पळें, दिवस, वर्षे इ॰ कालविभागविरहित. ॰द्वादशी-स्त्री. मार्गशीर्ष शुद्ध द्वादशी. ॰पद-(ग.) बीजगणितांतील मूळ प्रकाशक नसलेलें अकरणी पद. ॰श्रेढी-स्त्री. (ग.) गणितांतील एक श्रेढीप्रकार; यांतील पदें क्रमानें खंड न पडतां एकसारखीं असतात. ॰सौभाग्य- न. १ अव्याहत, एकसारखी, सतत भरभराट-ऐश्वर्य-कल्याण. २ केव्हांहि वैधव्य प्राप्त न होणें; नवऱ्याच्या आधीं मरणें. [सं.] ॰सौभाग्यवती-स्त्री. जिला सतत सौभाग्यसुख लाधलें किंवा लाध- णार आहे अशी स्त्री; अविधवा. २ (ल.) वेश्या. ॰स्वारी-स्त्री. सर्व लवाजम्यासहित. 'अखंड स्वारी रायाची निघाली चौथीच्या अमलामधीं' -प्रला. ३०९. ॰ज्ञान- न. १ सतत ज्ञानमय स्थिति; स्थिर शुद्धि. २ संयोजीकरणानें होणारें ज्ञान. खंडज्ञान पहा. [सं.]

दाते शब्दकोश

अन्वयी      

वि.       १. संबंधी. सामा. शब्द − अन्य − अपर − इतर − उत्तर − उभय − एतत् − सत् − दूर − पूर्व − अन्वयी. २. दोन गोष्टींचे साहचर्य असणारा. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अंबोटी

स्त्री. १ आमटी. २ एक वनस्पति. ३ चुका; शत- वेधी. [अंबट; हिं. अंबोटी]

दाते शब्दकोश

अंगवटा, अंगवाटा      

पु.       शेतात उत्पन्न झालेल्या मालाच्या तीन (शेतमालक, बैल-नांगर मालक व शेत कसणारा) वाट्यापैकी शेत कसणाऱ्याचा वाटा. (वा.) अंगवट्यास पडणे – अंगवळणी पडणे; श्रम, त्रास इ. न होणे : ‘मग एकदा सवय पडली म्हणजे अंगवट्यास पडते.’ – शत २८७.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अशन, अशनी      

पु.       १. वीज, विद्युत : ‘एकोन योजनें शत टाकी मथुरापुरींत अशनीची । शक्ति किती’ – मोसभा १·८५. २. शस्त्रविशेष; वज्र. ३. उल्का पृथ्वीवर घनस्वरूप अवस्थेत येतात तेव्हा त्यांना अशनी म्हणतात. – आसूचि १८. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अशनि

पु. वीज; विद्युत्; वज्र. 'एकोन योजनें शत टाकी मथुरापुरींत अशनीची । शक्ति किती' -मोसभा १.८५. [सं.]

दाते शब्दकोश

असृक्, असृज

न. रक्त; रुधिर; शोणित. 'हो असृक् स्त्रोत; शत वाहे समराजिरीं खळखळातें ।' -मोद्रोण २.२३. ॰पीटिका- स्त्री. रक्ताचे गोलक. (इं.) ब्लड सेल, कॉर्प्युस्कल. [सं.]

दाते शब्दकोश

असत

न. असत्यपणा; अविनाशी पदार्थ. [सं. अ + सत्]

दाते शब्दकोश

असत्

वि. १ खरें नव्हें तें खोटें; असत्य; मिथ्या; अवा- स्तव; विनाशी; ज्याला अस्त्वि नाहीं तें; काल्पनिक; अस्सल नव्हे तें. 'तैसी सत् ना असत् होये ।' -ज्ञा १५.८१. 'तरी सच्छब्दें येणें । आटूनि असताचें नाणें । दाविजे अव्यंगवाणें । -ज्ञा १७. ३८०. [सं.] २ वाईट; दृष्ट; असाधु; खट्याळ. ३अन्याय्य; अयोग्य; सामाशब्द-असन्मित्र = खोटा मित्र, प्रसंगीं उपयोगी न पडणारा मित्र. असद्विद्या = कुविद्या; पिशाचविद्या; दु:शास्त्र. अस- न्मार्ग = कुमार्ग, अनिष्ट-वाईट मार्ग; असद्व्यापार-व्यवहार = वाईट- मुर्खपणाची कर्में-प्रघात. असद्भाव = दृष्टस्वभाव. असत्कर्म; अस- त्पथ; असत्पुत्र; असत्संसर्ग; असद्विचार; अस्दाचार; असद्वृत्ति इ॰ [सं.]

दाते शब्दकोश

असत् अंक      

पु.       (ग.) मूलभूत बैजिक क्रियांशी विसंगत असल्याने ज्यास काल्पनिक म्हटले जाते असा अंक. धन अथवा ऋण अशा कोणत्याही संख्येचा वर्ग नेहमी धनच असतो. त्यामुळे ऋण संख्येचे वर्गमूळ अस्तित्वात असू शकत नाही. म्हणून अशा संख्येस असत् अंक म्हणतात. कोणताही असत् अंक (अ + य ब) अशा स्वरूपात मांडता येतो. ज्यात अ व ब या दोन सत् संख्या असून य, म्हणजे (–) १चे वर्गमूळ, ही असत् संख्या असते. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अष्टोदरशे, अष्टोदशे      

वि.       (पाढ्यात) १०८ संख्या. [सं. अष्टोत्तर शत]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अष्टोदरशें

वि. (पाढ्यांत) १०८ संख्या. [सं. अष्टोत्तर- शत]

दाते शब्दकोश

असूड

पु. गाडीवाल्याचा-शेतकर्‍याचा लांब चाबूक; कोरडा. [सं. अस् = फेकणें; ध्व. सट्]. ॰गांठ (असूर गांठ)-स्त्री. एक पदर धरून आंसडा दिला असतां सुटण्याजोगी गांठ; सुरगांठ.

दाते शब्दकोश

अवोक्षण

न. औक्षण; अभिषेचन; पाणी शिंपडणें (विशे- षत: विधि, संस्कार यांमध्यें [सं. अव + उक्ष् = शिंपडणें]

दाते शब्दकोश

बाजू

स्त्री. १ बाहु; भुज. २ भाग; पैलू (वस्तूचा); कड; कंठ; किनारी; मर्यादा. 'त्रिकोन चौकोन इ॰ कांच्या बाजू.' ३ एखाद्या पदार्थांचा कोणत्याहि एखाद्या विभागाच्या विरुद्ध अस- लेला भाग. ४ (ल.) पक्ष; फळी; कड; तर्फ; चढाओढीच्या सामन्यांतील एक पक्ष. (क्रि॰ राखणें; सांभाळणें). ५ मोठी सत- रंजी; जाजम (पूर्वीं खोलीच्या एका बाजूला पुरेल अशा सतरंजीला म्हणत). ६ मदतनीस; साहाय्यकर्ता; आश्रयदाता; सहाय्यक. 'यशवंतराव बाजू सांग ज्या मर्दाला ।' -ऐपो. ७९.७ (पत्त्यांचा खेळ) खेळांतील रंग; हात; गंजिफांतील एका रंगाचीं १२ पानें; बाजी. ८ गाडीच्या साटीचीं लांबीच्या बाजूला असलेलीं दोन लाकडें. ह्याच्या उलट करोळें = साटींतील रुंदीचीं लाकडें. ९ संकट; अडचण; विघ्न; पेंच. [सं. बाहु; फा. बाजु] ॰मारणें- आपल्या पक्षाची सरशी करणें; स्वीकृत पक्ष यशस्वी करणें. ॰राखणें-अब्रू संभाळणें; नांव राखणें; फजिती किंवा दुर्लौकिक न होऊं देणें. ॰राहणें-अब्रू किंवा नांव राहणें. ॰वर बेतणें- अंगावर येणें-फजिती होण्याची वेळ येणें; पराभव होण्याचा रंग दिसणें. ॰चा देखावा-पु. (इमारत) पार्श्वनिदर्शन. ॰मारणारा-मारून नेणारा-वि. घेतलेला पक्ष यशस्वी करणारा; आपला पक्ष सिद्धीस नेणारा. ॰स-क्रिवि. एकीकडे.

दाते शब्दकोश

बाण

बाण bāṇa m (S) An arrow. 2 A rocket, whether the missile weapon or a sky-rocket. 3 A stone found in the Narmada river, worshiped as an emblem of Shiva. 4 fig. (Compared from his bareness to the बाण or lingam.) A term for a man without wife, or family, or home, or friends, or money. 5 Gunwale of a boat. 6 As intended in the following ex. असो बाणसंख्या दिवसांत ॥ सुवेले पर्यंत जाहाला सत ॥. An arrow of कामदेव the god of love. His quiver is charged with five, viz. अरविंद, अशोक, च्यूत, नव- मल्लिका or मोगरा, नीलोत्पल. 7 Distance from the ecliptic or celestial latitude.

मोल्सवर्थ शब्दकोश

बचकणी

स्त्री. १ लहान मुलांचा रेशमी धोतरेजोडा. 'सत- रंज्या अति विस्तृता बचकण्या आलोकिले चांदवे.' -सारु ३.४६. २ (कों.) मद्याचा शिसा. [हिं. बचकाना. का. बच्चकणि]

दाते शब्दकोश

बिछावणी

स्त्री. (सतरंजी, जाजम इ॰) जमिनीवर पस- रणें किंवा आंथरणें. [बिछाविणें] बिछव(वि)णें-सक्रि. १ (सत- रंजी, जाजम, गादी इ॰) जमीन, पलंग इ॰ वर पसरणें, आंथरणें, घालणें. 'गेली महालामध्यें दिला पलंग बिछाऊन । शेजारी निजले दोघे लई प्रीत लाऊन' -पला ७९. २ पाडणें; चीत करणें; जमीन- दोस्त करणें; लोळविणें. ३ संपवून टाकणें; खलास करणें; फडशा करणें. [हिं. बिछाना; बिछवाना]

दाते शब्दकोश

भेद

भेद bhēda m (S) Dividing, separating, severing, sundering, parting. v कर. 2 Divided or separated state. 3 Separateness, separate or distinct state. 4 Difference or diversity gen. 5 Distinguishing, discriminating, noting the diversity of. v कर. 6 A division or distinction; a species, kind, variety (included with others under some genus or head). Ex. विनाश ज्याची उत्तर अवस्था भेद सत कायी How is that species or kind true (real) of which the end is destruction? 7 Disunion, disagreement, variance. 8 Sowing dissension; breaking the unanimity of allies or confederates. One of the four means of success against an opponent. See साम, दाम, दंड. 9 Turning (as from a pursuit or purpose); causing change (of mind &c.): also turned or changed state. Ex. हा चाकरीस कबूल झाला होता तुम्ही ह्याचा भेद केला म्हणून राहीना- सा झाला. 10 Secrets, arcana, secret matters. Ex. हा शाहणा आहे त्या राज्यांतला भेद काढून आ- णील. 11 In the fourth signification, viz. that of Difference or otherness, भेद is much and elegantly used in comp. as अर्थभेद, शब्दभेद, भाषा- भेद, मतभेद, धर्मभेद, देशभेद, देहभेद, स्थलभेद, गृहभेद, शास्त्रभेद. Compounds of this class are highly serviceable, esp. to translators; but, as from the specimens now given their signification and usus are sufficiently intelligible, and as they lie subject to the creating will upon every occasion and to any amount, none are to be looked for in the columns of the dictionary. 12 In philosophy. Difference or otherness. Distinguished into स्वगत- भेद, सजातीयभेद, विजातीयभेद, Diversity within itself; (as a whole is diverse from its parts, and yet is but its parts aggregately;) diversity of individuals of one species, genus, or order; diversity of things of one class from things of another class.

मोल्सवर्थ शब्दकोश

भ्रमिष्ट

भ्रमिष्ट bhramiṣṭa a (S) pop. भ्रमित or स्त a Erring, wandering, confused, bewildered, perplexed. Ex. परि भ्र0 झाला द्विपंचवदन ॥; also परम होऊनि भ्र0 ॥ लंकेस गेला धाकें पळत ॥. 2 Ever confused and cloudy; ever misapprehending or mistaking; a puzzlehead.

मोल्सवर्थ शब्दकोश

छदाम

पु. १ पैशाचा एकचतुर्थोंश (नाणें) दोन दमड्या; सहा दाम. २ (ल.) अल्प अंशः किंचित भाग; जवळजवळ अभाव. 'एथे छदाम मिळावयाचा नाहीं. 'मी तुझा छदाम लागत नाहीं.' = कांहीं एक मिळायचें नाहीं-लागत नाहीं इ॰ [सं. षट् + द्रम्म; हिं. छे + दाम]

दाते शब्दकोश

छदाम      

पु.       १. पैशाचा एक चतुर्थांश (नाणे); दोन दमड्या; सहा दाम. २. (ल.) अल्प अंश; किंचित भाग; जवळजवळ अभाव : ‘त्याच्याजवळ छदामही शिल्लक नसतो.’ − सामा १८२. [सं. षट् + द्रम्म]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

छटा(टां)क

पु. शेराचा सोळावा भाग (वजनी, मापी) [सं. षट् + टंक]

दाते शब्दकोश

छटांक

छटांक chaṭāṅka m (षट् & टंक S through H) The sixteenth part of a पक्काशेर, whether of weight or of capacity.

मोल्सवर्थ शब्दकोश

छ्तार

स्त्री. सहा तारांचें एक तंतुवाद्य; सतार. [सं. षट् + तारा; हिं. छे + तार]

दाते शब्दकोश

छतार      

स्त्री.       सहा तारांचे एक तंतुवाद्य; सतार. [सं. षट् + तारा]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

डाई

पुस्त्री. द्वेष; हेवा. (क्रि॰ पेटणें; पडणें). 'पडला षट्- शत्रूंच्या डाईं । वासनेला मारुनि घाई ।' -अमृत १८. [दावा किंवा सं. दाह; हिं. डाह-द्वेष]

दाते शब्दकोश

दृष्टि

स्त्री. १ नेत्रगोलस्थित जें पहाण्याचें इंद्रिय आहे त्याची वृत्ति, कार्य तिनें झालेलें ज्ञान; पाहण्याचें सामर्थ्य; नजर. २ (ल.) (एखाद्या गोष्टीकडे द्यावयाचें) लक्ष; अनुसंधान. 'निरं- तर शास्त्राकडे दृष्टि ठेवावी तेव्हा शास्त्र येतें.' 'त्यास पागोटें द्यावयाचें खरें परंतु माझी दृष्टि चुकली.' ३ (ल.) सत्, असत् जाणण्यास कारणीभूत असलेली मनोवृत्ति; (एखाद्याकडे पहाण्याचा, एखाद्याशीं वागण्याचा) रोंख; कल; मनोवृत्ति. 'अलीकडे त्याची दृष्टि फिरली.' ४ (राजा.) पाषाणाच्या देवाच्या मूर्तीस रुपें इ॰ काचे बसवितात त्या डोळ्यापैकीं प्रत्येक. ५ दृष्ट; वाईट, बाधक नजर. दृष्ट २ पहा (क्रि॰ होणें; काढणें). 'राधा म्हणत्ये हा ! मज पुत्रवतींचीच लागली दृष्टि ।' -मोस्त्री ५.५. -वि. पाहणारा; दर्शी पहा. समासांत उपयोग जसें. गुणदृष्टि; स्थूलदृष्टि; दोपदृष्टि इ॰. [सं.] (वाप्र.) ॰ओळखणें-(एखाद्याच्या) नजरे- वरूनच, चेहर्‍यावरून त्याचें मनोगत ओळखणें. ॰काढणें- उतरणें-ओवाळून टाकणें-एखाद्यास वाईट दृष्टीची झालेली बाधा मंत्रतंत्र, तोडगा इ॰ कानें काढून टाकणें. ॰खालून जाणें- (एखादी गोष्ट. वस्तु इ॰ एखाद्याच्या) डोळ्याखालून, नजरें- तून जाणें; स्थूलपणें माहीत असणें. 'ज्यांचे दृष्टीखालून गेलें । ऐसें कांहींच नाहीं उरलें ।' -दा १.६.९. ॰घालणें-१ डोळा मोडणें, मिचकावणें, डोळ्यानें इशारा करणें. २ (एखाद्या गोष्टी- कडे) काळजीपूर्वक पहाणें, लक्ष देणें, म्न लावणें. 'स्वर्गांगनेसीं जरि साम्य आली । परंतु तेथें दृष्टी न घाली ।' -रामदासी २.४३. ॰चढणें-गावानें फुगणें; उन्मत होणें; डोळ्यांवर धूर येणें. ॰चुकणें-विसरणेः गोंधळून जाणें. घोटाळ्यात पडणें. ॰चुकविणें, चारणें-(एखाद्याच्या) डोळ्यास डोळा न देणेः नजरेस पडण्याचें टाळणें. ॰चारणें-नजर भारून टाकणें; नजरबंद करणें. 'कीं पुढिलाची दृष्टि चोरिजे । हा दृष्टिबंधु निफजे । परी नवल लाघव तुझें । जें आपणपें चोरे ।' -ज्ञा १४.५. ॰ठेवणें देणें-राखणें-(एखाद्या गोष्टीची, वस्तूची) काळजी घेणें; लक्ष देणें. 'ठेवीना गर्भींही दृष्टिस ती नीट जळहि सेवीन ।' -मोअश्व ४.८. ॰देखणें-(काव्य) पाहणें. ॰निवळणें-१ बिघडलेले, आलेले डोळे पूर्ववत् स्वच्छ होणें. २ (ल.) गर्व, ताटा, उन्माद नाहींसा होणें. ॰पडणें, होणें, लागणें-(एखा- द्याच्या) वाईट नजरेची बाधा होणें; दृष्ट होणें. ॰फांकणें-१ गोंधळून जाणें; भांबावून जाणें. २ नजर बेताल, ओढाळ होणें. ॰फाटणें-(एखाद्याच्या) आकांक्षा, महत्त्वाकांक्षा, हेतु इ॰ वाढणें, विस्तृत होणें. ॰फिरणें-१ राग येणें. 'येतां दृष्टी त्याची फिरली म्हणे ।' -रामदासी २.९८. २ ताठा चढणें; गर्व इ॰ नें दृष्टि अंध होणें; धुंदी चढणें. ॰बंद करणें-नजर भारून टाकणें; मोडून टाकणें; नजर बंद करणें; दृष्टि चोरणें. ॰भर पाहणें-पोटभर, डोळे भरून. तृप्ति होईपर्यंत, मनमुराद पाहणें. 'पाहा जा सदृढ दृष्टि भरूनि ।' -दावि ४६. ॰मरणें-तीच वस्तु अनेक वेळां पाहिल्यानें, तीच गोष्ट अनेक वेळां केल्याने, तिच्याबदृलची भीति, आश्चर्य, हिडीसपणा इ॰ वाटेनासें होणें. 'माडावर चढून चढून भंडार्‍याची दृष्टि मेलेली असते.' दृष्टीची मुखत राखणें-(एखाद्याच्या) भावनेस मान देणें; (एखाद्यास) न आवडेल अशी गोष्ट त्याच्या समक्ष न करणें. दृष्टीचें पारणें फिटणें-जें पाहण्याविषयीं उत्कठा आहे तें पाहण्यास मिळाल्यानें समाधान पावणें. दृष्टींत न आणणें-न. जुमानणें. 'ऐसे वदोनि आणित नव्हतासि च बा परासि दृष्टींत ।' -मोगहाप्रस्थानिक २.२० दृष्टींत न येणें- (एखाद्यास) तुच्छ लेखणें; कःपदार्थ मानणें. 'ज्याच्या दृष्टींत न ते सहसुत पांडवबळी न कंसारी ।' -मोकर्ण ६.६६. दृष्टीनें शिवणें-डोळ्यांनीं पाहणें. 'म्हणतो नाहीं शिवलों दृष्टि करुनिही धराधवा हविला ।' -मोआदि २.३. दृष्टीस पडणें- आढळून येणें; नजरेप येणें; अनुभवास येणें. दृष्टीस फांटा फुटणें-दृष्टि फाटणें; दृष्टीचें सामर्थ्य वाढणें. 'जैसें डोळ्यां अंजन भेट । ते वेळीं दृष्टीसी फांटा फुटे ।' -ज्ञा १.२३. चार दृष्टि होणें-भेट होणें; नजरानजर होणें. अडव्या दृष्टीनें पाहणें-वांकड्या, काण्या डोळ्यानें पाहणें. दृष्टीचा अंमल-पु. १ पाहण्यांत, नजरेंत आलेला काळाचा अवधि. 'हा दरिद्र्याचा श्रीमंत झाला हें माझ्या दृष्टीच्या अंमलांतलें.' २ नज- रेचें कार्यक्षेत्र कर्तबगारी. 'चित्र काढणें हें दृष्टीच्या अमलांत.' दृष्टीचा खेळ-पु. नजरेनें, दृष्टीनें करावयाची चमत्कृतिपूर्ण कुशलतेची गोष्ट; नजरेचा खेळ. 'पाहून लिहिणें, चित्र काढणें, इ॰ दृष्टीचे खेळ आहेत.' दृष्टीचा खोटा-पापी-वि. दुस- र्‍याचें चांगलें पाहून मनांत जळफळणारा; मत्सरबुद्धीचा. दृष्टीचा पसारा-पु. डोळ्यांनां दिसणारें विश्व. त्या दृष्टीनें-त्या धोर- णानें. बुद्धीनें. 'पुत्राकडे पुत्रदृष्टीनें पाहिलें असतां ममता वाटतें, नाहींतर सर्व एकच आहे.' म्ह॰ १ दृष्टीआड सृष्टी आणि वस्त्रा- आड जग नागवें = जें आपल्या देखत घडत नाहीं त्याला आपण जबाबदार नाहीं व त्याचा प्रतिकार करणेंहि कठिण. २ (व.) दृष्टी माया भाता भूक = दृष्टीस मूल पडलें कीं माया उत्पन्न होते व भात पहिला तर भूक लागते. दृष्टीसमोर कांहीं वाईट घडलें तर वाईट वाटतें. सामाश्ब्द- ॰अभिनय-पु. (नृत्य.) पापण्या, पाप- ण्याचे केस, बुबुळें, बाहुल्या व भिंवया यांच्या मदतीनें केलेला अभिनय. याचे प्रकार ३४ आहेत. ते:- कान्त, भयानक, हास्य, करुण, अद्भुत, वीर, बीभत्स, शांत, स्निग्ध, हृष्ट, दीन, क्रुद्ध, दृप्त, भयान्वित; जुगुप्सित, विस्मित, शून्य, लज्जित, म्लान, विषण्ण, शंकित, मुकुल, कुंचित, जिह्म अभितप्त, ललित, अर्ध- मुकुल, विभ्रांत, विप्लुत, आकेकर, विकसित, मध्यममद, अधमपद व त्रस्त. ॰कोन-पु. विचार करण्याचें, पाहण्याचें धोरण, रोंख, मनोवृत्तिः विचारसरणी. (इं.) अँग्ल ऑफ् व्हिजन्. 'आमचा दृष्टिकोन भिन्न असल्यामुळें त्यांनीं योजिलेली भाषा आम्हांला साहजिकच पटत नाहीं.' -मसाप २.२.१११. [दृष्टि + कोन] ॰गुण-पु. नजरेनें पाहिल्यामुळें पाहिलेल्या वस्तूंचें, मनुष्याचें बरें वाईट करण्याची (एखाद्यांतील) विशिष्ट शक्ति. ॰गोचर- वि. डोळ्यांनां दिसणारें; पाहतां येणारें; दृष्टीस पडणारें. [दृष्टि + सं. गोचर] ॰चरित-क्रिवि. जाणूनबुजून, बुद्धिपुरस्सर केलेलें (पाप इ॰). -ज्ञाको (क) १३८. [दृष्टि + सं. चरित = आचरलेलें] ॰चोर-पु. दुसर्‍याचा डोळा चुकवून चोरण्याचा, पळण्याचा ज्याचा स्वभाव आहे असा मनुष्य. [दृष्टि + चोर] ॰देखत-तां-क्रिवि समक्ष; पहात असतांना; डोळ्यांदेखत. [दृष्टि] ॰पथ-पु. दृष्टीची रेषा टप्पा. [दृष्टि + सं. पथिन् = रस्ता] ॰परीक्षा-स्त्री. (वैद्यक शास्त्र) रोग्याच्या डोळ्यांवरून, दृष्टी- वरून रोगाची चिकित्सा करणें. [दृष्टि + परीक्षा] ॰पात-पु. १ (एखाद्या वस्तूवर, मनुष्यावर) नजर पडणें, वळणें; अवलोकन. २ नजर बाधणें; दृष्ट लावणें. [दृष्टि + सं. पात = पडणें] ॰पिंड- पु. डोळ्यांतील पारदर्शक भिंग; इं.) लेन्स्. 'कांहीं मुलांस जन्मतः दृष्टिपिंडास विकार होऊन, त्या पिंडाची पारदर्शकता नाहींशी होते.' -बालरोग चिकित्सा १२६. [दृष्टि + पिंड] ॰फोड-स्त्री. १ बारीक पाहणी; चौकशी. २ डोळ्यांस त्रास होईल अशा प्रका- रचें जिकीरीचें काम; डोळेफोड सर्व अर्थीं पहा. -वि. १ डोळ्यांनां त्रास, ताण देणारें (कलाकुसरीचें काम, किचकट लिखाण इ॰). २ (क्व.) डोळ्यांस हिडीस दिसणारें; ओंगळ. [दृष्टि + फोडणें] ॰बंध-बंधन-पुन. मंत्रसामर्थ्यानें डोळें भारून टाकणें; नजरबंदी 'कीं पुढिलाची दृष्टि चोरिजे । हा दृष्टिबंधु निफजे ।' -ज्ञा १४.५. [दृष्टि + सं. बंध, बंधन = बांधणें] ॰भरू-वि. देखणा; सुंदर; डोळ्यांत भरणारा. [दृष्टि + भरणें] ॰भेट-स्त्री. १ आसन्नमरण मनुष्यास त्याच्या लांबच्या पुत्रादिक आप्तांची झालेली शेवटची दृष्टादृष्ट. २ दृष्टादृष्ट; नजरानजर. [दृष्टि + भेट] ॰मंडल-न. वलय; दृङ्मंडल; खमध्यवृत्त. [दृष्टि + सं. मंडल = वर्तुळ] ॰मणी-पु. लहान मुलास दृष्ट होऊं नये म्हणून त्याच्या गळ्यांत, मनगटाला बांधावयाचा कांचेचा पांढर्‍या ठिपक्यांचा काळा मणि. ॰मर्यादा-स्त्री. मनु- ष्याच्या डोळ्यांना जेव्हढा पृथ्वीचा भाग दिसूं शकतो तेवढी जागा; दृष्टीच्या टप्प्यांतील भूभाग; क्षितिज; काळीधार; चक्र- वाल. [दृष्टि + मर्यादा = सीमा] ॰रचना-रचनेचाउभार-स्त्रीपु. (काव्य) डोळ्यांनां दिसणारा इहलोकचा, सृष्टीचा पसारा. ॰विकार-पु. १ वाईट मनुष्याची (लहान मुलास) नजर लागून झालेली बाधा. २ दृष्टीचा रोग; डोळे बिघडणें. [दृष्टि + विकार = बाधा] ॰र्‍हास्वता-स्त्री. लांबचें दिसणें; (इं.) शॉर्टसाइट्. हा विकार मुलांनां सात ते नऊ वर्षांपर्यंत होतो. एकाग्रतेनें पाह- ण्यानें अगर वाचनानें हें व्यंग चांगल्या मनुष्यांसहि नवीन होऊं लागतें. -ज्ञाको (अं) ९५. [दृष्टि + सं. र्‍हस्वता = आंखुडपणा] ॰हेळा- स्त्री. कृपाकटाक्ष. 'जयाचिये दृष्टिहेळाचि संसारू । निरसोनि जाय ।' -विपू. २.२८. दृष्ट्यगोचर-वि. अदृश्य; न दिसणारें. [दृष्टि + सं. अगोचर-इंद्रियगम्य नव्हे असें]

दाते शब्दकोश

दसाडशत      

वि.       पंधराशे : ‘वोविया दसाडशत रत्नमाळ’ - तसा १०३६. [सं. दश+अर्ध+शत]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

द्वादशविधपुत्र

द्वादशविधपुत्र dvādaśavidhaputra m pl (S) The twelve sons or heirs at law; viz. औरस, क्षेत्रज, दत्त, कृत्रिम, गूढोत्पन्न, उपविद्ध, कानीन, सहोढ, क्रीत, पौनर्भु, स्वयंदत्त, शौद्र, as per श्लोक,--औरसः क्षेत्रजश्चैव दत्तः कृत्रिम एवच ॥ गूढोत्पन्नोपविद्धश्च दायादा बांधवाश्च षट् ॥ 1 ॥ कानीनश्च सहोढश्च क्रीत पौनर्भवेस्तथा ॥ स्वयंदत्तश्च शौद्रश्च षडदा- यादबांधवाः ॥ 2 ॥.

मोल्सवर्थ शब्दकोश

धाक

पु. भय; धास्ती; दहशत, जरब; वचक; दरारा. (क्रि॰ बाळगणें; धरणें; राखणें). 'तैसा कौरवां अशेखां । धाकु तुझा ।' -ज्ञा २.२१५. (वाप्र.) धाक दाखविणें-भीति, दहशत घालणें; दरारा ठेवणें. ॰फिटणें, ॰उडणें-भीति जाणें; दरारा न वाटणें. 'तेंवीं त्याचा समूळ धाक । फिटून गेला तत्काळ ।' -नव २४. १४९. 'चालला शिंदा दखनचा धाक उडाला ।' -ऐपो ४३३. धाक लावणें-भीति वाटेल असें करणें, वागणें; धाक दपटशा दाखविणें; जरबेंत ठेवणें. 'तूं असतां मत्पक्षी लाविन मी धाक लोकपाळाला ।' -मोभीष्म ११.१९. [हिं.] ॰दरारा-पु. दह- शत; वचक; जरब; भीति आणि धास्ती. (क्रि॰ पडणें; असणें; बसणें; बाळगणें; धरणें; राखणें). धाक ना धोका-कांहीं भीति, आदर नसणें; मुळींच धास्ती न वाटणें. पूर्ण निर्भीड, निर्भय, बेडर वृत्ति. ॰धुकी,धूक-स्त्री. धाकडधुकड पहा.

दाते शब्दकोश

धनुष्य

न. १ धनु; तिरकामटा; बाण मारण्याचें एक साधन. २ इंद्रधनुष्य. ३ चार हात लांबीचें (मोजण्याचें) परिमाण. 'फिरउनि गरगर तुरगा उडवि धनुःशत जसा खगेश्वर उरगा ।' -मोकृष्ण १०६. 'शत धनुष्य प्रमाण पुष्पावती ।' ४ परिघाचा एक खंड. (वाप्र.) ॰कंठीं घालणें-पराभव करणें. 'घालुनि धनुष्य कंठीं सहदेवा अभय दान दे हांसे' -मोकर्ण ६.५२. धनुष्यास गुण चढविणें-दोरी लावणें-धनुष्य सज्ज करणें; बाण सोडण्याची तयारी करणें, सोडणें, मारणें. 'मग उठिला वीर कर्ण । आपुलें संपूर्ण बळ वेंचून । धनुष्यास चढविला गुण । नानाप्रकारें करू नियां ।' -ह २६.८०.

दाते शब्दकोश

एकोदरशें, एकोद्दरशें, एकोद्दर्शें

वि. एकशें एक (१०१); हुंडी लेख वगैरेंतून हा शब्द येतो.' अश्वपति नरपति राजे होती । एकोदर्शें राणी तया वर्णूं नाहीं मिती ।'-वसा १३.'त्याचे एको- दरशें झालेच ! '-भा १०. [सं. एक + उत्तर + शत; एकोत्तर + शें]

दाते शब्दकोश

एकसडी

वि. एकदेंठी; एकच टाहाळा, खांदी असणारा (हरभरा, तूर, मेथीची भाजी वगैरे ). [ एक + सं. सट् = पृथक करणे; प्रा. सड]

दाते शब्दकोश

एकुणपन्नास-वन्नास

वि. ४९ संख्या. [सं. एकोनपंचा- शत्; प्रा. एगूणपन्नास; म. एक + उणा + पन्नास]

दाते शब्दकोश

गां(गा)व

पुन. १ वस्तीचें ठिकाण; ग्राम; मौजा; खेडें. २ (व्यापक) नगर; शहर. ३ गांवातील वस्ती; समाज. 'यंदा दंग्यामुळें कितीक गांव पळून गेलें.' ४ आश्रय. ५ (दोन गांवांमधील अंतरावरून) चार कोस; योजन; चार ते नऊ मैल अंतर. 'मारीचातें प्रभू शत गांवें पुंखसमीरें उडवी' -मोरा १.१९९. हा शब्द कोंकण आणि देशांत पुल्लिंगी व सामान्य- पणें नपुंसकलिंगी योजतात. समासांत-गांव-कुलकर्णी-चांभार- न्हावी-भट इ॰ याप्रमाणें बारा बलुत्यांच्या नांवापूर्वीं गांव हा शब्द लागून सामासिक शब्द होतात व त्या शब्दावरून त्या त्या बलुतेदाराच्या एक वर्षाच्या कामगिरीवरील हक्काचा बोध होतो. [सं. ग्राम; प्रा. गाम; हिं. गु. गाम; सिं. गांउ; फ्रेंजि. गांव; पोर्तुजि. गाऊ] (वाप्र.) (त्या)गांवचा नसणें-दुसर्‍यावर लोटणें; टाळणें (काम); (त्या) कामाशीं आपला कांहीं अर्था- अर्थी संबंध नाहीं असें दर्शविणें. ॰मारणें-लुटणें; खंडणी बसविणें. 'दौड करून गांव मारूं लागलें' -पया १८८. गांवानांवाची हरकी देणें-सांगणें-(तूं कोठून आलास, तुझें नांव काय आहे सांग इ॰) ज्याच्या अंगात भूतसंचार झाला आहे अशा मनु- ष्यास (भुतास, किंवा झाडास) विचारतात. यावरून पाहुण्यास आपण कोठून आलांत इ॰ नम्रपणें विचारणें. ॰गांवाला जाणें- १ जवळ नसणें. २ (ल.) निरुपयोगी असणें. जसें-'माझे हात कांहीं गांवाला गेले नाहींत' (जवळच आहेत, वेळ आली तर तुला रट्टा मारतील). गांवीं नसणें-पूर्ण अभाव असणें; अज्ञानी असणें; दरकार नसणें; खिजगणतींत नसणें. सामाशब्द- ॰आखरी-क्रिवी. (व.) गांवालगत-शेवटीं-लागून. गांवई- स्त्री. सरकारी जुलुमामुळें आपलें गांव सोडून दुसर्‍या गांवीं केलेली वस्ती; सरकारी हुकुमाची अमान्यता; सरकारी अटींना प्रति- रोध (सार्‍यांत सूट, तहकुबी इ॰ मिळविण्यासाठीं गांवचे सर्व लोक हा उपाय अंमलांत आणतात). ॰कंटक-वि.गांवाची पीडा; गांवाला त्रास देणारा. [सं. ग्राम + कंटक] ॰कबुलात-स्त्री. १ (कों.) वहिवाटदार खोतानें गांवांतील जमिनीचा सारा भर- ण्याबाबत दिलेली कबुली. २ गांवांतील गांवकर्‍यांनीं वहीत किंवा पडीत जमीन कोणती ठेवावी याबद्दल केलेला निश्चय, ठराव. ॰कर पु. १ गांवांतील वृत्तिवंत. -कोंकणी इतिहाससाहित्य लेख ४००. २ (राजा.) गांवच्या शूद्रांतील देवस्कीच्या मानपाना- संबंधातील एक अधिकारी. ३ भूतबाधा नाहींशी करणारा, देवस्की करणारा माणूस; धाडी. -झांमू १०२. ४ गांवचे लोक; रहिवासी; गांवांत घरदार शेताभात असणारा. 'गांवकर म्हणती हो पेटली आग ।' -दावि ३५०. ५ (कु. कों.) पाटील; खोत; पुढारी. ६ (रत्नागिरी) कुणबीवाड्याचा व्यवस्थापक; कुणबी. ॰करी-पु. १ एखाद्या गांवांत ज्याचें घरदार आहें तो त्या गांवचा रहिवासी; गांवांत राहणारा. 'त्या गांवचे सर्व गांवकरी आज देवळाजवळ मिळाले होते.' २ शेतकरी. गांवकी-स्त्री. १ गांवाच्या संबंधीचा हरयेक अधिकार (अमंगल इ॰); गांवचा कारभार. २ गांवसभा; तींत झालेले ठराव. ३ गांवचा विचार; गांवकरी व पुढारी यांनी एकत्र जमून केलेला विचारविनिमय. ४ वतनदारांचा गांवासंबंधाचा परस्पर संबंध व त्यांचा समाईक अंतर्बाह्य व्यवहार. -गांगा १६७ [सं. ग्रामिक] गांवकुटाळ- वि. गांवकुचाळ; गांवांतील निंदक; टवाळ; लोकांची निंदा करणारा. ॰कुठार-वि. १ गांवांतील लोकांवर संकट आणणारा (चहाडी, वाईट कर्म इ॰ करून); गांवभेद्या; कुर्‍हाडीचा दांडा. २ गांवांतील सामान्य लोक. 'दिल्लींतील वाणी, बकाल, बायका देखील गांवकुठार (हे) लश्करच्या लोकांस मारूं लागलें. ' -भाब १६०. ॰कुंप-कुसूं-कोस-नपु. १ गावाच्या भोंवतालचा तट. २ (ल.) वस्त्राचा (रंगीत) कांठ (धोतरजोडा, शेला इ॰ चा रेशमी, कलाबतूचा). ॰कुळकर्णी-पु. गांवचा वतनदार पिढीजात हिशेबनीस; याच्या उलट देशकुळकर्णी (जिल्हा, प्रांत, यांचा कुळकरणी).॰खर न. गांवाची सीमा, हद्द; सीमाप्रदेश; परिकर. [गांव + आखर] ॰खर्च-पु (जमीनमहसुली) गांवचा (धार्मिक समारंभ, करमणूक इ॰चा) (खर्च; पंडित, गोसावी, फकीर इ॰ स द्रव्य, शिधासामुग्री इ॰ देतात त्याचा खर्च. ॰खातें-न. १ (पोलीस; कुळकर्णी वगैरे गांवकामगार लोक. २ गांवचा हिशेब. ॰खिडकी-स्त्री. गांवकुसवाची दिंडी; हिच्या उलट गांव- वेस (दरवाजा). ॰खुरीस-क्रिवि. गावानजीक; जवळपास. ॰गन्ना-क्रिवि. दर गांवास; प्रत्येक गांवाकडून-गणिक-पासून. 'गांवगन्ना चार रुपये करून द्यावे.' 'गावगन्ना ताकीद करून सर्व लोक बोलावून आणा.' ॰गरॉ-वि. (गो.) गावठी. ॰गाडा- पु. गांवांतील सर्व प्रकारचें (तंटे, प्रकरणें, बाबी इ॰) कामकाज; गांवचा कारभार; गांवकी. (क्रि॰ हांकणें; चालविणें; संभाळणें). ॰गाय-स्त्री. आळशी व गप्पिष्ट स्त्री; नगरभवानी. ॰गांवढें- न. गांवें; खेडीं (व्यापक अर्थीं). ॰गिरी-वि. गांवांत उत्पन्न झालेलें, तयार केलेलें; गांवराणी; गांवठी; याच्या उलट घाटी; तरवटी; बंदरी इ॰. ॰गुंड-गुंडा-पु. १ गांवचा म्होरक्या. २ विद्वानांस आपल्या हुशारीनें (वास्तविक विद्या नसतां) कुंठित करणारा गांवढळ. ३ जादुगारांची मात्रा चालूं न देणारा पंचा- क्षरी; गारुड्यास त्याच्याच विद्येनें जिंकणारा. 'जेवी गारुडी- याचें चेटक उदंड । क्षणें निवारीत गांवगुंड ।' -जै २४.९. ४ गांवांत रिकाम्या उठाठेवी करणारा; त्रासदायक माणूस; मवाली; सोकाजी; फुकट फौजदार; ढंगबाजव्यक्ति; खेळ्या. ॰गुंडकी- स्त्री. १ गांवगुंडाचा कारभार; गांवकी. २ (ल.) फसवेगिरी; लबाडी. ॰गुंडांचा खेळ-पु. पंचाक्षरी किंवा जादूगार यांच्याशीं गांवगुंडांचा चढाओढीचा सामना; मुठीचा खेळ. ॰गोहन-पु. (व.) सबंध गांवांतील गाई एकत्र असलेला कळप. ॰गौर-स्त्री. सबंध गांवांत भटकणारी स्त्री. गांवभवानी. 'पोरीबाळीसुद्धां हिणवून पुरेसें करतील कीं, या गांवगौरीला हें भिकेचें वाण कुणी वाहिलें म्हणुन?' -पुण्यप्रभाव ॰घेणी-स्त्री. दरवडा; हल्ला. 'समुद्राचें पाणी सातवा दिसीं करील गांवघेणी ।' -भाए ६९. ॰चलण-णी, गांव चलनी-वि. गांवांत चालणारें (नाणें). ॰चा डोळा-पु. गांवचा वेसकर, महार, जागल्या. ॰चा लोक-पु. गांवांतील कोणी तरी; कोणास ठाऊक नसलेला; परका; अनोळखी. ॰चावडी-स्त्री. गांवांतील सरकारी कामकाजाची जागा; चौकी. ॰जाण्या-वि. गांवदेवतेस वाहिलेलें (मूल). ॰जेवण- जेवणावळ-भोजन-स्त्रीन. १ गांवांतील सर्व जातींना घात- लेलें जेवण. २ गांवांतील स्वजातीस दिलेली मेजवानी. म्ह॰ हें गांव- जेवण नव्हे कीं घेतला थाळातांब्या चालला जेवायला (महत्त्वाच्या गोष्टीची थट्टा करणारास उपरोधिकपणें म्हणतात). ॰जोशी- पु. गांवांतील वृत्तिवंत जोसपण करणारा. ॰झाडा-पु. गावां- तील (शेत इ॰) जमीनींचा कुळकर्ण्यानें तयार केलेला वर्णनपर तक्ता; कुलकर्णीदप्तर. ॰झोंड-पु. १ सर्व गांवापासून कर्ज काढून नागविणारा. २ गांवांतील खट्याळ, खाष्ट माणूस; गांवास त्रास देणारा माणूस. ॰ठण-ठण-न. स्त्री. गांवांतील वस्तीची जागा (अस्तित्वांत असलेली किंवा उजाड झालेली); आईपांढर. [सं. ग्राम + स्थान = म. गांव + ठाण] गांवठा-पु. १ गांवचा एक वतनदान. म्ह॰ गांवचा गांवठा गांवीं बळी. २ खेडवळ; गांवढळ गांवठी-ठू-वि. १ गांवचें; स्थानिक. गावगिरी अर्थ १ पहा. 'बाजारी तुपापेक्षां गांवठी तूप नामी.' २ गांवढळ; खेडवळ. ३ (विशेषतः गांवठू) रानटी; खेडवळ (माणूस, चालरीत). ॰गांवठी- वकील-पु. देशी भाषेंत वकिलीची परीक्षा दिलेला माणूस. इंग्रजी न जाणणारा किंवा वकिलीची मोठी परीक्षा न दिलेला साधा मुखत्त्यार वकील. गांवडुकर-पु. डुक्कराची एक जात; गांवांतच राहणारें डुक्कर; याच्या उलट रानडुक्कर. गांवडें-ढें-पु. अनाडीपण; अडाणीपणा. गांवढ(ढा)ळ-गांवढ्या-वि. १ खेड- वळ; मूर्ख; रानवट; अडाणी, 'खंती करिती कर्माची । ते गावंढे गा ।' -ज्ञा ३.१४५. २ खेड्यांत राहणारा; शेतकरी. ॰ढळकर-पु. (गो.) गांवढळ; खेडवळ; शूद्र. गांवढें-न. लहान खेडें, गांव; शेतकर्‍यांची वाडी; शेतवाडी; 'मला माझें गावर्डेच बरें.' -इसाप- नीति (छत्रे) [सं. ग्रामटिक प्रा. गामड] गांवढेकर-वि. खेडवळ; गांवढ्या. 'तेथें कोणी गांवढेकर कुणबी बसला होता.' -नि १४९. गांवढेकरी-पु. खेड्यांत राहणारा माणूस; गांवकरी. गांवढें गांव-पुन. वाडी; पाडा; खेडें; निवळ शेतकरी राहतात तें गांव. म्ह॰-गांवढे गांवांत गाढवी सवाशीण (गाढवी बद्दल गांवठी असा पाठभेद) = लहान गांवांत क्षुद्र माणसासहि महत्त्व येतें. ॰थळ-न. गांवठण पहा. [सं. ग्राम + स्थल] ॰था-वि. गांवढळ. -शर. ॰दर-री-स्त्री. गांवांच्या लगतची जागा. 'आतांशीं वाघ रात्रीचा गांवदरीस येत असतो.' ॰देवता-देवी-स्त्री. गांवची संरक्षक देवता; ग्रामदेवता. [सं. ग्राम + देवता] ॰धणें-न. गांवचीं गुरें. -शर. [गांव + धन?] गांवधें-न. १ वाडी; खेडें; गांवढें पहा. २ दुसर्‍या खेड्यांतील कामकाज. 'मला गांवधें उपस्थित झालें.' गांवधोंड-स्त्री. १ गांवावर बसविलेली जबरदस्त खंडणी. २ (सामा.) गांवावर आलेलें संकठ, अरिष्ट. [गांव + धोंडा] ॰निसबत इनाम-न. निरनिराळ्या प्रासंगिक खर्चाकरितां किंवा सरकारी खर्चाकरितां काढिलेल्या सार्वजनिक कर्जाच्या फेडीकरितां गांवकर्‍यांनीं गहाण ठेवलेली जमीन. ॰निसबत मिरास-स्त्री. जिचा मालकीहक्क सर्व गांवकर्‍यांकडे मिळून आहे अशी जमीन. ॰नेमणूक-स्त्री. गांवखर्चाकरितां तोडून दिलेला पैका. ॰पडीत-न. गांवांतील बिन लागवडीची, पडीत जमीन. ॰पण-(गो.) ग्रामसभा; गांवकी. 'गांवपण मांडलिया वायसें ।' -सिसं ८.१५७. ॰पाणोठा-था-पु. गांवची नदी- तळ्यावरील पाणी भरण्याची जागा. ॰पाहणी-स्त्री. गांवांतील पीक किंवा शेतजमीन यांची पाटलानें केलेली पाहणी, मोजणी; (सामा.) गांवाची सर्वदृष्टीनें पाहणी. ॰बंदी-वि. गांवांत वस्ती करून असलेला (फिरस्ता नव्हे). ॰बैल-पु. (पोळ्याच्या दिवशींचा) पाटलाचा बैल; हा सर्व बैलांच्या पुढें असतो; हा पाट- लाचा एक मान आहे. ॰महार-पु. (बिगारी इ॰च्या) गांवच्या चाकरीवर असलेला वतनदार महार. ॰मामा-पु. गांवांतील शहाणा माणूस; गांवकर्‍यांवर चरितार्थ चालविणारा व सर्वांशीं मिळूनमिस- ळून असणारा माणूस (उपहासात्मक). ॰मावशी-स्त्री. गांवां- तील कुंटीण; (सामा.) वयस्क व स्वैरिणी स्त्री. ॰मुकादम-पुअव. गांवचे सारे श्रेष्ठ वतनदार. -गांगा ४५. ॰मुकादमी-स्त्री. वतनी ग्रामव्यवस्था. ॰मुनसफ-पु. शेतकर्‍यांचे १० रु. च्या आंतील दावे चालविण्यासाठीं, शेतकी कायद्याप्रमाणें नेमलेला बिनपगारी मुनसफ. -गांगा ७२. ॰मेव्हणी-स्त्री. गांवांतील वेश्या. ॰म्हसन- न. गांवांतील स्मशान. ॰रस-न. गांवांतील घाणेरडें पाणी; लेंडी नाला; लेंडे ओहोळ. 'हां गा गावरसें भरलें । पाणी पाठीं पाय देत आलें ।' -ज्ञा १६.२५. ॰रान-न. १ गांव व त्याच्या आस- पासचा प्रदेश, जमीन. २ गांवची व आसपासची लोकसंख्या. ॰रान-नी-राणी-वि. स्थानिक; गांवठी; घरगुती; रानवट (भाजी, पदार्थ इ॰); याच्या उलट शहरी, पेठी. ॰वर्दळ- स्त्री. गायरानाखेरीज गांवच्या दिमतीस असलेली इतर जमीन. ॰वसाहत-वसात-स्त्री. १ गांवची वसलेली स्थिति, वसती. २ गांवचा वसलेला भाग. ३ गांवची लोकसंख्या. ॰वहीत-न. गांवची लागवडीखालची जमीन. ॰वेस-स्त्री. गांवाच्या तटाचा मोठा दरवाजा. ॰वेसकर-पु. गांवाच्या वेशीवर पहारा करणारा पाळीचा महार; याच्याकडे गांवाचें निकडीचें काम कर- ण्याचें असतें. ॰शाई-स्त्री. खडबडीत चपटें मोतीं, ॰शीव- स्त्रीन. गांव किंवा गांवें (यांना सामान्य संज्ञा); नांवगांव वगैरे माहिती. 'त्याची गांवशीव मला ठाऊक नाहीं.' ॰सई-स्त्री. १ गांवच्या भुताखेतांना दरसाल द्यावयाची ओंवाळणी, बळी (नारळ, कोंबडें इ॰). २ एकूणएक गांववस्ती; गांवकरी; अखिल ग्रामस्थ. ३ भगत सांगेल ते सात किंवा नऊ दिवस गावां- तील यच्चावत् माणसांनीं बाहेर जाऊन राहणें. -बदलापूर ३२०. ॰समाराधना-स्त्री. गांवजेवण पहा. ॰सवाशीण-सवाष्ण- स्त्री. १ (गोंधळ, मोहतूर इ॰ प्रसंगीं) पाटील किंवा चौगुला याच्या बायकोस म्हणतात. २ (ल.) गांवची वेश्या. गांवळी- क्रिवि. गांवोगांव; सर्व गावांतून. 'जेवी निळहारयांची नासे निळी । तो मिथ्यामात उठवी वायकोळी । ते देशीं विस्तारें गांवळी । सांचा सारिखी ।' -ज्ञाप्र ६२७. गांवाची खरवड- स्त्री. गांवास त्रास देणारा, द्वाड माणूस. गांवा-देशानें ओंवा- ळलेला-वि. द्वाड, वाईट म्हणून गांवानें दूर केलेला; कुप्रसिद्ध; गांवाची खरूज (ओवाळणें पहा). गांवांबाहेरचा, गांवा भायला-वि. महार; परवारी. (कु.) गांवाभायला. गावार- न. गांवजेवण गांवीक-वि. (राजा.) सार्वजनिक; गांवचें (शेत, पाणी, खर्च, पट्टी, कधा). गावुंडगो-वि. (गो.) गांवांत राहणारा.

दाते शब्दकोश

गाव      

पु.न.       १. वस्तीचे ठिकाण; ग्राम; मौजा; खेडे; देहे; पत्तन; कुग्राम. २. (व्यापक) नगर; शहर. ३. गावातील वस्ती; समाज. ४. आश्रय. ५. (दोन गावामधील अंतरावरून) चार कोस; योजन; चार ते नऊ मैल अंतर : ‘मारीचातें प्रभु शत गांवें पुंखसमीरें उडवी ।’ –मोरा १·१९९. (समासात) गावकुलकर्णी, गावचांभार, गावन्हावी, गावभट इ. याप्रमाणे बारा बलुत्यांच्या नावापूर्वी गाव हा शब्द लावून सामासिक शब्द होतात व त्या शब्दावरून त्या त्या बलुतेदाराच्या एक वर्षाच्या कामगिरीवरील हक्काचा बोध होतो. [सं. ग्राम] (वा.) गाव मारणे – लुटणे; खंडणी बसविणे : ‘दौड करून गांव मारूं लागले.’ –पया १८८. त्या गावचा नसणे – दुसऱ्यावर ढकलणे; टाळणे (काम); त्या कामाशी आपला अर्थाअर्थी काही संबंध नाही असे दर्शविणे. गावा नावाची हरकी देणे, गावा नावाची हरकी सांगणे – (तू कोठून आलास, तुझे नाव काय आहे सांग इ.) ज्याच्या अंगात भूतसंचार झाला आहे अशा मनुष्याला (भुताला किंवा झाडाला) विचारतात. यावरून पाहुण्याला आपण कोठून आलात इ. नम्रपणे विचारणे. गावाला जाणे – १. जवळ नसणे. २. (ल.) निरुपयोगी असणे. जसे:– माझे हात काही गावाला गेले नाहीत. (जवळच आहेत, वेळ आली तर तुला रट्टा मारतील.) गावी नसणे – पूर्ण अभाव असणे; अज्ञानी असणे; दरकार नसणे; खिजगणतीत नसणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गुंगणें

अक्रि. १ धुंद, जड, मूढ, सुस्त होणें. (मूर्च्छा, निशा, झोंप यांनीं) २ मागें लागणें; भुलणें; वेडावणें. 'त्या रांडेच्या पाठीमागें राजेश्री गुंगले.' ३ हळूच जाणें; निसटणें; सट- कणें. ४ तल्लीन, गर्क होणें; निमग्न असणें. ५ गुंग होऊन डुलूं लागणें; थक्क होणें. [फा. गुंग, गुंगा = मुका]

दाते शब्दकोश

घामेजणे, घामैजणे, घामेणे      

अक्रि.       १. श्रमादिकांमुळे शरीर घामाने भिजणे : ‘ऐसा मीचि एक जगीं । जया नाना कर्मांची वज्रांगी । तेणें वियोग दुःखाचिया आगी । तनु घामैजेना ॥’ – ज्ञाप्र ११३४; ‘धाके धाकें घामेजत । दडी देत गुप्तत्वें ।’ – एभा १०·८. (राजा.) २. श्रमी होणे; श्रमाने थकणे, शिणणे : ‘नाना चराचरीं भूतीं । दाटणी नव्हे क्षिती । तैसा नाना द्वंद्वीं प्राप्ती । घामेजेना ॥’ – ज्ञा १३·३४९. ३. (ल.) द्रवणे; कींव, दया येणे; हृदयाला पाझर फुटणे : ‘चित्ती अंध म्हणे सुत शत वधितां, लेशही न घामेला । – मोआश्रम १·२२.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

हरसट

स्त्री. (ना.) चंपाषष्ठी. सट पहा.

दाते शब्दकोश

जमखाण-न, जमखाना

पु. सूत्रासन, जाजम मोठी सत रंजी 'तिवाशा जमखाना टाकिलें ।' -ऐपो १५. [फा. जम्खानाह्]

दाते शब्दकोश

जन्माची साट

जन्माची साट janmācī sāṭa f A hoard, stock, or fund for life.

मोल्सवर्थ शब्दकोश

जोडाक्षर      

न.       जोडलेले अक्षर. उदा. क्र, म्ह, स्त इत्यादी.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

जुंबाड-डा-डें, जुंबडा-डें, जुंभाड

न. १ वेणी किंवा शेंडी यांचा डोक्यावर बांधलेला बुचडा, गांठ. २ समुदाय; झुबका; जुडगा (काथ्या, वेत, बोरू, मुळ्या, केस, मोत्यांचे सर इ॰ चा). -ज्ञा ११.३६३. 'तुझिया भुजांचें जुंबाड । हें मी करीन शत- खंड ।' -कथा २.१३.१४५. ३ सापाचें वेटोळें. 'हातें रगडितां सर्पतोंडें सुटली सर्पांचीं जुम्बाडें ।' -मुआदि २९.१०६. ४ दाट पानांचा वृक्ष, झुडुप; जाळी; झाडांच्या फांद्यांची, पानांची गुंता- गुंत; दाट झाडी. 'नाना वृक्षांचें जुंबाड ।' -दा १०.९.२. ५ (विशेषतः जुंबाड), माणसांची टोळी, समुदाय. 'माणसांच्या जुंबाडचीं जुंबाडें धावलीं.' जुंगाड पहा. [सं. युग्म; प्रा. जुम्म;? तुल॰ इं. जंबल]

दाते शब्दकोश

कैदी

वि. १ बंदिवान; तुरुंगांत असलेला. २ परतंत्र; ताब्यांत असणारा. २ (कों.) कैदखोर; खट्याळ; खाष्ट; चिडखोर; तिर- सट. [कैद]

दाते शब्दकोश

कोल

पु. डुक्कर. ॰कुतरा-पु. डुक्कर, कुत्रा वगैरे क्षुद्र प्राणि. 'ते होती शत जन्म कोलकुतरे गोमायु गोपुच्छहीं' -निमा १.१९. [सं. कोल = डुक्कर + कुत्रा. का. कोला = कुत्रा]

दाते शब्दकोश

क्षेत्र

न. १ शत. २ तीर्थाची जागा; पवित्र व धार्मिक स्थळ; यात्रेचें, देवतेचें ठिकाण; अयोध्या, गया, काशी इ॰. ३ जागा; स्थळ; स्थान; भूमिभाग. ४ (भूमिति) लाबी, रुंदी, उंची याप्रमाणें मापन करतां येणारा पदार्थ, आकृति. ५ बारा शाळिग्रामांचा संच. ६ ज्यांत आत्मा राहतो असें प्राण्याचें शरीर; सविकार व सजीव मनुष्यदेह. -गीर १४२. ७ (संतति उत्पत्तीचें स्थल म्हणून) स्त्री; पत्नी. 'जेंवि पितृक्षेत्रीं मीं, मत्क्षेत्रींहि तसें चि संतान ।' -मोआदि १९.३४. ८ लंघन; कडकडीत उपवास (धार्मिक उपवास मात्र नव्हे). (क्रि॰ पडणें; होणें; घालणें). ९ चोवीस शाळिग्राम, अकरा बाण, एकवीस नमदे गणपती, बारा सूर्यकात व आठ सुवर्णमुखी देवी इतक्या देवताचा समूह. १० उत्पतिस्थान. ११ यूद्धभूमि; रणांगण. 'तो ना गवसेचि क्षेत्रीं ।' -कथा १.७.६९. १२ रेखागणित; भूमिति. १३ नकाशा; आकृति. [सं.] ॰गणित-न. भूमितिशास्त्र. ॰ज-पु. स्वस्त्रीच्या ठायीं स्वतःचा भाऊ किंवा भाऊबंद यांचे पासून झालेला पुत्र; परवीर्यापासून स्वस्त्री(क्षेत्रा)च्या ठायीं उत्पन्न झालेलें अपत्य. नियोगापासून झालेली संतती. प्राचीन काळीं हिंदुधर्मशास्त्रांत असल्या संततीस कायदेशीर मान्यता असे द्वादशविधपुत्र पहा. ॰जीवी-वि. शेतकरी; शेतीवर उपजी- विका करणारा. ॰तीर्थ-न. १ तीर्थक्षेत्र; यात्रेचें ठिकाण. २ असल्या ठिकाणाची यात्रा. ॰देव-पु. तीर्थक्षेत्रातील देवता. 'अथवा क्षेत्रदेव पादाती । ठाईठाई ।' -दा १९.५.१८. ॰पाल- ळ-पु. स्थल, ग्राम रक्षक देवताच स्थानिक देवता; ग्रामदेवता. ॰फल-ळ-न. १ (भूमिती) कोणतीहि पातळी अथवा क्षेत्र एखाद्या क्षेत्रपरिमाणानें मोजलें असता त्या परिमाणाची निष्पन्न होणारी संख्या. २ (ल.) निकाल; परिणाम; फळ (काम, व्यापार, उद्योग यातील). 'पाच पुतळ्या दिल्या काय आणि पंचवीस रुपये दिले काय क्षेत्रफळ एकच.' 'आजा मेला नातू झाला क्षेत्रफळ सारखेंच.' ॰भूमि-स्त्री. १ लागवडीची, लागवडीस योग्य अशी जमीन. २ धार्मिक, पवित्र जागा; तीर्थक्षेत्र. ॰यात्रा-स्त्री. तीर्थस्नानाची यात्रा, प्रवास. ॰राशी-स्त्री. (भूमिति) कांहीं विशिष्ट आकाराची राशि, संख्या; (भूमिती च्या आकृतीनें दर्शविली जाणारी). ॰वास-पु तीर्थक्षेत्राच्या ठिकाणीं रहिवास, वास्तव्य. ॰वासी-वि. क्षेत्रवास करणारा. ॰संन्यास-पु. एखाद्या पुण्यक्षेत्रीं राहून, हे क्षेत्र सोडून मरेपर्यंत कोठेंहि जावयाचें नाहीं असा केलेला नियमच संन्यास घेऊन क्षेत्रीं राहणें. ॰संन्यासी-वि. क्षेत्रसंन्यास केलेला. ॰संस्कार-पुस्त्री. क्षेत्राचा गर्भाधान, पुंसवन इ॰ संस्कार; संततिरूप फल उत्पन्न होण्यासाठीं धार्मीक विधि. ॰स्थ-वि. क्षेत्र किंवा पवित्र ठिकाण येथील रहिवासी. ॰क्षेत्रज्ञविवार-पु. स्वतःच्या पिंडाच्या, क्षेत्राच्या किंवा शरीराच्या व मनाच्या व्यापाराचें परीक्षण करून त्यारून क्षेत्रज्ञरूपी आत्मा कसा निष्पन्न होतो याचें विवेचन करणें. -गीर १४१. ॰ज्ञ-पु. आत्मा; जीवात्मा; आत्मा देहांत बद्ध असला म्हणजे त्यास क्षेत्रज्ञ म्हणतात.' -गीर १९७. क्षेत्राजीव, क्षेत्रा-बि. शेतांत कष्ट करून उपजीविका चाल- विणारा शेतकरी. क्षेत्रोपवास-पु. १ क्षेत्रांत आल्यावर व मुंडन विधि करण्यापूर्वी करावयाचा उपवास. २ (ल.) अन्नपाण्या- शिवाय असा कडकडीत उपवास. क्षेत्रोपाध्याय-पु. क्षेत्राच्या ठिकाणचा पंड्या; याकडून क्षेत्रांतील सर्व धार्मिक विधि करून घेतात.

दाते शब्दकोश

खांडेकर, खांडेकरी      

पु.       तरवार बाळगणारा शिपाई; खांडाईत : ‘तीन शत उभे खांडेकर’ - कथा ४·६·१७५.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खांडें

न. तरवार; खांडा. 'सारथियांचा तोंडीं सूनि खांडें ।' -शिशु १०४७. [खंड] खांडेकरी-कर-पु. तरवार बाळगणारा शिपाई खांडाईत. 'तीन शत उभे खांडेकर ।' -कथा ४.६.१७५. ॰धुआवन-न. (महानु.) (तरवारीस पाणी देणें). एक प्रकारचा कर; खंडणी. 'खांडेधुआवन मागे अंतराळीं ।' -शिशु १६२.

दाते शब्दकोश

खडाष्टक

न. १ अतिशय द्वेष; हाडवैर (क्रि॰ बाळगणें; धरणें). २ (फल ज्यो.) षडाष्टक; वधुवरांपैकीं एकाच्या राशीपासून दुसर्‍याची रास सहावी व दुसर्‍याच्या राशी पासून पहिल्याची रास आठवी आली म्हणजे त्या दोघांत खडाष्टक येतें. यावरून वैर हा अर्थ. खडाष्टकाचे दोन प्रकार आहेत-(अ) प्रीतिषडा- ष्टक = प्रीति दाखविणारें खडाष्टक. (आ) मृत्युषडाष्टक = वैर दाख- विणारें; पैकी प्रचारांत दुसरें घेतात. [सं. षट् + अष्टक]

दाते शब्दकोश

खड्‌गोदक      

न.       सहा प्रकारचे रस; षड्रस : ‘गांठिवना मालती मृणाळें । असोख बावनें बकुळें । खड्‌गोदक मकरंद जळें । देतां मुखीं पोळत ॥’ - नरुस्व ५४१. [सं. षट् + उदक]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खड्गोदक

न.सहा प्रकारचा रस. ‘गांठिवना मालती मृणाळें । असोख बावनें बकुळें । खड्गोदक मकरंद जळें । देतां मुखीं पोळत ।। ’ –नरूस्व ५४१. [सं. षट् + उदक]

दाते शब्दकोश

खंकाळ, खंकाळा-ळ्या

वि. १ दुष्ट; उग्र. 'वेताळ खंकाळ लागला । ब्रह्मगिर्‍हो संचारला ।' -दा ३.३.२८. २ तिर- सट; कूरठा; रागीट, द्वाड. ३ पाणीदार; चलाख; तापट (घोडा, तट्टू). खंक पहा. ॰तट्टू-वि. अडेलतट्टू; माजूरी. ॰भवानी- स्त्री. अवदसा. 'आलीच ही खंकाळभवानी.' -सु २१.

दाते शब्दकोश

खटकण-कन-कर

क्रिवि. खटकन; झटकन; सटकन; सट- दिशीं; त्वरित; ताबडतोब; खट शब्द होई असें. (क्रि॰ निघणें; उम- जणें; उजडणें; डोळे उघडणें; झोंप न लागणें).

दाते शब्दकोश

खटकर्म      

न.       त्रासदायक; चेंगट; रेंगाळत चालणारे, तिरस्कार वाटणारे काम [सं. षट् + कर्म]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

न.       षटकर्म; निर्वाहाची सहा कर्मे. [सं. षट् + कर्म]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खतूत

(न.) [अ. खुतूत् अनेक व. ‘सत्’ चें] पत्र. “सर्कारचे मदारूल महाम यांनीं खतून मर्सूल केलें” (=पाठविलें) (राजवाडे १०।१६४).

फारसी-मराठी शब्दकोश

खट्याळ, खट्याळ-नाठ्याळ

वि. १ खट; तुसडा; तिर- सट; द्वाड; दुश्चित; वाईट; उपद्यापी (स्वाभाव, वागणूक). 'कळों- आलें खट्याळसें । शिंवों नयें लिंपों दोषें ।' -तुगा २७५४. २ खोडकर; हट्टी; छप्पन टिकल्याचा (घोडा, गाय). [सं. शठ; खठ + आळ; तुल॰ का केट्ट = वाईट; का. केडु = खोडी, केडु + आळि खोड्याळ]

दाते शब्दकोश

खुश्नमत

=आनन्द दायक. “सत खुश्न-मत (साने-पयाव ३८४).

फारसी-मराठी शब्दकोश

मेज, मेजणी, मेजणें, मेजदात or द

मेज, मेजणी, मेजणें, मेजदात or द mēja, mējaṇī, mējaṇē, mmējadāta or da or स्त Preferably मोज, मोजणी &c.

मोल्सवर्थ शब्दकोश

मोजदात or द

मोजदात or द mōjadāta or da or स्त f ( A or A) Counting or numbering (of houses or articles of property).

मोल्सवर्थ शब्दकोश

निश्चिंत

वि. चिंता, घोर, काळजी यापासून मुक्त; निचिंत; स्वस्थ; चिंतारहित. 'या लागीं शत जर्जर नावे । रिगोनि केविं निश्चिंत हो आवें ।' -ज्ञा ९.८९०.निश्चिंती-स्त्री. १ (अन्नवस्त्रादिकांच्या) काळजीपासून मुक्तता. २ स्वास्थ आणि सौख्याची हमी (धान्याची बगमी केल्यामुळें); निचिंती.

दाते शब्दकोश

नसद्धी      

वि.       नुसती; एकटी : ‘निगालेआं यदुपती । न शोभेची द्वारावती । जेवी नसद्धी शांती । विवेकेंविणु I’ – शिव ५३८. [सं. न+सत्+हि]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

नसद्धी

वि. (महानु.) नुसती; एकटी. 'निगालेआं यदु- पती । न शोभेचा द्वारावती । जेवी नसद्धी शांती । विवेकेंविणु ।' -शिशु ५३८. [सं. न + सत् + हि]

दाते शब्दकोश

ओळंगणें or ओळंघणें

ओळंगणें or ओळंघणें ōḷaṅgaṇē or ṃōḷaṅghaṇēṃ v c (आलिंगन S) To clasp eagerly (as in order to grasp or snatch from); to enfold and cling to. Ex. शतांच्या शत दासी ॥ ओळंग- ति जयेपासी ॥ इंदुवसना नाम जयेसी ॥ Sometimes applied as वळंगणें q. v.

मोल्सवर्थ शब्दकोश

ओम्, ॐ

अ. अ = विष्णु, उ = शिव, म = ब्रह्मा. ह्याप्रमाणें तिन्ही देवांचें वास्तव्य या शब्दांत आहे. १ वेद, पुराण, पोथी, स्तोत्र इ॰ म्हणण्यापूर्वीं व संपविल्यानंतर जो पवित्र शब्द उच्चार- तात तो; प्रार्थनेच्या वेळीं प्रारंभीं उच्चारावयाचा शब्द. 'ओम् नमोजी गणनायका ।'; 'ओम् श्रीरामरक्षास्तोत्रमंत्रस्य ।' २ आरंभ; उपक्रम. ३ प्रणवब्रह्म; शब्दब्रह्म; एकाक्षर ब्रह्म. 'ॐ नमोजी आद्या ।।' -ज्ञा १.१.३ वैदिक काळीं (मांडूक्य उपनिषदांत), अ = वैश्वानर, उ = तैजस, म = प्राज्ञ, ओम् = अतर्क्य, अवाच्य व ज्यामध्यें सर्व जगाचा समावेश होतो असें ब्रह्म, असा अर्थ होता. ओम् हें अक्षर प्रथम उपनिषदांत आढळतें. ॰कार-ओम् पहा. ॰तत्सत्- ॐ ( = ब्रह्म), तत् ( = तें), सत् ( = खरें,) फक्त ब्रह्म हें खरें किंवा शाश्वत आहे. 'ओम्, ॐ तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु ।' मंत्र किंवा एखादें कर्म संपविल्यानंतर हें वाक्य म्हणण्याचा परिपाठ आहे. लक्षणेनें याचा अर्थ संपविणें, पाणी सोडणें असा आहे. 'ॐ तत्सत् ब्रह्मार्पणं सेवट ।' -दावि २६. ॰पुण्या-पुण्याहम्- १ मी प्रणवरूप, पुण्यस्वरूप आहें अशा अर्थाचा मंत्र. एखाद्या मंगल संस्कारापूर्वीं स्वस्तिवाचन नांवाचें कर्म केलें जातें त्यामध्यें संस्कारकर्त्या यजमानास ब्राह्मण 'ओं पुण्याहं' असा आशीर्वाद देत असतात. 'चिद्ब्रह्मेंसि लग्न लाविशी । ओं पुण्येसी तत्त्वता ।' -एभा ८.१. २ लग्न मंत्राचा आरंभ, पुण्याहवाचनाचे वेळीं म्हणण्यांत येणारे मंत्र. 'ॐ पुण्याह म्हणोनियां जाण । लाविलें उभयतांचें लग्न ।।' -जै ५६.२०. ॰फस, ॰फस होणें- १ निष्फळ होणें; फसणें. 'परीक्षा नापास झाल्यामुळें त्याचे सारे बेत ओंफस झाले व पुन्हां तो कॉलेजची वारी करूं लागला.' २ लयास जाणें, नायनाट होणें. [ओम् + फस् = फुगा फुटल्याचा आवाज] ॰भवति १ (भिक्षां देहि). बाई भिक्षा वाढा, असा भिक्षा- मागतांना म्हणावयाचा मंत्र. २ (ल.) भिक्षा (मागणें); भिक्षाटन. 'नीट वागला नाहींस तर ओंभवती करीत फिरशील बरें !' ॰भवति पक्ष-१ भिक्षावृत्ति; भीक मागण्याचा पेषा. 'ब्राह्मणाची मुख्य दीक्षा । मागितली पाहिजे भिक्षा । ओं(वों)भवति या पक्षा ! रक्षिलें पाहिजे ।।' -दा १४.२.१. २ (ल. उप.) अर्ज विनंत्या करून (स्वराज्य) मागणार्‍यांचा एक पक्ष; मवाळ पक्ष.

दाते शब्दकोश

पातवडी-वड

स्त्रीपु. १ तळून खाण्याची पापडी (विशे- षत: तांदळाच्या किंवा जोंधळ्याच्या पिठाची). २ हरभर्‍याच्या पिठाचें धिरडें; पाटवडी पहा. ३ अळू इ॰कांच्या पानास डाळीचें पीठ लावून गुंडाळून, उकडून, तळून केलेली वडी. [पत्र + वडी]

दाते शब्दकोश

रुद्र

पु. एक सूक्तसंग्रह; रुद्राचे मंत्र; यजुर्वेंदांतील शत- /?/द्रीय स्तोत्र. समासांत-रुद्रगण, रुद्रपठण इ. [सं.]

दाते शब्दकोश

सा(सां)ट

पु. १ चाबूक; कोरडा; आसूड. -ज्ञा १८.७.३४; -एभा २९.११२. 'ऐसा तो अश्वरावो । तयावरी साजिन्नला घावो । साटू फुटला पहाहो । अरुणाचा ।' -कालिका १४.२४. २ तडाखा फटकारा. 'घोडियां सांट देती सोडूनि वाग्दोरे ।' -कृमुरा ९६; ५०.४८. [ध्व. सट्, का. चाटी = चाबूक, हिं; सटिका = छडी] ॰मार-री-स्त्री. १ एक राजेरजवाड्यांचा खेळ. यांत हत्ती रंगणांत सोडून त्यांस चावकांनीं-काठ्यांनीं मारून पळवतात. २ हत्तींची झुंज. ॰मार्‍या-पु. साटमार खेळांसाठीं योजलेला इसम.

दाते शब्दकोश

साधनचतुष्टय

साधनचतुष्टय sādhanacatuṣṭaya n S The four measures for ब्रह्मप्राप्ति (obtainment of the blessing of absorption into ब्रह्म); viz. वस्तुविवेक, वैराग्य, शमादि (i. e. शम, दम, दया, तितिक्षा, उपरति, समाधान), मुमुक्षुत्व; as per नित्यानिय वस्तुविवेक ॥ इहामूत्र फलभोग विराग ॥ शमादि षट् संपत्ति ॥ मुमुक्षुत्वं ॥. See under चतुष्टय.

मोल्सवर्थ शब्दकोश

साहा

वि. १. ६; सहा ही संख्या. सहा पहा. 'बसेत साहा कट दाट पाही । पिपीलिकेला परि मार्गं नाहीं ।' -सारुह ८.५३. २ (सांकेतिक) सहा शास्त्रें. 'कळा वाढविती शब्द । साही जणांशीं विशाद ।' -एरुस्व ६.७७; -होला १५. साही-अ. साहानें गुणून. 'एके साही साहा.' -वि. साहा पहा. 'साही चक्रें ओलांडुनि । मग स्थिरावला स्थानीं ।' -सिंस ४.१२९. [सं. षट्] साहा महिन्याची जांभई-स्त्री. फार काळ लांबलेला, अंत पाहणारा खटला, व्यवहार इ॰ स लावतात.

दाते शब्दकोश

शाने-शान-शानी

-अ. धातुसाधितांना ऊन व क्रि. विशे- षणांना ऊन, हून प्रत्यय लावल्यावर होणाऱ्या अब्ययार्थी खेड- वळ लोकांच्या प्रचारांतील प्रत्यय. 'तिथूनशाने कशाला दाख- वितोस; इकडे कां घेऊनशाने येईनास.' [सं. सत्]

दाते शब्दकोश

सारि

स्त्री. (हेट. गो.) चितारक्षा; तिसरे दिवशीं भरा- वयाची राख. [? सं. क्षार] ॰धुंवप-क्रि. (गो.) चिता धुम- सत राहणें.

दाते शब्दकोश

सात

सात sāta a (सप्त S) Seven. Used, as are the words for seven in other languages, to express Completeness or largeness of number. See in order सात ताड उंच, सात लबाड, सात सायास, साता पडद्यांत बसणें, सातव्या मजल्यावर or सातव्या ताळीं बसणें, साताळशी &c.

मोल्सवर्थ शब्दकोश

सात sāta f (सतत Constant or continual.) A course or run (esp. of epidemic disease--small pox, measles, influenza, fever &c.); and, freely, of any matter of one kind or character; as भाकरीची or भाताची सात (भोजनास); मुलांची or मुलींची सात (बायकोस).

मोल्सवर्थ शब्दकोश

सात sāta f (Better साथ) Company or companionship: also a companion.

मोल्सवर्थ शब्दकोश

साट

साट sāṭa m A frame composed of slit bamboos or slender sticks laid along and fastened together; forming the deck or flooring of boats and small vessels: also the lathing or similar work over the rafters of a roof: also the floor of a loft &c.

मोल्सवर्थ शब्दकोश

साट sāṭa n A cake formed of the pulp (of the jack, mango &c.) well mashed and blended, and rolled out.

मोल्सवर्थ शब्दकोश

सात लाजा

सात लाजा sāta lājā f pl The seven लाजा or shames; viz. जनलज्जा, मनोलज्जा, वयोलज्जा, धर्मलज्जा, कर्मलज्जा, जातिलज्जा, कुललज्जा. Ex. हा सा0 पदरीं बांधून दुराचारावर प्रवृत्त झाला. सा0 पदरीं बांधणें expresses To be utterly without sense of shame.

मोल्सवर्थ शब्दकोश

सात लबाड

सात लबाड sāta labāḍa a (Seven-fold false or lying.) Superlatively or preëminently lying; a terrible liar.

मोल्सवर्थ शब्दकोश

सात पांच करणें

सात पांच करणें sāta pāñca karaṇēṃ (To make seven and five.) To tell a story or make a statement with contradictions or inconsistencies.

मोल्सवर्थ शब्दकोश

सात or सांत

सात or सांत sāta or sānta f A particular fish.

मोल्सवर्थ शब्दकोश

शाट, शाटणें, शाटाशाट

शाट, शाटणें, शाटाशाट śāṭa, śāṭaṇē, ṃśāṭāśāṭa Misspelled for छाट &c.

मोल्सवर्थ शब्दकोश

सात सायास

सात सायास sāta sāyāsa m pl abridged into सातसाय f or सातसाया f pl (Seven efforts.) Many and great efforts; exceeding exertion and labor. More frequently in the case साता सायासांनीं Laboriously, strenuously, with might and main. सातसाया with करणें is further To treat daintily or delicately, as with endless pains and cares, with numberless regards and attentions (i. e. साता सायासांनीं, or, perhaps, from & A).

मोल्सवर्थ शब्दकोश

सात सडका

सात सडका sāta saḍakā f pl (Seven roads.) The flow from the temples of an elephant in heat. v सुट. Hence सात सडका सुटणें To turn wanton and run wild.

मोल्सवर्थ शब्दकोश

सात ताड उंच

सात ताड उंच sāta tāḍa uñca (High as seven Palmyra trees.) Exceedingly tall or lofty.

मोल्सवर्थ शब्दकोश

साटा

साटा sāṭā m (साटणें To heap or store.) Stuffing material (of गूळपापडी, सारण, खोबरें, crumbled plantains &c.) for puffs and cakes. Applied also to the flour, or butter, ghee, or oil which is sprinkled or smeared between the layers of pastry. v दे, लाव, भर, कर.

मोल्सवर्थ शब्दकोश

साटा sāṭā m (By mispronunciation of छाटा) A drop cast in sprinkling.

मोल्सवर्थ शब्दकोश

साता गुणांचा खंडोबा

साता गुणांचा खंडोबा sātā guṇāñcā khaṇḍōbā m A term for a person full of vices and evil ways; also for a person full of maladies and ailments.

मोल्सवर्थ शब्दकोश

साटा or ट्या

साटा or ट्या sāṭā or ṭyā m A frame &c. See साठा or ठ्या.

मोल्सवर्थ शब्दकोश

सात्त्विक-सात्त्विक

पु. सात्विकभाव. एकभाव, किंवा मनाची अवस्था (काव्यनाटकांतील). ही स्थायी आणि व्यभि- चारी या भावांमधील असून हिच्या ठिकाणीं सहज, अकृत्रिम, सत्य अशा भावना व्यक्त असतात. स्वेद, स्तंभ, रोमांच, स्वरभंग, वेपथु (कंप), वैवर्ण्य, अश्रु आणि प्रलय हे अष्ट- सात्त्विकभाव आहेत. 'आपुलेनि शिहाणपणें । आंगींचे सात्वीकु लपओ जाणें ।' -शिशु १८९. [सं.] -वि. (शुद्ध रूप सात्त्विक.) १ सत्य; पवित्र; प्रामाणिक; उत्कृष्ट; सत्त्वगुणांनीं युक्त. 'म्हणोनि उपनिषदादि समस्त । सात्त्विक ते ।' -ज्ञा २.२५६. २ सौम्य; हितकार; रोगनिवारक (औषध, पथ्य, इ॰). ३ अर्थ- युक्त; भरींव; ससत्त्व. ४ उत्साह, चैतन्य, बल, तेज इ॰ गुण असलेला. ५ सत्; सत्य; अस्तित्व असलेला; वास्तवपूर्ण. ॰चांडाळ-पु. सौभ्य वृत्तीचा चांडाल. ॰प्रेम-न. खरें, शुद्ध प्रेम. 'निराशेंत सात्त्विक प्रेम करुणवृत्तीचें रूप घेतें.' -एक १०७. ॰भाव-पु. सुखादि भावानें भावित होणार्‍या अंतःकरणापासून उत्पन्न होणारें भाव. हे आठ आहेत. सात्त्विक पहा. 'म्हणोनि सात्त्विक भावांची मांदी । कृष्णा आंगीं अर्जुना- आधीं ।' -ज्ञा ८.५६.

दाते शब्दकोश

शब्दून

(पु.) [फा. शब्दून्] सत छापा. “सर्कारच्या फौजांवर शब्खून घालावा हा इरादा इङ्ग्रज़ांनीं करून रात्रौ पोख्त सरन्ज़ामानसी चालून आले” (राजवाडे १९|८०). “रात्रौ त्या पल्टणांनीं दुसरे मार्गे येऊन असून घातला” (राजवाडे १९|९४). “शब्खुनास फिरङ्गी हुशार” (खरे ८|४३५६). “इसामिया. याजवर शब्खून पडल्याचें वर्तमान उठलें होतें” (राजवाडे ५|९३).

फारसी-मराठी शब्दकोश

सच्चिदानंद

सच्चिदानंद saccidānanda a S (सत् Being, चित् Mind or Intellect, आनंद Happiness.) A title of Brahm or the Supreme and all sustaining Essence. Rejoicing in essential being and understanding. Ex. जो स0 कमळावर ॥ मदन मनोहर रूपडें ॥.

मोल्सवर्थ शब्दकोश

पु. सर्व विश्वव्यापी पुरुष; त्रिकालीं असणारा; सत्यज्ञान व आनंदयुक्त परमेश्वररूप; ईश्वराचें निर्गुण रूप; परमात्मा. [सं. सत + चित् + आनंद]

दाते शब्दकोश

सच्चिदघन

सच्चिदघन saccidaghana a S (सत्, चित्, घन) Full of real being and intelligence;--epithet of the deity or of the spirit of man.

मोल्सवर्थ शब्दकोश

सच्चिद्घन

पु. जीवात्मा. -वि. खर्‍या ज्ञानानें, बुद्धिनें, अस्तित्वानें परिपूर्ण. [सं. सत् + चित् + घन]

दाते शब्दकोश

सच्चिदंश

सच्चिदंश saccidaṃśa m S (सत्, चित्, अंश) The intellectual portion or principle (of a rational being).

मोल्सवर्थ शब्दकोश

वि. प्राण्यांतील चेतना, बौद्धिक, तात्त्विक भाग; जीवांश. [सं. सत् + चित् + अंश]

दाते शब्दकोश

सच्चर्या

स्त्री. चांगली वर्तणूक, वागणूक. [सं. सत् + चर्या]

दाते शब्दकोश

सद्भाव

पु. १ अस्तित्व; स्थिति. 'म्हणोनि अज्ञान सद्भावो । कोणे परी न लाहो ।' -अभृ ७.२९३. २ साधुत्व; सद्गुणीपणा; सुस्वभाव; सुशीलता. ३ चांगली मनोवृत्ति; श्रद्धा; सद्वृत्ति. 'जे इये स्वप्नींहूनि सद्भावा । नेदावें निघों । ' -ज्ञा ११.६३७. ४ सत्य, योग्य अनुभव; प्रतीति. 'हें आलें मज सद्भावा । आतां तूंचि सर्व ।' -ज्ञा ११ ५३६. [सं. सत् + भाव]

दाते शब्दकोश

सदभ्यास

पु. चांगली संवय; चांगला अभ्यास; सदाचार. 'तेंवि सदभ्यासें निरंतर । चित्तासि परमपुरुषाची मोहर ।' -ज्ञा ८.८२. [सं. सत् + अभ्यास]

दाते शब्दकोश

सद्गगुण

पु. विद्या, कला, शौर्य, सहिष्णुता, उपकारकता इत्यादिसारखा उत्तम गुण; चांगला गुणधर्म; चांगलें तत्त्व. [सं. सत् + गुण् = मोजणें]

दाते शब्दकोश

सद्गृहस्थ

पु. प्रतिष्ठित, मला, प्रामाणिक, विश्वासु, सन्मान्य, सद्वर्तनी, प्रेमळ, सौम्य मनुष्य. [सं. सत् + गृहस्थ]

दाते शब्दकोश

सद्गत

सद्गत sadgata f Contracted from सद्गति q. v. infra. 2 Resource, remedy, help, an expedient or a means of ameliorating one's fortunes, or of obtaining happy issue out of straits, exigencies, or troubles. Ex. कारकुनास चाकरी केल्यावांचून स0 नाहीं. This word is popularly used as सत ना गत, and, in certain applications, for सोई.

मोल्सवर्थ शब्दकोश

सद्गति

स्त्री. चांगली गति; मरणोत्तर सुखावह अवस्था; गोक्षप्राप्ति; स्वर्गप्राप्ति; सुस्थितींत, उच्च जातींत पुनर्जन्म; पर- लोकप्राप्ति; मरणोत्तर कोणतीहि चांगली दशा. 'होतां वृथा प्रतिज्ञा सद्गति न घडो मला घडो पतन ।' -मोकर्ण ३५.४६. [सं. सत् + गति]

दाते शब्दकोश

सदमुख, सदमुषु

किवि. सन्मुख; समोर. 'बैसला ईश्वरा सदमुषु ।' उषा ९७. [सं. सत् + मुख]

दाते शब्दकोश

सद्नद

वि. अवरुद्ध; सद्गदित; कंठ दाटून आल्यामुळें अडखळलेली (स्थिति). 'मग म्हणतसे प्रसीद प्रसीद । वाचा होतसे सद्गद ।' -ज्ञा ११.५६८. [सं. सत् + गद]

दाते शब्दकोश

सद्वपासना

स्त्री. (अप) सदुपासना. योग्यतर्‍हेची भक्ति. 'सद्वुपासना सत्कर्म ।' -दा ५.३.१२. [सं. सत् + उपासना]

दाते शब्दकोश

सद्वत्त

न. चांगली वागणूक. -वि १ सदाचरणी; सत्प्र- वृत्तीचा; सद्वर्तनी; चांगली वागणूक आहे असा. २ गोल; वाटोळा; सुंदर, गोल आकाराचा. [सं. सत् + वृत्त + वृत्ति]

दाते शब्दकोश

शें

वि. शंभर; शत; शतकवाचक शब्दापुढें या शब्दाचा विशेषचः उपयोग होतो. उदा॰ दोनशें, तीनशें, पांचशें वगैरे. 'त्या सुहृदंगांतुनि वृषशर काढी सानुकंप शौरी शें.' -मोकर्ण ५०.१ [सं. शतम्] शेंकडा-पु. शंभर वस्तूंचा गट, समुदाय; शंभरी. -क्रिवि. दर शंभरास; प्रत्येक शंभर वस्तूंस वगैरे. 'शेकडा आठ आणे व्याज.' शेकडों-शःशा-क्रिवि. शतशः; शंभरांनीं; शेंकड्यांनीं.

दाते शब्दकोश

शें śēṃ a (शत S through H) A hundred. Note. To express the number Hundred the word शंभर is used; but to express plurality of hundreds, or even one or a hundred with definiteness or emphasis, शें is the word together with a numeral prefix; as एकशें, दोनशें, तीनशें.

मोल्सवर्थ शब्दकोश

सहा

(सं) वि० संख्याविशेष, षट्, ६.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

वि. ६ ही संख्या. [सं. षट्] -नअव. (ल.) सहा शास्त्रें. 'साहीसहित वोहटा । वाहिला वेदीं ।' -ज्ञा ११.६८२. 'तो हा पंढरीचा राणा । पुसा सहा चौं अठरांजणा ।' -तुगा २५३९. ॰कमळें-नअव. षट्चक्र पहा. ॰गुण-पुअव. षट्गुण; सहा चांगल्या वृत्ती; ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, ख्याति, यज्ञश्री, औदार्य. 'ज्ञान वैराग्य ऐश्वर्य ख्याति । यज्ञश्री औदार्य स्थिति । हे साही गुण वसिष्ठासी असती ।' -भारा बाल १५.३५. ॰नकार-पुअव. मौन, विलंब, भ्रूभंग, अधोवदन, गमन, विषयांतर. ॰मुखांचा-पु. कार्तिकस्वामी. 'सहा मुखांचा दडाला । कपाटामाजी ।' -ह ३.७. ॰सुभे-दक्षिणेंतील औरंगा- बाद (अहमदनगर), वर्‍हाड, खानदेश, विजापूर, गोवळकोंडें (हैदराबाद) व बेदर (कर्नाटक) हे मोंगलांचे सहासुभे. 'सहा सुभे दख्दन.' साडेसहासुभे- १ विजापूर, १ दौलताबाद, १ अहं- मदाबाद-गुजराथ, १ बर्‍हाणपूर-खानदेश, १ हैदराबाद-भागा- नगर, १ औरंगाबाद व अर्धा नागपूर. -शिदि २०. साडेसहा- सुभे दक्षिण. सहा महिन्यांची जांभई-अतिशय विलंब लाग- णारी गोष्ट. 'या सोनाराजवळ दागिना करावयास दिला म्हणजे सहा महिन्यांची जांभई.'

दाते शब्दकोश

शहांयशी

वि. ८६ संख्या. [सं. षट् + अशीति; प्रा. धासी इ॰]

दाते शब्दकोश

शिरजोर

शिरजोर śirajōra a ( P) Headstrong or reckless: also refractory, contumacious, turbulent, termagant. Ex. शि0 बायकोचें शेण जसें साधु दादला वाही ॥ धी वर्त्तवित्ये जीवा सत हो देवाशी दाद ला- वा ही ॥. Pr. चोर तो चोर घरधन्याहून शि0.

मोल्सवर्थ शब्दकोश

सज्जन

पु. १ शीलवान्, सात्त्विक, गुणी मनुष्य. 'आतां नमूं संत सज्जन' -शनि २ सखा; मित्र. 'तूं माझा सज्जन मी तुझी सांगाती ।' -ब ५२५. ३ रामदास; समर्थ. 'हें असो नाशिकीं असतां सज्जन ।' -दावि ८२. [सं. सत + जन] ॰गिरि-पु. सज्जनगड; परळीचा किल्ला. 'सज्जन गिरि- वरि मोक्ष प्रदानी ।' -स ६.९.

दाते शब्दकोश

सन्नद्ध, सन्नध

वि. सज्ज; तयारः सिद्ध; सायुध. 'सन्नद्ध करतां दळभार । येथें लागेल उशीर ।' -एरुस्व ५.१. [सं. सत् + णह्-बांधणें]

दाते शब्दकोश

शंभर

शंभर śambhara a (शत S) A hundred. Note. To express hundreds शें is substituted, taking up a numeral prefix; as दोनशें, तीनशें, शंभर stands alone to express One hundred, and suffers not the numeral prefix एक. शं0 बुड्या मारून आंग कोरडें दाखविणारा (One who, after a hundred dips, still shows himself dry.) A term for a sharp and subtle knave whose knavery no one can establish. शं0 हातांत येऊं न देणें (Not to suffer to approach within a hundred cubits.) To keep well off.

मोल्सवर्थ शब्दकोश

-वि. शत; १०० संख्या; शें; एक, दोन, तीन अशा- प्रकारची शंभराची पट दाखवितांना 'शें' असें रूप वापरतात. उदा॰ एकशें, दोनशें, तीनशें इ॰. [सं. शते; इं. सेंटम्] म्ह॰ शंभरांत फूल, हजारांत काणा, सर्वांत आंधळा दाणा. (व.) ज्याच्या डोळ्यांत फूल पडलें आहे, तो शंभर डोळसांत शहाणा, तसेंच एका डोळ्यानें आंधळा (काणा) असलेला हजारांत शहाणा व या सर्वांपेक्षां दोन्हीं डोळ्यांनीं आंधळा अधिक शहाणा असतो. (वाप्र.) शंभर बुड्या मारून अंग कोरडें दाख- विणारा-ज्याची लबाडी किंवा लुच्चेगिरी दुसऱ्यास सिद्ध करतां येत नाहीं असा; अनेक लबाड्या करून त्यांत न सांपडणारा. ॰रुपये तोळा बोलणें-मितभाषण, अगदीं थोडें व केवळ अवश्य तेवढेंच भाषण करणें (अबोल माणसाबद्दल वापरतात). ॰वर्षें भरणें-एखाद्याचा मरणकाल, विनाशकाळ जवळ येऊन ठेपणें. 'शतायुर्वै पुरुषः' या न्यायानें मनुष्याचें आयुष्य शंभर वर्षें आहे, तें संपणें; मरणें. 'तुला जी काय हकीकत माहीत असेल ती सगळी सांग, नाहींतर तुझीं शंभर वर्षें आतांच भरलीं समज.' -मथुरा. शंभर हातांत न देणें-अगदीं दूर राहणें; अलिप्त असणें. ॰नंबरी-वि. उत्कृष्ट प्रतीचें; अत्यंत शुद्ध; ज्यांत बिलकुल भेसळ नाहीं असें (सोनें इ॰).

दाते शब्दकोश

संन्याव

पु. योग्य न्याय; रास्त गोष्ट. 'अन्यावो तो सन्यावो करुनि दाखविला.' -पंच ३.१८. [सं. सत् + न्याय]

दाते शब्दकोश

संत

पु. १ साधु; पुण्यपुरुष; सत्पुरुष; सज्जन. 'जो जाणेल भगवंत । तया नांव बोलिजे संत ।' -दा ६.१.१६. २ सामान्यतः धर्मिक आचारविचार पाळणारा सदाचारी मनुष्य; शद्धाचरणी व्यक्ति. -न. ३ ब्रह्म. 'सदा संत आनंतरूपी भरावें ।' -राक १.११.३. -वि. नित्य; शाश्वत; स्थिर; अक्षय; टिकाऊ; त्रिकालाबधित. 'असंत नव्हे तें संत ।' -दा १७.२. २. [सं. सत्]

दाते शब्दकोश

सष्टम

वि. मोठा; सुंदर; सुरेख; ठळक (दागिना, भांडें, वस्तु); धड; मजबूत; बळकट (कापड, कागद अथवा इतर वस्तु). क्रिवि. (व.) यथेच्छ; खूप; दोन्ही कुशी ताणेपर्यंत. [सं. सत् + तम्]

दाते शब्दकोश

सता

पु. सती या शब्दाचें पुल्लिंगी रूप. 'खरेंच निघल काय सता पाह्यला थेट घेतली प्रेतकळा । तेव्हां तो तिजला झोंबूं लागला नार उघडून पाहे डोळा ।' -पला ८.१७. [सं. सत्]

दाते शब्दकोश

स्त्री. (महानु.) अस्तित्व; स्थिति; जवळीक. -विसू ९. [सं. सत्]

दाते शब्दकोश

सटाली

सटाली saṭālī f (सट!) Slipping out of (a promise or an engagement); swerving or turning back from a statement or saying. v खा. 2 esp. with हाताची A sudden jerk with the hand; a flinging out and a drawing back. v मार.

मोल्सवर्थ शब्दकोश

सटालणें

सटालणें saṭālaṇēṃ v i (सट!) To run off sharply.

मोल्सवर्थ शब्दकोश

शताळशी or सी

शताळशी or सी śatāḷaśī or sī a (शत & आळशी. Lazy by a hundredfold, or more than a hundred persons.) Superlatively lazy or indolent.

मोल्सवर्थ शब्दकोश

सटावणें

सटवणें or सटावणें v i To die of, or be affected with, a distemper occurring about the sixth day (सट) after birth, and viewed as a visitation from — infant.

वझे शब्दकोश

सटेगोपाळ

सटेगोपाळ saṭēgōpāḷa m (सट! With a pop, snap, fillip &c. and गोपाळ Proper name in constant use as a familiarly allusive appellative.) A term for a scamp or knave, a fellow that may deceive and run off at any moment. Also सटेगोपाळी f Scampishness, trickery, any untrustworthy practice or course.

मोल्सवर्थ शब्दकोश

स्ती

नालिश or स्त or स्ती f (Sometimes नालस्त or -स्ती f) A complaint, evil (as spoken or known concerning).

वझे शब्दकोश

सटी

स्त्री. सट, सटवी पहा. 'ब्रह्मा लिहितो अदृष्टीं । आणि वाचून जाते सटी ।' -दा १०.६.३४.

दाते शब्दकोश

सतीपतीचा

सतीपतीचा satīpatīcā a (सतपत Formation from सत् or सत्य & पत, but used only in the oblique cases.) Having truth and credit or good repute. सतीपतीनें With truth and credit; fairly, honorably, reputably.

मोल्सवर्थ शब्दकोश

सतिसप्तमी

सतिसप्तमी satisaptamī f S (सत् Being, existence, सप्तमी Seventh case. The case of BEING; the sense expressed by the present participle &c.) The ablative case absolute.

मोल्सवर्थ शब्दकोश

सत्जबाब

पु. (कायदा) उत्तरपक्ष; कैफियत; सयुक्तिक प्रत्युत्तर. [सं. सत् + फा.जबाब]

दाते शब्दकोश

सटका

सटका saṭakā m (सट!) Properly झटका q v. A jerk or fling out (of hand or foot or a cloth). v मार, दे, बस. 2 A smart slash, gash, cut, or stroke (with an edged instrument). v मार, दे, बस.

मोल्सवर्थ शब्दकोश

सत्कार

पु. सत् हा शब्द; अस्तिवाचक शब्द. 'तो प्रणवो आदिवर्णुबुजा । आणि तत्कारु जो दुजा । तिजा सत्कारु । ' ज्ञा १७.३४२. [सं.] सत्कारवाद, सत्कार्यवाद-पु. कार्य प्रकट होण्याच्या पूर्वीं त्याचें कारणामध्यें अस्तित्व मानणारें निरीश्वर सांख्य मत. 'मग सहजें सत्कारवादु । तो पद्यकरु वरदु । धर्म प्रतिष्ठा तो सिध्दु । अभय हस्तु ।' -ज्ञा १.१३; -गीर १५३. [सं.]

दाते शब्दकोश

पु. आदरातिथ्य; मानसन्मान; मानमरातब; बहुमान. २ आदर; पूज्यता. [सं. सत् + कृ] सत्कारणेंउक्रि. मानपान करणें; आदरातिथ्य करणें. सत्कारित, सत्कृत-वि. आदरसत्कार केलेला; मान दिलेला; पूज्य मानलेला.

दाते शब्दकोश

सटकणें

अक्रि. झपाट्यानें बाजूला होणें; चटकन दूर होणें; निसटणें; सुरुवात करून मधूनच नाहीसें होणें; वचनांतून मुक्त होणें. [ध्व. सट्] सटकपावली-स्त्री. झटकन् निघणें, चालूं लागणें, निसटून जाणें. (क्रि॰ करणें).

दाते शब्दकोश

शट्कर्णी

क्रिवि. (प्र.) षट्कर्णी; सर्वत्र प्रसिद्ध; जाहीर; उघड. (क्रि॰ करणें; होणें; जाणें; येणें. याशीं जोडून). तीन मनुष्यांस समजलेली गोष्ट गुप्त राहूं शकत नाहीं यावरून. [सं. षट् = सहा + कर्ण = कान]

दाते शब्दकोश

सटल or ल्ली

सटल or ल्ली saṭala or llī f (सट! Sound of slipping.) Slipping out of (a promise or an engagement). v खा. 2 Slipping or swerving from the truth (in narrating or declaring); storytelling. v मार, हाक.

मोल्सवर्थ शब्दकोश

सटल्ली or ल्या

सटल्ली or ल्या saṭallī or lyā a (सट! See above.) That slips out (of his promise &c.) 2 That swerves from the truth; of easy veracity; slippery.

मोल्सवर्थ शब्दकोश

सत्पात्र

सत्पात्र satpātra n (S सत् Good, पात्र Vessel.) One worthy to receive presents or honors; a proper object of gifts or charity. सत्पात्रीं दान n Giving or a gift to a worthy or proper recipient. Ex. सपात्रीं दानं द्यावीं जरीं ॥ तरीं धन नाहीं बहुत पदरीं ॥.

मोल्सवर्थ शब्दकोश

सटपट or टां

सटपट or टां saṭapaṭa or ṭāṃ or सटफट or टां ad (सट! फट!) Imit. of the rapid and closely successive utterances of a violent abusing or scolding. v बोल, कर.

मोल्सवर्थ शब्दकोश

सत्राण or णं

सत्राण or णं satrāṇa or ṇaṃ ad (Poetry. सत् & त्राण) With a vehement effort; with force collected; with one's might and main. Ex. वृक्ष भोंवडून स0 भीमाउजू टाकिला; सत्राणें उड्डाण हुंकार वदनीं.

मोल्सवर्थ शब्दकोश

सतरंग, सतरंज

पु. बुद्धिबळांचा खेळ. 'गंजीफा सत- रंज चोपट नवे ते नर्दही सांग जे ।' -सारुह ३.४६. [सं. चतुरंग; फा. शतरंज, सदरंज]

दाते शब्दकोश

सत्तोबा

सत्तोबा sattōbā & सत्तोपंत m (सत् &c.) Terms of irony or contempt for a pretender to truth or probity.

मोल्सवर्थ शब्दकोश

सटवाई or सटवी

सटवाई or सटवी saṭavāī or saṭavī f (षष्ठी through सट) A vulgar name of the goddess Durgá or Deví, and hence of a distemper incidental to infants considered as a visitation from her. 2 Applied as a term of reviling to a woman. सटवीचीं अक्षरें n pl सटवीचें लिहिणें n The letters or writing of सटवी constituting fate or destiny; answering to the "Web of the fates." सटवीनें लिहिलें तें टळणार नाहीं Destiny misses not and cannot be evaded.

मोल्सवर्थ शब्दकोश

सटवणें or सटावणें

सटवणें or सटावणें saṭavaṇē or ṃsaṭāvaṇēṃ v i (सट Name of Durgá or Deví.) To die of, or be affected with, a distemper occurring about the sixth day after birth, and viewed as a visitation from Deví--an infant.

मोल्सवर्थ शब्दकोश

सटवणी

सटवणी saṭavaṇī n (सट Sixth day, पाणी Water.) A term for the rain which falls on or about the sixth of the light half of मार्गशीर्ष.

मोल्सवर्थ शब्दकोश

सठ

स्त्री. सट पहा. [सं. षष्ठी]सठवणें, सठावणें, सठळणें, सठवाई, सठवी, सठवीपूजन-सटवणें, सटवाई वगैरे पहा.

दाते शब्दकोश

सठी

स्त्री. सट पहा. सठीसामाशीं-सटीसामाशी पहा.

दाते शब्दकोश

सव्वीस

वि. वीस अधिक सहा ही संख्या. [सं. षट् + विंशति]

दाते शब्दकोश

तेज      

न.       १. पंचमहाभूतांपैकी तिसरे भूत; सत् आणि ज्ञानाचे प्रतीक. २. प्रकाश; कांती; लकाकी; पाणी; झकझकी. ३. उष्णता; कडक सूर्यकिरण : ‘तोय तेज धूमु । ययां वायूसीं संगमु ।’ – ज्ञा १८·३०८. ४. वैभव; शोभा; उत्कर्ष. ५. गुण; उपयुक्तता; सत्त्व; प्रताप; परिणाम (औषध इ.चा); जोम; उत्साह. ६. वीर्य; पराक्रम : ‘तव तेजातें परा न सोसील ।’ – मोअश्व ३·१५. ७. तिखटपणा; तीक्ष्णता; झणझणीतपणा. ८. पराक्रम; सामर्थ्य. [सं. तेजस्] (वा.) तेज चढणे – एखाद्याचा दरारा बसणे; वरचढपणा दिसणे. तेज होणे – तयार, सिद्ध, सज्ज होणे. वि.      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तनसडी, तनसुडी      

स्त्री.       १. तणसडी. २. सोललेली अंबाडीची काडी; सणकाडी. (माण.) [सं. तृण + म. सट]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

त्रिशती

स्त्री. १ तीन शेकड्यांचा, तीनशेंचा समुदाय. २ देवीच्या प्रीत्यर्थ तीनशें ब्राह्मणांस पूजा करून जेवावयास घालण्याचा विधि. [सं. त्रि + शत = शंभर]

दाते शब्दकोश

तत्सद्ब्रह्मार्पणमस्तु

उद्गा. जें जें मी करतों तें ब्रह्मार्पण असो, अशा अर्थीं वाक्य. 'तत्सद्ब्रह्मार्पणमस्तु । असें किती वेळां मी वदलों' टिका १३१ [सं. तत् + सत् + ब्रह्म + अर्पणम् + अस्तु = असो]

दाते शब्दकोश

तत्सत्

न. १ तें (ब्रह्म) खरें (अविनाशी) आहे. २ (ल.) नाश; आहुति. (ओं तत्सत्ब्रह्मार्पणमस्तु होऊन मंत्रानें आहुति टाकतात यावरून) 'आठ पुत्रांचें पूर्ण तत्सत् होऊन माझा चंद्रगुप्त या पटलीपुत्राच्या सिंहासनावर...' -चंद्र ४१. [सं. तत् = तें + सत् = अस्तित्व असलेलें, सत्य]

दाते शब्दकोश

उत्तरावस्था

उत्तरावस्था uttarāvasthā f S The ultimate or final condition. Ex. विनाश ज्याची उ0 भेद सत कायी ॥ That is not true or real (is not पारमार्थिकभेद) which ends in ruin. (Finis coronat opus. Or, Dicique beatus Ante obitum nemo supremaque funera potest.)

मोल्सवर्थ शब्दकोश

वाव

पु. १ वायु; वारा; हवा. 'लागतां श्रीकृष्णाचा सुवावो । अवघा संसारचि होय वावो ।' -एभा १.२५१; १२.३०४. २ -पुस्त्री. जागा; अवकाश; रीघ. 'पुढें कनकवेत्रधारी धांवोन । वाव करिती चालावया ।' -ह ३३.११९. ३ सवड; अवसर; फुर- सत; योग्य वेळ. ४ (ल.) सबब; कारण; निमित्त; आधार; योग्य प्रसंग, स्थान, वेळ. ५ शिरकाव; प्रवेश; रिघाव. ६ -न. तण; कस्तण; निरुपयोगी गवत. [सं. वायु] वावझड-स्त्री. वाऱ्या- मुळें पावसाचे तुषार; शिंतोडे. [वाव + झड] वावझडी- स्त्री. १ वावझड; पावसाचे वाऱ्यानें आलेले तुषार, शिंतोडे. २ अशा तुषारामुळें येणारी हुडहुडी; गारठा; शिरशिरी. (क्रि॰ लागणें; भरणें; येणें.) [वाव + झडी]

दाते शब्दकोश

योग्य

(सं) वि० युक्त, जोगा, लायक. २ मान्य, सत्, चांगला.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

राष्ट्र

न. १ देश; राज्य; मंडल; प्रात. २ धार्मिक, सामा- जिक व राजकीय आपलेपणा भरलेला लोकसमुदाय; एका दिलाची व एकाच मनोभावनेनें प्रेरित झालेली देशांतील जनता. ३ जम- लेला समुदाय; पुष्कळ मंडळी; मेळा; वृंद. 'साकरेच्या भोंवतीं पहा कसें मुंग्यांचें राष्ट्र जमलें जाहे.' ४ (ना.) प्रस्थ; कारभार; वैभव. [सं.] सामाशब्द- ॰गीत-न. स्वदेश, स्वभाषा, स्वविक्रम, स्वधर्म किंवा संस्कृति यांचें निदर्शक गीत. ॰ध्वज- पु. सर्व राष्ट्रास मान्य अशा वर्ण व चिन्हांकित निशाण. राष्ट्रीय झेंडा, निशाण. ॰संघ-पु. सर्व देशांतील एकजुटीची संस्था; जगां- तील राष्ट्रांमध्यें समेटाचें कार्य कारणारी संस्था; (इं.) लीग ऑफ नेशन्स्. 'राष्टसंघाच्या बैठकींत हिंदी प्रतिनिधीचें नेतृत्व बिका- नेरच्या महाराजाकडे आलें.' -के १७.६.३०. [सं.] ॰सभा- स्त्री. सर्व भरतखंडाचें राजकरण करणारी एक सभा; कांग्रेस. 'राजकीय हक्क संपादण्यासाठीं आमच्या लोकांनीं अलीकडे जी राष्ट्रसभा स्थापिली आहे.' -आगर ३.६७. [सं.] राष्ट्रा(ष्ट)ण- न. १ झुंड; जमाव (दंग्यांतील); अस्ताव्यस्त मेळा. २ मोठा पसारा (अवाढव्य कामाचा, सामानाचा); मोठा राडा (जेव- णावळीनंतर अन्नाचा); अडगळीचा विखरडा (कामानंतर जिन्नसांचा, हत्यारांचा). (क्रि॰ घालणें; पडणें). [सं. राष्ट्र] राष्ट्रि(ष्टी)य-वि. राज्यासंबंधीं; राष्ट्रासंबंधीं; प्रांतासंबंधीं; राष्ट्रच्या हिताचें. [सं. राष्ट्र] राष्ट्रीय अस्तित्व-न. स्वतंत्र वृत्तीचें जीवन; स्वत:चें राष्ट्र स्वत: चालविण्याची पात्रता. 'हिंदु- स्तानच्या लोकांनीं राष्ट्रीय अस्तित्व कधींच संपादूं नये...' -टि ३.२. राष्ट्रीयत्व-न. स्वधर्म, स्वभाषा, स्वदेश व पूर्वज यांच्याविषयीं आदर, अभिमान. 'स्वधर्म, स्वभाषा, स्वदेशा- भिमान, पूर्वेतिहासस्मरण हीं राष्ट्रीयपणाचीं लक्षणें होत.' -टि २.२३७. [सं.] राष्ट्रीय शाळा-स्त्री. राष्ट्रीय शिक्षण देणारी शाळा. राष्ट्रीय शिक्षण-न. ज्या शिक्षणानें राष्ट्राची इभ्रत व संपत्ति वाढून त्याची इतरांवर छाप बसेल असें राष्ट्र बनविण्या- सारखें शिक्षण. राष्ट्रीय सभा-स्त्री. जनतेच्या प्रतिनिधींची राजकारणविषयक सभा; काँग्रेस; राष्ट्रसभापहा. [सं.]

दाते शब्दकोश

बळ

१ जोर; समर्थ; शक्ति; क्षमता. बल पहा. २ सैन्य 'पळती बळें समस्तें' -मोकर्ण २.१. [सं. बल] म्ह॰ जिकडे बळ तिकडे न्याय. ॰करणें-क्रि. १ जोरावर येणें; जुलूम, जबरीचे उपाय योजणें. २ सर्व शक्ति लावणें, लागू करणें. ॰धरणें- क्रि. नेट धरणें; दम धरणें; शक्ति मिळविणें. ॰बांधणें-क्रि. १ नेट धरणें. २ कमर बांधणें; तोंड देण्यास, यत्न करण्यास तयार होणें; शक्ति कमविणें बळाचा-वि. १ बळकट. २ दुसर्‍याचा जोर असणारें (बुद्धिबळ) बळास येणें-क्रि. जुलूम करण्यास आरंभ करणें; हमरीतुमरीवर येणें. सामाशब्द- ॰कट-वि. १ मजबूत; दृढ. २ जोराचा; झपा- ट्याचा (पाऊस). ३ भयंकर; घोर. 'धावे कुरुपति तेव्हां राया ! संग्राम होय बळकट कीं ।' -मोशल्य ३.११. -क्रिवि. १ झपा- ट्यानें; पूर्णपणें; अतिशय. 'मी बळकट जेवलों.' २ घट्ट; पक्का. 'हा सांधा बळकट बसला.' [सं. बळ + का. कट्टु] ॰कटी-स्त्री. १ सामर्थ्य; शक्ति. २ दृढता; जोर; टिकाऊपणा; मजबुती; सहन, प्रतिबंध करण्याची शक्ति (मनुष्याची, वस्तूंची). ॰कटून-क्रिवि. घट्टपणें; गच्च; आवळून. (क्रि॰ धरणें; बांधणें). ॰कुबळ-न. बलकुबल पहा. ॰गंड-वि. दांडगा. ॰गाढा-पु. बलिष्ठ; बलाढ्य. 'एक शत बळगाढे ।' -मुआदि २६.९९. ॰गें- न. (गो.) पाठबळ; शक्ति. ॰जोरी-जबरी-स्त्री. १ बलात्कार २ जुलूम; दांडगाई. ३ (कायदा) कोणा मनुष्यास गति येण्यास, बदलण्यास किंवा बंद होण्यास अंगबळानें कारण होणें; (इं.) फोर्स. ॰ताड-नु. नर जातीचें ताडाचें झाड. ॰त्कार-पु. (प्र.) बलात्कार. 'बलात्कार राया करावा सितेला ।' -राक १.१५. [सं. बलात्कार] ॰दर्प-पु. सामर्थ्याचा, शक्तीचा गर्व. 'येका सुटला चलकंप । गेला बळदर्प गळोनि ।' [सं.] ॰पोंची-स्त्री. हाताची शक्ति. ॰बंड-वि. दांडगा. [प्रा.] ॰भद्र-भद्या, बळि(ळी) भद्र-पु. १ कृष्णाचा वडील भाऊ; बळिराम. २ (ल.) मजबूत मनुष्य. ३ शिवाचा एक गण. 'केली गर्जना बळिभद्रें ।' -एरुस्व ५.३९. -वि. (ल.) कपाळकरंटा; कुलक्षणी. 'स्वप्नीचा अनुग्रह गुरु केला शुद्र । तोही बळिभद्र ज्ञानहीन ।' -ब ४३. [सं. बलभद्र] ॰मस्त-वि. शरीरबळाच्या गर्वानें फुगलेला. ॰मस्ती-स्त्री. शक्तीचा गर्व; मद. ॰मोड-पुस्त्री. (प्राणी, वनस्पति, रोग इ॰ इ॰ कांच्या) शक्तीचा र्‍हास. 'चांगलें झाड वाढत होतें पण गुरानें तोंड लावल्यापासून त्याची बळमोड झाली.' -वि. कमजोर झालेला; र्‍हास झालेला. ॰लिंक-स्त्री. (कों.) अशक्तता व आजार. 'ऐकु मनुक्शु एकुणचाळीस वरुसे वेळी बळलिके पडुनु रेंगत होता.' -ख्रिपु. २.२७. ॰वणें-क्रि. बळकावणें. [प्रा.] ॰वंत-वान-वि. बळकट; बलाढ्य; शक्तिमान; समर्थ. [सं.] ॰वत्तर-वि. बलवत्तर पहा. बलाढ्य, बळात्कार, बळाबळ, बळिष्ठ-बलाढ्य इ॰ पहा. बळाधिक-वि. (गो.) बळवंत; बळिष्ठ. बळार्थ-पु. पराक्रम; बळाचें काम. 'वयसा तरी येतुले- वरी । एर्‍हवीं बळाचा बळार्थ करी ।' -ज्ञा ६.२६१. बळावणें- अक्रि. १ बळकट, जोरदार होत जाणें; जोरानें, झपाट्यानें, जोमानें, अतिशयानें वाढत जाणें. २ -सक्रि. बळकट करणें. 'दाटुनि कीं हो ! बळाविला बंध ।' -मोशल्य ३.१७. बळका- वणें-अक्रि. शक्तीनें, बळानें वाढणें. बळावणें पहा. बळकावि- (व)णें, बळकविणें-सक्रि. बलात्कारानें, अन्यायानें, अन्यायानें ताबा घेणें; उपटनें; अन्यायानें वहिवाटणें; दाबून ठेवणें. [बळ] बळावळ- स्त्री. विपुलता; जोर; शक्ति (माणसें, पैसा, सैन्य इ॰ ची).

दाते शब्दकोश

ख्याति-ती

स्त्री. १ प्रसिद्धि; कीर्तिं. 'हांसे आले ख्याती नगरीं असि विभु करूनि आले ख्याति ।' -मोकृष्णपू ४३.२०. २ जगजाहीरपणा; महशूरता; लोकप्रसिद्धि; डंका; दांडोरा. 'त्रिकूटाचळीं ख्याति ऊदंड जाली ।' -राक भाग १ श्लोक ४६. ३ पराक्रम; मर्दुमकी. 'तेव्हां ख्याति प्रत्याहारें केली.' -ज्ञा ९. २१५. 'ख्याति केली विष्णुदासीं ।' -तुगा ३५५. ४ गोष्ट; हकीकत. ५ (वेदांत) प्रतीति; कथनरूप व्यवहार. पांच ख्याती आहेत. पहिली असत् ख्याती, ही शून्यवादी यांची. जसें-असत् (निःस्वरूप) सर्पाची रज्जूवर प्रतीति व कथन; दुसरी आत्मख्याति. ही क्षणिक विज्ञानवादी यांची. जसें-क्षणिक बुद्धिरूप आत्म्याची सर्परूपानें प्रतीति व कथन; तिसरी अन्यथा ख्याति. ही नया- यिकांची. जसें-दूर देशांत स्थित सर्पाची दोषाच्या बलानें रज्जु- देशावर प्रतीति व कथन, अथवा रज्जुरूप ज्ञेयाचें सर्परूपानें ज्ञान; चौथी अख्यातिख्याति. ही सांख्य प्रभाकर मताची. जसें 'हा सर्प आहे' येथें 'हा' अंश तर रज्जूच्या इदंपणाचें प्रत्यक्ष ज्ञान आहे व 'सर्प' हे पूर्वीं पाहिलेल्या सर्पाचें स्मृतिज्ञान आहे, हीं दोन ज्ञानें आहेत. त्यांच्या दोषाच्या बलानें अख्याति म्हणजे अविवेव (भेदप्रतीतीचा अभाव) होतो; पांचवी अनिर्वचनीय ख्याति. ही वेदांत्यांची. वेदांत व सिद्धांतांत रज्जूवर तिच्या अविद्येनें अनिर्वचनीय (सत् असताहुन विलक्षण) सर्प व त्याचें ज्ञान उपजतें त्यांची ख्याति म्हणजे प्रतीति व कथन होतें. 'आख्याति अन्यथाख्याती । शून्यख्याती सत्ख्याती । अनि- र्वचनीय जे ख्याती । तो वादू निश्चिती मी उद्धवा ।' -एभा १६.२०७. [सं.] ॰लावणें-पराक्रम करणें, करून दाखविणें. 'चैद्यादिक पक्षपाती । त्यासीरणीं लावीन ख्याती ।' -एरुस्व ५.४.

दाते शब्दकोश

मेण

न. १ मधाच्या पोळ्यांतून निघणारा चिकट, घट्ट, चरबीसारखा पदार्थ; मधूच्छिष्ट. २ जनावराच्या शरीरांतून किंवा वनस्पतीपासून काढण्यांत येणारा वरील सारखा पदार्थ; तेलाची बेरी. ३ (कु.) मासे मारण्याकरितां केलेलें विषारी औषध. -वि. (ल.) मऊ व चांगला शिजलेला पदार्थ (तांदूळ डाळ, इ॰). [फा. मोम्] (वाप्र.) ॰काढणें-(ल.) खूप चोपणें, झोडणें, मारणें. ॰घालणें-(कु.) मासे धरण्यासाठीं त्रिफळे, गेळफळ, निवळकांडें इ॰ कुटून पाण्यांत घालणें. ॰स्वस्त होणें-(मनुष्य) लठ्ठ व गुलगुलीत होणें. ॰होणें-१ नरमावून सौम्य, शांत होणें. २ शिजून मेणाप्रमाणें होणें (भात, डाळ इ॰). मेणाची चोटली कढयता-ओढून चंद्रबळ आणणें. मेण(णा)वणें-विणें-१ मेण, तेलाच्या तळची बेरी, तेलांत भिजवलेली चिंध्यांची राख इ॰ नीं सूप, टोपलीं इ॰ मढविणें; त्यांस लेप देणें. २ (ल.) गोंडस, लठ्ठ बनणें. सामाशब्द. ॰कट-न. १ (समई, तेलातुपाचें भांडें यांस चिक- टून असणारी) तेलाची घाण, मळ, चिकटा, बेरी. -वि. १ घाण तेलानें, तुपानें माखलेला; मेणचट; तेलकट; ओशट (वास). [मेण + कट] मेणक(कु)टणें-अक्रि. मेणकट लागणें; घाण तेला- तुपानें माखलें जाणें (भांडें). ॰कापड-न. मेण लावलेलें एक प्रकारचें कापड. ॰गट, मेण-कुटला-वि. अतिशय शिजविल्यानें मऊ व मेणासारखा झालेला (भात). [मेण] ॰गट, ॰कुटलें-न. जास्त शिजविल्यानें बिघडलेला भात. ॰गटी-स्त्री. जास्त शिजवि लेल्या भाताचा मऊपणा व मेणचटपणा. [मेणगट] ॰गुट होणें- अक्रि. एकजीव होणें; मिसळणें. ॰गोळी-स्त्री. १ मेणाची गोळी. २ (ल.) मऊ, नरम, सौम्य मनुष्य. ॰घुणा-ण्या-वि. सौम्य, शांत, गंभीर मुद्रेचा पण मनाचा कुढा, लबाड मनुष्य; न बोलणारा, आंतल्या गांठीचा इसम. ॰चट-वि. १ मेणचट; कण्या न पडलेलें (तूप). २ मऊ व मेणासारखा शिजलेला (भात). ३ गिच्च व पचपचीत (शिजविण्यांत बिघडलेलें अन्न). ४ मंद; ढील; गयाळ; सुस्त; निर्जीव; उत्साह, धैर्य, पाणी नसणारा. ५ कृपण; कंजूष (मेणचाटणारा). ॰चोट-चोट्या-वि. १ नपुसंक; निर्बल; नामर्द. २ जड; रेंगाळणारा; मेंग्या मारवाडी. ३ भोळ- सट; भोळानाथ. ॰तेल-न. (गो.) तेलांत शिजवलेलें मेण; (स्त्रिया कुंकु लावतांना हें मेणतेल कपाळास लावून त्यावर पिंजर लावतात). ॰बत्ती-स्त्री. मेणानें मढविलेली वात; मेणाचा दिवा. [फा. मोम, मूम + बत्ती] ॰बाजार-पु. जररोज दुकानासाठीं पालें द्यावयाचीं व तीं रात्रीं काढावयाचीं अशीं दुकानें असलेला बाजार; जुना बाजार. हा मुख्य रस्त्यांत नेहमीच्या दुकानाशीं समांतर ओळींत भरवितात. आयते तयार केलेले कपडे व जुनेपाने जिन्नस यांत विक्रीस मांडतात. ॰बाजारी-पु. १ मेणबाजारांतील दुकानदार, माल विकणारा. २ (ल.) पत नसलेला, बेअब्रूचा माणूस. ॰बावली-स्त्री. १ (ल.) लहान, सुबक, नेटकी व चपल स्त्री. २ गरीब, दुसऱ्याच्या तंत्रानें चालणारी नवरी, बायको. ॰वला-वि. (प्र.) मेणोला; मेणा पहा. ॰वात-स्त्री. मेणबत्ती पहा. मेण्या-ण्या-वि. मेण, तेलाचा-तुपाचा गाळ, जाळलेल्या चिंध्या, शेण्यांची राख इ॰ कांच्या मिश्रणानें लेपलेला (हारा, टोपलें, सूप, पाटी, इ॰). [मेण] मेणाचा-वि. १ मऊ; अशक्त; कम- कुवत. २ नरम; निर्जीव. ३ अयोग्य; अक्षम. ४ धिक्कार, तिरस्कार दाखविण्याकरितां नेहमीं योजतात. उदा॰ तूं कोण मेणाचा मला सांगायला ? ॰मेणाळ-स्त्री. (जरतारी धंदा) मेण असलेली, मेणयुक्त तार. मेणी-स्त्री. १ तेलकट काजळ; मस; घाण. २ केसांच्या वळलेल्या जटा. ३ (ठाणें) काकडीची एक जात. -कृषि ४८२. मेणी मोडशी-स्त्री. जुनाट, फार दिवसांची मोडशी. [मेण्या + मोडशी] मेणें-न. १ (कों.) जिच्या चिकानें मासे आंधळे होऊन सहज सांपडतात अशी नदी इ॰च्या प्रवाहांत टाकतात ती एक वनस्पति; कांड्याहुरा. २ माशांना मारण्याकरितां, गुंगी आणण्याकरितां नदींत टाकलेटा चिकचिकीत द्रव्याचा पदार्थ. मेणे डोळे-पुअव. डोळे आले असतां त्यांतून अतिशय पू वाहणारे, फार बरबरणारे डोळे; बरबरीत, पुवाचे डोळे; शेणे डोळे; याच्या उलट काटे डोळे. मेणें वावर-न. (रब्बीच्या पेरणीकरितां) नांगरून, खत घालून, राखून ठेवलेलें वावर. मेणोला, मेणोल-वि. मेणा पहा. मेण्या-वि. १ मऊ; दुबळा; नामर्द; गरीब. २ मंद; धारिष्ट नसलेला; निर्जीव. [मेण] मेण्यामारवाडी-पु. दिसण्यांत भोळा पण कावेबाज इसम; सौम्य मुद्रेचा पण शठ मनुष्य. मेण्या साप- पु. १ सापाची एक जात. २ (ल.) गुप्तपणें आकस धरून नाश करणारा मनुष्य.

दाते शब्दकोश

घाम

पु. ऊन, ज्वर, उष्णता, श्रम इ॰ कांनीं अंगाच्या त्वचेच्या छिद्रांतून गळणारें पाणी; घर्म; स्वेद; स्वेदोदक. २ ओलें लांकूड जळत असतांना त्यांतून बाहेर येणारा द्रव. ३ विस्तवावर पाणी असलेलें भाडें ठेवून त्यावर झांकण ठेविलें असतां झांकणाच्या आंतील बाजूस जमणारे (वाफेच्या) पाण्याचे) थेंब. ४ कठोर हृदयाला, पाषाणहृदयाला फुटलेला पाझर; दया; द्रव. [सं. घर्म; प्रा. घम्म; तुल॰ गु. घाम; बं. घाम; फ्रें. जि. खम = सूर्य, ऊन] (वाप्र.) ॰सुटणें-बावरणें; भीतीनें अंगास दरदरून घाम येणें. 'राघोबादादांना हें भाषण ऐकतांच घाम सुटला.; -इंप ६७. सामाशब्द- ॰गंडा-पु. (ना.) उष्णतेमुळें उत्पन्न होणारी पुळी. [सं. घर्म; म. घाम + सं. गड = फोड, पुळी] घाम(मा)घूम-स्त्री. १ धापा टाकण्याची, गुदमरण्याची, श्रमानें शीण आल्याची, उकडण्याची अवस्था; (श्रमानें, उन्हानें भीतीनें) घामानें डबडबण्याची स्थिति; अंगांतून घामाच्या धारा निघून जीव कासावीस झालेली अवस्था. -वि. (श्रमानें, भीतीनें, उन्हानें) घाम सुटलेलें; घामानें डबडबलेलें (अंग, मनुष्य); श्रमानें थकलेला; धापा टाकीत असलेला; सुस्कारे टाकीत असलेला. [घाम + घुमणें] घामट-ड-वि. ओंगळ; अस्वच्छ; घाणेरडा; गैदी; ज्याच्या अंगाला नेहमीं घाम येऊन घाण येते असा; मलिन. घामटघाण, घामठाण, घामष्टाण, घाम- साण-स्त्री. घामाची घाण, दुर्गंध. [घाम + घाण] घामटा-पु. (कों.) १ अति श्रमामुळें आलेला घाम; निढळाचा घाम. (क्रि॰ काढणें; निघणें). 'चौघांचें काम त्याच्यावर पडल्यामुळें त्याचा घामटा निघाला.' २ अतिशय श्रमाची अवस्था; पिठ्ठा पडणें. [घाम] घामाझोकळ-वि (व.) घामानें डबडबलेला; घामा- घूम. (क्रि॰ होणें). 'पन्नास दंड व पन्नास बैठका मारल्यानें तो घामाझोकळ झाला.' घामावणें, घामे(मै)जणें, घामेंणें- अक्रि. १ (राजा.) श्रमादिकांमुळें शरीर घामानें युक्त होणें. 'ऐसा मीचि एक जगीं । जया नाना कर्मोची वज्रांगी । तेणें वियोग दुःखाचिया आगी । तनु घामैजेना ।। ' -ज्ञाप्र ११३४. 'धाके धाकें घामेजत । दडी देत गुप्तत्वें । ' -एभा १०.८. २ श्रमी होणें; श्रमानें थकणें, शिणणें. 'नाना चराचरीं भूतीं । दाटणी नव्हे क्षिती । तैसा नाना द्वंद्वीं प्राप्ती । घामेजेना । ' -ज्ञा १३.३४८. ३ (ल.) द्रवणें; कींव, दया येणें; हृदयास पाझर फुटणें. 'चित्तीं अंध म्हणे सुत शत वधितां, लेशही न घामेला ।' -मोआश्रम १.२२. [घाम] घामेला-ल-वि. घामानें डबडबलेला; घाम आलेला. 'ये उठुनिहि घमेला, जनभावी वांचला जरि मघां मेला ।' -मोकृष्ण ३६.१०.

दाते शब्दकोश

अमृत

न. १ देवलोकींचें पेय (यानें वृद्धावस्था किंवा मृत्यु येत नाहीं); समुद्रमंथनांत निघालेल्या चौदा रत्नांपैकीं १४ वें; सुधा; पीयूष; सुधारस. 'जोडे अमृताची सुरसरी । तैं प्राणांतें अमर करी ।' -ज्ञा १७.२१९. २ दूध आटवून त्यांत खडीसाखर, जायफळ, वेलदोडे वगेरै पदार्थ घालून रात्रीं थंडींत उघड्यावर ठेवून दुसऱ्या दिवशीं प्रातःकाळीं तें दूध घुसळून त्यावर फेंस येतो तो. ३ मरणापासून मुक्तता, सुटका; मोक्ष. 'जिणें गरळ पाजिलें अमृत पाजिलें तीस तां ।' -केका ९१. ४ उदक; (ल.) देवाचें चरणतीर्थ. ५ ब्रह्म. 'अमृत म्हणजे अविनाशी ब्रह्म हा अर्थ उघड असून' -गीर ३५८. ६ दूध. 'सर्प पोसूनिया दुधाचाहि नाश । केलें थीता विष अमृताचें ।' -तुगा ३०७३. 'अमृता चवी यावलागून । साकर घालून पहावी ।' 'अमृतें तरिच मरिजे । जरी विखेंसीं सेविजे ।' -ज्ञा २.२२४. ७ पंचमहायज्ञ करून जें अन्न शिल्लक राहतें तें किंवा यज्ञशेष अन्न. -गीर २८८.८ (उत्तरहिंदुस्थान) पेरू; जांब. [तुल॰ फा. अमरूद] ९ शीख पंथांतील एक संस्कार-एका मोठ्या भांड्यांत पाण व साखर घालून तें मंत्र म्हणत किरपाणानें ढवळतात व मग तें प्राशन करावयास देतात. सामाशब्द-ज्ञानामृत, गीतामृत, अधरामृत. म्ह॰ १ अमृताचें जेवण मुताचें आंचवण = भव्य व चांगला आरंभ केला असून त्याचा शेवट क्षुद्रपणानें किंवा कमीपणानें झाला असतां योजितात. २ पासला पाडून अमृत पाजणें = बळजबरीनें एखाद्यास त्याच्या कल्या- णाच्या किंवा हिताच्या मार्गास लावणें. ३ अमृत देणाऱ्यास (तें चाख- ण्यास) जीभ दे असें सांगणें लागत नाहीं. 'अमृतप्रदा म्हणावें न लगे रसना मुखांत दे खाया.' -मोआश्रम ५.११. ४ अमृत सेवन करुनहि मरण येतें = एकाद्याच्या दुदैंवानें त्याला अमृत मिळालें तरी मृत्यु (हानि) येतो. 'अमृत सेवितांचि पावला मृत्य राहो । (राहू).' -दा १.१.२५. [सं. अमृत]. -वि. अमर; मरणाधीन नसलेला; मृत्युपासून सुटका झालेला. [सं.] ॰कर-पु. चंद्र. [सं.] ॰कळा- स्त्री. १ गाल; गालफाड. २ घशांतल्या गांठी (टॉन्सिल) 'येकांच्या बैसल्या अमृतकळा. -दा ३.५.४. म्ह॰ अमृतकळा बसणें = मृत्यूचा काळ जवळ येणें. 'अ॰ बसल्या आतां वाचणें कठिण.' ३ 'चंद्राची सत- रावी कळा' -ज्ञा १२.७. ॰कुंड-न. स्वर्गांतील अमृत भरलेलें पात्र- भांडें. ॰कुंडली-स्त्री. वाजविण्याचें एक चर्मवाद्य. ॰घटका, घडी- वेळ पहा. ॰घुटका-घुटिका-पु. १ अमृताचा घोट. २ मजे- दार गोष्टींचा चुटका. ३ छोटीशी व सुंदर गाण्याची चीज. ॰झोप-स्त्री. पहाटेची साखरझोंप. ॰धारा स्त्री. एक वृत्त. ॰ध्वनि-पु. एक छंद, वृत्त. ॰पाक-पु. रव्याच्या एका प्रकारच्या वड्या. ॰पान-प्राशन- न. अमृत पिणें; अमृतसेवन; अमृतघुटका; (ल.) विष पिणें-खाणें 'खुरशेट मोदी यानें अमृतप्राशन केलें.' ॰पी-प्राशी-वि. अमृत पिणारा. ॰फळ-न. १ जें फळ खाल्लें असतां मनुष्य अमर होतो तें. एक काल्पनिक फळ. राजा भर्तृहरीला असें फळ मिळालें होतें. २ पेरू, आंबा, द्राक्ष, बेदाणा, खिसमिस वगैरे. ३ एक पक्कान्न;मोदक. 'कीं देवाचिये सन्निधी अमृतफळें । पावतें जाली.' -ऋ ८२. 'निंबें नारिंगें नारेळे । अपूप लाडू अमृतफळें.' -एरुस्व ६.८६. 'तिळवे लाडू अमृतफळें' -वसा २६. ॰मंथन-न. अमृतासाठीं देव व दैत्य यांनीं केलेलें समुद्राचें मंथन, घुसळणें. 'एऱ्हवीं अमृतमंथना । सारिखें होईल अर्जुना ।' -ज्ञा १८.१४८२. ॰महाल-स्त्री. म्हैसूर राज्यांतील या नांवाच्या महालांतील बैलांची एक जात. 'खिलारी, अ॰ व कृष्णा- कांठ या जातीचे बैल तयार करणें.' -के १८.७.३१. ॰वर्षाव पु. अमृताचा पाऊस, त्यावरून चांगल्या व संतोषकारक गोष्टींचा किंवा पदार्थांचा वर्षाव किंवा देणगी; समृद्धि. ॰वल्ली-स्त्री. १ जिच्यामुळें अमरत्व प्राप्त होतें अशी एक काल्पनिक वेल. २ (ल.) भांग. ३ अमरवेल; गुळवेल. ॰वेळ-स्त्री. १ तीस घटकांपैकीं एक शुभ काल. एकंदर दिनमानाचे व रात्रिमानाचे ८ भाग धरून मुख्यतः आठ वेळा कल्पिल्या आहेत. ३ ।।। घटका हें यांचें मध्यम प्रमाण आहे. दिन- मानाप्रमाणें त्यांचा काल कमीजास्त होतो (वेळ पहा). 'अमृत- वेळ प्रसंगज्ञान । कैसें तें ऐकावें ।' -दा ४.१.२०. २ करमणूक; विलास व उपभोग यांची योग्य वेळ. ३ औषध देण्याची योग्य वेळ (सकाळ). ४ शांत, खुषींत असण्याचा-स्नेहभावाचा काल. ॰संजीवनी-स्त्री. १ मृतास जीवंत करणारी विद्या; मृतसंजीवनीचा पर्याय. २ अमृत. ३ (ल.) अद्वैतबोधरूपी अमृत. 'ते नमस्करूं अमृत संजीवनी । श्री देववाणी ।' -ऋ १.४ चंद्राची अमृत झिरपणारी १७ वी कळा. 'सतरावियेचें स्तन्य देसी ।' -ज्ञा १२.७. -वि. मृतास सजीव करणारी. 'अमृतसंजीवनी विजविली खाई । अंगें तये ठायीं हार- पलीं ।' -तुगा ३७८९. ॰सिध्दियोग-पु.रविवारी हस्त, सोमवारीं श्रवण किंवा मृग, मंगळवारीं अश्विनी, बुधवारीं अनुराधा, गुरुवारीं पुष्य, शुक्रवारीं रेवती, शनिवारी रोहिणी याप्रमाणें वार व नक्षत्र यांचा योग. हा कोणत्याहि कार्यास शुभ असतो. [सं.]

दाते शब्दकोश

जोड

पुस्त्री. १ दुक्कल; जोडी; जोडा; युग्म (एका जातीच्या दोन, दोन, एकाचवेळीं चालणार्‍या, असणार्‍या वस्तु). 'पाटल्या जोड, कांकणें जोड, इ॰' २ जोडी; संघ; संच; ताफा (सोंगट्या खेळणारांचा, पूजापात्रांचा, खेळणारांचा, वाद्याचा, वाजविणारांची); डाव (गंजिफाचा); संच (कपडे, धोतर व अंग- वस्त्र यांचा). सामान्यतः सेट. ३ ठिगळ; गावडी; सांचा लावलेला तुकडा; संयोग (वस्त्र, लांकूड, धातु वगैरेस) ४ सूर लावण्यासाठीं सा, रि, ग, म, प, ध, नी हे सूर खालीं-वर करणें; आलाप घेणें. ५ (-स्त्री.) (अक्षरशः व ल॰) सांठा; संचय; संग्रह मिळविलेलें द्रव्य. 'आपल्या सार्‍या हयातीची जोड आपण भोळसरपणानें घाल- वून बसलों.' ६ मिळकत; लाभ; किफायत. 'जोड जोडिली मनु- ष्यदेहा ऐसी ।' -तुगा ७१२. 'व्यर्थ भांडतां ह्यांत जोड काय !' ७ जोडलेला या अर्थी हा शब्द फळांच्या नांवांच्या मागें जोडतात. जसें-जोड-आंबा-पेरू-केळ इ॰. ८ दुहेरी या अर्थानें जोड शब्दाचे समास होतात. जसें- जोड-कडी-कांठ-खांब -तुळई-पदर-भिंत इ॰' ९ गुंतवण; सांधा; संबंध; सांगड; गुंत- वणूक (पशूंची, माणसांची); जोडपणा; सांखळी. (क्रि॰ घालणें). १० विण्याच्या मधल्या दोन तारा; सतारीच्या मधल्या दोन (ज्या षड्ज स्वरांत मिळविलेल्या असतात त्या) तारा. ११ मैत्री; सलगी; जिव्हाळा. १२ बरोबर; साम्य; साथ. 'धर्मासि म्हणे बागा साधो जोडा नसेचिया या दिवसा ।' -मोविराट ७.१६. 'गुंगा व गामा यांची जोड अगदीं अप्रतिम होती.' १३ (बांधकाम) पुस्ती; नवीन गोष्टींची किंवा कांहीं कामांची वाढ. १४ (ओतकाम) दोन पिश- व्यांचा दोन हातांनीं फुंकला जाणारा भाता. १५ (कुस्ती) एक डाव. जोडीदाराचा एक हात त्यांच्या दोन्ही पायांतून धरून आपल्या दुसरा हात जोडोदाराच्या मानेवर ठेवून जोडीदाराची मान खालीं दाबून पायांतून जोडीदाराचा धरलेला हात वर उचलून त्याला चीत करणें [सं. युज्-योजय्; प्रा. जोड; सं. जुड् = बांधणें] (वाप्र.) ॰करणें-साधणें; मिळविणें. 'पुण्याची करावया जोड; जोव हा सज्जला' -विक ६९. (पायाची). ॰करणें-कृपा संपादणें.' मी आपले पायाची जोड केली आहे.' ॰देणें-लाभ, फायदा देणें. 'संतपदाची जोड । दे रे हरी ।' -अमृत १०८. ३४. ॰नसणें-बरोबरी न होणें; उपमा न मिळणें. सामाशब्द- ॰अक्षर-न. (जोडाक्षर) जोडलेलें अक्षर. उदा॰ क्र, म्ह, स्त इ॰. ॰करीण-वि. जोडीची वस्तु. 'अटकेची जोडकरीण तोफ फत्तेलष्करा; संपादक करणारा; कमावता; मिळविता. 'जोडता पुत्र देखोनी गुनी । जनक जैसा सुखावे ।' -मुआदि ३०.२२४. 'कांतेला पति तोचि प्रीय हृदयीं जो कां असे जोडका' -सदाशिव कविकृत. उमाविलास ५ जोडका-जोडता-पूत-राम-रावजी- पु. १ कुटुंबातील पैसा कमविणारा मुलगा. २ जातींतील कमा- वता पुरुष (अक्षरशः व निंदार्थी) ३ (मराठी राज्यांत) लोकांच्या विरुद्ध बातमी मिळविण्यासाठीं व त्यांवरून दंड करून पैसा जमविण्यासाठीं प्रसंग आणून देणारा, सरकारनें ठेवलेला नीच माणूस; लोकांची अंडींपिलीं सरकारास कळविणारा पाजी माणूस. ॰काम-न. १ निरनिराळे तयार केलेले भाग, जमविलेलें सामान जोडून केलेलें काम. २ जोडधंदा; मुख्य कामाखेरीज दुसरें काम. ॰कार-वि. (गो.) जोडका. ॰गहूं-पु. खपल्या गहूं. ॰गिरी- गीर-वि. १ तुकडा जोडलेला; तुकडा जोडून केलेला. 'या गाड्याचा आंस जोडगिरी आहे.' २ दुहेरी; दोन वस्तू ज्यांत आहे असा; जोडाचा (खांब, किल्लाच्या भिंती, कौलांचे थर). 'घरास जोडगिरी खांब दिले असतां चांगली बळकटी येते.' -स्त्री. १ साथ; मदत (गवई, हरिदास यांस) 'हा पोर्‍या त्या हरि- दासाचे मागें उभा राहून जोडणारी चांगली करितो.' २ दुहेरीपणा; दोन पदार्थाचें एकत्रीकरण. ३ जोडलेली स्थिति; तुकड्यांची बना- वणी. ॰गोळी-स्त्री. १ दोन गोळ्यांचा बार. २ एका बंदुकींत एका वेळीं दोन गोळ्या. ३ (ल.) दोहीकडून खतपट. ४ (ल.) जोडी; युग्म. 'नवरदेवांची जोडगोळी' ॰चौकट-स्त्री. दुहेरी चौकट; यांच्या सांचा (विशेषतः दाराचा), दोन लांकडें बह्यांनां जोडून केलेला असतो. जोडजूं-(पुणें) शेलाटी; (नगर) शिळवट, जडी; (सातारा) शेवळ; (खानदेश) जोडणी जुवडी. जोडणी-स्त्री. जोड; सांधा जोडणें; (जोडणें क्रियापदांचे धातुसाधित). जोडणें-सक्रि. १ सांधणें; जुडविणें; शेवटास संयोग करणें; एकत्र करणें (दोन तुकडे). २ मिळविणें, अधिक लावणें; जोड देणें (लांबविण्यासाठीं); एकावर एक किंवा एकापुढें एक ठेवणें (दुसरा थर, अस्तर, लांबीचा तुकडा). 'सख- लातीस आंतून पासोडी जोडली तेव्हां थंडी राहीली.' ३ जवळ- जवळ, लांबीच्या पुढें, बाजूस शेजारीं ठेवणें. दोनी काठ्या जोडून पहा म्हणजे कोणती लांब तें कळेल. ४ जूंपणें; भानेवर जूं ठेवणें किंवा खोगीर घालणें (गुरें, घोडे यांच्या). ५ (ल.) जागेवर गुंतविणें; कामाला लावणें, चिकटविणें. 'पोराला त्या चाकरीवर जोडून द्या.' ६ जमविणें; गोळाकरणें; सांचविणें. 'संसारसंबंधे परमार्थ जोडे । ऐसें केवीं घडे जाणतें हो ।' ७ पूर्ण करणें; तडीस नेणें; घडवून आणणें. 'माझें एवढें, लग्न जोडून द्या.' ८ मिळविणें; संपादणें; स्वतःसाठीं कायम करणें, दृढ करणें (कृपा, स्नेह, मैत्री, आश्रम, धंदा इ॰) 'आम्हीं जें जें जोडावें । तें समस्तीं इहीं भोगवें ।' -ज्ञा १.२१७. ९ युक्ति काढणें; तजवीज करणें; उपाय करणें. -अक्रि. १ तांब्यात येणें; मिळणें. 'कीं रोग्यास रसायन निर्मळ । अकस्मात जोडलें ।' २ (क्व.) भरभराट होणें; भरमसाट मिळणें; लग्गा साधणें. [सं. जुड् = बांधणें] म्ह॰ अधव्याचा जोडला आणि पिढीचा मोडला. जोडता-वि. मिळविता; संपादन करणारा. जोडका पहा. ॰दंड-पु. (व्यायाम) कसरत करण्यासाठीं दोन आडवीं लांकडें बसविलेली योजना. (इं.) पॅरलल बार. ॰नळी-स्त्री. दुहेरी नळी (बंदुकीची). ॰नाल-पु. तालीमखान्यांतील एक वस्तु. जोडप-न. (राजा.) जोड; सांधा; जोडणें; जुडविणें. ॰पट्टी- स्त्री. (लोखंडी पाणरहाट) पोहोरे एकमेकांशी अडकवून माळ करण्या- साठीं प्रत्येक पोहर्‍यास दोन बाजूंस बसविलेले लोखंडी कांबेचे तुकडे. ॰पाडे-क्रिवि. द्वंद्वानें; भेदबुद्धीनें. 'विधिनिषेध जोडपांडें । जेथ विशेष कर्म वाढे ।' -एभा ७६७. ॰पाहरा-पु. दोन शिपायांचा पाहरा; जोडीचा पाहरा. जोडपी-वि. जोडीदार; सोबती; बरोबरीचा; जोडीचा; जुळणारा; (सजीव, निर्जीव वस्तूं मध्यें). 'तुला कोण पाहिजे तो जोडपी पाहा.' -स्त्री. (क्व.) १ जुळणी; मेळ; एकत्र जोडणें. २ जुळण्यास योग्य असणें; बरो- बरी. जोडणें-न. (कों.) नवराबायकोची जोडी. 'अडचणीमुळें विवाहसंबंधानें बध्द अशीं स्त्रीपुरुषांची विसंगत जोडपीं दृष्टीस पडतात.' -टि ४.२.२. जुळें एकदम जन्मलेला मुलगा व मुलगी. ॰फळ-न. (काव्य) जुळें फळ; दुहेरी फळ. ॰फळांचा सांधा-पु. १ (ल.) सततचा संयोग किंवा संबंध; नजीकचा एकत्र भाव (चांगलें वाईट, सुखदुःख इ॰). २ निकटची मैत्री; दाट स्नेह. 'जैसा जोडफळांचा सांधा । तैसा सुखदुःखाचा बांधा ।' ॰बंद -पु. एकास एक चिकटून लांबविलेला कागद

दाते शब्दकोश

निम

वि.अर्धा; निमा. [फा. निमा] ॰कंठीदार-वि. अर्धी कंठी (छातीवरील निमगोल पट्टी) असलेला (अंगरखा) ॰की-स्त्री १ उजळणीचा एक प्रकार. एक पासून शंभरापर्यंत संख्यांच्या निमपटी पाठ करणें. २ निमकें अर्थ (२)पहा. ॰कें- न. १ घोड्याच्या अथवा बैलाच्या ओझ्याचा अर्धाभाग (मुख्यत्वें आयात-निर्गत मालावरील जकातीसंबंधीं व्यवहारांत योजतात). २ अर्ध, अथवा त्याचा कोणताहि गुणाकार. उदा॰ १।।, २।।. [निमा] ॰खाई-स्त्री. शेतकी. व्यापार, उद्योग इ॰ व्यवहारांत अर्धा वांटा, हिस्सा. २ शेताच्या उप्तन्नांतील अर्धा वांटा (जमीन- कौलानें देणार्‍याचा अथवा घेणार्‍याचा) ३ अर्धेल, अर्धुक; अर्धा. निमाई पहा. [निमा + खाई प्रत्यय] ॰गुंडीचा-वि. न लाग- णार्‍या गुंड्या, मुदनी असणारा (अंगरख्याचा गळा). ॰गोणी, निमकगोणी-स्त्री. (जकातबाब) अर्धी गोणी, धान्याचें पोतें. ॰गोरा-वि. १ कांहींशा गोर्‍या वर्णचा; थोडा, अर्धवट गोरा. २ ख्रिश्चन; युरेशियन. 'ब्राह्मणेतरास पहिल्यानें जागा द्याव्या. त्यांतहि पहिल्यानें निमगोर्‍यास किंवा आठ आणे युरेजिनास...' -टि ३.२२. ॰गोल-पु. अर्धगोलाकृति; अर्धवर्तुल स्तंभाकार शरीर, आकार; गोळ्याचा, पंचपात्राचा अर्धा भाग. -वि. अर्धगोलाकृति; अर्धवर्तुलस्तंभाकार. ॰गोल कानस-स्त्री. (सोनारी धंदा) एका बाजूस गोल व एक बाजूस चपटी कानस. ॰चिकणी-वि. सुपारीचा एक प्रकार. ही जाड व चापट असतें; भरडा. ॰जरी-वि. अर्धें कलाबतूचें आणि अर्धें रेशीम, कापूस इ॰ नीं बनविलेलें, तयार केलेलें; अर्धें जरीचें. ॰ताजीम-स्त्री. (अर्धा मान, अर्धा सत्कार) उठून उभें न राहतां केवळ उठल्या- सारखें करून (भेटीस आलेल्याचें) स्वागत अथवा रवानगी करणें. (क्रि॰ देणें; घेणें). याच्या उलट खडी अथवा पुरी ताजीम. [निमी + ताजीम] ॰थल-स्त्री. १ शेताचें अर्धें उत्पन्न; विशेषतः अर्धा वांटा, हिस्सा (जमीन कौलानें घेणार्‍याचा अथवा देणार्‍याचा). २ जमीनीचें उप्तन्न वांटून घेण्याकरितां जमीनी कौलानें देणारा आणि घेणारा यांची भागीदारी; सारखी वांटणी; अर्धेंलीची पद्धत. [निमा + थल] ॰थाना-स्त्री. कापणीनंतर पिकांचें उप्तन्न काढण्याचा प्रकार. सर्व पेंढ्या मोजून त्यांतीन तीन (एक अगदीं भरदार दाण्याची, एक मध्यम व एक अगदीं फोलकट अशा) पेंढ्यांचा साधारण उतारा काढावयाचा व नंतर सर्व पेंढ्यांच्या उतार्‍याचा हिशेब करावयाचा. ॰दस्ती-वि. १ नेहमीच्या रकमेच्या निम्यानें कर, खंड बसविलेली (माल, जमीन). २ निमें धान्य देण्याच्या ठरावानें केलेलें (शेत इ॰). [निमा + दस्त] ॰पट-स्त्री. अर्धा; निमा; अर्धा भाग. [निमा + पट] ॰पितळी- वि. (कु.) थोडी पितळ घातलेलें (पायतण). ॰शाई-स्त्री. १ अर्धें करणें.(क्रि॰ करणें). २ अर्धेली; अर्धा भाग. अर्धेल पहा. ॰सर- कारी-वि. सरकारचा कांहीं ताबा असलेली (शाळा, संस्था इ॰). 'टिळक विद्यापीठ हें कांहीं सरकारी किंवा निमसरकारी विद्यापीठ नव्हे ...' -केले १.३२. ॰सारा-पु. अर्धा सारा. कर. ॰स्तनी-वि. अर्ध्या बाह्यांचा (अंगरखा); जाकीट; कोपरी. -वाडसभा १.११९. [निमी + अस्तनी]निमा-पु. अर्धा भाग; अर्ध. -वि. अर्धा. [फा. नीम] निमाई-स्त्री. निमखाई पहा. निमें-स्त्री. अर्ध; एकद्वितीयांश. 'आयुष्य वर्ष शत त्यांत निमें निजेलें ।' -वामन, स्फुट श्लोक ६९ (नवनीत पृ १४१). -वि. अर्धें. (विशेषतः समासांत उपयोग). [फा. नीम] निमे(मो)निम-वि. अर्धाअर्धा. -क्रिवि. अर्ध्यानें; अर्धेंअर्धें करून; अर्ध्या केलेल्या स्थितींत. निमेंशिमें-क्रिवि. अर्धेंमुर्धें; जवळजवळ अर्धें; सुमारें अर्धें. [निमे] निम्मा, निम्माई, निम्मे, निम्मेनिम, निम्मेशिम्में-निमा, निमाई इ॰ पहा.

दाते शब्दकोश

माया

स्त्री. १ सृष्टि निर्माण करण्यास साधनीभूत अशी ईश्वरशक्ति. 'इंद्रो मायाभिः पुरुरूप ईयते' = इंद्र आपल्या मायेनें अनेक रूपें धारण करतो.' -ऋग्वे ६.४७.१८. -गीर २२१. २ सृष्टिप्रपंच; नामरूपात्मक जगत्; जग हें अमूर्त, नित्य, अद्वि- तीय अशा ब्रह्मतत्त्वापासून उत्पन्न झालें असतां तें द्रव्यमय व भिन्नस्थिति आहे अशी त्याच्या स्वरूपाची ऐंद्रजालिकता. पुराणांत मायेवर चेतनधर्मारोप करून तिला स्त्री व ब्रह्म्याची सहधर्म- चारिणी आणि चुकीनें सृष्टीची रचना व विस्तार मानिलें आहे. ३ कपट; कृत्रिम गारूड; ऐंद्रजाल; मोह घालणारी ईश्वराची शक्ति. 'हे आदिपुरुळाची माया ।' -ज्ञा १.२०३. ४ अवस्तूच्या ठायीं वस्तुत्वबुद्धि; मिथ्या कल्पना; अवस्तूच्या ठिकाणी वस्तुत्वाचा भास; खोटा भ्रम. 'पैल जळ हे माया ।' -ज्ञा १३.१०३०. 'तैसी हे जाण माया ।' -ज्ञा २.१४०. ५ नाशवंत रूप. 'म्हणून विकारी किंवा नाशवंत नामरूपासच माया ही संज्ञा देऊन...' -गार २१७. ६ अविद्या; अज्ञान. 'तैसा विश्वस्वप्रेंसी माया । नीद सांडूनि धनंजया ।' -ज्ञा १८.४०५. ७ स्नेह; प्रेम; ममता. 'तेंवि करिल काय माय मायेतें?' -मोअनुशासन ४.३५. ८ दया; करूणा; अनुकंपा. ९ भांग. [सं.] म्ह॰ माया वेडी गू फेडी = काम कितीहि किळसवाणें, नीच असो, तें करण्यास माया प्रवृत्त करते. (वाप्र.) ॰निवारणें-मायेचें पटल घालविणें, दूर करणें. 'कृपादृष्टीनें पाहसी जया । तयाची माया निवारसी ।' ॰सांख- ळणें-अति प्रेम करणें; अपुर्वाई करणें. मायेक गेल, सेवेक चुकलें-(गो.) माया करायला दुसरीकडे गेलें पण त्यामुळें कर्तव्य चुकल्यें. मायेचें तोंड खालीं-निराळें-माया, ममता ही वरपांगी, दिखाऊ नसून, ती प्रकट होण्यापेक्षां अप्रकट रहा- ण्यांतच विशेष आहे; ममता नम्र असते. मायेंत अटकणें- घोंटाळणें-पडणें-फसणें; मायेनें गुंतणें-गोवणें-गुंडा- ळणें-प्रपंचाच्या फेऱ्यांत सापडणें; प्रवृत्तीमार्ग चालविणें. मायेन मगाळणें-(कु.) द्रव, पाझर फुटणें. सामाशब्द- ॰चक्र-न. माये- प्रमाणें मानलेलें पांचभौतिक जग. 'जय जय मायाचक्रचालका ।' [सं. माया + चक्र] ॰जाल(ळ), मायापाश-नपु. १ जग हें पांचभौतिक असून ब्रह्माहून भिन्न आहे असा विश्वास उत्पन्न करणारें, बुद्धि व इंद्रियें यांवर टाकलेलें मायेंचे जाळें. २ मोह. [सं.] ॰तीत-वि. मायाशक्तीच्या पलीकडे गेलेला (सत्पुरुष, ईश्वर). [सं. माया + अतीत] ॰पटल-पडळ-न. मायेचें घुंगट, आच्छा- दन; जग हें वस्तुतः ब्रह्मच असतांना त्यास भिन्न सत्ता आहे असें भासविणारा मायेनें जगास दिलेला आकार व छटा. [सं. माया + पटल] ॰पुर-न. (ल.) शरीर. ॰ब्रह्म-न. मायावेष्टित ब्रह्म. [सं. माया + ब्रह्म] ॰भान-न. मायेचा भ्रम, झापड. 'निरो- पिलें ब्रह्मज्ञान । जेणें तुटे मायाभान ।' -दा ७.१.६१. [सं.] ॰ममता-स्त्री. दया; माया; स्नेह; प्रीति. ॰मय-वि. मायारूप; मायेनें कल्पित. 'मायामय जग सारें अवघे दोन दिवसांचे वारे ।' [सं.] ॰मयविकार-पुअव. प्रापंचिक बदल; रूपांतरें; घडामोड व स्थित्यंतरें होणारा प्रपंच. 'नव्हते मायामय विकार । तेथें झाला स्फुरणगजर ।' ॰रूपी-वि. १ मायिक; फसवणारें रूप, मुद्रा, आकार असलेला. २ कृत्रिम; बाहेरून सुरेख पण आंतून नीच, वाईट; आंत एक बाहेर एक अशा स्वभावाचा (मनुष्य, सचेतन पदार्थ). [सं.] ॰लांघव-न. जगत् हें ब्रह्म- विस्तार नव्हे तर द्रव्यात्मक सृष्टि आहे अशी मनुष्याची वंचना करण्यांत दिसून येणारें मायेचें कौशल्य; अवस्तूच्या ठिकाणीं वस्तुत्वबुद्धि उत्पन्न करणारें मायेचें कौशल्य. [सं.] मायालु- ळू-वि. १ ममताळू; प्रेमळ. २ (ल.) जादुगार. [सं.] ॰वंत- वि. मायामय. ॰वाद-पु. सर्व बाह्य जग असत्, मायारूप असून या जगाच्या बुडाशीं असणारें ब्रह्मतत्व तेवढेंच सत् आहे असें प्रति- पादणारें मत. मायावादाचा पुरस्कार मुख्यत्वें अद्वैतमतवाद्यांनीं केलेला आहे [सं.] ॰वान्-वंत-वि. मायिक (जगत, सर्व दृश्य विषय.) [सं.] मायावी-वि. १ मांत्रिक; गारुडी. २ मायेचा नियंता (जगांत दिसणाऱ्या त्याच्या अद्भुत कौशला- वरून ईश्वरास म्हणतात). ३ खोटा; वरपंगी; कपटी; लबाड (भाषण, वर्तन, मनुष्य). 'हे अविद्या तरी मायावी ।' -अमृ ६.४३. [सं. माया + विन्(प्रत्यय)] ॰वेष-पु. मायिक देह. 'कीं लेउनि माया- मेषींचें लेणें ।' -ऋ ५. मायाळी-स्त्री. प्रेमळ स्त्री. 'तंव कोणी मायाळी रुदंतीसी ।' -दावि ११५. मायि(यी)क-वि. १ ऐंद्रजालिक; मायेनें रचिलेला. २ जगत् हें वस्ततः अमूर्त आणि ब्रह्मस्वरूप असतां तें पांचभौतिक व सृष्ट आहें असें भासवून वंचना करणारा (जग, जडसृष्टि). ३ खोटा; लटका; असत्य; पोकळ. जसें- मायिक कारभार-धंदा-सुख-दुःख-संपत्ति-दरिद्र-बोलणें- रडणें-करणें. 'आणिक नलगे मायिक पदार्थ ।' -तुगा १०७०. ४ माया करणारा. 'यापरी महीतें मायिक । कोणी नसें मज- लागी ।' -नव २४१६६. [सं. माया + इक (प्रत्यय)] मायि- कवृत्ति-स्त्री. वंचितवृत्ति, स्थिति; जडाच्या ठिकाणीं भासणारें सत्यत्व, सृष्टिभिन्नता, ब्रह्म व माया यांच्या ऐक्यत्वाविषयीं भ्रम. 'मायिकवृत्तींचा झणी धरिसी संग । इंद्रियाचा पांग सांडी रया ।' [सं.] मायेक-वि. मायावी, खोटें. -शर. [मायिक] मायेचा अवतार, मायाअवतार-पु. परमेश्वराचा मायिक अवतार (ईश्वराचे सर्व अवतार. कारण आत्मज्ञान लसलेल्या व मूढ अशा माणसात मात्र हे अवतार खरें भासतात). मायेचा गोंधळ- पु. प्रपंच; संसार. मायेचा पदर-पु. प्रेमाचें बंधन बाळगणारा मनुष्य (पुत्र, भाऊ, बांधव, आई, बाप इ॰). मायेचा पदार्थ- मनुष्य-माणूस-पु. स्नेह, प्रीति असलेला मनुष्य.

दाते शब्दकोश